Monday, 25 May 2015

अनुदानावर केले कडबाकुट्टी यंत्रांचे वाटप

उस्मानाबाद - आत्महत्याग्रस्त कुटुंबातील शेतकऱ्यांच्या वारसांना 100 टक्के अनुदानावर कडबा कुट्टी देण्याचा कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने घेण्यात आला. जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी आणि पदाधिकारी यांनी अभ्यास सहलीसाठी असलेल्या निधीचा खर्च टाळून हा निधी शेतकऱ्यांसाठी देऊन एक चांगला पायंडा पाडून आदर्श उदाहरण सर्वांसमोर ठेवले.

     तुळजापूर येथील पंचायत समितीच्या प्रांगणात पशुसंवर्धन व बांधकाम विभाग, जिल्हा परीषद,उस्मानाबादच्या संयुक्त विदयमाने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील वारसांना 100 टक्के अनुदानावर कडबाकुट्टी यंत्राचे वाटप व तुळजापूर येथील जिल्हा परीषदेतर्फे बांधण्यात आलेल्या विश्रामगृह वास्तूचे उदघाटन तसेच तुळजापूर तालुक्यातील आयएसओ प्रमाणपत्र मिळविणाऱ्या 11 ग्रामपंचायतींच्या सरपंच व ग्रामसेवकांना प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाचे आज आयोजन करण्यात आले होते. 
जिल्हा परीषदेचे अध्यक्ष . कुलदिप (धीरज) पाटील, आमदार मधुकरराव चव्हाण, जि.प. उपाध्यक्ष सुधाकर गुंड, कृषी व पशुसवंर्धन सभापती बाबुराव राठोड, अर्थ व बांधकाम सभापती दत्तात्रय मोहिते, महिला व बाल कल्याण सभापती श्रीमती लता पवार, तुळजापूर पंचायत समितीचे उपसभापती प्रकाश चव्हाण, जि.चे अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एन. उबाळे, सुनिल चव्हाण, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शितलकुमार मुकणे, जि.प.चे माजी अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, उमरगा पं. स. सभापती श्रीमती अक्षराबाई सोनवणे आदि उपस्थित होते.
जिल्ह्यात गेल्या चार वर्षापासून अपुरा पर्जन्यमान, नापीकी आणि गारपीट अशा अस्मानी संकटामुळे शेतकरी वर्ग अडचणीत सापडला. शेतकऱ्यांत नैराष्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे कुटुंब उघडयावर पडले. त्यांच्या कुटुंबाना मदत व सहाय्यासाठी जिल्हा परीषदेने धाडसी निर्णय घेवून आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबांच्या वारसांना मदतीचा हात दिल्याबदल मान्यवरांनी यावेळी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाचे कौतुक केले. आत्महत्या केलेल्या ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांकडे जनावरे आहेत त्यांना कडबा कुटटीचा लाभ होईल, परंतु ज्या शेतकऱ्यांकडे जनावरे नाहीत, अशांना पशुसंवर्धन विभागाने दुभती जनावरे, शेळया मेंढया पुरवठा केल्यास त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल, त्यादृष्टीनेही प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. 
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ॲड. पाटील म्हणाले की, सात लाख रुपये खर्च करुन खरेदी करुन कडबाकुट्टी यंत्रे खरेदी करुन ती आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना 100 टक्के अनुदानावर देण्यात येत आहे. तसेच तुळजापूर येथील जिल्हा परीषदेतर्फे 67 लाख 42 हजार 990 रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या विश्रामगृह वास्तू उभारण्यात आली असून तुळजापूर तालुक्यातील 11 ग्रामपंचायतीने उत्कृष्ट कार्य करुन आय एस ओ प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. जिल्हा परिषदेच्या दृष्टीने ही कौतुकाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. 
यावेळी आमदार श्री. चव्हाण म्हणाले की गावचा, तालुक्याचा व जिल्ह्याच्या विकास प्रक्रीयेमध्ये लोकप्रतिनीधीचा सहभाग आवश्यक आहे. ग्रामपंचायत कामात प्रशासकीय गतीमान आणण्यासाठी इतर ग्रामपंचायतीनी 11 ग्रामपंचायतीचा आदर्श घ्यावा. पेयजल योजनेची अंमलबजावणी करावी. गाव हागणदारीमुक्त करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. पशुसंवर्धन विभागातर्फे संकलित माहितीपत्रिकेचे व दिनदर्शिकेचे विमोचनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात झाले.
यावेळी तुळजापूर तालुक्यातील 11 ग्रामपंचायतीने आय.एस.ओ. हे गुणवत्ता प्रमाणपत्र मिळवल्याबद्दल वाणेगाव येथील सावित्रीबाई देवकर, पी. एस. भोसले, देवसिंगा नळ येथील मल्काबी राज पठाण, एम. एम. तांबोळी, अलीयाबाद येथील ज्योती प्रकाश चव्हाण, डी. बी, मुसने, वडगाव (दे.) येथील अनिता गणपत पाटील, जी. पी, करदोरे, वडगाव लाख येथील वनीता करंडे, पी. जे. देडे, किलज येथील राजेंद्र राठोड, व्ही .एस. कांबळे, आरळी बु. येथील चंद्रहार नारायणकर, एस. बी, इंगळे, तामलवाडी येथील ज्ञानोबा राऊत, एस. ए. कोटे, देवकुरळी येथील भगीरथी कांबळे, व्ही. एस. ताटे, खुदावाडी येथील रेवणसिध्द स्वामी, एस. आर. घोगरे, आणि सावरगाव येथील प्रभावती मारडकर, एस. एल. माशाळकर यांचा सत्कार करण्यात आला.
तुळजापूर तालुक्यात सिंदफळ येथील रामचंद्र माके, वडगाव येथील उमेश पवार, कसई येथील मधुकर पाटील, वानेगाव येथील दत्तात्रय बचाटे, पिंपळा खु. येथील लखन नाना कदम यांना मान्यवरांच्या हस्ते कडबा कुट्टी यंत्राचे वाटप करण्यात आले.
श्री. गुंड गुरुजी म्हणाले की, तुळजापूर येथे जिल्हा परिषदेने लोकप्रतिनिधी व भाविकांसाठी विश्रामगृहामुळे राहण्याची सोय झाली असून उत्पन्न वाढीसाठी जि.प. ने मोकळया जागेवर दुकाने शॉपींग कॉम्पलेक्स बांधून उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करणे गरजेचे आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. उबाळे यांनी शासकीय योजना लोकाभिमुख करण्यासाठी सर्वांनी योगदान दयावे. तुळजापूर येथे बांधण्यात आलेल्या विश्रामगृह ना नफा ना तोटा या तत्वावर देण्यात येणार असल्याचे सांगितले.
डॉ. व्हटटे म्हणाले की ,जिल्हा परिषदेने आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना दिलासा देताना सामाजिक बांधिलकी जपली असल्याचे आवर्जून नमूद केले. कृषी व पशुवंवर्धन सभापती बाबुराव राठोड यांचे समयोचित भाषण झाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक रमाकांत गायकवाड यांनी केले तर आभार उपअभियंता ओ. के. सय्यद यांनी केले.

जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत आर्थिक शिस्त आणण्‍याचे आदेश

उस्मानाबाद - जिल्हा मध्यवर्ती बॅंकेस आर्थिक स्थिरता येण्यासाठी बडे थकबाकीदार आणि साखर कारखाने यांच्याकडील कर्जाची वसुली करावी तसेच संचालकांनी स्वताच्या ठेवी बॅंकेमध्ये ठेवाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी बॅंकेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना दिले. त्याचबरोबर पीक विमा तसेच विविध अनुदानापोटी जिल्हा प्रशासनाकडून येणारा निधी संबंधीत लाभार्थ्यांनाच मिळाला पाहिजे, अशी स्पष्ट सूचना त्यांनी केली.
जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष सुरेश बिराजदार, संचालक भारत डोलारे, शिवाजीराव भोईटे, सुग्रीव कोकाटे, बॅंकेचे मुख्याधिकारी श्री. चांडक आदींबरोबर बॅंकेच्या स्थितीबाबत चर्चा केली. यावेळी जिल्हा उपनिबंधक (सहकार) एस.पी बडे यांचीही उपस्थिती होती. 
बॅंकेची सद्यस्थिती, आर्थिक अडचण, वसुलीचे प्रमाण, निधी उपलब्धता आदींची माहिती डॉ. नारनवरे यांनी यावेळी घेतली. बॅंकेबाबत विश्वास वाटावयाचा असेल तर प्रथम संचालकांनी त्यांच्या ठेवी बॅंकेत ठेवाव्यात, जेणेकरुन सामान्य ठेवीदारांना विश्वास वाटेल. जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे त्याचबरोबर मोठे थकबाकीदार आहेत, त्यांच्याकडून वसुली करावी, शिक्षकांचे पगार पूर्ववत जिल्हा बॅंकेकडून व्हावेत यासाठी शिक्षक संघटनांशी चर्चा करुन त्यांना विश्वास द्यावा, अशा सूचना त्यांनी केल्या.
जिल्ह्यातील शेतकऱयांची पीकविम्याची अनुदानाची 157 कोटी रुपये बॅकेत जमा होईल. ते संबंधीत लाभार्थ्यांनाच त्यांच्या खात्यावर तात्काळ दिले जावेत, याप्रकरणी कोणतीही अनियमितता चालणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. याशिवाय जिल्हा परिषदेचे 59 कोटी देणे तात्काळ देण्यासाठी वसुली वाढवावी, असेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाची असणारी ही बॅंक आर्थिकृष्ट्या स्थिर होण्यासाठी आर्थिक शिस्तीची गरज आहे. त्यादृष्टीनेच पावले उचलण्याच्या सूचना त्यांनी केल्या. 


Labels:

सत्ताधार्‍यांवर आंदोलनाची वेळ

बार्शी -  बार्शी नगरपरिषदेवर राष्ट्रवादीच्या आमदार दिलीप सोपल यांची सत्ता आहे परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील सार्वजनिक कामे वेळेत होत नसल्याने तसेच त्याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक होत असल्याने सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकार्‍यांवर आंदोलनाची वेळ आली आहे. अनेक दिवसांपासून बार्शी जामगाव रस्त्यावरील तेलगिरणी चौक येथे गटारांची व्यवस्था करण्याची मागणी असतांनाही त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने डोळेझाक केल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने ६ जून रोजी रास्तारोको आंदोलानाचा लेखी पत्राद्वारे इशारा देण्यात आला आहे.
शहरातून जाणार्‍या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यावर शासकिय विश्रामगृह ते तेलगिरणी चौक दोन्ही बाजूने सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या गटारांचे पाणी नैसर्गिक उताराने शिवाजी आखाडा मार्गे फौजदार चावडीच्या पिछाडीतून असलेल्या नाल्यात जाणे गरजेचे आहे. परंतु ते तेलगिरणी चौकातून ऐनापूर मारुती मंदिराकडे जाणार्‍या मुळ गावठाणातील जुन्या व अरुंद गटारांना जोडण्यात आले आहे. सदरच्या त्रुटीमुळे दरवर्षी पावसाळ्यांच्या दिवसांत तेलगिरणी चौक ते ऐनापूर मारुती मार्गावरील खुरपे बोळ, कुंभार बोळ, धारुरकर बोळ, चंद्रशेखर बोळ, पानागावकर बोळ, टाकणखार रोड आदी वस्त्यांमध्ये तसेच व्यापार्‍यांच्या घरे आणि दुकानांत पाणी शिरते. यामुळे नगरपरिषदेने दुरुस्ती केलेल्या रस्त्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होते. याबाबत अनेकवेळा सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करण्यात आली आहे. आमदार दिलीप सोपल यांच्या पत्राद्वारेही ही बाब निदर्शनास आणून दिलेली असतांना कोणत्याही प्रकारची कार्यवाही न झाल्याने शनिवारी दि. ६ जून रोजी ११ वाजता तेलगिरणी चौक, शिवाजी आखाडा परिसरातील नागरिकांसह रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असे लेखी कळविण्यात आले आहे. या निवेदनावर नगरसेविका निर्मला स्वामी, नगरसेवक देवीदास शेटे, गणेश जाधव, नागेश अक्कलकोटे यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Labels:

मोर्चा हा विरोधकांचा राजकिय स्टंट - सोपल

बार्शी -  कुमूदा-आर्यन शुगर्स कारखान्याचे निमित्ताने स्थानिक राजकिय विरोधकाशी आंदोलनकर्ते प्रभाकर देशमुख यांनी संधान साधून स्टंटबाजी चालवलेली आहे. सदर कारखाना कुमूदा उद्योग समुहाकडे आहे ही वस्तुस्थिती असताना सोपल कुटूंबियांच्या बदनामीचा प्रयत्न कदापी खपवून घेतलाजाणार नाही.                    ॠंबंधीतांविरोधात गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात येणार आहे असे सुधीरभाऊ सोपल यांनी सांगीतले आहे. ते पुढे म्हणाले ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या आम्ही पाठीशी आहोत आणि कायमस्वरुपी पाठीशी राहूत.
आर्यन शुगर्स या कारखानायाचे शेअर्स (समभाग) कुमूदा उद्योग समुहाने हस्तांतरीत (ट्रान्सफर) करुन घेतलेले आहे. खाजगी उद्योगात कंपनी ऍक्टनुसार शेअर ट्रान्सफर झाल्यानंतर त्याची सर्वस्वी जबाबदारी कुमूदा उद्योग समुहाची झालेली आहे. कारखाना विकला या ऐवजी शब्दश: शेअर ट्रान्सफर झाले असे म्हटले जाते. हि वस्तुस्थिती वर्तमानपत्राच्या माध्यमातून जाहीर करुनही सोपल कुटूंबाचा संबंध जोडून नाहक बदूामी करण्याचा डाव राजकिय विरोधक आणि प्रभाकर देशमुख यांनी एकत्रितपणे मांडलेला आहे.
सोपल कुटूंब गेली ३० वर्षापासून शेतकर्‍यांसोबतच आहे. आमदार दिलीप सोपल यांनी लोकप्रतिनिधी या नात्याने बार्शी तालुक्यातील शेतकर्‍यांना कायम न्याय देण्याची भुमिका घेतलेली आहे. ऐतीचे, विजेचे, सिंचनाचे प्रश्‍न असो की शेतकर्‍यांवर आलेली संकटे, मध्यंतरी अवकाळी आणि दुष्काळी संकटाच्या वेळी सुमारे सव्वाशे कोटी रुपये अनुदान हे सुध्दा फक्त आमदार दिलीप सोपल यांच्यामुळेच मिळाले हे शेतकरी कधीही विसरणार नाहीत. ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या ऊसाचे पैसे मिळालेच पाहिजेत हिच आमचीही भुमीका आहे. आम्हीही ऊस उत्पादक शेतकरीच आहोत आमचेही ऊसबील थकीत आहे. सनदशीर मार्गाने सर्वांचे थकित ऊसबील निश्‍चितपणे मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
सोपल पुढे बोलताना म्हणाले की, वस्तुस्थिती दडवून साखर कारखान्याच्या बिलासाठी कारखान्यावर मोर्चा न काढता तिथे आंदोलने न करता आमच्या घरावर मोर्चा काढण्याची भुमिका घायची, मोर्चाला कायदेशीरदृष्ट्या परवानगी नसतांना हटवादीपणाने ऊस उत्पादक शेतकर्‍यांऐवजी राजकिय विरोधी कार्यकर्ते घेऊन मोर्चाने प्रयत्न करणे, प्रसिध्दीसाठी आणि फक्त आणि फक्त बदनामीसाठी आंदोलनाचा फार्स करणार्‍या प्रभाकर देशमुख व इतरांविरोधात लवकरच गुन्हे दाखल करण्याची कायदेशीर प्रक्रिया आम्ही चालु केलेली आहे.
मोर्चाचा अल्प प्रतिसाद बघता त्यामध्ये ऊस उत्पादकाऐवजी राजकिय विरोधी कार्यकर्ते बहुसंख्येने होते. यावरुन विरोधकांचा हा पूर्णपणे राजकिय स्टंट होता.


Labels:

लिंगायत तेली समाजाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन

बार्शी -  वीरशैव लिंगायत तेली समाजसेवी संस्थेच्या वतीने रविवारी (दि.३१) रोजी राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा, सामुहिक विवाह सोहळ्यात पाच जोडप्यांचे विवाह, संस्थेच्या नूतन कार्यालयाचे भूमिपूजन, आरोग्य तपासणी आणि रक्तदानाचे आयोजन केल्याची माहिती संस्थाध्यक्ष राजाभाऊ कचरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेत सचिव भीमराव कोरे, नागजी नान्नजकर, सोमेश्वर देशमाने, दत्तात्रय देशमाने, दत्तात्रय सातारकर, किशोर दळवे, बाळासाहेब गाताडे, महेश देशमाने, अशोक नान्नजकर आदी उपस्थित होते.
मार्केट यार्ड येथील भाजी मार्केट हॉलमध्ये हा विवाह सोहळा होत आहे. तुळजापूर रोडवरील मार्केट यार्ड शॉपींग सेंटरच्या पहिल्या मजल्यावर नूतन कार्यालयाचे भूमिपूजन होत आहे. संस्थेने यापूर्वी चार विवाह सोहळे आणि परिचय मेळावे यशस्वी पार पाडले असून याकरिता राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. माजी मंत्री, आमदार दिलीप सोपल आणि ह.भ.प. जयवंत बोधले महाराज यांच्या उपस्थितीत हा सोहळा होत आहे. विवाह सोहळ्यातील दांपत्यांना संसारोपयोगी व विवाहासाठी आवश्यक साहित्य भेट देण्यात येणार आहेत. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वीरशैव लिंगायत तेली समाजसेवी संस्था, युवा ग्रुप परिश्रम घेत आहेत. अधिक माहितीसाठी ९८५००५०४६०, ९४२२६४८१९४, ८०८७४११००८ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Labels:

भगवान गड येथे वंजारी सेवा संघाचा मेळावा

 बार्शी -  सोमवारी दि.१७ रोजी श्रीक्षेत्र भगवानगडावर वंजारी सेवा संघाची ५ वी राज्य कार्यकारिणी बैठक घेण्यात आली. यावेळी राज्यभरातून हजारोंच्या संख्येने प्रतिनिधी उपस्थितीत होते. संत भगवान बाबा व लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे यांच्या प्रतिमा पूजनाने या बैठकीची सुरुवात करण्यात आली. 
            यावेळी वंजारी सेवा संघाचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष श्री. राहुलजी जाधवर, प्रदेश सचिव बाजी दराडे, प्रदेश उपाध्यक्ष अमोल कुटे, देवेंद्र बारगजे, महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा मंगलताई वाघ, प्रदेशकार्याध्यक्ष मंजूषा दराडे ,प्रदेश सहकार्यध्यक्ष दत्तात्रय जाधवर सरचिटणीस श्री धनंजय ओम्बासे ,प्रदेश संघटक धनंजय मुंढे राज्य सदस्य श्री सिद्धेश्‍वर मुंढे यांच्यासह सर्व जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष तसेच विविध पदाधिकारी उपस्थित होते.   
यावेळी पश्‍चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष पदी अनिलकाका सानप तर विभागीय कार्याध्यक्ष पदी सुधाकर मुंढे यांची नव्याने नियुक्ति करण्यात आली. याप्रसंगी बोलताना राहुल जाधवर म्हणाले की, वंजारी सेवा संघ ही बिगर राजकीय समाज चळवळ असून आज बुद्धिजीवी तरुण हा समाज्यात परिवर्तन करण्यास सज्ज झाला आहे. माझे संपूर्ण आयुष्य भगवान गडाची व वंजारी समाजाची सेवा करण्याचा माझा संकल्प असून वंजारी सेवा संघाची चळवळ ही सामाजिक परिवर्तनाची नांदी आहे. वंजारी समाज चार शाखेत विभागला गेल्याने बेठी व्यवहार होत नाही त्यामुळे एकीची भावना दिसून येत नाही. वंजारी समाजाचे मुळ आणि उगमस्थान एकच आहे. ज्या ज्या परिसरात हा समाज विस्तापित झाला त्या त्या परिसरातील रुढी, संस्कृती आणि पंरपरा समाजाने आत्मसात केल्या. संम्पूर्ण वंजारी समाज एक व्हावा , एक वंजारी ही भावना दृढ व्हावी हिच स्व. मुंढे साहेबांची ईच्छा होती. आजपासून ही परिर्वतनाची नांदी बाबांच्या आशिर्वादाने आणि स्व.साहेबांच्या प्रेरणेने सुरु झाली. येणार्‍या काळात चार शाखेत विभागल्या गेलेल्या या समाजाला एकत्रित आणावयाचे आणि त्यांच्यातील रोटी बेटी व्यवहार सुरु करुन संपूर्ण समाजाला एकत्र करण्याची, एकीची भावना, चळवळ सेवा संघाच्या माध्यमातुन ऊभी करण्यात येणार आहे. समाजाचे प्रेरणास्थान असलेल्या भगवान गडाचा प्रचंड कायापलट आणि विकास हा न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री व गडाचे सचिव श्री गोविन्द घोळवे यांनी केला आहे. वंजारी समाज हे ऋण कदापि विसरणार नाही. गोविन्द घोळवे यांनी सक्रीय समाजकारणात यावे असा ठराव यावेळी घेण्यात आला याबरोबर वंजारी समाज्यात हुंडा बंदी करणे, स्त्रीभृणहत्त्या थांबवणे , शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करणे, वंजारी तरुणांनी निर्व्यसनी निष्कलंक राहून स्त्रीयांचा सन्मान करण्यासाठी त्यांच्यात जनजागृती करणे, शासकीय कर्मचारी व विद्यार्थी यांच्या अडचणींचा विचार करता वंजारी समाजाचे आरक्षण बदलून समाजाचा समावेश ओबीसी मधे करावा असे विविध ठराव मंजूर करण्यात आले .
 प्रदेश सचिव बाजी दराडे यांनी वंजारी सेवा संघाचा अजेंडा,ध्येय धोरणे यावर मार्गदर्शन केले. महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा मंगलताई वाघ, कार्याध्यक्ष डॉ.मंजूषाताई दराडे, आशा मिसाळ यांनी वंजारी महिलांच्या समस्या, हुंडाबंदी ईत्यादींवर आवाज उठवत यापुढे महिलांच्या अडचणी सोडविण्यसाठी राज्यभर काम उभरणार असल्याचे जाहिर केले. प्रास्ताविक अनिल ङ्गड यानी केले तर सुत्रसंचालन दादासाहेब खेडकर यांनी केले. या बैठकीप्रसंगी सोलापूर जिल्हाध्यक्ष संतोष हरिदास जाधवर, जिल्हा उपाध्यक्ष विजय घोळवे, ईश्‍वर जाधवर, जिल्हा सरचिटणीस अभिजीत माळवे, बार्शी तालुकाध्यक्ष राम खराटे, शहराध्यक्ष राजाभाऊ वनवे, श्रीमंत बांगर, पिंटू पाटील, पद्माकर मुंढे यांच्यासह राज्यभरातून हजारो पदाधिकारी व कार्यकर्ते समाजबांधव उपस्थित होते.

Labels:

एकनाथ आवाड यांचे उपचारादरम्यान निधन

कळंब (भिकाजी जाधव)   मराठवाड्यातील दलित नेते तथा मानवी हक्क अभियानचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. एकनाथ आवाड यांचे सोमवारी सकाळी हैदराबादमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. त्यांना कळंब येथील पंडीत जवाहरलाल बाल उद्यान येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
          आवाड यांच्या निधनाने दलित चळवळीत मोठी पोकळी निर्माण झाली अशी भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. 
बीडमधील एका छोट्या गावात एकनाथ आवाड यांचा जन्म झाला होता. मातंग समाजात जन्मलेले एकनाथ आवाड यांचे बालपण हलाखीच्या स्थितीत गेले. जातीव्यवस्थेचे चटके सोसत आवाड यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले. पोतराज प्रथेला विरोध दर्शवत आवाड यांनी दलितांसाठी पहिला लढा दिला. यानंतर जातीभेद, नामांतर चळवळ, सावकारकी, एक गाव एक पाणवठा असे असंख्य लढे त्यांनी दिले. मानवी हक्क अभियान या मोहीमेतून आवाड यांनी  ५० हजार दलितांच्या जमिनी वाचवल्या. संयुक्त राष्ट्राच्या जिन्हिवा येथील राष्ट्रीय परिषदेत त्यांनी भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. 
गेल्या काही दिवांपासून आवाड यांना पोटाच्या आजाराने ग्रासले होते. यासाठी त्यांच्यावर हैदराबादमधील रुग्णालयात उपचार सुरु होते. सोमवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. दि.२६ मे मंगळवार रोजी सकाळी १० वाजता तेलगांव ता. माजलगांव जि.बीड येथे त्यांच्यावर अंत़्यसंस्कार केले जाणार आहेत, कळंब येथे संपन्न झालेल्या शोकसभेच्या अध्यक्षपदी महादेव महाराज आडसूळ हे होते यावेळी प्रा.संजय कांबळे, प्रा.खांडके, आश्रूबा गायकवाड, माधवसिंह राजपूत, शिनगारे गुरूजी, कॉ.बजरंग ताटे यांनी एकनाथ आव्हाड यांच्या आठवऩी आपल्या भाषणातून व्यक्त करून श्रद्धांजली अर्पन करण्यात आली यावेळी विक्रम शिंदे, राजू शेख, प्रकाश धावारे, माया शिंदे, त्रिवेनी पोटभरे सचिन क्षिरसागर, सुनिल कांबळे, भिकाजी जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Labels:

Saturday, 23 May 2015

ग्रामीण भागात विद्यार्थी मिळवण्‍याकरीता विविध प्रलोभने

पांगरी (गणेश गोडसे) शिक्षण क्षेत्रातील वाढती जीवघेणी स्पर्धा,शिक्षणाचे वाढते बाजारीकरण,व त्यातून काळानुसार विद्यार्थी मिळवण्यासाठी सुरू असलेली शाळांची धडपड. आपल्या मुलांना आमच्याच शाळेत घाला,आमचीच शाळा गुणवत्तापूर्वक आहे,आदि विविध प्रलोभने,विनंत्या पालकांना सुरू असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात सगळीकडेच दिसून येत आहे.मात्र योग्य शाळा निवडताना मात्र पालकांची मोठी दमछाक होताना दिसत आहे.यातून कसा मार्ग काढावा हा मोठा प्रश्न सध्या मुलांच्या पालकासमोर आहे.
           नवीन शाळांनाचे पेव: इंग्रजी शिक्षण व शाळांचे वेड शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात पोचू लागले असून ग्रामीण भागातही दिवसेंदिवस नवीन इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे लोन पोचू लागले आहे.खेड्या पाड्यात,वाड्या वस्त्यावरसुद्धा इंग्रजी शाळा सुरू करण्याचे धाडस संस्था चालक दाखवू लागले आहेत.गतवर्षी अथवा त्यापूर्वी  सुरू झालेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा आदर्श समोर ठेऊन दिवसेंदिवस नव नवीन शाळामद्धे भर पडत आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांची उपलब्धता करण्यासाठी संस्थापक शिक्षकावर बंधने घालताना दिसत आहेत.प्रत्येक शिक्षकाने किमान मुले आपल्या शाळेत कशी प्रवेश करतील यासाठी प्रयत्न करावे असे फर्मानच शाळा चालकांनी काढले आहेत.त्यात दिवसागणिक नवीन शाळा सुरू होत असल्यामुळे विद्यार्थी कसे मिळवायचे या भ्रांतेत शिक्षक दिसून येत आहेत.
     अनुदानित शाळा अडचणीत: प्रती दिन परिसरात कुठे ना कुठे तरी नवीन इंग्रजी शाळेची भर पडून अनुदानित शाळामधील पट संख्या कमी होत असल्यामुळे शाळा व वर्ग कसे टिकवायचे या चिंतेत शाळा चालक व शिक्षक दिसत आहेत.विद्यार्थी संख्या कमी झाल्यास शिक्षकांची संख्या घटून तुकड्या बंद होण्याचा धोका आहे.त्यामुळे किमान आपन अतिरिक्त ठरू नये व नौकरी टिकावी,गावाबाहेर जाण्याची वेळ आपल्यावर येऊ नये यासाठी शिक्षकही दारोदार फिरून पालकांना विनंती करून किमान आमच्या नौकारीसाठी तरी मुलाला आमच्या शाळेत पाठवा,आम्ही पुरेपूर काळजी घेऊ अशी विनवणी करताना दिसत आहेत.शाळेचा गणवेश,शाळेत जाण्यासाठि वाहन आदि सुविधा आम्ही आमच्या पगारातून मोफत पुरवू अशी आमिशेही दाखवली जात आहेत.त्यामुळे शिक्षणाचे बाजारीकरण कश्या प्रकारे झाले आहे याचा साक्षात्कार होतो॰
     दर्जेदार शिक्षणाची हमी देत अनेक मातब्बर शिक्षण क्षेत्रात प्रवेश करताना दिसत आहेत.आम्हीच शिक्षणाचे वारसदार असून विद्यार्थी आम्हीच घडवू शकतो असा आशावाद दाखवला जात आहे.नातेवाइकांनी आपले विद्यार्थी दुसर्‍या शाळेत घालू नयेत यासाठी पुरेपूर बांधणी केली जात आहे॰
  नामाकीत शाळाही विद्यार्थ्यांच्या दारोदार फिरताना दिसत आहेत.नवीन निर्माण झालेल्या शाळांचे ठीक आहे मात्र अनेक नामांकित शाळांचे प्रतींनिधीही घरोघर फिरू लागले आहेत.

Labels:

दुचाकी चोरास नागरिकानी दिले पोलिसांच्या ताब्यात

बार्शी  - चोर्‍या करणारे म्हणून पोलिस संशयाच्या पहिल्या क्रमांकात आजपर्यंत अनेक अशिक्षित, मागास प्रवर्गातील व्यक्तींकडे पाहिले जात होते परंतु आता उच्चभू्र समाजातील व्यक्ती देखिल चोर्‍या करतांना रंगेहात पकडले जाऊ लागल्याने चुकीचा समज खोडला जात आहे. बार्शीतील एकाची दुचाकी चोरी करुन गावाबाहेर नंबरप्लेट फोडून वाहनाची विल्हेवाट लावतांना एका उच्चभू्र समाजातील चोरट्याला पकडल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
     
याबाबत मिळालेली  माहिती अशी की , आनंद चंद्रकांत वाळवे (वय 30 , रा. उपळाई ठो.) असे उच्‍चभ्रु कुटूंबातील दुचाकी चोरटयाचे नाव आहे. सोमवारी दि.17 रोजी   ऐनापूर मारूती रस्‍त्‍यावरील चहाविक्रेते संतोष फिसके हे कुर्डूवाडी रस्‍त्‍यावरील स्‍टेट बँक ऑफ इंडियामध्‍ये आर्थिक व्‍यतहारासाठी गेले होते. बाहेर आल्‍यानंतर त्‍यांची दुचाकी जागेवर नव्‍हती.सदरचा प्रकार त्‍यांनी बँकेच्‍या संबधीत कर्मचा-याना सांगितले.  मात्र संबंधितानी उडवाउडवीचे उत्‍तर दिले .फिस्‍के यांनी दुचाकी चोरीची पोलिसात तक्रार दिली.येथेही त्‍यांना दुचाकी शोधण्‍यास सांगुन दुचाकी नाही सापडल्‍यास गुन्‍हा दाखल करू असे सांगण्‍यात आले.   फिस्‍के यानी आपले वाहन शोधत आसताना उपळाई रस्‍त्‍यावरील एका गॅरेज जवळ चोरटा फिस्‍के यांच्‍या वाहनाच्‍या नंबर प्‍लेट तोडत तसेच वाहनाची ओळख नष्‍ट करत असलयाचे दिसुन आले. यावेळी फिस्‍के व अन्‍य एकाने चोरटयाला रंगेहात पकडून पोलिसाच्‍या ताब्‍यात दिले.  आणले . यावेळी व्‍यापारी आणि नागरिकानी मोठी गर्दी केली.

Labels:

मस्के विद्यापीठात विधी परीक्षेच्या प्रात्यक्षिकात प्रथम

   बार्शी - साहित्य क्षेत्रात उल्लेखनिय काम केलेल्या प्राध्यापक लक्ष्मण मस्के यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात एलएलबीमध्ये प्रात्यक्षीकात विद्यापीद्यापीठातून प्रथम येण्याचा बहुमान मिळाला आहे.
मस्के यांनी एम.एम.बी.एड, सेट-नेट, बी.सीजे पदविका यापूर्वीच प्राप्त केल्या आहेत. अंकुर साहित्य संमेलनाच्या माध्यमातून तालुक्यातील साहित्यक्षेत्रात त्याचा नावलौकिक आहे. धाराशिव (उस्मानाबाद) येथील अखिल भारतीय अंकुर साहित्य संमेलनाच्या
कार्याध्यक्षपदीही त्यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.
विधी क्षेत्रातील नवोदित विद्यार्थ्यांसाठीही कायद्याचे मोफत मार्गदर्शन करत असून गरीब गरजू तसेच अन्यायग्रस्तांना मोफत मार्गदर्शन करण्याचा त्यांचा मानस आहे. बार्शीतील शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळातील अनिष्ट प्रथा मोडीत काढण्याचाही त्यांनी यापूर्वी प्रयत्न केला आहे. विद्यार्थी संस्कारक्षम व सक्षम घडावा यासाठी त्यांनी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांचे ते लोकप्रिय शिक्षक ठरले आहेत.

Labels:

जिल्ह्यातील 422 ग्रा.प. निवडणूकीचा सुधारीत कार्यक्रम

उस्मानाबाद - राज्य निवडणूक आयोगाने उस्मानाबाद जिल्ह्यातील 422 गावच्या ग्रामपंचायतीच्या जुलै  मध्ये प्रस्तावित असलेल्या माहे ऑगस्ट/सप्टेंबर ते ऑक्टोबर-2015 या कालावधीत मुदत संपणा-या  तसेच विभाजनामुळे व नव्याने अस्तित्‍वात आलेल्या स्वतंत्र ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदार यादीत अंशत: सुधारीत कार्यक्रम  जाहीर केला आहे.   
मतदार यादी ग्राह्य धरण्याचा . सोमवार दि.15 मे, रोजी, राज्य निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या तारखेस ‍अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार यादीवरुन ग्रामपंचायतीच्या निवडणूकीकरीता प्रभाग निहाय मतदार यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक सोमवार, दि. 1 जुन, हरकती व सूचना दाखल करण्याचा अंतिम शनिवार, दिनांक 6 जून, आणि मुंबई ग्रामपंचायत निवडणूक नियम 1959 मधील नियम (3) चे पोटनियम (5) नुसार मतदार यादीची जाहीर नोटीस प्रसिध्द करणे व अंतीम यादी प्रसिध्द करणे शनिवार   दि. 13 जुन,2015 आहे.      
         यानुसार उस्मानाबाद तालुक्यातील 63 ग्रामपंचायतीचा समावेश असून तुळजापूर तालुक्यातील-53, लोहारा तालुक्यातील-26, कळंब तालुक्यातील-57, भूम तालुक्यातील-69, वाशी तालुक्यातील-35, पंरडा तालुक्यातील-70 उमरगा तालुक्यातील-49 गावातील ग्रामपंचायतीच्या मुदत संपणार  असल्याची  माहिती  जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे ‍दिली आहे.
यानुसार तालुका निहाय ग्रामपंचायती अशा आहेत. उस्मानाबाद तालुक्यातील आरणी, चिलवडी, काजळा, खामसवाडी, रामवाडी, थुगाव, अनसुर्डा, बेंबळी, भानसगाव, धुत्ता, गावसुद, कुमाळवाडी, पींपरी, विठलवाडी, वडगाव सिध्देश्वर, बेडगा, डकवाडी, गौडगाव, घाटंग्री, कौडगाव बावी, मुळेवाडी, पळसप, सांजा, आळणी, ब्रम्हगाव बु, भंडारी, चिखली, दारफळ, दौतपूर, जागजी, जहागीरदारवाडी, म्होतरवाडी, रुईढोकी, सकनेवाडी, टाकळी ढोकी, वरवंटी, वानेवाडी, भंडारवाडी, बोरखेडा, गडदेवधरी, हिंगळजवाडी, खामगाव, खेड,मेडसींगा,  नितळी, पाटोदा, पोहनेर, सुंभा, ताकवीकी, तावरजखेडा, अंबेवाडी, बावी का, बोरगाव राजे, कोलेवाडी, नांदुर्गा, सांगवी, सोनेगाव, भीकारसारोळा, बु., बुकनवाडी, घुगी, लासोना, राजुरी, गोवर्धनवाडी, या गावांचा समावेश आहे.
          तुळजापूर तालुक्यातील-अणदूर,आरळी बु, बारुळ, बिजनवाडी, दहीवडी, इटकळ, जवळगा-मे.कातरी,खडकी-शिवाजीनगर,सलगरा-डी,शहापूर,शिंदगाव, सुरतगाव,येवती,आरळी खु,भातंब्री, देवकुरोळी, दिंडगाव-टेलरनगर, गंधोरा, गोंधळवाडी, हंगरगा-नळ, जळकोट, खानापूर, कुंभारी, नांदुरी, सारती, सिंदफळ, तीर्थ खु, वानेगाव, वडगाव काटी, बाभळगाव, अमृतवाडी,बसवंतवाडी, बोरगांव, फुलवडी, चिंचोली,जळकोटवाडी-नळ, कदमवाडी, काळेगाव-सि,कसई, किलज, मंगरुळ, पींपळा बु, पिंपळा  बु,पींपळा खु, रायखेल, शिराढोण, तामलवाडी, वडगाव-देव, धनेगाव, धनगरवाडी, हगलूर, हिप्परगा-ताड, सरडेवाडी या गावाचा समावेश आहे.
लोहारा तालुक्यातील-एकोंडी-लो, कोंडजीगड, बेलवाडी, हराळी, लोहारा खु, भोसगा, कामेगाव,कास्ती बु, मोघा बु, अष्टा का, धानुरी, कमालपूर, मुर्शदपूर, फानेपूर, राजेगाव, तावशीगड, आरणी, भातांगळी, चिंचोली का, दस्तापूर, हीप्परगा(स,) होळी, करजगाव, करवंजी, मार्डी, उदतपूर  या गावाचा समावेश आहे.
कळंब तालुक्यातील आढाळा, अडसुळवाडी, बरातेवाडी, भाटसांगवी, भाटशिरपुरा, देवधानोरा, घारगाव, रायगव्हाण, वडगाव-सीं, वाणेवाडी, बोरगांव खु, बोरवंटी, चोराखळी, ढोराळा, इटकुर, रांजणी, सातेफळ, सातारा, शिंगोली, ताडगाव, उमरा (परतपुर), वाकडी (इस्तळ), वाकडी (केज), येरमाळा, भोगजी, भोसा, देवळाली, दुधाळवाडी, एकुरका, हळदगाव, हावरगाव, लासरा, मलकापूर, संजीतपुर, पानगाव, पाथर्डी, पींपळगाव (ढो), जायफळ, सपनाई, अथरडी, बांगरवाडी, भावला, दहीफळ, गंभीरवाडी, कन्हेरवाडी, माळकरंजा, मंगरुळ, पाडोळी, शेलगाव (डी), उपळाई, ब्रम्हाचीवाडी, पिंपरी(शी.), बोरगाव (धा), नायगांव, कोंडला, सौंदणा (ढो), वडगाव (जा), शेलगाव (जा), या गावाचा समावेशआहे.
भूम तालुक्यातील चांदवड, गणेगाव, ईट, जांब, जयवंतनगर, मालेवाडी, पाथरुड, रामेश्वर, वाकवड, वंजारवाडी, वरुड, बागलवाडी, अंजनसोंडा, बरणपुर, बेदरवाडी, बेलगाव, भोगलगाव, चिंचोली, चुंबळी, दुधोडी, दिंडोरी, डोकेवाडी, घाट नांदुर, हाडोंग्री, हिवर्डा, इराचीवाडी, लांजेश्वर, निप्पाणी, सावगाव (डी), सोनगीरी, सुक्टा, उळुप, उमाचीवाडी, वडाची वाडी, वालवड, अंदरुड, आरसोळी, बावी, चिंचपूर (ध), गोरमळा, हिवरा, मेहत्रेवाडी, नागेवाडी, नानजवाडी, पाथरुड, राळेसांगवी, वाल्हा, जोतीबाचीवाडी, रामकुंड, नाली वडगाव, साडेसांगवी, आष्टा, देवळाली, जेजला, मानकेश्वर, गोळेगाव, इडा, कानडी, सावरगाव (पा), तींथरज, अंभी, आनंदवाडी, अंतरगाव, अंतरवली, देवंग्रा, वांगी (बु), दांडेगाव, शेकापूर, तांबेवाडी, या गावाचा समावेश आहे.
    वाशी तालुक्यातील खानापूर, पारगाव, शेंडी, वाशी, दसमेगाव, इंदापूर, खामकरवाडी, लखनगाव, घाटपींपरी, हातोला, जवळका, नंदगाव, तांदुळवाडी, ढवपीपळ, कनेरी, पांगरी, सारोळा (एम), सारोळा (डब्यु), सटवाईवाडी,‍झीन्नर, इजोरा, गोळेगाव,पार्डी , पींपळगाव (क), रुई, सरमकुंडी, कडकनाथवाडी, मांडवा, पिंपळगाव (को), पींपळगाव (एल), बावी, घोडकी, सालू, सोनारवाडी  आणि तेरखेडा या गावाचा समावेश आहे.
परंडा तालुक्यातील भोतरा, चिंचपूर, बु-लंगोटवाडी, चिंचपूर (को), डोंजा/ बंगारवाडी, हिंगणगाव (बु) ,जवळा(नी), कुंबेजा, पारेवाडी, पिंपरवाडी (ब्रमगाव), राजूरी, रोहकल, रोसा, शिराळा, तांदुळवाडी (पाचवड), वाटेफळ, आरणगाव-(बुके), आवार पिंपरी, भानेगाव, दैठण (बोडका), डोमगाव, गोसावीवाडी डोंजा, हिंगणगाव (खु), इनगोंडा, कपीलपूरी, खानापूर (जामगाव), खासापूरी, कुंभेफळ, लोणी (वानेवाडी), मलकापूर (हांगेवाडी), पांढरेवाडी, रत्नापूर, शेळगाव (काळेवाडी),  उंडेगाव ( ताकमोकवाडी), भोंजा, घारगाव, वाकडी, ढगपिंपरी, नालगाव, आलेश्वर, अनाळा, अंधोरा (अंधोरी), आसू, बावची, जकटेवाडी, खांडळगाव, कंधारी, काटेवाडी (जगदाळवाडी), कौडगाव, कुकडगाव, मुगाव,‍पिंपरखेड, सिरसव, टाकळी, वडनेर (सरणवाडी), वाघेगव्हाण, कोकरवाडी, देवुळगाव, दिवेगाव(बु), देवगाव (खु.)पीठापुरी,  धोत्री, जकेपिंपरी (लाख), कारला, कातराबाद, लोहारा (कारंजा), सकत (बु), पिस्टमवाडी, साकत (खु), सोनारी, खांडेश्वरवाडी, रुई (धुदी) आणि पाचपिंपळा. या गावाचा समावेश आहे.18 
उमरगा तालुक्यातील बलसूर, बेडगा, डाळींब, जकेकुर, कदेर, कदमापूर-दुधनाळ, कोळसूर खु, मुळज, पेठसांगवी, सांगवी भीकार, सावळसुर, तलमोड, तुरोरी, कराळी, व्हंताळ, बाभळसूर, दापका, दगडधानोरा, एकोंडी जा, गणेशनगर, जगदाळवाडी, जकेकुरवाडी, कौठा, कोळसूर ग, कुन्हाळी, नाईचाकुर, रामपूर, समुद्राळ, वागदरी, बोरी, गोगलगाव, गुंजोटी, गुरुवाडी, हिप्परगा राव, काळनिंबाळा, नाईकनगर, पळसगाव, सुपतगाव, आष्टा, भगतवाडी, चिंचकोटा, डीग्गी, हंडराळ, जवळगाबेट, कधोरा, मातोळा, मुरळी, नागनाळ ज, आणि थोरलेवाडी या गावाचा समावेश आहे.   

Labels:

तुळजापूर येथे दुग्ध व्यवसाय, शेळीपालन व कुक्कुट पालन प्रशिक्षण

उस्मानाबाद -  महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, उस्मानाबादतर्फे तुळजापूर येथे  सुशिक्षीत बेरोजगार युवक-युवतीसांठी दुग्धव्यवसाय, शेळीपालन व कुक्कुट पालन  प्रशिक्षण कार्यक्रम 28 मे  ते 8 जुन, या दहा दिवसीय कालावधीचे  प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. 
या प्रशिक्षण कार्यक्‌रमात संपूर्ण दुग्ध व्यवसायाचे महत्व, गायीच्या जाती, चाऱ्यांचे नियोजन, लसीकरण, दुधाचे पॅकिंग, दुध विक्री तसेच शेळी पालन, उस्मानाबाद शेळीचे महत्व, करड्याची निगा,  शेळीचे लसीकरण, आहार व आजाराविषयी माहिती देण्यात येणार आहे. तसेच अर्ध  बंदिस्त व बंदिस्त शेडची माहिती, शेळीच्या वेगवेगळया जाती, कुक्टपालनामध्ये गावरान व बॉयलर याची माहिती, खादयांची  व शेडसची माहिती, विमा, आजाराविषयी दररोज तज्ञ डॉ. व्यक्तीचे मार्गदर्शन व यशस्वी उदयोजकांचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
तसेच उदयोजकीय संभाषण, कौशल्य, उदयोजकीय व्यक्तीमत्व विकास, प्रकल्प अहवाल, बँक अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, शासकीय कर्ज प्रस्ताव, अहिल्याबाई होळकर महामंडळाची  तसेच नाबार्ड आदि विषयाची माहिती दिली जाणार आहे. इच्छुक युवक-युवतींनी अधिक  माहिती व अर्जासाठी कार्यक्रम आयोजक, सौ. माधुरी शिंदे, (मो. नं. 9665754433) यांच्याशी तुळजापूर पंचायत समिती येथे संपर्क साधावा, असे आवाहन कनिष्ठ प्रकल्प अधिकारी  उस्मानाबाद यांनी केले आहे. 

Labels:

आजारी पडू नये हि आयुर्वेदाची मूळ भूमिका - वैद्य गोगटे

पिंपरी - आयुर्वेदाने दिनचर्या व ऋतू चर्या या अनुसार आपण जर आपली जीवन शैली ठेवली तर योग्य संतुलीत आहार घेतला तर आपणास व्याधी होणार नाही हि आयुर्वेदाची मूळ संकल्पना असून आपण निरोगी राहण्यासंदर्भात आयुर्वेद उपदेश करत असतो तसेच  आजारी पडल्यानंतर काय करावं यापेक्षा आजारी पडू नये हि आयुर्वेदाची मूळ भूमिका आहे असे मत जेष्ठ वैद्य रा.ब. गोगटे यांनी व्यक्त केले.
   आयुर्वेदीय औषध विक्रेता संघाच्या आरोग्यप्रभा परिवारातर्फे  “लोककल्याणकारी आयुर्वेद” या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी  चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना गोगटे बोलत होते. कार्यक्रमाचे उदघाटन .गोगटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आलं.
वैद्य प्रशांत सुरू,वैद्य अशोक वाली, वैद्य समीर जोंधळे,वैद्य वंदना मुळे,वैद्य सुप्रशांत सरदेशमुख,आयुर्वेदिय औषध विक्रेता संघाचे अध्यक्ष सोपान कामठे , गिरीश गांधी, उपाध्यक्ष किरण सूर्यवंशी, सचिव प्रशांत गोलांडे, खजिनदार विद्या दंडवते, अरुण डोंगरे, गणेश थरकुडे, योगेंद्र खळदकर, डॉ. लक्ष्मीकांत गोळे, स्वप्निल गांधी, समीर जोंधळे, विशाल थरकुडे आदी यावेळी उपस्थित होते. 
यावेळी मान्यवरांच्या हस्ते आहार व आजारविषयक दोन पुस्तकांचे प्रकाशनही करण्यात आले.याठिकाणी नैसर्गिक मधाची माहिती व उपयोग, नैसर्गिक केशर, देशी गायीचे तूप, पंचगव्य निर्मित औषधी, गोमूत्र इत्यादीचे उपयोग, औषधी वनस्पती, आरोग्य, प्राणिक हिलिंग याबाबत माहितीपूर्ण प्रदर्शन, आयुर्वेदिक औषधी उत्पादनांचे व आयुर्वेद, आरोग्यविषयक पुस्तके यांचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत.
       तसेच रविवारी (दि. २४) सकाळी आठ ते नऊ या वेळेत चिंचवड येथील मोरया गोसावी समाधी ते प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहापर्यंत योग व आयुर्वेद दिंडी काढण्यात येणार आहे. सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत वैद्य रामदास आव्हाड यांचे आरोग्यपूर्ण दिर्घायुषी जीवनासाठी आयुर्वेदिय पंचकर्माची उपयुक्तता व माहिती या विषयावर व्याख्यान होईल. दुपारी दोन ते साडेचार या वेळेत वैद्य योगेश जोशी, वैद्य संगीता रानडे व वैद्य सुप्रिया गुगळे हे गर्भसंस्कार मनापासून मनापर्यंत, बीजसंस्कार ते गर्भिणी, बालक परिचर्या व बालकांचे आजार तसेच आरोग्य याबाबत आयुर्वेदीय दृष्टीकोनातून शास्त्रीय माहिती देणार आहेत. सायंकाळी पाच ते रात्री आठ या वेळेत वैद्य समीर जोंधळे, शैलेश वैद्य आणि विद्याधर कुंभार हे वैय्यक्तिक जीवनशैली व व्यावसायिक कार्यशैलीमुळे तसेच प्रदूषित वातावरणामुळे निर्माण होणाऱ्या आजारांबाबत संवादाद्वारे माहिती देणार आहेत.

Labels:

Friday, 22 May 2015

कामात ‍दिरंगाई करणा-या कर्मचा-याविरुध्द कार्यवाहीचे आदेश

   उस्मानाबाद -  शेतकरी गट व जलयुक्त शिवार योजनेच्या कामात ‍दिरंगाई, कामकूचार,निष्काळीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्याविरुध्द निलंबनाची कार्यवाही करावी व  त्यांच्या गोपनीय अहवालात नोंद घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी संबंधित यंत्रणेला दिले.  येथील जिल्हा परीषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात शेतकरी वैयक्तिक माहिती व विकास आराखडा प्रपत्र प्रगती आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे बोलत होते.
           यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार, आत्माचे श्री. लोखंडे, कृषि विज्ञान केंद्राचे  कृषी उपसंचालक श्री. चोले, श्री. मिनीयार, श्री. हिरेमठ, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शितलकुमार मुकणे, कृषि विकास अधिकारी श्री. खोत, सर्व तालुका कृषि अधिकारी, डॉ. टाकणकर, उपविभागीय कृषी अधिकारी, मंडल अधिकारी आदि उपस्थित होते. 
          उस्मानाबाद जिल्ह्याने शेतकरी गट स्थापनेत व जलयुक्त शिवार योजनेत उल्लेखनीय कार्य करुन राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. या कामाचा राज्यात व देशात नाव लौकीकात भर पडली आहे. राज्यातील इतर जिल्हयाने या कामाची दखल घेतली. शिवाय आंध्र व तेलंगणा राज्याने या कार्याचे कौतूक केले. तसेच  महाराष्ट्राचे मुख्य सचिवानी देखील या  कामाची दखल घेवून त्यानी  प्रशंसा केल्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी यावेळी आवर्जुन उल्लेख केला.
        जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे पुढे बोलताना म्हणाले की, कृषि विभागाचे के
लेले कार्याची  माहिती नियमित संकेतस्थळावर अपलोड करावी, शेतकरी गटांना एकत्रित करुन त्यांचे सबलीकरण करावे, कृषि गटाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा विकास करावा, शेतकरी गट, शेतकरी मित्रास प्रशिक्षण दयावे, प्रत्येक गावस्तरावर खरीप हंगामाच्या बैठका घेवून शिबीरे घ्यावीत. पीक विम्याचे तक्रारीचे निवारण करावेत, येत्या 30 तारखेपर्यंत प्रपत्र भरण्याचे 100 टक्के कार्य पुर्ण करावेत. खरीप हंगामाचे कामे पुर्ण करुन शेतकऱ्यांच्या हितासाठी योजना राबवाव्यात, सोयाबीन पेरणीबाबत  शेतकरी गटाच्या बैठका घ्याव्यातअसे निर्देश त्यांनी  कृषि विभागाला दिले.        यावेळी जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांच्या हस्ते आत्मातर्फे संकलीत सोयाबीन      घडिपत्रिकेचे विमोचन  करण्यात आले. यावेळी आत्माचे प्रकल्प संचालक श्री.  लोखंडे,जिल्हा अधिक्षक कृषि  अधिकारी श्री.तोटावार आदिनी  मार्गदर्शन केले.    

Labels:

प्रशासनाच्‍या अश्‍वासनानंतर उपोषण मागे

कळंब -  कळंबच्या तहसिलदार वैशाली पाटील यांनी गैरमार्गाने मिळविलेल्या संपत्तीची चौकशी करण्यासाठी कळंबच्या उपविभागीय अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या चौकशीचा अहवाल प्राप्त होताच जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळंबच्या तहसिलदाराविरुध्द योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हा प्रशासनाने दिल्यामुळे सर्वपक्षीय कार्यकर्त्‍यानी आपले
उपोषण मागे घेतले आहे.
      याबाबतची अधिक माहिती अशी की, कळंब तालुक्यातील शेतरस्ते गेल्या दोन वर्षापासून अर्धवट अवस्थेत आहेत. असे असतानाही नविन सिमेंट नाला बांधकामास परवानगी देण्यात येते. मुळात पुर्वीची मंजूर कामे अर्धवट अवस्थेत असताना पुन्हा नव्या कामांना का मंजूरी देण्यात येते, तसेच कळंबच्या तहसिलदार जनतेच्या सेवक म्हणून काम न करता हुकूमशहा प्रमाणे वागत असून त्या कार्यकत्र्यांना अपमाणीत करीत असतात, त्यामुळे गेल्या दोन वर्षातील कळंब तालुक्यातील महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतील कामाची चौकशी व्हावी तसेच तहसिलद वैशाली पाटील यांच्या गैरकारभाराची चौकशी करण्यात येवून त्यांच्या विरुध्द योग्य ती कार्यवाही करण्यात यावी यासाठी कळंब तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकत्र्यांनी काल दिनांक २१ मे पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरु केले होते.
दरम्यान उपोषणाच्या आज दुस-या दिवशी निवासी उपजिल्हाधिकारी तांबे यांनी नायब तहसिलदार एन. टी. भंडारे यांना सदर उपोषणार्थीची भेट घेण्यास सांगितले. यानंतर भंडारे यांनी उपोषण स्थळास भेट देवून कार्यकत्र्यांची भेट घेतली. आपण दिलेल्या निवेदनाची दखल घेण्यात आली असून कळंब तालुक्यातील महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामाची चौकशी करण्यासाठी कळंब येथील उपविभागीय अधिकाNयांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा अहवाल येताच या प्रकरणात योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. असे लेखी आश्वासन दिले.  हे लेखी आश्वासन दिल्यानंतर नायब तहसिलदार यांच्या हस्तेच त्यांना जूस देण्यात आला व हा ज्यूस पिवून उपोषणास बसणारे शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख भारत सागळे, विजय कवडे, युवराज पिंगळे, गजानन चोंदे, अरुण जाधवर, आश्रुबा बिक्कड, रत्नाकर उबाळे, जिव्हेव्हर कुचेकर, विकास वायसे, पांडूरंग डुकरे, भय्या निरफळ, बाळासाहेब जाधवर व प्रदीप यादव या सर्वपक्षीय कार्यकत्र्र्यांनी आपले उपोषण मागे घेतले

Labels:

शाळा सुधारणेबाबतचे कार्य काैतुकास्‍पद - पाटील

 उस्मानाबाद -  जिल्हा परिषदेचे अध्यक्ष धिरज पाटील, उपाध्यक्ष सुधाकर गुंड यांनी जिल्हा परिषद शाळेचा दर्जा सुधारण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत यांनी माझा तालुका माझा उपक्रम तसेच वाचन लेखन व गणित विकसन उपक्रमाच्या माध्यमातून शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी  मार्गदर्शन केले. सर्व ‍मुख्याध्यापक, शिक्षक व पर्यवेक्षक व अधिकाऱ्यानी शाळेचा दर्जा सुधारण्याबाबत केलेले कार्य कौतूकास्पद असल्याचे  जिल्हा रिषादेचे अध्यक्ष  धिरज पाटील यांनी नमूद केले.
          जि.प. प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी, उस्मानाबाद यांनी विविध उपक्रम राबवले पर्यवेक्षीय यंत्रणा उभी करुन शाळा भेटी व मार्गदर्शन केले. विदयार्थी व शाळेच्या सर्वांगीण विकासावर भर दिला. या उपक्रमांतर्गत सन 2014-15 वर्षात जिल्ह्यातील 37 शाळांनी अ श्रेणी प्राप्त केली व 434 शाळा ब श्रेणीत तर उर्वरीत 619 शाळा क श्रेणीत  आल्या आहेत. गतवर्षापेक्षा अ व ब श्रेणीतील शाळांच्या संख्या मोठी वाढ झाली आहे. 
          सन  2012-13 मध्य अ श्रेणीत 4 शाळा, अ श्रेणीत 64 शाळा ब श्रेणीत, क श्रेणीत 940, क श्रेणीत तर 85 शाळा ड श्रेणीत असे एकुण 1 हजार 93 शाळा होत्या. सन 2013-14 मध्ये अ श्रेणीत 7 शाळा, ब श्रेणीत 124 शाळा, क श्रेणीत 934 शाळा ड श्रेणीत 27 शाळांचा समावेश होता. 
           मुल्यांकनाच्या कार्यक्रमानुसार 1 जानेवारी ते 20 फेबुवारी,2015 या दरम्यान सर्व जिल्हा परिषद शाळांचे 200 गुणांचे मुल्यांकन करण्यात येते. या मुल्यांकनानुसार तालुक्यातून पहिल्या तीन शाळांना अनुक्रमे रुपये 5 हजार, 3 हजार व रुपये 2 हजार एवढी रक्कम बक्षिस स्वरुपात देण्यात येते. तसेच जिल्ह्यातील पहिल्या तीन शाळंना अनुक्रमे रुपये 10 हजार , साडेसात हजार रुपये पाच हजार रोख रक्कम बक्षिस स्वरुपात देण्यात येणार असून हा  खर्च जिल्हा परीषदेच्या सेस योजनेतून करण्यात येत असल्याची  माहिती शिक्षणाधिकारी (प्रा). यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.   

Labels:

परीक्षेचे प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध

 उस्मानाबाद -  महराष्ट्र राज्य परीक्षा परीषद, पुणे-01 यांचेमार्फत दि. 3 ते 7 जुन,2015 या कालावधीत शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र टंकलेखन व लघुलेखन परीक्षा- 304 केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षेचे प्रवेशपत्रे परीषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर 21 मे रोजी प्रसिध्द करण्यात आली आहेत.
           संबंधित टंकलेखन व लघुलेखन संस्था चालकांनी त्यांच्या संस्थेतील सर्व परीक्षार्थ्यांचे प्रवेशपत्र संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन परीक्षार्थ्याना वितरीत करण्यात यावेत. या परीक्षेस बसलेल्या विदयार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेशपत्रे संस्थेतून परीक्षेपुर्वी  हस्तगत करावेत, असे आवाहन व्ही. बी. पायमल, आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीपक्षा परिषद, पुणे यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.                   

Labels:

भरतीपूर्व प्रशिक्षणाबाबत युवक-युवतींना सूचना

उस्मानाबाद  -  सैन्य व पोलीस दलात भरती होवू इच्छिणाऱ्या युवक व युवतींना सूचित करण्यात येते की, महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ (मेस्को) व्दारे मेस्को कॅरीअर अकॅडमी करंजे नाका, सातारा येथे 121 वे भरतीपूर्व  प्रशिक्षण दि. 1 जुन ते 30 जुलै, 2015 या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.  सैन्‍य व पोलीस दलात भरतीबाबत युवकांना मार्गदर्शन  करुन शिबीरासाठी  निवड करण्यासाठी मेस्को कॅरीअर अकॅडमीचे  प्रतिनिधी सैनिकी (मुलांचे) वसतीगृह खाजानगर, धराशीव मंदिरासमोर, उस्मानाबाद येथे 26 मे,2015 रोजी उपस्थित राहणार आहेत.
            इच्छुक युवक-युवतींनी दि 26 मे रोजी सकाळी 9 वाजता उस्मानाबाद येथे शैक्षणिक प्रमाणपत्र व गुणपत्रकासह उपस्थित राहून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उस्मानाबादचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर (नि) सुभाष सासने, , यांनी  केले आहे. 
          प्रशिक्षण व अधिक  माहितीसाठी सकाळी 9 ते सायंकाळी 5 यावेळेत मोबाईल क्रमांक 7588624043 किंवा -9420697807 वर संपर्क साधावे व महाराष्ट् माजी सैनिक महामंडळ मेस्कोच्या संकेतस्थळास भेट दयावी. www.mescoltd.co.in असेही कळविण्यात आले आहे                                          

Labels:

मारहाणीत शेतकरी जखमी

पांगरी  (गणेश गोडसे)  झाडे तोडल्याबाबत तहसीलदारांकडे तक्रार केल्याच्या कारणावरून चिडून दोघांनी मिळून एकास कोयता व लोखंडी गजाने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना खामगाव (ता.बार्शी) येथील शिवारात घडली.
     पांडुरंग शिवाजी नलगे असे कोयत्याने झालेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकर्‍याचे नांव असून सूरज तानाजी नलगे व तानाजी नामदेव नलगे अशी मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपीची नावे असून त्यांना अटक करण्यात आले आहे.
      जखमी पांडुरंग नलगे रा.खामगाव यांनी पांगरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की आरोपींनी मिळून तू सामाईक जागेवरील झाडे तोडल्याबाबत बार्शीच्या तहसीलदारांकडे अर्ज का केला या कारणावरून चिडून राग मनात धरून त्यांच्या सामाईक विहीरीवर गाठून त्यांच्या डोक्यात कोयते मारून व हातावर पायावर लोखंडी गजाने मारून जबर जखमी केले.पांगरी पोलिसात दिलेल्या फिर्‍यादिवरून दोघावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करून न्यायालयासमोर उभे केले असतं त्यांना दि.23 शनिवार पर्यन्त पोलिस कोठडी देण्यात आली आहे.अधिक तपास हवालदार रविंद्र भडूरे हे करत आहेत.

Labels:

Thursday, 21 May 2015

मानसिक समुपदेशनातून देणार शेतक-यांना आधार

उस्मानाबाद-  जिल्ह्यात होणारे शेतकरी आत्महत्येसारखे प्रकार रोखण्यासाठी आता राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने पुढाकार घेतला आहे. आरोग्य विभागाच्या आशा कार्यकर्ती आणि अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून  गावागावांत जाऊन शेतकऱ्यांचे मनोबल उंचावणार असून त्यांना आत्महत्येसारख्या प्रकाराकडे प्रवृत्त होऊ नये, यासाठी समुपदेशनही करणार आहेत. यासाठी या आशा कार्यकर्तींना वेगळे मानधन देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्या
ण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केली.
येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात शेतकरी मानसिक समुपदेशन कार्यक्रमाचा शुभारंभ पालकमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते.  जिल्हा परिषदेचे अध्यक्ष  कुलदीप (धीरज) पाटील, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत, आरोग्य सहसंचालक डॉ. सुनीता तायडे, उपसंचालक डॉ. पाटील, जि. प. उपाध्यक्ष सुधाकर गुंड गुरुजी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वसंत बाबरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांच्यासह गौरीष शानभाग, माजी आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, सुधीर पाटील यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. 
यावेळी पालकमंत्री डॉ. सावंत यांनी या कार्यक्रमासाठी आलेल्या आशा कार्यकर्तींशी संवाद साधला. शेतकरी आत्महत्या रोखण्यात आरोग्य विभाग महत्वाची भूमिका बजावू शकतो.  आशा कार्यकर्ती आणि अंगणवाडी सेविका यांचा गावांत चांगला संपर्क असतो. तसेच त्यांचा प्रत्येक कुटुंबाशी संवादही असतो. हा सुसंवाद अधिक वाढवून या आशा कार्यकर्त्या शेतकरी व त्यांच्या कुटुंबियांचे मनोबल वाढविणार आहेत. शेतकऱ्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घ्या, जेणेकरुन शेतकरी मन मोकळे करु शकेल. त्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण या आशा कार्यकर्तींना देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.  राज्यात उस्मानाबाद आणि यवतमाळ जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर प्रत्येकी पाच तालुक्यात हा कार्यक्रम हाती घेतला जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र जिल्हा प्रशासन जिल्ह्यातील आठही तालुक्यात हा उपक्रम राबविणार आहे.
शेतकऱ्यांना आत्महत्येपासून रोखणे म्हणजे त्यांना नवसंजीवनी देणारे काम आहे.  आशा कार्यकर्ती हे काम करतील, याचा विश्वास असल्याचे पालकमंत्री डॉ. सावंत यांनी नमूद केले.  यासाठी मानसोपचार तज्ज्ञांकडून आशा कार्यकर्तींना आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात येईल. शेतकऱ्यांना नैराश्येच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठीचा हा महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे.  हे काम कठीण असले तरी संवेदनशील आहे. हे काम करणाऱ्या आशा कार्यकर्तींना वेगळा मोबदला दिला जाईल, असे ते म्हणाले.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी जनजागृती आणि जाणीवजागृतीचा हा अभिनव कार्यक्रम उपयुक्त ठरेल, असे जि.प. अध्यक्ष ॲड. पाटील यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जिल्हास्तरावर विविध माध्यमातून प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले तर मुख्य कार्यकारी अधिकारी रावत यांनी आत्महत्या रोखण्यासाठी आशा कार्यकर्ती प्रभावी भूमिका बजावतील, असे सांगितले. आभार डॉ. बाबरे यांनी मानले  
              
  

Labels:

Tuesday, 19 May 2015

शेतक-यांनी आधुनिक व यांत्रिक शेती करावी : रणदिवे

पांगरी (गणेश गोडसे) -: देशात मागे राहिलेला व दुर्लक्षित घटक म्हणून शेतक-याकडे पाहिले जात असले तरी शेतकर्‍यांनी आधुनिक व यांत्रिक शेती  करून उद्योग धंदयामध्ये उडी घ्यावी असे प्रतिपादन व्ही.आर.डी.शेती प्रोडूसर कंपनीचे (सारोळा)संचालक अमोल रणदिवे यांनी केले.ते कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व प्रायमुव्ह यांच्यावतीने मृदगंध अग्रो प्रोडूसर शेतकरी कंपनीच्या (पांगरी) संचालक व सदस्यांच्या अभ्यास दौर्‍यात मार्गदर्शन करताना बोलत होते.
  शेतकरीही सध्या आधुंनिकतेच्या दिशेने वाटचाल कर्त असून विकासाचे टप्पे पार केलेल्या शेतकर्‍यांची यशोगाथा इतर शेतकर्‍यांना समजावी यासाठी शासनाच्या कृषि खात्यातर्फे शेतकर्‍यासाठी अभ्यास दौर्‍याचे आयोजन करण्यात आले होते.शेतकर्‍यांनी संघटित होऊन शेतक्र्‍यासाठी तयार केलेल्या सारोळा व मेंढा (ता,जि.उस्मानाबाद) येथील शेतकरी कंपन्यांना यावेळी भेटी देऊन माहिती घेण्यात आली.कोणतेही काम करताना समोर ध्येय व विश्वास असणे गरजेचे आहे.मजूर टंचाई लक्षात घेऊन यांत्रिक शेती करावी,पूर्व मशागत ते काढणी येथपर्यंतची सर्व कामे मजराशिवाय काशी करता येतील यावर भर द्यावा आदि बाबी या अभ्यास दौर्‍यात समोर आल्या.
 यावेळी आत्माचे बार्शी तालुका समन्वयक श्री.के.आर.चाटी,सहाय्यक व्यवस्थापक शेलेश घोडके,प्रायमुव्हचे दिपक आग्रे, पांगरीचे उपसरपंच सतीश जाधव,रामलिंग सुरवसे,माजी सभापति विजय गरड,बालाजी पवार,सुधाकर बाभळे,साहेबराव पवार,किरण पवार,बालाजी सातनाक,लक्ष्मण बनसोडे यांच्यासह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
  

Labels:

Monday, 18 May 2015

विखेपाटील यांनी घेतली आत्‍महत्‍याग्रस्‍त कुटुंबियाची भेट

उस्‍मानाबाद - उस्‍मानाबाद जिल्‍हयातील गेल्‍या तीन वर्षापासून निसर्गाची अवकृपा असल्‍यामुळे पावसाचे अत्‍यल्‍प प्रमाण असल्‍यामुळे 1972 पेक्षा भि‍षन दुष्‍काळी परीस्‍ि‍थती निर्माण झालेली आहे. 
दि. 18/5/2015 रोजी मा.ना. राधाकृष्‍ण विख - पाटील, विधानसभा विरोधी पक्षनेता यांनी टाकळी (बें,) येथील आत्‍महत्‍या ग्रस्‍त शेतकरी कै. बालाजी विदुरथ शिंदे वयः46 वर्षे यांच्‍या कुटूंबीयांची भेट घेवून चर्चा  केल्‍यानंतर सततच्‍या नापीकीमुळे व कर्जबाजारीपणामुळे जिवन जगणे कठिण झाल्‍यामुळे आत्‍महत्‍या करुन आपली जीवनयात्रा संपविली. पाडोळी (आ) येथील पाडोळी (आ) - बोरगाव या महाराष्‍ट्र ग्रामीण रोजगार हमीयोजनेंतर्गत चालू असलेल्‍या रस्‍त्‍याच्‍या कामावरील मजुराशी संवाद साधला. तर बोरखेडा येथील  भीषण पाणी टंचाईग्रस्‍त ग्रामस्‍थांशी संवाद साधून दुष्‍काळाची तीव्रता समजून घेतली. कार्यकर्त्‍यांशी संवाद साधले.       

Labels:

आळणीत पाण्याचा ठणठणाट

आळणी : उस्मानाबाद तालुक्यातील आळणी येथे मागील दोन ते तिन महिन्यापासून तिव्र पाणी टंचाई निर्माण झाली असुनंना घागरभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असताना ग्रामपंचायतने केवळ पैसे लाटण्यासाठी बंद पडलेली विंधन विहिर अधिग्रहन करून पैसे लाटण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे आळणीवासीयांची पाण्यासाठी भटकंती होत असुन्रामपंचायतच्या पदाधिकार्‍यांवर तिव्र संताप व्यक्त केला जात आहे.
आळणी हे ७ ते ८ हजार लोकसंख्येचे गाव आहे. गावात तिव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. घागरभर पाण्यासाठी नागरिकांनावणवण भटकंती करावी लागत आहे. त्यातच पाण्यासाठी कांही शेतकर्‍यांकडे नागरिक जातात. मात्र शेतकर्‍यांकडून त्यांनाुसकावून लावले जाते. अनेक शेतकरी आम्हालाच पाणी पुरत नाही मग तुम्हाला कुठले द्यायचे असे वादही घालत आहेत.विजेचा लपंडाव सुरू असल्याने विज असताना रात्री बेरात्री पाण्यासाठी नागरिकांना रात्र जागून काढावी लागत आहे.लहान मुलासह वयोवृद्धांचाही समावेश आहे. पाण्यासाठी गावात एवढे विदारक चित्र असतानाही ग्रामपंचायतकडून उपायकरण्यात आली नाही. केवळ पैसे लाटण्याच्या उद्देशाने पाणी पुरवठ्यासाठी बंद पडलेली विंधन विहिर अधिग्रहन केली आहे.येथील नागरिकांनी वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष घालून बंद पडलेल्या अधिग्रहन करणार्‍या संबंधित अधिकार्‍यावर कारवाईफरिीकरून गावाला पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी केली आहे. मात्र ही कामे करणार्‍यांना वरिष्ठ अधिकार्‍यांचाच वरदहस्तल्याने बोगस कामाचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
कायम स्वरूपी पाणी पुरवठा करण्यासाठी एकही योजना ग्रामपंचायत मार्फत राबविण्यात आली नाही. तसेच उपलब्धस्त्रोतातुनही गावकर्‍यांना मुबलक पाणी मिळत नाही. त्यामुळे नागरिकांना रानोाळ भटकंती करून घागरभर पाणी मिळविण्याचीआली आहे.महादेव मंदिराजवळ एक बोअर असुन अर्ध्या गावाला या बोअरचा पाण्यासाठी आधार आहे. गावातील अनेकंत बंद पडले आहेत. ते दुरूस्त करण्यात आलेले नाहीत. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राजवळील वस्तीवरील नागरिकांना पाणीकरण्यासाठी एकही विहिर, बोअर नसल्याने येथील नागरिकांना पाण्यासाठी गावातील महादेव मंदिराजवळील बोअरवर किंवास्तीवर असलेल्या एका हातपंपावर दिवसरात्र रांगा लावून पाणी मिळवावे लागत आहे.पुरवठा करण्यासाठी टाकण्यात आलेल्या पाईपलाईनला नागरिकांनी जागोजागी छिद्रे पाडून पाईप लाईनची चाळणी केलीफरिीआहे. त्यामुळे त्या पाईप लाईनमधुन पुढे होणारा पाणी पुरवठा कमी दाबाने होत आहे. त्यामुळे नागरिकांतुन तिव्र संताप व्यक्त केलाआहे.एकही योजना राबविण्यात येत नाही त्यामुळे एखाद्या योजनेसाठी आलेला निधी ग्रामपंचायतच्या सदस्य व सरपंचाच्याचजातो की काय अशी अवस्था गावातील एकंदर परिस्थितीवरून दिसुन येते. 

Labels:

कमलताई नलावडे लिखीत कथासंग्रहाचे प्रकाशन

उस्मानाबाद -  व्यवस्थेचा जाचक पगडा मिरविणारा समाज संस्कृतीच्या नावाखाली खोट्या प्रतिष्ठा जपत असतो. त्यातून माणसांचे अवमुल्यन होते, अशा व्यक्ती तटस्थपणे टिपून वाचकांच्या मनात त्याविषयी विचार करण्याची संवेदना जागे करणारे साहित्य चिरकाल टिकते. कथा-व्यथा या कथासंग्रहात ती संवेदना आणि सहवेदना निश्‍चितच आहे. त्यामुळे सामान्य माणसांच्या सामान्य संघर्षाला अक्षरांच्या माध्यमातून एक जिवंतपणा आला असल्याचे प्रतिपादन प्रख्यात साहित्यीक देवीदास फुलारी यांनी केले. 
         
मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने येथील ज्येष्ठ लेखिका श्रीमती कमलताई नलावडे यांच्या कथा-व्यथा या कथासंग्रहाचे प्रकाशन फुलारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास पत्रकार दयानंद माने, प्राचार्या डॉ. अनार साळुंके, मसापचे अध्यक्ष नितीन तावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
नम्रता ही माणसाला नेहमी पुढे घेऊन जाणारी प्रक्रिया आहे. याचा प्रत्यय नलावडे यांचा कथासंग्रह वाचताना पावलोपावली येतो. यातील काही कथा या कथेच्या प्रारूप संकल्पनेत बसतील आणि काही बसणार नाहीत. मात्र तो एक सृजनात्मक अनुभव आहे. समीक्षक त्याला काहीही म्हणो; परंतु तो अस्सल अनुभव नलावडे यांनी प्रामाणिकपणे मांडला असल्याचेही फुलारी यांनी सांगितले. स्त्रीयांचे चित्रण त्यांच्या कथांमधून अधिक ठळकपणे समोर येते. कित्येक कथांमध्ये दीर्घकथा नव्हे, तर कादंबरीची बीजे आहेत. भविष्यात त्यांच्या हातून नक्की अशा साहित्यकृतीही आपणां सर्वांना अनुभवण्यास मिळतील, असा विश्‍वासही फुलारी यांनी व्यक्त केला. मागील दोन वर्षांत उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या साहित्य चळवळीची गती निश्‍चितच मराठवाड्याचे लक्ष वेधून घेत असल्याचे त्यांनी नमूद केले. त्याचा प्रत्यय घुमान येथे अखिल भारतीय मराठी साहित्य सारस्वतांनीही घेतला. उस्मानाबादकरांनी घुमानमध्ये आपल्या उपस्थितीच्या माध्यमातून सर्वांना दखल घेण्यास भाग पाडले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 
अवतीभोवती असलेली सर्वसामान्य माणसे, त्यांचा सभोवताल, दैनंदिन जीवनात दिसणारा आपला परिसर शब्दांच्या माध्यमातून मांडला आहे. अनेक दिवसांपासून हा अक्षर अनुभवांचा साठा पुस्तक रूपाने सर्वांसमोर ठेवण्याची इच्छा होती. आज ती पूर्ण होत आहे. वाट्याला आलेले अनुभव अगदी तळमळीने, प्रामाणिकपणे या कथांच्या माध्यमातून शब्दबध्द केले आहेत. या कथा निश्‍चितच आपणा सर्वांशी संवाद साधतील. आपणही मोकळेपणाने पुस्तकाशी बोला, असे आवाहन लेखिका कमलताई नलावडे यांनी केले. 
प्राचार्य डॉ. अनार साळुंके यांनी या कथासंग्रहामधील बलस्थाने श्रोत्यांसमोर मांडली. एकूण कथात्मक अनुभव व्यक्त करताना लेखिकेच्या व्यक्तीगत जीवनातील अनुभवांची त्यात झालेली बेमालूम सरमिसळ त्यांनी सर्वांसमोर उलगडवून दाखविली. पत्रकार दयानंद माने यांनी विद्यार्थी दशेपासून कमलताई नलावडे यांच्याकडून ऐकलेल्या कथांचे संदर्भ देत हा कथासंग्रह त्याचे मुर्त रूप असल्याचे सांगितले. अनेक पीढ्यांना शिक्षिका म्हणून घडविण्याचे त्यांनी काम केले. या कथासंग्रहाच्या माध्यमातून समाजशिक्षक असलेल्या नलावडे यांच्या दृष्टितून माणसांना स्पष्टपणे वाचण्याची प्रेरणा सर्वांना मिळेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. मसापचे अध्यक्ष नितीन तावडे यांनी मागील चार दशकांपासून कमलताई नलावडे यांनी सामाजिक, साहित्यीक आणि शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानाची माहिती सर्वांसमोर मांडली. आज जिवंत असलेली साहित्य चळवळ टिकावी, वाढावी यासाठी त्यांनी घेतलेल्या परिश्रमाची नोंदही तावडे यांनी यावेळी घेतली. भविष्यात मसापच्या वतीने अशा छोट्या-मोठ्या उपक्रमांच्या माध्यमातून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यासाठी लागणारे बळ निश्‍चितच मिळेल आणि उस्मानाबादकरांच्या मार्गदर्शनाने, सहकार्याने ते आपण यशस्वीरित्या पार पाडू, असेही त्यांनी सांगितले. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड. राज कुलकर्णी यांनी, सूत्रसंचालन रविंद्र केसकर तर आभार उमाकांत कुलकर्णी यांनी मानले. यावेळी शिक्षण, साहित्य, राजकारण, सहकार आदी क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


Labels:

पाणी मिश्रित पेट्रोलने वाहनात बिघाड

बार्शी - पेट्रोलपंप चालकाकडून अनेक प्रसंगी ग्राहकांची फसवणूक होत असते. या फसवणूकीची अनेक वेगवेगळे किस्से आणि अनुभव नागरिक सांगत असतात, बार्शीतील एका पंपावरुन चारचाकी वाहनात भरलेल्या पेट्रोलमध्ये चक्क ३० टक्केपर्यंत पाणीच आल्यामुळे ग्राहकाच्या वाहनात बिघाड होऊन वाहन बंद पडले.
रविवारी सकाळी भारत पेट्रोलियम कंपनीच्या मेसर्स ए आर कोठारी या पंपावर सदरचा प्रकार घडला. चारचाकी वाहन घेऊन आलेल्या दिनकर रुद्राके यांनी कोठारी यांच्या पंपावरुन सुमारे २२०० रुपयांचे पेट्रोल भरुन बाहेरगावी निघाले. गावाबाहेर पडताच त्यांचे वाहन अचानक बंद पडले. वाहनाची दुरुस्ती करणार्‍या गॅरेजचालकांना त्यांनी वाहन दाखविले. अथक परिश्रमानंतरही वाहन सुरु होत नसल्याने गॅरेजमधील कुशल कामगाराने पेट्रोलमध्ये पाहिले, यावेळी पेट्रोलमध्ये वेगळ्या प्रकारचे तरंग दिसून आल्याने त्याने त्याचा नमुना प्लास्टिकच्या रिकाम्या बाटलीत काढला. यावेळी सर्वजण बुचकळ्यात पडले कारण पेट्रोलमध्ये चक्क पाणीच मोठ्या प्रमाणात साठल्याचे दिसून आले. पाण्याचा वेगळा रंग असलेला थर खालच्या बाजूस तर पेट्रोलचा वेगळ्या रंगाचा थर वरच्या बाजूस वेगळा होतांना दिसू लागला. काही वेळात दोन्ही थरात सुमारे ३० टक्के पाण्याचा थर जमा झाला. फसगत झालेल्या रुद्राके यांनी सदरच्या पेट्रोलचा नमुना घेऊन पेट्रोलपंप गाठला. यावेळी होय नाही असे आढेवेढे घेत शेवटी पेट्रोल पंपावर भरलेल्या पेट्रोलमध्ये पाणी असल्याची कबुली पेट्रोल पंपावरील कर्मचार्‍याने दिली. कर्मचार्‍याने पंपाच्या मालकाशी रुद्राके यांचा फोनवरुन संपर्क करुन दिला. यावेळी पंपाचे मालक कोठारी यांनी रुद्राके यांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले.

Labels:

Saturday, 16 May 2015

निकृष्ट बांधकामाने महिलेचा बळी

बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) - महात्मा फुले भाजी मंडईतील स्वच्छतागृहाच्या आडोशाची भिंत कोसळल्याने शेतीमाल विक्रेत्या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. नगरपरिषदेच्या स्थापत्य व आरोग्य विभागाचा गलथन कारभार तसेच निकृष्ट दर्जाचे काम यामुळे सदरची दुर्घटना घडली आहे.
मंगल भानुदास कांबळे (वय ४५, रा.सोलापूर रोड, दगडी नाका, बार्शी) असे दुर्घटनेतील मयत महिलेचे नाव आहे. मंडईमध्ये मक्याचे कणीस भाजून विक्री करण्याचा या महिलेचा व्यवसाय असून भिंत आडोशाची भिंत कोसळून महिलेच्या डोक्यास, छातीस जबर मार लागला होता.
सदरच्या दुर्घटनेमुळे भाजी मंडईतील दुरावस्थेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. स्वच्छतागृह (मुतारी) च्या आडोशासाठी उभारण्यात आलेल्या ९ ईंची ७ फुट उंचीची भिंत बांधतांना माती व मुरुमावरील फरशीवरच बांधकाम करण्यात आले आहे. या ठिकाणी सतत पाणी मुरण्यामुळे जमीन खचून दुर्घटना घडली आहे. मंडईमध्ये भाजी विक्रेत्या महिलांना बसण्यासाठी पुरेशी सुविधा नसल्याने अनेक महिला व विक्रेते मिळेल त्या ठिकाणी आपली दुकाने थाटून व्यवसाय करीत आहेत. शनिवारचा दिवस हा बार्शीतील बाजारचा दिवस असल्याने ग्रामीण भागातील अनेक शेतकरी शेतीमालाची विक्री करण्यासाठी बार्शीतील मंडईत येऊन व्यवसाय करतात. त्यांना किमान सुविधा पुरविणे ही नगरपरिषदेची जबाबदारी असतांनाही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. सद्यस्थितीत असलेल्या जागेपेक्षा जास्त जागेची आवश्यकता तसेच व्यवसाय करण्यासाठी कठडे, निवारा शेड बांधणे, गरजेचे आहे.
मयत मंगलची बहिण बायडाबाई करपे हिने जेवणाचा डबा घेऊन आली, मंगलचे जेवण झाल्यानंतर तिची बहिणी घराकडे जेवणासाठी गेल्यानंतर काळी वेळात सदरची दुर्घटना घडली, दुर्घटनेनंतर जगदाळे मामा हॉस्पिटल येथे दाखल केल्यानंतर वैद्यंकिय अधिकारी यांनी मृत घोषित केले. ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन करुन अंत्यसंस्कार करण्यात आले. छाती व डोक्यास मार लागल्याने मृत्यू झाल्याचे वैद्यकिय अधिकारी डॉ.रविंद्र माळी यांनी सांगीतले.

Labels:

वामनदादा कडर्क यांच्‍या स्‍मृतिदि‍नामित्‍त विविध कार्यक्रम संपन्‍न

नळदुर्ग :- लोककवी, भिमशाहीर व महाराष्‍ट्र भूषण वामनदादा कर्डक यांच्‍या 11 व्‍या स्‍मृतिदिनानिमित्‍त अणदुर ता. तुळजापुर येथे लोकशाहीर वामनदादा कर्डक यांना विविध कार्यक्रमांनी भावपूर्ण आदरांजली वाहण्‍यात आली.
    आयुष्‍यभर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या समवेत राहून आंबेडकरी चळवळीला बळ देण्‍यासाठी गाव तेथे जलसा घेऊल लोकांचे संघटन, प्रबोधन व मनोरंजनातून लोक शिक्षण देणार, मोहोळ कार वामनदादा कर्डक यांच्‍या 11 व्‍या स्‍मृतिदिनानिमित्‍त मौजे अणदुर ता. तुळजापुर येथे जलसा वामनाचा हा आदरांजलीचा कार्यक्रम संपन्‍न झाला.
    या जलश्‍याचे उदघाटक म‍हाराष्‍ट्र राज्‍याचे माजी मंत्री व तुळजापुर तालुक्‍याचे आमदार मधुकरराव चव्‍हाण होते तर प्रमुख पाहुणे म्‍हणून पं. स.सदस्‍य साहेबराव घुगे, सेवानिवृत्‍त समाजकल्‍याण अधिकारी सॉलोमन कांबळे, हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्‍ये काशीनाथ शेटे, अजय अणदुरकर, राजकुमार स्‍वामी, आर. पी. आय चे तालुकाध्‍यक्ष एस. के. गायकवाड मलंग शेख, विजय मोकाशे, आदि मान्‍यवर उपस्थित होते.
     जलसा वामनाचा या कार्यक्रमामध्‍ये फक्‍त वामनदादा कर्डक यांनी लिहलेली गाणी, शाहीरी व पोवाडे गायली. यामध्‍ये नामवंत भिमशाहीर उपस्थित राहून आपली कला सादर केली. त्‍यामध्‍ये अंबादास वाघमारे, (नळदुर्ग) चंद्रकांत शिंदे (सिंदगाव), नागनाथ दुपारगुडे (सराठी) वालचंद कांबळे (नंदगाव), चंद्रकांत बनसोडे (मुळेगाव), यशवंत कांबळे (केशेगाव), सोपान गायकवाड (कणमस), विठ्ठल बनसोडे (मुळेगाव), काशिनाथ कांबळे (दर्गनहळळी), राम वाघमारे (चिवरी), मारुती येरवडे (दोड्डी), रमेश कांबळे (सोलापुर), बबन कांबळे (सोलापुर), नारायण चिमणे (चिवरी‍), पूजा कांबळे (लातुर), लक्ष्‍मण देडे (चिवरी) इत्‍यादी शाहीर उपस्थित होते.
    या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रबोध कांबळे यांनी केले तर प्रास्‍ताविक कार्यक्रमाचे निमंत्रक दयानंद काळुंके यांनी केले व आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजक आर.एस. गायकवाड यांनी मानले. यासाठी तालुक्‍यातून मोठ्या संख्‍येनी नागरीक उपस्थित होते.
    जलसा वामनाचा कार्यक्रमासाठी दादासाहेब जेटीथोर, लक्ष्‍मण दुपारगुडे, मारुती बागडे, मल्‍लीनाथ जाधव, लक्ष्‍मण सुरवसे, भुजंग पांडागळे, विजय सुर्यवंशी, सावन भंडारे, सोमनाथ साबळे, राम नागविले, काका चंदनशिवे, चंद्रहार ढवळे, मिलींद गायकवाड, महेश बागडे आदींनी परिश्रम घेतले.

Labels:

जीवन प्रमाण कार्ड तयार करण्यासाठी विशेष मोहिम

उस्मानाबाद-: जिल्ह्यातील निवृत्ती वेतन धारक माजी सैनिक/विधवा व अवलंबीतांना दर वर्षी माहे नोंव्हेंबरमध्ये हयात असल्याबाबत प्रमाणपत्र बँकांना सादर न केल्यास बँकाद्वारे पेन्शन बंद केली जाते. त्यामुळे निवृत्तीवेतन धारकांना बऱ्याच अडचणी येतात. त्या अनुषंगाने राज्य शासनाच्या आदेशानुसार, जीवन प्रमाण कार्ड तयार करण्यास माजी सैनिक/विधवांना सोयीचे व्हावे म्हणून जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, उस्मानाबाद यांच्याद्वारे खालील ठिकाणी व दिलेल्या तारखेस विशेष अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. 
         विशेष अभियानाचे केंद्र व ठिकाण पुढीलप्रमाणे 16 मे 2015 ते 25 मे,2015 कालावधीत सकाळी 10 ते 6 या वेळेत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,उस्मानाबाद. 
           16 मे 19 मे,2015 तुळजापूर, 20 ते 25 मे उमरगा, 24 ते 25 मे कळंबआणि 26 मे ते 27 मे,2015 नळदूर्ग.  वरील तालुक्यातील केंद्र माजी सैनिक संघटना कार्यालयात आहेत. त्यांच्या वेळा सकाळी 10 ते सायंकाळी 4 अशा राहतील.  
            तरी जिल्ह्यातील निवृत्ती वेतन धारक माजी सैनिक/विधवा/अवलंबीतानी त्यांचे आधार कार्ड, निवृत्ती वेतन बँक पासबूक, पी.पी.ओ व माजी सैनिक ओळखपत्राच्या छायांकित प्रतिसह जवळच्या विशेष अभियानाच्या ठिकाणी नमूद तारखेस हजर राहून जीवन प्रमाण कार्ड तयार करुन घ्यावे. अधिक माहितीसाठी अध्यक्ष, तालुका माजी सैनिक संघटना यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन मेजर (नि), सुभाष सासने, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, उस्मानाबाद यांनी केले आहे.                                 

Labels:

संगीत क्षेत्रातील कलावंताना पुरस्कारासाठी सुवर्णसंधी

उस्मानाबाद :-  संगीत क्षेत्रातील तरुण व गुणी कलाकारांना शोधून  त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आकाशवाणीच्या विविध  केंद्रावर आकाशवाणी तर्फे  संगीत स्पर्धा आयोजित केल्या  आहेत.  30 जून 2015 रोजी ज्यांचे वय 16 ते 24  दरम्यान असेल अशा कलाकारांसाठी ही स्पर्धा खुली आहे. 
           सहभागासाठी संगीतातील विविध प्रकारात हिंदुस्थानी  तसेच कर्नाटक संगीतातील शास्त्रीय गायन, सुगम, लोकसंगीत, संगीत नियोजक, वृंदगान हिंदुस्थानी तसेच उपशास्त्रीय गायन (आकाशवाणीच्या मान्यता प्राप्‍त कलाकारांना किंवा आकाशवाणीच्या कोणत्याही संगीत परीक्षेस बसलेल्या उमदेवारांना  या स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.) ही स्पर्धा दोन स्तरांवर घेण्यात येईल. 
            विहित नमुन्यातील अर्ज आकाशवाणी केंद्रात जमा करण्याची अंतिम तारीख 12 जून,2015 पर्यंत राहील. प्राथमिक स्तरावरील स्पर्धा 03 ऑगस्ट,2015 पासून घेण्यात येतील. प्राथमिक स्तरावरील स्पर्धेत ‍निवड झालेल्या उमेदवारांचं  ध्वनिमुद्रण  अंतिम फेरीसाठी पाठवलं जाईल. अंतिम फेरीतील विजेत्यांना  उचित  पुरस्काराने  सन्मानित करण्यात येईल.  या स्पर्धेसाठी भरावयाचा छापील अर्ज जवळच्या आकाशवाणी  केंद्रावर उपलब्ध असून प्रवेश शुल्क रुपये 300/-असे आहे. 
      ईच्छूक  स्पर्धकांनी मुंबईच्या आकाशवाणी  मुंबई केंद्राच्या संगीत विभागातून स्पर्धेचे छापील अर्ज कार्यालयीन वेळेत घेऊन जावेत.  अधिक माहितीसाठी पत्ता : आकाशवाणी  मुंबई केंद्र, चर्चगेट, मुंबई-400 020 दुरध्वनी क्रमांक - 22026242  विस्तार :249/252 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन हेंमत सपकाळे, कार्यक्रम अधिकारी,‍अतिरिक्त  महासंचालक,  आकाशवाणी  केंद्र,  मुंबई यांनी केले आहे.                     

Labels:

कौडगाव येथे 19 मे रोजी आरोग्य तपासणी ‍शिबीर

उस्मानाबाद :- जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद यांच्या वतीने दि. 19 मे,2015 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा  ‍परिषद  प्राथमिक शाळा,  कौडगाव ता. जि. उस्मानाबाद येथे राजीव गांधी  जीवनदायी  आरोग्य  योजनेतंर्गत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.  या शिबीरात बालरोग, शल्य चिकित्सा, अस्थीरोग तज्ञ, कान,नाक,घसा तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ सहभागी होऊन उपस्थितांची मोफत तपासणी करणार आहेत. तसेच या तपासणीतून  आवश्यकता भासल्यास  रुग्णांना  मोफत  शस्त्रक्रिया किंवा उपचारांसाठी  संदर्भित केले जाणार आहे. 
          तरी ‍परिसरातील पिवळे,  केशरी,  अंत्योदय व अन्नपूर्णा शिधापत्रिकाधारक रुग्णांनी  या शिबीराचा  लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक, उस्मानाबाद यांनी एका पत्रकान्वये केले आहे.                                  

Labels:

अंनिसच्या युवा शिबीरास मोठा प्रतिसाद

उस्मानाबाद -: विज्ञान निष्ठा, विवेकी समाज निर्माण करण्यासाठी संत महंतांचे योगदान मोठे आहे. त्या परिवर्तनाच्या लढाईत युवकांचा सहभाग वाढावा यासाठी अंनिसच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या युवा संवाद शिबीरास मोठा प्रतिसाद मिळाला. शहरातील यशश्री क्लासेसच्या सभागृहात शनिवारी दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलेल्या शिबीरास जिल्हाभरातील युवक उपस्थित होते.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्यावतीने राज्यभरात युवा संवाद शिबीराचे आयोजन केले जात आहे. पहिल्या टप्प्यात उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागात या शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. उस्मानाबाद शाखेच्यावतीने शनिवारी हे शिबीर घेण्यात आले. निकोप आणि सामाजिकदृष्ट्या पुरक चळवळीमध्ये युवा सहभाग वाढावा यासाठी व उपक्रम राबविला जात आहे. कोल्हापूर येथील अंनिसचे राज्य युवा सचिव कृष्णात कोरे, वाघेश साळुंके आणि जिल्हा कार्याध्यक्ष किरण सगर यांनी शिबीरात सहभागी युवकांना मार्गदर्शन केले.
तिन सत्रात दिवसभर चाललेल्या या शिबीरात प्रारंभी समाजातील विविध प्रश्‍नांचे युवकांना असलेले आकलन, प्रश्‍न समजुन घेण्याची तयारी, त्या प्रश्‍नांना भिडण्यासाठी आवश्यक असलेला अभ्यास या विषयावर चर्चा झाली. त्यानंतर युवकांच्या अंनिसकडून असलेल्या अपेक्षा, अंनिसच्या कामाची पद्धत, याबाबत प्रश्‍नोत्तराच्या स्वरूपात चर्चा झाली आणि शेवटी युवकांनी पुढील काळात निर्माण होणार्‍या सामाजिक समस्या सोडविण्यासाठी कोणत्या पद्धतीने सहभाग वाढवायला हवा, सोशल मिडीयाचा वापर परिवर्तनाच्या लढाईत अधिक चपखलपणे विधायकरित्या कसा करता येईल. महामानवांचे विचार समाजातील प्रत्येक स्तरात पोहंचविण्यासाठी कोणते कृती कार्यक्रम आखायचे यावर साधक बाधक चर्चा झाली.
यावेळी यशश्री क्लासेसचे संचालक रवि निंबाळकर, राष्ट्रसेवा दलाचे जिल्हाध्यक्ष देविदास वडगावकर, अब्दुल लतिङ्ग, गीता सानप, अंनिसच्या जिल्हाध्यक्ष शैलजा भस्मे, प्रा. अवंती सगर यांच्यासह जिल्ह्यातील अंनिसच्या विविध शाखांचे पदाधिकारी, तरूण तरूणी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन उस्मानाबाद शाखेच्या कार्याध्यक्ष भाग्यश्री केसकर यांनी तर शेवटी आभार प्रा. सुधिर कांबळे यांनी मानले.

Labels: