Monday, 30 June 2014

पालकमंत्री चव्हाण यांनी घेतला विकासकामांचा आढावा

तुळजापूर :- राज्याचे परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी तुळजापूर तालुक्यातील सलगरा मड्डी, बोरगाव (तु), शिंदगाव, हंगरगा (नळ) आदि गावाना भेटी देवून तेथील जनतेच्या अडी-अडचणी समजावून घेतल्या. शासकीय योजनेपासून कोणीही वंचित राहू नये,असे प्रतिपादन श्री. चव्हाण यांनी केले.
        तुळजापूर तालुक्यातील सलगरा मड्डी  येथे सामाजिक सभागृह, इंदिरा नगर ते नळदुर्ग रस्त्याचे भुमिपुजन पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते झाले.यावेळी कोरडवाहू शेती अभियानाचे उदघाटनही पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, या अभियानात शेतीशाळा, अभ्यासदौरा, पीकपाहणी याचा समावेश असल्याने यात सर्व शेतक-यांनी  सहभाग नोंदवावा असेही त्यांनी सांगीतले
    यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, तुळजापूर विकास प्राधिकरणाचे सदस्य अप्पासाहेब पाटील, जि.प.कृषी सभापती पंडीत जोकार, जि.प.सदस्य दिलीपराव सोमवंशी, सिद्रामप्पा मुळे, तुळजापूर पं.स. चे उपसभापती प्रकाश चव्हाण, अशोक पाटील, हरिश जाधव, जनार्धन वाघमारे, कृषी अधिकारी  एस. बी.जाधव, सा.गटविकास अधिकारी आर.व्ही.चकोर, महावितरणचे अभियंता म्हेत्रे, नायब तहसिलदार गणपतराव वाघे यांच्यासह  पदाधिकारी उपस्थित होते.
        यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले की, या कोरडवाहू शेती अभियानाला येणा-या खर्चाची तरतूद केली असून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या अभियानात सहभाग घ्यावा व अधुनिक शेती तंत्राची माहिती करुन घ्यावी असे आवाहन त्यांनी केले. नैसर्गिक आपत्तीमध्ये शासन शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून गारपीटग्रस्त शेतक-यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यात आली आहे असेही त्यांनी सांगीतले. शासनाच्या विविध योजना जनतेच्या दारी पोहाचविण्यात आल्या असून त्याचा चांगला फायदाही जनतेला झालेला आहे. शासनाच्या कृषी संजीवनी योजनेंतर्गत शेतक-यांना थकीत वीज बीलापैकी 50 टक्के रक्कम भरल्यास उर्वरित रक्कम माफ करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगीतले.
       बोरगाव येथे के.टी. बांधाऱ्याचे,अंतर्गत रस्त्यांचे भुमीपूजन तर शिंदगाव ते कुनसाळवाडी डांबरी रस्त्याचे लोकार्पण, हंगरगा (नळ) येथे दलीत वस्ती सुधार योजनेतून मंजूर असलेल्या सभागृहाचे, व सिमेंट रस्त्याचे भुमीपूजन तसेच वसंत नगर येथे बंजारा समाज मेळाव्याचे उदघाटन पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाले.     

Labels:

Sunday, 29 June 2014

बार्शीत शिवसेना कार्यकर्त्यांची बैठक

बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची जाहीरसभा होत आहे. दि.१९ जुलै रोजी बार्शीतील भगवंत मैदान येथे या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
      सभेचे नियोजन तसेच नवीन मतदारांची नोंद करण्यासाठी, वॉर्ड, प्रभागानुसार मतदारांची माहिती संकलन करण्यासाठी प्रमुख कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी बैठक घेतली. यावेळी पंचायत समितीचे उपसभापती केशव घोगरे, बाबासाहेब कापसे, आण्णा शिंदे, रावसाहेब मनगिरे, राजश्री डमरे, नगरसेवक दिपक राऊत, महेदिमियॉं लांडगे, आण्णा बोकेफोडे आदी उपस्थित होते.
    यावेळी बोलतांना राऊत म्हणाले, मागील पाच वर्षांत आपल्याकडे कोणतीही सत्ता नसतांनाही जनतेच्या अनेक अडचणी प्रामाणिकपणे सोडविण्याल्या. कार्यकर्त्यांनीही आपल्याकडे सत्ता नसल्याची उणीव भासू दिली नाही एकाही कार्यकर्त्यांने विरोधकांशी हातमिळवणी केली नाही यावरुनच जनतेचे प्रेम व विश्वास दिसून येत आहे. निवडणुकांचे कोणत्याही प्रकारचे वातावरण नाही तरीही पक्षप्रमुख उध्दव ठाकरे साहेबांच्या जाहीर सभेसाठी मोठ्या प्रमाणात गर्दि गोळा होईल. विधानसभेचे रणांगण तयार असून निवडुकीच्या रणसंग्रामात लढाईसाठी आपण सज्ज असल्याचे सांगत यावेळी कोणत्याही प्रकारच्या चुका होऊ देणार नाही, शिवसेनेतील आपला प्रवेश झाला त्यादिवशीच विरोधक पंक्चर झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत चांगले नियोजन केल्यामुळेच त्यांना यश मिळत गेले त्यांचा आदर्श व त्यांचे विचार घेऊन आपण वाटचाल करत आहोत. दूध उत्पादकांसाठी आपण दूध संघ सुरु केला, शेतकर्‍यांच्या प्रश्‍नासाठी आपण खाजगी तत्वावरील कृषि उत्पन्न बाजार समिती उभी केली त्याचे कामही जवळजवळ पूर्ण झाले असून पंधरा दिवसांत तेही पूर्ण होईल. त्यापुढे लिंबू प्रक्रिया उद्योग, चांगले हॉस्पिटल उभारणार आहोत.
    येणा-या काळात अनेक प्रकारचे नियोजन करायचे असल्याने जनतेने दुपारी एकच्या नंतर शक्यतो फोन करु नये. पोलिस स्टेशन उवा दवाखान्यातील अत्यंत आवश्यक काम असल्यास आपण कोणत्याही वेळी फोन घेऊ. येणार्‍या काळात नंबर वन बार्शी तालुका बनविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगीतले.

Labels:

वाचनालयाचे भूमिपूजन

बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: बेलगाव (ता.बार्शी) येथील मथुरा-नारायण सार्वजनिक वाचनालय इमारतीचे भूमिपूजन माजी शिवसेनेचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे उपसभापती केशव घोगरे, प्रा.अशोक सावळे, बाळासाहेब खराडे, खुशाल मुंढे, धीरज शेळके, नितीन शेळके, धनंजय शेळके, किशोर तावरे, अतुल डुरे, सुशिल घेवारे व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
    ग्रामीण विद्यार्थ्यांना पोलिस भरती परीक्षा, स्पर्धा परीक्षा, विविध क्षेत्रातील अभ्यासाकरिता वाचनालयाची गरज होती, ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी वाचनालयाचा चांगला उपयोग होणार असून जास्तीतजास्त विषयांच परिपूर्ण वाचनालय निर्माण करण्यासाठी सहकार्य करु असे आश्वासन राऊत यांनी यावेळी दिले.

Labels:

पावसाने आयर्न कारखान्‍यातील साखर भिजून लाखोचे नुकसान

बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : अचानक सुटलेल्या वादळात खामगांव (ता.बार्शी) येथील सोपल यांच्या आर्यन शुगर्स या खाजगी साखर कारखान्याच्या गोदामाचे छप्पर उडाले, यावेळी पाऊस पडल्याने आतील साखर भिजून खराब झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
     या गोदामात ठेवण्यात आलेल्या सुमारे ४५ ते ५० हजार क्विंटल तयार साखर छत उडून झालेल्या पावसाने भिजली आहेत. याचप्रमाणे मुख्य इमारतीवरील पत्रे उडाल्याने सुमारे २२ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती कारखान्याचे एम.डी. एस.आर.धाबेकर यांनी दिली. यावेळी कारखान्याचे चेअरमन योगेश सोपल, संचालक विलास रेणके व विश्वस्त उपस्थित होते. गुरुवारी दि.२६ रोजी रात्री आठ ते साडेआठच्या दरम्यान अचानक आलेल्या वादळात सदरची घटना घडली. यावेळी दोन गोदामाचा वरचा छत उडून गेला. यावेळी साखर कारखान्याच्या मुख्य इमारतीवरील काही पत्रे उडून गेल्याने नुकसान झाले आहे.
    बार्शी तालुक्यात सद्यस्थितीत सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचा इंद्रेश्वर शुगर्स व पालकमंत्री सोपल यांचा आर्यन शुगर्स हे केवळ दोन खाजगी साखर कारखाने सुरु असून. या दोन्ही साखर कारखान्याचा चांगला फायदा आजपर्यंत शेतकर्‍यांना झाला आहे.

Labels:

पालकमंत्री चव्हाण यांनी दिल्या विविध गावांना भेटी

उस्मानाबाद :- राज्याचे परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा, कामठा आणि कात्री आदि गावाना भेटी देवून तेथील जनतेच्या अडी-अडचणी समजावून घेतल्या. शासकीय योजनेपासून कोणीही वंचित राहू नये,असे प्रतिपादन  चव्हाण यांनी केले.
       तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा येथे दलित सुधार वस्ती योजना, इंदिरा आवास योजना, पाणीपुरवठा योजना, हांगणदारीमुक्त गाव तसेच पर्यावरण समतोल राखणे आदि बाबत आढावा घेतला. कामठा येथे जिल्हा नियोजन मंडळाकडून प्राप्त झालेल्या निधीतून दर्जेदार कामे करावीत, अशा सूचना पालकमंत्री श्री.चव्हाण यांनी  दिल्या.
    यावेळी तुळजापूर प्राधिकरणाचे सदस्य अप्पासाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन सभापती पंडित जोकार, अॅड. धीरज पाटील, बाबा वडणे, गटविकास अधिकारी श्री. खिल्लारे, नायब तहसीलदार श्री. वाघे, तालुका कृषी अधिकारी श्री.जाधव, महावितरणचे श्री. म्हेत्रे आदि उपस्थित होते.
     आपसिंगा ते दीपनगर तांडयापर्यंतचा रस्ता पूर्ण करण्यात यावा, असे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले. शासनाच्या विविध योजना अंमलबजावणी चांगल्या प्रकारे होत असून राजीव गांधी जीवनदायी योजनेत आजारी रुग्णांना या योजनेचा  लाभ झाला आहे. गारपीटमुळे झालेले नुकसान भरपाईसाठी शासनाने  निधी मंजूर केला आहे. निराधार लोकांना शासनाने घरकुल योजनेतून  घरे देऊन आधार दिला असल्याचेही त्यांनी सांगितले.
      काटी येथील पाणीपुरवठा योजनेतील व विहिरीचे कामे तातडीने पूर्ण करण्याबाबत संबंधित  अधिका-यांना सूचना पालकमंत्री चव्हाण यांनी  दिल्या.   त्या-त्या गावातील   सरपंच, उपसरपंच, सदस्य, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

Labels:

शहीद जावळे यांच्या कुटुंबियांचे पालकमंत्र्याकडून सांत्वन

उस्मानाबाद :- तालुक्यातील मेंढा गावचे सुपूत्र उमेश पांडूरंग जावळे हे गडचिरोली येथे नक्षलवाद्यांशी झुंज देत असताना शहीद झाले. मेंढा येथे जाऊन त्यांच्या कुटूंबियाची भेट पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी घेतली व त्यांचे सांत्वन केले.  यावेळी त्यांनी आम्ही आपल्या दुखामध्ये सहभागी असून आपल्या अडी-अडचणी सोडवण्यास आम्ही कटीबध्द आहोत, असे सांगितले.  यावेळी तुळजापूर प्राधिकरणाचे सदस्य अपासाहेब पाटील, लक्ष्मणराव सरडे, जि.प.सदस्य गुंड गुरुजी, श्री. सोनटक्के, धनंजय रणदिवे यांच्यासह ग्रामस्थ आदि उपस्थित होते.   

Labels:

शेतक-यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा : तोटावार

उस्मानाबाद :- या जिल्हयाचे पर्जन्यमान कमी आहे. शेतक-यांनी आधनिक शेती करण्या-यावर  भर दयावा. शेतक-यांनी कृषी विभागाच्या संपर्कात राहून शेतीचे नव-नवीन तंत्रज्ञान आत्मसात करुन आपला आर्थिक विकास साधावा, असे आवाहन  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले.
    उस्मानाबाद तालुक्यातील घोगरेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्रांगणात आयोजित विवेकानंद सेवाभावी संस्था, डोंबीवलीच्या सहकार्याने अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना बि-बियाणे, जैवीक खत वितरण कार्यक्रमात तोटावार यांनी  केले. यावेळी तालुका कृषि विकास अधिकारी डी. आर.जाधव, प्रगतीशिल शेतकरी भाऊसाहेब सावंत, कृषी पर्यवेक्षक बी. ए. पाटील, विवेकानंद सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष  केतन बोंदर, मंडळ कृषि अधिकारी ए. पी. चिक्षे आदि उपस्थित होते.
    यावेळी श्री.तोटावार म्हणाले की, या भागात मोठ्या प्रमाणात भाजीपाला उत्पादन होते. शेतक-यांनी उत्पादीत भाजीपाला विक्रीसाठी मोठ्या बाजारपेठेत पुरविण्याची व्यवस्था करण्यात येईल. अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतकरी वर्ग अडचणीत सापडला होता. सामाजिक बांधिलकीच्या भावनेने डोंबीवली येथे विवेकानंद सेवाभावी संस्थेने  शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आली. शेतक-यांना सुमारे 80 हजार रुपयाचे बी-बीयाणे, जैवीक खत मदत दिल्याबद्दल संस्थेचे आभार मानले. घोगरेवाडी गाव मॉडेल गाव करुन या गावच्या शेतीचे विकास कार्यात सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
    विवेकानंद  सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष केतन  बोंदर म्हणाले की, अवकाळी पाऊस, व गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी वर्ग  हवालदिल होवून अडचणीत आला. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून संस्थेने सुमारे 350 शेतक-यांना मदतीचा हात दिला असल्याचे सांगून  गावच्या विकासात गावक-यांचा सहभाग महत्वाचा असून गावक-यांनी एकजुटीने काम करावा. आधुनिक तंत्र व मार्केटींगचा अभ्यास करुनच शेतीचे उत्पन्न घ्यावे, असा मौलिक सल्ला त्यांनी दिला.
            प्रगतीशिल शेतकरी श्री सावंत, म्हणाले की, कृषी विभागाने या घोगरेवाडी गावच्या सर्वांगीण विकासासाठी मॉडेल गाव म्हणून निवड  करुन येथे शासनाच्या कृषी विभागाने विविध योजना राबवण्याची आवश्यकता आहे अशी आग्रहाची मागणी केली.
    प्रास्ताविकात तालुका कृषि अधिकारी श्री. जाधव यांनी केले.या कार्यक्रमास विवेकानंद स्वयंसेवी संस्थांचे उपाध्यक्ष रवी वारंग, कोषाध्यक्ष शैलेश निपुलगे,संस्थेचे सदस्य, प्रगतीशिल शेतकरी, लोकप्रतिनिधी,गावकरी  आदि उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कृषि पर्यवेक्षक के. जी. सुरवसे यांनी केले तर आभार प्रदर्शन मंडळ कृषि अधिकारी ए. पी. चिक्षे यांनी केले.
                                         पॉली हाऊसला भेट
    एमआयडीसी भाग परिसरातील शुरसेन शहाजी घोगरे यांच्या पॉली हाऊसला विवेकानंद संस्थेचे केतन बोंदर, संस्थेचे उपाध्यक्ष रवी वारंग, कोषाध्यक्ष शैलेश निपुलगे,संस्थेचे सदस्य, प्रगतीशिल शेतकरी, सावंत, संस्थेतील पथकानी भेट देवून शेततळी, फुलशेतीची पाहणी करुन  विविध फुलांची सविस्तर माहिती घोरगे यांनी दिली. त्यांच्यासमवेत कृषी अधीक्षक, शंकर तोटावार, तालुका कृषी अधिकारी डी.आर.जाधव, प्रगतीशिल शेतकरी भाऊसाहेब सावंत, कृषी पर्यवेक्षक बी. ए. पाटील, मंडळ कृषि अधिकारी ए. पी. चिक्षे आदि उपस्थित होते.

Labels:

Saturday, 28 June 2014

वीजपुरवठा सुरळीत करण्याकडे लक्ष द्या : ना. चव्‍हाण

उस्मानाबाद :- ज्या ग्राहकांना जादा वीज देयके देण्यात आली ते दुरुस्ती करण्यात यावी. वीजपुरवठा सुरळीत ठेवून नागरिकांना त्रास होणार नाही, अशा पद्धतीने काम करण्याच्या सूचना राज्याचे परिवहनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी महावितरणच्या अधिका-यांना दिल्या.
         तुळजापूर येथील सर्कीट हाऊसवर वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांची पालकमंत्री चव्हाण यांनी आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस विद्युत मंडळाचे अधीक्षक अभियंता श्री. पापडकर, कार्यकारी अभियंता इ.व्ही. मामीलवाड, सर्व सहायक अभियंता, तुळजापूर विकास प्राधिकरणाचे सदस्य आप्पासाहेब पाटील, जि.प. सदस्य, काशिनाथ बंडगर, अॅड. धीरज पाटील, जि.प. कृषी सभापती पंडित जोकार, तुळजापूर पं.स. चे उपसभापती प्रकाश चव्हाण, तहसीलदार काशीनाथ पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
    पालकमंत्री चव्हाण म्हणाले की, वीज मंडळाने विनाकारण वीज पुरवठा खंडीत होणार नाही, याची दक्षता घ्यावी. खंडीत वीज पुरवठा तात्काळ सुरु करावा. अवकाळी पाऊस, गारपीठीमुळे वीजेचे खांब पडले आहेत, ते पुन्हा उभारुन वीज पुरवठा सुरळीत करावा. ज्या गावात नवीन डीपीची मागणी आहे तेथे नवीन डीपीची उभारणी करावी. शेतक-यांना शेतीसाठी पाणी लागते मात्र  वीजेअभावी ते मिळत नाही, तेव्हा संबंधित यंत्रणेने लक्ष घालून शेतकऱ्यांचा वीज पुरवठा पुर्ववत सुरु ठेवण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
     कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचा-यांची गय केली जाणार नाही. संबंधितावर कार्यवाही करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश संबधित यंत्रणेला दिले.

Labels:

मंगळवारी कृषी दिन

उस्मानाबाद -: राज्य शासनाचा कृषि विभाग आणि जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांच्या वतीने राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त मंगळवार, दि. 1 जुलै रोजी कृषि दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
    जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी 11-30 वाजता राज्याचे परिवहनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले  असून खासदार रविंद्र गायकवाड हे उदघाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमास राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, आमदार सर्वश्री दिलीपराव देशमुख, ओमराजे निंबाळकर, राहूल मोटे, विक्रम काळे, ज्ञानराज चौगुले, सतीश चव्हाण, जिल्हाधिकारी  डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत, जि.प. उपाध्यक्ष संजय पाटील दुधगांवकर, जि.प. चे अर्थ बांधकाम सभापती धनंजय सावंत, कृषि व पशुसंवर्धन सभापती पंडीत जोकार, समाज कल्याण सभापती दगडु धावारे,महिला व बालकल्याण सभापती सविता कोरे, पं.स.सभापती प्रेमलता लोखंडे, उपसभापती दत्तात्रय देवळकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत हजारे  यांच्यासह  मान्यवर  उपस्थित राहणार आहेत.
    या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि  अधिकारी शंकर तोटावार, जि.प.चे कृषि विकास अधिकारी एम. एस. मिणीयार, आत्माचे प्रकल्प संचालक डी. डी. लोखंडे यांनी  केले आहे.          

Labels:

विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम

उस्मानाबाद :- मुख्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार दि. 1 जानेवारी 2014 या अर्हता दिनांकावर आधारित विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यकम 30 जुनपर्यंत राबविण्यात येणार असल्याने मतदार नेांदणीसाठी आलेल्या अधिकारी व कर्मचा-यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी केले आहे.
    विशेष कार्यक्रम शनिवार, 28 जुन  व रविवार, दि. 29 जुन राहणार असल्याने सर्व पात्र मतदारांनी आपले नाव नेांदणी करण्याकरीता आपल्या मतदान केंद्रातील केंद्रस्तरीय बी. एल. ओ. यांचेकडे किंवा सहायक मतदान नेांदणी अधिकारी तथा तहसीलदार यांचेकडे नाव नेांदणीसाठी  संपर्क साधावा.
    पात्र मतदारांनी याचा लाभ घ्यावा. तसेच शाळा/ महाविद्यालये यांचे मुख्याध्यापक/ प्राचार्य /सामाजिक संस्था/ संघटना तसेच राजकीय पक्षांचे मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी बी. एल. ए.  यांनीही मतदान नोंदणीच्या कार्यात सहकार्य करावे, असे उप जिल्हा निवडणूक अधिकारी प्रभोदय मुळे यांनी एका कळविले आहे.   

Labels:

कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत पेरणी यंत्राचे वाटप

उस्मानाबाद -: ढोकी (ता. उस्मानाबाद) येथील कृषि चिकित्सालयात कोरडवाहू शेती अभियान 2014-15 कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत  उस्मानाबाद तालुक्यातील 24 शेतकऱ्यांना बी बी एफ पेरणी यंत्राचे वाटप आमदार ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.  
         याप्रसंगी तालुका कृषि अधिकारी डी. आर. जाधव, मंडळ कृषि अधिकारी ए. पी. चिक्षे, कृषि पर्यवेक्षक बी. व्ही. पाटील, के. जी. सुरवसे, टी. जी. हिप्परकर, व्ही. आर. गायकवाड व येडशी आणि तेर मंडळातील सर्व कृषि सहायक उपस्थित होते.
    कृषि विभागाने अल्प /अत्यल्प, मागासवर्गीय व महिला शेतक-यांना व बहुभूधारक शेतक-यांना अल्पदरात यंत्र मंजूर केल्याने निश्चितच शेतक-यांच्या शेती उत्पन्नात वाढ होईल, असा विश्वास यावेळी आमदार निंबाळकर यांनी व्यक्त केला. कोरडवाहू शेती अभियान अंतर्गत बीबीएफ यंत्र अनुदान तत्वावर वाटपाचा कार्यक्रम हा शेतक-यांसाठी अतिशय उपयुक्त असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
      या पेरणी यंत्रामुळे रुंद सरी वरंब्यावर पेरणी करता येईल. प्रत्येक वरंब्यावर सरी पडल्याने सरित पावसाचे पाणी मुरुन जलसंधारण होते. जास्त पाऊस झाल्यास पाण्याचा निचरा होवून पिकाचे 20 टक्के अधिक उत्पादन होण्यास मदत होईल, असे यावेळी कृषी अधिकारी यांनी सांगितले.
    प्रास्ताविकात तालुका कृषि अधिकारी जाधव यांनी कोरडवाहू अभियान योजनेचे महत्व विशद केले. या पेरणी यंत्राची किंमत 48 हजार 348 असून अल्प, अत्यल्प, भूधारक शेतकरी, मागासवर्गीय व महिला शेतक-यांना 4 हजार 348 रुपयाला प्रतिनग तर बहुभूधारक शेतक-यांना  यंत्र 13 हजार 348 प्रति नग या प्रमाणे वाटप करण्यात येत  असल्याचे त्यांनी सांगितले.

Labels:

मागासवर्गीय मुला-मुलींचे शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन सुरु

उस्मानाबाद :- सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागातंर्गत  जिल्ह्यातील  खालील मागासवर्गीय मुला/ मुलींचे  शासकीय वसतिगृहाची 2014-15 या शैक्षणिक वर्षासाठी  प्रवेश प्रक्रिया 23 जुनपासून  ऑनलाईन सुरु झाली असून मागासवर्गीय मुला/ मुलींनी  प्रवेशासाठी संबंधित वसतिगृहाच्या गृहपाल यांच्याशी संपर्क साधुन विहीत कालावधीत  प्रवेश अर्ज ऑन लाईन भरावेत. वसतिगृह प्रवेशासाठी प्रवेश अर्ज https://mahaeschol.maharashtra.gov.in  या वेबसाइ्टवर जाऊन रजिस्ट्रेशन करुन ऑनलाईन अर्ज मुदतीतच सादर करावेत, असे आवाहन अनिल शेंदारकर,  सहायक आयुक्त, समाज कल्याण, उस्मानाबाद यांनी केले आहे.
          जिल्हास्तर व तालुकास्तरावरील शासकीय वसतिगृहासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 11 जुलै असून  वसतिगृह निहाय प्रवेशित विद्यार्थ्यांची यादी वेबसाइटवर 19 जुलै रोजी प्रसिध्द करण्यात येईल.  ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळाला असेल, त्या वसतिगृहाच्या गृहपाल यांच्याशी 24 जुलैपुर्वी संपर्क साधुन त्यांना मुळ कागदपत्रे दाखवून त्यांच्याकडे  कागदपत्राच्या झॅरोक्त प्रत सादर करावीत.
         उस्मानाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय (मुलांचे) शासकीय वसतिगृह, एल. आय. सी. आफीस तुळजापूर रोड, उस्मानाबाद आणि मागासवर्गीय (मुलींचे) शासकीय वसतिगृह- आर. पी. कॉलेजच्या पाठीमागे, उस्मानाबाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय (मुलांचे) शासकीय वसतिगृह, तुळजापूर, शिंदे हायस्कुलच्या शेजारी, मागासवर्गीय व आर्थिकदृष्टया मागासवर्गीय (मुलींचे) शासकीय वसतिगृह, तुळजपूर, एस. टी. कॉलनी-सैनिकी शाळेच्या समेार, तुळजापूर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय (मुलांचे) शासकीय वसतिगृह, नळदुर्ग- कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या पाठीमागे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय (मुलांचे) शासकीय वसतिगृह, लोहारा, सलगरा (दि). रोड, लोहारा, मागासवर्गीय व आर्थिकदृष्टया मागासवर्गीय (मुलींचे) शासकीय वसतिगृह, बालाजीनगर-उमरगा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय (मुलांचे) शासकीय वसतिगृह, कळंब, पंचायत समितीच्याशेजारी, मागासवीर्गय व आर्थिकदृष्या मागासवर्गीय (मुलींचे )  वसतीगृह, वाशी, जुने एस. टी. स्टॅन्डजवळ-वाशी, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय (मुलांचे) शासकीय वसतिगृह करमाळा रोड, आय. टी. आय. शेजारी, परंडा.
        ऑनलाईन अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी सोबत जातीचा प्रवर्ग व जात जातीचा दाखल/ जात वैद्यता प्रमाण, पालकांचे वार्षिक उत्पन्न (सक्षम अधिकाऱ्यांचा) उत्पन्ननाचा दाखला, अनाथ अल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र, अपंग असल्यास अपंगाची टक्केवारी व त्याबाबतचे (सक्षम अधिकारी) यांचे प्रमाणपत्र, दारिद्रय रेषेखाली असल्यास बी. पी. एल कार्डनंबर, मागील परीक्षेची गुणपत्रिका, विद्यार्थ्यांचा  /  पालकांचा मोबाईल क्रमांक/ ईमेल आयडी/ दुरध्वनी क्रमांक सोबत ठेवून ऑनलाईन अर्ज पुर्णपणे करावेत. अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून ठेवावी. अर्जासोबत कोणतेही कागदपत्रे जोडण्याची आवश्यकता नाही अथवा ती वसतिगृहाचे गृहपाल/ गृहप्रमुख यांच्याकडे सादर करण्याची आवश्यकता नाही.
विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत प्रवेश न घेतल्यास प्रवेश अर्ज रदृ करण्यात येईल. प्रतिक्षा यादी 30 जुलै रोजी वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात येईल. प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना ज्या शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला असेल त्या वसतिगृहाच्या  गृहपाल यांच्याशी 5 ऑगस्ट पुर्वी संपर्क साधुन पवेश घ्यावे. एकदा मिळालेले शासकीय वसतिगृह कोणत्याही कारणास्तव बदलून मिळणार नाही. अर्जात चुकीची माहिती आढळून आल्यास किंवा कागदपत्रे उपलब्ध नसल्यास त्या विद्यार्थ्यांचा अर्ज रदृ केला जाईल.
         ऑनलाईन अर्ज भरण्यास कांही अडचणी आल्यास त्यांनी मागासवगीर्य वसतिगृहात कागदपत्रे/ माहिती घेवून आल्यास त्यांचे अर्ज संबंधित वसतिगृहाच्या गृहपालकांकडून भरुन घ्यावेत अथवा आपल्या जिल्ह्यातील  शासकीस वसतिगृहाचे गृहपाल, संबंधित जिल्ह्याचे सहायक आयुक्त, समाज कल्याण/ सबंधित विभागाचे प्रादेशिक उप-आयुक्त समाज कल्याण यांच्याशी संपर्क सधावा व त्या अधिका-यांचे  दुरध्वनी क्रमांक वरील वेबसाईटवर संपर्कासाठी दिलेले आहे.  व्यावसायीक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम तारीख 31 जुलै नंतर वरील वेबसाईट वर प्रसिध्द करण्यात येईल.

Labels:

Friday, 27 June 2014

उस्मानाबाद जिल्ह्यात गजानन महाराजांच्या पालखीचे भव्य स्वागत

कळंब -: श्रीक्षेत्र शेगाव येथील संत गजानन महाराजांच्या पालखीचे उस्मानाबाद जिल्ह्याच्या हद्दीत मांजरा नदीच्या पुलाजवळ  कळंब शहरानजीक भक्तांनी अभूतपुर्व स्वागत केले. ही दिंडी शहरात दाखल होताच नगराध्यक्ष शिवाजी कापसे यांनी या पालखीचे पूजन करुन, मानक-यांचा सत्कार केला. यावेळी विठ्ठल नामाच्या गजराने कळंब नगरी दुमदुमन गेली होती.
      बीड जिल्ह्यातून गुरूवार (दि.२६) रोजी कळंब शहरात सायंकाळी या दिंडीचे आगमन झाले. यावेळी शहर व पंचक्रोशीतील गजानन भक्तांनी या पालखीचे अभूतपुर्व स्वागत केले. व्दारकानगरीपासून, शहरापर्यंत भाविक भक्तांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती तर अनेक दानशूर व्यक्तींनी यावेळी खाऊचे वाटप केले.
      शेगावच्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्यात अनेक वर्षापासून अबाल वृध्दांचे आकर्षण ठरलेल्या हत्तीणीचा मृत्यू झाल्याने, या वर्षीच्या पालखीत ती न दिसल्याने भाविक भक्तात चर्चा होती. हत्तीन नसल्याने, या पालखी सोहळ्यात या वर्षीपासून तीन अश्वांचा समावेश करण्यात आलेला आहे. प्रतीवर्ष्याप्रमाणे संध्याकाळी करंजकर परिवाराच्या वतीने आरती करण्यात येउन अन्नदान करण्यात आले , कळंब येथील जि.प.मुलांच्या शाळेत या पालखीचा मुक्काम असतो, कळंबमधून दि. २७ रोजी पहाटे पाच वाजता या दिंडीचे ढोकीकडे प्रयाण झाले, या पालखी सोबत चार पोलीस निरीक्षक, पाच पोलीस उपनिरीक्षक, ४७ पोलीस कर्मचारी, अकरा महिला कर्मचारी, साध्या वेशातील दहा कर्मचारी व रुग्णवाहिकेसह चार वाहने ठेवण्यात आली आहेत.

Labels:

मनसेच्‍या उस्मानाबाद जिल्हा क्रिडा विभागपदी धर्मराज सावंत

तुळजापूर -: येथील धर्मराज सावंत यांची महाराष्‍ट्र नविनर्माण सेनेच्‍या क्रिडा विभाग उस्‍मानाबाद जिल्‍हाध्‍यक्षपदी निवड करण्‍यात आली आहे.
    मनसविचे अदित्य शिरोडकर, राजेश येरुनकर साहेब यांच्या आदेशानुसार तसेच मनविसेचे जिल्हा संपर्क प्रमुख समिर राऊळ, मनसेचे जिल्‍हाध्‍यक्ष अमर परमेश्‍वर, इंद्रजित देवकते यांच्‍यात उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना क्रिडा विभाग जिल्हा अध्यक्ष पदी धर्मराज सावंत यांची निवड करण्यात आली. त्‍यांच्‍या या निवडीबद्दल अनेकांनी त्‍यांचे अभिनंदन केले आहे.

Labels:

एक झंझावात -अशोक जगदाळे

        उस्‍मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग या ठिकाणी २७ जून १९६६ रोजी अशोक जगदाळे  यांचा जन्‍म झाला. घरची बेताची परिस्थिती असतानाही शिक्षणाच्या आवडीने आणि ध्यासाने त्यांनी कमवा व शिका या तत्त्वाचे पालन करत दहावी पर्यंतचे शिक्षण नळदुर्ग येथील जिल्‍हा परिषदेत  पूर्ण केले. त्‍यानंतर त्‍यांनी गुलबर्गा येथे सिव्हिल डिप्‍लोमाचे शिक्षण पुर्ण केले. शिक्षण पूर्ण केल्‍यांनतर वयाच्या अवघ्‍या १८ व्या वर्षी सिव्हिल इंजिनियर होण्याचे त्यांचे स्वप्न मुंबई महापालिकेत १९८४ साली रुजू झाल्‍याने साकार झाले. सिव्हिल इंजिनियरिंगचा संबंध नैसर्गिक गोष्टी व विकासाशी येतो आणि स्थापत्यशास्त्र ही सर्व उद्योगांची जननी आहे असा विचार करून त्यांनी नौकरी करीत असतानाच रात्रीच्‍या शिक्षणातून सिव्हिल इंजिनियर डिग्रीचे शिक्षण पूर्ण केले. त्‍यांच्‍याकडे असलेल्‍या जिद़द व चिकाटीचा त्यांना शिक्षण घेत असताना खूप फायदा झाला.
सुरुवातीपासूनच त्‍यांची जास्‍त काळ नोकरी न करता स्वताचा उद़योग व्‍यवसाय उभारण्याची महत्त्वाकांक्षा होती.  त्‍यांनी १९९० साली महापलिकेतील नौकरीचा राजीनामा देवून जगदाळे अॅन्‍ड असोसिएटस या छोटया फर्मची स्‍थापना केली. सुरुवातीच्‍या काळात छोटी- मोठी कामे करीत व्‍यवसायावर जम बसविण्‍याचा प्रयत्‍न केला. या कंपनीच्‍या माध्‍यमातून काम करीत असताना उद्योगाला आवश्यक असा अनुभव त्यांनी मिळविला. कोणतीही व्यावसायिक परंपरा नसताना, पैशाचे पाठबळ नसताना, केवळ जिद्द आणि  ज्ञानाच्या जोरावर  त्‍यांनी २००० साली ‘दष्‍टी इंजिनअरिंग डेव्‍हलपर्स’ या कंपनीच्‍या माध्‍यमातून बांधकाम क्षेत्रातील मोठे व्‍यावसाय करण्‍यास सुरुवात केली. त्यांनी अत्यंत चिकाटीने कामे पूर्ण केल्याने त्‍यांना अल्‍पावधितच मुंबई शहरातील मोठे व्यावसायिक म्हणून ओळखले जाऊ लागले.
या कंपनीच्‍या माध्‍यमातून अल्‍पवाधितच अशोक जगदाळे यांचे नाव सर्वत्र झाले. २००५ साली दष्‍टी फर्ममध्‍ये त्‍याचे रुंपातर केले. तर २००७ साली त्‍यांनी दष्‍टी ग्रुपची स्‍थापना केली. आजमित्‍तीस मुंबईस राज्‍यभरातील पुणे, औरंगाबाद, सोलापूर या ठिकाणी दष्‍टी उदयोग समुहाच्‍या माध्‍यमातून ४५० कोटी रुपयांचे प्रोजेक्‍ट सुरु आहेत. कोणतेही काम उत्तम दर्जाचे व वेळेवर करण्याचे बांधकाम शास्त्राचे अर्थशास्त्र अशोक जगदाळे यांनी अंगिकारले आहे. 

आपण ज्‍या मातीत वाढलो आणि मोठे झाले त्‍या समाजाचे काही तरी देणे लागतो या उद्दत हेतूने त्‍यांनी नळदूर्ग या आपल्‍या जन्‍मगावाशी नाळ जोडलेली होती. त्‍यातूनच त्‍यांनी २०१० साली नळदुर्ग शहरालगत असलेला तुळजाभवानी शेतकरी सहकार साखर कारखाना चालविण्‍यास घेतला. त्‍यांनी कारखाना चालविण्‍यास घेण्‍याअगोदर दोन वर्षांपासून हा कारखाना बंद होता. राज्‍यातील कोणताही मोठा उदयोजक हा कारखाना चालविण्‍यासाठी घेण्‍यास तयार नव्‍हता. मात्र, त्‍यानी केवळ समाजाविषयी असलेली बांधिलकी लक्षात घेवून हा कारखाना भाडेतत्‍वार सहा वर्षांसाठी चालविण्‍यास घेतला. कारखाना दोन वर्ष चालवत त्‍यांनी एक वर्ष गाळप करून परिसरातील शेतक-यांची वाहवहा मिळवली. मात्र, हा कारखाना उस्‍मानाबाद ज्लिहा मध्‍यवर्ती बँकेचा कर्जदार असल्‍याने त्‍यांनी कारखान्‍याला जप्‍तीची नोटीस पाठविली. त्‍यामुळे कारखाना कर्जाची रक्‍कम भरत नसल्‍याने जगदाळे यांचा भाडेतत्‍ववरील करार मध्‍येच मोडण्‍यात आला. यामुळे त्‍यांना सहा कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. त्‍यानंतरही त्‍यांनी न डगमगता सामाजीक कार्य सुरुच ठेवले आहे.

त्‍यांनी नळदुर्ग येथील अंबाबाई मंदिराचा जीर्णोध्‍दार केला आहे. त्‍यासाठी त्‍यांनी मोठी देणगी मदत म्‍हणून दिली आहे. त्‍यासोबतच नळदुर्ग परिसरातील नंदगाव व अनेक गावातील मंदिर जीर्णोध्‍दरासाठी मोठी देणगी देवून समाजप्रती असलेली निष्‍ठा त्‍यांनी दाखवून दिली आहे.  त्यासोबतच जगदाळे यांनी नळदुर्ग येथे १७ मे रोजी सामुदायिक विवाह सोहळयाचे आयोजन केले होते. या विवाह सोहळयात १९ जोडप्यांचे विवाह करण्यात आले. या सोहळयासाठी तालुक्यातून वीस हजारपेक्षा आधिक नागरिक जमले होते.  आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना त्यामुळे मोठी मदत झाली आहे. याशिवाय त्यांनी समाजातील अनेक गरजुंना मदत केली आहे. कित्येक पेशंटना ऑपरेशनसाठी मदत म्हणून त्यांनी देणगी स्वरूपात रक्कम दिली. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत. त्यासोबतच नळदुर्ग शहरात त्यांनी पाणपोई सारखे सामाजीक उपक्रम राबवत समाजापुढे आदर्श ठेवण्याचे काम केले आहे. महिलांचे आरोग्य सुलभ रहावे म्हणून त्यांनी काटगाव, जळ‌कोट व नळदुर्ग येथे मोफत स्त्री रोग निदान शिबिराचे आयोजन केले.

आगामी काळातही जगदाळे हे तालुक्यातील जनतेच्या विकासासाठी अनेक उपक्रम राबविणार आहेत. विशेषता, तुळजापूर तालुक्यात मोठे उद्योग नसल्याने बेराजगारीचे प्रमाण अधिक आहे. युवा वर्गातील बेरोजगाराचे प्रमाण कमी व्हावे याकरीता ते कारखान्याची उभारणी करणार असून त्‍यामाध्‍यमातून तालुक्‍यातील अनेकजणांना रोजगार उपलब्‍ध होणार आहे. त्यासोबतच शैक्ष‌णीक संस्था उभारण्याचा त्यांचा मानस आहे. गेल्‍या ३० वर्षापासून अविरतपणे उदयोग क्षेत्रात व समाजसेवा करीत असलेल्‍या जगदाळे यांचा तुळजापूर तालुक्यातील जनेतेची सेवा करायची आहे.  आगामी काळात त्‍यांना लोकप्रतिनिधी म्हणून जनतेची कामे करायची आहेत. त्यामुळे त्यांचे जनेतेचे सेवा करण्याचे हे स्वप्न पूर्ण होऊ दे हीच त्यांच्या वाढदिनी तुळजाभवानी मातेच्या चरणी प्रार्थना. 

Labels: , , ,

Thursday, 26 June 2014

युवा पिढी घडविणारे समाजसेवक- जगदाळे

   नळदुर्ग  -   एकविसाव्या शतकात सर्वच क्षेत्रात उदयोग व्‍यवसायांनी भरारी घेतली आहे. आता प्रत्येक क्षेत्रात उदयोजक पाय रोवून खंबीरपणे उभे आहेत.नळदुर्गचे सुपूत्र अशोक भाऊ जगदाळे यानी  डिप्‍लोमाचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर जास्‍त काळ सरकारी नौकरी न करता करिअर म्हणून उद्योगची सुरुवात केली.
    उदयोजक अशोक जगदाळे  यानी स्‍वता बरोबरच अन्‍य काही युवकांना रोजगार मिळवून देत स्‍वताच्‍या पायावर उभे करण्‍याची किमया  साधली आहे. त्‍यांच्‍यामुळेच आज अनेक युवकांना स्‍वताच्‍या पायावर उभे राहता आले आहे. त्‍यांनी अनेक संसराला उभारी देण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. त्‍यांचा हा उपक्रम कौतुकास्‍पद तर आहेच त्‍याशिवाय समाजासाठी ‘माईल स्‍टोन’ ठरणारा आहे.
मुंबईत उदयोजक म्‍हणून यशस्‍वी ठरलेल्‍या अशोक जगदाळे यांनी अल्पावधीतच तुळजापूर तालुक्‍यात समाजसेवक म्‍हणून नावलौकिक मिळविला आहे. त्‍यानी समाजसेवक म्‍हणून कामगिरी करीत असताना सर्वसामान्यांमध्ये लोकप्रियता मिळवली आहे. सरकारी सेवेला रामराम ठोकून समाजकार्यामार्गे राजकारणात उतरण्‍याचा प्रयत्‍न करीत असलेल्‍या अशोक जगदाळे यांचा जन्‍म २७ जुलै १९६६ रोजी नळदुर्ग ता. तुळजापूर येथे झाला. त्यांचे वडील पेशाने शिक्षक होते. त्‍यांचे बालपण नळदुर्ग येथे गेले. नळदुर्ग येथील जिल्‍हा परिषदेच्‍या शाळेत शालेय शिक्षणानंतर ते गुलबर्गा येथील पॉलेटेक्‍नीक कॉलेजमधून सिव्हिल इंजिनिअर झाले.
त्‍यांनतर त्‍यांनी लगेचच १९८४ साली म्‍हणजे वयाच्‍या १८ व्‍या वर्षी मुंबई महापलिकेत इं‍जिनीअर म्‍हणून सरकारी सेवेत रुजू झाले आहे. त्‍यांनतर त्‍यानी नौकरी करीत असतानाचा रात्र शाळेतून डिग्रीचे शिक्षण पूर्ण केले. सुरुवातीपासूनच त्‍यांची जास्‍त काळ नोकरी न करता स्वताचा उद़योग व्‍यवसाय उभारण्याची महत्त्वाकांक्षा होती.  त्‍यांनी १९९० साली महापलिकेतील नौकरीचा राजीनामा देवून जगदाळे अॅन्‍ड असोसिएटस या छोटया फर्मची स्‍थापना केली. कोणतीही व्यावसायिक परंपरा नसताना, पैशाचे पाठबळ नसताना, केवळ जिद्द आणि  ज्ञानाच्या जोरावर  त्‍यांनी २००० साली ‘दष्‍टी इंजिनअरिंग डेव्‍हलपर्स’ या कंपनीच्‍या माध्‍यमातून बांधकाम क्षेत्रातील मोठे व्‍यावसाय करण्‍यास सुरुवात केली.

या कंपनीच्‍या माध्‍यमातून अल्‍पवाधितच अशोक जगदाळे यांचे नाव सर्वत्र झाले. २००५ साली दष्‍टी फर्ममध्‍ये त्‍याचे रुंपातर केले. तर २००७ साली त्‍यांनी दष्‍टी ग्रुपची स्‍थापना केली. आजमित्‍तीस मुंबईस राज्‍यभरातील पुणे, औरंगाबाद, सोलापूर या ठिकाणी दष्‍टी उदयोग समुहाच्‍या माध्‍यमातून ४५० कोटी रुपयांचे प्रोजेक्‍ट सुरु आहेत. कोणतेही काम उत्तम दर्जाचे व वेळेवर करण्याचे बांधकाम शास्त्राचे अर्थशास्त्र अशोक जगदाळे यांनी अंगिकारले आहे.
त्‍यांनी सुरू केलेल्‍या विविध ठिकाणच्‍या प्रोजेक्‍टमधून काम करीत असलेल्‍या शेकडो बेरोजगारांना रोजगारांना रोजगार उपलब्‍ध झाला आहे. कित्‍येक जणांना स्‍वताच्‍या पायावर उभे करण्‍यासाठी त्‍यांनी सर्वोत्‍तपरी मदत केली. आतापर्यंत त्‍यांच्‍या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणच्‍या प्रोजेक्‍टवर काम करणारे हजारो युवक स्‍वावलंबी झाले आहेत. स्‍वताच्‍या पायावर उभे असलेले कित्‍येक  युवक आज अशोकभाउ मुळेच आम्‍हाला नवीन मार्ग उपलब्‍ध झाला असे सांगतात.
आपण ज्‍या मातीत वाढलो आणि मोठे झाले त्‍या समाजाचे काही तरी देणे लागतो या उद्दत हेतूने त्‍यांनी नळदूर्ग या आपल्‍या जन्‍मगावाशी नाळ जोडलेली होती. त्‍यातूनच त्‍यांनी २०१० साली नळदुर्ग शहरालगत असलेला तुळजाभवानी शेतकरी सहकार साखर कारखाना चालविण्‍यास घेतला. त्‍यांनी कारखाना चालविण्‍यास घेण्‍याअगोदर दोन वर्षांपासून हा कारखाना बंद होता. राज्‍यातील कोणताही मोठा उदयोजक हा कारखाना चालविण्‍यासाठी घेण्‍यास तयार नव्‍हता. मात्र, त्‍यानी केवळ समाजाविषयी असलेली बांधिलकी लक्षात घेवून हा कारखाना भाडेतत्‍वार सहा वर्षांसाठी चालविण्‍यास घेतला. दोन वर्ष त्‍यांनी कारखाना चालविला एक वर्ष गाळप करून परिसरातील शेतक-यांची वाहवहा मिळवली. मात्र, हा कारखाना उस्‍मानाबाद जिल्‍हा मध्‍यवर्ती बँकेचा कर्जदार असल्‍याने त्‍यांनी कारखान्‍याला जप्‍तीची नोटीस पाठविली. त्‍यामुळे कारखाना कर्जाची रक्‍कम भरत नसल्‍याने जगदाळे यांचा भाडेतत्‍ववरील करार मध्‍येच मोडण्‍यात आला. यामुळे त्‍यांना सहा कोटी रुपयांचे मोठे नुकसान सहन करावे लागले. त्‍यानंतरही त्‍यांनी न डगमगता सामाजीक कार्य सुरुच ठेवले आहे.
त्‍यांनी नळदुर्ग येथील अंबाबाई मंदिराचा जीर्णोध्‍दार केला आहे. त्‍यासाठी त्‍यांनी मोठी देणगी मदत म्‍हणून दिली आहे. त्‍यासोबतच नळदुर्ग परिसरातील नंदगाव व अनेक गावातील मंदिर जीर्णोध्‍दरासाठी मोठी देणगी देवून समाजप्रती असलेली निष्‍ठा त्‍यांनी दाखवून दिली आहे.  त्यासोबतच जगदाळे यांनी नळदुर्ग येथे १७ मे रोजी सामुदायिक विवाह सोहळयाचे आयोजन केले होते. या विवाह सोहळयात १९ जोडप्यांचे विवाह केले. या सोहळयासाठी तालुक्यातून वीस हजारपेक्षा आधिक नागरिक जमले होते. कित्येक पेशंटना ऑपरेशनसाठी मदत म्हणून त्यांनी देणगी स्वरूपात रक्कम दिली. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत. महिलांचे आरोग्य सुलभ रहावे म्हणून त्यांनी काटगाव, जळ‌कोट व नळदुर्ग येथे मोफत स्त्री रोग निदान शिबिराचे आयोजन केले.
समाजसेवेची आवड निर्माण झाल्‍याने नळदुर्ग येथील युवकांची मदत घेत त्‍यांनी समाजसेवेची  चळवळ सुरूच ठेवली. समाजसेवा ही राजकारणविरहित हवी होती; पण चर्चेने फार काही साध्य होणार नाही, राजकारणात उतरण्याशिवाय पर्याय नाही, त्यासाठी राजकारणात उतरावे, असे ठरल्‍याने त्‍यांनी आगामी काळात राजकारणात उतरण्‍याचा निर्णय घेतला आहे. त्‍यांच्‍या या निर्णयाचे सर्वसस्‍तारातून स्‍वागत होत आहे.
आगामी काळात त्‍यांना तुळजापूर तालुक्‍याचे प्रतिनिधीत्‍व करायचे आहे. त्‍यासाठी त्‍यांनी आतापासूनच तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढविण्‍याचे ठरविले आहे. त्‍यांनी निवडणूक लढववी म्‍हणून त्‍यांच्‍या पाठीमागे हजारो युवकांची फळी उभारली आहे. सोशल मिडीयाच्‍या माध्‍यमातून त्‍यांच्‍या उमेदवारीला युवकांचा भरघोस प्रतिसाद लाभत आहे. त्‍यांनी आतापर्यंत केलेले समाजसेवेचे कार्य जनमानसांत रुजल्‍याने आागमी काळात तालुक्‍याला खंबीर नेतत्‍व मिळाल्‍याने नागरिकांत चैतन्‍याचे वातावरण आहे. आगामी काळात त्‍यांना जनतेची सेवा करायची आहे. त्‍यांचे हे स्वप्न पूर्ण होऊ दे हीच त्यांच्या वाढदिनी तुळजाभवानी मातेच्या चरणी प्रार्थना.  
आतापर्यंत रा‌बवलेले उपक्रम
१.बंद पडलेला कारखाना भाडेतत्वावर चालविला
२.नळदुर्ग येथील अंबाबाई देवस्थानचा जिर्णोध्दार
३.१९ जोडप्यांचे सामुदायिक विवाह सोहळ
४.महिलांसाठी आरोग्य शिबिर
५.समाजातील अनेक गरजुंना मदत
६.हदयरोग निदान ‌शिबिराचे आयोजन
७. सामाजीक उपक्रमासाठी मदत  
आगामी काळात रा‌बविण्यात येणारे उपक्रम
१.गुळ उदयोगाची उभारणी
२.मकापासून स्‍टार्च निर्मिती करणा-या कारखान्याची उभारणी
३.शैक्ष‌णीक संस्थाची निर्मिती
४. युवकांसाठी रोजगार उपलब्‍ध करणार
५.गरजू विद्यार्थ्यांना,पेशंटना, मदत
६. आरोग्यसंदर्भात जनजाग्रती करणार
७. सामाजीक उपक्रम राबविणार

नळदुर्ग येथे भगवत सप्‍ताहाचे आयोजन

नळदुर्ग -   येथील आदर्श शिक्षक  वसंतराव वासूदेवाचार्य अहंकारी यांच्‍या निवासस्‍थानी दि. 6 जुलै ते 12 जुलै दरम्‍यान भगवत सप्‍ताहाचे आयोजन करण्‍यात आले आहे.
     मागील 40 वर्षापासून अखंडपणे या भगवत सप्‍ताहाचे आयोजन करण्‍यात येत आहे. 1973 पासून सुरू झालेली ही परंपरा आहे. सुरूवातीला वे.शा.सं.कै श्रीनिवासाचार्य मुरूमकर यांनी 25 वर्ष भगवत कथा सांगितली. मागील 10 वर्षापासून वे.शा.सं श्री राम जोशी (.केज जि.बीड) यांच्‍या मुखातून भगवत कथा सांगितली जात आहे. श्रीराम जोशी हे अत्‍यंत अभ्‍यासू आहे. त्‍यांना वेदशास्‍त्राचा मोठा अनुभव आहे. त्‍यांच्‍या वणीमध्‍ये गोडवा आहे. त्‍यामुळे दररोज शेकडो भाविक भगवत कथेचा लाभ घेतात. गोपाळकाला हा प्रमुख उत्‍सव असतो. गुरूपोर्णीर्मेच्‍या दिवशी याची समाप्‍ती असते. यादिवशी महाप्रसादाचा वाटप असते. अनेक गावातील भाविक प्रसादाचा लाभ घेतात.
     तरी या भगवत सप्‍ताहाचा लाभ घ्‍यावा अशी विनंती श्री बाबूराव अहंकारी, वसंत अ‍हंकरी, बळवंत अहंकारी, विकास अहंकारी, योगेश अहंकारी वैभव अहंकारी, विनायक अहंकारी, श्रीनिवास अहंकारी यांनी केली आहे.


Labels:

नागरी सत्‍कार, संगीत रंजनीच्‍या कार्यक्रमाचे आयोजन

नळदुर्ग  - येथील सुपूत्र तथा दृष्‍टी उदयोग समुहाचे अध्‍यक्ष अशोक भाऊ जगदाळे यांचा शहरवासियांच्या वतीने भव्‍य नागरी सत्‍कार सोहळा नळदुर्ग येथे शुक्रवार दि.27 जुन रोजी सायंकाळी साडेसहा वाजता आयोजित करण्‍यात आला आहे.
लातूर येथील सिध्‍देश्‍वर सहकारी बँकेचे चेअरमन व माजी आ. सि ना आलुरे गुरूजी यांच्‍या हस्‍ते दि. 27 जुन रोजी नळदुर्ग येथील जि. प. शाळेच्‍या मैदानावर नागरी सत्‍कार सोहळा संपन्‍न होणार आहे. या कार्यक्रमानंतर सारेगमप मुंबई येथील दिग्‍गज कलाकारांचा भव्‍य संगीत रजनीचा कार्यक्रम आयोजित करण्‍यात आला आहे. तरी परिसरातील सर्व रसिक प्रेक्षकांनी याचा लाभ घ्‍यावा असे अवाहन नागरी सत्‍कार समितीचे अध्‍यक्ष दत्‍तात्र्य दासकर, सचिव शिवाजीराव मोरे, उपाध्‍यक्ष शफीभाई शेख, सदस्‍य सुर्यकांत पाटील, दिलीप कुलकर्णी, माहन नाईक, शिवाजी गायकवाड, सरदारसिंग ठाकूर, अमृत पुदाले, मुस्‍ताक कुरेशी, कमला‍कर चव्‍हाण, रामजी राठोड, संजय बताले, अशोक बनसोडे ,शब्‍बीर कुरेशी आदींनी केले आहे.
Read more »

Labels:

उस्‍मानाबाद येथे कॉंग्रेसचे रेल रोको आंदोलन

उस्मानाबाद :- केंद्रातील एनडीए सरकारने रेल्‍वेची केलेल्‍या दरवाढी विरोधात उस्‍मानाबाद जिल्‍हा कॉंग्रेस कमिटीच्‍यावतीने येथील रेल्‍वे स्‍थानकावर दि. 25 जून रोजी रेल रोको आंदोलन करण्‍यात आले.
    यावेळी जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील, जि. प. अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, विश्वास शिंदे, राजेंद्र शेरखाने, लक्ष्मण सरडे, समियोद्दीन मशायक, राजलक्ष्मी गायकवाड, विलास शाळू, सिद्धार्थ बनसोडे, दत्ता सोनटक्के, प्रथमेश पेंढारकर, दर्शन कोळगे, इक्बाल हुसेन, महेबुब पटेल, दिलीप भालेराव, बिभीषण खामकर, सुधाकर गुंड, संजय घोगरे, धिरज पाटील, काशिनाथ बंडगर, दिपक जवळगे, नळदुर्गचे नगराध्‍यक्ष शहबाज काझी, त्र्यंबक शेळके, प्रकाश चव्हाण, रामकृष्ण खरोसेकर, शिला उंबरे, नवाज काझी, विजयकुमार सोनवणे, उमेश राजे, धनंजय राऊत, सुरेश शेरखाने, यांच्‍यासह कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
    केंद्र सरकारने प्रवासी भाडे १४.०२ टक्के तर माल वाहतुक दरवाढ ६५ टक्के केल्यामुळे सर्व सामान्य लोकांना प्रवाशांचे असणारे एकमेव साधन म्हणजे रेल्वे आहे. भाड्याची भरमसाठी वाढ केल्यामुळे देशातील जनतेला अच्छे दिन आयेंगे म्हणणा-या मोदी सरकारने फसविले असुन भाववाढ रोख, महागाई थांबवू म्हणणा-या सरकारने त्यांचे खरे रूप दाखविण्यास सुरूवात केली आहे.
    रेल्वे दरवाढी पाठोपाठ गॅस, पेट्रोल, डिझेल, साखर व इतर वस्तुंचे ही भाववाढ करण्याकडे सरकारचा कल दिसत आहे. काँग्रेस पक्षाने रेल्वे दरवाढीची दखल घेऊन सरकारला दरवाढ रद्द करावी असा इशारा आज रेल रोको आंदोलन करून दिला आहे. आजच्या आंदोलनाने सरकारने भानावर यावे व दरवाढ रद्द करावी अन्यथा यापुढे या प्रश्नावर रस्त्यावर उतरूण तिव्र आंदोलन करू अशा सुचना वजा इशारा दिला आहे.

Labels:

मायबाप सरकारमुळे विद्यार्थ्‍यांचे भविष्‍य टांगणीला

पांगरी (गणेश गोडसे) : नुकतेच कांही महिन्यांपुर्वीच महाराष्‍ट्र सरकारने राज्यातील अनेक वर्षांपासुन अनुदानाच्या प्रतिक्षेत असलेल्या व विनाअनुदानीत तत्वावर सुरू असलेल्या राज्यातील कायम विनाअनुदानीत शाळांना अनुदान मंजुर करत कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांना व उच्च माध्यमिक वर्गातील शिक्षकांना सुधारीत वेतनश्रेणी देण्‍यास मंजुरी दिली आहे. मग केंद्रिय आश्रमशाळांच्या अनुदानाच्या बाबतीतच शासन भेदभाव का करत आहे? असे एक ना अनेक प्रश्‍न तयार होऊ लागले आहेत.
    सुरूवातीच्या काळात या केंद्रिय निवाशी आश्रमशाळांशी राज्यशासनाचा काडीचाही संबंध नसायचा. मात्र कागदोपत्री मेळ लावुन केंद्र शासनाच्या अनुदानाचा लाभ उठवणा-या बोगस संस्थांची राज्यात संख्या वाढली. त्यामधुन एका राज्यकर्त्यांने नागपुर खंडपिठात एक याचीका दाखल करून बोगस संस्थांचे पितळ उघडे पाडले होते. त्यावर नागपुर खंडपिठाने बोगस आश्रमशाळांना आळा घालण्‍याच्या उदेशाने आगामी काळात अशा संस्थांना महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभाग व समाजीक न्याय विभागाची मान्यता घेणे बंधनकारक केले होते. त्यानंतर राज्यातील 325 केंद्रिय निवाशी आश्रमशाळांना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने मान्यता दिली. राज्य शासनाच्या शालेय विभागाची व सामाजिक न्याय विभागाची मान्यता प्राप्त होऊनही अनुदानाची प्रकिया मात्र ठप्पच होऊन बसली. या घडामोडीतच केंद्र शासनाच्या समाजकल्याण विभागाने व केंद्र सरकारने केंदिय निवाशी आश्रमशाळा व त्यांना देण्‍याच्या अनुदानासंदर्भात निर्णय घेऊन त्याबाबतचे सर्वाधिकार हे त्या त्या राज्य शासनाला बहाल करून अनुदानाबाबत निर्णय घेचे ण्‍याआदेश दिले.
अनेक संस्थाचालक आश्रमशाळा बंद करण्‍याच्या विचारात
    बारा वर्ष खिशाला कात्री लावत व स्वताःच्या पोटाला चिमटा घेऊन निवाशी आश्रमशाळेतील विद्यार्थ्‍यांची सोय करणारे संस्थाचालक आपल्या शाळा बंद करून त्यांना कुलुप लावुन या शिक्षणक्षेत्रातुनच बाहेर पडण्‍याच्या विचारात आहेत. आश्रमशाळा बंद झाल्यास राज्यभरातील असंख्य विद्यार्थांसह हजारो शिक्षक व कर्मचा-यांचे अतोनात नुकसान होणार आहे. त्यामुळे अनेक कुटुंबे अंधकारमय होणार आहेत. ज्ञानदानाचे कार्य करणारेच बेरोजगार होण्‍याची शक्यता निर्माण झाली आहे. या आश्रमशाळांना अनुदान उपलब्ध होत नसल्यामुळे सुखी कुटुंबात अनेक दुदैवी घटना घडु लागल्या आहेत. अनुदान मिळण्‍याच्या आशेवर अनेक तरूण-तरूणींनी आपले संसार थाटले आहेत. मात्र अनेक वर्षांचा कालावधी जावुनही अनुदानाची प्रतिक्षा संपत नसल्यामुळे अनेक कुटुंबात खटके उडुन घटस्फोटांसारखे गंभीर प्रसंग उदभवु लागलेले आहेत.
    महाराष्ट्राची प्रतिमा शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, कला, क्रिडा व सांस्कृतीक क्षेत्रात भुषणावह असुन राज्य सरकारने या बाबींचा विचार करून निवडणुकांपुर्वी केंद्रिय निवाशी आश्रमशाळांच्या अनुदानाचा प्रश्‍न निकाली काढुन राज्यातील कर्मचा-यांचे संसार उभे करावेत अशी मागणी आहे.

मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण

मुंबई  : राज्यातील मराठा समाजाला 16 टक्के तर मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाने घेतला. हे आरक्षण शैक्षणिक संस्थांसाठी आणि शासकीय नोक-यांसाठी लागू असेल व सध्याच्या 52 टक्के आरक्षणाच्या व्यतिरिक्त असेल. या आरक्षणास उन्नत व प्रगत गटाचे (क्रिमीलेअरचे) तत्व लागू होईल. या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
      मंत्रिमंडळाच्या या महत्वपूर्ण निर्णयाची माहिती मुख्‍यमंत्री ना. चव्हाण यांनी सह्याद्री राज्य अतिथीगृहावर दिली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, अल्पसंख्याक विकास विभागाचे मंत्री मोहम्मद अरिफ नसिम खान, पदूम खात्याचे मंत्री अब्दूल सत्तार, अल्पसंख्याक विभागाच्या राज्यमंत्री फौजिया खान उपस्थित होत्या.
         मराठा समाजाला आरक्षण देताना Educationally & Socially Backward Category (ESBC) म्हणजेच “शैक्षणिक व सामाजिक मागासप्रवर्ग” असा प्रवर्ग तयार करून त्यात मराठा समाजाचा समावेश करण्यात आला आहे. राज्य मागासवर्ग आयोगाने दिलेला 22 वा अहवाल अंशत: स्वीकारण्याचा व अंशत: नाकारण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने आज घेतला. आयोगाच्या शिफारशींमध्ये योग्य ते फेरबदल करून मराठा समाजाला शैक्षणिक व सामाजिक मागासलेपणाच्या आधारे सध्याच्या 32 टक्के आरक्षण असलेल्या इतर मागासवर्गात समाविष्ट न करता मागासवर्गाचा एक वेगळा प्रवर्ग म्हणून 16 टक्के आरक्षण निश्चित करण्यात आले. या आरक्षणामध्ये राजकीय आरक्षणाचा समावेश नाही. हे आरक्षण शासकीय नोक-यांमधील सरळसेवा भरतीसाठी लागू राहील.
     मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची मागणी सातत्याने होत होती. या संदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाचा 22 वा अहवाल आणि न्यायमूर्ती आर.एम.बापट यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाच्या अहवालाचा अभ्यास करून मराठा आरक्षणाबाबत अहवाल देण्यासाठी उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची समिती नेमण्यात आली होती. या समितीत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड, (तत्कालिन सामाजिक न्याय राज्यमंत्री) गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर, अल्पसंख्याक विकास विभागाच्या राज्यमंत्री फौजिया खान, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.पी.एस.मिना, सामाजिक न्याय विभागाचे सचिव आर.डी.शिंदे यांचा समावेश होता. पुणे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे महासंचालक यांनी समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहिले.
        या समितीने राज्याच्या सर्व विभागामध्ये दौरा करून याबाबतची साधार आकडेवारी (Quantifiable Data) गोळा केला. यासाठी जिल्हाधिका-यांमार्फत राज्यातील चार लाख पाच हजार कुटुंबांचे सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक सर्वेक्षण केले. तसेच विविध संघटनांशी चर्चा केली आणि आपला अहवाल सादर केला.
        या समितीने सादर केलेल्या साधार माहितीच्या व राज्य शासनाच्या इतर विभागाकडील माहितीच्या आधारे मागासवर्ग आयोगाचा 22 वा अहवाल अंशत: नाकारण्यात आला आणि भारतीय राज्य घटनेच्या अनुच्छेद 15 (4) शैक्षणिक आरक्षण व 16 (4) नोक-यांमधील आरक्षणानुसार हे आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण
       राज्यातील मुस्लिम समाजाला शैक्षणिक संस्थामध्ये आणि शासकीय, निमशासकीय सरळसेवा भरतीमध्ये 5 टक्के आरक्षण देण्याचा निर्णयही आज राज्य मंत्रिमंडळाने घेतला. हे आरक्षण क्रिमीलेअर घटकांना लागू होणार नाही. भारतीय राज्य घटनेच्या कलम 15 (4) आणि 16(4) अन्वये मागासवर्गीयांसाठी असलेल्या एकूण 52 टक्के आरक्षणाव्यतिरिक्त, सामाजिक व शैक्षणिक मागास मुस्लिम समाजासाठी हे आरक्षण लागू होईल.
        राज्यातील मुस्लिम समाजातील सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक सद्यस्थितीचा अभ्यास व पाहणी करुन त्यांच्या सर्वांगिण विकासासाठी शासनास उपाययोजना सुचविण्याकरिता डॉ. मेहम्मदूर रहेमान यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट स्थापन करण्यात आला होता. या अभ्यासगटाने केलेल्या शिफारशी विचारात घेऊन मुस्लिम समाजातील सामाजिक व शैक्षणिक दृष्टया मागासलेल्या घटकांना आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. हे आरक्षण सामाजिक व शैक्षणिक दृष्टया मागासलेल्या मुस्लिम समाजातील घटकांसाठी विशेष मागास प्रवर्ग (मुस्लिम) हा प्रवर्ग निर्माण करुन त्यामध्ये देण्यात येईल. या आरक्षणाचा फायदा मुस्लिम समाजातील विविध 50 मागास घटकांना मिळेल. 
      अनुसुचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागासप्रवर्ग व इतर मागासप्रवर्गातील मुस्लिम समुदायातील ज्या घटकांना यापूर्वी आरक्षणाचा लाभ देण्यात आला आहे त्यांना पूर्वीप्रमाणे आरक्षण सुरु राहील व त्यांना विमाप्र (मुस्लिम) या 5 टक्के आरक्षणाचा फायदा मिळणार नाही. शालेय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, कृषी विद्यापीठातील व पशुवैद्यकीय शिक्षण संस्थामधील शिक्षणाच्या प्रवेशासाठी आणि शासकीय नोकऱ्यामध्ये सरळसेवा भरतीसाठी हे आरक्षण लागू राहील.
      2001 च्या जनगणनेनुसार राज्यातील एकूण लोकसंख्येतील मुस्लिमांचे प्रमाण 10.6 टक्के आहे. तसेच मराठा समाजाचे प्रमाण 32 टक्के आहे. सर्वसाधारणपणे लोकसंख्येच्या प्रमाणाच्या निम्मे आरक्षण दिले जाते. त्यानुसार मुस्लिमांसाठी 5 टक्के आणि मराठा समाजासाठी 16 टक्के आरक्षण देण्यात आले आहे.

Labels: , , ,

भैय्युजी महाराज यांच्‍या उ‍पस्थितीत आज मुर्ट्यात विविध कार्यक्रम

नळदुर्ग -: मुर्टा (ता. तुळजापूर) येथे गुरुवार दि. 26 जून रोजी सुर्योदय आदिवासी पारधी समाज आश्रमशाळा, बालगृह, व्‍यायाम शाळा याचा भव्‍य भूमिपूजन सोहळा व राष्‍ट्रचेतना पर्यावरण महायज्ञ कार्यक्रम आयोजित करण्‍यात आले आहे.
    आध्‍यात्‍माच्‍या माध्‍यमातून सामाजिक परिवर्तनाचा वसा घेतलेल्‍या श्री सदगुरु दत्‍त धार्मिक एवं परमार्थिक ट्रस्‍ट इंदौर संचलित सुर्योदय शिक्षण संकुल मुर्टा (ता. तुळजापूर) येथे गुरुवार दि. 26 जून रोजी सकाळी आठ वाजता श्री दत्‍त मुर्ती, श्री माणिक प्रभू, श्री स्‍वामी समर्थ, श्री साई बाबा, श्री गजानन महाराज, श्री शनिदेव, श्री हनुमान या मुर्तींची प्राणप्रतिष्‍ठापना व राष्‍ट्रचेतना पर्यावरण महायज्ञ कार्यक्रम होणार आहे. त्‍यानंतर सकाळी 11 वाजता सुर्यादय आदिवासी पारधी समाज आश्रम, बालगृह, व्‍यायाम शाळेचा भूमीपूजन होणार आहे. त्‍यानंतर देव वृक्षांचे वितरणाचा कार्यक्रम होईल. दुपारी 12 ते 2 प.पू. राष्‍ट्रसंत श्री भैय्युजी महाराज यांचा प्रवचन सोहळा होणार आहे. यावेळी उपस्थितांना महाप्रसादाचे वाटप करण्‍यात येणार आहे. तरी या कार्यक्रमाचा परिसरातील भाविक भक्‍तांनी लाभ घ्‍यावा आवाहन पत्रकाद्वारे सुर्यादय परिवार जिल्‍हा संघटक तथा शिवसेनेचे उपजिल्‍हाप्रमुख सुधीर पाटील, मुर्टा ग्रामपंचायतीचे सरपंच सत्‍यवान सुरवसे यांनी केले आहे.

Labels:

Wednesday, 25 June 2014

गुरुवारी सामाजिक न्याय दिन

उस्मानाबाद -: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, उस्मानाबादच्या वतीने 26 जुन रोजी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिन हा सामाजिक न्याय दिन म्हणून जिल्ह्यात सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे.
    सकाळी 11 वाजता यशवंतराव चव्हाण सभागृहात राज्याचे परिवहनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास खासदार रविंद्र गायकवाड, राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ.सुभाष व्हट्टे, आमदार दिलीपराव देशमुख, आ.ओमराजे निंबाळकर,आ. राहूल मोटे, आ.विक्रम काळे, आ.ज्ञानराज चौगुले, नगराध्यक्ष रेविता बनसोडे, समाज कल्याण सभापती दगडु धावारे, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत यांच्यासह  आदि उपस्थित राहणार आहेत.
    या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याणचे शेंदारकर ए एम, जि.प.चे समाजकल्याण अधिकारी एस के मिनगिरे यांनी केले आहे.

Labels:

महात्मा गांधी व्यसनमुक्ती ग्राम अभियानाचे उदघाटन

उस्मानाबाद :- जागतिक अंमलीपदार्थ विरोधी दिनानिमित्त्‍ महसूल विभाग, समाज कल्याण जिल्हा परिषद, उस्मानाबाद व येडाई व्यसनमुक्ती केंद्र, येरमाळाच्या सयुंक्त विद्यमाने गुरुवार, 26 जुन रोजी महात्मा गांधी व्यसनमुक्ती ग्राम अभियानाचे  येथील  मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या नियोजन समिती सभागृहात आयोजन करण्यात आले असून त्याचे उदघाटन राज्याचे परिवहनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते सकाळी  10-30 वाजता होणार आहे.
          जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  राहणार असून  प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत, समाज कल्याण सभापती दगडु धावारे आदि उपस्थित राहणार आहेत.
         गुरुवारी सकाळी 9 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयापासून ते  डीपीसी हॉल, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत अशी व्यसनमुक्ती दिंडी काढण्यात येणार आहे. या कार्यक्रमात  व्यसनमुक्तीवरील चित्रफीत दाखविण्यात येणार असून कार्यकर्त्यांचा सत्कारही करण्यात येणार आहे.
      उद्घाटन सत्रानंतर पोलीस पाटीलांसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. याशिवाय येडाई  व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉ.संदीप तांबारे यांचे आरोग्‍यावरील दुष्परिणाम, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. वैशाली कडुकर यांचे  व्यसनमुक्तीसाठी पोलीसांचे  सहकार्य या विषयावर मार्गदर्शन सत्र होणार आहे. करणार आहेत. अवैध मद्यनिर्मितीचा कायदेशिर प्रतिबंध या विषयावर राज्य  उत्पादन शुल्कचे उपनिरीक्षक एस. आर राठोड, व्यसन व अपघात यांचे संबंध या विषयावर-उप प्रादेशिक परिवहन अधिकारी एस. पी. मेत्रेवार, पोलीस पाटलांचे कर्तव्य व जबाबदारी या विषयावर निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांचे मार्गदर्शन होणार आहे. त्याचबरोबर व्यसनाच्या आहारी गेलेल्यांसाठी  अल्कोहोलिक्स अनानिमस (ए. ए. ) ची मदत या विषयावर संस्थेचे मराठवाडा व्यवस्थापक सुधीर ए. ए . यांचे मार्गर्शन होणार आहे.
        या कार्यक्रमास संबंधितानी उपस्थित रहावे, असे आवाहन अतिरिक्त्‍ जिल्हाधिकारी जे. टी. पाटील, समाज कल्याण अधिकारी एस. के. मिनगिरे व येडाई व्यसनमुक्ती केंद्राचे डॉ. संदीप तांबारे यांनी केले आहे.                

Labels:

क्रीडा नैपुण्य चाचण्यांद्वारे खेळाडूंची निवड

उस्मानाबाद :- शिक्षण व क्रीडा क्षेत्राचा दर्जा उंचावावा, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडु निर्माण  व्हावेत, यासाठी  राज्यात क्रीडा प्रबोधिनी सुरु करण्यात आली. या प्रबोधिनीमध्ये 8 ते 14 वयोगटातील मुलां-मुलीची बॅटरी ऑफ टेस्टव्दारे निवड करुन त्यांना खेळाचे तंत्रशुध्द प्रशिक्षण तज्ञ क्रीडा प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली दिले जाणार आहेत. या निवड चाचणीसाठी जास्तीत जास्त मुला-मुलींनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी संजय कुलकणी यांनी केले आहे.
    जिल्ह्यातील प्रत्येक गावातील शाळेत जात नसलेल्या पंरतु उत्कृष्ट शारीरिक क्षमता असलेल्या 8 ते 14 वर्ष वयेागटातील मुलांमुलींसाठी खालीलप्रमाणे नैपूण्य चाचण्या आयोजित करण्यात आल्या आहेत. शाळास्तरावर 9 चाचण्या असून वजन, उंची, 30 मी धावणे, 800 मीटर धावणे, 6X 10 मीटर शटल रन, उभे राहून लांब उडी, उभे राहून उंच उडी, मेडिसीन बॉल थ्रेा व लवचिकता अशा एकुण 27 गुणांच्या चाचण्याचे आयोजन करुन यात किमान 17 गुण प्राप्त करणाऱ्या मुलांमुलींना पुढील तालुकास्तर चाचणीसाठी पात्र ठरविण्यात येतील. शाळा पातळीवर निवड चाचण्याची अंतिम तारीख 7 जुलै आहे.
    जिल्हास्तरावर क्रीडा नैपुण्य चाचण्या दि. 25 ते 26 जुलै या कालावधीत श्रीतुळजाभवानी जिल्हा स्टेडियम, उस्मानाबद येथे सकाळी 9 वाजता आयोजित करण्यात येणार आहे.    सदर क्रीडा प्रबोधिनीसाठी निवड झालेल्‍या खेळाडूंना क्रीडा प्रशिक्षणासोबत मराठी व इंग्रजी माध्यमाची शालेय शिक्षण, निवास, भोजनाची, वैद्यकिय सुविधा, संगणक प्रशिक्षण, शैक्षणिक सहल, विमा संरक्षण, गणवेश आदि दिले जाणार आहे.
    सदर निवड चाचण्यासाठी तालुका संयोजक पुढीलप्रमाणे राहतील. उस्मानाबादसाठी गणेश पवार, भ्रमणध्वनी क्रमांक-9970095315 व संदीप वांजळे-9850954237 क्रीडा मार्गदर्शक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, उस्मानाबाद,  कळंबसाठी- एल. एम. मोहिते, शहिद भगतसिंग प्रशाळा, कळंब- 9423718902, परंडासाठी-सुधाकर कोकाटे, महात्मा गांधी विद्यालय-परंडा-9423758353,तुळजापूरसाठी-विष्णु दळवी, तालुका क्रीडा संकुल, तुळजापूर-9270917700,उमरगासाठी-राजू सोलनकर, सखुबाई माध्यमिक आश्रमशाळा बलसूर- 9665315110, भूमसाठी-वाघुंबरे व्ही. बी.न्यु हायस्कुल ईट- 9923518577, लोहारासाठी-पाटील एम. व्ही, वसंतदादा पाटील हायस्कुल लोहारा-9096507578 आणि वाशी तालुक्यासाठी विठल चौधरी, मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्रशाला इंदापूर 9423828455 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
   अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, श्रीतुळजाभवानी जिल्हा स्टेडियम, उस्मानाबाद येथील मुख्य क्रीडा मार्गदर्शक सत्येन जाधव -9028095500 या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही कळविण्यात  आले आहे

Labels:

बार्शी तालुक्यात कायदा सुव्यवस्था ऐरणीवर

पांगरी (गणेश गोडसे) :- बार्शी तालुक्यात कायदा सुव्यवस्थेने मान टाकल्यासारखीच परिस्थती निर्माण झाली असुन अवघ्या काही दिवसांच्या कार्यकाळात पांगरी पोलिस ठाण्याच्या हदीत दोन युवकांचे वेगवेगळया कारणावरून धारदार शस्त्राने सपासप वार करून खुनासारख्या गंभीर घटना घडल्या आहेत. उल्लेखनिय बाब अशी की खुन करणारी मंडळी व खुन झालेले दुदैवी हे पंचेविशीच्या आसपासचेच आहेत. ज्यांनी अजुन हे आयुष्य व जग पाहणे गरजेच होते त्यांना आज तुरूंगाची हवा खावी लागत आहे. त्यामुळे समाज मनात अशांतताच धगधगत असुन नेमक काय घडतय काय चाललय याचा ताळमेळ समाजातील ज्येष्ठांना लागत नाही. कायदयाचा धाक संपला का, लोकांच्या मनातली काहीही केले तरी कांहीच फरक पडत नाही, अशी धारणा वाढीस लागलीय का हे कोण घडवुन आणु पहातय, अशा एक ना अनेक प्रश्‍न सध्या समाजासमोर वेगळया स्वरूपात उभे आहेत. स्फोटक परिस्थती लक्षात घेऊन बिघडलेली कायदा सुव्यवस्था पुर्वपदावर आणण्‍यासाठी पोलिसांना कठोर पाऊले उचलणे गरजेचे आहे. सध्या पोलिस प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
    अलिकडील कार्यकाळात पांगरी पोलिस ठाण्याच्या हदीत दोन वेगवेगळया घटनांमध्ये दोन तरूणांचा दुदैर्वी मृत्यु झाला. खुनामागील कारणे काय? त्यातील मुळ रहस्य काय? खुन नेमका कशासाठी झाला असावा? पैसा अंतर्गत धुसफुस अथवा इतर कोणत्या कारणावरून खुनासारख्या गंभिर घटना प्रत्यक्षात झाल्या, याचा सोक्षमोक्ष पोलिस लावतीलही. मात्र बळी गेलेल्यांचा जिव कांही केल्या परत मिळणार आहे का? असा प्रश्‍न आहे. मरण इतक स्वस्त झालय का? किडयामुंग्यासारख आजकाल माणसांना मारल जावु लागलय. यावरून समाजातील भावी पिढीने काय बोध घ्यायचा. आजच्या युवा पिढीने भविष्यासाठी काय आदर्श घ्यायचा. विषेश बाब ही की खुनासारख्या कृर घटना हया मैत्रीतुनच पुढे आलेल्या आहेत. दोस्त दोस्त ना रहा हे चित्रपटातील गाणे आजच्या परिस्थतीला शोभेसे वाटत आहे. मैत्रीतुन कांही गोष्ठी विकोपाला जावुन त्यातुनच पाठिमागील सर्व गोष्‍टी विसरून मित्रच मित्राला संपवण्‍यासाठी पुढे सरसावत असल्यामुळे विश्‍वास कोणावर ठेवायचा? असा प्रश्‍न निर्माण होऊ लागला आहे. ज्याच्या मांडीवर जन्मदात्यानंतर विश्‍वासाने मान टेकवली जायची त्या मित्रांकडुनच केसाने गळा कापण्‍यासारख्या समाजघातक घटना घडु लागल्यामुळे समाजमने हेलावुन गेली असुन तरूणांची विचार करण्‍याची क्षमता संपलीय की काय? असा सुर समाजातुन उमटु लागलाय.
पुणे-मुंबईचं लोन आता ग्रामिण भागात
    पुर्वी पुणे-मुंबईसारख्या शहरी भागात घडणा-या खुनासारख्या गंभिर घटनांचे लोन आता ग्रामिण भागात पोचले असल्याचेच या घडलेल्या घटनांवरून दिसुन येत आहे. पुर्वी ग्रामिण भागात खुनासारख्या दुदैवी घटना क्विचीत कधी तरी घडुन यायच्या. मात्र अलीकडील आधुनिक काळात किरकोळ गोष्‍टीही विकोपाला जाऊन त्यामधुन खुन, खुनी हल्ले यासारख्या गंभिर घटना सहज घडुन येऊ लागल्या आहेत. अगदी सिने स्टाइल पदधतीने खुलेआम तरूण तरूणांना भोसकुन जीवे ठार मारू लागले आहेत. यातुन समाजाने काय बोध घ्यायचा. उद्याच्या तरूणांसमोर काय आदर्श उभा करायचा? असे एक ना अनेक प्रश्‍न त्यामधुन सामोरे येऊ लागले आहेत.

Labels:

उत्‍पन्‍नाचा दाखला लवकर देण्‍याची मागणी

कळंब -: सध्‍या विद्यार्थ्‍यांसाठी महाविद्यालयामध्‍ये प्रवेश चालू आहेत. त्‍यासाठी उत्‍पन्‍नाचा दाखल लागतो. कळंब सेतू सुविधा केंद्राकडून उशीर लागत असल्‍यामुळे विद्यार्थ्‍यांची गैरसोय होत आहे. तहसलिदारांनी याकडे लक्ष देऊन याकरीात वैयक्‍तीक नायब तहसिलदार या कामाासाठी नेमावा, तसेच विद्यार्थी व पालकांची होणारी गैरसोय टाळावी, अशी मागणी राणा‍जगजितसिंह युवा प्रतिष्‍ठानच्‍यावतीने कळंब तहसिलदारांना निवेदनाद्वारे करण्‍यात आली आहे. सदर निवेदनावर शहराध्‍यक्ष शिवाजी कराळे, उमेश गायकवाड, सुजित भोसले, शुभम पाटील, सुयोग शिंदे, अभिजीत हारकर, योगेश रेणके आदींच्‍या स्‍वाक्ष-या आहेत.

Labels:

शासनाचे उंबरे झिजवूनही पदरी निराशाच....

पांगरी (गणेश गोडसे) -: राज्यातील केंद्रीय अनुसुचित जाती जमातींच्या निवाशी आश्रमशाळांना अनुदान मिळावे, यासाठी गत बारा वर्षांच्या तपामध्ये अनेकवेळा वेगवेगळया पध्‍दतीने मागण्‍या करण्‍यात आल्या आहेत. प्रसंगी कित्येकदा आंदोलनाचेही हत्यार उपसण्‍यात आले. मात्र शासनदारबारी वारंवार उंबरठे झिजवुनही अजुन चालकांच्या व कर्मचा-यांच्या हाती कांहीच लागले नाही. केंद्र शासनाने विविध कारणे दाखवत अनुदान देण्‍यात वेळकाढुपणा केला आहे. विधानसभेत अनेकदा या निवाशी आश्रमशाळांसंदर्भात प्रश्‍न उपस्थित झाले. विविध स्तरांवर चर्चाही झाल्या, उपोषणही करण्‍यात आली. मात्र अनुदानाचा तिढा मात्र कांही सुटलेला नाही. तत्कालीन मुख्यमंत्री कै.विलासराव देशमुख यांच्या कार्यकालात अनुदानाची प्रकिया अंतिम टप्यात येऊन पोहचली होती. मात्र पुढे या प्रक्रियेला ब्रेक लागला गेला. शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी बेमुदत उपोषण करून अनुदानाची मागणी लावुन धरली होती.
    केंद्रीय निवाशी आश्र्रमशाळांमधुन अनुसुचित जातीं जमाती ओबिसी संवर्ग भटके व विमुक्त समाजातील विदयार्थांबरोबरच सर्वसाधारण प्रवर्गातील विदयार्थी शिक्षण घेतात. ज्या कुटुंबीयांची आपल्या मुलांना शिक्षण गणवेश याबरोबरच अन्न पुरवण्‍याची  ताकत नसते अशांच्या पाल्यांसाठी या केंद्रिय निवाशी आश्रमशाळा आशेचा किरण ठरू पाहतात. भविष्यात अशा प्रकारच्या आश्रमशाळांमधुन देशाचे भवितव्य घडवणा-या पिढीबरोबरच भारताचे भविष्य उज्जवल होऊ शकते. केंद्रिय शाळांना पालकांचा भरभरून प्रतिसादही लाभत आहे. बारा वर्षांपासुन आज ना उदया आपलेही भविष्य या मुलांबरोबर बदलेल या आशेने शिक्षक व संस्थाचालक विद्यादानाचे पवित्र काम करत आहेत. संस्थांना अजुनही अनुदानाची व्यवस्था नसल्यामुळे शिक्षक बिनपगारी काम करत असल्यामुळे त्याच्यातही नैराश्याची छटा दिसत आहे. उदरनिर्वाहाचा प्रश्‍न ऐरणीवर येऊ लागला असुन घरातही यांना किती दिवस पोसायचं अस उघडपणे बोलले जाऊ लागले आहे. इकडे सरकार अनुदान देण्‍यास राजी नसल्यामुळे पगार नाही व घरात शब्दांचा मार सहन करपलींकडे ते कांहीही करू शकत नाहीत.
    राज्यातील आश्रमशाळा, शिक्षक, संस्थाचालक यांची होत असलेली फरफट व दैना ही प्रशासन व शासनास माहित असतानाही शासन या शाळांच्या अनुदानाच्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष करून चालढकल का करत आहे? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. अनुदान द्यायचेच नव्हते तर मग प्रस्ताव मागवुन शाळा सुरू कशासाठी करू दिल्या याबरोबरच अजुन किती दिवस परिक्षा पाहणार आहात असे संबंधीतांकडुन बोलले जावु लागले आहे.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघात सतीश चव्हाण विजयी

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघात आघाडीचे उमेदवार आ. सतीश चव्हाण यांनी तिस-या फेरीअखेर १५ हजार मतांची आघाडी घेत पुन्हा एकदा विजय मिळविला आहे.
   मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी २० जून रोजी मतदान झाले होते. आघाडीचे उमेदवार आ. सतीश चव्हाण व महायुतीचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्यासह एकूण २३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले होते. आज सकाळी चिकलठाणा औद्योगिक परिसरातील कलाग्रामसमोरील सभागृहात ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. मतपत्रिकांच्या छानणीनंतर सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली. त्यामध्ये वैध ठरलेल्या ९६ मतांपैकी आ. चव्हाण यांना ४९ मते तर बोराळकर यांना ४३ मते पडली होती त्यामुळे सुरुवातीपासूनच आ. चव्हाण यांनी आघाडी घेतली होती.
    मतांचा कोटा दोन्ही उमेदवारांपैकी कोणीही गाठू न शकल्याने दुपारनंतर दुस-या पसंतीच्या मतमोजणीला सुरुवात झाली. तिस-या फेरीअखेर आ. सतीश चव्हाण यांना ७० हजार मते मिळाली होती तर महायुतीचे शिरीष बोराळकर यांना ५५ हजार मते मिळाली त्यामुळे आ. चव्हाण यांनी १५ हजार मतांनी विजय मिळविला असल्याचे जाहीर करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत आ. चव्हाण यांना विजयी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रीया सुरू होती.
    या मतदारसंघात एकूण १ लाख ४२ हजार १३६ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता त्यापैकी ७० हजार मते आ. चव्हाण यांना मिळाली. ही मतमोजणी पार पाडण्यासाठी वर्ग १, २ व ३ च्या सुमारे ३०० कर्मचा-यांसह निवडणूक निरीक्षक एस. एस. यवले, निवडणूक निर्णय अधिकारी संजीव जयस्वाल, आठही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पोलिस अधिका-यांच्या कडेकोट बंदोबस्तात पार पाडली.

Labels: , , ,

कारी येथे दोन गटात हानामारी; पाचजण जखमी

पांगरी (गणेश गोडसे) :- सिमेंट रस्त्यांवरून येण्‍याजाण्‍याच्या किरकोळ कारणावरून दोन गटात हानामारी होऊन दोन्ही गटातील पाचजण जखमी झाल्याची घटना सोमवार दि. 23 जून रोजी रात्री सात वाजण्‍याच्या सुमारास कारी (ता. बार्शी) येथे घडली.
    शांताबाई दशरथ जाधव, शितल जाधव, सोमनाथ रामलिंग करडे, निळुबा करडे, राहुल करडे असे मारहानीत जखमी झालेल्या दोन्ही गटातील लोकांची नांवे असुन परस्परविरोधी फिर्यादिवरून दोन्ही गटातील तेरा जणांविरूदध पांगरी पोलिसात मंगळवार रोजी सकाळी गुन्हा दाखल करण्‍यात आला असुन दोन्ही गटातील चौघांना अटक करण्‍यात आले आहे. सोमनाथ रामलिंग करडे, निळु करडे, रामलिंग करडे, सुलाबाई रामलिंग करडे, लहु करडे, सोजर करडे, बापु अंकुश करडे, शांताबाई जाधव, रागिनी जाधव, शितल जाधव, अनिता जाधव व दशरथ जाधव अशी परस्परविरोधी फिर्यादिवरून गुन्हे दाखल झालेल्या दोन्ही गटातील लोकांची नांवे आहेत. सोमनाथ करडे, निळु करडे, बापु करडे व दशरथ जाधव या चौघांना अटक करण्‍यात आले आहे.
    एका महिलेने दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, ती व तीची मुलगी अशा दोघीजणी घरासमोर बोलत बसल्या असताना सोमनाथ करडे हा सिमेंटच्या ओल्या रस्त्यावरूण जात होता. रस्ता ओला आहे, तो खराब होईल, तु जाऊ नकोस, असे त्या महिलेने करडे याला म्हटले असता करडेने शिविगाळ करण्‍यास सुरूवात केली. दरम्यान त्या महिलेल्या मुलीने तेथे येऊन सोमनाथ करडे यास तु आमच्या आईस विनाकारण शिविगाळ का करतोस असे म्हटले असता तिला वाईट हेतुने धरुन झोंबाझोंबी करून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच संगनमताने लाथा बुक्यांनी मारहान करून जखमी केले.
    विरोधी सोमनाथ करडे या तरूणाने दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, तो शांताबाई जाधव यांच्या घरासमोरून चालत किराणा दुकाणाकडे माल आणण्‍यासाठी जात असताना सिमेंट रस्त्यावरून का जातोस असे म्हणत फिर्यादीस अडवुन संगनमत करूण त्याच्या खिशातील रोख दोन हजार रूपये काढुन घेऊन व लाथा बुक्यांनी मारहाण केली. निळोबा करडे व राहुल करडे हे दोघे भांडणे सोडवण्‍यास आले असता त्यांनाही मारहान करण्‍यात आली.
    बारा जणांविरूध्‍द पोलिसात मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे. अधिक तपास हवालदार जनार्धन सिरसट हे करत आहेत.

Labels:

ऐतिहासिक अश्वमेध महासोमयाग यज्ञ अंतीम टप्प्यात

बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: कासारवाडी (ता.बार्शी) येथील योगीराज वेदविज्ञान आश्रमातील एप्रिल २०१३ पासून सुरु असलेल्या यज्ञांचा राजा म्हणून परिचित असलेल्या ऐतिहासिक साग्निचीत अश्वमेध महासोमयाग यज्ञ अंतीम चरणात आला आहे. त्याबाबतच्या महत्वपूर्ण विधी व इष्टी संपन्न होत असल्याची माहिती वेदविज्ञान आश्रमाचे संचालक नारायण उर्फ नाना काळे व दिक्षीत केतन काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
         या यज्ञाच्या सुरुवातीपासून आवश्यक असलेला पंचकल्याणी अश्व (घोडा) याच्या गुडघ्याच्या खाली तसेच तोंडाच्या पुढील भागात पांढरा रंग यासह विविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असल्याची कसोटी घेण्यात आली. या अश्वासाठी संपूर्ण भारतातील विविध ठिकाणी शोध घेऊन उपलब्धता करण्यात आली. यासह विविध प्रकारच्या गायी, हत्ती आदी यज्ञाच्या वेळी समोर हजर असतात. उडत्या गरुडाची ४५ फुट लांब, २६ फूट रुंद व ८ फुट उंचीची भव्य यज्ञवेदी तयार करण्यासाठी आवश्यक विविध तत्वांच्या माती उपलब्ध करुन त्याच्या विटा आश्रमातच भट्टी घालून तयार करण्यात आल्या. या विटा षोडशी, आग्निध्रियम, गार्हपत्येष्टिका, अर्धेष्टका, पक्षाग्रीया, पक्षमध्यीया, होत्रियम, मार्जालियम, पक्षेष्टका, पादेष्टका आदी विविध तसेच विशिष्ट आकारांच्या बनविण्यात येतात त्याची तंत्रशुध्द पध्दतीने निर्मिती करण्यात आली. या गरुडवेदी ३ प्रकारे तयार करण्यात येतात. सहस्त्र (हजार) वीटांची गरुडचीती तयारकरण्यासठी २०० विटांच्या एक स्तर अशा प्रकारचे पाच स्तर एकावर दुसरा ठेवण्यात येतात. 
          याच प्रकारे द्विसहस्त्र करीता दहा व त्रीसहस्त्रकरिता पंधरा स्तर मंत्रपूर्वक ठेवण्यात येतात. हा अश्वमेध यज्ञ अठराशे वर्षानंतर प्रथमच होत असून यापुढेही हजारो वर्षे जतन होण्यासाठी उडत्या गरुडाची वेदी तयार केली जात आहे. या यज्ञाची संपूर्ण माहिती ताम्रपटावर कोरण्यात आली असून दगडाच्या पेटीत बंद करुन वेदीच्या पाया भरणीत हा ताम्रपट ठेवण्यात आला आहे. कोणतेही कार्य सिध्दीसाठी संकल्प महत्वाचा असतो. वैदिक हिंदु संस्कृतीचे पुनरुत्थान व बलसंपन्न, समृध्द भारताच्या निर्मितीसाठी सनातन संस्थेचे संस्थापक डॉ.जयंत बाळाजी आठवले, शक्तिपाताचार्य शरद जोशी यांच्या हस्ते संकल्प करण्यात आला होता. यजमानाचा संकल्प गवामयन सत्री दिक्षीत नाना काळे व सौ.वैजयंत काळे यांनी केला. यज्ञासाठी आवश्यक असलेल्या पंचकल्याणी अश्वास अकरा महिने देशातील विविध भागांत शोभायात्रेद्वारे भ्रमण करण्यात आले. यावेळी यज्ञ संस्था आणि वेदांचे महत्व सांगण्यात आले. ऊर्षभरापासून दररोज तीन प्रमाणे एक हजार ऐंशी सावित्री इष्ट्या करण्यात आल्या. 
         दि. ८ जून पासून अश्वमेध महासोमयागातील महत्वाचे विधी संपन्न होत आहेत. दि. ८ ते २० जून पर्यंत दिक्षा विवृध्दी सप्तदिनात्मक अधिक षडिदक्षा ६ दिवस असे १३ दिवसांचे दिक्षाविधी, दि.१५ जून दीक्षणीयइष्टी व यजमानांचे क्षौर, प्रागवंशकरण, दिक्षा, केशनिदिक्षा, पावमानिं दिक्षा, नामनिर्देश व नवनीत दिक्षा देण्यात आली. ऐषऋत्वीज वरण, मधुपर्क पूजन प्रायणीइष्टी, सोमक्रय, आतिथ्य इष्टी पुर्वाह्ण प्रथमवर्ग्य उपसद, गरुडचितीचे प्रथमप्रस्तराचे उपधान, अश्वप्रणयन, प्रवर्ग्य व त्रिसाहस्त्र गरुडचितीचे १५ स्तराचे उपाधान व सहस्त्र हिरण्यानी चितीचे प्रोक्षण, महाग्निस्थापन प्रवर्ग्य उद्वासन, अग्निपोमीय याग असे विधी १२ दिवस सुरु आहेत. दि.४ व ४ जुलै ओजी अश्वत्रिरात्र सोमयागातील प्रथम सुत्याह गोतमो चतुष्टोमातील अग्नीष्टोम व रात्रभर अन्नहोम होणार आहे. दि.५ ते ८ जुलै दरम्यान दुसरा उक्थ्यसोमयाग होणार आहे. ७ जुलै रोजी यजमानास युध्दसज्ज वेश परिधान करुन, शस्त्रसज्ज करुन अश्वरथावर आरुढ करण्यात येणार असून यावेळी त्याच्याकडून देशाच्या शत्रूचा नाश करण्याची घोषणा करण्यात येईल. अशा प्रकारचे अनेक विधी संपन्न होत असून १५ जुलै ओजी संतपूजा, अग्रपूजा होत आहे.
    भारतीय संस्कृतीमध्ये आध्यात्मिक मूल्यांना महत्व आहे, शासनावर नैतिकतेचा अंकूश ठेवण्यासाठी प्रबळ चारित्र्यवान शासन निर्माण होणार्‍या राजसूय व अश्वमेध महायज्ञात आध्यात्मिक पुरुषांचा पूजन सोहळा यजमानांनी करावा लागतो. २०१४ मधील झालेले सत्तापरिवर्तन हे संतांचा संकल्प, राजसूय, अश्वमेध सोमयागामुळे निर्माण झालेला सुक्ष्माती परिणाम आहे. यासाठी दि.१५ जुलै रोजी संतपूजेने या साग्निचीत अश्वमेध महासोमयाग यज्ञाची सांगता होणार आहे.
    १२ दिवस सकाळी, संध्याकाळी प्रगर्ग्य अनुष्ठान (मातीच्या महावीर पात्रात गायीचे तुप उकळुन त्यामध्ये गायीच्या दूधाची आहुती घातल्याबरोबरच ४० ते ४५ फुट उंच अग्नीज्वाला आकाशात प्रक्षेपीत होतात. ऊैश्विक शक्ती सक्रीय करण्याचा हा विधी आहे.)
    या हवनामध्ये सर्वांना सहभागी होण्यासाठी श्रीसुक्त, रुद्र, गणपती उर्वशीर्ष, चंडीयाग इत्यादींचे आयोजन केले आहे. हे यज्ञ दि.२६ जून ते १४ जुलै २०१४ या कालावधीत होत आहेत.
   २१ जून पासून २ जुलैपर्यंत सुरु असलेले सुब्रम्हण्यम आवाहन हे इंद्रदेवतेस पर्जन्यासाठी सुरु आहे. यामुळे ५० ते १०० किलोमीटरच्या परिसरात चांगला पाऊस पडेल. अशी माहिती दिक्षीत केतन काळे यांनी दिली.

Labels:

डॉ. पार्श्वनाथ कटके यांचे निधन

डॉ. पार्श्‍वनाथ कटके
उस्मानाबाद :- बेंबळी (ता. उस्‍मानाबाद) येथील जुन्या काळातील वैद्यकीय व्यवसायिक डॉ.पार्श्वनाथ गोविंदराव कटके यांचे सोमवारी (दि. 23) वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी ते 93 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात मुलगा, सुन, नातवंडे असा परिवार आहे. 
      वैद्यकीय अधिकारी म्हणून ते 1981 रोजी सेवानिवृत्त झाले होते. सामाजिक क्षेत्रातील कामामुळे त्यांना समाजभुषण पुरस्कारानीही गौरविण्यात आले होते. त्यांच्या पार्थीवावर बेंबळी येथील त्यांच्या शेतात शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Labels:

भूमीपूजन व राष्‍ट्रचेतना पर्यावरण महायज्ञाचे आयोजन

नळदुर्ग -: मुर्टा (ता. तुळजापूर) येथे गुरुवार दि. 26 जून रोजी सुर्योदय आदिवासी पारधी समाज आश्रमशाळा, बालगृह, व्‍यायाम शाळा याचा भव्‍य भूमिपूजन सोहळा व राष्‍ट्रचेतना पर्यावरण महायज्ञ कार्यक्रम आयोजित करण्‍यात आले आहे.
    आध्‍यात्‍माच्‍या माध्‍यमातून सामाजिक परिवर्तनाचा वसा घेतलेल्‍या श्री सदगुरु दत्‍त धार्मिक एवं परमार्थिक ट्रस्‍ट इंदौर संचलित सुर्योदय शिक्षण संकुल मुर्टा (ता. तुळजापूर) येथे गुरुवार दि. 26 जून रोजी सकाळी आठ वाजता श्री दत्‍त मुर्ती, श्री माणिक प्रभू, श्री स्‍वामी समर्थ, श्री साई बाबा, श्री गजानन महाराज, श्री शनिदेव, श्री हनुमान या मुर्तींची प्राणप्रतिष्‍ठापना व राष्‍ट्रचेतना पर्यावरण महायज्ञ कार्यक्रम होणार आहे. त्‍यानंतर सकाळी 11 वाजता सुर्यादय आदिवासी पारधी समाज आश्रम, बालगृह, व्‍यायाम शाळेचा भूमीपूजन होणार आहे. त्‍यानंतर देव वृक्षांचे वितरणाचा कार्यक्रम होईल. दुपारी 12 ते 2 प.पू. राष्‍ट्रसंत श्री भैय्युजी महाराज यांचा प्रवचन सोहळा होणार आहे. यावेळी उपस्थितांना महाप्रसादाचे वाटप करण्‍यात येणार आहे. तरी या कार्यक्रमाचा परिसरातील भाविक भक्‍तांनी लाभ घ्‍यावा आवाहन पत्रकाद्वारे सुर्यादय परिवार जिल्‍हा संघटक तथा शिवसेनेचे उपजिल्‍हाप्रमुख सुधीर पाटील, मुर्टा ग्रामपंचायतीचे सरपंच सत्‍यवान सुरवसे यांनी केले आहे.

Labels:

Tuesday, 24 June 2014

कापसाच्‍या कारखान्‍यास आग; 6 लाखाचे नुकसान

पांगरी (गणेश गोडसे) :- इलेक्ट्रिक मिटरमध्ये शॉटसर्किट होऊन कापसाच्या कारखान्यास आग लागुन 6 लाख 10 हजार रूपयांचे साहित्य व मशिनरी जळुन खाक झाल्याची घटना सोमवार रोजी दुपारी जामगांव (ता. बार्शी) शिवारात घडली.
    दिपक सोमनाथ तलवाड (वय 31, रा.बालाजी कॉलनी बार्शी) यांनी पांगरी पोलिसात खबर दिली आहे. तलवाड यांनी पोलिसात दिलेल्या खबरीत म्हटले आहे की जामगांव (आ) शिवारात त्यांच्या असलेल्या कापुस कारखान्यात काल दुपारी विज वितरण कंपनीच्या कनेक्शन मिटरमधुन वायरचे स्पार्किंग होऊन व इलेक्ट्रिक सर्किट होवून एक लाख रूपये किंमतीच्या दोन वेस्ट कॉटनच्या मशीनरी एक लाख रूपये किंमतीची एक प्रेस मशिन 65 हजार रूपये किंमतीची इलेक्ट्रिक मोटार अडीच लाख रूपये किंमतीचे तयार कापडाचे गठठे सहा हजार रूपये किंमतीचा कच्चा माल पंधरा हजार रूपये किंमतीचे पन्हाळी पत्रे व वीस हजार रूपये किंमतीचे इतर साहित्य असा सहा लाख दहा हजार रूपये किमंतीचे साहित्य आगीच्या भक्षस्थानी पडुन जखुन खाक झाले. तलवाड यांच्या खबरीवरून अकस्मात जळित म्हणुन गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे. अधिक तपास हवालदार सुधाकर ठाकर हे करत आहेत.

Labels:

उस्मानाबादकरांसाठी अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा अमृतयोग

उस्मानाबाद :- यंदा होणार्‍या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अमृतयोग उस्मानाबादकरांसाठी येणार असल्याची शक्यता आहे. पुणे येथील अखिल भारतीय मराटी साहित्य महामंडळाच्या पथकाने मंगळवारी संमेलनासाठी आवश्यक असणार्‍या जागांची पाहणी केली. तसेच संमेलनाची मागणी करणार्‍या मराठवाडा साहित्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखेकडून करण्यात आलेल्या तयारीचा आढावाही घेतला. 
        मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. माधवी वैद्य, कोषाध्यक्ष सुनील महाजन, कार्यवाह प्रशांत पायगुडे, सदस्य उज्वला मेहेंदळे, कुंडलिक अतकरे, प्रवीण दाते यांनी उस्मानाबाद येथे येऊन संमेलन स्थळासाठी आवश्यक असणार्‍या जागांची पाहणी केली. शहरातील लेडीज क्लब, भोसले हायस्कूल, रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचा परिसर, पुष्पक मंगल कार्यालय, परिमल मंगल कार्यालय आदी ठिकाणी त्यांनी भेट देऊन संमेलन स्थळासाठी पूरक असलेल्या जागांचा आढावा घेतला. महामंडळाच्या पदाधिकार्‍यांचा भोसले हायस्कूल येथे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सुधीर पाटील यांनी, रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात प्राचार्य डॉ. युवराज भोसले यांनी सत्कार केले. शंभर वर्षाची परंपरा असलेल्या धाराशिव नगर वाचनालयाच्या वतीनेही मंडळातील पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला. उस्मानाबादकरांची आग्रही मागणी आणि संमेलनाच्या यशस्वीतेसाठी स्थानिक शाखेच्या वतीने घेण्यात आलेले परिश्रम पाहून महामंडळाचे पदाधिकार्‍यांनी आनंद व्यक्त केला. उस्मानाबाद येथे अखिल भारतीय साहित्य संमेलन होण्याची ही पहिलीच वेळ असल्यामुळे संमेलनाच्या मागणीचा सकारात्मक विचार केला जाईल, असे महामंडळाच्या पदाधिकार्‍यांनी संकेत दिले आहेत. महामंडळाने उस्मानाबादची निवड केल्यास यंदा डिसेंबर अथवा जानेवारीमध्ये होणार्‍या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा अमृतयोग उस्मानाबादकरांना अनुभवता येणार आहे. महामंडळाच्या पथकासोबत ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव, मराठवाडा साहित्य परिषद उस्मानाबाद शाखेचे अध्यक्ष नितीन तावडे, कार्याध्यक्ष राजेंद्र अत्रे, सचिव बालाजी तांबे, रणजित दुरूगकर, मधुकर हुजरे, प्राचार्य पी. एन. दापके, भा. न. शेळके, किरण सगर, रवींद्र केसकर, डी. के. शेख, जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण आदी उपस्थित होते.

Labels:

बारा वर्षानंतरही मागसवर्गीय आश्रमशाळा वा-यावर

पांगरी (गणेश गोडसे) :- शिक्षणाच्या प्रवाहापासुन दुर राहिलेल्या व वाडयावस्त्यांवरील पिचलेल्या समाजघटकातील विद्यार्थांसाठी शासनस्तरावर आश्रमशाळांच्या माध्यमातुन शिक्षणाची व्यवस्था केली गेली असली तरीही गत बारा वर्षांपासुन महाराष्ट्रातील 325 निवाशी आश्रमशाळांच्या अनुदानाची प्रकिया 12 वर्षांच्या एक तपानंतरही पुर्ण होऊ शकली नसुन शासन दिशाभुल करून वेळकाढुपणा करत असल्यामुळे राज्यातील आश्रमशाळा चालकांसह संस्थांमध्ये अनेक वर्षांपासुन कार्यरत असलेल्या हजारो कर्मचा-यांमधुन तिव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. किमान आता तरी अनुदानाची प्रकिया पार पाडुन अनुदान मंजुर करून चालकांसह कर्मचा-यांना सुखदः धक्का द्यावा, अशी राज्यातील कर्मचा-यांची मागणी आहे.
    अनुसुचित जाती-जमातींमध्ये शिक्षणाची ओळख नसल्यामुळे व हा समाज शिक्षण प्रवाहापासुन कोसो दुर राहील्यामुळे याचा विचार करून व राष्ट्रीय शैक्षणिक प्रगतीचा आलेख उंचावण्‍याबरोबरच सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक सबलीकरण करण्‍याच्या उदात्त हेतुने केंद्र शासनाच्या समाज केल्याने मंत्रालयात 2002 साली अनुसुचित जातींच्या विद्यार्थांसाठी निवाशी आश्रमशाळा सुरू करण्‍यासाठी महाराष्ट्र राज्यामधुन प्रस्ताव मागवुन घेण्‍यात आले होते.  प्रस्ताव स्विकारल्यानंतर महाराष्ट्रातील सदोतीस निवाशी आश्रमशाळांना तत्कालीन समाज कल्याण खात्याच्या सचिवांनी अनुदानही मंजुर करुन यशस्‍वी सुरूवात करून दिली होती. मात्र यानंतर माशी कुठे शिंकली की काय निवाशी आश्रमशाळांच्या अनुदान प्रकियेलाच खो बसला. राज्यातुन प्रस्तावित झालेल्या 325 निवाशी आश्रमशाळांचे प्रस्ताव अद्यापही प्रलंबित अवस्थेतच राहीले आहेत.
आश्रमशाळा चालक कर्जाच्या खाइत
प्रस्ताव दाखल केल्यापासुन सलग बारा वर्षांपासुन खिशातुनच आश्रमशाळा विद्यार्थांचे आहार निवास, कपडा लत्ता यासह इतर सेवा सुविधा पुरवताना संस्थाचालकांना नाकी नऊ आले आहे. संस्था चालवताना येणा-या अडीअडचनीतुन सोडवणुक करताना अणेक संस्थाचालकच कर्जाच्या खाइत लोटले गेलेले आहेत. अनेक चालक हे कर्जबाजारी होऊन बसले आहेत. संस्था चालवताना चालकांना सगळयांसमोरच हात जोडावे लागत असुन शासनस्तरावर आजना उद्या आमचा विचार होईल, अशी आशा चालक बाळगुन आहेत. मात्र त्यांची आशा पुर्ण होणार का? हा प्रश्‍न निर्माण होऊ लागला आहे. चालकांनी आश्रमशाळांसाठी लाखो रूपये इमारती मैदान आदींची व्यवस्था केली असुन संस्थाचालकांबरोबरच शिक्षक व कर्मचा-यांचेही बेहाल सुरू आहेत. कर्मचा-यांची तर दयनिय अवस्था झाली असुन शाळेव्यतिरीक्त व सुटीच्या दिवशी कर्मचा-यांना दुस-यांकडे मिळेल ते काम करून कुटुंबाच्या रोजीरोटीचा प्रश्‍न सोडवण्‍याची दुदैवी वेळ आली आहे.समाजातुन कर्मचारी व संस्थाचालकांचे हासु होत आहे.

पांगरी-पाथरी रस्त्याची दुरावस्था

पांगरी (गणेश गोडसे) :- पांगरी-पाथरी रस्त्याची खुपच दुरावस्था झाली असुन रस्त्यावर चिल्लारी व खडयांचे साम्राज्य पसरलेले आहे. या नादुरूस्त रस्त्यांमुळे पांगरीला शाळेत शिक्षणासाठी येणा-या शालेय विदयार्थांनाही अनंत यातनांचा सामना करावा लागत आहे. विद्यार्थी-विद्यार्थींनींना खराब रस्ते रस्त्यावर आलेल्या काटेरी वनस्पती आदीचा त्रास सहन करतच दिनक्रम काटावा लागत आहे. पावसाळयात तर शालेय विद्यार्थांना आपल्या सायकली अक्षरक्षः चिखलात रूतल्यामुळे रस्त्यावरच सोडुन शाळा गाठावी लागते.
रस्त्यांवर चिल्लारीचे आक्रमण
    पांगरी शहराला जोडणा-या पाथरी-पांगरी, शिराळे-पांगरी आदी रस्त्यांच्या कडेला असलेल्या सरकारी बाभळी, यालतार आदी विविध झांडांचे रस्त्यांवर आक्रमण झालेले आहे. वाहनचालकांना या वाढलेल्या चिल्लारीतुन वाट काढत पुढे जावे लागते. पाथरी रस्त्यावर वाढलेल्या चिल्लारीमुळे वाहनचालकांना अंदाज न आल्यामुळे अनेक वेळा अपघातास सामोरे जावे लागलेले आहे. मात्र संबंधित प्रशासन त्यांना याचे कांही देणे घेणे नसल्यासारखेच वागताना दिसत आहे. एखादी मोठी दुर्घटना घडुन एखादा बळी या पाथरी रस्त्यावर गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा प्रश्‍न या मार्गावरील शेतक-यांसह वाहनचालकांमधुन विचारला जात आहे.
रस्त्यांवर शेतक-यांचे अतिक्रमण
    शासनदरबारी अधिकृत नोंद असलेले मात्र प्रशासनाच्या डोळेझाक प्रवृत्तीमुळे अजुनही डांबरीकरणाचा स्पर्श न झालेले अनेक रस्ते पांगरी परिसरात अस्तीत्वात असुन ते रस्तेच सध्या शेवटची घटका मोजत आहेत. शासन-प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संबंधीत रस्त्यांवर स्थानिक शेतक-यांनी अतिक्रमण करून रस्त्यांवरच शेती करण्‍यासस सुरूवात केली असल्याचे दृष्य परिसरातील अनेक गांवातुन पहावयास मिळत आहे. अतिक्रमण केलेले शेतकरी स्थानिक व दैनंदीन संबंधातील असल्यामुळे तक्रार करण्‍यास कोणीही धजावत नसुन शिल्लक असलेल्या जेमतेम रस्त्यांवरूनच रहिवाशी व प्रवाशी वाटचाल करत आहेत. शासनाकडुन रस्त्यांपोटी मावेजा उचलुनही पुन्हा रस्त्यांवर अतिक्रमण हे कृत्य जरा जास्तच होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. तरी संबंधीत विभागांच्या वरिष्ठ अधिका-यांनी पांगरी विभागातील शासकीय रस्त्यांची पाहणी करून रस्त्यावर अतिक्रमण करणा-या शेतक-यांना समज अथवा अधिकृत नोटीसा देऊन रस्त्यांवरील अतिक्रमण काढुन टाकण्‍यास सांगावे, अशी जनतेची मागणी आहे.
    शासकीय, निमशासकीय कामांच्या निमित्ताने पांगरीला जाणे जिवावर उदार होऊनच अशी कांहीशी या भागातील लोकांची विचारसरणी तयार होत आहे. खराब रस्त्यांने पांगरीला जाताना गाडया नादुरूस्त होणे, पम्चर होणे, अपघात होणे, गाडी घसरणे आदी प्रकार नित्याचे होऊन गेले आहेत. शेजारील गावात एखादी दुदैवी घटना घडल्यास अथवा अपघात घडल्यास जखमीला पांगरी ग्रामिण रूग्णालयात घेऊन येताना रूग्णांसह समवेतच्या लोकांना नादुरूस्त रस्त्यांमुळे अनंत यातना सहन करत रूग्णालय गाठावे लागते. पांगरी पोलिसांना तात्काळ एखाद्या खेडयात पोहोचण्‍याची वेळ आली तर त्यांनाही खेडयात व घटनास्थळावर वेळेवर पोहचता येत नाही. यापुर्वी करण्‍यात आलेले रस्तेही निकृष्ठ दर्जाचे झाल्याचे जनतेची ओरड आहे. पांगरीला जोडणा-या सर्व रस्त्यांची दुरूस्ती करून पांगरीसह परिसरातील जनतेच्या नित्याची गैरसोय दुर करावी, अशी पंचक्रोशीतील लोकांची मागणी आहे.
    हा रस्ता आमच्याकडे येत नसल्याचे उडवाउडवीचे उत्तर जि.प. व सार्वजनिक बांधकाम विभागाकडुन दिले जात असुन मग या रस्त्याचा मालक कोण? असा प्रश्‍न या भागातील शेतक-यांसह जनतेमधुन विचारला जात आहे.

Labels: