Tuesday, 31 August 2021

पोलीस पाटील महिला संघटनेच्या अध्यक्षपदी रोहिणी पवार तर सचिवपदी रुपाली इंगळे यांची निवड


 
  
 अक्कलकोट,  दि. ३१ 

अक्कलकोट तालुका महिला अध्यक्षपदी रोहिणी पवार, यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर, सचिव पदी रुपाली इंगळे यांची वर्णी लागली आहे.

               
तालुक्यातील महिला पोलीस पाटील संघटनेची संपूर्ण कार्यकारणी तालुकाअध्यक्ष रहिमान अत्तार, उपाध्यक्ष महादेव  पाटील, जिल्हा संपर्कप्रमुख सिद्धार्थ कोळी, सचिव धनय्या स्वामी,यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर करण्यात आली.  पुढील प्रमाणे नूतन पदाधिकारी निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्ष भैरम्मा माळी (दक्षिण), वैशाली मोरे(उत्तर), कोषाध्यक्ष पूनम गायकवाड, सहसचिव मिनाक्षी माळी, प्रसिद्धीप्रमुख शुभांगी बाबर, कार्याध्यक्ष लालबी हंनुरे, संघटक सुमित्रा सुरवसे, सहसंघटक अर्चना पवार, खजिनदार महानंदा माळी, अशी निवड तालुकास्तरावर केली असून, तालुक्यातून जिल्हा कार्यकारणी निवड म्हणून  सुप्रिया गायकवाड, महादेवी पाटील, साक्षी कोळी, यांची सर्वानुमते निवड झाली आहे.


 तालुक्यातील विविध बीट प्रमुख म्हणून निवड करण्यात आलेल्या पदाधिकारी खलील प्रमाणे 
 करजगी बीट श्रीदेवी कोळी, दक्षिण विभाग महादेवी अरवत, हंनुर बीट  शैलजा पाटील, नागणसुर बीट ज्योती हंगरगी,  उत्तर विभाग सरस्वती पाटील, मैदंर्गी बीट मीनाक्षी चौधरी, वागदरी बीट शांताबाई भंगरगी, दुधणी बीट रेश्मा पठाण, दक्षिण उपप्रमुख शिवमंगल मुगलीमठ, उत्तर उपप्रमुख  जगदेवी तांबुळे, अशी वरील सर्व पदाधिकारी निवड जाहीर करण्यात आली आहे. 
           
यावेळी जिल्हा प्रमुख सिध्दार्थ  कोळी, पोलीस पाटील  धनय्या स्वामी, रोहन शिर्के, मोहोन वाघमोडे, महेश कोतले ,संतोष गुजा, योगेश जाधव,दयांनद पुजारी,सुरेश मैदर्गी,संतोष बनसोडे, दिगंबर सोनकांबळे,रमेश राठोड, भिमराव पाटील,विजय बावकर, लक्ष्मीपुत्र अंदेवाडी,श्रीशैल पाटील, अंबण्णा अस्वले,भिमाशंकर म्हेत्रे, आदि पोलीस पाटील यांच्या उपस्थिती होती. 

Labels:

राष्ट्रपुरुषांच्या पुस्तकांचे आमदार पाटील यांच्या हस्ते वाटप


अणदूर, दि.३१ : 

राष्ट्र पुरुषांच्या आठवणी त्यांचे जीवनचरित्र या पुस्तकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये रूजतील, यामुळे विद्यार्थ्यांना वाचनाची आवड होईल.कै. जीवनराव घुगे गुरुजी यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्ताने केलेले हे समाजोपयोगी कार्य असल्याचे मत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केले.

सेवानिवृत्त मुख्याध्यापक कै. जीवनराव घुगे गुरुजी यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आमदार पाटील बोलत होते.
 यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक महादेवप्पा नरे गुरुजी होते तर माजी सभापती दीपक आलुरे,सेवानिवृत्त रेल्वे अधिकारी दिनकर घुगे,भिवाजी इंगोले,साहेबराव घुगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना नरे गुरुजी यांनी कै. जीवनराव घुगे गुरुजी यांच्या आठवणींना उजाळा दिला,सन्मित्र पत संस्थेच्या माध्यमातून अनेकांची आर्थिक गरज भागवली, गावातील व समाजातील तंटे मिटवले असल्याचे सांगितले.

यावेळी अणदूर येथिल जिल्हा परिषदेच्या सहा शाळांना प्रत्येक ५० राष्ट्र पुरुषांच्या जीवन चरित्राची पुस्तके भेट देण्यात आली.  डॉ संतोष पवार यांना कै. जीवनराव घुगे गुरुजी यांचा आदर्श विद्यार्थी म्हणून सन्मानित करण्यात आले. आर एस गायकवाड,डॉ संतोष पवार यांनी गुरुजींच्या आठवणींना उजाळा दिला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक साहेबराव घुगे यांनी सूत्रसंचालन अनिल घुगे तर आभार कमलाकर घुगे यांनी मानले.

यावेळी काशीनाथ शेटे दीपक घोडके, ग्रामविकास अधिकारी देविदास चव्हाण, उध्दव घुगे , रेवण शेटे, वालचंद कंदले,वसंत घोडके, बालाजी कुलकर्णी,  डॉ.व्यंकटेश घुगे, दयानंद मुडके,यशवंत मोकाशे, अनिल अणदुरकर ,काशिनाथ घुगे,बापु घुगे,अनिल अणदूरकर,शाहुराज मोकाशे, म्हाळाप्पा गळाकाटे, शिवकुमार स्वामी,प्रज्योत करपे, सोमनाथ लंगडे,नागनाथ घोडके,सहा शाळांचे मुख्याध्यापक,गावातील जेष्ठ नागरिक,विद्यार्थी, शिक्षक व घुगे परिवारातील सदस्य उपस्थित होते.

Labels:

उस्मानाबाद : ॲड दयानंद माळी येणेगुरकर यांची नियुक्ती

उस्मानाबाद , दि .३१ : 

ॲड  दयानंद  माळी  येणेगुरकर  यांची  उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे  औरंगाबाद हायकोर्टात वकील म्हणून  नियुक्ती  करण्यात आली आहे. 


उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन व राष्ट्रवादी काँग्रेस   पार्टीचे  जिल्हाध्यक्ष  सुरेश  बिराजदार  व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय घोणसे   यांनी  येणेगुरचे सुपुत्र तथा   ॲड  दयानंद  माळी  येणेगुरकर  यांची  उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे  औरंगाबाद हायकोर्टात वकील म्हणून नेमणूक केली आहे.
 

Labels:

तुळजापुर येथील डाॅ.बापूजी साळुंखे नगरमध्ये वृक्षारोपण


तुळजापूर , दि .३१ : 

तुळजापूर शहरातील नळदुर्ग रोडकडील डाॅ.बापूजी साळुंखे सह.गृहनिर्माण संस्थेत  श्रावणी सोमवार व श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून  तुळजाभवानी कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. रमेश दापके यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. 



 माजी प्राचार्य डाॅ रमेश दापके यांना डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाचा जीवनसाधना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा शाल, श्रीफळ, व पुष्पहार घालून यथोचित सत्कार करुन सन्मानित करण्यात आले. याच कार्यक्रमात डाॅ.शिवाजीराव देशमुख यांची विध्यार्थी कल्याण मंडळाच्या जिल्हा समन्वयकपदी निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच प्रा. राजेंद्रकुमार घाडगे यांच्या राज सिरॅमिक ॲन्ड बिल्डिंग मटेरियल या दुकानाचे नरिमन पॉईंट पेट्रोल पंपासमोरील नवीन जागेत   स्थलांतरीत जागेत उद्घघाटन करण्यात आले. या संयुक्तपणे आयोजित कार्यक्रमात तुळजापूरातील डाॅ.बापूजी साळुंखे सह.गृह निर्माण संस्थेतर्फे प्राचार्य रमेश दापके, प्रा.राजेंद्रकुमार घाडगे, सोमाणी  यांच्या हस्ते कोरोनासारख्या महाभयंकर रोगावर यशस्वीपणे मात केल्याबद्दल प्रा.अभिमान हंगरकर (काटीकर) यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून  यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच भानुदासराव जाधव यांचाही सत्कार करण्यात आला.
    
या प्रसंगी डाॅ.रमेश दापके, प्रा.डाॅ.शिवाजीराव देशमुख, प्रा.विलासराव जगदाळे, प्रा.अभिमान हंगरकर, प्रा.राजकुमार घाडगे,माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंदे, पत्रकार उमाजी गायकवाड, प्रबंधक चव्हाण, सोमाजी,सुनिल वाडकर, रामेश्वर लाडुळकर, प्रा.कुकडे, प्रा.आशपाक आतार, प्रा.बाविस्कर,भानुदास जाधव, धनंजय मोरे, निरंजन व्हरकट, योगश कुलकर्णी,अभिमान शिंदे, प्रसाद खामकर, सतिश घोगरे, ज्योतिराम चवळे,  तानाजी भिसे,राहूल भोसले, तानाजी पुजारी,पारवे,खामकर,राहूल घोगरे,वागतकर,वसेकर,भिकाजी शिंदे, मधुकर गंगणे,आप्पासाहेब घोडके आदी मान्यवरांसह प्रा. राजेंद्रकुमार घाडगे परिवारातील सदस्य उपस्थित होते.

Labels:

Monday, 30 August 2021

जळकोट -अचलेर रस्त्याची चाळण;लोकसेवा संघटनेतर्फे बेश्रमने पूजा



जळकोट,दि.३० : मेघराज किलजे 

तुळजापूर तालुक्यातील कर्नाटक व सोलापूर जिल्ह्याला जोडणारा जळकोट ते अचलेर या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून , झोपेत असलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी जळकोट येथील लोकसेवा टमटम चालक-मालक संघटनेतर्फे या रस्त्याची बेशरमने पूजन करून अनोखे आंदोलन करून त्वरित रस्ता दुरुस्तीची मागणी  केली आहे.



जळकोट ते  अचलेर हा २० किमी अंतराचा रस्ता अत्यंत दयनीय अवस्थेत असून रस्ता आहे की ? खड्ड्यात रस्ता हेच समजत नाही. गेल्या अनेक वर्षापासून हा रस्ता अत्यंत खराब झाला असून डांबरीकरण पूर्णपणे उखडले गेले आहे. त्यामुळे वाहनधारकांना एक खड्डा चुकल्यानंतर दुसरा खड्डा चुकवण्यासाठी संतुलन राखावे लागत आहे. या रस्त्यावरून सतत वर्दळ असते. या रस्त्यावर दुचाकी व हातावर पोट असलेल्या टमटम चालकांची याच रस्त्यावर जास्त वर्दळ आहे. 


टमटम चालक वैतागून गेले आहेत. कर्नाटक व सोलापूर जिल्ह्याला तसेच अक्कलकोट तीर्थक्षेत्रला हा रस्ता जोडला गेला आहे. त्यामुळे वेळोवेळी मागणी करूनही प्रशासन सुस्त आहे. खराब रस्त्यामुळे अनेकांचे मणक्यांचे आजार वाढले आहेत.
या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी अनेक वेळा आंदोलने करण्यात आली आहेत. लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही रस्ता दुरुस्त करण्यासाठी डोळेझाक करण्यात येत आहे. झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी जळकोट येथील लोकसेवा टमटम चालक-मालक संघटनेच्यावतीने या रस्त्याचे बेशरमने पूजन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे. 


लोकसेवा टमटम चालक-मालक संघटनेने रस्त्याचे बेशरमने पूजन करून आगामी काळात हा रस्ता दुरुस्त नाही झाला तर आम्ही तीव्र आंदोलन करू. असा इशारा दिला आहे. 


या आंदोलनात शिवसेनेचे तालुका उपप्रमुख कृष्णात मोरे, लोकसेवा चालक-मालक संघटनेचे बाळासाहेब कदम, व्यंकट कदम, नागनाथ कदम, तानाजी कदम, मुस्तफा जमादार, मुर्तू जमादार, गणेश सावंत, तानाजी कानडे, मुकेश कदम, मुरहारी, ज्ञानेश्वर सुरवसे, संदीप पांचाळ, बालाजी लोखंडे, नागेश भांगे, गणेश माने, बालाजी सावंत, सतिश गायकवाड, भाऊसाहेब कदम, चांद जमादार, श्रीधर लोखंडे, सतीश कदम आदि संघटनेचे चालक-मालक, गावातील युवक यांनी सहभाग नोंदवला.

Labels:

साडेचार एकरावरील उडिद पिकावर शेतक-याने फिरविला ट्रॕक्टर रोटाव्हेटर


नळदुर्ग , दि . ३० 

बसवंतवाडी ता. तुळजापूर येथिल शिवारात खरिपातील साडे चार एकर क्षेत्रावरील  उडिद पिकावर शेतक-यानी रोटरव्हेटर फिरविल्याची घटना  घडली आहे.


तुळजापूर तालुक्यातील बसवंतवाडी शिवारात  नागेश बाबुराव बनसोडे यांचे एक एकर क्षेत्र ,  बिरु बाबुराव बनसोडे यांचे दिड एकर , तर सागर अण्णा माने यांचे दोन एकर क्षेत्र  असे मिळुन साडेचार एकर क्षेत्रावरील  शेतातील उभ्या उडिद पिकावर ट्रॕक्टरने रोटाव्हेटर फिरविले आहे. हि घटना शुक्रवार दि . २० आँगस्ट रोजी घडली आहे. 

याप्रकरणी सरपंच  नागेश बनसोडे यानी सांगितले ,  बसवंतवाडी येथिल वरील शेतक-यानी आपल्या शेतात खरीप हंगामात निर्मल कंपनीचे उडीद बियाणे आणुन पेरणी केली. पिक जोमात आले. माञ त्यास फळधारणा झाले नाही. म्हणुन उभ्या पिकावर ट्रॕक्टर फिरविला आहे. याप्रकरणी तक्रार करुन काही उपयोग होत नाही , म्हणुन शेतकऱ्यांनी कुठेही तक्रार केली नसल्याचे बोलताना बनसोडे यानी सांगितले .


दरम्यान शेती पिकली तर शेतमालाला भाव नाही , तर दर्जाहीन बियाणामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका नाहकच सहन करावा लागत असुन याबाबत पंचनामा करुन शेतक-याना नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतक-यातुन होत आहे.

Labels:

गणेशोत्सवनिमित्त उस्मानाबाद जिल्ह्यात वाहतूक नियंत्रणाचे आदेश जारी

                                       

     
उस्मानाबाद, दि. 30

जिल्ह्यात दि.10 सप्टेंबर  ते 19 सप्टेंबर  या कालवधीत श्रीगणेशोत्सव असुन हा उत्सव  जिल्ह्यात शांततेत पार पडावा ,  यासाठी वाहतुकीचे नियंत्रण आणि नियमन करणे आवश्यक आहे. 


यावेळी कोणताही अनुचित प्रकार न घडता कायदा तसेच सुव्यवस्था अबाधित रहावी. तणावाची परिस्थिती निर्माण झाली. तरी त्या परिस्थितीवर तात्काळ मात करता यावी म्हणून महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 36 प्रमाणे जिल्ह्यातील सर्व पोलिस उपनिरीक्षक आणि त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाचे पोलिस अधिकाऱ्यांना दिनांक 10 सप्टेंबर-2021 -2021  रोजीचे 00.01 वा. ते दिनांक 19 सप्टेंब- 2021 रोजीचे 24.00 वाजेपर्यंत अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.


 रस्त्यांवरील किंवा रस्त्यांवरुन  जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कशा रितीने चालावे, त्यांची वर्तणूक किंवा वागणूक कशी ठेवावी, या विषयी निर्देश देणे, अशा कोणत्याही मिरवणुका कोणत्या मार्गाने जाव्यात किंवा कोणत्या मार्गाने जावू नयेत ते मार्ग विहित करणे. सर्व मिरवणुकीच्या आणि जमावांच्या प्रसंगी प्रार्थनेच्या  वेळी तसेच कोणत्याही रस्त्यावरुन किंवा सार्वजनिक जागी किंवा लोकांच्या एकत्र जमण्याच्या जागी, गर्दी होणार असेल किंवा अडथळा निर्माण होण्याची शक्यता असेल अशा सर्व ठिकाणी अडथळा होवू न देणे, ही जबाबदारी या अधिकाऱ्यांनी पार पाडावयाची आहे.

सर्व रस्त्यावरील. नद्यांच्या घाटांवर सार्वजनिक ठिकाणी, स्नानाच्या, कपडे धुण्याच्या ठिकाणी जागेमध्ये बंदोबस्त आणि सुव्यवस्था राखणे, कोणत्याही रस्त्यावर सडकेजवळ किंवा सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ वाद्य वाजविणे आणि शिंगे, कर्कश वाद्य वाजविणे यावर नियमन करणे, किंवा त्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम संबंधित अधिकाऱ्यांनी करावयाचे आहे.सक्षम अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियमाच्या कलम 33, 34, 37 ते 41 या कलमान्वये केलेल्या कोणत्याही नियमनात्मक आदेशांचे अधिन असलेले आणि त्यास पुष्टी देणारे योग्य आदेश देणे आवश्यक आहे.जो कोणी नियमनात्मक आदेशांचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन करेल तो महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 134 प्रमाणे शिक्षेस पात्र राहिल,असेही जिल्हा पोलिस अधीक्षक राजतिलक रौशन यांनी म्हटले आहे.                                
                                                  

Labels:

स्वामी कुटुंबाच्यावतीने अशीही श्रीकृष्ण भक्ति


इटकळ , दि . ३० : 


इटकळ ता तुळजापूर येथील स्वामी कुटुंबाच्या वतीने श्रीकृष्ण जन्मष्टमी निमित्त रुग्ण्सेवा करुन साजरी केली

 श्रीकृष्ण भक्त पिंट्यु नागनाथ स्वामी यांनी  दि .३० रोजी समर्थ क्लिनिक इटकळ येथील डाॅक्टर आसबे यांच्या दिवस भर आलेल्या रुग्णाचे मेडीसिनसह संपुर्ण बिल   भरले. दिवस भरात जवळपास दिडशे रुग्णानी यांचा लाभ घेतला.
दरवर्षी स्वामी कुटुंबीयांकडून या दिवशी वेगवेगळ्या उपक्रमानी श्रीकृष्ण जन्मष्टमी साजरी करतात.

Labels:

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत तुळजापुरात मंदिर महाद्वार समोर शंखनाद


तुळजापूर दि. ३० : 

महाराष्ट्र सरकार विरोधात घोषणाबाजी करीत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह भाजपच्या अन्य कार्यकर्त्यांनी एक तास शंखनाद आंदोलन केले. नगराध्यक्ष सचीन रोचकरी व अन्य भाजपचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाराष्ट्रातील मंदिरे भाविकांना खुले करण्याच्या मागणीसाठी राज्यस्तरीय आंदोलन पुकारले होते या आंदोलनाला तुळजापुरात उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आंदोलनामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांसह व्यापारी आणि भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी याप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बेगड्या  हिंदुत्वावर टीका केली, दारूची दुकाने आणि इतर गर्दीची ठिकाणे सुरू केले आहेत मग मंदिरे खुले करण्यासाठी सरकारला कोणती अडचण आहे हे सरकार हिंदू विरोधी आहे का असा प्रश्न त्यांनी याप्रसंगी आंदोलनात विचारला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शंखनाद करीत सरकारविरोधी घोषणा दिल्या.

Labels:

सोया केक आयात मागे घेण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी


परंडा, दि .३० :   

गेली अनेक वर्षे शेतकरी स्वतः दिवस रात्र करून सर्वांना  अन्नधान्य पुरवतो,  कुठेलेही उत्पन्न घेतले तर त्याला त्याचा खर्च सुद्धा निघत नाही.कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, कधी चक्री वादळ, कधी जंगली जनावरे, आणि नंतर सरकारी धोरण, वीमा कंपनीचा मनमानी, बॅंकेचे दुर्लक्ष, सततचा कोरोना महामारीचा उत्पादीत केलेल्या शेत मालावर होणारा परिणाम हे सर्व पाहिल्यावर प्रशासन व लोकप्रतिनिधी का इतके कठोर काळजाचे बनलेत हा प्रश्न उपस्थित होतो, कधी नव्हे तो या वर्षी सोयाबीनला थोडा समाधान कारक भाव भेटत होता, पण 12 लाख टन सोया केक  आयात करण्याचे ठरल्यानंतर प्रचंड प्रमाणात भाव घसरले आहेत.



त्यामुळे सरकारने सोया केक आयातीचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा असे निवेदन दिले असून निवेदनावर जिल्हाध्यक्ष रविंद्र इंगळे, शंकर घोगरे धनाजी पेंदे, तानाजी पाटील, विष्णू काळे, शहाजी सोमवंशी, गुरूदास भोजणे, नेताजी जमदाडे, राजेंद्र हाके, अमर हजगुडे, मेघराज दंडनाईक ईत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत .

 

Labels:

युवकाने मुलीच्या जन्माचे स्वागतापित्यर्थ अपंग निवासी शाळेस केले अन्नधान्याचे वाटप

                                    
चिवरी ,दि .३०: 

 वंशाला दिवा हवा म्हणून मुलाच्या जन्माचा अट्टाहास केला जातो, तर अनेकदा मुलीच्या जन्मावर अश्रू ढाळले जातात. कायद्याने स्ञी  पुरुष समानता असली तरी मुलीच्या जन्माच्यावेळी बहुतेकदा दुःखच केली जाते, असे असताना तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील शंकर प्रकाश झिंगरे या युवकाने आपल्या मुलीच्या जन्माचे स्वागत अनोख्या पद्धतीने केले आहे. 

येथील झिंगरे परिवाराने सामाजिक बांधिलकी जपत लोहारा तालुक्यातील सास्तूर येथील अपंग निवासी शाळेस एक गोणी गहू आणि एक गोणी तांदूळ असा एक महिना पुरेल एवढे धान्याचे वाटप करून आपल्या कन्यारत्नाचे  स्वागत केले आहे, झिंगरे परिवाराकडून केलेल्या या अनोख्या उपक्रमाचे  सर्वत्र कौतुक होत आहे. 

Labels:

पक्षबांधणीसाठी युवकांनी पुढाकार घेऊन अधिक सक्रिय होण्याचे आवाहन - माजी मंञी मधुकरराव चव्हाण

               
मुरुम,  दि. ३०  : 


राज्यात काँग्रेस पक्ष मजबूत  करण्यासाठी व देशात राहुल गांधींच्या नेतृत्वाला अधिक सक्षम करण्याकरिता युवकांनी पुढाकार घेऊन अधिक सक्रिय होण्याचे आव्हान माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी यावेळी केले. 

उस्मानाबाद जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिवपदी दिलीप भालेराव यांची निवड झाल्याबद्दल त्यांच्या सत्कार माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या हस्ते विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना येथे रविवारी (ता.२९) रोजी करण्यात आला. यावेळी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बापुराव पाटील, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष धीरज पाटील, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष शरण पाटील, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे, उमरगा पंचायत समितीचे सभापती सचिन पाटील, लोहारा पंचायत समितीचे सभापती हेमलता रणखांब, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस रामकृष्णपंत खरोसेकर, उपाध्यक्ष प्रशांत पाटील, उमरगा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अँड. सुभाष राजोळे, नगराध्यक्ष प्रेमलता टोपगे, नगराध्यक्ष अनिता अंबर, प्राचार्य दिलीप गरुड, अशोक सरवदे, जिल्हा परिषद सदस्य धनराज हिरमुखे, दिपक जवळगे, रफिक तांबोळी, डॉ.जीवनगे, विकास हराळकर, महिला काँग्रेस अध्यक्षा संगिता कडगंचे संगिता पाटील, सुवर्णा भालेराव आदींची प्रमुख उपस्थिती होती. 


यावेळी बसवराज पाटील म्हणाले की, सध्या महाराष्ट्रातील बदलते राजकारण लक्षात घेऊन  येणाऱ्या काळात काँग्रेसपक्ष ग्रामीण भागात अधिक मजबूत व सक्रिय होणे गरजेचे आहे. पक्षाची ताकत वाढण्यासाठी युवकांनी अधिक संघटीत झाले पाहिजे. देशाचा विकास करण्यासाठी आणि उद्याचे नेतृत्व निर्माण करण्यासाठी पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी ही निवड खऱ्या अर्थाने सार्थ ठरेल. यावेळी सत्काराला उत्तर देताना दिलीप भालेराव म्हणाले की, जिल्ह्यातील काँग्रेसची ताकत वाढवून कॉंग्रेस पक्षाला गतवैभव व यश प्राप्तीसाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेन.       

सदर जबाबदारी दिल्याबद्दल प्रदेश काँग्रेस कमिटीचे त्यांनी यावेळी आभार मानले. या सत्कार कार्यक्रमासाठी उस्मानाबाद शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, युवक काँग्रेस प्रदेश सचिव महालिंग बाबशेट्टी, दीपक मुळे, जावेद काझी, उपसभापती व्यंकट कोरे, राहुल वाघ, प्रभाकर लोंढे, पंकज खरोसेकर, लोहारा युवक काँग्रेस शहराध्यक्ष हरी लोखंडे आदींनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.शोकत पटेल तर आभार चंद्रशेखर पवार यांनी मानले.

Labels:

चोरीच्या ४ मोटारसायकल , ४ मोबाईल फोनसह आरोपी ताब्यात


उस्मानाबाद , दि . ३० : 


स्थानिक गुन्हे शाखा: उस्मानाबाद जिल्ह्यातील माला विषयीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाकी स्था.गु.शा. च्या पोनि- श्री. गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखालील पोउपनि- श्री. पांडुरंग माने, श्री. सदानंद भुजबळ, पोहेकॉ- काझी, शेळके, पोना- अमोल चव्हाण, हुसेन सय्यद, कावरे, माने, पोकॉ- आरसेवाड, मरलापल्ले, सर्जे यांचे पथक आज‍ दि. 30 ऑगस्‍ट रोजी पहाटे गस्तीस होते. 



दरम्यान पथकास गोपनीय माहिती मिळाली की, पाटोदा पाटी येथील अविनाश दिलीप भोसले हा जुना बस डेपो पारधी पिढी, उस्मानाबाद येथील एका विट भट्टीमागील शेडमध्ये काही दिवसांपासून मोटारसायकली व भ्रमणध्वनी संशयीतरित्या बाळगून आहे. यावर पथकाने पहाटे 05.30 वा. अविनाश भोसले यास ताब्यात घेतले असता तो ढोकी पो.ठा. गु.र.क्र. 231 / 2021 या खूनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी असल्याचे समजले.


पथकाने त्याच्या ताब्यात असलेल्या 4 मोटारसायकल व 4 भ्रमणध्वनी बाबत मालकी- ताबा या विषयी त्यास विचारले असता त्याने समाधानकारक माहिती दिली नाही. यावर पथकाचा संशय बळावल्याने त्यांनी त्याच्या ताब्यातील मोटारसायकल सांगाडा- इंजीन क्रमांच्या सहायाने तसेच भ्रमणध्वनीच्या आयएमईआय (IMEI) क्रमांच्या आधारे तांत्रीक तपास शोध घेतला. 



यात 3 मोटारसायकलय या उस्मानाबाद (श.) पो.ठा. गु.र.क्र. 163 / 2021, शिराढोन पो.ठा. गु.र.क्र. 136 / 2021, बेंबळी पो.ठा. गु.र.क्र. 92 / 2021 या गुन्ह्यांत तर 1 मोटारसायकल ही सोलापूर जिल्ह्यातील सदर बाजार पो.ठा. हद्दीतून चोरीस गेल्याचे समजले. तसेच 4 भ्रमणध्वनी पैकी 3 भ्रमणध्वनी हे ढोकी पो.ठा. गु.र.क्र. 116, 193, 225 / 2021 या गुन्ह्यांत तर 1 भ्रमणध्वनी उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. गु.र.क्र. 244 / 2021 मध्ये चोरीस गेल्याचे समजले.


यावर पोलीसांनी अविनाश भोसले यास चोरीच्या मोटारासायकल व भ्रमणध्वनीसह ताब्यात घेतले असून त्याच्या उर्वरीत साथिदारांचा पोलीस शोध घेत आहेत. या कामगीरीबद्दल मा. पोलीस अधीक्षक श्री. राज तिलक रौशन यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे.

Labels:

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर संघटकपदी दिनेश क्षीरसागर यांची निवड

तुळजापूर , दि .३० : 


  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुळजापूर शहर संघटकपदी  दिनेश धन्यकुमार क्षिरसागर यांची निवड करण्यात आली आहे . या निवडीचे पत्र   जिल्ह्याचे नेते  जीवन गोरे ,  राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, जिल्हा कार्यध्यक्ष संजय दुधगावकर, प्रदेश सचिव सुरेश पाटील, युवती प्रदेशअध्यक्षा सक्षणा सलगर, डॉ प्रतापसिंह पाटील, तुळजापूर विधानसभा अध्यक्ष   गोकुळ शिंदे, महिला जिल्हाध्यक्षा मंजुषा मगर-माडजे, शहर अध्यक्ष अमर चोपदार, राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दुर्गेश साळुंके व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याच्या सर्व सेलचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Labels:

तुळजापूर : पाच हजार रुपयेची उपचारासाठी आशीही मदत

तुळजापूर ,दि .३०


एक हात मदतीचा' या उपक्रमा अंतर्गत तुळजापूर येथील जिजामाता प्रतिष्ठाणचे अध्यक्ष  मधुकर शेळके यांची सुकन्या कु.श्रद्धा  हिने रोख रक्कम  ५  हजार रुपये भेट दिली.


तुळजापूर येथील कु . प्रतिक्षा अमर बनसोडे हि अवघ्या ६ महिन्याची असल्यापासून तिला मेजर थॅलेसिमिया आहे, म्हणजे तिला दर दोन आठवड्यातून ब्लड ट्रान्समिशन करावे लागते. डॉक्टरांनी तिला बोनमॅरो ट्रान्सप्लांट करावयाचा सल्ला दिला आहे. या साठीचा खर्च तब्बल 14 ते 15 लाख रुपये सांगितला आहे, त्या अनुसंगाने तिला आर्थिक मदत करण्यासाठी इयत्ता सहावीत शिकणारी मुलगी श्रद्धा मधुकर शेळके या मुलीने आई-वडिलांनी खाऊसाठी दिलेले पैसे एकत्र करून, कुमारी प्रतीक्षा अमर बनसोडे, हिला पाच हजार रुपयांची मदत केली आहे.

Labels:

तुळजापूर : भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने युवा समाजसेवक कोळेकर महेश यांच्या कार्याचा गौरव



 तुळजापूर , दि .३० : 

काक्रंबावाडी  गावातील कोळेकर महेश बजरंग यांच्या विविध क्षेत्रातील समाजिक  कार्याची दखल घेत भ्रष्टाचार निर्मुलन समिती तुळजापूर यांच्या वतीने  त्याचा सत्कार करण्यात आला.

         
काक्रंबावाडी येथील युवा समाजसेवक म्हणून ज्यांची ओळख  उस्मानाबाद जिल्ह्यात झालेली आहे. त्याच्या  कार्याची दखल भ्रष्टाचार निर्मूलन समितीने घेऊन  गौरव  केला. यावेळी  भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे  अध्यक्ष विजय भोसले'  प्रसिद्धी प्रमुख दीपक पलंगे,  उपस्थित होते.
        
कोळेकर महेश  हा काक्रंबावाडी येथील युवा समाजसेवक असून त्यांनी आपल्या कोळेकर महेश मित्रपरिवार आणि आपल्या समाज उपयोगी विचारांनी अनेक सामाजिक कार्य केलेली आहेत जसे, वृक्ष रोपण, शैक्षणिक कार्य, लहान मुलांच्या स्पर्धा, शिधापत्रिका, मतदान जनजागृती , युवकांसाठी अनेक कार्यक्रम, तसेच शेतकऱ्यांसाठी उपयुक्त योजनांचा आढावा, शेतीशाळा अशा विविध कार्यामुळे तो  चर्चेत आला.

Labels:

अणदुर येथे भारतीय बौद्ध महासभेची बैठक संपन्न


वागदरी , दि .३०

अणदूर ता.तुळजापूर येथील अस्थी बुद्ध विहाराच्या प्रांगणात भारतीय  बौद्ध महासभा उस्मानाबाद  जिल्हा शाखा  पदाधिकारी व कार्यकर्त्यांची  महत्त्वपूर्ण विचार मंथन बैठक संपन्न झाली.


   
याबैठकिच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष अँड.दिलीप निकाळजे हे  तर प्रमुख मार्गदर्शनक म्हणून प्रा.डी.डी.मस्के, उप मुख्यकार्यकारी अधिकारी (नरेगा) तथा गटविकास अधिकारी विलास खिलारे, भारतीय बौद्ध महसभेचे माजी जिल्हा अध्यक्ष गुनवंत सोनवणे, रमाकांत गायकवाड आदी होते. 


प्रारंभी उपस्थित मांनवरांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून सामुदायिरित्या बुद्ध वंदना घेऊन या बैठकीची सुरुवात करण्यात आली. यावेळी धम्म संस्कार व धम्म प्रचार आणि प्रसारासंबधी नियोजन, धम्म चळवळ काल आज आणि उद्या एक चिकित्सा, जिल्ह्यातील नियोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक तडवळा आणि अस्थी बुध्दविहार अणदूरसह विविध विषयावर सखोल चर्चा करण्यात आली. याप्रसंगी बोलताना प्रा.डी.डी.मस्के म्हणाले की, बुद्ध विहार म्हणजे मानवतावादी विचारांचे संस्कार केंद्र असून गाव तेथे बुद्ध विहार असने ही काळाची गरज आहे. 

 विलास खिलारे म्हणाले की, धम्म चळवळ गतिमान करण्यासाठी बौध्द समाजातील कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी,आधिकारी यानी संघटीतपणे काम करण्याची गरज आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर.एस.गायकवाड यांनी  तर सुत्रसंचलन सुकेशन ढेपे यांनी केले व आभार  रमाकांत गायकवाड यांनी केले. 


यावेळी प्रा.विवेकानंद वाहुळे,जयसिंग भालेराव, दत्ता माने,नागनाथ कांबळे,संजय नाना शितोळे,विजय बनसोडे,  दादासाहेब बनसोडे, एस.के.गायकवाड, जयभीम वाघमारे, बाळासाहेब बागडे, शाम नागीले, दयानंद काळुंके,विलास दुपारगुडे,शाम कांबळे, विस्तार अधिकारी जे.टी. वग्गे,मनोहर बनसोडे, महादेव गवळी, संतराम कांबळे, चंद्रकांत सुर्यवंशी, संतोष कांबळे, प्रमोद सुर्यवंशी, रूकमी कांबळे, अविदा कांबळे, संगीता सुर्वे, रंजना कांबळे, प्रभावती कांबळे सह महीला, कार्यकर्ते   उपस्थित होते.

Labels:

Sunday, 29 August 2021

तुळजापूर : राष्ट्रमाता जिजाऊ यांचा पुतळा उभा करण्याबाबत आढावा बैठक संपन्न



तुळजापूर , दि .२९ : 


शहरात राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब यांचा पुतळा उभा करण्यात यावा या मागणीसाठी तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे प्रमुख पाहुणे श्रीमंत राजे अमरसिंह उदयसिंह जाधवराव,  अध्यक्ष  नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न झाली. 


यावेळी नगराध्यक्ष सचिन  रोचकरी म्हणाले की , तुळजापुर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी राजे यांच्या शेजारी राष्ट्रमाता जिजाऊ माॅसाहेबाचा पुतळा उभा करण्यासाठी तुळजापुर नगर परिषद ठराव घेऊन शासकिय पातळीवर सहकार्य करण्याचे सांगितले .  यावेळी त्यांना   निवेदन देण्यात आले,  जिजामाता प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर शेळके, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे, तुळजाभवानी प्राधिकरणाचे सदस्य विकास मलबा, महेश चोपदार,मानवहित लोकशाही पक्ष जिल्हा युवक अध्यक्ष किरण कांबळे, सुभाष कदम ,महेंद्र शिंदे, गोरख पवार, विजय मलकु नाईक, राजाभाऊ घाडगे, धनंजय बगडी, विनोद सरवदे, योगीराज जाधव, शिवराज जाधव, सौरभ कदम, परीक्षीत साळुंके, महेश शिंदे, चेतन पांडागळे उज्वल खलाटे, अजित सस्ते, किरण नावरे, श्रीनाथ बुरूगे, शैलेश शिवरकर,यांच्यासह शिवप्रेमी व जिजमाता प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Labels:

हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस साजरा

तुळजापूर , दि .२९ : 

जवाहर नवोदय विद्यालयात रविवार दि . २९  रोजी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस  "राष्ट्रीय खेल दिवस " म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला .

यावेळी सर्वप्रथम विद्यालयाचे उप प्राचार्य  एस. व्हि. स्वामी यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यालयाचे क्रीडा शिक्षक   आर .एम .अलसेट यांनी मेजर ध्यानचंद यांचा जीवन परिचय देऊन जीवनामध्ये आनंदी राहण्यासाठी खेळ किती महत्त्वपूर्ण आहे, यावरती आपले विचार प्रकट केले.


 विद्यालयाचे उप प्राचार्य  स्वामी यांनी सध्याच्या  कोरोनाच्या काळामध्ये खेळ व व्यायामाचे महत्त्व सांगून ऑलम्पिक मध्ये ध्यानचंद यांनी तीन सुवर्णपदके मिळवून देऊन देशाचा सन्मान वाढविला. यावरती विचार व्यक्त करून सर्वांना खेळ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.      कार्यक्रमासाठी एस. डी .खोब्रागडे, यश पाटील, एस.जी . भोरगे, एच. जी. जाधव, पी .एन. जोशी,   सुजाता कराड,  क्रीडाशिक्षक आर. एम. अलसेट, क्रीडा शिक्षिका एस. आर.अलसेट, डी.पी.बनसोडे , प्रकाश गुर्जर यांची उपस्थिती होती.

Labels:

तुळजापूर येथे विभागीय सहसंचालक डॉ. रणजीतसिंह निंबाळकर यांचा सत्कार


तुळजापूर दि . २९ : 

औरंगाबाद विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक डॉ.रणजितसिंह निंबाळकर यांनी तुळजापूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयास सदिच्छा भेट दिली. यानिमित्ताने बालाघाट शिक्षण संस्थेचे सचिव उल्हास बोरगावकर यांच्या  हस्ते सहसंचालक डॉ. निंबाळकर यांचा सत्कार करण्यात आला.

विभागीय सहसंचालक डॉ. रणजीतसिंह निंबाळकर उस्मानाबाद दौऱ्यावर असताना त्यांनी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयास सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी बालाघाट शिक्षण संस्थेचे सचिव उल्हास बोरगावकर यांच्याबरोबर त्यांची अनौपचारिक चर्चा झाली. 


या निमित्ताने त्यांचा महाविद्यालयाच्या वतीने संस्थेचे सचिव  बोरगावकर यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिल शित्रे, उपप्राचार्य डॉ. एन बी जाधव, सिनेट सदस्य डॉ. गोविंद काळे , प्रा जी. व्ही. पाटील , डॉ. शेषराव जावळे यांची उपस्थिती होती.

Labels:

काटी जवळगाव रस्त्याची दुरवस्था


काटी , दि .२९

 तुळजापूर तालुक्यातील काटी ते जवळगाव या डांबरी रस्त्याची जवळपास २५ वर्षांच्या काळात एकदाही दुरुस्ती झाली नाही. या डांबरी रस्त्यावरील मोठमोठे खड्डे गेल्या अनेक दिवसांपासून परिसरातील नागरिकांसाठी डोकेदुखी ठरले आहे. आता मात्र या रस्त्याचे दुरुस्ती शक्य नाही, तर रस्ताच नव्याने तयार करावा लागणार आहे.  आता या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाल्याने रस्त्यावरून चालताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे.


काटी येथील बऱ्याच शेतकऱ्यांची जवळगाव (ता.बार्शी)  शिवारात शेती असल्याने त्यांना दररोज या रस्त्यावरून ये-जा करावी लागते. उसाच्या हंगामात याच रस्त्यावरून उसाच्या गाड्या भरून जातात. तसेच काटी येथील नागरिकांसाठी दुसरा रस्ताच नसल्याने त्यांना याच रस्त्यावरून प्रवास करावा लागतो. माल वाहतूकही येथूनच होते. या सर्व कारणांमुळे आणि रस्त्यावरील रहदारीमुळे रस्ता सुस्थितीत असणे गरजेचे आहे. मात्र, या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. 

परिसरातील नागरिकांनी रस्त्याच्या कामाबद्दल अनेकदा संबंधित विभागाला विनंती करूनही उपयोग झाला नाही. हा रस्ता अनेक ठिकाणी दुतर्फा बाजूने खचला असून, ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याची खडी निघून गेली आहे. शेतीमालाची वाहतूक करण्यासाठी व ये-जा करण्यासाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागत असून येथील धनाजी देशमुख व जुबेर बेग या शेतकऱ्यांना खड्ड्यांचा अंदाज न आल्याने मोटारसायकल वरून पडून पाय फॅक्चर झाले आहेत. संबंधित विभागाने याची दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

त्रिगुणशिल साळुंके ,  शेतकरी, काटी              

आता पावसाळा सुरू झाला आहे. पाऊस पडला की खड्ड्यात पावसाचे पाणी साचून राहतो. रात्री - बेरात्री येथून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. या रस्त्याचा वापर करणारे काटी व जवळगाव, आंबेगाव  गावातील नागरिक आता सरकारी दिरंगाईला वैतागले आहेत. लवकरच रस्त्याचे काम हाती घेण्यात आले नाही तर आंदोलनाची तयारी नागरिकांनी दर्शवली आहे. 
             

Labels:

तालुका स्तरीय चित्रकला स्पर्धेत मंगरूळ शाळेची समृध्दी डोंगरे हीने तृतीय क्रमांक पटकावले

 
तुळजापूर ,दि .२९ : 

तालुका स्तरीय  चित्रकला स्पर्धेत  मंगरूळ ता . तुळजापूर येथिल   जिल्हा परिषद प्रशालेत इयत्ता चौथीची समृध्दी संतोष  डोंगरे हीने तृतीय क्रमांक पटकावत जिल्हास्तरावर धडक मारली. 

 

  शहरातील जिल्हा परिषद मुलींचा शाळेत स्वातंत्र्य दिना निमित्त 
घेण्यात आलेल्या चित्र कला स्पर्धेत समृध्दी डोंगरे हीने ध्वजारोहनाचा चित्र काढत तिसरा क्रमांक पटकावला. प्रथम शालेय नंतर केंद्र - बीट व तालुका स्तरा नंतर जिल्हा स्तरावर स्पर्धा होणार आहे.  मंगरूळ  जिल्हा परिषद प्रशालेत इयत्ता चौथीची विद्यार्थ्यांनी असलेल्या समृध्दी डोंगरे वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 

Labels:

भटके-विमुक्त दिनानिमित्त सोलापुरात मंगळवारी निर्धार मेळावा आयोजित



जळकोट, दि.२९ मेघराज किलजे

 ओबीसी आरक्षणासाठी राज्यभर आंदोलने सुरू आहेत. ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन तीव्र करण्यासाठी ओबीसी व्हीजेएनटी संघर्ष समन्वय समितीच्यावतीने भटके-विमुक्त मुक्ती दिनानिमित्त मंगळवार दि. ३१ ऑगस्ट  रोजी सोलापूर येथे राज्यस्तरीय निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.


सोलापूर येथील जुळे सोलापूर येथील गंगा लॉन्स येथे मंगळवारी सकाळी ११ वाजता हा निर्धार मेळावा पार पडणार आहे. या वड्याची स्वागताध्यक्ष म्हणून विधान परिषद आमदार राजेश राठोड हे राहणार आहेत. या मेळाव्याला राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा ओबीसीचे नेते विजय वडेट्टीवार यांचे प्रमुख मार्गदर्शन होणार आहे. 


यावेळी पोहरादेवी धर्मगुरू महंत बाबुसिंग  महाराज, महंत कबीरदास महाराज, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, माजी मंत्री चंद्रकांत बावनकुळे, माजी आमदार हरिभाऊ राठोड, माजी मंत्री संजय राठोड, माजी आमदार हुसेन दलवाई, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, आमदार प्रणितीताई शिंदे, माजी आमदार डॉ. नारायण मुंडे, माजी आमदार लक्ष्मण माने, ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मण गायकवाड, ओबीसी नेते डॉ. बबनराव तायवाडे, माजी आमदार रामराव वडकुते, भटक्या व विमुक्त जाती संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मच्छिंद्र भोसले आदी मान्यवर उपस्थित राहून ओबीसी आरक्षण संदर्भात आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार आहेत.


तरी या निर्धार मेळाव्यास तुळजापूर तालुक्यातील सर्व बंजारा समाज व ओबीसी समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन गोर सेनेचे तुळजापूर तालुका अध्यक्ष राजू चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष लखन चव्हाण, जिल्हा सचिव कुमार राठोड, जिल्हा कार्यकारणी सदस्य रवी पवार, संतोष चव्हाण, दिनेश राठोड, सचिन राठोड, अर्जुन राठोड, गोविंद राठोड, रवींद्र राठोड, वसंत चव्हाण, विकास चव्हाण, राजू राठोड, सुधाकर राठोड, वसंत महाराज, देविदास राठोड आदि पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी  पत्रकाद्वारे केले आहे.

Labels:

आमदार कल्याणशेट्टी यांनी घेतली बाबुराव जवळगे कुटुंबीयांची भेट



जळकोट , दि.२९ :

 तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी येथील रहिवासी अणदूर  येथील  जिल्हा परिषद प्रशालेचे सहशिक्षक बाबुराव किसन जवळगे यांचे नुकतेच निधन झाले आहे.अक्कलकोट तालुक्याचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.


यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ. सिद्रामप्पा खजुरे, सामाजिक कार्यकर्ते शरणाप्पा कबाडे, अप्पाराव कबाडे, सर्जेराव जवळगे, कै. बाबुराव जवळगे यांचे चिरंजीव विवेक जवळगे, विशाल जवळगे, सर्व जवळगे कुटुंबीय, ग्रामस्थ उपस्थित होते.

Labels:

श्री खंडेरायाची श्रावणी रविवार पूजा , धार्मिक विधी पूर्ण

अणदूर , दि . २९ : 

  मल्हार मार्तंड श्री खंडेरायाची  श्रावणी रविवार पूजा अणदूरचे (ता . तुळजापूर ) पुजारी,सेवेकरी नंदकुमार ढेपे व महालदार शुभम मोकाशे यांनी आजची पूजा केली. संपूर्ण श्रावण महिन्यात खंडोबा ट्रस्टने शासनाचे सर्व नियम पाळून श्री ची धार्मिक विधी पूर्ण केली आहे.



 नंदकुमार ढेपे आजचे सेवेकरी पुजारी यांनी स्वखर्चाने आजची पूजा केली असून कोरोना नियमा मुळे,भक्ता विना देवाची ही परीक्षा या काळात होत आहे, देवाचे नित्य पूजा  पुजारी मंडळी करीत आहेत. ऐन श्रावणात सलग दुसऱ्या वर्षी ही पूजा होत आहे, श्रावण महिन्यात अणदूर खंडोबाला विविध पोशाखाने सजवण्यात येते. तसेच राम राजू मोकाशे व शाम नीलकंठ मोकाशे यांच्या वतीने पहाटे ओल्या कपड्यात कावड घेऊन मैलापूर जवळील नागझरी मधून पाणी आणून देवाची पूजा पूर्ण श्रावण महिनाभर आणून त्याच पाण्याने पूजा केली जाते. ती प्रथा आजही सुरू असून कोरोना काळात मंदिर बंद असताना सुद्धा ही प्रथा परंपरा आजही चालू असून भक्त भाविक फक्त मुख्य दरवाजाचे दर्शन घेऊन समाधान पावत आहेत.


या अशा भीषण संकटात मंदिरे सरकारने खुली करावीत जेणेकरून भक्त आपल्या देवाला भेटतील व हे संकट पळून जाईल अशी भावना सामान्य भक्तांनी व्यक्त केली आहे


"लग्न,कार्य झाल्यावर आपल्या कुलदैवताला येण्याची प्रथा ,परंपरा असून, आंध्र, कर्नाटक, व महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून भक्त भाविक आपले नवस फेडण्यासाठी येत असतात, त्यांना दरवाजाचे दर्शन घेऊन माघारी जावे लागते, नाविलाज आहे शासनाच्या नियम अटींचे पालन करून भक्ता ना ,भावनिक आव्हान केले जाते व सहकार्याची अपेक्षा करून सर्व धार्मिक विधी केले जातात.

श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट अणदूर

Labels:

Saturday, 28 August 2021

पत्रकारांच्या सहकार्यामुळे काम करणे झाले सोपे - पोलिस उपनिरीक्षक कैलास लहाने


नळदुर्ग , दि . २८ सुहास येडगे : 

पत्रकारांच्या सहकार्यामुळे काम करणे सोपे झाले असल्याचे नळदुर्ग पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक कैलास लहाने यांनी म्हटले आहे. पदोन्नतीनंतर श्री कैलास लहाने यांची पुणे येथे बदली झाली आहे. पदोन्नतीनंतर कैलास लहाने हे आता सहाय्यक पोलिस निरीक्षक झाले आहेत. 


यानिमित्त नळदुर्ग शहर पत्रकार संघाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. गेल्या दोन वर्षांपासुन श्री कैलास लहाने हे नळदुर्ग पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक म्हणुन कार्यरत होते. त्यांनी अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल करुन आपल्या कार्याची चुणुक दाखविली आहे. नळदुर्ग येथे असताना श्री लहाने यांना दोन पदक तसेच दोन पुरस्कार मिळाले आहेत. जनमानसात मिसळुन काम करण्याचा त्यांचा हातखंडा आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी काम करण्याबरोबरच सामाजिक कार्यातही श्री कैलास लहाने हे नेहमी अग्रेसर असतात. पोलिस उपनिरीक्षक कैलास लहाने यांची पदोन्नती होऊन त्यांची सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक म्हणुन पुणे येथे बदली झाली आहे. 


यानिमित्त नळदुर्ग शहर पत्रकार संघाच्यावतीने त्यांचा दि.२८ ऑगस्ट रोजी सत्कार करण्यात आला. पत्रकार विलास येडगे यांच्या हस्ते  लहाने यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास पोलिस उपनिरीक्षक मुसा शहा, जीविशाचे  पोतदार, शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे, पत्रकार लतिफ शेख, शिवाजी नाईक, दादासाहेब बनसोडे, आयुब शेख, सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव, मारुती खारवे, रघुनाथ नागणे, आदीजन उपस्थित होते. 

यावेळी सत्काराला उत्तर देताना सपोनि कैलास लहाने यांनी म्हटले की, पत्रकार आणि पोलिस यांच्यामध्ये समन्वय चांगला असला की काम करण्यात कुठली अडचण येत नाही. पत्रकारांनी नेहमीच सहकार्य केले आहे. नळदुर्ग शहरांतील सर्व क्षेत्रातील नागरीकांनी आम्हाला प्रत्येक कामात सहकार्य केले त्यामुळे मला चांगले काम करता आले असे सपोनि लहाने यांनी म्हटले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार दादासाहेब बनसोडे यांनी मानले.

Labels:

तहसिल कार्यालयाच्या पुरवठा विभागाच्या वतीने इटकळ येथे शिधापत्रिका शिबीर सुरु


इटकळ , दि . २८ 

 इटकळ ता तुळजापूर येथे तहसिल कार्यालयाच्या पुरवठा विभागाच्या वतीने शिधापत्रिका शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.शनिवार  दि.२८ रोजी शिबिरासाठी  तहसीलदार सौदागर तांदळे, नायब तहसीलदार संदीप जाधव,  यांच्यासह सरपंच राजश्री बागडे, उपसरपंच फिरोज मुजावर, माजी सरपंच अरविंद पाटील, माजी सरपंच विजयकुमार गायकवाड, काशिनाथ लकडे ,सायबा क्षिरसागर, अमोल पाटील ,विनोद सलगरे, नजीर शेख,यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी इटकळ सज्जाच्या अंतर्गत असलेल्या गावातील लोकांच्या जीर्ण शिधापत्रिका बदलून देणे, विभक्त शिधापत्रिका देणे ,शिधापत्रिकेतील नाव कमी करणे ,शिधा पत्रिके मध्ये नाव समाविष्ट करणे, नवीन शिधापत्रिका देणे याबाबत इटकळ येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात तहसिलदार सौदागर तांदळे यांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केले.

 दि .२८ व २९ ऑगस्ट रोजी इटकळ  सज्जातील इटकळ, खानापूर, टेलरनगर, काटगाव,  घटेवाडी, चव्हाणवाडी, धोत्री ,खडकी ,शिवाजीनगर, केशेगाव, शिरगापुर ,बाभळगाव, केरुर ,येवती ,काळेगाव, हिप्परगा, आरबळी, दिंडेगाव ,निलेगाव, देवसिंगा (नळ ) या गावातील शेकडो शिधापत्रिका धारकांनी याचा लाभ घेतला.

यावेळी गावोगावचे तलाठी,सज्जाचे मंडळाधिकारी, राशन दुकानदार, शिधापत्रिका लाभधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


Labels:

तुळजापूरात सत्ताधारी गटासममोर यावेळेसही ' लाल बावट्या' चे कडवे आवाहन


तुळजापूर , दि .२८ : 

एकेकाळी शेकापचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणार्‍या तुळजापूर नगर परिषदेवर पुन्हा लाल बावटा फडकविण्याच्या तयारीला पदाधिकार्‍यांनी सुरूवात केली आहे. 

शनिवार  दि.28 झालेल्या बैठकीत आगामी नगर परिषद निवडणूक स्बळावर लढण्याचा निर्णय शेतकरी कामगार पक्षाने घेतला. त्यामुळे सत्ताधारी गटामोर शेतकरी कामगार पक्षाचे कडवे आव्हान यावेळेसही राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 पक्ष कार्यालयात झालेल्या बैठकीत आगामी नगर परिषद निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली. सर्वांची मते जाणून घेऊन स्बळावर ही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. 

यावेळी माजी नगराध्यक्ष भाई प्रकाश देशमुख, खलील शेख, उत्तम अमृतराव, मारूती नाईकवाडी यांनी पक्ष बांधणी आणि निवडणुकीच्या तयारीसंदर्भात मार्गदर्शन केले. 

बैठकीस शेकापचे तालुका सरचिटणीस किरण खपले, सहचिटणीस सुधीर जमादार, जिल्हा कार्यकारिणी सदस्य उत्तम अमृतराव, राजू माने, शहर चिटणीस किरण घाटशिळे, सुभाष छत्रे, प्रताप ताकमोघे, यल्लाप्पा बनपट्टे, सीताराम शिंगे, अभिलाष बेळंबे, उमेश भिसे, राहुल खपले, बापूसाहेब भोसले, शिवनाथ भांजी, नवनाथ जगताप, भालचंद्र अपराध, युवराज पवार यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Labels:

Friday, 27 August 2021

भूम : ४ अवैध खडी केंद्र सील : पोलिसात गुन्हा दाखल


                  
उस्मानाबाद , दि . २७ :

  जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर , अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती आवळे  यांच्या  प्रत्यक्ष उपस्थितीत  भूम तालुक्यातील  चार अनधिकृत स्टोन क्रशरवर कारवाई करत  ते सील करण्यात आले. 
       

याबाबत  पंचनामा करण्यात आला असून  पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे. या कारवाईत उपजिल्हाधिकारी सचिन गिरी, तहसीलदार श्रीमती शृंगारे , नायब तहसीलदार  सावंत ,  राठोड,  पाटील तसेच मंडळ अधिकारी  स्वामी,  पाटील,  हाके, तलाठी  थोरात,  केदार,  पाटील तसेच पोलीस ठाणे भूम येथील पोलिस कर्मचारी यांनी सहभाग घेतला. 

प्रत्यक्ष ठिकाणी ६०० ब्रास हून अधिक बारीक खडी ,  कच विनापरवाना साठवल्याचे आढळून आला आहे .  तसेच यापूर्वी मोठ्या प्रमाणावर टेकडी फोडून उत्खनन केल्याचे दिसून आले. त्याची इ टी (ets  मोजणी करून त्याबाबत कारवाई केली जात आहे. या कारवाईत पोलिस विभागाचेही सहकार्य मिळाले आहे .

Labels:

मुदगलेश्वर महादेव शिवलिंग मंदिरात अमरनाथ बाबा अवतार पोर्ट्रेट रांगोळी रेखाटली


नंदकुमार पोतदार,सुप्रिया कावरे (बडोदकर) टीमनी साकारली रांगोळी 


तुळजापूर ,दि .२७ : 

तुळजापूर येथील प्राचीन श्री मुदगलेश्वर महादेव शिवलिंग मंदिरात शहरातील भक्तांच्या माध्यमातून विविध रूपात आकर्षक अशी सजावट कायमस्वरूपी केल्याचे आपण पाहतो, नाविन्यपूर्ण देखावा मांडणी असो किंवा फळा फुलांची आरास असो  शिवभक्तांना यातून विविध रुपात शिवलिंगाचे नयनरम्य दर्शन घडवली जाते.


तुळजापूर घाट पायथ्याशी असलेल्या सिंदफळ गाव शिवारातील श्री मुदगलेश्वर महादेव शिवलिंग मंदिरात श्रावण महिन्यात दैनंदिन विविध रूपात सजावट करून भाविकांना सोशल माध्यमातून दर्शन दिले जात आहे, कोरोनाच्या महामारीमुळे महाराष्ट्रातील सर्व मंदिरे बंद असल्यामुळे श्री मुदगलेश्वर मंदिर हे भाविक भक्तांसाठी बंद ठेवण्यात आले आहे परंतु पुजारी बांधव आणि मंदिरात आकर्षक पद्धतीने सजावट करणाऱ्या टीमच्या माध्यमातून सातत्याने मंदिर व मंदिर परिसराचे नयनरम्य सजावट आपणास पहावयास मिळते आहे.


श्रावण महिन्यातील सोमवारी किंवा इतरही दिवशी सजावटी विशेष असतात तुळजापूर शहरातील आर्ट कलावंत नंदकुमार पोद्दार व  सुप्रिया बडोदकर टीम नी श्रावणमास निमित्त श्री. मुद्गलेश्वर महादेव मंदिरामध्ये अमरनाथ बाबा अवतार महापूजा सचित्र पोर्ट्रेट रांगोळी रेखाटन करून आपले कौशल्य चित्रणसेवा अर्पण केली आहे. 


ही पोर्ट्रेट कलाकृती रांगोळीद्वारे सुंदर  रेखाटल्यामुळे भक्तांमधून कौतुक व्यक्त केले जात आहे, या टीममधील नंदकुमार पोद्दार व कु. सुप्रिया बडोदकर,सहाय्यक कलावंत कु.नेहा कावरे (बडोदकर),कु. हर्षदा कावरे ( बडोदकर),कु.श्रावणी शिंदे कु.गार्गी कावरे,श्रावणी चव्हाण,कांचन इंगळे,सई लोंढे, साक्षी आदिंनी परिश्रम घेतले आहे.

Labels:

रविवारी उमरगा येथे प्रहार जनशक्ती पक्षाची सदस्य नोंदणी अभियान


उमरगा , दि .२७ :  

आगामी निवडणूकीच्या अनुषंगाने  पक्षावाढीसाठी  पहिल्यांदाच प्रहार पक्षाची बांधणीला सुरुवात झाली आहे. सुस्त प्रशासकीय यंत्रणेला त्रासलेले, सर्व दिव्यांग, निराधार, कामगार आणि शेतकरी बंधूचा कल प्रहार पक्षात होताना दिसून येत आहे.
 तर बरेच काही पक्षातील पदाधिकारी आणि काही सत्ताधारी सदस्य प्रहार जनशक्ती पक्षात सामील होणार असल्याचे उमरगा प्रहार सेवक सुरज आबाचाने यांनी माहिती दिली.
  

रविवारी दि 29 ऑगस्ट रोजी उमरगा येथे आयोजित सदस्य नोंदणी अभियानांतर्गत जास्तीत जास्त युवकांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षात सामील व्हावे असे प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सयाजीराव देशमुख  आणि दिव्यांग विभागाचे जिल्हाध्यक्ष मयूर काकडे यांनी आवाहन केले आहे.

      
  राज्यमंत्री बच्चू  कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या सदस्य नोंदणी कार्यक्रमास  संघटनेचे उस्मानाबाद जिल्ह्याध्यक्ष सयाजी देशमुख, प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे उस्मानाबाद जिल्ह्याध्यक्ष  मयूर काकडे, जिल्हा उपाध्यक्ष राचय्या स्वामी,बाळासाहेब कसबे, नवनाथ मोहिते , बाळासाहेब पाटील, जमीर शेख,  शशिकांत मुळे ,   नागनाथ पाटील,  महंमद शेख,  अनिल महाबोले आदिसांह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Labels:

तामलवाडी येथे सुंदर ग्राम पुरस्कार योजनेच्या निवड समितीचे स्वागत

                                                                                  
  तामलवाडी , दि . २७ : 

                  
 मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र यांच्या सरहद्दीवर वसलेले तामलवाडी ता. तुळजापूर  या ग्रामपंचायतीने "आर आर ( आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना "या योजनेत सहभाग घेतलेला असल्याने आदर्श ग्राम जिल्हा निवड समितीने परीक्षण केले.

 तामलवाडी येथे ग्राम सचिवालय विविध रस्ते गटारी, सार्वजनिक स्वच्छतागृहे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंगणवाडी ,जिमखाना ,स्पर्धा परीक्षांचे वाचनालय तसेच पाचवी ते बारावी पर्यंतचे वर्ग चालू असलेली सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे परीक्षण समितीने भेट देऊन समाधान व्यक्त केले.

 याप्रसंगी या परीक्षण समितीचे स्वागत करण्यात आले या कार्यक्रमास जिल्हा उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत नितीन दाताळ मुख्य लेखा व वित्त अधिकारी सुरेश केंद्रे, जिल्हा कृषी अधिकारी महेश तिर्थकर ,कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा दशरथ देवकर, नवनिर्वाचित  पंचायत समितीचे उपसभापती दत्तात्रय शिंदे गटविकास अधिकारी प्रताप सिंह मरोड ,सहाय्यक गटविकास अधिकारी मोहन राऊत, माजी पंचायत समिती सदस्य गुंडाप्पा गायकवाड ,सरपंच सौ मंगल  गवळी, उपसरपंच हमीद पठाण, ग्रामपंचायत सदस्य सतीश माळी, सुधीर पाटील ,आप्पासाहेब रणसुरे, माजी सरपंच ज्ञानेश्वर माळी, सामाजिक कार्यकर्ते हनुमंत गवळी, शाहीर गायकवाड ,डॉ रविकांत गुरव, शिवाजी सावंत, यांचा सत्कार त्र्यंबकेश्वर बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बसवनप्पा मसुते,  ग्रामपंचायत सदस्य यशवंत लोंढे , प्राचार्य सुभाष जाधव, पर्यवेक्षक गणेश हलकारे , ज्येष्ठ शिक्षक चंद्रकांत साळुंखे ,चांगदेव सावळे, प्रभाकर जाधव, सुहास वडणे, महादेव मसुते, महादेव माळी ,शिवकुमार सिताफळे, लक्ष्मण पाटील, योगेश राऊत, गिरीश जाधव ,विनोद कुंभार ,बालाजी साठे,  गणेश स्वामी ,दत्तू कोकरे, सुनील पाटील महिला शिक्षिका श्रीमती शाहिदा पिरजादे, मनीषा गिरे, मनीषा सावंत, विठाबाई पाटील या कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर क कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.


 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास वाढणे तर महादेव मसुते यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

Labels:

तुळजापूर : विकास कामासाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांचा जोरदार पाठपुरावा

तुळजापूर पंचायत समिती बैठक जि. प. उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या उपस्थितीत संपन्न



तुळजापूर , दि . २७ :

तुळजापूर पंचायत समिती सभागृहात  जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिवसेना नेते  धनंजय सावंत यांच्या अध्यक्षतेखाली तुळजापूर तालुक्यातील पंचायत समितीचे सर्व अधिकारी व पदाधिकारी आणि सरपंच उपसरपंच व ग्रामस्थ व शिवसेना तालुका पदाधिकारी यांची बैठक पंचायत समिती सभागृह येथे पार पडली. 

उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या उपस्थितीमुळे तुळजापूर तालुक्यातील शिवसैनिकांनी तालुक्यातील विकास प्रश्नाबाबत जोरदार पाठपुरावा केला.


 सदर बैठकीस पाणीपुरवठा, जलसंधारण, बांधकाम ,आरोग्यविभाग, शिक्षण विभाग. कृषी विभाग व शेत रस्ते व गाय, गोठा प्रस्ताव सादर करून तात्काळ मान्यता द्यावी असे जि प उपाध्यक्ष धनंजय सावंत  यांनी आदेश दिले.  



तसेच  जनतेसाठी विविध योजना गावपातळीवर पोचविण्याचे आदेश ग्रामसेवक व संबंधित अधिकाऱ्यांना दिले. कार्यक्रमाचे आभार प्रशांत कुमार मनोर यांनी मानले .


सदरील बैठकीस शिवसेना संपर्क प्रमुख अनिल खोचरे, पंचायत समिती सभापती व उपसभापती व माजी उपजिल्हाप्रमुख श्याम पवार,  तालुका प्रमुख जगन्नाथ  गवळी, तुळजापूर शहर प्रमुख सुधीर कदम,  उपतालुकाप्रमुख सुनील जाधव , बाजार समितीचे उपसभापती संजय भोसले,  अमीर शेख, रोहित चव्हाण, प्रदीप मगर, उपशहर बापू नाईकवाडी,  दिनेश रसाळ,  युवासेना तालुका प्रमुख प्रतीक रोचकरी,  सोशल मीडिया तालुकाप्रमुख चेतन बंडगर, विभाग प्रमुख बालाजी पांचाळ ,अनिल भोपळे, महेंद्र सुरवसे ,अनिल छाञे,सोशल मीडिया प्रमुख सिद्धाराम कारभारी तसेच जयप्रकाश दरेकर. कृष्णा दरेकर .दादाराव पारवे सौदागर साप्ते. बालाजी डांगे .नेताजी पवार. जय मार्कंड. कृष्णाथ मोरे .ज्ञानेश्वर भोसले. शिवाजी कामे .अमोल गवळी. सचिन देशमुख .राजेंद्र महाराज .नानाजी कारभारी .कालिदास सुरवसे आदी शिवसैनिक उपस्थित होते.

तुळजापूर तालुक्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नंतर पंचायत समितीच्या बैठकीसाठी शिवसेनेचे नेते जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी तुळजापूर तालुक्यातील शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीत तालुक्यातील विकास कामांचा आढावा घेतला या प्रसंगी तालुक्यातील शिवसेना नेत्यांनी आपापल्या गावांमधील विकास कामाच्या अनुषंगाने बैठकीमध्ये जोरदार पाठपुरावा करताना दिसून आले.

Labels:

तुळजापूरचे डॉ. निशांत भुजबळ यांस बी. ए. एम. एस. पदवी प्राप्त


तुळजापुर दि . २७ : 

तुळजापूर येथील निशांत हनुमंत भुजबळ यांनी बेंगलोर येथील राजीव गांधी हेल्थ सायन्स युनिव्हर्सिटी यांच्याकडून बी.ए.एम.एस. वैद्यकीय सेवेतील महत्त्वाची पदवी प्राप्त केली आहे. शिक्षण महर्षी सि.ना. आलुरे गुरुजी यांचे ते नातू आहेत.


विरपुलिकेश आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज बदामी ( कर्नाटक ) या महाविद्यालयांमधून निशांत हनुमंत भुजबळ यांनी ही पदवी संपादन केली आहे. 


राजीव गांधी हेल्थ युनिव्हर्सिटी बेंगलोर यांच्याकडून ही पदवी मिळाल्यानंतर माजी परिवहन मंत्री मधुकरराव चव्हाण, माजी आमदार नरेंद्र बोरगावकर, बालाघाट शिक्षण संस्थेचे सचिव उल्हास बोरगावकर, तुळजापूरच्या नगराध्यक्ष सचिन रोचकरी, अणदूर सरपंच रामचंद्र आलुरे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती ॲड दीपक आलुरे, यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल शित्रे, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय कोरेकर, जवाहर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी,  आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Labels:

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचेकडून हंगरकर कुटुंबियांचं सांत्वन


काटी , दि . २७ : 

तुळजापूर तालुक्यातील काटी येथील कुलस्वामिनी सुतमीलचे माजी संचालक व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी उपसरपंच कै. सुर्यभान हंगरकर यांचे 12 मे रोजी अल्पशा आजाराने दु निधन झाले. कै. सुर्यभान हंगरकर यांच्या निधनानंतर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी काटी येथे जाऊन हंगरकर  कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत कॉंग्रेस पक्षाचा महत्वाचा शिलेदार गमावल्याची भावना व्यक्त करीत कोरोना संसर्ग रोगाविषयी काळजी घेण्याचे सांगत हंगरकर कुटुंबियांचं सांत्वन केले.

     
यावेळी मुकुंद डोंगरे, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. धिरज पाटील, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष अमर मगर,सावरगावचे सरपंच रामेश्वर तोडकरी, बाबा वडणे, सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर, वडगाव काटीचे सरपंच गौरीशंकर कोडगिरे, प्रा.अभिमान हंगरकर,चंद्रकांत काटे,अमोल शितोळे,नानासाहेब जानकर ,ग्रा.पं.सदस्य भैरी काळे, शिवाजी चिवरे,अनिल हंगरकर,अखिल शितोळे,सुखदेव हंगरकर,अमित हंगरकर,अजित हंगरकर,दिपक फंड,विशाल काटे,निवृत्ती गाटे, धनंजय गुरव, कृष्णा दरेकर, आबा गाटे सुर्यभान हंगरकर यांच्या भगिनी गोदन वडणे व विजया शितोळे,मुलगा अनिलसह हंगरकर कुटुंबीय तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

Labels:

उस्मानाबाद : नुकससान भरपाईसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनाचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन



स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रस्त्यावर भाजीपाला फेकून आंदोलन

भाजीपाल्याचे दर गडगडले; शेतकर्‍यांना प्रतिक्विंटल हजार रूपये अनुदान द्या




 उस्मानाबाद ,दि .२७ : 

भाजीपाल्याबरोबर दुधाचे भाव प्रचंड प्रमाणात घसरले आहेत. बी-बियाणे, खते, औषधे व मजुरीचा खर्चही निघत नसल्यामुळे शेतकर्‍यांनी जगायचे कसे? असा सवाल करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजीपाला फेकून आंदोलन  केले. 


केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे जनसामान्यांच्या हिताचे कुठलेही निर्णय घेत नाहीत. अत्यंत वाईट अवस्थेत शेतकर्‍यांची स्थिती आहे. कुठलेही उत्पन्न घ्यायचे असेल तर त्याचा खर्च सुद्धा निघत नाही. दोन्हीही सरकारे शेतकर्‍यांच्या हितासाठी निर्णय घेताना दिसत नाहीत. त्यामुळे सर्व भाजीपाला पिकांना प्रतिक्विंटल एक हजार रूपये अनुदान व हेक्टरी एक लाख रूपये नुकसान भरपाई द्यावी, दुधाला योग्य दर मिळावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून मागण्याचे निवेदन देण्यात आले. 


निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे, तानाजी पाटील, राजेंद्र हाके, महादेव मुंडे, उद्धव भोजने, नोताजी जमदाडे, प्रदीप जमदाडे, ज्ञानेश्वर जमदाडे पांडुरंग काकडे, नवनाथ शिंदे, भैय्या भोरे, संतोष कानडे, जयदीप बोदले, शशि चव्हाण, दत्तात्रय खैरे, सूर्यकांत खैरे आदी पदाधिकार्‍यांच्या स्वाक्षरी आहेत.

Labels:

तुळजापूर : श्री कृष्णजन्माष्टमी महोत्सवानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन



तुळजापूर , दि .२८ :


तुळजापूर शहरामध्ये झुंजार हनुमान भजनी मंडळ व दीपक संघ सर्व सभासदांच्या वतीने “श्रीकृष्णजन्माष्टमी” निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  शुक्रवार   दि . २७ ऑगस्ट रोजी झुंजार हनुमान मंदिरामध्ये आयोजित रक्तदान शिबिरात  एक वाजेपर्यंत 25 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे ,असे यावेळी नितीन  रोचकरी यांनी सांगितले.


 यावेळी नितीन  रोचकरी, खंडू जाधव, संजू पैलवान, यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.  कार्यक्रम यशस्वीतेसाठी अमर काळे, दादा साठे, ओमकार काळे, संग्राम नाईकवाडी  ,सौरभ रोचकरी अमोल सोनवणे यांनी परिश्रम घेतले

Labels:

Thursday, 26 August 2021

सचिन घोडके यांची भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्यपदी निवड


नळदुर्ग , दि . २६ : 

गुळहळ्ळी ता .तुळजापूर येथिल कार्यकर्ते सचिन घोडके यांची
भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्यपदी  निवड  करण्यात आली आहे. त्याबद्दल घोडके यांचे आभिनंदन केले जात आहे.


भाजपाचे आमदार सुजितसिंह ठाकूर  यांच्या  मार्गदर्शनाखाली  सचिन घोडके याना   प्रथम तालुक्याची नंतर जिल्ह्याची आणि आता प्रदेशाची जबाबदारी दिली आहे. आतापर्यंत दिलेल्या जबाबदारीला व्यवस्थितरित्या पार पाडून भारतीय जनता पार्टीचे  विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम केले आहे. नव्याने दिलेल्या या जबाबदारीच्या संधीचे सोने करण्याची त्यांना पक्षनेतृत्वाने दिलेली आहे.
नव्या जबाबदारीच्या अनुषंगाने आता नवीन आव्हाने व नवीन काम करण्याची  संधी घोडके याना मिळालेली आहे. 


आमदार  सुजितसिंह ठाकूर , प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटिल , प्रदेश सचिव प्रेरणा होनराव,अरुण पाठक, तुळजापूर  आमदार राणाजगजितसिंह पाटिल,  सौअर्चना राणाजगजितसिंह  पाटिल, जिल्हाध्यक्ष नितीन काळे, दत्ता  कुलकर्णी, जिल्हा समन्वयक नेताजी  पाटिल, जिल्हाध्यक्ष राजसिंहा निंबाळकर, उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुशांत भूमकर  तालुकाध्यक्ष संतोष  बोबडे आदीनी  सचिन घोडके  यांचे अभिनंदन करुन  शुभेच्छा दिल्या.
 

Labels:

अस्मिता कृषिपर्यटन प्रकल्पास पर्यटन संचालनालयाने दिले नोंदणी प्रमाणपत्र

 

सोलापूर , दि . २६: 

 महाराष्ट्र शासनाने कृषी पर्यटनावर मोठा भर दिला आहे. महाराष्ट्र पर्यावरण मंत्री ना आदित्य ठाकरे यांनी कृषी पर्यटनाला बळ देण्याचे धोरण अंगीकारले आहे. त्यामुळे  कृषी पर्यटनाला मोठी चालना मिळत आहे. सोलापूर जिल्ह्यात एका शेतकरी महिलेने कृषी पर्यटन सुरू करण्याचा बहुमान शिवसेना नेत्या व  मनोरमा बँकेच्या व्हाईस चेअरमन अस्मिता गायकवाड  यांनी पटकावला आहे.

 मोहोळ तालुक्यातील मसले चौधरी येथे 40 एकर शेत जमिनीवर अस्मिता कृषी पर्यटनाचा भव्य प्रकल्प सन 2017 पासून उभारला जात आहे. यामध्ये आंबा, चिंच, पेरू, नारळ, लिंबू तसेच  चिकू ,मोसंबी, जांभूळ ,सीताफळ आदींच्या बागा आहेत . 

याशिवाय निवासी आणि अनिवासी पर्यटकांच्या सहली करिता भव्य मनोरंजन हॉल, मंगल कार्यालय, रेन डान्स, इंनङोअर गेम्स ,मैदानी खेळ, बोटिंग, बैलगाडी रपेट , ट्रॅक्टर रपेट, फेरी गार्डन, कृषी अवजारांचे प्रदर्शन ,भारतीय संस्कृतीचे प्रदर्शन  आणि स्वादिष्ट व चविष्ट भोजन , सुरक्षित निवासी व्यवस्था तसेच पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर या तीर्थक्षेत्रांच्या सहलीचा ही समावेश आहे. या प्रकल्पाची उभारणी पूर्णत्वाला आली असून लवकरच मान्यवरच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा  होणार आहे .


यासाठी प्रकल्पाची नोंदणी आणि आवश्यक ते परवाने मिळाले आहेत दि. 25 ऑगस्ट 2021 रोजी  बुधवारी महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालया विभागाच्या उपसंचालक श्रीमती सुप्रिया करमरकर यांनी या बाबतचे नोंदणी प्रमाणपत्र दिले आहे. यापूर्वी पर्यटन आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी आणि तपासणी विशेष पथकाद्वारे केली होती . प्रमाणपत्र अस्मिता कृषी पर्यटनाचे सी.ई.ओ. अॕङ. सुरेश गायकवाड यांनी पुणे येथील साखर संकुल येथे स्वीकारले आहे. यावेळी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे यांचे कृषी पर्यटन विभाग प्रमुख बाळासाहेब सोळांकूर हे देखील उपस्थित होते.

 सोलापूर जिल्ह्यातून एका महिला शेतकऱ्याने उभारलेला कृषी पर्यटनाचा हा एकमेव प्रकल्प आहे .यामुळे अस्मिता गायकवाड यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Labels:

तुळजापूर : तालुकास्तरीय भाषण स्पर्धेत आर्यन शिंदे प्रथम

 


तुळजापूर, दि. २६ :

स्वातंत्र्य दिनाचा 74 वा वर्धापन दिनानिमित्त तुळजापूर तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोताचीवाडीचा विद्यार्थी आर्यन अमोल शिंदे गट 1 ते 5 भाषण स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. त्याबद्दल त्याचे तुळजापूर ग्रामीण बीटच्या विस्तार अधिकारी श्रीमती. दैवशाला शिंदे मॅडम, केंद्रप्रमुख तानाजी महाजन ,विषय साधन व्यक्ती उंडे एस. एस. सरपंच सौ.मोहिनी ताई क्षीरसागर ,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रमोद क्षीरसागर ,उपसरपंच अजित देडे, सदस्या अर्चना पवार ,शाळेचे मुख्याध्यापक अशोक खडके सहशिक्षिका मनिषा क्षीरसागर व पालक व केंद्रातील सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले.

Labels:

जीव धोक्यात घालुन अनेकाचे प्राण वाचविणा-या नळदुर्गच्या जावाईचे सासुरवाडीत भव्य गौरव सोहळा


नळदुर्ग , दि . २६ : 

गेल्या महिन्यात  पावसाने सर्वञ हाहाकार उडविला. मुसळधार पावसामुळे आचानक पुर येवुन गंभीर परस्थिती निर्माण झाली आसताना 
नळदुर्गचे जावाई  गफार जमिल शेख रा. महाड जि.रायगड यानी जीव धोक्यात घालुन राञभर पाण्यातुन २२ लोकाचे प्राण वाचविले. या उल्लेखनीय व गौरवास्पद कार्याची दखल घेवुन शेख यांचा नळदुर्ग शहरात भव्य सत्कार करुन गौरविण्यात आले.

 
दि .२२ व २३ जुलै  रोजी महाड शहरात अतिवृष्टी झाली होती. त्यात प्रचंड जिवित व वित्त हानी झाली.सरेकर आळी या भागात २२ लोक पूरात अडकले होते.यावेळी स्वतःच्या जीवाची परवा न करता जीव धोक्यात घालून संध्याकाळी ७.३० वाजता पाण्यात गेले ते पहाटे ३.३०.पर्यन्त एकूण २२ लोकांचे प्राण वाचविले आहे. अत्यंत धाडसी काम केले आहे.  त्यांच्या या  कामाची विविध वृत्तवाहिनीने  दखल घेतली आहे.  बुधवार रोजी ते नळदुर्ग शहरात आले असता दिपक निकाळजे सामाजिक विकास संघटनेच्या वतीने  तालुका अध्यक्ष उमेश गायकवाड व अजहर शेख  यांनी सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. यावेळी  शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष कमलाकर चव्हाण ,राष्ट्रवादीचे बशीर शेख , परिवर्तनचे मारुती बनसोडे , रिपाईचे अरुण लोखंडे , सामाजिक कार्यकर्ते मारुती खारवे ,बाबूराव बनसोडे , पोलिस उपनिरीक्षक  प्रितमकुमार पुजारी , हाजी मस्तान शेख , अन्वर शेख ,पिन्टू लोंढे  तालुका उपाध्यक्ष ,भाजपाचे श्रमिक पोतदार (जिल्हा सचिव) , विशाल डूकरे , पत्रकार आयुब शेख ,गणेश बनसोडे , आंबादास पवार ,संतोष कलशेट्टी इत्यादि उपस्थित होते.

Labels:

गोदावरी अर्बन सास्तुर शाखेच्या वतीने जागतिक जेष्ठ नागरिक दिन साजरा


लोहारा , दि .२६ : 

लोहारा तालुक्यातील सास्तुरच्या गोदावरी अर्बन सोसायटी  शाखेच्या वतीने जागतिक जेष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून सस्तुरसह पाच राज्यातील सर्व शाखांमधून जेष्ठ नागरिकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे.


जेष्ठ नागरिक हे समाजाचे महत्वपूर्ण घटक असून त्यांचे जगणे सुसह्य होण्यासाठी जागतिक दिनाचे औचित्य साधत गोदावरी अर्बनने नागरिकांसाठी  पाऊण टक्का (०.७५) वाढीव व्याजदर दिले आहे. 
गोदावरी अर्बनचे संस्थापक खासदार हेमंत पाटील व अध्यक्ष राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गोदावरी अर्बनचे व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांनी गोदावरी अर्बनने जेष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून पाऊण टक्के (०.७५) अधिक व्याजदराची योजना अंमलात आणली आहे.

 यावेळी  गोदावरी अर्बन सोसायटीचे स्थानिक संचालक रब्बानी नळेगावे, विजयकुमार क्षिरसागर, श्याम हासुरे, उद्धव पवार, शिवशंकर मिटकरी, संतोष मूर्टे, गोविंद कोळी, किसन पवार व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

Labels:

श्री तिर्थक्षेञ तुळजापूरात श्रावणमासानिमित्त भाविकांची गर्दी



तुळजापूर , दि .२६: 

  कोरोनाचा    प्रादुर्भाव कमी होवु लागताच  तिर्थक्षेञ तुळजापूरात भाविकांचे आगमन मोठ्या संखेने होवु लागल्याने तिर्थक्षेञ तुळजापूरची अर्थव्यवस्था पुनश्च रुळावर येण्यास सुरुवात झाली आहे.


यामुळे शहरवासियामध्ये श्रावण महिन्यात उत्साहाचे वातावरण पसरले आहे. तिर्थक्षेञ तुळजापूर पंचक्रोशीतील पंचवीस ते तीस गावचे अर्थकरण  श्री तुळजाभवानी मंदीरवर  अवलंबून आहे. या गावातील हजारो तरुणांना येथे रोजगार मिळतो, तसेच शेकडो वृद्ध अंध,अपंग निराधाराचे पोट येथे भरते.  शेकडो  व्यापारी वर्गाचा व्यवसाय येथे  चालतो. स्थानिक नव्वद टक्के  कुटुंबाचा उदारनिर्वाहचा  प्रश्न येथे सुटतो. गरीबां पासुन श्रीमंता पर्यतचे सर्वाचेच अर्थिक व्यवहार चक्र मंदीरवर अवलंबून आहे.


माञ कोरोनामुळे श्री तुळजाभवानी मंदीर भाविकांना प्रवेश बंद होवुन या लोकांचा रोजी रोटीवरच गडांतर आल्याचे  सर्वश्रुत आहे.
कोरोना पहिल्या टप्पानंतर 16/11/2020 ला उघडले होते,व पुनश्च कोरोनाचा प्रादुर्भाव  वाढताच दुसऱ्या टप्यातील  5/4/21 ला  मंदीर भाविकांना बंद केले .


याचा मोठा परिणाम तिर्थक्षेञ तुळजापूर शहरासह पंचवीस गावांवार झाले. दुसरा फटका माञ सर्वानाच प्रचंड ञासदायक ठरला . यात पहिल्या टप्यातील नुकसानमुळे आधीच मेटाकुठीला आलेले सर्वच घटक दुसरा टप्पाचा आघात त्यांना सहन करण्यापलिकडे ठरला. पण करायचे काय असा प्रश्न त्यांच्या  समोर पडला. माञ देवीकृपेने कोरोना दुसरा टप्पा ओसरु लागला असुन त्यात श्रावण मास सुरु होताच देवीचे  बाहेरून का दर्शन घडेना, या हेतुन  श्रावणातील खेटा पुर्ण करण्यासाठी सध्या भाविकांचे आगमन तिर्थक्षेञी मोठ्या संखेने होवु लागल्यामुळे शहरातील अर्थव्यवस्थेचे थांबलेले चक्र हळुहळु चालु झाल्याचे दिसत आहे. याचे समाधान  येथील व्यापारी ,पुजारी , बेरोजगार तरुणासह अवलंबून  आसणा-यांना होवु लागले आहे.

 राज्य व देशातील करोना कमी होत असल्याने सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात श्री तुळजाभवानी मंदीर भाविकांना खुले होण्याची शक्यता  वर्तवली  जात आहे. लोकांना कोरोना बरोबर चालायाचे त्या शिवाय पर्याय नाही, हे उमगल्याने आता येथे येणारे भाविक दक्षता घेवुन येत आहे.
त्यामुळे भाविकांची उत्सुकता ताणुन देण्यासाठी प्रथमता दोन डोस  घेलेल्याना मंदीरात प्रवेश देण्याची मागणी होत आहे व मंदीर अखंड बावीस ते तेवीस तास सुरु ठेवले तर भाविकांचा गर्दीवर नियंत्रण येवुन जास्तीत जास्त भाविकांना दर्शन मिळेल अशी मागणी सर्वच स्तरातुन होत आहे.


माजी मंञी मधुकरराव चव्हाण यांची मंदीर सुरु करण्यासाठी महसुल मंञ्यांना विनंती


तिर्थक्षेञ तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदीर भाविकांना खुले करावे यासाठी  माजीं मञी मधुकरराव  चव्हाण यांनी  महसुल मंञी बाळासाहेब थोरात यांना साकडे घातले आसुन याचा सकारात्मक विचार केला जाईल असे आश्वासन त्यांनी दिल्याची माहीती माजी मंञी चव्हाण यांनी दिली.



कोरोना नियमाचे भाविकाकडुन पालन !

 श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला येणारा देवी भक्त  मास्कचा वापर करुन देवीदर्शन करीत असल्याने व लगेचच गावी जात असल्याने भाविक वर्ग ही शासनाच्या कोरोना निर्देशाचे पालन करीत असल्याबदल दिलासादायक ठरत आहे.

Labels:

शहापूर जिल्हा परिषद गटातील गावात प्रधानमंत्री ई मुद्रा कर्जबाबत भाजप कारर्यकर्त्यानी दिली माहिती


नळदुर्ग , दि . २६ : 

तुळजापूर तालुक्यातील  शहापूर जिल्हा  परिषद  गटात  प्रधानमंत्री ई मुद्रा लोन संदर्भांत भाजपचे  सुशांत भूमकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली
 गावा - गावात बैठक घेवुन माहिती देण्यात आली.
 

 शहापूर गटातील नवीन उद्योजकाना गावो गावी जाऊन ई मुद्रा लोन संदर्भात बैठक घेऊन या योजने बद्दल सविस्तर माहिती देऊन प्रत्येक गावात एका कार्यकर्त्यास हि जबाबदारी देण्यात आली व पुढील आठवड्यात या योजनेची सुरुवात करण्याचे नियोजन करण्यात आले.


कर्जासाठी  आवश्यक कागदपत्र पुढील प्रमाणे आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेत  खाते , मोबाईल  नंबर लिंक (सहा महिन्यापूर्वीचे) आधार कार्ड लिंक आवश्यक , पॅनकार्डसह मोबाईल लिंक आदीसह इतर  सर्व कागदपत्र व्यवस्थित असतील तर त्वरित आपले कर्ज आपल्या खात्यात जमा होईल. तरी ज्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्यानी वरील कागदपत्रांची पूर्तता करून खालील प्रमुख कार्यकर्त्यांना भेटावे व गरजुनी  ई मुद्रा लोन  घेण्याचे आवाहन करुन   काही अडचण असल्यास 
सचिन घोडके यांच्याशी संपर्क करावे,  त्याचबरोबर प्रमुख कार्यकर्ता 
शहापूर गणेश नवाडे ,निलेगाव
संजय जमादार , विठ्ठल घंटे , निलेगाव तांडा- दगडू दुधभाते , अकबर शेखदार , देवसिंगा (नळ)- धनराज पाटिल , केशेगाव -  प्रदिप हुकिरे ,
शिवानंद बिराजदार , सराटी - जठाशंकर पाटिल, सिद्राम सोलापूरे,  बाभळगाव - मेघराज जाधव आदी.


Labels:

Wednesday, 25 August 2021

लोहारा येथे शिधापञिका संदर्भात शिबीराचा शुभारंभ

लोहारा , दि .२५ : 
      
लोहारा तालुक्यातील जीर्ण शिधापत्रीका बदलुन देणे, विभक्त शिधापत्रीका देणे, तसेच शिधापत्रीकेतील नाव कमी करणे, नवीन नाव समावीष्ट करणे यासह आदी बाबत तालुका स्तरावर (दि.२५) ते (दि.२७) आगस्ट दरम्यान मोहिम राबविण्यात येत असून बुधवारी (दि.२५) लोहारा येथील भारत माता मंदिरात या शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.

  पहिल्या दिवशी पात्र लाभार्थ्यांना नवीन, दुय्यम, शिधापत्रिका व नाव कमी करणे, वाढवणे आदींचे तहसीलदार संतोष रुईकर पुरवठा विभागाचे पेशकार बालाजी चामे यांच्या हस्ते नागरिकांना वाटप करण्यात आले.

        
जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे सुचनेनुसार जिर्ण झालेल्या‍ शिधापत्रीका बदलुन देणे, नाव समाविष्ट करणे व नाव कमी करणे, नवीन नावे समाविष्ट करण्यासाठी शिबीराचे आयोजन करुन लाभ देण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार लोहारा येथे पहिल्याच दिवशी नागरिकांचा या मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून गुरुवारी (दि.२६) माकणी मंडळा अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांसाठी ग्रामंपचायत कार्यालय माकणी, तर
शुक्रवार (दि.२७) जेवळी मंडळा अंतर्गत सर्व  गावांसाठी जेवळी ग्रामंपचायत कार्यालयात शिबीराचे आयोजन करण्यात आले असून पात्र व गरजू लाभार्थ्यांना शिधापत्रिकेचे वाटप करण्यात येणार असून गरजू लाभार्थ्यांनी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार संतोष रुईकर व पुरवठा विभागाचे पेशकार बालाजी चामे यांनी केले आहे.

     शिबीर यशस्वीतेसाठी अव्वल कारकून शिवलिंग येरटे, मंडळ अधिकारी श्री. बरणाळे, श्री.  स्वामी, तलाठी श्री. हंगरगे, मनोज चव्हाण, दिगंबर कांबळे, आनंद राठोड, संभाजी सुरवसे, इंनुस पटेल, महेश्वरी साळुंके, यांच्यासह इतर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले

Labels: