Wednesday, 30 November 2022

इनामी ,कूळ सिलिंगच्या १, १३० एकर क्षेञ भोगवटादार वर्ग २ नोंदीच्या महसुली कार्यवाहीने शेतक-यात खळबळ

नळदुर्ग दि.३० : शिवाजी नाईक 

नळदुर्ग महसुल मंडळार्गत १९ गावातील जुने आभिलेख तपासुन  इनामी ,कूळ सिलिंग व  वक्फ बोर्डाच्या तब्बल १ हजार १३० एकर क्षेञ भोगवटादार वर्ग २ अशी नोंद घेण्यात आली आहे.यामुळे नळदुर्ग  शहरसह परिसरातील शेतक-याच्या चिंतेत भर पडली आहे.   


काही दिवसापुर्वी अतीवृष्टीने शेतातील पिक वाया गेले.विमा कंपनीकडून पिकविमा देण्यास झालेली टाळाटाळ आणि आता भोगवटदार वर्ग २ अशी झालेली नोंद यामुळे शेतक-यांच्या अडचणी वाढले आहे. आशावेळी राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारने याप्रकरणी शेतकरी हिताचा निर्णय  घेवुन दिलासा दयावा,अशी अपेक्षा शेतकरी वर्गातुन व्यक्त केली जात आहे.



नळदुर्ग  व शिवारातील असंख्य जमिनीची भोगवटदार वर्ग २ अशी नोंद झाल्याने शेतकरी व प्लाॕट धारकामध्ये मोठी खळबळ उडाली असून आज घडीला ११५ गटातील  १हजार१३० एकर  क्षेत्रावर भोगवटदार वर्ग २ असा उल्लेख करण्यात आला आहे.

 यामध्ये वक्फ बोर्ड राजपञ व जुना गाव नमूना ९, सिलिंग वाटप रजिस्टर नक्कल प्रमाणे ३६ ई कुळ रजिस्टर नक्कल प्रमाणे सात बारावर भोगवटदार  वर्ग २ प्रमाणे नोंद घेण्यासाठी तत्कालीन उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये नळदुर्ग सज्जा तलाठी यांनी २ नोव्हेंबर २०२२ रोजी नोंद घेतल्यानंतर मंडळ अधिकारी यांनी ९ नोव्हेंबर २०२२ रोजी यास मंजुरी दिली आहे.नळदुर्ग मंडळ अंतर्गत १९ गावात सर्वे करण्यात आला.या गटातील इनामी ,कुळ, सिलिंग व वक्फ बोर्डच्या अंतर्गत यामध्ये ३७५ संबंधित शेतकरी व प्लाॕटधारकांना नोटीस बजावण्यात आली. या नोटीस मध्ये संबधितांनी उपस्थित राहून म्हणणे दाखल करावे अन्यथा आपले काहीही म्हणणे नाही, असे समजून सदरचा फेरफार रद्द करून सदरील जमिन शासन जमा करण्यासाठी संबधिताकडे प्रस्तावित करण्यात येईल असा उल्लेख आहे. 



या नोटीस नंतर ७५ शेतक-यानी नळदुर्ग तलाठी कार्यालयात दि. २६ नोव्हेंबर रोजी प्रस्ताव दाखल केले आहेत.


भोगवटदार वर्ग २ अशी नोंद झालेल्यामध्ये शहरातील शासकीय विश्रामग्रह परिसर, शहरालगतच्या अक्कलकोट रोडवरील गणेशखीळा, कळवातणीचे शेत, कंदुरमळा, पाटील तांडा, जखणीतांडा, इंदिरानगर जवळील भाग, बोरीधरण लगत, मैलारपूर जवळील गव्हाणे पट्टा, भुईकोट किल्ला लगत दक्षिण भाग याचा समावेश आहे. 

शासनाकडून भोगवटदार वर्ग २, इनामी, वक्फ जमिनी, सिलींग कायद्यातील जमिनींचा मूळ प्रयोजनांसाठी वापर होतोय की नाही, हे तपासले जात आहे. शिवाय चुकीच्या पध्दतीने झालेले फेरफार रद्द करून संबंधितांवर कारवायाही केल्या जाणार आहेत. 


नळदुर्ग मंडळात अशा शेकडो एकर जमिनींच्या सातबारांवर आता भोगवटदार क्रमांक २, असा उल्लेख आल्याने प्लॉट खरेदी करून घरे उभारणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, ज्या जमिनींचे बेकायदेशीरपणे हस्तांतरण, विक्री झाली आहे,अशा जमिनी मूळ मालकांमार्फत रूपांतरण शुल्क भरून नियमित करता येऊ शकतात. भोगवटदार क्रमांक २ च्या जमिनी म्हणजे इनामी  जमिनी, वक्फच्या जमिनी,वन, गायरान, कूळाच्या तसेच वतनाच्या जमिनी असतात. भोगवटदार क्रमांक दोनच्या जमिनी विकण्याचा अधिकार संबंधित शेतकऱ्याला नसतो. इनामी किंवा वक्फच्या जमिनी या संबंधित मंदिर किंवा मशिदच्या सेवेसाठी दिलेल्या असतात. तर अन्य जमिनी स्वत:च्या उदरनिर्वाहासाठी असतात. मात्र,वतनाच्या किंवा इतर जमिनींची विक्री करता येते. त्यासाठी शासनाची अर्थात जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागते. काही प्रमाणात रूपांतरण शुल्क किंवा नजराणा रक्कम भरावी लागते अशी माहिती  मंडळ आधिकारी जे .एस .गायकवाड यांनी दिली.    

नळदुर्ग शहर व परिसरात या गटांतील शेतकऱ्यांचा भोगवटदार वर्ग २ मध्ये समावेश करण्यात आला आहे.
१४९/१,१४९/१/२, १४९/२, १५०/१, १५३,१५४,१५५, १५६, १५६/२, २७६/अ/१, २७९, ४३,४४, ४५, ४७, ४८, ५१/अ, ५१/क/२ ५१/ब,  ५२/अ/१, ५२/अ/२, ५२/क, ५२/ड, ५२/ब, ७३/अ, ७३/क, ७३/क/२, ७३/फ/१, ७३/फ/२, ७३/ब, १५०/२, १५२/१, १५२/२, २९६/१, २९६/२, २९६/३, २९६/४, १०१/१, १०१/२, १०७/२, १११/१, १११/२, ११२/१, ११२/२, ११४, ११५/१, ११५/२, ११५/३, १४०/१, १४०/२, १४०/३, १४१, १४१/२, १४१/३, १४२/१, १४८, १६७/१, १६७/२, १६७/३, १६७/४, १६७/५, १७६/४, १९०/१, १९०/२, १९०/३, २०४/अ/३, २१/१, २१/२, २१/अ/३, २१/४, २१/५, २२/१, २२/२, २२/३, २३/१, २३/२, २३/३, २३१/ब/३, ३२४/३, २३९/१, २३९/२, २३९/५, २३९/७, २३९/८, २४/१, २४/२, २४०/२, २४०/३, २५/१, २५/२, २५/३, २५/४, ६२, ६३, ६५, ८२/१, ८२/२, ८५/१, ८५/२, ८५/३ ईत्यादी.

Labels: ,

Tuesday, 29 November 2022

महाराष्ट्र लोक विकास मंचचे, जीवन गौरव व कार्यगौरव पुरस्कार जाहीर



कळंब ,दि.२९: भिकाजी जाधव


 महाराष्ट्र लोक विकास मंच (मलोविम) ही महाराष्ट्रातील सामाजिक संस्थांची संघटना असून, गेली 28 वर्षे सर्वंकष ग्रामीण विकास व वंचित घटकांचे हक्क व अधिकार या विषयावर कार्य करीत आहे. सामाजिक संस्थांच्या बळकटीकरणाच्या माध्यमातून मुलं,महिला, पाणी, जमीन,दुष्काळ ,रोजगार, यांच्या न्यायिक हक्कासाठी स्वयंसेवी संस्थांना मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहे. 


मलोविम गेली 16 वर्षे सामाजिक, शैक्षणिक, महिला, आरोग्य, कला, क्रीडा, साहित्य, शेती, पाणी, ग्रामीण विकास तसेच वंचित घटकांसाठी, समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंत व कर्तृत्ववान  कार्यकर्त्यांचा *कार्य गौरव पुरस्कार* देवून सन्मान करते. त्यानुसार मलोविमने 2022 सालाचे पुरस्कार नुकतेच जाहीर केले असून, 10 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता, मानवी हक्क दिनाचे औचित्य साधून, बीड येथील इन्फंट इंडिया ट्रस्ट येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पाडला जाणार आहे. 

मलोविम  कार्यगौरव  पुरस्कार पुढील मान्यवरांना देऊन सन्मानित केले जाणार आहे.

*1. चंद्रकला भार्गव, लातूर -* महिला, आरोग्य व ग्रामविकास.
*2. कल्पना गायकवाड, लातूर -* सक्षम महिला, पंचायतराज.
*3. सुनंदा खराटे, उस्मानाबाद -* एकल महिला पुनर्वसन.
*4. गौरी शिंदे, बीड -*  ट्रान्सजंडर कार्य.
*5. वैशाली पाटील, रायगड -* स्त्रीशक्ती व लोकचळवळ.
*6. बंडू खराटे, उस्मानाबाद -* लोककला व शाहिरी 
*7. भैरवनाथ कानडे, उस्मानाबाद -* साहित्यिक व समालोचक.
*8. दत्तात्रय नलावडे, बीड -* शेक्षणीक कार्य.
*9. उमेश टोणपे, औरंगाबाद -* उत्कृष्ठ व्यवस्थापन.
*10. हरीचंद्र ढाकणे, पुणे -* सामाजिक कार्य
*11.दत्तात्रय मानगुडे, सांगली -*  साहित्यरत्न
*12. संतोष राऊत, सोलापूर -* ग्रामीण विकास.
*13. राम शेळके, अहमदनगर -* आरोग्य सेवा.
*14. रवींद्र राऊत, यवतमाळ -* पाणीदार माणूस.
*15. राजेंद्र कासार, अहमदनगर -* कै मधुकर धस पाणीदार माणूस. 

विशेष मानाच्या पुरस्काराची सुरुवात


महाराष्ट्र लोकविकास मंचतर्फे, या वर्षापासून राज्यस्तरीय, "जीवन गौरव पुरस्कार " सुरू करण्यात आला आहे. *2022 च्या मानाच्या पहिल्या राज्यस्तरीय  पुरस्कारासाठी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व अफार्म संस्थेचे माजी कार्यकारी संचालक, एम. एन.कोंढाळकर (सर) यांची निवड मलोविमने केली आहे.*
 महाराष्ट्रातील स्वयंसेवी संस्था, संघटना, संस्थाचालक व कार्यकर्त्यांच्या क्षमता वर्धनासाठी तसेच त्यांच्या माध्यमातून, सर्वंकष ग्रामीण विकास व सामाजिक परिवर्तन यासाठी कोंढाळकर सर, 50 वर्षाहून अधिक काळ, आज वयाच्या 75 व्या वर्षीही महाराष्ट्रभर फिरून कार्य करीत आहेत. सदर पुरस्काराबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन
2021 च्या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या आयोनचे यजमानपद जबाबदारी, बीड येथील इन्फांट इंडियाचे दत्ताभाऊ बारगजे, नवचेतना संस्था केज मनीषाताई घुले, पसायदान संस्था बीडचे ओम गिरी यांनी स्वीकारली आहे. 
पुरस्काराचे स्वरूप ट्रॉफी मानपत्र शाल श्रीफळ हार असे असेल.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र लोकविकास मंचाचे अध्यक्ष विश्वनाथ (अण्णा) तोडकर , उपाध्यक्ष भूमिपुत्र वाघ, M.N. कोंढाळकर सर, मंगलताई दैठणकर, रमाकांत बापू, दत्ताभाऊ बारगजे, ओम गिरी, मनीषाताई घुले, आणि महाराष्ट्र लोकविकास मंचचे पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाला सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक सेवा देणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

Labels: ,

पुजा-याना मंदिराबाहेर काढण्याचा शिवसेनेचे कमलाकर चव्हाण यांचा इशारा

नळदुर्ग ,दि.२९: विलास येडगे

श्री.क्षेत्र मैलारपूर (नळदुर्ग ) येथिल  खंडोबा यात्रा जानेवारी २०२३ मध्ये झाल्यानंतर ज्या वेळेस खंडोबा देव सव्वा दहा महिन्याच्या वास्तव्यासाठी अणदुरला रवाना होतो त्यावेळी अणदुरच्या पुजाऱ्यांनी मैलारपुर येथील खंडोबा मंदिरात पुजा--अर्चा करण्यासाठी थांबु नये. अन्यथा पुजाऱ्यांना मंदिराबाहेर काढुन मंदिराला कुलुप घातले जाईल असा इशारा शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख तथा नळदुर्ग येथील खंडोबाचे मानकरी कमलाकर चव्हाण यांनी पञकार परिषदेत  दिला आहे.
        

 खंडोबा देवाचे मुळ ठिकाण हे नळदुर्ग (मैलारपुर) हे आहे. मात्र मागे नळदुर्ग--अणदुर मध्ये झालेल्या करारानुसार श्री खंडोबा देवाचे वास्तव्य पावणेदोन महिने नळदुर्ग व सव्वा दहा महिने अणदुर येथे राहील असे ठरले आहे. या करारानुसार अणदुर व नळदुर्गचे मानकरी आजपर्यंत हा करार पाळत आले आहेत. मात्र गेल्या कांही वर्षांपासुन अणदुरच्या पुजाऱ्यांनी मनमानी करीत मैलारपुर येथील खंडोबा मंदिरात वर्षभर पुजा करण्यासाठी ठाण मांडली आहे. वास्तविकपाहता यात्रा संपल्यानंतर ज्या वेळेस खंडोबा देव अणदुरला जातो त्यावेळी अणदुरच्या पुजाऱ्यांनीही मैलारपुर मंदिर सोडणे गरजेचे असताना येथील मिळणाऱ्या उत्पन्नावर डोळा ठेऊन हे पुजारी मैलारपुर येथील खंडोबा मंदिरात ठाण मांडुन बसत आहेत. या प्रकारामुळे नळदुर्गकरांवर मोठा अन्याय होत आहे. मैलारपुर येथील श्री खंडोबा मंदिरावर अणदुर येथील पुजाऱ्यांचा कुठलाच अधिकार नसतांना हे पुजारी आज या मंदिराचे मालक म्हणुन बसले आहेत. यापुढे पुजाऱ्यांचा हा मनमानीपणा नळदुर्गकर खपवुन घेणार नाहीत. असे कमलाकर चव्हाण यांनी म्हटले आहे.
      

  यात्रा संपल्यानंतर पुढील सव्वा दहा महिने मैलारपुर येथील खंडोबा मंदिरात नळदुर्गचे पुजारी पुजा करण्यासाठी सक्षम आहेत.तो नळदुर्गकरांचा अधिकार आहे. त्यामुळे यात्रा संपल्यानंतर अणदुरच्या पुजाऱ्यांनी स्वता होऊन मंदिर सोडावे अन्यथा पुजाऱ्यांना मंदिराबाहेर काढले  जाईल असा खणखणीत इशारा कमलाकर चव्हाण यांनी दिला आहे.
     
  नळदुर्गचे खंडोबाचे मानकरी, खंडोबा भक्त व नळदुर्ग शहरांतील नागरीकांनी हा सर्वानुमते निर्णय घेतला असुन यामुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली तर त्याला अणदुरचे पुजारी जबाबदार असतील असेही कमलाकर चव्हाण यांनी म्हटले आहे. यावेळी नळदुर्ग शहर  पञकार संघटनेच्या अध्यक्ष सुहास येडगे , तानाजी जाधव , विलास येडगे , भगवंत सुरवसे , शिवाजी नाईक, सुनिल गव्हाणे , आदीजण उपस्थित  होते.

Labels:

उस्मानाबाद : राजमाता जिजाऊ आदर्श शाळा कार्यक्रम व निजामकालीन शाळा दुरुस्तीसाठी लोकवाट्याची रक्कम जमा करावी - जिल्हाधिकारी


उस्मानाबाद,दि.२८


 राजमाता जिजाऊ आदर्श शाळा कार्यक्रम आणि निजामकालीन शाळा दुरुस्ती कार्यक्रम यासाठी महाराष्ट्र शासनाकडून 90 टक्के प्रमाणात निधी दिलेला आहे आणि लोकसहभागातून 10 टक्के निधी उपलब्ध करण्याबाबत सूचित केलेले आहे. शासनाकडुन प्राप्त असलेला निधी 31 मार्च 2022 पुर्वी उपयोजीत करणे आवश्यक आहे. अन्यथा हा निधी शासन खाती परत जावू शकतो. त्यामुळे 10 टक्के लोकवाट्याची रक्कम लवकरात लवकर जमा करणे अत्यावश्यक आहे.



तेंव्हा लोकसहभागातून आपल्या शाळेसाठी दर्शविलेला 10 टक्के प्रमाणे निधी निर्धारीत वेळेत जमा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे आणि जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे. तरी आपण व आपल्या गावातील सर्व दानशूर नागरीकांनी आपल्या शाळेच्या बँक खात्यामध्ये यथाशक्ती जास्तीत जास्त रक्कम जमा करुन आपल्या गावातील शाळा आदर्श करण्यासाठी योगदान द्यावे, असेही आवाहन जिल्हाधिकारी यांनी यावेळी केली.


राजमाता जिजाऊ शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियान निजाम कालीन शाळांचे दुरुस्ती आणि नवीन शाळा बांधकामासाठी जिल्ह्यास 13 कोटी रूपये शासनाकडून प्राप्त झाले आहेत. परंतु त्यामध्ये सर्वात महत्वाची अट अशी आहे की ते 10 टक्के लोकवर्गणी जमा करणे अपेक्षित आहे. तेंव्हा गावातील शाळांना सुंदर आणि सुशोभित करण्यासाठी व उत्कृष्ट वास्तू मध्ये आपल्या मुलामुलींचे शिक्षण व्हावे यासाठी सर्वांनी पुढे येऊन अपेक्षित रक्कम जमा करावी, असेही आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी यावेळी केले.

Labels: ,

Monday, 28 November 2022

भैरवनाथ कानडे यांना भारतरत्न डॉ .बी .आर . आंबेडकर राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार प्रदान


 नळदुर्ग,दि.२८


             तुळजापूर तालुक्यातील चिकुंद्रा येथील सहशिक्षक तथा पत्रकार भैरवनाथ खंडू कानडे यांना ७३ व्या राष्ट्रीय संविधान दिनाच्या निमित्ताने भारतरत्न डॉ .बी आर .आंबेडकर राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार देण्यात आला .


दिल्ली  येथील डॉ . विशाखा स्मृती सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य ,अखिल भारतीय सिद्धार्थ कल्याण केंद्र , नवी दिल्ली , परिवर्तन सामाजिक प्रतिष्ठान अंधेरी ,तेजराजजी जोहरलाल गांधी चॅरिटेबल ट्रस्ट  बारामती , निफा फाउंडेशन , झारखंड आदी संस्थांच्या वतीने (दि.२६ )रोजी बारामती येथे संविधान दिनाच्या निमित्ताने 'भारतातील सामाजिक समानता ' या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते . या परिषदेत शैक्षणिक ,सामाजिक ,साहित्य व पत्रकारिता क्षेत्रात  केलेल्या विशेष उल्लेखनीय कार्याबद्दल ज्ञानकिरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष भैरवनाथ कानडे यांना नवी दिल्ली येथील इंडियन ऑइल कार्पोरेशन लिमिटेडचे मॅनेंजर सुरज सिंग , बारामती पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक ,ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रा. माधव जोशी ,अखिल भारतीय खाटीक समाज संघटना नवी दिल्लीचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रविण गालींदे ,प्रा . गोरख साठे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला .याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .

Labels:

Saturday, 26 November 2022

माधवराव पाटील महाविद्यालयात संविधान दिन व शहीद जवानांना श्रध्दांजली अर्पण

             
मुरूम, ता. उमरगा, दि. २६  : 

येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयात महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती, उस्मानाबाद व राज्यशास्त्र पदवी-पदव्युत्तर व संशोधन केंद्रच्या संयुक्त विद्यमाने शनिवार (दि. २६) रोजी ७३ वा संविधान दिन साजरा करण्यात आला. 



प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक सपाटे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी २६ /११ हल्ल्यातील शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाविद्यालयातील विद्यार्थीनी कु. शुभांगी कुलकर्णी, अंबिका पाताळे, निकिता पाताळे, योगेश पांचाळ, अमोल कटके यांनी सामुहिक संविधानाच्या उद्येशपत्रिकेचे वाचन केले. यावेळी महाअंनिसचे जिल्हा कार्यध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे यांनी संविधानाचे महत्त्व याविषयावार मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सुजाता मुके यांनी केले. सूत्रसंचलन प्रा. डॉ. नागनाथ बनसोडे तर आभार प्रा. डॉ. विनायक रासुरे यांनी मानले. यावेळी महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हा सचिव प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले, प्रा. दिनकर बिराजदार, प्रा. राजकुमार रोहीकर, भालचंद्र टाचले, नानासाहेब बेंडकाळे, प्रभाकर महिंद्रकर, चंद्रकांत पुजारी, लालअहमद जेवळे, दिलीप घाटे, महेश लिमये आदींची उपस्थिती होती.             


फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील माधवराव पाटील महाविद्यालयात  संविधान दिन प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना प्राचार्य अशोक सपाटे, डॉ. महेश मोटे, प्रा. दिनकर बिराजदार, डॉ. नागनाथ बनसोडे व अन्य.

Labels: ,

Friday, 25 November 2022

नळदुर्गचा प्राचीन किल्ला : जागतिक वारसा सप्ताह विशेष लेख


नळदुर्ग किल्ला

              उस्मानाबाद या जिल्ह्याच्या ठिकाणापासून 57 किलोमीटरवर आग्नेय दिशेस नळदुर्ग आहे. 1904 पर्यंत हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण होते. मुंबई-पुणे-सोलापूर-हैद्राबाद या राष्ट्रीय महामार्गावरील हे ठिकाण समुद्रसपाटीपासून 670 मीटर उंचीवर आहे. 



हा किल्ला दोन वेगवेगळ्या कालखंडात दोन वेगळ्या शासकांनी बांधला. किल्ल्याचा मूळ भाग किल्ल्यातील पाणी महालाच्या पश्चिमेस आहे. तो रणमंडळ या नावाने ओळखला जातो. या किल्ल्याची बांधणी झाली त्यावेळी तो मातीचा किल्ला होता. चालुक्य तैल दुसरा यांचा सामंत नलराजा याने इ स. 993 मध्ये नळदुर्ग किल्ला बांधल्याचे तेथील शिलालेखावरून स्पष्ट होते. स्थानिक लोक त्याचा इतिहास पौराणिक काळातील नळ-दमयंतीपर्यंत घेऊन जातात. बहामनी काळात या किल्ल्याचे दगडी बांधकामात रुपांतर केले गेले.

             

नळदुर्गच्या उत्तरेस बोरी नदी वाहते. ती उत्तर-पूर्व दिशेने किल्ल्याला वेढा घालत दक्षिणेकडे पुढे निघून जाते. अग्नेय टोकाकडे पाणी अडवून ते पश्चिमेच्या खंदकात भरण्याची कल्पना प्रत्यक्षात आणून आणि नदीला एक फाटा फोडून तो पश्चिमेकडून दक्षिणेला नेऊन नदीला मिळविणे तसेच दुसरा फाटा दुर्गाजवळ फिरवून त्यावर बंधारा बांधून त्या जलाशयाचा उपयोग दुर्ग संरक्षणासाठी केला आहे. दुर्गाभोवती फिरवलेल्या या नदीच्या पाण्याने दुहेरी तटाच्या किल्ल्याभोवती पाण्याचा आणखी एक तट उभा केला आणि किल्याभोवती फिरवलेल्या पात्रामधून किल्यातील पाण्याची गरज भागविली आहे. बहामनीनंतरच्या काळात विजापूरच्या अली आदिलशहा आणि इब्राहिम आदिलशहा यांच्या काळात नळदुर्ग किल्ल्यास अभेद्य बनविण्यात आले आणि त्यास शाहदुर्ग या नावाने ओळखले जाऊ लागले. आदिलशाही, निजामशाही, बरीदशाही या तीन राज्यांच्या सरहद्दीवरील या किल्ल्यावर वर्चस्व मिळवण्यासाठी अनेक वेळा संघर्ष झाले. कालांतराने 14 मे 1677 रोजी या किल्ल्यावर मुघलांचे वर्चस्व निर्माण झाले. 



या काळात हा किल्ला नळदुर्ग या नावानेच ओळखला जाऊ लागला. सन 1852 ते 1857 या काळात कर्नल मेडोज टेलर हा येथे कलेक्टर म्हणून कार्यरत होता. त्याच्या 'स्टोरी इन माय लाईफ' या ग्रंथात त्याने नळदुर्ग किल्ल्याचे वर्णन केले आहे. मेडोज टेलरने या किल्ल्यास भेट दिली तेव्हा तो उदगारला, The fort of Naldurg is one of the most intresting place I have seen (आजपर्यंत मी पाहिलेल्या अनेक स्थळात नळदुर्गचा किल्ला हे मोठे आकर्षक ठिकाण आहे.)

               


अभेद्य दुहेरी दगडी तटबंदी आणि पहिल्या तटाभोवती खंदक असलेल्या किल्ल्याचे क्षेत्रफळ 126 एकरचे आहे. किल्ल्यात असलेले 114 बुरूज किल्ल्याची भव्यता स्पष्ट करतात. किल्ल्यातील बुरुजांना ढालकाठीचा बुरूज, नव बुरूज, उफळ्या उर्फ टेहळणीचा बुरूज, परंडा बुरूज अशी नावे आहेत. किल्ल्याच्या दक्षिणेस एकास एक असे नऊ बुरुज असलेल्या नवबुरूजास पाकळ्यांचा बुरूज असेही म्हणतात. किल्ल्यातील सर्वात उंच असलेला टेहळणीचा बुरूज (उफळ्या बुरूज) वैशिष्ट्यपूर्ण आहे. तो 30.5 मीटर उंच आहे. त्यावर जाण्यासाठी 5 ते 5.5 मीटर रूंदीच्या 78 पायऱ्या आहेत. बुरूजावर दोन तोफा आहेत. उफळ्या बुरूजावर जाणाऱ्या पायऱ्या जवळच एका कोष्टात खंडोबाचे स्थान दाखविले जाते. राजा नळाची राणी दमयंतीने प्रार्थना केल्यावर हा खंडोबा मैलारपुरावरून येथे येऊन स्थायिक झाल्याचे सांगितले जाते. या बुरूजाच्या पायथ्याशी पाण्याचा हौद आहे. रणमंडलावर जाण्यासाठी उफळ्या बुरुजाच्या अलीकडून एक मार्ग आहे. या मार्गावरच गंडभेरूडाचे शिल्प कोरलेले आहे. ते केवळ पक्षीरूप गंडभेरूड या प्रकारातील आहे.


तोफा: किल्ल्यात एकूण 12 तोफा आहेत. पैकी मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यावर चौथऱ्यावर चार तोफा, उफळ्या बुरूजावर दोन तोफा (पैकी एका तोफेचे तोंड पशूचे आहे.) किल्ल्यातील राज्य पुरातत्व खात्याच्या कार्यालयाच्या आवारात पंचधातुच्या तोफा आणि असंख्य तोफगोळे आहेत.


किल्ल्यातील इमारती : किल्ल्यात हत्तीखाना, दारुगोळा कोठार, धान्यकोठार, जोड इमारत, शिवकालीन इमारत, रंगमहाल, बारादारी- राजवाडा. राणी महाल, तुरूंग कोठडी आदी इमारती आहेत.


किल्लेदाराचा वाडा : किल्ल्यात प्रवेश केल्यावर आत जाताना प्रथम हत्तीखाना आणि त्यानंतर काही पडक्या इमारती लागतात. तसेच पुढे गेल्यास डाव्या हातास जामा मशीद आणि उजव्या हाताला किल्लेदाराचा वाडा लागतो. या इमारतीच्या मधोमध एका मोकळ्या चौकात दोन फारशी शिलालेख, काही कोरीव दगडी शिल्प, नगाऱ्याची लोखंडी पात्रे, पंच धातुची तोफ आणि असंख्य तोफगोळे पडलेले आहेत.


दारूचे कोठार : उफळ्या बुरूजाला लागूनच दारूचे कोठार आहे. याला लागूनच असलेली दुसरी इमारत धान्याचे कोठार असावे.


पाणी महाल: मध्ययुगीन कालखंडातील वास्तुशास्त्रातील प्रगती दर्शविणारी नळदुर्ग किल्ल्यातील सर्वात प्रेक्षणीय वास्तू म्हणजेच पाणी महाल होय. या गूढ अद्भुत चिरेबंदी वास्तूचे  सौंदर्य त्याच्या अंगावरून कोसळणाऱ्या जलधारेत आहे. किल्ल्याच्या मधून वाहणाऱ्या बोरी नदीच्या पात्रात एक बंधारा बांधून या नदीचे पाणी अडविण्यात आले आहे आणि त्याचा वापर किल्ल्यातील पाणीमहाल इमारतीसाठी करण्यात आला आहे. 174 मीटर लांब आणि 2.5 ते 14 मीटर रुंद तसेच 19 मीटर उंच असणाऱ्या या बंधाऱ्याच्या पोटात अत्यंत हवेशीर असा पाणी महाल उर्फ जलमहाल बांधलेला आहे. नदीचे पाणी बंधाऱ्यात साठते आणि बंधाऱ्यातील पाण्याचा प्रवाह या इमारतीवरून नर आणि मादी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांडव्यातून वाहतो. (नर आणि मादी ही स्थानिक नावे आहेत) विशेष म्हणजे पाणी वाहत असताना इमारतीच्या कोणत्याही भागाला या पाण्याचा स्पर्श होत नाही.

                


पाणी महालापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या आहेत. त्या उतरून गेल्या की, बंधाऱ्याच्या अर्ध्या उंचीवर डावीकडील वाट पाणी महालात घेऊन जाते. आत उतरताना अंधार जाणवतो. परंतु एकदा आत उतरल्यानंतर प्रकाश आहे. पश्चिमेकडील भिंतीवर फारशी भोषेतील एक शिलालेख आहे. 'आजदीदन इ चष्म मुहिब्बान रोशन मीग दर्द आणि चष्म दुष्मनान गदर्द कूर' त्याचा मराठी अनुवाद पुढीलप्रमाणे आहे - 'या महालास मित्रत्वाच्या दृष्टीने पाहिल्यास डोळे दिपून जातील आणि शत्रुत्वाच्या दृष्टीने पाहिल्यास डोळ्यापुढे अंधःकार येईल.'

              


याच्या उत्तरेकडे तोंड असलेली आयताकृती दालने आणि त्याला लागूनच डोकावणारा नऊ गवाक्षांचा रेखीव सज्जा आहे. या गवाक्षातून सांडव्यातून कोसळणारे पाणी पाहणे, हे दृष्य मोठे विलोभनीय दिसते. पाणी महालास जोडून स्नानगृह आणि शौचकुपी आहे. उत्तरेकडील बाजुकडे एक गणपतीची मूर्ती एका दगडी पट्टीत कोरलेली आहे. या खोलीस गणेश महाल असे म्हणतात. नदीच्या प्रवाहाचा आणखीन एक उपयोग तत्कालीन राज्यकर्त्यांनी करून घेतला आहे. पडणाऱ्या पाण्यातून निर्माण होणारी ऊर्जा त्यांनी पानचक्कीसाठी वापरली आहे. तिच्या सहाय्याने धान्य दळले जात होते. म्हणूनच मध्ययुगीन कालखंडात हा किल्ला वैशिष्ट्यपूर्ण समजला जातो. पाणी महालाचे बांधकाम इ. स.1560 मध्ये अबुल मुजफ्फर अली अदिलशहा पहिला याने ख्वाजा नियमततुल्लाह याच्या देखरेखीखाली करवून घेतले, असे सांगितले जाते.

श्रीकांत चंद्रकांत देशमुख

जिल्हा माहिती कार्यालय,

उस्मानाबाद

Labels:

"तुळजापूर" जागतिक वारसा सप्ताह विशेष लेख


 तालुका मुख्यालय असलेले तुळजापूर क्षेत्र उस्मानाबादच्या दक्षिण दिशेस 22 किलोमीटरवर धुळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर (एन. एच. 211) आहे. महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठातले आद्यपीठ श्री. क्षेत्र तुळजापूर आहे. तुळजापुरची अधिष्ठात्री देवी श्री. तुळजाभवानी ही महिषमर्दिनी दुर्गेच्या रुपात आहे. महाराष्ट्रात भवानी आईची पूजा मुख्यतः तुळजापुरच्या तुळजाभवानीचीच केली जाते. ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे. स्वराज्याची निर्मिती करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भोसले घराण्याची ही कुलदेवता आहे.


तुळजापूर मराठवाड्याच्या पश्चिम टोकास बालाघाट डोंगराच्या पश्चिम कड्यावरती वसले आहे. आजुबाजूच्या आंध्र, कर्नाटक या राज्यातून हजारो भक्त देवीच्या दर्शनाला नित्य येत असतात. कर्नाटकातील विशेषतः दक्षिण कन्नड प्रदेशातील सेन, कर्नाटक आणि  कदंब ही राजकुले तुळजाभवानीच्या उपासनेशी संबंधित असल्याचे मानले जाते.


तुळजापूर येथील चौदाव्या शतकातील एका शिलालेखात या स्थानाला ‘ महापूर’ असे म्हटले आहे. जुन्या कागदपत्रातून ‘ठाणे चिंचपूर’ असाही या स्थळाचा निर्देश सापडतो. अनुभूतीच्या हाकेला त्वरित थांबली म्हणून ‘त्वरिता’. त्यापासून ‘तुरजा’ आणि शेवटी ‘तुलजा’ अशा स्वरूपात आजचे ‘तुळजापूर’ नाव प्रचलित झाले आहे.

श्री. तुळजाभवानी देवीचे मंदिर आणि परिसर :

देवीचे मंदिर हे पूर्वाभिमुख आहे. रस्त्यावर दोन भव्य प्रवेशद्वार आहेत. दक्षिणेकडे राजे शहाजी दरवाजा तर उत्तरेकडील दरवाजाला राष्ट्रमाता जिजाऊ महाद्वार म्हणतात. मुख्य मंदिरात प्रवेश करताना आपण पुढे पायऱ्या उतरून खाली गेलो की, सरदार निंबाळकर दरवाज्यातून पुढे जावे लागते. खाली उतरताच समोर देवीचा होम लागतो. त्याच्या डाव्या बाजूस गोंधळ्याचा पार तर उजव्या बाजूला पालखीचा पार आहे. संपूर्ण मंदिर परिसर ओवऱ्यांनी बंदिस्त आहे. मंदिराच्या तीनही बाजूस ओवऱ्या आहेत. मंदिराच्या पाठीमागच्या बाजूस यमाई, श्रीनृसिंह, सरस्वती आणि खंडोबा यांसारख्या परिवार देवता आहेत. मंदिराच्या पाठीमागील बाजूस चिंतामणीच्या नावाने एक गोलाकार दगड आहे. भक्तगण श्रद्धेपोटी आपल्या इच्छित मनोकामनेसाठी त्याला कौल लावत असतात. पश्चिम दिशेला राजे शिवाजी महाद्वार आहे. अग्नेय दिशेस असलेल्या द्वारास टोळोबा दरवाजा म्हणतात.


तुळजाभवानीचे मुख्य मंदिर हे हेमाडपंथी शैलीतील आहे.मंदिराची रचना गर्भगृह, अंतराळ, अर्धमंडप आणि सभामंडप याप्रमाणे केलेली आहे. गर्भगृहावर भव्य शिखर आहे. खाली सिंहारूढ असलेली देवीची गंडकी शिळेतील पाषाणमूर्ती आहे. या मुख्य मंदिराला प्रवेश करण्याकरिता दक्षिण बाजूस पितळी दरवाजा, पूर्वेस कड़ी दरवाजा तर उत्तरेला चोपदार दरवाजा आहे.

श्री. तुळजाभवानीची मूर्ती :

सिंहासनारुढ असणारी देवीची मूर्ती पूर्वाभिमुख आहे.ती गंडकी शिळेपासून बनविलेली आहे. मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ती उत्सवाकरिता काढून अन्यत्र नेता येते म्हणून तिला चल मूर्ती म्हणतात. देवीच्या प्रसन्न मुद्रेस डोक्यावर सयोनी लिंग आहे. डोक्याच्या उजव्या अंगास सूर्य तर डावीकडे चंद्र कोरलेला आहे. मूर्तीच्या खालील बाजूस मार्कडेय ऋषी हात जोडून पुराण सांगाहेत. त्याच्या वरच्या बाजूस खाली सती अनुभूती शीर्षासनावस्थेत तपश्चर्या करतानाचे शिल्प आहे. देवीच्या पाठीवर बाणांचा भाता आहे. दोन्ही पायाच्यामध्ये महिषासूराचे शीर पडलेले आहे.

देवीच्या हातात दक्षिणक्रमाने त्रिशुळ, बिचवा, बाण, चक्र, शंख, धनुष्य, पानपात्र ही आयुधे आहेत. देवीच्या अंगावर चक्रकुंडले, केमद, अंगद, बांगड्या, कंठा, माला, मेखला, साखळ्या आणि पदबंध हे दागिने कोरलेले आहेत. युद्धस्थ अवस्थेत असूनही प्रसन्न दिसणारी देवीची मूर्ती पाहताना दिव्यत्वाची प्रचिती येते.

या मंदिराच्या दक्षिणाभिमुख पितळी दरवाज्यावर एक लेख कोरलेला आहे. त्यात जगदेव परमारने केलेल्या आत्मसमर्पणाची माहिती दिलेली आहे. मंदिरासमोर भव्य प्रांगण आहे. बाजुला प्रशस्त ओवऱ्या आहेत. प्रांगणात एक मोठे होमकुंड आहे. या होमकुंडासमोरील दोन दीपमाळांपैकी डावीकडील एक दीपमाळ आज शिल्लक आहे.

हैद्राबादच्या निजामाचे सरदार करमाळ्याचे रावरंभा निंबाळकर यांनी आपल्या या कुलस्वामिनीच्या मंदिराच्या बांधणीत मोठे योगदान दिलेले आहे.

तुळजापूर येथील पूजा, उत्सव, यात्रा : तुळजापूर येथे वर्षभर यात्रा चालू असते. येथे दसरा, दिवाळी, संक्रांत, गुढीपाडवा, अश्विन महिन्यातील नवरात्र आणि पौष महिन्यातील शाकंबरी नवरात्र, छबिना उत्सव लोकप्रिय आहेत.

पूजाविधी : तुळजाभवानीची पारंपरिकपणे पूजा अर्चा करण्याकरिता गावात भोपे, पाळीकर आणि उपाध्ये या तीन मंडळाचे पुजारी वर्षभर कार्यरत असतात. ते आपल्याकडे येणाऱ्या भक्तांची नोंद आपल्या दप्तरात ठेवत असतात. याला बाड म्हणतात. श्री तुळजाभवानीची दरदिवशी चार वेळा षोडषोपचारे पुजा करण्यात येते. पहाटेचे चरणतीर्थ, दुपारची महापूजा, सायंकाळी धुपआरती आणि रात्री प्रक्षाळ पूजा होते. देवीला पाचवेळा नैवेद्य दाखविला जातो. वर्षातून तीन वेळा देवीची निद्रा असते. भाद्रपद वद्य अष्टमी, ललितापंचमी, बलिप्रतिपदा, मकरसंक्रांत आणि रथसप्तमी या दिवशी देवीची अलंकार पूजा होत असते.

उत्सव : प्रत्येक मंगळवारी, प्रत्येक पौर्णिमेस, पौर्णिमेच्या अगोदरचा आणि दुसरा दिवस, गुढीपाडवा आणि बलिप्रतिपदा या दिवशी रात्री देवीचा छबिना निघत असतो. छबिन्यासाठी घोडा, मोर, सिंह अशी वेगवेगळी वाहने तयार करुन ठेवलेली आहेत. त्यावर श्रींच्या पादुका ठेवून देवालयाच्या परिसरात छबिना काढण्यात येतो. यावेळी पोतपरड्यांच्या बरोबरच आईच्या उदोकाराने सर्व परिसर गर्जुन उठतो.

विजयादशमीनंतर अश्विनी पौर्णिमेस नवरात्रातील सांगतेसाठी सोलापूरहून काठ्या येतात तर भातंगळी  (ता. लोहारा), शिरवळ, नायगाव (ता. वाई, जि. सातारा) येथील काठ्या चैत्र पौर्णिमेला उत्सवासाठी येतात. रस्त्यात देवी भक्तांचे स्वागत होते. श्रीच्या सिमोल्लंघनासाठी भिंगारहून तेथील भगत घराण्याकडून पालखी आणि श्रमनिद्रेसाठी नगरच्या पलंगे घराण्याकडून पलंग आणला जातो. या दोन्ही वस्तु थाटामाटाने मिरवत आणल्या जातात.

 

तुळजाभवानीचा गोंधळ :

देवीची स्तुतीपर कवने म्हणून उपासना करून कुलाचार म्हणून गोंधळविधी पार पाडला जातो. गणदल, गोधलपासून गोंधळ शब्द रूढ झाला. गोंधळविधी पार पाडणाऱ्या उपासकाला गोंधळी म्हणतात. महाराष्ट्रातील गोंधळ्यात कदमराई आणि रेणुराई या दोन पोटजाती आहेत. तुळजापुरातील गोंधळी कदमराईत मोडतात.

कदमराई गोंधळ्याचा वेष म्हणजे डोक्यावर कंगणीदार पगडी, पायघोळ झगा, चौसष्ट कवड्याची माळ आणि प्रत्येक कवडीनंतर रेशीम गोंडा असतो. गोंधळासाठी आठ ते 32 या प्रमाणे संख्या असते. याच्या प्रमुखाला नाईक म्हणतात. त्याच्या जोडीला मुख्य गायक, सहगायक, नर्तक, शिक, मार्दगिक आणि तालधारी यांचा समावेश असतो. संबळ आणि तुणतुणे हे गोंधळ्याचे मुख्य वाद्य आहे.

एका पाटावर नवीन वस्त्र, त्यावर तांदळाचा चौक आणि  चौकाच्या बाजुला ऊसाची किंवा ज्वारीची पाच ताट लावून चौक तयार करतात. त्यावर कडकणी अडकवितात. मध्यभागी कलशाची स्थापना करून त्यावर श्रीफळ आणि बाजुला आंब्याची पाने ठेवतात. चौकाच्या पुढे दिवा तेवत ठेवला जातो. त्याला यजमानाने तेल घालावे लागते. नवविवाहितांच्या भावी आयुष्यासाठी देवीचा आशिर्वाद मागण्यासाठी गोंधळ घालण्याचा प्रघात आहे. तुळजाभवानी मंदिरात गोंधळाकरिता स्वतंत्र पार व्यवस्था आहे. यास ‘गोंधळाचा पार’ म्हणतात.

पोतराज : महाराष्ट्रातील मरीआईचा एक उपासक म्हणजे पोतराज. तमिळ भाषेतील पोट्टुरासू या शब्दाचा अपभ्रंश म्हणजे पोतराज. प्राचीनकाळी पटकीसारखे साथीचे रोग आल्यावर गावावर देवीचा प्रकोप झाल्याचे मानून तेंव्हा मरिआईचा गाडा गावाबाहेर घालविण्यासाठी पोतराजाला निमंत्रण दिले जात असे.

एखाद्या मुलाला पोतराज म्हणून देवीला सोडून दिल्यानंतर त्याचे केस वाढविले जातात. पोतराजाचा पोशाख म्हणजे केस मोकळे सोडून कपाळी हळदी कुंकवाचा मळवट, कमरेला हिरव्या खणाचा घागरा, त्यावर घुंगराची माळ, पायात पितळी वाळा तर हातात कोरडा म्हणजे आसूड याप्रमाणे असतो. त्याच्यासोबत एक स्त्री डोक्यावर मरीआईचा देव्हारा घेऊन चालत असते. दार उघड, बया दार उघड...! याप्रमाणे आरोळी ठोकत तो आपल्या दंडावर कोरडा ओढत असतो. कधीकधी तो दाभणाने दंडावर टोचून रक्त काढत असतो. यावेळी देव्हारा घेतलेल्या स्त्रीच्या अंगात देवीचा संचार होऊ लागताच तिला प्रश्न विचारून त्यावर उपाय सांगितले जातात. भक्तगण देवीची यथासांग पूजा करून पोतराजाला धान्य अर्पण करतात. पोतराज हा महाराष्ट्रातील देवी उपासकातील एक महत्वपूर्ण घटक मानला जातो.


कुंकू, कवड्याची माळ, पोत आणि परडी :

तुळजाभवानी देवी ही स्त्रित्वाचे प्रतीक म्हणून कुंकवाला खूप महत्व आहे. तुळजापुरात अस्सल स्वरुपातील कुंकू मिळते. सौभाग्यलेणं आणि कुंकवाचा सड़ा टाकण्याच्या प्रथेमुळे तुळजापुरात मोठ्या प्रमाणात कुंकवाचा वापर होताना दिसतो.

प्राचीनकाळी कवडी हे चलन असल्याने कवड्याची माळ हे लक्ष्मीचे प्रतीक आहे. 64 कवड्यांची माळ ही 64 योगिनीचे प्रतिकात्मक रुप आहे. तुळजापुरात कवड्याची माळ ही अंबुकी कवडी आणि येडाई कवडी या दोन प्रकारात बनवतात. कवडी चेन्नईवरून तर त्याच्या गोफाचा वाक कोलकात्यावरून मागवितात.

देविचे रुप शाक्ताचे ! तर शाक्ताचे सर्व विधी रात्रीच्यावेळी साजरे होत असल्याने देवीभक्तांच्या  हातात पोत असतो. मनातील अहंकार जाळण्याचे प्रतीक असणारा पोत जुन्या किंवा नव्या कपड्यापासून पीळ घालून तयार केला जातो. भक्तगण आपल्या कुवतीप्रमाणे पोत करताना त्यात सोने, रुपे, हिरे किंवा पैसे अशा मौल्यवान वस्तू ठेवतात. तुळजाभवानी ही जगज्जेती तर तिचा भक्त हा याचक आहे. याचकाचे प्रतीक परडी म्हणून परडीचा वापर केला जातो. बांबू हा वंशवेलाचे प्रतीक असल्याने त्यापासून परडी तयार केली जाते. परडीतही दोन प्रकार असतात मोठ्या परडीला रेणूका तर लहान परडीला परशुराम म्हणतात. अशारितीने उत्सव आणि वैभवाचे प्रतीक म्हणून कुंकू आणि कवड्याची माळ, अहंकाराचे दमन म्हणून पोत, तर याचकाच्या रुपातील परडी देवीचे धार्मिक स्वरुपातील अलंकार आहेत.

 

 

काळभैरव :

भगवान शंकराचे गण म्हणजेच भैरव होय. कुठल्याही देवी मंदिराच्या अष्टदिशांना आठ भैरव असतात. पैकी काळभैरवाचे स्थान सर्वात वरचे असते. त्याला काशीचा कोतवाल म्हणतात. रात्रीच्या समयी आपल्या परिसराची निगराणी करण्याकरीता काळभैरव बाहेर पडतात, अशी आख्यायिका आहे. त्यानुसार काळभैरवांचे रुपही तेवढेच भयानक असते बाहेर काढलेली जिभ, हातात नरमुंड माळा, कमरेला सापाचे वेष्टन, हातात त्रिशुळ याप्रमाणे काळभैरवांचे रुप असते. देवी मंदिराच्यालगत दक्षिणेला काळभैरवाच ठाणे आहे. तेही हेमाडपंथी शैलीत आहे.

सकाळ-संध्याकाळ काळभैरवाची पूजा केली जाते. या पूजेचे वैशिष्ट्य म्हणजे काळभैरवाला नैवेद्य दाखविल्यानंतर गांजाची चिलीम दिली जाते. अश्विन अमावस्येला काळभैरवाच्या मंदिरातून भेंडोळी निघून ती देवी मंदिराच्या गाभाऱ्यात जाते, तो क्षण पाहण्यासारखा असतो. एका काठीला पेटते पलिते लावून तरुणवर्ग ती काठी खांद्यावरून वाहून नेतात. तुळजाभवानी मंदिराइतकेच काळभैरवाचे स्थान प्राचीन आहे. या मंदिराकडेही भरपूर दानपात्रे उपलब्ध आहेत. काळभैरवासोबत मुख्य मंदिराच्या अग्नेय दिशेला टोळ भैरवाचे हेमाडपंथी शैलीतील मंदिर आहे. त्याचीपण पारंपरिक स्वरूपात पूजा केली जाते. त्याच्या पुजाऱ्यांना टोळे (शिंदे) हे नाव पडलेले आहे. याशिवाय तुळजापुरात चारही बाजूला भैरवाची ठाणी आहेत. एकंदर देवीचे गण म्हणून आठही दिशेला अष्टभैरवाचे स्थान याही ठिकाणी पाहण्यास मिळते.

रामवरदायिनी :

रावणाचा वध करण्यासाठी रामाला वर देणारी ती रामवरदायिनी. रामवरदायिनी हे महिषमर्दिनीचेच एक रूप आहे. तुळजाभवानी मंदिराच्या उत्तरेला एका डोंगरकड्यावर रामवरदायिनीचे मंदिर पूर्वाभिमुख असले तरी देवीची मूर्ती दक्षिणाभिमुख आहे. आपल्या बोटाने दिशा दर्शविताना स्पष्टपणे जाणवते. रामवरदायिनीची मूर्ती छोटीशी असली तरी अतिशय सुबक आहे. महिषमर्दिनी असल्याने अष्टभुजा असून मूर्तीच्या प्रत्येक हातात आयुधे आहेत.

रामवरदायिनी मंदिराच्या बाजुलाच रामेश्वराचे एक मंदिर आहे.त्यात रामाची मूर्ती आहे. मंदिरालगत डोंगराची उतरण लागते. त्यात लक्ष्मणेश्वराचे मंदिर आहे. याच ठिकाणी रामतीर्थ, सूर्य आणि चंद्रकुंड आहे. खालच्या बाजुला प्रचंड दरी आहे. तिला रामदरा म्हणतात. अशा रितीने रामवरदायिनी मंदिराच्या परिसरात संपूर्ण रामायण साकारले आहे.

रामवरदायिनीचे पुजारीपण वाळके-सुरवसे घराण्याकडे आहे. सतराव्या शतकात विजापूरच्या आदिलशाहने या घराण्याला दिलेली दानपत्रे उपलब्ध आहेत. रामवरदायिनीचे मंदिर प्राचीन आहे.त्याच्या  देखाभाल दुरूस्तीची गरज आहे.

घाटशीळ मंदिर :

सोलापूरहून तुळजापूरला येताना समोर बालाघाटचा डोंगर लागतो आणि याच डोंगरावर एक छोटेसे परंतु टुमदार मंदिर लागते, तेच घाटशीळ मंदिर होय. नावाप्रमाणे तुळजापूरच्या दक्षिण बाजूला घाटामध्ये एक भलीमोठी शीळ म्हणजे दगड आहे.त्यावरच हे मंदिर बांधलेले आहे.

घाटशीळेचा संदर्भ रामायणाशी जोडला जातो. त्यानुसार रावणाने सीतेला पळवून नेल्यानंतर लंकेच्या दिशेने जाणाऱ्या रामाने सीतेचा शोध घेत घेत दंडकारण्यातील या परिसरात आले असता आई तुळजाभवानीने याच शिळेवर उभे राहून रामाला लंकेचा मार्ग दाखविला. अशा प्रकारची आख्यायिका सांगितले जाते.त्यामुळे या  घाटशीळेला महत्व प्राप्त झाले आहे. या अर्थाने उत्तर भारत ते श्रीलंका या दरम्यानचा मैलाचा दगड म्हणून घाटशीळेकडे पाहता येईल.

तुळजापूरला आल्यानंतर भाविक मोठ्या भक्तिभावाने घाटशीळेच्या दर्शनासाठी आवर्जुन जात असतात. रात्रीच्यावेळी तुळजापूरचा घाट चढताना घाटशिळेचे मंदिर लक्ष वेधून घेते.

 

श्रीकांत चंद्रकांत देशमुख

जिल्हा माहिती कार्यालय,

उस्मानाबाद

Labels:

तुळजापूर : दिल्लीत वडगाव (काटी) येथील द्राक्ष निर्यातदार शेतकरी हणमंत गवळी यांना 'एशिया पॅसिफिक आयकॉनिक' अवार्ड' प्रदान


काटी,दि. २५: उमाजी गायकवाड 

तुळजापूर तालुक्यातील वडगाव (काटी) येथील प्रगतिशील द्राक्ष बागायतदार शेतकरी हणमंत भानुदास गवळी यांनी वडगाव (काटी) शिवारात खडकाळ माळरानावर द्राक्षांचे उत्पादन घेऊन सहाशे टन द्राक्ष परदेशात निर्यात केली. 


सातत्याने निर्यातक्षम द्राक्षाचे उत्पादन घेऊन जागतिक बाजारपेठेत आपल्या मालाची विक्री केल्याबद्दल त्यांच्या उत्पादनाची दखल घेऊन अमेरिकेच्या ग्लोबल ह्युमन राईट कौन्सिल फॉर पीस ॲंड सस्टेनबल डेव्हलपमेंट या जागतिक पातळीवरील संस्थेचा 'एशिया पॅसिफिक आयकॉनिक अवार्ड' देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार विविध मान्यवरांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला. 


निसर्गावर अवलंबून असलेले द्राक्षांसारखे खर्चिक पीक पुर्णतः हवामानावर अवलंबून असताना प्रगतशील शेतकरी हणमंत गवळी यांनी खडकाळ माळरानावर उत्पादित केलेली 600 टन द्राक्षे परदेशात निर्यात केली. शेती क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कार वितरण सोहळ्यात उमरगा तालुक्यातील किल्लारी येथील राजाराम जाधव यांनाही पुरस्कार देण्यात आला.


त्यांना मिळालेल्या पुरस्कारांबद्दल वडगाव (काटी) व  परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आणि स्फुर्तिदायक ठरत असून सर्वत्र  कौतुक होत आहे.

Labels: ,

Thursday, 24 November 2022

मुरुम : दोन वर्षानंतर विठोबाच्या माळावरील यात्रेत भाविकांची गर्दी : मोटार गाडीने घेतली बैलगाड्याची जागा


मुरूम, ता. उमरगा, दि. २३  : सुधीर पंचगले


मुरूमच्या पंचक्रोशीत भरली जाणारी यात्रा म्हणजेच माळवरील विठोबाची जत्रा होय. बुधवारी दि.२३) रोजी मुरूमच्या माळावरील श्री विठ्ठल-रुकमाई मंदिरात भक्तिमय वातावरणात भाविकांनी  शांततेच्या वातावरणात विठ्ठलाचे दर्शन घेतले. 


प्रारंभी श्री विठ्ठल मंदिरात पहाटे ४ वाजता काकड आरती संपन्न झाली. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील यांनी आपल्या मित्रपरिवारासह दर्शन घेतले. मंदिर परिसरात विविध दुकाने थाटली होती. कोरोनाच्या कालखंडानंतर यात्रा हळूहळू पूर्वरत होताना दिसत आहे. या यात्रेकरिता परिसरातील विविध गावातील नागरिक हजेरी लावली. गेल्या अनेक वर्षाची परंपरा असल्याचे यावेळी मंदिराचे पुजारी महादेव महाराज यांनी सांगितले. सुंदरवाडी येथून श्री दुधागिरी महाराज यांची पालखीसह काटी मुरूम शहरातून रमेश लामजाने यांच्याकडून काला आणला जातो. 


एक ते दीडच्या सुमारास पालखी, काटीचे मंदिरात आगमन होते. त्यानंतर काला फोडल्यानंतर यात्रा फुटते अर्थात यात्रेस सुरवात होते, अशी माहिती पुजाऱ्यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रेवर बंदी होती. त्यानंतरची भरलेली विठोबाची ही पहिलीच यात्रा असल्याने भाविकांची तुफान गर्दी झाली होती. विविध खाद्यपदार्थ, फळ-फळावळ, चिमुकल्यासाठी खेळण्या, कपडे, सौंदर्य प्रसाधने, मनोरंजनाची दुकाने यात्रेनिमित्ताने थाटली होती. नागरिकांनी रांगेत दर्शन घेऊन मंदिर परिसरातील थाटलेल्या दुकानाचा आनंद घेतला. पूर्वी मुरूमच्या पंचक्रोशीतील यात्रेसाठी बैलगाड्या जुंपल्या जायच्या कालातराने बैलगाड्याची जागा आता मोटार गाडीने घेतली असल्याचे दिसून आले. मुरूम पोलीस प्रशासनाच्या वतीने यात्रेत अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस ठाण्याचे सपोनि डॉ. रंगनाथ जगताप, पवन इंगळेसह पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. 


ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने वैद्यकीय अधिक्षक डॉ. सत्यजित डुकरे यांच्या मार्गदर्शनाखाली देवस्थान परिसरात यात्रेत येणाऱ्या भाविकांना आयईसी देऊन आयसीटीसी विभागामार्फत त्यांना एच.आय.व्ही.(एड्स) तसेच एनसीडी विभागामार्फत बीपी-शुगर, तंबाखू नियंत्रण विषयावर माहिती देण्यात आली. यावेळी आरबीएसकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गुंडाजी कांबळे, समुपदेशक संतोष थोरात, सुजित जाधव, मलेरिया विभागाचे सुरेश भालेकर, गजानन डावरे, लखन भोसले आदी उपस्थित होते. नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी यात्रेत सहभाग घेऊन सहकार्य केले. यावेळी यात्रा स्थळी अग्निशमन यंत्रना सज्ज करण्यात आली होती.

Labels: ,

उमरगा: अचलबेट देवस्थान येथे दत्त जयंती महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन


उमरगा ,दि.२४: लक्ष्मण पवार

निसर्ग सौदर्य, साधू संत व ऋषि मुनींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तालुक्यातील तुरोरी परिसरातील अचलबेट देवस्थान येथे श्री दत्त जयंत्ती महोत्सवानिमित्त मंगळवारी सायंकाळ पासून व बुधवारी (०६ व ०७) दिवसभर दरवर्षी प्रमाणे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

शहरापासून दहा किमी अंतरावर राज्याच्या सीमेवर सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गालगत डोंगरावर निसर्ग सौंदर्याने नटलेले अचलबेट देवस्थान असून याला प्राचीन काळातील ऋषि मुनी व साधु संतांच्या योग साधनेचा वारसा लाभला आहे. वै.हभप. काशिनाथ महाराज, वै. हभप. उज्वलानंद महाराजांनी देवस्थानचा विकास तसेच परिसरातील जवळपास दोनशे ते दोनशे पन्नास गावात अध्यात्मिक प्रचार व प्रसार केल्याने दरवर्षी श्री दत्त जयंती महोत्सवानिमित्त अखंड हरिनाम, भजन, प्रवचन, किर्तन,हरीजागर, काकडा आरती आदीसह विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

यंदाच्या वर्षी दोन दिवस  सुरू असलेल्या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी मंगळवारी सायंकाळी ५ वा. हभप. ज्ञानदेव गुरूजी सुर्यवंशी हालसी यांचे प्रवचन आहे. राञौ ७ ते ९ यावेळेत हभप.पू.श्री.ज्ञानसिंधू चैतन्य महाराज देगलूरकर पंढरपूर यांची किर्तन सेवा संपन्न होणार आहे. 

 बुधवारी सकाळी ९ वा. श्री गुरू चरित्र पारायणाचे समारोप, सकाळी १० ते ११ यावेळेत हभप. श्री. जनार्दन हेबाडे गुरूजी यांचे प्रवचन होणार आहे. सकाळी ११ पासून नियमाचे हजेरी भजन सेवा हभप. भिम महाराज, किसन खोबरे, ज्ञानेश्वर बरमदे, जनार्दन भोसले, बाळासाहेब जांभळदारे, दामोदर मुगळे, रेणके गुरूजी, एकनाथ पांचाळ, विठ्ठल दामोदरे, सुनील माने, तुकाराम जाधव, तुकाराम माने, ईश्वर गुरूजी, सुनील चेळकर, ज्ञानेश्वर येवते, पिंगाने सर, शिवाजी पाटील, मोहिते गुरूजी, मंगेश लांडगे, दयानंद पाटील, नेताजी जाधव, रावसाहेब पाटील, निळकंठ जाधव, अंबादास सोळूंके, मारूती साबदे, विठ्ठल महाराज, खेळगे महाराज, खंडू मुळे, रमेश करनूरे, जयपाल ढगे, पुंडलिक टेकले, तुकाराम शिंदे, बाबूराव पांचाळ, किसन जाधव, पंढरी पाटील, बालाजी कारभारी, विश्वनाथ माने, बाबुराव गुरूजी, अशोक पाटील, माधव आगलावे, सिद्राम हाडपद, गुरू कारागीर, गंगाराम कुंभारे, नवनाथ कैतके साहेब, सुशील पांचाळ, शाहू पांचाळ, निळकंठ मुळे, अवधूत मोरे, बाबुराव हाडपद, नाटकरे साहेब, गुलाब थोटे, संदीप मरकटे, श्रीहरी माने, दाजीबा माने, अनिल बाबळसुरे, बळवंतराव जाधव, शाम गायकवाड, मकरंद पाटील, प्रल्हाद सोळुंके, एकनाथ कदम, सचिन मुगळे, विक्रम जाधव, सोनाजी आनंदवाडे हे संपन्न करणार आहेत. 

दुपारी २ ते ४:30 या वेळेत श्री शाम गोराणे  सौ. ज्योती गोराणे व सोहम गोराणे यांचे संगीत भजन सेवा होणार आहे. 

सायंकाळी ४:३० ते ५:३० या वेळी दत्त जयंतीनिमित्त ह. भ. प. हरी गुरूजी लवटे  यांच्या प्रवचन सेवेनंतर लाखो भाविक भक्तांच्या उपस्थितीत गुलालाची उधळण करीत दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

तत्पूर्वी दिवसभर श्री दत्त जन्मोत्सवामुळे देवदर्शनासाठी आलेल्या हजारो भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. श्री परमार्थ प्रबोधन सांस्कृतिक सेवा मंडळाचे अध्यक्ष हभप. भिम महाराज, संजय राठोड, नरसिंग लवटे, राजू माळी, हभप. हरी गुरूजी लवटे , जनार्दन भोसले, बाळू जांभळदारे, बंडु गुरूजी, मगर बिराजदार,करण कुन्हाळे,जगन्नाथ मुगळे, पंडित मुळे,बाळू पाटील, लक्ष्मण पवार, दामू बिराजदार,निळकंठ जमादार,गोविंद माने, ज्ञानेश्वर बरमदे, आबा मोरे , अशोक कारभारी, धोंडीराम मुगळे, बबर माने, एकनाथ कदम, सचिन मुगळे, ललित पटेल, सुरज राठोड, दर्शन मोरे,गणेश सुर्यवंशी,पांडुरंग पाटील सरजवळगा, हाणमंत जोगे  आदीसह परिसरातील भाविकांनी उत्सव यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.

अचलबेटच्या उंच डोंगरावर वै.हभप उज्ज्वलानंद महाराज यांनी महादेव, विठ्ठल रुक्मीणी, हनुमान या देवतांच्या एकत्रित भव्य मंदिराची उभारणी केली आहे. तर भक्तनिवास, सांस्कृतिक सभागृह, पाणी पुरवठा योजनेसह शौचालयाची कामे पुर्ण करीत भाविकांना सर्व सीयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

Labels: ,

Wednesday, 23 November 2022

उमरगा : अनैतिक देह व्यापार करणा-या 3 हॉटेल-लॉजवर छापे, १२ जणाविरुध्द गुन्हा


उस्मानाबाद , दि. २३

मा.पोलीस अधीक्षक श्री.अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरुन कळंब उप विभागाचे सहायक पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांसह पथक जिल्हातील अवैध धंद्यांविषयी माहिती काढुन कायदेशीर कारवाई करण्यासाठी काल दि. 21.11.2022 रोजी गस्तीस होते. गस्ती दरम्यान पथक उमरगा शहरात गेले असता गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली कि, उमरगा येथील- ‘हर्ष लॉज’ , ‘सुहाणा लॉज’ व ‘अभिराज हॉटेल’  या तीन हॉटेल- लॉजचे चालक, मालक हॉटेलमध्ये काही महिलांद्वारे वेश्या व्यवसाय करवुन घेत आहेत. 




यावर पथकाने सदर माहिती मा. पोलीस अधीक्षकांना देउन त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश, उपविभागीय पोलीस अधिकारी, उमरगा श्री. रमेश बरकते, उमरगा पो.ठा. चे पोनि- श्री. मनोज राठोड, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोनि- श्री. के.एस. पटेल, पोउपनि- श्री. चाटे यांसह पोलीस अंमलदार यांच्या पथकाने मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी तीन वेगवेगळे पथक तयार करुन दि. 21.11.2022 रोजी 23.00 ते दि. 22.11.2022 रोजी 01.00 वा. दरम्यान नमूद तीन्ही लॉजवर छापे टाकले असता 04 पिडीत महिला गुजरात व पश्चिम बंगाल असे बाहेर राज्यातून आणुन त्यांचे कडून वैश्या व्यवसाय करुन घेत असताना लॉज व हॉटेल चालक, मालक व ग्राहक असे एकुण 12 व्यक्तींना पोलीस ठाणे उमरगा येथे आणुन त्यांच्या विरुध्द मानवी अनैतीक व्यापार प्रतिबंधक अधिनियम कलम- 3,4,5 सह भा.दं.सं. कलम- 370, 370 (अ) (2) प्रमाने 03 वेगवेगळे गुन्हे दाखल करुन सदर गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस अधिक्षक श्री. एम. रमेश, उपविभागीय पोलीस अधिकारी, उमरगा श्री. रमेश बरकते व अनैतिक मानवी प्रतिबंधक कक्ष, उस्मानाबाद चे पोनि- श्री. पटेल हे करत आहेत.  

Labels: ,

तुळजापूर : मोर्डा रोडवरील पुलाचे काम निकृष्ट; भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे रस्ता रोको आंदोलन


काटी, दि.२३: उमाजी गायकवाड

तुळजापूर खुर्द येथील बोरी नदीवरील मोर्डा रोडवरील पुलाचे काम  निकृष्ट निकृष्ट झालेबद्दल भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग तुळजापूर यांना निवेदन देऊन निवेदनात संबंधित गुत्तेदाराने इस्टेमेट प्रमाणे झाले नसून काम निकृष्ट झाल्याचे नमूद करून संबंधित गुत्तेदारावर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.


सोमवार दि. 21 रोजी सकाळी अकरा वाजता भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम व ठेकेदाराबाबत संताप व्यक्त करत रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात कामाच्या दर्जाची चौकशी होऊन संबंधित अधिकारी व ठेकेदारावर कारवाई करण्याची व दुसरा पूल बांधून देण्याची मागणी करण्यात आली. तसेच संपूर्ण पुल पुन्हा नव्याने बांधण्यात यावा,पुलाची उंची वाढविण्यात यावी, अशा विविध मागण्या आंदोलना दरम्यान निवेदनात करण्यात आल्या आहेत.
 

पूल संपूर्णपणे नवीन बांधण्यात यावा आणि पुलाची हाईट वाढवण्यात यावी ही मागणी केली आहे. तहसील आणि बांधकाम विभागाचे प्रतिनिधी घोडके व विभुते आंदोलकांचे मत जाणून घेऊन मागणीचे निवेदन स्वीकारले. आंदोलनकर्त्यांशी चर्चा करुन पुढील तीन महिन्यात नव्याने पुल बांधून संबंधित दोषींवर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन स्थगित केले.


यावेळी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे प्रदेश सरचिटणीस आबासाहेब कापसेळ, प्रदेश सचिव चंद्रकांत गायकवाड, मराठवाडा विभागीय अध्यक्ष शिवाजी सावंत, जिल्हाध्यक्ष आनंद भालेराव, उपाध्यक्ष नेताजी शिंदे, लोहारा तालुकाध्यक्ष रवी पवार, फुलचंद गायकवाड, पंचाक्षरी चव्हाण, इसाक शेख, तालुका अध्यक्ष गणेश पाटील,शहराध्यक्ष निखिल आप्पा अमृतराव, तालुका संघटक बालाजी जाधव, तालुका संपर्कप्रमुख बाळासाहेब पाटील, नेताजी शिंदे, तालुका कार्याध्यक्ष त्रिशूल मुळे, बांधकाम विभाग अध्यक्ष श्रीकांत करंडे, दत्तू वाघमारे,दयानंद गड्डे, सचिदानंद हरताळे, भागवत बरगंडे, दिलीप देवघर, सागर कोरे, पंडित जळकुटे, शिवराज जगदाळे, भोजने सर, यांच्यासह  भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सर्व पदाधिकारी, सदस्य, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Labels: ,

उमरगा : बिरूदेव मंदिर येथे ११ हजार दिवे लावुन दिपोत्सव सोहळा संपन्न

उमरगा, दि. २३ लक्ष्मण पवार

उमरगा शहराजवळील लातूर रोड वरील बिरूदेव मंदिर देवस्थान येथे सातव्या अन्नछत्र वर्धापनदिनानिमित्त आकरा हजार दिवे लावून दिपोत्सव कार्यक्रम उत्साही वातावरणात मान्यवरांच्या उपस्थितीत मंगळवार दि. 22 रोजी सायंकाळी 7:30 वा संपन्न झाला. 


यावेळी आयोजित कार्यक्रमात व्यापारी महासंघाचे सिद्रामप्पा चिंचोळे, अंकुश शिंदे, श्री. चौगुले, जकेकूर चे सरपंच अनिल बिराजदार, दुशांत दंडगे, संतोष पटणे, श्रीशैल्य लिंबाळे, लक्ष्मण पवार, नगरसेवक गोविंद घोडके, पप्पू सगर, सचिन शिंदे, विनोद कोराळे, दत्ता शिंदे, नितीन कोराळे, जालिंदर सोनटक्के, बालाजी घोडके,पुणे येथील सौ. संगीता घोडके यांची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्रीक्षेत्र बिरूदेव मंदिर देवस्थान कमीटी च्या वतीने मंदीरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोफत पोटभरून जेवन दिले जात आहे. याला सहा वर्षे संपले असुन सातवा वर्धापनदिन सोहळा  तब्बल आकरा हजार दिप लावून मंदिरात रोषणाई करून दिपोत्सव व विशेष महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी शेकडो भाविक भक्तांनी उपस्थित राहून दिपोत्सव व महाप्रसादाचा लाभ घेतला.

Labels:

Tuesday, 22 November 2022

भुईकोट किल्ल्यात शहरातील पत्रकारांनी श्रमदान करत स्वच्छता अभियानात सहभाग नोंदवला

नळदुर्ग, दि..२२ : 


येथील भुईकोट किल्ल्यात १९ ते २५ नोव्हेंबर दरम्यान जागतिक वारसा सप्ताह सुरू असून यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वारसा सप्ताह निमित्त युनिटी मल्टिकाॕन्सचे मुख्य संचालक कफील मौलवी यांच्या आवाहनास प्रतिसाद देत मंगळवार दि.२२ नोव्हेंबर रोजी नळदुर्ग शहर पञकार संघटनेच्या पदाधिकारी व सदस्य   पत्रकारांनी किल्ल्यात स्वच्छता अभियान राबविले. 

यावेळी ज्येष्ठ पञकार विलास येडगे, तानाजी जाधव, सुहास येडगे, प्रा. पांडुरंग पोळे, शिवाजी नाईक, उत्तम बनजगोळे, संतोष पुदाले, भगवंत सुरवसे, अमर भाळे, शोएब काझी, नेताजी महाबोले,  आदीनी स्वच्छता आभियानात सहभाग घेतला. 


जनसंपर्क आधिकारी  विनायक अहंकारी यांनी जागतिक वारसा सप्ताह आयोजित करण्यामागचा उद्देश सांगितला.   प्रा. पांडुरंग पोळे व तानाजी जाधव  यांनी मनोगत व्यक्त केले. 


यावेळी युनिटी मल्टिकाॕन्स कंपनीचे किल्ला व्यवस्थापक जुबेर काझी, युनिटीचे जनसंपर्क अधिकारी विनायक अहंकारी, हाजी शेख, अमिर फुलारी यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

महाराष्ट्र पुरातत्व विभागाने 19 /11/2022 ते 25/11/2022 या दरम्यान जागतिक वारसा स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे..त्या नुसार नळदुर्ग किल्यात युनिटी मल्टीकॉन्स कंपनी च्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.. त्यानुसार किल्यात दररोज स्वच्छता अभियान केला जातो..
काल दिनांक 21/11/2022 रोजी नळदुर्ग शहरातील जि.प.प्रशाला मुलांची शाळा व जि.प्र.प्रशाळा मुलींची शाळा यांच्या मार्फत विद्यार्थी या अभियानात सहभागी झाले होते.. लहान मुलांना आपल्या ऐतिहासिक वारसाची जाणीव करून दिली..

Labels:

Monday, 21 November 2022

काटीचे तलाठी प्रशांत गुळवे यांची पिस्तूल शूटींगच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड


काटी, दि.२१:उमाजी गायकवाड


दि.२० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर दरम्यान भोपाळ, मध्य प्रदेश येथे होणाऱ्या नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया आयोजित ६५ व्या नॅशनल शूटींग स्पोर्ट्स  स्पर्धेसाठी १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात तुळजापूर तालुक्यातील काटी सज्जाचे तलाठी  प्रशांत प्रभाकर गुळवे यांची निवड झाली आहे. 


यापूर्वी मुंबई येथे झालेल्या ९ व्या वेस्ट झोन पिस्तूल शूटिंग स्पर्धा,२०२२ मध्ये केलेल्या कामगिरीच्या जोरावर त्यांची नॅशनल रायफल असोसिएशन, दिल्ली यांनी ही निवड केली आहे. मागील महिन्यात तिरुअनंतपुरम, केरळ येथे झालेल्या ऑल इंडिया मावलनकर शूटींग स्पर्धेत गुळवे यांनी सहभाग घेतला होता.


प्रशांत गुळवे हे सध्या काटी ता. तुळजापूर येथे तलाठी या पदावर कार्यरत आहेत .त्यांना हेमंत जाधव सातारा, व प्रमोद माळी, बार्शी यांचे मार्गदर्शन लाभत आहे. त्यांच्या निवडीबद्दल काटी ग्रामस्थासह  तुळजापुरचे तहसिलदार सौदागर तांदळे यांनी अभिनंदन केले.

Labels:

भाऊसाहेब बिराजदार कारखान्याच्या इथेनॉल व वीजनिर्मिती युनिटचे भूमिपूजन


उमरगा , दि.२१: लक्ष्मण पवार

 उमरगा लोहारा तालुक्यातील समुद्राळ येथील भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखाना संचलित कूनर्जी इंडस्ट्रीज या कारखान्याच्या इथेनॉल निर्मिती व वीजनिर्मिती युनिटचे भूमिपूजन विरोधी पक्षनेते तथा माझी उपमुख्यमंत्री ना .अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत दि .२० रोजी संपन्न झाला . यावेळी कारखान्याचे चेअरमन सुरेश बिराजदार व क्युनर्जीचे संचालक सचिन सिनगारे यांची प्रमुख उपस्थिती होती .
          

माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते ना .अजितदादा पवार हे उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता उमरगा लोहारा तालुक्यातील भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखान्याला सदिच्छा भेट दिली होती. त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये इथेनॉल निर्मिती व वीज निर्मिती युनिटचे भूमिपूजन कारखान्याचे चेअरमन प्रा.सुरेश बिराजदार, क्युनर्जीचे संचालक सचिन सिनगारे यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी श्री पवार यांनी कारखान्याच्या कामकाजाची पाहणी करून क्षमता वाढीच्या कामकाजाचा आढावा घेतला .भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखाना क्युनर्जी इंडस्ट्रीजला भाडेतत्त्वावर दिल्यानंतर अल्पावधीत कारखान्याने प्रगती साधत कारखान्याची गाळप क्षमता तर वाढवलीच आहे . त्यासोबत परिसरातील कारखान्यांपेक्षा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक भाव दिला आहे. नुकताच उमरगा येथे भाऊसाहेब बिराजदार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या रौप्य महोत्सवी सोहळ्यात विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी भाऊसाहेब बिराजदार कारखान्याची गाळप क्षमता वाढवण्यासह इथेनॉल निर्मिती व वीज निर्मिती युनिट उभारणार असल्याचा शब्द दिला होता. त्याप्रमाणे महिनाभरातच सदरील इथेनॉल निर्मिती व वीज निर्मिती प्रकल्पाचे भूमिपूजन त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाले .
सदरील प्रकल्प उभारल्याने पूर्वी दिलेल्या सर्वाधिक भावापेक्षा आणखीन जास्त भाव शेतकऱ्यांना मिळेल व परिसरातील उद्योगधंद्यांना चालना मिळण्यासह बेरोजगारांनाही कामाची संधी उपलब्ध होईल यासाठी कारखाना प्रशासन प्रयत्न करत आहे . अशी माहिती कारखान्याचे चेअरमन प्रा . सुरेश बिराजदार यांनी दिली आहे .
           

 यावेळी कारखान्याचे प्रभारी जनरल मॅनेजर बी .जे.पाटील, चीफ केमिस्ट एस.बी.पांढरे , चीफ इंजिनियर ए .एम.कोळगे, यांच्यासह परिसरातील शेतकरी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती .

Labels:

थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत सुशिक्षित महिलांनी सहभागी व्हावे - देशमुख (काटीकर) यांचे आवाहन

प्रतिकात्मक
काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी आणि ग्रामपंचायतच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून सर्वच पक्षांतील लोकप्रतिनिधींना सक्षम उमेदवार शोधून निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करावी लागणार आहे. 


सोसायटीच्या निवडणुकीत तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले असून 30 नोव्हेंबर रोजी फॉर्म काढून घेण्याची अंतिम तारीख असणार आहे. तर 11 डिसेंबरला  सोसायटीसाठी मतदान होणार आहे तर ग्रामपंचायतसाठी 18 डिसेंबरला मतदान होणार असून  ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 28 नाेव्हेंबर ते 2 डिसेंबर ही अंतिम तारीख  असणार आहे. आणि दाखल उमेदवारी अर्जाची छाननी 5 डिसेंबरला होणार आहे, तर दाखल उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 7 डिसेंबर आहे. तर 18 डिसेंबरला मतदान व 20 तारखेला निकाल लागणार आहे. काटी ग्रामपंचायतीसाठी थेट जनतेतून  सरपंचपदाच्या निवडीसाठी जनरल महिलांसाठी आरक्षण पडले आहे.


काटी येथील स्थानिक राजकारणाचा कणा समजली जाणारी ग्रामपंचायत निवडणुक ही स्थानिक राजकारणावर पकड मजबूत करण्याचे हे एक प्रभावी माध्यम व महत्वपूर्ण मानली जात असल्याचे काटी येथील जेष्ठ नागरिक तथा माजी प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. तसेच स्थानिक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सक्षम सुशिक्षित महिलांचा सहभाग होत नसल्याची खंत व्यक्त करून 73 आणि 74 व्या घटनादुरुस्तीनंतर स्त्रियांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 33 टक्क्यावरुन आरक्षण 50 टक्के झाले. परंतु स्थानिक गावपातळीवर सुशिक्षित महिलांचा सहभाग होत नसून नवऱ्याची जागा आरक्षित पडल्यामुळे महिलांना उभे केले जाते. परंतु अनेक ठिकाणी प्रशिक्षणाच्या माध्यमातून राजकारणाची माहिती घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये
गावपातळीवर महिलांनी राजकारणात आपला दबदबा असल्याचे दाखवून दिले असले तरी बऱ्याच ठिकाणी राजकारणात वावरणाऱ्या महिलांचा रबर स्टॅम्प सारखा वापर केल्याचे दिसून येते.त्यामुळे तुळजापूर तालुक्यातील काटी सारख्या सुशिक्षितांचे गाव म्हणून ओळख असलेल्या व  राजकीय क्षेत्रातील महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत मध्ये स्थानिक सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी थेट जनतेतून जनरल महिलांसाठी आरक्षित असलेल्या जागेवर सक्षम पदवीधर,पदव्योत्तर,कायद्याचे ज्ञान असलेल्या सुशिक्षित महिलांना संधी देऊन त्यांना स्थानिक राजकारणात उतरविण्याची गरज असल्याचे मत माजी प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख (काटीकर) यांनी व्यक्त केले.

Labels:

Sunday, 20 November 2022

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी घेतले तुळजाभवानीचे दर्शन


तुळजापूर,दि.२०: उमाजी गायकवाड 

मराठा समाजातील युवकांच्या सामाजिक आणि आर्थिक उत्थानासाठी स्थापन करण्यात आलेल्या स्व. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी कै. अण्णासाहेब पाटील यांचे पुत्र तथा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष
नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांची फेरनिवड झाली. त्यानंतर त्यांनी प्रथमच तुळजापूर येथे येऊन शनिवार दि.19 रोजी आई तुळजाभवानीची महापुजा करुन दर्शन घेतले. 


यावेळी आई तुळजाभवानीच्या आशिर्वादाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होत  असून स्व.अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे कार्य विस्तारुन त्या माध्यमातून   मराठा समाज आर्थिकदृष्ट्या प्रगत करणे हे स्वप्न मनात ठेवून राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन त्यांची सेवा घडावी अशी  इच्छा प्रकट केली. 

यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक अनंत  जाधव,राम जाधव, पुजारी विकास मलबा, भाजपचे जिल्हा चिटणीस सुहास साळुंके,तालुका सरचिटणीस शिवाजी बोधले, अविनाश गंगणे, माजी नगरसेवक तुळजापूर राजशेखर गुड्डू कदम, युवा शहराध्यक्ष सागर पारडे, युवा तालुका सरचिटणीस अर्जुन आप्पा साळुंके, सचिन गडदे, इरशाद शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

Labels:

नळदुर्ग : श्री क्षेत्र रामतीर्थ येथे हनुमान चालिसा पाठ पुस्तिका प्रकाशन

नळदुर्ग, दि.२० 

नळदुर्ग येथिल श्री  क्षेत्र  रामतीर्थ येथे राज्य पोलिस प्राधिकरणचे सदस्य उमाकांत मिटकर, रामतीर्थ देवस्थानचे महंत  विष्णूप्रसाद शर्मा महाराज आदी मान्यवरांच्या हस्ते हनुमान चालीसा पाठ पुस्तिकाचे प्रकाशन करण्यात आले.

 

रामतीर्थ येथील पुरातन राम मंदिरात शनिवारी .  रोजी सकाळी ९ वाजता  हनुमान चालीसा पठन, हनुमान चालिसावर आधारीत धार्मिक  पुस्तक प्रकाशन, महाआरती व  महाराष्ट्र राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणच्या अशासकीय सदस्यपदी दुस-यादा निवड झाल्याबद्दल उमाकांत मिटकर यांचा सत्कार करण्यात आला.


 यावेळी राममंदिर येथीला विष्णूप्रसाद शर्मा महाराज, बलभीमराव मुळे , उमाकांत मिटकर, श्रमिक पोतदार, सचिन डुकरे, प्रभाकर घोडके, विलास येडगे, मनीष हजारे यांच्यासह रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Labels:

Saturday, 19 November 2022

जागतिक वारसा सप्ताह निमित्ताने नळदुर्ग किल्यात स्वच्छता अभियानाला सुरुवात

नळदुर्ग ,दि.१९ : 

महाराष्ट्र पुरातत्व विभाग व नळदुर्ग भुईकोट किल्ला जतन व संगोपनाकरिता घेतलेल्या युनिटी मल्टीकॉन्स प्रा.लि. कंपनीच्या वतीने शनिवार दि.19 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर 2022 पर्यंत जागतिक वारसा सप्ताह साजरा करण्यात येत आहे.

या निमित्ताने शनिवारी  ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यात  स्वच्छता अभियानास सुरुवात करण्यात आली. यावेळी   युनिटी कंपनीचे व्यवस्थापक जुबेर काझी,   विनायक अहंकारी, हाजी शेख,  किल्लेदार नागनाथ गवळी
व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी सहा दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे.

Labels:

Friday, 18 November 2022

मराठा वधु - वर परिचय मेळाव्यात राज्यभरात सामुहिक विवाह सोहळे भरविण्याचे जवंजाळ पाटील यांचे आवाहन



तुळजापूर,दि. १८ :उमाजी गायकवाड


नुकतेच महाराष्ट्र मराठा सोयरीकच्या वतीने राज्यव्यापी विनाशुल्क वधु वर परिचय मेळावा संभाजीनगर (औरंगाबाद) येथे  संपन्न झाला. 


प्रारंभी व्यासपीठावर  पालकमंत्री संदिपान भुमरे, उद्योगपती भाऊसाहेब काळे,महाराष्ट्र मराठा सोयरीकचे संस्थापक सुनिल जवंजाळ-पाटील,हिवाळे पाटील, डॉ.पी.पी.पाटील, शिक्षणाधिकारी,ॲड.सौ कडू आदी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन प्रारंभ करण्यात आला.



या मेळाव्यामध्ये विदर्भ,खान्देश, मराठवाडा त्याच बरोबर पश्चिम महाराष्ट्रातील वधु-वर व पालकांची  उपस्थिती  होती. मेळाव्यामध्ये सुप्रसिद्ध उद्योजक भाऊसाहेब काळे यांचे वतीने आलेल्या सर्व विवाहच्छुक वधुवर व पालकांसाठी मोफत भोजन व्यवस्था करण्यात आली . तसेच हिवाळे पाटील लॉन्स हे हिवाळे पाटलांनी विना शुल्क उपलब्ध करून दिले होते. मराठा सोयरिकचे संस्थापक सुनिल जवंजाळ पाटील (बुलढाणा) यांच्या संकल्पनेतून लोकसहभागातून महाराष्ट्रभर आजपर्यंत  29 मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहेत. 

संभाजीनगर येथील या राज्यस्तरीय नियोजित मोफत सामुहिक वधुवर मेळाव्यातून 450 वधूनी तर 700 वरांनी आपला परिचय करून करुन देत आपला जीवनसाथी कसा असावा, त्याबाबत अपेक्षा व्यक्त केल्या. या मेळाव्यातून विवाहच्छुक वधूंनी शेतकरी वरांना पसंती न देता उच्चशिक्षित तरुणांना पसंती दिल्याचे दिसून आले. एकंदरीत "शेतकरी नवरा नको गं बाई" हेच चित्र दिसून आले.


 पालकमंत्री संदीपानजी भुमरे यांनी पैठणला लवकरच मेळावा घेण्याचे व मेळाव्यास लागणाऱ्या सर्व सुविधा आपण स्वतः पुरविणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी आयोजन समितीला दिले. त्याचबरोबर  भाऊसाहेब काळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलतांना लवकरच औरंगाबाद येथे सामुहीक विवाह सोहळा आयोजित करण्याचे अभिवचन दिले. त्याचबरोबर कन्नड येथील पोपटराव सपकाळ पाटील यांनीही कन्नड येथे पुढील महिन्यात मेळावा घेण्याची घोषणा केली.  पोपटराव सपकाळ यांना महाराष्ट्र मराठा सोयरीकच्या वतीने पालकमंत्री संदीपान भुमरे यांचे हस्ते मराठवाडा भुषण पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात आले. तर प्रा. जगदेव बाहेकर यांनी लवकरच बुलढाण्यात मेळावा घेण्याची घोषणा केली. सर्व उपस्थित मान्यवरांचा आयोजन समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. 



यावेळी मेळाव्यास संबोधित करताना मराठा सोयरिक ग्रृपचे संस्थापक अध्यक्ष सुनिल जवंजाळ-पाटील  म्हणाले की, महाराष्ट्रभर मराठा सोयरिक ग्रुपच्या माध्यमातून  राबविण्यात येत असलेल्या सामुहिक विवाह सोहळ्यामुळे धंदेवाईक विवाह संस्थेला चांगलाच चाप बसल्याचे सांगत आजपर्यंत महाराष्ट्रभर विनाशुल्क भोजन व्यवस्थेसह 29 मेळावे घेतल्याची माहिती दिली. तसेच सध्या चोहीकडे स्त्र‌ी जन्मदर घटला आहे. प्रत्येक पुरुषाला लग्नाकरिता स्त्री हवी असते. मात्र आपल्या पोटी मुलगी जन्माला यावी,अशी इच्छा कोणाचीच नसते. बायको हवी पण मुलगी नको, ही मानसिकता सोडण्याची गरज असून स्त्री जन्मदर घटल्याने अनेक तरुण वधूच्या शोधात फिरत असताना चित्र दिसून येत आहे. अनेक तरुण मुले गावोगावी लग्नापासून वंचित राहत असल्याचे भयान चित्र  समोर येत आहे. त्यामुळे महाराष्ट्राभर मोफत सामुहिक वधुवर सुचक मेळाव्याचे आयोजन करण्याची गरज व सर्वोत्तम उपाय असून धंदेवाईक विवाह संस्थेला आळा घालण्यासाठी ती काळाची गरज झाली आहे,असे प्रतिपादन  जवंजाळ-पाटील यांनी केले. 

कार्यक्रमाचे सुत्र संचालन  अंकुशराव मनगटे व श्री. गायकवाड  यांनी केले तर आभार  सौ.प्रतिभा जगताप यांनी मानले. 

मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी पोपट सपकाळ,ज्ञानेश्वर अंभोरे गुरुजी, प्रभाकर गायकवाड,धनुश्री अंकुशराव मनगटे,मनोहर वडजे,राम झांजे,कैलास बरडे,नंदीची जवंजाळ आदींनी पुढाकार घेतले.

Labels:

तुळजापूर : चव्हाणवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गुणवंतांचा सत्कार

काटी,दि.१८ 

तुळजापूर तालुक्यातील चव्हाणवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील 14 विद्यार्थ्यांनी  शिष्यवृत्ती परीक्षेतील देदीप्यमान यशाची परंपरा कायम ठेवत इयत्ता पाचवीच्या 11 व इयत्ता आठवीच्या 3 अशा एकूण 14 विद्यार्थ्यांनी जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे. या विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षकांचा येथील शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ, पालक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शाळेत गटशिक्षणाधिकारी मल्हारी माने यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या  हस्ते शुक्रवारी सायंकाळी सत्कार करण्यात आला़.


महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागातर्फे या शिष्यवृत्ती परीक्षांचे आयोजन करण्यात येते. बौद्धिक क्षमतांची कसोटी पाहणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता पाचवीतील 11, तर इयत्ता आठवीतील 3 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले होते. जुलै 2022 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी इयत्ता पाचवीतील 
कु.श्रीवणी सुरडे कु.श्रावणी खलाटे,श्रेयस चव्हाण,समृध्दी गायकवाड,कार्तिकी सुरडे, समृध्दी नवगिरे,श्रीहरी चव्हाण, करिश्मा शिंदे, श्रवण चव्हाण, श्रध्दा माळी, श्रेया सुरडे यांचा तर इयत्ता आठवीतील सापते मुक्ता, पांचाळ भक्ती,  खलाटे अक्षता या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला तर शाळेचे मुख्याध्यापक शेखु जेटीथोर सहशिक्षक बलभीम भोयटे श्रीमती सुषमा देशमुख,अशोक जेटीथोर, गीताश्री पाटील,सुखदेव भालेकर या मार्गदर्शक शिक्षकांचाही सत्कार करुन सन्मान करण्यात आला. 

गटशिक्षणाधिकारी पदावर पदोन्नती झालेबद्दल माने यांचा सत्कार

मंगरूळ बीटमधील विस्तार अधिकारी मल्हारी माने यांची गटशिक्षणाधिकारी पदावर पदोन्नती झालेबद्दल येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.


यावेळी सत्कार प्रसंगी  बोलताना गटशिक्षणाधिकारी मल्हारी माने म्हणाले की, शिक्षकांच्या विचारातील सकारात्मकता, आशावाद, विद्यार्थ्यांना जगण्याचे बळ देत असतो.भविष्यात चांगले विद्यार्थी घडवयाचे असतील तर  शिक्षकांना विद्यार्थी घडविण्याची, उत्तुंगतेची आस असली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या जीवनाकडे बघण्याचा दुर्दम्य अशावाद असला पाहिजे. शिक्षकांसाठी रोजचा दिवस हा शिक्षक दिन असला पाहिजे असे मत व्यक्त करुन शिक्षकांनी हार्डवर्क करण्याऐवजी स्मार्ट वर्क करण्यास  प्राधान्य देऊन विद्यार्थ्यांना यशाच्या शिखरापर्यंत नेण्यासाठी परीक्षेची पूर्वतयारी  करावी लागणार असून या कामात पालकांनी देखील तितकंच सजग राहून विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या सवयींचे निरीक्षण करणे,पालक म्हणून आपला मुलगा किंवा मुलगी दिवसातून किती वेळ आणि कशाप्रकारे अभ्यास करते, पाल्य कोणत्या तणावाखाली आहे का? याकडे देखील पालकांना जाणीवपूर्वक लक्ष  द्यावे लागणार आहे.तरच चांगले विद्यार्थी घडविले जाऊ शकतात असे मत व्यक्त केले.


यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नाना सुरडे उपाध्यक्ष राम सुरडे,सरपंच श्रीमती अनिता गोकुळे, उपसरपंच तुकाराम चव्हाण, पोलीस पाटील शञुघ्न चव्हाण,तंटामुक्तीचे अध्यक्ष यशवंत चव्हाण केंद्र प्रमुख संजय वाले, मुख्याध्यापक शेखू जेटीथोर,सहशिक्षक बलभीम भोयटे,सुषमा देशमुख,गीताश्री पाटील, अशोक जेटीथोर, सुखदेव भालेकर,   शिवाजी शिंदे, भिमा  शिंदे यांच्यासह शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य,विद्यार्थी,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Labels:

महाविकास आघाडीच्या वतीने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी आदरांजली



तुळजापूर , दि. १८ : उमाजी गायकवाड 

महाराष्ट्र प्रदेशात नव्हे तर अवघ्या हिंदुस्थानात कडवं हिंदुत्व जपणारे आणि जय भवानी जय शिवाजी हा जयघोष देशभर पोंचवणारे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या 10 व्या स्मृतीदिना निमित्ताने तुळजापूर येथील क्रांती चौक येथे शिवसेना व महाविकास आघाडीच्या वतीने अभिवादन करून आदरांजली वाहण्यात आली.


यावेळी महिला आघाडी जिल्हा प्रमुख शामल वडणे - पवार,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.धीरज पाटील,तुळजापूर शहर प्रमुख सुधीर कदम, महिला आघाडी शहर प्रमुख शोभा शिंदे,माजी उपजिल्हाप्रमुख शाम पवार,युवा सेना तालुका प्रमुख प्रतिक रोचकरी,उपशहर प्रमुख बाळासाहेब शिंदे,बापूसाहेब नाईकवाडी,युवा सेना शहर प्रमुख सागर इंगळे,कालिदास नाईकवाडी, अर्जुन  साळुंखे, विनोद बनसोडे, महेश लबडे, अक्षय नाईकवाडी,बळीराम जगताप,उपतालुका प्रमुख सुनील जाधव,उपशहर प्रमुख दिनेश रसाळ,विद्यार्थी सेना उपजिल्हा प्रमुख विकास भोसले,प्रदीप इंगळे, लालासाहेब देवकर,आंबेशर देशमुख,प्रसाद उंडरे, रितेश चव्हाण,काँग्रेसचे   ऋषिकेश मगर, राष्ट्रवादीचे महेश चोपदार,  गोरक्षनाथ पवार,शंकर शिंदे, अनिल आगलावे आदींची उपस्थिती होती.

Labels:

Thursday, 17 November 2022

हिंदुह्रदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदराजली

 
नळदुर्ग ,दि. १७ :

नळदुर्ग शहरात गुरुवारी  हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्त बाळासाहेब ठाकरे चौक येथे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे उपप्राचार्य रामदास ढोकळे व प्रा.पांडुरंग पोळे यांच्या हस्ते तर लालबहादूर शास्त्री चौकामध्ये माजी उपजिल्हाप्रमुख कमलाकर  चव्हाण यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करुन आदरांजली वाहण्यात आली.


 यावेळी उपतालुकाप्रमुख सरदारसिंग ठाकूर, शहर प्रमुख संतोष पुदाले, उपशहर प्रमुख श्याम कनकधर,   पत्रकार विलासजी येडगे,  तानाजी जाधव,  अमर भाळे, सुरज साळुंखे, युवा सेनेचे रवी पिस्के, ग्राहक कक्षाचे नेताजी महाबोले , संजय दुधभाते, भीमा कोळी, ज्ञानेश्वर कदम, पोपट कदम,  भिमाशंकर बताले आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Labels:

Wednesday, 16 November 2022

नळदुर्ग : बालाघाट महाविद्यालयास नॅकचे B++ दर्जा

नळदुर्ग, दि.१६  : प्रा. दिपक जगदाळे 


 कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,नळदुर्ग येथे नॅक मूल्यांकन समितीने दि. ९ व १० नोव्हेंबर रोजी भेट देऊन पाहणी केली. या त्रिसदस्यीय समितीने  महाविद्यालयातील सर्व विषयाचे विभाग, ग्रंथालय , राष्ट्रीय सेवा योजना विभाग, एन सी सी विभाग , प्रशासकीय कार्यालय , क्रीडा विभागाला समितीने भेट देऊन पाहणी केल्यानंतर आपला अहवाल  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय कोरेकर यांच्याकडे सुपूर्द केला होता. तोच अहवाल समितीने बंगलोर स्थित नॅकला सादर केला होता.  


याच अहवालानुसार नॅक ने महाविद्यालयास B++ दर्जा बहाल केल्याचे कळविले आहे. महाविद्यालयास हा दर्जा पुढील पाच वर्षांकरिता असून या आधारे महाविद्यालयास विद्यार्थ्यी केंद्रीत विविध उपक्रम राबविण्यासाठी विविध योजनांचा लाभ घेता येईल. समितीच्या अहवालामध्ये महाविद्यालयाने पुढील पाच वर्षांत विविध उपक्रमाबद्दल सूचना केल्या आहेत. समितीची भेट यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी महाविद्यालयातील सर्व घटकांनी योगदान दिले.


 नॅक समितीने महाविद्यालयास B ++ दर्जा बहाल केल्याबद्दल बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री मधुकरराव चव्हाण ,कार्याध्यक्ष माजी आमदार नरेंद्र बोरगावकर , सचिव उल्हास  बोरगावकर  , उपाध्यक्ष डॉ.अभय  शहापूरकर , संचालक बाबुराव  चव्हाण , कार्याध्यक्ष रामचंद्र  आलूरे ,सहसचीव प्रकाशराव चौघुले , .शहबाज काझी , लिंबराज कोरेकर , अशोकराव पुदाले , कोषाध्यक्ष.प्रदिप मंटगे आदीनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय कोरेकर , नॅक समन्वयक डॉ . मनोज झाडे ,उपप्राचार्य डॉ.रामदास ढोकळे यांचे अभिनंदन केले आहे.

Labels:

Sunday, 13 November 2022

नळदुर्ग : जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी नळदुर्गच्या भुईकोट किल्यास भेट देवुन केली पाहणी

नळदुर्ग ,दि. १३

उस्मानाबाद जिल्हाचे नूतन जिल्हाधिकारी  सचिन ओंबासे यांची नळदुर्ग येथिल भुईकोट किल्यास भेट देवुन पर्यटकासाठी युनिटी कंपनीने केलेल्या शोभिकरणाच्या कामाची पाहणी करुन किल्ल्याची ऐतिहासिक माहिती जाणुन घेतली.


उस्मानाबाद जिल्याचे नूतन जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी  महाराष्ट्रात रोल मँडेल ठरलेल्या नळदुर्गच्या  भुईकोट किल्यास भेट दिली..यावेळी त्यानी संपूर्ण किल्ल्याची  सविस्तरपणे पाहणी केली.. 


यावेळी युनिटी मल्टीकॉन्स कंपनीने किल्यात केलेल्या अमुलाग्र बदलाचे कौतुक केले.. यावेळी त्यांच्यासमवेत उस्मानाबाद जिल्हाचे पोलीस अधिक्षक  अतुल कुलकर्णी, उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे  मुख्यकार्यकारी आधिकारी  गुप्ता , तुळजापूरचे तहसीलदार  सौदागर तांदळे  आदी उपस्थित होते.. जिल्हातले सर्व मोठे अधिकारी आज नळदुर्ग किल्ला पाहण्यासाठी आले होते...
यावेळी युनिटी कंपनीच्या वतीने माजी नगरध्यक्ष  शहबाज काझी यांनी मान्यवरांचे स्वागत केले..
कंपनीचे व्यवस्थापक जुबेर काझी , जनसंपर्क आधिकारी  विनायक अहंकारी यांनी मान्यवरांचा पाहुणचार केला..

Labels:

Friday, 11 November 2022

नॅक ही एक निरंतर प्रकिया असून त्या अंतर्गत महाविद्यालयाने विद्यार्थी केद्रीत गुणवत्तापूर्ण उपक्रम राबवावे, डाॅ.राधाकृष्णन

नळदुर्ग, दि.११:

 नॅक ही एक निरंतर प्रकिया असून त्या अंतर्गत महाविद्यालयाने विद्यार्थीकेद्रीत गुणवत्तापूर्ण उपक्रम राबविण्यात यावे, डाॅ.राधाकृष्णन, माजी कुलगुरू


नळदुर्ग शहरातील  कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय येथे नॅक मूल्यांकन समितीने दि. ९ व १० नोव्हेंबर रोजी भेट देऊन माहिती जाणुन घेतली.  यामध्ये समितीचे अध्यक्ष डॉ. राधाकृष्णन माजी कुलगुरू केरळ विद्यापीठ तिरुअनंतपुरम, डॉ. रंगप्पा सदस्य समन्वयक दावणगिरी आणि प्राचार्य सुनील गोयल, शासकीय महाविद्यालय इंदौर यांचा समावेश होता. सर्वप्रथम कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय कोरेकर यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेतली त्यानंतर अंतर्गत गुणवत्ता कक्षात डॉ. मनोज झाडे यांनी महाविद्यालयातील विविध समित्या व विभागाची माहिती दिली. 



नॅक मूल्यांकन समितीच्या वतीने महाविद्यालयाची पाहणी करताना महाविद्यालयातील सर्व विषयाचे विभाग,ग्रंथालय , राष्ट्रीय सेवा योजना विभाग, एन सी सी विभाग , प्रशासकीय कार्यालय , क्रीडा विभागाला समितीने भेट देऊन पाहणी केली दुपारच्या सत्रात समितीने पालक, माजी विद्यार्थी, महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याशी चर्चा केली. सायंकाळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी नॅक समिती समोर महाराष्ट्रातील पारंपारिक लोककला व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.



 दुसऱ्या दिवशी समितीने महाविद्यालयातील विविध संशोधन केंद्र, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, महिला कक्ष आणि दत्तक गाव रामतीर्थ तांडा येथे भेट दिली. शेवटच्या सत्रात समितीने आपला अहवाल एक्झिट मीटिंगमध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय कोरेकर यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी समितीचे अध्यक्ष डॉ. राधाकृष्णन यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की ,नॅक ही एक निरंतर प्रक्रिया असून त्याअंतर्गत महाविद्यालयातील गुणवत्ता पूर्ण उपक्रम राबवावे असे आवाहन केले. एक्झिट मीटिंगसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय कोरेकर, समन्वयक डाॅ.मनोज झाडे, डॉ. आर के ढोकळे, डॉ.सावत,  अधीक्षक धनंजय पाटील व महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाविद्यालयाचे नॅक कोअर्डिनेटर डॉ. मनोज झाडे यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.

Labels:

Thursday, 10 November 2022

मैदानी क्रीडा स्पर्धेत विद्यापीठात माधवराव पाटील महाविद्यालयाच्या खेळाडूंनी मिळविले यश


             
 मुरुम, ता. उमरगा, ता. १० : 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने विद्यापीठात नुकत्याच आयोजित झालेल्या वैयक्तिक मैदानी क्रीडा स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धत श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या खेळाडूंनी विद्यापीठातून . घवघवीत यश संपादन  केले.   



कुमारी सोनाली पवार-भालाफेक (प्रथम) तर
कुमारी लक्ष्मी गुंजोटे-१०००० मीटर धावणे प्रथम क्रमांक पटकावला. त्यांची राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या स्पर्धेकरिता निवड झाली आहे. या त्यांच्या यशाबद्दल  प्राचार्य डॉ. अशोक सपाटे यांच्या हस्ते गुरुवारी (ता.९) रोजी त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार, डॉ. सतिश शेळके, डॉ. महेश मोटे, डॉ. राम बजगिरे, डॉ. अरविंद बिराजदार, प्रा. दयानंद बिराजदार, प्रा. अशोक बावगे, डॉ. संजय गुरव, डॉ. संध्या डांगे, प्रा. गोपाळ कुलकर्णी, राजू ढगे आदींची प्रमुख उपस्थिती होती. या खेळाडूंना क्रीडा विभाग प्रमुख प्रा. डॉ. भिलसिंग जाधव व प्रा. नारायण सोलंकर यांनी मार्गदर्शन केले.                       


Labels:

पोलीस अधिकारी- अंमलदारांना आयुर्वेदीक उत्पादने मोफत वाटप

पोलीस अधिकारी- अंमलदारांना आयुर्वेदीक उत्पादने मोफत वाटप.”

 

           उस्मानाबाद , दि. १०

 पोलीसांच्या वेळी- अवेळीच्या, धकाधकीच्या कर्तव्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. हे ध्यानात ठेउन मा. पोलीस अधीक्षक श्री.अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून जुलै 2022 मध्ये उस्मानाबाद जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील पोलीस अधिकारी- अंमलदार यांच्यासाठी आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. 




त्यामध्ये बऱ्याच पोलीस अधिकारी- अंमलदार यांना अपचन, गॅस, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयाचे विकार इत्यादी प्रकारचे आजार तसेच समस्या असल्याचे तपासणीमध्ये दिसुन आले होते. सदर आजार दुर करण्यासाठी आयुर्वेदिक उत्पादने वापरणे आवश्यक असल्याचे मा. पोलीस अधीक्षकांनी  ध्यानात घेउन त्यांच्या प्रयत्नाने टोरेन्ट पावर लि. समन्वय, 600 तपोवन, अंबावाडी, अहमदाबाद या कंपनीच्या सामाजिक दायीत्वातून ट्राईब मॅजीक कंपनीची आयुर्वेदीक उत्पादने उस्मानाबाद पोलीस दलातील अधिकारी- अंमलदार यांच्यासाठी उपलब्ध करुन त्यांना आज दि. 10.11.2022 रोजी सकाळी 10.00 वा. पोलीस मुख्यालयातील ‘अलंकार सभागृहात’ मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते मोफत वाटप करण्यात आली. यावेळी मा.पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, टोरेन्ट पावर लि. कंपनीचे अधिकारी वर्ग तसेच उस्मानाबाद पोलीस दलातील अधिकारी- अंमलदार आणि मंत्रालयीन कर्मचारी उपस्थित होते. 

Labels:

मुबंई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना "पञकार संरक्षण समिती"च्यावतीने निवेदन


पालघर ,दि.१०: 


  न दैन्यम न पलयानम ब्रिदवाक्य घेऊन घेऊन पत्रकारांचे न्याय व हक्कासाठी संपूर्ण देशभरात कार्यरत असलेली शासन मान्यता प्राप्त पत्रकार संरक्षण समितीच्या पालघर  जिल्हाध्यक्ष मनोज कामडी  व पदाधिकारी यांच्या कडून राज्यातील ग्रामीण व शहरी पञकारांच्या समस्या, बाबत आज महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना निवेदन देण्यात आले. 


पालघर जिल्हातील प्रगती प्रतिष्ठान या संस्थेला सुवर्ण महोत्सवी शुभारंभ कार्यक्रमा निमित्ताने संस्थापक स्व. वसंतराव पटवर्धन यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण कार्यक्रमासाठी महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व मंत्री सार्वजनिक बांधकाम,अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा पालघर पालकमंञी रवींद्र चव्हाण या कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित होते. 

 तसेच राज्यातील ग्रामीण व शहरी पञकारांच्या अनेक समस्या महाराष्ट्र शासन दरबारी पडलेल्या असल्यामुळे निवेदन , ईमेल व प्रत्यक्ष भेटून मांडण्यात आल्या असतांना सुद्धा आज रोजी दि. १० नोहेंबर २०२२ परत स्मरण म्हणून जेष्ठ पञकार पेन्शन योजना  बाबत जाचक अटी , पञकार ‌कल्याण निधी व अधिस्विकृती समिती बाबत  महामहिम राज्यपाल यांना पालघर पञकार संरक्षण समितीच्या माध्यमातुन ‌निवेदन देण्यात आले.  यावेळी पालघर आमदार श्रीनिवास वनगा , आमदार सुनील भुसारा , जिल्हाधिकारी , पोलीस अधिक्षक पालघर  संस्थेचे पदाधिकारी व पञकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Labels:

Wednesday, 9 November 2022

युनिटी कंपनीच्या कल्पकतेवर पर्यटक जाम खुश , नळदुर्ग किल्ल्यात पर्यटकानी लुटला मनमुराद आनंद

 
पर्यटनाचा आनंद घेताना पर्यटक 

नळदुर्ग, दि.०९ :   

सुट्टी व मादी धबधबा वाहत असल्यामुळे नळदुर्गच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यात  सुट्टीच्या कालावधीत पर्यटकांचा ओघ वाढल्याचे चिञ पहायला मिळाले. 


दिवाळीच्या सुट्टीकाळात ३५ हजार पेक्षा जास्त पर्यटकांनी भुईकोट किल्ला पाहण्याचा आनंद  घेतला. सोलापूरच्या युनिटी मल्टिकाँन्स कंपनीने  किल्ल्यात केलेल्या  सुशोभिकरणाच्या कामामुळे पर्यटक आनंद लुटण्यासाठी गर्दी करत आहेत.  लातुर, सोलापूरसह शेजारील जिल्ह्यातुन असंख्य पर्यटक किल्ल्यास भेट देत आहेत. सध्या किल्ल्यातील मादी धबधबा सुरू आहे.


 किल्ल्यात केलेले सुशोभिकरण, राष्ट्रीय महामार्गावर भुईकोट किल्ला असल्यामुळे तसेच किल्ल्यात  बोटींग, घोडे सवारी ,  विविध फुलझाडे , बगीचा , शुध्द पिण्याचे पाणी आदी सुविधासह भौगोलिक दृष्ट्या महाराष्ट्रातील सर्वात मोठा  किल्ला असूनही आत फिरण्यासाठी इलेक्ट्रिक वाहन असल्याने वयोवृद्ध, दिव्यांग यांनाही किल्ला पाहणे सोयीचे झाले आहे. परिणामी दिवसेंदिवस पर्यटकांचा ओघ नळदुर्ग किल्ल्याकडे वाढत आहे.

पावसाळ्यात किल्ल्याच्या तटबंदीवर वाढलेली झाडेझुडपे काढताना युनिटी मल्टिकाॕन्सचे कर्मचारी 
मागील चार पाच महिन्यात पावसामुळे भुईकोट किल्ल्याच्या तटबंदीवर  व बुरूजावर मोठ्या प्रमाणात गवत,झाडे झुडपे वाढली असून  युनिटी मल्टिकाॕन्स कंपनीकडून सुरक्षेची पूर्ण काळजी घेऊन तटबंदीवरील झाडे झुडपे काढण्याचे काम सुरू आहे. विस्तीर्ण तटबंदी पाहता हे काम मोठे जिकीरीचे व वेळखाऊ असल्याचे दिसत आहे.

नळदुर्ग किल्ला पर्यटनामुळे स्थानिक शेकडो बेरोजगाराना रोजगार मिळाला आहे. तुळजापूर ,अक्कलकोट व गाणगापूर येथे येणा-या भाविकासाठी किल्ल्याच्या शेजारी राहण्याची  व  विवाह समारंभ ,साखरपुडासह विविध कार्यक्रम घेण्याची सोय युनीवर्डस याठिकाणी उपलब्ध आहे.

Labels: