Sunday, 31 October 2021

सेवानिवृत्त मंडळाधिकारी रोहिदास गुजर यांचे अल्पशा आजाराने निधन

                       

तामलवाडी , दि .३१ :

 बामणी तालुका उस्मानाबाद हल्ली मुक्काम गणेश नगर उस्मानाबाद  येथील सेवानिवृत्त मंडळ अधिकारी रोहिदास शंकर गुजर वय वर्षे 65 यांचे  अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले.

 त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी दहा वाजता कपिलधारा स्मशानभूमी उस्मानाबाद येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात भाऊ,  पत्नी , दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे . त्यांनी लोहारा ,उमरगा, तुळजापूर, उस्मानाबाद या तालुक्यात महसूल विभागात   कार्य केलेले आहे. 

Labels:

मुरुम : लाठी असोसिएशनच्या वतीने राज्यपालांना निवेदन

 


मुरुम,  ता. उमरगा, दि . ३१ : 

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना लाठी असोसिएशन, महाराष्ट्र यांच्या वतीने लाठी हा ग्रामीण भागातील पारंपरिक खेळ असून इतर खेळाप्रमाणे यास विशेष दर्जा देवून क्रीडा विभागाकडून पारंपारिक खेळाच्या यादीत समावेश करण्यात यावा, असे निवेदन शुक्रवारी (ता. २९) रोजी महमदरफी शेख यांनी दिले. 

यावेळी विजय शिगवण व कुमारी श्रेया व्हंडरे उपस्थित होत्या. या निवेदनावर लाठी असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. युसुफ मुल्ला, सरचिटणीस सुराज मोहिते यांच्या सहया आहेत. लाठी या क्रीडा प्रकारास मान्यता मिळून देण्यास योग्य ते सहकार्य करू, अशी ग्वाही माननीय राज्यपालांनी यावेळी दिली.

Labels:

प्रथमच्या माध्यमातून सौर ऊर्जेचे मोफत प्रशिक्षण देऊन युवकांना रोजगार मिळवून देणार - अजय चांदोरकर


उमरगा ,दि .३१ 

देशात बेरोजगारांची  समस्या असताना प्रथम एजुकेशन फाउंडेशन मुंबई शाखा किल्लारी तर्फे बेरोजगार युवकांना मोफत सौर उर्जा प्रशिक्षण देऊन रोजगार मिळवून देणार असे अजय चांदोरकर  यांनी किल्लारी येथे आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यात व्यक्त केले.


  प्रथम एजुकेशन फाउंडेशन किल्लारी येथे आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना व्यक्त केले.  मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख सदाशिव साबळे हे होते
यावेळी श्री चांदोरकर यांनी जगासमोर पर्यावरण बदलामुळे नैसर्गिक समस्या निर्माण झाल्या असून कोळसा पाणी इंधनाची भविष्यात वीज निर्माण करण्यासाठी सौर ऊर्जेशिवाय पर्याय नाही. तेव्हा सुशिक्षित बेरोजगारांनी सौरऊर्जेचे प्रशिक्षण घेऊन स्वतःबरोबर देशाच्याही आर्थिक विकासास हातभार लावावा असे मत त्यांनी व्यक्त केले.


यावेळी श्री साबळे यांनी लातूर उस्मानाबाद जिल्ह्यातील बेरोजगार युवकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले. यावेळी परिसरातील असंख्य बेरोजगार युवक व युवती उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिनेश धुळे यांनी  तर आभार  अंगुल कुमार सूर्यवंशी यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  बालाजी भालेराव, सतीश कांबळे,  विशाल माळी, बसवराज साताळे, सोमनाथ घोडके, बालाप्रसाद पाचंगे, तुषार निधानकर, राम कोथिंबिरे, अरविंद पवार यांनी परिश्रम घेतले.

Labels:

नळदुर्ग : जामे मस्जिदचे इमाम सय्यद खुदबोद्दीन इमामोद्दीन इनामदार यांचे निधन

 


नळदुर्ग , दि .३१


शहरातील जामे मस्जिदचे इमाम (पुजारी ) सय्यद खुदबोद्दीन इमामोद्दीन इनामदार (वय ६५)यांचे अल्पशा आजाराने शनिवार (३०)रोजी रात्री ९वा निधन झाले,रविवारी सकाळी १० वा जामे मस्जिद कब्रस्थान येथे दफनविधी पार पडली,यावेळी राजकीय, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते, त्यांचा पश्चात पत्नी दोन मुली व दोन मुले असा परिवार आहे, पत्रकार जहीर इनामदार यांचे ते चुलते होत.

Labels:

सर्व रोग निदान शिबिरात ५५० रुग्णांची तपासणी; आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम


काटी , दि. ३१  उमाजी गायकवाड 


तुळजापूर तालुक्यातील काटी येथे रविवार दि. (31) रोजी तालुक्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील  यांच्या वाढदिवसानिमित्त येथील ग्रामपंचायत कार्यालयात तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, संचलित तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल,नेरुळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिरात 550  रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार देण्यात आले. 



तर शनिवारी झालेल्या  याच ठिकाणी आयोजित रक्तदान शिबिरात 50 जणांनी रक्तदान केले होते. डॉ.अजित निळे यांच्या नेतृत्वाखाली विविध आजारांचे जवळपास 12 तज्ञ डॉक्टरांनीं या शिबिरात सहभाग घेतला होता. 
        प्रारंभी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव ढगे, विद्यमान जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील,  भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख, सरपंच आदेश कोळी यांच्या हस्ते 
 दीपप्रज्वलन करून या शिबिराचे उदघाटन करण्यात आले. त्यानंतर शिबिरातील विविध आजारांचे तज्ञ डॉक्टरांचे व उपस्थित मान्यवरांचे आयोजन समितीच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

 शिबिरात नोंदणी विभाग, स्त्री रोग विभाग, हृदयरोग विभाग, नेत्र रोग विभाग तसेच औषध वितरण विभाग अशा प्रकारे विविध आजारांचे स्वतंत्र कक्षाची व्यवस्था करण्यात आल्याने रुग्णांची व्यवस्थित तपासणी करण्यात आली होती. या शिबिरात काटीसह परिसरातील 550 गरजू  रुग्णांनी मोफत तपासणी शिबिराचा लाभ घेतला.  या तपासणी शिबिरास तुळजापूर पंचायत समितीच्या सभापती सौ.रेणुकाताई इंगोले यांनी भेट दिली.
        
 यावेळी सभापती रेणुका इंगोले, जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव ढगे, सरपंच आदेश कोळी, पं.स. सदस्य रामहरी थोरबोले, मोतीराम आगलावे, भागवत गुंड, माजी सैनिक श्रीकांत गाटे, जितेंद्र गुंड, बाळासाहेब भाले, संजय महापुरे, मकरंद देशमुख, सुहास साळुंके, अतुल सराफ, अविनाश वाडकर, सतीश देशमुख, पोलीस पाटील सुनंदा म्हेत्रे यांच्यासह डॉ. अजित निळे, डॉ. रोहित दामोदर, डॉ. निशांत शिंदे, डॉ. अक्षय बहिर, डॉ. विनोद ओहळ, डॉ. परविन सय्यद , आशा कार्यकर्त्या, ग्रा.पं.कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

Labels:

तुळजापूर तालुक्यातील लोहगाव येथेजनशुभदा फाउंडेशन चषक 2021 चे रविवार रोजी उदघाटन

नळदुर्ग  , दि . ३१ 

लोहगाव ता. तुळजापूर येथे  ग्रामस्था च्यावतीने आयोजित जनशुभदा फाउंडेशन चषक 2021 चे रविवार रोजी  उदघाटन जनशुभदा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष  सोमनाथ  गुडडे यांच्या हस्ते करण्यात आला.


यावेळी उपस्थित लोहगावचे सरपंच पती रविंद्र दबडे, धनगर समाज महासंघ मराठवाडा अध्यक्ष  सुनील बनसोडे , उपसरपंच प्रशांत देशमुख,अजिंक्य संस्थेचे सचिव राम जवान,  नागनाथ पाटील ,शिवसेनेचे सुनील कदम, सामाजिक कार्यकर्ते  रवी शिंगाडे , फयाज सावकार, प्रवीण पाटील ग्रा. प . सदस्य  निजाम शेख, पोलिस पाटील शिवानंद पाटील,मानेवाडीचे शहाजी हाक्के  यासह अनेक  पदाधिकारी व लोहगाव ग्रामस्थ उपस्थित होते.


 यावेळी सोमनाथ गुडडे यांनी बोलताना हे चषक  युवकाना सोबत घेऊन प्रत्येक वर्षी ठेवणार असुन  ग्रामीण भागातील युवक क्रिडा क्षेञात नावलौकिक मिळवुन यशस्वी व प्ररेणादायी कार्य करावे अशी आपेक्षा व्यक्त केली.

 

Labels:

Saturday, 30 October 2021

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले चव्हाण कुटुंबियांचे सात्वन केले.

वागदरी , दि .३० एस.के.गायकवाड

माजी मंत्री , काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मधुकरराव चव्हाण ‌ यांच्या  पत्नी शालिनीताई  मधुकरराव चव्हाण यांचे अल्पशा आजाराने नुकतेच  निधन झाले. माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या कुटुंबीयांच्या घरी अणदूर ता.तुळजापूर येथे राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भेट देऊन चव्हाण कुटुंबियांचे सात्वन केले.


    कै.शालिनीताई मधुकरराव चव्हाण वय वर्ष 82 वर्ष यांचा नुकतेच पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
  निधनाची बातमी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना कळताच त्यांनी तुळजापूर तालुक्यातील अणदूर  येथे चव्हाण कुटुंबीयांच्या घरी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले.
याप्रसंगी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण , काँग्रेस पार्टीचे प्रदेश सचिव सुनील चव्हाण , जिल्हा परिषद सदस्य बाबुराव मधुकरराव चव्हाण   यांची भेट घेऊन   सांत्वन केले . यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य धीरज पाटील,  प्रकाश चव्हाण, नगरसेवक शहबाज काझीसह जिल्ह्यातील नातेवाईक , हितचिंतक उपस्थित होते.

Labels:

रक्तदान शिबिरात 50 रक्त बाटल्याचे संकलन; साडी चोळीचे वाटप व लसीकरण मोहीम संपन्न


काटी , दि .३० 

तुळजापूर तालुक्यातील काटी येथे शनिवार दि. 30 रोजी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात कोरोना महामारी व अतिवृष्टीने मोठे संकट उभे केले आहे. शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात असून अनेकांचे व्यवसाय बुडाले अशा परिस्थितीत वाढदिवस साजरा न करता विविध  समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्याचे आवाहन करण्यात आले होते. ‌ या आवाहनाला प्रतिसाद देत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख यांच्या पुढाकारातून राणाजगजितसिंह पाटील मित्र मंडळ व भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून येथील ग्रामपंचायत कार्यालयात रक्तदान शिबिर, साडी चोळीचे वाटप व लसीकरण मोहिमचे आयोजन करण्यात आले होते. 


प्रारंभी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख, सरपंच आदेश कोळी, भाजपच्या महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा ॲड. क्रांती थिटे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत रक्तदान शिबीराच्या विधायक उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.कोरोना संकटाच्या काळात अनेक रक्तपेढ्यातील रक्ताचा साठा कमी झाला आहे. रक्ताची टंचाई दुर व्हावी व गरजूं रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे या हेतूने बार्शी येथील श्री भगवंत ब्लड सेंटर बॅंकेच्या सहकार्यातून घेण्यात आलेल्या महा रक्तदान शिबिराला तरुण वर्गासह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या महा रक्तदान शिबिरात सौ.उज्वला प्रकाश हंगरकर या महिलेनेही रक्तदान करुन आपला सहभाग नोंदविला. त्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले. वाढदिवसाला उत्सवी स्वरूप न देता रक्तदाना सारख्या पवित्र कार्यामधून नागरिकांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना 50 जणांनी रक्तदान करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच भाजपच्या महिला मोर्चाच्या तालुकाध्यकक्षा ॲड. क्रांती थिटे यांच्या वतीने 25 महिलांना साडी,चोळीचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. तसेच कोविशिल्ड पहिला व दुसरा डोस लसीकरण मोहीम राबविण्यात आली.यामध्ये पहिला डोस 95 तर दुसऱ्या डोस साठी 5 जणांनी लसीकरण करून घेतले.



आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी  सर्व रोग निदान शिबिर भरविण्यात येत असून दुर्धर आजारावर तेरणा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून मोफत उपचार केले जाणार आहे. या शिबिरात बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख यांनी केले असून रक्तदान  शिबीरात संवेदनशील तरुण म्हणून रक्तदान करणं ही आपली राष्ट्रीय जबाबदारी असून आपले रक्तही कुणाला तरी जीवदान देऊ शकतो. ही जाणीव प्रत्येकाच्या मनात निर्माण होणे गरजे असल्याची भावना व्यक्त केली.

        
 यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख, सरपंच आदेश कोळी,ॲड.क्रांती थिटे, भागवत गुंड,बाळासाहेब भाले, माजी सैनिक श्रीकांत गाटे,माजी सैनिक संतोष थिटे, मकरंद देशमुख, अनिल बनसोडे, संजय महापुरे,अतुल सराफ, अविनाश वाडकर, अविनाश देशमुख, रणजीत देशमुख, नंदु बनसोडे, श्रावण वाघमारे आदीसह ग्रामस्थ भाजप कार्यकर्त्ये उपस्थित होते.

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अरळी (बु.) येथे शालेय साहित्याचे वाटप


 तुळजापूर तालुक्यातील अरळी (बु.)  येथे शनिवार दि. 30 रोजी येथील जिल्हा परिषद माध्यमिक प्रशालेत सकाळी 10:30 वाजता सरपंच गोविंद रंगनाथ पारवे यांच्या वतीने पाचवी ते आठवी मधील विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
       

 यावेळी सरपंच गोविंद पारवे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाजीराव जाधव, उपाध्यक्ष विलास उकरंडे, सोसायटीचे चेअरमन अनिल जाधव, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय गवळी, लक्ष्मण कचरे, कालिदास माने, नागनाथ बचाटे, संजय पारवे, धनाजी धोतरकर, उमेश पुरी, शाळेचे मुख्याध्यापक गौतम राठोड यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

Labels:

Friday, 29 October 2021

नगरपालिका निवडणुका होईपर्यंत कर्मचाऱ्यांच्या मुदतपुर्वी केलेल्या बदल्या रद्द करण्याची आमदार धस यांची राज्य निवडणुक आयुक्ताकडे मागणी


नळदुर्ग , दि. २९ : 


राज्यातील नगरपालिका निवडणुका होईपर्यंत नगर रचना विभागाने  रचना साहय्यक व नगर रचनाकार यांच्या नगरपालिकेच्या बाहेर केलेल्या बदल्या  रद्द करण्याची मागणी विधानपरिषद सदस्य  आमदार सुरेश धस यानी राज्य निवडणुक आयुक्त मुबंई यांच्याकडे लेखी पत्राव्दारे केली आहे.

संचालक नगर रचना व मुल्य निर्धारण विभाग पुणे यांच्या दि. ३० आॕगस्ट २०२१ च्या आदेशान्वये रचना साहय्यक गट ब व साहय्यक नगर रचनाकार गट ब या संवर्गातील ९३ पैकी अंदाजे ७५ कर्मचाऱ्यांच्या बदल्या न.प. च्या बाहेर (साईट पोस्टला) कर्मचाऱ्यांच्या बदल्या मुदतपुर्वी नगरपालिकेतुन इतर ठिकाणी केल्या आहे.

तरी सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेता पालिकेतील भौगोलिक  स्थिती , जणगणना नकाशा , विकास आराखडा नकाशा व प्रभाग रचना याचा आभ्यास झालेला आहे.तसेच निवडणुकीचे संदर्भातील  गोपनिय व महत्त्वाचे  कामकाज करण्यासाठी सदर कर्मचारी ,मुख्याधिकारी व नगरपालिका यांना आवश्यक आहे. तरी ऐन निवडणुकी च्यावेळी त्यांची नियुक्ती  सदर नगरपालिके मध्ये असणे गरजेचे आहे.


या वरिल बाबीचा विचार करुन संबधित कर्मचाऱ्यांच्या संपुर्ण महाराष्ट्रात झालेल्या ९३ पैकी ७५ कर्मचाऱ्यांच्या बदल्या नगरपालिके बाहेर झलेल्या बदल्या रद्द करुन त्याना मुळ नगरपालिके मध्ये नियुक्ती  देण्यासाठी कर्मचा-याच्या बदल्या या निवडणुक  होईपर्यंत रद्द करण्यात याव्यात व संबंधित  नगरपालिकेत हजर होण्याचे आदेश तात्काळ आपल्या स्तरावरुन देण्यात यावेत असेही आमदार धस यानी पञात शेवटी म्हटले आहे. याची एक प्रत नगरविकास विभागाचे प्रधानसचिव , नगरप्रशासन विभागाचे  आयुक्त तथा संचालाक याना पाठविले आहे.


Labels:

जळकोट ग्रामीण बँकेच्या व्यवस्थापकपदी नामदेवराव पाटील

जळकोट,दि.२९  :


तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील शिवाजी चौकातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे नवे शाखा व्यवस्थापक म्हणून नामदेवराव पाटील हे रुजू झाले. 


सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला. अनिकेत यादव यांनी यापूर्वी शाखा व्यवस्थापक म्हणून काम पाहिले आहे. त्यांची सांगली जिल्ह्यात बदली झाल्याने त्यांच्या जागी पाटील यांनी सूत्रे स्वीकारली. यावेळी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे कॅशियर प्रवीण इंगवले, बँक अधिकारी सौरभ माळबोरगावकर, बँक अधिकारी रंजना समरित, बँक कर्मचारी अल्ताफ जमादार, बँक मित्र गणेश वागदरे, बाळू मारेकर, लक्ष्मण कदम, अंकुश भोसले, बँकेचे खातेदार आदीजण उपस्थित होते.

Labels:

तुळजाभवानीच्या आशीर्वादाने प्रदीर्घ सेवा यशस्वी करू शकलो - मुंबई एस. बी. आय. एच. आर. मॅनेजर रमेश खोपकर


तुळजापूर दि २८ :

स्टेट बँक ऑफ इंडिया या शिखर बँकेच्या कारभारामध्ये अनेक वर्ष सेवा करण्याची संधी तुळजाभवानी देवीच्या आशीर्वादाने आपण यशस्वीपणे पार पाडू शकलो असे   निवृत्त एसबीआय मुंबई एच. आर. मॅनेजर रमेश खोपकर यांनी तुळजापुरात  सांगितले .


स्टेट बँक ऑफ इंडिया गोरेगाव मुंबई येथील शाखेमध्ये एच आर मॅनेजर या पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर तुळजापुरात समता नागरी पतसंस्था व संस्कार भारती तुळजापूर यांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष विनोद खपले, ज्येष्ठ उद्योजक किसनराव डोंगरे ,संस्कार भारतीचे प्रदेश लोककला प्रमुख डॉ. सतीश महामुनी, समता पतसंस्थेचे चेअरमन शांताराम पेदे, संस्थापक अध्यक्ष अविनाश धट, संस्कार भारती अध्यक्ष पद्माकर मोकाशे, माजी नगरसेवक चंद्रकांत लोंढे, उद्योजक कालिदास चिवचिवे, पुजारी श्याम शिरसागर, रोटरीचे ज्येष्ठ पदाधिकारी कुंदन कोंडो, पुजारी विजय कदम, पुजारी किसनराव कदम, सेवानिवृत्त अधिकारी आनंद मोरडे, सुधीर महामुनी, सचिव कालिदास भोसले, आकाश धट, राहुल खोपकर यांची याप्रसंगी उपस्थिती होती.


स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशभरातील मोठी बँक असून मुंबई येथील शाखेमध्ये काम करण्याचा अनुभव अत्यंत समाधान कारक होता तत्पूर्वी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी आपण सेवा केली असून प्रदीर्घ काळ बँक संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन आपण चांगले काम केले याचे समाधान असून सर्व वरिष्ठ अधिकारी आणि सहकारी यांनी आपल्यावर विश्वास ठेवून जी जबाबदारी दिली आई तुळजा भवानीच्या आशीर्वादाने आपण पूर्ण केल्याचे यावेळी सेवानिवृत्त शाखाधिकारी रमेश खोपकर यांनी आवर्जून सांगितले. शासन निर्देशाप्रमाणे आयुष्यातील सर्व सेवेमध्ये संबंधित घटकाला न्याय देण्यासाठी आपण पराकोटीचे प्रयत्न केले त्याचबरोबर गरजू व्यापारी यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला असेही त्यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष विनोद खपले यांनी रमेश खोपकर यांचे अभिनंदन केले. उपस्थित मान्यवरांनी अत्यंत कठीण परिस्थिती मध्ये रमेश खोपकर यांनी शिक्षण घेऊन अत्यंत प्रामाणिकपणे व उत्तम समाजाची बँकेच्या माध्यमातून सेवा केली आहे ही सेवा तुळजापूरकर निश्चितपणे कायमस्वरूपी लक्षात ठेवतील त्यांची कार्यपद्धती आणि स्वभाव या गुणवैशिष्ट्यांमुळे ते सदैव प्रशासकीय कामात यशस्वी झाले अशा शब्दात यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने गौरव करण्यात आला.

Labels:

तुळजापूर तालुक्यातील पिंपळा खुर्द येथील तुकाराम बब्रुवान कदम यांचे दुःखद निधन


काटी,  दि. २९


तुळजापूर तालुक्यातील पिंपळा खुर्द येथील तुकाराम बब्रुवान कदम,वय ५५ वर्ष यांचे दिनांक २९ ऑक्टोबर २०२१ रोजी, मुंबई येथे दुःखद निधन झाले आहे,आज सायंकाळी ०७, वाजता पिंपळा खुर्द येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे,त्यांच्या पश्चात एक मुलगी, मुलगा पत्नी असा परिवार आहे,ते शंकर कदम यांचे मोठे बंधू होते.

वात्सल्य सामाजिक संस्थेच्यावतीने शेतकरी गटाच्या कार्यशाळेचे आयोजन

 तुळजापूर  , दि .२९

वात्सल्य सामाजिक संस्थेच्या माध्यमातून कृषी विज्ञान केंद्र, तुळजापूर यांच्या सहकार्याने शेतकरी गटाच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शास्त्रज्ञ डॉ.भगवान अरबाड यांचे मार्गदर्शन लाभले.

डॉ.अरबाड म्हणाले की,बळीराजा सुखी तर सर्वजण सुखी,सध्याचे शेतीविषयक वातावरण ,या हंगामात घेतली जाणारी पिके,पाण्याचे नियोजन,शेतकऱ्यांनी शेतीतील करावयाचे माती-पाणी परीक्षण,रब्बी पिक व्यवस्थापन याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.


मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी च्या माध्यमातून विकसित केलेले ‘बायोमिक्स’ व जैविक खत सर्व शेतकऱ्यांना प्रयोगासाठी देण्यात आले.बायोमिक्स मुळे शेतकऱ्यांना हरभरा,ज्वारी, तुर,कांदा या पिकावर फवारणी केल्याने मर,करपा रोगाला आळा बसून पिकाची जोमाने वाढ होते .हे जैविक खत असल्याने त्याचे इतर परिणाम होत नाहीत.हे बायोमिक्स 150 रुपये किलो या प्रमाणे कृषी विज्ञान केंद्रात उपलब्ध असून त्याचा शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा असे आवाहन केले.


शेतीविषयक पिकाच्या कार्यशाळा,यशस्वी शेतकऱ्यांच्या बांधावर सहली,प्रशिक्षण वर्ग,आधुनिक तंत्रज्ञानातून शेती कशी फायद्याची ठरेल याची माहिती कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून व वात्सल्य च्या सहकार्याने घ्यावी असे आवाहन त्यांनी केले. यावेळी प्रयोगशाळा सहाय्यक   शाम शिंदे व शेतकऱ्यांचा गट उपस्थित होता.

Labels:

Thursday, 28 October 2021

पुणे येथील राज्य स्तरीय कराटे स्पर्धेत तुळजापूरच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी


 तुळजापूर , दि .२८ 

 
 पुणे येथील राज्य स्तरीय कराटे स्पर्धेत तुळजापूर च्या खेळाडूंनी चमकदार कामगीरी करत ०६ सुवर्ण पदक व ०५ रौप्य पदकांसह १७ पदके मिळवली. मोबाईल च्या युगात क्रिडा क्षेत्रात चमकदार कामगीरी करणार्या खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 

    
राष्ट्र पिता महात्मा गांधी जयंती निमित्त 
पुणे शहर कराटे असोसिएशन व युनिव्हर्सल स्पोर्टस् यांचा मान्यतेने एरंडवना, पुणे येथील अनुसया खिलारे माॅडेल स्कूल मध्ये पार पडलेल्या राज्य स्तरीय कराटे स्पर्धेत तुळजापूरच्या खेळाडूंनी चमकदार कामगीरी करत पदकांची लयलूट केली. या स्पर्धेत तुळजापूरच्या खेळाडूंनी  ०६ सुवर्ण पदक,  ०५ रौप्य पदक व ०६ कांस्य पदकासह एकूण १७ पदके मिळवली. या खेळाडूंना न्यू कराटे डू असोशियशनचे सुधाकर उळेकर व ज्ञानेश्वर गाडे यांचे मार्गदर्शन लाभले. फेसबूक आणि व्हाट्सापच्या जमान्यात क्रिडा क्षेत्रात चमकदार कामगीरी करणा-या  खेळाडूंवर अभिनंदन चा वर्षाव होत आहे. 

● सुवर्ण पदक ●

प्रथमेश अमृतराव  , नयन मगर   , वेदीका  दिरगुळे  ,   राजगुरू संघर्ष ,  सार्थक पारदे      
 पवार गणेश 

● रौप्य पदक ●

विनायक चव्हाण  , सिद्धी चव्हाण  ,सृष्टी साळुंखे ,  यश हंगरगेकर  ,  दुर्गेश दिरगुळे      

● कांस्य पदक ●

सुयश पवार  , समर्थ गायकवाड ,  दिशा पवार    श्रेया गिड्डे  , संयोगिता हाजगुडे  , रुद्र मलबा           

Labels:

Wednesday, 27 October 2021

हंगरगामोड व बोरमन तांडा येथे दुभाजकातुन रस्ता सोडा; महामार्गाच्या प्रकल्प संचालकांना मनसेचे निवेदन

जळकोट, दि. २७


      
राष्ट्रीय महामार्ग -६५ , सोलापूर- हैद्राबाद दरम्यान असलेल्या जळकोट ता. तुळजापूर येथील बोरमण तांडा येथे महामार्गावरील दुभाजकातुन रस्ता ( मेडन ओपनिंग ) सोडण्यात यावे व हंगरगा मोड पासुन जळकोट गावापर्यंत सर्व्हिस रोड करण्यात यावा . अशी मागणी दि. २७   रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांनी प्रकल्प संचालक,भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण , सोलापूर यांचेकडे केली आहे .
   वरील दोन्ही ठिकाणी बोरमन तांडा व हंगरगा मोड येथे राष्ट्रीय महामार्गावर मेडन ओपनिंग (दुभाजकातुन रस्ता ) न ठेवल्याने बोरमन तांडा येथील नागरिकांना दस्तापूरकडे २कि.मी. जावून  जळकोटकडे २ कि.मी .परत यावे लागत आहे . तसेच हंगरगा, नंदगाव, बोरगाव आदि गावांकडे जाण्यासाठी हंगरगा मोड पासून दस्तापुरकडे ४ कि .मी. जावुन ४ कि .मी .परत यावे लागते . अथवा जळकोट गावापासून हंगरगा मोड पर्यंत चुकिच्या बाजुने ( राँग साईड ) प्रवास करावा लागत आहे . यामुळे जीव धोक्यात घालुन नाहक त्रास सहन करावा लागत आहे .
   तरी बोरमन तांडा येथील नागरिकांची व हंगरगा मोड येथील प्रवाशांची व वाहनधारकांची गैरसोय तात्काळ दूर करण्यात यावी. अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांनी, प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, सोलापूर यांच्याकडे केली आहे . यावेळी मनसेचे प्रमोद राठोड हे उपस्थित होते . यावर प्रकल्प संचालकांनी तातडीने ही दोन्ही कामे करण्याबाबत आश्वासन दिले असल्याचे श्री . नवगिरे यांनी सांगितले .

Labels:

परप्रांतातील बसच्या वाहक चालकाच्या मनमानी धोरणावर मनसेचा संताप" वाहतूक नियंत्रकाकड़े निवेदन देऊन केली सूचना


नळदुर्ग, दि .२७ : 

कर्नाटक व आंध्रच्या एस.टी वाहक-चालकाच्या मनमानी धोरणावर मनसेने संताप व्यक्त करीत नळदुर्ग एस .टी .बसस्थानक येथिल 
"वाहतूक नियंत्रकाकड़े निवेदन देऊन संबधितावर कारवाईची  केली मागणी.


नळदुर्ग हे एक ऐतिहासिक शहर असून शहरापासुन जवळच असलेले तूळजापुर व अक्कलकोट हे दोन तीर्थक्षेत्र आहेत,नळदुर्ग किल्ला पाहण्यासाठी व देवदर्शनाला येणाऱ्या पर्यटक व भाविक यांना परतीचा प्रवास करताना रात्रीची वेळ झाल्यास कर्नाटक व आंध्रप्रदेश राज्याच्या ये-जा करणा-या एस.टी.बसेसचे वाहक व चालक यांची मनमानी होत असून रात्री अपराञी बस मध्ये प्रवाशांना प्रवेश देत नाहीत,अशा घटना घडत असून वारंवार तक्रारी येत आहेत,काल-परवाच आपल्या महामंडाळाच्या महिला कर्मचारी यांच्या बाबत ही असाच प्रकार घडला आहे,ते आपली सेवा बजावून घरी परतण्यासाठी बस मध्ये चढ़त असताना त्यांना नळदुर्ग येथे गाड़ी न थांबवता उमरगा येथे थांबेल असे बोलून उद्धट वागणूक दिली,व पुढे गाड़ी नळदुर्गला पंधरा मिनिटे थांबली,दिवसा मात्र या परराज्यातील महामंडळाच्या बसेसचे वाहक ओरडुन ओरडुन प्रवाशांना बोलवतात, मात्र रात्रीच्या वेळेस वेगळेच धोरण जर आपल्याच महामंडळ कर्मचा-याबद्दल असे घडत आहे. तर सर्वसामान्य प्रवाशांना किती त्रास होत असेल,तरी याबाबत आपल्या वरिष्ठामार्फ़त संबंधित राज्याच्या एस.टी. महामंडळाकड़े पत्रव्यवहार करावा व अशा मुजोर वृतीच्या वाहक-चालक यांच्यावर कार्यवाही करावी असे नळदुर्ग बसस्थानकचे वाहतूक नियंत्रक यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे .

निवेदनावर जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे, शहराध्यक्ष अलिम शेख,शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी,शहर उपाध्यक्ष रमेश घोड़के यांच्या स्वाक्षरी आहेत,यावेळी शहर संघटक रवि राठोड,रोहित नागरसे, दिलीप राठोड यांच्यासह प्रवासी व नागरिक उपस्थित होते.

Labels:

माजी सैनिक भिमराव बनसोडे यांचे निधन


काटी , दि .२७ 

तुळजापूर तालुक्यातील काटी येथील  माजी ग्रामपंचायत सदस्य तथा माजी सैनिक     भिमराव बाबुराव बनसोडे वय  (74) यांचे रविवार दि.24 रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजता वृद्धापकाळाने  निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रविवारी सायंकाळी काटी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.          त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले, सुना,दोन मुली,जावई  नातवंडे असा परिवार आहे.

Labels:

मनसेच्या वतीने नळदुर्ग नगरपालिकेस विविध मागण्याचे निवेदन

नळदुर्ग , दि .२७ : 

शहरातील वसंतनगर येथील सभागृहाची देखभाल,दुरुस्ती व रंगरंगोटी करा,घर तेथे शौचालय योजनेतील लाभार्थिना प्रोत्साहनपर तिसरा हप्ता वितरित करा, हुतात्मा बगिच्याचे कामे आदीसह इतर  विविध मागण्याचे  निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने नगरपालिकेस  देण्यात आले.

 नळदुर्ग  न. प.मुख्याधिका-यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की,वसंतनगर येथील सभागृह शोभेची वास्तु झाली असून,पालिकेने लाखो रुपये खर्चुन  सभागृह बांधले.  सध्या त्याची  दुरावस्था झाली आहे. सर्वत्र झाड़ाझुडुपामुळे परिसर झाकला आहे,इमारत अस्वच्छ आहे,पडझड होत आहे,रंगरंगोटी नाही,बाजूला शिल्लक असलेल्या जागेत बगीचा करावा,त्याचबरोबर घर तेथे शौचालय योजनेतील लाभार्थीना नगरपालिकेकडून प्रोत्साहनपर ३ हजार रुपयेचा तीसरा हप्ता वितरित करावा, यासाठी वारंवार निवेदनाद्वारे मागणी केली होती, 

त्यासाठी एक वेळेस उपोषण व आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा दिला होता,परंतु  लेखी आश्वासन दिल्यामुळे आंदोलन मागे घेतले होते,किमान आता तरी या योजनेतील लाभार्थिना प्रोत्साहन हप्ता द्यावा,व तसेच शहरातील हुतात्मा बगिचाचे काम पालिकेने ठेकेदारामार्फ़त सुरु केले होते,सदर काम अर्धवट झाले असून,झालेले काम ही उखडून जात आहे,तरी बगिचाचे कामे व सुशोभिकरण लवकरात-लवकर पूर्ण करावे अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेड़ण्याचा  इशारा दिला आहे.

नगरपालिकेचे  कार्यालयीन अधीक्षक लक्ष्मण    कुंभार यांना दिलेल्या निवेदनावर जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे,शहराध्यक्ष अलिम शेख,शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी,जनहित कक्ष व विधी विभागाचे अँड मतीन बाड़ेवाले,शहर उपाध्यक्ष रमेश घोड़के, माजी नगरसेविका सौ.उषा लोखंडे,शहर संघटक रवि राठोड यांच्या स्वाक्ष-या आहेत,यावेळी दिलीप राठोड,रोहित नागरसे आदि उपस्थित होते.

Labels:

Tuesday, 26 October 2021

नवोदितांनी रंगवली काव्य मैफिल


 जळकोट,दि.२६ :मेघराज किलजे


 नवोदित कवीनी काव्य लेखन करण्याअगोदर मनन चिंतन जरुर करावे. त्यामुळे दर्जेदार व ताकदवार साहित्य कागदावर उतरते. असे प्रतिपादन जेष्ठ लेखक कवी समीक्षक संजय पठाडे यांनी सुपा येथे नवोदित कवीना मार्गदर्शन करताना केले . 
    

 दि. २३ रोजी जेष्ठ साहित्यिक प्रशांत वाघ यांच्या संक्लपनेतुन काव्य मैफिलीचे आयोजन केले होते. त्यावेळी  संजय पठाडे अध्यक्षस्थानी होते .कार्यक्रमाचे प्रास्ताविक  प्रशांत वाघ यानी केले . कवी ओमप्रकाश देंडगे यांनी अनाथाची दिवाळी  ही कविता सादर करून  वास्तवाचे दिप पाजळले तर यांच्या पावसाची आठवण करून देणाऱ्या कवितेने पुन्हा श्रावण सरीची आठवण करुन दिली . अमोल सोनवणे यांच्या  शोध स्वत:चा या कवीने  अंतर्मनाचा आरसा दाखवला तर त्याची दुसरी कविता निर्भयाने कोपर्डी,लोणीमावळा व आताच्या जवळा घटनाची आठवण करुन दिली. कानिफ गायकवाड यांनी करोनावर कविता करत अनुभवाचे बोल विषद केले . जेष्ठ लेखक कारभारी बाबर यांनी वास्तव्य जीवनाशी कविता सादर करत  मैफीलीत उत्तोरतर रंग भरवीत नेले . संजय पठाडे यांनी एकसे बढकर एक कवीता गजल सादर केल्या .यात 
   पाहिले मी मोगर्याची रास होताना तुला
    पाहिले मी तुला चंदनाचा वास होताना तुला
     मोडलेले खोपटे पेटलेली भुकही
     पाहिले मी त्या पिलाचा घास होताना .
रोज अत्याचार होती भोवताली सारखे  पाहिले मी सोसण्याचा ञास होताना तुला .
अशा बहारदार कवितानी मैफील रंगत गेली तर कवी सुनिल सोंडकर यानी अप्रतिम रचना सादर करून दुधात साखर टाकण्याचे काम केले. आयोजक कवी यांनी सुमधुर स्वरात करोनावर लावणी सादर करत  दुधाची खीर बनवली .तर सुरेंद्र शिंदे यांनी ही आपल्या शब्दातुन उपस्थिताना सह्याद्रीची सफर घडवली . यावेळी जेष्ठ साहित्यिक विजय लोढे यांनी पूणे येथुन मैफिलीत सहभाग घेत आपल्या रचना सादर केल्या. तसेच सर्वच कवितावर विवचन करत मार्गदर्शन केले. जेष्ठ बहारदार कवी संजय ओहळ  यांनी बहारदार सर्व प्रकारच्या रचना सादर करत .चढत्या राञीत स्वराचे रंग भरले तर त्याच्या फेर धरन्याच्या रचनेने सर्व उपस्थितीताना ठेका धरण्यास भाग पाडले .प्रत्येक कवितेनंतर शेरोशायरी करत संजय ओहळ यांनी अप्रतिम सुञसंचलन केले. यावेळी  वैभव पठारे यांनी ही सहभाग घेतला .एकाहून एक सरस रचना सादर करत उपस्थित कविनी दिपावली अगोदरच शब्दाचे फटाके फोडले . शेवटी कवी अमोल सोनवणे यांनी काव्य सुरात आभार मानले .
बोचर्या थंडीत  एक वरचढ एक रचनानी काव्य मैफिल उत्तोरोतर रंगत गेली .जेष्ठ साहित्यिक विजय लोढे यांनी उपक्रमाचे कौतुक केले.

Labels:

जागतीक कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय सिनियर कुस्ती संघाची कोच म्हणून काटीची भाच्ची शबनम शेख यांची निवड


काटी , दि . २६ : 

तुळजापूर तालुक्यातील काटी येथील हॉटेल व्यावसायिक हेरार मतीन काझी यांची भाच्ची कर्जत ता.अहमदनगर येथील निवासी शबनम शेख हिची भारतीय कुस्ती महासंघाच्या वतीने 
जागतीक कुस्ती संघटनेच्या वतीने बेलग्रेड, सर्बिया (युरोप) येथे  दि. 1 ते 7 नोव्हेंबर 2021 या कालावधीत होणाऱ्या 23 वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय सीनियर कुस्ती संघाची कोच म्हणून निवड करण्यात आली आहे. 



ही स्पर्धा प्रा.शबनम शेख आंतरराष्ट्रीय कोच हे  प्रथम श्रेणीचे (NIS)असून आज पर्यत त्यांनी आशियाई, जागतीक स्पर्धा अशा 15 हून अधिक आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय कुस्ती संघाची कोच म्हणून काम पाहीले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्याचे मंत्री  प्राजक्त  तनपुरे, कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार, आ.संग्राम  जगताप,आ.अरुण  जगताप, आ.बबन पाचपुते, आ.शिवाजीराव कर्डिले ,मा.मंत्री अर्जुन  खोतकर, आ.भीमराव धोंडे , मा. खा.चंद्रकांत खैरे यांच्यासह  शबनम शेख यांच्या आजोळी काटी (ता. तुळजापूर)  येथे  अभिनंदन केले  जात आहे.. 

Labels:

नळदुर्ग : अनाधिकृतपणे काम करणाऱ्या ठेकेदार व अधिकारी यांच्या निषेधार्थ रास्ता रोको आदोंलन



   

 नळदुर्ग , दि . २६:  विलास येडगे

  न्यायालयाच्या  आदेशाचे अवमान करून राष्ट्रीय महामार्ग क्र.६५२ नळदुर्ग--अक्कलकोट या रस्त्याचे अनाधिकृतपणे काम करणाऱ्या ठेकेदार व अधिकारी यांच्या निषेधार्थ  मंगळवार दि.२६ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य अशोक जगदाळे व शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने नळदुर्ग येथे नळदुर्ग--अक्कलकोट रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
    

 राष्ट्रीय महामार्ग क्र.६५२ या रस्त्याच्या संदर्भामध्ये अनेकवेळेस निवेदन देऊन सुद्धा संबंधित ठेकेदार व अधिकारी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद  खंडपीठाचा अवमान करत आहेत. नळदुर्ग - अक्कलकोट रस्त्याच्या कामात शेतकऱ्यांवर अन्याय करून तसेच त्यांच्या जमिनीचा मावेजा न देता त्यांच्या जमिनीमधुन ठेकेदार व अधिकारी रस्त्याचे काम करीत असल्याच्या निषेधार्थ शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने हा रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य अशोक जगदाळे व शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. 


या आंदोलनात शेतकरी संघर्ष समितीचे सरदारसिंग ठाकुर,दिलीप जोशी,नगरसेवक नितिन कासार, सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव, मारुती खारवे, दिलीप नानासाहेब पाटील, काशिनाथ काळे, सुभाष मोरे, हुसेन पटेल, संतोष फडतरे, शिवाजी वऱ्हाडे, खंडू हलकंबे, व्यंकट पाटील, चंद्रकांत शिंदे, ज्ञानोबा सुरवसे, लक्ष्मण निकम, निलकंठ पाटील, नरसिंग निकम, शिवराम लोहार, प्रतापसिंग ठाकुर खुशालसिंग ठाकुर, दशरथसिंग ठाकुर, शरण शिरोळे, अरुण काळे, तोलू करीम शेख, गफूर मुल्ला, तुकाराम सुरवसे, बंडू मोरे, महादेव बिराजदार, प्रभाकर बिराजदार, पंडीत पाटील, गुलाब शिंदे, बडेसाहब कुरेशी, अजमोद्दीन शेख, अजीम कुरेशी, धैर्यशील खताळ--पाटील, पंडित महादेव निकम, अजय नाईक व विलास कोरे यांच्यासह शेतकरी  उपस्थित होते.
      

यावेळी बोलतांना अशोक जगदाळे यांनी म्हटले की, तालुक्याचा लोकप्रतिनिधी चुकीचा निवडला गेल्यामुळे आज शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. तालुक्याच्या लोकप्रतिनिधीला शेतकऱ्यांविषयी कांहीही देणेघेणे नाही. ठेकेदार आणि यांचे लागेबंधे आहेत त्यामुळे संबंधित विभागाचे अधिकारी व ठेकेदार मनमानी करीत न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करीत शेतकऱ्यांना दमदाटी करून अनाधिकृतपणे रस्त्याचे काम करीत आहेत. यापुढे हे खपवुन घेतले जाणार नाही. नळदुर्ग--अक्कलकोट रस्त्याच्या कामात या ठेकेदाराने कुठलीही आडकाठी नसताना नळदुर्ग शहरांतील गोलाई ते बस्थानकापर्यंतचे सर्व्हिस रस्ता, गटार बांधकाम व इतर कामे अर्धवट ठेवले आहेत. अधिकाऱ्यांनी ही अर्धवट कामे पुर्ण करून घ्यावेत. यापुढे ठेकेदार किंवा अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांवर अन्याय केला किंवा शेतकऱ्यांना दमदाटी केली तर त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल. 


शेतकऱ्यांनी एकजुटीने राहुन अनाधिकृतपणे काम होत असेल तर ते होऊ देऊ नये. शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहणार असल्याचे अशोक जगदाळे यांनी म्हटले आहे.
   यावेळी बोलताना कमलाकर चव्हाण यांनी म्हटले की, शेतकऱ्यांना दमदाटी करण्याचा प्रयत्न कुणी करू नये अन्यथा त्यांना त्याचे परीणाम भोगावे लागतील.शिवसेना या शेतकऱ्यांच्या पाठीशी असुन जोपर्यंत न्यायालयाचा निकाल लागत नाही तोपर्यंत या रस्त्याचे काम करू नये. अन्यथा शेतकऱ्यांना सोबत घेऊन हे काम शिवसेना बंद पाडेल असा इशारा कमलाकर चव्हाण यांनी यावेळी दिला. यावेळी शिवसेनेचे उपतालुकप्रमुख सरदारसिंग ठाकुर शहर शिवसेना प्रमुख संतोष पुदाले,दहिटण्याचे उपसरपंच सोमनाथ गुड्डे, शिवसेनेचे सुनिल कदम, दिलीप जोशी यांचीही यावेळी भाषणे झाली. रास्ता रोको आंदोलनानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी श्री कदम, मंडळ अधिकारी जयंत गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर मोटे, पोलिस उपनिरीक्षक बजरंग सरपाळे,एम. एम. शहा व जीविषाचे धनंजय वाघमारे, अच्युत पोतदार यांनी आंदोलनस्थळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

Labels:

पिंपळा येथे पालकांच्या समुपदेशनाने व सहमतीने ऑफलाइन शिक्षण साठी दुसरीची मुले प्रथमच शाळेत


काटी , दि .२६ : 

राज्यात इयत्ता पहिली ते चौथी चे ऑफलाईन वर्ग बंद आहेत. मात्र जिल्हा परिषद शाळा पिंपळा खुर्द येथील शिक्षक श्री. विठ्ठल नरवडे यांनी पालकांच्या परवानगीने दुसरीचा वर्ग सुरू केला आहे. कोरोना काळातील शासनाच्या सूचनांचा अवलंब करून प्रत्यक्ष वर्गात ऑफलाइन शिक्षणास सुरुवात केली आहे. 


यासाठी शाळा व्यवस्थापन समिती , ग्रामपंचायत व पालकांचे सहकार्य मिळत आहे. सध्या दुसरी वर्गात शिकत असलेली मुले प्रथमच ऑफलाइन शिक्षणाचा आनंद व अनुभव घेत आहेत. यासाठी काही पालकांनी स्वतःहून वर्ग प्रत्यक्ष सुरू करण्याबाबत पुढाकार घेतला तर काही पालकांना भेटून स्वेच्छेने आपण ही मुले शाळेत पाठवू शकता याची माहिती प्रत्यक्ष भेटून दिली. पालकांचा त्यास अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला.


लहान वयोगटासाठी श्री. नरवडे यांनी ऑनलाईनचा पर्याय शाळा बंद असताना वापरात आणला होता. मात्र या वयोगटासाठी तो प्रभावी व परिणामकारक दिसून येत नाही. तसेच यासाठी ग्रामीण स्तरावर अधिक समस्यांचाही सामना करावा लागतो. शिवाय यामध्ये शंभर टक्के प्रतिसाद ही नव्हता. त्यामुळे या वयोगटातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळून ,त्यांना शालेय प्रवाहात आणून प्रत्यक्ष ऑफलाइन पद्धतीने दिले अध्ययन अनुभव त्याची शिक्षणातील गोडी वाढविण्यासाठी उपयुक्त ठरतात. मुलांमध्ये शिकण्याची ऊर्मी नैसर्गिक असते प्रत्यक्ष वर्गातच या उर्मिला पोषक वातावरणाची निर्मिती करता येते. वर्गात सध्या 41 पैकी 33 विद्यार्थी उपस्थित असून दररोज मराठी, गणित व इंग्रजी या विषयाचे प्राथमिक धडे या वर्गात दिले जात आहेत. मुले वर्गात इतर मुलांसमवेत अध्ययनाचे धडे गिरवत आहेत. सध्या त्यांना त्यांच्याच वयातील मित्रांचा सहवास, संवाद व प्रत्यक्ष भेटीतून निखळ आनंद मिळत आहे.


शाळा बंद काळाचा परिणाम मुलांच्या शैक्षणिक, शारीरिक व मानसिक आरोग्यावरही झाला आहे. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी ऑफलाईन वर्गातून शिक्षण हाच प्रभावी पर्याय आहे. शिक्षक विठ्ठल नरवडे हे सुरुवातीला मुलांना शाळेची गोडी लागावी, त्यांचे मन शाळेत रमावे यासाठी विविध पर्यायांचा वापर करत आहेत. यामध्ये बडबड गीते, कविता गायन, मनोरंजक खेळ, कागद काम, कृतीयुक्त गीत याद्वारे विद्यार्थ्यांना लळा लावत आहेत.


मुलांना हसत खेळत शिक्षण प्रत्यक्ष मार्गदर्शन व संवाद यातून प्रभावी अशी विद्यार्थी शिक्षक आंतरक्रिया होते. त्यांचं शिक्षण सुलभ होतं. मुलांना शाबासकी, कौतुक यांनी प्रोत्साहित करून त्यांचा शैक्षणिक प्रवास सुकर होतो. हळूहळू मुलांना शाळेची गोडी वाढत आहे. कृतीयुक्त गीते, आवडीनुसार शिक्षण यातून मुले शिकण्याचा आनंद घेत आहेत.

  शिक्षक -विठ्ठल नरवडे , पिंपळा खुर्द

Labels:

Monday, 25 October 2021

जळकोटच्या महिलांची हवाई सफर ; गजेंद्र कदम यांनी घडवला योग


जळकोट, दि.२४ :मेघराज किलजे 


समाजातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या महिला मोलमजुरी करून आपल्या संसाराचा गाडा ओढत असतात. एखाद्या पर्यटन स्थळी जाणे त्यांना अशक्य असते. दूरवरचा प्रवास तर लांबच. अशा समाजातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या २५ महिलांना बेंगलोर ते तिरुपती व तिरुपती ते गुलबर्गा अशी विमानात  हवाई सफर ' घडवून . दूरवरचे स्वप्न सत्यात उतरवले आहे. 


जळकोट ता. तुळजापूर येथील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य गजेंद्र कदम यांनी स्वखर्चातून हि' हवाई सफर  घडवून आणली आहे .
 गजेंद्र हरिदास कदम यांनी  इतर आर्थिक दृष्ट्या सक्षम असणारे लोक स्वतः व कुटुंबाला पर्यटन स्थळी घेऊन जाऊ शकतात. परंतु समाजातील आर्थिक समस्यांमुळे अनेक महिलांना इच्छा असूनही पर्यटन स्थळी जाता येत नाही. अशा निराधार व आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या महिलांनाही दूरवरचे पर्यटन स्थळ पाहता यावे. यासाठी मी व माझे कुटुंब यांनी त्यांच्या समवेत पर्यटन करण्याचा निश्चय केला. या निश्चयाप्रमाणे सर्वसामान्यांना आवाक्याबाहेर असलेला विमान प्रवास आपण घडवावा. अशी मनापासून इच्छा व्यक्त झाली. 


जळकोट गावातील २५ महिलांना विमानातून प्रवास करण्याचा योग आला. हे मी माझे भाग्य समजतो. या महिलांना बेंगलोर ते तिरुपती व तिरुपती ते गुलबर्गा असा विमानप्रवास करून तिरुपतीचे दर्शन घडवले आहे. एक दिवस बेंगलोर शहरातील विविध स्थळांना भेटी देऊन महिलांना बेंगलोर शहर दाखवले आहे.
या विमानाच्या' हवाई सफर ' मध्ये हिरकणाबाई लिंबाजी चंदे, लक्ष्मीबाई श्रीमंत कुंभार, शांताबाई शिवलिंगप्पा कुंभार, शेषाबाई गणपती हासुरे, रूक्‍मीनबाई कुंडलिक जाधव, कस्तुराबाई धानाप्पा कुंभार, यमुनाबाई मारुती अंगुले, उषा प्रल्हाद सुतार, फुलाबाई बाबुराव मडोळे, वंदना विश्वनाथ सगर, शेवंता बाबुराव कदम, महानंदा पंडित साखरे, भारतबाई बाबुराव सुतार, भारताबाई धोंडीबा बोंगरगे, सुनिता जीवन लोखंडे, अश्विनी अनिल मोरे, सुषमा लक्ष्मण कदम, हिराबाई आनंदराव नळगे, शालनबाई शिवशंकर औसेकर, सोनाबाई विठ्ठल कुंभार, गजराबाई कल्लाप्पा कुंभार, मंगल अंगद सगर, शारदा भीम कदम, ललिता आप्पाराव येनकुळे, गंगावती बाबासाहेब गवंडी या महिलांनी विमानातून हवाई सफर करण्याचा आनंद लुटला.


या प्रवासात स्वतः गजेंद्र कदम, पत्नी सौ. सुलभा कदम, मुलगी कु. नम्रता कदम, मुलगा सयाजी कदम व माजी ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र कदम यांनी सेवा बजावली. समाजात स्वतः व कुटुंब याच्यामध्येच अनेक्जण  गुरफटत असतात. परंतु समाजाप्रती काहीतरी करावे. या संकल्पनेतून ही' हवाई सफर 'घडली आहे. असा योग घडवून आणणे हे फार कठीण असते. परंतु गजेंद्र कदम आणि हा योग घडवून आणून सर्वसामान्यांच्या डोळ्यातील स्वप्न सत्यात उतरवले आहे.

Labels:

मुख्यमंत्र्यांचा हस्ते 'वर्षा'निवासस्थानी 'यूपीएससी' तील यशस्वीतांचा गौरव

          

  उमरगा , दि . २५ : 

'यूपीएससी'मध्ये यश संपादन केलेल्या उमरगा तालुक्यातील जवळगा बेट येथील निलेश गायकवाड यांचा रविवार  रोजी मुख्यमंत्री ना . उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई येथील 'वर्षा'निवासस्थानी सत्कार करण्यात आला. 


याप्रसंगी पर्यटन आणि पर्यावरण मंत्री मा आदित्य ठाकरे,उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा.उदय सामंत,परिवहन मंत्री  अनिल परब, रश्मी ठाकरे, आयोजक  विजय कदम यांची उपस्थिती होती.


काही दिवसापूर्वी यूपीएससीचा निकाल लागला आहे.महाराष्ट्रातील गुणवंतांनी घवघवीत यश संपादन आपली करून गुणवत्तेची उज्वल परंपरा कायम ठेवली आहे. या सर्व गुणवंतांचे कौतुक करण्यासाठी आयोजित केलेला सोहळा विद्यार्थ्यांसाठी गौरवास्पद बाब आहे.प्रशासकीय सेवेत पुढील वाटचाल करताना मुख्यमंत्री तसेच इतर मान्यवराकडून मिळालेल्या शुभेच्छा व कलेले कौतुक प्रेरणादायी ठरेल असा विश्वास यशस्वीतांनी व्यक्त केला.

Labels:

जनतेसाठी आरोग्यविषयक जनजागृती अत्यंत महत्त्वाची - जिल्हा आयुष अधिकारी जी.आर. परळीकर


उस्मानाबाद दि २५ : 

उस्मानाबाद जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्यविषयक प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी धोरणात्मक निर्णयांची जनजागृती होणे अत्यंत गरजेचे आहे यादृष्टीने आरोग्य हक्क परिषदेच्या माध्यमातून करण्यात येणारे काम लोकांना उपयोगी ठरणारी आहे असे उद्गार जिल्हा आयुष अधिकारी जी.आर. परळीकर यांनी काढले.


उस्मानाबाद येथे जिल्हा पत्रकार संघाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य हक्क परिषदेच्या व्यासपीठावर जिल्हा आयुष अधिकारी जी आर परळीकर, माध्यम तज्ञ , पत्रकार डॉ. सतीश महामुनी, ज्येष्ठ विधिज्ञ देविदास वडगावकर, निवृत्त जिल्हा बालकल्याण अधिकारी अशोक सावंत, समाजसेविका तृप्ती जोशी, यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. उस्मानाबाद जिल्ह्यातील आठ तालुक्यामधून ६० प्रतिनिधी या जिल्हास्तरीय आरोग्य हक्क परिषदेला उपस्थित होते.


उद्घाटनानंतर पहिल्या सत्राला सुरुवात झाली व यावेळी एकल महिला संघटनेच्या सौ सुरेखा भोसले यांनी आरोग्यविषयक प्रश्नांची मांडणी केली त्याचबरोबर सर्वेक्षणातून हाती आलेले निष्कर्ष या परिषदेमध्ये मांडले. सामाजिक कार्यकर्ते गणेश चादरे यांनी या हक्क परिषदेमध्ये समन्वयाने काम करीत जन आरोग्य समिती मूलभूत आरोग्य विषयक सुविधा सामान्य माणसाला मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे हाती आलेले प्रश्न वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समोर मांडून चर्चने सोडवण्यासाठी येथे प्राधान्य दिले जाईल उस्मानाबाद जिल्ह्यातील आरोग्यविषयक परिस्थिती आणि उपलब्ध असणारी संसाधने त्याचा होणारा उपयोग या अनुषंगाने सातत्यपूर्ण काम केले जाईल असे सांगितले.


एकल महिला संघटनेच्या वतीने कांता शिंदे यांनी उस्मानाबाद शहरातील खाजा नगर येथे घडलेल्या आकस्मित घटनेवरून से आरोग्याचे प्रश्‍न जटिल झाले याचे उदाहरण परिषदेत सांगितले. उमरगा येथील सुमित कोथिंबिरे यांनी याप्रसंगी जन आरोग्य अभियानात सक्रिय होण्याचे आश्वासन दिले. लोकप्रबोधन अध्यक्ष धनाजी धोतरकर यांनी तुळजापूर तालुक्यातील आरोळी बुद्रुक व देवसिंगा येथील आरोग्य केंद्रातील प्रश्न उपस्थित केले. परंडा तालुक्यातील अनुराधा अंबुरे यांनी आरोग्य सेवा देणाऱ्या यंत्रणेमध्ये सुधारणा झाल्या पाहिजेत असा मुद्दा उपस्थित केला.


राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून काम करणारे राज्यातील 22 हजार कंत्राटी कर्मचारी कायम सेवेत होण्याच्या अनुषंगाने प्रयत्नशील आहेत या सर्व कर्मचाऱ्यांना कायम करण्याच्या अनुषंगाने जन आरोग्य समितीने कर्मचाऱ्यांना उच्चस्तरीय सहकार्य करण्याची अपेक्षा  कर्मचारी संघटनेचे एसएस बारकुल यांनी व्यक्त केली. हॅलो संघटनेच्या सामाजिक कार्यकर्त्या वासंती मुळे यांनी याप्रसंगी सखी वन स्टॉप या उपक्रमाची माहिती दिली आणि जिल्ह्यातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले कोरोणा काळात आरोग्य सुविधा देण्यासाठी डॉक्टर आणि इतर कर्मचारी यांच्याकडून देण्यात आलेल्या सुविधा संदर्भात त्यांनी आपले मत जाहीरपणे व्यक्त केले.

सर्वप्रथम सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती जोशी यांनी मराठवाडा आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील आरोग्यविषयक प्रश्नांच्या अनुषंगाने आपले विचार मांडले त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण विवेचना मधून उस्मानाबाद जिल्ह्यातील आरोग्यव्यवस्था बळकट करण्यासाठी आपण काम करू असा निर्धार व्यक्त केला . निवृत्त बालकल्याण अधिकारी अशोक सावंत यांनी जन आरोग्य समिती सामान्य माणसाच्या उपयोगासाठी येणाऱ्या कामासाठी संघर्ष आणि समन्वय या माध्यमातून काम करीत आहे हे स्तुत्य आहे असे सांगितले. ज्येष्ठ विधिज्ञ देविदास वडगावकर यांनी सामान्य माणसाला आरोग्यविषयक सुविधा मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासन बरोबर संवाद ठेवत उणिवा दूर करत काम केले पाहिजे प्रसंगी जिल्हाधिकारी आणि इतर वरिष्ठ अधिकारी यांना यासंदर्भात या प्रश्नाच्या अनुषंगाने लक्ष वेध घेण्याच्या सूचना केल्या पाहिजेत असे सांगितले. माध्यम तज्ञ ज्येष्ठ पत्रकार डॉ. सतीश महामुनी यांनी सामान्य माणसाला शासकीय आरोग्य सेवा आपली आहे याची जाणीव झाल्याशिवाय या सुविधा सक्षम होणार नाहीत आरोग्याचे प्रश्‍न सोडवणे कार्यकर्त्यांनी आपल्या पंचक्रोशी मध्ये आपली ओळख निर्माण करून प्रश्न सोडवण्यासाठी अधिकारीवर्ग बरोबर चर्चा करावी त्यामधून अनेक प्रश्न सुटू शकतील. जन आरोग्य समिती निश्चितपणे सर्व तालुक्यातील प्रश्नासाठी समन्वयाने व चर्चेमधून प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणार आहे असे सांगितले. जिल्हाधिकारी  व जिल्हा परिषद अध्यक्षा यांच्याशी लवकरच शिष्टमंडळ भेटून हे प्रश्न त्यांच्या समोर मांडणार आसल्याचे सांगितले.

आरोग्य हक्क परिषदेसाठी उपस्थित प्रमुख शासकीय अधिकारी जिल्हा आयुष अधिकारी जीआर परळीकर यांनी लोकांची मानसिकता बदलली पाहिजे आणि सर्व लोकांनी सकस आहार घेतला पाहिजे शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करीत प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे महाराष्ट्र शासन विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून लोकांना उपचार देण्याचे काम करते या सर्व योजनांचा लाभ नागरिकांनी घेतला पाहिजे या कामासाठी प्रशासनाकडून ागणारे सहकार्य निश्चित केले जाईल असे आश्‍वासन त्यांनी या जिल्हास्तरीय आरोग्य हक्क परिषदेमध्ये दिले. आरोग्य हक्क परिषदेचे सूत्रसंचालन व आभार धनाजी धोतरकर यांनी मानले

Labels:

तामलवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांचे स्वागत

काटी , दि . २५ : 

तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे रविवार दि.24 रोजी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी हे पती-पत्नी तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुळजापूरकडे जात असताना मराठवाड्याचे प्रवेशद्वार तामलवाडी येथे शाल, फेटा, पुष्पगुच्छ देऊन जंगी स्वागत करण्यात आले. अर्धांग वायूतून बरे होऊन ते प्रथमच पती-पत्नी तुळजाभवानी दर्शनासाठी जात होते.
     

 यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष आदित्य (भैय्या) गोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधानसभा उपाध्यक्ष  शिवाजी सावंत , विधानसभा उपाध्यक्ष ओबीसी सेल विठ्ठल माळी, राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा मीडिया सेलचे अध्यक्ष सर्जेराव गायकवाड, उमेश गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस युवक उपाध्यक्ष महेश गायकवाड, अध्यक्ष मराठवाडा शिवसेवक समिती  निरंजन करंडे,निलेश चिवरे, राष्ट्रवादी काँग्रेस तामलवाडी गण प्रमुख गणेश गुंड, सुरतगाव ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब घोडके, राजेंद्र सुरते,आकाश गुंड, राहुल गुंड आदीसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Labels:

Sunday, 24 October 2021

नळदुर्ग शहरातील इंदिरानगर येथे शनिवारी कोविड लसीकरण मोहिमेत ९१ लाभार्थीन दिले लस

नळदुर्ग , दि .२३ : 


प्राथमिक आरोग्य केंद्र व नगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने शहरातील वार्डनिहाय पहिले कोविड लसीकरण इंदिरानगर येथिल जि . प . प्राथमिक शाळेत  शनिवार दि .२३  रोजी  लसीकरण मोहिमेंचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ९१ लाभार्थीना लस देण्यात आली. 

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन नगरसेविका भारती सुनिल बनसोडे,  नळदुर्ग शहर पञकार संघाचे अध्यक्ष  सुहास येडगे , सामाजिक कार्यकर्ते मारुती खारवे , पञकार विलास येडगे , शिवाजी नाईक, जि. प .शाळेचे मुख्याध्यापक संजय घंटे ,आदीजण  उपस्थित होते.
प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांचे पुष्पगुच्छ  देवुन स्वागत करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मारुती खारवे यानी लसीकरण दरम्यान काही अडचण व गैरसोय निर्माण झाल्यास सर्वतोपरी मदत करण्याचे  बोलताना सांगितले .

  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिचारिका सुमन फुले,    शेख  एस यु, भुजबळ पी. एस , एम आर भुरे , म्हेञे कुसूम ,पद्मा सांगवे आदीसह नगरपालिकेचे कर्मचारी  यानी परिश्रम  घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  , सुञसंचलन, आभार परिचारिका सुमन फुले यानी मानले.

 

लाभार्थी सुशिलाबाई  पटणे याना लसीकरण करुन शुभारंभ करण्यात आला. लाभार्थीना पिण्याचे पाणी व बसण्यासाठी आसन व्यवस्था सामाजिक कार्यकर्ते मारुती खारवे यानी केले.


शहरातील १९ वार्डात  लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. लाभार्थ्यानी यांचा लाभ घेण्याचे आवाहन करुन  भविष्यात लाभार्थी शोधुन ,  घरोघरी जावुन  लसीकरण करण्यात येणार आहे. जेणेकरुन कोविड लसपासुन कुणीही वंचित राहणार नाही. वैद्यकीय  आधिकारी डाँ. राहुल जानराव यांच्या मार्गदर्शनाखाली  शंभर टक्के उद्दिष्ट आपण पुर्ण करण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे नळदुर्ग प्रा. आ. केंदाच्या परिचारिका सुमन फुले यानी सांगितले. 

Labels:

Saturday, 23 October 2021

महामार्गावरील जळकोटमध्ये पाच दुकाने फोडून साडेनऊ लाखाचा ऐवज लंपास


जळकोट,दि.२३ : मेघराज किलजे

तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील संभाजीनगरमधील व्यापारी लाईनचे दुकाने फोडून चोरट्यांनी साडे नऊ लाखाचा ऐवज लंपास केला. ही घटना शनिवार(दि.२३) रोजी मध्यरात्री दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास घडली.


 ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर व्यापारी यांनी खरेदी केलेल्या मालावर चोरट्यांनी डल्ला मारल्याने व्यापार्‍यावर संक्रांत आली आहे.
जळकोट गावच्या मुंबई- हैद्राबाद महामार्गावरुन जळकोटवाडी (नळ) या गावाला रस्ता जातो. रस्त्याच्या बाजूला व्यापाऱ्यांची दुकाने आहेत. या भागातील व्यापाऱ्यांनी नेहमीप्रमाणे दुकाने बंद करून घरी गेले असता, शनिवारी मध्यरात्री २ते ३ वाजण्याच्या सुमारास दुकानांचे शटर उचकटून ठिकठिकाणी जबर चोऱ्या केल्या आहेत. 

चोरट्यांनी पाच दुकानावर डल्ला मारला. उमरगा जनता बँकेच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या सिद्धनाथ सावंत यांच्या तिरुपती मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स या दुकानाचे दक्षिणेकडील दुकानाचे शटर उचकटून दुकानातील दिवाळीनिमित्त खरेदी करून ठेवलेल्या विविध कंपन्यांचे मोबाईल, मोबाईल दुरुस्तीचे साहित्य, टि. व्ही. आदि साडेचार लाखाचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.


संभाजीनगर भागातील गणेश अंगुले यांच्या संजीवनी फुटवेअर या दुकानाचे पश्चिमेकडील असलेला दरवाजा उचकटून गल्यातील रोख रक्कम १७ हजार ५०० रुपये चोरट्यांनी लंपास केले. याच भागातील  अनिल पाटील यांच्या लक्ष्मी किराणा स्टोअर्सचे पूर्वेकडे असलेला दुकानाचे शटर उचकटून गल्यातील अंदाजे चाळीस हजार रुपये चोरट्यांनी पळवले. तर कुठला औषध सचिन सुरवसे यांच्या सचिन ड्रेसेस या दुकानाचे पश्चिमेकडील शटर काढून रोख दहा हजार रुपये व दिवाळीसाठी खरेदी केलेल्या ५१ हजार रुपयाची कपडे चोरट्यांनी चोरून नेले. या दुकानालगत असलेल्या मिलिंद डावरे  यांच्या अमिता क्लॉथ स्टोअर्स हे दुकान फोडून रोख १९००० रुपये व ३ लाख साठ हजार रुपयेचे कपडे   चोरट्यांनी लंपास केले. सर्व दुकानातून जवळपास साडे नऊ लाख रुपयांचा ऐवज लुटला आहे.

संभाजी नगर भागातील आळीपाळीने पाच दुकाने चोरट्यानी एकाच रात्री ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर फोडल्याने व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. या चोरीच्या एक दिवस अगोदर आलियाबाद रोड लगत असलेल्या माऊली मॉल फोडण्याचा चोरट्यानी अयशस्वी प्रयत्न केला होता. याच्या दुसऱ्या दिवशी मोठी चोरी झाली आहे. काही दिवसांवर दिवाळी सण आल्याने व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या मालावर व पैशावर चोरट्यानी डल्ला मारल्याने नागरिकातही भीतीचे वातावरण पसरले आहे. परराज्यातील मोठी टोळी या चोरीमध्ये सक्रिय असावी? अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. मात्र पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

Labels:

काका चषक जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे सचिन पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

 मुरूम,   दि. २३  

 श्री माधवराव पाटील महाविद्यालयातील इनडोअर स्टेडियम मध्ये बापूराव माधवराव पाटील यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त शनिवारी  दि. २३ रोजी आयोजित जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे उद्घाटन उमरगा पंचायत समितीचे सभापती सचिन पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. 

यावेळी नगध्यराक्षा अनिता  अंबर, प्राचार्य डॉ. अशोक सपाटे, उपप्राचार्य चंद्रकांत बिराजदार, माजी नगराध्यक्ष बबन बनसोडे, नगरसेवक श्रीकांत बेंडकाळे, पंचायत समिती माजी उपसभापती गोविंद पाटील, नगरसेवक महेश माशाळकर, श्रीमंत भुरे उपस्थित होते. बापूराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दर वर्षी विविध उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून मुरूम शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा भरवण्यात आलेली आहे. या स्पर्धेत विविध गटातील ६८ संघाने सहभाग घेतला आहे. तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत १४ वर्षे वयोगट एकेरी १६ संघ, दुहेरी ०८ संघ, १९ वर्षे वयोगट एकेरी १६  संघ, दुहेरी ०८ संघ तर खुला गट एकेरी ०८ संघ दुहेरी १२ संघाने सहभाग घेतला असून मुलींचे चार संघ सहभागी आहेत. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते फित कापून व  कै. माधवराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उद्घाटनाचा सामना पालक कोठारी व न्याया हावळे विरुद्ध मयुरी जाधव व भक्ती चौधरी यांच्यात रंगला तर मुलांच्या गटात संग्राम इंगोले विरुद्ध शुभम शेवाळकर व सक्षम शेळके विरुद्ध समर्थ कोकणे यांच्यात रंगला. या सामन्याचे पंच म्हणून डॉ. भिलसिंग  जाधव, प्रा. नारायण सोलंकर, धनराज पवार, सुजित शेळके, अनिकेत इंगोले, निखिल हंगरगे, ओमकार महामुनी, नागेश हंगरगे आदींनी पंच म्हणून काम पाहिले. यावेळी काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष सुधीर चव्हाण व सर्व पदाधिकारी, शरण पाटील मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी तसेच उपप्राचार्य सुधीर अंबर, प्रा. डॉ. रवी आळंगे, प्रा. डॉ. राजू शेख, प्रा. डॉ. सुभाष हुलपल्ले, प्रा. अशोक बावगे, प्रा. सुजित मठकरी, प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले, प्रा. डॉ. राम बजगिरे, हुकुम कौलकर, झुंबर गायकवाड, प्रशांत मुरूमकर, नाना बेंडकाळे, संकेत इंगोले, राहुल वाघ, विकास शिंदे, राम डोंगरे, सुधीर गायकवाड, रूपचंद कारडामे, दीपक कौलकर, रवी माने, दिलीप स्वामी महाविद्यालयातील प्राध्यापक,  शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण गायकवाड तर आभार राजू मुल्ला यांनी मानले.      

Labels:

वात्सल्यचे काम आदर्शवत : पद्मश्री नीलिमा मिश्रा


तुळजापूर दि २२ :    

एकल महिलांमधील वात्सल्यचे काम आदर्शवत आहे असे प्रतिपादन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त, पद्मश्री नीलिमा मिश्रा यांनी महिला प्रबोधन मेळाव्यात केले.

रोटरी क्लब,रोटरी सेवा ट्रस्ट उस्मानाबाद यांच्या सहकार्याने वात्सल्य सामाजिक संस्थेने मंगरूळ येथे महिला प्रबोधन मेळावा आयोजित केला होता.एकल महिलांचे प्रश्‍न,जगण्यासाठी करावी लागणारी धडपड,स्वाभिमानी जीवन जगण्याचे मार्ग या विषयावर नीलिमा मिश्रा यांनी 11 गावांमधून आलेल्या  221 महिलांना बोलते केले.भगिनी निवेदिता ग्रामीण विज्ञान निकेतन च्या माध्यमातून पद्मश्री नीलिमा मिश्रा यांनी गरजू महिलांना स्वतःच्या पायावर उभा करण्याचा संकल्प केला आहे.त्यानिमित्त त्या राज्यभर प्रवास करत आहेत.


चूल आणि मूल यापर्यंतच मर्यादित असणारी महिला आता समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात दैदिप्यमान यश मिळवत आहे,आणि आपणही आता अडचणींचा बाऊ न करता त्यातून मार्ग काढून स्वतःच स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे त्यासाठी रोटरी,वात्सल्य सारख्या संस्था व मी स्वतः केव्हाही मदत करायला तयार आहे.असे मत यावेळी त्यांनी मांडले.व्यासपीठावरून खाली उतरून सर्व महीलांच्या समोर बसून अनौपचारीक व गोष्टीरूपाने स्वयंरोजगार,स्रीधन,उद्योग प्रशीक्षण,मीर्च मसाला प्रकल्प यासंदर्भात संवाद साधला व आलेल्या महीलांनीही मोकळेपणाने सहभाग घेतला.


प्रारंभी हलगीच्या निनादात,महिलांनी औक्षण करून नीलिमा मिश्रा यांचे स्वागत केले.वात्सल्य संस्थेच्या माध्यमातून चालणाऱ्या अनेक उपक्रमांची त्यांनी माहिती घेतली.सदरील कार्यक्रमास उस्मानाबाद येथील उद्योजक श्री.रवींद्र साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती श्री.साळुंके म्हणाले की जगभरातील वंचित बांधवामध्ये रोटरीने दखल घेण्यासारखे काम केले आहे.रोटरी क्लब व रोटरी सेवा ट्रस्ट या एकल भगिनींच्या पाठीशी नेहमीच असेल असे त्यांनी म्हटले.


यावेळी व्यासपीठावर पद्मश्री नीलिमा मिश्रा,रोटरी क्लब उस्मानाबाद चे अध्यक्ष श्री.सुनील गर्जे यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.विशाल सूर्यवंशी यांनी केले,कार्यक्रमाच्या सुरुवातीला युवा भारुडकार कृष्णाई उळेकर यांनी सादरीकरण केले.याप्रसंगी 11 गावातील 221 महिलांसह,संस्था पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.सदरील कार्यक्रम वात्सल्य सामाजिक संस्थेच्या मंगरूळ येथील भुजंग काका घुगे स्मृती सभागृहात संपन्न झाला.

Labels:

तुळजापूर तालुक्यातील चिकुंद्रा येथे निवडणूक साक्षरता मंचची स्थापना

वागदरी, दि .२३: एस.के..गायकवाड

भारत निवडणूक आयोगाच्या मतदारांचे पद्धतशीर शिक्षण आणि निवडणुकीत सहभाग या कार्यक्रमांतर्गत तुळजापूर तालुक्यातील चिकुंद्रा येथील श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालयात निवडणूक साक्षरता मंच स्थापन करण्यात आले आहे. 


परीक्षा मंडळाच्या नियंत्रणाखालील माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयातील नववी ते बारावीतील विद्यार्थ्यांकरिता निवडणूक साक्षरता मंच स्थापन करण्यात यावा यासाठी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिलेल्या निर्देशानुसार सदर निवडणूक साक्षरता मंच स्थापन करण्यात आला आहे .विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया बद्दल माहिती हवी, त्यांच्यामध्ये भावी मतदार म्हणून नाव नोंदणी करण्याविषयी, मतदान करण्याविषयी तसेच लोकशाही विषयी जागरूकता निर्माण करणे हा निवडणूक साक्षरता मंच स्थापनेमागील प्रमुख उद्देश आहे.  जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील सहभागी विद्यार्थ्यांमधून निवडणूक साक्षरता मंचचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्यासह कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आली. मुख्याध्यापक पांडूरंग पवार व सह शिक्षक तथा नोडल अधिकारी  भैरवनाथ कानडे यांच्या उपस्थितीत सहाय्यक नोडल अधिकारी  सत्यवान गायकवाड यांची तर विद्यार्थ्यांमधून , ज्ञानेश्वर मोटे, गोरक्षनाथ नाथजोगी ,साईनाथ मोटे,  संयोगिता जोगी, अपेक्षा गायकवाड, सागर गरड ,मीरा जाधवर आदींची कार्यकारी समिती निवडण्यात आली. या या मंचाच्या माध्यमातून निवडणूक साक्षरता परस्परसंवादी शाळा संवाद .कार्यक्रम, जागतिक मतदार दिन, निवडणूक साक्षरता सप्ताहाचे आयोजन, निवडणूक शिक्षणाशी संबंधित वादविवाद,लघुपट निर्मिती, घोषवाक्य ,चारोळी ,कविता लेखन , परिसंवाद कविता लेखन,चर्चासत्र,लोकशाही या विषयावरव्याख्याने, वक्तृत्व स्पर्धा, भितीपत्रके , पोस्टर बनविणे, याशिवाय निवडणूक आयोगाने निश्चित  केलेल्या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी सहशिक्षक महादेव गरड, वामन चव्हाण आदीसह विद्यार्थी, व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Labels:

तुळजापूर तालुक्यातील काळेगाव येथे ज्वारी बियाण्याचे वाटप


  इटकळ , दि .२३ : 

तुळजापूर तालुक्यातील  काळेगाव येथे रब्बी ज्वारी पिकाचे प्रात्यक्षिक साठी ०४ किलो च्या २५ बॅग चे कृषी सेविका श्रीमती एस टी राजमाने यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी गावातील उपसरपंच आनंराव उंबरे पाटील,  खंडू जाधव, कुमार उंबरे ,काशिनाथ उंबरे, सुरेश मुळे ,आकाश पाटील , बाळू उंबरे ,आमोल उंबरे , प्रकाश साखरे , ग्रामपंचायत शिपाई श्याम काटवटे , आदी  उपस्थित होते.

Labels:

Friday, 22 October 2021

नळदुर्ग नगरपालिकेच्या निवडणूकीसाठी मनसेची जोरदार तयारी जिल्हाध्यक्ष नवगिरे यांनी दिल्या पदाधिका-यांना सूचना


नळदुर्ग ,दि .२२: 


नळदुर्ग नगरपालिकेच्या निवडणूकीसाठी मनसेची जोरदार तयारी जिल्हाध्यक्ष  नवगिरे यांनी दिल्या पदाधिका-यांना सूचना


आगामी नगरपालिका निवडणूकीची मनसेकडून जोरदार तयारी सुरु झाली असून,पक्षाने आता पर्यंत लोकांच्या मनातील विषय  प्रशासनासमोर मांडून ते सोडविण्यासाठी कामे होण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे,शहरातील नागरी प्रश्न ज्या पद्धतीने मनसे आपली भूमिका मांडून प्रशासना समोर मांडते,  त्यामुळे लोकांच्या मनात मनसे बदद्दल आकर्षक वाढत आहे, येणा-या नगरपालिका निवडणूकीसाठी मनसे जोरदार तयारी करत असून ११ ते १२ ठिकाणी आपले उमेदवार उभे करण्याबाबत पदाधिकारी कामाला लागले असून,त्याबाबत काल दि-२१ऑक्टोबर रोजी प्रभाग क्र-१ वसंत नगर येथे मनसेने बैठक आयोजित केली होती,त्या बैठकीत तेथील रहिवासी सुद्धा उपस्थित होते.

यावेळी जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांनी उपस्थितांना मनसेच्या वतीने केलेल्या व करत असलेल्या कार्याच्या जोरावरच आम्ही निवडणूकिला सामोरे जाऊ,व पक्ष पदाधिका-यांना तयारीला लागावे अशी सूचना केली आहे,यावेळी जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे,शहराध्यक्ष अलिम शेख,शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी,जनहित कक्ष व विधी विभागाचे अॅड.मतीन बाड़ेवाले, शहर संघटक रवि राठोड,शहर उपाध्यक्ष रमेश घोड़के, मनविसे शहराध्यक्ष सूरज चव्हाण, सचिव आवेज इनामदार,संदीप वैद्य, दिलीप राठोड,किरण राठोड,सुनील चव्हाण, यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

Labels:

नळदुर्ग महाविद्यालयात शालिनीताई याना श्रद्धांजली अर्पण

      
नळदुर्ग , दि . २२ : 

येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात माजी मंत्री, बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष  मधुकरराव चव्हाण यांच्या धर्मपत्नी  कै. शालीनीताई मधुकरराव चव्हाण यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 

दि. २० शालिनीताई  यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून बालाघाट शिक्षण संस्थेचे संचालक रामचंद्र  आलुरे, प्राचार्य डॉ. संजय कोरेकर, उपप्राचार्य डॉ. रामदास ढोकळे, पर्यवेक्षक प्रा. नेताजी जाधव अधिक्षक धनंजय पाटील आदीसह सर्वांनी    अर्पण केले.
       

यावेळी प्राचार्य डॉ. संजय कोरेकर यांनी शालिनीताई या सात्विकतेच्या मूर्ती होत्या. त्यानी कौटुंबिक पातळीवरती फार मोठी जबाबदारी सांभाळली म्हणूनच चव्हाण मधुकरराव चव्हाण  याना जनतेची सेवा करता आली.  त्या हळव्या मनाच्या होत्या असे भावोद्गार काढले. तर रामचंद्र  आलुरे यांनी तीन पिढ्या पासून चव्हाण कुटुंबीयांबरोबर असलेल्या संबंधाचा उल्लेख करीत शालिनीताईच्या विषयी भावना व्यक्त करत असताना त्या  एक समंजस व्यक्तिमत्व होत्या. सर्वांची आपुलकीने, जिव्हाळ्याने विचारपूस करीत व चव्हाण यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील्या. दोन्ही पुत्रांवरती संस्कार करून सक्षमपणे त्यांना उभे करण्यात त्यांचा  फार मोठा वाटा आहे. त्यानी महिलांसाठी अणदूर क्षेत्रात चळवळ उभी केलेल्या आहेत. हे विसरता येणार नाही.  त्या समाजाभिमुख व्यक्तिमत्व होत्या म्हणुनच सर्वसामान्या विषयी नेहमीच त्या मदतीसाठी अग्रही राहील्या  असे उद्गार रामचंद्र आलुरे  यांनी काढले. 
      

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रास्ताविक संतोष पवार यांनी केले. शेवटी दोन मिनिटे स्तब्ध राहून कै. शालिनीताई  भावपूर्ण श्रद्धांजली वाहीली. यावेळी सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी  उपस्थित होते.

शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने नळदुर्ग येथे मंगळवारी रस्ता रोको आंदोलन

नळदुर्ग , दि .२२:  विलास येडगे

 नळदुर्ग - अक्कलकोट रस्त्याच्या कामात राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व ठेकेदार हे न्यायालयाचा अवमान करीत अनाधिकृतपणे रस्त्याचे काम करीत आहेत. याच्या निषेधार्थ दि.२६ ऑक्टोबर रोजी नळदुर्ग येथे बसस्थानकासमोर राष्ट्रीय महामार्गावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य अशोक जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. 


याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रीय महामार्ग क्र.६५२ नळदुर्ग - अक्कलकोट या रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादीत करून संपादीत क्षेत्र सातबारावरून कमी करून त्याचा मावेजा मिळावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात याचिका क्र.४०२२/२०१९ दाखल केली असुन दि.२८ मार्च २०१९ रोजी संबंधित रस्त्याच्या कामास खंडपीठाने अंतरीम स्थगिती दिलेली असताना संबंधित ठेकेदार व राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी यांनी  न्यायालयाचा अवमान करीत रस्त्याचे काम केले आहे. याविरोधात शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने अनेकदा राज्याचे मुख्यमंत्री, विभागीय आयुक्त संभाजीनगर, उपविभागीय अधिकारी धाराशिव, कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग सोलापुर, पोलिस अधीक्षक उस्मानाबाद  , तहसिलदार तुळजापुर, सहाय्यक पोलिस निरीक्षक नळदुर्ग यांना निवेदनाद्वारे व शेतकऱ्यांनी वैक्तिक निवेदन व अर्ज देऊन सुद्धा संबंधित ठेकेदार रस्त्याचे काम करीत आहे. हे काम करीत असताना जुन्या पुलाचे काम करीत जुने पुरावे नष्ठ करण्याचे काम ठेकेदार व अधिकारी करीत आहेत. याचा निषेध म्हणुन दि.२६ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ११ वाजता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य अशोक जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली नळदुर्ग येथे बसस्थानकासमोरील राष्ट्रीय महामार्गावर शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.



 या निवेदनावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य अशोक जगदाळे व शेतकरी संघर्ष समितीचे सरदारसिंग ठाकुर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनाच्या प्रती, पोलिस अधीक्षक धाराशिव, कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग सोलापुर, उपविभागीय अधिकारी तुळजापुर तहसिलदार तुळजापुर व सहाय्यक पोलिस निरीक्षक नळदुर्ग यांना देण्यात आले आहे.

Labels:

Thursday, 21 October 2021

तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथिल डाँ. जितेंद्र कानडे याना मातृशोक

अणदुर , दि .२१ : 

अणदूर ता.तुळजापूर येथील जेष्ठ महिला कार्यकर्त्या व दमयंती महिला मंडळाच्या माजी अध्यक्ष श्रीमती कांताबाई गुरुनाथ कानडे (वय ७५) यांचे गुरुवारी दि.२१ रोजी सोलापूर येथील खासगी रुग्णालयात अल्पशा आजाराने  निधन झाले.

त्यांच्यावर शुक्रवारी दि.२२ सकाळी १० वाजता अणदूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
त्यांच्या पश्चात चार मुले,एक मुलगी,सुना,नातवंडे असा परिवार असून अणदूर ग्रामपंचायत सदस्य व रविशंकर विद्यामंदिरचे संस्थापक अध्यक्ष डॉ जितेंद्र कानडे व उमरगा येथील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ राजकुमार कानडे यांच्या मातोश्री होत.

Labels:

प्रयाग मल्टीस्टेटच्यावतीनेविविध मान्यवरांचा सत्कार


जळकोट,दि.२१ : मेघराज किलजे 

तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील प्रयाग मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी च्यावतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.


जळकोट येथील प्रयाग मल्टीस्टेटच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात तुळजापूर पंचायत समितीचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेले बोरगाव शाळेचे मनोज चौधरी, जळकोट येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेचे श्रीमती सुरेखा राठोड, जळकोट येथील शिक्षण विस्ताराधिकारीपदी पदोन्नती मिळालेले शिवाजी सुरवसे, जळकोट येथील अंबवा महिला मंडळाच्या अध्यक्षा कस्तुरा कारभारी यांना सोलापूर येथील ड्रीम फाउंडेशनचा डॉ.ए. पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्र उभारणी प्रेरणा पुरस्कार मिळाल्याबद्दल व पुणे येथील उद्योजक राजेंद्र सोनटक्के यांचा प्रयाग मल्टीस्टेट च्या वतीने सुनील कदम व चेअरमन सचिन कदम यांच्या हस्ते भेटा, शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.


या कार्यक्रमास शिवाजी कदम, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष डी. डी. कदम, सुनील कदम, अरुण लोखंडे, विजयकुमार मोरे, श्रद्धानंद स्वामी, महादेव पवार, शेषराव कदम, निळकंठ इटकरी, रमेश औसेकर, शशिकांत कुलकर्णी, सिद्धेश्वर कुंभार, बालाजी माळी, अमित खारे,डॉ. संजय कदम, मनोज कदम, ताजुद्दीन शेख, ब्रह्मानंद कदम, श्रीकृष्ण कदम, साखरे, श्रीमती राजमाने, राजेंद्र चव्हाण आदीसह, संचालक मंडळ, शिक्षक वर्ग , कर्मचारी उपस्थित होते.

Labels:

ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर सोयाबीनचे दर निम्यावर ,शेतकरी हतबल ,दर वाढणार की नाही यामुळे शेतकरी द्विधा मनस्थित

                                                        
 तुळजापूर , दि .२१ राजगुरू साखरे : 


तुळजापूर तालुक्यातील परिसरात पेरणीच्या हंगामात सोयाबीनला तब्बल दहा हजारपेक्षा अधिक दर मिळाला होता . परंतु ऐन शेतकर्‍यांचे सोयाबीन बाजारात दाखल होताच सोयाबीनचे दर घसरतात याला जबाबदार कोण ? असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत ,सध्या परिसरात सोयबीनची काढणी व मळणी अंतिम टप्प्यात आली असून हंगामाच्या तसेच दिवाळी सणाच्या तोंडावर सोयाबीनचे दर दहा हजार प्रती क्विंटलवरून चार हजार नऊशे रूपयवार आल्याने शेतक्यातून नाराजी व्यक्त होत आहे.


 .ऐन सणसुदीत शेतकर्‍यांना दर घसरल्याने दिवाळी सण कसा साजरा करायचा ,असा प्रश्न शेतक्र्यसमोर आहे.यंदा सप्टेंबर व आक्टोंबर महिन्यात झालेल्या अतिव्रस्टी मुळे संपूर्ण सोयबीन पीक हातचे गेले आहे. जे शिल्लक असलेले पीक चिखल तुडवत काढण्यची वेळ शेत्क्र्‍यावर आली आहे . 

पावसामुळे पीक खराब झाले तरी सोयाबीन पीक मोठ्या हिमतीने काढून शेतकर्‍यांनी बाजार दाखल केले ,आता समाधानकारक दर मिळेल अशी अपेक्षा होती परंतु आगस्ट महिन्यापर्यंत आकरा हजार रुपये दराने विकणारे सोयाबीन आक्टोंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ४९०० रुपये प्रती क्विंटल दर मिळत आहे .अगोदरच अतिव्रष्टी मुळे सोयाबीन चे नुसकण झाले असताना आता पुन्हा सणाच्या तोंडावर दर कोसल्याने सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना दुहेरी फटका बसला आहे .

Labels:

काटीत रंगला बाल लावणी महोत्सव; लावणी सम्राट गणेश देशमुख, तेजू पुणेकर , राज सरवदे यांच्या धमाल लावणी नृत्यावर काटीकर झाले मंत्रमुग्ध


काटी , दि . २१ उमाजी गायकवाड


तुळजापूर तालुक्यातील काटी येथे बुधवार दि. 20 रोजी सायंकाळी येथील मावळे सांस्कृतिक,कला, व‌ क्रिडा मंडळाच्या वतीने  नवरात्रोत्सवनिमित्त तळागाळातील सर्वसामान्यांना हवाहवासा वाटणारा,  रसिक प्रेक्षकांच्या दिलावर राज करणारा दिमाखदार लावणी महोत्सव संपन्न झाले. 


 प्रारंभी सरपंच आदेश कोळी, चेअरमन विक्रमसिंह देशमुख, माजी चेअरमन सयाजीराव देशमुख, सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर, पत्रकार उमाजी गायकवाड, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव,मकरंद देशमुख, भैरी काळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत माजी प्राचार्य अशोक लाटकर पती, पत्नी यांच्या हस्ते भवानी देवी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व‌ आरती करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

     
 या कार्यक्रमात स्त्री वेषात इंटरनॅशनल गोल्ड मिडॅलिस्ट लावणी सम्राट गणेश देशमुख (लातूरकर), पुण्याची मैना तेजू पुणेकर, व लावणी रत्न नॅशनल गोल्ड मिडॅलिस्ट राज सरवदे यांच्या धमाकेदार अनेक सदाबहार लावण्यांचे सादरीकरण करण्यात आले. मिक्स लावण्यांनी सर्वांना ठेका धरायला लावला. रसिक प्रेक्षकांनी सतत टाळ्यांच्या कडकडाटात, शिट्ट्यांच्या निनादात, बक्षिसांची खैरात करीत विविध बालकलावंतानी सादर केलेल्या गीतांना मनमुराद दाद दिली.  आकर्षक विद्युत रोषणाईने  परिसरात आनंदी वातावरण निर्माण झाले .
     

पुण्याची फटाकडी, दिलबरा विडा रंगला ओठी, विचार काय हाय तुमचा, मला म्हणतात हो पुण्याची मैना, तुळजाभवानीची शान, छबीदार छबी, मला पिरतीच्या झुल्यात झुलवा, ढोलकीच्या तालावर, तेरे आँखो कायो काजल या सामुहिक नृत्य गीतांवर महिलांसह रसिक प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. नंदिनी पवार या बालकलाकाराने आपल्या अदाकारीने सादर केलेल्या "तेरे आँखो कायो काजल" या गीताला महिलांसह रसिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत अक्षरशः डोक्यावर घेतले. सामूहिक नृत्य, देवींचे गीते,  लावणी,फ्यूजन डान्समध्ये गणेश देशमुख, तेजू पुणेकर, व राज सरवदे (कळंबकर) यांच्यासह  मावळे मंडळातील बालकलावंताच्या
 सादरीकरणाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचलन जुबेर शेख यांनी केले.


कार्यक्रम यशस्वीतेसाठी महेश गाजरे, दिपक हांडे,जुबेर शेख, समीर पठाण, शुभम हांडे, अभिजित माळी, वैभव माळी, मुस्तफा पठाण, अमजद शेख, सचिन शिंदे, अरबाज शेख,रोहन कुंभार, प्रसाद कुंभार, बबलू गायकवाड, ऋषिकेश देशमुख, रजनीकांत राठोड आदींनी परिश्रम घेतले.

Labels:

Wednesday, 20 October 2021

नगरसेवक दयानंद बनसोडे याना शोकाकुल जनसमुदायांनी दिला अखेरचा निरोप


नळदुर्ग  एस.के.गायकवाड:



 नळदुर्ग नगरपरिषदेचे नगरसेवक तथा आंबेडकरी चळवळीतील एक पँथर, स्वाभिमानी आणि संयमी नेतृत्व दयानंद आप्पाराव 
बनसोड यांचे मंगळवारी  निधन झाले असून त्यांना बुधवारी आलियाबाद स्मशानभुमीत सहाश्रुनयनानी उपस्थित जनसमुदायानी  आखेरचा निरोप दिला.


  नगरसेवक दयानंद बनसोडे यांचे दि.१९आँक्टोबर  रोजी दुपारी १.३० वाजता  सोलापूर येथील एका खासगी दवाखान्यात उपचारादरम्यान ह्रदय विकाराच्या झटक्याने  निधन झाले.   मृत्यु समयी त्यांचे वय  59  वर्ष  होते.   दि.२० आँक्टोबर  रोजी दुपारी १२.३० वाजता  त्यांच्या पार्थिवावर बौध्द धम्म संस्कार नुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.

 दिवंगत दयानंद बनसोडे हे महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांनी भारतीय दलित पँथरच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रिय सहभागी झाले होते. सलग तीन टर्म ते भीमनगर, बुद्ध नगर प्रभागातून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. सध्या ते नळदुर्ग न.प.चे विद्यामान नगरसेवक तथा आरोग्य व स्वच्छता समितीचे सभापती होते. दि.१८ आँक्टोबर २०२१ रोजी आयोजित न.प.ची सर्व साधारण सभा ही त्यांची अखेरची सभा ठरली. या सभेत त्यांनी नळदुर्ग बसस्थानका समोरील चौकास डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान चौक असे नाव द्यावे असा ऐतिहासिक ठराव मांडला. तो सर्वानूमते सहमतही झाला आहे.


त्यांच्या निधनाने एका स्वाभिमानी व संयमी कार्यकर्त्याला आपण पोरके झालो आहोत आशा भावपूर्ण शब्दात उपस्थितानी त्यांना
 श्रध्दांजली वाहीली. यावेळी काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी जि.प.सदस्य दिलीप भालेराव, नगरसेवक शहबाज काझी,  मुस्ताक कुरेशी, निरंजन राठोड, विनायक अहंकारी,  बसवराज धरणे, नितीन कासार , महालिंगया स्वामी , शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख  कमलाकर  चव्हाण,  ज्ञानेश्वर घोडके, भाजपचे शहराध्यक्ष पद्माकर , घोडके   काँग्रेसचे शहराध्यक्ष नवाज काझी , सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव , मारुती खारवे , अझर जाहागिरदार ,  माजी नगरसेवक संजय बताले ,  अमृत पुदाले , न. प .चे कार्यालयीन अधिक्षक लक्ष्मण कुंभार , भोईराजचे सुनिल उकंडे, ,रिपाइंचे आनंद पांडागळे, तानाजी कदम,बाबासाहेब मस्के, अरूण लोखंडे, एस.के.गायकवाड, अरुण कदम, वंचित आघाडीचे आर.एस.गायकवाड, अंकुश लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते मारूती बनसोडे, पंडीत भोसलेसह विविध पक्ष व संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Labels:

लसीकरनाला गती देण्यासाठी उमरगा येथे कार्यशाळा संपन्न

उमरगा : दि .२० : 


गाव पातळीवर स्वयंम शिक्षण प्रयोग अंतर्गत गाव पातळीवर लीडर म्हणून काम करणाऱ्या महिलांसाठी उमरगा येथे बुधवारी दि 20 रोजी  एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली यामध्ये विविध विषयासह कोविड १९ प्रतिबंध लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले 

उमरगा पंचायत समिती तसेच स्वयं शिक्षण प्रयोग उस्मानाबाद आणि आरोग्य विभाग  यांच्या संयुक्त विद्यमाने  कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेत पंचायत समितीचे बाल विकास अधिकारी  डि.के. वाघ, तालुका कृषी अधिकारी महेशकुमार बिडवे ,आरोग्य विस्तार अधिकारी एम एम कांबळे यांनी यावेळी  मार्गदर्शन केले 
कोविड 19 लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी  लीडर महिलांना माहिती देण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वयंम शिक्षण प्रयोगाच्या तबसुम मोमीन यांनी केले मोहिमेत प्रकल्प उद्देश , कामाची व्याप्ती, करावयाची कामे तसेच गाव पातळीवर काम करणाऱ्या लिडरची जबाबदारी याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले
स्वयंम शिक्षण प्रयोगचे बाळासाहेब काळदाते , माधव गोरकट्टे ,दीपाली थोडसरे, आकाश लष्करे यांनी महिलांना विविध विषयांवर मार्गदशन केले    कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका समन्वयक शीतल रनखांब ,अंजना साबळे यांनी यांनी परिश्रम घेतले  सूत्र संचलन स्वयंम शिक्षण प्रयोगचे माधव गोरकट्टे यांनी केले

Labels:

कोतवाल संघटनेच्या मागण्या मान्य न झाल्यास सामूहिक रजेवर जाणार : बैठकीत निर्णय


     अककलकोट दि.२०
           
 कोतवाल संघटनेची बैठक दि. 20 रोजी जुना तहसिल कार्यालय अककलकोट येथील कार्यालयात जिल्हाध्यक्ष विठ्ठल गुरव यांच्या उपस्थितीत  संपन्न झाली. 


या बैठकी दरम्यान, जिल्ह्यातील कोतवाल कर्मचारी विविध मागण्यांसाठी आज मिटींग आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कोतवालांच्या कर्मचारी पदोन्नतीबाबत, शासन् निर्णय नुसार अमलबजावणी तात्काळ करणे, सेवा पुस्तक अद्यावत ,अर्जित रजा शिल्लक रक्कम, सेवा जेष्ठता यादी प्रसिद्ध ,राज्य स्तरीय प्रलंबित मागणी अशा विविध मागण्यांसाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती, दरम्यान वरील मागण्या 26 तारखेपर्यंत मान्य न झाल्यास 
 27 तारखेला एक दिवसीय धरणे आंदोलन व  28 रोजी पासून जिल्ह्यातील सर्व कोतवाल कर्मचारी सामुहिक रजेवर जाण्याचा निर्णय जिल्हा बैठकीत झाला असल्याची महिती जिल्हा अध्यक्ष विठ्ठल गुरव यानी सागितले आहे.


   
            
यावेळी तालुका अध्यक्ष शफी वाडीकर,  चौडपा कुंभार, बदेनवाज डफेदार, जिल्हा सहसचिव, प्रविण गुंजले, शिवानद कोळी, सचिव, उपाध्यक्ष रेवणसिद्ध सुतार, सुनिल मुलगे अर्जुन सनके बाबु कोरबु जाकीर कागदे, हसन मुजावर एन के मुजावर, सोमु आलुरे, मातु नागुरे,आर एस कुंभार, फिरोज ताबोळी, दत्ता कोळी,  सुर्यकांत रामपुरे, अर्जुन  सनके, रजाक जमादार, हणमंत सानप,  स्वामीनाथ जमादार, सैपन पठाण बसवराज गायकवाड,   शिवशरण कोळी, व  इतर पदाधिकारी कोतवाल बांधव उपस्थित होते.

Labels: