Saturday, 28 February 2026

बोरमन तांडा येथे संत सेवालाल महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

बोरमन तांडा येथे संत सेवालाल महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी 

जळकोट,दि.२८:

तुळजापूर तालुक्यातील बोरमन तांडा येथे संत सेवालाल महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

सर्व प्रथम जळकोट येथील वसंतराव नाईक चौकात संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन ढोल ताशांच्या गजरात भव्य अशी मिरवणूक जळकोट ते बोरमन तांडा पर्यंत काढण्यात आली. येथील शिवाजी चौकात मिरवणूक आल्यानंतर  संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आषारुढ पुतळ्यास जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आशिष सोनटक्के, श्रीनिवास पाटील, शिवजन्मोत्स मंडळाचे विठू कदम,शकंर वाडीकर,जितू पाटील, संतोष वाघमारे, संजय अंगुले, सुनील माने,अरुण लोखंडे, महेश कदम,कृष्णात मोरे, व्यंकट बारदाने, नागराज जाधव यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले.
यावेळी पारंपरिक वेशभूषात बंजारा महिलांनी व युवकांनी बंजारा गीतावर जयघोष करत नृत्य सादर केले.

यावेळी ,राजु चव्हाण, मोहन राठोड,अनिल राठोड, तानाजी चव्हाण,राजु भिका राठोड, भिमराव राठोड वसंत चव्हाण प्रदिप राठोड,राजु राठोड,बंडू चव्हाण, महादेव राठोड, नंदकुमार चव्हाण,आर.बी. टेलर, सुर्यकांत राठोड,आकाश राठोड,लहू चव्हाण यांच्या सह महिला,पुरुष,युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Labels:

तुळजापूर तालुक्यातील आलियाबाद गावास गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदेवे यांनी भेट देत घेतली माहिती जाणून

तुळजापूर तालुक्यातील आलियाबाद गावास गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदेवे यांनी भेट देत घेतली माहिती जाणून 

जळकोट,दि.२८:

तुळजापूर तालुक्यातील आलियाबाद येथे गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदेवे यांनी भेट देऊन मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत चालू असलेल्या कामाची पाहणी केली.


ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्था प्रामुख्याने काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना तिच्या कामगिरीनुसार प्रोत्साहित करुन तिची कार्यक्षमता वाढविण्याकरिता शासनाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबवित‌ आहे.आलियाबाद ग्रामपंचायत या अभियानात सहभागी असल्यामुळे आज तुळजापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदेवे, विस्तार अधिकारी ए.सी.कावळे यांनी भेट देऊन पाहणी केली व काही सुचना केल्या.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश चव्हाण, सरपंच सुर्यकांत चव्हाण, उपसरपंच अमृता चव्हाण,माजी नायब तहसीलदार माणिकराव चव्हाण, तंटामुक्ती अध्यक्ष विनायक चव्हाण, पोलीस पाटील शिवाजी चव्हाण, माजी उपसरपंच सुभाष नाईक, माणिक राठोड,शिवाजी चव्हाण, व्यंकट राठोड,हरीदास राठोड, सुभाष चव्हाण, राजाराम पवार, संदीप राठोड, ग्रामसेवक अविनाश खुटेंगावे यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.

Labels:

रोटरी क्लब मुरूम तर्फे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी शिक्षकांचा सन्मान

रोटरी क्लब मुरूम तर्फे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी शिक्षकांचा सन्मान

मुरूम,दि.२८:
 

 मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब मुरूम यांच्या वतीने मुरूम शहरातील मराठी विषयाच्या शिक्षकांचा यथोचित सत्कार करण्यात आला. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि अध्यापन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करून भाषेप्रती आदर व्यक्त करण्यात आला.

या कार्यक्रमात प्रतिभा निकेतन विद्यालय, मुरूमचे प्राचार्य उल्हास घुरघुरे, प्रतिभा निकेतन उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्रा. सतीश रामपुरे, प्रतिभा निकेतन विद्यालयाचे कांबळे सर तसेच कला व वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील मराठी विषयाचे प्रा. प्रसाद इंगोले यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब मुरूमचे अध्यक्ष प्रा. डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी होते, तर प्रमुख अतिथी म्हणून क्लबचे सचिव कल्लप्पा पाटील उपस्थित होते.

प्रास्ताविक करताना सुनील राठोड यांनी रोटरी क्लब ही सामाजिक बांधिलकी जपणारी संस्था असल्याचे सांगितले. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी शिक्षकांचा सन्मान व्हावा, त्यांच्या कार्याचे कौतुक व्हावे आणि त्यांनी मराठी भाषेवर केलेल्या प्रेमाची दखल घेतली जावी, या हेतूने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सत्काराला उत्तर देताना प्रा. सतीश रामपुरे यांनी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यामागील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित केले. मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून संस्कृती, परंपरा आणि अस्मितेची ओळख असल्याचे त्यांनी नमूद केले. त्याचबरोबर प्राचार्य उल्हास घुरघुरे यांनीही मराठी भाषेच्या जतनासाठी शिक्षकांनी सतत प्रयत्नशील राहण्याची गरज व्यक्त केली.

अध्यक्षीय समारोपात प्रा. डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी यांनी “मराठी शिक्षकांचा सत्कार म्हणजे प्रत्यक्षात मराठी भाषेचाच सत्कार होय,” असे प्रतिपादन केले. शिक्षकांच्या कार्यामुळेच भाषेची परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचते, असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष कांबळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सचिव कल्लप्पा पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भूषण पातळे, सुनील राठोड, मल्लिकार्जुन बदोले, कलया स्वामी आणि प्रकाश रोडगे यांनी परिश्रम घेतले.
मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमामुळे शिक्षकांचा उत्साह द्विगुणित झाला असून उपस्थितांनी कार्यक्रमाचे कौतुक केले.

Labels:

नळदुर्ग: बालाघाट महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा

नळदुर्ग: बालाघाट महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा

नळदुर्ग,दि.२८:

 येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुभाष राठोड  तर प्रमुख पाहुणे म्हणून कवी डॉ अरविंद हंगरगेकर व कवी डॉ. हुजरे सर उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात जेष्ट कवी  वि. वा. शिरवाडकर (कवी कुसुमाग्रज ) यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. 

या प्रसंगी कवी हंगरगेकर व कवी हुजरे यांनी कविता सादर करून मराठी भाषा ही किती समृद्ध आहे याची जाणीव करून दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ दयानंद भोवाळ यांनी केले. या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयातील डॉ. दयानंद भोवाळ, डॉ.जयश्री घोडके डॉ. दादासाहेब जाधव, प्रा.बाळू दराडे डॉ. संतोष पवार यांनी कविता सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. या कार्यक्रमास कार्यालय अधिक्षक धनंजय पाटील, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ अशोक कदम नॅक समन्वयक डॉ. शिवाजी घोडके,गणित विभाग प्रमुख डॉ एन. बी. जाधव, मराठी विभागाचे डॉ. लक्ष्मण थिटे,प्रा. काळे, प्रा. कु.जाधव यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ लक्ष्मण थिटे यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ संतोष पवार यांनी मानले.

Labels:

प्रतिभा निकेतन विद्यालय मुरूम येथे राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

प्रतिभा निकेतन विद्यालय मुरूम येथे राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा 

मुरुम,दि.२८:

प्रतिभा निकेतन विद्यालय मुरूम येथे राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रयोगशाळेचे उद्घघाटन व सी व्ही रामन यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य उल्हास घुरघुरेसर  व  शाळू  यांच्या हस्ते करण्यात आले.

 यावेळी उपमुख्याध्यापक कोंढारे  पर्यवेक्षक परसाळगे , महामुनी, राठोड , शिवशरण तांबडे , चंद्रशेखर कोराळे , संतोष बिंदगे , चव्हाण , स्वामी , प्रशांत मुरूमकर , कु.अनिशा फुगटे  कु.आरती कोराळे , सौ.सपाटे , सर्व विज्ञान शिक्षक उपस्थित होते.दि.२८ फेब्रुवारी हा भारतात दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन  म्हणून साजरा केला जातो. १९२८ मध्ये सर सी.व्ही. रमण यांनी 'रामन इफेक्ट' या महत्त्वपूर्ण शोधाची घोषणा केली होती ज्यासाठी त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला. या दिवशी देशभरात वैज्ञानिक जागृती आणि संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. याचाच एक भाग म्हणून प्रतिभा निकेतन विद्यालय मुरूमच्या विद्यार्थी व विद्यार्थिनीनी वेगवेगळे विज्ञान प्रयोग सादर केले. यामध्ये सहावीच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला. श्रेया बालाजी भोसले,समीक्षा संजय शेळके,आस्था अशोक गोडबोले, अर्निया विजयकुमार शेळके, अरशिया पटेल ,बुशरा  शेख, मीरा मुळे,धनश्री राठोड, संस्कृती टेकाळे,सुकृती मुदकन्ना, शुभ्रा मुदकन्ना,
  समृद्धी खुणे, मेघना कटारे, काव्या फिरंगे, तन्वी चव्हाण, श्रावणी वाकळे, समीक्षा शेळके,श्रद्धा येवले,धनश्री राठोड, साक्षी मुदकन्ना, अनन्या महिंद्रकर, रोहन धुमाळ,अथर्व कोरे,शशिकांत भोसले,सम्यक सुतके,महेश चिलोबा,प्रणव वाघ, श्लोक झुरळे,सोमनाथ सुरवसे, मयंक  मिणीयार, प्रशांत शेंडगे, रितेश दुर्गे,अब्दुल मकानदार, आरुष भोसगे,युवराज वाकळे, गणेश खुणे,कपिल हिरेमठ,प्रथमेश जिडगे या विद्यार्थ्यांनी भाग घेतला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कु. अनिशा  फुगटे मॅडम श्रीमती स्वामी मॅडम,कोराळे मॅडम यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन कु,आस्था अशोक गोडबोले यांनी केले आभार श्रेया बालाजी भोसले यांनी मानले.

Labels:

नळदुर्ग: करा विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

नळदुर्ग: करा विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

नळदुर्ग,दि.२८: डॉ. दिपक जगदाळे 

 येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात शनिवार दि.२८ फेब्रुवारी रोजी नोबेल पुरस्कार विजेते चंद्रशेखर व्यंकट रमण ( सि. व्हि. रमण ) यांचा सन्मान दिवस म्हणून आज राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुभाष राठोड हे होते. या कार्यक्रमाची सुरुवात सि. व्ही. रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुभाष राठोड उपप्राचार्य डॉ अशोक कदम डॉ. हंसराज जाधव, डॉ. समीर पाटील, डॉ. एन. बी. जाधव, डॉ. शिवाजी घोडके, डॉ उद्धव भाले, डॉ. रोहिणी महिंद्रकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. 

या वेळी प्राचार्य डॉ सुभाष राठोड, उपप्राचार्य डॉ अशोक कदम , डॉ रोहिणी महिंद्रकर, प्रा. धनंजय चौधरी,प्रा. बाळू दराडे यांनी विज्ञानाची महती आपल्या मनोगतातून व्यक्त केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ संतोष पवार यांनी केले तर आभार डॉ एन. बी. जाधव यांनी मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Friday, 27 February 2026

नळदुर्ग शहरातील सय्यद हसन -हुसैन जुळी भावंडाचा पहिला रोजा संपन्न

नळदुर्ग शहरातील सय्यद हसन -हुसैन जुळी भावंडाचा पहिला रोजा संपन्न 

नळदुर्ग,दि.२७:

 मुस्लिम धर्मियाचा पवित्र रमजान महिना सुरू झाला आहे. मुस्लिम धर्मात रमजान हा महीना पविञ मानला जातो. या महिन्यात  रोजे (उपवास) करतात. लहानापासुन ते मोठ्यापर्यत या महिन्यात मुस्लिम बांधव रोजे धरत असतात.

नळदुर्ग शहरातील दोन जुळी भावंडे व एक बहीण अश्या तिन्ही चिमुकल्यानी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा रखरखत्या उन्हातही दिवसभर अन्नाचा एकही कण व पाण्याचा एकही थेंब न घेता काटेकोरपणे यशस्वी पुर्ण केला. शहरातील प्रतिष्ठित नागरिक  अँड सय्यद कैसरअली जाहगीरदार यांची दोन जुळी मुले हसन अली (वय ५) व हुसैन अली(५) व त्यांची बहीण तोयबा (वय ७) यांनी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा पूर्ण केल्याने त्यांचे
सर्वत्र अभिनंदन होत आहे.यावेळी  सर्व लोकांच्या सुख- समृद्धी, शांतीसाठी चिमुकल्यानी  प्रार्थना केली.

Labels:

नळदुर्ग नगरपालिका अंदाजपत्रकावरुनविरोधक जाणून बुजून जनतेत गैरसमज निर्माण करत आहेत - नगराध्यक्ष बसवराज धरणे

नळदुर्ग नगरपालिका अंदाजपत्रकावरुन
विरोधक जाणून बुजून जनतेत गैरसमज निर्माण करत आहेत - नगराध्यक्ष बसवराज धरणे 

नळदुर्ग,दि.२७ :

नळदुर्ग नगरपालिकेच्या अंदाज पत्रकावर विरोधकानी कसलाच अभ्यास न करता फक्त जनतेत गैरसमज निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याचे नगराध्यक्ष बसवराज धरणे यांनी सांगितले.

गुरुवार दि.२६ फेब्रुवारी रोजी नळदुर्ग  नगरपालिकेचा सन २०२६ -२०२७ चा  अंदाजपत्रक सादर  नगराध्यक्ष बसवराज धरणे यांच्या अध्यक्षतेखाली अर्थिक अंदाजपत्रक सादर करण्यात आले . यावेळी  या  अंदाजपत्रकास काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी जोरदार आक्षेप नोंदवत सदरील अंदाजपत्रक स्थायी समितीत  न मांडता ते थेट सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आल्याचा आरोप करत नियमबाह्य मंजूर करण्यात आलेले अंदाजपत्रक रद्द करावे व
कायद्यानुसार योग्य प्रक्रिया राबवून नव्याने अंदाजपत्रक सादर करावे, अशी मागणी केली.


 याप्रकरणी नगराध्यक्ष बसवराज धरणे यांनी सांगितले की,  सदरील अंदाजपत्रकाबाबत पूर्ण अभ्यास न करता विरोधकांनी विरोधाला विरोध करणे हाच त्यांचा एककलमी कार्यक्रम असल्याचे वाटते. मुळात आर्थिक अंदाजपत्रक हे 15 डिसेंबर पूर्वी स्थायी समिती समोर सादर होणे गरजेचे असते. पण आपली स्थायी समिती त्यावेळेस अजून निर्माण झाली नव्हती. त्यामुळे स्थायी समितीने 31जानेवारीपूर्वी अंदाजपत्रक सादर न केल्यास नगराध्यक्ष विशेष अधिकाराचा वापर करुन आर्थिक अंदाजपत्रक सादर करता येते. म्हणून कोणताही बहुमताचा वापर न करता जे कायद्यात  बसेल, त्याप्रमाणे केले आहे.
म्हणून विरोधकांना माझी विनंती की सतत राजकारण करू नका.विकासाच्या मुदयावर बोला.जनतेत गैरसमज निर्माण करू नये.असेही सांगितले.


Labels:

नळदुर्ग नगरपालिकेचे सन२०२६ -२०२७ चा ३ लाख ६३ हजार ४२४ रुपयेचा शिल्लकी अंदाजपत्रक सादर

नळदुर्ग नगरपालिकेचे सन२०२६ -२०२७ चा  ३ लाख ६३ हजार ४२४ रुपयेचा शिल्लकी अंदाजपत्रक सादर 

नळदुर्ग,दि.२७:

नळदुर्ग  नगरपालिकेचा सन २०२६ -२०२७ चा एकूण ३ लाख ६३ हजार ४२४ रुपयेचा शिल्लकी अंदाजपत्रक सादर करण्यात आला असून सर्वानुमते हा आर्थिक अंदाजपत्रक मान्य करण्यात आला आहे. नगराध्यक्ष बसवराज धरणे यांच्या अध्यक्षतेखाली अर्थिकअंदाज पत्रक सादर करण्यासाठी गुरुवार दि.२६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते.

नगरपालिकेच्या सभागृहात गुरुवारी झालेल्या अर्थसंकल्पीय बैठकीत लेखापाल अंकुश माने यांनी सन २०२६-२७ चे अर्थिक अंदाजपत्रक वाचून दाखविले. यामध्ये तीन लाख त्रेसष्ठ हजार चारशे चोवीस रुपये शिल्लकीचे अंदाज पत्रक सभागृहात सादर करण्यात आले. यामध्ये दिव्यांग निधीकरीता पाच टक्के म्हणजे ५ लाख ५० हजारा रुपयेची तरतुद करण्यात आली असून महीला व बालकल्याण विकासासाठी पाच टक्के म्हणजे ५ लाख रुपयेची तरतुद करण्यात आली आहे. याशिवाय अर्थिक दुर्बल घटकासाठी पाच टक्क्यानुसार ५ लाखांची तरतुद करण्यात आली आहे. त्याचबरोबर खंडोबा यात्रा करीता विशेष अर्थीक ५ लाख रुपयेची तरतुद करण्यात आली आहे, तर शिक्षण आणि क्रिडा व सांस्कृतिक समीती करीता विशेष ६ लाखांची तरतुद करण्यात आली आहे. तर पाणी पुरवठा योजना अमृत ०.२ करीता खर्च तरतुद रक्कम १४ कोटी ६ लाख ५० हजार रुपये इतकी करण्यात आली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र सुवर्ण जयंती महानगरेत्थान अभियान जमा राज्यस्तर रुपये ५१ कोटी, रमाई आवास योजने करीता अनुदानीत जमा तरतुद रुपये १ कोटी रुपये, याशिवाय प्रधानमंत्री आवास योजने करीता जमा तरतुद ५ कोटी रुपयेची करण्यात आली आहे. महाराष्ट्र अग्नीशमन सुरक्षा अभियानाकरीता जिल्हा स्तरावरील ३० लाख, राज्य स्तरावरील १ कोटी रुपये आणि महापुरुषांचे पुतळा व स्मारकांची उभारणी, सुशोभीकरण करण्यासाठी २ लाख रुपयेची तरतुद करण्यात आली आहे.

 त्याचबरोबर नगरपालिकेकडून पुरविण्यात येणाऱ्या विविध सेवा करीता सेवा दर निश्चीत करण्यात आले, अशा प्रकारे प्रारंभीक शिल्लक ८ कोटी २२ लाख ५० हजार २०९ रुपये, एकूण महसुली जमा आठ कोटी एकोणसत्तर लाख पस्तीस हजार तर एकूण भांडवली जमा एक अब्ज अकारा कोटी एक्याएैशी लाख रुपये अशा प्रकारे एकूण जमा एक अब्ज अठ्ठावीस लाख बहाहत्तर हजार दोनशे नऊ रुपये आणि महसुली खर्च दहा कोटी चौदा लाख एकसष्ठ हजार पच्याऐंशी रुपये इतका अपेक्षीत आहे. तर भांडवली खर्च एक अब्ज आठरा कोटी चोपन्न लाख साठ हजार सातशे रुपये असा एकूण एक अब्ज आठठावीस कोटी एकोणसत्तर लाख एकेवीस हजार सातशे पंच्याएैंशी हजार रुपये खर्चाचा अंदाजपत्रक सादर करण्यात आला आहे . यामध्ये तीन लाख त्रेसष्ठ हजार चारशे चोवीस इतका शिल्लकीचा अंदाजपत्रक सादर करण्यात आला. दरम्यान यावेळी उपनगराध्यक्ष नय्यर जहागिरदार, भाजपचे गटनेते दत्तात्रय दासकर,काँग्रेसचे गटनेते मारुती खारवे यांच्यासह सभागृहात सर्वच नगरसेवक उपस्थित होते. सहाय्यक म्हणून कार्यालयीन अधिक्षक अजय काकडे यांनी काम पाहिले.

Labels:

नळदुर्ग नगरपालिकेचे अंदाजपत्रक रद्द करुनकायद्यानुसार योग्य प्रक्रिया राबवून नव्याने अंदाजपत्रक सादर करण्याची काँग्रेस गटाची मुख्याधिका-याकडे मागणी

नळदुर्ग नगरपालिकेचे अंदाजपत्रक रद्द करुन
कायद्यानुसार योग्य प्रक्रिया राबवून नव्याने अंदाजपत्रक सादर करण्याची काँग्रेस गटाची मुख्याधिका-याकडे मागणी 

नळदुर्ग, दि. २६ :

नळदुर्ग नगरपालिकेच्या सन २०२६-२०२७ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकास काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी जोरदार आक्षेप नोंदवत सदरील अंदाजपत्रक स्थायी समितीत  न मांडता ते थेट सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आल्याचा आरोप करुन योग्य त्या कायदेशीर प्रक्रिया राबविण्याची मागणी  निवेदनाद्वारे न.प. मुख्याधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे .

काँग्रेस गटाच्या नगरसेवकांनी  निवेदनात नमूद केले आहे की, २०२६-२७ या वर्षाचे अंदाजपत्रक कायद्यानुसार अपेक्षित प्रक्रियेप्रमाणे प्रथम स्थायी
समितीसमोर मांडणे आवश्यक होते. मात्र, ही प्रक्रिया न पाळता अंदाजपत्रक थेट सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आले, हे कायदेशीर तरतुदी व नियमानुसार नसल्याचा दावा करण्यात आला आहे. आर्थिक विषयांवर स्थायी समितीची पूर्व तपासणी अनिवार्य असताना ती टाळण्यात आल्यामुळे मंजुरी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून नियमबाह्य मंजूर करण्यात आलेले अंदाजपत्रक रद्द करावे व
कायद्यानुसार योग्य प्रक्रिया राबवून नव्याने अंदाजपत्रक सादर करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तसेच, आमचे म्हणणे न ऐकता अंदाजपत्रक बहुमताने मंजूर केल्यास त्या मंजुरीस आमचा विरोध असल्याची लेखी नोंद प्रोसेडिंगमध्ये घ्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

या निवेदनावर काँग्रेस पक्षाचे गटनेते मारुती खारवे, उपगटनेते आकाश कुलकर्णी, नगरसेवक इमाम शेख, सुधीर पोतदार नगरसेविका अपर्णा बेडगे, कमलबाई गायकवाड, मदिना बागवान, जुलेखांबेगम इनामदार , मुन्नाबी कुरेशी यांच्या सह्या आहेत.

Labels:

Thursday, 26 February 2026

शिव-बसव-राणा सार्वजनिक जन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी प्रमोद कुलकर्णी तर उपाध्यक्ष संदीप गायकवाड/ओंकार कदम

शिव-बसव-राणा सार्वजनिक जन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी प्रमोद कुलकर्णी तर उपाध्यक्ष संदीप गायकवाड/ओंकार कदम

उत्सवा दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन

नळदुर्ग,दि.२६:

 प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी शिव-बसव-राणा सार्वजनिक जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून समितीच्या अध्यक्षपदी प्रमोद कुलकर्णी तर उपाध्यक्ष संदीप गायकवाड, ओंकार कदम, कोषाध्यक्ष संतोष पुदाले सांस्कृतिक प्रमुख परमेश्वर जाधव,सल्लागार शरद बागल,सरदारसिंग ठाकूर,राजू वैद्य, मिरवणूक प्रमुख अमित शेंडगे, शाम कणकधर, प्रविण चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे.

 दि-04 मार्च रोजी लोकमान्य वाचनालय येथून दुपारी-04 वा."भव्य शोभा यात्रा (प्रमुख आकर्षण- तीनही महापुरुषांसारखी वेशभूषा धारण केलेले घोड्यावरील बाल,,शिव-बसव-राणा)" , शहरातील सर्व मान्यवर व हिंदू बांधव- माता-भगिनीं यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रतिमा स्थापना ,दि-06 मार्च रोजी "कृष्णाई उळेकर यांचा भव्य पोवाडा-भारूड-व लोकगीताचा कार्यक्रम"दि-07 मार्च रोजी "भव्य-दिव्य मिरवणूक (प्रमुख आकर्षण-महाकाल,,अघोरी नृत्य,शिवतांडव,भस्म आरती)होणार आहे. तरी सर्व कार्यक्रमास शहरातील नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Labels:

Wednesday, 25 February 2026

कमी खर्चात उत्पादन वाढविण्याकरितासकस धान्य निर्मितीसाठी माती परीक्षण आवश्यक - डॉ सतीश गावित

कमी खर्चात  उत्पादन वाढविण्याकरिता
सकस धान्य निर्मितीसाठी माती परीक्षण आवश्यक - डॉ सतीश गावित

मुरुम,दि.२५: डॉ सुधीर पंचगल्ले 

माती परीक्षण ही काळाची गरज असून शेतकऱ्यांना खर्च कमी करून उत्पादन वाढविण्यासाठी फायद्याचे आहे. यातून योग्य खताचा वापर करून सकस धान्य निर्मितीस चालना मिळेल.' असे प्रतिपादन  डॉ सतीश गावित यांनी केले. ते श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या व्हांतळ येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरातील दि. 24 फेब्रुवारी रोजी  बौद्धिक  सत्राच्या अध्यक्षीय समारोपात बोलत होते. 

याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून भूगोल विभाग प्रमुख डॉ धनराज इटले उपस्थित होते. त्यांनी माती परिक्षणासाठी मातीचा नमुना आणण्याची पद्धत सांगून शेतकऱ्यांना मोफत परिक्षणासाठी माती आणण्याचे आव्हान केले. यावेळी डॉ सूर्यकांत राठोड यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वंयसेवक सुशील सूर्यवंशी याने तर आभार अर्जुन जाधव याने मानले. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ बी ए शेळके, डॉ अनिल देशमुख, डॉ चंद्रसेन करे, डॉ समाधान पसरकळले, डॉ विठ्ठल ढोले, डॉ अतुल बिराजदार, शिबिरार्थी स्वयंसेवक, शेतकरी ग्रामस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Labels:

इतिहास प्रसिध्द नळदुर्गच्या भुईकोट किल्ल्याचे रुपडे पालटणार ; १४ कोटींचा विकास आराखडा तयार - आमदार राणाजगजितसिंह पाटील

इतिहास  प्रसिध्द नळदुर्गच्या  भुईकोट किल्ल्याचे रुपडे पालटणार ; १४ कोटींचा विकास आराखडा तयार - आमदार राणाजगजितसिंह पाटील


इतिहास  प्रसिध्द नळदुर्गच्या  भुईकोट किल्ल्याचे रुपडे पालटणार

१४ कोटींचा विकास आराखडा तयार : आमदार राणाजगजितसिंह पाटील

नळदुर्ग दि.२५ :

राज्यातील भौगोलिक दृष्ट्या सर्वात मोठा भुईकोट किल्ला अशी ख्याती असलेल्या व स्थापत्यशास्त्राचा अजोड नमुना समजल्या जाणाऱ्या नळदुर्ग किल्ल्याच्या जतन व संवर्धनासाठी तब्बल १४ कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत. या किल्ल्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि मूळ स्वरूपात दुरुस्ती करण्यासाठी सुमारे १० कोटी ८७ लाख रुपयांचा सविस्तर आराखडा तयार करण्यात आला आहे. तर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून चार कोटींची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
 पुरातत्व विभागाच्या वैभव संगोपन योजनेअंतर्गत केलेल्या विकास कामामुळे मागील काही वर्षांपासून नळदुर्ग किल्ल्याला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. पुढील काळात त्यात आणखी वाढ व्हावी आणि पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण व्हावे यासाठी नळदुर्ग किल्ल्याचा चौदा कोटी रुपयांचा सविस्तर विकास आराखडा तयार करण्यात आला असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.

पुणे येथील वास्तुविशारदांमार्फत तयार करण्यात आलेल्या या प्रस्तावात अनेक महत्त्वाच्या कामांचा समावेश आहे. त्यानुसार ऐतिहासिक वस्तूंच्या दुरुस्तीला प्राधान्य देण्यात आले आहे. किल्ल्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेला हत्तीखाना, कचेरी, मशीद, रंगमहाल आणि धान्य कोठाराचे जतन केले जाणार आहे. तसेच तटबंदीच्या भेगांचे ग्राऊटींग करून त्याचे मजबुतीकरण करण्यात येणार आहे. रणमंडल भागातील पडझड रोखणे आणि उपली बुरुजाचे मजबुतीकरण याचाही या आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. किल्ल्याच्या जतन आणि संवर्धनाबरोबरच पर्यटकांच्या सोयी सुविधांसाठीही या आराखड्यात विशेष तरतूद करण्यात आली आहे. बोटिंग परिसरात दगडी पायऱ्या, संपूर्ण किल्ल्यात दगडी पाथवे आणि दिशादर्शक फलक लावण्यात येणार आहेत. तसेच स्वच्छता व सौंदर्यिकरणावर विशेष लक्ष देण्यात आले आहे. किल्ल्याच्या भिंतींवरील झाडे-झुडपे काढणे आणि शास्त्रोक्त पद्धतीने उत्खनन करून हा अभिमानास्पद प्राचीन वारसा ठळकपणे पुन्हा एकदा जगासमोर मांडला जाणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.  तसेच यामुळे स्थानिक युवकांना हक्काचा रोजगार मिळणार आहे.

Labels:

आदर्श बागायतदार व उस्मानाबादी शेळीचे प्रचारक श्री व सौ.मनीषा गुंडू पवार या शेतकरी दाम्पत्यांचा जिल्हाधिकारी यांच्या हास्ते गौरव

आदर्श बागायतदार व उस्मानाबादी शेळीचे प्रचारक  श्री व सौ.मनीषा गुंडू पवार या शेतकरी दाम्पत्यांचा जिल्हाधिकारी यांच्या हास्ते गौरव 

नळदुर्ग, दि.२५ :

तुळजाभवानी कृषी महोत्सवात नळदुर्ग (आलियाबाद शिवार) येथिल आदर्श बागायतदार व उस्मानाबादी शेळीचे प्रचारक  गुंडू पवार व सौ.मनीषा गुंडू पवार या शेतकरी दाम्पत्यांचा जिल्हाधिकारी यांच्या हास्ते गौरव करण्यात आला.त्याबद्दल पवार दाम्पत्याचे सर्वत्र कौतुक करत अभिनंदन केले जात आहे.

महाराष्ट्र शासन कृषी विभाग आत्मा विभाग व महिला आर्थिक विकास महामंडळ आयोजित श्री तुळजाभवानी कृषी महोत्सव धाराशिव 2026 तुळजापूर या ठिकाणी जिल्ह्यातील सेंद्रिय पद्धतीने विषमुक्त शेती करीत असलेल्या नळदुर्ग आलियाबाद येथील आदर्श अंबा बागायतदार शेतकरी श्री गुंडू रंगराव पवार व मनिषा गुंडू पवार व उस्मानाबादी शेळीपालनाच्या माध्यमातून जिल्ह्यातील महिलांना व  तरुण शेतकरी वर्गांना रोजगार उपलब्ध करून दिल्याबद्दल आणि उस्मानाबादी शेळीचे नाव पूर्ण भारतभर नावलौकिक करून दिल्याबद्दल आदर्श बागायतदार व उस्मानाबादी शेळीचे प्रचारक म्हणून धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री कीर्ती किरण पुजारी यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

 यावेळी जिल्हा कृषी अधिकारी श्री राजकुमार तुकाराम मोरे, तालुका कृषी अधिकारी श्री सत्यजित देशमुख , जिल्हा परिषद सदस्य डॉ. जितेंद्र कानडे  , पंचायत समिती सदस्य भैय्या रोचकरी,  कृषी सहाय्यक श्री संतोष माने , इतर अधिकारी व लोक प्रतिनिधी उपस्थित होते.

Labels:

नळदुर्ग: झारीतल्या शुक्राचार्यांमुळे मटका, जुगार खुलेआम सुरू ! पोलिस प्रशासन संशयाच्या भोवऱ्यात?



झारीतल्या शुक्राचार्यांमुळे मटका, जुगार खुलेआम सुरू !

नळदुर्ग,दि.२५ :

झारीतल्या शुक्राचार्यांमुळे काळे धंदेवाल्यांना पुन्हा सुगीचे दिवस आले आहेत.नळदुर्ग शहरात मटका व्यवसाय पुन्हा तेजीत आला असून, पोलिसांच्या कारवाईचा धाक कमी झाल्याने 'ओपन-क्लोज'चा खेळ जोमात सुरू झाल्याची चर्चा नागरिकात  रंगली आहे .मिळालेल्या माहितीनुसार, शहरातच मटक्याचे कार्यालय सुरू करण्यात आले असून तेथून नळदुर्ग शहर व परिसरात एजंट नेमून मटका घेण्याचे काम जोमात सुरू आहे. 


नळदुर्ग शहरात वाढती बेरोजगारी, शहराच्या बाहेरून गेलेले दोन महामार्ग यामुळे व्यवसायावर होणारा विपरीत परिणाम, अविवाहित तरुणांचे झुंड या सगळ्या अडचणीचा पाढा वाचत असतानाच नळदुर्ग शहरावर एक नवीन संकट समोर येत आहे.  दोन नंबरवाले (मटका बुकी..)
झटपट पैसा कसा कमावायचे  यावर उपाय शोधणारे सुपीक डोकेबाज धुरंदर कामाला लागले आहेत. विविध अवैध धंदे सुरू करण्याचा सपाटा सुरु करत काहींनी "मटका बुकी" तर काहींनी जुगार अड्डा चालु केल्याची रसभरीत  चर्चा  ऐकावयास  मिळत आहे . 

 मात्र पोलिस प्रशासनही गप्प आहे.  मटका बुकींना रोखण्यासाठी पोलीस अधिक्षकांनाच कडक पावले उचलावी लागणार आहेत असे एकंदरीत वाटते. मात्र तोवर किती घराची राख रांगोळी होणार? मटका व्यवसाय अनेक कुटुंबांचे संसार उध्वस्त करणारा असल्याने शहरातून हा व्यवसाय हद्दपार करण्यासाठी कडक कारवाई होणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे मत आहे. मात्र काही स्थानिक मंडळींकडूनच हा व्यवसाय सुरू झाल्याने  याविषय शहरातील  नागरिकांत चर्चेला उधाण आले आहे. त्याचबरोबर पोलिस प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन नव्याने सुरू झालेली मटका बुकी बंद करून संबंधितांवर कारवाई करावी, अशीही मागणी नागरिकांतुन होत आहे.

Labels:

Tuesday, 24 February 2026

स्वच्छता हीच ईश्वर सेवा – डॉ पद्माकर पिटले

स्वच्छता हीच ईश्वर सेवा – डॉ पद्माकर पिटले

मुरुम,दि.२४:

अस्वच्छ परिसरामुळे नागरिक विविध आजाराला बळी पडतात. स्वच्छतमुळे मनुष्याला सुखकर निरोगी आयुष्य लाभते.  त्यामुळेच स्वच्छता हीच खरी ईश्वरसेवा आहे.’ असे प्रतिपादन उपप्राचार्य डॉ पद्माकर पिटले यांनी केले. 

येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने मौजे व्हांताळ येथील विशेष श्रमसंस्कार शिबिरात बोलत होते. शिबिरातील स्वंयसेवक ग्रामस्थांच्या वतीने सोमवार दि 23 फेब्रुवारी  रोजी संत गाडगे महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी डॉ वसंत हिस्सल तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ सूर्यकांत रेवते उपस्थित होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक डॉ सूर्यकांत रेवते यांनी इ कचरा ही अलीकडच्या काळातील मोठी समस्या  आहे असे सांगून त्याच्या व्यवस्थापनासंबंधी सखोल मार्गदर्शन केले.

 अध्यक्षीय समारोपात डॉ वसंत हिस्सल यांनी संत गाडगे महाराजांचे जीवनचरित्र सांगून समकालीन अर्थव्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ अनिल देशमुख, डॉ भरत शेळके, डॉ सूर्यकांत राठोड, डॉ अतुल बिराजदार, डॉ डॉ  राजेंद्र सूर्यवंशी,प्रा मनोज गायकवाड, शिबिरातील स्वंयसेवक विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक कार्यक्रमाधिकारी डॉ अनिल देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन निरंजन कटके यांनी तर कार्यक्रमाधिकारी डॉ भरत शेळके यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

Labels:

महिलेवर समाजकंटकांकडून भ्याड हल्ला; नळदुर्ग शहर सकल मराठा समाजाच्या वतीने जाहिर निषेध , दोषीवर कठोर कारवाईची मागणी

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविल्यावरून महिलेवर समाजकंटकांकडून भ्याड हल्ला; नळदुर्ग शहर सकल मराठा समाजाच्या वतीने जाहिर निषेध , दोषीवर कठोर कारवाईची मागणी 

 नळदुर्ग, दि.२४:

बुलढाणा जिल्ह्यातील चिखला काकड गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविल्यावरून मराठा भगिनी संजीवनी वाघ यांच्यावर  झालेल्या भ्याड हल्ल्याचा नळदुर्ग शहरातील सकल मराठा समाजाच्या वतीने 
जाहीर निषेध करत  दोर्षी समाजकंटकावर  कारवाई करण्याची मागणी नळदुर्ग पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

निवेदनात बुलढाणा जिल्ह्यातील चिखला काकड गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविल्यावरून झालेल्या भ्याड हल्ल्यात मराठा भगिनी संजीवनी वाघ यांना कपडे फाडून मारहाण करण्यात आली आहे, ही घटना संपूर्ण महाराष्ट्राला काळिमा फासणारी असून याचा  नळदुर्ग शहरातील सकल मराठा समाजाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात अशा काळिमा फासणाऱ्या घटना होत असतील तर यापेक्षा दुसरे दुर्दैव नाही, कारण छत्रपती शिरायांचा पुतळा बसविल्यावरून  कांहीं समाज कंटकानी हा भ्याड. हल्ला केला आहे, त्यामुळे शिवरायांच्या नावावर जगणाऱ्या सगळ्याच राजकीय पक्षांनी ही घटना गांभीर्याने पाहिली पाहिजे, मात्र ते होताना दिसत नाही, अशी खंत व्यक्त करत  आता आम्हाला रस्त्यावर उत्तरावे लागणार आहे, छत्रपतीच्या महाराष्ट्रात आज महिला सुरक्षित नाहीत, आम्हाला शिवरायांनी महिलेवर अत्याचार करणाऱ्या नराधमांचे हातपाय कलम करण्याचा इतिहास दिला असल्याचे सांगून  त्यांच्याच महाराष्ट्रात शिवरायांचा जन्मोत्सव साजरा करताना शिवरायांचा पुतळा उभा केला होता. त्या दरम्यान पुतळा बाजूला उभा करा म्हणून समाज कंटकानी महिलांवर भ्याड हल्ला करून महाराष्ट्र धर्माला कलंक लावला आहे, त्यामुळे यातील दोर्षीवर तात्काळ कारवाई करून कडक शासन करावे अशी मागणी  निवेदना‌द्वारे करण्यात आली आहे. 


या निवेदनावर संजय दशरथराव आधव , नगरसेवक तानाजी  जाधव, गोपीनाथ विश्वनाथ माने, भगवंत रामराव सुखसे , युवराज  जगताप, वैभव  पाटील , शिवाजी  सुरवसे,स्वप्नील  काळे, आकाश  काळे, गणेश  मोरडे,  संतोष रामचंद्र मुळे , संतोष  किल्लेदार,अभय गुरन्धक्षेत्र किल्लेदार,रतिकांत  नागणे, श्याम  शिंदे ,संदिप  गायकवाड ,नेताजी नामदेव मुळे, डॉ जितेंद्र  पाटील, मोतीराम जाधव, महादेव जगताप , बालाजी अरुण किल्लेदार, संदिप संतोष गायकवाड, श्याम राजेंद्र बागल आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


Labels:

Monday, 23 February 2026

नळदुर्ग: संत निरंकारी मिशन मार्फत स्वच्छ जल - स्वच्छ मन " अभियानांतर्गत मैलारपूर श्री खंडोबा मंदिर परिसर ,बोरी नदीची स्वच्छता

नळदुर्ग: संत निरंकारी मिशन मार्फत स्वच्छ जल - स्वच्छ मन " अभियानांतर्गत मैलारपूर श्री खंडोबा मंदिर परिसर ,बोरी नदीची स्वच्छता 

नळदुर्ग,दि.२३:

प्रोजेक्ट अमृत अंतर्गत स्वच्छ जल स्वच्छ मन अभियानांतर्गत नळदुर्ग येथिल मैलारपूरच्या खंडोबा मंदिर परिसर व बोरी नदीची स्वच्छता 
रविवार दि. 22 फेब्रुवारी रोजी जवळपास दोनशे जणांकडून करण्यात आली. या स्वच्छता मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

 सदगुरु माता सुदिक्षाजी महाराज व निरंकारी राजपिता रामितजी महाराज यांच्या पावन सानिध्यात युमुना छट घाट आय टीओ दिल्ली येथे शुभारंभ केला.
या परियोजना अंतर्गत संत निरंकारी मिशन सोलापूर झोन मधील ब्रँच नळदुर्ग येथील खंडोबा बानाई विवाह स्थळ यांच्या  पदस्पर्शशाने पावन झालेले खंडोबा मंदिर व बोरी नदी परिसर येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

संत निरंकारी मंडळाचे सचिव तथा समाज कल्याण विभागाचे प्रभारी जोगिदार सुखीजा जी यांनी या विषयी माहिती देताना सांगितले की, "स्वच्छ जल स्वच्छ मन" या आदर्श घोषवाक्यातून प्रेरणा घेऊन ही परियोजना भारतातील जवळपास 1600 पेक्षा अधिक ठिकाणी 27 राज्ये व केंद्र शाशीत प्रदेशातील 900 शहरात एकाच वेळी राबविण्यात आली. या अभियानाचा मुख्य उद्देश जलसाठे सुरक्षित ठेवण्याच्या विकल्पबाबत जणसामान्यांना जागृत करून येणाऱ्या भावी पिढ्याचे भवितव्ये स्वस्थ करणे हा आहे.

रविवारी झालेल्या स्वच्छता अभियानात शाखा नळदुर्गचे सर्व सेवादल व अणदूर, जळकोट ,नंदगाव , लोहगाव  मुर्टा, किलज, जेवळी, ईटकळ आदीसह नगरपरिषदेचे कर्मचारी,
परिसरातील 60 सेवादल, माता बहेनजी 120 जणांनी यामध्ये सहभागी झाले होते.

  नगराध्यक्ष बसवराज धरणे, नगरसेवक इमाम शेख, नळदुर्गचे सुपुत्र उदगीर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी,  अँड धनंजय धरणे, अँड लखन इंगोले , यांच्यासह नगरपरिषदेचे  कर्मचाऱ्यांनी  आपले योगदान दिले.  यावेळी सुनिल पिस्के यांनी  सर्वाचे आभार मानले.

Labels:

' प्रोजेक्ट अमृत ' स्वच्छ जल, स्वच्छ मन या संत निरंकारी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद...संत निरंकारी मिशनकडून स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न

' प्रोजेक्ट अमृत ' स्वच्छ जल, स्वच्छ मन या संत निरंकारी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद...
संत निरंकारी मिशनकडून स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न
 
मुरूम, ता. उमरगा, दि. २२ : 

येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेचा परिसर स्वच्छता व पर्यावरण जनजागृतीचा संदेश देत संत निरंकारी मिशनतर्फे शाखा मुरूम अंतर्गत स्वच्छता अभियान रविवारी (ता. २२) रोजी उत्साहात राबविण्यात आले. सद्गुरुमाता सुदिक्षाजी महाराज व निरंकारी राजपिता रमितजी यांच्या कृपाशीर्वादाने बाबा हरदेवसिंह महाराजांच्या ७२ व्या जन्मदिनाचे औचित्य साधून गुरु पूजा दिन साजरा करत अमृत प्रोजेक्ट : स्वच्छ जल, स्वच्छ मन या शीर्षकाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. 

या उपक्रमात मिशनचे सेवादल सदस्य, सादसंगत, स्थानिक नागरिक, युवक-युवती व लहान मुलांनीही सक्रिय सहभाग नोंदविला. अभियानादरम्यान परिसरातील झाडेझुडपे, मोकळ्या जागेत साचलेला घनकचरा गोळा करण्यात आला. स्वयंसेवकांनी हातमोजे व मास्कचा वापर करून सुरक्षिततेची काळजी घेत स्वच्छता केली. जमा केलेला कचरा योग्य प्रकारे विल्हेवाटीसाठी स्थानिक प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आला. 

या प्रसंगी उपस्थित रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष गोविंद पाटील, डॉ. नितीन डागा, डॉ. महेश मोटे, सचिव कलाप्पा पाटील, लक्ष्मण राठोड यांनी स्वच्छता ही केवळ एकदिवसीय मोहीम नसून ती प्रत्येकाची दैनंदिन जबाबदारी असल्याचे सांगितले. पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छ परिसर राखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी त्यांनी केले. संत निरंकारी मिशनतर्फे समाजहिताच्या विविध उपक्रमांबरोबरच स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षणाबाबत सातत्याने जनजागृती केली जात असल्याचे मुरूम ब्रँचचे मुखी दयानंद साखरे यांनी सांगितले. या उपक्रमाची सांगता मनश्री मोटे हिच्या गुरु पूजा गीताने झाली. या अभियानामुळे प्रशालेचा परिसर अधिक स्वच्छ झाला असून नागरिकांमध्ये सकारात्मक संदेश पोहोचला असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Labels:

आई-वडील हेच पहिले गुरु, त्यांच्या कष्टांचे मोल जाणून त्यांचा सन्मान राखणे, हीच खरी शिवजयंती....सुप्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे

आई-वडील हेच पहिले गुरु, त्यांच्या कष्टांचे मोल जाणून त्यांचा सन्मान राखणे, हीच खरी शिवजयंती....सुप्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे

वसंत हंकारे यांच्या व्याख्यानाला शहरातून उत्स्फूर्त प्रतिसाद 

 मुरूम,दि.२३:

मोबाईल आणि आधुनिक जीवनशैलीच्या प्रभावामुळे मुलांमध्ये वाढत चाललेली दुरावस्था टाळण्यासाठी पालकांनी मुलांना वेळ देणे, संवाद साधणे आणि आदर्श वर्तन ठेवणे आवश्यक आहे. आई-वडील हेच पहिले गुरु आहेत. त्यांच्या कष्टांचे मोल जाणून त्यांचा सन्मान राखणे, हीच खरी शिवजयंती साजरी करण्याची पद्धत असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांनी केले. शिवजयंतीच्या उत्सवी वातावरणात शहरवासीयांसाठी अशोक चौकातील मुख्य रस्त्यावर किसान शिवजन्मोत्सव समिती किसान चौक यांच्या वतीने आयोजित व्याख्यानात वसंत हंकारे यांनी “ आई-वडील आणि संस्कारांचे पावित्र्य ” या विषयावर प्रभावी मार्गदर्शन केले. शनिवारी (ता. २२) रोजी रात्री आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच बालकांची हजारोच्या संख्येने उपस्थिती राहिली. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला उमरगा जनता बँकेचे चेअरमन शरण पाटील, सुप्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष रमेश चव्हाण, नगरसेवक राजेंद्र बेंडकाळे, गौस शेख, सुजित शेळके, राजू मुल्ला, राहुल वाघ, रोटरी क्लब मुरूम सिटीचे अध्यक्ष प्रा. डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी, सचिव कलाप्पा पाटील, संतोष कांबळे, सुनील राठोड, डॉ. खाजालाल ढोबळे, नागनाथ बदोले, विजयकुमार देशमाने, संजय सावंत आदींची प्रमुख उपस्थिती होती.

वसंत हंकारे यांनी आपल्या ओजस्वी वक्तृत्वातून शिवरायांच्या जीवनातील मातृसंस्कारांचे महत्त्व उदाहरणासह अधोरेखित केले. राजमाता जिजाऊंनी दिलेल्या संस्कारांमुळेच शिवराय घडले. आई-वडिलांचे आशीर्वाद आणि योग्य संस्कार हीच प्रत्येक व्यक्तीच्या यशाची खरी गुरुकिल्ली आहे. आई-वडिलांना जीवनात कधीही विसरता कामा नये. आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत कुटुंबव्यवस्थेचे जतन करण्याची गरज व्यक्त केली. त्यांच्या भाषणादरम्यान उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी शिवरायांच्या विचारांचा अंगीकार करून कुटुंबातील नात्यांचे पावित्र्य जपण्याचा संकल्प करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करण्यात आली होती. किसान शिवजन्मोत्सव समिती किसान चौक अध्यक्ष रामहरी अंबर, उपाध्यक्ष स्वप्निल जाधव, सचिव विशाल जाधव, सहसचिव पवन फुकटे आदींनी पुढाकार घेऊन यशस्वी केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. महेश मोटे यांनी केले. सूत्रसंचालन मोहन जाधव तर आभार अजिंक्य मुरूमकर यांनी मानले. हा कार्यक्रम नागरिकांनी शांततेत व उत्साहात पार पाडत प्रेरणादायी व संस्कारमूल्यांची जाणीव करून देणारा ठरल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत होती. 

 फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा अशोक चौकात किसान शिवजन्मोत्सव समिती आयोजित व्याख्यानाप्रसंगी वसंत हंकारे बोलताना शरण पाटील व अन्य.

Labels:

Sunday, 22 February 2026

श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील एनएसएस विभागाच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरास सुरुवात

श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील  एनएसएस विभागाच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरास सुरुवात

मुरुम,दि.२२:

ग्रामीण भागातील पाणलोट व्यवस्थापन व पडीक जमिनीच्या विकासासाठी युवकांची भूमिका अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने मौजे व्हंताळ येथे श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, उमरगा येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचा उत्साहात शुभारंभ शनिवार दि. 21 फेब्रुवारी रोजी सायंकाळी झाला. 


“पाणलोट व्यवस्थापन व पडीत जमिनीच्या शाश्वत विकासासाठी युवक” हे ब्रीद घेऊन हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटन राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. विनोदकुमार वायचळ यांच्या हस्ते झाले.‌ कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय अस्वले होते. यावेळी लातूर येथील सहायक पोलीस निरीक्षक श्री. महावीर जाधव, उपप्राचार्य डॉ. पद्माकर पिटले, सरपंच श्री माधव जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. 

 यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. विनोद कुमार वायचळ यांनी जलसंवर्धन, मृदसंवर्धन व पर्यावरण रक्षण या बाबी आजच्या काळात अत्यंत आवश्यक असून युवकांनी प्रत्यक्ष कृतीतून या क्षेत्रात योगदान द्यावे, असे प्रतिपादन केले. पाणलोट व्यवस्थापनामुळे शेती, पाणी व ग्रामीण जीवनमानात सकारात्मक बदल घडून येतो, असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक महावीर जाधव यांनी  युवकांनी समाजहिताची जाणीव ठेवून शिस्तबद्ध व सकारात्मक कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. संजय अस्वले यांनी राष्ट्रीय सेवा योजना ही केवळ उपक्रम नसून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारी, नेतृत्वगुण व सेवाभाव निर्माण करणारी चळवळ असल्याचे सांगितले.
या शिबिराच्या कालावधीत घेण्यात येणारे उपक्रमाबद्दलची माहिती कार्यक्रमाधिकारी डॉ. भरत शेळके यांनी प्रास्ताविकात दिली. स्वयंसेवकांकडून श्रमदान, स्वच्छता मोहिम, वृक्षारोपण, जलसंधारणाविषयी जनजागृती असे विविध उपक्रम राबविण्यात येणार त्यांनी सांगितले.

याप्रसंगी व्हंताळ येथील उपसरपंच विजय सगर,  रविंद्र जगताप, विठ्ठल जाधव, महेश पाटील, राजाभाऊ पाटील, नंदकुमार जाधव,
राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. भरत शेळके, डॉ. अनिल देशमुख, प्रा. मुरलीधर जाधव, , डॉ. अतुल बिराजदार, प्रा. मनोज गायकवाड, प्रा. महेश जोशी तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Labels:

Saturday, 21 February 2026

नळदुर्गचे सुपुत्र प्रा.राजा सोनकांबळे यांचा राष्ट्रीय शिक्षण सेवा पुरस्काराने गौरव

नळदुर्गचे सुपुत्र प्रा.राजा सोनकांबळे यांचा राष्ट्रीय शिक्षण सेवा पुरस्काराने  गौरव 

नळदुर्ग,दि.२१ :

 नळदुर्ग  येथील सुपुत्र व सध्या एस.एन डी.टी.महिला विद्यालय नारायण पेठ पुणे येथे कनिष्ठ प्राध्यापक म्हणून सेवेत कार्यरत असलेले प्रा.राजा रेवाप्पा सोनकांबळे यांना काव्यमित्र संस्था पुणे यांच्या मार्फत दिला जाणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण सेवा पुरस्काराने शिवजयंती व राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीचे औचित्य साधून  पुणे येथे गौरविण्यात आले आहे.

रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज व स्वच्छतेचे दूत राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंती निमित्ताने काव्यमित्र संस्था पुणेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र विमलाई श्रीमंत सगर यांच्या मार्गदर्शनाखाली दि १९ फेब्रुवारी  रोजी पिंपरी चिंचवड पुणे येथिल सायन्स पार्क येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यअध्यक्ष विस्ताराधिकारी पंचायत संघटना व्हि. जे. वाघमारे हे  तर प्रमुख पाहुणे म्हणून मातृतीर्थ सिंदखेडराजा राजे लखोजी जाधवराव यांचे चौदावे वंशज संभाजी राजे जाधवराव व संत साहित्याचे गाढे अभ्यासक विजय बोत्रे (पाटील) हे होते. याप्रसंगी काव्यमित्र संस्था पुणे यांच्या वतीने विविध पुरस्काराचे वितरण करण्यात आले.यावेळी प्रा.राजा सोनकांबळे यांना संभाजीराजे जाधवराव व विजय बोत्रे (पाटील ) यांच्या  हस्ते राष्ट्रीय शिक्षणसेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 या प्रसंगी काव्यमित्र संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.संजय जगताप, सचिव हरीनाथ कांबळे सह सर्व काव्यमित्र संस्थे विश्वस्थ, निमंत्रित मान्यवर उपस्थित होते. त्याबद्दल मित्र परिवारांनी त्यांचे आभिनंदन केले आहे.

Labels:

Friday, 20 February 2026

व्यावसायिक हुरडा पार्ट्यांच्या गर्दीत ग्रामीण भागात अजूनही जपली जाते माणुसकीची परंपरा

व्यावसायिक हुरडा पार्ट्यांच्या गर्दीत ग्रामीण भागात अजूनही जपली जाते माणुसकीची परंपरा

 मुरूम,दि.२०: डॉ सुधीर पंचगल्ले 

शहरी भागात हुरडा पार्ट्यांचे व्यवसायिकीकरण झालेले असताना ग्रामीण भागात पारंपारिक हुरडा पार्ट्यांवर शेतकरी बांधव देखील भर देताना दिसत आहे. महाराष्ट्रासह सीमावरती ग्रामीण भागात हिवाळ्यात रंगणाऱ्या हुरडा पार्ट्यांचा उत्साह यंदाही ओसंडून वाहताना दिसत आहे.

 उमरगा तालुक्यातील बिराजदार वस्तीतील कलाप्पा पाटील यांनी आपल्या मित्र परिवाराला एकत्रित आणून शेतात हुरडा पार्टी गुरुवारी  रोजी मोठ्या उत्साहात संपन्न केली. शहरातील लोकांना शेतीची ओळख व्हावी, ग्रामीण परंपरा जपल्या जाव्यात, नवीन पिढीला शेती संस्कृतीची ओळख व्हावी, याकरिता या अनोख्या पार्टीचे आयोजन केले जाते. यामुळे सामाजिक सलोखा वाढण्यास मदत होते. रोटरी क्लब मुरूम सिटीचे अध्यक्ष प्रा. डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी, महात्मा बसवेश्वर पतसंस्थेचे अध्यक्ष शिवशरण वरनाळे, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष गोविंद पाटील, डॉ. नितीन डागा, प्रा. डॉ. महेश मोटे, संतोष कांबळे, उपप्राचार्य कलय्या स्वामी, मल्लिकार्जुन बदोले, प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले, प्रा. राजकुमार वाकडे, प्रा. भूषण पाताळे, शरणाप्पा धुम्मा, सहशिक्षक नागनाथ बदोले आदींनी याचा आस्वाद घेतला. 

हुरडा म्हणजे ज्वारीच्या कोवळ्या कणसांना शेतातल्या चुलीवर भाजून थेट ताटात  तयार केलेला पारंपरिक खाद्यपदार्थ. शेतातच कणसे भाजून त्यासोबत लसूण चटणी, शेंगदाण्याची चटणी, गूळ, चिवडा, खारमुरे, पेंडखजूर, उसाचा रस यांचा आस्वाद घेण्याची खास मेजवानी यावेळी ठेवण्यात आली होती. ग्रामीण भागातील पारंपरिक पद्धतीने चुली पेटवून हुरडा तयार करण्यात आला. याप्रसंगी शेतकरी विठ्ठल कुडवकल, सुनील कुडवकल यांनी हुरडा परंपरेचे महत्त्व सांगितले. हुरडा पार्टी ही केवळ खाद्य मेजवानी नसून शेतकरी संस्कृतीचा एक उत्सव आहे. निसर्गाशी नाते जपण्याचा हा एक सुंदर मार्ग असून हा गावरान मेवा असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. याप्रसंगी साऊंड सिस्टिम लावून वातावरण निर्मिती करून लोकगीतांचे सादरीकरण, पारंपरिक खेळांचे आयोजन, मनोरंजनात्मक विषयांवर चर्चा घडवून आल्या. हुरडा पार्टीच्या उत्साहात रसवंती चालक महादेव मुळे, नरसप्पा पाटील, मल्लिनाथ पाटील यांनी विशेष पुढाकार घेऊन आपुलकीने खाऊ घालण्यावर भर दिला. यामुळे आलेल्या सर्वांनाच आपल्या  परंपरेचे दर्शन दिसून आले. 


 फोटो ओळ : बिराजदार वस्ती, ता. उमरगा येथील कलाप्पा पाटील यांच्या शेतात विशेष हुरडा पार्टीच्या प्रसंगी हुरड्याचा आस्वाद घेताना  मित्रपरिवार व अन्य.

Labels:

Thursday, 19 February 2026

बालाघाट महाविद्यालयात हुतात्मा बाबुराव बोरगांवकर , हुतात्मा निलय्या स्वामी यांना अभिवादन

बालाघाट महाविद्यालयात हुतात्मा बाबुराव बोरगांवकर , हुतात्मा निलय्या स्वामी यांना अभिवादन

नळदुर्ग,दि.१८:  प्रा. दिपक जगदाळे

नळदुर्ग येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात हुतात्मा दिनाचे औचित्य साधून हुतात्मा बाबुराव बोरगांवकर व हुतात्मा निलय्या स्वामी यांना अभिवादन करण्यात आले. 

याप्रसंगी बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, संस्थेचे सचिव उल्हास  बोरगांवकर , कार्याध्यक्ष रामचंद्र आलुरे, हुतात्मा नातू निलय्या स्वामी, सौ. रोहिणीताई बोरगांवकर यांनी हुतात्म्याच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
 
या कार्यक्रमास  नगराध्यक्ष बसवराज धरणे, माजी नगरसेवक दत्तात्रय कोरे, शिवाजी व-हाडे
,सुभाष कोरे, दयानंद स्वामी, प्राचार्य डॉ. सुभाष राठोड, कार्यालय अधिक्षक धनंजय पाटील, माजी प्राचार्य डॉ. संजय कोरेकर, उपप्राचार्य डॉ. प्रविण भाले, सिनेट सदस्य डॉ. गोविंद काळे, डॉ.मनोज झाडे, डॉ. अशोक कदम, डॉ. एन.बी. जाधव, डॉ. एस.बी. पाटील, डॉ. एच. के. जाधव, डॉ. निलेश शेरे, डॉ. शिवाजी जेठीथोर, दमयंती महिला शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सौ. सुभद्राताई मुळे, नगरसेवक प्रविण गायकवाड, नगरसेविका राणी सुरवसे, कल्पना गायकवाड, यांच्यासह दोन्ही महाविद्यालयातील सर्व कर्मचारी वर्ग व प्रतिष्ठित नागरीक उपस्थित होते.

Labels:

Monday, 16 February 2026

नळदुर्ग : शिवजयंती निमित्त पाळणा व दुग्धअभिषेक सोहळयाचे आयोजन



नळदुर्ग : शिवजयंती निमित्त पाळणा व दुग्धअभिषेक सोहळयाचे आयोजन

नळदुर्ग,दि.१६: 

हिंदवी स्वराज्य संस्थापक जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त नळदुर्ग येथील माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांच्या निवासस्थानी  दि.१९ फेब्रुवारी रोजी शिवजन्मोत्सव पाळणा व दुग्धअभिषेक सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे.

नळदुर्ग शहरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांच्या निवासस्थानी शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावेळी शहरातील असंख्य महिला भगिनी यांच्या उपस्थितीत शिव जन्म पाळणा केला जातो. यानंतर नळदुर्ग शहरातील मान्यवरांच्या हस्ते दुग्धअभिषेक सोहळा संपन्न होतो.

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती प्रत्येक घराघरात साजरी झाली पाहिजे, या हेतूने विनायक अहंकारी यांनी सुरु केलेला हा घरगुती जन्मोत्सव आज त्याला भव्य स्वरूप प्राप्त झाले आहे. यावर्षी गुरुवार दि.१९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती दिनी सकाळी १० वाजता हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. तरी जास्तीत शिवप्रेमीनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन विनायक अहंकारी यांनी केले आहे.

Labels:

Sunday, 15 February 2026

नळदुर्ग येथे संत सेवालाल महाराज यांची जयंती उत्साहात साजरी


नळदुर्ग येथे संत सेवालाल महाराज यांची जयंती उत्साहात : माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, नगराध्यक्ष बसवराज धरणे, उपनगराध्यक्ष नय्यरपाशा जहागिरदारसह अनेक मान्यवरांची उपस्थिती.

नळदुर्ग,दि.१६ :

क्रांतीकारी संत सेवालाल महाराज यांची जयंती 
फटाक्यांच्या अतिष‌बाजीने  मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. बंजारा समाजाच्या वतीने रविवार दि.१५ फेब्रुवारी रोजी नळदुर्ग येथील वसंतराव नाईक गोलाई चौकात सकाळी साडे दहा वाजता जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी संत सेवालाल महाराज की जय, असा जोरदार जयघोष दुमदुमला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी नळदुर्ग नगरीचे नगराध्यक्ष बसवराज धरणे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडले. यावेळी  माजी मंत्री मधुकरराव चव्हाण,  उपनगराध्यक्ष नय्यर जहागीरदार, माजी जि.प. सदस्य प्रकाश चव्हाण, रवी महाराज राठोड, प.स.सदस्य भिवा इंगोले व प्रमुख बंजारा बांधव यांनी प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन केले.

 नगरसेवक निरंजन राठोड, नगरसेविका छमाबाई राठोड , धिमाजी घुगे, वैभव जाधव,  नायक फुलचंद राठोड, कारभारी विनायक जाधव ,  विद्यानंद राठोड,  जेष्ठ नागरिक मानसिंग राठोड, भानुदास राठोड, अँड प्रवीण पवार, किरण राठोड, दत्ता राठोड, गणेश राठोड, संजय जाधव,  कैलास चव्हाण, सुरेश राठोड,विनायक जाधव, सरपंच सुर्यकांत चव्हाण, माजी सरपंच बालाजी राठोड, सुरेश राठोड, शिवाजी राठोड, विनायक राठोड,  सचिन राठोड यांच्या सह  विविध तांडयातील प्रमुख नाईक, कारभारी,बंजारा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


🪷बसवराज धरणे ,नगराध्यक्ष नळदुर्ग🪷 
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नाने व मार्गदर्शनाखाली याठिकाणी करण्यात येत असलेल्या दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक स्मारकाचे काम प्रगतीपथावर आहे. बंजारा समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी व विकासासाठी प्रथम प्राधान्य देणार.
♦️प्रकाश चव्हाण , माजी जिल्हा परिषद सदस्य♦️

संत सेवालाल महाराज हे संपूर्ण समाजासाठी प्रेरणास्थान होते त्यांनी आयुष्यभर समाजसेवा, त्याग आणि मानवतेचा संदेश दिला तसेच समाजातील सर्व घटकांना एकत्र आणून शिक्षणत एकता व प्रगतीसाठी प्रयत्न केले.युवकानी त्यांच्या कार्याचा कीआदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजात काम करावे असे मत माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण यांनी व्यक्त केले.

Labels:

Saturday, 14 February 2026

शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सुधाकर राठोड तर उपाध्यक्षपदी श्रीमती काजल लक्ष्मण तिबोले यांची निवड

शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सुधाकर राठोड तर उपाध्यक्षपदी श्रीमती काजल लक्ष्मण तिबोले यांची निवड 

नळदुर्ग, दि.१४:

नळदुर्ग शहरातील वसंतनगरच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत  शालेय व्यवस्थापन समितीची  सन 2026-28 ची नुतन  पदाधिकारी यांची निवड करण्यात आली आहे.त्यानुसार अध्यक्षपदी सुधाकर राठोड तर उपाध्यक्षपदी श्रीमती काजल लक्ष्मण तिबोले यांची निवड करण्यात आली.

शनिवार दि.१४ फेब्रुवारी रोजी लक्ष्मण चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली व  रवि (महाराज) राठोड , 
किसन वसाराम राठोड,  ज्योतिबा तिबोले, श्रीमती प्रीती जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक होवून पुढील पदाधिकारीची निवड करण्यात आली आहे.
अध्यक्ष सुधाकर माणिक राठोड ,उपाध्यक्ष श्रीमती काजल लक्ष्मण तिबोले , सदस्य  चव्हाण आकाश सूर्यकांत,  कोळी संतोष चित्तू , राठोड विशाल विजयसिंह, हणमंत तिम्मा पवार, सौ.रंजना बालाजी पवार, सौ. प्रियंका वसंत हटकर, सौ.प्रियंका सतीश राठोड, सौ.मनीषा नेताजी जाधव, सौ.रेश्मा लक्ष्मण जाधव, सौ.मीना दत्ता राठोड, शिक्षणतज्ञ सदस्य म्हणून किसन वसाराम राठोड ,मुख्याध्यापक सुरवसे एच.एम,
सहशिक्षक  जाधव वाय. टी,  भोसले यु.बी., 
राठोड ए.एस. श्रीम.कुंभलकर एन एन, श्रीम. राठोड आर.एस.आदी. यावेळी नागरिकांच्या वतीने नुतन पदाधिकारीचे सत्कार करण्यात आले.

Labels:

Friday, 13 February 2026

नगरपालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेपुर्वी काँग्रेसच्या नगरसेवकांनी शहर स्वच्छतेसह विविध प्रश्नांवर निदर्शने केले आंदोलन

नगरपालिकेच्या  पहिल्या सर्वसाधारण सभेपुर्वी  काँग्रेसच्या  नगरसेवकांनी  शहर स्वच्छतेसह विविध प्रश्नांवर  निदर्शने केले आंदोलन 

नळदुर्ग,दि.१३ : 

शहर स्वच्छतेसह विविध  प्रश्नावरून काँग्रेसच्या नगरसेवकांनी आक्रमक होत गुरुवार दि. १२ फेब्रुवारी रोजी  सकाळी साडे दहा वाजता नगरपालिकेच्या  प्रवेशद्वारवर जोरदार निदर्शने करत घनकच-यांचे टेंडर रद्द करा, संबंधित ठेकेदार व दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याच्या  मागणीसाठी आंदोलन केले. सदरील आंदोलन  सर्वसाधारण सभेपुर्वी  काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी केल्याने पालिकेतील सत्ताधारी भाजप -शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा होत आहे.

  
गुरुवारी  पालिकेत नगराध्यक्ष बसवराज धरणे यांच्या अध्यक्षतेखाली विविध १६ विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी साडेदहा वाजता कार्यालयाबाहेर काँग्रेसचे गटनेते मारुती खारवे, उपगटनेते आकाश कुलकर्णी, नगरसेवक इमाम शेख, सुधीर पोतदार,  अ. गफूर कुरेशी
नगरसेविका सौ.अपर्णाताई बेडगे,  कमल गायकवाड, मन्नाबी कुरेशी, मदीना बागवान  झुलेखां इनामदार आदीनी एकत्र येत स्वच्छतेचा प्रश्न, घनकचरा निर्मुलनासाठी नियुक्त कंपनीचे टेंडर रद्द करण्याची मागणी, बंद असलेले आरओ प्लांट सुरू करणे, दर्जाहीन काम करणाऱ्यांवर कारवाई,  पथदिवे चालु करण्याबरोबरच इतर मागण्यांसाठी हातात फलक घेऊन घोषणाबाजी केली.


Labels:

Thursday, 12 February 2026

नळदुर्ग : कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात इयत्ता १२ वी ची वार्षिक परीक्षा कॅमे-याच्या नगराणीखाली शांततेत सुरु

नळदुर्ग : कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात इयत्ता १२ वी ची वार्षिक परीक्षा कॅमे-याच्या नगराणीखाली शांततेत सुरु 

नळदुर्ग,दि.१२ : 

शहरातील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात इयत्ता १२ वी ची वार्षिक लेखी परीक्षा दि.१० फेब्रुवारी रोजी पासुन सिसीटी व्हीप कॅमेरा व कडक पोलिस बंदोबस्तात शांततेत सुरु झाली आहे.शेवटचा पेपर दि.६ मार्च रोजी होणार आहे. दरम्यान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांनी परिक्षा केंद्रास भेट दिली.

बालाघाट शिक्षण संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात १२ वी च्या परिक्षेकरीता एकुण २६ कक्ष असुन याठिकाणी ६३४ परिक्षार्थी विद्यार्थी परिक्षा देत आहे. या परिक्षा केंद्रावर पर्यवेक्षकासह एकूण ४०  कर्मचारी कार्यरत असून प्राचार्य डॉ सुभाष राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र संचालक प्रा.मोतीराम पवार कामकाज पाहत आहेत.

Labels:

नळदुर्ग शहर पर्यटन वाढीसाठी आराखडा तयार करण्याच्या विषयांसह विविध विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी सर्वसाधारण सभेचे आयोजन

नळदुर्ग नगरपालिकेत आज शहर पर्यटन वाढीसाठी पंचवार्षिक आराखडा तयार करण्याच्या विषयांसह विविध विषयांवर चर्चा करून निर्णय  घेण्यासाठी सर्वसाधारण सभेचे आयोजन 

नळदुर्ग,दि.१२:

नळदुर्ग नगरपालिकेच्या  सभागृहात  गुरुवार दि. 12/02/2026 रोजी सकाळी ११ वाजता नगराध्यक्ष बसवराज धरणे यांच्या  अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली असुन यावेळी विविध विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे.

1. शासकिय पत्रकाचे वाचन करून नोंद घेणे बाबत.

2. नळदुर्ग शहर पर्यटन वाढीसाठी पंचवार्षिक आराखडा तयार करणे व अंमलबजावणीबाबत विचार विनिमय करुन निर्णय घेणेबाबत.

3. श्री क्षेत्र मैलारपूर खंडोबा यात्रा करीता शासनाकडे यात्रा अनुदान मिळणेसाठी मागणी प्रस्ताव पाठविणेबाबत विचार विनिमय करुन निर्णय घेणेबाबत.

4. दिनांक-08 मार्च, 2026 महिला दिन साजरा करणेबाबत विचार विनिमय करुन निर्णय घेणेबाबत.

5. बाजार लाईन येथे महिलांसाठी सार्वजनिक शौचालय बांधकाम करणेबाबत विचार विनिमय करुन निर्णय घेणेबाबत.

6. नळदुर्ग शहरातील अर्धवट स्थितीतील विकास कामांना मुदतवाढ देणेबाबत विचार विनिमय करुन निर्णय घेणेबाबत.

7. नविन विकास कामे प्रस्तावित करणेबाबत विचार विनिमय करुन निर्णय घेणेबाबत.

8. नगरपरिषदेचे उत्पन्न वाढीसाठी विचार विनिमय करुन निर्णय घेणेबाबत.

9. दुबार व्यावसायिक नळ कनेक्शन, पाणीपट्टी, शाळा, धार्मिक यांना नळ जोडणी बाबत विचार विनिमय करुन निर्णय घेणेबाबत.

10. रहिमनगर, दुर्गानगर, वसंतनगर, शितलनगर, येथे विद्युत पोलसह पथदिवे बसविणेबाबत विचार विनिमय करुन निर्णय घेणेबाबत.

11. वार्षिक निविदा प्रक्रिया राबविणेबाबत विचार विनिमय करुन निर्णय घेणेबाबत.

12. नगरपरिषद आस्थापनेवरील कर्मचारी यांना नियमानुसार पदोन्नती देणेबाबत विचार विनिमय करुन निर्णय घेणेबाबत.

13. नगरपरिषदेचा आकृतीबंध सुधारित करुन घेणेबाबत विचार विनिमय करुन निर्णय घेणेबाबत.

14. जुन्या जन्म मृत्यु नोंद CRS पोर्टलवर ऑनलाईन करणेबाबत विचार विनिमय करून निर्णय घेणेबाबत.

15. शहरातील विविध ठिकाणी वॉलव्ह दुरुस्ती व चेंबर बांधणेबाबत विचार विनिमय करून निर्णय घेणेबाबत.

16. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार शेल्टर होम तयार करणेबाबत विचार विनिमय करुन निर्णय घेणेबाबत.

17. ऐनवेळीचे विषय अध्यक्ष यांच्या परवानगीने, आदी विषयांवर चर्चा होणार आहे.


Labels:

Wednesday, 11 February 2026

भाजप महायुतीचे अँड आशिष सोनटक्के यांचा मोठ्या मताधिक्याने विजय ; विजयी मिरवणूक जल्लोषात

जळकोट पंचायत समिती गणातून  भाजप महायुतीचे  अँड आशिष गणेशराव सोनटक्के यांचा मोठ्या मताधिक्याने विजय ;  विजयी मिरवणूक जल्लोषात 

नळदुर्ग,दि.११: 

जळकोट (ता.तुळजापूर ) पंचायत समिती गणातून तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती , भाजप महायुतीचे उमेदवार अँड आशिष गणेश सोनटक्के यांनी १ हजार ५०० मताच्या फरकाने दणदणीत विजय  मिळवत विरोधकांचा पराभव केला. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार मोहन चव्हाण यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला.

गणेश सोनटक्के आणि त्यांचे पुत्र अँड आशिष सोनटक्के यांनी सामाजिक कार्य सतत सुरू ठेवल्याने त्यांचा जनतेशी नाळ जुळलेली असल्याचे सर्वश्रुत आहे.जळकोट पंचायत समिती मतदार संघातील या निवडणुकीकडे तुळजापूर तालुक्याचे  लक्ष वेधले होते.  जळकोट पंचायत समिती गणात काँग्रेस व भाजपा अशी चुरशीची लढत रंगली होती. या लढतीत भाजप महायुतीचे  अँड आशिष सोनटक्के यांनी काँग्रेसचे मोहन चव्हाण यांचा  १ हजार ५०० मताधिक्यानी पराभव केला. जळकोट पंचायत समिती मतदार संघात आशिष सोनटक्के यांचा विजय निश्चित मानला जात होता. त्याप्रमाणे अपेक्षित निकाल लागला. आमदार राणाजगजितसिंह पाटील, भाजपचे नेते सुनील चव्हाण तसेच युवा नेते मल्हार पाटील यांच्या नेतृत्वाखाली  आशिष सोनटक्के यांनी शिस्तबद्ध आणि प्रभावी प्रचार केला.

जनसामान्याशी सतत संपर्कात असल्याने आणि विकासाकरिता प्रयत्नशिल , कामाची तत्परता यामुळेच अँड आशिष सोनटक्के यांना फायदा झाला. विजयनंतर जळकोट गावातून जंगी विजयी मिरवणूक काढत मोठा जल्लोष साजरा करण्यात आला . यावेळी असंख्य कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.

ॲड आशिष सोनटक्के यांनी तुळजापूर कृषी उत्त्प्न बाजार समितीचे सभापती म्हणुन उल्लेखनीय कार्य केले आहे. या कृषी उत्पन्न 
बाजार समितीचा राज्यात १९ वा तर लातुर विभागात ३ रा व धाराशिव जिल्हयात पहिला क्रमांक मिळाले आहे. त्यामुळे या बाजार समितीची भारतीय राष्ट्रीय बाजारात उल्लेख्निय नोंद झाली आहे.

Labels:

जनतेनी केलेल्या विकास कामाची पोहच म्हणून निवडणुकीत दिली पहिली पसंती -भाजपचे नुतन जिल्हा परिषद सदस्य सिध्देश्वर अण्णा कोरे


जनतेनी केलेल्या विकास कामाची पोहच म्हणून निवडणुकीत दिली पहिली पसंती -
भाजपचे नुतन जिल्हा परिषद सदस्य सिध्देश्वर अण्णा कोरे 


नळदुर्ग,दि.११ :

नंदगाव जिल्हा परिषद गटातील  भाजप महायुतीचे उमेदवार सिध्देश्वर अण्णा कोरे यांनी त्यांचे नजिकचे प्रतिस्पर्धी उबाठाचे सुर्यकांत आरबळे यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळविला आहे. कोरे यांना ७ हजार ४४६ मते मिळाली तर आरबळे यांना ५ हजार ४१८ मते मिळाली आहे. निवडणुकीत विजयी झाल्याने कोरे यांच्या समर्थकांनी गुलालाची मुक्त उधळण करत, फटाक्याची अतीषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला.



 जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये तुळजापूर तालुक्यातील नंदगाव गट आणि दोन्ही भाजप महायुतीचे  उमेदवार विजयी झाले आहे.

  आमदार राणाजगजितसिंह पाटील  यांच्या नेतृत्वाखाली  नंदगाव जिल्हा परिषद गटातून भाजप महायुतीचे उमेदवार   सिद्धेश्वर अण्णा कोरे  यांनी आजपर्यंत केलेल्या  विकास कामांवर  निवडणूक लढवुन दणदणीत विजय मिळविला आहे.  याच गटांतर्गत येणाऱ्या पंचायत समिती नंदगाव गणातून भाजपाच्या सौ. रोहिणी विवेकानंद मेलगिरी तर खुदावाडी गणातून भाजपाचे भिवाजी इंगुले यांचाही विजय झाला आहे. या निवडणुकीत नंदगाव गट आणि गणातील भाजपाचे उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी झाले आहेत. त्यांच्या  विजयाबद्दल नंदगाव येथे कोरे यांचा जेसीबीमधून भव्य मिरवणूक काढण्यात आली. फटाक्यांची आतषबाजी, जयघोष करत मोठा जल्लोष कार्यकर्त्यांनी केला. यावेळी सिद्धेश्वर अण्णा कोरे यांचा  कार्यकर्त्यासह  नंदगाव गावचे सरपंच शशिकांत नागिले यांनी सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.  यावेळी ग्रामस्थ, कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्याचबरोबर नळदुर्ग शहरात रिपाइंसह भाजपा महायुतीच्या वागदरी, येडोळा, लोहगाव नळदुर्ग शहरातील कार्यकर्त्यांनी  बसस्थानकासमोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर संविधान चौकात जंगी स्वागत करून विजय उमेदवारांचा  सत्कार केला.

भाजपचे नुतन जिल्हा परिषद सदस्य सिध्देश्वर अण्णा कोरे 

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या विकास कामाची जनतेनी मतदानरुपी आशिर्वाद दिले आहे. यापुढेही जनतेची सेवा करत विकास कामांच्या माध्यमातून नंदगाव गट मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी प्रयत्नशिल राहणार.

Labels:

Tuesday, 10 February 2026

घनकच-याचे टेंडर रद्द करुन नविन निविदा काढावी ; अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा काँग्रेस नगरसेवकांचा नळदुर्ग नगरपालिकेस इशारा

घनकच-याचे टेंडर रद्द करुन नविन निविदा काढावी ; अन्यथा  रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा काँग्रेस नगरसेवकांचा  नळदुर्ग नगरपालिकेस इशारा 

नळदुर्ग,दि.११:

घनकचरा निर्मुलनाचे कार्य केले जात नसल्यामुळे टेंडर धारकाचे टेंडर रद्द करुन नविन निविदा काढण्याची मागणी काँग्रेसच्या नगरसेवकांनी नगरपालिकेचे नगराध्यक्ष बसवराज धरणे यांच्याकडे मंगळवार दि.१० फेब्रुवारी रोजी निवेदनाद्वारे केली आहे.

 निवेदनात पुढे म्हटले आहे की, घनकचरा निर्मुलनाचे कार्य दोन महिन्यापासून शहरात टेंडर धारक कंपनी करीत नाही. या मुळे शहरातील गटार तुंबले आहेत. व नागरीकांच्या प्रचंड तक्रारी येत आहेत, शहरातील शास्त्री चौक, हत्ती गल्ली, जय भवानी चौक, ब्राम्हण गल्ली, सावरकर चौक, संभाजी चौक, बेडगे गल्ली, पाचपीर, नॅशनल शाळा, नळदुर्ग पोलीस ठाणे , चावडी चौक, कुरेशी गल्ली, इंदिरानगर, व्यासनगर, रहिमनगर, डि एड कॉलेज, रामलिला नगर, व्यंकटेशनगर, ठाकरेनगर, येथे सफाई कामगार जात नाहीत, त्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच दुर्गधी पसरली जात आहे,  जंतुनाशक औषध  फवारणी  केली जात नाही, यामुळे शहरात विविध साथीचे आजार पसरत आहेत. व नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

 घणकचरा टेंडर  घेणारी कंपनी शहराच्या प्रत्येक प्रभागानुसार कामगार लावत नाही, तर फक्त २५ महिला कामगार, ७ ड्रायव्हर ५ गाडवरच गेले दोन महिने काम चालु आहे. तसेच नगरपालिकेकडून जादा मजुर दाखवुन पैसे उकळून  फसवणुक केली जात आहे, ज्या भागात तक्रार येते तेथे दोन तीन तात्पुरते मजुर एक दोन तास पाठवुन काम करीत असल्याचे दाखवत आहे, ही नगरपालिकेची व जनतेची पुसवणुक असुन सदर कंपनी भ्रष्टाचार करीत असल्याने त्वरीत टेंडर रद्द करुन नवीन टेंडर काढावे. अन्यथा आम्हाला जनहितासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल असा इशारा निवेदनाद्वारे नगरपालिकेतील  काँग्रेसचे गटनेते तथा नगरसेवक मारुती खारवे, नगरसेवक अकाश कुलकर्णी ,सुधीर पोतदार, गायकवाड कमल यांनी दिला आहे.

Labels:

अर्जुन पाचंगे चा कर्नल संतोष नवगण यांच्या वतीने गौरव

अर्जुन पाचंगे चा कर्नल संतोष नवगण यांच्या वतीने गौरव 

मुरुम,दि.१० :

उमरगा येथील भारत शिक्षण संस्था संचलित, श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा येथील कॅडेट अर्जुन पाचंगे याची 'संबळ' या कला प्रकारामध्ये महाराष्ट्राच्या 26 जानेवारी 2026 रोजी झालेल्या गणतंत्र दिवस परेडसाठी महाराष्ट्राच्या संघात त्याची निवड झाली होती . तसेच भारताच्या संघात सांस्कृतिक वादन आणि गीत या प्रकारात अंतरराष्ट्रीय पातळीवर YEP म्हणजेच युथ एक्सचेंज प्रोग्रामसाठीही  निवड झाली आहे.

अर्जुन पाचंगे चा 53 महाराष्ट्र बटालियन एनसीसी लातूरचे कमान अधिकारी कर्नल संतोष नवगण व कर्नल वाय बी सिंह तसेच कॅप्टन डॉ ज्ञानेश्वर चिट्टमपल्ले यांनी त्याचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या .

याप्रसंगी कर्नल संतोषजी नवगन  यांनी कॅडेट्सने एनसीसी मध्ये आपले भवितव्य घडवावे व देशाची, समाजाची सेवा करावी .कैडेट्सनी या तीन वर्षांमध्ये वेळ न घालवता स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून एक चांगला अधिकारी म्हणून आपले ध्येय पूर्ण करावे असे त्यांनी यावेळी प्रतिपादन केले. सध्या स्पर्धेचे युग आहे. स्पर्धेत आपले स्थान मजबूत करावयाचे असतील तर कॅडेट्सना अष्टपैलू व्यक्तिमत्व बनवून आपले स्थान निश्चित करावे असे आव्हान त्यांनी यावेळी केले. या सत्कार समारंभा वेळी ॲडम ऑफिसर कर्नल वाय बी सिंह, कैप्टन डॉ चिट्टमपल्ले ज्ञानेश्वर , बाजीराव पाटील , संजय चिकने , आर्मी स्टाफ, कार्यालयीन कर्मचारी आदी उपस्थित होते .

Labels:

Monday, 9 February 2026

जिल्हा परिषद व पंचायत समितीवर महायुतीची सत्ता, भाजप ठरला जिल्ह्यातील क्रमांक एक पक्ष - दत्ताभाऊ कुलकर्णी

जिल्हा परिषद व पंचायत समितीवर महायुतीची सत्ता, भाजप ठरला जिल्ह्यातील क्रमांक एक पक्ष - दत्ताभाऊ कुलकर्णी


धाराशिव,दि.०९ : 

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा निकाल जाहीर झाला असून, या निवडणुकांमध्ये महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवत जिल्ह्यात सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती या दोन्ही स्तरांवर सर्वाधिक जागा जिंकून भारतीय जनता पार्टी जिल्ह्यातील क्रमांक एक पक्ष ठरला असल्याचे भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी सांगितले.

आमदार राणाजगजितसिंह पाटील व माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपने ही निवडणूक लढवली. या नेतृत्वाखाली केलेल्या नियोजनबद्ध प्रचाराचा आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा निकालात स्पष्टपणे प्रत्यय आला आहे. मतदारांनी भाजप व महायुतीवर दाखवलेला विश्वास हा विकासकामांना मिळालेला कौल आहे. ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा, शेतकरी, महिला, युवक व सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत पारदर्शक व गतिमान प्रशासन देण्याचा प्रयत्न केला जाईल. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी आता अधिक वाढली असून, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपा कटिबद्ध राहील, असा विश्वास भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे.

नगरपालिका निवडणुकांनंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये मिळालेला हा विजय नेतृत्व, संघटना आणि कार्यकर्त्यांच्या एकजुटीचे फलित असून, जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असेही त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे नमूद केले आहे.

Labels:

Wednesday, 4 February 2026

नळदुर्ग: जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात ; नगराध्यक्ष बसवराज धरणे यांच्या हस्ते शुभारंभ

नळदुर्ग: जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात ; नगराध्यक्ष बसवराज धरणे यांच्या हस्ते शुभारंभ 

नळदुर्ग,दि.०४ :

 नळदुर्ग शहरातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन मंगळवारी मोठ्या थाटात व उत्साहात पार पडले. 
नळदुर्ग नगरीचे नगराध्यक्ष बसवराज धरणे यांच्या हस्ते फीत कापून उदघाटन करण्यात आले. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन उपनगराध्यक्ष नय्यर जागीरदार, नगरसेवक इमाम शेख, आकाश कुलकर्णी, नगरसेविका सुमन ठाकूर,मीनाक्षी काळे, राणी सुरवसे यांच्या हस्ते करून कार्यक्रमास सुरुवात केली.
 
या कार्यक्रमात इयत्ता पहिली ते पाचवीतील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मराठी व हिंदी गीतावर बहारदार नृत्य सादर केले. तसेच पारंपारिक लेझीम कलाही सादर केली. तसेच मुलींचे महत्त्व सांगणारे, शेतकरी आत्महत्या रोखणारे व जिल्हा परिषद मराठी शाळेचे महत्त्व सांगणाऱ्या नाटिका विद्यार्थ्यांनी  उत्कृष्टपणे सादर केल्या. विद्यार्थ्यांर्नी नृत्य, गायन ,नाटक, लेझिम ,टिपऱ्या, आदी पारंपरिक कलाही सादर केल्या.  

यावेळी राष्ट्रवादीचे  युवक शहराध्यक्ष प्रमोद कुलकर्णी, उबाठाचे शहर प्रमुख संतोष पुदाले,
 मुख्याध्यापक भास्कर मस्के, सुंदर भालकाटे, जयश्री धुमाळ, प्रीती भंडारे, राहुल खोडके, महादेवी गायकवाड, रेणुका डोंगरे, योगिता माने   शालेय शिक्षण व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय डुकरे यांच्यासह  पालक, विद्यार्थी उपस्थित होते.

Labels:

Tuesday, 3 February 2026

प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले यांचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव

प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले यांचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव 

नळदुर्ग,दि.०३:

 
राज्यांतील गुणी, कर्तव्यनिष्ठ व समाजाभिमुख शिक्षकांचा त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल सन्मान शिर्डी येथे रविवार  दि. १ फेब्रुवारी रोजी साई पालखी निवारा येथे बी दि चेंज फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६ सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. 

शिक्षक हे समाजाची भावी पिढी घडविणारे खरे शिल्पकार असून, त्यांच्या निःस्वार्थ सेवाभावाचा गौरव व्हावा, या उद्देशाने बी दि चेंज फाउंडेशनतर्फे दरवर्षी या राज्य स्तरावरील पुरस्काराचे आयोजन करण्यात येते. यावेळी कर्नल सुनील राजदेव, माजी सैनिक अधिकारी अरुण भंडारे, अभिनेत्री सौ. निवेदिता पगार, क्विरिप्लायचे सीईओ ऋषिकेश खैरनार, एम्स अकॅडमीचे संचालक सुधाकर शृंगारे, अमृत रोहोम, संस्थेचे अध्यक्ष मयूर ढोकचौळे, विश्वस्त अभिषेक तुपे आदींच्या हस्ते डॉ. सुधीर पंचगल्ले यांना मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, फेटा बांधून सत्कार करण्यात आला. 


मुरुम येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयातील वाणिज्य विभागाचे प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासातील योगदानातून आदर्श विद्यार्थी घडविल्याबद्दल राज्य आदर्श शिक्षक २०२६ या पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांच्या या यशाबद्दल माजी मंत्री बसवराज पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील, उमरगा जनता सहकारी बँकेचे चेअरमन शरण पाटील, नगर शिक्षण विकास मंडळ संस्थेचे सचिव व्यंकटराव जाधव गुरुजी, संचालक डॉ. सतीश शेळके, माजी प्राचार्य डॉ. अशोक सपाटे, उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार, डॉ. रवींद्र गायकवाड, डॉ. महेश मोटे, डॉ. सुभाष हुलपल्ले, डॉ. शिवपुत्र कनाडे आदींनी त्यांचे विशेष अभिनंदन केले. 

  फोटो ओळ  : शिर्डी, जि. अहिल्यानगर येथील बी दि चेंज फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात डॉ. सुधीर पंचगल्ले यांचा सन्मान करताना सुनील राजदेव, अरुण भंडारे, निवेदिता पगार, ऋषिकेश खैरनार, सुधाकर शृंगारे व अन्य.

Labels:

Monday, 2 February 2026

ग्रामीण भागातील जनतेनी महायुतीच्या उमेदवारांना विजयी करावे. - महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

ग्रामीण भागातील जनतेनी महायुतीच्या उमेदवारांना विजयी करावे. - महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुरूम,दि.०२ फेब्रुवारी: डॉ सुधीर पंचगल्ले 

  केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार असेपर्यंत लाडकी बहीण योजना चालू राहणार आहे. आता सरकारने लखपती दीदी ही महत्वाकांक्षी योजना राबविण्यासाठी तयार झाले असून धाराशिव जिल्ह्यातील सर्व नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील महिलांना लखपती करण्याचा संकल्प करावा. देशातील आणि राज्यातील सरकार शेतकऱ्यांना मोफत वीज देणार असून दिवसा आणि रात्री वीजपुरवठा करून शेती सुजलाम सुफलाम होणार असून ग्रामीण भागातील जनतेनी महायुतीच्या उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
उमरगा-लोहारा तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ तालुक्यातील कोराळ मोड वर सोमवारी दि. २ रोजी आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री बसवराज पाटील, मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगावे, आ. राणाजगजितसिंह पाटील, जिल्हा अध्यक्ष दत्ता कुलकर्णी,  नगराध्यक्ष बापूराव पाटील, उमरगा जनता बँकेचे चेअरमन शरण पाटील, रामकृष्णपंत खरोसेखर, दिलीप भालेराव, संताजी चालुक्य, प्रकाश आष्टे, माधव पवार, रशीद शेख, कैलास शिंदे, शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष मोहन पनुरे, बलभीमराव पाटील आदींसह सर्व उमेदवार उपस्थित होते.

पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले की,
पंतप्रधान मोदी यांच्या ५५ योजना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपल्या भागत येणार आहेत.जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून ओबीसी, एस.सी., बंजारा, मराठा समाजाच्या कल्याणासाठी कमळा समोरील बटन दाबून
विकासाला मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले. विकसित महाराष्ट्र करण्याचा संकल्प देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. देशातील नरेंद्र मोदी सरकारने एक लाख कोटी रुपये महाराष्ट्र राज्याला देणार असून उमरगा तालुक्यातुन गेलेला राष्ट्रीय महामार्ग हाय स्पीड हायवेला जोडला जाणार आहे. शेतकऱ्यांच्या नदी नाल्यातील वाहून जाणारे पाणी फिरवून आणून शेतकरी बांधवांना देणार आहोत. सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार असून नव्याने स्मार्ट व्हिलेज संकल्पना राबवून ग्रामीण भागाचा कायापालट करणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा नेते शरण पाटील यांनी केले. त्यानीं महसूल विभागाच्या वतीने चालवलेल्या शेत रस्ते योजनेमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठी मदत झाली असल्याचे सांगितले.

या वेळी माजी मंत्री बसवराज पाटील म्हणाले की, धाराशिव लातूर हे दोन भावंडे आहेत.या जिल्ह्यात परिषदेच्या अध्यक्षपदी महायुतीचा अध्यक्ष बसवनार असून पक्षाच्या आदेशानुसार शरण पाटील यांची उमेदवारी मागे घेऊन सर्व सामान्य कार्यकर्त्याला संधी दिली असल्याचे ते म्हणाले. 

यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी महायुती सरकार मोठ्या ताकदीने काम करीत असल्याचे सांगितले. राज्यात व केंद्रात मोठी विकासाची पर्वणी होत आहे. पायाभूत सुविधेसाठी बारा लाख कोटी निधी मिळणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २१ टीएमसी हक्काचे पाणी आणण्यासाठी महायुती सरकारने निर्णय घेतले सात टीएमसीला मंजुरी मिळाली आहे. हे पाणी रामदऱ्यात  येणार आहे. तिथून तुळजापूर लोहारा उमरगा तालुक्यात हे पाणी येणार आहे. तुळजापूर देवी मंदिर विकासासाठी दोन हजार कोटी मंजूर झाले आहेत. शिर्डीच्या धर्तीवर विकास होणार असल्याचे ते म्हणाले.

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरण पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. शौकत पटेल यांनी केले. सभेपुर्वी माजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात झाली. 

फोटो ओळ : मुरूम, ता. कोराळ, ता. उमरगा येथील जाहीर सभेत बोलताना बावनकुळे, बसवराज पाटील, संजय कौडगावे, बापूराव पाटील शरण पाटील व अन्य

Labels:

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रचारात भाजप महायुतीची जोरदार मुसंडी ; ग्रामीण भागाचे रुपडे पालटण्यासाठी निवडणूक रिंगणात - उमेदवार सिद्धेश्वर अण्णा कोरे


जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रचारात भाजप महायुतीची जोरदार मुसंडी ;  

ग्रामीण भागाचे रुपडे पालटण्यासाठी निवडणूक रिंगणात - उमेदवार सिद्धेश्वर अण्णा कोरे 


नळदुर्ग,दि.०२ फेब्रुवारी:

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत  जनमताचा कौल भाजप महायुतीकडे वाढत असल्याचे पाहुन विरोधक धास्तावले असुन त्यांच्याकडे प्रचाराचे मुद्देच नाही. त्यामुळे बिनबुडाचे आरोप करुन दिशाभूल  करीत असल्याचे कारस्थान सुरू असुन त्यास मतदारानी बळी पडू नये, असे सांगत मतदार त्यांना  त्यांची योग्य जागा  दाखवणार  असल्याचे नंदगाव जिल्हा परिषद गटातील भाजप रिपाइं (आठवले),राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), शिव सेना (एकनाथ शिंदे).व मित्र पक्षाच्या महायुतीचे उमेदवार सिद्धेश्वर अण्णा कोरे  यांनी बोलताना सांगितले.

भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  ग्रामीण भागाचा विकासात्मक कायापालट करण्याकरिता आणि सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी  नंदगाव (ता.तुळजापूर )  जिल्हा परिषद गटातून भाजप महायुतीचे उमेदवार सिध्देश्वर अण्णा कोरे निवडणूक लढवित असल्याचे सांगितले.

नंदगाव जिल्हा परिषद गटातील भाजपा महायुतीचे उमेदवार सिद्धेश्वर कोरे, नंदगाव जिल्हा परिषद गटांतर्गत येणाऱ्या पंचायत समिती खुदावाडी गणातील उमेदवार भिवाजी इंगोले   यांच्या प्रचारार्थ मतदारसंघातील गावे पिंजुन काढत मतदारांना आपली बाजू पटवुन सांगत आहेत. नुकतीच खुदावाडी येथे  कॉर्नर सभा घेण्यात  आली. यावेळी नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला . या बैठकीस नळदुर्गचे नगराध्यक्ष  बसवराज धरणे, माजी पंचायत समिती सदस्य  महादेव सालगे, खुदावाडी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष ब्रम्हनंद कापसे , भिमाशंकर कबाडे , खुदावाडी पंचायत समिती गणाचे उमेदवार भिवाजी इंगोले ,रिपाइं चे जिल्हा सचिव एस.के. गायकवाड ,भाजपा मीडिया सेलचे तालुकाध्यक्ष किशोर धुमाळ, पत्रकार निजाम शेख, अंगद जाधव,  लक्ष्मन राठोड, माजी नगरसेवक किशोर नळदुर्गकर,राष्ट्रवादीचे प्रा. शिवाजी मारेकर आदीसह नंदगाव जिल्हा परिषद गटातील आणि गणातील सर्व गावातील प्रमुख कार्यकर्ते, महिला ग्रामस्थ उपस्थित होते.  

Labels: