Sunday, 30 October 2016

नळदुर्ग नगराध्यक्ष पदासाठी ११, तर नगरसेवक पदासाठी ७८ उमेदवारी अर्ज दाखल

📯 *नळदुर्ग नगरपालिका निवडणुक अपडेट* 📢
---------------------------------------------------------

*नळदुर्ग नगराध्यक्ष पदासाठी ११ जणांनी १६, तर नगरसेवक पदासाठी ७८ जणांनी ११९ उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.*

🔸 नगराध्यक्ष पदासाठी रेखा हरिदास जगदाळेे (राष्ट्रवादी कांग्रेस),सुफीयाबेगम सज्जाद अली जाहगीरदार (कांग्रेस),भुमकर संध्याताई सुभाष (भाजप),मंदाकीणी दिलीप कुलकर्णी (भाजप),विमलबाई निवृत्ती काळे (शिवसेना),शेख रजिया बी मक्सूद (एआयएमआय़एम),कुरेशी मुन्वर सुल्ताना निसार (भाजप),शिला किसन दासकर (अपक्ष),बेबी पद्माकर घोडके (अपक्ष),आशा अशोक जगदाळे (अपक्ष) व राठोड सुब्राबाई शिवाजी (अपक्ष) या ११ उमेदवारांचे १६ अर्ज दाखल झाले आहेत.

*नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल केलेले उमेदवार पुढीलप्रमाणे :-*

🔸प्रभाग १ मधून काँग्रेसच्या झिमाबाई राठोड, माणिक राठोड, राष्ट्रवादीकडून छमाबाई राठोड, निरंजन राठोड, भाजपच्या राणुबाई पवार व अजय पवार यांनी उमेदवारी दाखल केली आहे.

🔸 प्रभाग २ मधून काँग्रेसकडून राखी गायकवाड, शब्बीर सय्यद, राष्ट्रवादीकडून भारती बनसोडे, उदय जगदाळे, भाजपाकडून इस्माईल शेख, शिवसेनेकडून विद्या वाघमारे, कमलाकर चव्हाण व एमआयएमकडून खाजापाशा शेख.

🔸 प्रभाग ३ मधून काँग्रेसकडून समदानी कुरेशी, विद्या मुळे, राष्ट्रवादीकडून नितीन कासार, सुमन जाधव, भाजपाकडून पद्माकर घोडके, गुंडुबाई चौधरी, शिवसेनेकडून संतोष पुदाले.

🔸प्रभाग ४ मधून काँग्रेसकडून मंगल सुरवसे, बसवराज धरणे, राष्ट्रवादीकडून सुनंदा जाधव, संजय बताले, भाजपाकडून महानंदा बारुळकर, प्रमोद कुलकर्णी, शिवसेनेकडून अनिता गुरव, मल्लिनाथ कांबळे, एमआयएमकडून नसीम शेख.

🔸 प्रभाग ५ मधून काँग्रेसकडून फक्रोद्दीन मुजावर, सुफियाबेगम मासूलदार, तर राष्ट्रवादीकडून महालिंग स्वामी, असिफाबेगम काझी, भाजपाकडून सादिक बागवान, महानंदा गायकवाड, एमआयएमकडून अ. सलीम बागवान.

🔸 प्रभाग ६ मधून काँग्रेसकडून शहबाज काझी, मन्नाबी कुरेशी, राष्ट्रवादीकडून दौलतबी पल्लीवाले, शब्बीर कुरेशी, भाजपाकडून मुनव्वर सुलताना कुरेशी, जिंदावली शेख, एमआयएमकडून फातिमा कुरेशी, रशीद शेख.

🔸 प्रभाग ७ मधून काँग्रेसकडून नय्यरपाशा जहागीरदार, सुफिया कुरेशी, राष्ट्रवादीकडून अमिनाबी इनामदार, मुश्ताक कुरेशी, भाजपाकडून स्वाती मुळे, सादिक जहागीरदार, एमआयएमचे शबाना कुरेशी, खालेद बागवान.

🔸 प्रभाग ८ मधून काँग्रेसचे मारुती खारवे, वर्षा डुकरे व अमिनाबी शेख, राष्ट्रवादीकडून दयानंद बनसोडे, अंबुबाई दासकर, शाहीन मासूलदार, भाजपाकडून सबुबाई राठोड, उल्कावती वाघमारे, एमआयएमकडून महेमुदा कुरेशी आदींनी फॉर्म भरले आहेत.

याशिवाय अपक्ष म्हणून प्रभाग २ मधून कैलास चव्हाण, आनंद पवार, सचिन शिंदे, रियाज बेग, प्रभाग ३ मधून नवलकुमार जाधव, प्रभाग ५ मधून शंकर पुदाले, विलास पुदाले, असिफाकाझी, सुफिया मासूलदार, प्रभाग ६ मधून मुन्नाबी कुरेशी, सुनंदा गायकवाड, प्रभाग ७ मधून फातेमाबी इनामदार, मुनीर कुरेशी, प्रभाग ८ मधून योगेश बनसोडे, सचिन बनसोडे, लता नाईक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Labels: ,

उस्‍मानाबाद जिल्‍ह्यात मनसेला धक्‍का; जिल्‍हा सचिव अमरराजे परमेश्‍वर यांचा राजीनामा..


तुळजापूर : महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचे उस्‍मानाबाद जिल्‍हा सचिव अमरराजे परमेश्‍वर यांनी आपल्‍या जिल्‍हा सचिव पदाचा राजीनामा दिला आहे. सध्‍या नगरपालिकेच्‍या निवडूण चालू असून ऐन निवडणुकीच्‍या तोंडावर त्‍यांनी राजीनामा दिल्‍याने उस्‍मानाबाद जिल्‍ह्यात मनसेला मोठा धक्‍का बसला आहे.  परमेश्‍वर हे दुस-या पक्षात प्रवेश करतील का? आता परमेश्‍वर हे कोणती भूमिका घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सन 1990 पासून अमरराजे परमेश्‍वर हे मनसेचे काम करत आहेत. सन 2006 ते 2013 या कालावधीत परमेश्‍वर हे मनसेचे उस्‍मानाबाद जिल्‍हाध्‍यक्ष होते. सध्‍या उस्‍मानाबाद जिल्‍ह्यातील नगरपालिका निवडणूक लागल्‍या आहेत. मनसेने सुध्‍दा काही ठिकाणी आपले उमेदवार उभे केले आहेत. मात्र बरेच ठिकाणी पक्षातील निष्‍ठावंत कार्यकर्त्‍यांना संधी न देता मर्जीतील व दुस-या पक्षातील कार्यकर्त्‍यांना संधी देण्‍यात आली आहे. त्‍यामुळे अमरराजे परमेश्‍वर हे नाराज असल्‍यामुळे त्‍यांनी राजीनामा दिल्‍याचे बोलले जात आहे.
गेल्‍या अनेक वर्षापासून उस्‍मानाबाद जिल्‍ह्रयातील मनसेतील काही ठराविक पदाधिकारी मनसे अध्‍यक्ष राज ठाकरे यांची दिशाभूल करुन पक्ष सं‍पविण्‍यात प्रयत्‍न करीत आहेत. जो पर्यंत अशी मंडळी पक्षात ढवळाढवळी करण्‍याचे काम करीत आहेत तो पर्यंत मी पक्षाचे काम करु शकत नाही. निवडणूक लढवायचीच नसेल तर पक्षाचे कार्य करण्यात काय अर्थ ? तसेच निष्‍ठेने काम करणा-या मनसैनिकांना उमेदवारी न देता परक्‍यांना उमेदवारी देणे कितपर्यंत उचित आहे, या कारणामुळे मी माझ्या पदाचा राजीनामा देत असल्‍याचे अमरराजे परमेश्‍वर यांनी सांगितले.

Labels:

Monday, 3 October 2016

आज तिसरी माळ... श्री तुळजाभवानी देवीची आजची नित्योपचार पूजा

अश्विन शु २ शके १९३८
सोमवार दि ०३.१०.२०१६
आज तिसरी माळ...
श्री तुळजाभवानी देवीची आजची नित्योपचार पूजा
www.tuljapurlive.com

Labels:

Sunday, 2 October 2016

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. चव्हाण उद्या उस्मानाबादेत

उस्मानाबाद : माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण हे उद्या सोमवार दि. 3 ऑक्टोबर रोजी उस्मानाबाद दौ-यावर येत आहेत. यावेळी आगामी होणा-या नगरपालिका, जि.प. व पं.स. निवडणुकीबाबत खा. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे...

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण हे उदया उस्मानाबाद दौ-यावर  येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे :-  दि. 3 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता लातूरहून तुळजापूरकडे प्रयाण, साडे अकरा वाजता तुळजापूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन. त्यानंतर दुपारी बारा वाजता खा. चव्हाण हे श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतील.

त्यानंतर दुपारी दोन वाजता उस्मानाबाद येथे खा. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आगामी होणा-या नगरपालिका, जि.प. व पं.स. निवडणुक पुर्वतयारी बैठक होईल. त्यानंतर पाच वाजता उस्मानाबाद शहरातील समर्थ लाॅज येथे पत्रकार परिषद, तसेच साडेपाच वाजता छायादीप लाॅन्स येथे कार्यकर्ता मेळावा संपन्न होईल.. त्यानंतर रात्री साडे आठ वाजता खा. चव्हाण हे सोलापूरकडे रवाना होतील...
http://www.tuljapurlive.com

Labels: ,

*सोलापूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस*

सोलापूर, दि. ०२ : मागील तीन वर्षापासून दुष्काळाचा सामना करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या वर्षी पावसाने चांगलाच जोर धरला आहे़ आतापर्यंत ८१ टक्के पावसाची नोंद झाली आहे़ याशिवाय उजनी धरण १०० टक्के भरण्याच्या वाटेवर असल्याने धरण परिसरातील शेतकऱ्यांतून आनंद व्यक्त होत आहे़

जिल्ह्यात पुष्य व उत्तरा नक्षत्राच्या पावसाने सर्वत्र पाणी-पाणी झाले असताना हस्त नक्षत्रातही संततधार सुरू झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ८१ टक्के पाऊस पडला असून, सततच्या पावसाने खरीप पिकांना धोका तर ज्वारीच्या पेरणीला विलंब होणार आहे. सोलापूर जिल्ह्यात यावर्षी पाऊस समाधानकारक पडला आहे. १९ ते २९ जुलै दरम्यान जिल्ह्याचा जवळपास सर्वच भागात कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडला होता. त्याअगोदर व नंतर काही भागातच पाऊस पडला. त्यानंतर १३ ते २६ सप्टेंबर या कालावधीत सगळीकडे पाऊस पडला. तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा जिल्ह्यात संततधार सुरू झाली आहे. आॅगस्ट महिन्यात दीड महिना पाऊस नसल्याने खरिपाची काही पिके गेली होती तर उत्तराच्या संततधार पावसाने आलेली काही पिके पाण्यात गेली. खरिपाची तूर अन्य काही वाचलेली पिके चांगली असली तरी हस्त नक्षत्राच्या पावसाने राहतील की नाही हे सांगता येत नाही. यामुळे शेतकरी वर्ग दोन्ही बाजूने संकटात सापडला आहे.

🌀 *जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस*

सोलापूर जिल्ह्यात एकूण पावसाळ्यात ५३७७ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित आहे. ३० सप्टेंबरपर्यंत ४३६३ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात ४४५६ मि.मी. पाऊस पडला आहे. जिल्ह्यात ३० सप्टेंबरअखेर एकूण ४४५६ मि.मी. तर सरासरी ४०५ मि.मी. पाऊस पडला. याची टक्केवारी ८१.१५ इतकी येते. उत्तर तालुक्यात ९०.५५ टक्के, दक्षिण तालुक्यात ८८.९६ टक्के, बार्शीत ८२.७३ टक्के, अक्कलकोटमध्ये ७०.६२ टक्के, मोहोळ तालुक्यात ५५.९३ टक्के, माढा तालुक्यात ९२.३३ टक्के, करमाळ्यात ७२.३७ टक्के, पंढरपूर तालुक्यात ६७.९९ टक्के, सांगोला तालुक्यात १०९.९२ टक्के, माळशिरसमध्ये १०९.३० टक्के तर मंगळवेढा तालुक्यात ६५.४९ टक्के पावसाची नोंद झाली.
__________________________________

Labels:

तुळजापूर लाईव्ह ✏ हेडलाईन्स

🙏🌺 *शुभ सकाळ* 🌹🌷
🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅
*तुळजापूर लाईव्ह ✏ हेडलाईन्स*
www.tuljapurlive.com
✍🏻 *वृत्तसंकलन :- विकास नाईक*
Whatsapp no. :- 7249713739

*ता. 2 ऑक्टोबर 2016*        *वार : रविवार*
---------------------------------------------------------
☀ अहमदनगर : उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान; शासकीय जागेवरील कुटूंबाना मालकी हक्काचे उतारे देण्यास टाळाटाळ, राज्यातील प्रशासकीय अधिका-याविरुद्ध श्रावणबाळ माता-पिता सेवा संघाच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात लवकरच अवमान याचिका दाखल करणार - राजेन्द्र निंबाळकर...

☀ तुळजापूर : श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवराञ महोत्सवास 'उदो उदो' च्या जयघोषात घटस्थापनेने प्रारंभ... तुळजापूरात भाविकांची मांदीयाळी; पडत्या पावसात भाविकांचा महापूर...

☀ तुळजापूर : घटस्थापनेच्या पहाटे भवानी रस्त्यावर दर्शन रांगेत गाेंधळ निर्माण होऊन बॅरिकेड्सची मोडतोड झाली. या गोंधळात १० भाविक जखमी झाले...

☀ उस्मानाबाद : शहरातील कसबा राम मंदिरातील श्रीराम, सीता व हनुमानाच्या तांब्याच्या मूर्तीची चोरी..

☀ उस्मानाबाद : येरमाळा येथील श्री येडेश्‍वरी देवी मंदिरात शनिवारी रात्री मानकर्‍यांच्या हस्ते घटनस्थापना होवून देवीच्या शारदीय नवरात्रोत्वसास प्रारंभ...

☀ तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने शेतक-यांना फक्त 10 रूपयात भोजन, विजयादशमीला शुभारंभ...

☀ उस्मानाबाद : जिल्ह्यात पावसाने गाठली सरासरी, पावसाचे दमदार पुनरागमन, तेरणा प्रकल्प शंभर टक्के भरले...

☀ सोलापूर : सोन्याच्या तस्करीच्या संशयातून झोन स्कॉडने राजस्थानच्या दोन व्यक्‍तींकडून 47 लाख 52 हजार 480 रुपये किमतीचे 2 किलो 75 ग्र्रॅम 590 मिलीग्रॅमचे सोन्याचे दागिने केले जप्त...

☀ लातूर जिल्ह्यात नदी-नाल्यांना पूर, अनेक गावांचा रस्ता बंद, आठ मंडळांत अतिवृष्टी, मांजरा धरणाचे सहा दरवाजे उघडले, मासे पकडताना तरुण वाहून गेला...

☀ लातूर : सोलापुर-नांदेड रस्ता बंद. मुसळधार पावसाने मांजरा नदिला पुर आल्याने वाहतूक बंद; जनजीवन विस्कळीत...

☀ पनवेल तालुक्यातील आदिवली गावातील गोदामावर छापा टाकून ग्राहकांची दिशाभूल करुन विक्रीसाठी तयार असलेले ९४ लाख ६६ हजार रुपयांचे खाद्यतेल जप्त..

☀ उस्मानाबाद : लातूर विभागीय शालेय धनुर्विधा स्पर्धेवर उस्मानाबादचे वर्चस्व...

☀ सातारा : डी मार्टजवळ पुण्याकडे येणाऱ्या कारला कंटेनरची धडक, कारमधील महिलेचा मृत्यू. चार जण गंभीर जखमी...

☀ सिंधुदुर्ग : कणकवलीतील प्रसिद्ध साहित्यिक, दंतचिकित्सक डॉ. विद्याधर करंदीकर यांचे ह्रृदयविकाराच्या धक्क्याने निधन...

☀ सर्व अनधिकृत धार्मिक स्थळे जमीनदोस्त करा - मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला आदेश....

☀ पाक कलाकार भारतात का आणावे लागतात?, पाक कलाकारांपेक्षा भारतीय निर्माते दोषी- राज ठाकरे...

☀ शिवसेना गोव्यात २० जागा लढवणार, गोव्यातील जनतेला पर्याय देण्यासाठी शिवसेना सज्ज - संजय राऊत...

☀ लातूर : पुरामुळे लेंडी नदीवरील पूल वाहून गेला, रस्ता बंद, रेणापूर येथील सेवादासनगर तांड्यात पाणी शिरलं...

☀ कोलकाता कसोटी : दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, न्यूझीलंडचे ७ गडी बाद १२८ धावा, भारताची सामन्यावर मजबूत पकड...
- - - - - - - - - --  ✨- - - - - - - - -
🙏 *विकास नाईक* ♈
⚡ *Whatsapp no. - 7249713739*
____________________________
www.tuljapurlive.com

Labels:

घटस्थापनेने श्रीतुळजाभवानी देवीजींचा नवरात्र महोत्सवास प्रारंभ

उस्मानाबाद -:  महाराष्ट्राची कुलस्वामीनी आणि शक्तीदेवता श्रीतुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास तुळजापूर येथे शनिवारी धार्मिक वातावरणात प्रारंभ झाला. श्रीतुळजाभवानी मंदिरात पहाटे पारंपारिक पध्दतीने श्रीदेवीजींची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर दुपारी 12 वाजता श्रीतुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते विधीवत घटस्थापना करण्यात आली. मंत्रोच्चार, आई राजा उदो उदोचा जयघोष आणि संबळाच्या साथीने सर्व पूजाविधी  करण्यात आले.
यावेळी मंदिरातील पहिल्या दिवसाच्या मुख्य पूजा पार पडली. त्यानंतर घटकलशांची पारंपरिक पध्दतीने पूजा करण्यात आली आणि गोमुख तीर्थापासून या घटकलशांची मिरवणूक काढण्यात आली. मंदिरातील गाभाऱ्यात तसेच खंडोबा मंदिर, यमाईदेवी मंदिर, टोळभैरव आणि आदीमाया आदीशक्ती या मंदिरांमध्ये जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे आणि त्यांच्या पत्नी प्रियंका भगत-नारनवरे यांच्या हस्ते  घटस्थापना करण्यात  आली.
मंदिर व्यवस्थापन आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असून भाविकांनी शिस्तबध्द पध्दतीने व धार्मिक वातावरण कायम राखून दर्शन घ्यावे. कुठलीही अडचण असल्यास तात्काळ नजिकच्या पोलीस स्टेशन अथवा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी घटस्थापनेनंतर केले. त्यांनी यावेळी सर्व भाविकांना शारदीय नवरात्र महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
प्रतिवर्षाप्रमाणे या उत्सवासाठी महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश आणि कर्नाटक या राज्यातूनही मोठ्या प्रमाणात  भाविक तुळजापूर नगरीत दाखल झाले आहेत. आज हजारो भाविकांनी श्रीभवानी मातेचे दर्शन घेतले. वेगवेगळया गावातूनही अनेक युवक भवानी ज्योत घेवून जाण्यासाठी तुळजापूरकडे येतानाचे चित्र दिसत होते.
नवरात्र महोत्सवानिमित्त मंदिर संस्थान, पोलीस प्रशासन, नगरपालिका, तहसील कार्यालय यांच्यासह आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा, एस.टी. महामंडळ आदि विभागांनीही भाविकांच्या सोयीसाठी विविध सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. भाविकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा आणि गैरसोय टाळावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मंदिरातील धार्मिक कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांच्यासह महंत तुकोजीबुवा, महंत चिलोजीबुवा, पाळीकर पुजारी मंडळ, उपाध्ये मंडळ, भोपे पुजारी मंडळाचे पदाधिकारी,प्रांताधिकारी अभयसिंह मोहिते,तहसिलदार तथा मंदिर संस्थानचे व्यवस्थापक सुजित नरहरे, तुळजापूर तहसिलदार दिनेश झांपले,भूमचे तहसिलदार सुरेंद्र देशमुख, मंदिर संस्थानचे सहायक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी याशिवाय भोपे, पुजारी, आराधी, गोंधळी व भाविक मोठ्या संख्येने  उपस्थित होते.

Labels: