Friday, 31 December 2021

रेशन दुकानदाराकडुन आरटीआय कार्यकर्त्यांस जीवे मारण्याची धमकी ; कार्यकर्त्यांची पोलिस अधिक्षकाकडे धाव

प्रतिकात्मक छायाचिञ 

नळदुर्ग , दि . ३१


रेशन दुकानसंबंधी माहिती अधिकारात मागणी केल्याने संबंधीत स्वस्त धान्य दुकान चालकाने आर. टी. आय कार्यकर्त्यास जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची निवेदनाद्वारे उस्मानाबाद पोलीस अधीक्षकाकडे तक्रार करून संबंधीत धान्य दुकानदारावर   कार्यवाही करण्याची मागणी गुळहळळी ता. तुळजापूर येथील योगेश आनंद हांजगे यांनी केली आहे.    


निवेदनात पुढे नमूद केले आहे की, योगेश हांजगे यांनी दि. 08 ऑक्टोबर रोजी जनहितमाहिती अधिकारी तथा, नायब तहसिलदार (पु.) तुळजापूर यांच्याकडे माहिती अधिकारात मौजे गुळहळ्ळी येथील स्वस्त धान्य दुकानांशी संलग्नित माहिती मागीतली होती. सदर माहिती हि  धान्य दुकानदाराकडून परस्पर हस्तगत करण्याचे तहसिल कार्यालयाकडून हांजगे यांना कळविण्यात आले.  त्यावरून योगेश हांजगे यांनी  रेशन दुकानदार यांच्याकडे माहिती घेण्यासाठी दि. 20  ते  24 डिसेंबर रोजी या कालावधीत स्वस्त धान्य दुकान उघडण्याच्या वेळेत माहिती घेण्यासाठी गेले असता  संबंधित दुकान पाचही दिवस बंद असल्याचे म्हटले आहे. 

  
दि. 27 डिसेंबर रोजी त्यांनी  पुन्हा माहिती मागण्यासाठी दुकानदाराकडे  गेले असता  संबंधीतांना तहसिल कार्यालयाचे पत्र दाखविले.  त्यांनी  हांजगे यांना सांगितले की संबधीत माहिती ही दुकानात नाही. घरी आहे असे सांगीतले व माहिती घेण्यासाठी उद्या येण्याचे सांगीतले. यावेळी हांजगे यानी त्यांना अभिप्राय वही मागीतले असता ते ही घरी आहे असे सांगीतले. दि. 28 डिसेंबर रोजी  माहिती मागण्यासाठी सदरील दुकानात गेलो असता,   संबंधीतास  माहिती मागितली असता  हांजगे यांना जातीवाचक शिवीगाळ करून  त्यांनी  जिवे मारतो असे धमकावले. मी मरेपर्यंत तुला ठेवणार नाही गावात तुमचे घरे बोटावर मोजण्या इतके घरे आहेत, तुला बघयाचे आहे का? माझी काय ताकद आहे ते, असे बोलून जातीवाचक शिवीगाळ केली.  माहिती देणार नाही तुला काय करायचे करुन घे असे म्हटले.

निवेदनाची प्रत तुळजापूर तहसिलदार , नळदुर्ग  पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक याना देण्यात आले आहे.

Labels:

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त अणदुर जयमल्हार पत्रकार संघाच्यावतीने भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन

 
नळदुर्ग , दि . ३१ 


तुळजापूर तालुक्यातील आणदुर येथिल जय मल्हार पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिनानिमित्त दिनदर्शिका प्रकाशन व ग्रामीण पत्रकार बांधवांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.


प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी जय मल्हार पत्रकार संघ  अणदुर यांच्यावतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिनाचे औचित्य साधून जय मल्हार पत्रकार संघाचे २०२२ दिनदर्शिका प्रकाशन व ग्रामीण पत्रकार बांधवांचा पुरस्कार सन्मान सोहळा ६ जानेवारी २०२२ रोजी आणदुर येथील हुतात्मा स्मारक मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आले आहे .

 
 दिनदर्शिका प्रकाशन व ग्रामीण पत्रकार बांधवांचे पुरस्कार सन्मान सोहळा या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण तर प्रमुख पाहुणे म्हणून उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर , सरपंच रामचंद्र आलुरे ,  उपसंपादक प्रशांत जोशी , श्री श्री रविशंकर विद्या मंदिर अणदुरचे संस्थापक डॉक्टर जितेंद्र कानडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती पत्रकार सन्मान सोहळा संयोजक समितीने दिली आहे .

जय मल्हार पत्रकार संघ आणदूर यांच्यावतीने वर्षभर अनेक समाजोपयोगी कार्यक्रम राबविले  जातात . तर कोरोनाच्या महाभयंकर संकट काळात कोरोनाच्या नियमांचे पालन जनतेने करून शासनास सहकार्य करा कोरोनास हद्दपार करा या संदर्भात कलापथकाच्या माध्यमातून जय मल्हार पत्रकार पत्रकार संघाने गाव शहर वाड्या वस्तीत जाऊन प्रबोधन केली आहे . 


आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचा तुळजापूर तालुक्यातील पत्रकारांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जय मल्हार पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

Labels:

तुळजापूर तालुक्यातील लोहगाव येथे शाळा समितीचे पुनर्गठन


                          

 जळकोट, दि.३१

तुळजापूर  तालुक्यातील लोहगाव येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन करण्यात आले असून, नव्याने शालेय समिती पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.     
                                                              जि.प प्रशाला,  लोहगाव  शाळा व्यवस्थापन  समिती  नियुक्तीकरण्यात आली.
पालक मेळावा आयोजित करुन नविन शालेय शिक्षण समिती नियुक्ती करण्यात आली. यात
राहुल दत्तात्रेय मारेकर (अध्यक्ष), अरुण जनार्धन पाटील( उपाध्यक्ष),  तर सदस्य म्हणुन   आप्पाराव बाबुराव होळे , विकास काशिनाथ शिंगाडे , अविनाश नागनाथ मेंडके  सौ.उज्वला सतीश दबडे ,सौ.कल्पना बालाजी इंगोले,  सौ. तेजाबाई सोमनाथ  गायकवाड , सौ .रुक्मिणी अनिल लांडगे ,  वाघमारे डी .एस.( मुख्याध्यापक तथा सचिव),  पंडित पी.डी. (शिक्षक प्रतिनिधी),
कु. अश्विनी युवराज दबडे  (विद्यार्थी प्रतिनिधी),
गणेश सतीश बनसोडे( विद्यार्थी प्रतिनिधी)
  यांची  नियुक्ती करण्यात आली. नव्या पदाधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
      

यावेळी  सरपंच सौ. लोचनाताई दबडे, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष  सातलिंग पाटील,  प्रविण काटकर , उपाध्यक्ष  अतुल पाटील, उपसरपंच  .प्रशांत  देशमुख, तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष  प्रविण पाटील, उद्धव इंगोले, अनिल लांडगे ,प्रेमनाथ मारेकर, नागनाथ पडताळे, सचिन पाटील, महेबुब शेख, सुनील बनसोडे, कालिदास जाधव, सौ. कमल कलशेट्टी, महादेवी बनसोडे, शामल पांढरे , शामल पांढरे, अनुसया मारेकरी , सर्व शिक्षक उपस्थित होते.

Labels:

विराज पाचंगेची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड


 जळकोट,दि.३१:   

मनोहर पर्रीकर क्रीडासंकुल मडगाव, गोवा येथे दि. २६ ते ३० डिसेंबर २१ या कालावधीत पार पडलेल्या  राष्ट्रीय अजिंक्यपद सिकई मार्शल आर्ट स्पर्धा पार पडल्या. यामध्ये देश पातळीवरील गोवा, महाराष्ट्र जम्मू- कश्मीर, पश्चिम बंगाल, अंदमान-निकोबार ,पंजाब ,हरियाणा ,मध्य प्रदेश ,तामिळनाडू इतर असे २७ राज्यांनी  सहभाग घेतला .


या स्पर्धेत विराज विक्रम पाचंगे एरोसिकई या ग्रुप खेळामध्ये घवघवीत यश प्राप्त केले आहे. विराज पाचंगे याची निवड आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी झाली असून याचे सर्वत्र कौतुक होत आहे.  या क्रीडा प्रकारांचे एरोसिकई असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष मजहर खान ,सचिव रवींद्र गायकी, मुख्य प्रशिक्षक महमदरफी शेख यांचे मार्गदर्शन लाभले .

Labels:

उस्मानाबाद नगरपालिका प्रशासक पदी नेमणूक झाल्याबद्दल हरिकल्याण येलगट्टे यांचा नगरपालिकेत सत्कार



उस्मानाबाद , दि . ३१


उस्मानाबाद नगरपालिकेच्या प्रशासकपदी नेमणूक झालेल्या मुख्याधिकारी येलगटे यांचा सत्कार राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण निटूरे यांनी केला.
       

 विद्यमान नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदूराजे निंबाळकर यांचा ५ वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर उस्मानाबाद नगरपालिकेच्या प्रशासकपदी मुख्य अधिकारी हरीकल्याण  येलगट्टे यांची नियुक्ती झाली आहे. 

नवीन पदाधिकाऱ्यांची निवडणूक होईपर्यंत उस्मानाबादकरांना आवश्यक असणाऱ्या मूलभूत गरजा पुरवण्यासाठी आपण कटिबद्ध राहू अशी ग्वाही सत्कारानंतर हरीकल्याण येलगट्टे यांनी दिली आहे.

Labels:

रामलिंग पर्यटन स्थळ स्वच्छता मोहिम , 2 डोस पूर्ण झालेले नागरिक घेणार सहभाग




उस्मानाबाद , दि . ३१

जिल्ह्यातील मोजक्या पर्यटन स्थळांपैकी उस्मानाबाद तालुक्यातील येडशी परिसरातील रामलिंग पर्यटन स्थळाचा परिसर सध्या बेजबाबदार नागरिकांमुळे अस्वच्छ झालेला आहे , कचरा, प्लॅस्टिक ,पत्रावळ्या , बिस्किटांचे कव्हर ,प्लास्टिक बाॅटल्स ,दारु बाॅटल्स अशा अन्य वस्तुंमुळे सुंदर अस जंगल हळु हळु विद्रुप होत चाललेल आहे.

नविन वर्षाच्या सुरवातीला उस्मानाबाद जिल्ह्याची ओळख असलेल्या या पर्यटन स्थळाच्या ठिकाणी स्वच्छता मोहिम राबवुन या पुढेही रामलिंग पर्यटन स्थळ नेहमी स्वच्छ आणी सुंदर राहण्यासाठी MH 25 Helping Hands प्रयत्नशिल राहनार आहे अशी माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे

 स्वच्छता मोहीम दि. 2 जानेवारी 2022 , वार रविवार रोजी सकाळी 11 ते 4 या वेळत covid-19 च्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करत दोन डोस पूर्ण झालेल्या नागरिकांच्या उपस्थित ही मोहीम राबविण्यात येणार आहे. स्वच्छते मोहिमेमध्ये सहभाग घेतलेल्या नागरिकांना संस्थेच्या वतीने टी-शर्ट व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

Labels:

काटी येथे शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गणपत चिवरे तर उपाध्यक्षपदी सुनिल गायकवाड यांची निवड


काटी , दि . ३१


तुळजापूर तालुक्यातील काटी येथील  जिल्हा परिषद प्रशालेच्या शालेय व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन करण्यात आले.  यामध्ये शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गणपत श्रीपती चिवरे तर उपाध्यक्षपदी सुनिल दत्तात्रय गायकवाड यांची एकमताने निवड करण्यात आली. 


याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक अहमद सय्यद यांनी समितीची रचना व कार्यपद्धती याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत कदम यांनी केले व आभार सहशिक्षिका श्रीमती संगीता सुरवसे यांनी मानले यावेळी सर्व शिक्षक वृंद आणि बहुसंख्य पालक उपस्थित होते.

Labels:

तुळजापूर तालुक्यातील शहापूर येथे शाळा व्यवस्थापन समितीची निवड

जळकोट,दि.३१ : मेघराज किलजे


जिल्हा परिषद केंद्रीय  प्राथमिक शाळा शहापूर ता .तुळजापूर  येथे  ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते  भास्करराव सुरवसे,  गोरे उमांकात, सरपंच,  प्रदीप काळे ,उपसरपंच ,  पवार भिमराव ,  पाडूरंग मोरे  आदी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून पालक सभेला सुरुवात झाली.

 प्रास्ताविक मुख्याध्यापक  राठोड डी. यू यांनी करून पालक सभेचे औचित्य स्पष्ट केले आणि पालक सभेची रचना शाळा व्यवस्थापन समितीची रचना व कार्य स्पष्ट केले.  रचनेनुसार शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांची निवड करण्याचे आवाहन केले . यावेळी  पालकांनी चर्चा व विचारविनिमय करुन    शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना   केली.   नूतन शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारींची निवड पालकसभेत सर्वसंमत्तीने  करण्यात आली.  शिदे मुकूंद विश्वनाथ अध्यक्ष तर सौ. बालिका ईश्वर पवार, उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आली तर सदस्यपदी  नानासाहेब दिलीप पाटील (ग्रामपंचायत सदस्य), पालक सदस्य श्रीमती रईसा असिर पटेल,  तांदळे विष्णू बाबूराव,  सोमवसे चंद्रसेन विश्वनाथ , सौ. डावरे मिनाबाई दिपक,  जगताप अरविंद मनोहर, सौ. कोळी भाग्यश्री हरिश्चंद्र,  शिक्षक प्रतिनिधी श्रीमती. इनामदार अस्मतबानू मन्सूरअली ,सदस्य सचिव मुख्याध्यापक  राठोड ङि यू . यांची निवड करण्यात आली .


 पालक सभेत येऊन अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव यांची निवड जाहीर करण्यात आली. नंतर शाळेचे मुख्याध्यापक  राठोड यांनी नवनियुक्त शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व पदाधिकाऱ्यांचे पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. पालक सभेत नूतन अध्यक्ष व पालक सभेचे अध्यक्ष यांनी मनोगत व्यक्त केले .शेवटी मुख्याध्यापक   राठोड  यांनी  उपस्थितताचे  आभार मानले. या पालक सभेचे सूत्रसंचालन  जाधव अभयसिह  यांनी केले .ही पालक सभा  यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक  मगतराव , पवार पी. व्ही,  कोळी एच . आर.,  होगाडे शिवाजी,   श्रीमती शिदे अर्चना, श्रीमती सुर्यवंशी संगीता या  शिक्षकांनी तसेच शालेय पोषण आहार कर्मचारी  स्वामी धोडगे यांनी परिश्रम घेतले. या पालक  सभेस गावातील जेष्ठ नागरिक ,पालक , माता-पालक  उपस्थित होते .

Labels:

यंदा बळीराजासाठी नैसर्गिक आपत्तीचे ठरले मावळते वर्ष,आसमानी संकटाबरोबर सुलतानी संकटाने शेतकरी मेटाकुटीला



चिवरी , दि . ३१ : राजगुरू साखरे

एकीकडे कोरोनाचा कहर तर दुसरीकडे नैसर्गिक संकटाचा ज्वर अशा दुहेरी संकटात सापडलेल्या बळीराजाला सन २०२१ हे  वर्षे आपत्तीचे गेल्याचे दिसत  आहे, 


या मावळत्या वर्षात मार्चमध्ये अवकाळी गारपिटीचा तडाखा पुन्हा, एप्रिल-मे मध्ये अवकाळी पावसाने अनेक फळबागायती शेतकऱ्याची कंबरडे मोडले तर  नंतर जून मध्ये वेळेवर पाऊस येऊन शेतकर्‍यांनी पेरण्या लवकर आटोपुन घेतल्या. परंतु पिक फुलधारणीचे व फळधारणा अवस्थेत असताना महिनाभराचा पावसाचा खंड पडल्यामुळे पिकांच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट आली आणि उरले-सुरले पीक हातात येईल या आशेने शेतकऱ्यांनी मोठ्या हिमतीने मेहनत केली. परंतु सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी मध्ये संपूर्ण पिकाची दाणादाण उडवून दिली. यात खरीप हंगामातील पिकांमध्ये, सोयाबीन उडीद, मुग, तुरीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. 


या नुकसानीचे पिक विमा कंपनीकडे ऑनलाइन तक्रारी नोंदवून, पंचनामे होऊन देखील अनेक शेतकरी पिक विमा लाभापासून वंचित राहिले आहेत, त्याचबरोबर ऐन  रब्बी हंगामामध्ये महावितरणच्या मनमानी कारभारामुळे  कृषिपंपांची वीज तोडणीच्या मोहिमेमुळे शेतकऱ्याच्या संकटात आणखीन भर पडली आहे.  अशा सुलतानी संकटाचाही  शेतकऱ्यांना मावळत्या वर्षात सामना करावा लागला आहे. परंतु जिल्ह्यातील बळीराजाला कधी ओल्या तर कधी कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागतो हे मात्र नक्की.  शेतकऱ्यांना आता जागतिक हवामान बदलाचे चिन्हे दिसू लागली आहेत.  हिवाळा आणि उन्हाळा या ऋतूमध्ये पावसाळ्याचा अनुभव येत आहे. कधी हवामान कोरडे तर कधी अचानक ढग दाटून येऊन पावसाच्या सरी कोसळल्याचा अनुभव येत आहे.


 एकंदरीत सरत्या वर्षाला निरोप देताना शेतकऱ्याच्या दृष्टीने हे वर्ष नुकसानीचे गेल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही, सन २०२१ या वर्षामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरू असताना, दुसरीकडे निसर्गही शेतकऱ्यांचा पिच्छा सोडायला तयार नाही . एकंदरीत दरवर्षी नैसर्गिक संकटाना सामोरे जाणारा बळीराजा यावर्षीही संकटाला सामोरे गेला आहे. यातुन शेतकऱ्यांची सुटका कधी व केव्हा होणार? हा प्रश्न शेतकऱ्यांला कायम  सतावत आहे.

Labels:

तुळजापूर तालुक्यातील काटी येथिल कवताबाई बनसोडे यांचे निधन

काटी ,दि . ३१


तुळजापूर तालुक्यातील जेष्ठ महिला नागरिक कवताबाई संतराम बनसोडे वय ९०  यांचे मंगळवार दि. 28 रोजी सकाळी वृद्धापकाळाने राहत्या घरी  निधन झाले.


 त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी येथील बौद्ध स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या माजी उपसरपंच अशोक बनसोडे  व गायक भारत बनसोडे यांच्या मातोश्री होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Labels:

उस्मानाबाद : महामार्गावर कंटेनर व कारच्या भिषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघे जागीच ठार : कारचे झाले चक्काचूर


उस्मानाबाद , दि . ३१:  जुबेर शेख 

सोलापूर औरंगाबाद  महामार्गावर भरधाव   कंटेनर व कारच्या भिषण आपघातात कारमधील चौघे जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती घटनास्थळावरुन मिळाली आहे. हा आपघात सरत्या वर्षी  शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान झाल्याचे घटनास्थळी उपस्थित असलेल्या  नागरिकानी सांगितले.

उस्मानाबाद जवळील आळणी येथे शुक्रवार दि. ३१ डिसेंबर रोजी भीषण अपघातात 4 जन जागीच ठार झाल्याची घटना घडली असून कंटेनर व चारचाकी गाडी समोरासमोर जोरदार धडक होवुन आपघात झाला आहे . हा अपघात इतका भीषण होता की चारचाकी गाडीचा चक्काचूर झाला आहे . अपघातग्रस्त गाडी MH 24 AA 8055 मधील 4 जन ठार झाले असून गाडी लातूर येथील असल्याचे समजते . पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास व मदत कार्य सुरु करण्यात आले आहे .

Labels:

तुळजापूर तालुक्यातील दहिवडी शाळेत शालेय व्यवस्थापन समितीची निवड

तुळजापूर ,दि . ३१ : 

 तुळजापूर तालुक्यातील दहिवडी येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत  गुरुवार  दि. ३०  डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता  पालक मेळावा आयोजित करून शालेय व्यवस्थापन समिती सदस्य तथा अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची पालकांच्या संमतीने  निवड करण्यात आली .

 विद्यमान अध्यक्ष  गाटे शाम किसन हे सलग तिसऱ्यांदा (हॅट्रीक) अध्यक्ष पदाचे मानकरी ठरले आहेत . उपाध्यक्ष पदी सौ. सारिका विठ्ठल चव्हाण यांची   " बिनविरोध" निवड झाली आहे . शालेय व्यवस्थापन समितीत एकूण १६ सदस्य असून त्यात  ५० टक्के महिला सदस्य आहेत .



निवड करण्यात आलेली शालेय व्यवस्थापन समिती

अध्यक्ष  गाटे शाम किसन ,उपाध्यक्ष सौ सारिका विठ्ठल चव्हाण ,  सदस्य  गाटे आनंद बबन, सौ ज्योती शहाजी पवार ,ज्ञानेश्वर हनमंत सिरसाट ,वैष्णवी समाधान अंधारे ,रविंद्र दादाराव अंधारे ,अश्विनी सोमऩाथ माळी ,दिनकर बब्रुवान मारुती ,भाऊ डोलारे ,राधिका तानाजी.गायकवाड , राहुल अनिल.शिंदे, आण्णासाहेब बाबुराव दाटे ,किशोर अऱुण जाधव,  तुपेरे भारती सोपान ,सचिव सोनवणे पांडुरंग शहाजीआदी.

यावेळी सहशिक्षिका साठे सविता पांडुरंग , कदम अनिषा रामकृष्ण   सय्यद समीना रज्जाक यानी पुढाकार घेतले.

Labels:

Thursday, 30 December 2021

साहित्य निर्मितीमधुन वास्तविक जिवनाचा बोध ; वाड:मय मंडळाचे उद्घाटन - राजकुमार धुरगुडे यांचे प्रतिपादन



तुळजापूर, दि.३०: 

येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूरच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त तिन्ही भाषा विभागाच्या संयुक्त विद्यमाने वांड:मय मंडळाचे उद्घाटन संपन्न झाले, याप्रसंगी प्रमुख उद्घाटक म्हणून राजकुमार धुरगुडे, प्रसिद्ध उद्योजक , तुळजापूर यांनी वरील उदगार काढले,


धुरगुडे  बोलताना पुढे म्हणाले की, साहित्य निर्मितीमधुन आत्मिक सुखाची प्राप्ती होते,त्यातुन माणसाला माणूसपणाची शिकवण मिळते, जिवनातील अनुभव हा माणसाचा खरा गुरू असतो,इतरांनी केलेल्या निंदेचे भांडवल करून जिवनाची सकारात्मक जडणघडण होत असते.आपल्या सभोवताली जे वातावरण असते त्यातुन सुध्दा कांहीं चांगल्या बाबींचा अंगीकार करणे गरजेचे असते, जिद्द नसलेल्या व्यक्तीला आयुष्यातील ध्येयाची प्राप्ती होत नाही, शेवटी मानव सेवेतच ईश्वर असतो असा अनमोल संदेश त्यांनी यावेळी दिला.कार्यक्रमाच्या निमित्ताने याप्रसंगी राजकुमार धुरगुडे यांनी महाविद्यालयास कांहीं ग्रंथ ही भेट स्वरुपात यावेळी दिले.


कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एम मणेर म्हणाले की, साहित्यिक विचारांमधुन मानवास जिवन संजिवनी प्राप्त होत असते,काव्य रचनेतुन कवि स्वत: बरोबरच इतरांच्या भावना देखील व्यक्त करत असतो, साहित्य ज्वलंत प्रश्नांवर असावे, साहित्य जळणारे नव्हे तर उजळणारे असावे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.कार्यक्रमाचे मार्गदर्शक डॉ.संतोष राजगुरू, इंग्रजी विभाग प्रमुख,कला वाणिज्य महाविद्यालय,माढा हे म्हणाले की, आधुनिक काळात भाषा कौशल्य विकसित होणे गरजेचे आहे, मातृभाषेबरोबरोच इतर भाषा सुध्दा आत्मसात कराव्या लागतील,आजची पिढी ही ऐकण्यात खुप कमी पडत आहे,आपण श्रवण कौशल्य आत्मसात केल्याशिवाय आपल्या व्यक्तीमत्त्वाचा विकास होणार नाही,भाषा शिक्षण प्रक्रियेत भाषेचे व्याकरण गृहण करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली.


कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात डॉ एस एम देशमुख यांनी साहित्यिक विचारांमधुन सामाजिक दृष्टीकोणाचा विकास होत असतो असे सूतोवाच केले.यावेळी डॉ ,मेजर वाय.ए.डोके यांची प्रमुख उपस्थिती होती,तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा सोहन कांबळे यांनी व आभार प्रा.व्ही.एच.चव्हाण यांनी मानले.सदर प्रसंगी कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर सर्व योग्य ती खबरदारी घेऊन कार्यक्रम संपन्न झाला.

Labels:

प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचा राज्यस्तरीय युवा पुरस्कार भैरवनाथ कानडे यांना जाहीर

वागदरी , दि . ३०

प्रथम एज्युकेशन फाउंडेशन ,मुंबई शाखा किल्लारी तर्फे उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून रोजगार मिळवून देणाऱ्या सामाजिक संस्था व कार्यकर्त्यांना देण्यात येणारा "राज्यस्तरीय बेरोजगार मुक्त युवा पुरस्कार "तुळजापूर तालुक्यातील चिकुंद्रा येथील सहशिक्षक तथा ज्ञानकिरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष भैरवनाथ कानडे यांना जाहीर झाला आहे.


मुंबई येथील प्रथम फाउंडेशन या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून देशातील सर्वच राज्यात विविध विषयावर 1994 पासून काम आहे. मराठवाड्यातील वाढती बेरोजगारी निर्मूलनासाठी सदर संस्थेच्या माध्यमातून किल्लारी केंद्रामार्फत मोफत ऑनलाईन व ऑफलाईन कौशल्य विषयक प्रशिक्षणव व रोजगार मिळवून देण्यात येते.विद्यार्थी तसेच बेरोजगार युवक - युवती यांच्या साठी विविध प्रशिक्षण व व्याख्यानाच्या माध्यमातून जाणीव जागृती करण्याचे काम ज्ञानकिरण सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात येत असून या कार्याची दखल घेत प्रथम फाउंडेशने भैरवनाथ कानडे यांची सदर पुरस्कारासाठी निवड झाली असुन किल्लारी येथे होणाऱ्या पुरस्कार वितरण समारंभात मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान केला जाणार असल्याचे प्रथम फाऊंडेशनचे केंद्रप्रमुख सदाशिवराव साबळे व जिल्हा समन्वयक सुमित कोथिंबिरे यांनी कळविले आहे. यापूर्वी कानडे यांना महाराष्ट्र  शासनाच्या वतीने राज्यस्तरीय संत रविदास संस्था पुरस्कार ,केंद्र शासनाचा नेहरू युवा पुरस्कार व अन्य संस्था-संघटनांच्या वतीने विविध पुरस्कार मिळालेले आहे.सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे  अभिनंदन होत आहे.

Labels:

Wednesday, 29 December 2021

कोल्हापूरच्या भक्ताकडुन तलवार तर विजापुरच्या भाविकाने केले लाख रुपये श्री .तुळजाभवानी देवीचरणी अर्पण


तुळजापूर ,दि . २९ : 

महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी मातेस कोल्हापूर येथील अँड सुधीर शशीकांत चव्हाण या देविभक्तने मंगळवार दि .२८ रोजी तिर्थक्षेञ तुळजापूर येथे येवुन श्रीतुळजाभवानी देविचरणी चांदीची तलवार अर्पण केली.


कोल्हापूर येथील रहिवासी असलेले अँड सुधीर चव्हाण कै सदाशिव दिनकर राऊत यांच्या स्मरणार्थ 1920.290मिली ग्रँम वजनाची हुपरी येथे बनवुन घेतलेली सुमारे पंचाहत्तर हजार रुपये किमतीची चांदीची तलवार अर्पण केली.

तसेच कर्नाटक राज्यातील विजापूर येथील देविभक्त  लक्ष्मी विठ्ठल सिद्धांत  यांनी श्रीदेवीजींस रोख एक लाख रुपये रोख देणगी दिली आहे. यानिमित्ताने  या भक्ताचा मंदिर संस्थानच्या वतीने सहाय्यक व्यवस्थापक धार्मिक नागेश शितोळे यांनी श्री देवीची प्रतिमा व साडी, श्रीफळ देऊन सत्कार केला.  यावेळी मंदिर कर्मचारी व सुरक्षा रक्षक उपस्थित होते.

Labels:

तुळजापूर : शाकंभरी नवराञोत्सवाचा यजमानपदी प्रविण कदम


 तुळजापूर , दि . २९ : 

 महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्रीतुळजाभवानी मातेच्या पौष महिन्यात होणाऱ्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाच्या यजमानपदी पुजारी मंडळाचे सदस्य प्रवीण नरहरी कदम (केशव ) यांची निवड करण्यात आली . 



श्री तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवराञोत्सवाचे  यावर्षीचे  यजमानपद निवडीसाठी  पुजारी मंडळाचे  अध्यक्ष बिपीन शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली .  यजमान पदासाठी नऊ  पुजाऱ्यांनी इच्छा व्यक्त केली.  यात यजमान पदासाठी चिठ्ठीव्दारे निवड प्रक्रिया राबविण्यात आली.  
 

यावेळी प्रवीण नरहरी कदम  यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्याने  शाकंभरी नवरात्रच्या यजमानपदी  पुजारी प्रवीण नरहरी कदम यांची निवड जाहीर करण्यात आली. या निवाडीनंतर   मंडळाच्या वतीने अध्यक्ष बिपिन शिंदे ,यांनी प्रविण कदम यांचा पुष्पहार घालुन सत्कार केला.


 यावेळी  अविनाश गंगणे  नागेश साळुंके , सुधीर रोचकरी , शिवाजी बोदले , प्रा . धनंजय लोंढे , अविनाश गंगणे , गणेश आंदुरकर , किशोर गंगणे , विशाल रोचकरी , कालिदास चिवचिवे आदीसह पुजारी उपस्थितीत  होते .

Labels:

तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे चोरट्यानी मारला पाऊण लाखाच्या ऐवजावर डल्ला


नळदुर्ग , दि . २९  : 

नळदुर्ग पोलिस ठाण्याच्या हाद्दीतील जळकोट  ता. तुळजापूर येथे सोमवारी मध्यराञी अज्ञात चोरट्यानी एका घरातुन रोख रक्कमृसह सोन्या चांदीचे दागिने असे मिळुन पाऊण लाखाच्या मुद्दे  चोरुन नेल्याची घटना घडली आहे.याबाबत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


संभाजीनगर, जळकोट, ता. तुळजापूर येथील किरण ग्यानबा सगर यांच्या घराच्या जिन्यावरील उघड्या दरवाजातून दि. 27- 28.12.2021 रोजी दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने प्रवेश करुन घरातील सोने- चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकुण 73,500 ₹ चा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या किरण सगर यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

Labels:

प्रसिद्धी प्रमुखपदी व साहित्य परिषदेच्या तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पत्रकार अनिल आगलावे यांचा सत्कार


तुळजापूर ,दि . २९ :

 पञकार  अनिल आगलावे यांची महाराष्ट्र सरपंच परिषद राज्य प्रसिद्धी प्रमुखपदी व अखिल भारतीय मराठी  साहित्य परिषदेच्या तुळजापूर तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा बुधवार दि. 29 रोजी सर्किट हाऊस तुळजापूर येथे पत्रकारांच्या वतीने नगरसेवक सचिन पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात  करण्यात आला.


यावेळी बाबासाहेब घोंगते, पदमाकर  गडदे, बाबा श्रीनिमे,दिनेश बागल ,जगदीश पाटील,पत्रकार अंबादास पोफळे,डॉ.सतीश महामुनी,गोविंद खुरुद,अँड.जगदीश कुलकर्णी,सचिन ताकमोघे,श्रीनिवास साळुंखे,प्रदीप अमृतराव,शुभम कदम, अमीर शेख,सिद्धीक पटेल,संजय खुरुद, प्रमोद कावरे,सतीश पवार,कुमार नाईकवाडी, संजय गायकवाड आदींची उपस्थिती होती.

Labels:

जापनीज मेंदुज्वर प्रतिबंधक लसीकरण मोहीम यशस्वी करावी - जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर



                              

          उस्मानाबाद,दि.29

 जिल्ह्यात दि.03 ते 22 जानेवारी 2022 या कालावधीत जे.ई. (जापनीज मेंदुज्वर) लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. ही मोहीम यशस्वी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आज येथे केले. जापनीज मेंदूज्वर प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या अनुषंगाने आज  जिल्हाधिकारी  दिवेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली जे.ई. (Japanese Encephalitis) लसीकरण मोहिम जिल्हा समन्वय समितीची बैठक झाली, तेव्हा ते बोलत होते .
        

 जे.ई.( Japanese Encephalitis) या आजाराबाबत माहिती देताना जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ.कुलदीप मिटकरी यांनी सांगितले की, जपानी मेंदुज्वर हा विषाणुजन्य आजार आहे. तो क्युलेक्स विष्णोई जातीच्या डासांमुळे पसरतो. या आजाराच्या लक्षण म्हणजे सुरुवातीच्या काळात हुडहुडी भरुन ताप, डोकेदुखी, अंगदुखी या शिवाय रुग्ण बेशुध्द अवस्थेत जावू शकतो. या रोगामुळे मज्जासंस्थेचे विकार, भावनिक परिणाम आणि अपंगत्व अशा प्रकारचे परिणाम होवू शकतात. या आजाराच्या नियंत्रणासाठी डासोत्पत्ती स्थाने नष्ट करणे, डासांमार्फत होणारा प्रसार रोखण्यासाठी संरक्षणात्मक उपाययोजना करणे या बरोबरच लसीकरण अत्यंत प्रभावी ठरते. यासाठी वय वर्ष 1 ते 15 वयोगटातील सर्व बालकांना जे.ई. लस देवून संरक्षित करणे हा रामबाण उपाय आहे. जिल्ह्यात दि.03 ते 22 जानेवारी 2022 या कालावधीत 1 ते 15 वर्ष वयोगटातील बालकांना जे.ई. लस देण्याची मोहीम आयोजित करण्यात आलेली आहे. 
         

 या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील 1 ते 15 वर्ष वयोगटातील एकूण 3 लाख 67 हजार 977 अपेक्षित बालकांना शाळेमध्ये आणि अंगणवाडी स्तरावर लसीकरण सत्रांचे आयोजन करुन जे.ई.लस देण्यात येणार आहे. ही मोहीम आरोग्य विभाग शिक्षण विभाग, महिला व बाल विकास विभाग, समाज कल्याण विभाग, खाजगी वैद्यकीय व्यावसायिक संघटना, स्वयंसेवी संघटना यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, शिक्षक, अंगणवाडी कर्मचारी, आशाताई यांच्या प्रत्यक्ष सहभागानेच पूर्ण होईल. आजच्या या बैठकीस जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता यांनाही मार्गदर्शन  करताना म्हणाले , बालकांची यादी अद्ययावत करावी  आणि लसीकरण सत्र आयोजित करण्यासाठी संबधित विभागांनीआवश्यक ते सर्व सहकार्य करावे.

ही मोहीम राबविताना कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या कामात देखील सातत्य राखण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभागासोबतच शिक्षण विभाग, महिला व बाल विकास विभाग आणि समाज कल्याण विभाग यांनी सक्रिय सहभाग नोंदवून मोहीम शंभर  टक्के यशस्वी करावी, असेही आवाहन जिल्हाधिकारी  दिवेगावकर यांनी केले .                      

 यावेळी  अप्पर जिल्हाधिकरी रुपाली अवले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.डी.के.पाटील,  डॉ.इस्माईल मुल्ला,  डॉ.एस .एम.काटकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बा.क.) बी एच  निपाणीकर, आय.एम.ए.अध्यक्ष डॉ.सचिन देशमुख, निमा संघटना अध्यक्ष डॉ.गोविंद पाकले, अध्यक्ष रोटरी क्लब, शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक, उस्मानाबाद शहरातील भोसले हायस्कूल, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल आणि गाझी हायस्कूल या शाळांचे मुख्याध्यापक प्रतिनिधी, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयांचे अधिष्टता यांचे प्रतिनिधी, कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता,  विभागीय नियंत्रक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांचे प्रतिनिधी, जिल्हा प्रजनन व बाल आरोग्‍य अधिकारी डॉ.के. के .मिटकरी , सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ.अन्सारी, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.एम.आर. पांचाळ, जिल्हा क्षयरोग कार्यालय अधिकारी डॉ.होळे, सहा.संचालक कुष्ठरोग कार्यालयाचे डॉ.घोगरे, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. गजानन परळीकर, युनिसेफ कन्सलटंट डॉ.उज्वला कळंबे, सांख्यिकी पर्यवेक्षक एच.के.पवार व  आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.


Labels:

नळदुर्ग शहर पञकार संघटनेच्या अध्यक्षपदी सुहास येडगे , सचिवपदी सुनिल गव्हाणे यांची सर्वानुमते निवड

नळदुर्ग , दि. २९ : 


 नळदुर्ग शहर पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी सुहास येडगे यांची तर सचिवपदी सुनिल गव्हाणे यांची निवड करण्यात आली आहे.


         नळदुर्ग शहरात पहिल्यांदाच शहरातील सर्व पत्रकार एकत्रीत येऊन शहर पत्रकार संघटनेची स्थापना केली आहे. शहर पत्रकार संघटनेच्या सदस्यांची मंगळवार  दि.२८ डिसेंबर रोजी जेष्ठ  पत्रकार विलास येडगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत सन २०२२ या वर्षासाठी संघटनेच्या कार्यकारीणीची निवड करण्यात आली. यामध्ये नळदुर्ग शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष म्हणुन सुहास येडगे यांची तर सचिव म्हणुन सुनिल गव्हाणे यांची निवड करण्यात आली. त्याचबरोबर संघटनेचे इतर पदाधिकारी पुढील प्रमाणे आहेत. उपाध्यक्ष आयुब शेख, श्रीनिवास भोसले, कोषाध्यक्ष भगवंत सुरवसे व प्रसिद्धी प्रमुख शिवाजी नाईक आदीची निवड करण्यात आली. तर  सदस्य म्हणुन विलास येडगे, सुनिल बनसोडे,तानाजी जाधव,लतिफ शेख, उत्तम बनजगोळे, जहीर इनामदार,इरफान काझी,दादासाहेब बनसोडे,अजित चव्हाण, शोएब काझी,अनिल जाधवर, मुजम्मील शेख, किशोर नाईक विशाल डुकरे , प्रा. दिपक जगदाळे  यांची निवड करण्यात आली.
      

यावेळी सुनिल बनसोडे, आयुब शेख, श्रीनिवास भोसले, तानाजी जाधव व शिवाजी नाईक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शहर पत्रकार संघटनेच्या वतीने शहरात विविध कार्यक्रम राबविण्याबरोबरच शहरात पत्रकारांसाठी घरकुल योजना तसेच पत्रकार भवन उभारले जावे यासाठी येणाऱ्या काळात प्रयत्न केले जातील असे सांगितले.

Labels:

आधुनिक काळात मोबाईल पार्कींग काळाची गरज ; करिअर कट्टा उदघाटन प्रसंगी यशवंत शितोळे यांचे प्रतिपादन


तुळजापूर, दि.२९, 

येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूरच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून महाविद्यालयात महाराष्ट्र शासनाचा करिअर कट्टा हा उपक्रम सुरू करण्यात आला असून या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी यशवंत शितोळे,अध्यक्ष, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र, महाराष्ट्र शासन यांनी वरील उदगार काढले.

 शितोळे बोलताना  पुढे म्हणाले की, स्मार्ट मोबाईल आपण वापरत नाहीत तर आज मोबाईलच आपला वापर करत आहे, परिवारातील निर्माण झालेल्या या आभासी भिंती नष्ट होणे गरजेचे आहे, आजमितीला संगणक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी राईट टू डिस्कनेक्ट हे बिल संसदेत मांडले आहे, किमान दहा  तास तरी मोबाईल किंवा तत्सम गोष्टींपासून लोक दूर राहून स्वत:शी संवाद साधू इच्छितात,आज महाराष्ट्रातील तरुण दिल्लीमध्ये जाऊन युपीएससी सारख्या परिक्षांची तयारी करतात, यामध्ये दिल्ली स्थित खासगी मार्गदर्शन केंद्राची फक्त फिसमधुन ५०० कोटींची उलाढाल होताना दिसुन येते.

मराठवाड्यातील विद्यार्थी हे कष्टाळु आहेत,आज त्यांच्या साठीच पुढचे पाऊल या संस्थेद्वारे ८५० सनदी अधिकारी एकत्र येऊन महाराष्ट्र शासनाच्या वतिने करिअर कट्टा उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षांकरिता मार्गदर्शन करत आहेत.आजचा युवा हा वायुच्या वेगाने स्वत:ला घडविण्यासाठी धावला पाहिजे असे सूतोवाच त्यांनी यावेळी केले.अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एम मणेर हे म्हणाले की,आज तरुणांनी नौकरी बरोबरच व्यावसायिक कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे, कॉलेज कट्ट्यावर होणाऱ्या चर्चा या करिअर विषयीच असणे आवश्यक आहे, विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करुन तळमळीने,जिद्दीने प्रयत्न केल्यास त्यांना हमखास यश मिळेल असा मौलिक संदेश त्यांनी यावेळी दिला.


करिअर कट्टा उपक्रमांतर्गत महाविद्यालयातुन अभिषेक लसणे बी.कॉम, भाग एक,कु साखरा कांबळे बी.ए.भाग एक यांची ब्रॅण्ड ऍंबेसिडर म्हणुन नियुक्ती करण्यात आली, यावेळी करिअर कट्टा उपक्रमाचे जिल्हा समन्वयक प्रा.डॉ.नितिन पडवळ , तसेच तालुका समन्वयक प्रा  जेटिथोर यांची प्रमुख उपस्थिती होती.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक प्रा.ए.बी वसेकर यांनी केले  तर सूत्रसंचालन समन्वयक प्रा.व्ही.एच.चव्हाण यांनी केले, कार्यक्रमाचे आभार प्रा.डॉ.गुंड बी.डब्ल्यू यांनी मानले.यावेळी कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर उपस्थित विद्यार्थ्यांना मास्क वापरणे बंधनकारक केले होते.सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एम मणेर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

Labels:

Tuesday, 28 December 2021

महाराष्ट्र मराठा सोयरीक एक सामाजिक लोक चळवळ सुनिलराव जवंजाळ - पाटील


मुबंई ,दि. २८ 


महाराष्ट्र मराठा सोयरिकचे अटकेपार झेंडे,
हरियाणा पाठोपाठ मध्य प्रदेशातही "वधु-वर परिचय मेळावा"


 29/01/2016 ला बुलडाणा शहरात सुरू झालेली महाराष्ट्र मराठा सारिकची
लोकचळवळ ही आता राज्यापुरतीच मर्यादिन न राहता अखिल भारतीय लोकचळवळ म्हणून अल्पावधीतच नावारूपास आलेली आहे. व बहुसंख्येने समाज बांधव स्वयंस्फुर्तीने या लोकचळवळीत हिरीरीने सहभाग
नोंदवित आपले समाजऋण फेडण्याचे कार्य करीत असल्याचे दिसून येत आहे.



नुकतीच महाराष्ट्र मराठा सोयरिक ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सुनिलराव जवंजाळ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मध्यप्रदेशातील बहाणपूर येथे दि.26/12/2021, रोज  येथे मध्यप्रदेशातील समाज बांधवांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा नियोजनार्थ
बैठक पार पडून बैठकीमध्ये मेळाव्याच्या आयोजन व नियोजना संदर्भात चर्चा होऊन मार्च अखेर मेळावा घेण्याचे निश्चित करण्यात आले.



सदर मेळावा हा महाराष्ट्रात संपन्न झालेल्या 27 मेळाव्यांप्रमाणेच भव्य असा अखिल भारतीय स्वरुपाचा असणार आहे. सदर मेळाव्यामध्ये संपूर्ण भारतातील विखुरलेला मराठा समाज एकत्र आणण्याचा मानस बैठकीमध्ये जवंजाळ पाटील यांचा मनोदय आहे.


मध्यप्रदेशातील मराठा समाजाचे नेते श्री. रमेश पाटील यांनी बैठकीत प्रस्तावना करून मेळाव्याच्या निमित्ताने मराठा समाजाचे संगठन आणखी मजबूत करून महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील सोईर-संबंध दृढ़ करण्याच्या दृष्टीने हा मेळावा लाभदायी ठरणार असल्याचे बोलून दाखविले. बैठक संपल्यानंतर सर्व समाज
बांधवांच्या वतीने मंगल कार्यालयाची पाहणी करून लवकरच तारीख निश्चित करण्यात येणार आहे. बैठकीला प्रामुख्याने इंदौर, नेपानगर, खांडवा, ईच्छापूर येथील बहुसंख्येने समाज बांधव उपस्थित होते.



सदर बैठकीला दिनेश चौधरी, राजाराम कातोरे, महेश चौहान, प्रविण गुंजाळ, रामदास झुंजारके, काशिराम ढगे, इंदौर येथील कच्छ दादा, दळवी काका, संतोष पडोळ, मेघराजजी लांडे, अॅड. सत्यनारायण वाघ, नेपानगर  येथील संजय पवार, गजानन कु-हाळे, बुलडाणा येथून जेष्ठ पत्रकार   समाधान कु-हाळे पाटील, प्रा.भगवानराव कानडजे, प्रा. जगदेवराव बाहेकर , चंदू साखरे, नारायणराव गाढे, नारायणराव मिसाळ
 आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Labels:

उस्मानाबाद : राज्यसेवा परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक कलम १४४ लागू



          
उस्मानाबाद , दि. २८


राज्यसेवा (पूर्व) परीक्षा -2021 ही  रविवार दि.02 जानेवारी 2022 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 12.00 आणि दुपारी 03.00 ते सायंकाळी 05.00 वाजेपर्यंत या कालावधीत होणार आहे.ज्या ठिकाणी परीक्षा केंद्र असतील तेथे प्रतिबंधत्मक कलम 144 लागू करण्यात येणार आहे.        
        

   या परीक्षेसाठी उस्मानाबाद शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कुल, तळ मजला, मेन उमेदवारांची संख्या 240, श्रीपतराव भोसले ज्यु.कॉलेज येथील तीन मजल्यावरील केंद्र,उमेदवारांची एकूण संख्या 1128, श्रीपतराव भोसले ज्यु कॉलेज (आण्णा ई टेक्नो), नवीन इमारत,मेन रोड  उमेदवारांची संख्या 336,  रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, नवीन इमारत, मेन रोड, उस्मानाबाद,उमेदवारांची संख्या 240, छत्रपती शिवाजी हायस्कुल, तांबरी विभाग उमेदवारांची संख्या 384, विद्यामाता हायस्कुल, सांजा चौक, औरंगाबाद बायपास रोड उमेदवारांची संख्या 240, जिल्हा परिषद कन्या प्रशाला, शहर पोलिस स्टेशन जवळ उमेदवारांची संख्या 264, रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, तळ मजला, तांबरी विभाग, मेन रोड पार्ट-B, उमेदवारांची संख्या 336, रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, पहिला मजला, तांबरी विभाग, मेन रोड  पार्ट-A, उमेदवारांची संख्या 240 असे एकूण 3408 उमेदवार ही परीक्षा देणार आहेत.  
         

 परीक्षा केंद्राच्या सभोवताली 100 मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करणे आवश्यक आहे. त्यामुळे परीक्षा केंद्राच्या परिसरात कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्यात येणार नाहीत.परिक्षार्थी अथवा अन्य व्यक्तींकडून शांततेस बाधा निर्माण होईल असे कृत्य करण्यात येणार नाही. परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर्स, पानपट्टी, टायपिंग सेंटर, एसटीडी बुथ, ध्वनिक्षेपक, कॉम्प्युटर सेंटर, इंटरनेट कॅफे आदी माध्यमे बंद राहतील. मोबाईल फोन, सेल्युलर फोन, फॅक्स, ईमेल आणि इतर प्रसार माध्यमे घेवून प्रवेश करण्यास मनाई असेल. कोणत्याही व्यक्तींकडून परीक्षा सुरळीतपणे आणि शांततेच्या वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी कोणतीही बाधा उत्पन्न करण्यात येणार नाही. परीक्षा केंद्रावर कोणत्याही वाहनांस प्रवेशास मनाई राहील. परीक्षेशी संबंधित नसलेल्या व्यक्तींना परीक्षा केंद्रात प्रवेश नसेल. केवळ संबंधित परीक्षा केंद्रावर नेमणूक केलेले अधिकारी, कर्मचारी, शासकीय कामावरील अधिकारी आणि कर्मचारी, संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी आणि परीक्षार्थी यांनाच परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश राहील. इतरांना (परीक्षार्थींच्या नातेवाईकासह) प्रवेश असणार नाही. परीक्षा केंद्राचे 100 मीटरच्या आवारात पाच  किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येता येणार नाही. 
       

  हा आदेश परीक्षा केंद्रावर काम करणारे अधिकारी,कर्मचारी, परीक्षाथी, परीक्षा केंद्रावर निगराणी करणारे अधिकारी आणि पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्यासोबत त्यांच्या परीक्षासंबंधी कर्तव्ये पार पाडण्याच्या अनुषंगाने लागू राहणार नाहीत. हे आदेश दि. 02 जानेवारी 2022 रोजी सकाळी 07.00 ते सायंकाळी 07.00 या कालावधीत वरील परीक्षा केंद्राच्या परिसरात लागू राहतील. या आदेशाची अवमानना केल्यास भारतीय दंड विधानचे कलम 188 नुसार गुन्हा नोंदवून फौजदारी कार्यवाही करण्यात येईल. असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी दिले आहेत.

Labels:

षटकोळी समूहाचे ३ रे राज्यस्तरीय काव्य संमेलन



जळकोट, दि.२८ : मेघराज किलजे


षटकोळी साहित्यप्रेमी समूहाचे तिसरे ऑफलाईन काव्यसंमेलन श्री .क्षेत्र देवगड ( जि.अहमदनगर) येथे १ व २ जानेवारी २०२२ रोजी होणार आहे. या संमेलनाचे आयोजन षटकोळी साहित्यप्रेमी समूहाच्या  कवयित्री संध्याराणी कोल्हे व कवी नितीन गायके यांनी केले आहे.


  संमेलनाचे अध्यक्ष जेष्ठ कवी व लेखक श्री .विठ्ठल घाडी हे राहणार आहेत. तर उद्घाटक साहित्यिक कवी डाॅ.कुलदिप पवार हे करणार आहेत. हे संमेलन दोन दिवशीय आहे. दोन्ही दिवसासाठी वेगवेळे प्रमुख पाहुणे असणार आहेत. यामध्ये   प्रमोद पाटील, प्रा.डाॅ.संतोष तागड, दैवशाला पुरी, कांचन ठाकूर, ऍड.शंकर कदम, आनंदा साळवी, गुंफा कोकाटे, राणी चोपडे हे आहेत. १ जानेवारी रोजी सायंकाळी पुस्तक प्रकाशन व पुरस्कार वितरण सोहळा  व काव्यसंवाद मैफिल होणार असून २ जानेवारी रोजी निमंत्रित कवीवर्यांचे कवी संमेलन होणार आहे.


षटकोळी साहित्यप्रेमी समूहातर्फे  डॉ.कुलदीप पवार यांना जीवनगौरव, श्रीमती संगिता झेंडे यांना जीवनगौरव, डॉ.प्राचार्य गुंफा कोकाटे यांना ज्ञानज्योत, ऍड .कवी शंकर कदम यांना काव्यरत्न, कवी गुलाबराजा फुलमाळी यांना काव्यभूषण, कवी रज्जाक शेख यांची काव्यज्योत पुरस्कारासाठी  निवड झालेली आहे.

Labels:

उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातर्फेकिसान कार्ड योजना सुरू

                          


  
उस्मानाबाद,  दि. २८ : 


जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत किसान क्रेडिट कार्ड योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे.किसार क्रेडिट अंतर्गत जिल्हयातील पशुपालकांना त्यांचा विमा संरक्षण कवच, जनावरांसाठी चारा.औषधे आणि पशुखाद्यासाठी सात टक्के दराने कर्ज उपलब्ध करण्यात आला आहे.  

                                 
कर्ज त्या त्या वर्षात नियमित परतफेड केल्यास दोन टक्के सुट मिळणार आहे.त्यावर किसान क्रेडिट कार्डावर तीन टक्के सुट मिळणार आहे.आयुक्त पशुसंवर्धन यांच्या मार्गदर्शक सूचनानुसार या योजनेसाठी दि.15 फेब्रुवारी-2022 पासुन ऑनलाईन (संगणकीय) प्रणालीद्वारे नोंदणी करण्यात येणार आहे.
सर्व पशुपालकांनी नमुद विहित वेळेत किसान क्रेडिट कार्डासाठी अर्ज करावेत,असे आवाहन जिल्हा परिषदेचे सभापती कृषी पशुसंवर्धन आणि दुग्धशाळा समितीचे दत्ता सांळुके यांनी केले आहे.

Labels:

खुदावाडी ग्रामपंचायतीचे ग्रामस्थासाठी आभिनव उपक्रम ; सर्वञ कौतुक व शुभेच्छाचा वर्षाव


अणदूर , दि . २८ : श्रीकांत अणदूरकर 

तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी ग्रामपंचायतीच्या वतीने थकीत व चालू ग्रामपंचायत कर  शंभर टक्के  भरणाऱ्या कुटुंबियांना आता यापुढे मोफत दळण दळून दिले जाणार असुन  पिठाची गिरणी  यंत्राचे पूजन,जेष्ठ समाजसेवक डॉ सिद्रामपा खजुरे यांच्या हस्ते, ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आले आहे .


 आता शासनाच्या आदर्श शाळा निर्मिती बरोबरच खुदावाडी ग्रामपंचायत व गाव पुढाऱ्याने शक्कल लढवून एक नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.  ग्रामपंचायतीच्या वतीने गावात दोन पिठाची गिरणी यंत्र आणले आहेत. गिरणी यंत्र बसवण्याच्या कामाला लवकरच सुरूवात करण्यात येणार आहे . शभंरटक्के ग्रामपंचायत कर भरणा करणा-या या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे. आता यापुढे मोफत दळण दळून दिले जाणार आहे . यावर संपूर्ण नियंत्रण ग्रामपंचायतीचे राहणार असल्याची माहिती ग्रामपंचायतीचे सरपंच शरद नरवडे यांनी  बोलताना दिली .


सरपंच नरवडे यानी पुढे बोलताना  म्हणाले की , ग्रामपंचायतची थकीत व चालू बाकी शंभर टक्के    भरणाऱ्या  कुटुंबांना , कुटुंबातील सदस्याच्या संख्येनुसार प्रत्येक महिन्याला सरासरी किती पिठ लागते, याबाबत उपसरपंच व  सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन काही नियम अटी लागू करण्यात येणार असल्याचे  सांगितले.

या नवीन यंत्राचे पुजन समाजसेवक  डॉ . सिद्रामप्पा खजुरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सरपंच शरद नरवडे, ग्रामपंचायत  सदस्य शेकाप्पा  सालगे, यादव जाधव, वसंत  सालगे, आणू बोगरगे, मनोहर अहंकारी , आशा कार्यकर्ती मंगलताई कापसे, रघुनाथ सांगवे, सहदेव जवळगे,  दिलीप सालेगावे, श्रीधर नरवडे, आपु टेलर, शाम बोगरगे ,नागनाथ खजुरे ,संभाजी कापसे ,पांडुरंग व्हलदुरे आदीसह  नागरिक युवक महिला उपस्थित होते . 


हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारी उस्मानाबाद जिल्ह्यातील हि पहिली ग्रामपंचायत असल्याने या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे .

Labels:

सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा नळदुर्ग येथे विविध कार्यक्रमाने वाढदिवस साजरा

  

वागदरी , दि . २७


रिपब्लिकन पार्टी आँफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा देशाचे सामाजिक न्याय राज्य मंत्री  ना. रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त  नळदुर्ग येथील आपलं घर  येथिल अनाथ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व फळाचे वाटप करुन वाढदिवस साजरा करण्यात आला.  


   रिपाइं (आठवले) नळदुर्ग शहर शाखेच्या वतीने   रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त येथील राष्ट्र सेवादल संचलित आपलं घर बालकाश्रमातील अनाथ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व फळांचे वाटप करण्यात आले. तसेच जवाहर महाविद्यालय अणदूर येथे संस्कृत भाषा विषयाचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ.सत्येंद्र राऊत याना संस्कृत भाषेतील डिलीट पदवी मिळाल्या बद्दल त्यांचा याप्रसंगी  सत्कार करण्यात आला.
 


 या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पँथर नेते प्रमोद कांबळे  तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते मारुती बनसोडे , भैरवनाथ कानडे हे उपस्थित होते. 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे यांनी केले. तर  सूत्रसंचालन रिपाइंचे जिल्हा सचिव एस.के.गायकवाड यांनी केले. यावेळी रिपाइं युवक आघाडीचे जिल्हा कार्याध्यक्ष अरूण लोखंडे, नळदुर्ग शहराध्यक्ष दत्ता बनसोडे, शहर कार्याध्यक्ष महादेव कांबळे, येडोळा शाखा अध्यक्ष देवानंद लोंढे, राष्ट्र सेवा दलाचे गुंडू पवार आदीसह विद्यार्थी  उपस्थिती होते.

Labels:

Monday, 27 December 2021

गुलचंद व्यवहारे यांची जैन प्रकोष्ठच्या मराठवाडा विभाग प्रमुख पदी नियुक्ती




तुळजापूर , दि . २७  

देशाचे पंतप्रधान,माननीय श्री नरेंद्र मोदीजी, मा,जे.पी,नड्डा, देवेंद्र फडणवीस, यांच्या नेतृत्वाखाली, मा,चंद्रकांत दादा पाटील यांच्या सहमतीने, तुळजापूर येथील गुलचंद व्यवहारे यांची भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश,जैन प्रकोष्ठच्या मराठवाडा विभाग प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.


गुलचंद व्यवहारे यांना देण्यात आलेल्या नियुक्तीपत्रात भारतीय जनता पार्टीच्या ध्येय व धोरणाच्या प्रभावीपणे प्रचार व प्रसार करून पक्ष बळकट व संघटन मजबूत करण्याकरिता अहोरात्र प्रयत्न कराल व पक्षाच्या संविधानाचे पालन करावे असा आदेश देण्यात आला आहे.

गुलचंद व्यवहारे यांच्या या निवडीबद्दल आमदार सुजितसिंह ठाकूर, आमदार राणा जगजीतसिंह पाटील,आमदार अभिमन्यू पवार,भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, प्रदेश कार्यकारणी सदस्य सुधीर पाटील, ॲड. अनिल काळे, ॲड.व्यंकटराव गुंड, तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, फेडरेशनचे चेअरमन नारायण ननवरे,नगरसेवक सचिन पाटील आदींनी अभिनंदन केले आहे.

Labels:

धोंडपा नंदे यांना"डॉ.बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता आदर्श पत्रकार" पुरस्कार प्रदान ...


सोलापूर ,दि . २७: 

अक्कलकोट तालुक्यातील  वागदरी परमेश्वर देवस्थान ट्रस्टचे प्रसिद्धी प्रमुख,मुक्तपत्रकार,स्तंभलेखक, साहित्यिक धोंडपा नंदे यांना संत दत्ताबपू साहित्य नगरी ,संत रविदास सांस्कृतिक सभागृह हदगाव जिल्हा नांदेड येथे ६ वे अखिल भारतीय गुरू रविदास साहित्य संमेलनात पत्रकारिता  क्षेत्रात उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन "डॉ .बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता" आदर्श पत्रकार पुरस्कार संमेलनाध्यक्ष  साहित्यिक सुभाष सोनवणे यांच्या हास्ते प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आले.
    

 यावेळी अखिल भारतीय गुरू रविदास समता परिषद संस्थापक अध्यक्ष संमेलन आयोजक चंद्रप्रकाश देगलूरकर , प्रमुख पाहुणे डी एन सुर्यवंशी ,एच.पी.कांबळे ' प्राचार्य  विकास कदम, जेष्ठ कवी .मधु बावलकर,राजेंद्र धने,सुरेश गंगासागरे, माणिकराव गिरगावकर,कैलास राऊत आदी  उपस्थित होते.
       

गेल्या २२ वर्षापासून धोंडपा नंदे  वृत्तपत्र लेखन क्षेत्रात कार्यरत असून विशिष्ट वृत्तपत्रांतून विविध विषयावर सातत्याने लेखन करत आहेत. आतापर्यत जवळजवळ सहा हजार लेख प्रसिद्ध झाल्याचे त्यानी सांगितले .बदलत्या काळाप्रमाणे सोशल मिडीयावर विविध विषयावर लेखन करत असतात, ते फेसबुक वरील अक्कलकोट घडामोडी ग्रुपचे प्रमुख असून तालुक्याच्या विविध प्रश्नावर वाचा फोडण्याचा काम करत आहेत.आतापर्यंत विविध सामाजिक संघटना व संस्थाकडून त्याना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे.
      

 ६ वे अखिल भारतीय गुरू रविदास साहित्य संमेलनात डॉ.बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता आदर्श पत्रकार"पुरस्कार मिळाल्या बदल वागदरीसह अक्कलकोट तालुक्यातील अनेक मान्यवरांनी त्याच अभिनंदन केले आहे.

Labels:

Sunday, 26 December 2021

मुरुम येथिल नागरबाई स्वामी यांचे निधन



मुरूम, दि . २६ 

उमरगा तालुक्यातील  मुरुम येथील बसवेश्वर युवक मंडळाचे अध्यक्ष मनोज स्वामी यांच्या मातोश्री नागरबाई धानय्या स्वामी यांचे रविवारी (ता.२६) रोजी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले.  त्या ६७ वर्षाच्या होत्या. 



त्यांच्या पश्चात्य तीन मुले, एक मुली, सुना, जावई, नातवडे असा परिवार आहे. त्यांच्यावरती दुपारी ३ वाजता त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Labels:

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त लोहारा तालुक्यातील आष्टा , जेवळीत सुशासन दिन


जळकोट,दि.२६ : मेघराज किलजे


येथून जवळच असलेल्या आष्टा (कासार) व जेवळी  (ता.लोहारा ) येथे माजी पंतप्रधान,भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त  अभिवादन करण्यात आले. 



 सुशासन दिनानिमित्त भाजपा जिल्हाअध्यक्ष  नितीन काळे व लोहारा तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भाजपा जेष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार, तसेच मोदी सरकारच्या कामगिरीवर माहिती देण्यात आली. तसेच केंद्र सरकारच्या विविध योजनेची माहिती देण्यात आली . आष्टा कासार येथील जेष्ठ कार्यकर्ते गहीनाथ कागे (माजी सैनिक) , काशीनाथ घोडके (मा.जिल्हा उपाध्यक्ष ,ओबीसी मोर्चा) व जेष्ठ  कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला . जेवळी येथील उदय कुलकर्णी यांचाही सत्कार करण्यात आला .

यावेळी भाजपा युवा मोर्चा जिल्हा चिटणीस बालाजी चव्हाण, प्रसिद्धी प्रमुख भाजपा जयेश सुर्यवंशी, आष्टा कासार शाखा अध्यक्ष महादेव कोरे , बसवराज कोंडे , अमित पोतदार,  चतुर्भुज कागे, राजू गायकवाड , म्हाळप्पा गाडेकर, महादेव लोहार, प्रविण हारके , महिला, भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

Labels:

Saturday, 25 December 2021

जवळगा (मे) सह परिसरातील गावात रानडुकरांकडून पिकांचे नुकसान; बंदोबस्ताची मागणी

किलज, दि . २५ 


तुळजापूर तालुक्यातील जवळगा (मे) शिवारात त्याचबरोबर सलगरा(दि) वडगाव देव,या गावांच्या परिसरात रान डुकरांनी पिकांचे नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.
रानडुकरांचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा,अशी मागणी शेतकऱ्यांतून प्रशासनाकडे होत आहे.

जवळगा (मे) येथील शेतकरी मागील अनेक दिवसांपासून रान डुकरांच्या त्रासामुळे हैराण झाले आहेत.कधी अवर्षण तर कधी अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे.तरीही नाईलाजास्तव बहुतांश शेतकरी शेती करतात. मागील वर्षी झालेले नुकसान पुढील वर्षी भरून निघेल या आशेवर शेतकरी उत्साहात पेरणी करतात.
 परंतु,जवळगा(मे) येथील शेतकऱ्यांना सध्या मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे.जवळगा, वडगाव देव,सलगरा(दि) शिवारात मागील काही दिवसांपासून रानडुकरांनी हैदोस घातला आहे. रानडुकरांकडून शेतातील पिकांचे नुकसान केले जात आहे.मागील काही दिवसांपूर्वी या रानडुकरांनी हरभरा,ज्वारी,पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले.यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला.
तसेच सध्या शेतात ज्वारीचे पीक आहे.याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.रात्रीच्या वेळी हे रानडुकर शेतात येतात आणि पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात.यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.परंतु, रात्रीच्या वेळी अंधारात कसा बंदोबस्त करायचा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.कारण रानडुकर आपल्या अंगावर आले तर काय हा भीतीपोटी प्रश्न सर्वांना पडत आहे.त्यामुळे शेतात रानडुकर आले की बॅटरीने लाईट दाखवून भीती दाखवणे, मोठा आवाज करणे असे अनेक प्रकार शेतकऱ्यांकडून केले जात आहेत. तरीही म्हणावा तसा फरक दिसून येत नाही.ज्वारी बरोबर ऊस पिकाचेही नुकसान होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे जवळगा येथील शेतकरी हैराण झाले आहेत.या रानडुकरांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी अनेक शेतकऱ्यांकडून केली जात आहे.



आमच्या शेतात आम्ही हरभरा पिकाची पेरणी केली आहे तसेच ऊस सुद्धा आहे.मात्र मागील काही दिवसांपासून आमच्या शेतात रात्री रान डुक्करांचा हैदास सुरू आहे.याबद्दल प्रशासनाने तात्काळ काही तरी करावे.
-धोंडीबा कालेकर,वडगाव देव शेतकरी.



आमच्या शेतात मागील १५ दिवसापासून रान डुक्कर हे मोठ्या प्रमाणात शेतातील पिकाचे नुकसान करत आहेत.यामुळे भरपुर शेतीचे नुकसान होत आहे.याचा काही तरी बंदोबस्त करणे गरजेचे आहे.
-नवनाथ वाघ.जवळगा (मे),शेतकरी.

Labels:

सुरतगाव येथे साने गुरुजी जयंती व मुख्याध्यापिका सूर्यवंशी यांचा वाढदिवस शालेय साहित्य वाटपाने साजरा .

 

तामलवाडी , दि . २५


 सुरतगाव ता .तुळजापूर येथील  जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शनिवार दि.25 रोजी साने गुरुजी जयंती व शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सूर्यवंशी छाया रामराव यांचा वाढदिवस शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे व अल्पोपहाराचे  वाटप करून साजरा करण्यात आला.  
 
      
 याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सी.आर. सूर्यवंशी व सहशिक्षक ए. एस.मगर यांचे हस्ते साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच मुख्याध्यापिका यांच्या वतीने वाढदिवसाचे औचित्य साधून सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून त्यांना अल्पोपहार देण्यात आला.          
       

यावेळी शालेय समिती व सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन यथोचित   मान सन्मान करण्यात आला.      

        

यावेळी शालेय समिती अध्यक्ष श्रीमती सोनाली गुंड,सुलभाताई गुंड,अनुराधा विटकर,आशा मगर, सुनिता धोत्रे,सुरेखा साळुंके  इतर पालक व ग्रामस्थ उपस्थित होते .                   या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार आबा मगर यांनी मानले.

Labels:

गुरुवारी श्री 1008 पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर सावरगाव येथे वार्षिक यात्रा महोत्सवाचे आयोजन


काटी , दि . २५  : उमाजी गायकवाड

तुळजापूर तालुक्यातील काटी सावरगाव येथे श्री 1008 पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर वार्षिक यात्रा महोत्सवाचे आयोजन गुरुवार दि. 30 डिसेंबर रोजी करण्यात आले असून सोलापूर जिल्हा व उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व श्रावक श्राविकानी याचा धर्म लाभ घ्यावा. असे आवाहन मंदिर समितीचे पद्मकुमार मेहता व डॉ. आदर्श मेहता यांनी केले आहे.



सकाळी 9 ते 9:30  ध्वजारोहण 9:30ते10;30,कुंभमेला 10:30 ते1:00, भगवंत अभिषेक पूजा व विधान 1:00ते 2:30, मिष्ठान्नभोजन 2;30 ते4:00, पालखी मिरवणूक सोहळा 4:00 ते 5:00 आचार्य श्री यांचे प्रवचन होणार आहे.
      

यावेळी परम पूज्य आचार्य 108 सुयश सागरजी महाराज परम पूज्य 108 सुहितसागरजी महाराज परम पूज्य 108 सुशांत सागरजी  महाराज  यांच्या उपस्थितीत ही वार्षिक यात्रा संपन्न होणार असून यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे  व धर्म लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Labels:

गुन्ह्याना आळा घालण्यासाठी नळदुर्ग येथे ग्राम सुरक्षा यंत्रणेचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण शिबीर उत्साहात संपन्न

 


नळदुर्ग , दि . २५ :

संकटसमयी स्वत;च्या मोबाईलवरून सर्व गावक-यांना एकाच वेळी कॉलच्या माध्यमातुन सुचना देणे , सावध करणे किंवा मदतीला बोलावण्यासाठी उपयुक्त यंत्रणा पोलिस ठाणे व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विदयमाने गावात होणा-या विविध गुन्हयाना आळा घालण्यासाठी ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत नळदुर्ग येथे ग्राम सुरक्षा यंत्रणेचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण शिबीर शनिवार दि . 25  डिसेंबर रोजी संपन्न  झाले . 



ग्राम सुरक्षा यंत्रणा , उस्मानाबाद जिल्हा पोलिस दल व जिल्हा परिषद उस्मानाबाद यांचा संयुक्त विदयमाने आयोजित या कार्यक्रमाच्या व्यासपिठावर  ग्राम सुरक्षा यंञाणा  संचालक डि. के गोर्डे ,  उपविभागीय पोलिस आधिकारी सई भोरे पाटील ,   सहाय्यक पोलिस निरीक्षक  जगदीश राऊत , सुधीर मोटे आदि उपस्थित होते. 

नळदुर्ग  पोलीस ठाण्याच्या हाद्दीतील 99  गावात ग्राम सुरक्षा  यंत्रणा  प्रभावीपणे राबविण्यासाठी तथा ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी शनिवारी  नळदुर्ग पोलीस ठाणे अंतर्गत  गावातील पोलीस पाटील,  सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, पोलीस कर्मचारी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासाठी  ग्राम सुरक्षा यंत्रणेचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते. ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक डी.के. गोर्डे यांनी उपस्थितांना यंत्रणेचे प्रात्यक्षिक दाखवले. यावेळी  डि.के. गोर्डे उपस्थितांना मार्गदर्शन करताना  म्हणाले की, मागील काही वर्षात पुणे, नाशिक, सातारा, अहमदनगर जिल्ह्यातील गावे ग्राम सुरक्षा यंत्रणेत सहभागी झाली असून सर्व नागरिक ग्राम सुरक्षा यंत्रणेचे ॲपद्वारे आपापले मोबाईल नंबर नोंदवून यंत्रणा वापरत असल्याची माहिती देऊन ग्रामीण भागात सुरक्षिततेच्या दृष्टीने ग्राम सुरक्षा यंत्रणा प्रभावी ठरत असल्याचे सांगितले.


जिल्ह्यात ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. यामुळे चोरी,दरोडा यासारख्या घटनांमध्ये तात्काळ मदत मिळणार आहे.चोर,दरोडेखोर जागेवर जेरबंद करण्यास ही यंत्रणा उपयुक्त ठरणार आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून संकट काळात स्वतःच्या मोबाईलवरुन  सर्व गावकऱ्यांना एकाच वेळी कॉलच्या माध्यमातून सुचना देणे, सावध करणे, किंवा मदतीला बोलावण्यासाठी हि यंत्रणा उपयुक्त असून पोलीस स्टेशन व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या गावात मालमत्तेसंदर्भात व शरीराविरुध्द होणारे गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी चोरी, दरोडे, आग, जळीतांच्या, आपत्कालीन परिस्थितीत, ग्रामसभा, सरकारी सुचना आदी घटनांमध्ये सर्वांना एकाचवेळी  सुचना देण्यासाठी सर्वांसाठी वापरता येणारा टोल फ्री नंबर 18002703600 वर नोंदी केलेल्या नागरिकाने आपत्ती काळात फोन केल्यास त्याचा आवाज परिसरातील अनेक नागरिकांना त्वरीत मोबाईलवर ऐकू जातो.परिसरातील नागरिकांना घटना घडत असतानाच घटनेची माहिती मिळाल्याने तातडीने मदत करणे व नुकसान टाळणे शक्य होते.
ग्राम सुरक्षा यंत्रणेमुळे घटनाग्रस्त नागरिकांना परिसरातील नागरिकांची तातडीने मदत मिळणे,गावातील कार्यक्रम,घटना विनाविलंब नागरीकांना एकाच वेळी कळणे, अफवांना आळा घालणे, प्रशासनाला नागरिकांशी जलद संवाद साधता येणे, पोलीस यंत्रणेस कायदा सुव्यवस्था कायम राखण्यासाठी नागरिकांचे सहकार्य मिळणे असे फायदे असल्याचे सांगून  गावासाठी यंत्रणा सुरु करणे व सहभागी होण्यासाठी सोपी पध्दत समजावून सांगितले. या प्रात्यक्षिकास उपस्थितानी प्रतिसाद दिला.याप्रसंगी पोलिस उपविभागीय आधिकारी सई भोरे पाटील यानीही  मार्गदर्शन केले.
  
        
कार्यक्रमाचे प्रस्ताविक व आभार सपोनि जगदीश राऊत यानी मानले तर  सुञसंचालन भैरवनाथ कानडे यानी केले.   यावेळी  ग्राम सुरक्षा यंत्रणा विधायक अधिकारी उत्तम सुतार, पोलीस उपनिरीक्षक रमेश घुले, सहाय्यक पोलीस निरीक्षक  टी .आर. तायवडे, पोलीस उपनिरीक्षक एम . एम शाहा , जिविशाचे धनाजी वाघमारे , अच्युत पोतदार आदिसह परिसरातील सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.   कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नळदुर्ग  पोलीसांनी परिश्रम घेतले.

Labels:

येडोळा येथे ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळ्याचे आयोजन


वागदरी , दि .२५ : एस.के.गायकवाड

येडोळा ता.तुळजापूर येथे दि.3 जानेवारी२०२२ ते ९जानेवारी२०२२ दरम्यान श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.



  प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी तुळजापूर तालुक्यातील मौजे येडोळा येथील समस्त ग्रामस्थ भाविक भक्ताच्या वतीने श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत.दि ३जानेवारी २०२२रोजी या पारायण सोहळ्याची विधीवत सुरुवात होणार आहे. दि.३ जानेवारी ते ९ जानेवारी २०२२दरम्यान प्रवचन ,हरीभजन,किर्तन व इतर धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले  असून ह.भ.प.महेश महाराज माकणीकर,राम गायकवाड महाराज चिकुंद्रा, माऊली महाराज मेडसिंगा,गोपाळ वासकर महाराज पंढरपूर,प्रल्हाद सरडे महाराज नांदुरी, फुलचंद महाराज रिंगणीकर आदींचे किर्तन होणार आहे तर परिसरातील वागदरी, नळदुर्ग, चिकुंद्रा, लोहगाव,शहापूर, गुजनुर, किलज, नंदगाव,चव्हाणवाडी, हिप्परगा (रवा), गुळहळ्ळी,चिवरी,होर्टी,जेवळी,शिरगापूर आदी गावातील भजनी मंडळाच्या हारीभजनाचा कार्यक्रम होणार आहे. तर भाविक भक्तानी या ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळ्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहवे आसे आवहान आयोजक ग्रमस्थानी केलेआहे.

Labels:

Friday, 24 December 2021

तामलवाडी परिसरात अवैद्य गौण खनिजाचे उत्तखनन,बांधकाम भरीसाठी मुरुमाचे उत्तखनन, गौण खनिज विभागाचे दुर्लक्ष



तामलवाडी ,दि .२४

तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध उत्तखनन केले जात असून नैसर्गिक साधन संपत्तीचा ऱ्हास होताना दिसून येत आहे. गौण खनिज विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे या परिसरात मुरुम उपसा करणारी मोठी टोळी कार्यरत झाली असून सुपारी घेऊन मुरुमाचे उत्तखनन केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. 



तामलवाडी गावाजवळील गंजेवाडी रोड लगत असलेल्या साठवण तलावातून जेसीबीच्या सहाय्याने मुरुमाचे उत्तखनन करुन वार्ड क्रमांक 1 मधिल मशिदीशेजारी सुरु असलेल्या बांधकामावर जेसीबी क्रमांक एम.एच- 25 ए.स - 3420 या मशीनच्या सहाय्याने अंदाजे 20 ते 25 पंचेवीस ब्रास मुरुम सपाट करत असल्याचे तामलवाडी महसूली सज्जाच्या तलाठी आशु राजमाने यांच्या निदर्शनास आले असून त्यांनी स्थळ पंचनामा केला असून दोषीं व्यक्तीवर काय कारवाई होणार ? की नेहमी सारखे हेही प्रकरण दाबले जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Labels:

बसवंतवाडी येथे नुतन शालेय व्यवस्थापन समिती पदाधिकाऱ्यांचा सत्कार संपन्न


काटी , दि . २४

 तुळजापूर तालुक्यातील बसवंतवाडी येथे शुक्रवार दि. 24 रोजी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन बिनविरोध करण्यात आले. याबद्दल आज शाळेत मुख्याध्यापक व शिक्षकांच्या वतीने नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.


 व्यवस्थापन समिती अध्यक्ष  मल्हारी हनुमंत बोबडे, उपाध्यक्ष सुनील मोहन जाधव यासह सदस्य  राजेंद्र पारवे, संतोष शिंदे, सारिका देडे, जयश्री सुरवसे, राजकन्या भालेकर, अनुसया बनसोडे, सुरेखा भोसले, पूजा मुळूक, शिक्षणतज्ञ सूर्यकांत मुळूक, ग्रामपंचायत सदस्य नागेश बनसोडे तसेच विद्यार्थी प्रतिनिधी संध्याराणी ताटे व कृष्णा टकले यांचा सत्कार करण्यात आला. 
मागील सहा वर्षापासून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून ज्यांनी काम पाहिले व शाळेच्या विकासात मोलाचे सहकार्य केले असे माजी अध्यक्ष जगन्नाथ उत्तम शिंदे (पाटील) यांचा ही शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. सर्व नूतन पदाधिकाऱ्यांनी शाळेच्या विकासासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. 
      

 यावेळी सरपंच नागेश बनसोडे, जगन्नाथ शिंदे यासह प्रतिष्ठित नागरीक उपस्थित होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक भारत कांबळे तर प्रमुख पाहुणे सरपंच नागेश बनसोडे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिपक ढोणे यांनी केले. सूत्रसंचालन प्रमोद चौधरी यांनी तर आभार श्रीमंत टेंगळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी धोंडिबा गारोळे, रामचंद्र शिंदे व राजकुमार घोडके यांनी परिश्रम केले.

Labels:

मोहा येथे विदेशातून आलेले दोघे ऑमायक्रॉन पॉझिटिव्हनागरिकांनी सतर्क राहुन कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याचे आवाहन

                                      
         
     
  उस्मानाबाद, दि.२४ 

राष्ट्रीय विषाणू संस्था (प्रयोगशाळा ) (NIV), पुणे यांच्याकडुन दि.23 डिसेंबर-2021 प्राप्त झालेल्या अहवालानुसार उस्मानाबाद जिल्हयातील मोहा (ता. कंळब) येथील दोन व्यक्ती ऑमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.यापैकी एक 31 वर्षीय पुरुष आणि दुसरा रुग्ण हा दोन वर्षीय बालक आहे. या 31 वर्षीय पुरुष हा घाणा या देशातून दि.13 डिसेंबर-2021 रोजी आलेला आहे.दुसरा रुग्ण संबंधिताचा मुलगा आहे.
        

जिल्हयात आजापर्यंत 98 व्यक्ती परेदशातून आलेल्या आहेत. आरोग्य विभागामार्फत संबंधित व्यक्तींचे ट्रेसीग आणि टेस्टींग करण्यात आलेले आहे.परदेशातून आलेल्या व्यक्तींची कोविड आरटीपीसीआर तपासणी करण्यात आलेल्या आहेत.यामध्ये जे रुग्ण कोविड बाधीत आढळून आले आहेत. त्याचे नमुने राष्ट्रीय विषाणू संस्था (प्रयोगशाळा) (NIV),पुणे येथे पाठविण्यात आलेले आहेत.यामध्ये आतापर्यंत जिल्हयात एकूण पाच ओमायक्रॉन बाधीत रुग्ण आढळून आलेले आहेत.त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथे उपचारासाठी ठेवण्यात आले आहे.
        

या पार्श्वभुमीवर जिल्हयातील आरोग्य यंत्रणा सतर्क झालेली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता नियमितपणे मास्क वापरणे,गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे,शारीरिक अंतर पाळावे,ज्या नागरिकांनी कोविड 19 लस अद्याप घेतलेली नाही.त्यांनी त्वरित कोविड 19 लस घ्यावी,परदेशातून आलेल्या प्रवाशांनी गृह विलगीकरणात अथवा संस्थात्मक विलगीकरणात रहावे, तसेच परदेशातून आल्यावर वेळीच प्रशासनास अवगत करावे.    
    

आरोग्य विभागास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय पाटील, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिवकुमार हलकुडे यांनी केले आहे.
                                  
,

Labels:

उस्मानाबाद जिल्हयातील 230 प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर

                               
          
         
उस्मानाबाद, दि.२४ 

जिल्हा परिषदेच्या शाळांमधील 230 प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी अनुज्ञेयतेसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उस्मानाबाद तथा अध्यक्ष वरिष्ठ, निवड श्रेणी नियुक्त समिती यांच्या अध्यक्षतेखाली राहुल गुप्ता  मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात दि. 16 डिसेंबर-2021 रोजी बैठक घेण्यात आली. 


या बैठकीस समितीचे सदस्य सचिव तथा शिक्षणाधिकारी (माध्यमिक),समिती सदस्य तथा शिक्षणाधिकारी (प्राथमिक), सर्व तालुक्यांचे गटशिक्षणाधिकारी,उपशिक्षणाधिकारी  (प्राथमिक) आणि कार्यालयीन शिक्षण विस्तार अधिकारी उपस्थित होते.
       

बैठकीमध्ये सदस्य सचिव यांनी अध्यक्ष आणि सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर वरिष्ठ आणि निवड वेतनश्रेणीसाठी आवश्यक असलेल्या शासन निर्णयानुसार वाचन करण्यात आले.त्यानुसार वरिष्ठ वेतनश्रेणी अनुज्ञेयतेसाठी प्रशिक्षीत अर्हतेसह प्राथमिक शिक्षक पदावरील सलग 12 वर्षे सेवा झालेल्या तसेच दोन वर्षाचे गोपनीय अहवाल समाधानकारक असलेल्या आणि सर्व शिक्षा अभियान योजनेअंतर्गत एका शैक्षणिक वर्षातील 21 दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण असणे या अटी पूर्ण करणाऱ्या शिक्षकांनाच या वेतनश्रेणी अनुज्ञेय करता येते. या बाबी निदर्शनास आणून देण्यात आल्या आहेत. तद्नंतर तालुकानिहाय  उस्मानाबाद -59, तुळजापूर-105, उमरगा- 84, भूम- 42, परंडा- 39    लोहारा- 41, कळंब- 64, वाशी- 35 अशा एकूण सादर केलेल्या सर्व 469 प्रस्तावांची समिती सदस्य, उपस्थित गटशिक्षणाधिकारी आणि कार्यालयीन शिक्षण विस्तार अधिकारी यांनी पडताळणी केली. वरिल तपासलेल्या सर्व प्रस्तावांपैकी 230 प्राथमिक शिक्षकांचे प्रस्ताव वरील निकषांचे पुर्तता करत असल्यामुळे उक्त परिशिष्टात दर्शविलेल्या दिनांकापासून देय आणि अनुज्ञेय वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर करण्यात येत आहे. 


सादर केलेल्या 469 प्रस्तावांपैकी 239 प्रस्ताव यामध्ये विहित निकषांची पुर्तता न केल्यामुळे या  प्रस्ताव पुढील बैठकीमध्ये निकष पुर्ण करुन ठेवता येतील काय? याबाबत खात्री करावी. खात्री झाल्यास पुनश्च: सादर करावेत. अशा सूचना सर्व सूचना सर्व गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.
       

 या प्रमाणे कामकाज पुर्ततेनंतर निवड श्रेणी नियुक्त समितीचे अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच सदस्य सचिव तथा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) तसेच सर्व गटशिक्षणाधिकारी, कार्यालयीन शिक्षण विस्तार अधिकारी यांचे आभार व्यक्त करुन बैठक 
संपविण्यात आली. तद्नंतर उक्त 230 प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी अनुज्ञेयतेसाठी आदेश पारित करण्यात आले आहेत.    
                                    

Labels:

उस्मानाबाद : आरोग्य विभागाच्या कायाकल्प कार्यक्रमांतर्गत जिल्हयातील रुग्णाल्यांना पुरस्कार जाहीर


उस्मानाबाद, दि. २४


आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या कायाकल्प कार्यक्रमांतर्गत जिल्हयातील उपजिल्हा रुग्णालय परंडा, उमरगा, तुळजापुर आणि कळंब तसेच ग्रामीण रुग्णालय सास्तुर, तेर, मुरुम, लोहारा, भूम या आरोग्य संस्थेस 2020-21 या वर्षातील कायाकल्प राज्यस्तीय पुरस्कार जाहिर झाला आहे. 



पुरस्कार जाहिर झालेल्या रुग्णालयास प्रत्येकी एक लाख रुपये इतकी रक्कम पुरस्कार म्हणून जाहिर करण्यात आली आहे. या रक्कमेचा विनियोग रुग्णांना आरोग्य सेवा देण्यासाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी करण्यात येणार आहे.या रुग्णालयांना लवकरच राज्यस्तरावरुन पुरस्काराचे वितरण होणार आहे.


राज्यातील सर्व आरोग्य संस्थेमधील सेवांची गुणवत्ता सुधारणे तसेच आरोग्य संस्था नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके राहण्यासाठी स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत आरोग्य संस्थेमध्ये कायाकल्प अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य संस्थेस पुरस्कार देण्यात येतो. यामध्ये आरोग्य संस्थास्तर, जिल्हास्तर आणि राज्यस्तरावरुन मुल्यांकन करण्यात येते.राज्यस्तरीय पथकामार्फत करण्यात आलेल्या मुल्यांकनमध्ये आरोग्य संस्था पुरस्कारास पात्र ठरली आहे.या मुल्यांकन दरम्यान रुग्णालयामधील जैववैद्यकीय घनकचरा व्यवस्थापन, जंतुसंसर्ग व्यवस्थापन, रुग्णालयातील स्वच्छता, आरोग्य सेवा इत्यादी बाबींची तपासणी करुन गुण दिले जातात.



जिल्हास्तरीय पुरस्कारामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र नाईचाकूर, पाथरुड, दहिफळ,जेवळी, जळकोट, माणकेश्वर, वालवड, आनाळा, सावरगाव, बेंबळी, कोंड या प्राथमिक आरोग्य केंद्राची जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र नाईचाकूर (ता.उमरगा) या प्राथमिक आरोग्य केंद्रास प्रथम क्रमांकाचे दोन लाख रुपयांचे बक्षीस स्वरुपात मिळणार आहे.तसेच इतर प्राथमिक आरोग्य केंद्रास प्रत्येकी 50 हजार रुपये इतकी रक्कम बक्षीस स्वरुपात मिळणार आहे.

हा पुरस्कार मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  राहुल गुप्ता,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.डी.के.पाटील,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एन.डी.बोडके यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे,आरोग्य सभापती धनंजय सावंत यांचे मोलाचे सहकार्य लाभले.जिल्हास्तरीय अधिकारी यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचना आणि प्रशिक्षण इत्यादीच्या माध्यमातुन आरोग्य संस्थेस पुरस्कार मिळण्यासाठी मदत झाली.रुग्णालयांनी पुरस्कार प्राप्त झालेल्या रुग्णालयाचा आदर्श घेऊन आपल्या आरोग्य संस्थेस प्रत्येक वर्षी पुरस्कार मिळण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

Labels:

सातारा येथे मराठी भाषा चिंतन शिबीर

 जळकोट, दि.२४ : मेघराज किलजे

सातारा येथे राज्यस्तरीय दि.  २५, २६ डिसेंबरला मराठी भाषा चिंतन शिबीर या शिबिरास येण्याचे आवाहन  मराठवाडा संघटक  अभिमन्यू कदम ,
माय मराठी अध्यापक संघ यांनी केले आहे.



महाराष्ट्रातील माध्यमिक व उच्च माध्यमिक मराठी भाषा शिक्षकासाठी माय मराठी राज्य अध्यापक संघाचे वतीने राज्यस्तरीय ‘मराठी भाषा चिंतन शिबिर दि.२५व २६ डिसेंबर रोजी सातारा येथे संपन्न होत आहे. 
     
सातारा येथीलपुणे – बंगलोर महामार्गावरील वाढे फाट्यावरील  यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ शिक्षण संस्थेच्या टेक्निकल कँम्पस मध्ये दि.२५ ,२६ डिसेंबर या दोन दिवशीय राज्यस्तरीय मराठी भाषा चिंतन शिबिराचे अध्यक्षस्थान नाशिकचे सुप्रसिध्द कवी प्राचार्य लक्ष्मण महाडिक भूषविणार आहेत. 


शनिवार दि.२५ डिसेम्बर रोजी सकाळी अकरा वाजता सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन नितीनकाका लक्ष्मणराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न होईल.या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी सातारा जिल्हा परिषदेचे शिक्षणव अर्थ सभापती मानसिंगराव जगदाळे ,पुणे येथील अल्पसंख्यांक व प्रौढ शिक्षण विभागाचे शिक्षण उपसंचालक राजेश क्षीरसागर , सातारा जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती प्रभावती कोळेकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे. तर या चिंतन शबिराचे स्वागत अध्यक्ष सातारा येथील  यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ, सातारा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे भूषविणार आहेत. 



याप्रसंगी कवी प्राचार्य लक्ष्मण महाडिक
आपल्या अध्यक्ष भाषणातून मराठी भाषेचा प्रवास, भाषिक स्थित्यंतरे,मराठी भाषेचे स्वरूप, चिंता आणि चिंतन, मराठी भाषेपुढची नवी आव्हाने, भाषा विकासात वाचन चळवळीचे महत्व, तसेच मराठी अध्यापकाचे स्थान, भाषेचा अभ्यासक्रम आणि क्रमिक पाठ्यपुस्तके, अध्यापन व मूल्यमापनातील नवे बदल तसेच  नवीन शैक्षणिक धोरण या सारख्या मुद्यांना स्पर्श करणार आहेत.उद्घाटन सोहळ्यानंतर दुपारी २ ते ३ या पहिल्या सत्रात निवृत्त शिक्षण उपसंचालक व सुप्रसिध्द कथाकथनकार मा. श्री. मकरंद गोधळी हे  ‘वाचिक अभिनय तंत्र आणि मंत्र’ याविषयावर विचार मांडणार आहेत.तर प्रा. अनिल पाटील (सांगली ) हे ‘मराठी भाषा सक्तीचा अधिनियम सद्यस्थिती ’या विषयावर मनोगत व्यक्त करतील . दुपारी ३ ते ४ दरम्यानच्या दुसऱ्या सत्रात  पसायदान या विषयावर सुप्रसिध्द प्रबोधनकार इंद्रजीत देशमुख संवाद साधतील. दुपारी ५ ते ७ च्या तिसऱ्या सत्रात महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य कवी प्रा. प्रा. प्रदिप पाटील (इस्लामपूर)यांच्या अध्यक्ष तेखाली निमंत्रित कवींचे कविसंमेलन होईल .


त्यात कवी  प्रा. वैजनाथ महाजन,कवी वसंत पाटील,कवयित्री सौ. मनिषा पाटील व इतर कवी सहभागी होतील. रविवार दि. २६ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० ते ११ .३० पहिल्या सत्रात पुणे येथील माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख व अंभेरी शिवधामचे आचार्य शिवानंद भारती यांची प्रकट मुलाखत प्रा. अनिल बोधे व डॉ.प्रिया निघोजकर घेतील. ११.३० ते १२.३० दुसऱ्या सत्रात ‘नवे शैक्षणिक धोरण २०२०’या विषयावर  प्रा. डॉ. सुफिया शिकलगार विचार मांडतील . १२.३० ते १.३० या तिसऱ्या सत्रात  संघाचे विश्वस्त  हनुमंत कुबडे हे ‘ मायमराठी राज्य अध्यापक संघाची भविष्यातील वाटचाल ’या विषावर विचार मांडतील. दुपारी २.३० ते ३.३०चौथ्या सत्रात प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे ह ‘मराठी भाषा साहित्य एक सांस्कृतिक अनुबंध ’या विषयावर विचार मांडतील .त्यांतर पुणे येथील शिक्षण संचालक दिनकर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत  पहिल्या मायमराठी राज्यस्तरीय मराठी भाषा चिंतन शिबिराचा समारोप होईल. तरी या राज्यस्तरीय मराठी भाषा चिंतन शिबिराला मराठी भाषा शिक्षकांनीकोव्हीड नियमांचे पालन करून मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.असे आवाहन हनुमंत कुबडे(खेड) ,लक्ष्मण महाडिक (नाशिक ) व्दारकानाथ जोशी,(औरंगाबाद )अनिल बोधे,(सातारा )रमाकांत देशपांडे,(बीड ) अशोक तकटे, ज्ञानदेव दहिफळे जगन्नाथ शिवले,(पुणे) विलास पाटील(चोपडा ) अशोक मार्कंड ,अमृता कविश्वर (नाशिक )सौ. सुनिता पाटील)(सांगली ) भिकाजी कुलकर्णी( सोलापूर ) सौ. अलका बोर्डे(* अकोला ) संतोष पाटील(धुळे) जयश्री गिते(शेगाव ) मनिषा घेवडे(मुबई )आदीसह  राज्य कार्यकारणी मंडळाच्या सदस्यांनी केली आहे.

Labels: