परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे या मागणीसाठी ब्राह्मण समाजाचे उपोषण
Labels: Naldurg
तुळजापूर लाईव्ह, महाराष्ट्राची बित्तम बातमी
Labels: Naldurg
पीक विमा अग्रीमाबाबत तालुका कृषि अधिकारी कार्यालयातील विमा प्रतिनिधीकडे चौकशी करा ---जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांचे शेतकऱ्यांना आवाहन
धाराशिव दि.३०
प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2023 मध्ये धाराशिव जिल्हयातील 757853 अर्जाद्वारे शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग नोंदविलेला होता जिल्ह्यातील सर्व सोयाबीन विमाधारक पात्र शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम विमा रक्कमेचे विमा कंपनीमार्फत वितरण चालू आहे. हे वितरण आधारलिंक बँक खात्यावर जमा करण्यात येत आहे. यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचा पिक विमा जमा न झाल्याबाबत तक्रारी प्राप्त होत आहेत, शेतकऱ्यांचा पिक विमा अद्याप जमा झालेला आहे किंवा नाही याचे मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या तालुक्यातील तालुका कृषि अधिकारी कार्यालयात पुढील 4 ते 5 दिवस विमा प्रतिनिधींना बसविण्यात येणार आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी आपल्या तालुक्यातील तालुका कृषि अधिकारी कार्यालयामध्ये जाऊन आपली पिक विम्याची रक्कम कोणत्या खात्यावर जमा झालेली आहे याची चौकशी करावी. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी केले आहे.
ज्या शेतकऱ्यांचा अर्ज दुरुस्तीसाठी रिव्हर्ट आलेला आहे अशा शेतकऱ्यांनी ज्या ऑनलाईन सेंटरवरुन विमा भरलेला आहे त्या ऑनलाईन सेंटरवर जावून दुरुस्तीसाठीची आवश्यक कागदपत्रे अपलोड करुन घ्यावीत, आपण कागदपत्रे अपलोड केल्यानंतरच विमा भरपाई रक्कम आपल्या खात्यावर जमा होईल, ज्या शेतकऱ्यांची विमा भरपाई रक्कम रु.1000/- पेक्षा कमी आहे अशा शेतकऱ्यांची उर्वरीत रक्कम शासनाकडून प्राप्त झाल्यानंतरच त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर बरोबर रक्कम रु.1000/- जमा करण्यात येईल,ज्या शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाचे विमा भरलेले क्षेत्र 7 हेक्टर पेक्षा जास्त आहे अशा शेतकऱ्यांच्या क्षेत्राची पडताळी करण्यात येणार असुन पडताळणीचे काम पुर्ण झाल्यानंतरच त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर विमा भरपाई रक्कम जमा होईल.
वरील कारणाव्यतिरिक्त इतर कारणामुळे पिक विमा रक्कम जमा झालेली नसेल तर त्या शेतकऱ्यांनी खालीलप्रमाणे नमूद करण्यात आलेल्या संबंधित तालुक्यातील संबंधित विमा प्रतीनिधीकडे विमा रक्कम जमा न होण्याचे कारणबाबत चौकशी करावी असे आवाहनही करण्यात आले आहे.
कार्यालय विमा प्रतिनिधीचे नाव मोबाईल क्रमांक पुढील प्रमाणे
तालुका कृषि अधिकारी कार्यालय धाराशिव- सुमेध लांडगे- 9922251357, तालुका कृषि अधिकारी कार्यालय- तुळजापूर- रोहीत आलाट-9518523476, तालुका कृषि अधिकारी, कार्यालय-उमरगा- अक्षय निंबुर्गे- 9420750582, तालुका कृषि अधिकारी कार्यालय- लोहारा- रामेश्वर बिराजदार- 9325843396, तालुका कृषि अधिकारी कार्यालय- भूम- गणेश कावळे- 8830421143, तालुका कृषि अधिकारी कार्यालय- परंडा- तेजस अनभुले -9552831863, तालुका कृषि अधिकारी कार्यालय- कळंब- ज्ञानेश्वर शिंदे- 9881450381, तालुका कृषि अधिकारी कार्यालय- वाशी- रामेश्वर सुरवसे- 9403081038
Labels: Daharashiv
अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेती क्षेत्राचे तात्काळ पंचनामे करा – खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर
जिल्हाधिकारी धाराशिव यांचे पंचनामे करणे बाबतचे आदेश निर्गमित
धाराशिव ,दि.३०
मागील चार दिवसापासून हवामानात अचानक बदल होवून अवकाळी पावसाने जिल्हयात मोठया प्रमाणात शेती पिकाचे नुकसान केले आहे. खरीप हंगामात पावसाने मोठा खंड घेतल्यानंतर शेतकऱ्यांनी मोठया आशेने रब्बी हंगामाची पेरणी केली होती.पिके व्यवस्थीत वाढ आवस्थेत असताना अचानक हवामानात बदल होवून धाराशिव जिल्हयातील 25 महसुल मंडळामध्ये पावसाने रब्बी हंगामातील द्राक्ष बाग, पपई, ऊस, कांदा, तूर, ज्वारी व इतर पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान केले आहे. सदर पावसाने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करणे बाबत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी जिल्हा प्रशासनास सुचना केल्या आहेत.
धाराशिव जिल्हयातील भुम व परंडा, धाराशिव व तुळजापुर, उमरगा व लोहारा, कळंब व वाशी. लातूर जिल्हयातील औसा व निलंगा व सोलापूर जिल्हयातील बार्शी तालुक्यात झालेले नुकसानीचे कृषी विभागामार्फत व जिल्हा प्रशासनामार्फत पंचनामे करणे बाबत सुचना करण्यात आल्या असून 33 टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या पिकांचे गावनिहाय पंचनामे तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक यांच्या मार्फत जिओ टॅग फोटोसह पंचनामे करुन सदर पंचनामे सादर करणे बाबत पत्राव्दारे सुचना करण्यात आल्या होत्या जिल्हाधिकारी, धाराशिव, जिल्हाधिकारी, लातूर यांनी आज स्थळ पंचनामे करण्याचे आदेश निर्गमित केले आहे.
Labels: Daharashiv
Labels: Tuljapur
Labels: Daharashiv
Labels: Naldurg
प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी विदर्भ व मराठवाडा वैधानिक विकास मंडळांना मुदतवाढ द्या!
Labels: Daharashiv
Labels: Naldurg
Labels: Naldurg
माधवराव पाटील महाविद्यालयात संविधान दिन व शहीद जवानांना श्रध्दांजली अर्पण
Labels: Daharashiv
Labels: Naldurg
Labels: Naldurg
भाजपा जिल्ह्यात नंबरवन राहणार - चालुक्य पाटील
Labels: Dharashiv
Labels: Naldurg
पिकस्पर्धा रब्बी हंगाम 2023
ज्वारी,गहू,हरभरा,करडई व जवस या पिकांचा स्पर्धेत समावेश, डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज मागविले
धाराशिव,दि.23
राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात. उत्पादकतेत वाढ करण्यात येते.अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास,त्यांची इच्छाशक्ती व मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल.तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल,हा उद्देश ठेवून राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.
वंचीत,दुर्लक्षीत तसेच पौष्टिक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादन तंत्रज्ञानात वाढ होण्याची आवश्यकता विचारात घेऊन तसेच जास्तीत जास्त शेतकरी पीक स्पर्धांमध्ये सहभागी होतील या दृष्टिकोनातून रब्बी हंगाम 2023 पासून पिकस्पर्धा तालुका,जिल्हा व राज्य पातळीवर राबविण्यात येणार आहे.त्यानुसार कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम सन 2023 मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी ज्वारी,गहू,हरभरा,करडई व जवस या पिकांसाठी पिकस्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
रब्बी हंगाम 2023 करीता ज्वारी,गहू,हरभरा,करडई व जवस या पाच पिकांचा पिकस्पर्धेत समावेश करण्यात आला आहे.
स्पर्धेसाठी पात्रता निकष पुढीलप्रमाणे आहेत.स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतक-यांकडे स्वत:च्या नावे जमीन असणे व ती जमीन तो स्वत: कसत असणे आवश्यक आहे. एकाचवेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत भाग घेता येईल. पिकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थ्याच्या शेतावर त्या पिकाखाली किमान 40 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.
या स्पर्धेत भाग घेण्यासाठी विहित नमुण्यातील अर्ज (प्रपत्र - अ), ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन,7/12, 8-अ चा उतारा,जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास),पिकस्पर्धेसाठी शेतक-याने संबंधित 7/12 वरील घोषीत केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकीत केलेला नकाशा आणि बँक खाते चेक/पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकीत प्रत आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.
रब्बी हंगाम पीक स्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतीम तारीख 31 डिसेंबर 2023 आहे.अर्ज दाखल करण्याच्या तारखेच्या दिवशी शासकीय सुट्टी असल्यास त्यापुढील शासकीय सुट्टी नसलेली तारीख गृहीत धरण्यात यावी. तालुकास्तर,जिल्हास्तर व राज्यस्तरावरील पीकस्पर्धा निकाल-प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाचे पिकस्पर्धा विजेते निवडण्यात येतील.पीकनिहाय सर्वसाधारण गटासाठी रक्कम 300 रुपये वव आदिवासी गटासाठी रक्कम 150 रुपये याप्रमाणे स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क राहील.
रब्बी हंगाम 2023 साठी सर्वसाधारण व आदिवासी गट बक्षिसाचे स्वरुप पुढीलप्रमाणे आहे. तालुका पातळीवर पहिले बक्षिस 5 हजार रुपये, द्वितीय क्रमांक 3 हजार रुपये तर तृतीय क्रमांक 2 हजार रुपये आहे. जिल्हा पातळीवर पहिले बक्षिस 10 हजार रुपये, द्वितीय बक्षिस 7 हजार रुपये व तृतीय बक्षिस 5 हजार रुपये आहे.राज्य पातळीवर पहिले बक्षिस 50 हजार रुपये, द्वितीय बक्षिस 40 हजार रुपये व तृतीय बक्षिस 30 हजार रुपये आहे.
दुय्यम तसेच पौष्टिक तृणधान्य पिकाच्या क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ व्हावी याकरीता जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक स्पर्धत सहभागी व्हावे,असे आव्हान कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.
पीक स्पर्धेबाबत अधिक माहीतीसाठी शेतकऱ्यांनी संबधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयास संपर्क साधावा किंवा महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
Labels: Dharashiv
Labels: Tuljapur
Labels: Naldurg
Labels: Tuljapur
Labels: Naldurg
Labels: Dharashiv
Labels: Dharashiv
Labels: Naldurg
Labels: Naldurg
Labels: Naldurg
Labels: Naldurg
Labels: Dharashiv
Labels: Naldurg
Labels: Dharashiv
नळदुर्ग : बोरी धरणातील पिण्याच्या पाण्याचा निर्माण झाला वाद
नळदुर्ग,दि.१० :
नळदुर्ग येथिल बोरी (कुरनूर मध्यम प्रकल्प) धरणातील पिण्याच्या पाण्याबाबत माजी मंञी मधुकरराव चव्हाण व राष्ट्रवादीचे नेते आशोक जगदाळे यांच्यात वाद निर्माण झाले आहे.
या बोरी धरणातून तीर्थक्षेत्र तुळजापुर शहरासह मुर्टा, चिकुंद्रा, अणदूर, नळदुर्ग शहराला पाणीपुरवठा होत असून यंदाच्या पावसाळयात बोरी धरण्याच्या पाणलोट क्षेत्रात कमी पर्जन्यमान झाल्याने हे धरण पाण्याने भरले नाही. भविष्यात पाणी टंचाईला तोंड दयावे लागणार म्हणून जिल्हा प्रशासनाने पाणी पिण्यासाठी आरक्षित केले आहे. शेतीसाठी अवैध पाणी उपसा सुरु असल्याने ते बंद करुन विदयुत पंप जप्तीच्या कारवाईसाठी माजी नगरसेविका छमाबाई धनराज राठोड यांनी दि. ६ नोव्हेंबर रोजी धाराशिव पाटबंधारे उपविभाग नळदुर्ग कार्यालयासमोर एक दिवसांचे लाक्षणिक उपोषणही केले.
नळदुर्ग शहरासह मुर्टा, चिकुंद्रा, अणदुर, तीर्थक्षेत्र तुळजापूरला पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या नळदुर्ग येथील बोरी धरणात दिवसेंदिवस पाणी पातळी कमी होत आहे. उपयुक्त पाणी साठा अत्यंत कमी आहे. यावर्षी बोरीधरणाच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमान अत्यंत कमी झाले आहे. भविष्यात भिषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. धाराशिव जिल्हयातील संभाव्य पाणीटंचाईच्या अनुषंगाने टँकर अधिग्रहणाबाबतची स्थिती सिंचन, प्रकल्पातील पाणीसाठा व उपयुक्त पाणीसाठयाची सदयस्थिती याबाबतीत संभाव्य पाणीटंचाईच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी जिल्हयातील सर्व पाटबंधारे प्रकल्पातील सध्या उपलब्ध असलेले पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्याचे आदेश ऑगस्ट महिन्यामध्ये दिले आहेत. त्यावरुन तुळजापूर तहसिलदार यांनी भरारी पथक नियुक्ती केले आहे. त्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक, संबंधित प्रकल्पाचे शाखा अभियंता, महावितरण कंपनीचे शाखा अभियंता, संबंधित गावचे ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, पोलीस पाटील व कोतवाल यांचा समावेश आहे. या भरारी पथकात बदली होवून इतरत्र गेलेल्याही कर्मचा-यांचे नावे दिसून येत आहे.
दरम्यान, उपोषणकर्ते माजी छमाबाई राठोड यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना व भारत राष्ट्र समितीने पाठिंबा दिला आहे. पाटबंधारे सिंचन विभागाचे शाखा आभियंता एस सी जगताप, उपविभागीय आभियंता रमेश टोकलवड, मडंळ आधिकारी श्रीमती एस. एन जगताप, महावितरणचे शाखा आभियंता प्रविण गायकवाड आदीनी अवैध पाणी उपसा करणा-या शेतकऱ्यावर कारवाई करुन विद्युत पंप जप्तीची कारवाई करण्याचे लेखी आश्वासन श्रीमती राठोड याना दिल्याने त्यानी उपोषण मागे घेतले.
बोरी धरणातुन वर्षाकाठी पुढीलप्रमाणे होतो पाणी पुरवठा
नळदुर्ग कुरनूर मध्यम प्रकल्पातुन वर्षाकाठी पुढीलप्रमाणे पिण्याच्या पाण्याची गरज भागविली जाते. तीर्थक्षेत्र तुळजापूर शहराला 1.6197 दशलक्ष घनमीटर, नळदुर्ग शहराला 1.941 दशलक्ष घनमीटर, अणदुर गावाला 1.1295 दशलक्ष घनमीटर, चिकुंद्राला 0.0375 दशलक्ष घनमीटर, मुर्टा गावासाठी 0.041 दशलक्ष घनमीटर असे मिळून महिन्याकाठी 0.34 दलघमी एवढा पाणीपुरवठा केला जातो. दि.6 नोव्हेंबर रोजीची बोरी धरणात पाणी (जिवंत) साठा 7.63 दलघमी म्हणजेच 23.64 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
Labels: Dharashiv
ईटकुर शिवारात अवैध गांजा लागवड करुन संवर्धन करणाऱ्या इसमावर कळंब पोलीसांची कारवाई,500 किलो 500 ग्रॅम वजनाची ओलसर गांज्याची झाडे किंमत 60,06,000/- (साठ लाख सहा हजार रुपये) चा मुदेमाल जप्त
धाराशिव ,दि.०६
दिनांक 04/11/2023 रोजी कळंब पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक, सुरेश साबळे यांना गोपनिय माहीती मिळाली की, इटकुर ता.कळंब जि.धाराशिव येथे एका इसमाने त्याचे शेतात स्वता:च्या आर्थीक फायद्यासाठी विनापरवाना बेकायदेशिर रित्या गांज्याच्या झाडांची लागवड करुन त्याचे संवर्धन व जोपासना करीत आहे, अशी खात्रीलायक माहीती मिळाल्याने याबाबत मा.पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री नवनीत काँवत साहेब व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री एम रमेश साहेब उप विभाग कळंब यांना रेड बाबत माहीती देवुन त्यांचे मार्गदर्शनाखाली कारवाई करणे कामी कळंब तहसील कार्यालयाचे सक्षम अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी यांना माहीती देवुन शासकीय पंचासह माहीतीच्या ठिकाणी छापा मारला असता, इटकुर शिवारात शेत गट नं 1201 मध्ये शेतकरी इसम नामे- दशरथ संपती काळे रा.इटकूर याने मकाच्या शेतात अवैध गांज्याचे झाडे लावुन त्याचे संवर्धन करीत असताना मिळुन आला. त्याचे शेतातुन एकुण 500 किलो 500 ग्रॅम वजनाची ओलसर गांज्याची झाडे एकुण किंमत 60,06,000/- (साठ लाख सहा हजार रुपये) चा मुदेमाल जप्त करण्यात आला आहे. सदर शेतकरी यांचे विरुध्द कळंब पोलीस स्टेशन येथे गुरनं 476/2023 कलम 20 एन.डी.पी.एस. कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री नवनीत काँवत साहेब, उपविभागीय पोलीस अधीकारी श्री एम रमेश साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री सुरेश साबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, हनुमंत कांबळे, पोहेकॉ/ सुनिल कोळेकर,बाळासाहेब तांबडे, चालक पोहेकॉ/ पांडुरंग माने, पोना/ दत्तात्रय शिंदे, अजिज शेख, शिवाजी राऊत, मपोना/ सविता कांबळे, पोअं/ भरत गायकवाड, करीम शेख, वैजिनाथ मोहीते, फुलचंद मुंढे, रणजित लांडगे, मपोअं/रोहीणी चव्हाण, चालक / पोअं/परमेश्वर मगनाळे यांचे पथकाने केली आहे
Labels: Dharashiv
Labels: Naldurg
अंगद पवळे लिखित चला शिकूया या ग्रंथाचे प्रकाशन.....
Labels: Dharashiv
लोकसेवकाच्या कर्तव्यात अडथळा करणाऱ्यांवर नळदुर्ग पोलिसात गुन्हा नोंद.”
नळदुर्ग पोलीस ठाणे :आरोपी नामे-1) छोटु बाळु घुगे, रा. अणदुर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.30.10.2023 रोजी 15.45 वा. सु. फिर्यादी नामे- मुकूंद मनोहरराव वेद्य, वय 47 वर्षे, व्यवसाय- नोकरी वाहतुक नियंत्रक रा. ब्राम्हण गल्ली नळदुर्ग, ता. तुळजापुर जि. धाराशिव हे ऑफीसमध्ये त्यांचे काम करत असताना नमुद आरोपी हा आला व बसस्थानकावर महिलांसाठी बाथरुमची का सोय केली नाही असे म्हणून फिर्यादी यांच्याशी हुज्जत घालून, अरेरावीची, असभ्य भाषा करुन वाद घालून केबीन मधून धक्का मारुन बाहेर काढून शासकिय काम काज पार पाडण्यास अडथळा निर्माण केला. यावरुन मुकूंद वैद्य यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 353, 323अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
जाहिरात
*_☮️आयुर्वेदिक चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र☮️_*
*_🧘♀️आयुर्वेदाची घेऊन साथ जुन्या व्याधीवर करू मात🧘♀️_*
_◼️पेन किलर व कॅल्शियम च्या गोळ्या खाऊन कंटाळा आहात का ...?_
_◼️डॉक्टरांनी मणक्याचे ऑपरेशन सांगितले आहे का...?_
_◼️रोजची औषधे खाऊन त्याचा तुमच्या शरीरावर दुष्परिणाम होतोय का...?_
_◼️ऋतू बदलामुळे सांधेदुखीचा त्रास वाढतो आहे का...?_
_👉🏻तर आजच भेट द्या 🤝 नळदुर्ग येथील *☮️ श्री अरुणोदय आयुर्वेदीक क्लिनिक व पंचकर्म केंद्र, नळदुर्ग☮️*_
*🛑आयुर्वेदिक चिकित्सा व पंचकर्म खालील आजारावर उपलब्ध👇🏻*
🔹आमवात/संधिवात
🔸हाडांची व मणक्यांची झीज
🔹मानेची किंवा कंबरेची नस दबणे
🔸गादी सरकणे
🔹हाता पायामध्ये मुंग्या येणे
🔸खांदे दुःखी / फ्रोजन शोल्डर
🔹 टेनिस एल्बो
🔸 सियाटिका
🔹 पॅरालिसिस
🔸 जॉईंट स्टिफ्फनेस
🔹पोटाचे आजार
🔸त्वचा विकार
🔹लहान मुलांचे आजार
🔸वजन कमी करणे
*_🛑उपलब्ध पंचकर्म ट्रीटमेंट👇🏻_*
◻️मसाज/स्टीम
◻️बस्ती
◻️षष्ठी शाली पिंड स्वेद
◻️कटी बस्ती
◻️स्पाईन बस्ती
◻️विध्द कर्म / कपिंग थेरेपी
◻️जलौका / लीच थेरेपी
_🦵सांध्यांच्या व मणक्यांच्या🧘♀️ विकारावर परिपूर्ण आयुर्वेद व पंचकर्म उपचार...🏥_
*_📑नाव नोंदणी आवश्यक🔖_*
*⏰तपासणी वेळ* - सकाळी १० ते सायं ५
*🎴पत्ता* - शिवतीर्थ कॉम्पलेक्स पाटील हॉस्पिटलच्या वरती पहिला मजला मेन रोड, नळदुर्ग
*☎️संपर्क -*
७०६६०५५८७२
८०७३६९४८६९
--------------
Labels: Naldurg
Labels: Naldurg