Friday, 28 February 2025

नळदुर्ग: ब्रम्हकुमारीज पाठशाळेत ८९ व्या महाशिवरात्री महोत्सवा निमित्त शिवध्वजारोहण


नळदुर्ग: ब्रम्हकुमारीज पाठशाळेत ८९ व्या महाशिवरात्री महोत्सवा निमित्त शिवध्वजारोहण


नळदुर्ग,दि.२८:

 येथिल श्री तुळजाभवानी शेतकरी साखर कारखाना येथिल निवृत्त सपोनि सुभाषभाई बेडगे यांच्या निवासस्थानी प्रजापिता  ब्रम्हकुमारीज पाठशाळा असुन
याठिकाणी शुक्रवार दि.२८ फेब्रुवारी रोजी ८९ व्या महाशिवरात्री महोत्सवा निमित्त शिवध्वजारोहण करण्यात आले. 

यावेळी उपस्थिताना महाशिवरात्रीचे आध्यात्मिक माहिती तुळजापूर सेवा केंद्राच्या ब्रम्हकुमारी स्मिता बहेनजी, बी के सुरेशभाई जगदाळे यांनी माहिती सांगितली.याप्रसंगी
अरुणा पाटील , निवृत्त साहय्यक पोलिस निरीक्षक 
सुभाष भाई बेडगे,कृष्णा बेडगे माता, गणेश राजपूत, शंकर बेडगे, विकी वाल्मिकी आदी उपस्थित होते.

Labels:

संविधानामुळेच देशाचे अखंडत्व टिकून आहे- डॉ. दत्ताहारी होनराव

संविधानामुळेच देशाचे अखंडत्व टिकून आहे- डॉ. दत्ताहारी होनराव
श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात एकदिवसीय कार्यशाळा संपन्न

मुरुम दि.२८: सुधीर पंचगल्ले 

फाळणीचा इतिहास लक्षात घेता या देशातील भाषिक, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक विविधता लक्षात घेऊन घटनाकारांनी प्रबळ केंद्र सरकार असणारे संघराज्य निर्माण केले,  राज्यांना अधिकाराच्या  बाबतीत स्वायत्तता दिली नाही. तसेच या देशातील कोणत्याही घटकराज्याला फुटून बाहेर पडण्याचा अधिकार दिला नाही अशा एकात्मक संघराज्यामुळेच या देशाचे अखंडत्व टिकून आहे असे मत प्रा. डॉ.
दत्ताहरी होनराव यांनी व्यक्त केले. 

ते  श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात भारतीय संविधान आणि मराठी साहित्य या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय अस्वले यांनी केले.

येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात मराठी आणि मानवी हक्क विभागाच्या वतीने संविधान गौरव महोत्सव आणि मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात दत्ताहरी होनराव यांनी भारतीय संविधानाची 75 वर्षे या विषयावर मार्गदर्शन करताना त्यांनी देशातील वर्तमान राजकीय संस्कृतीवर ताशेरे ओढले. केंद्र-राज्य यांच्यातील वाढत्या तणावावरही  त्यांनी भाष्य केले.

कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात प्रा. डॉ. रत्नाकर बेडगे यांनी  मराठी कवितेतील संविधानिक मूल्ये या विषयावर मार्गदर्शन करताना साठोत्तरी कवितेतून स्वातंत्र्य, समता, बंधुता, यासारख्या मूल्यांना कवींनी आपल्या कवितेतून समाजापर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले आहे. कविता ही समाज प्रबोधनाचेच एक साधन आहे. अनेक कवितांमधून सामाजिक न्यायाचा संदेश दिला असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. 

कार्यशाळेच्या तिसऱ्या सत्रात खुली चर्चा करण्यात आली. या सत्रात प्रा. किरण सगर, डॉ. दत्ताहरी होनराव, डॉ. रत्नाकर बेडगे, डॉ. पद्माकर पिटले यांनी सहभाग घेतला. यावेळी विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना मार्गदर्शन केले गेले. 

संविधानाच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून शहरातील पत्रकारांचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय अस्वले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी दै. पुढारीचे पत्रकार शंकर बिराजदार, दिव्य मराठीचे अंबादास जाधव, गो.ल. कांबळे आणि नारायण गोस्वामी यांची उपस्थिती होती. याप्रसंगी संविधान गौरव महोत्सवाच्या निमित्ताने घेतलेल्या निबंध, वक्तृत्व, पोस्टर प्रदर्शन आणि सामान्य ज्ञान स्पर्धांचे पारितोषिक वितरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. निबंध स्पर्धेत  घोडके साक्षी, गायकवाड पूजा, पवार सौंदर्य, सगर आरती यांनी पारितोषिक मिळविले. पोस्टर स्पर्धेत पवार सौंदर्य, शेंडगे वैभवी, कांबळे वैष्णवी, पटेल मेहताब, जमादार पंकज यांनी पारितोषिक मिळविले. सामान्य ज्ञान स्पर्धेत गायकवाड अनिरुद्ध, पाटील सौरभ, माने निकिता, तांबोळी उमादेवी यांनी पारितोषिक मिळविले तर वक्तृत्व स्पर्धेत पटेल मेहताब, शिंदे सिद्धिविनायक, संध्या जगताप, गंगोत्री चिंचोळे यांनी पारितोषिक मिळविले.  या कार्यशाळेचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य विलास इंगळे हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. पद्माकर पिटले यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. गिरीधर सोमवंशी यांनी केले तर मानवी हक्क विभागाचे समन्वयक डॉ. डी. बी. ढोबळे  यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Labels:

नळदुर्ग महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त 'डॉ जगदीशचंन्द्र बोस' व्याख्यानमाला

नळदुर्ग महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त 'डॉ जगदीश चंन्द्र  बोस' व्याख्यानमाला

नळदुर्ग,दि.२८: डॉ. दिपक जगदाळे 

 नळदुर्ग, येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नळदुर्ग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग  यांच्या संयुक्त विद्यमाने वनस्पतीशास्त्र आणि भौतिकशास्त्र  विभागाच्या वतीने डॉ जगदीश चन्द्र बोस व्याख्यानमालेचे आयोजन राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून शुक्रवार  दि. २८ रोजी करण्यात आले होते.

या व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुभाष राठोड होते. प्रमुख व्याख्याते  औषधनिर्माण शास्त्राचे जागतिक किर्तीचे शास्त्रज्ञ  चन्नाबश्वेश्वर फॉर्मसी महाविदयालय लातुरचे प्रा. डॉ. ओमप्रकाश भूसनुरे  तसेच प्रा डॉ विश्वनाथ मोटे, वनस्पतीशास्र  विभाग प्रमुख   प्रा डॉ विजय सांवत,  भौतिकशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. रोहीणी महिंद्रकर, नॅक समन्वयक प्रा डॉ शिवाजी घोडके,  संयोजक प्रा डॉ उध्दव  भाले प्रा लत्ता ढोणे कु शिल्पा भोसले आर्दीची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी  राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त डॉ सी व्ही रमन यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. तसेच  रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या  कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आणि प्रस्ताविक  संयोजक प्रा डॉ. उध्दव भाले यांनी केले.  तर पाहुण्यांचा परिचय आणि आभार डॉ रोहीणी महिंद्रकर यांनी मांडला. डॉ. ओमप्रकाश भुसनूरे यानी मानवी जीवनातील इपिजेनेटीक घटक कोणते आणि ते शरिरामध्ये कशाप्रकारचे कार्य करतात. शिवाय शरिरामध्ये स्वयंप्रेरीत संप्रेरके कसे कार्य करतात, त्यासाठी आपल्या बुद्धीमध्ये नेहमीच  योग्य विचार ठेवलात तर शरिरातच योग्य रसायन तयार होऊन शरिर स्वाथ्य व्यवस्थित राहु शकते . त्याचबरोबर शरिरामध्ये कोणत्याही आजाराला बरे करणारे औषध चांगल्या विचाराने निर्माण होऊ शकते  आदी वैज्ञानिक विचाराच्या माध्यमातून डॉ जगदिशचन्द्र बोसची वनस्पतीना चेतना भावना असू शकतात अशा संदर्भातील लाईव्ह डेमो देखील चलचित्र फितीच्या  माध्यमातून मांडण्यात आल्या. दैनदिन मानवी जीवनामध्ये विविध स्वरूपात वापरत  असलेल्या साधनाच्या माध्यमातून   होणारे परिणाम आणि दुष्परिणाम कोणते होऊ शकतात यासंदर्भाने अनेक उदाहरणे देऊन आपले विचार मांडले.

तसेच दुसऱ्या सत्रामध्ये दयानंद विज्ञान महाविद्यालय लातूर येथील भौतिकशास्त्रीतील जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ प्रा डॉ विश्वनाथ मोटे  यांनी डॉ जगदीश चन्द्र बोस यांचे भौतिकशास्त्रातील आणि वनस्पतीशास्त्रातील योगदान या विषयी मार्गदर्शन केले.फक्त जगदीश चंद्र बोस यांनी केलेल्या संशोधनामुळेच मार्कोनी यांना नोबल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याविषयीचे त्यांनी केलेले संशोधन  कोणते होते यावर प्रकाश टाकला. अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्राचार्य डॉ. सुभाष राठोड यानी विद्यार्थ्यांना विज्ञानामध्ये उपेक्षित राहिलेल्या शास्त्रज्ञांचा आभ्यास होणे गरजेचे आहे. हाच  उद्देश डोळ्यासमोर ठेवून या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे असे ते म्हणाले. 

या व्याख्यानमालेच्या  माध्यमातून भौतीकशास्त्र  विषयातील नोबल पारितोषीक विजेते डॉ सी व्ही रमन यांचे संशोधन आत्मसात करून विज्ञानामध्ये विध्यार्थ्यांनी आणि प्राध्यपकांनी प्रगती साधली पाहिजे असे मत व्यक्त केले.
शिवाय याच कार्यक्रमात वनस्पतीशास्त्र विभागाने वनस्पतीशास्त्रावर आधारीत प्रश्नमंजूशा  स्पर्धा आयोजीत केली होती त्या स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ येणाऱ्या विध्यार्थी विध्यार्थीनीचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी संशोधक विद्यार्थी श्री किरण व्हंताळकर , बारीक  शिंदे,उमेश सर्जे, पापा गायकवाड,  रमेश सर्जे,  काशीनाथ कोळी ,सिद्ध सुतार आदींनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा उध्दव भाले यांनी केले  तर आभार प्रा.  रोहीणी महिंद्रीकर यांनी मांडले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील  प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी  उपस्थित होते. 

Labels:

नुतन पोलीस निरिक्षक यादव यांचा पत्रकार संघाच्या वतीने सत्कार

नुतन पोलीस निरिक्षक यादव यांचा  पत्रकार संघाच्या वतीने सत्कार 

वागदरी ( एस.के. गायकवाड ):

तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक सचिन यादव यानी नुकतच आपल्या पदाचा पदभार स्विकारून ते नळदुर्ग पोलीस ठाणे येथे रुजू झाल्याने त्यांचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई तालुका शाखा तुळजापूरच्या वतीने त्यांचा स्वागतपर सत्कार करण्यात आला.
  
नळदुर्ग येथील पोलीस निरिक्षक गजेंद सरोदे यांची पोलीस प्रशासनाकडून अचानक पणे तात्काळ बदली झाल्याने त्यांच्या जागी सचिन यादव यांची नियुक्ती करण्यात आली असून ते नळदुर्ग पोलीस ठाणे येथे रूजू झाले आहेत. त्याबद्दल त्यांचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ तुळजापूर तालुका शाखेच्या वतीने तालुका अध्यक्ष अरुण लोखंडे,उपाध्यक  इरफान काझी यांच्या हस्ते यथोचित स्वागतपर सत्कार करण्यात आला.यावेळी पत्रकार संघाचे एस.के. गायकवाड, शाम नागीले,किशोर धुमाळ, विजय पिसे, आरविंद लोखंडे आदी उपस्थित होते.

Labels:

स्वा.वि.दा.सावरकर यांच्या आत्मार्पण दिन व मराठी भाषा गौरव दिनानिमित्त व्याख्यान व प्रतिमा पूजन संपन्न

स्वा.वि.दा.सावरकर यांच्या आत्मार्पण दिन व मराठी भाषा गौरव दिनानिमित्त व्याख्यान व प्रतिमा पूजन संपन्न

शहरात स्वातंत्र्यवीरांचे स्मारक व्हावे,कार्यक्रमात एकमुखी ठराव

नळदुर्ग,दि.२८ :

येथे ब्राह्मण समाज संघटना  आयोजित स्वा.वि.दा.सावरकर यांच्या आत्मार्पण दिन व मराठी भाषा गौरव दिनानिमित्त भव्य प्रतिमा पूजन व व्याख्यानाचे आयोजन केले होते,मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून,पुणे येथील नारदीय व वारकरी किर्तनकार व उत्तम वक्ते कु.पूर्वा शिवप्रसाद काणे यांनी स्वा.सावरकर व मराठी भाषा,कवि कुसुमाग्रज यांच्या साहित्य,लेखन,कविता व देशभक्ती,मातृभाषा याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले,

यावेळी छोटया वक्त्यांसह कमलाकर चव्हाण, डॉ.खजूरे,गोपाळ कुलकर्णी,बलभीम मुळे,प्रणाली केसकर,यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले,या कार्यक्रमात शहरातील मराठी शिक्षकांचा,व नुकतेच शासकीय सेवेसाठी स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करणाऱ्यांचा व सेवानिवृत्तांचा सन्मान करण्यात आला,यामध्ये प्रणाली केसकर,शुभांगी गायकवाड,राज जगदाळे,शुभदा जोशी,जयश्री घोडके यांचा विशेष सन्मान आयोजित केला होता,कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन सेवानिवृत्त शिक्षक बलभीम मुळे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणुन जवाहर विद्यालय अणदूरचे मुख्याध्यापक गोपाळ कुलकर्णी,समाजसेवक डॉ.खजूरे,तलाठी संध्या कुलकर्णी,माजी नगराध्यक्ष उदय जगदाळे, धिमाजी घुगे,
माजी नगराध्यक्ष नितीन कासार,माजी नगरसेवक कमलाकर चव्हाण,माजी नगरसेवक बसवराज धरणे हे होते,

कार्यक्रमात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल केंद्र शासनाचा अभिनंदनाचा ठराव कमलाकर चव्हाण यांनी मांडला. त्यास उदय जगदाळे यांनी अनुमोदन दिले,स्वा.सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा असा ठराव शिवसेनेचे संतोष पुदाले यांनी मांडला. त्यास बसवराज धरणे यांनी अनुमोदन दिले व तसेच ऐतिहासिक नळदुर्ग शहरात स्वा.सावरकर यांचे भव्य स्मारक व्हावे असा ठराव ब्राह्मण समाज संघटनेचे अध्यक्ष विनायक अहंकारी यांनी मांडला .त्यास स्वा.सावरकर युवा मंचचे अध्यक्ष प्रमोद कुलकर्णी यांनी अनुमोदन दिले,तिन्ही ठराव मोठया संख्येने उपस्थित असलेले सावरकर प्रेमीनी एकमताने मंजूर केले,यावेळी माजी नगरसेवक अमृत पुदाले,सुधीर हजारे,महालिंग स्वामी,संतोष पुदाले,रमेश जाधव,पत्रकार विलास येडगे,दिपक जगदाळे,श्रीकांत अणदूरकर,उत्तम बनजगोळे,मारुती खारवे,उमेश जाधव,सुभद्राताई मुळे,सुप्रियाताई पुराणिक,संध्याताई भूमकर यांच्यासह महिला,सावरकर प्रेमी व हिंदू बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी विनायक अहंकारी,मुकुंद नाईक,प्रमोद कुलकर्णी,उमेश नाईक,सचिन भूमकर,प्रदीप ग्रामोपाध्ये,सदानंद नाईक,ज्ञानेश्वर केसकर,अजय देशपांडे,प्रसन्न कुलकर्णी,संतोष नाईक,सौरभ रामदासी,राजकुमार वैद्य,संदीप वैद्य,अजित भूमकर,मयूर जोशी,सुदर्शन पुराणिक,गजानन कुलकर्णी,संकेत भूमकर यांनी परिश्रम घेतले,कार्यकमाचे सूत्रसंचालन प्रमोद कुलकर्णी,सौरभ रामदासी यांनी केले,प्रास्ताविक विनायक अहंकारी,तर आभार मुकुंद नाईक यांनी मानले.

Labels:

मुरूम शहरात छावा चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठी भरगच्च गर्दी ; छत्रपती संभाजी महाराजांची गाथा पाहण्यासाठी उस्फुर्त प्रतिसाद

मुरूम शहरात छावा चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठी भरगच्च गर्दी ;  छत्रपती संभाजी महाराजांची गाथा पाहण्यासाठी उस्फुर्त प्रतिसाद

मुरूम, ता. उमरगा, दि. २७ :

 शहरात छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य गाथेवर आधारित छावा चित्रपट स्क्रीनिंगद्वारे बुधवारी (ता. २६) रोजी मोठ्या उत्साहात दाखविण्यात आला. सचिन शिंदे (पाटील) यांच्या संकल्पनेतून छत्रपती संभाजी राजे ग्रुपने छावा चित्रपट संभाजी नगर येथे प्रदर्शित केला. हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असून त्यांच्या शौर्याने प्रेरित होऊन त्यांचे कार्य समाजात पोहोचवण्यासाठी हा प्रयत्न करण्यात आला. चित्रपटाचे प्रदर्शन सायंकाळी साडेसात वाजता सुरू झाले. शहरातील व संभाजी नगरच्या नागरिकांनी या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद दर्शविला.  या स्क्रीनिंगला विशेषत: वृद्ध महिला, पुरुष आणि युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रम डिजिटल स्क्रीन आणि साऊंड सिस्टिमच्या सहाय्याने अत्यंत प्रभावीपणे नियोजन करण्यात आले होते. ज्यामुळे उपस्थितांना एक अनोखा अनुभव मिळाला. याप्रसंगी रोटरी क्लब मुरूम सिटीचे अध्यक्ष कमलाकर मोटे, डॉ. आप्पासाहेब सुरवंशी, प्रकाश रोडगे, संतोष मुरूमकर, राजकुमार काकडे, माजी प्राचार्य दत्ता इंगळे, सुरज शिंदे, आप्पासाहेब पाटील, प्रकाश कंटेकुरे, कल्लू येवले, संतोष पाताळे, सतिश मुदकन्ना, देविदास नागणे, श्रीमंत शिंदे,  गोपाळ शिंदे, बब्रुवान जाधव आणि अन्य ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिन शिंदे व छत्रपती संभाजी राजे ग्रुपचे सदस्य आकाश शिंदे, आकाश जगदाळे, गणेश शिंदे, वैभव शिंदे, सुमित शिंदे, गोविंद जगदाळे, मल्लू तडकले, उत्तम शिंदे, राहुल आहेर, सुमित शेळके, रामजी खंडागळे, विकास शिंदे, सुनिल जाधव, आनंद सुरवसे, सागर शिंदे, पप्पू शिंदे, शहाजी भोसले आदींनी पुढाकार घेतला.        फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील संभाजीनगरात छावा चित्रपटाप्रसंगी  संभाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करताना उपस्थित मान्यवर व अन्य.

Labels:

मराठीचा वापर, प्रचार व प्रसार करा- भारत सातपुते

मराठीचा वापर, प्रचार व प्रसार करा- भारत सातपुते 

 अणदुर,दि.२८: चंद्रकांत हागलगुंडे 

 गुरुवार   दि. 27 फेब्रुवारी रोजी जवाहर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय अणदूर  ता.तुळजापूर येथे मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. 

याचे उद्घाटन प्रमुख पाहुणे  भारत सातपुते यांचे हस्ते कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष  प्राचार्य उमाकांत चनशेट्टी   उपप्राचार्य मा.डॉ. मल्लिनाथ लंगडे  मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. संजय कुलकर्णी  डॉ.मल्लिनाथ  बिराजदार डॉ. प्रसन्न कदंले उपस्थित होते.  उमाकांत चनशेट्टी  यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे   यांचा सत्कार करण्यात आला. 

 भारत सातपुते म्हणाले की, मराठी भाषेचा एक दिवसापुरता गौरव न करता आपण दैनंदिन जीवनामध्ये मराठीचा वापर केला पाहिजे. त्याचा प्रसार व प्रचार केला पाहिजे. माझे सगळ्यात जवळचा मित्र म्हणजे पुस्तक आहेत. वाचन करणे मला फार आवडते.म्हणूनच मला  कविता, कथा, आत्मचरित्र सारख्या साहित्य प्रकारातून लेखन करता आले. नारायण सुर्वे, दया पवार, कुसुमाग्रज यांचा सहवास मला लाभला त्यांच्या सानिध्यात मी राहिलो. तरीपण माझे पाय मी जमिनीवर ठेवलेले आहेत. सर्वात जास्त  इमानदार माणूस जर कोण असेल तर तो न शिकलेला व्यक्ती. मराठीत बघून ओव्या वाचतात आणि न बघता शिव्या देतात अशी एकंदर परिस्थिती आहे. 

मराठीमध्ये बरेच शब्द इंग्रजीचे आलेले आहेत. पण त्याचे मराठीकरण झाल्याचा भास होतो. उदा. टेबल, पेन, फ्रिज,टीव्ही. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे पुरेसे नाही तर त्यानंतर काही जो निधी उपलब्ध होईल त्याचा वापर करून मराठी भाषा ही समृद्ध केली पाहिजे. त्याचबरोबर त्यांनी दुकानावरील मराठी पाट्या ज्या लावल्या जातात त्याचेही विडंबन वात्रटिकेतून  केले. जुना इतिहास आपल्या हातून पुसला जाणार नाही याची काळजी घ्या असेही ते म्हणाले. मनापासून मराठी भाषेवर व मातीवर प्रेम करा. प्रत्येकाने आपलं काम प्रामाणिकपणाने केलं पाहिजे. विचारांचे दारिद्र्य हटवायचे असेल तर पुस्तकाशिवाय पर्याय नाही. मराठी व्याकरणाचाही अभ्यास केला पाहिजे. त्याशिवाय तुमचं शुद्धलेखन सुधारणार नाही त्याचबरोबर त्यांनी स्वतःच्या जीवनातल्या काही कटू प्रसंग आणि आठवणी सांगितल्या. गरीब परिस्थिती मधून मी आल्यामुळे आजच्या या परिस्थितीची जाणीव मला सतत होताना दिसते. त्यासाठी आपण सर्वांनी आपल्या आहे त्या परिस्थितीमध्ये मधून कसे पुढे जाता येईल याचा विचार करावा असे ते म्हणाले. 

अध्यक्ष समारोप करताना उमाकांत चनशेट्टी  म्हणाले की,  विद्यार्थ्यांनी वाचनाकडे लक्ष दिले पाहिजे. भारत सातपुते यांचे चरित्र जागरण यामध्ये भारत सातपुतेनी जे आपले जीवनातील घटना, प्रसंग सांगितले आहे, त्याचे विश्लेषण  केले.  गरीब परिस्थिती मध्ये जीवन जगलेले भारत सातपुते आज लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ. संजय कुलकर्णी यांनी केले तर आभार डॉ. प्रसन्न कंदले यानी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एम. बी. बिराजदार यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर  कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. वंदे मातरम या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Labels:

Thursday, 27 February 2025

आनंदनगर मुरुम येथे रोटरी क्लब तर्फे सर्वरोग आरोग्य शिबिरात 90 रुग्णाची तपासणी

आनंदनगर मुरुम येथे रोटरी क्लब तर्फे सर्वरोग आरोग्य शिबिरात 90 रुग्णाची तपासणी 


मुरुम, ता. उमरगा, दि. २७  

येथील रोटरी क्लब मुरुम सिटी, ग्रामीण रूग्णालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आनंदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आनंदनगर शाळेत महिला-पुरूष व विद्यार्थ्यांची सर्वरोग निदान आरोग्य शिबिर रोटरी डे व महाशिवराञीचे औचित्य साधुन गुरुवार (ता. २७) रोजी घेण्यात आले. 

प्रारंभी रोटरी क्लबचे अध्यक्ष कमलाकर मोटे यांच्या हस्ते डाॅ. तेजस्वीनी सोनवणे, डाॅ. सागर काबरा, डाॅ. गिरिष मिनियार, मुख्याध्यापक बाबुराव पवार यांच्या उपस्थितीत दंतचिकित्साचे प्रात्यक्षिक करुन करण्यात आले. 
यावेळी नागरिक, विद्यार्थी यांची तपासणी करुन औषधे देण्यात आली. रोटरीचे संतोष कांबळे, प्रा. डाॅ. अप्पासाहेब सुर्यवंशी, प्रा. राजकुमार वाकडे, कलप्पा पाटील, आरोग्य विभागाचे सुजित जाधव, वैष्णवी शिंदे, शिक्षक सुनिता खंडागळे, तानाजी बिराजदार आदींनी पुढाकार घेतला. विद्यार्थ्यांना राजगिऱ्याचे लाडु वाटप करून संध्या पुजारी यांनी अभार मानले.                      फोटो ओळ : आनंदनगर, ता. उमरगा येथील जिल्हा परिषद शाळेत सर्व रोग निदान शिबिराप्रसंगी डॉक्टर्स रुग्णांची तपासणी करताना रुग्ण व अन्य.

Labels:

मन मेंदू आणि मनगट सशक्त करणारी शाळा आहे - पोलीस निरीक्षक सचिन यादव.

मन मेंदू आणि मनगट सशक्त करणारी शाळा म्हणजे जिजाऊ इंग्लिश स्कूल अणदूर - पोलीस निरीक्षक सचिन  यादव. 

अणदुर,दि.२७ : चंद्रकांत हागलगुंडे 

मन मेंदू आणि मनगट सशक्त करणारी एकमेव शाळा असल्याचे मत पोलीस निरीक्षक सचिन  यादव यांनी अणदूर त्या.तुळजापूर येथे जिजाऊ इंग्लिश स्कूल शाळेच्या स्नेहसंमेलनात व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वैजनाथ शेटे  ,उद्घाटक पोलीस निरीक्षक सचिन  यादव ,
प्रमुख पाहुणे  सरपंच रामचंद्र  आलूरे ,फुलवाडीच्या सरपंच छायाताई लोहार ,तंटामुक्ती अध्यक्ष काशिनाथ शेटे, धनराज मुळे, कल्याणी  मुळे, मलंग  शेख, प्रा.  अनिता मुदकण्ण , मेजर धनाजी शिंदे पूर्व सीमेवरून उपस्थित राहिल्याने  त्यांचा सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक मुख्याध्यापिका स्वप्न शेटे यांनी तर
सूत्रसंचालन पूजा स्वामी  , ज्योती चव्हाण यांनी केले.
आभार संस्थेचे कार्याध्यक्ष अँड विशाल शेटे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सचिन तोग्गी, रवींद्र व्हड्रे  , नित्यानंद आलूरे, लक्ष्मण लोहार,महेश कुंभार, राधिका जिडगे, आनंदीताई मुळे,शिक्षक स्वप्ना शेटे मुख्याध्यापक. सुनिता ढाकणे -घुगे ,पूजा स्वामी, ज्योती भोसले, अश्विनी पवार, सुवर्णा गुड्ड, सविता बिराजदार,,वर्षा मुळे, शकुंतला इंगळे, शीतल मुले मॅडम, नीलम लोहार  , सुशांत भुरे, बसवराज कर्पे, संकेत दुलंगे, लक्ष्मण लोहार,विश्वनाथ मोकाशे , अभिलाष कर्पे,आनंद यावलकर , प्रज्योत मेलवंकी, इमाम नदाफ आदींनी पुढाकार घेतले. यावेळी 
सोमनाथ शेटे, राचप्पा जिडगे, ब्रह्मानंद कापसे, सचिन मुळे, सतेंद्र राऊत , चंद्रकांत लोहार, जय मल्हार पत्रकार संघाचे सर्व सदस्यासह  पालक उपस्थित होते.

Labels:

महाकुंभ - महाव्यवस्थापनाचा मानदंड! ; श्रीकांत प्रभुदेसाई यांचा ऑन द स्पॉट रिपोर्ट!

महाकुंभ - महाव्यवस्थापनाचा मानदंड!
श्रीकांत प्रभुदेसाई यांचा ऑन द स्पॉट रिपोर्ट!

त्रिवेणी संगमाच्या जसे जवळ जावे तसे तिथे तर लोकांचा महासागर उसळलेला होता. बरोबरचा माणसाचा एक सेकंद हात सुटला तरी परत सापडणं अवघड, इतकी गर्दी. मात्र प्रशासनाने अनेक ठिकाणी 'खोया-पाया केंद्र' स्थापन केली होती व तेथून होणारी अनाउन्समेंट ही संपूर्ण कुंभ परिसरात ऐकू जाईल अशी ध्वनि यंत्रणा केलेली होती. त्यामुळे हरवलेली एखादी व्यक्ती नेमकी कुठे आहे हे अनाउन्समेंट वरून लगेच लक्षात येत होते. तसेच संगम स्थानी प्रत्येक खांबाला वेगळा नंबर दिलेला होता त्यामुळे आपले पर्जन नेमके कुठे आहेत हे एकमेकांना कळवणे सहज शक्य होत होते.  संगमस्थानी खूप मोठ्या प्रमाणात महिलांच्यासाठी कपडे बदलण्याचे बंदिस्त आडोसे तयार केलेले होते. त्यामुळे महिलांची अजिबात गैरसोय होत नव्हती....*

    माघी पौर्णिमा, दि.१२ फेब्रुवारी या दिवशी महाकुंभमेळ्यामध्ये जाण्याचा सुयोग मला लाभला, हे माझे भाग्यच! मी श्रद्धावान असलो तरी गर्दीच्या, जत्रेच्या ठिकाणी जाण्याचे मी नेहमी टाळतोच. देवदर्शन हे शक्यतो शांतपणे, मनसोक्त व्हावे असा माझा स्वभाव.  मात्र गेले चार-सहा महिने कुंभमेळ्याची तयारी, त्याच्या आयोजनातील अवाढव्यपणा आणि तितकाच नेटकेपणा, परिपूर्णता याविषयी सर्व माध्यमातून जी माहिती मिळत होती, ती पाहता हा अपूर्व योग तर आपण साधायलाच हवा अशी भावना होऊ लागली. परंतु त्याही पेक्षा व्यवस्थापन शास्त्राचा विद्यार्थी म्हणूनही आपण या कुंभमेळ्यात जायला हवे, असा मनाचा निर्धारच झाला.
      
कुंभमेळ्याविषयी अतिप्रचंड माहिती सर्वत्र उपलब्ध आहे. त्यामुळे त्याविषयी पुनरुक्ती करण्याचा माझा विचार नाही. मात्र व्यवस्थापन शास्त्राच्या दृष्टीकोनातून हा कुंभमेळा म्हणजे जगातील एक अद्भुत आयोजन होते, याबाबत मला कोणतीही शंका उरलेली नाही. 

     मुळात कुंभमेळ्याचे क्षेत्र अतिशय छोटे, म्हणजे साधारणतः १५ वर्ग किलोमीटर. म्हणजे एखाद्या छोट्या शहरापेक्षाही लहान.  तरीही या जागेमध्ये कोट्यावधी लोकांची तात्पुरती व्यवस्था  कशी उभारली असेल?
     दुसरी गोष्ट म्हणजे कुंभमेळा गंगेच्या व यमुनेच्या संगम क्षेत्रात म्हणजेच पूरक्षेत्रातील वाळवंटामध्ये भरतो. अशा वाळवंटात भुसभुशीत जागेत इतकी प्रचंड व्यवस्था कशी उभी केली असेल? हा ही कुतुहलाचा विषय होता. कारण पावसाळ्यामध्ये या ठिकाणी दोन्ही नद्यांच्या पुराचे 15-20 फूट उंचीचे पाणी भरलेले असते. इतक्या प्रचंड प्रमाणात येणाऱ्या जनसंख्येच्या, दीड दोन महिना टिकतील अशा आवश्यक त्या सर्व व्यवस्था तात्पुरत्या स्वरूपात उभाराव्या लागणार होत्या. यामध्ये या लोकांचा निवास, आहार आणि संडास बाथरूम आदि सर्व शारीरिक गरजा आल्या. हे कसे शक्य होणार? हा देखील मूलभूत प्रश्न होता. 

      आपल्या महाराष्ट्रातला अनुभव असा आहे की काही लाख लोकांची आषाढी-कार्तिकी वारी ज्या भागातून जाते त्या भागातील गावातील लोक वारीनंतर महिना महिना आपले गाव सोडून दुसरीकडे राहायला जातात. इतकी बिकट अवस्था त्या गावांची होत असते. वारीमध्ये लोक एका जागी एक किंवा फार तर दोन दिवस राहतात. इथे महा कुंभात तर सतत दीड महिना वारीच्या 50 पट जास्ती लोकसंख्या विशिष्ट क्षेत्रात राहणार होती. 

     या सर्व प्रश्नांना कसे सोडविले याबाबत  प्रत्यक्ष पाहूनच मत बनवावे, ही एक भावना महाकुंभाला जाण्यामागे होती. 
  
       मी महाकुंभात पोहोचलो तेव्हा मेळा सुरू होऊन सुमारे तीस दिवस झालेले होते. तीस दिवसांमध्ये या क्षेत्रामध्ये ४० कोटी लोक येऊन गेले अशी आकडेवारी सांगत होती. त्यामुळे त्या क्षेत्राच्या जवळ जाताच दुर्गंधीचा प्रचंड सामना करावा लागेल या मानसिक तयारीत मी होतो.  त्याचप्रमाणे कचऱ्याचे, प्लास्टिकचे डोंगरच्या डोंगर पाहण्याची देखील मनाची तयारी केलेली होती. परंतु प्रामाणिकपणे सांगतो - यापैकी कोणतेही दृश्य मला कुंभामध्ये दिसले नाही. तात्पुरते उभारलेले हजारो संडास असूनही व ४० कोटी लोकांच्याकडून त्याचा वापर झालेला असूनही परिसरामध्ये नावालाही दुर्गंधी नव्हती. उलट अतिशय प्रसन्न वातावरण होते.

      कुंभामध्ये तीन दिवस फिरत असताना कचऱ्याचे डोंगर तर सोडाच, कचराच दिसला नाही. सफाई कर्मचारी सातत्याने सफाई करत होतेच, परंतु या करोडो लोकांमध्ये देखील अलीकडच्या काही वर्षातील सरकारच्या प्रयत्नामुळे आलेली स्वच्छतेची  जागृती बऱ्याच प्रमाणात जाणवत होती. 

     हजारो संस्था व नागरिकांनी येणाऱ्या भक्तांसाठी विनामूल्य अन्नभंडारे चालवले होते. त्यामुळे भक्तांना अन्नावरती खर्च करण्याची अजिबात गरज नव्हती. भंडाऱ्यांमध्ये बनवले जाणारे जेवण स्वच्छ व सात्विक असल्यामुळे कुणाच्या तब्येती देखील बिघडल्या नाहीत. पूर्व नियोजन केल्यामुळे सर्व भंडार्यांमध्ये स्टीलच्या ताटवाट्या वापरल्या गेल्या. त्यामुळे कागदी व प्लॅस्टिक पत्रावळ्या, पाण्याचे प्लास्टिकचे ग्लास याचेही बिलकुल दर्शन झाले नाही. पिण्याच्या पाण्यासाठी सरकारने जागोजागी विनामूल्य आर ओ वॉटर प्लांट लावलेले होते. त्यामुळे खूप चालायला लागले तरीही लोकांना पाण्यावरती खर्च करावा लागत नव्हता. 

       या करोडो लोकांच्या साठी संडासची व्यवस्था कशी केली असेल हा एक मला मोठा प्रश्न पडलेला होता. पण या परिसरामध्ये सरकारने जी हजारो पक्की तात्पुरती टॉयलेट्स उभारली होती त्यांची सातत्याने सफाईची व्यवस्था केलेली होती. आणि शिवाय सेप्टिक टॅंक मधील मैला रोजच्यारोज उचलण्यासाठी टँकरची चोख व्यवस्था होती. त्यामुळे सर्व नागरिकांना स्वच्छ, आरोग्यपूर्ण, दुर्गंधीरहित व्यवस्था उपलब्ध झाली व महाकुंभमेळा परिसर निर्मळ व पवित्र राहिला.
   
      गंगा यमुनेच्या दोन्ही तटांवर मेळा असल्याने नदीपलीकडील आखाड्यात जायचे तर मोठा वळसा मारावा लागणार व असलेले पक्के पूल वाहतूक कोंडीमुळे कुचकामी ठरणार, याबाबत सरकारने विचारपूर्वक आधीपासून तयारी केलेली होती. गंगेवर काही नव्या पक्या पुलांची निर्मिती केलेली होतीच. त्या व्यतिरिक्त केवळ या पाच-सात किलोमीटर परिसरात २५ तात्पुरते पूल उभारले होते. मात्र हे तात्पुरते पूल इतके भक्कम होते की त्याच्यावरून ट्रक देखील सुरक्षितपणे जाऊ शकतील.  मोठमोठे हवाबंद टँकर नदीपात्रात अंथरून त्यावरून जाड लोखंडी प्लेट्स टाकून तात्पुरते, तरीही पक्के पूल उभारलेले होते. याला पॉंटून ब्रिज किंवा स्थानिक भाषेत पीपा पूल असं म्हटलं जात होतं. असा एक पूल तयार करण्यासाठी सुमारे ११० टँकर लागत होते. व असे ३० पूल केलेले होते. यामुळेच सर्व परिसरात येणेजाणे अतिशय सुलभ झाले.

      हा सर्व परिसर वालुकामय आहे आणि इतक्या लोकांना ये-जा करण्यासाठी, त्यांच्यासाठी लागणाऱ्या सर्व गरजांच्या साहित्याची वाहतूक करणे यासाठी रस्ते उभारणे हे देखील एक आव्हानच होते. यासाठी सरकारने वापरलेली पद्धत माझ्यासाठी अभिनवच होती. कदाचित अशा प्रकारचे तंत्रज्ञान सैन्यांमध्ये वापरले जात असेल. वाळूमध्ये जाड जाड अशा लोखंडी प्लेट्स अंथरून, त्या प्लेट्स एकमेकांना जोडून मोठमोठे रस्ते तयार केलेले होते. एकेका प्लेटचे वजन तीनशे किलो असेल असे सोबतच्या व्यवसायाने इंजिनीयर असलेल्या मित्राने सांगितले. रस्त्यांसाठी पाच-पंचवीस लाख प्लेट्स चा वापर नक्कीच केला गेला असेल.   या प्लेट्स च्या रस्त्यांमुळे या संपूर्ण परिसरात कोठेही एकही वाहन वाळूत किंवा चिखलात रुतलेले व त्यामुळे झालेली वाहतुक अडचण दिसली नाही. प्लेट्स वर येणारी वाळू व त्यातून जाणारे करोडो लोक व जाणारी वाहने यांच्यामुळे परिसरामध्ये धुळीचे साम्राज्य निर्माण होईल हे लक्षात घेऊन दिवसातून ठराविक अंतराने रस्त्यांवर पाणी मारण्याची व्यवस्था केलेली होती. त्यामुळे ही हवाप्रदूषण पूर्णपणे टाळले होते.

     महाकुंभ परिसरात एक मोठे रुग्णालय उभारलेले आहे, ज्यामध्ये  अतिदक्षता विभाग देखील होता. तेथील सेवा देखील दिवसरात्र व तत्परतेने मिळत होत्या. सामान्य व तज्ञ डाॅक्टर्स व आवश्यक तो पॅरामेडिकल स्टाफ, औषधे, सलाईन बाॅटलस् आदि सर्वाची पर्याप्त तयारी होती. अनेक रुग्णवाहिका देखील रुग्णसेवेसाठी सज्ज होत्या.

   जागोजागी अग्निशामक यंत्रणा देखील तयार होती. या परिसरातील सर्व उभारणी कापडी मंडपांच्या सहाय्याने झालेली होती व कोट्यावधी लोकांसाठी दररोज दिवसरात्र अन्न शिजत होते. त्यामुळे कुठेतरी आग लागण्याचा धोका होताच. तशा १~२ घटना घडल्या सुद्धा. पण पूर्व तयारी मुळे फारशी हानी न होता आग विझवणे शक्य झाले.

       या परिसरामध्ये रात्री देखील दिवसाप्रमाणे उजेड राहील अशी विद्युत व्यवस्था केलेली होती. या हजारो खांबांची गेल्या दोन-चार महिन्यात उभारणी केली होती असे स्थानिकांकडून कळले. अचानक वीज गेल्यामुळे गोंधळ होणे व त्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होणे अशा घटना भारतामध्ये आपण अनेक वेळा बघतो. परंतु अशा प्रकारची एकही घटना कुंभमेळ्याच्या दीड महिन्यात झाली नाही. 

     प्रचंड गर्दीमुळे शेवटच्या ठिकाणापर्यंत मोठी वाहने सोडणे अशक्यच होते. मात्र मोठ्या प्रमाणात ई-रिक्षा उपलब्ध होत्या. त्यांच्यामुळे लोकांची मोठी सोय होत होती आणि ध्वनी व वायू प्रदूषण ही टळत होते. याहीपेक्षा एक अभिनव गोष्ट म्हणजे प्रशासनाने स्थानिक युवकांना लोकांची ने-आण करण्याची परवानगी दिली असावी (कदाचित अनधिकृतपणे). असे हजारो स्थानिक तरुण आपल्या मोटारसायकलसह दिवसरात्र राबत होते. त्यामुळे या युवकांना चांगला रोजगार मिळालाच व लोकांची ही मोठी सोय झाली.

       विविध प्रांतातून करोडो लोक येणार म्हणजे लाखो वाहने येणार हे तर सरळच आहे. या लाखो वाहनांना आवश्यक ते डिझेल-पेट्रोल केवळ या दीड महिन्याच्या काळात कैकपट अधीक प्रमाणात उपलब्ध करणे ही देखील फार मोठी व्यवस्था होती. याबाबत ही कोणत्याही वाहनाची गैरसोय झाली नाही.
       इतक्या लोकांच्यासाठी लागणारे अन्न तयार करायचे तर त्यासाठी आवश्यक ते सर्व अन्नधान्य, भाजीपाला, तेल, गॅस या सर्वाचा साठा किती आधीपासून उपलब्ध करून ठेवावा लागला असेल. कारण पूर्ण भारताच्या सुमारे ४०% लोक हे केवळ दीड महिना कालावधीमध्ये या भागात येऊन गेले. सामान्य काळापेक्षा हजारपट जास्त सर्व गोष्टी प्रयागराज-काशी-अयोध्या या परिसरात लागल्या. परंतु या कालावधीमध्ये आलेल्या प्रवाशांना कोणतीही गोष्ट मिळाली नाही असं झालं नाही. यासाठी किती आधी नियोजन करून ठेवावं लागलं असेल! साखर, चहा, दूध, बिस्किटे, पाण्याच्या बाटल्या, गॅस, सिलेंडर,  अशा शेकडो गोष्टींचे विचारपूर्वक पूर्व नियोजन केले गेले होते. त्यामुळे हा दीड महिना इतक्या प्रचंड लोकसंख्येचा भार या परिसराने यशस्वीपणे पेलला. केवळ पेलला नाही, तर या संधीचे प्रत्येक व्यावसायिकाने सोने करून घेतले. कोणतीच गोष्ट अनाठाई अधिक दराने विकली गेली नाही  मात्र भरपूर प्रमाणात विक्री झाल्यामुळे त्या भागातील व्यवसायिकांनी दोन-तीन वर्षाची कमाई या दीड महिन्यात नक्कीच केली. आणि ती सुद्धा येणाऱ्या भाविकांना समाधान वाटेल अशा पद्धतीने! 
       
      भक्तांच्या माथी कुमकुम टिळक लावणारे, चहा विक्री करणारे, भेळ चाट चे विक्रेते, रिक्षावाले, रस्त्यातील दुकानदार, हॉटेल्स, पेट्रोल पंप, वाहन दुरुस्ती करणारे इत्यादी सर्व व्यावसायिकांनी आपल्या क्षमतेची परीक्षा पाहणारे काम केले व भरभरून कमाई देखील केली. 
      विश्वातल्या कल्पनेपेक्षाही प्रचंड मोठ्या अशा अभूतपूर्व मेळ्याचे आयोजन हा खरोखरच यापुढे जागतिक विद्यापीठांमध्ये अभ्यासाचा व कौतुकाचा विषय राहणार आहे, हे निश्चितच.
      कुंभमेळा यशस्वी झाला हे तर सांगण्याची गरज नाहीच. परंतु या कुंभमेळ्यामुळे भारतातल्या सर्व प्रकारच्या धार्मिक आयोजनांमध्ये नक्कीच मोठ्या प्रमाणात बदल होतील. सर्व ठिकाणी या कुंभमेळ्यातल्या आदर्शांप्रमाणे व्यवस्था ठेवण्याचे प्रयत्न होतील. त्यामुळे भक्तांची देखील सोय होईल.  धार्मिक श्रद्धेला मोठे पाठबळ मिळेलच, परंतु एकंदरीत भारतभर धार्मिक पर्यटनामुळे व धार्मिक मेळ्यांच्यामुळे अर्थव्यवस्थेला प्रचंड प्रमाणात चालना मिळेल असा माझा अंदाज आहे. 
     या कुंभमेळ्यामध्ये मुळे केवळ प्रयागराज मध्ये दीड महिन्यात तीन लाख कोटी रुपयाची उलाढाल झाली. संपूर्ण भारतभरातून आलेले प्रवासी पाहता भारतभरात याच्या अनेक पट जास्त उलाढाल या कुंभमेळ्यामुळे झाली. याचा परिणाम म्हणून यावर्षीचा भारताचा विकासदर एक टक्क्यांनी वाढलेला दिसला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको.
     तेच पोलीस, तेच सरकारी अधिकारी, तेच सरकारी कर्मचारी आणि तेच नागरिक! मात्र नेतृत्व विचारी, विश्वासार्ह व क्रियाशील  असेल तर किती मोठा बदल घडू शकतो, याचे हा महाकुंभ हे मोठे उदाहरण आहे. 
         यामध्ये मुद्दाम उल्लेख करायला हवा अशी जाणवलेली आणखी एक गोष्ट. एकाच वेळी, एकाच ठिकाणी करोडो लोक जमले तर केवळ पोलीस व सरकारी कर्मचारी यांच्या बळावर त्यांना अनुशासित करणे केवळ अशक्य असते. यातूनच अनेक दुर्घटना घडतात. परंतु येथे आलेला सर्व जनसमुदाय हा मुळातच एका धार्मिक उद्देशाने आलेला होता व आपल्याकडून कोणतीही गैर वर्तणूक होणार नाही व आपण पापाचे धनी होणार नाही याची काळजी घेत होता. तसे त्यानां वारंवार आवाहन केले जात होते. पोलीस, सरकारी कर्मचारी हे अथकपणे, उत्तम  काम करतच होते. मात्र जमलेल्या भक्तजनांपैकी गरीब-श्रीमंत, शिक्षित-अशिक्षित, सर्व जातीपंथांतील लोक हे स्वतःहून चांगले वर्तन करत हा धार्मिक सोहळ्याचा आनंद उपभोगत होते. हे देखील या महाकुंभाच्या सफलते मागील एक महत्त्वाचे कारण आहे, जे भारताच्या इतिहासातील पूर्वानुभव पाहता अनोखे आहे.  फार महत्त्वाचे आहे.

   उद्या महाकुंभाचे पाचवे व शेवटचे स्नान संपेल तेंव्हा ६६कोटी भाविक प्रयागराज मध्ये येऊन गेलेले असतील.  हे वर्षभर आणखीन कैक कोटी भाविक येत रहातील. व हिंदू धर्माकडून एक वैश्विक इतिहास रचला गेला असेल.
 
     २९ जानेवारी रोजी झालेली दुर्घटना हा या कुंभाच्या आयोजनाला लागलेला एक कलंक आहे हे नक्कीच. त्यासाठी नेमके कोण दोषी होते हे शोधून त्यांना योग्य ती शिक्षा दिली जाईलच. परंतु ही घटना वगळता कुंभमेळ्यामध्ये सर्वांचे अनुभव चांगलेच आहेत हे उल्लेखनीय!

 जय गंगे! जय यमुने! जय सरस्वती! 
जय श्रीराम! जय काशीविश्वनाथ!

श्रीकांत प्रभुदेसाई, इचलकरंजी.

Labels:

Wednesday, 26 February 2025

श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयास सेंटर ऑफ एक्सलन्स प्रमाणपत्र व प्राचार्य डॉ संजय अस्वले यांना उत्कृष्ट जिल्हा समन्वयक पुरस्कार

श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयास सेंटर ऑफ एक्सलन्स प्रमाणपत्र व प्राचार्य डॉ संजय अस्वले यांना उत्कृष्ट जिल्हा समन्वयक पुरस्कार

 मुरुम,दि.२६ : डॉ सुधीर पंचगल्ले 

 महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करिअर कट्टा अंतर्गत महाराष्ट्रातील 50 महाविद्यालयांना सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून प्रमाणित करण्यात आले.महाविद्यालयाच्या सेंटर ऑफ एक्सलन्स चे प्रमाणपत्र आणि निधी तसेच 2024-25 चा श्री छत्रपती संभाजीनगर  विभागातील उत्कृष्ट जिल्हा समन्वयक पुरस्कार प्राचार्य डॉ संजय अस्वले यांना  प्रफुल्ल पाठक, सेक्रेटरी पॉवर सेक्टर स्किल दिल्ली,   बाबासाहेब वाघमारे लायझनिंग ऑफिसर, ऊर्जा विभाग मंत्रालय,  मा राज देशमुख, संस्थापक वुई फाउंडेशन, सिंघानिया कंपनीचे सीआयओ, मा. शंकर जाधव, प्रीआयएस सेंटर मुंबई संचालिका .भावना पाटोळे, पोलीस आयुक्त निलेश घटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
 
मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर सभागृहामध्ये आयोजित करिअर कट्टा एकदिवसीय कार्यशाळा आणि राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा 25 फेब्रुवारी रोजी संपन्न झाला.या कार्यक्रमात या कार्यशाळेसाठी व पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्याची उद्योग मंत्री ना उदयजी सामंत यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले

यावेळी करिअर कट्टा प्रमुख मा. यशवंत शितोळे, आवाजाची कार्यशाळा चे मा. सोनाली लोहार, इमोशनल इंटेलिजन्स च्या मा. मिथिला दळवी मा. प्राचार्य प्रज्ञा प्रभू, मा. प्राचार्य अतुल साळुंखे, मा. डॉ दीपा वर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.

येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयास करिअर कट्ट्याच्या वतीने गेली तीन वर्षे सेंटर ऑफ एक्सलन्स प्रदान करण्यात आले आहे. गतवर्षी या सेंटर ऑफ एक्सलन्स बी ग्रेड होता यावर्षी महाविद्यालयाने करिअर कट्ट्याच्या माध्यमातून केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल ए प्लस दर्जा देऊन सन्मान केला आहे. त्याचबरोबर महाविद्यालयातील प्रभारी प्राचार्य डॉ संजय अस्वले यांनी 2024-25 या शैक्षणिक वर्षात धाराशिव जिल्ह्याचे जिल्हा समन्वयक म्हणून करिअर कट्ट्याच उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल संपूर्ण श्री छत्रपती संभाजी नगर विभागातून उत्कृष्ट जिल्हा समन्वयक म्हणून पुरस्काराने सन्मान मुंबई येथील विशेष कार्यक्रमात करण्यात आला आहे. 

महाविद्यालयाच्या या यशाबद्दल आणि डॉ अस्वले यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल शिवाजीराव मोरे, उपाध्यक्ष .आश्लेष शिवाजीराव मोरे, सरचिटणीस .जनार्दन साठे, सचिव .पद्माकर हराळकर, सहसचिव .डॉ सुभाष वाघमोडे, आणि सर्व संचालक मंडळ, उपप्राचार्य डॉ विलास इंगळे, उपप्राचार्य डॉ पद्माकर पिटले, उपप्राचार्य प्रा जी एस मोरे, पर्यवेक्षक प्रा शैलेश महामुनी, प्रबंधक राजकुमार सोनवणे, कार्यालयीन अधीक्षक नितीन कोराळे, महाविद्यालयातील  प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Labels:

शॉट सर्कीट मुळे ठिणगी पडुन लागलेल्या आगीचा वनवा भडकला : शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

वागदरी शिवारात शॉट सर्कीट मुळे ठिणगी पडुन लागलेल्या आगीचा वनवा भडकला : शेतकऱ्यांचे मोठे नुकसान 

वागदरी ,दि.२६: एस. के. गायकवाड 

तुळजापूर तालुक्यातील मौजे वागदरी शिवायरातील एका शेतकऱ्याच्या शेतातील विद्यूत वहाक तारेवर झालेल्या शॉट सर्कीट मुळे ठिणगी पडून लागलेल्या आगीचे रुपांतर वनव्यात झाले आणि बघता बघता आगीचा वनवा भडकून शेजारील सहा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.सुदैवाने कसलीही जिवीत हानी झाली नाही पण मोठ्य प्रमाणात वित्त हानी झाली आहे.
 
  याबाबत वृत्त असे की दि.२४ फेब्रुवारी २o२५ रोजी दुपारी १.३o वा. सुमारास वागदरी ता.तुळजापूर शिवारातील गट नंबर ६४ व,६५ मधिल शेतकरी नागनाथ चव्हाण यांच्या शेतात विद्यूत वहाक तारेवर झालेल्या शॉट सर्किट मुळे ठिणगी  पडून शेतातील गवताला आग लागली. उन्हाच्या तिव्रतेमुळे व अधुमधून येणाऱ्या वाऱ्याच्या झुळकेमुळे त्या आगीचे वनव्यात रूपांतर होऊन आगीचा भडका उडाला व आग सर्वत्र पसरून जवळपास दहा एकर शेत जमिनीवरील जनावराचा चारा (गवत)जळून गेल तर गट नबर ७५ मधिल गुरूनाथ सोमा वाघमारे यांच्या शेतात जनावरासाठी चारा म्हणून बनिम रचून ठेवलेला २५०० पेंढ्या ज्वारीचा कडबा, गोटयावरील 30 पत्रे, शेतीउपयोगी अवजारे, ताडपत्री, वगेरे जळुन अंदाजे १,५०,००० रूपये (एक लाख पन्नास हजार रुपयाचे)नुकसान झालेले आहे तर याच गटातील राजकुमार सोमनाथ वाघमारे यांचा सोयाबीनचा दोन ट्रॉली चारा व एक सायकल असे अदाजे पंधरा हजार रुपये  (१५००० रु )चे नुकसान झाले तर गट नंबर ७४ मधिल कुंडलिक जगन्नाथ वाघमारे यांच्या शेतातील सोयाबीनचा चारा व शेती उपयोगी साहीत्य तर याच गटातील बाबासाहेब कुंडलिक वाघमारे यांचे दहा पत्रे,१५०० ज्यारीच्या कडब्याच्या पेंढया, सोयाबिनचा दोन ट्रॉली चारा, शेती उपयोगी अवजारे जळून मोठे नुकसार झाले आहे.तसेच गट नंबर ६७ मधिल श्रीधर भाऊराव बिरादार यांच्या शेतातील काढणीस आलेले तुरीचे पिक व शेती अवजारे जळून अंदाजे १५ooo रु.पंधरा हजार रुपयाचे नुकसान झाले आहे तर गट नंबर ७३ मधिल मोहन सोमवंशी, प्रमोद सामवंशी व नितीन सोमवंशी यांचा सोयाबिनचा चारा व शेती उपयोगी अवजारे जळून मोठे नुकसान झाले आहे.
   
सदर जळीत घटनेचा ग्राम महसुल आधिकारी सज्जा खुदावाडीचे तलाठी धनंजय मेहदंर्गी यानी प्रतक्ष घटनास्थळी पंचनामा करून संबधित वरिष्ठाधिकारी तहसीलदार तुळजापूर याना सादर केला आहे.
 सदर घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून जळीतग्रस्त शेतकऱ्याना शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.

Labels:

माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या हस्ते बसवराज पेट्रोलियमचे उद्घाटन

बसवराज पाटील यांच्या हस्ते बसवराज पेट्रोलियमचे उद्घाटन


मुरूम, दि.२६ :

देशाला अधिक समृद्ध करण्यासाठी तरुणांनी नवनवीन व्यवसायाकडे वळले पाहिजे. त्यामुळे स्वतःच्या प्रगती बरोबरच देशाची ही प्रगती होते. सध्या पेट्रोल, डिझेल हे अत्यावश्यक झाल्याचे प्रतिपादन  उद्घाटन प्रसंगी  माजी राज्यमंत्री  बसवराज पाटील यांनी केले.

 मुरूम ता. उमरगा येथे भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेडचे बसवराज पेट्रोलियम या पेट्रोल पंपाचे उद्घाटन बसवराज पाटील यांच्या हस्ते सोमवारी (ता. २४) रोजी करण्यात आले. यावेळी  जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील, उमरगा जनता सहकारी बँकेचे चेअरमन शरण पाटील, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, सोलापूरचे सीनियर सेल्स मॅनेजर शाश्वत शर्मा, संस्कार गुप्ता, लोहारा पंचायत समितीचे माजी सभापती विश्वनाथ पत्रिके, माजी नगराध्यक्ष रशीद शेख, सचिन राजनाळे, विश्वनाथ मुदकण्णा, अंकुश पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना बसवराज पाटील म्हणाले की, मुरूम हे शहर राष्ट्रीय महामार्गालगत आहे. त्यामुळे येथे दुचाकी, चार चाकी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या व्यवसायामुळे इथल्या ग्राहकांची सेवाच होणार आहे. हा व्यवसाय करताना आपण  त्यात शुद्धता टिकवून ठेवणे आवश्यक आहे. या भागात शेतकरी वर्ग मोठा असून शेतीतील बरीचशी कामे यंत्राद्वारे, ट्रॅक्टरच्या माध्यमातून केली जातात. त्यामुळे शेतकऱ्यांनाही एक प्रकारे मदत या पेट्रोल पंपाच्या माध्यमातून होईल.  

पंचायत समितीचे माजी सभापती मदन पाटील, डॉ. नितीन डागा, शरणाप्पा मंगरूळे, श्रीशैल मंगरूळे, अजय औसेकर, प्राचार्य अशोक सपाटे, दत्ता चटगे, राजशेखर मुदकण्णा, संतोष चटगे आदि उपस्थित होते.  किरण बरबडे, ओमकार पाटील, नाना बेंडकाळे, गणेश काबरा, गणेश अंबर, गुरु स्वामी, शरण बेळमगे, महेश पाटील, श्रीहरी पाटील, महादेव मेणसे व बरबडे परिवारातील सर्व सदस्यांनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरज बरबडे यांनी केले.  सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुभाष हुलपल्ले तर आभार शितल राजनाळे यांनी मानले.

Labels:

महाशिवरात्रीनिमित्त वसंतनगरच्या (नळदुर्ग) श्री.पंचमुखी मुक्तेश्वर महादेव मंदिरात भाविकांची गर्दी

महाशिवरात्रीनिमित्त वसंतनगरच्या (नळदुर्ग) श्री.पंचमुखी मुक्तेश्वर महादेव मंदिरात भाविकांची गर्दी

 नळदुर्ग,दि.२६ : 

 बुधवारी सर्वत्र महाशिवरात्रीचा उत्सव उत्स्फूर्तपणे 
 साजरा करण्यात आला. महाशिवरात्रीनिमित्त  भाविकांनी मध्यरात्रीपासूनच दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. विविध ठिकाणी महापूजा, महाआरती तसेच अनेक ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमाचे  आयोजन करण्यात आले आहे.

याच पार्श्वभूमीवर नळदुर्गच्या वसंतनगर येथील श्री. पंचमुखी मुक्तेश्वर महादेव मंदिरात वसंतनगर ग्रामस्थांनी सकाळ पासूनच मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. सकाळी सात वाजता आरती करण्यात आली. त्यानंतर भाविकांना महाप्रसाद देण्यात आले. सायंकाळी सात वाजता महाआरती करून संध्याकाळी नऊ वाजता औसा येथील ह.भ.प. नितीन महाराज जगताप यांच्या कीर्तनाचे कार्यक्रम पार पडले. 
पंचमुखी मुक्तेश्वर महादेव मंदिराचे पुजारी ह.भ.प. श्री. शामानंद महाराज यांचे सत्कार संत श्री सेवालाल महाराज समितीचे उपाध्यक्ष संजय जाधव, रवी महाराज राठोड, दिलीप राठोड, गणेश राठोड,  जेतालाल राठोड , दगडू राठोड तेजस राठोड विनोद राठोड सुयश राठोड  यांनी केले.

Labels:

नेट परिक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल प्रा. खंडेराव काळे, प्रा. अकबर सय्यद यांचा बालाघाट महाविद्यालयात गौरव

 नेट परिक्षा उत्तीर्ण  झाल्याबद्दल प्रा. खंडेराव काळे, प्रा. अकबर सय्यद यांचा बालाघाट महाविद्यालयात 
गौरव 

नळदुर्ग ,दि.२६ :

शहरातील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील मराठी विषयाचे प्रा. खंडेराव काळे व इतिहास विषयाचे प्रा. अकबर सय्यद यांनी नेट परिक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल त्यांचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. 

या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुभाष राठोड, वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ विजय सावंत, कार्यालयीन शिक्षण अधिक्षक धनंजय पाटील, डॉ. निलेश शेरे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Labels:

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे साहित्य नष्ट होत असुन तरुण पिढी वाचनापासून दूर ; मोबाईलच्या आहारी गेल्याचे मत : डॉ. तुळशिराम दबडे

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे साहित्य नष्ट होत असुन 
तरुण पिढी वाचनापासून दूर ;  मोबाईलच्या आहारी गेल्याचे मत :  डॉ. तुळशिराम दबडे

नळदुर्ग,दि.२६: डॉ. दिपक जगदाळे 

 कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे व काळाच्या ओघात दिवसेंदिवस साहित्य नष्ट होत आहे. त्यामुळे तरुण पिढी वाचनापासून दूर गेली असून मोबाईलच्या आहारी गेली असल्याचे  मत डॉ. तुळशिराम दबडे यांनी व्यक्त केले. 

नळदुर्ग येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात आयोजित इंग्रजी विषयाच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदचे दि. २४ व २५ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन अणदूर महाविद्यालयाच्या माजी प्राचार्या डॉ अनिता मुदकन्ना यांच्या हस्ते करण्यात आले.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ विजय सावंत हे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून कार्यालयीन अधिक्षक धनंजय पाटील हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थित पाहुण्यांचा परिचय राष्ट्रीय परिषदेचे समन्वयक डॉ. टी. एल. दबडे यांनी करून दिला.  इंग्रजी विषयाच्या राष्ट्रीय परिषदेमध्ये इंग्रजी विषयाच्या ९१ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. सहभागी विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. 

 कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राचार्य डॉ सुभाष राठोड कार्यालयीन अधिक्षक धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील इंग्रजी विभागातील प्रा.आशिष हंगरगेकर,प्रा. दादासाहेब जाधव, प्रा. बाबा सूर्यवंशी, प्रा. गजानन चिंचडवड, प्रा. झरीना पठाण यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा आशिष हंगरगेकर यांनी केले तर आभार प्रा दादासाहेब जाधव यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील  शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. 

Labels:

वागदरी येथे शिवजयंती निमित्ताने आयोजित शिवसप्ताहाची भव्य मिरवणूकिने सांगता

वागदरी येथे शिवजयंती निमित्ताने आयोजित शिवसप्ताहाची भव्य मिरवणूकिने सांगता

वागदरी,दि.२६ :एस. के. गायकवाड 

धाराशिव जिल्ह्यातील वागदरी ता़.तुळजापूर येथे
शिव-बसव-राणा व काशिबा महाराज जन्मोत्सव मंडळ वागदरी च्या वतीने रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती चे औचित्य साधून आयोजित शिव सप्ताहाची भव्य मिरवनूकिने सांगता करण्यात आली आहे.

  वागदरी येथे शिव -बसव -राणा-काशिबा महाराज जन्मोत्सव मंडळ वागदरी च्या वतीने छत्रपती शिवाजी महारज, महात्मा बसवेश्वर, महाराणा प्रतापसिंग व संत काशिबा महाराज यांचा संयुक्त जन्मोत्सव शिव जयंतीचे औचित्या साधून विविध उपक्रमाने साजरा केला जातो. या निमित्ताने शिव सप्ताहाचे आयोजन केले जाते.
  या वर्षी दि १९ फेब्रूवारी ते २५ फेब्रूवारी २०२५ दरम्यान जन्मोत्सव मंडळाच्या वतीने शिव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यानच्या काळात व्यख्यान, शालेय विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम, महिलासाठी कार्यक्रम, वागदरी व परिसरातील शालेय विद्यार्थ्यांची सामान्य ज्ञान स्पर्धा परिक्षा घेण्यात आली असून या स्पर्धेत प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे ११०००, ५००० व
२५०० रूपयाचे रोख पारितोषिक व स्पर्धेम सदभागी विद्यार्थाना शिवाजी कोण होता हे शिव चरित्रपर पुस्तक व स्मृती चिन्ह देण्यात आले. या सप्ताहाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरात ३७ रक्तदात्या मावळ्यानी रक्तदान केले.शेवटी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची पालकीतून भव्य मिरवणूक काढून या जन्मोत्सव सप्ताहाची सांगता करण्यात आली.

या सर्व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी 
अँड.अमोल पाटील,प्रमोद बिराजदार,योगेश सुरवसे, जन्मोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्रीकार धुमाळ ,उपाध्यक्ष नीतीन यादव,सचिव भगतसिंग ठाकूर,अमोल पवार,रवी ठाकुर, बालाजी बिरादार,पंकज सुरवसे,शाम सिंग चव्हाण सह मंडळाचे सर्व पदाधिकारी युवा कार्यकर्ते यानी परिश्रम घेतले.

Labels:

बोळेगाव तलाठी सज्जा चें नुतन तलाठी शिवकन्या शिंदे रुजू : ग्रामस्थानी केला सत्कार

बोळेगाव तलाठी सज्जा चें नुतन तलाठी शिवकन्या शिंदे रुजू : ग्रामस्थानी केला सत्कार

वागदरी,दि.२६: एस. के. गायकवाड

तुळजापूर तालुक्यातील गाव कामगार तलाठी सज्जा बोळेगावचे नुतन तलाठी शिवकन्या शिंदे यानी आपला परभार स्विकारल असून ते कामावर रुजू होताच येथील ग्रामस्थानी गावच्या पोलीस पाटील अश्विनी सुर्यवंशी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून स्वागत केले.
  

 गाव कामगार तलाठी सज्जावर कार्यरत असलेले तलाठी अमर पडवळ यांची अन्यत्र बदली झालाने त्यांच्य जागी शिवकन्या शिंदे यांची शासनाने तलाठी म्हणून नियूक्ती केल्याने ते नुकतल आपला पदभार स्विकारुन कामावर रूजू झाल्याने येथील ग्रामस्थानी त्यांचा पोलीस पाटील अश्विनी सुर्यवंशी यांच्या हस्ते यथोचित सत्कार करून स्वागत केले तर येथे कार्यरत असलेले तलाठी अमर पडवळ यांची बदली झाल्याने ग्रामस्थांच्या वतीने गावचे सरपंच विलास पाटील यांच्या हस्ते सत्कार करून त्याना निरोप देण्यात आला.

  यावेळी उपसरपंच शांताबाई मुलगे, ग्रा.प.सदस्य अंगद जाधव, सामाजिक कार्यकर्त्या संगीता सुरवसे,चैतन रुपनुर,सोपान सुरवसे,पंडीत सुरवसे, संजय सुरवसे सह ग्रामस्थ उपस्थित होते.

Labels:

Tuesday, 25 February 2025

कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात महात्मा गांधी व्याख्यानमाला दोन सत्रात संपन्न ; श्रोत्यांचा उत्स्फूर्त सहभाग

कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात महात्मा गांधी व्याख्यानमाला दोन सत्रात संपन्न ; श्रोत्यांचा उत्स्फूर्त सहभाग

नळदुर्ग, दि.२५  : 

येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग व कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यशास्त्र व अर्थशास्त्र विभागाच्या वतीने महात्मा गांधी व्याख्यानमालेचे आयोजन मंगळवार दि. २५ रोजी करण्यात आले होते. 

या व्याख्यानमालेच्या  अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुभाष राठोड होते. प्रमुख व्याख्याते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे व श्री माधवराव पाटील महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. राजेंद्र गणापुरे, कार्यालयीन अधीक्षक धनंजय पाटील, राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. निलेश शेरे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. आतिश तिडके, डॉ. विजय सावंत  आदींची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी कुंडीतील रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या सत्राच्या कार्यक्रमाचे प्रस्ताविक व डॉ. मोटे यांचा परिचय डॉ. निलेश शेरे यांनी करून दिला. डॉ. महेश मोटे यांनी महात्मा गांधीजींच्या विचारांची प्रासंगिकता या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, महात्मा गांधीजींचे सत्य, अहिंसा सत्याग्रहा संबंधीच्या विचारांचे महत्त्व समजावून सांगितले. महात्मा गांधीजींचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान, महात्मा गांधीजींनी दिलेला शांततेचा संदेश आजही जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी उपयुक्त आहे. अहिंसा ही जगातील सर्वात मोठी ताकद आहे. आज सरकारच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया चा नारा दिला जातो. हा विचार देखील महात्मा गांधीजींनी आपल्या तत्त्वज्ञानामध्ये स्वदेशी, ग्रामस्वराज्य, लोकशाही मूल्य, स्वयंपूर्ण खेडे, इत्यादीच्या माध्यमातून मांडला आहे. 

याप्रसंगी डॉ. अतिश तिडके यांनी डॉ. गणापुरे यांचा परिचय करून दिला. डॉ. राजेंद्र गणापुरे यांनी महात्मा गांधीजींचे आर्थिक विचार या विषयावरती विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, महात्मा गांधीजींनी भारतातील आर्थिक विषमता कमी करण्यासाठी समतेला महत्त्व दिले. एवढेच नव्हे तर समता प्रस्थापित करण्यासाठी कोणतेच काम हे श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसते, हा महत्त्वाचा विचार महात्मा गांधीजींनी सांगितला आहे. महात्मा गांधीजींनी विश्वस्ताची संकल्पना मांडली त्या संकल्पनेच्या माध्यमातून आपल्याकडे असलेला अतिरिक्त पैसा जनतेच्या कल्याणासाठी वापरला पाहिजे परंतु अलीकडच्या काळात असे होताना दिसत नाही. अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्राचार्य डॉ. सुभाष राठोड यांनी महात्मा गांधी यांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी महाविद्यालयाच्या माध्यमातून अशा व्याख्यानमालेचे आयोजन महत्त्वाचे आहे. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेच्या माध्यमातून महात्मा गांधीजींचे विचार, त्यांचे आदर्श तत्त्वज्ञान हे विद्यार्थ्यांमध्ये रुजले पाहिजे. त्या विचारांची शिदोरी घेऊन विद्यार्थ्यांनी राष्ट्र उभारणीस आपले योगदान दिले पाहिजे, असे मत व्यक्त केले. 

प्रा. बालाजी क्षीरसागर, डॉ. बाळासाहेब पाटील, प्रा. महेश राठोड, उमेश सर्जे, पापा गायकवाड, दिनेश पुदाले, रमेश सर्जे, सिद्ध सुतार आदींनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. ए. द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी कीर्ती इटकरी तर आभार प्रा. संगीता मोरे यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Labels:

राष्ट्रीय महामार्गाच्या अर्धवट कामाची पाहणी करून तातडीने काम पूर्ण करण्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे आदेश

राष्ट्रीय महामार्गाचे अर्धवट कामाची पाहणी करून तातडीने काम पूर्ण करण्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे आदेश

अणदूर,दि.२५: चंद्रकांत हागलगुंडे 

राष्ट्रीय महामार्गाचे अर्धवट कामाची पाहणी करून काम तात्काळ पूर्ण करून चिवारी पाटी, भुजबळ वस्ती, मधुशाली नगर येथील पाण्याचा वीसर्ग तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य डॉ. जितेंद्र कानडे यांनी दिली. 

खासदार ओमराजे निंबाळकर यांनी या रस्त्याची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना कामासंदर्भात सूचना देऊन तात्काळ काम पूर्ण करण्याचे आदेश दिले. सोबत ठाकरे गटाचे  माजी तालुका अध्यक्ष बाळकृष्ण घोडके पाटील हे उपस्थित होते.

अणदूर हे सांस्कृतिक दृष्ट्या ऐतिहासिक गाव असून असंख्य जनतेचे श्री खंडोबा कुलदैवत आहे. त्यामुळे भाविकांचे मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते, याचा विचार करून कोणाचेही अडचण होऊ नये याची दक्षता प्रत्येकाने घेतले पाहिजे. त्यासाठी आपण निश्चितच प्रयत्न करणार असल्याची ग्वाही खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिली.
.

Labels:

शिव -बसव -राणा सार्वजनिक जन्मोत्सवाच्या अध्यक्षपदी संतोष पुदालेची निवड


शिव -बसव -राणा सार्वजनिक जन्मोत्सवाच्या अध्यक्षपदी संतोष पुदालेची निवड

नळदुर्ग,दि.२५: नेताजी महाबोले 

नळदुर्ग  शहरामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी  छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर महाराज व वीर महाराणा प्रतापसिंह महाराज यांची संयुक्त  सार्वजनिक  जयंती साजरी करण्यात येते.

 या अनुषंगाने  दि.24/02/2024 रोजी श्री मल्लिकार्जुन मंदिर येथे नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत नूतन कार्यकारिणीची निवड पुढीलप्रमाणे  करण्यात आली. 
 अध्यक्ष -  संतोष पुदाले, उपाध्यक्ष -  वैभव पाटील, प्रमोद कुलकर्णी, कोषाध्यक्ष शिवप्पा स्वामी व नवल जाधव , सचिव  शिवाजी गायकवाड, सहसचिव  राहुल जाधव, सांस्कृतिक प्रमुख  अमित शेंडगे , प्रवीण चव्हाण ,  नेताजी महाबोले व मिरवणूक प्रमुख मिरवणूक प्रमुख :- नितीन कासार, शरद बागल, अमृत पुदाले, सरदारसिंग ठाकूर, विनायक अहंकारी, बसवराज धरणे, सुधीर हजारें, प्रसिध्दी प्रमुख म्हणून नळदुर्ग शहरातील सर्व पत्रकाराची सर्वानुमते निवड करण्यात आली. 

या बैठकीला माजी नगराध्यक्ष नितिन कासार, माजी नगरसेवक शरद बागल, विनायक अंहकारी, सरदारसिंग ठाकूर, शाम कनकधर,लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा अध्यक्ष शिवाजी गायकवाड, नवल जाधव, प्रवीण चव्हाण, अक्षय भोई, दर्शन शेटगार, अक्षय दासकर, वीरेंद्र बेडगे, प्रसन्न कुलकर्णी, चंदर सगरे, प्रमोद कुलकर्णी, राहुल जाधव, आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Labels:

Monday, 24 February 2025

महात्मा गांधी विद्यालय, रावणकोळा येथे नवनियुक्त कर्मचाऱ्यांचा भव्य सत्कार सोहळा

महात्मा गांधी विद्यालय, रावणकोळा येथे नवनियुक्त कर्मचाऱ्यांचा भव्य सत्कार सोहळा

,मुरुम,दि.२४ :सुधीर पंचगल्ले

 जळकोट तालुक्यातील  रावणकोळा येथील महात्मा गांधी विद्यालय, रावणकोळा व संदीप वाघमारे यांच्या वतीने गावातील विविध क्षेत्रांत निवड झालेल्या नवनियुक्त कर्मचाऱ्यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.

सन्मानाचा सोहळा – मान्यवरांची उपस्थिती
अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष संग्रामजी वाघमारे, प्रमुख पाहुणे तहसीलदार राजेशजी लांडगे, गटविकास अधिकारी नरेंद्रजी मेडेवार व अरुणाताई सूर्यवंशी, सरपंच सत्यवान दळवे पाटील, भाजप तालुका अध्यक्ष सत्यवानजी पांडे, माजी सरपंच मंगेशजी हुंडेकर, युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष धनराज दळवे, विद्यालयाचे मुख्याध्यापक सोरगेकर एस.एम., मनोज जाधव व कृष्णराज वाघमारे उपस्थित होते.

नवनियुक्त कर्मचाऱ्यांचा जाहीर सत्कार
गावातील प्रतिष्ठित नागरिक, आजी-माजी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा त्यांच्या पालकांसह जाहीर सन्मान करण्यात आला. सन्मानित व्यक्ती – रमिज सय्यद,  लिपिक यशवंत सूर्यवंशी एस आर पी एफ , ऋषिकेश वाघमारे मुंबई पोलीस, राम वाघमारे आरोग्य सहाय्यक, सूर्यकला वाघमारे मुंबई पोलीस, सूर्यकांत वाघमारे राज्य परिवहन महामंडळ चालक, माजी विद्यार्थी व माजी कर्मचारी यांचा पण यावेळी सत्कार करण्यात आला प्रवीण वाघमारे महावितरण, उद्धव वाघमारे राज्य परिवहन महामंडळ, शिवराज जमदरे सहशिक्षक जिल्हा परिषद, 

संघर्ष, जिद्द आणि यशाच्या कथा
नवनियुक्त कर्मचाऱ्यांनी संघर्ष व यशाच्या आठवणी सांगून तरुणांना कठोर परिश्रम, सातत्य व जिद्दीचे महत्त्व पटवले. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना यशस्वी भविष्यासाठी प्रेरणादायी विचार मांडले.

विद्यालयाच्या उपक्रमाचे कौतुक
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन व्ही.आर. सूर्यवंशी यांनी केले व शंकरा डिजिटल फोटो स्टुडिओ यांनी सुंदर असा छायाचित्र केले. या भव्य सत्कार सोहळ्यामुळे रावणकोळा नगरीतील तरुणांना नवी प्रेरणा मिळाली, तसेच विद्यालयाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

यशाचा नवा प्रवास – नव्या ऊर्जा, नव्या दिशा
हा सोहळा केवळ सन्मानापुरता मर्यादित न राहता, तरुणांना मोठी स्वप्ने पाहण्यास आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रेरित करणारा ठरला. संघर्ष, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर सामान्य परिस्थितीतील विद्यार्थीही उच्च पदांवर पोहोचू शकतात, याचा प्रत्यय उपस्थितांना या सोहळ्यातून आला.

रावणकोळा नगरीतील युवकांमध्ये नव्या ऊर्जेचा संचार झाला असून, हा सत्कार सोहळा यशस्वी भविष्यासाठी नव्या दिशेची वाट दाखवणारा ठरला.

Labels:

आपल्यातले स्ट्रेंथ आणि विकनेस ओळखून यशाच्या आकाशात गरुड झेप घेता येते.: सिने अभिनेत्री सिमरन खेडकर

आपल्यातले स्ट्रेंथ आणि विकनेस ओळखून यशाच्या आकाशात गरुड झेप घेता येते.: सिने अभिनेत्री सिमरन खेडकर

 अणदुर,दि.२४: चंद्रकांत हागलगुंडे 

 स्वैराचार आणि स्वातंत्र्य घरातून विनाअट मिळणार सपोर्ट यामुळे स्वातंत्र्याचा पुरेपूर फायदा आपण घेतला कशाच्या बळावर? हे बाळकडू कसे प्राप्त झाले? या प्रश्नाला उत्तर देताना  सिने अभिनेत्री सिमरन खेडकर म्हणाल्या की ,जीवनात संघर्ष, स्पर्धा असेल तर खूप काही शिकता येतं .आपल्यातले स्ट्रेंथ आणि विकनेस ओळखून यशाच्या आकाशात उंच भरारी घेता येतं. घरात मिळालेल्या स्वातंत्र्याला  स्वैराचार समजून वागल्यास आपण दिशाहीन होतो .यशापासून कोसो दूर राहतो. आईने माझ्यावर केलेले संस्कार मला जीवनात उपयोगी पडले. कला, क्रीडा ,कथाकथन, नाट्य, वाचन, वादविवाद, हार्मोनियम, संगीत याचे बाळकडू मला मिळाले, छोट्या बायो ची मोठी स्वप्न ,वेल डन भाई, लॉकडाऊन 20-20 ,कोलंबस, अशोक मामा ,रुबाब यामध्ये मला मनापासून काम करता आले. आपणही करू शकता. तरुणाईला कानमंत्र देताना त्या म्हणाल्या, तरुणपणी चालक व्हा. सोयी प्राप्त करून घ्या. मोबाईल आणि कलर टीव्ही म्हणजे संसार नाही. असेही त्या म्हणाल्या.


जवाहर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय अणदूर ता.तुळजापूर येथे वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाले .या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून मुंबईच्या सिने अभिनेत्री सिमरन खेडकर उपस्थित राहून विद्यार्थ्यांना त्यांच्या  हस्ते  पारितोषिक प्रदान करण्यात आले.

 अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव रामचंद्र  आलुरे ,श्रीमती नीता खेडकर, डॉ. अशोक चिंचोले, प्राचार्य, गोपाळ कुलकर्णी, प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी ,उपप्राचार्य डॉ. मल्लिनाथ लंगडे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. अंकुश कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात कर्मयोगी संत गाडगेबाबा व शिक्षण महर्षी सि.ना अलुरे गुरुजी यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाले. मान्यवरांच्या स्वागतानंतर सिने अभिनेत्री सिमरन खेडकर यांचे प्रकट मुलाखत घेण्यात आले. 

डॉ.अनिता मुदकन्ना व डॉ. मल्लिनाथ बिराजदार यांनी मुलाखत घेतले. सिमरन खेडकर यांनी मुलाखतीला उत्तर देताना अभ्यासपूर्ण विचार मांडून संपूर्ण श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. अध्यक्षीय समारोप करताना रामचंद्र  म्हणाले की, जीवनात स्थिर होण्यासाठी एकच मार्ग निवडणे आवश्यक असते .ध्येय डोळ्यासमोर ठेवून कार्य केल्यास जीवनात आपण यशस्वी होऊ शकतो. आजचा युवक नेटच्या जाळ्यात अडकलेला आहे. कृत्रिम मशीन मध्ये जिथे गंध नाही, सुगंध नाही ,रस नाही अशावेळी पालकांनी पाल्यांना हाताळणे गरजेचे आहे. वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त काव्यवाचन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा ,मेहंदी स्पर्धा पारंपारिक वेशभूषा स्पर्धा ,क्रीडा स्पर्धा , शैक्षणिक क्षेत्रात यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. 

अहवाल वाचन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उमाकांत चनशेट्टी यांनी केले. आभार डॉ. प्रसन्न कंदले यांनी मानले. डॉ.सोमशंकर राजमाने, डॉ.उमाकांत सलगर, डॉ. सूर्यकांत आगलावे ,डॉ. राजशेखर नळगे ,डॉ. वीरभद्रेश्वर स्वामी, संतोष चौधरी , दिलीप चव्हाण , नामदेव काळे ,बसवंत बागडे,गणेश सर्जे, महादेव काकडे ,अमित आलुरे ,शुभांगी स्वामी यांचे सहकार्य लाभले .या कार्यक्रमास प्रतिष्ठित नागरिक, पालक ,पत्रकार, विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Labels:

शाळेचे ऋण कधीही फेडता येत नसतात - मनीषा पाटील

शाळेचे ऋण कधीही फेडता येत नसतात - मनीषा पाटील

अणदूर, दि.२४:चंद्रकांत हागलगुंडे 

आपण कितीही मोठे झालो तरीही ज्या शाळेमुळे आपण मोठे झालो त्या शाळेसाठी काहीतरी करण्याची जिद्द मनी बाळगणे ही फार मोठी गोष्ट असून नेमकी तीच गोष्ट, दत्तू आण्णा पाटील विद्यालयात शिकून गेलेल्या सन 2000ते 2001 या वर्षातील 10 वी च्या विद्यार्थ्यांनी  एक आदर्श निर्माण केला असून ,आपण कितीही मोठे झालो तरी ज्या शाळेने आपणास घडवले त्याचे ऋण कधीच फेडता येत नसतात असे प्रतिपादन तुळजापूर तालुक्याच्या माजी पंचायत समिती सभापती,तथा चिवरी येथील ज्ञानविकास शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा मनीषाताई पाटील यांनी व्यक्त केले.


त्या चिवरी येथील दत्तू पाटील (आण्णा)माध्यमिक विद्यालयात  सन 2000 ते  2001 या शैक्षणिक वर्षात शालांत प्रमाणपत्र परीक्षेत बसलेल्या म्हणजेच दहावी बॅच च्या 45 विद्यार्थ्यांनी आयोजित स्नेह बंध अर्थात (गेट-टुगेदर) या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पोपटराव पाटील, मुख्याध्यापीका लक्ष्मी बिराजदार संस्थेतील सर्व शिक्षकवर्ग उपस्थित होता,या वेळी 45 माजी विद्यार्थ्यांनी ही शाळा ग्रामीण भागातील तरुणांचे भविष्य घडवणारी असून आम्ही या शाळेसाठी काहीतरी मोठे करणार असल्याचे सांगितले,तसेच जुन्या आठवणींच्या स्मृतीला उजाळा देऊन भूतकाळातील आनंदाच्या क्षणांना पुन्हा एकदा अनुभवण्याचा क्षण साजरा करण्यासाठी स्नेह बंध अर्थात (गेट-टुगेदर) हा कार्यक्रम संपन्न केला,असल्याचे सांगितले.


 या वेळी शाळेतील शिक्षक.शिंदे एस .एम ,शिंदे एस.बी , मस्के एस.ए., सूर्यवंशी के . एस , ठाकूर के. पी .,श्रीमती ढगे एस. बी , शिंदे बी .बी, युवा प्रशिक्षणार्थी महेश सूर्यवंशी, घोडके पी एल ,सूर्यवंशी बी एल आदी शिक्षकांनी शाळेचे तास घेतले.
  या स्नेहबंध कार्यक्रमात अनेक वेगवेगळे मनोरंजनपर खेळ घेतले गेले त्या खेळात प्रथम येणाऱ्या खेळाडूस ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रम अतिशय आनंदात खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न करण्यासाठी राजकुमार भातागळे, विकास बलसुरे, सुरेश हिंगमिरे ,आनंद साखरे, भैय्या इंगळेअमोल बिराजदार, वैभव कोरे, रमा भुजबळ राहुल नगदे आण्णा काळे लक्ष्मण शिंदे गिरजाप्पा झांबरे यांनी विशेष प्रयत्न केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापिका अश्विनी लबडे याने केले तर सूत्रसंचालन प्राध्यापक संतोष पवार यांनी केले कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्वांचे आभार व्यक्त करण्याचे काम स्वाती सूर्यवंशी यांनी केले.

Labels:

Sunday, 23 February 2025

आदर्श जिल्हा परिषद शाळा अणदुरच्या वत्सलानगरचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

आदर्श जिल्हा परिषद शाळा वत्सलानगरचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात 

अणदूर, दि.२३: चंद्रकांत हागलगुंडे 

तुळजापूर तालुक्यातील  अणदूर येथील आदर्श जिल्हा परिषद शाळा वत्सलानगर या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन शुक्रवारी (दि.२१) रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले.संमेलनाचे उद्घाटन ज्याचे सरपंच रामचंद्र आलुरे व नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सरोदे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ए पी आय आनंद कांगुने,ग्रामपंचायत सदस्य धनराज मुळे, बालाजी घुगे, गणेश सूर्यवंशी,जयश्री व्हटकर, साहेबराव घुगे,सुजाता चव्हाण,मलंग शेख,उद्योजक लक्ष्मण चौगुले, संतोष मुळे, गौतम बनसोडे,आर एस गायकवाड,जावेद शेख,बी के कांबळे,चेअरमन सुनील सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पोवाडा ,लोकगीत ,लावणी ,भारुड, योगा डान्स, हिंदी मराठी रिमिक्स गाण्यावरती विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले तर बंजारा समाज नृत्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी तीनशे विद्यार्थ्यांनी या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग नोंदवला.

यावेळी बोलताना रामचंद्र आलुरे म्हणाले की, वत्सलानगर हा वस्तीचा भाग असला तरी अणदूर  गावापेक्षा मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक सुविधा या भागांमध्ये निर्माण झाले आहेत.या ठिकाणी काम करणाऱ्या सर्व शिक्षकांचा आपणास अभिमान असल्याचे सांगू पुढील काळात ग्रामपंचायतच्या वतीने शाळेस सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
    
शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा दराडे,सुभाष स्वामी,बाबुराव पांचाळ,भीमराव घोडके, वैशाली आडम शिवदास भागवत,दत्ता आरदवाड,विवेकानंद खलाटे,श्रीधर गिरी,पल्लवी लंगडे,गणेश नन्नवरे,वैजयंती बोंगरगे,काजल भालेराव यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सुरेखा दराडे यांनी.सूत्रसंचालन श्रीधर गिरी तर आभार शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोमनाथ लंगडे यांनी मानले.

नवोदय विद्यालय प्रवेश वर्ग,शिष्यवृत्ती जादा तासिका व इतर स्पर्धा परीक्षा या मध्ये तालुक्यातून सर्वाधिक विद्यार्थी निवड झाल्या बद्दल  जनसेवा मित्र मंडळ व न्यू इंडिया गणेश मंडळच्या वतीने सर्व शिक्षकांचा सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला.यावेळी ग्रामपंचायत सदस्या जयश्री व्हटकर,बाबू नदाफ,उस्मान नदाफ,संपत वाघे,प्रभाकर गाढवे,संतोष व्हटकर,संतोष चव्हाण,सुनील भोळे,शुभम गाढवे, श्रद्धा दुपारगुडे यांनी पुढाकार घेतला.

रेहान इलेक्ट्रीकल अँन्ड मोटार रिवायडिंग 
लोकमंगल बँके शेजारी नळदुर्ग 
फोन न. 9860222631
अलीम शेख

Labels:

महाशिवरात्री महोत्सव

नळदुर्ग: श्री रामतीर्थ देवस्थान येथे महाशिवरात्री निमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रमाचे लाभ घेण्याचे आवाहन ; महंत श्री विष्णु शर्मा महाराज 

नळदुर्ग,दि.२३:

महाशिवरात्री महोत्सवा निमित्त नळदुर्ग येथिल श्री क्षेत्र रामतीर्थ येथे बुधवार दि. २६ फेब्रुवारी रोजी भरगच्च विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी सकाळी सकाळी ८.३० वाजता संगीतमय महारुद्र अभिषेक होणार असुन संगीतमय रुद्राभिषेक  श्री उपेंद्र पांडे व मंडळी, हैद्राबाद (भाग्यनगर) यांच्या समवेत होईल.तसेच सकाळी ११ वाजता  शोभायात्रा, सकाळी १२.२० :  महाकाल महाआरती,दुपारी  १ वाजता महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.

संगीतमय रुद्राभिषेक मध्ये ज्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी  आपल्या नावाची नोंदणी करावी. त्यानंतर रुद्राभिषेकची नोंदणी घेण्यात येणार नाही व फक्त ३०१  भक्तानाच रुद्राभिषेक मध्ये सहभागी  होता येईल याची  नोंद घ्यावी व या पवित्र धर्मकार्यात आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन महंत श्री विष्णु शर्मा महाराज यांनी केले आहे.

 ज्या भक्तांनी पावती केली आहे, त्यांना विनंती की सोबत येताना पूजा ताट, पूजा कलश व पुजापळी घेवून येणे, बाकी पूजा साहित्य मंदिर देवस्थान तर्फे देण्यात येईल. संगीतमय रुद्राभिषेक देणगी पावती करीता श्री रामतीर्थ देवस्थान नळदुर्ग येथे संपर्क साधावा, ड्रेस कोड : पुरुष - पांढरे वस्त्र, स्त्रिया - लाल साडी असे परिधान करावे.

Labels:

संत निरंकारी मंडळाकडून मुरूमच्या जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या परिसराची स्वच्छता

संत निरंकारी मंडळाकडून मुरूमच्या जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या परिसराची स्वच्छता 

मुरुम, ता. उमरगा, दि. २३  : डॉ सुधीर पंचगल्ले 

संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन, दिल्ली व मुरुम शाखेकडून संत निरंकारी बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या ७१ व्या जन्मदिनाचे औचित्य साधून संपूर्ण जगात हा दिवस स्वच्छता मोहीम म्हणून साजरा केला जातो. सद्गुरु माता सुदिक्षा सविंदर हरदेवजी महाराज व निरंकारी राजपिता रमितजी यांच्या कृपा आशीर्वादाने रविवारी (ता.२३) रोजी स्वच्छ चल स्वच्छ मन मोहिमेअंतर्गत जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.


 या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुरूम रोटरी क्लबच्या डॉ. सुवर्णा पाटील होत्या. यावेळी रोटरीचे माजी अध्यक्ष डॉ. नितीन डागा, महाराष्ट्र पत्रकार संघाचे विभागीय उपाध्यक्ष प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले, बालाजी व्हनाजे, मुख्याध्यापिका अलका गायकवाड,  नळदुर्गचे राजेंद्र पोतदार, प्रा. डॉ. महेश मोटे आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी कल्लेश्वर पांचाळ, रमेश मिणीयार, तुकाराम शेवाळे, सुरेश कोळी, सुधाकर नारायणकर, हनुमंत पोतदार, प्रा. त्रिंबक व्हटकर, दगडू दिक्षीवंत, लक्ष्मण राठोड, हणमंत मंडले, राजेंद्र सुपेकर, ग्यानप्रकाश यादव, किशोर चव्हाण, परमेश्वर जाधव, महादेव देडे, अमोल कटके आदींनी पुढाकार घेतला. शाळेच्या आतील व बाहेरील परिसरातील झाडे-झुडपे तोडून स्वच्छता सेवादल बिरु बंदीछोडे, दत्ता बोडरे, गुंडेराव चौगुले, प्रमोद नारायणकर, शिवाजी राठोड, विष्णू पवार, बालाजी कसबे, बसवराज बिराजदार, योगेश भोकले, शुभम कोकणे, दयानंद व्हनाळे, प्रसाद सुपेकर, व्‍यंकट  इगवे तर सेवादल बहिणजी अनुसया नारायणकर, अनिता देडे, गुरुदेव बोडरे, मंगल बनसोडे, भाग्यश्री घोडके, श्रध्दा साखरे आदिंनी घनकचरा, गवत, झाडांना आळे, पाणी घालून परिसर स्वच्छ केला. उषा साखरे, मंगल घोडके, सुनिता व्हटकर, अश्विनी पांचाळ, मुक्ताबाई कोळी, भारत बेगमपुरे, बालिका बनसोडे, जयश्री सोनवणे आदिंनी स्वच्छता फलकाचा प्रचार करून स्वच्छतेचा संदेश दिला. कमल शेवाळे यांच्या गीताने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी नितीन डागा  यांनी मनोगत व्यक्त करताना ग्राम स्वच्छतेचे जनक संत गाडगे महाराजांची जयंती व बाबा हरदेवसिंग महाराजांचा जन्मदिवस हा अतिशय योगायोग आहे. संत निरंकारी मंडळाचे स्वच्छता अभियान ही केवळ एक मोहीम नसून समाजसेवेचे आणि नैतिकतेचे एक उत्तम उदाहरणच आहे. गेल्या अनेक वर्षापासून हे स्वच्छता अभियान निरंतर व अखंडपणे चालू असल्याचे समाधान त्यांनी शेवटी व्यक्त केले. अध्यक्षीय समारोपात सुवर्णा पाटील म्हणाल्या की, माणसाला आतून व बाहेरून मानसिक, आत्मिक समाधान देणारा हा उपक्रम आहे. तरुणांना सामाजिक बांधिलकीची जाणीव व्हावी, शहर व परिसर स्वच्छ व्हावा, हा या अभियानाचा खरा उद्देश आहे. 

या उपक्रमामुळे पर्यावरण रक्षण, जनजागृती आणि सामाजिक ऐक्य वृद्धिंगत होत असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. या अभियानाचे प्रास्ताविकपर मनोगत निरंकारी मंडळाचे मुखी दयानंद साखरे यांनी केले. सूत्रसंचलन डॉ. महेश मोटे तर आभार मीरा मोटे यांनी मानले. शहर व परिसरातील बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.    

फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील संत निरंकारी मंडळाकडून जिल्हा परिषद कन्या प्रशालेचा परिसर स्वच्छ करताना पुरुष व माता भगिनी.

Labels:

रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवचरित्र हे माणसाला सर्वांग सुंदर जिवन जगण्याला प्रेरणा देते : भैरवनाथ कानडे

रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवचरित्र हे माणसाला सर्वांग सुंदर जिवन जगण्याला प्रेरणा देते : भैरवनाथ कानडे 

वागदरी ( एस. के.गायकवाड):
मातृभूमीची परकीय अमलापासून मुक्तता,म्हणजेच हिंदवी स्वराज्याची स्थापना हे शिवछत्रपतींचे जीवनकार्य होते. या कार्यासाठी त्यांनी  अविरत कष्ट घेतले. स्वराज्याच्या उभारणीबरोबर त्यांनी त्यांचे अत्यंत कार्यक्षम व लोकाभिमुख असे प्रशासन निर्माण केले . त्यांची कामगिरी त्यांच्या लष्करी पराक्रमांइतकीच महत्त्वाची आहे. सामान्य  माणसाचे,गोरगरीब रयतेचे कल्याण व संरक्षण हे त्यांच्या प्रशासनाचे मुख्य सूत्र असल्याने लोककल्याणकारी राजे म्हणून जगभरात त्यांची प्रतिमा निर्माण झाली.मराठयांचे एकीकरण करून त्यांच्यामध्ये स्वातंत्र्याची अभिलाषा उत्पन्न करणे, याशिवाय समाजात  राष्ट्रीयत्वाची भावना जोपासणे याचा संदेश आपणास शिवचरित्रातून मिळतो.तेव्हा शिवप्रभुंच्या विचार कार्यावरच आमच्या राष्ट्राचे भवितव्य अवलंबून असून शिवचरित्र हे आमच्या सर्वांग सुंदर जगण्याची प्रेरणा आहे.असे मत भैरवनाथ कानडे यांनी व्यक्त केले .

तुळजापूर तालुक्यातील वागदरी येथे शिव-बसव-राणा व काशिबा महाराज जन्मोत्सव मंडळ वागदरीच्या वतीने आयोजित शिवसप्ताहाच्या प्रसंगी ' "शिवचरित्र जगण्याची प्रेरणा" या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ कार्यकर्ते भालचंद्र यादव हे हाते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डॉ.गणेश बिराजदार,तंटा मुक्त अध्यक्ष तथा माजी सरपंच राजकुमार पवार आदी होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर, महाराणा प्रतापसिंग,व संत काशिबा महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करू आभिवादन करन्यात आले. 
 या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्र संचलन अँड. अमोल पाटील यानी केले.
    
यावेळी जेष्ठ कार्यकर्ते फतेसिंग  ठाकूर, माजी उपसरपंच दत्ता सुरवसे,उत्तम झेंडारे, रिपाइं (आठवले) जिल्हा समन्वयक एस.के. गायकवाड,नामदेव यादव, पांडू बिराजदार, जन्मोत्सव मंडळाचे प्रमोद बिराजदार,श्रीकार धुमाळ भगतसिंग ठाकूर, सह ग्रामस्था,महिला, यूवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Labels:

Saturday, 22 February 2025

शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून युवकानी वाटचाल करावी डॉ. शेटे

शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून युवकानी वाटचाल करावी डॉ. शेटे
जवाहर महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन जल्लोषात उद्घाटन 

अणदूर,दि.२२: चंद्रकांत हागलगुंडे 

दिनांक 22 फेब्रुवारी 2025 रोजी वार्षिक स्नेहसंमेलनाचे जल्लोषात शिवचरित्रकार ,शिवव्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव रामचंद्र दादा आलुरे डॉ. अशोक चिंचोले ,माणिक आलुरे प्राचार्य डॉ.उमाकांत चनशेट्टी, उपप्राचार्य डॉ.मल्लिनाथ लंगडे यांच्या उपस्थितीत संस्थेचे संस्थापक सचिव शिक्षण महर्षी सि.ना . आलुरे गुरुजी यांच्या प्रतिमेच्या पूजनाने व दिपप्रजलित करून उद्घाटन करण्यात आले.

 उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना,डॉ. शेटे म्हणाले की, राष्ट्रबांधणी युवकच करू शकतात. छ. शिवरायांचे आदर्श समोर ठेवून युवकांनी व्यसनमुक्त राहून अनेक क्षेत्र पादा क्रांत केले पाहिजे. जगातील सर्वात श्रेष्ठ जागा म्हणजे आई-वडिलांचे चरण आहेत .राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊंनी मांडीचे सिंहासन करून बाल शिवबाला रामायण महाभारताचे गोष्टी सांगितले, संस्कार केले .पुढे चलून 32 मण सोन्याच्या सिंहासनावर शिवरायांचे शिवराज्याभिषेक करण्यात आले. अध्यक्षीय समारोप रामचंद्र आलुरे यांनी केले. या उद्घाटन समारंभास पालक, प्रतिष्ठित नागरिक, सेवानिवृत्त मुख्याध्यापक ,शिक्षक माजी विद्यार्थी पत्रकार बांधव पंचक्रोशीतील मान्यवर व महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक ,शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मल्लिनाथ बिराजदार यांनी व आभार डॉ. राजशेखर नळगे यांनी मानले.

Labels:

६ एप्रिलच्या सावंतवाडी येथे होणाऱ्या डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या तिसऱ्या महाअधिवेशनास सहकार्य करणार

६ एप्रिलच्या सावंतवाडी येथे होणाऱ्या डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या तिसऱ्या महाअधिवेशनास सहकार्य  करणार

सावंतवाडी,दि.२२ :


माजी शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांची ग्वाही
मुंबई,दि:-  डिजिटल पत्रकारांच्या चळवळीला सदैव पाठबळ देणाऱ्या माजी शिक्षणमंत्री व सावंतवाडीचे आमदार दिपक केसरकर यांनी डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या दि.६एप्रिल २०२५ रोजी सावंतवाडी (सिंधुदुर्ग -कोकण)येथील भोसले नॉलेज सिटी येथे होत असलेल्या तिसऱ्या महाअधिवेशनास सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी मुंबईत दिपक केसरकर यांची भेट घेऊन अधिवेशनाचे रितसर निमंत्रण दिले.यावेळी माने यांच्या समवेत कुंदन हुलावळे हे होते.
अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हस्ते होणार आहे.संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने  मुख्यमंत्री फडणवीस यांना अधिवेशनाचे निमंत्रण यापूर्वीच दिलेले आहे.देण्यासाठी भेट घेतली.

सावंतवाडी येथील महाअधिवेशनाचे स्वागताध्यक्षपद सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी तर सहस्वागताध्यक्षपद भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत भोसलें यांनी स्वीकारले आहे.अधिवेशनाचे सन्माननीय मार्गदर्शक म्हणून माजी शिक्षणमंत्री आ.दिपक केसरकर आहेत.या अधिवेशनाचे निमंत्रण माजी मुख्यमंत्री खा.नारायण राणे,राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि आ.निलेश राणे यांनी स्वीकारलेले आहे.अधिवेशनाचे संयोजन समितीचे प्रमुख म्हणून संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष सागर चव्हाण व सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष पारकर हे कार्यरत आहेत.अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी विविध व्यापक समित्या गठित होत असून कोकणातील विविध क्षेत्रातील मान्यवर व मंत्र्यांना निमंत्रित केले जाणार आहे.आज राजा माने व यांनी संघटनेची आजवरची वाटचाल व सावंतवाडी येथे होणाऱ्या महाअधिवेशनाच्या कार्यक्रमांची माहिती आ.दिपक केसरकर यांना दिली.अधिवेशनात सहभागी होवून ते यशस्वी करण्यासाठी संपूर्ण सहकार्य करण्याची ग्वाहीही आ.केसरकर यांनी दिली.

Labels:

विद्यार्थ्यांनी व्यसनापासून व मोबाईलपासून दुर राहाण्याचे प्राचार्य डॉ सुभाष राठोड यांचे आवाहन

विद्यार्थ्यांनी व्यसनापासून व मोबाईलपासून दुर राहाण्याचे प्राचार्य डॉ सुभाष राठोड यांचे आवाहन 


नळदुर्ग,दि.२२:

यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी व्यसनापासून व मोबाईलपासून दुर राहावे, त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत सहभागी व्हावे, अभ्यासाकडे दुर्लक्ष करु नये, असे आवाहन प्राचार्य डॉ. सुभाष राठोड यांनी विद्यार्थ्यांना केले.
नळदुर्ग येथील अंजनी प्रशालेत वार्षिक स्नेहसंमेलन व मान्यवरांचा सत्कार आयोजित करण्यात आले होते.. यावेळी अध्यक्षयी समारोपा प्रसंगी कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष राठोड हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.

कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक सतीश पाटील हे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार शिवाजी नाईक, खालेद इनामदार, निवृत्त मुख्याध्यापक प्रदीप कदम, कल्पना गायकवाड आदीजण उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या कविता, लेख, काव्य हस्तलिखित "अंजनीचे" प्रकाशान डॉ. सुहासिनी विवेक मुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त प्रा.डॉ. जयश्री घोडके यांचा सत्कार करण्यात आला. तर लोकसेवा आयोग मधून महसुल सहाय्यक पदी निवड झालेल्या  शाळेची माजी विद्यार्थीनी सौ. शुभांगी सचिन गायकवाड-कदम याचा गौरव करण्यात आला.यावेळी विद्यार्थ्यांनी आकर्षक नृत्यसह विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. त्यास उपस्थिततानी दाद दिली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका ठोकळ व्ही.एन, सहशिक्षक राठोड बी.पी, शिंदे आर.एम., चव्हाण,एस.एस, दासकर सुजाता,  के.बी.काळे, एम.पी पांचाळ, सचिन कांबळे, खाटमोडे डी.एम., रणशुर बी.पी., दिपक हुलगे आदीनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभद्रा मुळे यांनी तर सुत्रसंचालन जितेंद्र मोरखंडीकर यांनी केले. आभार व्ही.एन.ठोकळ यांनी मानले.

Labels:

Friday, 21 February 2025

वागदरी येथे शिव जन्मोउत्सवा निमित्त शिव सप्ताहाचे आयोजन

वागदरी येथे शिव जन्मोउत्सवा निमित्त शिव सप्ताहाचे आयोजन

वागदरी,दि.२१: एस.के. गायकवाड 

वागदरी ता.तुळजापूर येथे शिव-बसव-राणा व संत काशिबा महाराज जन्मोत्सव मंडळच्या वतीने शिव जयंती निमित्ताने शिव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून भागवताचार्य ह.भ.प.मधुकर नांदरे महाराज यांच्या शुभ हस्ते प्रतिमा पुजन करून या शिव सप्ताहाची सुरुवात करण्यात आाली आहे. 


शिव-बसव-राणा व काशिबा महाराज जन्मोत्सव मंडळ वागदरी ता.तुळजापूरच्या वतीने वागदरी येथे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा बसवेश्वर,महाराणा प्रतापसिंग व संत काशिबा महाराज यांचा संयूक्त जन्मोत्सव दरवर्षी विविध उपक्रमाने व मोठया उत्साहाने सजरा केला जातो.या निमित्ताने शिव सप्ताहाचे आयोजन केले जाते. प्रति वर्षाप्रमाने याही वर्षी शिव जयंतीचे औचित्य साधून दि.१९ ते २५ फेब्रूवारी २०२५ दरम्यान जन्मोत्सव मंडळाच्या वतीने शिव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असू ह.भ.प. मधुकर नांदरे महाराज यांच्या हस्ते तर ह.भ.प. राजकुमार पाटील, सेवा निव्रात स.पो.नि. राजेंद्र पाटील,माजी सरपंच तथा तंटा मुक्त अध्यक्ष राजकुमार पवार,पत्रकार किशोर धुमाळ, माजी उपसरपंच दत्ता सुरवसे, ग्रा.प.सदस्य अमोल पवार, शशिकांत बिरातदारसह समस्त ग्रामस्थांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा बसवेश्वर, महाराणा प्रतापसिंग व संत काशिबा महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करून या शिव सप्ताहाची सुरुवात करण्यात आली.

या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिर, व्याख्यान, विविध गुणदर्शन, सामान्य ज्ञान स्पर्धा, महिलासाठी कार्यक्रम आदी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात अले असून दि.२५ फेब्रूवारी रोगी भव्य मिरवणूकीने या शिव सप्ताहाची सांगता करण्यात येणार आहे.
  तरी सर्व ग्रामस्थ,महीला, विद्यार्थी व यूवा कार्यकर्ते यानी मोठया संख्येने या शिव सप्ताह मध्ये सहभागी होऊन हा शिव सप्ताह यशस्वी करावा असे नम्र आवहान जन्मोत्सव मंडळाचे अधक्ष श्रीकार धुमाळ,उपाध्यक्ष नितीन यादव,कार्याध्यक्ष शामसिंग चव्हाण,सचिव भगतसिंग ठाकूर,नागेश बिराजदार, रमेश पवार,रामसिंग चव्हाण,बालाजी बिराजदार आदीने केले आहे

Labels:

नळदुर्ग शहर विकास आराखडा मंजुरीसाठी पालकमंत्र्यांना निवेदन

नळदुर्ग शहर विकास आराखडा मंजुरीसाठी पालकमंत्र्यांना निवेदन

नळदुर्ग,दि.२१:

नळदुर्ग शहर विकास आराखडा अंतीम मंजुरी करिता मंत्रालयात गेल्या दिड वर्षांपुर्वी पासून रखडत पडले असुन याप्रकरणी शिफारस करुन ते निकाली काढण्याबाबत भारतीय जनता पार्टीच्यावतीने धाराशिव जिल्ह्याचे  पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक नळदुर्ग येथे आले असता निवेदन देण्यात आले आहे.
   
 
नळदुर्ग (ता.तुळजापूर जि.धाराशिव) येथील नगरपरिषदेने नळदुर्ग शहर विकास आराखडा अंतिम मंजुरीसाठी सन 2023-2024 साली मंत्रालय येथे पाठविले आहे. तरी मेहरबान साहेबांनी या प्रकरणी लक्ष घालुन मंजुरीसाठी शिफारस करावी असे निवेदनाव्दारे भाजपचे शहराध्यक्ष धिमाजी घुगे यांनी मागणी केली आहे.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे ,  सुशांत भूमकर, उदय जगदाळे, निरंजन राठोड, मुद्दसर शेख, पद्माकर घोडके, उमेश नाईक, रियाज शेख, सागर हजारे, बंडू पुदाले, शशिकांत पुदाले, बबन चौधरी, आदीसह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Labels: