Thursday, 28 February 2013

3 मार्चला महालोकअदालतीचे आयोजन

सोलापूर :- सोलापूर जिल्ह्यातील सर्व न्यायालयामध्ये दि. 3 मार्च  रोजी महालोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या महालोक अदालतीत दिवाणी, फौजदारी, चलनक्षम दस्तऐवज कायदा कलम 138, मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, भुसंपादन प्रकरणे, शाळा प्राधिकरण, सहकार, कामगार, औद्योगिक न्यालयातील, कौटुंबिक न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांचे व दाखलपूर्व प्रकरणांचा समावेश करण्यात आला आहे. सदर महालोकअदातमध्ये आपली प्रलंबित असलेली प्रकरणे सामंजस्याने मिटविण्यासाठी प्रलंबित असलेल्या कोर्टामध्ये अर्ज करावा व सदर संधीचा सर्वांनी आवश्य लाभ घ्यावा असे आवाहन आर. व्ही. कोकरे, सदस्य सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर यांनी केले आहे.

Labels:

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीबाबत शाळांना आवाहन

सोलापूर :- सामाजिक न्याय विभागाच्यावतीने 8 वी ते 10 वी च्या वर्गामध्ये शिकणा-या विजाभज (VJNT) व विमाप्र (SBS) प्रवर्गातील विद्यार्थीनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती दिली जाते. सोलापूर जिल्ह्यातील 8 वी ते 10 वी च्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यीनीचे सावित्रीबाई फुले शिष्यवृतीचे प्रस्ताव विहित नमुन्यात दि. 10 मार्च 2013 पर्यंत तात्काळ सादर करावे. प्रस्ताव वेळेत सादर न केल्यास शिष्यवृत्तीपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थिनींची सर्वस्वी जबाबदारी विद्यालयावर राहील असे  सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सोलापूर यांनी कळविले आहे. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, सातरस्ता, सोलापूर यांच्याशी संपर्क साधावा (फोन नं. 0217-2734950).

Labels:

नाटयपरिषद


Labels:

साहित्यिक गप्पांतून उलगडला सावित्रीच्या लेकींचा जीवनप्रवास

उस्मानाबाद :-  उच्च पदावर काम करतानाही बालपणी मनावर झालेले वाचनाचे संस्कार, साहित्यिकाच्या एखाद्या काव्यकृतीने मनावर केलेलं गारुड आणि प्रशासनात अधिकारी पदावर काम करताना आलेल्या अडचणीवर मात करण्याचं साहित्याने दिलेलं बळ… असे एक ना अनेक अनुभवाचे पदर जिल्ह्यातील सावित्रीच्या लेकींनी उलगडले, निमित्त होतं, ग्रंथोत्सव-2013 उपक्रमात आयोजित केलेल्या ‘आम्ही सावित्रीच्या लेकी’ या उच्च पदावर काम करीत असलेल्या महिला अधिका-यांशी साहित्यिक गप्पांचे!
    महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने जिल्हा माहिती कार्यालयामार्फत उस्मानाबाद येथे ग्रंथोत्सव-2013 उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमात या साहित्यिक गप्पा रंगल्या. उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॅा. वैशाली कडूकर, गटविकास अधिकारी प्रियदर्शिनी मोरे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य कमलादेवी आवटे आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी या साहित्यिक गप्पात भाग घेतला. राजेंद्र अत्रे, ॲड. देवीदास वडगावकर आणि रवींद्र केसकर या त्रयीने या सावित्रीच्या लेकींच्या बोलते करुन त्यांच्या आठवणींचा कप्पा रसिकांसमोर उलगडला.
    साहित्य म्हणजे काय तर मनाला भिडते ते साहित्य. प्रेरणा देते ते साहित्य अशी मांडणी करीत या साहित्यिक गप्पांना सुरुवात झाली.  शिल्पा करमरकर यांनी अगदी बालपणापासूनच्या आठवणींना उजाळा दिला. जणू या साहित्यिक गप्पांमधून त्यांनी आपले बालपण पुन्हा अनुभवले. परीक्षा असली तरी गोष्टींच्या पुस्तकांशी मैत्री, महाविद्यालयातही पुस्तक वाचनाच्या वेडामुळे मिळालेले गोल्ड कार्ड आणि त्यामुळे ग्रंथालयातील सगळ्या कादंबऱ्यांचा वाचून पाडलेला फडशा, प्रशासनात काम करताना साहित्यानं दिलेला मानसिक आधार, कुटुंबाकडून वाचनासाठी मिळालेले पाठबळ अशा एकेक आठवणीच त्यांनी रसिकांसमोर ठेवल्या.
    डॉ. वैशाली कडूकर  यांनी आपल्या व्यक्तिमत्व विकास आणि वाटचालीत ‘छावा’ ही शिवाजी सावंत यांची कादंबरी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार, जीवनमुल्ये प्रेरणादायी असल्याचे सांगितले. बालपण खेड्यात गेले, वडिलांना वाचनाची प्रचंड आवड मात्र आपण ही आवड पाहिजे त्या प्रमाणात जोपासू शकलो नाही, याची खंत त्यांनी आपल्या मनोगतात मांडली. अर्थात, गूढकथा, कादंबऱ्या आवडायच्या, त्यामुळेच पोलीसी सेवेकडे ओढा वाढला असावा, असे त्यांनी सांगितले.
    प्रियदर्शिनी मोरे यांनीही समाजकारणाचा वारसा घरातून मिळाल्याने साहित्यिक आवड जोपासता आल्याचे सांगितले. पहिली कविता सहावीत असताना लिहीली, आता मात्र कविता लिहिणे होत नसल्याची खंत त्यांनी श्रोत्यांसमोर मांडली. प्रशासनात सतत लोकांना सामोरं जावं लागतं, अशावेळी साहित्य बळ देतं. मानसिक विकासासाठी वाचनाची आवड गरजेची असल्याचे त्यांनी सांगितले. लहानपणी आपण ‘यमक्या कविता’ लिहिल्या तसेच कविता वाचनात भाग घेतला. मैत्रीणीला गोष्ट लिहून दिली आणि तिलाही स्पर्धेत भाग घ्यायला लावला. विशेष म्हणजे, कवितेत मला उत्तेजनार्थ तर मैत्रीणीला गोष्टीत प्रथम क्रमांक मिळाला. ही आठवण ऐकताना अख्खे सभागृह हास्यकल्लोळात बुडाले.
    कमलादेवी आवटे यांनी आपल्या वाचनाचं वेड हे आई-वडील आणि भावांच्या प्रभावामुळे निर्माण झाल्याचे सांगितले.दिवाळीच्या सुट्टीत मामाच्या गावाला गेलो की भावंडांची पुस्तक वाचनाची अक्षरश: स्पर्धा असायची. राखीपौर्णिमा, भाऊबीज, वाढदिवसाला भावांकडून हमखास पुस्तकांची भेट मिळायची, हे सांगताना त्या बालपणीच्या आठवणीत हरवून गेल्या. जसजसं मोठे होत गेलो, तसे सानेगुरुजी, गो.नी. दांडेकर यांच्या साहित्याने मनावर प्रभाव निर्माण केला. आजही तो प्रभाव कायम असल्याचे त्यांनी सांगितले. त्या काळात वाचलेल्या लिखाणानेच आपल्याला प्रेरणा दिल्याचे त्या आवर्जून सांगतात.
    पोलीसी सेवेत असणाऱ्या अश्विनी भोसले यांनी आपल्या आठवणींच्या भावनांना या गप्पांमध्ये शब्दरुप दिले आणि यानिमित्ताने त्यांची कवयित्री म्हणून ओळख रसिकांसमोर आली. ‘थोडासा रुमानी हो जाए’ असे म्हणत त्यांनी आठवणींचा एकेक कप्पा उलगडला. मुंबई विद्यापीठात असताना वसंत बापट, शंकर वैद्य, मधू दंडवते, केशव मेश्राम, विजया राजाध्यक्ष, अरुण कांबळे असे दिग्गज साहित्यिक शिक्षक म्हणून लाभल्याचा सार्थ अभिमान त्यांनी व्यक्त केला. घरात असणारा पुस्तकांचा खजिना वाचनालयासाठी दिला, यातून त्यांच्या सामाजिक जाणीवेची नवी ओळख श्रोत्यांना झाली. गानसम्राज्ञी लतादीदींचा सहवास, प्रत्येक वाढदिवशी त्यांच्या येणाञया शुभेच्छा हा आपल्यासाठी सन्मान असल्याचे सांगताना त्यांचा आवाजही कातर झाला. ज्या लेखकांची पुस्तके अभ्यासक्रमासाठी आहेत, ते लेखक तुम्हाला शिकवतात, ही कल्पनाच खूप मोठी आहे. त्यावेळी आपली अवस्था ‘घेशील किती दो कराने’ अशी होऊन जाते. पी.एच.डी.साठी वि. स. खांडेकर, कवीवर्य कुसुमाग्रज, विंदा करंदीकर या ज्ञानपीठ विजेत्या साहित्यिकांवर पेपर वाचणे हा अनुभव अमूल्य होता. बहिणाबाईंच्या कविता, अब्राहम लिंकनचे पत्र, वीणा गवाणकर यांचे एक होता कार्व्हर या पुस्तकांचा जीवनावर प्रभाव असल्याचे त्या सांगतात.
    आठवणींचा एकेक कप्पा उलगडताना या सावित्रीच्या लेकी श्रोत्यांनाही त्या आठवणीत घेऊन जात होत्या. साहित्यिक गप्पांची ही संध्याकाळ कधी संपूच नये, ही भावना मनी ठेवूनच टाळ्यांच्या कडकडाटात या प्रत्येकीच्या वाटचालीला शुभेच्छा देत रसिकांनी ही मैफील अधिक बहारदार केली.

Labels:

महिलांसाठी स्‍वतंत्र बँकेसह भरीव निधीची तरतूद

नवी दिल्‍ली -: केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी अर्थसंकल्पात महिलांसाठी भरीव तरतूद केली आहे. महिलांसाठी स्वतंत्र राष्‍ट्रीयकृत बँक आणि महिलांच्या सुरक्षेसाठी 'निर्भया फंड'ची घोषणा चिदंबरम यांनी केली. याशिवाय महिला आणि बालकल्‍याणासाठी वाढीव निधी दिला आहे. याशिवाय असंघटीत क्षेत्रातील महिलांचीही दखल घेत त्‍यांच्‍यासाठीही विमा योजनेची तरतूद अर्थमंत्र्यांनी केली आहे.
         अर्थसंकल्पात महिलांसाठी एकूण 97 हजार कोटींची तरतूद करण्‍यात आली आहे. महिला आणि बालकल्याण मंत्रालयासाठी 41 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. दिल्लीतील बलात्काराच्या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आल्याने महिलांच्या सुरक्षेसाठी दोन हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच निर्भया फंड सुरु करण्यात येणार असून, त्यासाठी एक हजार कोटींची तरतूद केली आहे. बचतगट आणि मोलकरणींसाठी समूहगट विमा योजना सुरू करण्यात येणार आहे.
         चिदंबरम यांनी अर्थसंकल्पात महिलांसाठी स्वतंत्र बँका स्थापन करण्याची महत्त्वाची घोषणा केली. या बँकेत कर्मचा-यांपासून ग्राहकांपर्यंत सर्व महिलाच राहतील. बँकेसाठी एक हजार कोटींची तरतूद करण्यात येत असल्याचे सांगितले. या बँकेचा परवाना ऑक्टोबर 2013 पर्यंत मंजूर करण्‍यात येईल, असेही अर्थमंत्री म्‍हणाले.

Labels:

मराठी दिन


Labels:

Wednesday, 27 February 2013

केंद्रीय पथक सदस्यांकडून दुष्काळी भागाची पाहणी

पंढरपूर :- राज्यात दुष्काळ सदृश्य परस्थिती जाणवत असून या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी गावांची पाहणी, केंद्रिय पथकाचे सदस्य व पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे (भारत सरकार) उप सल्लगार व्ही.के बाठला यांनी केली.
           सांगोला तालुक्यातील महूद, शिवणे येथील मध्यम प्रकल्प तलाव, अनकढाळ येथील चारा छावणी, पाचेगांव खुर्द येथील शेतक-यांच्या जळालेल्या फळबागा, इंग्रज राजवटीत बांधण्यात आलेला बुध्दीहाळ येथील पाणी साठवण तलाव, सिमेंट बंधारा, टँकर मध्ये पाणी भरण्याचे पाँईन्ट आदीं ठिकाणाची त्यांनी पाहणी केली.तसेच दुष्काळी  स्थितीबद्दल ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांची मते जाणून घेतली.
       यावेळी जिल्ह्यातील सरासरी कृषी क्षेत्रा पैकी 58 टक्के खरीप तर 61 टक्के इतकी रब्बी पेरणी झाल्याचे जिल्हाधिकारी डॉ.प्रविण गेडाम यांनी सांगितले तर सांगोला तालुक्यात 93 छावण्या सुरु असून त्यामध्ये सुमारे 1 लाख 7 हजार जनावरे तसेच 80 टँकरव्दारे पाणी पुरवठा सुरु असल्याची माहिती तहसिलदार नागेश पाटील यांनी दिली.
           सांगोला तालुक्यातील वरील गावांना भेटी दिल्यानंतर श्री बाठला यांनी  मंगळवेढा तालुक्यातील गावांनाही भेटी देऊन तेथील दुष्काळी परस्थिती जाणून घेतली. या प्रसंगी त्यांच्या समवेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार, कृषी विभागाचे सहसचिव डॉ.एस.एल.जाधव, मृदू संधारण व पाणलोट  विभागाचे संचालक सुरेश आंबुलगेकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी गुरव, लाभ विकास प्राधिकरणाचे अजय दाभाडे, प्रांतधिकारी बाबासाहेब बेलदार, जिल्हा कृषी अधिक्षक अशोक किरनाळे, उजनीचे सचिन पवार, नगराध्यक्ष मारुती बनकर, प.सं सभापती ताई मिसाळ, जि.प.सदस्य अशोक शिंदे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Labels:

सौर ऊर्जेच्या माध्यमातून नागरिकांनी वीज तयार करा - राज्यपाल पाटील

उस्मानाबाद -: भविष्यात वीजेची  निकड लक्षात घेऊन सौरउर्जेच्या माध्यमातून शेतकरी सभासदांनी कारखान्याबरोबरच प्रत्येक नागरिकांनी वीज तयार करावे, असे आवाहन पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील-चाकूरकर यांनी केले.
         डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना, अरविंदनगर केशेगाव येथील 10 मेगॅवॅट टर्बाईन उभारणीचा शुभारंभ व 12 लाख 1 व्या साखर पोत्याचे पूजन आणि शेतकरी मेळाव्यात बोलतांना त्यांनी केले. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्रीमंत विक्रमसिंह घाटगे, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे जयप्रकाश दांडेगावकर, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा आमदार बसवराज पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन अरविंद गोरे, शैलेस पाटील यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
        राज्यपाल पाटील म्हणाले की, सहकारी साखर कारखान्यांना वीजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी सौरऊर्जा, वाफेवर चालणारे टर्बाईन प्रकल्पाची उभारणी करावी, पाण्याचे पूर्नवापर केल्यास  वीज व पाणी या संकटावर मात करुन ऊसासारखे पीक येऊ शकेल. शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी सहकारी कारखान्यानीच नव-नवीन प्रयोग हाती घ्यावेत. शेतकरी व सभासदांनी सौरउर्जेद्वारे वीज निर्मिती केल्यास रक्कमेची बचत होऊन आर्थिक उत्पनात वाढ होते. या प्रकल्प उभारणीसाठी खांबाची आवश्यकता नाही. वीज ही सौरऊर्जाद्वारे मोफत मिळते. सौर ऊर्जा प्रकल्पासाठी  शासनातर्फे 30 टक्के अनुदान देण्यात येते. याचा लाभ सर्व शेतकरी सभासदांनी घ्यावा, असे ते त्यांनी सांगितले.
       ऊसासारख्या पीक उत्पादनासाठी पाण्याची गरज असते. त्यासाठी मोठी तळे बांधल्यास त्याचा फायदा शेती उत्पादन वाढीसाठी होईल. ऊसापासून मिळणाऱ्या  साखर, अल्कहोल व वीजेच्या प्रकल्पांना प्राधान्य देण्यात यावे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर कारखाना हा चांगली प्रगती करत असून  नवीन नवीन उपक्रम हा कारखाना राबवत असल्याबद्ल राज्यपाल पाटील यांनी संचालक मंडळाचे कौतूक केले.
         आमदार बसवराज पाटील म्हणाले की, हा कारखाना चांगल्याप्रकारे चालवून शेतकऱ्यांना न्याय देण्याचे कार्य करत आहे. काटकसर व योग्य नियोजन केल्यामुळेच प्रगती झाल्याने कारखान्याला नावलौकीक मिळविला आहे. सहकार चळवळ मजबूत करुन गत वैभव प्राप्त करुन देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व कारखान्यांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे मत मांडले. 
       यावेळी श्रीमंत विक्रमसिंह घाटगे महाराज, श्री.जयप्रकाश दांडेगावकर यांची यावेळी शेतकरी मेळाव्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
    प्रास्ताविक डॉ.बाबासाहेब आंबेडकर कारखान्याचे चेअरमन अरविंद गोरे यांनी कारखानामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाची व प्रगतीचा माहिती दिली. या मेळाव्यास संचालक मंडळ, सभासद शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अँड.शैलेस बारखडे यांनी मानले.

Labels:

ग्रामीण आरोग्य व्यवस्था बळकटीसाठी १२५७ नवीन आरोग्य संस्थांची निर्मिती : मुख्यमंत्री

मुंबई : राज्यातील ग्रामीण आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी आरोग्य विभागाचा बृहतआराखडा मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार 1 हजार 257 नवीन आरोग्य संस्था निर्माण करण्यात येणार आहेत,असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे सांगितले.
    सह्याद्री अतिथीगृहातील यशवंतराव चव्हाण सभागृहात काल डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्काराचे वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी, राज्यमंत्री प्रा. फौजिया खान, आमदार मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव जयन्त कुमार बाँठिया  आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
      उत्कृष्ट कार्य करणारी आरोग्य उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, स्त्री आणि जिल्हा रुग्णालये, सेवाभावी खासगी संस्था तसेच डॉक्टर यांना प्रोत्साहन देण्यासाठी गेल्या पाच वर्षांपासून
         डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, राज्यातील सामान्य जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा मिळण्यासाठी राज्य शासनातर्फे प्रयत्न केले जात आहेत. वाढती लोकसंख्या लक्षात घेता नव्याने आरोग्य संस्था निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर सुमारे 1 हजार 916 वैद्यकीय अधिकाऱ्यांची नवीन पदे देखील निर्माण केली जाणार आहेत. आरोग्य सेवा अधिक दर्जेदार करण्यासाठी आरोग्य विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्यात येतील.
    आठ महिन्यांपूर्वी सुरू केलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत
        38 हजार रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. ह्या योजनेची व्याप्ती पाहता लवकरच संपूर्ण राज्यात ही योजना लागू करण्याचा शासनाच्या विचाराधीन आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, सातारा येथे अलिकडे शुभारंभ करण्यात आलेली जीवन अमृत सेवा प्रथम सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबविली जाणार आहे. काही महिन्यांच्या कालावधीत ही योजना संपूर्ण राज्यात लागू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. आरोग्याच्या क्षेत्रात महाराष्ट्र नेहमीच आघाडीवर राहीला असून आपत्कालीन वैद्यकीय सेवा हा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प राज्य शासन हाती घेणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत सुसज्ज रुग्णवाहिकेच्या सहाय्याने रुग्णांना वैद्यकीय मदतीसाठी ही योजना असणार आहे. केंद्र शासनाने शहरी आणि ग्रामीण भागात ही योजना सुरू करण्यास मान्यता दिल्याने लवकरच संपूर्ण राज्यात ही योजना लागू करण्यात येईल. राजमाता जिजाऊ मिशनच्या माध्यमातून राज्याने कुपोषण मुक्तीकडे वाटचाल सुरू केली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
    आरोग्यमंत्री श्री. शेट्टी म्हणाले, रुग्णांना दर्जेदार व शाश्वत आरोग्य सेवा देण्यासाठी विभागाने विविध महत्वाकांक्षी योजना हाती घेतल्या आहेत. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत त्याचाच भाग म्हणून राज्यातील माता मृत्यू आणि बाल मृत्यूचे प्रमाण लक्षणीय घटले आहे. एनआरएचएमच्या माध्यमातून राज्याने देशात अग्रेसर राहून यशस्वीरित्या योजनांची अंमलबजावणी केल्यामुळे केंद्र शासनातर्फे महाराष्ट्रासाठी 37 कोटी रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान जाहीर झाले आहे. राज्यासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. विभागातील रिक्त पदे भरण्याबरोबरच नवीन पदांची निर्मिती देखील करण्यात आली आहे, असे सांगून आरोग्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाने गेल्या तीन वर्षात यशस्वीरित्या राबविलेल्या योजनांविषयी माहिती दिली.            
    ग्रामीण भागात आरोग्य विभागाचे कर्मचारी चांगल्या प्रकारे काम करत असून त्याचा फायदा तळागाळातील जनतेला होत आहे. डॉ. आनंदीबाई जोशी यांच्या नावाने दिलेला पुरस्कार हा रुग्णसेवेसाठी झटणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिलेली शाबासकीची थाप आहे, असे राज्यमंत्री फौजिया खान यांनी यावेळी सांगितले.
    कार्यक्रमास आरोग्य विभागाच्या सचिव मिता राजीव लोचन, एनआरएचएमचे प्रकल्प संचालक विकास खारगे, सहसंचालक डॉ. सतिष पवार आदींसह आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी प्रास्ताविक केले.

Labels:

पालकमंत्री चव्हाण यांचा जिल्हा दौरा

उस्‍मानाबाद -: राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्य व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण हे जिल्हा दौ-यावर येत असून त्यांच्या कार्यक्रमांचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.
          गुरुवार, दि. 28 फेब्रुवारी रोजी  सकाळी 7-05 वाजता सोलापूरहून अणदूरकडे (ता. तुळजापूरकडे) प्रयाण. सकाळी 7-50 वा. अणदूर येथे आगमन व राखीव.  स. 9 -45 वा. शासकीय वाहनाने मुरुम, ता. उमरगाकडे  प्रयाण. 10-45 वाजता मुरुम येथे आगमन व राखीव. 11-30 वाजता मुरुम- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुल कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : कृषी उत्पन्न बाजार समिती,आवार, मुरुम), दु. 2 वा. वाहनाने अणदूरकडे प्रयाण. दु.3 वा.  अणदूर (ता. तुळजापूर) आगमन व राखीव. सायंकाळी 4 वाजता लोहगाव ता. तुळजापूर येथील पाणीपुरवठा टंचाई व दुष्काळ निवारणार्थ ग्रामस्थांशी चर्चा. 6 वा. नंदगाव ता. तुळजापूर  येथे पाणीपुरवठा टंचाई व दुष्काळ निवारणार्थ ग्रामस्थांशी चर्चा. सोईनुसार शासकीय वाहनाने अणदूरकडे प्रयाण, आगमन व  मुक्काम.
         शुक्रवार, दि. 1 मार्च रोजी सकाळी 9 वा. शासकीय विश्रामगृह, उस्मानाबादकडे प्रयाण. स.10 वा. शासकीय विश्रामगृह, उस्मानाबाद येथे आगमन व राखीव. स.10-30 वा. उस्मानाबाद शहरास पुरविण्यात येणाऱ्या उजनी पाणी पुरवठा योजनेच्या कामाची पाहणी व सोईनुसार शासकीय वाहनाने अणदूरकडे प्रयाण, आगमन व  मुक्काम.
           शनिवार, दि. 2 मार्च रोजी स. 10 वा. शासकीय विश्रामगृह, तुळजापूरकडे प्रयाण.  स.10-30 वाजता शासकीय विश्रामगृह, तुळजापूर येथे आगमन व राखीव. स. 11 वाजता तुळजापूर तालुका कॉग्रेस कमेटी कार्यालयास भेट व कार्यकर्त्यांशी पक्ष संघटनेसंदर्भात चर्चा व मार्गदर्शन व सोईनुसार अणदूरकडे प्रयाण, आगमन व  मुक्काम.
             रविवार, दि.3 मार्च रोजी अणदूर ता. तुळजापूर येथे राखीव व रात्री 7 वाजता  अणदूरहून सोलापूरकडे प्रयाण. शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे आगमन व राखीव. रात्री 10-45 वा.सोलापूर येथून सिध्देश्वर एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.

Labels:

बहारदार कवितांनी रसिकांना दिला काव्यसंध्येचा आनंद

उस्मानाबाद -: कधी मनाचे अंतरंग उलगडून दाखविणारी तर कधी आत्ममग्न करायला लावणारी, कधी अल्लड वा-याप्रमाणे हितगूज करणारी तर कधी उपहासातून सद्यस्थिती मांडणारी कविता ग्रंथोत्सवात रसिकांना भेटली अन या कवितांनी रसिकांना अक्षरश: कवितेच्या गावाची सफर घडवून आणली. निमित्त होते, राज्य शासनाचा मराठी भाषा विभाग, साहित्य व संस्कृती मंडळ आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने ग्रंथोत्सव उपक्रमाचे! जिल्ह्याच्या विविध भागातून आलेल्या कवींनी आपल्या कवितांनी मंगळवारची सायंकाळ काव्यमय केली.
          येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आनंदनगर येथील सभागृहात दि. 26 फेब्रुवारीपासून सुरु झालेल्या ग्रंथोत्सवात काव्यसंध्या कार्यक्रमाने अक्षरश: रंगत आणली. यात माधव गरड, राजेंद्र अत्रे, बालाजी इंगळे, डी.के. शेख, सुभाष चव्हाण, देवीदास पाटील, प्रा. हनुमंत काळे,  शेखर गिरी, युवराज नळे, पंडित कांबळे, सतीश मडके, भाग्यश्री वाघमारे, प्रमोद माने, डॉ.विजय परदेशी यांनी आपल्या कविता सादर केल्या.  काव्यसंध्येचे सूत्रसंचलन कवी रवींद्र केसकर यांनी केले.
    मराठी भाषेचे महत्व माधव गरड यांनी ‘अंतरीचा उमाळा मी मराठीत सांगतो’ या शब्दात व्यक्त केले तसेच बालाजी इंगळे यांच्या रान नभात या कवितेतील ‘पायाखाली तुडवून अंधार सूर्य घेऊन फिरतो’ या भावनांनी उपस्थितांनाही विचार करावयास भाग पाडले. ‘ती हसली की मी ही हसतो, हे काळीज अख्खे तिला अर्पूण बसतो’ या डी.के. शेख यांच्या कवितेने रसिकांना मनमुराद हसविले. बदलत्या वातावरणाचे आणि त्याच्या परिणामांची यथार्थ वर्णन करणारी सुभाष चव्हाण यांची ‘ आमच्या बापजन्मी माहित नव्हतं असं आता ऊन पडलंय’ ही कविताही दाद घेऊन गेली. गर्द पानातही अबोल हाक देणारी भाग्यश्री वाघमारे यांच्या गेय कवितेने वातावरणात संगीतमय जान आणली तर युवराज नळे यांच्या ‘पोरा असं कसं झालं’ या कवितेने आणि ‘सारीच गर्दी शिकाऱ्यांची, नेमका कदरदान कोण?’ गझलने वाहवा मिळविली.
        कळंबचे कवी सतीश मडके यांनी ‘ती घरी नसताना’ प्रत्येकाच्या भावना व्यक्त करणारी कविता रसिकांसमोर ठेवली. पंडीत कांबळे यांची क्रांतीची बीजे ही कविताही दाद घेईन गेली. उमरग्याचे कवी प्रमोद माने धाकट्या बहिणीचे भावविश्व सांगणारी आणि भावाच्या भावनांचा काव्यमय पट उलगडणारी कविता सादर केली. वाशी येथील प्रा. हनुमंत काळे यांची ‘खरंच बापू देशासाठी तुम्ही परत याल का’ अशी सद्यस्थिती दाखविणारी आणि काळातील बदलत्या विश्वाचे भान सांगणारी कविता रसिकांना ऐकवली. विजय परदेशी यांची ‘बरं झालं देवा’ आणि ‘पटलं तर ऐका’ या कवितांनाही रसिकांनी चांगली दाद दिली. प्रा. शेखर गिरी यांच्या ‘ती अशी हातातून सटकून जाते, प्रीत माझी अशी भटकून जाते’ असं तरूणाईच्या मनातील भावनांना शब्दरूप दिले. प्रा. देवीदास पाटील यांनी आपल्या कवितेतील सामर्थ्यशाली शव्दांचा परिचय रसिकांना करुन दिला. रवींद्र केसकर यांनी आपल्या बहारदार शैलीत सूत्रसंचलन केले. त्यांच्याच ‘पत्र शेवटचे लिहितो आई’ या कवितेने रसिकांना धीरगंभीर वातावरणात नेले आणि काव्यसंध्येचा समारोप झाला.

ग्रंथोत्सवाचा उद्या गुरुवारी समारोप
उस्मानाबाद -: महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती  मंडळ आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने जिल्हा माहिती कार्यालयामार्फत उस्मानाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथोत्सव-2013 उपक्रमाचा समारोप दि. 28 रोजी सायंकाळी 4 वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून प्रसिध्द लेखक-वक्ते प्रा. मिलींद जोशी यांचे वाचन संस्कृती या विषयावर व्याख्यान होणार आहे.
         ग्रंथोत्सव उपक्रमात सुरु असणारे ग्रंथप्रदर्शन रात्री 9 वाजेपर्यंत रसिकांसाठी खुले राहणार आहे. सर्व रसिक वाचकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.             

Labels:

दोन कॉपीबहाद्दर विद्यार्थ्यांना पकडले

तुळजापूर : बारावीच्या परीक्षेत कॉमर्स शाखेतील पुस्तकपालन आणि लेखाकर्म विषयाच्या परीक्षेवेळी कॉपी करताना दोन विद्यार्थ्यांना भरारी पथकाने पकडले. तुळजापूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात हा प्रकार घडला. माध्यमिक शिक्षणाधिकारी वैजीनाथ खांडके यांच्या पथकाने ही कारवाई केली. या परीक्षा केंद्राच्या संचालकांकडील कारभारही काढून घेण्यात आल्याचे खांडके यांनी सांगितले.

Labels:

मातीशी नातं सांगणा-या ज्येष्ठ लेखकांचा ग्रंथोत्सवात गौरव

उस्मानाबाद -: ग्रामीण भागाचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या आणि मातीशी नातं सांगणा-या साहित्याची निर्मिती करणाऱ्या जिल्हयातील ज्येष्ठ लेखकांचा सत्कार आज ग्रंथोत्सव उपक्रमात करण्यात आला. निमित्त होते, मराठी राजभाषा दिनाचे!
       राज्य शासनाचा मराठी भाषा विभाग, साहित्य  व संस्कृती मंडळ आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने ग्रंथोत्सव-2013 या पुस्तक प्रदर्शन आणि विक्री उपक्रमास उस्मानाबाद येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आनंदनगर येथील सभागृहात दि. 26 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. या उपक्रमात आज जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिक वेदकुमार वेदालंकार, उत्तम लोकरे, बाबुराव कांबळे, भ. ना. कदम, शिवमूर्ती भांडेकर, भाऊराव सोमवंशी आणि भारत गजेंद्रगडकर यांचा ज्येष्ठ पत्रकार आणि दैनिक एकमतचे संपादक शरद कारखानीस यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, लोकराज्य मासिकाचा मराठी राजभाषा दिन विशेषांक देऊन गौरव करण्यात आला. मराठवाडा साहित्य परिषदेचे उस्मानाबाद शाखेचे अध्यक्ष नितीन तावडे, नगरवाचनालयाचे ग्रंथपाल दशरथ क्षीरसागर, जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
       यावेळी आपल्या भाषणात कारखानीस यांनी ज्येष्ठ लेखकांना एकत्र आणण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले. लोकांना साहित्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न या माध्यमातून होत आहे.  ज्येष्ठ लेखकांचे साहित्य क्षेत्रातील योगदान महत्वाचे आहे. ग्रामीण भागात राहून साहित्याची सेवा करणे आणि वाचकांपर्यंत मातीशी नाळ सांगणारे साहितय् पोहोचवणे महत्वाचे असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी मराठी भाषेतील वि. स. खांडेकर, कवीवर्य कुसुमाग्रज, रणजीत देसाई, शिवाजी सावंत या ज्येष्ठ लेखकांच्या साहित्यिक वाटचालीच्या आठवणी उपस्थितांना सांगितल्या.
         लेखकांच्या वतीने प्रा. वेदालंकार यांनी आपले मनोगत मांडले. मराठी भाषा ही आपली अस्मिता आहे. तिचा अभिमान आपण बाळगला पाहिजे. आपल्या साहित्याची नोंद घेतली जाईल की नाही याची खंत न बाळगता नवीन लेखकांनी लिहिले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
तावडे यांनी राज्य शासन ग्रंथ प्रसार आणि प्रचारासाठी करत असलेल्या कामाबद्दल कौतुकोद्गार काढले.
         कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात श्री. चव्हाण यांनी मराठी राजभाषा दिन आणि त्यानिमित्त आयोजित या ज्येष्ठ लेखकांच्या सत्कारामागील भूमिका समजावून सांगितली. आभार अर्जुन परदेशी यांनी मानले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कवीवर्य सुरेश भट यांचे कौशल इनामदार यांनी संगीतबद्ध केलेले मराठी अभिमान गीताचे सादरीकरण करण्यात आले.

Labels:

भौतिकशास्‍त्राच्‍या पेपरमधूनही विद्यार्थ्‍यांची घोर निराशा

बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : तांत्रिक अभ्यासक्रमाचा जादा ताण तसेच प्रत्येक विषयाचे 2 भाग, प्रात्यक्षिकांच्या धड्यांची घटलेली संख्या, नवीन अभ्यासाचा अनावश्यक बोझा यामुळे खचलेल्या विद्यार्थ्‍यांनी भौतिकशास्‍त्र विषयाचा पेपर सुटल्यावर अनेक विद्यार्थ्‍यांना रडू कोसळले.
    चालू वर्षात विद्यार्थ्‍यांना देण्यात आलेली पुस्तके उशीराने मिळाली, मंडळाच्या आराखड्याप्रमाणे प्रश्नपत्रिकांचे स्वरुप नसल्याचे अनेक विद्यार्थ्‍यांनी म्हटले तर काही शिक्षकांनाच अभ्यासक्रमक समजला नसल्याने त्यांना विद्यार्थ्‍यांना शिकविता आले नाही. यामुळे काही विद्यार्थ्‍यांनी खाजगी शिकवणी लावूनही त्यातून कसलाही फायदा झाला नाही.
    काही विद्यार्थ्‍यांनी खाजगी शिकवणीमध्ये महत्वाच्या सांगीतलेल्या प्रश्नांची खास तयारी केल्याने त्यांना ते प्रश्न परीक्षेत नसल्याने विनाकारण झालेल्या गाढव श्रमाचा राग आला. कोणत्या स्वरुपात परीक्षा घेण्यात येणार याची कसलीही पूर्वतयारी न करता डायरेक्ट परीक्षेत नवीन पध्दतीचा भाग एक व दोनचा एकत्र पेपर घेण्यात आला. नुकत्याच झालेल्या इंग्रजी विषयाच्या परीक्षेतील बोर्डाच्या चुकीमुळे 7 मार्क वाढिवण्याची नामुष्की ओढवलेल्या बोर्डाला आता भौतिक शास्‍त्र विषयाच्या विद्यार्थ्‍यांचा प्रश्‍न समोर आला आहे. सामान्य विद्यार्थ्‍यांना पेपर समजण्याइतपतदेखील प्रश्नपत्रिकेचे स्वरुप नाही यामुळे खचलेल्या विद्यार्थ्‍यांवर परिणाम होत आहे. सदरच्या बाबत पूर्वीप्रमाणे दोन विभागाच्या परीक्षा घ्याव्यात, अथवा प्रत्येकाला 20 गुण देऊन पास करावे अन्यथा पालक व विद्यार्थी कोर्टात याचिका दाखल करणार असल्याचे पालकांनी सांगीतले.
     याबाबत भौतिकशास्‍त्र विषयाच्या शिक्षकांशी संवाद साधला असता, त्यांनी यापूर्वी 40 गुणांचे दोन पेपर प्रत्येकी 2 तासांचे होते व दुसर्‍या पेपरमध्ये एक दिवसाचा अभ्यासासाठी कालावधी मिळत सध्याच्या पध्दतीमध्ये 7 गुणांचा एकच पेपर असून 4 ऐवजी 3 तासांचा पेपर आहे. सदरच्या अभ्यासक्रमात 21 धडे आहेत. ज्या मुलांना शाळेत अभ्यासात लक्ष नाही त्या मुलांना नीटपणे परीक्षेत लक्ष लागत नव्हते एक तासानंतर नुसते शांत बसून होते. नवीन अभ्यासक्रमानुसार पुस्तके वेळेवर उपलब्ध होती. पुस्तकांच्या बाहेरचे प्रश्न नाहीत. ज्यांनी नीट अभ्यास केला त्यांनी 6 ते 7 पुरवण्या जोडून प्रश्नपत्रिका सोडविल्या आहेत. नव्याने राबविलेल्या सी.बी.एस्सी. पॅटर्नला आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थी चांगल्या पध्दतीने सामोरे जात नाहीत त्याला त्या प्रमाणात सुविधा नसल्याचेही कारण असू शकते. या अगोदर गणित व रसायन विषयांचा अभ्यासक्रम वेळेत न झाल्याने त्यांच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. ज्या विद्याथ्र्यांना नीट लक्ष देऊन अभ्यास करायचा नाही त्यांना आईनस्टाईनदेखिल शिकवू शकणार नाही.

Labels:

रेल्‍वे बजेट


Labels:

माय मराठी


Labels:

Tuesday, 26 February 2013

बार्शीत अतिक्रमणाबाबत उपोषण सुरु

बार्शी (मल्लिकाजून धारुरकर) : संबंधिताकडे वारंवार पाठपुरावा करुनही अतिक्रमण काढत नसल्याच्या निषेधार्थ बाबासाहेब खडसरे यांनी बार्शी नगरपालिकेसमोर दि. 25 फेब्रुवारी पासून उपोषण सुरु केले असून मंगळवार या दुसर्‍या दिवशीही उपोषण सुरुच होते.
     दि. 17 जानेवारी 2011 मध्ये बार्शी नगरपरिषदेचे मुख्‍याधिका-याकडे तक्रार देऊन एका इसमाचा हातगाडा हा री येण्याजाण्याच्या मार्गावरील अडथळा होत असून तसेच बेकायदा व अवैध धंदा होत असल्याचे लेखी तक्रारीत म्हटले होते. त्‍याचबरोबर हा गाडा कायमस्वरुपी एकाच ठिकाणी लावला जात असल्‍याचे तक्रार असल्‍याने त्‍यावरुन दि. 25 जानेवारी 2011 रोजी नगरपालिकेने त्यांच्या मिळकत विभागाकडे अतिक्रमण जागा पाहून साहित्य जप्त करण्याचे लेखी कळिवले होते. तक्रारीचे निराकरण न झाल्याने दि. 2 जून 2011 रोजी पुन्हा लोकशाही दिनात तक्रार दाखल केली. दि. 3 जून 2011 रोजी काही नागरिकांच्याही तक्रारी दाखल झाल्या. खडसरे यांनी दि. 6 जून 2011 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनात तक्रार दिली. तसेच मुख्याधिकारी यांना पुन्हा स्‍मरणपत्र दिले. 28 जून 2011 रोजी नगरपरिषदेने अतिक्रमण दिसून येत नसल्याचे पत्र खडसरे यांना न देताच दिले असल्याची माहिती अधिकारातून उघड झाले. दि.10 मे 2012 रोजी जिल्‍हाधिकारी यांच्याकडून लोकशाही दिनात खडसरे यांनी दिलेल्या तक्रारीच्या उत्‍तरात नगरपालिकेच्या पत्रावरुन अतिक्रमण नसल्याचे पत्र दिले. खडसरे यांनी दि. 22 जून 2012 रोजी जिल्‍हाधिकारी यांच्या कार्यालयात पुन्हा सदरच्या ठिकाणचे अतिक्रमण असून नगरपरिषदेची कारवाई बेबनावाची असल्याची तक्रार दिली. यावर दि. 27 जून 2012 रोजी जिल्‍हाधिकारी कार्यालयातून मुख्याधिकारी यांना अतिक्रमण काढण्यास व उपोषणकर्त्‍यास उपोषणापासून परावृत्त करण्याचे पत्र दिले. दि.11 सप्टेंबर 2012 रोजी जिल्‍हाधिकारी कार्यालयाने अद्यापपर्यंत अहवाल सादर झाला नसल्याचे पत्र दिले. दि. 8 ऑक्टोबर 2012 रोजी नगरपरिषदेने दिलेल्या पत्रावरुन अतिक्रमण नसल्याचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आले. दि.12 नोव्हेबर 2012 रोजी माहिती अधिकाराचे पहिले अपिल खडसरे यांनी केले. खडसरे यांनी दि. 21 जानेवारी 2013 रोजी पुन्हा नगरपरिषदेकडे अतिक्रमण हटविण्याबाबत तक्रार दिली व 27 जूनपासून उपोषणास बसणार असल्याचे कळविले.
     याबाबत उपोषणकर्ते खडसरे यांची आमच्‍या प्रतिनिधीने भेट घेतली असता त्‍यांनी आपण 25 फ्रेब्रुवारी 2013 रोजी सकाळी अकरा पासून बेकायदा अतिक्रमणाच्या विरोधात उपोषणास बसलो असून अद्यापपर्यंत नगरपरिषदेचे कर्मचारी, पोलिस प्रशासन अथवा वैद्यकीय विभागाकडून साधी विचारपूस देखील झाली नसल्याचे सांगीतले.

Labels:

शिक्षकांचे वेतन ‘शालार्थ’ प्रणाली मार्फत अदा करण्याकरिता दोन महिने मुदत वाढ

मुंबई -: ‘शालार्थ’ या नवीन प्रणालीच्या तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन पथदर्शी प्रकल्पांतर्गत निवडलेल्या जिल्हयांत या नवीन प्रणालीमार्फत वेतन अदा करण्याकरिता दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात येत आहे.
     राज्यातील खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक  तसेच जिल्हा परिषद व महानगरपालिका आणि नगरपालिका शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ‘शालार्थ’ ही नवीन प्रणाली लागू करुन या नवीन प्रणालीद्वारे अदा करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला होता. मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, लातूर या जिल्हयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे जानेवारी 2013 चे वेतन (पेड इन फेब्रुवारी 2013) या प्रणाली द्वारे अदा करण्याचे निर्देश देण्यात आले होते. 24 जानेवारी 2013 च्या शासन परिपत्रकान्वये एक महिना मुदत वाढ देण्यात आली होती.
     ‘शालार्थ’ या  नवीन प्रणालीच्या तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन सदर प्रणाली 15 दिवस बंद राहणार असल्याने मुंबई, ठाणे, पुणे व लातूर या पथदर्शी जिल्हयांव्यतिरिक्त इतर जिल्हयांनी या नवीन प्रणालीमध्ये डेटा एन्ट्री पुढील निर्देश प्राप्त होईपर्यंत करु नयेत, असे आदेश शालेय शिक्षण विभागाने 15 फेब्रुवारी 2013 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकान्वये दिले आहेत. उपरोक्त शासन परिपत्रकाचा संकेतांक क्रमांक 201302151153000321 असा आहे.

Labels:

नोंदणी फी व मुद्रांक शुल्क ई-पेमेंटद्वारे जमा करण्याची सुविधा उपलब्ध

मुंबई -:  नागरीक आता घरी अथवा कार्यालयात बसून आपल्या फ्लॅटची नोंदणी फी व मुद्रांक शुल्क ई-पेमेंट द्वारे शासनास जमा करु शकतील. नोंदणी फी, मुद्रांक शुल्क तसेच नोंदणी व मुद्रांक विभागास जमा होणा-या इतर सर्व रकमा ई-चलनमार्फत ‘ग्रास’ (गर्व्हमेंट रिसिप्ट अकाऊंट सिस्टिम) या प्रणालीद्वारे ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध असल्याची माहिती नोंदणी महानिरीक्षक एस.चोकलिंगम यांनी आज येथे दिली.
       नोंदणी व मुद्रांक विभागाच्या वतीने आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आज होमी तल्यारखान हॉल रेड क्रॉस येथे नोंदणी फी व मुद्रांक शुल्क शासनाकडे कशा प्रकारे जमा करावयाचा या संदर्भात विकासक आणि त्यांच्या संघटना तसेच वकील आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. लेखा व कोशागारे विभागाचे संचालक शिलानाथ जाधव यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ. ए. टी. कुंभार, स्टेट बँकेचे उप महाव्यवस्थापक रविनंदन सहाय आणि विभागाचे अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
          मुद्रांक नोंदणी आणि शुल्क विभागात विविध कागदपत्रांची नोंदणी आणि राज्यभरातील जवळजवळ 470 उपनिबंधकांच्या कार्यालयांमार्फत मुद्रांक शुल्काच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांचा महसूल जमा होत असतो. तसेच लाखों कागदपत्रांची दरवर्षाला या कार्यालयात नोंदणी केली जाते असे सांगून चोकलिंगम म्हणाले, ग्रास या प्रणालीमुळे एका शासकीय कामासाठी आवश्यक असणारे सर्व प्रकारचे शुल्क एकाच वेळी एकाच ठिकाणी भरणे शक्य होणार आहे. तसेच नागरिकांना रांगेत उभे न रहाता सोयीस्कर वेळेनुसार शासनाला रक्कम जमा करणे शक्य होत आहे. पारदर्शक कार्यपध्दतीमुळे बनावट चलनाला वाव रहाणार नाही. शासन आणि विकासकांना ही प्रणाली लाभदायक ठरेल.
    जाधव यांनी लेखा व कोषागारे विभागाच्या कामकाजाच्या कार्यपध्दतीबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, ग्रास ही प्रणाली जून 2010 ला सुरु झाली. अजूनही ती प्राथमिक स्वरुपात असून यावर्षी या प्रणालीमार्फत 10 हजार कोटीचा महसूल जमा झाला आहे. तांत्रिक कौशल्यापेक्षा शासन, कर्मचारी व नागरिकांची विचारधारा बदलणे आवश्यक असून यासाठी नागरिक आणि कर्मचारी यांनी सुलभ असलेल्या या कार्यपध्दतीचा वापर केला पाहिजे. ग्रास या प्रणालीमध्ये अनेक सेवांचा समावेश आहे. जवळ जवळ 13 बँका ऑनलाईन पेमेंटसाठी सुरु करण्यात आल्या आहेत. आणखी अनेक बँकांना आवाहन करण्यात आले आहे.  
          भारतीय स्टेट बँक ही सर्वात जुनी बँक आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात तीचा विस्तार आहे. ग्रामीण नागरिकांशी तीचा जास्तीत जास्त संबंध आहे. ग्राहकांना अधिकाधिक सेवा सुलभ पध्दतीने देण्याचा आमच्या बँकेचा सातत्याने प्रयत्न चालू असतो. असे स्टेट बँक ऑफ इंडियाचे रविनंदन सहाय यांनी सांगितले. मुद्रांक कार्यालयाने अधिकाधिक महसूल वाढविण्यासाठी तसेच कामकाजात पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने वेळोवेळी या कार्यपध्दती केलेल्या सुधारणा बाबतची माहिती  डॉ. ए. टी. कुंभार यांनी यावेळी दिली.

Labels:

11 वीतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्राची पडताळणी करावी

मुंबई -: इयत्ता 11 वी च्या सर्व शाखांमध्ये शिक्षण घेत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्राची पडताळणी करुन घ्यावी. इयत्ता 11 वी मध्ये शिक्षण घेत असताना त्याच शैक्षणिक वर्षाच्या ऑक्टोबरपर्यंत संबंधित प्राचार्यांमार्फत आदिवासी विकास विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली कार्यरत असलेल्या अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समित्यांकडून तसेच सामाजिक न्याय विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली कार्यरत असलेल्या विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांकडून करुन घेण्यात यावी, असे निर्देश शासनाने दिले आहेत. 
     हा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला असून त्यांचा संगणक संकेतांक क्र. 20132131241371721 असा आहे.

Labels:

लोकाभिमुख प्रशासनासाठी नाविण्यपूर्ण योजना राबवा : मुख्यमंत्री

नागपूर -: महसूल विभागात काम करताना बदलत्या तंत्रज्ञानाचा आधार घेऊन नाविण्यपूर्ण योजना राबविण्यासोबतच प्रशासन लोकाभिमुख कसे होईल व त्याचा उपयोग सामान्य माणसाला कसा होईल यादृष्टीने काम करा, शासन तुमच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
      देशपांडे सभागृहात महसूल दिनानिमित्त आयोजित महसूल अधिकारी, कर्मचारी यांचा गौरव सन्मान सोहळयात ते बोलत होते. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.  वनमंत्री डॉ. पतंगराव कदम, अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख, महसूल राज्यमंत्री प्रकाश सोळंके, राज्यमंत्री राजेंद्र मुळक, मुख्य सचिव जयंत कुमार बांठिया, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रीय, विभागीय आयुक्त वेणू गोपाल रेड्डी यांच्यासह सर्व विभागाचे आयुक्त व जिल्हाधिकारी उपस्थित होते.
    मुख्यमंत्री पुढे म्हणाले, महसूल अधिकारी गौरव सन्मान दरवर्षी घेण्यात येईल. जमिनीची फेरमोजणी करण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम राज्यभर राबविण्यात येणार असून याची खूप मोठी जबाबदारी महसूल विभागावर आहे. त्याचप्रमाणे आधारकार्डवर आधरित योजना यशस्वी करण्याची जबाबदारीही पार पाडावी लागणार आहे. महसूल विभागातील रिक्त पदांबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, दहा टक्के नोकरभरतीचा प्रस्ताव पाठविल्यास त्यावर सकारात्मक विचार केला जाईल. राज्यात सध्या दुष्काळी परिस्थिती असून दुष्काळाची कामे गंभीरतेने पार पाडा, अशा सूचना  त्यांनी केल्या.
    राज्यसेवेत कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना भारतीय प्रशासकीय सेवेची  परीक्षा देता यावी यासाठीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला असून त्याला लवकरच मंजुरी मिळणे अपेक्षित आहे असे ते म्हणाले. अधिकाऱ्यांना पाच टप्यात प्रशिक्षण देण्याची योजना विचाराधीन असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
    अध्यक्षीय भाषणात बाळासाहेब थोरात यांनी नाविण्यपूर्ण योजना राबविणा-या अधिका-यांचे अभिनंदन केले. महसूल प्रशासन राज्याचा कणा असल्याचे सांगून दुष्काळी परिस्थिती अतिशय जबाबदारीने हाताळणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. रिक्त जागा त्वरित भरण्याची विनंती केली.  महसूल विभागाने गेल्यावर्षी 55 लाख जातीचे दाखले थेट शाळेत वितरीत केल्याचे त्यांनी सांगितले. शासनाचा कणा असलेल्या महसूल विभागाला नियतव्यय वाढवून द्यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
    महसूल राज्यमंत्री प्रकाश सोळंके यांनी महसूल विभागावरील अतिरिक्त भार कमी करण्यासंदर्भात सूचना केली. मुख्य सचिव जयंत कुमार बांठिया यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे नुतनीकरण व प्रशासकीय सेवा दिवस साजरा करण्याची विनंती केली.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक अपर मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रीय यांनी केले. नाविण्यपूर्ण कल्पना, कल्पनेची अंमलबजावणी, जनतेला झालेला लाभ व अनुकरणीय योजना या निकषावर पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सुवर्ण जयंती राजस्वी अभियानाअंतर्गत करण्यात आलेल्या विविध कामावर आधारित सी.डी.चे प्रकाशन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले.
  
 पुरस्कार विजेत्यांची नावे खालीप्रमाणे- 
भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी- डॉ. अनुप यादव, एकनाथ डवले, लक्ष्मीकांत देशमुख, चंद्रकांत दळवी, आबासाहेब जऱ्हाड, कुणाल कुमार, श्रीकर परदेशी, श्रावण हार्डीकर, श्रीमती रिचा बागला, पी. वेलरासू, वीरेंद्र सिंह, अभिषेक कृष्णा व सौरभ राव.
    नागपूर विभाग : उपायुक्त एम.ए.एच.खान, श्रीमती किरण कुळकर्णी, प्रकाश पाटील, प्रसाद मते, एम.एन.सपाटे, एस.बी. जगताप, आर.एस. वाटघरे, व्ही.एन.गेडाम, श्रीमती मानसी जोशी, अमरावती विभाग : जितेंद्र वाघ, उपविभगीय अधिकारी संजय खडसे, नायब तहसीलदार सचिन पाटील, आर.एस.शेख, सुरेश बुटे, संजय सरागे, मोहन साठे, हरिदास भातकर. औरंगाबाद विभाग : अजय गुल्हाने, जगदिश मिनीयार, महेश शेवाळे, एस.एम.देशमुख, विवेक मंडलिक, एस.व्ही. शिंदे, महेश चामणीकर, एस.पी. उगले, बाबासाहेब बहिरट, शेख अफसर, नाशिक विभाग : गणेश पाटील, राजेंद्र पाटील, नितीन पाटील, अमोल मोरे, एस.आर. सोनवणे, नरेश गावित, श्रीमती व्ही.एस. सावळे, नितीन डावखर, श्रावण दाबसे, कोकण विभाग : अजित पवार, नवनाथ जरे, डॉ. संदीप माने, बी.बी. जाधव, प्रकाश जाधव, भारत फुलपगारे, चंद्रकांत राजपूत, श्रीमती जी.सी. भाटकर, हिरालाल महाला, पुणे विभाग : सुहास दिवसे, श्रीमती स्नेहल बर्गे, संजय पवार, एस.डी. जानराव, एस.सी. परदेशीमठ, विनायक माने, सागर देसाई, संजय जंगम या अधिकारी-कर्मचा-यांचा पुरस्कारप्राप्त करणा-यांमध्ये समावेश आहे.

Labels:

ग्रंथोत्सवात बुधवारी ज्येष्ठ लेखकांचा सत्कार आणि आम्ही सावित्रीच्या लेकी कार्यक्रम

उस्मानाबाद -:  जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने  दिनांक 26  ते 28 फेब्रुवारी या कालावधीत  उस्मानाबाद येथे ग्रंथोत्सव-2013 उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमांतर्गत बुधवार, दि. 27 रोजी सकाळी 11 वाजता मराठी राजभाषा दिनानिमित्त जिल्ह्यातील ज्येष्ठ लेखकांचा सत्कार आणि सायंकाळी 6-30 वाजता आम्ही सावित्रीच्या लेकी हा जिल्ह्यात उच्च पदावर कार्यरत असणाऱ्या महिला अधिकाऱ्यांशी साहित्यिक गप्पांचा कार्यक्रम होणार आहे.
       दैनिक एकमतचे संपादक शरद कारखानीस आणि दैनिक संघर्षचे संपादक व्यंकटेश हंबीरे यांच्या हस्ते मराठी राजभाषा दिनानिमित्त सकाळी 11 वाजता जिल्ह्यातील ज्येष्ठ लेखकांचा सत्कार केला जाणार आहे. यात वेदकुमार वेदालंकार, उत्तम लोकरे, बाबुराव कांबळे, श.मा. पाटील, भ.ना.कदम, शिवमुर्ती भांडेकर, भाऊराव सोमवंशी, योगीराज वाघमारे, भारत गजेंद्रगडकर या ज्येष्ठ लेखकांचा समावेश आहे. या कार्यक्रमास मराठवाडा साहित्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखेचे अध्यक्ष नितीन तावडे, जिल्हा शासकीय ग्रंथालयाचे ग्रंथपाल सुनील हुसे आणि नगर वाचनालयाचे ग्रंथपाल दशरथ क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
        याचदिवशी सायंकाळी 6-30 वा. आम्ही सावित्रीच्या लेकी हा जिल्ह्यात उच्च पदावर कार्यरत असणाऱ्या महिला अधिकाऱ्यांशी साहित्यिक गप्पांचा कार्यक्रम होणार आहे. यात उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, उस्मानाबाद आणि तुळजापूरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अनुक्रमे डॉ. वैशाली कडुकर आणि शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या कमलताई आवटे, भूम आणि परंडा येथील तहसीलदार अनुक्रमे अहिल्या गाठाळ आणि वैशाली पाटील, उस्मानाबाद आणि तुळजापूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी अनुक्रमे प्रियदर्शिनी मोरे आणि तृप्ती ढेरे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांचा या कार्यक्रमात सहभाग राहणार आहे. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.    

Labels:

दुष्काळाकडे दुर्लक्ष करुन आजीमाजींनी बाया नाचिवल्या : आंधळकर

बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर)  : मुकी जनावरे, शेतकरी, सामान्य जनता ही पाण्यावाचून होरपळून जात आहे आणि बार्शीचे आजी-माजी आमदार हे बाया नाचवून करोडो रुपयांची उधळपट्टी करत आहेत, असा आरोप शिवसेनेचे भाऊसाहेब आंधळकर यांनी केला.
     बार्शीतील जुन्या पोलिस स्टेशनजवळ झालेल्या शिवबसव भिमशक्ती हमाल माथाडी जनरल कामगार संघटनेच्या शाखा उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष दिपक आंधळकर, रामभाऊ जगदाळे, खजिनदार विजूखुडे, सतीश सोनवणे,  पिंटू नाईकवाडी, कृष्णा चव्हाण, मंगलताई पाटील, मनीषा विभूते, माऊली पवार, दिगंबर कानगुडे आदीजण उपस्थित होते.
     पुढे बोलतांना आंधळकर म्‍हणाले की, आजपर्यंत 4500 माथाडी कामगारांनी आमच्या संघटनेत नावे नोंदविली असून मार्केट यार्डातील हमाल, तोलार, कामगार, रिक्षा वाहतूक कामगार, कामगार तळ, दुकानातील कर्मचारी, मंडप कामगार, फोटोग्राफर, बँक, पतसंस्था, हॉटेल, दवाखाने इ. सर्वस्तरातील कामगारांच्या न्याय हक्कासाठी आमची संघटना काम करत आहे.  अधिकृत नोंदणी असलेल्या संघटनेच्या कामगारांनाच काम देणे कायद्याने बंधनकारक आहे. याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी त्यांना प्रथम निवेदने दिली जातील यानंतर त्यांच्या हक्कासाठी लढा उभारला जाईल. असे सांगून ते    पुढे म्हणाले, सर्वहिंदूचे श्रध्दास्थान असलेल्या श्री शिवछत्रपतींनी सुबेदाराच्या स्त्रीबद्दल काढलेले चांगले उदगार हे सर्वांना आदर्श असतांना त्यांच्या शिकवणुकीचा आजी-माजी आमदारांना विसर पडलेला आहे. त्यांच्या जयंतीनिमित्‍त बार्शीत माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी काढलेल्या मिरवणुकीत तमाशातील बाया नाचवल्या व तरुणांना दारु पाजून शहरातील व्यापार्‍यांना वेठीस धरले. तर चालू आमदार गावाबाहेर तमाशातील बाया नाचवत आहे. तीन वर्षे शिवजयंतीकडे दुर्लक्ष करणारांनी आगामी 2014 च्या निवडणुकांना डोळ्यासमोर ठेऊन साजरी केली जाणारी शिवजयंती मिरवणुक ही त्यांचा नाटकी पुळका असून जनतेच्या प्रश्नासाठी त्यांना कसलेही देणे घेणे नाही.     आमची कामगार माथाडी संघटना ही भूमिपुत्रांची असून कायदेशीर अंमलबजावणी करण्यासाठी बार्शी तालुक्यातील पोलीस उपाधिक्षक, पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक या सर्वांना लेखी निवेदन देण्यात आले आहे.

Labels:

ग्रंथोत्सव उपक्रमास साहित्य रसिकांच्या उपस्थितीत शुभारंभ

मानवी मूल्य जपणा-या साहित्याची गरज : प्रा. चंदनशीव
उस्मानाबाद -: सध्याच्या काळात माणसाची नाती-गोती आणि वाचन संस्कृती दुरापास्त होत चालली आहे. अशावेळी मानवी मुल्याची जपणूक व जिव्हाळा निर्माण करणाऱ्या साहित्याची गरज आहे,   असे प्रतिपादन  ज्येष्ठ साहित्यिक प्रा. भास्कर चंदनशीव यांनी केले.
       राज्य शासनाचा मराठी भाषा विभाग, साहित्य  व संस्कृती मंडळ आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने आयोजित ग्रंथोत्सव-2013 या पुस्तक प्रदर्शन आणि विक्री उपक्रमाचे उदघाटन जिल्हाधिकारी डॉ.के.एम.नागरगोजे आणि प्रा. चंदनशीव यांच्या हस्ते येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सांस्कृतिक सभागृहात झाले. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल.हरिदास प्रमुख पाहुणे म्हणून तर  मराठवाडा विभागाचे माहिती संचालक राधाकृष्ण मुळी अध्यक्षस्थानी होते. उस्मानाबाद मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष नितीन तावडे, जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण यांची  व्यासपीठावर उपस्थिती होती. 
       यावेळी प्रा.चंदनशिव यांनी आपल्या भाषणात साहित्याची मानवी जीवनाला असलेली निकड स्पष्ट केली. जागतिकीकरणाच्या युगात इंग्रजी ही नोकरीसाठी आवश्यक असणारी भाषा ठरत असताना मातृभाषा ही सर्वांगीण जीवन विकासासाठी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. चांगल्या ग्रंथांचे, पुस्तकांचे वाचन हे विकासासाठी आवश्यक असून संत तुकाराम महारांजांची गाथा आणि महात्मा फुले यांचे शेतकऱ्यांचा आसूड हे ग्रंथ सर्वसामान्यांच्या मनाची भाषा बोलतात, असे प्रा. चंदनशीव  यांनी नमूद केले.
     आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी साहित्यातील बदलत्या प्रवाहाविषयी उहापोह केला. त्यातही ग्रामीण साहित्याविषयी त्यांनी सविस्तर विवेचन केले. माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातील गतीमान प्रगतीमुळे सर्वसामान्य माणसाची धावपळ होत आहे. अशावेळी अक्षराच्या माध्यमातून पोहोचविण्याचे काम ग्रंथ करत असतात. वाचन लेखनामुळे वेगवेगळया संस्कृती निर्माण होत आहेत. साहित्य व वाचन संस्कृतीला वाव देण्यासाठी ग्रंथाची निर्मिती व बांधणी महत्वाची आहे.साहित्याची परंपरा जपण्यासाठी ग्रंथाचे निरंतर वाचन महत्वाचे आहे. प्रदर्शन व संमेलने आयोजन केल्यामुळे माणसाच्या मनातील कडवटपणा नाहीसा होण्यास मदत होते. प्रत्येक शब्द हा संस्कृती घेऊन येतो. त्यामुळे साहित्यिक नवीन भाषा निर्माण करण्याचे कार्य करत असतो. ग्रंथ वाचनातून विचारांची देवाणघेवाण वाढविण्याचे काम   ग्रंथ करत असतात. मराठी भाषा व्यापक होण्यासाठी शब्दाचा प्रवाह महत्वाचा असतो. मराठी  संस्कृती ही विविध घटकांशी निगडीत असल्यामुळे त्याचे जतन करण्याची जबाबदारी ही आपणावर आहे, असे प्रा. चंदनशीव यांनी नमूद केले.
         जिल्हाधिकारी डॉ. नागरगोजे म्हणाले की,  ग्रंथाविषयी वाचकांना प्रेम असते. वाचनामध्ये बरेच काही शिकण्यासारखे असते. विशिष्ट विषयाची माहितीही ग्रंथामधूनच होत असते. त्यासाठी वाचकांना ग्रंथाची खरेदी एक संधी निर्माण झाली असून त्यांनी मोठया प्रमाणात   वाचन  करावे व आपल्या ज्ञानात भर घालावी. वाचनामुळे संस्कारक्षम व विचारवंत समाजाची निर्मीती होते. तेव्हा पुस्तक व ग्रंथाचे महत्व लक्षात घेवून सर्वांनी वाचन संस्कृती जोपासावी,असे आवाहन त्यांनी केले. 
          माहिती संचालक मुळी  म्हणाले की, राज्यात सर्व जिल्ह्यात हा उपक्रम सुरु आहे. वाचकांपर्यंत पुस्तके पोहोचविण्याच्या या प्रयत्नांना वाचकांनीही सकारात्मक प्रतिसाद दयावा. गतवर्षी या तीन दिवसीय ग्रंथप्रदर्शनाला सर्वांनी मोठा प्रतिसाद दिला होता. यावर्षी उस्मानाबादकर साहित्य रसिक भरभरुन प्रतिसाद देतील,अशी अपेक्षा व्यक्त करुन  ग्रंथप्रदर्शन आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली.
          ग्रंथोत्सवात  दि. 26 ते 28 फेब्रुवारी या कालावधीत जिल्हा माहिती कार्यालयामार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनात मराठवाडा तसेच राज्यातील इतर भागातून पुस्तक प्रकाशक आणि विक्रेते आले आहेत. वाचकांनी ग्रंथ प्रदर्शनाला भेटी देऊन मोठया संख्येने याचा लाभ घ्यावा, असे जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. 
        प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन ग्रंथोत्सवाचे उदघाटन करण्यात आले. जिल्हा माहिती कार्यालयातील सर्व सहकाऱ्यांच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रणजित दुरुगकर यांनी केले तर चव्हाण  यांनी आभार मानले. या कार्यक्रमास साहित्यिक, रसिक  वाचक, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
                       
ग्रंथप्रदर्शनाचे उदघाटन; 22 ग्रंथविक्रेते-प्रकाशकांचा सहभाग
उस्मानाबाद -:  जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथोत्सव उपक्रमात आज जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे आणि ख्यातनाम साहित्यिक प्रा. भास्कर चंदनशीव यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाचे उदघाटन फीत कापून करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एल. हरिदास, माहिती संचालक राधाकृष्ण मुळी, मसाप उस्मानाबाद शाखेचे अध्यक्ष नितीन तावडे, जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण यांची यावेळी उपस्थिती होती.
         ग्रंथप्रदर्शनानंतर प्रमुख पाहुण्यांनी पुस्तक प्रदर्शनाला भेट देऊन पाहणी केली. विविध स्टॅाल्सना भेटी देऊन पुस्तकांची माहिती घेतली तसेच पुस्तके खरेदीही केली.
         राज्याच्या विविध भागातून विविध ग्रंथ व पुस्तकांचे 22 स्टॉल्स याठिकाणी लावण्यात आले आहेत. यात सोलापूर येथील सुविद्या प्रकाशन,विजय प्रकाशन, विद्यादायीनी ग्रंथप्रकाशन, औरंगाबाद येथील सुमेध बुक डेपो, साकेत प्रकाशन, लोकसाहित्य प्रकाशन, लातूर येथील साईशाम पुस्तकालय, विचार सेतू, परभणी येथील पुजा ग्रंथ वितरण आणि प्रतिभास प्रकाशन, सातारा येथील लक्ष्मीनारायण एजन्सीज, पुणे येथील समकालीन प्रकाशन व ग्रंथाली प्रकाशन, औसा येथील विकास बुक सेलर्स, मुंबई येथील इस्लामीक मराठी पब्लीकेशन ट्रस्ट तसेच उस्मानाबाद येथील पृथ्वीराज प्रकाशन, ज्ञानदाता साहित्य सेवा आदि ग्रंथ विक्रेते व प्रकाशक यांत सहभागी झाले आहेत.
        विविध विषयांवरील तसेच नामवंत लेखकांची पुस्तके, आत्मचरित्रे, कथा,कादंबरी, कवीताविषयक पुस्तके तसेच पर्यटन, पाककला, सौंदर्य,अशा विविध विषयांवरील पुस्तकेही या ग्रंथप्रदर्शनात वाचकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. याशिवाय स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारी पुस्तकेही या प्रकाशकांमार्फत याठिकाणी विक्रीस ठेवण्यात आली आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आनंदनगर येथील सांस्कृतिक सभागृह येथे दि.28 फेब्रुवारीपर्यंत सकाळी 9 ते रात्री 9 या कालावधीत हे ग्रंथ प्रदर्शन वाचकांसाठी खुले राहणार आहे. जिल्ह्यातील पुस्तकप्रेमी आणि रसिक वाचकांनी आवर्जून या ग्रंथोत्सवास उपस्थिती  लावावी आणि पुस्तक खरेदीचा आनंद घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.           

Labels:

चारा छावणीवर नको दावणीवर द्या : विनोद तावडे

उस्मानाबाद :- मराठवाड्यात दुष्काळाने मांडलेले थैमान पाहता सरकारने पुरवलेल्या तकलादू उपाय योजना या आम्हाला मान्य नाहीत, सरकारची काम करण्याची भुमिका अत्यंत चुकीची आहे. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये काही गावांची पाहणी केली असता जनावरांच्या चार्‍या-पाण्याचा प्रश्‍न अतिशय गंभीर बनला आहे तरी आपले सरकार पोहचू शकत नाही, ही अतिशय दुर्देव आहे असे मत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
        यावेळी आमदार संभाजी पाटील निलंगेकर, लोकमंगलचे कार्याध्यक्ष  रोहन देशमुख, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे,  माजी जिल्हाध्यक्ष अँड. मिलींद पाटील, प्रदेशाध्यक्ष सुजितसिंह ठाकुर आदींची उपस्थिती होती.
         पुढे बोलाताना तावडे म्हणाले की, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दुष्काळ ङ्गार तिव्र आहे तरी पण रोजगार हमी योजनेची कामे कुठेही चालू असलेली दिसत नाहीत, त्यामुळे जिल्ह्यातील बेरोजगारी जनतेचे स्थलांतर वाढले आहे. ते स्थलांतर थांबविण्यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी रोजगार हमीची कामे चालू करणे महत्वाची बाब आहे. परंतू प्रशासनाचे याकडे लक्ष नाही. जिल्ह्यातील दुष्काळी परस्थितीतवर मात करण्यासाठी जिल्ह्यामध्ये असणार्‍या सामाजिक आणि आर्थिक संस्थांनी दुष्काळ ग्रस्तांना मदत करावी, असे आवाहन आम्ही भाजपाच्यावतीने केले आहे. याचबरोबर जिल्ह्यातील तामलवाडी, सुरतगाव, दहिवडी, कसई, बेंबळी, आंबेवाडी, या ठिकाणची पाहणी विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी केली असता त्या ठिकाणी शासनाच्या २५ टक्केसुध्दा सुविधा पोहचलेल्या नाहीत, तरी प्रशासनाने वेळीच लक्ष घालावे, असे त्यांनी सांगितले. आमदार ओमराजे निंबाळकर यांच्या उपोषणाला माझा पाठींबा आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Labels:

मिलट्री पेन्‍शन धरकांना आवाहन

सोलापूर -: सोलापूर जिल्ह्यातील मिलट्री पेन्‍शन धारकांना योग्य पेन्शन मिळावून देण्याकामी, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर द्वारे नेमलेल्या प्रतिनिधी मार्फत पेन्शन फॉर्म भरण्याचे काम जिल्ह्यातील माजी सैनिक संघटनांच्या कार्यालयात चालु आहे. सोलापूर जिल्ह्यातील पेन्शनधारकांनी आपआपल्या तालुक्यातील संघटनेच्या कार्यालयातुन आपले पेन्शन फॉर्म भरुन घ्यावेत असे आवाहन माजी कॅप्टन सु. मो. गोडबोले, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सोलापूर यांनी केले आहे. पेन्शनधरकांनी संघटनेच्या कार्यालयात जाताना सोबत आपले डिसचार्ज बुक, ओळखपत्र व पी.पी.ओ. ची आणि बँक पासबुकची मूळ प्रत व या सर्वांच्या छायांकित प्रती सोबत आणणे आवश्यक आहेत. अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दूरध्वनी क्र. 0217-2731035 वर संपर्क साधावा.

Labels:

रेशीम शेती अभ्यास दौ-यासाठी ८२ शेतकरी रवाना

उस्मानाबाद -: जिल्हा रेशीम कार्यालयाच्या वतीने शेतक-यांसाठी रेशीम शेती अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. दि.२६ ते २८ या दरम्यान नांदेड, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यातील रेशीम शेती शेतकरी पाहणार आहेत. या दौ-यासाठी जिल्हाभरातून ८२ शेतकरी मंगळवारी रवाना झाले.
          उस्मानाबाद जिल्ह्यापेक्षा अन्य जिल्ह्यात रेशीमचे उत्पादक कसे घेतले जाते, त्यांची पध्दत आणि उत्पादन पाहण्यासाठी या दौ-याचे आयोजन करण्यात आले आहे.या दौ-यासाठी जिल्हा रेशीम कार्यालयाच्या वतीने दोन बस करण्यात आल्या असून, प्रत्येक शेतक-यांना प्रवास भत्ता देण्यात आला आहे. या शेतक-यांना मंगळवारी साडेबारा वाजता निरोप देण्यात आला.त्यांना शुभेच्छा देण्यासाठी जिल्हा रेशीम विकास अधिकारी श्रीमती पी.एस.गणाचार्य, रेशीम अधिकारी एन.बी.बावगे आदी उपस्थित होते.
        यावेळी बोलताना श्रीमती गणाचार्य म्हणाल्या की, उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतक-यांचा कल आता रेशीम पिक घेण्याकडे वळला आहे. जवळपास ३८० एकर क्षेत्रात सध्या रेशीमचे पिक आहे.उस्मानाबाद,कळंब,भूम तालुक्यातील जवळपास २७० शेतक-यांनी रेशीमचे उत्पादन सुरू केले आहे.रेशीमचे प्रती एकर दरवर्षी ५ क्विंटल उत्पादन निघते. साधारण एक एकरात शेतक-यांना वार्षिक दीड लाख रूपये मिळतात. खर्च केवळ २० ते ३० टक्के आहे.शेतक-यांना जिल्हा रेशीम कार्यालयाच्या वतीने अनुदानाबरोबर त्यांना त्यांना तांत्रिक मार्गदर्शन केले जाते.
         सध्या रेशीम कोषाला सोन्याचा भाव मिळत आहे.प्रती किलो ३८० ते ४२० रूपये भाव मिळत आहे.

Labels:

रेल्वे अर्थसंकल्पात महाराष्‍ट्राला मिळाल्या नव्या गाड्या...

नवी‍ दिल्ली -: केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्‍ट्राच्या वाट्याला काय मिळेल? अशा संभ्रमात असलेल्या जनतेला 'कही खुशी कही गम' देणारा यंदाचा रेल्वे अर्थसंकल्प ठरला आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी मंगळवारी लोकसभेत 2013-14 साठी रेल्वे अर्थसंकल्प मांडला आहे. त्यात महाराष्ट्राला आठ नव्या गाड्या मिळाल्या तर नागपूर शहराकडे बन्सल साहेबांचे विशेष लक्ष दिले असल्याचे दिसून आले आहे.. 
       नागपूरला  रेल्वेच्या 'नीर' प्लॅन्ट, रेल्वे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, अद्ययावत लाऊंच सारखे नवे प्रकल्प उभारले जाणार आहेत. सर्वाधिक महसूल मिळवून देणार्‍या मुंबईला मात्र अल्प प्रमाणात न्याय दिला आहे.
    दिल्ली आणि मुंबईदरम्यान आणखी एक राजधानी एक्सप्रेस सुरु होण्याची आशा व्यक्‍त करण्यात आली होती. मात्र ती रेल्वेमंत्री बन्सल पूर्ण करू शकले नाही. मात्र त्यांनी लोकलच्या बाबतील घोषणा करून मुंबईकरांना खूश केले आहे.

नव्या गाड्या...
> अजनी(नागपूर) ते लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला)  (व्हाया हिंगोली)
> हजरत निजामुद्दीन - मुंबई एसी एक्स्प्रेस (व्हाया भुसावळ)
> हुबळी- मुंबई (व्हाया मिरज पुणे) (साप्ताहिक)
> काकीनाडा- मुंबई (आठवड्यातून दोन दिवस)
> कालका- साईनगर एक्स्प्रेस
>  लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला)- कोचुवली एक्स्प्रेस साप्ताहिक
>  मुंबई- सोलापूर एक्स्प्रेस (व्हाया पुणे)
>  उना- नांगल ते हुजुरसाहेब नांदेड (साप्ताहिक)

या गाड्यांचा पल्‍ला वाढविण्‍यात आला आहे
12145/12146 लोकमान टिळक टर्मिनस-भुवनेश्व‍वर एक्‍स्‍प्रेसचा जगन्‍नाथ पूरीपर्यंत विस्‍तार
12545/12546 लोकमान्य टिळक (टी)-दरभंगा एक्स्प्रेस रख्‍सौलपर्यंत (गेज परिवर्तनानंतर)
22107/22108 मुंबई सीएसटी-लातूर एक्स्प्रेस हुजूरसाहेब नांदेड़पर्यंत धावणार
51183/51184 भुसावळ-अमरावती पॅसेंजर नरखेडपर्यंत धावणार

या गाड्यांचा पल्‍ला वाढविण्‍यात आला आहे
12145/12146 लोकमान् टिळक टर्मिनस-भुवनेश्‍वर एक्‍स्‍प्रेसचा जगन्‍नाथ पूरीपर्यंत विस्‍तार
12545/12546 लोकमान्य टिळक (टी)-दरभंगा एक्स्प्रेस रख्‍सौलपर्यंत

Labels:

नळदुर्गात संत रोहिदास महाराजांची जयंती उत्‍साहात साजरी

नळदुर्ग -:  येथील शास्‍त्री चौकात श्री संत रोहिदास महाराजांची जयंती मोठ्या उत्‍साहात साजरी करण्‍यात आली.
    संत रोहिदास महाराज यांच्‍या प्रतिमेचे पूजन ज्ञानकिरण संस्‍थेचे भैरवनाथ कानडे यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. यावेळी शिवसेना शहरप्रमुख संतोष पुदाले, शिवसेना तुळजापूर उपतालुकाप्रमुख सरदा‍रसिंग ठाकूर, ज्ञानेश्‍वर घोडके, चर्मकार समाजाचे अध्‍यक्ष शंकर वाघमारे, ज्ञानदेव वाघमारे, गोविंद दस, विठ्ठल कांबळे, पिंटू दस, संभाजी कांबळे, बलदेव ठाकूर, मारुती घोडके आदीजण उपस्थित होते.
    संत रोहिदास जयंतीनिमित्‍त मोहनसिंग ठाकूर यांनी अन्‍नदान केले. जयंती उत्‍सव यशस्‍वी करण्‍यासाठी अध्‍यक्ष शंकर वाघमारे, उपाध्‍यक्ष लक्ष्‍मण कांबळे, कोषाध्‍यक्ष दिलीप गवळी यांच्‍याासह अनेकांनी परिश्रम घेतले.

Labels:

मिरगणे यांनी केवळ समाजकारण करावे : आंधळकर

बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : बार्शी तालुका भगवंत मित्रमंडळाच्या वतीने राजेंद्र मिरगणे यांना भगवंतरत्न, कमलेश मेहता यांना बार्शी तालुका भूषण, नामदेव घायितडक यांना जीवनगौरव पुरस्कार तसेच विविध विभागातील उल्लेखनीय कार्य केलेल्या 18 व्यक्तींचा विशेष गौरव करण्यात आला.
     मागील 13 वर्षांपासून सुरु असलेल्या बार्शीतील पुणेकर झालेल्या व्यक्तींनी स्थापन केलेल्या बार्शी तालुका भगवंत मित्रमंडळातर्फे उल्लेखनीय कार्यकरणा-या बार्शीकरांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. बार्शीत राहून उल्लेखनीय कार्याबद्दल भगवंतरत्न, बार्शीतील व्यक्तींनी कोणत्याही क्षेत्रात केलेल्या विशेष कार्याबद्दल बार्शी तालुका भूषण तसेच बार्शीतील व्यक्तींनी बाहेर राहून उल्लेखनीय कार्य करुनही त्यांची बार्शीकरांनी दखल घेतली नसेल त्यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात येतो.
     हा कार्यक्रम रविवाद दि. 24 फेब्रुवारी रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील उद्यान प्रसाद मंगल कार्यालयात पार पडला. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी हरिश्चंद्र गडसिंग, प्रमुख पाहुणे भाऊसाहेब आंधळकर, दिनकर पाटील, मुकूंद कुलकर्णी, आर.एम.करजखेडे, अतुल पाटील, राजन बुडूख, अपर्णा आंबेडकर, भास्कर जामदार आदी उपस्थित होते.
     यावेळी दिनकर पाटील, मुकूंद कुलकर्णी, रामलिंग आढाव, करजखेडे, अतूल पाटील, राहूल जगदाळे, मोहसिन शेख, कमलेश मेहता, राजाभाऊ काकडे, राजेंद्र मिरगणे, नामदेवराव घायितडक, भाऊसाहेब आंधळकर, सुधाकर बोकेफोडे, ज्योती सपाटे, हरिश्चंद्रगडसिंग यांनी विचार मांडले.
     भाऊसाहेब आंधळकर यांनी बोलतांना पुरस्कार मिळालेल्या मिरगणे यांचे सामाजिक कार्य चांगले असून त्यांनी राजकारणात येण्याअगोदर विचार करुन निर्णय घ्यावा असे म्हटले. यापूर्वी आपल्याला याच मंडळाकडून पुरस्कार मिळाला असून सामाजिक कार्याचा व राजकारणाचा मला चांगला अनुभव आल्याचे सांगत आगे बढो म्हणणारे लोक केंव्हा पाठीमागून निसटू जातील हे सांगता येत नाही असे अनुभवाचे बोल सांगीतले. सामाजिक कार्यात राजकारण नको पण या व्यासपीठावर मी पुरस्कार देणार्‍यांच्या शेजारी असलेला फोटो पाहून मिरगणे व मेहता यांना काही सामाजिक लोकांकडून त्रास होण्याची शक्यता वर्तवली. इतक्या खालच्या पातळीवरील बार्शीचे राजकारण असून आपण या सर्वांना भारी असून शिवसेनेच्या तिकीटावर आपण आमदार होणार असल्याचेही ठणकाऊन सांगीतले. बार्शीकरांच्या स्वप्नातील सुंदर शहराच्या निर्मितीला हातभार लावतांना मिरगणे यांनी पुण्याहून बार्शीत येऊन चांगल्या दर्जाच्या दहा दहा मजली इमारती उभ्या केल्या. 
     विशेष सत्कारामध्ये लेखिका सुजाता बोरा, चार्टर्ड अकौंटंट श्रध्दा वायचळ, गिर्यारोहक अनन्या शेटे, शिवाजी हावळे, पत्रकार भक्ती, डिझाईनर उदय मोहिते, विजय ठोंगे, अशोक लोहार, धिरज मांजरे, गायत्री जोशी, शेखर मस्के, अनिल शिंदे, अमर देवकर, शिवाजी जाधव,  सतीश कुलकर्णी, अरुण बकाल, राहुल बुलबुले यांचा विशेष गौरव करण्यात आला.

Labels:

स्वातंत्र्यवीर


Labels:

Monday, 25 February 2013

मंगळवारपासून ग्रंथोत्सवास प्रारंभ

उस्मानाबाद :- महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती  मंडळ आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने जिल्हा माहिती कार्यालयामार्फत दि. 26 ते 28 फेब्रुवारी या कालावधीत  उस्मानाबाद येथे ग्रंथोत्सव-2013 उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध ग्रंथ व पुस्तक विक्रेते, प्रकाशक यांत सहभागी होणार असून कवीसंमेलन, व्याख्यान, साहित्यिक गप्पा अशा विविध कार्यक्रमांची मेजवानी जिल्ह्यातील  रसिक वाचक व पुस्तकप्रेमींना मिळणार आहे. दि. 26 रोजी सकाळी 10-30 वाजता जिल्हाधिकारी डॅा. के. एम. नागरगोजे आणि प्रख्यात साहित्यिक प्रा. भास्कर चंदनशीव यांच्या हस्ते या ग्रंथोत्सवाचे उदघाटन होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आनंदनगर येथील सांस्कृतिक सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. या ग्रंथोत्सवात सातारा,सोलापूर, पुणे,लातूर, औसा, औरंगाबाद आणि परभणी येथील ग्रंथविक्रेतेही सहभागी होणार आहेत.
    महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यात हा उपक्रम राबविला जात आहे. ग्रंथोत्सवाच्या उदघाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे एस.एल. हरिदास उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी मराठवाडा विभागाचे माहिती संचालक राधाकृष्ण मुळी हे राहतील.
        उदघाटनाच्या दिवशीच सायंकाळी 6-30 वाजता निमंत्रितांची काव्यसंध्या हा काव्यवाचनाचा कार्यक्रम होणार आहे.यात माधव गरड, राजेंद्र अत्रे,  बालाजी इंगळे, डी.के. शेख,  सुभाष चव्हाण, देवीदास पाटील, प्रा. हनुमंत काळे,  शेखर गिरी, युवराज नळे, पंडित कांबळे,  तृप्ती अंधारे, प्रमिला राठोड, सतीश मडके, भाग्यश्री वाघमारे, प्रमोद माने,  डॉ.विजय परदेशी या  जिल्ह्यातील मान्यवर कवींचा  सहभाग असणार आहे. या  काव्यसंध्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कवी रवींद्र केसकर हे करणार आहेत.
    दि. 27 रोजी मराठी राजभाषा दिनानिमित्त सकाळी 11 वाजता जिल्ह्यातील ज्येष्ठ लेखकांचा सत्कार केला जाणार आहे.  दैनिक एकमतचे संपादक शरद कारखानीस आणि दैनिक संघर्षचे संपादक व्यंकटेश हंबीरे यांच्या हस्ते या लेखकांना गौरविण्यात येणार आहे. यात वेदकुमार वेदालंकार, उत्तम लोकरे, बाबुराव कांबळे, श.मा. पाटील, भ.ना.कदम, शिवमुर्ती भांडेकर, भाऊराव सोमवंशी, योगीराज वाघमारे, भारत गजेंद्रगडकर या ज्येष्ठ लेखकांचा समावेश आहे. या कार्यक्रमास मराठवाडा साहित्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखेचे अध्यक्ष नितीन तावडे, जिल्हा शासकीय ग्रंथालयाचे ग्रंथपाल सुनील हुसे आणि नगर वाचनालयाचे ग्रंथपाल दशरथ क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
         त्याचदिवशी सायंकाळी 6-30 वा. आम्ही सावित्रीच्या लेकी हा जिल्ह्यात उच्च पदावर कार्यरत असणाऱ्या महिला अधिका-यांशी साहित्यिक गप्पांचा कार्यक्रम होणार आहे. यात उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, उस्मानाबाद आणि तुळजापूरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अनुक्रमे डॉ. वैशाली कडुकर आणि शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या कमलताई आवटे, भूम आणि परंडा येथील तहसीलदार अनुक्रमे अहिल्या गाठाळ आणि वैशाली पाटील, उस्मानाबाद आणि तुळजापूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी अनुक्रमे प्रियदर्शिनी मोरे आणि तृप्ती ढेरे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांचा या कार्यक्रमात सहभाग राहणार आहे.
    दि.28 रोजी सायंकाळी 4 वा. जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप होणार असून प्रसिध्द लेखक-वक्ते प्रा. मिलींद जोशी यांचे वाचन संस्कृती या विषयावर व्याख्यान होणार आहे.
    या सर्व कार्यक्रमास जिल्ह्यातील पुस्तकप्रेमी आणि रसिक वाचकांनी आवर्जून उपस्थिती  लावावी आणि पुस्तक खरेदीचा आनंद घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण यांनी केले आहे.   
गतवर्षी झालेल्या ग्रंथोत्सवास उस्मानाबादकर साहित्य प्रेमींनी भरभरुन प्रतिसाद दिला होता. यावर्षीही पुस्तके पाहण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी असाच प्रतिसाद लाभेल,अशी अपेक्षा आहे.                                      

सातारा, सोलापूर, पुणे, लातूर, औसा, औरंगाबाद परभणी येथील ग्रंथ विक्रेत्यांचा ग्रंथोत्सवात सहभाग
 उस्मानाबाद :- जिल्हा माहिती कार्यालयामार्फत दिनांक 26 ते 28 फेब्रुवारी या कालावधीत  उस्मानाबाद येथे ग्रंथोत्सव-2013 उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवात सातारा,सोलापूर, पुणे,लातूर, औसा, औरंगाबाद आणि परभणी येथील ग्रंथविक्रेतेही सहभागी होणार आहेत.
        विविध ग्रंथ व पुस्तकांचे 22 स्टॉल्स याठिकाणी लावले जाणार आहेत. यात सोलापूर येथील सुविद्या प्रकाशन,विजय प्रकाशन, विद्यादायीनी ग्रंथप्रकाशन, औरंगाबाद येथील सुमेध बुक डेपो, साकेत प्रकाशन, लोकसाहित्य प्रकाशन, लातूर येथील साईशाम पुस्तकालय, विचार सेतू, परभणी येथील पुजा ग्रंथ वितरण आणि प्रतिभास प्रकाशन, सातारा येथील लक्ष्मीनारायण एजन्सीज, पुणे येथील समकालीन प्रकाशन व ग्रंथाली प्रकाशन, औसा येथील विकास बुक सेलर्स,मुंबई येथील इस्लामीक मराठी पब्लीकेशन ट्रस्ट तसेच उस्मानाबाद येथील पृथ्वीराज प्रकाशन, आदि ग्रंथ विक्रेते व प्रकाशक यांत सहभागी होणार आहेत.
         विविध विषयांवरील तसेच नामवंत लेखकांची पुस्तके, आत्मचरित्रे, कथा,कादंबरी, कवीताविषयक पुस्तके तसेच पर्यटन, पाककला, सौंदर्य,अशा विविध विषयांवरील पुस्तकेही या ग्रंथप्रदर्शनात वाचकांना उपलब्ध होणार आहेत. याशिवाय स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारी पुस्तकेही या प्रकाशकांमार्फत याठिकाणी विक्रीस ठेवण्यात येणार आहेत. दि.26  ते 28 फेब्रुवारी या कालावधीत सकाळी 9 ते रात्री 9 या कालावधीत हे ग्रंथ प्रदर्शन वाचकांसाठी खुले राहणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आनंदनगर येथील सांस्कृतिक सभागृह येथे या ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील पुस्तकप्रेमी आणि रसिक वाचकांनी आवर्जून उपस्थिती  लावावी आणि पुस्तक खरेदीचा आनंद घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.   

Labels:

तीन महिन्याला आरोग्य शिबीर घ्यावे : श्यौराज जीवन

सोलापूर : सफाई कर्मचा-यांच्या आरोग्यासाठी त्यांची नियिमत तपासणी होणे आवश्यक आहे. यासाठी दर तीन महिन्याला एकदा आरोग्य शिबीराचे आयोजन करुन त्यांची तपासणी करण्यात यावी अशा सूचना राष्ट्रीय सफाई कर्मचारी अयोगाचे सदस्य श्यौराज जीवन यांनी दिल्या.
    येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सफाई कामगारांच्या प्रश्नांबाबत आयोजित बैठकीत ते बालेत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम यांची प्रमुख उपस्थिती होती.
    याप्रसंगी बोलतांना श्यौराज जीवन म्हणाले की, देशाचा खरा सेवक सफाई कर्मचारी आहे. त्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत. जिल्ह्यातील नगरपालिकानिहाय लोकसंख्या व सफाई कर्मचा-यांची संख्या, सफाई कर्मचा-यांची रिक्त पदे आदिबाबत श्री. जीवन यांनी माहिती घेत रिक्त पदांची कारणे जाणून घेवून त्वरित भरण्याच्या सूचना दिल्या.
    तसेच सफाई कर्मचा-यांना नियमित वेतन दिले जाते की नाही. वेतन व्हेंडर मार्फत दिले जाते की कसे दिले जाते. त्यांच घरकुलांस्थितीबाबतची  माहिती घेतली. त्याच प्रमाणे सर्वेक्षण करुन त्यांना बीपीएल कार्ड देण्यात यावे. सफाईची उपकरणे देण्यात यावीत. या घटकातील विधवा, वृध्द, विकलांगासाठी शिबीरे घेवून त्यांना सहाय्य करण्यात यावेत अशा सूचनाही श्योराज जीवन यांनी बैठकीत दिल्या.

Labels:

नागरिकांना मूलभूत गरजा पुरविण्यास शासन कटिबध्द - पालकमंत्री चव्हाण

उस्मानाबाद :- नागरीकांना मुलभूत गरजा पुरविण्यास शासन कटिबध्द असून जनतेला नियमित पिण्याचे शुध्द पाणी, वीज, दळणवळणासाठी  मजबुत रस्ते, रस्त्यावर पथदिवे बसवून जनतेस मुलभूत सुविधा संबंधित यंत्रणेनी पुरवाव्यात, असे प्रतिपादन पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी तुळजापूरात बोलताना केले.
            यावेळी माजी आमदार नरेंद्र बोरगांवकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन पाटील, पंचायत समितीचे उपसभापती प्रकाश चव्हाण, नगराध्यक्ष अर्चनाताई, गंगणे, गोकुळ शिंदे, अशोक मगर, तहसिलदार व्ही. एल. कोळी, मुख्याधिकारी संतोष जिरगे, वीज मंडळाचे कार्यकारी अभियंता मामीलवार, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आदि उपस्थित होते.
            पालकमंत्री चव्हाण म्हणाले की,  तुळजापूर शहरास येत्या 3 आठवडयात नळयोजनेतून नियमित पाणी व मार्चपर्यंत अखंडीत वीज चालू ठेवण्यात येईल. वॉर्डा-वॉर्डात सौर उर्जेव्दारे वीज पुरवठा, दलित वस्तीत दोन विंधन विहीरीची कामे त्वरीत हाती  घ्यावीत, ड्रेनेजची व पाणीपुरवठयाची पाईपलाईन टाकावी, अंतर्गत पाणी पुरवठ्याची कामे घ्यावीत. वॉर्डात टाक्या ठेवून जनतेला नियमित पाणी पुरविण्यात यावे, परिसर स्वच्छतेसाठी नगरपालिकेनी प्रत्येक वॉर्डात  कचराकुंडी ठेवावी, असे निर्देशही त्यांनी संबंधित यंत्रणेला यावेळी  दिले.  यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते वॉर्डात  पाणीपुरवठा योजना व विकास कामांचा शुभारंभही  करण्यात आला.
       पालकमंत्री चव्हाण यांनी तुळजापूर तालुक्यातील तुळजापूर खुर्द, सारा गौरव, लमाणतांडा, अयोध्यानगर, विश्वासनगर, हडको, जिजामातानगर, कणेगल्ली, भोसले गल्ली, मातंगनगर आदि वार्डास  भेटी दिल्या. नागरीकांच्या अडचणी समजावून घेवून त्यांचे जागच्या जागी निराकरण करण्याचे निर्देशन त्यांनी  संबंधित यंत्रणेला दिले. प्रत्येक वॉर्डात महिलांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजावून घेतल्या. तत्पुर्वी पालकमंत्री चव्हाण यांनी तुळजापूर शासकीय विश्रामगृहात शहरातील पाणीपुरवठा व विकास कामांबाबत संबंधित अधिकाऱ्यांची आढावा घेतला.                             

Labels:

राष्ट्रीय बाल स्वास्थ सुरक्षा कार्यक्रम विविध पदासाठी भरती

सोलापूर :- राष्ट्रीय बाल स्वास्थ सुरक्षा कार्यक्रमांतर्गत विविध पदाकरिता भरती कार्यक्रम थेट मुलाखतीद्वारे  जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, सोलापूर येथे दि. 25 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी पर्यंत राबविण्यात येणार आहे. सर्व उमेदवारांनी सकाळी 9.00 वाजता हजर राहणे बंधनकारक आहे. सकाळी 10.00 वाजल्यानंतर अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची सर्व उमेदवारांनी नोंद घेण्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.
    मुलाखत स्थळ जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, सी ब्लॉक, श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर.

Labels:

परिवर्तनाची लाट


Labels:

Sunday, 24 February 2013

पवारांवर टीका करण्‍याची पात्रता राज ठाकरेंकडे आहे का? राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचा सवाल

सोलापूर -: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी सायंकाळी सोलापुरातील नॉर्थकोट मैदानावर केलेल्या जाहीर भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह व खालच्या थराला जाऊन वक्तव्य केल्याबद्दल ठाकरेंवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी पोलिस आयुक्तांना निवेदनाद्वारे केली. तसेच सदर बझार पोलिस ठाण्यात ठाकरे यांच्या भाषणाची सीडी व निवेदन देण्यात आले. राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे अध्‍यक्ष शरद पवार यांच्‍यावरही राज ठाकरेंनी टीका केली होती. शरद पवारांवर टीका करण्‍याची पात्रता राज ठाकरेंकडे आहे का, असा सवाल राष्‍ट्रवादी कॉंग्रेसने केला आहे.

अन्यथा आंदोलन करणार
दोन दिवसांत पोलिसांनी ठाकरे यांच्यावर कारवाई न केल्यास संपूर्ण जिल्हाभर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन करणार असल्याचे सांगण्यात आले. ठाकरेंवर कलम 504, 501-1 सी-499 या अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

चार पुतळा चौकात दुपारी प्रतीकात्मक पुतळा दहन
दरम्यान, शनिवारी दुपारी एकच्या सुमाराला चार पुतळा चौकात राज ठाकरे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. त्यानंतर फौजदार चावडी पोलिसांनी संतोष पवार यांच्यासह तीसजणांना अटक करून पोलिस ठाण्यात आणले. पुतळा दहन केल्याप्रकरणी सर्वांवर गुन्हा दाखल करून त्यांना जामिनावर सोडण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक चंद्रकांत शिंदे यांनी दिली.

पोलिस आयुक्तांना निवेदन
पोलिस आयुक्त प्रदीप रासकर यांना भेटून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. या शिष्टमंडळात संतोष पवार, संजय पाटील, गणेश पाटील, भारत बेंद्रे, जितेंद्र साठे, बिपीन करजोळे यांच्यासह सुमारे शंभर कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

राज ठाकरे यांना निरोप
गुरुवारी रात्री सोलापुरात आलेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे शनिवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास सोलापुरातून उस्मानाबादकडे रवाना झाले. दोन्ही दिवस त्यांचा मुक्काम सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहात होता. सकाळी तेथून ते नाष्ट्यासाठी युवराज चुंबळकर यांच्याकडे (भागवत थिएटर समोर) आले, तेथून पांजरापोळ चौक मार्गे ते उस्मानाबादकडे रवाना झाले. ते रवाना होताच सोलापुरात शुक्रवारच्या त्यांच्या भाषणाचे राजकीय पडसाद उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी दुपारी आंदोलनही केले. त्यांचे भाषण राज्यभर चर्चेत राहीले.


माहिती घेत आहोत
भाषणाची सीडी व्हेरीफाय होणार आहे. विधी अधिकार्‍यांचा सल्ला घेतल्यानंतर गुन्हा दाखल होत असेल तर कारवाई करणार. कोणत्या पद्धतीने कारवाई करता येईल याची माहिती घेत आहोत.’’ प्रदीप रासकर, पोलिस आयुक्त

आमच्या भावना दुखावल्या

ठाकरे यांच्या भाषणाबद्दल आमचे काही म्हणणे नाही. लोकशाहीत सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे. पण, त्यांनी उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्यावर खालच्या थराला जाऊन वक्तव्य केले. याने पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत. दोन दिवसांत कारवाई करावी. अन्यथा आम्ही आंदोलन छेडणार आहे.’’ संतोष पवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, जिल्हाध्यक्ष

दोन दिवसांत निर्णय होईल
राष्ट्रवादी पक्षातर्फे सदर बझार पोलिसांना ठाकरे यांच्या वक्तव्याबद्दल निवेदन व सीडीही दिली आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी त्यांची मागणी आहे. याबाबत गुन्हा दाखल करता येतो का याची विधी सल्लागार यांच्याकडे माहिती घेण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. दोन दिवसांत याबाबत निर्णय होईल.’’ रवींद्र थोरात, साहाय्यक पोलिस निरीक्षक, सदर बझार पोलिस स्टेशन

* सौजन्‍य दिव्‍यमराठी

Labels:

राज्‍यपाल चाकूरकर यांच्‍या हस्‍ते गुरुवारी व्‍यापारी संकुलाचे उदघाटन

मुरुम -: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने उभारण्यात आलेल्या व्यापारी संकुलाचे उदघाटन पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील-चाकूरकर यांच्या हस्ते गुरुवार दि. 28 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरु आहे.
       उमरगा तालुक्‍यातील मुरुम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात 70 लाख रुपये खर्चून 24 गाळ्यांचे व्यापारी संकुलन बांधण्यात आले आहे. या संकुलाचा उदघाटन सोहळा दि. 28 फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता पंजाबचे राज्‍यपाल शिवराज पाटील-चाकूरकर यांच्‍या हस्‍ते होणार आहे. या कार्यक्रमास राज्‍याचे पशुसंवर्धन, दुग्‍धविकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री तथा जिल्‍ह्याचे पालकमंत्री ना. मधुकरराव चव्‍हाण, राज्याचे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील,औसाचे आमदार बसवराज पाटील यांची उपस्थिती राहणार आहे. बाजार समितीकडून जय्यत तयारी करण्यात येत असून आडत आणि खरेदीदार व्यापार्‍यांनी कार्यक्रमासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील यांनी केले आहे.

Labels:

गुजरातमध्‍ये मैला वाहणा-यांना मोदी सरकार नेमणार मंदिरावर पुजारी

गांधीनगर : गुजरात राज्‍यातील बहुतांश भागात आजही दलितांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही. त्‍या ठिकाणी मुख्‍यमंत्री नरेंद्र मोदी सरकारने एक परिवर्तनवादी निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने मैला वाहून नेणार्‍या व्यक्तींना मंदिरांचे पुजारी बनविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना हिंदू रीतीरिवाजानुसार विशेष प्रशिक्षण दिले जाणार असून ते सर्व धार्मिक विधी आणि कर्मकांडाचे सोहळे पार पाडू शकतील. 
      एका इंग्रजी वृत्तपत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, सामाजिक न्याय विभागाने सफाई कामगारांना अशा प्रकारचे प्रशिक्षण देण्यासाठी २0१३-१४ च्या बजेटमध्ये २२.५0 लाखांचा निधी निर्धारित केलेला आहे. याचे विशेष प्रशिक्षण १६ भागवत पीठे आणि सोमनाथ संस्कृत विद्यापीठसारख्या संस्थांतून दिले जाणार असून सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. 'नवसृजन' या दलित अधिकार संघटनेच्या मंजुळा प्रदीप यांनी सरकारचे हे पाऊल परिवर्तनकारी असल्याचे म्हटले आहे. राज्य सरकारने उचललेल्या या नव्या पावलामुळे ओबीसी समाजातील मोदींना देशभरातील दलितांकडून पाठिंबा मिळणार आहे. समाजातील दलित-ओबीसी लोकांचा प्रतिनिधी म्हणून आपल्याला पंतप्रधान बनवावे, असा दावा मायावतींनी केलेला होता. यामुळेच मोदींनीही आपण दावेदार असल्याचे दाखवून देण्यासाठी हा निर्णय घेतला असावा, असा तर्क लढविला जात आहे.

Labels:

नायब तहसीलदार, तलाठय़ावर गुन्हा

कळंब -: बनावट दस्‍तऐवज तयार करुन वंशपरंपरागत जमीन परस्पर इतरांच्या नावे केल्याप्रकरणी तत्कालीन नायब तहसीलदार सह तलाठी व इतर दोघांविरुद्ध कळंब पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळंब तालुक्यातील कोठाळवाडी येथे हा प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे.
         येथील अश्‍वीनी सुधाकर कोठावळे (रा. कोठाळवाडी, ता. कळंब ) यांनी पोलीसात दिलेल्‍या फिर्यादीत म्‍हटले आहे की, माणिक गोवर्धन कोठावळे व बिभीषण गोवर्धन कोठावळे यांच्या वडिलांच्या नावे कोठाळवाडी शिवारात जमीन होती. सदर जमीन या दोघांनी तत्कालीन नायब तहसीलदार आर. पी. बोरसुरे व तलाठी बी. एस. कसबे यांच्याशी संगनमत करुन स्वत:च्या नावे करुन घेतली. नायब तहसीलदार व तलाठय़ांच्या सहाय्यानेने बनावट कागदपत्रे तयार केली. यामध्ये वारस असलेल्या अश्‍विनी कोठावळे यांना कसलाही हिस्सा न देता परस्पर बनावट व बेकायदेशीर कागदपत्रे तयार करुन जमीन नावावर करुन घेत फसवणूक केल्याची फिर्याद अश्‍विनी कोठावळे यांनी दिली आहे. त्यावरुन नायब तहसीलदार बोरसुरे, तलाठी कसबे, मणिक कोठावळे व बिभीषण कोठावळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास हवालदार गोलेकर हे करीत आहेत.

Labels:

राग


Labels: