Saturday, 31 December 2022

श्री.श्री.रविशंकर यांच्या आगमनानिमित्त आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे काटी येथे 3 जानेवारी पासून ‘हॅपिनेस प्रोग्राम’ चे आयोजन


काटी, दि. ३१: उमाजी गायकवाड

श्री श्री रवीशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे देशभरात लाखों लोकांना ‘हॅपिनेस प्रोग्राम’ द्वारे आनंदी, उत्साही आणि तणाव मुक्त जीवनाची रहस्ये शिकवण्यासाठी विविध ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. 

तब्बल 10 वर्षांनी जगभरात शांतता दूत म्हणून ओळखले जाणारे प.पू. गुरुदेव श्री.श्री.रविशंकरजी 2 फेब्रुवारी रोजी तब्बल 10 वर्षांच्या प्रदिर्घ कालखंडानंतर तुळजापूर नगरीत येत आहेत. त्याअनुषंगाने आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनच्या वतीने तुळजापूर तालुक्यातील काटी येथे 3 जानेवारी ते 8 जानेवारी या कालावधीत ‘हॅपिनेस प्रोग्राम’ या आनंदलहरी
शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.


काटी येथे घेण्यात येणाऱ्या ‘हॅपिनेस प्रोग्राम’चा मुख्य भाग म्हणजे गुरुदेवांना प्राप्त झालेली सुदर्शन क्रिया ही अतिशय प्रभावी अशी तालबद्ध श्वसन प्रक्रिया आहे. या विशेष श्वसन प्रक्रियेमुळे मानसिक ताण,थकवा निघून जातो. क्रोध, नैराश्य व उदासीनता यासारख्या नकारात्मक भावना नाहीशा होतात. शांत, उत्साही वाटते आणि एकाग्रता वाढते. या शिबिराच्या माध्यमातून सहभागी  शिबिरार्थी आनंदी होण्याचे मार्ग शिकणार आहेत. त्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगचे खास प्रशिक्षित शिक्षक व स्वयंसेवक या शिबिरासाठी मार्गदर्शन करणार आहेत. 

काटीसह परिसरातील नागरिकांनी ‘हॅपिनेस प्रोग्राम’ या शिबिरात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आर्ट ऑफ लिव्हिंगचे डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट कमिटीचे सदस्य अमरसिंह देशमुख यांनी केले आहे. 

काटीमधील शिबिरात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी आर्ट ऑफ लिव्हिंगचे उस्मानाबाद डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट कमिटीचे सदस्य अमरसिंह देशमुख व आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक संतोष सावंत यांच्याशी संपर्क साधावा.

या शिबिरात सहभाग घेण्यासाठी खालील क्रमांकावर नोंदणी करावी.
 
संपर्क क्रमांक-
1)अमरसिंह देशमुख मो.नं.9422070604,
9527391095
2) संतोष सावंत बीड, 
मो.नं. 7776991111
या क्रमांकावर संपर्क करावा.

Labels:

Tuesday, 27 December 2022

जीवनविद्या मिशन मुंबई च्यावतीने उस्मानाबादेत व्याख्यान , शाळा मार्गदर्शन

नळदुर्ग,दि. २७ :

सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त जीवनविद्या मिशन जोगेश्वरी यांच्या वतीने  उस्मानाबाद येथे दि २८ ते ३० डिसेंबर रोजी शाळा मार्गदर्शन , ग्रंथदिंडी व  प्रबोधने आयोजित करण्यात आली आहेत. 


जीवनविद्या मिशन जगातील प्रत्येक माणूस सुखी व्हावा आणि भारत हे राष्ट्र सर्वार्थाने प्रगतीपथावर जावे यासाठी वेगवेगळे अभियान अगदी विनामूल्य राबवित असते . यातील एक अभियान विद्यार्थी मार्गदर्शन अभियान. हे तुळजापूर आणि उस्मानाबाद मध्ये राबविण्यात येणार आहे. सर्वांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.

संपर्क : 
तुळजापूर - 
श्री अनिल रोचकरी - ९८९०८४४५०४
श्री समीर माने  - ९०२८५६६०१८
श्री संजय पवार - ९८९०९३९७३०

उस्मानाबाद -
श्री रोहित फिसरेकर - ८९९९६३१६४९
श्री सुनील चव्हाण - ९८८१७८७१७९

मुंबई (जोगेश्वरी) -
श्री दत्तात्रय पुजारी - ९८९२२९३८३३
श्री सूर्यकांत दळवी - ९८६७५११९२७

Labels:

Monday, 26 December 2022

तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे विविध क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन


तुळजापूर ,दि. २६ :


तुळजापूर  तालुक्यातील काटी बीट मधील क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन बीटचे विस्तार अधिकारी  अर्जुन जाधव यांच्या हस्ते ज्योत पेटवून मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले . 


याप्रसंगी अति केंद्राचे केंद्रप्रमुख संजय सोलंकर ' केंद्राचे केंद्रप्रमुख तुकाराम क्षीरसागर प्रमुख पाहुणे होते . यावेळी काटी बीट मधील सर्व शाळांनी विविध क्रीडा प्रकारात आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला .

     
सनराइज् इंग्लिश मीडियम स्कूल तामलवाडीच्या मैदानावर या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते . सर्व विद्यार्थ्यांची प्रथम क्रीडा मैदानावर रॅली काढण्यात आली . यावेळी अर्जुन जाधव यांनी सर्व खेळाडूंनी खेळ विषयक भावना जपून या स्पर्धा पार पाडाव्यात .खेळामध्ये विजय पराजयापेक्षा खिलाडू वृत्ती ही महत्त्वाची असते . याचे भान सर्वांनी ठेवावे असे सांगून सर्व खेळाडूंना या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या .कबड्डी , खो-खो , हॉलीबॉल या सांघिक खेळात बीट मधील सर्व संघानी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला .तर वर्ग १ ते ५ या गटात संगीत खुर्ची , लिंबू चमचा , थैला रेस व धावणे या स्पर्धा पार पडल्या .विविध समित्यांचे प्रमुख व समित्यांचे सदस्ययांचे सहाय्य मोलाचे ठरत आहे .


सर्वच क्रीडा प्रकारात प्रत्येक संघाने आपल्या खेळाचे कौशल्य दाखवून उपस्थितांची मने जिंकली .खोखो खेळांच्या सामन्यात सर्वाधिक  चुरस पाहायला मिळाली .तर लहान गटातील संगीत खुर्ची , थैला रेस व लिंबू चमचा यामध्ये चुरशी बरोबर आनंद व गमतीशीर खेळाने सर्वजण हार्षोल्हासीत झाले . यावेळी महादेव वाघमारे , प्रभाकर जाधव , हर्षवर्धन माळी , रोकडे सर यांनी पंच म्हणून काम पाहिले .

     
बीटमधील सर्व शाळांनी प्रत्येक क्रीडा प्रकारात सहभाग नोंदवला होता यावेळी खेळाडू बरोबर मार्गदर्शक उपस्थित होते . कदम सर , गुरव सर , रोकडे सर , मुख्याध्यापक महादेव वाघमारे सोमनाथ जामगावकर ,संतोष भालेकर , ज्योतिबा जाधव , अकबर मुलानी , विठ्ठल नरवडे , हर्षवर्धन माळी , उत्तरेश्वर पैकीकरी 'राजाराम वाघमारे , राजेंद्र कदम , तात्यासाहेब चौगुले , पांडुरंग जावळे ,अमोल कविटकर ,संगमेश्वर साठे हेमंत जोशी ,विशाल कंदले ,सविता गोबूर,सुरेखा दराडे , महिला शिक्षिका श्रीमती जयमाला वटणे , स्मिता पाटोळे , छाया सूर्यवंशी , विभावरी गायकवाड , हबू  हे या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेत आहेत .

Labels:

अफार्म पुणे ,फिक्की व परिवर्तन संस्थेच्यावतीने शेतकरी मेळावा संपन्न


अफार्म पुणे ,फिक्की आणि परिवर्तन सामाजिक संस्था नळदुर्ग  यांच्या संयुक्त विद्यमाने येडोळा ता. तुळजापूर येथे हवामानानुकूल-अल्पखर्चिक शाश्वत शेती तंत्रज्ञान प्रचार प्रसार अभियानांतर्गत शेतकरी मेळावा घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच मा. पद्माकर पाटील होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून अमित घेरडे कृषी सहाय्यक हे उपस्थित होते.


 प्रारंभी संस्थेचे सचिव मारुती बनसोडे यांनी या कार्यक्रमाची पार्श्वभूमी ,संकल्पना ,गरज व महत्व विस्ताराने सांगीतले. त्यानंतर साधन व्यक्ती म्हणून उपस्थित असलेले अमित घेरडे यांनी हवामान बदलाचे शेतीवर होणारे दुष्परिणाम सांगून त्यावर मात करण्यासाठी नव नवीन तंत्रज्ञानाचा वापर शेतीत करावे व येणाऱ्या संकटाला सामोरे जाण्यासाठी शेतकर्‍यानी संघटीतपणे लढा देण्याची गरज विषद केली. शेंद्रीय शेती व रासायनिक शेतीची सांगड घालून उत्पादन व उत्पन्न वाढविण्यावर भर दिला पाहिजे असे सांगीतले. तर अध्यक्षीय समारोप करताना सरपंच  ग्रामपंचायत स्तरावर शेतकऱ्यांना जे जे सहकार्य करता येईल ते करणार व शेतीच्या अनेक योजना गावात राबविणार व शेतकऱ्यांना नविन तंत्रज्ञान वापरण्यासाठी प्रेरीत करणार असे सांगीतले. यावेळी हवामान बदलाचे शेतीवर होणारे दुष्परिणाम , गांडूळ खत कसे तयार करावे , अझोला हायड्रोपोनिक व अन्य महत्वपूर्ण माहिती असलेले पोस्टर्स प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.सहभागी शेतकऱ्यांना पाकीट डायरीचे वाटप करण्यात आले .या शेतकरी मेळाव्यात  गावातील अनेक अल्प भूधारक , सिमांत व मध्यम वर्गीय शेतकरी उपस्थित होते. 

Labels:

Wednesday, 21 December 2022

झारखंड सरकारच्या निर्णयाचा नळदुर्ग सकल जैन समाजाच्या वतीने जाहीर निषेध

नळदुर्ग, दि. २१: विलास येडगे

 जैन धर्मियांचे अतीशय पवित्र असे सिद्धक्षेत्र श्री सम्मेद शिखरजी हे पर्यटन क्षेत्र म्हणुन घोषित केल्याचा झारखंड सरकारच्या निर्णयाचा नळदुर्ग सकल जैन समाजाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला असुन याच्या निषेधार्थ  दि.२१ डिसेंबर रोजी नळदुर्ग शहरातील जैन बांधवांनी आपली दुकाने बंद ठेऊन झारखंड सरकारचा जाहीर निषेध केला आहे. याबाबतचे निवेदन तुळजापुर तहसिलदारांना देण्यात आले आहे.
         


या निवेदनात म्हटले आहे की, जैन धर्मियांचे २४ तिर्थकरापैकी २० तीर्थंकर ज्या पवित्र भुमीत मोक्षाला गेले अशा झारखंड राज्यांतील मधुबन (जिल्हा गिरडोह) येथील महा पर्वतराज श्री सम्मेद शिखरजी क्षेत्र झारखंड सरकारने पर्यटन क्षेत्र म्हणुन घोषित केले आहे. या अनुषंगाने त्याठिकाणी नॉनव्हेज हॉटेल्स, पब बार व इतर अशा बऱ्याच मनोरंजक गोष्टी सुरू होतील की ज्या अहिंसा तत्वाच्या एकदम विरुद्ध असणार आहेत.
        

जैन समाजातील प्रत्येक व्यक्ती आयुष्यात एकदा तरी श्री सम्मेद शिखरजी येथे जाऊन २० तिर्थकर पवित्र मोक्ष भुमीवर पहाड वंदना अनवाणी करण्याची इच्छा बाळगतो. परंतु सरकारच्या या निर्णयामुळे जैन समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पवित्र भुमीचे पावित्र्य धोक्यात आले असुन जैन समाजाच्या अस्मितेवर घाला घालण्याचा हा प्रयत्न आहे. या निर्णयामुळे जैन समाजामध्ये संतापाची लाट पसरली आहे.
      

 झारखंड सरकारच्या या निर्णयाचे नळदुर्ग शहर व परीसरातील सकल जैन मंदिर ट्रस्ट, संघटना, युवक व महिला मंडळ, शैक्षणिक संस्था यांनी निषेध केला आहे. जैन समाजाच्या भावनांचा आदर करून झारखंड सरकारने हा निर्णय बदलावा अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.
        
 या निवेदनावर नळदुर्ग शहर सकल जैन समाजाचे अध्यक्ष सुधीर पाटील, उपाध्यक्ष प्रविण कासार, नितीन कासार, एन. व्ही. यादगिरे, अजित पाटील, शितल पाटील, मयुर पाटील, सुरज पाटील, सिद्धपा शेटगार, बाहुबली शेटगार, इंद्रजित पाटील, केवल पाटील यांच्यासह जैन बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Labels:

Tuesday, 20 December 2022

काटीच्या ग्रामपंचायतीवर कॉंग्रेसचा झेंडा , सरपंच पदी आशा हंगरगेकर यांची निवड

 
काटी, दि.२०: उमाजी गायकवाड

तुळजापूर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या बहुचर्चित काटी ग्रामपंचायतवर भाजपची सत्ता उलथवून कॉंग्रेस पक्षाचा झेंडा रोवला. 


या निवडणुकीत काँग्रेसचे बाजार समितीचे माजी संचालक सुजित हंगरगेकर यांच्या पदवीधर असलेल्या पत्नी आशाताई हंगरगेकर या 56 मतांनी निवडून आल्या आहेत.निवडणूक निकालानंतर गुलालाची मुक्त उधळण,फटाक्यांच्या आतिषबाजीत कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मागील पाच वर्षांत सुजित हंगरगेकर यांच्या आई सौ.शामलताई हंगरगेकर या उपसरपंच म्हणून पदावर होत्या.


मंगळवारी झालेल्या मतमोजणी दरम्यान येथील भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख यांना जबरदस्त धक्का मतदारांनी दिला असून या निवडणुकीत त्यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्या सौ.राजगौरी देशमुख यांचा पराभव झाला आहे. 


या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भाजप,कॉंग्रेस व राष्ट्रवादी या पक्षाचे स्वतंत्र पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.  कॉंग्रेसचे युवा नेते सुजित हंगरगेकर,कॉंग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते तथा माजी चेअरमन सयाजीराव देशमुख, माजी ग्रा.प. सदस्य करीम बेग,माजी सरपंच शामराव आगलावे यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस प्रणित ग्रामविकास आघाडी पॅनल निवडणूक रिंगणात उतरवून तरुण युवकांची फळी उभा करून  मोठी ताकत लावली होती.


 या निवडणुकीत काँग्रेसचे सौ. आशाताई सुजित हंगरगेकर, भाजपच्या माजी जिल्हा परिषद सदस्या सौ.राजगौरी विक्रमसिंह देशमुख व प्रसिद्ध उद्योजक माजी पंचायत समिती सदस्य संजय देशमुख यांच्या पत्नी सौ. अश्विनी देशमुख यांच्यात अत्यंत अटीतटीची तिरंगी लढत झाली. या निवडणुकीत काँग्रेसचे 8 सदस्य तर भाजपचे 7 सदस्य निवडून आले.तर राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र आपले खातेही उघडता आले नाही. 


या निवडणुकीत काँग्रेसचे सरपंच पदासाठी पदवीधर असलेल्या सौ.आशाताई सुजित हंगरगेकर तर कॉंग्रेसमधून वार्ड क्रमांक दोन मधून अमोल महादेव गावडे, जुबेर हारुन शेख,सौ.उषाताई रामहरी लोंढे, वार्ड क्रमांक तीन मधून सौ.सविता सयाजीराव देशमुख, करीम (दादा) इस्माईल बेग,तर वार्ड क्रमांक पाच मधून सौ.शुभांगी चंद्रकांत काटे,भैरीनाथ बाबुशा काळे,प्रकाश रामचंद्र सोनवणे हे आठ निवडून आले आहेत. तर भाजपमधील वार्ड क्रमांक एक मधून अनिल सतिश बनसोडे, सौ. रेखा अनिल गुंड,बिस्मिल्ला मंजूर कुरेशी तर वार्ड क्रमांक तीन मधून ओबीसी प्रवर्गातून सौ.रंजना बाळासाहेब शिंदे व वार्ड क्रमांक चार मधून अरविंद ज्ञानदेव ढगे, सौ. आशा बाळासाहेब भाले व पुतळाबाई गोकुळ सोनवणे हे सात उमेदवार निवडून आले आहेत.


कॉंग्रेसच्या सर्व उमेदवार शिलेदारांचा अणदूर येथे राज्याचे माजी पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री मधुकरराव चव्हाण व जि.म.बॅंकेचे संचालक कॉंग्रेसचे युवा नेते सुनिल चव्हाण यांनी सत्कार करुन ग्रामपंचायत मध्ये चांगले काम करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी माजी सरपंच शामराव आगलावे, माजी चेअरमन सयाजीराव देशमुख, बाजार समितीचे माजी संचालक सुजित हंगरगेकर,नवनिर्वाचित ग्रा.प.सदस्य करीम बेग,प्रा. अभिमान हंगरकर,भैरी काळे, बाळासाहेब लोंढे, जुबेर शेख, अहमद पठाण, प्रकाश सोनवणे,जयाजी देशमुख, जाहेद इनामदार,रामदास देवकर, आकाश देवकर,सयाजी गायकवाड,संताजी गायकवाड, नितीन पांढरे,शहाबुद्दीन शेख,शुभम काटे,शाम गरड,दादा गाढवे,  आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Labels:

उमरगा व लोहारा तालुक्यातील ग्रामपंचायतीवर कॉंग्रेसचे वर्चस्व


मुरुम,दि.२०

उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बंकेचे चेअरमन बापुराव पाटील व  महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रसचे उपाध्यक्ष  शरणजी पाटील  यांच्या  मार्गदर्शनाखाली उमरगा व लोहारा तालुक्यातील निवडणुका पार पडल्या  या  निवडणुकीत  नियोजनपुर्वक सर्व गावामध्ये सभा व रॅली घेवुन दोन्ही तालुक्यात कॉग्रेस पक्षाला घवघवीत यश मिळवुन दिले. 


उमरगा तालुक्यातील 23 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये कॉंग्रेसने भरघोस यश संपादन केले असुन यापैकी तब्बल 11 ग्रामपंचायतमध्ये तर लोहारा तालुक्यातील 12 पैकी 3 ग्रामपंचयातवर कॉंग्रेसचे सरपंच निवडूण आलेले आहेत. उमरगा तालुक्यातील एकुण 23 ग्रामपंचायतच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये भुसणी, येणेगुर, आलुर, बेळंब, औराद धाकटीवाडी, मळगीवाडी, वरनाळ, महालिंगरायवाडी, कोराळ, एकुरगा या ग्रामपंचायतवर कॉंग्रेसने सत्ता संपादन केली आहे तसेच लोहारा तालुक्यातील 12 ग्रामपंचायतपैकी सालेगांव, विलासपूर पांढरी व वडगांववाडी या ग्रामपंचायमध्ये कॉंग्रेसने यश मिळवले आहे. कॉंग्रेसच्या सर्वच कार्यकर्त्यामध्ये आनंदी व उत्साहाचे वातावरण असून निवडून आलेल्या सरपंच व सदस्य पदाच्या उमेदवारांचा मुरूम येथे सत्कार करण्यात आला.

Labels: ,

गुळहळ्ळी ग्रामपंचायत निवडणुकीत बहुजन ग्राम विकास पँनलचा सरपंचासह पाच सदस्याचा दणदणीत विजय


नळदुर्ग,दि. २०: 

गुळहळ्ळी ता. तुळजापूर येथिल ग्रामपंचायत निवडणुकीत बहुजन ग्राम विकास पँनलचे सरपंचासह पाच सदस्याचा दणदणीत विजय झाला आहे.  तर ग्रामविकास पँनलला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. 

सरंपच तानाजी बनछरे , सदस्य कलिमा पटेल , सुभाष घोडके , कमलबाई क्षिरसागर , शशिकला पटणे , संगिता हलकंबे आदी विजयी झाले आहे.

ग्रामविकास पँनलचे यापुर्वीच  छायाबाई काळुंके हे बिनविरोध तर प्रेमनाथ निकम हे निवडुण आले. सरंपचपदासाठी दत्ता निकम हे अपक्ष म्हणुन निवडणुक लढवले.या निवडणुकीत  तानाजी बनछरे हे १११ मतानी सरपंचदी निवडुण आले. निवड झाल्याचे समजताच कार्यकर्ते व समर्थकानी जल्लोषा साजरा केला.

बहुजन ग्राम विकास पँनल प्रमुख आनंदाप्पा हाजगे , राम हलकंबे , शिवराम लांडगे , बालाजी पाटील शिवरुद्र हांजगे , महादेव बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुक झाली.

Labels:

चिवरी ग्रामपंचायतीवर बळीराजा ग्रामविकास पॅनलचे वर्चस्व


चिवरी , दि. २०: राजगुरु साखरे

 तुळजापूर तालूक्यातील ४८  ग्रामपंचायतसाठी रविवारी दि, १८ रोजी पार पडलेल्या निवडणुकीमध्ये मौजे चिवरी गावचा समावेश होता. या निवडणुकीमध्ये बळीराजा ग्रामविकास पॅनेलने दणदणीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत बळीराजा ग्रामविकास पॅनलने ११ जागेपैकी  ८ जागेवर विजय मिळवला आहे तर महालक्ष्मी ग्रामविकास पॅनलला ४ जागेवर समाधान मानावे लागले आहे. 



यामध्ये बळीराजा ग्रामविकास पॅनलचे सरपंच पदाच्या विजयी उमेदवार कमल पंडित बिराजदार या १३४ मताने विजय झाल्या आहेत ,तर सदस्य पदासाठी विजयी उमेदवार  रवी भीमा देडे, निर्मला लक्ष्मण लबडे , स्वाती नीलकंठ स्वामी, दीपक विजय पाटील , कविता लक्ष्मण मेंढापुरे, तुकाराम नारायण देशमुख , मिलिंद मारुती होगाडे यांचा समावेश आहे. तर महालक्ष्मी ग्रामविकास पॅनल मध्ये बालाजी ज्ञानदेव पाटील , लता उत्तम चिमणे , रंजना शशिकांत झांबरे, अश्विनी सचिन शिंदे यांनी विजय मिळवला आहे. या विजयाबद्दल बळीराजा ग्रामविकास पॅनलचे सर्व कार्यकर्ते व ग्रामस्थांनी गुलालाची मुक्त उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला.

Labels:

सौ.तेजाबाई मिटकर झाल्या वागदरीच्या सरपंच


नळदुर्ग, दि. २०

ग्रामीण भागात अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या गावगाड्याच्या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आला असून तुळजापूर तालुक्यातील वारकरी संप्रदायाचे व तालुक्यातील राजकारणात महत्त्वाचे गाव असलेल्या वागदरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ.तेजाबाई शिवाजीराव मिटकर ह्या पूर्ण पॅनलच्या बहुमताने निवडून आल्या.

गेल्या दहा वर्षापासून सत्ताधारी गटाने गावाच्या विकासासाठी दाखवलेली अनास्था यामुळे मतदारांमध्ये नाराजी होती.त्याशिवाय संत भगवानसिंग महाराज ग्रामविकास पॅनेलने सर्वसामान्य माणसाला विश्वासात घेऊन गावाच्या विकासासाठी केलेला आराखडा गावातील रस्ते,शिक्षण,आरोग्य,पाणी,विज यावर भर देऊन गावाचा सर्वांगीण विकास कसा करता येईल याचे
केलेले सादरीकरण त्यामुळे सुरुवातीपासूनच ही निवडणूक एकतर्फी झाली होती.त्यामुळे तेजाबाई मिटकर ह्या विक्रमी मताधिक्याने निवडून आल्या.

नवनियुक्त सरपंच सौ.तेजाबाई शिवाजीराव मिटकर ह्या सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक श्री.शिवाजीराव मिटकर यांच्या पत्नी तर शिक्षक नेते सोसायटीचे चेअरमन श्री.प्रशांत मिटकर व राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाचे न्यायिक सदस्य श्री उमाकांत मिटकर यांच्या मातोश्री आहेत.

Labels:

Monday, 19 December 2022

जुन्या खंडोबा मंदिरात भाविकांसाठी धर्मवीर संभाजी गणेश मंडळाच्या वतीने अन्नदान

नळदुर्ग, दि.१९: विलास येडगे

 ग्रामपंचायत निवडणुकीमुळे नळदुर्ग (मैलारपुर) येथील श्री खंडोबा मंदिरात दि.१८ डिसेंबर रोजी चौथ्या रविवारी भाविकांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. मैलारपुर येथील जुन्या खंडोबा मंदिरात भाविकांसाठी अन्नदान सुरू करण्यात आले आहे. शहरांतील धर्मवीर संभाजी तरुण गणेश मंडळाच्या वतीने हे अन्नदान करण्यात आले.
          

 नळदुर्ग (मैलारपुर) हे खंडोबाचे मुळ ठिकाण असुन पावणेदोन महिन्याच्या वास्तव्यासाठी श्री खंडोबा देव याठिकाणी आल्यानंतर खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी दर रविवारी भाविक याठिकाणी मोठी गर्दी करतात. चौथा रविवार दि.१८ डिसेंबर  रोजी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान असल्याने याचा परिणाम म्हणुन मैलारपुरात येणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे दिसुन आले आहे. इतर रविवारी मंदिरात असणारी या रविवारी अतीशय कमी दिसुन आली.मैलारपुर येथील जुन्या खंडोबा मंदिरात श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान समितीच्या वतीने भाविकांसाठी अन्नदान सुरू करण्यात आले आहे.


या अन्नदानामध्ये सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव वऱ्हाडे गुरुजी यांचेही मोठे योगदान लाभले. या अन्नदानातील पहिल्या महाप्रसादाचा मान धर्मवीर संभाजी तरुण गणेश मंडळ व शिवाजीराव वऱ्हाडे यांना मिळाला आहे. धर्मवीर संभाजी तरुण गणेश मंडळाने आयोजित केलेल्या या महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घेतला आहे. मंडळाचे पिंटू जाधव, सुनिल गव्हाणे, गणेश मोरडे, निरंजन कोप्पा, नेताजी मुळे, संतोष जाधव, अण्णाराव जाधव, संकेत स्वामी, रोहित वाले, संजय जाधव, बबन जाधव, तात्या जाधव व स्वप्नील गव्हाणे यांनी भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले. या अन्नदानाचा शुभारंभ श्री खंडोबा देवाला नैव्यद्य दाखवुन करण्यात आला. यावेळी मंडळाचे उमेश जाधव, पिंटू जाधव, भाजयुमोचे जिल्हा सचिव श्रमिक पोतदार, पत्रकार सुहास येडगे, विलास येडगे,दादासाहेब बनसोडे,विशाल डुकरे, सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव, अमर भाळे,मारुती खारवे, देवाचे पुजारी अशोक चव्हाण आदीजन उपस्थित होते.

Labels:

संपादक रवीचंद्र गायकवाड यांचा उपचारा दरम्यान सोलापूर रुग्णालयात निधन

तुळजापूर ,दि. १९ :

धनराज टि व्ही न्युज चँनेलचे संपादक श्री रवीचंद्र शिवाजी गायकवाड वय ३२, राहणार किलज ता.तुळजापूर  यांचा आपघात रविवारी राञी ८ वाजण्याच्या सुमारास तुळजापूर तालुक्यातील  सलगरा परिसरात दुचाकीचा आपघात होवुन गंभीर जखमी झाले . त्याना उपचारासाठी सोलापूर येथे रुग्णालयात  दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा आज  सोमवारी  सकाळी ८ वाजता  निधन झाल्याचे पञकार  दादासाहेब बनसोडे यानी सांगितले .

रविचंद्र गायकवाड यांच्या  पश्चात आई , वडिल,पत्नी असा परिवार आहे.
गेल्या दहा वर्षापासुन तुळजापूर येथे धनराज टि व्ही न्युज चँनेलचे संपादक म्हणुन गायकवाड हे काम करीत असताना त्यानी  अनेक विषय हाताळुन विविध प्रश्नावर प्रकाशझोत टाकले आहे. वर्षभरापुर्वी त्यांचा विवाह झाला होता. 
त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सर्वञ हळहाळ व्यक्त केली जात आहे.
तुळजापूर लाईव्ह परिवारांच्या वतीने भावपुर्ण श्रध्दाजली 

Labels:

Sunday, 18 December 2022

नळदुर्ग : जलसिंचन कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदामुळे शेतकऱ्यांचा खोळंबा ; शेतक-यातुन संताप

नळदुर्ग, दि.१८ :

 शहरातील पाटबंधारेच्या जलसिंचन शाखेत,शाखाधिकारीसह अनेक कर्मचाऱ्यांचे रिक्त पद असल्याने शेतकऱ्यांना कामासाठी अनेक महिन्यापासुन कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहे.  प्रशासनातील वरिष्ठ आधिका-यांच्या उदासिन धोरणाचा शेतकऱ्यांना नाहकच फटका सहन करावा लागत असुन शेतकऱ्यांना न्याय मिळण्याकरिता  महाराष्ट्र  नवनिर्माण सेनेने उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांच्याकडे धाव घेतली आहे.


नळदुर्ग शहरातील जलसिंचन शाखा क्र-२६,२७,२८,२९ असे एकूण चार शाखा आसुन एका शाखेसाठी शाखाधिकारी-१,दप्तर कारकुन-२,कालवा,निरीक्षक-४,मोजनीदर-४,कालवा चौकीदार -४,कार्यालय, चौकीदार -४,शिपाई- १,कालवा टपाली-१,मजूर असे  एका शाखेत एकूण २२कर्मचा-यांचा स्टाफ असून ४ शाख़ेंचे मिळून ८४ कर्मचारी असायला हवेत,परंतु सद्या या जलसिंचन शाखेचा कारभार रामभरोसे असून या चार शाखेचे मिळून केवळ २ कर्मचारी आहेत,तर सब डीव्हिजनला दप्तर कारकुन -४,सहा. अभियंता, शिपाई -२,चौकीदार -२,ड्रायव्हर-१,असा कर्मचारी वर्ग असून पण सद्य स्थितीत दप्तर कारकुन-१,सहाय्यक अभियंता -१,ड्रायव्हर-१,शिपाई-१,असा कर्मचारी वर्ग असल्याने काम करत असताना त्या कर्मचा-यांना सुद्धा तारेवरची कसरत करावी लागत आहे.


 कारण जलसिंचन शाखा क्र-२७ मध्ये कुरनुर ,व इतर-२,क्र-२८ मध्ये खंडाळा मध्यम प्रकल्प व इतर १०(छोटे तलाव) ,क्र-२६-१०,क्र -२९-१०, असा  मोठा विस्तार असताना,केवळ २ कर्मचारी हा कार्यभार सांभाळत आहेत.


कोणत्याही शाखेत शाखाधिकारी व इतर कर्मचारी नसल्याने शेतकऱ्याचे तर नुकसान होतच आहे,कारण गेल्या सहा महिन्यापासून पाणी परवाना मिळत नाही,शेतकरी फक्त हेलपाटे मारण्याचे काम करीत आहेत.त्यामुळे शेतक-यांचा वेळ जात असून नाहक त्रास होत आहे, शिवाय शाखाधिकारी व इतर कर्मचारी नसल्याने कार्यालयीन कामकाजावर सुद्धा मोठा परिणाम होत आहे.पाहणी,ड्रॉइंग,अंदाज पत्रक,पाणी परवाना,सिंचन व्यवस्थापन,कार्यालयीन कामकाज,कर वसूली,बँकेत भरना,अशा जबाबदारी बरोबरच पाणी परवाना मिळवण्यासाठी सहा महिन्यात जवळपास ७५ शेतकऱ्याचे अर्ज धूळ खात पडले आहेत. कर्मचारी  नसल्याने जवळपास ५० लाख वार्षिक करवसूली होणारी ती केवळ २ कर्मचा-यांमुळे १८-२० लाख एवढीच होत आहे,याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उस्मानाबाद पाटबंधारे विभाग क्र-२ उमरगा कार्यकारी अभियंता व धाराशिव जिल्हाधिकारी यांना पत्रव्यवहार करुन हे सर्व निदर्शनास आणून दिले आहे,शिवाय शाखाधिकारी सह इतर  आवश्यक कर्मचारी यांची तात्काळ नियुक्ती करण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.


निवेदनावर मनसेचे  जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे,शहराध्यक्ष अलिम शेख,शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी,शहर संघटक रवि राठोड यांच्या स्वाक्षरी आहेत.तसेच येत्या महीना अखेर पर्यंत ज्या शेतकऱ्याचे पाणी परवान्यासाठी अर्ज आले आहेत,त्यांना तात्काळ पाणी परवाने देण्यात यावेत अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या स्टाइलने आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मनसेने संबंधित विभागाला दिला आहे.

Labels:

Friday, 16 December 2022

दत्तात्रय देवकते यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवडीबद्दल पत्रकार संघ व मैलारपुर कट्टा मित्र परिवारांच्या गौरव

नळदुर्ग ,दि.१६: विलास येडगे

 बार्शी तालुक्यातील हळदुगे येथील रहिवासी व नळदुर्ग येथील शहाजी येडगे यांचे जावई दत्तात्रय देवकते यांची पोलिस उपनिरीक्षक म्हणुन निवड झाल्याबद्दल दि.१३ डिसेंबर रोजी नळदुर्ग येथे शहर पत्रकार संघ व मैलारपुर कट्टा मित्र परिवाराच्या वतीने सत्कार करून त्यांचा गौरव करण्यात आला. 



या सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन अमर भाळे यांनी केले होते. दत्तात्रय देवकते यांच्या घरची परिस्थिती अतीशय हालाकीची आहे. वडील दुसऱ्यांची शेती करून त्यांनी आपल्या मुलाला शिकविण्याचा प्रयत्न केला आहे. दत्तात्रय देवकते यांनीही अतीशय मेहनत घेऊन अभ्यास केला. सुरुवातीला त्यांनी मुंबई पोलिस म्हणुन पोलिस सेवेत भर्ती झाले. पाच वर्षे मुंबई पोलिस म्हणुन नोकरी केल्यानंतर त्यांनी एमपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. या कालावधीत त्यांनी प्रचंड मेहनत व अभ्यास केला. आणि त्यात त्यांनी घवघवीत यश संपादन केले.यामध्ये त्यांची पोलिस उपनिरीक्षक म्हणुन निवड झाली आहे. ते दि.१३ डिसेंबर रोजी नळदुर्ग येथे आल्यानंतर त्यांचा नळदुर्ग शहर पत्रकार संघ व मैलारपुर कट्टा मित्र परिवाराच्या वतीने भव्य सत्कार करून त्यांचा गौरव करण्यात आला. सत्कार समारंभाचा हा कार्यक्रम येथील हरी--सुंदर कॉम्प्लेक्स येथे पार पडला. 
         
प्रारंभी अमर भाळे,पत्रकार उत्तम बनजगोळे व माजी नगरसेवक सुधीर हजारे यांनी पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय देवकते यांचा सत्कार केला. यावेळी माजी नगरसेवक विनायक अहंकारी, डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष मारुती खारवे, सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव, शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे,पत्रकार तानाजी जाधव,शिवाजी नाईक, दादासाहेब बनसोडे, विलास येडगे,शहाजी येडगे, गणेश येडगे, रोहीत येडगे, अमित येडगे, कृष्णा लवटे, राघव येडगे आदीजन उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विनायक अहंकारी यांनी केले तर आभार तानाजी जाधव यांनी मानले.

Labels:

Thursday, 15 December 2022

डॉ. संजय कांबळे व डॉ. सुधीर पंचगल्ले यांचा बसवराज पाटील यांच्या हस्ते सत्कार

                     
 मुरूम, ता. उमरगा, दि.१५

 येथील श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना सभागृहात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या हस्ते बुधवारी
डॉ. संजय कांबळे व डॉ. सुधीर पंचगल्ले यांचा  सत्कार  करण्यात आले.

 दि. १४ रोजी नुकत्याच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्राधिकरणाच्या निवडणुकीत बामुक्टो प्राध्यापक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. संजय कांबळे यांची अधिसभा (सिनेट) सदस्य पदी निवडून आल्याबद्दल व प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले यांची बिझनेस अँडमिनिस्ट्रेशन अँड मर्कंटाईल लॉ या विषयाच्या अभ्यास मंडळाच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल  सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. डॉ. शौकत पटेल उपस्थित होते.

Labels: ,

Tuesday, 13 December 2022

वैभव शिंदे (पाटील) यांना महाराष्ट्र बिझनेस पुरस्कार


मुरूम, ता. उमरगा, दि. १२  : 

उस्मानाबाद जिल्ह्यातील बिझनेसमध्ये करिअर घडवण्याचा संकल्प करणारे  मुरूम ता. उमरगा  येथील रहिवाशी तरूण उद्योजक वैभव शिंदे यांनी महाविद्यालयीन शिक्षण शिकत असताना फोटोग्राफीत स्वतःचे करिअर करण्याची भूमिका घेऊन त्यात आवड निर्माण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे सलग ३ वेळा स्पॉट फोटोग्राफीमध्ये पारितोषीक पटकावले. 
आपल्या कलेचा उपयोग करुन आपल्या व्यवसायात करिअर करून प्रगती करणारे  वैभव यांनी आपल्या राजमुद्रा फोटोग्राफी या स्टुडिओची सुरुवात ७ सप्टेंबर २०१७ ला गावातून सुरुवात केली. 


आज या व्यवसायात उत्तुंग भरारी घेत आपल्या घराची जबाबदारी सांभाळत आहेत. या त्यांच्या नावीन्यपूर्णतेमुळेच या पुरस्काराचे ते मानकरी ठरले आहेत. वैभव यांना महाराष्ट्रासह, कर्नाटक राज्यासह आजू-बाजूच्या जिल्ह्यातून सर्व शुभ कार्यासाठीचे फोटोग्राफी व व्हिडीओग्राफीसाठी बोलावण्यात येते. वैभव यांनी या अगोदर मकरंद अनासपुरे, संदीप पाठक अशा मराठी कलाकारांकडून ही पुरस्कार मिळाले आहेत. 


वैभव शिंदे यांना फोटोग्राफीमधील गुरू फोटोग्राफर गोपाळ इंगोले हे होते. तसेच महाविद्यालयात असताना प्रा. डॉ. सुभाष हुलपल्ले व प्रा. डॉ. महेश मोटे यांचेही मार्गदर्शन लाभले. आज पर्यंतच्या कार्याची दखल घेऊनच त्यांना पुरस्कार मिळाला. महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्रातील सर्वात मोठा समजला जाणारा हा पुरस्कार यांना नाशिक येथे ता. ११ डिसेंबर २०२२ रोजी प्रसिद्ध मराठी कलाकार अभिनेत्री तेजस्विनी पंडित, अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी पुरस्कार स्वीकारताना सोबत वैभव व लहान भाऊ विकास हे होते. 

Labels: ,

Monday, 12 December 2022

तिस-या रविवारी मैलारपूरात श्री खंडोबाच्या दर्शनासाठी भक्तांची अलोट गर्दी

नळदुर्ग, दि.११ :


  महाराष्ट्रासह परराज्यातील  भाविकांचे श्रद्धास्थान, कुलदैवत असालेल्या श्री क्षेञ  मैलारपूर ( नळदुर्ग ता. तुळजापूर ) येथील श्रीखंडोबाच्या दर्शनासाठी तिस-या रविवारी     भाविकांनी प्रचंड गर्दी केली. कोरोना संसर्गजन्य आजारामुळे दोन वर्षाच्या प्रदिर्घ कालावधीनंतर मैलारपूर येथील मंदिर परिसर भक्तांनी फुलून गेल्याचे चिञ तिसऱ्या खेट्यास दिसून आले. त्याचबरोबर सर्वञ प्रसिध्द असलेल्या मैलारपूर कुस्ती आखाड्याचे  उद्घाटन रविवारी मोठ्या थाटात करण्यात आले.
        

श्री खंडोबाच्या मुख्य स्थानापैकी नळदुर्ग (मैलारपूर ) हे एक आहे. रविवारी सकाळपासूनच मैलारपूर मंदिराबाहेर दर्शनासाठी भाविकांच्या  रांगा लागल्याचे चिञ होते.
       
   श्री खंडोबा व बाणाईचा विवाह सोहळा नळदुर्ग भुईकोट  किल्ल्यात झाल्याची आख्यायिका आहे.   श्री खंडोबाची मुर्ती तुळजापूर तालुक्यातील  अणदूर गावामध्ये  सव्वा दहा महिने आणि नळदुर्गच्या मैलारपूर मध्ये पावणे दोन महिने वास्तव्यास असते. मुर्ती  देवाणघेवाण संबधी अणदुर व नळदुर्गच्या मानक-यामध्ये लेखी करार होतो. दोन मंदिर माञ देवाची एकच मुर्ती असण्याचे हे दुर्मिळ उदाहरण आहे. वर्षभर "श्री " ची मुर्ती नळदुर्ग (मैलारपूर) येथे नसतानाही भाविक श्री खंडोबाचे मुख्य स्थान मैलारपूर हे असल्यामुळे दर्शनासाठी येतात.  मैलारपूर ( नळदुर्ग ) येथील श्री खंडोबाची याञा दरवर्षी पौष पोर्णिमेस भरते. या याञेस लाखो भाविक येतात.

मैलारपूर कुस्ती आखाड्याचे  उद्घाटन
           
         
यावर्षी मैलारपूर याञेनिमित्त कुस्ती स्पर्धा दि.७ जानेवारी २०२३ रोजी संपन्न होणार आहे. या कुस्ती स्पर्धेचे आयोजन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अशोक जगदाळे यांनी केले आहे. या भव्य कुस्ती स्पर्धेची जय्यत तयारी आतापासुनच  करण्यात येत आहे. मैलारपुर येथील या भव्य कुस्ती स्पर्धेच्या आखाड्याचे पुजन रविवार  दि.११ डिसेंबर रोजी राष्ट्रवादीचे  अशोक जगदाळे यांच्या हास्ते  करण्यात आले. यावेळी श्री खंडोबा देवस्थान कुस्ती आखाडा समितीचे अध्यक्ष राजाभाऊ ठाकुर,शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण, माजी नगरसेवक नितीन कासार, अमृत पुदाले,संजय मोरे, सुधीर हजारे, किशोर नळदुर्गकर, शरीफ शेख, नळदुर्ग शहर पञकार संघटनेचे अध्यक्ष सुहास येडगे ,  सदस्य विलास येडगे,  अंबाबाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रमेश जाधव, शिवाजी वऱ्हाडे, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन संजय बेडगे, व्हाईस चेअरमन ताजोद्दीन सय्यद,  भाजयुमोचे जिल्हा सचिव श्रमिक पोतदार, विशाल डुकरे, कुस्ती समितीचे उपाध्यक्ष अनिल पुदाले,सुधाकर चव्हाण, सतीश पुदाले आदीजण उपस्थित होते.

Labels:

Saturday, 10 December 2022

एस.बी.आय. फाऊंडेशन मुंबईकडून विकास कामाची पाहणी

    
  नळदुर्ग,दि. १०

एस.बी.आय.फाउंडेशन मुंबई व दिलासा जनविकास प्रतिष्ठान औरंगाबाद यांच्या समन्वयाने समाजिक दायित्व निधीतून तुळजापूर तालुक्यातील रामतीर्थ, रामनगर, येडोळा, जकनी तांडा, गायरान तांडा या पाच गावामध्ये ग्रामसेवा कार्यक्रम मागील पाच वर्षांपासून चालू आहे. 




 याअंतर्गत गावामध्ये शाळा संगणिकीकरण , पाणी शुद्धीकरण केंद्र, विद्युतीकरण, महिला सक्षमीकरण, उपजीविका विकास, स्वच्छता, बायोगॅस आदी  विकास कामे झाली आहेत. या कामाची एस.बी.आय फाउंडेशन मुंबईचे सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक अनिल काठेवाड यांनी पाहणी करत समाधान व्यक्त केले.
    

  यावेळी दिलासाचे सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक अंतरयामी करजे, समन्व्यक विलास राठोड, रामतीर्थचे सरपंच बालाजी राठोड, गुरुदेव राठोड , भूषण पवार, श्रीमंत राठोड,अमित लोंढे, जि.प.शाळेचे शिक्षक स्टाफ शेख आय.एम, पवार एस.एस, राठोड एस.एम., कांबळे, महाबोले, प्रतिभा स्वामी, शिंदे एल.एस, गाडवे.एस.एम, अजित राठोड, सीताराम चव्हाण, मनोज चव्हाण, महिला बचत गटाच्या निर्मला राठोड, कांता राठोड आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Labels:

Thursday, 8 December 2022

अमर पवार यांनी एक एकर शेतात तब्बल १०४ टन उसाचे घेतले उत्पादन

         

मुरूम, ता. उमरगा, दि. ८ :  


सर्वसाधारणपणे शेतकरी याअमर पवार यांनी एक एकर शेतात तब्बल १०४ टन उसाचे उत्पादन घेतले. परिसरात एकरी सरासरी ७० ते ७५ टन उसाचे उत्पादन घेतले जाते. पण या सरासरीच्या गणिताला बगल देत चिंचोली भुयार, (ता. उमरगा) येथील प्रयोगशील शेतकरी अमर पवार यांनी एक एकर शेतात तब्बल १०४ टन उसाचे उत्पादन घेतले. पवार यांना वडिलोपार्जित २० एकर शेती असून शेतीकडे लक्ष देण्यासाठी त्यांनी वकीली व्यवसायाला राम-राम ठोकत शेती व्यवसाय करण्याचा चंग बांधला. 



या वर्षी साखर कारखान्याचे बायलर पेटल्यानंतर ऊसतोड सुरु झाली आणि पवार  यांनी एकरी १०४ टन ऊस उत्पादन काढले आहे. उस्मानाबाद जिल्हात सरासरी एकरी ७० ते ७५ टन ऊस उत्पादन काढले जाते. पवार यांनी सरासरी पेक्षा अधिक उत्पादन घेत शंभरी आकडा पार केल्याने शेतकऱ्यांत चर्चा चालू आहे. जेमतेम रासायनिक खत व सेंद्रिय खताचे मिश्रण करून व ऊसातील तण काढण्यात सातत्य ठेवल्याचे गमक असल्याचे पवार यांनी सांगितले. ऊसाला ड्रीपच्या तूटलेल्या नळीचे तोटा बनवून तोट्याच्या सहाय्याने पाणी देण्यात आले आहे. यामुळे योग्य प्रमाणात पाणी पोहचले व श्रम देखील कमी लागले. सन २००० मध्ये शेतकरी अमर पवार यांनी एल.एल.बी. चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही काळ वकीली व्यवसाय केला. काही कारणाने विधी व्यवसायातील आवड कमी झाल्याने ते शेती व्यवसायाकडे वळून अभ्यासपूर्ण शेती व्यवसाय करण्याचा निश्चय केला.    

          फोटो ओळ : भुयार चिंचोली, ता. उमरगा येथील अमर पवार यांच्या शेतातील उसाचे क्षेत्र

Labels: ,

Wednesday, 7 December 2022

काटी येथे दत्त जयंती धार्मिक कार्यक्रमाने उत्साहात साजरी

काटी/उमाजी गायकवाड 

तुळजापूर तालुक्यातील काटी येथे बुधवार दि. 7 रोजी सायंकाळी येथील दत्त मंदिरात   धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून दत्तजयंती मोठ्या उत्साहात व थाटात साजरी करण्यात आली. 


दत्त जन्मोत्सवनिमित्त  मंदिरात फुले व रोषणाई करून दिवसभर ‘दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ चा गजर सुरू होता. मागील वर्षी येथील भक्तांनी स्वत: पुढाकार घेऊन मंदीरात होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांसाठी कायम स्वरुपी स्पिकरसेट खरेदी केला होता. 

जन्मोत्सवाचा सोहळा अनुभवण्यासाठी येथील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. 
 मंदिरात आकर्षक फुलांच्या सजावटीने पाळणा बांधून अनेक भाविकांच्या उपस्थितीत वैविध्यपूर्ण धार्मिक कार्यक्रमांनी दिगंबरा, दिगंबरा,श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात संध्याकाळी सहा वाजता पुष्पवृष्टी वाहून दत्त जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला. बुधवारी सायंकाळी हभप सुनिल महाराज ढगे यांच्या किर्तन सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
    
दत्त जन्मोत्सव यशस्वी करण्यासाठी गाटे गल्ली, माळी गल्ली भजनी मंडळासह येथील भाविकांनी परिश्रम घेतले.

Labels:

प्रथमेश अमृतराव याची शालेय क्रिडा स्पर्धेत विभागीय फेरीत धडक


तुळजापूर, दि . ०७

    लोटस पब्लिक स्कुल चा विद्यार्थी प्रथमेश अमृतराव याने जिल्हास्तरीय शालेय सॉफ्ट टेनिस आणि लॉन टेनिस स्पर्धेत उत्कृष्ट खेळी करत विभागीय फेरीत धडक मारली आहे. प्रथमेश अमृतराव याने जिल्हास्तरीय लाॅन टेनिस स्पर्धेत द्वितय क्रमांक तर जिल्हा स्तरीय शालेय सॉफ्ट टेनिस स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला आहे. प्रथमेश अमृतराव चे या यशाबद्दल कौतुक होत आहे.  

     
प्रथमेश अमृतराव च्या या यशाबद्दल लोटस पब्लिक स्कुल चा वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजय जाधव, संस्थेचे सचिव आणि मुख्याध्यापक धनंजय शहापुरे,  कोषाध्यक्ष सचिन सूर्यवंशी, श्रीकांत कावरे यांचा सह शाळेतील शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रथमेश अमृतराव ला प्रशिक्षक संजय नांगरे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. 

Labels:

विश्वाला तारण्यासाठी गुरू ची सेवा करणे गरजेचे - हभप. हरी लवटे महाराज.

उमरगा : लक्ष्मण पवार

विश्वाला तारण्यासाठी गुरू ची सेवा करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन अचलबेट देवस्थान चे हभप. हरी गुरूजी लवटे महाराज यांनी केले. 


ते अचलबेट देवस्थान येथे दत्त जयंती निमित्त आयोजित प्रवचन सेवेत बोलत होते. यावेळी बसवकल्याण चे आमदार शरणू सलगर, मगर बिराजदार, बाळासाहेब जांभळदारे, विठ्ठल दामोदरे, पंडित मुळे, तुकाराम माने, ज्ञानेश्वर बरमदे, ज्ञानेश्वर येवते, हभप. दिपक महाराज जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. 


यावेळी मार्गदर्शन करताना हभप. हरी गुरूजी म्हणाले की, गुरू चा जयजयकार करण्यासाठी  परंपरा जपण्यासाठी प्रयत्न करावे, ब्रम्हा, विष्णू, महेश यांना गुरू समान पध्दतीने पहावे, गुरू शी एकनिष्ठ रहावे, ज्ञानेश्वर,तुकाराम,एकनाथ महाराज या संतांनी गुरू चे महत्व सांगितले आहे. कोण कोणासोबत आहे हीच संगत भविष्य ठरवते. वैचारिक पातळी ठरते. गुरू गुरू साधनेत असताना गुरूशी लिन व्हायला पाहिजे असे म्हणाले. 


शेवटी बोलताना म्हणाले की, उज्वलानंद बाबा गुरूस्थानी आहेत. ज्ञान देव म्हणे तरलो तरलो या ओवी प्रमाणे सदगुरू नाथ उदार असतात, गुरू शिष्याला उदार अंतःकरणाने भक्तांच्या मनातील इच्छा पूर्ण करतात. गुरू उदार असतात म्हणून गुरूचा साक्षात्कार होणे गरजेचे आहे असे ते म्हणाले. यावेळी दत्त जयंती निमित्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा चा जयघोष करीत गुलालाची उधळण करून संपन्न करण्यात आले. यावेळी अचलबेट देवस्थान चे सर्व  भावीक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Labels: ,

Tuesday, 6 December 2022

मार्गदर्शन करणे काळाची गरज - हभप ज्ञानसिंधू चैतन्य महाराज देगलूरकर पंढरपूर

उमरगा, दि. ०६ : लक्ष्मण पवार

उपदेशाचे स्वरूप न बदलू देता मार्गदर्शन करणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन हभप. ज्ञानसिंधू चैतन्य महाराज देगलूरकर पंढरपूर यांनी केले. 

ते अचलबेट देवस्थान येथे दत्त जयंती निमित्त आयोजित किर्तन सेवेत मंगळावर दि. ६ रोजी बोलत होते. यावेळी हभप. देगलूरकर महाराज बोलताना म्हणाले की, उपदेश करण्यासाठी जगदगुरु संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज या सर्वांनी चांगले उपदेश केले. पुढे हभप. चैतन्य महाराजांनी 

देह नव्हे मी सरे
उरला उरे विठ्ठल || १ ||

म्हणऊनि लाहो करा
काळ सारा चिंतने || धृ ||

पाळणाची नाहीं चिंता 
ठाव रिता देवाचा  || २ ||

तुका म्हणे जिवासाठी
देव पोटीं पडेल  || ३ ||

या अभंगाद्वारे संत महात्म्यांनी केवळ उपदेश करावे देवाने उपदेश करू नये. भगवान भक्तांचे रक्षण करण्यासाठी अवताराला येतोय. ज्ञानोबारायाने माता समवेत उपदेश केल्याने सर्वांच्या मनोकामना पुर्ण होतात. जिवन जगताना अभ्यास करणे आवश्यक आहे. मरणानंतर पुढील जन्मात पुढील शिल्लक राहिलेला अभ्यास चालू होतो. असे म्हणून जीवनाचे रहस्य सविस्तर उलगडले. 

शेवटी बोलताना सांगितले की, लाख गोष्टी बाजूला ठेवा अगोदर दान करा नंतर अंघोळ करा. कोट्यवधी गोष्टी बाजूला ठेवा ज्ञानार्जन करावे असे म्हणून रामराम स्मरा असे म्हणाले. शेवटी अचलबेट देवस्थान च्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्रीगुरू दिनदर्शिकेचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. 

यावेळी किर्तन सेवा यशस्वीतेसाठी हभप. हरी गुरूजी लवटे महाराज,हभप.महेश महाराज त्यांच्या समवेत अचलबेट देवस्थान भक्त परिवार व सेवेकरी मंडळींनी पुढाकार घेतला होता.

Labels: ,

माळुंब्रा येथील रणजित वडणे यांना जागतिक स्तरावरील एलआयसीतील सर्वोच्च एमडीआरटी पुरस्कार जाहीर

काटी/उमाजी गायकवाड तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा येथील रहिवासी तथा सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेले रणजित (दादा) वडणे यांना एलआयसीतील जागतिक स्तरावर विमा क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल दिला जाणारा 2023 चा एमडीआरटी हा सर्वोच्च पुरस्कार जाहीर झाला आहे. 

तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा येथील रहिवासी असलेले रणजीत (दादा) वडणे यांनी 2022  मध्ये एलआयसीमध्ये कमी कालावधीत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल विमा कंपनीतील मानाचा समजला जाणारा "एमडीआरटी" हा सर्वोच्च पुरस्कार जाहीर झाला आहे. जागतिक स्तरावरील या पुरस्कारामुळे उस्मानाबाद जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

रणजित वडणे यांना विकास अधिकारी प्रशांत बोठे यांचे मार्गदर्शन लाभले. वडणे यांनी आजपर्यंत 1500 पेक्षा अधिक कुटुंबांना विमा संरक्षित केले आहे. कुटुंबाचे योग्य अर्थिक नियोजन म्हणजे निवृत्तीकरिता पेन्शन योजना, मुला-मुलींसाठी शिक्षण व विवाहासाठीच्या पैशाचे नियोजन योग्यरीत्या करुन देण्याचे कार्य केले.

 रणजीत (दादा)वडणे यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल माळुंब्रासह परिसरातून सर्वत्र कौतूक होत आहे.

Labels:

व्ही. डी. गायकवाड यांचे शैक्षणिक कार्य कौतुकास्पद - प्राचार्य श्रीपाल



काटी/उमाजी गायकवाड

समाजामध्ये ज्ञान , विज्ञान , आणि सुसंस्काराची पेरणी करीत आदर्श शिक्षकांची  उपजत संस्कृती जोपासणारे गुरुवर्य विश्वनाथ गायकवाड यांचे शैक्षणिक कार्य कौतुकास्पद आहे असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ . श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले .

तुळजापूर तालुक्यातील सांगवी (मार्डी ) येथे मराठवाडा समन्वय समिती , पुणे व गायकवाड परिवार यांच्या वतीने आयोजित गुरुवर्य विश्वनाथ दगडोबा गायकवाड यांचा अमृत महोत्सवी गौरव समारंभ व गौरव ग्रंथ प्रकाशन कार्यक्रमात अध्यक्षीय पदावरुन ते बोलत होते. 

यावेळी  प्रमुख पाहुणे म्हणून, मराठवाडा समन्वय समितीचे अध्यक्ष राजकुमार धुरगुडे - पाटील , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे लिगल सेलचे अध्यक्ष ॲड.लक्ष्मण राणे, निवृत्त प्राचार्य डॉ.रमेश दापके, माजी जिल्हा परिषद सदस्य मुकुंद डोंगरे,महेंद्र धुरगुडे, व्ही.डी.गायकवाड यांच्या जीवनावर आधारित 'ऋषितुल्य ' गौरव ग्रंथाचे संपादक संदिपान पवार, प्रा.अभिमान हंगरगेकर, नितीन बागल,शिवसेना उपशहर प्रमुख पिंपरी चिंचवडचे नेताजी काशीद,कवी दास पाटील , दत्ताभाऊ अर्जुन, शंकर पवार, किसन डफळे,संयोजक ॲड. सुभाष गायकवाड आदींची उपस्थिती होती .


यावेळी मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन ७५ व्या अमृत महोत्सवी समारंभाच्या निमित्ताने विश्वनाथ गायकवाड यांचा प्राचार्य डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला . याशिवाय मान्यवरांच्या हस्ते "कृषीतुल्य" गौरव ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले . यावेळीआदर्श व्यवसायिक पुरस्कार युवराज तुकाराम बागल ,औदुंबर बागल , सतीश बागल , किशोर जाधव तर आदर्श शेतकरी पुरस्कार गुंडेराव पवार ,शरद पवार , हनुमंत गायकवाड यांना व आदर्श माता पुरस्कार कल्पना राजेंद्र बागल , आशा गणपत बागल यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.या कार्यक्रमात अॅड. लक्ष्मण राणे , संदीपान पवार ,मुकुंद डोंगरे , राजकुमार धुरगुडे ,प्राचार्य रमेश दापके, गौरव मूर्ती  गायकवाड आदींची भाषणे झाली . संदिपान पवार यांनी गौरव ग्रंथ प्रकाशन  भूमिका विशद केली . प्रास्ताविक अॅड.सुभाष गायकवाड यांनी तर सूत्रसंचालन भैरवनाथ कानडे यांनी केले .आभार प्रदर्शन विलास गायकवाड यांनी केले .या कार्यक्रमास शैक्षणिक ,सामाजिक  साहित्य व उद्योग क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Labels:

तालुकास्तरावरीय योगा स्पर्धेत यमगरवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

काटी, दि. ०६: उमाजी गायकवाड


तुळजापूर तालुक्यातील यमगरवाडी येथील विद्या संकूलमधील 17 वर्षीय वयोगटातील विद्यार्थ्यांनी योगा स्पर्धेत सहभाग नोंदवून घवघवीत यश संपादन करीत यशाची परंपरा कायम राखली. 

तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील श्री श्री रविशंकर विद्यालयात भरविण्यात आलेल्या तालुका स्तरीय योगा स्पर्धेत हे यश संपादन केले. 

अणदूर येथे पार पडलेल्या 17 वर्ष वयोगटातील योगा स्पर्धेत यमगरवाडी विद्या संकूलमधील विद्यार्थ्यींनी कु.शितल ठाकूर, साक्षी गायकवाड,सोनाली गिरी, पायल साळुंके यांनी तर विद्यार्थ्यांमधून रोहन माने,समीर जाधव या विद्यार्थ्यांनी विजय मिळविल्याने त्यांची  जिल्ह्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.

या त्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र वैदू,उपाध्यक्ष डॉ.अभय शहापूरकर, कार्यवाह विवेक आयचित, मुख्याध्यापक विठ्ठल म्हेत्रे,अण्णासाहेब कोल्हटकर,बालाजी क्षीरसागर, महादेव शेंडगे,माऊली भुतेकर यांच्यासह शाळेचे शिक्षक वृंद सर्व कर्मचारीवर्ग यांनी कौतुक व अभिनंदन केले.

Labels:

बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

काळेगाव ,दि. ०६

तुळजापूर तालुक्यातील काळेगाव येथे
डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त  अभिवादन करण्यात आले.


डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त  ग्रामपंचायत कार्यालय, व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळेगाव ता. तुळजापूर येथे प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले, 


यावेळी ग्रामसेविका शेख , तलाठी ए बी काळे, उपसरपंच आनंद उंबरे पाटील, शिपाई श्याम काटवटे, संगणक चालक बाळू उंबरे, मुख्याध्यापक उमेश पोतदारसह शिक्षक प्रशांत गायकवाड,सहशिक्षक माशाळे, मुकेश साखरे आपास साखरे, कालिदास भोवाळ, शंकर भोरे, प्रकाश साखरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Labels:

डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांचा 66 वा महापरीणिर्वान दिन साजरा


नळदुर्ग ,दि. ०६

नळदुर्ग शहरात डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांचा 66 वा महापरीणिर्वान दिन साजरा करण्यात आला .

डाॕ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय बौध्दनगर  नळदुर्ग व बु.जनार्धन रणे प्रतिष्ठान  नळदुर्ग यांच्या वतीने . सहाय्यक पोलीस निरीक्षक   सिध्देश्वर गोरे , शासकीय धान्य गोडावुनचे गोदामपाल कानडे , माजी नगरसेवक विनायक अंहकारी . यांच्या हस्ते डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेचे पुजन  कररण्यात करण्यात आले . 

वाचनालयाच्या माध्यमातून जी काहि समाजसेवा समाजात चालू आहे . हि खरी  डाॕ. आंबेडकरांना आदरांजली  आहे , असे म्हणून गोरे साहेबांनी विश्वास रणे यांच्या कार्याचे कौतुक केले व असेच कार्य समाजविकासा साठी चालु राहु द्या , असे सांगितले व वाचनालया साठि पुस्तके देतो अशी  हमी देखिल दिली .

कार्यक्रमाचे आयोजन  वाचनालयाचे अध्यक्ष युवानेते विश्वास भाऊ रणे यांच्या नियोजना खाली करण्यात आले होते 

या कार्यक्रमास उपस्थितीत  सामाजिक कार्येकर्ते शिवाजी गायकवाड ,  उमेश गायकवाड , बाळु रणे , रामा झेंडारे , सुनिल भांगे . करण लोखंडे, संभा कांबळे . पप्पु कांबळे , नागु कांबळे . महादेव बनसोडे ,  आप्पाराव बनसोडे  , प्रकाश बनसोडे , दिलीप बनसोडे , राजु व्हणाळे , चांगदेव रणे , दत्ता बनसोडे , अमर बनसोडे , देवा कांबळे . दिलीप भांगे .बापु झेंडारे लक्ष्मण गायकवाड ,  विकास बनसोडे , राजु साखरे , विकी कांबळे , आकाश कांबळे , महेश कांबळे , अमर कांबळे , बिगु गायकवाड , लल्लु ठाकुर . बबलु जाधव , विलास सुरवसे , दिनेश सुरवसे , विशाल बनसोडे , किरण कांबळे , अर्जुन भांगे , नाना कांबळे . शाम लोखंडे , शिलामणी भांगे , अनिल भांगे , विश्वास  बनसोडे , भय्या वाघमारे , टोबु सरपे , बंडु ठाकुर ,   सोनबा रणे , सामाजिक कार्यकर्त्या अनिता  रणे , सुमन गायकवाड , फुलाबाई गुरव , शोभा यादव , सिमा कांबळे ,सुशमा जाधव , बबिता ठाकुर ,कविता झेंडारेसह आदीजण उपस्थित होते. सर्वांचे आभार युवानेते  विश्वास रणे यांनी मानले .

Labels:

आमदार सतीश चव्हाण यांचा नळदुर्ग महाविद्यालयात जाहीर सत्कार


नळदुर्ग,दि. ०६ 

 येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांचा माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री मधुकरराव चव्हाण हे होते  तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे, संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. अभय शहापूरकर, कार्याध्यक्ष रामचंद्र आलुरे, सहसचिव प्रकाशराव चौगुले, शहेबाज काझी , आश्लेष  मोरे, डॉ. शिवाजीराव मदन, प्राचार्य डॉ. घनश्याम जाधव, प्राचार्य डॉ. मणेर, प्राचार्य डॉ. चंदनशिव, प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी, प्राचार्य डॉ. दापके हे उपस्थित होते . 


याप्रसंगी बसवराज पाटील यांनी सांगितले की 78 तालुक्याचा असलेला  मतदारसंघ सतीश चव्हाण हे सांभाळत आहेत हे सदयाच्या काळामध्ये फार जिकरीचे काम असून माणसं कशी एकत्रित करावी आणि माणसांची मन कशी जिंकावी ते यांच्याकडून शिकले पाहिजे . याप्रसंगी आमदार विक्रम काळे यांनी आपले विचार मांडताना सांगितले की, शिक्षकांचे व पदवीधरांचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आपल्या सत्काराला देताना आमदार सतीश चव्हाण म्हणाले कि, नवीन शैक्षणिक धोरणानुसार आपल्याला स्वतःमध्ये बदल करून घ्यावा लागेल आणि विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून व्यवसायाभिमुख शिक्षण देण्याची गरज आहे असे प्रतिपादन केले. तर अध्यक्षीय समारोप करत असताना मधुकरराव चव्हाण यांनी सतीश चव्हाण यांच्या कार्याचा गौरव आपल्या मनोगतातुन व्यक्त केला स्व. वसंतराव काळे यांचा वसा घेऊन सतीश चव्हाण आणि विक्रम काळे पदवीधरांचे आणि शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच तत्पर असतात असा गौरवोद्गार त्यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपातून केला. 


यावेळी डॉ. शिवाजीराव मदन, रामचंद्र दादा आलुरे, शहबाज काझी, प्रा. शौकत पटेल, डॉ. घनश्याम जाधव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय कोरेकर यांनी केले तर सुत्रसंचालन डॉ. संतोष पवार व आभार डॉ. सुभाष राठोड यांनी मांडले. या कार्यक्रमास मराठवाड्यातून आलेले प्राध्यापक वृंद, महाविद्यालयातील सर्व  शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.                          

Labels:

Monday, 5 December 2022

पारधी समाज बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तामलवाडी पोलीसामार्फत वडगाव (काटी) पारधी पेढीवर प्रबोधन


काटी , दि. ०५ : उमाजी गायकवाड


पारधी समाज बांधवांना समाजातील मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पारधी समाज बांधव आणि पोलीस यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून रविवार दि.4 रोजी ज्येष्ठ साहित्यिक तथा सामाजिक कार्यकर्ते नामदेव भोसले व तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांनी तुळजापूर तालुक्यातील वडगाव (काटी) पारधी पेडीला भेट देऊन पारधी समाजातील रुढी आणि परंपरांच्या जोखडातून बाहेर काढण्यासाठी त्यांच्यात समाज प्रबोधन करित पारधी समाजाच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.
    

यावेळी ज्येष्ठ साहित्यिक नामदेव भोसले यांनी पारधी समाजाच्या व्यथा सांगताना म्हणाले की,पारधी समाज हा अत्यंत मागासलेला व वंचित समाज आहे. शिक्षणाचे प्रमाण हे अत्यंत तुरळक असल्या कारणाने या समाजाची प्रगती होत नाही.  या समाजात शिक्षण नसल्यामुळे व गरिबीमुळे हा समाज विकासापासुन कोसो दुर राहिलेला आहे. पारधी समाजातील बहुतांशी लोकांना राहायला जागा नाही, घर नाही, उद्योगधंद्याची साधने नाहीत, नोकर्‍या नाहीत,जातीची दाखले, रेशन कार्ड,रहिवाशी दाखला नसल्या कारणामुळे त्यांना अनेक हालअपेष्टांना सामोरे जावे लागते. या समाजातील लोकांना त्यांच्यासाठी असणार्‍या शासकीय योजनांची माहिती मिळत नाही. कारण, त्यांच्या पर्यंत या योजना पोहचत नाहीत आणि हे पारधी लोक ही तिथपर्यंत पोहचत नाहीत. पर्यायाने हा पारधी समाज गुन्हेगारीकडे वळल्याने गुन्हेगारीचा ठपका त्यांच्यावर बसल्याचे दिसून येते.


 त्यामुळेच या सर्व गोष्टींवर चर्चा होण्यासाठी व त्यांच्यासाठी असणार्‍या योजनांची माहिती पारधी समाजाला मिळावी त्या अनुषंगाने प्रयत्न करुन 
पारधी समाजाचे विविध प्रश्न शासनासमोर मांडुन ते प्रश्न सोडवणे गरजेचे असून या पारधी आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पोलीस प्रशासनाने सहकार्य करण्याची मोठी गरज असल्याचे मत व्यक्त केले. यानंतर तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांनी उपस्थित  पारधी समाज बांधवांसोबत चर्चा करून त्यांना येणाऱ्या अडीअडचणीसाठी पोलीस प्रशासन वेळोवेळी सहकार्य करेल असे आश्वासन दिले. कार्यक्रमानंतर तामलवाडी पोलीस ठाण्याच्या वतीने  पारधी समाज बांधवांच्या मुलांना खाऊचे वाटप केले . 


यावेळी तामलवाडी  पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित, जेष्ठ साहित्यिक तथा सामाजिक कार्यकर्ते नामदेव भोसले,वडगावचे सरपंच गौरीशंकर कोडगिरे आणि तामलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस ठाणे अंमलदार शिवाजी शिरसाट,तुराब शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

Labels:

मतिमंद विद्यालयास मदत करुन विश्वनाथ तोडकर यांचा वाढदिवस साजरा


कळंब , दि. ०५: भिकाजी जाधव
आनावश्यक खर्चाला फाटा देवुन मतिमंद विद्यालयास धान्य,वसूतुची मदत  करुन वेगळ्या  पध्दतीने   विश्वनाथ  तोडकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.


महाराष्ट्र लोकविकास मंचचे अध्यक्ष तथा पर्याय सामाजिक संस्थेचे सचिव विश्वनाथ  तोडकर यांचा 59 वा वाढदिवस सोलापूर जिल्ह्यातील कुंभारी गावातील आधार मतिमंद निवासी वसतिगृहातील विध्यार्थी यांना खाऊ वाटप करून तसेच गहू, ज्वारी, किराणा साहित्य, 50 ताट, 50 चमचे, 50 ग्लास इत्यादी भांडी देऊन नुकतेच साजरा करण्यात आला.


 यावेळी आधार मतिमंद निवासी विद्यालयाच्या मुख्याध्यापक शुभांगी कलकेरी यांनी विश्वनाथ अण्णा तोडकर यांचा सपत्नीक सत्कार केला, यावेळी महाराष्ट्र लोकविकास मंच चे उपाध्यक्ष भूमिपुत्र वाघ, विठ्ठल आबा तोडकर, अनिताताई तोडकर, सुलभा ताई तोडकर, विलास गोडगे, विकास कुदळे, सुनंदा खराटे, प्रसाद हिंगमिरे, धनश्री हिंगमिरे, हिराबाई तोडकर, साक्षी तोडकर, सिद्धांत तोडकर आदी उपस्थित होते.

आधार मागासवर्गीय महिला संस्था सोलापूर संचलित आधार मतिमंद निवासी विद्यालय कुंभारी, सोलापूर.जगदीश सिद्राम कलकेरी संस्थापक अध्यक्ष,  मुख्याध्यापिका सौ. शुभांगी जगदीश कलकेरी , कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शुभम कलकेरी,  कोमलिका कलकेरी, व्यंकटेश शिंदे, शुभदा कलकेरी, सृष्टी शिंदे, सोनाली शिंदे, राम शिंदे, अंबू गड्डी, मंजुषा हिबारे आदिसह विद्यार्थी , कर्मचारी उपस्थित होते.

Labels: ,

औरंगाबाद येथे गायरान जमिन हक्क प्रश्नावर समविचारी संघटनांची बैठक

औरंगाबाद ,दि.०५

गायरान आणि इतर सर्व जमिनींच्या मालकीहक्क प्रश्नावर समविचारी संघटनांची बैठक  औरंगाबाद येथे संपन्न झाली.


उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर राज्यातील गायरान धारक व अतिक्रमण धारक या निर्णयाला विरोध करत आहेत.राज्यात जिल्ह्याच्या तालुक्याच्या ठिकाणी वेगवेगळ्या संघटनेच्या वतीने मोर्चा धरणे आंदोलन करण्यात येत आहेत. काल औरंगाबाद येथे जमिन अधिकार आंदोलन चे राष्ट्रीय अध्यक्ष मा.विश्वनाथ तोडकर यांच्या अध्यक्षतेखाली गायरान जमिन हक्क प्रश्नावर बैठक  घेण्यात आली.यावेळी राज्यातील सर्व जिल्ह्यांतील गायरान व इतर प्रश्नावर काम करणारे  प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. वहिती असलेल्या गायरान जमिनी गायरान धारकांनच्या नावे करण्यात यावी असे ठराव या बैठकीत घेण्यात आले.


राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार व जिल्हाधिकारी याना निवेदन देण्यात येणार. २०१० पर्यत अतिक्रमण असलेल्या गायरान जमिनी नावे करण्यात यावी. शासनाच्या जमिनीवर गेल्या अनेक वर्षांपासून वहिती करीत असलेल्या भुमिहिन कास्तकराच्या हक्काचा सातबारा व ८ अ चा उतारा करण्यात यावा . गायरान जमिनी हक्क परिषद घेण्यात येणार . यावेळी जमिन अधिकार आंदोलन चे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वनाथ तोडणकर यांनी राज्यात जिल्ह्यात जिथे गायरान जमिनी हक्क परिषद घेण्यात येईल तिथे उपस्थित राहून गायरान धारकांनाच्या बाजूने उभे राहणार असे सांगितले. 


स्वराज इंडिचे ललित बाबर यानी देखील गायरान जमिन धारकांचे पश्न घेऊन भव्य मोर्चा काढू व मुख्यमंत्री यांना भेटून सध्याची परिस्थिती मुख्यमंत्री यांना सांगू असे बोलले .भाई रमेश खंडागळे यांनी या गायरान जमिनी हक्क चळवळीला ताकद देऊ असे सांगितले. यावेळी सुभाष लोमटे,मनिषा तोकले ,प्रभा ..
अशोक तांगडे,दशरथ जाधव , अरविंद हमदापूरकर,कडूदास कांबळे ,अमर ताटे ,बायजाबाई घोडे, ओमप्रकाश गिरी आप्पाराव मोरताटे ,बाजीराव ढाकणे ,मनिषा घुले,विजय जाधव व महाराष्ट्रातील गायरान धारक उपस्थित होते.

Labels: ,

Saturday, 3 December 2022

राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त आरणीचे सरपंच गोविंद हारकर यांचा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते सत्कार


उस्मानाबाद ,दि. ०३

तालुक्यातील आरणी येथील युवा सरपंच गोविंद नारायण हारकर यांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावपातळीवर केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल नवी दिल्ली येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय उत्कृष्ट सरपंच पुरस्कारान सन्मानित करण्यात आले. संविधान दिनी 26 नोव्हेंबर रोजी केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री फगनसिंह कुलसते, माजी लोकसभा अध्यक्ष चिरंजितहींह अखाल, सामाजिक कार्यकर्त्या अलका सपकाळ आदी मान्यवरांच्या हस्ते सरपंच हारकर यांना स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या भरीव यशाबद्दल महाराष्ट्राचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते सरपंच हारकर यांचा भव्यदिव्य सत्कार करण्यात आला.


यावेळी काँगे्रस पक्षाचे जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखाने, जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण सरडे,  प्रशांत पाटील, तालुकाध्यक्ष रोहीत पडवळ, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष धनंजय राऊत, मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ बनसोडे, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष खलील सय्यद, उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे संचालक आशिष मोदानी, तसेच प्रभाकर लोंढे, समीयोद्दीन मशायक, अ‍ॅड.राहुल लोखंडे, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, सुभाष हिंगमिरे, संजय गजधने, पंचायत समितीचे माजी सदस्य आश्रुबा माळी, अंकुश पेठे, सौरभ गायकवाड, प्रवीण पडवळ, कफिल सय्यद, सुरेंद्र पाटील, संदीप चादरे यांच्यासह काँगे्रस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Labels: ,

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पदाधिकारी निवड जाहीर


तुळजापूर , दि . ०३

 तुळजापूर शहरातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात दुसरे राज्यस्तरीय बालाघाट साहित्य संमेलन दि.१७ डिसेंबर संपन्न होणार असून  परिषदेच्या तुळजापूर तालुका पदाधिकारी निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत.

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांच्या सूचनेनुसार राष्ट्रीय विश्वस्त ज्ञानेश्वर पतंगे,मराठवाडा अध्यक्ष परमेश्वर पालकर यांनी तुळजापूर येथील आयोजित बैठकीत तुळजापुर तालुका पदाधिकारी विस्तार घोषित केला.

तुळजापूर तालुकाध्यक्ष अनिल आगलावे यांच्यासह तालुका उपाध्यक्षपदी भाग्यश्री देवकते,सचिवपदी डॉ.अविनाश ताटे,कोषाध्यक्षपदी जयमाला वटणे, तालुका कार्यवाहकपदी राहुल दुलंगे यांची निवड जाहीर करण्यात आली आहेत.

Labels:

तुळजाई नगरीत १७ डिसेंबर रोजी दुसरे राज्यस्तरीय बालाघाट साहित्य संमेलनाचे आयोजन


तुळजापूर , दि. ०३


तुळजापूर शहरातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात दुसरे राज्यस्तरीय बालाघाट साहित्य संमेलन दि.१७ डिसेंबर संपन्न होणार असल्याचे साहित्य परिषदेचे राष्ट्रीय विश्वस्त ज्ञानेश्वर पतंगे यांनी तुळजापूर येथील आयोजित बैठकीत घोषित केले.

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हे संमेलन तुळजापूरला आयोजित करण्याचा निर्णय सर्वांनूमते घेण्यात आला,कळंब येथे पहिले साहित्य संमेलन झालेले असुन यावर्षी तुळजापूर येथे दुसरे साहित्य संमेलन १७ डिसेंबर रोजी संपन्न होणार आहे. 


तुळजापूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात हे साहित्य संमेलन संपन्न होणार आहे, या संमेलनात उद्घाटनसत्र, परिसंवाद, कथाकथन, कविसंमेलन असे एकदिवसीय भरगच्च कार्यक्रम पार पडणार आहेत. लवकरच या संमेलनाचे स्वागताध्यक्ष व संमेलनाध्यक्ष जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


यावेळी साहित्य परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष परमेश्वर पालकर,तुळजापूर तालुकाध्यक्ष अनिल आगलावे यांची उपस्थिती होती.

Labels:

Friday, 2 December 2022

तुळजाभवानी मंदिर परिसरातूनआयुर्वेद रथ याञेचा शुभारंभ: 35 जिल्ह्यात आयुर्वेद प्रचार व प्रसार शिबीरामध्ये 225 रुग्णांची मोफत तपासणी

 

 तुळजापूर दि.2

महाराष्ट्रातील 35 जिल्ह्यात आयुर्वेद प्रचार व प्रसारासाठी प्रभा आयुर्वेद रथयात्रा काढण्यात आली आहे. त्याचा शुभारंभ येथील तुळजाभवानी मंदिर परिसरातून आज करण्यात आला. 

शुभारंभानंतर शहरातून आयुर्वेद प्रचार दिंडी काढण्यात आली. मोफत रोगनिदान शिबिर घेण्यात आले. यामध्ये 225 रुग्णांची तपासणी करण्यात आली.
         

रथयात्रा शुभारंभ प्रसंगी पोलीस निरीक्षक काशिद, तुळजाभवानी देवस्थान कमिटीचे विश्वास परमेश्वर , , रोटरीचे रविंद्र साळुंके, डॉ मिलिंद कवठेकर  ,डॉ  प्रविण जोशी, डॉ रामदास आव्हाड, डॉ नरेंद्र गुजराथी, डॉ.ऋतूराज कदम , डॉ.गजानन कुलकर्णी, याञा समन्वयक डॉ.दत्ताञय दगडगावे, लातूर संस्कृती फाऊंडेशनचे डॉ.बी. आर. पाटील, दिपरत्न निलंगेकर, लातूर, तुळजापूर येथील डॉक्टर असोसिएशन चे सदस्य, वर्ल्ड स्कुलचे विद्यार्थी, आयुर्वेदिक महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक यांची उपस्थिती होती.
         

वीर तपस्वी मठामध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 225 रुग्णांची तपासणी करण्यात आली.150 जणांना पंचकर्म लाभ देण्यात आला. सात दिवसांची औषधे मोफत देण्यात आली डॉ. रामदास आव्हाड यांचे व्याख्यान ही झाले. डॉ गणेश मलवाडे , डॉ राजेश पवार, डॉ नितीन  धनोकार यांनी वैद्य व विद्यार्थी चर्चासत्रात मार्गदर्शन केले.

Labels:

Thursday, 1 December 2022

दलित मित्र पुरस्कार प्राप्त तथा कवी नंदु बनसोडे यांना व्यसन मुक्ती पुरस्कार प्रदा

काटी/उमाजी गायकवाड 

नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित कोल्हापूर येथे दसरा चौकातील शाहू स्मारकामध्ये  सोमवार दि.28 नोव्हेंबर रोजी कवी संमेलन भरविण्यात आले होते. या कवी संमेलनाचे उद्घघाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ.अलका नाईक अभिनेत्री पुजा पवार यांच्या हस्ते करण्यात आले होते.


या कार्यक्रमात तुळजापूर तालुक्यातील काटी येथील कवी दलित मित्र नंदु बनसोडे यांनी सध्या देशाला मोठ्या प्रमाणात तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे. शालेय वयातच अनेकजण व्यसनांना बळी पडत आहेत. व्यसन हे तरुणाईचे स्टाईल स्टेटमेंट बनत आहे.अशा बिघडत्या परिस्थितीत तरुणाईला व्यसनमुक्त करण्यासाठी व  व्यसनाधीन तरुणाईला सावरण्यासाठी कवी बनसोडे यांनी "व्यसनमुक्ती" या विषयावर आपली  बहारदार व दर्जेदार कविता सादर करुन व्यसनमुक्ती कार्यात सहभाग नोंदविल्याबद्दल त्यांच्या सन्मानार्थ राज्यस्तरीय "व्यसनमुक्ती"  प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.


यावेळी प्रा. डॉ. अलका नाईक, अभिनेत्री पुजा पवार-साळुंके, प्रमुख पाहुणे अमोल मडापे, आयोजक सुरेश संकटे यांच्यासह
विविध ठिकाणचे जेष्ठ, बाल कवी उपस्थित होते.

Labels:

काटी सोसायटी निवडणुकीत 9 जागेसाठी 13 उमेदवार रिंगणात


काटी/उमाजी गायकवाड

तुळजापूर तालुक्यातील काटी येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी बुधवारी (दि. ३०) माघारीच्या अंतिम दिवशी 20 उमेदवारी अर्जांपैकी 7 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने 13 जागांपैकी 4 जागा बिनविरोध आल्या असून सोसायटीच्या राहिलेल्या 9 जागांसाठी 13 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद आर. कुलकर्णी यांनी दिली.


काटी विकास सोसायटीसाठी  अर्ज छाननीपुर्वी भटक्या विमुक्त जाती जमाती मधून कॉंग्रेसचे भारत राजाराम आगलावे, महिला राखीव मधून कॉंग्रेसच्या  आशा मधुकर साळुंके,तर महिला राखीव मधून दुसऱ्या चंपाबाई खेला पुजारी हे उमेदवार बिनविरोध आले होते. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वसाधारण गटातील प्रदीप श्रीरंग साळुंके, राजेंद्र रामहरी गाटे,जयाजी विजयसिंह देशमुख, धनाजी अण्णासाहेब देशमुख, नाशेर अहमद अ.नईम काझी, वसंत लक्ष्मण हेडे यांनी तर सर्वसाधारण गटातील नाबाजी गोरख ढगे या 7 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने इतर मागासवर्गीय गटातील भाजपचे धनाजी दत्तू ढगे हे बिनविरोध निवड आले आहेत.

येथील सोसायटीच्या निवडणुकीसाठी 11 डिसेंबरला दोन वेगवेगळ्या बॅलेट पेपरद्वारे मतदान होत असून गुरुवारी सकाळी अकरा वाजता कपबशी, बॅट,विमान, सिलिंग फॅन,छत्री या निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले.तर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 18 डिसेंबरला मतदान होणार आहे. सोसायटी आणि ग्रामपंचायतसाठी सक्षम उमेदवार निवडण्यापासून निवडणुकीतील मोर्चेबांधणीसाठी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक झाल्याचे दिसून आले. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमुळे सोसायटीची निवडणूक बिनविरोध काढण्यासाठी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत प्रयत्न केले  परंतु हे सर्व प्रयत्न असफल ठरले. 


निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख, सरपंच आदेश कोळी,बाजार समितीचे माजी संचालक सुजित हंगरगेकर, माजी चेअरमन सयाजीराव देशमुख, राष्ट्रवादीचे पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव, मकरंद देशमुख करीम बेग,चंद्रकांत काटे, प्रदीप साळुंके आदी स्थानिक गावपुढाऱ्यांनी प्रयत्न केला. मात्र तो प्रयत्न उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अखेर फोल ठरला. बुधवारी (दि. ३०) माघारीच्या दिवशी 20 पैकी 7 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने आता 9 जागांसाठी 13 उमेदवार समोरासमोर उभे ठाकले आहेत. 

गटनिहाय उमेदवार पुढीलप्रमाणे - (सर्वसाधारण गट) 
1)अविनाश हणमंत देशमुख 2)रामलिंग उद्धव जाधव (खुंटेवाडी)
3) सयाजीराव विजयसिंह देशमुख
4)नजीब खलील काझी 5)अभिमान भागवत बामणकर
6) राजु सिध्दलिंग वाडकर
7)हरि नागू जाधव (खुंटेवाडी) 8)संजय रामचंद्र साळुंके 9)काकासाहेब गणपती वीर 10)प्रकाश दत्तु गाटे
11) बाबुराव मारुती ढगे

अनुसूचित जाती जमाती गटातून-
1)अशोक आगतराव जाधव
2) सुभाष पांडुरंग गायकवाड
याप्रमाणे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 


काटी विकास सोसायटीच्या 9 जागांसाठी रविवारी 11 डिसेंबर 2022 रोजी मतदान घेण्यात येऊन, त्याच दिवशी मतमोजणी करण्यात येणार आहे. भाजप, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पॅनलमध्ये होणाऱ्या या चुरशीच्या लढतीकडे संपूर्ण गावासह तालुक्याचे लक्ष लागून आहे. ऐन थंडीच्या दिवसात सोसायटी आणि ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा धुरळा उडणार आहे तर स्थानिक पदाधिकाऱ्यांची प्रतिष्ठा चांगलीच पणाला लागली असून गावात राजकीय वातावरण तापले आहे.

Labels:

इनामी ,कूळ सिलिंगच्या १, १३० एकर क्षेञ भोगवटादार वर्ग २ नोंदीच्या महसुली कार्यवाहीने शेतक-यात खळबळ

नळदुर्ग दि.२९ : 

नळदुर्ग महसुल मंडळार्गत १९गावातील जुने आभिलेख तपासुन  इनामी ,कूळ सिलिंग व  वक्फ बोर्डाच्या तब्बल १ हजार १३० एकर क्षेञ भोगवटादार वर्ग २ अशी नोंद घेण्यात आली आहे.यामुळे नळदुर्ग  शहरसह परिसरातील शेतक-याच्या चिंतेत भर पडली आहे.   


काही दिवसापुर्वी अतीवृष्टीने शेतातील पिक वाया गेले.विमा कंपनीकडून पिकविमा देण्यास झालेली टाळाटाळ आणि आता भोगवटदार वर्ग २ अशी झालेली नोंद यामुळे शेतक-यांच्या अडचणी वाढले आहे. आशावेळी राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारने याप्रकरणी शेतकरी हिताचा निर्णय  घेवुन दिलासा दयावा,अशी अपेक्षा शेतकरी वर्गातुन व्यक्त केली जात आहे.



नळदुर्ग  व शिवारातील असंख्य जमिनीची भोगवटदार वर्ग २ अशी नोंद झाल्याने शेतकरी व प्लाॕट धारकामध्ये मोठी खळबळ उडाली असून आज घडीला ११५ गटातील  १हजार१३० एकर  क्षेत्रावर भोगवटदार वर्ग २ असा उल्लेख करण्यात आला आहे.

 यामध्ये वक्फ बोर्ड राजपञ व जुना गाव नमूना ९, सिलिंग वाटप रजिस्टर नक्कल प्रमाणे ३६ ई कुळ रजिस्टर नक्कल प्रमाणे सात बारावर भोगवटदार  वर्ग २ प्रमाणे नोंद घेण्यासाठी तत्कालीन उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये नळदुर्ग सज्जा तलाठी यांनी २ नोव्हेंबर २०२२ रोजी नोंद घेतल्यानंतर मंडळ अधिकारी यांनी ९ नोव्हेंबर २०२२ रोजी यास मंजुरी दिली आहे.नळदुर्ग मंडळ अंतर्गत १९ गावात सर्वे करण्यात आला.या गटातील इनामी ,कुळ, सिलिंग व वक्फ बोर्डच्या अंतर्गत यामध्ये ३७५ संबंधित शेतकरी व प्लाॕटधारकांना नोटीस बजावण्यात आली. या नोटीस मध्ये संबधितांनी उपस्थित राहून म्हणणे दाखल करावे अन्यथा आपले काहीही म्हणणे नाही, असे समजून सदरचा फेरफार रद्द करून सदरील जमिन शासन जमा करण्यासाठी संबधिताकडे प्रस्तावित करण्यात येईल असा उल्लेख आहे. 



या नोटीस नंतर ७५ शेतक-यानी नळदुर्ग तलाठी कार्यालयात दि. २६ नोव्हेंबर रोजी प्रस्ताव दाखल केले आहेत.
भोगवटदार वर्ग २ अशी नोंद झालेल्यामध्ये शहरातील शासकीय विश्रामग्रह परिसर, शहरालगतच्या अक्कलकोट रोडवरील गणेशखीळा, कळवातणीचे शेत, कंदुरमळा, पाटील तांडा, जखणीतांडा, इंदिरानगर जवळील भाग, बोरीधरण लगत, मैलारपूर जवळील गव्हाणे पट्टा, भुईकोट किल्ला लगत दक्षिण भाग याचा समावेश आहे. 

शासनाकडून भोगवटदार वर्ग २, इनामी, वक्फ जमिनी, सिलींग कायद्यातील जमिनींचा मूळ प्रयोजनांसाठी वापर होतोय की नाही, हे तपासले जात आहे. शिवाय चुकीच्या पध्दतीने झालेले फेरफार रद्द करून संबंधितांवर कारवायाही केल्या जाणार आहेत. नळदुर्ग मंडळात अशा शेकडो एकर जमिनींच्या सातबारांवर आता भोगवटदार क्रमांक २, असा उल्लेख आल्याने प्लॉट खरेदी करून घरे उभारणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, ज्या जमिनींचे बेकायदेशीरपणे हस्तांतरण, विक्री झाली आहे,अशा जमिनी मूळ मालकांमार्फत रूपांतरण शुल्क भरून नियमित करता येऊ शकतात. भोगवटदार क्रमांक २ च्या जमिनी म्हणजे इनामी  जमिनी, वक्फच्या जमिनी,वन, गायरान, कूळाच्या तसेच वतनाच्या जमिनी असतात. भोगवटदार क्रमांक दोनच्या जमिनी विकण्याचा अधिकार संबंधित शेतकऱ्याला नसतो. इनामी किंवा वक्फच्या जमिनी या संबंधित मंदिर किंवा मशिदच्या सेवेसाठी दिलेल्या असतात. तर अन्य जमिनी स्वत:च्या उदरनिर्वाहासाठी असतात. मात्र,वतनाच्या किंवा इतर जमिनींची विक्री करता येते. त्यासाठी शासनाची अर्थात जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागते. काही प्रमाणात रूपांतरण शुल्क किंवा नजराणा रक्कम भरावी लागते.      

नळदुर्ग शहर व परिसरात या गटांतील शेतकऱ्यांचा भोगवटदार वर्ग २ मध्ये समावेश करण्यात आला आहे.
१४९/१,१४९/१/२, १४९/२, १५०/१, १५३,१५४,१५५, १५६, १५६/२, २७६/अ/१, २७९, ४३,४४, ४५, ४७, ४८, ५१/अ, ५१/क/२ ५१/ब,  ५२/अ/१, ५२/अ/२, ५२/क, ५२/ड, ५२/ब, ७३/अ, ७३/क, ७३/क/२, ७३/फ/१, ७३/फ/२, ७३/ब, १५०/२, १५२/१, १५२/२, २९६/१, २९६/२, २९६/३, २९६/४, १०१/१, १०१/२, १०७/२, १११/१, १११/२, ११२/१, ११२/२, ११४, ११५/१, ११५/२, ११५/३, १४०/१, १४०/२, १४०/३, १४१, १४१/२, १४१/३, १४२/१, १४८, १६७/१, १६७/२, १६७/३, १६७/४, १६७/५, १७६/४, १९०/१, १९०/२, १९०/३, २०४/अ/३, २१/१, २१/२, २१/अ/३, २१/४, २१/५, २२/१, २२/२, २२/३, २३/१, २३/२, २३/३, २३१/ब/३, ३२४/३, २३९/१, २३९/२, २३९/५, २३९/७, २३९/८, २४/१, २४/२, २४०/२, २४०/३, २५/१, २५/२, २५/३, २५/४, ६२, ६३, ६५, ८२/१, ८२/२, ८५/१, ८५/२, ८५/३ ईत्यादी.

Labels: