Thursday, 31 March 2022

तुळजापुरातील एक्सेस पास बंद करण्याची राष्ट्रवादीची मागणी


तुळजापूर, दि . ३१:  डॉ .सतीश महामुनी


 तुळजाभवानी मंदिर प्रवेशासाठी सुरू असलेले ॲक्सेस पास बंद करण्याची मागणी निवेदनाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.  तहसीलदार सौ. योगिता कोल्हे  यांना  राष्ट्रवादी विद्यार्थी जिल्हाध्यक्ष दुर्गेश साळुंके यांनी निवेदन दिले. 


 निवेदनात तुळजाभवानी देवीचे पंचामृत अभिषेक पूर्वीप्रमाणे सुरू करण्याच्या अनुषंगाने महत्त्वाची मागणी केली आहे. वयोवृद्ध आणि लहान मुलांना खूप त्रास होतो त्यामुळे प्रवेश पास बंद करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे .यावेळी युवक शहर अध्यक्ष नितीन रोचकरी, ज्येष्ठ नेते दिलीप  मगर , अण्णासाहेब क्षीरसागर , गोरख पवार , समर्थ पैलवान, रोहित चव्हाण , मयूर दराडे , आदित्य शेटे , रणजित उंबरे , पुष्कराज शिंदे , संकेत साळुंके , विजय बोधले उपस्थित होते. भाविकांना या योजनेमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे अशी प्रतिक्रिया या निमित्ताने विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष दुर्गेश साळुंके यांनी पत्रकारांना दिली.

Labels:

तुळजापूर तालुक्यातील कुन्सावळी येथे विविध कामास प्रारंभ

नळदुर्ग ,दि . ३१


तुळजापूर तालुक्यातील   कुन्सावळी येथे नाली बांधकामास सुरुवात करण्यात आली आहे.

गावातील काळनाथ कट्टा,ग्रामपंचयत ,पाणीटाकी ते तालीम पर्यंत ,श्री.हनुमान मंदिर समोर भुमीगत 28 पाईप टाकून नालीचे काम चालू करण्यात आले . या कामाचे सुरुवात  सरपंच सौ.कविता शणमुख गायकवाड यांच्या  हास्ते पुजन करुन करण्यात आले .यावेळी ग्रामसेवक  स्वामी  गावातील नागरिक नरसु रुपनुर , सखाराम जंगालेसह नागरिक  उपस्थित  होते .

        मजबुतीकरणाच्या कामास प्रांरभ
 
 पाझर तलाव क्र. 2 व पाझर तलाव क्र. 4 चे मजबुतीकरणाच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे . या कामाचे शुभारंभ  सरपंच सौ.कविता शनमुख गायकवाड , उपसरपंच सौ.रुपाली अर्जुन शिंदे यांनी केले. यावेळी सिंदगावचे सरपंच विवेकानंद मेलगिरी  शिंदे , जयराम वायकर , अर्जुन शिंदे , नरसु रुपनूर ,  बाबा शिंदे , रघुआप्पा कोकरे ग्रामसेवक स्वामी  आदी उपस्थित होते.

Labels:

सहशिक्षिका सांगळे यांची बदली : वागदरी ग्रमस्थानी दिला निरोप


वागदरी , दि . ३१


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वागदरी ता.तुळजापूर येथील सहशिक्षिका सुषमा सांगळे यांची अन्यत्र बदली झाल्याने येथील विद्यार्थी व ग्रामस्थ पालकांनी सत्कार करून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देवून निरोप दिला.



  सहशिक्षिका सुषमा सांगळे ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जिल्हा बदली होऊन जून २०१८ मध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील वागदरी ता.तुळजापूर येथील जि.प.प्राथमिक शाळेत सहशिक्षिका म्हणून रूजू झाल्या होत्या.त्या एक उपक्रमशिल शिक्षिका असून साहित्य निर्मितीची त्यांना आवड आहे. त्यांचा एक कवितासंग्रह प्रकाशित असून   त्यांचे अनेक लेख प्रकाशित झालेले आहेत.

 त्यांना महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे.अल्पावधीतच त्यांनी   विद्यार्थी प्रिय  शिक्षिका म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.  शासनाच्या तांत्रिक आडचणीमुळे त्यांची वागदरी येथून जि.प.प्राथमिक शाळा मानेवाडी ता.तुळजापूर याठिकाणी  बदली झाली आहे. त्याची बदली झाल्याचे कळताच शालेय व्यवस्थापन समिती  अध्यक्ष रामसिंग परिहार यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करून शुभेच्छासह निरोप देण्यात आला. 
  
यावेळी ग्रा.प.सदस्य दत्ता सुरवसे, रिपाइंचे जिल्हा सचिव तथा पत्रकार एस.के.गायकवाड,बाळू पवार, मुख्याध्यापिका महादेवी जते,सहशिक्षिका एम.आर. चौधरी,अंगणवाडी सेविका पद्ममीनीबाई पवार, सहशिक्षक तानाजी लोहार, किसन जावळे, पत्रकार सतिश राठोड, सह विद्यार्थी, पालक, व ग्रामस्थ उपस्थित होते.

Labels:

Wednesday, 30 March 2022

काँग्रेसचे प्रदेश सचिव सुनील चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त नळदुर्ग येथे पाणपोईचे शुभारंभ


नळदुर्ग दि. ३०

काँग्रेसचे प्रदेश सचिव तथा  श्री तुळजाभवानी साखर कारखान्याचे चेअरमन  सुनील मधुकरराव  चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन  संजीवनी मेडिकल स्टोअर्स नळदुर्ग व
8 फार्मा ग्रुप अणदूर-नळदुर्ग-जळकोट यांच्यावतीने नागरिकासाठी बुधवारी नळदुर्ग येथे पाणपोईचा शुभारंभ करण्यात आले.



यावेळी नळदुर्ग पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुहास येडगे  व माजी  नगरसेवक सुधीर हजारे  यांच्या हास्ते जलचे (पाण्याचे जार ) पुजन करुन  श्रीफळ वाढवुन आणि फित कापुन शुभारंभ  करण्यात आले.


याप्रसंगी जेष्ठ पञकार  विलास येडगे,  शिवाजी नाईक,  दादासाहेब बनसोडे, लतीफ शेख, अजित चव्हाण, अमर भाळे, शोएब काझी,  अजय अणदूरकर, संजय दशरथ जाधव, गोविंद शिंदे, जीवन मोजगे, महेश कारले, रविंद्र कानडे, पंकज नरवडे, हिराजी गायकवाड,  राम जाधव आदि उपस्थित होते.

Labels:

मनसेच्या निवेदनाची दखल घेवुन नळदुर्गमधील नालीचे काम सुरु

नळदुर्ग , दि . ३०


सर्व्हिस रस्तालगत नालीचे काम सुरु
सर्व्हिस रस्ता,नाली,व स्ट्रीट लाईटचे काम तात्काळ सुरु करा अन्यथा  आंदोलन करण्याचा मनसेने दिला होता इशारा

नळदुर्ग शहरातून गोलाई-ते अक्कलकोट हा महामार्ग करताना,शहराच्या मुख्यमार्गाला जोडणारा सर्व्हिस रस्ता व नालीचे काम रखडले होते. त्यामुळे सांडपाणी महामार्गावर येत आहे. त्याच कारणाने दि .१२ मार्च रोजी एका दुचाकीस्वाराचा बसस्थानकासमोर अपघात झाला होता,सांडपाण्याला वळण देत असताना पाठीमागून येणाऱ्या गाडीने धडक दिल्याने त्या अपघातग्रस्ताचा मृत्यु झाल्याचे सर्वश्रुत आहे.  ,या अपघातास जबाबदार कोण?असा प्रश्न  मनसेने उपस्थित  केला होता. अशा घटना टाळण्यासाठी सर्व्हिस रस्ता,नाली  याचे काम विनाविलंब तात्काळ सुरु करावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना  आंदोलन  करण्याचा इशारा  राष्ट्रीय महामार्ग सोलापुर विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना दिला होता . त्याची दखल घेवुन संबंधित विभागाने अर्धवट असलेल्या नालीचे काम सुरु केले आहे.

Labels:

रासेयोचे तिर्थ खुर्द येथे आरोग्य शिबीर संपन्न


तुळजापूर,दि.३०: 

येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूरच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वच्छ ग्राम व आरोग्य संवर्धनासाठी युवा हे विशेष श्रम संस्कार शिबिर मौजे तिर्थ खुर्द येथे दि.२५ ते ३१ मार्च या कालावधीत संपन्न होत आहे,शिबिरादरम्यान तुळजापूर उपजिल्हा रुग्णालय यांच्या सहयोगाने आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.

सदर आरोग्य तपासणी कार्यक्रमामध्ये एकुण ३२ व्यक्तिंचे शुगर, रक्तदाब व हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली, यावेळी जिल्हा उपरुग्णालय तुळजापूर येथील मुख्य अधिक्षक डॉ जाधव, डॉ शेख, आरोग्य कर्मचारी भाग्यश्री हिरमेठ, जगदाळे यांच्या सह तिर्थ खुर्द येथील उपसरपंच रामदास पवार , तसेच सरपंच बिरुदेव सोनटक्के ,मयुर जाधव यांचे सहकार्य लाभले, 


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.कॉम भाग एक चा विद्यार्थी अभिषेक लसने याने केले तर आभार कु पूजा लिंगफोडे हिने मानले,सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रमाधिकारी प्रा चव्हाण व्ही एच,प्रा एस.पी वागदकर,प्रा.डॉ.एम.आर आडे, प्रा.बी.जे कुकडे,प्रा.डॉ.बी डब्ल्यू गुंड,प्रा.बी.जे कुकडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले, तसेच सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एम मणेर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला, यावेळी सर्व स्वयंसेवक, तसेच मोठ्या प्रमाणात तिर्थ खुर्द येथील रहिवासी उपस्थित होते.

Labels:

शिक्षक समन्वय समितीने विविध प्रलंबित प्रश्नी केले धरणे आंदोलन


उस्मानाबाद , दि . ३०


वारंवार पाठपुरावा करुनही विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लागत नसल्यामुळे जिल्हा शिक्षक समन्वय समितीच्या वतीने आज (दि.30) जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन करुन प्रशासनाचे लक्ष वेधले. तसेच मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.


विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व प्राथमिक पदवीधर पदोन्नतीचे आदेश काढण्यात यावे,  गेली दोन वर्षांपासून प्रलंबित असलेली हजारो वैद्यकीय देयके तात्काळ द्यावीत, पूरग्रस्तांसाठी जमा केलेला 25 लाख निधीचा हिशोब देऊन उर्वरित निधीचा विनियोग करावा, प्रलंबित पुरवणी देयकांसाठी आर्थिक तरतूद उपलब्ध करून देयके पारित करावीत, प्रतिमहा मासिक वेतन तारखेलाच करावे,  शिक्षणाधिकारी माध्यमिक हे वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीसाठी जाणूनबुजून अडथळे निर्माण करत असल्यामुळे अनेक प्रकरणे प्रलंबित असून, सर्व प्रकरणे निकाली काढण्यात यावी, आकस्मिक मृत्यमुखी पडलेल्या डीसीपीएस बांधर्वाना सानुग्रह तदर्थ अनुदानाचा लाभ द्यावा, अहमदनगर जिल्हा परिषदेप्रमाणे पंचायत समिती अधिनियम 96 (1) नुसार वैद्यकीय देयकांचे रुपये 2 लाखांपर्यंतचे मंजुरी अधिकार पंचायत समिती स्तरावर बीडीओंना द्यावेत, अराजपत्रित मुख्याध्यापक पदोन्नतीमध्ये माध्यमिक शिक्षकांना सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती द्यावी, दिव्यांग कर्मचारी व शिक्षकांना सहायक तंत्रज्ञान उपकरणे पुरविण्यात यावी, या प्रलंबित प्रश्नाकडे आपले लक्ष वेधण्यासाठी शिक्षक समन्वय समितीच्या वतीने कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

 मागण्यांची दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही समितीच्या वतीने देण्यात आला.

आंदोलनात बाळकृष्ण तांबारे, कल्याण बेताळे, विभीषण पाटील, लालासाहेब मगर, विक्रम पाटील, बशीर तांबोळी, विलास कंटेकुरे, अविनाश मोकाशे, बळवंत घोगरे, अभयकुमार यादव, पवन सूर्यवंशी, संतोष देशपांडे, बाळासाहेब वाघमारे, विठ्ठल माने, महादेव शिंदे, योगीराज कुंभार,  सुनील मुंढे, काशीनाथ भालके, विशाल अंधारे, संतोष भोजने, किशोर पिसे, प्रशांत माने, सुखदेव भालेकर, नितीन कोळी, सविता पांढरे आदींसह शिक्षक समन्वय समितीचे पदाधिकारी, शिक्षक सहभागी झाले होते.

Labels:

शिबीरे ही तरुणांच्या व्यक्तीमत्वाची माध्यमे : गोविंद पाटील


मुरुम, ता. ३० दि : 


तरुणांच्या बाहय व्यक्तीमत्वाचा सर्वांगीण विकास हा अशा राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबीरामध्ये सहभागी झालेल्या शिबीरांमधून होतो. अशी शिबीरे ही तरुणांच्या व्यक्तीमत्वाची माध्यमे असल्याचे प्रतिपादन उमरगा पंचायत समितीचे माजी उपसभापती गोविंद पाटील यांनी केले. 



गणेशनगर, ता. उमरगा येथे श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने  ' ग्रामस्वच्छता, जलसंवर्धन व आरोग्य संवर्धनासाठी युवा वार्षिक शिबीर ' प्रसंगी बुधवार (ता. ३०) रोजी शिबीराच्या समारोप प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगर शिक्षण विकास मंडळाचे सचिव व्यंकटराव जाधव गुरूजी होते. 

यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक रंगनाथ जगताप, सरपंच उषा चव्हाण, उपसरपंच सतिश पवार, प्राचार्य डॉ.अशोक सपाटे, उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत विराजदार, मुख्याध्यापक सुभाष राठोड, उपसरपंच, तंटामुकत समितीचे अध्यक्ष माणिक राठोड, पोलीस पाटील कलावती चव्हाण, कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. संध्या डांगे, एनएसएसचे विद्यार्थी प्रतिनिधी योगेश पांचाळ, अमितकुमार बनसोडे, लता कांबळे, अंजली स्वामी आदिंची प्रमुख उपस्थिती होती.  

                       
पुढे बोलताना गोविंद पाटील म्हणाले की, महाविद्यालयातील शिक्षणाबरोबरच हे बाहय शिक्षण माणसाला व्यवहारीक जीवन शिकविते. यामुळे आपले व्यक्तीमत्व सतत घडत असते. आपल्या जीवनाला योग्य दिशा मिळून जगण्याचा एक आदर्श मार्ग सापडतो. अशा शिबीरांमधून खुप शिकण्यासारखे असून त्याचा पुरेपुरे उपयोग तरुणांनी करुन घ्यावा असे आवाहनही त्यांनी शेवटी केले. यावेळी प्राचार्य डॉ. अशोक सपाटे यांनी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी चांगला संकल्प करुन स्वतःचा विकास करुन घ्यावा. यावेळी रंगनाथ जगताप, अमोल कटके व भाग्यश्री पवार आदींनी मनोगत व्यक्त केले. 

उत्कृष्ट सहभागाबद्ल सोनाली चव्हाण, दिक्षीवंत जाधव, शितल कटके, सोनू चव्हाण, सोनाली जाधव, श्वेताराणी कसनकर, नामदेव शिंदे, यशोदा बोडरे, आकाश पांचाळ, पुजा शिंदे, प्राजक्ता थोरात, सतिश महिंद्रकर आदींचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला. प्रा. डॉ. महेश मोटे, प्रा. प्रकाश कुलकर्णी, प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले, प्रा. लखन पवार, प्रा. सचिन राजमाने, प्रा. अशोक बावगे, डॉ. नागनाथ बनसोडे, डॉ. सुशील मठपती, प्रा. भूषण पाताळे, श्रावण कोकणे, प्रभाकर महिंद्रकर, दत्ता कुंभार आदींनी पुढाकार घेतला. शिबीराचे प्रास्ताविक प्रा. डॉ. रवि आळंगे यांनी केले. प्रा. डॉ. सुभाष हुलपल्ले यांनी सूत्रसंचालन तर प्रा. डॉ. आप्पासाहेब सुर्यवंशी यांनी आभार मानले. 

Labels:

Tuesday, 29 March 2022

बारावी बोर्ड चेअरमन सुधाकर तेलंग यांची यशवंतराव चव्हाण महाविद्यालय परीक्षा केंद्राला भेट


तुळजापूर,  दि .२९ : 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ लातूरचे चेअरमन सुधाकर तेलंग यांनी यशवंतराव चव्हाण महाविद्यालय तुळजापूर येथील परीक्षा केंद्राला भेट दिली.

यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथे दि . २९ मार्च रोजी दुसऱ्या सत्रा मध्ये संरक्षण शास्त्र या विषयाची परीक्षा सुरू असताना अचानकपणे मंडळाचे चेअरमन सुधाकर तेलंग यांनी परीक्षा केंद्राला भेट दिली. सुरु असलेल्या परीक्षा दालनांमध्ये त्यांनी पाहणी केली आणि त्यानंतर परीक्षा केंद्राच्या कामासंदर्भात अभिप्राय नोंदविला.


 याप्रसंगी केंद्राची केंद्र संचालक प्रा. राजेंद्र खेदाड, सह केंद्रसंचालक प्रा. दत्तात्रय देवगुंडे, सह परिरक्षक ऋषिकांत भोसले, रनर प्रा. विवेकानंद कुंभार, परीक्षा कमिटीचे डॉ. सतीश महामुनी, प्रा. अमर भरगंडे, प्रा. अनंत माने, प्रा. गुलाब सय्यद, महादेव डुकरे,  सुरेश मुळे आदी उपस्थित होते.


बारावी परीक्षेच्या अनुषंगाने  सुधाकर तेलंग यांनी महत्त्वाच्या सूचना दिल्या. महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्र या कामकाजाबद्दल त्यांनी याप्रसंगी समाधान व्यक्त केले.

Labels:

ग्रामीण भागात शेतकरीपुञाला मुली मिळत नसल्याने लग्न जमवणे झाले कठीण, शहरी नोकरदार मुलाला सर्वाधिक पसंती

  


चिवरी , दि .२९  राजगुरू साखरे


अलीकडच्या काळात मुलांचे लग्न जमीवणे ही फार मोठी समस्या मुलांच्या पालकवर्गामध्ये निर्माण होऊन बसली आहे.लग्नाच्या बाबतीमध्ये मुलींच्या पालकवर्गामधुन मुलाबद्दलच्या अपेक्षा वाढले आहे. 


उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सुद्धा गत दोन वर्षांपासून चांगले पर्जन्यमान झाल्यामुळे सिंचन क्षमतेमध्ये वाढ झाल्यामुळे बागायतदारांचे प्रमाणही वाढु लागले आहे , राहायला बंगला, चार चाकी गाडी, घरात एलईडी टीव्ही दारात बुलेट , अशा भावी सूनेसाठी  सर्व तयारी करून बसलेल्या शेतकऱ्याच्या मुलाला विवाहासाठी मात्र, मुलींकडून  शेतकरी नवरा नको ग बाई  अशा नवरी मुलीच्या भूमिकेमुळे नवरदेव नवरदेव राहण्याची भीती निर्माण झाली आहे . 


सध्या नवरदेव होण्यासाठी इच्छुक असलेले तरुण नवरी शोधण्यासाठी गावोगावी फिरत आहेत, पाहुण्या- रावळात गेले  तर मुलाला नोकरी पाहिजे पुण्या मुंबईत राहणारा पाहिजे, मुलीला देश-विदेशात फिरवणारा नवरा पाहिजे अशा फर्माईश मुलीकडून होऊ लागले आहेत.यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात राबण्याची कोणत्याच मुलीची तयारी दिसत नाही, विशेष म्हणजे शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मुलीसुद्धा शेतकरी नवरा नको ग बाई असे म्हणत आहेत. मुलीचे अत्यल्प शिक्षण असले तरी प्रामुख्याने शासकिय नोकरी करणारा व शहरात राहणारा मुलगा पाहिजे.अशी अपेक्षा करणाऱ्या मुलींचे प्रमाण सातत्याने वाढताना दिसत आहे. त्याचबरोबर  त्यामुळे विवाह जमविण्यास विलंब होत असुन विवाह जमण्यास विलंब झाल्यामुळे मुलांमध्ये नैराश्याची वातावरण निर्माण होऊ लागले आहे, त्याचबरोबर आजच्या काळामध्ये ३० ते ३२ वयापर्यंत तर मुलाचे स्थळ पाहण्यास जात आहे. अलिकाडच्या काळात नोकरी मिळणे दुरापास्त होऊन बसले आहे.



उच्च शिक्षण घेऊनदेखिल मुलांना नोकरी मिळत नाहीत. असे चित्र दिसत आहे. , अलिकाडच्या काळामध्ये मुलींच्या आपल्या पतीबद्दलच्या अपेक्षादेखिल वाढल्या आहेत.अत्यल्प शिक्षण घेतलेली मुलगी देखिल आपणास मोठ्या पगाराची नोकरी करीत असलेला मुलगा पती म्हणुन मिळावा अशा अपेक्षा करू लागल्या आहेत .त्यातच मुलीच्या जन्मदर घटल्यामुळे मुलांच्या प्रमाणात मुलींची संख्या कमी झाली असल्याने मुलांच्या लग्नाची ,समस्या आणखीन वाढल्या आहेत, एखाद्या व्यसयात स्थिर असलेला मुलगा चांगल्या प्रकारे पैसे मिळवत असला तरीदेखील अशा मुलाशी विवाह करण्यास मुलीची मानसिकता नसल्याचे अलीकडे दिसुन येत आहे.त्यामुळे अशा ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील मुलांना विवाहाविना राहण्याची वेळ आली आहे . 


पूर्वीच्या काळी  पालकवर्ग मुली लग्नाच्या वयात आल्या की त्यांच्या लग्नासाठी पायातील वहाना झिजेपर्यंत पळताना दिसतात. आता मात्र हे उलट होताना दिसून येत आहे असाच प्रयत्न मुलांच्या लग्नाच्या बाबतीत करतान दिसतो आहे..तसेच मुलांचे शिक्षण व नोकरी मिळेपर्यंत मुलांचे लग्नाचे वय वाढलेले असते व त्यामुळे त्याच्यां वयास अनुरुप अशा मुली मिळताना अडचणी येतात.मुलींच्या पालकांनादेखील सरकारी नोकरी करणारा मुलगाच मिळाला पाहिजे ही मानसिकता बाजुला ठेऊन उत्तम शेती अथवा उत्तम  व्यापार  करणाऱ्या मुलांस आपली मुलगी देणे गरजेचे आहे.


कधीकाळी आपल्याही मुलांच्या  लग्नाच्यावेळी ही समस्या निर्माण होऊ शकते याचे भान ठेऊन मुलींच्या लग्नासाठी जी तत्परता दाखवली तर मुले आत्महत्या, व्यसनाधिनता ,नैराश्य अशा घटना निश्यचितपणे होणार नाहीत. त्याचबरोबर सध्या सोशल मीडियावर शेतकरी मुलंसुद्धा आपलं मत व्यक्त करताना दिसत आहेत " वावर हाय तर पावर हाय, असाच भाव कांद्याला मिळत गेला तर जीन्स वाल्या पोरी सुद्धा हेच म्हणतील शेतकरी नवरा हवा ग बाई ,  असे नवनवीन शेतीविषयक जनजागृतीचे व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित होताना दिसत आहेत.

Labels:

जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर मेहनत करा :डॉ. राम जाधव


 मुरूम,  दि. २९  : 


सध्या सर्व क्षेत्रात प्रचंड स्पर्धा सुरु असून या परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी जिद्य, चिकाटी व मेहनत महत्वाची आहे. यश तुमच्या पुढे आहे. तुम्ही तुमच्या स्वप्नासाठी काम केले नाही तर दुसऱ्यांच्या स्वप्नासाठी नक्की काम करावे लागेल. स्वतःची कार्यक्षमता ओळखून निर्णय घेता आला पाहिजे. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर प्रचंड मेहनत करा असे प्रतिपादन उमरगा येथील दिशा अकादमीचे संचालक डॉ. राम जाधव यांनी केले.                       


 श्री माधवराव पाटील  महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत सुरू असलेल्या विशेष शिबीरा प्रसंगी सोमवार  दि.२८ रोजी आयोजित  ' तरुणांसमोरील आव्हाने आणि नव्या संधी ' या विषयावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. 


या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे होते. यावेळी उमरगा रोटरीचे माजी अध्यक्ष प्रवीण स्वामी, डॉ. शीला स्वामी, डॉ. जयश्री सोमवंशी, सहशिक्षक शाहूराज माने, डॉ. सुभाष हुलपल्ले, प्रा. प्रकाश कुलकर्णी, प्रा. अशोक बावगे, डॉ. राम बजगिरे, डॉ. विनायक रासुरे, प्रा. दिनकर बिराजदार, डॉ. विलास खडके, प्रा. मुकूंद धुळेकर, प्रा. राजकुमार तेलंग, प्रा. भूषण पाताळे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.                   


पुढे बोलताना  जाधव म्हणाले की, चांगल्या संधी शोधताना वेळ, काळ आणि वय लागत नाही. सकारात्मक विचारच माणसाला प्रगतीच्या शिखरावरती पोहचवत असतात. ज्याप्रमाणे अंधारात चालताना प्रकाशाची गरज असते त्याप्रमाणेच जीवनात यशस्वी होण्याकरिता गुणवत्तापूर्ण शिक्षणाची गरज असते. जीवनात कोणतेही क्षेत्र लहान-मोठे नसते. त्याकडे आपण कोणत्या दृष्टीकोनातून पाहतो याला फार महत्व असते. यशस्वी तोच होतो ज्याला संधीचे सोने करता येते. अध्यक्षीय समारोप प्रसंगी डॉ. महेश मोटे म्हणाले की, तरुणांनी महत्वकांक्षी बनून आव्हानाचा हसत-हसत मुकाबला केला पाहिजे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहूण्यांचा परिचय प्रा. डॉ. रवि आळंगे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. आप्पासाहेब सुर्यवंशी तर आभार प्रा. डॉ. संध्या डांगे यांनी मानले. यावेळी विविध  शाखेतील युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 

Labels:

डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त मुरूम शहरात प्रथमच मॅरेथॉनचे आयोजन



मुरुम,  दि. २९  : 


मुरुमचे सुपुत्र तथा पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांच्या संकल्पनेतून शहरात प्रथमच मॅरेथॉनचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून   दि.१७ एप्रिल   रोजी करण्यात येणार आहे. इच्छूकांनी सदर स्पर्धेत  दि.५ एप्रिल  पर्यंत नाव नोंदणी करावी.


 सदर स्पर्धा ३ कि.मी. अ-गट (वय : १२-१५ वर्ष), ब- गट (वय :१६-४५ वर्ष) आणि महिला  तर ५ कि.मी. खुला गट असणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी किरण गायकवाड, सिद्धांत गायकवाड, प्रशांत मुरूमकर, देवराज संगुळगे, शरणप्पा वाडे, आनंद कांबळे, जिंदावली सन्नाटे, विकी चव्हाण, अतुल सावंत, आशुतोष गायकवाड आदींकडे संपर्क साधून नोंदणी करावी. या स्पर्धेत सहभाग होण्यासाठी नोंदणी शुल्क आकारले जाणार नाही. तरी शहर व परिसरातील जास्तीत-जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांनी केले आहे. विजेत्यांना मेडल, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. 
 सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे अधिकृत माहिती आयोजकांनी दिली आहे.

Labels:

Monday, 28 March 2022

अणदुर येथे पाणपोईचा शुभारंभ

अणदूर , दि .२७

ओमसाई क्लिनिक व बसवराज हॉटेल यांच्या वतीने कै. काशीनाथ  मुळे यांच्या स्मरणार्थ अणदुर  ता .तुळजापूर  येथिल  बसस्थानक याठिकाणी  नागरिकांसाठी थंड पाणी पिण्यासाठी  मिळावे याकरिता  पाणपोईचे शुभारंभ  पत्रकार अजय अणदूरकर यांच्या हस्ते  करण्यात आले.


ऐन मार्च मधेच उनाचा चटका मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे नागरिकांना जारचे थंडगार पाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉ शशिकांत तोडकरी व बसवराज मुळे यांचे यावेळी आभार मानण्यात आले, प्रवासी, नागरिक, शाळकरी मुले, महिला यांच्यासाठी ही पाणपोई अतिशय महत्त्वाची ठरणार आहे, 

यावेळी अणदूर सोसायटीचे चेअरमन आप्पू शेटे, प्रकाश गोवे, सुभाष कोळी, बसवराज पाटील, अशोक दाजी गळाकाटे,डॉ शशिकांत तोडकरी, सुभाष राठोड, गणेश राठोड, बसवराज मुळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Labels:

अविराज जगदाळे यांचा पिंपळेकरांकडून कौतुक सोहळा


काटी , दि .२७ : 

अविराज जगदाळे याचे जेजे हॉस्पिटल मुंबई येथे एम. बी. बी . एस . प्रवेशासाठी पात्र झाल्याच्या प्रित्यर्थ  सहशिक्षक विठ्ठल नरवडे व त्यांच्या  परिवाराकडून त्यांचा अभिनंदनपर स्वागत सोहळा संपन्न झाला. 


नीट परीक्षेत 637 मार्क मिळवून अविराजने देशातील नामांकित वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवला आहे .पहिल्याच प्रयत्नात त्याने हे यश मिळवले आहे .
     

 विकास जगदाळे यांचे सुपुत्र असलेले अविराज यांनी अथक परिश्रम व चिकाटी या जोरावर हे यश मिळवले . देशातील नामांकित वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून अविराजने इतर विद्यार्थ्यांसमोर ही एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. कोरोना प्रादुर्भाव असताना ही कठीण अशा काळात शाळा व महाविद्यालये बंद असतानाही ऑनलाइन शिक्षण व इतर पर्यायांच्या माध्यमातून नाउमेद न होता , जिद्द व चिकाटी याची सोबत असेल तर कठीण परिस्थितीमध्ये ही यश मिळवता येते हे त्याने दाखवून दिले आहे .त्याच्या या अनुपम यशाबद्दल पिंपळा बुद्रुक येथील नरवडे परिवाराकडून त्याचा अभिनंदनपर शुभेच्छा सोहळा पार पडला .यावेळी  विठ्ठल नरवडे यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त करून त्याच्या भावी वैद्यकीय जीवनास शुभेच्छा देऊन इतरांनीही परिस्थीती समोर न डगमगता अथक परिश्रमाच्या जोरावर जिद्द व चिकाटी ठेवून यश मिळवावे असे आवाहन केले .


तसेच शाळेबरोबरच पालकांचेही मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये किती महत्त्वाचे असते हे त्याचे वडील विकास व आई अर्चना जगदाळे यांनी दाखवून दिले आहे. इतर ही पालकांनी पूरक व प्रेरणादायी मार्गदर्शक अशीच पालकांनी भूमिका ठेवावी असे त्यांनी सांगितले .यावेळी श्रीम. ज्ञानेश्वरी शिंदे यांनी प्रेरणा व शुभेच्छामय काव्य प्रस्तुत करून सर्वांना प्रेरणा व शुभेच्छा दिली .यावेळी विकास जगदाळे , ज्ञानेश्वरी शिंदे - नरवडे , अर्चना जगदाळे ,विठ्ठल नरवडे , यशराज जगदाळे , वेदांत नरवडे , श्रीम. रतन जगदाळे यांची विशेष उपस्थिती होती .

Labels:

लोहारा शहरात मुस्लिम धर्मियाचा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न



मुरूम, ता. उमरगा, दि. २८ 


  लोहारा शहरात मुस्लिम समाजातील सामुदायिक विवाह सोहळा रविवारी  दि. २७ रोजी उत्साहात संपन्न झाला. शहरातील अस्लम सय्यद (शेख) यांनी सामाजिक भावना जपत स्वखर्चातून मुस्लिम समाजातील सामुदायिक  विवाह सोहळ्याचे आयोजन केले. 



या सामुदायिक विवाह सोहळा शहरातील सुरेश वाघ यांच्या शाळेच्या प्रांगणात  सायंकाळी मोठ्या थाटात संपन्न झाला. यावेळी ९ जोडप्यांचा विवाह संपन्न झाला. यावेळी वधु-वरांना आशिर्वाद देण्यासाठी कॉंग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील, कॉंग्रेस प्रदेश सरचिटणीस दिलीप भालेराव, किशोर साठे, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश चिटणीस मसुद शेख, कादर खान, असद पठाण, तौफिक शेख, इफतेकार पटेल, वकील शेख, अभिमान खराडे, उपनगराध्यक्ष आयुब हबीब शेख, शब्बीर गवंडी, रोहयोचे माजी चेअरमन आयुब अब्दुल शेख, नगरसेवक अविनाश माळी, अर्थ व बांधकाम समिती सभापती गौस मोमिन, नगरसेवक जालिंदर कोकणे,  अमिन सुंबेकर, युवासेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार, मेडीकल असोसिएशन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले, युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, पं.स.माजी सदस्य दिपक रोडगे, ओम कोरे, वामन भोरे, प्रा‌. डॉ. महेश मोटे, पत्रकार इकबाल मुल्ला, डॉ. सुभाष हुलपल्ले, बालाजी व्हनाजे,  गिरीश भगत, रफिक पटेल, मुन्ना जाधव, गौस शेख, रौफ बागवान, नगरसेवक आरिफ खानापुरे, प्रशांत काळे, दिपक मुळे, हरी लोखंडे, काँग्रेस शहराध्यक्ष आयनुददीन सवार, तंटामुक्ती अध्यक्ष फजल कादरी, लायक कादरी, तौफिक कमाल, अजिज सय्यद, अमिन कुरेशी, सलीम कुरेशी, साहेबलाल शेख, जाकिर कुरेशी, अश्फाक शेख, यासिन शेख, वजीर मनियार, संतोष फावडे, ओम पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. 



यावेळी संसार उपयोगी साहित्य देण्यात आले. या सामुदायिक विवाह सोहळ्यास परिसरातील विविध भागातून महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा सामुदायिक विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी शहरातील नागरिकांनी परिश्रम घेतले.

Labels:

सर्वांगीण विकासासाठी शिक्षण महत्त्वाचे डॉ. अभय शहापूरकर बारूळ येथील राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा समारोप


तुळजापूर, दि . २८ : 

समाजाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शिक्षण हाच प्रमुख मार्ग आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाला महत्त्व देऊन उच्च शिक्षण घेण्याचे आवाहन बालाघाट शिक्षण संस्थेचे संचालक डॉ.अभय शहापूरकर यांनी राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या समारोप प्रसंगी केले.



 यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे बारूळ ता .तुळजापूर  येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या समारोप प्रसंगी अध्यक्षीय समारोप करताना डॉ.अभय शहापूरकर यांनी उपस्थित ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी सौ. सई भोरे पाटील, संस्थेचे सदस्य व अणदूरचे सरपंच रामचंद्र आलुरे, प्राचार्य डॉ. अनिल शित्रे, उपप्राचार्य डॉ. नरसिंग जाधव, कनिष्ठ महाविद्यालय उपप्राचार्य प्रा रमेश नन्नवरे,
सिनेट सदस्य डॉ गोविंद काळे, सरपंच सौ शिंधुताई सुपणार,  शहाजी सुपणार,नबीचाचा शेख,बाबुराव ठोबरे ,सुभाष पाटील,राजकुमार वट्टे ,प्रभाकर धनकवडे, मलिकार्जुन ठोबरे,सौ सुमनताई ठोबरे ,भास्कर सगट, संजय ठोबरे,मुख्याध्यापक श्रीहरी लोखंडे,  मुख्याध्यापक मंगेश अंदूरकर , विठ्ठल धनकवडे, समन्वयक सौ. डॉ.शशिकला भालकरे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

यावेळी डॉ. अभय शहापूरकर यांनी समाज परिवर्तनामध्ये शिक्षण हेच प्रमुख शस्त्र आहे त्याचा वापर सर्वांनी केला पाहिजे असे सांगितले.

अणदूरचे सरपंच रामचंद्र आलूरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जिद्द आणि कष्ट याच्या जोरावर विद्यार्थ्यांनी अभ्यासामध्ये आघाडी घ्यावी असे सुचवले. विभागीय पोलीस अधिकारी सौ. सई भोरे पाटील यांनी आपण विद्यार्थ्यांना शैक्षणिक कारणासाठी मदत करण्यासाठी उत्सुक आहोत गरजूंनी संपर्क साधावा असे आवाहन केले याशिवाय घरगुती छोट्या छोट्या कामांमध्ये विद्यार्थ्यांनी मदत करावी त्यामुळे आत्मविश्वास वाढतो असे सांगितले. शिबिराच्या समन्वयक सौ.डॉ. शशिकला भालकरे यांनी अहवाल वाचन  व प्राचार्य डॉ. अनिल शित्रे यांनी प्रास्ताविक केले. बारूळ ग्रामपंचायतीच्या वतीने महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक आणि इतर सहकाऱ्यांचा शाल फेटा बांधून सत्कार करण्यात आला.

शिबिरार्थी विद्यार्थिनी कु श्रद्धा यादव बी कॉम द्वितीय वर्ग हीने अनुभव कथन केले. सूत्रसंचालक डॉ. शिवाजी जेटीथोर   व  आभार कार्यक्रम अधिकारी डॉ .बृहस्पती वाघमारे,यांनी मानले. कार्यक्रम अधिकारी अनिल पाटील डॉ अंबादास बिराजदार,डॉ श्रीरंग लोखंडे,डॉ विलास राठोड, डॉ.मंदार गायकवाड, श्री हनुमंत भुजबळ,जनार्धन सरडे,राजकुमार बनसोडे,शिबिरार्थी विद्यार्थी आणि ग्रामस्थ याप्रसंगी उपस्थित होते.

Labels:

Sunday, 27 March 2022

ग्राहकांच्या सेवेसाठी कटिबद्ध: कुरमुडाग्रामीण बँकेचे नव्या वास्तूत स्थलांतर




जळकोट, दि.२७ : मेघराज किलजे

महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेमधून ग्राहकांना उत्तम प्रकारे सेवा देऊन , ग्राहकांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी बँक सदैव कटीबद्ध राहील. असे आश्वासन महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक राजेंद्र कुरमुडा यांनी जळकोट येथे व्यक्त केले.


तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील शिवाजी चौकातील महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखेचे येथील मुंबई- हैदराबाद महामार्गावरील जिल्हा परिषद प्रशाला शाळेच्या बाजूला नवीन वास्तुत स्थलांतर झाले आहे . या नव्या वास्तूच्या उद्घाटनप्रसंगी राजेंद्र कुरमुडा हे बोलत होते. या नव्या वास्तूच्या इमारतीचे उद्घाटन कुरमुडा यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना पुढे म्हणाले की, जळकोट शाखा हि दहा शाखामधून एक नंबर ला आहे. येथील शाखेच्या उत्तम सुविधा देण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील राहू. महाराष्ट्र ग्रामीण बँक हि स्पर्धेत उतरली असून शेतीपूरक कर्ज व अन्य सुविधेचा लाभ ग्राहकानी घेऊन बँकेच्या विकासास हातभार लावावा. असे आवाहन  या प्रसंगी त्यांनी केले.



कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व दीप प्रज्वलन करून  उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, पंचायत समितीच्या सभापती सौ. रेणुका इंगोले, सरपंच अशोकराव पाटील, जळकोट शाखेचे व्यवस्थापक नामदेव पाटील, लातूर येथील गंजगोलाई शाखेचे शाखा व्यवस्थापक डॉ. दिलीप गाढे,भिवाजी इंगोले, ग्रामपंचायत सदस्य गजेंद्र कदम, ग्रामपंचायत सदस्य अंकुश लोखंडे, जळकोटवाडीचे सरपंच शिवाजी कदम, होर्टी सरपंच संजय गुंजोटे, लोहगावच्या सरपंच सौ.लोचना दबडे, प्रकाश चौगुले, नारायण पटणे, रमेश सोनटक्के, माजी शाखा व्यवस्थापक शिंदे , बँक अधिकारी सौरभ  माळ बोरगावकर, प्रवीण इंगवले आदि सह, खातेदार, ठेवीदार,महिला, शेतकरी , बँकेचे कर्मचारी, वक्रांगी केंद्राचे केंद्रचालक, ग्रामस्थ उपस्थित होते.

Labels:

कुटुंब व्यवस्थेमध्ये स्त्रीचे स्थान अनन्यसाधारण - इंदुमती भोरे

तुळजापूर दि. २७ :

भारतीय संस्कृती आणि कुटुंब व्यवस्थेमध्ये स्त्रीचे स्थान अनन्यसाधारण आहे , जिथे स्त्री शक्तीचा सन्मान होतो तिथे समृद्धी आणि सौख्य नांदते अशा शब्दात निवृत्त उपप्राचार्य इंदुमती भोरे यांनी बारूळ येथील महिला मेळाव्यात मार्गदर्शन केले.

 यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरामध्ये  २६ मार्च २२ दुपारी ४  वाजता महिला मेळावा संपन्न झाला. या वेळी प्रमुख वक्त्या म्हणून कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग येथील माजी उपप्राचार्य श्रीमती इंदुमती भोरे या उपस्थित होत्या ,कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ सुलभ कोरेकर या होत्या.  '"मुलगी जगवा मुलगी शिकवा' या वेळी बोलताना निवृत्त उपप्राचार्य भोरे  म्हणाल्या की मुलगी वंश वेल वाढवते,त्याबरोबर ती कुटुंब संस्था टिकवून ठेवते कुटुंब व्यवस्थेमध्ये स्त्रीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे महिला शक्तीचा समाजाने सदैव आदर करावा .

या कार्यक्रमात कु,श्रद्धा यादव,कु सोनाली,कु राजमाने,कु लोहार,कु शेळके,यांनी आपले मनोगत व्यक्त केले याप्रसंगी विद्यार्थिनींनी स्त्री पुरुष समानता आणि आणि स्त्रिया मधील गुणवत्ता याविषयी आपली मनोगते व्यक्त केली.

 कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कर्यक्रम अधिकारी डॉ शशिकला भालकरे,डॉ आशा बिडकर,प्रा उषा बदने,प्रयत्न केले सूत्र संचालन कु सोनाली राजमाने हिने केले. आभार डॉ सुलभा कोरेकर यांनी मानले.

Labels:

तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील तानाजी प्रभाकर येवते यांचे नेट परीक्षेत यश


चिवरी , दि . २७ : राजगुरू साखरे:


 यूजीसी कडून फेब्रुवारी २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या नेट या राष्ट्रीय पात्रता परीक्षा या देशपातळीवरील सहाय्यक प्राध्यापक परीक्षा मध्ये तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील शेतकरी कुटुंबातील तानाजी प्रभाकर येवते यांनी यश संपादन केले आहे.


 येवते यांनी देशातून लाइफ सायन्स  बॉटनी परीक्षेमध्ये  ८८ व्या क्रमांक पटकावला आहे. या यशाकरता त्यांना  भाऊराव चौसष्टे सरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सध्या ते संजीवनी कला वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय कोपरगाव येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. येवते यांनी प्राथमिक शिक्षण दत्तू पाटील अण्णा माध्यमिक विद्यालय चिवरी येथे केले, माध्यमिक शिक्षण नळदुर्ग   येथील कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात, तर पदव्युत्तर शिक्षण औरंगाबाद विद्यापीठांमध्ये केले.



 चिवरी येथील छोट्याशा गावातील शेतकरी कुटुंबातील  तानाजी येवते यांनी अतिशय खडतर परिस्थितीमधे  यश संपादन केल्याबद्दल त्यांचे ग्रामस्थांसह सर्व स्तरातून  कौतुक होत आहे.

Labels:

अबकी बार सिर्फ रोजगार हाच जाहीरनामा राबवण्याची गरज -ॲड रेवण भोसले


उस्मानाबाद दि. २७ :

 देशातील बेरोजगारी हा कधीही फुटू शकणारा टाईमबॉम्ब असून वेळीच त्याबाबत उपाययोजना न केल्यास देशातील कुटुंब व्यवस्था तसेच सामाजिक आणि आर्थिक जीवन  उध्वस्त होईल त्यामुळे आता अबकी बार सिर्फ रोजगार हेच धोरण राबवण्याची गरज असल्याचे स्पष्ट मत जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रवक्ते ॲड रेवण भोसले यांनी  व्यक्त केले आहे . 
     

 देशातील औद्योगिक व कामगार विषयक धोरणांमुळे सध्याची बेरोजगारी ही व्यक्तीच्या आयुष्यात  पुन्हा पुन्हा उद्भवणारी समस्या ठरू लागली आहे. आर्थिक अरिष्ट आले की कामगार कपात केली जाते आणि त्यामुळे नोकरदार व्यक्तीही पुन्हा बेरोजगार बनते. 


बेरोजगार तरुणाचा डोक्यात आत्मक्लेशाची वाळवी लागलेली असते. अशा तरुणांना नोकरी मिळवून देण्याचा प्रयत्न करतानाच त्याची उमेद खचणार नाही, तो निरुत्साही होणार नाही, त्याच्यात न्यूनगंडाची भावना तयार होणार नाही, यासाठी समाज म्हणून विशेष लक्ष देण्याची गरज आहे.  बेरोजगारीमुळे तरुणांची लग्न वेळेवर होत नाहीत, झाली तर ती टिकत नाहीत. पालकांच्या बेरोजगारीमुळे मुलांच्या आरोग्याचे शिक्षणाचे प्रश्न निर्माण होतात. यातून कुटुंब व्यवस्था आणि सामाजिक जीवन उद्ध्वस्त होण्याचा धोका आहे. 


भारताची लोकसंख्या प्रचंड असल्यामुळे बेरोजगारी आहे असे सांगितले जाते. परंतु परिस्थिती नेमकी उलटी आहे. चांगली नोकरी मिळाली की त्यातून आर्थिक संपन्नता येते, त्यामुळे कुटुंबाचा आकार कमी होत जातो. तर दारिद्र्यावस्थेत कुटुंबे मोठी असतात. त्यामुळे भारताच्या लोकसंख्यावाढीला बेरोजगारीतून येणारे दारिद्र्य कारणीभूत आहे. 
    

 तरुणांच्या हाताला काम देणे ही शासन यंत्रणा आणि समाज म्हणून देशाची जबाबदारी आहे. "नोकर्‍या मागणारे  नव्हे, नोकऱ्या देणारे बना" हे विधान ऐकायला चांगले असले तरी फसवे आहे. प्रत्येक व्यक्ती उद्योजक व व्यवसायिक बनू शकत नाही, असेच शास्त्रीय निष्कर्ष आहेत. देशात दरवर्षी हजारोंच्या संख्येने लोक मोठ्या उमेदीने व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न करतात. परंतु बरेच जण एक-दोन वर्षात व्यवसाय बंद पडून कर्जाच्या सापळ्यात अडकतात. त्यामुळे नोकरी देणारे बना. या वाक्याच्या सापळ्यात न अडकता हाताला काम देणे, ही शासनाची जबाबदारी आहे, हे तरुणांनी सरकारला ठणकावून सांगायला हवे.  किंबहुना २०२४ च्या लोकसभा तसेच राज्यांतर्गत निवडणुकांमध्ये "अबकी बार सिर्फ रोजगार" हाच जनतेचा जाहीरनामा असला पाहिजे आणि त्यावर सर्व राजकीय पक्षांना भूमिका घ्यायला भाग पाडले पाहिजे, असे ॲड भोसले यांनी म्हटले आहे .
 

देशात रोजगार निर्माण व्हायचा असेल तर तसे पोषक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केंद्र व राज्य सरकारांनी करायला हवा. आज रोजगार निर्मिती हा विकासामागील उद्देश राहिला नसून, केवळ राष्ट्रीय उत्पन्नात वाढ, हा उद्देश बनला आहे. त्यामुळे पुरेशा प्रमाणात रोजगार निर्माण होत नाही. नव्वदच्या दशकापर्यंत सार्वजनिक उद्योगात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली गेली. परिणामी मोठ्या संख्येने रोजगार तर निर्माण झालाच पण त्याची गुणवत्ताही चांगली होती. उच्चपदस्थ अधिकारी ते चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांपर्यंत नोकरीची हमी, चांगले वेतन, कामाचे निश्चित तास अशा सर्व गोष्टी ठरलेल्या असत!आता मात्र नोकरी मिळाली तरी, ती किती काळ राहील, रोज किती तास काम करावे लागेल याची कसलीच शाश्वती नाही. दुसरीकडे सरकार सार्वजनिक उद्योग विकायला निघाले आहे. त्यामुळे यापूर्वी निर्माण झालेल्या रोजगाराच्या संधीही हिरावल्या जाणार आहेत. त्यामुळे सरकारला आपल्या धोरणांमध्ये बदल करायला तरुणांनी भाग पडले पाहिजे.


रस्ते, रेल्वे, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, शिक्षण, आरोग्य पर्यावरण रक्षण, याच्याशी निगडित "ग्रीन टेक्नॉलॉजी"मध्ये भविष्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करावी लागणार आहे. यातील नफ्याचे प्रमाण कमी असणार आहे. त्यामुळे सरकारनेच या क्षेत्रात गुंतवणूक करून रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात, त्याचबरोबर शेतीतील गुंतवणूक वाढवावी.


बेरोजगारीच्या  समस्या अतिशय गंभीर बनली असून त्यावर वेळीच उपाययोजना न केल्यास महाराष्ट्रातील तरुण सरकारच्याविरुद्ध पेटून उठल्याशिवाय राहणार नाही असे स्पष्ट मतही भोसले यांनी व्यक्त केले.

Labels:

साहेब चषक’ क्रिकेट स्पर्धेत येरमाळा इलेव्हन संघ विजेता



उस्मानाबाद  , दि .२७


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित क्रिकेट स्पर्धेत येरमाळा इलेव्हन संघाने अंतिम सामन्यात सागर इलेव्हन संघावर मात करुन ‘साहेब चषक’ पटकावला. तर सागर इलेव्हन संघ उपविजेता ठरला. शनिवारी (दि.26) सायंकाळी मान्यवरांच्या हस्ते चषक व बक्षीस रक्कम देऊन विजेत्या संघाला सन्मानित करण्यात आले.


उस्मानाबाद येथील तुळजाभवानी जिल्हा स्टेडियमवर दि. 23 मार्चपासून सुरू असलेल्या क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटप्रेमींचा मोठा प्रतिसाद मिळाला. बाद पद्धतीने खेळविल्या गेलेल्या या स्पर्धेसाठी संघासह खेळाडूंना मोठ्या रकमेची वैयक्तिक पारितोषिके ठेवण्यात आली होती. स्पर्धेत येरमाळा इलेव्हन आणि सागर इलेव्हन या संघामध्ये चुरशीचा  सामना रंगला. यात येरमाळा इलेव्हन संघाने बाजी मारुन साहेब चषक पटकावला. अंतिम सामन्यानंतर शनिवारी सायंकाळी विजेत्या संघासह उपविजेते संघ व खेळाडूंना वैयक्तिक पारितोषिकांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. 


 विजेत्या येरमाळा संघाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय निंबाळकर यांच्या वतीने 51 हजार रुपये व चषक, उपविजेत्या सागर इलेव्हन संघाला डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या वतीने 31 हजार रुपये व चषक, तृतीय पारितोषिक माजी नगराध्यक्ष अमित शिंदे यांच्या वतीने 21 हजार रुपये व चषक बाबा इलेव्हन संघ, तर चौथे पारितोषिक राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक नेते मृत्यूंजय माणिक बनसोडे यांच्या वतीने 11 हजार रुपये व चषक शबनम इलेव्हन संघाला देण्यात आले. तसेच माजी नगरसेवक बाबा मुजावर यांच्या वतीने मॅन ऑफ द सीरिज 5 हजार रुपयाचे बक्षीस सागर इलेव्हन संघाचा ऋषीकेश आदटराव यास देण्यात आले. अनिकेत पाटील यांच्या वतीने मॅन ऑफ मॅच फायनल 2 हजार रुपयाचे बक्षीस ओंकार काळे, माजी नगरसेवक बाबा इस्माईल यांच्या वतीने बेस्ट बॅट्समन ऑफ द सिरीज 2 हजार रुपये सचिन काळे, तर जयंत देशमुख यांच्या वतीने बेस्ट बॉलर ऑफ द सिरीज 2 हजार रुपयाचे बक्षीस सोमनाथ बारकुल याने पटकावले.



यावेळी राष्ट्रवादीचे नेते डॉ.प्रतापसिंह पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष असद पठाण, कादर खान, माजी नगरसेवक प्रदीप घोणे, बाबा मुजावर, बाबा इस्माईल, मृत्यूंजय बनसोडे, शहराध्यक्ष आयाज शेख, अनिकेत पाटील, राजकुमार पवार, युवक नेते रणवीर इंगळे, शेखर घोडके, बिलाल तांबोळी, विधिज्ञ विभागाचे शहराध्यक्ष अ‍ॅड. योगेश सोन्ने-पाटील, मिनिल काकडे,  नवनाथ डांगे, प्रशिक्षक सूर्यवंशी, सईद काझी, ए.बी. 17 क्रिकेट क्लबचे अध्यक्ष अक्षय बावस्कर यांच्यासह खेळाडू, क्रीडाप्रेमी नागरिक उपस्थित होते. 

Labels:

Friday, 25 March 2022

आम आदमी पार्टीच्या तुळजापूर तालुका अध्यक्षपदी मधुकर शेळके तर शहर अध्यक्षपदी प्रंशात इंगळे यांची निवड

तुळजापूर , दि . २५ : 

आम आदमी पार्टीच्या तुळजापूर  तालुका अध्यक्षपदी  मधुकर शेळके यांची तर तुळजापुर शहर अध्यक्षपदी  प्रंशात इंगळे यांची निवड करण्यात आली आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वञ  आभिनंदन केले जात आहे.

आम आदमी पार्टी उस्मानाबाद जिल्हा कमिटीच्या वतीने आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल  यांचे विचार  आणि सर्व सामान्य लोकांचे  प्रशन सोडवण्यासाठी व पक्षाची विचार धारा तळगाळा पर्यत पोहोचवण्यासाठी तुळजापुर तालुका अध्यक्षपदी   मधुकर शेळके यांची तर तुळजापुर शहर अध्यक्षपदी  प्रंशात इंगळे यांची निवड करण्यात आली.

 यावेळी जिल्हा अध्यक्ष  अजित खोत, जिल्हा सचिव मुन्ना शेख यांनी त्यांना  नियुक्ती  पत्र  देवुन शुभेच्छा  दिले आहे. 

Labels:

अणदुर येथिल पञकार चंद्रकांत गुड्ड याना मातृशोक


नळदुर्ग , दि .२५ : 

 तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील जेष्ठ नागरिक रत्नाबाई शंकर गुड्ड वय (९०) यांचे दि . २५ मार्च रोजी सकाळी आठ वाजता अल्पशा आजाराने  निधन झाले. अणदूर येथील दै सकाळचे पत्रकार चंद्रकांत गुड्ड यांच्या त्या मातोश्री होत.


तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी गावच्या  शिवारात त्यांच्या शेतात त्यांच्या पार्थिवावर दुपारी  अंतीम संस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात चार मुले, दोन मुली,सुना, नातवंडे असा परिवार आहे.

त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच पञकार बांधवासह विविध मान्यवरानी श्रध्दाजली आर्पित केली.

Labels:

सहकार सेनेच्या बीड जिल्हासंघटकपदी पंकज कुटे यांची निवड


बीड , दि . २५ : 

मुबंई शिवसेना भवन येथे सहकार सेनेच्या राज्य अध्यक्षा शिल्पा सरपोतदार  यांनी पंकज कुटे यांना बीड जिल्हा सहकार सेनेचे जिल्हासंघटक पदाचे नियुक्तीपत्र  दिले.


सहकार सेना शिवसेनेची अंगीकृत संघटना असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  यांनी शिवसेना पक्ष सहकार क्षेत्रात वाढविण्यासाठी दिलेल्या आदेशानुसार शिवसेना  मराठवाडा संपर्क प्रमुख चंद्रकांत खैरे ,  मराठवाडा विभागीय समन्वयक  विश्वनाथज नेरूरकर  यांच्या आदेशानुसार शिव सहकार सेनेच्या अध्यक्षा  शिल्पा सरपोतदार, उपाध्यक्ष प्रदिपकुमार खोपडे, सरचिटणीस विशाल तांबे, शिवसेनेचे संपर्कप्रमुख आनंद जाधव, जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी बीड जिल्हा सहकार सेनेच्या जिल्हा संघटकपदी पंकज कुटे यांची निवड केली. 
      
 
यावेळी शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख उल्हास गिराम, सरपंच प्रदिप कोटुळे, चंदुनाना कागदे, शुभम घोडके यांची उपस्थिती होती.

Labels:

तुळजापूर : माळुंब्रा येथे 'शाळापूर्व तयारी अभियान' केंद्रस्तरीय प्रशिक्षण संपन्न

                          
तुळजापूर ,दि . २५ : 

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, महाराष्ट्र शासन यांचेमार्फत जून 2022 मध्ये इयत्ता पहिलीला दाखल पात्र बालकांसाठी 'स्टार्स' प्रकल्पांतर्गत 'शाळा पूर्वतयारी अभियान' या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

 या उपक्रमांमध्ये 'प्रथम' या स्वयंसेवी संस्थेचा सहभाग आहे.त्या अनुषंगाने सूरतगाव केंद्रातील सर्व जि.प.शाळांतील इ.1ली ते 5 वी.ला अध्यापन करणारे शिक्षक, मुख्याध्यापक व अंगणवाडी ताई असे  एकूण 82 प्रशिक्षणार्थ्यांसाठी  प्रशिक्षणाचे आयोजन जि.प.प्रशाला माळुंब्रा येथे गटशिक्षणाधिकारी  अर्जुन जाधव यांच्या नियंत्रणाखाली व केंद्रप्रमुख  राजेश धोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली दि . 25 मार्च रोजी करण्यात आले. 


नवीन शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या मुलांची शाळा पूर्वतयारी होण्याच्या दृष्टीने हे प्रशिक्षण घेण्यात आले. या उपक्रमांतर्गत मुले व पालक यांचे मार्चअखेर एक व जूनच्या प्रारंभी एक असे दोन मेळावे शाळा स्तरावर घेण्यात येणार आहेत. पहिल्या मेळाव्यात मुले पहिलीत दाखल होण्यापूर्वी त्यांच्यामध्ये मूलभूत क्षमता किती विकसित आहेत यांची नोंद कृतीच्या माध्यमातून घेतली जाणार आहे. ज्या मुलांना मूलभूत क्षमता आवश्यक असलेल्या कृती करताना मदतीची गरज लागते. त्या मुलांच्या पालकांना शिक्षक व अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून समुपदेशन करण्यात येणार आहे. दुसऱ्या मेळाव्या पर्यंतच्या कालावधीत पालकांच्या भेटी घेऊन समुपदेशन करण्यात येणार आहे.                                     


मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रकल्पात शाळा बंद असल्याने विद्यार्थी शिक्षणापासून दूर झाले. पूर्व प्राथमिक शिक्षण देणारी अंगणवाडी केंद्रे देखील बंद आहेत. यामुळे या वर्षी शाळेत दाखल होणारी बालके व इयत्ता पहिलीत दाखल असलेली बालके यांचे पूर्व प्राथमिक शिक्षण काहीही झालेले नाही.त्यामुळे त्यांचे प्राथमिक शिक्षण सुरू होण्यापूर्वी  शिक्षणाची आनंददायी पद्धतीने पूर्वतयारी करून घेण्यासाठी या अभियानाची मदत होणार आहे.  शाळा पूर्व तयारी मेळावे कशा पद्धतीने घ्यावेत याबाबतची रंगीत तालीम पूर्व प्राथमिक बालकांच्या मदतीने मेळावाआयोजित करून घेण्यात आली.या मेळाव्यास  गुणवंत चव्हाण व शांताराम कुंभार यांनी सुलभक म्हणून काम पाहिले.

Labels:

तुळजाभवानी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनाचे विशेष श्रम संस्कार शिबिरास सुरुवात



तुळजापूर, दि.२५ 


 येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालयाचे तिर्थ खुर्द ता. तुळजापूर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग व  डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष श्रम संस्कार शिबिराचे उद्घाटन संपन्न झाले.
दि.२५ मार्च ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत शिबिरामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत.


 यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एम मणेर यांनी स्वयंसेवकांना आणि गावकऱ्यांना उद्देशुन राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व आणि राष्ट्रीय विकासात रासेयोची भूमिका स्पष्ट केली. त्याचबरोबर डॉ बालाजी गुंड यांनी ही उपस्थितांना मार्गदर्शन केले.सदर प्रसंगी कार्यक्रमाधिकारी प्रा.व्ही.एच.चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले, यावेळी कनिष्ठ विभागाचे रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा.वागदकर एस.पी,प्रा.वसावे एम.जी, तसेच डॉ.सी आर दापके, डॉ.एम.आर आडे,प्रा.बी.जे कुकडे, डॉ.ए.बी.गायकवाड,प्रा.के.एस.कदम,प्रा.एस.एम.कदम, डॉ.एफ.एम.तांबोळी,तर तिर्थ खुर्द येथील उपसरपंच रामदास पवार, महेश मोरे,मयुर जाधव, काशिनाथ दांगट, हनुमंत जाधव, बालाजी जमदाडे यांचे उत्तम सहकार्य लाभले. आभार प्रा.एस.सी.सुरवसे यांनी  मानले, 

. 

Labels:

उस्मानाबादेत शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान



पक्ष संघटन मजबूत करण्यासह महाविकास आघाडी सरकारच्या योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे आवाहन


उस्मानाबाद , दि . २५ : 


आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान गतिमान झालेले आहे.  अभियानाअंतर्गत उस्मानाबाद शहरातील विविध प्रभागांमध्ये 13 ठिकाणी गुरुवारी (दि. )  शिवसैनिक आणि नागरिकांशी संपर्क साधून संवाद साधण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या वतीने घेण्यात आलेले जनहिताचे निर्णय आणि योजनांचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्याबरोबर पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याचे आवाहन अभियानात शिवसंपर्क अभियानाचे प्रमुख मार्गदर्शक प्रदिप निकम, शामराव पाचंगे यांनी केले.


उस्मानाबाद शहरातील प्रभाग एक मधील दत्त नगर, प्रभाग सातमधील तांबरी विभाग, प्रभाग आठमधील तांबरी विभाग, प्रभाग 16 मधील गणेश नगर, प्रभाग 17 मधील ख्वाजा नगर, प्रभाग नऊ मधील समता नगर,  प्रभाग  12 मधील निंबाळकर गल्ली,  प्रभाग दोनमधील विकास नगर, प्रभाग तीन बँक कॉलनी,  प्रभाग 19 शिवरत्न चौक, प्रभाग 13 भिम नगर या ठिकाणी शिवसंपर्क अभियानांतर्गत बैठक घेण्यात आली. अभियानादरम्यान शहरातील माजी नगराध्यक्ष दत्तात्रय बंडगर यांचे संपर्क कार्यालय तसेच माजी शहरप्रमुख प्रवीण कोकाटे यांच्या कार्यालयास भेटी देऊन मान्यवरांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.


या सर्व बैठकांना नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, युवासेना जिल्हाप्रमुख अक्षय ढोबळे, शहरप्रमुख संजय मुंडे, गटनेते सोमनाथ गुरव, नगरसेवक राजाभाऊ पवार, नगरसेवक सुरज साळुंके, नगरसेवक राणा बनसोडे, नगरसेवक सिद्धेश्वर कोळी, रवींद्र वाघमारे, तुषार निंबाळकर, बाळासाहेब काकडे, प्रवीण कोकाटे, रोहित निंबाळकर, दत्ता बंडगर, दीपक जाधव, पंकज पाटील, सह्याद्री राजेनिंबाळकर, अफरोज फिरजादे, मुजीब काझी, साबेर सय्यद, अजय नाईकवाडी, विनोद केजकर, रवी कोरे आळणीकर, अभीराज कदम, गणेश राजेनिंबाळकर, बंडु आदरकर, संकेत सुर्यवंशी, प्रविण केजकर, अजय धोंगडे, शिवयोगी चपणे, शिवप्रताप कोळी, राम साळुंके, संदीप बनसोडे, निलेश साळुंके, दिनेश बंडगर, सत्यजित पडवळ, सॅडी गायकवाड, राम बनसोडे आदींसह शेकडो शिवसैनिक, महिला भगिनी व पदाधिकारी उपस्थित होते.

Labels:

महाराष्ट्र व गोवा राज्य बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी निवडीबद्दल अ‍ॅड.वसंतराव साळुंके यांचा सत्कार

महाराष्ट्र व गोवा राज्य बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी निवडीबद्दल अ‍ॅड.वसंतराव साळुंके यांचा सत्कार



उस्मानाबाद , दि. २५ : 


मराठवाड्याचे सुपुत्र अ‍ॅड.वसंतराव साळुंके यांची महाराष्ट्र व गोवा राज्य बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.


 उस्मानाबादकरांसाठी ही बहुमानाची बाब असल्याने विधिज्ञ क्षेत्रासह सर्वच स्तरातून अ‍ॅड. साळुंके यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

उस्मानाबाद येथे अ‍ॅड. वसंतराव साळुंके आले असता महाराष्ट्र व गोवा राज्य बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शिवसेनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. माजी शहरप्रमुख प्रवीण कोकाटे यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन अ‍ॅड. साळुंके यांचा सत्कार करुन सदिच्छा दिल्या. 

यावेळी अ‍ॅड.चित्राव गोरे, शिक्षक भालचंद्र कोकाटे यांच्यासह शिवसेनेचे शहरातील आजी-माजी पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.

Labels:

राष्ट्रीय सेवा योजनेच्या बारूळ शिबिरात ग्रामविकास चळवळीवर समाजसेवक गणेश चादरे यांचे व्याख्यान


तुळजापूर, दि. २४ 

ग्रामीण भागाच्या विकासामध्ये लोकसहभाग असणे अत्यंत गरजेचे आहे. ज्या गावांमध्ये लोकांचा विकासामध्ये सहभाग असतो, अशी गावे निश्चित प्रगतिपथावर असतात, असे प्रतिपादन समाजसेवक गणेश चादरे यांनी राष्ट्रीय सेवा योजना शिबिरामध्ये बारूळ ता.तुळजापूर येथे केले.


यशवंतराव चव्हाण महाविद्यालय तुळजापूर यांच्याकडून मौजे बारूळ येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिरामध्ये ग्रामीण विकास आणि युवकांची जबाबदारी याविषयावर समाजसेवक गणेश चादरे यांचे व्याख्यान संपन्न झाले. बारूळ ग्रामस्थ,  विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी ज्येष्ठ बाबुराव वट्टे, सोसायटीचे चेअरमन ठोंबरे, सामाजिक कार्यकर्ते नबीलाल शेख, माजी सरपंच शहाजी सुपनार, यांची प्रमुख उपस्थिती होती.  कार्यक्रमाधिकारी डॉ.बृहस्पति वाघमारे डॉ.अनिल पाटील, यांची याप्रसंगी उपस्थिती होती.

याप्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ग्रामीण भागाचा विकासामध्ये वेगवेगळ्या योजनांचा सहभाग वाढविण्याच्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्था आणि गावातील युवकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. सहविचाराने आणि लोकसहभागाने गावाचा कायापालट होऊ शकतो असा विश्वास याप्रसंगी आपल्या व्याख्यानांमध्ये  गणेश चादरे यांनी व्यक्त केला. 

महाविद्यालयाचे डॉ.अंबादास बिराजदार, डॉ.श्रीरंग लोखंडे, डॉ.विलास राठोड, डॉ.मंदार गायकवाड, हनुमंत भुजबळ, जनार्दन सरडे, राजकुमार बनसोडे  यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहभाग घेतला.

Labels:

शिव--बसव--राणा सार्वजनिक जन्मोत्सव समितीच्या वतीने ज्रायस्तरीय नृत्य स्पर्धेस उत्स्फुर्त प्रतिसाद

नळदुर्ग , दि . २५ : विलास येडगे

नळदुर्ग येथे शिव--बसव--राणा सार्वजनिक जन्मोत्सव समितीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेस स्पर्धकांचा व नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. 


या स्पर्धेत उस्मानाबाद,  बीड, लातुर, सोलापुर, पुणे या  जिल्ह्यांतील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे उद्घाटन  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य अशोक जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आले.
      


 दि.२३ मार्च रोजी शिव--बसव--राणा सार्वजनिक जन्मोत्सव समितीच्या वतीने नळदुर्ग येथील भवानी चौकात राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा लावणी गट, वैयक्तीक गट व युगल नृत्य या तीन प्रकारात घेण्यात आली.या स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य अशोक जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन नगरसेवक शहेबाज काझी,नितीन कासार, बसवराज धरणे,  कमलाकर चव्हाण,माजी नगरसेवक सुधीर हजारे, शरद बागल आदीजण उपस्थित होते. प्रारंभी सर्व मान्यवरांचा शिव--बसव--राणा सार्वजनिक जन्मोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला.
      

यावेळी  अशोक जगदाळे , नगरसेवक शहेबाज काझी व कमलाकर चव्हाण यांचेही भाषणे झाली. या नृत्य स्पर्धेचे सुत्रसंचलन प्रा. संतोष पवार यांनी  बहारदार आवाजात केले. या स्पर्धेतील लावणी गटात प्रथम क्रमांक म्हसवड--सातारा येथील सानिका भागवत हिने तर द्वितीय क्रमांक पुणे येथील शिफा पुणेकर, तर तृतीय क्रमांक उमरगा येथील अंकिता माने हिने पटकाविले. तर उत्तेजनार्थ पारितोषिक बीड येथील अनामिका अहिरे हिने पटकाविला.
    

 वैयक्तीक गट या प्रकारात प्रथम क्रमांक लातुर येथील दिनेश जाधव याने पटकाविला तर द्वितीय क्रमांक वैष्णवी भट तुळजापुर हिने तर तृतीय क्रमांक इब्राहिम शेख लातुर यांनी पटकावला. या प्रकारात उत्तेजनार्थ पारितोषिक शुभम बोराडे यांनी मिळविले.
       

युगल नृत्य प्रकारात प्रथम क्रमांक गणेश देशमुख/इब्राहिम शेख लातुर या जोडीने पटकावला तर द्वितीय क्रमांक स्वप्नील कांबळे/दिनेश जाधव लातुर या जोडीने तर तृतीय क्रमांक गणेश पवार/इब्राहिम शेख या जोडीने पटकाविला.  युगल नृत्य स्पर्धेत लातुरच्या स्पर्धकांचाच बोलबाला राहिला.स्पर्धेतील सर्व विजेत्या स्पर्धकांना रोख रकमेसह सन्मान चिन्ह देऊन शिव--बसव--राणा सार्वजनिक जन्मोत्सव समितीच्या वतीने गौरविण्यात आले.ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष दर्शन शेटगार, उपाध्यक्ष आकाश धरणे, राहुल जाधव, कोषाध्यक्ष नवल जाधव यांच्यासह इतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले.

Labels:

तुळजापूर तालुक्यातील येडोळा येथिल प्राथमिक शाळेत स्वंयशासनदिन साजरा


नळदुर्ग , दि . २५


तुळजापूर तालुक्यातील येडोळा (लमाण तांडा) येथिल  जिल्हा  परिषद प्राथमिक शाळेतील  विद्यार्थ्यांनी  स्वयंशासन दिन उत्साहात साजरा केला. 

यावेळी  इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना  निरोप देण्यात  आला.   स्वयंशासन दिनानिमित्त मुख्याधिपिका रेखा दुधाजी जाधव हिने शालेय कामकाजावर सुरेख आशा पद्धतीने नियंत्रण ठेऊन कामकाज पाहिले. तसेच 4थी मधील विद्यार्थ्यांनी   गुरुजी म्हणून कामकाज पाहिले. याप्रसंगी  विद्यार्थ्यांनी  मनोगत व्यक्त करताना इयत्ता  दुसरी मधील रोहित सुनील पवार या विद्यार्थ्यांने उत्तम सादरीकरणातून मनोगत व्यक्त केले. या शाळेत शेख इमामोद्दीन मैनुद्दीन प्रभारी मुख्याध्यापक म्हणून तर पवार साहेब शिवाजी सहशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

Labels:

Thursday, 24 March 2022

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या शिबिरात कृषी विषयक मार्गदर्शन

तुळजापूर दि २४ 

यशवंतराव चव्हाण महाविद्यालय तुळजापूर यांच्याकडून मौजे बारूळ येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिरामध्ये कृषिपूरक शासकीय योजनांची माहिती या विषयावर कृषी अधिकारी संजय जाधव यांचे व्याख्यान संपन्न झाले याला विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी ज्येष्ठ बाबुराव वट्टे, सोसायटीचे चेअरमन ठोंबरे, सामाजिक कार्यकर्ते कमलाकर ठोंबरे, एस एस जगदाळे, राहुल मते,  कार्यक्रमाधिकारी डॉ.बृहस्पति वाघमारे डॉ.अनिल पाटील, यांची याप्रसंगी उपस्थिती होती.

याप्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कृषी अधिकारी संजय जाधव यांनी शासनाच्या योजना व त्यासाठी ऑनलाइन कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले .महाविद्यालयाचे डॉ.अंबादास बिराजदार, डॉ.श्रीरंग लोखंडे, डॉ.विलास राठोड, डॉ.मंदार गायकवाड, हनुमंत भुजबळ, जनार्दन सरडे, राजकुमार बनसोडे  यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहभाग घेतला.

Labels:

जिल्ह्यात आणखी 7 टीबी डायग्नोस्टिक सेंटर उभारण्यात येणार- राहुल गुप्ता; जागतिक क्षयरोग दिनानिमित्त रॅलीचे यशस्वी आयोजन


 

उस्मानाबाद,दि.२४ : 


दि . 24 मार्च जागतिक क्षयरोग दिनानिमित्त शास्त्रज्ञ डॉ.रॉबर्ट कॉक यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा शल्यचिकित्सक डी. के. पाटील, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवकुमार हलकुडे, निवासी वैद्यकीय अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी, डॉ.सचिन देशमुख, डॉ. पांचाळ, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ रफ़िक अन्सारी, अधिसेविका जयश्री जाधव, उपप्राचर्य सुनिता पोखरकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. होळे, डॉ. बेटकर जिल्हा क्षयरोग कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी तसेच नर्सिंग कॉलेजमधील विद्यार्थी आदी उपस्थित होते.



 उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीची सुरुवात करण्यात आली. जिल्हा रुग्णालय येथून ताजमहाल टॉकीज, शिवाजी चौक मार्गे आंबेडकर चौक आणि शहर पोलीस स्टेशन मार्गे परत जिल्हा रुग्णालयापर्यंत रॅलीचा मार्ग होता. त्यानंतर सर्व उपस्थितांना क्षयरोग विषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले.



जागतिक क्षयरोग दिनानिमित्त रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली. श्री.गुप्ता यांच्या हस्ते रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस आणि प्रमाणपत्र वितरण करण्यात आले . 2022 च्या जागतिक क्षयरोग दिन यावर्षीचे घोषवाक्य “टीबी संपविण्यासाठी गुंतवणूक करा व जीव वाचवा” असे आहे.



जिल्ह्यातील संशयित क्षयरोग रुग्णांची लवकर थुंकी तपासणीद्वारे निदान होण्यासाठी सद्यस्थितीतील कार्यान्वित 19 टीबी डायग्नोस्टिक सेंटर मध्ये आणखी 7  सेंटर ची भर घालण्यात येणार आणि सर्व उपजिल्हा रुग्णालय येथे CBNAAT मशीन पुरवण्यात येणार आहेत, त्यासाठी आवश्यक साहित्य आणि मनुष्यबळाचे नियोजन जिल्हा स्तरावरून करण्यात येईल असेही   गुप्ता यांनी सांगितले.

डॉ.डी.के पाटील म्हणाले, आपला जिल्हा निती आयोगामध्ये असल्याने जिल्हा क्षयरोग मुक्त करण्यासाठी जिल्हा रुग्णालयातर्फे पूर्णपणे सहकार्य केले जाईल. डॉ. हलकुडे  म्हणाले की,टीबी मुक्त भारत अभियान राबविण्यासाठी एक लाख लोकसंख्येमध्ये 3400 संशयीत क्षयरुग्ण शोधण्याकरिता आरोग्य संस्थेला आवाहन केले आहे. याकरिता आरोग्य संस्थेतील प्रत्येक घटकाचा वाटा मोलाचा राहील असेही त्यांनी यावेळी सांगितले.



जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.रफिक अन्सारी म्हणाले की, समाजातील सर्व संशयित क्षयरुग्ण शोधून निदान झालेल्या क्षय रुग्णास औषध उपचारावर आणण्यात येईल आणि राज्यस्तरावर प्राप्त झालेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तसेच उस्मानाबाद जिल्हा टीबी मुक्त करण्यासाठी प्रयत्न करू असेही ते म्हणाले.

Labels:

तुळजापूर : राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात आरोग्यविषयक व्याख्यान


तुळजापूर, दि . २४ : 

येथिल यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांच्या वतीने  बारूळ  ता . तुळजापूर येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिरामध्ये उत्तम आरोग्य आणि आहार या विषयावर वैद्यकीय तज्ञ डॉ.एम.ई. सय्यद यांचे व्याख्यान संपन्न झाले. 


याप्रसंगी ज्येष्ठ मार्गदर्शक शिवाजी सुपनार, सोसायटीचे चेअरमन ठोंबरे, सामाजिक कार्यकर्ते नबी शेख,  कार्यक्रमाधिकारी डॉ.बृहस्पति वाघमारे , डॉ.अनिल पाटील, डॉ.अंबादास बिराजदार, डॉ.श्रीरंग लोखंडे, डॉ.विलास राठोड, डॉ.मंदार गायकवाड, हनुमंत भुजबळ, जनार्दन सरडे, राजकुमार बनसोडे  यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहभाग घेतला. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने यावेळी व्याख्यानामध्ये डॉक्टर सय्यद यांनी महत्त्वाचे मार्गदर्शन केले

Labels:

यश मिळवण्यासाठी त्याग महत्वाचा : ज्येष्ठ विचारवंत पन्नालाल सुराणा


नळदुर्ग ,दि .२४ :

शालेय जीवनामध्ये समाज व शिक्षकांकडून मिळणारे संस्कार आपल्याला दिलेली ज्ञानाची शिदोरी हीच आपल्यामध्ये जगण्याचे सामर्थ्य निर्माण करणारी असते, यश मिळवण्यासाठी त्याग महत्वाचा आहे.जर तुम्ही त्यागासाठी तयार आहात तर यश तुमचेच आहे. असे प्रतिपादन जेष्ठ विचारवंत पन्नालाल सुराणा यानी केले 


नळदुर्ग येथिल  राष्ट्र सेवा दल संचलित आपलं घर प्रकल्पातील  धरित्री विद्यालयात गुणवंताचा गौरव करण्यात आला.
यावेळी पुढे  बोलताना  पन्नालाल सुराणा म्हणाले की ,  विद्यार्थ्यांच्या  मनात ही भीती असते, शंका,काळजी असते . पण तरी ही त्यांची यश मिळवण्याची इच्छा त्यांना स्वस्थ बसु देत नाही ,त्याकरिता उंच भरारी घेणे आवश्यक आहे असे  ज्येष्ठ विचारवंत भाई पन्नालाला सुराणा यांनी नळदुर्ग  येथे आयोजित गुणवंताचा सत्कार  प्रसंगी अध्यक्षीय स्थानावरुन बोलताना केले.



 प्रारंभी कार्यक्रमाची सुरवात 'इतिहासाचे रंग रुप हे आले नगरा ' या स्वागत गीताने करुन   मान्यवरांच्या हस्ते साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन  करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका श्रीमती संगिता शहा यानी केले.धरित्री विद्यालय  व आपले घर मधील माजी विद्यार्थीनी   माधुरी मिसाळ श्रीमंत पोलीस उपनिरीक्षकपदी व माजी विद्यार्थी  कुमार राम दळवे एम.फील.,सेटनेट परीक्षेत उज्वल यश संपादन   केल्यामुळे तसेच ज्येष्ठ शिक्षक सुनील पुजारी अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला प्रमुख कार्यवाहपदी निवड झाल्यामुळे आदींचा  सत्कार  करण्यात आला. 


यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ विचावंत पन्नालाल  सुराणा  तर प्रमुख  उपस्थिती अॕड सयाजी शिंदे सचिव ,वसंतराव रामदासी सहसचिव ,मधुकर इंगळे ,श्रीमंत मिसाळ ,आपलं घर प्रकल्पाचे सचिव गुंडू पवार ,विलास वकील व्यवस्थापक ,अनिल धामशेट्टी मुख्याध्यापक ,संगिता शहा मुख्याध्यापिका ,सुनील पुजारी उपस्थित होते.


 अॕड सयाजी शिंदे यांनी एक कथा सांगुन विद्यार्थ्यांची  मने जिंकले.कोकणे माणिक यांनी माधुरी मिसाळ ,राम दळवी यांच्या जीवनावर एक कविता सादर केली. यावेळी माजी विद्यार्थी  व विघार्थीनी आपल्या मनोगतातून शाळेबद्दलची कृतज्ञता ,गुरुजीचे  ऋण व्यक्त करत शाळेने आम्हाला भरभरुन दिले आहे.त्यामुळे आम्ही एवढे मोठे यश संपादन करु शकलो असा विश्वास व्यक्त केला.


या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कारंजे एस.पी.यांनी तर आभार जगताप जी.एम. यांनी मांनले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले व कार्यक्रमास विद्यार्थी  ,पालक  उपस्थित होते .कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

Labels:

सेंद्रीय शेतीची चळवळ वाढविण्यासाठी ‘मोर्फा’चा पुढाकार ; उस्मानाबाद जिल्ह्यात गावागावात जनजागृती करणार - जिल्हाध्यक्षा सुरेखा जाधव



उस्मानाबाद , दि . २४ :


महाराष्ट्रात विषमुक्त, सेंद्रीय शेतीची चळवळ गावागावात पोहचविण्यासाठी महा ऑरगॅनिक रेथ्यूड्यू फ्री फार्मर्स असोसिएशन (मोर्फा)ने पुढाकार घेतला असून जास्तीत जास्त शेतकर्‍यांना यात सहभागी करुन घेण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यात जनजागृती करणार असल्याची माहिती मोर्फाच्या जिल्हाध्यक्षा सौ.सुरेखा जाधव यांनी दिली.



बारामती तालुक्यातील कन्हेरी-काटेवाडी येथे माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील मोर्फाचे जिल्हाध्यक्ष व संचालकांची बैठक बुधवारी (दि.23) पार पडली. या बैठकीत सेंद्रीय शेतीची चळवळ गतिमान करुन सेंद्रीय उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्याकरिता उपाययोजनांबाबत खा. शरद पवार यांनी मार्गदर्शन केले.  सेंद्रीय शेतीकडे जास्तीत जास्त शेतकरी वळावेत यासाठी मोर्फाच्या पदाधिकार्‍यांनी जनजागृती करावी, असे आवाहन करताना प्रत्येक शेतकर्‍याने किमान दहा गुंठे तरी सेंद्रीय शेती करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन खा. पवार यांनी केले.  


तसेच प्रत्येक शहराच्या ठिकाणी तीन दिवस सेंद्रीय पद्धतीने पिकविलेल्या भाजीपाला, फळे व इतर पिके विक्रीसाठी बाजार भरविण्यात यावा, शेतकर्‍यांनी उत्पादित केलेल्या सेंद्रीय पिकांची मोर्फामार्फत खरेदी करुन बाजारपेठ मिळवून द्यावी, तुम्ही पिकवा - आम्ही खरेदी करु असा विश्वास शेतकर्‍यांमध्ये मोर्फाने निर्माण करावा. त्याचबरोबर गावागावात वाहनाद्वारे सेंद्रीय उत्पादनाची विक्री करुन त्यासोबत जनजागृती देखील करावी, असे आवाहन देखील खा. पवार यांनी केल्याची माहिती मोर्फाच्या जिल्हाध्यक्षा सौ.जाधव यांनी दिली. बैठकीस सेंद्रीय शेती चळवळीचे  प्रमुख युगेंद्र पवार, अध्यक्ष अंकुश पाडुळे, उपाध्यक्षा स्वातीताई शिंगाडे, सचिव प्रल्हाद वरे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर उस्मानाबाद येथून जिल्हाध्यक्षा सौ.सुरेखा जाधव या बैठकीस उपस्थित होत्या.

सौ.सुरेखा जाधव,जिल्हाध्यक्षा, मोर्फा उस्मानाबाद
मोर्फाच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्षपदी निवडीनंतर उस्मानाबाद जिल्ह्यात सेंद्रीय शेतीची चळवळ गतिमान करण्यासाठी लवकरच जिल्हा व तालुका कार्यकारिणीची निवड करुन शेतकर्‍यांमध्ये जनजागृती करणार आहे.

Labels:

समाज सेवेसाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा : सचिन पाटील

                      
मुरुम, ता. उमरगा, . २४  : 


 देशाला प्रदूषणमुक्त, शक्तीशाली व समृध्द बनविण्यासाठी पाण्याचे नियोजन, पर्यावरणाचे संवर्धन, परिसर स्वच्छता, महिलांची सुरक्षितता, आरोग्य संवर्धन करण्यासाठी युवकांनी समाजाचे प्रबोधन करण्यासाठी  सेवाभावी वृत्तीने पुढाकार  घेण्याचे आवाहन  उमरगा पंचायत समितीचे माजी सभापती सचिन पाटील यांनी केले.


 गणेशनगर, ता.उमरगा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत ' ग्रामस्वच्छता, जलसंवर्धन व आरोग्य संवर्धनासाठी युवा वार्षिक विशेष शिबीरा ' प्रसंगी गुरूवारी (ता. २४ ) रोजी उद्घाटक म्हणून पंचायत समितीचे माजी सभापती सचिन पाटील बोलत होते. 


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अशोक सपाटे होते. प्रारंभी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून सर्व उपस्थित मान्यवरांनी श्रमदान केले.  यावेळी गणेशनगरच्या सरपंच उषा चव्हाण, उपसरपंच सतीश पवार, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष माणिक राठोड, पोलीस पाटील कलावती चव्हाण, नगर शिक्षण विकास मंडळाचे संचालक प्रा. डॉ. सतीश शेळके, मुख्याध्यापक सुभाष राठोड, सहशिक्षक शाहूराज माने, संजय चव्हाण आदिंची प्रमुख उपस्थिती होती.         


 पुढे बोलताना सचिन पाटील म्हणाले की, वाढती लोकसंख्या, प्रदूषण व आरोग्य आदी कारणामुळे शहरीकरणाच्या समस्या दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रचंड मोठया प्रमाणात होत असलेली जंगलतोड यामुळे विविध समस्यांना तोंड दयावे लागत आहे. आपला भाग दुष्काळाच्या छायेत असल्याने पाण्याची बचत करुन त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे. जलसंधारणांची कामे करण्याकरिता तरुणांनी पुढाकार घेऊन लोकांची मानसिकता बदलणे गरजेचे असल्याचे शेवटी ते म्हणाले.  अध्यक्षीय समारोप प्रसंगी सपाटे म्हणाले की, श्रमदान हेच श्रेष्ठदान असल्याने सर्व तरुणांनी पुढाकार घेऊन हा परिसर स्वच्छ करावा. संस्कारयुक्त पिढी निर्माण करणे हे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्य आहे.                       

 प्रा. डॉ. संध्या डांगे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. डॉ. प्रकाश कुलकर्णी, डॉ. महेश मोटे, डॉ. विलास खडके, विद्यार्थी प्रतिनिधी अमितकुमार बनसोडे, लता कांबळे, योगेश पांचाळ, अंजीवनी स्वामी, अमोल कटके, संतोष कांबळे, आकाश पांचाळ, नामदेव शिंदे, अक्षय कांबळे, श्रावण कोकणे, प्रभाकर महिंद्रकर आदिंनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. रवी आळंगे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुभाष हुलपल्ले तर प्रा. डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी यांनी मानले.  

Labels:

पोलिस आधिका-यावर प्राणघातक हल्ला; तिघाविरुध्द नळदुर्ग पोलिसात गुन्हा दाखल


नळदुर्ग , दि . २४ 

  पोलिस आधिका-यावर प्राणघातक हल्ला झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान पोलिस आधिका-याने दिलेल्या तक्रारीवरुन   याप्रकरणी नळदुर्ग   पोलिस ठाण्यात  तिघा  भावाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




याबाबत सपोनि सुधीर मोटे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,  दि. २२ मार्च रोजी बंदोबस्त करीत असताना दुपारी ४ ते ५ वाजण्याच्या सुमारास शहरातील भवानी चौकात मोटार सायकल वाहनावर मोटार वाहन कायद्यानुसार केसेस करीत असताना नळदुर्ग येथील संदीप संजय राठोड हा मोटार सायकल क्र. एम. एच.१३ सी. वाय.२८५३ वर आला तेंव्हा त्याच्या वाहनावर कारवाई करण्यात आली.  त्यानंतर सायंकाळी ७ वाजता सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर मोटे व पोलीस कर्मचारी रुपेश पाटील हे पेट्रोलिंग करीत मुख्य रस्त्यावरुन बसस्थानकाकडे जात असताना मदन मोबाईल शॉपीसमोर रोडवर पप्पु पाटील यांच्या सोबत बोलत थाबले असताना त्याठिकाणी सुशिल संजय राठोड, संदीप संजय राठोड व रोहीत संजय राठोड हे तिघे येवुन यावेळी संदीप राठोड याने तु माझ्यावर कारवाई का केली असे म्हणुन वाद घालण्यास सुरुवात केली.  सुशिल हा शिवीगाळ करून  तुला जिवंत ठेवणार नाही असे बोलुन हातात दगड घेऊन  अंगावर मारण्यासाठी आला. त्यावेळी पप्पु पाटील व इतरांनी सुशिल याला बाजुला केले. त्याचवेळी रोहीत याने हाताने माझ्या डोक्यात मारले. माझ्या डोक्यात मार लागल्याने मी खाली बसलो असता सुशिल राठोड हा हातात तलवार घेऊन आणि तुला कापतोच असे बोलुन जीवे मारण्याच्या उद्देशाने अंगावर धाऊन आला.




 त्यावेळी पोलीस कर्मचारी रुपेश पाटील यांनी त्यास पकडले. त्यावेळी सुशिल याने पाटील यांच्या पोटात जोरदार हाताच्या कोपऱ्याने मारून तिथुन गेला. यानंतर पोलिस उपनिरीक्षक बजरंग सरपाळे, अच्युत पोतदार, शिवाजी राठोड व होमगार्ड संदीप राठोड, विनोद राठोड तेथे आले व त्यांनी मला व रुपेश पाटील यांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले.सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर भाऊसाहेब मोटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सुशिल संजय राठोड, संदीप संजय राठोड व रोहीत संजय राठोड यांच्याविरुद्ध कलम ३०७,३५३,३३२,५०४ व ३४ भादविसह कलम ४,२५ आर्म ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे हे करीत आहेत. 


Labels:

Wednesday, 23 March 2022

श्री तुळजाभवानी मंदिरात १४ ते १८ एप्रिलला चैत्र पौर्णिमा महोत्सव

                                                     



उस्मानाबाद.दि.23  : 

 श्री.तुळजाभवानी मंदिर येथे दि. १४ ते १८ एप्रिल  या कालावधीत चैत्र पौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.  यात्रेस येणाऱ्या भाविकांना सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि यात्रा महोत्सव सुरळीतपणे आयोजित व्हावी. या दृष्टीकोनातून उस्मानाबादचे उपविभागीय अधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे विश्वस्त सदस्य योगेश खरमाटे यांच्या अध्यक्षतेखाली आज तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिराशेजारील नवीन प्रशासकीय इमारतीतील कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली.

         

 यावेळी तहसीलदार तथा मंदिर प्रशासनाच्या व्यवस्थापक योगिता कोल्हे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद नातू, शहर समन्वयक सुशांत गायकवाड,अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त एस.बी. कोडगिरे,अन्न सुरक्षा अधिकारी प्रमोदकुमार काकडे,  पोलीस उपनिरीक्षक श्री.कांबळे, मंदिर सुरक्षेचे पोलीस उपनिरीक्षक अर्जुन जाधव,पुजारी मंडळाचे सुधीर कदम आदी उपस्थित होते.

          
यात्रेसाठी येणा-या भाविकांना सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि यात्रा महोत्सव सुरळीतरित्या आयोजित व्हावी यासाठी मंदिर प्रशासन, नगर पालिका ,पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग,परिवहन विभाग,वीज वितरण कंपनी या सर्वांनी आपल्या जबाबदा-या चोखपणे पार पाडल्यास हा महोत्सव अत्यंत यशस्वीरित्या आयोजित होण्यास मदत होईल असे  खरमाटे यांनी सांगितले.


पाणी आणि वीज पुरवठ खंडित होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे,उन्हाळा असल्यामुळे नगर परिषदेने यात्रा काळात दोन ते तीन वेळा पाणी पुरवठा करावा.शहरात आवश्यक सर्व ठिकाणी मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करून त्याठिकाणी मुबलक पाणी उपलब्ध करण्याचे नियोजन करावे. यात्रा कालावधीपूर्वी नगर परिषदेने पाणी पुरवठ करणा-या सर्व टाक्या स्वच्छ करून घ्याव्यात ,असेही आदेश श्री.खरमाटे यांनी यावेळी दिले.

          
गर्दी नियंत्रण,अतिक्रमण,पार्किंग आणि वाहतूक व्यवस्था तसेच मंदिरात दर्शनासाठी येणा-या भाविकांच्या दर्शन व्यवस्थेचा मार्ग आराखडा अथवा बॅरिकेटिंगसाठी तहसीलदार, पोलिस निरिक्षक,मुख्याधिकारी नगर परिषद आणि व्यवस्थापक(प्रशासन)यांनी संयुक्तरित्या नियोजन करावे. शहरातील अतिक्रमणे दोन दिवसात हटवण्याची प्रक्रीया नगर परिषदेने करावी, यासाठी पोलीस प्रशासनाने न.प ला आवश्यक ती मदत करावी, तसेच पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थेसाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. नियोजन करतांना व्यापारी आणि भाविकांची गैरसोय होणार नाही यास प्राधान्य द्यावे, असेही  खरमाटे यांनी यावेळी सांगितले.

 खरमाटे म्हणाले की आरोग्य विषयक बाबींवर ग्रामीण रुग्णालय, नगर परिषद आणि अन्न व औषध प्रशासनाचे फार महत्वाचे योगदान असते. शहराकडे येणा-या रसत्यावरील विहीरी आणि बोअरवेल यांचे निर्जंतुकीकरण करावे.हॉटेल्स आणि खानावळ येथील अन्न पदार्थांची संपूर्ण तपासणी करावी. विशेषत: पाण्याच्या बाटल्या तपासावेत, कारण जुन्या बाटल्यांमध्ये अस्वच्छ पाणी विक्री होण्याची दाट शक्यता असते.भाविकांच्या आरोग्याच्या अनुषंगाने मंदिरासमोरील मैदानावर वैद्यकीय सेवा कायमस्वरूपी सज्ज ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केले.


सुरक्षा आणि दक्षता तसेच मंदिरातील शिस्तीबाबत मार्गदर्शन करतांना श्री.खरमाटे म्हाणाले, मंदिराबरोबर शहरातही पोलीस बंदोबस्त अलर्ट असणे आवश्यक आहे.विशेषत: चर्णतिर्थ,छबीना, अभिषेक,पूजा याप्रसंगी बंदोबस्त चोख असावा,मंदिरात अनुभवी पोलीस आणि महिला कर्मचारी नेमावेत.तसेच मंदिरात येणारे सर्व पुजारी आणि पोलीस    कर्मचा-यांनी भाविकांशी सौजन्याने वागण्याच्या सूचना देण्यात याव्यात,शिवाय तज्ञांमार्फत संबंधितांना प्रशिक्षणही देण्यात येईल असेही  खरमाटे यांनी यावेळी सांगितले.

Labels:

पाण्याचा काटकसरीने वापर करा : डॉ. महेश मोटे

मुरुम, ता. उमरगा, दि. २३ :  


येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने जलसंवर्धन दिन मंगळवारी  रोजी साजरा करण्यात आला. 


याप्रसंगी महाविद्यालयातील राज्यशास्त्र संशोधन केंद्राचे समन्वयक प्रा. डॉ. महेश मोटे यांनी जलसंवर्धन व युवक या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करताना म्हणाले की, दि.
२२ मार्च हा प्रतिवर्षी जागतिक जलसंवर्धन दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. याचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे पिण्यास योग्य असलेल्या ताज्या, स्वच्छ  पाण्याचे महत्त्व प्रत्येकास समजावे. २२ मार्च हा जागतिक जलसंवर्धन दिन असावा. हा ठराव डिंसेबर १९९२ च्या संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरणविषयक परिषदेत    ‘ रिओ द जानेरो ’ या शहरात मांडला गेला, नंतर युनोच्या अधिवेशनात तो सर्व संमतीने मान्य करण्यात आला आणि १९९३ पासून अमलातसुद्धा आला. 

आपल्या पृथ्वीवर ९७ टक्के पाणी महासागरात साठलेले आहे. उरलेले तीन टक्के पाणी ताज्या रूपात असते. त्यातील २ टक्के बर्फाच्या रूपात आहे आणि उरलेले १ टक्का पाणी भूगर्भात, ओल्या जमिनीत, वाहत्या नद्या, तलाव, विहिरी, धरणे यामध्ये उपलब्ध असते आणि यावरच आपले सर्व जीवन अवलंबून आहे. या ताज्या पाण्याचा सन्मान करावा, त्याचे प्रदूषण करू नये, प्रत्येक थेंब जपून वापरावा, पाण्याचा अपव्यय टाळावा. हे समजून घेणे, त्याचे समाजाच्या सर्व पातळीवर योग्य प्रबोधन आणि शिक्षण देणे, स्वच्छ पाण्याचे संवर्धन आणि संरक्षण कसे आवश्यक आहे. यासाठी हा दिन साजरा केला जातो. प्रतिवर्षी २२ मार्चला त्या वर्षांचे पाण्याच्या संबंधामधील घोषवाक्य संयुक्त राष्ट्रातर्फे जाहीर होते. २०२० मधील घोषवाक्य होते. ‘‘ पाणी आणि वातावरण बदल ’’ तर २०२१ ला ‘‘ स्वच्छ पाण्याची किंमत ’’ या घोषवाक्यावर जगभरामध्ये काम झाले. यावर्षी जागतिक पाणी दिवसाचे घोषवाक्य आहे.     


  ‘‘ भूगर्भामधील पाणी : अदृश्य ते दृश्य. ’’ भूगर्भात हजारो वर्षांपासून साठलेले पाणी अतिशय मौल्यवान आहे, पण याच पाण्याचा अनावश्यक उपसा करून आपण त्यास कवडीमोल करत आहोत. एवढेच नव्हे तर भविष्यामधील पिण्याच्या पाण्याकरिता संकटास सामोरे जात आहोत. यावर्षी भूगर्भामधील पाण्याबद्दल जास्त जागृती या जागतिक पाणी दिवसापासून जगभर होणार आहे. भूगर्भातील पाणी अदृश्य आहे पण त्याचे परिणाम आपणास सर्वत्र दृश्य स्वरूपात पाहावयास मिळतात. वातावरण बदलाचे परिणाम जसजसे गंभीर होतील. त्या प्रमाणात भूगर्भामधील पाण्याची परिस्थितीसुद्धा चिंताजनक होईल, म्हणून तर त्यास जपण्यासाठी आपण सर्वानी एकत्र येणे गरजेचे आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. अशोक सपाटे होते. 



यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. रवि आळ॑गे, डॉ आप्पासाहेब सुर्यवंशी, प्रा. डॉ. संध्या डांगे, प्रा. दिनकर बिराजदार, डॉ. अरविंद बिराजदार, डॉ. रविंद्र गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.  रवी आळंगे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुभाष हुलपल्ले तर आभार प्रा. मुकुंद धुळेकर यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.

Labels: