Thursday, 30 October 2025

जगन्नाथ गोशाळेचा गोमाता पुजनाचा अनोखा उपक्रम

जगन्नाथ गोशाळेचा गोमाता पुजनाचा अनोखा उपक्रम

मुरुम,दि.३० :

मुरूम येथे श्री जगन्नाथ गोशाळेत उमरगा तालुक्यातील मौजे औराद येथील श्री.यादव विश्वंभर सूर्यवंशी यांनी आपली देशी गोवंश गोमाता श्री जगन्नाथ गोशाळेला देणगी म्हणून आणून दिली,या गोमातेचे मुरूम येथे आगमन होताच हलगी या गजरात श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक ते श्री जगन्नाथ गोशाळा पर्यंत ढोल ,हलगी च्या गजरात या गोमातेचे संपूर्ण मुरूम मधून मिरवणूक काढत गोमातेचे स्वागत,पूजन व औक्षण करण्यात आले.

 सर्वप्रथम श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक  येथे रोटरी क्लब मुरूम च्यावतीने गोमातेचे पूजन करण्यात आले,यावेळी रोटरीचे अध्यक्ष अप्पासाहेब सूर्यवंशी,मल्लिनाथ बडोले,डॉ नितीन डागा,डॉ.सुधीर  पंचगल्ले,सुनील राठोड,संतोष कांबळे,वाकडे सर,कल्लाप्पा पाटील,भूषण पाताळे,आदी उपस्थितीत होते,तसेच यावेळी श्री जगन्नाथ गोशाळाला गोमाता देणगी म्हणून देणारे श्री यादव विश्वंभर सूर्यवंशी यांचेही स्वागत करण्यात आले,लुटे किराणा येथे गोमाता चे आगमन होताच लुटे किराणा च्यावतीने गोमातेचे पूजन करण्यात आले,महात्मा बसवेश्वर चौक येथे अंबर हार्डवेअरच्या वतीने मंथन अंबर यांनी गोमातेचे पूजन केले तसेच सिद्याप्पा मठ येते साई किरण,मेडिकल व मुदकन्ना परिवाराच्या वतीने  गोमातेचे पूजन औक्षण करण्यात आले.शेवटी श्री जगन्नाथ गोशाळा येथे सौ क्रांती सूर्यवंशी यांच्या हस्ते गोमातेचे पूजन करण्यात आले या वेळी श्री जगन्नाथ गोशाळा चे निर्मलकुमार लिमये, सूरज राजपूत ,रौनक शर्मा, प्रकाश सूर्यवंशी हजर होते.

Labels:

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त नळदुर्ग शहर भाजपच्या वतीने विविध ठिकाणी निराधार बालकांना, रुग्णांना ब्लॅकेट वाटप करत अन्नदान करुन साजरा

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या  वाढदिवसा निमित्त नळदुर्ग शहर भाजपच्या वतीने विविध ठिकाणी  निराधार बालकांना, रुग्णांना ब्लॅकेट वाटप करत अन्नदान करुन साजरा

नळदुर्ग, दि.३० : 

तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय आमदार श्री राणाजगजितसिंह पाटील यांच्या ५५ वा वाढदिवसाचे औचित्य साधून नळदुर्ग शहर भाजपच्या वतीने विविध ठिकाणी खाऊ वाटप, गरजुना, ब्लॅकेट,निराधार विद्यार्थ्यांना भोजन देवुन वाढदिवस साजरा करण्यात आला.
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या  वाढदिवसा निमित्त गुरुवार दि.३० आक्टोंबर रोजी नळदुर्ग शहरातील उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना सफरचंद, केळी, बिस्कीट आणि ब्लॅकेट वाटप करण्यात आले.रणे प्लाटिंग येथिल पालावरच्या शाळेत चटाई, फळे,खाऊ,व ब्लॅकेट वाटप करण्यात आले. त्याचबरोबर "आपलं घर" प्रकल्पातील अनाथ व निराधार बालकांना खाऊ देत सर्वाना भोजन देवुन ब्लॅकेट वाटप करण्यात आले.
याप्रसंगी भाजपचे नेते सुशांत भूमकर, नळदुर्ग शहराध्यक्ष बसवराज धरणे,  नय्यर जागीरदार, शहर उपाध्यक्ष किशोर नळदुर्गकर, माजी अध्यक्ष धिमाजी घुगे, पांडू पुदाले, माजी नगरसेवक विनायक अहंकारी, सुधीर हजारे, श्रमिक पोतदार, बबन चौधरी, सुदर्शन पुराणिक,पद्माकर घोडके, जिलानी कुरेशी, अनिल ऊर्फ पप्पू पाटील, संजय जाधव, गणेश  मोरडे, सागर हजारे, रियाज शेख, कल्पना गायकवाड, संदीप गायकवाड, विश्वास रणे, मुद्दसर शेख, सलीम बागवान, मुजू शेख, विरेंद्र बेडगे,आरिफ जहागिरदार शोभित बचाटे. आदीसह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Labels:

केसरजवळगा येथे 31 रोजी राज्यस्तरीय दांडपट्टा अजिंक्यपद क्रीडा स्पर्धासाठी निवड चाचणी

केसरजवळगा येथे 31 रोजी राज्यस्तरीय दांडपट्टा अजिंक्यपद क्रीडा स्पर्धासाठी  निवड चाचणी ; जिल्ह्यातील इच्छुक स्पर्धकांना आवाहन

 मुरूम,दि.३०:

  सातारा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय दांडपट्टा अजिंक्यपद क्रीडा स्पर्धा 2025 साठी दि.31 ऑक्टोंबर रोजी केसर जवळगा (ता. उमरगा)  येथील  पीएम श्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, केसर जवळगा  मैदानावर  निवड चाचणी घेण्यात येणार आहे.

या निवड चाचणीच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातून राज्यस्तरीय पातळीवर खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. निवड झालेल्या खेळाडूंच्या स्पर्धेचे आयोजन  देवगिरी लॉन, वाई वाठार रोड, जोशी विहीर, ता. वाई, जि. सातारा येथे दिनांक 8 व 9 नोव्हेंबर 2025 रोजी करण्यात आले आहे. या निवड चाचणीचे आयोजन धाराशिव जिल्हा दांडपट्टा असोसिएशनचच्या वतीने करण्यात येणार आहे. दांडपट्टा स्पर्धेसाठी, जिल्ह्यातील इच्छुक खेळाडूंनी दांडपट्टा क्रीडाप्रकारावरील आपले कौशल्य सिद्ध करण्यासाठी या निवड चाचणीत सहभागी व्हावे, असे आवाहन दांडपट्टा धाराशिव जिल्हाअध्यक्ष डॉ प्रीती चिलोंबा व पी एम श्री जिल्हा परिषद कें प्रा शाळेचे मु अ बालाजी भोसले , सुनिल  राठोड व प्रशिक्षक महंमद रफी शेख यांच्या वतीने करण्यात आले आहे.सकाळी 8:30 ते 11:30 या वेळेत इच्छुक स्पर्धकांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे

Labels:

विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडूनपालकमंत्र्यांची रस्तेकामांना स्थगित ; मुख्यमंत्र्‍यांकडे मागितली दाद, लवकरच कामे सुरू होणारः भाजप जिल्हाध्यक्ष दत्तभाऊ कुलकर्णी

विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडून
पालकमंत्र्यांची रस्तेकामांना स्थगिती

मुख्यमंत्र्‍यांकडे मागितली दाद, लवकरच कामे सुरू होणारः भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी

धाराशिव,दि.३०:
जिल्ह्यातील अपप्रवृत्तीच्या विरोधकांनी दिलेल्या चुकीच्या माहितीला गृहीत धरून पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री श्री. एकनाथ शिंदे सांहेबांकरवी धाराशिव शहरातील ५९ रस्ते आणि नालीच्या कामावर स्थगिती आणली आहे. ही बाब अत्यंत खेदजनक आहे. याबाबत आम्ही मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागितली आहे. यावर लवकरच तोडगा निघेल आणि कामे सुरू होतील, असा विश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे. 

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नांमुळेच नगरोत्थान योजनेतून या कामासाठी ११७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

धाराशिव शहरातील ५९ रस्ते आणि नाल्यांची कामे करण्यासाठी मित्रचे उपाध्यक्ष, आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून ११७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करवून घेतला. हे काम सुरू झाले तर आपली अकार्यक्षमता लोकांसमोर येईल, या भीतीने काही अपप्रवृत्तीच्या राजकीय विरोधकांनी या कोमात खोडा घातला. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या पत्राचा आधार घेऊन उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेबांनी दूरध्वनीद्वारे या कामांना स्थगिती दिली. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे, अशी भावना भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी व्यक्त केली. 

धाराशिव शहरातील रस्त्यांची गेल्या अनेकत महिन्यांपासून दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांचा हा त्रास कमी करण्यासाठी आमदार राणाजगजतिसिंह पाटील साहेब यांनी प्रयत्न केले. त्यामुळे नगरोत्थान योजनेतून ५९ रस्ते आणि नालींच्या कामासाठी ११७ कोटी रुपये मंजूर झाले. निधी मंजूर झाला, आता कामे सुरू झाली तर आपली अकार्यक्षमता जनतेसमोर येईल, या भीतीने जिल्ह्यातील अपप्रवृत्तीच्या विरोधकांनी वेगवेगळ्या पद्धतीने या कामात आडकाठी आणण्याचे प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी विविध हातखंडे वापरत हा विषय अनेक महिने प्रलंबित ठेवला. 

मात्र आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी रस्त्यांच्या कामाचा विषय लावून धरला आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आले. त्यानुसार धाराशिव नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांनी १६ ऑक्टोबर २०२५ रोजी कार्यारंभ आदेश जारी केले होते. २८ ऑक्टोबर २०२५ रोजी या कामांना प्रत्यक्ष प्रारंभ देखील झाला. मात्र, त्याच दिवशी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या पत्राच्या आधारावर उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दूरध्वनीद्वारे या कामांना स्थगिती दिली. ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे, असेही दत्ता कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

धाराशिव शहरात जवळपास सर्वच रस्त्यांची अक्षरशः चाळणी झाली आहे. या खराब रस्त्यांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील हजारो नागरिकांना मणक्याचे आजार झाले आहेत. अबालवृद्ध व माता भगिनींना प्रवास करणे असह्य झाले आहे. अपघातांचे प्रमाण वाढले आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे.

जिल्ह्याचे पालकत्व ज्यांच्याकडे आहे त्या पालकमंत्र्यांनीच राजकीय अपप्रवृत्तींनी या कामाच खोडा घालण्यासाठी जाणीवपूर्वक चुकीची माहिती दिली. ती माहिती गृहीत धरून शहराच्या विकासकामांवर स्थगिती आणणे हे अत्यंत खेदजनक आहे. धाराशिव शहरातील जनतेच्या हिताचा विचार करून नगरोत्थान योजनेतील रस्ते व नाली कामांवरील स्थगिती त्वरित उठवण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडे दाद मागितली आहे. यावर लवकर तोडगा निघेल आणि कामे सुरू होतील, असा विश्वास दत्ता कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे.

Labels:

✴️हमारा यारा 🧡 : नळदुर्ग शहरामध्ये हिंदी भाषा रुजवणारे व्यक्तिमत्व चंद्रकांत दस निवडणुकीच्या रिंगणात

✴️हमारा यारा 🧡 :नळदुर्ग शहरांमध्ये हिंदी भाषा रुजवणारे व्यक्तिमत्व चंद्रकांत दस निवडणुकीच्या रिंगणात

नळदुर्ग ,दि.३०: शिवाजी नाईक 

 मागील ३५ वर्षापासून नळदुर्ग शहरातील राजकारणाचा बारीक- सारीक अभ्यास करत समाज कार्य करणारे नाव म्हणजे चंद्रकांत नरसू दस उर्फ नळदुर्ग करांचा लाडका 'यारा भाई'. यारा भाई हे  अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या प्रभाग दोन मधून नळदुर्ग नगरपालिकेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्या दृष्टीने याराभाई यांनी प्रभाग दोन पिंजून काढला आहे. यारा भाई हे कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार हे गुलदस्त्यात असले तरी त्यांनी निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे.


नळदुर्ग शहरात बॉलीवूड नंतर जर कोणी हिंदी भाषा रुजवली व वाढवली असेल तर ते आहेत यारा भाई. आपले बोलतानाची विशिष्ट लकब यामुळे यारा भाई सगळ्यांना परिचित आहेत.
यारा भाई हे तुळजापूर तालुक्याचे माजी आमदार कै. नरेंद्रजी बोरगावकर साहेब यांचे कट्टर समर्थक आहेत.
माजी नगराध्यक्ष कै. उदयभाऊ जगदाळे यांचा राजकीय प्रवास जवळून पाहणारे व कै. उदय जगदाळे यांच्या यशस्वी राजकीय वाटेवर चालवण्यासाठी यारा भाई सज्ज झाले आहेत. राष्ट्रवादीचे महबूबभाई शेख व अजित अण्णा झुनैदी यांचे जीव की प्राण असलेले यारा भाई राजकीय पटलावर आपले नशीब आजमावणार आहेत. 

 शहरातील हिंदू धर्मीयांसह मुस्लिम धर्मियांशीही याराभाई यांची घनिष्ठ मैत्री आहे. याचा फायदा यारा भाई यांना नक्कीच होणार आहे.

👉🧡यारा भाई यांचा नळदुर्ग शहरासाठी व शहरवासीयांसाठी मानस-
▶️शहरात हिंदी भाषा अध्यसन केंद्र उभारणे.
▶️ शहराचा पाणी प्रश्न सोडवणे. 
▶️ बेळगाव शहराच्या धर्तीवर नळदुर्ग शहरात अंडरग्राउंड ड्रेनेज
▶️नागरिकांचे प्रश्न जागेवर सोडवणे
▶️तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे. 
▶️ शहरालगत औद्योगिक वसाहत उभारणे.
▶️ आधुनिक युगातील गरजेनुसार युरोपीय पद्धतीने नळदुर्गचा विकास करणे.

Labels:

Wednesday, 29 October 2025

नोकरी महोत्सव आणि स्वयंरोजगार मेळाव्यास उस्फुर्त प्रतिसाद; आयोजक शंतनु पायाळ यांच्या कार्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले कौतुक

नोकरी महोत्सब आणि स्वयंरोजगार मेळाव्यास उस्फुर्त प्रतिसाद; आयोजक शंतनु पायाळ यांच्या कार्याचे आ. राणादादांनी केले कौतुक

धाराशिव,दि.२९:
 
दि.२८ ऑक्टोबर  रोजी भव्य नोकरी महोत्सव आणि स्वयंरोजगार  मेळावा पुष्पक मंगल कार्यालय, येथे संपन्न झाला. सदरील मेळाव्याचे उद्घाटन मित्रा संस्थेचे उपाध्यक्ष , आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते झाले.

 पुष्पक मंगल कार्यालय, धाराशिव येथे भव्य नोकरी महोत्सव व स्वयंरोजगार मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या महोत्सवाचा शुभारंभ करून उपस्थितांशी संवाद साधला. या मेळाव्यास 2200 हून अधिक इच्छुक उमेदवारांची उपस्थिती होती. त्यापैकी 478 उमेदवारांना ऑफर लेटर मिळाले व 503 उमेदवारांना शॉर्टलिस्ट करून अंतिम मुलाखतीसाठी कंपनीत बोलवले आहे. तसेच ऑनलाईन नोंदणी केलेल्या  उमेदवारांना येत्या वर्षभर त्यांच्या पात्रतेनुसार रोजगाराच्या संधीबाबत माहिती मिळणार आहे. 

या महोत्सवात 52 हून अधिक नामांकित कंपन्यांनी ज्यात एच.सी.एल, टाटा प्रीव, बजाज ऑटो, एक्सीस बँक, ईत्यादी नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला व उपस्थित उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. या महोत्सवाचे आयोजन भाजपाचे युवा नेते शंतनू पायाळ यांनी केले होते.

स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणार्‍या उमेदवारांसाठी विविध शासकीय महामंडळांच्या योजनांची माहिती आणि मार्गदर्शन देखील या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले होते.

जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पुराच्या अभूतपूर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, तरुण-तरुणींच्या हाताला काम मिळावे, रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात या हेतूने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असे आयोजक शंतनू पायाळ यांनी सांगितले. येत्या काळातही अशा प्रकारचे नोकरी व स्वयंरोजगार महोत्सव आयोजित करण्यात येणार आहेत.

यावेळी माजी खा. श्री.सुधाकरराव शृंगारे, जिल्हाध्यक्ष श्री.दत्ताभाऊ कुलकर्णी, श्री.नितीन काळे, श्री.शंतनू पायाळ, श्री.विकास बारकूल, श्री.खंडेराव चौरे, श्री.अमित शिंदे, श्री.सुनील काकडे, श्री.अभय इंगळे, श्री.राहुल काकडे, सौ.अस्मिताताई कांबळे, श्री.प्रीतीताई कदम, श्रीमती उषाताई येरकळ, कु.विद्या माने, श्री.नीलकंठ पाटील, श्री.संदीप इंगळे, श्री. सनी पवार, श्री. नितीन शेरखाने, श्री.सागर दंडनाईक, श्री.मदन बारकूल,  श्री.कुणाल निंबाळकर, श्री.पुष्पकांत माळाले, श्री.गोपाळ कदम यांच्यासह तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विक्रमसिंह माने, प्रा.चंद्रजीत जाधव यांच्यासह जिल्हाभरातून आलेले तरुण, तरुणी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Labels:

♦️हेच आमचा नळदुर्ग नगरपालिका निवडणुकीतील उमेदवार राहणार ; मतदार आक्रमक , शहरवासीयासह राजकीय पक्षांचे वेधले लक्ष♦️

♦️हेच आमचा  नळदुर्ग नगरपालिका निवडणुकीतील उमेदवार राहणार ;  मतदार आक्रमक , शहरवासीयासह राजकीय पक्षांचे वेधले लक्ष♦️ 

नळदुर्ग,दि.२९: शिवाजी नाईक 

कसलाही राजकीय वारसा नाही, लोकांच्या मदतीसाठी कधीही अहोरात्र धावुन जाणारे, आपल्या कार्य कृतत्वाने लोकप्रियतेचे शिखर गाठणारे श्री रवी महाराज राठोड यांच्याकडे मोठ्या अपेक्षेने नागरिक आपल्या समस्या, अडचणी घेऊन येतात. राठोड  हे वैयक्तिक कामे बाजूला ठेवून लोकांच्या समस्या अडी आडचणी सोडविण्यास प्रथम प्राधान्य देतात.त्यामुळे रवी महाराज राठोड हेच आमचा  नळदुर्ग नगरपालिका निवडणुकीतील उमेदवार राहणार अशी जोरदार चर्चा दुर्गानगर -वसंतनगर प्रभागात होत आहे.

 सर्वसामान्य कुटुंबातील एका सामान्य युवकाने सामाजिक बांधिलकी जोपासत युवकांच्या सहकार्याने अनेक सामाजिक, शैक्षणिक व लोकहिताचे कार्य करुन सर्वाना आपला हक्काचा माणुस म्हणून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या नळदुर्ग (वसंतनगर ) शहरातील श्री रवी महाराज राठोड  हेच आपल्याला न्याय देतील, ख-या अर्थाने लोकांचे वर्षानुवर्ष रखडत पडलेले विविध प्रश्न, समस्या सोडवत विकासाला चालना मिळेल 
अशी पक्की धारणा नागरिकातुन व्यक्त केली जात आहे. या भागातुन निवडून गेलेले लोकप्रतिनिधी त्यांच्याच पक्षाच्या पदाधिका-यांचे साधे फोन उचलत नाही.तिथे नागरिकांचे ग-हाणे  कोणाला सांगायचे  असे  प्रतिप्रश्न नागरिक विचारत आहेत.

सध्या नळदुर्ग नगरपालिका निवडणुकीचे जोरदार वारे वाहत आहेत.वसंतनगर दुर्गानगर प्रभाग क्रमांक ०१ मध्ये २ हजार २४ एवढी मतदारांची संख्या आहे. येथील आरक्षण अ ) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला , ब)  सर्वसाधारण असे आहे. काळ बदलला तसा पुर्वीचा मतदार आता बदलत असल्याचे दिसत आहे. सुज्ञ झालेला मतदार आक्रमक होत आपला प्रतिनिधी निवडण्यासाठी वसंतनगर, दुर्गानगर प्रभागात  पुढाकार घेत असल्याच्या चर्चेने राजकीय पक्षांसह शहरवासियांचे लक्ष वेधले आहे.

👉 रवी महाराज राठोड 

दरम्यान आपण लोकांच्या आग्रहास्तव होणारी नगरपालिका निवडणुक लढविणार आहे . आरक्षण सोडत झाल्यापासून कांही राजकीय पक्षांचे पदाधिकारी आपल्या पक्षाच्या उमेदवारीवर निवडणुक लढविण्यासाठी संपर्क करत आहेत. याविषयीचा निर्णय प्रभागातील मतदार ठरवणार आहेत.जे निर्णय घेतील ते आपणास मान्य आहे.  असे "तुळजापूर लाईव्ह" शी बोलताना रवी महाराज राठोड यांनी सांगितले.

Labels:

Tuesday, 28 October 2025

गणेश रंगनाथ गायकवाड अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या प्रभाग २ मधुन भाजपाकडून ईच्छुक

गणेश रंगनाथ  गायकवाड  अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या प्रभाग २ मधुन भाजपाकडून ईच्छुक 

नळदुर्ग,दि.२८:

मागील चार दशकापासून भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ शिलेदार रंगनाथ गायकवाड (बाबू टेलर) यांचे चिरंजीव गणेश रंगनाथ  गायकवाड हे अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या प्रभाग दोन मधून भाजपाकडून नळदुर्ग नगरपालिकेची होऊ घातलेली निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. 

  भाजपा मंडळ अध्यक्ष बसवराज आप्पा धरणे यांचे कट्टर समर्थक असलेले गणेश गायकवाड हे प्रभाग दोन मध्ये सक्रिय आहेत. बाबू टेलर यांच्या जनमानसातील प्रतिमेचा वापर करून त्यांचा सामाजिक वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी इंदिरानगर येथील नागरिकांची सेवा करण्यासाठी मला एक संधी द्या अशी भावनिक हाक गणेश गायकवाड यांनी इंदिरानगर येथील मतदारांना दिली आहे. अठरापगड जातींची मोट बांधून इंदिरानगर भागातील पायाभूत सुविधासह तरुणांसाठी ठोस काम करण्याचा मानस गणेश गायकवाड यांनी व्यक्त केला आहे. केंद्रात नरेंद्र मोदीजी व राज्यात देवाभाऊ यांच्या विकास कार्याचा लाभ होईल. 

 वडील बाबू टेलर यांच्या एकनिष्ठतेचा भारतीय जनता पार्टी कडून प्राधान्याने विचार होऊन मला भाजपाकडून तिकीट मिळेल व मी विजयी होईन याची खात्री असल्याचे गणेश गायकवाड यांनी आवर्जून सांगितले.

Labels:

मुरूम हद्दीतील तुगाव फाट्यावरील वेश्या व्यवसाय अड्ड्यावर कारवाईदोन बांगलादेशी तरुणी ताब्यात तर तीन युवकाविरुद्ध गुन्हा

मुरूम हद्दीतील तुगाव फाट्यावरील वेश्या व्यवसाय अड्ड्यावर कारवाई ;
दोन बांगलादेशी तरुणी ताब्यात तर तीन युवकाविरुद्ध गुन्हा ,

मुरूम,दि.२८

धाराशिव येथील अनैतिक मानवी वाहतूक 
प्रतिबंधक विभागाने मुरूम पोलिस ठाणे हद्दीतील तुगाव फाट्यावर उघडपणे सुरू असलेल्या  वेश्या व्यवसायावर धाडसी  कारवाई केली आहे. या कारवाईत दोन बांगला देशी तरुणींना ताब्यात घेण्यात आले असून तीन युवकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आले आहे.

  दरम्यान जिल्हास्तरावरील पथकाने  कारवाई केल्याने स्थानिक मुरूम पोलिस अधिकाऱ्याच्या  कार्यपद्धतीवर शंका व्यक्त होत असून या ठाण्याच्या प्रमुख अधिकाऱ्यामुळे  मुरूम हद्दीतील कायदा आणि सुव्यवस्था कितपत सुरक्षित आहे हे यावरून स्पष्टपणे दिसते


राष्ट्रीय महामार्ग सोलापूर ते उमरगा रस्त्यावरील मुरूम पोलिस ठाणे हद्दीत येत असलेल्या तुगाव मोडवरील एका धाब्यामध्ये गेली अनेक महिन्यापासून गैर मार्गाने वेश्या व्यवसाय सुरू होता.याबाबत  गुप्त माहिती प्राप्त झाल्याने धाराशिव येथील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने दि 27 रोजी सांयकाळी 4 च्या सुमारास  सदरील धाब्यावर  धाडसी कारवाई केली रात्रभर चौकशीची प्रक्रिया पार पडली त्यानंतर झालेल्या कारवाईत देहविक्री करणाऱ्या दोन बांगलादेशी तरुणी ताब्यात घेण्यात आले  तर गैर मार्गाने वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या तीन युवकांविरुद्ध मुरूम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .याप्रकरणी धाराशिवचे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक  विभागाचे  पोलीस अधिकारी आर एस गायकवाड पुढील तपास करत आहेत दरम्यान बऱ्याच महिन्यापासून या भागात गैर मार्गाने वेश्या व्यवसाय सुरू होता. याबद्दल  मुरूम पोलिस ठाणे अधिकाऱ्याला किंचितही माहिती नसेल असे नसेलच. असले घाणेरडे प्रकार खुलेआम सुरू असताना याविरुद्ध कारवाई करण्याऐवजी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याचा कृत्य मुरूम पोलिस  यांनी का? करत राहिले याबद्दल   शंका उपस्थित होत आहे. अखेर जिल्ह्याच्या पथकानेच कारवाई करून पोलिस कर्तव्याची  जाणीव करून दिली आहे.

Labels:

नळदुर्ग: नगराध्यक्ष, नगरसेवक पदाची निवडणूक लढविण्यासाठी अनेक इच्छुक सरसावले ; नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत कायदे तज्ञाची भर

नळदुर्ग: नगराध्यक्ष, नगरसेवक पदाची निवडणूक लढविण्यासाठी   अनेक इच्छुक
 सरसावले ; नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत कायदे तज्ञाची भर

नळदुर्ग,दि.२७: शिवाजी नाईक 
 
नळदुर्ग नगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडीना वेग आला आहे.भाजप  स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याने  कोणत्याही पक्षाने युती  करण्याबाबत संकेत दिले नाही . त्यामुळे  राजकीय पक्षाकडुन उमेदवारी मिळविण्यासाठी नगराध्यक्ष, नगरसेवकपदाची निवडणूक लढविण्यासाठी  इच्छुक अनेकजण पुढे सरसावल्याची  चर्चा रंगली आहे.

आगामी होणाऱ्या निवडणुकीसाठी शहरात काही पक्षाचे संपर्क कार्यालय उघडण्यात आले आहे. यंदाची होवु घातलेली निवडणुक अत्यंत चुरशीची व अटीतटीची होणार असे चित्र निवडणुक जाहिर होण्यापूर्वीच निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

नळदुर्ग  नगरपालिकेचे नगराध्यक्षपद
खुल्या प्रवर्गाला सुटल्याने व प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झाल्याने निवडणुकीतील मोर्चेबांधणीला प्रचंड वेग आला आहे. मूळ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बहुतांश कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपाशी हातमिळवणी केल्याने यंदाची निवडणूकीची रणधुमाळी गाजणार असे नागरिकातुन बोलले जात आहे.

नगराध्यक्ष पदासाठी भाजपचे शहराध्यक्ष बसवराज धरणे, माजी नगराध्यक्ष नय्यर जहागिरदार तर काँग्रेस पक्षाकडून अँड अरविंद बेडगे, माजी नगराध्यक्ष शहाबाज काझी यांच्या उमेदवारीबाबत या दिग्गजांचे
नावे आघाडीवर असल्याची जोरदार चर्चा होत आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य अशोक जगदाळे हे नगराध्यक्षपदासाठी योग्य व सक्षम उमेदवार देणार की ऐनवेळी निवडणूक रिंगणात उतरणार याचा निर्णय अद्यापही जाहिर केले नाही.
त्याचबरोबर  उद्धवसेनेकडून सरदारसिंग ठाकूर तर शिंदे सेनेकडून ज्ञानेश्वर घोडके, निखिल घोडके यांची नावे नगराध्यक्षांच्या उमेदवारीकरिता  सध्यातरी चर्चेत आहेत. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
----------
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अँड धिरज पाटील यांचे निकटवर्तीय म्हणून अँड  अरविंद बेडगे हे ओळखले जाते. त्यांनी  कायदयाचे उच्च शिक्षण घेतले आहे. ते उच्च शिक्षित व प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून त्यांचे नावलौकिक आहे.नळदुर्ग शहर व परिसरात वकिली व्यवसायाच्या माध्यमातून त्यांचा मोठा जनसंपर्क आहे.त्याचबरोबर तुळजापूर तालुका बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी त्यांची बिनविरोध निवड झाली होती.
 पहिल्यांदाच नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसकडून ईच्छुक उमेदवार म्हणून त्यांच्या  नाव पुढे आले आहे. सन २०११ मध्ये न.प. च्या निवडणुकीत त्यांच्या सुविधा पत्नी सौ अर्पणाताई अरविंद बेडगे ह्या  काँग्रेसच्या उमेदवारीवर प्रभाग क्रमांक ३ मधुन नगरसेविका म्हणून सर्वाधिक मतांनी निवडून आल्या होत्या.त्यानंतर सन २०१३ मध्ये त्यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाली. त्यांनी शहर विकासासाठी सातत्याने प्रयत्न केल्याचे सर्वश्रुत आहे.
--------
शहाबाज काझी हे  वयाच्या एकविसाव्या वर्षी १९९२  ते आजपर्यंत नगरसेवक आहेत.२०१४ साली नगराध्यक्ष झाले , २०१२ ते २०१४  दक्षिण सोलापूरचा निरीक्षक, १९९७ ते२००० या कालावधीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अल्पसंख्याक सेल प्रदेश चिटणीस, २०१८ पासुन उपाध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमेटी, सहसचिव बालाघाट महाविद्यालय, नगराध्यक्ष कालावधीत शहराचा विकास साधण्याचा प्रयत्न केला.त्यानी सन २००५ ते २०१५ मध्ये संजय गांधी निराधार योजनांतर्गत  २ हजार ६०० लाभार्थ्यांना लाभ मिळवुन दिला.


Labels:

३६ वर्षांनंतर श्री व्यंकटेश विद्यालय, वलांडीस्नेह मेळावा व गुरूजनांचा गौरव सोहळा

३६ वर्षांनंतर श्री व्यंकटेश विद्यालय, वलांडी
स्नेह मेळावा व गुरूजनांचा गौरव सोहळा

मुरुम,दि.२८ :

 श्री व्यंकटेश विद्यालय वलांडी ता. देवणी जि. लातूर येथील ई.स. १९८८ ८९ च्या इयत्ता दहावीच्या वर्ग मित्रांचा स्नेह मेळावा व गुरु
गौरव समारंभ संपा. तब्बल ३६ वर्षांनी कुमारवयातील आठवणींना उजाळा देत वयाची पन्नाशी ओलांडल्या नंतरच्या प्रवासातील अनेक घटनांना व गुरुजनांनी दिलेल्या ज्ञानाच्या शिदोरी वरच प्रवास सर्व वर्गमित्रांनी गुरुजनांसमोर कथन केला. 

सर्व प्रथम दीपप्रज्वलन करून विद्यालयाचे स्वर्गीय मुख्याध्यापक गिरीधरराव पाटील, इतिहास विषय शिक्षक स्व. शिंबरराव पाटील,शाळेचे सचिव स्व. रामचंद्रराव पाटील तळेगावकर, लिपीक स्व. प्रल्हाद कटके यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. तसेच या जून्या व हाडांच्या शिक्षकांच्या निधनाने व आठवणीने अनेक विद्यार्थी गहीवरले. हलका धुकट सकाळचा वारा. श्री व्यंकटेश विद्यालय' हे फलक तसंच थोडं झिजलेलं, पण अभिमानानं उभं. या शाळेच्या गेटसमोर एकेक गाडी थांबते. आतून ओळखीचे चेहरे उतरतात. कुणाचं केस पांढरं झालंय. कुणी चष्मा लावलेला, पण
डोळ्यातलं चमकणारं बालपण अजून जिवंत. ३६ वर्षांनी पुन्हा एकदा एकत्र आलेले तब्बल ६० माजी विद्यार्थी हसरे चेहरे, हलकीशी ओढ, आणि मनात एकच प्रश्न किती बदललो रे आपण ?
असाच प्रश्न फक्त नजरेने एकमेकांना विचारत होते..हातात कॅमेरे, मोबाईल पण क्षण टिपण्या आदीच अनेकांच्या डोळ्यांत पाणी. जुन्या बाकाकडे पहताना कोणी हलकंसं हसत, कोणी फोटो काढत, कुणाचातरी मन भुतकाळात हरवत त्या निरागस दिवसाच्या गंधात गाणी, विनोद आणि आठवणी चा पाऊस. पण तरीही काही नजरा एकमेकांना शोधतात. माजी विद्यार्थी यांचे अनुभव कथन. हशा आणि आसवं सगळ
जणू एका सिनेमासारखं घडतंय. सर्व जणाचे एकत्र स्नेहभोजन... नजरेत आओळख, मनात भावना, आणि ओठावर एकच शब्द पुन्हा भेटू. विद्यार्थी स्नेह मेळावा हा माजी विद्यार्थी साठी आयुष्यभरासाठी आठवणीचा नाही तर एक भावनिक प्रेम. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे अध्यक्ष श्री व्यंकटराव पाटील, तत्कालीन शिक्षक , संस्था सहसचिव तथा सेवानिवृत गटशिक्षणाधिकारी नागोराव भोसले मुख्याध्यापक मांजीबाळे एम. बी. गणिताचे शिक्षक खंडेराव बिरगे, शिवाजी भोसले, कडव्या शिस्तीचे शाळेचे कडक पर्यवेक्षक शिवाजी ऊमाटे, दिलीप कुलकर्णी, डी. डी. पाटील गुरुजी आदीची प्रमुख उपस्थीती होती. स्नेह मेळावाचे आयोजन श्री शिवराज पंचगल्ले, अजिज सौदागर, जलील बौडीवाले,चंद्रकांत माने यांनी पुढाकार घेतला. व इतर सर्व वर्गमित्रांच्या सहकायाने गुरुजनाचा गुण गौरव व स्नेहमेळावा पार पाडले.

Labels:

Monday, 27 October 2025

भव्य लाठी-काठी प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन शस्त्रपूजेनं संपन्न

भव्य लाठी-काठी प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन शस्त्रपूजेनं संपन्न

मुरुम,दि.२७:

 पी.एम.श्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, केसरजवळगा आणि लाठी असोसिएशन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य लाठी-काठी प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन आज शस्त्रपूजा करून मोठ्या उत्साहात पार पडले.

या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून राज्यस्तरीय हॉलीबॉलपटू मुनीर शेख सर उपस्थित होते. तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष  संदीप पाटील, उपाध्यक्ष  अजिज शेख, माजी सरपंच अमोल पटवारी, उपसरपंच जयपालसिंग राजपूत, सहशिक्षक सुनिल राठोड, बोडरे सहदेव, युसूफ गवंडी , श्रीशैल भुरे, कणमुसे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस शस्त्रांची व साहित्याची पूजा करून पारंपरिक पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. यानंतर मुनीर शेख सर यांनी विद्यार्थ्यांना व्यायामाचे व आत्मसंरक्षणाचे महत्त्व पटवून देत पारंपरिक भारतीय कलेचा गौरव सांगितला.दरम्यान उपसरपंच जयंपालसिंग राजपूत यांनी शाळेतील हुशार, गरजवंत वहोतकरू असलेल्या आशा 10 विद्यार्थ्यांची फिस देऊन सहकार्य केल्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचे आभार व कौतुक होत आहे.
    
 या शिबिरात लाठी-काठी, भाला, दांडपट्टा, कराटे, सेल्फ डिफेन्स, लाल तलवार यांचे प्रशिक्षण तज्ञ प्रशिक्षक मोहमद रफी शेख सर यांच्या मार्गदर्शनाखाली दिले जाणार आहे. शिबिराचा कालावधी २६ ते ३१ ऑक्टोबर २०२५ असा असून दररोज सकाळी ८.०० ते ११.३० या वेळेत प्रशिक्षण होणार आहे.
     
  या उपक्रमासाठी प्र मु अ बालाजी भोसले, सहशिक्षक सुनिल राठोड,संजीव भोसले, यु का प्र वैभव पाटील व सर्व शिक्षकवर्ग यांनी मेहनत घेतली.
        कार्यक्रमाला पालक, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Labels:

Sunday, 26 October 2025

धाराशिव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीची भाजपची तयारी पूर्ण- दत्ताभाऊ कुलकर्णी


धाराशिव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीची भाजपची तयारी पूर्ण-  दत्ताभाऊ कुलकर्णी

आमदार राणाजगजितसिंह पाटील व माजी आमदार सुजितसिंह ठाकूर व माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बूथनिहाय रणनीती आखणी

धाराशिव ,दि.२६:

 जिल्ह्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था भाजपच्या ताब्यात आणण्याची आमची तयारी पूर्ण झाली असल्याचा दृढ विश्वास भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे.

 जिल्ह्यातील आठ नगरपालिका, आठ पंचायत समित्या तसेच जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी पक्षाकडून संघटित व शिस्तबद्ध मोहीम सुरू असून, आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही रणनीती आखण्यात येत आहे. पक्ष संघटनेत उत्साहाचे वातावरण असून, प्रत्येक प्रभाग व बूथनिहाय कार्यकर्त्यांची बांधणी सुरू आहे.

 जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये आढावा बैठका घेऊन स्थानिक मुद्द्यांचा अभ्यास करण्यात येत आहे. विरोधकांच्या ताब्यात असलेल्या पालिकेत त्यांनी केलेल्या कारभाराच्या त्रुटींचा व लोकांना येणाऱ्या स्थानिक अडचणींचा बारकाईने अभ्यास करून, विकासाच्या योजना प्रभावीपणे राबवण्याची आखणी केली जात आहे. धाराशिव जिल्हा परिषदेत ५५ जागा, आठ पंचायत समित्यांमध्ये ११० सदस्य आणि आठ नगरपालिकांमध्ये सुमारे १७५ जागा असून, या सर्व ठिकाणी भाजपने स्वबळावर विजय मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यासाठी मित्रपक्षांसोबत युतीबाबत चर्चाही सुरू असल्याचेच सांगितले. तसेच केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याचा लाभ घेत जिल्ह्याच्या विकासाचा नवा आराखडा राबवण्याची तयारी पक्षाने पूर्ण केली आहे. ग्रामीण तसेच शहरी भागात भाजपची पकड दिवसेंदिवस मजबूत होत असून, कार्यकर्त्यां मधील उत्साह आणि जनतेचा वाढता विश्वास पाहता जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था भाजपच्या ताब्यात येतील, असा आत्मविश्वास जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे.

Labels:

Saturday, 25 October 2025

संगणक अभियंता धर्मवीर लोंढे यांची निवड झाल्याबद्दल येडोळा ग्रामस्थांच्या वतीने गौरव

संगणक अभियंता धर्मवीर लोंढे यांची निवड झाल्याबद्दल येडोळा ग्रामस्थांच्या वतीने गौरव

नळदुर्ग,दि.२५:

तुळजापूर तालुक्यातील मौजे येडोळा (भिमनगर) येथील  धर्मवीर रागिणी देवानंद लोंढे सोलापूर येथील सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये  संगणक अभियंता म्हणून शिक्षण घेणा-या धर्मवीर  यांची congnizent कंपनीत निवड  झाल्याबद्दल गावकऱ्यां वतीने सत्कार करण्यात आला.

 धर्मवीर हा इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षात असताना त्यांच्या कॉलेज congnizent च्या campus Recruitment process साठी निवड झाली आहे.  त्यास  आई वडिलांचे सहकार्य लाभले आहे , त्याच्या  यशाबद्दल प्रगतिशील शेतकरी श्री खंडेराव पाटील व राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार तालुका सरचिटणीस श्री रवी पाटील व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार तालुका उपाध्यक्ष  गोवर्धन लोंढे , माजी  ग्रामपंचायत सदस्य अमर जेठीथोर , रणवीर लोंढे आदींनी धर्मवीरचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

Labels:

आगामी होणाऱ्या नळदुर्ग नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप कार्यकर्ता संवाद मेळावा; आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

आगामी होणाऱ्या नळदुर्ग नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप कार्यकर्ता संवाद मेळावा;  आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे  कार्यकर्त्यांना आवाहन


नळदुर्ग, दि. २५ :

आगामी होणाऱ्या नळदुर्ग नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने नळदुर्ग शहरात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप कार्यकर्ता संवाद मेळावा झाला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी भाजपने केलेल्या दमदार विकासात्मक कामाची माहिती मतदारांना देऊन नगरपालिकेवर भाजपची सत्ता काबीज करण्याचे आमदार पाटील यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले. 
 या मेळाव्यास आमदार राणाजगजितसिंह पाटील, भाजपचे नेते सुनील चव्हाण, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, भाजपचे शहराध्यक्ष बसवराज धरणे, माजी उपनगराध्यक्ष नय्यर जहागीरदार, सुशांत भूमकर, दत्तात्रय कोरे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले की, नळदुर्ग शहराचा विकास करण्यासाठी भाजपने भरघोस निधी उपलब्ध करून दिले आहे.अल्पकालाधीत लोकहिताचे निर्णय घेवुन ते प्रत्यक्षात साकार होताना दिसत आहेत. त्यामुळे येणारी नगरपालिका ही एक हाती भाजपच्या ताब्यात  घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद विसरून कामाला लागावे, कारण नळदुर्ग शहरात आता अतिरिक्त तहसील कार्यालय सुरू झाले आहे. नळदुर्गच्या पर्यटनाच्या दृष्टीने ऐतिहासिक किल्ला हा चालविण्यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबविली जाणार असून लवकरच शासकीय तंत्रनिकेतनचा प्रस्तावही सादर केला जाणार आहे. त्यामुळे भाजपने शहरात केलेली विकासकामे आणि कार्य लोकांपर्यंत घेऊन जाणे गरजेचे आहे.

यावेळी माजी नगरसेवक निरंजन राठोड, छमाबाई राठोड, कैलास चव्हाण, सुधीर हजारे, संभाजी कांबळे, जिलानी कुरेशी, स्वप्निल काळे, संजय विठ्ठल जाधव, बबन चौधरी, सागर हजारी, धिमाजी घुगे, गणेश मोरडे, सुभाष कोरे, पप्पु बेडगे, मुकुंद नाईक, तानाजी जाधव,संदिप गायकवाड, विजय ठाकुर, नाना काझी, कल्पना गायकवाड, मुद्द्सर शेख, रियाज शेख,  यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Labels:

आधुनिक AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या ऊसवाढीसाठी प्रयत्नशिल - श्री सिद्धीविनायकचे संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी

आधुनिक AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या  ऊसवाढीसाठी प्रयत्नशिल - श्री सिद्धीविनायकचे संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी

श्री सिद्धीविनायक ॲग्रीटेक इंडस्ट्रीज लि.चा पाचवा मोळी पूजन सोहळा उत्साहात संपन्न 


तुळजापूर,दि.२५:

आधुनिक AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या  ऊस वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे श्री सिद्धीविनायकचे संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी देवकुरळी या.तुळजापूर  श्री सिद्धीविनायक ॲग्रीटेक इंडस्ट्रीज लि. कारखान्याच्या पाचव्या मोळी पूजनाच्या कार्यक्रम प्रसंगी बोलताना सांगितले.

तुळजापूर तालुक्यातील देवकुरळी येथे श्री सिद्धीविनायक ॲग्रीटेक इंडस्ट्रीज लि. कारखान्याच्या पाचव्या मोळी पुजनाचा 
सोहळा शुक्रवार, दि. २४  आक्टोंबर रोजी
 मोठ्या थाटात  व उत्साहात पार पडला. यावेळी अणदूरचे श्री निळकंठेश्वर मठाचे मठाधिपती श्री.श्री.श्री. १००८ शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी, श्री सद्गुरू शिवराम बुवा संस्थांचे ह.भ.प. विवेक महाराज दिंडेगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या सोहळ्यास श्री सिद्धीविनायक परिवाराचे संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, कारखान्याचे संचालक दिनेश कुलकर्णी, बालाजी कोरे, गणेश कामटे, राजकुमार जाधव, देविदास कुलकर्णी, ॲड. नितीन भोसले, देवकुरळीचे हनुमंत जाधव, पांडुरंग चव्हाण, बालाजी शिंदे, केशेगावचे सरपंच मल्लिनाथ गावडे, नारायण नन्नावरे, नागेश नाईक, राजाभाऊ पवार, दत्ताभाऊ राजमाने, साहेबराव घुगे, शिवाजी बोधले, आशिष सोनटक्के, अण्णासाहेब सरडे, विजय शिंगाडे, मंगेश कुलकर्णी, संजीव चिलवंत, मकरंद धोंगडे, शुभम मिंढे आदी मान्यवरांसह परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

याप्रसंगी श्री सिद्धीविनायक परिवाराचे संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी शेतकऱ्यांना सन्मानजनक भाव देणे, हेच आमचे प्रमुख ध्येय असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच कारखान्याचे काम पुढे नेऊ. तसेच आधुनिक AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या ऐकरी ऊसवाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले. 

यावेळी ह.भ.प. विवेक महाराज दिंडेगावकर आणि श्री श्री शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी यांनी कारखान्याच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करत श्री सिद्धीविनायक ॲग्रीटेक परिवाराचे कौतुक केले आणि पुढील वाटचालीसाठी  शुभेच्छा दिल्या.

Labels:

Friday, 24 October 2025

बातमीच्या कारणावरुन पत्रकारावर हल्ला ; गुन्हा दाखल करुन एकास अटक


बातमीच्या कारणावरुन पत्रकारावर हल्ला ;  गुन्हा दाखल करुन एकास अटक    

नळदुर्ग,दि.२४ :

नेताच्या बातम्या  का लावत नाही या कारणावरुन  पत्रकारास मारहाण करत तीक्ष्ण शस्त्राने हल्ला करून जखमी केल्याची घटना नळदुर्ग शहरात दि.२१ऑक्टोंबर रोजी दुपारी ३ वाजता घडली. याप्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून एकास अटक करण्यात आली आहे.

अझहर मैनुद्दीन शेख, वय ३८ वर्षे, रा. नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.तर आयुब अब्दुल गणी शेख, वय ३५ वर्षे, रा. नळदुर्ग ता. तुळजापूर असे जखमी पत्रकाराचे नाव आहे.

दि.२१ रोजी ३ वाजण्याच्या सुमारास नळदुर्ग येथील बसस्थानका जवळ गौरी हॉटेल समोर यातील आरोपीने नेताच्या बातम्या का लावत नाही, या कारणावरुन जिवे ठार मारण्याचे उद्देशाने शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी,चाकुने मारहाण करुन जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशी  फिर्याद आयुब शेख यांनी दि.22. 10.2025 रोजी दिल्याने अझहर  शेख याच्याविरुद्ध नळदुर्ग पोलिसात  भा.न्या.सं.कलम 109, 115(2), 352, 351 (2), अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत .       

Labels:

Thursday, 23 October 2025

बैलांच्या टक्कर स्पर्धेतील विजेत्या बैल मालक शेतक-यास रोख रक्कमेचे पारितोषिक व ट्राफी देवुन गौरव

बैलांच्या टक्कर स्पर्धेतील विजेत्या बैल मालक शेतक-यास रोख रक्कमेचे पारितोषिक व ट्राफी देवुन गौरव

नळदुर्ग,दि.२४:

शिंदे गट  शिवसेनेचे  सोमनाथ गुडडे यांनी तुळजापूर तालुक्यातील नंदगाव येथे दिपावली पाडव्या निमित्त आयोजित बैलांच्या टक्कर स्पर्धेतील विजेत्या बैल मालक शेतक-यास रोख रक्कमेचे पारितोषिक व ट्राफी देवुन गौरव केला.

बैल टक्कर स्पर्धा नंदगाव येथे बुधवारी मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी शिवसेनेचे सोमनाथ गुड्डे यांची प्रमुख उपस्थिती होती व.

 शिंदे गट शिवसेनाच्या वतीने  बैल टक्कर स्पर्धेत प्रथम क्रमांक, व्दितीय, तृतीय क्रमांक आलेल्या बैल मालकाचा ट्राफी देवुन सन्मानित  सन्मान करण्यात आले.

प्रथम पारितोषिक श्रीशैल सातलगावकर, द्वितीय पारितोषिक बंडेशा बशेट्टी,  तृतीय पारितोषिक श्रीशैल सातलगावकर इत्यादी.

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून दहिटणा गावचे माजी उपसरपंच सोमनाथ गुड्डे ,संजय घोडके, नंदगावचे सरपंच  शशिकांत नागिले , संयोजक सतीश काटे, शिवशंकर वाले, सचिन कोरे, मल्लिनाथ वाले, विश्वजीत घंटे, सागर चौगुले, सचिन करपे, कमलाकर तुपे, सुरज गुड्डे, लाला कांबळे, समर्थ पाटील, चिदानंद बशेट्टी, परमेश्वर शिवगुंडे, श्रद्धानंद कलशेट्टी, काटे गुरुजी, मरगु इटकर, शेखर कलशेट्टी, परमेश्वर गब्बुरे, रहीम शेख, श्रीशैल कामशेट्टी, मेजर सलीम इनामदार, सुरेश घोडके, बसवेश्वर गुड्डे आदीसह  पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

Labels:

नळदुर्ग : शहरातील मराठा गल्लीत श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास सुरुवात ; पारायण कालावधीत भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन

नळदुर्ग : शहरातील मराठा गल्लीत श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास सुरुवात ; पारायण कालावधीत भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन 

नळदुर्ग,दि.२३: शिवाजी नाईक 

नळदुर्ग येथील मराठा गल्ली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात गुरुवार दि.२३ऑक्टोंबर रोजी पासुन श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास सुरुवात झाली आहे. पारायणे हे वर्ष ४७ वेळ वर्ष आहे.

गुरुवर्य वै.श्री. शिवराम बुवा दिंडेगांवकर यांच्या आशिर्वादाने, वें.श्री. तात्यासाहेब वासकर (आवा) महाराज यांचे कृपादृष्टीने तसेच वै.ह.भ.प. मारुती महाराज कानेगांवकर यांच्या कृपेने आणि पावन नगरीतील आविकांच्या तन, मन, धन या सहकार्याने संपन्न होत आहे.

 पारायण काळातील दैनंदिन कार्यक्रम

पहाटे ४ ते ६ काकडा आरती, सकाळी ६ ते ७ माऊलीची पुजा, ७ ते ९ सामुदायिक ज्ञानेश्वरी वाचन, ९ ते ९.३० विश्रांती, ९.३० ते ११ वाचन स. ११ ते १२ भोजन व विश्रांती, १२ ते २ महिलांचे भजन व भारुडाचा कार्यक्रम, २ ते ४.३० गाथा भजन, ४.३० ते ५.३० प्रवचन,
६ ते ७ हरीपाठ, ७ ते ८ भोजन, ८ ते १० किर्तन ११ ते ४ पहाटे हरिजागर .
प्रवचनकार
गुरूवार दि. २३/१०/२०२५ रोजी ह.भ.प. श्री. बलभिम बागल (चिकुंद्रा) यांचे प्रवचन  तर ह.भ.प.श्री. दिपक निकम महाराज (धनगरवाडी) यांचे किर्तन होणार आहे.शुक्रवार दि. २४ रोजी ह.भ.प.श्री. अशोक जाधव (गुरुजी) बाभळगांव यांचे प्रवचन तर हभप राम महाराज गायकवाड चिकुंद्रा यांचे किर्तन, शनिवार दि.२५ रोजी ह.भ.प.श्री. बाबुराव पुजारी (पाडोळी), तर किर्तन ह.भ.प.श्री. विरपाक्ष महाराज (कानेगांव), 
रविवार दि.२६ रोजी ह.भ.प.श्री. मोहन पाटील (किलजकर), ह.भ.प.श्री. ज्ञानेश्वर महाराज (माकणीकर) यांचे  सायं. ७ ते ९ किर्तन होणार आहे. सोमवार दि. २७ रोजी ह.भ.प.श्री. संजय पवार (शहापूर) यांचे प्रवचन तर ह.भ.प.श्री. गुरुवर्य आप्पासाहेव महाराज (दिंडेगावकर) यांचे किर्तन, मंगळवार दि. २८ रोजी ह भ प राजकुमार पाटील वागदरी, तर ह.भ.प.श्री. गुरुवर्य चैतन्य महाराज वासकर (वाशी)यांचे किर्तन होईल.

सांगता समारंभ बुधवार दि. २९/१०/२०२५

 बुधवार दि. २९/१०/२०३५ रोजी सकाळी ८ ते ९ पसायदान हभप. गुरुवर्य चैतन्य महाराज वासकर, काला ह भ प गुरुवर्य आप्पासाहेब दिंडेगावकर महाराज, काल्याचे कीर्तन ह भ प श्रीहरी ढेरे महाराज काक्रंबा यांचे होवुन  माऊली पालखी मिरवणूक होईल. यावेळी महाप्रसाचे कार्यक्रम होणार आहे. तरी वरील धार्मिक कार्यक्रमाचे लाभ घेण्याचे आवाहन समस्त गावकरी, पारायण समिती, शिवशाही तरुण मंडळ नळदुर्ग यांनी केले आहे.

Labels:

नळदुर्ग शहरात काँग्रेस पक्षाच्या संपर्क कार्यालयाचे अँड धिरज पाटील यांच्या हस्ते उदघाटन

नळदुर्ग शहरात काँग्रेस पक्षाच्या संपर्क कार्यालयाचे अँड धिरज पाटील यांच्या हस्ते उदघाटन

नळदुर्ग,दि.२२:

नळदुर्ग शहरात काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी हे पक्ष कार्यालय एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल, असा विश्वास काँग्रेसचे धाराशिव जिल्हा अध्यक्ष अँड धिरज पाटील यांनी व्यक्त केले.


आगामी होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीची  तयारीसाठी बुधवार दि. २२ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११ वाजता दिपावली पाडव्याच्या मुहूर्तावर  नळदुर्ग शहरात काँग्रेस पक्षाच्या  संपर्क कार्यालयाचे  उदघाटन   जिल्हा अध्यक्ष अँड धिरज पाटील यांच्या हास्ते करण्यात आले आहे.

सदरील कार्यालय  शास्त्री चौक, नळदुर्ग येथिल श्री शिवलिंगेश्वर हिरेमठ कॉम्प्लेक्सच्या पहिल्या मजल्यावर हा कार्यक्रम पार पडला.

याप्रसंगी प्रमुख उपस्थिती काँग्रेसचे तुळजापूर तालुका अध्यक्ष रामचंद्र आलुरे , माजी नगराध्यक्ष शाहबाज काझी, अँड अरविंद बेडगे, संदीप सुरवसे, जनसेवक अमोल  कुतवळ,आबेदिन कुरेशी, रामराव  पाटील, इमाम शेख, गफूर कुरेशी, अजय बागडे, आप्पा स्वामी, अमीर शेख, धनंजय डुकरे, संजय गुंजुटे, चंद्रकांत बनसोडे, मुजमिल कुरेशी, हैदर कुरेशी, शोकत कुरेशी, आत्ताप कुरेशी, कचरू पठाण, नाना शितोळे, विजय डोंगरे, अमोल जेटिथोर, क्षितिज नरवडे, सिद्धेश्वर कस्तुरे, हरीश जाधव, विजयराव क्षिरसागर, युसुफ पटेल आदीसह काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते  स्थानिक नागरिक उपस्थित होते.

 

Labels:

Tuesday, 21 October 2025

सिंदगाव येथे शंभर गरजू कुटुंबांना दिवाळी किटचे वाटप करून दीपोत्सव साजरा

सिंदगाव येथे शंभर गरजू कुटुंबांना दिवाळी किटचे वाटप करून दीपोत्सव साजरा 

नळदुर्ग,दि.२१:  एस.के.गायकवाड 

 तुळजापूर तालुक्यातील मौजे सिंदगाव येथे दिवाळी सणाच्या निमित्ताने गरजू शंभर कुटुंबांना किराणा साहित्य  किटचे वाटप करून दीपोत्सव  उत्साहात साजरा करण्यात आला.

 अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील पिकासह जमिनीचे मोठे नुकसान झाले.ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर भूमिहीन शेतमजुरांच्या हाताचे काम बंद झाले. शासनाने आनंदाचा सिधा दिला नाही.त्यामुळे अतिवृष्टीच्या सावटाखाली शेतकऱ्यांना व भूमिहीन शेतमजुरांना दिवाळीचा सण साजरा करण्याची वेळ आली.शेतकऱ्यांना तुटपुंज का असेना शासनाने सरसकट नुकसान भरपाईच्या माध्यमातून आर्थिक मदत केली. परंतु भूमिहीन गोरगरीब शेतमजुरांच्या हाताला काम नसल्याने, त्या कुटुंबावर मात्र दिवाळीच्या सणावर अतिवृष्टीचे सावट निर्माण झाले.या अतिवृष्टीच्या सावटाखाली दीपावलीचा सण साजरा करणाऱ्या सिंदगाव ता. तुळजापूर येथील १०० गरजू कुटुंबांना, विधवा,परितक्ता, निराधार  एकल महिलांना येथील सामाजिक युवा कार्यकर्ते सतीश ज्ञानोबा शिंदे यांनी दिवाळी किट्सचे वाटप करून त्यांचा दीपावली सण गोड केला.

 येथील धम्मक्रांती बुद्ध विहारात या किटचे वाटप करण्यात आले. प्रारंभी तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करून बुद्ध वंदना घेऊन या किटचे वाटप करण्यात आले.ज्या गरजू  वृद्ध दिव्यांग व्यक्तींना किट वाटपाच्या ठिकाणी येणे शक्य झाले नाही अशा व्यक्तीच्या घरापर्यंत जाऊन त्यांना दिवाळीचे किटचे वाटप करण्यात आले. शासनाने या दिवाळीला आनंदाचा शिधा दिला नाही परंतु येथील सामाजिक कार्यकर्ते सतीश शिंदे यांनी मात्र या आनंदाच्या सिद्याची उणिव भरून काढत गोरगरीब सामान्य गरजू कुटुंबाच्या दिवाळीमध्ये आनंद निर्माण केला आणि मोठ्या उत्साहामध्ये त्यांच्या समवेत दीपोत्सव आपल्या मित्र परिवारासह साजरा केला. त्यांचा हा स्तुत्य उपक्रम समाजाला प्रेरणादायी असून सतिश शिंदे यांच्या या स्तूत उपक्रमाचे ग्रामस्थामधून कौतूक केले जात आहे.

 या प्रसंगी भिम शाहीर तथा प्रमाणित लेखापरीक्षक चंद्रकांत शिंदे,विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन सिद्रामाप्पा परशेट्टी, माजी सरपंच लक्ष्‍मण शिंदे,लाडूशा शिंदे, सामाजिक कार्यकर्ते राम कांबळे सह सतीश शिंदे  मित्रपरिवार, युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

Labels:

नंदगाव जिल्हा परिषदेसाठी माजी उपसरपंच सोमनाथ गुड्डे उमेदवारीसाठी इच्छुक; प्रबळ दावेदारीने राजकीय वातावरण ढवळणार.!

 
नंदगाव जिल्हा परिषदेसाठी माजी उपसरपंच  सोमनाथ गुड्डे  उमेदवारीसाठी इच्छुक; प्रबळ दावेदारीने राजकीय वातावरण ढवळणार.!

नळदुर्ग,दि.२१: शिवाजी नाईक 

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे आरक्षण सोडत जाहीर झाल्याने राजकीय हालचालींना मोठा वेग आला आहे. लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार असल्याने उमेदवारीसाठी इच्छुक सरसावले आहेत.
नंदगाव गट जि.प. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नव्या राजकीय हालचालींना वेग आला असून दहिटण्याचे माजी उपसरपंच सोमनाथ गुड्डे  यांनी शिवसेना शिंदे गटाकडून
उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली आहे.
 त्यांची दावेदारी प्रबळ मानली जात असून, कार्यकर्त्यांसह समर्थकांनी जोरदार मोर्चेबांधणी करण्याची रणनीती आखत आसल्याची चर्चा रंगली आहे.

  सोमनाथ गुड्डे हे   दहिटणा येथिल रहिवासी असुन गावच्या विकासात त्यांचा मोठा वाटा आहे.  गावात रस्ते  ,पाणी,यासह विविध कामे केली आहेत.  गेल्या निवडणुकीत  नंदगाव  गटातुन निवडणुक लढविली होती.   त्यावेळी अतिशय कडवी झुज  त्यांनी  दिली होती.  त्यानंतर  त्यांनी दोनदा उपसरपंचपद भुषविले . दहिटणा गावामध्ये अंडर ग्राउंड गटारी, पिण्याचे पाणी, वीज, सिमेंट काँक्रीटचे रस्ते असे अनेक विकासकामे  त्यांच्या कालावधी मध्ये झाल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.
 
 नंदगाव जिल्हा परिषद गटातील गावांमध्ये ते नेहमीच विविध सामाजिक कार्याच्या माध्यमातून संपर्कात आहेत .तरुणांना क्रिकेटसाठी मदत करणे,  झाडे लावणे,  महिलांसाठी होम मिनिस्टरचा कार्यक्रम,   विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप , यात्रेत सहभाग, महापुरुषांची  जयंती  साजरी करण्यासाठी मदत, आरोग्यासाठी गोरगरिबांना आर्थिक मदत करणे, सैनिक ,महिलासह समाजातील  अनेक मान्यवरांचा गौरव त्यांनी केले आहे . "जनशुभदा  फाउंडेशनच्या" माध्यमातून त्यांनी  विविध सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा कला, विज्ञान या सर्वच क्षेत्रांमध्ये त्यांची उल्लेखनीय कामगिरी आहे.

 एक नवीन चेहरा , सर्वसामान्य  कुटुंबातून पुढे येत लोक कल्याणकारी कार्यक्रम राबवत असल्याचे सर्वश्रुत आहे.आगामी होणा-या जिल्हा परिषदेची निवडणूक लढवुन  ग्रामीण भागाचा विकास करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

Labels:

पुरात वाहून गेलेल्या कुटुंबियांना केली आर्थिक मदत ; "एक हात मदतीचा ग्रुपचा" आधार ! स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

पुरात वाहून गेलेल्या कुटुंबियांना केली आर्थिक मदत ; "एक हात मदतीचा ग्रुपचा" आधार ! स्तुत्य उपक्रमाचा कौतुक 

धाराशिव दि.२१:

 यंदा शेतकरी अतिवृष्टी, महापूर आणि पिकांची नासाडी आदी सासख्या नैसर्गिक संकटात सापडलेला आहे. या पुरामध्ये काही शेतकरी वाहून गेले तर पिक वाहून गेल्यामुळे काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे कुटुंबाचे छत्र हरवलेल्या कुटुंबियांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अशा विवंचनेत सापडलेल्या कुटुंबाच्या मदतीला "एक हात मदतीचा ग्रुप" धाऊन आला आहे.

 या ग्रुपच्या माध्यमातून संबंधित कुटुंबियांच्या वारसास प्रत्येकी ५ हजार रुपयांप्रमाणे २२ कुटुंबांना १ लाख १० हजार रुपयांची रोख आर्थिक मदत करण्यात आली आहे. त्यामुळे हा ग्रुप अडचणीच्या काळात त्या कुटुंबांचा आधार बनला आहे.

धाराशिव व सोलापूर जिल्ह्यांवर निसर्गाचा प्रकोप झाला असून पुराच्या पाण्यात शेतकरी व नागरिक वाहून गेले. त्याबरोबरच शेतातील उभी पिके देखील मातीसह वाहून गेली आहेत. पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या व पिक उध्वस्त झाल्यामुळे नैराश्यात सापडून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील वारस सदस्य असलेल्या पत्नी व इतर नातेवाइकांना नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील नामपूर येथील एक हात मदतीचा या ग्रुपच्या माध्यमातून प्रत्येकी पाच हजार रुपये रोख स्वरूपात घरी तसेच बांधावर जाऊन ती मदत पोहोच केली आहे. ही मदत करण्यासाठी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, पत्रकार विलास बडे व सामाजिक कार्यकर्ते राहुल भड यांचे मार्गदर्शन लाभले. 
हा ग्रुप नामपूर येथील असून यामध्ये बाहेरगावी नोकरी करणाऱ्या तरुणांचा समावेश आहे. गेल्या ९ वर्षांपासून या ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करणे, आश्रम शाळेत जाऊन विद्यार्थ्यां समवेत वाढदिवस साजरा करणे व इतर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. शेतकऱ्यांच्या कुटुंबांना पंकज कापणीस, रोहिदास कापणीस, महेश कापणीस, अमोल पाटील, अविनाश मोरे व हर्षल कापडे, राहुल भड आदींसह संबंधित कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

यानी केली आपतीग्रस्त कुटुंबियांना  मदत

एक हात मदतीचा या ग्रुपच्या माध्यमातून मयत कुटुंबियांच्या वारसास प्रत्येकी ५ हजार रुपयांप्रमाणे रोख रक्कम त्यांच्या घरी तसेच बांधावर जाऊन पोहोच केली. यामध्ये धाराशिव जिल्ह्यासह बार्शी तालुक्यातील शेतकरी कुटुंबांचा समावेश आहे. यामध्ये श्वेता शरद गंभीर व उमेश विधाते (कारी), बाळासाहेब भोसले (रऊळगाव), अर्चना उमाकांत संकपाळ (गौडगाव), बाळासाहेब पवार (संगमनेर), लक्ष्मण पवार (म्हात्रेवाडी), श्रीरंग दराडे (भालगाव), लक्ष्मण कढपे (झरेगाव), प्रकाश लोंढे (आवाड शिरपुरा), लक्ष्मण गावसाने (दहिटणा), मोहन बोरगावे (उंबरे गव्हाण), बालाजी मोरे (नागूर), उमेश ढेपे (अणदुर), चंद्रशेखर लोखंडे (जवळगा मेसाई) आदींसह इतर शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचा समावेश आहे.

Labels:

शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात्र ठरलेल्या तुळजापूर शुगरचा बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा मोठ्या थाटात ; दिड लाख मेट्रिक टन ऊस गाळाचे उद्दिष्ट - चेअरमन ॲड अनिल काळे

शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात्र ठरलेल्या तुळजापूर शुगरचा बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा मोठ्या थाटात ; दिड लाख मेट्रिक टन ऊस गाळाचे उद्दिष्ट - चेअरमन ॲड अनिल काळे 

तुळजापूर,दि.२०:

 गेल्या गळीत हंगामात ऊसाला २ हजार ७०० रुपये प्रति टनाला भाव  दिले. त्याचबरोबर एस उत्पादक शेतकऱ्यांना शंभर टक्के उसाचे पेमेंट दिले. वाहतूक व ठेकेदार यांना वेळेवर पैसे दिले. त्यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास या कारखान्यावर आहे. मागच्या हंगामात  ४१ हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले. या हंगामात दीड लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करण्याचा उद्दिष्ट आहे. यंदाच्या गाळप हंगामातही  उसाला चांगला भाव देणार असल्याचे सांगत शेतकऱ्यांनी या कारखान्यास परिपक्व ऊस देण्याचे आवाहन 
तुळजापूर शुगरचे चेअरमन ॲड अनिल काळे यांनी केले आहे. 

तुळजापूर शुगर प्रा. लि. काटी ता. तुळजापूर या गुळ पावडर कारखान्याचा सन २०२५-२०२६ चा पहिला गळीत हंगाम बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा मोठ्या थाटात  शनिवार दि.१९ ऑक्टोंबर रोजी धनत्रयोदशीच्या मुर्हतावर कारखान्याचे चेअरमन ॲड अनिल काळे व त्यांच्या सुविधा पत्नी यांच्या हस्ते संपन्न झाले.
दि. १९ ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर तुळजापूर शुगरचे चेअरमन ॲड अनिल काळे यांच्या हस्ते सह पत्नीक बॉयलर अग्निप्रदीपनाचा कार्यक्रम झाला .यावेळी कारखाना क्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी ,वाहन ठेकेदार, कारखान्याचे कर्मचारी, अधिकारी आदीसह मान्यवर उपस्थित होते. 

याप्रसंगी कारखान्याचे संचालक आदित्य काळे ऋषी वडगावकर, गिरीश देशमुख, अभियंता पटेल आदीसह शेतकरी, कर्मचारी उपस्थित होते.

Labels:

Monday, 20 October 2025

रोटरी क्लब मुरूम सिटीतर्फे आनंदी फाउंडेशन येथे दिवाळी फराळाच्या पदार्थांचे वाटप

रोटरी क्लब मुरूम सिटीतर्फे आनंदी फाउंडेशन येथे दिवाळी फराळाच्या पदार्थांचे वाटप 

मुरूम,दि .२०: डॉ सुधीर पंचगल्ले 

दिवाळीचे औचित्य साधून रोटरी क्लब मुरूम सिटीच्या वतीने आनंदी फाउंडेशन उमरगा येथील राहणाऱ्या मनोरुग्णांना दिवाळीचा फराळाचे पदार्थ वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. 

आनंदी फाउंडेशन येथे वीस मनोरुग्न असून त्यांची अविरत सेवा करणारे जाधव कुटुंबांना एक मदत व्हावी म्हणून रोटरी क्लब मुरूम सिटीने चार दिवस पुरेल एवढा दिवाळीमध्ये करण्यात येणारे रोटरी क्लबच्या सदस्यांच्या घरी बनवलेले फराळाचे पदार्थ देण्यात आले. मनोरुग्णांना दिवाळी भेट म्हणून कपडे देण्यात आले. रोटरी क्लब मुरूम सदस्य आलेले पाहून मनोरुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण झाला होता आणि ते मनमुराद फराळाचा आस्वाद घेतला.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब मुरूमचे अध्यक्ष आप्पासाहेब सूर्यवंशी, सचिव कल्लप्पा पाटील, उपाध्यक्ष संतोष कांबळे, सुनील राठोड, मल्लिकार्जुन बदोले प्रा. कलया स्वामी , डॉ.नितीन डागा, बाबासाहेब पाटील ,प्रा. डॉ.सुधीर पंचगले यांनी परिश्रम घेतले.

Labels:

Sunday, 19 October 2025

नळदुर्ग नगरपरिषद निवडणुक राष्ट्रवादी कॉग्रेस (शरद पवार गट) स्वबळावर निवडणूक लढविणार !


नळदुर्ग नगरपरिषद निवडणुक राष्ट्रवादी कॉग्रेस  (शरद पवार गट) स्वबळावर निवडणूक लढविणार !

नळदुर्ग,दि.१९ : शिवाजी नाईक 

नळदुर्ग नगरपरिषद अध्यक्षपदासह नगरसेवक पदाची  होणारी निवडणूक  राष्ट्रवादी कॉग्रेस  (शरद पवार गट) पक्ष  नगराध्यक्ष व सर्व प्रभागात स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याचे बैठकित निर्णय घेण्यात आल्याची माहिती सोशल मिडियावर पोस्ट व्हायरल झाली आहे.याप्रकरणी राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष मुश्ताक कुरेशी यांच्याशी संपर्क साधले असता या वर्तला दुजोरा दिला आहे.

शनिवार दि. १८ ऑक्टोंबर रोजी  राष्ट्रवादी कॉग्रेस ( शरद पवार गट) पक्षाची
 नळदुर्ग शहरात नगरपरिषद निवडणूकीबाबत पदाधिकारी व कार्यकर्त्यांची  बैठक  माजी नगरध्यक्ष मुस्ताक  कुरेशी यांच्या अध्येक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीस नळदुर्ग शहर अध्यक्ष महेबूब  शेख, तालुका उपाध्यक्ष बशीर शेख आदीची प्रमुख उपस्थिती होती.

  नगरपरिषद अध्यक्ष व  १० प्रभागातील २० नगरसेवक पदासाठी  होऊ घातलेली निवडणुक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीवेळी राष्ट्रवादी पक्षाचे विद्यार्थी प्रदेश सचिव ताजोद्दीन बशीर शेख, युवक शहर अध्यक्ष आनंद ऊर्फ पिंटु पुदाले, अल्पसंख्याक सेल तालुका उपाध्यक्ष  मिनहाज ईनामदार, अ. सं शहर अध्यक्ष वसीम कुरेशी, जावेद  काझी, अ. स.कार्याध्यक्ष ईरफान कुरेशी,शिवराज धरने, अरफात सैय्यद, मज्जिद  ईनामदार, दाऊद कुरेशी आदीसह  कार्यकर्ते उपस्थित होते.

Labels:

अशोक जगदाळे यांची नळदुर्ग नगरपालिका निवडणुकीसाठी मोर्चे बांधण; पुन्हा एकदा एकहाती सत्ता मिळविण्याचा निर्धार

अशोक जगदाळे  यांची नळदुर्ग नगरपालिका निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी; पुन्हा एकदा  एकहाती सत्ता मिळविण्याचा निर्धार 


 नळदुर्ग, दि. १९, ऑक्टोबर

आगामी होणा-या नळदुर्ग नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य अशोक जगदाळे  यांची मोर्चे बांधणी सुरु आहे .योग्य व सक्षम उमेदवाराची चाचपणी सुरु असुन  पुन्हा एकदा न.प. वर एकहाती सत्ता मिळविण्याचा निर्धार व्यक्त करत त्यांनी आपली भुमिका स्पष्ट केली.

शनिवारी रोजी अशोक जगदाळे यांच्या निवासस्थानी पत्रकाराशी बोलताना सांगितले की, नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार पक्ष पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे . सन२०१६ मध्ये झालेल्या  उमेदवार निवडीतील चुका यावेळी टाळण्यात येणार असल्याचे सांगितले. सर्वसमावेशक उमेदवार निवडून नगरपालिका जिंकण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नगरपालिका निवडणुकीचे आरक्षण जाहीर होताच जगदाळे कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. अखेर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक लढविण्याचा निर्णय स्पष्ट केला. मात्र सध्या नगराध्यक्ष पदाबाबत त्यांनी मौन राखले असले तरी महाविकास आघाडीच्या माध्यमातून हे पद लढवण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे निवडणुकीत मोठी चुरस निर्माण होणार आहे.


राजकीय कामगिरी

ऑक्टोबर २०१४ मध्ये विधानसभा निवडणुक अक्षप म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्या निवडणुकीत माघार घेतली होती.

नोव्हेंबर २०१६ मध्ये नळदुर्ग नगरपालिका निवडणुक लढवली. त्यामध्ये नळदुर्ग नगरपलिकेवर पहिल्यांदाच एक हाती सत्ता आणली. २५ वर्ष विरोधकांच्या ताब्यात असलेल्या नळदुर्ग नगरपलिकेच्या निवडणुकीत वर्चस्व प्राप्त केले. १२ नगरसेवक व जनतेतून नगराध्यक्ष निवडुन आणला.

मार्च २०१७ मध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणुक लढवली होती. जिल्हा परिषदेच्या तालुक्यातील ९ गटापैकी चार गटात विजय मिळवला होता. त्यामध्ये मंगरुळ, काटी, काटगाव व तामलवाडी गटाचा समावेश होता, तर आठ पंचायत समित्या निवडून आणल्या. कालांतराने येथील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सदस्यांनी पक्षांतर करीत भाजपामध्ये प्रवेश केला होता.

तुळजापूर तालुका कृषी उत्पन बाजार समितीची निवडणुक लढवत चार संचालक निवडुन आणले.

जुन 2018 साली बीड-धाराशिव (उस्मानाबाद)-लातुर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक लढवली. ही निवडणुक राष्ट्रवादी व काँग्रेसच्या पाठिंब्यावर म्हणून लढवली होती. त्यामध्ये थोडक्या मताने निसटता पराभव स्विकरला.

ऑक्टोबर २०१९ मध्ये तुळजापूर विधानसभा मतदासंघात निवडणुक लढवली होती. या निवडणुकीत ३८ हजार मते मिळवत तालुक्यात तिसऱ्या क्रमाकांवर राहिले होते.

Labels:

टोल वसुल विरोधात सोमवारी चक्काजाम आंदोलन

प्रतिकात्मक फोटो

 टोल वसुल विरोधात सोमवारी चक्काजाम आंदोलन

अणदूर दि.१९ : चंद्रकांत हागलगुंडे 

सोलापूर- उमरगा राष्ट्रीय महामार्गावरील फुलवाडी येथील कामे  अर्धवट असल्याचे दिसून येत आहे. तरीही  टोल वसुली मात्र जोमात सुरू असुन या कारभारा विरुद्ध  दि. 20 ऑक्टोबर रोजी  टोल  वसुली विरोधात चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे पवन  घुगरे 
यांनी दिले आहे.

निवेदनात नमुद केले आहे की, फुलवाडी टोल नाका उमरगा -सोलापूर रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट व प्रवाशांच्या जीवाशी खेळणारे, नियमबाह्य घीसाड घायीने काम करून निव्वळ आर्थिक हित जोपासण्याचे काम येथे झाले आहे. गेल्या 14 वर्षापासून अत्यंत निकृष्ट, प्रवाशांच्या जीवाशी, वाहनधारकांच्या जीवाशी खेळून  टोल वसुली मात्र आकाच्या मार्गदर्शनाखाली बेधुंद चालू आहे. हे सर्व गेली 14 वर्षापासून कसे काय चालू आहे हा शोधाचा विषय असला तरी प्रवासी वाहनधारक यांची मात्र पुरेपूर लूट होताना दिसत आहे.

याबाबत अनेक वेळा आंदोलन, रस्ता रोको ,टोल वसुली बंद झाले मात्र पुनश्च पूर्वपदावर येऊन वसली चालूच आहे याविरुद्ध आंदोलन व चक्काजाम करण्याचा इशारा वरिष्ठांना देण्यात आला आहे.

अणदूर, जळकोट येथे रस्त्याच्या अर्धवट कामामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने घरे उध्वस्त झाले तर अनेकांच्या जमिनी पाण्याखाली गेल्या एवढे असूनही संबंधित रस्ते वाहतूक अधिकारी  मूग गिळून गप्प का असा संताप सवाल प्रवासी व वाहनधारकातून केला जात आहे.

Labels:

आस्थपना विभाग आधिका-याच्या त्रासाला कंटाळुन निवृत्त लिपिकाचा नगरपालिकेसमोर आत्मदहनाचा इशारा

आस्थपना विभाग आधिका-याच्या त्रासाला कंटाळुन निवृत्त लिपिकाचा नगरपालिकेसमोर आत्मदहनाचा इशारा

नळदुर्ग,दि.१९: शिवाजी नाईक 

 अस्थापना विभागाकडून दिल्या जाणाऱ्या सततच्या त्रासामुळे वैतागलेल्या नगरपरिषदेचे निवृत्त लिपीक पटेल मुश्ताक नजीर यांनी नळदुर्ग न.प.कार्यालयासमोर येत्या  दि.५ नोव्हेंबर रोजी  आत्मदहन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे  जिल्हाधिकारी यांना दिला आहे.

निवेदनात मुश्ताक पटेल यांनी म्हटले  आहे  की, नळदुर्ग नगरपरिषद  कार्यालयातून दि. ३०/ ०६/ २०२५  रोजी सेवानिवृत्त झालो आहे. माझ्या सेवानिवृत्ती नंतरची मिळणारी रक्कम सेवाउपदान, रजा रोखीकरण व एनपीएस मधून मासिक पगारामधून कपात झालेली रक्कम इत्यादी मिळण्याकरीता अस्थापना प्रमूख यांना वेळोवेळी तोंडी विनंती करुन, शासनाचे परिपत्रक देऊनसुद्धा आस्थापना क्र. १ मधील संबंधीत अधिकारी हे मला गेल्या काही दिवसांपासून सतत मानसिक छळ, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, धमक्या देणे व अन्यायकारक वागणूक देत आहेत.

तरीसुद्धा माझ्या मिळणाऱ्या रक्कमेबाबत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. परिणामी मी प्रचंड मानसिक तणावाखाली असून या अन्यायाविरुद्ध न्याय न मिळाल्यास मी दि. ०५/११/२०२५ रोजी नगर परिषद नळदुर्ग कार्यालयामध्ये आत्मदहन करीत आहे. याप्रकरणी संपूर्ण जबाबदारी पुर्णपणे अस्थापना क्र.१ मधील संबंधीत अधिकाऱ्यावर राहील,  माझ्या घरातील परस्थिती बिकट असून सध्या माझ्या घरी मुलगी आजारी असल्याने व मला बिपीचा त्रास असल्याने औषधोपचाराकरीता माझ्याकडे पुरेशी रक्कम उपलब्ध नाही माझा सर्व उदनिर्वाह याच रक्कमेवर अवलंबून आहे.

 मला मानसिक व शाररिक त्रास देणाऱ्या अस्थापनेच्या अधिकाऱ्यावर कडक कारवाई करुन भविष्यात अन्य कोणावरही वेळ येऊ नये,  यांची गांभीर्याने नोंद घेण्यात यावी, तरी   योग्य न्याय  देण्याची मागणी केली आहे.

सदर प्रकरणातील तपास सुरु करुन संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध शासकीय व फौजदारी कारवाई करण्यात यावी. माझ्यावर करण्यात आलेल्या  अन्याय प्रकरणी संबंधीत अधिकाऱ्यांवर आहे.
निवेदनाची प्रत धाराशिव जिल्हाधिकारी,पोलिस अधिक्षक, तुळजापूर तहसिलदार, न.प. मुख्याधिकारी, पोलिस निरीक्षक आदींना देण्यात आले आहे.

Labels:

नळदुर्ग: प्रारूप मतदार यादी अनुषंगाने जवळपास २ हजार ९७९ हरकती ; मतदार यादीबाबत नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया

नळदुर्ग: प्रारूप मतदार यादी अनुषंगाने जवळपास २ हजार ९७९ हरकती ; मतदार यादीबाबत नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया

नळदुर्ग,दि.१९ : शिवाजी नाईक 

 नगरपालिकेने निवडणूकीच्या प्रारूप यादीच्या अनुषंगाने ८ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर दरम्यान नागरिकांनी हरकती दाखल करण्याबाबत सूचित केल्यानुसार एकंदरीत दोन हजार नागरिकांनी २ हजार ९७९  हरकती दाखल केल्याने मतदार यादीबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

नळदुर्ग  न.प. सार्वत्रिक निवडणूक २०२५ करीता एकंदरीत १८ हजार ३४१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. प्रारूप प्रभाग रचना अनुषंगाने एकंदरीत चार हरकती प्राप्त झाल्या होत्या. मात्र प्रारूप मतदार यादी अनुषंगाने जवळपास २ हजार ९७९ हरकती प्राप्त झाल्या आहेत.
दिवसभर नागरिक मतदार यादी वर हरकती नोंदवित होते. हरकतीच्या नोंदी अभिलेख्यावर करून त्याचे प्रभाग निहाय वर्गीकरण करण्यासाठी पालिका प्रशासनाला रात्री उशिरापर्यंत वर्गीकरणाचे काम  सुरू होते.


एकंदरीत दहा प्रभागातून २० नगरसेवक निवडले जाणार असून त्या करीता एकंदरीत १८ हजार३४१ इतके मतदार हे मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
नागरिकांच्या बहुतांश हरकती ह्या रहिवास एका ठिकाणी व मतदार यादीत नाव भलत्याच ठिकाणी अशा स्वरूपाच्या आहेत.
बहुतांश तक्रारी या मुस्लिम बहुलक प्रभाग क्रमांक 6 व 7 या ठिकाणच्या असून सर्वात कमी तक्रारी या प्रभाग 1 व 2 मध्ये आहेत.

 मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार  

हरकती मोठ्या प्रमाणात असल्या तरी त्यात खूप मोठी तफावत नाही. मतदार संख्या बरोबर आहे. बहुतांश मतदारांना त्यांच्या सोयीनुसारच्या प्रभागात नाव हवे आहे.तक्रारदाराच्या तक्रारी व त्यांचे पत्ते व निवास याची छाननी करूनच आवश्यक तो बदल केला जाईल.असे कुंभार  यांनी  सांगितले.

 आक्षेप घेण्यामध्ये दुबार नोंदणी, मतदार रहात असलेला प्रभाग वेगळा तर यादी मधील नाव दुसऱ्या प्रभागात येणे आदी कारणांमुळे आक्षेप नोंदवले गेले. हक्काचे मतदार दुसऱ्याच प्रभागात गेल्यामुळे अनेक इच्छुकांची मोठी दमछाक होताना  अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवशी पर्यंत दिसून आले. तर नागरिक  याप्रकरणी संताप व्यक्त करताना  दिसुन  आले.

अक्षेप नोंदवल्यानंतर अर्ज 'अ' साठी नगरपालिकेकडून स्थळ पाहणी व निर्णय तर अर्ज 'ब' साठी मात्र नोटीस, चौकशी व उपजिल्हाधिकारी किंवा तत्सम अधिकाऱ्यासमोर सुनावणी आदी प्रक्रिया राबवून अंतिम मतदार यादी तयार करण्यात येणार आहे. ही सुनावणी जिल्ह्याच्या ठिकाणी होण्याची शक्यता आहे.


Labels:

Saturday, 18 October 2025

शिवसैनिक रविंद्र दबडे खुदावाडी पंचायत समिती गणनातून (महाविकास आघाडी) निवडणुकीसाठी इच्छुक

शिवसैनिक रविंद्र  दबडे  खुदावाडी पंचायत समिती गणातून (महाविकास आघाडी) निवडणुकीसाठी इच्छुक 

नळदुर्ग,दि.१४:

तुळजापूर तालुक्यातील मौजे लोहगाव येथील ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सौ लोचना रविंद्र दबडे यांचे पती तथा लोहगाव शिवसेना (उबाठा गटाचे) शाखाप्रमुख  रविंद्र अशोक दबडे हे नंदगाव गटातील खुदावाडी पंचायत समिती गणातून निवडणुकीसाठी इच्छुक आहेत.

रविंद्र दबडे हे धाराशिवचे खासदार  ओमराजे निंबाळकर , आमदार  कैलास  पाटील यांचे कट्टर  सर्मथक शिवसैनिक आहेत. ते तुळजापूर तालुक्यातील नंदगाव गटातंर्गत येणाऱ्या खुदावाडी पंचायत समिती गणातून ( उबाठाकडून) महाविकास आघाडीकडून इच्छुक आहेत. गेल्या पाच वर्षात सरपंच असताना 225 कुटुंबांना उज्वला अंतर्गत मोफत गॅस, 300 कुटुंबांना घरकुले मंजूर करून दिले, गावातील पाण्याची सुविधा, सिमेंट काँक्रेट रस्ते, शेतकऱ्यांच्या पगारी असे अनेक कामे त्यांनी केले आहे. पंचायत समिती गणात खुदावाडी, लोहगाव, दहिटणा, वागदरी, गुजनूर,येडोळा, रामतीर्थ आदी गावाचा समावेश आहे. 

Labels:

प्रधानमंत्री स्वनिधी अंतर्गत 30 लाभार्थ्यांना हजाराचे कर्ज वाटप

प्रधानमंत्री स्वनिधी अंतर्गत 30 लाभार्थ्यांना  हजाराचे कर्ज वाटप

नळदुर्ग,दि.१८:

 दि .१७ ऑक्टोंबर रोजी नगरपरिषद नळदुर्ग व स्टेट बँक ऑफ इंडिया आणि श्री समर्थ बहुउद्देशीय संस्था नळदुर्ग यांचे संयुक्त विद्यमाने पीएम स्वनिधी अंतर्गत कॅम आयोजित करण्यात आले. त्यामध्ये पात्र लाभार्थ्यांना कर्ज वाटप करण्यात आले. 

त्याचबरोबर अपात्र लाभार्थ्यांच्या त्रुटीची पूर्तता कारुन घेण्यात आले. सदर कॅम्पला माजी नगरसेवक बसवराज धरणे, माजी नगरसेविका सुनंदा जाधव, बँकेचे व्यवस्थापक घोडके, लोण विभागाचे  शिवम बराटे, नगर परिषदचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुरज गायकवाड तसेच बँकेचे अधिकारी कर्मचारी व लाभार्थी उपस्थित होते.
 लहान, लहान स्थिर व फिरता व्यवसाय करणाऱ्या लाभार्थ्यांना किंवा पथ विक्रेते यांना 15 हजार 25 हजार व 50 हजाराचे कर्ज घेऊन व्यवसाय उभा करण्यासाठी सहाय्य या योजनेचा लाभ घेण्याचे  नागरिकांना आवाहन करण्यात आले.

Labels:

Thursday, 16 October 2025

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्तांना प्रशासनाकडून धनादेश वाटप

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्तांना प्रशासनाकडून धनादेश वाटप 

मुरुम,दि.१६:

तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे घरांची पडझड व दुकानात पाणी शिरल्याने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते. नुकसानग्रस्तांना भाजपाचे युवा नेते शरण बसवराज पाटील, उपविभागीय अधिकारी दत्तात्रय शेवाळे व तहसीलदार गोविंद येरमे यांच्या हस्ते शासनाच्या वतीने आर्थिक मदतीचे धनादेश देण्यात आले.

उमरगा तालुक्यात सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे अनेकांच्या घरात पाणी गेले घर कोसळले. कपड्याचे शोरुम, किराणा दुकान आदी दुकानात पाणी शिरल्याने खूप नुकसान झाले तात्काळ पंचनामे करून अतिवृष्टीमुळे नुकसान झाले अशा कदेर, गुंजोटी, दाळिंब, येणेगूर, बेळंब व मुरूम आदी गावातील नुकसानग्रस्तांना उमरगा जनता बँकेचे चेअरमन शरण बसवराज पाटील, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे व उमरगा तहसीलदार गोविंद येरमे यांच्या हस्ते शासनाची मदत स्वरूपात धनादेश वाटप करण्यात आले. 

यावेळी उमरगा पंचायत समितीचे माजी सभापती मदन पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रफिक तांबोळी, डाॅ. विक्रम जिवनगे, रविंद्र ढंगे, योगेश राठोड, महालिंग बाबशेट्टी, गौस शेख, अमर भोसगे, बाबा शिकलगर, सुजित शेळके, महानंद कलशेट्टी, भाजप मुरुम मंडळ अध्यक्ष गणेश अंबर, सचिव राजु मुल्ला, मुरूमचे माजी उपनगराध्यक्ष श्रीकांत बेंडकाळे, श्रीराम राठोड, गुंजोटीचे माजी सरपंच शंकरराव पाटील, साधू गायकवाड, कदेर सरपंच सतिश जाधव, सुधिर चव्हाण, पंकज बनसोडे, धनराज जाधव, सिद्राम देशमुख, सुनिल पाटील, मनोज गुरव, महेश पाटील,  पिंटू साखरे, तम्मा शेटगार, बाळू चौधरी, लिंबराज पाटील, योगेश पाटील, रवि देशमुख, सरपंच परशुराम देवकते, इक्बाल पटेल, सादिक चाकूरे, अब्दुल गुत्तेदार, अप्पू गुंजोटे, विजय सोनकटाळे, धनराज पाटील, दत्ता बिराजदार, शेषेराव पाटील, सैफन चौधरी, गणेश पाटील, मुस्तफा कागदी, सचिन नागोबा, चाँद गवंडी  आदीसह शेतकरी  उपस्थित होते.

Labels:

पदवीधर मतदार नोंदणी अभियानात सक्रिय सहभागाचे भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांचे आवाहन

पदवीधर मतदार नोंदणी अभियानात सक्रिय सहभागाचे  भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांचे आवाहन 

धाराशिव,दि.१६:

 आगामी होणा-या  मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या तयारीसाठी पदवीधर मतदार नोंदणी अभियानास सुरुवात झाली आहे. या अभियानाद्वारे धाराशिव जिल्ह्यातील सुशिक्षित वर्गाने लोकशाही प्रक्रियेत सहभाग नोंदवून राज्याच्या धोरण निर्मितीत आपला थेट वाटा उचलावा, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी केले आहे. 

निवडणूक आयोगाने सन २०२६ मध्ये होणाऱ्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला आहे. या अनुषंगाने १ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत नोंदणी प्रक्रिया पार पडणार आहे. धाराशिव जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी व हिंगोली या आठ जिल्ह्यांतील १ नोव्हेंबर २०२२ पूर्वी पदवी प्राप्त केलेले नागरिक नोंदणीस पात्र आहेत. धाराशिव भाजपच्या वतीने जिल्ह्यात, महाविद्यालयांत जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचे मार्गदर्शन आमदार राणाजगजीतसिंह पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर तसेच मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे मतदार प्रमुख आमदार संजय केनेकर व मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे करत आहेत. जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, युवक मोर्चा व महिला आघाडी पदाधिकारी एकत्रितपणे या अभियानात कार्यरत आहेत. नोंदणी प्रक्रिया संबंधित तहसील कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन पूर्ण करता येते. त्यासाठी पदवी प्रमाणपत्र, ओळखपत्र, आणि निवास दाखला सादर करावा लागतो. जिल्ह्यातील शासकीय यंत्रणा आवश्यक सहकार्य करत असून, धाराशिव येथील भाजप जिल्हा कार्यालय प्रतिष्ठान भवन येथे मदत व मार्गदर्शन केंद्र उपलब्ध करण्यात आल्याचे सांगितले.

Labels:

नळदुर्ग शहरातुन संचलन; पथसंचलनातून संघ साधना अन राष्ट्रभक्तीची प्रेरणा


नळदुर्ग  शहरातुन संचलन; पथसंचलनातून संघ साधना अन राष्ट्रभक्तीची प्रेरणा

नळदुर्ग,दि.१६:

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल  ऐतिहासिक शताब्दी निमित्त नळदुर्ग शहरातुन बुधवार दि.१५  ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ५ वाजता  स्वयंसेवकांचे शिस्तबध्द पथसंचलन पार पडले. या संचलनाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघशक्तीचे दर्शन झाले.

पथसंचलनातून शंभर वर्षांची लॉट, संघसाधना व राष्ट्रभक्तीची प्रेरणा नागरिकांनी अनुभवली. स्वयंसेवकांनी शिस्तबध्द पध्दतीने नळदुर्ग शहरातील बालाघाट कॉलेज येथुन व्यासनगर, बसस्थानक, शास्त्री चौक, जय भवानी चौक, सावरकर, चौक, गवळी गल्ली, मराठा गल्ली, ऐतिहासिक किल्ला गेट, चावडी चौक मार्गे श्री अंबाबाई मंदिर सभागृह येथे संचलनाची सांगता करण्यात आली यावेळी विजयादशमीचा उत्सव झाला.

 

शहरातील विविध मार्गावरून संघाची शिस्त, एकजूट, राष्ट्रनिष्ठा याचे दर्शन या संचलनाच्या माध्यमातून नागरिकांना घडले. मध्यभागी  ध्वजरक्षक स्वयंसेवकांसह मध्यभागी भगवा ध्वज त्यापुढे व पाठीमागे स्वयंसेवक होते.

शताब्दीनिमित्त संचलनाद्वारे सामाजिक बांधिलकी व मूल्यांचा प्रसार देशातील शेवटच्या घटकांपर्यंत करण्यास सुरुवात झाली आहे. यातून सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संरक्षण, स्वबोध आणि नागरी शिष्टाचार या पंचसूत्रीबाबत आगामी काळात कर्तव्य करण्याचा संदेश देण्यात आला. प्रत्येक स्वयंसेवकाने आपापल्या क्षेत्रात सक्रिय राहून समाज परिवर्तनाचे काम करावे, हा या संचलनाचा मुख्य संदेश  वक्त्यांनी  मांडला


 संघ स्थापनेच्या शताब्दीनिमित्त पंचसूत्री कार्यक्रमांची सुरुवात या संचलनापासून झाली. खाकी पॅन्ट आणि पांढरा शर्ट या गणवेशातील स्वयंसेवकांनी संचलनात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. 

 या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून  हभप शिवाजी चव्हाण, प्रमुख वक्ते म्हणून धाराशिव जिल्हा संघचालक अँड रविंद्र कदम यांनी सहभाग घेतला. तसेच यावेळी शस्त्र पूजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचा समारोप श्री  अंबाबाई  मंदिर सभागृह येथे झाले. प्रारंभी तुळजापूर तालुका कार्यवाह  ऑड. धनंजय धरणे यांनी  प्रास्ताविक केले.

Labels:

Tuesday, 14 October 2025

नळदुर्ग : नगरपरिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी इच्छुकांची भाऊ गर्दी ; बसवराज धरणे यांच्या समाज कार्याविषयी नागरिकात रंगली जोरदार चर्चा


 नळदुर्ग : नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी इच्छुकांची  भाऊ गर्दी  ;    बसवराज धरणे यांच्या समाज कार्याविषयी नागरिकात रंगली जोरदार चर्चा  

नळदुर्ग, दि.१४ : शिवाजी नाईक 

नळदुर्ग नगरपरिषदेच्या आगामी होणा-या निवडणुकीसाठी राजकीय हालचालीना  वेग आला आहे. येथिल  अध्यक्षपद हे सर्वसाधारण असल्याने माजी नगरसेवक तथा भाजपचे बसवराज धरणे यांच्या उमेदवारीबाबत नागरिकात  चर्चेला उधाण आले आहे.

 बसवराज धरणे हे सामाजिक कार्य, रुग्णसेवा आणि जनसंपर्क यामध्ये नेहमीच पुढाकार घेताना दिसुन येतात. नागरिकांशी   संवाद साधत ते समाजातील विविध घटकांशी  जोडले गेले आहे. त्यांच्या कार्यशैलीमुळे   सर्वधर्मियात  प्रभावी युवक नेतृत्व  म्हणून बसवराज धरणे हे  आलीकडे उदयास आल्याचे सर्वश्रुत आहे.  

सन २०१० मध्ये  काँग्रेस पक्षाने त्यांच्या कार्याची दखल घेत शहर युवक अध्यक्ष पदांची जबाबदारी दिली. त्यांनी  युवकासाठी प्रभावीपणे सक्रिय  काम केले. त्यानंतर मागील २०१६ मध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीत बसवराज धरणे हे प्रभाग क्रमांक ४ मधुन निवडणुक लढवुन भरघोस मतांनी विजयी झाले. नगरसेवक म्हणून  त्यांनी विकास कामाबरोबरच सामाजिक उपक्रमांवर अधिक भर दिला.

२०२४ मध्ये लोकसभा  निवडणुकीत  तुळजापूर तालुक्याचे युवक नेते  सुनील चव्हाण यांच्यासमवेत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केले. भारतीय जनता पार्टीच्या नळदुर्ग मंडल अध्यक्षपदी निवड करण्यात आली . आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विकास कामाला गती देण्याचे काम केले. आगामी नळदुर्ग नगरपरिषद निवडणुकीत भाजपकडून   बसवराज धरणे यांना उमेदवारी मिळणार याबाबत  राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.

होणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण पुरुषासाठी  सुटल्याने  अनेक मातब्बराचे ( माजी नगराध्यक्ष मुस्ताक कुरेशी, शहबाज काझी, नय्यर जहागिरदार, निखिल घोडके, ज्ञानेश्वर घोडके इत्यादीसह अनेक जण ) नाव याठिकाणी पुढे येत आहे. पण गेल्या काही वर्षांपासून  आपल्या नेतृत्व व कर्तुत्वाने एक वेगळी ओळख निर्माण करणारे  बसवराज  धरणे यांच्या मागील कार्याविषयी सध्या शहरात जोरदार चर्चा  होत आहे.

 धरणे यांनी अनेक सामाजिक उपक्रमातुन वेगवेगळ्या माध्यमातून नळदुर्गची सेवा केल्याने युवकात त्यांची लोकप्रियता आहे.
 रक्तदान शिबिरच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले तर  कोरोना काळात किराणा किट वाटप,  उपजिल्हा रुग्णालयात गादी वाटप, दिर्घकाळ गोशाळेतील गाईंसाठी चारा दिले.हे सर्व  त्यांनी स्वखर्चाने केले आहेत. तसेच अनेक गरजूंना त्यांनी सर्वतोपरी मदतही केल्याचे सर्वश्रुत आहे.
---------
नळदुर्ग नगरपरिषद अध्यक्षपद खुल्‍या प्रवर्गासाठी  दुसऱ्यांदा आरक्षित झाले आहे.
​या निवडणुकीत १० प्रभागातुन  नगरपरिषद अध्यक्षपदासह २० नगरसेवक निवडले जाणार आहेत.​यासाठी एकूण १८ हजार ३४१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.मात्र अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर मतदान वाढणार आहे.

Labels: