Sunday, 28 February 2021

तुळजापूर आगारातील एस टी वर्कर्स इंटक संघटनेच्या निवडी बिनविरोध

 

तुळजापूर, दि.२८ :
 महाराष्ट्र एस टी वर्कर्स इंटक  संघटनेची सन 2021 सालच्या कार्यकारिणीची बिनविरोध निवड होवुन  अध्यक्षपदी  शिवाजी वंदारने तर सचिवपदी बापू हुंडेकर यांची निवड करण्यात आली आहे.

यामध्ये कार्याध्यक्षपदी रोहित हुच्चे,उपाध्यक्षपदी भारत व्यवहारे, एम. ए .देवकर, संघटक सचिव म्हणून संदेश सुरवसे,चेतन कांबळे,सहसचिव वि. एफ. दसवंत,
के.एस.राऊत,कोषाध्यक्षपदी अमित जाधव,सहकोषाध्यक्षपदी सतीश भांजी, महिला संघटक एस.डी. माळी, वैशाली कटारे,अर्चना घोडके,प्रसिद्धी प्रमुख म्हणून एस. टी. कांबळे,तानाजी कोळीतर  सदस्य म्हणून ए. एम .पवार, डी. एच. कदम, व्ही. जी माळी,एस. पी. चिवरे,संजय पैलवान, पी .एम. काक्रमकर,एम आर पटेल
एल बी पाटणकर,जी एम कांबळे आदींची निवड करण्यात आली.

यावेळी संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी मोहन साळुंके,चंद्रकांत नेपते,सुनील बोधले, शहाजी रोचकरी यांच्यासह  संघटनेचे  सदस्य सागर सूर्यवंशी, विजय पवार, रमेश बनसोडे, बाळासाहेब पाटील, रामभाऊ बनपट्टे, दीपक राऊत, नागनाथ मसुते, परमेश्वर आगलावे, गुरुदेव पडवळ, मनोज पाटील, खंडू पाटील, मेहराज पटेल, यशवंत कावरे, महेंद्र नाईकवाडी, डी. बी. बनचेडे, एस. ए.सय्यद, आर.डी.निर्मळे  उपस्थित होते.

Labels:

तुळजापूर : तीक्षण शस्ञाने केलेल्या हाल्ल्यात सलुन चालक गंभीर, दुचाकीची तोडफोड करुन नुकसन

 

तामलवाडी,दि.२८:  
केश कर्तनाचे पैसे सलुन चालकांनी मागितल्याच्या कारणावरुन  एकाने   धारदार शस्त्राने हल्ला केलेल्या घटनेत सलुन चालक  गंभीर जखमी तर दुकानबाहेरील दुचाकीचे नुकासान झाल्याची  घटना माळुंब्रा ता.तुळजापूर येथे घडली आहे.


याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा येथे रमेश व नंदकुमार रमेश वाघमारे हे दोघे पिता- पुत्र  शुक्रवार दि.26 फेब्रुवारी रोजी साडेतीन वाजण्याच्या सुमारास गावातील आपल्या केश कर्तनालय दुकानात होते.


 यावेळी नमूद पिता- पुत्रांनी गावकरी- शुभम दत्तात्रय वडणे यांना केश कर्तनाचे पैसे मागीतले असता शुभम यांनी चिडुन जाऊन त्या दोघांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तर शुभमचा मित्र सचिन शशिकांत कुटार याने नंदकुमार यांच्या डोक्यात धारदार बतईने वार करुन गंभीर जखमी केले. तसेच केशकर्तन दुकानावर व दुकानासमोरील मोटारसायकलवर दगड मारुन मोठे नुकसान केले. 


अशा मजकुराच्या नंदकुमार वाघमारे यांनी 27 फेब्रुवारी रोजी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 326, 323, 504, 506, 427, 34 अंतर्गत तामलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Labels:

सावरगाव : आयोजित रक्तदान शिबिरात 81 दात्यांनी केले रक्तदान

    
काटी ,दि.२८: उमाजी गायकवाड
 तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथे रविवार  रोजी   बसस्थानक शेजारी शिवजयंती निमित्त व भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष  बोबडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात स्वयंस्फूर्तीने 81 दात्यानी   रक्तदान करून आपला सहभाग नोंदवला. 


या रक्तदान शिबिरात सोमनाथ तानवडे व सौ.शशिकला तानवडे या पती, पत्नीनेही सहभाग नोंदवला .
यंदा कोरोनामुळे भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष बोबडे यांनी  वाढदिवस न करता सामाजिक बांधिलकी जपत   रक्ताच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर व निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा भरून काढण्याच्या उद्देशाने येथील बोबडे मित्र परिवार , शिवजन्मोत्सव तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सावरगाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 


 या रक्तदान शिबिराचे उद्घघाटन जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष  बोबडे, सरपंच रामेश्वर  तोडकरी यांच्या हस्ते आई तुळजाभवानी व छत्रपती शिवाजी महाराज  यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 
 

यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, सरपंच रामेश्वर तोडकरी, उपसरपंच आनंद बोबडे, नेताजी कदम,श्रीधर पाटील, सचिन मगर, चेअरमन विनायक करंडे, माजी उपसभापती विलास डोलारे, शंकर  शिंदे, बाळासाहेब शिंदे, प्रमोद माने,संजय लिंगफोडे,किरण डोलारे,  बाळासाहेब डोके,अमर मगर, अविनाश माने, सोमनाथ तानवडे, शशिकला तानवडे, प्रशांत लिंगफोडे, राजेंद्र डोलारे, विश्वनाथ राऊत, राजाभाऊ फंड, मनोज फंड, हणमंत फंड,अमोल माने, दयानंद भडंगे, बाळकृष्ण गवळी, शुभम बोबडे, ओमराजे बोबडे, कृष्णाथ बोबडे, रमेश चौगुले, रणजीत भालेकर, सुदर्शन भालेकर, गणेश फंड, काकाराज फंड, सौदागर निकम, नागेश कुंभार, नाना कुंभार,झाकिर शेख,राजेश धावणे, धनाजी भालेकर, तायाप्पा ताटे, धर्मराज बोबडे, अमोल फंड, दमाणी ब्लड बॅंकेचे अभय कुलकर्णी,दिपा मलपेदी,ममता मेहता, पल्लवी धावडे, महेश शिंदे, रवि वीर, डि.एस.जाधव, सुधीर कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

Labels:

कोरोना रोखण्यासाठी मास्क बंधनकारक ; मास्क न घातल्यास दंड वसुली , मुख्याधिकारी रविवारी रस्त्यावर



तुळजापूर, दि.  २८ :
तुळजापूर शहरात कोरोनाचे रुग्ण वाढू नये म्हणून नगर परिषदेच्या  वतीने सर्वांना बंधनकारक करण्यात आला आहे. मास्क न घातल्यास दंड वसुली करण्याचे सत्र नगरपरिषदेने चालू केले आहे.

शहर आणि परिसरामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर नगरपरिषदेच्या वतीने कर्मचारी , मुख्याधिकारी आशिष लोकरे यांनी रविवारी दिवसभर शहरातील बाजारपेठेमध्ये व्यापारी वर्गाकडून आणि शहरवासीयाकडून मास्क घालण्याबाबत दुर्लक्ष करीत असल्याची बाब नगरपरिषदेच्या लक्षात आल्यानंतर मुख्याधिकारी लोकरे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी पावती पुस्तकासह दंड वसुलीचे सत्र सकाळ पासून सुरु केले.

कोरोना संसर्ग वाढत चालल्याचे चित्र समोर आल्यानंतर वरिष्ठ पातळीवरून प्रशासनाकडे यासंदर्भात होणारी विचारणा तसेच तुळजाभवानी देवीचे मंदिर काही प्रमाणात सुरू असून त्यामुळे व्यापाऱ्यांचे व्यवस्थित अर्थकारण होत असताना व्यापारी आणि ग्राहक तसेच तुळजापूर शहरवासीय बाहेरगावाहून येणारे भाविक भक्तानी मास्क वापरला पाहिजे, म्हणजे संसर्ग अधिक वाढणार नाही या भूमिकेने मुख्याधिकारी , कर्मचारी यानी मास्कची सक्ती करताना दिसुन आले. .
 मास्क न घातलेल्या व्यक्तींना रस्त्यावर अडवून दंड वसुली करीत होते, न.प .च्या अधिक्षक वैभव पाठक व इतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

संसर्गाची भीती सर्वांना असताना मास्क वापरण्यासाठी व्यापारी वर्गाने दुर्लक्ष करू नये, पालिकेचे पथक आल्यानंतर खिशातील रुमाल अथवा मास्क लावणे योग्य नाही. आरोग्याची काळजी घेण्यासाठी सर्वांनी पूर्णवेळ मास्क लावावा असे आवाहन मुख्य अधिकारी आशिष लोकरे यांनी केलेले आहे.

Labels:

नळदुर्ग : मराठी भाषा दिनानिमित्त मनसेच्या माजी कार्यकर्त्यांनी केला शिक्षक व पञकाराचा गौरव करुन साजरा

नळदुर्ग , दि.२७ , 
नळदुर्ग शहरातील मनसेच्या माजी कार्यकर्त्यांच्यावतीने  मराठी भाषा गौरवदिन म्हणून साजरा करण्यात आला.यानिमित्त शिक्षक व पञकार  यांचा गौरव करण्यात  आला.

 मराठी शिक्षक जितेंद्र मोरखंडीकर, राजेंद्र काशिद, पञकार विलास येडगे, तानाजी जाधव , शिवाजी नाईक, भगवंत सुरवसे, सुनिल गव्हाणे, उत्तम बणजगोळे  सामाजिक कार्यकर्ते मारुती खारवे, उत्तम वक्ता तथा नगरसेवक विनायक अहंकारी, न.प. कर्मचारी   नवनाथ होनराव  आदीचा लेखनी व पुष्पगुच्छ देवुन सत्ककार करण्यात आला.

छञपती शिवाजी महाराज व सर्व थोर व्यक्तीसह संत , कवी, लेखक याच्यांमुळे मराठी भाषा  जिवंत असल्याचे सहशिक्षक मोरखंडीकर यांनी सांगुन मराठी भाषेबद्दल सविस्तर माहिती दिली.
 मनसेचे माजी कार्यकर्ते  शिवाजी सुरवसे, अरुण जाधव, दिलीप शंकरशेट्टी,  शिरीष डुकरे आदीनी कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला. सुञसंचालन व आभार दिलीप शंकरशेट्टी यानी मानले. 

Labels:

खुदावाडीत माझा गांव सुंदर गाव आभियानास ग्रामस्थांचा उत्सर्फुत प्रतिसाद


वागदरी, दि.२८ : 
माझा गाव ,सुंदर गाव, स्वच्छ गाव हा संकल्प करीत खुदावाडी  ता.तुळजापूर येथे माझा गाव सुंदर गाव या आभियानाला सुरुवात करण्यात आली असुन या मोहीमेस  ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद  मिळला आहे . 

 खुदावाडी ग्रामस्थानी 2001 साली  संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबवून राज्यात आदर्श कामगिरी बजावली होती . 
या अभियानाचा धागा धरून ग्रामस्थानी " माझा गाव सुंदर गाव" या मोहिमेस सुरुवात करून  गाव स्वच्छतेकडे नेण्याचा एकच ध्यास सुरू केला आहे .

जि.प.उस्मानाबाद अंतर्गत जिल्हाभर चालू असलेल्या माझा गाव सुंदर गाव या आभियानाला प्रतिसाद देत खुदावाडी येथील सरपंच  शरद नरवडे  यांच्या मार्गदर्शनाखाली  या आभियानाला सुरुवात केली आहे .
   या मोहिमेत सरपंच शरद नरवडे ,   सामाजिक कार्यकर्ते संभाजी कापसे ,  शालेय व्यवस्थापन कमिटीचे संगाप्पा चिंचोले , ग्रामस्थ , महिला ,  युवक व शासनाच्या उमेद आभियाना अंतर्गत असलेल्या बचत गटातील महिला  , अशा कार्यकर्त्या देखील सहभागी झाले होते .

Labels:

Saturday, 27 February 2021

सावरगाव येथील जेष्ठ नागरिक सादु मारडकर यांचे निधन

काटी ,दि.२७
 तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील सादु महादेव मारडकर वय ६५ यांचे शनिवार रोजी पहाटे साडेचार वाजता हृदय विकाराच्या  झटक्याने  निधन झाले.
 त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Labels:

तुळजाभवानी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा


तुळजापूर,दि.27, 

येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे मराठी भाषा गौरव दिना निमित्त कवि कुसुमाग्रज तसेच संत रोहिदास यांच्या जयंतीनिमित्त प्रा.डॉ. वाय.ए.डोके व क्रीडाविभाग प्रमुख प्रा.डॉ.विलास गुंड पाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजन करुन अभिवादन करण्यात आले. 

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मराठी विभागप्रमुख प्रा डॉ शिवाजीराव देशमुख यांनी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त तसेच संत रोहिदास यांच्या जयंतीनिमित्त उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रा.सोहन कांबळे,प्रा.अण्णासाहेब वसेकर, प्रा.डॉ.बालाजी गुंड, प्रा.विवेकानंद चव्हाण यांच्या सह महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची  उपस्थिती होती.

यावेळी कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर सोशल डीस्टसिंगचे यथायोग्य पालन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एम मणेर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

Labels:

नळदुर्ग महाविद्यालयात मराठी राजभाषा दिन राज्यस्तरीय काव्यधारा कविसंमेलनाने साजरा


नळदुर्ग, दि. २७:  
येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त मराठी विभागाच्या आणि अक्षरवेल महिला साहित्य मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय काव्य धारा कवी संमेलन पार पडले. 

सर्वप्रथम सुरुवातीला ग्रंथदिंडी काढण्यात आली व ग्रंथदिंडीचे आगमन महाविद्यालयात होताच ग्रंथ दिंडीचे पूजन प्राचार्य.डॉ. संजय कोरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. कवि  संमेलनाचं उदघाटन ज्येष्ठ कवी साहित्यिक समीक्षक माधव पवार यांच्या हस्ते करण्यात आले. कवि संमेलनाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय कोरेकर हे होते. 

यावेळी व्यासपीठावर कवी वसुंधरा शर्मा, माधव गरड, विद्या भगरे भोसले, उपप्राचार्य डॉ रामदास ढोकळे, अक्षरवेलच्या अध्यक्षा सुप्रिया परळकर, कविता पुदाले, मराठी विभाग प्रमुख डॉ. दयानंद भोवाळ उपस्थित होते.  

  कवी माधव पवार यांनी आजच्या साहित्याविषयी  बोलताना म्हणाले की कविता वाटते तेवढी सोपी नसते. कवितेला जन्माला घालत असताना अगोदर वेदना जन्माला यावी लागते तेव्हा खऱ्या अर्थाने कविता फुलू लागते. त्यानी अनेक बहारदार अशा कवितेचे सादरीकरण करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. अध्यक्षीय समारोप करत असताना डॉ. संजय कोरेकर कविसंमेलनाला घेण्यामागचा हेतू व विद्यार्थ्यां प्रति असलेली रसिकता याविषयी आपले मत मांडत असताना विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर साहित्य समजून घेणे गरजेचे आहे यासाठी काही नाविन्यपूर्ण व महत्त्वपूर्ण कवी ना आमंत्रित करून विद्यार्थ्यांसमोर आणणे गरजेचे वाटले.


 यासाठी अक्षरवेलच्या सदस्या या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी व विद्यार्थीनींची मदत मिळाली. 
यावेळी वसुंधरा शर्मा यांनीही मनोगत व्यक्त केले. या कविसंमेलनात वरील मान्यवरांसहीत डॉ. सुवर्णा गुंड चव्हाण, डॉ मल्लिनाथ बिराजदार, स्मिता ढोनसळे, आशाबी शेख, पंकज काटकर, निर्मला मोटे, अंजली सुरवसे, श्वेता परळकर, प्रा. एस. पी. कटारे, डॉ. तुळशीराम दबडे,  कविता पुदाले, डॉ दयानंद भोवाळ, डॉ. सुभाष राठोड, प्रा. इंदुमती भोरे, डॉ.जयश्री घोडके, प्राची चिंचोले, ऋतिका सोमोसे, वैशाली गायकवाड, विद्या व्हनमाने आदी कवीने आपल्या बहारदार कवितांचे सादरीकरण केले. 

या कविसंमेलनाचे प्रास्ताविक डॉ. एल. बी. थिट्टे व कविता पुदाले यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. जयश्री घोडके यांनी करून दिला. या कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन डॉ.संतोष पवार प्रा . झरीना पठाण व डॉ.सचिन देवद्वारे यांनी केले. तर आभार डॉ. सुभाष राठोड यांनी मानले. या कविसंमेलनासाठी पत्रकार शिवाजी नाईक, एस. के. गायकवाड, सचिन गायकवाड अक्षरवेलच्या सदस्या शैलजा भस्मे, छाया कदम, उमा जाधव, प्रतिभा पवार, निलावती गायकवाड आदींसह  प्राध्यापक, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Labels:

तुळजापूर तालुक्यातील अणदुर येथे मराठी राजभाषादिन साजरा

अणदूर, दि.२७:  

जवाहर विद्यालय,अणदूर ता.तुळजापूर   येथे  शनिवारी मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

सकाळी प्रथमतः संत रविदास महाराज व कविवर्य वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त विदयालयाचे मुख्याध्यापक सुरेश ठोंबरे यांच्या हस्ते प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर  सामाजिक अंतर राखून विद्यार्थी व शिक्षकांच्या स्वरचित काव्य-वाचनाचा कार्यक्रम संपन्न झाला.त्यामध्ये कु.शैलेजा मोकाशे, अंजली घुगे,सानिका संगशेट्टी, आश्विनी जगताप,ऋतिका सोमवसे, श्रृती मोकाशे,  प्रदिप कदम,मकरंद पाटील,दत्ता राऊत,सिध्देश्वर मसुते यांनी काव्य मैफिल रंगवून टाकली. 

मुख्याध्यापक सुरेश ठोंबरे ,उपमुख्याध्यापक विनोद कदम यांनी मराठी भाषा दिनानिमित्त शुभेच्छापर विद्यार्थ्यांनां मार्गदर्शन  केले..रविदास महाराज व वि.वा.शिरवाडकर यांच्या जीवनाचरित्राचे वाचन करण्यात आले.

यावेळी विद्यार्थी,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदिप कदम यांनी केले .

Labels:

किमान आधारभूत धान्य खरेदी केंद्राचा शुभारंभ बापुराव पाटील यांच्या हस्ते

  मुरूम, दि.२७  : 
दिनकर जावळे पाटील अँग्रो फुड प्रोड्युसर कंपनी लि. नागूर, ता. लोहारा यांच्यावतीने दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लि., उस्मानाबादच्या वतीने सन २०२०-२१ खरीपासाठी किमान आधारभूत किंमत योजने अंतर्गत नाफेडमार्फत धान्य खरेदी केंद्राचा शुभारंभ कै.माधवराव पाटील मार्केट संकुलातील गाळ्यामध्ये जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बापुराव पाटील यांच्या हस्ते शनिवारी  रोजी करण्यात आले. 

यावेळी माजी नगराध्यक्ष धनराज मंगरुळे, रशीद शेख, दिनकरराव जावळे पाटील, दत्ता चटगे, आयुब मासुलदार, सुधीर चव्हाण, रमेश मिणियार, मार्केट कमिटीचे सहसचिव अण्णाराव कुंभार, किरण गायकवाड, नितीन अष्टेकर, या केंद्राचे चेअरमन प्रदीप पाटील, व्यवस्थापक सलीम शेख, अजमेर दाळिंबकर, प्रकाश राठोड, शिवराज पाटील, बालाजी कारभारी, भीमसेन जाधव, अक्रम खान, देवेंद्र येवले, सिध्दू कवाळे आदींची उपस्थिती होती. 


सदर केंद्रावर धान्य आणताना शेतकऱ्यांनी मालातील खडे, माती व काडी कचरा नसलेला व न भिजलेला, मालाची आर्द्रता १२ टक्के पेक्षा कमी असावी, खरेदी केंद्रावर येताना शेतकऱ्यांनी सातबारा व आठ अ उतारा, तलाठ्याचा पीकपेरा प्रमाणपत्र, आधार कार्ड, आधार कार्ड लिंक असलेल्या बॅंकेच्या चालू पासबुकाची झेरॉक्स, खरेदी केंद्रावर आणलेल्या मालाचे वजन झाल्यावरच ऑनलाईनद्वारे काटा पावतीनंतर शेतकऱ्यांचे पेमेंट ऑनलाईन शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल. 


कृपया शेतकऱ्यांनी शेतमाल नमुना अगोदरच तपासून घेऊन शेतमाल केंद्रावर आणावा, तुर हमीभाव सहा हजार तर हरभरा ५१०० रुपये प्रती क्विंटल दराने माल घेण्यात येत असून मालाची ऑनलाईन नोंदणी नि: शुल्क करता येईल असे केंद्राचे व्यवस्थापक सलीम शेख यांनी माहिती दिली. 

Labels:

वाचन संस्कृती जोपासल्याशिवाय मराठी भाषा समृध्द होणार नाही- डॉ. रमाकांत पाटील

 मुरूम, ता. २७ :       
   कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस हा मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून साजरा करताना मराठी भाषा आणि साहित्याचे जतन करताना वाचन संस्कृती जोपासल्याशिवाय मराठी भाषा समृद्ध होणार नाही असे प्रतिपादन ज्येष्ठ विद्रोही साहित्यिक डॉ. रमाकांत पाटील यांनी केले. 

माधवराव पाटील महाविद्यालयात महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती व मराठी अभ्यास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शनिवारी दि.२७ रोजी प्रमुख अतिथी म्हणून  बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माधवराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक सपाटे होते. यावेळी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. रविंद्र आळंगे, आक्युएसीचे समन्वयक डॉ. किरण राजपूत, विद्यापीठाच्या वाणिज्य अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. रवींद्र गायकवाड, महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हा सचिव डॉ. सुधीर पंचगल्ले, प्रा.सतिश रामपूरे, प्रा.दयानंद बिराजदार आदींची प्रमुख उपस्थिती होती.

 पुढे बोलताना डॉ. पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचा आदर करून साहित्याच्या माध्यमातून समाज परिवर्तनासाठी ज्यांनी त्याग व बलिदान दिले अशा साहित्यिकांच्या विचाराचे स्मरण झाले पाहिजे. विद्यार्थ्यांनी वाचनाच्या माध्यमातून विचार शब्दबद्ध करायला शिकावे तरच खऱ्या अर्थाने मराठी भाषा प्रगल्भ होईल असे ते शेवटी म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नागनाथ बनसोडे यांनी केले. प्रास्ताविक प्रा. शिवाजी राजोळे आणि आभार प्रा. सोमनाथ व्यवहारे  यांनी केले.

Labels:

संत रविदास महाराज यांना जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन


        उस्मानाबाद,दि.27:

‘मन चंगा तो कठौती मे गंगा’ मन शुध्द असेल तर कुठेही समाधान लाभते, पापी मनाने कितीदाही अन् कोणत्याही नदीत स्नान केले तरी समाधान लाभत नाही, असे विचार सांगणाऱ्या संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना आज अभिवादन करण्यात आले.


 यावेळी  निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, सामान्य प्रशासनचे नायब तहसीलदार संतोष पाटील, अव्वल कारकुन नरसिंह ढवळे, गजानन नरवडे, ज्योतीराम देवकर, नागरगोजे, शेख शाकीर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Labels:

तुळजापूर : जीर्ण झालेल्या झाडाची नगरपरिषदेकडून विल्हेवाट


तुळजापूर, दि. २७ :

तुळजापूर शहरातील उस्मानाबाद रोडवर जीर्ण झालेल्या वृक्ष तोडणी करण्यासाठी युवक नेते दिनेश क्षीरसागर यांच्या पाठपुराव्यास अखेर यश आले असुन  नगरपरिषदेने कार्यवाही सुरु केली आहे.

 तुळजापूर शहरातील उस्मानाबाद रोडवरील  लगतच्या फुटपाथच्या बाजूला जीर्ण अवस्थेतील धोकादायक वृक्ष प्रशासनाने तोडण्याची कार्यवाही केली आहे . सलग एक महिना   नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांना अर्ज करून  पाठपुरावा झाल्यानंतर  नगरपरिषदेने झाड तोडण्यासाठी कर्मचारी नियुक्त करून झाड तोडले आहे.

Labels:

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित "मराठी स्वाक्षरी" स्पर्धेला नळदुर्ग येथे उत्स्फूर्त प्रतिसाद

नळदुर्ग ,दि.२७ : 
मराठी भाषा दिन व कवि कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त मनसे अध्यक्ष  राज ठाकरे यांनी मराठी जनतेला आवाहन केल्यानुसार   मराठी स्वाक्षरी अभियानात 
आपला सहभाग नोंदवावा, त्याप्रमाणे   नळदुर्ग शहरात मनसेच्या वतीने आयोजित केलेल्या मराठी स्वाक्षरी स्पर्धेला उत्सर्फुत  प्रतिसाद मिळाला आहे.


या आभियानात विशेष म्हणजे  सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिका-यानी आपला सहभाग नोंदवला आहे. त्याचबरोबर पत्रकार, व्यापारी सामाजिक, राजकीय, वैद्यकीय , शिक्षण आदि क्षेत्रातील मान्यवरानी अभियानात सहभागी झाले.

यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे, जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे,नगरसेवक शहबाज काझी, नगरसेवक बसवराज धरणे, जळकोट ता. तुळजापूर  ग्रामपंचायतचे सरपंच  अशोकराव पाटील,सामाजिक कार्यकर्ते संजय  जाधव,अझर जहागिरदार,भाजयुमो शहराध्यक्ष श्रमिक पोतदार,एम.आय. एम.चे मन्सूर शेख, पत्रकार विलास येडगे, शिवाजी नाईक, दीपक जगदाळे, तानाजी जाधव, सुनील गव्हाणे ,विशाल डुकरे,आदिसह अनेक मान्यवरानी अभियानात सहभाग नोंदवला

 या स्पर्धेत प्रथम क्रमांक ॲड.धनंजय धरणे, द्वितीय डॉ. सत्यजीत डुकरे, तृतीय  पत्रकार  विलास येडगे या सहभागी असणाऱ्यानी स्वाक्षरी स्पर्धेत  विजय मिळवला आहे. विजेत्याना मनसेच्या वर्धापन दिनी ९ मार्च रोजी  गौरव करून आकर्षक भेट वस्तु,सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचे आयोजन जनहित कक्ष व विधि विभागाचे ॲड.मतीन बाड़ेवाले,मनसे शहराध्यक्ष अलीम शेख,शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी, शहर उपाध्यक्ष रमेश घोड़के,मनविसे शहराध्यक्ष सूरज चव्हाण, शहर सचिव आवेज इनामदार आदिनी केले होते.

Labels:

तुळजापुरात पंतप्रधान आत्मनिर्भर कर्ज वितरण




तुळजापूर, दि. २७ :

स्टेट बँक आँफ इंडीया शाखा तुळजापूर  नगरपरिषद  यांच्या संयुक्त विद्यामानातुन पंतप्रधान आत्मनिर्भर योजनेतुन प्रत्येकी लाभार्थींना १० हजार  रुपयेचे कर्ज  वाटप  करण्यात आले.    

यावेळी  बँकेचे शाखा प्रमुख डाॅ पद्माकर चांदणे, बाळासाहेब हंगरगेकर, विकास सिंगल, एस एस वाघमारे ,नगर परिषदचे अधिकारी माने अर्जुन, हे उपस्थित होते.

Labels:

तुळजापूरात सावरकर पुण्यतिथी साजरी; सावरकरांच्या विचाराचा प्रसार होणे गरजेचे


तुळजापुर, दि. २६ :

स्वा. सावरकर  यांच्या ५५ व्या स्मृतिदिनानिमित्त सावरकर विचारमंच तुळजापूरच्या वतीने   संस्कार भारती तुळजापूर शहराध्यक्ष  पद्माकर मोकाशे  व सचिव   सुधीर महामुनी  ,  सावरकर विचारमंचचे अध्यक्ष बाळासाहेब शामराज यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. 


यावेळी स्वा. सावरकर यांच्या विषयीचे विचार संस्कार भारती अध्यक्ष पद्माकर  मोकशे व  गणेश जळके यानी   सावरकरांचे विचार मांडताना सावरकरांचे विचार तरूणांनी आंगीकारावे असे त्यांनी विचार व्यक्त केले .

यावेळी मंचाचे अध्यक्ष  बाळासाहेब शामराज  तसेच   पत्रकार  अंबादास पोफळे,   जगदिश कुलकर्णी, पुजारी मंडळाचे उपाध्यक्ष  बिपीन शिंदे. सनातन  संस्थेचे  बगडी  सावरकर विचारमंच उपाध्यक्ष उमेश गवते, कार्याध्यक्ष महेश कुलकर्णी, महेश गरड,  सुहास साळुंखे, गिरीश  देवळालकर, शिवाजी डावकरे,  सर्व सावरकर प्रेमी नागरिक  उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक  महेश कुलकर्णी यांनी तर आभार  बाळासाहेब निकते यांनी केले.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचाराचे पूर्वीपासून देशाला गरज आहे आज ती अधिक प्रखरतेने जाणवत आहे त्यामुळे नवीन पिढीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे साहित्य वाचन करून त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करून अनुकरन करावे असे आवाहन  बाळासाहेब शामराज यांनी केले.

Labels:

यशवंतराव चव्हाण कॉलेजमध्ये राजभाषा दिन साजरा


तुळजापूर, दि. २७ :

 येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात मराठी राजभाषा दिन प्राचार्य डॉ. मोहन बाबरे प्रा. रत्नाकर उपासे आदीच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. साहित्यिक प्रा. रत्नाकर उपासे यांच्या कथाकथनाचा कार्यक्रम यानिमित्ताने  झाला.

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयमध्ये  कुसुमाग्रज जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन   करण्यात आले. याप्रसंगी प्रा. डी. जी. जाधव, प्रा. राजीव कदम , प्रा. रत्नाकर  उपासे, अधीक्षक पांडुरंग नागणे यांची उपस्थित होती. प्रास्ताविकात  राजीव कदम यांनी कुसुमाग्रज यांच्या जीवनावरील प्रसंग सांगितले. यावेळी बडबदीकाठ या पुस्तकाचे लेखक साहित्यिक प्रा. रत्नाकर उपासे यांनी मंगरुळच्या एकनाथ यांच्या पात्राला समोर ठेऊन लिहीलेली कथा सांगितली. ग्रामीण ढंगातील ही कथा सांगताना मंगरूळ येथील एकनाथ यांच्या सहज आणि सर्वांना हवाहवासा वाटणारा एकनाथ उभा केला, मोहोळ काढणारा एकनाथ सांगताना, प्रा. उपासे यांनी आपल्या शैलीत खास घटना व्यक्त केल्या. प्रा. प्रवीण भाले, डॉ. विनय चौधरी, प्रा. मंदार गायकवाड, प्रा. अमोद जोशी, प्रा. ए. डी. पाटील, प्रा. आर. जे बोपालकर, डॉ. सतीश महामुनी, प्रा सी टी तांबे, प्रदीप कदम यांची यावेळी उपस्थिती होती.

Labels:

पिंपळा (खुर्द) येथील शिवसेनेच्यावतीने वृक्षारोपण


काटी, दि. २७ :
 तुळजापूर तालुक्यातील पिंपळा (खुर्द) येथे  शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा कळंब- उस्मानाबाद  विधानसभेचे आमदार  कैलास पाटील यांचा वाढदिवसानिमित्त  शिवसैनिकांच्या वतीने सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून कोरोनामुळे  सामाजिक अंतराचे  पालन करीत ठिकठिकाणी वृक्षारोपणाचे  कार्यक्रम राबविण्यात आले. 


  यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी, बालाजी चुंगे, सरपंच गिता वाघमोडे, उपसरपंच विजय जाधव, ग्रा.पं.सदस्य संग्राम पांढरे, मोहन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

Labels:

पळस बहरला, वसंत ऋतूची चाहुल

चिवरी, दि.२७ : राजगुरु साखरे
वसंत ऋतूची चाहूल लागताच नजरेला भुरळ घालणारा पळस सध्या लाल गडद झाला आहे, पळस सध्या बालाघाटच्या डोंगररांगा माळावर भरला आहे. यामुळे रानात आत्तापासूनच रंग उत्सवाला सुरुवात झाली आहे, हिंदू संस्कृती मधील होळी सणानिमित्त पळस फुलापासून रंगाची उधळण केली जाते.

 पळस सध्या चहूकडे मोठ्या प्रमाणात बहरला आहे, लाल केशरी आणि किंचित पांढऱ्या रंगाच्या फुलांनी भरलेली पळसाची झाडे सध्या सर्वच ठिकाणी वाटसरूंचे  लक्ष वेधून घेत आहे. उन्हाळ्यात सर्व झाडांची स्थिती चिंताजनक असते, नेमकी पळसाला मात्र लालजर्द फुले लागलेले असतात. या झाडाला पाने नसतात, नुसत्या फुलांची जणू काय वसंत ऋतुचे आगमन होताच उन्हाळ्याची स्वागत करायला पळस फुलेला दिसतो . 

त्यानंतर काही दिवसातच नवीन तजेलदार पोपटी ,हिरवीगार पाने त्याला लागतात. त्याच्या ग्रामीण भागात विवाह समारंभात जेवणासाठी पत्रावळी म्हणून वापर करतात या झाडाचे वैशिष्ट्य म्हणजे या झाडाला पाणी कुणी घालत नाही, माळरानावर शेतीच्या बांधावर, अत्यल्प पाण्याच्या ठिकाणी ही झाडे आपोआप येतात. 

पळसाच्या फुलांचा पूर्वी रंग करण्यास वापर होत असे, मात्र अलीकडच्या काळात कृत्रिम रासायनिक रंगामुळे ही पद्धत मागे पडत चाललेली दिसून येत आहे.

Labels:

Friday, 26 February 2021

महाराष्ट्र ग्रामीण बँक सास्तूर शाखेतर्फे स्वयंसहाय्यता गटांना 16 लाखांचे कर्ज वाटप

  उस्मानाबाद,दि . २६ :
उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंर्तगत लोहारा तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती  आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा सास्तूरच्या संयुक्त विद्यमाने सास्तूर येथील उमेद अंतर्गत स्थापन झालेल्या 14 महिला स्वयंसहाय्यता गटांना 16 लाख रुपये बँक कर्ज वाटप करण्यात आले. 


नुकतेच लोहारा पंचायत समिती येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कर्ज वाटप मेळावा घेण्यात आला.
 महिला ह्या स्वयंमपूर्ण झाल्या आहेत आणि त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे आवश्यक आहे. या कर्जाच्या माध्यमातून महिलांनी जास्तीत जास्त शाश्वत उपजीविकेची साधने उभी करावीत. आपल्या आर्थिक उत्पन्नात वाढ करावी जेणे करून बँक कर्जाची वेळेत परतफेड करता येईल,असे मत डॉ.फड यांनी यावेळी व्यक्त केले.


 यावेळी फड यांच्या हस्ते उपस्थित गटातील सदस्यांना कर्ज वाटप करण्यात आले.यावेळी महिलांनी कर्जाचा योग्य प्रकारे विनियोग करावा यातून नवीन  व्यवसाया उभे करून बँकेच्या कर्जाची वेळेत परतफेड करावी, असे आवाहन  फड यांनी  यावेळी केले.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार नवाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितिन दाताळ, उपविभागीय अधिकारी  विठ्ठल उदमिले, गटविकास अधिकारी सोपान अकेले, महाराष्ट्र ग्रामीण बँक सास्तुर चे शाखा व्यवस्थापक सचिन डाके यांची उपस्थिती होती. तसेच लोहारा पंचायत समिती अंतर्गत सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका अभियान व्यवस्थापक अमोल कासार,  तालुका व्यवस्थापक आर्थिक समावेशन कटकदौंड प्रणिता, प्रभाग समन्वयक प्रीतम बनसोडे, बँक सखी मालन कांबळे, सीआरपी रेशमा कादरी तसेच उमेद चे सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
                                        

Labels:

नळदुर्ग : स्वा.वि.दा.सावरकर यांच्या आत्मार्पण दिनानिमित्त प्रतिमापूजन

नळदुर्ग, दि. २६ : हिंदुहृदयसम्राट,स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनानिमित्त नळदुर्ग  येथिल स्वा.सावरकर युवा मंचच्या वतीने प्रतिमेचे पूजन नगरसेवक   विनायक अहंकारी यांच्या हस्ते करण्यात आले.


यावेळी मनसेचे सरचिटणीस तथा स्वा सावरकर युवा मंचचे अध्यक्ष  प्रमोद कुलकर्णी, सनी भूमकर,सूरज जोशी, स्वप्नील कुलकर्णी, आदित्य कुलकर्णी, अनिल गुरव,अरुणराव जोशी, भीमराव चव्हाण    ,सचिन भूमकर, शामकांत पाटील,सोनू गवळी,आनंद कमठाणकर,यांच्यासह सावरकर प्रेमी नागरिक उपस्थित होते.

Labels:

सावरगाव येथे शिवजयंती व संतोष बोबडे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरासह विविध कार्यक्रमाचे आयोजन

    
काटी, दि.२६ : उमाजी गायकवाड तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथे शनिवार दि. 27 रोजी सकाळी 9 वाजता येथील बसस्थानक शेजारी शिवजयंती निमित्त व भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष (दादा) बोबडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 

यंदा कोरोना संसर्गाच्या पार्श्र्वभूमीवर भाजपचे तालुकाध्यक्ष यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला नाही. परंतु राज्यातील रक्ताच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून व निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा भरून काढण्याच्या उद्देशाने येथील संतोष(दादा) बोबडे मित्र परिवार व शिवजन्मोत्सव तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सावरगाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या भव्य रक्तदान शिबिरात सहभाग नोंदविण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Labels:

तामलवाडी येथे बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या वतीने 12 महिला बचत गटांना कर्जाचे वितरण


काटी, दि.२६:  
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या वतीने महाराष्ट्र ग्रामीण जीवन उन्नती उमेद अभियान अंतर्गत बॅंकेचे शाखाधिकारी अभिषेक कुमार यांच्या हस्ते  बारा महिला बचत गटांना एक टक्का या नाममात्र व्याज दराने प्रत्येकी एक व दोन लाख रुपये असे एकूण 19 लाख रुपये कर्जाचे वितरण करण्यात आले. 

 महिला बचत गटांचे चार प्रस्ताव तयार आहेत. या मध्ये प्रामुख्याने जय संतोषी माता महिला बचत एक लाख, उपासणा महिला बचत गट एक लाख, करण अर्जून महिला बचत गट दोन लाख, श्री समर्थ महिला बचत गट दोन लाख या बचत गटांना बुधवार दि.24 रोजी कर्जाचे वितरण करण्यात आले. तर यापुर्वी शिवशंभो, श्रीराम, सावित्रीबाई फुले, श्री गणेश, परी, श्रेया या महिला बचत गटांना प्रत्येकी एक लाख कर्जाचे वितरण करण्यात आले. तर आणखी चार महिला बचत गटांचे प्रस्ताव तयार असल्याचे बॅंकेच्या वतीने सांगण्यात आले. 

लॉकडाऊनमुळे सर्वच नागरिकांच्या जीवनमानावर परिणाम झाला आहे. बचतगट चालविणाऱ्या महिलांनाही त्याचा फटका बसला आहे. सध्या कोरोनामुळे उद्योगधंदे बंद असल्याने ग्रामीण भागातील महिला मोठ्या संकटाचा सामना करीत आहेत. ग्रामीण भागातील बऱ्याचशा महिला महिला या घरेलू क्षेत्रात काम करतात आणि रोजच्या कमाईवर अवलंबून असतात. याचा सकारात्मक विचार करून बॅंकेचे शाखाधिकारी अभिषेक कुमार यांनी महिला बचत गटांना प्राधान्यांने कर्ज पुरवठा केला. त्यामुळे बचत गटातील अनेक महिलांना याचा फायदा होत असून महिला मधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

 यावेळी शाखाधिकारी अभिषेक कुमार, बॅंक कर्मचारी मेधा धारिया, भोसले, बनसोडे, बी.एम.शेरखाने, नामदेव तांबटकरी, नवीन शिंदे,राम मस्के यांच्यासह महिला बचत गटातील संजीवनी हजारे, अनिता म्हेत्रे, शबाना शेख, शैला भाळे,वंदना घोटकर, शबाना जमादार, उज्वला जगताप आदी महिला उपस्थित होत्या.

Labels:

Thursday, 25 February 2021

नुतन पोलिस उपनिरीक्षकासह दोघा जवानांचा ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार

इटकळ ,दि.२५ :
नुकतेच पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत उज्वल यश संपादन केलेले अणदूर ता.तुळजापूर येथील महेश घोडके व केशेगाव येथील भारतीय सेनेतील दोन जवानांचा ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.

अगदी प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत केवळ जिद्दीच्या बळावर अणदूर येथील महेश धनराज घोडके यांनी पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत घवघवीत यश संपादन करून आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केले.व सध्या महेश धनराज घोडके हे  नागपुर येथे पोलीस दलात सेवा बजावत आहेत. त्यांनी हे उज्वल यश संपादन केल्या बद्दल पोलीस उपनिरीक्षक महेश घोडके व केशेगाव येथील भारतीय सेनेतून 21 वर्ष सेवा पूर्ण करून सेवानिवृत्त झालेले मेजर भालचंद्र कोळी , रामचंद्र साखरे यांचा ग्रामस्थांच्या वतीने नितिन जळकोटे व संजय शिवकर मुरलीधर शिंनगारे यांनी  शाल ,श्रीफळ ,पुष्प गुच्छ व फेटा बांधुन सत्कार केला.


यावेळी भिमाशंकर घंटे,संगमेश्वर जळकोटे,नागनाथ जळकोटे,चन्नापा साखरे,परमेश्वर हन्नुरे ,दिनेश सलगरे,नामदेव गायकवाड ची प्रमुख  उपस्थिती  होती.

Labels:

आरती गायकवाड यांची ओबीसी महासंघाच्या युवती प्रदेश अध्यक्षपदी निवड

वागदरी, दि. २५ : 
बोरगाव (तु.) ता.तुळजापूर येथील मुळ रहिवासी असल़ेले आणि सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेले सामाजिक कार्यकर्ते आरवींद  गायकवाड यांची कन्या आरती आरविंद गायकवाड यांची आखिल भारतीय ओबीसी महासंघ युवती विभाग महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.


 आखिल भारतीय ओबीसी महासंघाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष रवीकुमार स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली सांगली येथे नुकतेच झालेल्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली आहे. 


  यावेळी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रकाश हिवारकर,विनोद भामरे, राष्ट्रीय सचिव गजानन मिरजे,राष्ट्रीय सरचिटणीस कुमार कुंभार,राष्ट्रीय प्रसिद्धीप्रमुख गणेश नकाते, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गौरव पाटील, राज्य सरचिटणीस विक्रम विजापूरे, मराठवाडा विभाग अध्यक्ष राजेश भांगे आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

त्यांच्या या निवडी बद्दल सामाजिक कार्यकर्ते आर.एस.गायकवाड, मारुती बनसोडे, शिवाप्पा जवळगे ,सुनील बनसोडे, अरुण लोखंडे, एस.के.गायकवाड, डॉ. क्रांती गायकवाड, सहशिक्षिका आरती गायकवाड, प्रिती गायकवाड आदीनी आभिनंदन केले आहे.

Labels:

शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ज्ञानेश्वर घोडके यांनी अनाथ मुलीचे स्वीकारले पालकत्व




तुळजापूर , दि.२५ :  शिवसेनेचे उस्मानाबाद  जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख तथा कळंब- उस्मानाबाद  विधानसभा मतदार संघाचे  आमदार कैलास  पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण जिल्हाभरात विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण जिल्ह्यात हा वाढदिवस विविध प्रकारच्या सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

 नळदुर्ग शहरातील इंदिरानगर येथे केंद्रीय जिल्हा परिषद शाळेमधील एक अनाथ मुलीचा दहावी पर्यंतचा शिक्षणाचा खर्च उचलत तिचे  युवा सेनेचे माजी तालुकाप्रमुख ज्ञानेश्‍वर घोडके यांनी पालकत्व घेतले आहे. या वेळेस त्यांनी प्राथमिक स्वरूपात एक हजार रुपयाचा धनादेश गडदे वैष्णवी रेशीम या मुलीकडे सुपूर्द केला.

   शहर पञकार संघटनेचे अध्यक्ष सुहास येडगे, विलास येडगे, अमर भाळे यांच्या हस्ते हा धनादेश देण्यात आला. तसेच यावेळी शाळेतील उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. या मुलीची शैक्षणिक गुणवत्ताही इतर कोणत्याही कारणास्तव दबली जाऊ नये, यासाठी केलेला हा आपला एक छोटासा प्रयत्न असल्याचे यावेळी  ज्ञानेश्वर घोडके यांनी सांगितले. 

 ज्ञानेश्वर घोडके, मुख्याध्यापक संजय घंटे , भुजबळ  शेख , अंगणवाडीसेविका सांगवीकर  म्हेत्रे , युवा सेनेचे माजी शहरप्रमुख अफजल कुरेशी, लक्ष्मीकांत घोडके, आकाश घोडके, राहुल घोडके, रामेश्वर घोडके, अजय पवार, किरण दुस्सा, रोहित माने, शशिकांत जाधव, शमशोद्दीन शेख यांच्यासह नळदुर्ग शहरातील शिवसैनिक व युवा सैनिक  उपस्थित होते.

Labels:

संगणक परिचालकांचे आंदोलन काढण्याचा षड्यंत्र



नंदगाव, दि.२५:शाम नागीले
 महाराष्ट्र राज्य संगणक परीचालक संघटना गेल्या चार दिवसापासून मुबंईच्या आझाद मैदान येथे आंदोलन करत असून ते  आंदोलन हाणून पाडण्याचे षडयंत्र महाविकास आघाडी सरकार करत असल्याचा आरोप केला जात  आहे.

   राज्य संगणक परीचालक संघटना गेली 10 वर्षापासून संग्राम प्रकल्प ,आपले सरकार सेवा केंद्र मध्ये काम करत असून यामध्ये टोटल 22000 संगणक परिचालक आज काम करीत आहेत. महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेतील संगणक परिचालक यांना आयटी महामंडळा कडून कर्मचारी दर्जा देऊन किमान वेतन द्यावे या मागणीसाठी आझाद मैदानात गेली चार दिवसांपासून आंदोलन करीत आहेत संगणक परिचालक संघटनेमुळे आज महाराष्ट्र सरकारला तीन वेळेस प्रथम पारितोषक मिळाले असून हे फक्त महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेमुळे महाराष्ट्र सरकार प्रथम क्रमांक मिळाला असून अशा संगणक परिचालकांना आजही सरकार आश्वासन व वचन देऊन सुद्धा त्या आश्वासनाची पूर्तता  करत  नाही.  यामुळे आज महागाई ,बेरोजगारी वाढत आहे.

 या महागाईच्या काळामध्ये 6 हजार एवढ्या वेतनावर काम करत असून 
शासन ,प्रशासन व ग्रामीण जनतेचा दुवा असलेला संगणक परिचालक यांना महाराष्ट्र सरकारने आयटी महामंडळात कर्मचारी दर्जा देऊन किमान वेतन द्यावे, या मागणीसाठी आज चौथ्या दिवशीही आझाद मैदानावर आंदोलन करीत असून येथे आंदोलन हाणून पाडण्यासाठी महाविकास आघाडी सरकार पोलिसांना पुढे करून हे आंदोलन मिटवण्याचे व संपविण्याचा कट कारस्थान करत असल्याचा आरोप संगणक परिचालकातुन होत आहे.


Labels:

महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून उद्योग उभारावेत:अस्मिता कांबळे



उस्मानाबाद, दि. 25

माहिलांनी पुढे  येऊन बचत गटाच्या माध्यमातून उद्योग उभारावेत आणि स्वत:सह कुटुबांला आर्थिक र्स्थेर्य मिळवून द्यावे,असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अस्मिता कांबळे यांनी नुकतेच केले. 


महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष कळंब पंचायत समिती, अंतर्गत दहिफळ येथे प्रगती महिला ग्राम संघामार्फत नुकतेच घरकुल मार्टचे उद्घाटन  जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिताताई कांबळे यांच्या हस्ते झाले,यावेळी त्या बोलत होत्या.    
  
    जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. सहाय्यक गट विकास अधिकारी  कुसनेनीवार, जिल्हा अभियान व्यवस्थापक समाधान जोगदंड,जिल्हा समन्वयक गुरुनाथ भांगे कृतीसंगम, दहिफळचे सरपंच पाटील, ग्रामसेवक  यांच्या उपस्थिीत  करण्यात आले.


उमेद अभियानांर्तगत प्रगती महिला ग्राम संघाच्या मध्यातून नाविन्यपूर्ण उपक्रम करण्यात आला आहे. सर्वासाठी घरे हे केंद्र शासनाचे महत्त्वकांक्षी धोरण आहे.केंद्र पुरस्कृत प्रधान मंत्री आवास योजना (ग्रामीण) आणि राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना,शबरी आवास योजना, पारधी आवास योजना,कोलाम आवास योजना इत्यादी योजना घरकुलासाठी राबविण्यात येतात या योजनाची अमलबजावणी गतिमान आणि गुणवत्तापूर्वक होण्याकरिता राष्ट्रीय आवास दिनाचे औचित्य साधून राज्यामध्ये 20 नोव्हेबर 2020 ते 28 फेब्रुवारी 2021 या शंभर दिवसाच्या कालावधीमध्ये माहाआवास अभियान (ग्रामीण) भागात राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.


 घरकुल मार्ट अंर्तगत घरकूल लाभार्थींना घर बांधणीसाठीचे सर्व साहित्य एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे. घरकूल मार्ट सुरु होण्यापूर्वी लाभार्थ्यांना घरकूलाकरिता लागणारे सर्व साहित्य कळंब किंवा येरमाळा येथून आणावे लागत होते. आता लाभार्थी यांना वाहतुकीचा खर्च तसेच वेळ सुधा वाचणार आहे. या घरकूल मार्टचा फायदा दहिफळ ग्रामपंचायत परिसरातील सपनाई,गौर,वाघोली बाभळगाव, परतापूर आणि उपाळई या गावाना होणार आहे.या घरकूल मार्टच्या मध्यातून जवळ जवळ 238 घरकूल लाभार्थ्यांना सर्व  साहित्य  माफक दारामध्ये चांगल्या गुणवत्तेचे उपलब्ध होणार आसल्यामुळे त्यांना थेट फायदा होणार आहे. 


या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्राम संघाचे अध्यक्ष अंजली ढवळे यांनी केले. तर भाग्यश्री यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला तालुका अभियान व्यवस्थापक सचिन ठोकळ,तालुका व्यवस्थापक आयबी/सीबी तेजस कुलकर्णी, तालुका व्यवस्थापक एमआयएस विलास ताटे,प्रभाग समन्वयक स्नेहल गावंडे,अमोल सालपे व गावातील स्वयंसहाय्यता गटातील महिला उपस्थित होत्या.
                                     

Labels:

जळकोट येथे अमोल पाटील यांचा सत्कार

जळकोट,दि.२५
आमदार रोहित पवार विचार मंचचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा नूतन राष्ट्रवादी काँग्रेस माहिती तंत्रज्ञान सेलचे उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष  ऍड. अमोल पाटील यांनी जळकोट गावाला भेट दिली.


ॲड. अमोल पाटील यांची नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस माहिती तंत्रज्ञान सेलच्या जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली आहे. या निवडीबद्दल जळकोट येथील राष्ट्रवादी युवक कार्यकर्त्यांनी सत्कार केला.

या सत्काराला उत्तर देताना पाटील यांनी सांगितले की, शरदचंद्र पवार यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम करणार असून, या माध्यमातून सर्वसामान्यांच्या अडी अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे. यावेळी ब्रह्मानंद कदम, ॲड. सचिन कदम, दगडू सुरवसे, रोहित कदम, अंगद पाटील, अजय गंगणे, गणू गंगणे, विशाल कदम, तानाजी चव्हाण, करण भोगे, अमीर पाशा जमादार आदिसह राष्ट्रवादीचे युवक कार्यकर्ते उपस्थित होते.

Labels:

खुदावाडी ग्रामस्थांच्यावतीने अणदूर ग्रामपंचायतीचे नूतन सरपंच, उपसरपंच ,सदस्याचा सत्कार

अणदुर,दि.२५: 
तुळजापूर तालुक्यातील  "अणदूरच्या सरपंचपदी रामचंद्र आलूरे यांच्या निवडीमुळे ग्रामस्थांच्या गावच्या विकासाच्या अपेक्षा वाढल्या आहेत, त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी निस्वार्थी, प्रामाणिक, दूरदृष्टी, सगळ्यांना विश्वासात घेऊन ,स्वच्छ,पारदर्शक कारभार नूतन सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी करावा" असे आवाहन जेष्ठ समाजसेवक डॉ. सिद्रामप्पा खजुरे यांनी केले.


 खुदावाडी ग्रामस्थांच्या वतीने अणदूर ग्रामपंचायतचे नूतन सरपंच, उपसरपंच ,सदस्य यांच्या सत्कार समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून खजुरे हे  बोलत होते.
 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खुदावाडीचे सरपंच शरद नरवडे हे होते. या वेळी गावचे उपसरपंच पांडू  बोगरगे हे उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. खजुरे म्हणाले की ,विरोधकांचा सन्मान करा, सहकाऱ्यांना बरोबर घ्या, समाजाच्या नेमक्या अडचणी समजून घ्या, शासकीय योजनेचा अभ्यास करा, प्रगतशील गावांना भेटी देऊन त्यांनी कसा गावाचा विकास केला. त्याचा अभ्यास करा, ठोस निर्णय, अंमलबजावणी करा, जनतेचा विश्वास संपादन करा, मग बघा कसा गावाचा सर्वांगीण विकास निश्चित होतो ते,
यावेळी सत्कारमूर्ती माजी सरपंच सरिता मोकाशे म्हणाल्या की , खुदावाडी गावाने फार मोठा विकास डॉ. खजुरेंच्या नेतृत्वाखाली केला असून इतर गावांना भेटी देण्याऐवजी खुदावाडीला आम्ही सर्व सदस्य भेट देऊन व तुमचे मार्गदर्शन घेऊ असे सांगितले, 

संत गाडगेबाबा यांची जयंती निमित्त हा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी सरपंच रामचंद्र आलूरे, उपसरपंच डॉ नागनाथ कुंभार, बाळकृष्ण घोडके यांची भाषणे झाली, या वेळी डॉ. जितेंद्र कानडे, धनराज मुळे, डॉ विवेक बिराजदार, उज्वला बंदपट्टे, स्नेहा मुळे, भागीरथी गुड्ड व इतर सर्व नूतन सदस्यांचा सत्कार करण्यात आला . बाबुराव जवळगे यांनी सूत्रसंचालन व आभार  केले. कार्यक्रमास वसंत चिंचोले, दगडू सालेगावे, सर्जेराव जवळगे, तुकाराम बोगरगे,गोटू नरवडे, राम जवळगे, संजय नरवडे, भास्कर व्हलदुरे आदी मान्यवरांसह महिला, ग्रामस्थ  उपस्थित होते. कोविड नियम व अटी पाळून सदरील कार्यक्रम घेण्यात आला.

Labels:

अचलेर : आमदार कैलास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना मास्कचे वाटप

 

अचलेर ,दि.२५ : जय गायकवाड
उस्मानाबाद-कळंब मतदार संघाचे आमदार  कैलास  घाडगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लोहारा तालुक्यातील अचलेर येथे युवा नेते सतीश सोमवंशी व मित्र परिवाराच्या वतीने विद्या विकास हायस्कूल मधील शालेय विद्यार्थ्यांना मास्क चे वाटप करण्यात आले.


कोरोना या रोगाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी  या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक भास्कर बेंडगे,लोहारा तालुका पंचायत समितीचे माजी सभापती सिद्रामप्पा दुलंगे,अचलेर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच हिराकांत सोलंकर,तंटामुक्त समिती अध्यक्ष सुरेश खंडाळकर, सतीश सोमवंशी सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ पुजारी,सुनील मदने,दत्तू धनशेट्टी,अतुल सोमवंशी,बंडूसिंह बायस,शिवसेना अचलेर शाखा अध्यक्ष सुधीर बंडगर,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे लोहारा तालुका अध्यक्ष नितीन गोपणे,पत्रकार जय गायकवाड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धेश्वर विभुते  तर आभार फारुक जमादार यांनी मानले.

Labels:

Wednesday, 24 February 2021

श्री तुळजाभवानी मंदिरात भाविकांना मास्क नसल्याने दंडाची कारवाई


तुळजापूर : सतीश महामुनी

तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरामध्ये भाविक भक्तांनी मास्क न घातल्याबद्दल मंदिर प्रशासनाच्या वतीने त्यांची चौकशी करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे सत्र सुरू करण्यात आले यामुळे अनेक भाविकांची पंचाईत झाल्याचे चित्र दिवसभर मंदिर परिसरात दिसून आले.

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापुर यांच्याकडून सोशल डिस्टन्स आणि मास्क तुळजाभवानी मंदिर परिसर आणि शहरांमध्ये बंधनकारक करण्यात आली आहे याविषयी मंदिर संस्थान नाही या प्रसिद्धी करण करून सर्वांनी मास्क घातल्याशिवाय मंदिरात प्रवेश करू नये असा नियम केला आहे या नियमाला अपवाद असणाऱ्या भाविक भक्तांना तसेच पुजारी आणि व्यापारी यांना या अनुषंगाने दिवसभर चौकशी करून मास्क नसणाऱ्या भाविकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली याविषयी मंदिर संस्थानच्या वतीने जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे.

जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर हे मंदिर संस्थानचे अध्यक्ष असून त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे तुळजाभवानी मंदिर संस्थान परिसरात खळबळ उडाली असून गेल्या चार-पाच दिवसांपासून मंदिर संस्थांकडून सातत्याने मास्क आणि सोशल डिस्टन्स राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे याला अपवाद ठरणार या सर्व घटकावर कारवाई केली जाईल असा इशारा तहसीलदार सौदागर तांदळे यांनी दिलेला आहे.

Labels:

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अध्यक्षपदी आबासाहेब खोत यांची निवड

उस्मानाबाद, दि. २४ : 
येथिल  शासकीय विश्रामगृह येथे  धनंजय शिंगाडे यांच्या मार्गदर्शानाखाली बहुजनयोध्दा सामाजिक संघटनेची बैठक संपन्न झाली.

या बैठकीत  नितिन शेरखाने यांच्या अध्यक्षतेखाली  सर्व मागासवर्गीय व ओ. बी. सी समाजातील पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

 या सर्वांच्या उपस्थितीत जयंती उत्सव समितीची नुतन कार्यकारणीची निवड करण्यात आली.समिती अध्यक्ष  आबासाहेब खोत, कार्याध्यक्ष सौ अस्मिता पारवे,उपाध्यक्षपदी संजोग पवार व सतिश कदम,  सचिव  शिवानंद कथले,कोषाध्यक्ष  विशाल शिंगाडे, सहसचिव  अँड गणपती कांबळे, प्रसिध्दीप्रमुख  सुखदेव भालेकर, मिरवणुक  कृष्णा  भोसले, स्वप्निल शिंगाडे,महेश शिंगाडे,अक्षय शिंगाडे,रोहित शिंगाडे,अविनाश शिंगाडे,संतोष वाघमारे,भैय्यासाहेब शिंदे,कल्पक शिंदे,नितेश जानराव, सांस्कृतीक प्रमुख सागर चव्हाण,भावेश काशिद,सतिश ओहाळ,अक्षय सोनवने,अविराज सोनवने,प्रमुख सल्लागार डि. एन. कोळी,लक्ष्मण माने,रवि कोरे आळणीकर, रावसाहेब शिंगाडे,नितिन शेरखाने,संतोष हंबीरे,मुकेश नायगावकर,भारत डोलारे,पांडुरंग लाटे,बबन वाघमारे,अँड संदिप माडेकर,सतिश लोंढे,आदिंची निवड करण्यात आली.

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती दिपक पवार, विकी पवार,दिपक वनवे,अजय शिंगाडे,अक्षय जोगदंड,प्रसाद वाघमारे,आर एन गायकवाड,पृथ्वीराज गायकवाड, प्रथमेस ढेंगळे,विनित सोनटक्के, शुभम घरबुडवे,अमोल वाघमोडे, सुनिल राठोड,अविनाश इंगळे,प्रसाद हुलवने,आदिंची उपस्थिती होती.

Labels:

बेंबळी येथील ग्रामपंचायतीच्या वतीने कुस्ती स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव



उस्मानाबाद,दि.२४ : 
तालुक्यातील बेंबळी येथील ग्रामपंचायतीच्या वतीने राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.


बेंबळी येथील रहिवासी असलेले वैभव गोविंद शिडूळे व सुरज राजेंद्र जाधव यांनी वेरूळ (औरंगाबाद) येथे झालेल्या सीनियर, ज्युनियर, सबज्युनियर राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत अनुक्रमे सिल्वर व ब्राँझ मेडल मिळवले. यांची पंजाब येथे होणार्‍या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या दोघांचा ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच नितीन इंगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


 यावेळी ग्रामविकास अधिकारी करपे, ग्रामपंचायत सदस्य नवाब पठाण, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे संचालक संतोष आगलावे, सामाजिक कार्यकर्ते विष्णूआप्पा निकम, विश्वजीत बरडे सर, अजित माने, दादा वाघे, मारुती कस्पटे, हनुमंत इंगळे, आकाश पाटील, आकाश मुंगळे, अभय डोणे, ग्रामपंचायत कर्मचारी निळकंठ रेडेकर, नेताजी माने आदी उपस्थित होते.

चिवरी येथील श्री महालक्ष्मी यात्रा कोरोनामुळे रद्द, मानक- यांच्या उपस्थितीत होणार धार्मिक विधी


चिवरी,दि.२४:  

 लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील श्री महालक्ष्मी यात्रा यंदा कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय मंदिर कमिटी, पोलीस प्रशासन व महसुल प्रशासनाच्या वतीने बुधवार  दि,२४ रोजी संयुक्त बैठक घेऊन करण्यात आले. यामध्ये श्री महालक्ष्मी देवीचे सर्व धार्मिक विधी रूढी व परंपरा ह्या स्थानिक पातळीवर मोजक्याच मानकरी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पार पडले जाणार असल्याचे बैठकीत निर्णय घेण्यात आला, 
या बैठकीमध्ये   तहसीलदार सौदागर तांदळे  यांनी यावर्षी दि,२, व ३ मार्च रोजी भरणारी महालक्ष्मी यात्रा यावर्षी कोरोनाच्या  पार्श्‍वभूमीवर संपूर्ण यात्रा काळामध्ये मंदिर बंद ठेवून व बाहेर गावातील भाविकांनी घरातच राहुन  प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले.

या बैठकीस  तहसीलदार सौदागर तांदळे , नळदुर्ग  पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक जगदीश राऊत, सरपंच अशोक घोडके, उपसरपंच बालाजी पाटील, सोसायटीचे  बालाजी शिंदे, ग्रामसेवक गोरबा गायकवाड, पोलीस पाटील रुपेश बिराजदार, तलाठी डी. एन. गायकवाड, मंदिर कमिटीचे अध्यक्ष. जयपाल सिंह बायस, ज्ञानदेव झिंगरे, ग्रामपंचायत लिपिक अनिल देडे, धनराज कोरे,कल्याण स्वामी,मोतीराम चिमणे , गोविंद शिंदे, शंकर झिंगरे, दादाराव शिंदे, मारूती काळजते, बबन काळजाते, धनराज मिटकरी, लक्ष्मण कोरे, यांच्यासह ग्रामस्थ व्यापारीवर्ग व पत्रकार  उपस्थित होते.


 यात्रा काळामध्ये चिवरी  महालक्ष्मी मंदिर बंद असल्यामुळे गावातील तसेच पंचक्रोशीतील भाविकांनी घरीच देवीच्या प्रतिमेचे प्रतिष्ठापना करून पूजाअर्चा नैवेद्य दाखवून यात्रा साजरी करावी  असे आव्हान ग्रामपंचायत व मंदिर ट्रस्टच्या वतीने भाविकांना करण्यात आले आहे.

Labels:

नळदुर्ग : पहिल्या निवडणुकीतच उपसरपंच पदावर झेप घेणा-या सौ. सपना चव्हाण यांचा माहेरी गौरव सोहळा थाटात

नळदुर्ग, दि.२४
माहेरहुन सुसंस्काराची शिदोरी घेवुन काही महिन्यापुर्वी सासरी नांदवयास गेलेल्या नळदुर्गच्या कन्येने सासरी ग्रामपंचायत निवडणुक लढवुन विजयी होवुन उपसरपंचपदी वर्णी लागली. त्यामुळे कमी वयात उपसंरपचपदी झेप  घेण्याचा बहुमान मिळविणा-या या कन्येचा नळदुर्गवासियानी जल्लोष करीत थाटात गौरव सोहळा साजरा केला.
 
नळदुर्गचे  माजी न.प.सदस्य सुधीर हजारे यांची विवाहित मुलगी सौ. सपना शंकरसिंह चव्हाण यांची अमरावती जिल्ह्यातील हातुर्णा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी निवड झाल्याने  शहरवासियांच्या व हजारे कुंटूंबियाच्यावतीने गौरव करण्यात आला. 

  नळदुर्ग शहरातील  सुधीर हजारे यांच्या मुलीचे सासर विदर्भातील हातुर्णा जि. अमरावती हे गाव असुन नुकतेच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत  सपना चव्हाण ह्या  मंत्री बच्चु कडू यांच्या प्रहार या पक्षाकडून निवडणुक लढवुन  विजयी  झाल्या. त्यानंतर  त्यांची थेट हातुर्णा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी निवड झाली.  

 
नळदुर्ग येथे  माहेरी आलेल्या सपना शंकरसिंह चव्हाण यांचा  हजारे परिवार, महाराण प्रताप तरुण गणेश मंडळ,शहर पत्रकार संघ, शिवशाही तरुण मंडळ, व शहरवासियांच्या वतीने सत्कार करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात  आले.
यावेळी अनेकानी  मनोगत व्यक्त करुन आभिनंदनपर मार्गदर्शन   केले आहे.


नगरसेवक नितीन कासार, बसवराज  धरणे , महालिंग स्वामी, विनायक अहंकारी , सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव, शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख कमलाकर चव्हाण, माजी नगरसेवक संजय बताले,  सरदारसिंग ठाकुर,  शिवसेनेचे शहर प्रमुख  संतोष पुदाले,  विलास येडगे,शिवाजी नाईक , सुहास येडगे, तानाजी जाधव, उत्तम बणजगोळे ,दिपक जगदाळे, दादासाहेब बनसोडे, अय्युब शेख , अमर भाळे ,अझहर जहागिरदार, रणजितसिंग ठाकुर, राजेंद्र महाबोले, भाजयुमोचे शहराध्यक्ष श्रमिक पोतदार , मनिषसिंह हजारे, राहुल हजारे, सोसायटीचे चेअरमन सुरेश हजारे, शुभम हजारे, महेश हजारे, संदिप हजारे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष  महेबुब शेख, डॉ. अंबेडकर इंग्लिश स्कुलचे संस्थापक मारूती खारवे, राजेंद्र महाबोले, राजेंद्र काशिद, रघुनाथ नागणे, उदयोजक मनिष हजारे, सागर हजारे आदीसह शहरातील विविध मंडाळाचे पदाधिकारी ,कार्यकर्ते मान्यवर उपस्थित होते. कार्सुयक्ञरमाचे संचालन व  प्रास्ताविक विनायक अंहकारी,आभार सुधीर हजारे यानी मानले.

Labels:

तुळजापूर तालुक्यातील खुदावाडीत जया एकादशी निमित्त वारकरी दिंडीसह धार्मिक कार्यक्रम संपन्न


वागदरी,दि .२४,एस.के.गायकवाड 
 तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी येथे श्री  विठ्ठल रुक्मिण मंदिर समितीच्या वतीने  जया एकादशीचे औचित्य साधून टाळ मृदंगाच्या तालावर, हरीनामाचा गजर करीत वारकऱ्यांनी गावात पायी दिंडी काढुन पारंपारिक पद्धतीने विविध धार्मीक कार्यक्रम उत्साहात  साजरे  केले.


  थोर संताच्या माध्यमातून महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाचा वारसा लाभला असून समाजप्रबोधनाचे फार मोठे कार्य वारकरी मंडळाकडून अविरतपणे चालू आहे, चालू राहणार आहे, यात शंका नाही. 
तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी येथेही गेल्या अनेक वर्षांपासून वारकरी संप्रदायाचा वारसा जोपासला जातोय .जया एकादशी निमित्ताने वारकऱ्यांनी गावात पारंपरिक पद्धतीने पायी दिंडी काढून विविध धार्मिक कार्यक्रम केले.

Labels:

नळदुर्ग : उमरगा (चिवरी) येथे संत गाडगेबाबा जयंती साजरी


वागदरी, दि.२४ :
 तुळजापूर तालुक्यातील उमरगा चि येथे राष्ट्रय संत गाडगे बाबा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.


 प्रारंभी सरपंच सौ.स्वाती लिंगाप्पा दुधभाते, उपसरपंच आण्णाराव कदम,यांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना आभिवादन करण्यात आले.


 याप्रसंगी ग्रामसेवक गोरोबा गायकवाड,जेष्ठ कार्यकर्ते शिवाजी नागनाथ सिरगीरे, ग्रामपंचायत सदस्य
विजय सावंत , रोजगार सेवक  गोरख बोराडे, ग्रामपंचायत  कर्मचारी बिरप्पा दुधभाते,सह ग्रामस्थ उपस्थितीत होते.

Labels:

मास्कचे महत्व पटवून देण्यासाठी 'मास्क नाही , तर प्रवेश नाही' तामलवाडी बॅंक ऑफ महाराष्ट्रची अभिनव मोहीम


काटी ,दि.२४ : उमाजी गायकवाड 
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील बॅंक ऑफ महाराष्ट्रचे शाखाधिकारी अभिषेक कुमार यांनी संसर्गजन्य   वाढत्या कोरोनामुळे   सोमवार दि. 22 पासून बॅंक ग्राहकांना मास्क वापराचे महत्व पटवून देण्यासाठी 'मास्क नाही तर प्रवेश नाही' अभिनव मोहीम सुरू करण्यात आली. 
   
बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या तामलवाडी शाखेने राबविलेल्या कोव्हीड प्रतिबंधात्मक  उपाययोजनेसाठी मास्क नाही तर प्रवेश नाही या मोहिमेला बॅंक ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला. 

     
राज्यात सध्या वाढत चाललेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्र्वभूमीवर बॅंक ग्राहकांना मार्गदर्शन करताना शाखाधिकारी अभिषेक कुमार म्हणाले की, मास्कचा नियमित वापर हाच सध्यातरी कोरोनापासून बचावाचा सर्वोत्तम मार्ग असल्याचे सांगून नागरिकांनी मास्कचा नियमित वापर करणे, एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवणे, तसेच वारंवार हात धुणे ही त्रिसूत्री कोरोनाला आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी महत्वाची असल्याचे सांगितले.
 

या मोहीमेअंतर्गत तामलवाडी, धोत्री, पिंपळा,गंजेवाडी, देवकुरुळी येथील बॅंक ग्राहकांना मास्क घालून येण्याच्या सुचना देऊन मास्क वापराचे महत्व,मास्कचा वापर कशा पध्दतीने करावा, हात वारंवार धुण्याचे फायदे, सुरक्षित अंतर का ठेवावे  याविषयी व्यापक जनजागृती करण्यात आली. शाखाधिकारी अभिषेक कुमार यांनी राबविलेल्या या मोहिमेला ग्राहकांनी  प्रतिसाद दिला. 

 यावेळी बॅंक कर्मचारी मेघा घारिया, सुशील भोसले, नितीन बनसोडे, वायचळ यांच्यासह बॅंक ग्राहक उपस्थित होते.

Labels:

Tuesday, 23 February 2021

संत गाडगे महाराज यांना जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन


उस्मानाबाद,दि.23 : अज्ञान, अंधश्रध्दा आणि अस्वच्छतेने ग्रासलेल्या समाजाला कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करणारे थोर समाजसुधारक संत गाडगे महाराज यांच्या 145 व्या  जयंती निमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले.


यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती रुपाली आवले, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी,उपजिल्हाधिकारी पुनवर्सन श्रीमती शुभांगी आंधळे, जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहाय्यक कुलकर्णी, वाघमारे,अव्वल कारकून मोरे, देवकर, नरसिंह ढवळे, चव्हाण, गायकवाड, केंद्रे, चौधरी, महसूल सहायक गजभार आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Labels:

पांगरदरवाडीत आयोजित रक्तदान शिबीरात 26 दात्यानी केले रक्तदान


तामलवाडी, दि. २३:  
तुळजापुर तालुक्यातील पांगरदरवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमीत्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 26 शिवभक्तांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिरामध्ये महिला रक्तदात्यांनी देखील उत्सफुर्तपणे सहभाग नोंदवला होता.

 छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोमवार दि.22 फेबु्रवारी रोजी रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरातील रक्तसंकलन करण्यासाठी उस्मानाबाद येथील शासकिय रूग्णालयातील रक्तपेढीला पाचारण करण्यात आले होते. 

या रक्तदान शिबिरास तामलवाडीचे सहाय्यक पोलिस निरिक्षक सचीन पंडित यांनी भेट देऊन आयोजकांचे आभार मानले. यावेळी सरपंच विजय निंबाळकर, पोलिस पाटिल दादासाहेब मारडकर, प्रताप निंबाळकर, सोमनाथ शिंदे यादिंची उपस्थिती होती. 

रक्तसंकलन करण्यासाठी रक्तपेढीच्या वतिने डॉ.आश्‍विनी गोरे, दिनकर सुपेकर, गणेश साळुंके,सुष्मा घोडके, महादेव जाधव यांनी सहभाग नोंदवला. 

रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी महेश सावंत, मंगेश कदम, ऋषिकेश टिंगरे, अमिर पठाण, प्रमोद कदम, शंकर गाटे यादिं शिवप्रेमी युवकांनी सहकार्य केले.  

Labels:

आई-वडिलांचे संस्कार जीवनाला वळण देतात ह.भ.प शिवलीलाताई पाटील



मुरूम, दि. २३: 

तरूणांनी शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे. माँ जिजाऊंनी बालपणी शिवाजी महाराजांवर जे संस्कार रुजवले त्या संस्कारामुळेच शिवाजी महाराज जाणता राजा होऊ शकले. प्रत्येकाच्या आई-वडीलांचे संस्कार जीवनाला वळण देतात हभप कुमारी शिवलीलाताई पाटील (बार्शीकर) यांनी मुरूम येथे आयोजित कार्यक्रमात सोमवारी (ता.२२) रोजी शरणजी पाटील मित्र मंडळच्या वतीने शिवजयंतीचे  औचित्य साधून  
कै.गंगादेवी माधवराव पाटील यांच्या स्मरणार्थ कीर्तनाप्रसंगी त्या बोलत होत्या.  

पुढे बोलताना त्या म्हणल्या की, छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य युवकांना सतत प्रेरणादायी राहिले आहेत. शिवाजी महाराजांचे कार्य समाजाला प्रगतीकडे घेऊन जाणारे असून सामाजिक जडण घडणीमध्येही त्यांचे मोलाचे कार्य राहिले आहे. अशा महापुरुषांच्या विचारांचा  वसा आणि वारसा जोपण्यासाठी त्यांचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे. दर वर्षी शिवरायांची जयंती मोठया उत्साहात साजरी केली जाते. 

छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या १५ व्या वर्षी हिंदवी स्वराज स्थापन करुन एक इतिहास घडविला. सध्याच्या तरुण पिढीबाबत कीर्तनाच्या माध्यमातून आपल्या मनोरंजनात्मक वाणीतून प्रबोधन केले. त्या म्हणल्या, की अखेरच्या श्वासापर्यंत शिवजयंती साजरी करु या. तरुण पिढीने आई वडिलांची सेवा करुन त्यांचे चांगले विचार आत्मसात करावे. 
 
 नागरिकांनी काळानुसार स्वतः मध्ये बदल करून आनंदी जीवन जगले पाहिजे. चांगला मित्रपरिवार निर्माण करा. कै.गंगादेवी माधवराव पाटील एक आदर्श माता म्हणून त्यांचे कार्य कौतुकास्पद असून त्यांची आठवण सातत्याने ठेवली पाहिजे. यावेळी सर्व नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक उपायाचे काटेकोर पालन करण्यात आले. 

या कार्यक्रमास जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बापूराव पाटील, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरणजी पाटील, उमरगा पंचायत समितीचे माजी सभापती मदन पाटील, नगराध्यक्षा अनिता अंबर, जिल्हा परिषदेचे सदस्य रफिक तांबोळी, उमरगा तालुका काँग्रेस कमिटी राहुल वाघ, शहराध्यक्ष सुधीर चव्हाण, नगरसेवक श्रीकांत बेंडकाळे, बबनराव बनसोडे, योगेश राठोड, देवराज संगुळगे, शिवा दुर्गे, श्रीहरी पाटील, ओमकार पाटील, गौस शेख, उत्कर्ष गायकवाड, प्रणित गायकवाड आदींची उपस्थिती होती. सुत्रसंचालन किरण गायकवाड तर आभार देवराज संगुळगे यांनी मानले. 

Labels:

नुतन सरपंच रामचंद्र आलूरे यांचा सत्यप्रमोद तीर्थ माधव मंडळाच्या वतीने सत्कार

अणदूर,  दि. २३:
 येथिल नूतन सरपंच रामचंद्र आलूरे यांचा  ब्रम्हवृंद संचलित श्री सत्यप्रमोद तीर्थ मधव मंडळच्या वतीने सत्कार करण्यात आला.

अणदूर ता. तुळजापूर  येथिल ग्रामपंचायतीचे नुतन  सरपंच रामचंद्र आलूरे यांच्या  निवडीमुळे मंडळाच्या वतीने त्यांच्या निवासस्थानी जाऊन शाल, श्रीफळ, फेटा, पुष्पहार, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

 यावेळी बोलताना मंडळाचे सचिव गोपाळ कुलकर्णी म्हणाले की, सर्वात जुनी ही ब्राम्हण समाजाची संस्था असून समाजाच्या विविध सामाजिक प्रश्नांची सोडवणूक या संस्थेमार्फत चांगल्या पद्धतीने होते, गावच्या प्रथम नागरिक म्हणून रामचंद्र आलूरे यांची निवड ही सार्थ गोष्ट  असून संस्थेला याचा अभिमान असल्याचे सांगितले.

 यावेळी मंडळाचे अध्यक्ष अनिल अणदूरकर, मंगेश अणदूरकर,राजेश देवसिंगकर, अजय अणदूरकर,गणेश देवसिंगकर,बालाजी कुलकर्णी, श्रीनिवास कुलकर्णी,वैभव उपळेकर, ऋषी कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते

Labels:

तुळजाभवानी महाविद्यालयात संत गाडगेबाबा महाराज यांना अभिवादन


तुळजापूर,दि.23, 

येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे संत गाडगेबाबा यांना अभिवादन करण्यात आले.यावेळी  प्राचार्य  डॉ. वाय.ए.डोके यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.तसेच प्रा.सोहन कांबळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी डाँ.एस.एम.देशमुख, प्रा.डॉ.बालाजी गुंड, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख प्रा विवेकानंद चव्हाण , कार्यालयीन कर्मचारी गोवर्धन भोंडे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम .मणेर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. कार्यक्रमाचे आभार प्रा.सिध्देश्वर सुरवसे यांनी मानले.

Labels:

संत गाडगेबाबा महाराज यांच्या विचारांचा आदर्श घेवुन " गाव सुंदर " गाव करण्याच प्रयत्न करावा : एस.के.गायकवाड


नळदुर्ग,दि.२३:   संपूर्ण आयुष्यभर प्रत्यक्ष  कृतीतुन स्वच्छतेचा संदेश देवून समाजातील अंधश्रद्धा व व्यसनाधीनता कमी करण्यासाठी समाजप्रबोधनपर  कार्य करणारे राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांच्या विचारांचा आदर्श समोर ठेवून आपण मानवी आरोग्याच्या दृष्टीने  आपले गाव सुंदर गाव बनविण्यासाठी प्रयत्न करावा असे आवहान रिपाइंचे जिल्हा सचिव तथा पत्रकार एस.के.गायकवाड यांनी काळेगाव  ता.तुळजापूर येथे बोलताना केले.


 काळेगाव येथिल ग्रामपंचायत कार्यालयात संत गाडगेबाबा महाराज यांच्या 145 व्या जयंती निमित्त त्यांना आभिवादनाचे कार्यक्रम आयोजित  करण्यात आले होते. यावेळी   गायकवाड हे  प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते.

  प्रारंभी उपसरपंच आनंदराव विनायक पाटिल,ग्रामसेविका श्रीमती टी.ए. शेख, ग्रा.प.सदस्य विशाल रामचंद्र मुळे यांच्या हस्ते संत गाडगेबाबा महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून आभिवादन करण्यात आले. 

यावेळी पञकार  शिवाजी नाईक, जि.प  पाणी पुरवठा विभागाचे  शाखा आभियंता जी.जी.बिराजदार, नागेश भोवाळ,गोविंद मुळे, अमोल आकोस्कर,शाम काटवटे यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Labels:

संगणक परिचालकांचे मुंबई आझाद मैदानात आंदोलन सुरू


मुबंई ,दि.२३,  शाम नागीले:
  
 आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पातील संगणक परिचालक यांना महाराष्ट्र एस.टी महामंडळाकडून कर्मचारी दर्जा देऊन किमान वेतन मिळावे, या मागणीसाठी मुबई येथिल आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे.  महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या नेतृत्वाखाली शेकडो संगणक परिचालक सहभागी झाले आहेत.

                                        राज्यातील सुमारे 29 हजार ग्रामपंचायती 351 पंचायत समित्या व  34 जिल्हा परिषद कार्यालयामध्ये संग्राम व आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून सुमारे 15,000 संगणक परिचालक काम करत आहेत. सहा कोटी ग्रामीण जनतेच्या शासनाच्या योजना असून डिजिटल महाराष्ट्र साकार करणाऱ्याचे काम संगणक परिचालक आज करीत आहेत. महाराष्ट्र शासन प्रशासन व ग्रामीण जनता यांच्यातील दुवा म्हणून हे काम करतात याकडे सरकारने लक्ष वेधून राज्य सरकारने संगणक परिचालक  यांना महाराष्ट्र आयटी महामंडळाकडून कर्मचारी दर्जा देऊन किमान वेतन द्यावे अशी मागणी महाराष्ट्र संगणक परिचालक संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे.

दि. 18 सप्टेंबर 2019 रोजी सरकारने आपले सरकार प्रकल्पातील सर्व संगणक परिचालक यांना महाराष्ट्र आयटी महामंडळाकडून नियुक्ती देण्याचा ठराव केला आहे. त्यानुसार ग्रामविकास विभागाने गठीत केलेल्या समितीने शिफारस केल्याप्रमाणे सुधारित आकृतिबंध अनुसार ग्रामपंचायत स्तरावर कर्मचारी दर्जा देऊन किमान वेतन देण्याची मागणी केली आहे. यासाठी परिचालक यांचे आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले आहे. अशी महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचे राज्यअध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी सांगितले.

Labels:

Monday, 22 February 2021

मंगरूळ येथील राहत्या घरासमोरील मोटर सायकल चोरी

   
तुळजापूर,दि.२२: 
 तालुक्यातील मंगरूळ येथील दयानंद युवराज जाधव यांची हिरो स्प्लेंडर प्लस मोटरसायकल एम एच.२५ वाय ५२४३ या या क्रमांकाची 17 ते 18 फेब्रुवारी दरम्यानच्या रात्री त्यांच्या राहत्या घरासमोरून अज्ञात व्यक्तीने चोरून नेली, अशा मजकुराच्या दयानंद जाधव यांनी दिलेल्या प्रथम खबरीवरून भा.दं.सं. कलम 379 अंतर्गत पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Labels:

महाराजांचे विचार हे तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवा- शिवश्री ऋषिकेश शिवाजी घोडके

 

किलज,दि.२२ :  
तुळजापूर तालुक्यातील किलज येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त  किलज येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 या कार्यक्रमांमध्ये व्याख्यान मालेचे आयोजन दि.२० रोजी करण्यात आले होते. यामध्ये व्याख्याते म्हणून लाभलेले उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रसिद्ध व्याख्याते शिवश्री. ऋषिकेश घोडके हे होते. शिवजयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या या छोटे खाणी स्वरूपाच्या कार्यक्रमात सर्व नियमांचे पालन करीत योग्य ती खबरदारी घेत  हा कार्यक्रम पार पडला. 

यामध्ये घोडके यांनी शिवाजी महाराजांचे विचार हे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी तरुण वर्ग पुढे आला पाहिजे, महाराजांचे महिला बाबतीत असणारे धोरण आणि आताची परिस्थिती याचा आपण विचार करायला पाहिजे असे शिवश्री.घोडके यांनी बोलताना सांगितले. 
यामध्ये लहान मुलेही उपस्थित होती. त्यांनाही मनोरंजनाच्या  माध्यमातून करिअर संदर्भात मार्गदर्शन केले.

यावेळी गावातील तरुण वर्ग तसेच गावातील महिला ही बहुसंख्येने उपस्थित होत्या.

Labels: