तामलवाडी : सर्जेराव गायकवाड
तुळजापुर तालुक्यातील तामलवाडी येथील दोन्ही बाजुच्या पर्यायी रस्त्यावर दोनचाकी, चारचाकी वाहनांचा वेग वाढत असुन अपघात होण्याचा धोका निर्माण झाल्याने या दोन्ही बाजुच्या पर्यायी रस्त्यावर गतिरोधक बसवण्याची मागणी ग्रामस्थांमधुन होत आहे.
राष्ट्रीय महामार्ग हा तामलवाडी गावच्या मध्यभागामधुन गेल्याने गावचे दोन भागात विभाजन झाले आहे. ग्रामस्थांना ये - जा करण्यासाठी दोन्ही बाजुस पर्यायी रस्ते बनवण्यात आले आहेत पुर्वेकडील बाजुस शाळा,ग्रामपंचायत,पोलिस स्टेशन,तलाठी कार्यालय,सर्व शासकीय कार्यालये तर पश्चिम बाजुस,दवाखाने,मोठी दुकाने, मंदिर, मशीद, रस्त्यालगत असलेली घरे व याच बाजुस मुळ गाव असल्याने या दोन्ही पर्यायी रस्त्यावर दररोज गर्दी असते. याच रस्त्यावरून दोनचाकी,चारचाकी वाहनांचा वावर वाढला असुन वाहनचालक वाहने चालवताना अतिवेगाने चालवित असुन यामुळे छोटे अपघात घडले आहेत तसेच मोठा अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी पुर्व बाजुस जुनी बॅंक ऑफ महाराष्ट्र इमारत,पिंपळा रोड,नविन बस थांबा,तसेच पाण्याची टाकी याठिकाणी तर पश्चिम बाजुस मशीद रोड,समृध्दी कापड दुकान,स्वराज अक्वा,तसेच पुढे दोन ठिकाणी गतिरोधक बसवण्याची मागणी ग्रामस्थांमधुन होत आहे.दोन्ही बाजुच्या पर्यायी रस्त्यावर वरील ठिकाणी महामार्गाच्या वरीष्ठ अधिकारी यानी पाहणी करून गतिरोधक बसवुन घ्यावेत जेणेकरून पर्यायी रस्त्यावर सुसाट धावणार्या दोनचाकी,चारचाकी वाहनांचा वेग नियंत्रणात राहुन अपघाताचा संभाव्य धोका कायमस्वरूपी टळणार आहे.
शाळा सुरू झाल्यावर आणखी धोका वाढणार
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्या तरी काही महिन्यांनी शाळा सुरू होणार असुन शाळा सुरू झाल्यास याच रस्त्यावरून विद्यार्थ्यांना ये -जा करीत शाळा गाठावी लागते.ज्यांच्याकडे वाहन परवाने नाहीत अशी काही मुले दोनचाकी गाड्या सुसाट वेगाने चालवत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला असुन या रस्त्यावर गतिरोधक बसवण्याची आवश्यकता असल्याचे संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष सर्जेराव गायकवाड यानी बोलताना सांगितले आहे.
भुयारी मार्गातील लाईट दोन महीन्यापासुन बंद
गावातील ग्रामस्थांना ये - जा करण्यासाठी दोन भुयारी मार्ग बनवले असुन मोठ्या भुयारी मार्गातील लाईट गेली दोन महीन्यापासुन बंद असल्याने भुयारी मार्गात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.रात्री यातुन मार्ग काढताना महीला,मुली,वृध्दांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.या भुयारी मार्गातील लाईट लवकरात लवकर चालु करावी अशी मागणी शिवरत्न सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येत आहे.
Labels: Tuljapur