Sunday, 20 August 2023

रतन टाटा उद्योग,नवोपक्रम, स्टार्टअप आणि सामाजिक जाणिवेचे चालते बोलते विद्यापीठ - राज्यपाल रमेश बैस

उद्योगरत्न, उद्योगमित्र, उद्योगिनी आणि उत्कृष्ट मराठी उद्योजक पुरस्कार प्रदान, 

रतन टाटा उद्योग,नवोपक्रम, स्टार्टअप आणि सामाजिक जाणिवेचे चालते बोलते विद्यापीठ -  राज्यपाल रमेश बैस


 मुंबई, दि २० 


रतन टाटा हे केवळ एक व्यक्ती नाहीत तर ते स्वतः एक संस्था आहेत.रतन टाटा यांनी चहा, मीठ ते स्टील,ऑटोमोबाईल्स,आयटी, विमानबांधणी,आदरातिथ्य अशा  वैविध्यपूर्ण क्षेत्रांसह टाटा उद्योग समूहाला जागतिक समूहात रूपांतरित केले.ते उद्योग,नवोपक्रम, स्टार्टअप आणि सामाजिक जाणिवेचे चालते बोलते विद्यापीठ आहेत. महाराष्ट्र राज्याचा पहिला 'उद्योगरत्न' पुरस्कार स्वीकारून त्यांनी महाराष्ट्र शासनाची आणि पुरस्काराची प्रतिष्ठा वाढवली आहे,असे गौरवोद्गार राज्यपाल रमेश बैस यांनी काढले. 


उद्योग विभागाच्यावतीने देण्यात येणारे उद्योगरत्न', 'उद्योग मित्र', 'उद्योगिनी' आणि 'उत्कृष्ट मराठी उद्योजक' पुरस्कार आज जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमधील जास्मिन हॉल येथे प्रदान करण्यात आले.यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन श्री बैस बोलत होते.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, मुख्य सचिव मनोज सौनिक,उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ.हर्षदीप कांबळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. 

पहिला उद्योगरत्न पुरस्कार पद्मविभूषण रतन टाटा यांच्यावतीने  टाटा उद्योग समुहाचे अध्यक्ष चंद्रशेखरन यांनी स्वीकारला.तर उद्योगमित्र पुरस्कार अदर पुनावाला यांना तसेच उद्योगिनी पुरस्कार गौरी किर्लोस्कर यांना,उत्कृष्ट मराठी उद्योजक पुरस्कार विलास शिंदे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला .'उद्योगरत्न' पुरस्काराचे स्वरूप २५ लक्ष रुपये ,सन्मानचिन्ह व मानपत्र असे आहे. 'उद्योगमित्र' पुरस्काराचे स्वरुप  १५ लक्ष रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र, 'उद्योगिनी' पुरस्काराचे स्वरुप ५ लक्ष रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र तर 'उत्कृष्ट मराठी उद्योजक' पुरस्काराचे स्वरुप ५ लक्ष रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र असे आहे.

यावेळी  राज्यपाल श्री बैस यांनी महत्त्वाचे 'उद्योग पुरस्कार' सुरू केल्याबद्दल  महाराष्ट्र सरकार आणि राज्याच्या उद्योग विभागाचे अभिनंदन केले.कालच श्री रतन टाटा यांना उद्योगरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.हा पुरस्कार देण्यासाठी भारतीय उद्योगक्षेत्रात रतन टाटा यांच्यापेक्षा चांगला माणूस असूच शकत नाही असेही ते म्हणाले. 

जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले तरुण राष्ट्र म्हणून,भारताला आज अभूतपूर्व अशी संधी आहे.  जगातील अनेक विकसित देश वृद्ध होत आहेत. ते त्यांच्या कामगारांचा पुरवठा पूर्ण करण्यासाठी भारताकडे पाहत आहेत.या संधींचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्राने कौशल्य विकास आणि उद्योजकतेला सर्वाधिक महत्त्व दिले पाहिजे.कौशल्य विकासात उद्योग भागीदारी आवश्यक आहे.भारत स्वातंत्र्याच्या सुवर्णकाळात पाऊल ठेवत असताना, महाराष्ट्राच्या पुढील २५ वर्षांच्या औद्योगिक विकासासाठी ब्ल्यू प्रिंट तयार करण्यासाठी  मुख्यमंत्र्यांनी व्यापारी नेते, उद्योगपती आणि विविध चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या प्रमुखांची उच्चाधिकार समिती स्थापन करावी. देशांतर्गत आणि परदेशी गुंतवणुकीचे स्वागत होईल आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल असे अद्योगिक वातावरण राज्यात निर्माण होईल अशी आशा राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केली. 

 आदर पूनावाला  यांच्या नेतृत्वाखाली सीरम इन्स्टिट्यूटने 'कोविशील्ड' ही लस विकसित करून देशाचा नावलौकिक केला आहे.पहिल्या 'उद्योग मित्र' पुरस्कारामुळे आदर पुनावाला यांच्यासोबतच 1960 च्या दशकात सीरम इन्स्टिट्यूटची पायाभरणी करणा-या सायरस पूनावाला यांचाही सन्मान पुरस्काराच्या रुपात होत आहे.आदर पुनावाला यांचे कौतुक करताना ते म्हणाले की,विविध देशांचे राज्यपाल, मंत्री,राजदूत अनेकदा भारताने विकसित केलेल्या 'कोविशील्ड' लसीचा उल्लेख करतात.कोविड-19 महामारीनंतर त्यांना 'कोविशील्ड' लस उपलब्ध करून दिल्याबद्दल आणि आपल्या देशवासीयांचे प्राण वाचवल्याबद्दल ते भारताचे मनापासून आभार मानतात.
 
 किर्लोस्कर हे उद्योगक्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव आहे.श्री लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी स्थापन केलेल्या आणि शंतनुराव किर्लोस्कर यांच्यासारख्या महान उद्योजकांनी चालवलेल्या १३५ वर्ष जुन्या किर्लोस्कर समूहालाही हा सन्मान जातो.गौरी किर्लोस्कर यांना देण्यात येणारा 'उद्योगिनी' पुरस्कार सर्व महिला उद्योजकांसाठी प्रेरणादायी आहे.

सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांना दिला जाणारा मराठी उद्योजक पुरस्कार हा महाराष्ट्रातील प्रगतीशील शेतकऱ्यांचा पुरस्कार आहे.शिंदे हे एक दूरदर्शी शेतकरी आहेत ज्यांनी शेतकऱ्यांचे जीवन समृद्ध करण्यासाठी शेतीची क्षमता ओळखली.
 
 उद्योग पुरस्कारांसाठी पुरस्कार विजेत्यांची निवड करताना, सरकारने आपल्या अर्थव्यवस्थेतील उत्पादन क्षेत्र, सेवा क्षेत्र आणि कृषी क्षेत्र या तीनही क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पुरस्कार विजेत्यांची निवड करून चांगले काम केले आहे असेही राज्यपाल श्री.बैस म्हणाले. 


रतन टाटा म्हणजे माणसातला देवमाणुस - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आपण कुणीही देव पाहिलेला नाही. पण, देव चराचरात आहे. गरजूंच्या मदतीला देव नेहमी धावतो. यंदाच्या उद्योगरत्न पुरस्कारासाठी आपण अशाच एका माणसातल्या देवमाणसाची निवड केली आहे. टाटा म्हणजे अढळ विश्वास, गुणवत्तेची खात्री आणि प्रचंड सामाजिक भान असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.

आपण विविध क्षेत्रात विशेष असं योगदान दिलेल्या मान्यवर व्यक्तीस महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानीत करत असतो. त्याच धर्तीवर उद्योजकांचा सन्मान करण्यासाठी आपण उद्योग पुरस्कारांची सुरवात केली  आहे.

मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. महाराष्ट्र राज्य हे देशाच्या औद्योगिक प्रगतीचं ग्रोथ इंजिन आहे. या ग्रोथ इंजिनाची सगळ्यात मोठी शक्ती अर्थातच उद्योग क्षेत्राची आहे. म्हणूनच हे उद्योग पुरस्कार देऊन राज्यातील उद्योग विश्वाचा सन्मान करण्याचे शासनाने ठरविले आहे.

उद्योगरत्न पुरस्कारासोबतच आज आपण 'उद्योग मित्र', 'उद्योगिनी' आणि उत्कृष्ट मराठी उद्योजक हे तीन पुरस्कार प्रदान करत आहे. आजच्या चारही सत्कारमुर्तीमधील मोठं साम्य  म्हणजे ट्रस्ट, विश्वास आहे. 

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, आपल्या राज्याला उद्योगपतींच्या अनेक पिढ्यांनी घडविले. अगदी पारतंत्र्यापासून उद्योगांनी या देशासाठी योगदान दिले आहे. आज मोठ्या प्रमाणावर सेवाक्षेत्र, आयटी क्षेत्र राज्यात आणि देशात विकसित झालं आहे. या उद्योग क्षेत्राने आजवर अब्जावधी हातांना रोजगार दिला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

आपल्याला कृषी आधारित उद्योगांना देखील राज्यात वाढवायचे आहे, त्यांना प्रोत्साहन द्यायचे आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ५ ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राला १ ट्रिलियन डॉलर्सचे योगदान द्यायचे आहे. दावोसच्या वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या बैठकीत आम्ही १ लाख ३७ हजार कोटींचे करार केले. ते नुसते कागदोपत्री नाहीत तर ८५ टक्के करारांची अंमलबजावणी सुरु झाली आहे. आज परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात अव्वल क्रमांकावर आला आहे असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.


सर्वोत्कृष्ट मानव संसाधन महाराष्ट्रात- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 टाटा ट्रस्टने आधुनिक भारताच्या विकासात अमूल्य असे योगदान दिले आहे. जगात पाचव्या क्रमांकावर असलेले टाटा ग्रुप महाराष्ट्रात आहे याचा आम्हाला अभिमान आहे. महाराष्ट्र राज्य प्रत्यक्ष गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर आहे.सर्वोत्कृष्ट मानवसंसाधन महाराष्ट्र राज्यात असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. 

उपमुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, देशाचे स्टार्टअप कॅपिटल महाराष्ट्र राज्यात आहे. सर्वाधिक स्टार्टअप महाराष्ट्रात आहे. स्टील इंडस्ट्रीत गुंतवणूक वाढत आहे, भविष्यात 'स्टील सिटी' म्हणुन गडचिरोली नावारूपाला येत आहे.ट्रीलियन इकॉनॉमीची वाटचाल करताना सर्व विभागाला सोबत घेवून जात आहे, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

टाटा ट्रस्ट सेवाभावी संस्था - उपमुख्यमंत्री अजीत पवार

उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र राज्याचे पहिल्या क्रमांकाचे नाव पुढे नेण्याचे काम हे सरकार  करत आहे.  टाटा ट्रस्ट ही एक सेवाभावी संस्था आहे. राज्याच्या इतिहासात पहिला उद्योग क्षेत्रातील पुरस्कार रतन टाटा यांना दिला याची नोंद ठेवली जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.पुरस्कार मिळालेल्या सर्वांचे अभिनंदन करून उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले,आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून नवीन पिढीने उज्ज्वल काम केले आहे.

प्रस्ताविकात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पुरस्कार सुरु करण्यामगची भूमिका विषद केली. त्यांनी उद्योग मित्रव रोजगार मित्र या नाविन्यपूर्ण प्रकल्प तसेच उद्योग मित्र व्हॅन बाबत माहिती दिली. 

यावेळी मनोगत व्यक्त करताना टाटा ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रशेखरन म्हणाले की, उद्योजकांना पुरस्कार हा राज्य शासनाचा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. महाराष्ट्र हे देशातील उद्योगात अग्रेसर असलेले राज्य आहे. त्याचबरोबर शिक्षण, आरोग्य आणि उद्योगाच्या बाबत दूरदृष्टी असणारे  राज्य म्हणुनही ओळखले जाते.  

सिरम इन्स्टिट्यूट ही देशाची, महाराष्ट्राची कंपनी आहे. कोविड काळात 90 टक्के लस हे महाराष्ट्राने पुरवले. महाराष्ट्राची कार्य संस्कृती वेगळी आहे, त्यामुळे आपण महाराष्ट्रातच यापुढेही उद्योगाला प्राधान्य देऊ. हा पुरस्कार हा राज्य, देश सिरम इन्स्टिट्यूट मधील कामगार आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार आहे. 

गौरी किर्लोस्कर मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, उद्योग क्षेत्रात महिलांसाठी समान संधी निर्माण केल्याबद्दल राज्य शासनाचे त्यांनी आभार मानले. उद्योग क्षेत्रातील आजोबा व वडिलांचे योगदान सांगतानाचा भारताच्या निर्माणशक्तीवर त्यांचा विश्वास होता असेही त्या म्हणाल्या.

मी एक शेतकरी असून कृषी क्षेत्रातील पुरस्कार मला मिळणे अपेक्षित होते मात्र राज्य शासनाने मराठी उद्योजक पुरस्कार दिल्यामुळे यापुढे शेतीला उद्योगाचा दर्जा मिळण्याकडे वाटचाल सुरू झाली असे म्हणावे लागेल. शेतकऱ्यांनी एकीने शेती केली तर शेतीत निश्चितच बदल घडू शकतो. महाराष्ट्राचा शेतकरी आज युरोपात सर्वात जास्त द्राक्ष विकत आहे याचा मला अभिमान असल्याचे विलास शिंदे  यावेळी म्हणाले.  

यावेळी  मुख्यमंत्री रोजगार कार्यक्रम योजनेंतर्गत यशस्वी उद्योजकांच्या यशकथांच्या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्याक्रमाचे सुत्र संचालन अजीत भुरे यांनी तर आभार डॉ.हर्षदीप कांबळे यांनी मानले.

Labels:

नळदुर्ग येथे जागतिक छायाचित्र दिनानिमित्त छायाचित्रकारांचे सत्कार

नळदुर्ग येथे जागतिक छायाचित्र दिनानिमित्त छायाचित्रकारांचा गौरव
तुळजापूर तालुका ग्रामीण फोटोग्राफर असोसिएशनचा  उपक्रम 


नळदुर्ग ,दि. २० 

शनिवार दि. १९ ऑगस्ट रोजी   जागतिक छायाचित्र दिनाचे औचित्य साधून तुळजापूर तालुका ग्रामीण फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने विविध उपक्रमाने  जागतिक छायाचिञ दिन  उत्साहात  साजरा करण्यात आला.



यामध्ये  उस्मानाबाद  जिल्ह्यातील उत्कृष्ट छायाचित्रकारांचा सत्कार सोहळा,स्नेह भोजन, सप्तसुरांची संगीत मैफिल रंगली होती. 


शनिवार रोजी तुळजापूर तालुका ग्रामीण फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने जागतिक छायाचित्र दिनाचे औचित्य साधून  तुळजापूर  तालुक्यातील नळदुर्ग येथील लोकमान्य वाचनालय येथे जिल्ह्यातील  उत्कृष्ट व जेष्ठ छायाचित्रकारांचे  नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल लोखंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. तसेच छायाचित्रकारांसाठी स्नेह भोजन तसेच दशरथ शिंदे यांच्या सप्तसूर एक संगम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसाद देशमुख  तर प्रमुख उपस्थितीत बैंगलोर येथील प्रकाश चलवादी, सोलापूर येथील जेष्ठ फोटोग्राफर सुरेश लकडे, संघटनेचे अध्यक्ष निजाम शेख, उपाध्यक्ष शिवानंद खुने हे उपस्थित  होते.


यावेळी संघटनचे कोर कमेटी सदस्य संजय कुंभार,धनराज साखरे,लक्ष्मण दुपारगुडे,सचिव गणेश जवळगे, कार्याध्यक्ष अलीम शेख, संघटक शुभंक मायाचारी, कोषाध्यक्ष किशोर वाघमारे, सहसचिव किरण कांबळे,संघटक नितीन गायकवाड, रियासत शेख,अनिल जाधव, शिवानंद नाटेकरी,ज्ञानेश्वर केसकर,विशू बोंगरगे,सुनिल दिक्षित,सुहास राठोड,श्रीमंत डेंग,अक्षय पाटील,सुरज टेंगळे,अंकित शिंदे,शुभम राठोड, मारूती कोळी,आप्पा कांबळे, रमेश दबडे,मन्सूर शेख,रोहित राठोड,महमंद इनामदार लखन वाघमारे,विकी धुते,उमर सय्यद, खलील इनामदार,सह अदि फोटोग्राफर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्रद्धा दुपारगुडे प्रास्ताविक निजाम शेख तर आभार लक्ष्मण दुपारगुडे यांनी मानले.

Labels:

Saturday, 19 August 2023

नळदुर्ग शहर विकास कामे वाटपातील गैरप्रकार उघडकीस राष्ट्रवादीचे जगदाळे अक्रमक होवुन दिला आदोंलनाचा इशारा


नळदुर्ग, दि.१९ 

नळदुर्ग  शहराच्या विविध विकास कामासाठी
शासनाच्या नगरविकास विभागाकडुन आलेला निधी व जिल्हा नियोजन समितीचा निधी खर्चुन विकास कामे वाटपातील झालेल्या गैरप्रकार उघडकीस आणुन त्यावर  सडकुन टिका करत   जनतेस अंदाज पञकाच्या तरतुदीनुसार दर्जेदार कामे करुन घेण्याचे आवाहन राष्ट्रीवादी काॕग्रेस पक्षाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य अशोक जगदाळे यांनी पत्रकार परिषदेद्वारे केले आहे.

नळदुर्ग शहराच्या विकासासाठी आलेला  करोडो रुपयेचा निधी खर्च करताना विकास कामे वाटून घेण्यासाठी सुरू असलेला वाद, पोटगुत्तेदारी,  कार्यारंभ आदेश देऊन दोन महिन्यानंतरही ऐंशी टक्के कामास सुरवात न होणे, शहरात वाढती गुन्हेगारी, अवैध धंदे, धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या घटना याबद्दल चिंता व्यक्त करत राष्ट्रीवादीचे अशोक जगदाळे यांनी आंदोलनही करणार असल्याची माहिती दिली.

 शहरात विविध योजनेतून शासनाकडून आलेला निधी हडप करण्यासाठी चुकीच्या पद्धतीने निविदा प्रक्रिया राबवणे, कमी रकमेच्या निविदा नाकारून शासनाचा पैसा अनावश्यक खर्च करणे, एकेका कामासाठी दोन ते तीन पोट गुत्तेदार आढळून येणे. एका पक्षाच्या चार पदाधिकार्यांनी मिळून कामे वाटून घेणे, प्रशासनातील व्यक्तीने एखाद्या पक्षासाठी निधी वसूल करणे असे प्रकार घडत असल्याचा आरोप जगदाळे यांनी केला. तसेच शासनाच्या नगरविकास विभागाकडून आलेला निधी व जिल्हा नियोजन समितीचा निधी आला आहे. असा निधी सर्वच पालिकेंना देण्यात आला असताना आमच्या नेत्याने आणला म्हणून श्रेय घेण्यासाठी होर्डींग लावणे हास्यास्पद असल्याची टीका जगदाळे यांनी केली. चांगला निधी आला आहे कामेही चांगल्या दर्जाची करा, जिथे लोकवस्ती नाही तिथे कामे करू नका, खासगी लेआऊट असलेल्या ठिकाणी निधी खर्च करत असल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला.
   

शहरातील कायदा व्यवस्था ढेपाळली आहे, अवैध धंदे, मटका, जुगार, हातभट्टी दारू विक्री, गुटखा विक्री जोरात सुरू आहे. सामाजिक वातावरण क्लुषीत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तरूणाई गुन्हेगारीकडे वळत आहे. शहरासाठी ही बाब धोकादायक असून पोलीस महासंचालकांची याबाबत भेट घेणार असल्याचे जगदाळे यांनी सांगितले.

Labels:

Thursday, 17 August 2023

कर्तबगारीचा इतिहास ठेवण्याकरिता आई-वडिलांनी आता सजग राहावे - सपोनि स्वप्नील लोखंडे

अणदुर दि.१७ :


भगतसिंग ज्या वयात देशासाठी फासावर गेले त्या वयातील आजचे युवक मिरवणुका व इतर कार्यक्रमांनी डीजेवर ताल धरत असल्याची खंत नळदुर्ग पोलीस ठाण्याचे नूतन सहाय्यक   पोलिस  निरीक्षक  स्वप्नील लोखंडे यांनी व्यक्त केली.

 ते अणदुर ता तुळजापूर येथे मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव समितीच्या वतीने स्वातंत्र्यसैनिकाचे प्रतिमापूजन, हुतात्मा स्तंभाला अभिवादन, स्वातंत्र्य सैनिक वारसांचा सन्मान कार्यक्रमात प्रमुख पाहुणे पदावरून बोलत होते. अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गेली वर्षभर अंणदुर येथील हुतात्मा स्मारकात वारसांचा सन्मान हुतात्मा स्तंभाला अभिवादन कार्यक्रम ठेवण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी स्वातंत्र्यसैनिक पुत्र सुभाष स्वामी  तर प्रमुख पाहुणे म्हणून वारस श्रीमंतराव मुळे गुरुजी, माणिकराव कार्ले गुरुजी, रजाक शेख,  सामाजिक कार्यकर्ते विनायक अहंकारी, अणदुर ग्रामविकास अधिकारी देविदास चव्हाण हे उपस्थित होते.
 

प्रारंभी गावातील २० स्वातंत्र्यसैनिकाच्या प्रतिमांचे व स्वातंत्र्यलढ्यात सशस्त्र लढा देताना वीरभद्र स्वामी यांनी वापरलेले चिलखत व हुतात्मा स्तंभाचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते  पूजन करण्यात आले .तदनंतर महाराष्ट्र गीताने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
   

 यावेळी बोलताना सहाय्यक   पोलिस  निरीक्षक  स्वप्नील लोखंडे पुढे  म्हणाले की, आजच्या पिढीमध्ये देशप्रेम नसल्याने पुढच्या पिढीमध्ये ते कसे येणार असा प्रश्न उपस्थित करून या अगोदरची पिढी व आताची पिढी यातील अनेक उदाहरणे देत तुलना केली. भगतसिंगाच्या आईने 65 हजार युवकांपुढे व्यक्त केलेले मनोगत ही यावेळी त्यांनी विशद केले. पुढील पिढी समोर आता कर्तबगारीचा इतिहासच ठेवला पाहिजे येणाऱ्या पुढील काळात आई-वडिलांनी आता सजग राहण्याची आवाहन  त्यांनी शेवटी केले.
 

यावेळी स्वातंत्र सैनिक वारस श्रीमंत मुळे गुरुजी, प्राध्यापक सुभाष स्वामी , विनायक अहंकारी, पत्रकार राजकुमार स्वामी, यांचेही भाषण झाले.
  या कार्यक्रमास उमाकांत करपे, तात्या काळे, महावीर कंदले, रामचंद्र शेटे, अरविंद घोडके, मल्लिनाथ लंगडे  ,चंद्रशेखर आलुरे , सिद्राम सोमवंशी, सुरेश चव्हाण, बसवराज घुगरे, उमाकांत करपे ,बालाजी कुलकर्णी ,माणिक निर्मळे ,भारत गायकवाड ,बालाजी राजपुत,कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता देशमुख, शिक्षिका सुरेखा क्षीरसागर, विमल जाधव, आदीजण उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी म्हाळाप्पा घोडके, प्रजोत करपे ,संतोष तिरगुळे, शिवानंद खूने, काशिनाथ घुगे, आनिल अणदुरकर, नयन तोग्गी यांनी परिश्रम घेतले.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमृत महोत्सव समितीचे सदस्य साहेबराव घुगे, तर सूत्रसंचालन व आभार राहुल राठोड यांनी केले.

 यावेळी मराठवाडा मुक्ती संग्रामात सशस्त्र लढा देणारे वीरभद्र स्वामी यांनी वापरलेले चिलखत  दर्शनासाठी ठेवण्यात आले होते.

Labels:

Wednesday, 16 August 2023

महिलाना मारहाण प्रकरणी आरोपीवर विनय भंगाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पिडित कुटूंबाचा पोलिस ठाण्यासमोर उपोषणाचा इशारा


उस्मानाबाद , दि. १६ :
 
  राञीच्यावेळी बंजारा समाजाच्या  एका कुटूंबातील दोन  महिलाना  घरात घुसून खासगी सावकाराने मारहाण केल्याने याप्रकरणी  अरोपीविरुध्द विनयभंगचा गुन्हा दाखल करुन अटक करण्याच्या मागणीसाठी  कुटूंबासह मुरुम पोलिस ठाणे येथे दि. २३  आॕगस्ट रोजी  उपोषण करण्याचे निवेदन पिडीत महिलेने उस्मानाबाद पोलिस आधिक्षक याच्यासह संबंधिताना दिले आहे.

  निवेदनात पुढे मुन्नाबाई राठोड यानी म्हटले आहे की,  मी आष्टा कासार ता. लोहारा येथील रहिवाशी आसून  शेतीवरच  कुटूंबीयांचा उदरनिर्वाह असुन माझ्या कुटुबात पती राजकुमार तुकाराम राठोड, सासरा तुकाराम राठोड, सासु कमलाबाई  व माझी तीन मुले असे आहेत. माझा मोठा दिर पांडुरंग हा विभक्त राहतो. माझे पती राजकुमार यांच्या नावाने आष्टा गावाच्या शिवारात साडे पाच एकर शेती आहे.

माझे पती बाहेर गावी गेल्याचे पाहून दि. 12 एप्रिल  रोजी रात्री 10:30 वाजता  आलूर ता. उमरगा येथिल दोघे खासगी सावकार घरात घुसून लज्जास्पद अशा अर्वाच्या भाषेत,  आम्हा महिलांना शिवीगाळ करुन मारहाण केल्याचे नमुद करुन दिर पांडुरंग यास शेतजमीन वाटुन दया अन्यथा तुम्हाला खल्लास मारुन टाकीन असे तक्रारी आर्जात नमुद केले आहे. 


 याप्रकरणी मुरुम पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याने  दोघा आरोपी विरुध्द अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला. वासतविक पाहता गुंडगिरी करणाऱ्या व महिलांना मारहाण करणाऱ्या  आरोपीवर विनयभंगचा गुन्हा दाखल  करणे अपेक्षित होते. मात्र पोलिसांनी थातुरमातुर कार्यवाही केली.  पोलिसांचे आरोपीस अभय  असल्यामुळेच  आरोपी सतत दमदाटी करुन आम्हाला  आजही नाहकच ञास देत आसल्याचे बोलताना  सांगितले आहे.



गेल्या सात महिन्यापूर्वीपासून शेतजमिनी प्रकरणी वरील आरोपीसह माझ्या दिराकडून सतत जीवे मारण्याच्या धमक्या देणे, शिवीगाळ करणे, रात्री बेरात्री येऊन नाहाक त्रास देण्याचे प्रकार अजूनही सुरूच आहे. पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिल्यानंतर उलट वरील आरोपी (खासगी सावकार) जास्तच त्रास देत आहेत. पोलिस आमचे काहीही वाकडे केले नाही, असे सांगून शेतजमीन हडप करण्यासाठी आम्हाला लज्जास्पद अर्वाच्या भाषेत शिविगाळ करुन जीवे मारण्याची धमकी देत असल्याने याप्रकरणी दि. 17 जुलै रोजी पोलिस अधिक्षक यांना तक्रार अर्ज देऊन दुधणे (पिता पुञ) या आरोपीना आमच्या घराकडे येण्यास प्रतिबंध करावा व न्याय देण्याची मागणी केली होती. मात्र याप्रकरणी पोलिस प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आरोपीची मुजोरगीरी  वाढत आहे. म्हणुनच वारंवार आरोपी आमच्या घरी येऊन शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी देत आहेत.

 याप्रकरणी वरिष्ठ पातळीवरुन चौकशी करुन दोषीवर दि. 22  आॕगस्ट रोजी पर्यतकठोर कारवाई करावी , आरोपी विरुध्द विनयभंगचा गुन्हा दाखल करुन अटक करावी, अन्यथा दि. 23 आॕगस्ट रोजी सकाळी 10 वाजता मी माझ्या कुटुंबीयासह मुरुम ता. लोहारा येथील पोलिस ठाण्यासमोर न्याय मागण्यासाठी लाक्षणीक उपोषणास बसत आसल्याचे निवेदनात म्हटले आहे.

राजकुमार तुकाराम राठोड
खासगी सावकारांच्या  भाईगिरीमुळे माझे कुटूंब दहशतीखाली आहे. याप्रकरणी पोलिसाना वारंवार तोंडी व लेखी सांगुन दखल घेतली नाही.आम्हाला न्याय मिळावे म्हणुन गेल्या आठवड्यात पोलिस ठाणे येथे गेलो असता "पुन्हा पोलिस ठाण्यात येवु नको अशी पोलिसानि तंबी देवुन माझे अर्ज घेण्यास नकार दिला. म्हणुन  पोलिस अधिक्षक कार्यालय गाठले असे राजकुमार राठोड यानी तुळजापूर लाईव्हशी बोलताना  सांगितले.


Labels: ,

Tuesday, 15 August 2023

स्ट्रीट लाईटच्या कामाचे मनसे पदाधिकाऱ्याच्या हस्ते शुभारंभ

स्ट्रीट लाईटच्या कामाचे 
मनसे पदाधिकाऱ्याच्या हस्ते शुभारंभ 



नळदुर्ग , दि. १५ :

 नळदुर्ग शहरात  गोलाई ते एस.टी. बसस्थानक पर्यंत महामार्गावर दुभाजकात  करण्यात आलेल्या पथदिवेच्या कामाचे लोकार्पण आज   १५ ऑगस्ट  रोजी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून करण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठपुराव्यामुळे अखेर हा महामार्ग प्रकाशमय होणार आसल्याने मनसे कार्यकर्त्यांचे शहरवासियातुन आभिनंदन  केले जात आहे.


नळदुर्ग शहराच्या सौंदर्यात भर पडणारी व महामार्ग प्रकाशमय करणाऱ्या स्ट्रीट लाईटचे उद्घाटन मनसे जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे, शहराध्यक्ष अलिम शेख,शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवुन व पूजनाने करण्यात आले,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गेल्या दोन - अडीच वर्षापासून सतत  निवेदन देत संबधीत अधिकाऱ्याशी भेट घेऊन संपर्क करत  पाठपुरावा केल्याने स्ट्रीट लाईट मंजूर झाली,व अखेर स्ट्रीट लाईटचे स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत मनसे पदाधिकाऱ्या हस्ते लोकार्पण करण्यात आले,

याप्रसंगी परिवर्तन सामाजिक संस्थेचे मारुती बनसोडे,जनहित कक्षाचे ॲड.मतीन बाडेवाले,मनसे शहर संघटक रवि राठोड,शहर उपाध्यक्ष रमेश घोडके,मनविसे,तालुकाध्यक्ष सूरज चव्हाण,मनविसे शहराध्यक्ष निखिल येडगे,शिरीष डुकरे,संदीप वैद्य,राम सातपुते,अमीर फुलारी,सरदार सय्यद,यादवराव कुलकर्णी, यांच्यासह रचना कन्स्ट्रक्शनचे सुपरवायझर सलामत टिनवाले,टोल वे कंपनीचे सुपरवायझर भूपेंद्र सिंह व वाहनधारक,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Labels:

Monday, 14 August 2023

काटी येथे सन ग्रुप उद्योग समुह व आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण

काटी येथे सन ग्रुप उद्योग  समुह व आर्ट  ऑफ लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण 


काटी, दि.१४ 

 
तुळजापूर तालुक्यातील  काटी येथे धाराशिव जिल्ह्यातील नामांकित अशा सन ग्रुप उद्योग समुह  व आर्ट ऑफ  लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शुक्रवार  रोजी पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन ही सध्या जागतिक चिंतेची बाब लक्षात घेत "झाडे लावा झाडे जगवा, वृक्षवल्ली आम्हा सोयरे"  हा संदेश देत प्रमुख पाहुणे व मान्यवरांचे उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात  आला. 


पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीकोनातून वृक्ष लागवड करणे काळाची गरज ओळखून पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस मुख्यालयाकडून देण्यात आलेल्या वृक्ष रोपवाटीकेचे धाराशिव येथील प्रसिद्ध सन ग्रुप उद्योग समूह आणि  आर्ट  ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून सन ग्रुपचे सर्वेसर्वा तथा रोटरी क्लब  धाराशिवचे माजी जिल्हाध्यक्ष अमरसिंह बाजीराव देशमुख यांच्या पुढाकाराने प्रमुख पाहुणे शरद जगताप व  धिरज लोमटे नबाब (अंबाजोगाई) यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.


यावेळी अजयसिंह देशमुख,विजय देशमुख, उद्योजक अमरसिंह देशमुख,संजय देशमुख, प्रदीप साळुंके, शरद जगताप,धिरज लोमटे नबाब, सयाजीराव देशमुख, प्रकाश गाटे, अशोक  जाधव,भिमसेन लोमटे, कृष्णा लोमटे, ओम लोमटे, अभिजित देशमुख, सत्यजित देशमुख, सिद्दु  बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Labels:

विरमाता श्रीमती शांताबाईबनसोडे यांच्या हस्ते शहीद किर्ती चक्र नायक यशवंत बनसोडे यांच्या शिला फलकाचे अनावरण

विरमाता श्रीमती शांताबाई
बनसोडे यांच्या हस्ते शहीद किर्ती चक्र नायक यशवंत बनसोडे यांच्या शिला फलकाचे अनावरण

नळदुर्ग , दि.१४: एस.के.गायकवाड


माझा देश माझी माती या अभियानांतर्गत नगरपरिषद  यांच्या वतीने आज केंद्रीय प्राथमिक शाळा नळदुर्ग येथील प्रांगणात किर्ती चक्र शहीद नायक यशवंत मारुती बनसोडे यांच्या शीला फलकाचे अनावरण विरमाता श्रीमती शांताबाई मारुती बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले.
 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक विनायक अहंकारी, केंद्रिय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक भास्कर मस्के हे होते.


प्रारंभी शालेय विद्यार्थ्यांच्या स्वागत गीताने उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
 या प्रसंगी मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांच्या हस्ते किर्तीचक्र  शहीद यशवंत बनसोडे यांच्या मातोश्री  वीरमाता शांताबाई मारुती बनसोडे,शहीद राम सादु गायकवाड यांची वीरपत्नी श्रीमती लक्ष्मीबाई गायकवाड सह सर्व माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये विनयकुमार पंडीत, बाळासाहेब जाधव, बळी दस, शिवानंद खद्दे, दशरथ जाधव, प्रकाश मोर्डे, शिवशंकर हत्ते, विश्वनाथ हत्ते, कृष्णा माने, सुरेश सुरवसे, विठल जाधव,सिद्धराम मुळे इत्यादींचा मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांच्या हस्ते शाल, पुष्गुच्छ व प्रमाण पत्र देवून सत्कार करून वृक्षारोपण करण्यात आले. 


यावेळी माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन  परिवर्तन सामाजिक संस्थेचे सचिव मारुती बनसोडे यांनी  तर आभार  सुरज गायकवाड यांनी केले.


 यावेळी न.प.चे सर्व कर्मचारी, शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Labels:

सार्वजनिक आरोग्य विभागाचे निर्णय 15 ऑगस्ट पासून मोफत उपचार आरोग्य मंत्री डॉ.सावंत यांची नागरिकांना स्वातंत्र्य दिनाची भेट


सार्वजनिक आरोग्य विभागाचे निर्णय 15 ऑगस्ट पासून मोफत उपचार
आरोग्य मंत्री डॉ.सावंत यांची नागरिकांना स्वातंत्र्य दिनाची भेट

उस्मानाबाद,दि.13

 सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत येणाऱ्या रुग्णालयात दाखल झाल्यास अनेकदा रुग्णाच्या नातेवाइकांना बाहेरून औषधे आणण्याची चिठ्ठी दिली जाते. त्यामुळे पैसे आणि वेळ या दोन्हींचा अपव्यय होतो. या पार्श्वभूमीवर आता आरोग्य विभागांतर्गत येणाऱ्या सर्व रुग्णालयांत 15 ऑगस्टपासून मोफत उपचार करण्यात येणार असून त्याबरोबरच रुग्णांना वा त्यांच्या नातेवाइकांना बाहेरून औषधे आणण्याची चिठ्ठी न देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रुग्णांना काही तक्रारी असल्यास 104 या टोल फ्री क्रमांकावर त्याची नोंद करता येणार आहे.



 15 ऑगस्टपासून मोफत उपचारांची अंमलबाजवणी करण्यासंदर्भात सूचना करण्यात आली आहे. रुग्णांकडून आलेल्या प्रत्येक तक्रारीची नोंद घेतली जाईल आणि संबंधित संस्था प्रमुखास सांगितले जाईल, प्राप्त झालेल्या तक्रारींचे निवारण करण्याची जबाबदारी संस्था प्रमुखाची असेल सार्वजनिक रुग्णालयात क्वचितप्रसंगी बाहेरील औषधे रुग्णास द्यावयाची गरज लागल्यास रुग्ण कल्याण समितीच्या अनुदानातून स्थानिकरीत्या औषध खरेदी करून रुग्णास मोफत औषध उपलब्ध करून द्यावे. तसेच आरोग्य संस्थेमध्ये शुल्क आकारण्यात आल्याचे आढळून आल्यास संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची जबाबदारी जिल्हा शल्यचिकित्सक किंवा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याची असेल, रुग्णांना शासनाने अधिकृत केलेल्या ओळखपत्राच्या आधारे निःशुल्क नोंदणी करण्यात यावी, आरोग्य संस्थांमध्ये होत असलेल्या सर्व तपासण्या मोफत कराव्यात. कोणतेही शुल्क आकारू नये,आरोग्य संस्थांमध्ये होत असलेल्या सर्व चाचण्या मोफत कराव्यात. कोणतेही शुल्क आकारू नये, यामध्ये सीटी स्कॅन, एक्स रे, प्रयोग शाळा चाचण्या यांचा समावेश आहे,



आंतररुग्ण विभागामध्ये दाखल झालेल्या रुग्णास डिस्चार्ज देताना कोणतेही शुल्क आकारू नये, यापूर्वी रुग्णांकडून जमा करण्यात आलेले शुल्क शासन खाती अथवा रुग्ण कल्याण निधीमध्ये जमा करावे,रक्ताचे शुल्क भरावे लागणार,राष्ट्रीय रक्त धोरणानुसार व रक्त घटक पुरवठा यासाठी मात्र नियमानुसार असणारे शुल्क भरावेच लागणार आहे.

Labels: ,

Sunday, 13 August 2023

महाराष्ट्रधर्म टिकण्यासाठी लढण्याचा खा.शरद पवार यांचा संदेश पोहचविण्यासाठी राष्ट्रवादी पुन्हा मैदानात

महाराष्ट्रधर्म टिकण्यासाठी लढण्याचा खा.शरद पवार यांचा संदेश पोहचविण्यासाठी राष्ट्रवादी पुन्हा मैदानात

आ.रोहीत पवार यांची धाराशिव येथे पत्रकार परिषदेत माहिती


धाराशिव दि. १३


सध्याची बदललेली राजकीय परिस्थिती पुन्हा पूर्ववत व्हावी, सर्वसामान्यांच्या हिताच्या प्रश्नांसाठी संघर्ष करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने घेतलेली भूमिका, महाराष्ट्रधर्म टिकला पाहिजे हे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार साहेब यांचा संदेश घेऊन राष्ट्रवादीची फौज पुन्हा मैदानात उतरली आहे. देशातील राजकारणाची पातळी खालावली असली तरी महाराष्ट्रात आपल्याला फुले, शाहु, आंबेडकरांचा विचार जपायचा आहे. कितीही संकटे आली तरी महाराष्ट्र दिल्लीपुढे झुकणार नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक नेते आमदार रोहीत पवार यांनी व्यक्त केले.

देशाचे माजी कृषीमंत्री, खासदार शरदचंद्र पवार यांचा संदेश घेऊन आ.रोहीत पवार यांनी महाराष्ट्र दौरा काढला आहे. या दौर्‍याची सुरुवात रविवारी (दि.13) तुळजापूर येथे महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन केली. त्यानंतर धाराशिव येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पक्षाची भूमिका आणि सद्यस्थितीबाबत भाष्य केले. आ.पवार म्हणाले की, भारतीय जनता पार्टीकडे सध्या आर्थिक आणि दबावतंत्राची ताकद आहे. म्हणून लोकांच्या हितासाठी लढण्यासाठी आम्ही काम करत असताना आमच्यावरही कारवाई होऊ शकते. कितीही आघात झाले तरी आपण जनतेसाठी लढणे ठरविलेच असेल तर ते लढावेच लागते. ही शिकवण खा.शरद पवार साहेबांनी दिलेली आहे. म्हणून महाराष्ट्र कधी दिल्लीपुढे झुकला नाही आणि झुकणारही नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

मराठी अस्मिता टिकवण्यासाठी स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना फोडून त्या पक्षात दोन गट निर्माण केले. खा.शरद पवार याना साठ वर्षांचा राजकीय अनुभव आहे. राष्ट्रवादीला सोडून गेलेल्या लोकांना आगामी निवडणुकीत जनता धडा शिकवेल असेही आ. रोहीत पवार म्हणाले. 


यासोबतच गेल्या चार वर्षातील घडामोडी आणि सध्याच्या राजकीय घडामोडींबाबत त्यांनी परखड मत व्यक्त केले. यावेळी एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे, माजी आमदार राहुल मोटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय निंबाळकर, संजय दुधगावकर, नितीन बागल, माजी नगराध्यक्ष अमित शिंदे, राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष शेखर घोडके, शहराध्यक्ष आयाज शेख, राष्ट्रवादी प्रवक्ता सेलचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.तुषार वाघमारे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.


तत्पूर्वी धाराशिव जिल्हा दौर्‍यास सकाळी आ. रोहीत पवार यांनी कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन सुरुवात केली. त्यानंतर धाराशिव येथील राष्ट्रवादी कॉग्रेस कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. त्यानंतर रायगड फंक्शन हॉल येथे कार्यकर्त्यांशी मुक्त संवाद साधत त्यांची मते जाणून घेतली. यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते, आजी-माजी पदाधिकारी, राष्ट्रवादी कॉग्रेस, राष्ट्रवादी महिला काँग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेससह विविध सेलचे पदाधिकारी, उपस्थित होते.

Labels: ,

पत्रकार महाजन यांच्या वरील हल्ल्याचा जाहीर निषेध : हल्लेखोरावर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी

पत्रकार  महाजन यांच्या वरील हल्ल्याचा जाहीर निषेध : हल्लेखोरावर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची  मागणी


नळदुर्ग, दि. १३

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर खुनी हल्ला करणाऱ्या गावगुंडाचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ तालुका शाखा तुळजापूर व नळदुर्ग, जळकोट, अणदूर परिसरातील पत्रकारांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे.


  यासंदर्भात नळदुर्ग पोलीस ठाण्यात पत्रकार संघाच्या वतीने एक लेखी निवेदन देण्यात आले असून त्यात म्हटले आहे की, पाचोरा,जिल्हा जळगाव येथील पत्रकार संदीप महाजन यांनी एका घटनेची बातमी दिल्याने दुखावलेले स्थानिक आमदार किशोर पाटील यांनी फोनवरून पत्रकार संदीप महाजन यांना मारण्याची धमकी दिली व आमदारच्या गावगुंडानी पत्रकार संदीप महाजन यांच्यावर खुनी हल्ला केला. सदर घटना ही लोकशाहीला काळीमा फासणारी असून आभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणनारी आहे. सदर निंदनीय घटनेचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ तालुका शाखा तुळजापूरच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत असून पत्रकार संदीप महाजन यांच्यावर हल्ला करणाऱ्या गांवगुडावर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कारवाई करून त्याना कडक शासन करावे अशी मागणी करण्यात येत आहे.


 नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक याना देण्यात आलेल्या निवेदनावर, महाराष्ट्र पत्रकार संघाचे मंत्रालयीन प्रतिनिधी प्रकाश गायकवाड, तुळजापूर तालुका अध्यक्ष अरूण लोखंडे, पत्रकार संघाचे एस.के. गायकवाड, किशोर धुमाळ, ईरफान काझी, संजय पिसे, राजेंद्र स्वामी, सतिश राठोड आदीच्या  पत्रकारांच्या सह्या आहेत.

Labels:

मालिकेतून उलगडणार सिंधूताईंचा जीवनपट ; "सिंधूताई माझी माई" मालिका पाहण्याचे आवाहन

मालिकेतून उलगडणार सिंधूताईंचा जीवनपट

माई परीवारच्या वतीने "सिंधूताई माझी माई" 
मालिका पाहण्याचे आवाहन 



तुळजापूर , दि. १३ : 


  अनाथ लेकरांच्या आई बनलेल्या पद्मश्री डॉ. सिंधूताई सपकाळ यांच्या आयुष्याची प्रेरणादायी संघर्षमय गाथा १५ ऑगस्टपासून संध्याकाळी ७ वाजता कलर्स मराठीवर सिंधूताई माझी माई - गोष्ट चिंधीची या मालिकेतून उलगडणार आहे. 

अनाथ लेकरांच्या आई बनलेल्या पद्मश्री सिंधूताई सपकाळ यांच्या आयुष्याची प्रेरणादायी संघर्षमय गाथा येत्या १५ ऑगस्टपासून संध्याकाळी ७ वाजता 'कलर्स मराठी'वर 'सिंधूताई माझी माई - गोष्ट चिंधीची' या मालिकेतून उलगडणार आहे. मराठी टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच प्रेक्षकांना सिंधूताईंच्यावरील चरित्रकथा बघायला मिळणार आहे. 

या मालिकेत सिंधूताईंच्या बालपणीची भूमिका बालकलाकार अनन्या टेकवडे साकारणार आहे.  अनन्याशिवाय या मालिकेत,प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे,बिग बॉस फेम किरण माने,अभिनेत्री योगिनी चौक, अभिजित झाडे,आनंद भुरचंडी,शर्वरी पेठकर हे कलाकार मालिकेतून महत्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. 

"सिंधूताई माझी माई" ही मालिका सर्वांनी पहावी असे आवाहन ममता सिंधूताई सपकाळ यांच्या वतीने माई परीवारचे सदस्य अनिल आगलावे यांनी पत्रकार परिषदेत केले.

Labels:

आष्टा (कासार) येथे दि.२० आँगस्ट रोजी पहिले आंबेडकरवादी साहित्य संमेलनाचे आयोजन

आष्टा (कासार) येथे रविवार दि.२० आँगस्ट रोजी पहिले आंबेडकरवादी साहित्य संमेलनाचे आयोजन

नळदुर्ग, दि. १३ : एस.के.गायकवाड


लोहारा तालुक्यातील आष्टा (कासार) जिल्हा उस्मानाबाद येथे रविवार दि.२०आँगस्ट २०२३ रोजी पहिले आंबेडकरवादी साहित्य संमेलनाचे व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवराना  जिवन गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
   

समिक्षा फाउंडेशन, लुंबिनी बुद्ध विहार ट्रस्ट,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचनालय, बुद्धत्व सामाजिक बहुउद्देशिय संस्था व संबोधी महिला मंडळाच्या संयुक्त विद्यामाने ग्रामीण भागातील आष्टा (कासार) येथे पहिले आंबेडकरवादी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लातूर येथील  जेष्ठ विचारवंत साहित्यिक डॉ.सुरेश वाघमारे हे आहेत. तर या सम्मेलनाचे उदघाटन माजी  मंत्री  बसवराज पाटील  यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

 याप्रसंगी आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ विचारवंत कथाकार जेष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे (सोलापूर),जेष्ठ लेखीका सुरेखा शहा,व लोहरा येथील शीघ्र पत्रकार निलकंट कांबळे आदी मान्यवराना समिक्षा फाऊंडेशन पुणे(आष्टा कासार) यांच्या वतीने दिवंगत पिताश्री तुकाराम गायकवाड यांच्या २४ व्या स्मृती दिनाच्या निमित्ताने दिला जाणारा जिवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. शिवाय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप,सहशिक्षक आर.जी.गायकवाड यांचा सेवानिवृत्तीबदल सत्कार अशा प्रेरणादायी कार्यक्रमाची जोड या सहित्यसंमेलनास देण्यात आली असून उदघाटन, परिसंवाद,विद्रोही कवी नितीन चंदनशिवे यांच्या अध्यक्षतेखाली नवोदितांचे कविसंमेलन व समारोप अशा चार सत्रात हे साहित्य संमेलन पार पडणार आहे. अशी माहिती संमेलनाचे मुख्य प्रवर्तक आंबेडकरी चळवळीतील साहित्यिक विचारवंत डॉ. डी.टी.गायकवाड यांनी दिली आहे.



पुढे बोलताना ते म्हणाले की,साहित्य हे समाजाचा आरसा असुन साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आंबेडकरी विचार, समता,स्वतंत्र, बंधुता व न्याय या च:तूसुत्रावर आधारित भारतीय संविधानाचे महत्त्व,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी अचार,विचार,आणि नेतृत्व समाजाच्या तळागाळातील लोकांच्यामध्ये रुजवावे समाजात नवीन नेतृत्व निर्माण व्हावे हा मुख्य उद्देश समोर ठेवून कसलाही राजकीय हस्तक्षेप न ठेवता व कोणाकडूनही कसलेही आर्थिक मदत किंवा वर्गणी न घेता लुंबिनी बुद्ध विहार आष्टा (कासार) च्या प्रांगणात या पहिल्या आंबेडकरवादी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी परिसरातील साहित्यिक,कवी, चळवळीतल कार्यकर्ते, साहित्य प्रेमी नागरिक,महिला व युवक युवतीने  या साहित्य संमेलनास उपस्थित राहवे असे आवाहन  डॉ.डी.टी..गायकवाड यासह समस्थ विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Labels:

तुळजापूर तालुका ग्रामीण फोटोग्राफर असोसिएशच्या अध्यक्षपदी शेख ,उपाध्यक्षपदी खुने यांची निवड

तुळजापूर तालुका फोटोग्राफर अध्यक्षपदी निजाम शेख; उपाध्यक्षपदी शिवानंद खुने यांची निवड


नळदुर्ग, दि. १३

तुळजापूर तालुका ग्रामीण फोटोग्राफर असोसिएशच्या अध्यक्षपदी निजाम शेख तर उपाध्यक्षपदी शिवानंद खुने यांची  बिनविरोध निवड करण्यात आलीआहे.


तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथे रविवार दि.१३ आॕगस्ट रोजी  फोटोग्राफर  सदस्यांची बैठक पार पडली. या बैठकीत नुतन कार्यकरणी सर्वानुमते जाहिर  करण्यात आली.

 अध्यक्षपदी निजाम शेख, उपाध्यक्षपदी शिवानंद खुने,सचिव गणेश जवळगे,सहसचिव किरण कांबळे, कार्याध्यक्ष अलीम शेख,संघटक शुभंक मायाचारी, कोषाध्यक्ष किशोर वाघमारे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.


या निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचे कोर कमेटी सदस्य प्रसाद देशमुख,संजय कुंभार,लक्ष्मण दुपारगुडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.यावेळी प्रशांत साळुंके,सुधाकर राठोड, रोहित राठोड,बाळू डॅंग  अदि फोटोग्राफर संघटनेचे सदस्य उपस्थित होते.

Labels:

उद्योजक अजयकुमार करंडे यांचा काटी येथे गौरव; तरुणांनी नोकरीच्या मागे लागण्यापेक्षा स्वतंत्र व्यवसाय करावा - करंडे

काटी ग्रामपंचायत कार्यालयात उद्योजक अजयकुमार करंडे यांचा सत्कार 
तरुणांनी नोकरीच्या मागे लागण्यापेक्षा स्वतंत्र व्यवसाय   करावा  - करंडे
 
काटी, दि.१३: उमाजी गायकवाड 


तुळजापूर तालुक्यातील काटी येथे  बाजार समितीचे माजी संचालक तथा सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर यांच्या पुढाकाराने येथील ग्रामपंचायत कार्यालयात रविवार दि.13 रोजी सकाळी पुणे येथील उद्योजक तथा सासुरे ता. बार्शी येथील मुळ रहिवासी सर्वसामान्य कुटुंबातील बी. ई .मेकॅनिकल इंजिनिअरींग पदवी प्राप्त उद्योजक अजयकुमार करंडे यांचा विविध  मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ, व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.


प्रारंभी प्रास्ताविकात जयाजी देशमुख यांनी पाहूण्याची ओळख करुन  दिली तर सरपंच  परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर यांनी मराठी तरुण उद्योग क्षेत्रात अग्रेसर असल्याचा अभिमान असल्याचे सांगून त्यांच्या उद्योग व्यवसायासाठी शुभेच्छा  दिल्या.


यावेळी उद्योजक अजयकुमार करंडे हे सत्काराला उत्तर देताना म्हणाले की, आज शेती, तसेच नोकरी या दोन्ही गोष्टी बेभरवशाच्या होत आहेत. तसेच आज उत्तम शेती, दुय्यम धंदा व कनिष्ठ नोकरी हा क्रम आता उत्तम नोकरी, दुय्यम धंदा व कनिष्ठ शेती झाल्याने पदवी किंवा पदविकाधारक तरुण-तरुणींनी स्वतंत्र व्यवसायांकडे वळण्याचे आवाहन  केले. जगदंबा इंजिनिअरिंग कंपनीच्या माध्यमातून पुण्यात व बाहेर राज्यातील अनेक तरुणांना रोजगाराच्या  संधी दिल्याचे सांगून यापुढेही आपण गावातील तरुण एकत्र करून उत्कर्ष फाऊड़ेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी कार्यक्रम हाती घेतले असून या माध्यमातून गावाकडील व परिसरातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणार असल्याचे व काटी  गावाच्या विकासात्मक कामासाठी मदतीचे आश्वासन दिले. पुढे बोलताना ते म्हणाले की, वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य लोकांना; तसेच शिक्षित तरुणांना शहरात स्थायिक होणे, स्वतःचे घर घेणे जिकिरीचे होत आहे. वडिलोपार्जित शेतीवाडीत म्हणावा तितका जमिनीचा हिस्सा मिळत नसल्यामुळे, गावाकडे नवीन प्रकल्प साकारणे व स्थायिक होणे, ही तारेवरची कसरत ठरत आहे. मग दुय्यम धंदा हा पर्याय शिल्लक राहतो आणि म्हणूनच आज पदवीधारकांनी रोजगार निर्मिती; तसेच व्यवसायाकडे वळले  पाहिजे असे त्यांनी आवर्जून सांगितले. 


यावेळी सरपंच  परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर, प्रशांत भारती ( उद्योजक सासुरे),सादिक शेख, ज्ञानेश्वर नागणे, कैलास साळुंखे, तुकाराम आडसूळ,डॉ.अजित राठोड,  चंद्रकांत काटे,अभिमान बामणकर,अमोल गावडे, भैरीनाथ काळे,जयाजी देशमुख, प्रविण विभूते, तानाजी हजारे आदी मान्यवर उपस्थित होते.

Labels:

आंतरराष्ट्रीय खेळाडू जयदेव म्हमाणे यांची वर्ल्ड कॉम्बॅट गेम्स स्पर्धेसाठी पंच म्हणून निवड

जयदेव म्हमाने  यांची युनायटेड वर्ल्ड रेसलिंग (UWW)  या संघटनेच्या वतीने व इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी (IOC) यांच्या मार्फत होणार-या स्पर्धेत एकमेव भारतीय पंच म्हणून निवड

जागतिक पँक्रेशन स्पर्धा 2023 रियाध, सौदी अरेबिया 21 ते 28 ऑक्टोबर 2023


काटी,दि.१३: उमाजी गायकवाड 


धाराशिव जिल्यातील तुळजापूर तालुक्यातील वडगाव (काटी) चे व सध्या  पुण्यात वास्तव्यास असलेले किक बॉक्सिंग मधील आंतरराष्ट्रीय खेळाडू जयदेव घनश्याम म्हमाणे यांची दि.  21 ते 28 ऑक्टोबर 2023 या कालावधीत  रियाध (सौदी अरेबिया) येथे होणार्‍या युनायटेड वर्ल्ड रेसलिंगअंतर्गत स्पर्धेसाठी वर्ल्ड कॉम्बॅट गेम्समध्ये पंच म्हणून  निवड झाली आहे. 


या  स्पर्धा 18 क्रीडाप्रकारात होणार असून त्यामध्ये रेसलिंग, पँक्रेशेन, किकबॉक्सिंग , जिदो,तायकन्दो,इ. रेसलिंगसर्धेत जगातून 16 देशातून प्रत्येकी  एक पंच निवडण्यात आला असून भारतातर्फे या खेळात जयदेव म्हमाने यांची निवड करण्यात आहे. या स्पर्धेसाठी हजारांहून अधिक खेळाडू येणार असल्याची शक्यता असून या स्पर्धेत सर्वात रोमांचक लढाऊ खेळ आणि मार्शल आर्ट्स गेम्स  खेळले जाणार आहेत. यापूर्वी वर्ल्ड कॉम्बॅट गेम्स 2013 मध्ये सेंट पीटर्सबर्ग (रशिया) येथे खेळविण्यात  आल्या होत्या.


यूनाइटेड वर्ल्ड रेसलिंग (यू डब्ल्यू डब्ल्यू) आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटी (आय ओ सी) आणि यू डब्ल्यू डब्ल्यू एशियाला  ट्रेडिशनल रेसलिंग अँड पँक्रॅशन करीता ,ओलंपिक कौन्सिल ऑफ एशिया.(ओसीए) द्वारे मान्यता प्राप्त आहे. आय टी डब्ल्यू पी एफ,आय ओ सी च्या  मान्यतेने  वर्ल्ड कॉम्बॅट गेम्स 2013 सेंट पीटर्सबर्ग, रशिया येथे  आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटी (आय ओ सी) च्या संरक्षणाखाली खेळांमध्ये भाग घेत या स्पर्धांमध्ये जयदेव म्हमाणे  यांनी आशिया खंडाचे नेतृत्व करित एकमेव खेळाडू होण्याचा बहुमान मिळविला  आणि तबल 10 वर्षानी पंच म्हणून निवड झालेला केवळ एकमेव खेळाडू आहे. जयदेव म्हमाने यांची निवड झाल्याने जगात धाराशिव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. हि  अभिमानाची बाब आहे.



यू डब्ल्यू डब्ल्यू सदस्य सर्व आय ओ सी आणि ओ सी ए द्वारे आयोजित  खेळांमध्ये भाग घेऊ शकतात. म्हणूनच, यू डब्ल्यू डब्ल्यू सदस्य म्हणून केवळ आमच्या राष्ट्रीय महासंघाने   भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (आय ओ ए) च्या पथकात सहभाग घेतला होता.


  युवा व क्रीडा मंत्रालय, भारत सरकारच्या मान्यतेने २०१७ मध्ये आम्ही “ओ सी ए च्या  एशियन इंडोर व मार्शल आर्ट गेम्स मध्ये  अश्गाबात, तुर्कमेनिस्तान  येथे  45 सदस्यांच्या प्रतिनिधी समवेत पारंपारिक कुस्ती शैली आणि बेल्ट रेसलिंगमध्ये भाग घेतला आणि आपल्या भारत  देशासाठी चार कांस्यपदक जिंकले. त्यामधे जयदेव म्हमाने यांचा समावेस होता तसेच यूनाइटेड वर्ल्ड रेसलिंग (यू डब्ल्यू डब्ल्यू) आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटी (आय ओ सी) आणि यू डब्ल्यू डब्ल्यू एशियाला  ट्रेडिशनल रेसलिंग अँड पँक्रॅशन युनायटेड  वर्ल्ड रेसलिंग स्पर्धेसाठी भारतातर्फे तुळजापूर तालुक्यातील वडगाव (काटी) येथील अंतरराष्ट्रीय खेळाडू जयदेव म्हमाने यांची निवड झाल्याने  त्यांच्या निवडीचे सर्वत्र  आभिनंदन  होत आहे.

Labels: ,

Saturday, 12 August 2023

मोफत नेत्र तपासणी शिबिरात ४०० लाभार्थी रुग्णाची तपासणी; लवकरच रुग्णांना मोफत चष्म्याचे होणार वाटप

मोफत नेत्र तपासणी शिबिरात ४०० लाभार्थी रुग्णाची तपासणी; लवकरच रुग्णांना मोफत चष्म्याचे होणार वाटप


नळदुर्ग,दि. १२ : अरुणकुमार नाईक 


श्री क्षेत्र रामतीर्थ देवस्थान मंदिरात आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिराचे उदघाटन माजी मंञी मधुकरराव चव्हाण , महंत श्री विष्णूप्रसाद शर्मा महाराज यांच्या हास्ते करण्यात आले. या शिबीरात ४०० लाभार्थी रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३५ मोतीबिंदू रुग्ण आढळले  असुन या रुग्णावर उस्मानाबाद व हैद्राबाद येथिल रुग्णालयात  मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.  त्याचबरोबर  या शिबीराचा जवळपास ४० ते ५० शालेय विद्यार्थ्यांनी  लाभ घेतला आहे.

             श्री रघुनाथजीं महाराजांच्या कृपेने रामतीर्थ देवस्थान नळदुर्ग यांच्या वतीने महंत श्री विष्णू महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व दिल्ली येथील नामांकित शिवम ऑप्टिक्स, लेडीज सर्कल इंडिया व नेत्र चिकित्सक डॉ. आनंद काटकर ,  वैद्यकीय अधिकारी  डॉ. सत्यजित डुकरे  यांच्या सहकार्याने मोफत नेञ तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले 

रामतीर्थ येथे  पहिल्यांदाच झालेल्या या शिबिरात नळदुर्गसह  परिसरातील लोहगाव, चिकुंद्रा, येडोळा, नांदगाव, अणदूर, जळकोट, वागदरी येथील लाभार्थी रुग्णांचा समवेश आहे.  
    या शिबिराचे उद्घाटन माजी मंत्री मधुकरराव चव्हाण आणि महंत श्री विष्णूप्रसाद शर्मा महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री शुक्ला महाराज, सौ. सुभद्रा मुळे, कल्पना गायकवाड, निवृत्त मुख्याध्यापक   बलभीम मुळे, पत्रकार विलास येडगे, राम भक्त माजी नगरसेवक सचिन डुकरे, भाजपचे श्रमिक पोतदार, प्रभाकर घेडके, श्रीकांत पोतदार, बाबुराव राठोड, लखन भोसले, जमन ठाकूर, डॉ. आनंद काटकर यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. 
   

या शिबिरात मोफत नेत्र तपासणीमध्ये ४०० लाभार्थी  रुग्णाची तपासणी करण्यात आली.  मोतीबिंदूचे ३५ रुग्ण  आढळले आहे.   लाभार्थी रुग्णांच्या चष्म्याचा नंबर काढुण व फ्रेमची साइज याचा मेळ घालून ते तयार करून १० ते १५ दिवसात त्या, त्या लाभार्थी रुग्णांस देण्यात येणार असल्याचे डॉ. आनंद काटकर यांनी बोलताना सांगितले. तसेच सध्या डोळे येणे  या साथीच्या आजाराबाबत काळजी घेण्याबाबत काटकर यानी मार्गदर्शन केले.

आजच्या धकााधकीच्या जीवनशैलीत अनेकांना मधुमेह, उच्च रक्तदाब यासारख्या आजारांनी ग्रासले आहे. हे आजार झाल्यानंतर त्याचे परिणाम शरीराच्या इतर अवयवांवर होतात. मधुमेहाचा परिणाम सर्वात अगोदर डोळ्यांवर होतो. त्यामुळे डोळ्यांची निगा कशी राखायची याची माहिती नसल्याने अनेकांना अंधत्व आल्याचे निदर्शनास येते.त्याकरिता मोफत नेञ तपासणी शिबीर आयोजित करुन ग्रामीण भागातील नागरिकाना लाभ मिळवुन देण्याचे स्तुत्य उपक्रम देवस्थान व राम भक्तानी  राबविल्याचे कौतुक माजी मंञी मधुकरराव चव्हाण यानी केले.

Labels:

Friday, 11 August 2023

नळदुर्ग शहरातील महत्वाच्या विविध मागण्यासाठी मनसेचा मोर्चा

शहरातील महत्वाच्या विविध मागण्यासाठी मनसेचा मोर्चा


नळदुर्ग, दि.११ :


 नियोजित नळदुर्ग शहराला  तालुक्याचा दर्जा द्या,तूर्तास अप्पर तहसील कार्यालय कार्यान्वित करा,महावितरणचे प्रस्तावित असलेले उपविभागीय कार्यालयास मंजूरी देऊन सुरू करा, शहराला २४ तास पाणी पुरवठा करणाऱ्या प्रस्तावित योजनेस मंजुरी देऊन निविदा प्रक्रिया सुरू करा, उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदांची भरती करा, शहरातील बंद पडलेले शासकीय विश्रामगृह पूर्ववत सुरू करावे अशा विविध मागण्यासाठी  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दि १ सप्टेंबर २०२३ रोजी किल्ला गेट ते बसस्थानक पर्यंत भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्र कुमार कांबळे यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.



जिल्हाधिकारी  मार्फत मुख्यमंत्री, महसूल मंत्री, पाणी पुरवठा मंत्री, ऊर्जा मंत्री,आरोग्य मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री आदीना  निवेदनाची प्रत पाठवण्यात आली आहे. त्याचबरोबर  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही ही पाठविण्यात देण्यात आले आहे. 


जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात असे म्हंटले आहे की,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नियोजित  नळदुर्ग तालुक्याचा २१ पानी अहवाल या अगोदरच्या सरकारकडे सादर केला आहे.  जवळपास नळदुर्ग शहर व परिसरातील ६० गावातील लोकांची मागणी गेल्या ४० वर्षापुर्वीपासुन आहे. नळदुर्ग शहर हे एक ऐतिहासिक शहर असून पूर्वी निजाम राजवटीत येथे सुभा, मामलेदार कचेरी, मुन्सफ कोर्ट असा दर्जा होता.ज्या ज्या वेळेस जिल्हा व तालुका पुनर्रचना समित्या शासनाने स्थापित केल्या, त्या त्या समितीने नळदुर्गला भेट देऊन पाहणी करून अत्यंत कमी खर्चात तालुका होण्याचा अहवाल शासनाकडे सादर केला होता,परंतु गेल्या ३ दशकाहून अधिक काळ येथील लोकांच्या भावनेचा व गरजेचा विचार झाला नाही. त्याचबरोबर सन २०१९ मध्ये नळदुर्ग येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्यात येणार असल्याचे तत्कालीन सरकारने प्रस्ताव मागवला होता.त्याचे पुढे काय झाले,तूर्तास अप्पर तहसील कार्यालय कार्यान्वित करून नागरिकाना  सोयी सुविधा उपलब्ध करुन दयावे,  त्याचबरोबर अनेकवेळा महावितरणचे उपविभागीय कार्यालय सुरू होण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता,तो शासन दरबारी धूळखात पडला असून त्यास मंजुरी देऊन उपविभागीय कार्यालय सुरू करावे,तसेच बोरी धरणात मुबलक प्रमाणात पाणी साठा असताना ही ८ - १० दिवसाआड शहरात पाणीपुरवठा केला जात आहे,शहराला २४ तास पाणी पुरवठा करणाऱ्या प्रस्तावित योजनेस मंजुरी देऊन निविदा प्रक्रिया सुरू करावी. जेणे करून शहरवासीयांची अनेक वर्षाची २४ तास पाणी मिळण्याची प्रतीक्षा संपेल,त्याचबरोबर उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदांची भरती करावी,कारण त्या रिक्त पदांमुळे अनेक रुग्णांना इतरत्र हलविण्याची वेळ येत आहे,इतक्या सुसज्य इमारतीमुळे शहराला सौंदर्य लाभले आहे, याठिकाणी आरोग्य नगरी होईल,त्या दृष्टीने रिक्त पदांची भरती तात्काळ करावी. तसेच नळदुर्ग येथे शासकीय विश्रामगृह आहे,त्याची अवस्था भूत बंगल्यागत झाली आहे,या विश्रामगृहामुळे येणाऱ्या पर्यटकांची व भक्ताची मोठी सोय होणार असल्याने या विश्रामगृहाची तात्काळ दुरुस्ती करून पूर्ववत सुरू करावे,आदी मागण्या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वारंवार निवेदने देण्यात आली आहे, मागण्या पूर्ण झाल्यास  शहर व  परिसरातील जवळपास दीड लाख लोकांना याचा फायदा होईल असे मनसेने दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे.


 शासनाचे  लक्ष वेधून घेण्यासाठी या मागण्या संदर्भात दि १ सप्टेंबर २०२३ वार शुक्रवार  रोजी किल्ला गेट ते बसस्थानक पर्यंत विराट असा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष महेश जाधव, जिल्हा सचिव जोतिबा येडगे,तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन कुंभार, विधानसभा अध्यक्ष मयूर गाडवे,तालुका सरचिटणीस गणेश पाटील,नळदुर्ग शहराध्यक्ष अलिम शेख,शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी, शहर उपाध्यक्ष रमेश घोडके,शहर संघटक रवि राठोड आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Labels:

Thursday, 10 August 2023

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याची छावा संघटनेची मागणी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याची छावा संघटनेची मागणी



उस्मानाबाद  दि.९ 

 उसमानाबाद जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयास छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय छावा संघटनेच्यावतीने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी मार्फत पालकमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांच्याकडे दि.९ ऑगस्ट रोजी केली आहे.


दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरा पगड व बारा बलुतेदार यांना एकत्रित करून हिंदवी स्वराज्य निर्माण केले. राज्यातील रयतेस लेकरांप्रमाणे जीव लावणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिप्रेत असणारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उस्मानाबाद  येथे सुरू आहे. त्या महाविद्यालयास छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी छावा संघटनेने केली आहे. 


यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र साळुंके, जिल्हा संघटक अमोल गोरे, धाराशिव तालुकाध्यक्ष रोहित पाटील, वाहतूक आघाडीचे धाराशिव तालुकाध्यक्ष शिवाजी भोसले, वाहतूक आघाडीचे विकास कोळी, शहराध्यक्ष सचिन रणखांब आदी उपस्थित होते.

Labels: ,

पालकमंत्री सावंत यांच्या उपस्थितीत शेकडो युवकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत शेकडो युवकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश



तुळजापूर ,दि. १० :

 महाराष्ट्र राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांच्या हस्ते व सहसंपर्कप्रमुख अमरराजे कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक युवकांनी बुधवारी  शिवसेनेत जाहीर प्रवेश घेतला.


यावेळी बापूसाहेब भोसले, अभिजित अमृतराव, धर्मराज पवार, माजी नगरसेवक तथा बार असोसिएनचे अध्यक्ष अ‍ॅड.संजय पवार, अ‍ॅड.उदयसिंह भोसले, देवसिंगाचे सरपंच देविदास राठोड, मोहन भोसले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष बिपिन खोपडे, रमेश ननवरे, खंडू कुंभार, देवानंद चव्हाण, निरंजन करंडे, गणेश रोकडे, अभिजीत पाटील, सुरज कोठावळे, निलेश कदम, संजय गायकवाड, अनिल जाधव, कृष्णा घाटे, शाहूराज कोरेकर, राजकुमार कोरेकर, मल्हारी कांबळे, स्वराज कदम, अमोल शिंदे, धनाजी खंडाळकर, पवन कदम, प्रमोद कदम, सचिन विलास धुरगुडे, ज्येष्ठ शिवसैनिक मनोज मिश्रा यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा आज जाहीर प्रवेश घेण्यात आला.

पालकमंत्री सावंत यानी पक्षप्रवेशानंतर मंदिरच्या प्रशासकीय कार्यालयात जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्यासमवेत बैठक घेऊन होणार्‍या मंदिर विकास आराखड्यातील त्रुटी निदर्शनास आणून दिल्या. भक्तांनी देवीस अर्पण केलेले दागिने गहाळ प्रकरणी चौकशी पूर्ण होताच कोणाला ही पाठीशी घातले जाणार नाही असे त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. तसेच भवानी रोडवर चांभारगल्ली समोरील लोखंडी गेट दुचाकी वाहनास खुले करण्याचे आदेश दिले.


यावेळी धाराशिव जिल्हा सहसंपर्कप्रमुख अमरराजे कदम परमेश्वर, शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पणुरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके, सुरज साळुंके, दत्ता साळुंके, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, अनिल खोचरे, प्रा.गौतम लटके, शिवसेना तालुकाप्रमुख संभाजी पलंगेसह आदीसह  पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.

Labels:

Wednesday, 9 August 2023

गुरुवारी श्री क्षेञ रामतीर्थ देवस्थान मंदिरात मोफत नेत्र तपासणी शिबीर

गुरुवारी श्री क्षेञ रामतीर्थ देवस्थान मंदिरात मोफत नेत्र तपासणी शिबीर


नळदुर्ग,दि.०९

 श्री क्षेञ रामतीर्थ देवस्थान मंदिरात गुरुवारी मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात  आले आहे. या शिबीराचा नळदुर्ग शहर व परिसरातील नागरिकानी  लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


श्री रघुनाथजीं महाराजांच्या कृपेने रामतीर्थ देवस्थान नळदुर्ग यांच्या वतीने महंत श्री विष्णू महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व दिल्ली येथील नामांकित शिवम ऑप्टिक्स, लेडीज सर्कल इंडिया व नेत्र चिकित्सक डॉ. आनंद काटकर ,  वैद्यकीय अधिकारी  डॉ. सत्यजित डुकरे  यांच्या सहकार्याने गुरुवारी दि. 10 आॕगस्ट रोजी सकाळी 10 वाजता  रामतीर्थ मंदिर,  येथे मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.


 याशिबीरात   मोतिबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया, नंबर चेक करणे व मोफत चष्मा वाटप करण्यात येणार आहे. तरी शिबिरास येताना लाभार्थीनी सोबत आधारकार्ड आणणे आवश्यक आहे.

Labels:

Monday, 7 August 2023

सुप्रसिद्ध सिनेदिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी घेतले श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन

सुप्रसिद्ध सिनेदिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी घेतले श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन


तुळजापूर ,दि. ०७

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध सिनेदिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी  श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन  पूजाअर्चा केली. 


त्यांचे पौरोहित्य भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम यांनी केले. मधुर भांडारकर हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि निर्माते आहे. सन 2016 मध्ये भांडारकर यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. हा देशातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार असून फिल्मफेअर आवार्ड, राष्ट्रीय फिल्म पुरस्कार तसेच इतरही अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. चांदणी बार, पेज थ्री, सत्ता, फॅशन, हिरोईन अशा अनेक हिंदी चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केलेले आहेत.

तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन विधिवत पूजाअर्चा केल्यानंतर भांडारकर यांचा धाराशीव जिल्हा शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख अमरराजे कदम यांनी श्री तुळजाभवानी मातेची प्रतिमा व छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देवून सत्कार केला. यावेळी त्यांच्यासमवेत अंतीम महेश्वरी, अशोक पंडीत, मंदिर संस्थानचे अधिकारी सातपुते, अतुल मलबा, चैतन्य मलबा, विकास मलबा व इतर पुजारी, मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.

Labels:

Saturday, 5 August 2023

बळी ढगे भाजी विकून बनला करोडपती : ५ हजार रुपयांत सुरू केला स्टार्टअप

 ७ वी पास काटीचे सुपुत्र बळी ढगे भाजी विकून बनला करोडपती...
५ हजार रुपयांत सुरू केला स्टार्टअप, आज  हजारांहून अधिक ग्राहक

काटी , दि.०५ : उमाजी गायकवाड 


तुळजापूर तालुक्यातील काटी येथील सुपुत्र बळीराम उर्फ बळी हणमंत ढगे हा पुणे कोथरूड भागातील सुप्रसिद्ध भाजीपाला विक्रेता असून त्याच्या भाजीपाला, फ्रुट व फुड्स विक्री स्टॉलला रविवार दि. 30 जुलै रोजी पत्रकार उमाजी गायकवाड व जागतिक किक बॉक्सिंग पट्टु वडगाव (काटी) चे सुपुत्र जयदेव म्हमाने यांनी सदिच्छा भेट दिली.

सातवी पास बळी ढगेच्या भाजीपाला, फ्रुट व फुड्स  व्यवसायाचा कोथरुड भागातील बाजारात पसारा चांगलाच वाढला आहे. 

तुळजापूर तालुक्यातील काटी सारख्या छोट्या खेड्यातील ग्रामीण भागातील बळी ढगेचा संघर्षमय प्रवास खरोखरच थक्क करणारा आहे. बळीने 1985 ला अंगावरच्या कपड्यांनशी गाव सोडले. म्हणजे जवळपास 38 वर्षे झाले. सुरुवातीला ट्रकवर क्लिनर म्हणून काम केले. त्यानंतर त्याने मुंबईत 1987 ते 88 या कालावधीत  मुंबईमध्ये एका वर्कशॉपमध्ये कामाला सुरुवात केली. काही काळ दुग्धव्यवसाय घरोघरी जाऊन केला. त्यानंतर 32 वर्षांपूर्वी पुणे गाठले. पुण्यात आल्यानंतर पुण्यातील सुप्रसिद्ध चितळे मिठाई  स्वीट्समध्ये काम केले. सुमारे 18 वर्षे चितळे मिठाई स्वीट्समध्ये काम करुन 14 वर्षापुर्वी स्वतः चे कोथरुड पुणे येथे अथर्व व्हिजिटेबल,फ्रुट ॲंन्ड फुड्सचा छोटासा व्यवसाय सुरु केला. 


आज बळीराम ढगेने कोथरूड भागात अथर्व व्हिजिटेबल, फ्रुट ॲंन्ड फुड्स विक्रिच्या माध्यमातून चांगलेच नाव कमावत आपले बस्तान बसवले. आज 45 वर्षे असलेला बळी ढगे हा केवळ 7वी पास आहे. आज तो स्टॉलसह ऑनलाइन भाजी विकून वर्षाला सुमारे 3 कोटींची उलाढाल करतो आहे. निव्वळ नफा 30% म्हणजे थोडाथोडका नव्हे तर सुमारे सव्वा ते दिड कोटींचा नफा बळी कमावतो आहे.
 
एरवी अनेकांना चांगले शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नाही किंवा करियरमध्ये यश  मिळत नाही. मात्र तुळजापूर तालुक्यातील काटी सारख्या छोट्याशा ग्रामीण भागातील एका सातवी पास तरुणाने आपल्या चिकाटीने फक्त भाजीपाला विकून करोडपती झाल्याच्या त्याचा प्रवास आश्चर्यचकित करणारा आहे.

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे लोक घरातच अडकले होते. त्यावेळी ऑनलाईन होम डिलिव्हरी सुरु केले. त्याच काळात ऑनलाइन होम डिलिव्हरीची मागणी वाढली. लोक ऑनलाइन भाजी मागवू लागले. ऑनलाईन भाजी विक्रित ग्राहकांमधूनही चांगला प्रतिसाद मिळाला. सर्व भाज्या घरपोच आणि बाजारभावात मिळाल्यावर ग्राहकदेखील खूश होते. या कामात त्यांची अर्धांगिनी असलेल्या अर्चना बळीराम ढगे यांनी घर सांभाळून  मुलांचे शिक्षण व व्यवसायतही चांगला हातभार लावला. या यशात माझ्या बायकोचाही सिंहाचा वाटा असल्याचे बळीराम ढगे यांनी आवर्जून सांगितले.

आज बळीचे कोथरूड येथे तीन मजली स्वतः चे घर असून 7 नोकर दुकानात कामाला आहे. थोरला मुलगा अथर्व याने कला शाखेतील पदवी घेतली असून तो उत्तम लेखक, कवि, व साहित्यिक आहे. त्याचा एक कविता संग्रहाचे पुस्तकही प्रकाशित झाले आहे. तर दुसरा मुलगा ओंकार बळीराम ढगे हा कॉम्प्युटर इंजिनियरिंगचे शिक्षण घेत आहे. आता तर बळीरामचा व्यवसाय चांगला वाढला आहे. त्याची दोन्ही मुले देखील शिक्षण घेत आपल्या वडिलांना चांगला हातभार लावत आहेत. ग्रामीण भागातील या युवकाचे अतिशय कठोर परिश्रमातून कमावलेल्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Labels:

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश अखेर मुरुम शहरातील मुख्य रस्यावरील खड्डे बुजवले

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश अखेर मुरुम शहरातील मुख्य रस्यावरील खड्डे बुजवले

मुरूम, ता. उमरगा, दि. ५ : 

शहरातील मुख्य रस्त्यावरील दुतर्फा पडलेले मोठे खड्डे नगरपरिषदेच्या वतीने बुजवण्यात आले आहे. त्यामुळे वाहतुकीस काहीसा दिलासा मिळाला आहे. यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले होते. 


शहरातील  शिवाजी महाराज चौक ते  बसवेश्वर चौक या मुख्य रस्त्यावर दुतर्फा ठिकठिकाणी खड्डे पडून रस्त्याची दुरवस्था झाली होती.

 वाहनचालकांनाही खड्डे चुकवताना तारेवरची कसरत करावी लागत होती. तर पायी चालत जाणाऱ्यांना जीव मुठीत घेऊन जावे लागत असे. यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नव्हती. शहरांतील नागरीक तसेच दररोज प्रवास करणारे वाहनचालक याबाबत नाराजी व्यक्त करत होते. रस्त्यावरील खड्डे लवकरात-लवकर बुजवण्यात यावेत व शहरवासीयांना दिलासा मिळावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल. अशी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने सातत्याने पाठपुरावा करत मागणी केली होती. याचे गांभीर्य लक्षात घेऊन नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन भुजबळ यांनी नगर परिषद प्रशासनाला आदेशित करून शहरांतील खड्डे बुजवण्यास सांगीतले. 

नगर परिषद प्रशासनाकडून मुख्य रस्त्यावरील दुतर्फा पडलेले मोठ-मोठे खड्डे बुजवण्यात आल्याने वाहनचालक व नागरिकांची गैरसोय दूर झाल्याने नगर परिषदेचे मुख्याधिकाऱ्यांसह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आभार व्यक्त करून नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. 


फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील मेन रोडवरील खड्डे नगरपरिषद प्रशासनाकडून बुजवण्यात आल्यानंतर

Labels: ,

मुरूम नगर परिषद कडून जलशुद्धीकरण केंद्रामध्ये वृक्षारोपण

मुरूम नगर परिषद कडून जलशुद्धीकरण केंद्रामध्ये वृक्षारोपण
एका दिवसात विविध प्रकारचे सहाशे वृक्षाची लागवड

मुरूम, ता. उमरगा, दि. ४  : 

नगरपरिषदकडून माझी वसुंधरा या अभियानांतर्गत जलशुद्धीकरण केंद्राच्या परिसरामध्ये   विविध प्रकारच्या  वृक्षाची मुख्याधिकारी सचिन भुजबळ यांच्या हस्ते लागवड करून यावर्षीचा वृक्ष लागवडीचा श्री गणेशा करण्यात आला. 

मुरूम नगरपरिषदमार्फत हरघर नर्सरी व कार्यालय नर्सरी तसेच माझी वसुंधरा या अभियानांतर्गत विविध जातीचे पंधरा हजार वृक्ष लागवडीचे लक्ष ठेवण्यात आलेले आहे. यापैकी आठ हजार रोपे नगरपरिषदेच्या नर्सरीमध्ये तयार करण्यात येत असून बाकी उर्वरित रोपे वन विभागाकडून मागविण्यात येणार आहेत. या वृक्ष लागवड अभियानाची सुरुवात  मुरूम येथील नगर परिषदच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या परिसरात एका दिवसात ६००  वृक्षाची लागवड करून करण्यात आली. यात विशेष बाब म्हणजे लागवड करण्यात आलेली सर्व रोपे नगर परिषदच्या नर्सरीमध्ये बियांपासून तयार करण्यात आलेली आहेत. 


या रोपामध्ये करंज, आपटा, चिंच, रामफळ, जांभूळ आदी प्रकारच्या वृक्षांचा समावेश आहे. मागील तीन वर्षांमध्ये जलशुद्धीकरण परिसरामध्ये नगरपालिकेकडून पेरू, आवळा, सागवान व बांबू या वृक्षाच्या बागा तयार करण्यात आलेल्या आहेत. याच परिसरात घनवन देखील निर्माण करण्यात आलेले आहे. यामुळे शहराचा सौंदर्य वाढले आहे. नगरपरिषेच्या शहरातील खुल्या जागेत येणाऱ्या काळात वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी सचिन भुजबळ यांनी सांगितले. तसेच हरघर नर्सरी या योजनेअंतर्गत प्रत्येक घरामध्ये नागरिकांनी बियापासून ५० रोपांची निर्मिती करून घरात जागा उपलब्ध असेल त्या ठिकाणी लागवड करावी. जागा नसल्यास ती रोपे नगर परिषदेस द्यावी. या रोपांची लागवड व जोपासना नगरपरिषदेमार्फत करण्यात येईल, असे प्रशासक तथा मुख्याधिकारी  सचिन भुजबळ यांनी नागरिकांना आवाहन केले.                             


Labels: ,

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी जनजागृती अभियानची जगदंबेच्या दरबारात सांगता




छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी जनजागृती अभियानची जगदंबेच्या दरबारात सांगता

तुळजापूर ,दि. ०५

 शेतकऱ्यांच्या उसाला भाव नाही, सोयाबीनला आणि कापसाला भाव नाही. त्यामुळे  शेतकरी आत्महत्या वाढत आसल्याचा आरोप करत  शेतकऱ्यांचे मरण थांबविण्यासाठी राज्य सरकारला सुबुध्दी मिळावी म्हणुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पावन रायगडावरून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी जनजागृती अभियान सुरू केले आहे. धाराशिव जिल्ह्यातही जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांच्या नेतृत्वाखाली कालभैरवनाथ सोनारी ते श्रीक्षेत्र तुळजापूर छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी जनजागृती अभियान राबविले.  



या अभियानाची तुळजाभवानी चरणी सांगता करताना  शेतकऱ्यांच्या प्रश्नाना न्याय देण्याची सरकारला सुबुद्धी दे असे साकडे आम्ही घालत असल्याचे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालंधर पाटील यांनी केले.


धाराशिव जिल्ह्यात 28 जुलै पासून सुरू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी जनजागृती अभियानची शुक्रवार  रोजी कुलस्वामिनी जगदंबेच्या दरबारात तुळजापूर येथे महाद्वारसमोर सांगता झाली. 


यावेळी ते बोलत होते. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उच्चाधिकार समितीचे प्रकाश पोपळे, युवती महिला आघाडीच्या अध्यक्षा  पूजाताई मोरे, मराठवाडा अध्यक्ष गजानन बंगाळे पाटील, महाराष्ट्र राज्य समन्वयक प्रा.डॉ.बिभीषण भैरट, मराठवाडा युवा अध्यक्ष गोरख भोरे, ओबीसी सेलचे राजाभाऊ हाके, तालुकाध्यक्ष भोजने, नेताजी जमदाडे,  जनार्दन पाटील, प्रशांत डिक्कर, धाराशिव जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष धनाजी पेंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. 


पुढे बोलताना पाटील म्हणाले की,  शेतकऱ्यांच्या प्रश्नावर फक्त घोषणा करण्यात सरकार मशगुल आहे. म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सरकारला सद्बुद्धी मिळावी म्हणून हे अभियान राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 


यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आपले विचार व्यक्त केले. अभियानच्या समारोपप्रसंगी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत समुद्रे,  जिल्हा संपर्कप्रमुख शहाजी सोमवंशी  यांच्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी  उपस्थित होते.


प्रबोधनपर गीतांमधून मांडल्या शेतकर्‍यांच्या व्यथा

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी जनजागृती अभियानात कला पथकामार्फत प्रबोधनपर गीतांद्वारे जनजागृती करण्यात आली होती. समारोप कार्यक्रमातही गायक नंदकुमार कदम, गीतकार प्रदीप पाटील, संबळ वादक अशोक पाटील, सिराज पठाण यांनी संबळाच्या कडकडाटात प्रबोधनपर गाणी सादर करून शेतकर्‍यांच्या व्यथा मांडल्या.

*जिल्हाभरात शेतकर्‍यांमध्ये जनजागृती*
श्रीक्षेत्र काळभैरवनाथ मंदिरातून 28 जुलै रोजी सुरू झालेले हे अभियान 29 जुलै रोजी भूम, 30 जुलै वाशी, 31 जुलै कळंब आणि त्यानंतर मंगळवार, 1 ऑगस्ट रोजी धाराशिव, 2 ऑगस्ट रोजी लोहारा, 3 ऑगस्ट उमरगा तालुक्याचा प्रवास करत शुक्रवार, 4 ऑगस्ट रोजी कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या श्रीक्षेत्र तुळजापुरात संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या हस्ते महाआरती करून अभियानची सांगता करण्यात आली. 

Labels:

दाभोळ येथील घटनेचा नाभिक समाजाच्या वतीने नळदुर्ग येथे जाहीर निषेध

  

नळदुर्ग ,दि.०५ नेताजी महाबोले

 ओमळी जि. रत्नागिरी  या गावातील नाभिक समाजाच्या कु. निलिमा सुधाकर चव्हाण हि  कामावरून घरी  जात असताना तिची निर्घृणपणे हत्या झाल्याचे उघडकीस आल्याने या घटनेचा नळदुर्ग शहर व परिसरातील  नाभिक समाजाच्यातीने जाहिर निषेध करण्यात आले आहे.


या घटनेचा निषेध म्हणून नळदुर्ग अणदूर व जळकोट येथील नाभिक समाज बांधवांच्या वतीने नळदुर्ग पोलीस स्टेशनचे सहाय्यक  पोलीस निरीक्षक  स्वप्निल लोखंडे  यांना निवेदन देऊन या घटनेचा जाहीर निषेध करुन गुन्हेगारास फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.


 यावेळी नळदुर्ग शहर नाभिक समाज संघटनेचे अध्यक्ष अध्यक्ष संदीप सुरवसे, अणदूर नाभिक संघटनेचे अध्यक्ष अमोल महाबोले, जळकोट नाभिक समाज अध्यक्ष विश्वनाथ सुरवसे, उपाध्यक्ष नेताजी महाबोले, सचिव महादेव माने, समीर सुरवसे ,संतोष महाबोले ,हानमंत हिल्लाल, राम सोमवसे, मधुकर भुरे,, अनिल महाबोले, सुधाकर भुरे, लखन महाबोले, मंगेश सुरवसे, बालाजी सुरवसे ,राजेंद्र विभुते, अंबादास क्षीरसागर ,राजेंद्र मोरे, किशोर पवार, अंकुश भुरे, प्रशांत महाबोले, गोविंद गवळी, सिधदु सुरवसे, परमेश्वर सुरवसे ,सुदर्शन सोमवसे, पंडित माने, गोवर्धन आतकरे ,सुमित महाबोले, सोमनाथ महाबोले, बाबा काळे, विशाल सुरवसे, दामोदर सोमवसे, सचिन सुरवसे, स्वप्नील भुरे, रामेश्वर भुरे, रवी सोमवसे, अजय सुरवसे ,अभिजीत महाबोले, भिम आतकरे ,लक्ष्मण सोमवसे आदीसह समाज बांधव उपस्थित राहून निषेध व्यक्त केला.

Labels:

Tuesday, 1 August 2023

श्री संत ज्ञानेश्वरी पारायण व श्रीमद भागवत कथा सोहळ्यास प्रारंभ

नळदुर्ग , दि. ०१

 नळदुर्ग येथील भवानीनगर येथे असलेल्या बाळकृष्ण मंदिरात स्व. बाळ सुजित डुकरे यांच्या स्मरणार्थ सौ. उषाताई नंदकुमार डुकरे यांच्या संकल्पनेतुन १ ते ७ ऑगस्ट २०२३ या कालावधीत श्री संत ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व श्रीमद भागवत कथा महायज्ञ सोहळा संपन्न होणार आहे.


श्रीमद भागवत कथा निरूपण प्रसिद्ध भागवताचार्य रुपालीताई सवने (परतुरकर) या करणार आहेत. इतक्या भव्य व मोठ्याप्रमाणात श्री संत ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व श्रीमद भागवत कथा महायज्ञ सोहळा नळदुर्ग शहरात एकत्रित साजरा होण्याची ही पहिलीच वेळ आहे. नळदुर्ग येथील भवानीनगर येथे असणाऱ्या बाळकृष्ण मंदिरात स्व. बाळ सुजित डुकरे यांच्या स्मरणार्थ सौ. उषाताई नंदकुमार डुकरे यांच्या संकल्पनेतुन १ ते ७ ऑगस्ट २०२३ या कालावधीत श्री संत ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व श्रीमद भागवत कथा महायज्ञ सोहळा साजरा होणार आहे. श्री गुरू शिवरामबुवा दिंडेगावकर, श्री सद्गुरू विरनाथ मल्लिनाथ महाराज औसा संस्थान व श्री कृष्ण कृपेने सकळ नळदुर्गकर यांच्या सौजन्याने हा सोहळा संपन्न होणार आहे.

या कालावधीत दररोज पहाटे ४ ते ६ काकडा,६ ते ७ पुजा,७ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण,११ ते १ भोजन व विश्रांती, दुपारी १ ते ५ श्रीमद भागवत कथा निरूपण, सायंकाळी ५ ते ६ नामजप,६ ते ७ हरीपाठ,७ ते ९ भोजन व विश्रांती,९ ते ११ कीर्तन,११ ते ४ हरीजागर असे कार्यक्रम होणार आहेत.त्याचबरोबर श्री. ह.भ. प.भगवान महाराज, वरवडा, श्री. ह.भ. प.राजेंद्र महाराज गुगळगाव, श्री. ह.भा.प.गुरुवर्य ज्ञानेश्वर महाराज दिंडेगावकर, श्री. ह.भ. प.विश्वनाथ गर्जे महाराज, माळेगाव, श्री. ह.भा.प.आबा पाटील महाराज,कुरनुर, श्री. ह.भ. प.वामन महाराज जाधव, मुरंबीकर यांचे कीर्तन होणार आहे. त्याचबरोबर दि.६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ ते रात्री ८ श्री. ह. भ.प.आबा पाटील महाराज यांचे चक्री भजन होणार आहे. दि.७ ऑगस्ट रोजी दुपारी १२ ते २ श्री. ह.भ.प.वैभव महाराज कानेगावकर यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.


ज्ञानेश्वरी ग्रंथ पुजन सौ. श्री. नंदकुमार पितांबर डुकरे, कलश पुजन सौ. व श्री. शुभम महेश डुकरे, विना पुजन सौ. व.श्री प्रकाश अंबादास दासकर मृदंग पुजन सौ. व.श्री. पंकज रमेश पुदाले,टाळ पुजन सौ. व.श्री. महेश पितांबर डुकरे, पेटी पुजन सौ. व.श्री. सुनिल तुकाराम उकंडे यांच्या हस्ते होणार आहे.श्रीमद भागवत कथा पुजन राज्याचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार राणाजगजितसिंह पाटील, पंढरपुर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संस्थांचे अध्यक्ष ह.भ.प.श्री. गहिनीनाथ महाराज औसेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे, अणदुरचे सरपंच रामचंद्र आलुरे, नळदुर्ग शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे यांच्या हस्ते होणार आहे. श्री संत ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व श्रीमद भागवत कथा महायज्ञ सोहळ्यानिमित्त आयोजीत केलेल्या सर्व कार्यक्रमांचा लाभ भाविक व नागरीकांनी घ्यावा असे आवाहन नंदकुमार डुकरे, महेश डुकरे, सुनिल उकंडे, शशिकांत पुदाले,सचिन डुकरे यांच्यासह बाळकृष्ण युवा शक्ती मंडळ, भोईराज तरुण गणेश मंडळ, स्व.माधवराव पुदाले प्रतिष्ठान व समस्त  नळदुर्गवासियांच्या वतीने करण्यात आले आहे.

Labels: