Monday, 29 September 2025

अनुदानाच्या रकमेतून वसुली नको, खात्यांवरील होल्डही हटवा; आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली होती सूचना

अनुदानाच्या रकमेतून वसुली नको, खात्यांवरील होल्डही हटवा; अग्रणी बँकेचे मुख्य व्यवस्थापक यांचे आदेश : आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली होती सूचना

धाराशिव,दि.२९: 

अतिवृष्टी आणि महापुरामुळे धाराशिव जिल्ह्यावर अभुतपुर्व संकट कोसळले आहे. अशा वेळी शेतकरी बांधवांना मिळणाऱ्या विविध प्रकारच्या अनुदानातून कर्ज वसुली बंद करण्यात यावी. तसेच खात्यांवर लावण्यात आलेले होल्ड तत्काळ हटविण्यात यावेत असे आदेश अग्रणी बँकेचे मुख्य व्यवस्थापक यांनी दिले आहेत. सर्व बँकांना तसे निर्देश देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्र दिले होते.

अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या संकटाचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत बँकांनी शेतकऱ्यांकडून कर्जवसुली करू नये, शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवरील होल्ड तातडीने हटवावेत, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदानातून, मदतीतून वसुली न करू नये, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सर्व बँकांना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार आता अग्रणी बँकेचे मुख्य व्यवस्थापकांनी तातडीने वरील कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याचे मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे. 

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता सर्व बँकांची ऑनलाइन मीटिंग घेण्याची सूचना  जिल्हाधिकाऱ्यांना केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी बैठक घेऊन बँकांना तसे निर्देश दिले होते. मुसळधार पावसामुळे  खरीप हंगामातील पिके पूर्णपणे वाया गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा आकांक्षावर पाणी फेरले गेले आहे. घरात धान्य नाही, गुरांना चारा नाही, शेतात उभे पिक उरले नाही, अशी बिकट अवस्था शेतकरी बांधवांच्या वाट्याला आली आहे.

अशा विदारक परिस्थितीतही बँका शेतकऱ्यांच्या खात्यांवर होल्ड लावत आहेत. त्यामुळे त्यांच्या नावावर जमा होणारे सरकारी अनुदान, मदत रक्कम, घरकुल योजना निधी किंवा इतर शासकीय योजनांचे पैसे ते काढू शकत नाहीत. त्यांच्या खात्यावरील रक्कम त्यांच्यासाठी जीवनावश्यक खर्च भागवण्याचा एकमेव आधार आहे. या अनुषंगाने बँकांची बैठक घेऊन त्यांना आदेश द्यावेत, अशी सूचना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत केली होती.अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवरील सर्व होल्ड हटवावेत, कर्जवसुली करू नये, कर्जाचे पुनर्गठन करावे, सर्व शासकीय अनुदान व मदतीची रक्कम होल्ड न लावता थेट शेतकऱ्यांना, नागरिकांना उपलब्ध करून द्यावी, असे आदेश आता अग्रणी बँकेचे मुख्य व्यवस्थापक यांनी सर्व बँकांना दिले आहेत.

Labels:

डॉ. रामलिंग पुराणे यांना नवी दिल्ली येथे क्रिएटिव्ह भारत अवॉर्डने गौरव

डॉ. रामलिंग पुराणे यांना नवी दिल्ली येथे क्रिएटिव्ह भारत अवॉर्डने गौरव 

मुरूम दि.. २९ : डॉ सुधीर पंचगल्ले 

येथील सामाजिक कार्यकर्ते तथा बसव प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ. रामलिंग काशिनाथ पुराणे यांना नवी दिल्ली येथील नमस्ते क्रिएटिव्ह भारतच्या माध्यमातून मॅगझीनमध्ये डॉ. पुराणे यांचे सामाजिक कार्याचे पॉवर प्रोफाइलची निवड झाली आहे.

रविवार दि. २८   रोजी नवी दिल्ली येथील इंडिया इंटरनॅशनल सेंटर येथे पार पडलेल्या कार्यक्रमात त्यांना क्रिएटिव्ह भारत अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी दक्षिण दिल्ली  खासदार रमेश बिधुरी, डायरेक्टर टेकनॉलॉजि अँड इनोव्हाशन्स प्रा. डॉ. आर. के. खंडाल, कमांडर, इंडियन नेव्ही वेत्रण व्ही. के. जेटली, पूर्व लोकसभा टीव्ही सी ई ओ सीमा गुप्ता,कथक डान्सर डॉ. अनु शर्मा, इंटरनॅशनल किक बॉक्सर सुधीर सक्सेना, आयोजक जितेंद्र तिवारी, राजेश तिवारी आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

नमस्ते क्रिएटिव्ह भारत या चळवळीच्या माध्यमातून संपूर्ण देशभरातून विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याची दखल घेऊन त्यांचे राष्ट्रहितासाठीचे प्रेरणादायी कार्याचे पॉअर प्रोफाइल नमस्ते क्रिएटिव्ह भारत या मॅगझीन मध्ये प्रकाशित करण्यात आले .यावेळी महाराष्ट्रातून उपस्थित डॉ. पुराणे यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी कु. रुद्राक्षी रामलिंग पुराणे सह देशभरातील नागरिक उपस्थित होती.

Labels:

घोळसगावचा चारीही बाजूचा संपर्क तुटल्याने गावकरी अडचणीत; वाहन जात येत नसल्याने रुग्णांचे बेहाल , तातडीने पूल करून मार्ग सुरळीत करण्याची मागणी

घोळसगाव गावचा चारीही बाजूचा संपर्क तुटल्याने गावकरी अडचणीत; वाहन जात येत नसल्याने रुग्णांचे बेहाल , तातडीने पूल करून मार्ग सुरळीत करण्याची मागणी

अक्कलकोट दि. २९:

         तालुक्यातील मराठवाडा बॉण्ड्री लागत असलेले पश्चिम महाराष्ट्रातील शेवटचे गाव म्हणून ओळख असलेले घोळसगाव या गावचा गेल्या 15 दिवसापासून चारही बाजूनी संपर्क तुटल्याने गावाकऱ्यांचे तोबाहाल पाहायला मिळत असून, गावातील आजारी रुग्णांना, डिलेव्हरी रुग्ण यांना दवाखान्याला कसे व कुठून घेऊन जायचे हा यक्ष प्रश्न गावाकऱ्यासमोर उभा आहे. गावातील जीवनाआवश्यक वस्तूचा देखील तुटवडा जाणवत आहे. 

या सर्व गंभीर बाबीकडे प्रशासनाच्या नाकर्ते पाणामुळे घोळसगावकराना प्रचंड मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकऱ्यांना सांगून देखील त्यांनी बोरगाव ते घोळसगाव, घोळसगाव ते किरणळी, घोळसगाव ते किणी, घोळसगाव ते सिंदगाव या चारही रस्त्याचे काम जाणूनबुजून करत नसून, आम्ही जगायचं कसं अशी आर्त हाक घोळसगाव च्या ग्रामस्थांमधून पाहवयास मिळत आहे. जर चारही बाजूचे रस्ते तात्काळ दुरुस्त न केल्यास रस्ता रोको आंदोलन करणार असल्याचे घोळसगाव चे सरपंच राजशेखर किवडे यांनी सांगितले. 

 घोळसगाव चा चारही बाजूनं संपर्क तुटला असून, माझ्या गावाकऱ्यांची सर्व बाजूनी हाल होत आहेत. आजारी रुग्णांना रुग्णालय पर्यंत घेऊन जायचे कसे..? हा प्रश्न पडलाय. एकदा पेशन्ट जरी दगावला तर याला सरस्वी सार्वजनिक बांधकाम विभाग व प्रशासन जबाबदार आहे. जर तात्काळ रस्ते दुरुस्त न केल्यास अमरण उपोषण करणार आहे.
राजशेखर किवडे, सरपंच, घोळसगाव

Labels:

मुरुम : महिलांचा नगरपरिषदेला घागरीसह हल्लाबोल मोर्चा ; आंदोलनकर्त्या महिलांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत जाब विचारला; मुख्याधिकारी भुजबळ गैरहजर

मुरुम : महिलांचा नगरपरिषदेला घागरीसह हल्लाबोल मोर्चा ; आंदोलनकर्त्या महिलांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत जाब विचारला; मुख्याधिकारी भुजबळ गैरहजर

मुरुम, ता. उमरगा, दि. २९  : 

शहरातील यशवंतनगर परिसरातील उडचणे प्लॉट भागातील असंख्य महिलांनी सोमवारी दि. २९ सप्टेंबर रोजी आपल्या जगण्याशी निगडित असंख्य समस्या घेऊन नगरपरिषदेवर हल्लाबोल मोर्चा काढला. सामाजिक कार्यकर्ते सिद्धलिंग हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली हलगीच्या निनादात घागरी हातात घेऊन निघालेल्या या मोर्चात परिसरातील रस्ते, शुद्ध पाणी, वीजपुरवठा, तुंबलेल्या गटारी, औषध फवारणी, तसेच उपलब्ध विजेच्या खांबांवर दिवे बसवावेत अशा प्रमुख मागण्या महिलांनी जोरदारपणे मांडल्या. 

मोर्चा नगरपरिषद कार्यालयावर दाखल होताच महिलांनी आक्रमक पवित्रा घेत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाठिंबा दर्शविला. यावेळी महिलांनी संतप्त स्वरात सांगितले की, आम्ही दिवसभर शेतीकाम करून कुटुंबाचा गाडा चालवतो. एक दिवस मजुरी नाही केली तर कुटुंब उपाशी राहते. अशा परिस्थितीत शुद्ध पाणी, रस्ते, वीज अशा प्राथमिक सोयीही मिळत नसल्याने जगण्याची लढाई अधिक कठीण होत आहे. अनेकदा तक्रारी केल्या तरी आज-उद्या काम करू असे सांगून आम्हाला उडवा-उडवीची उत्तरे दिली जातात. परंतु प्रत्यक्षात काहीही काम होत नाही. दरम्यान, नगरपरिषदेचे कार्यालयीन अधीक्षक विशाल अमृतराव यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, उडचणे प्लॉटचा मागील लोकवस्ती भाग नगरपरिषदेच्या हद्दीत नसला तरी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने पाहणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अहवाल मिळाल्यानंतर नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील.

 यावेळी सुद्यान हिप्परगे, सुलताना शेख, मंगल जाधव, विजया कुंभार, रुकिया कारभारी, शाहीन पाटोदे, बानुबी पटेल, वाशिमा मासूलदार सारिका बोळे, फातिमा महाबुसे, आसमा शेख, नजबुलबी शेख, उषाबाई आळंगे, अश्विनी मडोळे, सुजाता सूर्यवंशी, शफिका शेख, सोनाबाई सुरवसे, असलम महाबुसे, तेजस शिंदे, बालाजी माने, कन्हैया भोकले, अमोल कदम, गुंडू माने, बाळू वाघमारे, हणमंत मांडले, अंकुश वाळके, गिरजाप्पा शिंदे, शिवाजी जाधव, राम कांबळे, सुरेश गायकवाड आदि असंख्य नागरिक उपस्थित होते.

 या भागातील अडचणी गंभीर असून नागरिकांचा संताप वाढला आहे. नगरपरिषदेकडून तात्काळ अंमलबजावणी न झाल्यास येत्या काळात त्यापेक्षा तीव्र आंदोलन उभारले जाईल.
सिद्धलिंग हिरेमठ (सामाजिक कार्यकर्ते)                            
फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील उडचणे   प्लॉट मधील महिलांचा नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना निवेदन देताना...

Labels:

नळदुर्ग महाविद्यालयाला ग्रीन क्लब मधील महाराष्ट्र शासनाचे विविध पुरस्कार

नळदुर्ग महाविद्यालयाला ग्रीन क्लब मधील महाराष्ट्र शासनाचे विविध पुरस्कार

नळदुर्ग ,दि.२९: डॉ दिपक जगदाळे 

शहरातील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयास  ग्रीन क्लब  विभागाने केलेल्या पाणी बचती संदर्भाने केलेल्या कार्याला महाराष्ट्र शासनाचे विविध पुरस्कार प्राप्त. 

उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या Youth Engagement and Water Stewardship (YEWS) 2023-2025 या उपक्रमांतर्गत जाहीर करण्यात आलेले विविध राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय पुरस्कारांचा वितरण सोहळा  दि. २९.९.२०२५  रोजी आयोजित करण्यात आला होता. पुरस्कार वितरण सोहळा  चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर , अप्पर मुख्य सचिव  गोपाल रेड्डी, युनिसेफचे प्रमुख कबीर युसूफ , सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगूरू  डॉ सुनील भिरुड,तंत्र शिक्षण विभाग  सहसंचालक  दत्तात्रेय जाधव, विभागीय सहसंचालक  मगर  आदी मान्यवरांच्या  हस्ते  सिओईपी (COEP- Technological University) तंत्रज्ञान विद्यापीठ, शिवाजीनगर, पुणे (पूर्वीचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय)  येथे पारितोषीक  वितरण संपन्न झाले. 

जागितक जलदिन (२२ मार्च) निमित्त आयोजित  महाराष्ट्र शासनाचे  राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय उत्कृष्ट ग्रीन क्लब, उत्कृष्ट पोस्टर व उत्कृष्ट शॉर्ट व्हिडिओ/रील, उत्कृष्ठ ग्रीन कलब समन्वयक अशा   संयुक्तपणे घेतलेल्या स्पर्धेमध्ये
नळदुर्ग महाविद्यालयाने महाराष्ट्र शासनाचे एकूण पाच पारितोषीके मिळवलेले आहेत. त्यामध्ये
 उत्कृष्ठ ग्रीन क्लब- राज्यस्तरीय प्रथम,उत्कृष्ठ ग्रीन क्लब- जिल्हास्तरीय प्रथम, पाणी बचत शार्ट व्हिडीओ/ रील- जिल्हास्तरीय द्वितीय, पाणी बचत पोस्टर- जिल्हास्तरीय तृतीय, उत्कृष्ठ ग्रीन क्लब समन्वयक- जिल्हास्तरीय प्रथम.

 ग्रीन क्लब कार्यातील जागतिक जलदिनानिमित्त घेण्यात आलेल्या सर्व स्पर्धाचे मानकरी ठरणारे नळदुर्ग हे एकमेव   महाराष्ट्रातील महाविद्यालय ठरले. याप्रसंगी महाविदयालयाचे प्राचार्य डॉ सुभाष राठोड ग्रीन क्लब समन्वयक, डॉ उध्दव भाले, ग्रीन  क्लब सहसमन्वयक,डॉ निलेश शेरे, कार्यालयीन अधिक्षक  धनंजय पाटील आदी उपस्थित होते.  

याबद्दल प्राचार्य डॉ राठोड, ग्रीन क्लब समन्वयक डॉ. भाले, सहसमन्वयक डॉ निलेश शेरे, डॉ हंसराज जाधव  यांचे बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, सचिव उल्हास बोरगावकर ,संस्थेचे सर्व संचालक महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह विविध शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.

Labels:

सांगवी खु येथे पूरग्रस्तांना मदत, पंढरपूरचे शिक्षक विद्याधर भोसले यांच्या कडून किट वाटप

सांगवी खु येथे पूरग्रस्तांना  मदत, पंढरपूरचे शिक्षक विद्याधर भोसले यांच्या कडून किट वाटप

अक्कलकोट दि. २९:

      सध्या महाराष्ट्रासह सोलापूर जिल्ह्यात पावसाने धुमाकुळ घातला असून, अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरणाच्या वरच्या भागात धुवाधर पाऊस पडल्याने खालच्या् भागात मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले असून त्याच पुराच्या पाण्याचा फटका बोरी नदीच्या तोंडाला असलेले सांगवी खु गावाला बसला त्या दरम्यान 15 ते 20 घरे पाण्याखाली गेली असून, त्यांना तातडीने सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.

 नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांच्या जीवना आवश्यक वस्तूंची नासधूस झाली. हे प्रसार  माध्यमातून कळताच पंढरपूर येथील शिक्षक  विद्याधर भोसले यांचे सुपुत्र महाराष्ट्रातील नामवंत आय कॅन ट्रेनिंग अकॅडमीचे संचालक विवेक भोसले  यांनी तात्काळ  जीवनावश्यक वस्तूचे किट वाटप केले. 

सदरील किटमध्ये तांदूळ, शेंगदाणे, रवा, गोडेतेल, साबुदाणा, तूरडाळ, साखर, लाल तिखट, हळद, तेल, चहा पावडर, या वस्तूचा समावेश असून, त्यांच्या या अनमोल मदतीमुळे पूरग्रस्त कुटूंबाला मदतीचा हात मिळाला आहे.

Labels:

आजच्या आधुनिक जीवनशैलीत हृदयविकाराचा वाढता धोका(जागतिक हृदय दिन विशेष २९ सप्टेंबर २०२५)लेखक - डॉ. प्रीतम भी. गेडाम

आजच्या आधुनिक जीवनशैलीत हृदयविकाराचा वाढता धोका
(जागतिक हृदय दिन विशेष २९ सप्टेंबर २०२५)
लेखक - डॉ. प्रीतम भी. गेडाम


हृदयरोग ही जगभरात वेगाने वाढणारी आरोग्य समस्या आहे. आपल्या देशात ती शिगेला पोहोचली आहे. एक-दोन दशकांपूर्वीपर्यंत ही समस्या फक्त श्रीमंत वृद्ध लोकांमध्येच आढळते, असे वाटायचे. पण आता हा आजार आपल्या देशात खूप वेगाने पसरला आहे. मुले आणि तरुणही याला बळी पडत आहेत. देशातील सातत्याने वाढणारे प्रदूषण आणि भेसळीमुळे संपूर्ण जीवसृष्टी साठी धोका वाढला आहे आणि माणसाचा आळस, लोभ, निकृष्ट दर्जाचे अन्न, आधुनिक जीवनशैली आणि मानसिक ताण यामुळे मृत्यूच्या स्वरूपात आजारांना आमंत्रण मिळाले आहे. देशात, तरुण हृदयरोगतज्ज्ञ देखील हृदयरोगामुळे आपले प्राण गमावत आहेत. या वर्षी २०२५ च्या जागतिक हृदय दिनाची थीम "एकही ठोका चुकवू नका" आहे. ही थीम आपल्या हृदयाच्या आरोग्याला गांभीर्याने घेण्याची एक मजबूत आठवण करून देते, हृदयरोगाच्या सुरुवातीच्या चेतावणीच्या लक्षणांबद्दल सक्रिय राहणे आणि तपासणीला उशीर न करणे, निरोगी सवयी स्वीकारणे आणि वेळेवर वैद्यकीय हस्तक्षेप करणे यावर भर देते.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, हृदयरोग हे जगभरातील मृत्यूंचे प्रमुख कारण आहेत. २०२२ मध्ये, अंदाजे १.९८ कोटी लोक हृदयरोगाने मरण पावले, जे जागतिक स्तरावरील एकूण मृत्यूंपैकी अंदाजे ३२ टक्के आहे. यापैकी ८५ टक्के मृत्यू हृदयविकार आणि स्ट्रोकमुळे झाले. अमेरिकेत दर ३४ सेकंदाला एका व्यक्तीचा हृदयरोगाने मृत्यू होतो आणि २०२३ मध्ये, हृदयरोगामुळे ९,१९,०३२ मृत्यू झाले, म्हणजेच दर तीन मृत्यूंपैकी एक. तंबाखूचा वापर, अस्वास्थ्यकर आहार (मीठ, साखर आणि तेलाचे जास्त प्रमाण) आणि लठ्ठपणा, शारीरिक निष्क्रियता, आक्रमकता, चिडचिड, राग, नैराश्य, चिंता, भेसळ, हानिकारक मद्यपान आणि वायू प्रदूषण यासारख्या वर्तणुकीशी संबंधित आणि पर्यावरणीय जोखीम घटकांवर लक्ष देऊन बहुतेक हृदयरोग टाळता येतात. हृदयरोगाचे लवकरात लवकर निदान करणे महत्वाचे आहे जेणेकरून समुपदेशन आणि औषधोपचाराने व्यवस्थापन सुरू करता येईल.

दिल्लीस्थित आकाश हेल्थकेअरने केलेल्या पाच वर्षांच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की कोविड-१९ साथीच्या आजारानंतर हृदयरोगाच्या रुग्णांमध्ये दुप्पट वाढ झाली आहे आणि आपत्कालीन रुग्णांमध्ये ६० टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०२० ते २०२३ दरम्यान भारतातील रुग्णालयांमधून गोळा केलेल्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की हृदयरोगाच्या रुग्णांपैकी ५० टक्के रुग्ण ४० वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत, ही एक अतिशय गंभीर समस्या आहे. गेल्या ४-५ वर्षांत तरुणांमध्ये या आजाराच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. जोखीम घटकांमध्ये उच्च रक्तदाब (२४ टक्के), मधुमेह (१० टक्के) आणि डिस्लिपिडेमिया (३९ टक्के) यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, धूम्रपान (३६ टक्के), जास्त मद्यपान (१६ टक्के), अपुरी शारीरिक हालचाल (११ टक्के) आणि खराब आहाराची गुणवत्ता (१२ टक्के); वैयक्तिक आणि कामाशी संबंधित ताण आणि नैराश्य यासारखे मानसिक घटक; आणि जीवनातील घटना (३२ टक्के) ज्यामुळे इंट्राव्हस्कुलर थ्रोम्बोसिसचा धोका वाढतो आणि परिणामी, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी घटना. याव्यतिरिक्त, अनुवांशिक घटक आणि सामाजिक-आर्थिक असमानता परिस्थिती अधिक गुंतागुंतीची बनवतात. तंबाखूशी संबंधित हृदयरोगामुळे जगभरात १.९ दशलक्ष मृत्यू होतात.

गुजरातमधील जामनगर शहरातील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. गौरव गांधी (४१) यांचे त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अहवालांनुसार, डॉ. गांधी यांनी त्यांच्या कारकिर्दीत १६,००० हून अधिक हृदय शस्त्रक्रिया केल्या होत्या. अलिकडेच, ३९ वर्षीय हृदयरोगतज्ज्ञ डॉ. ग्रॅडलिन रॉय यांचे चेन्नईतील एका रुग्णालयात कामावर असताना अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. गोव्यात झालेल्या ३२ किमी मॅरेथॉनमधील सहभागी, ३९ वर्षीय दंतचिकित्सक, फिटनेस उत्साही यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पुनीत राजकुमार, सिद्धार्थ शुक्ला, राजू श्रीवास्तव, गायक केके आणि नुकत्याच निधन झालेल्या ४२ वर्षीय शेफाली जरीवाला यांसारख्या अनेक तंदुरुस्त आणि निरोगी चित्रपट सेलिब्रिटींच्या मृत्यूचे कारण देखील हृदयरोग होते. काही महिन्यांपूर्वी, महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील एका प्रसिद्ध तरुण कुस्तीपटूचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. कर्नाटकमध्ये, एका २८ वर्षीय तरुणाचा क्रिकेट सामन्यातील विजयाचा आनंद साजरा करताना मृत्यू झाला आणि एका २५ वर्षीय वराचा लग्न समारंभात मंगळसूत्र बांधल्यानंतर लगेचच मृत्यू झाला. विविध भागांमध्ये व्यायामादरम्यान तरुणांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही नोंदवल्या गेल्या आहेत.

आता लहान शाळकरी मुलांनाही हृदयरोगामुळे जीव गमवावा लागल्याच्या बातम्या खूप वाढल्या आहेत. अहवाल दर्शवितात की देशात दरवर्षी १४ वर्षांखालील शेकडो मुले हृदयविकाराच्या झटक्याने किंवा हृदयविकाराने जीव गमावतात. राजस्थानमधील सिकर येथील एका शाळेत ९ वर्षांच्या मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. अलिगडमधील एका १४ वर्षांच्या मुलाचा शालेय क्रीडा स्पर्धेची तयारी करताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वीच, महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे एक १० वर्षांचा मुलगा त्याच्या घरासमोर खेळत होता, तेव्हा त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागले, तो घरी गेला आणि त्याने त्याच्या आईला पिण्यासाठी पाणी मागितले आणि तो आईच्या कुशीतच मरण पावला. यापूर्वी, महाराष्ट्रातील नाशिकमध्ये एका ६ वर्षांच्या शाळकरी मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

वायू प्रदूषणामुळे दरवर्षी ७० लाख मृत्यू होतात, ज्यामध्ये इस्केमिक हृदयरोग हे या मृत्यूंचे एक प्रमुख कारण आहे. जागतिक आरोग्य संघटनेचा अंदाज आहे की दरवर्षी अंदाजे ४.२ दशलक्ष अकाली मृत्यू बाहेरील वायू प्रदूषणामुळे होतात. वायू प्रदूषण असलेल्या भागात राहणारे लोक; रस्ते, रेल्वे, बंदरे किंवा औद्योगिक क्षेत्रांजवळ राहणारे किंवा काम करणारे लोक, वणव्याच्या धुराच्या संपर्कात येणारे लोक, धूम्रपान न करणारे पण दुसऱ्याने केलेल्या धूम्रपानाच्या धुराच्या संपर्कात येणारी मुले यांचे आरोग्यावर हानिकारक आणि असंख्य परिणाम होतात. दुसऱ्याने केलेल्या धुम्रपानातील धुराच्या संपर्कात आल्याने हृदयरोग आणि स्ट्रोक, फुफ्फुसांचा कर्करोग, अचानक शिशु मृत्यु सिंड्रोम, वारंवार आणि गंभीर दम्याचे झटके आणि इतर गंभीर आरोग्य समस्या उद्भवतात. अनेक अभ्यासांनी वायू प्रदूषण आणि हृदयाच्या आरोग्यामधील स्पष्ट संबंध स्थापित केला आहे. जेव्हा लोक प्रदूषित हवेत श्वास घेतात, तेव्हा सूक्ष्म कण फुफ्फुसांमध्ये खोलवर जाऊ शकतात आणि रक्तप्रवाहात प्रवेश करू शकतात. यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्या उद्भवू शकतात, ज्यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे: वाढलेला रक्तदाब, हृदयाच्या लयीत अडथळा, हृदयविकाराचा धोका वाढणे, एथेरोस्क्लेरोसिस आणि असुरक्षित लोकसंख्येवर परिणाम.

अधिक जागरूकता, चांगली तपासणी आणि जीवनरक्षक उपायांची उपलब्धता वाढवून हृदयरोगामुळे होणाऱ्या अकाली मृत्यूंचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी केले जाऊ शकते. देशातील व्यापक प्रदूषण, भेसळ आणि अस्वच्छता रोखण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलली पाहिजेत. जर आधुनिक जीवनशैली आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असेल तर अशी जीवनशैली सोडून देणेच चांगले. संतुलित आहार घेणे हे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे. फळे आणि भाज्या, प्रथिने, निरोगी वसा, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचे संतुलन राखा. तुमच्या जीवनशैलीत दररोज ३० मिनिटे व्यायामाचा समावेश करून सुरुवात करा. हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी, शारीरिक हालचाली वाढवण्यासाठी आणि निरोगी वजन राखण्यासाठी कोई भी शारीरिक व्यायाम, हेल्दी छंद महत्त्वाचा आहे. मीठ, साखर आणि तेलाचे सेवन नेहमी कमी करा. दररोज रात्री ७-८ तासांची पुरेशी झोप घ्या. तंबाखू, दारू किंवा इतर कोणतेही व्यसन ताबडतोब सोडून द्या. तुमच्या दैनंदिन दिनचर्येत तणाव कमी करणारे उपक्रम समाविष्ट करा. स्वच्छता पाळा, पर्यावरण सांभाळा. जीवनातील समस्या शहाणपणाने, शांततेने आणि विवेकाने सोडवा, ताण घेऊ नका. व्यस्त वेळातून स्वतःसाठी थोडा वेळ आनंदी क्षण जगा, कधीकधी तुमचे बालपण देखील जगा. जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदाने सकारात्मकतेने जगा.

लेखक - डॉ. प्रीतम भी. गेडाम

ईमेल prit00786@gmail.com

Labels:

Sunday, 28 September 2025

मुसळधार पावसामुळे ओढ्याला पुर ; गुळहळ्ळी गावाचे शनिवारी संपर्क तुटले ,जनजिवन विस्कळीत , प्रशासनाने उपाययोजना करण्याची मागणी

मुसळधार पावसामुळे ओढ्याला पुर ; गुळहळ्ळी गावाचे शनिवारी संपर्क तुटले ,जनजिवन विस्कळीत , प्रशासनाने  उपाययोजना करण्याची मागणी 

नळदुर्ग,दि.२८ :

शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे तुळजापूर तालुक्यातील गुळहळ्ळी येथे ओढ्याला पुर आल्याने शनिवारी दिवसभर संपर्क तुटला. रविवारी सकाळी पाणी ओसरले. कांहीं दिवसापुर्वी सुध्दा अतीवृष्टीने गावातील घरात पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले होते. दरम्यान दि.२७ सप्टेंबर रोजी शहापुर, दहिटणा या गावास अपर जिल्हाधिकारी यांनी भेट दिली. मात्र गुळहळ्ळी गावाचे संपर्क तुटल्याने या गावास भेट देता आले नसल्याचे समजते.
 गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे गुळहळ्ळी ता तुळजापूर येथील नागरिकांचे जीवन धोक्यात आले असून गावाचा  संपर्क तुटला आहे. गावाच्या मुख्य मार्गावर असलेला ओढा  दुथडी भरून वाहत असल्याने, नागरिक रोजचा प्रवास करताना जीव मुठीत घेऊन तो ओलांडताना दिसत आहे.. प्रशासनाने या  समस्येकडे तातडीने लक्ष देऊन नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करावी अशी ग्रामस्थातुन  मागणी होत आहे.

अतिवृष्टीमुळे ओढ्यावर असलेला पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. पाण्याचा प्रवाह इतका वेगवान आहे की, गावाचा बाहेरील जगाशी असलेला संपर्क तुटला आहे. यामुळे अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय मदत, किराणा दुकान, दळण, दळण्यासाठी आणि दैनंदिन गरजांसाठी नागरिकांना अत्यंत धोकादायक परिस्थितीत हा ओढा ओलांडावा लागत आहे. या जीवघेण्या प्रवासमुळे शाळकरी मुले, नोकरदार आणि शेतकरी यांना दररोज धोकादायक पद्धतीने पाणी ओलांडून जावे लागत आहे. अनेक ठिकाणी पाण्याचा वेग इतका जास्त आहे की, घसरून पडण्याचा आणि वाहून जाण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाला शहरात किंवा जवळच्या दवाखान्यात घेऊन जाणे जवळपास अशक्य झाले आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. महिला आणि वृद्धांना हा ओढा ओलांडणे अत्यंत कठीण झाले आहे.
या गंभीर परिस्थितीची जिल्हाधिकारी कार्यालयाने आणि आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने तातडीने दखल घ्यावी. नागरिकांच्या मूलभूत सुरक्षिततेकडे झालेले दुर्लक्ष भविष्यात एका मोठ्या दुर्घटनेला आमंत्रण देऊ शकते. जीवघेणा प्रवास थांबवून प्रशासनाने तातडीने पाऊले उचलाण्याची मागणी प्रतिष्ठित नागरिक योगेश हांजगे यांनी केली आहे.

Labels:

अणदूर येथील आठवडी बाजारातील विक्रेते व बाजारकरुंना सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी

अणदूर येथील आठवडी बाजारातील  विक्रेते व बाजारकरुंना सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी 

अणदुर,दि.२७ :

तुळजापूर तालुक्यातीलअणदूर येथील आठवडी बाजारातील  विक्रेते व बाजारकरुंना कोणत्याही सुविधा नसल्याने विक्रेत्यांसह बाजरकरुंची ससेहोलपट सुरु आहे.याकरिता सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात आहे.

अणदूर येथे दर गुरुवारी आठवडी  बाजार राईसमील मैदानावर भरतो. याठिकाणी कोणत्याही सुविधा उपलब्ध  नसल्याचे दिसून येत आहे.परंतू विक्रेत्यांकडून कर वसुली मात्र सुरु असल्याने व्यापारी बांधवामध्ये नाराजी आहे. पाऊस पडला की बस स्थानकापासूनचे पाणी गटार नसल्याने दिशा मिळेल तिकडे घुसते .त्यातील बहुतांश पाणी,शासकीय दवाखाना,जिल्हा परिषद कन्या शाळा व अर्ध्या बाजारात घुसत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना अक्षरशः चिखलात व पाण्यात भाजीपाला विक्री करावी लागत आहे. तर नागरिकांनी तुडवीत गेलेल्या दुषीत चिखल पाण्यातील भाजीपाला खरेदी करण्याची वेळ आली आहे. बाजारात व्यापाऱ्यांना बसण्यासाठी ना बाजार ओट्यांची सोय ना स्वच्छता गृहाची सोय, ना पिण्याच्या पाण्याची सोय आहे. जिथे आडोसा मिळेल तिथे बाजारकरी व व्यापारी नैसर्गिक विधी उरकतात.परिणामी दुर्गंधी पसरुन परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.कांही विक्रेत्यांना कर भरुनही नाईलाजाने स्वखर्चाने मुरुम टाकून येणारे पाणी रोखण्याची दुर्दैवी वेळ आली आहे.

परिसरातील जवळपास २५ गावातील नागरिक व विक्रेते बाजारात येतात. तेव्हा ग्रामपंचायतीने बाजार ओटे उभारुन, स्वच्छतागृह व पिण्याच्या पाण्याची सोय करावी अशी मागणी होत आहे.

Labels:

Saturday, 27 September 2025

मुसळधार पावसात वीज पडून वासरू मृत्यूमुखी; नदीच्या पुरात दोन म्हशी वाहुन गेल्या; शहापूर गावाचा संपर्क तुटला, अपर जिल्हाधिकारी यांची भेट

मुसळधार पावसात वीज पडून वासरू मृत्यूमुखी; नदीच्या पुरात दोन म्हशी वाहुन गेल्या; शहापूर गावाचा संपर्क तुटला, अपर जिल्हाधिकारी यांची भेट

नळदुर्ग,दि.२७ :

शुक्रवारी रात्री वीजाचा कडकडाट, मेघगर्जनेसह नळदुर्ग व परिसरात जोरदार मुसळधार पाऊस झाला.  या पावसातच पहाटे ४:३० वाजण्याच्या दरम्यान दहिटणा ता.तुळजापूर शिवारात पहाटे पुर्वी वीज पडून म्हशीचे वासरु दगावले तर दोन म्हशी नदीच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे.तर पूर आल्याने नळदुर्ग अक्कलकोट मार्गावरील शहापूर गावाचा संपर्क तुटला. दरम्यान शनिवार रोजी अपर जिल्हाधिकारी स्वाती पाटील  यांनी भेट दिली.
 तुळजापूर तालुक्यातील शहापूर व दहिटणा या गावास अपर जिल्हाधिकारी व भाजपच्या पदाधिका-यांनी भेट देवुन परिस्थिती जाणुन घेतली. शहापूर गावाचा संपर्क पुलावरील पाण्यामुळे तुटला होता. दहिटणा गावात शुक्रवारी रात्री मुसळधार पावसामुळे दोन जनावरे वाहून गेली असून अप्पासाहेब पाटील या शेतकऱ्याचे
एक वासरू वीज पडून मृत्यूमुखी पडले आहे.तर अप्पासाहेब पाटील, मल्लिनाथ बिराजदार यांच्या म्हशी नदीच्या पुरात वाहून गेल्याची माहिती तलाठी एम.एस गायकवाड यांनी सांगितले.
आज आणि उद्या अतिवृष्टीचा इशारा असल्यामुळे सर्व गावकऱ्यांनी सुरक्षित रहावे. कसलीही अडचण असल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क करावा अशा सूचना अपर जिल्हाधिकारी यांनी दिल्या.सदरील घटनेचा तलाठी एम.एस. गायकवाड यांनी पंचनामा केला.

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या सुचनेनुसार  तांडा सुधार समितीचे अशासकिय सदस्य विलास राठोड, राज्य परिषदेचे सदस्य सिध्देश्वर कोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आशिष सोनटक्के,भिवा इंगोले, महादेव सालगे आदिंसह भाजप पदाधिकाऱ्यांनी  वरील गावास  भेट देवुन माहिती घेतली. यावेळी दहिटणाचे सरपंच शिवकांता कांबळे, तुळजापूरचे तहसिलदार अरविंद बोळंगे, नळदुर्गचे अपर तहसिलदार प्रमोद गायकवाड, ग्रामपंचायत अधिकारी महेश मोकाटे, मंडळ अधिकारी पवन भोकरे,अमर गांधले, कृषी साहाय्यक उषाताई कार्ले शेतकरी बांधव, ग्रा.प. सदस्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Labels:

मराठवाडा भूषण पुरस्काराने पत्रकार मोहन जाधव यांचा गौरव

मराठवाडा भूषण पुरस्काराने पत्रकार मोहन जाधव यांचा गौरव       

 मुरूम,दि.२७: डॉ सुधीर पंचगल्ले 

पुणे येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या औचित्याने थोर साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, डॉ. भाऊसाहेब जाधव, अभिमन्यू पवार व प्रकाश इंगोले यांच्या विशेष उपस्थितीत सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, शाल, हार घालून मान्यवरांच्या हस्ते  शुक्रवारी (ता.२५) रोजी मुरूमचे सुपुत्र तथा पत्रकार मोहन जाधव यांना मराठवाडा भूषण पुरस्कार- २०२५ ने गौरविण्यात आले. 

पुरस्कारानंतर माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना मोहन जाधव म्हणाले की, हा पुरस्कार माझ्या नावाने जरी घोषित झाला असला, तरी तो खराखुरा माझ्या गावकऱ्यांचा शेतकरी-कामगार मायबाप जनतेचा आहे. पत्रकारितेला केवळ दोन वर्षां पूर्ण होत आहेत, पण या अल्पावधीतच शेतकऱ्यांच्या व्यथा, सर्वसामान्यांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवणे, अन्यायाविरुद्ध आवाज बुलंद करणे, हेच ध्येय समोर ठेवले. दरम्यान अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या संघर्षाची नोंद प्रशासनाकडे पोहोचवण्यासाठी सलग पंधरा दिवस केलेली धडपड आजही मनात जिवंत आहे. हा पुरस्कार म्हणजे त्याच जनआवाजाचा गौरव आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रात मला प्रेरणा देणारे . पत्रकार चंद्रसेन देशमुख,  महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा  प्रा. डॉ. महेश मोटे , पत्रकार रफिक पटेल यांचे सातत्याने मार्गदर्शन लाभले. याशिवाय सामाजिक चळवळीच्या पार्श्वभूमीवर प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात लोकशाहीचा चौथा स्तंभ टिकून ठेवण्यासाठी मार्गदर्शन करणारे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार, जिवलग सहकारी सीपीआय चे नेते कॉम्रेड आकाश शिंदे, छोटे बंधु एआयएसएफ चे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड लखन भोंडवे यांच्या सहवासाने सत्य, स्पष्ट व निर्भीड पत्रकारिता करण्याची प्रेरणा मिळत राहिली. 

                      
 फोटो ओळ  : मुरूम, ता. उमरगा येथील मोहन जाधव यांना मराठवाडा भूषण पुरस्कार प्रदान करताना डॉ. श्रीपाल सबनीस, डॉ. तात्याराव लहाने, डॉ. भाऊसाहेब जाधव, अभिमन्यू पवार व अन्य.

Labels:

उमरगा (चि.) जि.प. शाळेत "सायबर शिक्षा पर सायबर सुरक्षा" हा उपक्रम संपन्न

उमरगा (चि.) जि.प. शाळेत "सायबर शिक्षा पर सायबर सुरक्षा" हा उपक्रम संपन्न 

नळदुर्ग,दि.२७ : 

 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उमरगा (चि.) ता . तुळजापूर येथे "सायबर शिक्षा पर सायबर सुरक्षा" हा उपक्रम राबविला.

 तुळजापूर तालुक्यातील अणदुर जवाहर उच्च माध्यमिक विद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रतिक मातोळे व फिरोज शेख हे दोन विद्यार्थी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूर येथे  संगणकशास्त्र संकुलात बीसीए सेकंड ईयरला शिकत असून 'सायबर सिक्युरिटी' याबद्दल विनामूल्य अशी माहिती देण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उमरगा (चि.) येथे "सायबर शिक्षा पर सायबर सुरक्षा" हा उपक्रम मुख्याध्यापक शिवराज स्वामी  यांच्या अध्यक्षतेखाली राबविण्यात आला. 

 म्हाळाप्पा कोरे, अतुल पोद्दार शिक्षक उपस्थित होते. या सेमिनरमध्ये आजच्या युगामध्ये होणाऱ्या ऑनलाइन फसवणुकी पासून कसे सावध राहायचे. OTP कोणास सांगू नये, अनोळखी नंबर वरून आलेल्या फोन कॉलची तपासणी करावी,  या विषयावर सेमिनार घेतला.

Labels:

स्वस्थ नार ,सशक्त परिवार अभियानांतर्गत आरोग्य शिबीरात नळदुर्ग उपजिल्हा रुग्णालयात ३७२ रुग्णांची तपासणी

स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत आरोग्य शिबीरात नळदुर्ग उपजिल्हा रुग्णालयात ३७२ रुग्णांची तपासणी

नळदुर्ग,दि.२७ :

स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान आरोग्य शिबीरामध्ये नळदुर्ग उपजिल्हा रुग्णालयात ३७२ रुग्णांची तपासणी तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी  केली.या शिबीरास रुणांचा प्रतिसाद मिळाला.

शासनाच्या आरोग्य विभागाकडून स्वस्थ नारी- सशक्त परिवार हे अभियान दि.१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर  दरम्यान  राबविण्यात येत असून या अंतर्गत नळदुर्ग उपजिल्हा रुग्णालयात गुरुवार दि.२५ संप्टेबर रोजी एकदिवसीय शिबिर घेण्यात आले.

 यामध्ये नाक,कान,घसा, कॅन्सर विषयी तपासणी, गरोदर मातांची तपासणी असे एकूण ३७२ रुग्णांची तपासणी करण्यात आली. तसेच आयुष्यमान कार्ड नोंदणी यासह किशोरवयीन मुली यांची सर्व तपासणी करून मार्गदर्शन करण्यात आले. 

यावेळी उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. चंचल बोडके यांनी मार्गदर्शन केले. सुरुवातीस दीप प्रज्वलन करून शिबिराची सुरुवात करण्यात आली यावेळी अधिक्षक डॉ.चंचल बोडके,डॉ सुरेंद्र मडके, डॉ विशाल बिराजदार, डॉ दिपक चव्हाण, डॉ प्रांजली कांबळे, डॉ तबस्सुम तांबोळी,डॉ सुहास शिंदे, डॉ लक्ष्मीकांत माने, डॉ राहुल जेडगे, डॉ अविनाश भोरे,डॉ मंजिरी शिंगारे,डॉ प्रीती कुलकर्णी,डॉ जगन्नाथ कुलकर्णी, डॉ योगेश्वरी गुट्टे यांनी रुग्ण तपासणी केली.

शिबिरादरम्यान नेत्रचिकित्सक आनंद काटकर
प्रयोगशाळा साहाय्यक शितल चिलोबा, इन्चार्ज मनिषा होगले, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी
उमाकांत डिग्गे, संतोष कांबळे, सुमन फुले , निर्मला तोडकरी, संतोष कांबळे , कु. छकुली राठोड, रामराजे राक्षे, किरण अधिकारी  आशिष शेलार,पुजा केसकर,आरती खडतरे यांच्यासह सर्व कर्मचारी, परिचारिका यांनी परिश्रम घेतले. औषध निर्माण अधिकारी  नरसिंह जोशी यांनी सूत्रसंचालन तर सहाय्यक अधीक्षक अविनाश धरणे यांनी आभार मानले.

  

Labels:

Friday, 26 September 2025

नळदुर्ग: न.प. कार्यालयात प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना अर्थात पीएम स्वनिधी ; पथविक्रेत्यांसाठी आत्मनिर्भरतेची संधी


नळदुर्ग: न.प. कार्यालयात प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना अर्थात पीएम स्वनिधी ; पथविक्रेत्यांसाठी आत्मनिर्भरतेची  संधी

नळदुर्ग,दि.२६:

केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेंतर्गत नळदुर्ग शहरातील सर्व स्थिर /फिरते आणि तात्पुरते फेरीवाले यांच्यासाठी सदर योजना चालू झाली असून शहरातील जनतेने या योजनेचा खालीलप्रमाणे लाभ घ्यावा असे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांनी आवाहन केले आहे. 

 पहिलले कर्ज रुपये १५ हजार, दुसरे कर्ज रुपये २५ हजार, तिसरे कर्ज  ५० हजार रुपयांचे खेळते भांडवल राष्ट्रीयकृत बँकेमार्फत उपलब्ध करून देण्यात येईल. त्याचबरोबर व्याजावर ७ टक्के अनुदान, डिजिटल व्यवहारावर कॅशबॅक, विनातारण कर्ज सुविधा आहे. याकरिता लाभ घेण्यासाठी पुढीलप्रमाणे आवश्यक कागदपत्रे 
 आधार कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, पॅन कार्ड, आधार कार्ड लिंक मोबाइल नंबर,बाजार फी वसुली पावती, फोन पे/गुगल पे/यूपीआय आयडी ईत्यादी.

लाभार्थ्यांनी नळदुर्ग नगरपरिषद कार्यालयात शहर अभियान व्यवस्थापन कक्ष सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री  सुरज गायकवाड  (DAY - NULM / DJAY-S ) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन न.प.प्रशासनाने केली आहे.

नळदुर्ग नगरपरिषदे मार्फत लोक कल्याण मेळावाचे आयोजन

 केंद्रशासन पुरस्कृत प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी  योजनेंतर्गत लोकल्याण मेळावाचे आयोजन मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांचे अध्यक्षतेखाली नळदुर्ग नगरपरिषदेत करण्यात आले.

दि. १७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोंबर या कालावधीत चालणा-या लोककल्याण मेळावाच्या दरम्यान पथविक्रेत्यांना प्रथम टप्प्याचे १५ हजार रूपये कर्ज उपलब्ध  करून दिले जाणार आहे. हे कर्ज एक वर्ष मुदतीत परतफेड केल्यानंतर व्दितीय टप्प्यासाठी २५ हजार रूपये आणि ५० हजार रुपये असे या योजनेमधून तीन टप्प्यांमध्ये पथविक्रेत्यांना पीएम  स्वनिधी योजनेतू कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.  केंद्रशासनाची पीएम स्वनिधी ही एक महत्तवकांक्षी योजना  मार्च २०३० पर्यंत मुदतवाढ बाबत सर्वांना अवगत करण्यात आले. तसेच  शहरातील सर्व बँकांनी पथविक्रेंत्याचे कर्ज तात्काळ मंजूर करून कर्ज वितरीत करावे, सर्व लाभार्थ्यांचे प्रलंबित कर्ज प्रस्ताव लवकर निकाली काढावे, अशा बँकांना सूचना देण्यात आल्याआहेत.

Labels:

राष्ट्रवादीच्या वतीने शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी येडशी चौरस्त्यावर रास्तारोको ; ओला दुष्काळ जाहीर करुन हेक्टरी ५० हजाराच्या मदतीसह शेतकरी कर्ज माफी करण्याची मागणी

राष्ट्रवादीच्या वतीने शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी येडशी चौरस्त्यावर  रास्तारोको ; ओला दुष्काळ जाहीर करुन हेक्टरी ५० हजाराच्या मदतीसह शेतकरी कर्ज माफी करण्याची मागणी

धाराशिव ,दि.२६:

    धाराशिव जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करुन हेक्टरी रुपये ५० हजाराची मदत करावी. तसेच शेतकऱ्यांची सर्व कर्जमाफी करण्यात यावी, यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या नेतृत्वाखाली येडशी (ता. धाराशिव) चौरस्त्यावर शुक्रवारी (दि.२६)सकाळी ११ वाजता जोरदार रास्तारोको आंदोलन करण्यात आले. 

या रास्तारोकोमुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. यावेळी मागण्या मान्य न झाल्यास धाराशिव जिल्ह्यात मंत्र्याच्या गाड्या आडविण्यात येतील, असा इशारा श्री. दुधगावकर यांनी दिला आहे.
       
यावेळी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले की, माहे १ जून २०२५ ते २४ सप्टेंबर २०२५ या कालावधीत धाराशिव जिल्ह्यामध्ये सरारीने ४२ मंडळामध्ये १००० ते ११०० मी.मी.पाऊस पडला. त्यापूर्वी १४ मे २०२५ ते ३१ मे २०२५ या कालावधीत १७३ मी.मी. पावसाची नोंद झाली. जिल्ह्यामध्ये खरीप २०२५ ला ५ लाख ७२ हजार इतक्या शेतीवर सोयाबीन, मुग, उडीद, मका, फळबागा, ऊस उत्पादक आदीची लागवड झाली. परंतू ही पीके १०० टक्के अतिवृष्टीमुळे उद्धवस्थ झाली. जिल्ह्यातील सर्व मंडळामध्ये शासनाने सरसकट पंचनामे न करता ओला दुष्काळ जाहीर करुन ५० हजाराची तातडीने मदत करावी. शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे. शेतीमालाला, भाजीपाला व फळांना हमीभाव कायदा करुन भावांतर योजना लागू करावी. दुधाला हमीभाव कायदा लागु करुन गाईच्या दुधाला ४० रुपये व म्हशीच्या दुधाला ७० रुपये भाव देण्यात यावा. प्रधानमंत्री पीक विमा योजना या हंगामापासून रद्द केलेले (१) पेरणी न होण्याची परिस्थिती (२) प्रतिकुल हवामान (३) स्थानिक अपदा (४) पिक कापनी पश्चात अपदा या तरतुदी पीक विमा योजनेसाठी पूर्वीप्रमाणेच समाविष्ट कराव्यात. ज्या शेतकऱ्यांची जमीन खरडून गेली व गाळ साठला आहे, अशा बहुभुधारक शेतकऱ्यांना देखील शासकीय योजनेमध्ये सामावेश करावा.अतिवृष्टी व पुरामुळे घरांची, शेतकऱ्यांची, मजुरांची व जनावराचे गोठे उद्धवस्थ झालेले आहेत, त्यांना आर्थीक मदत द्यावी, ज्या शेतकऱ्यांचे व शेतमजुरांचे पशुधन वाहुन गेले आहे, अशांना पशुधनाची भरपाई चालु बाजार भावाप्रमाणे द्यावी. अतिवृष्टीमुळे तलाव, बंधारे, ओढे रस्ते, पूल वाहुन गेलेले आहेत त्याची ताबडतोब दुरुस्ती करावी. शासनाने घोषीत केलेली ३१ आॅगस्ट २०२५ पर्यंत धाराशिव जिल्ह्याला घोषीत केलेली १७९ कोटी रुपयाची मदत अत्यंत तुटपूंजी स्वरुपाची आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून घेणारे राज्य सरकारने धाराशिव हा आकांक्षीत जिल्हा व शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा असताना ही मदत शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखी आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकरी, शेतमजूर व ग्रामीण भागातील जनतेच्या वतीने मायबाप सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.

   या आंदोलनात जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, भारत शिंदे, बालाजी डोंगे, नामदेव चव्हाण, इकबाल पटेल, किशोर आवाड, गौतम क्षिरसागर, बबन काळदाते, प्रदिप काळदाते, अ‍ॅड. प्रविण शिंदे, अ‍ॅड. प्रमोद शिंदे, आप्पासाहेब आवाड, किशोर आवाड, बाळासाहेब निगुट, गणपत भोसले, बाळासाहेब कथले, विठ्ठल माने, औदुंबर धोंगडे, मनोहर हरकर, लिंबराज लोकरे, शिवाजी ढोले, गुंडाप्पा गाजरे, संभाजी गायकवाड, हनुमंत गरड, भास्कर शिंदे, पांडूरंग भराटे, महमंद शेख, भगवान बायस, किसन शिंदे, दिनेश खुने, शंकर कांबळे, सतीश माने, चंद्रकांत पाटील, राजाभाउ शेळके, शशिकांत पाटील, संदीप जाधव, उध्दव शेळके, बापू शेळके, अमित पाटील, कुलदिप घावटे, शाहु पवार-नाईक, प्रशांत मेटे, गणेश धाबेकर, गणेश गडकर, बाळासाहेब कणसे, बाळासाहेब माने, पंडीत घाडगे, मदर शेरीकर, रफिक शेख, सरदार पटेल, दत्तात्रय वाघमारे, दिनकर गायकवाड, राजेंद्र शिंदे, उमेश रितापुरे, अनिल जाधव, राहुल धाबेकर, अक्षय धाबेकर आदींची मोठ्या संख्येनी उपस्थिती होती. 

Labels:

नवदुर्गा ऐश्वर्याने केली साता समुद्रापार भरारी घेऊन पदवी प्राप्त

नवदुर्गा ऐश्वर्याने केली सातासमुद्रापार भरारी घेऊन पदवी प्राप्त

 मुरूम, ता. उमरगा, दि. २६ :प्रा. महेश मोटे

 उमरगा येथील सुकन्येने साता समुद्रापार भरारी घेत युनिव्हर्सिटी कॉलेज बर्मिंगहॅम, इंग्लंड मध्ये बेकिंग पिटासरी ॲड टेक्नॉलॉजी मध्ये पदवी केली प्राप्त.याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक करत अभिनंदन केले जात आहे.

 ऐश्वर्या पाटीलचा हा प्रवास साधा सोपा सरळ नव्हता. श्री. श्री. रविशंकर स्कूल, उमरगा येथून ऐश्वर्या नामक चिमुरडीने आपल्या प्राथमिक शिक्षणाची सुरुवात केली. पुढे तिने माध्यमिक शिक्षण देशी केंद्र, लातूर तसेच विमलताई गरवारे हायस्कूल, पूणे असे स्थलांतर करीत दवे पब्लिक स्कूल, नवी मुंबई येथून विशेष प्राविण्यासह दहावी पास केली. महाविद्यालयीन शिक्षणासाठी डी. वाय. पाटील, नवी मुंबई येथे प्रवेश घेऊन बी. एससी. पदवी घेतली. या शिक्षणा दरम्यान शैक्षणिक सहली साठी जर्मनी, स्वित्झर्लंड बेल्जियम, स्पेन, फ्रांस, इटली आदी देशांत जाण्याची संधी मिळाली. या निमित्ताने बेकिंग आणि डिसोर्टस या संबंधी बरीच माहिती झाली. इथेच तिने मनोमन ठरवलं की यातच आपण  करियर करायचं.  असं म्हणतात माणसाच्या जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या गोष्टी त्याच्या बालपणी अथवा किशोरवयीन अवस्थेत घडून जातात. शाळकरी वयात विविध प्रकारच्या पाककृती बनविण्यात अभिरुची दाखविणारी ही किशोरी उद्याची मास्टर असेल अशी कधी कुणी कल्पना ही केली नसेल.

ती तिच्या आज्या कै. दमयंती बब्रुवान मुळे आणि श्रीमती शकुंतला मधुकरराव कदम यांचे कडून भारतीय पारंपरिक सणावाराला खीर, पुरणपोळी, कटाची आमटी, वड्या आदी घरगुती पद्धतीचे तसेच वार्षिक साठवणूकीचे लोणचे,पापड, कुरड्या, सांडगे इत्यादी तिने छंद म्हणून शिकून घेतले होते. योगायोगाने पूढे थोड्या फार फरकाने हेच तिचे ध्येय ठरले. 

डी. वाय. पाटील येथील पदवी शिक्षणाच्या शेवटच्या टप्प्यात तिने पुढील शिक्षणासाठी जागतिक स्तरावरील संधीचा स्वतः होऊन स्वतंत्रपणे विचार करत शोध घेतला. शेवटी प्रयत्नाला यश आले आणि लंडन येथील युनिव्हर्सिटी कॉलेज बर्मिंगहॅम येथे प्रवेश निश्चित केला. भारतात असताना कधीही एकटीने प्रवास न केलेल्या या मुलीने इंग्लंड मधील पूढील तीन वर्षे एकटीने सारे प्रश्न हाताळले.
परदेशात जाऊन ही ती आपल्या मार्गदर्शक ,शिक्षक,गणगोत, मित्र मैत्रिणी, व्यवसायातील सहकारी यांचेशी ती कायम संपर्कात असते. अशा या  मुलीने युनिव्हर्सिटी कॉलेज, बर्मिंगहॅम (इंग्लंड) येथून मास्टर डिग्री दरम्यान लंडन येथील जग प्रसिद्ध रेस फार्म्युला १ सर्किट मध्ये फरारी कंपनी मध्ये फ्रंट स्टाॅलवर १ वर्षे व नंतर सलग दोन वर्षे तिथेच व्हिआयपी लॉंजवर अपॉईंटमेंट मिळाली. अशी संधी स्कॉलरनाच मिळते. ती तीने मिळविली.ही तिच्या शैक्षणिक जीवनातील अत्यंत अभिमानाची आणि गौरवपूर्ण मिळकत होती असे म्हणता येईल.

उमरगा येथील यशवंत वसंतराव पाटील आणि डॉ. उमा पाटील यांच्या सुकन्येने मराठ मोळ्या ऐश्वर्याने मास्टर डिग्री प्राप्त केल्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. एका अर्थाने घवघवीत यश संपादन करणारी विज्ञान नवयुगातील ही नवदुर्गाच आहे.

Labels:

Thursday, 25 September 2025

अतिवृष्टती पिक नुकसानीचे सरसकट प्रती हेक्टरी एक लाखाची शेतकऱ्यांना मदत करण्याची पालकमंत्री याच्याकडे शेतकरी संघर्ष समितीची मागणी

अतिवृष्टी पिक नुकसानीचे सरसकट प्रती हेक्टरी एक लाखाची शेतकऱ्यांना मदत करण्याची   पालकमंत्री  याच्याकडे शेतकरी संघर्ष समितीची मागणी

नळदुर्ग, दि.२५:

धाराशिव जिल्हात मागच्या काही दिवसापासून होत आसलेल्या आतीवृष्टीने शेतकऱ्यांच्या हाता तोडाशी आलेले घास निसर्गाने हिरावले. अतिवृष्टीत पिक नुकसानीचे सरसकट प्रती हेक्टरी एक लाखाची शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी पालकमंत्री  याच्याकडे शेतकरी संघर्ष समितीने निवेदनाद्वारे केली आहे.

पिकासह  जमिन खरडुन गेली आहे. शेतकऱ्यांचे जनावरे मृत्यूमुखी पडलेले आहेत. घरामधी पाणी शिरून नुकसान झालेले आहे. झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी हावालदील झालेला आसुन शेतकऱ्यांला सध्या आर्थिक मदतीची गरज आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून नुकसान भरपाई म्हणून सरसकट एक लाख रूपये प्रती हेक्टरी आर्थिक मदत तात्काळ शेतकऱ्यांना देण्यात यावी, महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत दिलेल्या आश्वासन प्रमाणे संपुर्ण कर्जमाफी करुन शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी निवेदनाद्वारे प्रताप सरनाईक परिवहन मंत्री तथा पालकमंत्री धाराशिव याना दिलेल्या निवेदिता केली आहे.

 निवेदन मंडल अधिकारी नळदुर्ग काबळे यांना अप्पर तहसील नळदुर्ग येथे देण्यात आले. यावेळी दिलीप जोशी, सरदारसिग ठाकुर, व्यकट पाटील, महादेव बिराजदार, महेश घोडके, दिलीप पाटील, गुलाब शिदे, काशिनाथ काळे, आशोक पाडोळे, तोलु शेख, बंडु मोरे, बालाजी ठाकुर, प्रताप ठाकुर, पिरपाशा ईनामदार, संतोष फडतरे, कालीदास जाधव, आरुण काळे ईत्यादी शेतकरी नळदुर्ग, वागदरी, गुजनुर, शाहापुर गावचे शेतकरी निवेदन देण्यासाठी उपस्थित होते.

Labels:

पंडित दीनदयाल उपाध्याय जयंतीनिमित्त नळदुर्ग भाजप कार्यालयात आभिवादन

पंडित दीनदयाल उपाध्याय  जयंतीनिमित्त नळदुर्ग भाजप कार्यालयात  आभिवादन

नळदुर्ग,दि.२५ :

 थोर विचारवंत, जनसंघाचे संस्थापक पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त नळदुर्ग शहर भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीने आभिवादन करण्यात आले.

गुरुवार दि.२५ सप्टेंबर रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हास्ते करण्यात आले.त्यानंतर दिवंगत माजी नगराध्यक्ष उदय जगदाळे यांना आदरांजली वाहिली.

यावेळी भाजपचे नेते सुशांत भुमकर, नळदुर्ग शहर मंडल अध्यक्ष बसवराज धरणे, ग्रामीण मंडल अध्यक्षा रंजनाताई राठोड, जिल्हा सरचिटणीस साहेबराव घुगे, अँड दीपक आलुरे,  राज्य परिषद सदस्य सिद्धेश्वर कोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आशिष सोनटक्के, जिल्हा उपाध्यक्ष दत्ता राजमाने ,तांडा सुधार समितीचे अशासकिय सदस्य विलास राठोड, माजी शहराध्यक्ष धिमाजी घुगे, माजी नगरसेवक सुधीर हजारे, किशोर बनसोडे, दामाजी  राठोड, सिकंदर काजी,अक्षय भोई,अनिल ऊर्फ पप्पू पाटील, बंडू कसेकर ,संजय जाधव ,संजय मोटे आदी उपस्थित होते.

Labels:

रोटरी क्लब ऑफ मुरुम सिटी आयोजित आदर्श गणेश मंडळ पुरस्कार वितरण सोहळा; किसान गणेश मंडळाचा शहरातून प्रथम क्रमांक

रोटरी क्लब ऑफ मुरुम सिटी आयोजित आदर्श गणेश मंडळ पुरस्कार वितरण सोहळा; किसान गणेश मंडळाचा शहरातून प्रथम क्रमांक

मुरुम, ता. उमरगा, दि. २५ : 

शहरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रोटरी क्लब ऑफ मुरुम सिटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आदर्श गणेश मंडळ पुरस्कार २०२५ वितरण सोहळा शहरातील महात्मा बसवेश्वर पतसंस्थेच्या सभागृहात बुधवारी  रोजी पार पडले. 

 या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरीचे अध्यक्ष प्रा. डॉ. आप्पासाहेब सुर्यवंशी होते. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे, महात्मा बसवेश्वर पतसंस्थेचे अध्यक्ष शिवशरण वरनाळे, पतसंस्थेचे सचिव शरणाप्पा मुदकन्ना, रोटरीचे सचिव कल्लप्पा पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी शिवशरण वरनाळे, प्रा. डॉ. महेश मोटे, डॉ. संदीप दहिफळे यांनी मनोगते व्यक्त केले. 

यावेळी डॉ. महेश मोटे म्हणाले की, गणेशोत्सव हा केवळ भक्तीभाव व्यक्त करण्याचा सोहळा नसून सामाजिक बांधिलकी आणि प्रबोधन यांचा मिलाफ आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव, सामाजिक,आरोग्यविषयक जनजागृतीपर उपक्रम, शिस्तबद्ध मिरवणूक या गोष्टींमुळे समाजात सकारात्मक संदेश जातो. आज गौरव झालेली मंडळे ही भाविकांसाठी आदर्श ठरावीत, अशी अपेक्षा आहे. निवड समितीने पर्यावरणपूरक गणेशमूर्ती, प्रबोधनात्मक देखावे, आकर्षक सजावट, सामाजिक उपक्रम, नागरिकांचे प्रबोधन, शिस्तबद्ध मिरवणूक, बालकलाकारांचे नृत्य यासारख्या विविध निकषांवर मंडळांचे मूल्यमापन करून पारितोषिकांची निवड केली. यामध्ये शहरातून प्रथम क्रमांकाचा मान किसान चौक येथील किसान गणेश मंडळांनी पटकावला, द्वितीय क्रमांक सोनार गल्ली येथील श्रीराम गणेश मंडळ तर तृतीय क्रमांक अशोक गणेश मंडळ यांना मिळाला. 

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गणेश मंडळांच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ढाल भेट देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहशिक्षक संतोष कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन सुनिल राठोड तर आभार कलाप्पा पाटील यांनी केले. यावेळी शहरातील विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी, सदस्य व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.                         

फोटो मुरूम, ता. उमरगा येथील रोटरी क्लबच्या वतीने किसान गणेश मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांना प्रथम पारितोषिक देताना संदीप दहिफळे, आप्पासाहेब सुर्यवंशी, शिवशरण वरनाळे, शरणाप्पा मुदकन्ना व अन्य.

Labels:

धाराशिवला नुकसानीचे क्षेत्र सव्वादोन लाख हेक्टरवर ; एकाचवेळी पंचनामे व ऑगस्टमधील अनुदान वाटपाचे काम वेगाने सुरु - निवासी उपजिल्हाधिकारी

धाराशिवला नुकसानीचे क्षेत्र सव्वादोन लाख हेक्टरवर; एकाचवेळी पंचनामे व ऑगस्टमधील अनुदान वाटपाचे काम वेगाने सुरु - निवासी उपजिल्हाधिकारी 
------
धाराशिव,दि.२५:

जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये विशेषतः मागील चार दिवसात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची प्राथमिक आकडेवारी संकलित झाली आहे. जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजनुसार जिल्ह्यातील दोन लाख २६ हजार ७०६ हेक्टवरील पिके व फळबागांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. एक हजार ४८ घरांची पडझड झाली असून २०७ जनावरे मृत्यमुखी पडली आहेत. जिल्ह्यातील ३६३ गावांसह एक लाख ९८ हजार ३७५ शेतकरी अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने वेगाने हाती घेतले असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी कळविले आहे.
एकाच वेळी पंचनामे व ऑगस्टमधील शासनाकडून मंजूर अनुदानाचे वाटप करण्यासाठी याद्या तयार करण्याचे काम गतीने सुरु आहे. पंचनाम्यानंतर भरपाईसाठी तातडीने निधीची मागणी शासनाकडे करण्यात येणार असून ऑगस्टमधील अनुदान वाटप आजपासून सुरुवात झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी दिली. मागील चार दिवसापूर्वी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी तसेच पुरामुळे झालेल्या नुकसानीची माहिती संकलन करण्यात येत असून आतापर्यंत जिल्ह्यातील दोन लाख दोन हजार ८३९ हेक्टवरील जिरायती, २१ हजार ४४२ हेक्टवरील बागायती व दोन हजार ४२५ हेक्टवरील फळपिकांचे ३३ टक्क्याहून अधिक नुकसान झाल्याचे समोर आले आहे. सर्वाधिक फटका परंडा तालुक्याला तर सर्वात कमी झळ कळंब तालुक्याला बसली आहे. परंडा तालुक्यातील ५२ हजार पाचशे शेतकऱ्यांच्या ३७ हजार जिरायत, १९ हजार बागायती तर दोन हजार शंभर फळपिकांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे दोन व्यक्तींचा मृत्यू झाला असून २०७ जनावरे मृत्यू पावले आहेत. दुधाळ जनावरांची संख्या मोठी असून त्यात १६५ मोठी तर ३६ लहान जनावरांचा समावेश आहे. अन्य सहा जनावरे ओढकाम करणारी असल्याचे जिल्हाधिकारी पुजार यांनी सांगितले.
-------
हजाहून अधिक घरांची पडझड
------
एक हजार ३७ कच्च्या घरांची पडझड झाली असून सात घरे संपूर्ण पडली असून चार गोठ्यांनाही अतिवृष्टीची बाधा पोहचली आहे. सार्वजनिक मालमत्तेचीही अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. यात पंधरा तलाव फुटूले असून बारा रस्ते व तीन पुलांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे १६ गावांचा संपर्क तुटला होता. आता तो पुर्ववत झाला आहे. विविध ठिकाणी पुरामध्ये अडकलेल्या ४९८ नागरिकांची एनडीआरएफ, लष्कराचे पथक, महसूल विभाग व आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पथकांनी शोध व बचाव कार्य करुन सुटका केली आहे. या सर्वांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. जिल्ह्याती परिस्थिती हळूहळू पुर्वपदावर येत असून जिल्हा प्रशासन पंचनामे तसेच अनुदान वाटपाच्या कामावर लक्ष ठेवून आहे. येत्या काळात पावसाचा अंदाज गृहित धरुन शोध व बचाव कार्यासह अन्य उपाययोजनांसाठी प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी सांगितले.  
---------
तालुकानिहाय नुकसानीचा प्राथमिक अंदाज
----------
तालुका - बाधित शेतकरी - बाधीत गावे - बाधीत क्षेत्र हेक्टरमध्ये
धाराशिव - २६ हजार - ५४ - ४४ हजार ६०
तुळजापूर - ३७ हजार - ४८ -  ३९ हजार ८५०
उमरगा - ५१ हजार ३४५ - ८१ -  ५४ हजार २०६
लोहारा -  ६ हजार - ११ - ७ हजार ६९०
भूम - २२ हजार - ३० - १७ हजार ३२०
परंडा - ५२ हजार ५०० - ९१ - ५८ हजार १००
कळंब - २३० - २५ - ३३०
वाशी -  ३ हजार ३०० - २३ - ५ हजार १५०
----------

Labels:

राष्ट्रीय सेवा योजना दिन उत्साहात साजरा

राष्ट्रीय सेवा योजना दिन उत्साहात साजरा   

 मुरूम,दि.२५: 

येथील कनिष्ठ महाविद्यालयात बुधवारी (ता. २४) रोजी राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा करण्यात आला. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य गोविंद इंगोले होते. यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. किसन माने म्हणाले की, स्वयंसेवकांनी स्वतःसाठी नाही तर समाजासाठी परिसर स्वच्छता, प्रौढ शिक्षणासाठी जनजागृती, मतदान जनजागृती, वृक्षारोपण अशा विविध उपक्रमामध्ये स्वयंसेवकांनी सहभाग नोंदवला पाहिजे. प्राचार्य इंगोले म्हणाले की,  विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची जाणीव निर्माण करून त्यांना सामाजिक कार्य करण्यास प्रोत्साहित करणे, हे राष्ट्रीय सेवा योजनेचे मुख्य उद्दिष्टे असल्याचे  व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक कार्यक्रमाधिकारी गजानन उपासे यांनी केले. यावेळी कार्यक्रमाधिकारी प्रसाद इंगोले, सुजित चिकुंद्रे उपस्थित होते, सूत्रसंचालन व आभार प्रा. शेषेराव राठोड यांनी मानले. यावेळी विविध शाखेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.                    
फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी गोविंद इंगोले बोलताना किसन माने, गजानन उपासे  व अन्य.

Labels:

Wednesday, 24 September 2025

बंजारा समाजाचा आरक्षणासाठी धाराशिव मोर्चाबाबत जनजागृती युध्दपातळीवर सुरु

बंजारा समाजाचा आरक्षणासाठी धाराशिव मोर्चाबाबत जनजागृती युध्दपातळीवर सुरु

नळदुर्ग,दि.२४:
सकल गोर बंजारा समाजास अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये समाविष्ठ करण्याच्या प्रमुख मागणीसाठी येत्या दि. २९ रोजी धाराशिव  जिल्हाधिकारी कार्यालयावर बंजारा समाजाच्या निघणा-या मोर्चाबाबत पत्रके वाटप करुन बंजारा समाजात जनजागृती करण्याचा युध्दपातळीवर मोहीम राबविण्यात येत आहे.
अनेक मान्यवरानी तुळजापूर तालुक्यातील बहुतांश तांड्यावर प्रत्यक्ष  भेटी गाठी घेत आहेत. त्याचबरोबर रानावनात काम करणा-या शेतमजूरापर्यंत पोहचुन  त्यांना सविस्तर माहिती देण्याचे  कौतुकास्पद काम होत असल्याने विविध ठिकाणी मान्यवराचे स्वागत केले जात आहे.या होणा-या मोर्चात  बंजारा बांधव ,महिला भगिनींनी जास्तीत जास्त संख्येनी सहभागी होण्याचे आवाहनही  करण्यात आले.

 तुळजापूर तालुक्यातील जखंणी तांडा,येडोळा तांडा, रामनगर, रामतीर्थ , फुलेवाडी, धनगरवाडी , केशेगाव , इटकळ यासह अनेक तांडयास भेट देवुन  बंजारा समाजातील प्रतिष्ठित, युवक, महिला, शेतमजूर यांच्याशी संवाद साधत बंजारा समाजास आरक्षण मिळावे याकरिता सोमवार दि.२९ सप्टेंबर २०२५ रोजी  धाराशिव येथे आयोजित महामोर्चाबाबत माहिती  देत जनजागृती  करण्यात आली.
 माजी जि.प. सदस्य प्रकाश चव्हाण, तांडा सुधार समितीचे अशासकिय सदस्य विलास राठोड,  निवृत्त अन्न सुरक्षा अधिकारी शंकर राठोड, रवी महाराज राठोड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक हरिष जाधव,  निवृत्त मुख्याध्यापक शिवाजी राठोड, अशासकीय सदस्य वसंत पवार,  दामाजी राठोड, लक्ष्मण राठोड, माजी सरपंच बालाजी राठोड, धाराशिव गोरसेना जिल्हा उपाध्यक्ष राजू चव्हाण आदींसह अनेकजण सहभागी  होवुन जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेतले आहे.

Labels:

नळदुर्ग महाविद्यालयाचा संघ खो-खो स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावले

नळदुर्ग महाविद्यालयाचा संघ खो-खो स्पर्धेत 
प्रथम क्रमांक पटकावले

नळदुर्ग,दि.२४: डॉ. दिपक जगदाळे 

 शालेय तालुका स्तरीय १९ वर्ष वयोगटातील मुलांमुलींच्या खो-खो स्पर्धे मध्ये नळदुर्ग येथील कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील मुलामुलींच्या संघानी प्रथम क्रमांक पटकाविला तर द्वितीय क्रमांक जळकोट येथील राजश्री शाहू कला , विज्ञान विद्यालयाने मिळविला. 

नळदुर्ग येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालच्या मैदानावर आयोजित या स्पर्धेसाठी एकूण सहा संघांनी नोंदणी केली होती परंतु प्रत्यक्षात या स्पर्धेसाठी फक्त तीनच संघानी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेचे उद्घाटन तालुका क्रीडा अधिकारी गणेश पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेचे औचित्य साधून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुभाष राठोड यांच्या हस्ते नांदेड येथे झालेल्या बॉक्सिंग स्पर्धेत निवड झालेल्या कु.प्रिया जाधवर हिचा सत्कार देखील करण्यात आला. 

या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुभाष राठोड कार्यालयीन अधिक्षक धनंजय पाटील, डॉ. अशोक कदम , डॉ. उद्धव भाले, तुळजापूर येथील जेष्ट क्रिडा मार्गदर्शक इसाक पटेल,क्रिडा शिक्षक डॉ. कपिल सोनटक्के प्रा. पांडुरंग पोळे , लिपिक विनायक राठोड उपस्थित होते. सदरिल स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सुरेश गायकवाड, यल्लापा गायकवाड, सिद्धू सुतार यांनी परिश्रम घेतले.

Labels:

विभाग स्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत नळदुर्ग महाविद्यालयाचे दोन विद्यार्थी सुवर्ण पदकाचे मानकरी

विभाग स्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत नळदुर्ग महाविद्यालयाचे दोन विद्यार्थी सुवर्ण पदकाचे मानकरी

नळदुर्ग,दि.२४: डॉ. दिपक जगदाळे 

 विभाग स्तरीय शालेय तायक्वांदो क्रिडा स्पर्धेत नळदुर्ग येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी यश संपादन केल्याने या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 लातूर येथील विभागीय क्रीडा संकुल येथे दि. २४ सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या १९ वर्ष वयोगटातील या स्पर्धेत महाविद्यालयातील मल्लिकार्जुन कोने या विद्यार्थ्याने ( ४८ कि.ग्रॅ. ) वजन गटात सुवर्ण पदक पटकावले आहे तर ऋतुराज मोरे या विद्यार्थ्याने (७३ कि. ग्रॅ. ) वजन गटात सुवर्ण पदक मिळविले आहे. विभागीय स्पर्धेत या दोन्ही विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करून सुवर्णपदक मिळविल्याबद्दल मल्लिकार्जुन कोने व ऋतुराज मोरे यांची राज्य स्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

 या विद्यार्थ्यांना क्रिडा शिक्षक डॉ. कपिल सोनटक्के यांचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेत सुवर्णपदक संपादन केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री मधुकरराव चव्हाण ,सचिव उल्हास  बोरगांवकर ,कार्याध्यक्ष रामचंद्र  आलुरे , बाबुराव  चव्हाण, उपाध्यक्ष डॉ. अभय शहापूरकर, सहसचिव प्रकाशराव चौगुले, शाहबाज काझी , अँड. प्रदीपराव मंटगे , लिंबराज कोरेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुभाष राठोड कार्यालयीन अधिक्षक धनंजय पाटील यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले.

Labels:

Tuesday, 23 September 2025

श्री. विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

श्री. विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

मुरुम,दि.२३: डॉ सुधीर पंचगल्ले 

 यावर्षी कारखाना कार्यक्षेत्रात पाऊस चांगला झाल्याने कारखाना कार्यक्षेत्रात मुबलक प्रमाणात ऊस उपलब्ध आहे. त्यादृष्टीने हंगाम २०२५-२६ मध्ये ५.११ लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट ठरवून परिपूर्ण तयारी  केलेली असून भागातील संपूर्ण ऊसाचे गाळप करणार आहोत. गळीत हंगाम २०२५-२६ चा बॉयलर प्रदिपन व गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रम पुढील आठवडयात होणार आहे. तरी सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याची आग्रहाची विनंती आहे. अशी माहिती माजीमंत्री तथा कारखान्याचे चेअरमन मा. श्री. बसवराज पाटील यांनी सभेच्या अध्यक्षपदावरुन बोलताना दिली.

पुढे बोलताना चेअरमन पाटील म्हणाले की, कारखाना आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचे ऊसास जास्तीचा भाव देणे यासाठी साखर उत्पादनाबरोबरच उपपदार्थ निर्मिती करणे गरजेचे आहे. त्यानुसार कारखाना साईटवर ६० केएलपीडी क्षमतेचा डिस्टीलरी प्रकल्प उभारणी करण्यास मंजुरी मिळालेली आहे. जवळपास डिस्टीलरी उभारणीसाठी सर्व औपचारीकता पूर्ण झाल्या असून प्रकल्प अहवालानुसार रक्कम रू.१०० कोटी किंमतीच्या डिस्टीलरीचे काम लवकरच सुरु होणार आहे. या कामासाठी मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आदी मंत्री महोदयांचे आभार चेअरमन पाटील यांनी मानले.

सदर सभेत सर्व उपस्थित सभासदांनी विषय पत्रिकेवरील विषयांना टाळयांच्या गजरात मंजुरी दिली. विषय पत्रिकाचे वाचन प्र. कार्यकारी संचालक मा.श्री. एस. आर. गवसाणे यांनी केले. सदर कार्यक्रमास कारखान्याचे व्हाईस चेअरमन सादिकमियाँ काझी, धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन मा.श्री.बापुराव पाटील, उमरगा जनता सहकारी बँकेचे चेअरमन मा. श्री. शरण पाटील संचालक सर्वश्री अॅड. सुभाष राजोळे, केशवराव पवार, रामकृष्णपंत खरोसेकर, शब्बीर जमादार, दिलीपराव पाटील, संगमेश्वर घाळे, शरणप्पा पत्रिके, राजीव हेबळे, माणिकराव राठोड, दत्तू भालेराव, श्रीमती मंगलताई गरड, सौ. इरम्माताई स्वामी, शिवलिंग माळी, अॅड. संजय बिराजदार तसेच प्रकाश आष्टे, बलभिमराव पाटील, मा.प्रा. दिलीप गरुड, प्राचार्य राम सोलंकर, प्राचार्य श्रीराम पेठकर, दिपक मुळे, हरि लोखंडे, शिवशंकर जट्टे, रशिद शेख आदी मान्यवर कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमास सभासद मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे प्र. कार्यकारी संचालक एस. आर. गवसाणे यांनी केले. आभार  संचालक विठ्ठलराव बदोले यांनी केले. सुत्रसंचालन केन अकौंटंट राजु पाटील यानी केले.

Labels:

राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीश महाजन यांनी केली अतिवृष्टीची पाहणी

राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीश महाजन यांनी केली अतिवृष्टीची पाहणी

धाराशिव,दि.२३:

राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीश महाजन हे धाराशिव जिल्हा अतिवृष्टी पाहणी दौऱ्यावर आले असून त्यांनी पारगाव, ता.वाशी येथील मांजरा नदी पूर परिस्थितीची पाहणी केली. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पुर परिस्थितीची माहिती दिली.

गेल्या काही दिवसापासून सुरु असलेल्या अतिवृष्टी आणि सततच्या मुसळधार पावसामुळे धाराशिव जिल्ह्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पारगाव जवळून वाहणाऱ्या मांजरा नदीला आलेल्या पुरामुळे पाण्याने पात्र सोडून परिसर कवेत घेतला आहे. मांजरा नदी पात्र सोडून तब्बल १ किमी अंतराने विस्तीर्ण होत वाहू लागल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील लहान मोठे नदी, नाले, ओढे ओसंडून वाहत असल्याने नुकसानीची सर्वत्र अशीच परिस्थिती निर्माण झाली असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मंत्री गिरिश महाजन यांच्या  निदर्शनास आणून दिले. 
यावेळी जिल्हाध्यक्ष  दत्ताभाऊ कुलकर्णी,  नितीन काळे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते व शेतकरी बांधव उपस्थित होते.


Labels:

सोलापुरात अतिवृष्टी, पुराच्या पाण्यात अडकले रिधोरे गावकरी, पूरग्रस्तांना तातडीने सुरक्षित स्थळी हळविण्यात यश

प्रतिकात्मक छायाचित्र 

सोलापुरात अतिवृष्टी, पुराच्या पाण्यात अडकले रिधोरे गावकरी, पूरग्रस्तांना तातडीने सुरक्षित स्थळी हळविण्यात यश,
अक्कलकोट तहसील आपदा पथक घटनास्थळी दाखल

अक्कलकोट दि. २३

 गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राला मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पूरस्थिती चिंताजनक आहे. अक्कलकोट तहसील कार्यालयाचे आपदा पथक तैनात झाले असून, माढा तालुक्यातील रिधोरे गावातील पूरग्रस्तांना तातडीने सुरक्षित स्थळी हळविण्यात आले असून, शेती आणि मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीने झोडपून काढले आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे सर्वत्र पूर आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. 

या ठिकाणी नद्यांना आलेल्या पुरामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे. सध्या प्रशासनाकडून मदत आणि बचावकार्य वेगाने सुरु आहे. राज्यातील पूर आलेल्या अनेक ठिकाणी अडकलेल्या लोकांना अक्कलकोट तहसील कार्यालय आपदा पथक यांच्या मदतीने तातडीने मदत केले जात असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात पाहवयास मिळत आहे.

सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर जिल्ह्याला गेल्या दहा दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपले आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व नद्या आणि धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. रात्री झालेल्या पावसामुळे सिना कोळेगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस चालू असल्याने सिना कोळेगाव धरणातून आज  दि :- 23/09/2025 रोजी  एकूण 61000 क्युसेकने सुरू असलेला विसर्ग आज पहाटे 5:30 वाजता वाढ करून  65500 क्युसेक एवढा करण्यात आला आहे.

सिना नदीच्या दोन्ही तिरावरील शेतकरी, नागरिक या सर्वांनी याबाबत सावधानता बाळगावी, पाण्याची आवक व पावसाचे प्रमाण लक्षात घेता नदीपात्रातील विसर्गात वाढ/कमी होण्याची शक्यता आहे.
असे आवाहन जिल्हा व तालुका महसूल प्रशासना च्या मध्यमातून करण्यात असून, धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. ज्यामुळे रिधोरे गावात नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच  माढा तालुक्यातील रिधोरे गावात नदीच्या पुरात 36 लोक अडकल्याची माहिती समोर आली होती. ही माहिती मिळताच रात्री अक्कलकोट येथून तहसील कार्यालयाचे  पथक दाखल झाले. या पथकाने केलेल्या बचावकार्यात 28 लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले असून, 8 जणांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत केले असून, उर्वरित लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
   
   या आपदा पथक अक्कलकोटचे तहसीलदार विनायक मगर  यांच्या मार्गदर्शनाखाली आपदा मित्र प्रविणकुमार बाबर, जाकीर कागदे, गोपीनाथ माने, रामचंद्र माने, हनुमंत सानप यांचा समावेश असून, आज पहाटे पासून, आतापर्यंत 40 लोकांना सुरक्षित स्थळी हळविण्यात यश आले आहे.

Labels:

माढा तालुक्यात आपदा पथकाच्या मध्यमातून बचाव कार्य सुरु; आतापर्यंत ४० लोकांना वाचविण्यात यश

सांगवी बु च्या पट्ट्याची दमदार कामगिरी,
माढा तालुक्यात अक्कलकोट तहसीलच्या आपदा पथकाच्या मध्यमातून बचाव कार्य सुरु; आतापर्यंत ४० लोकांना वाचविण्यात यश

अक्कलकोट दि. २३ :

सध्या महाराष्ट्र राज्यासह सोलापूर जिल्ह्यात पावसाने अक्षरशः थैमान घातले असून, काल रात्री झालेल्या मुसळधार पावसाने माढा तालुक्यात धुमाकूळ घातला असून, कित्येक गावचा संपर्क तुटला तर कित्येक शेतीचे नुकसान झाले असून, या पावसात सिना कोळेगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सध्या देखील चालू असल्याने धरणातून 65,500 इतक्या क्यूसेक्सचा विसर्ग करण्यात आला आहे.

 सिना नदीच्या दोन्ही तिरावरील शेतकरी व नागरिक पुरात अडकले असल्याची माहिती जिल्हा प्रसासनाला कळताच त्यांनी तात्काळ अक्कलकोट तहसील कार्यालयाचे आपदा पथकास पाचरण करण्याचे आदेश दिले. त्यानुसार माढा तालुक्यातील रिधोरे गावातील 36 लोकं पुरात अडकल्याची माहिती मिळताचा त्यातील या पथकाने 28 पूरग्रस्तांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले असून, 8 जणांना सुरक्षित स्थळी स्थलातरीत केले आहे, उर्वरित लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत .
    
  या आपदा पथक अक्कलकोटचे तहसीलदार विनायक मगर  यांच्या मार्गदर्शनखली आपदा मित्र प्रविणकुमार बाबर, जाकीर कागदे, गोपीनाथ माने, रामचंद्र माने, हनुमंत सानप, यांचा समावेश आहे.

Labels:

नवरात्रात नवदुर्गा गौर उपक्रमाचा सहावा वर्षारंभ ; श्री सिद्धिविनायक परिवारातर्फे धाराशिव जिल्ह्यातील महिलांचा सन्मान

नवरात्रात नवदुर्गा गौर उपक्रमाचा सहावा वर्षारंभ ; श्री सिद्धिविनायक परिवारातर्फे धाराशिव जिल्ह्यातील महिलांचा सन्मान

धाराशिव ,दि.२३:
 
 नवरात्र महोत्सव पार्श्वभूमीवर श्री सिद्धीविनायक परिवार तर्फे राबविण्यात येणाऱ्या नवदुर्गा गौरव उपक्रमाचा सहाव्या वर्षी शुभारंभ झाला. 

या उपक्रमांतर्गत धाराशिव जिल्ह्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात येतो. यावर्षीच्या उपक्रमाचा पहिला सन्मान डॉ. वसुधा दिग्गज दापके-देशमुख यांना प्रदान करण्यात आला. स्थानिक शाखा व्यवस्थापक व कार्यकर्त्यांच्या शिफारशीनुसार समाजकारण, व्यावसायिक क्षेत्र किंवा प्रेरणादायी कार्य करणाऱ्या महिलांची निवड करून त्यांना नवदुर्गा म्हणून गौरविण्यात येते. 

श्री सिद्धिविनायक परिवाराचे संस्थापक व भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जात असून महिलांना समाज जीवनात अधिक सक्रिय होण्यासाठी प्रोत्साहन देणे व त्यांच्या कार्याला समाजासमोर आदर्शरूपाने मांडणे हा यामागील उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. मागील पाच वर्षांत अनेक महिलांचा सन्मान या उपक्रमातून करण्यात आला असून यंदाही उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Labels:

अतिवृष्टीने नुकसान झालेल्याचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

अतिवृष्टीने नुकसान झालेल्याचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी 

धाराशिव,दि.२३:

धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत  देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी  यांच्याकडे करण्यात आली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना सोमवारी (दि. 22) दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  गेल्या महिनाभरापासून सतत पाऊस पडत असून धाराशिव जिल्ह्यातील संपूर्ण पिके पाण्याने पिवळी पडून जाग्यावर सडली आहेत. अनेक शेतकऱ्यांचे संपूर्ण पिक सततच्या पावसाने वाया गेलेले आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकतरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे. म्हणून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देणे गरजेचे आहे. तरी योग्य ती उपाययोजना करुन अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करण्यास संबंधीतास आदेशीत करुन जिल्हयातील शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भिमाशंकर इंगळे यांनी दिला आहे. 

यावेळी अभय साळुंके, शिवाजी चव्हाण, महादेव चव्हाण, सुभाष राठोड, विनायक राठोड, गोविंद चव्हाण, भीमराव राठोड, मोतीराम राठोड, पंडित पाटील आदी उपस्थित होते.

Labels:

Monday, 22 September 2025

धाराशिव येथिल आयोजित बंजारा समाजाच्या मोर्चावेळी वैद्यकीय सेवा पुरविण्याची मागणी

 
धाराशिव येथिल आयोजित बंजारा समाजाच्या मोर्चावेळी वैद्यकीय सेवा पुरविण्याची मागणी 

धाराशिव,दि.२२:

सकल गोर बंजारा समाजास अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये समाविष्ठ करण्याच्या प्रमुख मागणीसाठी येत्या दि. २९ रोजी धाराशिव येथे अहिल्यादेवी होळकर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर बंजारा समाजाच्या निघणा-या मोर्चा दरम्यान वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी धाराशिव 
शासकीय जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक  यांना सोमवारी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.

  सकल गोर बंजारा समाजास एस.टी. प्रवर्गात आरक्षण मिळण्याच्या उद्देशाने शासन स्तरावर निवेदन देण्यासाठी समाजाच्या वतीने महाराष्ट्रभर मोर्चे बांधणी चालू आहे. इतर जिल्हयाप्रमाणे धाराशिव जिल्हयातील बंजारा समाजाच्या वतीने दि. 29/09/2025 रोजी विराट मोर्चा काढण्यात येणार आहे.या मोर्चात बंजारा  बांधव, महिला भगिनी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.

सकल गोर बंजारा एस.टी. आरक्षण कृती समितीच्या निवेदनाचा  विचार करुन दोन तज्ञ डॉक्टर, दोन परिचारिका, आपतकालीन परिस्थिती इतर साधनाने सुसज्ज दोन अंबुलन्स (औषधोपचार) सेवा  पुरविण्याची मागणी करण्यात आली आहे.

 निवेदनावर  सुरेश पवार,विशाल जाधव, ॲड.राज राठोड, कालिदास चव्हाण, बाबाजी राठोड, अविनाश चव्हाण,मोहन राठोड,सचिन राठोड, रोहितदास राठोड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Labels:

"सेवा पंधरवाडा " निमित्त नळदुर्ग शहरात भाजप कार्यालयात कार्यशाळा संपन्न



 "सेवा पंधरवाडा " निमित्त  नळदुर्ग शहरात भाजप कार्यालयात कार्यशाळा संपन्न 

नळदुर्ग,दि.२२:

दि.१७ सप्टेंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते २ ऑक्टोंबर गांधी जयंती पर्यंत "सेवा पंधरवाडा " साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रम होत असल्याची माहिती जिल्हा सरचिटणीस साहेबराव घुगे यांनी नळदुर्ग येथे भाजप पदाधिकारी , कार्यकर्त्यांच्या आयोजित कार्यशाळेत दिली.

नळदुर्ग शहरातील भारतीय जनता पार्टी कार्यालयात नळदूर्ग शहर व ग्रामीण मंडलची सोमवार दि. २२ संप्टेबर रोजी कार्यशाळा संपन्न झाली.कार्यक्रमाच्या प्रारंभी भाजपचे नेते सुशांत भुमकर यांनी प्रास्ताविक केले.

यावेळी स्वच्छता अभियान, वृक्षारोपण कार्यक्रम ,आरोग्य शिबिर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या  जिवनावर आधारित कार्य, आत्मनिर्भर भारत , स्वदेशीचा जागर, दिव्यागं व्यक्तीचा सन्मान असे कार्यक्रम साजरे  केले  जात आहेत.तर कांहीं कार्यक्रम झालेले आहेत. पंडित दीनदयाल उपाध्येय यांची जयंती दि .२५ सप्टेंबर रोजी साजरी होणार आहे. त्यानिमित्त "एक पेड मॉ के नाम"  लावण्यात येणार आहे.

 
नळदुर्ग येथील कार्यशाळेत नळदुर्ग शहर मंडल अध्यक्ष बसवराज धरणे , ग्रामीण मंडल अध्यक्षा रंजनाताई राठोड, राज्य परिषदेचे  सदस्य सिद्धेश्वर कोरे, अरविंद पाटील, पद्माकर देवळे , संजय मोटे, उमेश गोरे, दिपक घोडके, विनायक अहंकारी, जिलानी कुरेशी, नाना काजी, गौस शेख, सिकंदर काजी, श्रमिक पोतदार ,धिमाजी घुगे,पद्माकर घोडके,  एस के बागवान, रियासत शेख, अवेज सय्यद, सलीम बागवान, अभिजीत लाटे, अक्षय भोई ,बबन चौधरी, संदीप गायकवाड,  सुदर्शन पुराणिक, कैलास चव्हाण, रियाज शेख, शरद देशमुख , मुदस्सर  शेख आदी उपस्थित होते.

Labels:

मुरूम परिसरातील अतिवृष्टी; शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचीमागणी

मुरूम परिसरातील अतिवृष्टी; शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना  नुकसान भरपाई  देण्याची मागणी                       


 मुरूम ता.उमरगा दि.२३: डॉ सुधीर पंचगल्ले 


 मागील आठवडाभरापासून संपूर्ण उमरगा-लोहारा तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने सगळीकडे पूर परिस्थिती निर्माण झाली असून विशेषतः बेन्नीतुरा नदीच्या पात्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदीने धोक्याची पातळी ओलांडून नदीपात्राच्या परिसरातील हजारो हेक्टर शेतीमध्ये नदीचे पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. 
मुरूम ते अक्कलकोटकडे जाणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. या अनुषंगाने रविवारी (ता. २१) रोजी शिवसेना उपनेते तथा माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी मुरूम परिसरातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसेच या सर्व परिस्थितीची माहिती धाराशिव जिल्हाधिकारी कीर्तीकिरण पुजार यांना व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून देत पर्जन्य मापकाची तांत्रिक अट न धरता उमरगा-लोहारा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवणे बाबत विनंती केली. याच दौऱ्या दरम्यान मुरूम शहरातील भीमनगर ते आष्टा कासार रोडवरील शेत शिवार, किसन चौक ते स्मशान भूमीकडे जाणारा नाला, शहरातील ग्रामीण रुग्णालयात ते बाजार रस्ता मध्ये येणारे अनेक दुकानात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात शिरल्याने दुकाने, घरे व इतर सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्याची पाहणी करत सदरची संपूर्ण परिस्थितीची माहिती राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, महसूलमंत्री, कृषीमंत्री यांना अवगत करून देऊन संपूर्ण धाराशिव जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव नुकसान भरपाई मिळवून देण्याची ग्वाही माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी उपस्थित शेतकरी व नागरिकांना दिली. 

यावेळी महसूल मंडळ अधिकारी व्ही. एस. माटे, सहाय्यक कृषी मंडळ अधिकारी जाधव, व्ही. एस. चाकरे, सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अभियंता संजय मंडगे, मुरूम मुख्याधिकारी सचिन भुजबळ, युवा सेना मराठवाडा निरीक्षक किरण गायकवाड, तलाठी सुदेश होनक्लास, तालुका प्रमुख बळीराम सुरवसे, भीमराव वरनाळे, शेखर मुदकन्ना, श्रीकांत मिनीयार, सुरेश मंगरुळे, प्रशांत मुदकन्ना, भगत माळी, दत्ता इंगळे, प्रशांत पाटील, बाबा कुरेशी, अमृत वरनाळे, बाळू खंडागळे, पिंटू फुगटे आदींची उपस्थिती होती.                                                  
फोटो ओळ :  मुरूम, ता. उमरगा येथील अतिवृष्टी झालेल्या शेतशिवाराची पाहणी करताना ज्ञानराज चौगुले, किरण गायकवाड, श्रीकांत मिनियार, कृषी  अधिकारी जाधव, व्ही. एस. चाकरे, संजय मंडगे व अन्य.

Labels:

५३ महाराष्ट्र बटालियन एनसीसी लातूरच्या वार्षिक प्रशिक्षणास सुरुवात

५३ महाराष्ट्र बटालियन एनसीसी लातूरच्या वार्षिक प्रशिक्षणास सुरुवात

मुरुम,दि.२३: डॉ सुधीर पंचगल्ले 

सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवालय लातूर येथे ५३ महाराष्ट्र बटालियन एनसीसी लातूरच्या कम्बाईन वार्षिक प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ झाला असून सदर शिबीर २१ ते 30 सप्टेंबर २०२५ पर्यंत चालणार आहे.
या कॅम्पचे कॅम्प कमांडंट कर्नल संतोष नौगण ,डेप्युटी कॅम्प कमांडंट वाय.बी.सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली एनसीसी कॅडेटना विविध प्रकारचे सैनिकी प्रशिक्षण दिले  जाणार आहेत. या वार्षिक प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना कर्नल संतोष नौगण यांनी एनसीसी कॅडेटना एकता व अनुशासन याचे पालन करून राष्ट्र निर्मितीसाठी एनसीसी कॅडेट यांनी आपले योगदान द्यावे असे आवाहन केले. या कॅम्पसाठी सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवालय चे प्रशासक  सचिन जांबुतकर व देवस्थान चे विश्वस्त  यांनी कॅम्पसाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे सर्वप्रथम आभार व्यक्त केले. 


या कॅम्प चा मुख्य उद्देश २६ जानेवारी २०२६ मध्ये होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी एनसीसी कॅडेट्स निवड  केली जाणार आहे .या  एनसीसी  कॅडेट्सना ड्रिल ,फायरिंग,सांस्कृतिक कार्यक्रम, फ्लॅग एरिया, खेळ , बेस्ट कॅडेट  इत्यादी सराव घेतला जाणार आहे .
या कॅम्प दरम्यान कॅडेट्सना  सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन त्याचबरोबर विविध खेळाचे आयोजन  केले आहे. या कॅम्पमध्ये लातूर धाराधिव,धुळे अमळनेर,अहिल्यानगर,नांदेड, छत्रपती संभाजीनगर असे एकूण 09 बटालियन च्या शाळा व महाविद्यालयातील  जवळपास ४५० एनसीसी कॅडेट सहभागी झाले आहेत.


या कॅम्पच्या यशस्वीतेसाठी कॅप्टन डॉ चिट्टमपल्ले ज्ञानेश्वर,सुभेदार मेजर शंभू सिंग, चिफ ऑफिसर महावीर काळे,लेफ्टनंट के .एम. क्षिरसागर,नमनगे जगदीश ,विलास राऊत ,सुभेदार हरेंदर सिंग, सू. संजय चिकने, सू.देशराज सिंह , सू.उत्तम पाटील,ना.सुभेदार बाजीराव पाटील,बीएचएम शिवशंकर निकम तसेच  कार्यालयीन हेड क्लर्क घोगरे बी .व्ही.व पवार आर आर हे परिश्रम घेत आहेत .

Labels:

Sunday, 21 September 2025

धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर २९ सप्टेबंर रोजी बंजारा समाजाचा भव्य मोर्चा - बंजारा आरक्षण कृती समितीची माहिती


 धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर २९ सप्टेबंर रोजी बंजारा समाजाचा भव्य मोर्चा -
 बंजारा आरक्षण कृती समितीची माहिती 

धाराशिव,दि.२१ :

बंजारा  समाजास अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी येत्या सोमवार दि.२९ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी  व आपल्या हक्काच्या मागणीकरिता बंजारा समाज बांधवांनी या महामोर्चात जास्तीत जास्त संख्येनी सहभागी होण्याचे आवाहन
धाराशिव जिल्हा बंजारा एस.टी. आरक्षण कृती समितीच्या वतीने  करण्यात आले आहे.

बंजारा समाजास आरक्षण मिळावे ही मागणी खुप जुनी आहे. बंजारा समाजाचे धर्मगुरू, समाजाचे नेते मंडळीसह अनेकांनी  वेळोवेळी तत्कालीन  पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री यांना आवश्यक ते पुरावे,निवेदन, अर्ज देवुन विनंत्या केली आहे. मात्र शासनाने बंजारा समाजाच्या मागणीकडे डोळेझाक केले आहे . लोकप्रतिनिधीनी  समाजाचा मतदानासाठीच  उपयोग केल्याचे आरोप केला जात आहे. सध्या राज्यात सर्वत्र आरक्षण मागणीसाठी बंजारा समाज पेटुन उठला असुन आक्रमक झाल्याचे सर्वश्रुत आहे.

 आरक्षण मागणी संदर्भात  जिल्हास्तरावर  मोर्चे बांधणी चालू आहे. त्याकरिता सोमवार दि.२९ सप्टेंबर रोजी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चामध्ये समाज बांधवासह बंजारा समाजाच्या विविध संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते,विविध क्षेत्रातील मान्यवर, विविध संघटना ,माता भगिनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.

     
   

Labels: