Saturday, 30 November 2013

उमरग्‍यात अन्‍याय अत्‍याचार विरोधी परिषदेचे आयोजन

उमरगा (लक्ष्‍मण पवार) :- संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दलित, मागासवर्गीय, भटके व आदीवासी लोकांवर वारंवार अन्याय अत्याचार होत आहेत. त्या अत्याचारा विरोधात अन्याय अत्याचार विरोधी परिषदेचे आयोजन उमरगा येथे रविवार दि. 1 रोजी करण्यात आल्याची माहिती पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे यांनी शुक्रवार रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
     ही परिषद डॉ. बाबासाहेब अंबेडकर सांस्कृतीक महोत्सव समीती पुणे यांच्या वतीने उमरगा शहरातील शांताई मंगल कार्यालयात आयोजित केली आहे. सदर परिषदेच्या माध्यमातून अन्याय अत्याचाराला वाचा फुटली पाहिजे. अत्याचार करणा-या गुन्हेगारावर योग्य ती कडक कारवाई झाली पाहिजे. व अन्याय अत्याचार बंद झाले पाहिजेत. या सर्व बाबींवर योग्य ते निर्णय घेण्यासाठी चर्चा करण्‍यात येईल. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. रावसाहेब कसबे तर उद्घाटक म्हणुन  अर्जून डांगळे  हे उपस्थित राहणार आहेत.
    परिषदेचे निमंत्रक जि.प. सदस्य कैलास शिंदे, धिरज बेळंबकर, प्रा. डी.के. कांबळे, दत्ता रोंगे, दिगंबर भालेराव पोपटराव सोनकांबळे, राहणार आहेत. यावेळी प्रल्हार लुलेकर, प्रा. राजकुमार कांबळे, मनिषा टोकळे, डॉ. नितेश नवसागरे, प्राचार्य दिलीप गरूड, प्रा.ज्योती वाघमारे, मोतीराज राठोड, हे मार्गदर्शन करणार आहेत.
    कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. बाबासाहेब अंबेडकर सांस्कृतीक महोत्सव समीतीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर माणुसकी संस्था पुणेच्या प्रियदर्शी तेलंग आदी उपस्थित राहणार असल्याच सांगितले. चा परिषदेला महाराष्ट्र, कर्नाटक व आंधप्रदेश राज्यातील बांधव उपस्थित राहणार आहेत. या पत्रकार परिषदेत कैलास शिंदे, प्रा. डी.के. कांबळे, हरीष डावरे, दिगंबर भालेराव, दत्ता रोंगे, नवनाथ डांगे, परशुराम वाडेकर, शिवाजी कांबळे, शहाजी मस्के यांची उपस्थित होती.

Labels:

कळंब शहरात महात्‍मा फुले यांची पुण्‍यतिथी साजरी

सावित्रीबाई फुले विद्यालयात फुले यांना अभिवादन
कळंब (बालाजी जाधव) : शहरातील सावित्रीबाई फुले विद्यालयात महात्‍मा फुले यांची पुण्‍यतिथी साजरी करण्‍यात आली. महात्‍मा फुले यांच्‍या प्रतिमेचे पूजन विद्यालयाच्‍या मुख्‍याध्‍यापिका श्रीमती मनोरमा भवर यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले.
    महात्‍मा फुले यांच्‍याविषी शाळेतील शिक्षक काकासाहेब मुंडे यांनी आपले विचार व्‍यक्‍त केले. यावेळी शाळेतील विद्यार्थ्‍यांनी 'महात्‍मा फुले अमर रहे' अशी घोषणा केली व शाळेचे परिसर दणाणून टाकला. कार्यक्रमासाठी विद्यालयाच्‍या पर्यवेक्षिका श्रीमती अलका देवरे, ज्ञानेश्‍वर तोडकर आदीजण उपस्थित होते.
    कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शंकर गोंदकर यांनी केले तर आभार तानाजी मोरे यांनी मानले. यावेळी शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्‍तर कर्मचारी उपस्थित होते.

वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेतर्फे शिक्षकदिन साजरा
कळंब :- क्रांतीसूर्य महात्‍मा ज्‍योतीबा फुले यांच्‍या स्‍मृती दिनानिमित्‍त वीर भगतसिंह विद्यार्थी परि‍षदेतर्फे शिक्षकदिन साजरा करण्‍यात आला.
यावेळी छत्रपती शिवाजी चौकामध्‍ये महात्‍मा ज्‍योतीबा फुले यांच्‍या प्रतिमेचे पूजन करण्‍यात आले.
    देशातील बहुजन समाजांच्‍या मुलांना शिक्षण मिळावे, म्‍हणून आपले सर्वस्‍व अर्पण करुन आपल्‍या देशातील पहिले शिक्षक म्‍हणजे महात्‍मा ज्‍योतीबा फुले यांनी शिक्षकांची गंगा दारा-दारात पोहचवली. म्‍हणून विद्यार्थी परिषदेतर्फे महात्‍मा फुले यांचा स्‍मृतीदिन हा शिक्षक दिन म्‍हणून साजरा करण्‍यात आला. यावेळी विद्यार्थी परिषदेने महात्‍मा ज्‍योतीबा फुले व सर्वपल्‍ली राधाकृष्‍णन यांच्‍या बद्दलची सर्व माहिती एका पत्रामध्‍ये काढून सर्व पत्रके कळंब येथील शि.म. ज्ञानदेव मोटे महाविद्यालय, सावित्रीबाई फुले माध्‍यमिक व उच्‍च माध्‍यमिक विद्यालय, वसंतराव काळे महाविद्यालय, रणसम्राट शाळा, महाविद्यालयात जाऊन शिक्षक व विद्यार्थी यांना माहिती पत्रके वाटून सर्व शिक्षकांचा सत्‍कार करण्‍यात आला. तसेच महात्‍मा फुले यांच्‍या जीवन चरित्रावरती विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन करण्‍यात आले. या उपक्रमास शहरातील शाळा, मह‍ाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
    हा कार्यक्रम यशस्‍वी करण्‍यासाठी विद्यार्थी, युवक, पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. यावेळी वीर भगतसिंह विद्या‍र्थी परिषदेचे जिल्‍हाध्‍यक्ष सागर बाराते, उपजिल्‍हाध्‍यक्ष बालाजी सुरवसे, तालुकाध्‍यक्ष विनोद यादव, शहराध्‍यक्ष राजेश काळे, मोहेकर कॉलेजचे विद्यापीठ प्रतिनिधी गोविंद चौधरी, कळंब तालुका मराठा सेवा संघाचे प्रकाश घस, प्रवक्‍ते अतुल गायकवाड, प्रेम मडके, आकाश शेळके, विशाल पुरेकर, रविंद्र गालफाडे, प्रा. बोंदर आदीजण उपस्थित होते.

महात्‍मा फुले यांची पुण्‍यतिथी साजरी
कळंब -: येथील नगरपरिषदेमध्‍ये क्रांतीसूर्य महात्‍मा ज्‍योतीबा फुले यांची
पुण्‍यतिथी साजरी करण्‍यात आली. यावेळी नगराध्‍यक्ष शिवाजी कापसे यांच्‍या शुभहस्‍ते महात्‍मा फुले यांच्‍या प्रतिमेचे पूजन करण्‍यात आले. या कार्यक्रमास बांधकाम सभापती अतुल कवडे, कार्यालय अधिक्षक डी.एम. मांडवकर, नगर अभियंता डी.जे. कवडे, करनिकरक्षक के.ए. मुल्‍ला, स्‍वच्‍छता निरीक्षक आर.एस. गायकवाड यांच्‍या कर्मचारी, मान्‍यवर उपस्थित होते.



हसेगावात महात्‍मा फुले पुण्‍यतिथी साजरी
कळंब : तालुक्‍यातील महात्‍मा फुले बहुउद्देशीय सामाजिक संस्‍था हसेगाव केज येथे विविध उपक्रमाने महात्‍मा फुले यांची पुण्‍यतिथी साजरी करण्‍यात आली. संस्‍थेचे सचिव भागवत तोडकर यांनी महात्‍मा फुले यांच्‍या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्‍हणून शेतकरी गटाचे हरीभाऊ करंजकर हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विलास तोडकर यांनी केले तर प्रदीप यादव यांनी आभार मानले.

Labels:

डिझेल प्रति लिटर 50 पैशांनी महाग

नवी दिल्ली :- डिझेलच्या दरांमध्ये प्रति लिटर 50 पैशांनी वाढ करण्यात आली असून पेट्रोलच्या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. डिझेलचे नवीन दर शनिवारी मध्यरात्रीपासून लागू केले जाणार आहेत. जानेवारी महिन्यापासून तब्बल 11 वेळा डिझेलचे दर वाढविण्यात आले आहेत.
    स्थानिक कर आणि व्हॅट यांची आकारणी ठिकठिकाणी वेगवेगळी असल्याने डिझेलच्या दरांमधील वाढही भिन्नभिन्न राहणार आहे. दिल्लीत डिझेलच्या दरात 57 पैशांनी वाढ झाली असून आता दर प्रति लिटर 53.67 रुपये राहतील. मुंबईत डिझेल लिटरमागे 60.70 रुपयांना मिळणार आहे. सध्या हा दर 60.08 रुपये प्रति लिटर आहे.
    डॉलरच्या तुलनेत रुपया 25-30 पैशांनी घसरला असला तरी याचा ताण ग्राहकांवर न टाकण्याचा निर्णय पेट्रोलियम कंपन्यांनी घेतला आहे. त्यामुळे पेट्रोलच्या दरांत कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.

Labels:

पुनर्विलोकन समिती अंतर्गत उपसमितीची बैठक

पुणे -: शासकीय जाहिरात वितरण धोरण पुनर्विलोकन समिती अंतर्गत जाहिरात मंजुरी,‍ वितरण इत्‍यादी बाबत निकष संबंधात उपसमिती बैठक पुणे येथील विभागीय माहिती कार्यालयात शनिवार दि. 7 डिसेंबर रोजी आयोजित करण्‍यात आली आहे.
      या दिवशी दुपारी चार ते पाच या वेळेत संपादक / पत्रकार संघटनांची निवेदने स्विकारली जाणार आहेत. जरी ज्‍या संपादक / पत्रकार संघटनाना जाहिरात मंजुरी, वितरण इत्‍यादी निकषाबाबत निवेदने द्यावयाची आहेत त्‍यांनी दि. 7 डिसेंबर रोजी दुपारी चार ते पाच या वेळेत निवेदने द्यावीत, असे उपसंचालक (माहि‍ती) पुणे तथा उपसमितीचे सदस्‍य यांनी कळविले आहे. 

Labels:

शुन्य गाठायचंय ! गर्भवती महिला व पीपीटीसीटी सेवा

     महिलांचे एचआयव्ही मधील वाढते प्रमाण खरोखरच चिंताजनक आहे. त्यातही प्रजननक्षम वयोगटातील (18 ते 25 वर्षे) महिलांचे प्रमाण एकूणच गंभीर आहे. महाराष्ट्रातील गरोदर मातांमधील एचआयव्ही संसर्गाचे प्रमाण 2004 मध्ये 0.88% होत ते 2009 मध्ये 0.63 % पर्यंत खाली आले.
        गर्भवती महिलांच्या शरीरात एचआयव्हीचा शिरकाव असल्यास अशा 100 पैकी ढोबळ मानाने 30 बालकांना एच.आय.व्ही. संसर्ग सहजपणे होऊ शकतो. हा संसर्ग होण्याच्रे प्रमाण सुमारे 25 % ते 30% आहे. गर्भवती महिलेकडून बाळाला एच.आय.व्ही. संसर्ग होण्याची शक्यता ही पुढील गोष्टींवर अवलंबून असते.
      एचआयव्ही संसंर्गित मातेच्या गर्भात बाळ असताना आतमध्ये काही इजा झाल्यास 3 बाळांना हा संसर्क होऊ शकतो. बाळंत होत असताना नाजुक त्वचेस इजा होऊन किंवा रक्ताचा  व बाळाचा संबंध येऊन 21 बाळांना व स्तनपानादरम्यान 6 बाळांना.
सर्व गर्भवती महिलांना एचआयव्ही बाबत माहिती मिळणे आवश्यक आहे तसेच योग्य प्रकारच्या समुपदेशनानंतर अशा स्वत:ची एचआयव्ही बाबत सद्यस्थिती कळविणेसाठी रक्तचाचणी करुन घेण्याची सुविधा पुरविणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत पीपीटीसीटी कार्यक्रमांतर्गत शासनाने सर्व जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, महानगरपालिका दवाखाने आणि ग्रामीण भागातील सर्व ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात एचआयव्ही तपासणीची सोय मोफत उपलब्ध केली आहे.
        एचआयव्ही संसर्गित माते पासून तिच्या बाळाला HIV चा संसर्ग  होवु नये म्हणुन महाराष्ट्र राज्य एड्स प्रतिबंध व नियंत्रण संस्थेमार्फत जिल्हास्तरावर व ग्रामीण रुग्णालय मध्ये पीपीटीसीटी हा कार्यक्रम राबविला जातो.

सध्या चालु असलेला पालकांकडून मुलांना होणा-या एचआयव्हीच्या संसर्गाचा प्रतिबंध कार्यक्रम -
गर्भधारणे दरम्यान एचआयव्हीच्या प्रसाराला प्रतिबंध करणे यासाठी पालकांना त्यांच्या स्वत:च्या एचआयव्ही संसर्गाबद्दल महिती असेल आणि त्यांनी पीपीटीसीटी कार्यक्रमात उपलब्ध केलेल्या प्रतिबंधाच्या मार्गाचा अवलंब केला तर बाळाला होणा-या संसर्गापासून वाचविणे शक्य होईल म्हणून प्रत्येक गर्भवती महिलेचे समुपदेशन करणे आणि तपासणी करणे महत्वाचे आहे.
      जर महिला एचआयव्ही संसर्गीत असेल तर कुटुंब नियोजन पध्दतीचा अवलंब करुन गर्भधारणा टाळणे, जर एचआयव्ही संसर्गीत महिलेने गर्भधारणा स्वीकारली तर गर्भधारणे दरम्यान तिला प्रॉफीलॅक्सीस उपचार देणे यामध्ये बाळंतपणाच्या कळा सुरु झाल्यास नेव्हॅरीपीन हे औषध दिले जाते. व बाळ जन्मल्यानंतर लवकरात लवकर त्या बाळास NVP Syrup देण्यात येते. (200 मि.ग्रॅम एकत्र मात्रा आईस, व 2 मि. ग्रॅम प्रति कि. ग्रॅम बाळास एकदाच घ्यावी लागते.) या औषधामुळे बाळंतपणाच्या वेळी बाळास होणारा एचआयव्ही संसंर्ग आपण टाळू शकतो यासाठी प्रत्येक एचआयव्ही संसर्गीत मातेने आपली प्रसृती ही इस्पितळामध्येच करणे आवश्यक आहे.
     एचआयव्ही विषाणू मातेच्या स्तनातील दुधातही असतो म्हणुन काही माता आपल्या बाळास अंगावरचे दूध न देता वरचा आहार देणे पसंत करतात. पण भारतातील नवजात बाळामध्ये एचआयव्ही मुळे होणा-या मृत्युच्या प्रमाणापेक्षा हगवण व कुपोषणामुळे होणारे मृत्युचे प्रमाण जास्त आहे. म्हणुन बाळाला 6 महिन्यापर्यंत स्तनपानच करावे.
     बाळाला जर वरच अन्न द्यायच असेल तर AFASS चा विचार करणे गरजेचे आहे.
A - अक्सेटबल - घरच्या लोकांची वरचे अन्न देणेबाबत मान्यता असणे.
F- फिसीबल - आहार देणे प्राप्त परिस्थितीत शक्य आहे किंवा नाही हे पाहणे.
A- अफोरडेवल - लहान बाळास दर दोन तासाला पौष्टीक आहार देणे गरजेचे असते ते आपणास परवडेल का ते पाहणे.
                   
S- सस्टेनेबल - हे वरचे अन्न देणे कायमस्वरुपी देणे गरजेचे असते जर आपण अंगावरचे दूध व
             वरचे असे दोन्ही अन्न दिले तर बाळास एचआयव्ही संसर्ग होण्याचा धोका वाढतो.
S-सेफ - हे अन्न देत असताना प्रत्येक वेळी भांडी उकळलेल्या पाण्यामध्ये धुऊन व स्वच्छता राखून हे अन्न देणे गरजेचे असते.
    वरील सर्व बाबींचा विचार करुन आपणास शक्य असेल तरच फक्त वरचे अन्न देणेस काही हरकत नाही.
   पालकांकडून अर्भकाला होणा-या एचआयव्हीचा संसर्ग रोखण्यासाठी (PPTCT-MDR) नवीन औषधोपचार पध्दत - पालकांकडून अर्भकाला होणा-या एचआयव्हीच्या संसर्ग शुन्यापर्यंत खाली आणणे हे या कार्यक्रमाचे मुख्य ध्येय व उद्दीष्ट आहे. सध्या एकूण एचआयव्ही संसर्गीत व्यक्ती मध्ये सर्वसाधारण 5.4 टक्के प्रमाण बालकांचे आहे. (NACO Annual Report 2009-2010) सर्वसाधारणपणे अर्भकाला एचआयव्ही संसर्ग होण्याचा धोका तीन टप्प्यामध्ये असतो त्यात गर्भधारणा होत असताना जर गरोदरमातेचा व्हायरल लोड जास्त असेल तसेच बाळंतपणाच्यावेळेस व स्तनपान करीत असेल तर एचआयव्ही संसर्ग होण्याचा धोका असतो. यात ढोबळमानाने 100 एचआयव्ही संसंर्गीत मातांपासून गर्भधारणा होत असताना 5 अर्भकाला तर बाळंतपणाच्यावेळेस 15 बाळांना तसेच स्तनपानाच्या वेळेस 10 बालकांना एचआयव्ही संसर्ग होण्याचा धोका असतो. नवीन पीपीटीसीटी कार्यक्रमाच्या माध्यमातून चार गोष्टींवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे.
    बाळाला होणारी एचआयव्हीचे लागण टाळण्यासाठी (PPTCT-MDR) प्रभावशाली औषध पध्दत
1 जानेवारी 2014 या दिवसापासून ही योजना महाराष्ट्रात राबविली जाणार आहे बरेच वर्षे आग्रह व पाठपुरावा केल्यानंतर आंध्र तामिळनाडू आणि कर्नाटकनंतर ही योजना महाराष्ट्रात सुरु करण्यात येत आहे. जुन्या दिल्या जाणा-या औषध पध्दतीपेक्षा खुप प्रभावशाली अशी औषध उपचार पध्दती असल्याने या पध्दतीचा काटेकोरपणे वापर केल्यास बाळाला होणारा एचआयव्ही संसर्ग 100 बालकांपैकी दोन ते शुन्यापर्यंत आपण हे प्रमाण नेऊ शकतो. मात्र ही औषध उपचार पध्दती सर्व एआरटी सेंटर मध्ये उपलब्ध असल्याची माहिती समाजापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी प्रसारमाध्यमावर योग्य पध्दतीने औषध देण्याची धुरा वैद्यकीय व्यवस्थेवर व आवश्यक औषध उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी सरकारी संरचनांवर आहे. सोलापूर जिल्ह्याचा विचार केल्यास चालु वर्षामध्ये गर्भवती स्त्रियांमध्ये एचआयव्ही संसर्गाचे प्रमाण दर हजारी 1 ते 2 एवढं आढळतं. महाराष्ट्राचा विचार केल्यास हे प्रमाण हजारात 1 ते 2 एवढं आहे. तरी राज्यात तीन हजाराहून अधिक स्त्रीया एचआयव्ही संसर्गीत आढळतात. या तीन हजारातील 40 ते 45 टक्के स्त्रिया सरकारी वैद्यकीय व्यवस्थेकडे जातात. तेवढ्याच स्त्रिया खाजगी वैद्यकीय सेवेच्या वाटेने जातात. या सर्वांचा विचार करुन पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अंतर्गत जिल्ह्यामध्ये 54 एफ आय सीटीसी खाजगी रुग्णालयात देण्यात आल्या आहेत व एचआयव्ही संसर्गीत व्यक्तींना तालुका स्तरावर एआरटी औषधउपचार मिळावे म्हणुन जिल्ह्यात 3 एआरटी सेंटर व 5 लिंक एआरटी सुरु करण्यात आले आहेत.
       अर्ली इनफन्ट डायग्नॉसिस हा कार्यक्रम सोलापूर जिल्ह्यामध्ये एप्रिल 2010 पासून सुरु करण्यात आला या कार्यक्रमांतर्गत एचआयव्ही संसर्गीत मातांना होणा-या बाळाची 6 आठवड्यापासून 18 महिन्यापर्यंतच्या बाळाची (DBS Dried Blood Spot) या पध्दतीद्वारे तपासणी केली जाते. यामध्ये (DNAPCR) डिऑक्सी निव्योन्युक्लीक असिड पॉलिमरेज चेन रिअक्शन या टेस्‍टद्वारे बालकांची तपासणी केली जाते ही टेस्ट पुणे येथील राष्ट्रीय एड्स संशोधन केंद्र या ठिकाणी केली जाते. जर बाळाला एचआयव्हीचा संसर्ग असल्याचे या तपासणीत कळून आले तर जरुरी असलेले उपचार एआरटी केंद्रामार्फत सुरु केला जातो. ही तपासणी महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी मार्फत मोफत उपलब्ध आहे.

 - जिल्हा माहिती कार्यालय, सोलापूर

Labels:

शासन योजनांचा लाभ सर्वसामान्यांना मिळावा यासाठी पाठपुरावा : ना. चव्‍हाण

उस्मानाबाद :- केंद्र व राज्य शासनाच्या प्रत्येक विकास योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचावी आणि त्यांना या योजनांचा लाभ मिळावा यासाठीच आपण प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केले. उस्मानाबाद तालुक्यातील भंडारवाडी, टाकळी (ढोकी) आणि येवती येथे चव्हाण यांच्या हस्ते विविध विकास कामांच्या शुभारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते.
      जिल्हा परिषद सदस्य सुधाकर गुंड गुरुजी, नारायण समुद्रे, संजय गांधी निराधार योजनेचे तालुका समितीचे अध्यक्ष लक्ष्मण सरडे, रोजगार हमी योजनेचे तालुकाध्यक्ष विनोद वीर, पत्रकार धनंजय रणदिवे, कल्पना मगर, अशोक शिंदे, बलभीम जाधव, सरपंच मंगल काटे, हरिश्चंद्र काटे, उपसरपंच सुधाकर एडके, गटविकास अधिकारी प्रियदर्शिनी मोरे, नायब तहसीलदार प्रभू जाधव यांच्यासह विविध मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.
       भंडारवाडी, येवती व टाकळी (ढोकी) येथे पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते सांस्कृतिक सभागृह बांधण्याच्या कामाचे भूमीपूजन करण्य़ात आले.
   पालकमंत्री चव्हाण म्हणाले की, गावच्या विकासाच्या आड कोणतेही मतभेद न आणता लोकोपयोगी योजना लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. आपण स्वता जिल्ह्यासाठी पाठपुरावा करुन विविध विकासकामांसाठी निधी मंजूर करुन आणला आहे.  या योजना गावांसाठी कशा राबविता येतील, हे पाहिले पाहिजे. प्रत्येक योजनेत आता लोकसहभाग महत्वाचा आहे. गाव व्यसनमुक्त, हागणदारीमुक्त झाले पाहिजे. यासाठी गावातील युवकांची मोठी जबाबदारी आहे. अन्न सुरक्षा कायदा, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे हित जोपासण्याचे काम राज्य व केंद्र शासन करीत आहे. प्रत्येक गावातील युवकांनी या योजना समजावून घेऊन त्या गावात राबविल्या जातील हे पाहिले पाहिजे.
      भंडारवाडी येथे वैधानिक विकास मंडळाच्या माध्यमातून तसेच विविध योजनातून जवळपास एक कोटीहून अधिक रकमेची विकासकामे केल्याचे त्यांनी सांगितले.  घरकुल योजना, रमाई आवास योजना, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना अशा सर्वसामान्य नागरिकांच्या हिताशी  निगडीत योजनांचा लाभ त्यांना मिळण्यासाठी जाणीवपूर्वक पाठपुरावा केल्याचे श्री. चव्हाण यांनी नमूद केले. श्री. सरडे व श्री. समुद्रे यांचेही यावेळी भाषण झाले.
      ज्याठिकाणी कामांचे भूमीपूजन झाले, ही कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिका-यांना दिले

Labels:

जागतिक एडस् दिनानिमित्त रॅलीस उत्तम प्रतिसाद

उस्मानाबाद :- जागतिक एडस दिनानिमित्त जिल्हा एडस प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा रुग्णालयाच्या वतीने एडस जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीस प्रभारी जिल्हाधिकारी जे. टी. पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला. 
    यावेळी नगर पालिकेचे मुख्याधिकारी अजय चारठाणकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. आर. हाश्मी, वैद्यकिय अधिकारी तथा जिल्हा कार्यक्रम अधिकारी  गणेश काकडे, जिल्हा रुगणालयातील सर्व वै्‌द्यकिय अधिकारी  व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
        या रॅलीत शहरातील महाविद्यालयातील प्राचार्य, प्राधयापक, अकराशेहून  विद्यार्थी, विद्यार्थींनी, रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच स्वयंसेवी संस्थाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. ही रॅली सकाळी जिल्हा रुग्णालय-काळामारुती चौक-नेहरु चौक, देशपांडे स्टॅन्ड-शिवाजी चौक मार्गे  निघून रॅलीचा समारोप पुन्हा  जिल्हा रुग्णालयात करण्यात आला. या  रॅली आयोजनासाठी पोलीस अधिक्षक, नगर परिषद, शहर पोलीस स्टेशन, शहर वाहतूक शाखा आणि शहरातील विविध महाविद्यालयातील प्राचार्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
      ही  रॅली यशस्वीतेसाठी अमोल व्हट्टे, शितोळे, पाटील, कारले, निकम, खांडवे, बचाटे, खुने, मुंडे, रोडगे, तिगाडे, श्रीमती कांबळे, नवले, कुंभार आदिनी परिश्रम घेतले.
        या रॅलीत के. टी. पाटील फार्मसी कॉलेज, के.टी पाटील नर्सींग कॉलेज, जिल्हा परिषद उच्च माध्यमिक (मुलांची) शाळा, जिल्हा परिषद (कन्या) शाळा, आर. पी. अध्यापक विद्यालय, आर. पी. महाविद्यालय, छत्रपती शिवाजी ज्युनिअर कॉलेज,आर्य चाणक्य विद्यालय, शरद पवार उच्च माध्यमिक विद्यालय व महाविद्यालयातील विद्यार्थी  आणि विद्यार्थींनी सहभाग घेतला होता.   

Labels:

एकात्मिक पाणलोट जनजागृतीची अभियानाची बैठक संपन्न

उस्मानाबाद :- येथील जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात अप्पर जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पाणलोट जनजागृती अभियान कार्यक्रमाची लोकप्रतिनिधीना माहिती व्हावी, यासाठी  सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांची बैठक घेण्यात आली.
    प्रास्ताविकात प्रकल्प संचालक तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावर यांनी एकात्मिक पाणलोट व्यस्थापन कार्यक्रमांतर्गत प्राप्त निधी/ झालेला खर्च / प्रत्यक्ष निधी व पुढील कालावधीत नियोजीत कामाबाबत सादरीकरणाव्दारे उपस्थित मान्यवराना माहिती  देवून  एकात्मिक  पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम अंमलबजावणी कार्यक्रम यशस्वीतेसाठी  सर्वांनी योगदान देण्याचे  आवाहन केले.
     उपविभागीय कृषी अधिकारी बिराजदार यु. पी. यांनी एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत प्रकल्पाची निवड, राष्ट्रीय, राज्य, जिल्हा, प्रकल्प कार्यान्वयीन यंत्रणा व पाणलोट समिती स्तरावरील रचना व कार्यपध्दती, प्रकल्पांच्या पुर्वतयारीचा टप्पा,  प्रत्यक्ष कामे व बर्हिगमन टप्पा, प्रकल्पामुळे प्रकल्प क्षेत्रातील गावांना मिळणारे फायदे यांची सविस्तर माहिती दिली.
     शेवटी जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी श्री. मिणीयार यांनी आभार मानले. सदरील अभियान  6 डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येणार असल्याची माहिती दिली.

Labels:

2 डिसेंबरला जिल्हास्तरीय दक्षता समितीची बैठक

उस्मानाबाद -: जिल्हा सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत वितरीत करण्यात येणा-या जीवनाश्यक वस्तुवर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय दक्षता समितीची बैठक 2 डिसेंबर रोजी दुपारी  1 वाजता राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली  आयोजित करण्यात आली आहे.
    सदरील बैठक येथील जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात होणार असून  संबधितानी  या बैठकीस वेळेवर उपस्थित रहावे, अशी विनंती जिल्हा पुरवठा अधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हास्तर दक्षता समिती, उस्मानाबाद यांनी केले आहे.

Labels:

सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिन

सोलापूर -: जिल्हाधिकारी कार्यालयात माहे डिसेंबर 2 मधील जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार दिनांक 2 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजेपासून जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सर्वसाधारण शाखेकडून कळविण्यात आले आहे.

Labels:

साथीचे गुन्‍हेगार


Labels:

कळंब येथील अॅप्‍टेकला मिटकॉनचा पुरस्‍कार

कळंब (बालाजी जाधव) -: मिटकॉन पुणे यांच्‍या तर्फे एमकेसीएल च्‍या एमएस-सीआयटी या अभ्‍यासक्रमाचा उत्‍कृष्‍ट प्रशिक्षण केंद्र हा पुरस्‍कार कळंब येथील अॅप्‍टेक कॉम्‍प्‍युटर एज्‍युकेशनला मिळाला आहे. हा पुरस्‍कार अॅप्‍टेक च्‍यावतीने प्रा. संजय घुले यांनी स्विकारला. एमएस-सीआयटी अभ्‍यासक्रमाच्‍या उत्‍कृष्‍ट प्रशिक्षणाबद्दल व व्‍यवसायातील सातत्‍याबद्दल हा पुरस्‍कार दरवर्षी प्रत्‍येक जिल्‍ह्यातील एका केंद्राला देण्‍यात येतो.
    या कार्यक्रमासाठी एमकेसीएल चे जिल्‍हा समन्‍वयक धनंजय जेवळीकर, मिटकॉनचे विभागीय समन्‍वयक मच्छिंद्र बहिरे, रोटरी क्‍लब ऑफ कळंब सिटीचे अध्‍यक्ष अँड. दत्‍ता पवार, शिशीर राजमाने, विश्‍वजीत ठोंबरे, धर्मेंद्र शहा, सुंदर कदम यांच्‍यासह विद्यार्थी उपस्थित होते.
    याप्रसंगी बोलताना मच्छिंद्र बहिरे म्‍हणाले की, गेल्‍या तीन वर्षापासून या विभागातील उत्‍कृष्‍ट प्रशिक्षण केंद्र म्‍हणून अॅप्‍टेकला गौरविले जात आहे. आज हा पुरस्‍कार प्रदान करताना मला अतिशय आनंद होत आहे. कळंब चे अॅप्‍टेक खरोखरच स्‍तुतीपात्र आहे.
    धनंजय जेवळीकर यांनी अॅप्‍टेकच्‍या कार्याबद्दल कौतुक करुन पुढील वाटचालीस शुभेच्‍छा दिल्‍या. अध्‍यक्षीय समोराप अँड. दत्‍त पवार यांनी केले. प्रा. संजय घुले यांनी     पुरस्‍काराचे श्रेय संस्‍थेतील सर्व प्रशिक्षकांना दिले. या कार्यक्रमाचे सुत्रसचांलन प्रा. विजय घोळवे यांनी केले तर दिग्विजय माळवदे यांनी आभार मानले.
फोटो :

Labels:

'रमाई' योजनेचा निधी परत गेल्‍याच्‍या निषेधार्थ रिपाइंचा मोर्चा

एस.के. गायकवाड
नळदुर्ग -: येथील नगरपालिकेने रमाई आवास घरकुल योजनेचा दीड कोटी रुपयांचा निधी परत पाठविल्‍याच्‍या निषेधार्थ व विविध मागण्‍यांसाठी रिपाइंच्‍यावतीने मंगळवार दि. 3 डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता नळदुर्ग नगरपालिकेवर मोर्चा काढून निदर्शन आंदोलन करण्‍यात येणार आहे. 
   नळदुर्ग नगरपालिकेने रमाई आवास घरकुल योजनेचा दीड कोटी रुपयांचा निधी परत पाठवून मागासवर्गीय लोकांवर अन्‍याय केला आहे. न.पा. च्‍या या कृत्‍याचा रिपाइंच्‍यावतीने जाहीर निषेध करण्‍यात येत असून याच्‍या निषेधार्थ तसेच बौध्‍दनगर येथील सर्व्‍हे नं. 29 मधील शासकीय गावठाण जमिनीवर अतिक्रमण करुन कच्‍च्‍या घरात राहणा-या मागासवर्गीय लाभार्थ्‍यांना त्‍यांचे अतिक्रमण कायम करुन त्‍यांना रमाई आवास घरकुल योजनेचा लाभ मिळवून द्यावा या प्रमुख मागण्‍यांसह इतर विविध मागण्‍यासंदर्भात तुळजापूर तालुका रिपाइंच्‍यावतीने दि. 3 डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता नळदुर्ग नगरपालिका कार्यालयावर मोर्चा तसेच निदर्शने आंदोलन करण्‍यात येणार आहे. या मोर्चा व आंदोलनात रिपाइं कार्यकर्त्‍यांनी मोठ्या संख्‍येनी सहभागी व्‍हावे, असे आवाहन करण्‍यात आले आहे. 
     सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना दिलेल्‍या निवेदनावर रिपाइंचे जिल्‍हा उपाध्‍यक्ष दुर्वास बनसोडे, तालुकाध्‍यक्ष एस.के. गायकवाड, नळदुर्ग शहराध्‍यक्ष बाबासाहेब बनसोडे, सदस्‍य बाणू बनसोडे आदींच्‍या सह्या आहेत.

Labels:

Friday, 29 November 2013

शिवशक्ती बँकेस बँको २०१३ पुरस्कार जाहीर

बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : कोल्हापूर येथील अविज पब्लिकेशन व पुणे येथील गॅलक्सी कौन्सीलिंग यांच्या संयुक्त विद्यमाने बार्शीतील शिवशक्ती अर्बन को ऑप. बँकेस बँको २०१३ हा पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती बँकेचे चेअरमन डॉ.प्रकाश बुरगुटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
    बुधवारी दि.४ डिसेंबर रोजी साज रिसॉर्ट महाबळेश्वर येथे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, सहकार आयुक्त मधुकरराव चौधरी यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असून दि. ३ ते ५ दरम्यान राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबीरदेखिल घेण्यात येत आहे. यावेळी पी.एन.जोशी यांचे बँकिंग नियमन कायद्यातील सुधारणा या विषयावर, डॉ. मेधा दुभाषी यांचे मायक्रोफायनान्सिंग या विषयावर, प्रशांत पोळ यांचे भविष्यकालीन बँकींगमध्ये तंत्रज्ञानाचे महत्व या विषयावर, विश्राम दिक्षीत यांचे आपला ग्राहक ओळखा अँटी मनी लॉंड्रींग या विषयावर, के.सी.मिश्रा यांचे रिझर्व बँकेच्या चर्चा लेखान सहकारी बँकिंगचे भवितव्य या विषयावर, व्ही.एस.पत्की यांचे बँकींगसाठी विमा गरज या विषयावर कार्यशाळेत मार्गदर्शन होणार आहे.
    कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या विचाराने वाटचाल करणार्‍या शिवशक्ती बँकेतून सभासद, ठेवीदरांच्या हिताचे तसेच समाजोपयोगी कार्यास अग्रेसर राहून सातत्याने काम केले जाते. कर्मचार्‍यांच्या अथक परिश्रमामुळेच एन.पी.ए. चे प्रमाण ३% वर आले व संस्थेस ऑडीट वर्ग अ चा दर्जा प्राप्त झाला आहे. सभासदांकरिता १५% लाभांश, कर्मचार्‍यांना १००% वेतनवाढ, बँकेने मागील स्वमालकीची जागा घेतली असून त्याचे बांधकामही प्रगतीपथावर आहे. बार्शीतील मोक्षधामच्या जीर्णोध्दारास देणगी, दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्री सहायता निधी, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्‍मान, कर्जदारांचा सत्कार आदी उपक्रमांतून सामाजिक बांधीलकी जोपासण्यात येते. कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त वैशिष्ट्यपूर्ण व्याख्यानमाला घेण्यात येत आहे यामुळेच बँकेस आदर्श संस्था २०१२ हा जिल्हास्तरीय पुरस्कारदेखिल यापूर्वीच मिळाला आहे. त्याच पध्दतीची वाटचाल यापुढेही सुरु असल्याममुळे यंदाचा बँको २०१३ हा पुरस्कार प्राप्त झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगीतले. प्रा.अशोक जगदाळे, व्यवस्थापक भारत उमाटे व संचालक यावेळी उपस्थित होते.

Labels:

बार्शीत संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान सप्ताहनिमित्त जनजागृती रॅली

बार्शी :- ग्रामस्वच्छता, व्यसनमुक्ती, वृक्षारोपन, वृक्षसंवर्धन, पोतराजा बंदी, स्त्रीभृण हत्या विरोध, न.पा. कर्मचार्‍यांनी विविध वेशभूषा परिधान करुन जनजागृतीचे संदेश देत शहरातील प्रमुख मार्गावरुन रॅली काढली.
    महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. दिलीप सोपल, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते नागेश अक्कलकोटे यांच्या मार्गदर्शनाखाली या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जवाहर हॉस्पिटल येथे शुक्रवार दि. 29 नोव्‍हेंबर सकाळी अकरा वाजण्‍याच्‍या सुमारास नगराध्यक्ष कादर तांबोळी यांच्या हस्ते या रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष राहुल कोंढारे, जिल्ह्याचे स्वच्छता दूत प्रा. मधुकर डोईफोडे, आरोग्य सभापती अरुणा परांजपे, नगरसेवक देविदास (मुन्ना) शेटे, आरोग्याधिकारी विजय गोदापुरे, प्रशासनाधिकारी शरद कुलकर्णी, उपमुख्‍याधिकारी पवन म्हेत्रे, आरोग्य निरीक्षक बाळासाहेब गुंड, नागेश लामतुरे आदीजण उपस्थित होते.
     बाळासाहेब गुंड, दिपक काकडे, विवेक गजशिव, सोङ्कनाथ झोंबाडे यांच्या नियोजनात सदरची रॅली नगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी, सुमित फॅसिलिटीझचे कर्मचारी यांना बरोबर घेऊन, मॉडेल हायस्कूल, शिवाजी महाराज शाळा क्र.१, डॉ.बाबासाहेब आंबेडकर शाळा क्र.७, डॉ.झाकिर हुसेन शाळा क्र.१२, भगवान महावीर शाळा क्र.२, शाहिर अमर शेख उर्दू शाळा क्र.११, राजमाता जिजाऊ शाळा क्र.९ इत्यादी शाळांच्या विद्यार्थ्यांनी या रॅलीमध्ये सहभाग नोंदविला. यावेळी झाडे लावा-झाडे जगवा, स्वच्छ दर बार्शी, उघड्यावर शौचास बसू नका, पाण्याचा वापर काटकसरीने करा, गटारांमध्ये कचरा टाकू नका, प्लास्टीक पिशव्यांचा वापर टाळा असा संदेश देणारे फलक व घोषणा देण्यात आल्या.
    कार्यक्रम यशस्वीतेसाठी दत्ता पवार, संतोष कुलकर्णी, बाळासाहेब बगाडे, योगेश लोंढे, शाम सोनवणे, अमित निकम, प्रताप गुंड, आबा आगलावे, संजय अवघडे, सूर्यकांत (आण्णा) लोंढे, शामलाल कसबे, गणेश वाघमारे, दिपक मोरे, बाबा वाघमारे, सचिन वाघमारे, विजय वाघमारे, धनंजय गायकवाड, प्रशांत बोकेफोडे, संजय पवार, विशाल बगाडे, पांडुरंग मोरे, देविदास झांझुर्टे, विश्वनाथ शिंदे, अमोल थोरात, त्रिंबक रोकडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Labels:

पालकमंत्री मधुकरराव चव्हाण उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौ-यावर

उस्मानाबाद :- राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण हे दोन दिवसाच्या जिल्ह्यायाच्या  दौ-यावर येत असून  त्यांचा कार्यक्रमांचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.
      शनिवार, दि. 30 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता अणदूर, (ता. तुळजापूर) येथे आगमन, सकाळी 9-30 वा. शासकीय विश्रामगृह उस्मानाबादकडे प्रयाण, स.10-30 वा. शासकीय विश्रामगृह,उस्मानाबाद येथे आगमन व राखीव. स. 11 वा. मौ. भंडारवाडी येथील सांस्कृतिक सभागृहाचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थित. दु. 12-15 वा. टाकळी ढोकी, ता. उस्मानाबाद येथील सांस्कृतिक सभागृहाचे भूमिपूजन कार्यकमास उपस्थित. दु.1-15 वा. मौ. येवती  येथील सांस्कृतिक सभागृहाचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. दु. 2 वा. मौ. टाकळी बेंबळी  येथील सांस्कृतिक सभागृहाचे भेमिपूजन कार्यकमास उपस्थिती व श्री. मनोहर राम चौरे यांच्या सुकन्येच्या शुभविवाहास उपस्थित  राहून सोईुसार टाकळी-बेंबळी येथून अणदूरकडे प्रयाण. राखीव व मुक्काम.
      रविवार, दि. 1 डिसेंबर रोजी सकाळी 9-45 वा. अणदूर येथून नळदुर्गकडे प्रयाण, स.10 वा. नगर परिषद सभा मंडपाचे उदघाटन कार्यकमास उपस्थिती. स्थळ-अंबाबाई मंदिर नळदुर्ग, (ता. तुळजापूर), दु. 2 वा. मौ. सिंदफळ (ता. तुळजापूर)  येथे मुद्रलेश्वर मंदिर वाहनतळ, फेवरब्लॉक बसविणे कामाचा शुभारंभ व मतदार संघातील कार्यकर्त्यांची बैठक, स्थळ- मुद्रलेश्वर, सिंदफळ, ता. तुळजापूर, सायं.4-30 वा. सिंदफळ येथून सोलापूरकडे प्रयाण करतील.      

Labels:

उसदराप्रश्नी सामोपचाराने मार्ग काढावा - जिल्हाधिकारी पाटील

उस्मानाबाद :- शेतकरी प्रतिनिधी व कारखानदार यांनी सामंजस्याची भूमिका घेऊन उस दर निश्चितीप्रकरणी शांततेच्या व चर्चेच्या मार्गानेच तोडगा काढावा. जिल्ह्यातील शांतता व सुव्यवस्था कोणत्याही प्रकारे बाधित होणार नाही आणि सर्वसामान्य नागरिकांना त्याची झळ पोहोचणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जे.टी. पाटील यांनी केले.
    येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवार दि. 29 नोव्‍हेंबर रोजी शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी व जिल्ह्यातील कारखान्यांचे प्रतिनिधी यांची बैठक झाली. त्यावेळी श्री. पाटील यांनी हे आवाहन केले. नांदेड येथील साखर सहसंचालक श्रीकांत देशमुख, अपर पोलीस अधीक्षक बाळकृष्ण भांगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, जिल्हा उपनिबंधक एस.पी. बडे यांच्यासह शेतकरी संघटना प्रतिनिधी व साखर कारखाना प्रतिनिधी यांची यावेळी उपस्थिती होती.
     यावेळी शेतकरी संघटना प्रतिनिधींचे म्हणणे श्री. पाटील व श्री. देशमुख यांनी ऐकून घेतले. यावेळी साखर कारखान्यांनी दर जाहीर करावा, अशी मागणी संघटना प्रतिनिधींनी केली. यासंदर्भात कारखाना प्रतिनिधींनी अध्यक्ष व संचालक मंडळांशी चर्चा करुन आजच्या बैठकीतील शेतकरी संघटनांची मागणी त्यांच्यापर्यंत पोहोचवावी. दोघांनीही एकमेकांशी समन्वयाने दराबाबत सकारात्मक चर्चा करावी, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले. श्री. देशमुख यांनीही शनिवारपर्यंत कारखाना प्रतिनिधींनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाल्याची बाब साखर सहसंचालकांना कळवावी, असे सांगितले. या प्रश्नी सामोपचारानेच मार्ग निघू शकतो. उसदरासंदर्भात केंद्रीय स्तरावरही समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी प्रतिनिधींनीही याबाबत शांततेने तोडगा काढण्याबाबत आग्रही राहावे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
    जिल्ह्यातील शांतता व सुव्यवस्था यास कुठेही बाधा येणार नाही, अशा पद्धतीने हा प्रश्न सोडविण्यावर भर द्यावा, असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी पाटील यांनी केले.  

Labels:

7 डिसेंबरला उस्मानाबादेत जिल्हा नियोजन समितीची बैठक

उस्मानाबाद :- जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती सभागृह मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, उस्मानाबाद येथे शनिवार, दि.7 डिसेंबर रोजी सकाळी 11-30 वा. आयोजित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी व सदस्य सचिव जिल्हा नियोजन समिती, उस्मानाबाद यांनी दिली आहे.
    या बैठकीत 2013 अखेर झालेल्या खर्चाचा आढावा तसेच पुनर्विनियेाजन प्रस्तावास मान्यता देणे व सन 2014-15 च्या  तिन्ही योजनेच्या प्रारुप आराखड्यास मान्यंता देणे, 14 ऑगस्ट 13 रोजी झालेल्या  जिल्हा नियोजन समितीची बैठकीचे इतिवृत्त कायम करणे,  सन 2013-14 (सर्वसाधाण,अनुसूचित जाती, उपयोजना, ओटीएसपी) माहे नोव्हेंबर अखेर झालेल्या खर्चाचा आढावा,  (सर्वसाधाण, अनुसूचित जाती, उपयोजना, ओटीएसपी ) पुनर्विनियेाजन प्रस्तावास मान्यता देणे, जिल्हा वार्षिक योजना 2014-15 (सर्वसाधाण,अनुसूचित जाती, उपयोजना, ओटीएसपी) प्रारुप आारखडयास मान्यता देणे, आदिबाबत बैठकीत आढावा घेण्यात येणार आहे.
    जिल्हा नियोजन समितीच्या सर्व सदस्यांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा नियेाजन अधिकारी एम .के. भांगे यांनी केले आहे.

Labels:

भडाचीवाडी येथे पाणलोट जनजागृती अभियानास प्रारंभ

उस्मानाबाद :- एकात्मिक पाणलोट कार्यक्रमांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पाणलोट जनजागृती अभियानाचे उदघाटन उस्मानाबाद तालुक्यातील भडाचीवाडी येथे  आमदार ओममराजे निंबाळकर यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. सदरील अभियान 6 डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यात  राबविण्यात येणार आहे. 
    यावेळी अध्यक्ष पणलोट समिती भडाचीवाडी उमेश बिराजदार,  विभागीय कृषि अधिकारी जी. व्ही. सस्ते, मंडळ कृषि अधिकारी डी. बी. काकडे, प्रकल्प  कार्यान्वयक यंत्रणा  ए. पी. चिक्षे, मंडळ कृषि अधिकारी  बी. व्ही. पाटील, कृषी पर्यवेक्ष के. ए. मगर, ए. ए. घोगरे, व्ही. एस. सुर्यवंशी, वाय. एन. इंगळे, डी. पी. जगताप आदि कृषी सहायक व पाणलोट विकास पथकातील सदस्य प्रमुख उपस्थिती होती.
    प्रारंभी आ. निंबाळकर यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पुजन करुन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, तालुक्यातील पाण्याची उपलब्धता व वारंवार येणारी दुष्काळसदृष्य परिस्थिती विचारात घेवून कृषी विभागाने जलसंवर्धनाच्या कार्यक्रमास महत्व देण्याची गरज प्रतिपादन केली.
    श्री .बिराजदार, यांनी एकात्मिक पाण्लोट विकास कार्यकमाबाबत सविस्तर माहिती दिली. प्रास्ताविक चिक्षे यांनी केले तर आभार प्रदर्शन सस्ते यांनी केले. यावेळी बहुसंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.                 

Labels:

जागतिक एड्स दिना निमित्त रॅलीचे आयोजन

सोलापूर : दि. 1 डिसेंबर 2013 जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून युवक रॅलीचे आयोजन महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, मुंबई अंतर्गत जिल्हा एड्स प्रतिंध व नियंत्रण केंद्र, छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि अश्विनी हॉस्पीटल, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रॅली आयोजित करण्यात आली आहे.
      अधिष्ठाता डॉ. अशोक शिंदे यांच्या हस्ते रॅलीचे उद्घाटन करण्यात येणार आहे त्यानंतर सामुहिकरित्या शपथ वाचनाचा कार्यक्रम घेण्यात येईल.
     रॅली सुरु होण्यापुर्वी एचआयव्ही/एड्स या विषयी लोककला पोवाड्याद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे. जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली व विजय कुलकर्णी जिल्हा पर्यवेक्षक डापकु यांच्या नेतृत्वाखाली रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. रेड रिबन क्लब (आर.आर.सी.) महाविद्यालयाचे विद्यार्थी, जिल्हा रुग्णालयीन नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थीनी, निरामय आरोग्यधाम संस्था, परमप्रसाद चॅरिटेबल ट्रसट (लिंक वर्कर स्किम), सेवाधाम प्रकल्प (पीपीटीसीटी व स्थालांतरीत कामगार प्रकल्प) सोलापूर सामाजिक कार्यसमिती (स्थलांतरीत कामगार प्रकल्प) प्रयास संस्था इ. संस्थेतील पदाधिकारी व कर्मचारी यांचा सहभाग राहणार आहे.

Labels:

तलमोड येथील बीएसएनएलची सेवा आठ दिवसापासून विस्‍कळीत

तलमोड -: उमरगा तालुक्‍यातील तलमोड येथील बीएसएनएल टॉवरची सेवा गेल्‍या आठ दिवसांपासून गायब असल्‍याने कार्डधारक हैराण झाले आहेत.
    तलमोड (ता. उमरगा) येथील राष्‍ट्रीय महामार्गाशेजारी बीएसएनएल चे टॉवर असून या टॉवर वरुन तलमोड, धाकटीवाडी, जगदाळवाडी, कोळसूर, हिप्‍परगा, हिप्‍परगावाडी, तलमोड तांडा, कराळी आदी गावांना यापासून रेंज मिळते. या टॉवरला विद्युतपुरवठा शेतातील कृषी पंपाचा असून या टॉवरची रेंज आठ दिवसापासून गायब झाल्‍याने परिसरातील ग्राहक हैराण झाले आहेत.    एरवी सुध्‍दा या टॉवरची रेंज कृषी पंपाची वीज गेल्‍यानंतर नेटवर्क बंद पडते. या परिसरामध्‍ये शेतक-यांसाठी शासनाने दिलेल्‍या कृषी कार्डाची संख्‍या अधिक असून शेतक-यांसह सर्वच ग्राहकांना याचा फटका बसत आहे. तरी वरिष्‍ठांनी याकडे लक्ष देऊन इन्‍वर्टरची सुविधा उपलब्‍ध करुन चोवीस तास सेवा देण्‍याची मागणी ग्राहकातून केली जात आहे.

Labels:

तालुकास्‍तरीय स्‍वच्‍छतामित्र वक्‍तृत्‍वस्‍पर्धा संपन्‍न

उमरगा (लक्ष्‍मण पवार) : येथील पंचायत समिती सभागृहात तालुकास्‍तरीय स्‍वच्‍छता वक्‍तृत्‍वस्‍पर्धा गुरुवार दि. 28 रोजी उत्‍साही वातावरणात पार पडली.
    आयोजित कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी गटविकास अधिकारी बी.बी. खंडागळे हे होते. स्‍पर्धेचे उदघाटन सभापती सौ. अक्षरबाई सोनवणे यांच्‍या हस्‍ते झाले. तर प्रमुख पाहुणे म्‍हणून आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप गरुड, गटशिक्षणाधिकारी सौ. सुधा साळुंखे, अधिक्षक ए.बी. शिंगडे, डी.आर. किरनाळे, जिल्‍हा समाज शास्‍त्रज्ञ रमाकांत गायकवाड, पी.एफ. चव्‍हाण यांची उपस्थिती होती.
    उमरगा तालुक्‍यातून पंचवीस विद्यार्थ्‍यांनी या स्‍पर्धेत सहभाग नोंदविला होता. या स्‍पर्धेत परीक्षक म्‍हणून श्रीमती सरिता कापसे, प्रविण स्‍वामी, विक्रम पांचगे, रघुवीर आरणे, ए.बी. शिंगडे आदींनी काम पाहिले. वरिष्‍ठ गटातून आदर्श महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. सुप्रिया भोसले हिने प्रथम क्रमांक पटकाविले. पृथ्‍वीराज जैनू राठोड याने द्वितीय तर तानाजी शिवाजी राठोड याने तृतीय क्रमांक पटकाविले. कनिष्‍ठ गटातून शिवाजी महाविद्यालय बलसूरची कु. स्‍वाती कुंभार प्रथम, कला, वाणिज्‍य व विज्ञान कनिष्‍ठ महाविद्यालय मुरुमचा राहुल विजय देडे द्वितीय, तर ज्ञानेश्‍वर उच्‍च माध्‍यमिक विद्यालय तुरोरीचा नाजमीन शब्‍बीर मुरमे याने तृतीय क्रमांक पटकाविला.
    दोन्‍ही गटातून अनुक्रमे रोख पाच, तीन व दोन हजार रुपये व प्रमाणपत्र असे पारितोषिक आहे. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार शांताराम गायकवाड यांनी मानले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी श्रीहरी चव्‍हाण, विनोद जाधव यांनी परीश्रम घेतले.

Labels:

लाईक-कॉमेन्‍ट


Labels:

रविवारी कम्‍युनिटी हॉल बांधकामाचे भूमीपूजन

नळदुर्ग -: नगरपालिकेच्‍यावतीने महाराष्‍ट्र सुवर्ण जयंती नगरोत्‍थान योजनेंतर्गत अंबाबाई मंदीर येथे कम्‍युनिटी हॉल बांधकामाचे भूमीपूजन व अंबाबाई मंदिराजवळील घाटाचे लोकार्पण सोहळा रविवार दि. 1 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता पालकमंत्री ना. मधुकरराव चव्‍हाण व हिरेमठ संस्‍थानचे बसवेश्‍वर महास्‍वामीजी यांच्‍या शुभहस्‍ते होत आहे.
    या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी सिध्‍देश्‍वर सहकारी बँक लातूरचे चेअरमन सि.ना. आलुरे गुरुजी, श्री तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखान्‍याचे चेअरमन नरेंद्र बोरगावकार हे राहणार आहेत. तर कॉंग्रेसचे उस्‍मानाबाद जिल्‍हाध्‍यक्ष आप्‍पासाहेब पाटील, नगराध्‍यक्ष शब्‍बीरअली सावकार, उपनगराध्‍यक्षा सौ. अर्पणा बेडगे, नगरसेविका लक्ष्‍मी खारवे, सुप्रिया पुराणिक, सुमन जाधव, नगरसेवक नय्यर जहागिरदार, दयानंद बनसोडे, श्री कुलस्‍वामिनी सहकारी सुत गिरणीचे अध्‍यक्ष अशोक मगर, अंबाबाई देवस्‍थान ट्रस्‍टचे अध्‍यक्ष रमेश जाधव, अंबाबाई देवस्‍थान जिर्णोध्‍दार समितीचे अध्‍यक्ष शरद बागल यांची प्रमुख उ‍पस्थिती राहणार आहे. तरी या कार्यक्रमास उपस्थित राहण्‍याचे आवाहन नगरसेवक नितीन कासार, शहबाज काझी, देविदास राठोड, संजय बताले, कमलाकर चव्‍हाण, अमृत पुदाले, सचिन डुकरे, नगरसेविका निर्मला गायकवाड, सु‍फिया कुरेशी, कुशावली शिरगुरे, मंगल सुरवसे, मुन्‍वर सुलताना कुरेशी यांनी केले आहे.

Labels:

नळदुर्ग शहरातील अवैध धंदे बंद करण्‍याची मागणी

नळदुर्ग : दिवसेंदिवस शहरात अवैध धंदे वाढत चालले असून येत्‍या आठ दिवसात पोलिसांनी अवैध धंद्याना आळा नाही घातला तर महाराष्‍ट्र नवनिर्माण सेना नळदुर्ग शहर शाखेच्‍यावतीने पोलीस ठाण्‍यासमोर साखळी उपोषण आंदोलन करण्‍याचा इशारा मनसेच्‍यावतीने नळदुर्ग पोलीस ठाण्‍याचे पोलीस उपनिरीक्षक यांना देण्‍यात आले आहे.
    गेल्‍या काही दिवसापासून नळदुर्ग शहरामध्‍ये अवैध धंद्यांना मोठ्याप्रमाणावर ऊत आले आहे. हातभट्टी दारु, मटका, गुटखा असे बेकायदा धंदे खुलेआम चालू आहे. या अवैध धंद्यावर कोणतीही कारवाई होत नाही. त्‍यामुळे मोठ्याप्रमाणावर अवैध धंद्यात वाढ होत आहे. मटका हा प्रकार शाळकरी मुलांमध्‍ये खुप प्रसिध्‍द झाला आहे. शाळेला जाणारी मुले जर मटका खेळत बसली तर समाजाच्‍या दृष्‍टीने ते खूप घातक आहे. नळदुर्ग शहरातील वसंतनगर, अक्‍कलकोट रोड यासह इतर ठिकाणी हातभट्टी दारु, मटका लावणे अश्‍या धंद्याना ऊत आलेला आहे. अवैध धंद्याना आळा नाही घातला तर गोरगरीब जनतेचे संसाद उध्‍दवस्‍त होईल. तरी अवैध धंदे बंद करावे, अन्‍यथा मनसेच्‍यावतीने साखर उपोषण करण्‍याचा इशारा देण्‍यात आला आहे. या निवेदनावर मनसेचे शहराध्‍यक्ष जोतिबा येडगे, शहर उपाध्‍यक्ष शिवाजी चव्‍हाण, अलिम शेख, रमेश घोडके, अरुण जाधव, गौस कुरेशी, दत्‍तात्रय धारवाडकर, रमेश झुंबर अंधारे, कुरेशी वसीम, शिरीष डुकरे आदींच्‍या स्‍वाक्ष-या आहेत. याची एक प्रत माहितीस्‍तव राज्‍याचे गृहमंत्री, उस्‍मानाबाद जिल्‍हा पोलीस अधिक्षक, जिल्‍हाधिकारी आदींना पाठविण्‍यात आले आहे.

Labels:

खेळामुळे सांघिक भावना तयार होते - पोलीस आयुक्त

सोलापूर -: सांघिक खेळामूळे संघ विजेता होत असतो. सांघिक भावना तयार होण्यासाठी खेळाचे महत्व आहे, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त प्रदिप रासकर यांनी केले.
    राज्य राखीव पोलीस बल, सोरेगांव, सोलापूर येथील क्रीडांगणावर पुणे विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा 2013 चे त्यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार, प्रभारी अप्पर आयुक्त  तुकाराम पवार आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
    यावेळी बोलतांना रासकर म्हणाले की, क्रीडा स्पर्धेत नैपुण्याची कसोटी लागते. त्यामूळे या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले. सर्व खेळाडूंनी क्रीडा स्पर्धेच्या नियमाचे पालन करावे. नैपुण्यामध्ये आगळा - वेगळा ठसा उमटवावा असे आवाहन केले.
    याप्रसंगी बोलतांना जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम म्हणाले की, महसुल अधिकारी, कर्मचारी यांना सतत कामाचा व्याप असतो. कामासाठीची वेळेची निश्चित मर्यादा नसते. त्यामूळे या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेच्या निमित्ताने 3 दिवस मनसोक्तपणे सहभागी व्हावे, चांगल्या खेळांचे दर्शन घडवावे असे आवाहन केले.
    प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी प्रास्ताविकात क्रीडा स्पर्धेबाबतची माहिती दिली.
    यावेळी विविध जिल्ह्यातील अप्पर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, महसुल विभागाचे विविध कर्मचारी, शहरातील नागरिक उपस्थित होते.

Labels:

रोहयो करिता तक्रार निवारण प्राधिकारी नियुक्त

सोलापूर -: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात तक्रार निवारण प्राधिकारी (ओम्बडसमन) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
      हे तक्रार निवारण प्राधिकारी प्रत्येक ग्रामपंचायतींना भेटी देऊन तपासणी करणार आहेत असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रोजगार हमी शाखेकडून कळविण्यात आले आहे.

Labels:

सतिश शिंदे यांचे सेट परिक्षेत यश

बार्शी : वांगी (बु.) ता. भूम, जि. उस्‍मानाबाद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सतिश गजेंद्र शिंदे यांना सोलापूर केंद्रातील शिक्षणशास्त्र विषयातील सेट परीक्षेत सुयश मिळाले आहे. यापूर्वी त्यांना मुक्त विद्यापीठातून एम.मीलची पदवी प्राप्त झाली आहे. त्‍यांच्या या यशाबद्दल समाजातून अभिनंदन होत आहे.

Labels:

गणपत तावरे यांना टी.डी.एफ.ची उमेदवारी

बार्शी : जुन २०१४ दरम्यान होत असलेल्या शिक्षक मतदारसंघात महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी (टी.डी.एफ.) यांच्यावतीने सहशिक्षक गणपत तावरे हे शिक्षक मतदार संघातून निवडणूक लढविणार आहेत.
    शिवाजीराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मिरज येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती टी.डी.एफ.चे अध्यक्ष एस.डी.जमाले यांनी दिली. विना अनुदानित, अंशत: अनुदानित, अनुदान, पूर्ण अनुदानातील शाळांच्या शिक्षकांच्या प्रश्‍नाची सोडवणूक करण्यासाठी केलेल्या विशेष प्रयत्नांची दखल घेऊन त्यांची उमेदवारी निश्‍चित करण्यात आली आहे.

Labels:

ग्रा.पं.कर्मचार्‍यांना सुधारित श्रेणी लागू

बार्शी -: ग्रामपंचायत कर्मचारी यांना किमान वेतन, विशेष भत्ता यांचे सुधारीत दर श्रेणी प्रमाणे लागू करुन त्वरीत अंमलबजावणी करण्याचे आदेश ग्रामविकास व जलसंधारण विभागाचे उपसचिव डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या पत्रान्वये प्राप्त झाल्याची माहिती आयटकचे जिल्हाध्यक्ष कॉं.तानाजी ठोंबरे यांनी दिली.
    कर्मचार्‍यांचा मागील काही वर्षांपासून हा लढा सुरु होता. जिल्हा व राज्य पातळीवर आंदोलनेही झाली. त्याला यश मिळून उद्योग, उर्जा व कामगार विभागाने ७ ऑगस्ट रोजी अधिसूचनाही काढली आहे. त्यानुसार जिल्हा पातळीवरील मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. यांना तसेच तालुका पातळीवरील गटविकास अधिकारी यांना तात्काळ अंमलबजावणी करण्यास सांगीतले आहे.
    यानुसार दहा हजार पेक्षा जास्त लोकसंख्येच्या ग्रामपंचायतीकरिता ७१००, पाच ते दहा हजार लोकसंख्येच्या ग्रा.पं.६९००, पाच हजारपेक्षा कमी ग्रा.पं. ६३०० मूळ किमान वेतन, विशेष राहणीमान भत्ता ११००, अर्धकुशल कर्मचार्‍यांना ६४००, ६२००, ५६००, अकूशल कर्मचार्‍यांकरिता ५९००, ५७००, ५१०० प्रमाणे दर लागू करावे. ग्रामपंचायत ही स्वायत्त संस्था असून ग्रामनिधीतून वेतन लागू करावे असे आदेशात म्हटले आहे. संघटनेची मूळ मागणी ही ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना जिल्हा परिषदेच्या कर्मचार्‍यांच्या समकक्ष समजण्यात यावे, पेन्शन, ग्रॅच्युईटीचे अधिकार व यासारख्या मुलभूत मागणीसाठी महासंघाच्या नेतृत्वात १६ डिसेंबरला नागपूर विधानभवनावर धडक मोर्चाही काढण्यात येणार असल्याचे संघटनेने जाहीर केले आहे.

Labels:

शिवाजी महाविद्यालयात संविधानदिन साजरा

बार्शी -: शिवाजी महाविद्यालयाच्या प्राध्यापक प्रबोधिनी व सांस्कृतिक विभागाने संविधान दिनानिमित्त राज्यशास्त्र विभागप्रमुख, नेहरु स्टडिज सेंटरचे डायरेक्टर डॉ.टी.एस. मोरे यांचे भारतीय संविधानाची जडणघडण या विषयावर व्याख्यान झाले.
    यावेळी भारतीय संविधानाबाबत सविस्‍तर माहिती विशद करण्‍यात आली. नव्‍या पिढींना संविधानाचे आकलन व्‍हावे, याकरीता या व्‍याख्‍यानाचे आयोजन करण्‍यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मधुकर फरताडे यांनी अध्‍यक्षीय समोराप केला. प्रास्‍ताविक पंडित लावंड यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.व्‍ही.बी. वाघमारे तर आभार डॉ. आनंद करडे यांनी मानले.

Labels:

उमरग्‍यात वाल्मिकी जयंतीचे आयोजन

उमरगा (लक्ष्‍मण पवार) -: शहरातील पंचायत समितीच्‍या मैदानावर महर्षी वाल्मिकी जयंती समारोह सोहळा रविवार दि. 1 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता आयोजित करण्‍यात आला आहे.
    महाराष्‍ट्र राज्‍यातील कोळी बांधवांचे आराध्‍य दैवत महर्षी वाल्मिकी ऋषी जयंती कार्यक्रमात कोळी समाज संघटनेचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष तथा ठाणे महानगरपालिकेचे महापौर अनंत तरे हे मार्गदर्शन करणार आहेत. प्रमुख पाहुणे म्‍हणून माजी आमदार रविंद्र गायकवाड, आ. ज्ञानराज चौगुले, बार्शी येथील आरएसएम उद्योग समूहाचे संस्‍थापक अध्‍यक्ष राजेंद्र मिरगणे, शिवसेनेचे जिल्‍हा उपप्रमुख सुधीर पाटील, भाजपाचे विभाग संघटन मंत्री अविनाश कोळी, महाराष्‍ट्र कोळी संघटनेचे राज्‍य उपाध्‍यक्ष सिध्‍देश्‍वर कोळी, अक्‍कलकोटच्‍या उपनगराध्‍यक्षा सौ. छाया कामाटी, राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे सादीक कारचे, जि.प. सदस्‍य कैलास शिंदे, दिलीप भालेराव, हरीष डावरे, भारीप नेते रामभाऊ गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते कमलाकर सुर्यवंशी आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
    या कार्यक्रमानंतर सायंकाळी सहा वाजता कोळी गितांचा व लोकगिताच्‍या कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले आहे. जयंती सोहळा यशस्‍वी करण्‍यासाठी कोळी बांधवांनी मोठ्या संख्‍येनी उपस्थित राहावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते पंढरीनाथ कोणे, ज्ञानेश्‍वर पालमपल्‍ले, संजय सर्जे, प्रभाकर घाटे, दिगंबर जमादार, सौ. इंदूबाई घाटे, जिवन जगदाळे, सत्‍यवान भालेराव, विक्रम घाटे, ब्‍यंकट घाटे, हणमंत पालमपल्‍ले, बापू जगदे, किशोर घाटे, अंबादास गुंढे यांच्‍यासह समाज बांधवांनी केले आहे.

Labels:

माविमचा शनिवारपासून तेजस्वीनी बाजार महोत्सव

उस्मानाबाद :- महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने उस्मानाबाद येथे   दि. 30 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत स्वयंसहायता महिला बचतगट उत्पादित मालाचे व वस्तूंचे जिल्हास्तरीय तेजस्वीनी बाजार महोत्सव-2013 चे आयोजन करण्यात आले आहे. बसस्थानकाजवळ नगरपरिषदेच्या समोरील यशराज लान्स येथे हे प्रदर्शन भरणार असून 50 हून अधिक बचत गट सहभागी होणार आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल. हरिदास यांच्या हस्ते आणि जिल्हाधिकारी जे.टी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दि. 30 रोजी दुपारी 12 वाजता या प्रदर्शनाचे उदघाटन होणार आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी डा. वैशाली कडूकर-पाटील या प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
      या तेजस्विनी बाजार महोत्सवात महिला बचत गट उत्पादित गृहोपयोगी आकर्षक व सुंदर शोभेच्या वस्तू, ज्वेलरी, रेडीमेड कपडे, गावरान धान्य-दाळी, पापड, शेवया, मसाले, चटणी, खाद्य पदार्थ आदींचे प्रदर्शन व विक्री होणार आहे. याशिवाय तीनही दिवस सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा होणार आहेत.
      या तेजस्वीनी बाजार महोत्सवाचा लाभ जिल्ह्यातील व परिसरातील नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी संतोष इंगोले यांनी केले आहे.

Labels:

जिल्हास्तरीय प्रदर्शनास जनतेचा भर-भरुन उत्तम प्रतिसाद

उस्मानाबाद :- औरंगाबाद विभागस्तरीय व जिल्हास्तरी प्रदर्शन व विक्री सिध्दी-2013  उस्मानाबाद येथे समुह व बचतगट निर्मित वस्तुंचे जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्री जिल्हा क्रीडा संकुल, येथे 25 नोव्हेंबर पासून सुरु असून या  प्रदर्शनास जनतेकडून भर-भरुन उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या प्रदर्शनातील विक्रेत्यांशी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एल. हरिदास यांनी आज गुरुवार रोजी विक्रेत्यांशी संवाद साधून त्यांच्या अडी-अडचणी जाणून घेवून त्यावर तात्काळ उपाय योजना करण्याबाबत संबंधितांना सूचना दिल्या.
    जिल्हा क्रीडा संकुलातील या प्रदर्शनामध्ये विदर्भ, खानदेश, पश्चिम, महाराष्ट्र व मराठवाड्यातून साधारण अडीचशे महिला  बचत गटांनी सहभाग नोंदवला आहे. या बचतगटांनी हस्तकला, पाककला, प्रसाधने, पोषण आहार विविध मुर्ती, खेळणी, विविध प्रकारचे, घोंगडी तसेच विदर्भातील वनाऔषधी, मुसळी, आवळा पदार्थ, लहान मुलांची आकर्षक लाकडी खेळणी, बंजारा ड्रेस, ज्युसच्या पिशव्या, मसाला पापडर, मुगाची भजी, मासवडी, शिरकुर्मा, अंबील, खानदेशी वांगी भरीत, कळण्‍याची भाकरी तसेच खानदेश व विदर्भातील विविध खाद्य पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध असून अनेक दर्दी खवय्ये त्याचा स्वाद-चव घेत असल्याचे दिसत आहेत.
    गेल्या चार दिवसापासून सांस्कृतिक मेजवाणी साठी संध्याकाळी प्रदर्शनास भेट देणाऱ्या नागारीकांना विरंगुळा म्हणून विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबत प्रबोधनही करण्यात येत आहे व प्रदर्शनात सहभागी झालेल्या गटातील महिलांच्या विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आला आहे.  दि. 29 रोजी संगीत रजनी (स्वरानंद), आणि 30 नोव्हेंबर  रोजी भारुडाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. तसेच प्रदर्शनस्थळी मोफत जेवण व चहा नाष्टा, मोफत निवास, पिण्यासाठी शुध्द पाणीपुरवठा, मोफत वैद्यकिय सुविधा, अग्नीशमन व्यवस्था, मोफत स्टॉल आणि विद्युत सेवा पुरविण्यात आल्या आहेत.
           सरासरी या सर्व स्टॉलवरील विक्री आजपर्यंत 7 लाख 27 हजार 710 रुपये झाली असून हे प्रदर्शन संपेपर्यंत जवळपास 35 ते 40 लाखापर्यंत उत्पादीत मालाची विक्री होईल, अशी अपेक्षा उत्पादकांनी व्यक्त केली आहे. या प्रदर्शनास जनतेकडून भर-भरुन प्रतीसाद मिळत असल्याचेही विक्रेत्यांनी सांगितले.
    तसेच या विक्रीमध्ये रोजच्या रोज वाढ होत असल्याचे त्यांनी सांगीतले. सदर प्रदर्शनातील विक्रेत्यांशी प्रत्यक्ष चर्चेतून त्यांना देण्यात आलेल्या सुविधा राहणे, जेवण, पाणी आदि व्यवस्थित मिळत असल्याचे व समाधानी असल्याचे त्यांनी सांगितले.
    या प्रदर्शनामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातून 22, जालना-13, नांदेड-34, बीड-15, हिंगोली-12, परभणी-15, लातूर-29,  बुलढाणा-1, जळगाव-2, रायगड-1, उस्मानाबाद-55 अशा अनेक ठिकाणाहून महिला बचत गट उत्पादीत वस्तू विक्रीसाठी घेवून आल्या आहेत. या बचत गटाकडील वस्तु उत्तम प्रकारच्या असल्यामुळे खरेदीसाठी नागरीक, महिला, बच्चे कंपनी गर्दी करीत आहेत.
    वैशिष्टपुर्ण असणा-या बचत गट पुढीलप्रमाणे आहे. भिमाई महिला बचत गट बुलढाणा यांनी शेतीत उत्पादित केलेल्या  आयुर्वेदीक वनस्पती सफेद मुसळी पावडरची विक्रमी विक्री केली आहे. या गटातील महिलांचे विक्री कौशल्य अतिशय चांगले आहे. या गटाने  पंजाब, दिल्ली आणि मुंबई येथील प्रदर्शनात सहभागी झाले होत.  या गटाने आजपावेतो 30 हजारापयंत विक्री केली आहे. समता महिला बचत गट- पाचोड, जि. जळगाव यांनी मसाला व पापडची  25 हजारापर्यंत विक्री केली आहे. अहिल्यादेवी महिला बचत गटा-ताडनायंगाव, जि.जालना यांनी घोंगडीची 40 हजाराची विक्रमी विक्री  केली आहे. श्रीसाई महिला बचत गट सोयगाव, जि. औरंगाबाद यांनी स्टोन आर्टिकल मुर्ती आदिची विक्री 25 हजारापर्यत केली आहे. ओम महिलाबचत गट माथेरान यांच्याकडील  लेदर चप्पल व इतर पादत्राणे विक्री केली आहे. गंगासागर महिला बचत गट जळगाव यांचे खानदेशी वांग्याचे भरीत व भाकरी  उस्मानाबादकर चवीने चाखत आहेत. हरिओम महिला बचत गट निफाड, जि. नाशिक यांचे काळे मणुके ,किसमिस विक्रमी विक्री केली आहे.
    विशेष करुन नागरीक आयुर्वेदीक वनऔषधी, मुसळी, शतावरी, निरगुडी तेल, आवळा कँडी, आवळाकंद,  शिकाकाई पावडर, हळद पावडर याशिवाय अनेक वेगवेगळी वनऔषधी या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहे. विशेष करुन ज्यांना पाठीचा मणक्याचा त्रास आहे असे नागरीक शयन करण्याकरीता घोंगडी खरेदी करताना दिसत आहेत. सर्वज्ञ कयाधु हर्बल प्रोडक्ट यांचे हायड्रोऑल पर्पज पॅक, हळदी चंदन, वांग क्रीम, कुमारी अर्क, अशी वेगवेगळी प्रोडक्ट महिला खरेदी करताना दिसत आहेत. विशेष करुन बच्च कंपनी दहि धपाट्यावर ताव मारताना दिसत आहत.
    या प्रदर्शनास विविध प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी आदिंनी भेटी देवून समाधान व्यक्त केले.  या प्रदर्शनास जिल्ह्यातील सर्व नागरीकांनी भेट देवून लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालकांनी केले आहे. हे प्रदर्शन दि. 1 डिसेंबर,2013 पर्यंत जनतेसाठी खुले राहणार आहे.

Labels:

निवृत्तीवेतनधारकांना सूचना

उस्मानाबाद :- सर्व निवृत्तीवेतन धारकाना सूचित करण्यात येते की, 1 नोव्हेंबर रोजी निवृत्ती वेतनधारकांनी  हयात असल्याचे नवीन नमुन्यातील हयातीचे व पुनर्विवाह न केल्याबाबतचे छापील नमुने सर्व संबंधित बॅकेत पाठविण्यात आले आहे. ज्या बँकेमार्फत आपण निवृत्ती वेतन घेत असाल त्या बँकेत जाऊन 16 डिसेंबरपर्यंत स्वाक्षरी करावी, असे आवाहन अप्पर कोषागार अधिकारी  (निवृत्ती वेतन) , उस्मानाबाद यांनी केले आहे.
    विहीत मुदतीत हयातीचे दाखले स्वाक्षरी करुन दिले नाहीत, तर माहे डिसेंबर,2013 चे निवृत्तीवेतन बँकेत पाठवले जाणार नाही, याची निवृत्ती वेतनधारकांनी नोंद घ्यावी, असेही आवाहन  एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे करण्यात  आले आहे.

Labels:

गटविकास अधिकारी आचारसंहिता प्रमुख

उस्मानाबाद - राज्य निवडणूक आयोगाने घोषित केल्याप्रमाणे जानेवारी ते मार्च 2014 मध्ये मुदती संपणाऱ्या तसेच विभाजनामुळे व नव्याने अस्तित्वात आलेल्या स्वतंत्र  ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व पोट निवडणूकांसाठी निवडणूक कार्यक्रम  घोषित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे. 
          संबंधित तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रिया सुरु झाली असून निवडणूक आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, यासाठी आचार संहिता प्रमुखांची  नेमणूका  करण्यात आल्या असून  संबंधित तालुक्याचे गटविकास अधिकारी, पंचायत समिती  यांची आचार संहिता प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

Labels:

युवक कल्याण अनुदानासाठी 15 डिसेंबरपर्यत प्रस्तावाची पुर्तता करण्याचे आवाहन

उस्मानाबाद :- क्रीडा व युवक सेवा संचलनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे युवक कल्याण अनुदान योजनेअंतर्गत  अनुदान मिळण्यासाठी पंजीकृत संस्थाकडून अर्ज मागविण्यात आले होते. प्रास्त प्रस्तावाची छाननी केली असता त्यात अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत.
    तरी संबंधित संस्थांनी आपल्या प्रस्तावातील त्रुटीची पूर्तता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय श्रीतुळजाभवानी जिल्हा स्टेडियम, उस्मानाबाद येथे दि.15 डिसेंबरपर्यंत प्रत्यक्ष येवून वेळेत करावी. मुदतीत पुर्तता न केल्यास त्या प्रस्तावाचा विचार केला जाणार नाही, याची संबंधितानी  याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, उस्मानाबाद यांनी केले आहे.                                             

Labels:

जिंदावली देवस्थान मार्डी भक्त निवास बांधकामाची जाहिरात प्रसिध्द

उस्मानाबाद : लोहारा तालुक्यातील जिंदावली देवस्थान मार्डी येथील भक्त निवास बांधकामाची जाहिरात प्रसिध्द झाली असून या बांधकामाची जाहिरात http://mahatenders.gov.in या संकेतथळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
      सदर जाहिरातीच्या अटी व शर्ती सदर संकेतस्थळावर उपलब्ध आहे. याची सर्व सबंधितानी नोंद घ्यावी व पात्र ठेकेदारांनी ई-निविदा वेळेत सादर करावी. असे आवाहन जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, उस्मानाबाद यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.                                         
उपळा येथे पशुवैद्यकिय अधिकारी व वर्ग 4 निवासी   इमारत  बांधकामाची जाहिरात प्रसिध्द
उस्मानाबाद - उस्मानाबाद तालुक्यातील उपळा येथील पशुवैद्यकिय दवाखाना श्रेणी-1 अधिकारी निवासी  व वर्ग 4 निवासी इमारत बांधकामाची जाहिरात प्रसिध्द झाली असून या बांधकामाची जाहिरात http://mahatenders.gov.in या संकेतथळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर जाहिरातीच्या अटी व शर्ती सदर संकेतस्थळावर उपलब्ध आहे. याची सर्व सबंधितानी नोंद घ्यावी व पात्र ठेकेदारांनी वेळेत ई-निविदा सादर करावी. असे आवाहन जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, उस्मानाबाद यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.                     

Labels:

स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन

बार्शी : शेतकर्‍यांच्या प्रश्‍नासाठी बार्शी तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सुरु केलेले आंदोलन बार्शी पोलिसांनी अवघ्या पंधरा मिनीटांतच गुंडाळले. पोलिस निरीक्षक सालार चाऊस यांच्या उपस्थितीत एक तुकडी यावेळी घटनास्थळी हजर झाली.
    कासारवाडीचे सरपंच जितेंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ३० ते ४० कार्यकर्त्यांसमवेत सुरु असलेले बार्शी-कुर्डूवाडी रोडवरील रास्ता रोको आंदोलन बार्शी पोलिसांनी हस्तक्षेप करुन आटोक्यात आणले. 

बस वाहतूक ठप्प
    बार्शी बस स्थानकाहून पुणे मार्गावरील वाहतूक काही काळाकरिता स्थगित करण्यात आली. पुणे येथे जाणार्‍या ७ बस, मुंबई येथे जाणार्‍या २ बस, बोरीवली ३ बसचा प्रवास रद्द करण्यात आला. वैराग व मोहोळ भागातील वाहतूक तसेच पंढरपूर, इचलकरंजी, कराड, कोल्हापूर आदी भागात होणारी बस वाहतूक रद्द करण्यात आल्याची माहिती डेपो मॅनेजर प्रशांत वासकर यांनी दिली.

Labels:

बार्शीच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयास अंशत: मंजूरी

बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : मागील पस्तीस वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बार्शीतील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयास अंशत: मंजूरी मिळाली व अंतीम मंजूरीची प्रक्रिया येत्या काही दिवसांत पूर्ण होईल, अशी माहिती बार कौन्सील महाराष्ट्र व गोवाचे अध्यक्ष आशिष देशमुख यांनी दिली.
    पालकमंत्री ना.दिलीप सोपल हे बार्शी बार असोसिएशनचे अध्यक्ष असतांना मागील तीस ते पस्तीस वर्षांपूर्वीच याची मागणी केली होती. जागेची व इमारतीसाठीही विशेष निधीची उपलब्धता करुन बांधकाम पूर्ण करुन प्रक्रियेतील अडचणी दूर करण्यात आल्या आहेत.
    उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळासमवेत झालेल्या बैठकीत ही मंजूरी मिळाली आहे. पंढरपूर व माळशिरसच्या धर्तीवर बार्शी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय होण्यासाठी जानेवारीमध्ये होणार्‍या कोर्ट इस्टॅब्लीश कमिटीच्या बैठकीत इतर बाबींचा विचार करुन उर्वरित पूर्तता करण्यात येईल. सदरच्या बार्शीतील न्यायालयाच्या कामकाजामुळे तीन तालुक्यांतील नागरिकांच्या व वकिलांच्या वेळेची बचत होणार आहे. सदरच्या अंशत: मंजूरीनंतर बार्शीतील वकिलांमध्‍ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Labels:

बार्शीत महात्‍मा फुलेंचा स्‍मृतीदिन शिक्षकदिन म्हणून साजरा

बार्शी : शिक्षणाची दारे उघडी करुन बहुजन समाजाच्या घरात ज्ञानगंगा आणण्याचे काम महात्‍मा फुले यांनी केले. त्यामुळेच त्यांचा स्‍मृतीदिन हा शिक्षकदिन म्हणून साजरा करावा, असे मत मधुकर डोईफोडे यांनी व्यक्त केले.
    संभाजी ब्रिगेडच्या बार्शी शाखेच्या वतीने सावळे सभागृह येथे  महात्‍मा फुले यांचा स्‍मृतीदिन शिक्षकदिन म्‍हणून साजरा करण्‍यात आला. यावेळी डोईफोडे हे बोलत होते. याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष आनंद काशीद, देवा चव्हाण, विजय भोसले, चौरे, माळी, डॉ.राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.
    यावेळी बोलतांना देवा चव्हाण म्‍हणाले, कर्मठ व सनातनी लोकांनी त्याकाळात महात्‍मा फुले यांच्या कार्याला विरोध केला परंतु कोणत्याही दबावाला न घाबरता त्यांनी ज्ञानदानाचे कार्य केले. त्यामकुळेच आज बहुजन समाजातील स्त्रियांना बहुमान मिळत आहे. महात्‍मा फुले, सावित्री फुले यांच्या त्यागामुळेच आज स्त्रियांचे शिक्षण होत आहे.

Labels: