Tuesday, 31 December 2024

महाराष्ट्र उद्योजकता विकास विभाग व शिवाजी महाविद्यालय वाणिज्य विभागाच्या वतीने महिलांसाठी आरीवर्क प्रशिक्षण

महाराष्ट्र उद्योजकता विकास विभाग  व शिवाजी महाविद्यालय वाणिज्य विभागाच्या वतीने महिलांसाठी  आरीवर्क  प्रशिक्षण संपन्न

मुरुम,दि.३१:

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र धाराशीव आणि श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय वाणिज्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने  महिलांसाठी 15 दिवसाच्या आरीवर्क  प्रशिक्षणचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणात 30 महिलांनी सहभाग घेतला. 

आधुनिक बदलत्या फॅशन नुसार शहरी आणि ग्रामीण महिलांची वाढत्या मागणी विचारात घेऊन  महिलांसाठी आरीवर्क  प्रशिक्षण उपयुक्त ठरेल अनिष्ट रोजगार संधी उपलब्ध करील असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ  संजय अस्वले यानी केले.

शिवाजी महाविद्यालयात या प्रशिक्षणाचा समारोप झाला यावेळी अध्यक्षीय समारोपात डॉ अस्वले यानी महिलांनी प्रशिक्षण घेऊन स्वावलंबी व्हावे असे आवाहन केले. यावेळी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र धाराशीव चे प्रकल्प अधिकारी पांडुरंग मोरे यांनी प्रशिक्षित महिलांना उद्योग उभारणीस सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. प्रोग्राम समन्वयक सतीश चव्हाण यांनी सहकार्य केले. या समारोपात श्री अशोक चव्हाण यांनी प्रशिक्षित महिलांनी व्यावसाय उद्योग कसा करावा याचा मंत्र देतांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
प्रशिक्षणार्थी महिलांनी बनवलेल्या. 
आरीवर्क ला रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

यामध्ये प्रथम क्रमांक भारती चौगुले,   द्वितीय क्रमांक अशादेवी सोनकवडे, तृतीय क्रमांक शिल्पा गायकवाड आणि उत्तेजनार्थ अंकिता पाटील व ज्योती अंकुश यांना मिळाला आहे.

प्रशिक्षका ज्योती पवार यानी महिलांना प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणा साठी  वाणिज्य  विभागाचे  डॉ अजित अष्टे, प्रा. खंडू मुरलीकर, प्रा. अक्षता बिरादार, प्रा. विद्या  गायकवाड,  प्रा. संध्याराणी चौगुले, प्रा. विद्या गायकवाड प्रा. राणी बेंबलगे, प्रा. अंजली चव्हाण यांनी सहकार्य केले आहे.

Labels:

अचलेर परिसरात वेळाआमवस्या उत्साहात ; शेतकऱ्यासह बालगोपालांनी लुटला वनभोजनाचा आनंद

अचलेर परिसरात वेळाआमवस्या उत्साहात ; शेतकऱ्यासह बालगोपालांनी लुटला वनभोजनाचा आनंद 

अचलेर दि.३०  

लोहारा तालुक्यातील अचलेर सह  परिसरातील आष्टा कासार,आलूर,बोरगाव,सिंदगाव,सलगर,कुनसावळी,बेळंब , केसरजवळगा  या भागात वेळा अमावस्या सण शेतकरी मोठया उत्साहात साजरा केला.यंदाही  शेतकर्यांनी पारंपरिक पध्दतीने हा सण साजरा केला.

मुळ कर्नाटकातील असणारा महाराष्ट्रातील सोलापूर , धाराशिव व लातूर जिल्ह्यासोबत शेजारील तालुक्यांमध्ये मार्गशीर्ष अमावस्या म्हणजेच वेळ अमावस्या मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. ही आमावस्या दर्शवेळा अमावस्या म्हणूनही ओळखली जाते. मूळ कानडी शब्द “येळ्ळ अमावस्या” म्हणजे पेरणीनंतर येणारी सातवी अमावस्या म्हणजे येळी अमावस्या, याचाच अपभ्रंश होऊन वेळ अमावस्या शब्द रुढ झाला.

या दिवशी सकाळी लवकरच शेतकरी आपल्या घरपरिवारासह शेताकडे जातात. अगोदरच्या दिवशी कडब्यापासून तयार केलेल्या कोपीमध्ये शेतीत असणाऱ्या सर्व पिकांची व मातीपासून बनवलेल्या पांडवांची [पंचमहाभूते] पुजा करण्यात आले.

या अचलेर व  परीसरातील शेतकरी कुटूंबाने आपल्या नातेवाईकांसह मित्र परिवारा सोबत एकत्रीत वनभोजनाचा आनंद लुटला.वेळा अमावस्ये निमित्त  सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासुन अनेक शेतकरी आपल्या बैलजोडीला सजावट करून त्याच बैलगाडीमध्ये आपल्या सर्व नातेवाईक,व मित्र व आपल्या परिवारासह डोक्यावर अंबीलाचे गाडगे घेऊन शेताकडे जात होते.   शेतात गेल्यानंतर तेथे पारंपरिक पध्दतीने पांडवाची पुजाकरून काळ्याआईची ओटी  भरण्यात आली. त्यानंतर सर्वांनीच वेळा आमस्या निमीत्त तयार केलेले पदार्थ,सर्व भाजीपाला एकत्रीत करून तयार केलेले भज्जी,ज्वारीचे,बाजरीचे उंडे, शेगा पोळी, खीर,आंबट भात,तसेच या सणाचा खास  पदार्थ म्हणजे आंबील या पंच पकवानावर ताव मारला. वनभोजनाचा आनंद घेतल्यानंतर सायंकाळी बैलगाड़ी, मधून मोठ्या आनंदात घरी परत आले.व सायंकाळी वेळाआमवस्यां निमीत्त  अचलेर चे  पोलिस पाटील  शिवपुत्र पाटील यांची   मानाचे  दिवे व  म्हातारी डालाची मिरवणूक अचलेर गावातून काढण्यात आले.

  मोठ्या उत्साहात येथील सर्व  शेतकरी परिवार तसेच मित्रमंडळ,सर्व बालगोपाल एकत्रीत शेतामध्ये जमा होवून हा सण मोठ्या उत्साहात साजरा आला .

Labels:

Sunday, 29 December 2024

नळदुर्ग: बालाघाट महाविद्यालयाच्या विद्यार्थी कलावंताचे युवा महोत्सवात यश

बालाघाट महाविद्यालयाच्या विद्यार्थी कलावंताचे युवा महोत्सवात यश            

नळदुर्ग,दि.२९: प्रा.डॉ.दिपक जगदाळे 

 येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थी कलावंतांनी छत्रपती संभाजीनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या युवा महोत्सवात लोक आदिवासी नृत्य या प्रकारात प्रथम तर लोकगीत या प्रकारात द्वितीय क्रमांकाचे यश मिळविल्या बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. युवक  महोत्सवात यश संपादन केलेल्या विद्यार्थी कलावंताचे संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री मधुकरराव चव्हाण व संचालक बाबुराव चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

याप्रसंगी मधुकरराव चव्हाण यांनी सांगितले कि, विद्यार्थ्यांनी स्वतःला सिद्ध करण्यासाठी नेहमी धडपड केली पाहिजे तरच यश मिळू शकते हे सर्व तुमच्या परिश्रमाचे श्रेय आहे .ग्रामीण भागामध्ये आपल्या आवतीभोवती अनेक लोककला आहेत की ज्या लोप पावत जातात कि काय अशी शंका असताना युवा महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थी कलावंतांच्या द्वारे ही कला जोपासली जाते आहे याचा आनंद होत आहे. या लोककलांनी पूर्वीपासून चालत आलेली पारंपारिकता  खऱ्या अर्थाने जोपासली पाहिजे व ती विद्यार्थी कलावंतांनी लोक आदिवासी नृत्य, लोकगीत, भजन अशा कला प्रकारातून जतन करताना दिसून येते आहे याचे कौतुक करत विद्यार्थी कलावंताना प्रोत्साहन दिले.
महाविद्यालयातल्या विद्यार्थी कलावंतांनी लोक आदिवासी नृत्य, लोकगीत, लावणी, समूह गायन, सुगम गायन, भजन, वक्तृत्व, काव्यवाचन, रांगोळी, कोलाज, चित्रकला, प्रश्नमंजुषा अशा १२ कला प्रकारात आपला सहभाग नोंदवून सादरीकरण केले. महाविद्यालयातील रामकृष्ण चव्हाण, रुपेश चव्हाण, अर्चना चव्हाण, किर्ती इटकरी, वैष्णवी सुतार, सुधामती काळे, वृषाली गायकवाड, मुस्कान शेख, श्वेता नाईक, अनुष्का सोनवणे, सोनाली काळे या विद्यार्थी कलावंतांनी सहभाग घेऊन आपल्या कलेचे उत्कृष्ठ सादरीकरण करून यश मिळविले आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष राठोड , कार्यालयीन अधिक्षक धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शाखाली सांस्कृतिक विभागातील  प्राध्यापकांनी यशस्वी विद्यार्थांना मार्गदर्शन केले.
         

सर्व यशस्वी कलावंतांचे व मार्गदर्शकांचे संस्थेचे अध्यक्ष मधुकरराव चव्हाण, सचिव उल्हास बोरगावकर, कार्याध्यक्ष रामचंद्र आलुरे, उपाध्यक्ष डॉ.अभय शहापूरकर, कोषाध्यक्ष प्रदीप मंटगे, सहसचिव शहबाज काझी, लिंबराज कोरेकर, प्रकाशराव चौगुले, बाबुराव चव्हाण प्राचार्य डॉ. सुभाष राठोड, कार्यालयीन अधीक्षक धनंजय पाटील, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले आहे. 

Labels:

माजी नगरसेविका श्रीमती छमाबाई धनराज राठोड यांची निवड झाल्याबद्दल आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडून गौरव

माजी नगरसेविका श्रीमती छमाबाई धनराज राठोड यांची निवड झाल्याबद्दल आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडून गौरव 

नळदुर्ग,दि.२९:

संपूर्ण भारत जन कल्याणकारी योजना प्रसार व प्रचार अभियान (आर एम एस एस) महिला धाराशिव जिल्हाध्यक्षपदी नळदुर्ग येथील माजी नगरसेविका श्रीमती छमाबाई धनराज राठोड यांची निवड झाल्याबद्दल आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
शनिवार दि.२८ डिसेंबर रोजी धाराशिव येथे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानी निवड झाल्याचे पत्र श्रीमती राठोड यांना देण्यात आले.
केंद्र सरकारच्या असंख्य जनकल्याणकारी योजनांची माहिती श्रीमती राठोड या जनसामान्यांपर्यंत पोहोचवतील अशी अपेक्षा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केली आहे. याप्रसंगी भाजपचे नळदुर्ग शहराध्यक्ष धिमाजी घुगे, माजी नगरसेवक विनायक अहंकारी,  सौ. जयश्री राठोड,  प्रशांत राठोड, सौ. रेखा राठोड, देविदास जाधव यांच्यासह कार्यकर्ते 




(RMSS) राष्ट्रीय- मोदी सेवा समिती- संपूर्ण भारत संघठन भारतीय जनता पार्टी- दिल्ली- प्रचार- प्रसार जनकल्याणकारी अभियान- संपूर्ण भारत संघठन-  अंकुश जाधव-महाराष्ट्र प्रदेश महामंत्री आर एम एस एस संपूर्ण भारत संघठन, प्रचार प्रसार भारतीय जनता पार्टी

Labels: