Friday, 30 July 2021

तुळजापूर शहरातील तरुणाच्या खूनाचा आरोपी 24 तासांत अटक


उस्मानाबाद , दि . ३०

तुळजापूर पोलीस ठाणे : तुळजापूर- लातूर रस्त्यालगतच्या गुदामाजवळ दि. 29 जुलै रोजी 17.45 वा. शंकर दाजीराम गायकवाड, वय 26 वर्षे, रा. काक्रंबा, ता. तुळजापूर यांना तुळजापूर येथील सुरज दिपक शिंदे याने कौटुंबीक वादातून चाकूने भोकसून, वार करून ठार मारले. यावरुन काक्रंबा ग्रामस्थ- सुर्यकांत भिसे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 302 अंतर्गत गुन्हा दाखल आहे. गुन्हा केल्यानंतर आरोपी- सुरज हा घटनास्थळावरुन पसार झाल्याने पोलीसांनी त्याचे छायाचित्र जिल्हाभर प्रसिध्द केले होते.


दरम्यान आरोपी सुरज हा सुम्भा गाव परिसरात असल्याची गोपनिय माहिती उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. च्या पोउपनि- श्री. अनिल टोंगळे, सपोफौ- किशोर रोकडे, पोना- समाधान वाघमारे व तुळजापूर पो.ठा. च्या पोहेकॉ- सोनवने, पोकॉ- माळी, सावरे, राऊत, अमोल पवार यांच्या संयुक्त पथकास मिळाली. यावर पथकाने आज दि. 30 जुलै रोजी सुम्भा शिवारात सापळा लावून आरोपी- सुरज शिंदे यास अटक केली आहे.

Labels:

लोहारा : एन ए ची अट लावू नये , महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे राष्ट्रवादीची मागणी


लोहारा , दि . ३०

1993 मध्ये भूकंपानंतर अनेक शेतकऱ्यांनी शहर वस्ती निर्माण करण्यासाठी तत्कालीन ग्रामपंचायत ८ अ नुसार प्लॉट जागा खरेदी विक्री केली आहे. उर्वरित प्लॉट धारक शेतकऱ्यांना दुय्यम निबंधक श्रेणी एक  कार्यालयातील अधिकारी "एन ए "ची अट घालत असल्याने सदर बाब अन्यायकारक असल्याने तात्काळ आपल्या स्तरावरून भूकंपामध्ये काही प्लॉट विक्री केल्याने उर्वरित प्लॉट "एन ए " करणे अवघड असल्याने ८ अ नुसार खरेदी विक्री करण्यासाठी जसे होते ,त्याच पद्धतीने कायम करावे अशी मागणी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष आयुब हबीब शेख यांनी तहसीलदार मार्फत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना लेखी निवेदन दिले आहे.


 सदर निवेदन नायब तहसीलदार रणजित शिराळकर यांना देण्यात आले आहे .दिलेल्या निवेदनात उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात 1993 साली भूकंप झाले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने भूकंप भागात अनेक शेतकऱ्यांनी वस्ती निवास वास्तव्य करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात नकाशा व ग्रामपंचायतला सार्वजनिक नागरिकांच्या प्रयोजनासाठी खुले जागा मूळ मालकाकडून दुय्यम निबंधक कार्यालयाकडून ग्रामसेवक यांच्या नावे दस्त करून  ग्रामपंचायतला जागा देण्यात आली आहे. त्यानुसार मूळ मालकाचे  ८ अ तयार करण्यात आले होते.

     
भूकंपामध्ये अनेक शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत ८ अ नोंदणी प्रमाणे वस्तीसाठी काही प्लॉट खरेदी विक्री केली आहे. तर आज ही अनेकांच्या शेतातील काही प्लॉट उर्वरित क्षिल्लक आहेत. दुय्यम निबंधक कार्यालयाकडून एन ए ची अट सांगितले जात असल्याने अनेक शेतकऱ्याच्या शेतातील उर्वरित प्लॉट चें एन ए करता येणार नाही. लोहारा शहरातील ग्रामपंचायत नंतर नगरपंचायत अस्तित्वात आले आहे. भूकंपानंतर अनेकांनी तत्कालीन ग्रामपंचायत मध्ये  शेतकऱ्यांनी जागेचे 8 अ ला नोंद केली आहे . तर  आज घडीला नगर पंचायत अस्तित्वात आलेले आहे. तत्कालीन ग्रामपंचायत व भूकंपानंतर 8 अ नोंद नुसार आज घडीला अनेक शेतकऱ्यांनी  कुटूंबाचा गाडा हकण्यासाठी वेळेनुसार प्लॉट विक्री करीत आहेत ,तर काही प्लॉट अर्धवट आज ही आहेत. परंतु अचानक प्लॉट विक्रीसाठी एन ए ची अट अधिकारी सांगत असल्याने एक प्रकारे शेतकऱ्यांची कुचंबणा केली जात आहे. 

लोहारा तालुका हे ग्रामीण भागातील तालुका असून भूकंप प्रवण क्षेत्र असल्याने व येथील शेतकऱ्यांनी भूकंपामध्ये ग्राम पंचायत व तात्कालीन शहरासाठी नगर पंचायत मध्ये जुन्याच नोंदी असल्याने अर्धवट प्लॉट खरेदी विक्री तात्काळ चालू करण्यासाठी आपल्या स्तरावरून आदेश देऊन येथील शेतकऱ्यावर होणारे अन्याय दूर करावे , अशी मागणी लोहारा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

 या निवेदनावर शहराध्यक्ष आयुब हबीब शेख, नवाज सय्यद, राजेंद्र कदम, सुरेश वाघ, आमीन सुंबेकर,शब्बीर गवंडी, ताहेर पठाण, रियाज खडीवाले,मिलिंद नागवंशी, अजीज शेख, सह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Labels:

तुळजापूर : जमियते उलेमा ए हिंदच्यावतीने पूरग्रस्तांना मदतीचा हात


तुळजापूर , दि . ३० : 
 
पश्चिम महाराष्ट्रातील चिपळूणच्या पूरग्रस्त कुटुंबियांना जमियते उलेमा ए हिंदच्यावतीने जिवनावश्यक वस्तुंची मदत रवाना करण्यात आली असुन यासाठी उस्मानाबाद जमियते उलेमा ए हिंद  यांनी पुढाकार घेतला. 


महापुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांतील नागरिकांना अन्नधान्यांचे वाटप केले जात आहे. यामध्ये राशन, चादरी, बेडशिट, टॉवेल, अन्नपदार्थ आदीचा समावेश आहे. 

दि. ३० जुलै रोजी तुळजापूर जमियते उलेमा ए हिंद शाखेच्या वतीने शहरातील विविध नागरिकांद्वारे मदत स्वरूपात पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी जीवनावश्यक लागणाऱ्या वस्तू गहू , तांदूळ , तेल डाळ तसेच चादर आदी  मदत स्वरूपात पाठवण्यात आली आहे.


 शहरातील मुस्लिम बांधवांनी जो माणुसकीचा विचार करून पूरग्रस्त भागातील लोकांना जी मदत केली ती खरोखरच खुप कौतुकास्पद आहे,  असे नगराध्यक्ष सचिन रोचकरी बोलताना म्हणाले . 

यावेळी जमियते उलेमा ए हिंद तालुका अध्यक्ष मौलाना बशीर, शहर अध्यक्ष मौलाना मुक्ती फिरदोस पठाण, सेक्रेटरी मौलाना हाफिज इब्राहिम, नगराध्यक्ष सचिन रोचकरी ' पोलीस निरीक्षक आजिनाथ काशीद गोकुळ  शिंदे , सज्जन साळुंखे , आनंद कंदले अविनाश गंगणे,  रणजित इंगळे , बबन गावडे , युसूफ शेख,  मकसुद शेख , फेरोज पठाण , आरिफ बागवान , तोफिक शेख ,  मोसीन बागवानसह नागरिक उपस्थित होते.

Labels:

तुळजाभवानी मंदिरासमोरील दगडी पाय-या काढण्यासाठी नगरसेवक सुनील रोचकरी यांचे महाद्वारासमोर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन



तुळजापूर  दि . ३० 

श्री तुळजाभवानी मंदिर महाद्वार समोर असणाऱ्या दगडी पायर्‍या काढण्यात याव्यात आणि तेथे सरळ रस्ता करण्यात यावा अशी मागणी या प्रभागाचे नगरसेवक सुनील रोचकरी यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी डॉ. कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे केली आहे. यामध्ये विशेष म्हणजे नगरसेवक रोचकरी यांचे हे चौथे निवेदन महाद्वार समोर जिल्हाधिकारी यांचा दौरा असताना देण्यात आले आहे.


तुळजापूर विकास प्राधिकरणाच्या कामामधून तुळजाभवानी मंदिराच्या परिसरात दगडी पायर्‍या बांधण्यात आले आहेत. तत्कालीन प्रस्तावामध्ये महाद्वार परिसराला ऐतिहासिक स्वरूप प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने या दगडी पायऱ्या करण्यात आले आहेत. परंतु या दगडी पायऱ्या झाल्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर बांधकामाचे साहित्य आणि मोटार सायकल उभ्या करण्यात येत आहेत. यामुळे खूप मोठा अडथळा निर्माण झाला आहे. यामध्ये अनेक दगडी पायऱ्या निघाल्या आहेत. 

खडकाळ गल्ली व परिसरात राहणाऱ्या लोकांना ही मोठी अडचण झाली असल्यामुळे नागरिकांनी व या प्रभागाचे नगरसेवक सुनील रोचकरी यांनी या दगडी पायऱ्या काढण्याची मागणी केली आहे. तेथे सामान्य रस्ता करण्यात यावा अशी नागरिकांची मागणी आहे .


या निवेदनावर अंबादास कदम, दिवाकर शेळके, रमेश अमृतराव,  शेषकुमार रोचकरी, आकाश अमृतराव, शिवाजी अमृतराव, लखन शिंदे, सचिन माने, विकास सोनजी, प्रशांत शिरसागर, महेश अमृतराव ,नरसिंग साळुंखे, उमेश शिरसागर ,गणेश कदम, अर्जुन पलंगे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


या  संदर्भात नगरसेवक सचिन रोचकरी यांनी सांगितले की,  जिल्हाधिकारी  यांनी प्रत्यक्ष या परिसराची पाहणी केली आहे. आम्ही या पायऱ्यामुळे होणारे धोके आणि रस्त्यामध्ये झालेला अडथळा त्यांच्या निदर्शनास आणून दिला आहे. लवकरच या संदर्भात निर्णय होईल अशी माझी अपेक्षा आहे. यानंतरही आपण या प्रश्नाच्या अनुषंगाने तुळजापूर विकास प्राधिकरणाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.

Labels:

स्पर्श रुग्णालयाकडून काटेवाडी येथे फिरत्या मोबाईल मेडीकल युनिटमार्फत शंभर रुग्णांची तपासणी

                    

मुरूम, दि. ३० : 


काटेवाडी, ता. उमरगा येथे सास्तूर येथील प्राईड इंडिया स्पर्शमार्फत फिरते मोबाईल मेडीकल युनिटमार्फत दोन दिवसात १०० रुग्णांची तपासणी करण्यात आली. सदर फिरते आरोग्य वाहन हे अत्यंत दुर्बल वाड्या-वस्त्यांवर जावून  मोफत रुग्णांची तपासणी केली जात आहे.


 स्पर्श रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी डॉ. रमाकांत जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर, नर्स, तंत्रज्ञ आदी फिरत्या मोबाईल मेडीकल युनिटद्वारे आरोग्य तपासणी, औषधोपचार, लसीकरण, गरोदर माता प्रसूतीपूर्व, प्रसूती पश्यात सेवा, ज्येष्ठ नागरिकांची तपासणी, उपचार, रक्त, लघवी तपासणी व इ.सी.जी या सर्व सेवा सुविधा पुरविल्या जात आहेत. या आरोग्य तपासणीचा शुभारंभ गुरुवारी (ता.२९ ) रोजी सरपंच रंजीत गायकवाड, रामराव जाधव, डॉ. भालचंद्र भोसले, शांत काकडे, राम मुगले, नंदकिशोर भोसले, सचिन भोसले, रवी भोसले, राम क्षीरसागर, आशाताई विद्या मरकडं, कुंडलिक क्षीरसागर, मनोज सूर्यवंशी, फातीमा जमादार, अंगणवाडी सेविका उर्मिला कांबळे, इमाम सोलापूरे, राम इंगोले, मदतनीस लक्ष्मीबाई सुर्यवंशी, चंद्रकांत सुर्यवंशी, गोपीनाथ भोसले आदींच्या उपस्थितीत करण्यात आला.

 दोन दिवस चालू असलेल्या रुग्ण तपासणीचा शिवाजी भोसले, रमेश मरकडं, रमेश भोसले, सिताराम जाधव, मुकुंद भोसले, जनक इंगोले, महेबुब मुल्ला, भीमा काकडे, नितीन भोसले आदी रुग्णांनी या सेवेचा लाभ घेऊन या सेवेबद्ल समाधान व्यक्त केले.                                    

Labels:

तुळजापूर : जळकोट येथे मान्यवरांच्या हस्ते विलगीकरण कक्षाचे उद्घाटन


                  
 जळकोट, दि.३० मेघराज किलजे : 

तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे  मान्यवरांच्या हस्ते विलगीकरण कक्षाचे उद्घाटन जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेच्या नवीन हॉलमध्ये करण्यात आले.    
                               

स्वयं शिक्षण प्रयोग, उस्मानाबाद या संस्थेच्या वतीने संपूर्ण जिल्हाभरात विलगीकरण कक्षाची निर्मिती करण्यात येत आहे. जिल्हा आरोग्य विभाग व स्थानिक ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने सदर विलगीकरण कक्षाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, सरपंच अशोकराव  पाटील , प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी कु. रोहिणी जाधव यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. 

तत्पूर्वी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे विधीवत पूजन करण्यात आले. यावेळी स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेच्या  तालुका समन्वयक जयश्री कदम यांचा सत्कार जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, सरपंच अशोकराव कदम  यांच्या हस्ते करण्यात आला. 

याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य कल्याणी साखरे, अंकुश लोखंडे,  मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सहचिटणीस  महेश कदम, सेनेचे तालुका उपप्रमुख कृष्णात मोरे, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष बसवराज कवठे, प्राथमिक कन्या शाळेचे मुख्याध्यापक महादेव राठोड, सहशिक्षक मोटे, आरोग्य विभागाच्या बालिका कदम, प्रभाग संघाच्या अध्यक्षा शिरिन इनामदार, सचिव सुरेखा कुंभार, सुनिता कोळगे, नौशाद तांबोळी,  ज्योती कदम, आशा कार्यकर्ती रेणुका नळगे , शालिनी कडते,  वैशाली कदम, लक्ष्मी लष्करे, सविता जाधव, मनीषा गायकवाड, वनमाला सुरवसे, अंगणवाडी सेविका गजरा डोके, ग्रामपंचायत कर्मचारी लहू कार्ले, विशाल जाधव, नागू स्वामी, प्रवीण कदम ,बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

Labels:

लोहारा : संगप्पा नागनाथ बिराजदार यांचे अल्पशा आजाराने उपचारा दरम्यान निधन

लोहारा , दि .३०


 शहरातील जेष्ठ नागरिक संगप्पा नागनाथ बिराजदार (वय ६५) यांचे अल्पशा आजाराने उपचारा दरम्यान दि.२९ पहाटे ३:३० वाजण्याच्या सुमारास निधन झाले आहे. 

त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी १ वाजता स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. ते माजी सैनिक प्रदीप संगप्पा बिराजदार यांचे वडील होत.

Labels:

कोरोनामुळे पतीचा मृत्यू झाल्याने विधवा झालेल्या महिलांच्या कुटुंबचे पुनर्वसन करण्यासाठी शासनाने ठोस धोरण जाहीर


वागदरी , दि . एस.के.गायकवाड

कोव्हीड-१९ कोरोना विषाणूची लागण होऊन पतिचा मृत्यु  झाल्याने विधवा झालेल्या महिलांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करण्यासाठी शासनाने ठोस धोरण जाहीर करावे, त्यांचे व त्यांच्या मुलांची नावे पतीच्या प्रापर्टीमध्ये नोंद करावीत आशा विविध मागण्याचे निवेदन उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध सेवाभावी संस्थाच्या वतीने उस्मानाबाद जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांना देण्यात आले.


  कोव्हीड-१९ मुळे विधवा झालेल्या महिलासाठी राज्य शासनाने धोरण जाहीर करावे या मागणीसाठी दि.२९जुलै २०२१ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात स्वयंसेवी संस्थेच्या मार्फत शासनाकडे निवेदनाद्वारे विनंती करण्यात आली असून त्याचाच भाग म्हणून उस्मानाबाद जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांनी लोकप्रतिष्ठाणच्या संस्थापिका डॉ.स्मिता शहापूरकर ,परिवर्तन सामाजिक संस्थेचे संस्थापक मारूती बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी याना कोव्हिड-१९ मुळे विधवा झालेल्या महिलांची शासनाने त्वरित व्यवस्था करावी, सामाजिक सुरक्षेच्या योजनांचा  लाभ त्याना देण्यात यावा, त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये त्यांच्या नावाची नोंद करावी व  त्यांच्या मुलांची शिक्षणाची व्यवस्था करावी असा एकून १३ मागण्याचे लेखी निवेदन जिल्ह्यातील दहा संस्थानी मिळून दिले आहे.


  यावेळी संत गाडगेबाबा स्वयंसेवी संस्था देवसिंगा (तुळ) चे तानाजी जाधव, शामनाथ संस्था भुमचे सर्जेराव इंदलकर,अँड.मनीषा पाटील कळंब, अँड.जी.बी.वाघे उस्मानाबाद ,सुधाकर बुकं उस्मानाबाद, संजीव आगळे उस्मानाबाद ,मंजुषा शिंदे, तानाजी शिंदे बसवंतवाडी, इत्यादी संस्था प्रतिनिधी उपस्थित होते . जिल्हाधिकारी यांनी या विषयावर त्वरित लक्ष देऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यात येतील असे आश्वासन या प्रसंगी दिले. उस्मानाबाद व बिड जिल्ह्यात मिळून जवळपास 1000 विधवांची नोंद झालेली आहे असेही त्यांनी सांगितले

Labels:

सोलापूर जिल्हा कोतवाल संघटनेच्या अध्यक्षपदी गुरव तर सरचटणीसपदी जाधव यांची निवड



   सोलापूर , दि. ३० :

               
सोलापूर जिल्ह्या कोतवाल संघटनेची संपूर्ण कार्यकारणी महसूल संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष शंतनू गायकवाड व महाराष्ट्र राज्य  सरचटणीस कृष्णा शिंदे, राजाभाऊ साठे राज्य सदस्य
यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर करण्यात आली. या बैठकीत सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी विठ्ठल गुरव यांची बिनविरोध निवड करण्यात आली, तर सरचटणीस पदी अनिल जाधव यांची वर्णी लागली आहे .

  पुढील प्रमाणे नूतन पदाधिका-यांची निवड बिनविरोध  करण्यात आली आहे .जिल्हा उपाध्यक्ष राहुल तोडकरी,  मल्लिनाथ बाळगी, भगवान पारसी, गोरख ढोबळे, प्रल्हाद खरे, गुरुदास अरणे,  कार्याध्यक्ष राजाभाऊ साठे, कोषाध्यक्ष  आधुसिद्ध पुजारी, 
सहकार्याध्यक्ष बसवंत सुतार, 
सह कोषाध्यक्ष संजय कुरवडे, 
सहसचिव बंदेनवाज डफेदार,
 जिल्हाप्रसिद्धी प्रमुख प्रविणकुमार बाबर,  सल्लागार भागवत चंदनशिवे, बाळासाहेब कांबळे, रवी धेंडे, गुलाब सोनवणे,  प्रवक्ता नवनाथ इंगोले, प्रवीण गुंजले, रशीद शेख, संघटक आनंद इंगळे , मसा साबळे, उमेश क्षिरसागर, शहाजी हुलगे, शिवाजी काळे,  संपर्क प्रमुख रामभाऊ खरात, बालाजी पाटील, अर्जुन सनके, दयानंद क्षिरसागर,  महिला प्रतिनिधी सुलोचना देशमुख, ममता कोळी आदीची निवड करण्यात आल्याची
 महिती विठ्ठल गुरव जिल्हा अध्यक्ष यानी जाहिर केले आहे. वरील सोलापूर जिल्हा कोतवाल संघटनेचे कार्यकारणी ही पाच वर्षे साठी असेल असे महिती कृष्णा शिंदे राज्य सरचिटणीस महाराष्ट्र राज्य  कोतवाल संघटना यानी जाहीर केले असून या बैठकीला  जिल्ह्यातील पदाधिकारी तालुका पदाधिकारी व कोतवाल 
 महादेव खिलारे पंढरपुर 
शफीक वाडीकर अककलकोट ,धानया हिरेमठ दक्षिण सोलापूर,
अनिल भोसले करमाळा,  गौतम ठोकळे सागोला, नाना पवार माढा, 
बालाजी व्हळे बार्शी, राजु कुभार मोहोळ,  बंडु मडवळकर उत्तर सोलापूर, संजय कुरवडे मंगळवेढा 
आनंद इंगळे  माळशिरस , यांच्यासह  कोतवाल शंकर बनसोडे ,   गुलाब सोनवणे ' सज्जन शिंदे ,पांडुरंग वाघमारे , शिवानंद कोळी , समाधान सुर्यसुंगध ,अंकुश मुढे , दत्ता कदम ' रेवणसिध्द सुतार, सुनिल मुलगे मारुती गुंड ' स्वामीनाथ जमादार , हणमत सानप ,  रशीद शेख ,शिवाजी काळे , बाळासाहेब खेदाड , बनसोडे शिवशरण , कोळी सूर्यात रामपुरे , प्रदीप शिवशरण महादेव चव्हाण  दिपक काबळे जावेद मुलाणी  सुनिल कोळी  प्रदीप पाटील पवार,  फिरोज ताबोळी, याची उपस्थितत सोलापूर जिल्हा कोतवाल संघटनेच्या नूतन कार्यकारिणी  जाहीर करण्यात आली आहे.

    

Labels:

Thursday, 29 July 2021

तुळजापूर येथे पूर्व वैमनस्यातुन तरुणाची हत्या केल्याची घटना उघडकीस


तुळजापूर , दि .२९

तुळजापूर शहरातील विश्वनाथ कॉर्नर पाठीमागे शासकीय गोदाम जवळ पूर्व वैमनस्यातुन एका तरुणाची  निर्दयपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना तुळजापूर शहरांमध्ये  दि .29 जुलै रोजी घडली आहे .
                           
 याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी आहे की , तुळजापूर शहरातील विश्वनाथ कॉर्नर शासकीय गोदाम जवळ  मयत शंकर दाजीबा गायकवाड वय अंदाजे 25 वर्ष  राहणार काक्रंबा ता . तुळजापूर या युवकाला दोन युवकांनी बोलून घेऊन निर्दयपणे धारदार शस्त्राने युवकाची हत्या करण्यात आली आहे . पूर्व वैमनस्य मधून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे .सदर युवकाला प्राथमिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे दाखल करण्यात आले होते. परंतु उपजिल्हा रुग्णालय येथील डॉक्टर विनोद बर्वे यांनी त्याचा  मृत्यु झाल्याचे घोषित केले आहे .  दोन वार झाल्यामुळे सदर व्यक्ती मयत झाली असल्याची प्राथमिक माहिती समजत आहे .सदर घटनेची माहिती मिळताच
पोलीस निरीक्षक अजिनाथ काशीद सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील चव्हाण,पोलीस उपनिरीक्षक चनशेट्टी, पोलीस कॉन्स्टेबल महेश सुडके, अमोल भोपळे,ज्ञानेश्वर माळी, चालक अंनत ताठे इत्यादी तत्काळ घटनास्थळी  दाखल झाले . याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याची पूढील प्रक्रिया सुरू आहे . 

Labels:

मंगरुळ येथे माळी इलेक्ट्रॉनिक्स दालनाचा थाटात शुभारंभ


काटी , दि .२९ : उमाजी गायकवाड 

तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ येथे नुकताच मंगरुळचे पोलीस पाटील लक्ष्मण माळी व त्यांचे तीन बंधूंनी माळी मोबाईल शॉपी, माळी फोटो स्टुडिओ सोबतच आता माळी इलेक्ट्रॉनिक्स दालनाचा शुभारंभ केला आहे. खास ग्रामीण भागातील नागरिकांसाठी योग्य किंमतीत सेवा देण्यासाठी मंगरुळमधील मुख्य चौकात माळी बंधूंच्या  माळी इलेक्ट्रॉनिक्स दुकानाचा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत  आई शशिकला व वडिल राजेंद्र विठ्ठल माळी (पाटील) यांच्या  हस्ते फित कापून थाटात शुभारंभ करण्यात आला.

       
 पोलीस पाटील लक्ष्मण माळी व त्यांचे बंधू रामहरी माळी,  नितीन माळी, व सचिन माळी यांचे माळी मोबाईल विक्री व दुरुस्ती हा व्यवसाय अविरतपणे सुरु असून काळानुरुप बदल करुन मोबाईल शॉपी सोबतच आता माळी इलेक्ट्रॉनिक्स  या दालनाच्या माध्यमातून अद्यायावत असे ग्रामीण भागातील नागरिकांना ब्रॅण्डेड कंपन्यांचे फ्रीज, एलईडी टिव्ही, वाशिंग मशिन,फॅन, तसेच  फर्निचर योग्य भावात देण्यासाठी एकमेव दालनाचा शुभारंभ करण्यात आला असून या दुकानात बजाज फायनान्स, टी.व्ही.एस. फायनान्स, क्रिडीट कार्ड, डेबिट कार्ड, बुलडाणा बॅंक फायनान्सची सुध्दा सोय उपलब्ध असल्याची माहिती माळी इलेक्ट्रॉनिक्सचे सर्वेसर्वा पोलीस पाटील लक्ष्मण माळी यांनी दिली आहे. 


त्यामुळे मंगरुळसह परिसरातील नागरिकांना आता इतर शहरांमध्ये जावून इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, मोबाईल खरेदी करण्याची गरज नाही. कारण मंगरुळ मधील माळी बंधूंनी एकाच दालनात एकाच छताखाली या सर्व वस्तू मिळवून देण्याची किमया केली आहे.

       
 

Labels:

नळदुर्ग पोलिस ठाण्याच्या हाद्दीत धुमाकूळ घालाणा- या चौघा चोरट्याना अटक : आरोपीकडुन ९० हाजाराचा मुद्देमाल जप्त


नळदुर्ग , दि . २९

शेळया व जनावरे चोरुन तुळजापुर तालुक्यात धुमाकूळ घालणा- या चौघा चोरट्याच्या मुसक्या  स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने  आवळल्या. या आरोपीच्या ताब्यातुन  13 लहान मोठ्या शेळ्या,  किंमत 66 हजार रुपये व रोख रक्कम 23 हजार रुपये असे मिळुन एकुण 89 हजार रुपयेचा मुद्देमाला जप्त केले आहे. तर नळदुर्ग पोलिस ठाण्यातील चोरीचे ४ गुन्हे उघडकीस आणल्याने स्थानिक गुन्हा शाखेच्या सर्व टिमचे कौतुक व आभिनंदन होत आहे.



  दि . २८ जुलै  रोजी उस्मानाबद जिल्ह्यात  जनावरे व शेळ्या चोरी करणा-या आरोपीची गुप्त बातमीदारामार्फत माहिती काढून गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करून आरोपी बाळू वसंत सावंत वय 30 वर्षे ,  रावसाहेब शेषराव कदम वय 35 वर्ष, दोघे  रा जळकोट ता तुळजापूर , मोहम्हद शेख वय 45 वर्ष रा हंगरगा (तूळ) ता तुळजापूर यांना पकडून त्यांच्या तब्यातुन एकुण 13 लहान मोठ्या शेळ्या,  किंमत 66 हजार रुपये व रोख रक्कम 23 हजार रुपये असे मिळुन एकुण 89 हजार रुपयेचा मुद्देमाला जप्त करून एकुण  (04)  जनावर व शेळी चोरीचे गुन्हे उघडकिस आणले आहे. 

 1)* पोस्टे नळदुर्ग 21/2020 कलम 379 भादवी 
2)* पोस्टे नळदुर्ग गुरनं. 374/2020कलम 379 भादवी, 
3)* पोस्टे नळदुर्ग गुरनं. 42/2021 कलम 379 भादवी,
 4)* पोस्टे नळदुर्ग गुरन 244/2021 कलम 379 भादवी,
    
रिपोर्ट सपोनि एम. डी निलंगेकर  ने.स्थानिक गुन्हे शाखा उस्मानाबाद
         
 पोलिस निरीक्षक   घाडगे  यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक   पोलिस निरीक्षक  एम. डी निलंगेकर ,पोलिस उपनिरीक्षक  भुजबळ,  पोहेंका शेळके पोलिस नाईक लाव्हरे ,पाटील पो. का सावंत पो कॉ ढगारे , कोळी , ठाकुर
, आरसेवाड  चालक  हवलदार कवडे
, घुगे चा.पो. ना गव्हाने
चालक  माने आदीया कारवाईत सहभागी झाले होते.  

Labels:

कोरोनामध्ये मृत्यू पावलेल्या मातंग समाजातील कुटूंबियांना कर्ज मिळावा : माजी सभापती शिवाजीराव गायकवाड


मातंग समाजातील कोरोनामध्ये मृत्यू पावलेल्या मातंग समाजातील कुटूंबियांना कर्ज स्वरूपात पत पुरवठा मिळावा यासाठी जिल्हाधिकारी यांचेकडे माजी सभापती शिवाजी गायकवाड यांचे निवेदन

काटी , दि . २९ , उमाजी गायकवाड 

तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा येथील रहिवासी तथा मातंग समाजाचे नेते तुळजापूर पंचायत समितीचे माजी सभापती शिवाजीराव गायकवाड यांनी जिल्हाधिकारी  यांना निवेदन देऊन कोरोना महामारीत मातंग समाजातील कुटुंब प्रमुख मृत्युमुखी पडल्याने त्यांचे संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडले आहे.


 त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. महात्मा फुले, संत रोहिदास  महामंडळ व अन्य महामंडळा तर्फे कर्ज पुरवठा केला जातो. त्याच धर्तीवर मातंग समाजातील कोरोनामध्ये उघड्यावर पडलेल्यांच्या कुटुंबाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी त्यांना 4 लाखांपर्यंत कर्ज स्वरूपात पत पुरवठा  करावा अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.

Labels:

टायगर ग्रुप उस्मानाबाद शाखेच्यावतीने पूरग्रस्त भागामध्ये मदत पोहोच




उस्मानाबाद , दि . २९


 टायगर ग्रुप उस्मानाबाद जिल्हा शाखेच्या तर्फे एक हात मदतीचा ही संकल्पना राबवली व सांगली येथील कृष्णा नदीत आलेल्या पुरामुळे जी परिस्थिती  निर्माण झाली त्यात अनेक घर व तेथील लोक बेघर झाले . जीवनावश्यक वस्तू पुरात वाहून गेल्या हीच बाब लक्षात घेवुन टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष पैलवान डॉ.तानाजी  जाधव यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष पैलवान तुषार  शिंदे व जिल्ह्यातील सदस्यांनी जमा केलेल्या जिवन अत्यावश्यक वस्तू सांगलीचे जिल्हाध्यक्ष पैलवान पिंटू  माने  यांच्याकडे पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या मदतीसाठी संपूर्द करण्यात आले.


  त्यांचे योग्य पध्दतीने वाटप देखील सांगली जिल्हा  अध्यक्ष पिंटू माने
यांच्या मार्गदर्शनाखाली झाले आहे.

Labels:

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या शेतकरी चंद्रकांत गोरे कुटुंबास तुळजापूर रोटरी क्लबची मदत



तुळजापूर दि २८ डॉ. सतीश महामुनी


तुळजापूर  तालुक्यातील आपसिंगा येथील तरुण शेतकरी चंद्रकांत सुभाष गोरे कोरोना संसर्गाने  मृत्यू झाल्याने  रोटरी क्लब तुळजापूर यांच्यावतीने  गोरे परिवारातील दोन मुलांना शैक्षणिक वर्षासाठी दत्तक घेण्यात आले. कोरोनामुळे गोरे परिवारावर खूप मोठे संकट कोसळल्यामुळे तुळजापूरच्या रोटरी क्लबने या परिवाराला सानुग्रह मदत करण्याचा निर्णय घेऊन मदतीचा धनादेश कुटुंबियास सुपूर्द केला.



या कुटुंबातील मुलीसाठी तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी ३५ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. जीवन सुकन्या योजनेसाठी गुंतवणूक करण्यात आले . रोटरी अध्यक्ष रामचंद्र गिड्डे यांच्या हस्ते गावकऱ्यांच्या उपस्थितीत हा धनादेश देण्यात आला. यावेळी रो. अनिल रोचकरी  रो.धीरज क्षिरसागर रो.सुनील क्षिरसागर आदी मान्यवर उपस्थित होते.


रोटरी क्लबचे नवनिर्वाचित अध्यक्ष रामचंद्र गिड्डे यांनी  ग्रामीण भागातील जीवन जवळून पाहिले आहे. त्यामुळे अपसिंगा येथील गोरे कुटुंबाच्या अडचणीवर मात करण्यासाठी रोटरी क्लबच्या माध्यमातून ही छोटीशी मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. रोटरी क्लबच्या सामाजिक ध्येयधोरण आणि कार्यपद्धती याला अनुसरून ही मदत करण्यात आल्याचे सांगितले.


यावेळी चंद्रकांत गोरे यांचे शालेय जीवनातील इयत्ता पहिली ते दहावी शिकणाऱ्या मित्र मंडळींनी पुढाकार घेऊन व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून निधी संकलन केले. विधिज्ञ दिगंबर श्रीहरी भाकरे,  राहुल तोडकरी,  सखाहरी गोरे, दत्तात्रय डांगे, विधिज्ञ गोकुळ गोरे, बसवेश्वर खोचरे, 
रघुनाथ क्षीररसागर, ज्ञानेश्वर तोडकरी, सचिन सरडे ,सुनील माळी, राजकुमार सरडे,विनोद माळी ,रवी घोडके मारुती यल्लाळ सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा गोरे, छन्नू रोकडे, संजय क्षीरसागर ,विशाल कदम, खंडू क्षीरसागर, रमजान शेख, सुनील माळी यांचे मोलाचे सहकार्य लाभले व समस्त अपसिंगा येथील ग्रामस्थ दयानंद हाके यांनी रोटरी क्लबचे आभार मानले . कार्यक्रमास गावातील माजी सरपंच रामदास  गोरे, डॉ.श्रीहरी भाकरे , वनधिकारी नकाते  व सुभाष गोरे यांची उपस्थिती होती.

Labels:

Wednesday, 28 July 2021

सोलापूर जिल्हा कोतवाल संघटनेचे विविध प्रलंबित मागण्या न मान्य झाल्यास बेमुदत संपाचा इशारा



सोलापूर  दि.२८ : 

          
महसूल विभागातला शेवटचा घटक म्हणून ओळखले जाणाऱ्या  कोतवाल संघटनेच्या वतीने विविध प्रलंबित मागण्या करिता  सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना निवेदन देण्यात आले, या निवेदनात सोलापूर जिल्ह्यातील कोतवाल यांच्या पदोन्नती व वेळीवेळी दिलेल्या निवेदनातील प्रमुख प्रलंबित मागण्या असून कोतवाल संवर्गातुन शिपाई संवर्गात पदोन्नती गेल्या ११ वर्षांपासून प्रलंबित आहे.

कोव्हीड १९ च्या प्रादुर्भावाने मयत झालेल्या कोतवाल कर्मचारी यांच्या शासन निर्णयानुसार ५०,००००० (पन्नास लाख रु) वारसांना मदत मिळणे, ६/२/२०१९ च्या शासन निर्णयाची जिल्ह्यात अंमलबजावणी करणे, सेवा पुस्तक आद्यवत करणे, सन २०२० व २०२१ यावर्षी अंतिम सेवाज्येष्ठता यादी प्रसिध्द करणे ,कोतवाल कर्मचारी सेवा निवृत्त झाल्यानंतर शासन निर्णयानुसार शिल्लक अर्जित रजेंची रक्कम मिळण्याबाबत, बार्शी तालुक्यातील दोन महिन्यांचे थकीत वेतन मिळण्याबाबत, कोतवलांच्या रिक्त जागा भरणे बाबत, अशा अनेक प्रलंबित मागण्यांसाठी  जिल्हाधिकारी यांना महसूल संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष शंतनू गायकवाड, कोतवाल संघटनेचे प्रदेश सरचिटणीस कृष्णा शिंदे,  जिल्हाध्यक्ष विठ्ठल गुरव, जिल्हा उपाध्यक्ष राहुल तोडकरी, मल्लिनाथ बाळगी, भगवान पारसी, गोरख ढोबळे, प्रल्हाद खरे, गुरुदास अरणे, कार्याध्यक्ष राजाभाऊ साठे, कोषाध्यक्ष आधुसिद्ध पुजारी, सहकार्याध्यक्ष बसवत सुतार, सह कोषाध्यक्ष संजय कुरवडे, सहसचिव बंदेनवाज डफेदार, जिल्हाप्रसिद्धी प्रमुख प्रविणकुमार बाबर, सल्लागार भागवत चंदनशिवे, बाळासाहेब कांबळे, रवी धेंडे, गुलाब सोनवणे, प्रवक्ता नवनाथ इंगोले, प्रवीण गुंजले, रशीद शेख, संघटक आनंद इंगळे , मसा साबळे, उमेश क्षिरसागर, शहाजी हुलगे, शिवाजी काळे, संपर्क प्रमुख रामभाऊ खरात, बालाजी पाटील, अर्जुन सनके, दयानंद क्षिरसागर, महिला प्रतिनिधी सुलोचना देशमुख, एम एस कोळी यांच्या उपस्थितीत  जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला.

      
 कोतवलांचा  विषय कित्येक वर्षांपासून प्रलंबित असून, त्याबाबत वारंवार निवेदन, आंदोलन, संप करून देखील पदोन्नतीच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहे. कोतवाल हा महसूल विभागातला शेवटचा घटक असला, तरी तो सध्या शेवटची घटका मोजत आहे. अशी अवस्था सध्या कोतवलांची झाली आहे.

          गेल्या ११ वर्षांपासून सोलापूर जिल्ह्यात पदोन्नती झाली नसून, महाराष्ट्र राज्यात अनेक जिल्ह्यात दरवर्षी पदोन्नती देण्यात येते, फक्त सोलापूर जिल्ह्यातच पदोन्नती देण्यात आली नाही. हे पाहता कोतवाल कर्मचारी यांच्यावर अन्याय होत असून, पदोन्नती चे वय ४५ वर्षाचे मर्यादा असल्याने जिल्हा प्रशासनाच्या बेजबाबदार, हलगर्जीपणा पणामुळे अनेक कोतवाल कर्मचारी पदोन्नती पासून वंचित राहिले आहेत.    

            
जर,येत्या ८/८/२१ पर्यंत कोतवलांच्या वरील प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास, सोलापूर जिल्ह्यातील सर्व कोतवाल ९/८/२१ पासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने नोंद घ्यावी. 
            

यावेळी,अक्कलकोट तालुका अध्यक्ष शफील वाडीकर, सरचटणीस शिवानंद कोळी, हणमंत सानप, सुनील मुलगे, नाना पवार, अनिल भोसले, बालाजी ओव्हाळ, गौतम ठोकळे, धानय्य स्वामी, महादेव खिलारे, धानय्य क्षिरसागर, दत्ता कदम, हमीद शेख, सुनील कोळी, समाधान सुर्यगंध, बाळासाहेब खेन्दाड, सुदर्शन गुरव, यासह जिल्ह्यातील व तालुक्यातील कोतवाल कर्मचारी उपस्थित होते.

Labels:

नळदुर्ग (वसंतनगर) येथे वृक्षारोपण , रवी महाराज राठोड यांचा पुढाकार


नळदुर्ग , दि . २८

येथील वसंतनगर येथे श्री.जगदंबा मंदिर व श्री.सेवालाल मंदिर परिसरात १०१ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले, हा उपक्रम  रवी महाराज राठोड यांनी आयोजित केला होता, यावेळी
 फुलचंद राठोड. विनायक जाधव, (कारभारी).मानसिग राठोड, कनिराम राठोड, काशीनाथ राठोड, बाबू जाधव, चांगदेव चव्हाण, गुलचंद राठोड, भानुदास राठोड, दत्ता राठोड, दिलीप राठोड, शेखर राठोड, अमोल जाधव, सुनील चव्हाण, आकाश जाधव, किरण राठोड, आदी उपस्थित होते.

Labels:

पूरग्रस्ताना उस्मानाबाद महाराष्ट्र पत्रकार संघाकडून आर्थिक मदत

                        
मुरूम, दि. २८  : निसर्गाच्या प्रकोपाने रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली जिल्हयात अस्मानी संकट कोसळले आहे. शेतातील उभी पिके, बागा डोळ्यादेखत जमीनदोस्त झाल्या. शेकडो घराच्या भिंती पडल्या. हजारो लोक बेघर झाले. उद्योग-धंदे बंद पडले. या सर्व पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र पत्रकार संघ, उस्मानाबादकडून माणुसकीचे दर्शन व सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून महाराष्ट्र पत्रकार संघाकडून पूरग्रस्तांना ऑनलाईनद्वारे मंगळवार रोजी १७ हजार रुपयाची रक्कम पाठविण्यात आली आहे. 


पूरग्रस्तांना अत्यावश्यक वस्तू, कपडे, आरोग्य व अन्य बाबी खरेदीसाठी पैशाची गरज असल्याने ती रक्कम तात्काळ जमा करण्यात आली. या परिसरातील अनेकांच्या घरासह शेत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. गावांचा संपर्क तुटला आहे. लाखो लोकांचा संसार उघड्यावर पडला आहे. आता केवळ त्यांना जगणे महत्वाचे असल्याने अशा लोकांना अन्न, वस्त्र, पाणी व आरोग्यांच्या सुविधा पुरविणे महत्वाचे आहे. 


महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष विलास कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय अध्यक्ष प्रा. डॉ. शिवपुत्र कनाडे, उपाध्यक्ष डॉ. सुभाष हुलपल्ले, जिल्हाध्यक्ष डॉ. महेश मोटे, उपाध्यक्ष अमोल पाटील, सचिव डॉ. सुधीर पंचगल्ले, सल्लागार प्रा. युसूफ मुल्ला, तालुका कार्याध्यक्ष गुंडू दूधभाते, कोषाध्यक्ष नामदेव भोसले, उमरगा तालुकाध्यक्ष महेबुब पठाण, कार्यकारिणी सदस्य किशोर व्हटकर, दिगंबर पांचाळ, मनोज हावळे आदींनी तात्काळ इतरांना आवाहन करत पुढाकार घेतला.

Labels:

एक ऑगस्ट रोजी तुळजापुरात दंडवत यात्रेचा होणार समारोप

 
तुळजापूर  दि २८ 

राज्यव्यापी आराधी, गोंधळी, वाघ्या, शाहिर, भजनी परिषदेची निलंगा तालुक्यातील नणंद  येथून  तुळजापूरकडे दंडवत यात्रेस सुरुवात झाली असून दि . १ ऑगस्ट  रोजी ही यात्रा तुळजापुरात येणार आहे,   शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तुळजापूर येथे  राज्यव्यापी आराधी, गोंधळी, वाघ्या, शाहिर, भजनी परिषदेचे १ ऑगस्ट रोजी तुळजापूर येथे केले आहे.  


कलावंताच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कलावंताच्या मागण्या मांडण्यासाठी तुळजापूर येथे या कलावंतांना एकत्र केलेले आहे. नणंद ते तुळजापूरपर्यंत २५ जुलै २०२१ ते १ ऑगस्ट २०२१ या दरम्यान, दंडवत यात्रेचा प्रवास असा शिवणी, मोगरगा, २६ जुलै रोजी लामजना, २७ जुलै रोजी तपसे चिंचोली, २८ जुलै रोजी पोमादेवी जवळगा, २९ जुलै रोजी माळकोंडजी, कवळी, वांगजी, ३० जुलै रोजी आशिव, उजनी, ३१ जुलै रोजी पाटोदा, करजखेडा, काक्रंबा, १ ऑगस्ट रोजी तुळजापूर येथे समारोप होणार आहे. 


दि .३ ऑगस्ट २०२१ रोजी श्री क्षेत्र नणंद येथे महाप्रसाद कार्यक्रम आयोजित केला आहे, अशी माहिती राजेंद्र गायकवाड यांनी दिली आहे. गोंधळी, वाघ्या, राज्यव्यापी आराधी, शाहीर, भजनी परिषद शाहीर, भजनी परिषद असेल, २५ जुलै रोजी नणंद,उद्घाटन अ. भा. गोंधळी समाज संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष राजेंद्र वनारसे यांच्या हस्ते झाले आहे.

समारोप राज्यव्यापी आराधी, गोंधळी, वाघ्या, शाहिर, भजनी परिषदेचे प्रांताध्यक्ष राजेंद्र गायकवाड (गोंधळी) यांच्या उपस्थितीत होणार आहे.

गोरगरीब कलावंतांना मागील दोन वर्षापासून प्रचंड मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागले आहे आजही शासन या कलावंतांना मदत करण्यास कोणतेच निर्णय करीत नसल्याचे दिसून येत असल्यामुळे संघटनेने हा कलावंताचा आवाज शास्त्र पर्यंत पोहोचण्यासाठी सदर दंडवत यात्रेचे आयोजन केल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष राजाभाऊ गायकवाड गोंधळी यांनी दिली आहे.

Labels:

मुख्यमंत्री ना उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तुळजापूर येथे विविध कार्यक्रम संपन्न



तुळजापूर , दि . २८ 

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना  उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तुळजापूर शहर शिवसेना व युवासेना यांच्या वतीने महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना उदंड आयुष्य लाभू दे यासाठी महाआरती करण्यात आली .


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रसादाचे वाटप करण्यात आले .  तुळजापूर उपजिल्हा रुग्णालय येथे कोविड  सेंटर येथील रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. 

यावेळी उपस्थित उपशहर प्रमुख बापूसाहेब नाईकवाडी, बाळासाहेब शिंदे, दिनेश रसाळ, युवासेना जिल्हा चिटणीस लखन परमेश्वर, युवा सेना तालुका प्रमुख प्रतीक रोचकरी, युवा सेना शहर प्रमुख सागर इंगळे, विद्यार्थी सेना उपजिल्हाप्रमुख विकास भोसले, उपतालुका प्रमुख शंकर लोभे,  भरत आप्पा जाधव,  ग्राहक संरक्षण शहर प्रमुख स्वरुप कांबळे, युवासेना शहर कार्याध्यक्ष प्रदीप इंगळे, अर्जुन साळुंके, लक्ष्मण माळी, दीपक नाईकवाडी, विद्यार्थी सेना शहर प्रमुख ऋषिकेश इंगळे तुळजापूर शहर शिवसैनिक उपस्थित होते

Labels:

नळदुर्ग येथे विद्यार्थी गुणगौरव सोहळा व करियर मार्गदर्शन उत्साहात संपन्न


नळदुर्ग : एस.के.गायकवाड

 शिक्षणाच्या बळावर जीवनात सर्वांनाच यश हवं असतं,  प्रत्येक क्षेत्रात सफल व्हावे असे प्रत्येकाला वाटत असते. तेव्हा येणाऱ्या अडथळ्यांना पार करून  दुर्दम्य इच्छाशक्ती व  आत्मविश्वासाच्या बळावर अभ्यासात सातत्य ठेवल्यास यश निश्चित असल्याचे  तहसिलदार सौदागर तांदळे यांनी व्यक्त केले.


 नळदुर्ग  पोलिस ठाणे येथे मुक्तांगण संवाद विद्यार्थ्यांशी या उपक्रमांतर्गत   इयत्ता दहावीच्या गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा व करिअर मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. 
पोलिसांच्या सामाजिक उपक्रमातून पोलीस, विद्यार्थी, शिक्षक व पालक यांचा सुंदर  अनुबंध निर्माण करण्याच्या दृष्टीने मुक्तांगण संवाद विद्यार्थ्यांशी या कार्यक्रमात पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील इयत्ता दहावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सन्मानपत्र, पुस्तक व पुष्पगुच्छ देवून तहसीलदार सौदागर तांदळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश राऊत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित मस्के, पोलीस उपनिरीक्षक कैलास लहाने, मुक्तांगणचे समन्वयक  भैरवनाथ कानडे आदींची उपस्थिती होती. 


दहावीनंतर  विद्यार्थ्यांनी नेमकं कोणत्या क्षेत्रात करिअर करावे, शिवाय त्यांना विविध स्पर्धा परीक्षांना सामोरे जायचं असतं परंतु  त्यांना यामध्ये येणार्‍या चढ-उताराची पुरेशी  जाणीव नसते यासाठी दहावीनंतर पुढे काय? विद्यार्थ्यांनी मुक्त ,  निर्भय जगण्यासाठी काय करावं?  बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी संबंधितांनी कोणती खबरदारी घ्यायला हवी, याशिवाय आपले क्षेत्र निवडताना पालकांसोबतचा संवाद ,विद्यार्थ्यांनी आपली क्षमता व कल कसा ओळखावा आणि उपलब्ध असणाऱ्या करिअरच्या विविध संधी क्षेत्रात त्यांनी यशस्वी कसं व्हावं   या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक जाणिवा अधिक प्रगल्भतेसाठी मुक्तांगण संवाद विद्यार्थ्यांशी या कार्यक्रमात  भैरवनाथ कानडे यांनी सौदागर तांदळे,  जगदीश राऊत , कैलास लहाने,अमित मस्के यांची प्रकट मुलाखत घेतली. 



यावेळी आपली इच्छा ,कार्यक्षमता आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर आपले ध्येय आपण साध्य करू शकतो ,आपले क्षेत्र कोणतेही असो त्यामध्ये आपण प्रामाणिकपणे व आत्मविश्वासाने सातत्य ठेवून कार्यमग्न झाल्यास यशाची कर्तुत्व शिखरे आपणाला पादाक्रांत करता येतात असा विचार उपस्थित मान्यवरांनी मांडला . प्रारंभी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित मस्के यांनी विदयार्थ्यांना पोलीस स्टेशनच्या कामकाजाची व शस्त्राची  प्रात्यक्षिकासह माहिती दिली. 


यावेळी महिला दक्षता कमिटीच्या सुभद्राताई मुळे, कल्पना गायकवाड ,सुजाता चव्हाण ,कस्तुरा कारभारी, शाहेदाबी सय्यद,  जिजाबाई जाधव, शिवाय रंजीता कानडे, केशर जाधवर, धनाजी वाघमारे , बालाजी मोकाशे,  हरिष जाधव, पांडूरंग पवार,मनोहर घोडके, सत्यवान गायकवाड, लखन वाघमारे, विठ्ठल जाधवर , माणिक कोकणे ,प्रविण गुरव ,महावीर धोंगडे , एस .के गायकवाड, अरुण लोखंडे, आयुब शेख, सतीश राठोड आदीसह विद्यार्थी शिक्षक व पालक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन भैरवनाथ कानडे यांनी तर आभार  सत्यवान गायकवाड यांनी केले.

Labels:

Tuesday, 27 July 2021

अल्पवयीन मुलीवर दोघांनी केला अत्याचर , पोक्सो कायदा व ॲट्रासिटीचा ५ जणाविरुध्द गुन्हा दाखल, चौघे पोलिसांच्या ताब्यात

प्रतिकात्मक


इटकळ दि.२७ :

येवती ता.तुळजापूर येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गावातील दोघांनी अत्याचर केला.पिडीतेच्या कुटुंबास जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण करण्यात आली.ही घटना दि.२६ रोजी रात्री साडे आठच्या सुमारास घडली.

तुळजापूर  तालुक्यातील येवती येथील अल्पवयीन मुलगी सायंकाळी साडे सातच्या सुमारास मैत्रीणीचे पुस्तक देण्यासाठी गेली होती. परत येत असताना अनुराग ढोले, व प्रशांत पालवे यांनी दुचाकी वरुन तोंड दाबून गावातील शाळेतील भात शिजविण्याच्या  खोलीत नेवुन दोघांनी अत्याचर केला.

याबाबत पिडीतेच्या कुटुंबातील आई -  वडील  विचारणा करण्यासाठी गेले आसता सिद्राम पालवे, अविनाश पालवे, प्रशांत पालवे, व सावित्री पालवे ह्यांनी जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण  केली.

याबाबत पिडीत मुलीच्या आईने नळदुर्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार पाचजणावर पोक्सो कायदा व ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील चौघाना  पोलीसांनी ताब्यात घेतलेआहे.

याप्रकरणी  पुढील आधिक तपास पोलीस उपअधीक्षक दिलीप टिपरसे हे करीत आहेत.

Labels:

काटीतील आडत व्यापारी दत्ता चवळे यांचे निधन

 

काटी , दि .२७

 तुळजापूर तालुक्यातील काटी येथील आडत व्यापारी  दत्ता सौदागर चवळे वय (50) यांचे रविवार दि. 25 रोजी पहाटे साडेतीन वाजनेच्या सुमारास सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारा दरम्यान दु:खद  निधन झाले. त्यांच्यावर जवळपास एक महिनाभर सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. काटी येथील आडत व्यापारी साजिद इनामदार यांचे मागील पंच्चेवीस वर्षांपासूनचे अतिशय विश्वासू व यशस्वी बिझनेस पार्टनर होते. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी तीन वाजता येथील चवळे मळ्यात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अकाली जाण्याने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

         
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, चार मुली, एक मुलगा, तीन जावाई असा परिवार आहे.

Labels:

तुळजापूर तालुक्यात मुख्यमंत्री ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्ताने विविध उपक्रम


तुळजापूर, दि . २७ :

 शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा  वारसा  मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे अत्यंत समर्थपणे चालवत आहेत.  महाराष्ट्रातील सरकार चालवत असताना त्यांनी खंबीरपणे सर्वांना सोबत घेऊन वाटचाल चालविली आहे असे उदगार शिवसेनेच्या  महिला जिल्हा आघाडी प्रमुख सौ शामल पवार यांनी काढले .

ना. उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन शिवसेनेच्यावतीने सावरगाव  ता . तुळजापूर येथे जिवन आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले . तर मधुकरराव चव्हाण विद्यालय केमवाडी येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख श्यामल वडणे, माजी उपजिल्हाप्रमुख श्याम पवार, शहर प्रमुख सुधीर कदम, उपतालुका प्रमुख प्रदीप मगर, गटप्रमुख धर्मराज काशीद शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.

या निमित्ताने जिल्हाप्रमुख सौ. श्यामल पवार यांनी अत्यंत धिराने आणि धायरी आणि मुख्यमंत्री महाराष्ट्राचे जडणघडण करीत आहेत. तीन पक्षाचे आघाडी सरकार त्यांच्या नेतृत्वाखाली निश्चित लोकांच्या अपेक्षा पूर्ण करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

याप्रसंगी उपतालुका प्रमुख प्रदीप मगर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सर्वसामान्य माणसाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मुख्यमंत्री झालेले आहेत. उस्मानाबाद  जिल्ह्यामध्ये विविध सामाजिक उपक्रम शिवसैनिकांच्या वतीने उस्फूर्तपणे केले जात आहेत असे सांगितले.

Labels:

तिन्ही मुलींची शैक्षणिक व आरोग्याची जबाबदारी घेऊन , नवीन कपडे व साहित्य वाटप करून केला आदर्श निर्माण

नळदुर्ग , दि .२७ 

स्वतःच्या पोटच्या तीन मुली पैकी दोन मुलींना उमरगा बस स्थानकावर सोडून गायब होणाऱ्या अणदुर ता. तुळजापूर येथील राठोड  कुटुंबीयांची            येथील  माजी पंचायत समिती सदस्य साहेबराव घुगे यांच्या पुढाकारातून मित्र मंडळाने आज सकाळी प्रत्यक्ष भेट घेऊन विचारपूस करून तिन्ही मुलींची दहावी पर्यंतची शैक्षणिक व आरोग्यविषयक देखभालीची जबाबदारी घेऊन , लागलीच  नवीन कपडे व साहित्य वाटप करून एक आदर्श निर्माण करून माणुसकीचे दर्शन घडवले आहे.      

                           
  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "बेटी बचाव, बेटी पढाओ" असा संदेश दिला आहे. त्यास अशा कृतीतून बळकटी या मित्र मंडळाने दिलेली आहे. मुली जन्माला आल्या पाहिजेत, त्या वाढल्या पाहिजेत आणि त्या मोठ्या ही झाल्या पाहिजेत  यावर संपूर्ण देशभरात मोठे व्यापक जनजागरण, कार्यक्रमाचे, आयोजन होत असताना अशा घटना अजूनही समाजामध्ये घडत आहेत. अशीच ह्रदय हेलावणारी घटना राठोड पती-पत्नीने नैराश्यातून केल्याचे समोर आले. आपल्या पोटी मुली जन्माला येत आहेत, म्हणून दिनेश मेघा राठोड हा व्यसनाधीन झाला. त्यातूनच त्याने मुली होण्यास तूच जबाबदार म्हणून पत्नी सुनीतास त्रास सुरू केला. याला कंटाळून सुनीतानी  माहेरला जाण्याचा बहाणा करून उमरगा स्थानकावर दि . २४ जुलै रोजी दुपारी तिन्ही मुली सोडून गायब झाली होती. त्यातील दीड वर्षाच्या मुलीने आईचे अंगच न सोडल्याने ती सोबत राहिली, तर १ महिनाची व तीन वर्षाची बबली स्थानकात राहिली होती.                                      .    

 शब्द अपुरे पडत असलेल्या घटनेचा तपास उमरगा, नळदुर्ग पोलिसांनी अत्यंत गतीने केल्याने हे कुटुंब अणदुर पाटील तांडावरचे निघाले. अशा या राठोड कुटुंबीयांची मगंळवारी सकाळी भेट घेऊन अशी घटना पुन्हा घडू नये, या मुलींना वाढवा, मोठे करा त्यासाठीची शैक्षणिक  जबाबदारी साहेबराव घुगे मित्रमंडळाने तर मोफत आरोग्य विषयक देखभाल करण्याची जबाबदारी डॉ.व्यंकटेश घुगे यांनी घेऊन या भेटीदरम्यान तिन्ही बाळांना व आईंस टाॉनिक, खाऊ, फळे,तिन्ही मुलींना नवीन कपडे, शाळेचे साहित्य देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

 यावेळी माजी पंचायत समिती सदस्य साहेबराव घुगे, डॉ. व्यंकटेश घुगे,  शाहूराज मोकाशे, राहुल राठोड, पत्रकार चंद्रकांत गुड्ड, संजय आलुरे, गुंडेशा गोवे, म्हाळाप्पा घोडके, काशिनाथ घुगे, प्रज्योत कर्पे हे यावेळी उपस्थित होते.

Labels:

तुळजापूर : अपसिंगा येथे शिवसेनेच्या वतीने वृक्षारोपण


तुळजापूर दि . २७ ;

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुळजापूर तालुक्यात ठिकाणी समाजोपयोगी उपक्रम शिवसेनेच्या वतीने राबविण्यात आले.

तुळजापूर  तालुक्यातील अपसिंगा येथे वृक्षारोपण व शालेय साहित्य वितरण करण्यात आले . मुख्यमंत्री ना .ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मौजे आपसिंगा  तालुका तुळजापूर येथील नरेंद्र आर्य विद्यालय येथे इयत्ता आठवी ते बारावी पर्यंतच्या दोनशे विद्यार्थ्यांना रजिस्टर व वह्यांचे वाटप करण्यात आले.


अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख अमीर शेख, सोशल मीडिया तालुका प्रमुख चेतन बंडगर, मुख्याध्यापक देशमुख यांच्या उपस्थितीत २१ वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शिवअल्पसंख्यांक सेना जिल्हाप्रमुख अमीर शेख , सोशल मीडिया तालुकाप्रमुख चेतन बंडगर, युवा नेते श्याम माळी, बालाजी पांचाळ, माजी सरपंच जब्बार काझी, माजी सरपंच भागवत क्षिरसागर, ग्रामपंचायत सदस्य अजित क्षीरसागर , सदस्य नागनाथ खोचरे, अभिजीत लोके , माजी शिक्षक पाटील , माजी शिक्षक दिगंबर इंगळे  , साहेबराव सरडे ,मुख्याध्यापक  देशमुख  यांच्यासह सर्व शिक्षक विद्यार्थी व गावातील नागरिक व शिवसैनिक उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक  मगर प्रकाश यांनी केले. तर आभार अल्पसंख्यांक सेनेचे जिल्हाप्रमुख अमीर शेख यांनी मानले .

Labels:

Monday, 26 July 2021

मुबंई : पूरग्रस्त भागातील वीज, पाणी पुरवठा, रस्ते दुरूस्ती तातडीने करण्याचे मुख्यमंञ्याचे आदेश ,




मुंबई, दि. २६ : -  पूरग्रस्त भागातील वीज आणि पाणी पुरवठा तातडीने सुरु करण्यात यावा. तसेच अनेक ठिकाणी रस्ते खचले असून, पूल पाण्याखाली गेले आहेत. तेथील वाहतूक तातडीने सुरु होईल, यासाठी दुरुस्ती हाती घ्या. पूरग्रस्त भागात रोगराई पसरू नये यासाठी स्वच्छतेच्या आणि आरोग्याच्या सुविधा पुरविण्यासाठी युद्धपातळीवर कार्यवाही करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थिती आणि नुकसानीबाबत मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी आज वर्षा या शासकीय निवासस्थानी आढावा घेतला. बैठकीस उद्योग मंत्री सुभाष देसाई, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय चहांदे, आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ड़ॉ. प्रदीप व्यास, ऊर्जा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दिनेश वाघमारे, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव विकास खारगे, वित्त विभागाचे प्रधान सचिव ओ.पी. गुप्ता, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रदान सचिव असीमकुमार गुप्ता, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. महेश पाठक, पशु संवर्धन विभागाचे प्रधान सचिव जे. पी. गुप्ता, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा गृह निर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, जलसंपदा विभागाचे विशेष कार्य अधिकारी विजय गौतम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव देबडवार, अन्न व औषध प्रशासन आय़ुक्त परिमल सिंह आधी उपस्थित होते. 
पूरग्रस्त भागातील रस्ते, पाणी पुरवठा योजना, वीज पुरवठा यांच्या अनुषंगाने बैठकीत तपशीलवार आढावा घेण्यात आला. 

*रस्त्यांची दुरूस्ती युद्धपातळीवर करा*

सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव उल्हास देबडवार यांनी माहिती दिली की, महाबळेश्वर, पोलादपूर आणि पन्हाळा याठिकाणचे रस्ते अर्धे खचले आहेत. त्याठिकाणी पाईप्स टाकून एकमार्गी वाहतूक सुरु करण्यात येत आहे. एकूण २९० रस्ते दुरूस्त करण्याची गरज असून, ४६९ रस्त्यांवरची वाहतूक बंद आहे. ८०० पूल आणि मोऱ्या पाण्याखाली गेल्या आहेत. प्रत्येक विभागात एक-एक अतिरिक्त मुख्य अभियंता दर्जाचा अधिकारी नियुक्त केला आहे. तो प्रत्यक्ष सर्वेक्षण करत आहे.

*वीज पुरवठा सुरळीत करा*
ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांनी सांगितले की, बारामती- सातारा  आणि पेण अशा दोन उपकेंद्रांचे नुकसान झाले आहे. १४ हजार ७३७ ट्रान्सफॉर्मर्स नादुरूस्त झाले होते, त्यापैकी ९ हजार ५०० दुरूस्त झाले आहेत. नादूरुस्त ६७ उपकेंद्रांपैकी ४४ परत सुरू करण्यात आले आहेत. एकंदर ९ लाख ५९ हजार बाधित ग्राहकांपैकी साडे सहा लाख ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. महाडमध्ये दोन मोठे वीज मनोरे तातडीने दुरूस्त करणे सुरु आहे. 

*पाणी पुरवठा योजनांची तातडीने दुरुस्ती*
पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे यांनी सांगितले की, रत्नागिरी, चिपळूण, खेड, पोलादपूर याठिकाणी पाणी पुरवठा योजनांचे नुकसान झाले असून, रत्नागिरीत १७ गावांना तसेच सिंधुदुर्गात २० गावांत पाणी पुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या ठिकाणी टँकर्सद्वारे पाणी पुरविण्यात येत आहे. पूरग्रस्त ७४६ गावांमध्ये पाणी पुरवठा योजनांचे नुकसान झाले आहे. 

*साथ रोग पसरू नये म्हणून काळजी*
आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले की, पूरग्रस्त ४९६ गावांमध्ये ४५९ वैद्यकीय पथके प्रत्यक्ष घरोघर भेटी देत आहेत. कोल्हापूर जिल्हयात २९३ तर रत्नागिरी जिल्ह्यात ६ मदत छावण्या उघडण्यात आल्या आहेत. ही पथके पाणी शुद्धीकरणासाठी क्लोरीनच्या गोळ्यांचे वाटप, किटकनाशक औषधांची फवारणी करत आहेत. याशिवाय सर्पदंशावरील लशीची पुरेशी उपलब्धता आहे. गरोदर माता आणि लहान मुलांकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. लेप्टास्पायरोसीस टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक औषधे देणे सुरु केले आहे. याशिवाय गंभीर रुग्णांना पुरेश्या रुग्णवाहिकांची सोय करण्यात आली आहे.
  
*नुकसान भरपाई, मदतीचे प्रस्ताव तयार करा*
मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, नुकसानीबाबतची आकडेवारी आणि करावयाची मदतीबाबत तपशीलवार वस्तूनिष्ठ अहवाल तयार करा, जेणेकरून आपदग्रस्तांना वेळेत आणि तातडीने मदत पोहचविता येईल. पूराचा फटका बसलेल्या सर्वच व्यापारी, व्यावसायीकांची माहिती एकत्र करा, त्यांना राज्य आणि केंद्राच्या कोण-कोणत्या योजनांमधून सवलत देता येईल, मदत करता येईल त्याबाबतचे प्रस्ताव तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. तत्काळ मदत देऊच, पुन्हा पुन्हा ही आपत्ती येऊ नये. त्यातून बचाव करता येईल यासाठी पूरसंरक्षक भिंती, धोकादायक वस्त्यांयाबाबत जिल्हा निहाय प्रस्ताव तयार करा. डोंगराळ भागातील खचणारे रस्ते, पायाभूत सुविधांबाबतही एक सर्वंकष आराखडा तयार करा, असेही त्यांनी सांगितले. पंचनामे करण्यासाठी ड्रोन तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. तसेच हे पंचनामे वेळेत पूर्ण करावेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

*कोकणात पूराचा इशारा देणारी यंत्रणा तीन महिन्यात*
कोकणामधील एकंदर २६ नद्यांची खोरे असून, याठिकाणी पूराबाबत इशारा देणारी ‘आरटीडीएस’ यंत्रणा लवकरात लवकर कार्यान्वीत करा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यानुसार जलसंपदा विभागाकडून पहिल्या टप्प्यात सात नद्यांवर येत्या तीन महिन्यात अशी यंत्रणा कार्यान्वीत करण्यात येणार आहे. 

*एसडीआरएफचे बळकटीकरण करणार*
एनडीआरएफच्या धर्तीवर राज्यात प्रत्येक जिल्ह्यात एसडीआरएफचे केंद्र असावे. तसेच त्याठिकाणी जवांनांना मदत व बचावाचे प्रशिक्षण द्यावे यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी मदत व पुनर्वसन विभागाला दिले. 

*दरडग्रस्त गावांचे पूनर्वसन*
महाड येथील तळीये गावांचे पुनर्वसन करण्यासाठी योग्य जागा निश्चित करा. तेथील सोयी-सुविधांसाठी नियोजन करा, उद्योजकांची देखील मदत घ्या. गावकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी अडचण येणार नाही असे बघा, तसेच त्यांच्या घरांचा आराखडा लगेच तयार करून कार्यवाही करा. अशा प्रकारे डोंगर उतारांवरील वाड्या आणि वस्त्यां ग्रामीण भागात तसेच शहरी भागात देखील आहेत. धोकादायक स्थितीतील या वाड्या-वस्त्यांचे कशापद्धतीने पुनर्वसन करता येईल, यावर निश्चित असा आऱाखडा तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. 

Labels:

नळदुर्ग व तुळजापूर येथे जुगार आड्डयावर पोलिसांच्या कारवाईत ११ आरोपीविरुध्द गुन्हा दाखल


उस्मानाबाद , दि .२६

नळदुर्ग पोलीस ठाणे : अहेमद कुरेशी, सत्यजित कांबळे, नाजिम शेख, सलीम सय्यद, माजिद इनामदार, अब्दुल शेख, सर्व रा. नळदुर्ग हे सहा जण दि. 25 जुलै रोजी 17.10 वा. सु. रहीमनगर, नळदुर्ग येथील एका पत्रा शेडसमोर तिरट जुगार खेळत असतांना जुगार साहित्य व 9,040 ₹ रोख रक्कम बाळगलेले नळदुर्ग पो.ठा. च्या पथकास आढळले.

तुळजापूर पोलीस ठाणे : प्रकाश जटाळ, अविनाश भिसे, शिवराज साठे, विशाल झाडपिडे, रामदास डोंगरे, सर्व रा. कमानवेस, तुळजापूर हे पाच जण दि. 25 जुलै रोजी 17.00 वा. सु. राहत्या परिसरातील धर्मशाळेजवळ तिरट जुगार खेळत असतांना जुगार साहित्य व 7,700 ₹ रोख रक्कम बाळगलेले तुळजापूर पो.ठा. च्या पथकास आढळले.

           

 यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द म.जु.का. अंतर्गत नळुदर्ग व तुळजापूर पो.ठा. येथे गुन्हे नोंदवले आहेत.

Labels:

तुळजापूर : ७ वर्षापासुन फरार असलेला आरोपी अटकेत


उस्मानाबाद , दि . २६ 

स्थानिक गुन्हे शाखा:  तामलवाडी पो.ठा. गु.र.क्र. 83 / 2014 भा.दं.सं. कलम- 379 सह मोका कायदा कलम- 3 या गुन्ह्यातील आरोपी- भाऊसाहेब मधुकर पवार उर्फ टुरम्या, वय 48 वर्षे, रा. वडशिवणी, ता. करमाळा, जि. सोलापूर याचा पोलीस गेल्या 7 वर्षापासून शोध घेत होते. तो पोलीसांना हुलकावनी देत असल्याने त्याचा निश्चित ठावठिकाणा लागत नसल्याने पोलीस त्याच्या तपासावर होते. 


तपासादरम्यान स्था.गु.शा. च्या पोउपनि- श्री पांडुरंग माने, श्री. सदानंद भुजबळ, पोहेकॉ- काझी, शेळके, पोना- हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, पोकॉ- बबन जाधवर, सर्जे, अविनाश मरलापल्ले, आरसेवाड, माने यांच्या पथकास भाऊसाहेब पवार हा त्याच्या गावी परतल्याची गोपनीय खबर मिळाल्याने पथकाने दि. 26 जुलै रोजी त्याच्या घरास वेढा घालून त्यास घरातून ताब्यात घेउन पुढील कार्यवाहिस्तव तामलवाडी पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे.  

Labels:

उस्मानाबाद जिल्हयात कोविड लसींच्या दोन्ही डोसचे , एक लाख तर एका डोसचे साडेतीन लाख लाभार्थी

  

 

उस्मानाबाद, दि.26 : 


कोविड-19 महामारीपासून बचावासाठी प्रतिबंधक लसीकरण हा अत्यंत महत्वाचा उपाय सिध्द होत आहे.कोविड लसीकरण दि.26 जानेवारी 2021 पासून सुरु झाल्यानंतर आजतागायत उस्मानाबाद जिल्हयामध्ये एकूण 4 लाख 44 हजार 669 लसीकरण झाले आहे. त्यापैकी 3 लाख 42 हजार 690 लाभार्थ्यांना पहिला डोस देण्यात आलेला आहे.दि.26 जुलै 2021 रोजी उस्मानाबाद मधील कोविड लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लाभार्थ्यांची संख्या एक लाखाच्या पुढे गेली आहे.


उस्मानाबाद मधील एक लाख एक हजार 979 लाभार्थ्यांचे कोविड लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत.हा एक चांगला योगायोग दिसून आला आहे.कारण याच दिवशी महाराष्टामधील कोविड लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लाभार्थ्यांची  संख्याही एक कोटीच्या पुढे गेली आहे.


सध्या मिळत असलेल्या लस साठयापेक्षा अधिक लस प्राप्त झाल्यास उस्मानाबादमधील लाभार्थ्यांचे संपूर्ण लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करता येईल,असे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.

                              

Labels:

शेकापूर प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे बांधकाम रखडले , बांधकाम सुरु न केल्यास आंदोलनाचा इशारा




उस्मानाबाद, दि.26 -
उस्मानाबाद शहरालत शेकापूर येथील बालाजीनगर भागात मंजूर असलेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्र इमारतीचे बांधकाम कार्यारंभ आदेश मिळूनही रखडले आहे. हे बांधकाम 10 दिवसात सुरु करण्यात यावे, अन्यथा भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  बालाजीनगर, शेकापूर येथे सन 2017 साली ग्रामस्थांच्या मागणीनुसार उस्मानाबाद जिल्हा परिषद मार्फत प्राथमिक आरोग्य उपकेंद्र इमारत उभारण्यासाठी ग्रामपंचायत मालकीचा ओपन स्पेस आरोग्य विभाग जिल्हा परिषद यांना खरेदीखताने ताब्यात दिलेला आहे. त्यावर शासनाने ई-निविदा रक्कम रु. 87,53,033/- ही निविदा काढली असता मे. वैष्णवी कन्स्ट्रक्शन मु.पो. माळंब्रा ता. तुळजापूर यांनी हे काम घेतले. परंतु आजपर्यंत या कामाची सुरुवात किंवा बांधकामाची सुरुवात प्रत्यक्षात करण्यात आलेली नाही.

या कामामाध्ये मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी स्वतः लक्ष घालून या प्राथमिक आरोग्य उपकेंद्र इमारतीचे बांधकाम लवकरात लवकर सुरु करावे. हे बांधकाम कार्यारंभ आदेशाप्रमाणे दि. 29/10/2020 रोजी सुरु झाले असते तर गेल्या 2-3 महिन्यात हे आरोग्य केंद्र कार्यान्वित होऊ शकले असते.  त्याचा लाभ येथील नागरिकांना कोव्हीड-19 या महामारीमध्ये उपचारासाठी झाला असता. या भागातील कोव्हीड-19 च्या महामारीमुळे अंदाजे 20 लोकांचा मृत्यू झालेला आहे. हे आरोग्य उपकेंद्र सुरु झाले असते तर कदाचित यातील काही व्यक्ती वाचू शकले असते. 

कारण लोकांची उपचारादरम्यान दवाखान्यातील गर्दी पाहून अनेक रुग्णांनी घाबरुन उपचाराला प्रतिसाद न दिल्यामुळे ते मृत्युमुखी पडलेले आहेत. आरोग्य उपकेंद्र सुरु झाले असते तर कदाचित हे रुग्ण घाबरले नसते. त्यांनी योग्य उपचार घेतला असता व त्यामुळे ते जगूही शकले असते. या कामामध्ये प्रशासनाने केलेला हजगर्जीपणा जबाबदार असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. 

दहा दिवसात या उपकेंद्र इमारत बांधकामाला सुरुवात करावी. अन्यथा भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संतोष क्षीरसागर यांची स्वाक्षरी आहे.

Labels:

"स्पर्श" चे प्रकल्प अधिकारी डॉ. रमाकांत जोशी यांचा सत्कार


लोहारा , दि . २६ : 

   ग्रामीण तसेच दुर्गम भागात आरोग्य सेवा पोहचविण्यासाठी लोहारा तालुक्यातील  सास्तूर येथील प्राईड इंडिया 'स्पर्श' मार्फत उस्मानाबाद जिल्ह्यात चार फिरत्या मोबाईल मेडिकल युनिट मार्फत 136 गावात आरोग्य सेवा दिली जात आहे. 

सेवाभावी वृत्तीतून केले जाणारे हे महत्वपूर्ण कार्य प्रकल्प अधिकारी डॉ. रमाकांत जोशी यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली होत असल्यामुळे त्यांचा जवळगा बेट च्यावतीने सोमवार दि.26 जुलै  रोजी प्रा.डॉ.श्रीकांत गायकवाड, माजी सरपंच राम मुकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला. फिरत्या मोबाईल मेडिकल युनिटद्वारे आरोग्य तपासणी, औषधोपचार, लसीकरण, गरोदर माता प्रसूतीपूर्व व प्रसूती पश्चात  सेवा,ज्येष्ठ नागरिक  तपासणी व उपचार, रक्त, लघवी तपासणी, इ.सी.जी यासर्व सेवा सुविधा दिल्या जात आहेत. त्यामुळेच आरोग्य सेवेचा हा सास्तूर पटर्न' कौतुकस्पद ठरत आहे.

Labels:

कोतवालाच्या प्रलंबित प्रश्नाबाबत आमदार कल्याणशेट्टी यांच्याकडे कोतवाल संघटनेची धाव



अक्कलकोट , दि .२६

सोलापूर जिल्ह्यातील कोतवाल यांचा पदोन्नतीचा विषय कित्येक वर्षांपासून प्रलंबित असून, त्याबाबत वारंवार निवेदन, आंदोलन,  करून देखील पदोन्नतीच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहे. याप्रकरणी न्याय मिळवुन देण्याच्या मागणीसाठी अक्कलकोट  तालुका कोतवाल संघटनेच्या वतीने आमदार  सचिन कल्यांणशेट्टी याना निवेदन देण्यात आले आहे. 


गेल्या ११ वर्षांपासून सोलापूर जिल्ह्यात पदोन्नती झाली नसून, अक्कलकोट तालुका कोतवाल संघटनेच्या वतीने आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी कोतवलांचा विषय जिल्हा प्रशासना पर्यंत पोहचवावा ह्या करिता निवेदन सादर करण्यात आले आहे. यावेळी, आ. कल्यांणशेट्टी यांनी  जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना भेटून तुमचा विषय मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्न करतो, असे आश्वासन दिले.

 
महाराष्ट्र राज्यात अनेक जिल्ह्यात दरवर्षी पदोन्नती देण्यात येते, फक्त सोलापूर जिल्ह्यातच पदोन्नती देण्यात आली नाही. हे पाहता कोतवाल कर्मचारी यांच्यावर अन्याय होत असून, पदोन्नतीचे वय ४५ वर्षाचे मर्यादा असल्याने जिल्हा प्रशासनाच्या बेजबाबदार, हलगर्जी पणामुळे अनेक कोतवाल कर्मचारी पदोन्नती पासून वंचित राहिले आहेत.


 या पदोन्नतीबाबत आ. कल्यांणशेट्टी यांनी कोतवलांचा विषय जिल्हा प्रशासना पर्यंत पोहचवून कोतवालाना न्याय मिळवून देण्याकरिता संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी, जिल्हाध्यक्ष विठ्ठल गुरव, तालुका अध्यक्ष शफील वाडीकर, सरचटणीस शिवानंद कोळी, उपाध्यक्ष रेवणसिद्ध सुतार, कार्याध्यक्ष शिवशरण कोळी, प्रसिद्धी प्रमुख प्रविणकुमार बाबर, स्वामींनाथ आलूरे, वीरभद्र स्वामी, सल्लागार हणमंत सानप, बसवराज गायकवाड,  दीपक कांबळे, कोषाध्यक्ष सुनील मुलगे, महिला प्रतिनिधी सुचिता काळे, ममता कोळी, चौडप्पा कुंभार, सूर्यकांत रामपुरे, फिरोज तांबोळी, जाकीर कागदे, महादेव चव्हाण, मल्लिनाथ कलशेट्टी, यासह सर्व कोतवाल कर्मचारी उपस्थित होते.

Labels:

शामल शिंदे यांना ओम साई फाऊंडेशनचा गुरू गौरव पुरस्कार प्रदान


काटी , दि .२६ उमाजी गायकवाड 

तुळजापूर तालुक्यातील काटी येथील कन्या व सावरगाव येथील प्रा.माणिकराव शिंदे यांच्या पत्नी तथा ब्लॉसम पब्लिक स्कूल पुणेच्या क्रीडा शिक्षिका सौ.शामल माणिकराव शिंदे यांना ओम साई फाऊंडेशनचा गुरू गौरव पुरस्कार नुकताच  पुणे येथील मल्हार गार्डनमध्ये  मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 


गुरूपौर्णिमेनिमित्त पिंपळे गुरव मध्ये नवीन सांगवी येथील मल्हार गार्डन मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर माई ढोरे व संजय गांधी निराधार योजनेचे संजय मराठे यांचे हस्ते शामल शिंदे यांचा गुरू गौरव पुरस्कार व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.


   आ.लक्ष्मण जगताप यांच्या प्रेरणेतून व माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ओम साई फाऊंडेशनच्या वतीने दर वर्षी शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यात येतो.
 या कार्यक्रमास महापौर माई ढोरे,ओम साई फाउंडेशनचे संजय मराठे, जवाहर ढोरे, सोनम गोसावी, ज्योती खंडारे, मदन कोठुळे, रामचंद्र गायकवाड, राजेंद्र बाईत, रमेश चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.


 या शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणारे शामल शिंदे यांच्यासह मुकेश पवार,मनीषा जाधव,चंद्रकांत सोनवणे, राजू सावंत, मनिषा पाटील,सचिन शिंगोटे,बलभीम भोसले,सुधा खोले आदी शिक्षकांचाही मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

Labels:

पंचायत समितीचे उपसभापती दत्तात्र शिंदे यांचा महात्मा फुले ग्रुपच्या वतीने सत्कार


काटी , दि . २६ : 

 तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पंचायत समिती गणाचे पं.स.सदस्य तथा राणाजगजितसिंह पाटील यांचे कट्टर समर्थक दत्तात्रय शिंदे यांची तुळजापूर पंचायत समितीच्या उपसभापती म्हणून बिनविरोध निवड झाल्याबद्दल काटी येथील महात्मा फुले ग्रुपच्या वतीने मान्यवरांचे उपस्थितीत सत्कार करण्यात आले.

 शाल, श्रीफळ, पुष्पहार घालून सत्कार करण्यात येऊन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
 या प्रसंगी मारूती रोकडे,काटीचे ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब भाले, नवनाथ सुरडकर, मोहन हागरे, बालाजी ढगे आदी मान्यवर उपस्थित होते.

Labels:

Sunday, 25 July 2021

श्री . खंडोबा मंदिर जीर्णोद्धार कार्यात न्यु चैतन्य तरुण गणेश मंडळाचे योगदान



नळदुर्ग , दि . २५

येथिल जुने ऐतिहासिक खंडोबा मंदिराची वास्तु जोपासणे हे महत्वपुर्ण काम सुरु आसुन या कार्यात शहरातील सर्व नागरीकांचा सहभाग आवश्यक आहे. यातुनच हे मंदिर कार्य होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी गणेशोत्सव साजरा करण्यात आला नाही तर या वर्षीही गणेशोत्सव होईल कि नाही याची शाश्वती नाही. परंतु  या उत्सवासाठी जो निधी मंडळाकडे जमा होतो तो सत्कारणी लागावा, या उदात्त हेतुने न्यु चैतन्य तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मंडळाचे मार्गदर्शक व आधारस्तंभ शरद बागल यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेतली.

         
गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने गणेशोत्सव गेल्या वर्षासारखाच होणार आहे तर मग गणेशोत्सवाचा जमा निधी विधायक कार्यास लागावा , यासाठी तिनशे ते चारशे वर्षानंतर प्रथमच होत असलेल्या आपल्या ग्रामदैवत खंडोबा मंदिराचा जिर्णोध्दार कार्यास हातभार लावन्याचा निर्णय मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी घेतला व स्वयंस्फूर्तीने १३ हजार ५११  रुपयांचा निधी जमा करून खंडोबा जिर्णोध्दार कार्यासाठी सुपुर्द केला. 


न्यु चैतन्य तरुण गणेश मंडळाने घेतलेला निर्णय कौतुकास्पद आसुन या मुळे खंडोबा मंदिर जिर्णोध्दारास अत्यंत महत्वपुर्ण मदत मिळाली आहे.


 त्यांच्या या कार्यामुळे ऐतिहासिक वास्तुचे जतन व संवर्धन होणार आहे. मंडळाचे कार्यकर्त्ये केवळ आर्थिक मदतच करीत नसुन प्रत्येकास त्यांच्या कामाव्यतीरीक्त फुरसत मिळेल तसे मंदिर परीसरात येवुन श्रमदान ही करीत आहेत. या मंडळा प्रमाणेच शहरातील प्रत्येक गणेश मंडळाने जिर्णोध्दार कार्यासाठी पुढे यावे व जिर्णोध्दार कार्यात सहभागी व्हावे असे अवाहन केल्याने  मंडळाचे आधारस्तंभ  शरद बागल, अमित शेंडगे, कैलास घाटे, गणेश शेंडगे, नारायण दोपारे तसेच सुशांत भूमकर, रमेश जाधव, अशोक चव्हाण, संजय वेदपाठक, धिमाजी घुगे, अभिजित लाटे, शशिकांत चौधरी आदी उपस्थित होते.

Labels:

भाविकांना लागली श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनाची ओढ


तुळजापूर दि . ३५ 

 कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भाविकांना ओढ लागली आहे, सोशल डिस्टन्स आणि मास्क याचा वापर करून भाविक देवीच्या दर्शनासाठी तुळजापुरात येत असून महाद्वार दर्शन करून परत जात आहेत.

 श्री  तुळजाभवानी देवीचे दर्शन भाविकांना मागील पावणेदोन वर्षांपासून बंद आहे कुलधर्म कुलाचार करण्यासाठी तसेच घरामध्ये शुभकार्य झाल्यानंतर देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविक तुळजापुरात येत आहेत ही संस्कृती असल्यामुळे शेकडो लोक दररोज महाद्वार दर्शन करीत आहे. या दरम्यान प्रशासनाने घेतलेली काळजी लक्षात घेऊन भाविक गर्दी न करता मास्कचा वापर करून निर्माणचे पालन करीत आहेत . त्यामुळे येथील पुजारी मंडळ आणि व्यापारी मंडळ यांच्याकडून तुळजाभवानी देवीचे भाविकांना दर्शन सुरू करण्याची मागणी आहे.

महाराष्ट्राच्या सर्व भागांमध्ये जनजीवन सुरळीत होत आहे. त्यामुळे तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिर देखील भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात यावे , जास्त वेळ मंदिर उघडल्यानंतर गर्दीवर नियंत्रण करणे शक्‍य होईल  अशी नागरिकांची मागणी आहे. 

तुळजाभवानी मंदिर संस्थान प्रशासन तुळजापूर नगरपरिषद प्रशासन आणि राज्य शासनाच्या वतीने तुळजापूर येथे खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत त्या लक्षात घेऊन व्यापारी आणि शहरवासीय बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांना सेवा देण्यासाठी उत्सुक आहेत . प्रशासनाने तातडीने मंदिर भाविकांना खुले करून व्यापारपेठ सुरळीत सुरू ठेवण्याची परवानगी करण्याची गरज आहे कारण दुकाने बंद असल्यामुळे व्यापाऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे . नुकसान सहन करण्याची व्यापाऱ्यांची क्षमता संपून गेली आहे . या बाबीचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. स्थानिक प्रशासनाने यासंदर्भातला अहवाल तयार करून जिल्हा प्रशासन व राज्य प्रशासनाकडे दिला पाहिजे. सर्वांनी एकत्रित खबरदारी घेऊन शहर सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

Labels:

आमदार कैलास पाटील यांचा तुळजापूर शिवसेनेकडून सत्कार


तुळजापूर दि २५ :


यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत अंतर्गत वसंतराव नाईक तांडा - वस्ती सुधार योजना तालुकाध्यक्षपदी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास पाटील यांची निवड झाल्याबद्दल तुळजापूर शिवसेना शहर व तुळजापूर तालुका शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. 


याप्रसंगी  शिवसेना माजी उपजिल्हाप्रमुख श्याम पवार, शहर प्रमुख सुधीर कदम, उपतालुकाप्रमुख सुनील जाधव, माजी तालुकाप्रमुख बाळकृष्ण पाटील,  बाजार समिती उपसभापती संजय भोसले,  उपशहरप्रमुख बापूसाहेब नाईकवाडी, उपशहर प्रमुख बाळासाहेब शिंदे हे  उपस्थित होते.

Labels:

तुळजापूर येथे प्राधिकरणाच्या कामाच्या दर्जा बाबत तक्रार


तुळजापूर दि 25 : 

तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत शहरांमध्ये लाईटचे पोल उभे करण्याचे काम सुरू आहे. अनेक वर्षापासून रेंगाळत पडलेले विद्युत पोल आणि लाईन टाकण्याचे  काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रारी आहेत , याबाबत भारतीय जनता युवा  मोर्चाच्या लेटर पॅडवर विपीन शिंदे यांनी तक्रार दिली आहे.


शहरामध्ये गेल्या सहा वर्षापासून विद्युत पोल उभारणी व लाइन उभारणी काम रेंगाळत पडले होते अत्यंत विलंबाने या कामाला सुरुवात झाली . मात्र या कामाचा दर्जा आणि कामाची पद्धत याविषयी शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहे . प्राधिकरणाअंतर्गत होणाऱ्या विविध कामांमध्ये अधिकारी आणि गुत्तेदार यांच्यामध्ये कोणताही समन्वय नसल्यामुळे मनमानीपणे शासनाच्या पैशाचा खर्च शहरात होत आहे. मात्र शहरवासियांची या विकास कामाच्या दर्जाबाबत समाधान होत नाही. विविध कामासंदर्भात लोकांच्या तक्रारी आहेत.


विद्युत पोल उभारण्याचे काम रस्ते होण्या अगोदर करणे गरजेचे होते. मात्र तुळजापूर विकास प्राधिकरण आवर काम करणाऱ्या सर्व सदस्यांनी याकडे लक्ष दिले नाही. अगोदर होणारी कामे नंतर होत असल्यामुळे रस्ते फोडणे आणि पूर्वी केलेल्या कामाची नासधूस करण्याचे प्रकार होत आहेत. प्राधिकरणावर आमदार , नगराध्यक्ष आणि तहसीलदार ही मंडळी असताना विकास कामांचा दर्जा चांगला राखण्यात यावा अशी जनतेची मागणी आहे.


भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी पदाधिकारी बिपिन शिंदे यांनी यासंदर्भात आपली तक्रार निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्याकडे केली आहे . परंतु तुळजापूर येथे काम करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांनी या कामाच्या दर्जाकडे आजपर्यंत का लक्ष दिले नाही असा प्रश्न जनतेकडून विचारण्यात येत आहे.

Labels:

डाॕ. प्रितम गेडाम यांना डॉ. कलाम राष्ट्र उभारणी समाजगौरव प्रेरणा पुरस्कार जाहीर


 

आजचा युगात निस्वार्थ परोपकाराची भावना कमी होत चालली आहे. चांगल्या कार्याला नेहमी प्रोत्साहनाची साथ मिळायला हवी जेणेकरून असे सेवाभावी कार्य आणखी जोमाने चालले पाहीजे. असेच सेवाभावी कार्याला सलाम म्हणून राज्यातील अग्रणी सेवाभावी संस्था ड्रीम फाउंडेशन दरवर्षी राज्यभरातून वेगवेगळ्या क्षेत्रातील सर्वश्रेष्ठ योगदानाबद्दल उत्कृष्ट कार्यकर्तेला राज्यातील प्रतिष्ठेचा समजला जाणारा असा हा “डॉ. कलाम राष्ट्र उभारणी समाजगौरव प्रेरणा पुरस्कार” द्वारे सन्मानित करून त्यांचा कार्याला शाबासकीची थाप देते.


     ही खूप अभिमानाची गोष्ट आहे की ह्या वर्षी उत्कृष्ट शैक्षणिक व सामाजिक कार्याकरीता नागपुर शहराचे लेखक डॉ. प्रितम भि. गेडाम यांची निवड करण्यात आली आहे. उच्च शिक्षित डॉ. प्रितम गेडाम निरंतर सेवाभावी मनाने सामाजिक समस्या, विकास व जनजागृतीवर सातत्याने लिखाण करीत असतात. त्यांचे देशाचा प्रत्येक राज्यातून सोबतच विदेशातून देखिल शेकडो लेख प्रकाशित झाले आहेत. वनीकरण, पर्यावरण, व्यसनमुक्ती, स्वच्छता अभियान, शिक्षण, करीअर मार्गदर्शन, रोजगार उन्मुख, शैक्षणिक समुपदेशन व व्याख्याने करीत असतात. 


ज्या समाजात आपण वावरतो त्याकरीता प्रत्येक मानवाचे समाजाला काही देणे लागते आणि परोपकाराची भावना सर्वाचा अंगी असलीच पाहीजे असे विचार ठेवूनच डॉ. प्रितम भिमराव गेडाम निस्वार्थपणे समाजकार्य करीत असतात. हे प्रतिष्ठीत ”डॉ. कलाम राष्ट्रउभारणी समाजगौरव प्रेरणा पुरस्कार“ 27 जुलाई रोजी सोलापुर येथे कोरोनामुळे मोजक्या लोकांचा उपस्थितीत त्यांना मान्यवरांचा हस्ते हे सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. ह्या पुरस्कारकरीता निवड झाल्याबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

Labels:

मुरुमच्या महात्मा बसवेश्वर पतसंस्थेस विभागीय स्तरावरील द्वितीय दिपस्तंभ पुरस्काराने सन्मानित

 मुरुम, दि.२४  : 

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय दिपस्तंभ पुरस्कार वितरण सोहळा शिर्डी येथील सहकारी प्रशिक्षण व संशोधन मंदिर येथे आयोजित ता. २४ (शनिवारी) रोजी पार पडला. यावेळी महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या विविध पतसंस्थेला विभागीय पुरस्कार देण्यात आला. 

यामध्ये सन २०१८-१९ चा उमरगा तालुक्यातील मुरुमच्या श्री महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्था चळवळीत दिपस्तंभाप्रमाणे उत्कृष्ट व दिशादर्शक कार्य केल्याबद्ल गट क्रमांक १ मधून १ कोटी ते १० कोटीच्या दरम्यान झालेला पारदर्शक व्यवहार, वाढते भागभांडवल, वसुली व कोरोना काळात सामाजिक बांधीलकीची भावना जोपासून केलेली मदत. त्यांच्या या कार्याबद्ल अहमदनगर जिल्ह्याचे सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर, विधान परिषदेचे आमदार सुधीर तांबे, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे, कार्याध्यक्ष राजूदास जाधव यांच्या हस्ते पतसंस्थेस मराठवाडा विभागीय दिपस्तंभ द्वितीय पुरस्कार देण्यात  आला .

 पतसंस्थेचे पदाधिकारी संस्थापक अध्यक्ष शिवशरण वरनाळे, उपाध्यक्ष शरणाप्पा मुदकण्णा, सचिव कमलाकर जाधव, कर्जवसुली समितीचे सदस्य विकास जाधव आदींना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देवून मान्यवरांनी सन्मानित केले. सदर पतसंस्थेने या अगोदर दोन वेळा पुरस्काराने सन्मानित करण्यात येवून हा तिसरा पुरस्कार प्राप्त झाला आहे. या त्यांच्या यशाबद्ल संस्थेचे सर्व संचालक, सभासद, कर्मचारी वृंद आदिंनी फटाके वाजवून व गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा करून त्यांचे विशेष अभिनंदन केले.   


                           

Labels:

ॲड अमोल पाटील याना पुणे येथे पुरस्कार प्रदान

नळदुर्ग , दि . २५ : 

राष्ट्रवादीचे युवक नेते ॲड अमोल पाटील याना पुरस्काराने पुणे येथे गौरविण्यात आले. पाटील यांचे सर्वञ आभिनंदन होत आहे.

 

"विक्रमशीला हिंदी विद्यापीठ", भागलपूर बिहार, प्रादेशिक शाखा महाराष्ट्र, यांच्या वतीने सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन, डेक्कन विश्वविद्यालयाचे माजी कुलगुरू प्रा.  वसंत शिंदे  यांच्या हस्ते, व महाराष्ट्रातील ख्यातनाम साहित्यिक,लेखक, विश्लेषक,अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, डॉ.श्रीपाल सबनीस यांच्या उपस्थिती मध्ये  ॲड. अमोल पाटील यांना "महाराष्ट्र रत्न" पुरस्काराने "पुणे" येथे सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी  डॉ.संभाजी बाविस्कर, डॉ.गीता बोरा आदी उपस्थित होते.

Labels:

बेळगाव सीमाभाग हा महाराष्ट्राचा आत्मा - खासदार संजय राऊत

 

उस्मानाबाद , दि . २५

"बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र  हा झाला पाहिजे, यासाठी हुतात्मे दिलेले आहेत , तिथल्या व्यक्तीला जेव्हा काठी बसते त्याचा वळ आम्हाला जाणवतो .सीमाभागात मराठी संस्कृती नांदते आहे. सीमाभागात शैक्षणिक व साहित्य संमेलनातून भाषा संस्कृतीचे संवर्धन केले जात आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाकडून आर्थिक सहकार्य करण्याचा मी प्रयत्न करेन. म्हणून बेळगाव सीमाभाग हा महाराष्ट्राचा आत्मा आहे.असे प्रतिपादन  खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

अखिल भारतीय साहीत्य परिषद आयोजित  2 रे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन आज पार पडले .खा राऊत यांनी या संमेलनाचे उद्घाटन केले .त्या वेळी ते बोलत होते .ज्येष्ठ  पत्रकार ,साहित्यिक श्रीराम पचिंद्रे यांनी संमेलनाचे अध्यक्ष स्थान भूषविले तर अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचेे संस्थापक व राष्ट्रीय  कार्याध्यक्ष , सुप्रसिद्ध साहित्यिक शरद गोरे हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते .


  केंद्र आणि राज्यांनी समन्वय साधून बेळगाव चा प्रश्न सोडवावा --गोरे 

 पाचहजार मातृभाषा भाषा शब्दकळा मूल जन्म घेताना असते म्हणून मातृभाषा ही महत्वाची आहे म्हणून विज्ञान तंत्रज्ञानात यशस्वी होण्यासाठी मातृभाषेत  शिक्षण हवं. भाषा आणि संमेलने ही वैश्विक आहेत. सीमाभागातील 865 गावात मराठी संस्कृतीचा  समृद्ध वारसा आहे. कर्नाटक महाराष्ट्र राज्यांनी एकत्र येवून समन्वयाने केंद्राने मध्यस्थी करून सीमाप्रश्न निकाली काढला पाहिजे असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक व संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद गोरे यांनी केले .


संमेलनाच्या सुरुवातीला सीमाभागात साहित्य संमेलन ही मराठी संस्कृतीला ऊर्जा देणारी आहे. संमेलने भाषा संस्कृतीचे संवर्धन , साहित्यिकांना  लिहिण्याचे बळ मिळावे , मराठी वाचन संस्कृती रुजावी व नवोदित कवींना संधी मिळावी ही भूमिका सीमा भागातील संमेलनाची आहे. यासंमेलनाना महाराष्ट्र शासनाकडून आर्थिक तरतुद करण्यात यावी असे प्रास्ताविक मध्ये अखिल भारतीय परिषद चे कर्नाटक राज्याध्यक्ष रवींद्र पाटील यानी सांगितले.

सकाळी ११ वा. संमेलनाला दूर दृश्य प्रणाली व्दारे आयोजित संमेलनाचे उद्घाटन संपन्न झाले,  

यावेळी उदघाटन सत्राला विशेष अतिथी म्हणून शिवसंत संजय मोरे , परिषदेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा शुभांगीताई काळभोर , राष्ट्रीय विश्वस्त, राष्ट्रीय विश्वस्त सुवर्णा पवार,ज्ञानेश्वर पतंगे, डाॅ.अमोल बागूल उपस्थित होते संयोजक बेळगाव जिल्हाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण व उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन उपाध्यक्ष डी.बी.पाटील यांनी सुत्रसंचालन केले.

Labels: