Wednesday, 31 July 2024

महामार्गावरील नळदुर्ग येथे एक कोटीपेक्षा अधिक किमंतीचा ५२८ किलो गांजासह एकास अटक: गस्ती पोलिसांच्या कामगिरीचे सर्वञ कौतुक

महामार्गावरील नळदुर्ग येथे एक कोटीपेक्षाअधिक किमंतीचा ५२८ किलो  गांजासह  एकास अटक: गस्ती पोलिसांच्या कामगिरीचे सर्वञ कौतुक 

नळदुर्ग, दि. ३१ : 

भरधाव चारचाकी वाहनातून तब्बल ५२८ किलो गांजाची महामार्गावरुन वाहतुक करीत असताना नळदुर्ग पोलिसानी पेट्रोलिंग करताना रंगेहात पकडून सुमारे १ कोटी १५ लाख ७८ हजार ८०० रुपये एवढ्या किंमतीचा  मुद्देमाल  पोलिसांनी  जप्त करुन एकास अटक केली आहे.  दरम्यान महामार्गवरील ही सर्वात मोठी कारवाई आहे.

 दि 30 जुलै रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास नळदुर्ग पोलिसांची रात्री राष्ट्रीय महामार्गवर गस्त सुरु होती यावेळी उमरग्याहुन सोलापुरकडे भरधाव वेगात स्कार्पिओ गाडी क्र. एम. एच. 08 झेड 5684 ही जात असताना पोलिसांना संशय आल्याने त्यांनी नळदुर्ग येथील राष्ट्रीय महामार्गवर ही गाडी अडविली. गाडी थांबल्यानंतर गाडीची तपासणी केल्यानंतर गाडीत मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला. यावेळी अतिष राजकुमार माने याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर हा गांजा आपण सोलापुरला घेऊन जात असल्याचे सांगितले. त्यांचबरोबर त्याच्याकडे चौकशी केले असता यामध्ये भीमराव दिलीप खडसुळे, राम दिलीप खडसुळे, डी. जे. चहाविक्रेता, कळवे, रवी सर्व रा. सोलापुर व राहुल रा. अहमदनगर हे यामध्ये सहभागी असल्याचे निष्पन्न झाले.

या  आरोपीविरुध्द  पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असुन यातील अतिष राजकुमार माने याला अटक करण्यात आली आहे. स्कार्पिओ गाडीतुन पोलिसांनी एकुण 528 किलो गांजा जप्त केला आहे त्याची किमत 1 कोटी 5 लाख 78 हजार 800 रुपये इतकी किमत आहे. गांजा व स्काकर्पिओ गाडी असा एकुण 1 कोटी 15 लाख 78 हजार 800 रु्पयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंद कांगुने हे करीत आहेत.सदरील कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक गोहर हसन, तुळजापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख मार्गदर्शनाखाली नळदुर्ग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंद कांगुने, सुरज देवकर,विजय आटोळे, पोलिस उपनिरीक्षक ईश्वर नांगरे,संतोष गिते, विजय थोटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल उमाजी गायकवाड, सुरेश सगर, अमर जाधव, सूर्यकुमार फुलसुंदर, बालाजी शिंदे ,दत्ता हिंगे, दत्ता कुंभार, शंकर कांबळे यांच्यासह  पोलिस कर्मचाऱ्यांनी केली आहे.

Labels:

नगर शिक्षण विकास मंडळाकडून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा गौरव

नगर शिक्षण विकास मंडळाकडून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार                          

मुरूम, ता. उमरगा, ता. ३१ : 


येथील नगर शिक्षण विकास मंडळ संचलित प्रतिभा निकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात  कार्यरत असलेल्या प्राचार्य महानंदा रोडगे, प्रा. डॉ. रमाकांत पाटील, सहशिक्षक कांत सोमवंशी, शिवानंद पाटील यांचा सेवानिवृत्तीबद्दल संस्थेकडून सेवापूर्ती सत्कार सोहळा बुधवारी (ता. ३१) रोजी प्रतिभा निकेतन विद्यालयात पार पडला. 

या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील होते. यावेळी उमरगाचे गटशिक्षणाधिकारी शिवकुमार बिराजदार, संस्थेचे सचिव व्यंकटराव जाधव गुरुजी, जिल्हा मुख्याध्यापक संघटनेचे मानद अध्यक्ष एम. डी. देशमुख, अध्यक्ष सुरेश टेकाळे, पंचायत समितीचे माजी सभापती मदन पाटील, गोविंद पाटील, कोथळीचे सरपंच आप्पासाहेब पाटील, सुनिल पुजारी, माजी नगराध्यक्ष रशिद शेख, देवेंद्र कंटेकुरे, दत्ता चटगे आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कै. माधवराव (काका) पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बापूराव पाटील यांच्या हस्ते महानंदा रोडगे, रमाकांत पाटील, कांत सोमवंशी, शिवानंद पाटील यांचा सपत्नीक यथोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी एम. डी. देशमुख, महानंदा रोडगे, रमाकांत पाटील, शिवानंद पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रा. कल्याणी टोपगे, प्रा. विश्वजित अंबर, प्रा. अण्णाराव कांबळे, प्रा. उमाकांत महामुनी, विवेकानंद पडसाळगे, अमोल गायकवाड, शोभा पटवारी, रेखा उन्नद आदींनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उल्हास घुरघुरे  यांनी केले. सुत्रसंचालन प्रा. करबसप्पा ब्याळे तर आभार संतोष सुर्यवंशी यांनी मानले. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील कार्यकर्ते, पदाधिकारी, शिक्षकवृंद, नागरिक उपस्थित होते.               


 यावेळी शिवकुमार बिराजदार म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरणात काळानुरूप तंत्र कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम आल्याने विद्यार्थी अधिकाधिक स्वावलंबी बनणार आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व आवडीनिवडीनुसार शिक्षण घेता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवला पाहिजे. या संस्थेने येथील कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्य दिल्याने गुणात्मक व दर्जात्मक विद्यार्थी घडविले आहेत. सेवानिवृत्तीनंतर देखील सामाजिक क्षेत्रात शिक्षकांनी योगदान द्यावे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

Labels:

जिल्हाधिकारीचे आदेश असुनही घरजागेची नोंद घेण्यास न.प. प्रशासनाकडून टाळाटाळ ; संतप्त नागरिकांचा नगरपालिकेवर मोर्चाचा इशारा

जिल्हाधिकारीचे आदेश असतानाही  घरजागेची नोंद घेण्यास न.प. प्रशासनाकडून  टाळाटाळ ;  संतप्त नागरिकांचा नगरपालिकेवर मोर्चाचा इशारा


नळदुर्ग , दि.३०

शहरातील नागरिकानी वारंवार विनंती अर्ज, अमरण उपोषण ,आदोंलन केले, जिल्हाधिकिरी यांचे आदेश असतानासुध्दा  घरजागेची नोंद घेण्यास न.प. प्रशासन टाळाटाळ करीत असल्याने वसंतनगर व अक्कलकोट रोड सर्व्हे न. २९ मधील संतप्त नागरिकांनी नगरपालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. 

शासकिय जागेवर कब्जे वहिवाटीनुसार राहणाऱ्या बेघर कुटुंबाच्या घरजागेची येत्या आठ दिवसात  नगरपरिषदेत भोगवटदार म्हणून नोंद करावे, मालमत्ता कर भरून घ्यावे अन्यथा दि.२ ऑगस्ट् रोजी वसंतनगर येथिल श्री  सेवालाल सामाजिक संस्था व  सर्व्हें नं.२९ मधील नागरिकांचा दि.५ ऑगस्ट् रोजी न.प.कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा नागरिकांनी जिल्हाधिकारी यासह सबंधीतांना निवेदनाव्दारे  दिला आहे.   

नळदुर्ग शहरातील वसंतनगर व  अक्कलकोट रोड लगत सर्व्हे नं.२९ मध्ये गेल्या ५० वर्षा पूर्वीपासून भटक्या विमुक्त समाजाचे कुटूंब शासकीय जागेवर राहत आहेत. नगरपरिषदेने जा.क्र.४३१/न.प.न./२०२३ दि.१८/०७/२०२३ रोजी आम्हाला नोटीस देऊन जिल्हाधिकारी  यांचे दि.१७/०७/२०२३ च्या आदेशानुसार रमाई आवास, प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ देण्याकरीता शासकिय जागेवरील पात्र लाभार्थ्यांकडुन आवश्यक ते कागदपत्रांची विहीत नमुन्यात प्रस्ताव दाखल करून घेतले.
त्यास  एक वर्षं उलटले. मात्र न.प.ने अद्याप पर्यंत भोगवटदार म्हणून नोंद केली नाही. त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभापासुन  लाभार्थी वंचित राहिले. 

याप्रकरणी दि. १६ नोव्हेंबर २०२३  रोजी न.प. कार्यालया समोर वसंतनगर, दुर्गानगर, इंदिरानगर ,बौध्दनगर ( सर्व्हे न.२९) आदी ठिकाच्या बहुसंख्य 
नागरिकांनी  आमरण उपोषण केले होते. यावेळी नगरपरिषदेने लेखी अश्वासन दिल्याने नागरिकानी उपोषण मागे घेतले. हे आंदोलन करून १० महिने होत आले. मात्र याकडे  न.प. प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. 

त्याचबरोबर मालमत्ता कराचे सर्व्हे होऊन सहा महिने उलटून गेले, तरीही सुस्त नगरपालिका प्रशासन नागरिकांकडून मालमत्ता कर भरून घेण्यास टाळाटाळ करीत आहे.  त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.


 येत्या आठ दिवसांत नगरपरिषदेने लाभार्थ्यांकडून मालमत्ता कर भरून घेऊन  घर जागेची न.प. दप्तरी नोंद घ्यावी, तसेच ८ अ नक्कल द्यावे अन्यथा वसंतनगरच्या नागरिकांचा दि. २ आॕगस्ट रोजी तर सर्व्हे न. २९ मधील नागरिक दि. ५  आंँगस्ट  रोजी सकाळी ११ वाजता नगरपालिका कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. निवेदनावर फुलचंद राठोड, विनायक जाधव, सुरेश राठोड, संजय जाधव, रवि राठोड, अजित चव्हाण, शेखर राठोड,  शिवाजी नाईक, अशोक बंजारे, राजाराम नाईक, राम नाईक, यांच्यासह नागरिकांच्या सह्या आहेत. 

नगरपरिषद प्रशासनाच्या हालगर्जीपणामुळे शासनाचे लाखो रूपयेचा महसुल बुडत आहे. तर दुसरीकडे टेंडर काढणे, ठेकेदाराचे बील काढण्यात न.प. प्रशासन व्यस्त आहे.  त्यामुळे  सर्वसामान्य नागरिक कामासाठी न.प.चे उबंरठे झिजवत आहेत. नळदुर्ग नगरपरिषदेच्या तुघलकी काराभाराविरुध्द नागरिकात असंतोष निर्माण होत आहे.

Labels:

वागदरी ग्रामपंचायतीला तेरणा युथ फाॅंऊडेशनच्या वतीने रेडीमेड सुलभ शौचालयाची सुविधा


वागदरी ग्रामपंचायतीला तेरणा युथ फाॅंऊडेशनच्या वतीने रेडीमेड सुलभ शौचालयाची सुविधा 

 वागदरी , दि. ३१: एस.के.गायकवाड

वागदरी ता. तुळजापूर येथे  तेरणा युथ फाऊंडेशन च्यावतीने जिल्हा परिषद धाराशिवच्या माजी उपाध्यक्षा तथा लेडीज क्लबच्या अध्यक्षा  अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त तेरणा फाऊंडेशनचे संस्थापक मेघ दादा पाटील यांच्या पुढाकाराने रेडीमेड सुलभ शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.


 या प्रसंगी तेरणा युथ ‌फाॅंऊडेशन धाराशिवच्या टीमचे वागदरी गावात आगमन होताच त्यांचे ग्रामपंचायत, भाजपा शाखा आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. तेरणा युथ फाउंडेशनच्या वतीने मेघ दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संबंध जिल्हाभर समाज उपयोगी  उपक्रम राबविले जात असून त्याचाच भाग म्हणून तेरणा युथ फाॅंऊडेशनच्या वतीने वागदरी ग्रामपंचायतीला 
दि.२९ जुलै २०२४ रोजी अर्चनाताई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने रेडीमेड सुलभ शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.

यावेळी जि.प.च्या अध्यक्षा अस्मिताताई कांबळे, भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षा रंजना राठोड, भाजपा सोशल मीडिया जिल्हा प्रमुख विद्याताई माने, तेरणा युथ फाॅंऊडेशनचे आकाश तावडे, गणेश इंगळगी,राज नवले, विशाल पाटील, प्रविण शेटे, नितीन खंडागळे, गावातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवाजी मिटकर गुरुजी, भालचंद्र यादव, माजी उपसरपंच मिनाक्षी बिराजदार,  पत्रकार कीशोर धुमाळ, भाजपा शाखा प्रमुख किशोर सुरवसे, बाळू पवार,रत्नसिंग चव्हाण,आदीसह ग्रामस्थ  उपस्थित होते.

Labels:

Tuesday, 30 July 2024

राज ठाकरे यांच्या आदेशानंतर तुळजापूर विधानसभेचा आढावा घेण्यासाठी निरीक्षक दाखल

राज ठाकरे यांच्या आदेशानंतर तुळजापूर विधानसभेचा आढावा घेण्यासाठी निरीक्षक दाखल


तुळजापूर/नळदुर्ग, दि.३०

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतेच   विधानसभेच्या जागा लढविण्याची तयारी असल्याचे सांगितल्यानंतर राज्यातील प्रत्येक विधानसभा क्षेत्राचा आढावा घेण्यासाठी पक्ष निरीक्षकांची नियुक्ती केली   आहे.त्यानुसार मनसे सरचिटणीस तथा निरीक्षक नयन कदम, प्रवक्ते हेमंतकुमार कांबळे,सुदेश चूडनाईक,कुणाल माईणकर,घनश्याम परब,नरेश सावंत,अवधूत चव्हाण याच्या प्रमुख उपस्थितीत तुळजापूर विधानसभा क्षेत्राची सद्याची राजकीय परिस्थिती,स्थानिक नागरी प्रश्न,पक्षाने केलेले विविध आंदोलने याची माहिती घेतली, पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रमुख पदाधिका-यांना सूचना दिल्या, तसेच आढावा बैठक,केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करणार आहेत

या बैठकीस जिल्हा उपाध्यक्ष महेश जाधव,जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे,विधानसभा अध्यक्ष मयूर गाढवे, तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन कुंभार,तालुका सरचिटणीस गणेश पाटील,नळदुर्ग शहराध्यक्ष अलिम शेख,शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी,शहर संघटक रवि राठोड, तुळजापूर शहर उपाध्यक्ष,वेदकुमार पेंदे,मनविसे तालुकाध्यक्ष सूरज चव्हाण,सोमेश्वर आलूरे,दगडू लकडे, धर्मराज सावंत, अविनाश पवार , मनोज सोनवणे, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते  उपस्थित होते.

यावेळी सूत्रसंचालन व प्रास्ताविक शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी यांनी  तर पक्षाची कामगिरी व संघटनेबाबत माहिती देऊन जिल्हा उपाध्यक्ष महेश जाधव यांनी आभार मानले.

Labels:

Monday, 29 July 2024

वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन काळाची गरज-उपजिल्हाधिकारी राहुल गायकवाड

वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन काळाची गरज-उपजिल्हाधिकारी  राहुल गायकवाड

 मुलांची शासकीय निवासी शाळेत वृक्षारोपण


मुरुम, ता. उमरगा, दि. २९  :

 वाढत्या औद्योगीकरणामुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ होऊन पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. त्याकरिता वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. पर्यावरणाचे रक्षण करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन काळाची गरज असल्याचे प्रतिपादन रत्नागिरीचे उपजिल्हाधिकारी राहुल गायकवाड यांनी केले.


 मुरूमच्या विठ्ठलसाई कारखाना परिसरातील अनुसूचित जाती शासकीय निवासी शाळेत प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. प्रारंभी रत्नागिरीचे उपजिल्हाधिकारी राहुल गायकवाड, मुंबईचे उपजिल्हाधिकारी श्यामसुंदर सुरवसे, उपजिल्हाधिकारी महादेव किरवले, नायब तहसीलदार  सिद्धार्थ धलकर, प्रशांत बारलावर यांच्या हस्ते  वृक्षारोपण करण्यात आले. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रत्नागिरीचे उपजिल्हाधिकारी राहुल गायकवाड होते. यावेळी उमरगाचे विस्तार अधिकारी अजित भांगे, जिंदाल ग्रुप मुंबईचे राजकुमार येवलेकर, समुपदेशक अभय भालेराव, आप्पासाहेब मुंडासे, खंडाप्पा धुम्मा, महेश कोळी, पवन कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.  पुढे बोलताना राहूल गायकवाड म्हणाले की, विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात अधिक वाचन, लेखन, चिंतन करावे. मनाच्या शुद्धतेसाठी दररोज योगा-ध्यानधारणा करावी. अभ्यास करत असताना अवांतर वाचन वृत्तपत्रे, महापुरुषांचे आत्मचरित्र, त्यांच्या जीवन कार्यावरील ग्रंथ,  विविध प्रकारचे लेख वाचावेत. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून त्यांच्या सेवासुविधा बाबत माहिती जाणून घेतली. 


या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिलीप सुरवसे, उत्तम राठोड, अमोल कांबळे, सचिन फुगटे, प्रदिप झिंगाडे, अभिजीत काळे, विनोद कांबळे आदिंनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक दत्तात्रय कुंभार यांनी केले. सूत्रसंचालन व आभार लखन इनकर यांनी मानले.               

  फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील शासकीय निवासी विद्यालयात वृक्षारोपण करताना राहुल गायकवाड, श्यामसुंदर सुरवसे, महादेव किरवले, सिद्धार्थ धलकर, प्रशांत बारलावर व अन्य.

Labels:

राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत बचत गटांना 50 लाखाचे कर्ज वितरण

राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत बचत गटांना 50 लाखाचे कर्ज वितरण

नळदुर्ग ,दि.२९

राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत नळदुर्ग शहरातील सहा  बचत गट असे मिळुन एकूण  50 लाखाचे कर्ज वितरण दि. 29 जुलै रोजी नगर परिषदेत करण्यात आले.

 दिन दयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांचे मार्गदर्शननुसार शहरातील महिला बचत गटाला विविध व्यवसाय करण्यासाठी  स्टेट बँक ऑफ इंडिया यांचे मार्फत जय मल्हार बचत  गटाला 10 लक्ष, कल्पराज महिला बचत गटाला 10 लक्ष, जिजामाता महिला बचत गटाला 10 लक्ष, पंचशील महिला बचत गटाला 10, भिमाई महिला बचत गटाला 5 लक्ष आणि विजया लक्ष्मी महिला बचत गटाला 5 लक्ष असे एकूण 50 लाखाचे कर्ज वितरण करण्यात आले आहे.

 सदरच्या कर्जातून बचत गट छोटे मोठे व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहित झाले आहेत व सदर व्यवसायातून कुटुंबाचा उदरनिर्वाह व राहणीमानाचा दर्जा चांगल्या प्रकारे साधण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सदर कर्ज मिळण्यासाठी नगर परिषदेचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुरज गायकवाड, समुदाय संघटिका रानुबाई सपकाळ, शहरस्तरीय संघाचे अध्यक्ष कल्पना गायकवाड, सचिव जिजाबाई जाधव यांच्या प्रयत्नातून आणि बँकेचे व्यवस्थापक साळुंके, लोन मॅनेजर खुशाल राऊत, व गणेश यांच्या सहकार्यतून  गटाला कर्ज वितरण झाले. कर्ज वितरणासाठी उपस्थित नगरपरिषदेचे व बँकेचे अधिकरी कर्मचारी आणि शहर स्तराचे व बचत गटांच्या महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

Labels:

Sunday, 28 July 2024

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सरचिटणीस आदित्य गोरे यांंची येडोळा गावास भेट

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे  सरचिटणीस  आदित्य गोरे यांंची येडोळा गावास भेट

नळदुर्ग ,दि.२८

तुळजापूर तालुक्यातील मौजे येडोळा येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे  सरचिटणीस  आदित्य गोरे यांनी आढावा बैठक निमित्त भेट दिली. यावेळी त्यांचा स्वागतपर सत्कार करण्यात आले.


 येडोळा गांवचे माजी  सरपंच पद्माकर पाटील,  ग्रामपंचायत सदस्य  उत्तम जाधव , प्रगतीशील शेतकरी  दत्तात्रय जाधव व धाराशिव विद्यार्थी  काँग्रेस जिल्हा अध्यक्ष  ज्ञानेश्वर निंबाळकर यांचा सत्कार येडोळा राष्ट्रवादी युवक काँग्रेस  पक्षाच्या वतीने  रवि पाटील, युवा कार्यकर्ते प्रसाद जाधव, शाम जाधव, ओंकार पाटील, आदित्य पाटील, हेमंत पाटील, समर्थ पाटील, संकल्प चव्हाण, गोवर्धन लोंढे, अभिजित चव्हाण , गौस पटेल अमोल जाधव यानी केले.


याप्रसंगी आदित्य गोरे यांनी युवकांना मार्गदर्शन करताना तुळजापूर विधानसभा निवडणूकीसाठी महाविकास आघाडीकुडून माजी परिवहन मंत्री जीवनराव गोरे  हे इच्छुक आहेत.  विकासासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन दिले. यावेळी ग्रामस्थ, युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

Labels:

डॉ. सुभाष राठोड यांची प्राचार्यपदी नियुक्तीबद्दल सन्मान

डॉ. सुभाष राठोड यांची प्राचार्यपदी नियुक्तीबद्दल सन्मान

नळदुर्ग,दि.२८  

 येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. सुभाष राठोड यांचे विद्यापीठ प्रशासनाकडून अधिकृत नियुक्ती केल्याने तुळजापूर तालुका बंजारा समाज व मित्रपरिवाराकडून  राठोड यांचा सन्मान करण्यात आला .


यावेळी तुळजापूर तालुका बंजारा समाजाच्यावतीने  पंचायत समितीचे माजी सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण , माजी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक हरीश जाधव ,  संजय राठोड , रामतीर्थ ग्रामपंचायत सरपंच लक्ष्मण राठोड,  उपसरपंच तारू पवार , आलियाबाद ग्रामपंचायतचे उपसरपंच अमृता चव्हाण , माजी उपसरपंच सूर्यकांत राठोड ,   एम पी राठोड , प्रा. दीपक जगदाळे ,  महाविद्यालयाचे अधीक्षक प्रा. धनंजय पाटील,कर्मचारी माणिक राठोडसह मित्र परिवारांनी डॉ सुभाष राठोड यांचा सन्मान करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या .

Labels:

Saturday, 27 July 2024

गोरगरीब गरजू माणसाला नजरेत ठेऊन प्रशासकीय सेवा बजावली- हरिभाऊ बागडे

गोरगरीब गरजू माणसाला नजरेत ठेऊन प्रशासकीय सेवा बजावली-  हरिभाऊ बागडे                              O अतिरिक्त जिल्हाधिकारी राजकुमार सागर यांच्या सेवापूर्ती कार्य गौरव सोहळा                         

 मुरूम, दि.२७ प्रा.सुधीर पंचगल्ले : 

राजकुमार सागर यांच्या सोबतीने विधानसभा अध्यक्ष पदाच्या कार्यकाळात उत्तम प्रकारचे कार्य त्यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर लंडनमध्ये असताना ज्या खोलीत राहुन शिकले. ती जागा ज्या व्यक्तीच्या मालकीची होती. त्याने ती जागा जेंव्हा विकायची ठरवली. त्यावेळी लंडनमध्ये राहणाऱ्या भारतीयांनी ती  संपूर्ण इमारत महाराष्ट्राने विकत घ्यावी, असे सांगितले. परंतु राज्य सरकारला इतर देशातील जागा विकत घेणे नियमबाह्य असल्याने भारत सरकारने ती जागा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकत घेऊन भारतीयांच प्रेरणास्थान या हेतूने ते सर्वांना पाहण्यासाठी खुले ठेवले. लंडनमधील त्या प्रेरणास्थानी मी, सागर व काही सहकारी जावून भेट दिली होती. सागर हे गोरगरीब गरजू माणसाला नजरेत ठेऊन प्रशासकीय सेवा बजावल्याचे प्रतिपादन विधानसभेचे माजी सभापती हरिभाऊ बागडे यांनी केले.


 मुरूम येथील श्रीराम मंगल कार्यालयात अतिरिक्त जिल्हाधिकारी राजकुमार सागर यांच्या सेवानिवृत्तीबद्ल त्यांच्या मित्र परिवाराकडून आयोजित त्यांच्या कार्यगौरव सोहळ्यात शनिवारी (ता. २७) रोजी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री बसवराज पाटील होते. प्रमुख अतिथी विधानसभेचे माजी सभापती हरिभाऊ बागडे, उमरगा-लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, माजी मंत्री अनिस अहमद, माजी मंत्री डॉ. दशरथ भांडे, बिदरचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गिरीश बदोले, सिद्धार्थ भालेराव, दामूअण्णा, सागर यांच्या सौभाग्यवती वंदाराणी सागर, पिताश्री मंगेश व मातोश्री कस्तुरबाई सागर, पदमाकर कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

अध्यक्षीय समारोप प्रसंगी बसवराज पाटील म्हणाले की, माधवराव पाटील यांनी काढलेल्या शाळेचे राजकुमार सागर हे विद्यार्थी आहेत. याचा मला अभिमान वाटतो. मुरुमच्या मातीतून असे हिरे घडले याचा मुरुमकर म्हणून आनंद होतो आहे. मुळात मुरूमच्या मातीचा हा गुणधर्मच आहे. राज्यात असे विविध क्षेत्रांमध्ये नाविन्यपूर्ण अधिकारी काम करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 


सत्काराला उत्तर देताना राजकुमार सागर म्हणाले की, मी या सेवा गौरव समितीचा ऋणी आहे. ज्यांनी अतिशय सुंदर आयोजन केले. मी उपस्थितांच्या प्रेमाने भारावून गेलो आहे. पुढील काळात देखील सेवाभावीवृत्तीने समाजकार्य करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. दशरथ भांडे, मधुकरराव चव्हाण, ज्ञानराज चौगुले, गिरीश बदोले, अनिस अहमद, अजय देडे, मदन गायकवाड, अरविंद चौधरी, मंदार वैद्य, प्रा. किरण सगर, राजेश सुरवसे, राहूल गायकवाड आदींनी मनोगतपर भावना व्यक्त केल्या. शिवानंद बोळशेट्टे, प्रा. आण्णाराव कांबळे, किरण गायकवाड, प्रा. अभिजीत अंबर, शंभुलिंग पाटील, शिवराज पाटील, डॉ. विजयानंद बिराजदार आदींसह गौरव समितीने पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक मिणीयार यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुनिल धनगर तर आभार श्यामसुंदर सुरवसे यांनी मानले. शहर व परिसरातून बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.                                
 फोटो ओळ : मुरुम, ता. उमरगा येथील राजकुमार सागर यांच्या कार्यगौरव सत्काराप्रसंगी बसवराज पाटील, हरिभाऊ बागडे, ज्ञानराज चौगुले, मधुकर चव्हाण, अनिस अहमद दशरथ भांडे व अन्य.

Labels:

वागदरी येथे लाडकी बहिण योजनेसाठी दोनशे महिलांनी भरला अर्ज

वागदरी येथे लाडकी बहिण योजनेसाठी दोनशे महिलांनी भरला अर्ज 

वागदरी ,दि.२७ : एस.के.गायकवाड:

तुळजापूर तालुक्यातील मौजे वागदरी येथील जवळपास दोनशे महिलांनी मुख्यमंत्री  लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज दाखल केला असून गावातील एकही महिला लाभार्थी या योजनेपासून वंचित राहू नये म्हणून सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार कीशोर धुमाळ,एस.के.गायकवाड, कीशोर सुरवसे, अंगणवाडी कार्यकर्ती पद्मीनीबाई पवार, मदतनीस रूपाली जाधव, ग्रामसेवक एम.एम.तांबोळी,सरपंच तेजाबाई शिवाजी मीटकर, उपसरपंच सुरेखा भालचंद्र यादव, सर्व ग्रा.प.सदस्य जाणिव पुर्वक प्रयत्न करत आहेत.


  महिलांचा आत्मसन्मान वाढविण्यासाठी आणि महिला सबलीकरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला असून दर महिन्याला एक हजार पाचशे ( १५०० /- ₹) अनुदान देण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची सुरुवात केली.सध्या संबंध महाराष्ट्रभर या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ‌एकात्मिक महिला व बालविकास विभागा मार्फत अर्ज भरण्याची प्रक्रिया जोरदार पुणे सुरू आहे.प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधी ही योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी शर्ती चे प्रयत्न करताना दिसत आहेत.त्याचाच भाग म्हणून मौजे वागदरी येथे तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यामान आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत येथील ग्रामपंचायत व कार्यकर्ते कामाला लागले आहेत.येथील भाजपाचे बुथ प्रमुख तथा मिडीया‌ विभाग तालुका अध्यक्ष किशोर धुमाळ यांनी दोनशे अर्ज‌ मोफत‌ स्वखर्चाने उपलब्ध करून दिले आहेत तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे जिल्हा सचिव एस.के.गायकवाड, भाजपा चे शाखा प्रमुख किशोर सुरवसे, सरपंच उपसरपंच सर्व ग्रा.प.सदस्य अंगणवाडी कार्यकर्ती मदतनीस सर्व पक्षीय कार्यकर्ते लाडक्या बहिणीला अर्ज भरण्यासाठी सहकार्य  करीत आहेत.आता‌‌ पर्यंत र्आॅफ लाईन व आॅन लाईन मिळून गावातील जवळपास दोनशे‌ महिलांनी अर्ज भरून संबंधित अंगणवाडी कार्यकर्ती पद्मीनीबाई पवार यांच्या कडे दिला असून यातील पन्नास टक्के अर्ज आॉन लाईन झाल्याचे समजते.

Labels:

Friday, 26 July 2024

नळदुर्ग: प्राचार्यपदी डॉ. सुभाष राठोड यांची विद्यापीठ प्रशासनाकडून अधिकृत नियुक्ती

कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. सुभाष राठोड यांची विद्यापीठ प्रशासनाकडून अधिकृत नियुक्ती

नळदुर्ग, दि.२६: प्रा. दिपक जगदाळे

 शहरातील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. सुभाष राठोड यांची विद्यापीठ प्रशासनाकडून अधिकृत नियुक्ती झाल्यामुळे  त्यांचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करुन पुढील कार्यास शुभेच्या देण्यात आल्या. 

तत्कालीन प्राचार्य डॉ. संजय कोरेकर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर बालाघाट शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ. सुभाष राठोड यांची महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी नियुक्ती केली होती. या कालावधीत राठोड यांची काम करण्याची तळमळ पाहून संस्थेने विद्यापीठ प्रशासनाकडे कायम स्वरूपी प्राचार्याची नेमणूक करण्याचा प्रस्ताव पाठवून सदरील पदाची मुलाखत घेऊन कायमस्वरूपी प्राचार्याची नेमणूक करावी अशी मागणी केली होती. त्या अनुषंगाने विद्यापीठ प्रशासनाने  महाविद्यालयात प्राचार्य पदाच्या मुलाखतीस आलेल्या प्राचार्यांच्या मुलाखती घेतल्या व डॉ. सुभाष राठोड यांची नियुक्ती केली. 

आज कारगिल विजयी दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या वतीने सर्व कर्मचाऱ्यांच्या उपस्थित नूतन प्राचार्य डॉ. सुभाष राठोड यांचा कार्यालयीन अधिक्षक धनंजय पाटील , वनस्पती विभाग प्रमुख डॉ. विजय सावंत , नॅक समन्वयक डॉ. शिवाजी घोडके , प्रा. आशिष तिडके यांनी सत्कार केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पांडुरंग पोळे यांनी केले तर आभार डॉ. सचिन देवद्वारे यांनी मानले. 

Labels:

नळदुर्ग येथे पत्रकार संवाद यात्रेचे मान्यवरांच्या हस्ते पोस्टर प्रकाशन

नळदुर्ग येथे पत्रकार संवाद यात्रेचे मान्यवरांच्या हस्ते पोस्टर प्रकाशन 

नळदुर्ग,दि.२६

लोकशाहीच्या बळकटीसाठी, पत्रकारांच्या हक्कासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या वतीने या पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार संवाद यात्रा नागपूर (दीक्षाभूमी) ते मुंबई मंत्रालय पर्यंत दि. २८ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान होणार असून या संदर्भातील 'पोस्टर' चे प्रकाशन नळदुर्ग ता.तुळजापूर येथे बसस्थानकाच्या समोर  डॉ.बाबासाहेब आंबेडकर संविधान चौकात करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई तालुका शाखा तुळजापूरच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते तथा माजी जि.प.सदस्य गणेश सोनटक्के , पत्रकार राजेंद्र स्वामी यांच्या हस्ते तर सामाजिक कार्यकर्ते तथा डॉ आंबेडकर इंटर नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल नळदुर्गचे संस्थापक मारुती खारवे, संपादक शिवाजी नाईक, पञकार दादासाहेब बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न  झाला.

 प्रसिद्धी माध्यम अर्थात पत्रकारीता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे असं म्हटलं जातं. शासनाने जनहिताच्या कोट्यवधी रुपयांच्या जाहीर केलेल्या योजना व धोरणात्मक निर्णय जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम आपापल्या प्रसिद्धी माध्यमांतून पत्रकार प्रामाणिकपणे करतात. मात्र लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावणाऱ्या पत्रकारांच्या प्रश्नांकडे केंद्र आणि राज्य सरकार दुर्लक्षच करीत असल्याचे दिसून येते. पत्रकार हा देखील एक मतदार आहे. याचा विसर राजकीय नेत्यांना पडलेला दिसत आहे.याची जाणिव करुन देण्यासाठी पत्रकारांच्या विविध समस्या शासन दरबारी मांडण्यासाठी सदर पत्रकार संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले असून दि.२८ जुलै २०२४ पासुन नागपूर येथील दिक्षा भूमी पासुन या यात्रेची सुरुवात करण्यात येणार आहे. दि.८ आॉगस्ट २०२४ रोजी मुंबई मंत्रालय येथे सांगता होणार आहे .या निमित्ताने या पत्रकार संघाच्या तुळजापूर तालुका शाखेच्या वतीने नळदुर्ग येथे पोस्टर प्रकाशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
  प्रारंभी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर संविधान चौकाच्या नामफलकास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते पत्रकार संवाद यात्रेचे पोस्टर प्रकाशन करण्यात आले.

  यावेळी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष  अरुण लोखंडे, पत्रकार संघाचे मंत्रालयीन प्रतिनिधी अहमद शेख,संघाचे सुनील माळगे, संजय पीसे, शामकांत ‌नागीले, इरफान काझी, एस.के.गायकवाड, किशोर धुमाळ, अजिंक्य मस्के पत्रकार संजय रेनुके, भगवंत सुरवसे, सामाजिक कार्यकर्ते सतिश गंगणे, सहशिक्षक राम शेट्टी सह पत्रकार, कार्यकर्ते  उपस्थित होते.

Labels:

अतिरिक्त जिल्हाधिकारी राजकुमार सागर यांच्या सेवापूर्ती कार्यगौरव सोहळ्याचे आयोजन

अतिरिक्त जिल्हाधिकारी राजकुमार सागर यांच्या सेवापूर्ती कार्यगौरव सोहळ्याचे खास आयोजन                             

 मुरूम, ता. उमरगा, दि. २६ : 

अतिरिक्त जिल्हाधिकारी राजकुमार सागर हे मुरुमचे रहिवाशी असून त्यांच्या सेवानिवृत्तीबद्ल त्यांच्या मित्र परिवाराकडून त्यांच्या कार्यगौरव सोहळ्याचे खास आयोजन शनिवारी (ता. २७) रोजी सकाळी अकरा वाजता करण्यात आला आहे. 


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री बसवराज पाटील हे उपस्थित  राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून विधानसभेचे माजी सभापती हरिभाऊ बागडे, धाराशिवचे  खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, उमरगा-लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, माजी मंत्री अनिस अहमद, माजी मंत्री डॉ. दशरथ भांडे, बिदरचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गिरीश बदोले आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

 हा सोहळा मुरुम येथील अक्कलकोट रोड लगत असणाऱ्या श्रीराम मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आल्याचे कार्य गौरव समितीच्या वतीने परिसरातील बंधू-भगिनींनी या सोहळ्याकरिता उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Labels:

Thursday, 25 July 2024

नळदुर्ग परीसरात डुकरांचा हौदोस ; आर्धा एकर ऊसाचा फडशा पाडल्याने शेतकऱ्याचे नुकसान

नळदुर्ग शहर व परीसरात डुकरांचा हौदोस ; आर्धा एक्कर ऊसाचा फडशा पाडून शेतकऱ्याचे केले मोठे नुकसान                   

नळदुर्ग,दि.२५ : सुधीर पोतदार

डूकराच्या कळपाने शेतातील ऊभ्या ऊसाचे जवळपास अर्धा एकर पिक भुईसपाट केल्याने शेतक-याचे मोठे नुकसान होऊन आर्थिक फटका बसला आहे. ही घटना नळदुर्ग ते जकणी तांडा रस्त्यालगत शेतात घडल्याचे उघडकीस आले आहे.


नळदुर्ग शहरात वराह पालकांनी मोठ्या संखेने डुकरे आणुन सोडली आहेत. शहरातील गल्लो गल्ली डुकराच्या फलटणी मुक्तसंचाराने अनेक नागरिक ञस्त झाले आहेत.त्यातच डुकरांची उत्पतीही झपाट्याने वाढत आसल्याने हे शहर व परीसरातील शेतात घुसुन  पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करीत आहेत. 


शहरातील जकणीतांडा रोड जवळ  सिध्दु मानशेट्टी यांचे  शेत असुन त्यांनी गेल्यावर्षी शेतात दिड एक्कर 86032 या ऊसाची लावन केली.  जिवापाड मेहनत करुन लाखो रुपये खर्च करुन ऊसाची ते दिवसराञ जोपासना करीत आहे. सध्या ऊस बारा ते पंधरा कांड्यावर गेला आसताना सतत तिन दिवस चालु असलेल्या पावसात डुकरांनी चक्क आर्धा एकर ऊस तोडून ऊसाचा फडशा पाडला.  या आगंतुक डुकरांच्या टोळीने उसाचे एवढे मोठे नुकसान केल्याने शेतकरी मानशेट्टी यांचे आर्थिक नुकसान तर झालेच आहे. परंतु मोठा धक्काही त्यांना बसला आहे.त्यांना महसुल व कृषी विभागाने शेतातील  झालेल्या नुकसानीचा पंचनामा करुन त्वरीत नुकसान भरपाई द्यावी तसेच वराह पालन करण्या-यावर  कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांतुन होत आहे.

Labels: