Sunday, 31 July 2022

गावठी दारु निर्मीती अड्ड्यावर छापा; १लाख ८० हजार रुपये किंमतीचा माल आढळला


नळदुर्ग पोलीस ठाणे :  नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पथक पो.ठा. हद्दीतील अवैध मद्य विरोधी कारवाई साठी काल दि. 30 जुलै रोजी पहाटे पासून गस्तीस होते. 



दरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने 09.50 वा. सु. तुळजापूर तालुक्यातील येडोळा शिवारात असलेल्या खंडाळा नदी पात्राजवळील गावठी दारु निर्मीतीच्या अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी तेथे येडोळा ग्रामस्थ- सुनिल तिप्पु पवार हे गावठी दारु निर्मीती करताना आढळले. घटनास्थळी गावठी दारु निर्मीतीचा गुळ- पाणी मिश्रणाचा एकुण 3,600 लिटर आंबवलेला द्रव हा  लोखंडी पिंपांत असलेला एकुण अंदाजे 1,80,000 ₹ किंमतीचा माल आढळला. गावठी दारु निर्मीतीचा द्रव पदार्थ हा नाशवंत असल्याने पथकाने तो जागीच ओतून नष्ट करुन नमूद व्यक्तीविरुध्द नळदुर्ग पो.ठा. येथे गुन्हा क्र. 238/2022 हा महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65 (ई) अंतर्गत नोंदवला आहे.

           

 सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांच्या आदेशावरुन नळुदर्ग पो.ठा. चे सपोनि- श्री. सिध्देश्वर गोरे यांसह पथकाने केली आहे.

Labels:

जबाबदारी आत्मविश्वासाने पार पाडावे- बसवराज पाटील


मुरूम  दि.३०, 


येथील प्रतिभा निकेतन विद्यालयातील १९८८-८९ च्या बॅचच्या म्हणजेच तब्बल तेहत्तीस वर्षाने वर्गमित्रांचा स्नेह मेळावा व त्याचबरोबर गुरुजनांचा सत्कार सोहळा कार्यक्रम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.


 यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन बापूराव पाटील, नगर शिक्षण विकास मंडळ मुरूमचे सचिव व्यंकट जाधव, कंटेकुर सरपंच गोविंद पाटील, विविध कार्यकारी सोसायटी मुरूमचे चेअरमन दत्ता चटगे, माजी उपनगराध्यक्ष श्रीकांत बेंडकाळे, प्राचार्य पी पी गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.

 यावेळी बोलताना पाटील म्हणाले आपल्याला जी जबाबदारी दिलेली आहे, ती जबाबदारी आपण आत्मविश्वासाने पार पाडावी, विविध क्षेत्राच्या माध्यमातून कार्य करत जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे तुमचे-आमचे कर्तव्य आहे, आणि ते कर्तव्य आपण प्रामाणिकपणे पार पाडावे असे मत यावेळी पाटील यांनी व्यक्त केले व त्याच बरोबर संस्था उभी करत असतानाच्या जुन्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला, पन्नास वर्षांत काय केलं? असे प्रश्न अनेकजण विचारतात परंतु या पन्नास वर्षात ज्यांनी आपलं आयुष्य उभा केला त्यांचा विचार मात्र आपण करत नसल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. 


प्रारंभी कै. माधवराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून द्वीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली, यावेळी माजी विद्यार्थ्यांचे वतीने आपल्या गुरुजनांचा डी. के. शेळके, जाधव बी एम, हुलसुरे के जी, अंबर एस टी, उंबरे टी एस,वाघमारे डी एन,चव्हाण सी एस  सत्कार करून चांदीची विद्याची देवता सरस्वतीचे मूर्ती भेट दिले. 


सेवानिवृत्त अंबर एस टी माजी विद्यार्थी मल्लिनाथ स्वामी,डॉ.चंद्रशेखर हंगरगे,राजशेखर मूदकण्णा, चंद्रकांत बडदाळे,डॉ.अनिल वाली आदींनी मनोगतपर बोलताना शाळेतील जुन्या आठवणी ताज्या केल्या, पत्र्याच्या शेड मधून शिक्षण घेऊन विविध क्षेत्रांमध्ये करत असलेल्या कामाचे अनुभव त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. माजी विद्यार्थ्यांच्या वतीने विद्यालयास शाळेचे इमारतीचे चित्र व झेरॉक्स मशीन भेट देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उल्हास घुरघुरे प्रास्ताविक मल्लिनाथ स्वामी, तर आभार सचिन शेळके यांनी मानले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मिलींद पोतदार,महताब नूरसे,विरभद्र जोजन,गुलाब अडके, श्रीशैल मंगरूळे, सुरेश मंगरूळे, हुकूम कौलकर,रियाज इनामदार,सुदर्शन उपाध्य,महादेव कळसे आदींनी परिश्रम घेतले.

Labels:

Saturday, 30 July 2022

स्मशान भूमी नसल्याने ग्रामपंचायती समोर अंत्यविधी

नळदुर्ग ,दि.३०

 स्मशान भूमी नसल्याने संतप्त नातेवाईकानी चक्क गावातील ग्रामपंचायत कार्यालया समोर अंत्यविधी उरकल्याने परिसरातील ग्रामस्थामध्ये जजोरदार चर्चा होत आहे.  हि घटना  तुळजापूर तालुक्यातील निलेगाव येथे घडली आहे. मालु लिंगा दुधभाते वय ८० यांचां अंत्यविधी  शनिवारी ३० जुलै रोजी ग्रामपंचायत कार्यालय समोर करण्यात आला.


याबाबत घटनास्थळाहुन मिळालेली माहिती अशी की,  तुळजापूर तालुक्यातील निलेगाव येथे  गावाजवळ असलेल्या हमिद कुरणे यांच्या शेतात २०१६पुर्वी   बांधलेली स्मशान भूमी पाडण्यात आली.तेंव्हापासून हा वाद सुरू आहे.२०१६ पासून गावांमध्ये मृत्यू झाला तर पोलिस संरक्षणात अंत्यविधी होत आहेत. परंतु  शनिवार दि.३० जुलै  रोजी गावकऱ्यांनी आम्हाला आमच्या पुर्वीच्या ठिकाणी अंत्यविधी करु दया आशी भुमिका घेतली.

संबंधित शेतकऱ्याच्या शेताच्या मधोमध हि जागा असल्याने व याबाबत कुठलीही नोंद सातबारा उता-यावर नसल्याने शेतकऱ्याने स्व:ताची जागा रस्त्याच्या कडेला दिली होती.परंतु काही लोकांच्या मते दिलेली जागा शाळेच्या शेजारी व गावाच्या जवळ असल्याने आम्हाला पुर्वीची जागा मिळावी आशी मागणी केली होती.
दरम्यान या घटनेनंतर ग्रामस्थामध्ये उलटसुलट चर्चा होत आहे.


याप्रकरणी महसुल विभागाशी संपर्क साधला असता स्मशानभुमीची सातबारा उता-यावर नोंद असल्याचे बोलताना तहसिलदार सौदागर तांदळे यानी सांगितले .

Labels:

सैन्याधिकारी आई-वडिलांच्या मुलीची एक आगळी वेगळी देशसेवा...!


सैन्याधिकारी आई-वडिलांच्या मुलीची एक आगळी वेगळी देशसेवा...!

     
कार्तिकी, वय वर्ष अवघं 17, इयत्ता बारावीची विद्यार्थिनी. इथपर्यंतची ही ओळख सर्वसाधारणपणे इतर विद्यार्थ्यांचीही  बऱ्यापैकी अशीच असू शकते.
    

मात्र कुमारी कार्तिकी संतोष महाडिक या मुलीची ओळख इतरांपेक्षा नक्कीच वेगळी आहे, सर्वांना प्रेरणादायी आहे. कार्तिकीचे बाबा सैन्याधिकारी होते तर आई सैन्याधिकारी आहे. महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्हयामधील आरे या गावचे सुपुत्र शहीद कर्नल संतोष महाडिक हे 41 राजस्थान रायफल्स चे कमांडिंग ऑफिसर होते. त्यांना देशाच्या शत्रूशी लढताना दि.17 नोव्हेंबर 2015 रोजी वीरमरण प्राप्त झाले. त्यावेळी कार्तिकी अवघी 10 वर्षाची होती. या कुटुंबावर मोठे आभाळ कोसळले. मात्र शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती संतोष महाडिक देखील कणखर बाण्याच्या. सैन्याधिकारी पती शहीद झाल्यानंतर रडत न बसता त्यांनी अख्ख्या जगासमोर महाराष्ट्राच्या इतिहासातील राजमाता जिजाऊंच्या लढाऊ बाण्याचा आदर्श ठेवला. स्वाती महाडिक यांनी संरक्षण प्रशासनाकडे दाद मागितली आणि एका शहीद सैन्याधिकाऱ्याची पत्नी पहिल्यांदा एक सैन्याधिकारी बनण्याचा इतिहास घडला. 


तोदेखील स्वकर्तृत्वावर, सैन्याधिकारी बनण्यासाठीच्या सर्व परीक्षा उत्तीर्ण होऊन आणि त्यानंतरचे सर्व खडतर प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करून.....
    असा आदर्शवत लढाऊ बाणा रक्तातच असलेल्या लढाऊ आईबाबांची लाडकी लेक कार्तिकी वेगळी कशी बरे असू शकेल.... सैन्याधिकारी आईवडिलांचे देशप्रेमाचे संस्कार लाभलेली कार्तिकी शालेय जीवनापासूनच अष्टपैलू. इयत्ता 7 वी त असल्यापासूनच तिने "भरतनाट्यम" हा राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय असलेला नृत्यप्रकार आत्मसात करण्यास सुरुवात केली. जसे जसे दिवस पुढे पुढे जाऊ लागले तसे तसे कार्तिकी कठोर मेहनत घेत भरतनाट्यम मध्ये पारंगत होऊ लागली. आणि आता कार्तिकी तिच्या आईबाबांसारखीच आपल्या भारतमातेचे नाव उज्ज्वल करण्यासाठी सज्ज झालीय. तेही आंतरराष्ट्रीय स्तरावर... युरोपातील स्कॉटलंड या देशात एडिनबर्ग या ठिकाणी 1947 पासून सांस्कृतिक महोत्सव भरविला जातो. ज्यामध्ये देशविदेशातील विविध प्रकारच्या कलांचे प्रदर्शन उत्तमोत्तम कलाकारांकडून सादर केले जाते. कोरोनाच्या जागतिक संकटामुळे गेली 3-4 वर्ष हा सांस्कृतिक महोत्सव आयोजित होऊ शकला नव्हता. नजीकच्या काळात म्हणजेच 2018 साली या महोत्सवाच्या माध्यमातून जगभरातील 3 हजार 548 कलांचे 55 हजार सादरीकरणे एडिनबर्ग शहरातील 317 विविध ठिकाणी सादर करण्यात आले. प्रत्येक वर्षी ऑगस्ट महिन्यात हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील सांस्कृतिक महोत्सव स्कॉटलंड या देशात भरविला जातो. हा कला महोत्सव तब्बल 25 दिवस सुरू असतो. यावर्षी हा महोत्सव 5 ऑगस्ट 2022 ला सुरू होऊन 29 ऑगस्ट 2022 पर्यंत सुरू राहील.
      

अशा या  आंतरराष्ट्रीय पातळीवरील अत्यंत मानाच्या  सांस्कृतिक महोत्सवात आपल्या कार्तिकीची भरतनाट्यम नृत्यकलेतील "अरंगेत्रंम्" हा विशेष प्रकार सादर करण्यासाठी निवड झाली आहे. तिच्यासोबत तिच्या सहकारी निकिता आणि अन्यना यादेखील असणार आहेत. चेन्नई येथील "कलाक्षेत्र फाईन आर्ट्स" या संस्थेच्या गुरू श्रीमती सी. के.राजलक्ष्मी आणि पंडित राजेंद्र गंगणी यांचे मोलाचे मार्गदर्शन या सर्वांना मिळाले आहे.
        

आज 30 जुलै 2022 रोजी कार्तिकी आपल्या डेहराडून येथील शाळेत आपली कला सादर करणार असून ऑगस्ट च्या पहिल्या आठवड्यात ती आपली कला स्कॉटलंड या देशातील मधील एडिनबर्ग या शहरात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सवात सादर करील. या वयात पितृछत्र हरविलेल्या भारतीय विद्यार्थिनीने आपल्या देशाचे, आपल्या शाळेचे या महोत्सवात प्रतिनिधित्व करण्याची स्वकर्तृत्वाने संधी मिळविणे, या यशाचे शब्दात वर्णन करणे तसे कठीणच आहे. एक प्रकारे कार्तिकीने वीरमरण पत्करलेल्या आपल्या वडिलांना आणि आता सध्या सैन्यात सैन्याधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या आपल्या आईला आपल्या कर्तृत्वाने जणू कडक सलामीच दिली आहे .
   कार्तिकी आणि तिच्या सहकाऱ्यांना संपूर्ण भारत देशवासियांकडून लाख लाख शुभेच्छा..! जय हिंद..!

मनोज शिवाजी सानप
जिल्हा माहिती अधिकारी, 
रायगड-अलिबाग

Labels:

वागदरी येथे प्रभागानूसार आरक्षण जाहीर

वागदरी ,दि..३० : एस.के.गायकवाड


वागदरी ता.तुळजापूर येथे आगामी होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणूक संदर्भात येथील प्रभागानूसार जागेचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
   

नोव्हेंबर-डिसेंबर २०२२ मध्ये राज्यात मुदतपूर्व ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका होणार असल्याची शक्यता आहे. त्यात तुळजापूर तालुक्यातील मौजे वागदरी ग्रा.प.चा समावेश आहे. त्याअनुषंगाने येथील प्रभागानूसार जागेचे आरक्षण निवडणूक प्राधिक्रत आधिकारी तथा प.स.तुळजापूरचे आभियंता बि.एल.वाघमारे यांनी प्रत्यक्ष मोक्याच्या ठिकाणी हजर राहून जहीर केले.
  

वागदरी येथे तिन प्रभागातून सात जागेकरिता निवडणूक होणार आहे. त्यानुसार जाहीर करण्यात आलेले आरक्षण पुढील प्रमाणे. प्रभाग क्रमांक-१ मध्ये सर्वसाधारण महिलेसाठी १ जागा व अनुसूचित जातीसाठी (पुरुष) १ जागा , तर प्रभाग क्रमांक-२ मध्ये सर्वसाधारण गटाकरिता(षुरुष) १ व ओबीसी महिला करिता १ जागा तसेच प्रभाग क्रमांक-३ मध्ये अनुसूचित जाती महिला १,सर्वसाधारण महिला १ व ओबीसी (पुरुष )करिता १ जागा आरक्षित करण्यात आली आहे. याप्रमाणे येथील ग्रा.प.चे आरक्षण जाहीर करण्यात आले. 
   

यावेळी विद्यामान सरपंच ज्ञानेश्वर बिराजदार, ग्रामसेवक जी.आर.जमादार,माजी सरपंच ह.भ.प.राजकुमार पाटील, रिपाइं (आठवले) चे जिल्हा सचिव एस.के. गायकवाड, पोलीस पाटील बाबुराव बिराजदार, ग्रा.प.सदस्य रावसाहेब वाघमारे,जेष्ठ कार्यकर्ते मोहनसिंग चव्हाण,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामसिंग परिहार, ग्रा.प.सदस्या विद्या  बिराजदार,युवा कार्यकर्ते अमोल पवार,नामदेव यादव, आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Labels:

वाणेवाडी शाळेत व्यवस्थापन समितीची निवड

नळदुर्ग ,दि. ३०

वाणेवाडी ता.तुळजापूर  येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शैक्षणिक वर्ष 2022 -23 याकरिता शाळा व्यवस्थापन समितीची निवड शनिवार दि. ३० जुलै रोजी करण्यात आली.

 नुतन अध्यक्ष  पंडितराव बामणकर वाणेवाडी ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य  किशोर मिरजे शाळेचे नुतन मुख्याध्यापक  राहुल गवळी  यांच्या नियोजनात शाळेच्या वार्षिक आराखड्यासह पहिली सुसंवाद कार्यशाळा संपन्न झाली. 

यावेळी इयत्ता चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत आंब्याची रोपे वाटप करण्यात आले.
शाळा तिथे ग्रंथालय या उपक्रमातंर्गत लोकवाट्यातून 3 हजार 232 रूपयेचा निधी शंभर टक्के जमा झाला आहे.  आर्थिक सहकार्य करणाऱ्या सर्वांचे शाळेच्या वतीने  आभार मानण्यात  आले. यावेळी सहशिक्षक नागेश भोसले, नितीन माळी , सदस्य सुभद्रा म्हमाणे,  वैशाली बामणकर, मीरा वाडकर, संतोष कांबळे, 
विद्यार्थी प्रतिनिधी उत्कर्षा शिंदे, प्रथमेश गाढवे,
आदीची उपस्थिती होती.

Labels:

काटी येथे बहुजन रयत परिषद शाखेचे उद्घघाटन


काटी, दि.३० 

 तुळजापूर तालुक्यातील काटी येथे शुक्रवारी  अण्णाभाऊ साठेनगर मध्ये  बहुजन रयत परिषदेच्या शाखेचे उद्घघाटन बहुजन रयत परिषदेच्या महिला महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा ॲड. कोमल साळुंखे- ढोबळे यांच्या हस्ते करण्यात आले. 

प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, लहुजी वस्ताद साळवे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर बहुजन रयत परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय महापुरे यांच्या हस्ते ॲड.कोमल  साळुंके-ढोबळे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. 

या कार्यक्रमाचे आयोजन बहुजन रयत परिषदेचे कार्याध्यक्ष संजय महापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली एस.एम.   ग्रुपच्या वतीने करण्यात आले.  यावेळी उपस्थितांना  कोमल साळुंके - ढोबळे यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की, समाजातील युवकांनी पदवीधर शिक्षण घेऊन पुढे यावे असे आवाहन करुन समाजातील अडीअडचणी सोडवण्यासाठी  कटिबद्ध असल्याची ग्वाही उपस्थिताना दिली.
     

यावेळी संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष रमेश गालफाडे, बहुजन रयत परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय महापुरे, विकास क्षिरसागर, देवा महापुरे, विष्णू कांबळे, भाऊ क्षिरसागर, दिलीप डोलारे, जितेंद्र चव्हाण, साजन क्षिरसागर, प्रविण क्षिरसागर, श्रावण वाघमारे आदींसह बहुजन रयत परिषदेचे कार्यकर्ते व महिला वर्ग उपस्थित होता.

Labels:

Friday, 29 July 2022

कर्मचाऱ्यांना सेवा समाप्ती दिवशीच शासकीय देयके अदा करणार - मुख्य कार्यकारी अधिकारी गुप्ता


उस्मानाबाद , दि.२९

शासकीय सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीच्या दिवशीच सर्व शासकीय देयके अदा केली जाणार असल्याची माहिती उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी दिली.


जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये वरिष्ठ सहाय्यक तथा भंडारपाल मधुकर सदाशिव कांबळे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
 25 वर्ष 7 महिने मधुकर सदाशिव कांबळे हे उस्मानाबाद जिल्हा परिषदेत कार्यरत होते. त्यांच्याविषयी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी गुप्ता म्हणाले, एखाद्या सेलिब्रिटी प्रमाणे कांबळे यांनी जिल्हा परिषदेत काम केले.सर्वांशी समन्वय साधून स्वतःची ओळख निर्माण केली हे त्यांचे मोठेपण आहे. भांडार विभागातील अडचणी आणि त्रुटी पूर्ण करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत असे गुप्ता म्हणाले.       


जिल्हा परिषदेतून सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा समाप्ती  दिवशीच सर्व शासकीय देय अदा केली जातील असे गुप्त यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषद कर्मचारी चालक संघटना, परिचर संघटना,एकात्मिक बालविकास विभाग,ऑल जर्नलिस्ट अँड फ्रेंड सर्कल या राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष जी.बी.राजपूत यांच्यासह महादेव गंगणे (अंबाजोगाई) आणि भाटशिरपुरा ग्राम पंचायतीच्या सरपंच सुनिता दिलीप वाघमारे यांनी गावकऱ्यांच्या वतीने कांबळे यांचा सपत्नीक सत्कार केला.


या कार्यक्रमाप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन सूर्यकांत भुजबळ, कार्यकारी अभियंता (बांधकाम) नितीन भोसले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक श्रीमती शिंदे यांच्यासह जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकारी कर्मचारी यांची यावेळी उपस्थिती होती.

Labels:

मुलींनी प्रामाणिकपणे अभ्यास करून जिवनात मोठे यश संपादन करावे - .गोरे


वागदरी , दि.२९ :एस.के.गायकवाड 

शालेय मुलीनी समाजात भयमुक्त व स्वाभिमानी जीवन जागवे आणि भरपूर मेहनत करून प्रामाणिक पणे आभ्यास करून जीवनात मोठे यश संपादन करून आपले व आपल्या आईवडीलाचे नाव मोठ करावे असे प्रतिपादन नळदूर्ग पोलीस  ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक  सिध्देश्वर गोरे यांनी केले.


 तुळजापूर  तालुक्यातील जळकोट येथील जिल्हा परिषद प्रशाला येथे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या पोलीस पिंक पथकाच्या वत्तीने शालेय मुलीसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . कार्यकमाच्या सुरवातीस शाळेच्या वतीने शाळेचे मुख्यध्यापक जाधवर  यांनी सहाय्यक पोलिस निरिक्षक सिध्देश्वर गोरे,पोलीस उपनिरिक्षक रमेश बनसोडे, पोलीस कॉंन्सटेबल मुंडे ,  पोलीस कॉ .जाधव ,यांचा स्वागतपर सत्कार केला.
  

पुढे बोलताना म्हणाले की मुलीनो तुम्हाला जर गावातुन  रस्त्यांनी किंवा परगावाहून गाडीतुन प्रवास करत असताना गावातील टवाळखोर मुलाकडून त्रास होत असेल किंवा तुमची कोणी छेड काढत असेल तर घाबरून जावू नका पिंक पथक आणि मी कायम आपले संरक्षण करण्यासाठी कटिबध्द अहोत. आम्ही प्रत्येक शाळेत महाविदयालयात आम्ही एक फलक लावणार आहोत. त्यावर आमचा संर्पक नंबर असणार आहे. तेंव्हा आपणास कसलीही अडचण आल्यास तात्काळ निसंकोचपणे आमच्याशी संवाद साधावा असे मुलीना अवाहन केले.

  यावेळी पिंक पथकातील पी.एस.आय. रमेश बनसोडे  यांनीही मुलीना सविस्तर माहिला विषयक कायदया संदर्भात मार्गदर्शत केले व बॅड टच संदर्भातही सविस्तर पणे माहीती सांगितली व संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यामधे आपल्या जिल्ह्यचे पोलीस अधिक्षक  अतुल कूलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली व या पथकांच्या प्रमुख डॉ. सई भोर पाटील  यांच्या वत्तीने हे अभियान राबविण्यात येणार असल्याचे सागितले. हा स्तूत्य उपक्रम उस्मानाबाद पोलीस दल राबवित आहे. 

Labels:

विभागीय प्रादेशिक उपायुक्तांची वात्सल्य संस्थेस सदिच्छा भेट


नळदुर्ग ,दि. २९ : 

लातूर समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त श्री.अविनाश देवसटवार यांनी मंगरूळ येथील वात्सल्य सामाजिक संस्थेस भेट देऊन संस्थेमार्फत चाललेल्या सामाजिक कामाचे कौतुक केले.


श्री.देवसटवार हे त्यांच्या लातूर, उस्मानाबाद , नांदेड,हिंगोली या विभागात येणाऱ्या सर्व आश्रमशाळा व वस्तीगृहामध्ये वृक्ष लागवडी विषयी सातत्याने कार्यरत आहेत. वात्सल्य संस्थेच्या माध्यमातून चाललेल्या अत्यंत दुर्मिळ वनौषधी,देशी प्रजातींच्या वृक्षांची लागवड त्याचे केलेले उत्तम संगोपन,समाजामध्ये चाललेल्या वृक्ष चळवळीच्या जागृतीची माहिती घेतली.

प्रारंभी त्यांचे संस्थेमार्फत तुळशीची माळ घालून व पर्यावरणपूरक बुके देऊन औक्षण करण्यात आले. श्री.देवसटवार म्हनाले की,संस्थेच्या माध्यमातून चाललेल्या अत्याधुनिक रुग्णवाहिका, गोशाळा,वृक्ष चळवळ, एकल महिलांसाठी चाललेले काम, हे सर्व समाजोपयोगी उपक्रम पाहून समाधान वाटले.संस्थेच्या कामास माझ्या शुभेच्छा असून भविष्यातील सर्व उपक्रमात मला सहभागी व्हायला आवडेल.

यावेळी त्यांच्या समवेत लातूर जिल्हा सहाय्यक  समाजकल्याण आयुक्त श्री शिवकांत चिकुर्ते,श्री.सचिन नटवे उपस्थित होते.

Labels:

काटी ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत जाहीर; ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अनेकांनी दंड थोपटले

काटी , दि.२९: उमाजी गायकवाड

 तुळजापूर तालुक्यातील काटी ग्रामपंचायत निवडणुकीसाठीचे आरक्षण शुक्रवार दि.29 रोजी सकाळी अकरा वाजता प्राधिकृत अधिकारी ए.आर.यादव, सरपंच आदेश कोळी, तलाठी प्रशांत गुळवे, ग्रामसेवक लक्ष्मीकांत सुरवसे यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयात जाहीर करण्यात आले.

 2011 च्या जनगणनेनुसार काटी गावची एकूण लोकसंख्या ही 6875 असून काटी ग्रामपंचायतीचे एकूण पाच वॉर्ड असून  प्रत्येक वार्ड निहाय 3 सदस्य संख्या याप्रमाणे 15 सदस्य संख्या आहे. तर अंदाजे जवळपास 4800 मतदार आहेत. यंदाही सरपंचपद थेट जनतेतून निवडला जाणार असल्याने सरपंचपदाच्या आरक्षणावर इच्छुक नजर ठेवून आहेत.

यावेळी जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीत  प्रभाग क्र.1 मध्ये ओबीसी स्त्री 1, सर्वसाधारण स्त्री 1, सर्वसाधारण पुरुष 1, प्रभाग क्र. 2 मध्ये एससी स्त्री 1, सर्वसाधारण 2, प्रभाग क्र.3 मध्ये ओबीसी स्त्री 1, सर्वसाधारण स्त्री 1, सर्वसाधारण 1, प्रभाग क्र.4 मध्ये ओबीसी 1, एससी स्त्री 1, सर्वसाधारण 1, तर प्रभाग क्र.5 मध्ये एससी 1, ओबीसी 1, सर्वसाधारण स्त्री 1 याप्रमाणे आरक्षण जाहीर झाले आहे. 

यंदा ग्रामपंचायत निवडणुकीत अनेकजण निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता असून अनेकजण मातब्बर गुडग्याला बाशिंग बांधून तयार असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत तीन ते चार पॅनल निवडणुक रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोणाच्या सोयीचे तर कोणाच्या गैरसोयीचे आरक्षण पडल्याने कही खुशी कही गम अशी स्थिती निर्माण झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत मावळत्या ग्रामपंचायत सदस्यांमधून सुध्दा अनेक ग्रामपंचायत सदस्य पुन्हा नशीब आजमावण्याची शक्यता आहे.
   

 तालुक्यातील लक्षवेधी समजली जाणारी काटी ग्रामपंचायत आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख, सरपंच आदेश कोळी,संजय महापुरे, ग्रा.पं. सदस्य अनिल बनसोडे, जिंतेद्र गुंड,  बाळासाहेब भाले, मकरंद देशमुख, कॉंग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते तथा माजी चेअरमन सयाजीराव देशमुख, करीम बेग, सुजित हंगरकर, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव, आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष साळुंके आदी मात्तबर समजले जाणारे पदाधिकारी ग्रामपंचायची सत्ता आपल्याकडे खेचून आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणार हे निश्चित. माजी पंचायत समिती सदस्य संजय देशमुख यंदाच्या होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांचे स्वतंत्र पॅनल उभे करणार का? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.त्यामुळे आगामी काळात काटी ग्रामपंचायत निवडणुकीने राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे.

Labels:

डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठच्या वतीने उत्कृष्ट स्वयंसेवकाचा पुरस्कार विक्रम राठोड याना प्रदान

नळदुर्ग , दि. २९ : 


येथिल कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक विक्रम माणिक राठोड यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद, राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्याकडून सन 2020-21 चा उत्कृष्ट विद्यापीठस्तरीय  स्वयंसेवकाचा पुरस्कार विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रमोद येवले  यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले , राज्य संपर्क अधिकारी एन एस एस डॉ.प्रशांतकुमार वनंजे , डॉ. शरद बोरुडे अहमदनगर एन एस एस संचालक डॉ. आनंद देशमुख यांच्या हस्ते औरंगाबाद येथे नुकतेच प्रदान करण्यात आला. यापूर्वी विक्रम  राठोड यास 2020-21 चा महाराष्ट्र शासनाचा उस्मानाबाद जिल्ह्याचा कोविड योद्धा पुरस्कार उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते देऊन त्याचा गौरव करण्यात आला होता. या दुहेरी यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा माजी मंञी मधुकरराव चव्हाण , सचिव उल्हास  बोरगावकर ,  प्राचार्य डॉ. संजय कोरेकर, उपप्राचार्य डाॅ.ढोकळे  ,डाॅ.झाडे , नॅक समन्वयक, एन.एस.एस. कार्यक्रमाधिकारी डॉ. निलेश शेरे, डॉ.रोहिणी महिंद्रकर, प्रा. महेंद्र भालेराव यांनी त्याचे अभिनंदन  करुन शुभेच्छा दिल्या.

Labels:

शाळेत दररोज संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन व्हावे : सम्राट ग्रूपची मागणी

वागदरी , दि. २९: 

जिल्हा परीषद व खासगी शिक्षण संस्थेच्या प्रत्येक प्राथमिक व माध्यमिक शाळेत दररोज सकाळी परिपाटच्या वेळी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन व्हावे आशी मागणी नळदुर्ग  येथील सम्राट सेवाभावी सामाजिक विकास संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.


   जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळा नळदुर्ग येथे शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती राऊत  याना सम्राट सेवाभावी सामाजिक विकास संस्थेच्या वतीने सदर मागणीचे निवेदन देण्यात आले.  निवेदनात म्हटले आहे की, तथकालीन शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रत्येक शाळेत दररोज सकाळी प्रार्थनेच्या वेळी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्याचे जी.आर.पारीत केले आहे.  प्रत्येक शाळेत याची अमलबजावणी होतेच असे नाही.तरी वरीष्ठाधिकाऱ्यानी याकडे लक्ष केंद्रित करून प्रत्येक शाळेत संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन झालेच पाहिजे याची दक्षता घ्यावी. अन्यथा यासंदर्भात जनांदोलन उभे करण्याचा इशारा दिला आहे.
 सम्राट संस्थेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनावर संस्थचे संस्थापक अध्यक्ष सुर्यकांत सुरवसे, शहराध्यक्ष प्रशांत कांबळे,रिपाइं (गवई) चे तुळजापूर तालुका अध्यक्ष तथा संस्थेचे उपाध्यक्ष प्रमोद लोंढे,संस्थेचे सचिव संतोष कांबळे, कोषाध्यक्ष सुभाष कांबळे आदीच्या सह्या आहेत

Labels:

Thursday, 28 July 2022

तुळजापूर तालुक्यामध्ये सर्वसाधारण महिला गटासाठी दिवाळी; सुंठे वाचून खोकला गेल्याची भावना


तुळजापूर दि २८ :   डॉ. सतीश महामुनी

तुळजापूर तालुक्यातील अनेक वर्षापासून राजकारण करणाऱ्या ग्रामीण भागातील नेतृत्वाला आरक्षणाच्या सोडतीनंतर जबरदस्त धक्का बसला आहे, सर्वसाधारण पुरुष गटासाठी असलेले अनेक दिग्गज उमेदवार यांना सर्वसाधारण पुरुष ऐवजी सर्वसाधारण महिला असे उमेदवार द्यावे लागणार आहेत.


 तालुक्याच्या राजकारणात पुरुषांच्या राजकारणाला धक्का देणारे हे आरक्षण निर्माण झाले आहे. जिल्हा परिषदेचे नेतृत्व करण्यासाठी महिला अग्रभागी दिसतील असे चित्र आहे. निवडणुकीचा वाढता खर्च लक्षात घेता जिल्हा परिषदेसाठी अनेक उमेदवार राजकीय ताकतवार असून देखील खर्चाच्या अनुमानामुळे निवडणुकीपासून दूर राहण्याचा पवित्रा घेतलेले होते. अशा उमेदवारांना हे आरक्षण म्हणजे सुंठी वाचून खोकला दुरुस्त झाल्याचे आहे.

जिल्हा परिषद मतदार संघ निहाय अनुक्रमे सिंदफळ ,अणदुर ,मंगरूळ, खुदावाडी, काटगाव या ठिकाणी सर्वसाधारण महिला उमेदवार आरक्षण आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी काक्रंबा तामलवाडी येथे आरक्षण आहे नागरिकांचा मागासवर्ग महिला नांदगाव मतदारसंघात आहे.  अनुसूचित जाती मतदारसंघासाठी जळकोट आणि काठी हे दोन मातब्बर मतदारसंघ असणार आहेत.

तुळजापूर पंचायत समिती गटाचे आरक्षण घोषणा झाल्यानंतर सर्वसाधारण गटामधून आरळी बुद्रुक, मंगरूळ, चिवरी ,सावरगाव ,येवती हंगरगां नळ,  खुदावाडी येथे सर्वसाधारण खुल्या गटातील उमेदवारांना निवडणूक लढवता येणार आहे. अपसिंगा सलगरा दिवटी किलज वडगाव काटी तामलवाड येथे महिलासाठी सर्वसाधारण आरक्षण मिळाले आहेत .

तालुक्यातील काँग्रेसचे प्राबल्य असणारा काटगाव मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे. महिला अनुसूचित जातीसाठी काटी व केशेगाव असे आरक्षण आहे .जळकोट व काक्रंबा येथे नागरिकांचा मागास प्रवर्ग असे आरक्षण आहे. नांदगाव सिंदफळ व अणदुर येथे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला गट असे आरक्षण मिळाले आहे.
सिंदफळ येथे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष धीरज पाटील यांचा मतदारसंघ महिला झालेला आहे. मावळत्या जिल्हा परिषद अध्यक्ष सौ अस्मिता कांबळे यांना मतदारसंघ बदलून निवडणूक लढवावी लागणार आहे. आमदार राणाजगजितसिह  पाटील यांनी तुळजापूर तालुक्यात विजय संपादन केल्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या राजकारणावर लक्ष केंद्रित केले होते. परंतु आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेक दिग्गजांना स्वतः निवडणूक न लढवता इतरांना निवडून आणण्यासाठी मदत करण्याची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे असे चित्र आहे.

Labels:

सावरगाव येथील जागृत देवस्थान नागोबा यात्रेस प्रारंभ


काटी , दि. २८ :उमाजी गायकवाड


तुळजापूर  तालुक्यातील सावरगाव  येथील जागृत  देवस्थान तथा ग्रामदैवत  श्री नागनाथ  महाराज यांच्या  यात्रेला आषाढ  अमावस्या  ते श्रावण नागपंचमी या दरम्यान  सुरू  होणाऱ्या  यात्रेला दि. 28  सकाळी  श्री नागनाथ  महाराज  यांच्या मुर्तीला रुद्र  अभिषेक  व पंचआरती व भजन गायनाच्या कार्यक्रमाने कंकन बांधून उत्साहात  प्रारंभ  झाला. 


मागील दोन वर्षे कोरोनाच्या संकटामुळे येथील यात्रा साधेपणाने साजरी करण्यात आली होती. तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील प्रसिद्ध श्री नागोबा यात्रेस गुरुवारी उत्साहात प्रारंभ झाला. आषाढी अमावस्या गुरुवारी आल्याने या यात्रेचे प्रमुख आकर्षण असलेले नाग, पाल, विंचू एकत्रित आले आहेत.
एकमेकांचे शत्रू समजले जाणारे नाग,पाल,विंचू हे नागोबा यात्रेत एकत्रित येत असल्याचे दृश्य प्रतीवर्षी पहावयास मिळते़ त्यांचा मुक्काम पाच दिवस मंदिरासमोर असेल, नागोबा देवस्थानचे मुख्य पुजारी कल्याण मल्लिकार्जुन खरगे महाराज यांनी सांगितले. सावरगाव  येथील जागृत देवस्थान  असलेल्या या नागोबा यात्रेला  राज्याच्या  कानाकोपर्‍यातून भाविक  येथे दर्शनासाठी  येतात. परंतु मागील दोन वर्षात या यात्रेस कोरोनाच्या संकटामुळे खंड पडला होता. 

आजच्या  काळात  या यात्रेकडे सर्वधर्म समभावाचे प्रतीक म्हणून भाविकांमधून पाहिले जाते. नाग, पाल, व विंचू  हे उभयचर एकमेकांचे कट्टर  हाडवैरी  समजले जाणारे  मुके प्राणी आषाढ  अमावस्या  ते श्रावण नागपंचमी असे पाच दिवस  एकत्र येऊ शकतात तर  समाजातील  लोकांनी  सुध्दा  एकत्रित  येण्याचा  संदेश  देणारी ही  यात्रा असल्याचे या यात्रेला दरवर्षी  येणारे भाविक आवर्जून  सांगतात. 

सावरगाव  येथे नागपंचमीला विविध  प्रथा

येथे नागपंचमीच्या दिवशी प्रत्येकांच्या घरोघरी प्रथा वेगवेगळ्या असतात. या दिवशी अनेकांच्या घरी भाजी चिरण्यासाठी विळी तसेच, पोळी भाजण्यासाठी तव्याचा उपयोग केला जात नाही. काही घरांत प्रत्येकाने नदीवर जाऊन आंघोळ करण्याची पद्धत आहे. परंपरेनुसार ज्या प्रथा रुढ झाल्या आहेत, त्या आजही कायम आहेत. आजच्या  धावत्या  युगातही  ग्रामीण  भागावर रुढी, परंपरांचा पगडा कायम आहे. हेच  या ग्रामीण  भागातील  ग्रामदैवतांच्या  माध्यमातून  दिसून येते. आषाढी अमावस्या  ते श्रावण नागपंचमी दरम्यान  होणाऱ्या   या यात्रेसाठी   हजारो भक्तगण  याठिकाणी  आजही  दर्शनासाठी  येतात. 

पन्नास  वर्षापासून डोके कुटूंबाचे विनामूल्य  माळा बनविण्याचे कार्य अविरत सुरु

लिंबाऱ्याच्या पाल्यापासून गोलाकार माळा बनविण्याचे काम हरीदास विश्वनाथ डोके यांचे कुटुंबीय मागील  पन्नास  वर्षापासून विनामूल्य करीत असून ते कार्य आजतागायत  सुरु आहे. डोके कुटुंबियांकडून लिंबाऱ्याच्या माळा बनविण्याचे काम सुरु आहे.या तयार केलेल्या माळा नागपंचमीदिवशी गण मिरवणुकीत भाविकांना वाटण्यात येतात. ही लिंबाऱ्याची माळ वर्षभर घरात अडकवतात त्यामुळे घरात सापांचा वावर होत नाही, अशी आख्यायिका आहे.

पोलीस प्रशासन व ग्रामपंचायत नियोजनासाठी सज्ज

यंदा ही यात्रा 27 जुलै ते 2 ऑगस्ट रोजी होणाऱ्या यात्रेसाठी येथील ग्रामपंचायत प्रशासन व पोलिस प्रशासन सज्ज झाले असून परिसरातून येणाऱ्या वाहनांची स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असून यंदा होणाऱ्या संभाव्य यात्रेतील गर्दीच्या पार्श्वभूमीवर येथील भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, सरपंच रामेश्वर आबा तोडकरी, जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडीत, रमेश काढगावकर, नेताजी कदम, अण्णा लिंगफोडे, बंडू तानवडे, सिध्देश्वर तोडकरी, बत्तु पाटील, महारुद्र अक्कलकोटे, बंडु तेली, सोमनाथ तोडकरी, पिंटू तानवडे, महेश स्वामी, बाळासाहेब डोके आदी मान्यवरांच्या उपस्थितीत शांतता कमिटीची बैठक घेऊन नियोजनासंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच या यात्रेच्या पार्श्वभूमीवर तगडा पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.

Labels:

माळुंब्रा येथे आपघातात मृत्युमुखी पडलेल्या वानरावर टाळ मृदंगाच्या गजरात विधीवत अंत्यसंस्कार


काटी, दि . २८ : उमाजी गायकवाड 

 तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा येथे बुधवारी सोलापूर -तुळजापूर रोडवर हॉटेल पंचरत्न शेजारी 3:30 वाजनेच्या सुमारास जवळपास 10 ते 12 वानरांचा कळप रस्ता ओलांडत असताना त्यापैकी एका वानरास अचानकपणे अज्ञात वाहनाच्या जोरदार धडकेत वानराचा जागीच मृत्यू झाला. 


हे दृश्य हॉटेल चालक संतोष भोसले यांनी पाहिले. त्यांनी तात्काळ गावातील भाजपचे कार्यकर्ते गजानन वडणे, संग्राम वडणे, यशवंत भोसले यांना या घटनेची माहिती दिली. गावातही याबाबत माहिती समजताच या घटस्थाकडे धाव घेतली. ग्रामस्थांनी वनकर्मचारी यांना पण याची माहिती दिली. ही घटना  भोसले यांच्या शेतासमोर झाल्याने या मृत वानरावर माळुंब्रा येथील भजनी मंडळ, ग्रामस्थ, महिला यांच्या उपस्थितीत प्रति हनुमानाचे रुप समजून  टाळमृदंगाच्या गजारात   विधीवत अंत्यसंस्कार करण्यात आले.  त्या ठिकाणी   हनुमान मंदिर बांधण्याचा संकल्प केला.

Labels:

Monday, 25 July 2022

अवैध तीन कत्तल खान्यांवर छापे, गुन्हा दाखल.”


नळदुर्ग , दि . २५ : 

शहरातील  कुरेशी गल्ली येथे विविध ठिकाणी पोलिस पथकाने  तीन अवैध कत्तल खान्यांवर आचानक  छापा मारुन  सातजणाविरुध्द कारवाई करुन आरोपीच्या ताब्यातुन  सुमारे १ लाख ३२ हजार रुपयाचे किंमतीचे गोवंशीय ८५० किलो मांस , कत्तलीचे शस्ञ, कत्तलीसाठी बांधलेल्या तीन गोवंशीय जनावरे जप्त  केली.


नळदुर्ग येथे अवैधरित्या गोवंशीय जनावरांची कत्तल चालू असल्याची खबर मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांना मिळाल्याने त्यांच्या आदेशावरुन अपर पोलीस अधीक्षक यांचे वाचक- सपोनि श्री अमोल पवार, पोलीस नियंत्रण कक्षाचे पोउपनि- श्री. संदीप ओहोळ यांसह पोलीस पथकाने आज दि. 24 जुलै रोजी रात्री 03.00 वा. सु. नळदुर्ग येथे रवाना होउन नळदुर्ग पो.ठा. चे सपोनि- श्री. सिध्देश्वर गोरे यांच्या मदतीने शहरातील तीन अवैध कत्तल खान्यावर छापे टाकले.

            

यावेळी गोपनीय खबरेच्या आधारे 06.10 वा. सु. कुरेशी गल्ली येथे तीन छापे टाकले. पहिल्या छाप्यात निजाम अजीज कुरेशी व महेमुद रहेमान कुरेशी हे दोघे अजीज कुरेशी यांच्या घरी गोवंशीय जनावरांचे अंदाजे 24,000 ₹ किंमतीचे 200 कि.ग्रॅ. मांस व तीन धारदार सत्तुर व चाकु बाळगलेले मिळुन आले. दुसऱ्या छाप्यात अरबाज शब्बीर कुरेशी हे आपल्या घरालगतच्या बोळीत गोवंशीय जनावरांचे अंदाजे 48,000 ₹ किंमतीचे 400 कि.ग्रॅ. मांस व एक सत्तुर व चार चाकु मिळुन आले. बातमीप्रमाणेच तीसऱ्या छाप्यात सादीक सत्तार कुरेशी यांच्या घरी सादीक यांसह मुन्ना नसीर कुरेशी, मुदस्सर गफार कुरेशी हे गोवंशीय जनावराचे अंदाजे 30,000 ₹ किंमतीचे 250 कि.ग्रॅ. मांस व तीन सत्तुर व पाच चाकु तसेच त्यांच्या ताब्यात कत्तलीसाठी बांधलेले दोन खोंड व एक कालवड असे तीन गोवंशीय जनावरे मिळुन आले. यावर पथकाने अंदाजे 1,32,000 ₹ किंमतीचे गोवंशीय मांस व जीवंत तीन जनावरे जप्त करुन प्रयोगशाळा परिक्षणाकरीता पशुधन विकास अधिकारी, अणदुर डॉ. श्री. खाडे यांच्यामार्फत मांसाचे नमूने काढले आहेत. तसेच जप्त मांस हा नाशवंत पदार्थ असल्याने तो नगरपरिषद नळदुर्ग यांच्या डंम्पींगच्या जागेत खड्ड्यात पुरुन नाश केले व तीन गोवंशीय जणावरे ही गो शाळेत देण्याची कार्यवाही केली आहे. या प्रकरणी पोउपनि- श्री. संदीप ओहोळ यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन महाराष्ट्र प्राणि संरक्षण कायदा कलम- 5, 9 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.


सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि- श्री. अमोल पवार, पोउपनि- श्री. संदीप ओहोळ, पोहेकॉ- माने, पोना- भोजगुडे, लोखंडे, पोकॉ- जमादार, नाईकवाडी व दंगा काबू पथक यांच्या पथकाने केली आहे.

Labels:

Sunday, 24 July 2022

श्री खंडोबा विराजमान होणार चांदीच्या सिंहासनावर


 

अणदूर , दि . २४: 

 तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील श्री खंडोबा मंदिरातील 'श्री' चे सिंहासन ( मखर ) चांदीने मढवण्यात आले असून , त्यासाठी 61 किलो चांदी लागली आहे. नाशिकच्या कारागिरांनी अवघ्या 21 दिवसात हे  काम पूर्ण केले आहे.

अणदूर येथील श्री खंडोबा मंदिर पुरातन असून श्री खंडोबा - बाणाई विवाह स्थळामुळे हे स्थान महाराष्ट्र, कर्नाटक ,आंध्रप्रदेश या तीन राज्यात प्रसिद्ध आहे. छत्रपती शाहू महाराज आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी या मंदिराचा सभामंडप बांधण्याचा उल्लेख येथे आढळतो.

या मंदिरातील सिंहासन पूर्वी पितळी होते, त्याची झीज झाल्यामुळे ते बदलण्यात आले,  लातूरच्या कारागराकडून हे  सिंहासन सागवानी करून त्याला 61 किलो चांदीने झळाळी देण्यात आली. नाशिकचे कारागीर परेश कुलकर्णी व त्याच्या पाच साथीदारांनी अवघ्या 21 दिवसात हे काम पूर्ण केले, त्याचे रविवारी ( दि. २४ जुलै ) लोकार्पण आज करण्यात आले.

यावेळी  मंदिर समितीचे अध्यक्ष बालाजी मोकाशे, उपाध्यक्ष अविनाश मोकाशे,सदस्य  शशिकांत मोकाशे, दीपक मोकाशे, महादेव मोकाशे, अमोल मोकाशे, सदानंद येळकोटे, दिवाकर (अण्णा) मोकाशे, श्री खंडोबा फार्मिंग सोसायटीचे चेअरमन  सुदर्शन  मोकाशे आदी उपस्थित होते.

भाविकांनी आजवर दिलेल्या चांदीचा या कामी उपयोग करण्यात आला तसेच भाविकांनी देणगी दिल्यामुळे हे काम पूर्ण होऊ शकले, अशी प्रतिक्रिया मंदिर समितीचे सचिव सुनील ढेपे यांनी दिली. लवकरच मंदिराचा गाभारा दरवाजा आणि म्हाळसादेवी , हेगडीप्रधान यांचे प्रभावळ देखील चांदीने मढवण्यात येणार असल्याचे ढेपे यांनी सांगितले. 

Labels:

Friday, 22 July 2022

उमेदीच्या तिरंगा विक्री केंद्राचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उदघाटन

  

उस्मानाबाद दि .22 

हर घर तिरंगा* या अभियानांतर्गत ग्रामीण विकास यंत्रणेच्या उमेद च्या  उस्मानाबाद तालुक्यातील कनगरा येथील जिल्हास्तरिय विक्री केंद्र येथे एनकेपी ( NPK )उत्पादक गट यांनी  उत्पादित केलेल्या राष्ट्रीय ध्वज  तिरंगा झेंडा स्टॉलचे उदघाटन  जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर  यांच्या हस्ते  आज करण्यात आले .                   

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता , अप्पर जिल्हाधिकारी रुपाली  आवळे , निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी ,  जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रांजल शिंदे   यांचीही   उपस्थिती होती .  

यावेळी जिल्हा व्यवस्थापक अल्ताफ जिकरे, अमोल सिरसट, समाधान जोगदंड, तालुका अभियान व्यवस्थापक पुजा घोगरे, तालुका व्यवस्थापक अभिजित पडवळ, नागेश काकडे, तसेच NPK उत्पादक गटाच्या सदस्या उपस्थित होत्या.

Labels:

दलित मित्र चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त राजश्री शाहू महाविद्यालयात वृक्षारोपण


जळकोट ,दि . २२


दलित मित्र मोतीराम चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त येथील राजश्री शाहू महाविद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. 


येथील महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ जळकोट ता. तुळजापूर या  संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मोतीराम  चव्हाण यांची पुण्यतिथी निमित्त मान्यवराच्या हस्ते ‌वृक्षारोपन करण्यात आले.(यावेळी माजी परिवहण मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी ही भेट देऊन अभिवादन केले.)



यावेळी ,जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश चव्हाण,जळोकटचे सरपंच अशोक पाटील, कृष्णात मोरे, महेश कदम, बसवराज कवठे,माणिकराव चव्हाण, अमृता चव्हाण, ताराचंद चव्हाण, शकंर‌ चव्हाण, ॲड.बाबुराव पवार, ताराचंद राठोड,हरिष जाधव,शरणाप्पा कबाडे, बबन मोरे, पत्रकार मेघराज किलजे, अंकुश लोखंडे,बसु भोगे,अनिल छत्रे,पिन्टू चुंगे, शिवाजी पोलिस पाटील, पांडुरंग चव्हाण, बाबुराव चव्हाण, शिवाजी चव्हाण, सुर्यकांत चव्हाण, प्राचार्य संतोष चव्हाण विनायक राठोड, विनायक चव्हाण,अमोल चव्हाण, लक्ष्मण राठोड, शिवाजी राठोड, यांच्या शिक्षकवृंद ग्रामस्थ उपस्थित होते.

Labels:

जगाला विश्वशांतीचा संदेश देण्याचे महान कार्य प्रजापिता विश्वविद्यालयाचे - शरणजी पाटील

            
 मुरूम, ता. उमरगा, ता. २२:  

गेल्या दोन वर्षापासून आपण जागतिक कोरोना महामारीचा सामना करत आहोत. जगात विविध  समस्या व आव्हाने असतानाही प्रजापिता विश्वविद्यालय केंद्र मात्र  मनुष्यमात्रामध्ये शांती, संयम्, स्नेह व बंधूभाव जोपासण्याचे व विश्वशांतीचा संदेश देण्याचे महान कार्य या केंद्राच्या वतीने केले जात असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष शरणजी पाटील यांनी केले.           



मुरुम येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेवाकेंद्राच्या  वतीने आजादी का अमृत महोत्सव व राजयोगिनी ब्र. कुमारी सोमप्रभा दीदी यांच्या ७५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून योग तपस्या भट्टी व ग्रंथतुला कार्यक्रम गुरुवारी (ता. २१) रोजी रत्नमाला मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शरणजी पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी माऊंटआबु (राजस्थान) चे राजयोगी ब्र. कु. छोटेलाल भाई, सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. रंगनाथ जगताप, केंद्राचे संचालक ब्र. कु. राजूभाई भालकाटे, उमरगा पंचायत समितीचे माजी सभापती सचिन पाटील, सोलापूरचे उद्योजक रवींद्र कन्नुरे, माजी निवडणूक अधिकारी तुकाराम मस्के, आळंदच्या दीपा केशवानी, मंगला बहिजी, जेऊरच्या अश्विनी बहिजी, डॉ. वगण्णा, राजेंद्र फुंडीपल्ले, आनंद हिरवे, उमरगाचे उद्योजक मनोज थोरे, राजकुमार सूर्यवंशी, सुशांत मोहिते,  श्रीकांत बेंडकाळे, डॉ. नितीन डागा, काशिनाथ मिरगाळे, प्रा. करबसप्पा ब्याळे, प्रा. सुधीर नाकाडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.                       


ब्रह्माकुमारी राजयोगिनी सोमप्रभा दीदी यावेळी आशीर्वचन देताना म्हणाल्या की, मानुष्याने नेहमी चांगल्या गुंणांचा स्वीकार करत जगावे. चांगले गुण व आचरणच व्यक्तीला प्रतिष्ठा व श्रेष्ठत्व मिळवून देते. मला या कार्यक्रमाची पूर्व कल्पना नव्हती की, माझा वाढदिवस ग्रंथतुला या स्वरूपात होईल. हे माझ्यासाठी सुवर्णक्षणच मनावा लागेल. आपण सर्वांनी मिळून आपल्या हातून अशाच पद्धतीने सेवाभावीवृत्ती ठेवून जनसेवा हीच ईश्वरसेवा मानून सतत कार्य करण्याचा संदेश त्यांनी यावेळी शेवटी दिला. याप्रसंगी ब्रह्मकुमार छोटेलाल भाईजी, तुकाराम मस्के आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रारंभी स्वागत गीत संगमेश्वर स्वामी यांनी गायले. कुमारी काव्या चौधरी हिने सत्यम्-शिवम्-सुंदरम या गीतावर नृत्य सादर केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने वृक्षारोपण व शहरातून शांततेचा संदेश देण्यासाठी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. 


रतनभाई पटेल, अनिता मिरकले, वैष्णवी दीदी,  सविता भरदाळे, बाळासाहेब भालकाटे, दिलीप हंगरगे, आदींनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमास सोलापूर, उस्मानाबाद, उमरगा, दाळींब, कवठा, तावशी, कदेरसह शहरातील बहुसंख्येने माता-भगिनी व नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुरूमच्या  प्रजापिता ब्रह्मकुमारी केंद्राचे संचालक ब्र. कु. राजूभाई भालकाटे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन लोहारा सेवाकेंद्राच्या संचालिका सरिता  तर आभार शिल्पा  यांनी मानले.                   


Labels:

उस्मानाबाद : जुगार अड्डयावर पोलीसांची कारवाई ; १९ जण गजाआड

 

उस्मानाबाद ,दि . २२: 

स्थानिक गुन्हे शाखा : मा.पोलीस अधीक्षक श्री.अतुल कुलकर्णी यांचे आदेशावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्हातील अवैध धंदयांविषयी माहिती काढुन कायदेशीर कारवाई करण्यासाठी दि.21 जुलै रोजी उमरगा उपविभागात गस्तीस होते. दरम्यान सपोनि श्री शैलेश पवार यांना गुप्त बातमी दारामार्फत माहिती मिळाली कि, मनोहरनगर, होळी तांडा ग्रामस्थ- दत्ता चव्हाण यांचे शेतात एका पत्राचे शेडमध्ये काही इसम तिर्रट नावाचा जुगार खेळत आहेत. 



यावर पथकाने त्या ठिकाणी 17.00 वा. सु. छापा टाकला असता तेथे 1.दत्ता चव्हाण 2.राजेंद्र चव्हाण 3.बबन चव्हाण 4.विकास राठोड 5.संतोष राठोड 6.अजित जाधव 7.गुलाब चव्हाण 8.बाबु चव्हाण 9.विजय चव्हाण, सर्व रा. होळी तांडा, ता. लोहारा 10. खंडु खराटे 11.अरुण गायकवाड 12.विश्वनाथ क्षिरसागर 13.महावीर सुरवसे 14.रफीक शेख 15.सचिन मुनाळे 16.शकील शिरगापुरे 17.बाबुराव दुधभाते, सर्व रा. किल्लारी, ता. औसा, जि. लातूर 18.रोहन पवार, रा. माकणी 19.अजय चव्हाण, रा. राजेगाव, ता. लोहारा हे सर्व लोक तिर्रट जुगार खेळताना मिळुन आले. 


त्यांचेकडे जुगाराबाबत विचारणा केली असता सदर पत्रा शेडचे मालक दत्ता चव्हाण हेच जुगाराचा अड्डा चालवित असल्याचे समजले. त्या ठिकाणाहून जुगाराचे साहित्यासह 05 मोटारसायकल, 01 कार, 17 भ्रमणध्वनी व 29,300 रु. रोख रक्कम असा एकुण 10,31,880 रु चा मुददेमाल पोलीसांनी जप्त केला असुन त्यांचेविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम 4,5 प्रमाणे लेाहारा पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.

            


सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्री.अतुल कुलकर्णी, मा.अपर पोलीस अधीक्षक श्री.नवनीत काँवत यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोनि-श्री.रामेश्वर खनाळ, सपोनि- श्री.शैलेश पवार, पोहेकॉ- प्रकाश औताडे, जावेद काझी, हुसेन सय्य्द, मेहबुब अरब, धनंजय कवडे, पोना- शौकत पठाण, अमोल चव्हाण, अशोक ढगारे या पथकाने केली आहे.

Labels:

"आजादी का अमृत महोत्सव" अंतर्गत हर घर तिरंगा रॅली नळदुर्ग येथे संपन्न


नळदुर्ग,दि . २२

शहरातील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना यांच्या संयुक्त विद्यमाने "आजादी का अमृत महोत्सव" अंतर्गत हर घर तिरंगा रॅली नळदुर्ग शहरात काढण्यात आली.


भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, जनतेच्या मनात या स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील क्रांतिकारक, घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे व  देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात राहावी, या उद्देशाने या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमान पूर्वक संस्मरण करण्यासाठी "हर घर तिरंगा" या उपक्रमा अंतर्गत ही रॅली काढण्यात आली होती. 

या रॅलीचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय कोरेकर  यांनी केले. हि रॅली महाविद्यालयातुन मुख्य रस्त्याने नळदुर्ग नगरपरिषद येथे नेण्यात आली. याप्रसंगी नळदुर्ग  नगर परिषदेचे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार , नळदुर्ग पोलीस स्टेशनचे  सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे ,  माजी नगरसेवक  नितीन कासार , माजी नगरसेवक विनायक अहंकारी,  पत्रकार व नागरिक  उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय कोरेकर यांनी  रॅली  काढण्या मागचा उद्देश स्पष्ट केला.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. निलेश शेरे तर आभार डॉ. सुभाष राठोड यांनी मांनले. यानंतर ही रॅली महाविद्यालयामध्ये आणून विसर्जित करण्यात आली. या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सहभागी झाले होते. ही रॅली यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, सांस्कृतिक विभाग, क्रीडा विभाग तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुढाकार घेतले.

Labels:

श्रीक्षेत्र अक्कलकोट कडे जाणाऱ्या मार्गावर दिशादर्शक फलक लावा-मनसेची मागणी


नळदुर्ग, दि. २२: 

नळदुर्गहुन  श्री क्षेञ अक्कलकोट जाणा-या रस्त्यावर  दिशादर्शक फलक नसल्याने प्रवाशी वाहनचालका भक्ताची गैरसोय होत असुन तातडीने संबधित विभागाने दिशादर्शक फलक लावण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने करण्यात आली आहे.

शहरातील  राष्ट्रीय महामार्गावरुन दररोज असंख्य पर्यटक व भक्त हे नळदुर्ग किल्ला,श्रीक्षेत्र तूळजापुर,व श्रीक्षेत्र अक्कलकोट येथे दर्शन घेण्यासाठी जात असतात,व. नळदुर्ग बसस्थानकच्या बाजूस दुतर्फा अक्कलकोटकडे जाण्याचा मार्ग दर्शविणारे फलकच नसल्याने भक्तामध्ये संभ्रम निर्माण  होत आहे.रात्रीच्या वेळेस तर कोणीही मार्ग सांगण्यासाठी नसते,अशावेळी त्यांना मार्ग समजन्यासाठी दिशादर्शक फलक लावण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राष्ट्रीय महामार्ग विभाग सोलापुरचे कार्य.अभियंते  संतोष कुलकर्णी यांच्याकडे केली आहे.

Labels:

चिवरी येथील महालक्ष्मीच्या "आकाड बोन याञेत भाविकांची मांदियाळी


चिवरी , दि . २२: राजगुरु साखरे

 भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील श्री महालक्ष्मी मंदिरात दरवर्षी आषाढ महिन्याच्या चौथ्या शुक्रवारी भरणारी आकाडबोन यात्रेत हजारो भाविकांनी दर्शन घेऊन नवस्फूर्ती केली, मागील दोन वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील यात्रा साधेपणानं साजरी करण्यात आली होती, यंदा मात्र भाविकांनी सकाळपासूनच मंदिरात दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. 



देवीजींना पहाटे अभिषेक ,महाआरती करून दुपारी होमवहानसमोर रूढी परंपरेनुसार धार्मिक कार्यक्रम पार पाडून यात्रेची सांगता होते, महालक्ष्मीची दरवर्षी माघ महिन्यातील पौर्णिमेच्या पहिल्या मंगळवारी यात्रा भरते याला " कायरं  या नावाने ओळखले जाते तर आषाढ महिन्यातील शेवटच्या शुक्रवारी भरणाऱ्या यात्रेला आकाडबोन या नावाने ओळखले जाते ,यात्रेमध्ये पर जिल्ह्यासह पंचक्रोशीतील शेकडो भाविकांनी सहभाग नोंदवला होता, यात्रे दिवशी गावातील प्रत्येक कुटुंबातून देवीला दहीभाताचा नेवैद्य दाखवला जातो, दिवसभरामध्ये लहान मुलांची जावळ काढणे, नवीन पोतराजाला दीक्षा देणे, पट बांधणे आदी नवस्फूर्तीचे कार्यक्रम होतात.   


यावेळी आराधी, वाघ्या मुरळी,  जान्या    ,पोतराज यांच्या गीताने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता, भाविकांच्या सोयीसाठी देवस्थान ट्रस्ट मंदिर कमिटी, पुजारी मंडळ , ग्रामपंचायत आदींनी पुढाकार घेतला.

 मात्र संबंधित बांधकाम विभागाच्या अक्षम दुर्लक्षामुळे यंदाही मंदिराच्या खड्डेमय रस्त्यावरून धक्के खातच भाविकांसह वाहन चालकाला प्रवास करावा लागल्याचे चित्र दिसून आले.

Labels:

Wednesday, 20 July 2022

सोयाबीन नुकसान भरपाई देण्याची शिवसेनेची मागणी

नळदुर्ग, दि.२०

शेतकऱ्यांना सोयाबीन पिक  नुकसान भरपाई म्हणून एकरी २५ हजार रुपये देण्याच्या मागणीचे निवेदन  शिवसेनेच्या वतीने  तुळजापूर  तहसीलदार  यांना देण्यात आले.


 यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी उपतालुकाप्रमुख प्रदीप मगर, सुनील जाधव, शहर प्रमुख सुधीर कदम, विभाग प्रमुख धुळा रक्षे, दगडू  शिंदे, तुळशीराम बोबडे, बालाजी पांचाळ, अनिल छत्री, महेश गिराम, किरण वरदे, विशाल कस्तुरे ,बाळू सोमवंशी ,नागराज खोबरे, अमर खोबरे ,लक्ष्मण वरदे ,भीमाशंकर नकाते, बाळू सोमवंशी, नंदलाल हजारे, आदीजण  उपस्थित होते. सदरील निवेदन   तहसिलदार सौदागर याना देण्यात आले.

Labels:

Monday, 18 July 2022

सिंदगाव सोसायटीच्या निवडणूकीत भाजप प्रणित श्री दत्त शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत विजय


नळदुर्ग , दि . १८ : विलास येडगे

 सिंदगाव ता. तुळजापुर येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखालील भाजप प्रणित श्री दत्त शेतकरी विकास पॅनलने दणदणीत विजय मिळविला असुन या पॅनलचे सर्वच्या सर्व १३ उमेदवार मोठया मताधिक्याने विजयी झाले आहेत.
      

सिंदगाव येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणुक दि.१७ जुलै रोजी पार पडली. ही निवडणुक आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखालील भाजप प्रणित श्री दत्त शेतकरी विकास पॅनल व कृषी ग्राम विकास आघाडी पॅनल या दोन पॅनेलमध्ये अतीशय चुरशीची दुरंगी लढत झाली. या निवडणुकीत श्री दत्त शेतकरी विकास पॅनेलने बाजी मारली असुन या पॅनेलने सर्वच्या सर्व १३ जागा जिंकत कृषी ग्राम विकास पॅनलचा अक्षरशा धुव्वा उडविला आहे. श्री दत्त शेतकरी विकास पॅनलचे प्रमुख सरपंच विवेकानंद मेलगिरी, मलप्पा पाटील, श्रीपत ताडकर, सुरेश बिराजदार व जाकीर शेख यांनी अतीशय नियोजनबद्ध निवडणुकीची तयारी केली असल्यानेच श्री दत्त शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत विजय झाला.

या निवडणुकीसाठी दि.१७ जुलै रोजी मतदान पार पडले. या निवडणुकीत एकुण ४८४ मतदारांपैकी ४४० मतदान झाले होते. मतदान पार पडल्यानंतर लगेच मतमोजणी घेऊन निकाल जाहीर करण्यात आला.यावेळी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन के. एस.बोनदर
 यांनी काम पाहिले त्यांना सुधीर पुराणिक यांनी सहकार्य केले.
        

 श्री दत्त शेतकरी विकास पॅनलचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत. काशिनाथ भोसले (२३८),रेवाप्पा बेडजीरगे (२४२),श्रीकांत बिराजदार (२३८),राजेंद्र करंडे (२४२),सिद्धाराम परशेट्टी (243),ज्ञानेश्वर रेड्डी (२४५),बसय्या स्वामी (२४५),महम्मद शेख (२४१),दत्तू शिंदे (२५४),लक्ष्मीबाई बनजगोळे (२५०),अंबुबाई सुरवसे (२५३),दत्तात्रय ताडकर (२५७),व बलभीम पांढरे (२५०)  विजयानंतर श्री दत्त शेतकरी विकास पॅनलच्या समर्थकांनी गावात फटाक्यांची आतषबाजी व गुलाल उधळून एकच जल्लोष केला.

Labels:

किलज सोसायटी निवडणूकीत जय मल्हार पॅनलचा दणदणीत विजय


किलज ,दि. १८ : रविचंद्र गायकवाड

तुळजापूर तालुक्यातील किलज येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या झालेल्या
 चुरशीच्या पंचवार्षिक निवडणुकीत जय मल्हार परिवर्तन पॅनलने १२ पैकी ११ जागांवर दणदणीत विजय मिळविले आहे.


माजी चेअरमन वैजिनाथ कोनाळे, दिनकर पाटील, नागेश कुताडे, माजी सरपंच विठ्ठल मर्डे यांच्या नेतृत्वाखालील जय मल्हार परिवर्तन पॅनलने १२ पैकी ११ जागांवर दणदणीत विजय मिळवून विरोधकांना धोबी पछाड केले. एकूण १३ जागेसाठी झालेल्या निवडणुकीत जय मल्हार परिवर्तन ग्राम विकास पॅनलचे वि.जा.भ.जा. गटातून शामराव राठोड हे उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहे. तर माजी पंचायत समिती सदस्य खंडेराव शिंदे, यांच्या नेतृत्वाखालील जय शंभो शेतकरी विकास आघाडीला केवळ एक जागेवर समाधान मानावे लागले.
 

 रविवारी (दि.१७) रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. मतदानानंतर लगेच मतमोजणी होऊन निकाल घोषित झाला. या निवडणुकीत ५३० पैकी ४८९ मतदान झाले. सर्वसाधारण गटात जय मल्हार परिवर्तन ग्राम विकास पॅनलचे चॉंदसाहेबलाल इनामदार (२२४), लक्ष्मण गिरमल (२२३), प्रविण कुठार (२२७), वैजिनाथ कोनाळे(२३०), राम किनगे (२२९), जयराम राठोड (२३०), अशोक शेळके (२३५) निवृत्ती शिंदे (२२७), तर याच गटातून जय शंभो शेतकरी विकास आघाडीचे मनोहर भोईटे (२०४), सचिन बिडवे (२२१), आण्णाराव मोजगे (२०५), बाळू राठोड (२१५), दगडू शिंदे (२१५), विजय शिंदे (२१४), विवेकानंद सोमवंशी (२१८), माणिक येलूरे (२११) यांना सपशेल पराभव पत्करावा लागला. अनुसूचित जाती गटात महादेव गायकवाड (२५०) विजयी झाले तर भिमा गवळी (२२७) पराभूत झाले. इतर मागास प्रवर्ग गटातील शिवाजी सगर (२५२) विजयी झाले तर महेश माने (२२१) पराभूत झाले. महिला राखीव गटात जय मल्हार परिवर्तन ग्राम विकास विकास पॅनलच्या गंगाबाई सारणे (२४३) विजयी झाल्या तर कुसूम गायकवाड (२३०) यांचा जय शंभो शेतकरी विकास आघाडीच्या कुसूम शिंदे (२३१) यांनी केवळ एका मतांनी पराभव केला. तर जय शंभो शेतकरी विकास आघाडीच्या शेषाबाई सगर (२१६) यांचाही पराभव झाला.
  

सोसायटी निवडणूक म्हणजे ग्रामपंचायतची रंगीत तालीम समजली जाते. त्यामुळे अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. विजय खेचून आणण्यासाठी दोन्ही पॅनलमध्ये चांगलीच चुरस निर्माण झाली होती. अखेर जय मल्हार परिवर्तन ग्राम विकास पॅनलने १३ पैकी १२ जागा जिंकून किलज सोसायटीवर आपले प्रभुत्व प्रस्थापित केले आहे.

Labels:

Sunday, 17 July 2022

बंधन सामाजिक संस्थेचे कार्य कौतुकास्पद - प्रमोद कुलकर्णी


नळदुर्ग, दि . १७ : 

 बंधन सामाजिक संस्था ही निराधार महिला व आर्थिक दृष्टया दुर्बल घटकातील महिलांना स्वावलंबी बनविन्याच्या उद्देशाने कार्य करत आहे,या सामाजिक संस्थेस मोठ्या कंपन्यानी सीएसआर फंडातुन आर्थिक देणगी देत अशा महिलांना व्यवसायासाठी प्रोत्साहन म्हणून थेट मदत करत आहेत.


नळदुर्ग शहर व परिसरातील   निराधार व आर्थिक दृष्टया दुर्बल घटकातील महिलांना बंधन सामाजिक संस्थेच्या वतीने शिलाई मशीन,पीठाची गिरणी,किराणा स्टॉल,कपडयाचे दुकान आदिचे मोफत वितरण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी फुलवाड़ी ता. तुळजापूर येथिल सरपंच चद्रकांत लोहार, उपसरपंच राजेंद्र धबाले,पत्रकार शिवाजी नाईक,अजित चव्हाण, शाखा व्यवस्थापक  उत्पाल घोष ,  समन्वयक फारूक अहमद, ब्रांच सी.ओ विजयकुमार स्वामी,अनिल पार्गी,ब्रांच इंचार्ज राजीव मंडल,अनिल मेघवाल यांच्यासह लाभार्थी महिला व  नागरिक  उपस्थित होते.

Labels:

Friday, 15 July 2022

आम आदमी पार्टीच्या महिला शहर अध्यक्षपदी मुळे तर उपाध्यक्षपदी नदाफ यांची निवड

नळदुर्ग ,दि . १५ : 

 आम आदमी पार्टीच्या नळदुर्ग महिला शहर अध्यक्षपदी सौ. संध्यारानी संतोष मुळे तर महिला शहर उपाध्यक्षपदी प्यारन नदाफ यांची निवड करण्यात आली आहे . या निवडीबद्दल नुतन महिला पदाधिका-याचे आभिनंदन केले जात आहे.


यावेळी आम आदमी पार्टीचे  नळदुर्ग शहर अध्यक्ष वसिमखान पठान,सचिव अजहर शेख,संघटक प्रमुख असलम सय्यद,व्यापारी अध्यक्ष मुनवर बवाशे,संतोष मुळे ,तौफीक कुरेशी,सलीम शहा,(पाशा मिस्त्री) हाफिज अली पटेल,फक्रोद्दीन शाह, आदी उपस्थित होते.



Labels:

Tuesday, 12 July 2022

आषाढी एकादशी निमित्त वारकरी यांना राज सिरॅमिक ॲन्ड बिल्डिंग मटेरियल तर्फे पाणी व फराळाचे वाटप

तुळजापूर , दि . १२

शहरातील नळदुर्ग रोडवरील नरिमन पॉईंट पेट्रोल पंपासमोरील मेटरोला कंपनीचे डीलर व राज सिरॅमिक व बिल्डिंग मटेरियलसचे चालक प्रा.राजेंद्र  घाडगे यांनी आषाढी एकादशी निमित्त  वारकरी यांना पिण्याचे पाणी,केळी व फराळाचे वाटप उपस्थित मान्यवरांचे करण्यात आले.


 यावेळी मोहन चव्हाण,कृष्णा चव्हाण, प्रा.राजेंद्र घाडगे, प्रा.विलासराव जगदाळे,जयराज घाडगे, सुनिल वाडकर,धनंजय मोरे,पांडुरंग पांढरे,अमोल भोसले, ओंकार वडणे ,राजा माने,केदार सर,निरंजन व्हरकट, अभिमान शिंदे , आदी  उपस्थित होते.

Labels:

बाळासाहेब महाबोले यांचे शैक्षणिक कार्य कौतुकास्पद - माजी मंञी मधुकरराव चव्हाण


नळदुर्ग दि . १२

  खडतर परिश्रम , जिद्द , आत्मविश्वास याच्या बळावर  प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करून एक प्राथमिक शिक्षक ते शिक्षण विस्तार अधिकारी  यशस्वी प्रवास करणारे सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी बाळासाहेब महाबोले यांचे कार्य हे प्रेरणादायी व अत्यंत कौतुकास्पद असल्याचे मत माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी  नळदुर्ग येथे आयोजित बाळासाहेब महाबोले यांच्या सेवापूर्ती गौरव समारंभ प्रसंगी बोलताना व्यक्त केले.


नळदुर्ग येथील रहिवासी असलेले व उमरगा पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी कार्यालयात शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत असलेले बाळासाहेब सिताराम महाबोले यांच्या सेवा निवृत्ती निमित्त  सेवापूर्ती गौरव समारंभ निमित्त सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री मधुकरराव चव्हाण माजी नगराध्यक्ष नितीन कासार , माजी नगरसेवक बसवराज धरणे , कमलाकर चव्हाण ,संजय बताले महेंद्र कावरे, सरदारसिंग ठाकूर  , समीर सुरवसे , बलभीम मुळे , सुभाष महाबोले, नाभिक समाजाचे नेते लक्ष्मण धाकतोडे   , माजी विस्तार अधिकारी शिवाजी सुरवसे , पांडुरंग पुदाले , श्रमिक पोतदार ,एस. के. गायकवाड , आदींची प्रमुख उपस्थिती होती .

तुळजापूर तालुक्यातील खानापूर सह विविध ठिकाणी प्राथमिक शिक्षक म्हणून शैक्षणिक कार्य करीत असताना दरम्यानच्या काळात त्यांची शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून उमरगा गट शिक्षणाधिकारी कार्यालयात पदोन्नती झाली आणि नियत वयोमानानुसार तब्बल 38 वर्षे सहा महिने सेवा पूर्ण करीत ते सेवानिवृत्त झाले. याबद्दल शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व  महाबोले मित्र परिवाराच्या वतीने त्यांचा सेवापूर्ती गौरव समारंभात   मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते बाळासाहेब महाबोले यांना मानपत्र प्रदान करून सत्कार करण्यात आला .  


त्यांनी ज्या ज्या ठिकाणी नौकरी केली त्या त्या ठिकाणचे नागरिक व अनेक विद्यार्थी कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी महाबोले यांच्या मातोश्री ग. भा.रुक्मिणीबाई महाबोले यांची साखरतुला करण्यात आली.  नळदुर्ग शहरातील सेवानिवृत्त शिक्षक मुख्याध्यापकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .यावेळी कमलाकर चव्हाण, महेंद्र कावरे , बलभीम मुळे , संजय बताले आदींची भाषणे झाली.

 कार्यक्रमासाठी राजेंद्र महाबोले , हरिदास महाबोले , बालाजी सुरवसे ,सुजित सुरवसे , सुशील सुरवसे ,शिवराम महाबोले ,राम सोमवसे , सहदेव माने ,सचिन सुरवसे आदींनी परिश्रम घेतले . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सहशिक्षक भैरवनाथ कानडे यांनी केले तर आभार प्रदर्शन  मयुर महाबोले यांनी मानले.

Labels:

काटी-तुळजापुर रस्त्यावर नागनाथ मंदीरापासून काही अंतरावर भगदाड

काटी , दि . १२

  काटी ते तुळजापूर रस्त्यावर नागोबा मंदीरापासून  अर्धा किलोमीटर अंतरावर पावसामुळे मोठ  मोठे भगदाड पडले आहे. ऐन पावसाळ्यातच पडलेल्या या दिड  ते दोन फुटांच्या भगदाडामुळे व पावसाच्या पाण्यामुळे या खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने अपघाताची
शक्यता वर्तवली जात आहे.


  काटी ते तुळजापूर  या रस्त्यावर कायमच वाहनांची चांगली वर्दळ असते. अशा वर्दळीच्या रस्त्यावरच हे भगदाड पडले असून, स्थानिक नागरिकांनी त्याभोवती दगड ठेवल्याने दिवसा ते वाहनचालकांच्या लक्षात येत आहे. मात्र, रात्री या रस्त्यावर भगदाड पडल्याचे लक्षातच येत नसल्याने अपघाताची भीती व्यक्त होत आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन अपघात घडण्याअगोदर उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

Labels:

तुळजापूरच्या विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी निमित्ताने गीतापठण


तुळजापूर, दि. १२ 

आषाढी एकादशीच्या निमित्ताने तुळजापूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये सामुदायिक गीतापठणाचा धार्मिक कार्यक्रम उत्साहात साजरा झाला. 


तीर्थक्षेत्र असणाऱ्या तुळजापूर शहरांमध्ये दर एकादशी  निमित्ताने येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये गीता पठण केले जाते, आषाढी एकादशी निमित्त सामुदायिक गीतापठणाचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी स्थानिक महिला वर्गांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. गीता परिवारातील गीतेच्या अभ्यासक अश्विनी अनंत कोंडो यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.

 येथील स्थानिक महिला वर्गामधून सौ. सुवर्णमाला पाटील, सौ. मीना भिरगे, सौ. शोभा घुगे, सौ. उर्मिला महामुनी, सौ. मीरा घोगरे, सौ. उज्वला कुतवल, सौ मनीषा प्रयाग, सौ. लीला कवठेकर, सौ. भाग्यश्री मलबा, सौ. रंदन मलबा, सौ. मुक्ता पाठक, सौ. अनुराधा पाटील, सौ. उज्वला पाटील, सौ. रंजना पाटील, सौ सुवर्ण चाटूफळे, सौ संजीवनी प्रयाग, सौ रंजना पाठक, सौ संगीता प्रयाग, सौ विद्या कोंङो, सौ अंजली लहाने यांच्यासह इतर महिला उपस्थित होत्या.

आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर या सर्व महिलांनी गीतेचे १८ अध्याय वाचन केले आणि त्यानंतर विष्णुसहस्त्रनाम पठण करण्यात आले. अत्यंत उत्साहामध्ये दुपारी दोन वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होवुन पाच वाजेपर्यंत हा कार्यक्रम सुरू होता.

Labels:

Monday, 11 July 2022

तामलवाडी पोलीस ठाण्यातील सलगर यांची पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती झाल्याने सत्कार


काटी, दि . ११

 तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पोलीस ठाण्यातील  कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस फौजदार  केरबा सलगर यांची पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला.


 पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशांन्वये सलगर यांची पदोन्नती करण्यात आली आहे. त्यानिमित्त  तामलवाडी पोलीस ठाण्याच्या  वतीने सोमवार दि.11 रोजी  सत्कार   करण्यात आले .
      

यावेळी तामलवाडी पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडीत यांच्या हस्ते  पदोन्नती झालेले पोलीस उपनिरीक्षक केरबा सलगर यांचा   सत्कार करुन शुभेच्छा  देण्यात आले.

Labels:

वाढती लोकसंख्या : समस्यांची जननी (जागतिक लोकसंख्या दिन विशेष - ११ जुलै २०२२)

वाढती लोकसंख्या : समस्यांची जननी

(जागतिक लोकसंख्या दिन विशेष - ११ जुलै २०२२)



जागतिक लोकसंख्या दिन हा जागतिक लोकसंख्येच्या समस्यांबद्दल जागरुकता वाढवणारा वार्षिक कार्यक्रम आहे, जो १९९० पासून दरवर्षी ११ जुलै रोजी साजरा केला जातो. या विशेष दिवसाचा उद्देश कुटुंब नियोजन, लैंगिक समानता, गरिबी, माता आरोग्य, मानवी हक्क इत्यादींसारख्या विविध लोकसंख्येच्या मुद्द्याबद्दल जागरूकता आणि वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांबाबत सर्वसामान्यांना जाणीव करून देणे आहे. या वर्षीच्या जागतिक लोकसंख्या दिन २०२२ ची थीम आहे "८ अब्जांचे जग: सर्वांसाठी एक लवचिक भविष्याकडे - संधीचा वापर, सर्वांसाठी हक्क आणि पर्याय सुनिश्चित करणे". जगाची लोकसंख्या १ अब्जापर्यंत वाढण्यास हजारो वर्षे लागली, नंतर केवळ २०० वर्षांत ती सात पटीने वाढली. २० व्या शतकाच्या मध्यापासून, जगाने अभूतपूर्व लोकसंख्या वाढ अनुभवली आहे. १९५० ते २०२० दरम्यान जगाची लोकसंख्या तिपटीने वाढली आहे. २०११ मध्ये, जागतिक लोकसंख्या ७ अब्जांवर पोहोचली आणि २०२१ मध्ये ती सुमारे ७.९ अब्ज पर्यंत वाढ झाली आणि २०३० मध्ये सुमारे ८.५ अब्ज, २०५० मध्ये ९.७ अब्ज आणि २१०० मध्ये १०.९ अब्ज इतकी वाढण्याची अपेक्षा आहे.


येत्या काही वर्षांत भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश चीनला मागे टाकणार आहे. देशात दरवर्षी सुमारे १.६० कोटी लोकसंख्येची वाढ होत आहे, ज्यासाठी लाखो टन अन्नधान्य, १.९ लाख मीटर कापड, २.६ लाख घरे आणि ५२ लाख अतिरिक्त नोकऱ्यांची आवश्यकता आहे, तसेच नैसर्गिक आणि मानव निर्मित संसाधनांवर लोकसंख्येची गरज पूर्ण करण्यासाठी दबाव पडतो. ज्या देशात मोठी लोकसंख्या दररोज २ डॉलर पेक्षा कमी वर जगते, तेथे वाढणारी लोकसंख्या अन्न सुरक्षेची परिस्थिती आणखी बिघडवेल. २०५० पर्यंत, जगातील सुमारे ६६ टक्के लोकसंख्या शहरांमध्ये राहणार आहे. लोकसंख्या वाढीचा थेट परिणाम आर्थिक वाढ, रोजगार, उत्पन्न वितरण, गरिबी आणि सामाजिक सुरक्षिततेवर होतो. ते आरोग्य सेवा, शिक्षण, गृहनिर्माण, स्वच्छता, पाणी, अन्न आणि उर्जेवर सार्वत्रिक प्रवेश सुनिश्चित करण्याच्या प्रयत्नांवर देखील प्रभाव पाडतात. युथ इन इंडिया, २०१७ च्या अहवालानुसार, १९७१ ते २०११ दरम्यान तरुणांची वाढ १६८ दशलक्ष वरून ४२२ दशलक्ष झाली आहे.


संयुक्त राष्ट्रसंघ, आर्थिक आणि सामाजिक व्यवहार विभाग अंतर्गत, लोकसंख्या विभाग यांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ८ जुलै २०२२ पर्यंत भारताची सध्याची लोकसंख्या १,४०,७८,७३,९९८ आहे आणि जगाची एकूण लोकसंख्या ७,९५,९१,५०,८४५ आहे. जे नवीनतम संयुक्त राष्ट्र डेटाच्या वर्ल्डोमीटर तपशीलावर आधारित आहे. भारताची लोकसंख्या जगाच्या लोकसंख्येच्या १७.७ टक्के आहे, परंतु जगातील गोड्या पाण्याच्या संसाधनांपैकी फक्त ४ टक्के आहे. एकूण जमीन क्षेत्र २,९७३,१९० चौ. किमी आहे. म्हणजेच जगाच्या एकूण क्षेत्रफळाच्या २.४ टक्के हिस्सा भारताचा आहे. अन्न आणि कृषी संघटना (एफएओ) च्या मते, भारतातील सुमारे १४.८ टक्के (जवळपास २२.४ कोटी) लोकसंख्या कुपोषित आहे. भारतातील पाच वर्षांखालील बालकांच्या मृत्यूंपैकी ६९% मृत्यू कुपोषणामुळे होतात, गरिबी हे कुपोषणाचे एक मूळ कारण आहे आणि गरिबी निर्मूलन अद्याप खूप दूर आहे. भारतातील डॉक्टर-लोकसंख्येचे प्रमाण १:१४५६ आहे, डब्ल्यूएचओच्या शिफारसी १:१००० च्या तुलनेत. युनायटेड नेशन्स ग्लोबल अर्बनायझेशन प्रॉस्पेक्ट्सनुसार, देशातील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या १०४ दशलक्ष किंवा भारताच्या एकूण लोकसंख्येच्या ९ टक्के असल्याचा अंदाज आहे. प्रत्येक १० झोपडपट्ट्यांपैकी सहा घरांमध्ये पाण्याचा निचरा करण्याची योग्य व्यवस्था नाही. भारतातील ६३ टक्के झोपडपट्टी घरे एकतर ड्रेनेज कनेक्शन नसलेली आहेत किंवा उघड्या नाल्यांना जोडलेली आहेत. जगातील अविकसित देशांप्रमाणे भारतातही अशा लोकांची संख्या मोठी आहे ज्यांना जगण्यासाठी पुरेसे अन्न मिळत नाही. एवढेच नाही तर त्यांना मिळणाऱ्या अन्नातही पोषक तत्वांचा अभाव असतो. प्यू रिसर्च सेंटरने अहवाल दिला होता की, भारतातील जे लोक दररोज १५० रुपये कमवू शकत नाहीत (खरेदी शक्तीवर आधारित उत्पन्न) त्यांची संख्या गेल्या एका वर्षात झपाट्याने वाढली आहे. अशा लोकांची संख्या एका वर्षात सहा कोटींनी वाढली असून एकूण गरिबांची संख्या १३४ दशलक्ष झाली आहे.

११६ देशांच्या ग्लोबल हंगर इंडेक्स २०२१ मध्ये, भारत २०२० मध्ये ९४ व्या स्थानावरून १०१ व्या स्थानावर घसरला आहे. भारत आपल्या बहुतेक शेजाऱ्यांपेक्षा मागे आहे. पाकिस्तान ९२व्या, नेपाळ ७७व्या, बांगलादेश ७६व्या आणि श्रीलंका ६५व्या स्थानावर आहे. गरीबी निर्मूलनासाठी काम करणाऱ्या ऑक्सफॅम या संस्थेच्या म्हणण्यानुसार, जगभरात दर मिनिटाला ११ लोक भुकेने मरतात. संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या २०२१ च्या अन्न कचरा निर्देशांक अहवालानुसार, भारतात, घरगुती अन्नाचा कचरा दरवर्षी ५० किलो किंवा देशभरात एकूण ६८,७६०,१६३ टन इतका असल्याचा अंदाज आहे. यूएनईपी च्या अहवालानुसार, २०१९ मध्ये अंदाजे ९३१ दशलक्ष टन अन्न वाया गेले. गेल्या पाच वर्षांत ३८,००० मेट्रिक टनांहून अधिक अन्नधान्य वाया गेल्याचे ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने उघड केले आहे.


संयुक्त राष्ट्रांच्या अन्न सुरक्षा आणि पोषण स्थिती २०२२ अहवालात म्हटले आहे की २०२१ मध्ये जगभरात भुकेने ग्रस्त लोकांची संख्या ८२८ दशलक्ष झाली आहे.

प्रदूषण, अन्न भेसळ, ग्लोबल वॉर्मिंग, धोकादायक ई-कचरा, प्रदूषित हवा-पाणी, सुपीक शेतजमिनीचा अभाव, नैसर्गिक संसाधनांचा अतिवापर व ऱ्हास, वृक्षतोड, जंगलांचा नाश, वन्यजीव आणि मानव यांच्यातील वाढता संघर्ष, इंधनाचा वाढता वापर. कधी दुष्काळ, कधी पूर, स्वच्छ हवा आणि पाण्याचा अभाव, पर्यावरणाचा ऱ्हास, वाढती काँक्रीटची जंगले, बेरोजगारी, भूक, महागाई, जीवनसंघर्ष आणि वाढते गंभीर आजार या सर्व समस्यांचे कारण वाढती लोकसंख्या आहे. जास्त लोकसंख्या म्हणजे अधिक गरजा. आजही आपल्या समाजातील अनेक असहाय्य लोक, भिकारी, आजारी, हतबल लोक, असहाय मुले रस्त्यावरील कचरा, खराब झालेल्या अन्नाच्या ढिगाऱ्यातून अन्न निवडताना दिसतात, ही आपल्यासाठी अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. लोकसंख्या वाढीमुळे झोपडपट्ट्या, घाणेरडे वातावरण, निरक्षरता, गरिबी, अपुरे पोषण, योग्य संगोपनाचा अभाव, आर्थिक विषमता अशा गंभीर समस्या आहेत, अशा गरीब परिस्थितीत लहानपणापासूनच मुलांच्या जीवनाचा संघर्ष सुरू होतो.



आज भारत जगातील सर्वात मोठी युवा शक्ती असलेला देश म्हटले जाते, युवकांना योग्य साधनसंपत्ती, रोजगार, व्यवसाय, शिक्षण, आरोग्य सेवा, उज्वल भविष्यासाठी योग्य नियोजन आणि सर्वांना समान संधी मिळाल्या तर युवाशक्ती देशाला महाशक्ति बनवू शकते. अन्यथा ही युवाशक्ती बेरोजगारी, महागाई, गरिबी, साधनांची कमतरता यामुळे चुकीच्या दिशेने वाटचाल करेल आणि समाजासमोरील समस्या वाढवेल. आज आपल्या देशात अशी समस्या सामान्य झाली आहे, तरुणांमधील गुन्हेगारीचा प्रमाण खूप वाढला आहे. आपण आपल्या बाळाला जीवनाच्या मूलभूत गरजा देखील पुरवू शकणार नाही हे माहीत असताना आपण आपल्या आयुष्यात नवजात बाळाच्या जन्माचा आनंद खरोखरच घेऊ शकतो का? आजच्या भागमभागासारख्या वातावरणात श्रीमंत माणसाला वेळ नाही, गरीब माणूस दोन वेळच्या भाकरीची व्यवस्था करण्यात धडपडत आहे, कुणी जबाबदारीने तर कुणी मजबुरीने बांधलेले आहे. आधुनिकतेची उधळण प्रत्येकावर पडली आहे, आता लहान मुलांकडूनच नाही तर मोठे वडिलधाऱ्यांकडूनही देखील मोठ्याप्रमाणावर संस्कारांची अवहेलना केली जात आहे. परंतु, मुलांना जन्म दिल्यानंतर, ते मूल सुसंस्कृत नागरिक होईपर्यंत त्या मुलाची संपूर्ण जबाबदारी पालकांची असते, मुलांचे भविष्य पालकांच्या हातात असते. आपण आपली जबाबदारी झटकू शकत नाही. मुलांच्या जन्मापूर्वी पालकांनी त्यांच्या भविष्याचा गांभीर्याने विचार करण्याची आज नितांत गरज आहे.

डॉ. प्रितम भि. गेडाम

Labels:

मुरूमच्या पंढरीनाथाचा थाटामाटात पूजन संपन्न,विठोबा माळावर भक्तांची मांदियाळी

मुरूम दि.११, 

आषाढी एकादशीनिमित्त मुरूम येथील विठ्ठलसाईच्या माळरानावर विठ्ठल-रुखमाई मंदिरात भक्तांच्या मांदियाळीत विठ्ठल-रुखमाईचे भक्तीभावाने श्री.विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश कार्यध्यक्ष बसवराज पाटील यांच्या हस्ते पूजन संपन्न झाले. 


यावेळी उस्मानाबाद जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन बापूराव पाटील, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष शरण बसवराज पाटील,बाळासाहेब पाटील,संचालक माणिक राठोड उपस्थित होते. मुरूम येथील विठ्ठल-रुखमाई मंदिर प्रति पंढरपूर व त्याचबरोबर विठोबाचे माळ या नावानी जाणिले जाते. मुरूम व परिसरातील वारकरी, आषाढी एकादशी,जत्रेला माळावर भाविक-भक्तांची मांदियाळी भरते. मुरूम व परिसरातील नागरिक प्रति पंढरपूरला पायी चालत येऊन आणि विठ्ठल-रुखमाईचे दर्शन घेतात.


 यावेळी मंदिर परिसरात जणू वारकऱ्यांची मांदियाळी भरलेले दृश्य दिसून येते. आषाढी एकादशी निमित्त विठोबा माळावरील विठ्ठल-रुखमाई मंदिरात दर्शनासाठी सकाळ पासूनच भाविक-भक्तांच्या रांगा दिसून आल्या, दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याच्या वतीने अतिशय भक्तिमय वातावरणात पाटील परिवाराच्या हस्ते पूजन करण्यात आले व त्याच बरोबर दर्शनासाठी आलेल्या भाविक-भक्तांना उपवासाचे फराळीचे प्रसाद वाटप करण्यात आले. यावेळी कारखान्याचे एम डी अथणी, मुरूम पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक डॉ.रंगनाथ जगताप,माजी उपनगराध्यक्ष श्रीकांत बेंडकाळे, उल्हास घुरघुरे, महेश माशाळकर, महालिंग बाबशेट्टी आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्व भाविक-भक्तांना बसवराज पाटील यांनी आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या.

Labels:

परंडा येथे आषढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांनी काढली दिंडी


परंडा, दि . ११


परंडा येथील खंडेश्वर इंग्लीश मिडीयाम स्कुलच्या वतीने आषढी एकादशी निमित्त  भव्य दिंडी काढण्यात आली.  विद्यार्थ्यांनी  ज्ञानोबा तुकाराम गजर करीत येणाऱ्या जाणार्‍यांचे लक्ष वेधले.  अतिशय उत्साहात  हा सोहळा पार पडला .


खंडेखर इंग्लीश मिडीयम स्कुलचे मुख्यध्यापक संजय जाधव , पठाण लदसूम, अर्चना बनसोडे, प्रियंका डिसले, मंजुषा भांगे, वर्षा गरड, विभुते  व पोळ  यांनी पुढाकार  घेतले.

 
अतिशय कौतुकास्पद विद्यार्थ्यांनी टाळ मृदंगाचा गजर करीत ठेका धरला होता. सर्व विद्यार्थी विद्यार्थीनी वारक-याच्या भुमिका पार पाढल्या व विठ्ठल रुक्मीनीचे पात्र अतिशय सुंदर तयार करण्यात आले होते.

Labels:

Sunday, 10 July 2022

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबियानी घेतले श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन



तुळजापूर, दि. १० :


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी सौ लता शिंदे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी शनिवारी रात्री उशिरा महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. मंदिर संस्थांनच्या वतीने विश्वस्त आमदार राणाजगजितसिह  पाटील यांनी शिंदे कुटुंबीयांचा सत्कार केला.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणीची शासकीय पूजा करण्यासाठी येण्यापूर्वी त्यांचे कुटुंबीय महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी तुळजापुरात दाखल झाले. तुळजाभवानी देवीच्या दर्शनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे कुटुंबीय यांची पंढरपूर येथे भेट झाली आणि कुटुंबीयांनी शासकीय पूजेमध्ये सहभाग नोंदवला. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान यांच्याकडून मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे , चिरंजीव श्रीकांत शिंदे , एकनाथ शिंदे यांच्या सून आणि नातू या सर्वांनी तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतल्यानंतर प्रशासकीय कार्यालयात त्यांचा मंदिर संस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला. 

मंदिराच्या बाहेर जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष सौ अर्चना पाटील यांनी सौ लता शिंदे यांचे  स्वागत केले. याप्रसंगी तुळजापूर शहर आणि तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

Labels: