Thursday, 28 November 2019

तुळजापुर : राज्यस्तरीय मराठा वधुवर परिचय मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात


तुळजापूर : उमाजी गायकवाड

संपूर्ण  भारताच्या विविध प्रांतामध्ये पसरलेल्या मराठा समाजाला आपल्या उपवर वधू वराच्या सोईरीकीच्या   निमित्ताने सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून  मराठा समाजाचे संघटन  एकत्रित करण्याचे कार्य मराठा सोयरीक वधू-वर परिचय मेळाव्याचे संस्थापक अध्यक्ष सुनील जंवजाळ पाटील यांच्या माध्यमातून अविरत सुरू आहे. त्यांच्याच प्रेरणेतून तुळजापूरातील मराठा सोयरीक वधू-वर परिचय मेळावा समितीच्या वतीने आयोजित मराठा समाज वधू-वर परिचय मेळाव्याचे रविवार दि. 1 डिसेंबर 2019 रोजी तुळजाभवानी पुजारी मंगल कार्यालय, जुन्या बस स्टँडसमोर तुळजापूर येथे मराठा समाज वधू-वर परिचय मेळाव्याचे सकाळी 8 ते 5 या कालावधीत  आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याची संपूर्ण तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

समाजातील अनिष्ट चालीरीती, बोकाळलेल्या विवाह संस्था, विवाह जोडणीत निर्माण झालेले दलाल या सर्वांना आळा बसवण्याचा हा अल्पसा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रभर सुरू आहे. या प्रयत्नातून दलालांना व फसवणूक करणाऱ्या विवाह संस्थांना जरब बसवण्यात महाराष्ट्र मराठा सोयरीक संघाला  बरेचसे यशही मिळालेले आहे. पालकांच्या अवाजवी उंच अपेक्षेमुळे फार मोठी विषमता आज समाजात निर्माण झाली असून शेतकऱ्यांच्या मुलांना लग्नाच्या मुली मिळेनाश्या झाल्या आहेत.  शिवाय मधल्या काळात मुलींचा जन्म दर कमी झाल्याने  राज्यात प्रत्येक खेड्यात 100 च्या वर मुले आहेत की ज्यांच लग्नच जुळेल की नाही असा प्रश्न निर्माण झालेला आहे. ही भयानक विषमता दूर करणेसाठी महाराष्ट्र मराठा सोयरिकचे मेळाव्याच्या माध्यमातून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.        
  
कर्मन्य वाधिकारस्ते माफ्लेशु कदाचन  गृहस्थाश्रम हा एक पवित्र आश्रम त्यासाठी विवाह विधी महत्वाचा आहे. विवाह जमविणे जेवढे  जिकरीचे तेवढेच  महत्वाचे कार्य आहे, हे एक सामाजिक व सेवाभावी काम असून त्याच वृत्तीने ते केले तरच खरा आनंद व समाधान मिळते. याच सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून 29 जानेवारी 2016 रोजी  सोशल मीडियाचा आधार घेऊन विदर्भातील बुलडाणा शहरातून सुरू झालेली महाराष्ट्र मराठा सोयरीक ही संकल्पना आज देशव्यापी बनत चाललेली आहे.  1जानेवारी 2017 रोजी महाराष्ट्र मराठा सोयरीकचा पहिला राज्यस्तरीय मेळावा घेण्याचा बहुमान  अहमदनगर जिल्ह्याने मिळवला होता. त्याच धर्तीवर रविवार दि.  1 डिसेंबर  2019 रोजी तुळजापूर येथील पुजारी मंगल कार्यालयात महाराष्ट्रातील संपन्न होणारा भोजन व्यवस्थेसह विनाशुल्क  मराठा समाज वधू-वर परिचय मेळावा हा  राज्यातील 24 वा मेळावा असणार आहे. 

तर  सिल्व्हर जुबली  म्हणजे 25 वा मेळावा हा जानेवारी 2019 च्या शेवटच्या आठवड्यात लातूरमध्ये घेण्याचा मानस आहे जंवजाळ पाटील यांनी व्यक्त केला आहे. व याच मेळाव्यात महाराष्ट्र मराठा सोयरिकचे संस्थापक सन्मानीय श्री जवंजाळ पाटील यांचा गुण गौरव सोहळा पार पडणार आहे. तुळजापूर येथे रविवार दि. 1 डिसेंबर रोजी घेण्यात येणाऱ्या विनाशुल्क थेठभेट  वधू-वर परिचय मेळाव्यास मराठवाड्यातील वधू-वरांनी, पालकांनी बहुसंख्येने सहभागी  व्हावे असे आवाहन मराठा समाज सोयरीक वधू-वर परिचय मेळाव्याचे संस्थापक अध्यक्ष सुनीलराव जंवजाळ पाटील बुलढाणा यांनी केले आहे. तसेच  तुळजापूरात   होणाऱ्या मराठा समाज वधू-वर परिचय मेळाव्या संदर्भात मराठा सोयरीक संघाचे संस्थापक अध्यक्ष सुनीलराव जंवजाळ पाटील व तुळजापूर  मराठा समाज वधू-वर परिचय मेळावा समितीची  यांची संयुक्त पत्रकार परिषद शुक्रवार दि. 29 रोजी सकाळी अकरा वाजता येथील पुजारी मंगल कार्यालयात  घेण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेला सर्व पत्रकार बा॑धवानी उपस्थित राहण्याचे आवाहन  संस्थापक अध्यक्ष सुनीलराव जंवजाळ पाटील व जिल्हा प्रसिध्दी प्रमुख पत्रकार उमाजी गायकवाड यांनी केले आहे.

Labels:

भारतीय बालरोग संघटना शाखा उस्मानाबाद ला राज्य परिषद संघटनेचे प्रथम पारितोषिक


उमरगा : लक्ष्मण पवार

भारतीय बालरोग संघटना शाखा उस्मानाबाद ला राज्य परिषद संघटनेचे प्रथम पारितोषिक अमरावती येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्य पातळीवरील परिषदेत सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्र राज्यातील सर्व बालरोग तज्ञाची राज्य स्तरावरील परिषद अमरावती येथे १५ ते १७ नोव्हेंबर रोजी पार पडली. या परिषदेत उस्मानाबाद शाखेचे वार्षिक काम मोलाचे असल्यामुळे वेगवेगळ्या तीन विभागात प्रथम क्रमांक पटकावला. यात सर्वोत्कृष्ट शाखा,ओआरएस आठवडा अवरनेस प्रोग्राम,बेस्ट फिडींग ( स्तनपान ) अवरनेस प्रोग्राम या विविध स्तरातील ३ उत्कृष्ट पुरस्कार देवून गौरविले आहे.

यावेळी जिल्हा बाल रोज तज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. डी. एस. थिटे, विद्यमान सचिव डॉ. प्रशांत मोरे, कोषाध्यक्ष डॉ. एन. डी. बिराजदार यांनी अथक परिश्रम घेवून शाखेला  प्रथम क्रमांक मिळवून दिला.

जेव्हापासुन उस्मानाबाद शाखेची सूत्रे उमरगा येथील डाँक्टरांनी घेतली आहेत तेव्हांपासुन अनेक उपक्रम घेत सम्पूर्ण महाराष्ट्र भर नाव लोकिक केलेला आहे.

या पारितोषिक चे श्रेय जिल्ह्यातील पूर्ण बालरोगतज्ञांचा हातभार आहे. यात
प्रामुख्याने  उस्मानाबाद शाखेचे उपाध्यक्ष - डॉ. श्रीनिवास हम्बिरे,
डॉ. मुळे, डॉ. समीर, डॉ. सोनटक्के, डॉ.अभय पाटिल, डॉ. अभय शापूरकर यांच्यासह डॉ. सुचेता पोफळे,डॉ.रामकृष्ण लोंढे यांचे सहकार्य मोलाचे आहे.

यापुढील काळात चौरस राहून सर्वोत्तम काम करण्यात येईल असा विश्वास डॉ. प्रशांत मोरे यांनी दर्शविला आहे.

Labels:

Friday, 15 November 2019

ग्रंथालयात पुरेसा निधी व कुशल कर्मचारीवर्ग असणे नितांत गरजेचे


पुस्तक मानवाची चांगली मित्र असतात ते मानवाचा जीवनात प्रत्येक वाटेवर सोबतीला असतात म्हणजे जे लोकं नेहमी वाचन करतात ते कधीच जीवनात एकटे नसतात. ज्या भागात ग्रंथालय असते तेथील वाचकवर्गाला वाचनाची गोडी लागते. एकेकाळ आपला देश नालंदा तक्षशिला सारख्या शिक्षणकेंद्र व ग्रंथालयाने समुद्ध होता व जगभरातील विद्यार्थी शिक्षणाकरीता इथे यायचे. आजचे ग्रंथालय हे फक्त ग्रंथालय नसून माहिती स्त्रोताचे मुख्य केंद्र बनले आहेत जिथे वाचकाला इंटरनेटच्या एका क्लिकवर जगभरातील भरमसाठ माहितीचा साठा क्षणभरात प्राप्त होतो म्हणजे शिक्षणाला दर्जेदार व वाचकाला योग्य ती माहिती कमी वेळात ग्रंथालय देते. ग्रंथालय समाजाचा सर्वच क्षेत्रात दिसते. मानवाचा लहानपणापासून ते जीवनाचा शेवट पर्यंत सोबतीला असते, मग विचार करा की ऐवढ्या महत्वाचा केंद्राचे व्यवस्थापन किती मोठ्या स्तरावर व्हायला हवे?

       ग्रंथालय हे ज्ञानाचे भंडार असतात ज्याद्वारे मानव विकासामधे भर पडते तरी सुद्धा आपल्याकडे पुष्कळसे महाविद्यालयीन ग्रंथालय अनुदानीत असून देखील आधारभूत सेवाही देत नाही. आपल्या देशाचा तुलनेने परदेशात ग्रंथालय व शिक्षण क्षेत्राने फार प्रगती केली आहे. ग्रंथालयात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो. ग्रंथालयात ऐतिहासिक, दुर्मळ, महागळे, हस्तलिखीत, अद्यावत सर्वच प्रकारचे साहित्य उपलब्ध असते. घरीबसल्या किंवा जगात कोणत्याही जागेवर असले तरी सुद्धा वाचक ग्रंथालयीन मोल्यवान माहितीचा साठा वापरू शकतो, वाचकांना ग्रंथालयीन वेबसाईटचे लाॅगईन आयडी पासवर्ड व स्मार्ट कार्ड दिले जातात व ई-मेल किंवा सोशल मिडीया द्वारे ग्रंथालयीन संबंधी माहिती वाचकांना अद्यावत ठेवण्यास नियमित रूपाने पुरविली जाते. वाचकांसाठी 24 तास ग्रंथालयीन सेवा उपलब्ध असतात, वाचक संशोधन केंद्र व तज्ञांना त्वरीत संपर्क करू शकतात, वाचकांचा अडचणीवर ग्रंथालय विभाग त्वरित प्रतिसाद देतात. नविन वाचकांना ग्रंथालयीन भरमसाठ माहितीचा व तंत्रज्ञानाचा वापर कसा, कधी, कोणत्या प्रकारे करावे ह्या संबंधी माहिती नसते म्हणून वाचकांना सुद्धा ग्रंथालय तर्फे माहिती साक्षरतेचे प्रशिक्षण दिले जात असते. अशाप्रकारे आताचा ग्रंथालयाने माहिती केंद्राचे स्वरूप घेतले पण त्या मानाने आपण प्रगती केली आहे का? आज आपल्याकडील ग्रंथालयाचे नाव घेता आपल्या डोळ्यासमोर जे चित्र उद्भवते ते म्हणजे पारंपारीक सर्वसाधारण ग्रंथालय! पण असे का? कारण आपण कित्येक काळापासून असेच ग्रंथालय बघत चाललोय.

ग्रंथालय हे शिक्षणापासून ते समाज, व्यवसाय, शासकीय व इतर सर्व विभागात क्षेत्रात महत्वाचे स्थान निभावतो म्हणजे प्रत्येक ठिकाणी याचे विशेष स्थान आहे. आपण प्रगतीच्या खूप गोष्टि करतो की जगात सर्वात जास्त शिक्षण केंद्र असणारे तिसरे क्रमांकाचे देश भारत आहे पण त्या मानाने आपण गुणवत्तेत कुठे आहोत? आज परदेशात उच्च शिक्षणाकरीता सर्वात जास्त विद्यार्थी आपल्या देशातून जातात त्यामागे मोठी रक्कम सुद्धा जात असते, असं का? शिक्षणाचा मुख्य भाग हा ग्रंथालय असून सुद्धा देशातील 90 टक्के ग्रंथालय आता ही आपल्या आधारभूत सोयीपासून दूर आहेत. मोठ्या शहरात ग्रंथालयांची परीस्थिती थोडी फार तरी बरी आहे पण लहान शहरात व ग्रामीण भागात तर ग्रंथालय व्यवस्था खूप काळजीजनक आहे.



ग्रंथालयीन कर्मचारी भरतीवर भर देणे गरजेचेः- शासनाने ग्रंथालयाचा विकासाकरीता मोहीम राबवायला हवी. वाचनाची आवड मुलांना शाळेपासूनच लागायला हवी म्हणजे ग्रंथालयाची भूमिका तेव्हापासूनच चालू असते पण आपल्या राज्यातील अधिकांश शाळा विना ग्रंथालयीन आहेत. ग्रंथालय विभाग असेल तर त्यात ग्रंथसाहित्य नाही, ग्रंथालय कर्मचारी नाही तर कुशल कर्मचारी किंवा आधुनिक तंत्रज्ञान कुठून असणार. कित्येक काळ लोटला पण अनुदानित खाजगी शाळेंवर ग्रंथालयीन कर्मचारीवर्गाचे पद भरत्या झाल्याच नाही. मोल्यवान ग्रंथालयीन साठा धूळ खात पडले आहे. तिथल्या लहान विद्याथ्र्यांना तर ग्रंथालय म्हणजे काय हे सुद्धा माहिती नसते मग अशा वातावरणात आपण सुसंस्कृत शिक्षीत भावी पिढी कशी घडविणार? ग्रंथालयाचे महत्व सगळ्यांना पटायलाच हवे. विषयाचा तज्ञ कर्मचारी हाच आपल्या विभागाशी योग्य न्याय करू शकतो तेव्हा केंद्रशासनाच्या नवोदय, केंद्रिय विद्यालय प्रमाणे दर वर्षी राज्यशासनाद्वारे ही अनुदानित खाजगी संस्थेचा शाळेंवर ग्रंथालय कुशल कर्मचारीवर्गाची पद भरती करायला हवी.



ग्रंथालयाकडे पाहण्याचा दृष्टिकोण बदलायला हवाः- आज आपण ग्रंथालय म्हंटल तर बहुतेक लोक असे मानतात की ग्रंथालय फक्त ग्रंथ देव-घेव सेवेकरीताच असते आणखी त्यात असतेच काय? पण सत्य ह्यावून वेगळे आहे. आजचे ग्रंथालय हे ई-ग्रंथालयाचा स्वरूपात बदलत आहेत. ग्रंथालयाचा साहित्य सामग्री मधे डिजीटल साहित्य, ई-पुस्तक, ई-पत्रिका, आॅडिओ-विडीओ संग्रह, सिडी-डिवीडी, डाटाबेस, आॅनलाईन ग्रंथालयीन सहभागीता, ई-कैटलाॅग, ई-अनुक्रमणिका व इतर सामग्री सुद्धा आॅनलाईन रूपात उपलब्ध असते. जे-गेट, एन-लिस्ट, डेलनेट सारखे अनेक सबक्रीब्शन शैक्षणिक संस्थेकरीता उपलब्ध आहेत जे विद्याथ्र्यांना जगभरातील वेगवेगळ्या विषयावंर भरमसाठ माहिती पुरवितात. ग्रंथालयीन पुर्ण कार्य हे आता आॅनलाईन झाले आहेत अशा काळात कर्मचारीवर्ग सुद्धा कौशल्यपुर्ण तज्ञ व कुशल ग्रंथालयीन प्रबंधक असणे गरजेचे आहे. आधुनिक काळात मोठ्याप्रमाणात माहितीचा साठा तयार होतो तेव्हा तो कमी वेळात योग्य वाचकांपर्यंत योग्यरीतीने पोहोचविणे ही जबाबदारीचे कार्य ग्रंथालय द्वारे होत असते. ग्रंथालयीन कार्य ऐवढे सोपी नाही जेवढे ते दिसते या यशस्वी ग्रंथालयीन कार्यप्रणाली मागे संपुर्ण टीम कार्यरत असते. ग्रंथालय बजट, कमेटी, पुस्तक पत्रिका मैगझीन, संदर्भ ग्रंथ व इतर सामग्री निवड खरेदी प्रक्रिया, नोंदणी, वर्गीकरण, बारकोडींग लेबलींग पासून पुष्कळसा प्रक्रियेतून जावे लागते, अनेक प्रकारचे बिल्स, फाईल्स, रिपोर्ट, पत्र-व्यवहार, रिकाॅर्ड, रजीस्टर मेनटेन करावे लागतात, वेगवेगळ्या क्षेत्रातील वाचकवर्ग ग्रंथालयात आपली समस्या किंवा गरजेपोटी येत असतात त्यात सर्वांना योग्य व निवडक माहिती योग्य वेळेत पुरविणे हेच ग्रंथालयाचे ध्येय असते. 



      अनेक ग्रंथालय हे संपण्याचा वाटेवरः- आज आपण पुष्कळ ठिकाणी बघतो की निधीच्या कमतरतेमुळे ग्रंथालयाचा कर्मचारीवर्गाचे पगार होत नाहीत, ग्रंथालयात आवश्यक साधन-सामग्री नाही, वर्तमानपत्रे, पत्रिका नाही म्हणजे सर्वसाधारणपणे आधारभूत सोयी सुद्धा नाही आणी जे काही थोडेसे साहित्य आहेत ते सुद्धा धूळ खात पडले आहेत. कुठे ग्रंथालयाची इमारत जर्जर झाले आहे तर कुठे हे ग्रंथालय कचराघर झाले आहे. काही ठिकाणी तर ग्रंथालय चक्क स्टोअर हाउस च्या प्रमाणे वापरण्यात येते तर कुठे मोठ-मोठी ग्रंथालय हे तिथल्या चतुर्थ श्रेणीच्या कर्मचारीवर्गावर चालत आहे. जर ग्रंथालयाला सुखरूप चालविण्याकरीता निधीच नसणार तर ग्रंथालयीन कार्यप्रणाली कशी चालणार. आजचा आधुनिक काळात अशी ग्रंथालय समाजातील विकासात अळचणीचा रूपात आहेत जेव्हापर्यंत हे ग्रंथालय सुधारीत स्वरूपात नाही येणार तो पर्यंत हे मोल्यवान ज्ञानाचे भंडार नष्ट होतच जाणार.



ग्रंथालय कर्मचारीवर्गांनी सुद्धा आपल्या पदाशी न्याय करायला हवाः- ग्रंथालय विषय खूप व्यापक आहे जगभरात ह्या विषयात निरंतर विकास होतच चाललाय पण डाॅ. एस. आर. रंगनाथन द्वारे दर्शविलेले ग्रंथलयाचे पाच नियमांची अमलबजावणी प्रत्येक ग्रंथालयात पुर्णपणे होते का? खाजगी संस्थेत निधीच्या कमतरतेचा प्रश्न असतोच पण अनुदानित महाविद्यालयीन ग्रंथालय हे आपल्याकडे संशोधन केंद्राचा स्वरूपात का विकसीत होत नाहीत? प्रत्येक महाविद्यालयातील ग्रंथालय हे संशोधन केंद्र व्हायलाच हवे. प्रत्येक ग्रंथालयातील ग्रंथसाहित्याला वाचक मिळालाच पाहीजे व ग्रंथालय नियीमत रूपाने प्रगतीपथावर वाढतच राहीले पाहीजे. ग्रंथालय कर्मचारी नेहमी ग्रंथालयाचा विकास व ग्रंथालयीन नियमांचे पालन करणारा असायला हवा तेव्हाच तो आपल्या पदाशी न्याय करू शकतो.



डाॅ. प्रितम भि. गेडाम

मोबाईल क्रं. 082374 17041

prit00786@gmail.com

Labels: ,

Tuesday, 12 November 2019

तुळजाभवानी मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा संपन्न


तुळजापूर दि 12 प्रतिनिधी

हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत तुळजाभवानी मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त स्वामी समर्थ सेवा केंद्र तुळजापूर आणि उस्मानाबाद केंद्राच्या वतीने संपन्न झाला.  हजारो पणत्यांनी तुळजाभवानी मंदिर उजळून निघाले.

श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र तुळजापूर आणि उस्मानाबाद यांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने तुळजाभवानी मंदिराच्या सर्व परिसरात पणत्यांची आरास आणि रांगोळ्या चे रेखाटन करण्यात आले.  आई राजा उदो उदो सदानंदीचा उदो उदो च्या जयघोषात भाविक भक्तांनी या कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवला. सोलापूर संस्कार भारतीच्या रांगोळी प्रमुख मनीषा मोरवंचीकर आणि त्यांच्या सहकारी यांच्या वतीने मंदिर परिसरात आकर्षक नेत्रदीपक रांगोळ्या काढण्यात आल्या सायंकाळी पाच वाजेपासून स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या भक्तांच्या वतीने पणत्या होमकुंड आणि मंदिर परिसरात सर्वत्र प्रज्वलित करण्यात आल्या. 

त्रिपुरारी पौर्णिमा निमित्ताने सकाळपासून भाविक भक्तांची मोठी गर्दी तुळजाभवानी मंदिरात आहे या हजारो भाविकांच्या उपस्थितीत स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या या उपक्रमाला भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली

Labels: ,

Sunday, 10 November 2019

तुळजापुरात होणाऱ्या राज्यस्तरीय मराठा समाज थेटभेट वधु वर परिचय मेळाव्याच्या नियोजनसाठी मराठा समाज एकवटला


तुळजापूर : उमाजी गायकवाड

तुळजापूर शहरामध्ये महाराष्ट्र मराठा सोयरीक ग्रुपच्या वतीने   महाराष्ट्रातील 24 वा विनाशुल्क राज्यस्तरीय विनाशुल्क भोजन व्यवस्थेसह  लोकसहभागातून   वधु वर परिचय मेळाव्याच्या नियोजनासाठी येथील   दुर्गा लाॅज माऊली नगरमध्ये   उस्मानाबाद  जिल्हय़ातील समाज बांधवांची  रविवार दि. (10 ) रोजी सकाळी  अकरा वाजता मराठा सोयरीक  ग्रुपचे संस्थापक  अध्यक्ष सुनिलराव   जवंजाळ  पाटील  यांच्या  अध्यक्षेतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत प्रस्ताविकात प्रा.अभिमान हंगरकर यांनी मराठा सोयरीक  ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष  सुनिलराव  जवंजाळ  पाटील  यांच्या  संकल्पनेतून  मराठा सोयरीक  ग्रुपच्या माध्यमातून  चालणाऱ्या  कार्याची माहिती दिली.    
  
    
या बैठकीत मेळाव्याची तारीख,  नियोजन, मराठा  समाजात लग्न  जमविण्यास येणाऱ्या  अडचणी, समस्या  आदी विषयांवर  चर्चा करण्यात आली. या बैठकीत  1 डिसेंबर  रोजी तुळजापूर  येथील एस.टी. जवळील पुजारी मंगल कार्यालयात मोफत  अतिभव्य राज्यस्तरीय  मराठा  वधु-वर थेटभेट  मेळावा घेण्याचे ठरले असून हा मेळावा  घेण्यासाठी पुजारी मंडळाचे अध्यक्ष माजी  नगराध्यक्ष  सज्जनराव साळुंके  यांनी मंगल कार्यालय मोफत पंधरा हजार रुपये  देण्याची घोषणा केली. तसेच रविवारी  झालेल्या  बैठकीस दुर्गादास अमृतराव यांनी दुर्गा लाॅज माऊली  नगरमधील  आपला हाॅल मोफत उपलब्ध करून  दिला होता. या 1 डिसेंबर  रोजी  तुळजापूरात होणाऱ्या राज्यस्तरीय  मराठा  वधू-वर  थेटभेट भव्य मेळाव्यास अनेक  सामाजिक  कार्यकर्ते,  नेते, पदाधिकारी,  सामाजिक  संघटना पुढे  सरसावल्या  आहेत. अनेकांनी नियोजित  वधु-वर  थेटभेट  मेळाव्यातील विविध  जबाबदाऱ्या  स्वेच्छेने घेण्याचे मान्य केले. 
        
  या वेळी  मार्गदर्शन  करताना  मराठा  सोयरीक  ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सुनिलराव जवंजाळ  पाटील म्हणाले की,  एकीकडे  मराठा वधु-वरांना लग्न  जमविण्यास  अनेक अडचणींना  सामोरे जावे लागत  असताना अनेक  व्यवसायिक  वधु-वर  सुचक मंडळे कार्यरत  झाल्याने चिंता व्यक्त  करीत अशा व्यवसायिक वधु-वर  सुचक मंडळावर चौफेर  हल्ला  चढविला. मराठा  समाजातील   वधु-वरांना  येणाऱ्या  अडचणींवर  मात  करण्यासाठी सामाजिक  बांधिलकीच्या जाणिवेतून   समाजाचा अवघड  प्रश्न हाती घेऊन महाराष्ट्रातील  36 जिल्हय़ातून  320 'मराठा सोयरीक ' हाॅट्स अप ग्रुपची निर्मिती  करुन  त्या माध्यमातून बायोडाटा व फोटोची देवाणघेवाण ग्रुपवर करुन त्यांच्या  पसंतीनुसार अनेक  युवक-युवतीनी लग्नाच्या  रेशीमगाठी  बांधून  आजपर्यंत 8400 जोडपी विवाहबंधनात अडकली असल्याची माहिती  त्यांनी यावेळी दिली. व तुळजापुरात होणारा  हा  24 राज्यस्तरीय वधू- वर मेळावा महाराष्ट्रातील सर्वात मोठा  होणार  असल्याचा विश्वास  व्यक्त केला. यावेळी आयोजकांच्या वतीने मराठा  सोयरीक  संस्थापक अध्यक्ष  सुनिलराव  जवंजाळ  पाटील  यांचा सत्कार केला.  तर उस्मानाबाद  जिल्हा  महिला सोयरीकच्या नवनिर्वाचित अध्यक्षा  जयश्रीताई सुर्यवंशी  पाटील  व लातूरच्या जिल्हा  अध्यक्षपदी  रंदावणी सुखदेव  यादव यांचा पाटील  यांच्या हस्ते  सत्कार करण्यात आला. तर  सौ.  मधुमती दुर्गादास  अमृतराव  यांची शहर  महिला  प्रतिनिधी  तर लक्ष्मी  कुमार करडे यांची सहप्रतिनिधी नेमणूक करण्यात  आली  त्या बद्दल  त्यांचाही सत्कार करण्यात आला.      
       
या बैठकील मराठा  सोयरीकचे संस्थापक अध्यक्ष  सुनिलराव  जवंजाळ  पाटील   माजी नगराध्यक सज्जनराव  साळुंके, दुर्गादास  अमृतराव, नगरसेवक  अमर मगर, राहुल  खपले, सामाजिक  कार्यकर्ते तथा महाराष्ट्र  भ्रष्टाचार  निर्मूलन समितीचे  प्रदेशाध्यक्ष  राजाभाऊ  माने,  उत्तमराव अमृतराव, दिलीपराव  खपले,   विजयराव नवले,  प्रा.अभिमान  हंगरकर, सुहासराव  साळुंके, पत्रकार  उमाजी गायकवाड, नागनाथ  बागल, मस्के मुरुड, पवार,  सुखदेव यादव,  जयश्रीताई  सुर्यवंशी,  रंदावणी  यादव, सौ.  मधुमती दुर्गादास  अमृतराव, लक्ष्मी  कुमार करडे, कवि प्रदीप  शिंदे,  दिगंबर  कवडे देशमुख,   आशिष  फंड,  उमेश भिसे, प्रा. सुरेंद्र  मोरे,   दिलीप  मगर,  लक्ष्मीकांत मगर,  अरविंद  साळुंके,  शाहुराज चव्हाण   आदीसह उस्मानाबाद,  तुळजापूर,  लातूर,  कळंब,  औसा,  नळदुर्ग,  लोहारा येथील  वधू-वर  पालक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Labels: ,

Friday, 8 November 2019

विहंगम योग साधना हे अध्यात्मिक विज्ञान आहे - राष्ट्रसंत किशनलाल शर्मा

तुळजापूर दि ८  :

विहंगम योग साधना या आध्यात्मिक मार्ग मधून माणसाच्या शारीरिक मानसिक बौद्धिक आणि आत्मिक विकास होण्याला मदत होते म्हणून हे विज्ञान आहे याचा समाजातील सर्व स्तरातील नागरीकांनी उपयोग करावा असे आवाहन महाराष्ट्र संत किसनलाल शर्मा यांनी केले.

तुळजापूर पंचायत समिती सभागृहात आयोजित राष्ट्रसंत किशनलालजी शर्मा यांच्या व्याख्यान व विहंगम योग साधना अशा संयुक्त कार्यक्रमात पंचायत समिती सभापती शिवाजी गायकवाड, प्राधिकरण सदस्य नागेश नाईक, डॉक्टर डी डी केंकरे, हभप मुरलीधर जाधव, गटविकास अधिकारी प्रशांत मरोड, लघुपाटबंधारे अभियंता गजानन होळकर, ग्रामीण पाणीपुरवठा अभियंता सरवदे, शिक्षण विभागाचे वाय के चव्हाण, बांधकाम विभाग अभियंता रवी किरण मोहिते, पत्रकार सतिष महामुनी यांची उपस्थिती होती. प्रारंभी सद्गुरु सदाफल देव जी महाराज यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. राष्ट्रसंत किशनलाल जी शर्मा यांचे पंचावन्न किलोच्या गुलाबाच्या पुष्पहार आणि तुळजापूर तालुक्यातील नागरिकांच्या वतीने स्वागत करण्यात आले.

विहंगम योग साधना ही सामान्य लोकांनी केवळ दहा मिनिटे देऊन केली जाणारी साधना आहे कर्मकांड या मध्ये न अडकता केवळ ध्यान करून ही विज्ञानाची अनुभूती प्रत्येकाला घेता येते त्यामुळे समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांनी विहंगम योग साधनेच्या पुणे येथे होणाऱ्या विश्वशांती वैदिक महायज्ञ 16 व 17 नोव्हेंबर रोजी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले. याप्रसंगी राष्ट्रसंत शर्मा यांनी योग साधना मुळे मनशांती होऊन सर्वत्र आसाममधून माणूस मुक्त होतो आणि तो जगाकडे मोठ्या विश्वासाने पाहतो तसेच आपल्या आयुष्यामधील प्रत्येक कामामध्ये यशस्वी होतो हा आपला विश्वास आहे आणि तुळजाभवानीच्या पुण्यपावन नगरीतील या सत्संगामध्ये जमलेल्या नागरिकांनी याची अनुभूती घ्यावी असेही सुचवले.

याप्रसंगी पंचायत समिती सभापती शिवाजीराव गायकवाड यांनी आपण 2015 पासून योगसाधनेची जोडले गेलो आहोत त्यामुळे चेहऱ्यावरील तेज आणि विचारातील प्रामाणिकपणा तसेच वर्तणुकीतील चांगुलपणा प्रभा होण्यासाठी मला अनुभव मिळाला आणि गुरूंच्या सान्निध्यामुळे ज्ञानामध्ये वाढ झाली याचा अनुभव सर्वांनी घेण्यासाठी साधनेचा उपयोग करावा असे सुचवले.डॉ. के के केंकरे यांनी यावेळी विहंगम योग साधनेचे उपयोग स्पष्ट केले. गटविकास अधिकारी मरोड, ह-भ-प जाधव महाराज आणि प्राधिकरण सदस्य नाईक यांना स्व देव हा ग्रंथ राष्ट्रसंत शर्मा यांच्या हस्ते भेट करण्यात आला. मोठ्या संख्येने भाविक भक्त आणि नागरिक या प्रसंगी उपस्थित होते.

Labels: ,

Thursday, 7 November 2019

रविवारी तुळजापूरात राज्यस्तरीय मराठा समाज वधु वर परिचय मेळाव्याच्या नियोजनार्थ बैठकीचे आयोजन


तुळजापूर, दि. 07 :

तुळजापूर शहरामध्ये महाराष्ट्र मराठा सोयरीकच्या वतीने आयोजित महाराष्ट्रातील 24 वा विनाशुल्क राज्यस्तरीय वधु वर परिचय मेळाव्याच्या आयोजनार्थ उस्मानाबाद  जिल्हय़ातील समाज बांधवांची रविवार दि. (10 ) रोजी सकाळी  अकरा वाजता  येथील श्री दुर्गा भक्त निवास, नवीन बस स्टँडच्या मागे, माऊली नगर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी   
महाराष्ट्र मराठा सोयरीकचे संस्थापक अध्यक्ष सुनिलराव जवंजाळ  पाटील हे असणार  असून या बैठकीला नगराध्यक्ष  बापू  कणे, माजी नगराध्यक्ष  देवानंद  रोचकरी, सज्जनराव  साळुंके, उत्तमराव अमृतराव,  विजयराव नवले, नितीनजी बागल, अॅड.  धिरज पाटील,  अमर मगर,  विनोद गंगणे,  नारायण  नन्नवरे, सुनिल (पिंटू ) रोचकरी, अॅड. अनिल काळे, पंडितराव  जगदाळे, माजी उपनगराध्यक्ष दुर्गादास अमृतराव कदम, विशाल  रोचकरी, संदीप  गंगणे,  राहुल  खपले, सुहास  साळुंके,  सचिन  रोचकरी, सुहास  साळुंके,  शिवाजी  बोधले, सचिन  पाटील,  प्रभाकर  मुळे आदी  मान्यवरांची   प्रमुख उपस्थिती राहणार आहे.  
          
या बैठकीमध्ये मराठा समाज  वधू-वर परिचय  मेळाव्याचे आयोजन व नियोजन संदर्भात चर्चा करण्यात  येणार  असून मेळावा  यशस्वीपणे  पार पाडण्यासाठी विविध  समित्यांचे  गठण करण्यात  येणार आहे. त्याच प्रमाणे संस्थापक अध्यक्ष  सुनिलराव  जवंजाळ  पाटील  यांच्या हस्ते नवनिर्वाचित अध्यक्षांचा सत्कार करण्यात येणार आहे. 
     
 महाराष्ट्र मराठा सोयरीक हा एक सेवा भावी सामाजिक यज्ञ असून यामध्ये राज्यातीलच नव्हे देशातील मराठा समाज बांधव स्वयंफुरतीने ,सेवा भावी वृत्तीने काम करीत असून  आजपर्यंत महाराष्ट्रात 8400 जोडपी विवाहबंधनात अडकली आहेत.  व महाराष्ट्र मराठा सोयरीकच्या माध्यमातून राज्यात 23 जिल्ह्यात विनाशुल्क भोजन व्यवस्थेसह राज्यस्तरीय मेळावे लोकसहभागातून विनाशुल्क   आयोजित करण्यात आले  व महाराष्ट्रात  322 तालुक्यात मराठा सोयरीक या नावाने व्हाट्स अप ग्रुप बनवून  त्या माध्यमातून विवाह जुळवण्याचे कार्य अविरत  सुरू असल्याची  माहिती संस्थापक अध्यक्ष सुनिलराव  जवंजाळ  पाटील  यांनी दिली. 
    
  तरी तालुक्यातील मराठा समाज  बांधवानी मेळावा नियोजनपूर्व बैठकीस बहुसंख्येने   उपस्थितीत  राहण्याचे आवाहन  उस्मानाबाद  जिल्हा महिला सोयरीक संघाच्या नवनिर्वाचित  अध्यक्षा जयश्रीताई सुर्यवंशी पाटील यांनी केले आहे.

Labels: ,

Wednesday, 6 November 2019

अयोध्येतील रामजन्मभूमी व बाबरी मशिद संदर्भात न्यायालयाच्या निकालानंतर सर्वांनी शांतता राखावी - डॉ. दिलीप टिपरसे


काटी : उमाजी गायकवाड 

तुळजापूर  तालुक्यातील काटी येथे बुधवार  दि. ( 6 ) रोजी  सायंकाळी तामलवाडी पोलीस  ठाण्याच्या  वतीने उपविभागीय  पोलीस अधिकारी डॉ.  दिलीप  टिपरसे यांच्या  मार्गदर्शनखाली अयोध्येतील  रामजन्मभूमी व बाबरी  मशिद  जागेच्या  निकाला संदर्भात येथील  ग्रामपंचायत आवारात    शांतता  समितीची बैठक  संपन्न झाली.   
         
 यावेळी सामाजिक, राजकीय,  सर्व  समाजातील  प्रतिनिधी,  ग्रामस्थ  यांना मार्गदर्शन  करताना तालुक्याचे उपविभागीय  पोलीस अधिकारी  डॉ.  दिलीप  टिपरसे म्हणाले की, अयोध्येतील रामजन्मभूमी, बाबरी  मशिद  प्रकरणी लवकरच   न्यायायलायकडून निकाल दिला जाणार आहे. हा निकाल कोणत्याही बाजूने लागू शकतो त्यामुळे निकालानंतर अती उत्साही होवून जल्लोषात फटाके फोडणे, डिजे  लावणे,  मिरवणूक  काढणे, किंवा निकालाबाबत निषेध करणे या बाबी अयोग्य आहेत. न्यायालयाच्या निकालानंतर सर्वांनी शांतता राखावी तसेच अनुचित प्रकार घडू नये यासाठी सोशल मीडियावर निकालासंबंधी कोणत्याही पोस्ट अथवा चर्चा करू नये, अथवा एखादी  पोस्ट त्या प्रकारची आढळून  आल्यास  तात्काळ  पोलीस स्टेशनला कळवावे असे आवाहन त्यांनी  यावेळी  केले. तसेच 14 व्या वित्त आयोगाच्या निधीतून  ग्रामपंचायतच्या वतीने गावातील  प्रमुख  मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावेत सीसीटीव्ही  कॅमेरे बसविण्यासाठी  पोलीसातील तज्ञांकडून सहकार्य  करण्याचे  आश्वासनही  त्यांनी  यावेळी दिले.
     
यावेळी तामलवाडी  पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक  नितीन  मिरकर यांनीही मार्गदर्शन करताना  सांगितले की,  रामजन्मभूमी किंवा  बाबरी मशीद  जागेच्या  संदर्भात न्यायालयाकडून जो काही निकाल येईल. त्याबद्दल काही सांगता येत नाही परंतु निकालानंतर त्याबद्दल जल्लोष किंवा निषेध करणे चुकीचे आहे. तसेच सोशल मीडियावर देखील निकलाबद्दल चर्चा करू नये असे आवाहन केले. या बैठकीत माजी  जिल्हा परिषद  सदस्य  बाबुराव  ढगे यांनी  ग्रामस्थांच्या वतीने बोलताना सांगितले की,  या गावात सर्व  समाजातील  लोक  गुण्यागोविंदाने राहत असून गावात शांतता ठेवण्याचे आश्वासन दिले. 
     
यावेळी काटीतील सर्व समाजाचे प्रतिनिधी, सर्व पक्षातील  राजकीय  पदाधिकारी, पत्रकार व  सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी, हिंदू, मुस्लीम समाजातील ग्रामस्थ  मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Labels: ,

Tuesday, 5 November 2019

पत्रकार शिवशंकर तिरगुळे यांना उत्कृष्ट पर्यावरण सेवा पुरस्कार प्रदान


अणदूर, दि. 05 :

तुळजापुर तालुक्यातील अणदुर येथील चन्नबसव बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष व पत्रकार शिवशंकर तिरगुळे यांना पर्यावरण क्षेत्रातील  कार्याबद्दल सांगली येथील भारतीय माहिती अधिकार संघटनेचा समाजरत्न हा पुरस्कार यावर्षीचा उत्कृष्ट पर्यावरण सेवा पुरस्कार 2019 म्हणून मा.डॉ.नथानिएल ससे संचालक वान्लेस हाँस्पिटल मिरज,मा.डॉ. दयानंद नाईक जेष्ठ नाट्य दिग्दर्शक, मा.अँड.शशिकांत चौधरी मुंबई उच्च न्यायालय मुंबई कायदेशीर सल्लागार संघटक प्रमुख मा.रविंद्र कांबळे जेष्ठ पत्रकार सांगली,मा.शौकत नायकवडी अध्यक्ष भारतीय माहीती अधिकार संघटना यांच्या हस्ते हाँटेल सिझन फोर येथे दि.3 रोजी च्या आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.हा पुरस्कार मिळाल्या बद्दल  चंद्रकांत हागलगुंडे श्रीकांत अणदुरकर, डॉ. जितेंद्र कानडे, डॉ. अमरदीप कंदले,महाराष्ट्र एन.जी.ओ.फेडरेशन अध्यक्ष दिपक आगळे,मेघराज किलजे, चंद्रकांत गुड्ड, दयानंद कांळुके, संजीव आलुरे,सचिन तोग्गी,सुदर्शन मोकाशे,सचिन गायकवाड, लक्ष्मण दुपारगुडे,गुणवंत मुळे,गंगाधर कबाडे,दयानंद नरे,गौरीशंकर धुमाळ आदींनी अभिनंदन केले.

साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे प्रकाशन गुरूवारी


उस्मानाबाद, दि. 5 :

93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची उस्मानाबाद येथे जय्यत तयारी सुरू आहे. संमेलनाच्या निमित्ताने उस्मानाबाद जिल्ह्याचा इतिहास मांडणारे बोधचिन्ह तयार करण्यात आले आहे. या बोधचिन्हाचे प्रकाशन गुरूवार, दि. 7 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंढे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष नीतीन तावडे यांनी दिली.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 10, 11, 12 जानेवारी 2020 रोजी उस्मानाबाद येथे होत आहे. यंदाच्या साहित्य संमेलनाचा बहुमान मराठवाडा साहित्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखेला मिळाल्याने या परिसरातील साहित्यिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, भौगोलिक इतिहास साहित्यविश्वासमोर ठळकपणे अधोरेखित करण्याची संधी प्राप्त झाली आहे. त्याअनुषंगाने संमेलनाच्या पूर्वतयारीला वेग आला आहे.

संमलेनाचा महत्त्वपूर्ण भाग असलेल्या बोधचिन्हाचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. या बोधचिन्हाचे प्रकाशन गुरूवार, 7 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी 10.30 वाजता अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उस्मानाबाद येथील संपर्क कार्यालयात जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंढे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास सोलापूर येथील प्रसिद्ध उद्योजक दत्तात्रय सुरवसे, उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते,  जिल्हा पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमास जिल्ह्यातील साहित्यिक, साहित्यप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन स्वागताध्यक्ष नीतीन तावडे यांनी केले आहे.

Labels: ,

Monday, 4 November 2019

वडगाव (काटी) च्या जयदेव म्हमाणे यांची UWW जागतिक पॅनक्रेशन स्पर्धेसाठी निवड



काटी : उमाजी गायकवाड 

तुळजापूर  तालुक्यातील वडगाव  (काटी)  येथील सर्वसामान्य शेतकरी  कुटुंबातील जागतिक  आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा  किकबाॅक्सिंग पट्टु जयदेव घनश्याम  म्हमाणे  यांची भारतीय संघात निवड झाली आहे.        

या स्पधाॅ दिं. 12 ते 18 नोंव्हबर 2019 या कालावधीत इटलीची राजधानी  रोम येथे  होणाऱ्या   UWW जागतिक पॅानक्रेशन स्पर्धेसाठी  निवड करण्यात आली. रोम येथे होणाऱ्या  या स्पधेसाठी  आॅल इंडिया ट्रेंडिश्नल रेसलिंग संघटनेचे अध्यक्ष उमर मुक्तार तांबोळी  यांनी  निवडीचे पत्र देण्यात आले असे जयदेव म्हमाणे  यांनी सांगितले .

भारतीय  संघात सात खेळाडूंची   निवड करण्यात आली आहे.  यामध्ये अंकुर  जैन मध्य प्रदेश  (57 किलो), महेश  झुंडरे महाराष्ट्र  ( 60 किलो), जयदेव  म्हमाणे महाराष्ट्र  ( 90 किलो), मोनिल  सॅम्युअल महाराष्ट्र  ( 67 किलो),  आयन सिन्हा कलकत्ता   ( 84 किलो), पाॅल डिकिसन केरळ ( 71 किलो) यांचा समावेश  आहे. हा संघ 11 नोव्हेंबर रोजी इटलीची राजधानी  रोमकडे रवाना होणार आहे किकबाॅक्सिंग  पट्टु  जयदेव  म्हमाणे यांनी  विविध देशात जाऊन आजपर्यंत , सुवर्णपदक,  रोप्यपदकाची तसेच ब्राॅन्झ कमाई केली आहे. 1995 मध्ये वडगाव  (काटी) सारख्या  ग्रामीण भागातून पिंपरी चिंचवड  (पुणे) येथे  जावून  विविध  कंपन्यात काम करीत कराटे, किकबाॅक्सिंग  या खेळात  यश संपादन केले. रोम येथे होणाऱ्या  स्पर्धेत  निवड झाल्याने उस्मानाबाद  जिल्ह्य़ाची मान उंचावली असून वडगाव ( काटी) सह परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Labels: ,

महिला मराठा सोयरीक संघाच्या उस्मानाबाद जिल्हा अध्यक्षपदी जयश्रीताई सुर्यवंशी पाटील यांची नियुक्ती

तुळजापूर : उमाजी गायकवाड

लोहारा तालुक्यातील रहिवासी असलेल्या  जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या जयश्रीताई सुर्यवंशी   पाटील, यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत,महाराष्ट्र मराठा सोयरिकने त्यांच्या खांद्यावर उस्मानाबाद  जिल्हा  महिला सोयरीक संघाच्या जिल्हा अध्यक्षपदाची धुरा सोपवली आहे.


जयश्रीताई सुर्यवंशी  पाटील ह्या उच्च शिक्षित असून त्यांनी समाज शास्त्रात M, A B,ed केलेले आहे, उस्मानाबाद जिल्ह्यातील सामाजिक व राजकीय क्षितिजावर त्या सतत अग्रेसर राहत आलेल्या आहेत, आपल्या उत्कृष्ट वक्तृत्व शैलीमुळे त्यांनी जनमानसात आपले आगळे वेगळे असे स्थान निर्माण केलेले आहे, सामाजिक क्षेत्राबरोबरच त्या राजकीय क्षेत्रात सुद्धा अग्रेसर असून त्या महिला बचत गट सक्षमीकरना करिता सतत अग्रेसर राहून  फार मोठी क्रांती त्यांनी त्या क्षेत्रात घडून आणलेली आहे.अनेक सामूहिक विवाह सोहळे  सुद्धा त्यांच्या प्रेरणेतून राज्यात घडून आले आहेत. 

महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यातील विनाशुल्क वधु वर 
परिचय मेळाव्याला त्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील पाल्य व पालकांसह हजेरी लावलेली आहे, व यथोचित मार्गदर्शन वधु वर पालकांना केलेले आहे, त्यांच्या याच कार्याची दखल घेत नुकत्याच औरंगाबाद येथे संपन्न   झालेल्या एका बैठकीत महाराष्ट्र मराठा सोयरीकचे संस्थापक अध्यक्ष श्री सुनील जवंजाळ पाटील बुलडाणा यांनी त्यांचा सत्कार करून त्यांची उस्मानाबाद जिल्हा महिला सोयरीक संघाच्या अध्यक्ष पदाची घोषणा केली.

यावेळी पोपटराव पाटील सपकाळ, सौ प्रतिभाताई जगताप, नितीनजी बागल, संभाजीराव फरताडे,  ज्ञानेश्वर गायकवाड, ज्योतिरामजी गोरे, प्रा. नागनाथ बागल, लातूर जिल्हा समनवयक माधवराव गंभिरे, सौ रंदवणी यादव, सौ अनुजाताई पाचरणे पाटील,  शेखर पाटील काळे, सुधीर काळवाघे, सौ वैशाली म्हस्के ,श्री घायाळ पाटील, अॅड.शिंगणे, कैलासराव बरडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Labels: ,

अभाविपने दिला आंदोलनाचा इशारा


अणदुर, दि. 04 :

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी आपण सर्वजण सुपरिचित आहातच. अभाविप ही एक विद्यार्थी संघटना असून ती गेल्या कित्येक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक तसेच समाजातील सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करत असते. त्यापैकी आम्ही आज दिनांक 04 नोव्हेंबर, 2019 रोजी गावातील काही प्रमुख समस्या निवेदनात्मक ग्रामपंचायत, अणदूरला देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  खंडोबा मंदिर परिसर, हुतात्मा स्मारक, जुनी चावडी, वत्सला नगर, धनगर गल्ली, आदी. अशा बऱ्याच ठिकाणी कचऱ्याचे प्रमाण विखुरलेल्या स्वरूपात आढळून येत आहे. त्या कचऱ्यावर असलेले अन्य-पदार्थ, प्लास्टिक पिशव्या तसेच इतर पदार्थ हे गाई-म्हशी सह सर्व जनावरांचे खाद्य बनले आहे. त्यामुळे जनावरांसह गावातील नागरिकांना आरोग्याच्या समस्येसह बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तरी कचऱ्याचे तात्काळ व्यवस्थापन करण्यासाठी अणदूर ग्रामपंचायतला जाग आणण्याचे काम अभाविप करत आहे. यासह अणदूर ग्रामपंचायतला कुलदैवत खंडोबा मंदिरामध्ये स्वच्छतागृह, सार्वजनिक ठिकाणी धोबी कट्टे, गाळमुक्त गटारी, इत्यादी आवश्यक सर्व ठिकाणातील परिसर तात्काळ स्वच्छ करण्याचे आवाहन अभाविप करीत आहे. वरील निवेदनातील ग्रामस्तरावरील कामे पुढील पंधरा दिवसात करावी हि नम्र विनंती केलेली आहे. हे प्रश्न 15 दिवसात मार्गी नाही लागल्यास अभाविप अणदुर शाखेकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अभाविप अणदूर शाखेने दिले आहे. तरी ग्रामपंचायत कार्यालय अणदूरने या समस्यांचा तात्काळ निपटारा करावा अशी मागणी शहरमंत्री निखिल पवार यांनी केली आहे
     
 अणदूर शहरातील समस्त ग्रामस्थांनी कचरा व्यवस्थापन करण्यासाठी ग्रामपंचायत व कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे अशी विनंती अभाविप करीत आहे.  कोणीही रस्त्यावर अथवा सार्वजनिक ठिकाणी कोठेही कचरा टाकू नये, आपण कचरा रस्त्यावर टाकल्यास तो सर्वत्र विखुरला जातो व घाणीचे साम्राज्य निर्माण होते. त्याचे दुष्परिणाम आपल्या आरोग्यावर तर होतीलच परंतु त्याअगोदर सर्व नागरिकांनी स्वच्छता राखण्याची जबाबदारी घ्यावी असे आवाहन अभाविपने केले आहे. यावेळी कार्यालय मंत्री प्रशांत सुरवसे, महादेव निर्मळे, रवि निर्मळे व जिल्हा कार्यालय मंत्री अंकुश चिनकरे आदी अभाविप कार्यकर्ते उपस्थित होते.

Labels:

आरळीच्या निसर्ग सानिध्यात रमली शालेय आठवणींची मैफिल

आरळीच्या निसर्ग सानिध्यात रमली शालेय  आठवणींची मैफिल  

तुळजापुर - तालुक्यातील आरळी बु हे गाव तस  परिसरात खूपच चर्चेत असत कारण या गावात 1967 साली स्थापन झालेली जिल्हा परिषदेची  एकमेव शाळा त्या शाळेने अनेक रत्न घडवली आहेत,जी आज देशभर आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत.अशाच एका 1987 च्या एस.एस.सी.चे वर्गमित्रांनी गेट टू गेदर माध्यमातून एकत्र दैनंदिन जीवनातून वेळ काढत निसर्गाच्या सानिध्यात सुख दुःखाच्या गोष्टी जाणून घेत मनसोक्त आनंद घेतला.

यावेळी सुनिल कृ.पारवे,मोहन द.पौळ,अरुण द.नन्नावरे,गणेश सां.व्हरकट,सुनिल ल. धोतरकर,भास्कर ना.बोबडे,सुभाष द. गायकवाड ,माधव म. बामणकर,डिंगबर ह. उंबरकर,संजय पारवे,कुमार दा. मातोळे,लक्ष्मण ग.जाधव,रमेश वि. यादव,दत्ता रा. पाटिल,सुधाकर अं. पारवे,अनिल सु. सलगर,बालाजी द. माने,संजय लि. जाधव,हामीद क.पठाण,बाळासाहेब प्र.पाटिल आदींची उपस्थिती होती.

वेगवेगळ्या क्षेत्रात करिअर करत असताना पुन्हा 32 वर्षांनंतर एकत्र येणं तस अवघडच असत,पण नियोजन करत गेट टू गेदर घडवून आणत गाव परिसरातील तलावाच्या सानिध्यात वनभोजनाचा आनंद घेत गप्पांची मैफिल खूपच मजेत सम्पन्न झाली.

Labels:

Sunday, 3 November 2019

मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे समर्थकांसह राष्ट्रवादीत

जळकोट : मेघराज किलजे  

उस्मानाबाद जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण  सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांच्यासह मनसेच्या पदाधिकार्यांनी मुंबई येथे माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ गटनेते अजीत  पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या ह स्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जाहिर प्रवेश केला.

   
प्रशांत नवगिरे यांचेसोबत महाराष्ट्र
नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे  जिल्हाध्यक्ष महेश जाधव,उपजिल्हाध्यक्ष मल्लिकार्जून कुंभार,मयूर गाढवे,राहूल गायकवाड, मनसे तुळजापूर तालूकाध्यक्ष धनाजी साठे,उपतालूकाध्यक्ष अविनाश कांबळे,  मनविसे तालुकाध्यक्ष रोहित दळवी या पदाधिकार्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहिर प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष सुरेश  बिराजदार व जि.प.सदस्य महेंद्र धुरगुडे उपस्थित होते. प्रशांत नवगिरे यांनी मनसेकडून तुळजापूर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली होती. विधानसभा निवडणूक काही दिवस झाली असताना , समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने उस्मानाबाद जिल्ह्यात मनसे बॅकफूटवर आले आहे.

Labels: ,

Saturday, 2 November 2019

तुळजापूर तालुका ओला दुष्काळ जाहिर करण्याची मागणी


शिवाजी नाईक

तुळजापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचले आहे. सर्वत्र कुर्डू गवताची वाढ झाली आहे.तर खरीप पिके व पाचशे एकरपेक्षा आधिक  द्राक्षे बागाचे नुकसान झाले आहे.खरीप गेले तर रब्बी हंगामाची वाट लागत आहे. हाता तोडांशी आलेला घास हिरावून न्यावा तशीच काहीशी अवस्था  शेतक-यांची झाली आहे. दरम्यान शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी शेतक-यांतुन मागणी आहे.

तुळजापूर तालुक्यात सोयाबीनची 71 हजार 168 हेक्टर पेरणी झाली असुन तालुक्यात 1 हजार हेक्टर द्राक्ष बागा असलयाचे कृषी आधिकारी जी.बी.शेख यानी दिली.यावर्षी पुर्व मोसमी पाऊस म्हणावा तसा झाला नाही. तर पाऊस वेळेवर न झाल्याने पेरण्या लांबल्या. कसेबसे खरीप पिके आले. मात्र दोन आठवडयापासुन पाऊस सुरू असुन नोव्हेंबर उजाडला तरी यावर्षी पावसाळा सुरूच आहे. पाऊस थांबणार तरी कधी असा प्रश्न तुळजापूर तालुक्यातील शेतक-यांना पडला आहे. खरीपातील पिके व फळबागेचे मोठे नुकसान झाले आहे. 
 दरवर्षी शेतकरी रब्बी हंगाम साधण्यासाठी शेतीची मशागत करून आक्मटोबरध्ये पेरणी करतो. मात्र यावर्षी शेतात साचलेले पाणी,कुर्डसारखे गवत व तण वाढल्याचे पाहून शेतकरी हतबल झाला आहे. शासकीय भरीव आर्थिक मदत मिळण्याची शेतक-यातुन मागणी होत आहे. 

परतीच्या पावसाने द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांची पिके पूर्णतः पाण्यात आहेत. या अतिवृष्टीचा सर्वच पिकाना बसला असून, सध्या द्राक्षबाग बहरात असताना, पावसामुळे अतिरिक्त पाणी होऊन, द्राक्ष बागांवर डाऊणी व घडकुजमुळे द्राक्षांचे घड  उद्ध्वस्त होत आहेत. यामुळे द्राक्ष बागायतदार हैराण झाले आहेत.उन्हाळयात द्राक्ष बाग जगविण्यासाठी प्रचंड मेहनत शेतकऱ्यांनी घेतली आहे. परंतु ही मेहनत या रोगामुळे पाण्यात गेली आहे.जळकोट व नळदुर्ग, सावरगाव मंडलातील बहुतांशा द्राक्ष बागा रोगग्रस्त झाल्याचे दिसुन येत आहे.त्यामुळे यंदा द्राक्ष उत्पादनावर प्रचंड परिणाम होणार असल्याचे चित्र आहे. 
  
 तुळजापूर तालुक्यात पावासाची सरासरी 837मि.मी असुन आज अखेर पर्यंत 900मि.मी पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. मंडलनिहाय झालेला पाऊस पुढीप्रमाणे आहे.
तुळजापूर 882 मि.मी,मंगरूळ 719 मि.मी,सावरगांव 888 मि.मी,नळदुर्ग 905 मि.मी,जळकोट 847 मि.मी,सलगरा दिवटी 1105 मि.मी, ईटकळ 866 मि.मी. इतका पाऊस झाला आहे.गतवर्षी तालुक्यात 520.26 मि.मी एवढा पाऊस झाला होता.

संतोष बोबडे, द्राक्ष बागायतदार , सावरगाव ता.तुळजापूर
माझी 24 एकर द्राक्ष बाग आहे. सावरगाव व तुळजापूर मंडलात जवळपास पाचशे एकर द्राक्षबागा आहेत. बागेची ऑक्टोबरमध्ये छाटणी करावी लागते.मात्र सततच्या पावसामुळे छाटणी करता आली नाही.ज्यानी बागेची छाटणी केली,पावसामुळे त्याच्या द्राक्षेचे घड गळुन पडले आहे.

 सौदागर तांदळे, तहसिलदार ,तुळजापूर 


 तुळजापूर तालुक्यातील नुकसानग्रस्त  शेतातील पिकाचे पंचनामा कृषी साहय्यक , तलाठी,ग्रामसेवक यांच्याकरवी सरसकट शुक्रवार दि.१ नोव्हेंबर रोजी सकाळ पासुन सुरु केले आहे.  शेतीचे विमा भरलेल्याना व न भरलेल्या पण नुकसानग्रस्त शेतक-याना लाभ मिळणार आहे. हे पंचनामे तीन दिवसात करणार आहे.

Labels: