लोहारा : किरण महादेव मोरे यांचे अल्पशा आजाराने उपचारादरम्यान निधन
Labels: Tuljapur
तुळजापूर लाईव्ह, महाराष्ट्राची बित्तम बातमी
Labels: Tuljapur
Labels: Osmanabad
Labels: Osmanabad
Labels: Tuljapur
Labels: Osmanabad
Labels: Tuljapur
Labels: Tuljapur
Labels: Osmanabad
Labels: Osmanabad
Labels: Naldurg
Labels: Naldurg
Labels: Naldurg
Labels: Osmanabad
Labels: Tuljapur
Labels: Tuljapur
Labels: Osmanabad
Labels: Osmanabad
Labels: Osmanabad
Labels: Tuljapur
Labels: Pradesh
Labels: Pradesh
Labels: Osmanabad
Labels: Osmanabad
Labels: Tuljapur
Labels: Naldurg
Labels: Osmanabad
Labels: Tuljapur
उस्मानाबाद : जिल्हयातील एका खेडेगावातील एक 28 वर्षीय महिला दिनांक 27.06.2021 रोजी शेतातील विहरीजवळ काम करत असतांना गुपचुपपणे तेथे आलेल्या गावातीलच एका तरुणाने तिला पाठीमागुन मिठी मारुन तिचा विनयभंग केला.अशा मजकुराच्या संबंधीत महिलेने दिलेल्या प्रथम खबरे वरुन भादसं कलम 354 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
Labels: Osmanabad
उस्मानाबाद ,दि.२८
पोलीस ठाणे, आनंदनगर : अमर सुर्यवंशी रा.सांजा हे आपल्या अर्धवट बांधकाम असलेल्या व दारे- खिडक्या नसलेल्या आपल्या घरात दिनांक 26-27 जुन दरम्यानच्या रात्री कुटुंबासह झोपलेले होते. या वेळी अज्ञाताने त्यांच्या घरात प्रवेश करुन घरातील तीन स्मार्ट फोनसह 10,000 ₹ रोख रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या अमर सुर्यवंशी यांनी दि. 27 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, तुळजापूर : संतोष बुटटे रा.तुळजापूर यांनी घरासमोर ठेवलेली स्प्लेंडर मोटार सायकल क्रमांक एम एच 25 एस 3039 ही दिनांक 12 जुन रोजी पहाटे अज्ञाताने चोरुन नेली. अशा मजकुराच्या संतोष यांनी दि. 27 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, कळंब : माणीक डिकले रा.कल्पना नगर,कळंब यांनी घरासमोर ठेवलेली स्प्लेंडर मोटार सायकल क्रमांक एम एच 25 व्ही 3078 ही दिनांक 27 जुन रोजी पहाटे अज्ञाताने चोरुन नेली. अशा मजकुराच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
Labels: Osmanabad
उस्मानाबाद दि.२८
पोलीस ठाणे मुरुम: नागेश भिमाशंकर भिमाशेटटी वय 48 रा.येणेगुर हे अंध असुन दिनांक 05.06.2021 रोजी 19.00 वा सु नागोबा मंदिरा समोरील कटटयावर बसले असता गावातीलच 1) शुभम बिराजदार 2) वैभव बिराजदार 3)महादेव हुळमजगे 4)व्यंकट हुळमजगे यांनी संगणमत करुन नागेश भिमाशेटटी यांना शिवीगाळ करुन आंधळया लई माजलास का असे अपमानित करुन धक्काबुककी केली.अशा मजकुराच्या नागेश यांनी दिनांक 27.06.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरे वरुन गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे मुरुम: मेहताब शेख रा.मुरुम हे दिनांक 26.06.2021 रोजी गावातील डागा हॉस्पीटल समोर उभे होते.या वेळी जुन्या वादातुन गावकरी -जाकीर बागवान ,नदीम ईमनामदार ,अभिषेक मंडले यांसह अकरा पुरुषांनी ठार मारण्याच्या उददेशाने मेहताब यांना लोखंडी गजाने व तलवारीने मारहाण केल्याने ते जखमी झाले. अशा मजकुराच्या दिनांक 27.06.2021 रोजीच्या प्रथम खबरे वरुन गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे उस्मानाबाद (ग्रामीण): सरस्वती गरड रा.केकस्तळवाडी ता.उस्मानाबाद या दिनांक 26.06.2021 रोजी 20.30 वा मुलगा व सुन यांसह आपल्या घरात होत्या.यावेळी गावकरी सखाराम, राजा, संपत या शिंदे कुटुंबीयांसह राजाभाउ कावळे यांनी सरस्वती यांच्या घरात घुसुन तुमच्यामुळे आमच्या घरात भांडणे होतात. असे धमकाउन सरस्वती यांसह त्यांच्या मुलगा व सुनेला शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी व विटेने मारहाण केली.अशा मजकुराच्या सरस्वती यांनी वैदयकिय उपचारादरम्यान दिलेल्या निवेदनावरुन भादसं 452,323 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
Labels: Osmanabad
उस्मानाबाद दि.२८ :
पोलीस ठाणे उमरगा: अवैध मद्य विक्रीच्या गोपनीय खबरेवरुन उमरगा पो.ठा. च्या पथकाने दि. 27 जून रोजी
एम एस ई बी ऑफिस जवळ बलसुर ते कलदेव लिबांळा जाणारे रोडलगत छापा टाकला असता सुधाकर सोमला चव्हाण वय 32 वर्षे, रा.बलसुर तांडा हे पत्रा शेडसमोर 19 लिटर गावठी दारु अवैधपणे बाळगलेले आढळले. तर कदेरपाटी येथे सुनिल गणपत राठोड वय 30 वर्षे, रा.पळसगाव तांडा हे 40 लिटर गावठी दारु अवैधपणे बाळगलेले आढळले.
पोलीस ठाणे कळंब: अवैध मद्य विक्रीच्या गोपनीय खबरेवरुन कळंब पो.ठा. च्या पथकाने दि. 27 जून रोजी जुनी दुध डेअरी येथे छापा टाकला असता आशा रवि काळे वय 25 वर्षे,रा.जुनी दुध डेअरी कळंब या 10 लिटर गावठी दारु अवैधपणे बाळगलेले आढळले.
पोलीस ठाणे उस्मानाबाद (शहर): अवैध मद्य विक्रीच्या गोपनीय खबरेवरुन उस्मानाबाद-शहर पो.ठा. च्या पथकाने दि. 27 जून रोजी साठे चौक येथे छापा टाकला असता रतन संतु काळे वय 54 वर्षे,रा साठे चौक,दुध डेअरीच्या पाठीमागे उस्मानाबाद हे 15 लिटर गावठी दारु अवैधपणे बाळगलेले आढळले.
पोलीस ठाणे तामलवाडी: अवैध मद्य विक्रीच्या गोपनीय खबरेवरुन तामलवाडी पो.ठा.तामलवाडी च्या पथकाने दि. 27 जून रोजी देवकुरळी गावात छापा टाकला असता संजय गायवाड वय 30 वर्षे,रा.देवकुरळी हे 10 लिटर गावठी दारु अवैधपणे बाळगलेले आढळले. तर खडकी गावात छापा टाकला असता सचिन बजरंग राठोड वय 25 वर्षे,रा.खडकी हे 10 लिटर गावठी दारु अवैधपणे बाळगलेले आढळले
यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत संबंधीत पो.ठा. येथे गुन्हे नोंदवले आहेत.
Labels: Osmanabad
Labels: Osmanabad
Labels: Tuljapur
Labels: Tuljapur
Labels: Osmanabad
Labels: Pradesh
Labels: Osmanabad
प्रतिकात्मक
उस्मानाबाद , दि .२७ :
पोलीस ठाणे,नळदुर्ग: नागेश बोगरगे रा.खुदावाडी हे दि.24 जुन रोजी 07.30 वा वडील दिगंबर यांसह घरासमोर उभे होते. या वेळी भाउबंद संजय, अजय या पिता पुत्रांसह अजय ची आई हिराबाई या तिघांनी कोरोना रुग्न घरात असल्याच्या वादातुन नागेश व पिता दिगंबर यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, विटेने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या नागेश यांनी दि. 26 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 324, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, तुळजापूर : क्राक्रंबा येथील निव्रत्ती दासा साबळे व दगडु दासा साबळे या दोघा भावांच्या कुटुंबात दि 25 जुन रोजी 13.30 वा शेतीविषयक कामातुन वाद झाला. यात दोन्ही कुटुंबांनी परस्पर विरोधी गटास शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, कु-हाडीच्या दांडयाने मारहान करुन खुनाची धमकी दिली अशा मजकुराच्या दोन्ही गटांनी दि. 26 जून रोजी परस्पर विरोधी दिलेल्या दोन प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504,506, 143,147, अंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत.
पोलीस ठाणे, वाशी : ॲडव्होकेट अजितकुमार पाटील हे दिनांक 25 जुन रोजी विजोरा ग्रामपंचायत बैठकीस हजर होते. यावेळी अनावश्यक लोकांनी बैठकीस हजर राहण्यास त्यांनी विरोध केल्याने गावकरी 1) महादेव रामलाल क्षत्रीय 2) गणेश अंगद खोसे 3) अनिल जगन्नाथ खोसे यांनी अजितकुमार यांना शिवीगाळ करुन, खुनाची धमकी देउन धारदार पात्याने व खुर्चीने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या अजितकुमार यांनी दि.26 जुन रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324,323,504,506,34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
Labels: Osmanabad
उस्मानाबाद , दि . २७ :
पोलीस ठाणे, नळदुर्ग : शेटे तांडा,धनगरवाडी येथील गणेश निसरगुंडे हे 25-26 जुन दरम्यानच्या रात्री घरात झोपलेले असतांना अज्ञाताने त्यांच्या घरात प्रवेश करुन घरातील 23 ग्रॅम सुवर्ण दागिने व 80,000 ₹ रोख रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या निसरगुंडे यांनी दि. 26 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
Labels: Naldurg
उस्मानाबाद , दि.२७ :
पोलीस ठाणे, कळंब : कळंब येथील भारत फायनान्स शाखेचे प्रतिनिधी अमोल कदम रा.कौडगांव ता.उस्मानाबाद यांनी मार्च 2020 ते ऑक्टोबर 2020 या काळात महिला बचत गटांकडुन मासीक हप्ते गोळा केले . तसेच महिला बचत गटांना कर्ज देण्याच्या बहान्याने कर्ज फी पोटी रकमा घेतल्या. अशा प्रकारे कदम यांनी एकुण 6,91,026 रुपये गोळा करुन भारत फायनान्स मध्ये न भरता अपहार केला.
अशा मजकुराच्या व्यवस्थापक आकाश गाढवे यांनी दिलेल्या प्रथम खबरे वरुन भादसं कलम 409 अंतर्गत गुन्हा नोदंविला आहे.
Labels: Osmanabad
Labels: Tuljapur
उस्मानाबाद ,दि. २७
पोलीस ठाणे, नळदुर्ग : दत्तात्रय बनसोडे रा.सोलापुर हे दि. 04 जून रोजी 10.30 वा. सु. सोलापुर –ईटकळ रस्त्याने मोटार सायकल चालवत जात होते. या वेळी पाठीमागुन आलेल्या अज्ञात वाहनाची धडक त्यांना लागल्याने ते गंभीर जखमी होउन मयत झाले. या अपघातानंतर नमूद कारचा अज्ञात चालक जखमीस उपचारकामी न नेता, अपघाताची खबर पोलीसांना न देता अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या बापु धुते रा.खानापुर यांनी दि. 26 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 134 (अ) (ब) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
Labels: Naldurg
पोलीस ठाणे तामलवाडी : उस्मानाबाद – सोलापुर महामार्गावर दि. 26 जून रोजी तामलवाडी पोलीस गस्तीस असतांना माळुंब्रा विदयुत उपकेंद्रासमोर पोलीसांना अशोक लेलॅन्ड दोस्त वाहने क्रमांक एम एच 25 ए जे 6700 व एम एच 12 एन एक्स 9542 दिसली. या वाहनांत अत्यंत दाटीवाटीने,चारा न पुरवता, जनावरांची निर्दयपणे व विनापरवाना वाहतुक चालक तानाजी खराडे रा.मसला खुर्द व अब्दुल सय्यद रा.उस्मानाबाद हे करत असल्याचे आढळले.
यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- पशु क्रुरता प्रतिबंधक कायदा व महाराष्ट पोलीस कायदा अंतर्गत दोन गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
Labels: Tuljapur
उस्मानाबाद ,दि. २७ :
पोलीस ठाणे लोहारा: रहदारीस धोका अडथळा निर्माण होईल अशा रितीने रस्त्यात हातगाडे उभे करणा-या पाच व्यक्तींवर लोहारा पोलीसांनी दि. 26 जून रोजी भादसं कलम 283 अंतर्गत कारवाया केल्या.
यात शायर बागवान, शफिक हेडडे, मुनीर सुंभेकर,शैकत बागवान, सोहेल शेख हे लोहारा येथील सास्तुर चौकात आपापले फळ हातगाडे रहदारीस धोका अडथळा निर्माण होईल अशा रितीने लावुन व्यवसाय करतांना आढळले.
Labels: Osmanabad
उस्मानाबाद, दि . २७ :
ब्लॅकमेल करुन खंडणी उकळण्याचा ‘सेक्सटॉर्शन’ हा नवीन प्रकार सामाजिक प्रसार माध्यमांच्या अविवेकी वापरामुळे उदयास आला आहे. या प्रकारात अज्ञात स्त्री- पुरुष हे खंडणी उकळण्याकरीता नवनवीन सावज शोधण्यासाठी ऑनलाईन सामाजिक प्रसार माध्यमांचा उपयोग करतात. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हाट्सॲप यांसारख्या मेसेजींग ॲप, डेटींग ॲप यांसारख्या सामाजिक प्रसार माध्यमांत खोटे नाव, पत्ते, छायाचित्रे वापरून आपले बनावट खाते (प्रोफाईल) उघडून आपण उच्च पदस्थ, श्रीमंत, देखणे, सुंदर असल्याचा बनाव करतात. अशा बनावट खात्यांद्वारे फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठवून, मिस कॉल देउन, व्हीडीओ कॉल करुन किंवा डेटींग ॲपद्वारे प्रेम, विवाह, संभोग असे भुरळ घालणारे प्रस्ताव इतरांना पाठवून त्यांची मैत्री संपादन करतात.
या मैत्रीतूनच पुढे अर्धनग्न, नग्न अवस्थेत एकमेकांना व्हीडीओ कॉल, चॅटींग केले जाते. बनावट खातेधारक असे अर्धनग्न, नग्न व्हीडीओ कॉल- छायाचित्रे, अश्लील संभाषन-संदेशांची देवान जतन (रेकॉर्ड) करुन ठेवतात. कालांतराने त्याच रेकॉर्डीगच्या आधारे ते व्हीडीओ कॉल, छायाचित्रे, चॅटींग अशी खासगी माहिती इंटरनेटवर जगजाहिर करण्याची धमकी समोरील व्यक्तीस देउन ब्लॅकमेल करतात आणि त्याच्याकडून ऑनलाईन खंडणी उकळतात.
दुसऱ्या प्रकारात ऑनलाईन अश्लील साहित्य दाखवणाऱ्या संकेतस्थळांचे (वेबसाइट)सदस्य असणारे ग्राहक आपली नावे, बॅक खाते विषयक माहिती तेथे भरतात. “तुम्ही अश्लील व्हीडीओ पाहत असुन तुमचा सर्व बायोडाटा आमच्याकडे आहे.” अशी ऑनलाईन धमकी ते अज्ञात लोक ग्राहकांना देउन त्यांच्याकडून ऑनलाईन खंडणी उकळतात. आपली बदनामी टाळण्याच्या भीतीने पिडीत व्यक्ती समोरील त्या अज्ञाताच्या धमक्यांस बळी पडून खंडणी देतात किंवा प्रसंगी आत्महत्याही करतात.
“सेक्सटॉर्शन पासून सुरक्षीत रहायचे असेल तर कोणत्याही ज्ञात- अज्ञात व्यक्तीशी अश्लील चॅटींग करु नका. आपली अर्धनग्न, नग्न छायाचित्रे एकमेकांस पाठवू नका. अर्धनग्न, नग्न अवस्थेत व्हीडीओ कॉल करु नका. तसेच आपली खाजगी छायाचित्रे, व्हीडीओ हे मोबाईल फोन, मेमरीकार्ड, ऑनलाईन ड्राईव्ह यांत जतन करतांना अधीकृत ॲपचा वापर करुन मजबूत पासवर्डचा उपयोग करावा. अविश्वसनिय, संशयास्पद असणारे ॲपलिकेशन्स मोबाईल मध्ये घेउ नका. सामाजिक प्रसार माध्यमांचा मर्यादीत व सुरक्षीत वापर करा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सेक्सटॉर्शनच्या धमक्यांना बळी न पडता नजीकच्या पोलीस ठाण्यात किंवा www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर संपर्क साधा.” असे आवाहन पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांनी जनतेस केले आहे.
Labels: Osmanabad
Labels: Osmanabad
Labels: Osmanabad
Labels: Naldurg
Labels: Naldurg
Labels: Naldurg