Saturday, 29 September 2018

काक्रंबा येथे बिटस्तरीय कार्यशाळेस सुरुवात


तुळजापूर : कुमार नाईकवाडी

तालुक्यातील काक्रंबा येथील जिल्हा परिषद शाळेत आज शुक्रवार  दि २९ रोजी काक्रंबा व किलज केंद्रातील शिक्षकाचे तीन दिवशीय  बीट स्तरीय मूल्यवर्धन प्रशिक्षण  कार्यशाळा सुरुवात झाली. तीन दिवस चालणाऱ्या बीट स्तरीय मूल वर्धन प्रशिक्षण कार्यशाळे मध्ये काक्रंबा  व किलज या २ केंद्रातील ३५ शिक्षक व ४ साधनव्यक्ती यांनी सहभाग घेतला आहे. याच प्रशिक्षण कार्यशाळेचे अनिल बंडगर , शालेय व्यस्थापन समिती अध्यक्ष  भारत पाटील , केंद्रप्रमुख रामराव खलाटे,यांच्या प्रमुख उपस्थितीत सरस्वती च्या प्रतिमेच पूजन करून सुरूवात करण्यात आली.

यावेळी पत्रकार ज्ञानेश्वर वाघमारे व शिक्षक  पवन सुर्यवंशी यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून कार्यशाळेस सुरुवात झाली. आलेल्या मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. प्रशिक्षण च नेमका उद्देश केंद्रप्रमुख  खलाटे यांनी आपल्या प्रास्ताविक मध्ये सांगितला. व तालुक्यावरून आलेले साधनव्यक्ती श्री जाधव यांनी प्रशिक्षण ची रूपरेषा मंडळी व त्यानंतर मान्यवरांचे मनोगते झाली व त्यांनी प्रशिक्षण ला शुभेच्छा देण्यात आल्या.तत्पूर्वी प्रशचे उद्दिष्ट  पवन सुर्यवंशी यांनी सांगितले.   कार्यक्रम चे सूत्रसंचालन साधनव्यक्ती श् मसलेकर यांनी तर आभार उमेश सुर्वे यांनी मानले. कार्यक्रम स साधनव्यक्ती मसलेकर, मोरे , बाबू चेपटे,  जाधव , तसेच बिट मधील 33 शिक्षक उपस्थित होते. सदर प्रशिक्षण हे पहिला टप्पा  3 दिवस चालणार असून दुसरा टप्पा हा दि 5 ऑक्टोबर रोजी सुरू होणार आहे.

Labels:

श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविदयालयात "करिअर गाईडन्स" वर सेमिनार


तुळजापूर : कुमार नाईकवाडी

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान संचलित श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयात गुरूवार दिनांक २७ रोजी द्वितीय वर्ष अभियांत्रिकी विद्यार्थ्यासाठी टीपीओ अंतर्गत करिअर गाईडन्स यावर सेमिनार घेण्यात आले. 

प्रारंभी  मान्यवरांचे स्वागत  प्राचार्य  डॉ. शेखर जगदे  व प्रा . रवी मुदकण्णा यांनी केले. या शिबिरात युनिक अकॅडमी उस्मानाबादचे प्राध्यापक धनेश वरुळे व सुमंत वेदलंकार यांनी यूपीएससी व एमपीएससी या स्पर्धा परीक्षेसाठी सविस्तर मार्गदर्शन केले तसेच टीपीओ प्रमुख प्राध्यापिका छाया घाडगे यांनी या विषयी मनोगत व्यक्त केले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरयू क्षिरसागर व अंजली कदम या विद्यार्थिनीने केले आभार पूजा लाड हिने मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी  समन्वयक प्रा. संतोष एकदंते ,प्रा. एन.आर .चव्हाण, प्रा.धुरगु्डे व प्रा. प्रिया पवार यांनी परिश्रम घेतले.

Labels:

औषधी दुकानदारांच्या देशव्यापी बंदला तुळजापूर शहर व तालुक्यात प्रतिसाद


तुळजापूर : कुमार नाईकवाडी

केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने पुकारलेल्या देशव्यापी बंदला तुळजापूर शहरासह तालुक्यात मोठा प्रतिसाद मिळाला. शहरासह तालुक्यातील सर्व औषधी दुकाने १००% कडकडीत बंद होती.

विविध कंपन्यांद्वारे होत असलेल्या अॉनलाईन औषधी विक्रीस विरोध करण्यासाठी केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने शुक्रवार दि. २८ रोजी देशव्यापी बंदची हाक दिली होती. देशव्यापी संघटनेच्या सूचनेप्रमाणे तुळजापूर शहरासह तालुक्यातील औषधी दुकानदारांनी आपली औषधी दुकाने बंद ठेवली होती. शहरासह तालुक्यात एकही औषधी दुकान उघडले नाही. अॉनलाईन औषधी विक्रीच्या विरोधात पुकारलेल्या या बंदमध्ये सर्व दुकानदारांनी सहभाग नोंदवून आपली दुकाने १००% बंदच ठेवली.

मागील आठवड्यात देशपातळीवरील या बंदचे नियोजन करण्यात आले होते. नियमित ग्राहक रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी मागील तीन ते चार दिवसांपासून तशा सूचना दुकानदार ग्राहकांना देत होते. 

तुळजापूर शहरात एकूण ५८ औषधी दुकाने आहेत. सर्वच दुकाने १००% बंद होती. नियमित औषधी खरेदी करणार्‍या ग्राहक रुग्णांना अगोदरच बंद बाबत सूचना दिल्या गेल्या होत्या. परंतू काही रुग्णांचे मात्र सर्वच औषधी दुकाने बंद असल्यामुळे हाल झाले.

तत्पूर्वी गुरुवारी २७ रोजी शहरातील औषधी दुकानदारांची बैठक होऊन हा बंद संपूर्ण यशस्वी करण्यासाठी नियोजन करण्यात आले होते.

शुक्रवारी दि. २८ रोजी सकाळी ११ वा. बंदसंदर्भातील मागण्यांचे निवेदन तहसीलदार, तुळजापूर यांना देण्यात आले. यावेळी, किरण हंगरगेकर, लक्ष्मण निकम, जीवन वाले, संतोष लोखंडे, सचिन कुंभार, रोहीत नाईकवाडी, महेश वट्टे, प्रशांत संकपाळ, विश्वजीत पवार, मोरे, पंकज वारुळे, आनंद पाटील, उमेश बनसोडे, मयूर शेटे, आकाश मिसाळ, पवन सोनवणे यांच्यासह शहरातील औषधी दुकानदार उपस्थित होते.

शासनाकडे ऑनलाईन औषधी विक्री बंद करण्याबाबत वेळोवेळी मागण्या करूनही शासन या बाबीकडे गंभीरतेने पाहत नाही. या ऑनलाईन औषधी विक्री करणाऱ्या विविध कंपन्यांवर सरकारचे कसलेही नियंत्रण नाही.

बंदी असलेली, तसेच अप्रमाणित औषधी ऑनलाईन विक्रीच्या माध्यमातून बेधडक विकली जात आहेत. ही विक्री बंद करण्याच्या मागणीसाठी केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने हा बंद पुकारला असून तुळजापूर शहर व तालुक्यात हा बंद १००% यशस्वी झाला असल्याची माहिती असोसिएशनचे जिल्हा उपाध्यक्ष किरण हंगरगेकर, तालुका अध्यक्ष लक्ष्मण निकम, शहराध्यक्ष बाबासाहेब कदम यांनी दिली.

Labels:

भाजपाच्या तालुका सरचिटणीसावर चोरटयांचा हल्ला

तुळजापूर : कुमार नाईकवाडी

तालुक्यातील शिराढोण येथील बबन सोनवणे हे भारतीय जनता पार्टीत तालुका सरचिटणीस पदावर कार्यरत असून अज्ञात तीन चोरट्यानी त्यांना चाकुचा धाक दाखवून ८१ हजाराला लुटले. हि घटना दि. २७ रोजी संध्याकाळी घडली.

पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, गुरूवारी रात्री बाहेरगावाहून परतल्यानंतर ते तुळजापूर येथे उतरले. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास मुलगा अभिजित याच्यासमवेत गावाकडे शिराढोणकडे दुचाकीवरून निघाले. दरम्यान, श्रीकांत कुलकर्णी यांच्या शेताजवळ सिंदफळ शिवारात अज्ञात तीन लुटारूंनी त्यांना रोखले. मुलाच्या गळ्यावर धारदार शस्त्र लावून सोनवणे यांना बेदम मारहाण केली. त्यांच्या जवळील दोन मोबाइल फोन, बजाज कंपनीची दुचाकी व रोख ३६ हजार रूपये , तसेच पाच हजार रुपये असा एकूण ८१ हजाराचा ऐवज लुटून चोरटे अंधारात पसार झाले. जखमी सोनवणे यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत . बबन सोनवणे या फिर्यादीवरून कलम ३०७, ३९२ नुसार तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद. पुढील तपास स. पो . नि . चव्हाण करीत आहेत .

Labels:

Friday, 28 September 2018

स्टेनोग्राफर राजनंदिनी यादव यांचा सत्कार


उस्मानाबाद : येथील पोलीस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ लिपीक सविता धनंजय यादव यांची मुलगी राजनंदिनी यादव हिने औरंगाबाद येथील न्यायालयात स्टेनोग्राफर परिक्षेत सुयश मिळविले आहे. त्याबद्दल पोलीस अधीक्षक आर. राजा यांच्या हस्ते राजनंदिनी व आई सविता यादव यांचा सत्कार करण्यात आला. 

औरंगाबाद येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्यावतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या स्टेनोग्राफर परिक्षेची अंतिम निवड यादी प्रसिध्द झाली आहे. यात एकूण 47 जण पात्र ठरले असून राजनंदिनी गुणानुक्रमे 12 व्या क्रमांकावर आहे. राजनंदिनी एमएससी मॅथ व स्टेनोग्राफर अशी पदवीधारक असून तिच्या निवडीबद्दल पोलीस अधीक्षक कार्यालयातील कर्मचारी, आई-वडिल व नातेवाईकांमधून अभिनंदन होत आहे. पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी राजनंदिनी व तिची आई सविता यादव यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

Labels:

शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पाच कोटींचा धनादेश


मुंबई : शिर्डी येथील श्री साईबाबा विश्वस्त संस्थानच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आज पाच कोटींचा धनादेश संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सह्याद्री अतिथीगृह येथे सुपूर्द केला.

यावेळी जलसंधारणमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे, सामान्य प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार, मुख्य सचिव दिनेशकुमार जैन, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, संस्थानच्या कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल आदी उपस्थित होते.

Labels:

राज्य शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार विजय पाटील यांना घोषित


मुंबई : राज्य शासनातर्फे गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नावाने दरवर्षी दिला जाणारा पुरस्कार यंदा ज्येष्ठ संगीतकार विजय पाटील ऊर्फ राम लक्ष्मण यांना आज येथे घोषित करण्यात आला. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज या पुरस्काराची घोषणा केली.

प्रतिवर्षी राज्य शासनातर्फे गायन व संगीत क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या कलाकारास गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या पुरस्काराचे स्वरुप रु. ५ लाख रोख, मानपत्र, सन्मानचिन्ह असे आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या पुरस्कारासाठी ज्येष्ठ संगीतकार श्री विजय पाटील ऊर्फ रामलक्ष्मण यांच्या नावाची शिफारस केली. गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या कार्यक्रमाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

यापूर्वी हा पुरस्कारश्रीमती माणिक वर्मा, श्रीनिवास खळे, गजानन वाटवे, दत्ता डावजेकर, पं.जितेंद्र अभिषेकी, पं. हृदयनाथ मंगेशकर, ज्योत्सना भोळे, आशा भोसले, अनिल विश्वास, सुधीर फडके, प्यारेलाल शर्मा,रवींद्र जैन, स्नेहल भाटकर,मन्ना डे, जयमाला शिलेदार, खय्याम, महेंद्र कपूर, सुमन कल्याणपूर, सुलोचना चव्हाण, यशवंत देव, आनंदजी शहा, अशोक पत्की, कृष्णा कल्ले, प्रभाकर जोग, उत्तम ब्रिदपाल सिंग, पुष्पा पागधरे यांना प्रदान करण्यात आला आहे.

श्री. पाटील ऊर्फ राम लक्ष्मण यांचा जन्म १६ सप्टेंबर १९४२ रोजी नागपूर येथे झाला, त्यांनी संगीत शिक्षणाचे धडे लहानपणी त्यांचे वडील काशीनाथ आणि त्यांचे काका प्रल्हाद  यांच्याकडून गिरविले आणि उर्वरित शास्त्रीय संगीताचे शिक्षण भातखंडे शिक्षण संस्था, नागपूर येथून पूर्ण केले. आपल्या कारकीर्दीचा केंद्रबिंदू मुंबई राहावा यासाठी त्यांनी मुंबई मध्ये 'अमर विजय' या नावाने ऑर्केस्ट्राची सुरुवात केली अशा एका ऑर्केस्ट्राच्या वेळी दादा कोंडके यांची नजर राम लक्ष्मण यांच्या कार्यक्रमावर पडली आणि त्यांनी १९७४ साली 'पांडू हवालदार' या मराठी चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शक म्हणून त्यांची निवड केली येथूनच त्यांच्या पुढील प्रवासास सुरुवात झाली. पांडू हवालदार, तुमचं आमचं जमलं, राम राम गंगाराम, बोट लाविन तेथे गुदगुदल्या, आली अंगावर, आपली माणसं, हिच खरी दौलत, दीड शहाणे, लेक चालली सासरला, देवता या सर्व दादा कोंडके यांच्या मराठी चित्रपटांसाठी राम लक्ष्मण यांनी संगीत दिले.  तसेच त्यांनी एजंट विनोद, तराणा, हम से बढकर कौन, मैने प्यार किया, हम आप के है कोन, हम साथ साथ है, १०० डेज, अनमोल, पोलिस पब्लिक, सातवा आसमान, पत्थर के फुल या हिंदी चित्रपटांना त्यांनी बहारदार संगीत दिले. त्यांनी हिंदी, मराठी, भोजपुरी चित्रपटसृष्टीतील १५० हून अधिक चित्रपटांना संगीत देऊन आपले बहुमूल्य योगदान दिले आहे.

Labels:

सावरगांव ते वडाळा रस्ता बनला मृत्यूचा सापळा


काटी : उमाजी गायकवाड

तुळजापूर तालुक्यातील सावरगाव ते वडाळा या रस्त्याची प्रचंड खड्ड्यांनी चाळण झालेली आहे.या रस्त्यावरुन वाहनचालकांना व नागरिकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.केमवाडी येथील ग्रामस्थांनी यापूर्वीच लेखी निवेदन देऊन या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी केली होती.तसेच रस्ता दुरुस्ती न केल्यास तीव्र आंदोलनाची शक्यता व्यक्त केली होती.

या रस्त्यावरून तुळजापूर ते वडाळा तसेच काटी ते सोलापूर आदी बसेस तसेच मालवाहतूक, शालेय विध्यार्थी वाहतुक मोठ्या प्रमाणात होते.केमवाडी ते वडाळा हा रस्तातर अत्यंत बिकट झाला असुन जवळ जवळ 10 ते 15 फुट लांबीचे व 2 फुट खोलीचे  खड्डे पडले असून सतत अपघात होत आहेत.त्यामुळे एस.टी.बस सेवा बंद होण्याची शक्‍यता आहे.



यापूर्वीच उस्मानाबाद येथील बांधकाम विभागाला रस्ता दुरुस्ती संबंधी लेखी निवेदन देऊनही संबंधीत विभागाने कसलीच दखल घेतली नाही. हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा अन्यथा पुन्हा आंदोलन छेडले जाईल असा इशारा केमवाडी ग्रामस्थांनी दिला आहे.

Labels:

तुळजाभवानी महाविदयालयात डॉ. बापूजी साळुंखे वाड्:मय मंडळाचे उदघाटन


तुळजापूर :

येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालयतुळजापूर येथे मराठी, हिंदी व इंग्रजी विभागाच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बापूजी साळुंखे वाड्;मय मंडळाचे मोठ्या ऊत्साहात उदघाटन संपन्न झाले.

या कार्यक्रमाचे उदघाटन प्राचार्य डॉ. अनार साळुंखे, व्यंकटेश महाजन महाविद्यालय उस्मानाबाद तथा संचालक डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद उपकेंद्र परीसर उस्मानाबाद यांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्या म्हणाल्या की, साहित्यातुन आपल्या भावनांचा निचरा होत असतो.साहित्यिक निःस्वार्थपणे समाजाची सेवा करत असतात.कोणत्याही भाषेचे साहित्य हे भावनिक समतोल साधत असते.वेदनेचा हुंकार साहित्यातुन प्रकट होत असतो.स्वर्गीय लेखिका कविता महाजन यांच्याही साहित्याचा त्यांनी आढावा घेतला.स्ञीवादी साहित्य म्हणजे भावनांचा महापुर असतो.शब्दांचा वापर जपून करण्याचा अनमोल संदेश त्यांनी शेवटी दिला.  

अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .एस.एम.मणेर म्हणाले की, सत्यम, शिवम, सुंदरम हे वाक्य साहित्यविश्वाचे महाब्रिद आहे. प्रत्येक भाषेच्या साहित्यात या महाब्रिदाची प्रचिती आपणास येते. सत्यमेव जयते या उक्तिवरच आपले साहित्य आधारित आहे,साहित्य वास्तवामध्ये मानवी जिवनाची संजीवनी आहे असे मौलिक विचार त्यांनी यावेळी मांडले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ. मेजर वाय.ए.डोके यांनी केले तर आभार प्रा.डॉ .शिवाजीराव देशमुख यांनी मानले. सदर प्रसंगी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनि तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूञसंचलन प्रा.विवेकानंद चव्हाण यांनी केले.तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ .एस.एम.मणेर यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.

Labels:

तुळजाभवानी महाविदयालयात अभिनय कला तंत्र व अविष्कार कार्यशाळा संपन्न


तुळजापूर : 

येथील तुळजाभवानी महाविद्यालयात मराठी विभागातर्फे शिक्षणमहर्षी डॉ .बापूजी साळुंखे जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधुन अभिनय कलाः तंत्र व अविष्कार या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दिप प्रज्वलनाने झाली. या कार्यशाळेचे ऊदघाटक श्रीकांत नाडापुडे यांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात ते म्हणाले की,तुळजाभवानी महाविद्यालयाचा अभिनय क्षेञात सुवर्ण इतिहास आहे. उमेश जगताप, शंतनु गंगणे, दिपाली साखरे, दिलीप भोसले यांसारखे दिग्गज कलाकार या महाविद्यालयाने महाराष्ट्राला दिले. यथार्थ अभिनय म्हणजे आपल्या भूमिकेशी अचूक तर्कशुद्ध वृत्ति ठेवणे होय.आपल्या कलेच्या अधिष्ठाणाचे अध्ययन हे खरया अभिनयाचा श्रीगणेशा आहे. या वेळी कलेतील ललित अंगाचा शोध घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकपर भाषणात प्रा.डॉ .शिवाजीराव देशमुख म्हणाले की, अभिनयात बाह्यांग व अंतरंग अभ्यासण्याची गरज आहे.अभिनयाशी तादात्म्य स्थापित साधणे ऊत्तम कलाकाराचे लक्षण आहे.कलाकाराला प्रत्येक क्षण आपल्या अंतःकरणात साठऊन ठेऊन तो जगता आला पाहीजे असा मौलिक विचार त्यांनी या वेळी मांडला .अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ .एस.एम.मणेर म्हणाले की,माजी विद्यार्थ्यांनी या महाविद्यालयाशी असलेला जिव्हाळा जपला पाहिजे ,प्रत्येक विद्यार्थ्यां मध्ये कला सुप्तावस्थेत असते यासाठी विशिष्ट मंचावर येण्याचे धाडस विद्यार्थ्यांच्या मध्ये असावे असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.याप्रसंगी शिवाजी बोधले यांनी अंधळ्या खिडक्या नावाच्या एकांकी मधील एक प्रसंग सुंदर पध्दतीने करुन दाखविला.तर सचिन घोडके यांनी अभिनयातील संवाद विषयावर मार्गदर्शन केले. प्रा.सोहम कांबळे यांनी ऊत्तम मिमिक्रीचे सादरणीकरण केले.बी.कॉमभाग तसेचा बी.ए.भाग १च्या विद्यार्थी कलावंतानी आपली कविता सादर केली.कार्यक्रमाचे सूञसंचालन प्रा.रावसाहेब देशमुख यांनी तरआभार प्रा.रविंद्र शेटे यांनी मानले.

Labels:

भारीप बहुजन महासंघाच्या वतीने तुळजापुरात भव्य मोटार सायकल रॅली


तुळजापुर : कुमार नाईकवाडी

भारीप बहुजन महासंघाच्या वतीने बहुजन आघाडीचे शुक्रवार दि. २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी पार्क मैदान सोलापुर येथे पहिल्या होणाऱ्या अधिवेशनच्या पार्श्वभूमीवर भारीप बहुजन संघाच्या वतीने दि.२८ शुक्रवार रोजी  प्रथम  डाँ बाबासाहेब आंबेडकर व छञपती शिवाजी महाराज यांच्या आश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पन अभिवादन करून भारीप बहुजन महासंघाच्या वतीने तुळजापुर ते सोलापूर भव्य दिव्य मोटार सायकल रॅली काढण्यात आली होती.

या बहुजन आघाडीच्या महाआघाडी च्या अधिवेशनास पाठींबा देण्यासाठी मोटार सायकल रँलीत परीट धोबी संघटना ढोर समाज संघटना कैकाडी समाज संघाटना हिंदु नाथ पंथी डवरी गोसावी  समाज संघटना आदीसह ६५ संघटना नी  अधिवेशनास पाठींबा दर्शविला होता.या मोटार सायकल रँलीत भारीप बहुजन समाजाचे जिल्हाध्यक्ष मिलींद रोकडे परीट समाज बांधवाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ शिंदे  शशीकांत गायकवाड रवि कोरे विकास बनसोडे शंकर कोरे आदीसह कार्यकर्ते उपस्थिती होते.

Labels:

सुगम गीत गायन स्पर्धेत अक्कलकोट येथील मयुर स्वामी याने प्रथम क्रंमाक मिळविला


लोहारा : इकबाल मुल्ला

द.भै.फ.दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय,बॅंक ऑफ़ महाराष्ट्रा आणि हिंदी विकास मंच सोलापुर यांच्यावतीने हिंदी दिनानिमित्य सुगम गीत गायन स्पर्धा घेण्यात आल्या.या स्पर्धेत अक्कलकोट येथील मयूर स्वामी याने प्रथम क्रमांक पटकविला आहे. यावेळी दयानंद महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. विजयकुमार उबाळे यांच्या हस्ते मयुर स्वामी यांना प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी प्रमुख म्हणुन सोलापुर विद्यापीठाचे प्रथम कुलगुरु डॉ. इरेश स्वामी,बॅंक ऑफ महाराष्ट्राचे प्रबंधक मृदुला जोगळेकर,हिंदी विभागप्रमुख प्रा.गंगाधर बिराजदार आदि उपस्थित होते.

या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.कीर्ती पांडे,संगीतालंकार शरणप्पा कलबुर्गी, डॉ.सुनील पाटील,प्रा.सुमित गाडेकर,प्रा.किशोर थोरे, प्रा.अमोल बोभडे,प्रा.शिवाजी राजगुरु,आकाश चव्हाण,अदिनी अभिनंदन केले आहे.

Labels:

अक्कलकोट येथे पर्यूषण पर्वानिमित्त जैन समाजाची पालखी मिरवणूक


अक्कलकोट : रियाज सय्यद

दिगंबर थोरले जैन मंदिर यांच्यावतीने पर्यूषण पर्वनिमित्त शहरातील प्रमुख मार्गावरुन वाद्यांच्या गजरात पालखी मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी भाविकांनी पालखी सोहळ्याचे सौभाग्यवतींनी, भाविकांनी जलकुंभाद्वारे जलार्पण केले. पंचारतीने पालखीचे पूजन केले. 

हा पालखी सोहळा शहरातील मेन रोड, सेंट्रल चौक, कापड बाजार, उत्तर पोलिस चौकीसमोर कारंजा चौक, विभुते घर, एखंडे घर येथे पूजन होऊन पुन्हा कारंजा चौकातून सुभाष गल्ली, मधला मारुती, राम गल्ली, फत्तेसिंह चौका मार्गे मुख्य मंदिराकडे मार्गस्थ झाले. या पीषण पर्व पालखी सोहळ्यामध्ये डॉ. संतोष मेहता, अँड, हर्षवर्धन एखंडे, प्रशांत विभुते, अन्नछत्र मंडळाचे - उपाध्यक्ष अभय खोबरे, माजी नगराध्यक्षा अनिता खोबरे , विलास गडदे, रोहित खोबरे, स्वप्नील आळंद, राजकुमार विभुते, अभिनंदन गांधी, प्रवीण शहा, किशोर शहा, अजित शहा, युवराज अळ्ळे, स्वप्ना शहा, विजया शहा, विद्या विभुते, प्रज्ञा मेहता, राहुल गांधी, विराग दोशी, अभिनंदन गांधी, रुपाची शहा, अशोक येणगुरे, रवि शहा, संदेश शहा, प्रतिक मेहता, भूषण शहा, सुयश शहा, ऋषिकेश शहा, निखिल मेहता, अरिंजय गांधी आदी संमती सेवादलाचे सर्व कार्यकर्ते, समाज बांधव, महिला मंडळ मोठ्या प्रमाणात भक्तगण सामिल होते.

Labels:

लोहगाव येथे स्वछता अभियानास प्रतिसाद


नळदुर्ग  : सचिन गायकवाड 

तुळजापूर तालुक्यातील लोहगाव येथे शासनाच्या  "स्वच्छता ही सेवा" अभियानास  ग्रामपंचायतीच्या वतीने शुक्रवार  दि. 28 सप्टेंबर रोजी प्रारंभ करण्यात आले.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच  "स्वच्छता हि सेवा " अभियानाला सुरुवात झाली असून तुळजापूर तालुक्यातील गावोगावी उत्सपुर्तपणे हे अभियान राबविले जात आहे. लोहगाव येथील गावातील मुख्य रस्ते शासकीय निमशासकीय इमारती शाळा परिसर स्वच्छ करून या मोहिमेत ग्रामस्थ महिला  सहभाग नोंदविला आहे. 

यावेळी ग्रामसेवक खुंटगावे, सरपंच लोचना दबडे, उपसरपंच प्रशांत देशमुख, ग्रामपंचायत सदस्य निजाम शेख,रू गक्मीण लांडगे, राजेंद्र वाघमोडे,सौदागर दबडे,सुनिल पाटिल,अमोल शिंगाडे,रविंद्र दबडे,  प्रविण पाटील, सातलिंग पाटिल, अतुल पाटिल, संजय घोडके,मारूती बनसोडे, हणमंत लांडगे,बालाजी दबडे,आरविंद दबडे,करबसु कलशेट्टी,नितीन काटकर, यांच्यासह ग्रामस्थांनी या मोहिमेत सहभाग नोंदवला होता.

Labels:

जळकोटवाडी येथील बोबडे कुटूंबियांचे अशोक जगदाळे यांच्याकडून सांत्वन


काटी : उमाजी गायकवाड

तुळजापूर  तालुक्यातील जळकोटवाडी  येथील गरीब  कुटुंबातील शेतकरी  कै.बबन अंबादास  बोबडे वय ( 51) यांचे  वीस दिवसापुर्वी  रात्रीच्या वेळी  शेताकडे  जात असताना  वाटेच्या कडेला असलेल्या  विहिरीचा अंदाज न आल्याने  शेतातील  विहिरीत  पडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूमुळे बोबडे कुटूंबियावर दु:खाचा डोंगर कोसळला  असून घरातील  कर्ता  पुरुषच गेल्याने   सर्वत्र  हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मयत बबन  बोबडे  यांच्या  पश्चात  आई,  पत्नी, एक मुलगी,  एक  मुलगा  असा परिवार आहे.  

या दु:खद घटनेची माहिती  मिळताच  राष्ट्रवादीचे  नेते अशोक  जगदाळे यांनी बोबडे कुटंबियाची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच मयत बबन अंबादास  बोबडे  यांच्या  कुटुंबास   सर्वतोपरी मदत करणार  असल्याचे  सांगून त्यांच्या  मुलीच्या लग्नाची जबाबदारी  घेऊन कन्यादान मी स्वतः  करणार  असल्याचे  त्यांनी  यावेळी सांगितले. 

यावेळी जिल्हापरिषद सदस्य सदस्य राजकुमार पाटील, संजय फंड, उपसरपंच जालींदर  देशमुख, इंद्रजित फंड, बाबासाहेब बोबडे, सुदाम बंडगर, माजी नगरसेवक संजय बताले, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थितीत होते.

Labels:

सालेगाव येथे नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळुन शेतकऱ्याची आत्महत्या

नारायण देवराव साळुंके

लोहारा : इकबाल मुल्ला

सालेगाव ता. लोहारा येथील एका 65 वर्षीय शेतक-याने दुष्काळी परिस्थिती, सततची नापिकी व कर्जबारीपणाला कंटाळून गफळास घेवून आत्महत्य केल्याची घटना गुरुवार दि. 27 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान घडली. याप्रकरणी लोहारा पोलीसात आकस्मता मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. 

नारायण देवराव साळुंके (वय 65 वर्षे, रा. सालेगाव, ता. लोहारा) आसे आत्महत्या केलेल्या शेतक-याचे नाव आहे. यातील नारायण साळुंके याना एक एकर स्वतःची शेतजमीन असून त्यांनी यंदा खरीप हंगामाची पेरणी करण्यासाठी ५० हजार रुपये हातऊसणे घेतले होते. तसेच सहकारी सोसायटीचे १० हजार रुपये कर्ज घेतले होते. परंतू मात्र पावसाने हुलकावणी दिल्याने हाता तोंडाशी आलेली पिके करपून गेली. त्यामुळे ५० हजार रुपये व सहकारी सोसायटीचे कर्ज कसे फेडायचे या चिंतेतून साळुंके यांनी स्वतःच्या राहत्या घरातील भिंतीच्या खुंटीला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत लोहारा पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

Labels:

देशाला सामर्थ्य संपन्न बनवायचे असेल तर युवक वैज्ञानिक दृष्टया सक्षम बनला पाहिजे - माधव बावगे

                                          

लोहारा : इकबाल मुल्ला

राष्ट्र उभारणीच्या कार्याबरोबर युवकांनी स्वत:मोठी स्वप्ने पाहिली पाहिजेत.आपले भविष्य आपल्या हातात आहे. स्वतःमध्ये असलेली जिद्द, चिकाटी व मेहनत करण्याची तयारी असेल तर यश मिळतेच, जर देशाला सामर्थ्य संपन्न बनवायचे असेल तर युवक वैज्ञानिक दृष्टया सक्षम बनला पाहिजे, असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव माधव बावगे यांनी केले.   

लोहारा भानुदास चव्हाण महाविद्यालयाच्या सभागृहात महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती, उस्मानाबाद जिल्हा यांच्या वतीने आयोजित 'वैज्ञानिक जाणीव जागृती अभियानांतर्गत' आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य सरचिटणीस प्रा.किरण सगर होते.या वेळी प्रमुख म्हणुन अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.डॉ.महेश मोटे, जिल्हा प्रधान सचिव चंद्रकांत उळेकर,अंनिस कार्यकर्ते राजाराम वेदपाठक, समीर शेख,उपप्राचार्य विरभद्रेश्वर स्वामी, अदि,उपस्थित होते. 

 यावेळी पुढे बोलताना माधव बावगे म्हणाले की,स्पर्धच्या काळात शिक्षणाबरोबरच वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगून गुणवत्ता,तंत्र-कौशल्ये,आत्मविश्वास वाढून स्वयमपूर्ण बनने गरजेचे आहे.स्वप्न मोठी पहा म्हणजे विकास मोठा होईल.तरुणांचे हे वय अतिशय महत्वाचे असून या वयातच चिकित्सात्मक वृत्ती निर्माण झाल्यास योग्य दिशा मिळते.जर या काळात योग्य दिशा मिळाली नाही तर आयुष्याची वाट लागते असा मौलिक सल्ला त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला.त्यांनी विविध चमत्काराचे प्रयोग सादर करुन त्या पाठीमागील कार्य कारण भाव सउदाहरण स्पष्ट केला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.व्ही.ए.तुंगे, प्रा.स्वाती निकम,प्रा.रुपाली कोटनुर,प्रा.अभिजीत सपाटे,प्रा.राजपाल वाघमारे,अदिंनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.महेश मोटे व  सूत्रसंचालन विपुल गायकवाड यांनी केले तर आभार उप प्राचार्य प्रा.विरभद्रेश्वर स्वामी यांनी मानले. या कार्यक्रमास विविध शाखेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Labels:

गणेशोत्सव व मोहरमच्या काळात चोख पोलीस बंदोबस्त ठेवल्याने पो.नि. सर्जेराव भंडारे यांचा सत्कार


लोहारा : इकबाल मुल्ला

लोहारा पोलिस स्टेशन हद्दित गणेश उत्सव व मोहरम सण हिंदु,मुस्लीम बांधवानी एकोपा ठेवुन सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, कार्यक्रम कुठलाही गालबोट न लावता शांततेत उत्साहात साजरा केला. या काळात पो.नि. सर्जेराव भंडारे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. यामुळे या पोलीस ठाणे हद्दीत कुठलाही अनुसुचित प्रकार घडला नाही. या कार्याची दखल घेवुन लोहारा विकास समितीच्यावतीने पो.नि. सर्जेराव भंडारे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

यावेळी लोहारा विकास समितीचे अध्यक्ष जालिंदर कोकणे, समितीचे मार्गदर्शक नागन्ना वकील, नगरसेवक  बाळासाहेब कोरे, शब्बीर गवंडी, बालाजी मक्तेदार, गोरख नारायणकर यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Labels:

तुळजापूर येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन


तुळजापूर :

शुक्रवार दि. 28 सप्टेंबर ते दि. 30 सप्टेंबर या कालावधीत तुळजापूर येथे मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी याचा गरजूंनी लाभ घेण्याचे आवाहन जि.प. सदस्य ॲड. धिरज पाटील यांनी केले आहे. 

स्व. माणिकराव कदम-पाटील चॅरिटेबल ट्रस्ट तुळजापूर, मानव कल्याण हितवादी सेवाभावी संस्था मुंबई  व एचव्ही देसाई आय हॉस्टिपल पुणे यांच्या संयुक्त विदयमाने तुळजापूर येथे दि. 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत सदरील शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दि. 28 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता तुळजापूर येथील चर्मकारी गल्ली, रोहिदास मठ या ठिकाणी शिबीर होणार असून त्याचदिवशी सकाळी साडे नऊ वाजता नगरपरिषद शाळा क्रं. 2 घाटशिळ रोड, तसेच शनिवार दि. 29 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता मंकावती गल्ली, विठ्ठल‍ रुक्मिणी मंदीर, साडे नऊ वाजता सांस्कृतिक सभागृह, जिजामाता नगर, रविवार दि. 30 सप्टेंबर रोजी सांस्कृतिक सभागृह तुळजापूर खुर्द या ठिकाणी हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
तरी या शिबीराचा गरजूंनी लाभ घेण्याचे आवाहन, ट्रस्टचे अध्यक्ष तथा विदयमान जि.प. सदस्य ॲड. धिरज पाटील यांनी केले आहे.

Labels:

Thursday, 27 September 2018

उस्मानाबादेत टीव्हीएस मोपेडचे अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते अनावरण


उस्मानाबाद :

येथील पुष्पक मंगल कार्यालयात संपन्न झालेल्या दिमाखदार सोहळ्यात प्रसिद्ध सिनेअभिनेते व टीव्हीएस चे ब्रँड अँबेसिडर यांच्या मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते एक्सएल-100 एचडी मोपेड चे गुरुवार दि. 27 सप्टेंबर रोजी अनावरण करण्यात आले.

यावेळी मीनाक्षी टीव्हीएसचे संचालक आशिष मोदानी, रुपेश मोदाणी, उस्मानाबाद जनता बँकेचे चेअरमन ब्रीजलाल मोदाणी, जय तुळजाभवानी अर्बन बँकेचे संजय पाटील यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आशीष मोदाणी यानी  तर सुत्रसंचालन प्रा. वैभव कुलकर्णी यांनी तर आभार प्रदर्शन संजय मोदाणी यांनी मानले.



Labels:

दसऱ्याच्या मुहूर्तावर विठ्ठलसाई चे गाळप सुरू करणार - आ. बसवराज पाटील


मुरूम : विठ्ठलसाई कारखान्याची योग्य दिशेने वाटचाल सुरू असून उत्पादन खर्च कमी आहे.कुठल्याही प्रकारचे भेदभाव न करता सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना समान न्याय देण्याचा प्रयत्न करत कारखाना कर्जमुक्त केले आहे.येणाऱ्या काळात अडचणींना तोंड देण्यास कारखाना प्रशासन सक्षम असल्याचे सांगितले.त्याचबरोबर दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन चेअरमन आमदार बसवराज पाटील यांनी केले.

उमरगा तालुक्यातील मुरुम येथील विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार (दि 27) रोजी चेअरमन आ बसवराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.यावेळी व्हा चेअरमन सादिकमियाँ काझी,संचालक बापुरावजी पाटील,शरणाप्पा पत्रिके,माणिक राठोड,शिवमूर्ती भांडेकर,विठ्ठल बदोले आदींची उपस्थिती होती.प्रारंभी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी तसेच अहवाल वर्षात दिवंगत झालेल्या विविध सामाजिक,राजकीय, सरंक्षण क्षेत्रातील मान्यवर त्याचबरोबर कारखान्याचे सभासद यांना आदरांजली वाहण्यात आली.कारखान्याचे कार्यकारी अधिकारी एम बी अथणी यांनी अहवाल वाचन करत मांडलेल्या विषयांना उपस्थित सभासदांनी टाळ्यांचा गजरात मान्यता दिली.

पुढे बोलताना आ पाटील म्हणाले की,अनेक अडचणींना तोंड देत कारखान्याची वाटचाल सुरू आहे.सभासदांच्या जोरावर योग्य नियोजन करून कारखाना कर्जमुक्त केला आहे. निसर्गाच्या लहरीपणावर मात करत ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पाण्याचे योग्य नियोजन करून चांगल्या प्रतीच्या ऊसाचे उत्पादन घ्यावे.विठ्ठलसाई कारखाना परिसरातील सर्वच ऊसाचे गाळप करण्यात येणार असून सभासदांनी गडबड न करता परिपक्व ऊस गाळपासाठी विठ्ठल साई कारखान्यास देऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू पाटील यांनी केले. संचालक विठ्ठल बदोले यांनी आभार मानले.या प्रसंगी कारखान्याचे सर्व संचालक, सभासद,कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Labels:

सातारा जिल्हा स्वच्छ सर्वेक्षण मध्ये देशात प्रथम


सातारा :

केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण मध्ये सातारा जिल्ह्याने पहिला क्रमांक मिळवला आहे. शासनाच्या त्रयस्थ संस्थेमार्फत करण्यात आलेल्या सर्वेमध्ये साताऱ्याने पुन्हा एकदा आपले वर्चस्व गाजवले असून यामुळे जिल्ह्याचा नावलौकिक वाढला आहे. 

याबाबतचा अहवाल राज्य आणि राज्याकडून केंद्र सरकारला प्राप्त झाल्यानंतर स्वच्छ सर्वेक्षण मध्ये देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये साताऱ्याचा अग्र क्रमांक लागला आहे.  यामुळेच हे यश प्राप्त झाले आहे. याबाबत जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था अधिकारी कर्मचारी यांचे अभिनंदन केले.

Labels:

स्टार्टअप इंडिया - महाराष्ट्र यात्रेचा ३ ऑक्टोबर रोजी शुभारंभ


नवी दिल्ली : नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी स्टार्टअप इंडिया - महाराष्ट्र यात्रेचा शुभारंभ 3 ऑक्टोबर रोजी  राजभवन, मुंबई येथून  होणार आहे. याअंतर्गत 10 जिल्ह्यांमध्ये शिबीर आयोजित करण्यात येतील तर 23 शहरांमध्ये  स्टार्टअप व्हॅन थांबणार आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल चे.विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री सुरेश प्रभू आणि महाराष्ट्राचे कामगार व कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील -निलंगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत स्टार्टअप इंडिया - महाराष्ट्र यात्रेचा शुभारंभ  होणार आहे.

स्टार्टअप इंडिया - महाराष्ट्र यात्रेचे आयोजन केंद्रीय औद्योगिक धोरण व प्रोत्साहन विभाग, केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग तसेच महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र राज्य इनोवेटिव्ह सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

स्टार्टअप इंडियाच्या पुढाकाराने देशातील छोट्या जिल्ह्यांमधील नवउद्योजक प्रतिभेला शोधणे हा या यात्रेचा मुख्य उद्देश आहे. नवउद्योजकांना तसेच उद्योग क्षेत्रात भविष्य घडवू इच्छिणाऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन, सुविधा प्रदान करून देणेही या यात्रे मागचा मानस आहे.

नाविन्यपूर्ण कल्पना घेऊन येणाऱ्या व्यक्तींसाठी आणि स्टार्ट अपसाठी आवश्यक त्या सुविधांनी युक्त सुसज्ज व्हॅन स्टार्टअप इंडिया यात्रेत असणार आहे.  ही व्हॅन 16 जिल्ह्यांतून 23 शहरांमधून जाणार असून 3 नोव्हेंबरला नागपूर येथे पोहोचणार आहे. नागपूर येथे भव्य समारोपीय कार्यक्रम होणार आहे. या दरम्यान 10 ठिकाणी शिबीर आयोजित केले जातील, जिथे स्टार्टअप इंडिया आणि महाराष्ट्र स्टार्टअप धोरण यावर सादरीकरण केले जाईल.

या यात्रेत सहभागी होण्यासाठी www.startupindia.gov.in वर नोंदणी करणे आवश्यक आहे.

10 जिल्ह्यांमध्ये शिबीर

मराठवाडा विभागात औरंगाबाद, बीड आणि हिंगोली येथे, पश्चिम महाराष्ट्रात पुणे आणि सोलापूर येथे विदर्भामध्ये नागपूर, चंद्रपूर, अकोला तर कोकण विभागात रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये स्टार्टअप शिबीर आयोजित करण्यात येणार आहे.

यात्रेदरम्यान 23 शहरांमध्ये स्टार्टअप व्हॅन थांबणार

स्टार्टअप इंडिया महाराष्ट्र यात्रे दरम्यान राज्यातील 23 शहरांमध्ये स्टार्टअप  व्हॅन थांबणार आहे. यामध्ये पालघर, कल्याण, वेंगुर्ला, मालवण, राजापूर, कुडाळ, कोल्हापूर, सांगली, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, शिर्डी, मालेगाव, धुळे, जळगाव, बीड, नांदेड, यवतमाळ, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर ही शहरे आहेत.

महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमध्ये स्टार्टअप  यात्रेदरम्यान शिबीर आयोजित करण्यात येणार आहेत .

दिनांक -15 ऑक्टोबर 2018 रोजी औरंगाबाद, 16 ऑक्टोबर रोजी बीड, 18 ऑक्टोबर सोलापूर, 20 ऑक्टोबर  सिंधुदुर्ग, 22 ऑक्टोबर रत्नागिरी, 24 ऑक्टोबर पुणे, 26 ऑक्टोबर हिंगोली, 27 ऑक्टोबर अकोला, 29 ऑक्टोबर चंद्रपूर, 31 ऑक्टोबर नागपूर.

23 ठिकाणी स्टार्टअप यात्रेची व्हॅन थांबणार आहे. त्याची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे.

दि. 4 ऑक्टोबर रोजी पालघर, कल्याण, 6 ऑक्टोबर वेंर्गुला, मालवण, 8 ऑक्टोबर राजापूर, कुडाळ, 9 ऑक्टोंबर कोल्हापूर, सांगली, 10 ऑक्टोबर पुणे, 11 ऑक्टोबर अहमदनगर, 12 ऑक्टोबर औरंगाबाद, शिर्डी, 13 ऑक्टोबर मालेगाव, धुळे, 15 ऑक्टोबर जळगाव, 16 ऑक्टोबर बीड, 17 ऑक्टोबर नांदेड, 19 ऑक्टोबर यवतमाळ, अमरावती, 20 ऑक्टोंबर भंडारा, 22 ऑक्टोबर चंद्रपूर, गडचिरोली, 23 ऑक्टोबर नागपूर.

Labels:

नागराळ ग्रामपंचायतच्या सरपंचपदी शिवसेनेच्या रितु गोरे तर बेंडकाळ ग्रामपंचायतच्या सरपंचपदी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या सुरेखा गोरे विजयी

रितु गोरे



सुरेखा गोरे










 


लाेहारा : इकबाल मुल्ला

लोहारा तालुक्यातील नागराळ व बेंडकाळ या दोन ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल दि.27 सप्टेंबर रोजी घोषीत झाला. नागराळच्या सरपंचपदी शिवसेनेच्या रितु गोरे तर बेंडकाळच्या सरपंचपदी राष्ट्रवादीच्या सुरेखा गोरे यांनी बाजी मारली आहे. यावेळी नायब तहसीलदार पंकज मंदाडे, पेशकार बालाजी चामे उपस्थित होते.


लोहारा तालुक्यातील नागराळ,बेंडकाळ या दोन ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारी दि.26 सप्टेंबर रोजी मतदान झाले.लोहारा तहसील कार्यालयात दि.27 सप्टेंबर रोजी सकाळी साडे आठ वाजता मतमोजणीची प्रक्रिया पार पडली.नागराळ, बेंडकाळ,ग्रामपंचायतीचे सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित होते.प्रथमच थेट जनतेतून सरपंच निवडला जात असल्याने दोन्ही ठिकाणी मोठी चुरस निर्माण झाली होती.

नागराळ ग्रामपंचायतीच्या एकूण सात जागा आहेत.यापैकी सहा जागा यापूर्वीच बिनविरोध निघाल्या आहेत.सरपंंच व एका सदस्याच्या जागेसाठी निवडणूक झाली.सरपंचपदासाठी जयश्री पाटील, इंद्रायणी गोरे,रितू गोरे,निर्मला नेताजी गोरे यांच्यात चौरंगी लढत झाली.यात रितु गोरे यांनी सर्वच प्रभागात आघाडी घेत विजयी झाल्या.त्यांना 210 मताधिक्य मिळाले तर त्यांचे प्रतिस्पपर्धी इंद्रायणी गोरे यांना 154,तर निर्मला गोरे यांना तिसऱ्या क्रमाकांची 88 मते मिळाली.प्रभाग दोन मधून शेषेराव गोरे यांनी विजय मिळविला.

 बेंडकाळ ग्रामपंचायतच्या सात जागेपैकी तीन जागा बिनविरोध निघाल्या आहेत.तर प्रभाग दोनमधील इतर मागास वर्गासाठी राखवी असलेल्या जागेसाठी एकही उमेदवारी न आल्याने जागा रिक्त राहिली.त्यामुळे सपंचासह चार जागेसाठी निवडणूक झाली. सरपंचपदाच्या चौरंगी लढतीत सुरेखा गोरे यांनी 207 मताधिक्य घेऊन विजयी झाल्या.शकुंतला गोरे यांना 139 तर अनुसया गोरे यांना 138 मते मिळाली. प्रभाग एकमधून लक्ष्मण मोरे,रत्नप्रभा गोरे विजयी झाले.प्रभाग तीनमधून रंजना कांबळे विजयी झाल्या. निकाल घोषीत नागराळ व बेंडकाळ येथील कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी जल्लोष साजरा केला. यावेळी पो.नि.सर्जेराव भंडारे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

Labels:

राज्यात घेण्यात येणा-या सर्व स्पर्धा परीक्षा एमपीएससी मार्फत घेण्याची प्रहारची मागणी



तुळजापूर : कुमार नाईकवाडी

राज्यात घेण्यात येणा-या संपूर्ण स्पर्धा परीक्षा या महाराष्ट्र राज्यसेवा आयोगामार्फत घेण्यात याव्यात, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने तुळजापूर तहसिलदार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

निवेदनात म्हटले आहे की, सरकारी अधिकारी होण्यासाठी महाराष्ट्रातील असंख्य विदयार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. राज्य सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात येणा-या परीक्षा नवीन खासगी आयटी कंपनी नेमून घेण्याचे जाहीर केले असून विदयार्थ्यांकडून लाखो रुपये गोळा केल्याचे सांगून निवेदनात पुढे म्हटले आहे की,  महापरिक्षा पोर्टल तयार करुन पाच ते सहा परीक्षा घेतल्या. या ऑनलाईन परीक्षेत प्रचंड गोंधळ व अपारदर्शकता असल्याच्या तक्रारी विदयार्थ्यांनी सरकारकडे केल्या होत्या. तसेच गुरुवार रोजी प्रहार जनशक्तीचे संस्थापक आमदार बच्चू कडू व प्रशासकीय अधिकारी यांच्यात या मुद्दयावरुनच वाद विवाद झाला होता. तरी प्रशासनाने राज्यात घेण्यात येणा-या संपूर्ण स्पर्धा परीक्षा या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनाची एक प्रत तुळजापूर पोलीस ठाणे यांना देण्यात आली आहे. 

या निवेदनावर प्रहार जनशक्तीचे जिल्हाध्यक्ष केदार सौदागर, तुळजापूर तालुकाध्यक्ष शशिकांत मुळे, उपतालुकाध्यक्ष जुबेर शेख, तालुका सचिव अमिर शेख, तुळजापूर शहराध्यक्ष सनातन सौदागर, शहर उपाध्यक्ष सुनिल शिंदे, शहर सचिव कृष्णा सावंत, प्रहार अपंग क्रांतीचे तालुकाध्यक्ष महादेव चोपदार, तालुका उपाध्यक्ष मारुती पाटील, हनुमंत मोरे, समाधान मगर, नागेश कुलकर्णी आदींच्या स्वाक्ष-या आहेत.

Labels:

प्लास्टिक पासून पर्यावरणास धोका : प्रा. यू. एन. भाले


नळदुर्ग :  सचिन गायकवाड 

प्लास्टिक बॅग्जपासून होणा-या पर्यावरणाचं नुकसान आज सर्वानाच माहीत आहे. जगात आज निव्वळ प्लास्टिकच्या वापरापासून होत नसेल इतकं नुकसान केवळ प्लास्टिक बॅग (थैली किंवा पातळ पिशवी)च्या वापरामुळे होत आहे. मुद्दा हा आहे की जगभरात प्लास्टिकची वाढती समस्या अधिकाधिक गंभीर बनत चाललीय. या समस्येचाच एक सर्वात मोठा भाग आहे प्लास्टिक पिशव्या. आज या पिशव्यांचा वापर आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनून राहिला आहे, असे मत डॉ. .प्रा. यू. एन. भाले यांनी मांडले. 

नळदुर्ग येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय येथे प्लास्टिक मुक्ती आयोजित कार्यक्रमात प्रा. भाले हे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. आर.के. ढोकळे, प्रा. शिवाजी घोडके हे होते. 

पुढे बोलताना प्रा. भाले म्हणाले की, एकदा निर्माण झालेलं प्लास्टिक हे कधीच नष्ट होत नाही. या उलट त्याचे तुकडे पडून ते इतरत्र जमिनीत, समुद्रात, नदी-नाल्यात मिसळत जाऊन ते प्राण्यांच्या तोंडी येतात. काही वेळेस असे प्राणी मनुष्याच्या पोटात गेल्यावर याच प्लास्टिकचा अंश आपल्याही पोटात जात असतो.या पिशव्या २० मायक्रॉनपेक्षा कमी असतात. या पिशव्यांचा कचरा ही आज जगाची सार्वत्रिक समस्या बनलेली आहे. हा कचरा गाळ बनून आपल्या, सांडपाणी वाहून नेणा-या पाईप्समध्ये, गटारांमध्ये, जमिनीत, नाल्यांमध्ये, नद्या व समुद्रात अडकून राहतो. असा कचरा साठल्यामुळे कित्येक कसदार जमिनी नापीक बनल्याची उदाहरणं आहेत.प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणं लोकांनी थांबवावं यासाठी आज जगात सर्वत्र समाजप्रबोधन केलं जातं. त्याला यशही मिळतं आहे. लोकांनी प्लास्टिक पिशव्यांचा कमीतकमी वापर करावा यासाठी त्यांना समजावलं जातं. त्यानुसार आज अनेकांनी या पिशव्या वापरणं कमी किंवा बंद केलेलं आहे.ङाॅ.प्रा. यू. एन. भाले यांनी सांगितले आहे. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष हंगरगेकर यांनी  तर आभार प्रा. लता ढोणे यांनी मानले.

Labels:

तुळजाई नागरी सहकारी पतसंस्था राज्यस्तरीय दिपस्तंभ पुरस्काराने सन्मानित


तुळजापूर : कुमार नाईकवाडी

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन यांच्या वतीने प्रतिवर्षी दिपस्तंभा प्रमाणे दिशादर्शक काम करणा-या सहकारी पतसंस्थेस दिला जाणारा राज्य स्तरीय दिपस्तंभ पुरस्कार तुळजापूरच्या तुळजाई नागरी सहकारी पतसंस्थेस नुकताच लोणावळा येथे आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.  

ज्या संस्था स्वबळावर आपले कामकाज चालवितात याचबरोबर बदलते आधुनिक तंत्रज्ञान, वाढती स्पर्धा, सामाजिक, राजकीय, आर्थिक, आणि सहकार श्रेत्रातील घडामोडींचा अंदाज घेऊन योग्य समतोल साधून आपले कामकाज करतात सभासदांची विश्वासहर्ता वाढवितात, नफा मिळवितात, आपल्या ग्राहकांचा विकास साधतात आणि प्रगतिचे शिखर गाठतात आशा पतसंस्था राज्यातील इतर पतसंस्था करीता राज्य फेडरेशनच्या वतीने प्रतिवर्षी आशा पतसंस्थाचा दिपस्तंभ पुरस्काराने गौरव करण्यात येतो.

यावर्षी लोणावळा येथे आयोजित कार्यक्रमात  रामराजे निंबाळकर (सभापती,विधानपरिषद महाराष्ट्र राज्य) यांच्या शुभहस्ते व ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन) यांच्या उपस्थितीत तुळजापूर येथील तुळजाई नागरी सहकारी पतसंस्था या संस्थेस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी राज्यभरातील पतसंस्थाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यापूर्वी पतसंस्थेस सन२०१६ व सन २०१७ साली हा पुरस्कार मिळाला असून यावर्षी तिसर्‍या वेळी हा बहुमान संस्थेस मिळाला आहे.

२१वर्षापूर्वी अवघ्या रु.२५०००/- भागभांडवलावर प्रत्यक्ष व्यवहार सुरु केलेल्या संस्थेची वार्षिक उलाढाल रु ४० कोटी रुपयावरती पोहचली आहे. संस्थेकडे विविध प्रकारच्या एकूण १७ कोटी रु.ठेवी जमा असून संस्थेकडून विविध व्यावसायिकांना रु. ०८ कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. संस्थेची कर्ज वसूली ९८% एवढी आहे. संस्थेचे भागभांडवल रु. ९१लाखावर पोहचले आहे. संस्थेस लेखापरीक्षणात सातत्याने अ वर्ग मिळाला आहे. संस्था नुकतेच स्वमालकीच्या इमारतीत स्थलांतरित झाली असून या इमारतीत ग्राहकांना परीपूर्ण बँकींग सेवा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.व तसेच संस्था लवकरच मिनी एटीएमची सुविधा सूरु करीत असून या माध्यमातून सर्व बँकांचे एटीएम कार्डचा वापर करु शकतील हा पुरस्कार संस्थेच्या सर्व ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक यांना समर्पित करण्यात येतो हा पुरस्कार स्विकारते वेळी संस्थेचे अध्यक्ष पंडितराव जगदाळे, उपाध्यक्ष राजभाऊ देशमाने, संचालक आदिनाथ ठेले, अमीर शेख, महेश साबळे प्रा.निलेश एकदंते संस्थेचे सचिव संजय ढवळे व प्रमोद क्षीरसागर आदी उपस्थित होते.

Labels:

स्टेट बँक ऑफ इंडियाकडून पीक कर्जासाठी अडवणूक; दलालांचा सुळसुळाट


तुळजापूर : कुमार नाईकवाडी

येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत पीक कर्जाचे वाटप अत्यंत संथगतीने सुरु असून यामुळे गरजू शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच बँकेत दलालांचा सुळसुळाट झाला असून सर्वसामान्य शेतकऱ्यांची दलालांच्या माध्यमातून लूट होत आहे. सर्वसामान्य, गोरगरीब शेतकऱ्यांची अडवणूक करून त्रास देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर त्वरीत कारवाई करून पीककर्जाचे वाटप सुरळीत करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या वतीने तहसीलदार, तुळजापूर यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, जाचक नियम, अटी लावून पीककर्जासाठी आलेल्या गोरगरीब शेतकऱ्यांना वाटेला लावले जात आहे. पीककर्ज मंजुरीचे काम अत्यंत संथगतीने सुरु आहे. अटींची पूर्तता करणाऱ्या शेतकऱ्यांना मनुष्यबळ उपलब्ध नाही, यासह विविध थातूरमातूर कारणे देत बोळवण केली जात आहे. विचारणा करणार्‍या शेतकऱ्यांना संबंधित अधिकाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. बँकेत दलालांचा सुळसुळाट झाला आहे. अडलेल्या शेतकऱ्यांच्या गरजेचा फायदा घेऊन काम करून देण्यासाठी दलाल प्रत्येक फाईलसाठी दोन ते तीन हजाराची मागणी करत आहेत.

यंदा अत्यल्प पावसामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. उत्पादित शेतमालाला भाव नाही. सर्व बाजूने कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांची बँकेकडून नाहक अडवणूक होत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गास मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. तरी संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून सर्वसामान्य, गोरगरिब शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवून त्वरीत  पीककर्ज वाटप करण्यात यावे, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. 

या निवेदनावर मयूर गाढवे, महेश जाधव, रोहीत दळवी, अक्षय साळवे, आकाश पवार, सागर जगताप, समीर शेख, राहुल गायकवाड, ऋषी माने, शिवाजी झाडपिडे, भागवत तिघाडे, मुकुंद देवारे, महेश देवारे, दयानंद माळी, संतराम करंडे, शेखर स्वामी, दिपक कोनाळे, सोमनाथ भोरे, नागनाथ वडवे, रोहीत सुतकर आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Labels:

प्रमाणपत्र देण्यासाठी दिरगांई करणा-या सबंधिताविरुध्द शिरगापूर ग्रामपंचायतीची जिल्हाधिका-यांकडे तक्रार


नळदुर्ग : विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी जेष्ठ नागरिकांसह अपंग असलेल्या लाभार्थ्यांना वयाचे प्रमाणपत्र देण्यासाठी तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य अधिकारी, कर्मचारी विनाकारण आडकाठी करणा-या व हुज्जत घालणा-या संबंधित कर्मचा-यांविरुध्द कारवाईच्या मागणीसाठी शिरगापूर ता. तुळजापूर ग्रामपंचायती सरपंच व उपसरपंचानी जिल्हाधिका-यांकडे लेखी तक्रार केली आहे. 

निवेदनात म्हटले आहे की, दि. 25 सप्टेंबर रोजी मौजे शिरगापूर येथील सरपंच अंकुश कदम व उपसरपंच सौ. अश्विनी जाधव यांचे पती विनायक जाधव हे वृद्ध, निराधार व अपंग अशा 32 लोकांना घेवून श्रावण बाळ व संजय गांधी निराधार योजेनेच्या पेन्शन साठी वयाचे दाखला घेण्यासाठी तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात गेले असता यावेळी वैदयकीय अधिका-यांनी वयाच्या प्रमाणपत्रावर सही करून दिले व नवीन इमारतीमध्ये जावून शिक्का घेण्यास सांगितले. त्याप्रमाणे आम्ही गेलो असता सदरील ऑफीस बंद असल्याचे आढळून आले. अधिक चौकशी केली असता कर्मचाऱ्यांनी सांगितले की ऑफिस साडे चार वाजता चालू होईल. तो पर्यंत आम्ही सर्वजण रुग्णालयात थांबून रितसर फीस भरली. त्यानंतर साडे चार वाजता प्रमाणपत्रावर शिक्का घेण्यास गेलो असता त्यांना विचारणा केली की, आम्ही साडे बारा वाजल्यापासून वाट पाहत थांबलोय. तेंव्हा संबंधित आरोग्य अधिकारी व कर्मचा-यांनी हे काम आमचं नाही, आम्ही करतो हेच उपकार समजा, मदत करत आहे, सहानभुती पोटी करून देतो हेच उपकार समाजा, असे अरेरावीची भाषून बोलुन आमची तक्रार कुठे करायची आहे तिथे करा, असे सांगून आम्ही काय रिकामे नाहीत, असे बोलून वाद घातले. 

दरम्यान, आठवड्यातील एक दिवस सदरील प्रमाणपत्रा देण्यासाठी ठरविण्यात आले आहे. तुळजापूर तालुक्यातुन नागरीक येतात. एक दिवस प्रमाणपत्र देण्याचा दिवस असूनसुद्धा सदरील आरोग्य कर्मचारी साडे बारा वाजताच कामकाज बंद करीत असल्यामुळे नाहकच जेष्ठ, निराधार, अपंग व्यक्तींना किरकोळ कामासाठी दिवसभर रुग्णालयात मनस्ताप सहन करत थांबावे लागते. याबाबत शिरगापूर ता. तुळजापूर ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच यांनी संबंधितांना लेखी तक्रार देवून सुरळीतपणे प्रमाणपत्र देण्याची मागणी करुन संबंधित आरोग्य अधिकारी व कर्मचा-याची चौकशी करुन दोषींविरुध्द कारवाई मागणी करण्यात आली आहे. या निवेदनाची प्रत जिल्हा आरोग्य अधिकारी, तुळजापूर तहसिलदार यांना देण्यात आले आहे.

Labels:

मुलांची प्रगती पाहून आनंद वाटला - सभापती राजेसाहेब देशमुख


अंबाजोगाई : दत्ता खोगरे

मुलांच्या कला गुणांची प्रगती पाहून  मला आनंद वाटला असे प्रतिपादन आरोग्य व शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख यांनी केले.

स्व.मदन बप्पा यादव विचार मंच व देवळा श्रमकारी ग्रुप यांच्या वतीने सभापती देशमुख सत्कार करण्यात आला व  शालेय समिती देवळा यांच्या संयुक्त विद्यमाने देवळा ता. अंबाजोगाई येथे शाळेतील मुलांना  गणवेश वाटप व सत्कार सोहळयाच्या कार्यक्रमा प्रसंगी ते बोलत होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  मुख्याध्यापक सरवदे कचरू होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आरोग्य व शिक्षण सभापती राजेसाहेब  देशमुख, वैजनाथ सोनवणे, आण्णासाहेब डांगे, डाँ राऊत साहेब, भानुदास  देवरवाडे ,रावसाहेब यादव, नानासाहेब शेळके, कल्याण देशमुख,  दशरथ सोनवणे, सरपंच यादव वत्सलाबाई ,मनिषा  पवार, दशरथ पवार,उमेश पवार, ग्रामसेवक धुमाळ नितीन आदी उपस्थित होते.

यावेळी राजेसाहेब देशमुख यांनी जि.प.शाळाह्या गरीबांची म्हणुन ओळखली जाते  ग्रामीण भागातील पालकांनी जि.प.शाळा आपली वाटावी  यासाठी शाळेच्या दुरुस्तीसाठी दोन लाखाचा निधी देण्याचे जाहीर केले  
यावेळी साविञीबाई फुले,संत गाडगेबाबा, यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हास्ते करून कार्यक्रमाला  सुरुवात करण्यात आली यावेळी गावातील शाळेत शिक्षण घेवून एम बी बी एस ला नंबर लागलेल्या आत्मम वामन आदमाने, तसेच जिल्हास्तरीय कलाश्री पुरस्कार प्राप्त अमोल सगट यांचा प्रमुख पाहूण्याच्या हास्ते सत्कार करण्यात आला यावेळी देवळा श्रमकारी ग्रुपच्या सामाजिक कार्याची धडपड पाहून शालीय समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
  
या कार्यक्रमाचे प्रस्तावित प्रभाकर सगट यांनी केले तर सुञसंचालन रविंद्र देवरवाडे यांनी केले तर आभार गंगणे यांनी मानले यावेळी गावातील पालक  विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Labels:

श्री तुळजाभवानी कारखान्याच्या निविदा प्रक्रियेला न्यायालयाचीही स्थगिती


नळदुर्ग : तुळजापूर तालुक्यातील एकमेव सहकारी तत्त्वारील असलेल्या नळदुर्ग येथील श्री तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर चालविण्यास देण्याबाबत निविदा प्रक्रियेवरुन राजकारण्यात जुंपली आहे. त्यावरुनच  आरोप प्रत्यारोपाची फैरी झडत असतानाच उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनेही या निविदा प्रक्रियेत जिल्हा बँकेला सहभागी करुन न घेतल्याने अखेर निविदा प्रक्रियेला उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातून स्थगिती मिळवली आहे. या घटनेवरुन शेतक-यांत उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. 

नळदुर्ग येथील श्री तुळजाभवानी शेतकरी साखर कारखान्याकडे उस्मानाबाद जिल्हा बँकेचे सुमारे 119 कोटी 50 लाख 50 हजार रुपयांचे कर्ज असून जिल्हा बँकेची आर्थिक परीस्थिती कोलमडली असल्याने कर्जवसुलीसाठी कारखाना भाडेतत्वावर देण्याच्या निविदा प्रक्रिेयेसाठी संचालक मंडळाने ठराव घेवून शासनाकडे पाठविला होता. याबाबत निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. मात्र या प्रक्रियेत जिल्हा बँकेला कुठेही स्थान देण्यात आले नाही. दरम्यान, साखर आयुक्त व सहकारमंत्री यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत निविदा प्रक्रियेतील त्रिसदस्यीय समितीमध्ये बँकेस सामावून घेण्याची मागणी करण्यात आली होती. परंतू बँकेचा समावेश न करता कारखान्याची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. तसेच जिल्हा बँकेने निविदा प्रक्रियेतील कागदपत्रांची पडताळणी केली असता यामध्ये बँकेच्या कर्जाची वसुली होण्याबाबत काही सुधारणा सुचविल्या होत्या. कारखान्यासह आसवानी प्रकल्पातून मिळणारे भाडे रक्कमेचा बँकेकडे परतफेडीचा कोणताही उल्लेख नव्हता. या सर्व कारणामुळे जिल्हा बँकेने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करुन तुळजाभवानी कारखान्याच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती मिळवली आहे. 

Labels:

लैंगिक अत्याचार प्रकरणी ग्रामस्थांचा उद्रेक, आश्रमशाळेची मोडतोड

सांगली : राजेश पाटील

सांगली जिल्ह्यातील  वाळवा तालुक्यातील कुरळप येथील मिनाई आश्रमशाळा लैंगिक अत्याचारप्रकरणी गुरुवार रोजी ग्रामस्थांचा उद्रेक झाला. संतप्त ग्रामस्थांकडून नराधम अरविंद पवार याच्या आश्रमशाळेवर हल्लाबोल करत कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची तिरडी काढून दहन करण्यात आले. 

सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कुरळपमधील मिनाई आश्रमशाळेत अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. यानंतर याचे तीव्र पडसाद कुरळपमध्ये उमटले. संतप्त ग्रामस्थांनी या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ अरविंद पवार याच्या आश्रमशाळेवर हल्लाबोल करत संस्थाचालक असणाऱ्या नराधम पवारच्या कार्यालयाची तोडफोड केली. आक्रमक ग्रामस्थांनी अरविंद पवार याच्या निषेधार्थ गावातून मोर्चा काढला. आरोपीच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे तिरडीवरुन फेरी काढत दहन करण्यात आले आहे.


दरम्यान, कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांनी आश्रमशाळेला भेट देऊन पाहणी केली. पीडित मुलींशी संवाद साधला. कुरळप पोलीस ठाण्यास भेट दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्याकडून तपासाचा आढावा घेतला. प्रकरणाची मुळापर्यंत जाऊन चौकशी करावी, कुणाचीही गय करु नका, जे दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, असे आदेश नांगरे-पाटील यांनी कुरळप पोलिसांना दिले आहेत.

गावाला कलंक लावणाऱ्या या घटनेचा कुरळप ग्रामस्थांनी जोरदार निषेध नोंदवत आहेत. या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. ग्रामस्थांच्या आक्रमक पवित्र्यामुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Labels:

तुळजापूर : राखेल येथे क्षुल्लक कारणावरुन तिघास मारहाण; आठ जणांविरुध्द गुन्हा दाखल


तुळजापुर : कुमार नाईकवाडी

तुळजापूर तालुक्यातील राखेल येथे क्षुल्लक कारणावरुन आठ जणांनी मिळुन तिघास लाकडी काठीने व सळईने डोक्यात मारुन गंभीर जखमी केल्याची घटना मंगळवार दि. 25 सप्टेंबर रोजी रात्री साडे आठ वाजण्याच्या दरम्यान घडली. याप्रकरणी तुळजापुर पोलीस ठाण्यात आठ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत पोलीस सुञाकडुन मिळालेली माहिती अशी की, मंगळवार दि. २५ सप्टेंबर रोजी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास तुळजापूर तालुक्यातील राखेल येथील अनिता हणमंतराव गवळी व त्यांचा मुलगा, पुतण्या हे भाच्याच्या वाढदिवसाकरिता गावातुन जात असताना  शशीकांत विष्णू भगत, शुभम पांडुरंग भगत, सुर्यकांत विष्णू भगत, विष्णू तुकाराम भगत, पार्वती पांडुरंग भगत, अजय पांडुरंग भगत, वंदना विष्णू भगत, रेणुका शशीकांत भगत सर्व रा.राखेल ता.तुळजापुर यांच्यात क्षुल्लक कारणावरुन बाचाबाची होवुन यामध्ये  अनिता गवळी व त्यांच्या पुतण्यास वरील आठ लोकांनी लाकडी काठीने, सळईने मारहाण करुन डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. याप्रकरणी अनिता हणमंतराव गवळी यांच्या फिर्यादीवरुन तुळजापुर पोलीस ठाण्यात आठ जना विरोधात गु..न.305/कलम 143, 147,148,326,324,504,506 भा.द.वि.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास पो.ना.माने हे करीत आहेत.

Labels:

सृजन समाज निर्मितीसाठी शिक्षकांचे योगदान खुप मोठे आहे - आ. बसवराज पाटील


लोहारा : इकबाल मुल्ला

सृजन समाज निर्मितीसाठी शिक्षकांचे योगदान खुप मोठे असुन त्यांचा आचार व विचारापासुनच देश घडत असतो,त्यामुळे त्यांचा सन्मान झाला पाहीजे,असे प्रदिपादन औशाचे आ.बसवराज पाटील यांनी केले.

लोहारा पंचायत समिती व गटशिक्षण कार्यालयाच्यावतीने लोहारा शहरातील सप्तरंग मंगल कार्यालयात दि.26 सप्टेंबर रोजी सांयकाळी पाच वाजता तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पं.स.सभापती ज्योतीताई पत्रिके होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणुन जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बापुराव पाटील, पं.स. उपसभापती नमिता पाटील, जि.प.सदस्या शोभाताई तोडकरे, समन्वय समिती माजी अध्यक्ष नागण्णा वकील, सहकार बोर्ड संचालक अविनाश माळी, पं.स.माजी सभापती आसिफ मुल्ला, माजी जि.प. सदस्य दिलीप भालेराव, पं.स. सदस्य वामन डावरे, पं.स.माजी सभापती मदन पाटील, कॉग्रेस तालुकाध्यक्ष अँड. सुभाष राजोळे, राष्ट्रवादी कॉग्रेस जिल्हा सरचिटणीस शब्बीर गवंडी, ॲड. विश्वनाथ पत्रिके, शामसुंदर तोरकडे, युवक कॉग्रेस शहराध्यक्ष हरी लोखंडे, गटविकास अधिकारी क्रांती बोराटे, सहाय्यक गटविकास अधिकारी डॉ.जास्मिन शेख, गटशिक्षणाधिकारी टी.एच.सय्यदा, पं.स.सदस्य व्यंकट कोरे, नगरसेवक आरीफ खानापुरे, ब्रह्मानंद पाटील आदीजण उपस्थित होते.

या सत्कार सोहळ्यात महानंदा चव्हाण (खेड), तानाजी दबडे (लोहारा), श्रीकृष्ण गाडेकर (उत्तर जेवळी), रमेश निंगशेट्टी(दक्षिण जेवळी), नागेश ढगे (भातागळी), सोमनाथ चिनगुंडे (भोसगा), विश्वनाथ लोमटे (सालेगाव उत्तर), किरण भुजंने(सालेगाव), एकनाथ शिंदे (आष्टा कासार), धनंजय संदीकर (नागुर), शिवराज सुतार (एकोंडी लो), सतिश माळी(राजेगाव), या शिक्षकांना 2017-18 या वर्षातील आदर्श शिक्षक पुरस्कार आ. बसवराज पाटील यांच्या हस्ते देवुन सन्मानित करण्यात आले. तसेच सन 2015-16 व सन 2016-17 या दोन वर्षातील शिक्षक पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आला. 

या कार्यक्रमाचे प्रस्ताविक गटशिक्षणाधिकारी टी.एच. सय्यदा व सुत्रसंचालन विस्तार अधिकारी डी.एम. जंगम यांनी केले तर आभार विस्तार अधिकारी आर. एच.चव्हाण यांनी मानले.या कार्यक्रमास शिक्षक व  नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Labels: