Wednesday, 31 July 2013

विदर्भातील अतिवृष्टीच्या विषयावर चर्चा

विधानसभा समालोचन
    विधानसभेच्या आजच्या कामकाजात विदर्भातील अतिवृष्टीच्या विषयावर झालेली चर्चा,प्रश्नोत्तरे इत्यादी कामकाज झाले. विदर्भातील अतिवृष्टीच्या विषयावर दोन्ही बाजूच्या सदस्यांनी राज्य सरकारला धारेवर धरले हेच आजच्या कामकाजाचे वैशिष्ट्य होते.
    कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय मागासवर्गीय वसतिगृहातील गृहपालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या अटक प्रकरणी सुजीत मिनचेकर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी सदर आरोपीला निलंबित केल्याचे सांगितले. अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिका-याची बदली करून एका महिन्यात चौकशी करण्याचे आदेश देण्याची घोषणा गृहमंत्री पाटील यांनी प्रा राम शिंदे याच्या प्रश्नाला उत्तर देताना दिली. निविदा प्रक्रियेत फेरफार केल्याबाबतच्या शिंदे यांच्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. मुंबई, ठाणे,नवी मुंबई या ठिकाणी उड्डाणपुलाखाली असलेल्या वाहनतळांबाबतच्या नितीन सरदेसाई आणि इतर सदस्यांच्या प्रश्नाला सार्वजनिक बांधकाम मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी दिलेल्या उत्तराने सदस्यांचे समाधान झाले नाही त्यावेळी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी प्रश्न राखून ठेवला. राज्यातील आय.पी.एस. पोलीस अधिकारी सरकारी कोट्यातील घरे घेतल्याबाबत संजय गावंडे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना गृहमंत्री आर आर पाटील यांनी ज्या अधिका-यांनी नियमबाह्य वर्तंन केल्याचे आढळून आल्यास कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
    प्रश्नोत्तरांच्या कामकाजानंतर सदनात कागदपत्रे पटलावर ठेवण्याचे कामकाज पुकारण्यात आले त्यावेळी संसदीय कामकाजमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आश्वासन समितीच्या गेल्या बावीस वर्षातील अहवाल सादर केल्याने त्यावर विरोधी बाजूच्या सदस्यांनी आक्षेप घेतला. त्यावेळी दोन्ही बाजूच्या सदस्यांनी याबाबत गंभीर मुद्दे उपास्थित केले. अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी मंत्री आणि सचिवांनी याबाबत लक्ष द्यावे अशी सूचना अध्यक्षानी केली.
    राज्यातील मराठवाडा, कोकण विशेषत: विदर्भातील अतिवृष्टीच्या विषयावर विजय वडेट्टीवार आणि इतर सदस्यांच्या प्रस्तावावर घणाघाती चर्चा झाली. चर्चेला सुरूवात करताना वडेट्टीवार यांनी ६६९ गावे बाधित झाल्याची माहिती दिली. पन्नास टक्केची अट न लावता हेक्टरी सरसकट २५ हजार रुपये देण्याची मागणी त्यांनी केली. मालगुजारी तलांवांच्या दुरूस्ती करिता दरवर्षी दोनशे कोटी रूपये देण्याची मागणी त्यानी केली. नाना पटोळे, यशोमती ठाकूर, सुधीर मुनगंटीवार, आशिष जयस्वाल,अनिल बोंडे, गोपाळदास अगरवाल, विरेंद्र जगताप आदी सदस्यांनी या चर्चेत ओला दुष्काळ जाहिर करण्याची मागणी केली. मदत आणि पुनर्वसन मंत्री डॉ पतंगराव कदम यांनी चर्चा सुरु असताना मध्येच अध्यक्षांच्या अनुमतीने सदनाबाहेर जाण्याची परवानगी मागितली त्यावेळी सदनात केवळएकच कँबिनेट मंत्री हजर असल्याने विरोधी तसेच सत्ताधारी सदस्यानी आक्षेप घेतल्याने कामकाज दहा मिनीटे तहकूब करावे लागले. हे समालोचन लिहून पूर्ण होत असताना सदनात अतिवृष्टीची चर्चा सुरू होती.
 
किशोर आपटे

Labels:

कोल्हापुरातील 6666 शालेय मुली साकारणार भरतनाट्यम

कोल्हापूर -: कोल्हापुरातील 6666 शाळकरी मुली एकाच वेळी भव्य सामूहिक भरतनाट्यमचा आविष्कार घडवणार आहेत. जानेवारी महिन्यात आयोजित या उपक्रमाचा संकल्प दि. 6 ऑगस्ट रोजी नृत्यगुरू पंडित टी. रवींद्र यांच्या उपस्थितीत होणार आहे. या उपक्रमाच्या संयोजिका संयोगिता पाटील, सरला पाटील, शोभा पाटील व संजय भिडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
    संयोगिता पाटील यांनी याआधी 13 व 66 तास नृत्य केले होते. याचाच पुढचा टप्पा म्हणून सामूहिक भरतनाट्यम आयोजित करण्यात येणार आहे. 10 वर्षांखालील शाळकरी मुलींना या उपक्रमामध्ये सहभागी करून घेतले जाणार असून त्यांना भरतनाट्यमचा इतिहास, पद्धत, वेशभूषा, केशभूषा, घुंगरू बांधणे याबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
    या उपक्रमाची नोंद गिनीज  बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यासाठीचे नियोजन करण्यात येणार आहे. याआधी मुंबई येथे 4428 व तैवान येथे 3300 मुलींच्या सामूहिक नृत्याचा कार्यक्रम झाला आहे. या कार्यक्रमासाठी सहभागी होणा-या मुलींकडून काही शुल्क आकारले जाणार असून त्यांना वेशभूषा व मेकअपचे 4000 रुपयांचे किट पुरवण्यात येणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

* सौजन्य दिव्यमराठी

Labels:

बुधवारी महसूल दिनानिमित्त कुंथलगिरी येथे कार्यक्रम

उस्मानाबाद :- बारावा वा महसूल दिन समारोह व उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी तसेच गुणवंत पाल्यांचा सत्कार सोहळा दि. 1 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे यांच्या अध्यक्षतेखाली  सकाळी 11 वाजता श्री दिगंबर जैन सिध्दक्षेत्र, कुंथलगिरी ता. भूम येथे आयोजित करण्यात आला आहे.
     या कार्यक्रमास जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  एस.एल. हरिदास, अपर जिल्हाधिकारी  राम मिरासे  यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
       या कार्यक्रमास संबधितांनी बहूसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा महसूल अधिकारी संघटना, जिल्हा महसूल कर्मचारी संघटना, जिल्हा तलाठी संघटना, जिल्हा वाहन चालक संघटना, जिल्हा कोतवाल संघटना व जिल्हा चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेतर्फे करण्यात आले आहे.

Labels:

जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेस शनिवारी प्रारंभ

उस्मानाबाद :- उस्मानाबाद जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा-2013 चे उदघाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शशिकांत कुलकर्णी यांच्या हस्ते शनिवार, दि. 3 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5-30 वा. पोलीस मुख्यालय, उस्मानाबाद येथे होणार आहे.

Labels:

शेषनारायण देवडकर यांचे निधन

शेषनारायण देवडकर
मुंबई :- राज्याच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाचे सहसंचालक शेषनारायण ग्यानदेव देवडकर (वय 52 वर्ष)  यांचे दि. 29 जुलै रोजी पुणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले.  त्यांच्यावर पुणे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यामागे आई-वडिल, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.
      बीड जिल्हयातील आडगाव येथील ग्रामीण सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या देवडकर यांनी एम.ई(इलेक्ट्रॉनिक्स) पर्यंतचे शिक्षण घेतले होते.  वारकरी संप्रदायातील घराण्याची कौटुंबिक पार्श्वभूमी असल्याने त्यांना तत्वज्ञानाची विशेष रुची होती.  पूर्णवादाचे प्रणेते पारनेरकर महाराजांचे ते शिष्य होते. प्रांरभी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये व्याख्याता म्हणून अध्यापनाचे कार्य केल्यानंतर ते शासनाच्या उद्योग विभागात रुजू झाले. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली होती.  1998 मध्ये व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागात उपसंचालक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. नाशिक व पुणे विभागात सेवा केल्यानंतर ते सध्या मुंबईत कार्यरत होते. या विभागाच्या प्रभारी संचालकपदाची धुराही त्यांनी दोन वर्षे यशस्वीपणे सांभाळली होती. अतिशय बुध्दिमान, कर्तबगार व शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांचा प्रशासकीय वर्तुळात लौकिक होता.  त्यांच्या निधनाने एक उत्तम प्रशासक गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.             

Labels:

मिलींद दीक्षित यांचे निधन

मिलींद दीक्षित
बार्शी -: येथील वृत्तपत्र विक्रेते मिलींद श्रीपाद दीक्षित (वय 51) यांचे हदयविकाराच्या तीव्र झटक्याने रविवार रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे. सोलापूर येथील एस.टी.बुक स्टॉलच्या माध्यमातून त्यांनी वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय सुरु केला होता. सध्या ते बार्शी येथे वास्तव्यास होते. त्यांच्यावर येथील वैकुंठ स्मशानभूमीत सोमवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
   

Labels:

बैलाच्या हल्ल्यात शेतकरी ठार; अणदूर शिवारातील घटना

नळदुर्ग -: अणदूर (ता. तुळजापूर) शिवारातील एका शेतात बैलाच्या हल्ल्यात शेतकरी ठार झाल्याची घटना मंगळवार रोजी घडली. याप्रकरणी नळदुर्ग पोलिसात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
    श्रीशैल्य मारुती दळवे (वय ४५, रा. अणदूर, ता. तुळजापूर) असे बैलाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शेतक-याचे नाव आहे. यातील श्रीशैल्य दळवे हे मंगळवारी दुपारी शेतातून घराकडे येत होते. त्यावेळी अंतर्गत रस्त्यावर त्यांना बैलाने पोटात शिंग मारले. यामुळे दळवी हे रस्त्यावर बेशुद्ध पडले होते. अणदूर येथील प्रा. आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तेथे पोहचण्यापूर्वीच श्रीशैल्य दळवी यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी प्रा. आ.केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सिकरकर यांनी दिलेल्या माहितीवरुन पोलिसांत अकस्मात मृत्यू म्हणून नोंद झाली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Labels:

खाजगी व पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्याना आवाहन

उस्मानाबाद :- सप्टेंबर/ऑक्टोबर मध्ये राजय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे औरंगाबाद व लातूर विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र  (इ. 12 वी)  परीक्षेस पुनर्परीक्षार्थी ,नाव नेांदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार येाजनेअंर्तत प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याच्या तारेखत कांही तांत्रिक कारणास्तव बदल करण्यात आला आहे.
          विद्यार्थ्यांनी शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामार्फत ऑनलाईन पध्दतीने विहीत शुल्कासह आवेदनपत्रे सादर करण्याचा तारीख बुधवार, दि. 31 जुलैपर्यंत असून विलंब शुल्कासह  6 ऑगस्ट ही आहे, दि. 3 ऑगस्टपर्यंत शाळा/कनिष्ठ महाविद्यालयाने परीक्षा शुल्क भरणे व चलनाची माहिती अपलोड करणे अपेक्षित असून  विलंब परिक्षा शुल्क भरणे व अपलोड करणे यासाठी दि. 7 ते   10 ऑगस्ट ही मुदत आहे.
          विद्यार्थ्यांनी  आवेदनपत्र भरण्यासाठी संबंधित शाळा/ महाविद्यालय यांच्याशी संपर्क साधावा.  सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरुनही ऑनलाईन आवेदनपत्र भरावीत, असे मंडळाच्या सचिवांनी  पत्रकाव्दारे कळविले आहे.

Labels:

जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धा तारखेत बदल

उस्मानाबाद -: प्राचार्य, मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक, खेळाडूंना सूचित करण्यात येते की. उस्मानाबाद येथे  (14, 17 व 19 ) वर्षाखालील मुले व मुलींच्या जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो  स्पर्धा 16 व 17 सप्टेंबर रोजी घेण्यात येणार होती. आता या स्पर्धेच्या तारखेत तांत्रिक कारणास्तव  बदल करण्यात आला आहे. आता ही स्पर्धा 5 व 6 ऑगस्ट रोजी श्रीतुळजाभवानी जिल्हा स्टेडियम,उस्मानाबाद  येथे घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी संजीव कुलकर्णी  यांनी दिली. या बदलाची नोंद  संबंधितांनी घेवून आपला संघ वेळेवर  पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
                                                    
जिल्हास्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धा तारखेत बदल 
उस्मानाबाद -: प्राचार्य, मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक, खेळाडूंना सूचित करण्यात येते की. उस्मानाबाद येथे  (14, 17 व 19 ) वर्षाखालील मुले व मुलींच्या जिल्हास्तरीय शालेय सॉफटबॉल स्पर्धा 2 व 3 सप्टेंबर रोजी घेण्यात येणार होती. परंतु आता या स्पर्धेच्या तारखेत कांही तांत्रिक कारणास्तव  बदल करण्यात आला आहे. आता या स्पर्धा 7 व 8 ऑगस्ट रोजी श्रीतुळजाभवानी जिल्हा स्टेडियम,उस्मानाबाद  येथे घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी संजीव कुलकर्णी  यांनी दिली. या बदलाची नोंद  संबंधितांनी घेवून आपला संघ वेळेवर  पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
        तसेच लातूर विभागीय सॉफ्टबॉल स्पर्धा दि. 12 ऑगस्टला मुलांची व 13 ऑगस्ट रोजी मुलींची स्पर्धा तालुकाक्रीडा संकुल,तुळजापूर येथे आयोजित करण्यात आली आहे. या बदलाची नोंद घेवून आपला संघ वेळेवर पाठविण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

Labels:

नाशिकच्या पाच अभियंत्यांना उस्मानाबाद प्रशासनाची आदरांजली

उस्मानाबाद :- नाशिक जिल्ह्यात बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम पाहताना मृत्युमुखी पडलेल्या पाच  अभियंत्यांना आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आदरांजली वाहण्यात  आली. जिल्हाधिकारी डॉ.के.एम. नागरगोजे यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपजिल्हाधिकारी ‍शिल्पा करमरकर, महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री.पापडकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक धाकतोडे, उपविभागीय अधिकारी प्रशांत सुर्यवंशी, तहसीलदार सुभाष काकडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.                                                 

Labels:

ईटकुर प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकामाबाबत आवाहन

उस्मानाबाद :- कळंब तालुक्यातील ईटकुर प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकामाची ई- निवीदा प्रसिध्द झाली असून  त्यात कंत्राटदाराचा वर्ग 4 अ नमूद करण्यात आला आहे. तथापी वर्ग 4 अ कंत्राटदार हे सदर ई- निविदेसाठी पात्र ठरत नाही. तरी सदरील कामासाठी वर्ग 4 व त्यावरील कंत्राटदार पात्र आहेत व वर्ग 4 अ कंत्राटदारांची निविदा अपात्र राहील, याची संबंधिक कंत्राटदारांनी नेांद घ्यावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता, (बांधकाम), जिल्हा परिषद, उस्मानाबाद  यांनी  केले आहे.     

Labels:

Monday, 29 July 2013

अहमदनगर जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांची कामे तातडीने मार्गी लावा -: दिलीप सोपल

मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील विविध पाणीपुरवठा योजनांची प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावण्यात यावीत. प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मान्यता, निधीची उपलब्धता आदी कारणास्तव योजना रेंगाळल्या असल्यास संबंधीत अधिकाऱ्यांनी याबाबत पाठपुरावा करुन योजना गतिमान कराव्यात, असे निर्देश पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री दिलीप सोपल यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना दिले. 
        सोपल यांच्या प्रमुख उपस्थितीत आज त्यांच्या मंत्रालयीन दालनात याबाबत बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. कृषीमंत्री  राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या विनंतीवरुन ही बैठक बोलविण्यात आली होती. बैठकीस आमदार चंद्रशेखर घुले-पाटील, शेवगाव पंचायत समिती सभापती अरुण लांडे-पाटील, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता डॉ. हेमंत लांडगे, अहमदनगरचे कार्यकारी अभियंता जी. बी. सागू आदी मान्यवर उपस्थित होते. 
       दुष्काळी परिस्थिती संपली असली तरी अहमदनगर जिल्ह्यातील काही गावांना अजुनही टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. अहमदनगर जिल्हा कायमचा टँकरमुक्त करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांची प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावणे गरजेचे आहे. काही योजनांची कामे सध्या सुरु आहेत तर काही योजना या प्रशासकीय, तांत्रिक किंवा इतर प्रकारच्या मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत. संबंधीत अधिकाऱ्यांनी याचा पाठपुरावा करुन जिल्ह्यातील सर्व पाणीपुरवठा योजना मार्गस्थ कराव्यात, असे श्री. सोपल यावेळी म्हणाले.
           शेवगांव पाथर्डी आणि परिसरातल्या ५४ गावांसाठी नवीन पाणीपुरवठा योजना राबविली जात आहे. तसेच शहर टाकळी आणि परिसरातील २८ गावांसाठीच्या योजनेचे नुतनीकरण केले जात आहे. या योजनांची प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावावीत, असे श्री. सोपल म्हणाले. याशिवाय शिर्डी परिसरातील लोणी बुद्रुक व खुर्द, आडगावसह परिसरातील इतर २ गावे, पिंपरी निर्मळ, वाढीव राहाता, विस्तारीत पुणतांबा योजना, पानोडी आणि इतर ९ गावांची योजना आदींचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत (एमजेपी) केले जात आहे. एमजेपीच्या अधिकाऱ्यांनी या योजनांची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत, असे श्री. सोपल म्हणाले. पिंप्री लोकी अजमपूरची योजना तसेच औरंगपूर येथील पाणीपुरवठा योजनेचे काम जिल्हा परिषदेमार्फत होत आहे. या योजनांनाही गती द्यावी, असे त्यांनी सांगितले. 

Labels:

जिल्हयात शस्त्रबंदी व जमावबंदी

उस्मानाबाद :- जिल्ह्यात  येत्या  30 जुलैपासून मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. यासंदर्भात अप्पर जिल्हादंडाधिकारी संजय गायकवाड  यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, उपरोक्त कालावधीत जिल्हयात नागरीकांना शस्त्र किंवा तत्सम वस्तु बाळगण्यास अथवा त्यांची वाहतूक करण्यात बंदी राहील.
आवेशी भाषणे, अंगविक्षेप, विडंबनात्मक नक्कला करता येणार नाही.  सभ्यतेस व नितिमत्तेस बाधा येईल किंवा अराजकता माजेल अशी चित्रे, नकाशे, घोषणा फलक, चिन्ह आणि अशा अन्य वस्तु जवळ बाळगता येणार नाहीत. व्यक्ति किंवा समुहाच्या भावना जाणूनबुजून दुखविण्याच्या उद्देशाने वाद्य वाजविता येणार नाही अथवा गाणी म्हणता येणार नाहीत. तसेच पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तिंना एकत्र येण्यास, सभा घेण्यास किंवा मिरवणूका काढण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचा भंग करणा-यांविरुध्द कायदेशिर कार्यवाही करण्यात येईल. हे आदेश 13 ऑगस्ट रोजीच्या  मध्यरात्रीपर्यंत लागू राहील.   

Labels:

Sunday, 28 July 2013

आजचे विद्यार्थी देशाची भावी संपत्ती : सुभाष देशमुख

लोहारा -: आजचे विद्यार्थी देशाची भावी काळातील संपत्ती आहे. त्यांच्या जडणघडणीकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन माजी खासदार तथा लोकमंगल उद्योग समूहाचे अध्यक्ष सुभाष देशमुख यांनी केले. 
     लोहारा तालुक्यातील तोरंबा येथे स्वामी विवेकानंद विचार मंचच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात देशमुख बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच रंजनाताई बनसोडे तर प्रमुख उपस्थितीत उपसरपंच यादव चव्हाण, माजी उपसरपंच बळीबापू रणखांब, भारतीय जनता पक्षाचे तालुका उपाध्यक्ष प्रवीण चव्हाण, माजी सरपंच शिवाजी दुणगे, मुख्याध्यापक शाहुराज तावशे आदी मान्यवर होते.
    यावेळी पुढे बोलताना देशमुख म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या प्रकारची गुणवत्ता आहे. परंतु, त्यांना योग्य दिशा देण्याची आवश्यकता आहे. युवकांनी व्यसनांपासून दूर रहावे व पालकांनीही आपल्या पाल्यांसमोर व्यसन करू नये, असे आवाहन केले. याप्रसंगी गुणवंत विद्यार्थी अनिता दुणगे, रणधीर राजकुमार, प्राजक्ता नन्नवरे, रार्जशी भालेराव, प्रमोद तेली, दयानंद माताळे, अश्विनी दुधभाते यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विचार मंचचे अध्यक्ष विक्रम चव्हाण, उपाध्यक्ष गोविंद दुणगे, सचिव रजनीकांत बेडगे यांच्यासह लिंबराज बिराजदार, राकेश मेवाडा, अमर यादव, निलेश भालेराव, विनोद कांबळे यांनी पुढाकार घेतला.

Labels:

Saturday, 27 July 2013

बार्शीच्या जलसंधारण पॅटर्नची शासनाने घेतली दखल

बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: येथील आर.एस.एम. संस्थेच्यावतीने राबविण्यात आलेल्या जलसंधारण पॅटर्नची भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने घेतली असून सोमवारी दि. 29 रोजी होणा-या कृषी परिषदेकरीता राजेंद्र मिरगणे यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
    शासनाच्या इंडियन काऊन्सली ऑफ ॲग्रोकल्चर रिसर्च (भारतीय कृषी अनुसंधान परिषद), आय.सी.ए.आर. नवी दिल्लीच्यावतीने अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषी विदयापीठ येथे दान दिवस कृषी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातील शंभराहून अधिक कृषी संशोधन या परिषदेत उपस्थित राहणार असून शास्त्रशुध्द जलसंधारण पॅटर्न राबविल्याबददल तसेच देशाच्या विकासाला उपयुक्त असल्याने राजेंद्र मिरगणे यांचा बहुमान केला जात आहे. या परिषदेमध्ये जलसंधारण पॅटर्नची तंत्रशुध्द माहिती व त्याचे परिणाम याचे विश्लेषण स्वत: राजेंद्र मिरगणे हे करणार आहेत. राज्यातील विविध भौगोलिक परिस्थितीनुसार वेगवेगळया प्रकारचे पॅटर्न उपयुक्त ठरत असून तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी तालुक्याच्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करुन सर्व त्रुटी दुरुस्त करत नवीन पॅटर्न तयार करण्यात आला. सदरचा पॅटर्न हा अत्यंत उपयुक्त ठरला असून हा कोणत्याही भौगोलिक परिस्थितीमध्ये राबविता येतो.
    राज्यातील अनेक जलसंधारण पॅटर्न जवळील बंधा-याजवळ शेतक-यांची जमीनी वाहून जात असल्याने अनेक बंधारे फोडले गेले. सदरच्या बाबीसाठी शासनाचे हजारो कोटी रुपये वाया गेल्याने यातील त्रुटी शोधून त्यावर चांगल्या प्रकारची कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी या पॅटर्नची निर्मिती करण्यात आली. सदरच्या पॅटर्नमधील उतार, जमीनीतील घेण्यात आलेल्या बोअर तसेच जमीनीच्या भौगोलिक रचनेचा अभ्यास, बंधा-याजवळील काळया मातीभोवती लावण्यात येणारे दगड इत्यादी सुधारणा करण्यात आल्या आहेत.

Labels:

भूक


Labels:

बटटा


Labels:

नगराध्यक्षपदी रेविता बनसोडे बिनविरोध

उस्मानाबाद -: नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभाग क्रमांक 5 मधील रेविता माणिक बनसोडे यांची शुक्रवार दि. 26 जुलै रोजी बिनविरोध निवड झाली. नगरपालिकेच्या स्थापनेनंतर (1958) पहिल्यांदाच बौद्ध समाजाला नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी क रीत गुलाल व निळ्या रंगाची उधळण करून जल्लोष केला.
        पालिकेचे अध्यक्षपद पहिल्या अडीच वर्षांसाठी एससी महिलेसाठी राखीव आहे. निवडणुकीनंतर राष्ट्रवादीच्या सरस्वती घोणे यांची नगराध्यक्षपदावर निवड करण्यात आली होती. राष्ट्रवादीच्या अंतर्गत करारानुसार नगराध्यक्षा सरस्वती घोणे यांनी राजीनामा दिल्यानंतर नगराध्यक्ष निवडीसाठी शुक्रवार दि. 26 जुलै रोजी सकाळी 11 वाजता पालिका सभागृहात बैठक घेण्यात आली. या पदासाठी रेविता बनसोडे यांचा एकमेव अर्ज आला होता. त्यामुळे निवडणूक निर्णयाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रशांत सूर्यवंशी यांनी बनसोडे बिनविरोध निवडून आल्याचे घोषित केले. विजयाची घोषणा होताच, सर्मथकांनी एकच जल्लोष केला.

स्वीकृत सदस्यपदी पवार, शेख


शुक्रवार दि. 26 जुलै रोजी दोन स्वीकृत नगरसेवकांची बिनविरोध निवड करण्यात आली. राष्ट्रवादीचे राजाभाऊ पवार आणि अय्याज हारूण शेख यांची निवड झाली आहे. या दोघांसह या पदासाठी नऊ अर्ज दाखल झाले होते. यामध्ये फिरोज खाँ पठाण, कादरखाँ पठाण, प्रसाद जोशी, रमन जाधव, नारायण तरूप, विलास पवार, र्शीहरी गवाड यांचेही अर्ज आले होते. तर रमन जाधव, नारायण तरूप, विलास पवार, र्शीहरी गवाड यांचा अर्ज अवैध ठरला. उर्वरित तिघांनी माघार घेतल्याने पवार व शेख यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. निवडणूक निर्णयाधिकारी म्हणून उपविभागीय दंडाधिकारी प्रशांत सूर्यवंशी, साहाय्यक म्हणून तहसीलदार सुभाष काकडे, मुख्याधिकारी अजय चारठणकर यांनी काम पाहिले.

Labels:

पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला जन्मठेपेची शिक्षा

उस्मानाबाद - चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा पेटवून देऊन खून केल्याप्रकरणी पतीस उस्मानाबाद येथील सत्र न्यायाधीश शशिकांत कुलकर्णी यांनी जन्मठेपेची शिक्षा व 10 हजार रुपयांचा दंड सुनावला.
    खेड येथील बापू कोळी हा पत्नी वर्षा व दोन आपत्यांसह काक्रंबा (ता. तुळजापूर) येथील विटभट्टीवर मोलमजुरी करून उदरनिर्वाह करीत होता. बापू कोळी हा सतत पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असे. यातूनच 24 जानेवारी 2012 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास वर्षा कोळी लघुशंकेसाठी उठून बाहेर जात असताना पती बापू कोळी याने पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. यावेळी केलेल्या आरडाओरडीमुळे मदतीस आलेल्या शेजारच्या नागरिकांनी पाणी ओतून आग विझवत गंभीर जखमी झालेल्या वर्षा यांना उस्मानाबाद शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यावेळी वर्षा यांनी पती बापू कोळी याने अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिल्याचा जबाब रुग्णालयातील पोलिस कर्मचारी आर. ए. फुलारी यांच्याकडे नोंदविला. सदरच्या जबाबावरू न तुळजापूर पोलिस ठाण्यात बापू कोळी याच्याविरोधात कलम 498 अ, 302 भादंविनुसार गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकरणाचा तपास करून पोलिस उपनिरीक्षक एस. एन. साबळे यांनी तुळजापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकार्‍यांसमोर दोषारोपपत्र सादर केले. या प्रकरणाची उस्मानाबाद येथील सत्र न्यायाधीश शशिकांत कु लकर्णी यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी सरकार पक्षाच्या वतीने 6 साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये जबाब घेणा-या पोलिस नाईक फुलारी व डॉ. बी. एम. साबळे यांची साक्ष महत्वाची ठरली. यावेळी समोर आलेला पुरावा व सरकार पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता पी. वाय. जाधव यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायाधीश कुलकर्णी यांनी आरोपी बापू कोळी यास जन्मठेपेची शिक्षा व 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला. तसेच दंड न भरल्यास आणखी एक वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.

Labels:

Friday, 26 July 2013

कारगील विजय दिनानिमित्त शहीद जवानांना अभिवादन

उस्मानाबाद -: कारगील विजय दिनानिमित्त जिल्ह्यात आज या युद्धात शौर्य गाजवून धारातीर्थी पडलेल्या जवानांना आदरांजली वाहण्यात आली. यानिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नगरपरिषदेच्या हुतात्मा स्तंभास आज सकाळी जिल्हाधिकारी डॅा. के.एम. नागरगोजे, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, प्रभारी नगराध्यक्ष अमित शिंदे, मुख्याधिकारी अजय चारठाणकर, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर निवृत्त सुभाष सासणे आदींनी पुष्पचक्र वाहून अभिवादन केले.
      देशाच्या कारगिल भारत सन 1999 मध्ये पाकिस्तानच्या सैनिकांनी केलेले आक्रमण भारतीय शुर सैनिकांनी त्यांच्या साहसाने व धाडसाने खांद्यास खांदा लावून शत्रुशी झूंज देवून यशस्वीरित्या परतावून  लावले. या युध्दास आज 14  वर्षे पुर्ण झाली. कारगिल युध्दात शहीद झालेल्या शूर सैनिकाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन विजय हा कारगिल विजय स्मृति दिवस म्हणून साजरा करत आहे.
         ऑपरेशन विजय युध्द संग्रामात देशातील एकूण 517 अधिकारी/ जवान शहीद झाले असून 1251 अधिकारी व जवान घायाळ होवून कायम अपंगत्व  पदरी पडलेले आहे. महाराष्ट्राने स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय लष्काराचे महत्वाचे योगदान दिलेले आहे. शैार्याची  व त्यागाची परंपरा असलेल्या आपल्या राज्यातील विविध शहिदांनी सन 1962, 1965 व 1971 च्या युध्दामध्ये व इतर विविध युध्दजन्य परिस्थतीत सक्रीय भाग घेवून कोटयावधी भारतीयांच्या संरक्षणासाठी प्राणाची पर्वा न करता विशेष उल्लेखनीय शौर्याचा पराक्रम केले आहे. दि.1 मे 1995 ते 30 एप्रिल 1999 या काळात आपल्या राज्यातील एकुण 114 वीर योध्दांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. कारगिल युध्दानंतर सुध्दा महाराष्ट्राची शौर्यगाथा कायम राखण्यासाठी आजपर्यंत 247 शहीदांनी सर्वस्वाचा त्याग करुन महाराष्ट्राची परंपरा कायम राखली आहे.
       या परंपरेला वंदन  करण्यासाठी आज शहरात विविध कार्यक्रमही आयोजित करण्यात आले. सकाळी विविध शाळांमधून शालेय विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी काढून या वीर जवानांचे  स्मरण केले.  यानिमित्त चित्रकला स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते.
      जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सासणे यांच्यासह सैनिक कल्याण कार्यालयातील एस.जी. बिराजदार, एम.एम.कानगुले, के.डी.कंगारे, राजेंद्र साळुंखे,महादेव सुतार, रमेश गलांडे, टी.एन. वाघमारे, के. एन. सुरवसे आदिंनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.       

Labels:

नियमनात्मक अधिकार प्रदान

उस्मानाबाद :- जिल्ह्यातील पोलीस उपनिरीक्षक व त्यापेक्षा वरिष्ठ अधिका-यांना जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी  मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 प्रमाणे  जिल्ह्यातील सर्व पोलीस उपनिरीक्षक व त्यापेक्षा वरीष्ठ  अधिकाऱ्यांना दि. 8 ते 10 ऑगस्ट-2013 च्या मध्यरात्रीपर्यंत  या कालावधीत नियमनात्मक अधिकार बहाल केले आहेत.
    त्यानुसार ते अधिकारी  मिरवणूकीला अथवा जमावाला आवश्यक ते निर्देश देवू शकतील व त्याचे पालन करणे बंधनकारक असेल
.

Labels:

शिरबावी, पंढरपूर, मंगळवेढ्यातील पाणीपुरवठ्याची कामे तातडीने पूर्ण करा : दिलीप सोपल यांचे निर्देश

मुंबई -: सोलापूर जिल्ह्यातील शिरबावीसह (ता. सांगोला) परिसरातील ८१ गावांच्या  प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेची कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप सोपल यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना दिले. पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांच्या प्रलंबित कामांनाही व्यापक गती देऊन ही कामे पूर्ण करण्यात यावीत, असेही श्री. सोपल यांनी यावेळी सांगितले.    
    ना. सोपल यांच्या मंत्रालयीन दालनात काल याबाबत बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. मंत्री . सोपल यांनी यावेळी या योजनांचा सविस्तर आढावा घेतला. या बैठकीस आमदार गणपतराव देशमुख, आमदार लक्ष्मणराव ढोबळे, आमदार भारत भालके, आमदार दिपक साळुंखे-पाटील, पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव एस. एस. संधू, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे (एमजेपी) सदस्य सचिव श्री. मोपलवार, एमजेपीचे मुख्य अभियंता हेमंत लांडगे, पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता तथा विशेष कार्य अधिकारी डि. सी. सुर्यवंशी यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील संबंधीत अधिकारी उपस्थित होते.
    सोपल म्हणाले की, शिरबावी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेची व्याप्ती मोठी असून सांगोला तालुक्यातील ८१ गावांना या योजनेचा लाभ मिळत आहे. या योजनेतील एअर वॉलची गळती थांबविणे, पाणी टाक्यांची पुनर्उभारणी करणे यासह इतर कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत. जेणेकरुन पाणी वाया न जाता गावकऱ्यांना पुरेसे पाणी उपलब्ध होऊ शकेल.
      पंढरपूर पाणीपुरवठा योजनेसाठी तिर्थक्षेत्र विकास योजनेतून निधी उपलब्ध करुन देण्याबाबतही याप्रसंगी चर्चा झाली. पंढरपूर हे राज्यातील प्रमुख तिर्थक्षेत्र आहे. त्यामुळे पंढरपूर शहरासह तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण करण्यास प्राथम्याचे स्थान देण्यात यावे, असे निर्देश श्री. सोपल यांनी यावेळी संबंधीत अधिकाऱ्यांना दिले. मंगळवेढा तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांच्या कामांना गती द्यावी, असेही सोपल यावेळी म्हणाले.        

Labels:

बोरी, खंडाळा, बाभळगाव व निलेगाव प्रकल्पांतील पाणीसाठयात वाढ

नळदुर्ग -: सध्या पडत असलेल्या पावसामुळे नळदुर्ग येथील बोरी धरण, खंडाळ प्रकल्प तसेच बाभळगाव येथील पळस निलेगाव प्रकल्पात मोठयाप्रमाणात पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे नागरिकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न जवळपास मिटला आहे.
    गेल्या काही दिवसांपासून नळदुर्ग व परिसरात सतत पाऊस पडत आहे. या पावसामुळे सर्व प्रकल्पांमध्ये पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. नळदुर्ग येथील बोरी धरणामध्ये सध्या आठ फुट इतका पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे नळदुर्ग शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जवळपास मिटला आहे. या धरणाची पाणी साठविण्याची क्षमता 28 फुट इतकी आहे असून धरण भरण्यासाठी अजून मोठा पाऊस होणे गरजेचे आहे. या धरणावरच बरेच अवलंबून आहे. नळदुर्ग शहरासह तुळजापूर व अणदूर शहराही याच धरणातून पाणीपुरवठा होतो. त्याचबरोबर धरण झाल्यानंतर हजारो एकीर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. मात्र सध्या पावसामुळे धरणात ब-यापैकी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त नागरीकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर या पावसामुळे खंडाळा प्रकल्प व बाभळगाव येथील पळस निलेगाव प्रकल्प हे जवळपास भरण्याच्या मार्गावर आहेत. खंडाळा प्रकल्पात सध्या 541.50 म्हणजेच 1.4813 द.ल.घ.मी. इतका पाणीसाठा झाला आहे. या धरणाची पाणी साठविण्याची क्षमता 548.75 दलघमी इतकी आहे. पळस निलेगाव प्रकल्पातही मुबलक पाणीसाठा झाला असून हे प्रकल्पही भरण्याच्या मार्गावर आहे. या प्रकल्पात गाळ मोठयाप्रमाणात काढला असल्याने यावर्षी या प्रकल्पात मोठया प्रमाणात पाणीसाठा होणार आहे. याचा फायदा या परिसरातील शेतक-यांना होणार आहे.

Labels:

बसचालकास मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

नळदुर्ग -: चिकुंद्रा (ता. तुळजापूर) येथे खडडयात एसटी बसचे चाक जावून अंगावर पाणी उडाल्याचे कारणावरुन बसचालकास मारहाण झाल्याची घटना गुरुवार रोजी दुपारी घडली. याप्रकरणी नळदुर्ग पोलिसांत दोघांविरुध्द करण्यात आला आहे.
    बाबू ऊर्फ लक्ष्मण गंजे व दयानंद शाहूराज गायकवाड असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. तर विनायक भिमराव काळे असे मारहाण झालेल्या बसचालकाचे  नाव आहे. तुळजापूर आगारातील बस (एम. एच. २0/बी. 0१५४) चिकुंद्रा मार्गे तुळजापूरहून नंदगावला जात होती. चिकुंद्रा येथे सदर बस आल्यानंतर खड्यातील पाणी  गंजे व  गायकवाड यांच्या अंगावर आले. यावेळी बसचालक विनायक काळे व वरील दोघांत झालेल्या बाचाबाचीत बाबू व दयानंदने लाथाबुक्क्याने मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद बसचालक विनायक काळे यांनी दिली आहे. त्यावरुन वरील दोघांवरिुद्ध नळदुर्ग पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Labels:

विजेच्या धक्क्याने विद्यार्थिनीचा मृत्यू

येरमाळा -: मध्यान्ह भोजनासाठी शाळेला सुटी झाल्यानंतर मैत्रीणीच्या घरी जेवण्यासाठी गेलेल्या एका विद्यार्थिनीचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवार दि. 25 जुलै दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कळंब तालुक्यातील शेलगाव (दि.) येथे घडली. 
     पल्लवी शिवाजी माने (13, रा. शेलगाव दिवाणे) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. यातील पल्लवी माने ही शेलगाव दिवाणे गावातीलच जिल्हा परिषद शाळेत इयत्ता 7 वीमध्ये शिकत होती. दुपारी शाळेला सुटी झाल्यानंतर तिची मैत्रीण प्रांजली विठ्ठल दिवाणे हिच्या घरी दुपारचे जेवण करण्यासाठी गेली होती. भोजनानंतर ताट धुवून पाणी बाहेर टाकण्यासाठी दरवाज्यात गेलेल्या पल्लवीकडून पाणी विजेच्या तारेवर पडले. तार घराच्या अत्यंत जवळ असल्याने पाण्यातून विद्युत प्रवाह प्रवाहित होऊन तिला विजेचा जोरदार धक्का बसला. यात पल्लवीचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार पाहताच मैत्रीणींचाही भीतीने थरकाप झाल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. विद्यार्थिनींनी या घटनेची माहिती मुख्याध्यापकांना दिली.

Labels:

पावसाची चाळीशी, प्रकल्प कोरडेच

उस्मानाबाद जिल्ह्यातील 17 मध्यम, 193 लघु प्रकल्पांना दमदार पावसाची प्रतीक्षा, सीना- कोळेगावमध्ये मृत पाणीसाठा
उस्मानाबाद -: जिल्ह्यात यावर्षी सरासरी 40.05 टक्के पाऊस झाला असला तरी मध्यम आणि लघु प्रकल्प क्षेत्रात अद्यापही दमदार पाऊस न झाल्याने प्रमुख धरणांत ठणठणाट आहे. मध्यम प्रकल्पात सध्या (0) शून्य टक्के उपयुक्त पाणीसाठा असून, 194 लघु प्रकल्पांत 1.79 टक्के पाणीसाठा झाला आहे. दरम्यान, पावसाच्या टक्केवारीमध्ये औरंगाबाद विभागात उस्मानाबाद जिल्हा यावर्षीही पिछाडीवर आहे. हे प्रकल्प भरण्यासाठी दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

यावर्षी पावसाला सुरुवात लवकर झाली असली तरी दमदार पावसाने हजेरी न लावल्याने नद्या, ओढे खळाळून वाहिले नाहीत. तसेच जिल्ह्यातील धरणेदेखील तहानलेलीच आहेत. सध्या रिमझिम स्वरुपाचा पाऊस पडत असल्याने हे पाणी जमिनीत मुरत आहे. तसेच दमदार पाऊस होत नसल्याने प्रकल्पांतील पाणीसाठय़ामध्ये वाढ झालेली नाही. जिल्ह्यात सीना- कोळेगाव हा एकमेव मोठा प्रकल्प असून, यामध्ये सध्या 19.210 दलघमी पाणी आहे. परंतु, या प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा नाही. तसेच 17 मध्यम प्रकल्पांपैकी उस्मानाबाद शहराजवळील वाघोली मध्यम प्रकल्प (2.87) वगळता उर्वरित 16 प्रकल्पांत उपयुक्त पाणीसाठा झालेला नाही. एकूण मध्यम प्रकल्पांत 0.10 टक्के पाणीसाठा झाला आहे. तर एका प्रकल्पात 25 टक्के पाणी असून, आठ प्रकल्पांतील पाणी जोत्याच्या खाली आहे. आठ मध्यम प्रकल्प कोरडे पडले आहेत. 193 लघु प्रकल्पांपैकी 81 प्रकल्प जोत्याखाली असून, 81 प्रकल्प कोरडे पडले आहेत. सलग दोन वष्रे दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याने जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पांमध्ये ठणठणाट निर्माण झालेला आहे. उस्मानाबाद शहराला पाणीपुरवठा करणार्‍या तेरणा मध्यम प्रकल्प कोरडा असून, रुईभर प्रकल्पातही उपयुक्त पाणीसाठा शिल्लक नाही. त्यामुळे भविष्यकाळात टंचाईची शक्यता आहे.

211 - एकूण प्रकल्प
90 - प्रकल्प जोत्याखाली
89 - प्रकल्प कोरडे
16 - प्रकल्प 15 टक्के साठा

अशी आहे जिल्ह्यातील प्रकल्पांची स्थिती
प्रकल्प संख्या उपयुक्त साठा(दलघमी) टक्केवारी
मोठे 1 0.000 0.00
मध्यम 17 0.096 0.10
लघु 194 5.917 1.79

गतवर्षीच्या तुलनेत बर्‍यापैकी पाऊस
गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाची सुरुवात लवकर झाली. शिवाय रिमझिम पाऊस झाल्याने खरिपातील पिकांना पोषक वातावरण निर्माण झाले होते. गतवर्षी पावसाने ताण दिल्यामुळे खरीप व रब्बी दोन्ही हंगामावर विपरित परिणाम झाला होता. यावर्षी दि. 25 जुलैपर्यंत जिल्ह्यात 40.05 टक्के पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा समाधानकारक पाऊस झाला आहे.

यावर्षीचा पाऊस

274.2 भूम

224.6 परंडा

314.8 वाशी

266.4 कळंब

342.56 लोहारा

282.6 उमरगा

438.84 तुळजापूर

345.4 उस्मानाबाद

उस्मानाबादवर कृपादृष्टी
पावसाची उस्मानाबाद शहर व परिसरावर कृपादृष्टी दिसून येत आहे. जिल्ह्यातील महसूल मंडळातील 42 सर्कलमध्ये यावर्षी सर्वाधिक पावसाची नोंद (574 मिमी) उस्मानाबाद सर्कलमध्ये झाली आहे. तर सर्वात कमी पावसाची नोंद परंडा तालुक्यातील सोनारी सर्कलमध्ये (134.5) झाली आहे. उस्मानाबाद परिसरात समाधानकारक पाऊस झाल्याने शहरातील भोगावती नदीतून काही प्रमाणात पाणी वाहत आहे.

औरंगाबाद विभागात पिछाडी


औरंगाबाद विभागात पावसाच्या टक्केवारीत उस्मानाबाद जिल्हा यावर्षीही पिछाडीवर आहे. दि. 25 जुलैपर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात 48.33 टक्के, जालना 60.78 टक्के, परभणी 59.46, हिंगोली 76.72, नांदेड 62.51, बीड 52.11, लातूर 55.13 टक्के आणि उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजेच 40.05 टक्के पावसाची नोंद झाली आहे. दरवर्षीच जिल्हा पिछाडीवर असतो.

Labels:

Thursday, 25 July 2013

केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा सोलापूर जिल्हा दौरा

सोलापूर -: केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असुन त्यांचा सविस्तर दौरा खालीलप्रमाणे.
    शनिवार दि. 27 जुलै 2013 रोजी सकाळी  6.50 वा. मुंबई येथून सिध्देश्वर एक्सप्रेसने सोलापूर येथे आगमन. सोलापूर येथे इफ्तार मेजवानीस उपस्थिती. रात्री सोलापूर येथे मुक्काम.
    रविवार दि. 28 जुलै 2013 रोजी सायंकाळी 6 वाजता डॉ. निर्मलकुमार फडकुले पुरस्कार समारंभास उपस्थिती. रात्रौ 10.45 वाजता सोलापूर येथून सिध्देश्वर एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.

Labels:

पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांचा दौरा

उस्मानाबाद :- राज्याचे पशुसंवर्धन दुग्ध विकास व मत्स्य व्यवसायमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांच्या कार्यक्रमाचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.
          शनिवार, दि.27 रोजी रात्री 7 वा.सोलापूरहून अणदूर ता.तुळजापूरकडे प्रयाण, आगमन व मुक्काम. रविवार,दि.28 रोजी सकाळी 9 वा. अणदूरहून उस्मानाबादकडे प्रयाण. सकाळी 9-45 वा. शासकीय विश्रामगृह उस्मानाबाद येथे आगमन व राखीव. स.10 वा. सांगवी ता.उस्मानाबाद येथील युवक काँग्रेस शाखेचे उदघाटन.स. 10-30 वा. अणदूरहून लोहाराकडे प्रयाण. स.11-30 वा.लोहारा येथे आगमन व तालुक्यातील विविध विकास कामांच्या आढावा बैठकीस उपस्थिती. स्थळ- तहसील कार्यालय,लोहारा. दु. 12-30 वा. ता. काँग्रेस पक्ष मेळाव्यास उपस्थिती.स्थळ- सप्तरंग मंगल कार्यालय, लोहारा. दु.1-30 वा. लोहारा येथून अणदूरकडे प्रयाण व राखीव. सायं.7 वा. अणदूरहून सोलापूरकडे प्रयाण.

Labels:

निर्मल भारत अभियान जनजागरण मोहिम राबविणार : एस.एल. हरिदास

उस्मानाबाद - निर्मल भारत अभियानांतर्गत निवडलेल्या गावात जनजागरण अभियान दि. 1 जुलै ते 31 ऑगस्ट 2013 या कालावधीत जिल्हयात राबविण्यात येणार आहे. या अभियानासाठी चालू वर्षाकरीता निवडलेली गावे 100 टक्के हागणदारीमुक्त करुन निर्मल ग्राम करण्यात येणार आहे. गावा-गावात जनजागरण उपक्रम मोहिम हाती घेण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  एस. एल. हरिदास यांनी दिली.
          जनजागरण मोहिम अधिक गतीमान करणे व अभियानातून जिल्ह्याची स्वच्छता व्याप्ती वाढविण्यासाठी हिरीरीने प्रयत्न केले जाणर आहे. मोहिम जिल्हयात निवडलेल्या 106 गावातील ग्रामस्थांना स्वच्छ पाणी व स्वस्च्छतेसाठी शौचालय बांधकाम व वापर, स्वच्छ हात धुणे, पिण्याचे पाण्याची योग्य हाताळणी व लहान मुलांच्या विष्टेची योगय विल्हेवाटप लावण्यासाठी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनच्यावतीने दोन पथक तयार करण्यात आली आहेत.
            प्रत्येक दिवशी गावात सकाळी 10 वाजता शालेय विद्यार्थ्याची प्रभात फेरी काढून विद्यार्थ्यांना स्वच्छ हात धुणे, शालेय व अंगणवाडी शैचालय पाहणी करण्यात येणार आहे. शौचालय वापरण्यास योग्य असल्याची खात्री तज्ञांकडून करुन घेण्यात येईल. ज्या शाळा व अंगणवाडीतील शौचालय वापरण्यास अयोग्य असतील अशा शाळा व अंगणवाडीची नावे तज्ञ प्रशासकीय कार्यवाहीसाठी  जिल्हा परीषदेकडे पाठविण्यात येतील.
           गावात शौचालय नसणाऱ्या कुटुंबाची प्रत्यक्ष गृहभेट देवून त्यांना शौचालय बांधकामास प्रवृत्त करतील. त्याच दिवशी कमीत कमी गावातील 5 कुटुंबांच्या घरी शौचालय बांधकामाचे उदघाटन करण्यात येणार आहे.  त्याचे  नियोजन सरपंच व ग्रामसेवक करतील. गावात 1 एप्रिल 2012 नंतर ज्या कुटुंबांनी शौचालय बांधली, अशा कुटुंबाचा सत्कार करुन प्रोत्साहनपर निधीचे वाटप करण्यात येईल. प्रत्येक गावात सायंकाळी ग्रामसभा घेवून निर्मल भारत अभियान व शौचालय बांधकामाविषयी तज्ञ सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत.
         सदरील कार्यक्रमास सभापती / उपसभापती पंचायत समिती  व संबधित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, तालुकास्तरीय सर्व खातेप्रमुखांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Labels:

जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धा लांबणीवर

उस्मानाबाद -: प्राचार्य, मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक, खेळाडूंना सूचित करण्यात येते की. उस्मानाबाद येथे  (14, 17 व 19 ) वर्षाखालील मुले व मुलींच्या जिल्हास्तरीय शालेय फूटबॉल  स्पर्धा 1 व 2 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार होती. आता या स्पर्धेच्या तारखेत तांत्रिक कारणास्तव  बदल करण्यात आला आहे. आता ही स्पर्धा 28 व 29 ऑगस्ट रोजी श्रीतुळजाभवानी जिल्हा स्टेडियम,उस्मानाबाद  येथे घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी संजीव कुलकर्णी  यांनी दिली. या बदलाची नोंद  संबंधितांनी घेवून आपला संघ वेळेवर  दि. 28 व 29 ऑगस्ट रोजी पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Labels:

तालुकास्तरीय महिला लोकशाही दिन दर महिन्याच्या चौथ्या सोमवारी

उस्मानाबाद :- समस्याग्रस्त व पिडीत महिलांसाठी तालुकास्तरीय महिला लोकशाही दिन दर महिन्याच्या चौथ्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी आपल्या तक्रारी व निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असल्यास दोन प्रतीत विहीत नमुन्यात माहिती सादर करुन या योजनेचा लाभ घ्यावे, असे आवाहन बाल विकास प्रकल्प अधिकारी,  एकात्मिक  बाल विकास सेवा योजना, तुळजापूर यांनी  केले आहे.

Labels:

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारासाठी 15 ऑगस्टपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

उस्मानाबाद : राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन आणि उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. 2012 या वर्षाकरिता दिनांक 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2012 पर्यंतच्या कालावधीसाठी प्रवेशिका मागविण्यात येत आहेत.प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक  यापूर्वी 30 जून 2013 असा होता. त्याला आता 15 ऑगस्ट 2013 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
            सन 2012 या कॅलेंडर वर्षात प्रसिध्द झालेले विकासविषयक लेख, विशेष वृत्त व वृत्त मालिका, वृत्तपत्र छायाचित्रकारांच्या संदर्भात त्यांची संबंधित वर्षात प्रसिध्द झालेली  विकासविषयक छायाचित्रे यांचा विचार करण्यात येईल. जिल्ह्यातील स्पर्धकांनी जिल्हा माहिती कार्यालयाकडून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध आहेत.
        पुरस्कारासाठी पाठवावयाच्या प्रवेशिकेसोबत मूळ लिखाणाचे कात्रण त्याच्या 2 प्रतीसह पाठवावे लागेल. मूळ लिखाणाच्या वृत्तपत्रीय कात्रणांसोबत त्याच्या 2 प्रती  नसल्यास प्रवेशिका रद्द होईल. मूळ लिखाणावर लेखकाचे नाव नसल्यास, ज्या नियतकालिकात हा लेख प्रसिद्ध झाला असेल,  त्या नियतकालिकाच्या संपादकांचा दाखला प्रवेशिकेबरोबर जोडलेला असावा. अन्यथा त्या प्रवेशिकेचा विचार केला जाणार नाही.
            पत्रकारांच्या गटात भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी शासन अथवा शासकीय महामंडळाच्या सेवेत नसल्याचे प्रतिज्ञापत्र प्रवेशिकेसोबत जोडणे आवश्यक आहे. या स्पर्धेविषयींची माहिती आणि अर्जाचे नमुने माहिती व जनसंपर्क  महासंचालनालयाच्या  http://dgipr.maharashtra.gov.in तसेच  महाराष्ट्र शासनाच्या   www.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. 
     या स्पर्धेत राज्यातील पत्रकारांनी अधिकाधिक संख्येने सहभागी   व्हावे,  असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने करण्यात आले आहे. 

Labels:

भविष्य निर्वाह निधी वर्गणीदारांनी वार्षिक लेखा विवरण पत्रे कार्यालयातून घ्यावीत

उस्मानाबाद -: भविष्य निर्वाह निधी वर्गणीदारांची 2012-13 ची वार्षिक लेखा विवरण पत्र, प्रधान महालेखाकार, मुंबई कार्यालयाकडून वर्गणीदारांना देण्याकरिता राज्याच्या संबंधित आहरण व संवितरण कार्यालयाकडे पाठविण्यात आलेली आहेत. तरी वर्गणीदारांनी आपली विवरणपत्रे आपल्या कार्यालयातून घ्यावीत. या वार्षिक लेखा विवरणपत्रात जर काही त्रुटी असतील तसेच मिसिंग क्रेडिट/डेबिट दर्शविले असेल, तर त्याचे विवरण व ज्या वर्गणीदारांची जन्मतारीख तसेच नियुक्तीची तारीख विवरण पत्रात नमूद केली नसेल तर त्यांचा तपशील संबंधित आहरण व संवितरण अधिकाऱ्यांमार्फत त्वरीत प्रधान महालेखाकार कार्यालयाला द्यावा. म्हणजे त्यात योग्य त्या सुधारणा करुन देणे सोयीचे होईल. भविष्य निर्वाह निधीची विवरण पत्रे ऑक्टोबर 2013 पासून इंटरनेटवर वर्गणीदारांच्या सोयीसाठी उपलब्ध असतील. सदर वेबसाईटचा पत्ता http:// agmaha.cag.gov.in असा आहे.

Labels:

माजी सैनिकांना आवाहन

उस्मानाबाद -: विभागीय वनअधिकारी यांच्या आस्थापनेवरील लिपीक, वाहनचालक, पहारेकरी या रिक्त पदाची भरती प्रक्रिया होत आहे.या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जुलै ही असून जिल्ह्यातील माजी सैनिकांनी याचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हासैनिक कल्याण अधिकारी मेजर निवृत्त सुभाष सासणे यांनी केले आहे.                                  

Labels:

दहिटणा येथे शिवलिंग प्रतिष्ठापना व कळसारोहण निमित्त कार्यक्रम

नळदुर्ग -: दहिटणा (ता. तुळजापूर) येथे शुक्रवार दि. 26 ते सोमवार दि. 29 जुलै रोजी शिवलिंग प्रतिष्ठापना व कळसारोहण समारंभानिमित्त धार्मिक कार्यक्रमासह विविध कार्यक्रमाचे आयोजन समस्त सदभक्त ग्रामस्थ मंडळी, दहिटणा यांच्यावतीने करण्यात आले आहे.
    तुळजापूर तालुक्यातील दहिटणा या गावातील पंचक्रोशित असलेल्या पुरातन महादेव मंदिराचे जिर्णोध्दार करण्यात आले असून या मंदिरात भव्य शिवलिंग प्रतिष्ठापना जंगमवाडीमठ वाराणसीचे श्री श्री श्री जगदगुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे. त्याचबरोबर शुक्रवार दि. 26 जुलै सकाळी नऊ ते दुपारी दोन पर्यंत मोफत बालरोग चिकित्सा शिबीर, महिला आरोग्य तपासणी शिबीरात अनुक्रमे बालरोग तज्ञ डॉ. चिंतामणी चौधरी, डॉ. बालाजी चौधरी, हॅलो मेडिकल फाऊंडेशन अणदूरचे डॉ. शशिकांत अहंकारी, डॉ. सत्यजीत डुकरे हे उपस्थित राहून रुग्णांचे उपचार करणार आहेत. तसेच शनिवार दि. 27 जुलै रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोनपर्यंत नॅब जिल्हा शाखा सोलापूरचे नेत्र तपासणी शिबीर, डॉ. हेडगेवार रक्तपेढी सोलापूर यांचे रक्तदान शिबीर होणार आहे. रविवार दि. 28 जुलै रोजी सकाळी 7 ते दुपारी 3 पर्यंत होमहवन व रुद्राभिषेक होईल. सोमवार दि. 29 जुलै रोजी सकाळी साडे नऊ ते दोन वाजता श्री श्री श्री 1008 जगदगुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते शिवलिंग प्रतिष्ठापना व कळसारोहण होणार आहे. यावेळी अचलेर येथील श्री.ष.ब्र. शिवमुर्ती शिवाचार्य यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. त्याचदिवशी गावातून ग्रंथदिंडी व सवादय मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर उपस्थित भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. सर्व वैदिक कार्याचे प्रमुख श्री.वे. शिवयोगी शास्त्री होळीमठ हे राहणार आहेत. सर्व भक्तांनी, सार्वजनिक मंडळानी, भजन मंडळांनी दि. 29 रोजी ग्रंथदिंडीत व जगदगुरुंच्या भव्य मिरवणुकीत सहभागी होण्याचे आवाहन जिर्णोध्दार समितीच्यावतीने करण्यात आले आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी सरपंच राजेंद्र माने, बसवराज पाटील, माजी उपसरपंच उमाकांत कदम, विजयकुमार पाटील, राजेंद्र कुंभार, के.डी. पाटील, तुकाराम कदम, आप्पासाहेब पाटील, बलभीम चव्हाण आदींनी पुढाकार घेतले आहे.

Labels:

Wednesday, 24 July 2013

याचिका


Labels:

सेझ


Labels:

खरीप हंगाम पिक विमा योजनेत शेतक-यांनी सहभागी व्हावे : जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम

सोलापूर :-  राज्य शासनाने खरीप हंगाम सन 2013 साठी पिक विमा योजना जाहिर केली आहे. विविध समस्येसमुळे व आपत्तीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी सव शेतक-यांनी पिक विमा भरावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम यांनी केले.
    येथील जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय कृषी विमा योजनेच्या बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते.
    राष्ट्रीय कृषि विमा भरणेबाबत भात, ज्वारी, तूर, उडीद, मूग, सूर्यफुल, भुईमुग, सोयाबिन, तीळ आदि पिकांचा समावेश आहे. यासाठी शेतक-यांनी पिकाची नोंद असलेला 7/12 चा उतारा किंवा पिक असलेबाबतचा कृषी अधिका-यांचा दाखला व अर्ज शेतक-यांनी बँकेत जमा  करावेत. सदरचा अर्ज व भरावयाच्या रक्कमेबाबतची माहिती बँकेत उपलब्ध असणार आहे.
    सदरच्या विमा हप्त्याची रक्कम कमी आहे. सध्या पाऊस चांगला असला तरी भविष्यातील संभाव्य अडचणीचा विचार करुन विमा भरावा. विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2013 आहे. अखेरच्या दिवशी बँकेत गर्दी होवू शकते. त्यामुळे शेतक-यांनी त्यापूर्वीच तात्काळ पिक विमा हप्ता  भरण्याचे आवाहन करण्यात आले.
    रब्बी हंगाम 2011 मध्ये सोलापूर जिल्ह्यात 56 हजार 855 शेतक-यांनी विमा योजनेत सहभाग घेतला होता. त्यापैकी 50 हजार 447 शेतक-यांना या योजनेत विविध पिकाखाली लाभ मिळाला. रब्बी हंगाम 1999 पासुन शासनाने ही योजना सुरु केली आहे. या योजनेत खरीप 2012 पर्यंत 7 लाख 70 हजार 549 शेतक-यांनी सहभाग घेतला. त्यातील 4 लाख 53 हजार 830 शेतक-यांना या योजनचा लाभ मिळाला असल्याची माहितीही कृषी विभागाच्या अधिका-यांनी बैठकीत दिली.

Labels:

गुटखा ते मावा


Labels:

सोलापूर शहर व जिल्हा ओलाचिंब

सोलापूर -: सोलापूर शहर आणि जिल्हा गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने ओलाचिंब झाला आहे. पुष्य नक्षत्राच्या पावसाने दमदार हजेरी लावली. शहर व जिल्ह्यात पावसाची संततधार कायम आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मदत मिळणार आहे. शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
       जिल्ह्यात गेल्या दहा दिवसापासून कमी-अधिक प्रमाणात पावसाची संततधार सुरुच आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर पाऊस आहे. करमाळा, माळशिरस, सांगोला, पंढरपूर, माढा, मंगळवेढा, मोहोळ, बाश्री, अक्कलकोट, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर या सर्वच तालुक्यांमध्ये दिवसभर पाऊस होता. या पावसामुळे जिल्ह्यातील पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे.
       सोलापूर शहरातही दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे शहराच्या अनेक भागात पाणी साचले होते. काही परिसरात पाणी साचून मोठय़ा प्रमाणावर तळे निर्माण झाले होते. तर झोपडपट्टी भागामध्येसुद्धा मोठय़ा प्रमाणावर पाणी घुसल्याने नागरिकांचे हाल झाले. अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्यामधून वाहने बाहेर काढताना नागरिकांना भलतीच दमछाक करावी लागली. एकूणच सोलापूर शहर आणि परिसरात दिवसभर कोसळत असलेल्या पावसामुळे शहरातील जनजीवन मात्र पूर्णपणे विस्कळीत झाले होते.

Labels:

इंद्रायणी नदीत प्रवाश्यांसह तवेरा वाहून गेली

पिंपरी :- आळंदीत नव्या पुलावरून प्रवाशांना घेऊन जाणारी तवेरा गाडी पुलाचे लोखंडी कठडे तोडून इंद्रायणी नदीत वाहून गेल्याची घटना मंगळवारी घडली. या गाडीत सहा ते सात प्रवासी होते. गाडी कोसळल्याचे पाहताच येथे असलेल्या रिक्षा चालकांनी वाहून जात असलेल्या दोघा प्रवाशांना वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना यश आले नाही.
     घटनेची माहिती मिळताच पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अग्निशमन दलाचे आणि तळेगाव येथील एनडीआरएफ जवान घटनास्थळी दाखल झाले आणि मदतकार्य सुरू केले. दोरीच्या सहाय्याने रबरी बोट पाण्यामध्ये सोडून बोटीवरील जवानांनी गाडीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात यश आले नाही.
       एनडीआरएफच्या पाणबुडयांनी खोल बुडी घेऊन गाडीचा शोध घेण्यास सुरुवात केली असून रात्री उशिरापर्यंत गाडीचा ठावठिकाणा लागलेला नाही. प्रचंड पाऊस झाल्यामुळे नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे प्रवाहात ही गाडी दूरवर वाहून गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाऊस आणि अंधार यामुळे मदतकार्यात अडचणी येत होत्या.

Labels:

मोदी विरोधात प्रियांका गांधी मैदानात

रायबरेली -: 2014 च्या लोकसभा निवडणूकांचे पडघम आतापासूनच वाजू लागले आहेत. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी लवकरच ‘रिमोट कंट्रोल‘ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लोकसभा मैदानातून त्या माघार घेणार असून त्यांची जागा त्यांच्या सुपूत्री प्रियांका गांधी घेणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
     प्रियांका गांधी सोनियांच्या रायबरेली मतदारसंघातून येणारी लोकसभा निवडणूक लढविणार आहेत. त्याबाबतची घोषणा लवकरच अपेक्षित आहे. तसे झाल्यास सोनिया नेमक्या निवडणूक लढणार की पक्षावर रिमोट कंट्रोलद्वारे अधिकार गाजविणार हे अजून स्पष्ट झाले नाही. मागील विधानसभा निवडणुकीत रायबरेली येथे काँग्रेसला दारुण पराभव पत्करावा लागला होता. खुद्द सोनियांच्या मतदारसंघात काँग्रेसची ही अवस्था झाल्यानंतर प्रियांकांनी येथील सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत.
       गेली दीड वर्षे प्रियांका रायबरेलीतील काँग्रेस संघटना आणि दैनंदिन प्रश्नांवर लक्ष ठेवून आहेत. पराभवाची कारणमीमांसा करून त्यांनी कार्यकर्त्यांना पुन्हा कामाला लावले आहे. प्रियांकांच्या या कामगिरीमुळे त्यांना जिल्हा दक्षता आणि निरीक्षण समितीमध्ये सोनियांच्या प्रतिनिधी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. रायबरेलीतून निवडणूक लढण्यासाठीचा तो एक टप्पा मानला जात आहे.
      काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे स्वत:चे नेतृत्व गुण दाखविण्यात करण्यात अपयशी ठरले आहेत. त्यातच प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने नरेंद्र मोदींसारख्या खमक्या नेत्याला केंद्रस्थानी आणले आहे. अशा परिस्थितीत प्रियांका गांधी यांना सक्रीय राजकारणात उतरवल्यास काँग्रेसला त्याचा फायदा होऊ शकतो.
     युवा वर्गात प्रियांकाबद्दल प्रचंड आकर्षण आहे. लोक प्रियांकामध्ये इंदिरा गांधी यांना बघतात. उत्तर प्रदेशपुरता का होईना काँग्रेससाठी ही जमेची बाजू ठरू शकते, असे राजकीय पंडितांना वाटते.

Labels:

उमरगा आगाराचा तुघलकी कारभार; प्रवाशांतून संताप

अणदूर : ग्रामीण भागात रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्याने या रस्त्यांवरून धावणार्‍या नादुरुस्त बसगाड्यांमुळे अनेक वेळा प्रवाशांची हेळसांड झाल्याचे चित्र पहावयास मिळते. परंतु, खास प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू केलेली ‘यात्रा स्पेशल’ बसगाडीही सातत्याने पंर होऊन प्रवाशांची गैरसोय झाल्याने उमरगा आगाराच्या काराभाराविरोधात यात्रेकरू प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला.
     आषाढी वारीनिमित्ताने पंढरपूरसाठी खास उमरगा-पंढरपूर ही ‘यात्रा स्पेशल’ बस (क्र. एमएच.२0 बीएल १९७१) सुरू करण्यात आली. मात्र, ही बस खराब टायर-ट्युबमुळे तीन दिवसात तब्बल अकरा वेळा पंर झाल्याने प्रवाशांसोबतच चालकांचेही हाल झाले. शिवाय बस पंक्चर काढण्यासाठी आगाराचा मेकॅनिक उपलब्ध नसल्याने चालकालाच टायरची खोल-फिटिंग करावी लागली. ग्रामीण भागात नादुरुस्त बसगाड्यांमुळे प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागतो आहे. त्यामुळे प्रवास सुखाचा होण्याऐवजी त्रासाचा झाल्याच्या कडवट प्रतिक्रिया प्रवाशांतून ऐकावयास मिळाल्या.

ही टेक्निकल बाब..
आषाढी वारीसाठी खास यात्रेकरूंसाठी सुरू करण्यात आलेल्या यात्रा स्पेशल बसगाडीच्या अवस्थेबाबत आगारप्रमुखांशी संपर्क साधला असता, त्यांनी रा. प. महामंडळाच्या कारभारावर पांघरूण घालत, चक्क ही टेक्निकल बाब असल्याचे सांगितले. पावसाळ्यात रबर मऊ पडतात व चालकाला रस्त्यातील खड्डय़ांचा अंदाज न आल्याने टायर आपटतात. बहुतांश वेळेस टायरमध्ये खडे अडकून राहिल्याने असे प्रकार घडतात, अशी सहज स्पष्टोक्ती उमरगा आगारप्रमुख एम. के. वाकळे यांनी दिली.

Labels:

तुळजापुरात घरफोडी करुन पावणे दोन लाखांचा ऐवज लंपास

तुळजापूर : येथील दयानंदनगर भागात मंगळवारी पहाटे एका घराची खिडकी तोडून घरात प्रवेश करुन अज्ञात चोरटयानी कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असे मिळून सुमारे पावणे दोन लाख रुपये किंमतीचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
    तुळजापूर-नळदुर्ग रस्त्यावर असलेल्या दयानंदनगर भागात बिभीषण शिवराम आगलावे यांचे घर असून आगलावे हे आपल्या कुटुंबियासह घरातील एका खोलीत झोपले होते. मंगळवार, दि. २३ जुलै रोजी पहाटे चोरट्यांनी त्यांच्या दुस-या खोलीच्या खिडकीची लोखंडी जाळी तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी बंद कपाटाचे दारही तोडले. त्यातील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम एक हजार रुपये असा एकूण एक लाख ८४ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी बिभीषण आगलावे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरुद्ध तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास  पोलिस निरीक्षक संजय कुलकर्णी हे करीत आहेत.

Labels:

तुळजापूर येथे युवकांचा मनसेत प्रवेश

तुळजापूर -: तुळजापूर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची बैठक पार पडली. यावेळी तुळजापूर येथील कार्यकर्त्यांनी संकेत कदम व अक्षय साळवे यांच्या नेतृत्वाखाली मनसेत प्रवेश केला.  त्यामध्ये अक्षय साळवे, संकेत कदम, रवी भोसले, विरेंद्र कांबळे, शंकर जगाप, सोमनाथ नरगवडे, संकेत कदम, अजित मस्के, नीलेश माडजे, ज्योतिबा सपताळ, महेश मागाळे, विनोद क्षिरसागर, कपील सोनवणे, समर्थ पैलवान, रवि भोसले आदी जणांचा समावेश आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष शाम माळी हे होते. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Labels:

गटसमन्वयक पदासाठी पात्र-अपात्र उमेदवारांची यादी जाहीर

उस्मानाबाद -: जिल्हा ग्रामीण यंत्रणा उस्मानाबाद मार्फत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्न्ती अभियानांतर्गत गटसमन्वयक ही पदे करार पध्दतीने भरावयाची आहेत. सदर पदासाठी प्राप्त अर्जानुसार पात्र व अपात्र उमेदवारांची यादी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा उस्मानाबाद कार्यालयाच्या सूचना फलकावर तसेच www.Osmanabad.nic. in  या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. ज्या उमेदवारांनी हरकती नोंदविल्या होत्या, त्यानुसार सुधारीत पात्र व अपात्र उमेदवारांची यादी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या नोटीस बोर्डावर डकविण्यात आली असून त्यानुसार पात्र् उमेदवाराची लेखी परीक्षा दिनांक 28 जुलै 2013 रोजी जिल्हा परिषद (मुलांची) माध्यमिक शाळा, सरकारी दवाखान्याजवळ, उस्मानाबाद येथे सकाळी 10-30 ते 12-30 या वेळेत आयोजित करण्यात आलेली आहे. तरी पात्र उमेदवारांनी परीक्षेचे प्रवेशपत्र 27 जुलैपर्यंत कार्यालयीन वेळेत हजर राहून प्रवेशपत्र प्राप्त करुन घ्यावेत, असे आवाहन प्रकल्प संचालक डॅा. केशव सांगळे यांनी केले आहे.

Labels:

जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची शुक्रवारी बैठक

उस्मानाबाद -: जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची बैठक दि. 26 जुलै  रोजी दुपारी 5 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाचे बैठक कक्षात ठेवण्यात आलेली आहे. या  दिवशी जनतेच्या तक्रारी किंवा अभिकथने पुराव्यासह ऐकून घेण्यात येतील. तरी सर्व कार्यालय प्रमुख, अशासकीय सदस्य व नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन निवासी जिल्हाधिकारी संजय गायकवाड यांनी केले आहे.    

Labels:

कारगिल विजय दिनी प्रभात फेरी, चित्रकला स्पर्धा

उस्मानाबाद -: कारगिल विजय दिवस 26 जुलै रोजी साजरा केला जाणार आहे. कारगिल (ऑपरेशन विजय) युध्दात मिळालेल्या विजयास दिनांक 26 जुलै 2013 रोजी चौदा वर्षे पुर्ण होत असून त्यानिमित्त 14 वा विजय दिवस साजरा करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
        या दिवशी सकाळी 8 ते 9 वाजता शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी,  सकाळी 9-30 वजता जिल्हाधिकारी डॅा. के.एम. नागरगोजे यांच्या हस्ते नगर परिषद येथील स्मृतीस्तंभास अभिवादन करण्यात येईल. या दिवशी शहर व जिल्हावासीयांनी आपापल्या घरांसमोर रांगोळ्या काढाव्यात, दीपप्रज्वलन करावे, घरांवर रोषणाई करावी व कारगिल विजय दिवस साजरा करावा,  असे आवाहन जिल्हाधिकारी, उस्मानाबाद आणि जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर (नि) श्री. सासणे, उस्मानाबाद यांनी केले आहे

Labels:

पीडितांना मदतीचे उत्तराखंड सरकारचे आवाहन

उस्मानाबाद -: उत्तराखड येथे अतिवृष्टीमुळे (ढगफुटी) जनजीवन व सार्वजनिक संपत्तीचे अतोनात नुकसान झाल्याने जनजीवन पुर्ववत होण्यासाठी तेथील पिडीत लोकांना स्वेच्छा मदत देण्यासाठी उत्तराखंड सरकारने आवाहन केले आहे. मदत करु इच्छिणाऱ्यांनी मुख्यमंत्री राहत कोष उत्तराखंड या नावाने धनाकर्ष (डीडी) काढून तो मुख्यमंत्री कार्यालय, उत्तराखंड सचिवालय परिसर, 4 सुभाष रोड, देहरादून -248001 या पत्त्यावर किंवा ऑनलाईन भरण्यासाठी मुख्यमंत्री राहत कोष खाता संख्या 30395954328 एसबीआय या शाखेत जमा करण्याबाबत कळविण्यात आलेले आहे.   

Labels:

Tuesday, 23 July 2013

पिकांवरील प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाचा सल्ला

उस्मानाबाद :- जिल्ह्यात सोयबिन ,कापूस या पिकावर कांही ठिकाणी उंट अळी, व तंबाखुवरील पाने खाणारी अळी स्पोडोप्टेरा अळीचा  प्रादुर्भाव दिसून येत आहे. तसेच कापूस पिकावर तुडतुडे व पांढरी माशीचा प्रादुर्भाव दिसून आल्याने शेतकऱ्यांनी या किडीच्या नियंत्रणासाठी खालीलप्रमाण उपाय योजना करुन आपल्या शेतपीकांचे संरक्षण करावे, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी, उस्मानाबाद यांनी केले आहे.
        सोयाबीन पिकावरील उंट अळी व तंबाखूवरील पाने खाणारी अळीसाठी - 5 टक्के निंबोळी अर्क 25 मिली आणि क्लोरोपायरीफॉस 25 ईसी 20 मिली किंवा प्रोफेनोफॅास 50 ईसी 25 मिली, कापूस पिकावरील तुडतुडे व पांढरी माशीसाठी - ऑसिटामेप्रिड 20 टक्के 4 ग्राम प्रती 10 लिटर  पाण्यात मिसळून फवारणी करावी. सदरील किटकनाशकाचे प्रमाण साध्या पंपासाठी असून पेट्रोल पंपासाठी  किटक नाशकाची मात्रा 3 पट करावी. कापूस बियाणास इमीडाक्लोप्रिडची बीज प्रक्रिया केलेली असल्यामुळे त्याच कीटकनाशकाची फवारणी करु  नये असे आवाहन  करण्यात आले आहे.

Labels:

कौशल्य अभियानामध्ये काम करण्याची संधी

उस्मानाबाद -: महाराष्ट्र उद्योजकता विकासकेंद्रातर्फे आयोजित कौशल्य अभियानात पदवीधारकासांठी काम करण्याची संधी आहे. त्यासाठी दि 25 ते 31 जुलै या कालावधीत कार्यक्रम आयोजक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी राजकुमार गायकवाड, कार्यक्रम समन्वयक (मो. ९०११२१९७०१), महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, उस्मानाबाद येथे दि. २४ जुलैपर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.   

Labels:

विनापरवाना अन्न व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना होणार दंड

उस्मानाबाद :- अन्न सुरक्षा कायदा 2006 व त्या खालील नियमांतर्गत अन्न व्यवसाय करणाऱ्या व्यावसायीकांनी अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत अन्न परवाना घेणे आवश्यक आहे. परवाना न घेता अन्न व्यवसाय चालू ठेवल्याचे आढळून आल्यास त्यांच्याविरुध्द न्यायालयात खटला दाखल करुन  रुपये 5 लाख दंडाची तरतुद अन्न सुरक्षा कायद्यातंर्गत करण्यात आली आहे. तरी संबंधित व्यावसायीकांनी आपल्या व्यवसायासाठी आवश्यक  परवाना घेवून आपला व्यावसाय सुरु ठेवावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त  अ. घी. पारधी  यांनी केले आहे.
         उत्पादन अन्न प्रक्रिया केंद्र विभागणी दर्जानुसार दुध संकलन/ शितकरण केद्र, दुध पॅकेजिंग व प्रक्रिया केंद्र, दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादक, पुनर्वेष्टन, सॉल्वंट एक्सटॅकटींग ॲन्ड ऑईल रिफायनिंग प्लान्ट,  तेल घाणे, आटा मैदा, रव्याचे उत्पादक, साखर कारखाने, गुळ उत्पादक, गुऱ्हाळ, डिस्टीलरीज, वाईनरीज, बियर उत्पादक, विदेशी  दारु उत्पादक, पॅकेज्ड ड्रिकिंग वॉटर / मिनीरल वॉटर उत्पादक, शीतपेय उत्पादक, मसाला पदार्थांचे उत्पादक, फुड ॲडिटीव्हचे उत्पादक, खादयरंग उत्पादक, पुरक अन्न पदार्थ उत्पादक, न्युटासिटीकल फुड उत्पादक, चहा, कॉफी उत्पादक, पॅकर कन्फेक्शनरी उत्पादक, आईसक्रीम उत्पादक, आईस कॅन्डी उत्पादक, बेकरी बेक फुड उत्पादन, सुकडी उत्पादक, कत्तलखाने, खारेशेंगदाणे व चणे फुटाणे, फेणी, शेवया, चकली उत्पादक, चिवडा आदी  घरगुती उत्पादक, कॅन्डी स्लॉस,  बुढढीके बाल उत्पादक, चहा कॉफीचे उत्पादक,पॅकर तारांकित हॉटेल, रेस्टारंट, हॉटेल, कॅटरींग ढाबा किंवा तत्सम आस्थापना, क्लब, कॅन्टीन, खाजगी कंपन्यातील कॅन्टीन, खाजगी वसतीगृहातील कॅन्टीन, शाळांमध्ये जेवण पुरविणारी महिला मंडळे/ बचतगट/ शासकीय कॅन्टीन निमशासकीय कॅन्टीन, एस. टी. कॅन्टीन, सरकारी गोदाम, निमसरकारी गोदाम, अंगणवाड्या, शासकीय आश्रमशाळा, समाज कल्याण खात्यांतर्गत वसतीगृहे, खाजगी केंद्र, शितगृहे, किरकोळ दुध वितरक दुग्धजन्य पदार्थाचे वितरक, साठवणूक/ गोदाम अन्न धान्याचे वितरक, मसाल्याच्या पदार्थांचे वितरक, कन्फेक्शनरी वितरक, खाद्यतेल, वनस्पती, तुपवितरक, पॅकेज्ड ड्रिकिंग वॉटर/ मिनरल वॉटर वितरक शीतपेय वितरक, भाजीपाला घाऊक विक्रेते, फळे घाऊक विक्रेते, अन्नपदार्थांचे घाऊक विक्रेते, अन्नपदार्थ्याचे किरकोळ विक्रेते, शिधावाटप केंद्र, रेशन शॉपफुड ॲडिटीव्ह विक्रेते, भाजीपाला किरकोळ विक्रेते, फळे किरकोळ विक्रेते किरकोळ विक्रेते, चिकन शॉप मटन, शाप मासे विक्रेते, कुल्फी विक्रेते, बर्फगोळा /आर्ईस कॅन्डी  विक्रेते आईसक्रीम विक्रेते. ज्युस सेटर ,उस रस विक्रेते, चहा कॉफी स्टॉल ,चव्हाण कॉफी व इतर अन्न पदार्थ्याचे विक्रेते, स्नॅक बार खानावळ, वडापाव उत्पादन व विक्री पोळीभाजी केंद्र, इडलीवडा स्टॉल, चायनिज अन्न पदार्थ्यांचे स्टॉल/ इडलीडोसा तयार पिठ विक्रेते, फेणी, शेवया, चकली, चिवडा इ. विक्रेते भेळपुरी विक्रेते, पाणीपुरी विक्रेते, अंडी/ पाव/ ब्रेड/ बिस्कीट विक्रेते, पानशॉप, जत्रा, मेळावे, प्रदर्शन, इ.तात्पुरत्या काळातीलअन्न पदार्थ विक्रेते जत्रा आठवडीबाजारातील अन्नपदार्थांचे विक्रेते, आयातदार, निर्यातदार अन्न पदार्थ वाहतूकदार अशा सर्वांना हे परवाने घेणे बंधनकारक आह, असे कळविण्यात आले आहे.

Labels:

पीककर्ज परतफेडीसाठी शेतकऱ्यांना 15 आगस्टपर्यंत मुदतवाढ

उस्मानाबाद :- शेतकऱ्यांना पीक कर्ज परतफेडीसाठी राज्य शासनाने 15  ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली असून जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था एस. पी. बडे यांनी केले आहे. शेतकऱ्यांनी मागील हंगामात बॅंकांकडून घेतलेल्या पीक कर्जाची  या मुदतीत परतफेड करावी, यामुळे संबंधित शेतकरी डॅा. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत लाभ घेण्यास पात्र ठरतील, असे कळविण्यात आले आहे.
        शासनाने दिलेल्या सवलतीनुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विहित मुदतीत परतफेड करावी. अशा शेतकऱ्यांना प्राधान्याने नवीन कर्ज पुरवठा करण्यात येईल, असे बॅंकांनीही मान्य केले आहे.
      अधिक माहितीसाठी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, उस्मानाबाद अथवा संबंधित तालुका सहायक निबंधक सहकारी संस्था यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन बडे यांनी केले आहे.                          

Labels:

महिला बेपत्ता

उस्मानाबाद :- दत्तनगर, कळंब येथील 20 वर्षाची उषा विनोद माळी महिला जुन 2013 मध्ये सासरच्या घरातून म्हणजे येरोळ ता. शिरुर अनंतपाळ, जि. लातूरहून कोणालाही कांही ही न सांगता घरातून निघुन गेली आहे. तीचा शोध घेणे चालू आहे. या महिलेबाबत कोणास कांही माहिती असेल, त्यांनी एस. एम. जाधव पो. हे. कॉ.965 तपासी अंमलदार, कळंब पोलीस स्टेशन यांच्याशी दुरध्वनी क्र. 02473-262133 वर  संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.  सदर महिला ही भोळसर स्वभावाची, रंगाने- गोरी, अंगाने- सडपातळ, अंगावर लाल गुलाबी रंगाची साडी, उंची- अंदाजे 5 फुट 2 इंच अशा वर्णनाची असून सदर महिला कोणास आढळल्यास  संपर्क साधण्याचे आवाहन  पोलीस निरीक्षक, कळंब यांनी केले आहे. 

Labels:

अनोळखी इसमाचा मृत्यू

उस्मानाबाद  :- तुळजापूर तालुक्यातील काटीरोड लगत रोडच्याकडेला एक अनोळखी  बेवारस पुरुष मृत अवस्थेत आढळून आला आहे. यासंदर्भात (मसला खुर्दचे)  पोलीस पाटील सुशांत वैद्य यांनी पोलीस स्टेशन तामलवाडी येथे तक्रार दाखल केली आहे.
     अनोळखी मृत इसम पुरुष असून  रंगाने-सावळा, गोल चेहऱ्याचा, डोक्यास केस-बारीक, उंची- 5 फुट 5 इंच, उजव्या हातावर गुरुदेव, लव्ह, बदामचिन्ह, सविता असे नाव गोंदलेले आहे. अंगात पांढऱ्या रंगाचा हाफबाहीचा शर्ट, कॉलरवर इंग्रजीमध्ये रेमंड विराणूर असे लिहीले आहे, अंगात  काळया रंगाची पॅंन्ट ज्यात पांढऱ्या रेषा दिसत आहेत. अशा वर्णनाचा बेवारस इसम मृत आढळून  आला आहे.  याबाबत कोणास अधिक माहिती असल्यास त्यांनी पोलीस उपनिरीक्षक, पोलीस ठाणे (तामलवाडी), ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद यांचेशी  संपर्क साधावा.

Labels:

केरोसीन कोट्याची उचल करुन वितरण करण्याचे निर्देश

उस्मानाबाद :- जिल्हयासाठी माहे जुलै करीता शासनाकडून केरोसीन कोटा प्राप्त झाल्याने घाऊक व केरोसीन व किरकोळ आपला कोटा उचल करुन जिल्हयातील शिधापत्रिका धारकांना माहे जुलैचे केरोसीनचे 100 टक्के  वितरण करावे आणि वाटप अहवाल दरमहा, पाक्षिक अहवाल 17 व 27 तारखेपुर्वी सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांनी दिले आहेत. तहसीलदारांनी या वितरणात गैरप्रकार होणार नाही, याची काळजी घ्यावी. अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

Labels:

भविष्य निर्वाह निधी वर्गणीदारांनी वार्षिक लेखा विवरण पत्रे कार्यालयातून घ्यावीत

मुंबई -: भविष्य निर्वाह निधी वर्गणीदारांची 2012-13 ची वार्षिक लेखा विवरण पत्र, प्रधान महालेखाकार, मुंबई कार्यालयाकडून वर्गणीदारांना देण्याकरिता राज्याच्या संबंधित आहरण व संवितरण कार्यालयाकडे पाठविण्यात आलेली आहेत. तरी वर्गणीदारांनी आपली विवरणपत्रे आपल्या कार्यालयातून घ्यावीत. या वार्षिक लेखा विवरणपत्रात जर काही त्रुटी असतील तसेच मिसिंग क्रेडिट/डेबिट दर्शविले असेल, तर त्याचे विवरण व ज्या वर्गणीदारांची जन्मतारीख तसेच नियुक्तीची तारीख विवरण पत्रात नमूद केली नसेल तर त्यांचा तपशील संबंधित आहरण व संवितरण अधिकाऱ्यांमार्फत त्वरीत प्रधान महालेखाकार कार्यालयाला द्यावा. म्हणजे त्यात योग्य त्या सुधारणा करुन देणे सोयीचे होईल. भविष्य निर्वाह निधीची विवरण पत्रे ऑक्टोबर 2013 पासून इंटरनेटवर वर्गणीदारांच्या सोयीसाठी उपलब्ध असतील. सदर वेबसाईटचा पत्ता http:// agmaha.cag.gov.in असा आहे.

Labels:

Monday, 22 July 2013

अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बार्शी नगरपालिकेचा एक लक्ष वृक्ष लागवडीचा शुभारंभ

बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बार्शी नगरपरिषदेच्यावतीने एक लक्ष वृक्ष लागवडी उपक्रमांतर्गत औदयोगिक वसाहतीचे चेअरमन सुधीर सोपल यांच्या हस्ते रोपांच्या वितरणाचा शुभारंभ करण्यात आला. सोमवार दि. 22 रोजी नगरपालिकेच्या स्व. जगदाळे मामा सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला.
    यावेळी रवि फौंडेशनचे संस्थापक मधुकर डोईफोडे, बार्शी नगरपालिकेचे नगराध्यक्ष कादर तांबोळी, उपनगराध्यक्ष राहुल कोंडारे, मुख्याध्याधिकारी लांघी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तानाजी बापू मांगडे, राष्ट्रवादीचे गटनेते नागेश अक्कलकोटे, नगरसेवक देविदास शेटे, संदिप बारंगुळे, दगडू मांगडे, बाबुराव जाधव, ज्योतिर्लिंग कसबे, रमेश पाटील, माजी नगरसेवक अब्बासभाई शेख, आबा पवार, भगवान माने, बिटकू फुरडे, नगरसेविका मंगलताई शेळवणे, संगिता मेनकुदळे, रिझवाना शेख, जयश्री खोगरे, अरुणा परांजपे, शरद कुलकर्णी, आरोग्याधिकारी विजय गोदापुरे यांसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.
    यावेळी बोलताना मधुकर डोईफोडे यांनी दुष्काळदृश्य परिस्थितीत पाण्याचे दुर्भिक्ष असतांनाही नगरपालिकेच्या माध्यमातून फॉरेस्टमधील जोपासलेल्या वृक्षांना पाण्याची उपलब्धता करुन दिली. त्यामुळेच आपल्या रवि फौंडेशन या संस्थेच्यावतीने झाडांना संजीवनी देवू शकलो. रवि फौंडेशन आणि देशमाने यांच्या खर्चातून आपली संस्था वृक्षांना जगविण्याचे काम करत असून आज तयार झालेले पावसाचे वातावरण हे त्यामुळेच आहे. ना. दिलीप सोपल यांनी बार्शी शहराच्या  घराघरात उजनीचे पाणी पोहोचवले असून त्यांना मंत्रिपद मिळाल्याने कॅनलच्या माध्यमातून संपूर्ण तालुका आणि जिल्हयाच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघेल. त्यांच्या सारख्या कर्तृत्वान व्यक्तीस वनमंत्री केले तर संपूर्ण राज्याचे चित्र बदलेल. सर्वत्र सुजलाम सुफलाम वातावरण तयार होण्यास मदत होईल व भवियात येणा-या दुष्काळावर मात करणे सोपे होईल. आपल्या क्लासच्या विदयार्थ्यांनी यापूर्वीही मनापासून वृक्ष जगविले आहेत. आंघोळ केलेले पाणी देखील वाया जाऊ न देता ते झाडांना देणे, वेळोवेळी त्याची काळजी घेणे हे विदयार्थ्यानी मनापासून केले आहे. मागच्या वर्षी विदयार्थ्यांनी 30 हजार वृक्ष जोपासले आहेत. तालुक्यासाठी सुरु असलेल्या उपसा सिंचनच्या कॅनलच्या दुतर्फा जंगली वृक्षांची रोपे लावल्यास भविष्यात चांगले वृक्ष निर्माण होतील. नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्या संस्थेला वृक्षासंबंधीच्या अडचणी सोडविण्यासाठी वेळोवेळी मदत झाली असल्यानेच फॉरेस्टमधील चांगले दृश्य पाहावयाला मिळत आहे.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश अक्कलकोटे यांनी केले. रमेश यांनी प्रास्ताविक केले. तर आभार नगरसेविका सौ. परांजपे यांनी मानले.

Labels:

कुत्र्यांच्या हल्ल्यात दहा वर्षांचा मुलगा जखमी

बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: येथील साई उमाकांत महंकाळे हा दहा वर्षाचा मुलगा शौचासाठी घराबाहेर पडल्यावर आठ ते दहा कुत्र्यांनी हल्ला करुन त्यास जखमी केले. तळयाच्या जवळील येडाई विहीरीजवळ शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास हा प्रकार घडला असून उपचारासाठी त्याला जगदाळेमामा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
    साई महंकाळे हा प्राथमिक विदयामंदीर येथील विदयार्थी असून शनिवारी पाऊस येत असल्याने तो शाळेत गेला नाही. त्याच्यावर हल्ला झाल्याचे तसेच त्याला काही कुत्री चावा घेवून  फरफटत ओढून नेत असल्याचे त्याच्या नातेवाईक असलेल्या सुरज कडवे याने पाहिले. समयसूचकता व वेळेचे भान राखून सुरजने साईकडे धाव घेतली. हातामध्ये दगड घेवून तसेच त्या कुत्र्यांच्या मध्ये पडून साईला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. सदरच्या प्रकारानंतर इतरांनीही धावून कुत्र्यांपासून त्यांची सुटका केली.
    सदरच्या प्रकारामध्ये साईच्या मांडीला, मानेजवळ, डाव्या हाताला गंभीर जखमा झाल्या आहेत. फरफटत गेल्यामुळे पाठला जखम झाली आहे. जगदाळे मामा रुग्णालयात डॉ. कुलकर्णी व डॉ. पोकळे यांनी त्याच्यावर उपचार केले आहेत.
    याबाबत बोलताना साई महंकाळेचे नातेवाईक काही अंतरावर असलेल्या कत्तलखान्यामुळे जनावरांचे मांस खाऊन कुत्र्यांचे प्रमाण वाढले आहे. सदरच्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एकाच वेळी 30 ते 40 कुत्र्यांचा कळप बाहेर पळत असल्याचे चित्र नेहमी दिसते. सातत्याने हिंस्त्रपणे अनेकांवर हल्ले करत आहेत. नगरपालिकेच्या मुख्याध्याधिकारी व आरोग्याधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता आमच्याकडून याला काही करता येत नाही. आम्हाला कुत्री मारायला बंदी आहे, याबाबत काही होऊ शकत नसल्याचे सांगण्यात आले.
    याचप्रकारे बार्शी तालुक्यातील सौंदरे येथील एका मुलाला पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने जगदाळे मामा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रविवारी बहुतेक डॉक्टर्स उपलब्ध नसतात त्यामुळे त्याला दुस-या दिवशी बोलावण्यात आले.  सोमवारी त्याला या ठिकाणी उपचाराची सुविधा मिळाली नसल्याने सोलापूर येथील सिव्हील हॉस्पिटल येथे घेवून जाण्याचे सांगण्यात आले.
    अनेक ठिकाणी कुत्र्यांची संख्या झपाटयाने वाढली आहे. नगरपालिकेच्यावतीने कुत्र्यांची नसबंदी केल्याचे सांगण्यात येते. परंतु त्यांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. मोकाट कुत्र्यांनी माणसांनाच काय पण बंदूकधारी पोलिसांनाही हैराण करुन सोडले आहे. हातात बंदूक अथवा काठया असल्या तरी पोलिसांना या कुत्र्यांपासून प्रचंड भिती निर्माण झाली आहे. हत्यारे चालविण्याची परवानगी नाही आणि कुत्र्यांपासून भीती कमी होत नाही.
    मध्यंतरी तर त्याहून कहर झाला होता. राज्यभर गाजलेल्या सोलापूर महापालिकेतील कुत्र्यांच्या रेबीज इंजेक्शनऐवजी केवळ साध्या पाण्याचे इंजेक्शन देण्यात येत असल्याचे उघड झाले होते. त्यामुळे अगोदरच नागरिकांच्या मनामध्ये प्रचंड असंतोष असताना बार्शी नगरपालिकेचे कुत्र्यांच्या संख्येकडे दुलैक्ष होत आहे. शासनाच्या कुत्र्रयांना मारु नका, या आदेशावर नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. कुत्रे महत्त्वाची की माणसे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Labels:

बार्शीत 3 सप्टेंबर रोजी विवेकानंद सार्धशती रथयात्रा

बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : ज्या गुरुंनी विदयार्थ्यांना शिक्षण दिले, त्याच विदयार्थ्यांपासून परीक्षेच्या वेळी गुरुंना संरक्षण घ्यावे लागते, ही खेदाची बाब आहे. त्याकरीता स्वामी विवेकानंदांचे विचार तरुणापर्यंत पोहोचवणे ही गरज आहे. विवेकानंदांच्या विचराचे आचरण केल्यास समाज परिवर्तन होईल, असे मत डॉ. बी.वाय. यादव यांनी व्यक्त केले.
    स्वामी विवेकानंद यांची सार्धशती रथयात्रा समितीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना डॉ. यादव बोलत होते. यावेळी विजयश्री पाटील, धिरज शेळके, संतोष खुडे आदीजण उपस्थित होते.
    रामकृष्ण मठ, पुणे येथून निघालेली चित्ररथ, पथनाटय, नृत्य, गाणी, लेझीम, समाजपरिवर्तन देखावे, अशी शोभायात्रा दि. 3 सप्टेंबर रोजी बार्शीत येत असून शहरातील सर्व शाळा, महाविदयालये, सांस्कृतिक, क्रीडा मंडळे, सेवाभावी संघटना यांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन समितीच्यावतीने करण्यात आले.

Labels:

नळदुर्गच्या उपजिल्हा रुग्णालय व निवासस्थानासाठी 21 कोटी 82 लाखांचा निधी मंजूर

नळदुर्ग -: नळदुर्ग येथे उपजिल्हा रुग्णालयासाठी वारंवार मागणी करुनही जमीन उपलब्ध न झाल्याने उपजिल्हा रुग्णालयासाठी प्राप्त झालेल्या निधी परत गेला होता. मात्र पालकमंत्री ना. मधुकररराव चव्हाण यांनी पुन्हा एकदा शासन दरबारी प्रयत्न करुन नळदुर्ग येथे मंजूर झालेल्या उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारत बांधकामासाठी तसेच वैदयकीय अधिकारी व इतर कर्मचा-यांच्या निवासस्थानाच्या बांधकामासाठी 21 कोटी 82 लाख रुपयांचा निधी मंजूर करुन आणला आहे.
    पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण यांच्या या प्रयत्नामुळे आता नळदुर्ग येथे लवकरच सुसज्य असे उपजिल्हा रुग्णालय उभारण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पालकमंत्री ना. चव्हाण हे सातत्याने नळदुर्ग शहराच्या विकासासाठी नेहमीच प्रयत्न करीत आहेत. त्यांच्याच प्रयत्नातून शहरात असणा-या प्राचीन अंबाबाई मंदिराचा सर्वांगिण विकास होणार आहे. अंबाबाई मंदिरासाठी ना. चव्हाण यांच्या प्रयत्नातून पर्यटन विकास योजनेंतर्गत तब्बल एक कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्याचबरोबर ना. मधुकरराव चव्हाण यांच्या सांगण्यावरुनच नगरपरिषदेने अंबाबाई मंदिराच्या विकासासाठी व त्या ठिकाणी येणा-या भाविकांच्या सोयीसाठी 65 लाख रुपये खर्चाचा सभागृह मंजूर केला आहे. त्यामुळे प्राचीन असणा-या अंबाबाई मंदिराचे भाग्य उजळले आहे.
    पालकमंत्री ना. चव्हाण यांनी नेहमीच नळदुर्ग शहराच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केला आहे. पाणीपुरवठा योजनेचे काम असो की, शहरातील रस्त्याचे काम असो प्रत्येक कामाला ना. चव्हाण कधीच निधीची कमतरता पडू दिली नाही. त्याचबरोबर शहरातील गरीब नागरिकांच्या कबाल्याचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्नही ना. चव्हाण यांनी केला. त्यांनी नळदुर्ग शहर व परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळाव्यात, गरीब नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शासन दरबारी प्रयत्न करुन नळदुर्ग येथे पन्नास खाटांचे उपजिल्हा रुग्णालय उभारण्यास मंजूरी आणली होती. मात्र त्यानंतर नळदुर्ग येथे उपजिल्हा रुग्णालय उभारण्यासाठी वारंवार मागणी करुनही जागा उपलब्ध करुन देण्यात आली नसल्याने उपजिल्हा रुग्णालय उभारणीसाठी शासनाकडून प्राप्त झालेला निधी परत गेला होता. त्यामुळे नळदुर्ग येथे उपजिल्हा रुग्णालय होणार की नाही, याबाबत शंका निर्माण झाली होती. दरम्यान मध्यंतरीच्या काळात ना. चव्हाण यांनीच नळदुर्ग येथे उपजिल्हा रुग्णालय उभारण्यासाठी लागणारी जवळपास पाच एकर जमीन शासनाकडून उपलब्ध करुन घेतली आहे. जमीन उपलब्ध झाली मात्र उपजिल्हा रुग्णालय उभारणीसाठी शासनाकडून प्राप्त झालेला निधी परत गेल्याने उपजिल्हा रुग्णालय उभारणीचे काम रेंगाळत पडले होते. मात्र पुन्हा एकदा नव्याने प्रयत्न करुन ना. मधुकरराव चव्हाण यांनी नळदुर्ग येथे उपजिल्हा रुग्णालय इमारत बांधकामासाठी व वैदयकीय अधिकारी तसेच इतर कर्मचा-यांचे निवासस्थान बांधण्यासाठी शासनाकडून तब्बल 21 कोटी 82 लाख रुपयांचा निधी मंजूर करुन आणला आहे.    त्यामुळे आता लवकरच नळदुर्ग येथे सुसज्ज असे पन्नास खाटाचे उपजिल्हा रुग्णालय उभारण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Labels: