Sunday, 30 September 2012

स्‍त्रीभ्रुण हत्‍या बाबत जनजागृती आवश्‍यक – प्राचार्या मुदकण्‍णा


अणदूर :-  स्‍त्रीभ्रुण हत्‍या हा विषय अत्‍यंत महत्‍त्‍वाचा असून याविषयी समाजात जनजागरण करण्‍याचे विधायक कार्य सार्वजनिक गणेश मंडळाने केले असून हे कार्य कौतुकास्‍पद आहे. सध्‍या मुलींचे घटते प्रमाण लक्षात घेऊन यावर समाजातील सर्वच घटकानी विशेष प्रयत्‍न करणे गरजेचे असल्‍याचे प्रतिपादन जवाहर महाविद्यालयाच्‍या प्राचार्या सौ. अनिता मुदकण्‍णा यानी केले. 
                               अणदूर ता. तुळजापूर येथील सार्वजनिक गणेश मंडळाच्‍यावतीने गणेशोत्‍सवानिमित्‍त स्‍त्रीभ्रूण  जनजागृती अभियान राबविण्‍यात आले. आयोजित स्‍त्रीभ्रुण जनजागरण रॅलीमध्‍ये पाचशे विद्यार्थिनी व महिलांचा समावेश होता. ही रॅली सकाळी जवाहर महाविद्यालयापासून मारूती मंदिर मार्गे काढून अण्‍णा चौकात समारोप करण्‍यात आला. यावेळी प्राचार्य मुदकण्‍णा बोलत होत्‍या. या रॅलीचे नेतृत्‍व राष्‍़ट्र सेवा दलाच्‍या रूपाली माने, सेवा दलाचे उस्‍मानाबाद जिल्‍हाध्‍यक्ष बळीराम जेठे यानी केले. या कार्यक्रमास जळकोट ता. तुळजापूर येथील अंबव्‍वा महिला मंडळाच्‍या कस्‍तुरा कारभारी, आपलं घरचे व्‍यवस्‍थापक शिवाजी पोतदार, सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्‍यक्ष पप्‍पू धमुरे, प्रशांत पोतदार, अमोल सालगे, राचप्‍पा जिडगे, दयानंद मुडके यांच्‍यासह परिसरातील शाळेचे विद्यार्थी, युवक कार्यकर्ते नागरीक उपस्थित होते.

Labels:

आंबेडकर कृती समितीच्‍यावतीने जिल्‍हाधिकारी कार्यालयावर भव्‍य मोर्चा


तुळजापूर :-  उस्‍मानाबाद जिल्‍हाधिकारी कार्यालयावर सोमवार दि. 1 ऑक्‍टोबर रोजी महामोर्चा काढण्‍यात येणार असल्‍याचे रिपाइं तुळजापूर तालुकाध्‍यक्ष एस.के. गायकवाड यानी सांगून आंबेडकरप्रेमी नागरिकांनी या मोर्चात सहभागी होण्‍याचे आवाहन केले आहे.  आंबेडकरी चळवळीतील पक्ष, संघटना यांनी एकत्रित येऊन स्थापन केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन कृति समितीच्या वतीने या मोर्चाचे आयोजन केले आहे.
            या मोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्‍ह्यात सर्वत्र बैठका घेण्यात येत असून आंबेडकर चळवळीत सक्रीय असलेल्‍या कार्यकर्त्‍यांनी व संघटनानी पक्षाच्‍या नेत्‍यांनी एकत्रित येवून समाज व धर्म कार्यासाठी आवाज उठविण्‍याचे गरज आहे. चळवळीतील गवई गटाचे राज्य सरचिटणीस यशपाल सरवदे, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओव्हाळ, डी. एस. ग्रुपचे संस्थापक धनंजय शिंगाडे, बसपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघमारे, भारिप-बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष मिलींद रोकडे यांच्यासह विकास बनसोडे, नगरसेवक माणिक बनसोडे, दादासाहेब जेटीथोर, बहुजन एकता विकास परिषदेचे प्रशांत बनसोडे, आदींनी एकत्रित येत, डॉ. आंबेडकर विचार संवर्धन कृती समिती स्थापन केली. या समितीने उस्मानाबादसह तालुका ठिकाणी जाऊन तालुका कृती समितीची स्थापना केल्याने जिल्हाभरात वातावरण निर्मिती झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर सोमवारी दुपारी १ वाजता उस्मानाबादमधील क्रांती चौकातून हा महामोर्चा निघत आहे. इंदूमिलच्या साडेबारा एकर जागेवर आंतरराष्ट्रीय स्मारक उभे रहावे व या कामाचे भूमिपूजन धम्मचक्र प्रवर्तन दिनी करावे, अशी प्रमुख मागणी असून, या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.  

Labels:

नळदुर्गात अकरा तास मिरवणुकीने गणरायाचे विसर्जन



नळदुर्ग  :-    गुलालाची मुक्त उधळण, ढोल ताशाच्या गजरात, गणपती बाप्पा मोरयाऽऽ पुढच्या वर्षी लवकर याऽऽ च्या जयघोषात नळदुर्ग येथे तब्बल अकरा तास ‘श्री’ च्या मिरवणुकीने विसर्जन करण्यात आले.
                  शहरातील विविध गणेश मंडळानी शनिवार रोजी सकाळपासूनच लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी टॅक्टर सजविण्यास सुरुवात केली होती. दुपारी तीन वाजता शहराच्या विविध भागातून मिरवणुकीस प्रारंभ झाले. ही मिरवणूक ऐतिहासिक किल्ला गेट येथे सायंकाळी पाच वाजता आली. त्यानंतर क्रांती चौक, चावडी चौक मार्गे धर्मवीर चौकातून बोरी घाटावर गणरायाचे विसर्जन उत्साहाने करण्यात आले. मिरवणुकीमध्ये शिवशाही तरुण गणेश मंडळ, जय हनुमान तरुण गणेश मंडळ, जय भवानी गणेश मंडळ, न्यू चैतन्य गणेश मंडळ, नवचैतन्य गणेश मंडळ, धर्मवीर गणेश मंडळ, भोईराज गणेश मंडळ, जवाहर गणेश मंडळ, इंदिरानगर गणेश मंडळ, भवानी नगर गणेश मंडळ, जयहिंद गणेश मंडळ या मुख्य गणेश मंडळासह इतर गणेशमंडळानी गणपतीची आकर्षक सजावट करुन टॅक्टरवर विद्युत रोषणाई केली होती. अनेक मंडळाने लेझीम संघ, भजनी मंडळ, नृत्य भारदारपणे सादर केले. तर काही मंडळाच्या पुढे पथनाट्य सादर करण्यात आले. तर काही मंडळाने देखावा सादर केला होता. चावडी चौकात शहर युवक कॉंग्रेसच्यावतीने श्री तुळजाभवानी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन सुनील चव्हाण यांच्या हस्ते तर दृष्टी उद्योग समूहाचे मुख्य प्रवर्तक अशोक जगदाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व गणेश मंडळास सन्मानपत्र वाटप करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष नितीन कासार, उपनगराध्यक्ष शहबाज काझी, नायब तहसिलदार तथा नगरपालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी राजेश जाधव, नगरसेवक कमलाकर चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी शर्मिष्ठा घारगे वालवलकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शेटकर, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश गायकवाड, मुबारक शेख यांच्यासह अनेक प्रतिष्ठित नागरीक, मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
                 मिरवणुकीमध्ये नगरपालिकेच्यावतीने पिण्याचे पाणी पुरवठा करण्यात आले. त्याचबरोबर ‘श्री’ च्याविसर्जन बोरी घाटाचे नगरपालिकेच्यावतीने स्वच्छता करण्यात आली होती. दुपारी तीन वाजता सुरु झालेली मिरवणुक रात्री दीड वाजेपर्यंत सुरु होती. पहिल्यांदा माऊलीनगर गणेश मंडळाच्या गणपतीचे विसर्जन झाले. त्यानंतर शिवशाही गणेश मंडळाच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले. सातव्या दिवशी व्यापारी गणेश मंडळ, पोलीस ठाणे गणेश मंडळाचे तर नवव्या दिवशी महाराणा गणेश मंडळाचे त्याचबरोबर दहाव्या दिवशी अंजनी प्रशालेच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आलेे. मिरवणुक शांततेत पार पडली. अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


Labels:

दलित वस्‍तीत मृतदेह दफन करण्‍यास विरोध


नळदुर्ग :-  येथील भीमनगर लगत असलेल्या दलित वस्तीमध्ये बेवारस मृतदेह दफन गेल्या अनेक वर्षापासून दफन करण्यात येत आहे. ते बंद करून इतरत्र ठिकाणी मृतदेह दफन करावे, अशी मागणी सम्राट बहु उद्देशीय सेवाभावी संस्थेच्यावतीने पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
            नळदुर्ग येथील दलित वस्तीत अनेक वर्षापासून बेवारस मृतदेह दफन केले जात असून त्याना जागेच्या केवळ २० ते २५ फुटावर चौरस बाजू एक महिलांसाठी शौचालय असून त्याच्या पूर्वेला मशीद असून पश्चिमेला कब्रस्तान आहेत. यासाठी दलित वस्तीतील महिला शौचालय बांधकाम होणार असून ते शौचास जाणा-या महिलामध्ये भय निर्माण झाले आहे. शहरापासून एक किमी अंतरावर बेवारस मृतदेह दफन करण्याकस यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या अर्जावर सम्राट ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सुर्यकांत चंद्रकांत सुरवसे, दादासाहेब बनसोडे, संतोष लोखंडे, अमोल सोनकांबळे, आकाश गायकवाड, सचिन कांबळे, अभिजीत कांबळे, सुभाष रणे आदींच्या सह्या आहेत. 
          नळदुर्ग शहरातील भिमनगरमध्ये १९३६ सालापासून असलेली आड (विहीर) असून विहीरीतील पाणी स्वच्छ आहे. पावसाने हुलकावणी दिल्याने सर्वत्र पाणीटंचाई जाणवत आहे. त्याचबरोबर नळदुर्गच्या बोरीधरणात पाण्याच्या मृतसाठा असून भविष्यात पाणी टंचाई जाणवणार असल्याने नगरपालिकेने या विहीरीच्या परिसराची स्वच्छता करुन येथील पाणी उपयोगात आणता येते. तरी याप्रकरणी विहीरीचा परिसर स्वच्छ करुन घ्यावे, अशी मागणी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी याना सम्राट ग्रुपचे मुख्य प्रवर्तक सुर्यकांत सुरवसे, पत्रकार दादासाहेब बनसोडे यांनी केली आहे.


Labels:

महाराणा मंडळाने राबवले स्‍तुत्‍य उपक्रम : उपनगराध्यक्ष काझी


नळदुर्ग :-  येथील महाराणा प्रताप गणेश मंडळाने गणेशोत्सवात अनावश्यक खर्चाला फाटा देवून विविध उपक्रम राबवून एक आदर्श निर्माण केला, असे प्रतिपादन उपनगराध्यक्ष शहबाज काझी यानी केले.
                शहरातील महाराणा चौकात महाराणा प्रताप गणेश मंडळाने गणेशोत्सवात शालेय विद्यार्थ्यांसाठी, महिलांसाठी विविध घेतलेल्या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शहबाज काझी हे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष नितीन कासार, व्यासपीठावर पत्रकार शिवाजी नाईक, माजी नगरसेवक अनिल हजारे, शहर कॉंग्रेस दलाचे अध्यक्ष विनायक अहंकारी, शहर युवक कॉंग्रेस अध्यक्ष बसवराज धरणे, शिवसेनेचे तालुकाउपप्रमुख सरदारसिंग ठाकूर, माजी नगरसेवक सुधीर हजारे, अर्चना डुकरे, नगरसेवक सचिन डुकरे आदीजण उपस्थि होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व प्रमुख अतिथीचे सत्कार मंडळाचे अध्यक्ष अजितसिंह हजारी, उपाध्यक्ष बालसिंह चौहान, इंद्रजित ठाकूर, सागर हजारी, अनिकेत बिसेनी, जगदीश गहेरवार, मंगेश चंदेले, अनिल दिक्षीत, सुजित हजारी, मनीष हजारी, अजय चंदेले, सुनिल हजारी आदीजणानी केले.
                    यावेळी महिला व विविध स्पर्धेतील विजेत्या शालेय विद्यार्थ्यांना कप, मेडल व शैक्षणिक साहित्य असा पारितोषिक देवून गौरविण्यात आला. यावेळी विनायक अहंकारी यानी मंडळाने विविध सामाजिक उपक्रम राबविल्याबद्दल कौतुक करुन अभिनंदन केले. त्यानंतर विजेता स्पर्धक आकाश कांबळे याने थोडक्यात आपले मनोगत व्यक्त केले.

Labels:

Friday, 28 September 2012

गांजा तस्‍करास सात दिवसाची पोलीस कोठडी

नळदुर्ग :-  अपघातग्रस्त कारमध्‍ये नळदुर्ग येथे आढळलेल्या गांजाप्रकरणी एका आरोपीस पोलिसानी अटक करुन शुक्रवार रोजी उस्मानाबाद जिल्हा सत्र न्यायालयात उभे केले असता त्यास सात दिवसाची म्हणजे दि. ५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश महाजन कोर्टाने दिल्याचे पोलिसानी सांगितले.
      एम. मल्लेश गंगाराम रेड्डी (वय ३३ वर्ष, रा. निजामाबाद, हल्ली मुक्काम हैद्राबाद) असे पोलिस कोठडी मिळालेल्या आरोपीचे नाव आहे. दि. १८ सप्‍टेंबर रोजी नळदुर्गहून तुळजापूरकडे भरधाव वेगाने फियाट कार क्रमांक एपी १६ पी ३४९९ ही जात असताना सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास श्री तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखान्यासमोर झुंबर नागनाथ गायकवाड यास जोरदार धडक देवून कार रस्त्याच्या कडेला जावून अपघात झाला होता. त्यात गायकवाड हे गंभीर जखमी झाले होते. अपघातानंतर चालकासह अन्य एकजण कार जागीच सोडून पळून गेले होते. या कारमध्ये १५० किलो गांजा आढळून आला होता. पोलीसानी पंचनामा करुन  कारसह सुमारे ३ लाख ५० हजाराचा मुद्देमाल पोलिसानी जप्त केला होता. याप्रकरणी पोलिसानी तपास करुन अवघ्या दहा दिवसात आरोपी मल्लेश रेड्डी यास गुरुवार रोजी रात्री पाऊणे नऊ वाजता हैदराबाद येथे अटक करुन आज शुक्रवार रोजी उस्मानाबाद जिल्हा सत्र न्यायालयात उभे केले असता दि. ५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी शर्मिष्ठा घारगे-वालवलकर हे अधिक तपास करीत आहेत.

Labels:

आजारास कंटाळून शेतक-याची आत्‍महत्‍या

नळदुर्ग :-  दीर्घ आजारास कंटाळून एका शेतकर्‍याने शेतातील गोठ्यात दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आरळी खुर्द (ता. तुळजापूर) शिवारात शुक्रवार दि. २८ सप्टेंबर रोजी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.
                        रेवण विश्वनाथ शिलवंत (वय ६७ वर्ष, रा. आरळी खुर्द, ता. तुळजापूर) असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे. याप्रकरणी पंडित शंकर शिलवंत (वय ४३ वर्ष, धंदा शेती रा. आरळी खुर्द, ता. तुळजापूर) यानी नळदुर्ग पोलिसात खबर दिली. त्याचा चुलत चुलता रेवण यास मुतखड्याचा आजार होता. त्यास कंटाळून शेतातील गोठ्यात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. या घटनेची पोलिसात आकस्मात मृत्यू म्हणून या घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास इटकळ दूरक्षेत्र पोलीस चौकीचे हवालदार अशोक गिरी हे करीत आहेत.

Labels:

देवसिंगा नळ ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार


नळदुर्ग :-  देवसिंगा (नळ) ता. तुळजापूर येथील ग्रामपंचायतीस गेल्या चार वर्षात विविध योजनांतर्गतमिळालेल्यालक्षावधी रुपयाचा निधीत गैरप्रकार झाल्याने विकास कामांचा बट्‌ट्याबोळ झाले असून या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरुन चौकशी करुन संबंधितावरकडककारवाई करण्याची मागणी माजी पं.स. सदस्य विष्णु शामराव घोडके यासह ग्रामस्थांनी जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मौजे देवसिंगा नळ (ता. तुळजापूर) येथील सरपंच व ग्रामसेवक यांनी संगनमत करुन सन २००८ ते २०१२ या कालावधीत ग्रामपंचायतीस आलेला निधी उचलून एकही काम केले नसल्याचा आरोप करुन म्हटले आहे की, वरील कालावधीत सुमारे दहा ते अकरा लाख रुपये निधी उचलल्याचे सांगितले आहे. सदरील विविध कामाचे पैसे उचलून सर्व काम अर्धवट आज रोजी आहेत. गावातील अर्धवट कामे पूर्ण करावे या मागणीचे तुळजापूर पंचायत समिती गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, सरपंचासह संबंधितांना तोंडी व लेखी तक्रार देवूनही याकडे जाणीवपूर्वक दूर्लक्ष करण्यात आले आहे.
देवसिंगा ग्रामपंचायत अंतर्गत तांड्यावरील अंगणवाडीचे बांधकाम अर्धवट, दलित वस्ती, समाज मंदीराचे बांधकाम अर्धवट आहेत. त्याचबरोबर मागील सर्व अर्धवट कामे पूर्ण केल्याशिवाय यापुढे ग्रामपंचायतीला निधी वाटप करु नये, असे सांगून पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण यांनी वीस दिवसापूर्वी तुळजापूर तालुका दौर्‍यावर असताना दि. ९ सप्टेंबर रोजी देवसिंगा नळ गावास भेट देवून पाहणी केली. यावेळी संबंधित कामे पूर्ण करुन ग्रामस्थांना न्याय देण्याचे लेखी निवेदन दिल्याने त्यानी तात्काळ संबंधित अधिकार्‍यांना आदेश दिले. मात्र तरीही वीस दिवसाचा कालावधी उलटला, अद्यापपर्यंत काहीच हालचाल झाली नाही. संबंधित कामाचा निधी गैरप्रकार थांबवून अर्धवट कामे तात्काळ सुरु करुन मार्गी लावावी व दोषीवर कडक कारवाई अशीही मागणी करण्यात आली आहे. याची एक प्रत पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण, जिल्हाधिकारी उस्मानाबाद, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, तुळजापूर तहसिलदार, तुळजापूर पंचायत समिती गटविकास अधिकारी आदीना देण्यात आले आहे.

Labels:

पिंपळा शिवारात मृतदेह आढळलेल्या महिलेचा खून झाल्याचे स्पष्ट

तुळजापूर :-  तीन दिवसांपूर्वी ३५ वर्षीय अनोळखी महिलेचा पिंपळा (बु) शिवारात मातीनाल्याच्या बांधाखाली असलेल्या झुडप्यामध्ये मृतदेह आढळून आले होते. याप्रकरणी वैद्यकीय अधिका-याच्या शवविच्छेदन अहवालावरून सदरील महिलेच्या तोंडावर व हातावर मोठयाप्रमाणावर जखमा आढळून आल्या व घटनास्थळी रक्तस्त्राव मोठयाप्रमाणावर झाले असून या बाबीवरून त्या महिलेचा खून झाल्याचे स्पष्ट झाल्याने याप्रकरणी तामलवाडी पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक भरत राठोड यांच्या फिर्यादीवरून अज्ञात मारेक-याविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    तुळजापूर तालुक्यातील धोत्री, पिंपळा, देवकुरुळी या गावच्या शिवारात वनविभाग व गायरानाचे क्षेत्र आहे. पिंपळा (बु) हद्दीतील गायरान जमिनीमध्ये ३५ वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह आढळल्याची माहिती गुराख्यांनी पोलिस पाटील धैयश्रील राजेपांढरे  यांना दिली. त्यावरून बुधवारी पोलिस पाटील यांनी घटनास्थळी जावून खात्री करून पोलिसांना माहिती कळविली. या घटनेची पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.  तुळजापूर उपविभागीय पोलिस अधिकारी शर्मिष्ठा घाडगे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय कुलकर्णी यांनी पंचासह घटनास्थळी भेट दिली. यावेळी सदरील महिलेच्या प्रेताचा बीट अंमलदार प्रभाकर कुलकर्णी, सुनिल यादव यांनी पंचनामा करुन काटगाव प्रा.आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांनी घटनास्थळीच प्रेताचे शवविच्छेदन केले.
मयत महिलेच्या अंगावर काळपट गुलाबी रंगाचे ठिपके असलेला ब्लाऊज, हातात काचेच्या बांगड्या, पायामध्ये पैंजण आहे. सदरील महिलेचे प्रेत पूर्णत: कुजलेल्या अवस्थेमध्ये दिसून आले. पाच दिवसापूर्वी तिचा मृत्यू झाला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. महिलेच्या तोंडावर व हातावर मोठय़ा जखमा होत्या तर प्रेताशेजारी मोठय़ा प्रमाणावर रक्तस्त्राव झालेला दिसत होता. शवविच्छेदनाच्या वैद्यकीय अहवालावरून सदर महिलेचा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप जाधव व प्रदिप साळूंके हे करीत आहेत.
दरम्यान, जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी पिंपळा बु शिवारातील घटनास्थळी भेट दिली. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी शर्मीष्ठा घाडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप जाधव,  पोलीस उपनिरीक्षक भरत राठोड यांच्यासह पोलिस कर्मचारी व सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ हजर होते.

Labels:

Thursday, 27 September 2012

जय हनुमान मंडळाने केला आदर्श निर्माण

नळदुर्ग :-   दहिटणा (ता. तुळजापूर) येथिल जय हनुमान तरुण गणेश मंडळाने यावर्षी ‘एक गाव एक गणपती’ या संकल्पनेनुसार गावात एकाच गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे. त्याचबरोबर पहिल्यांदाच गणेश मंडळाच्या पदाधिकार्‍यामध्ये सर्व जातीधर्माना समान संधी देवून अध्यक्षपदी मुस्लीम समाजास बिनविरोध प्रतिनिधीत्व देवून सर्व धर्म समभाव जोपासून इंथेही राष्ट्रीय एकात्मता असल्याचे गावकर्‍यानी गणेश उत्सवाच्या माध्यमातून दाखवून दिले आहे. यावर्षी मंडळाने विविध सामाजिक उपक्रम राबवून आगळ्यावेगळ्या त-हेने गणेशोत्सव साजरा केल्याने परिसरात मंडळाबद्दल कुतूहल निर्माण झाले असूनमंडळाचेअभिनंदन करण्यात येत आहे.या मंडळाचा आदर्श इतर मंडळानी घेण्यासारखाच आहे.
                   अध्यक्ष आसिफ हिरालाल शेख, उपाध्यक्ष नागेश इराण्‍णा पाटील, कार्याध्यक्ष गहिनीनाथ कदम, सचिव रोहित नागरसे, श्रीकांत पाटील, शंकर चव्हाण, सोमनाथ गुड्डे, सल्लागार सचिन पाटील, भीम कुंभार, विजय पाटील, मिरवणुक प्रमुख सरपंच बसवराज पाटील, उपसरपंच उमाकांत कदम, सदस्य माजी सरपंच सुर्यकांत पाटील, मच्छिंद्र माने, राजेंद्र माने, आप्पासाहेब पाटील, अविनाश पाटील, फैय्याज सावकार, संजयराव कदम, बलभीम कदम, शंतनु कदम, विवेक कदम, प्रकाश गुड्डे, विकास कदम, मारुती गुड्डे, राहुल पाटील, मोहन गुरव, अर्जून कुंभार, संतोष भोंडवे, अमोल कदम, दत्ता कुंभार, इरफान शेख, सदाम शेख, शरद कांबळे आदीजणअसून गणेशोत्सवाच्या कालावधीत दैनंदिन पूजाअर्चा गावातील सर्व धर्मीय ग्रामस्थ, महिला, बालचमू एकत्र येवून करीत आहेत. यापुढे स्त्री भ्रूण हत्या विरोधात समाजात जनजागृती करुन गावातील कायमची दारुबंदी युवकांच्या सहकार्याने करणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष आसिफ शेख यानी बोलताना सांगितले.
                         रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची, बादलीत चेंडू टाकणे, निबंध स्पर्धा, डान्स स्पर्धा, स्लो सायकल स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा आदी स्‍पर्धा घेण्‍यात आले. रचनात्मक संघर्ष समितीच्यावतीने ‘आजची युवा पिढी कशी असली पाहिजे’ या विषयावरती प्राचार्य राजेंद्र गायकवाड यानी मार्गदर्शन केले. लोकमंगल मल्ट्रीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन रोहन देशमुख, तुळजापूर पंचायत समिती सदस्य अर्जून कदम यांनी भेट दिली.


Labels:

मन आले ग भरून.....

मन आले ग भरून.....

भर चांदण्‍यात सखे
तुझ्या पैंजणाचा नाद
मैनेसाठीच हा राधु
झाडातून घाली साद

चांदण्‍याच्‍या मैफलीत
सखे विरहाने उभा
स्‍वागत सभा तुझ्या
चांदण्‍याची भरे सभा

रूप पाहण्‍यास तुझे
चंद्र आला ढगापुढे
परि अजु न येण्‍याचे
तुज लागे कसे वेड

डोळयात भिजलेली
तुझी वाट कोरून
रूप पाहुनिया सखे
मन आले ग भरून....
* भैरवनाथ कानडे,  चिकुंद्रा

Labels:

नवा शब्‍द कोश

* नवा शब्‍द कोश
विवाह  -  असमांतर रेषेने केलेला कोन
मृत्‍यू   -  चांदण्‍यातील पहिली रात्र
जीवन  -   रेल्‍वेगाडीचा एक प्रवास
प्रेम      -   करमणुकीचे एक साधन
पतीपत्‍नी - ट्रक व गाडी याची टक्‍कर
पदवी     -  जास्‍त हुंडा मिळविण्‍याचे एक साधन
संप      -  टाईमपासाचे आधुनिक साधन
दारू     -  लवकर मोक्ष मिळविण्‍याचे औषध
अपघात  -  लोकसंख्‍या कमी करण्‍याचे साधन
* मग असे करा
चालावे वाटत असेल तर सन्‍मार्गाने चाला
पळावे वाटत असेल तर दुर्जनापासून पळा
धरावे वाटत असेल तर चांगली संगत धरा
टाकावे वाटत असेल तर आळस टाका
बोलावे वाटत असेल तर खरे तेच बोला
गिळावे वाटत असेल तर राग गिळा
गावे वाटत असेल तर प्रभुगुण गा
भांडावे वाटत असेल तर सत्‍यासाठी भांडा
मरावे वाटत असेल तर देशासाठी मरा .....
* भैरवनाथ कानडे, चिकुंद्रा

Labels:

अश्रुचे पाणी.....

अश्रुचे पाणी.....

गगन भरारी इमारती
पावसाखाली न्‍हात होत्‍या
इमारतीच्‍या उग्र घाणीत
पायथ्‍याच्‍या झोपडया वाहत होत्‍या
पाहता नजर माझी गेली
झोपडीतील त्‍या बालकावर
नव्‍हते ज्‍याचे वस्‍त्र
एक सुध्‍दा शरीरावरते
बालक अस्‍वच्‍छ पाण्‍यात
कपडे करत होता स्‍वच्‍छ
त्‍याला वाटत तरी नसाव
आता होणार हे पुच्‍छगुच्‍छ
बालकाला विचारण्‍यास
वाहुन आले माझे स्‍पंदन
प्रश्‍नाअंती उलट आले
उदया आहे झंडावंदन
वाटलं मला मित्र हो
त्‍याला  नाही गणवेश
हाच का हो माझा तो
सोन्‍याचा हा भारत देश
अंतःकरणात बालकाच्‍या
दुःख किती ये पिचलेलं
डोळ्यात ही अश्रू तुडुंब होते साचलेले
अश्रु होते न दिसणारे
माथ्‍यावरील पाण्‍यासमवेत
वाहुन जात होते सारे.
* पत्रकार भैरवनाथ कानडे, चिकुंद्रा

Labels:

पंखावलेल्‍या पाखरा....

पंखावलेल्‍या पाखरा....

अरे! पंखावलेल्‍या पाखरा
‍विश्‍व व्‍यापी पोकळीत
दिनदुबळ्यांचा तू आसरा
विषमतेच्‍या पाठीवर
समानतेची मार लाथ
आता तरी थांबव
गरीबांचा घात
उसळ तुझं
सळसळनार रक्‍त
आठवं बलीदानी देशभक्‍त
देशाच्‍या संस्‍कृतीच
आता तरी ठेव भान
भुकेलेल्‍या पिलासाठी
फुलू देत माळ रान
पंखावलेल्‍या पाखरा
सोन्‍याची रे तूच खान
देशाचा तू मान
अखंड विश्‍व मंचावर
ठेव निरंज्‍़याचीच शान
* पत्रकार भैरवनाथ कानडे, चिकुंद्रा
    

Labels:

Wednesday, 26 September 2012

वृक्षवेलीने वेढलेला असाही मनोरा

तुळजापूर  :-  सराटी (ता. तुळजापूर) येथील ग्रामपंचायतीचे भारत संचार निगम लिमिटेडचे तरंग फोनचे मनोरा असे वृक्षलीने वेढलेले आहे. गेल्‍या पाच ते सहा वर्षापासून बीएसएनएलचा हा मनोरा वेलीने वेढलेला आहे. दरवर्षी ग्रामपंचायतीने शक्‍य होईल तेवढे वेल ओरबडून काढतात. मात्र मनोरा उंच असल्‍याने अधिक उंचीवरील वेल काढता येत नाही. पावसाळ्यात पुन्‍हा वेल वरून खाली झपाट्याने येत असल्‍याचे ग्रामस्‍थांचे म्‍हणणे आहे. छायाचित्र श्री व्‍यंकटेश्वर यांनी टिपले आहे.

Labels:

आदर्श पुरस्‍काराबद्दल पुजारींचा सत्‍कार

नळदुर्ग :- येथील आपलं घर प्रकल्पातील धरित्री विद्यालयाचे शिक्षक सुनील पुजारी यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा व्यवस्थापक शिवाजी पोतदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक सुरेश कांबळे व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.
पुजारी याना सोलापूर जिल्हा वृत्तपत्र लेखक मंचच्यावतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आल्याचे म्हटले आहे.

Labels:

चिवरी शिवारात पीक पंचनामा

नळदुर्ग :- पीक अनेवारी नजर अंदाजे अंतर्गत तुळजापूर तालुक्यात पीक पंचनामा करण्यात येत असून चिवरी (ता. तुळजापूर) येथील शिवारात सोयाबीन व इतर पिकाचे पीक पंचनामा करण्यात आला. यावेळीत हसिलदार व्ही .एल. कोळी, नायब तहसिलदार राजेश जाधव, तालुका कृषी अधिकारी डी.आर. जाधव, तुळजापूर कृषी मंडळाधिकारी विनायक पाटील, अणदूरचे कृषी मंडळ अधिकारी एच.एस. गायकवाड, मंडळ निरीक्षक एम.एम. पवार, तलाठी शेख, सरपंच, उपसरपंच, महिला सदस्यासह शेतकरी व ग्रामपैसेवारीचे सदस्य उपस्थित होते.

Labels:

Tuesday, 25 September 2012

‘धमाल से हुआ कमाल’ चित्रपट दिपावलीच्‍या शुभमुहुर्तावर नळदुर्गात प्रदर्शित होणार

नळदुर्ग :- ‘धमाल से हुआ कमाल’ या विनोदी चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण नळदुर्ग व परिसरात झाले असून दिपावलीच्‍या शुभ मुहुर्तावर हा चित्रपट प्रदर्शित करणार असल्‍याचे पत्रकार परिषदेत सांगण्‍यात आले. हा चित्रपट छोट्या पडद्यावरील दोन तासाचे टेलिफिल्‍म आहे. या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण सहा दिवस व तीन रात्रात पूर्ण करण्‍यात आले असून वसंतनगर, काझी गल्‍ली, मुर्टा पाटी, गवळी गल्‍ली, मुलतान गल्‍ली, गणेश विसर्जन घाट, अक्‍कलकोट रोड, मुख्‍य बाजार पेठ यासह विविध ठिकाणी चित्रीकरण करण्‍यात आले आहे. ‘उसने दिल मेरे कदमोमे रख दिया’ या आयटम सॉंगवर अभिनेत्री चंद्रशिला बनसोडे हिने दिल खेचक अदाकारी केल्‍याने मोठी धमाल झाली आहे. त्‍याचबरोबर ‘चंपा तेरी याद हमे दिन रात सताये’ या गाण्‍यावर अबरार काझी, एस कदम, गौस शेख, आझीम काझी, विठ्ठल ठाकूर यांचे धमाल नृत्‍य आहे. या चित्रपटाचे दिग्‍दर्शक अनिकेत शिंदे (पुणे), प्रवीण वाघमारे, निर्माता फैसल रजवी, अहमद इनामदार, कथा व संवाद असीफ काझी, क्रियेटीव्‍ह डायरेक्‍टर सिकंदर काझी, प्रोडेक्‍शन मॅनेजर मंहमद इनामदार यानी परिश्रम घेऊन स्‍थानिक व परिसरातील कलाकारांना सोबत‍ घेऊन चित्रीकरण पूर्ण केल्‍याचे फैसल रजवी यानी सांगितले. कलाकाराच्‍या प्रमुख भूमिकेत अबरार काझी, एस कदम, गौस शेख, आझीम काझी, विठ्ठल ठाकूर, ज्‍योतीबा येडगे, मुक्‍ताबाई कापसे, राधा चौधरी, आनंद बिराजदार, मयुर भूमकर, विनायक भूमकर, आनंदा पांचाळ, इम्रान शेख, नसिर काझी, प्रतिमा म्‍हानुरे, रमेश अंधारे यांच्‍यासह इतर सहकलाकारांचा या चित्रपटात समावेश आहे. या चित्रपटाचे दिग्‍दर्शक अनिकेत शिंदे यानी आतापर्यंत जीव गुंतला, सिनेमा, रक्षक या प्रमुख चित्रपटाबरोबर अनेक चित्रपटांचे चित्रीकरण केलेले आहे.

Labels:

Monday, 24 September 2012

मायक्रोसॉफ्टचा विंडोज-८ गिनिज बुकात

बंगळूर :- सॉफ्टवेअर निर्मिती क्षेत्रातील दिग्गज कंपनी असणा-या मायक्रासॉफ्टने आयोजित केलेल्‍या विंडोज-८ या अॅप्लिकेशन फेस्टिव्‍हलची नोंद चक्‍क गिनिज बुकात झाली आहे. सॉफ्टवेअर निर्मितीसाठी या अनोख्‍या महोत्‍सवाचे आयोजन करण्‍यात आले होते. त्‍यात २,५६७ सॉफ्टवेअर डेव्‍हलपर्स सहभागी झाले होत. या सर्व संशोधक मंडळींनी अठरा तासात क्षणभर देखील न थांबता कोडिंग मॅरेथॉना अनोखा थरार अनुभवला. नव्‍या कॉम्‍प्‍युटर अॅप्लिकेशनची निर्मिती, त्‍याचे डिझायनिंग आणि चाचणीला प्रोत्‍साहन देण्‍यासाठी या महोत्‍सवाचे आयोजन करण्‍यात आले होते. या सॉफ्टवेअर निर्मितीच्‍या मॅरेथॉनमध्‍ये एवढया मोठया संख्‍येने डेव्‍हलपर्स सहभागी होण्‍याची ही पहिलीच वेळ असल्‍याचे गिनीज वर्ल्‍ड रेकॉर्डचे उपाध्‍यक्ष पॉल ओ नील यांनी सांगितले. या अनोख्‍या विश्‍वविक्रमामुळे मायक्रोसॉफ्टच्‍या नावाला संगणकीय विश्वामध्‍ये एक वेगळेच वलय प्राप्‍त झाले आहे. यापूर्वी कोणत्‍याही कंपनीने अशाप्रकारच्‍या महोत्‍सवाचे आयोजन केले नव्‍हते. या महोत्‍सवाचे आणखी एक वैशिष्‍ट्य म्‍हणजे त्‍यात देशभरातील असंख्‍य होतकरू आणि मेहनती विद्यार्थ्‍यांना त्‍यांचे कौशल्‍य दाखविण्‍याची संधी मिळाली. तसेच उदयोन्‍मुख सॉफ्टवेअर अभियंत्‍यांना आंतरराष्‍ट्रीय व्‍यासपीठ उपलब्‍ध होऊ शकले. * सौजन्‍य - पुढारी

Labels:

Sunday, 23 September 2012

जळकोट महाविद्यालयाच्‍या काळ्या कारभाराचा पर्दाफाश

तुळजापूर - मौजे जळकोट (ता. तुळजापूर) येथील एका महाविद्यालयात परप्रांतीय विद्यार्थ्‍यास इयत्‍ता दहावीमध्‍ये विज्ञान विषयात 40 गुण नसताना इयत्‍ता बारावी विज्ञान वर्गात नियमबाह्य व गैरमार्गाने प्रवेश दिल्‍याचे उघडकीस आले आहे. तसेच दहावीच्‍या टि.सी. वरून चक्‍क बारावीच्‍या वर्गात प्रवेश दिला आहे. या प्रकारामुळे शिक्षण क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. याबाबत महाविद्यालयाचा गैरप्रकाराबद्दल विद्यार्थी व पालकात चर्चेला उधाण आले आहे.
महाराष्‍ट्र राज्‍य माध्‍यमिक व उच्‍च माध्‍यमिक शिक्षण मंडळ लातूर विभागीय सचिव याना कदम जगन्‍नाथ नागनाथ यानी लेखी तक्रार देऊन त्‍यात म्‍हटले आहे की, मौजे जळकोट ता. तुळजापूर येथील इंदिरा काळे कला व विज्ञान महाविद्यालयाने सन 2011-12 या शैक्षणिक वर्षात इयत्‍ता बारावी विज्ञान वर्गात शोएब इब्राहिम साब या परप्रांतीय विद्यार्थ्‍याला इयत्‍ता दहावीमध्‍ये विज्ञान विषयात 40 गुण नसताना प्रवेश दिला आहे. तसेच दहावीच्‍या टि.सी. वरून चक्‍क बारावीच्‍या वर्गात प्रवेश दिल्‍याचे नमूद केले आहे. सदरील विद्यार्थी हा राज्‍याबाहेरील असून त्‍याचा योग्‍यता फॉर्मही भरलेला नाही, असे सांगून सन 2012-13 याही शैक्षणिक वर्षात इयत्‍ता दहावीमध्‍ये विज्ञान विषयात 40 गुण नसताना अनेक विद्यार्थ्‍यांना संस्‍थाचालकांनी पुढच्‍या वर्गात प्रवेश दिल्‍याचे म्‍हटले आहे. याप्रकरणाची चौकशी करून संस्‍थेची मान्‍यता काढून घ्‍यावी व प्राचार्यास निलंबित करण्‍याची मागणी कदम जगन्‍नाथ यानी केली आहे. याची एक प्रत माहितीस्‍तव उस्‍मानाबाद जिल्‍हाधिकारी, पालकमंत्री मधुकरराव चव्‍हाण, शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा आदीना देण्‍यात आले आहे.

Labels:

रिपाइंमध्ये बंजारा कार्यकर्त्यांचा प्रवेश

वागदरी - येडोळा (ता. तुळजापूर) येथील बंजारा समाजाचे कार्यकर्ते धोंडीबा राठोड यासह महिला व पुरूष कार्यकर्त्‍यांनी रामदास आठवले यांच्‍या नेतृत्‍वाखालील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. नळदुर्ग येथे शासकीय विश्रामगृहावर जिल्‍हा उपाध्‍यक्ष दुर्वास बनसोडे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली झालेल्‍या कार्यक्रमात बंजारा समाजाचे धोंडीबा राठोड, ग्रामपंचायत सदस्‍य मंगल राठोड, यदू जाधव, सेवा आडे, राजेंद्र राठोड, तारू पवार यासह असंख्‍य बंजारा कार्यकर्त्‍यांनी प्रवेश केला आहे. यावेळी तालुकाध्‍यक्ष एस.के. गायकवाड, जिल्‍हा सरचिटणीस तानाजी कदम, अरूण लोखंडे, राजा लोंढे, बाबासाहेब बनसोडे, अरूण कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.

Labels:

भैरवनाथ विद्यालयाचा संघ विभागीय स्‍पर्धेसाठी लातूरला रवाना

चिकुंद्रा - येथील भैरवनाथ विद्यालयातील विद्यार्थ्‍यांचे उस्‍मानाबाद येथे नुकतेच झालेल्‍या जिल्‍हास्‍तरीय कबड्डी स्‍पर्धेत मुलाच्‍या संघाने प्रथम क्रमांक पटकाविल्‍याने सदर संघाची लातूर येथे होणा-या विभागीय कबड्डी स्‍पर्धेसाठी निवड झाली आहे. लातूर येथे सोमवार दि. 24 सप्‍टेंबर रोजी क्रिडा संकुलन येथे या स्‍पर्धा पार पडणार आहेत. या संघास क्रिडा शिक्षक व्‍ही.टी. चव्‍हाण यांचे मार्गदर्शन लाभले. या संघास संस्‍थेचे अध्‍यक्ष यशवंत गायकवाड, उपाध्‍यक्ष धोडींबा काळुंके, सचिव प्रकाश जगदाळे, मुख्‍याध्‍यापक पी.एस. पवार, सहशिक्षक बी.के. कानडे, एम.डी. गरड, डी.बी. शिंदे, सरपंच रमाकांत गायकवाड आदीजणांनी शुभेच्‍छा दिल्‍या.

Labels:

उस्‍मानाबाद जिल्‍ह्यात मत्‍स्‍य संशोधन केंद्र उभारण्‍याची मागणी

चिकुंद्रा - बेरोजगारी ही भारतातील विशेषतः ग्रामीण भागातील एक जुनी समस्‍या असून ती सोडविण्‍याच्‍या दृष्‍टीने एक रोजगार विनिमय केंद्र म्‍हणून उस्‍मानाबाद जिल्‍ह्यात राज्‍यातील अद्ययावत गोडया पाण्‍यातील मत्‍स्‍य संशोधन केंद्र उस्‍मानाबाद जिल्‍ह्यात सुरू करण्‍याची मागणी जोर धरत असून याप्रकरणी मत्‍स्‍यवसाय मंत्री तथा पालकमंत्री ना. मधुकरराव चव्‍हाण यांनी लक्ष घालण्‍याची मागणी होत आहे.
वास्‍तवात आज देशातील बेरोजगारी घटल्‍याचा दावा केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाने केला असला तरी ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगारीचे प्रमाण आजही अधिकतम आहे. यासाठी रोजगाराच्‍या क्षेत्रात मत्‍स्‍य व्‍यवसायाला चालना मिळावी म्‍हणून तसेच रोजगाराच्‍या उपलब्‍धतेसाठी मत्‍स्‍य संशोधन केंद्र निर्मितीची गरज आहे. महाराष्‍ट्रात सद्य स्थितीत अद्ययावत असे गोडया पाण्‍यातील मत्‍स्‍य संशोधन केंद्र नाही. त्‍याकरीता उस्‍मानाबाद जिल्‍ह्यात गोडया पाण्‍यातील मत्‍स्‍य संशोधन केंद्र निर्मितीची गरज प्रकर्षाने जाणवत आहे. जिल्‍ह्यात सध्‍या तेरणा, रूई, वाघोली, कुरनूर, हरणी, खंडाळा, जकेकूर, तुरोरी, बेनीतुरा, रायगव्‍हाण, बाणगंगा, रामगंगा, संगमेश्‍वर, खासापूर, चांदणी, खंडेश्‍वर, साकत असे मिळून 17 मध्‍यम प्रकल्‍प व 161 लघु प्रकल्‍प आहेत. पैकी तेरणा मध्‍यम प्रकल्‍प किंवा तुळजापूर तालुक्‍यातील बोरी धरणालगत (कुरनूर मध्‍यम प्रकल्‍प) येथे शास्‍त्रशुद पद्धतीने मत्‍स्‍यव्‍यवसाय करण्‍यासाठी नागपूर येथील महाराष्‍ट्र पशु व मत्‍स्‍य विज्ञान विद्यापीठांतर्गत मत्‍स्‍य संशोधन केंद्र निर्माण करण्‍याची अनेक दिवसाची मागणी आहे. सध्‍या ना. मधुकरराव चव्‍हाण हे राज्‍याचे पशुसंवर्धन, दुग्‍धविकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री व जिल्‍ह्याचे पालकमंत्री म्‍हणून काम पाहत आहेत. त्‍यांच्‍या कारकिर्दीत जिल्‍ह्यात अनेक लहान-मोठी प्रकल्‍प झाल्‍यामुळे सिंचन क्षेत्रात वाढ झाली आहे. त्‍यामुळे त्‍यांच्‍या सध्‍याच्‍या कारकिर्दीत जिल्‍ह्यात अपेक्षित ठिकाणी मत्‍स्‍य संशोधन केंद्र उभारण्‍यासाठी मत्‍स्‍य सहकारी संस्‍था, बेरोजगार, मत्‍स्‍य व्‍यावसायिक यांच्‍या आशा उंचावल्‍या आहेत. अपेक्षित मत्‍स्‍य संशोधन केंद्र उभारल्‍यास या केंद्रातून शास्‍त्रशुध्‍द व तांत्रिक व्‍यवसाय प्रशिक्षण दिले जाईल. शिवाय व्‍यावसायिकांनी सल्‍ला व सहाय्य मिळण्‍यास मदत होईल, मत्‍स्‍य बीज उत्‍पादन मोठयाप्रमाणात होर्इल, त्‍याचबरोबर मत्‍स्‍य व्‍यावसायिकांचे आर्थिक जीवनमान उंचावून बेरोजगार युवकाना रोजगाराची नवी संधी उपलब्‍ध होईल. एकंदर मत्‍स्‍यव्‍यवसायाला अधिक चालना मिळण्‍यासाठी मत्‍स्‍यसंशोधन केंद्राची मागणी मत्‍स्‍य सहकारी संस्‍था, मत्‍स्‍य व्‍यावसायिक व संबंधितातून होत आहे. * भैरवनाथ कानडे पत्रकार

Labels:

इंटरनेट वापरणा-याना मायक्रासॉफ्टचा इशारा

बोस्‍टन - इंटरनेट एक्‍सप्‍लोरर म्‍हणजेच ‘आयई’ वर आतापर्यंतच्‍या सर्वात खतरनाक व्‍हायरस सापडला असल्‍यामुळे मायक्रोसॉफ्टने आयई वापरणा-या जगभरातील ग्राहकांना हे ब्राऊसर वापरणे धोकादायक असल्‍याचा इशारा दिला आहे. इंटरनेट एक्‍सप्‍लोररमध्‍ये एक धोकादायक बग (व्‍हायरस) सापडला आहे. त्‍यामुळे ब्राउसर वापरणा-या संगणकातील व्‍यक्‍तीगत डाटा नष्‍ट होण्‍याची भीती व्‍यक्‍त केली आहे. पायसन वेली असे नाव व्‍हायसरला देण्‍यात आले आहे. हा व्‍हायरस इतका धोकादायक आहे की तो तुमच्‍या संगणकात घुसल्‍यास संगणक थेट हॅकर्सच्‍या रिमोट कंट्रोलशी जोडला जातो. त्‍यामुळे तुमच्‍या इंटरनेट वापराची क्षणाक्षणाची माहिती हॅकर्सपर्यंत पोहोचते. तुमच्‍या संगणकावरून होणा-या प्रत्‍येक क्लिकवर नजर ठेवू शकतात, अशी माहिती मायक्रोसॉफ्टने दिली आहे. जगभरातील नेटीझन्‍सपैकी 33 टक्‍के लोक इंटरनेट एक्‍सप्‍लोर वापरतात. त्‍यामुळे मायक्रोसॉफ्टने या संभाव्‍य धोक्‍याची गंभीर दखल घेतली आहे. * सौजन्‍य - मुंबई चौफेर

Labels:

स्‍टेट बँकेची सेवा कोलमडली ; एटीएम सुरू करण्‍याची मागणी

नळदुर्ग - उस्‍मानाबाद जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँकेच्‍या मनमानी कारभाराचा फटका सर्वसामान्‍य खातेदारास बसल्‍याने नळदुर्ग येथील स्‍टेट बँक ऑफ हैदराबाद व अणदूर (ता. तुळजापूर) येथील भारतीय स्‍टेट बँकेत अल्‍पावधीतच हजारो बचतखाते उघडले. त्‍याचा परिणाम बँकेची सेवा कोलमडल्‍याचे दिसून येत आहे. बँकेत अपुरे कर्मचारी असल्‍याने खातेदारास म्‍हणावी तशी सेवा उपलब्‍ध होत नसल्‍याने त्‍यांची कुंचबना होत आहे. त्‍यात शालेय, महाविद्यालय विद्यार्थी, ज्‍येष्‍ठ नागरीक, शेतकरी यांचा समावेश मोठयाप्रमाणावर असून बँकेची सेवा पुर्ववत करण्‍यासाठी तात्‍काळ नळदुर्ग व अणदूर येथे एटीएम सेवा सुरू करण्‍याची मागणी होत आहे. नळदुर्ग शहरांतर्गत परिसरातील 80 खेडयागावाचा दैनंदिन कामकाजासाठी दररोज संपर्क आहे. त्‍याचबरोबर अणदूर येथेही 25 ते 30 गावाचा दररोज कामकाजासाठी लोकांचा संपर्क आहे. हे दोन्‍ही गावे राष्‍ट्रीय महामार्गावर वसलेले गाव असून परिसरातील अनेक गावांचा व्‍यवहार या बँकेतून होते. त्‍यात साखर कारखाना, शासकीय, निमशासकीय शैक्षणिक संस्‍था याचा समावेश आहे. परिसरातील शासकीय कर्मचारी या भागात मोठयाप्रमाणावर या भागात राहत असून आंध्रप्रदेश, कर्नाटक व महाराष्‍ट्रातून श्री क्षेत्र खंडोबा, रामतीर्थ, नानीमॉं दर्गाह व इतर देवाच्‍या दर्शनासाठी भाविक मोठयाप्रमाणात ये‍थे येतात. येथूनच अक्‍कलकोट, गाणगापूर, तुळजापूर व चिवरीच्‍या महालक्ष्‍मीच्‍या दर्शनासाठीही भाविकांची दररोज वर्दळ असते. त्‍यांना ऐन अडचणीच्‍या वेळी आर्थिक पैशाची गरज असते. त्‍यासाठी नळदुर्ग, अणदूरला एटीएम सेवा सुरू करण्‍याची गरज आहे. राष्‍ट्रीय महामार्गालगत हे दोन्‍ही गावे असून सर्व सोयीसुविधा उपलब्‍ध झाल्‍या असल्‍या तरी अद्यापपर्यंत याठिकाणी एटीएम सुविधा सुरू झाली नाही. सोलापूर ते उमरगा या 90 किलोमीटरच्‍या अंतरात व उमरगा ते तुळजापूर 75 किलोमीटर अंतरात कोठेही ही बँकेची सुविधा उपलब्‍ध नाही. याबरोबरच वरील बँकेत कर्मचारी संख्‍या अपुरी असल्‍याने बचत खातेदारांची मोठया प्रमाणात गैरसोय होत आहे. एटीएमची सेवा होण्‍यासाठीची वरिष्‍ठ कार्यालयास एक हजार ग्राहकांच्‍या सह्यांचे निवेदन अणदूर येथून देवून सहा महिने झाले आहे. अणदूर व मुरूम येथे एटीएम सेवा सुय करण्‍यासाठी वरिष्‍ठ कार्यालयाने परवानगी दिली असून मुरूम हे महामार्गावरून दहा किलोमीटर अंतरावर आत आहे. तेथे एटीएम एटीएम सेवा उघडली जाते, परंतू येथे मात्र गैरसोय सुरू आहे. त्‍यामुळे बँक ग्राहकांमधून तीव्र नाराजी व्‍यक्‍त केली जात आहे.

Labels:

सावकाराच्‍या जाचातून मुक्‍त करण्‍याची डोंगरे यांची मागणी

नळदुर्ग - खासगी सावकाराकडून व्‍याजाने घेतलेल्‍या पैशाची परतफेड केल्‍यानंतरही पुन्‍हा खासगी सावकार वारंवार पैशाची मागणी करीत असून पैसे न दिल्‍यास दुकानाला कुलूप घालण्‍याची भाषा करणा-या सावकारावर कारवाई करण्‍याची मागणी अमजद डोंगरे यांनी केली आहे. शहरातील एका खासगी सावकाराकडून 20 हजार रूपये व्‍याजाने घेतले होते. त्‍याच्‍या मोबदल्‍यात त्‍या सावकाराला आतापर्यंत 50 हजार रूपये दिले आहेत. तरीही हा सावकार आणखी वीस हजारांची मागणी करीत आहे. मी पैसे देत नसल्‍याने हा गुंड प्रवृत्‍तीचा सावकार समोर उभे राहून शिवीगाळ करीत आहे व दुकानाची कुलूप घालण्‍याची भाषा करीत आहे. व्‍याजाने घेतलेले पैसे दुप्‍पट देवूनही पुन्‍हा पैशाची मागणी करून नाहक त्रास देणा-या सावकाराविरूद्ध कारवाई करून मला न्‍याय द्यावा, अशी मागणी अमजद डोंगरे यांनी केली आहे.

Labels:

Saturday, 22 September 2012

गणेशोत्‍वा निमित्‍त व्‍हॉलीबॉल स्‍पर्धा

तुळजापूर - जळकोट (बोरमन तांडा) ता. तुळजापूर येथील श्री गणेशोत्सवानिमित्त रविवार दि. 23 ऑक्‍टोबर रोजी हॉलीबॉल स्‍पर्धेचे आयोजन करण्‍यात आले आहे. तरी व्‍हॉलीबॉलप्रेमी नागरीक व संघानी स्‍पर्धेत सहभागी होण्‍याचे आवाहन संयोजक केले आहे. सदरील व्‍हॉलीबॉल स्‍पर्धा शिवसेनेचे धाराशिव माजी जि.प. सदस्य यांच्‍यावतीने रविवार रोजी आयोजित करण्‍यात आले आहे. स्‍पर्धेतील प्रथम विजेत्‍यास रोख 5 हजार रुपयांचे पारितोषिक गणेश सोनटक्‍के यांच्‍यावतीने देण्‍यात येणार आहे. तर द्वितीय विजेत्‍यास 3 हजार एक रुपये राजू भिका राठोड तर्फे तर तृतीय पारितोषिक 2 हजार एक रुपये सेवा सुदर्शन गणेश मंडळातर्फे दिले जाणार आहे. या पारितोषिकांबरोबरच गणेश मंडळांनी घेतलेल्या विविध स्पध्रेचे पारितोषिक वितरीत करण्यात येणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होणा-या इच्‍छुक संघानी आपल्‍या संघाचे नोंदणी करण्‍याचे आवाहन संयोजक संयोजक प्रदीप जाधव, निशांत राठोड, तानाजी चव्हाण, प्रवीण राठोड, विकास चव्हाण, संजय चव्हाण आदीनी केले आहे.

Labels:

वाहक-चालकाचा गौरव

नळदुर्ग   -   अहोरात्र सेवा करणा-या एस टी महामंडळातील वाहक, चालकांचा अणदूर (ता. तुळजापूर) येथील गणेशोत्‍सव मडळाच्‍या वतीने पुष्पगुच्छ, गौरवपत्र देऊन गौरव करण्यात आला. शुक्रवार दि. 21 रोजी सकाळी हा कार्यक्रम संपन्‍न झाला. गेल्या अकरा वर्षापासून या मंडळाच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून राज्‍यासह कर्नाटक व आंध्रप्रदेशातील महामंडळाच्या पन्नासहून अधिक वाहक-चालकांचा यावेळी सत्कार करण्यात आल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष पप्पू धमुरे यांनी दिली. या कार्यक्रमास वाहतूक नियंत्रक बसवराज स्वामी, सुरेश कंदले, भीमाशंकर मुळे,  अमोल सालगे,  राचप्पा जिडगे,  प्रशांत पोतदार,  आझर शेख, नागेश शेटे, जावेद तांबोळी यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Labels:

Thursday, 20 September 2012

गणेश मंडळाचा अशाही स्‍तुत्‍य उपक्रम


तुळजापूर  -  तुळजाई सांस्‍कृतिक व क्रीडा (तुळजापूर खुर्द) मंडळाने गणेशोत्‍सव साजरा न करता मंडळाच्‍या सभासदातून जमलेली अकरा हजार रूपयाची वर्गणी मुख्‍यमंत्री सहाय्यता निधीसाठी म्‍हणून जिल्‍हाधिका-याकडे धनादेश सुर्पूद केले आहे.  या मंडळाचे स्‍तुत्‍य उपक्रमाबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
      या मंडळाने अकरा वर्षापूर्वी गुजरातच्‍या भुकंप व पुरग्रस्‍तासाठी, किल्‍लारीच्‍या भूकंपग्रस्‍तासाठी 21 हजार रूपये आर्थिक मदत केली होती. मंडळाने आजपर्यंत कसलेही वर्गणी गोळा न करता सभासद वर्गणीतून विविध समाजोपयोगी व समाज प्रबोधनपर कार्यक्रमास महत्‍व दिले आहे. त्‍याचबरोबर पशुवैद्यकीय शिबिरांचे आयोजन, समाजोपयोगी रक्‍तदान, नेत्रचिकित्‍सा, दंतचिकित्‍सा, स्‍त्रीरोग, बालरोग असे शिबिर या मंडळाने यापूर्वी आयोजन केले आहे. त्‍याचबरोबर बौद्धीक व्‍याख्‍याने घेवून स्‍त्रीभ्रूण हत्‍या रोखण्‍यासाठी एका मुलीवर कुटुंब नियोजन करणा-या दांम्‍पत्‍यास एक लाख रूपये देण्‍याचे ठरविले आहे. मंडळाच्‍या कार्याची दखल घेवून शासनाने दलित मित्र पुरस्‍कार, नेहरू युवा केंद्राचा युवा पुरस्‍कार, एक गाव, एक वार्ड गणपती जिल्‍हा पुरस्‍कार यासह एडस् जनजागरण पुरस्‍कार, सोलापूर डॉ. हेडगेवार रक्‍तपेढीचे उत्‍कृष्‍ट रक्‍त संकलनाचा जिल्‍हास्‍तरीय पुरस्‍कार देवून मंडळाला गौरविले आहे.
मंडळाच्‍यावतीने दुष्‍काळग्रस्‍तांसाठी मुख्‍यमंत्री सहाय्यता निधीसाठी नुकतेच 11 हजार रुपयाचा धनादेश जिल्‍हाधिकारी डॉ. के.एम. नागरगोजे यांच्‍याकडे दिले. यावेळी मंडळाचे अध्‍यक्ष अजय देशमाने, आदिनाथ तुळजापूरे, प्रमोद क्षीरसागर, हणमंत साबळे, मकसूद शेख, महेश कांबळे व सभासद उपस्थित होते. याप्रसंगी नगराध्‍यक्षा अर्चना गंगणे, उपनगराध्‍यक्ष बाळासाहेब शिंदे, तहसिलदार व्‍ही.एल. कोळी, नगरसेवक पंडित जगदाळे, तुळजाई पतसंस्‍थेचे चेअरमन राजेंद्र देशमाने यांची प्रमुख उपस्थिती होती.

Labels:

Wednesday, 19 September 2012

उस्मानाबाद रेल्वे स्टेशनवरुन धावणा-या गाड्यांचे वेळापत्रक

रेल्‍वे वेळापत्रक


ट्रेन नंबर
गाडीचे नाव
धावण्‍याचे दिवस
आगमन
प्रस्‍थान
मार्गे
51433
निझामाबाद-पंढरपुर पॅसेंजर
दररोज
पहाटे १.३७


1.42
पांगरी, बार्शी
51426
मिरज-परळी पॅसेंजर
दररोज
पहाटे १.४०

1.43
लातुरकडे
12527
मुंबई-लातूर एक्सप्रेस
दररोज
पहाटे ४.३७

4.40
लातुरकडे
01404
नागपूर-कोल्हापूर एक्सप्रेस
बुध,रवि
सकाळी ६.५७

07
बार्शी, दौड

17014
हैद्राबाद-पुणे एक्सप्रेस
सोम,बुध,शनि
सकाळी ७.५०

7.55
कुर्डवाडी, मिरज

51434
पंढरपूर निझामाबाद एक्सप्रेस
दररोज
सकाळी १०.०५

10.10
मुदखेडी, नवीपेठ

51425
परळी-मिरज पॅसेंजर
दररोज
सकाळी ११.३०

11.35
ढालगाव, सांगोला
17013
पुणे-हैद्राबाद एक्सप्रेस
सोम,बुध,शनि
रात्री ०७

07.05
बिदर, जहिराबाद
01403
कोल्हापूर-नागपूर एक्सप्रेस
सोम,शुक्र
रात्री ७.२९

7.30
हिंगोली, वर्धा

12528
लातूर-मुंबई एक्सप्रेस
दररोज
रात्री ११.३५

11.37
दौड, लोणावळा



Labels: