Friday, 31 July 2020

मराठा आर्थिकदृष्ट्या दुर्बल सवलतीस पात्रं नसल्याचे परिपत्रक रद्द करा - ॲड. रेवण भोसले


उस्मानाबाद दि 31 : महाराष्ट्र सरकारने मराठा समाजासह इतर आरक्षणाचा लाभ मिळणाऱ्या समाजघटकांना आर्थिक दुर्बल घटकांच्या आरक्षणाचा लाभ मिळणार नसल्याचं परिपत्रक काढला आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल ही सवलत जातीवर नव्हे तर आर्थिक परिस्थितीवर आधारित आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मराठा समाजातील आर्थिक दुर्बल घटकांवर मोठा अन्याय होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने हे परिपत्रक तात्काळ रद्द करण्याची मागणी जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रवक्ते अॅड रेवण भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

        महाराष्ट्र सरकारने अतिशय चुकीच्या पद्धतीने आर्थिक मागास घटकांच्या आरक्षणाबाबत परिपत्रक काढले आहे. यात मराठा समाजाचे विद्यार्थी या आरक्षणाचा लाभ येऊ शकत नाहीत असं सांगण्यात आले आहे .कुठल्या आरक्षणात भाग घ्यायचा आणि कोणत्या आरक्षणात नाही हा राज्यात जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीला अधिकार आहे. या परिपत्रकात जिल्हा प्रशासनाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील प्रमाणपत्र देताना संबंधित अर्जदार आरक्षित वर्गातील आहे की इतर याची खातरजमा करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत .तसेच जे उमेदवार आरक्षित घटकांमधील आहेत त्यांना राज्य शासकीय सेवा व शैक्षणिक संस्थांच्या प्रवेशासाठी असे प्रमाणपत्र न देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रमाणपत्र देण्यापूर्वी तहसीलदार आणि संबंधित प्राधिकरणाने उमेदवार कोणत्याही सामाजिक आरक्षण प्रकारात  मोडतो की नाही हे तपासले पाहिजे. कारण केंद्र व राज्य प्रमाणपत्रांचे मॉडेल वेगळे आहेत. सदर आरक्षण हे जातीआधारित नाहीत याचा प्रामुख्याने विचार होणे आवश्यक आहे. सध्या कोरुणा महामारीमुळे लोकांना जगणे मुश्कील झाले आहे .असे असताना लोकांच्या हिताच्या सवलती बंद करून महाराष्ट्र सरकार जनतेच्या अडचणीत भर घालत आहे .राज्य सरकारच्या या निर्णयामुळे केवळ मराठा समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना या सवलतीपासून वंचित राहावे लागणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने हे परिपत्रक त्वरित मागे घ्यावे आणि मराठा समाजातील  आर्थिक दुर्बल घटकावरील अन्याय थांबवण्याची मागणीही ॲड भोसले यांनी केली आहे.

Labels:

काटीचे सरपंच कोरोनातून बरे होऊन गावात दाखल


काटी : उमाजी गायकवाड

तुळजापूर तालुक्यातील काटी येथील सरपंच आदेश जालिंदर कोळी यांना कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने कोरोनाची लागन झाली होती. त्यांच्यावर लातूर येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. काटीतील दररोज वाढत्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संख्खेमुळे  नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत. मात्र, आजचा दिवस काटीतील नागरिकांसाठी दिलासा  देणारा ठरला. आज बारा दिवसानंतर सरपंच पूर्णपणे बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात  आल्याने गावात दाखल झाले. यावेळी ग्रामस्थांनी सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करत त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन केले. सरपंचासह इतर अकरा कोरोना रुग्ण बरे होऊन घरी आले आहेत.

          यावेळी ग्रा.प. मकरंद देशमुख, जितेंद्र गुंड, बाळासाहेब भाले, अनिल बनसोडे, करीम बेग,अतुल सराफ, अरविंद कोळी, दत्ता बनसोडे, शहाबुद्दीन शेख,दत्ता छबिले आदीजण उपस्थित होते.


Labels:

तुळजापूरातील सराईत गुंड एमपीडीए कायद्यान्वये तुरुंगात स्थानबध्द


उस्मानाबाद, दि. 31 : 

अभिषेक राजेंद्र माने उर्फ राजाभाऊ, रा. तुळजापूर हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने त्याच्याविरुध्द पो.ठा. तुळजापूर येथे मारहाण, बेकायदेशीर जमाव जमवणे, शस्त्राचा धाक दाखवणे इत्यादी स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तुळजापूर शहरातील त्याच्या वास्तव्यामुळे कायदा व्यवस्थेला बाधा निर्माण झाली होती. त्याच्याविरुध्द प्रचलित कायद्या प्रमाणे कारवाई करुनही त्याच्या वर्तनात सुधारणा होण्या ऐवजी त्याच्या गुन्हेगारीचा आलेख वाढतच होता.

त्याच्या गुंडगीरीला आळा बसावा या उद्देशाने मा. पोलीस अधीक्षक श्री राज तिलक रौशन यांनी अभिषेक माने याच्या विरुध्द एमपीडीए कायदा अंतर्गत स्थानबध्दतेची कारवाई करण्याचे निर्देश उपविभागीय पोलीस अधिकारी- श्री. दिलीप टिपरसे व तुळजापूर पो.ठा. चे प्रभारी अधिकारी- श्री हर्षवर्धन गवळी यांना दिले. त्यास अनुसरून अभिषेक माने याच्याविरुध्द दाखल व न्यायप्रविष्ट असलेल्या गुन्ह्यांचे अभिलेख जोडून एमपीडीए कायदा अंतर्गत स्थानबध्दतेचा प्रस्ताव मा. जिल्हादंडाधिकारी, उस्मानाबाद यांना सादर करण्यात आला होता.

अभिषेक माने याला मोकळे ठेवणे समाज हितास अपायकारक असल्याची व त्याच्या वर्तनात सुधारना होणे गरजेचे असल्याचे मा. जिल्हादंडाधिकारी यांना पोलीस प्रशासनाने युक्तीवाद करुन पटवून दिले. त्यास अनुसरुन मा. जिल्हादंडाधिकारी यांनी अभिषेक माने यास एमपीडीए कायद्यानुसार कारागृहात स्थानबध्द करण्याचा आदेश दि. 29.07.2020 रोजी जाहीर केला. त्यानुसार तुळजापूर पोलीसांनी काल दि. 30.07.2020 रोजी अभिषेक माने यास ताब्यात घेउन त्याची रवानगी औरंगाबाद शहरातील ‘ मध्यवर्ती कारागृह- हर्सुल’ येथे केली आहे. हा प्रतिबंधात्मक स्थानबध्दता प्रस्ताव बनवण्यात तुळजापूर पो.ठा. च्या पोहेकॉ- अश्विनकुमार जाधव, पोना- चक्रधर पाटील, महिला पोकॉ- मनिषा शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Labels:

उमरगा : तीन शाळकरी मुलांच्या मृत्यूप्रकरणी पाचजणांविरुध्द गुन्हा दाखल


उमरगा, दि. 31 : उमरगा तालुक्यातील मौजे तलमोड येथील शेत सर्वे क्र. 71 / 72 मध्ये 1)पीबीएआय या कंपनीचे मालक 2)प्रकल्प व्यवस्थापक- धर्मेद्र कुमार 3)उप व्यवस्थापक- प्रमोद चांडके 4) पर्यवेक्षक- भगवान चव्हाण 5) शेत मालक- विनोद मनोहर मोरे, रा. तलमोड यांनी विनोद मोरे यांच्या नमूद शेतातील डोंगर खोदुन मोठा खड्डा तयार केला. त्या खड्ड्यास कोणत्याही प्रकारची सुरक्षेबाबतची उपाययोजना न करता, सुचन फलक न लावता तो खड्डा न बुजता तसाच ठेवल्याने त्यात पावसाचे पाणी साचले. त्यामुळे दि. 30.07.2020 रोजी 16.00 वा. सु. संतोष हेमला राठोड, रा. दयानंद नगर, कोळसुर (क.) तांडा, ता. उमरगा यांची मुलगी- अंजली संतोष राठोड, वय 12 वर्षे, भाची- प्रतिक्षा मधुकर पवार, वय 10 वर्षे, व भाचा- ओमकार राजुदास पवार, वय 11 वर्षे हे तीघेही त्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडल्याने बुडून गुदमरुन मयत झाले. अशा मजकुराच्या संतोष राठोड यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद 5 आरोपींविरुध्द भा.दं.सं. कलम- 304, 34 अन्वये गुन्हा दि. 30.07.2020 रोजी नोंदवला आहे.

Labels:

मुरुम येथील अपंग श्रद्धाने दहावीच्या परीक्षेत मिळविले घवघवीत यश


मुरूम, दि. 31 :  एक हाताने अपंग असतानाही मुरूम येथील कु श्रध्दा आप्पासाहेब मुंडासे हिने दहावीच्या परीक्षेत 92.20 टक्के गुण मिळवत घवघवीत यश संपादन करत उस्मानाबाद जिल्ह्यातुन अपंग विध्यार्थ्यांमध्ये प्रथम येण्याचा मान मिळवले आहे.

 येथील प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कुलची ती विद्यार्थिनी कुमारी श्रध्दा ही जन्मतःच एक हाताने अपंग आहे.मात्र ती शिक्षणात कधीच मागे राहिली नाही.अपंगत्वावर मात करत दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून अपंग विद्यार्थ्यांतुन जिल्ह्यात प्रथम आल्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत असून तिच्या या यशाबद्दल नगरविकास शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बापूराव पाटील,मुख्याध्यापक,शिक्षक तसेच महात्मा बसवेश्वर युवक मंडळ याबरोबरच शहरातील विविध सामाजिक संघटनांच्यावतीने कु श्रद्धाचे अभिनंदन करण्यात आले.

Labels:

कोविड विषाणू तपासणी प्रयोगशाळेसाठी तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा - पालकमंत्री गडाख


उस्मानाबाद, दि.31 : येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरात नव्याने सुरू करण्यात आलेल्या कोविड -19 विषाणू तपासणी प्रयोग शाळेसाठी आणखी काही अत्यावश्यक साहित्याची खरेदी करावी लागणार आहे.त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ प्रस्ताव तयार करून आवश्यक तो निधी उपलब्ध करून दयावा अशा सूचना राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव यशवंतराव गडाख यांनी  दि.31 जुलै रोजी केल्या.

पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी कोविड विषाणू तपासणी प्रयोग शाळेची पाहणी केली. त्यानंतर याबाबत विद्यापीठ सिनेट सदस्य संजय निबांळकर यांनी प्रयोग शाळेस केमिस्ट, लॅब टेक्नीशीन,पॅथोलाजीस्ट आदिची संख्या अपूरी असून ती उपलब्ध करून देण्यात यावी. सध्या या प्रयोग शाळेतून एका शिप्‍टमध्ये 90 नमुन्याची तपासणी केली जात असून ती 2 शिप्‍टमध्ये करण्यात येते. यापुढे 3 शिप्‍टमध्ये तपासणी करावयाची असल्याने वजा 18 व वजा 20 डिग्री सेंटीग्रेटचे फ्रिजर लागणार आहेत.त्यामुळे हे साहित्य खरेदी करण्यासाठी कमीत कमी 30 लाख रूपयेची निधीची आवश्यकता भासणार आहे. तसेच या प्रयोग शाळेसाठी पक्का रस्ता नसल्याने या रस्त्याचे काम आमदार किंवा खासदार निधीतून करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी देखील निबांळकर यांच्या मागणीस दुजोरा देत व पुढील महिन्यात रुग्णांची संख्या वाढणार असल्याने सदरील साहित्य उपलब्ध करून देण्याची त्यांनीही मागणी केली.

यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिबांळकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना या कामासाठी माझ्यासह इतर सर्व लोकप्रतिनिधी सहकार्य करतील असे आश्वासन दिले.यावेळी आमदार कैलास घाडगे-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एच.व्ही.वडगावे,उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे,तहसिलदार गणेश माळी,उपकेंद्राचे संचालक गायकवाड, नोडल अधिकारी दीक्षीत, कराळे आदीसह इतर मान्यवर उपस्थित होते.यावेळी पालकमत्र्यांनी ही प्रयोग शाळा उभारणीसाठी सतत पाठपुरावा करून तो प्रश्न मार्गी लावल्या बद्दल संजय निबांळकर व जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांचे विशेष कौतूक केले.

त्यानंतर  जिल्हा शासकीय रूग्णालयातील कोविड सेंटरला पालकमंत्री गडाख यांनी भेट देऊन तेथील आरोग्य सुविधा व रुग्णांलयातील रुगण व पुरविण्यात येत असलेल्या सर्व सोयी सुविधांची पाहणी केली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राज गलांडे व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनजंय पाटील यांच्याशी चर्चा करून कोणत्या प्रकारच्या अडचणी येत आहेत ? हे जाणून घेऊन या रूग्णांलयामध्ये आवश्यक लागणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनास सूचना दिल्या. तसेच वैराग रोड लगत असलेल्या  डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलींचे निवासी वस्तीगृह या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या कोविड सेंटरला भेट देऊन  पाहणी करून तेथील सर्व परिस्थितीची माहिती जाणून घेतली. त्यानंतर खाँजा गाजी रहे दर्गाह  या देवस्थान परीसरात मोहल्ला क्लिनिक सुरू करणाऱ्या कार्यकर्त्याशी संवाद साधत त्यांना आवश्यक असलेली रूग्णवाहिका  डॉक्टरसह  कर्मचारी उपलब्ध करून देण्याची सूचनाही प्रशासनाला केली.

Labels:

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी - पालकमंत्री



उस्मानाबाद, दि. ३१ : जिल्ह्यात आज पर्यंत कोरोना बाधित झालेल्या रुग्णांची संख्या ९४६ इतकी असून त्यापैकी ४९ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.कोरोना बाधित  रुग्णांचा मृत्यूदर ४.७ इतका असून हा दर राज्याच्या मृत्युदर पेक्षा अधिक असल्याने मृत्यूदर कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने उपाययोजनांची काटेकोरपणेअंमलबजावणी करावी, असे निर्देश राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जिल्हा covid-१९ च्या अनुषंगाने आढावा बैठकीत पालकमंत्री गडाख बोलत होते यावेळी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष धनंजय सावंत,आमदार सुजितसिंह ठाकूर, आमदार कैलास घाडगे- पाटील, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते, नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर,पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन, अप्पर जिल्हाधिकारी रूपाली आवले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजभाऊ गलांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एच.व्हि. वडगावे व अन्य लोकप्रतिनिधी व अधिकारी बैठकीस उपस्थित होते.

पालकमंत्री गडाख पुढे म्हणाले की, आरोग्य यंत्रणेने जिल्ह्यात जे  कोरोना बाधित रुग्ण आहेत त्यातील अत्यंत गंभीर रुग्णांची स्वतंत्र यादी तयार करावी व या गंभीर रुग्णांवर अधिक चांगल्या पद्धतीने उपचार करण्याबाबत लक्ष केंद्रित करावे व हे रुग्ण पूर्णपणे बरे होतील यासाठी प्रयत्न करावेत व जेणेकरून जिल्ह्यात  कोरोनामुळे मृत्यू होणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश त्यांनी दिले. 

राज्यातील इतर जिल्ह्याची कोरोनाची परिस्थिती पाहता उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या त्या मानाने नियंत्रित आहे परंतु पुढील काळात ही संख्या अधिक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही हे गृहीत धरून जिल्हा प्रशासनाने शासकीय तसेच खासगी रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर बेडची उपलब्धता करून ठेवावी. त्यासाठी आवश्यक सर्व इतर सुविधाही उपलब्ध कराव्यात,असे निर्देश पालकमंत्री गडाख यांनी दिले.
जिल्ह्यात  कोरोना बाधित रुग्ण आहे परंतु या रुग्णांना कोविड आजाराची कोणतीही लक्षणे नाहीत अशा रुग्णांना शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना प्रमाणे व त्यांच्या इच्छेनुसार  होम क्वॉरंटाईन करण्याबाबत प्रशासनाने विचार करावा. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरचा थोडासा ताण कमी होऊन जे गंभीर रुग्ण आहेत. त्यांच्यावर अधिक लक्ष केंद्रित करता येईल येईल. असे पालकमंत्री गडाख यांनी सांगून पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या  व्यक्तींचे स्वॅब तपासणी साठी पाठवल्यानंतर त्या व्यक्तींचा रिपोर्ट येईपर्यंत एकाच ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था करावी, अशी सूचना त्यांनी केली.

कोविड च्या अनुषंगाने आरोग्य विभागाने जी पदभरतीची प्रक्रिया राबविली आहे त्या अंतर्गत आतापर्यंत फक्त १०० पदांची भरती केलेली दिसून येत आहे. परंतु सद्यस्थितीमध्ये आरोग्य विभागाकडे मनुष्यबळाची कमतरता जाणवत असल्याने जिल्हा शल्यचिकित्सक यांनी  ८ ऑगस्ट २०२० पर्यंत उर्वरित १५० पदांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश श्री. गडाख यांनी दिले. तसेच प्रशासनाने खासदार निधीतून तात्काळ एक रुग्णवाहिका खरेदी करून ती आरोग्य यंत्रणेकडे सुपूर्द करावी असेही त्यांनी सूचित केले.

 जिल्ह्यातील जास्तीत जास्त खाजगी रुग्णालयांनी कोविड रुग्णावर उपचार करण्याबाबत पुढे यावे. या करीता जिल्हा प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी. तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेत जे रुग्णालय आहेत. त्यांनीही ही कोविड रुग्णांवर उपचार करावेत व पुढील काळासाठी मोठ्या प्रमाणावर बेडची उपलब्धता करून ठेवावी असे आवाहन पालकमंत्री गडाख यांनी केले. तसेच परंडा शासकीय रुग्णालयात व्हेंटिलेटर खरेदी करण्याबाबत तेथील लोकप्रतिनिधींनी चार महिन्यापूर्वी पत्र देऊनही त्यावर आतापर्यंत का कारवाई करण्यात आलेली नाही याची चौकशी करून त्यातील दोषीवर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात उपलब्ध असलेल्या बेडची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व्हावी याकरिता डॅशबोर्ड तयार करून त्यावर रुग्णालय निहाय बेडची उपलब्धतेची माहिती द्यावी. त्याप्रमाणेच पोलिस विभागाने लॉकडाऊन मध्ये अधिक कडक पद्धतीने काम करून गर्दीवर नियंत्रण ठेवावे अशी सूचना पालकमंत्री गडाख यांनी केली. प्रशासनाने दहा हजार रॅपिड टेस्ट किट्सची उपलब्धता करून त्या किट्स तालुकानिहाय उपलब्ध करून द्याव्यात व मोठ्या प्रमाणावर रॅपिड टेस्ट कराव्यात अशीही सूचना त्यांनी केली.
उस्मानाबाद शहरात १ ऑगस्ट पासून दुचाकीस बंदी घालण्यात आलेली आहे. त्याबाबत जिल्हा प्रशासनाने १ दिवस अंमलबजावणी करून त्याचा पुनर्विचार करावा तसेच आजच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णय व सूचना याबाबत रोज आढावा घेऊन त्याच्या पूर्तीसाठी प्रयत्न करावे असे निर्देश पालकमंत्री गडाख यांनी दिले.

प्रारंभी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांनी covid-19 च्या अनुषंगाने उस्मानाबाद जिल्ह्यात प्रशासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली तसेच जिल्ह्याचा मृत्युदर ४.७ इतका असून तो कमी करण्या बाबत प्रशासनामार्फत उपाय योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार आहेत. असे सांगितले. तसेच १० हजार रॅपिड टेस्ट किट्स उपलब्ध होणार असून त्यामुळे तपासण्याची संख्या वाढणार आहे असे सांगून आणखी २० हजार रॅपिड टेस्ट किट्स ची मागणी नोंदविली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच प्रशासनामार्फत पुढील काळात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढल्यास जास्तीत जास्त बेड उपलब्ध करण्याबाबत कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी खासदार निधीतून रुग्णवाहिका खरेदी करावे असे सांगितले. तसेच प्रशासनाने कोरोना अनुषंगाने उपाय योजना राबवून सर्वसामान्य रुग्णांना दिलासा द्यावा असे आवाहन केले. तसेच यावेळी इतर लोकप्रतिनिधी  यांनी कोरोनाच्या अनुषंगाने सूचना व प्रश्न मांडून त्यावर कार्यवाही करण्याची मागणी केली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गलांडे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे यांनी आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

Labels:

तुळजापूर : उदयोजक दिनेश अग्रवाल यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा


तुळजापुर : कुमार नाईकवाडी

येथील युवा उद्योजक दिनेश अग्रवाल यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी शहरातील गरजू भुकेल्यांना शिवभोजन थाळीचे मोफत वाटप करण्यात आले तर स्वस्तिक प्राईम येथे वृक्षारोपण करण्यात आले.

शहरातील जुन्या  बसस्थानका समोर 110 गरजूंना शिवभोजन थाळीचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी नगरसेवक सचिन पाटील, प्रकाश मगर, पंकज शहाणे, पत्रकार संजय खुरूद आदींची प्रमुख उपस्थिती होती. तर सारा गौरव च्या पाठिमागे स्वस्तिक प्राइम येथे 50 वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मुकुंद शिंदे, अनंत रसाळ, कुलदीप पवार, सचिन अमृतराव, गणेश पुजारी, आबा पवार आदींची उपस्थिती होती. 

दरम्यान पंचायत समिती सभागृहात दिनेश अग्रवाल यांचा वाढदिवसा निमित्त भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी भाजप तालुका अध्यक्ष संतोष बोबडे, पिंटू मुळे, आनंद कंदले,  माजी नगराध्यक्ष चंद्रकांत कणे, आबा पवार, गोविंद खुरूद आदींची उपस्थिती होती.  

काटी येथे आणखी चारजण कोरोना पॉझिटिव्ह


काटी : उमाजी गायकवाड

तुळजापूर तालुक्यातील काटी येथे गुरुवार दि. 30 रोजी आलेल्या रिपोर्टमध्ये पुर्वीच्या कोरोनाबाधित पेशंटच्या संपर्कातील गुरुवारी  दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असतानाच शुक्रवार दि.31 रोजीच्या रिपोर्ट मध्ये आणखी चार रुग्णांचा समावेश झाला असून या कोरोना पॉझिटिव्ह  चार रुग्णांपैकी तिघांनी प्रायव्हेट लॅबमध्ये स्वॅब दिला होता. या चार पैकी पुर्वीच्या  कोरोनाबाधित तिघांच्या कुटूंबातील तीन महिला सदस्यांचा समावेश आहे. तर एकजण कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील पुरुष रुग्ण आढळून आला आहे‌.

त्यामुळे आता काटी येथील रुग्णांची संख्या आता तेवीसवर गेली आहे.तर अकरा रुग्ण बरे होऊन घरी आले आहेत.काटी येथे  रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने हि वाढ थांबणार कि नाही या भितीने नागरिक धास्तावल्याचे चित्र दिसून येत आहे.

Labels:

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काटी येथील रेशन दुकानदाराची अनोखी शक्कल


काटी : उमाजी गायकवाड

तुळजापूर तालुक्यातील काटी येथे दिवसेंदिवस कोरोना पेशंटच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असून गावात 19 रुग्ण आढळून आल्याने काटी हे गाव कोरोना हॉट्सपॉट बनत चालले आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांना ग्रामपंचायतीच्या वतीने घरात थांबण्याचे आवाहन करण्यात येत. दोन वेळा जनता कर्फ्युही पुकारण्यात आला होता. परंतु आवश्यक कामासाठी नागरिकांना घराबाहेर पडावे लागत आहे.  अत्यावश्यक सेवेत अन्नधान्याचा समावेश असल्याने रेशन दुकानातून धान्य वितरण करण्यासाठी येथील अमरसिंह निंबाळकर या  रेशन दुकानदाराने अनोखी शक्कल लढवली आहे. सोशल डिस्टन्सिंगसाठी या दुकानदाराने वजन केलेला माल एका पाईपमधून ग्राहकाला देण्यास सुरुवात केली, याची काटीसह परिसरात चांगलीच चर्चा सुरु आहे. 

अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करावे, मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा, कामा व्यतिरिक्त घराबाहेर जाणे टाळावे, एकमेकांचा संसर्ग टाळावा, असे सांगितले जात असताना हा संसर्ग टाळण्यासाठी तुळजापूर तालुक्यातील काटी   गावच्या अमरसिंह निंबाळकर (दुकान क्रमांक 2) या स्वस्त धान्य दुकानदाराने एक अनोखी शक्कल लढवली आहे.या दुकानदाराने विटांचा एक चबुतरा बांधून या चबुतऱ्यामधून धान्य देण्यासाठी एक प्लॅस्टिक  पाईप दुकानातून बाहेर काढला. तराजूत धान्याचे वजन केल्यानंतर तराजुजवळ लावलेल्या पाईपमधून हे धान्य वितरीत केले जात आहे. पाईपचे एक टोक तराजुजवळ तर दुसरे टोक दुकानाबाहेर काही अंतरावर ठेवले. त्यामुळे दुरूनच नागरिकांना हे धान्य घ्यावे  लागत असल्याने कोरोना संसर्गाचा धोका टळत आहे.

Labels:

तुळजापुरात युवकाची गळफास लावुन आत्महत्या


तुळजापुर : कुमार नाईकवाडी

तुळजापुर शहरातील एका २८ वर्षीय तरुणाने गळफास लावुन आत्महत्या केल्याची घटना घडली. मागील सहा दिवसातील ही दुसरी घटना आहे. या अगोदर २५ जुलै रोजी एका युवकाने आत्महत्या केली होती. ती घटना ताजी असतानाच अजून एका युवकाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.


या बाबत सविस्तर माहिती अशी की, तुळजापुर शहरातील जवाहर गल्लीतील भागात राहणाऱ्या नितेश उर्फ (टिल्लु) दिलीप कदम वय वर्षे २८ या तरुणाने आपल्या राहत्या घरातील दुसऱ्या मजल्या वरील बाथरुम मध्ये दि.३० गुरुवार रोजी सायंकाळ च्या सुमारास अज्ञात कारणामुळे साडीने गळफास लावुन आत्महत्या केली. या तरुणाने नेमकी आत्महत्या कशामुळे केली याचे कारण समजु शकले नाही. त्याच्या पश्चात आई, भाऊ असा परिवार आहे. त्याच्या नातेवाईकाच्या खबरीवरुन तुळजापुर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली. 

विशेष म्हणजे  मयत नितेश (टिल्लु) कदम हा  अविवाहित होता. तो अंत्यत मनमिळावु स्वभावाचा होता. त्यास क्रिकेट फार आवड होती. त्या भागात राहणाऱ्या  मिञ कंपनीचा फार आवडता होता. त्याच्या या अचानक निघुन जाण्याने त्याच्या कुंटुबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. येथील जवाहर गल्लीतील भागात शोककळा पसरली होती. त्याच्या पार्थिवावर  दि.३१ शुक्रवार रोजी सकाळी येथील घाटशीळ रोड वरील स्मशान भुमीत अंत्य संस्कार करण्यात आले.

गेल्या चार माहिन्यापासुन संसर्गजन्य कोरोना साथीच्या रोगामुळे तुळजापुर  शहराची व्यापार उद्योग क्षेत्र आदीसह व्यवसाय ठप्प झाल्याने याचा फटका सर्व सामान्य नागरीकांना बसल्यामुळे आर्थिक विवंचनेने आत्महत्या चे सञच सुरुच आहे. या चार माहिन्याच्या कालावधीत चार ते पाच तरुण युवकांनी व एका माहिलेनी आत्महत्या केल्याने तुळजापुर शहरातील नागरीकांतुन चर्चेले जात आहे.

Labels:

Thursday, 30 July 2020

बेंबळी ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा यथोचित सत्कार


बेंबळी : गुणवंत विद्यार्थी,विद्यार्थींनी आपल्या परिश्रमाच्या बळावर दहावीच्या बोर्ड परीक्षेत प्राविण्य मिळवले आहे अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार बेंबळी ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने  करण्यात आला.
 
दहावी परीक्षा उत्तीर्ण झालेले गुणवंत विद्यार्थी सोहेल पटेल 98:60% ,कु.वैष्णवी खापरे, 94:60%, कु.संध्या गाढवे, 90:60%, कु.प्रतिक्षा माने  87%,द पाटील 84% शेरीकर आजरा 83%जवेरिया पठाण 80%, या गुणवंत विद्यार्थी,विद्यार्थींनी चा सत्कार सरपंच सत्तार शेख यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य यांनी केला.
 
यावेळी ग्रामविकास अधिकारी श्री करपे साहेब सौ.नंदा रसाळ,अहेमद शहा, प्रकाश शेळके,मिलिंद पाटील,मोहन खापरे महेबुब कुरेशी सरदार पटेल,माने सर,राजभाऊ नळेगावकर,मजहर शेरीकर सलमान शेख,विठ्ठल खापरे,नासर पठाण, अतिक सय्यद,महेश पाटील सद्दाम शेख यांच्यासह ग्रामस्थ  ग्रामपंचायत कार्यलयीन कर्मचारी उपस्थित होते.

या कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाच्या वाटचालीस शुभेच्छा पर आपले मनोगत थोडक्या शब्दांत सरपंच सत्तार शेख यांनी व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.

*त्यानंतर श्री करपे साहेब यांनी ही पुढील शिक्षण पध्दतीवर आपले मार्गदर्शन केले.*

 *गुणवंत विद्यार्थी सोहेल पटेल यांनी*
*अभ्यासक्रमाबाबत आपले मनोगत व्यक्त केले..*

*कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रकाश शेळके यांनी केले तर सुञसंचालन महेश पाटील यांनी केले..*

Labels:

काटी येथे कोरोना पॉझिटिव्हच्या संपर्कातील आणखी दोघेजण कोरोना पॉझिटिव्ह


काटी :  उमाजी गायकवाड

तुळजापूर तालुक्यातील काटी येथे गुरुवार दि. 30 रोजी आलेल्या रिपोर्टमध्ये पुर्वीच्या कोरोनाबाधित पेशंटच्या संपर्कातील आणखी दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून यामध्ये एका पुरुषाचा तर कोरोनाबाधित रुग्णाच्या आईचा समावेश आहे. त्यामुळे आता काटी येथील रुग्णांची संख्या आता एकोणीसवर गेली आहे.तर आठ रुग्ण बरे होऊन घरी आले आहेत.काटीत वाढत असलेल्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने हि वाढ थांबणार कि नाही या भितीने नागरिक धास्तावल्याचे चित्र दिसून येत आहे.

Labels:

तीन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू


उमरगा : रस्त्याच्या कामासाठी मुरुम काढलेल्या खड्डयात साचलेल्या पाण्यात बुडून तीन शाळकरी मुलांचा दुर्देवी अंत झाला. ही घटना उमरगा तालुक्यातील कोळसूर कल्याणीच्या दयानंदनगर तांडाच्या शिवारात घडली. मृतांमध्ये दोन मुली व एका मुलाचा समावेश आहे.

प्रतीक्षा मधुकर पवार (वय १२), ओंकार राजुदास पवार (वय १२) व अंजली संतोष राठोड (वय१३) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या शाळकरी मुलांचे नावे आहेत. उमरगा तालुक्यातील कोळसूरच्या दयानंदनगर तांड्यावरील वरील तीन मुले गुरूवारी दुपारी रस्त्याने फिरत गेली होती. यामधील किसन राठोड यांची भाची प्रतीक्षा मधुकर पवार  ही लॉकडाऊन काळात पुणे येथून गावाकडे आली होती. हिच्यासह ओंकार व अंजली हे दोघे तुरोरी येथील श्री ज्ञानेश्वर विद्यालयात शिक्षण घेत आहेत. हे तिनही मुले गुरुवारी दुपारी गावातील रस्त्याने फिरत गेले असता शिवारातील रस्त्याच्या कडेला राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी मुरूम काढण्यासाठी खोदलेल्या खड्डयातील पाण्यामध्ये पडली. त्यात बुडून तिघांचा मृत्यू झाला. ही घटना समजताच ग्रामस्थ व नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली.  पोलिस निरीक्षक गजानन घाडगे, बीट अंमलदार वाल्मिक कोळी यांच्यासह पोलिस कर्मचारी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

पोलिस व ग्रामस्थांच्या सहकार्याने चिमुकल्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यावेळी नातेवाईकांचा आक्रोश सुरू झाला, ग्रामस्थांचे डोळे पाणावले. तीनही मुलांचे मृतदेह  उपजिल्हा रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान संतोष यमाला राठोड यांच्याकडून पोलिसात तक्रार देण्याचे काम सुरु होते. या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Labels:

विनापरवाना जिल्हा प्रवेश करणाऱ्यावर पोलीसांतर्फे गुन्हा दाखल


उमरगा, दि. 30 :

यावरुन उमरगा पो.ठा. चे पोकॉ- बाबुराव राउत यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन महेश निंगदाळे यांच्याविरुध्द भा.दं.सं. कलम- 188, 269 सह आपत्ती व्यवस्थान कायदा कलम- 51 (ब) अन्वये गुन्हा दि. 30.07.2020 रोजी नोंदवला आहे.

Labels:

उस्मानाबाद जिल्हयात चोरीचे तीन गुन्हे दाखल


उस्मानाबाद जिल्हयात चोरीचे तीन गुन्हे दाखल

पोलीस ठाणे, तामलवाडी: अमर नवनाथ वडणे, रा. माळुंब्रा, ता. तुळजापूर यांनी स्वत:ची होंडा शाईन मो.सा. क्र. एम.एच. 25 एआर 2490 ही दि. 28.07.2020 रोजी मध्यरात्री राहत्या घरा समोर लावली होती. ती त्यांना दुसऱ्या दिवशी लावल्या जागी आढळली नाही. यावरुन ती मो.सा. अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या अमर वडणे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 29.07.2020 रोजी नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, तुळजापूर: धोंडीबा धनाजी मस्के, रा. पिंपळा (खुर्द), ता. तुळजापूर यांनी स्वत:ची हिरो एचएफ डिलक्स मो.सा. क्र. एम.एच. 25 एपी 9937 ही दि. 28.07.2020 रोजी 15.30 वा. सु. तुळजापूर येथील एसबीआय बँके समोर लावली असता अज्ञात चोरट्याने ती चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या धोंडीबा मस्के यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 29.07.2020 रोजी नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, उस्मानाबाद (ग्रा.): रामेश्वर किसन निचळ, रा. गावसुद, ता. उस्मानाबाद यांनी सवत:ची हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मो.सा. क्र. एम.एच. 13 एआर 6894 ही दि. 20.07.2020 रोजी मध्यरात्री आपल्या राहत्या घरा समोर लावली होती. ती दुसऱ्या दिवशी लावल्या जागी आढळली नाही. यावरुन ती मो.सा. अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या रामेश्वर निचळ यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 30.07.2020 रोजी नोंदवला आहे.

Labels:

उस्मानाबाद व उमरगा नगर पालिका क्षेत्रात दुचाकी वाहनांना वाहतुकीस बंदी


उस्मानाबाद, दि. 30  : 

भारत सरकार व महाराष्ट्र शासनाचे आदेशानुसार दुचाकी वाहनांवर फक्त एक व्यक्तीस (चालकास) प्रवास करण्याची परवानगी असून अनेक दुचाकीस्वारांकडून या नियमाचे उल्लंघन होत असल्याने त्यांचेविरुद्ध पोलिस विभाग व स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत दंडात्मक कार्यवाही करण्यात आली आहे. यानंतरही नगर पालिका क्षेत्रामध्ये अनेक दुचाकीस्वारांकडून वारंवार नियमाचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले आहे. तसेच कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी अनावश्यकरित्या बाहेर न पडणे गरजेचे असून अनेक दुचाकी रस्त्यावर अनावश्यकरित्या फिरत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे उस्मानाबाद व उमरगा नगर पालिका क्षेत्रामध्ये कोविड-19 चा प्रादुर्भाव वाढत असून तो रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी उस्मानाबाद व उमरगा नगर पालिका क्षेत्रामध्ये दुचाकींच्या वाहतूकीस प्रतिबंध करणे आवश्यक असल्याची खात्री झाली आहे.

त्यामुळे जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद नगर पालिका क्षेत्रामध्ये पुढील आदेशापर्यंत खालील नमूद बाबींसाठी  होणाऱ्या दुचाकीच्या वाहतुकीव्यतिरिक्त अन्य दुचाकींच्या वाहतुकीस मनाई केली आहे.  

शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना कार्यालयात जाणे-येणेसाठी ओळखपत्राआधारे दुचाकीवर प्रवासाची परवानगी राहील. 

अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींना व कोविड-19 चे प्रतिबंधाचे अनुषंगाने नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचारी, व्यक्तींना ओळखपत्राआधारे दुचाकीवर प्रवासाची परवानगी राहील. उस्मानाबाद नगर पालिका क्षेत्रांतर्गत अत्यावश्यक सेवेसाठी  व कोविड-19 चे प्रतिबंधाचे अनुषंगाने नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचारी, व्यक्तींना नगर पालिकेने ओळखपत्रे द्यावीत.
फिरते दूध विक्रेत्यांना दूध विक्रीसाठी दुचाकीचा वापर करण्यास परवानगी  राहील.

Labels: ,

अणदूर येथील निवृत्त मुख्याध्यापक जीवनराव घुगे यांचे निधन


अणदुर, दि. 30 :

त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले,एक मुलगी,सुना,जावई,नातवंडे असा परिवार आहे.गुरुवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.  सन्मित्र पतसंस्थेचे अध्यक्ष,  तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष,दक्षता समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य,लोकमंगल मल्टीस्टेट पतसंस्था सल्लागार आदी पदावर त्यानी काम  केले आहे. माजी पंचायत समिती सदस्य साहेबराव घुगे यांचे ते  वडील होत.

Labels:

श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी बनविला ऑटोमॅटिक हॅन्ड सॅनिटायझर


तुळजापूर : कुमार नाईकवाडी
येथील श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयातील अनुवैजिक व दूरसंचार विभागातील प्राध्यापकांनी महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ. शेखर जगदे यांच्या मार्गदर्शनाखाली ऑटोमॅटिक हॅन्ड सँनिटायझर सिस्टीम अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून  बनविला आहे. हा अँटोमँटिक हँड सँनिटायजर अल्प किमतीत बनविला असून याचा एका वेळेस सातशे व्यक्तींना लाभ घेता येतो.

हा ऑटोमॅटिक हँड सँनिटायझर एक फूट उंच व पाऊन फुट लांब असून हा सेन्सर बेस्ड सिस्टीम वर चालतो. यात दीड लिटर सँनीटायझर लिक्विड भरता येते. यात सातशे व्यक्ती आपले हात सँनिटायझर करू शकतात. यासाठी अत्याधुनिक मायक्रोकंट्रोलर बोर्ड , प्रॉक्सीमिटी सेंसर व इतर अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक साहित्याचा वापर करण्यात आला आहे. हा हँड सँनिटायझर अवघ्या पाच हजार रुपये किंमतीत बनविण्यात आला आहे. या ऑटोमॅटिक हॅन्ड सँनीटायझर मुळे व्यक्तींचा वेळ वाचण्यास मदत होते. तसेच यासाठी कोणतेही मनुष्यबळ लागत नाही त्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता ही येत नाही. याकामी विभाग प्रमुख प्रा. डॉ. एन. डी. पेरगाड, डॉ. धनंजय खुमणे, विभाग प्रमुख प्रा. संजय सुरवसे, उपप्राचार्य प्रा.रवी मुदकणा यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले असे ऑटोमॅटिक  हॅन्ड सॅनिटायझर  सिस्टिमचे  निर्माते  प्रा.  संजय आखाडे यांनी सांगितले. 

सदरचा ऑटोमॅटिक हॅन्ड सँनिटायझर सिस्टीम श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानकडे व्यवस्थापक तहसीलदार योगिता कोल्हे  यांच्याकडे भाविकांच्या वापरासाठी देण्यात आला आहे.  मंदिर  संस्थानच्या अध्यक्षा तथा जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे व सर्व विश्वस्त यांच्या प्रेरणेने ऑटोमॅटिक  हॅन्ड  सँनिटायझर बनविण्यात आला आहे असे प्राचार्य डॉ शेखर जगदे यांनी सांगितले.

Labels:

हद्दवाढ भागात नागरिकांचे हाल; न.प. च्या कारभाराबाबत नागरिकांची नाराजी


तुळजापूर : कुमार नाईकवाडी

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या पुण्य तुळजापूर नगरीत दिवसेंदिवस शहराचा विस्तार होत असून गेल्या दहा वर्षापूर्वी हद्दवाढीसाठी मंजुरी मिळाली होती. माञ नागरिकांना या भागात पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत. यामुळे तेथील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात  हाल होत आहे. या भागातील नागरीकांना अनेक संकटाला तोंड द्यावे लागत आहेत. या भागातील नागरीकांना  रस्ते, गटारी, रस्त्यावरील पथदिवे उपलब्ध नाहीत. पिण्याच्या पाण्याची सोय नाही. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. गटारी नसल्यामुळे घरातील सांड पाणी रस्त्यावर येत असल्यामुळे त्या भागात घाणीचे साम्राज्य होऊन रोगराईला निमंत्रक दिल्यासारखे चिञ पहावयास मिळत आहे.


नळदुर्ग रोडवरील मस्के वस्ती, आदित्य कॉलनी आदीसह हद्दवाढ भागात कुठल्याच प्रकारचे रस्ते नाहीत. सध्या पावसाळा चालु असल्याने त्या भागात चिखलाची मोठी दलदल झाली आहे. नागरीकांना चिखलातून घराकडे जाताना वाट काढावी लागत आहे. त्या भागात सुमारे साठ-सत्तर घरे आहेत. तरी अद्याप तेथे नागरिकांसाठी कुठल्याच रस्त्याची सोय केली नाही. यामुळे तेथील नागरिकांना चिखलातुन ये जा करावी लागत आहे. पावसाळ्यात चिखल मोठ्या प्रमाणावर झाल्याने या ठिकाणी  वाहनाना मोठी कसरत करावी लागत आहे.  काही वेळा वाहने त्या चिखलात फसत आहेत.  तरी नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ हद्दवाढ भागात नागरिकांना सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी येथील नागरिकांमधुन होत आहे. या भागात राहणाऱ्या नागरीकांची मोठी गैर सोय होत असल्याने तेथील नागरीक हैराण झाले आहेत. तरी वेळीच न.प.प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

Labels:

भाषण संभाषण एक कला कार्यशाळेस उत्तम प्रतिसाद


मुरूम :

यावेळी डॉ.हुलपल्ले यांनी आपण व्यासपीठावर कसे बोलावे, माइक समोर कसे उभे राहावे, आपली शब्दरचना, शब्द उच्चार, आवाजातील चढ-उतार, आपले चेहऱ्यावरील हावभाव आदि बाबींचे प्रशिक्षण  ही कार्यशाळा सर्वांसाठीच खूप उपयोगी व गरजेची असल्याच्या प्रतिक्रिया सहभागी प्रशिक्षणार्थीनी दिल्या. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक सपाटे होते.  या  कार्यशाळेसाठी संगणक विभागाचे विभाग प्रमुख प्रा. सचिन राजमाने, प्रा.लखन पवार, डॉ.महेश मोटे, डॉ.सुधीर पंचगल्ले यांनी पुढाकार घेवून कार्यशाळा यशस्वी केली.

प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कुलचा शंभर टक्के निकाल


मुरूम, दि. ३० :

Labels:

पालकमंत्री शंकरराव गडाख शुक्रवारी उस्मानाबाद जिल्हा दौ-यावर


उस्मानाबाद, दि. 30 :

शुक्रवार दि.31 जुलै 2020 रोजी सकाळी 9.00 वाजता कोविड तपासणी प्रयोग शाळेस भेट व पाहणी (स्थळ: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र उस्मानाबाद).  9.30 वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड सेंटरला भेट. 10.00 वाजता शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय तथा रुग्णलयामधील कोविड सेंटरला भेट. 10.30 वाजता क्वारंटाईन सेंटरला भेट (स्थळ शासकीय वस्तीगृह वैराग रोड उस्मानाबाद). 11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद येथे कोविड व इतर विषयासंदर्भात बैठक. सोईनुसार शासकीय मोटारीने मौ. सोनई ता. नेवासा जिल्हा अहमदनगर कडे प्रयाण.     

Labels:

प्रतिभा निकेतन सेमीचा प्रतिक पाटील यांचा माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या हस्ते सत्कार

 
मुरुम : येथील प्रतिभा निकेतन विद्यालयातून प्रतिक पाटील याने महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मार्च मध्ये घेण्यात आलेल्या शालांत परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवून त्याला ९९.६० टक्के गुण मिळाल्याबद्ल गुरूवार (ता.३०) रोजी त्यांचा सत्कार माजी मंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या हस्ते फेटा, शाल, पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी नगर शिक्षण विकास मंडळाचे अध्यक्ष बापूराव पाटील, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरणजी पाटील, आप्पासाहेब हाळ्ळे आदिंनीही त्यांचे विशेष कौतुक करुन आभिनंदन केले.  

                      
यावेळी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे व्हाईस चेअरमन प्रमोद कुलकर्णी यांच्या हस्ते प्रतिक पाटील यांचा फेटा, शाल व पुष्पहार देवून सत्कार करण्यात आला. यावेळी चंद्रकांत बालकुंदे, आप्पासाहेब हाळ्ळे, प्रा.डॉ.सुधीर पंचगल्ले, प्रा.करबसाप्पा ब्याळे, प्रा.शिवाजी राजोळे, प्रा.विठ्ठल चलपते, प्रा.उमाकांत महामुनी आदिंनी  पेढे भरवून त्याचे कौतुक केले.

Labels:

प्रतिभा निकेतन सेमी इंग्रजीचा निकाल शंभर टक्के तर विद्यालयाचा ९७.२३ टक्के

 
 मुरुम : येथील प्रतिभा निकेतन विद्यालयातून प्रतिक पाटील याने महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मार्च मध्ये घेण्यात आलेल्या शालांत परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविला. त्याला ९९.६० टक्के गुण मिळाले. द्वितीय क्रमांक सोहम अंबर ९८.४० टक्के तर तृतीय क्रमांक कुमारी शितल नाटेकर हीला ९८ टक्के मिळाले. प्रशालेतून विशेष प्राविण्य ९८, प्रथम श्रेणी ८४, द्वितीय श्रेणी ५४ तर उत्तीर्ण ६ असे परीक्षेत बसलेले विद्यार्थी २५३ होते. प्रशालेचा निकाल ९७.२३ टक्के लागला तर सेमी इंग्रजीचा १०० टक्के निकाल लागला आहे.


 त्यांच्या या यशाबद्ल माजी मंत्री तथा महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील, नगर शिक्षण विकास मंडळाचे अध्यक्ष बापूराव पाटील, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरणजी पाटील, संस्थेचे सचिव व्यंकटराव जाधव, प्रशालेचे मुख्याध्यापक प्रविण गायकवाड, उपमुख्याध्यापक धनराज पवार, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य सुधीर अंबर, माधवराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक सपाटे, पर्यवेक्षक सुभाष फुलसुरे, सहशिक्षक उल्हास घुरघुरे, तात्यासाहेब शिंदे, विवेकानंद परसाळगे, राधाकृष्ण कोंडारे, चंद्रामाप्पा कंटे, इरफान मुजावर, महानंदा रोडगे, मंगल शिंदे, मनिषा कंटेकूरे, शाहीन तांबोळी आदिंनी त्यांचे विशेष कौतुक करुन प्रशालेच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

Labels:

वासरावरील प्रेमापोटी पशुपालकाने गाठले सातारा


नळदुर्ग, दि. ३० :

नळदुर्ग येथील पशुपालक प्रविण प्रभाकर सुरवसे यांनी  आपल्या देवनी गायीचे नर वासराच्या प्रेमापोटी उपचार कण्यासाठी चक्क सातारा गाठून राज्यस्तरीय पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-१ रेठरे बुद्रुक जि.सातरा येथे घेऊन गेले. त्या वासराला जन्मजात दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकलेले किंवा चिकटलेले होते. याला सायंटिफिक भाषेमध्ये Bilateral flexore tendon असे म्हणतात अशी माहिती डाँक्टर विनोद पाटील यांनी दिली.  हे वासरू अवघ्या एक महिन्याचे होते युट्युब वरील डॉक्टर सचिन वंजारी यांच्या ऑपरेशनचा व्हिडीओ पाहून व डॉक्टर विनोद पाटील यांच्या सांगण्यावरून  सुरवसे हे नळदुर्ग येथून रेठरे बुद्रुक पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये ऑपरेशन करण्यासाठी गेले होते. 

प्रविण सुरवसे यांचे त्या वासरा वरती एवढे प्रेम होते की जेव्हा आम्ही त्यांना विचारले की तुम्ही एवढ्या दूर कसे काय घेऊन आला तर त्यांनी असे सांगितले की मी माझ्या मुलावर मी जेवढे प्रेम करतो तेवढेच या वासरा वरती करतो, व हे त्यांचे वाक्य ऐकून आम्ही ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. अशी माहिती उपचार करणाऱ्या डाँक्टर वंजारी यांनी दिली व पुढे सांगीतले की , २२ जुलै रोजी ऑपरेशन चालू केले या ऑपरेशनला सकाळी दहा वाजता सुरुवात केली होती व ते तीन वाजता पूर्ण झाले हे ऑपरेशन डाँ. सचिन वंजारी,  पशुधन विकास अधिकारी रेठरे बुद्रुक व डॉ. विनोद पाटील पशुधन विकास अधिकारी औंढ तसेच दत्ता देसाई, हनुमंत जाधव व इतर सहकारी यांच्या टीमने पाच तास अथक प्रयत्न करून पूर्ण केले ऑपरेशन करत असताना या लहान वासरा वरती डॉक्टरांनी एका पायावर तीन ऑपरेशन करावे लागले पहिले म्हणजे जन्मजात वाकडे असलेले पाय सरळ करणे  हे ऑपरेशन करत असताना जे आखूड असणारे   muscles and tendon ला झेड कट घेऊन लांब करण्यात आले व जोडण्यात आले त्याचबरोबर दुसरी शस्त्रक्रिया म्हणजे सरळ झालेला जो पाय होता त्या ठिकाणी आणि तिथे  कातडी कमी पडत होती ती कातडी दुसऱ्या जागेवरून कापून कमी पडलेल्या जागी बसवण्यात आली त्याला स्किन ग्राफ्टिंग असे म्हणतात तसं बघितलं तर ही शस्त्रक्रिया खूप गुंतागुंतीची आणि क्लिष्ट अशी आहे ही शस्त्रक्रिया माणसांमध्ये करून देखील यशस्वी  होण्याचे प्रमाण खूप कमी आहे पण या वासराच्या प्रेमापोटी आणि ही शस्त्रक्रिया केली तसेच तिसरी शस्त्रक्रिया म्हणजे सरळ केलेला पाय काही दिवस तरी न हलता किंवा तसाच सरळ राहिला पाहिजे. त्याशिवाय या झालेल्या जखमा किंवा जोडलेले muscles and tendons जोडले जाणार नाहीत याकरिता स्टील राँड च्या साह्याने या वासरांमध्ये external fixation केले व ऑपरेशन झाल्यानंतर एक तासाने हे वासरू शुद्धीवर आले त्यानंतर त्या वासराने दूध पिले व आपल्या मालकाबरोबर नळदुर्ग या गावी रवाना झाले. आशी माहिती डाँक्टर वंजारी यांनी दिली.

Labels:

Wednesday, 29 July 2020

तुळजापुरात युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश


तुळजापुर : कुमार नाईकवाडी 

तुळजापुर शहरातील विविध भागातील युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश सोहळा संपन्न झाला. रा.काँ चे युवक जिल्हाध्यक्ष आदित्य गोरे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील तरुण युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस ची विचार धारेवर विश्वास व्यक्त करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा मध्ये प्रवेश केला. 

या मध्ये अनिकेत काठेवाड,रोहीत चव्हाण,गणेश मेटे,रमण शिंदे,करण दराडे यांनी घेतला प्रवेश.या तरुण युवकांनी रा.काँ.मध्ये प्रवेश घेतल्याने उपस्थित प्रमुख मान्यवराच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले.  या वेळी रा.काँ .चे जेष्ट नेते गोकुळ शिंदे, रा.काँ चे युवक चे जिल्हा उपाध्यक्ष सचिन कदम, रा.काँ चे युवक चे शरअध्यक्ष शरद जगदाळे,  रा.काँ युवकचे विद्यार्थी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष दुर्गेश सांळुके, बबन गावडे, अमर चोपदार, संदीप गंगणे, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष फिरोज पठाण, अल्पसंख्याक शहराध्यक्ष तौफीक शेख, व्यापार आघाडी तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार, कार्याध्यक्ष बाळु पेंदे, नितीन रोचकरी, विवेक शिंदे, गणेश नन्नवरे, शशीकांत नवले, समर्थ पैलवान, संकर्षण देशमुख, प्रज्वल अंगुले उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संदिप गंगणे व आभार गणेश नन्नवरे यांनी मानले.

Labels:

उस्मानाबाद जिल्ह्यातील पवन चक्की बंद करा; मनसेचे पर्यावरण मंत्र्याना निवेदन


उस्मानाबाद, दि. 29 : महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री ना. आदित्यजी ठाकरे यांना उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पावसाळ्यात तात्काळ पवन चक्की बंद करण्याबाबतचे निवेदन मनसेचे जिल्हासंघटक अमरराजे कदम,जिल्हा सचिव दादा कांबळे उमरगा-लोहारा विधानसभा अध्यक्ष जालिंदर भाऊ कोकणे यांच्याकडून नुकतेच देण्यात आले.

उस्मानाबाद जिल्ह्यात प्रतिवर्षा पेक्षा यावर्षी कमीच पाऊस झालेला आहे याचे कारण यावर्षीच जिल्ह्यातील पवनचक्की चालू झालेल्या आहेत. पवनचक्कीमुळे आलेले ढग पुढे सरकले जातात की काय असे शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांकडून बोलले जात आहेत.प्रशासनाने वेळीच लक्ष घालावे जेणेकरून पुढील वर्षी दुष्काळीचे चटके सर्वसामान्य व शेतकरी यांना बसू नये अशी ही मागणी मनसेकडून करण्यात आलेली आहे.याबाबींची सरकारकडून चौकशी समिती नेमून शहानिशा करून घ्यावी असे निवेदनात नमूद केलेले आहे.येत्या आठ दिवसात प्रशासनाने या मागणीची दखल नाही घेतली तर संपुर्ण जिल्हाभर तिव्र आंदोलन घेतले जाईल असा इशारा प्रशासनास देण्यात आलेला आहे.

निवेदनावरती मनसेचे जिल्हा संघटक अमरराजे कदम,जिल्हा सचिव दादा कांबळे,अध्यक्ष  उमरगा लोहारा विधानसभा,अजय पवार व अमोल सलगरे यांच्या स्वाक्ष-या आहेत.

Labels:

तुळजापूर घाटातील अवजड वाहतूक बंद करण्याची मनसेची मागणी



तुळजापूर, दि. 29 : शहरालगत असणा-या घाटशीळ घाटात दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत असून सदरील घाटातून येणा-या अवजड वाहनांची वाहतुक बंद करा, अशी मागणी बुधवार रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने तुळजापूर तहसिलदारांना निवेदनाद्वारे करण्यात आली. सदरील निवेदनाची दखल घेत तहसिलदार यांनी तुळजापूर पोलीस ठाणे व सार्वजनिक बांधकाम विभागास तातडीने याग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले. 

तुळजापूर शहरातील सोलापूर रोड हा घाट परिसरात आहे व तो एस आकाराचा आहे. त्यामुळे त्या घाट क्षेत्रात वारंवार अपघाताचे प्रमाण वाढत आहे. या ठिकाणी अनेकांनी आपला जीव सुध्दा गमावला आहे. त्यामुळे घाटातून येणारे सर्व अवजड वाहने बंद करण्यात येवून ते शहराबाहेरील बायपास या मार्गाने सोडण्यात यावे, जेणेकरुन अवजड वाहनास तारेवरची कसरत करण्याची गरज भासणार नाही, असे निवेदनात नमूद केले होते.
या निवेदनावर मनसेचे जिल्हासंघटक अमरराजे कदम, शहराध्यक्ष धर्मराज सावंत,अक्षय साळवे तालुका उपाध्यक्ष, प्रमोद कदम जिल्हाध्यक्ष मनविसे, सुरज कोठावळे जिल्हासचिव मनविसे, समीर शेख जिल्हा उपाध्यक्ष मनविसे, उमेश कांबळे झुंबर काळदाते तालुका उपाध्यक्ष मनसे, सौरभ लोखंडे तालुका अध्यक्ष मनविसे, विशाल माने शहर उपाध्यक्ष मनसे, आदी पदाधिकारी यांच्या स्वाक्षरी आहेत.

Labels:

दहावी परीक्षेत श्रुती पाटील हिस ९९ % गुण; माजी आमदार नरेंद्र बोरगावकर यांच्या हस्ते सत्कार


तुळजापूर, दि. २९ : ग्रीनलँड हायस्कूल उस्मानाबाद येथील विद्यार्थिनी कुमारी श्रुती शहाजी पाटील हिने ९९ टक्के गुण मिळवून प्रशालेत अभिनंदनीय यश मिळवले आहे, याबद्दल माजी आमदार नरेंद्र बोरगावकर यांनी श्रुती हिचा सत्कार केला आहे.

ग्रीनलँड स्कूल उस्मानाबाद येथील विद्यार्थिनी कुमारी श्रुती शहाजी पाटील या विद्यार्थिनीने ९९ टक्के गुण मिळाले आहेत, या यशाबद्दल  माजी आमदार नरेंद्र बोरगावकर, बालाघाट शिक्षण संस्थेचे सचिव उल्हास बोरगावकर पेढा भारवुन तिचा सत्कार केला आहे. कुलस्वामिनी सूतगिरणीचे अध्यक्ष सुनील चव्हाण, वडील शहाजी पाटील, यांच्यासह इतर मान्यवरांनी कुमारी श्रुती पाटील हिचे अभिनंदन केले आहे.

Labels:

श्री तुळजाभवानी मंदीरातील पवित्र कुंडातील जल अयोध्याकडे रवाना


तुळजापूर : कुमार नाईकवाडी 

अयोध्यात उभारण्यात येणाऱ्या श्रीराम मंदीर भूमी पुजन सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील साडेतीन शक्ती पीठापैकी क संपूर्ण अध्यशक्तीपीठ असलेल्या श्री तुळजाभवानी मंदीरातील श्री कल्लोळ व गोमुख तिर्थकुंडातील पविञ जलाचे  विधीवत पुजन करुन हा पविञ जल बुधवार रोजी अयोध्या कडे रवाना करण्यात आले. 

बुधवार दि.२९ जुलै रोजी श्री तुळजाभवानी मंदीरातील 108 नद्याचा संगम म्हणून प्रचलित असलेल्या श्री कल्लोळ व श्री गोमुख  तिर्थ या दोन पविञ कुंडातील जल आणि त्यानंतर श्री रामवरदायनी देवी मंदीरातील देवीच्या पायाचे कुंकु व राम विश्रांती साठी थांबलेल्या घाटशिळ या पविञ स्थानातील मृतिका घेवुन याचे राजेशहाजीमहाध्दार समोर पुजन करुन ते अयोध्या कडे रवाना करण्यात आले.

 यावेळी मंहत दत्तअरण्य महाराज हभप चौरे महाराज, अर्जून सांळुके  विश्व हिंदू परिषदेचे  धाराशिवकर, तालुकाध्यक्ष प्रा काकासाहैब शिंदे आदीसह हिंदूत्ववादी कार्यकर्ते, कार्यकर्त्या यावेळी उपस्थिती होते.

Labels:

तुळजापूर तालुक्यात दहावीच्या परीक्षेत मुलींची बाजी


तुळजापूर : कुमार नाईकवाडी 

तालुक्यातील आरळी बु जिल्हा परिषद प्रशाळेचा निकाल 94 टक्के लागला असून शाळेतील गुणानुक्रमे कु.योगिता व्यंकट माने 91.80 % घेऊन प्रथम,शेख अरबाज मौला 90.40% घेऊन द्वितीय,तर कु.गवळी प्रणाली संजय 88.80% घेत तृतीय क्रमांक मिळवत यश संपादन केले आहे. मुख्याध्यापक,शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

मंगरूळ जिल्हा परिषद प्रशाळेचा निकाल 91.40 टक्के लागला असून शाळेतील गुणानुक्रमे कु.शेख मेहर इमामपाशा 96.20% घेवून प्रथम,कु. ढोकळे अर्पिता अरुण 95.60% घेऊन द्वितीय,कु.गरगडे तनुजा ज्ञानेश्वर 92.60 % घेत तृतीय क्रमांक घेऊन यश संपादन केले आहे. मुख्याध्यापक,शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

मंगरूळ इंदीरा कन्या प्रशालेचा निकाल 100 % लागला असून शाळेतील गुणानुक्रमे कु.गरगडे वैष्णवी वसंत 95.40% घेऊन प्रथम, कु.डोंगरे अक्षता सुरेश 93 % तर लोंढे साक्षी सुभाष 92.60 %  तृतीय क्रमांक घेऊन यश संपादन केले आहे.संस्थापक अध्यक्ष, मुख्याध्यापक,शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

चिवरी येथील दत्तूआण्णा पाटील माध्यमिक विद्यालयाचा निकाल 100 % लागला असून शाळेतील गुणानुक्रमे  कुमारी मनशेट्टी प्रतीक्षा बलभीम 94 % घेऊन प्रथम,मुळे गोविंद रघुनाथ 91 % घेत द्वितीय,मनशेट्टी पल्लवी दतात्रय 82.20%  तृतीय क्रमांक घेऊन यश संपादन केले आहे.संस्थेचे संस्थापक पोपटराव पाटील,अध्यक्षा सौ.मनिषाताई पोपटराव पाटील यांनी उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक व  सर्व शिक्षक स्टाफचे अभिनंदन केले.
महाराष्ट्र विद्यालय तीर्थ बु. शाळेचा निकाल 91.67%  लागला असून शाळेतील गुणानुक्रमे विद्यार्थी कु. नावडे साक्षी शरद 90.20% प्रथम ,कु.स्वाती सोन्याबापू जाधव 86%द्वितीय, पासले संकेत राजेंद्र 86% द्वितीय,कु.पुरी प्रणाली औदुंबर 83.40% तृतीय क्रमांक घेऊन यश संपादन केले आहे.

महात्मा जोतीबा फुले रात्रशाळा तुळजापूर शाळेचा निकाल 73.68 % लागला असून शाळेतील गुणानुक्रमे पुजारी कृष्णा आत्माराम 69.40 % घेऊन प्रथम,भोसले अष्टविनायक दत्तात्रय 64.40 % घेऊन द्वितीय,तर इंगळे आदित्य पांडुरंग 64.20 %  तृतीय क्रमांक घेऊन यश संपादन केले आहे.

तुळजापूर येथील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हायस्कूलचा 86.48 % निकाल लागला असून शाळेतील गुणानुक्रमे युवराज धर्मेंद्र कावरे 98.20 % घेत प्रथम,कु.अंजली दादाराव क्षीरसागर 97 % घेत द्वितीय,तर अमान बशीर आतार 96.20% घेत तृतीय क्रमांक मिळवला असून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे

Labels:

कोरोनाच्या संकटामुळे विज बिल पूर्ण माफ करा; मनसेचे तहसिलदारांना निवेदन


तुळजापूर : कुमार नाईकवाडी 

गेल्या चार महिन्यापासून कोरोनाच्या संकटामुळे पूर्ण अर्थचक्र थांबले आहे. लोंकांच्या हाताला काम नाही.जनता प्रचंड अडचणीत सापडली आहे,त्यामुळे शेती आणि घरगुती चे संपुर्ण वीज बिल माफ करण्याच्या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तहसीलदारांना लेखी निवेदन देऊन करण्यात आले आहे.

तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या या महाभयंकर  महामारीच्या संकटामुळे सर्व व्यवसाय, छोटे-मोठे उद्योग बंद पडले आहेत. तसेच नागरीक गेले चार महिन्यापासुन घरात बसुन आहेत. अशातच विजवितरण कंपनीने भरमसाठ वीज बिल पाठवली आहेत. नागरिक गेल्या ४ महिन्यापासून चिंताग्रस्त असताना हे नवीन आर्थिक संकट ओढवले आहे. सर्व नागरीकांना दिलासा देण्यासाठी म्हणुन तुळजापूर तालुक्यातील सर्व वीज ग्राहकांचे असलेले संपूर्ण वीज बिल माफ करावे.  जर वीजबिल माफ केले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल .असा इशारा देण्यात आला आहे. 

या निवेदनावर महेश जाधव जिल्हाउपाध्यक्ष, मयुर गाढवे विधानसभा अध्यक्ष, मल्लीकार्जुन कुंभार तालुकअध्यक्ष, धनाजी साठे तालुका सचिव, रोहित दळवी तालुकाउपाध्यक्ष, प्रशांत डोलारे तालुकाउपाध्यक्ष, राहुल गायकवाड तालुकाउपाध्यक्ष, अविनाश पवार शहरउपाध्यक्ष, अकाश पवार तालुकाउपाध्यक्ष, शिवाजी झाडपिडे तालुकाउपाध्यक्ष, रूषी माने शहरउपाध्यक्ष वि. से,  युवराज पूरी आदी मनसैनिकांच्या स्वाक्ष-या आहेत.

Labels:

जळकोट येथील पार्वती कन्या प्रशालेचा ९८ टक्के निकाल

                             

जळकोट, दि. २९ : मेघराज किलजे

तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील पार्वती कन्या प्रशालेचा  निकाल ९८ टक्के लागला असून विशेष प्राविण्यासह २२, प्रथम श्रेणीत १६ द्वितीय श्रेणी ४, तृतीय श्रेणीत १ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत  .शाळेची विद्यार्थिनी कु. श्वेता बबनराव मोरे ही ९३.६० टक्के गुण घेऊन जळकोट केंद्रात प्रथम आली आहे. कु. अनुराधा धनाजी जाधव ही ९२.७ टक्के गुण घेऊन केंद्रात द्वितीय आली आहे तर कु. ज्योती खंडू चंदे ही ९२% घेऊन केंद्रात तृतीय आली आहे . तसेच मूलांमधून  आकाश संजयकुमार  सगर  प्रथम ८४.८०, किरण बिराजदार द्वितीय ८१.६०,  घनश्याम कदम तृतीय ८१.२० आला. 

यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष  बंकटराव  कदम, संस्थेचे सचिव महेश  कदम , प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. लता सोमवंशी- कदम , विजयकुमार मोरे ,अभिमन्यू कदम , बसवराज मडोळे ,पंढरीनाथ कदम , सुजाता होटकर , सचिन गुड , तळेकर  यांनी  सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.


Labels:

दिव्या कांबळे हिचे दहावीच्या परीक्षेत यश


जळकोट, दि. २९ : मेघराज किलजे

आर्थिक परिस्थिती बिकट असतानासुद्धा कु. दिव्या कांबळे या विद्यार्थिनींने घवघवीत यश संपादन केले  आहे .तुळजापूर तालुक्यातील कु. दिव्या सचिन कांबळे हिने सुधाकरराव जाधवर माध्यमिक शाळा, पुणे येथून ७२.०० टक्के गुण घेऊन प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाली आहे .तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचं सहकार्य लाभल्यामुळे आणि माझ्या आई-वडिलांच्या अथक परिश्रमामुळे मी हे यश संपादन केले आहे, असं तिने भावुक होऊन सांगितले .  सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 

Labels:

कसई ग्रा.पं. च्या उपसरपंचपदी भाजपाच्या सौ. नुरजान शेख यांची निवड झाल्याबद्दल सत्कार


काटी : उमाजी गायकवाड

तुळजापूर तालुक्यातील कसई येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी भाजपाच्या सौ. नुरजान फत्तु शेख यांची निवड झाल्याबद्दल भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष विजय शिंगाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी कसई गावचे सरपंच सौ अश्विनी विजय शिंगाडे, ग्रामपंचायत सदस्य शेषराव चौधरी, तंटामुक्त अध्यक्ष नागनाथ सापते, शालेय समितीचे अध्यक्ष रमेश कामठे, तानाजी पाटील, महेंद्र सुरवसे, कुंडलिक भोवाळ, रवी कुलकर्णी, धनंजय साखरे, उमेश कबाडे, भाजपाचे अल्पसंख्यांकांचे अध्यक्ष रफिक शेख, प्रदीप पात्रे, पृथ्वीराज कोळी, अमीर शेख, दशरथ घोंगते, लहू सापते, तुकाराम म्हमाणे, सुजित जाधव आदीजण उपस्थित होते.

Labels:

काटी येथील येडेश्वरी प्रशालेची उत्तुंग यशाची परंपरा यंदाही कायम; येडेश्वरी प्रशालेचा 98.18 टक्के निकाल

चि.राम प्रकाश गाटे 94.60 टक्के


काटी : उमाजी गायकवाड 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेचा निकाल बुधवार  दि. ( 29 ) ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला. तुळजापूर  तालुक्यातील काटी  येथील मराठा समाज सेवा मंडळ सोलापूर संचलित, येडेश्वरी कन्या प्रशालेने आपल्या उत्तुंग यशाची परंपरा यंदाही कायम राखत प्रशालेचा 98.18 टक्के  निकाल आहे.  
कु. साक्षी संजय अंधारे 92.60 टक्के

प्रशालेतील यशस्वी  विद्यार्थी,  विद्यार्थीनींचे ग्रामस्थामधून कौतुक केले  जात आहे.  या प्रशालेतून एकूण 55 विद्यार्थी  परिक्षेसाठी बसले होते. त्यापैकी 54 विद्यार्थी उत्तीर्ण झाले  असून  यामध्ये 17 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 25 विद्यार्थी विशेष प्राविण्यात  उत्तीर्ण झाले आहेत.

कु. साक्षी नाबाजी ढगे 89.60 टक्के

 यापैकी प्रथम तीन क्रमांका मध्ये चि.राम प्रकाश गाटे 94.60 टक्के, कु. साक्षी संजय अंधारे 92.60 टक्के, साक्षी नाबाजी ढगे 89.60  टक्के गुण मिळवीत या तीन विद्यार्थ्यांनी संस्था व शाळेच्या उज्ज्वल यशाच्या परंपरेत पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवत सर्वप्रथम येण्याचा मान मिळविला आहे.संस्थेच्या वतीने संस्थापक मनोहर सपाटे, शालेय शिक्षण समितीचे चेअरमन मोहनराव गोरे यांनी प्रशालेची यशाची परंपरा कायम राखल्याबद्दल प्रशालेचे  मुख्याद्यापक सुनिल खेंदाड, सहशिक्षक दिगंबर कदम, किशोर बनसोडे, गणेश गुंगे यांच्यासह यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले.

Labels:

काटी येथील जिल्हा परिषद प्रशालेची उज्ज्वल यशाची परंपरा कायम

महादेव देविदास  हांडे  81.40 प्रथम
महादेव देविदास  हांडे  81.40 प्रथम


काटी : उमाजी गायकवाड

तुळजापूर तालुक्यातील काटी येथील जिल्हा परिषद प्रशालेने  यावर्षीही घवघवीत यश संपादन करीत आपल्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली असून प्रशालेचा 90.90. टक्के निकाल लागला आहे.यंदाच्या मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत येथील जिल्हा परिषद  प्रशालेतील एकूण 22 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी विशेष प्राविण्यात तीन विद्यार्थी, प्रथम श्रेणीत नऊ विद्यार्थी, तर आठ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये चि.महादेव देविदास हांडे 81.40 टक्के, चि. तन्मय सतीश साळुंके 80.40 टक्के, व प्रथमेश जितेंद्र जाधव 79.00 टक्के गुण मिळवित या तिन्ही विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळेच्या उज्ज्वल यशाच्या वैभवशाली परंपरेत पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवत प्रथम येण्याचा मान मिळविला आहे.

तन्मय सतीश साळुंके 80.40

    ग्रामस्थ व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ. शालु प्रफुल्ल म्हेत्रे उपाध्यक्ष अरुण गाटे आणि शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने प्रशालेचे मुख्याध्यापक संजय जाधव, सहशिक्षक अहमद सय्यद, गुरुप्रसाद भूमकर, शिवाजी राठोड, हनुमंत कदम, संजयकुमार भालेराव, श्रीमती क्षिरसागर, श्रीमती सुरवसे, श्रीकांत पांगे, मल्लिकार्जुन घोडके यांच्यासह सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

प्रथमेश जितेंद्र जाधव 79%


Labels: