Sunday, 30 June 2013

हरितक्रांतीचे प्रणेते, मुख्‍यमंत्री वसंतराव नाईक यांच्‍या जयंतीनिमित्‍त कार्याचा आढावा

मानवता, न्‍याय व समतेसाठी झुंज देणारे जे महामानव झाले, त्‍यात वसंतराव नाईक यांचे अगक्रमाने आहे. हरितक्रांतीचे शिल्‍पकार व बंजारा समाजाला आधुनिक जगाची ओळख करुन देणा-या तसेच सतत अकरा वर्ष महाराष्‍ट्राचे मुख्‍यमंत्री पद भूषविलेल्‍या दिवंगत मुख्‍यमंत्री वसंतराव नाईक यांची सोमवार दि. 1 जुलै रोजी 100 वी जयंती सर्वत्र विविध कार्यक्रमाने साजरी केली जात आहे. हरित क्रांतीचे प्रणेते, थोर नेते वसंतराव नाईक यांच्‍या कार्याचा आढावा...
वसंतराव नाईक यांचा जन्‍म बंजारा समाजामध्‍ये सौ. होनुबाई फुलसिंग नाईक यांच्‍या पोटी दि. 1 जुलै 1913 रोजी गहुली (ता. पुसद, जि. यवतमाळ) या गावी झाला. वसंतराव नाईक यांचे आजोबा चतुरसिंग (राठोड) नाईक यांनी गहुली हे गाव वसविले. चतुरसिंग हे तांड्याचे प्रमुख होते. म्‍हणून त्‍यांना लोक नाईक म्‍हणत. वसंतरावाचे बालपण गहुली गावीच गेले. त्‍यांचे प्राथमिक शिक्षण पोहरादवी, उमरी, भोजला, बान्‍सी या ठिकाणी झाले. त्‍या काळी वाहनांची सोय नसल्‍यामुळे ते चार-पाच मैल चालत जाऊन मोठ्या जिद्दीने व कष्‍टाने शिक्षण घेतले. पुढे महाविद्यालयीन शिक्षण अमरावती व नागपूर येथे पूर्ण केले. तत्‍कालीन नागपूर जुन्‍या मध्‍यप्रदेशाची राजधानी होती. नागपूर शहराचे प्रभाव वसंतरावांच्‍या जिवनात फार महत्‍त्‍वाचे ठरले. तेथे त्‍यांच्‍यात अमुलाग्र बदल होत गेला. वाचनाची उदंड आवड निर्माण होवून महात्‍मा फुले व अन्‍य समाजसुधारकांचे वाचन केले. त्‍यांनी नागपूरच्‍या मॅरिश कॉलेजमध्‍ये प्रवेश घेतला. या महाविद्यालयात विविध जातीचे धर्माचे विद्यार्थी होते. त्‍यांचा त्‍यांच्‍याशी संपर्क आला. त्‍यातूनच समाजिक कार्याची आवड निर्माण होत गेली. मुळातच लहानपणापासून चाणाक्ष बुध्‍दी व वाकपटुता अंगी असल्‍याचे पुढील व्‍यक्‍तीवर प्रभाव पडत असे. सन 1933 साली नागपूर येथील नील सिटी हायस्‍कूलमधून मॅट्रिक परीक्षा वसंतराव नाईक उत्‍तीण झाले. 
नागपूर विद्यापिठातून सन 1937 साली बी.ए. ची पदवी घेतली. पुढे 1940 साली नागपूर विद्यापीठ विधी महाविद्यालयातून एल.एल.बी शिक्षण घेऊन कायद्याची पदवी मिळवली. सन 1941 साली प्रारंभी अमारावतीचे प्रख्‍यात वकील कै.बॅ. पंजाबराव देशमुख यांच्‍याबरोबर व नंतर पुसद येथे स्‍वतंत्रपणे वकीली व्‍यवसायास सुरुवात केले. सर्वांचे विरोध पत्‍करुन दि. 16 जुलै 1941 रोजी त्‍यांनी बाह्मण समाजातील वत्‍सला घाटे हिच्‍याशी आंतरजातीय विवाह केला. दोघांच्‍याही परिवारातुन आंतरजातीय विवाहास कडाडुन विरोध होता. दोघानीही समाजाची पर्वा न करता समाज परिवर्तनाचा हा मार्ग त्‍यांनी निर्माण केला. वकीली व्‍यवसायात त्‍यानी दिन-दुबळ्या, गोर-गरिबांना मदतीचा हात देऊन विविध अडचणीतून बाहेर काढण्‍याचे प्रयत्‍न केले. यात त्‍यांना मोठे यश आले.
    डॉ. पंजाबराव देशमुख या नेत्‍यांच्‍या मार्गदर्शनाखाली एक धडाडीचे समाज कार्यकर्ता म्‍हणून वसंतराव नाईक यांची संपूर्ण यवतमाळ जिल्‍ह्यात ख्‍याती पसरली. या काळात शेतक-यांच्‍या फायद्याचे 74 कलम पास व्‍हावे, यासाठी शेतक-यांत मिळून प्रचार केला. सन 1943 साली पुसद कृषी मंडळाचे अध्‍यक्ष म्‍हणून त्‍यांची निवड झाली. सन 1946 मध्‍ये त्‍यांनी कॉंग्रेस पक्षामध्‍ये प्रवेश केला. वसंतराव नाईक यांचे राजकारण हे मूळक्षेत्र नसताना देखील जनमानसाच्‍या‍ विश्‍वासातून सन 1950 पर्यंत तालुका अध्‍यक्ष म्‍हणून निवड करण्‍यात आली. याचवर्षी पुसद हरिजन मोफत वसतीगृहाचे व दिग्रस राष्‍ट्रीय मोफत छात्रालयाचे नाईक हे अध्‍यक्ष होते. त्‍यावेळी विदर्भ प्रतिक अध्‍यक्ष बियागीकडे होते. सन 1946 मध्‍ये पुसद नगरपालिका निवडणुकीमध्‍ये कॉंगेसच्‍यावतीने निवडणुक लढविली त्‍यात वसंतराव नाईक विजयी होवून त्‍यांची पुसद नगरपालिकेचे नगराध्‍यक्ष म्‍हणून निवड झाली. त्‍यावेळी झालेल्‍या निवडणुकीत वसंतराव नाईक हे 12 हजार मतांनी निवडून आले. यवतमाळ जिल्‍ह्याचे प्रतिनिधी म्‍हणून मध्‍यप्रदेश विधानसभेवर निवडून आले तसेच मध्‍यप्रदेश मंत्रिमंडळात महसूल उपमंत्री झाले. सन 1951 साली ते मध्‍यप्रदेश सहकारी मध्‍यवर्ती बँकेचे संचालक होते. याचवर्षी विदर्भ प्रदेश समितीचे व कार्यकारिणीचे सदस्‍यपदी निवड झाली. सन 1956 साली भाषावार प्रांत रचना होईपर्यंत त्‍यांनी उपमंत्रीपदाची धुरा सांभाळली. त्‍यांनी महसूल खात्‍याची जबाबदारी अत्‍यंत हुशारीने पार पाडली. दि. 1 नोव्‍हेंबर 1956 रोजी द्विभाषीक मुंबई राज्‍याच्‍या मंत्रीमंडळात सहकार, कृषी, दुग्‍धव्‍यवसाय या खात्‍याचे मंत्री म्‍हणून त्‍यांचा समावेश झाला. त्‍यावेळी यशवंतराव चव्‍हाण हे मुख्‍यमंत्री होते. अखिल भारतीय कॉंग्रेसचे तसेच महाराष्‍ट्र विभागीय कॉग्रेस समितीचे व कार्यकारणीच्‍या सदस्‍यपदी त्‍यांची निवड झाली.
    सन 1955 साली वसंतराव नाईक यांनी यवतमाळ जिल्‍ह्यातून व विदर्भातून हजारो एकर जमीन भुदानासाठी मिळवून दिले. याच कालावधीमध्‍ये इंदिरा गांधी व डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्‍या हस्‍ते पाच हजार एकराचे भुदान केले. तत्‍पुर्वी अखिल भारतीय कॉंग्रेस अध्‍यक्ष यु.एन. टेंबर यांच्‍या हस्‍ते पुसद तालुक्‍यातील सात हजार एकर जमीन भुदान केले. सन 1957 च्‍या दुस-या सार्वत्रिक निवडणुकीत त्‍यांचे निकटचे प्रतिस्‍पर्धी दत्‍तराम देशमुख यांचा अठरा हजार मतांनी पराभव केला व त्‍यांची पुसद मतदार संघातून दुस-यांदा निवड होवून यशवंतराव चव्‍हाण यांच्‍या मंत्रीमंडळात वसंतराव नाईक यांची कृषी मंत्री म्‍हणून निवड करण्‍यात आली. तेंव्‍हापासून कृषी क्षेत्रात परिवर्तनाला सुरुवात झाली. सन 1958 साली जपानला गेलेल्‍या आंतरराष्‍ट्रीय राईस कमिशनच्‍या भारतीय शिष्‍टमंडळात समावेश करण्‍यात आला व त्‍यांनी जपानला भेट दिली. टोकीयो येथे एफ.ए.ओ. च्‍या बैठकांना ते हजर होते. ते दि. 14 सप्‍टेंबर 1959 ला चीन सरकारच्‍या निमंत्रणावरुन चीन भेटीला रवाना झाले. त्‍यानंतर त्‍यांनी सन 1958 साली जपानचा दौरा केला.सन 1959 साली गोर-गरीबांच्‍या मुलांना शिक्षणाची सोय व्‍हावी म्‍हणून, फुलसिंग नाईक मह‍ाविद्यालयाची पुसद येथे स्‍थापना केली.  दि. 1 मे 1960 रोजी मराठी भाषेचे महाराष्‍ट्र राज्‍य अस्तित्‍वात आले. राज्‍याच्‍या पहिल्‍या मंत्रिमंडळात वसंतराव नाईक महाराष्‍ट्राचे महसुलमंत्री होते. त्‍याच काळात म्‍हणजे दि. 3 सप्‍टेंबर 1960 रोजी नाईक यांचे वडील फुलसिंग नाईक यांचा मृत्‍यू झाला. ही बातमी समजताच हे पुसदला निघाले, रस्‍त्‍याने जाताना दुष्‍काळी कामाबाबत अधिका-यांना सूचना देत वडिलांच्‍या मृत्‍यूपेक्षा गोर-गरीब जनतेचे दुःख मोठे आहे, असे समजून यवतमाळ जिल्‍ह्याचा दुष्‍काळी दौरा केला. सन 1962 साली झालेल्‍या निवडणुकीत त्‍यांच्‍या प्रतिस्‍पर्धी सौ. नलिनीबाई यांचा 17 हजार मतांनी नाईक यांनी पराभव केला व पुसद मतदारसंघातून तिस-यांदा निवड होवून त्‍यांची पुन्‍हा महसूल मंत्री म्‍हणून निवड करण्‍यात आली.
    यशवंतराव चव्‍हाण हे भारताचे संरक्षणमंत्री झाले. त्‍यामुळे महाराष्‍ट्राच्‍या मुख्‍यमंत्रीपदाचे सुत्रे दादासाहेब कन्‍नमवार यांच्‍या हाती आले. परंतु एक वर्षानंतर म्‍हणजे 1963 साली दादासाहेब कन्‍नमवार यांचे निधन झाल्‍यामुळे वसंतराव नाईक यांची बहुमताने मुख्‍यमंत्रीपदी निवड झाली. सन 1964 साली त्‍यांनी युगोस्‍लाव्हिया या देशाचा दौरा केला. सन 1966 साली एक नवा इतिहास महाराष्‍ट्रात घडला, ते म्‍हणजे 1 मे रोजी मराठी ही भाषा महाराष्‍ट्राची भाषा म्‍हणून घोषित करण्‍यात आली व महाराष्‍ट्र राज्‍याचा कारभार मराठी भाषात सुरु झाला. सन 1965 साली भारत-पाक संघर्ष सुरु होताच दि. 9 ते 11 सप्‍टेंबरला मुंबईत स्‍फूर्तिदायक व मार्गदर्शक भाषणे दिली. त्‍यामुळे महाराष्‍ट्रात चैतन्‍यदायी वातावरण निर्माणे झाले. नंतर काही महिने युध्‍द सज्‍जतेसाठी त्‍यांनी महाराष्‍ट्राचा दौरा केला. याच वर्षी शेती उत्‍पादनाच्‍या नव्‍वा कार्यक्रमाचा प्रचार करण्‍यासाठी महाराष्‍ट्रातील 25 जिल्‍ह्यांचा दौरा त्‍यांनी केला. सन 1966 साली अवर्षणामुळे भयंकर परिस्थिती निर्माण झाली होती. संकटात सापडलेल्‍या शेतक-यांना हिंमत देण्‍यासाठी राज्‍यातील दुष्‍काळ जिल्‍ह्यांत झंझावती दौरा त्‍यांनी केला.
    सन 1967 साली सार्वत्रिक निवडणुकीच्‍या प्रभावी प्रचारासाठी महाराष्‍ट्रात दौरा केला. या निवडणुकीत विधानसभेवर पुसद मतदारसंघातून चौथ्‍यांदा निवड होवून दि. 6 मार्च 1967 ला महाराष्‍ट्राच्‍या मुख्‍यमंत्री पदावर दुस-यांदा वसंतराव नाईक यांची एकमताने निवड झाली.    कृषी क्षेत्राविषयी अत्‍यंत आवड असल्‍यामुळे नाईक यांच्‍या प्रयत्‍नामुळे 15 लाख टन धान्‍य अधिक उत्‍पादन वाढले. त्‍यातून दि. 19 एप्रिल 1969 साली पंजाबराव कृषी विद्यालयाची स्‍थापना करुन शेतकी व्यवसायात भर टाकण्‍यात मदत केली. 10 मे 1968 रोजी गुन्‍हेगारांना मुक्‍त जगता, यावे यासाठी पहिले खुले कारागृह पैठण येथे स्‍थापन केले व गुन्‍हेगारांना माणूस म्‍हणून जगण्‍यास मार्ग दाखविला. सन 1970 साली शहरी जीवनात वाढ व्‍हावी, गोरगरीब मध्‍यमवर्गीयाना शहरात नौकरी करता यावी, म्‍हणून शासनातर्फे लोकांच्‍या मदतीला हातभार म्‍हणून 18 मार्च रोजी सिडकोची स्‍थापना केली. त्‍यातून लोकांना निवारा मिळाला. याचवर्षी अमेरिकेच्‍या निमंत्रणावरुन अमेरिकेचा दौरा व युरोपीय देशांना भेटी त्‍यांनी दिले. सन 1972 साली पुन्‍हा सार्वत्रिक निवडणुकीच्‍या प्रचारासाठी राज्‍यभर दौरा करुन पुसद मतदार संघातून वसंतराव नाईक यांची पाचव्‍यांदा निवड होवून दि. 14 मार्च 1972 ला महाराष्‍ट्राच्‍या मुख्‍यमंत्रीपदी तिस-यांदा निवड झाली. सन 1972 ते 1973 साली राज्‍यात दुष्‍काळाची परिस्थिती निर्माण झाली. लोकांचे भुकेने बेहाल, जनावरांचा चारा यासारख्‍या गंभीर समस्‍या नाईक यांच्‍या समोर आ वासून उभ्‍या होत्‍या. मात्र त्‍या अडचणीवर त्‍यांनी मात करुन विविध कामे सुरु केली. मजुरदार लोकांना सुगडी खाण्‍यास देऊ केले. विविध योजना राबवून जनतेला दिलासा दिला. राज्‍यातील नऊ जिल्‍ह्यातील दुष्‍काळ हा देशातील इतर कोणत्‍याही भागातील दुष्‍काळापेक्षा अधिक तीव्र स्‍वरुपाचा होता. त्‍यावेळी त्‍यांनी प्रत्‍येक जिल्‍ह्यात फिरुन दुष्‍काळी कामाला मोठ्याप्रमाणावर चालना दिली. दि. 20 फेब्रुवारी 1975 साली वसंतराव नाईक यांनी मुख्‍यमंत्री पदाचा राजीनामा दिला. दि. 12 मार्च 1977 साली वसंतराव नाईक यांनी वासीम मतदार संघातून खासदार म्‍हणून लोकसभेवर निवडून गेले. वसंतराव नाईक केंद्रात जावूनही जनतेला विश्‍वासात घेऊन विविध विकास कामे पार पाडली. डोंगर कपारीत व रानोमाळ भटकणा-या बंजारा समाजाला आधुनिक जगाची ओळख करुन दिली. समाज जागृतीचा पहिला अध्‍याय त्‍यांनी समाजाला दिला. त्‍यांचे हे विचार बंजारा समजापुरते मर्यादित न राहता प्रत्‍येक जाती, धर्म, विविध समाजात पोहचले आणि प्रत्‍येक ठिकाणी एक माणुस म्‍हणून पुढं यावे, हीच त्‍यांची इच्‍छा होती. दि. 18 ऑगस्‍ट 1979 रोजी वसंतराव नाईक व सौ. वत्‍सला नाईक या उभयंतांनी सिंगापूर यात्रा करत असताना वसंतराव नाईक यांचे 66 व्‍यावर्षी निधन झाले.

शिवाजी नाईक
संपादक 
तुळजापूर लाईव्‍ह
मो. 9657684370 
email : shivajinaik22@yahoo.in

Labels: ,

मतदार यादीबाबत मतदारांना आवाहन

सोलापूर -: सोलापूर जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघात सध्या फोटो मतदार यादी अद्ययावत करणेचे काम चालु आहे. या अंतर्गत ज्यांची नांवे मतदार यादीत आहेत. परंतु फोटो नाहीत अशा मतदारांचे फोटो मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बी. एल. ओ.) यांचे मार्फत गोळा करताना काही मतदार मतदार यादीत नमुद पत्यावर रहात नसल्याचे आढळून आलेले आहे.
    अशा मतदारांची त्याचप्रमाणे मयत, दुबार, स्थलांतरीत मतदारांची नांवे http://solapurr.nic.in या वेबसाईटवर पहाणेसाठी उपलब्ध होते. http://solapurr.nic.in या वेबसाईटवर गेल्यानंतर निवडणूक या पर्यायावर जावून आपले विधानसभा नंबर यादी भाग नंबर टाकुन फॉर्म 7 निवडल्यानंतर मतदार यादीतून वगळणी केलेले मतदारांचे नावांची यादी पहाता येईल. आपले नांव वगळणीचे यादी नसल्याची मतदारांनी खात्री करावी.
    या बाबत हरकत असेल तर आपण आपले भागातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बी. एल. ओ.) यांचेशी अथवा संबंधित विधानसभा मतदार संघातील तहसिलदारांशी संपर्क साधावा व आपला फोटो त्यांच्या कार्यालयात जमा करावा. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बी. एल. ओ.)  यांचे नावाची यादी व त्यांचे दूरध्वनी नंबर वेबसाईटवर उपलब्ध असून आपण नेहमी ज्या मतदान केंद्रावर मतदान करता त्या मतदान केंद्राचे दरवाज्यावर लिहिलेले आहेत. तरी सर्व मतदारांनी याची नोंद घ्यावी. आपले नाव वगळले जाणार नाही याची दक्षता घ्यावी. त्याप्रमाणे आपणास स्वत:हून छायाचित्र जमा करावयाचे असलेस संबंधित तहसिलदार कार्यालयात जमा करावेत असे आवाहन जिल्हाधिकारी सोलापूर यांनी केले आहे.

Labels:

स्वयंसेवी संस्थांना आवाहन

सोलापूर -: महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाची, प्रकल्पाधारीत सेंद्रिय शेती योजना सन 2013-14 मध्ये सोलापूर जिल्ह्यातील निवडक गावात स्वयंस्फूर्तीने कार्य करणा-या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून राबविण्याचे प्रस्तावित आहे. त्याकरीता सेंद्रिय शेती योजनेत सहभागी होऊ इच्छिणा-या स्वयंसेवी संस्था, अशासकीय संस्था, मित्रमार्गदर्शक संस्था, कृषि विज्ञान केंद्र, स्वयंसहाय्यता गट प्रमुख यांनी संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सोलापूर कार्यालयातील एच. ए. हंजगीकर यांना भ्रमणवनी क्र. 7588001386 वर संपर्क साधावा.

Labels:

शेतक-यांचा मुख्‍यमंत्री

सर्वाधिक काळ महाराष्‍ट्राचे मुख्‍यमंत्रीपद भुषविणारे दिवंगत मुख्‍यमंत्री वसंतराव नाईक यांच्‍या कारकिर्दीचा गौरवाने उल्‍लेख केला जातो. त्‍यांच्‍या कारकिर्दीत घडलेल्‍या धवलक्रांती आणि हरितक्रांतीने राज्‍यातील शेतकरी आणि शेतीशी संबंधितांचे अवघचे जीवनच बदलले. त्‍यांनी शेती क्षेत्रात घडविलेल्‍या बदलांची फळे आपण आजही चाखत आहोत. आधुनिक राहणीमुळे प्रसिध्‍द असलेले वसंतराव नाईक त्‍यांच्‍या ऐतिहासिक निर्णयांसाठीही कायमचे स्‍मरणात राहतील. सोमवार दि. 1 जुलै रोजी त्‍यांची 100 वी जयंती साजरी होत असून त्‍यांच्‍या जयंतीनिमित्‍तांना विशेष लेख....
    बंद गळ्याचा कोट, तोंडात चिरुट, चमकदार सोनेरी चष्‍मा, शिकारीची आवड अशा प्रकारे बाहेरुन आधुनिक वाटणा-या माजी दिवंगत मुख्‍यमंत्री वसंतराव नाईक यांचे व्‍यक्‍तीमत्‍त्‍व विचाराने आणि कृतीने मात्र पुर्णतः मराठमोळे होते. शेती आणि शेतकरी, ग्रामीण भागातील महत्‍त्‍वाचे प्रश्‍न हा त्‍यांच्‍या सततच्‍या चिंतनाचा आणि जिव्‍हाळ्याचा विषय होता. नागपूरच्‍या मॉरिस महाविद्यालयातून पदवी प्राप्‍त केल्‍यानंतर त्‍यांनी कायद्याचीही पदवी मिळविली. बंजारा समाजातील पहिले वकील असा त्‍यांचा लौकिक होता. डॉ. पंजाबराव देशुख यांच्‍यासारख्‍या नामवंत कायदे पंडिताच्‍या हाताखाली त्‍यानी वकिली सुरु केली. मात्र केवळ वकिलीत अडकून न राहता त्‍यांनी स्‍वतःच्‍या बंजारा समाजामध्‍ये सुधारणा केली. इथूनच त्‍यांच्‍या सामाजिक आणि राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. यानंतर पुसर नगरपालिकेचे अध्‍यक्ष, आमदार, उपमंत्री, मंत्री आणि त्‍यानंतर मुख्‍यमंत्री अशी त्‍यांची कारकीर्द उत्‍तरोत्‍तर वृध्‍दीगंत होत गेली. ग्रामीण भागातील हा नेता महाराष्‍ट्रात सर्वाधिक काळ मुख्‍यमंत्री पदावर राहिला, याचे श्रेय त्‍यांचा प्रामाणिकपणा, लोकप्रियता आणि कामावरील निष्‍ठा यालाच द्यावे लागेल.
    नागरपूरच्‍या नील सिटी हायस्‍कूलमधून वसंतरावांनी मॅट्रीक उत्‍तीर्ण केले. याच काळात त्‍यांना वाचनाची आवड निर्माण झाली. त्‍यांनी हरीभाऊ आपटे आणि नाथमाधव अशा कादंबरीकारांच्‍या साहित्‍यकृतींचे वाचन केले. या दोन साहित्‍यकारांसोबतच महात्‍मा फुले, साने गुरुजी यांच्‍या विचार व साहित्‍याचा पगडा वसंतरावांवर होता. अस्‍पृश्‍यता निवारण, स्‍त्री शिक्षण, समाजजागृती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सामाजिक लढा त्‍याचबरोबर महात्‍मा फुले, डॉ. आंबेडकर आणि डेल कार्नेजी यांच्‍या आचार-विचार आणि कार्याचा त्‍यांच्‍यावर प्रभाव पडला. यामुळे त्‍यांच्‍या मनात सामाजिक कार्याची प्रेरणा रुजली.
    एकीकडे सामाजिक, राजकीय कार्य तर दुसरीकडे शेती आणि शेतकरी हे त्‍यांच्‍या केवळ जिव्‍हाळ्याचे नव्‍हे तर अभ्‍यासाचेही विषय होते. शेतीच्‍या जिज्ञासेपोटी त्‍यांनी तालुक्‍यातील शेतीत अनेक सुधारणा घडवून आणल्‍या. महाराष्‍ट्राच्‍या आर्थिक, कृषी, औद्योगिक, सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रावर स्‍वतःचा असा ठसा उमटविणारा हा नेता या राज्‍याचा सर्वात जास्‍त काळ मुख्‍यमंत्री होता. खंड न पाहता मुख्‍यमंत्री पदावर सलग अकरा वर्षापेक्षा अधिक काळ हा मान त्‍यांच्‍या लोकप्रियतेमुळेच मिळू शकला.
    वसंतरावांनी आपल्‍या प्रदीर्घ कारकिर्दीत अनेक महत्‍त्‍वाचे निर्णय घेतले. या ठाम निर्णयांनतूच राज्‍याला विकासाची भक्‍कम दिशा देण्‍याची भूमिका त्‍यांनी पार पाडली. त्‍यांनी शेती आणि शेतक-यांचे प्रश्‍न, समस्‍या यांना सर्वाधिक प्राधान्‍य‍ दिले. राज्‍यात मोठ्या प्रमाणात घेतल्‍या जाणा-या कापूस, ज्‍वारी, भात या पिकांची खरेदी एकाधिकार पध्‍दतीने खरेदी करण्‍याचा निर्णय घेतला त्‍यांची अंमलबजावणीही केली. दुधाबाबत परावलंबी असलेल्‍या राज्‍याला त्‍यांनी दूध उत्‍पादनात अग्रेसर केले. सं‍करित गायी खरेदी करुन दुग्‍ध उत्‍पादन वाढविण्‍यासाठी शेतक-यांना बँकांच्‍या माध्‍यमातून कर्जपुरवठा करण्‍याची व्‍यवस्‍था केली. त्‍यामुळे हरितक्रांती प्रमाणेच धवलक्रांतीचे रेयही वसंतरावांनच द्यावे लागेल.
    आज देशभरात राबविली जाणारी आणि गोरगरीबांच्‍या, गरजूंच्‍या हाताला निश्चितपणे काम देणारी व लोकप्रिय ठरलेली रोजगार हमी योजना वसंतरावांच्‍याच कार्यकाळात सुरु झाली. त्‍यांच्‍या काळत या योजनेतून असंख्‍य विहीरी, तलाव खोदले गेले. गावागावात पोहचणारे रस्‍ते निर्माण झाले. या 'ग्रास रुट' च्‍या योजना राबविताना पारंपारिक शेतीला आधुनिकतेची जोड मिळावी, कृषी उत्‍पादनाच्‍या बाबतीत प्रगत राष्‍ट्रांशी स्‍पर्धा करण्‍यासाठी शेतक-यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि पीक पध्‍दतीची माहिती मिळावी, यासाठी राज्‍यात चार कृषी विद्यापिठांची स्‍थापना केली, हे केवळ वसंतरावांच्‍या कृषीविषयक ध्‍ेययधोरणांमुळेच घडू शकले.
    मराठवाड्यामधील पैठण येथे राज्‍यातील पहिले खुले कारागृह सुरु करणा-या वसंतरावांची दृष्‍टी किती आधुनिक होती, हे दिसून येते. मटका, जुगार आदी प्रकारांना आळा बसावा, यासाठी त्‍यांची राज्‍य शासनाची लॉटरी सुरु केली. वसंतरावांनी 14 फेब्रुवारी 1964 रोजीच मराठी ही राज्‍याची राज्‍यभाषा राहील, असा महत्‍त्‍वपूर्ण निर्णय घेतला. त्‍यानंतर 1965 मध्‍ये 'पुढच्‍या दोन वर्षात महाराष्‍ट्र अन्‍नधान्‍याच्‍या बाबतीत स्‍वयंपूर्ण झाला नाही तर मला फाशी द्या', असे त्‍यांनी जाहीररित्‍या सांगितले. त्‍यांच्‍या या वाक्‍याप्रमाणे त्‍यांनी बरोबर दोन वर्षात राज्‍याला अन्‍नधान्‍याच्‍या बाबतीत स्‍वयंपूर्ण करुन दाखविले. अशी ही प्रातिनिधिक उदाहरणे असली तरी राज्‍याच्‍या एकूण प्रगतीच्‍या दृष्‍टीनं त्‍यांची कामगिरी खूपच महत्‍त्‍वाची आहे.
    आपल्‍या प्रदीर्घ कारकिर्दीत त्‍यांनी राज्‍याचा चेहरामोहराच बदलून टाकला. शेती, महसूल, राज्‍यभाषा, दारुविक्री, सरकारी यंत्रणेला कार्यप्रवण करणे यासोबतच अवर्षण, दुष्‍काळ या नैसर्गिक आपत्‍तींवर मात करण्‍यासाठी त्‍यांनी कठोर परिश्रम घेतले. मुख्‍यमंत्री म्‍हणून वसंतरावांनी जी छाप सोडली, तीच छाप त्‍यांनी संसदेत खासदार म्‍हणूनही सोडली. अत्‍यंत सौजन्‍यशील, नम्र, सुसंस्‍कृत, शांत स्‍वभावाचा हसतमुख नेता म्‍हणून त्‍यांचा लौकिक होता. त्‍यांच्‍या याच गुणांवर त्‍यांनी इंदिरा गांधी व लाल बहादुर शास्‍त्री या जेष्‍ठ नेत्‍यांबरोबरचे अत्‍तम संबंध निर्माण झाले होते. आधुनिक पेहराव आणि राहणीमान असलेला, पण ख-या अर्थाने शेतक-यांचा कैवारी असलेला असा हा नेता होता. त्‍यांनी आखून दिलेल्‍या मार्गावरुनच महाराष्‍ट्राची मार्गक्रमणा सुरु आहे.

साभार : लोकराज्‍य
शब्‍दांकन : सतिश लळीत

Labels:

Saturday, 29 June 2013

बेकायदेशिररित्‍या पिस्‍टल व काडतूसे बाळगणा-या दोघास अटक

उस्‍मानाबाद -: पिस्‍टल व काडतुसे याची बेकायदेशीररित्‍या येडशी (ता. उस्‍मानाबाद) येथे विक्री करीत असताना पोलिसांनी सापळा रचून दोन इसमांना ताब्‍यात घेवून गजाआड केले. ही घटना आज शनिवार दि. 29 जून रोजी घडली असून ही कारवाई दरोडा प्रतिबंधक पथकाने केली आहे.
    प्रतीक मधुकर चौधरी (रा. येडशी, ता. उस्‍मानाबाद), बाबुराव विठोबा भोसकर (रा. सापनाई, ता. कळंब) असे अटक करण्‍यात आरोपींचे नाव आहे. दरोडा प्रतिबंधक पथकाचे पोलीस कर्मचारी गुन्‍ह्यातील मालाचा शोध घेत असताना एका गुप्‍त खब-यामार्फत माहिती मिळाली की, येडशी येथील राहणारे दोन इसमांनी कोठून तरी पिस्‍टल व त्‍याचे काडतूस आणलेली आहेत व ते विक्री करण्‍यासाठी येडशी चौकात थांबले असल्‍याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली असता, वरील आरोपींना ताब्‍यात घेवून त्‍यांची झडती घेतली. यावेळी बाबुराव भोसकर यांच्‍या कंबरेस खोवलेली एक देशी बनावटीचे पिस्‍टल व पाच काडतुसे मॅगझीनसह मिळून आले. त्‍यांच्‍याकडे पिस्‍टलबाबत विचारपुस केली असता, त्‍यांच्‍याकडे पिस्‍टणे बाळगणेबाबत कोणताही परवाना (लायसन्‍स) नसल्‍याचे सांगून उडवाउडवीचे उत्‍तरे त्‍यांनी दिली. त्‍यावरुन त्‍याना ताब्‍यात घेवून उस्‍मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्‍यात आर्म अँक्‍ट कलम 3, 5/25 व जमाब बंदी कायदा कलम मु.पो.का. 135 प्रमाणे गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Labels:

उत्तराखंड : मृतांची संख्या तब्बल १० हजारांवर, विधानसभा सभापतींची माहिती

अलमोरा :- ढगफूटी आणि महापूरात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या १० हजारांवर जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती उत्तराखंड विधानसभेचे सभापती गोविंदसिंह कुंजवल यांनी आज शनिवार रोजी दिली.
      यासंदर्भात गोविंदसिंह कुंजवल म्हणाले, की मी गढवाल भागाला भेट दिल्यानंतर मला वाटले होते, की मृतांची संख्या ४ ते ५ हजारांच्या घरात असेल. परंतु, आता मला मिळालेल्या माहितीनुसार आणि लोकांनी बघितलेल्या मृतदेहांनुसार मृतांची संख्या सुमारे १० हजारांवर जाण्याची दाट शक्यता आहे.
       मृतांची संख्या सांगण्यास हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांनी नकार दिला असून, सुमारे हजार नागरिक नैसर्गिक संकटात मृत्युमुखी पडले असावेत असे सांगितले आहे. राडारोडा काढल्यानंतर मृतांची नेमकी संख्या आपल्याला समजेल असेही त्यांनी सांगितले आहे.
      मृतदेह कुजत असल्याने रोगराई पसरण्याची शक्यता गृहित धरून तातडीने पावले उचलण्यात येत आहेत, असेही कुंजवल यांनी सांगितले आहे.

आई-वडिलांचा शोध न लागल्याने महिलेची आत्महत्या
केदारनाथच्या तिर्थयात्रेला गेलेल्या आई-वडिलांचा शोध न लागल्याने व्यतित झालेल्या एका ३५ वर्षिय महिलेने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. मुळच्या मध्य प्रदेशच्या असलेल्या या महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. १५ जून रोजी तिचे आई-वडिलांसोबत मोबाईल फोनच्या माध्यमातून संभाषण झाले होते. परंतु, त्यानंतर आई-वडिलांसोबत तिचा संपर्क होऊ शकला नाही. या महिलेचा पती तिच्या आई-वडिलांचा शोध घेण्यासाठी केदारनाथला गेला आहे. 

Labels:

ग्रामसभेचे निमंत्रण आता एसएमएसद्वारे - सतेज पाटील

मुंबई : माहिती तंत्रज्ञानाच्या युगात लोकांना दवंडीद्वारे दिले जाणारे ग्रामसभेचे निमंत्रण प्रभावहीन ठरल्यामुळे यापुढे आता ग्रामसभेचे निमंत्रण गावातील लोकांना एसएमएसद्वारे देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे, अशी माहिती ग्रामविकास राज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली.
    भारतात संसद, विधिमंडळ व ग्रामसभा या संस्थांच्या माध्यमातून निर्णय प्रक्रिया राबविली जाते. ग्रामसभा हा लोकशाहीतील सर्वात महत्त्वाचा पायाभूत घटक असून तेथील निर्णय प्रक्रियेत लोकांचा सहभाग वाढविण्यासाठी त्यांची उपस्थिती आवश्यक असल्याचेही ते यावेळी म्हणाले. यासाठी ग्राम पंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या व भारत निर्माण योजनेतील नेमणूक केलेल्या स्वयंसेवकाच्या सहाय्याने ग्रामसेवकामार्फत सर्व मतदारांचे भ्रमणध्वनी जमा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. गावपातळीवरील संग्राम कक्षाची मदत घेऊन ग्रामसभेबाबत तसेच ग्रामपंचायतीकडे इतर महत्त्वाच्या सूचना भ्रमणध्वनीद्वारे एसएमएस पाठविण्याबाबतची कार्यवाही ग्रामपंचायत करणार आहे. यासाठी डेटा एंट्री ऑपरेटर, तालुका व जिल्हा स्तरावरील संग्रामकक्ष पूर्ण सहकार्य करणार आहे. राज्यातील सर्व ग्रामसेवक व डेटा एंट्री ऑपरेटर यांना भ्रमणध्वनीद्वारे व विविध उपलब्ध संकेतस्थळावरुन लघु संदेश पाठविण्याकरिता तालुका पातळीवर गटविकास अधिकारी प्रशिक्षण देणार आहे.
    ग्रामसभेच्या सूचना सर्व ग्रामस्थांना एसएमएसद्वारे देण्यात येणार आहेत. ग्रामपंचायतीच्या हद्दीतील मतदारांनी नवीन भ्रमणध्वनी क्रमांक मिळविल्यास त्याची माहिती ग्रामपंचायतीकडील संग्राम कक्षाकडे द्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. सदरचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा सांकेतांक क्रमांक 201306271357286820 असा आहे.

Labels:

वसंतराव नाईक यांच्‍या जयंतीनिमित्‍त सोमवारी उस्‍मानाबदेत कृषिनिष्ठ शेतक-यांचा सत्कार

उस्मानाबाद  -: राज्य शासनाचा कृ‍षि विभाग व जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने  सोमवार दि. 1 जुलै रोजी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त कृषि दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यात जिल्ह्यातील कृषिनिष्ठ शेतक-यांचा पुरस्कार देवून गौरव करण्यात येणार आहे. 
     राज्याचे  पशुसंवर्धन, दुग्धविकास  व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार असून खा.डॉ. पद्मसिंह पाटील उदघाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत. उस्‍मानाबाद येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या डीपीडीसी हॉलमध्ये दुपारी 2 वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
    या कार्यक्रमात जिल्हा परिषद स्तरीय कृषिनिष्ठ शेतकरी सन 2011-12 साठी अशोक चौपाटे, विलास झिंगाडे, रमेश टेकाळे, प्रियंका चेडे, सचिन इतापे, सतिष सोमवंशी यांना तर सन 2012-13 साठीचा पुरस्कार रामेश्वर पाटील, सतिष तवले,शहाजी कागदे, तात्यासाहेब गोरे,मोहन करपूरे, नरेंद्र माने, उमाकांत जाधव आणि अर्जुन देवकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास  जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, राज्य परिवहन  महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे, आ.राहूल मोटे, आ. राणा  जगजितसिंह पाटील,  आ. दिलीपराव देशमुख, आ. सतीष चव्हाण, आ. विक्रम काळे, आ. ज्ञानराज चौगुले, आ. ओमराजे निंबाळकर,  जिल्हाधिकारी डॉ. के. एम.  नागरगोजे, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एल. हरिदास, जि.प. उपाध्यक्ष संजय पाटील दुधगांवकर, विविध विषय समित्यांचे  सभापती धनंजय सावंत, दगडु धावारे, सविता कोरे तसेच  अति. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. हजारे आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
     या कार्यक्रमास बहुसंख्येनी उपस्थित राहण्याचे आवाहन
सल्याचे जिल्हा परिषदेचे कृषि व पशुसंवर्धन सभापती पंडित जोकार, कृषि विकास अधिकारी एम.एस. मिनीयार आणि जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.

Labels:

आय.टी. आय. प्रवेशासाठी 8 जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज करावा

उस्मानाबाद :- औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उस्मानाबाद येथे डि.जी.ई. टी नवी दिल्ली, केंद्र शासनाने खालील व्यवसाय अभ्यासक्रमास मान्यता दिली आहे. इच्छुक  विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमासाठी  ऑनलाईन प्रवेश दि. 8 जुलैच्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत घेण्याचे आवाहन औद्यागिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य बी. एस. गायकवाड यांनी केले आहे.
    एक वर्ष मुदतीचे अभ्यासक्रम- सुतारकाम, संधाता, मेसन, फळे व भाज्या संस्करण, फळे व भाज्या संस्करण (अल्पसंख्याक), ड्रेसमेकींग (मुलीसाठी), ड्रेसमेकींग (मुलीसाठी अल्पसंख्याक), हेअर ॲड स्किन केअर (मुलीसाठी), हेअर ड स्किन केअर मुलीसाठी (अल्पसंख्याक), कोपा, डिटीपीओ, सेक्रेट्रीयल प्रॅक्टीस, सीओइ सेंटर ऑफ एक्सलन्स अंतर्गत्‍प्रॉडक्शन मॅन्युफॅक्चरींग सेक्टर.
    दोन वर्षाचे अभ्यासक्रम - विजतंत्री, तारतंत्री, यांत्रिक मोटारगाडी, एमआरएसी, एमआरटीव्ही, जोडारी , पेंटर (जनरल), मशिनिष्ट आणि  यांत्रिक विजक हे अभ्यासक्रम असून  या अभ्यासक्रमासाठी व अधिक माहितीसाठी www.dvet.gov.in व www.maharojgar.gov.in  या संकेतस्थळाचा वापर करुन आपले अर्ज ऑनलाईन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Labels:

गैर न्यायिक सदस्यपदी मुकुंद सस्ते

उस्मानाबाद -: जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, कार्यालयात नवनियुक्त गैर न्यायिक सदस्य या पदावर मुकुंद भगवान सस्ते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच रिक्त असलेल्या अध्यक्ष  या  पदाचा अतिरिक्त कार्यभार जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, लातूरच्या  श्रीमती ए. जी.  सातपुते यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
       तसेच जिल्हा ग्राहक तक्रार  निवारण मंच उस्मानाबाद येथील न्यायकि कामकाज हे दरमहा पहिले दोन आठवडे चालणार असल्याची माहिती कार्यालय प्रमुख कृष्णा गेठे, प्रबंधक, जिलहा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद यांनी दिली आहे.  

Labels:

ठाणबंध शेळी पालनासाठी अर्ज करण्याचे आवाहन

उस्मानाबाद :- ग्रामीण स्वयंरोजगारासाठी अंशत:  ठाणबंध शेळीपालन योजनेअंतर्गत 10+1 शेळी  गट वाटप ही नाविण्यपुर्ण राज्यस्तरीय योजना जिल्हयात राबविण्यात येणार आहे. या योजनेत शेळया व बोकड खरेदी, शेळ्यांचा विमा, शेळ्यांचा वाडा, खाद्यांची व पाण्यासाठी भांडी, आरोग्य सुविधा आदि बाबीसाठी खर्च करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त, उस्मानाबाद यांनी दिली आहे.
    या योजनेसाठी लाभार्थी हा दारिद्रय रेषेखालील असावा, अत्यल्प भुधारक  शेतकरी  (1 हेक्टरपर्यंतचे भूधारक शेतकरी), अल्प भूधारक शेतकरी (1 ते 2 हेक्टरपर्यंतचे भूधारक असावा), सुशिक्षित बेरोजगार  (रोजगार व स्वयंरोगजार केंद्रात नाव नोंदणी केलेली असावी), महिला बचत गटातील लाभार्थी  ( 1 ते 4 लाभार्थी असावी ).
       एका गटाची किंमत 87 हजार 857 असून सर्वसाधारण योजनेसाठी 26 लाभधारकांची निवड करुन 50 टक्के अनुदान व अनु. जातीच्या लाभार्थ्यांना 75 टक्‍के अनुदान देण्यात येणार आहे.  इच्छुक लाभार्थ्यांनी शेळीपालनांसाठी  आपले अर्ज 20 जुलै पर्यंत पाठवावा. अर्जाचा नमुना पशु विकास अधिकारी (विस्तार ) पंचायत समिती यांच्याकडे उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.                            

Labels:

संकरीत दुधाळ गाय व म्हैस पालनासाठी अर्ज करण्याचे आवाहन

उस्मानाबाद :- शासनातर्फे दुध उत्पादनास चालना देण्यासाठी  संकरित दुधाळ गायी/ म्हशीचे गट वाटप ही नाविण्यपुर्ण योजना पशुसंवर्धन विभागामार्फत उस्मानाबाद जिल्हयात राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त, उस्मानाबाद यांनी दिली.
     या योजनेअंतर्गत दुधाळ 6 जनावरे खरेदी, जनावरांचा विमा, जनावरांचा गोठा, कडबा कुटटी यंत्र, खाद्य साठवणूकीचे शेड आदिसाठी  एका गटांसाठी  3 लाख 35 हजार 184  खर्च करण्यात येणार असून  या योजनेसाठी लाभार्थी हा दारिद्रय रेषेखालील असावा, अत्यल्प भुधारक  शेतकरी  (1 हेक्टरपर्यंतचे भूधारक शेतकरी), अल्प भूधारक शेतकरी (1 ते 2 हेक्टरपर्यंतचे भूधारक असावा), सुशिक्षित बेरोजगार  (रोजगार व स्वयंरोगजार केंद्रात नाव नोंदणी केलेली असावी), महिला बचत गटातील लाभार्थी  ( 1 ते 4 मधील लाभार्थी असावी ).
        या योजनेसाठी सर्वसाधारण योजनेअंतर्गत 22 लाभार्थ्यांची निवड करुन 50 टक्के अनुदान व अनु. जातीच्या 20 लाभार्थी निवडीचे उददीष्ठ देण्यात आले असून या लाभार्थ्यास 75 टक्‍के अनुदान देण्यात येणार आहे.  इच्छुक लाभार्थ्यांनी गायी, म्हशीपालनांसाठी  आपले अर्ज 20 जुलै पर्यंत पाठवावा. अर्जाचा नमुना पशु विकास अधिकारी (विस्तार ) पंचायत समिती यांच्याकडे उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

Labels:

उस्‍मानाबाद जिल्हयात शस्त्रबंदी व जमावबंदी

उस्मानाबाद :- जिल्ह्यात  येत्या  14 जुलैपर्यंत  मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. यासंदर्भात अप्पर जिल्हादंडाधिकारी संजय गायकवाड  यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, उपरोक्त कालावधीत जिल्हयात नागरीकांना शस्त्र किंवा तत्सम वस्तु बाळगण्यास अथवा त्यांची वाहतूक करण्यात बंदी राहील.
    आवेशी भाषणे, अंगविक्षेप, विडंबनात्मक नक्कला करता येणार नाही.  सभ्यतेस व नितिमत्तेस बाधा येईल किंवा अराजकता माजेल अशी चित्रे, नकाशे, घोषणा फलक, चिन्ह आणि अशा अन्य वस्तु जवळ बाळगता येणार नाहीत. व्यक्ति किंवा समुहाच्या भावना जाणूनबुजून दुखविण्याच्या उद्देशाने वाद्य वाजविता येणार नाही अथवा गाणी म्हणता येणार नाहीत. तसेच पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तिंना एकत्र येण्यास, सभा घेण्यास किंवा मिरवणूका काढण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचा भंग करणा-यांविरुध्द कायदेशिर कार्यवाही करण्यात येईल. हे आदेश 30 जुन ते  14 जुलै  रोजीच्या  मध्यरात्रीपर्यंत लागू राहील.                                        

Labels:

सेवानिवृत्तीनिमित्त फुलारी यांचा 2 जुलै रोजी निरोप समारंभ

उस्मानाबाद :- अपर  जिल्हाधिकारी ज्ञानोबा फुलारी हे दि. 30 जुन रोजी  सेवानिवृत्त होत असून महसूल अधिकारी आणि महसूल कर्मचारी संघटनेतर्फे  दि. 2 जुलै रोजी दु. 4 वाजता परिमल मंगल कार्यालय येथे निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व कार्यालय प्रमुख, विविध कार्यालयीन संघटनांचे अध्यक्ष ,पदाधिकारी, सदस्य आणि प्रसिध्दी माध्यम प्रतिनिधींनी या कार्यक्‌रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन उस्मानाबाद जिल्हा राजपत्रित अधिकारी महासंघाच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांनी केले आहे.

Labels:

अपु-या पावसावरच पेरणीला सुरुवात

कळंब -: उस्‍मानाबाद जिल्‍ह्यातील कळंब व वाशी तालुक्‍यात अपु-या पावसावर अवलंबूनच बळीराजाने पेरणीला सुरुवात केली आहे.
    कळंब तालुक्‍यातील ईटकूर, कोठाळवाडी, खोंदला, आथर्डी, पाथर्डी, गंभीरवाडी या गावच्‍या शिवारात तसेच वाशी तालुक्‍यातील मांडवा, गोजवडा, तांदुळवाडी, लखनगाव, दसमेगांव, झिन्‍नर, पिंपळगाव (लिं), सारोळा, सेलू, पारा आदी गावांच्‍या शिवारात पेरणीला सुरुवात झाली असून केवळ दोन दिवसाच्‍या छोट्या पावसावर भरवसा ठेऊन ही पेरणी शेतक-यांनी केली आहे. खरीप हंगामातील या पेरणीमध्‍ये प्रामुख्‍याने खरीप ज्‍वारी, तूर, सोयाबीन, सुर्यफूल, मका, उडीद या पिकांबरोबर कपाशी लागडवाडीलाही सुरुवात झाली आहे.
    कळंब व वाशी तालुक्‍यात सोयाबीन या नगदी पिकांच्‍या पेरणीवर शेतक-यांनी भर दिला आहे. आणखीन एकही मोठा पाऊस झाला नाही. त्‍यामुळे मोठ्या पावसाची प्रतिक्षा बळीराजाला आहे.

Labels:

‘हिरकणी कक्ष’ उपक्रम आपल्या संस्कृतीचाच एक भाग : गावडे

सांगोला -: मातेला आपल्या देशाच्या संस्कृतीत उच्च स्थान दिलेले आहे. मातेला संरक्षण मिळावे यासाठी राज्य परिवहन महामंडळाने सुरु केलेला ‘हिरकणी कक्ष’ हा उपक्रम आपल्या संस्कृतीचाच एक भाग असल्याचे मत पोलीस निरिक्षक दयानंद गावडे यांनी व्यक्त केले.
    सांगोला बसस्थानकावर ‘हिरकणी कक्षा’चे उद्घाटन गावडे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, अनेक माताभगिनी बसस्थानकावर येतात. आपल्या तान्हुल्याची भूक भागवताना त्यांना संकोच वाटतो. त्यासाठी महामंडळाने अशा माताभगिनींसाठी सुरु केलेला हा उपक्रम म्हणजे माताभगिनींची सेवा करण्यासाठीच आहे. या उपक्रमाचा लाभ माताभगिनींना होणार आहे असे सांगून बसस्थानकावर टवाळगिरी करणार्‍यांचा बंदोबस्त करण्यासाठी आपण सक्षम असून लवकरच 24 तास पोलीस बसस्थानकासाठी देणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रारंभी आगार व्यवस्थापक एल.डी.जाधव यांनी या कक्ष स्थापनेविषयी आपली भूमिका मांडून जिल्ह्यातील पहिल्यांदाच अशा प्रकारचा कक्ष स्थापन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अशोक क्षीरसागर यांनीही आपले विचार व्यक्त केले. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख मधुकर बनसोडे, युवा अध्यक्ष अनिल निंबाळकर, रमेश देशपांडे, अरुण बोत्रे, सतीश सावंत, भारत कदम, अरुण जगताप, प्रकाश महाजन आदींसह मान्यवर उपस्थित होते. आभार प्रदर्शन बाबासाहेब बनसोडे यांनी मानले.

Labels:

फेसबुक युझर्संना वाय-फाय फुकटात

जर तुम्‍ही फेसबुकचा वापर करणा-यांपैकी असाल तर तुमच्‍यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण लवकरच तुम्‍हाला वाय-फाय सोय अगदी फुकटात मिळणार आहे. सोशल नेटवर्किंग वेबसाईटनेच असा प्रस्‍ताव पुढे आणला असुन प्रायोगिक पातळीवर याची सुरुवात झाली आहे. छोट्या उद्योगाच्‍या ठिकाणी ही सेवा देण्‍याचा विचार असून युझर्संना केवळ फेसबुकच्‍या वापरासाठी वाय-फाय सेवा देण्‍यात येणार आहे. एखाद्या कॉफी शॉपमध्‍ये किंवा अन्‍य ठिकाणी तुम्‍ही वाय-फायद्वारे फेसबुकचा वापर करु शकता. यासाठी रुट लिंक फेसबुकद्वारेच उपलब्‍ध करुन दिली जाणार आहे. युझरला फेसबुकचा वापर करायचा असेल तर संबंधित कॉफी शॉपच्‍या फेसबुक पेजद्वारे तुम्‍ही फेसबुकवर दाखल होवू शकता. याद्वारे संबंधित उद्योजकांच्‍या पेजला लाइक्‍स मिळण्‍याची शक्‍यता असल्‍याचे फेसबुकने म्‍हटले आहे.

Labels:

देहू-आळंदीचा परिसर वारकर्‍यांनी गजबजला, पालखी प्रस्थानाची तयारी पूर्ण

पुणे - श्रीक्षेत्र देहू आणि आळंदीचा संपूर्ण परिसर विठुरायाच्या गजराने दुमदुमत असून राज्यभरातून लक्षावधी वारकर्‍यांचे आगमन येथे झाले आहे. आज (शनिवार) देहूमधून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होणार असून पालखी सोहळ्याचा मंगलमय प्रवास सुरू होणार आहे. त्यापाठोपाठ उद्या (30 जून) रोजी संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचे प्रस्थान आळंदी येथून होणार आहे. पालखी सोहळ्यात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेण्यात येत असून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Labels:

नळदुर्ग व परिसरात शिक्षणाचे तीन तेरा

नळदुर्ग शहर व परिसरात शिक्षणाचे तिन तेरा वाजले असून दर्जेदार शिक्षणाकरीता आपल्‍या पाल्‍यासह अनेक कुटुंबियांनी बाहेरगावी स्‍थलांतर केले आहे. त्‍यामुळे शिक्षणावर शासनाकडून होणारा लाखो रुपयांचा खर्च कुचकामी ठरत आहे. शिक्षणासाठी दररोज नळदुर्गमधून बाहेरगावी जाणा-या विद्यार्थ्‍यांचा लोंढा जिल्‍हाधिका-यांनी लक्ष घालून थांबविण्‍याची मागणी शिक्षणप्रेमी नागरिकांतून केली जात आहे. 
       नळदुर्ग शहरामध्‍ये जिल्‍हा परिषद व खासगी संस्‍थांच्‍या शाळा असून बहुतांश शाळेमध्‍ये  गुणवत्‍तापूर्वक शिक्षणाचे धडे दिले जात नाही. तर अनेक शाळेत परिपूर्ण अभ्‍यास घेतला जात नसल्‍याची धक्‍कादायक माहिती उघडकीस आली आहे. विद्यार्थ्‍यांना स्‍वाध्‍यायपुस्तिका, गृहपाठ दिले जात नाहीत किंवा परिपूर्ण तपासले जात नाहीत. यामुळे या परिसरातील विद्यार्थ्‍यांची गुणवत्‍ता वाढण्‍यास शिक्षक, पालक जबाबदार असल्‍याची प्रतिक्रिया व्‍यक्‍त केली जात आहे. शिक्षण व शिक्षकांवर क्षेत्रिय अधिका-यांचे म्‍हणावे तितके लक्ष नाही. त्‍याचा परिणाम गोर-गरीब व मागासवर्गीय विद्यार्थ्‍यांच्‍या शिक्षणावर पर्यायाने त्‍यांच्‍या भविष्‍यावर होत आहे, ही एक चिंतेची बाब आहे.
        अनेक जिल्‍हा परिषद शाळेमध्‍ये नौकरीस असलेल्‍या शिक्षकांचे मुले, संबंधित कर्मचारी व नोकरवर्गांचे मुले इतरत्र नावाजलेल्‍या खासगी शाळेत शिक्षण घेत आहेत. नळदुर्ग शहरामध्‍ये जिल्‍हा रिषदेच्‍या मुला-मुलींच्‍या शाळेची वेगवेगळी भव्‍य इमारत असून त्‍या इमारतीला साजेल असे विद्यार्थ्‍यांची संख्‍या म्‍हणावी तितकी नाही. हे त्‍या इमारतीचे दुर्भाग्‍य आहे. सदर इमारत बांधकामासाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्‍यात आले आहे. विद्यार्थ्‍यांच्‍या गळतीचे नेमके कारण शोधण्‍याची गरज निर्माण झाली आहे. शिक्षणाची गुणवत्‍ता नसल्‍याने या शाळेकडे विद्यार्थ्‍यांचा येण्‍याचा वेग कमी झाला आहे. याला येथील शिक्षक व क्षेत्रिय अधिकारीच जबाबदार असल्‍याची संतापजनक प्रतिक्रिया नागरिकांतून व्‍यक्‍त केली जात आहे. या शाळेमध्‍ये गुणवत्‍तापूर्ण शिक्षण दिले तर विद्यार्थ्‍यांचे या शाळेकडे येण्‍याची संख्‍या वाढेल. नळदुर्ग मधील जि.प. प्रशाला मुलांची मुलींची या दोन्‍ही शाळेला राज्‍य पत्रित मुख्‍याध्‍यापकाचे पद आहे. पण दोन्‍हीही जागा रिक्‍त आहेत. शाळेतील जेष्‍ठ शिक्षकाकडे मुख्‍याध्‍यापकाचे काम देवून शाळेचे कामकाज पूर्ण करीत आहेत. त्‍यामुळे शिक्षकांवर अंकुश नाही, विद्यार्थ्‍यांवर वचक नाही. त्‍यामुळे गुणवत्‍ता राहिली नाही. शाळेतील शिक्षक विद्यार्थ्‍यांला शिकविण्‍यापेक्षा शैक्षणिक राजकारण करीत असल्‍याचे सर्वश्रूत आहे. याकडे अधिकारी दूर्लक्ष करीत आहेत. प्रथमतः शिक्षकांत गुणवत्‍ता आल्‍याशिवाय विद्यार्थ्‍यांमध्‍ये सुधारणा होणार नाही.
        एकेकाळी शिक्षकाला ‘गुरुजी’ म्‍हणून सन्‍मानाची वागणूक दिली जात असे. कारण त्‍या काळी गुरुजी हे विद्यार्थी प्रिय शिक्षक होते व अध्‍यापनावर तन, मनाने जीव तोडून विद्यार्थी घडवित होते. मात्र अलीकडच्‍या काळात एकेकाळचा गुरुजी आज ‘सर’ म्‍हणून मिरविताना दिसत आहे. त्‍याचबरोबर विद्यार्थी घडविण्‍याऐवजी स्‍वहित पाहून इतर उद्योगात मग्‍न असल्‍याचे दिसून येत आहे. यामुळे ख-या गुणवत्‍तेकडे दुर्लक्ष केले जात आहे. विद्यार्थ्‍यांचे हित पाहून जिल्‍हापरिषद शिक्षण विभागाने अनेक शाळेत बायोमेट्रीक यंत्रणा बसविले आहे. त्‍याचा हेतू शिक्षक कर्मचारी वेळेवर हजर राहून पूर्ण वेळ शाळेत शिकविणे गरजेचे आहे. त्‍यातूनच काही महाभागानी पळवाट शोधली आहे. बायोमेट्रीक यंत्रच नादुरुस्‍त करणे, कनेक्‍शन तोडणे, चालू न ठेवणे यासारखे प्रकार काही ठिकाणी उघडकीस आले आहे.
        प्राथमिक शाळेतील शिक्षकांकडे वर्गाव्‍यतिरिक्‍त अनेक शाळेतील कामे करावे लागतात. यामध्‍ये विद्यार्थ्‍यांची विविध माहिती, शालेय पोषण आहाराचे काम, विद्यार्थी लाभाच्‍या योजना, अचानक इतर अधिका-यांनी सांगितलेली कामे करावी लागतात. पण माध्‍यमिक शाळेत प्रत्‍येक विषयाला विषय शिक्षक असते. लिपीक असतो. तीन-तीन शिपाई असतात. एवढी यंत्रणा असूनही माध्‍यमिक शाळेतील विद्यार्थ्‍यांची म्‍हणावी तशी गुणवत्‍ता व शाळेतील विद्यार्थी संख्‍या नाही. याला येथील शिक्षकच जबाबदार आहेत. याकडे शाळा समितीने व गावातील शिक्षणप्रेमी नागरिकांनी, लोकप्रतिनिधींनी लक्ष देवून माध्‍यमिक शाळेंची गुणवत्‍ता सुधारण्‍यासाठी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
      नळदुर्ग शहरातील जवळपास तीनशे ते चारशे विद्यार्थी गेल्‍या अनेक वर्षापासून येथून जवळच असलेल्‍या जवाहर विद्यालय अणदूर येथे शिक्षणासाठी जात आहेत. हे दृश्‍य आजकालचे नसून गेल्‍या अनेक वर्षापासून हा विद्यार्थ्‍यांचा लोंढा जात असताना या शहरातल्‍या कोणत्‍याही खासगी संस्‍था व जिल्‍हा परिषद शाळा विद्यार्थ्‍यांचा लोंढा थांबवू शकल्‍या नाहीत. कारण दर्जेदार शिक्षण त्‍या शाळेत मिळत नसल्‍याच्‍या कारणावरुन पालकांनी इतरत्र पाठवित असल्‍याचे सांगतात. इतरत्र शाळेत जाताना विद्यार्थ्‍यांना प्रवासात अनेक प्रकारच्‍या अडचणींना तोंड देत प्रवास करावे लागते. प्रसंगी बसमध्‍ये चढताना, उतरताना अनेकांना, विद्यार्थ्‍यांचा अपघात झालेला आहे. एवढेच नव्‍हे तर अपघात होवून प्रसंगी प्राण ही गेल्‍याची घटना सर्वश्रूत आहे. हे सर्व टाळण्‍यासाठी शहरातील शाळा सुधारणे गरजेचे आहे. यासाठी लोकप्रतिनिधी, शिक्षणप्रेमी नागरीक व पालकांनी दक्ष राहून शिक्षण क्षेत्रात लक्ष घालणे गरजेचे झाले आहे.
         जिल्‍हापरिषद शाळा असो खासगी शाळा असो या शाळेतील शिक्षक दररोज परगावाहून उमरगा, उस्‍मानाबाद, सोलापूर, तुळजापूर या ठिकाणाहून ये-जा करतात आणि मुख्‍यालयीन असल्‍याचे प्रमाणपत्र घेवून घरभाडे भत्‍ता उचलत असल्‍याचे समजते. याकडे प्रशासनाचे लक्ष नाही. पहिली ते दहावी पर्यंतच्‍या  वर्गात शिकवताना विद्यार्थ्‍यांना पारंपारिक पध्‍दतीचा वापर न करता नवीन तंत्रानुसार अध्‍यापनात संगणक, लॅपटॉप किंवा शैक्षणिक साहित्‍यात त्‍याचा अधिक वापर केल्‍यास जिल्‍हा परिषद शाळा असो किंवा खासगी शाळा असो विद्यार्थ्‍यांची गुणवत्‍ता वाढल्‍याशिवाय राहणार नाही. शिक्षक आमदार व जिल्‍हा परिषद यांनी ब-याच शाळांना संगणकाचे वाटप केले आहे. या संगणकाचा उपयोग विद्यार्थ्‍यांपर्यंत होणे अपेक्षित आहे. कारण काही शाळेंमध्‍ये संगणक साक्षर शिक्षक नाहीत. तर काही ठिकाणी संगणक संस्‍थाचालकाच्‍या घरात असल्‍याचे दिसून आले आहे. एका चांगल्‍या योजनेचा लाभ ख-या अर्थाने विद्यार्थ्‍यांना देण्‍याऐवजी गैरप्रकाराने बरबटलेल्‍या संस्‍थाचालकानी स्‍वतःचा फायदा करुन घेण्‍याकडेच जाणीवपूर्वक लक्ष दिले जात आहे.
        दरवर्षी आपली संस्‍था टिकविण्‍यासाठी व विद्यार्थ्‍यांची पटसंख्‍या पूर्ण करण्‍यासाठी संस्‍थाचालक आपल्‍या कर्मचा-यांना शाळेत विद्यार्थी प्रवेश घेण्‍यापूर्वीच घरोघरी हिंडून विद्यार्थी मिळवितात. विद्यार्थ्‍यांची एकप्रकारे दरवर्षी पळवापळवी होताना दिसून येते. पण याच विद्यार्थ्‍यांना गुणवत्‍तापूर्वक शिक्षण दिले जाते की नाही, हे संस्‍थाचालक पाहत नाहीत. आज स्‍पर्धेच्‍या युगात टिकण्‍यासाठी शिक्षकांनी तनमयतेने विद्यार्थ्‍यांना घडविण्‍याची गरज असून व तो विद्यार्थी स्‍पर्धेत उतरण्‍यासाठी त्‍याची क्षमता निर्माण करावी, अशी पालकांमधून अपेक्षा व्‍यक्‍त केली जात आहे.
        शाळा सुरु होवून दोन आठवडे उलटले असून मुलांच्या प्रवेश प्रक्रियेची सर्वच शाळेतून लगबग दिसून येत आहे. याचा फायदा संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि शाळेतील कर्मचारी घेतात. मागासवर्गीयासाठी मोफत व सक्तीचे शिक्षण असल्याच्या जाहिराती शिक्षण विभागाकडून केल्या जातात. तर दुसरीकडे वाटेल ते डोनेशन कधी बांधकाम निधी तर कधी एखादी योजना आखली जावून पैसा उकळण्याचे काम या मंडळीकडून केले जाते.दुष्‍काळाने होरपळलेल्‍या शेतक-यांसमोर आजच्‍या शिक्षण पध्‍दतीमुळे कमालीची अडचण येत आहे. शेतकरी आपल्या मुलांना आपल्या सारखी शेतात काम करण्याची वेळ येऊ नये, म्हणून शेतकरी आपल्या पाल्याला चांगल्या प्रकारचे शिक्षण मिळावे म्हणून शाळेत पाठवतो. परंतु हे शिक्षणसम्राट या गरीब शेतक-यांकडे आवाच्या सव्वा डोनेशन मागत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. नैसर्गिक संकटाला सामोरा जाणारा शेतकरी मात्र या संकटाला बळी पडताना दिसत आहे. या शाळा संस्थांना जणू पैसे कमवण्याचे लासन्स मिळाले आहे, असे वागत आहे. यामुळे शिक्षणाचे वाटोळे झाल्याचे दिसत आहे. यासर्व प्रकरणाकडे येथील शिक्षण अधिका-यांकडून कसलीच कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्‍त केले जात आहे.

Labels:

सोने उतरले, सेन्‍सेक्‍स चढला

मुंबई -: काही दिवसांपूर्वी तेजीच्या वारूवर स्वार असलेले सोने गेल्या तीन दिवसांत 2000 ते 2500 रुपयांनी स्वस्त झाले आहे. जागतिक घडामोडींनी या मौल्यवान धातूचा तेजीचा रथ रोखला. दोन महिन्यांपूर्वी तोळ्यामागे 30 ते 31 हजारांच्या कक्षेत फिरणारे सोने शुक्रवारी 25,650 रुपयांपर्यंत खाली आले. सोन्याचा हा 23 महिन्यांचा नीचांक आहे. तसेच शुद्ध सोने प्रति १0 ग्रॅम २५२६५ रुपये पातळीवर बंद झाले. सोन्याप्रमाणे चांदीदेखील २६0 रुपये घसरून प्रतिकिलो ४0१९0 रुपये पातळीवर बंद झाली.
    अमेरिकी फेडरल रिझर्व्हने रोखे खरेदीचा हात आखडता घेण्याचे दिलेले संकेत आणि केंद्राच्या सोन्यावरील निर्बंधांमुळे मागणी घटली. शुक्रवारी दिल्लीत सोन्याची प्रचंड विक्री झाली. गुंतवणूकदार शेअर्सकडे वळल्याने सोन्याला फटका बसत आहे. जागतिक बाजारात सोन्याने 3 वर्षांचा नीचांक गाठला. सिंगापूरमध्ये सोने औंसमागे (28.35 ग्रॅम) 24.40 डॉलरनी घसरून 1200.80 वर आले.
    ल्ली आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याच्या दरातील घसरणीचा परिणाम स्थानिक बाजारपेठांवर नेहमीच होत असतो. अमेरिकेत महागाईविरोधात संरक्षण म्हणून सोन्यात गुंतवणूक होणार नाही, असे संकेत मिळाल्याने तेथील गुंतवणूकदारांनी सोन्यातील गुंतवणूक काढून शेअरमध्ये गुंतवण्यास सुरुवात केली. त्यामुळे जागतिक बाजारात देखील सोन्याचा भाव कोसळला. अमेरिकेच्या बाजारात तर सोन्याचा भाव प्रतिऔंस (३१ ग्रॅम) २४.४ डॉलर्स कोसळून १२00.८0 डॉलर्स प्रतिऔंस असा नोंदला गेला. याचा परिणाम देखील भारतीय सराफा बाजारावर मोठय़ा प्रमाणात झाला.

Labels:

तुळजापूरच्या नगराध्यक्षपदी विद्या गंगणे यांची बिनविरोध निवड

तुळजापूर -: येथील नगरपालिकेच्‍या नगराध्यक्षपदी बिनविरोध विद्या दिलीप गंगणे यांची निवड झाल्‍याने समर्थक व कार्यकर्त्‍यांनी फटाक्‍याची आतिषबाजी करुन एकच जल्‍लोष केला.
    नगराध्यक्षा अर्चना गंगणे यांनी आपल्या पदाचा मुदतीपूर्वीच राजीनामा दिल्याने अध्यक्षपद रिक्त झाले
होते. तत्पूर्वी दीड महिना अनिता साळुंके या प्रभारी नगराध्यक्षा होत्या. मात्र, राजीनाम्यानंतर नवीन निवड प्रक्रियेस गती आली. यामध्ये विद्या गंगणे यांचेच चार अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित होती. शुक्रवारी दुपारी 12 वाजता नगराध्यक्ष निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पीठासीन अधिकारी तथा तहसीलदार व्ही. एल. कोळी यांनी नगराध्यक्षपदी गंगणे यांची निवड झाल्याचे घोषित केले. माजी अध्यक्षा अर्चना गंगणे यांनी नूतन अध्यक्षा विद्या गंगणे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष सुरेश देशमुख, तालुकाध्यक्ष गोकुळ शिंदे, शहराध्यक्ष राजामामा भोसले, माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर, गटनेता नारायणराजे गवळी, सज्जन साळुंके, सचिन देशमुख, विजय कंदले, बाळासाहेब शिंदे, अनिता साळुंके, रेखा कदम, डॉ. स्मिता लोंढे, जयर्शी कंदले, श्रीकृष्ण सूर्यवंशी, नितीन पाटील, अमर हंगरगेकर, प्रकाश मगर, रणजीत गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. निवडीनंतर नगराध्यक्षा गंगणे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

Labels:

इंग्रजी शाळांच्‍या जमान्‍यात मराठी शाळांचे भवितव्‍य चिंताजनक

नळदुर्ग -: शहराबरोबरच आता ग्रामीण भागातही इंग्रजी माध्‍यमांच्‍या शाळा मोठ्या प्रमाणात सुरु होत असल्‍याने याचा फार मोठा फटका शाळांना बसत असून यामुळे मराठी शाळांचे भवितव्‍य चिंताजनक बनत चालले आहे. पालकांचा तसेच विद्यार्थ्‍यांचाही कल इंग्रजी शाळांकडेच वाढत चालला आहे. याचाच फायदा घेत इंग्रजी शाळा सुरु करणारे संस्‍थाचालक अव्‍वाच्‍या सव्‍वा फीस आकारुन पालकांची लुट करताना करताना दिसून येत आहेत.
    पूर्वी मोठ्या शहरात, जिल्‍ह्याच्‍या ठिकाणी त्‍याही अगदी बोटावर मोजण्‍या इतक्‍याच इंग्रजी माध्‍यमांच्‍या शाळा होत्‍या. मात्र गेल्‍या दोन-चार वर्षात शहराबरोबरच आता ग्रामीण भागातही इंग्रजी शाळा मोठ्याप्रमाणात सुरु झाल्‍याचे दिसून येत आहे. इंग्रजी शाळा सुरु करुन आज अनेकजण शिक्षणसम्राट बनत चालले आहेत. त्‍याचबरोबर सध्‍या ज्‍या खेडेगावात इंग्रजी शाळा सुरु झाल्‍या आहेत. त्‍यातील किती शाळज्ञंना शासनाची मान्‍यता आहे हे मसजत नाही. त्‍याचबरोबर इंग्रजी शाळा सुरु करण्‍यामध्‍ये दोन शाळांमधील अंतर किती असावे, तसेच जि.प. च्‍या मराठी शाळेजवळ इंग्रजी शाळा सुरु करता येते का, हेही कुणी पाहत नसल्‍याने गावागावात इंग्रजी शाळा सुरु होत आहे.
    सध्‍या जि.प.च्‍या मराठी प्राथमिक शाळांमधूनही सेमी इंग्रजी शिकविले जात आहे. मात्र पालक तसेच विद्यार्थ्‍यांचा कल हा जि.प. शाळांऐवजी इंग्रजी शाळांकडेच जास्‍त असल्‍याने व जास्‍त गावोगाव इंग्रजी शाळा सुरु होत असल्‍याने मराठी शाळेचे भवितव्‍य चिंताजनक बनत चालले आहे. याचाच परिणाम म्‍हणून जि.प. च्‍या शाळांमधील संख्‍या रोडावत चालली आहे. पूर्वी गावात सरकारी शाळा व्‍यतिरिक्‍त इतर कोणत्‍याही शाळा नसायच्‍या, त्‍यामुळे शिक्षण संस्था उघडल्‍या असल्‍याने व या शाळंमध्‍ये मुबलक खेळाचे साहित्‍य व विद्यार्थ्‍यांच्‍या कलागुणाना वाव यामुळे विद्यार्थी शाळेत रमताना दिसून येत आहेत. आज मराठी शाळांमधून पोषण आहार देण्‍याबरोबरच शाळेची इमारतही भव्‍य असूनदेखील अशा शाळांकडे विद्यार्थी येत नाहीत, तर पालकांचा कल महागडे असले तरी इंग्रजी शिक्षण देण्‍याकडेच असल्‍याने याचा परिणाम मराठी शाळांवर होत असल्‍याचे दिसून येत आहे.

Labels:

Friday, 28 June 2013

जसे शिक्षक तसेच विद्यार्थी

बीड : सोमनाथ खताळ
    काही दिवसांपुर्वी पदवीपूर्व शालेय अभ्यासक्रम शिकवणार्‍या विद्यालयांची म्हणजेच राज्यातील डी.एड. कॉलेजेसची तपासणी करण्यात आली. आता ही विद्यालये डी. टी. एड. (डिप्लोमा इन ट्रेनींग एज्युकेशन) या नावाने ओळखले जातात. हा अभ्यासक्रमपूर्ण करणार्‍या उमेदवारांना प्राथमिक शालेय स्तरावर शिक्षकाची नोकरी मिळू शकते. पूर्वी या शिक्षण संस्था अगदी मोजक्या म्हणजे जिल्ह्यात तीन-चार ठिकाणी असायच्या. त्यावेळी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणार्‍या उमेदवारांची संख्याही मर्यादीत होती. त्या मानाने नविन निघणार्‍या शाळा आणि त्या ठिकाणी असणार्‍या शिक्षक या पदांच्या जागा मात्र भरपुर असायच्या. 
      मध्यंतरी शासकीय नोकर्‍यांमध्ये नविन उमेदवार भरती करणे बंद करण्यात आले होते. त्यामुळे डी. टी. एड. अभ्यासक्रमाला सोन्यासारखे दिवस आले होते. डी. टी. एड. झाले की, नौकरी पक्की अशीच लोकांची धारणा झाली होती. या कारणास्तव डी. टी. एड. ला प्रवेश मिळावा म्हणुन प्रचंड गर्दी होऊ लागली. त्यातुन प्रवेशासाठी देणगी घेण्याची प्रथा सुरु झाली अन् अनेक संस्थाचालक या देणग्यामुळे मालामाल झाले. तेव्हापासुन डी. टी. एड. कॉलेज म्हणजे जणु काही सोन्याचे अंडे देणारी कोंबडी म्हणुन त्याकडे पाहीले जाऊ लागले. त्याचबरोबर डी. टी. एड. कॉलेज काढणार्‍यांची गर्दी देखील वाढली. विना अनुदान या तत्वावर खिरापत वाटल्याप्रमाणे डी. टी. एड. कॉलेजच्या पाट्या गल्ली बोळात दिसु लागल्या.
    पण पाच-सात वर्षातच परिस्थिती बदलली. डी. टी. एड. झालेल्या उमेदवारांची संख्या वाढत गेली. तर दरवर्षी निघणार्‍या शिक्षकांच्या जागांची संख्या कमी होत गेली. साहजिक डी. टी. एड. ला प्रवेश घेणार्‍या उमेदवारांची संख्या रोडावली. एकेकाळी भरगच्च दिसणारी डी. टी. एड. कॉलेजेस आता ओस, रिकामी दिसु लागली आहेत. अशा या डी. टी. एड. कॉलेजची काही दिवसांपूर्वी शासनामार्फत तपासणी करण्यात आली. तेव्हा अनेक धक्कादायक बाबी निदर्शनास आल्या. सध्या कार्यरत असलेल्या डी. टी. एड. कॉलेजपैकी साठ टक्के संस्था आवश्यक असणार्‍या बाबी किंवा अशी अटी पूर्ण करण्यात असमर्थ असल्याचे दिसुन आले. कुठे संस्थेला इमारत नाही, कुठे पुरेसा शिक्षक वर्ग नाही. कुठे संस्थेत ग्रंथालय, प्रयोग शाळा, मैदान या सुविधा नाहित, तर कुठे प्रत्यक्षात वर्गच चालु नसल्याचे आढळून आले. यावरुन शिक्षक घडवणार्‍या या शिक्षण संस्थाची अवस्था आणि पात्रता ही किती खालावलेली आहे हे दिसुन आले. या संस्थेमधुन प्रशिक्षण घेतलेला शिक्षक म्हणुन एखाद्या शाळेवर त्याची नेमणुक झाली तर तो विद्यार्थ्यांना काय आणि कसे शिकवणार? ही भयानक अवस्था केवळ शिक्षकांचीच आहे, असे नाही. ती आजच्या प्राथमिक शिक्षणाची देखील अशीच भयानक परवड झाल्याचे एका तपासणी अहवालावरुन निदर्शनास आले आहे.
    पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणुन ओळखले जाते. पुणे शहरातील काही प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. तेव्हा हा भयानक प्रकार उघडकीस आला. या सर्वेक्षणानुसार सध्या प्राथमिक शिक्षणाचा दर्जा कमालीचा घसरला असुन आपल्या पाचवी आणि दुसरीतल्या विद्यार्थ्यांना साधी आणि सोपी वाक्ये लिहीता आणि वाचता येत नाहीत आणि त्याचा अर्थही कळत नाही, असे लक्षात आले आहे. इतकेच नव्हे तर पाचवीतल्या विद्यार्थ्यांना दुसरीसाठी असणारी बेरीज, वजाबाकी यावर आधारीत साधी गणीतेही येत नाहीत, असा या अहवालाचा निष्कर्ष आहे. सध्या शिक्षण क्षेत्र अनेक नविन प्रयोग, उच्च आणि तंत्रशिक्षणाची सुसंधी, तंत्रज्ञान क्षेत्रातील क्रांती आणि नविन संशोधन यामुळे ढवळुन निघत आहेत. एकीकडे शिक्षणाचे मोठे कारखाने ठरतील, अशी विद्यापीठे आणि महाविद्यालये, अनेक मजली अभियांत्रीकी महाविद्यालये, तंत्रशिक्षण संस्था, वैद्यकीय शिक्षण संस्था यांच्यामध्ये हजारो विद्यार्थी, शेकडो प्राध्यापक आणि लाखो रुपयांची फीस आणि डोनेशन अशी नविनच इंडस्ट्री विकसीत झाली आहे. त्यातच अशा शिक्षण क्षेत्रात पुरक उद्योग म्हणुन प्रत्येक शहरात डझनभर खाजगी ट्युशन क्लास आणि इन्स्टिट्युटचा मार्गदर्शनाचा धंदा जोरात चालु आहे. एकवेळ सरकारी शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळणे सोपे आहे, पण अनेक वर्षे बोर्डात पहिला येण्याची परंपरा गाजवणार्‍या मुंबई, ठाणे, पुण्यातल्या खासगी क्लासमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या कुंडलितील गृहमान अनुकुल असेल तरच प्रवेश मिळु शकतो. त्यामुळे हायस्कुल पासुन शाळा, ट्युशन, टि. व्ही. आणि इतर प्रलोभने लक्षात घेतली तर विद्यार्थ्यांना घरासाठी आणि गृहपाठ करायला वेळ मिळत नाही. त्यातुन गाईड आणि इंटरनेटच्या मुठ्ठीमध्ये सामावलेले जग याची व्याप्ती लक्षात घेतली, तर अभ्यासाठीच नव्हे पण परिक्षेत संभाव्य प्रश्‍न किंवा कॉपी करण्यासाठी चुटकीसरशी प्रश्‍नोत्तरे प्रिंट आउटसकट ताबडतोब मिळु शकतात. याच पठडीतील वरचा मजला असा असल्यामुक्षळे प्राथमिक शिक्षण हे अत्यंत दर्जाहीन नव्हे, पण जुन्या पिढीतील शाळेतील बाराखडी, तोंडी गणिते, काम आता संगणक आणि इंटरनेट करत आहे.
    पाटी पेन्सील गेली, अंकलिपीही नष्ट होत चालली, पाढे म्हणुन घेतले जात नाहित. आता तर कॅल्क्युलेटर आणि लॅपटॉप, टॅबलेट असल्याने आकडेमोड करायचे कष्ट घेतो कोण? तशातच आपले आई-वडिल यांना मान देणे, त्यांचे सांगणे ऐकणे हे मागासलेपणाचे लक्षण समजले जाते. आता शिक्षक वर्गालाही संतती नियमन, निवडणुका, मतदार याद्या, आधार कार्ड अशा शिक्षणाखेरीज अनेक उपाध्या असतात. त्याखेरीज साहित्य संमेलन, वेगवेगळ्या स्पर्धा, चर्चा सत्रांमध्ये शिक्षक हजेरी लावतात. अशी सर्व परिस्थिती असल्यामुळे आणि प्रत्येक पिरीयडमध्ये ४० ते ४५ मिनीटे त्यांच्या शिक्षणासाठी असला तरी मुलांच्या तक्रारी, मारामार्‍या त्यांच्या वह्या तपासणे यामुळे फारच थोडा वेळ मुलांना शिक्षण मिळते. या सर्व कारणांमुळे दर्जा घसरला असुन शिक्षण संस्थांमध्ये शिक्षणालाच उपक्रम देण्याचे धोरण ठेवले तरच ही परिस्थिती बदलु शकते.

Labels: ,

पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण शनिवारी तुळजापूरात

उस्मानाबाद -: राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण हे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
      शनिवार, दि. 29 जून रोजी सकाळी 8 वाजता अणदूर, ता. तुळजापूर येथे आगमन व राखीव. सकाळी 9 वा.  अणदूर येथून शासकीय विश्रामगृह, तुळजापूरकडे प्रयाण. स. 10-30  वा. शासकीय विश्रामगृह, तुळजापूर येथे  आगमन व विविध स्थानिक कार्यक्रमांना उपस्थिती. दु. 1 वा. तुळजापूर तालुका काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा. स्थळ-पुजारी मंगल कार्यालय, तुळजापूर. त्यानंतर सोईनुसार अणदूरकडे प्रयाण, आगमन, राखीव व मुक्काम.
      रविवार, दि.30 रोजी अणदूर येथून शासकीय विश्रामगृह, तुळजापूरकडे प्रयाण. स.10-30 वा. शासकीय विश्रामगृह, तुळजापूर येथे आगमन व विविध स्थानिक कार्यक्रमांना उपस्थिती. स. 11 वा. राष्ट्रीय पेयजल योजनेच्या कामांची आढावा बैठक. स्थळ- तुळजापूर पंचायत समिती सभागृह,तुळजापूर,सायंकाळी 4 वा. शासकीय वाहनाने  अणदूरकडे प्रयाण, आगमन, राखीव व मुक्काम. सायं. 6-30 वा. अणदूर येथून सोलापूरकडे प्रयाण.  

Labels:

व्यवसाय अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन अर्ज करावा

उस्मानाबाद :- डि.जी. ई. टी नवी दिल्ली, केंद्र शासनाने खालील व्यवसाय अभ्यासक्रमासाठी मान्यता दिली आहे. इच्छुक  विद्यार्थ्यांनी व्यवसाय अभ्यासक्रमासाठी  ऑनलाईन प्रवेश दि.7 जुलैच्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत घेण्याचे आवाहन औद्यागिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य बी. एस. गायकवाड यांनी केले आहे.
    एक वर्ष मुदतीचे अभ्यासक्रम - सुतारकाम, संधाता, मेसन, फळे व भाज्या संस्करण, फळे व भाज्या संस्करण (अल्पसंख्याक), ड्रेसमेकींग (मुलीसाठी), ड्रेसमेकींग (मुलीसाठी अल्पसंख्याक), हेअर अँड स्किन केअर (मुलीसाठी), हेअर अँड स्किन केअर मुलीसाठी (अल्पसंख्याक), कोपा, डिटीपीओ, सेक्रेट्रीयल प्रॅक्टीस, सीओइ सेंटर ऑफ एक्सलंन्स अंतर्गत्‍प्रॉडक्शन मॅन्युफॅक्चरींग सेक्टर.
    दोन वर्षाचे अभ्यासक्रम - विजतंत्री, तारतंत्री, यांत्रिक मोटारगाडी, एमआरएसी, एमआरटीव्ही, जोडारी, पेंटर जनरल, मशिनिष्ट आणि  यांत्रिक विजक. या अभ्यासक्रमासाठी व अधिक माहितीसाठी www.dvet.gov.in व www.maharojgar.gov.in  या संकेतस्थळाचा वापर करुन आपले अर्ज ऑनलाईन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.  

Labels:

जिल्ह्यातील मंत्रालयीन स्तरावरील प्रलंबित समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील : दिलीप सोपल

सोलापूर : महसूल आणि जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांच्या अडचणी  व प्रलंबित समस्या मंत्रालयीनस्तरावर पाठपुरावा करुन सोडविण्याचे आश्वासन  राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप सोपल यांनी दिले.
    जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशिय सभागृहात पालकमंत्री सोपल यांनी  जिल्हा प्रशासनातील अधिका-यांची  आणि जिल्हा परिषदेतील पदाधिकारी आणि अधिका-यांची स्वतंत्ररित्या बैठक  घेऊन प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेतला.
    यावेळी महसूल अधिका-यांना मार्गदर्शन करतांना सोपल म्हणाले की, महसूल विभागातील वेग-वेगळ्या खात्याची जास्तीत जास्त कामे होण्यासाठी निधीसाठी मंत्रालयीनस्तरावर पाठपुरवा करण्यात येईल. त्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याने वेळ देऊन मंत्रालयात येऊन प्रश्न सोडविले पाहिजेत. जिल्ह्याचा विकास होण्यासाठी सर्व ते सहकार्य मिळेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
    जिल्हा परिषदेत मार्गदर्शन करतांना ते म्हणाले की, शासन पातळीवरील प्रलंबित मागण्यांचा आढावा घेऊन त्या मागण्या विविध विभागाकडून मंजुर करण्यासाठी मंत्रालयात स्वतंत्ररित्या बैठक घेतली जाईल. जिल्हा परिषदेचा उपकर, इमारतीचे पैसे, रस्त्यांच्या कामांचा निधी  मिळून देण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील.  जिल्हा परिषदेला विकास कामांसाठी जास्तीत जास्त निधी मिळवून देऊन सर्व प्रश्न चांगल्या पध्दतीने सोडविल्या जातील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
    बैठकीस आमदार दिपक साळुंके, जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी, उपाध्यक्ष सुभाष गुळवे, जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम, मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार, महापालिका आयुक्त अजय सावरीकर,  जिल्हा परिषदेचे विविध पदाधिकारी आणि शासकीय विभागांचे विभाग प्रमुख व अधिकारी उपस्थित होते.

Labels:

नळदुर्गमधील शिवकालीन व निजामकालीन पाणीस्‍त्रोतांची स्‍वच्‍छता

नळदुर्ग -: येथील शिवकालीन व निजामकालीन आड व प्राचीन विहीरीमधील गाळ काढून दुरुस्‍तीच्‍या कामास सुरुवात झाली आहे. या कामासाठी सुमारे 15 लाख 35 हजार रुपयाचा निधी मंजूर केल्‍याची माहिती नगराध्‍यक्ष शब्‍बीरअली सय्यद सावकार यांनी दिली.
    नळदुर्ग शहरातील प्राचीन काळातील आड व विहीर असे मिळून आठ ठिकाणी असलेल्‍या विहीरीमधील गाळ काढून दुरुस्‍तीचे काम युध्‍दपातळीवर सुरु आहे. शहराला पाणीपुरवठा करणा-या बोरी धरणातील पाण्‍याचा मृतसाठा केंव्‍हाही संपुष्‍टात येण्‍याची शक्‍यता असून तीव्र पाणीटंचाईशी लढताना नागरिकाबरोबर प्रशासनाची दमछाक होत आहे. पाणी प्रश्‍न सोडविण्‍यासाठी शासनाने मोठ्याप्रमाणावर निधी खर्चूनही पाण्‍याचा प्रश्‍न सुटत नाही. येत्‍या काही दिवसात बोरी धरण पाणलोट क्षेत्रात मोठे पाऊस झाल्‍यास तात्‍पुरता का होईना पिण्‍याच्‍या पाण्‍याचा प्रश्‍न सुटणार आहे, अन्‍यथा पाऊस न झाल्‍यास आगामी काळात तुळजापूर, नळदुर्ग व अणदूर या गावाना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. आगामी काळात उदभवणा-या परिस्थितीशी मुकाबला करण्‍यासाठी शासन विविध उपाययोजना करीत आहे. नळदुर्गचे नगराध्‍यक्ष शब्‍बीरअली सय्यद सावकार यांनी शहरात पाणीटंचाई निर्माण झाली तर त्‍यावर मात करण्‍यासाठी शहरात असणारे प्राचीन व निजामकालीन आडातील गाळ काढून त्‍यांची दुरुस्‍ती करण्‍यासाठी जिल्‍हाधिका-यांनी निधी उपलब्‍ध करुन द्यावा, याबाबतचा प्रस्‍ताव जिल्‍हाधिका-यांर्कडे सादर केला होता. जिल्‍हाधिका-यांची नुकतीच याला मान्‍यता दिली असून यासाठी 15 लाख 35 हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. नगराध्‍यक्ष शब्‍बीरअली सावकार यांनी केलेल्‍या प्रयत्‍नामुळे शहरातील प्राचीन असणारी सोलखॉं मस्जिदीजवळील विहीर, साठेनगरजवळील राष्‍ट्रीय महामार्गात असलेला निजामकालीन आड, मराठा गल्‍ली येथील निजामकालीन आड, वसंतनगर येथील प्राचीन विहीर, भीमनगर येथील आड, गवळी गल्‍ली येथील आड, जुन्‍या जकात नाक्‍याजवळील आड, नागझरी येथे पाण्‍याची टाकी बांधणे, आदी विहीर व आडातील गाळ काढण्‍यात येणार आहे. बुधवारी सोलेखॉं मस्‍जीदजवळील प्राचीन विहीरीतील गाळ काढण्‍यास प्रारंभ करण्‍यात आला.
    पूर्वी या आड व विहीरीत अतिशय मुबलक पाणी होते. मात्र कालांतराने गाळ तसेच नागरिकांनी यामध्‍ये घाण टाकल्‍याने हे पाण्‍याचे स्‍त्रोत बुजून गेले आहेत. या विहीर व आडातील गाळ पूर्णपणे काढल्‍यानंतर संपूर्ण शहरातील तहान हे आड व विहीर भागवू शकणार आहेत. माजी नगरसेवक मुश्‍ताक कुरेशी, बाबू कुरेशी, नगरअभियंता स्‍वप्‍नील काळे, जिलानी कुरेशी हे सोलेखॉं मस्‍जीदजवळील विहीरीतील गाळ काढताना उपस्थित होते.

Labels:

Thursday, 27 June 2013

आपत्ती काळात प्रसारमाध्यमांचे काम समाजजागृतीचे : जिल्हाधिकारी

उस्मानाबाद -: आपत्ती काळात जागरुक नागरिकाची भूमिका बजावली तर हानी कमी होऊ शकते. विविध यंत्रणांमार्फत आपत्ती व्यवस्थापनाचे कार्य सुरु असते. या यंत्रणांचे काम सकारात्मक पद्धतीने जनतेसमोर मांडण्याचे काम प्रसिद्धी माध्यमे करत असतात, अशा शब्दांत जिल्हाधिकारी डॉ.के.एम.नागरगोजे आपत्ती व्यवस्थापनातील प्रसिद्धीमाध्यमांकडून असणाऱ्या अपेक्षा व्यक्त केल्या.
    जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने येथील रायगड फंक्शन हॉल येथे एकात्मिक प्रसिध्दी कार्यक्रमांतर्गत आपत्ती व्यवस्थापन व प्रसारमाध्यमांकडून प्रशासनाच्या अपेक्षा या विषयावर ग्रामसंवाद कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उदघाटनपर भाषणात डॉ. नागरगोजे बोलत होते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वृषाली तेलोरे, उस्मानाबाद पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही.बी. कोटेचा, सीना कोळेगाव पाटबंधारे प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता श्री.आवलगावकर, होमगार्ड विभागाचे गजानन सुतार, प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण यावेळी उपस्थित होते.
    डॉ.नागरगोजे म्हणाले की, आपत्ती व संकटे ही सांगून येत नाहीत. गावपातळीवर आपत्ती नियोजन आराखडा तयार करुन आपत्ती पासून बचाव करण्यासंबंधीची माहिती दिली जाते. मात्र जनजागृतीच्या दृष्टीने प्रसारमाध्यमांचे काम अतिशय महत्वाचे आहे.  विविध पद्धतीने येणाऱ्या आपत्तींची माहिती देऊन त्यापासून कसा बचाव करावयाचा याची माहिती या माध्यमातून जनतेपर्यंत गेल्यास हानी कमी होऊ शकते, असे त्यांनी नमूद केले. आपत्ती व्यवस्थापनातील पूर्वतयारी महत्वाची असते. विविध यंत्रणा त्यासाठी कार्यरत असतात. या यंत्रणांची भूमिका आणि कार्यहीलोकांपर्यंत पोहोचले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
    श्रीमती तेलोरे यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाची माहिती दिली. आपत्ती व्यवस्थापन कक्ष 2005 मध्ये स्थापन झाला. संकटकालीन आपत्तीच्या काळात काय करु नये, छोटे-छोटे अपघात कसे टाळता येतात, याची माहिती देऊन आपत्तीची तीव्रता कमी करण्याची ताकद प्रसारमाध्यमांमध्ये असल्याचे त्यांनी नमूद केले.आपला जिल्हा भूकंपप्रवण क्षेत्रात येतो. त्यादृष्टीने जिल्ह्यात भूकंप प्रतिरोधक घरे बांधणी करण्याबाबत प्रसारमाध्यमांनी जनजागृती करावी, असे आवाहन त्यांनी केले.
    कार्यकारी अभियंता कोटे व आवलगावकर यांनी पूरपरिस्थितीत सिंचन प्रकल्पांची घ्यावयाची काळजी, जनतेत करावयाची जागृती, पावसाळ्यात उद्भवणाऱ्या अडचणी व त्यावर करावयाची मात यावर सविस्तर विवेचन केले. तसेच संवादाच्या माध्यमातून त्यांनी विविध प्रश्नांनाही उत्तरे दिली.
    सुतार यांनी आपत्ती व्यवस्थापनात मदतकार्य करतांना करावयाच्या उपाययोजनांबाबत होमगार्ड दलाच्या वतीने विविध प्रात्यक्षिके सादर केली.
      जिल्हा आरोग्य विभागामार्फत जिल्हा शल्य चिकीत्सक डॅा. अशोक धाकतोडे आणि  श्रीमती मीरा दलभंजन यांनी नैसर्गिक आपत्ती काळात आरोग्य विभागामार्फत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली.  पाणीटंचाईसारख्या आपत्तींचा सामना यावर्षी जिल्ह्याला करावा लागला. त्या पार्श्वभूमीवर एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमाबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी सविस्तर माहिती दिली.
       कार्यशाळेचा समारोपात जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील आपत्ती व्यवस्थापनात पोलीस दलाची भूमिका स्पष्ट केली. कोणत्याही आपत्तीच्या काळात महसूल व पोलीस दलाची भूमिका महत्वाची असते. नैसर्गिक व मानवनिर्मित अशा दोन्ही प्रकारच्या आपत्तीच्या काळात पोलीस दल नेहमीच समर्थपणे बचावकार्य करीत आला आहे. मात्र, सर्वसामान्य चांगला माणूस हाच कोणत्याही आपत्ती काळात महत्वाचा दुवा असतो. कारण आपत्तीच्या ठिकाणी तात्काळ मदत पोहोचविणे आवश्यक असते. अशावेळी प्रसारमाध्यमे ही सकारात्मक भूमिका बजावत असतात, असे त्यांनी सांगितले.
      कार्यशाळेत सहभागी झालेल्या जिल्ह्यातील विविध दैनिक, साप्ताहिकाचे संपादक, जिल्हा प्रतिनिधी, बातमीदार, वार्ताहर आदी प्रसारमाध्यम प्रतिनिधींना जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील, तोटावार, डॅा. धाकतोडे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
     प्रारंभी चव्हाण यांनी प्रास्ताविकात  कार्यशाळा आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्जून परदेशी व अशोक माळगे यांनी केले. जिल्हा माहिती कार्यालयातील एस.जी. शेळके, मकरंद नातू, आयुब पठाण, नरहरी गुट्टे, सिद्धेश्वर कोंपले, तानाजी सुरवसे, अनिल वाघमारे, अशोक सुरडकर, शशीकांत पवार, श्रीमती चित्रा घोडके यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. 

Labels:

इंटरनेटवरील लग्‍न टिकत नाहीत !

बंगळूर -: सध्‍याच्‍या हायटेक युगात इंटरनेटवर सर्च करुन आपला साथीदार निवडण्‍याचे युवकांमधील प्रमाण लक्षणीय वाढले आहे. सोशल नेटवर्किंग साईटसवरुन प्रेमात पडलेली असंख्‍य युगूले आपल्‍याला पहायला मिळतात. पण इंटरनेटवरुन जुळवण्‍यात आलेले निम्‍मे विवाह तुटत असल्‍याचे नव्‍या सर्वेक्षणानुसार दिसून आले आहे. त्‍यामुळे इंटरनेटवर जुळलेले विवाहांना काहीच दिवसात पूर्णविराम मिळत असल्‍याची धक्‍कादायक बाब उघडकीस आली आहे.
    गागील काही दिवसांत विवाह जुळजवणा-या संस्‍केतस्‍थळांचा नेटविश्‍वात चांगलाच बोलबाला निर्माण झाला आहे. मागील वर्षी या संकेतस्‍थळाची उलाढाल 510 कोटींच्‍या घरात पोहोचल्‍याचे दिसून आले. जगभरातील विवाहविषयक संकेतस्‍थळावर दर महिन्‍याला 20 लाखांपेक्षाही अधिक युजर्संच्‍या प्रोफाईल अपडेट होत असल्‍याचे दिसून आले. तसेच विवाहविषयक संकेतस्‍थळे चालविणा-या संस्‍था 50 ते 70 टक्‍के भरघोस नफा कमावतात. प्रत्‍यक्षात या संस्‍थांच्‍या माध्‍यमातून जुळविलेल्‍या विवाहांचे प्रमाण केवळ दहा टक्‍के आहे. त्‍यामुळे पारंपारिक पध्‍दतीने विवाह जुळविणा-या वधुवर सुचक मंडळाचे महत्‍त्‍व पुन्‍हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Labels:

यंत्राच्या सहाय्याने पेरणी; भविष्‍यात तिफणीवरील मूठ होणार दुर्मिळ

नळदुर्ग -: ‘काळ्या मातीत मातीत तिफण चालते’ या गीताला छेद देवून यंदाच्‍या खरीप हंगामात नळदुर्ग व परिसरातील बहुतांश शेतक-यानी अत्‍याधुनिक यंत्राच्‍या सहाय्याने पेरणी केली आहे. त्‍यामुळे भविष्‍यात तिफण, तिफणीचे चाडे, शेतक-यांच्‍या कमरेला आवळलेली बी-बियाणाची ओटी (पिशवी) व तिफणीवर बळीराजाची मुठ दुर्मिळ होण्‍याची शक्‍यता शेतक-यांतून वर्तविली जात आहे. 
             खरीप हंगाम असो की रब्‍बी हंगाम असो शेतकरी पेरणीपूर्वी जमिनीची मशागत करुन पेरणीचे दिवस जवळ आले की पेरणीचे अवजारे, बी-बियाणे, खते वगैरेची जुळवाजुळ करुन ग्रामीण भगात सुतारांच्‍याया आडीवर तिफण भरुन घेण्‍याकरीता (दुरुस्‍ती) शेतकरी गर्दी करताना दिसून येतो. परंतु यंदाच्‍या खरीप हंगामाच्‍या पेरणीकरीता नळदुर्ग व परिसरातील ब-याच शेतक-यांनी ट्रॅक्‍टरच्‍या सहाय्याने पेरणी यंत्राचा उपयोग करुन पेरणी केल्‍याचे दिसून आले.
           आधुनिक तंत्रज्ञानानुसार आजघडीला शेती करण्‍यास बळीराजा प्रयत्‍न करताना दिसत आहे. पूर्वी शक्यतो लाकडी शेती अवजारे वापरणारा शेतकरी आता लोखंडी कुळव, कोळपे, तिफण, नांगर वगैरे लोखंडी शेती अवजारे वापरात आणताना दिसत आहे. नवनवीन रासायनिक खते, बी-बियाणे, किटकनाशके वगैरेंचा वापर करुन तुषार पध्‍दतीने शेतातील पिकाना पाणी देवून कमीत कमी क्षेत्रात, कमी वेळात जास्‍तीत जास्‍त उत्‍पन्‍न कसे मिळेल, यासाठी शेतकरी सातत्‍याने प्रयत्‍न करीत आहे. या धावपळीच्‍या काळात शेणखताचा वापर, शेतातील पिकाची खळ्यावरील रास, बैलाचा पाता, रास उफनेची वावडी ह्या बाबी आता शेतातून जवळपास काळबाह्य झाल्‍या आहेत. शेणखताची जागा रासायनिक खताने घेतली. खळे, खळ्यावरील रास, बैलाचा पाता, वावड याची जागा मळणी यंत्राने घेतली. चारबैली बळीराम नांगराची जागा ट्रॅक्‍टरने घेतली. तर आता पेरणी यंत्र निघाल्‍याने तिफणीची जागा पेरणी यंत्र बळकावताना दिसत आहे. यावर्षी खरीप हंगामातील पेरणी ब-याच शेतक-यांनी ट्रॅक्‍टरच्‍या मदतीने पेरणी यंत्राद्वारे केलेली आहे. कमी वेळात जास्‍त क्षेत्र पेरणी करण्‍याचे साधन उपलब्‍ध झाल्‍याने शेतक-यांनी यंत्राद्वारे पेरणी करण्‍याचे पसंत केले असल्‍याचे शेतक-यांतून बोलले जात आहे.

Labels:

मल्‍हार सेनेच्या तुळजापूर तालुकाध्‍यक्षपदी म्‍हाळापा बंदीछोडे

नळदुर्ग -: मल्‍हार सेना या सामजिक संघटनेच्‍या तुळजापूर तालुकाध्‍यक्षपदी निलेगाव (ता. तुळजापूर) येथील युवा कार्यकर्ते म्हाळाप्‍पा भुताळी बंदीछोडे यांची निवड करण्‍यात आली आहे.
    मल्‍हार सेना संघटनेचे संस्‍थापक अध्‍यक्ष माजी मंत्री आण्‍णासाहेब डांगे यांच्‍या आदेशानुसार या संघटनेचे उस्‍मानाबाद जिल्‍हाध्‍यक्ष धनाजी सातपुते यांनी बंदीछोडे यांना सदर निवडीचे पत्र दिले असून सामाजिक कार्यात सक्रिय राहून संघटना बांधणीच्‍या कामी योगदान द्यावे, याकरीता आपली निवड दोन वर्षासाठी करण्‍यात येत आहे, असे निवड पत्रात नमुद करण्‍यात आले आहे.    

          बंदीछोडे यांच्‍या निवडीबद्दल निलेगाव येथे कार्यकर्त्‍यांनी जल्‍लोष साजरा केला. तर ग्रामस्‍थांच्‍यावतीने सामाजिक कार्यकर्ते बसवराज जमादार यांच्‍या हस्‍ते त्‍यांचा सत्‍कार करण्‍यात आला.

Labels:

आषाढी यात्रेनिमित्त जिल्हयातील कलापथक व कलाकारांची 29 रोजी निवड

उस्मानाबाद -: राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने  पंढरपूर आषाढी यात्रेनिमित्त संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज  पालखी सोहळ्यानिमित्त  दिंडीत वारकऱ्यांना  व ग्रामस्थांना निर्मल भारत अभियानांर्गत स्वच्छतेविषयी प्रबोधन  करण्यासाठी  जिल्हयातून 6 व्यक्तीचे कलापथक, कलाकारांची  निवड दि. 29 जुन रोजी सकाळी 11 वाजता  येथील कै यशवंतराव चव्हाण सभागृहात करण्यात येणार आहे.
    इच्छुक कलावंत व पथकांनी त्यांच्या संचातील कलाकारांच्या विविध कलेतून स्वच्छतेविषयक उत्कृष्‍ट प्रबोधन सादरीकरणासाठी आपल्या वादयवृंद साहित्यासह कार्यशाळेत सहभाग घ्यावा,असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांनी केले आहे.
    स्वच्छता दिंडीसाठी कलापथकाची निवड केल्यानंतर  दिंडी कालावधीचे प्रतिदिन प्रती व्यक्ती एक हजार रुपये एवढे मानधन दिंडी पुर्ण झाल्यानंतर  देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी  जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन (कक्ष), जिल्हा परिषद, उस्मानाबादशी (मोबाईल क्रमांक-9850981451) संपर्क साधावा.

Labels:

राष्‍ट्रीय सुक्ष्म सिंचन अभियानासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

उस्मानाबाद :– जिल्ह्यात पडलेला दुष्काळाचे सावट लक्षात घेवून उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी  राष्‍ट्रीय सुक्ष्म सिंचन अभियान 2012-13 मध्ये शेतक-यांचे ऑनलाईन प्रस्ताव स्वीकारण्यास शासनाने मंजूरी दिली आहे. जिल्हयातील मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी व मान्यता प्राप्त कंपन्यांचे वितरकांनी  सुक्ष्म सिंचन योजनेसाठी प्रस्ताव 30 जुनपर्यंत ऑनलाईन करुन घ्यावे असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.  
      मुदतीनंतरचे पाठविलेले प्रस्ताव स्वीकारले जाणार नाही, याची संबंधितांनी नोंद घ्यावी,असेही कळविण्यात आले आहे.

Labels:

काँग्रेस, राष्ट्रवादीची २९ रोजी संयुक्त बैठक

उस्मानाबाद : तुळजापूर बसस्थानकाच्या लोकार्पण सोहळा कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी काँग्रेस व राष्ट्रादीची संयुक्त बैठक २९ जून रोजी दुपारी १ वाजता येथील पुजारी मंगल कार्यालयामध्ये होणार आहे.
     बैठकीस पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण, एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे, आ. राणाजगजितसिंह पाटील, माजी आ. नरेंद्र बोरगावकर, राकाँ जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील, गोकूळ शिंदे यांची उपस्थिती राहणार आहे. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बैठकीस उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश बिराजदार, आप्पासाहेब पाटील यांनी केले आहे.

Labels:

तरुणीची गळफास घेवून आत्महत्या

नळदुर्ग : किरकोळ कारणावरुन एका एकोणीस वर्षीय तरुणीने ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आलियाबाद (ता. तुळजापूर) येथे घडली. याप्रकरणी नळदुर्ग पोलिसात तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    नेहा संजय चव्हाण (वय 19 वर्षे, रा. आलियाबाद, ता. तुळजापूर) असे गळफास घेवून आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. तर शंकर पोभा राठोड, सावळाबाई मोतीराम राठोड, सखराबाई भिलू राठोड (तिघे रा. आलियाबाद, ता. तुळजापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींचे नावे आहेत. तुळजापूर तालुक्यातील आलियाबाद येथे पाणी भरण्याच्या कारणावरून शिवीगाळ व मारहाण केल्याचा राग मनात धरून नेहा चव्हाण हिने स्वत:च्या घरात पत्र्याच्या आडूला ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना बुधवार रोजी सव्वा चार वाजेच्या सुमारास आलियाबाद येथे घडली. संजय भीमराव चव्हाण यानी नळदुर्ग पोलिसात खबर दिल्यावरुन वरील तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Labels:

राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त गुणवंतांचा सत्कार

नळदुर्ग -: जळकोट (ता. तुळजापूर) येथील प्रशिक बहुउददेशीय सामाजिक संस्थेच्यावतीने छत्रपती राजर्षी श्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त गुणवंत विदयार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे सदस्य हरीष डावरे तर प्रमुख अतिथी म्हणून शिवसेनेचे माजी जि.प. सदस्य गणेश सोनटक्के, रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष दुर्वास बनसोडे, तुळजापूर पंचायत समिती सदस्य अर्जुन कदम, नळदुर्ग पोलीस ठाण्‍याचे सहाययक पोलीस निरीक्षक सुरेश शेटकर, राष्ट्रसेवादलाचे अध्यक्ष प्रा. शरद गायकवाड, सरपंच मुकेश सोनकांबळे आदींची प्रुमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर दहावी व बारावीतील गुणवंत विदयार्थ्यांचा शाल, पुष्पगुच्छ व शैक्षणिक साहित्य देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकार संजय पिसे, मेघराज किलजे, श्रीशैल साखरे, अमर जेटीथोर, शुभम कदम यांच्यासह नागरीक, विदयार्थी उपस्थित होते.

Labels:

Wednesday, 26 June 2013

केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनच्या बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद

नळदुर्ग (प्रतिनिधी) -: अन्न व औषध प्रशासनाच्या धोरणाच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनने पुकारलेल्या दुपारी एक पर्यंत सर्व औषधी दुकाने बंद आंदोलनाला नळदुर्ग व परिसरातील औषध दुकानदारांनी दुकाने बंद ठेवून उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. तर रुग्णांची गैरसोय होताना दिसून आली.
    फार्मासिस्ट पूर्ण वेळ हजर पाहिजे, फक्त एमबीबीएस डॉक्टरांच्या चिठठीवरच औषधे दयावीत या व अशा अनेक कारणांनी राज्य केमिस्ट ॲन्ड ड्रगिस्ट असोसिएशन आणि अन्न व औषध प्रशासन यांच्यात एक महिन्यांपासून संघर्ष चालू आहे. या संदर्भात अनेक बैठका झाल्या. मंत्री पातळीवरील बैठकाही निष्फळ ठरल्याने औषध संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील सर्व होलसेलरनी कंपन्यांकडे औषधाची ऑर्डरही दि. 1 जूनपासून बंद केली असल्याने अभुतपूर्व औषधांचा तुवटडा जाणवत आहे. यामुळे रुग्णांचे हाल सुरु आहेत. अशातच राज्य संघटनेने अचानक मंगळवारपासून ग्रामीण भागातील औषधी दुकाने दुपारी एक ते रात्री नऊ वाजेपर्यंत चालू राहतील तर शहरी भागातही दुकाने दुपारी दोन ते रात्री दहा वाजेपर्यंत सुरु राहतील, असे आंदोलन पुकारले. त्याप्रित्यर्थ नळदुर्ग-अणूदर-जळकोट परिसरातील औषधी दुकानदारांनी दुकाने दुपारी एक वाजता उघडली. त्यामुळे रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत. हा संप किती दिवस अजून राहणार, याची माहितीही मिळू शकली नाही. औषधे ही जीवनावश्यक वस्तू असून शासनाने यामध्ये हस्तक्षेप करुन अन्न व औषध प्रशासनाचे आठमुडे धोरण त्वरीत थांबवावे व औषधी व्यावसायिकांना सुरळीत काम करु दयावे, अशी मागणी जनतेतून होत आहे. हा बंद यशस्वीतेसाठी उस्मानाबाद जिल्हा कार्यकारिणी सदस्य संजय जाधव, गोविंद शिंदे, तुळजापूर तालुका कार्यकारिणी सदस्य सचिन कासार, जीवन मोकाशे यांनी पुढाकार घेतला.

Labels:

नळदुर्ग शहरात चो-यांचे सत्र सुरुच

नळदुर्ग -: शहरात चोरटयानी गेल्या काही दिवसांपासून घर तसेच दुकाने फोडण्याचे सत्र चालू ठेवले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी तात्काळ या चोरटयांचा बंदोबस्त करावा व शहरात रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.
    सध्या पावसाने मोठी दडी मारली आहे. त्यामुळे सलग दुस-या वर्षी तुळजापूर तालुक्यावर भीषण दुकाष्ळाचे सावट निर्माण झाले आहे. दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाल्याने नळदुर्ग शहर व परिसरात चो-यांच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. नळदुर्ग शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरटयांच्या कारवायात वाढ झाली आहे. शहरातील शासकीय विश्रामगृहासमोरील परिसर तसेच व्यासनगर, वैष्णवनगर परिसरात चोरटे भलतेच सक्रीय झाले असल्याचे दिसून येत आहे. या परिसरातील अनेक दुकाने व घरांमध्ये चोरी करुन माल लंपास केल्याच्या घटना घडल्या आहेत. चोरटयांनी केलेल्या चो-या पाहता, हे चोरटे भुरटे चोर असल्याचे दिसून येत आहे. कारण चोरटयांनी पाण्याच्या बाटल्या, कोल्डींग्स, घरातील तिखट असे सामान चोरुन नेले आहे. चो-यांच्या प्रमाणात वाढ झाली असल्याने शहरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी तात्काळ या चोरटयांचा बंदोबस्त करावा तसेच शहरात रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे. चो-यांना आळा घालण्यासाठी पोलिसांबरोबर नागरिकांनाही सतर्क राहणे गरजेचे आहे.

Labels:

Tuesday, 25 June 2013

खरीप हंगामातील क्षेत्र नोंदणीच्या पिकनिहाय तारखा निश्चित

उस्मानाबाद -: सन 2013-14 हंगामाकरिता प्रमाणीकरणाच्या साखळी अंतर्गत नोंदणीसाठी पिकनिहाय क्षेत्र नोंदणीच्या तारखा राज्य बीज प्रमाणीकरण, अकोला यांच्याकडून निश्चित करण्यात आल्या असून त्या  खालीलप्रमाणे आहेत.
    उडिद,मुग-क्षेत्र नोंदणी प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख 20 जुलै,2013 तर शुल्क भरणा करण्याची अंतिम तारीख 24 जुलै,2013, संकरित कपाशी, सु.कपाशी, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, भुईमुग व इतर पिकांसाठी प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख 25 जुलै तर शुल्क भरण्याची अंतिम तारीख 29 जुलै,2013, धान रोवणी पिकांसाठी प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट  तर शुल्क भरण्याची अंतिम तारीख 26 ऑगस्ट ही आहे.  खरीप सुर्यफुल साठीची क्षेत्र नोंदणीसाठीची अंतिम तारीख 31 ऑगस्ट असून तर शुल्क भरण्याची अंतिम तारीख 4 सप्टेंबर अशी राहील.   

Labels:

लोहारा येथे मुलांच्या वसतीगृहासाठी प्रवेशाचे आवाहन

उस्मानाबाद :- राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे लोहारा जि.उस्मानाबाद येथे डॉ.बाबासाहेब आंबडेकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृहात सन 2013-14 या शैक्षणिक वर्षाकरीता मागासवर्गीय व आर्थिक दृष्टया मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार प्रवेश घेण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे. ही  प्रवेश प्रक्रिया  ऑनलाईन असून  https://mahaeschol.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज भरावा.
       वसतीगृहात विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे अधिकार शासन निर्णयानुसार सहाय्यक आयुक्त समाज कल्याण उस्मानाबाद यांना प्रदान केलेले आहेत. निवड यादी वसतीगृहात नोटीस बोर्डावर लावण्यात येते. व संबंधीत विद्यार्थ्यांना तसे पत्राने कळविण्यात येते.  या संकेत स्थळावर परिपूर्ण माहिती भरुन अनु.जाती,जमाती,वि.जा.भ.ज.विशेष मागास प्रवर्ग अपंग,अनाथ व आर्थिक दृष्टया मागास वर्ग विद्यार्थ्यांनी वसतीगृह प्रवेशासाठी अर्ज करावेत असे आवाहन गृहपाल, मुलांचे शासकीय वसतीगृह लोहारा यांनी केले आहे.

Labels:

घरकुल मंजूर पात्र लाभार्थीची बुधवारी निवड

उस्मानाबाद -: जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या पारधी समाजाचे लोकांकरीता घरकुल मंजूर करण्यासाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, औरंगाबाद कार्यालयास प्राप्त झालेल्या अर्जाची प्रकल्पस्तरीय समितीद्वारे छाननी करण्यात आली आहे. पात्र व अपात्र लाभार्थ्यांच्या याद्या उस्मानाबाद, तुळजापूर, कळंब, भूम, वाशी व परंडा या तहसील कार्यालय तसेच पंचायत समिती कार्यालयाच्या सूचना फलकावर डकविण्यात आल्या आहेत. पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी अपर जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांचे दालनात दि. 26 जून रोजी दुपारी 2 वाजता निवड समितीची बैठक आयोजित करण्यात आली असून पात्र लाभार्थ्यांची निवड ही चिठ्ठीद्वारे करण्यात येणार आहे. पात्र लाभार्थ्यांनी बैठकीस जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित रहावे, असे आवाहन प्रकल्प अधिकारी श्रीमती जे.एस.साने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, औरंगाबाद यांनी केले आहे.

Labels:

कामाची ई-निविदा संकेतस्थळावर

उस्मानाबाद -:  भूम तालुक्यातील राज्य मार्ग 62 ते आलमप्रभु ते राज्य मार्ग 57 या रस्ता कामाची जाहिरात http://mahatenders.gov.in  या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. या  जाहिरातीच्या सर्व अटी व शर्ती संकेतस्थळावर उपलब्ध असून पात्र  ठेकेदारांनी  ई-निविदा सादर करावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता (बांधकाम), जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांनी कळविले आहे.

Labels:

पानगावच्या महिलांची दारुबंदीची मागणी

बार्शी  (मल्लिकार्जून धारुरकर) -: विशेष तंटामुक्त गावचा पुरस्कार मिळविलेल्या बार्शी तालुक्यातील पानगांव या गावातील महिलांनी मागील अनेक वर्षापासून दारु विक्रेत्यांमुळे त्रास होत असल्याची तक्रार केली आहे.
    सदरच्या बेकायदा दारुकिव्रीच्या विरोधात गावातील नागरीक व महिलांनी तंटामुक्त समितीकडे वेळोवेळी तक्रार केली. सदरच्या तक्रारीची दखल न घेतल्याने वैराग पोलिसांनी तक्रार दिली. परंतु तरीही जाणीवपूर्वक डोळेझाक होत असल्याने गावातील महिलांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन दिले आहे. सदरच्या तक्रारीत दारु विक्रेत्यांकडून तसेच दारु पिणा-यांकडून महिलांची छेडछाड, शिवीगाळ व दमदाटी होत असल्याने गावतील दारुमुळे गंभीर समस्या निर्माण झाल्याचे‍ निवेदनात म्हटले आहे. पोलिसांकडून सदरच्या बेकायदा दारु विक्रेत्यांना एकप्रकारे अभय मिळत आहे. शेतात काम करायला जाणा-या शेतक-यांना घरात येवून तसेच प्रात:विधीसाठी जाणा-यांच्या हातात दारुच्या बाटल्या दिल्या जात आहेत. तंटामुक्त गाव घोषित केल्याने तंटामुक्त समितीही सदरच्या बेकायदा व्यवसायांविरोधात ठोस पावले उचलत नसल्याने सदरच्या कृत्य करणा-यांचा आत्मविश्वास बळावला आहे. सदरच्या तक्रारीची दखल लवकर न घेतल्यास गावातील महिला आंदोलन छेडणार असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
    सोमवारी सकाळी तंटामुक्त समितीच्या बैठकीत महिला तक्रार घेवून गेल्यावर महिलांसमोर दारु विक्रेत्यांनी शिटया वाजवून लज्जास्पद वर्तन केले. काही जणांनी टाळया वाजवू न सदरच्या महिलांना मानसिक त्रास देण्याचा प्रयतन केला. सदरच्या प्रकारने महिलांनी एकत्रपणे रस्त्यावर उतरुन गावातील दारुविक्री दुकानावर मोर्चा नेत दारुच्या बाटल्या फोडण्याचे ठरवले. परंतु सदरची कृती होण्याअगोदरच दारु विक्रेत्यांनी आपली दुकाने बंद करुन तेथून पळ काढला.

Labels: