Saturday, 31 August 2013

पेट्रोल प्रति लिटर 2.35 रुपयांनी तर डिझेल 50 पैशांनी महागले

नवी दिल्ली :- पेट्रोलचे दर प्रति लिटर 2.35 रुपयांनी तर डिझेलचे दर प्रति लिटर 50 पैशांनी वाढविण्यात आले आहेत. आज शनिवार रोजी मध्यरात्रीपासून नवीन दर लागू केले जाणार आहेत. नवीन दरांमधून स्थानिक विक्री कर आणि व्हॅट वगळण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक शहरानुसार ही दरवाढ जास्त राहणार आहे. गेल्या तीन महिन्यातील ही सहावी दरवाढ आहे.

डिझेलमध्ये प्रति लिटर 3 ते 5 रुपयांनी, रॉकेलमध्ये प्रति लिटर 2 रुपयांनी तर एलपीजी सिलिंडरमध्ये तब्बल 50 रुपयांनी वाढ करण्याचा प्रस्ताव पेट्रोलियममंत्री एम. विरप्पा मोईली यांनी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यासमोर ठेवला होता.

रुपया खाली घसरत असताना जागतिक बाजारपेठेत तेलाचे दर वाढत असल्याने पेट्रोलियम कंपन्यांना तब्बल 180,000 कोटी रुपयांचा तोटा होत आहे, असेही त्यांनी पंतप्रधानांना कळविले होते.

या प्रकरणी विरप्पा मोईली यांनी गुरुवारी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची भेट घेतली. जर दरवाढ केली नाही तर केंद्र सरकारला तब्बल 95,500 कोटी रुपये सबसिडी द्यावी लागेल, असेही मोईली यांनी पंतप्रधानांना सांगितले होते.

मोईली यांनी पंतप्रधानांना पाठविलेल्या पत्रात सांगितले होते, की जर सद्यस्थिती कायम राहिली तर तेल कंपन्यांना तब्बल 180,000 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागेल. गेल्या आर्थिक वर्षांत या कंपन्यांचा तोटा 161,000 कोटी रुपये होता.

Labels:

शिक्षक दिनानिमित्त डाएटचा वैशिष्टयपुर्ण उपक्रम

उस्मानाबाद :- जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,उस्मानाबाद, भारतीय प्रबंधन संस्था, अहमदाबाद व स्टेट इनोवेशन ॲन्ड रिसर्च फौंन्डेशन, सोलापूरच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण दिनानिमित्त दि. 3 व 4 सप्टेंबर रोजी प्रयोगशाळा शिक्षक कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कमलादेवी आवटे यांनी दिली.अशा प्रकारे कार्यशाळा आयोजित करणारी संपूर्ण राज्यात उस्मानाबाद ही पहिली जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था ठरणार आहे.
    अध्ययन-अध्यापनप्रक्रिये दरम्यान शिक्षकांना येणाऱ्या अडचणी दुर करण्यासाठी कांही प्रयोगशील शिक्षक प्रयत्नशिल असतात, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ व्हावी, प्रभावी अध्यापन, विविध विषयाचे अध्यापन, शैक्षणिक साहित्य निर्मिती, पटनोंदणी व उपस्थिती,‍विशेष गरजा असणारी मुले, मुलींचे शिक्षण व बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम अंमलबजावणीसाठी केलेले शैक्षणिक प्रयोगाची दखल या उपक्रमात घेतली जाणार आहे.
    या कार्यशाळेत  शिक्षकांनी केलेल्या नाविण्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगांचे सादरीकरण केले जाणार असून शैक्षणिक प्रयोगाचे संकलन करुन एज्युकेशन इनोवेशन बँक तयारी केली जाणार आहे. हे शैक्षणिक प्रयोग वेबसाईटवर उपलब्ध करुन दिले जाणार असून हा उपक्रम विनामुल्य राहणार आहे.
    डाएटचे  ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. दयानंद जटनुरे व फौंडेशनचे सिध्दराम माशाळे  हे या कार्यशाळेचे समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत.अहमदाबादचे प्रकल्प व्यवस्थापक चैतन्य भट्ट, प्रकल्प सहायक सुरेंद्र वाघमारे, बाळासाहेब वाघ, अनंत बावधनकर, सुधीर नाचणे, व्यंकटेश कुलकर्णी, महेबुब सवार तसेच राज्यातील नवोपक्रमशील पुरस्कार विजेते शिक्षक उपस्थित राहणार आहेत.
            कार्यशाळेचे संयोजन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था उस्मानाबादतर्फे करण्यात आले असून जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी किशोर चौधरी यांचे सहकार्य लाभणार आहे.

Labels:

सहकार वर्षानिमित्त आयोजित निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर

उस्मानाबाद :- यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी व आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त सहकार विभागाने राज्यस्तरीय व विभागस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विभाग स्तरावर उस्मानाबाद जिल्हयातील शालेय गटात- सकलेन महंमद पठाण, कु. अंकिता नरसिंग बावगे यांनी प्रत्येकी एक हजार एक रुपयाचे तर महाविद्यालयीन गटात- प्रतापसिंह जाधव यांनी 3 हजार एक रुपयाचे बक्षिस पटकाविले. जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) एस. पी. बडे यांच्या अध्यक्षतेखाली  स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकास मुख्याध्यापिका आर. डी. हुंडेकरी यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण करण्यात आले.
    यावेळी  श्री. बडे यांनी स्पर्धा व पुरस्काराची सविस्तर माहिती देवून प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. प्रास्ताविक सहायक निबंधक एम.ए.जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन सहायक निबंधक (प्रशासन) यु. यु .पवार यांनी केले. बक्षिस वितरण कार्यक्रमास जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था  कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Labels:

जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेच्या तारखेत बदल

उस्मानाबाद :- जिल्हा क्रीडा कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, उस्मानाबादच्यावतीने सन 2013-14 या वर्षातील जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला या स्पर्धा आता 27 व 28 सप्टेंबर रोजी श्रीतुळजाभवानी  जिल्हा स्टेडियम, उस्मानाबाद येथे घेण्यात येणार आहे. वयोगट 14,17 व 19 वर्षाखालील मुले आणि 19 वर्षाखालील मुलीं या गटात या स्पर्धा होणार आहेत. यापुर्वी 10 व 11 सप्टेंबर रोजी या  स्पर्धा होणार असल्याचे कळविण्यात आले होते. परंतु कांही तांत्रिक अडचणीमुळे या स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सर्व शाळा, महाविद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक यांनी या बदलाची नोंद घेवून आपला संघ वेळेवर उस्मानाबादेत पाठवावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी संजीव कुलकर्णी यांनी केले आहे. 

Labels:

जिल्ह्यात 22 सप्टेंबरला महा लोकअदालत

उस्मानाबाद :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय, उस्मानाबादच्यावतीने जिल्ह्यात सर्वत्र दि. 22 सप्टेंबर रोजी महा लोकअदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हा न्यायालय तसेच प्रत्येक तालुका न्यायालयात ही महालोकअदालत होणार आहे. या न्यायालयात प्रलंबीत असलेले मोटार अपघात/ कामगार नुकसान भरपाई प्रकरणे/ दिवाणी प्रकरणे तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, भूसंपादन  प्रकरणे आणि वादपूर्व प्रकरणे आदी तडजोडीने मिटविण्याकरीता ठेवण्यात येणार आहेत. 
    तरी संबंधित पक्षकारांनी त्यांची वरीलपैकी प्रलंबीत असणारी प्रकरणे या महा लोकअदालतीमध्ये ठेवून मिटवून घ्यावीत आणि न्यायालयात खर्ची पडत असलेला बहुमुल्य वेळ व पैशाची बचत करावी, असे आवाहन विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव  वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधिश पी. बी. मोरे उस्मानाबाद यांनी केले आहे. 

Labels:

सोने, चांदीच्या भावात घसरण

नवी दिल्ली :- साठेबाज आणि गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीमुळे शुक्रवारी सराफा बाजारात सोने आणि चांदीची तेजी उतरली. दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव ६२५ रुपयांनी कमी झाला आणि ३१,७०० पर्यंत खाली आला. तर चांदीच्या भावातही प्रति किलोला १,७१० रुपयांची घट झाली. मुंबईतही सोन्याच्या भावात प्रति तोळा तब्बल १७४५ रुपयांची घट झाली आणि भाव ३१,५२० पर्यंत खाली आला. शेअर बाजारातील तेजीने गुंतवणूकदार सोने विक्री करून नफा कमावत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
      जागतिक बाजारातही सोन्याचे भाव घसरले. अमेरिकन अर्थव्यवस्थेची अपेक्षेपेक्षाही सकारात्मक आकडेवारी येण्याची शक्यता आहे. ज्यामुळे फेडरल रिझव्‍‌र्हकडून रोखे खरेदी कमी केली जाईल, या आशेने आंतरराष्ट्रीय कमोडिटी मार्केटमध्ये सोन्याची विक्री झाली. देशांतर्गत सराफा बाजारातही सोन्यावर दबाव आहे.
गेल्या आठवडयापासून तेजीमध्ये असलेल्या सोन्याने ३४,५०० रुपयांचा उच्चांक गाठला होता. मात्र या तेजीचा फायदा घेत साठेबाज विक्री करून नफा कमावत असल्याने सोन्याच्या भावात सलग दुस-या दिवशी घसरण झाली असल्याचे कमोडिटी तज्ज्ञांनी सांगितले.

सोने आयात महागली

सोन्याचे भाव उच्चांकी स्तरावर असताना सरकारने शुक्रवारी सोने आणि चांदी या मौल्यवान धातूंवरील आयात शुल्क वाढवले आहे. या वाढीनंतर सोने आणि चांदीवरील हे शुल्क अनुक्रमे ४६१ डॉलर प्रति तोळा आणि ८०३ डॉलर प्रति किलोवर गेले आहे. याआधी हे शुल्क सोन्यावर ४३२ डॉलर प्रति तोळा आणि ६९७ डॉलर प्रति किलो एवढे होते. केंद्रीय उत्पादन आणि सीमा शुल्क मंडळाच्या या अधिसूचनेनंतर सोने आयातीवरील खर्च वाढणार आहे.

Labels:

भटकळच्या अटकेमुळे अनेक दहशतवादी कृत्यांचा उलगडा होण्यास मदत - मुख्यमंत्री

मुंबई : इंडियन मुजाहिदीनचा कुख्यात दहशतवादी यासीन भटकळला झालेल्या अटकेमुळे देशात यापूर्वी झालेल्या काही दहशतवादी कारवायांचा पर्दाफाश तर होईलच शिवाय भविष्यातील त्यांच्या अशा कटांचा उलगडा होण्यास मोठी मदत होणार आहे, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया देतांना सांगितले.
        यासीन भटकळचा शोध युद्धपातळीवर घेतला जात होता. महाराष्ट्र एटीएसने देखील त्याची आणि त्याच्या तीन सहकाऱ्यांची माहिती देण्यासाठी गेल्या वर्षीच १० लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. पुणे येथील जर्मन बेकरी आणि मुंबईतील झवेरी बाजार, दादर येथील बॉम्बस्फोटामागे भटकळचा हात असल्यामुळे आज त्याला झालेली अटक फार महत्वाची आहे. राज्यातील अशाच स्वरूपाच्या ८ गुन्ह्यांसाठी यासीन पोलिसांना हवा होता.
        सुरक्षा दलांमधील समन्वयामुळे मिळालेले हे यश असून लष्कर-ए- तोयबाचा प्रमुख दहशतवादी अब्दुल टुंडा याच्या आणि आता भटकळच्या अटकेने देशातील दहशतवाद्यांचे जाळे कमजोर होण्यास मदत होईल, असे आपल्याला वाटत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

Labels:

Friday, 30 August 2013

राष्ट्रीय क्रीडा दिन विविध स्पर्धांनी उत्साहात साजरा

उस्मानाबाद : जिल्हा क्रीडा कार्यालय व जिल्हा हॉकी संघटना उस्मानाबादच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्रीडा दिनाचे आयोजन करण्यात आले. क्रीडा दिनानिमित्त हॉकी, फुटबॉल, धनुर्वद्या, जेष्ठ नागरीकांचया स्पर्धाही घेण्यात आल्या.  विविध क्रीडा स्पर्धेचे  उदघाटन अंकुश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी  स्व. मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पुजनही करण्यात आले.
         याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी संजीव कुलकर्णी, जिल्हा हॉकी संघटनेचे फीरोज खान, जफर शेख, जिल्हा फुटबॉल संघटनेचे जावेद शेख, जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे प्रवीण गडदे, विद्यामाता हायस्कुलचे सबस्टेन फादर, ज्येष्ठ हॉकी खेळाडू बाबु काझी, महमंद अली शेख, खमरोदृीन, जामगे, शानमे यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्र्‍संचलन राज्य क्रीडा मार्गदर्शक गणेश पवार यांनी केले अनिल देशपांडे, बी. के. नाईकवाडी, सत्येन जाधव, संदीप वांजळे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

Labels:

पाच वर्षांचा तपशीलवार आराखडा द्या

उस्मानाबाद -:  जिल्हा परिषद अंतर्गत असणाऱ्या विविध विभागांनी त्यांच्या मार्फत राबविण्यात येत असणाऱ्या योजना तसेच अनुषंगिक बाबींसाठी पुढील पाच वर्षात किती निधी लागणार आहे, याचे नियोजन तयार करुन एका महिन्यात ते वित्त आयोगाकडे पाठवावे, असे निर्देश राज्याच्या वित्त आयोगाचे अध्यक्ष  जे. पी. डांगे यांनी दिले.
          येथील जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात डॉ. डांगे यांनी आज शुक्रवार दि. 30 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचा आढावा घेतला. जि.प.चे अध्यक्ष डा. सुभाष व्हट्टे, मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल. हरिदास, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत हजारे, पंचायत समितीचे सभापती असिफ मुल्ला (लोहारा), लक्ष्मीकांत आटोळे (वाशी) आणि छाया वाघमारे (कळंब) यांची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती.
         राज्याच्या सर्वींगीण विकासात स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका खूप महत्वाची आहे. त्यामुळे या पातळीवर विकास कामांचे नियोजन योग्यरित्या होणे गरजेचे आहे. विविध विकासकामांसाठी येणारा निधी योग्य कारणासाठी वापरला जातो का, पायाभूत सुविधा व त्याच्या बळकटीकरणासाठी पुरेसा निधी उपलब्ध होतो का, आगामी पाच वर्षात विविध कामांसाठी कसा व किती निधी लागणार आहे, याची तपशीलवार माहिती देण्याचे निर्देश यावेळी श्री. डांगे यांनी दिले. वस्तुस्थिती योग्य प्रकारे मांडली तर राज्याच्या पातळीवरुन निधी देणे शक्य होईल व त्यादृष्टीने शिफारस करता येईल, असे त्यांनी नमूद केले.
        यावेळी  श्री. हरिदास यांनी प्रास्ताविकात जिल्हा परिषदेला देखभाल व दुरुस्ती कामांसाठी कोणताही निधी मिळत नसल्याचे सांगितले. त्याचबरोबर शाळा इमारती बांधकाम व दुरुस्ती, त्यांच्या संरक्षक भिंतीचे बांधकाम, कोल्हापुरी बमधाऱ्यांची दुरुस्ती, पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती, रस्ते विकास निधी आदी कामांसाठी राज्य शासनाकडून अधिक निधी मिळणे आवश्यक असल्याचे सांगितले. जिल्हा परिषदेकडे विविध योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याने त्यांच्या अंमलबजावणीस मर्यादा येत असल्याचे सांगितले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब वानखेडे यांनीही पदभरती, रिक्त पदे याबाबत म्हणणे मांडले.
       यावेळी विविध विभागप्रमुखांनी आपल्या विभागास योजना राबविताना येणाऱ्या अडचणी मांडल्या.  याचबरोबर अंगणवाडी बांधकामासाठी निधी, विविध शासकीय इमारतींसह सभापती व उपसभापती तसेच पदाधिकाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधकाम यासाठी निधीची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
         राष्ट्रीय पेयजल योजनेत राज्य सरकारने टाकलेल्या हागणदारीमुक्त गाव आणि लोकवाट्याच्या अटीमुळे जिल्ह्यात ही योजना राबविण्यास अडचण येत असल्याची वस्तुस्थितीही श्री. डांगे यांच्यासमोर मांडण्यात आली.
      डसॅ. व्हट्टे यांनी जिल्हा परिषद अध्यक्षांचे प्रशासकीय अधिकार वाढविण्याची मागणी केली.  पंचायत समिती सभापती श्री. मुल्ला यांनीही पंचायत समिती सभापतींना वित्तीय अधिकार देण्याची मागणी केली. राज्यातील सभापतींसाठी सभापतीफंड निर्माण करावा, जिल्हा नियोजन समितीत प्रतिनिधीत्व द्यावे, अशा मागण्याही त्यांनी आयोगाच्या अध्यक्षांसमोर मांडल्या.

Labels:

रविवारी तलाठी पदाची लेखी परीक्षा

उस्मानाबाद :- जिल्हा प्रशासनाच्यावतीने घेण्यात येणारी तलाठी पदाची लेखी परीक्षा रविवार, दि. 1 सप्टेंबर रोजी 12 परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षा केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये सकाळी 8 ते सायंकाळी 4 यावेळेत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आल्याचे अपर जिल्हादंडाधिकारी संजय गायकवाड यांनी कळविले आहे. 
    श्रीपतराव भोसले हायस्कूल, (जूनी इमारत), तांबरी विभाग, उस्मानाबाद, श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नवीन इमारत (दुसरा, तिसरा मजला व तळ मजला), रामकृष्ण परमहंस महाविद्यालय (पार्ट-ए),  (पार्ट-बी),  शासकीय तंत्रनिकेतन तुळजापूर रोड, उस्मानाबाद, छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, तांबरी विभाग, जिल्हा परिषद कन्या प्रशाला, शहर पोलीस स्टेशनसमोर,उस्मानाबाद, अभिनव इंग्लिश स्कूल, भानूनगर, उस्मानाबाद, भारत विद्यालय, निंबाळकर गल्ली, सुभाषचौक, उस्मानाबाद येथे होणार आहेत.
    या आदेशानुसार परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात घोषणा देण्यास, परीक्षार्थी अथवा अन्य व्यक्तीकडून शांततेस बाधा निर्माण होईल असे कृत्य करण्यास मनाई करण्यात आली आहे. याशिवाय या परिसरातील झेरॉक्स सेंटर्स , पानपट्टी, टायपींग सेंटर, एस.टी.डी.बुथ, ध्वनीक्षेपक, कॉम्पूटर सेंटर्स तसेच इंटरनेट कॅफे बंद राहतील. परीक्षा केंद्र परिसरात मोबाईल, सेल्यूलर फोन, फॅक्स, ई-मेल व इतर पसार माध्यमे घेऊन प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांवर कोणत्याही वाहनास प्रतिबंध असेल. केवळ संबंधित परीक्षा केंद्रांवर नेमणूक केलेले अधिकारी/ कर्मचारी, शासकीय कामावरील अधिकारी व कर्मचारी, संबंधित शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक, कर्मचारी आणि उमेदवारांनाच परीक्षा केंद्रांवर प्रवेश असेल. परीक्षा केंद्राच्या 100 मीटर आवारात 5 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येता येणार नाही. हे आदेश संबंधित दिवशी सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत लागू राहणार आहेत.                 

Labels:

जि.प.चे पुढील पाच वर्षातील अंदाजपत्रक आयोगाकडे त्वरीत पाठवा : डांगे

सोलापूर :- पुढील पाच वर्षातील जिल्हा परिषदेचा खर्च आणि उत्पन्न याचे अंदाजपत्रक वित्तीय तुटीसह वित्त आयोगास त्वरीत पाठविण्याच्या सुचना चौथ्या महाराष्ट्र राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष जे.पी. डांगे यांनी दिल्या.
    जिल्हा परिषदेत डांगे यांनी आज शुक्रवार दि. 30 ऑगस्ट रोजी वित्तीय आढावा बैठक घेतली. या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी गुरव, परिविक्षाविधीन आय.ए.एस.अधिकारी कुणाल खेमनार यांच्यासह जिल्हा परिषदेतील विभाग प्रमुख उपस्थित होते.
     बैठकीत सूचना करताना डांगे म्हणाले की, जिल्हा परिषदेमार्फत कार्यान्वित होणा-या सर्व योजनांसाठी लागणारा खर्च, जिल्हा परिषदेचे उत्पन्न आणि मिळणारा आर्थिक निधी यांचा ताळमेळ वित्त आयोगाने पाठविलेल्या सहपत्र दोन मध्ये दिलेल्या 1 ते 10 मुद्यांनुसार सप्टेंबर 2013 अखेर पर्यंत कळवावे. तसेच जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्रामपंचायत यांना विविध विभागातील इमारती, रस्ते किंवा अन्य अनुषंगिक बाबींकरीता लागणारा देखभाल खर्चही कळविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. सहपत्र दोन पाठविण्यास टाळाटाळ करणा-या अधिका-यांवर कडक कारवाई करण्याचेही त्यांनी मुख्य कार्यकारी अधिका-यांना सूचीत केले.
    बैठकीतकासार यांनी जिल्हा परिषदेच्या विविध विभागाने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची माहिती दिली.

Labels:

खाजगी प्रकाशकांना भाषांतराबाबत सूचना

उस्मानाबाद : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे अंतर्गत  राष्ट्रीय अभ्यासक्रम एन सी एफ 2005 च्या आधारे/ एन सी ई आर टी च्या मार्गदर्शक  तत्वानुसार अभ्यासक्रम आरखडा 2010 एस सी एफ-2012 तयार करण्यात आला असून या मसुदयास शासनाची मान्यता मिळाली आाहे.  शैक्षणिक वर्ष 2012-13 पासून इ. 9 वी व इयत्ता 11 वी साठी शैक्षणिक वर्ष 2013-14 पासून इयत्ता 10 वी व 12 साठी पुर्नरचित अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यास मान्यता मिळाली आहे.
            इ. 11 वी व 12 वीसाठी भाषेतर विषयाची इंग्रजी व मराठी माध्यम सोडून उर्वरीत माध्यमिकाची पाठय पुस्तके मंडळ तयार करीत नसल्याने व मंडळ स्तरावर त्याची कार्यवाही करणे शक्य नसल्याने ती पाठयपुस्तके भाषांतर करण्याची परवानगी जाहिररित्या खाजगी प्रकाशकांना देण्यात येत आहे.
          इ. 11 वी व 12 वीसाठी सदर पाठयपुस्तके भाषांतरीत करताना मंडळाची मराठी व इंग्रजी माध्यमांची पुस्तके प्रमाणित मानावीत.  इ. 11 वी व 12 वीसाठी ची पाठयपुस्तके भाषांतराची तसेच ती तपासून घेण्याची पूर्ण जाबदारी संबधित प्रकाशकांची राहील. याबाबत मंडळ स्तरावर कोणतीही कार्यवाही होणार नाही तसेच मंडळाकडून त्यास शिफारस / मान्यता देण्यात येणार नाही व खाजगी प्रकाशकांकडून कोणतेही शुल्क घेण्यात येणार नाही. त्यामुळे पाठयपुस्तकातील कोणत्याही मजकूराचा दर्जेदार भाषांतराची जबाबदारी सर्वस्वी  खाजगी प्रकाशकांची राहील.
         मुळ पाठयपुस्तकातील वापरण्यात येणाऱ्या चित्राकृती किंवा आलेख यांची चूकीची छपाई झाल्यास त्यास राजय मंडळ जबाबदार राहाणार नाही तसेच चित्राकृती संदर्भात राज्यमंडळाचे सर्व मालकी हक्क अबाधीत राहतील. सदर पुस्तकातील मुळ मजकुराचा दुरुपयोग होणार नाही या अटीवर पाठयपुस्तके भाषांतर करण्यास मान्यता देण्यात येईल, असे मंडळाचे सचिवांनी कळविले आहे.

Labels:

खादी व ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष सुरेश पाटील सोमवारी उस्मानाबादेत

उस्मानाबाद :- महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष सुरेश पाटील हे सोमवार दि. 2 सप्टेंबर रोजी उस्मानाबादच्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्याचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.
    खादी व गा्रमोद्योग मंडळाच्या माध्यमातून शासनाच्या उद्योगाविषयीच्या विविध योजना, शासनाचे धोरण, ग्रामीण कारागीर, बुलतेदार यांची कर्जमाफी या व इतर अडीअडचणीवर चर्चा करण्यासाठी  दि. 2 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वा. रायगड फंक्शन हॉल तेरणा कॉलेजसमोर, उस्मानाबाद येथे बलुतेदार, ग्रामीण कारागिर व उद्योजकांचा मेळाव्यास मार्गदर्शन करणार आहेत.

Labels:

अन्नधान्य वितरणाचे परिमाण

उस्मानाबाद :- जिल्हयात सप्टेंबर महिन्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरीत होणा-या अन्नधान्याचे परिमाण खालीलप्रमाणे निर्धारीत केले असल्याचे  जिल्हाधिकारी डॉ. के. एम.नागरगोजे यांनी कळविले आहे.
      शिधापत्रिका धारकांसाठी बीपीएल योजनेअंतर्गत गहू प्रतिकिलो 5 रुपये दराने 20 किलो, तांदुळ 6 रुपये दराने 15 किलो, अंत्योदय योजनेत गहू 2 रुपये दराने 20 किलो, तांदुळ 3 रुपये दराने 15 किलो, अन्नपुर्णा योजनेअंतर्गत गहू/ तांदुळ प्रतिकार्डास 10 किलो उपलब्धतेनुसार मोफत, ए. पी. एल. गहू 7 रुपये 20 पैसे या दराने प्रतिकार्डास 10 किलो, तांदुळ 9  रुपये 60 पैसे दराने प्रतिकार्डास 5 किलो,  साखर, अंत्योदय, बीपीएल  व अन्नपुर्णा योजनेअंतर्गत साखर  प्रति किलो  13 रुपये 50 पैसे या दराने दरडोई 500 ग्राम  निर्धारीत करण्यात आले आहे.
      याशिवाय सवलतीच्या दराने पामतेल ए. पी. एल., बी.पी.एल , अन्नपुर्णा अंत्योदय योजनेतील शिधापत्रिका धारकांसाठी प्रतिलिटरसाठी  50 रुपये दर निर्धारीत करण्यात आला आहे.त्याचे वाटप उपलब्धतेनुसार होईल.
    दरम्यान जिल्हा प्रशासनाने केरोसीनचे तालुकानिहाय विक्रीचे दर कळविले असून ते प्रतिलिटरसाठी पुढीलप्रमाणे आहेत.
    उस्मानाबाद 15 रुपये 65 पैसे, तुळजापूर 15 रुपये 55, उमरगा 15 रुपये 77 पैसे, लोहारा 15 रुपये 68पैसे, कळंब 15 रुपये 89 पैसे, परंडा 15 रुपये 85 पैसे, भूम 15 रुपये 86 पैसे आणि वाशी  15 रुपये 87  पैसे.

Labels:

छायाचित्रासह मतदार यादयांचा पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर

उस्मानाबाद -: जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाच्यावतीने  दि. 1 जानेवारी 2014 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादयांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आल्याची माहिती  उप जिल्हा निवडणूक अधिकारी, उस्मानाबाद यांनी दिली आहे.
             यादयांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. प्रारुप मतदार यादयांची प्रसिध्दी- सोमवार, दि.16 सप्टेंबर,2013, दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी -दि. 16 सप्टेंबर ते दि.17 ऑक्टोबर, छायाचित्र मतदार यादीतील संबंधित यादी भागांच्या प्रतीचे ग्रामसभा, स्थानिक संस्था, मोहल्ला सुधार समिती येथे वाचन करणे व नावांची पडताळणी करणे- दि.21 सप्टेंबर व दि.5 ऑक्टोबर, राजकिय पक्षांचे मतदान केंद्रस्तरीय अभिकर्ते यांचे उपस्थितीत दावे व हरकती स्विकारण्याची विशेष मोहिम- दि. 22 सप्टेंबर, 29 सप्टेंबर आणि 6  ऑक्टोबर, दावे व हरकती निकालात काढणे- सोमवार, दि 2 डिसेंबर,  डाटाबेसचे अदयावतीकरण व पुरवणी यादीची तयारी व छपाई- दि.2 ते दि.31  डिसेंबरपर्यंत. अंतिम मतदार यादी प्रसिध्दी -  दिनांक 6 जानेवारी, 2014.  

Labels:

नगरपालिकांनी विकास कामाबाबत सुक्ष्म नियोजन करावे - जे.पी. डांगे

सोलापूर -:  वाढत्या नागरिकीकरणाने महानगरपालिका व नगरपालिका यांच्यावर विकास कामाबाबत ताण येतो हा ताण दूर करण्यासाठी वरील संस्थांनी विकास कामाबाबत पुढील पाच वर्षासाठी सुक्ष्म नियोजन करावे तसेच येत्या महिन्याभरात जिल्हाधिका-यांमार्फत विकासाबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा असे, निर्देश  महाराष्ट्र वित्त आयोगाचे अध्यक्ष,  जे.पी. डांगे यांनी दिले.
    जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील नगरपालिकांच्या मुख्याधिका-यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी ते मार्गदर्शन करत होते.
    नागरी लोकसंख्येच्या प्रमाणात नगरपालिका, महानगरपालिकांना अनुदान मिळावे, त्याचबरोबर नवीन विकास कामांसाठी किती निधी लागेल ? याची माहिती सादर करावी असे सांगून श्री. डांगे पुढे म्हणाले की, मुख्याधिका-यांनी रस्ता, पाणीपुरवठा, गटारी, नगरपालिका इमारती, शाळा तसेच यांच्या देखभालीसाठी लागणा-या निधी बाबत तसेच नगरपालिकेकडे असणा-या कर्ज व दायित्वाची आकडेवारीही द्यावी.
    यावेळी बोलताना अप्पर जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी शहर विकासाबाबत म.न.पा. व न.पा यांना येणा-या अडचणी कथन करुन नगरपालिकेला अतिरिक्त कर्मचारी मिळावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. जिल्ह्यातील सर्व नगरपालिका आर्थिकदृष्टया सक्षम होण्यासाठी कराव्या लागणा-या उपाय-योजनांचा आढावा घेण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. यामध्ये नगरपालिकेला येणा-या आर्थिक, वैधानिक, तांत्रिक तसेच प्रशासकीय अडचणीचा आढावा घेण्यात आला.
     या आढावा बैठकीसाठी जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम, निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, जिल्हा प्रकल्प अधिकारी मायकलवार त्याचबरोबर सांगोला, करमाळा, बार्शी, पंढरपूर नगरपरिषेदेचे मुख्याधिकारी अनुक्रमे धैर्यशील जाधव, शिवाजी गवळी, दत्तात्रय लांगी व रविंद्र जाधव यांच्यासह मैदर्गी, अक्कलकोट, दुधनी, मंगळवेढा व कुर्डुवाडी नगरपरिषदेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Labels:

विजेच्या धक्क्याने बालकामगाराचा मृत्यू

वाशी : गोजवडा (ता. वाशी) येथे विजेच्या धक्क्याने बालकामगाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरूवार दि. 29 ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान घडली.
    कैलास अशोक जावळे (वय 16 वर्षे, रा. खामकरवाडी, ता. वाशी) असे विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या बालकामगाराचे नाव आहे. गोजवडा (ता. वाशी) येथे दीपक थोरबोले यांच्या बांधकामावर अंतर्गत प्लंबिंगचे काम चालू होते. यावेळी विजेच्या प्रवाहाची पिन काढत असताना विजेचा धक्का बसल्याने कैलास जावळे याचा जागीच मृत्यू झाला. सदरचा बालकामगार हा प्लंबिंगचे काम करणारे खाजगी गुत्तेदार दिंगंबर सावंत यांच्यामार्फत रोजंदारीवर कामास होता.
    दरम्यान, कैलास जावळे यास तात्काळ वाशी येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. वंदना क्षीरसागर यांनी त्यास मृत घोषित करून याची माहिती पोलिसांना दिली. यावरून पोलीसात अाकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Labels:

दरोड्याच्या तयारीतील पाचजण गजाआड

उस्मानाबाद -: दरोड्या तयारीत असणार्‍या सातारा जिल्ह्यातील पाच जणांना उस्मानाबाद दरोडा प्रतिबंधक पथकाने गुरुवार दि. 29 ऑगस्ट रोजी दुपारी मोठय़ा शिताफीने गजाआड केले. यावेळी त्यांच्याकडून चोरीची टाटासुमो, धारदार शस्त्र, मिरची पूड असे साहित्य जप्त केले.
    दरोडा प्रतिबंधक पथकाचे उपनिरीक्षक महादेव गोमारे कर्मचार्‍यांसह गुरुवारी दुपारी गुन्हेगारांच्या शोधात येरमाळा, तेरखेडा परिसरात फिरत होते. यावेळी त्यांना तेरखेडा शिवारात पांढर्‍या रंगाच्या टाटासुमो जीपमधून काहीजण संशयास्पद फिरत असल्याची माहिती बातमीदारामार्फत मिळाली. त्यानुसार पथकाने तेरखेडा शिवारातून अचानक टाटासुमो जीपचा ताबा घेऊन आतमधील संतोष नागप्पा भिसनाळ (26,तळेगाव दाभाडे), संतोष चंद्रकांत वाडेकर (36, पुसेगाव, सातारा), संतोष चांगदेव राईज (20, तळेगाव दाभाडे), सूरज हनुमंत जाधव (19, पुसेगाव) व कुमार बद्रु पवार (19, पुसेगाव, सातारा) यांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडे गाडीच्या कागदपत्राविषयी चौकशी केल्यानंतर जीप क्र. एमएच 14- बीके- 7060 तळेगाव दाभाडे येथून चोरल्याचे समोर आले. त्यानंतर गाडीची तपासणी केली असता आतमध्ये जर्कीनच्या खाली दोन तलवारी, जंबीया, लाकडाच्या काट्या, गाड्यांच्या चाव्यांचा झुपका, सुती दोरी, माकड टोप्या, मिरची पावडर, दोन बॅटर्‍या व रोख 11,560 रुपये आढळून आले. सदरील गुन्हेगार दरोड्याच्या तयारीत असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. त्यानुसार या सर्वांना येरमाळा पोलिस ठाण्यात आणून उपनिरीक्षक महादेव गोमारे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक सचिन पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक बाळकृष्ण भांगे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक माधव गुंडीले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाचे उपनिरीक्षक महादेव गोमारे, कर्मचारी मधुकर घायाळ, मोईन काझी, तानाजी माळी, प्रफुल्ल ढगे, अनंत ताटे, विक्रम सावंत, इरफान शेख, चालक दत्ता करडे, काका शेंडगे यांनी केली.

Labels:

Thursday, 29 August 2013

जिल्हा विकासासाठी राज्य स्तरावरुन स्वतंत्र निधी देण्याची मागणी

उस्मानाबाद :- जिल्हा विकासाच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या रस्ते विकास, सूक्ष्म सिंचन, शासकीय इमारती बांधकाम, सिंचन प्रकल्प, हुतात्मा स्मारकांची दुरुस्ती यासाठी राज्य स्तरावरुन निधी मिळावा, अशा मागण्या जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने वित्त आयोगाचे अध्यक्ष डॅा. जे.पी. डांगे यांच्यासमोर मांडण्यात आल्या. जिल्हा नियोजन निधीतून सर्व विभागांच्या योजनांना निधी उपलब्ध करुन द्यावा लागत असल्याने या कामांसाठी अधिकचा निधी देण्यास मर्यादा येतात. त्यामुळे  हा निधी देण्याबाबत शिफारस करण्याची विनंती आयोगाकडे करण्यात आली. यासंदर्भात जिल्ह्यासाठी विविध विकासकामांसाठी आगामी पाच वर्षात किती निधी लागणार आहे, याची तपशीलवार माहिती सादर करण्याचे निर्देश डॅा. डांगे यांनी दिले.
     येथील जिल्हाधिकारी कार्यालयात डॅा. डांगे यांनी विविध विभागप्रमुखांशी जिल्हा वार्षिक योजनेतून तसेच संबंधित विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी मिळणारा केंद्र व राज्य शासनाचा निधी पुरेसा आहे किंवा नाही याबाबत तपशीलवार माहिती घेतली. जिल्हाधिकारी डॅा. के.एम. नागरगोजे, मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल. हरिदास, अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील, महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री. पापडकर यांच्यासह पाटबंधारे, कृषी, बांधकाम यासह विविध विभागांचे अधिकारी व  सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी उपस्थित होते.
        जिल्हाधिकारी डॅा. नागरगोजे यांनी सुरुवातीला जिल्ह्याने टंचाई परिस्थितीत केलेल्या कामांचा आढावा सादर केला. टंचाई परिस्थितीत जिल्हाधिकारी डॅा. नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने केलेल्या कामाचे डॅा. डांगे यांनी कौतुक केले.
       जिल्ह्यातील नगरपालिकांकडे असणाऱ्या मोठ्या प्रमाणातील दायीत्वामुळे विकासाला खीळ बसत आहे. त्यापैकी बहुतांशी हिस्सा हा  वीजबिलाशी निगडीत आहे. त्यामुळे या प्रकरणी राज्य स्तरावर निर्णय घेण्याची विनंती आयोगाकडे करण्यात आली.
       डॅा. डांगे यांनी यावेळी तुळजापूर विकास प्राधिकरणाच्या कामांचाही आढावा घेतला. प्रत्येक विभागास मागणीप्रमाणे पैसा मिळतो का, नगरपालिकांना येत्या पाच वर्षात किती निधीची गरज आहे, न.प.चे उत्पन्न किती, खर्च किती  याची माहिती घेतली. नगरपालिका करत असलेल्या  प्रत्येक विकासविषयक बाबींसाठी येणारा खर्च, त्याची तरतूद काय व यासंदर्भात राज्य शासनाकडून कशा प्रकारची मदत आवश्यक आहे, अशी माहिती डॅा. डांगे यांनी घेतली.
      यावेळी रस्ते, इमारत बांधकाम, पाणीपुरवठा योजना, सिंचन प्रकल्प यासह इतर घटकांसाठी देखभाल व दुरुस्तीसाठी निधी मिळत नसल्याबद्दल अडचणी डॅा. डांगे यांच्यासमोर मांडण्यात आल्या.

Labels:

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचे पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते भूमीपूजन

उस्मानाबाद :- काटगाव (ता. तुळजापूर)  येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या  कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या निवासस्थानाचे व स्माशानभूमीचे कुदळ मारुन भूमीपुजन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
          याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यख डॉ.सुभाष व्हट्टे ,जिल्हा कॉग्रेसचे अध्यक्ष आप्पासाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे  कृषी व पशुसंवर्धन सभापती पडित जोकार, पंचायत समितीच्या सभापती मनिषा पाटील, उपसभापती प्रकाश चव्हाण, सरपंच गणपती माळी यांचेसह पदाधिकारी  उपस्थित होते.
         याप्रसंगी चव्हाण बोलताना म्हणाले की, या भागातील गोरगरीब जनतेच्या सोयीसाठी 50 घरे बांधण्यात आली असून त्याचा ताबा लवकरच देण्यात येणार आहे तसेच मागास वस्तीमध्ये रस्त्याचे देखील कामे त्वरीत करण्यात येणार आहे. या भागातील निराधार व्यक्तीना संजय गांधी निराधार योजना , श्रावण बाळ निराधार योजनेतून सर्वांना लाभ मिळत असल्याबदृल त्यांनी समाधान व्यक्त करुन चव्हाण यांनी  तिर्थक्षेत्र विकासासाठी यावेळी 10 लाख रुपयाचे अनुदान जाहिर केले.  पीकर्ज योजनेतून शेतकऱ्यांना कर्ज त्वरीत वाटप होत असून त्याचा फायदा शेतकऱ्यांनी करुन घेण्याचे आवाहन  केले. तसेच यावेळी जि. प.अध्यक्ष डॉ. व्हट्टे, अप्पासाहेब पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी शेतकरी, ग्रामस्थ, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Labels:

बाभळगाव, लातूर येथे सैन्य भरती मेळावा

उस्मानाबाद :-  पोलीस परेड मैदान, बाभळगाव, लातूर येथे 23 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या दरम्यान सैन्य भरती  मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. उस्मानाबाद जिल्हयातील उमेदवारांची दि. 26 सप्टेंबर रोजी तसेच त्याच दिवशी एनसीसी प्रमाणपत्रधारकांची सैन्य दलात भरती करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर (नि) सुभाष सासने यांनी दिली आहे. भारतीय सैन्य दलामध्ये भरती होऊ इच्छिणाऱ्या जिल्ह्यातील उमेदवारांनी दि. 26 सप्टेंबर रोजी सकाळी 5-30 वा. पोलीस परेड मैदान बाभळगाव, लातूर येथे उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी दरध्वनी क्र.020-26341698 यांचेशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.
            तसेच, दि. 2 ऑक्टोबर रोजी आजी - माजी सैनिक/ विधवांची पाल्य व खेळाडुंसाठी सोल्जर जीडी, सोल्जर टेक्निकल, सोल्जर नर्सिंग असिंसस्टंन्स, सोल्जर क्लर्क/ एसकेटी व सोल्जर  ट्रेडसमन या पदाची  भरती करण्यात येणार आहे. सोल्जर जीडी या पदासाठी शैक्षणिक पात्रता-  उमेदवार 10 वी पास (45 टक्के मार्कस), सोल्जर टेक्निकल पदासाठी 12 वी सायन्स (पीसीएम पास), सोल्जर क्लर्क/ एसकेटी पदासाठी 12 वी पास- सर्वशाखा,  50 टके मार्क आणि गणित व इंग्रजीमध्ये 10 वी अथवा 12 वी मध्ये 40 टक्के गुण असावेत अशी आहे.

Labels:

फुटकळ


Labels:

देशप्रेम


Labels:

आठवण


Labels:

कुटील डाव


Labels:

स्वदेशी


Labels:

बार्शी उपसा सिंचन योजनेच्या दोन्ही टप्प्याचे काम 31 डिसेंबर पूर्वी करा : ना. सोपल

सोलापूर : बार्शी उपसा सिंचन योजनेतंर्गत माढा तालुक्यातील रिधोरे गावाजवळ उभारण्यात येणाऱ्या पंपगृहाच्या पहिल्या टप्प्यातील बांधकामाची पाहणी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप सोपल यांनी करुन या योजनेतील दोन्ही टप्प्यांचे पूर्ण काम 31 डिसेंबर 2013 अखेर पर्यंत पूर्ण करावे असे निर्देश संबंधितांना दिले. 
     पालकमंत्री सोपल पुढे म्हणाले की,  या बांधकामाची गुणवत्ताही जोपासली जावी. त्याचबरोबर येत्या 20 सप्टेंबर रोजी पंप फ्लोअरचे तर दुस-या स्लॅबच्या टप्प्याचे काम 10 ऑक्टोंबर पूर्वी कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्यात यावे अशा सूचनाही त्यांनी संबंधिताना यावेळी दिल्या.
       प्रारंभी भीमा कालवा मंडळ (सोलापूर) चे अधिक्षक अभियंता त.बा.तोंडे यांनी या योजनेबाबत आत्तापर्यंत झालेल्या कामाची माहिती ना. सोपल यांना दिली. भीमा-सीना जोड कालव्याद्वारे सीना नदीत सोडले जाणारे 2.59 टी.एम.सी. पाणी दोन टप्प्यात उपसा करुन आठमाही पद्धतीने ते बार्शी तालुक्यातील 12 हजार 550 हेक्टर व माढा तालुक्यातील 2 हजार 450 हेक्टर अशा एकूण पंधरा हजार हेक्टर इतक्या क्षेत्राला सिंचनासाठी  देण्यात येणार आहे.
       याप्रसंगी  नगरसेवक नागेश अक्कलकोटे, उजनी कालवा विभाग क्रं.8 चे कार्यकारी अभियंता बी.एस. बिराजदार, उप-कार्यकारी अभियंता एस.एस. तिपरादी,  शाखा अभियंता एस.के होनखांबे, व्ही.एस. जाधव, दुध संघाचे मा.अध्यक्ष कुंडलिक गायकवाड आदी उपस्थित होते.

Labels:

फेसबुकवर अपलोड करा दहा हजार फोटो

मुंबई -: नव-नवे बदल करुन नेटीझन्सना आपल्याकडे खेचणा-या लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकने आणखी एक नवा बदल आणला आहे. चॅटिंगसह, फोटो पाठवणे यासारख्या सुविधेनंतर फेसबुकने आता पुढचं पाऊल टाकलं आहे. आता फेसबुकवरुन एका वेळी अनेक जणांना एका सेम अल्बममध्ये फोटो अपलोट करता येतील. या नव्या फिचरमुळे युझर्सना एकाच वेळी तब्बल दहा हजार फोटो अपलोड करता येणार आहे.
    तुमच्या मित्रांचा ग्रुप पिकनिकला गेला आहे. त्यावेळी प्रत्येकाने आपआपल्या मोबाईमध्ये फोटो काढले आहेत. अशावेळी एकाच्या मोबाईलमध्ये असणारे फोटो दुस-याकडे असतीलच असे नाही.‍ त्यामुळे एखादया मित्राने या पिकनिकचा फोटो अल्बम तयार केला असेल, तर त्या ग्रुपमधील प्रत्येकजण या अल्बममध्ये फोटो अपलोड करु शकतो. तशी सुविधा फेसबुकने आणली आहे.
    जो कोणी अल्बम क्रिएट करेल, तो त्याचं ॲक्सेस पन्नास मित्रांना देऊ शकेल आणि प्रत्येकजण सुमारे दोनशे फोटो अपलोड करु शकेल. अल्बम क्रिएटर अल्बमधील अन्य मित्रांना त्यांचे कंट्रोल देऊ शकतो. जेणेकरुन ते इतरांना इन्व्हाईट करु शकतील किंवा क्रिएटर याचं कंट्रोल स्वत:कडेही ठेवू शकतो. यापूर्वी युझर्स त्याने क्रिएट केलेल्या अल्बममध्ये फोटो अपलोड करु शकत होता. त्याची मर्यादा एक हजार फोटो पर्यंत होती. मात्र आता या नव्या सुविधेमुळे नेटीझन्सना फोटोविश्व तयार करता येणार आहे. जगातील सर्वाधिक लोकप्रिय सोशल नेटवर्किंग वेबसाईट असलेल्या फेसबुकने फोटो अल्बम शेअर करण्याचे नवे फिचर दिले आहे. या नव्या फिचरमुळे युझर्सना एकाच वेळी तब्बल दहा हजार फोटो अपलोड करणे शक्य होणार आहे. सध्या हे फिचर केवळ अमेरिकेतील फेसबुक युझर्ससाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. येत्या काही दिवसांमध्ये ते सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे.
    या फिचरमुळे एकाच कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या व्यक्तींचे फोटो एकत्रितपणे अपलोड करणे शक्य होणार आहे. वाढदिवसाच्या पार्टीचे, लग्नाचे किंवा मित्रासोबतच्या सहलीचे फोटो एकाच वेळी अपलोड करुन त्या फोटोतील सर्व व्यक्तींबरोबर शेअर करता येणार आहे.

Labels:

मोबाईलवर समजणार तुमच्या किडनीची तंदुरुस्ती

वॉशिंग्टन : किडनीचा आजार झाल्याची शंका आल्यास लगेच रुग्णालयात जाण्याची गरज नाही. आता संशोधकांनी पोर्टेबल आकाराचे उपकरणे विकसित केले आहे. ते स्मार्टफोनला जोडल्यानंतर त्यावर किडनीची चाचणी करणे शक्य होणार आहे. या गॅजेटमुळे रुग्णालयात सारख्या चकरा मारण्याची गरज भासणार नाही. मधुमेही आणि इतर आजार असलेल्या लोकांना हे गॅजेट उपयोगी ठरणार आहे. हेन्री सॅम्युएल स्कूल ऑफ इंजिनिअरींग अँन्ड अप्लाईड सायन्स व अयडॉगन लॅब यांच्यावतीने याची निर्मिती करण्यात आली आहे.


Labels:

Wednesday, 28 August 2013

सहाय्यक पूर्वपरीक्षा - 2013

महाराष्ट शासनाच्या मंत्रालयीन  विभाग व महाराष्ट लोकसेवा आयोग कार्यालयातील एकूण 89 पदाची भरती पुर्व परिक्षा दि. 29 सप्टेंबर 2013 रोजी घेण्यात येणार आहे. उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पध्दतीने 3 सप्टेंबर 2013 पर्यंत www.mahaonline.gov.in या संकेत स्थळावर सादर करावेत.
वयोमर्यादा : 
1) डिसेंबर 2013 रोजी किमान 19 वर्ष् 33 वर्षापेक्षा  जास्त  नसावे.
2) मागासवर्गीय उमेदवारांना 5 वर्ष शिथिल.
3) अपंग उमेदवार 45 वर्षापर्यंत
4) पात्र खेळाडू 5 वर्षे शिथिल.
पात्रता : 
 1) मान्यता प्राप्त विदयापीठाची पदवी किंमता समतूल अर्हता
2) पदवी शेवटच्या वर्षात बसलेले उमेदवार पूर्वपरीक्षेत तात्पुरते पात्र असतील. मुख्य परीक्षाच्यावेळी पदवी पूर्ण असणे आवश्यक.
शुल्क : अमागास - 260/-, मागासवर्गीय - 135/-
बदलेला अभ्यासक्रम : सर्व परीक्षा 100 प्रश्नांची असून वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची असेल. एकुण गुण 100, प्रत्येक प्रश्नासाठी 1 गुण, परीक्षेचा कालावधी 60 मिनिटे, एकूणसात घटकांचा समावेश.
1) चालू घडामोडी : यासाठी दैनिक वर्तमानपत्रे व स्पर्धा परीक्षेसाठी वापरली जाणारी चाणक्य मंडळ, युनिक बुलेटीन, स्पर्धापरीक्षा ही मासिके वापरावित.
2) नागरिकशास्त्र : यामध्ये भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास राज्यव्यवस्थापन, ग्रामप्रशासन या घटकांचा समावेश आहे.
संदर्भ : भारताचे शासन आणि राजकारण - बी.बी. पाटील, महाराष्ट्राचे शासन आणि राजकारण - बी.बी. पाटील, महाराष्ट्राची प्रशासकी व्यवस्था - प्रा.के.आर. वेग, महाराष्ट्रातील पंचायतराज - मनोज आवळे / संजय खंदारे, राज्यशास्त्र - 12 वी सेठ प्रकाशन
3) आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास -
1) आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास - डॉ. एस.एस गाढाळ
2) आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास - डॉ. अनिल कठारे
3) आधुनिक भारताचा इतिहास - सेठ प्रकाशन
4) महाराष्ट्राचा इतिहास - 11 वी पाठयपुस्तक
5) महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास - के.सागर
4) भुगोल : (महाराष्ट्राच्या भुगोलाच्या विशेष अभ्यासासह) - पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नदया, उदयोधंदे आदी.
संदर्भ : 1) द मेगा महाराष्ट्र - ए.पी सवदी
2) महाराष्ट्राचा भूगोल - खतीब
3) शालेय पुस्तके - 8, 9, 10 वी
4) नवनीत ॲटलास
5) अर्थव्यवस्था : यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था, राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उदयोग, परकीय व्यापार, बँकिग, लोकसंख्या, दारिद्रय व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषित नीती आदी.
संदर्भ - 1) भारतीय अर्थव्यवस्था - रंजन कोळंबे
2) अर्थशास्त्र भाग 1/2 - देसले
3) वाणिज्य व अर्थव्यवस्था - डॉ. राम पाटील
6) सामान्य विज्ञान : भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणिशास्त्र, वनस्पतीशास्त्र, आरोग्यशास्त्र
संदर्भ : 1) आठवी ते दहावीची शालेय पुस्तके
2) संपूर्ण विज्ञान - जयदीप पाटील / चंद्रकांत गोरे
3) विज्ञान व तंत्रज्ञान - डॉ. विशाल माने
7) बुध्दिमापन चाचणी
संदर्भ : 1) अनिल अंकलगी - बुध्दिमापन चाचणी
2) बुध्दिमापन चाचणी - सुजित पवार
3) बुध्दिमापन चाचणी - पंढरीनाथ राणे / दांडेकर
8) अंकेगणित :
संदर्भ : 1) गणित गुरु - प्रा. शांताराम अहिरे
2) Magic Maths - कोकीळा प्रकाशन
3) गणित - पंढरीनाथ राणे, दोडेकर

    सहाय्यक पदासाठी 100 प्रश्न असल्यामुळे काठीण्यपातळी अधिक असल्याची शक्यता आहे. PSI पूर्व परीक्षा झाल्यानंतर सहाय्यकची तयारी करणा-या उमदेवारांनी अर्थशास्त्र या विषयाकडे अधिक लक्ष दयावे. STI मुख्य परीक्षेचा अर्थशास्त्र हा घटक चांगला केल्यास त्याचा निश्चितच उपयोग होईल. कोणतीही परीक्षा पास होण्याचे गुपित अधिक सराव व आत्मपरीक्षण हेच असू शकते. अधिक माहितीसाठी संस्केतस्थळावर भेट दयावी.
 
* सौजन्य - दै. पुढारी

Labels: ,

पालकमंत्री चव्हाण उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर

उस्मानाबाद :- राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण हे तीन दिवस उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
          गुरुवार, दि. 29 ऑगस्ट रोजी सकाळी 10-30 वा. सोलापूरहून काटगाव, ता. तुळजापूर   येथे आगमन व धनगर समाजासाठी आमदार निधीतून बांधकाम करावयाच्या समाज मंदिराचे भूमीपूजन कार्यक्रम व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन बांधकाम करावयाच्या जागेचे भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती. दु.2-30 वा. शहापूर जिल्हा परिष्द मतदार संघातील पक्ष कार्यकर्त्यांशी चर्चा, स्थळ-पेट्रोलपंप, नळदुर्ग व सोईनुसार अणदूरकडे प्रयाण. अणदूर येथे आगमन, राखीव व मुक्काम.
       शुक्रवार, दि. 30 रोजी सकाळी 11 वा. अणदूर येथून किल्लारी ता.औसा,जि. लातूरकडे प्रयाण, सायं. 4 वा. किल्लारीहून नळदुर्ग येथे आगमन व राखीव. सायं.5 वा. नळदुर्ग नगर परिषदेने आयोजित समाज विकास संस्थेतर्फ बचत गटाना प्रशिक्षण कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- हुतात्मा स्मारक नळदुर्ग व सोयीनुसार अणदूरकडे प्रयाण.अणदूर येथे  आगमन व मुक्काम.
         शनिवार, दि. 31 ऑगस्ट रोजी अणदूरहून उमरगाकडे प्रयाण, स.10-30 वा. शासकीय विश्रामगृह, उमरगा येथे आगमन व राखीव. स.11 वा. इन्स्पायर ॲवार्डअंतर्गत जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन कार्यक्रमास उपस्थिती.  स्थळ- आदर्श महाविद्यालय, उमरगा. सोयीनुसार उमरगा येथून अणदूरकडे प्रयाण, अणदूर येथे आगमन व राखीव, सायंकाळी 6-30 वा. अणदूरहून सोलापूरकडे प्रयाण.              

Labels:

ककर्जासाठीची प्रलंबित प्रकरणे 15 दिवसात निकाली काढा : पाटील

उस्मानाबाद :- शेतकऱ्यांना वेळेवर पीक कर्ज मिळाले तरच त्यांना उपयोग होईल. त्यामुळे बॅंकांनी कर्जासाठीचे प्रलंबित अर्ज मंजूर करुन 15 दिवसात पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट्य पूर्ण करावे, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी जे. टी. पाटील यांनी दिले. सहकार विभागाची यावेळी मदत घेण्याची सूचनाही त्यांनी केली.
         येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सल्लागार समितीची बैठक पार पडली. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल. हरिदास, रिझर्व्ह बॅंकेचे प्रतिनिधी सांगवेकर, सहकार निबंधक एस.पी. बडे, समन्वयक दुपारगुडे, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक सी.डी. देशपांडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावाड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॅा. केशव सांगळे यांच्यासह विविध बॅंकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती.
         यावेळी श्री. पाटील यांनी बॅंकांनी केलेल्या कर्जवाटपाचा आढावा घेतला. आतापर्यंत केवळ 74 टक्केच कर्ज वितरण झाले आहे.  सर्व गरजू शेतकऱ्यांना कर्ज मिळणे आवश्यक आहे. विनाकारण बॅंकांकडून अडवणूक होण्याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी येत आहेत. अशा तक्रारींची गंभीर नोंद घेऊन यासंदर्भात रिझर्व्ह बॅंकेला कळविले जाईल, असे त्यांनी स्पष्टपणे सुनावले. बॅंक आणि सहकार विभागाने संयुक्तपणे प्रयत्न करुन पीक कर्ज उद्दिष्ट्यप्राप्तीसाठी प्रयत्न करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या.
       सांगवीकर यांनीही कोणत्याही बॅंकेने आपल्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारु नये अशा स्पष्ट सूचना दिल्या.           

Labels:

मीडिया कॉन्फ्रन्ससाठी नाव नोंदणीचे आवाहन

उस्मानाबाद -: प्रजापिता ब्रम्हकुमारीज ईश्वरीय विदयालयाच्यावतीने माऊंट अबू (राजस्थान) येथे दि. 20 ते 24 सप्टेंबर दरम्यान होणा-या मीडिया कॉन्फ्रन्सचे आयोजन करण्यात आले आहे. शांती व सदभावना संवर्धनासाठी माध्यमांची भूमिका या विषयावर हे महासंमेलन चार दिवस होणार आहे.
    माऊंट अबू (राजस्थान) येथे होणा-या संमेलनासाठी उस्मानाबाद जिल्हयातील पत्रकारांनी मोठया संख्येने हजर राहावे, असे आवाहन उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष जाधव यांनी केले आहे.
    वृत्तपत्रांमध्ये काम करणारे पत्रकार, फोटोग्राफर, रेडीओ व टी.व्ही. चॅनलमध्ये काम करणा-या पत्रकारांना या संमेलनात हजर राहता येईल. ज्या पत्रकारांना मीडिया महासंमेलनास हजर राहायचे आहे त्यानी दि. 31 ऑगस्ट रोजीपर्यंत नाव नोंदणी करावी, नाव नोंदणी करताना कार्यालयीन ओळखपत्र देणे बंधनकारक आहे. नाव नोंदणीसाठी पत्रकारांनी पत्रकार भवन आंबेडकर पुतळयाजवळ व भाऊसाहेब भन्साळी, भन्साळी फोटो स्टुडिओ, उस्मानाबाद येथे संपर्क साधण्याचे आवाहन पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष जाधव, सचिव राजाभाऊ वैदय, कोषाध्यक्ष संतोष हंबीरे व पदाधिका-यांनी केले आहे.

Labels:

सुखमय जिवनासाठी स्वत:ला आत्मा समजून परमात्म्याला आठवण करा : कविता बहनजी

बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: जीवनात परमानंद सुखुखानंद व आंतरिक खुशी प्राप्त करण्यासाठी स्वत:ला देह न समजता आत्मा समजले पाहिजे. मनाला र्इश्वराकडे वळविणे गरजेचे आहे. कारण यामुळेच आपणास आत्म्याचे जे मुळ गुण अथवा स्वभाव पवित्रता शांती‚ प्रेम‚ सुख‚ आनंद‚ ज्ञान व शक्ति यांचा अनुभव येवू शकेल, असे उदगार भरतपूर येथील कविताबहनजी यांनी येथील ब्रहमाकुमारी सेवाकेंद्रावर काढले. त्या बार्शी येथील विद्यालयाच्या धार्मिक प्रभागाद्वारे आयोजित एक र्इश्वर एक विश्व परिवार यात्रा अभियानाच्या अंतर्गत आयोजित सदभावक स्नेहमिलन कार्यक्रमात आपले मुख्य वक्तव्य देत होत्या.
    र्इश्वराच्या आठवणीद्वारे कार्यक्रमाची सुरूवात झाल्यानंतर ब्र. कु. शकुंतला‚ महादेवी व राणी या भगिनीनी सर्वांचे स्वागत तिलक व पुष्पगुच्छाद्वारे केले.  डॉ नाना सामानगावकर‚ प्रतापराव जगदाळे‚ नानासाहेब कदम‚ मालाड येथील कुंतीबहनजी‚ भरतपूर येथील कविता बहनजी‚ नारायणभार्इ‚ बबनबार्इजी‚ शशीबहनजी‚ सोमप्रभबहनजी‚ संगीताबहनजी व वैजिनाथभार्इ या
मान्यवरांनी दीपप्रज्वलनाद्वारे स्नेहमिलनाचे उदघाटन केले.
    अभियान संचालक नारायणभार्इ यांनी अभियानाचा उददेश स्पष्ट केला. नानासाहेब कदम‚ प्रतापराव जगदाळे, कुंतीबहनजी यांनीदेखील समयोचित मनोगत व्यक्त केले. सोमप्रभाबहनजी व संगीताबहनजी यांनी अतिथींना र्इश्वरीय भेटवस्तू देवून सम्मानित केले. सभेमध्ये बार्शी शहरातीलातील आध्यात्मिक‚ धार्मिक‚ सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. सर्वांचा पुष्प देवून सत्कार करण्यात आला.
    आभारप्रदर्शन करणारे मोहनभार्इ यांनी कथन केलेले जीवनातील सदभावनाविषयक प्रत्यक्ष अनुभव कौतुकाचा विषय ठरला. ब्र. कु. वैजिनाथभार्इ यांनी सुत्रसंचलन केले. कार्यक्रमापूर्वी शिवाजी कॉलेजपासून ब्रम्हकुमारी सेवाकेंद्रापर्यंत विविध मार्गाने आयोजित शोभायात्रेचे उदघाटन दौलशेठ चांडक यांच्या शुभहस्ते संपंपन्न झाले. अत्यंत सुंदर व नियोजनबध्द कार्यक्रमाच्या सफलेसाठी संगीताबहनजी‚ अनिताबहन करवा‚ नानासाहेब कदम यांच्यासह सवब्र हमाकुमार बंधू भगिनी यांनी मोलाचे योगदान केले.

Labels:

अल्पवयीन


Labels:

धन्य लोकशाही


Labels:

रेशीम कोषाचे चांगले उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार

उस्मानाबाद :- रेशीम शेती उत्कृष्टरित्या करुन रेशीम कोषाचे चांगल्या प्रकारे करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार प्रादेशिक रेशीम विकास विभागाचे प्रादेशिक सहायक संचालक दिलीप हाके यांच्या हस्ते करण्यात आला.
          येथील रेशीम विकास कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, तालुका कृषी अधिकारी एस. पी. जाधव, रेशीम विकास अधिकारी पी. एस.गणाचार्य यांच्यासह रेशीम उद्योजक शेतकरी उपस्थित होते.
         रेशीम शेती उत्कृष्टरित्या करुन रेशीम कोषाचे उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी  तुती प्लॅट मधील फिलींग,चॉकी  रेअरींग, रेशीम कीटकांची प्रौढ अवस्था, किटक संगोपन आदिंबाबत श्री. हाके यांनी मार्गदर्शन  केले. यावेळी तेरखेडा (ता.वाशी) येथील दीपक पौळ आणि चिंचोली भू. (ता. उमरगा) येथील बळवंत गोविंद गायकवाड या रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रत्येकी रुपये एक हजार देऊन सत्कार करण्यात आला.
          तोटावार यांनी यावेळी रेशीम शेतकऱ्यांनी क्लस्टरमध्ये तुतीलागवड वाढवावी  व गट स्थापन करुन कृषी विभागाच्या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले. कृषी खात्याकडून शेततळी, पॉवर ट्रेलर, पॉवर व्हीलर असे साहित्य रेशीम उत्पादकांना देण्याबाबत प्राधान्य देण्यात येईल, असे सांगितले. रेशीम शेती कमी पर्जन्यमान असलेल्या उस्मानाबाद जिल्हयासाठी अतिशय उत्कृष्ट उद्योग असून हा उद्योग गावपातळीवर वाढला पाहिजे, असे नमूद केले.
          या चर्चासत्रात रेशीम उद्योजक शेतकरी पोपट गुंड, जयश्चंद्र गुंड, शिरीन पाटील, सुधाकर जाधवर, शिवाजी नाईकनवरे, दिपक पौळ, बळवंत गायकवाड, जयहिंद धुरगुडे, अशोक निपाणीकर, आबासाहेब पाटील, बाबू तुळजापूरे, दयानंद कडके आदि रेशीम उत्पादन शेतकऱ्यांनी रेशीम उत्पादनामध्ये येणाऱ्या अडीअडचणी विषद केल्या.
         आपल्या प्रास्ताविकात रेशीम विकास अधिकारी, श्रीमती गणाचार्य यांनी रेशीम उत्पादनाबाबत केलेल्या कार्यवाहीची माहिती  दिली. सूत्रसंचलन इप्पर एस.इ. यांनी केले.

Labels:

बीजभांडवल योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

उस्मानाबाद :- खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्टया कमकुवत बेरोजगार उमेदवारांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत  बीज भांडवल योजनेअंतर्गत कर्ज देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक रमेश पवार यांनी केले आहे.
         स्वयंरोजगार करु इच्छिणाऱ्या 18 ते 45 वयोगटातील ज्या उमेदवारांच्या  कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न शहरी भागासाठी 55 हजाराच्या आत तर ग्रामीण भागातील उमेदवारांचे वार्षिक उत्तपन्न 40 हजाराच्या आत असलेल्यांना या कर्ज योजनेचा लाभ,घेता येईल. बीजभांडवल कर्ज योजनेअंतर्गत उमेदवारास 5 लाखापर्यंत गुंतवणूकीची प्रकल्प मर्यादा असलेल्यांना अर्थसहाय्य मिळले. यात राष्ट्रीयकृत बँकेचा सहभाग 60 टक्क्के असून अर्जदारास 5 टक्के रक्कम स्वत:चा सहभाग म्हणून भरावा लागेल. बँकेनी मंजूर केलेल्या प्रकल्प रक्कमेच्या 35 टक्के रक्कम महामंडळामार्फत मंजूर करण्यात येते. महामंडळाकडील 35 टक्के रक्कमेला व्याजाचा दर दरसाल दरशेकडा 04 टक्के आकारण्यात येणार आहे.
           इच्छुक उमेदवारांनी या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गर्शन केंद्र, तळमजला, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, उस्मानाबाद येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.     

Labels:

बार्शीत बेकायदा डिजीटलवर येणार निर्बंध

बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: शहराच्या सौंदर्यासोबत सामाजिक शांतता बिघडविण्याचे प्रमुख कारण असलेल्या डिजीटल संदर्भात वरिष्ठ पातळीवरील आदेशानंतर मंगळवारी बार्शी पोलीस ठाण्यात पत्रकार, नगरपालिका, पोलिस प्रशासन व राजकीय पदाधिकारी यांची संयुक्त बैठक घेण्यात आली.
    यावेळी अध्यक्षस्थानी विभागीय पोलीस अधिकारी रोहिदास पवार, पोलीस निरीक्षक सालार चाऊस, उपनगराध्यक्ष राहुल कोंढारे, पंचायत समितीचे उपसभापती केशव घोगरे, माजी सभापती सुभाष लोढा, नगरसेवक विजय राऊत उपस्थित होते.
    या चर्चेत बेकायदा फलक व फलक लावणा-यांविरुध्द कायदेशीर उपाययोजना करण्याबात साधक बाधक चर्चा झाली. प्रामुख्याने डिजीटल फलकाचा आकार, उंची, त्यावरील मजकूर, छायाचित्रे याबरोबरच डिजीटल फलक लावण्याचा रितसर नगरपरिषदेचा परवाना क्रमांक व डिजीटल लावण्याची व लावण्यापूर्वी घ्यावयाची परवानगी या मुदयांवर प्रामुख्याने चर्चा झाली. डिजीटल फलक लावणा-याचे नाव, संपर्क क्रमांक, परवाना क्रमांक व मुदत डिजीटल फलकावर प्रसिध्द करण्याचे निश्चित झाले. असे न करणा-या विरुध्द योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे धोरण निश्चित झाले. डिजीटल फलकावरील मजकूराची छाननी पोलीस प्रशासनाने केल्यानंतरच सदरचा मजकूर डिजीटलवर प्रसिध्द करण्याचेही यावेळी ठरले.
    याप्रसंगी नगरपरिषदेचे प्रशासन अधिकारी शरद कुलकर्णी, नगरसेवक अशोक बोकेफोडे, अनिल पवार, रमेश पाटील, महेदीमिया लांडगे, सचिन गायकवाड, संदीप आलाट, विक्रम सावळे, बाबा कापसे, तानाजी बोकेफोडे यांनी चर्चेत सहभाग घेत सुचना मांडल्या. शेवटी आभार सालार चाऊस यांनी मानले.

Labels:

नळदुर्गच्या महाविदयालयास विविध क्रीडा स्पर्धेत पाच सुवर्णपदके

नळदुर्ग -: येथील बालाघाट शिक्षण संस्था संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविदयालयाच्या विदयार्थ्यांनी बाभळगाव येथे राष्ट्रीय छात्रसेनांतर्गत पार पडलेल्या ॲन्युअल ट्रेनिंग कॅम्पमध्ये झालेल्या विविध स्पर्धेमध्ये पाच सुवर्णपदक मिळवून यश संपादन केले आहे. या स्पर्धेत बेस्ट कॅडेट व बेस्ट परेड कमांडर म्हणून ऋषिकेश घुगे यास दोन सुवर्णपदके, प्रितम राठोड यास बेस्ट कॅडेट म्हणून एक सुवर्णपदक तसेच लहू भोसले व योगेश भोसले या विदयार्थ्यांनी कबडडीमध्ये दोन सुवर्णपदके मिळविली आहेत. या विदयार्थ्यांना कंपनी कमांडर प्रा. प्रवीण भाले यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विदयार्थ्यांचे पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण, माजी आमदार नरेंद्र बोरगावकर, सि.ना. आलुरे गुरुजी, महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. सुहास पेशवे, उपप्राचार्य एन.एम. माकणे, प्रा. एस.व्ही. चंदनशिवे, डॉ. उमाकांत चनशेटटी यांनी अभिनंदन केले आहे.

Labels:

महाराष्ट्रात ‘अन्न सुरक्षा’ यशस्वीपणे राबविणार : मुख्यमंत्री

मुंबई -: देशातील 82 कोटी जनतेला स्वस्तात अन्नधान्य उपलब्ध करून देणारा अन्न सुरक्षा कायदा हा राजकीय व सामाजिक पातळीवर आमूलाग्र परिवर्तन घडवणाराअसूनकोणीही उपाशी रहाणार नाही याची खात्री देणारा आगळावेगळाअसा कार्यक्रमआहे.महाराष्ट्रात हा कायदा यशस्वीपणे राबविण्याचा आमचा निर्धार आहे, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.
      युपीए-2 सरकारने मांडलेले अत्यंत महत्वांकाक्षी असे अन्न्‍ा सुरक्षा विधेयक लोकसभेत मंजूर झाले. याबद्दल समाधान व्यक्त करुन चव्हाण यांनी म्हटले आहे की, अन्न सुरक्षा कायदा अनेकांचे आयुष्य बदलवून टाकणारा आहे. देशातील दोन तृतीयांश जनतेला स्वस्त दरात धान्य उपलब्ध करुन देणाऱ्या ऐतिहासिक अन्न सुरक्षा विधेयकाची संयुक्त राष्ट्रानेही प्रशंसा केली आहे.त्यामुळेया कायद्याला जागतिक महत्त्व आहे.
काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात अन्न सुरक्षेचे कायदा करण्याचे आश्वासन दिले होते.काँग्रेसची गरीबी हटाओ घोषणा आता खऱ्या अर्थाने परीपूर्ण होणार आहे. युपीएच्या अध्यक्षाश्रीमतीसोनियागांधी, उपाध्यक्ष श्री राहुल गांधी वपंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनीसर्वंकष विचार विनिमय करुनगरिबांचेकल्याणकरणाराहानिर्णयघेतलाआहे. हे विधेयक मंजूर झाल्याबद्दल चव्हाण यांनी श्रीमती गांधी व पंतप्रधानांचे अभिनंदन केले आहे.

Labels:

महावितरणच्या विरोधात शेतकर्‍यांचा मोर्चा

नळदुर्ग -: वीज महावितरण कंपनीने थकीत वीज बिलापोटी महावितरण शेतक-यांच्या पंपांचा वीजपुरवठा तोडण्याची मोहीम सुरूच ठेवली तर शेतकरी संघटना अधिकार्‍यांना वटणीवर आणण्याची मोहीम जिल्हाभरात उघडेल, असा इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक अरविंद घोडके यांनी दिला.
अणदूर (ता. तुळजापूर) येथे महावितरणने शेतकर्‍यांच्या पंपांची वीज तोडण्याची मोहीम सुरू केली आहे. या विरोधात शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवार‍ दि. 27 ऑगस्ट रोजी महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी घोडके हे बोलत होते. मोर्चात संघटनेचे तालुकाध्यक्ष अप्पासाहेब शेट्टे, शहराध्यक्ष बसवराज मुळे, शिवसेनेचे बाळकृष्ण पाटील आदी उपस्थित होते.
घोडके बोलताना पुढे म्हणाले की, महावितरणने सुरू केलेली शेतकर्‍यांविरोधातील मोहीम अत्यंत दुर्दैवी आहे. सलग दोन वर्षे दुष्काळाचा चटका सहन करणार्‍या शेतकर्‍यांजवळ स्वत:चे पोट भरण्यासाठी पैसा नाही. तेव्हा वीजबिल भरण्यासाठी पैसा कोठून येणार, महावितरण मात्र गरीब शेतकर्‍यांच्या पाठीशी हातधुवून लागले आहे. मोठे उद्योगपती, कारखानदार, व्यावसायीकांना रान मोकळे सोडण्यात आले आहे. यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. महावितरणच्या कार्यालयाला कुलूप ठोकणे, अधिकार्‍यांना कोंडणे, वीज कर्मचार्‍यांना गावबंदी अशी आंदोलने शेतकरी संघटना करणार आहे. यासाठी जेल भोगण्याची पाळी जरी आली तरी मागे हटणार नाहीत. मोर्चात परिसरातील शेतकरी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. मनसेचे निलेश मुळे, शिवाजी कांबळे, राजकुमार स्वामी, दीपक घुगे, कल्याणी मुळे, र्शीशैल्य चौधरी आदींच्या शिष्टमंडळाने कनिष्ठ अभियंता पी. एस. पाटील यांना निवेदन दिले आहे.

Labels:

साठवण तलावांची गळती थांबविण्याचे निर्देश

उस्मानाबाद :- जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील दुष्काळीसदृष्य परिस्थितीवरील उपाय योजना व केलेली कामे याबाबत जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत सदयस्थितीत जिल्ह्यात पाऊसाचे प्रमाण कमी आहे, जो पाऊस झाला आहे त्याचे पाणी अडवून साठवण करण्यात कोणत्याही अधिकाऱ्यांनी दिरंगाई केली तर त्यांचेवर कडक कार्यवाही केली जाईल व पावसाचे पाणी साठवणी संबंधी जी कामे चालू आहेत ते तात्काळ पूर्ण् करुन अहवाल सादर करावा, असे आदेश देण्यात आले आहेत.
           सध्या ज्या तलावात पाणी साठवण झाली आहे व त्यात गळती वाढली आहे ती तात्काळ बंद करुन घ्यावी तसेच छतावरील पणी साठवणूक करण्याचे अपुर्ण कामे पुर्ण् करुन घ्यावीत सदर कामाबाबत निवीदा प्रचलित नियमावलीनुसार मागवून त्यास मान्यता घेवून दर्जेदार कामे करावीत, असेही सांगितले.
           याप्रसंगी विद्युत विभागाचे अधीक्षक अभियंता पापडकर, जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. तांगडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. बी. कोटेचा, जिल्ह्यातील सर्व नगरपालिकेचे मुख्याध्याधिकारी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.                   

Labels:

Tuesday, 27 August 2013

अन्नछत्र मंडळातर्फे काँग्रेस तालुकाध्यक्ष म्हेत्रे यांचा सत्कार

अक्कलकोट -: अक्कलकोट तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर म्हेत्रे यांचा श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ या धर्मादाय संस्थानात सत्कार करण्यात आला. अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजय भोसले यांच्या हस्ते शंकर म्हेत्रे यांचा शाल, कृपावस्त्र, स्वामींची प्रतिमा, मूर्ती, मानाचा फेटा, पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. तसेच मातोश्री लक्ष्मी शुगरचे संचालक शिवराज सिध्दाराम म्हेत्रे यांचा सत्कार अन्नछत्र मंडळाचे विश्वस्त अमोल भोसले यांच्या हस्ते  करण्यात आला. यावेळी अन्नछत्र मंडळाचे सचिव शाम मोरे, उपाध्यक्ष अभय खोबरे, नगरसेवक उत्तम गायकवाड माजी नगराध्यक्ष महेश इंगळे आदीजण उपस्थित होते.

Labels:

शाहीर अमर शेख पुरस्कारासाठी आवाहन

बार्शी -: महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा बार्शीच्यावतीने शाहीर अमर शेख यांच्या जयंतीनिमित्त मराठीतील उत्कृष्ट वाडमय:यासाठी शाहीर अमर शेख साहित्य पुरस्काराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पा.न. निपाणीकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
    या पुरस्कारासाठी काव्य सोडून कोणत्याही वाड:मय प्रकारातील साहित्यकृती पुस्तक पाठविण्यात यावे. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, स्मृतीचिन्ह व रोख रक्कम रुपये दोन हजार असे तीन पुरस्कार देण्यात येणार आहेत.
    जाग मराठा आम जमाना बदलेगा, असे टाहो फोडणा-या, संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन डफावर थाप देऊन तापत ठेवणा-या अमर शेख यांची बार्शी ही जन्मभूमी आहे. संपूर्ण बालपण बार्शीत व्यतीत केल्यानंतर त्यांनी आपल्या ओजस्वी पोवाडयातून हजारोंच्या जनसमुदायास मंत्रमुग्ध केले. अत्यंत नामवंत साहित्यिक व समीक्षकांनी शाहीर अमर शेख यांचे वाड:मय तसेच संयुक्त महाराष्ट्र डाव्या चळवळीतील भरीव योगदानाचे कौतुक केले. त्यांच्याच जन्मभूमीत शाहीर अमर शेख साहित्य पुरस्कार देण्यात येत असनू साहित्यिकांच्या लेखनीची पाती तेवत ठेवण्याचे काम या माध्यमातून करण्यात येत आहे.
    जानेवारी 2012 ते डिसेंबर 2012 या कालावधीमध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकांच्या दोन प्रती दि. 21 सप्टेंबरपर्यंत प्रमुख कार्यवाह, शब्बीर मुलाणी, शमा मंझील, पवार प्लॉट, उपळाई रोड, बार्शी जि. सोलापूर या पत्त्यावर पाठविण्याचे आवाहन म.सा.प. यांच्यावतीने करण्यात आले आहे.   

Labels:

Monday, 26 August 2013

कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला

उस्मानाबाद :- जिल्हयात सोयाबिन- कापूस किड रोग व सल्ला प्रकल्प सन 2013-14 अंतर्गत केलेल्या निरिक्षणावरुन सध्या सोयाबिन पिकावर काही ठिकाणी उंट अळी, घाटे अळी व तंबाखुवरील पाने खाणारी अळीचा सेडोप्टेरा आणि चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव दिसून येत असून कापूस पिकावर रस शोषक किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. किडीच्या नियंत्रणासाठी पुढील प्रमाणे उपाय योजना कृषी कार्यालयाच्या वतीने सुचविण्यात आल्या आहेत.
        सोयाबिन पिकावरील उंट अळी, तंबाखुवरील पाने खाणारी अळी व घाटे अळी च्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टोन बेन्झोएट 5 एस.जी. 0.4 ग्राम किंवा प्रोफेनोफॉस 50 ई. सी. 2.5 मिली प्रती लिटर पाण्यातुन फवारावे. चक्रीभुंग्याच्या व्यवस्थापनासाठी इथोफेनप्रोक्स 10 ई. सी. 5.2 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे. तंबाखुवरील पाने खाणारी अळीच्या अंडी पुंज व समुहातील अळयावर लक्ष ठेवावे. नत्रयुक्त खताचा अतिरिक्त वापर टाळावा. पाण्याचा निचरा करावा व पिक तणमुक्त ठेवावे.         तसेच कापूस पिकावरील रसशोषक किडीसाठी फिप्रोनिल 5 एस. सी. 2 मिली किंवा बुप्रोफेन्झीन 25 एस. सी. 1 मिली प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. इमीडाक्लोप्रोडची वारंवार फवारणी करु नये. तंबाखुवरील पाने खाणारी अळीच्या (सेडोप्टेरा) अंडी पुंज व समुहातील अळयावर लक्ष ठेवावे. नत्रयुक्त खताचा अतिरिक्त वापर टाळावा. या किटकनाशकाचे प्रमाण साध्या पंपासाठी किटकनाशकाची मात्रा 3 पट करावी. असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी उस्मानाबाद व जिल्हा किड नियंत्रक यांनी केले आहे.

Labels:

प्रीलीस्टचे बुधवारी वितरण

उस्मानाबाद :- उच्च माध्यमिक (इ. 12 वी) प्रमाणपत्र परिक्षा सप्टेबर / ऑक्टोबर 2013 पूनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांची फोटो प्रिलिस्ट जिल्हा परिषद कन्या प्रशाला उस्मानाबाद येथील वितरण केद्रावर बुधवार दिनांक 28 ऑगस्ट 2013 रोजी वितरित करण्यात येणार आहे. तसेच ज्या प्रिलिस्टमध्ये दुरुस्त्या असतील, अशा प्रिलिस्ट दिनांक 30 ऑगस्ट 2013 रोजी संकलन केंद्रावर मंडळ प्रतिनिधीकडे देण्यात याव्यात तसेच ऑनलाईनद्वारे आवेदनपत्र भरलेल्या विद्यार्थ्यांची हार्ड  कॉपी व चलन जमा नसतील तर प्रिलिस्ट सोबत मंडळ प्रतिनिधींकडे जमा करावी असे  विभागीय सचिव लातूर मंडळ, लातूर यांनी कळविले आहे. जिल्ह्यातील सर्व मान्यता प्राप्त उच्च माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक व प्रायार्चांनी याची नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Labels:

16 सप्टेंबरला जि. प.ची सर्वसाधारण सभा

उस्मानाबाद :- जिल्हा परिषद उस्मानाबादची सर्वसाधारण सभा दिनांक 16 सप्टेंबर 2013 रोजी आयोजित करण्यात  आली असून  दुपारी एक वाजता जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहातमध्ये ही बैठक घेण्यात येणार आहे, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी  जिल्हा परिषद उस्मानाबाद यांनी कळविले आहे.      

Labels:

अर्श कार्यशाळेत विद्यार्थिनींना मार्गदर्शन

उस्मानाबाद :-  जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथील अर्श कार्यक्रमातंर्गत नुकतेच अनुसुचित जाती मुलींची शासकीय निवसी शाळा, वैराग रोड उस्मानाबाद येथे किशोरवयीन मुलींचे मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले.
          या मार्गदर्शन शिबीरामध्ये शासकीय किशोरवयीन अवस्थेतील समस्या व आहार, शारीरिक व मानसिक बदल तसेच प्रजनन व लैगिक आरोग्य, गुप्तरोग तसेच अर्श मैत्री क्लिनीकबाबत मागदर्शन करण्यात आले. तसेच एचआयव्ही एडसबदल असलेले समज व गैरसमज व किशोरवयीन मुलीमध्ये रक्तक्षय कमी करण्यासाठीच्या उपायांची माहिती यावेळी देण्यात आली. अर्श कार्यक्रमा संबधी माहितीपट दाखविण्यात आला तसेच शिबीरामध्ये किशोरवयीन मुलीनी विचारलेल्या शंकाचे निराकरण  शात्रीय दृष्‍टिकोणातुन उदहरणासह सखोल अशा माहितीसह करण्यात आले. या शिबीरास स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. शिल्पा हंबीरे, डॉ वृधा वीर, श्रीमती सुनिता साळुंके, अमर सपकाळ, मुख्याध्यापक एन. ए. शिंदे गृहपाल श्रीमती एल. के. घुगे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जालींधर माळी, विनोद गायकवाड, श्री लगदिवे व निवासी शाळेतील शिक्षक उपस्थित होते.

Labels:

कै. अनंत भालेराव स्मृती पत्रकारिता स्पर्धेचे आयोजन

संतोष जाधव
औरंगाबाद -: मराठवाडा स्तरावरील पत्रकारांसाठी कै. अनंत भालेराव स्मृती पत्रकारिता स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष वार्ता आणि शोध वार्ता या दोन गटांत ही स्पर्धा घेण्यात येणार असून मराठवाड्यातील पत्रकारांनी या स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवाव्यात, असे आवाहन उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष जाधव यांनी केली आहे.
    कै. अनंत भालेराव स्मृती पत्रकारिता स्पर्धा मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने घेण्यात येते. यावर्षी कै. अनंत भालेराव स्मृती पत्रकारिता स्पर्धेचे २१ हे वर्ष आहे. या स्पर्धेसाठी मराठवाड्यात काम करणार्‍या दैनिक, साप्ताहिक व नियतकालिकाच्या पत्रकारांना या स्पर्धेत भाग घेता येईल. या स्पर्धेसाठी वार्तापत्र १ ऑगस्ट २0१२ ते ३१ जुलै २0१३ या कालावधीत प्रकाशित झालेले असावे. प्रवेशिकेच्या मूळ प्रतीवर दैनिकाचे नाव, दिनांक आणि पत्रकाराच्या नावाचा छापील उल्लेख असावा. नसल्यास संपादकाचे पत्र जोडावे. हा पुरस्कार दोन गटांत गुणाणुक्रमे येणार्‍या पहिल्या तीन विजेत्यास बक्षीस मान्यवरांच्या हस्ते देण्यात येईल.
    कै. अनंत भालेराव पत्रकारिता पुरस्कारांच्या प्रवेशिका या मूळ प्रत व त्याच्या ३ झेरॉक्स अशा ४ प्रतीत व्यवस्थित जोडणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणार्‍या पत्रकारांनी आपली प्रवेशिका १0 सप्टेंबर २0१३ पर्यंत संतोष जाधव, अध्यक्ष, पत्रकार भवन, आंबेडकर पुतळय़ाजवळ, उस्मानाबाद या पत्त्यावर पाठवायचे आहेत. या सर्व स्पर्धेमध्ये मराठवाड्यातील जास्तीत जासत पत्रकारांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष जाधव, सचिव राजाभाऊ वैद्य, कोषाध्यक्ष संतोष हंबिरे व पदाधिकार्‍यांनी केले आहे.

Labels: ,

‘प्रसारमाध्यमे बेजबाबदार होत आहेत का?' : प्रा. डोळेंसह अनेक ज्येष्ठ पत्रकारांचा सवाल

औरंगाबाद :- प्रसारमाध्यमांची संख्या सातत्याने वाढणे, दररोज नवनवीन वर्तमानपत्रे व वाहिन्यांची संख्या वाढणे हेच प्रसारमाध्यमे बेजबाबदार नाहीत याचे संकेत आहेत, असे मत प्रा.जयदेव डोळे यांनी व्यक्त केले. माध्यमे बेजबाबदार असती तर ही संख्या वाढलीच नसती, असेही ते म्हणाले. मराठी पत्रकार परिषदेच्या 39 व्या राज्यस्तरीय अधिवेशनात ‘प्रसारमाध्यमे बेजबाबदार होत आहेत का’ या विषयावर आयोजित परिसंवादात प्रा. डोळे बोलत होते. या वेळी ज्येष्ठ पत्रकार सारंग दर्शने, आमदार भाई जगताप, आमदार संजय शिरसाट, शेकापचे नेते एस.व्ही.जाधव, गंगाधर गाडे यांनी या परिसंवादात सहभाग घेतला.

डोळे म्हणाले की, आज माध्यमांमुळेच घोटाळे उघडकीस येत आहेत. माहितीची भूक वाढली आहे. माहितीचा साठा वाढल्यामुळे मागणीही वाढली आहे. त्यामुळे मराठी माध्यमे तर अजिबात बेजबाबदार नाहीत. सत्तेचे विकेंद्रीकरण झाल्यामुळे पत्रकार आणि राजकारणी खूप जवळ आले आहेत. मोठमोठय़ा उद्योगपतींनी वर्तमानपत्रे काढली, मात्र ती चालली नाहीत. तसेच माध्यमांमध्ये पेड न्यूज येण्यासाठी पत्रकार जबाबदार नसून मालक जबाबदार आहेत. त्यामुळेच पत्रकारांमध्ये सातत्याने नोकर्‍या बदलण्याचे प्रमाण वाढत असल्याचे मतही डोळे यांनी व्यक्त केले.

माध्यमांनी स्वत:च नैतिकतेची आचारसंहिता घालून घेण्याची गरज असल्याचे मत आमदार भाई जगताप यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, आज पेज थ्री कल्चर वाढले आहे. पानांची संख्या वाढत आहे. नकारात्मकताच बातमीचा विषय होत आहे. आमदार संजय शिरसाट यांनी एका बातमीमुळे काय नुकसान होते, याबाबत त्यांनी स्वत:चे उदाहरण सांगितले. एका बातमीमुळे आमदारकीपर्यंतचा प्रवास 12 वष्रे कसा लांबला याची माहिती दिली. त्यामुळे जबाबदारीने बातमी लिहिण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

अधिवेशनात चर्चेऐवजी वाहिन्यांवर चर्चा
या वेळी राजकारण्यांच्या मतांचा चांगलाच समाचार परिसंवादातील पत्रकारांनी घेतला. आज समाजकारण करणारे हट्टाग्रही झाले आहेत. तर राजकारणी बेपर्वा आणि संस्कार करणार्‍या संस्था असहिष्णू झाल्या आहेत. न्यायव्यवस्थेवर बोलायलाच नको, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच बातमीला प्रतिसाद देण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे सनसनाटी वाढत आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार र्शीमंत माने यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, जी काही बेजबाबदारी दिसते त्याला राजकारणीच जबाबदार आहेत. प्रशासकीय यंत्रणा हतबल झाल्यामुळे बातमीला प्रतिसादही मिळत नाही. त्यामुळे बातमीमध्ये सनसनाटी निर्माण होते. विधिमंडळ अधिवेशनात चर्चा करण्याऐवजी ते बंद पाडून वाहिन्यावर संध्याकाळी चर्चा केली जाते. समाजातील बधिरपणा ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे सांगत राजकीय पक्षांना आरटीआय लागू करण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

लिखाण काळजीपूर्वक करण्याची गरज
सभ्य माणसे बेजबाबदारपणे लिखाण करीत नाहीत. बातमी केल्यानंतर त्याचा पुरावा राहतो. तो अनेक वर्षांनी काढून पाहता येतो. त्यामुळे बातमी लिहिताना माध्यमांकडून पुरेपूर काळजी घेतली जाते, असे मत ‘दिव्य मराठी’चे निवासी संपादक धनंजय लांबे यांनी व्यक्त केले. बातमी, लिखाण हे बंदुकीच्या गोळीसारखे असून मागे घेता येत नाही. त्यामुळे शब्दांनी अचूक माणसाचा वेध घेत निदरेष व्यक्तींना त्याचा फटका बसू नये याची काळजी घेण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. सारंग दर्शने म्हणाले की, तेच ते बोलून अर्थशून्य चर्चेला आता अर्थ उरला नाही. आधुनिक माध्यमांचा प्रभाव झपाट्याने वाढतोय. सामाजिक संकेतस्थळावरून लोक व्यक्त होऊ लागले आहेत. माध्यमे आधुनिक झाल्यामुळे ती बेजबाबदार नाहीत, असे मतही त्यांनी व्यक्त केले. एन.व्ही.जाधव आणि गंगाधर गाडे यांनीदेखील माध्यमे जबाबदारीने काम करत असल्याचे सांगितले.

संपादकांपेक्षा व्यवस्थापनातील लोकांचे महत्त्व वाढले; अब्दुल कदीर यांची खंत

संपादकांपेक्षा आज व्यवस्थापनातल्या लोकांना जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे संपादक केवळ ब्रॅँड मॅनेजर होत आहेत, अशी खंत ज्येष्ठ पत्रकार अब्दुल कदीर यांनी व्यक्त केली. ‘संपादक नावाची प्रभावी संस्था निस्तेज होत चालली आहे का’ या विषयावर मराठी पत्रकार परिषदेच्या राज्यस्तरीय अधिवेशनात परिसंवाद घेण्यात आला होता. कदीर आणि सुशील कुलकर्णी यांनी मते व्यक्त केली. सुशील कुलकर्णी यांनी आज अग्रलेखामधली जागादेखील कमी होत आहे. वाचक संपादकीय वाचत नाहीत, अशी स्थिती निर्माण झाली आहे. मात्र, ही निस्तेजता कशामुळे आली याचा विचार करण्याची गरज असल्याचे सांगत लोक वाचत नाहीत यापेक्षा लोकांनी वाचावे, असे लिखाण करण्याची गरज असल्याचे मत कुलकर्णी यांनी व्यक्त केले. व्यासपीठावर बालाजी सूर्यवंशी, संजय वरकड, बाबा गाडे, प्रमोद माने, एस.एम.देशमुख यांची उपस्थिती होती.

39 वर्षांतले सर्वोत्कृष्ट अधिवेशन
या अधिवेशनात राज्यातल्या कानाकोपर्‍यातून 1600 पत्रकार सहभागी झाले होते. आतापर्यंत राज्यात अनेक ठिकाणी अधिवेशने झाली. मात्र, आतापर्यंतच्या अधिवेशनात हे अधिवेशन सवरेत्कृष्ट झाले, असे कौतुक एस.एम.देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांनी केले. हे अधिवेशन यशस्वी केल्याबद्दल स्वागताध्यक्ष बालाजी सूर्यवंशी, संजय वरकड, प्रमोद माने यांचे कौतुक करण्यात आले. या वेळी किरण नाईक यांनी अध्यक्षपदाचा, चंद्रशेखर बेहरे यांनी कार्याध्यक्षपदाचा तर संतोष पवार यांनी सरचिटणीसपदाचा कार्यभार स्वीकारला.

साभार - दिव्यमराठी

Labels:

इकारे यांच्या काव्योत्सवाने अध्यापिका विदयालयात बहार

बार्शी –: अध्यापिका विदयालय येथील सांस्कृतीक विभागाच्यावतीने कवि रामचंद्र इकारे यांच्या काव्योत्सव कवितांचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी प्राचार्या सौ. ए.एस. चौगुले, बी.एम. देडे, जे.एस. माळी, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस नरेंद्र दाभोळकर यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
      इकारे यावेळी बोलताना म्हणाले, जीवनाच्या प्रत्येक क्षणांचे प्रतिबिंब कवितेतून उमटते, त्यामुळेच कविता ही मानवी जीवनाचा आरसा बनते. कविता म्हणजे काय हे सांगणा-या “हाक” या कवितेपासून काव्योत्सव सुरु झाला. नंतर मनातील भावनांचे कप्पे उलगडत गेले. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, संस्कारक्षम जीवन अशा विविध विषयांना स्पर्श करणा-या कवितांच्या माध्यमातून हास्याबरोबर चिंतनाचाही समावेश काव्योत्सवातून झाला. सर्वसामान्य माणूस जगण्यापेक्षा आपल्या अंगी असलेल्या गुणांचा विकास करत असामान्य व्यक्ती बनावे. जीवनातील कोणतीही गोष्ट अशक्य नाही, मनात असलेल्या इच्छाशक्तीला कृतीशीलतेची जोड देऊन जीव सुखकर करावे, असा संदेशही त्यांनी यावेळी दिला.
      कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर.एम. हामणे यांनी केले तर आभार जे.के. लोखंडे यांनी मानले.

Labels:

श्री संत भगवान बाबा जयंती साजरी

बार्शी –: येथील वंजारी सेवा संघ, वंजारी समाजाच्यावतीने संत भगवान बाबा यांच्या 117 व्या  जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
    रविवार दि. 25 ऑगस्ट रोजी मोटारसायकल व कार रॅली काढण्यात आली. रॅलीचे विसर्जन ग्रामदैवत श्री भगवंत मंदिर येथे करण्यात आले. यावेळी श्री भगवंताचे व संत भगवान बाबांचे पूजन करण्यात आले. त्यांच्या जीवन कार्यातील विविध प्रसंगाचे स्मरण करुन त्यांचा आदर्श इतरांनी घ्यावा, असे प्रबोधन करण्यात आले.
    यावेळी बोलताना बाजीरावर दराडे म्हणाले, वंजारी समाजाचा इतिहास कथन केला, समजाने राष्ट्राला उभे करण्यासाठी आपले योगदान दयावे असे आवाहन केले. प्रा. खुशाल मुंढे म्हणाले, भगवान बाबांचे अंधश्रध्दा निर्मुलनाचे कार्य, शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार यामुळे समाजाची उन्नती झाल्याचे सांगितले. यावेळी व्यासपीठार विविध पक्षाचे, वंजारी समाजाचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
    यापुढे प्रत्येक वर्षी बिगर राजकीय कार्यक्रम घेण्यात येणार असून सर्व समाज बांधवांनी एकत्रितपणे जयंती उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.

Labels:

पोलिस ठाण्यात पेटवून घेतले

तुळजापूर -: विवाहितेवर अत्याचार केल्याप्रकरणी मुलांना अटक का केली, असे म्हणून पित्याने येथील पोलिस ठाण्यातच अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी प्रसंगावधान राखून आग विझवून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
    एका विवाहितेवर तिच्या पतीसमोरच अत्याचार केल्याप्रकरणी शुक्रवारी दि. 23 ऑगस्ट रोजी तुळजापूर येथील पोलिस ठाण्यात तालुक्यातील कसई येथील तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. यापैकी गड्या चंदू शिंदे, जकाला चंदू शिंदे यांना पोलिसांनी अटक केली. तर नेत्या चंदू शिंदे हा अद्याप फरार आहे. अटक आरोपींना पोलिस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले आहे. रविवारी दि. 25 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजण्याचा सुमारास आरोपीचा पिता चंदू विश्वंभर शिंदे (66 रा. कसई) हा पोलिस ठाण्यात आला. त्याने पोलिसांशी सुरुवातीला हुज्जत घातली. माझ्या मुलांना अटक का केली, असे म्हणून जाब विचारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी प्रतिसाद न दिल्यामुळे प्लास्टिकच्या बाटलीत आणलेले रॉकेल ओतून घेऊन त्याने पेटवून घेतले. काही पोलिस कर्मचार्‍यांनी लागलीच शिंदे यांच्याकडे धाव घेऊन हातातील रॉकेलची बाटली घेऊन फेकून दिली व आग विझविली. यामध्ये चंदू शिंदे जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. फौजदार बन्सीलाल मेसाजी सगट यांच्या फिर्यादीवरून शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार पी. पी. शिंदे हे करीत आहेत.

Labels:

पत्रकारास जीवे मारण्याची धमकी देणा-यावर कारवाईची मागणी

उस्मानाबाद : वृत्तपत्रात बातमी प्रसिध्‍द केल्याचा राग मनात धरुन उमरगा येथील एका पत्रकारास फोनवरुन जीवे मारण्याची धमकी देणा-या कचरा ठेकेदा-याच्या कर्मचा-यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघ व उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने निवेदनाद्वारे उस्मानाबाद जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे.
    निवेदनात म्हटले आहे की, रविवार दि. 25 ऑगस्ट रोजीच्या दै. दिव्यमराठीमध्ये  उमरगा येथील कचरा स्वच्छतेबाबत वृत्त प्रसिध्द झाले आहे. याचा राग मनात धरुन कचरा ठेकेदाराच्या कर्मचा-यांनी उमरगा प्रतिनिधी अरुण इगवे यांना मोबाईल वरुन जीवे मारण्याची धमकी दिली आहे. अशाप्रकारे स्वत:चा भ्रष्टाचार लपवण्यासाठी पत्रकारावर दबाव टाकण्याचा हा प्रकार अतिशय निंदनीय आहे. वृत्तपत्र स्वातंत्राची गळचेपी करणा-या संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देऊन शासनाकडे प्रस्तावित असलेला पत्रकार संरक्षण कायदा त्वरीत लागू करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनाची एक प्रत राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक याना देण्यात आले आहे. या निवेदनावर पत्रकार महेश पोतदार, विशाल सोनटक्के, चंद्रसेन देशमुख, प्रशांत कावरे, संतोष हंबीरे, जी.बी. राजपूत, संतोष जाधव, राजाभाऊ वैदय, बालाजी निरफळ, रविंद्र केसकर, राम खटके, उपेंद्र खटके, उमेश वाघमारे, सयाजी शेळके, बाळासाहेब माने, प्रविण पवार, सुधीर पवार आदींच्या स्वाक्ष-या आहेत.

Labels:

Sunday, 25 August 2013

वैष्णोदेवी कडून उत्कृष्ट दुग्धजन्य पदार्थाची निर्मिती : ना. चव्हाण

नळदुर्ग -: ग्रामीण भागातील सुशिक्षितासह अशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम उपलब्ध करुन दिले, त्याचबरोबर दुग्ध उत्पादकांना योग्य दर देऊन वैष्णोदेवी फुड प्रॉडक्ट कंपनीने अतिशय चांगल्या दर्जाचे दुग्धजन्य पदार्थाची निर्मिती करीत आहे. असे गौरवोदगार पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण यांनी बाभळगाव (ता. तुळजापूर) येथील वैष्णोदेवी फुड प्रॉडक्ट कंपनीच्या वर्धापनादिनानिमित्त आयोजित दुध भुकटी प्रकल्पाच्या उदघाटनप्रसंगी काढले.
            रविवार दि. 25 ऑगस्ट रोजी वैष्णोदेवी फुड प्रॉडक्ट कंपनीच्या सातव्या वर्धापनादिनानिमित्त आयोजित वीस टन दुध भुकटी प्रकल्पाचे उदघाटन पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर रक्तदान शिबीराचे उदघाटन ना. चव्हाण यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.  या प्रकल्पावर 4 लाख लीटर दुधापासून 20 टन दुध भुकटी व दुग्धजन्य पदार्थ तयार होणार आहे. सध्या या ठिकाणी 2 लाख 40 हजार लिटर दूध हाताळणी होते. या ठिकाणी दीडशेपेक्षा अधिक कामगार आहेत. गायीच्या प्रति लिटर दूधास 19 रुपये पन्नास पैसे दर, म्हशीच्या दुधाला 27 रुपये प्रतिलिटर दर दिले जाते. ग्रामीण भागातील दुध उत्पादकांना चांगला दर मिळत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. भविष्यात 6 लाख लिटर दूध संकलन करुन दररोज 30 टन दुध भुकटी करण्याचा संकल्प वैष्णोदवी फुड प्रॉडक्ट कंपनीचे कार्यकारी संचालक नवनीत काकानी यांनी सांगितले.
          सोलापूर येथील डॉ. हेडगेवार रक्तपेढी यांच्याकडून रक्तदान शिबिरामध्ये 51 रक्तदात्यांचे रक्त संकलन करण्यात आले. याकामी डॉ. आनंद वैदय, जनसंपर्क अधिकारी दिलीप बनसोडे, संगीता महनते, मनीषा साळुंखे, मारुती बंडगर, अनिल जांभळे, राजु गुजर, पार्वतीबाई कोळी आदींनी परीश्रम घेतले. तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी व्यवस्थापक गोपाल चंडक, उपकार्यकारी व्यवस्थापक महेंद्र जाधव, विजय मुळे, श्रीकांत जोशी, शरद बोर्डे, प्रिया जाधव, प्रज्वल शेटटी आदींनी परीश्रम घेतले.

Labels: