Tuesday, 30 September 2014

संतनाथ’चा भोंगा सुरु केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : राऊत

     बार्शी - राज्यातील एकमेव असा तीन जिल्हे व आठ तालुक्याचे कार्यक्षेत्र असणार्‍या व सत्ताधार्‍यांनी बंद पाडलेल्या वैराग येथील संतनाथ सहकारी साखर कारखान्याचा भोंगा सुरु केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, असे आश्‍वासन देत या परिसरात औद्यागिक वसाहतही उभी करण्याचे वचन विधानसभा निवडणुकीतील शिवसेनेचे उमेदवार माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी सर्जापूर, जवळगांव येथील सभेत दिले.
    सर्जापूर येथील सभेच्या व्यासपीठावर वैरागचे सरपंच संतोष दादा निंबाळकर, काकासाहेब कोरके, दादा डोईङ्गोडे, अशोक सावळे, आनंद कोरके, बाबासाहेब कापसे, दिगंबर कानगुडे, आयुब बागवान, रिपाइंचे शहराध्यक्ष शंकर वाघमारे, राहूल बोकेङ्गोडे, भाजपचे प्रमोद वाघमोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
    सर्जापूर येथील प्रचारसभेस प्रारंभ करण्यापूर्वी राऊत यांच्याहस्ते तुळजाभवानीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. भाषणात राऊत म्हणाले, आम्ही आमदार नसतानाही भोगावती कारखान्याच्या परिसरात एमआयडीसी उभारण्याचा प्रयत्न केला. जेणेकरुन येथील सुमारे तीन हजार बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल परंतु सत्ताधार्‍यांना ते पटले नाही. भोगावतीचा परिसर २८३ एकरचा आहे. त्यापैकी ८३ एकर मध्येच कारखान्याचे कामकाज सुरु होऊ शकते. उर्वरीत २०० एकर मध्ये औद्योगिक वसाहतीचे प्लॉट पाडून शेतकरी उद्योजकांना त्याचे वाटप करायचे की ज्यामुळे रोजगार उपलब्ध होऊन वैरागचा परिसर सुजलाम सुङ्गलाम होऊ शकतो. कारखानाही कांही दिवस खासगी तत्वावर सुरु करुन आधुनिक यंत्रसामुग्री बसवली तर ऊस उत्पादकांना इतरत्र ङ्गिरण्याची आवश्यकता नाही. या पध्दतीचे कामकाज आम्ही सुरुही केले होते. परंतू सत्ताधार्‍यांनी ते हाणून पाडले, अशी टीका राऊत यांनी दिलीप सोपल यांचेवर केली.
    तालुक्यातील जनतेने सलग १३ वर्षे पंचायत समितीची सत्ता दिली. त्या माध्यमातूनही आम्ही १६ हजारांपेक्षा जास्त घरकुल गोरगरिबांना मिळवून दिली. गावातील रस्ते, नळपाणीपुरवठा योजनेची कामे मार्गी लावली असेही राजेंद्र राऊत यांनी ठणकावून सांगितले. नदी नाले ओढ्याची लांबी,रुंदी वाढवून शेतीसाठी पाणी वापरले तर येथील सर्वच शिवार हिरवा होईल, सर्व विकासकामासाठीच शिवसेनेला साथ देण्याचे आवाहन राऊत यांनी ग्रामस्थांना केले.सर्जापूर येथील ज्येष्ठ नेते काकासाहेब कोरके यांनीही सर्जापूरच नव्हे तर वैराग मधूनही राऊत यांना मोठे मताधिक्य देऊ, असे आश्‍वासन दिले. माजी नगरसेवक अशोक सावळे यांनीही भाषणात सत्ताधार्‍यांवर टीका केली.
    जवळगांव येथील सभेच्या व्यासपीठावर माजी जि.प.सदस्य अनिल डिसले, सुभाष डुरे-पाटील, डॉ.भारत पंके, विलास गाटे, नेताजी डिसले, विष्णू ढेंगळे, काका ढेंगळे, नानासाहेब धायगुडे, शंकर खुने, भाऊ तांबे, कुंडलिक वाघमोडे, श्रीनिवास पाटील, कुंडलिक वाघमोडे, शहाजी निंबाळकर, रमेश माळी, शिवाजी सुळे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नानासाहेब घोरपडे, नवनाथ कापसे, निवृत्ती कापसे, विठ्ठल अडसूळ, धनाजी गलांडे, विष्णू डिसले, अहमद शेख, विकास मगर, किशोर सोनवणे, राहूल देशमुख, आप्पा खेंदाड, चंद्रकांत पौळ, श्रीशैल भालशंकर, दीपक लोंढे आदींनी परिश्रम घेतले.


Labels:

तुळजापूरा- मुरली अंलकार पूजा

तुळजापूर - नवरात्रोत्सवाच्या पाचव्या माळेदिवशी तुळजापुरात भाविकांचा महापूर लोटला. चार लाख भाविकांनी पायी येऊन पाचव्या माळेला परंपरागत खेटा पूर्ण केला.
  सिंहासन गाभा-यात सोमवारी तुळजाभवानी देवीची मुरली अलंकार पूजा मांडण्यात आली होती. देवीचे महंत पुजारी यांनी ही अलंकार पूजा बांधली.अभिषेक पूजेनंतर रात्री १०.३० वाजता छबिना मिरवणूक काढण्यात आली. या वेळी आई राजा उदो उदो'चा जयघोष आणि संबळाच्या कडकडाटाने आसमंत दणाणून गेला.

Labels:

उस्मानाबाद 35, तर उमरगा मतदार संघात 24 उमेदवारांचे अर्ज वैध

   उस्मानाबाद -   ‍विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2014 मध्ये अर्ज छाननीची प्रक्रिया आज पार पाडण्यात आली. छाननीनंतर  उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात  वैधरित्या नामनिर्देशीत 35 उमेदवार  तर उमरगा मतदारसंघात 24 उमेदवारांचे नामनिर्देशपत्र वैध ठरले.
    उस्मानाबाद विधानसभा मतदार संघात राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यता प्राप्त राजकीय पक्षाचे ॲड. घुले जयराम बळीराम ( बहुजन समाज पार्टी), दुधगावकर पाटील संजय त्रंबकराव(भारतीय जनता पार्टी),राजे निंबाळकर ओमप्रकाश भूपालसिंह (शिवसेना), राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील ( नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी), विश्वास जगदेवराव शिंदे           (भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस), संजयकुमार आत्माराम यादव  ( महाराष्ट्र नवनिर्माण सेना).
    नोंदणीकृत राजकीय पक्षाचे उमेदवार (राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यता प्राप्त पक्षाच्या उमेदवाराशिवाय अन्य उमेदवार  अकबरखान गुलाबखान पठाण ( ऑल इंडिया मजलीस ए. इतेहादुल मुस्लीमीन),  अनिल उत्तमराव हजारे (‍रिपब्लीकन सेना ), उमेश भिवाजी भालेराव ( बहुजन मुक्ती पार्टी), चव्हाण बाबू विठोबा (हिंदूस्थान जनता पार्टी), धनंजय मुरलीधर तर्कसे ( पाटील) (हिंदुस्थान निर्माण दल), मधुकर गायकवाड ( आंबेडराईट पार्टी ऑफ  इंडिया), डॉ.रमेश सुब्बराव बनसोडे (रिपब्लीकन पार्टी ऑफ  इंडिया ) तर इतर उमेदवार ( अपक्ष उमेदवार)  अर्चना राणाजगजितसिंह पाटील, अनंत जगन्नाथ चोंदे, ओहाळ राजाभाऊ उर्फ राजेंद्र, गाढवे केरबा विठठल, टेकाळे किरण दिगंबर,  तुपसुंदरे बालाजी बापुराव,  तांबोळी  फेरोज चाँदसाब, धनजंय दिनकरराव पाटील, पाडूळे सुशिलकुमार विनायक, पांडूरंग गणपतराव भोसले,  प्रदीप सिद्राम जाधव, भिमा शंकर जाधव, रजिओददीन आरेफोददीन सिददीकी,    प्रा.रणदिवे पोपट ग्यानबा, रामजीवन पंढरी बोंदर,  वाघमारे संजयकुमार भागवत, ॲड. वाजेद  सलिम शेख,  शिवाजी दिगंबर उर्फ  पांडूरंग कापसे, सय्यद समीर रशीद, स्मीता अभय शहापूरकर,  हाजीभाई हन्नुरे , हौसलमल ज्ञानदेव गोविंदराव .
     तर उमरगा मतदार संघात छाननीनंतर  वैधरित्या नामनि र्देशित झालेल्या उमेदवारांची नावे व पक्ष पुढीलप्रमाणे आहे.
    उमरगा विधानसभा मतदार संघात राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यता प्राप्त राजकीय पक्षाचे उमेदवार शिंदे कैलास चिंतामणराव (भारतीय जनता पार्टी), कांबळे किसन नागनाथ (भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस), गायकवाड संजय आत्माराम  (राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी), दत्ता लक्ष्मण गायकवाड (बहुजन समाज पार्टी), चौगुले ज्ञानराज धोंडीराम  (शिवसेना), क्षिरसागर विजय मारुती (मनसे), चंद्रकांत ईश्वर थोरात  ( भारतीय नवजवान सेना/पक्ष),  कांबळे प्रज्ञावर्धन भगवान  (नव बहुजन समाज परिवर्तन पार्टी ), विद्या आबाराव वाघमारे (रिपब्लीकन पार्टी ऑफ ‍इंडिया).
    या शिवाय अपक्ष उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे - डावरे  हरिश माधवराव, व्हटकरविलास शरणाप्पा, गायकवाड उमाजी पांडूरंग,   राजू उर्फ राजेंद्र  बळीराम उबाळे,  सरवदे रावसाहेब श्रीरंग, ‍ जितेंद्र उर्फ जितेश लक्ष्मण  चौगुले,  गायकवाड राम सईदा, प्रा. पांडूरंग शंकरराव पोळे, सुनिल वामनराव सुर्यवंशी, तेलंग  दिलीप साहेबराव, ‍क्षिरसागर ईश्वर मल्हारी, सरवदे सतिश ज्ञानोबा, कोनाळे बालाजी एकनाथराव, गायकवाड तानाजी वैजनाथ आणि  कांबळे लक्ष्मण तुकाराम अशी आहेत.

Labels:

तुळजापूर मतदार संघात 31तर परंडा 18 उमेदवारांचे अर्ज वैध

उस्मानाबाद -  ‍विधानसभा सार्व त्रिकनि  वडणूक-2014 मध्ये अर्ज छाननीची प्रक्रिया आज पार पाडण्यात आली. छाननीनंतर  तुळजापूर विधानसभा मतदारसंघात  वैधरित्या नामनिर्देशीत 31 उमेदवार  तर परंडा मतदारसंघात 18 उमेदवारांचे नामनिर्देशपत्र वैध ठरले.
    तुळजापूर मतदार संघात छाननीनंतर वैध ठरविण्यात आलेल्या उमेदवारांची नावे व पक्ष खालीलप्रमाणे आहेत.
        241- तुळजापूर विधानसभा मतदार संघात राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यता प्राप्त राजकीय पक्षाचे उमेदवार  गोरे जीवनराव ‍विश्वनाथ ( नॅशनॅलिस्ट  कॉग्रेस पार्टी), चव्हाण मधुकरराव देवराव ( भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस), डोरनाळीकर प्रेमानंद बळवंतराव ( बहुजन समाज पार्टी), देवानंद साहेबराव रोचकरी ( महाराष्ट्र नवनिर्माण सेना), निंबाळकर संजय प्रकाश ( भारतीय जनता पार्टी), पाटील सुधीर केशवराव  ( शिवसेना).
    नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार कसबे सतीश श्रीपती (महाराष्ट्र विकास आघाडी) राहूल नागनाथ जवान (हिंदुस्थान जनता पार्टी) तर अपक्ष उमेदवार अतुल नागनाथ जवान, अशोक  हरिदास जगदाळे, उपळेकर नवनाथ दशरथ, किरण जाधव,  डॉ. कोकाटे गोविंद विश्वनाथ, कृष्णा देवानंद रोचकरी, खतीब तन्वीर अली सय्यद अली, गणेश रामचंद्र सोनटक्के, गोरे सुचेता जीवनराव, चांदणे पिंटू पांडूरंग, देवकुळे ‍कानिफनाथ दुल्हा, पवार बालाजी प्रभाकर, महानंदा गजानन पैलवान, महेंद्र भानुदास धुरगुडे, राठोड नामदेव धर्मा, राठोड संतोष लिंबाजी, ॲड.रामेश्वर धोंडीबा शेटे, रेणूके संजय सुरेश, विजय सुधाकर ‍शिंगाडे, ॲड. विजयकुमार दिनकर नकाते, सुबरबाई शिवाजी राठोड,  सुरवसे सत्यवान नागनाथ, संतोष ज्ञानोबा केंदळे हे अपक्ष  उमेदवार आहेत. 
    243- परंडा विधानसभा मतदारसंघात 18 उमेदवार  आता  रा हिले आहेत.  त्यांची नावे व पक्ष खालीलप्रमाणे आहेत.
                परंडा विधानसभा मतदार संघात राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यता प्राप्त राजकीय पक्षाचे उमेदवार आगवाने संगिता बालाजी (बहुजन समाज पार्टी),गणेश दत्तात्रय शेंडगे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), चौधरी नुरोद्दीन म. युनुस म. इद्रिस (भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस), पाटील ज्ञानेश्वर रावसाहेब (शिवसेना), मोटे राहूल महारुद्र (नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी ).
    नोंदणीकृत राजकीय पक्षाचे उमेदवार ( राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यता पक्षाच्या उमेदवाराशिवाय अन्य उमेदवार     बाळासाहेब भगवंतराव पाटील (राष्ट्रीय समाज पक्ष), राजगुरु ‍त्रिंबक कुकडे महाराज (हिंदुस्थान जनता पार्टी) तर इतर अपक्ष उमेदवार अमेय बाळासाहेब पाटील,आर्यनराजे किसनराव शिंदे, ॲड प्रबुध्द साहेबराव अहिरे (राजा), बजरंग साहेबराव ताटे, बनसोडे संजयकुमार कोंडीबा, भोरे गोरख चांगदेव, मुलाणी अमीर छगन, मोटे वैशाली राहूल, शिंदे संभाजी नानासाहेब, सुर्यकांत चंद्रकांत कांबळे, हावरे अ.करीम.म.युसूफ हे सर्व अपक्ष उमेदवार आहेत.

Labels:

फटाका विक्री स्टॉल परवान्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

उस्मानाबाद - प्रतीवर्षाप्रमाणे दिपावली सणानिमित्त तात्पुरते फटाके विक्री स्टॉल परवानगीसाठीचे अर्ज 30 सप्टेंबर ते 13 ऑक्टोबरपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावेत. विहीत नमुन्यातील अर्ज फॉर्म एलई-5, ओळखपत्र संबंधित ग्रामपंचायत / नगरपरिषदेचे नाहरकत प्रमाणपत्र, व सांक्षाकीत नकाशा, संबंधित जागा खाजगी असेल तर जागा मालकाचे नाहरकत व जागेचे कागदपत्र, संबंधित पोलीस स्टेशनचे नाहरकत प्रमाणपत्र,  विहीत परवाना फीस भरणा केल्याचे चलन सादर करावे. परिपूर्ण असलेले प्रस्ताव या कार्यालयात स्वीकारण्यात येतील तसेच विहीत दिनांकानंतर  व उशीरा आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची संबधितांनी नोंद घ्यावी, असे जिल्हादंडाधिकारी, उस्मानाबाद यांनी  कळविले आहे.    

Labels:

मतदान जनजागृती रॅली आणि स्वच्छता अभियान

तुळजापूर  -  मतदान करणे हे प्रत्येक नागरीकांचे कर्तव्य आणि हक्क आहे. हा हक्क प्रत्येकाने निर्भयपणे बजावला  पाहिजे. भारतीय घटनेने मतदारांना मतदान करण्याचा अमुल्य अधिकार दिला आहे. तेव्हा प्रत्येकानी मतदानाचे महत्व लक्षात घेवून सर्वांनी विधानसभा निवडणूकीत मतदानाचा हक्क बजावावा,असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले.
           तुळजापूर येथील नवोदय विदयालयात जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान जनजागृती   अभियानानिमीत्त मतदार रॅली काढण्यात आली. या रॅलीचा शुभारंभ डॉ. नारनवरे यांनी हिरवी झेंडी दाखवनू प्रारंभ केला.
            जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे म्हणाले की, उमेदवार निवडण्याचा माझा अधिकार नसून ती  माझी राष्टरीय जबाबदारी आहे. विधानसभा मतदार  संघात मतदारात मतदानाविषयी जनजागृती करावी व  निर्भयपणे व कोणाच्या ही दबावास व अमिशाला बळी न पडता आपला मतदानाचा हक्क सर्वांनी बजावावा असे आवाहन केले.
           यावेळी  नवोदय विदयालयातील प्राचार्य,‍ प्राध्यापक, शिक्षक, विदयार्थ्यांना मतदान करण्या  विषयी शपथ दिली. त्यानंतर ‍ जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत   नारनवरे यांच्यासह विदयालयातील्‍ ‍शिक्षक, विदयार्थ्यानी विदयालय ‍परीसर स्वच्छता केली.    

Labels:

काँग्रेसच्या प्रचाराचा आज तुळजापुरातून शुभारंभ

तुळजापूर - राज्यातील विधानसभा निवडणूकांच्या पाश्र्वभूमीवर प्रदेश काँग्रेसच्या प्रचाराचा शुभारंभ आज तुळजाभवानीचे आशिर्वाद घेऊन तुळजापूरातुन होत आहे. या प्रचार शुभारंभासाठी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, प्रचार समिती प्रमुख नारायण राणे आदिसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तुळजापूर येथील हडको मैदानावर काँग्रेसचीही विराट प्रचार सभा होणार आहे. ‘आम्ही जिंकणारच’ हा संदेश काँग्रेसचे नेते या प्रचार सभेतून देणार आहेत. उद्या ३० रोजी सकाळी ११ वाजता. कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन सर्व मान्यवर या विराट प्रचार सभेकडे येऊन जनतेला मार्गदर्शन करणार आहेत. या सभेसाठी माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे, माध्यम समितीचे प्रमुख हर्षवर्धन पाटील, माजीमंत्री राजेंद्र दर्डा, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, शिवाजीराव पाटील निलंगेकर, बाळासाहेब थोरात, पतंगराव कदम, अब्दुल सत्तार, दिलीपराव देशमुख, अमित देशमुख, रजणीताई पाटील, आ. बसवराज पाटील, महिला आघाडीच्या प्रमुख कमलताई व्यवहारे आदिसह राज्यातील आजी-माजी मंत्री, आमदार, खासदार काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष व राज्यातील नेते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
नागरिकांनी या सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन या प्रचार सभेचे संयोजक, जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केले आहे.

Labels:

भूकंपाला २५ वर्षे आज पूर्ण

नळदुर्ग - ३० सप्टेंबर १९९३ ला झालेल्या महाप्रलयकारी भुकंपात लोक मृत्यूमुखी पडले. अनेकांचे संसार उघड्यावर पडले. हजारो मुले, मुली अनाथ झाले. यांना आधार देण्यासासाठी शासनाबरोबर अनेक स्वयंसेवी संस्था पुढे आल्या. सर्वांनीच या लोकांना या धक्यातून सावरण्यासाठी मदत केली. या भुकंपात अनाथ झालेल्या मुलांसाठी शाळा, विद्यालय . या शाळेमध्ये शिक्षण पुर्ण केले. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे करुन पदवी संपादन केली. परंतू पदवी घेतल्यानंतर पुढे काय करायचे? हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. अशा अनाथांना याकाळी ख-या आधार देण्याची गरज आहे.
आज भुकंप होवून २१ वर्ष पुर्ण झाली आहेत. भुकंपात निराधार झालेल्या या मुलांना समाजात स्वाभिमानाने उभे राहण्याकरिता त्यांना योग्य दिशा मिळणे गरजेचे आहे. कारण आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या या मुलांना चांगले काय, वाईट काय याचे भान नसल्यामुळे त्यांना योग्यवेळी त्यांच्या कर्तव्याची जाणीव होणे हिताचे ठरते. समाजातील पैसेवाल्याने अशा मुलांना पुढील शिक्षणासाठी लागणारा पैसा देवून त्यांचे शिक्षण पुर्ण करण्यासाठी लावावा. कारण अनेक विद्यार्थी पैशा अभावी उच्च शिक्षण न घेता आहे त्याच ठिकाणी राहत आहेत. किंवा मोठ्या शहरात पाच, दहा हजाराची नौकरी करण्याचा प्रयत्न करत परिस्थितीची जाणीव ठेवून आपल्यावर आलेले नैसर्गीक संकट दूर सारु. विद्यार्थी मोठ्या हिमंतीने गुणवत्ताधारक झाले. परंतू पुढे आपले कसे होणार आपणाला कोण आधार देणार? या विवंचनेत आहेत. कारण आज समाजातील माणुसकीलाच पावत चालली आहे. माणुस स्वार्थी बनला आहे. इतरांचे चांगले व्हावे हा विसर त्याला पडला आहे. प्रत्येकजण एकमेंकांचे पाय ओढण्याचा प्रयत्न करीत आहेत.
आपले घर, संसार, आपली मुले-बाळे त्यात तो गुरफटत चालला आहे. त्यामुळे समाजाचे आपण काय देणे लागतो. याचा तो विचारच करीत नाही. समाजात अनेक स्वयंसेवी संस्था आहेत. त्या गोरगरिबांच्या कल्याणासाठी काम करत आहेत. त्यांनी याबाबतीत लक्ष घालणे म्हणजे शासनाच्या अनेक योजना कल्याणकारी आहेत. परंतू त्या अनाथांचे कल्याण करण्यासाठी स्वत:चे कल्याण करुन घेण्यातच त्या खात्याचे अधिकारी धन्यता मानतात. त्यामुळे त्यांची अंमलबजावणी काटेकोरपणे होत नाही. निराधार, अनाथ मुलांना जर याचा फायदा झाला तर २१ वर्षापुर्वी निसर्गाने त्यांना दिलेला धक्का ते विसरुन जातील. एका अर्थाने धावत्या युगात ते समर्थपणे पुढे जाण्याचा प्रयत्न करतील.
मोठ-मोठ्या लाखोची देणगी देणा-या लोकांनी अशा निराधारांना आर्थिक हातभार लावल्यास देणगी दिलेल्या रक्कमेच्या चौपट पुण्य त्यांच्या पदरी पडेल हे निश्चित. भुकंप झालेल्या मुलांना पदवीनंतर मिळणारे शिक्षण व स्वतंत्र राहण्याची मुभा हिच त्यांच्या आयुष्याची खरी सुरुवात आहे. कारण आतापर्यंत त्यांच्या आवडी-निवडीचा विचाराने आयुष गेले आहे. मात्र २१ वर्षानंतर ही त्यांना स्वतंत्र होता येईल का? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

Labels:

Monday, 29 September 2014

मनसेच्‍या विभागीय सरचिटणीसपदी जागिरदार

 नळदुर्ग- येथील मनसेचे कार्यकर्ते एस.के. जागिरदार यांची महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेच्‍या मराठवाडा विभागाच्‍या सरचिटणीसपदी नियुक्‍ती करण्‍यात आली असून त्‍यांच्‍या नियुक्‍तीचे सर्वत्र स्‍वागत केले जात आहे.          
      एस.के जागिरदार यांनी काही महिन्‍यांपूर्वीच मनसेत प्रवेश केला होता. प्रवेशानंतर एस.के. जागिरदार यांनी अल्‍पावधीतच तुळजापूर विधानसभा मतदार संघात राजकीय ताकद वाढविण्‍याचा चांगला प्रयत्‍न केला. या कालावधीत त्‍यांनी मतदार संघात मनसेच्‍या 43 नवीन शाखा नव्‍याने सुरू केल्‍या. या मतदार संघातून जास्‍तीत जास्‍त युवकाना  मनसेत आणण्‍याचे काम त्‍यांनी केले. जागिरदार यांनी अल्‍पावधीत पक्ष वाढीसाठी केलेल्‍या कामाची दखल घेवून मनसेचे अध्‍यक्ष राज ठाकरे यांनी एस.के. जागिरदार यांची मनसेच्‍या मराठवाडा विधानसभाच्‍या सरचिटणीसपदी नियुक्‍ती करून त्‍यांना मराठवाडा पातळीवर काम करण्‍याची संधी दिली आहे. एस.के जागिरदार यांची मनसेच्‍या विभागीय सरचिटणीसपदी नियुक्‍ती झाल्‍याचे वृत्‍त समजताच त्‍यांच्‍या सामर्थकांनी फटाक्‍याची प्रचंड अतिषबाजी करून व पेढे वाटून आनंदोत्‍सव साजरा केला.

Labels:

१८ अपक्षांसह ३६ उमेदवारांचे ६९ अर्ज दाखल

तुळजापूर- पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या विरोधात एसटी महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांच्या उमेदवारीने तुळजापूरची लढत लक्षवेधी झाली आहे. तर माजी नगराध्यक्ष देवानंद रोचकरी यांनी शेवटच्या क्षणी मनसेच्या रेल्वे इंजिनवर स्वार होण्याचा निर्णय घेतल्याने चुरस वाढली आहे. तसेच आघाडीच्या बिघाडीने सेना-भाजप पदाधिकाऱ्यांच्याही आशा पल्लवीत झाल्या आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी विक्रमी १८ अपक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. शेवटच्या दिवसापर्यंत एकूण ३६ उमेदवारांनी ६९ अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी (दि. ऑक्टोबर) लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. काँग्रेसच्या मधुकरराव चव्हाण यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे जीवनराव गोरे यांच्या उमेदवारीने तुळजापूरच्या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. त्यातच माजी नगराध्यक्ष देवानंद रोचकरी यांनी मनसेकडून उमेदवारी दाखल केल्याने चुरस वाढली आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधीर पाटील आणि भाजपचे उमेदवार संजय निंबाळकर यांचेही आव्हान या उमेदवारांसमोर असणार आहे. मोदी लाट चालते का यावर निंबाळकर यांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.
{एसटी महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे हे आपल्या जिल्हा परिषद, एसटी महामंडळाच्या कामकाजाच्या अनुभवासह अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी मला विधानसभेत पाठवा, असे आवाहन करत आहेत. तसेच माजी कृषीमंत्री शरद पवार यांचे कृषी धोरणाचे कौतुक करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या अपयशावर टीका करत आहेत.यापुर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत सलग तीनवेळा वेगवेगळ्या पक्षांच्या वतीने देवानंद रोचकरी यांनी निवडणूक लढवली. प्रत्येकवेळीत्‍यांना मते पडली मात्र, त्यांना विजयश्री खेचता आली नाही.

Labels:

श्री तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भक्तांची रीघ

  उस्मानाबाद- महाराष्ट्राची कुलस्वामिनी  श्री तुळजाभवानीच्या दर्शनासाठी चौथ्या दिवशी भक्तांची रीघ  लागली होती. ललित पंचमी   आणि रविवार असल्याने व याचदिवशी  श्रीदेवीजींची नित्योपचार पूजासह रथ अलंकार महापूजा व रात्री छबिना कार्यक्रम असल्याने सकाळपासूनच भक्तांची  मोठया प्रमाणात गर्दी  होती. श्री तुळजाभवानीचे  दर्शन व्हावे, यासाठी ‍भाविकांची पावले तुळजापूरकडे जातानाचे चित्र दिसत होते.
    श्रीतुळजाभवानी मातेचे मंदीर ‍भाविकांसाठी ‍किमान 22 तास सुरु असते. त्यामुळे   ‍भाविकांमध्ये नवा उत्साह पहावयास मिळाला. ऐवढी मोठी गर्दी होऊनही  भाविकांच्या  चेहऱ्यावर नवा उत्साह  दिसून येत  होता. दर्शन घेऊन जाणारे ‍ भाविक आनंदाने आपल्या गावाकडे परतत असल्याचे  चित्रही पहावयास मिळाले.
    शारदीय नवरात्र महोत्सवाच्या चौथ्या दिवशी सकाळी 6 वाजता श्रीदेवीजींची नित्योपचार पूजासह रथ अलंकार महापूजा करण्यात आली.  त्यानंतर भवानी मातेच्या दर्शना करीता  व अभिषेक  पूजेकरिता  भक्तांनी एकच गर्दी केली होती.  यावेळी पोलीस प्रशासनाने योग्यरितीने नियोजन करुन पोलीस जागोजागी तैनात केले होते. त्यामुळे भाविकांची सोय होत होती. तसेच नवरात्र महोत्सवातील चौथ्या माळेला लातूर, बार्शी, सोलापूर, उस्मानाबाद येथून पायी येणाऱ्या भाविकांनी गर्दी केलेली दिसून आली. 
    मंदीर संस्थान, नगर ‍पालिका तसेच आरोग्य, पोलीस,‍ परिवहन विभागाकडून देण्यात येणाऱ्या सुविधांमुळे भक्तांमध्ये उत्साह होता. यावर्षी  मंदीर संस्थानच्यावतीने  महत्वाच्या रस्त्यांवर गर्दी होऊ नये, यासाठी  अतिक्रमण हटविल्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवणे सोपे होत होते. कोणत्याही  भक्तांना त्रास होऊ नये, यासाठी प्रशासनाच्या सर्व यंत्रणा कार्यरत होत्या.
    मंदिर संस्थांनचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी विविध विभाग  व यंत्रणाना सूचना देवून ‍भाविकांना सोई सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत निर्देश दिले आहेत. या शिवाय मंदिर संस्थान कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षात 24 तास व वरिष्ठ  अधिकाऱ्यांची  नेमणूक करण्यात आली आहे. सीसीटीव्हीव्दारे संपूर्ण मंदिर परिसराचे चित्रीकरण करण्यात येत असून त्याव्दारे नियंत्रण व लक्ष ठेवले जात आहे.
    सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून उपाययोजना करण्याचे निर्देशही डॉ. नारनवरे यांनी पोलीस प्रशासनास दिले आहेत. त्यादृष्टीने येणाऱ्या भाविकांच्या सर्व वस्तुंची तसेच सामानाची सुरक्षा यंत्रणेमार्फत तपासणी केली जात आहेत.
    मंदिर  परिसर व शहरात स्वच्छता राहावी, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी नगर पालिकेला निर्देश दिले आहेत. त्याप्रमाणे नगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी  ठराविक अंतराने शहराची स्वच्छता करीत आहेत. या कामात समन्वय राहावा, यासाठी जिल्ह्यातील इतर नगर पालिकांच्या  ‍वरिष्‍ठ मुख्याधिकाऱ्यांची  मदत घेण्यात आली असून त्याव्दारे समन्वय साधण्यात येत आहे.  

Labels:

तुळजाभवानी मंदिरात रथ अलंकार पूजा

 तुळजापूर - श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये रविवारी रोजी रथ अलंकार पूजा मांडण्यात आली. रथात स्वार झाल्यानंतरचे देवीचे रूप लक्षावधी भक्तांनी अनुभवले.
सकाळी येथे नियमितपणे करण्यात येणारा अभिषेक करण्यात आला. दुपारी ११ वाजता तुळजाभवानी देवीला महावस्त्र, अलंकार घालण्यात आले. त्यानंतर देवीची रथ अलंकार पूजा मांडण्यात आली. यावेळी देवीला रथात स्वार करण्यात आले. रथासमोर जुंपलेले घोडे, हातात लगाम चाबूक असा रथ देवी चालवत असलेला हुबेहूब देखावा मांडण्यात आला. रथात स्वार असलेले देवीचे हे चैतन्यदायी रूप सायंकाळी सात वाजेपर्यंत भाविकांसाठी खुले ठेवण्यात आले होते. नवरात्र महोत्सवामध्ये येणाऱ्या ललित पंचमीला अशी पूजा मांडण्यात येत असते. त्यानुसार रविवारी ही पूजा मांडण्यात आली. रथात स्वार झालेले देवीचे रूप पाहण्यासाठी दर्शनासाठी भाविक तुळजापूर नगरीत शनिवारपासून  दाखल झाले होते.

Labels:

पालकमंत्री सोपल यांच्या प्रचाराचा नारळ फुटला

    बार्शी (मल्लिकार्जुन धारूरकर ) बार्शी विधानसभा निवडणुकीच्या रणांगणावर चांगलीच रणधुमाळी सुरु झाली असून शिवसेनेच्या राजेंद्र राऊत यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादीच्या दिलीप सोपल यांनी आगळगाव (ता.बार्शी) येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी सोपल यांनी राऊत यांच्या सभेला चोख उत्तर देऊन प्रचारात आघाडी घेतली.
    यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी भाऊराव लंगोटे गुरुजी, अब्बासभाई शेख, पोपट डमरे, जयंत बुरगुटे, विक्रम सावळे, नंदू पाटील, बंडू गरड, विजय बदाले, नंदू काशीद, रमाकांत माळी यांच्यासह तालुक्यातील राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थित होते.   
    याप्रसंगी बोलतांना पालकमंत्री दिलीप सोपल म्हणाले, १९८५ पासून आपण निवडणुका लढविल्या आहेत परंतु मागच्या सर्व निवडणुकांपेक्षा जास्त उत्साह आज कार्यकर्त्यांमध्ये आहे. आजपर्यंत आगळगाव येथे ज्या सभा झाल्या त्यापैकी रेकॉर्डब्रेक गर्दी यावेळी दिसून आली. त्यांचा उत्साह पाहून आनंद , प्रफुल्लीत होऊन माणसाने माणसावर किती प्रेम करावे यामुळे मन भरुन आले आहे, आपण आयुष्यात येऊन आणखी काय मिळवायचं असे म्हणत प्रचाराचा नारळ फोडून स्टेजवर आल्याबरोबर पालकमंत्री दिलीप सोपल यांनी कार्यकर्त्यांना दंडवत घाताला. विरोधकांना कोणतेही काम मीच केले म्हणायची सवय लागली आहे. आपण केलेल्या कामाचेही श्रेय घेण्यासाठी विरोधकांचा नेहमी आटापिटा सुरु असतो. मतदार हा उमेदवारापेक्षा शहाणा असतो, जागृत मतदार हे सर्व काही पाहत असतात हे विरोधकांना कळत नाही याचे दुर्देव आहे. एक माणूस इतरांना एकदाच फसवू शकतो. वैराग भागातील संतनाथ साखर कारखाना कोणी बंद पाडला या सर्व गोष्टी त्यांना माहीत असल्यानेच आपल्याला यापूर्वी मताधिक्य मिळाले आहे. माणूस मेल्यावर कोणतेही धन सोबत नेता येत नाही हे सतत डोळ्यासमोर ठेवून ३० वर्षापेक्षा जास्त काळ काम केले. तालुक्यातील विकासासाठी ६५० कोटी रुपयांची वीजेच्या कामे सुरु झाली. मी जातीवंत वकिल असल्याने आपल्याकडे त्याचे सर्व पुरावे उपलब्ध आहेत. भिमा - सीना जोड प्रकल्पासाठी आवाज उठवून विधानसभेत केलेल्या भाषणांचेही पुरावे आहेत. विरोधकाला इंजिनिअर, फडणवीस असे उच्चारदेखिल स्पष्टपणे करता येत नाहीत. उजनीवरुन शेतीसाठी पाणी आणतांना बोगद्याची संकल्पना देखिल आपली होती त्याचे इतिवृत्त आपल्याकडे उपलब्ध आहे.

Labels:

राऊत-सोपल यांची प्रचारात आघाडी, मिरगणेंचे घोडे जागीच

    बार्शी (मल्लिकार्जुन धारूरकर ) बार्शी शहरात शिवसेना, भाजपा, कॉंग्रेस, राष्ट्रवादी, अपक्ष व इतरांमध्ये बहुरंगी लढत लागली आहे. शिवसेनेकडून राजेंद्र राऊत, भाजपाकडून राजेंद्र मिरगणे, कॉंग्रेसकडून सुधीर गाढवे, राष्ट्रवादीकडून दिलीप सोपल, अपक्ष व इतर अनेक उमेदवारांनी अर्ज भरले असून बहुरंगी लढतीमध्ये राजकिय वातावरण चांगलेच तापत आहे.
    अनेक वर्षांपासून राजकारणाचा व समाजकारणाचा अनुभव असल्यामुळे शिवसेनेचे माजी आमदार राजेंद्र राऊत आणि पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री दिलीप सोपल यांच्या प्रचाराला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. दोघांनीही आगळगाव (ता.बार्शी) येथील ग्रामदैवत विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरातून प्रचाराचा नारळ फोडून सुरुवात केली. दोन्ही प्रबळ उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र असतांना मिरगणे यांचे घोडे जागेवरच असल्याचे चित्र दिसून येत आहे.   
   
    अपक्ष फार्म भरलेल्या भाऊसाहेब आंधळकर यांनी मागील काही वर्षांच्या काळात पालकमंत्री दिलीप सोपल यांच्याशी असलेला घरोबा तोडून शिवसेनेत प्रवेश करुन वेगळी चूल मांडली. मधल्या काळात शिवसेनेकडे निर्माण झालेली पोकळी भरुन काढतांना अनेक शिवसैनिकांच्या कामकाजाच्या गरजा त्यांना पेलता आल्या नाहीत. त्यांनी त्यांच्या प्रत्येक कार्यात शिवसेनाप्रमुखांचे छायाचित्र, मनापासून शिवसेनेचे काम केले असून प्रचंड महत्वाकांक्षा असली तरी, निवडून येण्यासाठी असलेले कौशल्य, मनुष्यबळ, प्रचंड कामाची शिदोरी कमी पडल्याचे दिसून आले. शिवसेनेतून तिकीट मिळाले नाही तरी शिवसेना पक्षाचे काम करणार तसेच राजाभाऊ राऊत यांना उमेदवारी दिल्यावर प्रचार करणार असल्याचे अनेक जाहीर सभेतून केलेल्या वक्तव्यानंतर तिकीट कट झाल्यावर मात्र त्यांनी अपक्ष फॉर्म भरुन नाराजीचा सूर आवळला आहे. कॉंग्रेस पक्षातून फॉर्म भरलेल्या सुधीर गाढवे यांना तर आपण या तालुक्यातील मतदार आहोत, आपण या गावचे रहिवासी आहोत इथपासून ओळख करुन देण्याची गरज आहे. कोणत्याही सामाजिक कार्यात नसलेल्या नवख्या उमेदवाराला कॉंग्रेस पक्षाने दिलेली उमेदवारीच कॉंग्रेस पक्षाची दयनीय अवस्था दाखवून देते. राजेंद्र राऊत यांनी अगदी तळागाळातील कार्यकर्ता बनून राजकिय कारकिर्दीस सुरुवात नगरसेवक, नगराध्यक्ष, आमदार आदी पदे भूषवून ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपरिषद आदींवर झेंडा रोवला. अनुभवी विरोधक व सर्व सत्तास्थाने त्यांच्याकडे असतांनाही शिवसेनाप्रमुखांच्या आशिर्वादाने कार्यकर्त्यांची फळी उभी करुन सोपलसारख्या तगड्या राजकारणीच्या विरोधात राजकिय मुहूर्तमेढ रोवली. निवडणुकांमध्ये सक्षमपणे विरोध करण्यासाठी दुध डेअरी, खडी क्रशर, पशुखाद्याचा व्यापार, मोटार वाहतूक, पतसंस्था, शुध्द पाणी बाटली आदी व्यवसाय उभे करुन, खाजगी मार्केट कमिटीची उभारणी केली. नगरपालिकेच्या सर्व व्यवहारांवर बारीक लक्ष ठेवत राजकिय विरोधकांना सतत जागेवर आणले. दिलीप सोपल यांची कारकिर्द युवक कॉंग्रेसमधून सुरु झाली. कॉंग्रेसची परंपरा व संपूर्ण महाराष्ट्रात चांगली ताकद असतांना शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली विविध प्रकारचे राजकिय डाव शिकून तयार झालेला पैलवान म्हणून दिलीप सोपल यांचे नाव झाले. विरोधत असलेल्या मातब्बर उमेदवारांना पराभूत करुन वेगवेगळ्या चिन्हावर निवडून येण्याचा इतिहास निर्माण करुन बार्शी तालुक्याला पहिल्यांदाच मंत्रीपदाचा बहुमान मिळवून दिला. उजनी जलाशयावरुन पिण्याचे पाणी आणून महत्वाकांक्षी योजना पूर्ण केल्यानंतर उजनीवरुन शेतीसाठी पाणी बार्शीच्या जवळ आले आहे. सदरच्या शेतीसाठीच्या योजनेच्या पूर्णत्वाकडे नेऊन संपूर्ण तालुक्याचे नंदनवन करण्याचा संकल्प केला आहे. शहरात अनेक प्रकल्पांना मंजूरी देऊन जवळपास १४०० कोटींची कामे सुरु केली आहेत. राजेंद्र मिरगणे यांनी आर.एस.एम. समाजसेवा संस्थेच्या माध्यमातून मागील दोन वर्षांपासून सामाजिक कार्य सुरु केले. नेत्र तपासणी, दुष्काळी भागात टँकरने मोफत पाणी पुरवठा, शेतकर्‍यांना बियाणे वाटप, पोलिस प्रशिक्षण, शेतकरी मार्गदर्शन, जलसंधारण, कच्चे रस्ते, महिला बचत गटांना मार्गदर्शन आदी सामाजिक कार्यातून राजकिय प्रवेश केला आहे. त्यांच्याकडे अद्याप कोणतीही सत्ता नाही. लोकसभेसाठी इच्छुक म्हणून पुढे आल्यानंतर शिवसेनेने तिकीट डावलले, त्यानंतर पुन्हा विधानसभेसाठी तयारी केली यावेळीही अनुभवी असलेल्या राऊत यांना तिकीट मिळाल्यानंतर अपक्ष उभे राहण्याच्या परिस्थितीत असलेल्या मिरगणे यांना महायुती तुटल्याचा फायदा होऊन भाजपाने उमेदवारी दिली. मागील अनेक वर्षांपासून बार्शी तालुक्यात विविध प्रकारचे राजकिय परिवर्तने झाली आहेत. विधानसभेच्या रिंगणात अनेक उमेदवार उभे असले तरी शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र राऊत आणि राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप सोपल यांच्यातच खरी लढत होत असल्याचे चित्र सध्या स्पष्टपणे दिसत आहे.

Labels:

Sunday, 28 September 2014

मतदान केंद्राध्यक्ष आणि अधिका-यांचे प्रशिक्षण

    उस्मानाबाद - जिल्ह्यातील उमरगा, तुळजापूर, उस्मानाबाद आणि परंडा विधानसभा मतदारसंघात संबंधित जमतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान केंद्राध्यक्ष आणि अधिकारी यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.
    उस्मानाबाद येथे श्रीपतराव भोसले हायस्कूल येथे मतदान केंद्राध्यक्ष आणि अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.  निवडणूक निर्णय अधिकारी अभिमन्यू बोधवड यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सुभाष काकडे, तहसीलदार वैशाली पाटील, नायब तहसीलदार राजेश जाधव यांनी मार्गदर्शन केले.
    मतदानावेळी घ्यावयाची काळजी आदींबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.
भूम येथेही निवडणूक निर्णय अधिकारी संतोष राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण सत्र संपन्न झाले. तुळजापूर येथे निवडणूक निर्णय अधिकारी बी.एस. घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण सत्र झाले. उमरगा विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्राध्यक्ष आणि अधिकारी यांच्यासाठीही प्रशिक्षण सत्राचे आयोजन निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.

Labels:

परंडा विधानसभा मतदारसंघाचा जिल्‍हाधिकारीकडून आढावा

 उस्मानाबाद - जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी भूम येथे जाऊन परंडा विधानसभा मतदारसंघातील निवडणूक तयारीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी विविध कक्षांना भेटी देऊन पाहणी केली.
यावेळी त्यांनी व्हीडिओ पाहणी पथक,  निवडणूक साहित्य विभाग, खर्च विभागाचे शॅडो रजिस्टर आदींची तपासणी केली. यावेळी परंडा विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संतोष राऊत त्यांच्यासमवेत होते.  निवडणुक विषयक कामे गांभीर्याने घ्या. कोणत्याही प्रकारे कामात हलगर्जीपणा करु नका तसेच भारत निवडणूक आयोगाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांनुसार काम करा, असे त्यांनी सुनावले.

Labels:

उस्‍मरानाबाद - विद्यार्थ्‍यांची राज्‍यस्‍तरीय स्‍पर्धेसाठी निवड

उस्‍मानाबाद - नुकत्‍याच लातूर येथे झालेल्‍या विभागीय कराटे स्‍पर्धा आयोजित करण्‍यात आल्‍या होत्‍या. त्‍या स्‍पर्धेमध्‍ये कुडो असोसिएशन उस्‍मानाबादच्‍या वतीने आपसिंगा व कामठा ता. तुळजापूर येथील विद्यार्थ्‍यांनी सहभाग घेतला होता. यामध्‍ये या विद्यार्थ्‍यांना गोल्‍ड मेडल व एका विद्यार्थ्‍याला सिल्‍वर असे एकुण चार मेडल मिळालेले आहेत. यामध्‍ये गुजाल्‍ला अल्‍लाऊद्दीन फकीर व प्रियंका सुरेश रोकडे यांना गोल्‍ड मेडल हे दोन्‍ही नरेंद्र आर्य विद्यालय, आपसिंगा येथील विद्यार्थी आहेत. तर विजय काशिनाथ रोकडे याला गोल्‍ड मेडल हे कै. साहेबराव हंगरगेकर महाविद्यालय तुळजापूर येथील विद्यार्थी आहेत. तर शंभूनाना काशिनाथ रोकडे यास सिल्‍वर मेडल मिळाले आहे. तो छत्रपती शिवाजी ज्‍यु सायन्‍स कॉलेज उस्‍मानाबादचा विद्यार्थी आहे. व या सर्व विद्यार्थ्‍यांची राज्‍यस्‍तरीय स्‍पर्धेसाठी निवड झालेली  आहे. यशस्‍वी   विद्यार्थ्‍याचे सर्वत्र आभिनंदन होत आहे. प्रशिक्षक तथा कुडो असोसिएशनचे जिल्‍हाध्‍यक्ष इब्राहिम (मास्‍टर) शेख यांचे या विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन लाभले. 

Labels:

विषारी किटकनाशक प्राशन करून युवकाची आत्‍महत्‍या

जळकोट - होर्टी (ता.तुळजापूर) येथील  एका तरूणाने स्‍वत:च्‍या शेतात  शनिवार रोजी रात्री सोयाबिन पिकावर फवारले जाणारे किटकनाशक पिऊन आत्‍महात्‍या केल्‍याची घटना घडली.
      मंगेश माणिक भोसले (वय 32 )रा.होर्टी ता. तुळजापूर असे आत्‍महत्‍या केलेल्‍या युवकाचे नाव आहे. 27 सप्‍टेंबर रोजी रात्री 8 वाजण्‍याच्‍या सुमारास स्‍वत:च्‍या शेतात सोयाबिन पिकावरील किडनियंत्रणासाठी फवारण्‍यात येणारे विषारी किटकनाशक प्राशन करून  आत्‍महत्‍या केली. त्‍यास प्राथमिक उपचारासाठी नळदुर्ग येथील प्राथमिक आरोग्‍य केंद्रात दाखल करण्‍यात आले होते. तेथे उपचार चालू असतानाच मयत झाल्‍याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कोळेकर यांनी नळदुर्ग पोलिसात खबर दिली.त्‍यावरून  पोलिस नाईक पोपलायत. हावालदार .कुलकर्णी ए.बी. यांनी पंचनामा करून याची नोंद पोलिसात झाली आहे.  सदर मयताचे शवविच्‍छेदन नळदुर्ग प्राथमिक आरोग्‍य केंद्रात सुविधा नसल्‍याने जळकोट ता.तुळजापूर येथील आरोग्‍य केंद्रात नळदुर्गचे वैद्यकीय अधिकारी कोळेकर यांनी उत्‍तरीय तपासणी करून प्रेत नातेवाईकांच्‍या ताब्‍यात दिले.

Labels:

नवरात्र महोत्‍सवास उत्‍सहास प्रारंभ

नळदुर्ग - नवरात्र महोत्‍सवा निमित्‍त नळदुर्ग शहरात पाच देवीच्‍या मुर्तीची प्रतिष्‍ठापना करण्‍यात आली. तर प्राचीन अंबाबाई मंदिरातही नवरात्र महोत्‍सव मोठया उत्‍सहात विविध कार्यक्रमाने  साजरा होत आहे. यावेळी करण्‍यात आलेल्‍या आकर्षक विद्युत रोषणाईने शहरातील मुख्‍य रस्‍ते उजळून गेले आहे.
    नळदुर्ग येथे दि. 25 सप्‍टेंबर ते 3 ऑक्‍टोबर या कालावधीत मोठया भक्‍तीभवाने  नवरात्र साजरा करण्‍यात येत आहे .  नवरात्र महोत्‍सवा निमित्‍त शहातील शिवशाही तरूण मंडळ, जय भवानी तरूण मंडळ, इंदिरा नगर जय हिंद तरूण गणेश मंडळ व्‍यासनगर, सुंदरा देवी नवरात्र महोत्‍सव ब्राम्‍हण गल्‍ली या पाच ठिकाणी देवीच्‍या मुर्तीची प्रतिष्‍ठापना करण्‍यात आली आहे. त्‍याचबरोबर येथील प्राचीन अंबाबाई मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्‍यात आली आहे. शहरात प्रतिष्‍ठापन करण्‍यात आलेल्‍या देवीच्‍या मुर्तीचे दर्शन घेण्‍यासाठी भविक मोठया प्रमाणात गर्दी करीत आहेत. शिवशाही तरूण मंडळाच्‍या देवीसमोर दररोज रात्री 8 वाजता वा. महा आरती करण्‍यात येते. यावेळी भाविक उपस्थित रा‍हतात.



Labels:

तुळजापूर - 28 उमेदवारांचे 48 नामनिर्देशनपत्र दाखल

    उस्मानाबाद -- विधानसभा निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर अखेरच्या  दिवशी 241-तुळजापूर विधानसभा निवडणुकीसाठी  28 उमेदवारांनी 48 नामनिर्देशनपत्र दाखल केल्याचे निवडणूक यंत्रणेने कळविले आहे. 
     तुळजापूर विधानसभा मतदार संघात रेणूके संजय सुरेश (अपक्ष), किरण जाधव         (अपक्ष), राहूल नागनाथ जवान (हिंदुस्थान जनता पार्टी), अजय नागनाथ जवान (हिंदुस्थान जनता पार्टी), पाटील सुधीर केशवराव  (  शिवसेना ),  महानंदा गजानन पैलवान -2 (भारतीय जनता पार्टी/ अपक्ष), चांदणे पिंटू पांडूरंग -2 (अपक्ष), गणेश रामचंद्र सोनटक्‌के -2                  (शिवसेना/अपक्ष),   वर्षा संजय निंबाळकर -4 ( भारतीय जनता पार्टी ), ‍निंबाळकर संजय प्रकाश -2 ( भारतीय जनता पार्टी), पवार बालाजी प्रभाकर ( अपक्ष), पाटील  प्रेमा सुधीर           (शिवसेना),  कोकाटे  गोविंद विश्वनाथ -2 ( अपक्ष/ भारतीय जनता पार्टी), राठोड संतोष लिंबाजी ( अपक्ष),  देवानंद साहेबराव रोचकरी-2 ( पी. ॲड डब्लू पार्टी/ महाराष्ट्र नवनिर्माण सेना ), गोरे जीवनराव विश्वनाथराव -4 ( अपक्ष-1 /3- नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी ) , गोरे सुचेता जीवनराव -2 (अपक्ष/ नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी ), सुरवसे सत्यवान नागनाथ-2 ( भारतीय जनता पार्टी/अपक्ष), डोमलिकर  प्रेमानंद बळवंतराव -2 ( बहुजन समाज पार्टी), रामेश्वर धोंडिबा शेटे -4(अपक्ष/ जनस्वराज्य शक्ती /  शिवसेना/ बहुजन समाज पार्टी), कृष्णा देवानंद रोचकरी       (पी. ॲड डब्लू पार्टी ), खतीब तनवीरअल्ली सय्यदअली (अपक्ष), धुरगुडे महेंद्र भानुदास          (अपक्ष), संतोष ज्ञानोबा कंदले ( बहुजन समाज पार्टी), देवकुळे कानीफनाथ दुल्ला -2 (अपक्ष), विजय सुधाकर   ‍शिंगाडे-2 ( बहुजन समाज पार्टी/ अपक्ष),  रमेश राजाराम निंबाळकर (अपक्ष), आणि लोंढे मोहन वृशाल (अपक्ष) असे एकूण 28 उमेदवारांनी 48 नामाकंनपत्र दाखल करण्यात आले आहे.

Labels:

उस्मानाबाद - 24 उमेदवारांचे 36 नामनिर्देशनपत्र दाखल

 
             उस्मानाबाद, दि.27- विधानसभा निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील 242-उस्मानाबाद विधानसभा निवडणुकीसाठी  आज उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात 24 उमेदवारांचे 36 नाम निर्देशनपत्र दाखल केल्याचे निवडणूक यंत्रणेने कळविले आहे. 
     उस्मानाबाद विधानसभा मतदार संघात अर्चना राणाजगजितसिंह पाटील-2(नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी /अपक्ष), राणाजगजितसिंह  पद्मसिंह पाटील-2 (नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी /अपक्ष), पाटील धनंजय मुरलीधर (हिंदुस्थान निर्माण दल), वाघमारे संजयकुमार भागवत ( बहुजन समाज पार्टी), अनिल उत्तमराव  हजारे (  रिपब्लीक सेना), वाजेद सलीम शेख (अपक्ष), हाजी भाई हन्नुरे ( अपक्ष), डॉ.रमेश सुब्बराव बनसोडे (रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया),  पांडूरंग गणपतराव भोसले ( अपक्ष), शिंदे विश्वास जगदेवराव -4 ( भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस (आय)), प्रदीप पी.सिद्राम जाधव (अपक्ष),  चव्हाण बाबु विठ्ठोबा (हिंदुस्थान जनता पार्टी), टेकाळे ‍किरण ‍दिगंबर (अपक्ष), यादव संजयकुमार आत्माराम (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), उमेश  भिवाजी  भालेराव ( बहुजन मुक्ती पार्टी ), दुधगावकर पाटील संजय त्रंबकराव -4( भारतीय जनता पार्टी), पठाण अकबरखान गुलाबखान -2 ( ऑल इंडिया मजलीस ए. इत्तेहादूल मुस्लीमीन ),  शिवाजी दिंगबर उर्फे  पांडूरंग कापसे-2 ( भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस/ अपक्ष), समीर रसीद  सय्यद ( ऑल इंडिया मजलीस ए. इत्तेहादूल मुस्लीमीन ), गायकवाड मधुकर रामलिंग  ( आंबेडकर राईट पार्टी   ऑफ  इंडिया), अनंत जगन्नाथ चोंदे ( भारतीय शेतकरी कामगार पक्ष), दुधगावकर पाटील चारुशिला संजय -2( भारतीय जनता पार्टी), चांदणे पिंटू  पांडूरंग (अपक्ष),‍‍‍‍स्मिता अभय शहापूरकर -2 ( भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस आय / अपक्ष) असे एकूण 36 नामाकंनपत्र दाखल करण्यात आले आहे.

Labels:

‌केंद्रीय निवडणूक निरीक्षक मिश्रा व सिंग यांचे आगमन

    उस्मानाबाद - उमरगा (अ.जा.) आणि 241- तुळजापूर या मतदारसंघासाठी भारत निवडणूक आयोगाचे निरीक्षक म्हणून डी. के. मिश्रा आणि 242-उस्मानाबाद आणि 243-परंडा विधानसभा मतदार संघासाठी भारत निवडणूक आयोगाचे सर्वसाधारण निरीक्षक म्हणून श्री. विजय बहादूर सिंग यांचे आज जिल्ह्यात आगमन झाले.
श्री. मिश्रा हे तुळजापूर येथील सर्किट हाऊस येथे थांबणार आहेत तर श्री. सिंग हे उस्मानाबाद येथील शिंगोली सर्किट हाऊस येथे थांबणार आहेत.
    जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अभिमन्यू बोधवड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रभोदय मुळे, तहसीलदार सुभाष काकडे  आदी उपस्थित होते.
    उस्मानाबाद आणि परंडा विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक श्री. सिंग हे शिंगोली सर्किट हाऊस येथील वेरुळ कक्षात थांबणार आहेत. नागरिकांसाठी त्यांचा संपर्क क्रमांक 02472-229572 असा असून त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9420910968 असा आहे.
    श्री. सिंग हे उत्तर प्रदेश प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी असून श्री. मिश्रा हे पुडुचेरी प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी आहेत.

Labels:

निवडणुक व नवरात्रोत्‍सवात कडक सुरक्षा व्‍यवस्‍था

  नळदुर्ग – विधानसभा निवडणूक शांततेत पार पडावे व जनतेनी  नवरात्र महोत्‍सव उत्‍साहाने साजरा करावा , याकरीता कायदा व सुव्‍यवस्‍था  अबाधीत रहावे, याकरीता  पोलिसांनी  खबरदारीचे आवश्‍यक ते उपाय योजना केली आहे . त्‍यांचाच एक भाग म्‍हणुन विविध कलमांतर्गत 189 लोकांवर प्रतिबंधात्‍म कारवाई केली आहे. त्‍याचबरोबर कोणते‍ही बेवारस वस्‍तू किंवा संशयित व्‍यक्‍ती आढळून आल्‍यास भाविक, नागरिकांनी तात्‍काळ नळदुर्ग पोलीसांशी संपर्क साधण्‍याचे अवाहन नळदुर्ग पोलिस ठाण्‍याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एम.वाय. डांगे यांनी केले.
   विधानसभा निवडणूक व नवरात्र महोत्‍सव शांततेत पार पाडण्‍यासाठी नळदुर्ग पोलिसानी सर्वतोपरी तयारी केली आहे. विधानसभा निवडणूक व नवरात्र महोत्‍सवाच्‍या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी गुन्‍हेगार प्रवृत्‍तीच्‍या जवळपास 189 लोकांवर विविध कलमान्‍वये प्रतिबंधात्‍मक कारवाई केली आहे. यामध्‍ये फौजदारी प्रक्रिया संहितेतील विविध कलमान्‍वये 189 लोकांना नोटीसा बजावण्‍यात आल्‍या आहेत. पायी चालत जाणा-या लोकांच्‍या सुरक्षिततेसाठी 24 तास नळदुर्ग – तुळजापूर या मार्गावर पोलिसांची गस्‍त  सुरू करण्‍यात आाली आहे. यासाठी पाच पथकांची नेमणूक करण्‍यात आली आहे. भाविक किंवा नागरिकांना कोणतीही बेवारस वस्‍तू ,ज्‍यामध्‍ये बॅग, खेळणी, टेपरेकॉर्डर, रेडिओ, इलेक्‍ट्रानिक साहित्य आढळल्‍यास  किंवा एखादी संशयित व्‍यक्‍ती आढळून आल्‍यस तात्‍काळ पोलिसाशी  संपर्क साधण्‍याचे अवाहन सपोनि. डांगे यांनी केले आहे.
 पावसामुळे नळदुर्ग जवळील सर्व तलाव आणि डॅममध्‍ये पाणी भरलेले आहे. आणि विहिरी तुडूंब भरल्‍या आहेत. त्‍यामुळे भाविकांनी स्‍नान करण्‍यासाठी काठावरच पाणी घ्‍यावे, अन्‍यथा अनर्थ होण्‍याची शक्‍यता नाकारता येणार नाही. सिमकार्ड विक्रेत्‍यांनी सिमकार्ड विकताना त्‍यांचे नाव पत्‍याबाबात तसेच कागदपत्रांची खात्री झाल्‍यानंतरच सिमकार्डाची विक्री करावी, घरमालक किंवा दुकानमालक यांनी आपले घर आणि दुकान भाडयाने देताना अनोळखी परराज्‍यातील भाडेकरूंबाबत विशेष दक्षता बागळगून ,त्‍याची माहिती, नाव पत्‍ता व फोटो पोलिस ठाण्‍यात द्यावे, असे अवाहनाही करण्‍यात आले आहे. 

Labels:

तुळजापूरात पंचरंगी लढत रंगणार ?

तुळजापूर - तुळजापूर विधानसभा मतदार संघ अनेक राजकीय घडामोडीने गाजत आहे.  काहींनी उमेदवारी जाहीर झाली म्‍हणून फटाके फोडले तर काहींनी उमेदवारी मिळणार हे निश्चित समजून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र या सर्वांचा मोठा आपेक्षा भंग झाला आहे. या मंडळींना उमेदवारी मिळालीच नाही. कॉंग्रेस व मनसेच वगळता, भाजप शिवसेना व राष्‍ट्रवादी कॉंग्रेसने या मतदार संघात स्‍थानिकांना उमेदवारी न देता मतदार संघाबाहेरील मंडळींना उमेदवारी देऊन स्‍थानिकांवर मोठा अन्‍याय केला आहे. दरम्‍यानयेथे पंचरंगी निवडणुक होत असली तरी ख-या अर्थाने दुरंगी लढत रंगणार असल्‍याचे बोलले जात आहे. 
   राष्‍ट्रवादी कॉंग्रेसने जीवनराव गोरे शिवसेनेने सुधिर पाटील व भाजपाने संजय निंबाळकर, यांना उमेदवारी दिली आहे. वास्‍तविक पाहता या तिनही उमेदवारांचा या मतदार संघाशी कुठलाच संबंध नाही की त्‍यांचे या मतदार संघात कुठलेच कार्य देखील नाही. अशांना या तीन प्रमुख पक्षांनी उमेदवारी दिली हे समजत नाही. तुळजापूर विधानसभा मतदार संघात लादण्‍यात आलेल्‍या या गेटकेन उमेदवारावर त्‍या त्‍या पक्षातील कार्यकर्ते मोठया प्रमाणात नाराज असल्‍याचे दिसून येत आहे. याचा मोठा फटका निवडणूकीत त्‍यांना बसणार असल्‍याचे दिसते. या गेटकेन उमेदवारामुळे या मतदार संघातील कॉंग्रेसचे उमेदवार पालकमंत्री मधुकरराव चव्‍हाण यांच्‍या विजयाचा मार्ग सुखकर होत चालला आहे. 26 सप्‍टेंबर रोजी विराट शक्‍तीप्रदर्शन करीत ना. चव्‍हाण यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्‍यापूर्वी काढण्‍यात आलेल्‍या पदयात्रेत हजारो कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते. त्‍यामुळे हा मतदार संघ कॉंग्रेसचा बालेकिल्‍ला असल्‍याचे पुन्‍हा एकदा दिसून आले. ना. मधुकरराव चव्‍हाण यांच्‍या विजयासाठी या मतदार संघासह संपूर्ण जिल्‍हयातील कॉंग्रेस एकदिलाने परिश्रम घेत आहे. इतर पक्षातील फरक दिसून येतो. या मतदार संघात आणखी एक नाटयमय राजकीय घटना घडली. या मतदार संघातून प्रारंभी मनसेची उमेदवारी तुळजापूर येथील मनसेचे जिल्‍हा सचिव अमरराजे परमेश्‍वर यांना जाहीर झाली होती मात्र त्‍यानंतर अचानक मनसेची उमेदवारी देवानंद रोचकरी यांना जाहीर करण्‍यात आली. त्‍यामुळे ही विधानसभा निवडणूक देवानंद रोचकरी हे मनसेकडून लढविणार आहेत. रोचकरी यांना मनसेची उमेदवारी मिळाल्‍याने मनसे कार्यकर्त्‍यांमध्‍ये उत्‍साहाचे वातावरण पसरले आहे. मात्र विधानसभा निवडणूकीत या मतदार संघात मनसेचे अवाहन उभे करण्‍यासाठी मनसे कार्यकर्त्‍यांना मोठे परिश्रम घ्‍यावे लागणार आहेत. कारण या मतदार संघात मनसेची राजकीय ताकद अतिशय नगन्‍य समजली जात आहे. मनसेची जामेची बाजू म्‍हणजे देवानंद रोचकरी यांना उमेदवारी मिळाल्‍याची होय. त्‍यामुळे पुन्‍हा एकदा या मतदार संघात आता पुर्वीप्रमाणे कॉंग्रेसचे ना. मधुकरराव चव्‍हाण व मनसेच देवानंद रोचकरी यांच्‍यात चुरशीची लढत होण्‍याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

Labels:

Saturday, 27 September 2014

उमरगा विधानसभा 17 उमेदवारांचे 24नामनिर्देशनपत्र दाखल

  
       उस्मानाबाद - विधानसभा निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील उमरगा विधानसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी  अखेरच्या दिवशी  147 अर्जांची विक्री झाली मात्र केवळ  17 उमेदवारांनी 24 नामनिर्देशनपत्र दाखल केल्याचे निवडणूक यंत्रणेने  कळविले आहे. 
     उमरगा विधानसभा मतदार संघात चौगुले ज्ञानराज धोंडीराम  (शिवसेना), तेलंग  दिलीप साहेबराव-2 (राष्ट्रवादी कॉग्रेस/अपक्ष), शिंदे कैलास चिंतामणराव (भारतीय जनता पार्टीचे -2),कांबळे प्रज्ञावर्धन भगवान  (नवबहुजन समाज परिवर्तन पार्टी ), गायकवाड संजय आत्माराम -2 (राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी), गायकवाड तानाजी वैजनाथ-2  ( बहुजन समाज पार्टी ), वाघमारे विद्या आबाराव (रिपब्लीकेशन पार्टी ऑफ इंडिया), सुर्यवंशी सुनिल वामनराव (अपक्ष), कांबळे किसन नागनाथ-2 (भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस), सरवदे रावसाहेब श्रीरंग (अपक्ष),क्षिरसागर विजय मारुती-2 (मनसे),  क्षिरसागर ईश्वर मल्लारी (अपक्ष), सरवदे सतिश ज्ञानोबा-2 (अपक्ष/ मनसे), कोनाळे बालाजी एकनाथ (अपक्ष), दत्ता लक्ष्मण गायकवाड (बहुजन समाज पार्टी), कांबळे लक्ष्मण तुकाराम (अपक्ष) आणि सचिन  जयहिंद देडे (राष्ट्रवादी कॉग्रेस) अशा  एकूण 17 उमेदवारांनी 24 नामांकनपत्र दाखल केले आहेत.

Labels:

उस्‍मानाबाद- कळंबमधुन कॉग्रेसचे शिंदे यांची उमेदवारी दाखल

उस्‍मानाबाद - उस्‍मानाबाद - कळंब विधानसभा मतदार संघातुन कॉग्रेसचे उमेदवार विश्‍वास अप्‍पा शिंदे यानी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला . यावेळी जिल्‍हा बॅकेचे संचालक नारायण समुद्रे,  वसंतदादा बँकेचे अध्‍यक्ष विजय दंडनाईक , जि. प. उपाध्‍यक्ष सुधाकर गुंड, युवक कॉग्रेसचे माजी अध्‍यक्ष आप्‍पासाहेब शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती. 
  यावेळी प्रदिप सस्‍ते, अशोक भातलवंडे, दिलीप करंजकर,कळंब तालुकाध्‍यक्ष संजय घोगरे,  लक्ष्‍मण सरडे, माजी नगराध्‍यक्ष भाऊसाहेब उंबरे, विजय मुद्दे, नगरसेवक नादेर उल्‍ला हुसेनी, सय्यद खलिल,मुनीर कुरेशी, नानासाहेब निंबाळकर, चंद्रकांत बागल, मराठा महासंघाचे जिल्‍हाध्‍यक्ष प्रकाश जगताप, कळंब कॉग्रेसचे नेते दिलीपसिंह देशमुख, दौलत माने, अॅड त्र्यंबक मनगिरे, पांडूरंग घोंगडे, रूपामाता बँकेचे अध्‍यक्ष अॅड व्‍यंकट गुंड, जिल्‍हा उपाध्‍यक्ष बाळासाहेब शिंदे, युवक कॉंग्रेसचे अॅड जावेद काझी, विनोद वीर, उमेश राजेनिंबाळकर, ओबीसी प्रवेश विभागचे उपाध्‍यक्ष युवराज नळे,  नितीन बागल,  सिध्‍दार्थ बनसोडे, महिला कॉग्रेसच्‍या स्मिता शहापूरकर, गोदावरी केंद्रे,  समीयोद्दीन, मशाक, महेबुब शेख, बालाजी साळुंके, सुरेश शेरखाने, धनंजय राऊत, नितीन शेरखाने, उस्‍मान कुरेशी, प्रल्‍हाद मुंडे, सय्यद इक्‍बाल हुसेन, गणेश सापते, श्रीकांत भुतेकर, बाळासाहे्ब मुंडे, संभाजी गुंडरे, गणपतराव चव्‍हाण, नवनाथ डांगे, यांच्‍यासह  कार्यकर्ते उपस्थित होते.

Labels:

तुळजापूरसाठी शिवसेनेकडुन सुधीर पाटील याचा अर्ज दाखल

तुळजापूर - तुळजापूर विधानसभा मतदार संघातून सुधीर केशवराव पाटील यांनी शिवसेना पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केले असुन. यावेळी, जिल्‍हा संघटक  विमल वडणे, उपजिल्‍हा प्रमुख कमलाकर चव्‍हाण, तालुका प्रमुख दिलीप जावळे, तुळजापूर तालुका प्रमुख पठाण राजअहमद, तुळजापूर शहर प्रमुख सुधीर कदम, जि.प. सदस्‍या सुषमा देशमुख, बाळकृष्‍ण घोडके, सुनिल जाधव, मगर प्रदिप, भोसले संजिव, मोरे कृष्‍णा, मुरलीधर शिनगारे, ठाकूर सरदारसिंग, नळदुर्ग शहर प्रमुख पुदाले संतोष, यांच्‍यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Labels:

परंडा - 155 उमेदवारी अर्जांची विक्री, तर आज 17 उमेदवारांचे 25 नामनिर्देशनपत्र दाखल

   उस्मानाबाद - विधानसभा निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील 243-परंडा विधानसभा निवडणुकीसाठी एकूण 155 अर्जांची विक्री झाली तर आज परंडा विधानसभा मतदारसंघात 25 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केल्याचे निवडणूक यंत्रणेने  कळविले आहे. 
     परंडा विधानसभा मतदार संघात मोटे राहूल महारुद्र- 2 (नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी / अपक्ष), मोटे वैशाली राहूल-2 (नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी / अपक्ष), पाटील ज्ञानेश्वर रावसाहेब-2        (शिवसेना/ अपक्ष),  कुकडे राजगुरु ‍त्रिंबकराव-2 (भारतीय शेतकरी कामगार पक्ष/ ‍हिंदुस्थान जनता पार्टी),‍ अहिरे प्रबुध्द साहेबराव-2 (बहुजन समाज पार्टी/हिंदुस्थान जनता पार्टी), मुलाणी अमीर छगन (अपक्ष), गणेश दत्तात्रय शेंडगे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), चौधरी नुरोद्दीन  म. युनुस म. इद्रिस-3 (भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस -आय),  हावरे अ.करीम.म.युसूफ (अपक्ष), सुर्यकांत चंद्रकांत कांबळे (अपक्ष), अमेय बाळासाहेब पाटील (राष्ट्रीय समाज पक्ष), शिंदे संभाजी नानासाहेब (अपक्ष), खैरे कमलाकर रामलिंग-2 (लोकजनशक्ती पार्टी/ अपक्ष), बाळासाहेब भगवंतराव पाटील (राष्ट्रीय समाज पक्ष),  विलास ‍मल्लीकार्जून वायकुळे (अपक्ष), भोरे गोरख चांगदेव (अपक्ष) आणि  पडघन नानासाहेब ज्ञानदेव (अपक्ष) अशा 17 उमेदवारांनी   एकूण 25 नामांकनपत्र दाखल करण्यात आले आहेत.

Labels:

शेतकरी गट स्थापनेचे उद्दिष्ट्य पूर्ण करा-डॉ. नारनवरे

     उस्मानाबाद -  शेतक-याचे आयुष्य बदलण्यात कृषी सहायकांचे योगदान महत्वाचे आहे. शेतकरी गट स्थापनेचे महत्व शेतकऱ्यांना पटवून द्या आणि येत्या 10 दिवसात ते उद्दिष्य पूर्ण करा, असे निर्देश जिल्हाधिकारी  डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिले. येथील जिल्हा  परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित शेतकरी गटस्थापना आढावा बैठकीत ते बोलत होते. 
    यावेळी ‍अतिरिक्त जिल्हाधिकारी जे. टी. पाटील, आत्माचे प्रकल्प संचालक व्ही. डी. लोखंडे, उपसंचालक एस. आर. चोले, कृषी विभागाचे उपविभागीय  कृषी अधिकारी व्ही. बी. बिरादार, आर. टी. जाधव, तालुका कृषि अधिकारी, मंडळ अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, सहायक तंत्रज्ञ आदी उपस्थीत होते. 
    डॉ. नारनवरे पुढे म्हणाले की, उमरगा तालुक्यातील कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. त्या तालुक्याचा आदर्श इतर तालुक्याने घेवून कार्य करावे, उत्कृष्ट कार्य केलेल्यांचा राज्यस्तरावर सत्कार करुन त्यांना ग्रीनकार्ड देण्यात येईल.‍शिवाय  एक वेतनवाढ देण्यात येईल, पण  जे कर्मचारी कामात हलगर्जीपणा, कामचूकारपणा  करतील, अशाविरुध्द कठोर कार्यवाही करण्याचा इशारा त्यांनी दिला.  
    डॉ. नारनवरे मार्गदर्शन करताना म्हणाले की, कृषी क्षेत्रात तरुण महिला कृषी सेवक, सहायकांनी आपल्या कार्याची चुणूक  दाखविली आहे. तेव्हा इतर कर्मचाऱ्यांनी  आपणावर सोपविलेले  काम जबाबदारीने उत्तमरीत्या वेळेत पूर्ण करण्यात यावीत. शेतकरी गटस्थापनेचे काम भूम, परंडा, वाशी, कळंब या तालुक्याचे  काम असमाधानकारक केल्याने त्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली.      यावेळी जिल्हाधिकारी  डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते उत्कृष्ट कार्य केलेल्या  कृषी सहायक, कर्मचाऱ्यांचे सत्कार करण्यात आला.  *



Labels:

मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा -‍जिल्हाधिकारी

     उस्मानाबाद - विधानसभा निवडणूक-2014 मध्ये मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी निवडणूक यंत्रणा आणि शासनाच्या विविध विभागांमार्फत प्रयत्न करण्यात येतच आहेत. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्वीप कार्यक्रम राबविला जात आहे. शनिवारी येथील जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात कृषी विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मतदान करण्याची तसेच इतरांमध्ये त्याबाबतची जनजागृती करण्याची शपथ घेतली.
    मतदनाचा लोकशाहीने मार्गाने दिलेला अधिकार प्रत्येकाना बजावावा यासासाठी मतदारात जनजागृती होणे आवश्यक आहे, यासाठी सर्वांनी मतदान जागृतीसाठी उपक्रमाची व्यापकता वाढणे आवश्यक   असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी  डॉ. प्रशांत नारनवरे यांनी शेतकरी गटस्थापनासंदर्भात आढावा बैठक कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांची केले.
    जिल्हाधिकारी डॉ.     नारनवरे यांच्या प्रमुख उपस्थित अप्पर जिल्हाधिकारी जे. टी. पाटील यांनी सर्व  अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणूक आयोगाकडून प्राप्त शपथपत्राचे वाचन करुन सर्वांना मतदान करण्या विषयी शपथ दिल्यानंतर कार्यक्रमाची सांगता  झाली.    

Labels:

मतदार जन जागृतीसाठी अनोखा उपक्रम

वैराग (महेश पन्‍हाळे ) शासनाच्या वतीने मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी विविध उपक्रमाद्वारे मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे .या मोहिमेला हातभार म्हणून वैराग च्या ओम महा ई सेवा केंद्रामार्फत राबवण्यात येणाया जातीच्या प्रतिज्ञापत्रावर मतदान जागृतीचा संदेश देवून अभिनव उपक्रम राबिवला जात आहे
    बार्शी मतदार संघातचं नव्हे  तर सगळीकडे लोकसभा असो वा  विधानसभा मतदानाची टक्केवारी हि ५० ते ६० टक्के पर्यंतच असते त्यामुळे मतदारांचे मतदानाकडे होत चाललेले दुर्लक्ष लक्षात घेऊन शासनाने मतदान टक्केवारी वाढावी यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरे केले आहेत.त्यांच्या या प्रयत्नांना हातभार लावण्याचे काम वैरागच्या ओम महा ई सेवा केंद्र करत आहे. याआधी लोकसभेलाही त्यांनी अशाच प्रकारचा उपक्रम राबिवला होता. आता यावेळेस    जातीच्या प्रतिज्ञापत्रावरच त्यांनी
“लोकशाहीची मुल्ये जपण्यासाठी निर्भिड आणि निर्भयपणे मतदान करा..” 
 “ मताला किंमत नाही घेणार/ मतदान मात्र जरूर करणार .”
“ मतदानाचा हक्क बजावा ”
असे संदेश देणारे बोध वाक्य टाकली असून आता चालू असलेल्या मतदार याद्यात युवक मतदारांची संख्या जास्त असल्याने लक्षात घेऊन ते युवक जेव्हा जातीचे दाखले काढण्यासाठी महा ई सेवा केंद्राकडे येतात तेव्हा प्रतिज्ञापत्राचा फॉर्म भरत असताना त्यांचे मतदान जागृती साठी टाकलेल्या बोध वाक्याकडे लक्ष वेधत आहे व त्यांच्या  मनात मतदान करण्याची उत्सुकता निर्माण होत आहे यामुळे  लोकशाही बळकट होण्यासाठी याचा फायदा होणार आहे.
    सदरच्या उपक्रमाचे बार्शीचे तहसीलदार बालाजी सोमवंशी , निवासी नायब तहसीलदार उत्तम पवार , यांनी कौतुक  केले असून अशा प्रकारचे उपक्रम सर्वांनी राबवण्याचे आवाहन त्यांच्या कडून होत आहे.

Labels:

तुळजापूरसाठी राष्‍ट्रवादीकडून जीवानराव गोरे

तुळजापूर - तुळजापूर  विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीची उमेदवारी एस.टी.महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांना देण्‍यात आली आहे . त्यांनी शनिवारी रोजी  आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.त्यानंतर यावेळी सभाही झाली.यावेळी राष्ट्रवादीचे माजी मंत्री राणा जगजितसिंह पाटील,नरेंद्र बोरगावकर,गोकुळ शिंदे,अॅड.दीपक आलूरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते..

Labels:

स्वकाम सेवा मंडळाच्‍यावतीने श्री तुळजाभवानी मंदिरात स्‍वछता

तुळजापूर - प्रतीवर्षाप्रमाणे यावर्षीही  स्वकाम सेवा मंडळाच्‍यावतीने  श्री तुळजाभवानी मंदिरात  विनामोबदला सेवा रुजू करण्यात येते. यावर्षी दि. 25 सप्‍टेंबर म्‍हणजेच घटस्थापनेपासून 60 स्वयंसेवक सेवा करत असून त्यात 29 महिला स्वयंसेवक आहेत. संपूर्ण मंदिर व मंदिर परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम मंडळातर्फे करण्यात येते. दोन रुग्णवाहिका भाविकांच्या सेवेसाठी उपलब्ध करण्यात येतात.  महाराष्ट्रातील अनेक तीर्थ स्थळांच्या ठिकाणी सेवा रुजू करण्यात येते. या संस्थेत 1200 स्वयंसेवक असून 400 महिला स्वयं
  संस्थेचे अध्यक्ष सुनील तापकीर, व संस्थापक डॉ. सारंग जोशी आहेत.तुळजापूर येथे सेवेसाठी आलेले सदस्य आशा तापकीर, सुनंदा चव्हाण, उर्मिला बोराटे, कांताबाई हातेकर, दमयंती घीगे, सविता ताम्हाणे, बायडा कड, धनाजी गावडे, राजू सस्ते, पंडित आल्हाट, संदीप बर्गे, तुकाराम घीगे व इतर दिसत आहेत.

सेवक आहेत.या सेवा मंडळाच्‍यावतीने येथे  2009 पासून सेवा करण्‍यात येत आहे.

Labels:

चार विधानसभा मतदार संघात ४२ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल

उस्मानाबाद - १२ व्या विधानसभा निवडणुकीसाठी आज जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघातून ४२ जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये प्रामुख्याने अनेक दिग्गजांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
विधानसभेसाठी आज नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा आज ६ व्या दिवशी जिल्ह्यातील ४२ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. पितृपक्षानंतर आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या एक दिवस अगोदर तसेच आजचा शुभमुहूर्त असल्याचे भविष्य वेत्यांनी नेत्यांना सांगीतल्याने उमेदवारी भरण्यासाठी आज जिल्ह्यातील सर्वच नेत्यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. जिल्ह्यातील अनेक उमेदवारांनी कोणतेही शक्तीप्रदर्शन न करता आपले उमेदवारी अर्ज दाखल केले परंतू. उस्मानाबाद येथे आ. ओमराजे निंबाळकर यांनी तर तुळजापूर मधून पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी प्रचंड शक्तीप्रदर्शन करुन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
जिल्ह्यातून चार मतदार संघातून ४२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये तुळजापूर मधून काँग्रेसकडून मधुकरराव चव्हाण यांनी, शिवसेनेकडून सुधीर पाटील यांनी, उमरग्यातून काँग्रेसकडून किसन कांबळे, कैलास शिंदे यांनी, भाजपाकडून, संजय कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आपला उमेदवार अर्ज दाखल केले. उस्मानाबाद-कळंब विधानसभा मतदारसंघातून आ. ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेनेकडून तर परंडा मतदार संघातून बाळासाहेब हाडोंग्रीकर यांनी राष्ट्रीय समाज पक्षाकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
आज नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. जिल्ह्यातून सर्वच राजकीय पक्षानी आपले उमेदवार दिल्याने सर्वच पक्षांना आपल्या उमेदवारांसाठी आज उमेदवारी दाखल करण्यासाठी आजचा दिवस आहे.

Labels:

जिल्ह्याचा अनुषेश भरण्‍यासाठी चव्हाण यांना बळ द्या- राठी

तुळजापूर - तुळजापूर मतदार संघाचा ख-या अर्थाने विकास झाला आहे. यात कांही खंत नाही कारण आज माझ्या समोर जनसमुदाय बसला असल्‍याचे  काँग्रेस पक्षाचे राज्याचे प्रदेश उपाध्यक्ष प्रदिप राठी यांनी आमदार मधुकरराव चव्हाण यांच्या प्रचार शुभारंभाच्या  सभेत बोलताना सांगितले.
   विद्यमान आमदार मधुकरराव चव्हाण यांनी श्री. तुळजाभवानीचा आशिर्वाद घेवून मनोभावे दर्शन घेतले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन भव्य शक्ती प्रदर्शन करीत रॅलीस सुरुवात केली. ही रॅली भवानी रोड, शुक्रवार पेठ, जिजामाता नगर या मार्गे हाडको मैदान येथे आयोजित केलेल्या सभेस्थळी पोहंचली. या रॅलीत प्रचंड कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच महिला कार्यकत्र्या हातात काँग्रेस पक्षाचे झेंडे घेतलेले दिसत होते. ग्रामीण भागातील मंडळींनी हालगीच्या तालावर नाचत गाजत घोषणेबाजी करीत होते. रॅली मोठ्या उत्साहात दिसत होती. या रॅलीचे रुपांतर हाडको मैदानावरील सभेत रुपांतर झाले.
यावेळी व्यासपीठावर औसाचे आमदार बसवराज पाटील, शैलेश पाटील चाकूरकर, जिल्हा काँग्रेस कमेटीचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील. जि.प. अध्यक्ष धिरज पाटील, उपाध्यक्ष सुधाकर गुंड, जिल्हा महिला कॉ. कमेटीच्या अध्यक्षा राजलक्ष्मी गायकवाड, अशोक मगर, जि.प. सदस्य काशिनाथ बंडगर, पंडित जोकार, काँग्रेसचे युवा नेते सुनिल चव्हाण, पं.स. उपसभापती प्रकाश चव्हाण, तालुका युवा अध्यक्ष सचिन पाटील, तालुका अध्यक्ष सिद्धाआप्पा मुळे, मुकूंद डोंगरे, शहाबाज काझी, महादेव खटावकर, संतोष बोबडे, संजय दुधगावकर, विश्वास आप्पा शिंदे, सुभाष वट्टे, लक्ष्मण सरडे, अशोक जवळगेकर, महिला ता. अध्यक्षा कल्पना मगर, शहर अध्यक्ष भारत कदम, आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
आ. बसवराज पाटील यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्र हे विकासाच्या बाबतीत नंबर वन राज्य आहे. आम्ही आश्वासन व जातीवादावर मते मागत नाहीत. काँग्रेस पक्षामध्ये सर्वसामान्यालाही सन्मानाने वागविले जाते. राज्यातील काँग्रेस पक्षाला आई तुळजाभवानी च्या दरबारातून शक्ती मिळत गेली आहे. जिल्
आपल्या भाषणात मधुकरराव चव्हाण म्हणाले की, आज प्रत्येक जण काँग्रेस पक्षाचा वटवृक्ष मोठा झाला आहे. पण आम्ही आज ही या वटवृक्षाखाली आहेत म्हणुन काँग्रेस पक्षावर गोर-गरिबांची पक्षावर श्रद्धा आहे. आपल्या भाषाणात स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी काँग्रेस पक्ष कसा वाढवून गोर-गरिबांच्या झोपड्या पर्यंत नेला. हे विसरणे चुकीचे आहे. तरी कार्यकत्र्यांनी काँग्रेस पक्षज्ञाने केलेली कामे जनतेसमोर मांडावीत आम्ही लोकांच्या विकासासाठी काम केले आहे. कांही मंडळी स्वताच्या स्वार्थासाठी आमच्या पासुन वेगळी गेली आहेत. आज येथे तुम्ही माझ्या प्रेमापोटी एवढ्या मोठ्या संख्येने आला आहेत हीच मी केलेल्या कामाची पावती मिळाली.
ह्याचा अनुषेश भरुन काढण्यासाठी चव्हाण साहेबांना बळ द्या असे आवाहन केले.

Labels:

भाविकांची तुळजाभवानी मातेच्‍या दर्शनासाठी गर्दी

तुळजापूर - नवरात्रोत्सवाच्यादुस-या माळेला शुक्रवारी   भाविकांनी कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्‍यासाठी मोठी गर्दी केली होती. यामध्ये कर्नाटक राज्यातील भाविकांची संख्या लक्षणीय होती. दरम्यान पहाटे अभिषेक पूजेची रांग प्रांगण भरून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या भारतीबुवा मठापर्यंत गेली होती. गर्दीमुळे अनेक भाविकांना अभिषेक पूजेपासून वंचित रहावे लागले.
पहाटे एक वाजता चरणतीर्थ होऊन मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी दिवसभरात बावीस तास मंदिर खुले ठेवण्यात येत आहे. रात्री छबीना मिरवणुकीनंतर देवीचा गाभारा बंद करण्यात येत आहे. तर सकाळी सायंकाळी वाजता अशा दोन वेळेस देवीची दही, दुधाने अभिषेक पूजा करण्यात येत आहे. सायंकाळच्या पूजेनंतर रात्री १०.३० वाजता छबीना मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मंदिर संस्थानचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, नगराध्यक्षा जयश्री कंदले, तहसीलदार सुजित नरहरे, दिलीप नाईकवाडी यांच्यासह देवीचे महंत तुकोजी बुवा, आजच्या पूजेचे मानकरी पुजारी मंडळाचे अध्यक्ष किशोर गंगणे, सुधीर कदम, कैलास पाटील, सचिन पाटील, राजेश मलबा, विकास मलबा, अनंतराव कोंडो यांच्यासह पुजारी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-

Labels:

पुणेच्‍या ताम्हाणे बंधूंकडून फुलांची सजावट

 तुळजापूर - नवरात्र महोत्‍सवाच्‍या दुस-या माळेला शुक्रवार रोजी श्री तुळजाभवानी देवी  मंदिराच्या गाभा-यात पुणे येथील देवी राहुल  ताम्हाणे या भक्ताने आकर्षक देशी, विदेशी फुलांची सजावट केली आहे. तुळजाभवानी देवीचे  अनेक भाविकांनी या चैतन्यदायी रुपाचे दर्शन घेतले.
शुक्रवार रोजी तुळजाभवानी मंदिरात रंगी-बेरंगी, देशी-विदेशी फुलांनी सजावट करण्‍यात
आली . ऑरचिड, कारनेशियन, शेवंती, बेंगलोर शेवंती, बुजगुलाब आदी फुलांच्या सह्याने देवीचा मुख्य गाभारा, चोपदार दरवाजा, शेषघर, सिंहगाभारा, पितळी दरवाजा, निंबाळकर दरवाज्यासह भवानीशंकर, चिंतामणी मंदिरामध्ये आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली आहे. त्यामुळे मंदिराचे सौंदर्य आणखी खुलले असून फुलांचा दर्वळ पसरला आहे. ताम्हाणे बंधू मागील चार वर्षांपासून शारदीय नवरात्र शाकंभरी नवरात्रोत्सवात तुळजाभवानी मंदिरात फुलांची सजावट करतात. यावर्षी हे त्यांचे पाचवे वर्ष आहे. गुरुवारी रात्रीपासूनच ते १० कामगार सजावट करत होते. या सजावटीसाठी ३५० ते ४०० फुलांच्या गड्डी लागल्याचे राहुल ताम्हाणे यांनी सांगि‍तले.

Labels:

Friday, 26 September 2014

तुळजापूर विधानसभा मतदारसंघात17 नामनिर्देशनपत्र दाखल

     उस्मानाबाद - विधानसभा निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील तुळजापूर  विधानसभा निवडणुकीसाठी  सहाव्या  दिवशी  43 अर्जांची विक्री झाली तर आज तुळजापूर  विधानसभा मतदारसंघात 9 उमेदवारांनी 17 नामनिर्देशनपत्र दाखल केल्याचे निवडणूक यंत्रणेने  कळविले आहे. 
     तुळजापूर विधानसभा मतदार संघात सुबरबाई शिवाजी राठोड यांनी दोन नामांकन पत्र (अपक्ष), चव्हाण मधुकरराव देवराव  यांनी चार नामांकनपत्र (भारतीय राष्ट्रीय  काँग्रेस), धुरगुडे महेंद भानुदासराव यांनी नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी व अपक्ष असे दोन  नामांकन पत्र,  निंबाळकर संजय प्रकाश यांनी दोन नामांकनपत्र (भारतीय जनता पक्ष), कसबे सतीश  श्रीपती यांनी दोन नामांकनपत्र (महाराष्ट्र विकास आघाडी), कोळगे रामदास सुभाष यांनी एक नामांकन पत्र (भारतीय जनता पाटी),  राठोड नामदेव धर्मा (अपक्ष),अशोक हरिदास जगदाळे यांनी अपक्ष म्हणून दोन तर सुधीर केशवराव पाटील (शिवसेना ) यांनी  एक नामनिर्देशनपत्र दाखल केले.

Labels:

परंडा विधानसभा मतदारसंघात 8 नामनिर्देशनपत्र दाखल

     उस्मानाबाद  - विधानसभा निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील 243-परंडा विधानसभा निवडणुकीसाठी  सहाव्या  दिवशी  35 अर्जांची विक्री झाली तर आज परंडा विधानसभा मतदारसंघात 8 उमेदवारांनी नाम निर्देशनपत्र दाखल केल्याचे निवडणूक यंत्रणेने  कळविले आहे. 
     परंडा विधानसभा मतदार संघात संजयकुमार कोंडीबा बनसोडे (अपक्ष), आर्यनराजे ‍किसनराव शिंदे (अपक्ष), बजरंग साहेबराव ताटे (अपक्ष), जाधव रोहन राजाराम (भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस (आय)), श्रीमंत साहेबराव माने (अपक्ष), बाळासाहेब भगवंतराव पाटील (राष्ट्रीय समाज पक्ष), आगवाने संगिता बालाजी (बहुजन समाज पार्टी), अमेय बाळासाहेब पाटील (राष्ट्रीय समाज पक्ष), असे एकूण 8 नामाकंनपत्र दखल करण्यात आले आहे.

Labels:

उमरगा विधानसभा मतदारसंघात 13 नामनिर्देशनपत्र दाखल

      उस्मानाबाद - विधानसभा निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील उमरगा विधानसभा निवडणुकीसाठी  सहाव्या  दिवशी  24 अर्जांची विक्री झाली. तर आज उमरगा विधानसभा मतदारसंघात 13 उमेदवारांनी नाम निर्देशनपत्र दाखल केल्याचेनिवडणूक यंत्रणेने  कळविले आहे. 
     उमरगा विधानसभा मतदार संघात गायकवाड राम सैदा यांनी एक अपक्ष व एक भारीप बहुजन महासंघ, शिंदे कैलास चिंतामणराव ( भारतीय जनता पार्टी), कटकधौंड दत्तू नरसिंग (भारतीय जनता पार्टी), कांबळे किसन नागनाथ (भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस) यांनी दोन, व्हटकर विलास शरणाप्पा( शिवसेना),  थोरात  चंद्रकांत ईश्वर (भारतीय नवजवान सेना) यांनी दोन,  कांबळे संजय रामचंद्र (रा.कॉ.पा.) सुरवसे ‍सतिष श्रीमंत (रा.कॉ. पा.), पौळे पांडूरंग शंकरराव यांनी अपक्ष  व एक रा.कॉ. पा.तर्फे असे दोन नामनिर्देशन दाखल करण्यात आले असून एकूण 13 नामांकनपत्र दाखल केले आहेत.

Labels:

केंद्रीय निवडणूक निरीक्षकाची माध्यम कक्षाला भेट

   उस्मानाबाद - भारत निवडणूक आयोगाचे मतदार जागरुकता निरीक्षक एम. नागेंद्र स्वामी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन इमारतीत असलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -2014 साठी स्थापन केलेल्या जिल्हास्तरीय प्रसिद्धी माध्यम कक्ष तसेच माध्यम प्रमाणीकरण व माध्यम सनियंत्रण कक्षाला भेट दिली. उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रभोदय मुळे यावेळी त्यांच्यासमवेत होते.
    श्री. स्वामी यांनी यावेळी प्रसिद्धी माध्यम कक्षात वर्तमानपत्र प्रतिनिधींसाठीच्या सुविधांची माहिती घेतली. याशिवाय, पेड न्यूज तसेच माध्यम सनियंत्रण व्यवस्थेची पाहणी करुन त्याबाबत सूचनाही दिल्या. चारही मतदारसंघाच्या अनुषंगाने वर्तमानपत्रातील बातम्यांचे स्कॅनिंग केले जावे. पेड न्यूज आणि जाहिरातींवर लक्ष ठेवून त्यासंबंधीची माहिती संबंधित विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या खर्च विषयक कक्षाला कळवावी, असेही त्यांनी निर्देश दिले.
    यावेळी प्रसिद्धी माध्यम कक्ष प्रमुख दीपक चव्हाण यांनी श्री. स्वामी व श्री. मुळे यांचे स्वागत करुन त्यांना माध्यम कक्षाने केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. मतदार जागृतीबाबत माध्यम कक्षात लावलेल्या विविध पोस्टर्सचेही त्यांनी कौतुक केले.    

Labels:

27 स्प्टेंबर जागतिक पर्यटन दिन विशेष

पांगरी  (गणेश गोडसे)   दैनंदिन ताण,तनाव,तेच ते रहाटघाडगे याला वाट मोकळी करण्यासाठी व विरंगुळा करण्याच्या हेतूने, मन उल्हासित करण्यासाठी काही ठराविक दिवसाला प्रेक्षणीय स्थळांना भेटी देऊन मन मोकळे करण्याची पद्धत अलीकडे चांगलीच प्रचलित होऊ पहात असून तीर्थक्षेत्र रामलिंग,येडेश्वरी,घारीचे नागनाथ,नीलकंठेश्वर मंदिर आदि अनेक तीर्थक्षेत्रे अलीकडील काळात पर्यटन स्थळे म्हणूनही उदयास येत असून महाराष्ट्रातील पर्यटकांचा ओढा रामलिंग या तीर्थक्षेत्राकडे जास्त वाढत असल्याचे दिसत आहे.27 स्प्टेंबर हा जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा होतो.
  सध्‍याच्‍या धकाधकीच्‍या जिवनातुन वेळ मिळेलच याची खात्री नसून तरीही घरातून सहल,ट्रीप आदि बाबीसाठी घरातून विशेष प्राधान्य दिले जाते.समाजा समाजातील,राज्या राज्यातील,तसेच देश,परदेशातील दरी कमी करण्याच्या दृष्‍टीनेही पर्यटनाला महत्व आहे.केल्याने देशाटन अंगी येते शाहानपण ही म्हण अगदी तंतोतंत खरी ठरते.भटकंती हा विषय जवळजवळ सगळ्यांच्याच आवडीचा विषय आहे.भटकंती,भ्रमण, सहल आवडत नसणारा माणूस शोधूंनाच काढावा लागेल.
  अलीकडील काही वर्षात रामलिंग हे तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळ म्हणून उदयास आले असून डोंगरी भाग,दर्‍या,कपार्‍या,माकडे,यासह जंगली पशू,पक्षी,प्राणी आदींच्या वास्तव्यामुळे या क्षेत्राला पर्यटकांची पहिली पसंती ठरत आहे.तीर्थक्षेत्राचा दर्जा असलेल्या व तरुण-तरुणीसह भावीकांच्या मनात घर केलेले रामलिंग हे चांगलेच नावारूपाला येऊ पहात आहे.
 युवक युवतिसह प्रेमी युगलांना पर्वणीच:रामलिंग हे घनदाट जंगलांनी वेढलेले असल्यामुळे श्रावण महिन्यात तर हे ठिकाण लहानापासून थोरमोठ्यापर्यंत एक पर्वणीच ठरत आहे.दूर दुरून अनेकजण मौज, मजा,विरंगुळा करण्यासाठी रामलिंग परिसरात येत असतात.परिसरातून वाहणार्‍या नद्या पशू पक्ष्यांचे मंजुळ आवाज माकडांचे सर्वदूर वास्तव्य ससे हरिनाच्या लक्षवेधी कळप आदि निसर्गरम्य वातावरणामुळे रामलिंग हे सर्वांनाच खुणावत आहे.
   हिरव्यागार डोंगरावर विविध जातीच्या औषधी वनस्पतीचे अछादन,खोलखोल दर्‍या,डोंगरातून वाहणारे स्वछ पाणी,हिरव्यागार निसर्ग सृस्टीचा सहवास,मनाला नवी चेतना देणारे जवळच असलेले गुरुकुल,डोंगराच्या मध्यावर असलेले रामलिंग हे सोलापूर,उस्मानाबाद जिल्ह्यासह शेजारील अनेक जिल्ह्यातील पर्यटकांना खुणाऊ लागले आहे.रामलिंग या क्षेत्राचा पर्यटन विकास महामंडळाने याकडे लक्ष केन्द्रित करून विकास करणे गरजेचे आहे.शेकडो किलोमीटर दूर जाऊन निसर्गाच्या सानिध्यात जाण्याचा अनुभव घेण्यासाठी आर्थिक हानी सहन करावी लागते.मात्र रामलिंग या ठिकाणी सफर मारल्यास मिनी महाबळेश्वरचा अनुभव घेता येतो.रामलिंग देवस्थानच्या परिसरात हजारो एकर क्षेत्रात वन खात्याचे विस्तीर्ण क्षेत्र असून त्यामुळे याचे वेगळेपण आणखीनच खुलून जात आहे.
पर्यटन विकास दुर्लक्षित मुद्दा:ईतर राज्य पर्यटनस्थळांचा विकास करून त्यातून मोठा आर्थिक फायदा करून घेत असताना मात्र आपल्या भागातील अनेक प्रेक्षणीय स्थळांच्या विकासाकडे कोणी गंभीरतेने पाहताना दिसत नसल्याची जनतेची ओरड आहे.महाराष्ट्राला नेसर्गिक रचनेचा ठेवा मोठा असूनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याबदल पर्यटकामधून खंत व्येकत केली जात आहे.

Labels:

भाजप-सेना युती तुटली

मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व प्रमोद महाजन या दिवंगत नेत्यांनी २५ वर्षांपूर्वी केलेल्या युतीला अखेर आज घटस्थापनेच्या मुहुर्तावर भाजपने मुठमाती दिली. वाढीव जागा देण्याची मागणी शिवसेनेने धुडकावून लावल्याने व तब्बल आठवडाभर माथेफोड करूनही मार्ग न निघाल्याने अखेर आज भाजपने शिवसेनेबरोबरची युती तोडण्याची घोषणा केली. त्यानंतर काही वेळाने राष्ट्रवादी काँग्रेसने पत्रकार परिषद घेऊन काँग्रेससोबत काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला. एकाच दिवशी युती आणि आघाडी तुटल्याने राज्यात आज राजकीय भूकंप झाला असून अवघ्या महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशाच बदलली आहे. राज्यात युती गेल्या २५ वर्षांपासून, तर आघाडी १५ वर्षांपासून होती. या युती आणि आघाडीला अखेर एकाचवेळी तडा गेला आहे.
दरम्यान, महायुतीतील महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष, खा. राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना व विनायक मेटे यांच्या शिवसंग्रामने भाजपबरोबर राहण्याचा निर्णय घेतला असून रामदास आठवले यांच्याशीही चर्चा सुरू असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले. लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेवर स्वार झालेल्या भाजपने स्वबळावर बहुमत मिळविल्यापासून शिवसेना-भाजप युतीत रस्सीखेच सुरू होती. गेली अनेक वर्षे उराशी बाळगलेले शत प्रतिशत भाजपचे स्वप्न साकार करण्याची हीच संधी आहे, हे ओळखून भाजपने तयारी सुरू केली व जास्त जागांवर दावा सांगून शिवसेनेभोवती दोर आवळायला सुरुवात केली होती. शिवसेनेने आपल्या हिश्शातील १९ जागा भाजप व मित्र पक्षाला सोडण्याची तयारी दर्शविली; पण भाजपने आपल्याही जागा वाढवून देण्याची मागणी लावून धरली; पण शिवसेना किमान १५० जागा लढवणारच, अशी भूमिका घेतली. हा तिढा सोडविण्यासाठी गेला आठवडाभर चर्चा सुरू होती; पण दोन्ही पक्षांनी ठाम भूमिका घेतल्याने अनेक प्रस्ताव पुढे येऊनही तोडगा निघू शकला नाही. अखेर केंद्रीय नेतृत्वाकडून अनुमती घेऊन भाजपच्या कोअर कमेटीत शिवसेनेबरोबरची २५ वर्षांची युती मोडित काढण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, रासपचे महादेव जानकर यांनी सायंकाळी संयुक्त पत्रकार परिषदेत शिवसेना वगळून महायुती करण्याची घोषणा केली.
२५ वर्षांपूर्वी स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, भाजपनेते प्रमोद महाजन व स्व. गोपीनाथ मुंडे यांनी शिवसेना-भाजप युतीची स्थापना केली होती. आजवरच्या वाटचालीत अनेक राजकीय चढउतार येऊनही युती अभेद्य राहिली; पण या वेळी शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेमुळे सगळी चर्चा एकाच आकड्याभोवती फिरत राहिली त्यामुळे युती तोडण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचा आरोप भाजप नेते एकनाथ खडसे आणि प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी केला. लोकसभेपासून आमच्या बरोबर असलेल्या मित्र पक्षांना सोबत ठेवून त्यांचा सन्मान राहील, आशा जागा सोडण्याचा आमचा प्रयत्न होता; पण शिवसेना एकाच आकड्यावर ठाम राहिली. जे काही फॉम्र्युले पुढे आले, त्यात एक तर त्यांच्या जागा कमी होत होत्या किंवा आमच्या जागा कमी होत होत्या. त्यामुळे मार्ग निघत नव्हता. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दोन दिवस राहिले असल्याने अखेर हा निर्णय घ्यावा लागल्याचा दावा त्यांनी केला.

Labels:

१५ वर्षांची आघाडीही तुटली

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेससोबत आघाडी करण्याचा प्रयत्न केला. त्यातून वाटाघाटीही झाल्या. परंतु या वाटाघाटीसंबंधी काँग्रेसच्या नेत्यांनी चर्चा करण्याऐवजी ऐनवेळी चर्चा करण्याचे टाळले. आम्ही आतापर्यंत वाट पाहात होतो. परंतु काँग्रेसकडून कोणताही प्रस्ताव न आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले. त्यामुळे गेल्या १५ वर्षांची आघाडीही तुटली आहे.
  आघाडीच्या जागावाटपाची चर्चा सुरू असतानाच काँग्रेसने काल ११८ विधानसभा मतदारसंघांतील उमेदवार घोषित केले. त्यातील काही जागांवर वाटाघाटी सुरू होत्या. त्यामुळे नाराज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आज बैठक घेऊन आघाडीतून बाहेर पडण्याबाबत विचारविनिमय सुरू केला. त्यातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी आता चर्चेची वेळ निघून गेल्याचे सांगत स्वबळावर लढण्याची तयारी केल्याचे सांगितले. त्यामुळे आता आघाडीतील फूट अटळ मानली जात होती.
या पाश्र्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल आदी नेत्यांच्या उपस्थितीत आज बैठक झाली आणि या बैठकीत काँग्रेससोबत राहायचे की स्वतंत्र लढायचे, यावर चर्चा करण्यात आली. याबरोबरच उमेदवारांची यादी निश्चित करण्यासंबंधीही विचारविनिमय करण्यात आला. त्यानंतर रात्री ८ वाजता पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी तुटल्याचे जाहीर करण्यात आले. या पत्रकार परिषदेला प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते.
राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांचा राजीनामा
काँग्रेससोबतची आघाडी तोडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच मंत्र्यांनी राज्यपाल सी. विद्यासागर यांची भेट घेतली आणि सर्वच मंत्र्यांनी राजीनामे दिले. त्यामुळे राष्ट्रवादीने आघाडी तोडल्यानंतर सरकारमधून बाहेर पडण्याची भूमिका घेतली. यातून काँग्रेसची कोंडी करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने केला आहे.
-राष्ट्रवादी काँग्रेसने सातत्याने अवास्तव मागण्या केल्या. विशेष म्हणजे भाजपापाठोपाठ त्यांनी आघाडी तोडण्याचा निर्णय घेतला. पण जनता खुळी नाही.माणिकराव ठाकरे, प्रदेशाध्यक्ष काँग्रेस
निम्म्या जागा आणि अर्धा काळ मुख्यमंत्रिपद वाटून मागितले होते. परंतु काँग्रेस नेत्यांनी आमच्याशी संपर्क केला नाही किंवा प्रस्तावही दिला नाही. महिन्याचा काळ फुकट घालवला.प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी काँग्रेस नेते

Labels:

Thursday, 25 September 2014

पाचव्या दिवशी 95 उमेदवारी अर्जांची विक्री, 18 नामनिर्देशनपत्र दाखल

     उस्मानाबाद- विधानसभा निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील चार विधानसभा निवडणुकीसाठी  पाचव्या  दिवशी  95 अर्जांची विक्री झाली. तर आज उमरगा विधानसभा मतदारसंघात सहा, परंडा मतदारसंघात पाच  तर उस्मानाबाद मतदार संघात सात उमेदवारांनी नाम निर्देशनपत्र दाखल केले आहेत.  
   उमरगा मतदारसंघात 8 जणांनी 13 अर्ज, तुळजापूर मतदारसंघात 17 जणांनी 52 अर्ज, उस्मानाबाद मतदारसंघात 11 जणांनी  20 अर्ज आणि परंडा मतदारसंघात 6 जणांनी 10 अर्ज घेतल्याचे संबंधित निवडणूक यंत्रणेने कळविले आहे.
    उमरगा विधानसभा मतदार संघात चौघुले ज्ञानराज धोंडीराम(शिवसेना), व्हटकर विलास शरणाप्पा, गायकवाड उमाजी पांडूरंग, राजू उर्फ राजेंद्र बळीराम उबाळे, सरवदे रावसाहेब श्रीरंग, ‍जितेंद्र  उर्फ ‍जितेश लक्ष्मण चौघुले या अपक्षांनी तर उस्मानाबाद येथे तुपसुंदरे बालाजी बापूराव, गाढवे केरबा, रामजीवन  पंढरी बोंदर, हे अपक्ष तर राणाजगजितसिंह पाटील (राष्ट्रवादी), अनंत जगन्नाथ चौंदे ( भारतीय शेतकरी कामगार पक्ष)  तर जाधव  भीमा शंकर यांनी एक अपक्ष व भारतीय जनता पार्टी यांच्याकडून नामनिर्देशनपत्र, परंडा मतदार संघात पाटील ज्ञानेश्वर रावसाहेब (शिवसेना), मोटे राहूल महारुद्र (राष्ट्रवादी), बाळासाहेब भगवंतराव पाटील, अमेय बाळासाहेब पाटील दोन्ही राष्ट्रीय समाज पक्ष  आणि हावरे अब्दूल करीम म. युसुफ यांनी अपक्ष नामनिर्देशनपत्र दाखल केले

Labels:

मतदान जनजागृती करण्याचे आवाहन

  उस्मानाबाद - उमरगा विधानसभा मतदार संघात 100 टक्के मतदान व्हावे, यासाठी  विविध उपक्रमाद्वारे मतदान जागृतीचे काम प्रशासनाच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. मा.निवडणूक निरीक्षक (स्वीप-2) यांच्या मार्गदर्शनाखाली उमरगा-लोहारा  तालुक्यातील सर्व महसूली गावे -143, ग्रामपंचायती -124, महाविद्यालये 784, महसूली मंडळे-8, पंचायत समिती, नगरपालिका आणि शासनाचे विविध शासकीय कार्यालये, बचतगट, स्वयंसेवी संस्था यांच्यामार्फत मतदान जागृती करुन  उदिष्ट पूर्ण करण्याचे आवाहन विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. ‍रविंद्र गुरव यांनी केले आहे.
    उमरगा विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका  व छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या वतीने शहराच्या प्रमुख मार्गावरुन मतदान जागृती अभियानांतर्गत फेरी  काढण्यात आली. यावेळी न.प.मुख्याधिकारी डॉ.संतोष टेंगळे, राष्ट्रीय सेवा योजना  कार्यक्रमधिकारी डॉ.एस.पी.इंगळे, एनसीसीचे प्रा.डी.एस.चित्तमपल्ले, शैलेश महामुनी, ‍     सुजित ‍शिंदे, राजू सुर्यवंशी, प्रा.एस.इ.बिराजदार यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी , प्राध्यापक  व ‍शिक्षकेत्तर कर्मचारी यांना प्रा.अस्वले यांनी मतदार जागृतीची शपथ दिली.
    घटनेने दिलेल्या  मतदानाच्या  अधिकाराचा वापर  उमरगा व लोहारा  या  तालुक्यात मतदारांना होण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात  आला असून त्यानुसार  उपविभागीय कार्यालय अणि उमरगा तहसील कार्यालय, महात्मा गांधी महाविद्यालय उमरगा, भारत वि द्यालय, उमरगा, विद्या विकास विद्यालय दाळींब ता. उमरगा, नगरपालिका, मुरुम, ता. उमरगा, तहसील कार्यालय, लोहारा, जिल्हा परिषद, शाळा हिप्परगा (रवी), मार्डी, विद्या विकास हायस्कूल, अचलेर, माकणी, सास्तूर, भातांगळी, कासार आष्टा ता.लोहारा येथे जनजागृतीचे कार्यक्रमही घेण्यात आल्याचे यावेळी डॉ. ‍रविंद्र गुरव यांनी  सांगितले.

Labels:

घटस्थापनेने श्रीतुळजाभवानीच्‍या नवरात्र महोत्सवास प्रारंभ

  उस्मानाबाद- महाराष्ट्राची कुलस्वामीनी आणि शक्तिदेवता श्रीतुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास तुळजापूर येथे आज धार्मिक वातावरणात प्रारंभ झाला. श्रीतुळजाभवानी मंदिरात पहाटे पारंपारीक पध्दतीने श्रीदेवीजींची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर दुपारी 12 वाजता श्रीतुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते विधिवत घटस्थापना करण्यात आली. मंत्रोच्चार, आई राजा उदो उदोचा जयघोष आणि संबळाच्या साथीने सर्व पुजाविधी  करण्यात आले.
    यावेळी मंदिरातील पहिल्या दिवसाच्या मुख्य पुजेचा मान  सचिन पाटील यांना मिळाला.  त्यांनी  मंदिरात विधिवत पूजन केले. त्यानंतर घटकलशांची पारंपरिक पध्दतीने पुजा करण्यात आली आणि गोमुख तिर्थापासून या घटकलशांची मिरवणूक काढण्यात आली. मंदिरातील गाभाऱ्यात तसेच खंडोबा मंदिर, यमाईदेवी मंदिर, टोळभैरव आणि आदिमाया आदिशक्ति या मंदिरांमध्ये जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांच्या हस्ते  घटस्थापना करण्यात  आली.
मंदिर व्यवस्थापन आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने भाविकांच्या सोयीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असून भाविकांनी दर्शन मंडप सुविधेचा लाभ घ्यावा, शिस्तबध्द पध्दतीने व धार्मिक वातावरण कायम राखून दर्शन घ्यावे. कुठलीही अडचण असल्यास तात्काळ नजिकच्या पोलीस स्टेशन अथवा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, अनेक भाविक वेगवेगळया भागातून पायी चालत तुळजापूर येथे येतात त्यांनी  या मार्गावरुन चालतांना काळजी घ्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी घटस्थापनेनंतर केले. त्यांनी सर्व भाविकांना शारदीय नवरात्र महोत्सवाच्या शुभेच्छा यावेळी दिल्या.
प्रतिवर्षाप्रमाणे या उत्सवासाठी महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश आणि कर्नाटक या राज्यातूनही मोठ्या प्रमाणात  भाविक तुळजापूर नगरीत दाखल झाले आहेत. आज हजारो भाविकांनी श्रीभवानी मातेचे दर्शन घेतले. वेगवेगळया गावातूनही अनेक युवक भवानी ज्योत घेवून जाण्यासाठी तुळजापूरकडे येतानाचे चित्र दिसत होते.
नवरात्र महोत्सवानिमित्त मंदिर संस्थान, पोलीस प्रशासन, नगरपालिका, तहसील कार्यालय यांच्यासह आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा, एस.टी. महामंडळ आदि विभागांनीही भाविकांच्या सोयीसाठी विविध सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. भाविकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा आणि गैरसोय टाळावी, असे आवाहन करण्यात आले आहे.  मंदिरातील धार्मिक कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांच्यासह त्यांच्या मातोश्री,  नगराध्यक्षा जयश्री कंदले, महंत तुकोजीबुवा, महंत चिलोजीबुवा, पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष किशोर गंगणे, उपाध्ये मंडळाचे अध्यक्ष श्री. कोंडो, भोपे पुजारी मंडळाचे सुधीर कदम, मंदिर संस्थानचे तहसीलदार सुजित नरहरे, मंदिर संस्थानचे व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी उपस्थित होते. याशिवाय भोपे, पुजारी, आराधी, गौंधळी व भाविक मोठ्या संख्येने  यावेळी उपस्थित होते.    

Labels:

बार्शी तालुक्यात दुपारी गूढ आवाज

 पांगरी – गूढ आवाजाचे सत्र सुरूच असून आज दि.25 गुरुवारी दुपारी 12,50 वाजण्याच्या दरम्यान बार्शी तालुक्याच्या पूर्व भागात मोठा गूढ आवाज झाला.आवाज खूपच मोठा असल्याने व घटस्थापनेचा दिवस असल्यामुळे घरातच असलेल्या सर्व महिलासह लहान मुलेही घराबाहेर पडून आवाजाच्या दिशेने पाहत होती.आवाज मोठा असल्यामुळे जनतेमधुन घबराटीचे वातावरण दिसून येत होते.नेमके सन,उत्सव अश्या काळातच असे आवाज होत असल्यामुळे सर्वसामान्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.हा आवाज येरमाळा,ढोकी,येडशी,आगळगाव,चिखर्डे,आदि गावांसह शेजारील जिल्ह्यातही आला असल्याचे वृत आहे॰
  अलीकडे गूढ आवाज ऐकने नित्याचे होत असतांनाही आवाज आल्यास भूकंपाची आठवण येऊन घरातील सर्वजण घराबाहेर धावत येण्याची काळजी घेतात.येवढ्या मोठ्या प्रमाणात आवाज येऊनही प्रशासकीय पातळीवर याची कोणतीच नोंद होत नाही हे विशेष आहे.सैनिकांच्या सरावाच्या विमानाचे आवाज असावे,भूगर्भातील हालचालीचा परिणाम असावा,निसर्गाच्या बिघडलेल्या वातावरणाचा परिणाम असावा, पोकळी निर्माण झाल्यामुळे असे आवाज होत असावेत अश्या वेगवेगळ्या करणांनाई एकमेकांचे समाधान केले जात होते.शासनाच्या संबंधित विभागाने एकदा होणारे हे गूढ आवाज नेमके कशाचे आहेत याबाबत जनतेला माहिती देऊन त्यांचा जीव भांड्यात टाकणे गरजेचे आहे.

Labels:

अणदुर येथे बँक ग्राहकांची गैरसोय

नळदुर्ग  - अणदूर ता.तुळजापूर  येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत सध्या अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने ग्राहकांना मोठया अडचणीला सामोरे जावे लागत आहे.याप्रकरणी वरिष्‍ठ पातळीवरून चौकशी करून तात्‍काळ गैरसोय दुर करण्‍याची मागणी बँक ग्राहकातुन केली जात आहे.
   परिसरातील बारा गावांतील आर्थिक व्यवहार अणदुर येथिल या बँकेच्या माध्यमातून होतात.त्यामुळे बँकेत ग्राहकांची नेहमीच गर्दीअसते.या बँकेत बचत खात्यांची संख्या जवळपास ३५हजार आहे.याशिवाय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, निराधारांचे अनुदान, शेतकर्‍यांना पीक कर्जवाटप, ही कामेही सुरूच असतात.सध्या या बँकेत एक शाखाधिकारी, एक अकौंटंट आणि तीन क्लार्कअशा पाच जणांवर बँकेचा कारभार सुरू आहे.त्यामुळे ग्राहकांच्या अनेक कामांना विलंब होत असून, येथील रिक्त पदे तातडीने भरावित, अशी मागणी ग्राहकांमधून केली जात आहे.
याबाबत बँकेचे शाखाधिकारी श्रीरंग पळणीटकर यांच्याशी संपर्कसाधला असता, बँकेतील एक क्लार्कसेवानवृत्त झाले असून, दुसरे नोकरी सोडून गेले आहेत.त्यांच्या जागेवर अद्याप कर्मचारी नियुक्त झाला नसल्याने ही दोन्ही पदे रिक्त आहेत.याशिवाय शिपायाचे पदही रिक्त आहे.ही पदे भरण्याबाबत वरिष्ठांकडे पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
   भारतीय स्टेट बँकेने या ठिकाणी ग्राहकांसाठी एटीएम सेवा सुरू केली आहे.येथे पैसे काढण्यासाठी ग्राहकांची नेहमी मोठी गर्दीअसेल.विशेष म्हणजे, शेजारच्या नळदुर्ग शहरात एटीएम सुविधा उपलब्ध नाही.नळदुर्गहे नगरपालिका असलेले शहर  असून, तेथील बाजारपेठही मोठी आहे.त्यामुळे तेथील ग्राहकही अणदूर येथील एटीएम सेवेचा लाभ घेतात.परंतु, असे असले तरी ही सेवा केवळ बँक वेळेतच सुरू राहत आहे.त्यामुळे ग्राहकांना ठराविक वेळेतच येथून पैसे काढावे लागत असल्याने मोठी गैरसोय होत आहे.केवळबंदूकधारी सुरक्षा गार्डनसल्याने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

Labels:

घरच्या रंगमंचावर शिवाजीचा बहुमान

    बार्शी - सोलापूर विद्यापीठाच्या युवा महोत्सवात यावर्षीही बार्शीतील शिवाजी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या उत्कृष्ठ कामगिरीमुळे सर्वसाधारण विजेतेपद मिळविण्याचा बहुमान प्राप्त झाला. सोलापूर येथील वालचंद कला व विज्ञान महाविद्यालयाच्या संघातील विद्यार्थ्यांनी तळमळीने केलेल्या उत्कृष्ठ कला प्रकारातील अभिनयामुळे गोल्डन बॉय आणि गोल्डन गर्लचा बहुमान मिळविला आहे. विद्यापीठाच्या अकराव्या युवा महोत्सवाचे यजमानपद यंदा बार्शीतील शिवाजी महाविद्यालयाकडे होते. नेहमीच्या सरावाच्या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांच्या प्रोत्साहनात महाविद्यालयाला मिळालेला बहुमान हा घरच्या रंगमंचावर प्राप्त झाल्याने त्यांच्या आनंदात आणखी भर पडली आहे. या महोत्सवातील विजेत्या स्पर्धकांना सिने अभिनेत्री आदिती सारंगधर हिच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरु एन.एन. मचलदार, प्रशांत नलावडे, बी.वाय.यादव, सतिश वाघमारे, मधुकर फरताडे, रुपाली ऊारसे,ओंकार वायचळ, गुणवंत सरवदे, संदिप मिरगणे आदी उपस्थित होते.   
    उत्कृष्ठ पुरुष अभिनय १) शिवाजी महाविद्यालय,बार्शी २) अमृत ढगे, वालचंद कला व शास्त्र महाविद्यालय ३) सागर अचलकर, वालाचंद कला व शास्त्र महाविद्यालय,सोलापूर, उत्कृष्ठ स्त्री अभिनय १) मधुरा पानसे, शिवाजी महाविद्यालय,बार्शी, २) स्नेहल पोतदार, संगमेश्वर महाविद्यालय,सोलापूर, ३) मैथिली दळवी, दयानंद विधी महाविद्यालय,सोलापूर, उत्कृष्ठ संघ व्यवस्थापन १) सूर्यकांत शिंदे, अबोली सुलाखे, शिवाजी महाविद्यालय,बार्शी २) राजेश माळी, अमोल शिंदे, वालचंद कला व शास्त्र महाविद्यालय,सोलापूर, ३) पंकज पवार, वसुंधरा कला महाविद्यालय,सोलापूर, गोल्डन बॉय - सागर अचलकर, वालचंद कला व शास्त्र महाविद्यालय,सोलापूर, गोल्डन गर्ल - श्रध्दा हुलेनवरु, वालचंद कला व शास्त्र महाविद्यालय,सोलापूर इत्‍यादी.

Labels:

केशेगावचे राष्‍ट्रवादीचे कार्यकर्ते कॉंग्रेसमध्‍ये

नळदुर्ग  - केशेगांव (ता.तुळजापूर) येथील राष्‍ट्रवादीचे बहुसंख्‍य कार्यकर्ते कॉंग्रेसमध्‍ये पालकमंत्री मधुकरराव चव्‍हाण यांच्‍या प्रमुख  उपस्थित अणदुर येथे जाहीर  प्रवेश केला. यावेळी  शिवानंद हंद्राळे, राजकुमार हुकीरे, शिवाजी पाटील, चंद्रकांत पाटील, शशिकांत पाटील, अशोक हुकीरे, शिवानंद हुकीरे, महेश हुकीरे, माणिकराव साखरे, विजय‍कुमार पाटील या प्रमुख कार्यकर्त्‍यासह पंचेवीसच्‍या जवळपास राष्‍ट्रवादीच्‍या कार्यकर्त्‍यानी ना. मधुकरराव चव्‍हाण यांच्‍या नेतृत्‍वावर विश्‍वास ठेवुन कॉग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी अणदुरचे ग्रामपंचायतचे माजी सरपंच धनराज मुळे, उपसरपंच संगप्‍पा हगलगुंडे बाबूराव भाऊ  चव्‍हाण आदिजण यावेळी  उपस्थित होते.

Labels:

शिवराज्‍य पक्षाचे कार्यकर्ते राष्‍ट्रवादीत

उस्‍मानाबाद -   शिवराज्‍य पक्षाचे जिल्‍हाध्‍यक्ष ज्ञानदेव उर्फ बलराज रणदीवे यांचा राष्‍ट्रवादी कॉंग्रेस पार्टी पक्षामध्‍ये शेकडो शिवराज्‍य पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्‍यांसह जाहीर प्रवेश केला यावेळी माजी राज्‍यमंत्री राणाजगजीतसिंह पाटील यांच्‍या हस्‍ते प्रवेश देण्‍यात आला. यावेळी बलराज रणदिवे यांच्‍या समवेत दत्‍ता पवार, प्रकाश चव्‍हाण, कुमार ढाले, गणेश सुर्यवंशी,(देवळाली) गणपत साळुंके, संभाजी सुर्यंवशी,  सचिन मायकल, रवी झाडे, दिपक शिंदे, बाबा घटे, शिवाजी जाधव, आकश चव्‍हाण, राजू सुर्यवंशी, बाळू सुर्यवंशी, लहू शिंगाडे, बालाजी राठोड, रमेश चव्‍हाण, हनुमंत सुर्यवंशी, आदींनी प्रवेश घेतला यावेळी नगराध्‍यक्ष सुनिल काकडे, जिल्‍हाध्‍यक्ष सुरेश बिराजदार, कैलास पाटील, प्रवीण याधव, रमन जाधव मसुबभाई शेख, जुल्‍फेकार काझी, नाना घटगे, राजसिंह राजेनिंबाळकर, अभय इंगळे, मेसा जनराव, बापू पवार आदी मान्‍यवर उपस्थित होते.

Labels: