Monday, 30 November 2015

४६ वा आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ‘इफ्फी’ मधील महत्वाचे ठळक मुद्दे

पणजी :- गोवा इथे 20 नोव्हेंबर पासून सुरु झालेल्या  ४६ व्या  आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आज सोमवार दि. ३० नोव्‍हेंबर रोजी समारोप झाला. भारतीय चित्रपटसृष्टीच्या समृध्द प्रवासाला संगीतमय मानवंदना देत आणि आर्जेन्टिनाच्या ‘एल क्लान’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाने या महोत्सवाची सांगता होणार आहे.  

दहा दिवस चाललेल्या या चित्रपट महोत्सवातील काही महत्वाचे मुद्दे :
·         युनेस्कोच्या फिलीनी मेडल या पुरस्काराचे इफ्फी महोत्सवात पहिल्यांदाच वितरण होणार आहे.
·         इफ्फी २०१५ मध्ये स्पेन या देशावर भर दिला गेला होता. 
·         महोत्सवात एकूण ७००० प्रतिनिधी सहभागी झाले .
·         महोत्सवासाठी आंतरराष्ट्रीय जुरी समितीचे अध्यक्ष शेखर कपूर होते,त्याशिवाय, इग्लंडचे दिग्दर्शक मिखाईल रेडफोर्ड, पेलेस्टाईनच्या दिग्दर्शिका सुहा अराफ, जर्मन अभिनेत्री जुलिया जेन्स्त आणि दक्षिण कोरियाचे चित्रपट निर्माते जेओन क्यू हवान यांनी सदस्य म्हणून काम पाहिले.
·         १३ सदस्यांच्या फिचर फिल्म जुरीचे अध्यक्ष अरीबाम श्याम शर्मा होते, तर नॉन फिचर फिल्म साठी ७ सदस्यीय जुरीचे अध्यक्ष राजेंद्र जंगले होते.
·         या चित्रपटात एकूण १२० चित्रपटांचे प्रीमियर खेळ झाले , ज्यात जागतिक, आशियाई आणि भारतीय चित्रपटांचा समावेश होता.
·         यावर्षी महोत्सावत एकूण ८२० चित्रपट प्रतिनिधी सहभागी झाले, ज्यात ५४० भारतीय आणि २८० आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी होते. यात दिग्दर्शक, कलाकार ,निर्माते, तंत्रज्ञ, ऑस्कर अकादमी सदस्य आणि हॉलीवूडचे तज्ञ यांचा समावेश होता.
·         या महोत्सवात यंदा एकूण ७९० चित्रपट प्रवेशासाठी अर्ज आले होते.
·         यापैकी १८२ चित्रपटांची अंतिम निवड झाली .
·         एकूण ९० देशांनी या महोत्सवात सहभाग घेतला.
·         महोत्सवाचा आरंभ ‘द मन हू न्यू इन्फीनीटी’ या चित्रपटाने , तर मध्य- ‘ड दानिश गर्ल’ या चित्रपटाने झाला. या दोन्ही चित्रपटांचे समीक्षक आणि रसिक प्रेक्षकांनी कौतुक केले.
·         महोत्सवाचा अखेरचा चित्रपट ‘एल क्लान’ हा ७२ व्या व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या मुख्य स्पर्धा विभागासाठी निवडल्या गेला होता, या महोत्सवात दिग्दर्शक आबेलो त्रापेरो यांनी रौप्यसिंह पुरस्कार जिंकला. ८८ व्या अकादमी पुरस्कार स्पर्धेतही ‘एल क्लान’ परदेशी भाषा विभागात सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून निवडला गेला. 
·         ऑस्कर पुरस्कारासाठी अधिकृत प्रवेश म्हणून पाठवले गेलेले २६ चित्रपट , यासह कान्‍स, बर्लिन, तोरोन्तो आणि लोकार्नो चित्रपट महोत्सवातील चित्रपट इफ्फीमध्ये दाखवण्यात आले.
·         भारतीय पानोरामा विभागात एकून ४७ चित्रपट होते, ज्यात फिचर आणि नॉन फिचर चित्रपटांचा समावेश आहे.
·         न्यू होरायझन फ्रोम नॉर्थ इस्ट या विशेष विभागात इशान्येकडील ज्येष्ठ चित्रपट निर्माते अरीबाम श्याम शर्मा यांच्या चित्रपटांचा प्रवास आणि ईशान्य भारतातील नव्या पिढीच्या , युवा दिग्ददर्शकांचे चित्रपट दाखवले गेले.
·         यावर्षी आंतरराष्ट्रीय चित्रपट स्पर्धेत एकून १५ चित्रपट होते , त्यापैकी ५ चित्रपट विविध विभागात ऑस्कर पुरस्कारासाठी अधिकृत प्रवेश म्हणून पाठवले गेले आहेत. यात कोलंबियाचा “ अल अब्राझो दे ला सेर्प्न्ते’ ( सापाची मिठी) हा सिरो गुएरा यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट, फ्रान्‍सचा, देनिझ गाम्झे इर्गुवेन दिग्दर्शित ‘मस तंग’, जर्मनीचा , ‘इम लेबिरीन्थ देस श्विगंस’ हा ग्युलीयो रीसियारेली यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट, आईसलंडचा चित्रपट ‘राम्स’ हा ग्रीमुर हाकोनार्सन यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट , सर्बियाच्या गोरान राडोवेनोवीच यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट  ‘एन्क्लेव’ यांचा समावेश होता.
·         ऑस्करविजेते रशियन चित्रपट निर्माते, अभिनेते आणि रशियाच्या सिनेमटोग्राफर संघटनेचे प्रमुख निकिता मिखाल्कोव यांना या महोत्सवात जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले जाईल. जागतिक चित्रपटाला त्यांनी दिलेले योगदान लक्षात घेत , त्याचा गौरव केला जाणार आहे. त्यांचे काही खास चित्रपट ‘बर्न्त बाय द सन’ , संन्स्त्रोक, बार्बर ऑफ सायबेरिया अॅण्‍ड ओब्लोमोब’ यांचे प्रदर्शनही या महोत्सवात करण्यात आले.
·         महोत्सवाच्या प्रारंभी, शतकातील चित्रपट व्यक्ती म्हणून संगीतकार इलिया राजा यांचा गौरव करण्यात आला.
·         या महोत्सवात आय सी एफ टी - युनेस्को ने एक चर्चासत्र आयोजित केले होते, विषय होता - 'चित्रपट आणि सांस्कृतिक विविधता' यात फ्रान्सचे फिलिप कुएयु , कॅनडाचे चार्ल्स वेलरंड आणि भारताच्या शारदा रामनाथन यांनी सहभाग घेतला होता .
·         फिक्कीच्या समन्वयाने अमेरिकेमध्ये चित्रीकरण करण्याविषयी उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींची बैठक झाली.
·         राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियानाची माहिती सांगणारे बहुमाध्यम प्रदर्शनही या महोत्सवात आयोजित करण्यात आले होते .भारत सरकारचा प्रसिद्धी विभाग आणि राष्ट्रीय फिल्म्स डिव्हिजनने हे प्रदर्शन भरवले होते.
·         ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांच्या चित्रपट करकीर्दीवर प्रकाशझोत टाकणाऱा विशेष विभाग या महोत्सवात होता. त्या अंतर्गत, त्यांच्या अभिनय आणि चित्रपट निर्मिती कौशल्याची झलक दाखवली गेली. तसेच , शशी कपूर यांचे 8 चित्रपटही महोत्सवात दाखवले गेले. यात जूनून (1978) ,न्यू दिल्ली टाइम्स (1986) ,उत्सव (1984), इन कस्टडी (मूहाफीज), कलयुग (1981),दीवार (1975) शेक्सपियरवाला आणि हाऊस होल्डर या चित्रपटांचा समावेश आहे.
·         ऑस्कर अकादमीच्या तीन सदस्यीय शिष्टमंडळाने यावेळी पहिल्यांदाच भारताला भेट दिली. या शिष्टमंडळाने प्रतिनिधींना चित्रपट निर्मितीचे तंत्रज्ञान शिकवले . यात साऊंड डिझायनिंग , फिल्म आरकाईव्ह , एडिटिंग आणि कास्टिंग, यावर त्यांनी मार्गदर्शन केले.
·         आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील महत्वाच्या अशा चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांनी या सोहळ्याला हजेरी लावली. यात अनिल कपूर,ईलिया राजा , सोनाक्षी सिन्हा , कबीर खान , देव पटेल, आयुष्यमान खुराणा,  मार्क मांगिनी , आदिती राव हैदरी, जॅकी श्रॉफ , नाना पाटेकर , सचिन पिळगावकर , सुभाष घई, शेखर कापूर, कौशिक गांगुली, एडवर्ड प्रेसमान, निकिता मिखालकोव्ह , राजकुमार हिरानी, प्रियदर्शन, मधुर भांडारकर , आनंद राय, श्याम बेनेगल, के के सेनथील कुमार आणि  शंकर महादेवन यांची उपस्थिती होती.
·         राष्ट्रीय चित्रपट वारसासंग्रह अभियानाचे महत्व अधोरेखित करण्यासाठी ' जतन केलेले चित्रपट' असा एक विशेष विभाग ठेवण्यात आला होता. भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रह (NFAI) विभागाने भारतीय माहिती प्रसारण विभागाच्या मार्गदर्शनाखाली हा विभाग केला होता.भारताचा वैविध्यपूर्ण चित्रपट वारसा आणि परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोचवण्यासाठी हा उपक्रम महत्वाचा ठरेल.
·         जागतिक चित्रपट निर्मात्यांच्या प्रतिभेचा गौरव करण्यासाठी या महोत्सवात फर्स्ट कट हा विशेष विभाग होता .यात अमेरिकेचे चित्रपट निर्माते, ब्रियान पेकिंग्ज यांचा गोल्डन किंगडम, जर्मनीच्या मिखाईल क्लेट्टे यांचा सोलनेस, पोलंडच्या पीओतर चारझन यांचा मोसकविच - माय लव्ह, यांच्यासह इतर चित्रपट दाखवण्यात आले.
·         महिला दिग्दर्शक आणि निर्मात्यांना प्रोत्साहन देणारा विशेष विभाग ' वुमन क्लाचर ऑफ सिनेमा ' या महोत्सवात होता. यात भारतीय महिला दिग्दर्शिकांचे चित्रपट दाखवले गेले . यात अंजली मेनन यांचा मंजादिकुरु , अपर्णा सेनेचा 36 चौरंगी लेन, झोया अख्तरचा जिंदगी ना मिलेगी दोबारा , हे चित्रपट दाखवण्यात आले.
·         प्रसारमाध्यमांसाठी काही विशेष उपक्रमही या महोत्सवात होते. यात पत्रकार परिषदांचे इंटरनेटवर थेट प्रक्षेपण, महोत्सवाचा मोबाईल अँप, आणि चित्रपट , प्रतिनिधी, मान्यवर यांच्या त्वरित माहितीसाठी इतर सेवा देण्यात आल्या.
·         एकाचवेळी अनेक चित्रपटांचे खेळ सुरु असूनही प्रत्येक प्रदर्शनाला प्रेक्षकांची गर्दी होती.
·         राजकुमार हिरानी, मधुर भांडारकर, श्याम बेनेगल, वेत्तीमारन, कौशिक गांगुली, राकेश ओमप्रकाश मेहरा, प्रियदर्शन, आनंद राय, यांनी ' इन कनव्हरसेशन' या विशेष सत्रात सहभाग नोंदवला .या सत्रात रसिक प्रेक्षकांना आपले आवडते चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली.
·         'सध्याचा अर्जेंटिनियन चित्रपट ' हे विशेष पॅकेज या महोत्सवात होते. यात अर्जेंटिना झोन्दा, एल सिंको, इंटिमेट विटनेस, मेक्सिकन ऑपेरेशन , रपचर, आणि वाईल्ड टेल्स हे चित्रपट दाखवण्यात आले.
·         महोत्सावात झालेले खुले चर्चासत्र आणि पत्रकार परिषदेत प्रेक्षक आणि प्रसारमाध्यमांनी सहभाग घेतला.
·         महोत्सावाच्या समारोपाला अर्जेंटिना, नायजेरिया, आणि तुर्कस्तानचे मान्यवर येणार आहेत. उद्‌घाटन समारंभाला स्पेन आणि इस्रायलचे मान्यवर आले होते.
·         आंतरराष्ट्रीय आणि भारतीय चित्रपट दिग्गजांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून रसिकांना थेट संवाद साधता आला.
·         विविध विषयांवरील चित्रपटांच्या निवडीची परदेशी आणि भारतीय पाहुण्यांनी प्रशंसा केली.
·         जागतिक स्तरावरील सर्वोत्तम चित्रपटांचे शो भारतीय रसिकांना तर आतंरराष्टीय प्रेक्षकांना भारतीय चित्रपटांचे शो दाखवण्यात आले.
·         या संध्याकाळच्या विशेष कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संगीतकार ए आर रेहमान होते. नामवंत चित्रपट निर्माते पाबेलो सिझार, जोहन बेलस, गुनित मोंगा, मायकेल वार्ड यांच्यासारख्या दिग्गजांनी या महोत्सवात हजेरी लावली. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते, भागीरथी , तपन बिस्वास, श्रीजित मुखर्जी, कौशिक गांगुली यांच्यासह अनेक मान्यवरांनी रसिक प्रेक्षक आणि माध्यमांशी संवाद साधला.
·         जागतिक चित्रपट सृष्टीतील अद्वितीय आणि खास चित्रपटांचे या महोत्सवात प्रदर्शन करून इफ्फीने उत्तम दर्जाचे नवे मापदंड तयार केले आहेत. यात २६ ऑस्कर नामांकित चित्रपटांचाही समावेश होता. त्याशिवाय कान्स, बर्लिन, व्हेनिस आणि बुसान चित्रपट महोत्सवात प्रदाशित झालेले चित्रपटही यावेळी दाखवण्यात आले.
----------

Labels:

Sunday, 29 November 2015

पर्यावरणी मंत्री ना. रामदास कदम यांचा सत्कार

तुळजापूर : राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी शनिवारी सायंकाळी श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. यानंतर मंदिर संस्थानच्या वतीने विश्‍वस्त तेजस चव्हाण, मनसेचे अमरराजे कदम, शिवसेनेचे सुधीर कदम, रिपाइं विद्यार्थीआघाडीचे शुभम कदम यांनी त्यांचा सत्कार केला. 
    याप्रसंगी आ.ज्ञानराज चौगुले, जिल्हा प्रमुख सुधीर पाटील, अनिल खोचरे, गणेश सोनटक्के, शाम पवार, शामलताई वडणे, तहसीलदार काशिनाथ पाटील, व्यवस्थापक सुजीत नरहरे, दिलीप नाईकवाडी, सागर इंगळे, बापू नाईकवाडी, बापू सोंजी आदींची उपस्थिती होती.

Labels:

भारतीय स्टेट बँकेत उप व्यवस्थापक (कायदा) आणि सहाय्यक व्यवस्थापक पदाची भरती

भारतीय स्टेट बँक समुहामध्ये उप व्यवस्थापक (कायदा) आणि सहाय्यक व्यवस्थापक या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ डिसेंबर २०१५ आहे. अधिक माहिती www.sbi.co.in किंवा www.statebankofindia.comया संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Labels:

जिल्ह्यातील पाणी-चाराटंचाईचा पालकमंत्री डॉ. सावंत यांच्याकडून आढावा

उस्मानाबाद -: राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी जिल्ह्यातील टंचाई परिस्थितीचा आढावा घेतला. पिण्याचे पाणी, जनावरांना चार, हाताला काम आणि चारा छावण्यांबाबतची वस्तुस्थिती त्यांनी जिल्हा प्रशासनाकडून जाणून घेतली. तसेच भडाचीवाडी, खामगाव,  मस्सा (खं), हावरगाव, ईटकूर या गावांना भेटी देऊन तेथील पीकपरिस्थितीचीही त्यांनी पाहणी केली.
       पालकमंत्री डॉ. सावंत यांनी शनिवारी सकाळी जिल्हा प्रशासनाच्या विविध अधिकाऱ्यांसह बैठक घेतली. यावेळी जिल्ह्यातील सर्वच विधानसभा सदस्य सर्वश्री मधुकरराव चव्हाण, राणाजगजीतसिंह पाटील, राहूल मोटे आणि ज्ञानराज चौगुले, तसेच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अॅड. धीरज पाटील, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांच्यासह विविध यंत्रणांचे प्रमुख या बैठकीला उपस्थित होते. 
    पालकमंत्री डॉ. सावंत यांनी जिल्ह्यात सध्या पाण्याची उपलब्धता किती आहे, हे पाणी किती दिवस पुरेल, तसेच आगामी काळासाठी संभाव्य टंचाई आराखड्यानुसार पाणी कुठून उपलब्ध होऊ शकेल, त्यासाठीची व्यवस्था काय, आदींची माहिती घेतली. आवश्यक त्या ठिकाणी तात्पुरत्या पाणीपुरवठा योजनांची कामे हाती घेण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. याशिवाय, राष्ट्रीय पेयजल योजना, भारत निर्माण, जलस्वराज्य आदी योजनांतील जी कामे गैरव्यवहारांमुळे ठप्प झाली, त्याप्रकरणी संबंधीतांवर ठपका ठेऊन कार्यवाही करण्याचे आणि या प्रकरणी 1 महिन्यात निर्णय घेण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेत किती गावे समाविष्ट आहेत, याचीही माहिती घेतली.
    सध्या चारा छावण्यांची संख्या किती आहे, प्रस्ताव किती आले आहेत, याचीही त्यांनी माहिती घेतली. तसेच विविध लोकप्रतिनिधींनी जनावरांच्या संख्येबाबतच्या अटींसंदर्भात विचारणा केली असता यासंदर्भात मुख्यमंत्री महोदयांकडे विषय मांडण्यात येऊन निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय, टंचाई परिस्थिती लक्षात घेता ज्या ठिकाणाहून टॅंकरचे प्रस्ताव येतील, ते तपासून 3 दिवसांत निर्णय घेण्याचे निर्देशही डॉ. सावंत यांनी दिले. 
       रोजगार हमी योजनेत मजुरांची संख्या वाढविण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे पालकमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. अधिकाधिक कामे हाती घेऊन मजुरांच्या हाताला काम उपलब्ध करुन द्या, ज्याठिकाणी मागणी आहे, तेथे तात्काळ कार्यवाही करा, असेही त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी यावेळी प्रशासनामार्फत कामावर या अभियान सुरु असल्याचे सांगितले. अधिकाधिक मजुरांना कामांवर येण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. यासंदर्भात भूममध्ये नुकतीच सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, सहायक तांत्रिक अधिकारी, ग्रामस्वरोजगार सेवक यांची कार्यशाळा घेऊन त्यांना प्रेरित करण्यात आले असल्याचे सांगितले. सध्या मजुरसंख्या 10 हजारांवर गेली असून ती वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. 
     यानंतर पालकमंत्री डॉ. सावंत यांनी अन्न सुरक्षा योजनेचाही आढावा घेतला. सर्वांना या योजनेंतर्गत धान्य मिळतेय की नाही, याची खातरजमा करा.कोणाचीही तक्रार येता कामा नये, असे त्यांनी सांगितले. 
     त्यानंतर पालकमंत्री डॉ. सावंत यांनी टंचाईग्रस्त विविध भागांना भेटी देऊन तेथील शेतकरी आणि नागरिकांशी संवाद साधून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे हेही यावेळी त्यांच्यासोबत होते. त्यांनी भडाचीवाडी येथे पीकपरिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी खामगाव येथे जनावरांच्या छावणीला भेट देऊन पाहणी केली. तेथे त्यांनी जनावरांच्या छावणीतील व्यवस्था, त्यांना देण्यात येणाऱ्या पशुखाद्याविषयीची माहिती घेतली. यावेळी तेथील पशुपालकांच्या आरोग्य तपासणीसाठी उभारण्यात आलेल्या आरोग्य कक्षासही त्यांनी भेट देऊन पाहणी केली. 
      डॉ. सावंत यांनी त्यानंतर मस्सा खंडेश्वरी येथे विहीरीच्या कामाची तसेच फळबागेची पाहणी केली. ठिकठिकाणी त्यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. हावरगाव रस्त्यावर त्यांची वाट पाहात असलेल्या शेतकऱ्यांना पाहून त्यांनी गाडी थांबवली आणि त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर त्यांनी ईटकूर शिवारातील शेतीला भेट दिली. तेथील पीकपरिस्थितीची पाहणी करुन त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रालाही त्यांनी भेट दिली.

Labels:

महात्‍मा फुले यांना अभिवादन

उस्मानाबाद : महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त रिपाइंच्यावतीने महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी राजाभाऊ ओहाळ, रंजीत मस्के, डी. के. कांबळे, रवि माळाळे, गौतम कांबळे, विद्यानंद बनसोडे आदी उपस्थित होते. 

Labels:

Saturday, 28 November 2015

बारुळ येथील शेतक-याचा नाशिक येथे सन्‍मान

तुळजापूर (सुधीर सुपनार) -: बारुळ (ता. तुळजापूर) येथील दहा युवक शेतक-यांनी एकत्र येवून भवानी शंकर अॅग्रो प्रोडयुसर या शेतकरी गटाचे कंपनीत रुपांतर केले. याच गटातील शिवाजी नवगिरे या शेतक-याने एक कमी खर्चाचे स्‍प्रीकलर व एक टाकाऊ बाटल्‍यापासून स्‍प्रीकलर बनवून कमी खर्चात कशी शेती करावी, याचा उत्‍तम नमुना तरुणांसमोर ठेवला आहे. 
          याची दखल घेत तालुका कृषी अधिकारी संजय जाधव व आत्‍मा विभाग यांच्‍या सहकार्याने पुणे येथे पार पडत  असलेल्‍या राष्‍ट्रीय कृषी प्रदर्शनात प्रगतशील शेतकरी शिवाजी नवगिरे यांना सन्‍मानित करण्‍यात आले आहे. नाशिकचे पोलीस आयुक्‍त पी. जगनाथन व युथ आयकॉन बाळासाहेब दराडे यांच्‍या हस्‍ते नवगिरे यांना हा पुरस्‍कार प्रदान करण्‍यात आला.
      त्‍यांच्‍या या यशाबद्दल गटाचे अध्‍यक्ष सुनिल नवगिरे, धनंजय पवार, रतन मुदगुडे, बाबा वट्टे, चंद्रकांत ठोंबरे, संतोष कडबाने, गणेश चादरे, अमोल रणदिवे, सुधीर सुपनार आदींनी अभिनंदन केले आहे.

Labels:

Friday, 27 November 2015

दुष्काळी परिस्थितीबाबत पालकमंत्र्यांची शनिवारी आढावा बैठक

उस्मानाबाद -: राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा उस्‍मानाबाद जिल्हयाचे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत हे शनिवार दि. 28 नोव्हेंबर रोजी उस्मानाबाद जिल्हा दौ-यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. 
            शनिवारी, सकाळी 10-30 वाजता औरंगाबादहून मोटारीने शिंगोली शासकीय विश्रामगृह, उस्मानाबाद येथे आगमन. सकाळी 11 ते 11-45  वाजता  जिल्हाधिकारी व अन्य संबंधीत अधिकाऱ्यांशी दुष्काळी परिस्थितीत करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत आढावा बैठक. (स्थळ- जिल्हा नियोजन समिती सभागृह, उस्मानाबाद).  रात्री 8 वाजता  पक्षाच्या लोकप्रतिनिधींकडून तयार करण्यात आलेल्या तालुकानिहाय पाहणी अहवालावर चर्चा. (स्थळ- शिंगोली शासकीय विश्रामगृह). रात्री 9 वा तेथेच राखीव व मुक्काम.   रविवारी सकाळी 8 वाजता उस्मानाबादहून जालनाकडे प्रयाण.  

Labels:

चुकीच्‍या आयात धोरणांविरोधात सेना-भाजपा खासदारांच्‍या घरावर मोर्चा काढणार : पाटील

पंढरपूर : शुक्रवार दि. 27 नोव्‍हेंबर रोजी पंढरपूर येथे रघुनाथ पाटील शेतकरी संघटना, बळीराजा संघटना व जनहित शेतकरी संघटना यांची एकत्रित बैठक घेण्यात आली. 
यावेळी रघुनाथ पाटील यांनी स्वाभिमानीला रोखण्यासाठी व शेतक-यांच्या प्रश्नांनां करिता सरकारच्या विरोधात लढण्यासाठी बळीराजा शेतकरी संघटनांशी हातमिळवणी केली. केंद्रशासनाच्या चुकीच्या परदेशी आयात धोरणांविरोधात १२ डिसेंबर रोजी राज्यात सेना-भाजप खासदारांच्या घरांवर मोर्चा काढणार असल्‍याचे त्‍यांनी यावेळी सांगितले. तसेच केंद्रशासनाने घेतलेल्या ७ वा वेतन आयोग कशाप्रकारे शेतकर्यांवर अन्यायकारक आहे यासाठी समांतर वेतन आयोग स्थापन करुन केंद्र सरकारला ३ महिन्यात सादर करणार असून १५ ते १७ जानेवारी दरम्यान शिर्डी येथे राष्ट्रीय महाअधिवेशन भरण्‍यात येणार असल्‍याचे रघुनाथ पाटील यांनी सांगितले.

Labels:

सरडेवाडी जि.प. शाळेत संविधान दिन साजरा

तुळजापूर :- तुळजापूर तालुक्‍यातील सरडेवाडी येथे जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळेमध्‍ये दि. 26 नोव्‍हेंबर रोजी संविधान दिन मोठ्या उत्‍साहात साजरा करण्‍यात आला. 
       यावेळी ग्रामस्‍थाबरोबरच माता-पालक संघातील महिलाही उपस्थित होत्‍या. सुरुवातीस शाळेतील सहशिक्षक अशोक खडके यांनी संविधान विषयी माहिती सांगून संविधानाचे वाचन केले. संविधान जागृतीसाठी गावातून प्रभात फेरी काढून विद्यार्थ्‍यांनी घोषणा दिल्‍या. 

Labels:

वडाचा तांडा येथे संविधान दिन साजरा


तुळजापूर :- वडाचा तांडा (ता. तुळजापूर) येथील जिल्‍हा परिषदेस संविधान दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्‍यात आला. यानिमित्‍ताने गावातून प्रभातभेरी काढण्‍यात आली होती. यावेळी शाळेस ग्रामपंचायतीच्‍यावतीने संविधान भेट देण्‍यात आले. यावेळी  सरपंच शिवराम राठोड,, उपसरपंच लखन चव्हाण, आनंदा राठोड, वसंत चव्हाण, सूरेश राठोडख्‍ बळीराम जाधव, गूलाब राठोड यांच्‍यासह शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्‍थ उपस्थित होते. सूञसंचालन क्षिरसागर सर यांनी केले आभार वसंत चव्हाण यांनी मानले.

Labels:

Thursday, 26 November 2015

जिल्‍ह्यात संविधान दिन विविध कार्यक्रमानी साजरा

उस्‍मानाबाद -: ६६ वा भारतीय संविधान दिन उस्मानाबाद जिल्ह्यात विविध कार्याक्रमानी साजरा करण्यात आला. यानिमित्ताने संविधान फौंडेशनच्या वतीने आज सकाळी उस्मानाबाद शहरातील जिजाऊ चौकातून संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत शहरातील सामाजिक संघटना आणि शाळा महाविद्यालयातील विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी जिल्हाधिकारी डॉ प्रशांत नारनवरे आणि जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आनंद रायते यांनी या ठिकाणी उपस्थित राहून रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर हि रॅली संविधानाचा जयघोष करत शहरातील मुख्य रस्त्यावरून फिरत छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी पोहचली अभिवादनानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ जिल्हाधिकारी डॉ प्रशांत नारनवरे यांच्या उपस्थितीत सामुदायिक भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाचन करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ प्रशांत नारनवरे, जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी आनंद रायते, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी बी एन उबाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, शिवसेना जिल्हा प्रमुख सुधीर पाटील, पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश पोतदार, रविंद्र केसकर, शिवराज्याभिषेक समितीचे विष्णू इंगळे, आदीजण सहभागी झाले होते. ही रेली यशस्वी करण्यासाठी संविधान फौंडेशनचे सुजित ओव्हाळ, रमाकांत गायकवाड, किशोर गवळी, हुंकार बनसोडे यांनी परिश्रम घेतले.

Labels:

Wednesday, 25 November 2015

राज्यस्तरीय महिला मैदानी क्रीडा स्पर्धांचे उदघाटन

उस्मानाबाद -: क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी,उस्मानाबाद यांच्या वतीने आयोजित राजीव गांधी खेल अभियानातंर्गत राज्यस्तरीय महिला मैदानी क्रीडा स्पर्धाचे येथील तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम,उस्मानाबाद येथे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उदघाटन जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते आज उदघाटन करण्यात आले. 
         यावेळी पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे, उस्मानाबाद जिल्हा अॅथेलेटिक्स संजय बदोले, निवड समिती सदस्य गणेश पवार, श्रीमती सीमा पाटील, शिवकांता देशमुख, जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक बनसोडे, मोहन पाटील, अंबादास दानवे यांच्यासह 9 विभागातील 198 खेळाडू व प्रशिक्षक यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
        यावेळी उदघाटनपर भाषणात डॉ.नारनवरे म्हणाले की, महिला खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतला आहे. ही कौतूकास्पद बाब आहे. खेळाच्या बाबतीत महिलाही मागे नाहीत. हे महिलांनी दाखवून दिले आहे. सर्व खेळाडूंनी खेळाडू वृत्तीचे दर्शन घडवून आपला जिल्हा राज्यात व देशात पुढे नेहण्यासाठी अथक परिश्रम करुन जिल्हयाचे नाव आंतराष्टीय स्तरावर घेऊन जाण्यासाठी सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो. तर श्री. त्रिमुखे म्हणाले की, प्रत्येक खेळाडूंने मन लावून खेळून प्राविण्य मिळवावे.
        या राज्यस्तरीय महिला स्पर्धेत अमरावती,नागपूर, पुणे, मुंबई, कोल्हापूर, लातूर, नाशिक, औरंगाबाद आणि क्रीडा प्रबोधनी,पुणे यांनी सहभाग घेतला आहे. यामध्ये धावणे, गोळा फेक,थाळी फेक, उंच उडी आदि मैदानी क्रीडा स्पर्धे होणार आहेत. 
        कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक बनसोडे यांनी करुन या महिला स्पर्धेच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट करुन यासंबंधी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  गणेश पवार यांनी केले. 
        प्रारंभी आंतरराष्ट्रीय खेळाडू कुमारी  अर्चना आढावा यांनी सर्व खेळाडूंना शपथ दिली. 

Labels:

रुग्णांच्या समस्या सोडविण्यासाठी आरोग्य यंत्रणेने पुढाकार घेण्याचे डॉ.सावंत यांचे निर्देश

उस्मानाबाद -: जिल्ह्यातील शेतक-यांच्या प्रमुख समस्यांपैकी आजारीपणा ही समस्या आहे. माझ्याकडे सार्वजनिक आरोग्य व पालकमंत्री ही दुहेरी जबाबदारी असून जिल्ह्यातील शेतक-यांच्या व नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन विविध आरोग्य विषयक योजना राबवित आहे. या योजनांचा लाभ रुग्णांना मिळावा. तसेच रुग्णांच्या समस्या सोडविण्यासाठी आरोग्य यंत्रणेने पुढाकार घेण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी वैद्यकीय अधिका-यांच्या बैठकीत दिले.  
          येथील जिल्हा रुग्णालयात नुकतीच त्यांच्या अध्यक्षतेखाली वैद्यकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. त्यावेळी त्यांनी वरील निर्देश दिले. या बैठकीला  आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे, आरोग्य संचालक डॉ.सतिष पवार, अतिरिक्त संचालक डॉ.अर्चना पाटील, सहायक संचालक डॉ.साधना तायडे, उपसंचालक आरोग्य सेवा, डॉ.व्ही.एम.कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ए.ई.रायते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एकनाथ माले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकृष्ण पवार यांच्यासह आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची  उपस्थिती होती. 
            या आढावा बैठकीत डॉ.सावंत म्हणाले की, जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी विशेष आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न शासनाकडून करण्यात येत आहे. प्रेरणातंर्गत त्यांना समुपदेशन करण्यासाठी गावागावात प्रशिक्षणाचे आयोजन करावे. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आचारसंहितेचे पालन करावे. गावपातळी ते जिल्हा रुग्णालयापर्यंत यंत्रणा सक्षम करावी. सर्व दवाखन्यात औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करुन घ्यावा. रुग्णांना सन्मानपूर्वक वागणूक देणे, भ्रष्टाचार मुक्त आरोग्य सेवा करणे, रुग्णांची खाजगी तपासणी न करणे,  दवाखण्यात आलेल्या तात्काळ उपचार करणे आवश्यकता असेल तरच रुग्णांना रेफर करणे, रेफरलच्या प्रत्येक रुग्णांचे ऑडीट करणे, पुढील काळात आरोग्य सेवेत मोठया प्रमाणात रिक्त जागांसाठी भरती होणार असून ती पारदर्शक व्हावी.  प्रत्येक अधिकारी /कर्मचारी  व रुग्ण यांच्यामध्ये समन्वय असणे आवश्यक आहे. उस्मानाबाद जिल्हा आरोग्य सेवा महाराष्ट्रासाठी एक आदर्श होईल या दृष्टीने कामकाज करणे अत्यावश्यक असल्याचेही ते म्हणाले.  बैठकीचे प्रास्ताविक डॉ.अर्चना पाटील यांनी केले तर आभार डॉ.माले यांनी मानले.     

Labels:

अणदूरच्या श्री खंडोबा मंदिराची रंगरंगोटी सुरू

नळदुर्ग :- तुळजापूर तालुक्यातील अणदूरच्या श्री खंडोबाची यात्रा पुढील महिन्यात १२ डिसेंबर रोजी आहे.त्यानंतर श्री खंडोबाचे मैलारपूर (नळदुर्ग) कडे प्रस्थान होईल.
     श्री खंडोबाचा अणदूर येथे सव्वा दहा महिने आणि मैलारपूरमध्ये पावणे दोन महिने मुक्काम असतो. अणदूर ते मैलारपूर हे अंतर साधारण ४ किलोमीटर आहे.दोन्ही ठिकाणी स्वतंत्र मंदिरे आहेत.मंदिरे दोन असली तरी देव मात्र एकच असतो.देवाची एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी प्रतिष्ठापणा करण्यात येत असल्याचे महाराष्ट्रातील हे एकमेव उदाहरण आहे.ही प्रथा गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे.अणदूरहून मैलारपूरला देवाच्या मुत्र्या पालखीत घालून वाजत गाजत नेण्यात येतात,आणताना तिच प्रथा असते.अणदूरची यात्रा दरवर्षी देवदीपावली रोजी तर मैलारपूरची यात्रा पौष पोर्णिमा रोजी असते.
श्री खंडोबा आणि बाणाईचा विवाह नळदुर्गच्या भुईकोट किल्लात झाला होता.नळ राजाची पत्नी दमयंती हिच्या भक्तीसाठी श्री खंडोबा येथे प्रकट झाले ही आख्यायिका आहे.श्री खंडोबाची दगडी मुर्ती स्वयंभू असून ती जागृत आहे.नवसाला पावणारा हा देव असल्याने अणदूर आणि मैलारपूरमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी असते.जेव्हा मैलारपूरमध्ये श्री खडोबाचा मुक्काम असतो,तेव्हा दर रविवारी मोठी यात्रा भरते.
अणदूरच्या श्री खंडोबा यात्रेच्या पाश्र्वभूमीवर मदिराच्या रंगरंगोटीचे काम सध्या सुरू आहे.अगोदर शिखर,सभामंडप आणि प्रवेशव्दार असे रंगकाम करण्यात येत आहे.नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील मालाकोली येथील रंगकाम करणा-या कलाकारांना त्याचे काम देण्यात आले आहे.येथील कलाकारांनी महाराष्ट्रातील अनेक मंदिराचे रंगकाम केलेले आहे.भाविकांच्या देणगीतून हे काम सुरू आहे.
      त्याचबरोबर यात्रेची जय्यत तयारी सुरू आहे.यात्रेच्या दरम्यान मंदिरासह प्रवेशव्दारावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार असून,दर्शनासाठी दर्शन बारी तयार करण्यात येणार आहे.त्याचबरोबर अन्य सोयीही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.श्री खंडोबा यात्रा कमिटी आणि श्री खंडोबा देवस्थान समितीचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य अणदूरची १२ डिसेंबर रोजीची यात्रा सुरळीत पार पडण्यासाठी परिश्रम घेत आहेत.

Labels:

गृहनिर्माण मंत्री मेहता यांनी घेतले श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन

तुळजापूर :- राज्याचे गृहनिर्माण, खनिकर्म व कामगार मंत्री प्रकाश मेहता यांनी मंगळवार रोजी तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. त्यानंतर मंदीर संस्थानच्या वतीने उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण यांनी त्यांना श्री तुळजाभवानी मातेची  प्रतिमा, शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी दिलीप हजारे, अनिल काळे, स्वीय सहायक रवि सांगळे, तहसीलदार काशीनाथ पाटील, मंदिर संस्थानचे व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यांच्यासह पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते. 
        यावेळी मंदीर संस्थानच्या कार्यालयात जिल्हा पत्रकारांनी दिलेल्या गृहनिर्माण संस्थेच्या प्रस्तावाच्या निवेदनास गृहनिर्माण मंत्री श्री.मेहता यांनी विचारविनिमय करुन तात्काळ मंजूरी दिली व आवश्यक त्या कार्यवाहीस्तव प्रस्तावातील बाबींविषयी संबंधितांनी योग्य ते निर्देश दिले. तसेच चर्चाअंती ते म्हणाले की, शासनाच्या वतीने ग्रामीण भागापर्यंत म्हाडाची योजना पोहचविण्याचे शासनाचे धोरण असल्याचेही त्यांनी नमूद केले. 

Labels:

Monday, 23 November 2015

राज्यस्तरीय पेंटाव्हॅलंट लसीकरणाचा पालकमंत्र्यांच्‍या हस्ते शुभारंभ

उस्मानाबाद -: बालवयात होणा-या  संभाव्य घटसर्प, धनुर्वात, डांग्या खोकला, हिब आणि हेपिटायटिस बी अशा प्राणघातक रोगांपासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी राज्या शासनामार्फत सुरु केलेल्या पेंटाव्हॅलंट लसीकरणाचा राज्यस्तरीय शुभारंभ   राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी येथील जिल्हा रुग्णालयत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांनी केला. 
       यावेळी आमदार मधुकरराव चव्हाण, आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अॅड. कुलदिप(धिरज) पाटील, माजी खासदार डॉ.पद्मसिंह पाटील, जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे, आरोग्य संचालक डॉ.सतिष पवार, अतिरिक्त संचालक डॉ.अर्चना पाटील, सहायक संचालक डॉ.साधना तायडे, उपसंचालक आरोग्य सेवा, डॉ.व्ही.एम.कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ए.ई.रायते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एकनाथ माले, सहायक संचालक आरोग्य सेवा डॉ.बोरसे,डॉ. बाळकृष्ण कांबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकृष्ण पवार जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांच्यासह शेतकरी व आशा कार्यकर्त्यांसह आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांची मोठया संख्यने उपस्थिती होती. 
        डॉ.सावंत म्हणाले की, उस्मानाबाद जिल्हा माता आणि बालसंगोपनात राज्यात प्रथम आला आहे. लहान बालकांना बालपणात होणाऱ्या रोगांचे समुळ उच्चाटन करण्यासाठी या पेंटाव्हॅलंट लसीकरणाचा फार मोठा फायदा होणार असून ही पंचसूत्री राज्यात राबविण्यासाठी यांचा शुभारंभ करण्याचा मानही उस्मानाबाद जिल्ह्याला मिळाला आहे. अंगणवाडी सेविका व आशा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हे कार्य जिल्ह्यासह राज्यात राबविण्यात येणार आहे. या लसी करिता कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नसून ही लस सर्व बालकांना राज्य शासनाकडून मोफत देण्यात येणार आहे,याचा लाभ घ्यावा. यासाठी आरोग्य यंत्रणेमार्फत सर्वांना सर्व प्रकारच्या सोयी उपलब्ध करुन देण्यात येणार असून हा जिल्हा एक आदर्श जिल्हा म्हणून कार्यरत राहील, असेही गौरवोदगार डॉ.सावंत यांनी यावेळी काढले.
        यावेळी डॉ.सावंत यांनी प्राथनिधिक स्वरुपात काही बालकांना लसीकरण करण्यात आले.                                                       

Labels:

Sunday, 22 November 2015

पंढरीत आज कार्तिकी सोहळा

पंढरपूर : आध्यत्माची दक्षिण काशी असणा-या पंढरीनगरीनगरीत रविवारी कार्तिकीवारीचा भक्तीमय सोहळा रंगणार आहे. कार्तिक महिन्यातील शुध्द एकादशी अर्थात प्रबोधिनी एकादशीच्या मुहूर्तावर विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्यभरातून सुमारे पाच लाखांहून अधिक भाविक आज पंढरीत दाखल झाले आहेत.
पंढरीत दाखल झालेल्या भाविकाला पांडुरंगाच्या दर्शनाची मोठी उत्सुकता असली तरी तो सर्वप्रथम चंद्रभागेत आपले स्नान उरकून नंतर विठ्ठलाच्या दर्शनाला जात असतो. त्यामुळे या कार्तिकी यात्रेनिमित्त पंढरीत दाखल झालेले भाविक चंद्रभागेतील उपलब्ध पाण्यात आपले पवित्र स्नान उरकत आहेत. चंद्रभागेच्या वाळवंटात भाविकांची चांगलीच गर्दी झाली आहे. चंद्रभागा नदीचे वाळवंटही या कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने भाविकांनी फुलून गेल्याचा प्रत्यय येत आहे. पंढरीतील टाळ, मृदंग, बुक्का, गोपीचंदन, तुळशी माळ अशा विविध प्रासादिक वस्तूंना आध्यात्मामध्ये मोठे महत्त्व आहे. 
पांडुरंगाचा प्रसाद हा भाविकांना मिळावा या हेतूने मंदिर समितीच्या वतीने बुंदीचे लाडू बनविण्यात आले असून समितीतर्फे भाविकांसाठी संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप, पत्राशेड, दर्शन बारीची व्यवस्था करण्यात आली आहे, तर अनेक भाविक नामदेव पायरीचे दर्शन घेऊन तेथूनच पांडुरंगाचेही दर्शन घेत आहेत. 

Labels:

पंरडा येथे उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम

उस्मानाबाद :- जिल्हा उद्योग केंद्र, उस्मानाबाद पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योगजकाता विकास केंद्र, आयोजित सर्वसाधारण घटक योजनेतील सुशिक्षीत बेरोजगार युवक-युवती व महिलांसाठी मोफत अन्नधान्य व फळ प्रक्रियेवर आधारित उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम, परंडा येथे  24 नोव्हेंबर ते 22 डिसेंबर या कालावधीमध्ये आयोजित केला आहे.
            या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये संपुर्ण अन्नधान्य व फळ प्रक्रियेवर आधारित उद्योगसंधी, टमाटा सॉस, जाम जेली, केचप, ज्युसचे विविध प्रकार, मसाले प्रक्रिया उद्योगसंधी, सोया प्रक्रिया, आवळा प्रक्रिया, लोणचे, मंचुरियन, व्हेज, विविध प्रकार, पिझ्झाचे विविध प्रकार, इटालियन पास्ता व स्पॅगेटीचे विविध प्रकार, सुप व  विविध प्रकार, प्रात्यक्षिके व थेअरी मार्गदर्शन, खरेदी विक्री यांचे तंत्र, उद्योजकीय व्यक्तीमत्व विकास, विविध महामंडळ कर्ज व अनुदान विषयी योजनांची माहिती, दाळ प्रक्रिया,पापड प्रक्रिया, उद्योगसंधी,प्रकल्प अहवाल विक्री कौशल्य उद्योग नोंदणी,प्रकल्प भेटी, कर्ज प्रस्ताव दाखल करण्याविषयी माहिती, अन्न भेसळ व औषधी संबंधी कार्यालयाची माहिती, उद्योगाला लागणारे परवाने, लोगो परवाना, आयएसआय ट्रेड मार्क संबंधी माहिती, एमआयडीसीमधील भुखंड, एसएसआय रजिस्ट्रेशन बँक संबंधी माहिती, सुक्ष्म, लघू व माध्यम मंत्रालय भारत सरकार यांच्या योजना, जिल्हा उद्योग केंद्र व खादी ग्रामोद्योगाच्या विविध योजना, यशस्वी उद्योजक व तज्ञ मार्गदर्शन व अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.
        तरी इच्छूक युवती व महिलांनी प्रवेश अर्ज भरण्यासाठी व अधिक माहितीसाठी 23 नोव्हेंबर पर्यंत संपर्क साधावा. तसेच त्या रोजी प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. अधिक माहिती व अर्जासाठी कार्यक्रम समन्वयक किशोर कांबळे  मो.9881558846/ 7385709435 यांच्याशी पंचायत समिती, परंडा येथे संपर्क साधावा असे आवाहन पांडुरंग कांबळे, क. प्रकल्प अधिकारी, एम.सी.ई.डी. उस्मानाबाद यांनी केले आहे.

Labels:

खडकोणीच्‍या सरपंचपदी सचिन नलावडे

पांगरी (गणेश गोडसे) :- खडकोणी ता.बार्शी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी जय मल्हार ग्रामविकास आघाडीचे सचिन रामलिंग नलावडे यांची तर उपसरपंच पदीही त्याच आघाडीच्या सौ.राणी सचिन बगाडे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
नुकत्याच्या झालेल्या ग्रांमपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत जय मल्हार ग्रामविकास आघाडीने सात पैकी पाच जागा जिकून ग्रांमपंचायत आपल्या ताब्यात घेतली होती.सर्वसाधारण गटातील पुरुष प्रवर्गासाठी खुल्या असलेल्या सरपंच पदासाठी उच्चशिक्षित(एम.बि.ए) सचिन नलावडे यांचा व उपसरपंच पदासाठीही सौ.राणी बगाडे यांचाच एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी बिनविरोध निवडणूक पार पडल्याचे जाहीर केले.
यावेळी आश्विनी अशोक नलावडे, पूजा सुहास कोथमिरे,विक्रम मल्हारी जाधवर हे सदस्य हजर होते.संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात लक्षवेधी ठरलेल्या व मतदान यंत्र फोडल्यामुळे खडकोणी ग्रांमपंचायत निवडणुक चर्चेत होती॰येथे हायटेक प्रचार यंत्रणा,सभा,वचननामे आदीमुळे संपूर्ण बार्शी तालुक्याचे लक्ष लागले होते.
    बाळासाहेब बगाडे, पंढरी बगाडे, अशोक नलावडे, कल्याण नलावडे, अमित बगाडे, माधव नलावडे, गौतम नलावडे, बाबूशा नलावडे, दयानंद नलावडे, संजय बगाडे, मल्हारी जाधवर, श्रीकांत आगाव, दिलीप शिंदे, महादेव नलावडे, शहाजी बगाडे, डॉ.अभय नलावडे, डॉ.अनंत आगाव, भास्कर नलावडे, संतोष नलावडे, देवीदास नलावडे, बुवासाहेब आगाव, संदीप नलावडे, बाबा आगाव आदी उपस्थित होते.निवडीनंतर कार्यकर्त्यांनी कसल्याही प्रकारचा गाजा वाजा न करता अथवा फटाके न वाजवता फक्त एकमेकांना गुलाल लावून विजयोत्स्व अतिशय साध्या पद्धतीने साजरा केला.

Labels:

पांगरी ग्रा.पं. ची विशेष सभा संपन्‍न

पांगरी (गणेश गोडसे) :- पांगरी ता.बार्शी ग्रामपंचायतीची पहिली विशेष सभा शनिवार दि.21 रोजी विविध विषयांना मंजूरी देत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. विशेष सभेच्या अध्यक्षस्थाणी नूतन सरपंच युन्नुस बागवान हे होते. 
या सभेत संपूर्ण पांगरीत गावात ग्रामस्व्छता अभियान राबवणे,महिलांसाठी ठिकठिकाणी सुलभ शौचालयाची निर्मिती करणे,पांगरीत होत असलेले अन्यायकारक व अतिरिक्त भारनियमन कमी करणे,सिंगल फेजिंगच्या कामातील अडचणी दुर करून गावात सिंगल फेजिंगची योजना कार्यान्वित करण्यास विज वितरण कंपनीस भाग पाडणे,पांगरी पंचक्रोशतील रुग्णांच्या सोयीसाठी असलेल्या व सध्या शोभेचे बाहुले बनलेल्या पांगरी ग्रामीण रुग्णालयातील रिक्त जागा तात्काळ भरण्याबाबत पाठपुरावा करून तो प्रश्न निकाली काढणे,विविध ग्राम समित्यांचे पुंनर्गठण  करणे आदि ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. यावेळी सरपंच युन्नुस बागवान उपसरपंच रामभाऊ गाढवे ज्योती पोफळे,सुवर्णा बगाडे,गुणवंत गोडसे,रूपाली नारकर,गणेश जाधव,अंकुश लाडे,सुनंदा जाधव,विशाखा गायकवाड,महानंदा म्हसे,दिलीप जानराव,विश्वास देशमुख,रेश्मा कोतवाल,शुभांगी कुंभार यांच्यासह पंधरा सदस्य उपस्थित होते.ग्रामविकास अधिकारी वैभव माळकर,वरिष्ठ लिपिक मारुती म्हसे आदी यावेळी उपस्थित होते.

Labels:

Tuesday, 17 November 2015

सामाजिक न्याय भवनाचा गुरुवारी लोकार्पण सोहळा

उस्मानाबाद :- सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या वतीने बांधण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन या प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते गुरुवार, दि. 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे.  राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत  हे अध्यक्षस्थानी राहणार असून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
          मध्यवर्ती प्रशासकीय इमारत परिसरातील या इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यास जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारीही उपस्थित राहणार असल्याचे समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त  रवींद्र कदम आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बी.एम. थोरात यांनी कळविले आहे.

Labels:

बसच्‍या अपघातात तिनजण जखमी

पांगरी (गणेश गोडसे) :- पांगरी पोलिस हद्दीत पुणे-लातूर राज्य मार्गावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळांच्या बसच्या वेगवेगळ्या झालेल्या अपघातात तिघेजण जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.जखमीवर बार्शीच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पहिली घटना घारी ता.बार्शी येथील बसस्थानाकावर घडली.मारुती गोपीनाथ कातकडे वय 36 रा.ता.गंगाखेड,जि.परभणी यांनी पांगरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,ते त्यांच्या ताब्यातील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळांची एम.एच.20.बि.एल.2976 ही बस नालासोपाराहुन बार्शी-पांगरी मार्गे लातूरकडे जात असताना समोरून बार्शीकडे जाणार्‍या दुचाकी क्रमांक एम.एच.13 ए.एफ.272 या दुचाकीची एकमेकास धडक बसली.त्यात शिवाजी मनमथ होणराव वय 45 व निशा मनमथ होणराव वय 47 अशी अपघातात जखमी झालेल्या पती-पत्नीची नांवे आहेत.
  दुसर्‍या घटनेत शिदेश्वर हरिश्चंद्र जाधवर वय 32 रा.धोत्रे ता.बार्शी यांनी फिर्याद दिली आहे.त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,ते त्यांच्या दुचाकी क्रमांक एम.एच.42.ई.3380 या दुचाकीवरून जात असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या एम.एच.20 बि.एल.3165 ह्या एस.टी.बसच्या चालकाने त्याच्या ताब्यातील बस भरधाव वेगात चालवून दुचाकीस पाठीमागून जोरची धडक दिली.त्यात दुचाकीचे दहा हजाराचे नुकसान झाले आहे.अपघातांनंतर बस चालक फरार झाला आहे.हयगायीने व अविचाराने बस चालवून अपघात करून जखमी करण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी बस चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.अधिक तपास पांगरी पोलिस करत आहेत.

Labels:

तरुणांच्‍या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्‍नशील : विक्रम सावळे

पांगरी (गणेश गोडसे) :- पाठीवर कौतुकाची थाप टाकून समाजसेवेचे बळ देण्यासाठीच आम्ही घरोघरी व गावोगावी जावून सत्कारर्मूर्तीचा सन्मान करतो तसेच तरुणांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहू असे प्रतिपादन बार्शी तालुका विकास मंचचे अध्यक्ष विक्रम सावळे यांनी केले.ते पांगरी ता.बार्शी येथे नूतन सरपंच,उपसरपंच व विविध क्षेत्रातील नामांकित लोकांच्या सत्कार समारंभ कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.
सावळे पुढे बोलताना म्हणाले की समाजासाठी करण्यासाठी खूप कांही आहे.ग्रामीण भागातील अनेकजण आपल्या कर्तुत्वाने पुढे गेलेले आहेत.सरपंच युन्नुस बागवान,उपसरपंच रामा गाढवे,पत्रकार गणेश गोडसे यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी विकास मंचाचे उपाध्यक्ष गंगा आहिरे,महारुद्र जाधव,संजय हिंगमिरे,पि.एस.स्वामी,अरुण नारकर,सुनील मेंडके,मोरे मेजर,शकिल बागवान,सुखदेव नारायनकर,धनंजय तौर,अजित पोफळे,भीमराव कांबळे,ईसुब कोतवाल,मंजूर शेख,सादिक पठाण,मोती बागवान आदि उपस्थित होते.आभार महारुद्र जाधव यांनी तर सूत्रसंचालन नागेश गाभणे यांनी केले.

Labels:

पोलिस निरीक्षक सालार चाऊस यांचा सत्‍कार

मंगळवेढा (समाधान फुगारे) :- मंगळवेढा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सालार चाऊस यांनी शहरातील व तालुक्यातील गणेश उत्सव, नवरात्र महोत्सव, ग्रामपंचायत निवडणुका चांगल्या प्रकारे पार पडल्यामुळे जयमल्हार क्रीडा मंडळाकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.
      मंगळवेढा तालुक्यात गेल्या ३० वर्षापासून जयमल्हार क्रीडा व सामाजिक आणि संस्कृतिक विषयक काम करत असून तालुक्यात निरनिराळ्या क्षेत्रात काम करणार्‍या युवकासह प्रशासनात कामकरणार्‍या अधिकार्‍यांचेही कौतुक व विशेष कार्या बद्दल त्यांचा सत्कार करण्यात येतो.
       पोलिस निरीक्षक सालार चाऊस यांनी मंगळवेढा पोलिस स्टेशनचा पदभार स्वीकारल्या पासून त्यांनी आपल्या कामाचा एक वेगळा ठसा उमठावला आहे. गणपती उत्सव नवरात्र महोत्सव, ग्रामपंचायत निवडणुका,दीपावली सन अशा वेगवेगळ्या ठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त देवून त्यांनी जनतेला एक वेगळ्या प्रकारे दिलासा दिला आहे.
         आठवडा बाजार गर्दी पासून ते मंडळाच्या ठिकाणी चालणारे जुगार,मटका,गुटखा आदि गोष्टींवर त्यांनी वचक ठेवला आहे. शहरातील वाहतूक नियंत्रण असो अथवा गावागावातील भांडणे तंटे मिटवून वेगळा ठसा त्यांनी निर्माण केला आहे. 
       यावेळी भीमराव मोरे, शिवाजी पवार, मारुती वाकडे, सुजीत कदम, जयराम आलदर, बलवान वाकडे आदि नागरिकांनी पोलिस निरीक्षक सालार चाऊस यांचा सत्कार करण्यात आला.

Labels:

हिंदू ह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

उस्मानाबाद : हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त छत्रपती शिवाजी चौकात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कामगार सेनेचे प्रणिलसिंह रणखांब, सेनेचे माजी शहरप्रमुख प्रवीण कोकाटे, अक्षय ढोबळे, नवनाथ शेरकर, अजय धोंगडे, प्रितम खळदकर, सचिन लाकाळ, युवराज राठोड, वैभव वाघ, सचिन बनसोडे आदी उपस्थित होते. 

Labels:

कारीत शेतक-याची आत्‍महत्‍या

पांगरी (गणेश गोडसे) :- पांगरी भागाला लागलेले शेतकरी आत्महत्याचे लोन कांही केल्या थांबण्यास तयार नसून सततचा दुष्काळ,नापिकी व पाण्याचे दुर्भिष्य याला कंटाळून एका शेतकर्‍याने राहत्या घरी गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल दि.16 सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास कारी ता.बार्शी येथे घडली.
पांडुरंग अर्जुन शिंदे वय 60 असे साडीने गळफास लावून घेऊन स्वत: आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याचे नांव आहे.कुमार शिवाजी शिंदे याबाबतची खबर पांगरी पोलिसात दिली आहे.आत्महत्याग्रस्त पांडुरंग शिंदे यांचे सोयाबीन पीक पूर्णता: वाया गेले होते.त्यातून त्यांना उत्पन्न तर सोडाच पण झालेला साधा खर्चही निघाला नव्हता.त्यामुळे अलीकडील काही दिवसापासून निराश होते.काही दिवसापूर्वी त्यांनी पेरलेली ज्वारी पिकाची उगवणही झालेली नाही.कर्जाचा डोंगर वाढत असल्यामुळे कुटुंब चालवताना त्यांना पैशाची चणचण भासत होती.घर खर्च कसा चालवायचा या विवंचनेत असल्यामुळे त्यांनी अखेर काल राहत्या घरी गळफास लावून घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
 मयत शिंदे यांना तिन एकर शेती होती.त्यांच्या पश्चात दोन मुली,एक मुलगा,पत्नी असा परिवार आहे.पांगरी पोलिसात अकस्मात मयत म्हणून गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास हवालदार धननापा शेटे करत आहेत.

Labels:

विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक अशोक सिंघल यांचे निधन

नवी दिल्ली : विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांचे आज दुपारी निधन झाले आहे. गुडगाव येथील मेडिसिटी रुग्‍णालयात त्‍यांनी वयाच्‍या 89 व्‍या वर्षी अखेरचा श्र्वास घेतला. 
   गेल्या अनेक महिन्यांपासून अशोक सिंघल आजारी होते. त्यांच्यावर गुडगावमधल्या मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. आज वयाच्या ८९व्या वर्षी त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. तब्बल २० वर्ष अशोक सिंघल विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय प्रमुख होते.  अयोध्येतल्या राम मंदिर आंदोलनातले एक प्रमुख शिलेदार म्हणून अशोक सिंघल यांनी काम केलं.  बाबरी मशिदच्या उद्धवस्त केल्याप्रकरणी त्यांचावर खटलाही भरण्यात आला. 


Labels:

पांगरीच्‍या विकासासाठी तरुणांनी निर्माण केली एकजूट

पांगरी (गणेश गोडसे) :- पक्ष्यांने आकाशात कितीही उंच भरारी घेतली तरी त्याला ओढीपोटी शेवटी जमिनीवर यावेच लागते त्याप्रमाणेच माणूस कितीही विखुरला तरी त्यालाही आपल्या मातीची ओढ असतेच. याचाच प्रत्यय पांगरी भागातील अनेक गांवामधील जुन्या जाणत्या लोकांना आला आहे. जगभरात उद्योग धंदे, व्यवसाय, नौकरी आदी माध्यमातून पांगरी परिसरातील विविध गावातील तरुण विखुरलेले होते. मात्र ज्या मातीत आपण जन्माला आलो त्या मातीशी इमान राखत आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून उच्च पदस्थ युवकांनी गैर राजकीय पद्धतीने एकीची मूठ आवळत समाजसेवी संस्थेची स्थापना करत सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या प्रयोगाला नुकतीच सुरुवात केली आहे.
आज समाजात तरुणाच्या नावाने खडे फोडण्याचे काम होत असतानाच आमच्यात अजूनही सामाजिक भावना,संवेदना जागृत आहेत याचा संदेश देणारे तरुण आजच्या समाजातही असल्याचे दिसून येत आहे.पांगरी भागातील विविध क्षेत्रातील नामांकित उद्योगी तरुणांची बैठक  नुकतीच पार पडली.माणुसकी हरवत चाललेला समाज,दिशाहीन होत असलेला तरुण,आरोग्य,वीज,पाणी आदि विषयांवर चर्चा होऊन यात बादलाव आणण्यासाठी पांगरी पंचक्रोशी युवा मंचची स्थापना करून त्याच्या माध्यमातून विविध गांवात सामाजिक उपक्रम राबवण्याचा संकल्प करण्यात आला.यावेळी रूपाली नारकर,निर्माते दिग्दर्शक अशोक घावटे,माहिती व जनसंपर्क अधिकारी इरशाद बागवान,सुखदेव नारायणकर,रेल्वेचे सरकारी वकील श्रीधर जावळे,उद्योगपती शितल जानराव,डॉ.अरिफ शेख,वन अधिकारी रामदास घावटे,लक्ष्मण घावटे,पांडुरंग राऊत,शाम शिकेतोड,धनंजय तौर,आनंद मोरे,दादा जानराव,रवी माळी,बाळू जानराव,दत्ता घावटे,धनंजय झालटे,परवेझ काजी,पिंटू वासकर,पत्रकार गणेश गोडसे ,आबा घावटे यांच्यासह विविध क्षेत्रातील नामवंत उपस्थित होते.

Labels:

Monday, 16 November 2015

ज्‍येष्‍ठ अभिनेते सईद जाफरी यांचे निधन

मुंबई :-  ज्‍येष्‍ठ अभिनेते सईद जाफरी यांचे आज सोमवार रोजी ८६ व्या वर्षी वयाच्‍या निधन झालं. त्‍यांच्‍या पश्‍चात  मीरा, जिआ आणि सकीन या तीन मुली आहेत. 
सईद जाफरी यांनी हिना, शतरंज के खिलाडी, दिल, किशन कन्हैय्या, घर हो तो ऐसा, राजा की आएगी बारात, मोहब्बत, आंटी नंबर वन, चश्मे बद्दूर, मासूम, किसी से ना कहना, मंडी, मशाल, राम तेरी गंगा मैली, राम लखन, अजूबा यांसारख्या चित्रपटांत वेगवेगळ्या भूमिका साकारल्‍या आहेत. राजकुमार यांच्यासोबत त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले.  'ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर' हा पुरस्कार मिळवणारे जाफरी हे पहिले भारतीय ठरले.

Labels:

इफ्फी 2015 च्या तयारीचा सचिवांकडून आढावा

पणजी -: गोव्यात होणा-या 46 व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल ऑफ इंडिया इफ्फी अर्थात आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी माहिती आणि प्रसारण सचिव सुनील अरोरा आणि गोव्याचे मुख्य सचिव आर. के. श्रीवास्तव आणि गोवा एंटरटेनमेंन्ट सोसायटीचे उपाध्यक्ष दामोदर नाईक यांनी आढावा बैठकीच्या दोन फे-या घेतल्या.
       विविध ठिकाणच्या तयारीची आम्ही व्यक्तीश: भेट देऊन पाहणी करून आढावा घेतल्याची माहिती अरोरा यांनी आज पणजी इथे पत्रकारांना दिली. उद्‌घाटन आणि समारोपसत्राची व्यवस्था, उद्‌घाटनपर चित्रपट, इंडियन पॅनोरमा विभाग, प्रतिनिधी आणि प्रसारमाध्यमांच्या प्रसिध्दीसाठीच्या व्यवस्थेचा यात समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
        गेली 11 वर्ष कला, चित्रपट आणि प्रेक्षक यांच्यातल्या उत्तम मिलाफासाठी गोवा हे समर्पक स्थळ ठरलं आहे. नवनवीन आणि उत्कंठापूर्ण बाबी घेऊन चित्रपट रसिकांच्या स्वागतासाठी हा चित्रपट महोत्सव तयार असल्याचे अरोरा म्हणाले. उद्‌घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिध्द चित्रपट अभिनेते अनिल कपूर उपस्थित राहणार असून ऑस्कर सन्मानप्राप्त संगीत दिग्दर्शक ए.आर.रेहमान समारोपाला हजर राहणार असल्याचं माहिती आणि प्रसारण सचिवांनी सांगितलं. इफ्फी 2015 च्या जागतिक सिनेमा विभागाच्या विविध विभागात 89 देशातल्या 187 चित्रपटांचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे. स्पेनवर मुख्य लक्ष केंद्रीत राहणार आहे. भारतीय पॅनोरमा विभागात फिचर आणि नॉनफिचर गटात भारतातले 47 प्रेक्षणीय सिनेमा पाहता येतील.
             The Man Who Knew Infinity या मॅथ्यू ब्राऊन दिग्दर्शित सिनेमात ख-याखु-या मैत्रीची कथा आहे. 1913 मध्ये रामानुजन या भारतीय गणितज्ञानं ट्रिनीटी कॉलेज केंब्रिजपर्यंत प्रवास केला तिथे त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर जी.एच.हार्डी यांच्याशी त्यांचे मित्रत्वाचे नाते जुळले. प्रोफेसर हार्डी यांनी रामानुजन यांच्यातली गणिती बुध्दीमत्ता जगासमोर आणण्यासाठी मदत केली.
    नवव्या फिल्म बाजारामध्ये चित्रपट लॅब, को ऑपरेशन मार्केटसह विविध टप्प्यातल्या 150 चित्रपट प्रकल्पांवर भर दिला जाईल. निर्मिती आणि वितरण क्षेत्रातले सहकार्य वाढविण्याचा फिल्म बाजाराचा उद्देश आहे. 20 ते 24 नोव्हेंबर दरम्यानच्या या फिल्म बाजारमध्ये 38 देशातले प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
        इफ्फीसाठी गोवा हे कायमस्वरुपी ठिकाण जाहीर करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचं दामोदर नाईक यांनी स्वागत केलं.  आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव प्रेक्षणीय ठरावा यासाठी सर्व सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.  हा महोत्सव यशस्वी ठरावा. यात सहभागी होणाऱ्या 7000 प्रतिनिधींसाठी संस्मरणीय ठरावा यासाठी राज्य सरकारची जय्यत तयारी असल्याचे मुख्य सचिव आर. के. श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले.

Labels:

'प्रकाशाचे आनंदगाणे' कार्यक्रमात रसिक मंत्रमुग्ध

उस्मानाबाद :- छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या प्रकाशाचे आनंदगाणे या कार्यक्रमाने उस्मानाबादकरांना तब्बल तीन तासाहून अधिक काळ खिळवून ठेवले. भावगीत, भक्तीगीत आणि कवितांचा त्रिवेणी संगम, बासरी, तबल्याची दिलखेचक जुगलबंदी, नव्या दमाच्या गझलकारांचे दमदार सादरीकरण, ताल धरायला भाग पाडणारा नृत्याविष्कार, अशा एकाहून एक सरस कलाकृतींच्या अनुभूतीचा प्रत्यय रविवारी उस्मानाबादकरांनी अनुभवला. निमीत्त होते उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघ आणि उस्मानाबाद व्हॉट्सअॅप ग्रुपच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या सदाबहार संगीत मैफलीचे. 
      प्रारंभी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते नटराजाच्या मूर्तीचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, शिवसेनेचे लोकसभा सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश पोतदार यांची प्रमुख उपस्थिती होती.
       गायक श्रीराम पोतदार, प्रा. राहुलदेव कदम, आसावरी जोशी या त्रयिंनी उपस्थितांना अक्षरश: आपल्या स्वरांच्या पाशात बांधून ठेवले. कधी पंडित भीमसेन जोशी यांचा अभंग, तर कधी नवोदित कवितांना दिलेला स्वरसाज उपस्थितांना भारावून गेला. पंडित भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, सुरेश वाडकर, जितेंद्र अभिषेकी यांच्या बाजाची पोतदार यांनी केलेल्या मिमिक्रीमुळे सभागृहात हास्याचे लोट उसळले होते. प्रा. राहुलदेव कदम यांनी सादर केलेल्या संतोष नारायणकर, सतीश दराडे, वैभव देशमुख आणि शेखर गिरी यांच्या गझलांना नाट्यगृहातील रसिकांनी डोक्यावर घेतले. आसावरी जोशी यांच्या शुक्राची चांदणी या लावणीने कार्यक्रमात अधिक उत्साह भरला. शेखर गिरी आणि सतीश दराडे या तरूण गझलकारांनी आपल्या दमदार रचना सादर करून उपस्थितांना दखल घेण्यास भाग पाडले. व्हायोलीन शिवाजी पोतदार, सिंथ सिध्दार्थ सूर्यवंशी तर तबल्याची साथसंगत संतोष लोमटे यांनी केली. सलग चार तास सुरू असलेल्या या ऐतिहासिक कार्यक्रमाचे प्रभावी निवेदन कवी रविंद्र केसकर यांनी केले. 
      कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश पोतदार, उपाध्यक्ष देवीदास पाठक, सरचिटणीस विशाल सोनटक्के,  नगरसेवक पृथ्वीराज चिलवंत, प्रदीप मुंडे, सोमनाथ गुरव, दत्ता कुलकर्णी, डॉ. धीरज वीर, सुरज साळुंके, अमित मोदाणी, अनिल मंजुळे, अॅड. नितीन भोसले, प्रशांत पाटील, बलराज रणदिवे, कैलास पाटील, पंकज पाटील, इंद्रजित देवकते, दै. सकाळचे सहयोगी संपादक दयानंद माने, सयाजी शेळके, कमलाकर कुलकर्णी, संजय मंत्री, हुंकार बनसोडे, अमर भातलवंडे, राहुल कुलकर्णी, अक्षय ढोबळे, अनिल केसकर, दर्शन कोळगे यांच्यासह पत्रकार संघाचे पदाधिकारी, सदस्य आणि व्हॉट्सअॅप गु्रुपचे सदस्य, तसेच पालिकेचे अभियंता भारत विधाते, स्वच्छता विभागातील कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
बासरी-तबला जुगलबंदीने रसिकांना जिंकले
दोन्ही डोळ्यांनी अंध असलेला गुणी तबलावादक खंडेराव मुळे आणि देगलूर येथील बासरीवादक ऐनोद्दीन वारसी यांनी कार्यक्रमावर आपली छाप टाकली. बासरी आणि तबल्याच्या जुगलबंदीने या ऐतिहासिक कार्यक्रमात रसिकांच्या मनावर राज्य केले. दोघांची जुगलबंदी सुरू असताना सभागृहात टाळ्यांचा पाऊस कोसळत होता. या दोघांच्या जुगलबंदीचे क्षण टिपण्यासाठी अनेक रसिक हातातील मोबाईल उंचावून हा क्षण कॅमेराबंद करीत होते. 
उस्मानाबाद शहरात फोर-जी वाय-फाय सुरू होणार
प्रकाशाचे आनंदगाणे कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी उस्मानाबाद शहरात लवकरच रिलायन्स कंपनीच्या सहकार्याने फोर-जी वाय-फाय सेवा सुरू केली जाणार असल्याचे जाहीर केले. रिलायन्स कंपनीने नांदेड जिल्ह्यातील इस्लामपूर शहरात वाय-फाय सुरू झाल्यानंतर आता उस्मानाबादमध्येही 20 हॉटस्पॉट कार्यान्वित करून संपूर्ण शहर वाय-फायने जोडले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार संघाच्यावतीने उस्मानाबादकरांसाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे कौतूक केले. तसेच पत्रकार संघाला समाजोपयोगी उपक्रम राबविण्यासाठी एक लाख रूपयांची मदतही त्यांनी यावेळी जाहीर केली.
सोशल मिडीयातून सकारात्मक संदेश
पत्रकार संघ आणि उस्मानाबाद व्हॉट्सअॅप ग्रुपच्यावतीने आयोजित केलेला हा कार्यक्रम ऐतिहासिक असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. नाट्यगृहाच्या अभावामुळे निर्माण झालेली सांस्कृतिक पोकळी या कार्यक्रमाने भरून काढली. उत्कृष्ट ध्वनीसंयोजक व्यवस्था, पाहताक्षणी भुरळ पाडेल अशी प्रकाशव्यवस्था, रसिकांना पुरेपूर आनंद मिळावा यासाठी व्हॉट्सअॅप ग्रुपच्या सदस्यांनी घेतलेली मेहनत, पत्रकार संघाचे पदाधिकारी आणि सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिलेले योगदान कौतूकास्पद असल्याची भावना सभागृहातून बाहेर पडणारा प्रत्येकजण व्यक्त करीत होता. पुढील काळातही या नाट्यगृहात सांस्कृतिक चळवळीला पूरक कार्यक्रमाचे आयोजन होत रहावे, अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली. 

Labels:

धानोरे ग्रामपंचायतीच्‍या सरपंचपदी सुमंत गोरे

पांगरी (गणेश गोडसे) :- धानोरे (द) ता. बार्शी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राऊत गटाच्या यमाई देवी ग्रामविकास आघाडीचे सुमंत गोरे यांची तर उप-सरपंच पदीही त्याच आघाडीच्या लक्ष्मी पाटील यांची बिनविरोध निवड झाली.निवडीवेळी सुमंत गोरे,संतोष शिंदे,लक्ष्मी पाटील,शिवानी जमदाडे,मैनाबाई लोहार,सतीश लोहार,पद्मिनी झोंबाडे हे सातही नवनियुक्त सदस्य हजर होते.सरपंच व उपसरपंच पदासाठी प्रत्येकी एकाच उमेदवारी अर्ज दाखल झाल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी बिनविरोध निवडी झाल्याची घोषणा केली.
यावेळी पिंटू वडगणे,रमेश शिंदे,भगवान गोरे,माजी सरपंच पाटील,प्रभाकर चव्हाण,रामचंद्र गोरे,संजय गोरे,तानाजी चव्हाण,नवनाथ चव्हाण,जयवंत गोरे,श्रीमंत जमदाडे,शंकर विभूते,विशाल विभूते,शिवप्पा जमदाडे,उतरेश्वर जमदाडे,धंनंजय गोरे,नवनाथ गोरे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
निवडिंनंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत व गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला.नूतन पदाधिकार्‍यांना व एकमेकांना  पेढे भरवत आनंद व्यक्त केला.यावेळी सरपंच,उप-सरपंच यांचा व सर्व सदस्यांचा ग्रामस्थांनी सत्कार केला.

Labels:

महामंडळाच्या माध्यमातून सामाजिक न्याय देण्याचा प्रयत्न

        महाराष्ट्र शासन सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून समाजातील विविध घटकांसाठी काम करत असते. शासनाच्या योजना संबंधीत घटकांपर्यत पोहोचवून त्यांना सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या उभारी देण्यासाठी विविध विभाग आणि महामंडळे तसेच यंत्रणांच्या माध्यमातून राज्य शासन कार्यरत असते. विविध महामंडळांच्या कामाची आणि योजनांच्या अंमलबजावणीसंदर्भात त्यांनी केलेल्या कामाची ही माहिती...
महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ
        महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ हा शासनाचा उपक्रम असून राज्यातील अपंग व्यक्तींला स्वयरोजगारासाठी, आर्थिक साहाय्य उपलब्ध व्हावे, समाजातील दुर्बल, दुर्लक्षीत अपंगाच्या जीवनातील अंधकार दुर करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणावे,  या उद्देशाने स्वतंत्र महामंडळाची  स्थापना दि.27 मार्च 2002 रोजी  करण्यात आली. 
         या महामंडळाच्या वतीने अपंगांच्या कल्याणासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी विविध योजना राबविण्यात येतात.1.थेट कर्ज योजना  2.मुदती कर्ज योजना 3.वाहन कर्ज योजना 4.महिला समृध्दी कर्ज योजना  5.सुक्ष्म पथ पुरवठा कर्ज योजना 6.शैक्षणिक कर्ज योजना 7.कृषी संजीवनी कर्ज योजना
          या महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाच्या वतीने मागील वर्षात जिल्हा कार्यालयात 80 प्रकरणे प्राप्त झली होती 75 प्रकरणे मुख्यालयास पाठविले व 40 प्रकरणे मंजुर झाली आहेत.गेल्या वर्षात 33 लाभार्थीना रूपये  4602500 कर्ज वितरीत झाले आहेत. 
इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ
        महाराष्ट्र  राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ हा शासनाचा उपक्रम असून राज्यातील इतर मागास वर्गीय समाजातील व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी,त्यांच्या संर्वागीन कल्याण व विकासाठी विविध योजना राबवून अल्प दराने वित्त पुरवठा करणे व त्यांचा आर्थिक स्तर उंचावणे हे महामंडळाचे उद्दीष्ट आहे.महामंडळाची स्थापना 23 एप्रिल 1999 रोजी झाली आहे. 
महामंडळाकडून राबविण्यात येणाऱ्या योजना पुढील प्रमाणे आहेत. 1. थेट कर्ज योजना. 2. बीज भांडवल योजना, 3. मार्जिन मनी योजना 4. मुदती कर्ज योजना 5. सुक्ष्म पथ पुरवठा 6. शैक्षणिक कर्ज योजना.7. स्वर्णिमायोजना, 8.महिला समृध्दी योजना.
            मागील वर्षात बीज भांडवल योजने अंतर्गत 47 कर्ज प्रस्ताव बॅकेकडे पाठविले होते. त्यातील मंजुरी मिळालेल्या 14 लाभार्थ्याना कर्ज वाटप केले आहे. मुदत कर्जयोजने अंतर्गत 10 व शैक्षणिक कर्ज योजने अंतर्गत 11 लाभर्थ्याना कर्ज वाटप केले आहे. बीज भांडवल योजने अंतर्गत 14 लाभार्थ्यांना 7 लाख 40 हजार कर्ज वाटप केले आहे. मुदत कर्ज योजने अंतर्गत 10 लाभार्थ्यांना 16 लाख 32 हजार पाचशे रुपये कर्ज वाटप केले आहे. शैक्षणिक कर्ज योजने अंतर्गत 11 लाभर्थ्याना 3 लाख 64 हजार 750 रुपये कर्ज वाटप केले आहे. अशा प्रकारे एकूण 35 लाभार्थ्याना 27 लाख 57 हजार 250 कर्ज वाटप करण्यात आले.
    मागील वर्षात महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाकडून रूपये 12 लाख 45 हजार 942
इतकी वसुलीही करण्यात आली आहे.
खादी व ग्रामोद्योग विकास मंडळ
              राज्यातील खादी व ग्रामोद्योग विकासासाठी महाराष्ट्र शासनाने सन 1962 मध्ये राज्य विधान मंडळाच्या कायद्यानुसार या मंडळाची स्थापना केली असून ग्रामीण भागातील उद्योजक व ग्रामीण कारागीरांना त्यांचे उद्योगासाठी अर्थसहाय उपलब्ध करून देवून रोजगाराच्या संधी मिळवून देणे हे या मंडळाचे उद्दीष्ट आहे. 
     सध्या या मंडळामार्फत खालील प्रमाणे योजना राबविण्यात येतात.
1.पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम:-सन 2008 पासून केंद्रीय लघु व सुक्ष्म मंत्रालयामार्फत चालविण्यात येणारी ही योजना महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामउद्योग मंडळाच्या मार्फत राज्यामध्ये राबविण्यात येते. ग्रामीण भागातील कारागीर,बेरोजगार तरूणांना स्वंयारोजगाराची संधी स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देणे व खेडयापाडयातुन शहराकडे येणाऱ्या बरोजगार युवकांचे स्थनांतर थांबविणे तसेच ग्रामीण भागातील रोजगार वाढीस मदत करणे हा या योजनेचा उद्देश आहे. 
योजनेचे कार्यक्षेत्र:-फक्त ग्रामीण भागासाठी खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत ही योजना राबविली जाते.
प्रकल्प मर्यादा:-उत्पादन प्रक्रीया असलेल्या उद्योगासाठी जास्तीत जास्त प्रकल्प मर्यादा रू 25 लाखापर्यत. सेवा उद्योगासाठी जास्तीत जास्त प्रकल्प मर्यादा रू.10 लाखापर्यत अशी आहे. 
आर्थिक मदतीचे स्वरूप:- सर्वसाधारण प्रवर्गातील स्वयंगुंतवणुक प्रकल्प किंमतीच्या 10 टक्के,  बॅंक कर्ज- 90 टक्के आणि मार्जिन 25 टक्के. अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती / अल्पसंख्याक / इतर मागासवर्ग /महिला /माजी सैनिक /अपंग इत्यादीसाठी स्वयंगुंतवणुक प्रकल्प किंमतीच्या 5 टक्के,  बॅंक कर्ज 95 टक्के व मार्जिन 35 टक्के.
सन 2014-15 मध्ये पंतप्रधन रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत दिलेल्या लक्षांकापैकी खालीलपैकी प्रमाणे पुर्तता झालेली असून त्याचा तपशील पुढील प्रमाणे आहे.
सन 2014-15 लक्षांक -भौतिक 50, आर्थिक 67.36, पुर्तता- भौतिक 46,आर्थिक 88.89, निर्माण झालेला रोजगार 268.
विशेष घटक योजना :-शासनाच्या 20 कलमी कलम 11 अ अन्नवये अनुसूचित जाती व नवबैाध्द समाजातील दारिद्रय रेषेखालील कुटुंबाना रोजगार उपलब्ध करून देवून त्यांना दारिद्रय रेषेच्या वर आणण्याकरीता शासनाचे माध्यमातुन मंडळ राज्यात या कार्यक्रमाची अंमलबजावणी करीत आहे.अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील छोटे छोटे व्यवसाय करणाऱ्या लाभधारकांना त्यांच्या उद्योग उभारणीत राष्ट्रीयकृत बॅकामार्फत अर्थसहाय करूण देण्यात येते. सदर कर्जावर मंडळामार्फत विशेष केंद्रीय सहायातून एका लाभार्थ्यास रू.10000/-पर्यत अथवा मंजूर कर्जाच्या 50 टक्के यापैकी कमी असणारी रक्कम लाभधारकास अनुदान स्वरूपात देण्यात येते.
लाभार्थ्याची पात्रता :- लाभार्थी दारीद्रय रेषेच्या कुटुंबातील असावा,तसेच त्यांचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी रू.40500/- व शहरी भागासाठी 51500/- असणे गरजेचे आहे. लाभार्थी अनुसूचित जाती व नवबौध्द समाज घटकातील असणे या योजनेसाठी आवश्यक आहे. प्रामुख्याने पारंपारीक उद्योग करणारे कारागीर,छोटे व्यवसायीक जसे की, सुतार,लोहार,वाख दोरखंड,वेत बांबू, झाडू फडे तयार करणे,तसेच टेलरिंग,सायकल दुरूस्ती, मोबाईल दुरूस्ती,या उद्योगासाठी या योजनेतून लाभ देण्यात येतो.
सन 2014-15 मध्ये विशेष घटक योजनेखाली या कार्यालयाने पुढील प्रमाणे कामकाज केलेले आहे.लक्षांक –भौतिक 132, आर्थिक-13.20, पुर्तता- भौतिक 93,आर्थिक 9.30, निर्माण झालेला रोजगार 140.
मधमाशापालन योजना :-
मराठवाड विकास कार्यक्रमा अंतर्गत उस्मानाबाद जिल्हृयामध्ये या योजने अंतर्गत सन 2010-11 ते 2014-15 या आर्थिक वर्षात 49 उद्योजक व शेतकरी यांना महाबळेश्वर व कृषी विद्यापीठ परभणी येथे मधमाशा पालन उद्योजकांचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे.प्रशिक्षण दिलेल्या शेतकऱ्यांना 690 मध पेटया वाटप केल्या असून सदर कालावधीत 15870 कि. गँम एवढया मधाचे उत्पादन झालेले आहे. मध उद्योगासाठी उस्मानाबाद जिल्हृयात हवामान पोषक आहे. शेतकऱ्यांच्या शेतीसाठी हा उद्योग पूरक असून पिक वाढीसाठी परागीभवनामुळे उत्पादनात वाढ हाऊ शकते.  ****                
दिलीप वाठोरे ,लिपीक नि टंकलेखक, 
 जिल्हा माहिती कार्यालय, उस्मानाबाद

Labels:

कारीच्या सरपंचपदी चंद्रकला विधाते

पांगरी (गणेश गोडसे) :- कारी ( ता. बार्शी ) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी तुळजाभवानी ग्रामविकास आघाडीच्या चंद्रकला विनायक विधाते, तर उपसरपंचपदी शरदभाऊ हवेली ग्रामविकास आघाडीचे राजेंद्रकुमार वसंत गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली .सरपंच पदासाठी एक अर्ज व उपसरपंच पदासाठी एक अर्ज दाखल झाल्यामुळे ही निवड बिनविरोध झाली .
यावेळी ग्रामपंचायत सदस्य खासेराव विनायक विधाते , देवेंद्र रामलिंग डोके , विजयसिंह श्रीरंग विधाते , मेघा प्रभाकर गादेकर , राजेंद्रकुमार वसंत गायकवाड , दैवशाला श्रीकांत काळे, मंजुषा पद्माकर करळे ,ज्योति बालाजी लोहार , इंदुबाई महादेव हिप्परकर , अंजुम रिजवान सय्यद , उमेश दत्तू वाघमारे , ज्ञानेश्वर अर्जून माळी , चंद्रकला विनायक विधाते हे उपस्थित होते कारी ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये चार पँनल मध्ये लढत होऊन शरभाऊ हवेली ग्रामविकास आघाडीचे सहा सदस्य , तुळजाभवानी ग्रामविकास आघाडीचे चार , जय खंडेराया ग्रामविकास आघाडीचे तिन , तर जय खंडेराया ( तिसरी आघाडी ) ग्रामविकास आघाडीचा पूर्ण धुव्वा ऊडाला होता . त्यामुळे कारी ग्रामपंचायतीमध्ये त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्याने कुठल्या आघाडीची युती होणार आणि सरपंच कोण होणार या चर्चेला गावात उधाण आले होते . यामध्ये शरदभाऊ हवेली ग्रामविकास आघाडी व तुळजाभवानी ग्रामविकास आघाडी यांची युती होऊन चाळीस वर्षाचा वाद मिटवत हे दोन पँनल सत्तेवर आले आहेत.
यामध्ये पहिले आडीच वर्षे सरपंच पद हे तुळजाभवानी ग्रामविकास आघाडीकडे राहणार तर उपसरपंच पद हे शरदभाऊ हवेली ग्रामविकास आघाडीकडे राहणार आहे तर दुसऱ्या आडीच वर्षात सरपंच पद शरदभाऊ हवेली ग्रामविकास आघाडीकडे तर उपसरपंच पद हे तुळजाभवानी ग्रामविकास आघाडीकडे आहे आशा प्रकारे ही पदे विभागून युति केली आहे .
निवड पारपडल्यानंतर दोन्ही आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आतिषबाजी करत  गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा केला .यावेळी तुळजाभवानी ग्रामविकास आघाडीचे माजी सभापती विनायक ( आबा ) विधाते , तंटामुक्ती अध्यक्ष अनिल कावळे , बाळासाहेब देसाई , संपत शिंदे , इसाक सय्यद गुरूजी ,प्रविण डोके ,खासेराव विधाते, सचिन पाटील , सचिन लोहार , रिजवान सय्यद , मनोज माळी , भारत कदम , बाळासाहेब जगताप , विपुल घावटे , शरदभाऊ हवेली ग्रामविकास आघाडीचे शरदभाऊ हवेली , राजेंद्रकुमार गायकवाड , सुरेश येडवे ,  मंगेश गायकवाड ,प्रमोद करळे, श्रीकांत काळे , महेश गायकवाड , शरद गायकवाड , बापू करळे , कल्याण चौधरी , कल्याण सारंग , किशोर देसाई , बालाजी विर ,शिवाजी गुरव , बालाजी लोहार , दिपक काळे , जयराम वाघमारे , मधुकर काळे , नानासाहेब घोगरे हे उपस्थित होते
निवडणूक निर्णय अधिकारी पाटील . एस . जी , ग्रामसेवक खोबरे . एस . एस , तलाठी गायकवाड  व्हि. आर यांनी निवडीचे काम पाहीले.
चाळीस वर्षाचे विरोधक एकत्र -
शरदभाऊ हवेली , राजेंद्रकुमार गायकवाड व माजी सभापती विनायक ( आबा ) विधाते , तंटामुक्ती अध्यक्ष अनिल कावळे हे एकत्र आले आहेत.

Labels:

पांगरी परिसरातील ऊसउत्‍पादक अडचणीत

पांगरी (गणेश गोडसे) :- गत चार वर्षांच्या तुलनेत यावर्षी तर पांगरीसह परिसरात समाधानकारक हजेरी न लावल्यामुळे बार्शी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी पुर्णतः अडचणीत आला आहे.गतवर्षी किमान घाटमाथ्यावर पडलेले पावसाचे पाणी पांगरी परिसरातील साठवण तलावात आल्यामुळे साठवण तलावात अंशतः का होर्इना पाणी साठा झाला होता. आपल्या मागचा दुष्काळ पुढच्या वर्षी तरी संपेल या भोळया आशेवर गेल्या वर्षी तालुक्यात मोठया प्रमाणात लागवड झाली होती.मात्र चालु वर्षीही पुन्हा ऊस उत्पादक शेतक.यांच्या नशिबी दुष्काळाच आल्यामुळे हा शेतकरी पुरता निराश झाल्याचे दिसत आहे.सलग अणेक वर्षे दुष्काळाचे चटके भोगलेल्या शेतक.यांनी यावर्षीतरी भरघोष ऊत्पन्न मिळेल अशी अपेक्षा धरली होती.मात्र त्यांच्या आशेवर विरजण पडले आहे.
     1972 पेक्षाही दुष्काळाची जास्त दाहकता पांगरी भागातील ऊस ऊत्पादक शेतक-यांना अनुभवावी लागणार असल्याचे संकेत आहेत.अगोदरच सलग तिन वर्षांतील भिषण पाणीटंचार्इने अक्षरक्षः कंबरडे मोडलेले होते.सध्या मात्र तालुक्यातील कांही अंशीच उस उत्पादक शेतक.याचा ऊस शिल्लक राहीलेला आहे.
 ऊस लागवडीवर साखर कारखान्यांचे भवितव्यः 
सध्या बार्शी तालुक्यातील बहुतांश साठवण तलाव कोरडे ठणठणित पडलेले आहेत.समाधानकारक पाणी साठा नसल्यामुळे नव्याने उस लागवड मोठया प्रमाणावर होन्याची शक्यता नाही. बार्शी तालुक्यात सध्या दोन खाजगी साखर कारखाने कार्यरत आहेत.सध्या मात्र एकही कारखाना सुरू नसल्यामुळे खाजगी साखर कारखान्याचा यावर्षीचा गळित हंगाम होणार का नाही यबाबत शांसकता आहे.यावर्षी साखर कारखान्यांना गळीत हंगामास पुरेल येवढा ऊस शिल्लक नसल्यामुळे अणेक साखर कारखान्यांना आपला गळीताचा हंगाम लवकरच आटोपता घ्यावा लागणार आहे.गतवर्षी शेजारील उस्मानाबाद जिल्हयातील सर्वच साखर कारखाने उसाच्या व पाण्याच्या उपलब्धतेअभावी जवळपास बंद ठेवन्यात आले होते.त्यामुळे त्याचा लाभ शेजारील तालुक्यांना होऊन समाधानकारक उस येथील कारखान्यांना उपलब्ध झाला होता.त्यामुळे कारखाने पुर्ण क्षमतेने चालले होते.मात्र शासनाच्या परवानगीने सुरू होणा.या अणेक साखर कारखान्यांना यावर्षी उसाच्या उपलब्धतेसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करूणच कारखान्याचे गळित हंगाम यश्यस्वी करावे लागणार आहेत.
पाण्याचा काटेकोर वापर गरजेचा :
साठवण तलाव पुर्ण क्षमतेने भरले की शेतकरीही उपलब्ध पाण्याचा नियोजनबदध व गरजेनुसार वापर करन्याकडे दुर्लक्ष करूण पाण्याचा अतिरीक्त वापर करण्यावर जास्त भर दिला जातो.मात्र त्यामधुन पाण्याचा अपव्यय होऊन पाण्याची मोठया प्रमाणात नासाडी होते.शासनाने ऊस पिकासाठी ठिबक सिंचन सक्तीचे करन्याचा निर्णय घेतला असला तरी त्याची काटेकोर अंमलबजावनी होणे गरजेचे आहे.तसे झाले तरच पाण्याचा सदुपयोग होर्इल.
मुख्यमंत्र्यांच्या निर्णय अंमलबजावणीकडे डोळे :  
नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी ठिबकचे दर निम्यावर आणण्याचे संकेत दिले आहेत.त्यामुळे ऊस उत्पादक शेतक.यांचे डोळे मुख्यमंत्रयांच्या निर्णयाच्या अंमलबजावणीकडे लागुण राहिलेले आहेत.ठिबक सिंचनचे दर निम्यांवर आल्यास शेतीच्या पाण्याची मोठी बचत होण्यास मदत होणार आहे.

Labels: