Monday, 29 May 2023

नळदुर्ग येथे स्वा.सावरकर जयंती उत्साहात साजरी

नळदुर्ग दि.२९

शहरातील सावरकर चौकात स्वा.वि.दा.सावरकर यांच्या १४० व्या जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन  पत्रकार विलास येडगे,माजी नगरसेवक बसवराज धरणे,संतोष पुदाले ज्ञानेश्वर घोडके,सुशांत भूमकर,पद्माकर घोडके यांच्या हस्ते करण्यात आले. करून

यावेळी नामफलकाचे पूजन संतोष पुदाले,उमेश जाधव,प्रमोद कुलकर्णी,उमेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले,या कार्यक्रम प्रसंगी माजी नगरसेवक विनायक अहंकारी,सावरकर युवा मंचचे अध्यक्ष प्रमोद कुलकर्णी,संतोष पुदाले, सुशांत भूमकर,सरदारसिंग ठाकूर यांनी  आपले मनोगत व्यक्त केले,यावेळी माजी नगरसेवक भास्करराव मोहरीर ,माजी नगरसेवक बसवराज धरणे,विनायक अहंकारी,सरदारसिंग ठाकूर ज्ञानेश्वर घोडके,प्रमोद कुलकर्णी,संतोष पुदाले ,उमेश जाधव ,उमेश नाईक,अमित शेंडगे, सुभाषराव भूमकर,शिवाजीराव नागणे,धोंडोपंत कमठाणकर,मुकुंद भूमकर,मनोज कुलकर्णी, संदीप वैद्य,मिलिंद भूमकर,विकास कुलकर्णी, अशोकराव भूमकर,अनिलराव कुलकर्णी,प्रमोद जोशी,उत्तम रामदासी,आकाश कुलकर्णी,सारंग जोशी,प्रशांत चव्हाण,आशुतोष नाईक,प्रशांत जोशी,अनिल गुरव,मोहन कुलकर्णी,संतोष गवळी, संजय चव्हाण,दिलीपराव डोंगरे,धनु कुलकर्णी, मयूर भूमकर,आदित्य कुलकर्णी,हणमंत कुलकर्णी,सोनू गवळी यांच्यासह सावरकर प्रेमी नागरिक  संख्येने उपस्थित होते,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक अहंकारी यांनी केले तर आभार प्रमोद कुलकर्णी यांनी मानले.

Labels:

Saturday, 13 May 2023

प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना बांधकामाचे अनुदान देण्याची मनसेची मागणी


नळदुर्ग , दि. १३
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने न.प.चे मुख्याधिकारी  लक्ष्मण कुंभार यांना प्रधानमंञी आवास योजनेचे लाभार्थीना  रखडलेले अनुदान  तातडीने संबधित विभागाच्या अधिकाऱ्याकडे  योग्य तो पाठपुरावा करून आवास योजनेतील लाभार्थ्यांना बांधकामाचे हप्ते लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी  याना देण्यात आले आहे.  


 शहरात सद्या मोठ्या प्रमाणात प्रधानमंत्री घरकुल आवास योजने अंतर्गत लाभार्थी आपले राहते घरे पाडून पक्के घरे बांधकाम करत आहेत. अनेकांच्या घरांचे बांधकाम पूर्ण झाले असून मोठ्या प्रमाणात इतर लाभार्थीची बांधकामे सुरू आहेत. परंतु गेली २ महिने झाले . या लाभार्थींना बांधकामाचे हप्तेच मिळाले नसल्याने बांधकाम अर्धवट ठेवण्याची वेळ येत आहे.कारण बांधकाम सुरू करण्यासाठी खासगी सावकाराकडून व्याजाने पैसे घेऊन बांधकामास सुरुवात केल्याचे सांगुन  बांधकामाचे हप्ते मिळत नसल्याने कामे अर्धवट ठेवण्याची वेळ आली,यामुळे त्या बांधकामावर काम करत असलेल्या कामगारांना ही त्यांचा मोबदला मिळत नाही,त्यामुळे ते ही आर्थिक संकटात सापडले आहेत.आपले नाव यादीतून कमी होईल व नगरपालिकेने ज्या प्रकारे संबधिताना नोटिसा बजावल्या त्या भीतीपोटी खासगी सावकाराकडून कर्ज घेऊन राहते घरे पाडून बांधकामास सुरूवात केली होती,पण आता या लाभार्थीना बांधकामाचे हप्ते मिळत नसल्याने बांधकाम अर्धवट ठेवण्याशिवाय व दुसऱ्याच्या घरात किरायाने राहून इतर आर्थिक भुर्दंड सहन केल्याशिवाय पर्याय उरत  नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

 

या निवेदनावर मनसेचे जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे,शहराध्यक्ष अलीम शेख,शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी,शहर संघटक रवि राठोड यांच्या स्वाक्ष-या आहेत.

Labels:

Saturday, 6 May 2023

राज्यातील 12 तालुक्याचे होणार आता प्रशासकीय विभाजन, नळदुर्गचाही समावेश

मुबंई , दि. ०६ : चंदन शिरवाळे

तालुक्यासाठी विद्यमान तहसीलदार असताना आता त्या ठिकाणी अप्पर तहसीलदार नियुक्त करून कामे आणि गावांचे वाटप केले जाणार आहे. अप्पर तहसीलदारांसाठी स्वतंत्र कार्यालय असेल. लातूर जिल्ह्यातील कासार शिरशी, रायगड जिल्ह्यातील पनवेल आणि पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर या अप्पर तहसील कार्यालयांना मंजुरी मिळाली आहे. या ठिकाणी पदनिर्मिती करण्यात येत आहे. सध्या तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांची पदे मंजूर करण्यात आली असून, इतर पदे जिल्हा अथवा तालुका महसूल कार्यालयातून वर्ग करण्यात येणार असल्याची माहितीही महसूल विभागातील एका अधिकाऱ्याने दिली. 


नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील लासलगाव आणि नाशिक जिल्ह्यातील नाशिक तालुका, धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग, औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील अजिंठा, अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर तालुका, जळगाव जिल्ह्यातील जळगाव व चाळीसगाव तालुक्यातील मेहरबारी, जामनेर तालुक्यातील पहुर येथे, तर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याबाबत प्रस्तावित आहे.

जिल्हानिर्मिती लाल फितीत

नवीन जिल्ह्याच्या मागणीसंदर्भात मात्र अद्याप कोणतीही चर्चा सुरू नाही. नवीन जनगणना होत नाही, तोपर्यंत नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीबाबत विचार केला जाणार नाही, असे महसूल अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

साभार: आॕनलाईन पुढारी 

Labels: ,