Sunday, 30 June 2024

ॲड तथा सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी बाबुराव पवार यांचे निधन

 
ॲड तथा सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी बाबुराव पवार यांचे निधन

जळकोट ,दि. ३० 

तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील रहिवाशी ( मूळ निवासी आलियाबाद तांडा ) सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी अँड बाबुराव रामचंद्र पवार वय 61 वर्षे यांचे रविवार दि. 30 जून 2024 रोजी सकाळी 09 वाजत सोलापूर येथील खासगी रुग्णालयात अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.


बाबुराव पवार यांनी लातूर जिल्हयात जिल्हा परिषदेत  शिक्षक म्हणून ज्ञानदानाचे काम सुरू केले. त्यांच्या सेवाकाळात पदोन्नतीने मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख सेवानिवृत्तीवेळी शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून निवृत्त झाले होते. त्यांनी आपल्या सेवाकाळातच कायदयाचे शिक्षण ( LLB ) पुर्ण केले होते. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सेवेतून निवृत्त झाल्यानंतर विधिज्ञ म्हणून तुळजापूर, धाराशिव न्यायालयातून न्यायदानाचे कार्य करत होते. अजातशत्रू, मितभाषी, सर्वांशी आपुलकिने वागणारे,  अशा या बहुगुणसंपन्न व्यक्तिमत्त्वाची अखेर  झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

त्यांच्या पश्चात वडिल, चार भाऊ, भावजया, पत्नी, दोन मुली, जावाई, एक मुलगा, नातवंडे असा परिवार आहे. दलितमित्र पुरस्कारप्राप्त सरपंच तथा महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ जळकोटचे  संस्थापक दिवंगत मोतीराम नंदू चव्हाण यांचे जावई तर  माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण यांचे ते भावजी होत.

Labels:

Friday, 28 June 2024

राष्ट्रीय महामार्गावरील अर्धवट कामे तात्काळ पूर्ण करा;मनसेचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणला इशारा

राष्ट्रीय महामार्गावरील अर्धवट कामे तात्काळ पूर्ण करा;मनसेचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणला इशारा

नळदुर्ग,दि.२८

सोलापूर - हैद्राबाद या महामार्गावरील जळकोट, नळदुर्ग  बायपास, अणदूर (ता. तुळजापूर)  या गावांमधून गेलेला राष्ट्रीय महामार्ग क्र 65 याचे काम गेल्या 12 वर्षांपासून संथ गतीने आणि अर्धवट ठेवून ठेकेदार कंपनी,व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण हे नागरिकांच्या जिवाशी खेळत आहेत,

राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम आणि जे सुविधा पाहिजे ते झाले नाहीत उड्डाणपुलाचे काम तर प्रत्येक ठिकाणी अर्धवटच आहेत. तसेच नळदुर्ग बायपासचे काम अंत्यन्त संथ गतीने चालू आहे.मोठी लोकसंख्या असलेल्या जळकोट गाव आहे या ठिकाणी ही अनेक काम निकृष्ट दर्जाचे झाले आहेत दररोज हजारो नागरिकांना हा महामार्ग ओलांडून जावे लागते गावात वाहनांचा वेग कमी व्हावे यासाठी केवळ एक गतिरोधकाचा वापर केला आहे यामुळे या ठिकाणी मोठा अपघात होऊन जिवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


त्यामुळे गतिरोधकाची संख्या वाढवणे गरजेचे आहे तसेच सर्विस रोड आणि मुख्य महामार्ग यामध्ये बॅरिगेटिंग अथवा जाळी बसविणे, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते सर्विस रोड, संभाजीनगर भागात जाणारा मुख्य रस्ता ते सर्विस रोड आणि गावातून आलियाबाद कडे जाणाऱ्या मार्गाच्या दोन्ही बाजूंनी स्ट्रीट लाईटचे काम करणे आणि सदर महामार्गावरील ठीक ठिकाणी गतिरोधकावर थर्मो प्लास्टिक (पांढरेपट्टे) चे काम, सर्व सूचनाफलक तात्काळ करण्यात यावे.
व तसेच अणदूर येथील उड्डाणपूल आहे त्या उड्डाणपुलाला एक नवीन बोगदा होणे गरजेचे आहे. अणदूर गाव हे एक मोठे गाव आहे या ठिकाणी श्री खंडोबा देवस्थान असून शाळा, महाविद्यालय, राष्ट्रीय बँक, बाजारपेठ आहे,महामार्गाच्या दोन्ही बाजूने वसलेल्या या गावामध्ये जाण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांना खूप लांबून जावं लागत आहे व वयोवृद्ध माणसाला ही पटकन गावातील दवाखान्यात जाता येत नाही  उड्डाणपुलाला फिरून जावे लागत आहे त्यामुळे नागरिकांची खूप मोठी कसरत होत आहे.
या सर्व बाबीकडे त्वरित लक्ष घालून जिल्हाधिका-यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून सर्व काम त्वरित करावे अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात असा इशारा मनसे पदाधिका-यांनी संबंधीत विभागाला दिला आहे,


या निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष  महेश जाधव, जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे, तालुका अध्यक्ष मल्लिकार्जुन कुंभार,तालुका सरचिटणीस गणेश पाटील, विधानसभा अध्यक्ष मयूर गाढवे, नळदुर्ग शहराध्यक्ष अलीम शेख, शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी, अणदूर शाखाध्यक्ष सोमेश्वर आलुरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Labels:

Thursday, 27 June 2024

महाविकास आघाडीचे प्रबळ उमेदवार अशोक जगदाळे यांना उमेदवारी मिळाल्यास प्रचंड मताने निवडून आणण्याचे कार्यकर्त्यांनी केले निर्धार

महाविकास आघाडीचे प्रबळ उमेदवार अशोक जगदाळे यांना उमेदवारी मिळाल्यास प्रचंड मताने निवडून आणण्याचे कार्यकर्त्यांनी केले निर्धार

नळदुर्ग,दि. २७

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अशोक जगदाळे यांच्या वाढदिवसाच्या  निमित्त आयोजित भव्य शेतकरी मेळाव्यात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तुळजापूर विधानसभा जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला.
   

नळदुर्ग येथे दि. 26 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य अशोक जगदाळे यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकरी मेळावा आयोजित केला होता. या कार्यक्रमास महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित राहून अशोक जगदाळे यांना तुळजापूर विधानसभा मतदार संघातून आमदार म्हणून पाठवण्याचा मनोगत व्यक्त केले. 
 
 प्रारंभी शेतकरी मेळाव्यास तुळजापूर विकसनशील शेतकरी मार्गदर्शक गुंडू पवार, प्रगतीशील शेतकरी सत्यवान सुरवसे, यांनी मार्गदर्शन केले. यावेळी तुळजापूर मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट, व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. या सोहळ्यात अणदूरचे सरपंच रामचंद्र आलूरे, शिवाजीराव मोरे, यांनी मार्गदर्शन करून अशोक जगदाळे यांना शुभेच्छा दिल्या. तसेच असंख्य कार्यकर्त्यांनी यावेळी महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवावी. लोकसभा निवडणुकी सारखे आपण एकदिलाने एकमताने ही निवडणूक लढून अशोक जगदाळे यांचे आमदारकीचे स्वप्न पूर्ण करू व वाढदिवसाची भेट देऊ असा निर्धार व्यक्त केला. 

यावेळी तुळजापूर मतदार संघातील रखडलेल्या विकास कामास विद्यमान आमदार व राज्यसरकार हे जिमेदार आहे. त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, असेही म्हटले. महायुतीकडून तुळजापूर मतदार संघात सत्ताधारी पक्षास तोडीस तोड उत्तर देणारा उमेदवार एक प्रबळ दावेदार म्हणून अशोक जगदाळे यांच्या शिवाय दुसरा उमेदवार राहूच शकत नाही. तसेच यावेळी विरोधी मताची मतविभागणी टाळण्याकरिता एकास एक उमेदवार देऊन प्रचंड ताकदीने निवडणूक लढवण्याचा निर्धार केला. या सोहळ्यात अशोक जगदाळे यांच्या नावावर सर्व संमत्तीने शिक्का मोर्तब करण्यात येवून महाविकास आघाडीत जागा कोणत्या पक्षास सुटेल त्यानुसार जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्याचे मत ही कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.

 कमलाकर चव्हाण, शहबाज काझी, मुस्ताक कुरेशी, तीती शेख, नितीन कासार, महालिंग स्वामी, अमृत पुदाले, किशोर नळदुर्गकर, विनायक अंहकारी, दत्ताञ्य कोरे,संजय जाधव, मुनीर शेख, मुकुंद नाईक, संतोष पुदाले,  महबूब शेख, शिवाजी गायकवाड, शिवाजीराव मोरे, बंकट बेडगे ,   नवाज काझी, सरदारसिंग ठाकूर, गोविंद देवकर, होर्टीचे माजी सरपंच ज्ञानेश्वर भोसले, कृष्णात मोरे, , डॉ बालाजी जाधव, विलास पुदाले, कनगऱ्याचे सरपंच मधुकर गंगणे, उपसरपंच सुरज इंगळे, युवराज पिंपळे , माजी सरपंच अमोल मस्के काटीचे सरपंच सुजित हंगरगेकर ‌, काटगावचे दीपक माळी, शेतकरी संघटनेचे अरविंद घोडके, अबेद इनामदार,हलीम पटेल, रमेश जाधव , म्हंतेश पाटील
,ताजोद्दिन शेख,संजय बेडगे, मुन्ना शेख,अमित शेंडगे, शाम कनकधर,,ओम बागल, आदीसह कार्यकर्ते
उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्तविक अरुणधती शेटे यानी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुधीर पोतदार , नवल जाधव , प्रवीण चव्हाण, ओम बागल, बंटी मुळे, उदय भुमकर, विशाल जगदाळे, आदीनी पुढाकार घेतले. 

Labels:

Wednesday, 26 June 2024

राष्ट्रवादीचे नेते अशोक जगदाळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

राष्ट्रवादीचे नेते जगदाळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

नळदुर्ग, दि.२६


महाविकास आघाडीचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अशोक जगदाळे यांच्या वाढदिवसा निमित्त नळदुर्ग येथे बुधवार दि- २६ जून रोजी शेतकरी मेळाव्यासह विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजित  करण्यात आले आहे.

 बुधवारी सायंकाळी ५ वाजता महाविकास आघाडीचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अशोक जगदाळे यांचा वाढदिवस नळदुर्ग येथील बीके फंक्शन हॉल येथे मोठ्या उत्साहात व विविध समाजपयोगी कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील जनता सध्या अशोक जगदाळे यांच्याकडे भावी आमदार म्हणून पाहत आहे. अशोक जगदाळे यांनी राजकारणाबरोबरच समाजकार्यही मोठ्या प्रमाणात केले आहे. मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करून तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील शेतकरी गरीब मुला-मुलींचे विवाह करून दिले आहेत. त्याचबरोबर हजारो महिलांना मोफत देवदर्शन घडवून आणण्याचे काम अशोक जगदाळे यांनी केले आहे. तालुक्यात पाणीटंचाईच्या काळात अशोक जगदाळे यांनी अनेक गावातील नागरिकांना टँकरव्दारे मोफत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला आहे. त्याचबरोबर तालुक्यातील प्रत्येक गावात फिरता दवाखाना सुरू करून हजारो नागरिकांवर मोफत उपचार केले आहेत.
  

 तुळजापूर तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाना अन्नधान्यासह बी-बियाणे व खतांचे मोफत वाटप करण्याचे कामही अशोक जगदाळे यांनी केले आहे. कोरोनासारख्या महामारीच्या काळात अशोक जगदाळे यांनी नळदुर्ग शहरासह परिसरातील गावातील नागरिकांना आधार देण्याचे काम त्यांनी केले आहे. म्हणूनच आज अशोक जगदाळे यांच्याकडे तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील नागरिक एक आदर्श व लोककल्याणकारी नेता म्हणून पाहिले जात आहे.

Labels:

Tuesday, 25 June 2024

सर्वाच्या सहकार्याने नळदुर्ग भुईकोट किल्ल्याचे पर्यटन क्षेत्रात नावलौकिक - युनिटी मल्टिकाँन्स कंपनीचे कार्यकारी संचालक कफिल मौलवी


सर्वाच्या सहकार्याने नळदुर्ग भुईकोट  किल्ल्याचे पर्यटन क्षेत्रात  नावलौकिक - युनिटी मल्टिकाँन्स कंपनीचे कार्यकारी संचालक कफिल मौलवी

नळदुर्ग दि.२४ :

नैसर्गिक आपत्तीला तोंड देत नुकसानाची पर्वा न करता कोट्यावधी रुपये खर्चुन नळदुर्गच्या भुईकोट किल्ल्याचे सुशोभिकरण करुन कायापालट केले. इतिहास प्रेमी नागरिक व  येणा-या पर्यटकांना ऐतिहासिक वास्तुची माहिती व्हावी या हेतुनी अवाढव्य किल्ल्यात सुशोभिकरण व सोयी सुविधा निर्माण करण्यात प्रारंभीचे चार वर्ष गेले. त्यानंतर कोरोनात दोन वर्ष गेले. तर अतीवृष्टीत किल्ल्यात खुप मोठे नुकसान झाले. त्याचबरोबर नाम माञ उत्पन्न मिळाले तर खर्च आधिक झाले. सर्वाच्या सहकार्यामुळेच किल्ल्याचे पर्यटन क्षेत्रात  नावलौकिक झाल्याचे मत युनिटी मल्टिकाँन्स कंपनीचे कार्यकारी संचालक कफिल मौलवी यानी स्नेह मेळाव्यात बोलताना व्यक्त केले.

 सन 2014 रोजी करारान्वये महाराष्ट्र सरकार व राज्य पुरातत्व विभाग यांनी नळदुर्गचा  किल्ला दहा वर्षासाठी युनिटी मल्टीकॉन्स कंपनीला  दत्तक म्हणून संवर्धन व संगोपनासाठी दिला. हा  दहा वर्षाचा  कालावधी संपत आल्याने नळदुर्ग येथिल युनिवंडर्स रिसाॕर्ट याठिकाणी  सोमवारी युनिटी कंंपनीच्यावतीने स्नेह मेळावा आयोजित करण्यात आले होते. यावेळी युनिटीचे कार्यकारी संचालक कफिल मौलवी , संचालक जयधवल करकमकर यांचा  व  उपस्थित मान्यवारांचा  सत्कार करण्यात आला.

नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यातील झालेली विकासाची कामे किंवा वृक्ष लागवड व पिण्याच्या पाण्याची सोय हे भविष्यात पर्यटकांसाठी टिकून राहावे यासाठी आणखी दहा वर्षे हा किल्ला महाराष्ट्र राज्य संरक्षित स्मारक संवर्धन योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार व पुरातत्व विभागाने सध्या या किल्ल्याची संगोपन करण्याची जबाबदारी ज्या युनिटी मल्टीकॉन्स कंपनीकडे आहे. त्याच कंपनीकडे दत्तक देण्याची मागणी अनेक मान्यवरानी आपल्या मनोगतातुन व्यक्त केले.

युनिटीने किल्ला संगोपनासाठी घेतल्यानंतर गेल्या दहा वर्षात किल्ल्याचे प्राचीन व ऐतिहासिक महत्त्व अबाधित ठेवून पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली अतिशय सुंदर व पर्यटक वाढीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले आहेत. दहा वर्षापूर्वीचा किल्ला आणि आजचा किल्ला यामध्ये खुपच बदल झालेला आहे. पूर्वी किल्ल्यात भग्नावस्था होऊन आखेरची घटका मोजत होता. मात्र आज त्याचे रूपडे पालटुन निसर्ग सौदर्यांने नटलेला आहे. किल्ल्यात केलेल्या विकास कामामुळे युनिटी मल्टीकॉन्स कंपनीने किल्ल्यात हजारो वृक्ष लावून त्याची जोपासना केली आहे. त्यामुळे आज किल्ल्यात सर्वत्र हिरवी, वनराई दिसत आहे.

 वृक्ष लागवडी बरोबरच विविध जातीचे फुलझाडेही सर्वत्र लावण्यात आली आहेत. जागोजागी पर्यटकांसाठी  शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय,  स्वच्छतागृहाची   व्यवस्था केली आहे. त्यामुळे पर्यटकांची विशेष करून महिला पर्यटकांची  सोय झाली आहे.

 युनिटीने किल्ल्यात केलेल्या कामामुळे आज नळदुर्गचा ऐतिहासिक व प्राचीन किल्ला पर्यटन क्षेत्राच्या नकाशावर आला असुन एक रोल माॕडल ठरला आहे.  किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत गेल्या दहा वर्षात लक्षणीय वाढ झाली आहे. हे सर्व टिकून राहण्यासाठी पुन्हा एकदा पुढील दहा वर्षासाठी हा किल्ला महाराष्ट्र सरकार व पुरातत्त्व विभागाने युनिटी  कंपनीला संगोपनासाठी दत्तक देणे गरजेचे आहे.

 शासनाच्या वैभव संगोपन योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील दोन वास्तू व एक किल्ला करारान्वये संगोपनार्थ देण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे गाव देवराष्ट्रे येथील जन्मस्थान, नाशिक जिल्ह्यातील भगूर येथील स्वा. वि.दा. सावरकर यांचा वाडा व नळदुर्ग भुईकोट किल्ला.

 या कार्यक्रमास  शहबाज काझी, कमलाकर चव्हाण, सुनिल बनसोडे , रघुनाथ नागणे,  जोतीबा येडगे, प्रमोद कुलकर्णी , सुभद्राताई मुळे, कल्पनाताई गायकवाड , सुधीर हजारे, आविनाश नरवडे, शिवाजी गायकवाड , नितीन कासार , महालिंग स्वामी, संतोष पुदाले, धिमाजी घुगे, रमेश जाधव, वैजिनाथ कोरे, अमर भाळे, संजय जाधव, गोपाळ देशपांडे, मुश्ताक कुरेशी, शाम कनकधर , श्रमिक पोतदार, बसवराज धरणे, सरदारसिंग ठाकूर, शफी शेख , शरीफ शेख, बाबा बनसोडे,  प्रा. डाँ. पाडूरंग पोळे,शहर पञकार संघटनेचे अध्यक्ष सुहास येडगे, विलास येडगे, तानाजी जाधव, दादासाहेब बनसोडे, आयुब शेख , लतीफ शेख, उत्तम बनजगोळे,  शिवाजी नाईक आदीसह  सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाचे  प्रास्तविक विनायक अंहकारी यानी तर आभार युनिटीचे संचालक जयधवल करकमकर यानी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युनिटीचे जुबेर काझी , रईस जाहागिरदार नितीन पवार निखिल येडगे 

Labels:

Friday, 21 June 2024

माधवराव पाटील महाविद्यालयात योग दिन साजरा

माधवराव पाटील महाविद्यालयात योग दिन साजरा                          
मुरूम, ता. उमरगा, ता. २१ : 

येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या इनडोअर स्टेडियममध्ये आयोजित क्रीडा विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन शुक्रवारी (ता. २१) रोजी योगा व प्राणायाम करून साजरा करण्यात आला. 

महाविद्यालयातील विविध शाखेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी कर्मचारी वृंद यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक सपाटे होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार व योग शिक्षक प्रा. डॉ. राम बजगिरे यांनी योगाचे महत्व या विषयावर मार्गदर्शन केले. शारीरिक, बौद्धिक व मानसिक दृष्ट्या समृद्ध होण्यासाठी योगा करणे अत्यंत आवश्यक आहे. शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त होण्यासाठी योगाचे महत्त्व प्रात्यक्षिकाद्वारे दाखवत आपण सर्वांनी आपल्या दैनंदिन जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग म्हणून योगा स्वीकारला पाहिजे. हा संदेश देत यावेळी मुलांना १२ पेक्षा जास्त आसने करून दाखवली. 


यावेळी क्रीडा विभाग प्रमुख प्रा. डॉ. भिलसिंग जाधव, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. प्रतापसिंग राजपूत, प्रा. अशोक बावगे, डॉ. शिला स्वामी, डॉ. सतिश शेळके, डॉ. महेश मोटे, डॉ. सुधीर पंचगल्ले, डॉ. सायबण्णा घोडके, डॉ. जयश्री सोमवंशी, डॉ. संध्या डांगे, प्रा. दयानंद बिराजदार, डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी, डॉ. अविनाश मुळे, डॉ. राजकुमार देवशेट्टे, डॉ. सुशिल मठपती आदींची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. शिवपुत्र कनाडे, डॉ. मुकूंद धुळेकर, डॉ. रमेश आडे, डॉ. सुभाष हुलपल्ले, डॉ. नागनाथ बनसोडे, डॉ. राजेंद्र गणापूरे, डॉ. नरसिंग कदम, डॉ. सुजित मटकरी, प्रा. अजिंक्य राठोड आदींनी पुढाकार घेऊन योग दिन उत्साहात साजरा केला.    

फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील माधवराव पाटील महाविद्यालयात योग दिन साजरा करताना डॉ. चंद्रकांत बिराजदार प्रात्यक्षिकासह योगा करताना

Labels:

रोटरी क्लब मुरुम सिटीकडून छत्रपती संभाजी नगर येथे वृक्षारोपण

रोटरी क्लब मुरुम सिटीकडून छत्रपती संभाजी नगर येथे वृक्षारोपण                     

मुरुम, ता. उमरगा, ता. २१ 

 : येथील रोटरी क्लब मुरुम सिटीच्या वतीने योग दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण शुक्रवारी (ता. २१) रोजी छत्रपती संभाजी नगर भागात करण्यात आले. 

झाडे पृथ्वीच्या वातावरणातील कार्बन डायऑक्साइड, सीएफसी आणि इतर प्रदूषकांची पातळी कमी करण्यास मदत करतात. त्यांच्या लाकडात कार्बन सापडतो, सर्वांना ताजी हवा देतात आणि ग्लोबल वार्मिंगचा वेग कमी करतात. झाडांमध्ये पाचशे प्रजातींना स्वतःमध्ये ठेवण्याची क्षमता असते. वृक्षारोपण हा तुम्ही तुमच्या खास प्रसंगी करू शकता असा सर्वोत्तम उपक्रम आहे. हिरवाईने वेढलेली असताना मानवाला नेहमीच निसर्गाशी जोडलेले वाटते. जागतिक तापमानवाढीच्या वाढत्या दरासाठी जंगलतोड ही एक मोठी समस्या बनली आहे. तापमानाचे नियमन करण्यात आणि पावसाला पोषक हवामान बनवण्यात झाडे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. ते हवेतून कार्बन डायऑक्साईड घेतात, त्यामुळे ते शुद्ध करतात आणि ऑक्सिजन सोडतात, जो जीवनासाठी आवश्यक आहे. ते आपल्याला लाकूड, अन्न, इंधन, कागद इत्यादी देखील पुरवतात, जे आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग असल्याने छत्रपती संभाजी नगर येथील  होंडा शोरूम, गुरुकुल सेमी इंग्लिश स्कुल व विविध दुकानांच्या समोर अशा झाडाचे रोपण करण्यात आले. 

यावेळी रोटरीचे अध्यक्ष कमलाकर मोटे, सचिव सुनिल राठोड, कोषाध्यक्ष प्रकाश रोडगे, डॉ. नितीन डागा, डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी, गोविंद पाटील, शरणाप्पा धुम्मा, डॉ. महेश स्वामी, संतोष कांबळे आदींनी पुढाकार घेतला.

Labels:

Wednesday, 19 June 2024

शिंदे परिवाराकडून गुणवंताधारक विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार

शिंदे परिवाराकडून गुणवंताधारक विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार  


मुरुम, ता. उमरगा, दि. १९ 

शिक्षणाशिवाय विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होऊ शकत नाही हा दृष्टिकोन सतत डोळ्यासमोर ठेवून शैक्षणिक क्षेत्रात अविरत कार्य करणारे दिवंगत सिद्राम गंगाराम शिंदे गुरुजी यांच्या स्मरणार्थ बुधवारी (ता. १९)  रोजी शहरातील श्रीराम मंगल कार्यालयात दहावी-बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शिंदे परिवाराकडून विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. 

प्रारंभी सरस्वतीच्या प्रतिमेस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून दीप प्रज्वलन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे येथील आरोग्य विभागाचे माजी संचालक डॉ. रायप्पा कटके होते. यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे, धम्मचारी धम्मभूषण राम कांबळे, मुख्याध्यापक विजयकुमार देशमाने, मुख्याध्यापिका प्रमिला तुपेरे, मंकावती कांबळे, गंगाधर शिंदे, प्रा. रुक्मिणी शिंदे, बळीराम शिंदे, सीए शिवराज मिटकरी, हिमाचल प्रदेश येथे केंद्र सरकारच्या वस्त्र मंत्रालय विभागात टेक्स्टाईल इंजिनियर तथा मुरूमचे सुपुत्र शिवाजी शिंदे, माजी सुभेदार मेजर विजयकुमार शिंदे, रूपाली शिंदे, मंगल शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी शहरातील विविध शाळांमधील ७५ पेक्षा अधिक गुणवंत विद्यार्थी व पालकांचा सन्मानचिन्ह, शैक्षणिक साहित्य देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिंदे कुटुंबीयांच्या वतीने जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका मंकावती कांबळे यांच्याकडे शाळेतील गरजू विद्यार्थ्यांसाठी दोन सायकली भेट म्हणून देण्यात आल्या. याप्रसंगी गंगाधर शिंदे, प्रा. रुक्मिणी  शिंदे, प्रमिला तुपेरे, बळीराम शिंदे, मंकावती कांबळे, विजयकुमार देशमाने, प्रा. डॉ. महेश मोटे आदींनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की, गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशामुळे आपापल्या शाळेची उंची वाढत असल्याबद्दल आनंद व्यक्त करून कौतुक केले. 

आई-वडील, गुरुजनांनी केलेले संस्कार कधीही विसरू नका. आपली प्रतिमा आपल्यालाच निर्माण करावी लागते. विमान जसं वरती जातं तसंच ते परत खालीही येतं. त्यामुळे पाय जमिनीवर राहातील याचे भान ठेवा. आपल्या जीवनात समाजाचे स्थान महत्त्वाचे आहे, त्यामुळे समाजाला परत द्यायला शिका. जसे मोठे व्हाल तसे अमिषांपासून, व्यसनांपासून दूर राहा. तुमचे वय स्वप्न बघण्याचे आहे, पण अशीच स्वप्न बघा जी झोपू देत नाहीत. आपले आरोग्यदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे तब्ब्येत कमवा. ध्येय गाठण्याची जिद्द बाळगा. आम्हाला तुमचा अभिमान आहेच, पण आयुष्यात असे काही करा की आईवडील व गुरुजनांनाही तुमचा अभिमान वाटेल. अध्यक्षीय समारोप प्रसंगी डॉ. कटके म्हणाले की, माणसाने नेहमी एखाद्याच्या खऱ्या क्षमतेची जाणीव करून ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला दिशा देण्यासाठी विद्यार्थी, पालक व शिक्षक एकाच छताखाली आज या कार्यक्रमानिमित्ताने एकत्र आले आहेत. हा एक अद्भुत अनुभव आहे. अशा कार्यक्रमांमुळे शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे मनोबल वाढेल आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त करीत कार्यक्रमाचे आयोजक शिवाजी शिंदे व त्यांच्या कुटुंबियांचे कौतुक केले. गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे मुख्य आयोजक असणाऱ्या शिवाजी शिंदे व सौ. रुपाली शिंदे यांचा डॉ. खाजालाल ढोबळे यांनी विशेष सत्कार केला. याप्रसंगी शहरातील विविध दैनिकांच्या प्रतिनिधींचा विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. 

कार्यक्रमाकरिता ऐश्वर्या शिंदे, सचिन शिंदे, ज्योतीराम शिंदे, वसंत शिंदे, धनराज शिंदे, तुकाराम शिंदे, गिरजप्पा कावळे, रेवण कटके, राजु कटके, अंबादास शिंदे, प्रवीण शिंदे, धोंडीबा शिंदे, जयश्री कांबळे, रेश्मा शिंदे, वैभव कटके आदींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक शिवाजी शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन अजिंक्य मुरूमकर तर आभार तात्याराव शिंदे यांनी मानले. यावेळी परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.                              

फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथे शिंदे कुटुंबियांकडून गुणवंत समारंभाप्रसंगी जिल्हा परिषद कन्या शाळेस सायकल भेट देताना मान्यवरांसोबत मुख्याध्यापिका व अन्य.

Labels:

बेरडवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मेळावा संपन्न

बेरडवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मेळावा संपन्न                          

 मुरुम, ता. उमरगा, दि. १९ 

बेरडवाडी, ता. उमरगा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळा पूर्व मेळावा क्र. २ बुधवारी (दि. १९) रोजी घेण्यात आला. उपक्रमाच्या अनुषंगाने मेळाव्यामध्ये ७ स्टॉल्स लावले गेले. सर्व स्टॉल्सवर बालकांच्या कृतींच्या नोंदी विकास पत्रावर रकान्यात भरण्यात आल्या. सदर ७ स्टॉल्स पुढीलप्रमाणे नोंदणी (रजिस्ट्रेशन), शारीरिक विकास (सूक्ष्म व स्थूल स्नायू विकास), बौद्धिक विकास, सामाजिक आणि भावनात्मक विकास, भाषा विकास, गणनपूर्व तयारी आदी बाबी पडताळून पाहिल्या गेल्या.

 या वर्षी प्रवेशाचे उद्दिष्ट १० होते. त्यापैकी १३ जणांचे प्रवेश निश्चित झाले असून आणखीन प्रवेश होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात  पालकांना मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कांतराव मंडले होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे भुसनी केंद्राचे केंद्रप्रमुख एम. एस. माने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक अनिल मडमे, सहशिक्षक सुनिल राठोड, युवराज चव्हाण, बालाजी भालेराव, रंजना तांदळे आदींनी परिश्रम घेतले.              

फोटो ओळ : बेरडवाडी, ता. उमरगा येथील जिल्हा परिषद शाळेत मेळाव्याप्रसंगी शिक्षकवृंद, पालक यांच्याकडून बालकांना पुस्तक वाटप करताना

Labels:

Tuesday, 18 June 2024

पोलीस निरीक्षक जाधव यांचा नळदुर्ग येथे सत्कार

पोलीस निरीक्षक जाधव यांचा नळदुर्ग येथे सत्कार 

वागदरी(एस.के.गायकवाड) :

बिड जिल्ह्यातील शिरशाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद जाधव यांचा डाॅ.आंबेडकर इंटर नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल नळदुर्ग ता.तुळजपूर येथे यथोचित सत्कार करण्यात आला.

  पोलिस निरीक्षक आनंद जाधव हे तुळजापूर तालुक्यातील बोरगाव (तुपाचे) येथील मुळ रहिवासी असून  त्यांनी महाराष्ट्र पोलीस दलात काही काळ पोलीस शिपाई म्हणून काम करत  महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एम.पी.एसी.) ची परीक्षा उत्तीर्ण होऊन पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवेत दाखल होताच त्यांना नक्षलवादी परिसरात गडचिरोली येथे दिवटी देण्यात आली.तब्बल चार वर्षे यशस्वीरीत्या आपले कर्तव्य बजावून सध्या बिड जिल्ह्यातील शिरशाळा पोलीस ठाणें ता.परळी येथे पोलीस निरीक्षक म्हणून रूजू झाले असून त्यांनी नुकतच सम्यक सेवाभावी संस्था नळदुर्ग संचलित डॉ.आंबेडकर इंटर नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल नळदुर्ग येथे सदिच्छा भेट दिली असता शाळेचे संस्थापक अध्यक्ष मारुती खारवे व प्रा.भगवान चिमणे यांच्या हस्ते त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.


  या वेळी संपादक तथा बौध्दाचार्य दादासाहेब बनसोडे,महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष तथा रिपाइं (आठवले) युवा आघाडी चे जिल्हा कार्याध्यक्ष अरुण लोखंडे, रिपाइं चे जिल्हा सचिव एस.के.गायकवाड, दलित पँथरचे जिल्हा संपर्क प्रमुख शाम नागीले, अरविंद लोखंडे, शंकर भाळे आदी उपस्थित होते.

Labels:

जेष्ठ कार्यकर्ते कुंडलिक दुपारगुडे यांचे निधन

जेष्ठ कार्यकर्ते कुंडलिक दुपारगुडे यांचे  निधन

नळदुर्ग(प्रतिनिधी) : 

निलेगाव ता.तुळजापूर  येथील आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते कुंडलिक गोविंद दुपारगुडे यांचे दि.१६जून २०२४ रोजी रात्री १०.वा.सुमारास व्रध्दापकाळी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले.

   त्यांचे वय ९५ वर्षे होते.त्यांच्या पश्चात तिन मुले,तिन मुली सुना जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे.दि.१७ जून २०२४ रोजी दुपारी ठिक २.३० वा.दरम्यान निलेगाव येथे बौद्ध धम्म पध्दतीने त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले.या प्रसंगी उपस्थित शोकाकुल जनसमुदायानी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

Labels:

Sunday, 16 June 2024

तुळजापूर : छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करियर शिबिरास विद्यार्थी व पालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

 
तुळजापूर :  छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करियर शिबिरास विद्यार्थी व पालकांनी उपस्थित राहण्याचे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी मा. प्रविण औताडे यांचे आवाहन 


नळदुर्ग ( प्रा. डॉ. दिपक जगदाळे )

 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तुळजापूर यांच्या वतीने दिनांक 19 जुन रोजी सकाळी 10 ते 4 या वेळेत *तुळजाभवानी पुजारी मंडळ फंक्शन हॉल,पोलीस स्टेशन समोर धाराशिव रोड तुळजापूर* येथे शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी लोकप्रतिनिधी, प्रमुख तज्ञ वक्ते, मार्गदर्शक, अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

दहावी बारावी नंतरचे महाविद्यालयीन अभ्यासक्रम, करियर च्या संधी, महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया, कलमापन चाचणी, शैक्षणिक शिष्यवृत्ती व कर्ज योजना, करियर प्रदर्शणी, औदयोगिक प्रशिक्षण व कौशल्य विकास उपक्रम याबाबत तज्ञ व्यक्तीकडून सखोल मार्गदर्शन मिळणार आहे. 

या कार्यक्रमासाठी अनेक वित्त महामंडळे, बँका, महाविद्यालये, कौशल्य विकास केंद्र, औदयोगिक आस्थापना यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तुळजापूर यांच्या वतीने हि  एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.  शिबिरात उपस्थितांची नोंदणी केली जाणार आहे.

तरी विद्यार्थी व पालक यांनी दहावी बारावी नंतर कसे करियर घडवायचे याबाबतच्या मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी प्रविण औताडे व प्राचार्य मारुती बिरादार यांनी केले आहे. प्रा. दिपक जगदाळे नळदुर्ग

Labels:

नळदुर्ग : जि.प.केंद्रिय शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत करुन पुस्तके वाटप

नळदुर्ग : जि.प.केंद्रिय शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत करुन पुस्तके वाटप
नळदुर्ग ,दि. १६

येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत शनिवार (दि.१५) रोजी  विद्यार्थ्यांचे पुष्प, फुगे देवून  स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी मध्यान्ह भोजनावेळी गोड पदार्थ देण्यात आले.
 
 यावेळी मुख्याध्यापक भास्कर मस्के, शिक्षक बिलाल सौदागर, वंदना चौधरी, जयश्री धुमाळ, सुरेखा मोरे पालक प्रतिनिधी रवी सुरवसे, निरज डुकरे, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते.

Labels:

Saturday, 15 June 2024

प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूलमध्ये प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूलमध्ये प्रवेशोत्सव उत्साहात साजरा 

मुरूम, ता. उमरगा, दि. १५  :  

येथील प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूलचा या शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस या  दिवशी शाळेत शाळा प्रवेशोत्सव उत्साहात शनिवारी  रोजी साजरा करण्यात आला. 

सुट्टीनंतर शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह संचारला होता. यंदा नविन प्रवेश घेणाऱ्या व उपास्थित  सर्व विद्यार्थ्यांचे शाळेमार्फत प्रा. डॉ. पुरुषोत्तम बारवकर  व मुख्याध्यापिका अनुराधा जोशी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांना मिठाई देवून त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी शालांत परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सच्छिदानंद अंबर, धनराज हाळळे, संगमेश्चर लामजणे, सहशिक्षक सुभाष धुमाळ, विरेंद्र लोखंडे, पंकज पाताळे, सागर मंडले, जगदीश सुरवसे, सहशिक्षिका संगीता देशमुख, नेहा माने, शितल घोडके, सरस्वती समन, तनुजा जमादार, प्रभावती कलशेट्टी, साधना शेवाळकर, गीता सत्रे, शेळके, सरस्वती जाधव, सरोजा सारणे, अश्विनी क्षीरसागर, सोनाली कारभारी, सुधाराणी शेळके सह शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व पालक  उपस्थित होते.      

फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूलमध्ये प्रवेश उत्सव साजरा करताना विद्यार्थी, पालक व शिक्षक वृंद

Labels:

उमरगा : तहेजीब रहीम शेख यांचा गौरव

तहेजीब रहीम शेख सत्कार संपन्न 


मुरुम दि.१५ : सुधीर पंचगल्ले 

ऊमरगा तालुक्यातील जवळगा बेट येथील रहिवाशी तहेजिब रहीम शेख यांनी पदवी पूर्व वैद्यकीय प्रवेश परीक्षा 'नीट' मध्ये 700 पैकी 625 गुण घेऊन उज्वल यश संपादन केले आहे. 

 उमरगा येथे शुक्रवार दि.14 जून रोजी लातूर येथील बसवेश्वर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.श्रीकांत गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी तहेजीब शेख यांनी सांगितले की, नीट परीक्षेच्या पहिल्या प्रयत्नात 437 गुण मिळाले होते. परंतु पुन्हा दुसऱ्यांदा जिद्दीने प्रयत्न केल्यास या परीक्षेत चांगले यश मिळवता येईल या आत्मविश्वासाने मी नियमित व सातत्यपूर्ण अभ्यास केला. त्यामुळेच मला अपेक्षित यश संपादित करता आले.माझ्या या यशामध्ये तळमळीने मार्गदर्शन करणारे शिक्षक,मला प्रेरणा देणारे कुटुंबातील नातेवाईक यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. विद्यार्थ्यांना मला सांगावयाचे आहे की, जेव्हा आपण शिक्षण घेतो तेव्हा आपल्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात विशेषतः आपल्याला पुढे जाऊन काय करावयाचे आहे याबाबत आपले निश्चित ध्येय हवे. ते ध्येय प्रत्यक्षात साकार करण्यासाठी जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रम करावयास हवेत तरच आपले अपेक्षित ध्येय साध्य होऊ शकते.मी गरीब आहे, खेडूत आहे म्हणून विद्यार्थ्यांनी मनात न्यूनगंड बाळगता कामा नये.आहे त्या परिस्थितीवर मात करून आपण आपल्या जीवनाच्या प्रगतीची वाट चोखाळली पाहिजे असे स्पष्ट केले.

Labels:

Wednesday, 12 June 2024

नळदुर्ग येथे १० वी व १२ वी मध्ये गुणवंता प्राप्त विद्यार्थांचा गौरव

जिवनात यशस्वी वाटचाल करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना वाचा नक्कीच प्रेरणा मिळेल :  
डी.टी.गायकवाड 

नळदुर्ग येथे १० वी व १२ वी मध्ये गुणवंता प्राप्त विद्यार्थांचा गौरव 

नळदुर्ग (एस.के.गायकवाड)

 विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये शिक्षणाचे खुप महत्त्व आहे शिक्षण हे आपल्या उज्वल भविष्यासाठी अत्यावश्यक असून शिक्षण यंत्राचा विद्यार्थांनी पुरेपूर उपयोग करावा शिवाय  स्वतः ची एक वेगळी ओळख निर्माण करण्याचे शिक्षण हे खूप मोठे साधन आहे.शिक्षणा मुळे सामाजिक आणि कौटोंबिक आदर ही वाढतो यासाठी  शैक्षणिक दृष्ट्या सक्षम होण्याकरिता विद्यार्थ्याने आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास साधण्यासाठी  शिक्षणा विषयी प्रेरणा देणाऱ्या महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जिवनात यशस्वी वाटचाल करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचा नक्कीच प्रेरणा मिळेल असे प्रतिपादन आंबेडकरी चळवळीतील विचारवंत साहित्यिक डॉ.डी.टी.गायकवाड यांनी नळदुर्ग येथे आयोजित कार्यक्रमात केले .

   नळदुर्ग ता.तुळजापूर येथे जनसेवा बहुउदेशिय शिक्षण संस्था नळदुर्ग संचलित पैलवान रेवाप्पा सोनकांबळे क्रिडा प्रतिष्ठान नळदुर्ग पुणे यांच्या वतीने १० वी व १२वी मध्ये उत्तिर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व मान्यवरांना पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी ते कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. 
  
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रा.राज रेवाप्पा सोनकांबळे हे होते तर प्रमुख  पाहुणे म्हणून प्रा.डॉ.गौतम गायकवाड , नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक ईश्वर नांगरे , साहित्यिक,एक उत्कृष्ठ निवेदक , पत्रकार , महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त भैरवनाथ कानडे , यांनी सेवानिवृत्त मुख्याध्यापक शिवाजी वऱ्हाडे, सामाजिक कार्यकर्त्या कल्पना गायकवाड आदी होते .
  प्रारंभी तथागत भगवान गौतम बुद्ध, महामानव डॉ.बाबासहेब आंबेडकर आणि स्मृतिशेष पैलवान रेवाप्पा सोनकांबळे यांच्या प्रतिमांचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करून आंबेडकरी चळवळीतील विचारवंत साहित्यिक प्रा.डाॅ.गौतम गायकवाड (आंबेजोगाई) यांना फेटा, पुष्पहार पुष्पगुच्छ व सन्मान पत्र देऊन संस्थेच्या वतीने सेवा निवृत्त मुख्याध्यापक कैलास गवळी गुरुजी यांच्या हस्ते "डॉ.बाबासाहेब आंबेडकर राज्य स्तरीय उत्कृष्ट लेखक " पुरस्काराने तर सामाजिक कार्यकर्ते बंडु पुदाले (नळदुर्ग) याना उत्कृष्ट मल्ल पंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी रिपाइं (आठवले) चे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे यांनी सन्मान पत्राचे वाचण केले.


 याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते
इ.१० वी व १२ वी.उत्तिर्ण विद्यार्थ्यांचा शालेय साहित्य व वाचनीय पुस्तके देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रा.डॉ.गौतम गायकवाड,भैरवनाथ कानडे.साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ईश्वर नांगरे, शिवाजी वराडे,सामाजिक कार्यकर्त्या कल्पनाताई गायकवाड आदींची ही मार्गदर्शनपर भाषणे झाली.
       

याप्रसंगी  बौद्धाचार्य दादासाहेब बनसोडे, जेष्ठ कार्यकर्ते प्रकाश गायकवाड,पंचायत समिती उमरगा येथील सांखिकी विस्तार अधिकारी राहुल सोनकांबळे,सुधाकर सोनकांबळे,धर्मा सोनकांबळे ,वैशाली माने पोलीस कॉन्स्टेबल सुधाकर माने, बालीका सोनकांबळे, सचिन कांबळे सह विद्यार्थी,महिला युवा कार्यकर्ते  उपस्थित होते. सूत्रसंचालन रिपाइं (आठवले)चे जिल्हा सचिव एस.के.गायकवाड यांनी  तर शेवटी आभार कैलास गवळी यांनी मानले.

Labels:

Monday, 10 June 2024

नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेताच नळदुर्ग शहरात जल्लोष

नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेताच नळदुर्ग शहरात जल्लोष

नळदुर्ग,दि. १० 

 नरेंद्र मोदी यांनी हॕट्रीक साधत तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली.  यानंतर नळदुर्ग शहरातील अनेक भागात दिवाळीप्रमाणे फटाके फोडत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. 

शहरातील मराठा गल्ली, ब्राम्हण गल्ली, व्यास नगर, भवानी नगर, शास्त्री चौक येथे फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी शहर भाजपा कार्यालय,  ऐतिहासिक चावडी चौक, जय भवानी चौक व बसस्थानक समोरील डाॕ. बाबासाहेब आंबेडकर संविधान चौक येथे घोषणाबजी करत फटाके फोडले, गुलालाची उधळण करत  एकमेकांना मिठाई भरवली. 

यावेळी माजी नगराध्यक्ष  उदय जगदाळे, माजी नगरसेवक शहराध्यक्ष धिमाजी घुगे, भाजयुमोचे जिल्हा चिटणीस  श्रमिक पोतदार, माजी शहराध्यक्ष पद्माकर घोडके, माजी उपाध्यक्ष  अजय देशपांडे, सागर हजारे,गणेश मोरडे, अक्षय भोई,  विशाल डुकरे शिवसेनेचे ज्ञानेश्वर घोडके, दीपक घोडके, राष्ट्रवादी काॕग्रेसचे अजित झुनैदी, मनसेचे प्रमोद कुलकर्णी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Labels:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी नंतर वागदरीत जल्लोष

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी नंतर वागदरीत जल्लोष 

वागदरी, दि. १० एस.के.गायकवाड

सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर तुळजापूर तालुक्यातील मौजे वागदरी येथे कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने मिरवणूक काढून जल्लोष साजरा केला.
  
नुकतीच  पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत अनेक आश्चर्यकारक निकाल लागले असले तरी ही भाजपा महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याने दि.०९ जून २०२४ रोजी झालेल्या शपथविधी सोहळ्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली.

नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या शपथविधीनंतर वागदरी ता.तुळजापूर येथे भाजपा, शिवसेना (एकनाथ शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) रिपाइं (आठवले) सह महायुतीच्या कार्यकर्रत्यानी फटाक्यांची आतिषबाजी करून हालगीच्या कडकडाटात गावातून मिरवणूक काढून मोठ्या उत्साहाने जल्लोष साजरा केला.
याप्रसंगी भाजपासह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Labels:

Friday, 7 June 2024

विनायक अहंकारी यांच्या निवास्थानी शिवाराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा

विनायक अहंकारी यांच्या निवास्थानी  शिवाराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा 
नळदुर्ग, दि.६ .
 शहरातील माजी नगरसेवक तथा स्वा. सावरकर प्रतिष्ठाणचे प्रमुख विनायक अहंकारी यांच्या निवास्थानी गुरुवार रोजी  शिवाराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.

दि. ६ जून  शिवराज्याभिषेक दिनानिमित्त नळदुर्गचे माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांच्या निवासस्थानी दुग्धअभिषेक सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी माजी नगरसेवक संजय बताले, माजी उपाध्यक्ष शरद बागल, माजी नगरसेवक अमृत पुदाले, महालिंग स्वामी, बसवराज धरणे,  पत्रकार विलास येडगे, शिवाजी नाईक, विकास सोसायटीचे चेअरमन संजय बेडगे,शिवसेनेचे सरदारसिंह ठाकूर, भाजपाचे शहर अध्यक्ष धिमाजी घुगे,विकास सोसायटीचे संचालक रघुनाथ नागणे, भाजपचे युवा नेते सुशांत भूमकर, समीर मोरे,भाजयुवा मोर्चाचे जिल्हा सचिव श्रमिक पोतदार, सागर हजारे, पत्रकार भगवंत सुरवसे, दादासाहेब बनसोडे,सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव,अमर भाळे,आंबाबाई मंदिर समितीचे अध्यक्ष रमेश जाधव,  राजेंद्र महाबोले, नंदकुमार जोशी, शिवराम मोटे, प्रमोद जोशी,किशोर जोशी, अरुण जोशी, तानाजी नागणे, शिवाजी नागणे, अनिल गुरव, नारायण दोपारे,उमेश जाधव, संतोष जाधव,उमेश नाईक,सचिन भूमकर,राजकुमार वैद्य, अजित देशपांडे,प्रदीप ग्रामोपाध्याय,अमित भूमकर, संदीप वैद्य, ज्ञानेश्वर केसकर,रोहित वाले, अनिल पाटील,मारुती घोडके, बलदेव ठाकूर,अनिल कुलकर्णी, मयूर जोशी,सुहास पुराणिक, बंडोपंत कसेकर आदी उपस्थित होते.



Labels:

Thursday, 6 June 2024

वागदरी येथे दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार

वागदरी येथे दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार 

वागदरी , दि.०६

तुळजापूर तालुक्यातील वागदरी येथे इ.१० वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार येथील ग्रामपंचायत व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी वागदरीच्या वतीने करण्यात आला.

  मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या  इ.१० बोर्ड परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार  ग्रामपंचायत व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटीच्या वतीने करण्यात आले. 


  या प्रसंगी सरपंच तेजाबाई शिवाजी मिटकर,उपसरपंच सुरेखा भालचंद्र यादव, ग्रामसेवक एम. एम.तांबोळी ,ग्रा.प.सदस्या मिनाक्षी बिराजदार व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते इ.१० वी बोर्ड परिक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा पुष्पहार पुष्पगुच्छ व शालेय साहित्य देऊन  सत्कार करण्यात आला..या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन माजी उपसरपंच दत्ता सुरवसे यानी केले. यावेळी जेष्ठ मार्गदर्शक तथा सेवा निवृत्त मुख्याध्यापक शिवाजी मिटकर गुरुजी,  डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष तथा  निवृत्त पोलिस हवालदार संदिपान वाघमारे, माजी सरपंच तथा विद्यमान ग्रा.प.सदस्य ज्ञानेश्वर पाटील, जेष्ठ कार्यकर्ते मोहनसिंग (दादा) चव्हाण, नागनाथ जाधव, सुदामा वचणे,महादेव बिराजदार,रिपाइं (आठवले) चे जिल्हा सचिव एस.के.गायकवाड, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामसिंग परिहार,बाळु पवार, बाळकृष्ण बिराजदार,दत्ता पाटील, चरणसिंग परिहार,ग्रामपंचायत कर्मचारी ओंकार चव्हाण,सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Labels:

Wednesday, 5 June 2024

एसबीआय फाउंडेशन’चे २० सिमेंट बंधार्‍याचे काम- ‘एसबीआय फाउंडेशन’ने औसा आणि तुळजापूर तालुक्यातील २० गावांमध्ये बांधले २० सिमेंट बंधारे

‘एसबीआय फाउंडेशन’चे २० सिमेंट बंधार्‍याचे काम
- ‘एसबीआय फाउंडेशन’ने  औसा आणि तुळजापूर तालुक्यातील २० गावांमध्ये बांधले २० सिमेंट बंधारे, भर उन्हाळ्यात दिसू लागले पाणी, १८०० शेतकर्‍यांना फायदा

धाराशिव, दि. ०५

‘एसबीआय फाउंडेशन’ने औसा आणि तुळजापूर तालुक्यातील २० गावांमध्ये सिमेंट बंधार्‍याचे काम इतके मजबूत केले आहे की भर उन्हाळ्यातही लोकांना पाणी पहायला मिळत आहे. या कामामुळे तब्बल १८०० शेतकर्‍यांना फायदा होत असून अप्रत्यक्षपणे दहा हजार ग्रामस्थांना त्याचे फळ मिळू शकते.

मुंबईतील ‘एसबीआय फाउंडेशन’ने कामाचा चांगला ठसा उमटविला आहे. सिमेंट बंधार्‍यांमुळे बहुतांश गावांमध्ये यंदा भर उन्हाळ्यातही पाणी दिसत आहे. एरवी सगळीकडे पाण्याचे भयंकर दुर्भिक्ष्य दिसते पण या कामामुळे बंधार्‍यांच्या नजीक असलेल्या विंधन विहिरीत मात्र पाणी टिकून आहे. त्यामुळेच गावकर्‍यांच्या चेहेर्‍यांवर समाधान दिसत असल्याचे चित्र आहे. एवढेच नव्हे तर बंधार्‍यांची देखभाल, पाण्याचा योग्य वापर, त्या अनुषंगाने पीकांची निवड यावरही शेतकर्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले. त्यामुळेच गेल्या वर्षी अत्यंत कमी पाऊस पडूनही यंदा भर रणरणत्या उन्हाळ्यातही बंधार्‍यानजीकच्या विंधन विहिरीला पाणी टिकून आहे.

 त्यामुळेच हे काम खरोखरच दखलपात्र झाले आहे. 
एसबीआय फाउंडेशनच्या ‘ग्राम सक्षम’ प्रकल्पांतर्गत या कामासाठी पुढाकार घेण्यात आला. लातूर जिल्ह्यातील औसा तालुका आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात एसबीआय आणि दिलासाने केलेल्या या कामामुळे या बंधार्‍यांच्या कार्यक्षेत्रातील शेतजमिनींना फायदा झाला. या बहुतांश गावांमधील शेतकर्‍यांना या उपलब्ध पाण्याचा कसा फायदा घ्यायचा, पीक पद्धतीत कसे फायदेशीर बदल करायचे, बंधार्‍यांची देखभाल कशी करायची आणि त्यातून कायमस्वरूपी पाणीबचत कशी करायची याचेही प्रशिक्षण देण्यात आले. एवढेच नव्हे तर त्यासाठी काही निवडक अभ्यास सहलींचेही आयोजन करण्यात आले होते. 

 - गावकर्‍यांचाही सहभाग

या जलसंधारणाच्या कामामुळे वीस गावांमध्ये बर्‍यापैकी फायदा झाला आणि भविष्यातही ही कामे खूप उपयुक्त ठरणार असल्याचे अनेक शेतकर्‍यांनी सांगितले. विशेष म्हणजे या कामासाठी त्या त्या गावांमधील सरपंच, उपसरपंच, सदस्य, शेतकरी आणि युवकांनीही पुढाकार घेतला. त्यांच्या पुढाकारामुळेच ही कामे लवकर व योग्य पद्धतीने होण्यात मदत झाली. 


या गावांमध्ये झाले काम : तुळजापूर तालुक्यातील रामतीर्थ, इंदिरानगर, वागदरी, सोमलिंगनगर तांडा, येडोळा, रामनगर, हंगरगा, नल, लालवाडी, गायरान तांडा, जकनी तांडा, खुदावाडी या दहा गावांमध्ये तर औसा तालुक्यातील बनेगाव, तापसे चिंचोली, गाडवेवाडी, गोटेवाडी, तळणी तांडा, उत्का, दावतपूर आणि गंजनखेडा या वीस गावांमध्ये हे सिमेंट बंधारे उभारण्यात आले आहेत.

Labels: