Sunday, 31 May 2020

तुळजापुरात रविवारी सायंकाळी पाऊसाच्या रिमझीम सरी कोसळल्या

               

 तुळजापुर : कुमार नाईकवाडी

 तुळजापुरात रविवारी सायंकाळी ८ ते८ /३० सुमारास पाऊसाच्या रिमझीम सरी कोसळल्या. उन्हाळ्यात उकाड्याने हैराण झालेल्या नागरीकांना कांहीसा गारवा मिळाला तर हवेत गारवा निर्माण झाला होता. जवळपास १५ ते २० मिनिट पावसाने हजेरी लावल्याने शहरात सर्वञ पाणीच पाणी झाले होते.तर कांहीनी जुन माहिन्याच्या पुर्व संधेला पाऊस आल्याने मनसोक्त भिजण्याचा आनंद लुटला.हवामान खात्याने या पुर्वीच सांगितले आहे की, १ जुन ते १३ जुन पर्यत पाऊसाचे मोठे आगमन होणार आहे.बळीराजा शेतकरी मोठ्या पाऊसाच्या प्रतिक्षेनंतर काळ्या आई ची ओटी भरण्यास सज्ज असणार आहे.

Labels: ,

उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी दोघे कोरोना पॉझिटिव्ह


उस्मानाबाद :

उस्मानाबाद जिल्ह्यात रविवार दिनांक ३१ मे रोजी आणखी दोन जणांच कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून आणखी १० जणांचे तपासणी अहवाल प्रतीक्षेत आहेत.त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग बाधितांची  संख्या 73 झाली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातून एकूण 80 जणांचे स्वॅब  तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.  त्यात  तपासणी दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून  १० जणांचे तपासणी अहवाल प्रतीक्षेत आहेत . आढळलेल्या दोन रुग्णांपैकी एक नळदुर्ग येथील असून दुसरा उस्मानाबाद तालुक्यातील सुंभा येथील एका कोरुना बाधित मयत व्यक्तीच्या संपर्कात आलेला  व्यक्ती आहे. दोघांवरही उस्मानाबाद इथ जिल्हा शासकिय रुग्णालयात उपचार चालू आहेत..

Labels: ,

लग्नाचा वाढदिवस साजरा न करता शिवाजी व रुपाली शिंदे यांनी मुख्यमंत्री निधीला व गरजूंना केले साह्य

                             
       
 मुरुम, दि. ३१ :

उमरगा तालुक्यातील मुरुम येथील शिंदे गल्लीतील मुळचे पण सध्या हिमाचल प्रदेशामध्ये अभियंता पदावर कार्यरत असणारे सामाजिक कार्यकर्ते शिवाजी शिंदे व रुपाली शिंदे यांचा रविवारी(ता.३१) रोजी लग्नाचा २५ वा वाढदिवस आणि पुण्यश्लोक  अहिल्यादेवी होळकर यांच्या २९५ व्या जयंतीचे औचित्य साधून व सध्या निर्माण झालेल्या कोरोना संकटामध्ये आपणही मदत केली पाहिजे. सध्याचे हे संकट खुप मोठे होत असून दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. देशावर मोठे आर्थिक संकट असताना आमच्या लग्नाच्या वाढदिवसाला अनावश्यक खर्चाला फाटा देवून  तो खर्च आम्ही दोघांनी ठरवले की, गरजूंच्या मदतीसाठी कोविड-१९ मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी  पाच हजार रुपयाची रक्कम ऑनलाईनने मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करू आणि समाजातील होतकरू व गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या शालेय साहित्याकरिता प्रत्येकी पाचशे रुपये असे ३० विद्यार्थ्यांना मिळून पंधरा हजार रुपये त्यांच्या घरोघरी  जावून वाटप करण्याचे ठरविले. आज तो संकल्प पूर्ण केला.

 यावेळी वीरशैव कैककय्या महाराज संघटनेचे अध्यक्ष वसंत शिंदे, उपाध्यक्ष धनराज शिंदे, शिवाजी शिंदे, गिरजाप्पा कवाळे, तात्याराव शिंदे, राजू कटके, सचिन शिंदे, श्रावण कटके, रेवण कटके आदींनी शिंदे गल्लीतील राजेंद्र कटके, सुलभा कटके, राजेंद्र शिंदे, हनुमंत शिंदे, अंबादास शिंदे तर नेहरू नगर मधील श्रावण कटके, ईश्वर नारायणकर, लक्ष्मण शिंदे, पांडू खरटमल, रूक्मीणी चौघुले आदी पालकांच्या घरी जावून पाचशे रुपयाचे पॉकेट सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून देण्यात आले. शिंदे परिवारांचे सामाजिक बांधिलकीचे भान व समाजाप्रती असणारी कृतज्ञता भाव आज दुर्मिळ होत चाललेला असताना या पती-पत्नीने घेतलेल्या या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. समाज बांधवांनीही त्यांचे विशेष अभिनंदन करून त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Labels: ,

घरा-घरातच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९५ वी जयंती साजरी

           

 मुरुम, दि. ३१ : कोरोना संकट दिवसेंदिवस वाढतच असल्याने महापुरुषांच्या जयंत्या घरातच साध्या पद्धतीने साजरा करताना सर्वत्र दिसून येत आहेत. त्यामुळे शासनाच्या नियमांचे पालन होत असल्याचे यावरून दिसून येते. अहिल्यादेवी होळकर यांची २९५ वी जयंती देखील रविवारी (ता.३१) रोजी मुरूम शहर व परिसरात घरा-घरातच साजरी करण्यात आली.

मुरूम शहर व परिसरात डॉ.राजू शेंडगे, डॉ.सचिन शेंडगे, विजयाताई सोनकाटे, शिक्षकनेते प्रदिप मदने, डॉ.विजय बेडजुर्गे,माजी प्राचार्य गोरख घोडके, प्रा.अशोक दूधभाते,  माजी सैनिक खंडू दूधभाते, प्रा.डॉ.राम सोलंकर, चंद्रकांत बनसोडे गुरूजी, सामाजिक कार्यकर्ते राघवेंद्र गावडे, प्रा.डॉ.सायबण्णा घोडके,प्रा. संतोबा दूधभाते, डॉ.किशोर घोडके, गावडे बुवा, सहशिक्षक रमेश लोकरे, शिवाजी चेंडके, हणमंत शिंदे, विजय घोडके, गुंडू दूधभाते, मुख्याध्यापक कमलाकर मोटे, सुर्यकांत दूधभाते, सुभाष सोलंकर, प्रा.डॉ.आप्पासाहेब सोनकाटे, आण्णाराव पाटील, देविदास बनसोडे आदींच्या पुढाकारातून राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती घरातच राहून साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार शहर व परिसरातील बेळंब,भुसणी,सुंदरवाडी,आष्टाकासार,येणेगूर,दस्तापूर,दाळींब,अचलेर,केसरजवळगा,कदेर, कसगी,कसगीवाडी,गुंजोटी आदी गावात या आव्हानाला प्रतिसाद देत जयंती साजरी केली. अहिल्यादेवी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शारीरिक अंतर ठेवून अभिवादन करण्यात आले. या जयंती प्रसंगी अनेक ठिकाणी अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यकर्तृत्वाचे वाचन लहान बालकांनी केले. होळकर यांनी प्रतिकुल काळात एक कुशल राजकारणी, कर्तव्यदक्ष प्रशासक, एक आदर्श स्त्री राज्यकर्त्या म्हणून इतिहासाने त्यांच्या कार्याची दखल आणि नोंद घेतल्याच्या गोष्टी, जनतेची प्रगती व विकास साधताना सामाजिक भान व शांतता ठेवून समाजात स्वातंत्र्य, समता व न्याय या मुलभूत मानवी मूल्यांना होळकर यांनी प्रशासन करताना त्याकाळी विशेष प्राधान्य असे दिले अशा कितीतरी घटना व उदाहरणे इतिहासात नोंदविल्या गेल्याची चर्चा यावेळी बालगोपाळांनी केली.

Labels: ,

तुळजापुरात पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी

                            
तुळजापुर : कुमार नाईकवाडी

 महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी मातेच्या नगरीत दि.३१ में रविवार रोजी पुण्यश्लोक राजमाता आहिल्याबाई होळकर यांच्या जयंती चे औच्युत साधुन तुळजापूर शहरातील क्वारनटाईन नागरीकांना पुलाव राईस वाटप करण्यात आले.

   युवा नेते  विनोद पिटु गंगणे  व नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्या मार्गदर्शनाखाली तुळजापुर शहरातील क्वारन टाईन नागरीकांना पुलाव राईस चे अल्पोपहार जेवण वाटप करण्यात आले. यामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह, घाटशिळ रोड 108 भक्त निवास व उपजिल्हा ग्रामिण रुग्णालय या ठिकाणी नागरीकांना वाटप करण्यात आले. या दरम्यान क्वारनटाईन नागरीकांच्या सोई सुविधांची ही नगराध्यक्षांकडुन पाहणी करण्यात आली.

 यावेळी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, आनंद कंदले, नगरसेवक नानासाहेब लोंढे, अभिजित कदम, रत्नदिप भोसले, श्रीनाथ काका शिंदे, हणमंत पुजारी,व सहकारी उपस्थित होते.

Labels: ,

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी "एक गाव एक पोलिस कर्मचारी"


तुळजापूर : कुमार नाईकवाडी

 उस्मानाबाद जिल्हयात वाढत्या कोरोना चा प्रादुर्भावास आळा घालण्यासाठी उपविभागीय पोलिस कार्यालय  तुळजापूर अंतर्गत तुळजापूर, नळदुर्ग, तामलवाडी भागातील 130गावात ऐक गाव ऐक पोलिस  कर्मचारी अशी नेमणूक करुन कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना केल्याची माहीती उपविभागीय पोलीस अधिकारी डाँ दिलीप टिपरसे यांनी दिली.

संबंधित पोलिस कर्मचाऱ्याने नेमुन दिलेल्या गावात कोरोना पसरु नये याची जबाबदारी त्याचावर सोपवली आहे.संबंधित गावातील पोलिस पाटील कोरोना वाँरीयर्स  ग्रामसेवक  ग्रामपंचायत शिपाई  यांच्या मदतीने गावात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना वर देखरेख ठेवण्यात येणार आहे. गावात सोशल डिस्टंन्सिंग न पाळणा-यावर इसमांवर कारवाई करण्यात येणार आहे.सदर नेमुन दिलेल्या गावात पोलिस महसुल कर्मचारी गावात नेमलेल्या कोरोना वाँरीयर्स मदतीने कोरोना संसर्ग पासुन बचाव होणार आहे तुळजापूर नळदुर्ग तामलवडी येथील अधिकारींना ऐक पोलिस कर्मचारी माध्यमातून कोरोना संसर्ग पासुन नियंत्रण आणण्यासाठी काटेकोरपणे कायदा ची अमलबजावणी करण्याचे आदेस दिले आहेत  .

जिल्हा पोलिस अधीक्षक राजतिलक रोशन यांच्या मार्गदर्शन खाली  उपविभागीयपोलीसअधिकारी डा़ँ दिलीप टिपरसे यांनी तुळजापूर उपविभागात राबविण्याचे   आदेश दिले आहेत.


यांचे कामकाज पुढीलप्रमाणे :-

वारंवार गावांना भेट देऊन पोलिस पाटील व ग्राम सुरक्षा दलाचे मनोबल उंचावणे  क्वारटांईन बाबतीत योग्य ती दक्षता घेणे कोरोना बाबतीत तक्रारी आल्यास तात्काळ वरिष्टांना कळवून निवारण करणे गावात आलेल्यांची माहीती लपविल्यास कारवाई करणे होम क्वारटांईन व्यक्ती वर देखरेख करणे होम क्वारटांईन कक्षास वारोंवार भेटी देणे मास्क न वापरणे व नियम न पाळणा-यांवर कारवाई करणे..

Labels: ,

पात्र असणाऱ्या शाळांना मंजूर अनुदान वितरीत करावे; अन्यथा आमरण उपोषण


तुळजापूर : कुमार नाईकवाडी

राज्य उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय शाळा कृती संघटनेच्यावतीने दिनांक 1 जून रोजी राज्यभर आमरण उपोषण करण्यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तुळजापूर तहसीलदार यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.

या निवेदनामध्ये राज्यातील विनाअनुदानित शिक्षकांना मंजूर केलेल्या अनुदानाचे वितरित केले जात नसून वित्त विभागाने उच्च माध्यमिक शाळांची संपूर्ण माहिती तपासली तरीही अनुदानाचे वितरित केले जात नाही, सरकारने कायम हा शब्द काढला असेल तरीही अनुदान मिळत नाही, मंजूर निधीच्या वितरणाचा शासन आदेश निर्गमित होण्यास दिरंगाईमुळे अनेक विनाअनुदानित उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हवालदिल झाले आहे त्यामुळे आर्थिक व मानसिक संतुलन बिघडत चालले आहे,याकाळात 95 शिक्षक बांधवांनी आत्महत्या केल्या आहेत, आणखीन विलंब लावल्यास परिस्थिती आणि आणखीन गंभीर होऊ शकते त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांनी वित्त विभागाने पात्र ठरलेल्या उच्च माध्यमिक शाळांचा मंजूर अनुदान निधी वितरनाचा शासन आदेश निर्गमित करुन हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

तहसीलदार तुळजापूर यांना दिलेल्या निवेदनावर महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय शाळा कृती संघटना तुळजापूर तालुका अध्यक्ष प्रा.बालाजी गुरव,तालुका उपाध्यक्ष प्रा. अनिल बनसोडे, लातूर विभाग कोषाध्यक्ष श्रीधर मोरे यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Labels: ,

जिल्हाबंदीचे उल्लंघन करत नागरीकांचा वडगावात मुक्त संचार


तामलवाडी  : सर्जेराव गायकवाड 

सोलापूर जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या तुळजापुर तालुक्यातील वडगाव काटी येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर माती,काटेरी झुडपे टाकुन सिमा बंद करण्यात आल्या असतानाही ते बाजुला करून जिल्हाबंदीचे आदेश पायदळी तुडवत अनेक नागरीक वडगाव काटी गावात मुक्त संचार करत आहेत याकडे,ग्रामपंचायत,पोलिस प्रशासन यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे राष्ट्रीय छावा जिल्हाध्यक्ष विश्वजित चुंगे यानी बोलताना सांगितले आहे.
    सोलापूर जिल्हासह शहरामध्ये  कोवीड - १९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सिमेवरील गावानी सतर्क रहाण्याची आवश्यकता असतानाही सोलापूर जिल्ह्याच्या सिमेवर असलेले तुळजापुर तालुक्यातील वडगाव काटी गावात नागरीक कोरोनाला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत.रेड झोन जिल्ह्यातील नागरीकांनी गावामध्ये येऊ नये यासाठी गावच्या सिमा काटेरी झुडपे,माती टाकुन बंद करण्यात आल्या असतानाही काही महाशय काटेरी झुडपे काढुन गावामध्ये ये जा करत आहेत.अडवण्याचा प्रयत्न केला असता तक्रारी करत आहेत, गावामध्ये अजुनही अवैद्य दारूविक्री सुरूच असुन दारू पिण्यासाठी तळीराम प्रशासनाचे नियम धाब्यावर बसवुन एकच गर्दी करत आहेत.याकडे ग्रामपंचायत ,पोलिस प्रशासन मात्र अक्षम्य दुर्लक्ष करत असल्याचे छावा जिल्हाध्यक्ष विश्वजित चुंगे यानी बोलताना सांगितले आहे.तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊनचे तीन तेरा वाजले असुन काहीजण विनामास्क रस्त्यावर,चौकाचौकात एकत्र येत आहेत.कोरोनाच्या भीतीने मुंबई,पुणे या ठिकाणाहुन शेकडो नागरीक गावामध्ये आले असुन अनेकांनी आपली तपासणी केलेली नाही तर काहीजणांना  विलगीकरण केलेले असतानाही ते गावामध्ये मुक्तपणे संचार करीत आहेत याकडे कोणीच लक्ष देत नाहीत.अशीच परिस्थिती राहील्यास कोरोनाचा संसर्ग लहान गावानाही आपल्या विळख्यात नक्कीच घेणार. याकडे जिल्हाप्रशासनाने लक्ष घालुन गावप्रशासनाला जागृत  करावे अशी मागणीही राष्ट्रीय  छावा संघटनेचे  जिल्हाध्यक्ष विश्वजित चुंगे यानी तरूण भारतशी बोलताना केली आहे.

ग्रामसुरक्षा दलाची ओळखपत्रे केली परत

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावामध्ये तामलवाडी पोलिस ठाण्यांतर्गत ग्रामसुरक्षा दलाची नेमणुक करण्यात आली होती.परंतु कोरोना विरुद्ध काम करत असताना काही राजकीय मंडळी स्वार्थासाठी अडथळे निर्माण करत असल्याने व प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याने ग्रामसुरक्षा दल सोडुन पोलीस प्रशासनाने दिलेली ओळखपत्रे लेखी पत्र देऊन परत केली  असल्याचे विश्वजित चुंगे यानी सांगितले.


गावात दुसर्यांदा जंतुनाशक औषधाची फवारणी

कोविड- १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावामध्ये जंतुनाशक फवारणी औषध असतानाही फवारणी केली जात नसल्याने ग्रामपंचायतीच्या या भोंगळ कारभाराबाबत जिल्हाधिकारी याना सांगितले त्यावेळी वरीष्ठांच्या आदेशानुसार दि. २७ रोजी गावामध्ये दुसर्यावेळी जंतुनाशक औषधाची फवारणी करण्यात येत असल्याचेही विश्वजित चुंगे यानी सांगितले आहे.

Labels: ,

Saturday, 30 May 2020

आ.सतीश चव्हाण यांची लोहारा ग्रामीण रूग्णालयास भेट


लोहारा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी आज (दि.30) लोहारा ग्रामीण रूग्णालयास भेट देऊन तेथील अडीअडचणी जाणून घेतल्या. तसेच याठिकाणी लागणार्‍या आवश्यक त्या सोई-सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी संबंधीत अधिकार्‍यांना दिल्या.

आ.सतीश चव्हाण यांनी लोहारा ग्रामीण रूग्णालयाची पाहणी करून याठिकाणी कोण कोणत्या वस्तुंचा तुटवडा जाणवत आहे, सध्या तातडीने कोण कोणत्या वस्तुंची गरज आहे, कर्मचार्‍यांची सं‘या पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे का?, कर्मचार्‍यांना काम करताना कोणत्या अडचणी येत आहेत का?, एन-95 मास्क व पीपीई कीट उपलब्ध आहेत का? आदीसंदर्भात आरोग्य अधिकारी डॉ.गोविंद साठे यांच्याशी चर्चा केली. यावेळी याठिकाणी अनेक आवश्यक वस्तूंचा तुटवडा असल्याचे आ.सतीश चव्हाण यांच्या लक्षात येताच त्यांनी उस्मानाबाद जिल्हा रूग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राजकुमार गलांडे यांच्याशी फोनव्दारे चर्चा करून लोहारा ग्रामीण रूग्णालयास अत्यावश्यक वस्तूंची तात्काळ पूर्तता करण्याची मागणी केली. तसेच मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दीड महिन्यांपासून क्वारंटाईन केंद्र उभारण्यात आले आहे. याठिकाणी देखील आ.सतीश चव्हाण यांनी भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.

            यावेळी नायब तहसीलदार रणजित शिराळकर, लोहरा नगर पंचायतचे मुख्य  कार्यकारी अधिकारी गजानन शिंदे, आरोग्य अधिकारी डॉ.गोविंद साठे, सतीश इंगळे, नितीन बागवे, प्राचार्य डॉ.विरभद्रेश्वर स्वामी आदींची उपस्थिती होती.

Labels: ,

तिर्थक्षेञ तुळजापूरात गाड्या फोडण्याचे सञ


तुळजापूर : कुमार नाईकवाडी

शहरातील शुक्रवार पेठ भागातील खडकाळ गल्लीतील मुख्य रस्त्यावर असणाऱ्या जनरल स्टोअर्स समोरील फरशी व  समोर लावलेली ईर्टीका कारवर अज्ञातांनी दगडे मारुन गाडीच्या काचा फोडुन  सुमारे अठ्ठेचाळीस हजाराचे नुकसान केल्याची घटना घडल्याने  वाहन चालकांन मध्ये घबराहाटीचे वातावरण पसरले सदरील घटना शनिवार दि29रोजी राञी दोन वाजता  घडली.

या पुर्वी दहा ते बारा गाडींचा काचा फोडण्यात आल्या होत्या त्यानंतर काही दिवस जाताच पुन्हा गाड्या फोडण्याचे सञ सुरु झाले आहे.



या बाबतीत अधिक माहीती अशी की, शुक्रवार पेठ भागातील खडकाळ गल्ली परिसरातील मुख्य रस्त्यावर असणाऱ्या सायराज जनरल स्टोअर्स शेजारी लावलेली ईर्टीका  शुक्रवार राञी  अज्ञांतानी  प्रथम जनरल स्टाअर्स समोरील  फरशा फोडल्या त्यानंतर  फुटलेली फरशी घेवुन ईर्टीका कंपनीची गाडी क्रमांक MH25R9258 वर समोरील व पाठीमागील काचावर  मारुन यात काचेचा चक्काचुर होवुन  गाडीचे चाळीस हजाराचे व हाँटेल ची फरशी फुटुन आठ हजार असे ऐकुण अठ्ठेचाळीस  हजार  रुपयाचे नुकसान झाले आहे.

या प्रकरणी तुळजापूर पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. राञीअपराञी फिरणा-यांचा पोलिसांनी बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

Labels: ,

शिवसेनेच्या वतीने कार्ला येथे मास्क व सेनिटायझरचे वाटप


तुळजापुर, दि.  ३० :

तुळजापूर तालुक्यातील कार्ला येथे कोरोना बाधित तीन रुग्ण आढळून आल्याने गावातील काही भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून सिल करण्यात आला. प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या उपायोजनांची पाहणी केली. तसेच आणखीन नविन आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास घाडगे-पाटील यांच्या सूचनेवरून मास्क व सॅनिटीझर चे वाटप करणयात आले. यावेळी उपस्थित उस्मानाबादचे तालुका प्रमुख सतीश(भैया) सोमाणी, तुळजापूर तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी,  शिवसेना कक्ष जिल्हाप्रमुख मोईन पठाण,दिनेश हेड्डा,अनिल बागल,आकाश पाटील,किरण चव्हाण,रोहित नागनाथराव चव्हाण,कार्ला तंटामुक्ती अध्यक्ष  व्यकट देवकर, पोलीस पाटील उत्तम पाटील, सरपंच सुभाष देवकर, मा.सरपंच माणिक देवकर, शाखाप्रमुख किरण पवार आदि उपस्थित होते.

Labels: ,

विद्युत तारांच्या घर्षणामुळे होर्टी येथील शेतकऱ्याचा ऊस जळून खाक


होर्टी : बाळकृष्ण मुळे

तुळजापूर तालुक्यातील होर्टी येथील शेतकरी गणेश सिद्रामप्पा खराडे यांच्या शेतातील ऊस जळून खाक झाला आहे. यांच्या शेतातून जाणारे  विज वाहिन्यांच्या तारा खाली  लोंबकाळल्या होत्या. त्यामुळे विद्युत तारांच्या घर्षणामुळे आगीच्या ठिणग्या पडून दीड एकर शेतातील उभा ऊस जळून खाक झाला आहे.

24 मे रोजी झालेल्या विद्युत वाहिन्यांच्या घर्षणामुळे आगीच्या ठिणग्या पडल्या व ऊस जळून खाक झाला. दुपारी 4 वाजताच्या सुमारास ठिणग्या पडून उभा ऊस जळून खाक झाला आहे. यामध्ये दीड एकर शेतातील ठिबक जळले आहे. या बाबत  माहवितरण कंपनी कडे वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष केले......सलग दुसऱ्या वर्षी ह्या  शेतकऱ्याचे उसाचे नुकसान झाले आहे...१४ मे २०१९ रोजी ह्या गटातील विद्युत तारांच्या झालेल्या घर्षणामुळे आगीच्या ठिणग्या पडून उभा ऊस खाक जळून झाला होता....या वर्षी देखील महावितरणच्या हलगर्जीपणा मुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

Labels: ,

कै. बॅ. बी.एन. देशमुख यांना तुळजापूरात श्रद्धांजली


तुळजापूर, दि. ३० :

भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे  जेष्ठ नेते माजी न्यायमूर्ती बी.एन.देशमुख यांचे काल दिनांक 29/05/2020 रोजी वृद्धपकाळाने औरंगाबाद येथे राहत्या घरी निधन झाले. या जेष्ठ व अभ्यासू  नेत्यास शेतकरी कामगार पक्ष तुळजापूर यांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.

 या प्रसंगी माजी नगराध्यक्ष भाई प्रकाशराव देशमुख यांनी बी.एन. साहेब यांच्या सोबतच्या आठवणीला उजाळा दिला त्यामध्ये प्रामुख्याने आणीबाणी विरोधातील तुळजापूर कोर्टा मध्ये लढलेली केस,मंदिर मधील बकरे बलिदान कायम चालू ठेवण्यात साहेबांचे योगदान ,अश्या अनके आठवणीस उजाळा देण्यात आला,तसेच भाई उत्तम नाना अमृतराव यांनी ही त्यांच्या व्यक्तिमत्व ची  व कार्याची माहिती सांगितली ... शेवटी दोन मिनीट स्थब्द उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली...

किरण खपले,युवराज बापू पवार,भालचंद्र अपराध,राजेश देशमुख,उमेश भिसे,राहुल खपले,श्रेयस कुतवळ, नवनाथ जगताप, अनंत क्षीरसागर, इ उपस्थित होते.

Labels: ,

रोजगार हमी योजनेतील मजूर कामगार कुटुंबाना अनुदान द्यावे; रिपाइंची मागणी


वागदरी : एस. के.गायकवाड

 रोजगार हामी योजनेतील जाँबकार्ड धारक मजूर व शेतमजूर असंघटीत कामगार कुटुंबाना किमान पाच हजार अनुदान द्यावे अशी मागणी रिपाइंच्या वतीने तुळजापूर तहसीलदार मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या कडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

   रिपाइंच्या वतीने तुळजापूर तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले  आहे की, लाँकडाऊनच्या काळात असंघटीत शेतमजूर, रोजगार हमी योजनेतील मजूर कामगारांचे सर्व कामे बंद झाल्याने ते आर्थिक आडचणीत सापडले आहेत.

त्याना आतापर्यंत कसलीही आर्थिक मदत मिळालेली नाही.फक्त मोफत तांदूळ मिळाले पण भाता बरोबर वरण करण्याकरीता तेल, मिठ ,मिरची आणण्यासाठी आर्थिक  आडचण निर्माण होत आहे.तरी शासनाने रेशन देण्या पेक्षा जाँबकार्ड धारक कुटुंब प्रमुखाच्या खात्यावर किमान पाच हजार रुपये थेट अनुदान जमा करावे. आशी मागणी करण्यात येत आहे.


  रिपाइंच्या वतीने तुळजापूर तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनावर रिपाइंचे जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम,नगरसेविका वैशाली कदम,रिपाइं तुळजापूर शहराध्यक्ष अरुण कदम सह कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.
Read more »

Labels:

कोविड योद्धाना आरंभच्या वतीने रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारे आर्सेनिक गोळ्याचे वाटप



नळदुर्ग :

कोरोना सध्या जगभरात धुमाकूळ घालत आहे भारत देशात एकूण एक लाखापेक्षा जास्त कोरोनाची लागण झालेले रुग्ण आहेत. सध्या तरी कोरोनवर कोणतीही लस उपलब्ध नाही. एकूण रुग्णापैकी जवळपास 70 हजार रुग्ण आज बरे होऊन गेले आहेत. कोरोनावर लस जरी उपलब्ध नसली तरी होमिओपॅथीचे आर्सेनिक अल्बम 30 हे औषध रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपयोगी ठरत आहे. केंद्रातील आयुष मंत्रालयाने या औषधाला रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी व कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून या औषधाची शिफारस केली आहे. केरळ तसेच महाराष्ट्रातील मुंबई, नाशिक, कोल्हापूर ईत्यादी अनेक कोरोनाबाधित शहरात या औषधाचा वापर केला जात असून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हे औषध गुणकारी ठरत असल्याचे सांगितले जात आहे.
     
     कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथी औषधाचे वाटप सोशल डिस्टन्सिंग चे वापर करून डॉ. सुधाकर भानुदास मोहोळे, डॉ. जितेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नळदुर्ग शहरातील कोविड योद्धा डॉक्टर, नर्स, आशा सेविका, फार्मसिस्ट, नगरपालिका कर्मचारी, पत्रकार यांना वाटप करण्यात आले आहे यावेळी पत्रकार विलास येडगे, संस्थेचे अध्यक्ष राहुल हजारे, उपाध्यक्ष विशाल डुकरे, सचिव श्रमिक पोतदार, डॉ. आनंद काटकर, कोषाध्यक्ष सागर हजारे, मयूर महाबोले, सुरज आवटे, अतुल हजारे, मयूर पाटील आदी उपस्थित होते.

Labels:

Friday, 29 May 2020

किशोर कदम यांच्या स्मरणार्थ मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ३१००० रुपये


जळकोट,दि.२९ : मेघराज किलजे

 तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील राजे शिवछत्रपती सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीचे मुख्य आधारस्तंभ किशोर कदम यांचे दि.१८ रोजी आकस्मित निधन झाले आहे. त्यांचा गोड जेवणाचा कार्यक्रम न करता त्यांचे बंधू ऍड. अंगद कदम व कुटुंबीयांनी कोविड-१९ साठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ३१००० रुपये दिले आहेत.

सध्या जग कोरोनाच्या महामारीने संकटात सापडले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातही कोरोनाने आता हात पसरायला सुरुवात केली आहे. उस्मानाबाद जिल्हाही पूर्णतः भयभीत झाला असून प्रत्येक जण जीव मुठीत घेऊन कोरोना विरुद्ध लढत आहेत. उस्मानाबाद कोविड-१९च्या प्रतिबंधासाठी कोरोना-१९ युद्ध सुरू आहे. जळकोट येथील राजे शिवछत्रपती सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीचे मुख्य आधारस्तंभ किशोर कदम यांचे दि.१८रोजी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने जळकोट व  परिसर सध्या शोकमग्न आहे. त्यांचा गोड जेवणाचा कार्यक्रम न करता कोविड-१९ मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ३१००० रुपये त्यांच्या स्मरणात ऍड.अंगद कदम व कुटुंबियांनी दिले आहेत. मुख्यमंत्री सहायता निधीसाठी हा धनादेश उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी डॉ.दीपा मुधोळ- मुंडे यांच्याकडे शुक्रवार(दि.२९)रोजी सुपूर्द करण्यात आला. यावेळी ऍड.अंगद कदम, शिवजन्मोत्सव समितीचे ब्रह्मानंद कदम, शिवराम कदम, उमेश गंगणे आदीजण उपस्थित होते.

Labels: ,

लॉकडाउन : विनापरवाना जिल्हा प्रवेश, पोलीस पाटलांच्या तक्रारीवरुन 2 गुन्हे दाखल


उस्मानाबाद : कोविड- 19 चा संसर्ग पसरु नये म्हणुन लॉकडाऊन काळात उस्मानाबाद जिल्हयात विनापरवाना प्रवेश करण्यास बंदी आहे. असे असतांनाही 1)दिलीप बाबुराव जाधव 2)बालाजी जाधव 3)हिरालाल चव्हाण 4)मारुती जाधव 5)कांचन गायकवाड 6)नवीन गायकवाड 7)पवन गायकवाड सर्व रा. तलमोड, ता. उमरगा हे विनापरवाना, छुप्या मार्गाने पोलीस नाकाबंदी टाळून बाहेर जिल्ह्यातून दि. 17.04.2020 ते 18.04.2020 या काळात मौजे तलमोड, ता. उमरगा येथे आले. तर दुसऱ्या घटनेत विजय विश्वनाथ आतकरे व दयानंद विश्वनाथ आतकरे दोघे रा. देवळाली, ता. कळंब हे आज दि. 29.05.2020 रोजी पोलीस नाकाबंदी टाळून, विनापरवाना प्रवास करत सोलापूर येथून मौजे देवळाली, ता. कळंब येथे आपल्या घरी येउन गुपचूपणे राहीले. तसे आल्याबाबत त्यांनी प्रशासनास कोणत्याही प्रकारची माहिती दिली नाही.

अशा मजकुराच्या संबंधीत गावच्या पोलीस पाटील यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन वरील सर्व व्यक्तींविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269 सह, महाराष्ट्र कोविड- 19 उपाययोजना नियम- 11 सह, साथीचे रोग प्रतिबंधीत कायदा कलम- 3 अन्वये स्वतंत्र 2 गुन्हे संबंधीत पो.ठा. येथे नोंदवण्यात आले आहेत.

Labels:

सहा वर्षापासून पाहिजे असलेला आरोपी अटकेत


उस्मानाबाद, दि. २९ :

 पो.ठा. भुम गु.र.क्र. 72/2014 या चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी- किसन छगन काळे रा. भूम हा गेली सहा वर्षापासून पोलीसांना पाहिजे (Wanted) होता. त्यास स्थागुशा च्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे दि. 29.05.2020 रोजी भूम येथील पारधी पिढीवरुन ताब्यात घेउन उर्वरीत तपासकामी भुम पो.ठा. यांच्या ताब्यात दिले आहे.

ही कारवाई पोनि श्री. दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि श्री. आशिष खांडेकर, सपोफौ- मधुकर घायाळ, पोहेकॉ- भागवत झोंबाडे, तानाजी माळी, धनंजय कवडे, पोना- समाधान वाघमारे, महेश घुगे, यांच्या पथकाने केली आहे.

Labels:

बेंबळी येथील पोलिस स्टेशन कर्मचाऱ्यांना बॅटरीचे वितरण


बेंबळी, दि. २९ : 

कोरोनाच्या या लढाईत जिवाची बाजी लावत सर्वात पुढे आम्ही म्हणत लोकांच्या जिवाचे रक्षण करणारे म्हणजे पोलिस डिपार्टमेंट आहे.  गावातील सोशल डीस्टंसीगच्या विषयापासून ते जिल्हा बॉर्डरच्या सुरक्षेपर्यंत 24 तास सेवा देणारे उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी पोलिस स्टेशनचे सपोनि मुस्तफा शेख व त्यांच्या टिमचे कार्य उल्लेखनीय आहे. 

आज शुक्रवार शनिवारी रोजी दक्षता समिती बेंबळी च्या वतीने बेंबळी पोलिस स्टेशन येथे बँटरीचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी समीतीचे सदस्य गालिबखान पठाण, अमर कटके, नितीन पाटील, गोवींद पाटील, शाम पाटील,सुनिल वेदपाठक, बालाजी माने, नंदकुमार मानाळे, शितल शिंदे, सोनु निकम उपस्थित होते.

Labels: ,

बॅ.बी.एन.देशमुख यांचे निधनामुळे काटी गाव कडकडीत बंद



काटी : उमाजी गायकवाड

 तुळजापूर तालुक्यातील काटीचे सुपुत्र तथा  मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती,माजी आमदार बॅ.बलभिमराव नरसिंगराव देशमुख काटीकर( बी.एन. देशमुख) वय (85 वर्षे) यांचे मध्यरात्री  1:30 वाजनेच्या सुमारास औरंगाबाद येथील राहत्या घरी दु:खद निधन झाले. त्यांच्या निधनाचे वार्ता गावात समजताच गावातील सर्व दुकाने बंद करून येथील मुख्य बाजार चौकात त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांच्या निधनाची वार्ता गावात पसरताच गावात संपूर्ण गावात शोककळा पसरली होती. सर्व दुकाने बंद कडकडीत बंद करण्यात आली होती. गावात दुपारी सर्वत्र शुकशुकाट दिसून आला होता.  त्यांचे पार्थिवावर शुक्रवारी सकाळी 10 वाजता औरंगाबाद येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात एक मुलगा सुन, दोन नातवंडे असा परिवार आहे. शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी खासदारअँड.नरसिंहराव देशमुख यांचे पुत्र, विरोधीपक्ष नेते उध्दवराव पाटील यांचे ते भाच्चे होत. ते शेतकरी कामगार पक्षाचे नेते होते. तात्यासाहेब पुरोगामी युवक संघटनेचे संस्थापक व दीर्घकाळ अध्यक्ष होते, मराठवाड्याच्या जडणघडणीत पर्यायाने महाराष्ट्राच्या मोजक्या पुरोगामी नेतृत्वापैकी एक, शेतकरी कामगार पक्षाचे मातब्बर नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. तुळजापूर तालुक्यातील काटी गावाची ओळख बॅरिस्टर बी.एन. देशमुख यांचे गाव म्हणून संबंध महाराष्ट्राभर होती. 

शेतमालाला हमी भाव, कामगारांच्या कष्टाला दाम व गोरगरिबांना न्यायदान तसेच मराठा आरक्षणासाठीच्या लढ्यात महत्वपूर्ण योगदान आहे.उच्च व सर्वोच्च न्यायालयात ते वकिली करत असताना 1978 ते 1984 या कालावधीत राज्य विधान परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले होते. उस्मानाबादहुन लोकसभेची त्यांनी निवडणूकही लढविली होती. ते साम्यवाद विचारसरणीचे नेते होते. त्यानंतर त्यांची उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली होती.  शेतकरी ,कष्टकरी कामगार  तसेच सामाजिक प्रश्रावर त्यांनी उच्च न्यायालयात दिलेले अनेक निर्णय 'ऐतिहासिक' ठरले होते.



  सर्वसामान्यांचे प्रश्नावर लढणारऱ्या व महाराष्ट्राचे भूषण  असलेले बॅरिस्टर बी.एन. देशमुख उर्फ तात्यासाहेबांच्या निधनामुळे मराठवाड्यासह काटी गाव  पोरका झाला असून काटी गावावर शोककळा पसरली असून गावातील सर्व दुकाने बंद करून येथील मुख्य बाजार चौकात ग्रामस्थांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

Labels: ,

पवनराजे लोकसमृद्धी मल्टीस्टेट समूहाच्या वतीने 1 लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधी करिता सुपूर्द


   
उस्मानाबाद,दि.29 : कोरोना(कोविड-19) या साथरोगाच्या लढाईत समाजाप्रती बांधिलकी या नात्याने पवनराजे लोकसमृद्धी मल्टीस्टेट समूहाच्या वतीने 1 लाख 1 हजार रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी  जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांच्याकडे देण्यात आले.

          हा निधी पवनराजे लोकसमृद्धी मल्टीस्टेट समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुखीम सिद्दिकी, जनरल मँनेजर प्रशांत सुलाखे, व्यवस्थापक फिरोज शेख, ज्ञानेश्वर भोसले, संजय भुतेकर यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

Labels: ,

तुळजापुर येथील कोरोनाबाधित रुग्णाला डिस्चार्ज


तुळजापुर : कुमार नाईकवाडी

 तिर्थक्षेञ  तुळजापुरात   पुणे येथुन आलेल्या २१ वर्षीय गर्भवती माहिलेचा कोरोना अहवाल पाँझीटिव आल्यानंतर तिच्यावर उपजिल्हारुग्णालयातील परिसारातील  कोरोना रुग्णालयात उपचार करण्यात आल्यानंतर तिचा दुसरा तपासणी अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर दहा दिवसाने  शुक्रवार दि29रोजी ती कोरोना तुन मुक्त झाल्याने तिला रुग्णालयातील डाँक्टर मंडळी नी तिच्यावर पुष्पवृष्ट्री करुन तिला निरोप दिला.

सदरील 21 वर्षीय गर्भवती 19मे  रोजी कोरोना बाधित रिपोर्ट आल्यानै तिला येथील कोरोना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर तिच्या संपर्कातील तेवीस लोकांचे स्वँब तपासणी स पाठवण्यात आले, ते निगेटीव्ह आले.  नंतर तिच्यावर दहा दिवस उपजिल्हारुग्णालयाचा वैद्यकीय अधिकारी डाँ. चंचला बोडके यांच्या मार्गदर्शना खाली कोरोना रुग्णालयाचे प्रमुख डाँ. दिग्विजय कुतवळ यांनी तिच्यावर उपचार केल्यानंतर दहा दिवसा नंतर तिचा रिपोर्ट निगैटीव्ह आल्यानै तिला आज घरी पाठवण्यात आले.

 यावेळी डाँ. अमित शिरशीकर, डाँ श्रीधर जाधव, डाँ दिग्विजय कुतवळ, डाँ चंद्रकांत क्षिरसागर, सुनिल नायकल, सिस्टर भोसले, सिस्टर शितल, सिस्टर क्षिरसागर यांनी सदरील गर्भवती महिलेस निरोप दिला.

Labels: ,

काटी येथील क्वारंटाईन गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप


काटी : उमाजी गायकवाड

 तुळजापूर तालुक्यातील काटी येथे गुरुवार दि. (28) रोजी सायंकाळी सहा वाजता मदरसा दावतुल उलुम बहुउद्देशीय सामाजिक संस्था काटी, काक्रंबा,नळदुर्ग आणि उस्मानाबाद शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे, मुंबई, भिवंडी आदि ठिकाणांहून येऊन येथील जिल्हा परिषद प्रशाला, येडेश्वरी कन्या प्रशालेतील आपला 14 दिवसांचा कालावधी संपल्यानंतर घरी जाताना सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून 17 कुटूंबियांना तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जमदाडे यांच्या हस्ते किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. या 17 किटसह या संस्थेच्या माध्यमातून काटी येथे 175 किराणा साहित्याच्या किटचे वाटप करून मदतीचा हात देऊन लोकांची उपजीविका भागविण्यासाठी प्रयत्न केला आहे.

 सध्या चालू असलेल्या  कोरोना व्हायरस या विषाणूमुळे जे देशात राज्यात व आपल्या गावात लाॅकडाऊन चालू आहे त्यामुळे गोरगरिबांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्याअनुषंगाने सामाजिक बांधिलकी जपत जातीभेदाच्या भिंती पार करून मदरसा दावतुल उलुम बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जिल्हाभरात दहा हजार किटचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे सचिव पैगंबर काझी यांनी आमच्या प्रतिनिधीशी दिली.या त्यांच्या उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे.

       यावेळी तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जमदाडे, सपोनि राठोड, माजी चेअरमन सयाजीराव देशमुख,पो.हे.कॉ. नाईकवाडी,चेअरमन विक्रम देशमुख, सरपंच आदेश कोळी, पत्रकार उमाजी गायकवाड, सुजित हंगरकर, मकरंद देशमुख, करीम बेग,अहमदखान पठाण, बाळासाहेब भाले,भैरी काळे, मुईज इनामदार,  हाफिज, अकील इनामदार, हाफिज जिलानी कुरेशी आमिरखान पठाण आदी मान्यवर उपस्थित होते.

Labels: ,

बॅरिस्टर बी.एन.देशमुख (काटीकर) एक अलौकिक व्यक्तीमत्व


काटी : उमाजी गायकवाड

मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठातील माजी न्यायमुतीॅ मा.बॅरिस्टर बी.एन.देशमुख (काटीकर)उर्फ तात्यासाहेब तुळजापूर तालुक्यातील काटी येथील रहिवाशी. त्यांचे वडिल कै भाई नरसिंहराव देशमुख  हे उस्मानाबाद येथील सुप्रसिद्ध वकील सर्वसामान्यांचे,दिनदलिंताचे, शेतकरी, शेतमजूर कष्टकऱ्यांचे वकील म्हणून उस्मानाबाद जिल्ह्यात ख्याती होती.

       बॅरिस्टर बी.एन.देशमुख (काटीकर) यांचे मामा कै.भाई उध्दवराव पाटील हे महाराष्ट्रातील शेतकरी कामगार पक्षाचे एक अध्वर्यू नेते. एक डाव्या आघाडीचे नेते म्हणून संबंध महाराष्ट्र भर त्यांची ओळख होती व बॅरिस्टर बी.एन.देशमुख यांचे बालपणही काटीत व त्यांच्या मामाच्या सानिध्यात गेल्याने साहजिकच डाव्या विचारसरणीचा पगडा लहान वयातच आपोआपच पडला होता. मामाच्या सहवासात असल्यामूळे मार्क्स ,महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, यांच्या विचारसरणीचे बाळकडू त्यांच्या बालमनावर लहान वयातच मिळाले.


 त्यांचे दहावी पर्यंतचे  शिक्षण उस्मानाबाद व सोलापूर हरीभाई देवकरण प्रशाला येथे झाले. इ.स.1958 साली त्यांनी कायद्याची पदवी पुणे येथील विधी महाविद्यालयातून घेतली.कायद्या अभ्यासातील त्यांची रुची वाढत गेली.कायद्याच्या पदवीनंतर आंतरराष्ट्रीय कायद्याचा अभ्यास करण्यासाठी ते लंडणला गेले व बॅरिस्टर ही पदवी घेवुन 1962साली ते भारतात परत आले. मुंबई येथे त्यांनी वकीली व्यवसायास सुरुवात केली. त्यावेळी मुंबई उच्च न्यायालयातील सुप्रसिद्ध वकील रामराव आदिक यांच्याकडे त्यांनी जुनियरशिप केली. बॅ.बी.एन देशमुख यांचे पुर्ण नाव बलभीम नरसिंहराव देशमुख परंतु त्यांना त्यांच्या आजोबांच्या नावाने तात्यासाहेब या नावाने ओळखले जायचे.
कामाच्या व्यापामुळे आपल्या काटी या गावी फारसे येणे-जाणे नसले तरी गावासाठी त्यांनी केलेल्या कार्यावरुन आपल्या भुमीबद्दल वाटणारी त्यांची आत्मियता प्रकर्षाने  जाणवत असायची.

       1971-1972 साली बॅरिस्टर बी.एन.देशमुख व तत्कालिन सरपंच अॅड.भैरिनाथराव साळुंके यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळासह तत्कालीन विद्युत मंडळ बोर्डाचे संचालक रामराव आवरगावकर यांना भेटुन केलेले विद्युत पुरवठ्यासाठीचे प्रयत्न गावासाठी हितकारी ठरले व गाव प्रकाशमय झाले.

               
        1993 साली किल्लारीला भूकंप झाला या भूकंपात अनेकजण गाडले गेले या परिस्थितीत शासनाकडून कमकुवत झालेल्या घरांच्या दुरुस्तीसाठी अनुदान देण्याचा निर्णय घेतला. या भूकंपात काटीतील अनेक घरांना तडे गेले होते.परंतू येथे कुठलीही जिवितहानी झाली नव्हती. सदर गाव अनुदानापासुन वंचित राहिले होते.त्यावेळी येथील गावकऱ्यांनी गाव पुरातन व इतिहासकालीन असल्याचा पुरावा देवुन सदर अनुदान मिळण्यासाठी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यावेळी बॅरिस्टर बी. एन. देशमुख साहेबांनी कायद्याच्या चाकोरीत राहुन आपल्या भुमीबद्दल अनुदान मिळवुन दिले.त्यामुळे गावातील प्रत्येक घरावरील छप्पर निघाल्याने व सिमेंट काँक्रीटची घरे झाली तसेच येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या   संपुर्ण शाळेवर स्लॅप पडला. यामुळे गावचे रुपच पालटलेले दिसत आहे.


      27 ऑगस्ट 1981 रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाची स्थापना औरंगाबाद येथे झाली. औरंगबाद खंडपीठाच्या स्थापनेमध्येही त्यांचा सिंहाचा वाटा होता.अॅड.बी.एन.देशमुख साहेब उर्फ तात्यासाहेबांनी गावातील कोर्ट केसेच्या भांडणामध्ये आपल्या वडिलांचा कै.अॅड.नरसिंहराव देशमुख यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कधीही एका जणांची बाजू न घेता वाद आपसात मिटवण्याचा प्रयत्न केला. हे त्यांच्या स्वभावाचे वैशिष्ट्ये आहे. त्यांचे इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व वाखाणण्याजोगे होते. विषयाचे सखोल ज्ञान, विचारशक्ती, व सर्वात महत्वाचा गुण म्हणजे विनयशीलता व आपला मुद्दा पटवून देण्यातील त्यांची कसब आदी गुणामुळे ते मुंबई उच्च न्यायालयातील श्रेष्ठ व नामवंत वकील बनले.उच्च न्यायालयाच्या वैभवात उच्च परंपरेचा अंगीकार करून भर टाकली.

तत्कालिन मुख्यन्यायमुतीॅनी त्यांच्या कर्तत्वाने  भारावून जावून 1976 मध्ये उच्च न्यायालयाचे न्यायमुतीॅ बनण्याची विनंती केली. परंतु त्यांनी त्यांचे मामा भाई उध्दवराव पाटील यांचा सल्ला घेतला व त्यांच्या सल्ल्यानुसार न्यायालयाच्या चार भिंतीच्या आत बसुन न्याय-निवाडे करण्यापेक्षा समाजामध्ये राहुन समाजसेवा करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यांनी त्यावेळी नम्रपणे न्यायमुतीॅ बनणण्यास नकार दिला. त्यांच्या मामासारखाच त्यांच्या मनावर डाव्या विचारसरणीचा पगडा होता. त्यावेळी जर साहेबानी उच्च न्यायालयाचे न्यायमुतीॅपद भूषविले असते तर कदाचित त्यांनी सवोॅच्च न्यायालयाचे सरन्यायाधिशपदही भुषविले असते. त्यांनी आपला वकिली व्यवसाय हा एक पवित्र व्यवसाय मानुन वकिली केली. या आपल्या वकिली व्यवसायाचे बाजारीकरण केले नाही.त्यांना समाजकार्याची आवड होती, गोरगरीबांच्या पैशाच्या अडीअडचणी त्यांना माहित होत्या.कारण शेतकऱ्यांच्या  अडचणीची व्यथा त्यांनी फार जवळुन पाहिल्या होत्या, गरिबी काय असते हे त्यांनी जाणले होते.त्यांनी मनात आणले असते तर त्यांच्या या व्यवसायाने लाखो रुपये कमवून ऐषआरामाचे व चैनीचे जीवन ते सहजपणे जगू शकले असते कारण तेवढी विद्वत्ता, नैपुण्य ,कौशल्य, त्यांच्याजवळ नक्कीच होते.त्यांनी आयुष्यभर दिन-दुबळ्याची गरिब, शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी वकिली केली.त्यांनी आपल्या वकिली व्यवसायात कुठल्याही पक्षकारांशी फीस ठरवून कधीही वकिली केली नाही, मग तो पक्षकार गरिब असो की श्रीमंत पक्षकार जी काय फिस देईल त्यात समाधान मानून प्रामाणिकपणाने आपले काम करित राहायचे हा त्यांचा स्वभाव होता.फिस कमी दिली म्हणुन ते पक्षकारावर कधीच नाराज होत नसत.

1986साली त्यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात न्यायमुतीॅ म्हणुन नियुक्ती झाली या त्यांच्या कारकिर्दीत अनेक महत्वपूर्ण निर्णय त्यांनी दिले.त्यांनी या दहा वर्षाच्या कालखंडात दिलेले निवाडे वाचून पाहिल्यास अनेकांना स्फुतीॅ देणारे ठरतील.त्यांनी दिलेले निवाडे व्यक्तीसापेक्ष नसून समाजसापेक्ष आहेत मग तो निवाडा शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य भाव मिळावा म्हणुन असेल, इंजिनिअरींग प्रवेशासंबंधी असेल, डी.एड, बी.एड., मेडिकलसाठी असेल, भुकंपग्रस्तांसाठी असेल किंवा कामगारांना समान कामास समान वेतन नाकारणाऱ्या शासना विरुद्ध असेल, स्वातंत्र्य सैनिकांच्या पेंन्शनबाबत असेल, त्यांनी दिलेल्या प्रत्येक निवाड्यातुन व्यक्तीपेक्षा समाज दिन-दुबळ्या शेतकरी, कष्टकरी दलित, विद्यार्थी वर्ग प्रतिबिंबीत होतो.परंतु हे सर्व करीत असताना त्यांनी कायद्याच्या चौकटीचा भंग कधी केला नाही, न्यायालयीन प्रक्रियेचा, घटनेचा, संहितेचा संकोच केला नाही.

         सतत दहा वर्षे औरंगाबाद खंडपीठात न्यायमुतीॅपद मोठ्या दिमाखात गाजविले याचा आम्हा काटीकरांना सार्थ अभिमान आहे.

    बॅरिस्टर बी.एन.देशमुख यांचा राजकारणातही मोठा सहभाग होता आपल्या काॅलेज जिवनातही ते  महाविद्यालयीन निवडणूकामध्ये सक्रिय सहभाग रहायचा.त्यांचे मामा भाई उध्दवराव पाटील यांच्याकडुनच राजकारणाचे त्यांनी धडे घेतले त्यांच्या मामा सारखाच त्यांच्या मनावर डाव्या विचारसरणीचा पगडा होता. शेतकरी कामगार पक्षाच्या अनेक सभा त्यांनी गाजवल्या याच पक्षाच्या व्यासपीठावरुन त्यांनी गोवामुक्ती आंदोलन, कापुस एकाधिकार, सिमा लढा, शेतकऱ्यांच्या मालाला किफायतशीर भाव, शेतमजूराना व कामगारांना किमान वेतन आदी लढ्यावर आंदोलने छेडीत राहिले.एकवेळ ते महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी विधानपरिषदही आपल्या वकृत्व चातुर्याने  व बुध्दी कौशल्याने गाजविली. विधानपरिषदेचे आमदार म्हणूनही त्यांची कारकीर्द  अभ्यास पूर्ण राहिली.


ग्रामस्थांच्या आग्रहाखातर सत्कार स्विकारण्यास तयार

शुक्रवार दिनांक (25) डिसेंबर 2015 रोजी काँग्रेसचे  पक्षाचे जिल्हा अध्यक्ष मा.अप्पासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली गावातील शिष्टमंडळ उस्मानाबाद येथील एका खासगी कार्यक्रमात माननीय बॅरिस्टर बी.एन.देशमुख यांना भेटुन 81व्या वाढदिवसानिमित्त 19 जानेवारीला सत्कार स्विकारण्याची विनंती केली, परंतु तितक्याच नम्रपणे सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने आपण सत्कार स्विकारणार नसल्याचे त्यांनी शिष्टमंडळास स्पष्टपणे सांगितले. परंतु ग्रामस्थांनी सत्कार स्विकारण्याचा आग्रह धरला. या आग्रहाखातर त्यांनी ग्रामस्थांचा सत्कार स्विकारण्यास तयार झाले परंतु सत्कार हा दुष्काळी परिस्थिती मुळे साधेपणाने करण्याची अट घातली होती. व ग्रामस्थांनी वाढदिवसानिमित्त भ्रम नागरी सत्कार केला.

   
  अशा या थोर सुपुत्राचे शुक्रवारी मध्यरात्री 1:30 वाजता वृद्धापकाळाने वयाच्या 85 व्या वर्षी दु:खद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे काटी गावावर शोककळा पसरली असून गावातील सर्व दुकाने बंद ठेवून येथील मुख्य बाजार चौकात भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.






Labels: ,

तुळजापुर : लॉकडाऊन काळात गुटखा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी


तुळजापुर, दि. २९ : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यासह देशात लॉक डाऊन घोषित करण्यात आला आहे. असे असताना तुळजापुर शहरात अवैधरित्या गुटखा विक्री सुरू असून सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याने त्यातून कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्यावर कडक कारवाई करावी, अशी तक्रार येथील सामजिक कार्यकर्ते विजय यांनी उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

महाराष्ट्र शासनाने कोरोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजने अंतर्गत राज्यातील सर्व दुकानदारांना तंबाखुजन्य पदार्थ विक्री न करण्याच्या सुचना या अगोदर केलेल्या असुन सुद्धा तुळजापूर शहरामध्ये काही जण अवैधरित्या गुटखा विक्री करीत असून गुटखा खाऊन थुंकण्यामुळे संसर्ग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे अन्न व औषध प्रशासन विभागाचे दुर्लक्ष होत असून जिल्हाधिकारी यांनी याकडे लक्ष देवून गुटखा विक्री करणाऱ्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी विजय भोसले यांनी ऑनलाईन निवेदनाद्वारे केली आहे..

Labels: ,

उस्मानाबाद जिल्ह्यात दि. ३० व ३१ मे रोजी जनता कर्फ्यू



उस्मानाबाद, दि.29 :- कोरोना विषाणू संसर्गाच्या बाबतीत प्रशासनाकडून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवल्या जात आहेत. परंतु नागरिकांकडून आणखीही या उपाययोजनाना योग्य तो प्रतिसाद दिला जात नसून अनेक नागरिक घराबाहेर पडत आहेत. नागरिकांना कोरोना आजाराविषयी गांभीर्य असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने दिनांक 30 व 31 मे 2020 रोजी रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात "जनता कर्फ्यू" चे आदेश दिले असून नागरिकांनी घरामध्ये बसूनच सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी केले.

        या जनता कर्फ्यू च्या दरम्यान दि.30 व 31 मे 2020 रोजी रुग्णालये, औषधी दुकाने व दूध विक्रीचे दुकाने, हेच चालू राहणार आहेत.तसेच अत्यावश्यक सेवासाठी फक्त पेट्रोल पंपावर पेट्रोल उपलब्ध होईल. बाकीच्या सर्व अस्थापना बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात येत आहेत. जिल्ह्यातील कोणत्याही नागरिकांनी कोणत्याही कारणासाठी घराबाहेर पडू नये घरातच बसून राहावे. प्रशासन आपल्या सेवेसाठी घराबाहेर थांबले असून आपण प्रशासनाचा आवाहनाला प्रतिसाद देऊन घरातच बसून राहिल्यास कोरोना विषाणूचा संसर्ग होणार नाही असे  जिल्हाधिकारी मुधोळ मुंडे यांनी सांगितले.

उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोना विषाणू संसर्ग बाबत अधिक जागरुक होऊन प्रशासन राबवत असलेल्या उपाय योजनांना सकारात्मक प्रतिसाद देऊन घरामध्येच कुटुंबियासह थांबण्याचे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ -मुंडे यांनी केले.
                                      

Labels: ,

काटीचे थोर सुपुत्र बॅ. बी.एन.देशमुख यांचे निधन


काटी, दि. २९ : उमाजी गायकवाड

 तुळजापूर तालुक्यातील काटीचे सुपुत्र तथा  मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती,माजी आमदार बॅ.बलभिमराव नरसिंगराव देशमुख काटीकर( बी.एन. देशमुख) वय (85 वर्षे) यांचे मध्यरात्री  1:30 वाजनेच्या सुमारास औरंगाबाद येथील राहत्या घरी दु:खद निधन झाले. त्यांच्या निधनाचे वार्ता गावात समजताच गावातील सर्व दुकाने बंद करून येथील मुख्य बाजार चौकात त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांचे पार्थिवावर शुक्रवारी सकाळी 10 वाजता औरंगाबाद येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात एक मुलगा सुन, दोन नातवंडे असा परिवार आहे. शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी खासदारअँड.नरसिंहराव देशमुख यांचे पुत्र, विरोधीपक्ष नेते उध्दवराव पाटील यांचे ते भाच्चे होत. ते शेतकरी कामगार पक्षाचे नेते होते. तात्यासाहेब पुरोगामी युवक संघटनेचे संस्थापक व दीर्घकाळ अध्यक्ष होते, मराठवाड्याच्या जडणघडणीत पर्यायाने महाराष्ट्राच्या मोजक्या पुरोगामी नेतृत्वापैकी एक, शेतकरी कामगार पक्षाचे मातब्बर नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. तुळजापूर तालुक्यातील काटी गावाची ओळख बॅरिस्टर बी.एन. देशमुख यांचे गाव म्हणून संबंध महाराष्ट्राभर होती. 

शेतमालाला हमी भाव, कामगारांच्या कष्टाला दाम व गोरगरिबांना न्यायदान तसेच मराठा आरक्षणासाठीच्या लढ्यात महत्वपूर्ण योगदान आहे.उच्च व सर्वोच्च न्यायालयात ते वकिली करत असताना 1978 ते 1984 या कालावधीत राज्य विधान परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले होते. लोकसभेची त्यांनी निवडणूकही लढविली होती. ते साम्यवाद विचारसरणीचे नेते होते. त्यानंतर त्यांची उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली होती.  शेतकरी ,कष्टकरी कामगार  तसेच सामाजिक प्रश्रावर त्यांनी उच्च न्यायालयात दिलेले अनेक निर्णय 'ऐतिहासिक' ठरले होते.



  सर्वसामान्यांचे प्रश्नावर लढणारऱ्या व महाराष्ट्राचे भूषण  असलेले बॅरिस्टर बी.एन. देशमुख उर्फ तात्यासाहेबांच्या निधनामुळे मराठवाड्यासह काटी गाव  पोरका झाला असून काटी गावावर शोककळा पसरली असून गावातील सर्व दुकाने बंद करून येथील मुख्य बाजार चौकात ग्रामस्थांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

Labels: ,

तुळजापुर येथे कोरोना मुक्तीसाठी शतचंडी यज्ञ


तुळजापूर : कुमार नाईकवाडी

 राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे तसेच महाराष्ट्रातील जनता लवकरच कोराणा रोगातून मुक्त होवो, यासाठी तुळजापूर येथे शतचंडी यज्ञाचे गुरुवार रोजी आयोजन करण्यात आले होते. सदरचा शतचंडी यज्ञ शहरातील घाटशीळच्या पायथ्याशी वसुंधरा सांस्कृतिक सभागृहांमध्ये करण्यातआला होता . या यज्ञाचे आयोजन  वसंतराव पाटील व त्यांच्या पत्नी यांच्यावतीने करण्यात आले होते तसेच या यज्ञाचे पूजन यजमान  वसंतराव पाटील दाम्पत्याने केले. यावेळी महाविकास आघाडीचे गोकुळ शिंदे, सुधीर कदम, विशाल कोंडो, विजय भोसले इत्यादी उपस्थित होते.
     
  राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण हे लवकर कोरणा मुक्त होवो व त्यांना उत्तम आरोग्य लाभो तसेच महाराष्ट्र राज्यावरील आलेले कोरणाचे संकट लवकर दूर होवो, या मागणीसाठी या शतचंडी यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते असे शिवसेना शहर प्रमुख सुधीर कदम यांनी  सांगितले.

Labels: ,

तुळजापुर : नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत ४० विषयांना चर्चेअंती मंजुरी


तुळजापूर : कुमार नाईकवाडी

 नगर परिषदेची  सर्वसाधारण सभा दिनांक 28  मे  गुरुवार रोजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली .या सर्वसाधारण सभेत मागील 13 फेब्रुवारी रोजी बोलविण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेतील बारा विषयांवर चर्चा होऊन त्या विषयांना मंजुरी देण्यात आली आहे ,तर 23 मार्च रोजी तहकूब करण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेतील एकूण 40 विषयांना चर्चेअंती मंजुरी देण्यात आली.
      
     लेखा विभागाने जानेवारी महिन्यापासून काढलेल्या बिलास मान्यता देण्यात आली. रमाई आवास घरकुल योजने अंतर्गत सन 2019 - 20 मधील 45 लाभार्थ्यांना मान्यता देण्यात आली. शहरातील मुख्य चौकातील पाच ठिकाणच्या सिग्नलच्या देखभाल व दुरुस्ती साहित्य वापरून कामाच्या प्राप्त  निविदेस व इतर विविध विषयांच्या निविदांंना मंजुरी तसेच विविध  विभागातील  वार्षिक निविदा मागविण्यास   मंजुरी देण्यात आली. शहरातील मुस्लिम बांधवास शादीखानासाठी जागा उपलब्ध करून देणे ,भाई उद्धवराव पाटील सभाग्रह जागेत वाहनतळ उभारणे, स्वच्छ सर्वेक्षण 2020 मधील शहरातील शौचालयाच्या ठिकाणी दुरुस्ती करणे ,आठवडा बाजार फुटपाथ लिलाव करणे ,जिजामाता कन्या सन्मान योजना लागू करणे, शहरातील कोरोना विषाणू संसर्ग संक्रमण प्रतिबंधात्मक उपाय योजना, आरधवाडी व तुळजापूर खुर्द येथील स्मशानभूमी विकसित करणे, पोलीस उपविभागीय अधिकारी तुळजापूर यांनी पोलीस पोलिस चौकी संदर्भात दिलेल्या पत्रावर चर्चा, यासह न प कर्मचारी यांचे प्रश्न यावर सविस्तर चर्चा होऊन विषय मंजूर करण्यात आले . यावेळी मुख्याधिकारी आशिष लोकरे सभा प्रमुख वैभव अंधारे सभा लिपिक महादेव सोनार व नगरसेवक  उपस्थित होते.
         

Labels:

Thursday, 28 May 2020

लॉकडाउन : तंबाखुजन्य पदार्थाची विक्री केली, 2 गुन्हे दाखल


उस्मानाबाद : तंबाखु- तुबाखुजन्य पदार्थाची विक्रीस मा. जिल्हा दंडाधिकारी यांचा बंदी आदेश आहे. असे असतांनाही, 1)प्रशांत पोपट गुजर रा. तडवळे (क.), ता. उस्मानाबाद हा दि. 27.05.2020 रोजी 18.00 वा. सु. गावातील बाजारपेठ येथे तंबाखुनज्य पदार्थांची विक्री करत असतांना पो.ठा. ढोकी यांच्या पथकास आढळला. तर, याच दिवशी 2)आशाबाई मस्के रा. कळंब या रंगीला चौक, कळंब येथील आपल्या दुकानात तंबाखुजन्य पदार्थांची विक्री करत असतांना पो.ठा. कळंब यांच्या पथकास आढळल्या. यावरुन वरील दोघांविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269 सह, महाराष्ट्र कोविड- 19 उपाययोजना नियम- 11 सह, आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 (ब) अन्वये स्वतंत्र 2 गुन्हे संबंधीत पो.ठा. येथे नोंदवण्यात आले आहेत.

Labels: ,

लॉकडाउन : विनापरवाना जिल्हा प्रवेश केल्याने गुन्हा दाखल


तामलवाडी : कोविड- 19 चा संसर्ग पसरु नये म्हणुन लॉकडाऊन काळात उस्मानाबाद जिल्हयात विनापरवाना प्रवेश करण्यात बंदी आहे. असे असतांनाही प्रशांत शरणप्पा गायकवाड रा. वळसंग, ता. सोलापूर (द.) हे विनापरवाना, छुप्या मार्गाने पोलीस नाकाबंदी टाळून सोलापूर जिल्ह्यातून दि. 27.05.2020 रोजी मौजे धोत्री, ता. तुळजापूर येथे आले. अशा प्रकारे त्यांनी लॉकडाऊन काळात शासकीय आदेशाचे उल्लंघन केले. अशा मजकुराच्या पोलीस पाटील- दत्तात्रय पाटील यांच्या प्रथम खबरेवरुन नमुद व्यक्तीविरुध्द गुन्हा दि. 27.05.2020 रोजी नोंदवला आहे.

Labels:

तुळजापुरात सावरकर विचार मंचच्या वतीने स्वातंत्र्य वीर सावरकर यांची १३७ वी जयंती साजरी

                        
         
तुळजापुर : कुमार नाईकवाडी

तुळजापुरात स्वा वीर सावरकर विचार मंच च्या वतीने   दि.२८ गुरुवार रोजी स्वा.वीर सावरकर यांची जयंती अंत्यत साध्या पद्धतीने   साजरी करण्यात आली.प्रथम प्रमुख मान्यवराच्या हस्ते स्वा.वीर सावरकर यांच्या प्रतिमेचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

 या वेळी जेष्ट पञकार अंबादास पोफळे, सावरकर विचार मंच चे बाळासाहेब श्यामराज उमेश गवते,महेश कुलकर्णी ,सचिन सरकाळे आदीसह सावकर विचार मंच सदस्य उपस्थित होते.या वर्षी प्रथमच कोरोना च्या सावटाखाली स्वा.वीर सावरकर जयंती अंत्यत साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली.

Labels: ,

तुळजापुर नगर परिषद च्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी

       
                         
तुळजापुर : कुमार नाईकवाडी

 तुळजापुर नगरपरिषद च्या वतीने   दि.२८ गुरुवार रोजी स्वा.वीर सावरकर यांची जयंती  साजरी करण्यात आली.

प्रथम तुळजापुर नगरपरिषद च्या वतीने स्वा.वीर सावरकर यांच्या प्रतिमेचे पुजन करुन पुष्पहार अर्पन करुन अभिवादन करण्यात आले. या वेळी तुळजापुर नगरी चे नगराध्यक्ष सचिन रोचकरी, नगरसेवक नागेश नाईक,विजय(आबा) कदंले, अभिजित कदम,औंदुबर कदम, सुनील(पिंटू) रोचकरी आदीसह न.प.कर्मचारी उपस्थित होते.या वर्षी प्रथमच कोरोना च्या सावटाखाली स्वा.वीर सावरकर जयंती अंत्यत साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली.

Labels: ,

Wednesday, 27 May 2020

उस्मानाबाद जिल्ह्यातील 11 प्रलंबित आहवलापैकी 7 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह


उस्मानाबाद, दि. 27 :- जिल्हा सामान्य रुग्णालय मार्फत दिनांक 26 मे 2020 रोजी लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेल्या स्वाब पैकी 11 व्यक्तींच्या स्वाबचे रिपोर्ट प्रलंबित होते. त्या 11 पैकी 7 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह (    त्यापैकी 2 जुन्याच रुग्णाचे अहवाल पॉझिटिव्ह), 2 निगेटिव्ह व 2 अनिर्णीत आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर राजाभाऊ गलांडे यांनी दिली आहे.

     पॉझिटिव्ह आलेल्या सात व्यक्ती पैकी पाच नवीन रुग्ण असून  दोन रुग्णाचे अहवाल पूर्वीच पॉझिटीव्ह आलेले आहेत. पाच नवीन पॉझिटिव रुग्णांपैकी तुळजापूर तालुक्यातील कारला येथील तीन रुग्ण असून ते मुंबई रिटर्न आहेत. तसेच धुता येतील एक रुग्ण असून तो पूर्वीच्या  रुग्णाच्या कॉन्टॅक्ट मधील असून तोही मुंबई रिटर्न आहे. तर एक रुग्ण हा केसर जवळगा येथील असून पूर्वीच्या पॉझिटिव रुग्णाच्या संपर्कातील आहे, अशी माहिती डॉक्टर सतीश आदटराव व जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर गलांडे यांनी दिली आहे.
             

Labels: ,

तुळजापुर (खुर्द) येथील श्री तुळजाभवानी मंदीर ट्रस्टच्यावतीने कोरोना ग्रस्तासाठी २१ हजार रुपयाची मदत

                   

तुळजापुर : कुमार नाईकवाडी

 तुळजापुर (खुर्द) येथील श्री तुळजा भवानी मंदीर ट्रस्ट च्या वतीने कोरोना ग्रस्तसाठी २१ हजार रुपयाची दिली आर्थिक मदत दि.२७ बुधवार रोजी तुळजापुर चे तहसील सौदागर तांदळे यांच्या कडे २१ हजार रुपयाचा धनादेश कोरोना ग्रस्तसाठी सुपुर्द करण्यात आला.

या वेळी मंदीर ट्रस्ट चे अध्यक्ष प्रा.विलास जगदाळे,सुर्यभान ढवळे बापु भोजने,बाबुराव माळी,सोमनाथ क्षिरसागर आदी उपस्थित होते.

Labels: ,