औषध निर्माण अधिकारीपदी पदोन्नती झालेबद्दल सचिन करंडे यांचा काटी ग्रामपंचायतच्या वतीने सत्कार
Labels: Tuljapur
तुळजापूर लाईव्ह, महाराष्ट्राची बित्तम बातमी
Labels: Tuljapur
Labels: Dharashiv
Labels: Dharashiv
Labels: Dharashiv
1 ऑक्टोबरला ‘स्वच्छतेसाठी एक तारीख- एक तास’ उपक्रम
नळदुर्ग किल्ला परिसराच्या स्वच्छतेसाठी सर्वांनी
‘एक तारीख- एक तास’ स्वच्छता उपक्रमात सहभागी व्हा – क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण यांचे आवाहन
* पुरातत्व विभाग, नगर परिषद, माविम, धरित्री विद्यालय, स्वयंसेवी संस्था होणार सहभागी
धाराशिव,दि.29:
राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंतीनिमित्त देशभर 16 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत स्वच्छता पंधरवडा आणि स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत वेगवेगळे कार्यक्रम राबविण्यात येत आहेत, या अनुषंगाने माननीय पंतप्रधान यांनी आपल्या ‘मन की बात’ कार्यक्रमांमध्ये एक ऑक्टोबर रोजी देशातील विविध ऐतिहासिक स्थळे, नदी आणि अमृत सरोवर या ठिकाणी एक तास श्रमदानाच्या माध्यमातून स्वच्छता करण्याचे आवाहन केले आहे या आव्हानाला अनुसरूनच भारत सरकार माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, सोलापूर यांच्या वतीने नळदुर्ग किल्ल्यामध्ये एक तास स्वच्छता करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार १ ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 10 ते 11 या वेळेत नळदुर्ग किल्ला परिसरातील उपली बुरुजाची स्वच्छता करण्यात येणार असल्याची माहिती क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण यांनी दिली आहे.
‘स्वच्छतेसाठी एक तारीख-एक तास’ या उपक्रमात पुरातत्व विभाग, नगर परिषद, महिला आर्थिक विकास महामंडळ, महिला बचत गट आणि धरित्री विद्यालय आदी शासकीय आणि निमशासकीय संस्थांचा सहभाग असणार आहे. या अभियानात स्वयंस्फुर्तीने श्रमदान व स्वच्छतेसाठी नागरिकांनी www.swachhatahiseva.com या वेबसाईटवर आपले नाव नोंदवावे अथवा आमच्या व्हाट्सअप नंबर 9420923107 वर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंबादास यादव यांनी केले आहे.
Labels: Dharashiv
Labels: Tuljapur
Labels: Tuljapur
Labels: Tuljapur
Labels: Naldurg
Labels: Solapur
Labels: Naldurg
Labels: Naldurg
Labels: Tuljapur
Labels: Tuljapur
Labels: Tuljapur
Labels: Tuljapur
Labels: Tuljapur
Labels: Osmanabad
Labels: Tuljapur
Labels: Tuljapur
Labels: Naldurg
अवैध मद्य विरोधी विशेष मोहिमेदरम्यान जिल्हा भरात 12 छापे.”
धाराशिव , दि.२४:
मा.पोलीस अधीक्षक श्री.अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली काल शनिवार दि.23.09.2023 रोजी अवैध मद्य विरोधी विशेष मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान 12 कारवाया करण्यात आल्या. या छाप्यात घटनास्थळावर आढळलेला गावठी दारु निर्मीतीचा सुमारे 3,870 लि. आंबवलेले रासयनिकद्रव्य हे नाशवंत असल्याने तो जागीच ओतून नष्ट करण्यात आले. तर सुमारे 210 लि. गावठी दारु, 30 लि. सिंधी ताडी अम्ली द्रव व देशी- विदेशी दारुच्या 24 सिलबंद बाटल्या असे मद्य जप्त करण्यात आले. सदर ओतून दिलेला मद्यार्क निर्मीतीचा द्रवपदार्थासह मद्यनिर्मीती साहित्य व जप्त मद्य यांची एकत्रीत किंमत अंदाजे 3,26,180 ₹ आहे. यावरुन महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 12 गुन्हे खालीलप्रमाणे नोंदवण्यात आले आहेत.
1) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 5 ठिकाणी छापे टाकले. दत्तानगर पारधी पिढी ढोकी ता.जि.धाराशिव येथील-सुमाबाई मोहन पवार, वय 50 वर्षे, या 14.40 वा. सु. आपल्या राहात्या घराचे बाजूला अंदाजे 43,400 किंमतीचे गावठी दारु निर्मीतीचे 570 लि. गुळमिश्रीत रसायनिक द्रव व 35 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली. तर जुनी दुध डेअरी पारधी पिडी डिकसळ ता. कळंब जि. धाराशिव येथील- रुपाली विजय पवार, वय 24 वर्षे, या 16.40 वा. सु. आपल्या राहात्या घराच्या बाजूस डिकसळ येथे अंदाजे 33,000 किंमतीचे गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रसायनिक द्रव दारु जप्त करण्यात आली. तर गावसुद पारधी वस्ती, ता. जि धाराशिव येथील- नामदेव साहेबा काळे, वय 45 वर्षे, हे 15.50 वा. सु. गावसुद पारधी वस्ती ता. जि. धाराशिव येथे अंदाजे 61,600 ₹ किंमतीचे 800 लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव व 45 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली. तर चिमनवस्ती तेरखेडा, ता. कळंब जि धाराशिव येथील- शारदाबाई शिवाजी काळे, वय 52 वर्षे, या 17.00 वा. सु. तेरखेडा शिवारातील सुर्या बार समोरील चिमनवस्ती ता. कळंब जि. धाराशिव येथे अंदाजे 46,600 ₹ किंमतीचे गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव जप्त करण्यात आले. तर रामनगर, सांजा ता. जि धाराशिव येथील- बब्रु गुलाब काळे, वय 65 वर्षे, हे 14.00 वा. सु. आपल्या राहात्या घराच्या समोर रामनगर सांजा ता. जि. धाराशिव येथे अंदाजे 41,200 ₹ किंमतीचे 500 लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव व 35 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली.
2) तामलवाडी पो.ठा. च्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. बक्षी हिप्परगा, ता. दक्षिण सोलापूर जि. सोलापूर ह.मु. खडकी तांडा ता. तुळजापूर जि. धाराशिव येथील-गुरुदेव नुरा राठोड, हे 14.00 वा. सु. राजु गुराप्पा राठोड यांचे शेतात खडकी शिवारात अंदाजे 48,600 किंमतीचे 1,600 लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रसायनिक द्रव व 10 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली.
3) लोहारा पो.ठा. च्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. यात भातांगळी, ता. लोहारा जि. धाराशिव येथील- सचिन विकास जगताप, वय 23 वर्षे हे 18.50 वा. सु. आपल्या चिकनचे दुकानासमोर भामांगळी येथे अंदाजे 2,400 ₹किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या.
4) येरमाळा पो.ठा. च्या पथकाने 1 छापा टाकला. यात तेरखेडा, ता. वाशी जि. धाराशिव येथील- प्रविध बाळासाहेब घोलप, वय 34 वर्षे हे 19.00 वा. सु. तेरखेडा येथे ब्रिजचे पाठीमागे जाणारे बोळीत अंदाजे 1,050 ₹ किंमतीच्या देशी विदेशी 15सिलबंद बाटल्या बाळगलेले त्या जप्त करण्यात आल्या.
5)उमरगा पो.ठा. च्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले. यात कैकाडी गल्ली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक उमरगा, ता. उमरगा जि. धाराशिव येथील- प्रकाश धोंडीबा जाधव, वय 73 वर्षे, या श्री गुरु ॲक्वा च्या बाजूला पत्राचे शेड समोर उमरगा येथे अंदाजे 3,900 ₹ किंमतीची 45 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली. यात बालाजी मंदीर मागे उमरगा, ता. उमरगा जि. धाराशिव येथील- प्रकाश सदानंदे, वय 32 वर्षे, हे बालाजी मंदीराचे पाठीमागे पत्राचे शेड समोर उमरगा येथे अंदाजे 2,800 ₹ किंमतीची 30 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली.
6) नळदुर्ग पो.ठा. च्या पथकाने 1 छापा टाकला. यावेळी सलगरा मड्डी ता. तुळजापूर जि. धाराशिव येथील-राजु किसन राठोड, वय 45 वर्षे, हे 18.50 वा. सु. निसर्ग धाब्याचे पाठीमागे मोकळ्या जागेत सलगरा मड्डी ता. तुळजापूर येथे अंदाजे 630₹ किंमतीच्या 9 देशी विदेशी दारुच्या सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या.
7) आनंदनगर पो.ठा. च्या पथकाने 1 छापा टाकला. यावेळी पारधी पिढी, सांजा ता.जि. धाराशिव येथील-शिवाजी शंकर पवार, वय 45 वर्षे, हे 19.30 वा. सु. आपल्या राहात्या घरासमोर सांजा धाराशिव येथे अंदाजे 44,000₹ किंमतीचे 400 लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव व 40 लि. गावठी दारु करण्यात आली.
Labels: Osmanabad
Labels: Osmanabad
Labels: Naldurg
Labels: Tuljapur
Labels: Tuljapur
Labels: Tuljapur
Labels: Naldurg
नळदुर्ग , दि.२३
नळदुर्ग शहरातील एका जुगार आड्डयावर पोलिसांनी आचानक धाड टाकून जुगाराच्या साहित्यासह रक्कम व महिंद्रा कंपनीची फोर व्हिलर, हिरो होन्डा मोटरसायकल व 10 ॲन्ड्राईड व आयफोन मोबाईल असे मिळुन एकुण 9 लाख 38 हजार 200 रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. तर १३ आरोपिविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 4,5 अन्वये नळदुर्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने अवैध धंदे करणा-यात खळबळ उडाली आहे.
जुगार विरोधी कारवाई दरम्यान नळदुर्ग पोलीसांनी दि.21.09.2023 रोजी 23.15 वा. सु. नळदुर्ग पो. ठा. हद्दीत नळदुर्ग येथील सत्यम हॉटेलचे बाजूचे बंद खोलीमध्ये छापा टाकला. यावेळी आरोपी नामे -1)शिवराज शशिंकात भुमकर, वय 35 वर्षे, रा. नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव, 2) चेतन बजरंग धतेकर, वय 36 वर्षे रा. धाराशिव, 3) अजय दिलीप गायकवाड, वय 32 वर्षे,4) अतुल दिलीप ढोंगरे, वय 30 वर्षे, दोघे रा. नळदुर्ग, ता. तुळजापूर जि. धाराशिव, 5) प्रसाद अर्जुन शिंदे, वय 23 रा. बोरगाव ता. औसा जि. लातुर, 6)सागर शंकर कलशेट्टी, वय 29 वर्षे, 7) अबुताहेर बडेसाब कुरेशी, वय 38 वर्षे, 8) इरफान हनिफ कुरेशी, वय 35 वर्षे, 9) मोहन शांताराम लोहार, वय 29 वर्षे, 10) आदम अख्तर जहागीरदार, वय 30, 11) अंकुश अंबादास काळे, वय 35 वर्षे, 12) इरफान हसन शेख, वय 35 वर्षे, सर्व रा नळदुर्ग, ता. तुळजापूर जि. धाराशिव, 13) जुगाराचा अड्डा चालविण्यास देणारा अनोळखी जागा मालक हे सर्वजन नळदुर्ग येथील सत्यम हॉटेलचे बाजूचे बंद खोलीमध्ये येथे तिरट जुगार खेळत व खेळवित असताना जुगाराच्या साहित्यासह एकुण 17,200 ₹ रक्कम सह महिंद्रा कंपनीची फोर व्हिलर, हिरो होन्डा मोटरसायकल व 10 ॲन्ड्राईड व आयफोन मोबाईल असा एकुण 9,38,200 ₹ किंमतीचा माल स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 4,5 अन्वये नळदुर्ग पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
Labels: Naldurg
Labels: Naldurg
Labels: Pradesh