Tuesday, 30 November 2021

जुन्या पेंशनच्या मागणीसाठी निघालेल्या संघर्ष यात्रा , तुळजापुरात आई तुळजाभवानी मातेला घातले साकडे


तुळजापूर , दि .३० 


महाराष्ट्र राज्य पेन्शन संघर्ष समन्वय समिती आयोजित पेन्शन संघर्ष यात्रेची दि. 22 नोव्हेंबर रोजी मुंबई येथून सुरूवात झाली असुन  ही पेन्शन यात्रा   तुळजापूर तालुक्यात सकाळी  ‌‌9 वाजता आगमन झाले. यावेळी जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समितीच्या वतीने तुळजाभवानी मातेला 1 नोव्हेंबर 2005 नंतर शासकीय सेवेत लागलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी,मयत कर्मचारी यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती वेतन तात्काळ सुरू करावे व  तमाम कर्मचाऱ्यांमधील असंतोष  दूर करण्यासाठी संघर्ष समनवय समितीच्या मागण्या मान्य करण्याचा निर्णय घेण्याची सद्बुद्धी राज्य शासनास द्यावी यासाठी आई तुळजाभवानी मातेस तुळजापूर मध्ये आरती करून साकडे घालण्यात आले. 


यावेळी संघर्ष समन्वय समितीचे प्रमुख  वितेश खांडेकर (राज्याध्यक्ष जुनी पेन्शन हक्क संघटना, महाराष्ट्र राज्य) यांच्यासोबतच गोविंद उगले, प्राजक्त झावरे, सुनील दुधे, संजय सोनार व इतर पदाधिकारी उपस्थित होते. तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

      
  यादरम्यान संघर्ष समन्वय समिती तुळजापूरच्या वतीने राज्यावरून आलेल्या अतिथींचे/ लढवय्या शिलेदारांचे देवीचा फोटो,श्रीफळ व गुच्छ देऊन तुळजापूर नगरीत भव्य स्वागत केले -स्वागताचा हा कार्यक्रम पुजारी मंडळ येथे पार पडला . संघर्ष यात्रा स्वागतासाठी तुळजापूर तालुक्यातून बहुसंख्य शिक्षक ,तसेच जिल्हाभरातील सर्व संघटनांचे प्रमुख पदाधिकारी  लालासाहेब मगर, कल्याण बेताळे, विक्रम पाटील,  बिभीषण पाटील,  धनंजय मुळे,  बशीर तांबोळी, काशीनाथ भालके, चंदन लांडगे,  विशाल अंधारे,  सुखदेव भालेकर,  डी.एस. वाघमारे उपस्थित होते.

Labels:

श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी बालाजी मोकाशे , सचिवपदी सुनील ढेपे यांची फेरनिवड

अणदूर - नळदुर्गच्या श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी बालाजी मोकाशे

सचिवपदी सुनील ढेपे यांची फेरनिवड


अणदूर , दि . ३० :  तुळजापूर तालुक्यातील अणदूर - नळदुर्ग ( मैलारपूर ) येथील श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी बालाजी मोकाशे, उपाध्यक्षपदी अविनाश मोकाशे यांची नव्याने तर सचिवपदी सुनील ढेपे यांची फेरनिवड करण्यात आली आहे.



अणदूर - नळदुर्ग ( मैलारपूर ) येथील श्री  खंडोबा हे जागृत देवस्थान असून, श्री खंडोबा - बाणाई विवाहस्थळामुळे राज्यात प्रसिद्ध आहे.  श्री खंडोबाच्या दर्शनासाठी  महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश . तेलंगणा येथील हजारो भाविक दर्शनासाठी दरवर्षी येत असतात.

१० वर्षानंतर श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी बदलेले आहेत. सचिव सुनील ढेपे वगळता अन्य आठ सदस्य नवीन घेण्यात आले आहेत. मावळते अध्यक्ष प्रकाश मोकाशे यांनी नव्या पदाधिकाऱ्याकडे कार्यभार सोपवला.

नवीन पदाधिकारी असे : अध्यक्ष -  बालाजी  सुधाकर मोकाशे , उपाध्यक्ष  - अविनाश दिलीप मोकाशे , सचिव  - सुनील मधुकर ढेपे
सदस्य -  महेश विठ्ठल  मोकाशे,  शशिकांत यादव मोकाशे , दिपक अशोक मोकाशे ,महादेव गंगाधर मोकाशे , अमोल रमेश मोकाशे , सदानंद खंडेराव येळकोटे.



Labels:

Monday, 29 November 2021

पत्रकार गिरीश भगत यांना महात्मा ज्योतिबा फुले स्मृती ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार जाहीर


लोहारा , दि .२९ : 

स्मृतिशेष रामलिंगप्पा वैरागकर सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्यांना महात्मा ज्योतिबा फुले स्मृती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. पत्रकारिता क्षेत्रातून लोहारा येथील पत्रकार गिरीश भगत यांना महात्मा ज्योतिबा फुले स्मृती ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे.

                     
स्मृतिशेष रामलिंगप्पा वैरागकर सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता, साहित्य, अंधश्रद्धा क्षेत्रात योगदान देणाऱ्यांना महात्मा ज्योतिबा फुले स्मृती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. उमरगा येथे महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिनाचे औचित्य साधून दि. २८ नोव्हेंबर ला हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यात पत्रकारिता क्षेत्रातून लोहारा येथील पत्रकार गिरीश भगत यांना महात्मा ज्योतिबा फुले स्मृती ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारांचे वितरण स्मृतिशेष रामलिंगप्पा वैरागकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त दि. २८ डिसेंबर ला उमरगा येथे होणार आहे. 


यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांचे व्याख्यानही होणार आहे अशी माहिती पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष संजय वैरागकर, सदस्य सूर्यकांत वैरागकर व गिरीजाकांत वैरागकर यांनी दिली आहे.

Labels:

लोहारा येथे स्वखर्चाने खड्डा बुजवून देत घाण पाण्याला वाट करून दिली


लोहारा , दि . २९ 

      
 शहरातील प्रभाग क्रमांक १२ मध्ये पठाण, खडीवाले, शेख व पोतदार यांच्या घराजवळ खडा पडून तुंबलेली घाण पाण्याची गटार व खड्डा येथील सामाजिक कार्यकर्ते विष्णू नारायणकर व नितीन नारायणकर या भावंडांनी रविवारी (दि.२८) स्वखर्चाने जेसीबीच्या साहाय्याने मुरूम आणून बुजवल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.   

         
शहरातील प्रभाग क्रमांक १२ मध्ये पठाण, खडीवाले व शेख यांच्या घराजवळील पाणी पुरवठ्याची मुख्य लाईन फुटल्याने पाईप लाईन दुरुस्तीसाठी नगर पंचायतच्या वतीने मोठा खडा खोदण्यात आला होता. व गटारीचे वाहते पाणी अडवण्यात आले होते. परंतु पाईप लाईन दुरुस्ती केल्यावर खडाबुजवणे व सांडपाण्यासाठी वाट करणे आवश्यक होते परंतु नगर पंचायत प्रशासनाने याकडे साफ दुर्लक्ष केल्याने येथील नागरिकांना तुंबलेल्या गटारीच्या पाण्याचा व पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर वाहणाऱ्या घाण पाण्याचा नाहक त्रास सहक करावा लागत होता. अखेर लोहारा येथील विष्णू नारायणकर व नितीन नारायणकर या भावंडांनी नागरिकांना भेडसावणारी समस्या लक्षात घेऊन स्वखर्चातुन जे.सी.बी च्या खोदकाम करुन व मुरुम आणून टाकत खड्डा बुजवून व तुंबलेल्या गटारीच्या सांडपाणी वाहण्यासाठी स्वच्छता व रस्ता करुन दिल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

Labels:

प्राचीन मंदिरे भारतीय संस्कृती चे साक्षीदार असून त्यांचे संरक्षण झाले पाहिजे - श्री. बसवराज शिवाचार्य महास्वामीजी

नळदुर्ग ,दि .२९ : 

प्राचिन मंदिरे भारतीय  संस्कृतीचे साक्षीदार  आसुन जिथे देव प्रकटले ते स्थान जाग्रत आहेत . अश्या मंदिरांचे संरक्षण प्रत्येक नागरीकांनी केले पाहीजे असे प्रतिपादन नळदुर्ग येथिल श्री.शिवलिंगेश्वर हिरेमठाचे परमपुज्यनिय श्री. श्री.बसवराज शिवाचार्य महास्वामीनी व्यक्त केले.
     

 नळदुर्ग  येथिल ऐतिहासिक जुने मूळ खंडोबा मंदिराचा गेल्या सहा महिन्यापासुन जिर्णोध्दार कार्य सुरु आहे. या कार्यास रविवार दि. २८/११/२०२१ रोजी नळदुर्ग येथिल श्री शिवलिंगेश्वर हिरेमठाचे परमपुज्यनिय महास्वामीजी श्री बसवराज शिवाचार्य महाराज यांनी मंदीरास भेट देवुन जिर्णोध्दार कार्याची पाहणी केली. 


यावेळी श्री बसवराज महास्वामीजी म्हणाले की, हिंदुधर्म हा अखंड आसुन अधर्मी आक्रमकांनी धर्मावर हल्ले करुण अनेक मंदिरे उध्वस्त केली, धर्माचे विभाजन करण्याचाही प्रयत्न केला परंतु त्यात त्यांना यश आले नाही. धर्मात समाज व्यवस्था असली तरी सर्व समाज शिवाशी एकरुप झाला आहे. त्याचेच श्री खंडेराय हे एक उदाहरण आहे. अदिलशाहीत भारतातील अनेक जागृत देवस्थाने अक्रमकांनी जमिनदोस्त केली कांही भ्रष्ठही केली परंतु  हिंदुच्या प्रबळ धार्मिक श्रध्देवर अघात करु शकले नाहीत. कारण या मंदिरातुनच उर्जितावस्था निघत असते. तिथे प्रत्यक्षदेवाचा निवास असतो म्हणुनच पुन्हा मंदिरे मोठ्याप्रमाणात निर्माण  झाली. 


कांही दुर्लक्षित राहीली ती ही आता निर्माण होत आहेत.  प्रत्येक गोष्टीसाठी योग व वेळ यावी लागते तेंव्हाच कार्य होत असते. श्री खंडोबा मंदिराचा योग बऱ्याच वर्षाच्या कालखंडानंतर आला असून देवाच्या इच्छेनुसार हे कार्य होत आहे, तरुणांनी हाती घेतलेले हे कार्य प्रेरणादाई आहे. प्रत्येक कार्यात अडचणी येतच असतात परंतु त्यावर मात करीत जिर्णोध्दार कार्य पुर्ण करावे असे ही महास्वामीजी म्हणाले. प्रारंभी महास्वामीजिंचा मंदिराच्या वतीने सत्कार करण्यात आला.


यावेळी  श्रमिक पोतदार, विलास येडगे, अँड धनराज धरणे, संजय पोतदार शिवलिंग हिरेमठ, ज्योतिर्लिंग बचाटे, विनोद हिरेमठ, राजु मोटे, शशिकांत चौधरी  उपस्थित  होते.

Labels:

अवकाळी पाऊसाचा सांगवी - काटीतील द्राक्षबागेला फटका; शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान


काटी , दि . २९ : 

 तुळजापुर तालुक्यातील काटी मंडळ कृषी कार्यालया अंतर्गत येणाऱ्या सांगवी ( काटी ) शिवारात 22 नोव्हेंबर रोजी झालेल्या अवकाळी पावसाने झोडपुन काढल्याने विलास नागनाथ होळकर यांच्या अडीच एकर द्राक्षबागेचे पुर्णता नुकसान झाले आहे. 


हवामानातील बदल आणि मागील तीन चार दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष बागायतदार हवालदिल झाला आहे. पावसामुळे व ढगाळ वातावरणामुळे गड कुजने, फुलोरा गळणे यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. दावण्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे द्राक्ष बागा वाया जाण्याची भिती शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.  रोजच्या वातावरणातील बदलामुळे द्राक्ष बागेवर विविध प्रकारची महागडी औषधे फवारणी करावी लागत आहे.


 या अवकाळी पाऊसाचा फटका सांगवी (काटी) येथील शेतकरी विलास नागनाथ होळकर यांच्या गट नं. 34 मधील 1 हेक्टर 60 आर. मध्ये द्राक्षबागेला वादळी वारा व अवकाळी पावसाने  बसला असून  लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे. होळकर यांची अडीच एकर द्राक्ष बाग असून ऑक्टोबर मध्ये छाटणी करुन द्राक्षवेलीला फळ धारणा होण्यास सुरुवात होऊन द्राक्षांचे घड निर्मिती होण्यास गती येत असतानाच 22 नोव्हेंबर रोजी पहाटे दोन वाजता अवकाळी पावसाने तब्बल दोन तास अक्षरशः झोडपून काढले पावसाचे पाणी द्राक्षांच्या घडात साचून संपूर्ण अडीच एकरावरील  द्राक्ष बागेचे घड कुजून अतोनात नुकसान झाले.
     

महसूल प्रशासनाच्या वतीने सांगवी (काटी) सज्जाच्या तलाठी संजिवनी स्वामी यांनी शनिवार दि. 27 रोजी प्रत्येक्ष भेट देऊन पंचासमक्ष नुकसानीचा पंचनामा करून अहवाल तहसिल कार्यालयाकडे सादर केला आहे.या पंचनाम्यात लाखोंचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आले. यावेळी रवि मगर, वैभव कोळी, राजेद्र मगर, किशोर केवडकर, उदीत कोळी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.


साडेतीन  लाखाचा खर्च वाया
15 आक्टोबर रोजी अडीच एकर द्राक्षबागेची छाटणी केली छाटणी ते फळ धारणा ,मजुरी औषधे फवारणी . इत्यादी साठी साडे तीन लाखाचा खर्च केला . अवकाळी  पावसाने तो खर्चही वाया गेला आहे घड कुजल्याने संपुर्ण बाग वाया गेली आहे.

विलास होळकर , शेतकरी  ,सांगवी (काटी)

Labels:

हजरत टिपु सुल्तान यांच्या जयंतीनिमित्त नळदुर्ग येथे २१ रक्तदात्यांनी केले रक्तदान

नळदुर्ग , दि . २९ : विलास येडगे

 हजरत टिपु सुल्तान यांच्या जयंतीनिमित्त नळदुर्ग येथे टिपू सुल्तान जयंती कमिटीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात २१ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.


नळदुर्ग येथे हजरत टिपू सुल्तान यांची जयंती मोठ्या उत्साहात व विविध सामाजिक कार्यक्रम घेऊन साजरी केली जाते. सध्या महाराष्ट्रात सर्वच रक्त पेढ्यांमध्ये रक्ताचा मोठ्याप्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे त्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. नळदुर्ग शहर टिपू सुल्तान कमिटीचे अध्यक्ष गौस कुरेशी यांनी याहीवर्षी टिपू सुल्तान जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर घेण्याचे ठरविले. दि.२८ नोव्हेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिर घेण्याचे हे कमिटीचे सहावे वर्ष आहे.
     

या रक्तदान शिबिराचे उदघाटन नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर मोटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन पोलिस उपनिरीक्षक एम. एम. शहा, पत्रकार विलास येडगे, लतिफ शेख, आयुब शेख, हाफीज नियामतुल्ला इनामदार, खालेद इनामदार, सोलापुर नामाचे शोएब काझी, अजय चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते अमर भाळे,अश्विनी ब्लड बँकेचे बिराजदार आदीजन उपस्थित होते. या रक्तदान शिबिरात पत्रकार आयुब शेख यांच्यासह तरुणांनी उत्स्फुर्तपणे रक्तदान केले.
     रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी कमिटीचे अध्यक्ष गौस कुरेशी, उपाध्यक्ष मोहसिन शेख, सचिव वाजिद सौदागर, कोषाध्यक्ष वसिम कुरेशी व कमिटीच्या सर्व कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले.

Labels:

Sunday, 28 November 2021

हॉटेलमधील घाण पाण्यामुळे दुर्गंधी; नागरीकांचे आरोग्य धोक्यात

नळदुर्ग , दि . २८ :विलास येडगे

नळदुर्ग येथे बसस्थानकासमोरील राष्ट्रीय महामार्गावर महामार्गालगत असणारे हॉटेलचालक घाण पाणी सोडत आहेत. त्यामुळे याठिकाणी दुर्गंधी पसरली आहे. त्याचबरोबर कांही हॉटेलचालक तर महामार्गाच्या मध्ये असणाऱ्या दुभाजकामध्ये खरखटे घाण टाकत आहेत. यामुळे महामार्गावर दुर्गंधी पसरली आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने तात्काळ याची दखल घेऊन जे हॉटेलचालक हा प्रकार करीत आहेत त्यांच्यावर कारवाई करून हा प्रकार बंद करावा अशी मागणी होत आहे.

     
नळदुर्ग बसस्थानकासमोरील राष्ट्रीय महामार्गावर सध्या दुर्गंधी पसरली आहे. महामार्गालगत असलेले हॉटेलचालक हॉटेलचे घाण पाणी थेट महामार्गावर सोडत आहेत याचा परिणाम म्हणुन याठिकाणी मोठी दुर्गंधी सुटत आहे. विशेषम्हणजे या घाण व दुर्गंधीयुक्त पाण्यात उभे राहुनच फळे विकण्याची पाळी येथील  फळविक्रेत्यांवर आली आहे. यामुळे फळविक्रेते व ग्राहकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या हॉटेलचालकांचे सांडपाणी जाण्यासाठी याठिकाणी गटार नाही त्यामुळे हे हॉटेलचालक हे घाण पाणी थेट महामार्गावर सोडत आहेत. नळदुर्ग--अक्कलकोट रस्त्याचे काम बसस्थानकासमोर मोठ्याप्रमाणात अर्धवट राहिले आहे. त्यामुळे याठिकाणी गटार करण्यात आलेली नाही त्यामुळे हे हॉटेलचालक महामार्गावर घाण पाणी सोडत आहेत याचा त्रास मात्र नागरीकांना होत आहे. नागरीकांचा हा त्रास कमी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभाग किंवा नगरपालिका प्रशासनाने याठिकाणी गटार बांधणे गरजेचे आहे.


      
कांही हॉटेलचालकांनी तर कहरच केला आहे. बसस्थानकासमोरील पोलिस चौकीसमोर असणाऱ्या महामार्गावरील दुभाजकामध्ये हॉटेलमधील घाण व खरखटे आणुन टाकत आहेत यामुळेही याठिकाणी दुर्गंधी सुटली आहे. जो कोणी हा प्रकार करत असेल त्यांच्यावर राष्ट्रीय महामार्ग विभागाने तात्काळ कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे. नगरपालिका प्रशासनानेही याकडे लक्ष देण्याची गरज आहे. मुठभर लोकांमुळे नागरीकांना त्रास होत असेल किंवा नागरीकांचे आरोग्य धोक्यात येत असेल तर ते योग्य नाही. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभाग व नगरपालिका प्रशासनाने याबाबत कारवाई करावी अशी मागणी होत आहे.


Labels:

तुळजापुर तालुक्यातील चिवरी येथे शंभर टक्के लसीकरण

 
चिवरी , दि. २८ 

तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील 18 वर्षे पुढील ग्रामस्थांचे १०० टक्के लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. गावामध्ये ग्रामपंचायतीकडून कोरोना  लसीकरणा विषयी जनजागृती, चर्चासत्र तसेच घरोघरी जाऊन नागरिकांना लसीकरणाचे महत्त्व पटवून देण्यात आले. 

यामुळे आरोग्य विभाग व ग्रामपंचायतला 100 टक्के  लसीकरण करणे यशस्वी झाली आहे. येथील 18 वर्षे पुढील 2329 नागरिकाचे 100% लसीकरण करण्यात आले आहेत, यासाठी अणदुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ मल्लय्या स्वामी, सरपंच अशोक घोडके उपसरपंच बालाजी पाटील ग्रामसेवक गोरोबा गायकवाड, पोलीस पाटील योगेश बिराजदार,   आरोग्य सेवक निखिल डांगे, आरोग्य सेविका सुनिता माने, अंगणवाडी सेविका अनिता बिराजदार, उषाबाई नगदे, कल्पना शिंदे रेश्मा चिमणे, लक्ष्मी मेंढापूरे आशा कार्यकर्त्या अर्चना राजमाने राजश्री कांबळे,ग्रामपंचायत लिपिक अनिल देडे, संगणक चालक शंकर झिंगरे, कल्याण स्वामी ,धनाजी कोरे आदींनी पुढाकार घेतला होता.

Labels:

तुळजापूर शहरात कचरा कुंडीची सोय करण्याची मागणी

 तुळजापूर ,दि . २८ : 


 शहरात किसान चौकी ते आठवडा बाजार, कणे गल्ली, मटन मार्केट, साळुंके गल्ली या ठिकाणी कचरा कुंडीची सोय करण्याच्या मागणीचे  येथील समस्त नागरिकांनी मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे .

वरिल भागातील कचरा समस्या गंभीर झाली असून या भागात कचराकुंडी नाही तरी अधिकृत कचराकुंडी देण्यात यावे अशी मागणी  येथील रहिवाशांनी केली. सदरील निवेदनावर विजयकुमार नवले, बाबासाहेब पेंदे, विवेक इंगळे, विठ्ठल झाडपिडे, शिवाजी क्षिरसागर, तानाजी भोसले, अशोक पेंदे, विजय भोसले, उत्तम अमृतराव, बाळासाहेब नाईकवाडी, देवेंद्र झाडपिडे आदींसह अनेक नागरिकांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Labels:

दिवाळीपूर्वी विमा देण्याची घोषणा हवेतच, शेतकऱ्यांचा विमा कंपनीबद्दल संताप, तत्काळ विमा वाटप करण्याची शेतकऱ्यांमधून मागणी



 उस्मानाबाद , दि . २८ : राजगुरू साखरे

 उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये यंदा सुरुवातीच्या काळात वेळेवर पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपुन घेतल्या, नंतर बदलत्या वातावरणामुळे खरीप पिकांना मोठा फटका बसला, त्यामध्ये सुरुवातीला पावसाचा खंड पडला, त्यामध्ये उत्पन्नाच्या 50 टक्क्यांहून अधिक घट झाली. त्यानंतर सप्टेंबर, ऑक्टोबर मध्ये अतिवृष्टी झाली. अशा संकटाचा सामना करत असताना शेतकर्‍यांना आता पिक विमा कंपनीच्या कारभाराने गोंधळात टाकले आहे.


 संबंधित विमा कंपनीने दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 25 टक्के  अग्रिम विमा देण्याची घोषणा केली होती . परंतु हा पिक विमा जिल्ह्यातील  बोटावर मोजता येईल इतक्यात शेतकऱ्यांना मिळाला आहे. दिवाळी सण होऊन एक महिना होत आला तरी अद्याप शेतकऱ्यांना पिक विमा मिळालेला नाही. यंदा जिल्ह्यात शेतकऱ्यांनी उसनवारी करून ,लाखो रुपयांचा विमा संबंधित विमा कंपनीकडे भरला आहे, भरल्यापोटी एक दमडीही अजुन शेतकऱ्यांना मिळाला नाही , दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना विमा हप्ताची रक्कम देण्याची कबुली दिली असताना वेगवेगळी कारणे पुढे करून नफेखोरी विमा कंपनीने शेतकर्यांना वेठीस धरले आहे. त्यामुळे विमा कंपनी बद्दल शेतकऱ्यांमधून असंतोष पसरला आहे . 

त्याचबरोबर गतवर्षी २०२० खरीप हंगामाचा  आणि चालू वर्षीचा खरीप हंगामाचा पिक विमा तात्काळ वाटप करण्यात यावा अशी मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून होत आहे.

Labels:

प्रभाकर जाधव यांना राष्ट्रीय चर्मकार शिक्षक महासंघाचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान


                                 
तामलवाडी:-दि २८ 

 सरस्वती विद्यालय तामलवाडी ता. तुळजापूर  येथील क्रीडाशिक्षक तथा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राज्य कार्यकारणी सदस्य प्रभाकर जाधव यांना त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल नुकताच सोलापूर येथील कार्यक्रमांमध्ये राष्ट्रीय चर्मकार शिक्षक महासंघाच्या वतीने  राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


 राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माजी समाजकल्याण मंत्री बबनराव घोलप यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला .या कार्यक्रम प्रसंगी सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे, राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोक लामतुरे, सी .के. मुरळीकर, सुरेखाताई लामतुरे, प्रदेश युवक अध्यक्ष नितीन शेरखाने, प्रदेश कार्याध्यक्ष संजय बाबा शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष मधुकर गवळी, प्रदेश कोषाध्यक्ष राम कबाडे, जिल्हाध्यक्ष अजय राऊत, चर्मकार शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब अडसूळ ,गणेश तूपसमुद्रे, भैरवनाथ कानडे ,सोमनाथ बनसोडे, नगरसेविका संगीता जाधव यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला.

Labels:

महात्मा ज्योतिबा फुले यांची 131वी पुण्यतिथी साजरी

लोहारा , दि .२८ 

                                                           शहरातील शिवनगर येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची 131वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी प्रतिमेचे पुजन संजय दरेकर यांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले.        
   

 याप्रसंगी जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक अविनाश माळी, माजी पं. स. सदस्य दिपक रोडगे, सुग्रीव माळी, सतिश माळी, अशोक दुबे, माजी नगरसेवक श्रीनिवास माळी, राम क्षिरसागर, राजेंद्र क्षिरसागर, अमोल माळी, अशोक क्षिरसागर, ज्ञानेश्वर क्षिरसागर, राहुल माळी, प्रकाश कांबळे, बंट्टी फुलसुंदर, मधुकर भरारे, यांच्यासह आदी उपस्थित होते.

Labels:

Saturday, 27 November 2021

नळदुर्ग शहरात संविधान दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर संविधान चौक फलकाचे आनावरण



नळदुर्ग , दि .२७ : 


नळदुर्ग  येथे संविधान दिन विविध उपक्रमाने साजरा करण्यात आले असून संविधान दिनाचे औचित्य साधून येथील बसस्थानका समोरील चौकास डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान चौक या  नामकरणाच्या फलकाचे भिमसैनिकानी केले आनावरण 


  सार्वजनिक संविधान गौरव समिती नळदुर्गच्या वतीने येथील बसस्थानका समोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान चौकात ७२ व्या संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
 या कार्यक्रमाच्य अध्यक्षस्थानी  नगरसेवक नितीन कासार हे  तर प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक, शहबाज काझी , विनायक अहंकारी,बशवराज धरणे, शिवसनेचे माजी उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण,तालुका उपप्रमुख सरदारसिंग ठाकूर, शहर प्रमुख संतोष पुदाले,महिला काँग्रेसच्या  कल्पना गायकवाड,
आदी उपस्थित होते.
   
प्रारंभी  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस  उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून आभिवादन केले . 


दि . २६ नोव्हेंबर २००८ मध्ये अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी व दिवंगत नगरसेवक दयानंद बनसोडे यांना  श्रध्दांजली वहाण्यात आली. यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
 

याप्रसंगी  सपो उपनिरिक्षक सरपाळे , सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव,शाम कनकधर काँग्रेस जिल्हा कार्यकारणी सदस्य प्रमोद कांबळे  , रिपाइंचे  मराठवाडा विभाग सदस्य दुर्वास बनसोडे ,  जिल्हा सचिव एस के गायकवाड , चंद्रकांत बनसोडे,   युवा जिल्हा कार्याध्यक्ष अरुण लोखंडे आदींची प्रमुख उपस्थित होती.


   याकार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुण लोखंडे  तर सुत्रसंचलन एस.के.गायकवाड यांनी केले , जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे यानी भारतीय संविधानाच्या उद्देशिकाचे वाचन केले.तर परिसरातील भिम शाहीरानी दिवसभर प्रबोधनपर भिम गितगायन करून संविधानाचा गौरव केला.
   याकार्यक्रमाच्य यशस्वीतेसाठी दिपक निकाळजे ,  तालुका अध्यक्ष उमेश गायकवाड रिपाइंचे ( गवई ) तालुका अध्यक्ष प्रमोद लोंढे, सिद्धांत बनसोडे , योगेश सुरवसे, प्रशिक बनसोडे , सुरज कांबळे  ,राकेश बनसोडे , अजयकुमार बागडे ,अमोल कांबळे , पपू कांबळे किशोर बनसोडे  गणेश बनसोडे , दिलीप भांगे , कुमार सुरवसे , गौतम गायकवाड अमर बनसोडे राजरत्न बनसोडे , वैभव कांबळे , आदीनी परिश्रम घेतले . अजय बागडे यांनी आभार  मानले.

Labels:

नविन शैक्षणिक पॅटर्नचा अंगीकार करणे काळाची गरज ; नगराध्यक्ष सचिन रोचकरी


तुळजापूर,दि.२७, 

येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूरच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर  महाविद्यालयात तुळजापूर नगरीतील सर्व नगरसेवकांची नुकतीच बैठक संपन्न झाली. 


यावेळी तुळजापूर नगरीचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी सभेस उद्देशून  म्हणाले की १९७१ साली तुळजाभवानी महाविद्यालयाची स्थापना झाली, स्थापना वर्षांपासून आजतागायत या महाविद्यालयाने अनेक शैक्षणिक स्थित्यंतरे पाहिले, येथील अनेक विद्यार्थी शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे यांच्या संस्कारमयी विचाराने प्रेरित होऊन स्वत:च्या पायावर उभा आहेत . आज मितिला शैक्षणिक क्षेत्रात खूप वेगळ्या प्रकारचे बदल घडत असुन बदलत्या प्रवाहानुसार आपण ही हे बदल स्विकारण्याची व नविन परिवर्तनानुसार विद्यार्थी घडविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. 
सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त संस्थेचा एक माजी विद्यार्थी म्हणुन सर्व योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस.एम.मणेर म्हणाले की, शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे यांनी १९७१ साली या ज्ञान मंदिराची उभारणी केली.कित्येक विद्यार्थी या ज्ञान मंदिरात शिक्षण घेऊन आज यशस्वी झाले आहेत.हे महाविद्यालय चालू शैक्षणिक वर्षामध्ये नॅक पुनर्मूल्यांकनांसाठी सामोरे जात असताना महाविद्यालयाच्या आजी माजी विद्यार्थ्यांची खुप महत्त्वाची भूमिका पूनर्मूल्यांकन प्रक्रियेमध्ये असणार आहे, सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त अनेक शैक्षणिक, सामाजिक उपक्रम सर्वांना बरोबर घेऊन आयोजित करण्यात येणार असून तुळजापूर नगरीतील सर्वांनी सदर उपक्रमास आपले महाविद्यालय म्हणून सकारात्मक प्रतिसाद देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना केले.

सदर बैठकीसाठी नगरसेवक अविनाश गंगणे, सचिन पाटील , विशाल रोचकरी, सुहास साळुंके, औंदुबर कदम,विजय कंदले यांची प्रमुख उपस्थिती लाभली,या बैठकीमध्ये प्रा.धनंजय लोंढे आणि प्रा.डॉ.एस.एम.देशमुख यांनी उपस्थितांना सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांच्या आयोजनासंबधी माहिती दिली. बैठकीचे सूत्रसंचालन व आभार प्रा.आशपाक आतार यांनी मानले.

Labels:

तुळजापूर तालुक्यातील वागदरी येथे संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न


नळदुर्ग , दि . २७ 

 
तुळजापूर तालुक्यातील  वागदरी येथे विविध ठिकाणी संविधान दीन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.


  येथील ग्रामपंचायत कार्यालयात संविधान दिनानिमित्त भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामुदायिकरीत्या संविधानाच्या उद्देशिकाचे वाचन करण्यात आले. यावेळी सरपंच ज्ञानेश्वर बिराजदार, उपसरपंच मुक्ताबाई वाघमारे, ग्रामसेवक जी.आर.जमादार, ग्रा.प.सदस्य दत्ता सुरवसे, कमलबाई धुमाळ, महिला बचतगट सि.आर.पी.तथा ग्रा. प.सदस्या विद्या बिरादार, रोजगार सेवक रामसिंग परिहार, रिपाइं (आठवले)चे जिल्हा सचिव एस.के. गायकवाड, ओंकार चव्हाण, सह ग्रामस्थ उपस्थित होते.

   
येथील पंचशील बुद्ध विहार कमिटीच्या वतीने दि.२६ नोव्हेंबर रोजी ७२ व्या संविधान दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच ज्ञानेश्वर बिराजदार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच राजकुमार पवार,सामाजिक कार्यकर्ते आमोल पाटील,पत्रकार किशोर धुमाळ,माजी उपसरपंच बालाजी बिराजदार, ग्रा.प.सदस्य दत्ता सुरवसे आदी होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन पंचशील बुद्ध विहार कमिटीचे सचिव एस.के गायकवाड यांनी केले. 
  

प्रारंभी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज व भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यांच्या प्रतिमांचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करून आभिवादन करण्यात आले.यावेळी जळकोट येथे आयोजित क्रिकेट तोरणामेंट स्पर्धेतील उपविजेत्या वागदरी क्रिकेट कल्बचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.    याप्रसंगी आमोल पाटील व दत्ता सुरवसे आदींची शुभेच्छापर भाषणे झाली.
  

यावेळी पंचशील बुद्ध विहार कमिटीचे अध्यक्ष तथा माजी सरपंच नागनाथ बनसोडे,पोलीस पाटील बाबुराव बिराजदार, बाळु पवार,जेष्ठ कार्यकर्ते रामचंद्र बिराजदार, युवा कार्यकर्ते विनोद पवार बुद्ध विहार  कमिटीचे  संदीपान वाघमारे,अनिल वाघमारे, सादु वाघमारे,वाल्मिक वाघमारे, भारत वाघमारे, अशोक गायकवाड, शिवाजी वाघमारे, क्रिकेट कल्बचे कर्नधार धम्मदीप बनसोडे, उपकर्नधार आप्पा भंडारे सह सर्व खेळाडू , महिला,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Labels:

संविधान दिनानिमित्त धोत्री शांतीदूत तरुण मंडळाच्या वतीने पोलीस अधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा सत्कार


काटी , दि .२७  

तुळजापूर तालुक्यातील धोत्री येथील शांतीदूत तरुण मंडळाच्या वतीने भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधान ग्रंथाचे पूजन करण्यात आले. यावेळी 26/11च्या हल्ल्यात शहीद झालेल्या  पोलीस अधिकारी, कर्मचारी व नागरिक यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 


 संविधान दिनाचे औचित्य साधून शांतीदूत तरुण मंडळातील कार्यकर्त्यांनी उस्मानाबाद येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधिक्षक निवा जैन, जिल्हा परिषद कार्यालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांना तसेच तुळजापूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील डी.वाय.एस.पी. भोर पाटील व तामलवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांना प्रत्यक्ष भेट देऊन त्यांचा शाल, श्रीफळ, व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करुन सन्मानित करण्यात आले.
      

यावेळी शांतीदूत तरुण मंडळाचे कार्यकर्ते दत्ता उबाळे, सुरज मस्के, दत्ता मस्के, श्रीराम गायकवाड, राम उबाळे, समीर मस्के, योगीराज मस्के,किशन पांडागळे, लक्ष्मण मस्के आदी मंडळातील कार्यकर्ते उपस्थित होते.

Labels:

जिल्हा महीला काॅग्रेस,सुयोग फाऊंडेशन व पोलीस ठाणे तामलवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन साजरा


काटी , दि .२७

तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे शुक्रवार दि.( 26) रोजी येथील जिल्हा महीला काॅंग्रेस,पोलीस स्टेशन व सुयोग फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रारंभ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले.


तसेच 26/11 दहशतवादी हल्ल्याचे स्मरण करण्यात आले.या वेळी जिल्हा महिला काॅंग्रेसच्या अध्यक्षा तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सिताराम साखर कारखान्याच्या डाॅ.राजलक्ष्मी गायकवाड यांनी प्रास्ताविक करताना ग्रामीण भागातील महिलांना सतत मदतीचा हात देवुन त्यांना पुढे आणून  त्यांना संविधानाचे आधारे हक्काची जाणीव करुन दिली पाहीजे. तसेच ऊच्च शिक्षणासाठी प्रेरीत केले पाहीजे असे मत व्यक्त केले. यावेळी 
डि.वाय.एस.पी. सई भोरे-पाटील यांनी महीलांना व युवतींना मार्गदर्शन करताना संविधानाच्या आधारे युवतींनी प्रतीकुल परीस्थीतीवर मात करुन शिकले पाहीजे,खेळामध्ये पुढे आले पाहीजे.महीलांनी कुस्ती मध्ये नावलौकीक करावा तसेच स्पर्धा परीक्षा, ऊच्च शिक्षण घेवुन कुटुंब व समाजाला पुढे घेवुन जाण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे आवाहन केले.


पोलीस उपनिरीक्षक सचीन पंडीत यांनी उपस्थीत महीलांचे स्वागत केले. यावेळी कोरोना  वारीयर्स डाॅक्टर, डाॅ.श्वेता जाधव डाॅ.श्रोया कांगडे, डाॅ.प्राजक्ता शिनगारे,डाॅ.स्नेहा जाधव,डाॅ.दिव्या राजकुमार ईटुकडे(MBBS),कुमारी अनुजा कुंभार,कुमारी ऊमामा बेगडे, सेवाभावी शिक्षिका राधा गायकवाड, रमिजा गाडीवान, हॉस्पिटल कर्मचारी  फिजा तिलघर, रईसा शेख,अर्चना बंडगर,धनश्री बॅंकर ,श्रीमती.पौर्णीमा शिंदे, करिष्मा पटेल,वनिता धपाटे यांचा भोरे-पाटील यांच्या हस्ते शाल,श्रीफळ,ट्राॅफी,व पुष्पगुच्छ देवुन यथोचीत सत्कार करण्यात आला.

       
 यावेळी सरपंच मंगल गवळी,संजना गुरव, महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षा डॉ. राजलक्ष्मी गायकवाड, डॉ. रविराज गायकवाड, पोलीस निरीक्षक सचिन पंडित, पोलीस उपनिरीक्षक  बनसोडे,माळी, पोलीस कर्मचारी,युवा नेते हणुमंत गवळी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Labels:

Friday, 26 November 2021

काटी येथे ‘संविधान दिन’ उत्साहात साजरा


काटी , दि . २६  : 

तुळजापूर  तालुक्यातील काटी येथील भिमनगरमधील नालंदा बुद्ध विहारात व येथील जिल्हा परिषद शाळा इंदिरानगर येथे भारतीय राज्यघटनेच्या संविधान वर्धापनदिनानिमित्त जि.प.प्रशालेत शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तुकाराम छबिले यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तर येथील भिमनगरमधील बुध्दविहारात आंबेडकर प्रेमी भिमसैनिकांच्या वतीने शुक्रवार दि. (26 ) रोजी संविधान  दिन उत्साहात साजरा करण्यात आला. 
   

 भारतीय राज्यघटनेच्या संविधान वर्धापनदिनानिमित्त येथील दलितमित्र नंदु बनसोडे यांच्यासह उपस्थित  मान्यवरांच्या हस्ते डॉ.  बाबासाहेब आंबेडकर  यांच्या  प्रतिमेचे व संविधान ग्रंथाचे पूजन करण्यात येऊन येथील आंबेडकरप्रेमी महिलांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील गीते सादर केली. 
त्यानंतर मिठाईचे वाटप करुन संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी दलितमित्र नंदु बनसोडे, गौतम  बनसोडे आदींनी संविधानाच्या  प्रस्ताविकेचे वाचन करून  उपस्थितांना डॉ.  बाबासाहेब आंबेडकर व गौतम  बुध्द व संविधान  विषयी मार्गदर्शन केले.
            

 यावेळी नालंदा बुद्धविहारचे दलितमित्र नंदू बनसोडे, गौतम बनसोडे,माजी उपसरपंच अशोक बनसोडे, श्रावण वाघमारे, करण साबळे,ताई सुरते, अनुसया नंदु बनसोडे, रंजनाबाई शेरखाने, सोजरबाई बनसोडे यांच्यासह आंबेडकर  प्रेमी नागरिक, महिला उपस्थित होते. तर जि.प. प्रशालेत सहशिक्षक ज्योतिर्लिंग क्षिरसागर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तुकाराम छबिले, बालाजी बंडगर, राजेश काकडे आदीजण उपस्थित होते.

Labels:

अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाचे आवाहन


उस्मानाबाद , दि .२६ 

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा व पोलीस आयुक्तालयात ‘अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष’ (ए.एच.टी. सेल) कार्यरत असून या कक्षामार्फत वेश्या व्यवसाय, मानव तस्करी, दिर्घकाल बेपत्ता व्यक्ती अशा स्वरुपाच्या घटनांचा / गुन्ह्यांचा तपास केला जातो. 


गोडी गुलाबीने, फुस लाउन, प्रेम विवाह, रोजगार, मनोविकलांग व्यक्ती, निराश्रीत बालके इत्यादी कारणातून प्रामुख्याने अल्पवयीन मुली, महिला काही प्रसंगी मुलांनाही वेश्या, भिक्षा, मानवी अवयव तस्करी इत्यादी व्यवसायात ढकलले जात असून अशा स्वरुपाचे अनैतिक व्यवसाय हे गाव पातळी पासून आंतरराष्ट्रीय बाजारापर्यंत पसरलेले आहेत. उस्मानाबाद पोलीस अधीक्षक कार्यालयातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षामार्फत अशा प्रकरणांत अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कायदा- 1956 अंतर्गत कारवाई करण्यात येउन बालके, वेश्या यांची मुक्तता करण्यात येउन त्यांची रवानगी सुधारगृहात केली जात आहे.



दैनंदिन जीवनात आपणास उपरोक्त स्वरुपाचे अनैतिक व अवैध व्यवसाय समाजात होत असल्याचे आढळल्यास त्या संबंधीची सविस्तर माहिती आपण नमूद कक्षास, नजीकच्या पोलीस ठाण्यास किंवा उस्मानाबाद पोलीस नियंत्रण कक्षाच्या 02472- 222700, 222900 या दूरध्वनी क्रमांकावर  कळवावी. जनतेच्या या छोट्याशा निरीक्षणातून, कृतीतून एखाद्या व्यक्तीचे उध्वस्त जीवन पुन्हा फुलू शकते. असे आवाहन उस्मानाबाद जिल्हा पोलीस दलातर्फे  पोलीस अधीक्षक श्रीमती नीवा जैन यांनी जनतेस केले आहे.

Labels:

उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या राज्यस्तरीय शिफारस समितीवर प्रोफेसर डॉ. गोविंद काळे यांची ननियुक्ती


तुळजापूर , दि .२६ 

 वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबीत प्रश्न सोडविण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून 17 सदस्यांची राज्यस्तरीय समिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केली असून उस्मानाबाद जिल्ह्यातील शिक्षक नेते प्रोफेसर डॉ. गोविंद काळे यांची या महत्त्वाच्या समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे.

    या शिफारस समितीचे अध्यक्ष उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. .डी.आर माने,  विधान परिषदेचे नऊ आमदार, वरिष्ठ महाविद्यालयीन विविध प्राध्यापक संघटनेचे सहा पदाधिकारी व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे सात प्रतिनिधींचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.  

महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे विभागीय अध्यक्ष तथा 25 वर्षांपासूनचा 1992 ते 2000 पर्यंतच्या बिगर नेट/सेट प्राध्यापकांचा प्रलंबित नेट/सेट प्रश्नासाठी विद्यापीठ, विद्यापीठ अनुदान आयोग महाराष्ट्र शासन व न्यायालयीन पातळीवर सतत संघर्ष करून न्याय हक्क मिळवून देणारे नेट/सेट संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष प्रो.डॉ.गोविंद काळे यांची नेमणूक करण्यात आली आहे.तसेच नेट/सेट संघर्ष समितीतील डॉ.किशोरी भगत व डॉ. विजय किसन हिले यांचाही या समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे. 

नेट/सेट संघर्ष समितीतील तीन सदस्यांची राज्यस्तरीय समितीत नेमणूक करण्यात आल्यामुळे प्राध्यापकांचे प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागण्या बाबतच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. प्रा.डॉ.गोविंद काळे यांच्या नियुक्तीमुळे प्राध्यापकांमध्ये प्रचंड समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

     महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबीत प्रश्न सोडविण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न करीत असल्याबद्दल प्राध्यापकांमध्ये  समाधान व्यक्त करण्यात येत आहे. 

महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या तीन सदस्यांचा या समितीमध्ये समावेश करण्यात आल्यामुळे शिवसेना नेते.ना.सुभाष देसाई , उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सामंत  व  शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष ना. ज. मो. अभ्यंकर  यांचे  नेट/सेट संघर्ष समिती व महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनच्या वतीने  आभार व्यक्त करण्यात येत आहे.

Labels:

ठेकेदारावर कारवाईसाठी नळदुर्ग शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी , कार्यकर्त्यांची पोलिसात धाव

नळदुर्ग , दि . २६ : सुहास येडगे

 नळदुर्ग शहर भाजपचे अध्यक्ष पद्माकर घोडके यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करतो म्हणणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी म्हणुन नळदुर्ग शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते एकवटले असुन संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनात नागरीकांनी केली आहे.



नळदुर्ग शहरात सध्या मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरु आहेत, मात्र हे कामे आंदाजपत्रकानुसार होत नसल्याचे दिसुन येत आहे, त्यामुळे शहरातील राष्ट्रीय महामार्ग ते शास्त्री चौक पर्यंतचा मुख्य रस्त्याचे काम सध्या करण्यात येत आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजुस नाली बांधकाम करून नालीवर छत टाकुन त्यावर फुटपाथ करण्यात येणार आहे व रस्त्याच्या मधोमध दुभाजक करण्यात येणार आहे. दरम्यान नालीचे काम आर्धवठ सोडुन संबंधीत ठेकेदार हा दुभाजक बांधकाम करण्यासाठी सुरुवात केली असता शहर भाजपाचे अध्यक्ष पद्माकर घोडके यांनी संबंधित ठेकेदारास रस्त्याच्या बाजुच्या नालीचे बांधकाम पुर्ण करून मगच दुभाजकाचे काम करावे असे सांगितल्याने संबंधीत ठेकेदार यांनी पद्माकर घोडके यांना खंडणी मागितली म्हणुन गुन्हा दाखल करतो अशी धमकी दिली. त्यामुळे संबंधीत ठेकेदाराची शहरातील जबाबदार व्यक्तींना होत असलेली अरेरावी थांबविण्यासाठी व खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्यामुळे ठेकेदारावर कारवाई करण्यासाठी दि. २५/११/२०२१ रोजी रात्री येथील लोकमान्य वाचनालयाच्या सभागृहात सर्व पक्षीय बैठक बोलावण्यात आली होती.


 या बैठकीत सर्व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.  यावेळी  नगरसेवक शहबाज काझी, माजी नगरसेवक संजय बताले, माजी नगरसेवक सचिन डुकरे,पत्रकार सुनील बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे बशीर शेख राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष महेबुब शेख, युसुफ शेख, सतीश पुदाले, युवा सेनेचे माजी तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर घोडके, मनसेचे जिल्हा सरचिटणीस जोतिबा येडगे आदींनी मनोगत व्यक्त करून संबंधीत ठेकेदाराचा निषेध व्यक्त करून ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली. त्याचबरोबर संबंधीत ठेकेदाराने पद्माकर घोडके यांची माफी मागुन आता विकास कामावर पालिकेचा कायम स्वरुपी आभियांता ठेऊनच कामास सुरुवात करावी असेही म्हंटले आहे.  

त्याचबरोबर ठेकेदाराने शहरात सुरू केलेल्या कामावर काम सुरू होण्यापूर्वी आंदाज पत्रकाचा फलक लावणे बंधनकारक होते. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे या पुढे सगळ्या कामावर ठेकेदाराने नागरीकांच्या महितीस्तव अंदाज पत्रकाचे फलक लावुनच काम चालु करावे अशी मागणी यावेळी करण्यात  आली. दरम्यान बैठक संपल्यानंतर तेथुन पोलीस ठाण्यात जाऊन संबंधीत ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी म्हणुन पोलीस उपनिरीक्षक एम. एम. शहा यांच्याकडे नागरीकांनी निवेदन दिले.

 या बैठकीला  नगरसेवक उदय जगदाळे, शहबाज काझी, बसवराज धरणे, माजी नगरसेवक संजय बताले, सचिन डुकरे, सुधीर हजारे, शहर भाजपचे अध्यक्ष पद्माकर घोडके, एम आय एम चे युसुफ शेख, युवा सेनेचे माजी तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर घोडके,भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस श्रमिक पोतदार, सामाजिक कार्यकर्ते आझहर जहागीरदार, बशीर शेख, मनसेचे जिल्हा सचिव जोतिबा येडगे, शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे, मनसेचे शिवाजी सुरवसे, व्यापारी मंडळाचे मुकुंद नाईक, सुभाष कोरे, समीर बाडेवाले, पप्पू पाटील, सिकंदर काझी, मनसेचे शहर सचिव प्रमोद कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार सुनील  बनसोडे, सतीश पुदाले,आजीत जुनैदी, यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी संबंधीत ठेकेदारावर कारवाई नाही झाल्यास या पुढे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ही देण्यात आला.

Labels:

श्री.तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय, तुळजापूर यांची गुणवत्तेवर आधारीत शुल्क सवलत योजना


तुळजापूर, दि.२६ 

गेली २-३ वर्षापासून कोविड-१९ च्या परिस्थीतीमध्ये निर्माण झालेल्या बेरोजगारी, आर्थिक तणाव यामुळे अडचणीत आलेल्या पाल्य व पालकांना उस्मानाबाद जिल्हयाचे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष श्री.तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय, तुळजापूर यांनी गेली 4 वर्षापासून सुरु असलेल्या MHTCET 2021 च्या गुणांनुसार प्रवेशार्थी विद्यार्थ्यांना २५ टक्के ते १०० टक्के पर्यंत सवलत देण्यास मान्यता दिली आहे. 

तसेच प्रथम वर्ष प्रवेशार्थी विद्यार्थीनींना एक वर्षासाठी मोफत वसतिगृह सुविधा यास मान्यता दिली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.एन.डी. पेरगाड यांनी शुक्रवार  रोजी आयोजीत पत्रकार परिषदेमध्ये दिली. 


यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. रवी मुदकन्ना व प्रवेश प्रमुख प्रा. प्रदीप हंगरगेकर उपस्थित होते. ग्रामीण भागातील होतकरु व हुशार विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीचे तांत्रिक शिक्षण देवून त्यांना आपल्या पायावर उभे करण्याचा संस्थेचा उद्देश असून, श्री तुळजाभवानी मंदीर संस्थान तुळजापूर यांच्या भक्कम पाठींब्याने महाविद्यालयाने विविध इमारतीचे नुतनीकरण व रस्त्यांची दुरुस्ती, विविध प्रयोग शाळामध्ये मोठया प्रमाणावर यंत्र सामुग्री खरेदी केलेली आहे. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तज्ञ व अनुभवी प्राध्यापकांव्दारे अभियांत्रिकी शिक्षण देवून, गेल्या ३८ वर्षापासून अंदाजे आठ  हजारच्या वरती अभियंते महाविद्यालयाने निर्माण केले असून ते सर्व राष्ट्र निर्मीतीच्या कार्यामध्ये विविध क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत.


महाविद्यालयामध्ये सुसज्ज ग्रंथालय, ईंटरनेट सुविधा व अद्यावत वसतिगृहे, विमासंरक्षण तसेच वैद्यकिय सुविधा उपलब्ध आहेत.
महाविद्यालयाच्या ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाच्या चमकदार कामगिरीमुळे महाविद्यालयातील अंतिम वर्षाच्या ७९ टक्के विद्यार्थ्यांनी TCS, Cognizant , Infosys, Capegemini, L & T, Shirke अशा नामांकीत खाजगी कंपन्या तसेच MPSC व्दारे महाराष्ट्र शासनामध्ये नोक­ऱ्या मिळविल्या आहेत. महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कार्यक्रम आयोजीत केले जातात. याव्दारे विद्यार्थी व विद्यार्थीनींचे व्यक्तीमत्व विकसीत होत आहे. तरी श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घेवून नमूद सुविधेचा लाभ घेवून व्यक्तीमत्व विकास साधुन स्वत:ची सर्वांगीण प्रगती साधावी असे आवाहन प्राचार्य डॉ.एन.डी. पेरगाड, प्रवेश प्रमुख प्रा.पी.ए. हंगरगेकर व प्रा.पी.टी. सुर्यवंशी यांनी केले आहे.

Labels:

लोहगाव येथे संविधान दिन साजरा


लोहगाव , दि . २६ : 

तुळजापूर तालुक्यातील लोहगाव येथे शुक्रवार दि.२६ रोजी  भारतीय संविधान दिनानिमित्त  येथील जेतवन बुध्दविहारामध्ये भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव  डॉ.बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या मुर्तीचे पूजन ग्रामपंचायत सदस्य निजाम शेख यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच  ग्रामपंचायत कार्यालयात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपसरपंच प्रशांत देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.


यावेळी सौदागर दबडे,विजय बिराजदार,गुंडू दबडे, हणमंत लांडगे, अरविंद दबडे,परमेश्वर लोखंडे,राम कांबळे,लक्ष्मण कांबळे, चंद्रकांत गायकवाड,रमेश गायकवाड,अमोल गायकवाड,
गंगाधर कांबळे,खंडू बनसोडे,अतुल लोखंडे,महेश लोखंडे,लक्ष्मण बनसोडे,आदित्य बनसोडे, यांच्यासह आदि ग्रामस्थ उपस्थित होते.

Labels:

माधवराव पाटील महाविद्यालया मुरुम संविधान दिन उत्साहात साजरा

 

मुरुम , दि .२६ : 

श्री माधवराव पाटील महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दि. 26 नोव्हेंबर 2021 रोजी संविधान उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या  सुरुवातीस  महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ. अशोक सपाटे  यांच्या हस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधानाचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले .यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून उपप्राचार्य डॉ.सी टी बिराजदार  तर अध्यक्ष म्हणून एन एस एसचे कार्यक्रमाधिकारी प्रा डॉ रवि आळंगे होते. 


 प्रा गोपाळ कुलकर्णी यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून त्याचा अर्थ उपस्थित विद्यार्थी व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सांगितला, तसेच डॉ.संध्यां डांगे यांनी संविधान दिनाचे महत्त्व सांगून लोकशाहीचा अर्थ व व्याख्या सांगितल्या व 26 /11 च्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 


या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभागातील कार्यक्रम अधिकारी डॉ रवि आळंगे यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा.लक्ष्मन पवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन कार्यक्रमाधिकारी प्रा राजमाने यांनी केले. या कार्यक्रमाला प्रा डॉ पंचगल्ले सुधीर , शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Labels:

सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तामलवाडी येथे संविधान दिन साजरा

                             
 
तामलवाडी , दि .  26 

येथील सरस्वती विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय तामलवाडी ता. तुळजापूर  या शाळेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या  प्रतिमेचे पूजन करून संविधान दिन व 26/ 11 च्या मुंबई हल्ल्यातील शहिदांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला.

 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सुभाष जाधव तर प्रमुख पाहुणे  पर्यवेक्षक गणेश हलकरे ज्येष्ठ शिक्षक औदुंबर माडजे यांच्या हस्ते  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . तर सामाजिक अंतर ठेवून  शिक्षक महादेव मसुते  यांनी संविधान दिन व शहिदांच्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमाविषयी   सविस्तर माहिती दिली . 


  यावेळी ज्येष्ठ शिक्षक औदुंबर माडजे ,चंद्रकांत साळुंखे , चांगदेव  सावळे, प्रभाकर जाधव ,शिवकुमार सिताफळे, सुहास वडणे  ,महादेव मसुते,  महादेव माळी , लक्ष्मण पाटील, विनोद कुंभार , प्रशांत चुंगे , बालाजी साठे , गिरीश जाधव ,योगेश राऊत, श्री गणेश स्वामी ,बालाजी रणसुरे, दत्तू कोकरे ,सुनील पाटील,  महिला शिक्षिका श्रीमती शाहिदा पिरजादे , मनिषा गिरे, मनीषा सावंत ,विठाबाई पाटील तसेच  शिक्षक एम. एम. मसुते यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमास शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Labels:

भारतीय संविधानामुळे देशाची अखंडता कायम संविधान दिनी प्रा.डॉ.बालाजी गुंड यांचे प्रतिपादन

तुळजापूर,दि.२६ 

 येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.


यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एम मणेर यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.तसेच संविधान दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजना विभाग व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रा.डॉ.बालाजी गुंड यांचे भारतीय संविधान व आम्ही या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी डॉ.गुंड यांनी वरील प्रतिपादन केले.आपल्या मार्गदर्शनपर भाषणात ते पुढे म्हणाले की,आज आपण भारतीय स्वतंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असतांनाही देशाची एकता आणि अखंडता कायम आहे याचे श्रेय केवळ भारतीय संविधानालाच जाते.तसेच संविधानाने दिलेल्या स्वतंत्र समता बंधुता व सामाजिक न्याय या मूल्यांमुळे देशातील जनमानसात एकतेची भावना निर्माण झाली.व त्यातुनच  राष्ट्रीय ऐक्य निर्माण झाले.भारतीय संविधान म्हणजे त्यातील शब्द नव्हेत,तर या देशातील व्यक्ती केंद्रस्थानी मानून स्वतंत्र  व समतेची आस धरणारा एक जिवंत दस्तावेज आहे.संविधानाची पायाभूत मुल्ये न्यायपालिकेने जपलिच आहेत पण ती लोकांमध्ये व नागरी समाजामध्ये रुजायलाच हवीत या विषयीचे हे चिंतन आहे.म्हणून भारतातील नागरीकांनी भारतीय संविधानाचा विचार आत्मसात करावा असा अनमोल संदेश त्यांनी यावेळी दिला.


 महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एम मणेर हे म्हणाले की, सकारात्मक राज्यव्यवस्थेसाठी संविधान आवश्यक आहे.संविधान निर्मिती साठी २ वर्ष ११ महिने १८ दिवस एवढ्या प्रदिर्घ काळात अथक परिश्रमातून हे संविधान उदयास आले,व या संविधानामुळेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळाले व स्वातंत्र्याचा उपयोग आज प्रभावीपणे होताना दिसत आहे.परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सदुपयोग व्हावा व इतरांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत अशीच शिकवण संविधान देते.असे अनमोल मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले.

याप्रसंगी संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन देखील करण्यात आले.कार्यक्रमाप्रसंगी प्रा.धनंजय लोंढे,प्रा.वागदकर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा विवेकानंद चव्हाण यांनी व आभार प्रा.डॉ.नेताजी काळे यांनी मानले.कार्यक्रमासाठी  विद्यार्थी उपस्थित होते.सदर प्रसंगी सर्व उपस्थितांकडुन कोरोना संबंधित सर्व नियमांचे पालन करण्यात आले.

Labels:

Thursday, 25 November 2021

कवयित्री संध्याराणी कोल्हे यांच्या कवितेची निवड

जळकोट,दि.२५ :


नाशिक येथे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि.०३ डिसेंबर रोजी भुजबळ नॉलेज सिटी आडगाव,नाशिक येथे आयोजित केले असून  कवीकट्टा मध्ये  उस्मानाबाद जिल्ह्याच्या असलेल्या सध्या औरंगाबाद जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात सहशिक्षिका  म्हणून कार्यरत असलेल्या कवयित्री संध्याराणी जयहिंद कोल्हे यांच्या सुनी सुनी वाटे तुझी पंढरी या कवितेची निवड झाली आहे.निवड झालेल्या कवितांची मैफिल दि.५ डिसेंबर २१ रोजी सकाळच्या सत्रात भरणार आहे. त्याबद्दल ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संपर्क समिती सदस्य वैजयंती सिन्नरकर नाशिक यांनी पत्राद्वारे कळवले आहे . 

कवयित्री संध्याराणी कोल्हे यांनी विविध 
संमेलनात सहभाग नोंदवलेला आहे.भरतीय संस्कृतीला अनुसरून बहूसंख्य काव्य रचना सादर केल्या आहेत.अनेक पुरस्काराने सन्मानित, लिखाणाचा छंद जोपासीत त्यांनी षटकोळी हा नव काव्य प्रकार साहित्याची निर्मिती केली आहे. 
षटकोळी साहित्यप्रेमी समूहाची स्वतः स्थापना करुन नवोदित कवीना त्या साहित्याची सेवा अविरपणे करत आहेत. यापुर्वी त्यांच्या समूहाची दोन ऑफलाईन व चार ऑनलाईन काव्यसंमेलने यशस्वीपणे पार पडलेली आहेत. कवीकट्टासाठी कवितेची निवड झाल्याबद्दल अनेक पुरस्कारांनी सन्मानित या कवयित्रीचे साहित्य क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन केले जात आहे.


यापुर्वीच्या ९३वे अखिल भारतीय साहित्य संमेलन, उस्मानाबाद कवीकट्टा मध्ये त्यांच्या मला पंख असते तर या कवितेची निवड झाली होती.

Labels:

पांगरदरवाडी जि.प.शाळेतील अनुजा कुंभारचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

काटी ,दि .२५

ऑगस्ट 2021 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता   पाचवी मध्ये जि.प.प्रा.शाळा पांगरदरवाडी ता . तुळजापूर  येथील विद्यार्थिनी कु.अनुजा शांताराम कुंभार हिने 186 गुण प्राप्त करीत  शिष्यवृत्ती पात्र ठरली आहे.


2021 च्या जवाहर नवोदय विद्यालय परीक्षेतही तिने यश संपादित करुन ती नवोदयधारक झाली आहे.तिच्या ह्या यशाबद्दल काटी बीटचे विस्तार अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी श्री.अर्जुन जाधव,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. शंकर कदम,शाळेचे मु.अ.श्री. उत्तरेश्वर पैकेकरी, केंद्रप्रमुख श्री. राजेश धोंगडे,वर्गशिक्षक श्री.शांताराम कुंभार, मार्गदर्शक श्री. हर्षवर्धन माळी,नानासाहेब कोळी,अनिल हंगरकर,शहाजी कोळी, श्रीम.अनिता माने  यांनी अभिनंदन केले.
 
 कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थिती मुळे शाळाबंद व प्रत्यक्ष शिक्षण घेण्यातील अडचणींमुळे तसेच शिष्यवृत्ती परीक्षा आयोजनातील वारंवार झालेले बदल यांमुळे निकालाची टक्केवारी खूप खाली आली.संपूर्ण राज्याची पाचवी वर्गाची शिष्यवृत्ती पात्र टक्केवारी ही 16.99 टक्के  तर उस्मानाबाद जिल्ह्याची टक्केवारी ही 9.34 टक्के  आहे.

Labels:

भोर येथे विनाशुल्क राज्यस्तरीय मराठा वधु-वर थेटभेट परिचय मेळाव्याचे आयोजन


तुळजापूर , दि .२५ 


पुणे जिल्ह्यातील भोर येथे महाराष्ट्र मराठा सोयरिक गृपच्या वतीने तथा या संकल्पनेचे संस्थापक अध्यक्ष नागनाथ बागल (कुर्डुवाडी) उपाध्यक्ष मनोजकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली  विनाशुल्क राज्यस्तरीय मराठा  वधू-वरांचा थेट-भेट परिचय मेळाव्याचे आयोजन दि.5 डिसेंबर 2021 रोजी   येथील अभिजित मंगल कार्यालयात करण्याचे बुधवारी झालेल्या बैठकीत ठरविण्यात आले आहे. 



पुणे जिल्ह्यातील भोर येथील अभिजित मंगल कार्यालयात सकाळी 9 ते 5 या कालावधीत होणार असून हा पुणे जिल्ह्यातील पहिलाच मेळावा असल्याची माहिती मेळाव्याचे संस्थापक अध्यक्ष नागनाथ बागल यांनी  दिली. पुणे जिल्ह्यातील मराठा समाजातील  विविध मान्यवरांच्या उपस्थितीत बुधवारी झालेल्या बैठकीत सर्व सोयींनी युक्त विनाशुल्क मेळावा यशस्वी करण्याच्या दृष्टीकोनातून विचार विनिमय करून मेळाव्यातील समित्यांचे गठण करण्यात आले व प्रत्येकाकडे कामाच्या जबाबदाऱ्या देण्यात येऊन मेळावा यशस्वी करण्याचे आवाहन केले. 


तसेच महाराष्ट्र मराठा सोयरिक या नावाने सोलापूर, उस्मानाबाद, उदगीर, पुणे, कोल्हापूर,सांगली या जिल्ह्यात 128 व्हाट्स अप गृप कार्यरत असल्याची माहिती बागल यांनी दिली. तसेच या मेळाव्याचे उद्घघाटन मराठा समाजातील विविध मान्यवरांच्या हस्ते होणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

     या  राज्यस्तरीय मराठा  वधू-वर थेट भेट परिचय मेळाव्याच्या माध्यमातून विविध ठिकाणांहून वधू-वर उपस्थित राहणार असल्याने आपल्याला  आपल्या इच्छा प्रमाणे जोडीदार शोधता येणार असून अनुरूप वधूवरांना त्यांची ओळख, माहिती सांगून जोडीदाराबद्दल असणार्‍या अपेक्षा व्यक्त करता येणार आहेत तसेच मराठा समाजाच्या उपवर वधू वरांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे जोडीदार निवडता येणार असून या मेळाव्यात वधूवरांनी आपल्या पालकांसोबत स्वतःचा फोटो व बायोडाटा घेऊन हजर राहावे  असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने नागनाथ बागल, मनोजकुमार गोरे यांनी केले आहे.
    या मेळाव्यात मराठा समाजातील इच्छुक वधूवरांनी  बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रा. रामदास सुरवसे, कुमकर, प्रा.सौ.गायकवाड  प्रा.महाडिक, प्रा.पाटील, शिंदे  थोपटे , गोरड ,संजय शिरवले, वाडकर , पवार , संजय खरमरे, राजिवडे ,  खाटपे, लेकावळे,अमर बुदगुडे, दिघे, गोळे , प्राचार्य रवी सुरवसे, गणेश गवळी,बजीरंग दत्तू , श्रीमती प्राजक्ता बागल,सौ. अर्चना कवाडकर,अजय पाटील,            राजेंद्रपाटील, सुधीर  भोसले, उत्तम अमृतराव (तुळजापूर) ,सतीश काकडे, अनंतराव शिंदे, वसंत मस्के, माधवराव गंभीर,सुखदेव यादव, मोहन वाघ,टी पी गायकवाड, शिवश्री दत्ता शिंदे, सूरज पाटील,पंकज पिंगळे,अनंतराव सूर्यवंशी, पत्रकार दिनेश मडके ,   पत्रकार उमाजी गायकवाड, औदुंबर ढावरे यांनी केले आहे
  
      

Labels:

Wednesday, 24 November 2021

केंद्रप्रमुख राजेश धोंगडे यांची सुरतगाव येथिल झोपडपट्टी जिल्हा परिषद शाळेस भेट

                                                       तामलवाडी, दि. २४ 

 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झोपडपट्टी सुरतगाव ता. तुळजापूर येथे सुरतगाव केंद्राचे नूतन केंद्रप्रमुख राजेश धोंगडे यांनी या प्राथमिक शाळेस भेट देवुन पाहणी केली.  


 येथील नयनरम्य परिसर, वृक्षारोपण, विद्यार्थी गुणवत्ता ,कार्यालयीन अभिलेखे ,पालकांच्या सहमतीने ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण, विद्यार्थी उपस्थिती व शाळेच्या झालेल्या संख्यात्मक व गुणात्मक वाढ या सर्व गोष्टी पडताळून पाहिल्यानंतर व या शाळेची उत्तरोत्तर प्रगती होत असल्याचे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.      
 
 याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सी .आर .  सूर्यवंशी व सहशिक्षक ए. एस .मगर   यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन केंद्रप्रमुख धोंगडे यांचा सत्कार  केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार आबा मगर यांनी मानले.

Labels:

तुळजापूर तालुक्यातील उमरगा चिवरी येथे शंभर टक्के लसीकरण ,


चिवरी: (राजगुरू साखरे): 

तुळजापूर तालुक्यातील उमरगा चिवरी येथील १८ वर्षा पुढील शंभर टक्के ग्रामस्थांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. शंभर टक्के लसीकरणाची मोहीम राबवण्यात ग्रामपंचायत व आरोग्य विभागाला यश आले आहे. 

तुळजापूर तालुक्यातील  अणदुर प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत असणाऱ्या उमरगा चिवरी येथील  उपकेंद्रांमध्ये सतत लसीकरणाची कॅम्प घेऊन तसेच नागरिकांना लसीकरणाचे महत्त्व पटवून देत जनजागृती करून गावात शंभर टक्के लसीकरण पूर्ण केले आहे तसेच या मोहिमेला ग्रामस्थांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याने अवघ्या काही दिवसांमध्ये गावातील शंभर टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. 


हे लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत बडे, डॉ. मलय्या स्वामी, सरपंच स्वाती दूधभाते, उपसरपंच अण्णाराव कदम ,ग्रामसेवक गोरोबा गायकवाड,  आशा कार्यकर्ती अनिता भोसले , आरोग्य सेवक निखिल डांगे, पोलीस पाटील महेश पाटील, अंगणवाडी कर्मचारी , आदींनी लसीकरण मोहीम पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला होता.


              
गावात लसीकरणाचे महत्त्व पटवून देत जनजागृती करून गावात शंभर टक्के लसीकरण पूर्ण केले आहे, गावातील आरोग्य केंद्रामध्ये लस उपलब्ध झाल्यामुळे ग्रामस्थांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.                
 ग्रामसेवक : गोरोबा गायकवाड
   
      

Labels:

निलेश गायकवाड यांची भारतीय पोलीस सेवेपदी निवड

                                 

उमरगा , दि .२४ : 

 युपीएससी परीक्षा 629 रँकने उत्तीर्ण झालेले तालुक्यातील जवळगा ( बेट ) येथील रहिवाशी निलेश श्रीकांत गायकवाड यांची भारतीय पोलीस सेवेपदी निवड झाली आहे. संघ लोकसेवा आयोगाने मंगळवार दि.23 नोव्हेंबर रोजी ही निवड जाहीर केली आहे.


देशातील असंख्य तरुणांमध्ये आयपीएस पदाविषयी प्रचंड आकर्षण आहे. अनेकज परीक्षेला बसतात, मात्र काही मोजकेच कष्टाळू आणि हुशार विद्यार्थी अंतिम निवडीत स्थान मिळवू शकतात.या सेवेशी निगडीत आव्हाने आणि जबाबदाऱ्या आहेत, म्हणून संघ लोकसेवा आयोगाद्वारे अशा उमेदवारांची निवड केली जाते.IPS मध्ये निवडलेल्या उमेदवारांना सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी, हैदराबाद येथे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उमेदवाराला जे राज्य केडर मिळाले आहे त्या राज्यात नियुक्त केले जाते. या निवडीबद्दल निलेश गायकवाड यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Labels:

सांगवी (मार्डी) येथे ट्रॅक्टर व तेलाचा टॅंकर उलटला ; तेल घेण्यासाठी नागरिकांची झुंबड



तुळजापूर , दि .२४ : 


तुळजापूर तालुक्यातील सांगवी (मार्डी) येथे राष्ट्रीय महामार्ग नवीन क्रमांक 52 वर  बुधवार दि. 24 रोजी सकाळी 7 वाजनेच्या सुमारास सांगवी (मार्डी) येथे ऊसाने भरलेला ट्रॅक्टरला कट मारल्याने  खाद्यतेलाचा टँकर पलटी होऊन खाद्यतेल संपूर्ण रोडवरती पसरले होते. 

यावेळी तेल घेण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली होती. याअपघातात सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही. खाद्यतेलाचा टँकर क्र. जी.जे.36 T.5944 खाद्यतेलाचे टँकर सोलापूरच्या दिशेने जात असताना सांगवी (मार्डी) नजिक आला असता ऊसाने भरलेला ट्रॅक्टरला कट मारल्याने हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदरशी नागरिकांमधून समजते.

 घटनास्थळी तुळजापुर पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक चेंनशेट्टी,बीट अंमलदार राठोड, आयआरबीचे कर्मचारी व तुळजापूर नगरपरिषदेचे अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले होते. वाहतूक सुरळीत होण्यासाठी पोलीस  कर्मचारी व आयआरबीच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. जवळपास तीन तासांपर्यंत या महामार्गावरील संपूर्ण वाहतूक ठप्प झाली होती. तब्बल तीन तासांनंतर वाहतूक सुरळीत चालू झाली.

Labels:

तुळजाभवानी महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सव, विधायक कामात योगदान देण्याचे प्राचार्य मणेर यांचे आवाहन


तुळजापूर , दि . २४ : उमाजी गायकवाड

 स्वामी विवेकानंदांच्या शिक्षण विचाराला पुढे घेऊन जाणारे एक ध्येयवादी शिक्षण प्रसारक आणि शिक्षण प्रसारातून समाज परिवर्तनाचे स्वप्न पुर्ण करणारे एक दृष्टे समाजहितचिंतक श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संकल्प संस्थापक शिक्षण महर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांनी  मराठवाडाच्या प्रवेशद्वारी, बालाघाटाच्या डोंगररांगेत तथा आई तुळजाभवानीच्या तिर्थ क्षेत्रात स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे तुळजाभवानी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे  रोपटे तुळजापूरात 1971 मध्ये रोवले. तो आता वटवृक्ष झाला आहे. 


या महाविद्यालयातून अनेक विद्यार्थी घडले आहेत. शैक्षणिक वर्ष 2021-22 हे महाविद्यालयाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असून सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाची रुप रेषा स्पष्ट  करण्यासाठी   महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एम. मणेर यांनी बुधवार दि. 24 रोजी सकाळी महाविद्यालयात  पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी प्रास्ताविकात प्रा.डॉ.एस.एम.देशमुख यांनी  50 वर्षांपूर्वी बालाघाटाच्या डोंगररांगेत शिक्षणाच्या फारशा सुविधा नसताना अतिशय प्रतिकूल परिस्थितीत तुळजाभवानीच्या पावण भूमीत  स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेने तुळजाभवानी कला, वाणिज्य, व विज्ञान महाविद्यालयाची सुरुवात झाल्याचे सांगून अगदी प्रतिकूल अवस्थेत सुरू झालेले या  महाविद्यालयाने 50 व्या वर्षात पदार्पण केले असून यशाच्या 51व्या वर्षांची वाटचाल सुरू असल्याचे सांगितले. तुळजापूर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी या ठिकाणी येत असून सध्या जवळपास 1300 विद्यार्थी ज्ञानार्जनाचे धडे घेत आहेत. संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी पाहिलेले स्वप्न सत्यात उतरविण्याचे काम तुळजाभवानी महाविद्यालयाच्या माध्यमातून सुरु असून तुळजापूरच्या राजकारणात, समाजकारणात तसेच व्यवसायात पारंगत असलेले विद्यार्थी बहुतांशी याच महाविद्यालयातून घडल्याचे सांगितले. 


कोविड 19 च्या महामारी संकटामुळे सुवर्ण महोत्सव साजरा करण्यासाठी उशिर झाला असला तरी महिनाभरात उद्घघाटन सोहळा व समारोपाचा कार्यक्रम पालकमंत्री, सांस्कृतिक मंत्री, खासदार, आमदार,नगराध्यक्ष आदी मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखात होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
महाविद्यालयाचे यंदाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. या महोत्सवासाठी महाविद्यालयात तयारी सुरू आहे. गुणवत्तेच्या स्पर्धेत टिकण्यासाठी आधुनिकतेचा स्वीकार करणे गरजेचे असून महाविद्यालयाच्या सर्वांगीन विकासासाठी  अंतरंग व बाह्यरंग सुशोभीकरण भौतिक सुविधा उपलब्ध करून देणे अगत्याचे असल्याचे महाविद्यालय सल्लागार समितीतील खासदार ओमराजे निंबाळकर, नगराध्यक्ष सचिन रोचकरी व विकास समितीतील सदस्यांनी सुचित केले आहे. सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त प्राचार्य डॉ. एस.एम. मणेर यांच्या मार्गदर्शनाखाली  विकास समितीसह सल्लागार समिती, निधी संकलन समिती, सांस्कृतिक कार्यक्रम समिती, स्मरणिका समिती, कार्यकारी समिती, जाहिरात समितीचे गठण करण्यात आले आले. या समितीद्वारे विविध कार्यक्रम घेतले जाणार असून यामध्ये प्रामुख्याने परिसंवाद, व्याख्यानमाला, ऐतिहासिक प्रदर्शन, कृषी प्रदर्शन, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळा, माजी विद्यार्थी पालक मेळावा, असे विविध समाजोपयोगी कार्यक्रम घेतले जाणार आहेत.सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त महाविद्यालयाचे आजी-माजी विद्यार्थी एकत्रित येणार आहेत. तसेच पुढे बोलताना प्रा.डॉ.एस.एम. देशमुख  यांनी सांस्कृतिक वारसा लाभलेल्या तुळजापूर सारख्या ठिकाणी सांस्कृतिक सभागृह, नाट्यगृह नसल्याची खंत व्यक्त करून सांस्कृतिक सभागृह उभे करण्यासाठी महाविद्यालयाच्या मालकीची जागा उपलब्ध असून सांस्कृतिक सभागृह उभारणीसाठ लोकप्रतिनिधींनी भरीव तरतूद करुन पुढे येण्याची गरज असल्याची अपेक्षा व्यक्त करुन महाविद्यालय कर्मचाऱ्यांच्या वतीने आपल्या पगारातून पाच लाखांचा निधी संकलित केला असल्याची माहिती देऊन महाविद्यालयाच्या विधायक कामासाठी दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन आर्थिक योगदान देण्याचे आवाहन केले.



 महाविद्यालयाच्या प्रांगणात असलेल्या स्वामी विवेकानंदाचा पुतळा महाविद्यालयासमोरील नगरपालिकेच्या त्रिकोणी जागेत हस्तांतरित करण्यात यावे, यासाठी मंगळवार दि. 23 रोजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांचेकडे निवेदन दिले असून स्वामी विवेकानंदांचा पुतळा हस्तांतरित करण्यासाठी नगरपालिकेने महाविद्यालया समोरील जागा उपलब्ध करून द्यावी 
     प्राचार्य डॉ.एस.एम.मणेर
     
      
यावेळी प्राचार्य डॉ.एस.एम. मणेर, प्रा.डॉ एस.एम. देशमुख, प्रा. विवेकानंद चव्हाण,प्रा.धनंजय लोंढे, प्रा. जे.बी. क्षिरसागर पत्रकार आदी मान्यवर उपस्थित होते.

Labels:

Tuesday, 23 November 2021

दोघा आरोपीसह दोन चारचाकी वाहने केली पोलिसानी जप्त

नळदुर्ग , दि .२३ 

लुटीच्या कारसह दोघाना 48 तासात
  स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करुन  दोन चारचाकी वाहने किमंत सात लाख रुपयेचा मुद्दे माल हस्तगत केले. 

स्थानिक गुन्हे शाखा : आंध्रप्रदेशातील रहिवाशी चालक -फजल शेख हे दिनांक 20 नोव्हेंबर रोजी 02.30 वा टाटा झेस्ट कार क्रमांक टी एस 07 यु एच 2690 मधुन दोन अनोळखी पुरुषांना घेउन जात होते. नळदुर्ग शिवारातील चिकुंद्रा पुलाजवळ कार आली असता नमुद दोघांनी चालक शेख यांना दमदाटी करुन शेख यांच्या खिशातील 6,000 ₹ व भ्रमणध्वनीसह नमुद कार लुटुन नेली होती. यावर फजल शेख यांनी नळदुर्ग पोलीस ठाणे गाठून भा.दं.सं. कलम- 392, 34 नुसार गुन्हा क्र. 384 / 2021 हा दि. 21 नोव्हेंबर रोजी नोंदवला आहे.

            सदर गुन्हा तपासादरम्यान स्था.गु.शा. च्या पोनि- श्री. गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखालील सपोनि- मनोज निलंगेकर, पोहेकॉ- काझी, जगदाळे, शेळके, कवडे, पोकॉ- ढगारे, ठाकुर यांच्या पथकाने गुन्ह्याच्या कार्यपध्दतीचा सविस्तर अभ्यास केला. यातून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे व्हर्टी, ता. तुळजापूर येथील चेतन चंद्रकांत राजमाने व हिंजवडी, पुणे येथील विशाल राजेंद्र मिश्रा या दोघा आरोपींना आज दि. 23 नोव्हेंबर रोजी व्हर्टी येथून ताब्यात घेण्यात आले. लुटीच्या मालातील टाटा झेस्ट कारसह गुन्हा करण्यास वापरलेली  आरोपींनी वापरलेली ह्युंडाई कार क्र. एम.एच. 12 एनएक्स 3260 त्यांच्या ताब्यातून जप्त करुन उर्वरीत कारवाईसाठी त्यांना नळदुर्ग पोलीसांच्या ताब्यात दिले आहे. 


Labels:

तुळजापूर तालुक्यातील वागदरी पाटीजवळ ट्रक उलटला


नळदुर्ग ,  दि . २३ एस के . गायकवाड 




नळदुर्ग - अक्कलकोट मार्गावरील  वागदरी ता.तुळजापूर पाटीजवळ   सोमवार  दि.२२  रोजी सयंकाळी ५ वाजण्याच्या  दरम्यान   झालेल्या पावसामुळे चिखल होवुन रस्ता खराब झाला.   या मार्गावरुन जाणारा ट्रक वागदरी पाटीनजीक शंकर बिराजदार यांच्या शेताजवळ पलटी होऊन रोडच्या बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडल्याची घटना घडली.

 गेल्या २-३  वर्षांपासून नळदुर्ग ते अक्कलकोट या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक- ६५२ चे दुहेरी सिमेंट रस्ता कामाला सुरुवात झालेली असून ज्या शेतकऱ्यांची जमीन रोडमध्ये गेली आहे. त्यांनी सदर जमिनीचा मावेजा मिळावा म्हणून शासनाकडे मागणी करून आपल्या न्यायीक मागणी करिता हायकोर्टात प्रकरण दाखल केले आहे. ज्याठिकाणी अडवणुक नाही .त्याठिकाणी रोडचे बांधकाम चालू आहे .रोडचे बांधकाम करण्यासाठी गुत्तेदारानी रोडवर खोदकाम करून ठेवले आहे. परंतु शेतकरी,शासन, न्यायालय आणि गुत्तेदार यांच्या चक्रव्यूहात हे काम अडकले असून नळदुर्ग ते वागदरी पाटी या रोडवर शंकर बिराजदार यांच्या शेताजवळ रोड बांधकामासाठी खड्डा खोदण्यात आला. परंतु शेतकऱ्यानी अडवणुक केल्याने गेल्या दोन -तीन वर्षांपासून हे काम प्रलंबित आहे. 

या ठिकाणी वाहनधारकाना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे. दि.२२ नोव्हेंबर  रोजी सायंकाळी ५  वाजता पडलेल्या आवकाळी पावसमुळे झालेल्या चिखलात ट्रक क्रमांक एमएच बीयू-१३६० हा घसरुन खड्ड्यात पडला 
 सुदैवाने कसलीही जीवीतहानी झाली नाही. हे जरी खरे असले तरी शासनाने शेतकरी व न्यायालय यांच्याशी योग्य तो समन्वय साधून यावर तोडगा काढून प्रलंबित असलेले रोडचे काम त्वरित पूर्ण करावे. अशी मागणी जनतेतून होत आहे.

Labels:

Saturday, 20 November 2021

तुळजापूर तालुक्यातील वागदरी येथे घरोघरी जावून कोव्हिड लसीकरण : ९५ टक्के लसीकरण पुर्ण

वागदरी , दि .२० : एस.के.गायकवाड


तुळजापूर तालुक्यातील मौजे वागदरी तेथे कोव्हिड लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत असून वृध्द, अपंग व्यक्तीची गैरसोय होऊ नये म्हणून दि.२० नोव्हेंबर  रोजी घरोघरी जाऊन लसीकरण करण्यात आले.

  

कोव्हिड-१९ कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सर्वत्र लसीकरण मोहीम सुरू असून या मोहिमेला प्रतिसाद देत प्राथमिक आरोग्य केंद्र नळदुर्ग येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल जानराव यांच्या मार्गदर्शनाखाली वागदरी ता . तुळजापूर  येथे आता पर्यंत सात टप्प्यात लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आले असून दि.२०नोव्हेंबर २०२१ रोजी लसीकरणाच्या सातव्या टप्प्यात  वागदरी येते वृध्द  व अपंग व्यक्तींची गैरसोय होऊ नये,  ते लसीकरणापासून वंचित राहु नये म्हणून आरोग्य सेविका एस.बी.गोरे, ग्रामसेवक जी.आर.जमादार, ग्रा.प.सदस्य दत्तात्र सुरवसे, विद्या बिराजदार,पोलीस पाटील बाबुराव बिराजदार ,संगणक परिचारक आनंद गायकवाड, आशा कार्यकर्ती पार्वती बिराजदार,ग्रा.प.कर्मचारी सर्जेराव चव्हाण,आदींनी घरोघरी जावून लसीकरण मोहीम यशस्वी केली. गावात आता पर्यंत जवळपास ९५ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे.

Labels:

महागाई विरुद्ध जिल्हा काँग्रेसच्या वतीने जनजागरण अभियानास प्रारंभ



उस्मानाबाद , दि . २० : 

जिल्हा काँग्रेस कार्यालय गांधी भवन उस्मानाबाद येथे  केंद्र सरकरच्या चुकीच्या धोरणामुळे वाढलेल्या महागाईच्या विरुद्ध महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून नियुक्त केलेले निरीक्षक माजी आमदार  विश्वनाथ चाकोते, सहनिरीक्षक डॉ.श्रावण रॅपनवाड यांच्या हस्ते उस्मानाबाद जिल्हा जनजागरण अभियान रथाची पूजा करून  रथाला हिरवा झेंडा दाखवुन शुभारंभ करण्यात आला.


  या वेळी मार्गदर्शन करताना चाकोते यांनी अभियानाची पार्श्वभूमी सांगून काँग्रेस व भाजपा सरकारमधील सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यामधील फरक मांडला. काँग्रेस झोपडीतील गरीब माणूस केंद्र बिंदू समजून योजना अंमलात आणत होते, तर भाजपा सरकार अदानी ,अंबानी याना समोर ठेहून सरकार चालवत असल्याचा आरोप केला.


 डिझेल, पेट्रोल,गॅस,शेती औजारे,खाद्यपदार्थ, मशनरी,यांच्या किमती काँग्रेसच्या काळातील किमतीशी तुलना केली तर तीन पट किमती वाढल्या असल्यामुळे जनतेचे बजेट कोलमडले असल्याचे दिसून येत आहे. यावेळी सह निरीक्षक डॉ रॅपनवाड यांनीही मार्गदर्शन केले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी जनतेला जाग करावे असे आवाहन केले. जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून जनजागरण अभियान उस्मानाबाद जिल्ह्यात यशस्वी करू असे आश्वासन दिले.


 निरीक्षकांनी प्रत्येक तालुकाध्यक्ष यांचेकडून तालुकानिहाय आढावा घेहून अभियान प्रत्येक जि.प गट आणि गणात पोहचविण्याचे नियोजन करावे असे आवाहन केले. यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड.धिरज पाटील जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखाने कार्याध्यक्ष खलील सय्यद उपाध्यक्ष भागवत धस , प्रशांत पाटील, तालुकाध्यक्ष लक्ष्मण सरडे ॲड. हनुमंत वाघमोडे, पांडूरंग कुंभार, बाळासाहेब गपाट ,सेवा दल अध्यक्ष विलास शाळू  सचिव जावेद काझी ,ॲड. विश्वजीत शिंदे, शामराव भोसले, प्रणित डिकले, आनंद घोगरे, मिलिंद गोवर्धन, गोविंद पाटील ,ॲड.राहूल लोखंडे ,ॲड.अतुल देशमुख ,पोपट अंबिरकर उपस्थित होते.


 कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखाने यांनी  तर आभार उपाध्यक्ष प्रशांत पाटील यांनी मानले. कार्यक्रमास जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Labels:

एस.टी.कर्मचारी यांच्या आंदोलनाला पेशवा युवा संघटनेचा जाहिर पाठींबा



नळदुर्ग, दि . २०


महाराष्ट्र राज्य शासनाने राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासकीय सेवेत विलीनीकरण करून एस.टी.बसच्या सर्व कर्मचा-यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे,या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून चालू असलेल्या एस.टी.कर्मचारी यांच्या बेमुदत संप आंदोलनास "पेशवा युवा संघटन,तूळजापुर तालुका"यांचा जाहिर पाठींबा असल्याचे, तालुकाध्यक्ष  प्रमोद कुलकर्णी यांनी दि .२० नोव्हेंबर रोजी प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहे.

Labels:

सौर ऊर्जेच्या माध्यमातून युवकाने आपला आर्थिक विकास साधावा.. श्री राजेश ठोकळे


उमरगा , दि .२० 

बदलत्या काळानुसार नैसर्गिक इंधन कमी होत असून वीज पेट्रोल वरचेवर कमी होत असून यावर मात करण्यासाठी सौर ऊर्जेशिवाय पर्याय नाही. भविष्यात सर्वच क्षेत्रात सौर ऊर्जेचा वापर होणार आहे म्हणून बेरोजगार युवकांनी यांचे प्रशिक्षण घेऊन आपला आर्थिक विकास साधावा असे मत प्रथम एज्युकेशन फाउंडेशन मुंबई होकेशनल प्रोग्राम कार्यक्रम प्रमुख राजेश ठोकळे मुंबई यांनी व्यक्त केले.


किल्लारी येथील प्रथम एज्युकेशन फाउंडेशन या संस्थेत सोलार पीव्हीसी इंस्टॉलर (सूर्यमित्र) हा सौर ऊर्जेचा नवीन कोर्स सुरू करण्यात आला. यावेळी श्री राजेश ठोकळे यांनी मुंबई येथून ऑनलाइन पद्धतीने उद्घघाटन केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रथम चे वेल्डिंग कार्यक्रम प्रमुख श्री सचिन चांदुरकर, कंन्स्ट्रक्शन कार्यक्रम प्रमुख श्री संजय लोखंडे सोलार कार्यक्रमाचे असोसिएट अजय चांदुरकर प्लंबिंगचे श्री शिवाजी कदम हेल्थकेअर च्या अनिता गांगुर्डे, अतुल भिडे,  पुष्पा गायकवाड, किल्लारी येथील आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग दोडके, शिवाजी शिक्षण संस्थेचे संचालक बब्रुवान माने, व सामाजिक कार्यकर्त्या  जयश्री कांबळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख श्री सदाशिव साबळे हे होते. 


यावेळी बोलताना श्री ठोकळे म्हणाले भविष्यात सौर ऊर्जेत तंत्रज्ञाची कमतरता भासणार असूनयासाठी प्रथम ने देशातील पहिला सौर उर्जेचा कोर्स सुरू करून मराठवाड्यातील ग्रामीण भागातील युवकांना दोन महिने निवासी मोफत प्रशिक्षण देऊन रोजगार मिळवून देण्यात येणार असून याचा सर्व बेरोजगार युवकांनी लाभ घ्यावा. असे आव्हान करण्यात आले.


यावेळी डॉ.पांडुरंग दोडके, बब्रुवान माने, जयश्री कांबळे श्री सदाशिव साबळे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रथम चे इलेक्ट्रिकल कार्यक्रम प्रमुख श्री संजय शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन श्री बालाजी भालेराव यांनी केले व आभार प्रदर्शन श्री दिनेश धुळे यांनी केले.
कार्यक्रमास प्रशिक्षणार्थी युवक व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने हजर होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अॅड. अंगुलकुमार सूर्यवंशी, शिलरत्न शेळगे, संतोष गुंजोटे,बालाप्रसाद पाचंगे, सोमनाथ घोडके, सतीश कांबळे, विशाल माळी, बसव साताळे, राम कोथिंबिरे, अरविंद पवार, तुषार निधानकर, बाळासाहेब कदिरे बळीराम कांबळे यांनी परिश्रम घेतले.

Labels:

केंद्र सरकारने तीन कृषी कायदे रद्द केल्यामुळे जिल्हा काँग्रेस कडून आनंदोत्सव

उस्मानाबाद , दि . १९ : 

केंद्र सरकार मधील भारतीय जनता पार्टीच्या सरकारने शेतकरी विरोधी तीन काळे कायदे पारित केले होते त्या कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी काँग्रेससह विरोधी पक्ष गेली १४ महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसले होते. अखेर केंद्र सरकारने हे प्रस्तावित केलेले काळे कायदे रद्द केल्याचे जाहीर केले, केंद्र सरकार अखेर शेतकरी व विरोधकांच्या आंदोलना समोर झूकले म्हणून उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटी उस्मानाबाद च्यावतीने रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून   आणि फटाके फोडून आनंदोत्सव साजरा  केला.


  यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड.धिरज पाटील, संघटक राजा शेरखाने, कार्याध्यक्ष खलील सय्यद , उपाध्यक्ष प्रशांत पाटील,  ॲड.विश्वजीत शिंदे, ॲड.राहुल लोखंडे , ॲड.अतुल देशमुख, बालाजी नायकल, प्रभाकर लोंढे,  ॲड.गणपती कांबळे, अहमद चाऊस यांचेसह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी  उपस्थित होते

Labels: