Tuesday, 28 February 2023

नळदुर्ग येथे स्वा.वि.दा.सावरकरांना अभिवादन

नळदुर्ग ,दि. ०१

हिंदुहृदयसम्राट स्वा.विनायक दामोदर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनानिमित्त नळदुर्ग येथे माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांच्या निवासस्थानी प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले,


यावेळी  पत्रकार विलास येडगे,नंदकुमार जोशी,उत्तम बणजगोळे,माजी नगरसेवक विनायक अहंकारी,मनसेचे सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी,भाजपचे सुशांत भुमकर, पद्माकर घोडके ,उमेश नाईक,संजय जाधव,दादासाहेब बनसोडे,अमर भाळे,प्रमोद जोशी,सुनील देवकर,मुकूंद भूमकर आदी उपस्थित होते.

Labels:

Sunday, 19 February 2023

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त पुतळे वाटप

नळदुर्ग दि.१९

    शिवजयंती निमित्त छञपती शिवाजी महाराज यांचे १५१ पुतळे शिवप्रेमी नागरिकाना वाटप करण्याचा  कौतुकास्पद  उपक्रम युनिटी कंपनीच्या संचालकानी  राबविल्याबद्दल गौरव उदगार माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी "शिवराय मनामनात ,शिवजयंती घरा घरात" या  कार्यक्रमाप्रसंगी  काढले.
   

नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ल्यात शुक्रवारी "शिवराय मनामनात, शिवजयंती घराघरात" हा संकल्प घेऊन युनिटी मल्टीकॉन्स कंपनीच्या वतीने नळदुर्ग शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचे १५१ पुतळे घरघुती पूजेसाठी मोठ्या थाटात वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, तर प्रमुख अतिथी म्हणुन आमदार राणाजगजितसिह  पाटील, भाजपचे प्रदेश कार्यकारणी  सदस्य अँड. अनिल काळे, नितीन काळे, तालुका अध्यक्ष संतोष बोबडे, माजी महापौर दिलीप कोल्हे, शिव व्याख्याते साईनाथ रुद्रके ,माजी नगरसेवक  नय्यर जहागीरदार, उदय  जगदाळे, सुनील रसाळ, संजय शिंदे, युनिटी कंपनीचे मुख्य संचालक कफील मौलवी, संचालक जयधवल करकमकर, माजी नगरसेवक बसवराज धरणे, कमलाकर चव्हाण, सहाय्यक  पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे, जहीर जहागीरदार, सुभद्राताई मुळे,  पत्रकार सुहास येडगे, राष्ट्रवादीचे प्रदेश कार्यकारणी  सदस्य शफी शेख, आदीजण व्यासपिठावर उपस्थित होते.
   

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हास्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. यानंतर फटाक्याची आतीषबाजी करुन जल्लोष  करण्यात आला.

  यावेळी माजी मंत्री मधुकरराव  चव्हाण  म्हणाले की, युनिटी कंपनीने शिवजयंतीच्या अनुषंगाने शिवप्रेमी नागरिकाना छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे वाटप करण्याचा स्तुत्य उपक्रमाबद्दल त्यांनी युनीटी कंपनीच्या संचालकाचे कौतुक  करुन  युवकानी छञपती शिवाजी महाराज यांचा गौरवशाली इतिहास जाणुन घेवुन त्यांचे  प्रेरणादायी कार्य आत्मसात करण्याचे सांगितले. यावेळी शिवव्याख्याते साईनाथ रुद्रके यांचे व्याख्यान झाले.  आमदार राणाजगजितसिह  पाटील यांनी  उपस्थिताना मार्गदर्शन  केले. 


 यावेळी कफील मौलवी, जयधवल करकमकर, यांचा सत्कार माजी सैनिक संघटना व वतीने पत्रकारच्या वतीने करण्यात आले.मान्यवरांच्या हस्ते यावेळी 151 पुतळ्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास अक्षरवेल महिला मंडळाच्या कार्यकर्त्या, भाजपचे  धिमाजी घुगे, सुशांत भूमकर, पद्माकर घोडके,  शिवसेनेचे सरदारसिंग ठाकूर, संतोष पुदाले, मनसेचे ज्योतिबा येडगे, प्रमोद कुलकर्णी, लहुजी शक्ती सेनेचे शिवाजी गायकवाड,  सेवानिवृत्त शिक्षक, विविध संघटनेचे पदाधिकारी, माजी नगरसेविका सुप्रिया पुराणिक, माजी नगरसेवक  शहबाज काझी  आदीसह नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक अहंकारी तर आभार जयधवल करकमकर यांनी  मानले. या कार्यक्रमासाठी युनिटीचे रईस जाहागिरदार ,जुबेर काझी, निखिल येडगे, हाजी शेख यांच्यासह कर्मचा-यानी परिश्रम घेतले.

 प्रास्ताविकपर बोलताना  युनिटीचे मुख्य संचालक कफील मौलवी म्हणाले की, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त " शिवराय मनामनात - शिवजयंती घराघरात " हा संकल्प गेल्यावर्षी करुन यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांचे घरघूती पूजेसाठी  पुतळे वाटप करताना आम्हाला मनस्वी आनंद होत आसल्याची भावना व्यक्त केली.

  
शिवराय म्हणजे फक्त लढाई, गडकिल्ले, ढाल तलवार यापुरते मर्यादित नव्हते तर निसर्ग संवर्धक, जलनियोजन, आरमाराचे जनक, स्त्री रक्षणकर्ते, प्रजाहितदक्ष होते असे प्रतिपादन व्याख्याते साईनाथ रूद्रके यांनी केले.  तसेच आजच्या पिढीला शिवरायांचा आदर्श घेण्यासाठी आधी पालकांनी शहाजीराजे व जिजाऊंचा अभ्यास करणे गरजेचे असल्याचे रूद्रके यांनी सांगितले.

Labels:

Friday, 17 February 2023

नळदुर्ग : महाशिवरात्रीनिमित्त श्रीक्षेत्र रामतीर्थ येथे रुद्राभिषेक सोहळा

 

नळदुर्ग, दि. १७

   नळदुर्ग येथील प्राचिन व प्रभु श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री क्षेत्र रामतीर्थ येथे दि. 18 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीनिमित्त भव्य रुद्राभिषेक सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या रुद्राभिषेक सोहळयासाठी नाव नोंदणी सुरू असुन ज्यांना हा रुद्राभिषेक करायचा आहे. त्यांनी आपली नावे नोंदवावित असे आवाहन श्री क्षेत्र रामतीर्थ देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.


   शनीवार दि. 18 फेब्रुवारी रोजी सर्वत्र महाशिवरात्रीचा उत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. नळदुर्ग येथील प्राचीन व श्री प्रभु रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री क्षेत्र रामतीर्थ येथे महंत श्री विष्णु शर्मा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली महाशिवरात्रीचा उत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

महाशिवरात्री उत्सव

रामतीर्थ देवस्थान नळदुर्ग येथे महाशिवरात्री निमित्त भव्य रुद्राभिषेक आयोजित करण्यात आला आहे. या दिवशी श्री महादेव मंदिरात भव्य शृंगार व १०८ दांपत्या च्या हस्ते रुद्राभिषेक व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. रुद्राभिषेक करिता ११०० रू देणगी आकारण्यात येणार आहे. १०८ दांपत्याना अभिषेकसाठी लागणारे साहित्य रामतीर्थ मंदिर संस्थान तर्फे देण्यात येईल ज्यामध्ये संगमरवरी पिंड, पुजापात्र, फुलपात्र, संध्यापळी, उपरणे, भगवी टोपी व प्रसाद देण्यात येणार आहे. तरी ज्या दाम्पत्यांना महाशिवरात्री निमित्त महादेवाला रुद्राभिषेक करावयाचा आहे त्यांनी खालील सदस्यांशी व रामतीर्थ देवस्थान येथे संपर्क साधावा. १०८ दाम्पत्याची नोंद पूर्ण झाल्यानंतर नोंदणी स्वीकारण्यात येणार नाही.

       

संपर्क

श्रमिक पोतदार 9096427282

लखन भोसले 9011660454

रोहित मोटे 8830608889

संकेत खद्दे 9975569195

नितेश कौरव 9518335522

पप्पू (अनिल) पाटील 9665242424

Labels:

Thursday, 9 February 2023

नळदूर्ग येथे महावितरणचे उपविभागीय कार्यालय मंजूर करा - मनसेची ऊर्जा विभागाकडे मागणी

नळदूर्ग दि.०९

येथे गेल्या अनेक वर्षांपासून  महावितरणचे उपविभागीय कार्यालय मंजूर व्हावे यासाठी प्रस्ताव दाखल केला होता,परंतु अद्याप पर्यंत ते सर्व प्रस्ताव हे धूळखात पडून आहेत.


 उपविभागीय कार्यालय शहरात कार्यान्वित केल्यास वीज बिल दुरुस्ती,बिलिंग,थ्री पेज डिमांड,फिल्टर ऑफिस,स्वतंत्र निधी,अशा अनेक बाबी सोयीस्कर होणार आहेत,यामुळे शहरासह हद्दीतील गावात वीज ग्राहकांची संख्या जवळपास ३५- ४० हजारावर आहे, बोळेगाव सारख्या गावातील लोकांना तर कामानिमित्त तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी ७० किमीचे अंतर कापून जावे लागत आहे,व पहिल्या फेरीत काम होत नसल्याने हेलपाटे मारण्याचे काम करावे लागत आहे,यामुळे प्रशासनाने या महत्वूर्ण बाबीकडे तात्काळ लक्ष घालून हे उपविभागीय कार्यालयाचे प्रस्ताव मंजूर करावे व नळदूर्ग येथे सुरू करून ग्राहकांची होणारी हेळसांड थांबवावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने  ऊर्जा विभागाकडे केली आहे,निवेदनावर जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे,शहराध्यक्ष अलीम शेख,शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी,शहर संघटक रवि राठोड यांच्या स्वाक्षरी आहेत.

Labels:

Monday, 6 February 2023

उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीमधील अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करा- मनसे


नळदूर्ग , दि. ०६

येथील उपजिल्हा रुग्णालय सुरू होऊन अनेक महिने होत आहेत,परंतु इमारतीमधील अनेक कामे संथ गतीने होत असल्याचे निदर्शनास येत आहे,


यात प्रामख्याने कर्मचाऱ्यांचे क्वार्टर, रुग्णालयातील ऑपरेशन थिएटर जवळील स्क्रब एरिया,फायर फायटींग, आवश्यक त्या ठिकाणी स्टील रेलिंग, एक्सोस फॅन, आवश्यक त्या ठिकाणी टॅक्टाईल पेवींग,रुग्णालयातील सर्कल मध्ये पेवर ब्लॉक, सिटिंग बेंच,रेन वॉटर हर्वेस्टिंग, प्लींथ,लिफ्टचे काम हे अपूर्ण आहेत,ही कामे तात्काळ पूर्ण करावीत अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे,त्याच बरोबर येथील रिक्त पदे तात्काळ भरुन रुग्णाची हेळसांड थांबवावी अशी मागणी मनसेने जिल्हाधिकारी व जिल्हाशल्यचिकित्सक यांना दिलेल्या निवेदनात केली आहे,

यामध्ये प्रामुख्याने भुल तज्ञ,दंतरोग तज्ञ, एक्स- रे टेक्निशियन,  रेडीयोलोजिस्ट (सोनोग्राफी) आदी पदांची तात्काळ भरती होण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मनसेने दिलेल्या निवेदनात केली आहे,निवेदनावर जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे,शहराध्यक्ष अलीम शेख,शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी,शहर संघटक रवि राठोड यांच्या स्वाक्षरी आहेत.

Labels:

Sunday, 5 February 2023

तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील महालक्ष्मी यात्रेस ७ फेब्रुवारी पासून प्रारंभ


चिवरी , दि . ०५  राजगुरु साखरे

 लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तुळजापूर तालुक्यातील चिवरी  येथील महालक्ष्मी यात्रोत्सवास मंगळवार दि, ७ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे.  


महालक्ष्मीची यात्रा प्रथेप्रमाणे दरवर्षीच्या माघ पौर्णिमेनंतर येणाऱ्या पहिल्या मंगळवारी साजरी केली जाते. यात्रेनिमित्त देवस्थानच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले  आहे. देवीजींना सोमवार  मंगळवारच्या मध्यरात्री  महाअभिषेक , अलंकार पूजा करून महाआरती केली जाते,  त्यानंतर आंबट-गोड भातासह पुरणपोळीचा नैवद्य दाखवला जातो. पहाटे गाव ते मंदिर या एक किलोमीटर अंतरावर दंडवत व लिंबाच्या पाल्याने रस्ता झाडला जातो, या गावातील शेकडो भावीक सहभाग नोंदवितात .मंगळवार  हा यात्रेचा मुख्य दिवस असतो , या दिवशी  नवीन पोतराजांना दीक्षा देणे , दंडवत घेणे  , पट  बांधणे ,  लहान मुलांचे जावळ काढणे आदी नवस्फूर्तीचे कार्यक्रम होतात, तसेच वाघ्या मुरळी, आराधी पथके, यल्लमाची गाणी, धनगरी ओव्या, पोतराज गाणी,  अशा महाराष्ट्रीयन लोक कलेचे धार्मिक कार्यक्रम होतात. 


देवीच्या दर्शनासाठी लातूर, उस्मानाबाद, बीड, मुंबई, पुणे आदीसह परराज्यातून भाविक मोठ्या संख्येने येतात. विशेष म्हणजे या यात्रेमध्ये  हजारो पारधी समाज दाखल होतो, मंगळवारी दिवसभरात मानकरी वाणी पाटील, मराठा-पाटील यांच्या वाड्यावर जाणे, घोंगड्यात भात झेलणे,आदी मानपानाच्या विधी  पार पडतात. मंगळवारी रात्री गावातून देवींची शोभेच्या दारूकामासह पालखी छबिना मिरवणूक काढण्यात येते व पालखी मानाच्या पुजाऱ्याच्या घरी प्रस्थान होऊन रात्री बारा वाजता मंदिराकडे पालखी प्रस्थान होते. यानंतर होमावहनामध्ये धार्मिक विधी पार पडल्यानंतर भाविकांना महाप्रसाद दिला जातो. तसेच बुधवारी दि,८रोजी सकाळी सात वाजता पान व लिंबु याचा घाव होतो व  दुपारी चार वाजता कुस्त्याचा जंगी फड घेऊन यात्रेची सांगता होते. मागील दोन वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील यात्रा भरली नव्हती यंदा कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे निर्बंध मुक्त यात्रा होत असल्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. त्याचबरोबर यात्रेमध्ये अनुचित प्रकार घडू नये यासाठी नळदुर्ग  पोलीस ठाणे यांच्याकडून चोख बंदोबस्त करण्यात आला आहे.

Labels:

वागदरीत सोमवार पासून श्री संत तुकाराम महाराज गाथा पारायण व श्रीरामकथा महायज्ञ सप्ताहाचे आयोजन


वागदरी, दि. ०५ एस.के.गायकवाड :

वागदरी ता.तुळजापूर येते ह.भ.प.राजकुमार पाटील यांच्या आधिष्ठाणाखाली दि.६ ते १३ फेब्रुवारी २०२३ दरम्यान श्री संत तुकाराम महाराज गाथा पारायण व श्री रामकथा महायज्ञ सप्ताह आणि सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.


  या सप्ताहात कथा निरुपणकार साध्वी अनुराधा दिदी पंढरपूर यांची प्रमुख उपस्थित राहणार आहे. या पारायण सप्ताहाचे हे सलग सोळाव्ये वर्ष असून  दि.६ फेब्रुवारी सकाळी ६.०० वा.दरम्यान गाथा पुजन, कलश पुजन,विना पुजन,म्रदंग पुजन,टाळ पुजन वगेरे धार्मिक कार्यक्रमाने या पारायण सप्ताहाची सुरुवात करण्यात येणार आहे. या सातदिवसीय पारायण सप्ताहात ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज दिंडेगाव, सदगुरु गहिनीनाथ महाराज औसेकर,क्रष्णा महाराज काकडे वागदरीकर,महेश महाराज माकणीकर,राजकुमार पाटील महाराज वागदरी, फुलचंद महाराज रिंगणीकर,आबा पाटील महाराज कुरनुर,श्रीहरी ढेरे महाराज काक्रंबा,आदी महाराजांची किर्तन सेवा होणार असून याप्रसंगी चिकुंद्रा, बाभळगाव, केरूर, उमरगा (चिवरी);चुंगी,अणदुर, काटगाव, गुळहळ्ळी, शहापूर, खुदावाडी, नळदुर्ग,सराटी, नंदगाव,सिंदगाव,दहीटणा, किलज,दिंडेगाव, शिरगापुर,सह परिसरातील भजनी मंडळाचा हरीजागर भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
 

दि.१३ फेब्रुवारी २०२३ रोजी ह.भ.प.नारायण महाराज उत्तरेश्वर पिंपरी यांच्या काल्याच्या किर्तनानंतर महप्रसादाने या गाथा पारायण सप्ताहाची सांगता करण्यात येणार आहे.
   

तरी वागदरी,नळदुर्ग व परिसरातील भाविक भक्तानी मोठ्या संख्येने या गाथा पारायण सप्ताहमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन ह.भ.प.राजकुमार पाटील,शिवाजी मीटकर गुरुजी,श्रीशैल्य सुरेश पाटील महाराज, राजकुमार पवार,राम यादव, सुरेशसिंग परिहार आदीसह श्री संत भवानसिंग महाराज भजनी मंडळ वागदरी व ग्रमस्थानी केले आहे.

Labels: