Thursday, 31 July 2014

बेंबळी ग्रामपंचायतीवर धनगर समाजाचा मोर्चा

उस्‍मानाबाद :- राज्य घटनेतील तरतुदीनुसार धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करून आरक्षण जाहीर करावे तसेच तांडा वस्ती सुधार योजनेचा निधी मंजूर करवून घेऊन गावातील धनगर वस्तीच्या विकासासाठी तो निधी खर्च करावा, या मागण्यांसाठी धनगर समाजबांधवांनी मेंढरांसह ग्रामपंचायतीवर धडक मोर्चा काढला.
    गावातील श्रीखंडोबा मंदीर येथून सकाळी १० वाजता सामाजिक कार्यकर्ते शिवाजी फस्के, दत्ता सुडके, धनगर विकास परिषदेचे तालुका उपाध्यक्ष शिवाजी गावडे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चास प्रारंभ झाला. मेंढपाळ व्यावसायिक गोरोबा कोकरे व लक्ष्मण गाडे यांनी आपल्या मेंढरांसह मोर्चात सहभाग नोंदविला. ‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बाप्पाचं’, ‘धनगर आरक्षण जाहीर झालेच पाहिजे’, अशा घोषणा देत हा मोर्चा ग्रामपंचायतसमोर आला. धनगर विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ. गोविंद कोकाटे व तालुका उपाध्यक्ष शिवाजी गावडे यांनी मोर्चेकर्‍यांना मार्गदर्शन करून या मोर्चामागील भूमिका स्पष्ट केली. यावेळी उपसरपंच बाळासाहेब माने यांनी आपले मनोगत व्यक्त करून धनगर समाजबांधवांच्या या आंदोलनास पाठींबा जाहीर केला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य बालाजी गावडे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ सोनटक्के, माजी सरपंच मोहन खापरे, नंदकुमार गावडे, नवनाथ कांबळे, महादेव गावडे, गोरोबा घोडके, शंकर वाघे, अविनाश सोनटक्के, सचिन कोरे, मारूती कस्पटे, नारायण सोनटक्के, रणजित सोनटक्के, विजय दगडकाडे, तानाजी तानले, दिलीप सोनटक्के, सुहास सोनटक्के, अजय गंगथडे, गणेश गंगथडे, दादा सोनटक्के, रामभाऊ सोनटक्के, मुन्ना वाघुलकर, गजेंद्र वाघुलकर, अंकुश डावकरे, अनिल दाणे, अनिल घोडके, विष्णू सोनटक्के, महेश सोनटक्के, महेश गाडे, आकाश सोनटक्के, बालाजी दाणे, तानाजी फस्के यांच्यासह शेकडो समाजबांधव उपस्थित होते. यावेळी ग्रामसेवक सोनटक्के व तलाठी यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

Labels:

आरक्षणासाठी धनगर समाजबांधवांचे आमरण उपोषण सुरु

उस्मानाबाद -: धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करून आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी धनगर आरक्षण कृती समितीच्यावतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरूवार, दि. ३१ जुलै २०१४ पासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. याबाबतचे निवेदन  मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे. 
     राज्यातील धनगर समाजाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेनुसार एसटी प्रवर्गाची सवलत मिळणे आवश्यक असताना धनगड हा शब्द हिंदी असल्यामुळे महाराष्ट्रातील धनगर समाज या प्रवर्गात मोडत नसल्याचे सांगितले जात आहे. धनगड आणि धनगर हे दोन्ही शब्द एकच असल्याचा निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयानेही दिला आहे. असे असताना सवलतीपासून वंचित ठेवण्यासाठी व राजकीय खच्चीकरण करण्यासाठी धनगर समाजाला न्याय दिला जात नाही. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू न केल्यास निवडणुकीत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंगे्रस आघाडीला याची किंमत मोजावी लागेल, अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. या आमरण उपोषणात कमलाकर दाणे, संदीप वाघमोडे, अनिल ठोंबरे, यशवंत डोलारे हे उपोषण करीत आहेत. त्यांना डॉ. गोविंद कोकाटे, राजाभाऊ वैद्य, ऍड. खंडेराव चौरे, आश्रुबा कोळेकर, अमोल गाडे, राहुल कानडे, निळकंठ होळकर, शिवाजी गावडे, सुनिल कानडे, संदीप वाघमोडे, राजाराम तेरकर, पिंटू गायके, अमोल कस्पटे, अनिल ठोंबरे, दत्ता गायके, केशव सलगर, अमोल पाडुळे, पांडूरंग लोकरे, मुकेश कोळेकर, दौलत गाढवे, श्रीकांत मैंदाड, नामदेव गडदे, मनीष वाघमारे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अजित पिंगळे, उस्मानाबादचे तालुकाप्रमुख दिलीप जावळे-पाटील, कॉंग्रेस मिडीया सेलचे जिल्हाध्यक्ष धनंजय रणदिवे, रूपामाता मल्टीस्टेटचे चेअरमन ऍड. व्यंकटराव गुंड, प्रशांत कावरे आदींनी पाठींबा दिला.

Labels:

आपत्कालीन पीक नियोजन व्यवस्थापन

खरीप हंगामात शेतक-यांची आर्थीक उन्नती व्हावी, त्यांच्या प्रयत्नास यश मिळावे, कमी काळात, कमी वेळेत अधिक उत्पन्न देणारी पीक घेवून त्यांचा फायदा व्हावा, यासाठी आपत्कालीन पीक व्यवस्थापनाबाबत राज्य शासनाच्या कृषी विभागातर्फे मार्गदर्शन करण्यात येत आहे. कोणत्या कालावधीत कोणते पीक घ्यावे, याबाबत शेतक-यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.
    लहरी हवामानाचा फटका नेहमीच शेतकऱ्यांना बसतो. त्यातच पावसाचे उशीरा होणारे आगमन, पाऊस आल्यानंतरही त्याची अनियमितता यामुळे शेतकऱ्यांनी घेतलेली पीके वाया जातात. श्रम आणि आर्थिक फटकाही शेतकऱ्यांना बसतो. हे टाळण्यासाठी कृषि विभागातर्फे शेतकऱ्यांना आपत्कालीन पीक नियोजन व व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना आपत्कालीन काळात शेतीची निगा, करावयाची उपाययोजना पेरणी योग्य पावसाचे आगमन व कालावधीमध्ये कोणती पीक घ्यावी व कोणती घेवून नयेत, याबाबत शेतकऱ्यांना मौलिक सल्ला देण्यात येत आहे.
    खरीप हंगाम आता सुरु झाला आहे. अद्यापही जिल्ह्यात पाहिजे त्या प्रमाणात पाऊस पडलेला नाही. खरीप हंगामात पाण्याचा ताण पडल्यास पीकवाढीच्या काळात 15 ते 20 दिवसाची उघडीप झाल्यास पिकावर पाण्याचा ताण येण्याची शक्यता असल्याने शेतक-यांनी काही बाबी लक्षात घेऊन वेळेत शेतीची कामे करणे आवश्यक आहे.
    जमिनीत ओलावा टिकविण्यासाठी शेत तण विरहीत ठेवावे. तणामुळे ओलाव्यासाठी व अन्न द्रव्यासाठी पिकाबरोबर स्पर्धा वाढून ती पिकांना उपलब्ध होत नाही. त्यासाठी खुरपणी, निंदणी करावी. कोळप्याची हलकी पाळी दिल्यास जमिनीतील भेगाव्दारे नष्ट होणाऱ्या पाण्याचा अपव्यय टाळता येतो. आच्छादनाचा वापर करावा. उदा-गिरीपुष्प/ सुबाभूळ पाला किंवा गव्हाचे काडे पसरावे. पिकाच्या बाष्पीउत्सर्जन कमी करण्यासाठी पोटॅशियम नायट्रेटची फवारणी करावी. पाण्याची उपलब्धता असल्यास संरक्षित किंवा पीक जगविण्यासाठी पाणी दयावे, तुषार पध्दतीने पाणी दिल्यास जास्तीचे क्षेत्र कमी कालावधीत भिजविता येईल. तुषार पध्दतीने शक्य नसल्यास एक आड एक सरी भिजवावी व उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करावा.
    पाण्याचा ताण दिर्घकाळ राहील्यास पिकावर किडीचा प्रादुर्भाव वाढतो. उदा- कापूस पिकावर फुलकिडे तर सोयाबीन पिकावर पाने गुंडाळणाऱ्या अळया, पाने कुरतडणाऱ्या अळ्या, केसाळ अळ्या आदि किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते अशा परिस्थितीत कीड नियंत्रण करणे गरजेचे असते.
    उघडिपीनंतर पाऊस पडल्यास नत्राची मात्रा दयावी. कोळप्याच्या साहयाने अथवा लाकडी नांगरास 5 ते 6 इंचावर दोरी बांधून 4 ओळीनंतर सऱ्या काढाव्यात. यामुळे पुढे पडणाऱ्या पावसाचे मुलस्थानी जलसंवर्धन होईल, अशा तऱ्हेने नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करुन पिकाचे संरक्षण करावे.
    अतिवृष्टीच्या कालावधीत घ्यावयाची काळजी- अतिवृष्टी झाल्यास शेतातील पाण्याचा निचरा करावा, कापूस, तूरसारख्या जास्त अंतरावरील पिकात एक आड एक सऱ्या काढाव्यात म्हणजे पाण्याचा ताण पडल्यास संरक्षित पाणी दयावे व अतिवृष्टी झाल्यास निचरा होण्यास मदत होईल. जमीन आणि पाण्याचे संवर्धन करणे हा कोरडवाहू शेतीचा आत्मा आहे.
    यानुसार,  दिनांक 1 ते 15ऑगस्ट या कालावधीत संकरित बाजरी, रागी, सुर्यफुल, तूर, एरंडी-धने, एरंडी+तूर,एरडी+आणि धने अपरिहार्य परिस्थीत घ्यावीत. परंतु कापूस, संकरित ज्वारी, भुईमुगाची लागवड करु नये. दि.16 ते 31 ऑगस्ट या कालावधीत संकरित बाजरी, सुर्यफुल, तुर, एरंडी+धने, एरंडी+तूर आणि धने अपरिहार्य परिस्थिती लागवड करावीत. परंतु कापूस, संकरितज्वारी, भुईमग आणि तीळ ही पीके घेवू नयेत.
    दि.20 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत रब्बी ज्वारी, करडई पीके घ्यावीत. परंतु हरभरा, जवस आणि गव्हाची पेरणी करु नये. दि. 1 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर पर्यंत रब्बी ज्वारी, करडई आणि जवसाची पीके घ्यावीत. परंतु सुर्यफुल व गव्हाची पेरणी करु नये. आणि दि. 16 ऑक्टोबर ते 10 नोव्हेबर या कालावधीत हरभरा, करडई, गहू आणि जवसाची पीके घ्यावीत. परंतू रब्बी ज्वारी आणि सूर्यफुल या पीकाची लागवड करु नये.
    शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी गावपातळीवरील कृषी सहायक यांच्यासह मंडळ कृषी अधिकारी, तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी, आणि जिल्हास्तरावर अधीक्षक कृषी कार्यालय आणि जिल्हा परिषदेचा कृषी विभाग यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला तरीही त्यांना ही माहिती मिळू शकेल. त्यामुळे या सर्व मार्गदर्शनाचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहनही कृषी विभागाच्या मार्फत करण्यात येत आहे.    

- जिल्हा माहिती कार्यालय,
उस्मानाबाद

पिकविम्याची मुदतवाढ करण्याची शेतकरी संघटनेची मागणी

बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: सद्यस्थितीचा विचार करुन पिकविमा भरण्याची मुदत वाढविण्यात यावी तसेच वंचित गारपीठग्रस्त शेतकर्‍यांना अद्यापही अनुदान मिळाले नसल्याने सखोल चौकशी करावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष शंकर गायकवाड यांनी तहसिलदारांकडे केली आहे.
    दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माझ झाल्यानंतर उशीराने पावसाचे आगमन झाले त्यमुळे बार्शी तालुक्यात सद्यस्थितीत केवळ ५५ टक्के पेरण्या झाल्या आहेत. पिकविमा भरण्यासाठी देण्यात आलेली मुदत संपत असल्याने शेतकर्‍यांना पिकविम्याचा प्रस्ताव सादर करण्यासाठी मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. पिकविम्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची जुळवाजुळव करतांना तलाठ्यांची अनुपस्थिती, शेतकर्‍यांना पेरण्या करण्यासाठी शेतामध्ये थांबावे लागणे आदी कारणांसाठी विलंब होत आहे.
    मुदतवाढ केल्यास शेतकर्‍यांना त्याचा उपयोग होईल याबरोबरच गारपीठग्रस्त शेतकर्‍यांचे नुकसान भरपाई मिळावी यासाठी केंद्र व राज्य शासनाने दिलेले अनुदान ज्यांचे नुकसान झाले नाही त्यांना देण्यात आले आहे. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी विहीत नमुन्यातील र्ए करुनही त्यांचे अर्ज बाजूला ठेऊन ज्यांचे कसलेही नुकसान झाले नाही त्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्याची घाई केली आहे. सदरच्या घटनेत प्रचंड भ्रष्टाचार झाल्याची शंका येत असल्याने त्याची सखोल चौकशी करावी अशी मागणीही शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकर्‍यांच्या मागणी व तक्रारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यास शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल व प्रसंगी तहसिल कार्यालयास टाळे ठोकून संबंधीत अधिकार्‍यांना तोंडाला काळे फासेल असेही शेतकरी संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Labels:

खामगावात शुध्द पाणी जागृती अभियान

बार्शी : माणसांना अनेक आजार हे अशुध्द पाण्यामुळेच होतात, ग्रामीण भागात तर बहुतांश नागरीक अशुध्दच पाणी पितात, त्यामुळेच स्वयंसेवी संस्थांनी ही बाब गांभीर्याने घेत ग्रामीण भागात शुध्द पाण्याचे प्रकल्प उभा करण्याचा स्तुत्य आहे़ अशा प्रकल्पामुळे पाण्याबरोबरच नागरीकांची मने देखील स्वच्छ होतील असे प्रतिपादन डॉ़ सुनिल पाटील यांनी केले़.
    खामगाव येथे मातृभुमी प्रतिष्ठाणच्या वतीने शुध्द पाणी जागृती अभियानांतर्गत आयोजित कार्यक्रमात बोलत होते़. अध्यक्षस्थानी शिवाजी ग्राम कृषि मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर डमरे हे होते़ यावेळी शिवाजी पवार, रोटरीचे अध्यक्ष गौतम कांकरिया, मातृभुमी प्रतिष्ठाणचे अध्यक्ष संतोष ठोंबरे, सचिव प्रतापराव जगदाळे, सदस्य मुरलीधर चव्हाण, शहाजी फुरडे-पाटील, माजी सभापती युवराज काटे, सरपंच सुरज नलगे, कैलास मडके,शुध्द पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष काकासाहेब झांबरे, महादेव पाटील आदी उपस्थित होते़
    डॉ़ पाटील म्हणाले की, ग्रामीण भागात आजही मुलभुत सोयीसुविधांची वानवा आहे़ आपण रोज जे पाणी पितो ते आपल्याला वरुन शुध्द आहे असे वाटते मात्र ते तसे  सते, त्यामुळे अनेक आजार होऊ शकतात, त्यामध्ये कॉलरा हा मुख्य आजार आहेक़ॉलºयाबरोबरच काविळ, टॉयफॉइड, व आतड्याचे साठ प्रकारचे आजार होतात़ नागरिकांनी  जार झाल्यावर काळजी घेण्यापेक्षा पुर्वीच घेतलेले चांगले़ असे सांगून मातृभुमी प्रतिष्ठाण ने शुध्द पाणी नव्हे आरोग्याची गंगा गावात आणली असल्याचे पाटील म्हणाले़ शिवाजी पवार यांनी आज आपण नको त्या ठिकाणी कितीतरी पैसा खर्च करतो, मात्र पाण्याच्या बाबतीत आपण दक्ष नाही़ शुध्द रहाणे व चांगले खाणे हे महत्वाचे आहे़ आपण तंदुरुस्त असणे हे सर्वात महत्वाचे असून तंदुरुस्त असल्याशिवाय कांहीच करु शकणार नाही, त्यासाठी शुध्द पाणी पिणे गरजेचे आहे़ रोटरी क्लब, मातृभुमी प्रतिष्ठाण यासारख्या संस्था यासाठी  पुढे आल्या ही बाबत कौतुकास्पद आहे़ नागरीकांनी या शुध्द पाण्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन पवार यांनी केले़ प्रास्ताविकात प्रतापराव जगदाळे यांनी  मातृभुमी प्रतिष्ठाण विषयी तसेच शुध्द पाण्याच्या प्रकल्पाविषयी माहिती दिली़ सुत्रसंचलन काकासाहेब झांबरे यांनी केले़ कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तुकाराम नलगे, यशवंत मुठाळ, सुभाष ठोंबरे, तानाजी लोखंडे, सुधाकर करंडे, आण्णासाहेब उघडे, सचिन काटे, शंकर देशमुख, हरिश्चंद्र मुठाळ, बापूसाहेब नाईकनवरे, बाळासाहेब लोखंडे,शरद खंदारे, संतोष कंगले, यांनी परिश्रम घेतले़.
    बार्शी शहर व तालुक्यातील उद्योग, व्यवसाय,पत्रकारिता , प्रशासन आदीसह विविध क्षेत्रात यशस्वी झालेल्या तसेच ज्यांना समाजकार्यांची आवड आहे अशा कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन मातृभुमी प्रतिष्ठाणची स्थापना केली आहे़ नौकरीनिमीत्त आपण जरी आपल्या गावापासून बाहेर असलो तरी आपल्या मातृभुमीची सेवा करणे या एकमेव उद्देशाने या मंडळाची स्थापना करण्यात आली आहे.
    पहिल्या वर्षी आर ओ प्लँट बसवून शुध्द पाण्याचा प्रकल्प राबविण्यासाठी खामगाव, घारी, घाणेगाव, आगळगाव व इर्ले या गावांची निवड करण्यात आली आहे़ यामध्ये गावात सौरदिवे बसवणे, प्राथमिक शाळेसाठी मनोरंजनाची खेळणी बसवणे, आदी प्रकल्प मातृभुमी प्रतिष्ठाण, रोटरी क्लब, कृषी पदवीधर संघटना व गावकºयांचा लोकसहभाग यामधून बसवण्यात येणार आहेत.

Labels:

दुष्ट प्रवृत्तींना ठेचून काढू - प्रा.साहेबराव देशमुख

बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) :- सोलापूर जिल्हा परिषद आवारात असलेल्या सहकारमहर्षि शंकरराव मोहिते पाटील यांच्या पुतळ्याची समाजकंटकाकडून विटंबना करण्यात आली. त्याचे पडसाद संपूर्ण जिल्ह्यात दिसून आले. जनसेवा संघटना व विजय प्रताप युवा मंचच्या वतीने बार्शीतील शासकिय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन सदरच्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
    यावेळी बोलतांना संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रा.साहेबराव देशमुख व सुनिल पवार यांनी बुधवारी दि.३१ रोजी सोलापूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती दिली. जिल्ह्यातील शेतकरी व सर्वसामान्य शेतकर्‍यांचे दैवत असलेल्या सहकारमहर्षि शंकरराव मोहिते पाटील यांनी सहकाराची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या पुतळ्याच्या विटंबनेमुळे गालबोट लागले असून जिल्ह्यातील सर्व ठिकाणहून त्याबाबत निषेध केला जात आहे. सदरच्या प्रकरणानंतर खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले आहे. समाजकंटकाकडून वारंवार थोर पुरुषांची विटंबना करण्याचे प्रकार वाढत असल्याने अशा दुष्ट प्रवृत्तींना जनसेवा संघटना व विजय प्रताप युवा मंचच्या वतीने ठेचून काढू असेही साहेबराव देशमुख यांनी यावेळी म्हटले.
    बार्शी तालुक्यातील जनतेच्या वतीने तसेच शिवसेनेचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी आपण व्यक्तीश: निषेध व्यक्त करत असल्याचे सांगीतले. सदरच्या घटनेची संपूर्ण चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी जनसेवा संघटना, विजय प्रताप युवा मंच, मोहिते पाटील समर्थक यांच्या वतीने संयुक्तपणे करण्यात आली आहे.
    या पत्रकार परिषदेसाठी विजय प्रताप मंचचे अध्यक्ष प्रा.साहेबराव देशमुख, बार्शी तालुका राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष ऍड्.अनिल पाटील, जनसेवाचे जिल्हा सरचिटणीस सुनिल पवार, बाबासाहेब शिंदे, बाळासाहेब पाटील, नरेंद्र नलावडे, कौरव माने, अनिल डिसले, धनाजी गायकवाड, उमेस भोसले आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Labels:

बार्शीत धनगर समाजाचे रास्ता रोको

बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) :- राज्यातील सुमारे दिड कोटी लोकसंख्या असलेल्या धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एस.टी.) मध्ये समाविष्ट करावे या मागणीसाठी बार्शीतील धनगर समाज कृती समितीच्या वतीने कुर्डूवाडी रस्त्यावर पोस्ट चौकात सुमारे एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे वाहतुक विस्कळीत झाली होती. सकाळी ११ च्या सुमारास शहर व तालुक्यातील धनगर समाजातील कार्यकर्ते पिवळे ध्वज, ढोल व हळदीची उधळण करत घोषणा देत होते. पोष्ट चौकात धनगर समाजबांधवांनी एकत्र येऊन शासनाच्या विरोधात घोषणा दिल्या. धनगर समाजाच्या रास्त मागण्यांसाठी शिवसेनेचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी रास्ता रोकोच्या ठिकाणी हजर राहून जाहीर पाठींबा दिला. पालकमंत्री दिलीप सोपल यांना निवेदन देण्यात आले त्यांनी याबाबत पाठपुरावा करु असे आश्वासन दिले आहे. शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, राजेंद्र मिरगणे यांनी या आंदोलनास पाठींबा दर्शविला आहे.
    धनगर जातीच्‍या नमोल्‍लेखात झालेल्‍या त्रुटीमुळे अनेक वर्षापासून हा समाज अनुसुचित जमाती या सवलतीपासून वंचित राहिला आहे. शिक्षणाबरोबरच नोकरीतही आरक्षण मिळावे, या मागणीचे निवेदन नायब तहसिलदार गायकवाड यांना देण्‍यात आले.   
    यावेळी नारायण मारकड, विश्‍वास शेंडगे, आरपीआयचे तानाजी बोकेफोडे, धनगर समाज आरक्षण कृती समितीचे बसवराज कुंटोजी, आप्‍पा शेंडगे, प्रमोद वाघमोडे, सुभाष शेळके, अॅड. आर.यू. वैद्य, बाळासाहेब पाटील, सचिन वायकुळे, दिपक खरात, बिभीषण पाटील, शितल पाटील, भिकाजी शिंगाडे, अंबऋषी कोळेकर, अरुण वैद्य, पांडुरंग गडदे यांच्‍यासह मोठ्या संख्‍येनी धनगर समाजबांधव उपस्थित होते.
    रास्‍ता रोकोच्‍या ठिकाणी पोलीस निरीक्षक सालार चाऊस, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक डाके, अतुल पोस, सुरेखा धस, युवराज वाळके, पोलीस उपनिरीक्षक पंकज निकम यांच्‍यासह पोलिस बंदोबस्‍त तैनात करण्‍यात आला होता.

Labels:

पीक विमा भरण्‍यासाठी बँकेत शेतक-यांची गर्दी

पांगरी (गणेश गोडसे) :- दुष्काळी परिस्थतीच्या पार्श्‍वभुमीवर शेतक-यांचा आगाताचा हंगाम वाया जाण्‍याची चिन्हे असुन शेतक-यांनी पिक विमा भरण्‍यासाठी बँकामध्ये एकच गर्दी केली असुन पिक विम्याची मुदत वाढवुन मिळावी अशी बार्शी तालुक्यातील शेतक-यांची मागणी आहे. पीक विमा भरण्‍यासाठी बरेच सोपस्कर पार पाडावे लागत असल्यामुळे व त्यासाठी बराच काळ जात असल्यामुळे मुदतवाढ मिळणे गरजेचे आहे.
     शेतक-यांनी अल्पशा ओलीवर काळया आईची ओटी भरली असुन पिकांची उगवण झाली आहे. इतर भागात पर्जन्यवृष्ठी सुरू असताना बार्शी तालुका मात्र कोरडाच राहीला आहे. शासनाने सुरू केलेल्या राष्ट्रीय कृषी विमा योजनेतुन उडीद, मुग, सोयाबिन, तुर, सुर्यफुल, भुइमुग, भात हुलगा, मटकी, बाजरी, कांदा आदी पिकांचा विमा उतरवण्‍याचे काम सुरू असुन पिक विमा भरण्‍याची अंतिम मुदत ३१ जुलै ही ठरवण्‍यात आली आहे. त्यामुळे पिक विमा भरण्‍यासाठी शेतक-यांची एकच धांदल उडाली आहे. बँकामधुन इतर कामांना फाटा देऊन पिक विमा भरून घेण्‍यासाठी विशेष उपाययोजना राबुन त्यासाठी स्वतंत्र टेबलांची यंत्रणा तयार करण्‍यात आली आहे. पिक विमा भरण्‍यासाठी एकच दिवसाचा कालावधी शिल्लक राहीला असल्यामुळे बँक कर्मचा-यांसह शेतक-यांना त्रासदायक ठरत आहे. शेतक-यांच्या रांगा बँकेतुन दुरपर्यंत बाहेर पडुन रस्त्यांवर आल्याचे निदर्शनास येत आहे. पिक विमा भरणा-या शेतक.यांची संख्या अजुनही मोठया प्रमाणात शिल्लक असुन शासनाने पिक विमा भरून घेण्‍यासाठी मुदतीत वाढ करावी असा सुर शेतक-यांमधुन उमटत आहे.
    अगोदरच दुष्काळी परिस्थती त्यात पुरेश्या ओलीमुळे बियानांची उगवण झाली नाही. ज्यांच्या बियानांची उगवण झाली ती पिके पावसाअभावी माना टाकु लागली आहेत. पिकांची अवस्था भयावह असल्यामुळे किमान यावर्षी तरी पिक विम्याचा आधार मिळेल अशी आशा शेतकरी बाळगुन आहेत. मात्र पिक विमा भरूनही तो मिळेलच याची शाश्‍वती नसल्यामुळे ब-याच शेतक-यांनी याकडेही पाठ फिरवल्याचे दिसत आहे. चार वर्ष विमा भरल्यानंतर एकांदयावेळीच शेतक-याला विमा मिळतो असे शेतक-यांचे म्हणणे आहे. शेतक-यांचेच पैसै गोळा करून परत शेतक-यांना फिरवले जाते.

Labels:

कृषी मित्र आणि कृषी सहायकांमार्फत होतोय कृषी विस्तार

उस्मानाबाद -:  कृषी व संलग्न विभागांच्या विविध योजनांचा एकत्रित लाभ शेतक-यांना मिळाला पाहिजे, त्यासाठी कृषी मित्र  आणि कृषी सहायकांनी या योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत घेऊन जाणे आणि शेतक-यांना त्याचे महत्व पटवून देणे आवश्यक असल्याचा सूर उस्मानाबाद येथील आयोजित कार्यशाळेत उमटला.
       कृषी व पणन विभागाच्या वतीने पुष्पक मंगल कार्यालयात जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी  विविध विभागांच्या प्रमुखांनी त्यांच्या यंत्रणेचे कार्य व योजनांची माहिती उपस्थितांसमोर मांडली. कृषी विस्तार कार्यक्रम म्हणजे दुसरे काही नसून या योजना शेतकऱ्यांपर्यंत घेऊन जाणे आहे. त्यादृष्टीने सकारात्मक पद्धतीने प्रयत्न करण्याचे आवाहनही या कार्यशाळेत करण्यात आले.
     कषी योजनांसह आत्मा, दुग्धविकास, कृषी यांत्रिकीकरण, मत्स्यव्यवसाय, रेशीम उद्योग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या योजनांची माहिती यावेळी देण्यात आली.
     आत्माचे विभागीय उपसंचालक संतोष आळसे म्हणाले की, भारत हा कृषीप्रधान देश असून या देशात शेती विकास पध्दती विकसित करण्याचे कार्य शेतकऱ्यांकडून होणे अपेक्षित आहे. शेतकऱ्यांनी पुरुष व महिला गटाची स्थापना करुन शेतविषयक अडचणी मांडण्यासाठी पुढे आले पाहिजे. त्यांचे संयुक्त अभ्यास दौरे सोबत झाले तरच त्यांच्यामध्ये शेती विषयक केंद्राच्या अंमलबजावणीसाठी  एकोपा निर्माण करणे अभिप्रेत आहे. राष्ट्रीय फलोत्पादन योजना सर्व गटासाठी लागू करण्यासाठी शेतकरी गट, विस्तारित गट, समुह गट, गट शेतीचे साधनाच्या आधारे नियोजन करणे महत्वाचे आहे. आदर्श शेती करण्यासाठी कृषि मित्राचे मनुष्यबळाचा वापर करावा. त्यांचा वापर करुन घेतल्यास आदेश शेती करता येते,असे मत यांनी कृषि व संलग्न विभाग योजना अभिसरण जिल्हास्तरीय कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना सांगितले.
    विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाचे अधीक्षक कृषी अधिकारी अशोक किरनळ्ळी यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली. यामध्ये प्रामुख्याने पिक विमा, शेतकरी जनता अपघात विमा, खरीप हंगाम धोरण या संकल्पनेवर आधारित विकास योजना, तसेच कमी पाण्यावर जास्त उत्पादन घेण्यासाठी उत्पादक व ग्राहक धोरण, शेतकऱ्यांच्या बांधावर बियाणे, प्रकल्पावर आधारित कृषिविषयक गटामार्फत शेतकरी गटाचे बळकटीकरण करणे, गळीत व कडधान्य विकसीत करण्यासाठी काम करणे महत्वाचे आहे. कोरडवाहू शेती अभियानात गावांची निवड करुन प्रकल्पातंर्गत कामे करणे, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान ( नगदी पिके), राष्ट्रीय गळीत धान्य  तेलताडा अभियान, कोरडवाहू शेती अभियान आणि राष्ट्रीय कृषि विकास योजनेतंर्गत वैरण विकास कार्यक्रम योजनेच्या अंमलबजावणीसाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे,असे आवाहन श्री किरनळ्ळी यांनी केले.
    प्रादेशिक रेशीम कार्यालयाचे सहायक संचालक डॉ. डी. ए. हाके  यांनी रेशीम उद्योगाविषयी विवेचन केले. रेशिम उद्योग पूर्वी महाराष्ट्राच्या सीमालगतच्या भागात चालत असे, पण मागील काही वर्षापासून हा उद्योग प्रत्येक जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. रेशीम उद्योगासाठी लागणाऱ्या कोष व तुतीची लागवड यासाठी अत्यंत कमी पाणी लागते. कमी वेळेत चांगले उत्पादन घेता येते. या योजनेसाठी शासनाकडून अनुदानही उपलब्ध करुन दिले जाते. या व्यवसायात महिलांचा सहभाग महत्वाचा असल्याचे सांगितले. याशिवाय, शासनाने रेशिम उद्योगात कच्चा माल ते बाजारपेठ पर्यंतच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यामुळे या उद्योगावाढीसाठी शेतकरी  व महिलांनी पुढे यावे, असे आवाहन केले.
    तुळजापूर कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. व्ही. जी. टाकणखार यांनी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करतांना जमिनीचे आरोग्याची काळजी तेवढीच महत्वाची आहे. शेती करतांना जमिनीतील कस व पोत कमी होऊ नये यासाठी शेणखत, गांडूळखत, सेंद्रीय खताचा वापर शेतीत वाढविल्यास शेती पिकाचे उत्पादन  वाढते. तसेच चुनखडीयुक्त जमिनीचे अन्नद्रव्ये व्यवस्थापन करतांना त्यातील घटकांचे परिक्षण करणे गरजेचे आहे. समतोल अन्नद्रव्यासाठी कार्बन, हायड्रोजन व ऍ़क्सीजनची महत्व आहे. शेतीतील खताचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रति एकरी 8 किलो गंधकाचा वापर करावा,असेही त्यांनी सांगितले.  यावेळी डॉ. राज पाटील यांचे कृषी यांत्रिकीकरण विषयावर मार्गदर्शन झाले.  

Labels:

शेतकरी गटाच्या माध्यमातून योजनांच्या एकत्रित अंमलबजावणीसाठी प्रयत्न : डॉ. नारनवरे

उस्मानाबाद :- राज्य शासनाच्या कृषी व संलग्न योजनांच्या विविध योजनांची अंमलबजावणी एकत्रितरित्या केली तर त्याचा लाभ जिल्ह्यातील शेतक-यांना होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शेतक-यांनी शेतकरी गटाच्या माध्यमातून या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन विकास साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांनी केले.
    येथील पुष्पक मंगल कार्यालयात कृषी व संलग्न विभाग योजना अभिसरण (स्कीम कन्वर्जन्स) कार्यशाळा  आयोजित करण्यात आली होती. त्याचे उदघाटन डॉ. नारनवरे यांच्या हस्ते झाले. विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाचे अधीक्षक कृषी अधिकारी अशोक किरनळ्ळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, आत्माचे प्रकल्प संचालक विजय लोखंडे, आत्माचे विभागीय उपसंचालक संतोष आळसे, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. व्ही. जी. टाकणखार,  प्रादेशिक रेशीम कार्यालयाचे सहायक संचालक डॉ. डी. ए. हाके, मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. एस. आर. साबळे, एस. आर. चोले आदींची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती.
यावेळी डॉ. नारनवरे म्हणाले की, कृषी व संलग्न विभाग योजना अभिसरण हा राज्यातील नावीन्यपूर्ण उपक्रम असून तो आपल्या जिल्ह्यात राबविला जात आहे, ही आनंदाची बाब आहे. जिल्ह्यातील शंभर टक्के शेती ही शेतकरी गटामार्फत झाली, तर त्याचा लाभ हा सर्व शेतकऱ्यांना होणार आहे. त्यामुळे आत्मा योजनेंतर्गत  जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी शेतकरी गटात सहभागी झाले पाहिजे. कृषी सहायकांनीही शेतकरी गटाचे फायदे शेतक-यांना समजावून सांगून त्यासाठी प्रेरित करण्याचे आवाहन त्यांनी केले.
      शासनाच्या विविध योजना एकत्रितपणे राबविल्या तर त्याचा फायदा संबंधित शेतकरी आणि गावाला होणार आहे. सध्या कृषी क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. कृषी यांत्रिकीकरण प्रत्येक शेतकऱ्यांस खर्चाच्या दृष्टीने परवडते असे नाही. त्यामुळे गटाच्या माध्यमातून शेती करणे हे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्याही परवडणारे असल्याचे त्यांनी सांगितले. कृषी विस्ताराच्या कार्यक्रमात हे गट अतिशय उपयुक्त ठरणार असल्याचेही डॉ. नारनवरे यांनी स्पष्ट केले.
      कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात तोटावार यांनी कार्यशाळा आयोजनामागील भूमिका समजावून सांगितली. आजच्या कार्यक्रमात शेतीमित्रांनाही बोलावण्यात आले होते. त्याचबरोबर उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी, कृषी सहायक यांची यावेळी उपस्थिती होती. विविध जिल्हास्तरीय कृषी संलग्न विभागांचे अधिकारीही यावेळी उपस्थित होते.    

Labels:

उस्मानाबाद जिल्ह्यात 2 हजार 202 घरकुलाच्या बांधकामास प्रशासकीय मान्यता

उस्मानाबाद :- सन 2014-15  या वर्षासाठी उस्मानाबाद जिल्ह्यात इंदिरा आवास योजनेच्या 1 हजार 480 व रमाई आवास योजनेच्या 722 असे एकुण 2 हजार 202 घरकुलाच्या कामास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी  सुमन रावत यांनी प्रशासकीय मंजूरी दिली आहे.
    इंदिरा आवास योजनेअंतर्गत तालुकानिहाय मंजूर घरकुलांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. उस्मानाबाद तालुक्यात 295 घरकुले बांधण्यात येणार असून तुळजापूर तालुकयात 310, उमरगा तालुक्यात 176, लोहारा तालुक्यात 86, कळंब तालुक्यात 244, वाशी तालुक्यात 78,भूम तालुक्यात 153 व परंडा तालुक्यात 138 घराकुले बांधण्याच्या कामास मंजूरी देण्यात आली आहे.
    तसेच रमाई आवास योजनेअंतर्गत  उस्मानाबाद तालुक्यात 216 घरकुले बांधण्यात येणार असून तुळजापूर तालुक्यात 255, उमरगा 47, लोहारा 47, कळंब 50, वाशी 69,भूम 39 व परंडा तालुक्यात 29 घरकुलांच्या बांधकामाचा समावेश आहे. प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेल्या लाभधारकांच्या यादया संबंधित पंचायत समितीच्या नोटीस बोर्डावर डकविण्यात आलेल्या आहेत. तसेच या यादया www.osmanabad.nic.in वर देखील उपलब्ध आहेत.
         मंजूर यादीतील लाभधारकांनी पंचायत समितीशी संपर्क साधून कागदपत्राची पूर्तता करुन घ्यावी व राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडून करारनामा करुन घ्यावे. तदनंतर घरकुलांची कामे सुरु करावीत, असे आवाहन प्रकल्प संचालक, उस्मानाबाद यांनी केले आहे. 

Labels:

Wednesday, 30 July 2014

ग्रामविस्तार अधिका-यांसह दोघा ग्रामसेवकांवर निलंबनाची कार्यवाही

उस्मानाबाद : जिल्हा परिषदेअंतर्गत येडशी येथील ग्रामविकास अधिकारी आणि भंडारवाडी आणि मेडसिंगा येथील ग्रामसेवक यांना गटविकास अधिका-यांनी कामकाजात अनियमितता, निष्काळजीपणा, अनधिकृत गैरहजर राहणे यासह विविध कारणांसाठी निलंबित केले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत यांच्या आदेशानुसार ही कार्यवाही करण्यात आली आहे.   
      उस्मानाबाद तालुक्यातील ग्रामपंचायत, येडसी येथील ग्रामविकास अधिकारी एस. एस. भुसे यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत लेखा परिक्षणासाठी अभिलेखे वेळीच सादर न करणे, ग्रामपंचायतीच्या कामकाजात अक्षम्य अनियमितता करणे, अभिलेखे अदयावत न ठेवणे, मासिक/ पाक्षिक बैठकीस गैरहजर राहणे, अहवाल मुदतीत सादर न करणे, सज्जावर अनाधिकृत गैरहजर राहणे आदि विविध कर्तव्यात  कसूर  केल्याबाबत पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, उस्मानाबाद यांनी एका आदेशान्वये निलंबित केले आहे.           
भंडारवाडी येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका श्रीमती एस. व्ही. गायकवाड  यांनी  अभिलेखे अदयावत न  ठेवणे, ग्रामपंचायतीच्या कामकाजात अक्षम्य अनियमितता करणे, मासिक/ पाक्षिक बैठकीस गैरहजर राहणे, अहवाल मुदतीत सादर न करणे आदि कामात  कसूर  केल्याबाबत शिस्तभंगाची कार्यवाही करुन श्रीमती गायकवाड  यांना  निलंबित करण्यात आले आहे.   
     मेडसिंगा  येथील ग्रामसेवक एन. पी. काकडे  यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत लेखा परिक्षणासाठी अभिलेखे वेळीच सादर न करणे,  अभिलेखे अदयावत न  ठेवणे, ग्रामपंचायतीच्या कामकाजात अक्षम्य अनियमितता करणे, मासिक/ पाक्षिक बैठकीस गैरहजर राहणे, अहवाल मुदतीत सादर न करणे आदि कामात  कसूर  केल्याबाबत त्यांना निलंबित करण्यात आले आहे.         

Labels:

जहागिरदार यांचा मनसेत प्रवेश

नळदुर्ग -: येथील सय्यद कौसर पाशा जहागिरदार यांनी महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. ते तुळजापूर विधानसभा निवडणुक लढवणार असल्‍याचे मनोदय व्‍यक्‍त केले असून त्‍यामुळे तुळजापूर विधानसभा मतदार संघात निवडणुक लढवू इच्छिणा-या इच्‍छुक उमदेवारांची मोठी संख्‍या होत असून जिल्‍ह्यातील एकमेव या मतदार संघात उमेदवारी जाहीर होण्‍यापूर्वीच बहुरंगी चित्र दिसत आहे.
      नळदुर्गचे हाफीज  सय्यद कौसरपाशा जहागिरदार यांचा तुळजापूर मतदार संघात मोठा जनसंपर्क आहे. त्‍यांनी आजपर्यंत अनेक सामाजिक कार्य, क्रीडा तसेच इतर अनेक उपक्रम राबविले अाहेत. मुस्लिम बरोबरच हिंदूमध्‍ये देखील त्‍यांचे समर्थक मोठ्या संख्‍येनी आहेत. त्‍यामुळे त्‍यांच्‍या मनसे प्रवेशामुळे तुळजापूर तालुक्‍यात महाराष्‍ट्र नवनिर्माण सेना पक्ष बळकट होण्‍यास हातभार लागेल यात शंकाच नाही. 
     तालुक्‍यात ज्‍या गतीने महाराष्‍ट्र नवनिर्माण सेना वाढायला पाहिजे होती, तेवढ्या गतीने ती वाढली नाही. त्‍यामुळे तालुक्‍याच्‍या राजकारणात मनसेची अवस्‍था अतिशय नगन्‍य होती. मनसेचे जिल्‍हाध्‍यक्ष प्रशांत नवगिरे, जिल्‍हा सचिव अमरराजे परमेश्‍वर कदम, तालुकाध्‍यक्ष श्‍याम माळी, नळदुर्ग शहराध्‍यक्ष ज्‍योतीबा येडगे, परिवहनचे जिल्‍हा उपाध्‍यक्ष बशीर शेख यांच्‍यासह तालुक्‍यातील इतर पदाधिकारी, कार्यकर्त्‍यांनी तालुक्‍यात मनसे टिकवुन ठेवली आहे. मात्र ज्‍याप्रमाणे मनसेचा दबदबा आज राज्‍यात आहे, तसा दबदबा तुळजापूर तालुक्‍यात निर्माण झाले नाही. जहागिरदार यांच्‍या प्रवेशामुळे तालुक्‍यात पक्षाला बळकटी मिळणार आहे. मनसे अध्‍यक्ष राज ठाकरे यांच्‍या नेतृत्‍वावर विश्‍वास ठेवून तसेच राज्‍याचा विकास राज ठाकरे हेच करु शकतात.  हाफीज सय्यद कौसर पाशा जहागिरदार यांनी मनसेत प्रवेश केल्‍याने तुळजापूर मतदार संघाच्‍या निवडणुकीत अन्‍य प्रमुख राजकीय पक्षासमोर मनसेने आव्‍हान उभे करण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही.  जहागिरदार यांनी मनसेकडून तुळजापूर विधानसभा निवडणुक लढवण्‍याचा मानस व्‍यक्‍त केला आहे.

Labels: , , ,

कारीत नायब तहसिलदारांची अचानक भेट; रॉकेल व स्वस्त धान्य दुकानांची तपासणी

पांगरी (गणेश गोडसे) :- कारी (ता.बार्शी) येथील स्वस्त धान्य दुकान व रॉकेल विक्री यासंदर्भात ग्रामस्थांच्या वाढत असलेल्या तक्रारींची दखल घेऊन बार्शीचे नायब तहसिलदारांनी गावास रात्री अचानक भेट देऊन गावातील स्वत धान्य दुकान व रॉकेल दुकानांवर छापे टाकुन टाकुन पंचनामे केले. यावेळी दुकानासंदर्भात अनेक त्रुटी आढळुन आल्या आहेत. ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार योग्य ती रितसर कारवाई करून ग्राहकांना न्याय मिळवुन देऊ असे आश्‍वासन दुकान तपासणीवेळी ग्रामस्थांना देण्‍यात आले.
    स्वस्त धान्य दुकानातील बार्शी तालुक्यातील गोंधळ चांगलाच गाजत आहे. कारी येथील ग्रामस्थांनी गावातील स्वस्त धान्य दुकानासंदर्भात वरिष्ठांकडे तक्रारी केल्या होत्या. बार्शीचे नायब तहसिलदर उत्तम पवार यांनी रात्री सात वाजता कारीला अचानक भेट देत दुकानांची तपासणी केली. तहसिलदारांच्या तपासणीत ग्राहकांना दुकानदारांकडुन खरेची कोणतीही रितसर पावती दिली जात नाही, शासनाने मोठा गाजावाजा करून सुरू केलेल्या अन्नसुरक्षा योजनेची गावात अंमलबजावनीच नाही, दुकानांवर नामफलक परवाना क्रमांक दुकान उघडण्‍याची अथवा बंद करण्‍याची वेळ नाही. दुकानात शिल्लक धान्यसाठयाचा फलक नाही तर कांही दुकानात फलकच नाही. रॉकेल दुकानासंदर्भातही अशाच गंभिर चुका निदर्शनास आल्या. रॉकेल शासकीय नियमांप्रमाणे वितरीत न करता जादा दराने वितरीत केले जाते, मयत कोटयातुन सुध्‍दा २० रूपये दराने रॉकेल वाटप केले जाते. तहसिलदार गावात आल्याची नामी संधी साधत ग्रामस्थांनी दुकानासंदर्भातील आपल्या तक्रारींचा पाढाच त्यांच्यासमोर वाचुन अन्याय दुर करण्‍याची मागणी केली. उपस्थित असंख्य ग्रामस्थांनी तहसिलदारांवर दुकानासंदर्भात असंख्य प्रश्‍नांची सरबत्ती केली.
    यावेळी तहसिलदार पवार म्हणाले की, कारीतील दुकानदार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करत आहेत. दुकानात गहु, तांदुळ सांडलेले आढळुन आले. रॉकेल बाबतही नियम धाब्यावर बसवल्याचेच दिसुन आले. गावात ग्रामपंचायत मार्फत दक्षता कमीटीची नेमणुक गरजेची असुन त्यांच्या सहीनेच वितरणासाठी आलेला माल वितरीत केला गेला पाहीजे. मात्र याबाबत कारी ग्रामपंचायत फारसे गांभिर्याने पहाताना दिसत नसुन अन्न सुरक्षा कायदयाची अंमलबजावणी व त्यातील नावांची यादी ग्रामसभेत वाचुन दाखवणे हे ग्रामपंचायतीवर बंधनकारक आहे, आदी कायदयाबाबत त्यांनी ग्रामस्थांना माहिती दिली. यावेळी कारी गावातील बहुसंख्य ग्रामस्थ वत क्रारदार उपस्थित होते.
    वरिष्ठ प्रशासनाच्या अधिका-यांच्या पाठराखनीमुळे निर्ढावलेले स्वस्त धान्य दुकानदार बार्शी तालुक्यातील ग्राहहकांना मोगलाई पद्वधतीने लुटत असुन कुठेही तक्रारी अर्ज करा, अर्ज कसा निकाली काढायचा याची कला आमच्या नसानसात भिनली असल्याचे स्वस्त धान्य दुकानदार ग्राहकांना उघडपणे बोलत असुन लोकांचे मनाधैर्य खचत आहे. वरीष्ठांनी यात लक्ष घालुन लोकांना न्याय देणे गरजेचे आहे.

Labels:

बार्शीतील मेळाव्यात १८१ वधू-वरांचा सहभाग

बार्शी  (मल्लिकार्जून धारुरकर) -: येथील दिनकर रुद्राके यांच्या वतीने वीरशैव लिंगायत समाजाच्या सर्व पोटजातींकरिता आयोजित केलेल्या राज्यस्तरीय चौथ्या मोफत वधू-वर परिचय मेळाव्यात १८१ वधू-वरांनी सहभाग नोंदविला.
    रविवारी दि.२७ रोजी छत्रपती भवन येथे हा मेळावा पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस वैराग येथील श्री राजमाने, सुधीरभाऊ रुद्राके यांच्या हस्ते दिप प्रज्वलन व श्री महादेव प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महेश कुलकर्णी, मनिषा शिलवंत, संतोष मनगिरे, सतीश भडंगे, भिमाशंकर डोंबे यांनी परिश्रम घेतले. राज्यभरातून वधू-वर, पालकांनी हजेरी लावली होती. सहभागी वधू-वरांची माहिती रुद्राके यांच्या कार्यालयात उपलब्ध करण्यात आली असून त्याचा गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन आनंद रुद्राके यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९८५०४३१८२६, ९९७५९४३४२४ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Labels:

Tuesday, 29 July 2014

उस्मानाबाद येथे युवक-युवतींसाठी मोफत कॉम्प्युटर टॅली प्रशिक्षण

उस्मानाबाद :- जिल्हा उद्योग केंद्र पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांचेतर्फे विशेष घटक योजनेतील सुशिक्षीत बेरोजगार युवक व युवतींसाठी उस्मानाबाद येथे दि. 7 ऑगस्ट ते 06 ऑक्टोंबर, 2014 या कालावधीत मोफत कॉम्प्युटर टॅली  प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला आहे.
    या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये संपूर्ण कॉम्प्युटर टॅली व उद्योजकीय अभ्यासक्रम या विषयी दररोज दुपारी 12 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत तज्ञ मार्गदर्शक व अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.
तरी इच्छुक युवक व युवतींनी  प्रवेश अर्ज भरणेसाठी दि.05 ऑगस्टपर्यंत कार्यक्रम समन्वयक  किरण बनसोडे  यांच्याशी जिल्हा उद्योग केंद्र, एमसीईडी ऑफिस,उस्मानाबाद येथे संपर्क साधावा. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 8421484482 असा आहे. दि. 06 ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष मुलाखतीव्दारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे, अशी माहिती  प्रकल्प  अधिकारी, एम.सी.ई.डी. व महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, उस्मानाबाद यांनी एका पत्रकाव्दारे दिली आहे.    

Labels:

बस-टेम्पोची धडक; २ ठार, १९ जखमी

उस्‍मानाबाद : टेम्‍पो आणि बसची समोरासमोर जोरदार धडक होवून भीषण अपघातात एका विद्यार्थ्‍यांसह दोघेजण ठार झाले तर १९ जण जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी सात वाजण्‍याच्या दरम्‍यान घडली. हा अपघात लातूर-बार्शी मार्गावरील उस्मानाबाद जिल्ह्यातील घोगरेवाडी पाटीजवळ घडला.
    आकाश धनंजय डमे  (वय १८, रा. कसबतडवळे, ता. उस्‍मानाबाद), सेवानिवृत्‍त मेजर दशरथ बांगर (वय ४३, रा. बांगरवाडी, ता. कळंब) असे अपघात मरण पावल्‍यांचे नावे असून श्रीकांत उपचंद नोहेकर (30, कळंब), महेन्द्र साबळे (40), सूदर्शन लोहार(30), विकास काळे(35), बसचालक राम जाधव, संगीता शिंदे(40), सुलोचना पंडीत(20), पृथ्वीराज ठाकूर (30), भारत चव्हाण(64), श्याम सूर्यवंशी(32), गणपत राठोड(35), मिनाज शेख(25), प्रकाश शिंदे(65), हर्षद गवळी(16), रमाकांत कसबे(19), वाहक प्रकाश भुरके(35), सादीक शेख असे जखमींचे नावे आहेत.
    बार्शी आगराची एम.एच.०७ सी ७३३३ ही बार्शी-नांदेड बस सोमवारी सकाळी बार्शीहून मुरुडकडे येत असताना समोरून येणा-या एम.एच.१२ एन-२१९९ या क्रमांकाचा आयशर टेम्पो आणि बसची जोरदार धडक बसली. या अपघातात बसमधील चालकाच्या मागील जागेवर बसलेले दशरथ बांगर व आकाश ढगे (हे दोघे जागीच ठार झाले. तर बसचालकासह एकूण 19 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी ९ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
    अपघाताचे वृत्तसमजताच भाजपचे हणुमंत नागटिळक यांच्यासह कमलाकर कदम, गणेश दीक्षित, अनंत कणसे , विष्णू घुटे, चंद्रकांत नाडे व इतर नागरिक रुग्णवाहिकेसह अपघातस्थळी पोहचले. जखमींना मुरुडच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. गंभीर जखमी असलेल्या नऊजणांना लातूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.

Labels:

मुस्लिम बांधवाना जगदाळे प्रतिष्‍ठानची इफ्तार पार्टी

नळदुर्ग -: पवित्र रमजान महिन्‍या‍निमित्‍त नळदुर्ग येथे कै. दमयंती हरिदास जगदाळे प्रतिष्‍ठानचे अध्‍यक्ष अशोक जगदाळे यांच्‍यावतीने मुस्‍लीम बांधवासाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्‍यात आले होते.
          नळदुर्ग शहरातील काली मस्जिद येथे या इफ्तार पार्टीचे आयोजन करण्‍यात आले होते. या इफ्तार पार्टीस कै. दमयंती हरिदास प्रतिष्‍ठानचे अध्‍यक्ष अशोक जगदाळे, माजी नगरसेवक मुश्‍ताक कुरेशी, अजहर जहागिरदार, सय्यर कौसर पाशा जहागिरदार, जिलानी कुरेशी, इकबाल कुरेशी, अहमदानी जहागिरदार, व्‍यापारी मंडळाचे अध्‍यक्ष अशोक पुदाले, जिल्‍हा नियोजन समितीचे सदस्‍य शिवाजी मोरे, माजी पोलीस पाटील सुर्यकांत पाटील, माजी नगराध्‍यक्ष उदय जगदाळे, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख सरदारसिंग ठाकूर, तुळजापूर लाईव्‍हचे संपादक शिवाजी नाईक आदीजण उपस्थित होते.

Labels:

Monday, 28 July 2014

उमरग्‍यात विविध कार्यक्रमाने उध्‍दव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा

उमरगा (लक्ष्‍मण पवार) :- शिवसेना पक्षप्रमुख उध्‍दव ठाकरे यांचा वाढदिवस उमरगा व लोहारा तालुका शिवसेनेच्‍यावतीने उमरगा शहरात विविध उपक्रमाने साजरा करण्‍यात आला.
           उध्‍दव ठाकरे यांच्‍या वाढदिवसानिमित्‍त उमरगा येथे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्‍या हस्‍ते छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या पुतळ्यास पुष्‍पहार घालून अभिवादन करण्‍यात आले. तसेच शहरातील वैकुंठधाम
येथे नगराध्‍यक्षा केवलबाई औरादे यांच्‍या हस्‍ते वृक्षारोपण करण्‍यात आले. त्‍याचबरोबर येथील शिवनेरी संपर्क कार्यालयात शिवसेना सदस्‍य नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्‍यात आला. तर कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीचे माजी सभापती जितेंद्र शिंदे यांच्‍या हस्‍ते शहरातील झोपडपट्टी येथील नागरिकांचे कबाले वाटप करण्‍यात आले.
          वरील सर्व कार्यक्रमास आमदार ज्ञानराज चौगुले, माजी सभापती जितेंद्र शिंदे, माजी नगराध्‍यक्ष  रजाक सत्‍तार, नगराध्‍यक्षा केवलबाई औरादे, शिवसेनेचे उमरगा तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे, लोहारा तालुकाप्रमुख मोहन पणुरे, युवासेनेचे उमरगा तालुकाप्रमुख योगेश तपसाळे, लोहारा तालुकाप्रमुख दिपक मुळे, विद्यार्थी सेनेचे तालुकाप्रमुख संदीप चौगुले, न.प. चे गटनेते बालाजी सुरवसे, नगरसेवक बळी पवार, आकाश शिंदे, राजेंद्र सुर्यवंशी, आप्‍पाराव गायकवाड, राम जाधव, देविदास पाटील, संदीप जगताप, महिला आघाडा उपजिल्‍हाप्रमुख शंकुतला दुणगे, महिला आघाडी शहरप्रमुख मीनाताई राऊत आदीजण उपस्थित होते.

Labels:

बालविकास सेवा योजना कार्यालयात अधिका-यांची मनमानी

तुळजापूर -: येथील एकात्मिक बालविकास योजना कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी वेळेवर हजर राहत नसल्‍यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. बाहेरगावहून आलेल्‍या नागरिकांचा वेळ आणि पैसा नाहक वाय जात असल्‍याने संबंधित अधिकारी व कर्मचा-यांची चौकशी करुन कारवाई करण्‍याची मागणी मनसेच्‍यावतीने करण्‍यात आली आहे.
      शुक्रवारी एकात्मिक बालविकास कार्यालयात कामानिमित्‍त गेलेल्‍या नागरिकांना रिकाम्‍या  खुर्च्‍यांचे दर्शन घडले. कारण कार्यालयात अधिकारी व कर्मचारी हजर नव्‍हते. हजर असलेल्‍या दोन कर्मचा-यांनी उडवाउडवीची उत्‍तरे दिली. दरम्‍यान, नागरिकांनी मनसेच्‍या पदाधिका-यांशी संपर्क साधला. त्‍यांनी कार्यायात जावुन अधिकारी हजर का राहत नाहीत, याबाबत जाब विचारला असता दोन्‍ही कर्मचा-यांना समाधानकारक उत्‍तरे देता आली नाहीत. अधिका-यांच्‍या कामचुकारपणामुळे नागरिकांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्‍याने या प्रकरणी चौकशी करुन संबंधितावर कारवाई करावी, अन्‍यथा आंदोलन करण्‍याचा इशारा मनसेचे धर्मराज सावंत व एकनाथ साठे यांनी दिला आहे.

Labels:

शिष्‍यवृत्‍ती परीक्षेत स्‍वप्‍नील गायकवाड तालुक्‍यात द्वितीय

स्‍वप्‍नील गायकवाड
पांगरी (गणेश गोडसे) :- महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद पुणे यांच्यावतीने मार्च २०१४ मध्ये घेण्‍यात आलेल्या माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत पांगरी (ता. बार्शी) येथील कु. स्वप्नील श्रीहरी गायकवाड याने बार्शी तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळवला. यापुर्वीही स्वप्‍नील याने चौथीच्या शिष्यवृत्ती परिक्षेत यश प्राप्त केले होते. गायकवाड यांने बार्शी तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळवुन घवघवीत यश प्राप्त केल्याबदल त्याचे पांगरीचे केंद्रप्रमुख श्रीहरी गायकवाड, पी.एस.बाभळे आदींनीकडुन अभिनंदन होत आहे.

Labels:

माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन सदैव प्रयत्नशील : डॉ.नारनवरे

उस्मानाबाद -: भारतीय शुर सैनिकांनी कारगील युध्दात व संकटाप्रसंगी आपल्या कुटूंबाची तमा न बाळगता देशासाठी काम केले आहे. त्यांचा राष्ट्र घडविण्यात सिंहाचा वाटा आहे. त्या माजी सैनिकांच्या वैयक्तीक व सामाजिक अडचणी सोडविण्यासाठी प्रशासन सदैव प्रयत्नशील राहील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांनी केले.
    कारगील विजय दिनाचे औचित्य साधून येथील जिल्हा परिषदेच्या कै.यशवंतराव चव्हाण सभागृहात माजी सैनिकांच्या मेळाव्याचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी जे.टी.पाटील, कर्नल श्री. देशमुख, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय चारठाणकर, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर निवृत्त सुभाष सासणे, समादेशक एस.आर.बरडे आदींची उपस्थिती होती.
    युद्धात शौर्य गाजवून धारातीर्थी पडलेल्या जवानांनी देशासाठी काम केले आहे. देशाची सेवा करुन माजी सैनिक जेव्हा आपल्या घरी परतात तेव्हा त्यांना आधार देण्याचे कार्य आपणा सर्वांकडून झाले पाहिजे. त्यांच्या वैयक्तीक व समाजोपयोगी समस्या प्राधान्याने सोडविल्या जातील, अशी भावना डॉ.नारनवरे यांनी व्यक्त्‍केली. यापुढील काळात  गावाला व्यसनमुक्त करणे, तंटामुक्त करणे अशा विविध अभियानात  माजी सैनिकांचा समावेश करुन त्यांच्याकडून चांगल्या प्रकारचे कार्य करुन घेतले जाईल,असेही डॉ.नारनवरे यांनी सांगितले.
    श्री. पाटील मार्गदर्शन करतांना म्हणाले की, गावाच्या विकासासाठी प्रत्येकाचे योगदानाबरोबरच आरोग्यासाठी शौचालय, व्यसनमुक्ती, तंटामुक्ती अशा अभियानात माजी सैनिकाबरोबरच सर्वांना एकत्र घेऊन गावाचा विकास करावयाचे आहे. माजी सैनिकांच्या वैयक्तीक व सामाजीक अडचणी सोडविण्यासाठी स्वतंत्र यादी तयार करावी. जेणेकरुन तात्काळ अडचणी सोडविणे सोईचे होईल, याबाबत प्रशासनातील अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.
    माजी सैनिकांनी त्यांचे वैयक्तिक आणि त्यांच्या पाल्यांचे स्मार्ट कार्ड स्वतंत्ररित्या काढावेत, त्यामुळे रुग्णांवर स्वतंत्रपणे उपचार करणे सोईचे होईल, असे मत कर्नल देशमुख यांनी मांडले.
    श्री.चारठाणकर यांनी, पालिका हद्दतील माजी सैनिकांच्या समस्या तात्काळ सोडविल्या जातील. तसेच माजी सैनिकांची सेवा नगरपरिषदेच्या अत्यावश्यक सेवेमध्ये मानधन तत्वावर करुन घेणे, नगरपरिषद हद्दीतील जागेचा प्रश्न सोडविणे, मालमत्ता करामध्ये माजी सैनिकांना करात सवलत देणे, यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले. त्यासाठी माजी सैनिकांनी सकारात्मक सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
    यावेळी माजी सैनिकामार्फत आनंद शिंगाडे, राजेंद्र सुर्यवंशी, श्री. कुलकर्णी आणि   शहाजी चालुक्य यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
    प्रास्ताविकात मेजर (नि) सासणे यांनी सांगितले की, पाकिस्तानी सैनिकांनी केलेले आक्रमण भारतीय शुर सैनिकांनी खांद्यास खांदा लावून शत्रुशी झूंज देवून परतावून लावले. या युध्दास आज 15 वर्षे पुर्ण झाली. कारगिल युध्दात शहीद झालेल्या शूर सैनिकाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भारत सरकारने कारगिल विजय स्मृति दिवस साजरा करण्यात येत असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी माजी सैनिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी विविध योजनांबाबतही माहिती दिली.
   यावेळी शेख कोंडाजी मोहमद शेख (स्वयंरोजगारासाठी आर्थीक मदत),  बापू डावकरे (पाल्याचा शैक्षणिक खर्चासाठी), फावडे संदीपान (एम.एस.सी.आय.टी.करीता),  राम जाधव, हनुमंत सितापूरे, शेषेराव जाधव, आणि श्रीमती महानंदा लिंबनाथ सां‍ळूके यांना (मुलीच्या विवाहासाठी मदत), यांना तसेच श्रीमती लक्ष्मी काशीनाथ परीट, श्रीमती सरस्वती चंद्रसेन विधाते, बाबुराव पवार यांना (पतिच्या अंतविधीची अनुक्रमे आर्थीक मदत) या माजी सैनिकांच्या विधवा पत्नींना कल्याणकारी निधीचे वाटप जिल्हाधिकारी डॉ.नारनवरे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 
    कार्यक्रमाच्‍या सुरुवातीला सर्व उपस्थितांनी शहीद झालेल्या सैनिकांना श्रध्दांजली वाहिली. शहीद शिरीषकुमार भिसे यांच्या पत्नी मिनाक्षी भिसे यांचीही यावेळी उपस्थिती होती.
      जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर(नि) सासणे यांच्यासह सैनिक कल्याण कार्यालयातील डी.बी.काळे, ए.के.मेंगशेट्टी, रमेश गलांडे, बी.एन.शेंडगे, राजेंद्र साळुंखे, आर.के. बचुते, मनोजकुमार खोपे, के.एम.सुर्यवंशी आणि महादेव सुतार आदिंनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी राजेंद्र अत्रे यांनी तर आभार श्री.सासणे यांनी मानले.

Labels:

उपचारांसाठी एडस नियंत्रण विभागाची स्व-निधीची कल्पना

उस्मानाबाद -: एचआयव्ही संसर्गीत मातेकडून जन्माला येणा-या बाळाची तपासणी एआरटी सेंटरमार्फत करणे आवश्यक आहे. मात्र, अशावेळी आर्थिक परिस्थितीमुळे उपचार घेणे शक्य होत नसेल तर त्यांच्यासाठी जिल्हा एडस नियंत्रण विभागाने स्व-निधी  उभारुन अशा रुग्णांना मदत करण्याचे ठरविले आहे. याशिवाय, संबंधित रुग्णांच्या मदतीसाठी जिल्हा नियोजन समिती आणि आरोग्य विभागाकडेही याबाबतचा प्रस्ताव पाठवा, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील यांनी दिल्या.
       जिल्हा एडस प्रतिबंध व नियंत्रण समितीची आज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. जयपाल चव्हाण, राष्ट्रीय एडस नियंत्रण कार्यक्रमाचे नोडल ऑफीसर डॉ. एम. व्ही. बाबरे, एनआरएचएमचे कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. एन. के. गाडेकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. गोमसाळे,  एडस प्रतिबंध व नियंत्रण समितीचे कार्यक्रम व्यवस्थापक गणेश काकडे, स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे प्रकल्प अधिकरी आर. बी. जोशी, एनआरएचएमचे मूल्यमापन व सनियंत्रण अधिकारी श्री. तांदळे, जिल्हा पर्यवेक्षक महादेव शिनगारे आदी उपस्थित होते.
      यावेळी जिल्ह्यातील एचआयव्ही एडस नियंत्रण कार्यक्रमाचा तिमाही आढावा श्री. पाटील यांनी घेतला. मागील बैठकीवेळी ठरविण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या उद्दिष्ट्यपूर्तीचा अहवाल यावेळी श्री. काकडे यांनी सादर केला. जिल्ह्यामधील ट्रक ड्रायव्हर, कला केंद्रांमध्ये असणाऱ्या महिला, देहविक्री करणाऱ्या महिला यांच्यासाठी या कालावधीत हेल्थ कॅम्प आयोजित करण्यात आले होते. यात पार्डी फाटा (वाशी) आणि चौरस्ता (उमरगा), नळदुर्ग रोड येथे ट्रक ड्रायव्हरांसाठी तपासणी शिबीर घेण्यात आले.  तसेच कलिका कला केंद्र चोराखळी, साई व पिंजरा कलाकेंद्र येथील महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. याशिवाय, उस्मानाबाद येथे राजस्व अभियान राबविण्यात आले. यात एचआयव्ही संसर्गीत व्यक्ती, तृतीय पंथी, विधवा महिला, देह विक्रय करणाऱ्या महिला अशा 250 लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.              

Labels:

उध्‍दव ठाकरे यांच्‍या वाढदिवसानिमित्‍त मोटारसायकलचे वाटप

नळदुर्ग :- शिवसेना पक्षप्रमुख उध्‍दव ठाकरे यांच्‍या वाढदिवसानिमित्‍त शिवसेनेचे माजी जि.प. सदस्‍य गणेश सोनटक्‍के यांच्‍यावतीने रविवार रोजी तुळजापूर तालुक्‍यातील अकरा विभागप्रमुखांना मोफत मोटारसायकल वाटप करण्‍यात आल्‍या.
    शिवसेना जिल्‍हाप्रमुख सुधीर पाटील उपस्थितीत मोटारसायकल वाटप करण्‍यात आल्‍या. यावेळी शिवसेनेचे उपजिल्‍हाप्रमुख तथा नगरसेवक कमलाकर चव्‍हाण, तालुकाप्रमुख राजअहमद पठाण, उपतालुकाप्रमुख सरदारसिंग ठाकूर, नळदुर्ग शहरप्रमुख संतोष पुदाले, युवासेनेचे तालुकाध्‍यक्ष घानेश्‍वर घोडके आदीजण उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रद्रीप मगर यांनी केले. या कार्यक्रमास तुळजापूर विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्‍येनी उपस्थित होते.
फोटो :

Labels:

हजेरी सहाय्यकांचे भोग संपेनात

पांगरी (गणेश गोडसे) :- दोन तपापेक्षाही जास्त कालावधी जाऊनही राज्यातील हजेरी सहाय्यकांचे भोग कांही केल्या संपण्‍यास तयार नाहीत. शासनाच्या संबंधीत विभागाबरोबर वारंवार अर्ज विनंत्या निवेदने करूनही कांही फरक पडत नसल्यामुळे हजेरी सहाय्यक वेगळया मार्गाचा अवलंब करू लागलेले आहेत. न्याय मागणी करत मरण्‍याच्या विचारापर्यंत कर्मचा-यांची मानसिकता झाली आहे. किमान सेवानिवृत्तीच्या मार्गावर असलेल्या हजेरी सहाय्यकांना शासन आता तरी न्याय देऊन त्यांच्या कुटुंबांना न्याय देईल, अशी भाबडी आशा हजेरी सहाय्यक बाळगुन आहेत.
    शासनाने १७ मे २०१४ रोजी राज्यातील हजेरी सहाय्यकांसंदर्भात एक परिपत्रक काढुन त्यामध्ये कोणत्याही शासकीय सेवा शर्ती लागु न करता २५ जुन २००४ च्या शासन निर्णयानुसार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कक्ष विभागाकडे त्यांना वर्ग करण्‍यात आलेले आहे. त्यामध्ये कुठल्याही शासकीय तरतुदी व सेवाशर्थी लागु केलेल्या नसल्यामुळे शासन या हजेरी सहाय्यकांच्या पश्‍नांकडे दुर्लक्ष तर करत नाही ना असा प्रश्‍न या कर्मचा-यांना पडु लागला आहे.
हजेरी सहाय्यकांची परिस्थती गंभीर
    हजेरी सहाय्यकांची परिस्थती गंभिर असुन शासन त्यांचा पगार सरासरी सहा सहा महिन्यालाच करत आहे. आमची अवस्था सालगडयापेक्षाही भयावह असुन आमच्या कुटुंबांवर सतत अन्याय केला जातो असे त्यांचे म्हणणे आहे. आर्थिक चनचनींमुळे कुटुंबाचा विकास तर खुंटलाच आहे. उपासमारीची कु-हाड तर त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबावर कायमच टांगती राहीले आहे. शासनाकडुन सततच्या अन्यायामुळे हजेरी सहाय्यकांसह कुटुंबातील सदस्यांचे मानसिक शारीरीक कौटुंबीक आर्थिक हानी होत आहे.
    राज्यातील न्यायालयाच्या आदेशान्वये कामावर आलेल्या या हजेरी सहाय्यकांना तत्कालीन आदेशान्वये लागु केलेली चतुर्थश्रेणी वेतनश्रेणी आजही कायम आहे. या कर्मचा-यांना शासनाने नंतर लागु केलेला पाचवा सहावा आदी वेतन आयेगच लागु केलेले नाहीत.यावरूण या कर्मचा-यांवर अन्याय होतो की नाही याचा अंदाज सर्वसामान्यासह जनमाणसांना येऊ शकतो. राज्यातील सात हजार हजेरी सहाय्यकांना वेगळा न्याय व ५२७ हजेरी सहाय्यकांनाच वेगळा न्याय का असा प्रश्‍न विचारला जात आहे. किमान आता तरी या कर्मचा-यांसंदर्भात सकारात्मक निर्णय होणे गरजेचे आहे.
    हजेरी सहाय्यकांना मिळणारा पगार हा अतिशय तुटपुंजा असा असुन कामावर येण्‍याजाण्‍यासाठी त्या पगारातील पन्नास टक्के रक्कम खर्ची होते. राहीलेल्या शिल्लक पगारात कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्‍न या कर्मचा-यांसमोर कायम उभा असतो. पगार सहा सहा महिन्यांना होतो. त्यामुळे उर्वरीत पाच महिन्यांच्या काळात या कर्मचा-यांना उसनवार करत दिवस काढावे लागते. यावरून यांची आर्थिक दिवाळखोरी लक्षात येऊ शकते.
    तत्कालीन मुख्यमंत्री कै.विलासराव देशमुख यांच्या कार्यकालात राज्यातील ५२७ हजेरी सहाय्यकांच्या प्रश्‍नाला न्याय मिण्‍यान्याची प्रकिया अंतिम टप्यात आली होती. मात्र त्यानंतर माशी कुठे शिंकली व या प्रकियेलाच खो बसला असल्याचे हजेरी सहाय्यकानी बोलताना व्यक्त केले.

Labels:

Sunday, 27 July 2014

श्रावणातील श्रध्दास्थान : श्रीक्षेत्र रामलिंग - मिनी महाबळेश्‍वर

पांगरी (गणेश गोडसे) :- सोलापुर-उस्मानाबाद जिल्हयाच्या सरहद्दीवर येडशी पासुन तीन किलोमीटर अंतरावर बालाघाटाच्या पर्वतरांगा व दंडकारण्यात निसर्गाच्या कुशीत वसलेले असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान व तिर्थक्षेत्र म्हणून घोषित केलेले श्रीक्षेत्र रामलिंग म्हणजे भाविकांसाठी आणि पर्यटकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरत आहे. सध्या रामलिंग या तिर्थक्षेत्राच्या जिर्नोध्‍दाराचे काम सुरू आहे.
    मायावी हरिणाला पकडण्यासाठी गेलेल्या प्रभु रामचंद्राच्या अनुपस्थितीचा फायदा घेउन सीतेचे अपहरण करून पळालेल्या रावणाचा पाठलाग करून सीतेला सोडवण्याचा प्रयत्न करणा-या जटायु पक्षाचे आणि रावणाचे युध्द या प्रसिध्द अशा रामलिंग या ठिकाणीच झाल्याची आख्यायिका सांगितली जाते. युध्दानंतर या ठिकाणी प्रभु रामचंद्रांचे आगमन झाल्यानंतर जखमी अवस्थेतील जटायु पक्षाला पाणी पाजण्यासाठी व शिव शंकराची आराधना करण्यासाठी प्रभु रामचंद्रानी आपल्या जवळील बाणाने पाणी काढले, ते पाणी जटायु पक्षाला पाजले.  तसेच तेथेच त्‍यांनी स्वतः लिंगाची स्थापना करून शिव आराधना केली. पुजेसाठी बान मारून पाणी ऊपलब्ध केले. ते ठिकान आज गायमुख म्हणुन सुपरिचित आहे.
    रामलिंग हे द्रोणाच्या आकाराचे मंदिर असुन हेमाडपंथी वास्तुशिल्पाचा आणि दगडी कामाचा अप्रतिम असा अविस्कार आहे. चोहोबाजुंनी डोंगरांनी वेढलेल्या मंदिराचा परिसर अतिशय रमणीय असुन श्रावणात येथे सर्वत्र हिरवळ असते. यावेळी या परिसराची शोभा अवर्णणीय असीच असते. मंदिराच्या पहिल्या पायरीवर पाय ठेवल्याशिवाय मंदिर दिसतच नाही. २५० पायरी उतरूनच मंदिरात प्रवेश करावा लागतो. मंदिर प्रवेशासाठी पुर्व, पश्‍चिम व उत्तरेला असे तीन दरवाजे असुन पुर्वेला गोमुख आहे. तेथे अखंड पाण्याचा झरा वाहत असतो. तो कधीच आटत नाही असे येथील पुजारी यांनी तुळजापूर लाईव्‍हशी बोलताना सांगितले. मंदिराच्या पुर्वेला सुंदर असा धबधबा असल्यामुळे मंदिराच्या सौदर्यात आणखीनच भर पडते. मंदिराच्या चारी बाजुंना डोंगर, दाट जंगल पसरले असुन माकडे, वानरे, मोर, हरणे, ससे यासह अन्य वन्य प्राण्यांच्या अस्तित्वामुळे या परिसराला अभयारण्य म्हणुनही घोषित करण्यात आलेले आहे. चालु वर्षी वरुणराजाने या भागात वेळेवरच हजेरी लावल्यामुळे रामलिंग मंदिराच्या परिसरातील डोगरांनी हिरवी चादर पांघरलेली आहे असे दृष्य पहावयास मिळत आहे. त्यामुळे येथिल परिसराचे सौदर्य मनमोहक व आकर्षक वाटत आहे. येणा-या भाविकांच्या व पर्यटकांच्या मनात घर करत आहे. येथील मंदिरात अखंड धुनी तेवत असते.
    प्रत्येक वर्षी श्रावण महिन्‍यात आणि चंपाष्ठमीला येथे मोठी यात्रा भरते. सोलापुर, लातुर, उस्मानाबाद, बीड, परभणी, देड, अंबेजोगाई,  पुणे आदी जिल्हयांसह महाराष्ट्रामधुन विद्यार्थी सहलींसाठी तर भाविक या जागृत देवस्थानाच्या दर्शनासाठी येत असतात. रामलिंगला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आला असुन सध्या येथे विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. मंदिराला उत्पन्नाचे कोणतेच साधन नसुन मंदिराचा सर्व खर्च भाविकांच्या दानामधुनच भागवला जातो. तिर्थक्षेत्र विकास मंडळांकडुन रामलिंगसाठी विकास निधी मंजुर असुन त्यापैकी कांही अंशी ऊपलब्ध निधीतुन सध्या येथील विकास कामे सुरू आहेत. ४०० ते ५०० वाव-या कमकुवत असल्यामुळे त्या काढुन तेथे भक्तनिवास बांधण्‍याचा तेथील कारभारी मंडळींचा संकल्प आहे. या मंदिरात सन १९४० ते ५० च्या दरम्यान म्हैसुरकर स्वामी होऊन गेले होते. त्या स्वामी महाराजांचे ध्यान धारणा करण्‍याचे तळघर आजच्या काळातही सुस्थितीत असल्याचे पहावयास मिळत आहे. स्वामी करपात्री महाराज, स्वामी शंकराचार्य आदी महती या श्रध्‍दास्थानी येऊन गेल्याचा इतिहास आहे. उत्रेश्‍वर पिंपरीचे कै.ज्ञानेश्‍वर माऊली महाराजांचे रामलिंग हे अतिशय आवडते स्थळ होते.
    ‘वेदश्री” या शब्दाचा अपभ्रंस होऊन ‘येडशी ‘हे नांव तयार झाले असुन संतभुमी म्हणुन ओळखल्या जाणा-या प्रभु रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तसेच जटायुच्या बलिदानाने पवित्र झालेल्या श्रीक्षेत्र रामलिंगला भाविकांच्या मनात अढळस्थान आहे. आर्य समाजाचे गुरूकुल वैदिक संस्कृत महाविद्यालय या परिसरातच निसर्गाच्या सानिध्यात वसलेले आहे. शंभर वर्षांपुर्वी ब्रिटीशांनी बांधलेले दुर्गादेवी हिलस्टेशन सध्या नव्या दिमाखात उभे आहे. रामलिंग हे येथील रमणीय व मनमोहक वातावरणामुळे ‘मिनी महाबळेश्‍वर म्हणुनही ओळखले जात आहे.

वैरागमध्‍ये रोजा इफ्तार पार्टी उत्‍साहात

वैराग (महेश पन्‍हाळे) :- रमजान महिन्‍यातील पवित्र रोजा उपवास एकत्रितपणे सोडण्‍यासाठी वैरागमधील खडकपुरा मस्जिदमध्‍ये इफ्तार पार्टीचे आयोजन करण्‍यात आले होते. बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी या इफ्तार पार्टी उपस्थित राहून एकतेचा संदेश दिला. हिंदू-मुस्लिम यांच्‍यातील एकता म्‍हणजे समृध्‍दीचे प्रतीक असल्‍याचे राजेंद्र राऊत यांनी सांगितले. 
     शनिवारी वैराग (ता. बार्शी) येथील खडकपुरा जुम्‍मा मस्जिदमध्‍ये इफ्तार पार्टीचे आयोजन करण्‍यात आले होते. यावेळी वैरागचे सरपंच संतोष निंबाळकर, पं.स. चे उपसभापती केशव पोगरे, भाऊसाहेब काशिद, साहेबराव देशमुख, मौलाना आबास कादरी, रावसाहेब मनगिरे, वैजिनाथ आदमाने, शौकत पठाण, इब्राहीम शेख, अालम पठाण, अहमद शेख, समीर शेख, ईस्‍माइल पटेल आदीजण उपस्थित होते.

Labels:

शिष्‍यवृत्‍ती व आरअीएसई परीक्षेत हषवर्धन काळदाचे याचे यश

हर्षवर्धन काळदाते
पांगरी (गणेश गोडसे) :- मार्च २०१४ मध्ये घेण्‍यात आलेल्या माध्यमिक शालांत शिष्यवृत्ती परीक्षेत व आर.टी.एस.ई परीक्षेत बार्शीच्या महाराष्ट्र विद्यालयालयातील कु. हर्षवर्धन गुणवंत काळदाते याने सोलापुर जिल्हयाच्या गुणवत्ता यादीत उल्लेखनिय यश संपादन केले आहे. शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हयात २३ वा क्रमांक तर आरटीएसई परीक्षेत जिल्हयात ९ वा क्रमांक मिळवुन यश प्राप्त केले आहे.
    यापुर्वीही काळदाते याने चौथीच्या शिष्यवृत्ती परिक्षेत जिल्हयात १३ वा क्रमांक पटकावला होता. इयत्ता सहावीत असताना राज्यस्तरीय आय टी एस परिक्षेत राज्यात आठवा क्रमांक पटकावला होता. हर्षवर्धन काळादते यास संकपाळ, वर्गशिक्षिका देशमुख मॅडम, प्रशालेच्या मुख्याध्यापीका सौ. इटेवाड, पाचकवडे आदींचे मार्गदर्शन लाभले. जिल्हास्तरीय यश मिळवल्याबदल विकास भोसले, प्रतापसिंह काटे, बाबासाहेब घाडगे, गुणवंत काळदाते, युवराज पाटील, सागर पाटील, आनंद राऊत, संदिप गलांडे, विनोद कात्रे, चित्रपट निर्माते अशोक घावटे, पत्रकार गणेश गोडसे, मिठु काळदाते, ग्रामविकास अधिकारी सौ.गिता काळदाते आदींनी हर्षवर्धन याचे अभिनंदन केले.

Labels:

शंभर स्‍मार्ट सिटी संकल्‍पनेत नळदुर्ग शहराचा समावेश करण्‍याची मागणी

नळदुर्ग :-   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या कल्‍पनेतील शंभर स्‍मार्ट शहरे या संकल्‍पनेत नळदुर्ग शहराचा समावेश करुन ऐतिहासिक नळदुर्ग किल्‍ल्‍यात पर्यटन सुधारणा करण्‍याची मागणी नळदुर्ग शहर भाजपावतीने केंद्रीय सांस्‍कृतीक व पर्यटन मंत्री ना. श्रीपाद यांनी यांच्‍याकडे निवेदनाद्वारे करण्‍यात आली आहे.
    शनिवारी केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक यांनी नळदुर्ग शहराला भेट दिली. यावेळी त्‍यांचा नळदुर्ग शहर भाजपाच्‍यावतीने सत्‍कार करण्‍यात आला. यावेळी ना. श्रीपाद नाईक यांना नळदुर्ग शहराचा शंभर स्‍मार्ट शहरामध्‍ये समावेश करण्‍याबाबतचे निवेदन देण्‍यात आले. या निवेदनात म्‍हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात शंभर स्‍मार्ट शहरे करण्‍याचा निर्णय घेतला आहे. त्‍या अनुषंगाने त्‍यांनी कार्य ही हाती घेतली आहे. नळदुर्ग हे उस्‍मानाबाद जिल्‍ह्यातील ऐतिहासिक शहर आहे. चौदाव्‍या शतकातील चालुक्‍य वंशाचा राजा नळ यांची नळदुर्ग ही राजधानी होती. नळदुर्ग येथे 120 हेक्‍टर क्षेत्रावर ऐतिहासिक किल्‍ला वसलेला आहे. किल्‍ल्‍याच्‍या चौहीबाजूने नदीचे पात्र फिरवून किल्‍ल्‍याच्‍या आत नर-मादी धबधबा आहे. हा धबधबा पावसाळ्यात ओसंडून वाहत असतो. दीडशे फुट उंचावरुन पडतानाचे दृश्‍य विहंगम असते. हे दृश्‍य पाहण्‍यासाठी राज्‍यासह कर्नाटक व आंध्रप्रदेशातून लाखो भाविक नळदुर्गात येता. त्‍यामुळे नळदुर्ग शहरास स्‍मार्ट शहर बनवून पुढील सुविधा पुरविण्‍याची मागणी करण्‍यात आली आहे. नळदुर्ग किल्‍ल्‍यातील व किल्‍ला बाहेरील ऐतिहासिक क्षेत्र परिसरातील अतिक्रमण त्‍वरीत काढावे, येथे पार्कींगची व्‍यवस्‍था करावी, बोरी नदीचे पाणी साठा करुन सतत धबधबा सुरु कसा करता येईल त्‍या दृष्‍टीने प्रयत्‍न व्‍हावा, धबधब्‍यातून पडणा-या पाण्‍यापासुन वीज निर्मिती करता येते का? ते तज्ञामार्फत पहावे व त्‍यास चालना द्यावी, किल्‍ल्‍याच्‍या परिसरात पंचतारांकित हॉटेल्‍स उभारुन पर्यटकांची भोजन व्‍यवस्‍था करावी, बोदी नदीच्‍या पात्रात बोटींग व्‍यवस्‍था करावी, पाणी संग्रहालय व सुंदर बागेची निर्मिती करावी, या शहराची नगर रचना विभागामार्फत सिटी सर्व्‍हे करुन शहराचा सुधारित आराखडा तयार करावा, नळदुर्ग शहरास तालुक्‍याचा दर्जा देऊन पर्यटकांना आकर्षित करण्‍याबाबत राज्‍य शासनास आदेशित करावे, येथील रामतीर्थ देवस्‍थान क्षेत्राचा विकास करावा, नळदुर्ग येथील श्री खंडोबा तीर्थ क्षेत्राचा पर्यटन क्षेत्रात समावेश करुन विकास करावा, आदी मागणी ना. श्रीपाद नाईक यांच्‍या निवेदनाद्वारे करण्‍यात आली आहे. या निवेदनावर भाजपा मिडीया सेलचे जिल्‍हाध्‍यक्ष सुशांत भूमकर, भाजपाचे शहराध्‍यक्ष पद्माकर घोडे, तालुका सदस्‍य धिमाजी घुगे, गोपाळ देशपांडे, सचिन घोडके आदींच्‍या स्‍वाक्ष-या आहेत. यावेळी श्रीपाद नाईक यांनी म्‍हटले की, अशा प्रकारची मागणी ही संपूर्ण महाराष्‍ट्रातून सर्व प्रथम नळदुर्ग शहराच्‍यावतीने करण्‍यात आली आहे असे सांगून त्‍यांनी नळदुर्ग शहराचा विकास करण्‍याचा प्रयत्‍न करु, असे आश्‍वासन दिले.

Labels:

दुचाकी वाहन जाळल्याची घटना घडूनही बार्शी पोलिस अनभिज्ञच

बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: कुर्डूवाडी-लातूर रस्त्याच्या बार्शी बाह्यवळण रस्त्यावर एक दुचाकी जळालेल्या अवस्थेत पडून असल्याचे दिसून येत आहे. सदरच्या वाहनाची अवस्था ही अत्यंक दयनीय करण्यात आली असून सदरची घटना कोणाच्या वैमनस्यातून झाली अथवा मनोविकृतीन घडली याबाबत प्रत्यक्षदर्शी कोणीही दिसून येत नाही.
    सदरचे वाहन कोणत्या गुन्ह्यात वापरले होते काय ? बचह्यवळण रस्त्यावर कोणाता मोठा गुन्हा घडला काय असा प्रश्‍न अनेकांच्या मनात निर्माण झाला असला तरी बार्शी पोलिसांना मात्र याबाबत कसलीच कल्पना नसल्याचे दिसून आले. मागील दोन तीन दिवसांपूर्वी बार्शीतील मुस्लिम तरुणांनी शिवसेना पदाधिकार्‍यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दिवसाढवळ्या दहन केले परंतु याबाबत बार्शी पोलिसांत कसलीही नोंद नसल्याचे सांगण्यात आले. सदरच्या पुतळा दहनाचे छायाचित्र अनेकांनी आपल्या खाजगी फेसबुक या सोशल मिडीयावर अपलोडही केले, काही जणांकडे याच्या व्हिडीओ क्लिपदेखिल उपलब्ध झाल्या सोशल मिडीयावर याचा भरपूर वापर झाला असला तरी बार्शी पोलिसांना मात्र याबाबत कसलीही पुसटशीही कल्पना नसल्याचे चौकशीतून दिसून आले. सदरच्या घटनेची चौकशी करण्याचेही त्यांच्या मनात आले नाही याचे नेमके कारण काय याबाबतही अनेकांच्या मनात अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहे. बार्शी पोलिसांच्या कडून सर्वसामान्यांच्या असलेल्या कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या अपेक्षा मात्र फोल ठरतांना दिसून येत आहेत. मागील दोन तीन महिन्यांत बार्शी तालुक्यातील तीन खुनाचे प्रकार हे सर्व काही सागून जातात. बार्शीमध्ये नियमित सुरु असलेल्या बेकायदा धंद्यावरही पोलिसांचा अंकुश नसल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. एकूणच बार्शी पोलिसांचा कारभार नागरिकांच्या मनात शंका उत्पन्न करणारा व विश्वास कमी झाल्याचा दिसून आला आहे. यावर वरिष्ठ अधिकार्‍यांचेही जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे.

Labels:

रोहयो हजेरी साहाय्यकांवर उपासमारी

पांगरी (गणेश गोडसे) :-  रोजगार हमी योजना १९७८ मध्ये सुरू झाल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिका-यांनी रोजगार हमीच्या कामावर आदेशान्वये घेतलेल्या राज्यातील ५२७ हजेरी सहाय्यक आज तीस वर्षाच्या कालावधीनंतरही न्याय हक्कासाठी झगडत आहेत. सालगडयासारखी वर्षातुन दोनदाच पगार होत असल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
    राज्यातील अनेक हजेरी सहाय्यक सेवानिवृत्त झाले तर कांही मृत झाले. मात्र तरीही त्यांना शासनाच्या सेवाशर्तींचा लाभ मिळाला नाही. केलेल्या कामाचा मोबदला मिळवण्‍यासाठी आजही या हजेरी सहाय्यकांना शासनाबरोबर झगडावे लागत आहे. न्यायालयीन लढा देऊनही शासन या कर्मचा-यांना हेतुपुरस्पर डावलत असल्याचा हजेरी सहाय्यकांचा आरोप आहे. आपल्या विविध न्याय मागण्‍यांसाठी हजेरी सहाय्यकांनी येत्या ९ ऑगस्ट म्हणजे क्रांतीदिनी बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले असुन तरीही संबंधीत प्रशासनाने याची दखल घेतली नाही तर १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्‍याचा इशाराही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना एका लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.
    याबाबत माहिती अशी की, सन १९७८ साली रोजगार हमीची योजना मंजुर झाली. या योजनेच्या मंजुरीनंतर महाराष्ट्र शासनाने १९८२ पासुन या योजनेच्या अंमलबजावणीला सुरूवात केली. रोजगार हमी योजना सुरू झाल्यानंतर कामावरी मजुरांवर नियंत्रण ठेवण्‍यासाठी त्यांच्या उपस्थितीचा लेखा जोखा ठेवण्‍यासाठी तत्कालीन जिल्हाधिका-यांच्या अधिपत्याखाली कार्य करणा-या रोजगार हमीच्या अधिका-यांनी वरिष्ठांच्या आदेशान्वये हजेरी सहाय्यकांची नियुक्ती केली. न्यायालयाच्या निर्णयानुसार ५२७ हजेरी सहाय्यक कार्यरत होते. त्यापैकी असंख्य हजेरी सहाय्यक हे शासनाच्या निवृत्तीवेतन शासनाच्या सेवाशर्थी आदी कोणताच लाभ न घेता सेवानिवृत्त झाले तर कांहीजनांनी कसलाच लाभ न घेता या जगाचाच निरोप घेतला आहे. तरीही शासन या उर्वरीत लोकांच्या प्रश्‍नांकडे गांभिर्याने पाहताना दिसत नाही. महाराष्ट्र शासनाच्या राजगार हमी योजनेच्या खात्याने वारंवार निर्णय घेतलेले आहेत.
     १ डिसेंबर १९९५, २१ एप्रिल १९९९ व २५ जुन २००४ या निर्णयानुसार शासनाने अंदाजे ५७०० हजेरी सहाय्यकांना न्याय देऊन त्यांना शासकीय कर्मचारी व नागरी सेवा लागु करून इतर शासकीय नोक-यांमध्ये सामावुन घेतले. मात्र न्यायालयाच्या आदेशान्वये कामावर आलेल्या व हजेरी सहाय्यकांच्या बाजुने आदेश देऊनही शासन हे मान्य करण्‍यास तयार नाही. वारंवार संघर्ष करून शासनाबरोबर भांडुनही त्यांना अद्यापही न्यायापासुन दुर रहावे लागत आहे. न्‍यायालयाच्या निर्णयानुसार कामावर आलेल्या कर्मचा-यांपैकी २०० पेक्षा जास्त कर्मचा-यांना शासकीय लाभांशिवाय घराचा रास्ता धरावा लागलेला आहे. आता बोटावर मोजन्याइतकीच हजेरी सहाय्यकांची संख्या शिल्लक राहीलेली असतानाही त्यांना शासन दरबारी न्याय मिळत नाही. शासनाबरोबर लढा तरी किती द्यायचा तरीही कोणी या प्रश्‍नांकडे लक्ष देण्‍यास तयार नसल्यामुळे अंतिम निर्णयापर्यंत जावे लागले असल्याचे हजेरी सहाय्यकांचे म्हणणे आहे. किमान एवढया वर्षांच्या लढयाचा या निवडणुकांपुर्वीतरी शासनाने विचार करून हजेरी सहाय्यकांना न्याय द्यावा अशी मागणी आहे.

तुळजापूर-सोलापूर रेल्वेसाठी प्रयत्न करणार : श्रीपाद नाईक

तुळजापूर -: आई तुळजाभवानीच्या आशिर्वादामुळेच आपल्याला मंत्रीपद मिळाले असुन आपण तुळजापूर-सोलापूर रेल्वेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करू व लवकरात लवकर रेल्वेमार्ग होण्यासाठी पाठपुरावा करू तसेच तुळजापूरचा केंद्रीय पर्यटनस्थळात समावेश करू असे मत केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी सत्कार प्रसंगी व्यक्त केले.
    शनिवार दि. २६ रोजी केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक यांनी तुळजापूरला भेट देऊन श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. यानंतर रेल्वे संघर्ष समितीच्यावतीने नाईक यघांचा तुळजाभवानी मंगल कार्यालयात भव्य सत्कार करण्यात आला. संघर्ष समितीचे अध्यक्ष अविनाश कोळी, नगराध्यक्षा सौ. जयश्री कंदले, नागेश नाईक, किशोर गंगणे, सुधिर कदम यांनी तुळजाभवानी मातेची प्रतिमा, शाल, श्रीफळ देऊन यथोचित सत्कार केला.
    यावेळी रेल्वे संघर्ष समितीचे बबन गावडे, अ‍ॅड. किशोर कुलकर्णी, गणेश जळके, इंद्रजित साळुंके, विकास मलबा आदि उपस्थित होते. प्रारंभी नगराध्यक्षा जयश्री कंदले यांनी ना. नाईक यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अविनाश कोळी यांनी तर सुत्रसंचलन गणेश जळके यांनी केले. या कार्यक्रमास भाजपाचे विजय शिंगाडे, बाळा शामराज, सुहास साळुंके, उमेश गवते, शिवाजी डावकरे, नगरसेविका स्मिता लोंढे, पुजारी मंडळाचे पदाधिकारी, सदस्य व भाजपा, शिवसेना, रिपाईचे कार्यकर्ते उपस्थित होते.
    दरम्यान, याच कार्यक्रमात पंचायत समिती सदस्य साहेबराव घुगे यांनी नळदुर्ग येथील खंडोबा मंदिराच्या विकासासाठी तीर्थक्षेत्र विकास व पर्यटन योजनेतून सभागृह स्वच्छतेसह अन्य सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

Labels:

अॅप्‍टेक कॉम्‍प्‍युटर एज्‍युकेशनला क्लिक डिप्‍लोमासाठी पुरस्‍कार

कळंब :- कळंब येथील अॅप्‍टेक कॉम्‍प्‍युटर एज्‍युकेशनला क्लिक डिप्‍लोमा या कोर्सला मराठवाडा विभागात सर्वात जास्‍त प्रवेश केल्‍याबद्दल नुकतेच औरंगाबाद येथे पुरस्‍कार करुन गौरव करण्‍यात आला. एमकेसीएलचे व्‍यवस्‍थापकीय संचालक विवेक सावंत यांच्‍या हस्‍ते अॅप्‍टेकचे संजय घुले यांना हा पुरस्‍कार देण्‍यात आला. 
           क्लिक डिप्‍लोमा हा रोल बेसड अभ्‍यासक्रम असून याचा कालावधी सहा महिने आहे. यामध्‍ये विद्यार्थ्‍यांना आपल्‍या आवडीचे किंवा आवश्‍यक असणारे कोणतेही सहा कोर्स करता येतात. या कोर्समुळे विद्यार्थ्‍यांस व्‍यवसाय किंवा प्रायव्‍हेट कंपनीमध्‍ये चांगल्‍या प्रकारचा जॉब मिळू शकतो. एकंदरीत विद्यार्थ्‍यांच्‍या जीवनाला कलाटणी देणारा हा अभ्‍यासक्रम असून याचे विद्यार्थ्‍यांना योग्‍य मार्गदर्शन करुन प्रा. संजय घुले यांनी या अभ्‍यासक्रमाला मराठवाड्यात सर्वात जास्‍त प्रवेश केले. त्‍याची दखल घेत त्‍याना सन्‍मान चिन्‍ह घेऊन त्‍यांचा सत्‍कार करण्‍यात आला.       

Labels:

तेरखेडा स्फोटातील आणखी एकाचा मृत्यू

कळंब :- तेरखेडा (ता. वाशी) येथील दोन फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाला होता. यामध्ये नऊ जणांचा घटनेदिवशीच जागीच मृत्यू झालेला होता. या घटनेत गंभीर जखमी असलेल्या आणखी एका महिलेचा शनिवार दि. 26 जुलै रोजी उपचारादरम्‍यान मृत्यू झाला.
    लता घोलप असे मृत महिलेचे नाव आहे. 8 जुलै रोजी दुपारी तेरखेडा येथील वेलकम फायर वर्क्‍स व प्रिन्स फायर वर्क्‍स या फटाक्याच्या कारखान्यांत स्फोट झाला होता. यामध्ये घटनेदिवशीच नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला होता. तसेच उपचारादरम्यान महादेव सरवदे यांचा मृत्यू झाला होता. वेलकम फायर वर्क्‍स येथे गंभीर जखमी असलेल्या लता घोलप या महिलेवर लातूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. शनिवारी पहाटेच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Labels:

बारुळ येथील अंगणवाडी घाणीच्‍या साम्राज्‍यात; बालकांचे आरोग्‍य धोक्‍यात

बारुळ (सुधीर सुपनार) :-  बारुळ (ता. तुळजापूर) या गावात सध्‍या बालकांच्‍या शिक्षणाचा श्री गणेशा करणारे विद्येचे प्रवेशद्वारे म्‍हणजे अंगणवाडी ही सध्‍या घाणीच्‍या विळख्‍यात सापडली आहे. यामुळे बालकांचे आरोग्‍य धोक्‍यात आले आहे. अंगणवाडीच्‍या सभोवती गावातील लोक प्रांतविधीचे प्रतिक्रिया करत असल्‍यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्‍य पसरले आहे. ग्रामपंचायतीकडे विनंती करुनही प्रशासन या प्रश्‍नाकडे जाणुन बुजून दुर्लक्ष करत आहे. त्‍यामुळे लोकांमधून तिव्र नाराजी व्‍यक्‍त होते. प्रशासनाकडे तात्‍काळ यावर उपाययोजना नाही केल्‍यास याचा परिणाम बालकांच्‍या आरोग्‍यावर होईल.

Labels:

Saturday, 26 July 2014

पारदर्शक प्रशासनासाठी माहिती अधिकार कायदा उपयुक्त : गायकवाड

उस्मानाबाद -: चांगल्या व पारदर्शक प्रशासनासाठी माहिती अधिकार कायदा उपयुक्त आहे. सार्वजनिक हिताच्या या कायद्यामुळे लोकांचा सहभाग, पारदर्शकता, उत्तर दायित्व आणि जबाबदारी प्रत्येकावर असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी केले.
    तुळजापूर येथे जिल्ह्यातील माहिती अधिकारी व अपिलीय अधिकारी यांना माहिती अधिकार विषयक कायद्याचे मार्गदर्शन करतांना गायकवाड बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत यांची यावेळी उपस्थिती होती.
    यावेळी गायकवाड म्हणाले की, देशात माहिती अधिकार कायद्याने चांगले काम केले आहे. मागितलेली माहिती 30 दिवसात देणे आवश्यक आहे. अशा वेळी सर्व प्रथम तांत्रिकतेचा विचार न करता उपलब्ध माहिती वेळेत देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
    उपलब्ध आणि मागितलेली माहिती देणे आवश्यक आहे. सार्वजनिक हित लक्षात घेऊनच हा कायदा करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. काही वेळा माहिती मागणा-यांकडून भरमसाठ माहिती मागितली जाते त्यामुळे केवळ 150 शब्दातच माहिती  मागविणे आवश्यक आहे आणि एकाच अर्जात विविध बाबींविषयक माहिती मागितली असेल तर केवळ पहिल्या विषयाची माहिती देऊन उर्वरित माहितीसाठी संबंधितांना नव्याने अर्ज करावयास सांगण्याबाबत नियम करण्यात आला आहे. माहिती अधिकाराचा दुरुपयोग यामुळे काही प्रमाणात कमी झाल्याचे त्यानी सांगितले. अपिलीय अधिका-यांनीही 30 दिवसांच्या आत सुनावणी घेऊन  45 दिवसाच्या आत निर्णय देणे आवश्यक असल्याचेही श्री. गायकवाड यांनी सांगितले. एखादे कागदपत्र माहितीसाठी या कायद्यातंर्गत देताना किरकोळ रकमेसाठी पत्रव्यवहार न करण्याचा सल्ला त्यांनी दिला.
    कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी डॉ.नारनवरे यांनी गायकवाड यांचे स्वागत करुन कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला.

Labels:

कौशल्याधारित शिक्षण हवे : रत्‍नाकर गायकवाड

नळदुर्ग -: शिक्षणातून विकास हा परिवर्तनाच्या प्रक्रियेचा एक भाग आहे. त्यामुळे चारित्र्य निर्मिती करणारे शिक्षण देणे ही गरज असून त्याबरोबरच कौशल्य विकास महत्वाचा असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी केले.
    नळदुर्ग येथील डॉ.आंबेडकर इन्टरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलच्या नवीन इमारतीचे उदघाटन रत्‍नाकर गायकवाड यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत, शिवसेनेचे माजी जि.प.  सदस्‍य गणेश सोनटक्‍के, नळदुर्गच्या उपनगराध्यक्षा अपर्णा बेडगे, डॉ.भगवान गवई, अभिजित चव्हाण, मारुती खारवे, निर्मला गायकवाड आदिंची यावेळी उपस्थिती होती.
    यावेळी गायकवाड, डॉ.नारनवरे आणि मान्यवरांच्या हस्ते शाळा परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले.
    गायकवाड म्हणाले की, ही  शाळा ग्रामीण विकासाचे केंद्र व्हावे, शिक्षणातून विकास आवश्यक आहे. त्यासाठी मन आणि बुध्दीचा विकास करणारे आणि आधुनिक काळात कौशल्याधारित शिक्षण आवश्यक आहे. त्याद्ष्टीने शाळेने पाऊले उचलावीत. यासाठी पालक, शिक्षक आणि समाजाचाही सहभाग आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
    जिल्ह्याचा नावलौकीक  वाढविणारी ही शाळा ठरेल, असे डॉ. नारनवरे यांनी नमूद केले. श्रीमती रावत यांनी ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमाची शाळा ही या पिढीला भविष्य कालीन आव्हानासाठी  मार्गदर्शक ठरेल,असे सांगितले.
   गवई यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. शालेय विद्यार्थ्यांनी सुरुवातीला स्वागत गीत सादर केले.
    यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, तहसीलदार काशीनाथ पाटील, गटविकास अधिकारी खिल्लारे यांच्यासह परिसरातील मान्यवर उपस्थित होते.        

Labels:

लिपीक टंकलेखकाची रविवारी परीक्षा

उस्मानाबाद :- जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी लिपीक टंकलेखक (मराठी व इंग्रजी) परीक्षा-2014 या पदाची परीक्षा रविवार, दि. 27 जुलै   रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत तीन  परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. या  परीक्षा केंद्राच्या  100 मीटर परिसरात अपर जिल्हादंडाधिकारी, उस्मानाबाद यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 कलम अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. सर्व परीक्षा केंद्राचे परिसरात सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यत हे आदेश लागू राहतील. 
       यानुसार श्रीपतराव भोसले हायस्कुल (जुनी इमारत) तांबरी विभाग, श्रीपतराव भोसले ज्युनिअर कॉलेज  पहिला व दुसरा मजला,  सर्व उस्मानाबाद या तीन केंद्रावर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. 
       या आदेशानुसार परीक्षा केंद्राच्या परिसरात बाहृय उपद्रव कमी करणे, परीक्षार्थींना कसलाही अडथळा हेावू नये या संबंधित नसल्यास व्यक्तीस परीक्षा केद्रांच्या परिसरात प्रवेश करण्यात मनाई करण्यात आली आहे. शिवाय  केंद्राच्या 100 मीटर परिसरातील झेरॉक्‍स, फॅक्स, ईमेल, रेडिओ, इंटरनेट सुविधा, भ्रमणध्वनी, मोबाईल, संगणक, गणनायंत्र कॅल्क्युलेटर  व अशा इतर प्रकारच्या स्वरुपाच्या बाबी विद्यार्थ्यांना पुरवठा करता येणार नाही. परीक्षा केंद्राच्या परिसरात घोषणा देता येणार नाही. शांततेस बाधा निर्माण होईल, असे कृत्य करता येणार नाही.
    केंद्राच्या परिसरातील झेरॉक्‍स सेंटर,पानपट्टी, टायपींग सेंटर, एसटीडी बुध, ध्वनीक्षेपक, कॉम्पयुटर सेंटर, इंटरनेट कॅफे आदि माध्यमे बंद राहतील. शिवाय मोबाईल, फोन,सेल्‍युलर फोन, इमेल व इतर प्रसार माध्यमे घेवून प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.परीक्षा केंद्रावर कोणत्याही वाहनास प्रवेशास मनाई  करण्यात आली आहे.
       परीक्षा केंद्रावर नेमणुक केलेले  अधिकारी, कर्मचारी, शासकीय कामावरील अधिकारी व कर्मचारी, परीक्षार्थी,परीक्षा केंद्रावर निगराणी करणारे अधिकारी, संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी आणि उमेदवार यांनाच केंद्रात प्रवेश राहील. इतराना प्रवेश राहणार नाही. परीक्षा केंद्राच्या 100 मीटर आवारात 5 किंवा त्यापेक्षा अधिक  व्यक्तींना एकत्र  येता येणार नाही. केद्रांवर परीक्षेशी संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि परीक्षार्थी सोडून कुणालाही प्रवेश असणार नाही.हे आदेश परीक्षा केंद्रावर काम करणारे अधिकारी, कर्मचारी आणि परीक्षार्थी, परीक्षा केंद्रावर नेमणूक केलेले अधिकारी संबंधित शाळेचे मुख्यायापक, शिक्षक, कर्मचारी आणि उमेदवारांना या केंद्रात प्रवेश  राहील. इतरांना (उमेदवारांच्या नातेवाईकासह) प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. पोलीस अधिकारी, कर्मचारी त्यांचे परीक्षेसंबंधी कर्तव्य पार पाडण्याचे अनुषंगाने हे आदेश  लागू राहणार नाही. हे आदेश 25 जुलै रोजी जारी करण्यात आले आहे.    

Labels:

राज्यस्तर युवा पुरस्कारासाठी 30 जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

उस्मानाबाद -: राज्यातील युवांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी राज्य युवापुरस्कार प्रतिवर्षी देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. राज्यस्तरावर युवा पुरस्कार क्रीडा विभागाचे क्षेत्रीय विभागानुसार प्रत्येक विभागातील एक युवक, एक युवती, एक नोंदणीकृत संस्था यांना देण्यात येतील. सदरच्या पुरस्काराचे स्वरुप गौरवपत्र, सन्मानचिन्ह, रोख पुरस्कार प्रत्येकी पन्नास हजार व संस्थेसाठी गौरवपत्र, सन्मानचिन्ह, रोख पुरस्कार रुपये एक लक्ष असे असेल. 
    सदरील राज्य पुरस्काराच्या अटी व शर्ती पात्रता,अर्ज याबाबत सविस्तर माहिती क्रीडा व युवक सेवा संचालनायाच्या संकेतस्थळ http://sports.maharashtra.gov.in वर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम, उस्मानाबाद यांचेशी संपर्क साधावा आणि पुरस्कारासाठीचे परिपूर्ण प्रस्ताव 30 जुलै, 2014 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, उस्मानाबाद यांनी केले आहे.    

Labels:

छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात प्रवेशासाठी आवाहन

उस्मानाबाद -: संघ लोकसेवा आयोग, नवी दिल्ली यांचे मार्फत 26 ऑक्टोंबर, 2014 रोजी घेण्यात येणा-या कम्बाईड डिफेंस सर्व्हिसेस या संरक्षण दलातील अधिकारी पदाच्या परीक्षेकरीता एम्प्लॉयमेंट न्युज मध्ये 19 जुलै रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे ऑनलाईन अर्ज पोहचण्याचा अंतिम दिनांक 18 ऑगस्ट, 2014 असा आहे. सीडीएस परीक्षेचा ऑनलाईन फॉर्म भरणेसाठी  http://www.upsconline.nic.in  या वेबसाईट वर उपलब्ध आहे.या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना प्रशिक्षण नाशिक येथे देण्यात येणार असून त्यासाठी जिल्ह्यातील पात्र उमेदवारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, उस्मानाबाद येथे 30 जुलै रोजी सर्व शैक्षणिक प्रमाणपत्र व गुणपत्रिकेसह आणि ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रत सोबत घेऊन मुलाखतीसाठी येण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर (निवृत्त) सुभाष सासने यांनी केले आहे. मुलाखतीच्या वेळी वस्तूनिष्ठ पध्दतीची लेखी परीक्षा व तोंडी मुलाखत घेण्यात येणार आहे.
     सीडीएस परीक्षेद्वारा कायमस्वरुपी व अल्पमुदतीचे कमीशनसाठी निवड करण्यात येत असते. जे उमेदवार पदवीधर असून सीडीएस परीक्षेचा फॉर्म ऑनलाईन भरुन पाठवतील व रोजगार समाचार मध्ये दिलेल्या शैक्षणिक,शारिरिक, वयोगट पात्रतेनुसार पात्र आहेत. अशाच उमेदवारांची निवड परीक्षा पूर्व प्रशिक्षणाच्या तयारीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड, नाशिक येथे करण्यात आली आहे. 5 ऑगस्ट ते 18 ऑक्टोंबर,2014 या कालावधीत हे प्रशिक्षण वर्ग चालविण्यात येणार आहेत. निवास व प्रशिक्षणाची सोय विनामुल्य करण्यात आली आहे.
    विविध पदासाठीची वयोमर्यादा पुढीलप्रमाणे आहे. आयएमए  (2-7-1991 ते 1-7-1996 दरम्यान जन्मलेले अविवाहीत भारतीय युवक) नेव्हल ॲकेडमी (2-7-1991 ते 1-7-1996 दरम्यान) एअर फोर्स ॲकेडमी (2-7-1992 ते 1-7-1996 दरम्यान), ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकेडमी  (2-7-1990 ते 1-7-1996 दरम्यान जन्मलेले विवाहित व अविवाहित भारतीय युवक), ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकेडमी (महिला करिता (2-7-1990 ते 1-7-1996 दरम्यान जन्मलेले अविवाहित  मुलं नसलेल्या विधवा, पुन्हा विवाह न केलेल्या, मुलं नसलेल्या घटस्फोटीत भारतीय महिला). याशिवाय आयएमए व ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकेडमीसाठी उमेदवार मान्यताप्रापत विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेचा पदवीधर अथवा समकक्ष असावा. नेव्हल ॲकेडमीसाठी अभियांत्रिकी पदवीधर तसेच एअर फोर्स ॲकेडमीसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाचा (भौतिक शास्त्र व गणित  10+2  स्तर विषयासह ) पदवीधर किंवा बीई असणे आवश्यक आहे.
    अधिक माहितीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड, नाशिक ( 0253-2451031/32) यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Labels:

सुरवसे यांचा केंद्रीय मंत्र्याकडून सत्‍कार

तुळजापूर :- भाजपा किसान मोर्चाचे नूतन धाराशिव जिल्‍हा सरचिटणीस तथा प्रगतशील शेतकरी सत्‍यवान (भाऊ) सुरवसे यांनी तुळजापूर विधानसभा मतदार संघात शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, वयोवृध्‍दासह नागरिकांना बसण्‍यासाठी पाचशे बेंच वाटप करणार असून त्‍यापैकी आजअखेर सव्‍वाशे बेंच अनेक गावात, अनेक ठिकाणी बसविण्‍यात आले आहे.
    सिंदफळ येथे बेंच बसविल्‍यानंतर सत्‍यवान भाऊ सुरवसे यांच्‍या कार्याची दखल घेऊन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी त्‍यांचा सत्‍कार करुन शुभेच्‍छा दिल्‍या. यावेळी अॅड. मिलींद पाटील, भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष नितीन काळे, युवा कार्यकर्ते गोपाळ सुरवसे, तालुकाध्‍यक्ष विजय शिंगाडे, प्रभाकर मुळे, दत्‍ता राजमाने, तुळजापूर पं.स. साहेबराव घुगे, दत्‍ता कुलकर्णी, रामदास कोळगे, कार्यकर्ते मोहन गायकवाड, शरद सुरवसे, अतुल भोसले, बंडू सुरवसे, किशोर सुरवसे, विनोद कदम आदी उपस्थित होते.

Labels: