Tuesday, 30 December 2025

नळदुर्ग शहरातील पत्रकार आणि नवनिर्वाचित नगराध्यक्षासह नगरसेवकांचा गौरव

नळदुर्ग शहरातील पत्रकार आणि नवनिर्वाचित नगराध्यक्षासह नगरसेवकांचा गौरव

नळदुर्ग,दि.३० :

नळदुर्ग येथील शिवतीर्थ कॉम्प्लेक्स मध्ये डॉ. जितेंद्र पाटील व संजय दशरथ जाधव यांच्या वतीने  रविवार  रोजी रात्री आठ वाजता नवनिर्वाचित नगराध्यक्ष बसवराज धरणे व सर्वपक्षीय वीस नगरसेवक नगरसेविकांचा पुष्पहार घालून व फेटा बांधून यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच होऊ घातलेल्या दर्पण दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व पत्रकारांचाही सत्कार करण्यात आला.

Labels:

नळदुर्ग : नगराध्यक्ष पदाचे पदभार घेतल्याचे औचित्य साधून बसवराज ऊर्फ अप्पा धरणे यांचा सत्कार

नळदुर्ग : नगराध्यक्ष पदाचे पदभार घेतल्याचे औचित्य साधून बसवराज ऊर्फ अप्पा धरणे यांचा सत्कार 

नळदुर्ग,दि.३० डिसेंबर 

नळदुर्ग नगरपालेकेच्या नगराध्यक्षपदी भाजप महायुतीचे बसवराज ऊर्फ अप्पा धरणे यांनी पदभार घेतल्याचे औचित्य साधून मंगळवार दि. ३० डिसेंबर रोजी नवल सामाजिक संस्था व मित्र परिवाराच्या वतीने बसवराज धरणे यांचा शाल , पुष्पहार घालून आणि पेढे भरवुन सत्कार करुन अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
नगरपालिका कार्यालयातील नगराध्यक्ष दालनात झालेल्या सत्कार प्रसंगी भाजपचे माजी शहराध्यक्ष धिमाजी घुगे, पत्रकार शिवाजी नाईक, पत्रकार जहिर इनामदार, पत्रकार अजित चव्हाण, सधनशिल शेतकरी अशोक बंजारे, अतुल हजारे,नवल संस्थेचे व्यंकटेश नाईक, अविनाश बंजारे, ओम पाटील, जमन ठाकुर, अक्षय भोई,आदीसह नागरिक उपस्थित होते.

Labels:

Monday, 29 December 2025

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत नळदुर्ग नगरपालिकेचे नुतन नगराध्यक्ष बसवराज धरणे यांनी स्विकारला मोठ्या थाटात पदभार

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत नळदुर्ग नगरपालिकेचे  नुतन नगराध्यक्ष बसवराज धरणे यांनी 
स्विकारला मोठ्या थाटात पदभार 

नळदुर्ग,दि.२९ : 

 नळदुर्ग नगरपालिकेची निवडणूक होऊन भारतीय जनता पक्षाने घवघवित यश संपादन केल्यानंतर सोमवार दि. २९ रोजी लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले बसवराज ऊर्फ अप्पा धरणे यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार मोठ्या थाटात स्विकारला.

यावेळी नगरपालिकेच्या प्रांगणात झालेल्या सत्कार समारंभ प्रसंगी  आमदार राणाजगजितसिंह पाटील , भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी,  नेते सुनील चव्हाण, ज्येष्ठ नेते नितीन काळे, अर्चनाताई पाटील, युवा नेते मल्हार पाटील , संतोष बोबडे आदीसह  पदाधिकारी  उपस्थितीत होते,
 याप्रसंगी बोलताना आमदार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले की,नळदुर्गच्या जनतेने मतरूपी  विश्वास दाखविल्याबद्दल आभार व्यक्त करत नळदुर्गच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभाग निहाय शंभर दिवसाचा कार्यक्रम जाहीर करून त्याप्रमाणे विकास कामांची सुरुवात करणार असल्याचे सांगितले.

 तत्पुर्वी नगराध्यक्ष बसवराज धरणे व नगरसेवक नय्यरपाशा जाहगीरदार, दत्तात्रय दासकर, शशिकांत पुदाले, तानाजी जाधव, रिजवान काझी,निरंजन राठोड, नगरसेविका छमाबाई राठोड, मिनाक्षी काळे, राणी सुरवसे, सुमन ठाकूर, साक्षी नळदुर्गकर आदीसह सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला.

 पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले की,
शुद्ध पाणी पुरवठा, चांगले रस्ते, शहर स्वच्छता या मुलभूत प्रश्नासोबतच नळदुर्ग तालुका निर्मिती,पर्यटनाशी निगडित रोजगार निर्मिती, येणाऱ्या पर्यटकांना सोयी सुविधा तसेच राज्य व केंद्र सरकारच्या नविन योजनांचा पुरेपुर उपयोग
सर्वाच्य सहकार्याने करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
  
 तत्पुर्वी नवनिर्वाचित नगराध्यक्ष बसवराज अप्पा धरणे यांनी शहरवासियांचे जाहीर आभार मानले व पारदर्शक कारभार करण्यासोबत शहराच्या प्राथमिक गरजापुर्ण करून शहराचा कायापालट करण्याची ग्वाही दिली. नळदुर्गच्या विकासासाठी प्रसंगी कठोर निर्णय घेऊ असा गर्भित इशारा देत पालिकेच्या कर्मचाऱ्यांना व्यवस्थित काम करण्याची विनंतीवजा सुचना केली.
      
कार्यक्रमास  सुशांत भुमकर, विलास राठोड, सिध्देश्वर कोरे, निहाल काझी,किशोर नळदुर्गकर,  यांच्या सह नवनिर्वाचित नगरसेवक, भाजप पदाधिकारी,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.नगराध्यक्ष पदाचा पदग्रहण करताच कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत फटाक्यांची अतिषबाजी केली.

मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर, कार्यालयीन अधिक्षक खलील शेख, प्रकल्प अधिकारी सूरज गायकवाड, पल्लवी पाटील,आदीसह न.प.चे अधिकारी, कर्मचाऱ्यांसह भाजपचे सिध्देश्वर कोरे, सरपंच युवराज पाटील, साहेबराव घुगे, सुधीर हजारे, बलदेव ठाकुर, स्वप्ननिल काळे, धिमाजी घुगे, श्रमिक पोतदार, सुनिल चौधरी, सुदर्शन पुराणिक, पद्माकर घोडके, ज्ञानेश्वर घोडके ,किशोर नळदुर्गकर, अजय देशपांडे आदीसह पदाधिकारी , कार्यकर्ते, प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. 


नळदुर्ग नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष बसवराज धरणे यांचा पदग्रहण सोहळा मोठ्या थाटात व उत्साहात संपन्न झाला.  जनतेनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे, समन्वयाने आणि कटिबद्धतेने काम करण्याच्या अपेक्षा  नुतन पदाधिकारी यांच्याकडून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केल्या आणि त्यांना भावी कार्यासाठी  शुभेच्छा दिल्या.
त्याचबरोबर  उपस्थित नगरसेवकांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या. शहराच्या समस्या सोडवण्यासाठी, नळदुर्ग शहराचा कायापालट करण्याकरिता सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत,  त्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन   दिले.



Labels:

नळदुर्गमध्ये भाजपाकडून या निष्ठावंतांना मिळणार स्विकृतची संधी?


नळदुर्गमध्ये भाजपाकडून या निष्ठावंतांना मिळणार स्विकृतची संधी?


नळदुर्ग,दि.२९: 


नळदुर्ग नगरपालिका निवडणुका शांततेत पार पडल्यानंतर आता वेध लागले आहेत उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक कोण होणार याचे. इतिहासात पहिल्यांदाच भाजपने निर्भेळ यश संपादन केले आहे. 


भाजपच्या यशामध्ये आमदार राणाजगजितसिंह पाटील व युवा नेते सुनील चव्हाण यांचे सूक्ष्म नियोजन, भाजप पदाधिकाऱ्यांनी केलेले संघटित काम हे मुख्य कारण आहे. पहिल्यांदाच भाजपची सत्ता आल्यामुळे उपनगराध्यक्ष पदालाही महत्त्व प्राप्त होणार आहे.

 आतापर्यंत अपराजित राहिलेले व आमदार पाटील यांचे निष्ठावंत नय्यरपाशा जागीरदार व अनुभवी दत्तात्रय दासकर हे उपनगराध्यक्ष पदासाठी प्रमुख दावेदार मानले जात आहेत. मात्र ऐन वेळेस दुसरा एखादा नगरसेवक उपनगराध्यक्ष पदासाठी दावेदार ठरू शकतो. धार्मिक समतोल राखण्याच्या दृष्टीने जागीरदार यांचे पारडे जड वाटते.

स्वीकृत नगरसेवकसाठी विचार करता दोन्ही पक्षांनी अनेकांना आश्वासन दिले आहे. भाजपाकडून निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये भाजपचे जुने कार्यकर्त्यांचा समावेशच नसल्याचे स्पष्ट जाणवते. भाजपाकडून निवडून आलेल्यांमध्ये राष्ट्रवादीतून भाजपात आलेले चारजन, काँग्रेस मधून भाजपमध्ये आलेले तीघासह नगराध्यक्ष तर सेनेतून आलेले एक व इतर दोन जन विजयी झाले आहेत. म्हणजेच जुन्या किंवा मुळ भाजपातील एकही नगरसेवक नाही. त्यामुळे मूळ भाजपात नाराजी व खदखद असल्याचे आढळून येते. त्यामुळे भाजपातील जुने कार्यकर्ते धिमाजी घुगे, श्रमिक पोतदार, पद्माकर घोडके, अजय देशपांडे यांचा स्वीकृतसाठी विचार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच साठेनगर येथील पदाधिकारी धनाजी गायकवाड व मित्रपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे ज्ञानेश्वर घोडके यांचीही स्वीकृतसाठी वर्णी लागू शकते. 


काँग्रेसच्या स्विकृत नगरसेवकाबाबत विचार करता अशोक जगदाळे यांच्यासमवेत काँग्रेसवासी झालेल्या एकाही उमेदवाराचा विजय होऊ शकला नाही. त्यामुळे जगदाळे कोणत्या विश्वासू पदाधिकाऱ्यास संधी देतात हे पहावे लागेल.

Labels:

भाजपचे नुतन नगराध्यक्ष बसवराज धरणे यांचा पदग्रहण सोहळा ; आमदार राणाजगजितसिंह पाटील, भाजप नेते सुनिल चव्हाण, दत्ताभाऊ कुलकर्णी, नितीन काळे यांची प्रमुख उपस्थिती



 भाजपचे नवनिर्वाचित  नगराध्यक्ष बसवराज धरणे यांचा पदग्रहण सोहळा ; आमदार राणाजगजितसिंह पाटील, भाजप नेते सुनिल चव्हाण, दत्ताभाऊ कुलकर्णी, नितीन काळे यांची प्रमुख उपस्थिती, नळदुर्ग नगरपालिका कारभाराचा  नवा पर्व सुरु , 

नळदुर्ग,दि.२९ डिसेंबर 

नळदुर्ग नगरपालिकेच्या राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात होत असून भाजपचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष बसवराज धरणे आज  सोमवार दि.२९ डिसेंबर  रोजी रोजी दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी नगराध्यक्षपदाचा अधिकृत कार्यभार स्वीकारणार आहेत. यानिमित्ताने नगरपालिकेत पदग्रहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या पदग्रहण सोहळ्यास भाजपचे आमदार, मित्र संस्थेचे उपाध्यक्ष  राणाजगजितसिंह पाटील, निवडणूकीत गेम चेंजर ठरलेले  भाजप नेते सुनिल चव्हाण, जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, नितीन काळे आदीची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.  तरी नळदुर्ग शहारातील प्रतिष्ठित नागरिक, समाजसेवक, सर्वपक्षाचे प्रमुख, व्यापारी बांधव, विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व शहरातील नागरिकांनी या पदग्रहण सोहळ्यास  उपस्थित रहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 नगराध्यक्षपदाचा  हा बसवराज धरणे यांचा पहिलाच औपचारिक प्रवेश असल्याने शहरवासियांत उत्सुकता लागली आहे. निवडणूकीत मतदारानी बसवराज धरणे यांची नगराध्यक्षपदी निवड केली. सर्व धर्मियात लोकप्रिय असणारे  धरणे हे मनमिळाऊ असुन  सहज उपलब्ध होणारे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धरणे यांच्याकडून नळदुर्ग शहराच्या विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा  व्यक्त केली जात आहे. आज नगरपालिकेत होणाऱ्या पदग्रहण सोहळ्यास  पदाधिकारी,  नगरसेवक, कार्यकर्ते व प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती राहणार आहे.  

Labels:

Saturday, 27 December 2025

जिल्हा परिषद केसरजवळगा येथे आदप्पा गायकवाड यांच्या स्मरणार्थ शैक्षणिक साहित्य वाटप

जिल्हा परिषद केसरजवळगा येथे आदप्पा गायकवाड यांच्या स्मरणार्थ शैक्षणिक साहित्य वाटप

मुरुम,दि.२७: सुधीर पंचगल्ले 

 येथील पीएमश्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा  केसरजवळगा या शाळेत कालकथीत आदप्पा गायकवाड यांच्या  प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

 या उपक्रमातून शिक्षणाविषयीची गायकवाड यांची दूरदृष्टी आणि समाजाप्रतीची बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित झाली.
या कार्यक्रमास संजीवकुमार गायकवाड, डॉ. श्रेयस गायकवाड, श्रुती गायकवाड, विजयकुमार गायकवाड यांच्यासह गुंडाजी कांबळे, दत्तू गायकवाड (माजी सरपंच), अमोल पटवारी, जयंपालसिंग राजपूत (उपसरपंच), संदीप पाटील (अध्यक्ष शा. व्य.), अजीज शेख (उपाध्यक्ष), केंद्रप्रमुख संतोष बोडरे, शिरीष पाटील, पंडित जळकोटे, दिव्यांग संघटना अध्यक्ष विशाल गायकवाड, विजय गायकवाड आदी  उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्र मु अ बालाजी भोसले, सहशिक्षक संजीव भोसले, सुनिल राठोड, सुंकेवार , कुन्हाळे  , अनंत वाघमोडे, साधना ताशी आदींनी पुढाकार घेतला
      
  या कार्यक्रमाच्या  माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देत आदप्पा गायकवाड यांच्या समाजोपयोगी कार्याची प्रेरणा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. उपस्थितांनी त्यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण करून अशाच उपक्रमांतून त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा संकल्प व्यक्त केला.  सुत्रसंचलन  बालाजी भोसले  तर आभार सुनिल राठोड यांनी मानले..

Labels:

सोमनाथ गुड्डे नवी दिशा , नवी आशानंदगाव जिल्हा परिषद गटाचे उदयोन्मुख नेतृत्व

सोमनाथ गुड्डे  नवी दिशा , नवी आशा
नंदगाव जिल्हा परिषद गटाचे उदयोन्मुख नेतृत्व

नळदुर्ग,दि.२७:

तुळजापूर तालुक्यातील नंदगाव जिल्हा परिषद गटातून शिवसेना ( शिंदे गट) तर्फे इच्छुक उमेदवार म्हणून उदयास आलेले सोमनाथ गुड्डे हे दहिटणा (ता. तुळजापूर) येथील शेतकरी कुटुंबातील,  समाजकारणाची ओढ असलेले कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. विद्यार्थी दशेपासून त्यांनी सामाजिक कामाचा ध्यास घेतला असून विशेषतः महिला सक्षमीकरण, युवक रोजगार, गावविकास या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

गावविकासातील ठोस कामगिरी

दहिटणा ग्रामपंचायतीत सलग दोन वेळा पॅनेल विजय मिळवून संघटनशक्ती सिद्ध उपसरपंच पदाचा कार्यकाळ यशस्वी, गावात विविध विकासकामे वेगात , बंदिस्त गटार योजना, सिमेंट रस्ते, घरकुल योजना, रक्तदान शिबिरे, अशा अनेक योजनांची प्रभावी अंमलबजावणी केल्याचे बोलले जात आहे.

12 बचत गटांमार्फत महिला सक्षमीकरण, कर्जसहाय्य व प्रशिक्षण ,युवा आणि महिलांसाठी सातत्यपूर्ण उपक्रम राबविले आहे.

सोमनाथ गुड्डे यांनी केवळ गावापुरते मर्यादित न राहता पुणे येथे ‘राजमाता अहिल्याबाई होळकर रिक्षा असोसिएशन’ स्थापन केली. त्याद्वारे ग्रामीण भागातील युवकांना शहरात रोजगार मिळवून देण्याचे मोठे कार्य त्यांनी केले.
दरवर्षी दहिटणा येथे राजमाता अहिल्याबाई होळकर जयंती उत्सव भव्यदिव्य पद्धतीने साजरा करून महिलांना विविध पुरस्कारांनी गौरविण्याची परंपरा त्यांनी सुरू केली आहे.

जनशुभदा फाउंडेशनद्वारे समाजकार्य

गेल्या 5 वर्षांत जनशुभदा फाउंडेशन मार्फत विविध उपक्रमांची अंमलबजावणी, युवकांसाठी क्रिकेट स्पर्धा, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा, समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींना पुरस्कार व सन्मान, मागील निवडणुकीतील अल्प फरकाचा पराभव  यंदा विजय निश्चित मानले जात आहे.

मागील निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून त्यांनी निवडणूक लढविली होती. मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून देखील अतिशय कमी फरकाने पराभव झाला. मात्र, जनतेशी असलेला सातत्यपूर्ण संवाद, विकासकामांवरील विश्वास, आणि नेतृत्वगुण पाहता या वर्षी सोमनाथ गुड्डे यांना पसंती असल्याचे मतदारांमध्ये वातावरण आहे.


नंदगाव गटातील मतदारांत बहुजन समाजाच्या मेहनती नेत्याला साथ देणार, अशी चर्चा होत आहे. गावविकास, समाजकारण आणि परिवर्तनाच्या वाटचालीसाठी सोमनाथ गुड्डे यांना  विजयी  करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

Labels:

माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्यावतीने भाजपाचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष बापुराव पाटील यांचा सत्कार

 माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्यावतीने  भाजपाचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष बापुराव  पाटील यांचा सत्कार



मुरुम, दि.२७ :

भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष बापुराव  पाटील यांची भाजपाचे नेते माजी आ.सुजितसिंह ठाकूर यांनी मुरुम येथील त्यांच्या निवासस्थानी दि.26 डिसेंबर  रोजी भेट देऊन सत्कार केला आणि अभिनंदन करत  पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर यावेळी 
 माजी आ. सुजितसिंह ठाकूर यांचाही नुतन नगराध्यक्ष बापुराव  पाटील व युवा नेते शरण पाटील यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

 यावेळी भाजपाचे युवा नेते शरण बसवराज पाटील,भाजपा लोहारा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील,परंडा न.प. नवनिर्वाचित नगरसेवक रमेशसिंह परदेशी,भाजपा लोहारा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला,भाजपा उमरगा शहराध्यक्ष ॲड साईराज टाचले, नगरसेवक तथा भाजपा मुरुम शहराध्यक्ष गणेश अंबर,महालिंग बाबशेट्टी,राजूभाई मुल्ला,उत्कर्ष गायकवाड, काशीनाथ गायकवाड, महादेव कोरे,यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Labels:

Friday, 26 December 2025

नळदुर्ग नगरपालिकेत भारतीय जनता पार्टी महायुतीचा ऐतिहासिक विजय


नळदुर्ग नगरपालिकेत भारतीय जनता पार्टी महायुतीचा ऐतिहासिक विजय



नळदुर्ग नगरपालिकेत भारतीय जनता पार्टी महायुतीचा ऐतिहासिक विजय

विजयी झालेल्या भाजप व महायुतीच्या नगराध्यक्ष व नगरसेवकांचे मनःपूर्वक अभिनंदन

शुभेच्छुक : भारतीय जनता पार्टी, नळदुर्ग शहर

Labels:

Wednesday, 24 December 2025

रोटरीच्या वतीने किसान दिनानिमित्त किसानांचा सत्कार

रोटरीच्या वतीने किसान दिनानिमित्त किसानांचा सत्कार 

मुरूम,दि.२४: 

रोटरी क्लब मुरूमच्या वतीने किसान दिनाचे औचित्य साधून प्रगतशील शेतकरी त्याचबरोबर उपक्रमशील शेतकरी संजय मिनियार, मुरूम , अमर पवार भुयार चिंचोली, नितीन शेळके मुरूम, दयानंद व्हनाळे मुरूम यांचा सत्कार करण्यात आला.

 या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब मुरूम सिटीचे अध्यक्ष प्रा. डॉ.आप्पासाहेब सूर्यवंशी होते तर प्रमुख अतिथी म्हणून राजेंद्र कृषी सेवा केंद्राचे आप्पासाहेब पाटील, व्यंकटेश सुपर मार्केटचे विष्णुदास मुंदडा उपस्थित होते. प्रगतशील आणि उपक्रमशील शेतकऱ्यांचा सत्कार हा नव्या पिढीतील युवकांना नक्कीच मार्गदर्शक ठरणार असून त्यांनी केलेल्या कामाचा गौरव व्हावा आणि त्यातून नव युवकांना प्रेरणा मिळावी हा मुख्य उद्देश रोटरी क्लब आहे,असे प्रमुख अतिथी  अप्पासाहेब पाटील यांनी व्यक्त केले. शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन असे अनेक व्यवसाय आपल्याला करता येतात त्याचबरोबर आम्ही आज जवळपास 200 लिटर दूध रोज विकतो त्यातून मला बराच फायदा झालेला आहे असे संजय मिनीयार आणि ॲड अमर पवार यांनी व्यक्त केले
अध्यक्षीय समारोपात बोलताना प्रा डॉ आप्पासाहेब सूर्यवंशी म्हणाले आजचा युवक हा बेरोजगार झालेला असून त्यांना शेती व्यवसायामध्ये आवड निर्माण करण्याचे काम आपल्या माध्यमातून व्हावे हाच उद्देश ठेवून रोटरी क्लब मुरूमने प्रगतशील आणि उपक्रमशील शेतकऱ्यांचा गौरव या ठिकाणी केला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष कांबळे यांनी केले तर आभार सुनील राठोड यांनी मानले. 
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भूषण पाताळे, गोविंद पाटील यांनी परिश्रम घेतले. 
या कार्यक्रमासाठी डॉ.नितीन डागा, राजेंद्र वाकडे, कलया स्वामी, शिवकुमार स्वामी उपस्थित होते

Labels:

केवळ जागरूक आणि सावध ग्राहकच सुरक्षित

केवळ जागरूक आणि सावध ग्राहकच सुरक्षित (राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन विशेष - २४ डिसेंबर २०२५) लेखक - डॉ. प्रीतम भी. गेडाम

आजच्या डिजिटल युगात आर्थिक व्यवहार किंवा खरेदी करणे सोपे झाले आहे, परंतु त्याच वेगाने फसवणूक, बनावट उत्पादने, भेसळ, खोटा देखावा आणि सायबर गुन्हे देखील मर्यादेपलीकडे वाढले आहेत. इतरांवर आंधळेपणाने विश्वास, ढोंग, दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि खोट्या आश्वासनांवर विश्वास ठेवण्याऐवजी, आपण स्वतःच्या विवेकबुद्धीचा वापर केला पाहिजे. धोरणे, नियम आणि कायदे पाळा; तरच आपण जागरूक ग्राहक बनू शकू. जर एखाद्या ग्राहकाला एखादी वस्तू किंवा सेवा मिळाली तर ते त्यांनी खर्च केलेल्या किमतीच्या तुलनेयोग्य असली पाहिजे. ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ अंतर्गत वस्तूबाबत ग्राहकांचे महत्त्वाचे अधिकार प्रामुख्याने सुरक्षिततेचा अधिकार, माहितीचा अधिकार, निवडीचा अधिकार, सुनावणीचा अधिकार, तक्रारींचे निवारणाचा अधिकार आणि ग्राहक जागरूकता यांचा अधिकार हे विशेषतः सहा आहेत.  

ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ सोबत अनेक विशिष्ट नियम आणि कायदे आहेत. जसे की ग्राहक संरक्षण (ई-कॉमर्स) नियम, २०२० आणि केंद्रीय आणि राज्य ग्राहक वाद निवारण आयोगांना नियंत्रित करणारे कायदे. हे वेगवेगळे कायदे एकत्रितपणे ग्राहकांना अनुचित पद्धती, उत्पादन आणि सेवा दोषांपासून संरक्षण देतात. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण ही कायद्याअंतर्गत ग्राहकांच्या हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी स्थापन केलेली एक वैधानिक संस्था आहे. ग्राहक वाद निवारण आयोग विवादांचे निराकरण करण्यासाठी तीन-स्तरीय रचना प्रदान करतो, जिल्हा स्तरावर - ५० लाख रुपयांपर्यंत, राज्य स्तरावर - ५० लाख रुपयांपासून ते २ कोटी रुपयांपर्यंत आणि राष्ट्रीय आयोग - २ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे वाद.

उत्पादन दायित्व कायदा हे उत्पादनाची संकल्पना आणते, ज्यामुळे उत्पादक, सेवा प्रदाता आणि विक्रेता त्यांच्या सदोष उत्पादनामुळे किंवा खराब सेवेमुळे होणाऱ्या नुकसानासाठी जबाबदार असतात. ग्राहक संरक्षण (थेट विक्री) कायदा, २०२१ हे कायदे फसव्या योजना रोखण्यासाठी थेट विक्री उद्योगाचे नियमन करतात. ग्राहक संरक्षण (मध्यस्थी) नियम, २०२० ग्राहक मध्यस्थी कक्ष तयार करते आणि मध्यस्थीची प्रक्रिया निश्चित करते. ग्राहक संरक्षण (ग्राहक आयोग प्रक्रिया) नियमावली, २०२० मध्ये ग्राहक आयोगाच्या प्रक्रियेची तपशीलवार माहिती दिली आहे. ग्राहक संरक्षण (सामान्य) कायदा, २०२० मध्ये ग्राहक संरक्षणासाठी सामान्य तरतुदी देण्यात आल्या आहेत. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण (तज्ञ आणि व्यावसायिकांच्या नियुक्तीसाठी प्रक्रिया) नियमावली, २०२१ मध्ये केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणात तज्ञांना समाविष्ट करण्याची प्रक्रिया निश्चित केली आहे. अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा, १९५४ अन्नाची गुणवत्ता आणि सुरक्षितता नियंत्रित करतो. कृषी उत्पादन (ग्रेडिंग आणि मार्किंग) कायदा, १९३७ कृषी उत्पादनांच्या ग्रेडचे प्रमाणिकरण करतो. भारतीय मानक ब्युरो कायदा, १९८६ प्रमाणन मानकांद्वारे उत्पादनाची गुणवत्ता सुनिश्चित करतो. भारतीय करार कायदा, १८७२ अशा करारांचे नियमन करतो, जे करारांतर्गत ग्राहकांच्या हक्कांवर परिणाम करू शकतात. वस्तू विक्री कायदा, १९३० वस्तूंच्या विक्रीचे नियमन करतो.

देशातील ग्राहकांच्या फसवणुकीच्या सामान्य प्रकारांमध्ये एखाद्या व्यक्तीची वैयक्तिक माहिती, उदाहरणार्थ, बँक खाते किंवा पॅन तपशील वापरणे समाविष्ट आहे. स्कॅमर लोकांकडून ओटीपी, पासवर्ड किंवा कार्ड तपशील यासारखी संवेदनशील माहिती मिळवण्यासाठी ईमेल, एसएमएस किंवा फोन कॉलद्वारे बँका किंवा इतर विश्वसनीय संस्थांची तोतयागिरी करतात. युनिफाइड पेमेंट इंटरफेस आणि क्रेडिट कार्डवर अनधिकृत व्यवहार खूप सामान्य आहेत. गुंतवणूकदारांच्या पैशांचा वापर करून खऱ्या नफ्याऐवजी उच्च परताव्याचे आश्वासन देणारे गुंतवणूक घोटाळे, यामध्ये ई-कॉमर्स मार्केटप्लेस आणि ऑनलाइन रिटेलर साइट्सवरील स्कॅम समाविष्ट आहेत. स्कॅमर स्वतःला खरा व्यवसाय असल्याचे भासवतात आणि फोनवरून तुमचे पैसे किंवा वैयक्तिक माहिती घेतात.

भारतात सायबर हल्ले सातत्याने वाढत आहेत. राष्ट्रीय सायबर गुन्हे अहवाल पोर्टलवर नोंदवलेल्या सायबर सुरक्षा घटनांची संख्या २०२२ मध्ये १०.२९ लाखांवरून २०२४ मध्ये २२.६८ लाख झाली आहे, जी १२० टक्क्यांहून अधिक वाढ आहे. देशात "डिजिटल अटक" मध्येही वाढ झाली आहे, जिथे फसवणूक करणारे मोठ्या प्रमाणात विशेषतः वृद्धांकडून पैसे लुटण्यासाठी डीपफेक आणि बनावट ओळखीसारख्या प्रगत पद्धतींचा वापर करत आहेत. ह्या गुन्ह्यांवर प्रतिसाद म्हणून, सर्वोच्च न्यायालयाने कडक भूमिका घेतली आहे आणि संपूर्ण भारतात या प्रकरणांची चौकशी करण्याचे अधिकार सीबीआयला दिले आहेत आणि ऑनलाइन मध्यस्थांना तपासात सहकार्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गेल्या आठ महिन्यांत, महाराष्ट्र राज्यात २१८ डिजिटल अटक प्रकरणांमध्ये निष्पाप लोकांना ११२ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

२०२२-२३ या आर्थिक वर्षात, डुप्लिकेट उत्पादनांचे मूल्य सुमारे ८ लाख कोटी रुपये होते, त्यापैकी निम्म्याहून अधिक कापड आणि वस्त्र होते, जे ४,०३,९१५ कोटी रुपये होते. २०२४ मध्ये भारतातील बनावटी-विरोधी पॅकेजिंग बाजारपेठेचे मूल्य ₹५.५ अब्ज होते आणि २०२५-२०३३ दरम्यान ते ₹१४.३ अब्ज पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. या वर्षी जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत, ई-कॉमर्स क्षेत्रातील बनावट, खोटे आणि डुप्लिकेट उत्पादनांच्या विक्रीशी संबंधित ७,२२१ तक्रारी राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनवर नोंदवण्यात आल्या. २०२४ च्या सरकारी आकडेवारी आणि अहवालांवर आधारित अंदाज असे दर्शवतात की बनावट औषधांमुळे होणारे आर्थिक नुकसान सुमारे ७.५ अब्ज रुपये आहे. असा अंदाज आहे की भारतात पुरवल्या जाणाऱ्या सर्व औषधांपैकी १२-२५ टक्के औषध बनावट असू शकतात.

ग्राहकांची फसवणूक झाल्यास त्वरित मदत मिळवा किंवा तक्रार दाखल करा. नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टल (https://cybercrime.gov.in/) वर ऑनलाइन फसवणुकीची तक्रार करा. सामान्य ग्राहक त्यांच्या तक्रारींसाठी राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन वेबसाइट (https://consumerhelpline.gov.in/public/) वर त्वरित नोंद करू शकतात किंवा टोल-फ्री क्रमांक १८००-११-४००० किंवा १९१५ वर कॉल करून किंवा ८८००००१९१५ वर एसएमएस करून संपर्क साधू शकतात. ग्राहक डिजिटल पद्धतीने तक्रारी नोंदवण्यासाठी ग्राहक अॅप किंवा राष्ट्रीय पोर्टल ऑफ इंडियाचा वापर देखील करू शकतात. बँक फसवणूक झाल्यास, बँकिंग लोकपालाकडे तक्रार दाखल करा. गंभीर गुन्हेगारी घटनेच्या बाबतीत, जवळच्या पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करा. ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत, दाव्याच्या रकमेनुसार जिल्हा, राज्य किंवा राष्ट्रीय ग्राहक मंचात तक्रार दाखल करता येते. अनेक ग्राहक संस्था आणि स्वयंसेवी संस्था ग्राहकांच्या हितासाठी मार्गदर्शन देखील करतात, काही प्रकरणांमध्ये, दिवाणी न्यायालय देखील मदत मिळविण्याचा पर्याय असू शकते. अनेकदा, वाद सोडवण्यासाठी मध्यस्थीसारख्या पद्धती अस्तित्वात असतात.

केवळ ग्राहकांची जबाबदारी आणि जागरूकताच त्यांना फसवणुकीपासून वाचवू शकते. नैतिक ग्राहक बना, निष्पक्ष राहा आणि चुकीचे धोरण वापरू नका. वस्तू आणि सेवा निवडताना, त्यांची गुणवत्ता आणि सुरक्षितता विचारात घ्या, उत्पादन किंवा सेवेबद्दल माहिती गोळा करा आणि सध्याच्या तंत्रज्ञानातील बदल किंवा नवोपक्रमांबद्दल स्वतःला अपडेट ठेवा. ग्राहकांनी स्वतः विचार करावा आणि त्यांच्या गरजेनुसार उत्पादन किंवा सेवा निवडावी. ग्राहकांनी आपली मते मांडावी, वस्तू उत्पादक आणि सरकारसमोर आपल्या गरजा आणि इच्छा व्यक्त करा. एखाद्या उत्पादनाबद्दल किंवा सेवेबद्दल असमाधान असल्यास कळवा आणि इतरांना देखील सांगा. माहितीपूर्ण ग्राहक बना, जागरूक रहा, सुरक्षित रहा.

लेखक - डॉ. प्रीतम भी. गेडाम

ईमेल prit00786@gmail.com

Labels:

विकासाचा झंझावात भाजपचे सिद्धेश्वर कोरे ; आगामी नंदगाव जिल्हा परिषद (गटात) निवडणुक गाजणार

विकासाचा झंझावात भाजपचे सिद्धेश्वर  कोरे ; आगामी  नंदगाव जिल्हा परिषद (गटात) निवडणुक गाजणार 
 

नळदुर्ग,दि.२४ :

आगामी होणा-या जिल्हा परिषद निवडणुकीत
नंदगाव जिल्हा परिषद गटात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे कट्टर समर्थक 
माजी पंचायत समिती सदस्य सिद्धेश्वर कोरे  यांनी पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे.

कामातून ओळख निर्माण करणारे,विकासाला प्राधान्य देणारे आणि जनतेशी थेट नाळ जोडणारे नेतृत्व अशी सिध्देश्वर कोरे यांची ओळख आहे. सर्वाधिक निधी खेचून आणणारे,प्रभावी आणि कामदार पंचायत समिती सदस्य म्हणून त्यांची सर्वत्र ओळख आहे. रस्ते,पाणी पुरवठा,वीज, आरोग्य, शिक्षण,अंगणवाड्या,पशुवैद्यकीय दवाखाना ते सामाजिक विकासाच्या असंख्य योजना त्यांच्या कार्यकाळात मार्गी लागल्याचे सर्वश्रुत आहे. त्यामुळेच "सिद्धू अण्णा म्हटले की  काम बोलतं."ही ओळख आजही जनतेच्या मनात ठामपणे रुजलेली आहे.

आमदार राणाजगजितसिंह पाटील  यांचे विश्वासू शिलेदार म्हणून  कोरे पुढे येत असून,दोघांमधील समन्वय,विश्वास आणि विकासाचा समान दृष्टिकोन नंदगाव भागातील राजकारणात निर्णायक ठरत असल्याचे जाणकारांचे मत आहे.संघटनात्मक ताकद,प्रशासनावरील पकड आणि प्रदीर्घ अनुभवामुळे ते आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे खंदे पाठबळ मानले जातात.

नंदगाव जिल्हा परिषद गटातील सिदगाव, कुन्सावंळी, बोळेगाव, नंदगाव ,सलगरा, बोरगांव, लोहगाव, खुदावाडी,  दहीटणा, येडोळा, रामतीर्थ ,वागदरी ,गुजनुर ,जकणी तांडा, पाटील तांडा, घोडके तांडा, नरवडे तांडा ,गायरान तांडा , गावठाण तांडा व विविध वस्त्या,तांड्यांसह तुळजापूर तालुक्यातील अनेक गावांत त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. सरपंच, ग्रामपंचायत सदस्य,विविध विकास सोसायट्यांचे चेअरमन आणि तरुण कार्यकर्त्यांची मजबूत फळी हे त्यांचे प्रमुख बळ मानले जाते. 

विकासकामांच्या बाबतीत सिद्धू अण्णांची ठळक कामगिरी  

 प्रत्येक निवडणुकीत अती महत्वाची कामे बजावणारे गाव म्हणजे नंदगाव, या गावातील लोकांनी नेहमीच विकासाच्या पाठीशी राहिले आहे. ग्रामस्थाना नंदगाव ते सलगरा ये जा करण्यासाठी  जवळपास 6 कि.मी रस्त्यांची दुरवस्था झाल्याने  ग्रामस्थांनी रस्त्यासाठी मतदानावर बहिष्कार घातला असता आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत रस्ता मंजूर करून घेतला. दिलेल्या शब्दावर विश्वास ठेवून नंदगाव ग्रामस्थांनी बहिष्कार मागे घेतला आणि भरघोस मतांनी राणा दादाना निवडून दिले.
मौजे शहापूर, यडोळा, दहीटणा  या ठिकाणी  आमदार राणादादा यांच्या मार्गदर्शनाखाली अतिवृष्टीमुळे झालेल्या घराची पडझड व संसारिक वस्तूंचे झालेले नुकसान या संदर्भात पाहणी करण्यासाठी गेलो असता एक हात मदतीचा याप्रमाणे फुल ना फुलाची पाकळी मदत करण्याचे आश्वासन देऊन काही कुटुंबाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. छोट्या,मोठ्या गावातील युवा,ज्येष्ठ नेत्यांना संधी देऊन भाजप पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले. गावातील जरी सरपंच असले किंवा कार्यकर्ता असले त्यांना निवडून आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

नंदगाव परिसरातील राजकारणात सामाजिक सलोख्याचे ठोस उदाहरण म्हणून सिद्धू आणा यांचे नाव घेतले जाते.नंदगाव जिल्हा परिषद गटात निर्णायक भूमिका घेणारे मतदार म्हणजे मराठा लिंगायत,मुस्लिम,बहुजन,बंजारा,धनगर  तसेच इतर सर्व समाजघटकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे व विश्वासाचे संबंध आहेत.जाती-धर्माच्या चौकटी पलीकडे जाऊन सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे नेतृत्व म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

विकासकामे,मूलभूत सुविधा,सामाजिक प्रश्न असोत किंवा अडचणीच्या काळात मदतीचा हात सर्व समाजातील लोकांना सोबत घेऊन चालण्याची भूमिका त्यांनी  सातत्याने निभावली आहे.त्यामुळेच विविध समाजघटकांमध्ये त्यांच्याबद्दल आपुलकी,विश्वास आणि सकारात्मक भावना दिसून येते.

सर्वांना सोबत घेऊन,सर्वांसाठी काम करणारे हे नेतृत्व म्हणजेच नदगाव तील सामाजिक ऐक्याचे बळकटीकरण करणारा केंद्रबिंदू ठरत आहे.
नंदगाव जिल्हा परिषद गटात सर्वसमावेशक विकासाची भूमिका प्रत्यक्षात उतरवणारे नेतृत्व म्हणून  त्यांची ओळख निर्माण झाली आहे. विशेषतः सर्व समाजाच्या विकासासाठी  सर्वाधिक निधी उपलब्ध करून आणले आहे.


दफनभूमी, विकास, बोअरवेल व पाणीपुरवठा व्यवस्था,तसेच समाज मंदिर यांसारख्या अत्यावश्यक सुविधांसाठी त्यांनी जिल्हा परिषद व विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून भरीव निधी मंजूर करून घेतला.या कामांमुळे अनेक गावांतील  समाजाला दीर्घकालीन दिलासा मिळाला असून,त्यांच्या दैनंदिन गरजांना प्रत्यक्ष आधार मिळाला आहे.

पद,धर्म किंवा राजकारणाच्या चौकटीत न अडकता "सर्वांचा विकास"हा दृष्टिकोन केंद्रस्थानी ठेवून काम करणारे नेतृत्व म्हणून सिद्धू अण्णा  यांच्याकडे पाहिले जाते. दुर्गम भागातील वंचित घटक असोत किंवा अल्पसंख्यांक वस्त्या कोणताही समाज त्यांच्या लक्षाबाहेर राहिलेला नाही,हे त्यांच्या कामातून स्पष्टपणे दिसून येते...

नंदगाव गटातील सर्व समाजामध्येही त्यांच्या कार्याबद्दल विश्वासाची भावना निर्माण झाली असून,विकासकामांमुळे "सिद्धू अण्णा म्हणजे दिलेला शब्द पूर्ण करणारा नेता" अशी प्रतिमा अधिक दृढ होत चालली आहे.

आज नंदगाव जिल्हा परिषद गटात सिद्धू अण्णा हे सर्वाधिक चर्चेत असलेले नेतृत्व ठरत आहेत.ते पुन्हा एकदा "फुल ॲक्शन मोड" मध्ये उतरल्याचे स्पष्ट चित्र आहे.जर त्यांना पुन्हा संधी मिळाली,तर आमदार राणा दादा यांना अधिक बळ मिळून नंदगाव गटातून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत सिद्धू आणा नवा राजकीय इतिहास घडवतील,अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोरात सुरू आहे.

Labels:

Monday, 22 December 2025

अत्यंत चुरशीच्या आणि उत्कंठा वर्धक ठरलेल्या जुलेखा इनामदार यांनी महिला उमेदवारामधून सर्वात जास्त मते घेवुन दणदणीत विजयी

अत्यंत चुरशीच्या आणि उत्कंठा वर्धक ठरलेल्या  जुलेखा इनामदार यांनी महिला उमेदवारामधून सर्वात जास्त मते घेवुन दणदणीत विजयी 


नळदुर्ग,दि.२२:


नळदुर्ग नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ७ मधून जुलेखा इनामदार ह्या तब्बल २५५ मतांनी दणदणीत विजयी झाल्या आहेत.त्यांनी प्रतिस्पर्धी शाहना बेगम खतीब यांचा पराभव केला आहे.
अत्यंत चुरशीच्या आणि उत्कंठा वर्धक ठरलेल्या नगरपरिषदेच्या प्रभाग क्र ७ च्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून,काँग्रेस तर्फे नगरसेवक पदाच्या उमेदवार जुलेखा मैनोद्दीन इनामदार यानी विजयश्री मिळविला आहे,त्यांनी तब्बल ७९८ मते घेऊन निवडून आल्या आहेत.


 दरम्यान जुलेखा इनामदार या पहिल्यांदाच निवडणुक रिंगणात उभे होत्या,आणि नगरसेवक पदी विराजमान होण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. काँग्रेसच्या उमेदवार जुलेखा इनामदार यांना ७९८ मते मिळाली तर त्यांच्या विरोधामध्ये उभे असलेले राष्ट्रवादीच्या उमेदवार शहाणा खातीब यांना ५४३ मतांवर समाधान मानावे लागले आहे.
इनामदार यांच्या कुटूंबातून पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून नगरपालिकेत लोकप्रतिनिधी म्हणून धाडल्यामुळे प्रचंड उत्साहाचे वातावरण पसरले आहे,या विजयाचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे,या प्रसंगी इनामदार कुटुंब व प्रभागातील मतदारांनी सय्यद मोहियोद्दीन, जैनुल अबेद्दीन इनामदार, शमसोद्दीन इनामदार, अवेज इनामदार व इतरांनी  पुष्पहार, शाल, श्रीफळ देवून व पेढे  भरवून त्यांच्या सत्कार केला.

Labels:

मुरूम नगरपरिषदेवर भाजपची एकहाती सत्ता काबीज करून नगराध्यक्षपदी बापूराव पाटील विजय; पन्नास वर्षानंतर इतिहासाची पुनरावृत्ती करत विरोधकांचा सुपडा साफ....

मुरूम नगरपरिषदेवर भाजपची  एकहाती सत्ता काबीज करून नगराध्यक्षपदी बापूराव पाटील विजय; पन्नास वर्षानंतर इतिहासाची पुनरावृत्ती करत  विरोधकांचा सुपडा साफ

 मुरुम,दि.२२: सुधीर पंचगल्ले 

 नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी मतदान प्रक्रिया मंगळवार  रोजी पार पडली होती. निकाल मात्र लांबणीवर गेला .अखेर रविवारी  रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडली. नगरपालिकेत काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पाटील परिवाराची ५० वर्षापासून एकहाती सत्ता राहिली. यंदाही मुरूम नगरपरिषदेवर प्रथमच भारतीय जनता पार्टीचे कमळ फुलले. पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती करत पाटील परिवाराने एकहाती सत्ता कायम ठेवून ऐतिहासिक वर्चस्व प्रस्थापित केले. ही निवडणूक स्थानिक पातळीवर असल्याने या निवडणुकीत पक्ष नव्हे तर पाटील परिवारावर जनतेचे प्रेम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध होऊन मतदारांनी विजयी केले. 

पारंपारीक विरोधकांने एकहाती सत्तेचा बुरुज हलवीण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न केले. जनतेने मात्र त्यांच्या विचाराला नाकारून कमळ फुलवत मतदानरुपी लोकशाहीचा गुलाल पाटील परिवाराला लावून लोकशाहीच्या आढून जनतेचा विश्वास घात करणाऱ्या विरोधकांला मतदानातून मतदारांनी चांगलाच धडा शिकविला. माजी मंत्री तथा भाजप लातूर ग्रामीण चे जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार बापूराव पाटील, भाजप युवानेते शरण पाटील, सौ. संपदा शरण पाटील, स्मिताताई बापूराव पाटील व सर्व उमेदवार यांनी प्रत्येक प्रभागात घेतलेल्या कॉर्नर बैठका, प्रचार पदयात्रा आणि त्यामध्ये मिळत असलेला नागरिकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद म्हणजे विजयी संदेश देत होते. फक्त निकडणुकीची औपचारिकता बाकी राहिली होती. अखेर तो दिवस उजाडला २१ डिसेंबरला. ३० नोव्हेंबर रोजी शहरातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा बसवेश्वर चौक मार्गे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौकापर्यंत निघालेल्या पदयात्रेला उसळलेला जनसागर पुन्हा एकहाती सत्तेची साक्षी देत होते. नंतर साठे चौकात माजी मंत्री बसवराज पाटील, जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, नितीन काळे सह उपस्थित मान्यवरांच्या पार पडलेल्या विराट सभेत बसवराज पाटील यांनी मुरूमकरांना केलेल्या संभाषणाने विजयावर  शिक्कामोर्तब झाला. विरोधकांवर टीका-टिप्पणी करण्यापेक्षा आपण भविष्यात नगरपरिषदेच्या माध्यमातून जो वचननामा निवडणुकीत जनतेसमोर मांडून येणाऱ्या काळात विकासात्मक काम करण्याचा संकल्प अधोरेखित केला. या सभेपासूनच मतदारांना कळले की उच्च विचाराचे राजकारण काय असते. इथूनच मतदारांचे मतपरिवर्तन झाले. पाटील परिवाराच्या माध्यमातून सर्व धार्मियांना मुरूम नगरपरिषदेवर ५० वर्षे कै. माधवराव (काका) पाटील यांच्या हयातीत आणि त्यांच्या पश्चात बसवराज पाटील, बापूराव पाटील यांनी संधी दिली. 

मात्र या निवडणुकीत पाटील परिवारातील बापूराव पाटील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते. यावेळी मतदारांनी उत्स्फूर्तपणे बापूराव पाटलांचा प्रचार करत विजयाची माळ त्यांच्या गळ्यात घातली. विजयी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बापूराव पाटील यांनी प्रतिस्पर्धी अजित चौधरी यांच्यापेक्षा ४०१९ मताच्या फरकाने विजय मिळविला. या निवडणुकीतील प्रभागनिहाय विजयी उमेदवार खालील प्रमाणे... प्रभाग एक-अ व ब : स्नेहा राम बंडगर (७२८ मतांनी विजयी), 
अमर धनराज भोसले (५३६ मतांनी विजयी), प्रभाग दोन-अ व ब : सचिन गुलाब फनेपुरे (३११ मतांनी विजयी), श्रीदेवी नागप्‍पा दुर्गे (३९२ मतांनी विजयी), प्रभाग तीन-अ व ब : महादेवी बबन बनसोडे (३१३ मतांनी विजयी), अहमद युनूज मनियार (२४३ मतांनी विजयी), प्रभाग चार-अ व ब अंकिता राजकुमार अंबुसे (६७० मतांनी विजयी),
निरजानंद सच्चिदानंद अंबर (६९१ मतांनी विजयी), प्रभाग पाच-अ व ब : गौस रशीद शेख (२१० मतांनी विजयी), निर्मला प्रकाश कंटेकुरे (४७१ मतांनी विजयी), प्रभाग सहा-अ व ब : रूपचंद गुंडेराव गायकवाड (२५२ मतांनी विजयी), मुमताजबी मलंग ढोबळे (२०० मतांनी विजयी), प्रभाग सात-अ व ब : ज्योती सुजित शेळके (३४८ मतांनी विजयी), 
रमेश दत्तू चव्हाण (१७२ मतांनी विजयी), प्रभाग आठ-अ व ब : सुनिता मारुती बनणे (५५८ मतांनी विजयी), राजेंद्र संभाजी बेंडकाळे (५१२ मतांनी विजय), प्रभाग नऊ-अ व ब : समीना राजाबकसर मुल्ला (१३५ मतांनी विजयी), अजितकुमार अरविंद चौधरी (९ मतांनी विजयी), प्रभाग दहा-अ व ब : रागिनी भारत गायकवाड (३४६ मतांनी विजयी), 
सिद्राय्या सायबण्णा ख्याडे (५२२ मतांनी विजयी). मुरूम शहरातील नगरपरिषद निवडणुकीमध्ये नगरसेवक पदाकरिता सर्वात जास्त मतांनी निरजानंद सच्चिदानंद अंबर ६९१ मतांनी विजयी तर सर्वात कमी मतांनी अजितकुमार अरविंद चौधरी ९ मतांनी विजयी झाले. पाटील परिवारातून एक व्यक्ती शहराच्या सेवेसाठी सक्रिय होतो आहे. यात गैर काय ? असा सवाल मतदारांमध्ये निर्माण झाला होता मात्र मतदारांनी पाटील परिवारावर विश्वास दाखवून आपल्याच कुटुंबातील सदस्य असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले. मतदारांनी विरोधकांच्या विचाराला नाकारले आणि कमळ फुलविले.

 पाटील परिवाराने काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मुरूम नगरपरिषदेवर रचलेले ऐतिहासिक रेकॉर्ड पुन्हा एकदा पाटील परिवारानेच भाजपच्या माध्यमातून एकहाती सत्ता काबीज करून वर्चस्व सिद्ध केले. मुरूम शहरात पक्षाला नव्हे, पाटील परिवाराला पाहून मतदान होते. हे पुन्हा एकदा जनतेने सिद्ध करून जलवा कायम राखला. मतमोजणी प्रसंगी प्रशासकीय व पोलीस यंत्रणा सज्ज होती.

Labels:

Sunday, 21 December 2025

नळदुर्ग नगरपालिकेवर भाजपचे कमळ फुलले, अपेक्षेप्रमाणे नगराध्यक्षपदी बसवराज (अप्पा) धरणे विजयी; भाजप सेनेचे ११ तर काँग्रेसचे ९ उमेदवार विजयी

नळदुर्ग नगरपालिकेवर भाजपचे कमळ फुलले, अपेक्षेप्रमाणे नगराध्यक्षपदी बसवराज (अप्पा) धरणे विजयी; भाजप सेनेचे ११ तर काँग्रेसचे ९ उमेदवार विजयी 


नळदुर्ग,दि.२१ :


नळदुर्ग  नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बसवराज (अप्पा) विजयकुमार धरणे यांनी ४२० मतांनी घवघवीत यश मिळविले आहे, त्यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक जगदाळे व एमआयएमचे उमेदवार शहबाज काझी यांचा पराभव करून दणदणीत विजय मिळविला आहे.भाजपचे १० नगरसेवक पदाचे उमेदवार विजयी झाले तर काँग्रेसचे ९ व शिवसेना शिंदे गटचा १ नगरसेवक निवडून आला आहे.


नगरध्यक्ष पदाचे उमेदवार बसवराज अप्पा धरणे ४३३१ मते मिळाली. धरणे हे ४२० एवढ्या मताने विजयी झाले. पराभूत शहबाज अ. उलूम काझी (एआयएमआयएम) ३९११ मते,अशोक हरिदास जगदाळे (काँग्रेस)२९६८ मते,संजय अण्णप्पा बताले (राष्ट्रवादी अजित पवार)११०६
महबूब अ. सत्तार शेख (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार) १६४
ताजोद्दीन बशीर शेख (अपक्ष) २५ अशी नगराध्यक्ष पदासाठी लढत झाली.


प्रभाग क्रमांक 1 अ मधून भाजपाच्या छमाबाई धनराज राठोड तर  ब मधून भाजपचे निरंजन देविदास राठोड, प्रभाग क्रमांक 2 अ मधून कॉग्रेसचे मारूती खारवे,  ब मधून शिवसेना शिंदे गटाच्या सुमन बजरंगसिंह ठाकूर, प्रभाग क्रमांक 3 अ मधून भाजपाचे दत्तात्रय अंबादास दासकर, प्रभाग 3 ब मधून भाजपाच्या मिनाक्षी तानाजी काळे, प्रभाग क्रमांक 4 अ मधून काँग्रेसचे आकाश दिलीपराव कुलकर्णी, प्रभांग 4 ब मधून काँग्रेसच्या अर्पणा अरविंद बेडगे, प्रभाग क्रमांक 5 अ मधून भाजपाच्या राणी शिवाजी सुरवसे, प्रभाग 5 ब मधून भाजपचे तानाजी कोडींबा जाधव, प्रभांग क्रमांक 6 अ मधून काँग्रेस च्या मन्नाबी कुरेशी , प्रभाग 6 ब मधून भाजपाचे रिजवान काझी, प्रभाग क्रमांक 7 अ मधून काँग्रेसचे गफूर कुरेशी, प्रभाग 7 ब मधून काँग्रेसच्या जुलेखाबी इनामदार, प्रभाग क्रमांक 8 अ मधून कमल गायकवाड , प्रभाग क्रमांक 8 ब मधून काँग्रेसचे इमाम अ. मुनाफ शेख, प्रभाग क्रमांक 9 अ मधून काँग्रेसच्या मदीना बागवान, प्रभाग 9 ब मधून शशिकांत माधवराव पुदाले, प्रभाग क्रमांक 10 अ मधून साक्षी किशोर नळदुर्गकर, प्रभाग 10 ब मधून नय्यरपाशा जहागिरदार हे विजयी झाले. यामध्ये भाजपचे १० नगरसेवक पदाचे उमेदवार विजयी झाले तर काँग्रेसचे ९ व शिवसेना (शिंदे गट) चा १ नगरसेवक निवडून आला,भाजपचा एक नगराध्यक्ष व दहा नगरसेवक तसेच शिंदे सेनेचा एक नगरसेवक निवडून आले आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गट, राष्ट्रवादी शरद पवार गटास एकही जागा मिळाली नाही.


दरम्यान आमदार राणाजगजितसिंह पाटील, तुळजापूर तालुक्याचे नेते सुनील चव्हाण जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, नितीन काळे, विलास राठोड, आशिष सोनटक्के, साहेबराव घुगे, दत्ता राजमाने आदींनी नळदुर्ग येथे भेट देवुन नुतन नगराध्यक्ष बसवराज धरणे, व भाजपचे नुतन नगरसेवक यांना शुभेच्छा देवुन अभिनंदन केले.

Labels:

अखेर प्रतिक्षा संपुष्टात , अवघ्या कांहीं वेळानंतर मतमोजणी प्रक्रियेस होणार सुरुवात, नळदुर्ग नगरपालिकेचा रणसंग्राम; राजकीय पारा शिगेला

अखेर प्रतिक्षा संपली, अवघ्या कांहीं वेळानंतर मतमोजणी प्रक्रियेस होणार सुरुवात, नळदुर्ग नगरपालिकेचा रणसंग्राम; राजकीय पारा शिगेला


नळदुर्ग ,दि.२१: शिवाजी नाईक 

नगरपालिका निवडणुकीच्या निकालाबाबत शहरात प्रचंड कुतूहल निर्माण झाले असून, वाढत्या थंडीच्या वातावरणातही राजकीय चर्चानी नळदुर्गचे वातावरण अक्षरशः तापले आहे. पालिकेवर सत्ता कुणाची येणार आणि नगराध्यक्ष कोण होणार?" चौकाचौकात, चहाच्या टपरीपासून सोशल मीडियापर्यंत एकच प्रश्न घुमतो आहे.

प्रचार व मतदान संपल्यानंतरही कार्यकर्त्यांच्या हालचाली, सोशल मीडियावरील पोस्ट, विजयाचे दावे आणि अंदाज यामुळे राजकीय रंगत कायम आहे. प्रत्येक गट 'आमचाच उमेदवार निवडून येणार'  गुलाल आमचाच,असा ठाम दावा करत असल्याने नेमका कल कोणाकडे आहे, हे ओळखणे राजकीय विश्लेषकांनाही अवघड ठरत आहे. ही निवडणूक केवळ नगरपालिकेपुरती मर्यादित न राहता नळदुर्गच्या भविष्यातील राजकारणाची दिशा ठरवणारी ठरणार आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची कसोटी मानली जात असून, त्यांच्या संघटनबळाची आणि रणनीतीची खरी परीक्षा येथे होत आहे. तर काँग्रेसचे नेते अशोक जगदाळे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची लढाई ठरत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. 

नळदुर्ग येथील नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासह २० नगरसेवकपदांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल आज रविवारी जाहीर होणार आहे. जिल्हा परिषद मुलांच्या प्रशालेतील स्ट्रॉग रूम परिसरात सकाळी १० वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

 नगराध्यक्षपदासह २० नगरसेवकांसाठी २ डिसेंबर रोजी झालेल्या मतदान प्रक्रियेत १२ हजार ५२९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्याची मतमोजणी रविवारी सकाळी १० वाजता सुरू होत आहे. पाच टेबलावर ही मतमोजणी होणार असून, प्रत्येक टेबलावर एका अधिकाऱ्यासह पाच कर्मचारी कर्तव्य बजावणार आहेत. नगरसेवकपदासाठी चार फेऱ्यांत मतमोजणी होणार आहे. नगराध्यक्षपदासाठीही पाच टेबलावर मतमोजणी होणार आहे.

१० वाजल्यापासून सुरू होणार मतमोजणी प्रक्रिया

येथील १० प्रभागांतून  २० नगरसेवक पदांसाठी व नगराध्यक्षपदासाठी वीस मतदान केंद्रांवर मतदान झाले आहे. नगराध्यक्षपदासाठी सहा, तर वीस नगरसेवक पदांसाठी ८३ उमेदवार निवडणूक रिंगणात  होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अपर तहसीलदार प्रमोद गायकवाड, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर, अतिरिक्त सहायक निर्णय अधिकारी म्हणून नायब तहसीलदार घृष्णेश्वर स्वामी हे काम पाहत आहेत.

मतमोजणी रविवारी सकाळी १० वाजता होत असुन मतमोजणी अहवाल ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने जाहीर करण्यासाठी दोन स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आले आहेत. मतमोजणी परिसरात पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला असून, त्याठिकाणी निवडणूक विभागाने दिलेल्या ओळखपत्र धारकांनाच प्रवेश मिळणार आहे.

नगरपालिकेच्या मतमोजणीसाठी पोलिस प्रशासन दक्ष  सर्वत्र करडी नजर

 निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी अवघ्या दोन तासांवर म्हणजे १० वाजता सुरू होणार आहे. पोलिस निरीक्षक सचिन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने कंबर कसली असून, कायदा हातात घेणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा पोलिस प्रशासनाने  दिला आहे.  विजयी उमेदवारांनी मिरवणूक काढून पराभूत उमेदवार किंवा इतर समुदायांच्या भावना दुखावल्यास कारवाई केली जाईल. शासनाने विजयी मिरवणुकीवर निर्बंध घातले असून, सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट किंवा अफवा पसरवणाऱ्यांवर सायबर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.


Labels:

Wednesday, 17 December 2025

नळदुर्गचा आठवडी बाजार उद्या गुरुवारी भरणार

नळदुर्गचा आठवडी बाजार उद्या गुरुवारी भरणार 

नळदुर्ग नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ ची मतमोजणी रविवार (दि. २१) डिसेंबर रोजी जिल्हा परिषद प्रशाला, माऊली नगर येथे होणार आहे. मतमोजणी मुळे होणारी गर्दी, त्यातच असणारा आठवडे बाजार , यावेळी प्रशासनावर ताण येऊ नये, मतमोजणी नंतर होणारा जल्लोष, विजयी उमेदवार व त्यांच्या समर्थकांकडून आनंद उत्सव साजरा करत असताना बाजार करण्यासाठी आलेल्या नागरिकांनाही अडथळा निर्माण होऊ शकतो व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नही उद्भवू शकतो तसेच शेतकऱ्यांचा सण असलेला दर्शवेळा (येळवस) अमावस्या शुक्रवार (दि.१९) रोजी होणार असल्यामुळे या मोठ्या सणापूर्वी गुरुवारी (दि.१८) रोजी आठवडे बाजार भरवण्याचा निर्णय व्यापारी व प्रशासनाने एकमताने घेतला. 

त्यामुळे गुरुवार (दि.१८) रोजी नळदुर्ग येथील आठवडे बाजार भरवण्यात येणार आहे. शेतकरी, व्यापारी व नागरिकांना याची माहिती व्हावी म्हणून मागील आठवडे बाजारा दिवशी नगरपालिका प्रशासनाने मुख्य चावडी चौकात वार्ता फलक लिहून व आठवडे बाजारात सर्वत्र दवंडी देऊन ही माहिती सांगण्यात आली आहे.

Labels:

Sunday, 14 December 2025

नळदुर्ग केंद्रावर नवोदय विद्यालय प्रवेश चाचणी परीक्षा शांततेत ; २१६ परिक्षार्थीनी दिली परिक्षा


नळदुर्ग केंद्रावर  नवोदय विद्यालय प्रवेश चाचणी  परीक्षा  शांततेत ; २१६ परिक्षार्थीनी दिली परिक्षा


नळदुर्ग ,दि.१३:


ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे याकरिता जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश चाचणी  परीक्षा नळदुर्ग शहरातील जि.प.कन्या प्रशाला केंद्रांवर शनिवारी शांततेत  पार पडली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण निवासी शिक्षणाची संधी देणाऱ्या या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची आणि पालकांची मोठी उत्सुकता दिसून आली.
 परीक्षेला बसलेले विद्यार्थी हे इयत्ता पाचवी वर्गातील  असुन  खासगी व जि.प.  शाळेतील असे मिळुन एकुण २१६  विद्यार्थ्यांनी ही परिक्षा दिली. धाराशिव जिल्ह्यातील ८० जागेसाठी ही परिक्षा घेण्यात आली.एकटया नळदुर्ग परिक्षा केंद्रावर तब्बल २१६ परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली आहे. नळदुर्ग येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेत शनिवार दि.१३ डिसेंबर रोजी दोन तास लेखी परीक्षा घेण्यात आली.


 माध्यमिक शिक्षण विभागाने या परीक्षेचे नियोजन आखले होते. केंद्र प्रमुख व भरारी पथक महाजन तानाजी , निरीक्षक सुजाता कराड , तर केंद्र संचालक म्हणून मुख्याध्यापक निजाम इनामदार यांनी काम पाहिले. सकाळी  सव्वा अकरा वाजता विद्यार्थी परीक्षा केंद्रात पोहोचले होते. साडे अकरा ते दीड या वेळेत परीक्षा झाली. 

Labels:

Friday, 12 December 2025

महायुतीला भरभरुन मतदान करणा-या लाडक्या बहिणी नगरपालिका निवडणुकीत रुसल्या ?

महायुतीला भरभरुन मतदान करणा-या
 लाडक्या बहिणी नगरपालिका निवडणुकीत रुसल्या ?


नळदुर्ग, दि.११ : शिवाजी नाईक 


नगरपालिका निवडणूकीत महिला मतदानाच्या घसरलेल्या टक्केवारीचा फटका कुणाला बसणार?अशी चर्चा सध्या शहरात सुरु असून विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरभरून मतदान करणाऱ्या लाडक्या बहिणींनी नगरपालिका निवडणुकीत मात्र  मतदानासाठी काही अंशी बाहेर पडणेच टाळलं आहे. त्यामुळे महिलांच्या मतदानाचा टक्का पुरुषांच्या तुलनेत या निवडणुकीत कमी राहिला आहे.


 ४ हजार ५९३ मतदारांची मतदानाला दांडी


 नळदुर्ग नगरपालिका निवडणुकीत तब्बल ४ हजार ५९३ मतदारांनी म्हणजे तब्बल २७.८६ टक्के मतदारांनी मतदानाला दांडी  मारल्याची  बाब समोर आली आहे. मतदानाच्या कमी टक्केवारीमुळे उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरातील एकूण मतदार संख्या १७ हजार १२२ एवढी आहे. २०  जागांसाठी मतदान झाले. त्यासाठी मतदार संख्या १७ हजार १२२ होती. त्यामध्ये पुरुष ८ हजार ७३६ आणि ८ हजार ३८६ महिला मतदारांचा समावेश होता. प्रत्यक्षात मात्र १२ हजार  ५२९ मतदारांनीच मतदानाचा हक्क बजावला.


यावेळी २ हजार १९३ पुरुष मतदार आणि २ हजार  ४०० महिला मतदार अशाप्रकारे एकूण  ४ हजार ५९३ मतदार गैरहजर राहिल्याचे स्पष्ट झाले. मतदार यादीत काही मृत व्यक्तींची नावे असली, तरी हयात असलेल्यांनी मोठ्या संख्येने मतदान टाळल्याने ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.


नळदुर्गमध्ये पुरुष मतदारांची टक्केवारी अधिक
 नगर परिषद निवडणुकीत महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा कमी असुन लाडक्या बहिणींची मते निर्णायक ठरण्याची शक्यता फोल ठरली. केवायसीची अट लादल्यामुळे लाडक्या बहिणी  मतदानाबाबत निरुत्साह दाखविल्याची चर्चा  होत आहे. यावेळी महिलांच्या मतदानाचा कल पुरुषांच्या तुलनेत कमी दिसून आल्याने निवडणुकीचा अंतिम निकाल कसा लागणार याकडे लक्ष लागले आहे. निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी ६ उमेदवार रिंगणात असले तरी  ही निवडणूक तिरंगी झाली व नगरसेवक पदासाठी २० जागे करिता ८३ रिंगणात होते. कुठे तिरंगी , तर कुठे चौरंगी लढत झाली.
२०१६ मधील ७१.५१ टक्केच्या तुलनेत यंदा मतदानात सरासरी दोन टक्क्यांनी वाढ झाली आहे. 


तिजोरीची चावी त्यांच्याकडे असली तरी तिजोरीचे मालक आमच्याकडे आहेत असा प्रचार नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारा शुभारंभ प्रसंगी करण्यात आला. न्यायालयाच्या 'तारीख पे तारीख' या चक्रात गेली अनेक वर्ष सापडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पूर्वी घेण्यात यावा असा बडगा सर्वोच्च न्यायालयाने उगारल्यानंतर निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला.  नगरपालिका अस्तित्वात आल्यापासून कधीही निवडणूक प्रचार एवढे गाजले नाही. मोठ्या प्रमाणाच्या बाहेर ही निवडणूक गाजली आहे. कारण ही तसेच आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याच्या मंत्र्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मोठा रस घेऊन प्रचार केले आहे. 

विधानसभा निवडणुकीप्रमाणे नळदुर्ग नगरपालिका निवडणुकीत भाजप- शिवसेना शिंदे, आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, तर काँग्रेस- शिवसेना ठाकरे, राष्ट्रवादी शरद पवार, एम आय एम, समाजवादी पार्टी, वंचित या पक्षाने निवडणुका लढविल्या.

Labels:

Monday, 8 December 2025

ईव्हीएम ठेवलेल्या सभागृहाबाहेर कडक पोलिस पहारा; सीसीटीव्हीची चौफेर निगराणी

ईव्हीएम ठेवलेल्या सभागृहाबाहेर कडक पोलिस पहारा;  सीसीटीव्हीची चौफेर निगराणी 

नळदुर्ग,दि.०८ : शिवाजी नाईक 

ईव्हीएम सुरक्षेसाठी एसआरपीएफच्या प्लाटूनसह ८ सशस्त्र पोलिसांचा पहारा,तर बाहेरील सुरक्षेसाठी जिल्हा पोलीस दलाचे एक अधिकारी आणि ४ पोलीस कर्मचारी असे दोन शिफ्ट मध्ये १०जण तैनात आहेत, त्यात नगरपालिकेचा तीन शिफ्ट मध्ये प्रत्येकी एक कर्मचारी असे दररोज तीन कर्मचारी असा मोठा फौजफाटा ३ डिसेंबर ते २१ डिसेंबर पर्यंत तैनात राहणार आहे.
शिवाय २४ तास सीसीटीवीची  नजर असुन जिल्हा प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली आहे. पोलिस अधिक्षक रितु खरोखर, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ निलेश देशमुख आदीनी नळदुर्ग येथिल स्ट्रागरुमला भेट दिली आहे.गस्तीपथकाची वेळोवळी भेट असुन जिल्हा प्रशासनाची करडी नजर असल्याचे पोलिस निरीक्षक सचिन यादव यांनी बोलताना सांगितले.

जिल्हा परिषद प्रशाला (मुलांची) येथे नळदुर्ग नगरपरिषदेच्या निवडणुकीत वापरण्यात आलेले ईव्हीएम  स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आले आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी कडक पोलिस पहारा असून, एसआरपीएफ आणि पोलिसांचे कडेकोट बंदोबस्त तैनात आहेत.

स्ट्रॉगरूमच्या प्रत्येक कोपऱ्यावर सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ) पलटण आणि अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ८ सशस्त्रबलाचे कर्मचारी दिवस-रात्र परिसराचे रक्षण करत आहेत. विविध ठिकाणी बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारेही परिसरावर लक्ष ठेवले जात आहे. वरिष्ठ अधिकारी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत आहेत. एसआरपीएफच्या व्यतिरिक्त, स्ट्रॉगरूम सुरक्षित करण्यासाठी एक पोलिस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचा असा बंदोबस्त आहे.

एस आर पी एफ चे ८ सशस्त्र पोलिस कर्मचारी व जिल्हा पोलीस दलाचे एक पोलीस उपनिरीक्षक व  ४ पोलीस कर्मचारी आणि नगरपालिकेचा एक कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
येथील नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासह १० प्रभागांतील २० नगरसेवक निवडीसाठी निवडणूक प्रक्रिया मंगळवार(२) डिसेंबरला झाल्यानंतर उच्च न्यायलयचा आदेशानुसार मतमोजणी २१ डिसेंबर रोजी होणार आहे, तोपर्यंत निवडणुकीत वापरण्यात आलेले ईव्हीएम हे  पोलिस दलाच्या कडक पाहऱ्या मध्ये जि. प. प्रशाला येथील स्ट्राँगरूम मध्ये ठेवण्यात आलेले आहेत,परिसरात एस आर पी एफ आणि जिल्हा पोलीस दलाचे पोलीस बंदोबस्ता साठी तैनात आहेत काही अपवादत्मक परिस्थिती उद्भवलीस तर अग्निशमन दलाची गाडी कर्मचाऱ्यांसाह सज्ज आहे.

पाच टेबलवर होणार मतमोजणी 

२१ डिसेंबर रोजी सकाळी १० वा.मतमोजणीस प्रारंभ होणार असून पाच टेबल वर मतमोजणी होणार असून एका टेबलवर १ सुपरवायझर, १ पर्यवेक्षक आणि १ मदतनीस असे तीन जण मतमोजणी करणार आहेत, दोन तासात निकाल स्पष्ट होणार आहे.अशी माहिती मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर यांनी सांगितले.

Labels:

आठवडा होत आला , मतदानानंतरही निवडणुक निकालाबाबत सर्वाधिक चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच


आठवडा होत आला , मतदानानंतरही निवडणुक निकालाबाबत सर्वाधिक चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच 

नळदुर्ग, दि.०८ :

नळदुर्ग नगरपालिका सार्वञीक निवडणुकीसाठी मंगळवार दि.२ डिसेंबर रोजी  नगराध्यक्ष व २० नगरसेवकपदाच्या निवडीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. लगेच दुसऱ्या दिवशी मतमोजणी होवून निकाल जाहिर होणे अपेक्षित होते.मात्र  इतर काही नगरपालिकांची निवडणुक २० डिसेंबर रोजी असल्याने २ डिसेंबर आणि २० डिसेंबर या दोन्ही टप्प्यातील निवडणुकाची मतमोजणी  एकत्रित दि. २१ डिसेंबरला करण्याचे  आदेश  न्यायालयाने दिल्याने मतमोजणी प्रक्रिया लांबणीवर पडल्याने शहरात सर्वत्र चर्चेचे गुऱ्हाळ सुरु आहे. या बूथवर अमुक उमेदवाराला इतके मतदान पडतील, तर कोण पिछाडीवर? कोण आघाडी घेणार असा अंदाज बांधत चर्चा करताना दिसुन येत आहे.
 सार्वजनिक  ठिकाणी असलेल्या चहाच्या हॉटेल, पान टपऱ्या,गल्ली बोळात एकच चर्चा सुरु आहे, की नगरपालिकेचा नवीन कारभारी कोण? होणार.


 प्रभाग क्रमांक १ वसंतनगर, दुर्गानगर मधील १ हजार ६६८ मतदारांपैकी १ हजार ३५३ मतदान झाले.

 प्र.क्र. २ इंदिरानगर, व्यासनगर मधील २ हजार ११ मतदारांपैकी १हजार ३५२ मतदान झाले.

 प्र.क्र. ३ माऊलीनगर, व्यासनगर, शनिवार वाडा मधील १ हजार २९२ मतदारांपैकी ९५०,

 प्र.क्र. ४ ब्राह्मण गल्ली, गवळी गल्ली, महम्मद पन्हा मोहल्ला मधील १ हजार ५९६ मतदारांपैकी ९६४ एवढे मतदान झाले.

प्र.क्र. ५ मराठा गल्ली, बोरी घाट, काझी गल्ली, महंम्मद पन्हा मोहल्ला मधील १ हजार ७९१ मतदारांपैकी १ हजार ३१९  मतदान झाले.

प्र.क्र.६ मुलतान गल्ली, भोई गल्ली, साठेनगर मधील १ हजार ९७४ मतदारांपैकी १ हजार ४७५ मतदान झाले.

प्र.क्र. ७ कुरेशी गल्ली, इनामदार गल्ली,हत्ती गल्ली मधील १ हजार ८५५ मतदारांपैकी १ हजार ३७८ मतदान झाले.

प्र.क्र.८ चांभार गल्ली, हत्ती गल्ली,भिमनगर मधील १ हजार ५०८ मतदारांपैकी १ हजार ८६ मतदान झाले.

प्र. क्र ९ भवानीनगर रहीमनगर, प्राध्यापक कॉलनी, व्यंकटेशनगर मधील १ हजार ७१२ मतदारापैकी १हजार २८६ मतदान झाले.

प्र. क्र १० भिमनगर, बौद्धनगर, रणे प्लॉटिंग मधील १ हजार ९१३ मतदारापैकी १ हजार ३६६ इतके मतदान झाले. नळदुर्ग शहरातील एकुण १७ हजार १२२ मतदारांपैकी १२ हजार ५२९ स्ञी-पुरुष मतदारांनी आपला  मतदानाचा हक्क बजावला. त्याची सरासरी टक्केवारी ७३.१४ एवढी आहे.

   सध्या चर्चा रंगत आहे नगरपालिका निवडणुकीत झालेल्या मतदानाची. शहरातील चौका चौकात गप्पांमध्ये  कोणत्या प्रभागात ,कोणाचा जोर होता, यावरही चर्चा सुरू असते.पहिल्या क्रमांकावर कोण व दुसऱ्या क्रमांकाची कोण मते घेणार, याचीही समीकरणे सांगणारे मोठ्या आवेशाने चर्चा करताना दिसतात. नगराध्यक्षपदी कोण विराजमान होईल तर प्रभागातील  लढतीत कोण बाजी मारणार, याचीही गणित जुळवणे सुरू आहे.  पक्षाची नेतेमंडळी आता उमेदवार व जनतेकडून आपल्या पक्षाची या लढतीत मतदानात काय स्थिती होती, याचा आढावा घेत आहेत. मतमोजणीची तारीख लांब असल्याने साऱ्यांचे भवितव्य जरी मतपेटीत बंद असले तरी चर्चा मात्र सध्या जोरात सुरू आहे. कोणत्या पक्षाचे किती निवडून येणार व कोण नगराध्यक्षपदी बाजी मारणार, याच्याही गप्पा नागरिकात सुरू आहेत.

Labels:

मोहने-आंबिवली येथे बंजारा संघर्ष योद्धा,पत्रकार-सतिष राठोड यांचा गौरव

मोहने-आंबिवली येथे बंजारा संघर्ष योद्धा,पत्रकार-सतिष राठोड यांचा गौरव 

कल्याण,दि.०८: डिसेंबर 

 मोहने-आंबिवली ता. कल्याण येथील  संत सेवालाल महाराज व माता जगदंबा देवी मंदिरा संत श्री सेवालाल महाराज यांना भोग लावण्यात आला व अरदासाच्या जयघोषात पुजा करण्यात आली. यावेळी,बंजारा समाजास हैद्राबाद गॕझेटनुसार  आरक्षण मिळावे यासाठी चाळीसगांव तालुक्यातील परशुराम नगर (दडपिंप्री) या गावातील समाजसेवक तथा बंजारा संघर्ष योद्धा,पत्रकार-सतिष राठोड यांचा  मंदिर समितीच्या वतीने शाल,श्रीफळ आणि पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
      
 यावेळी संत सेवालाल महाराज बंजारा व लभाना समाज तांडा समृद्धी योजनेचे कोकण विभागीय अशासकीय सदस्य-कैलास पवार,ठाणे जिल्हा अशासकीय सदस्य-कैलास तंवर,जिल्हा सदस्या-सुमित्राताई जाधव,ॲड.गजानन जाधव,जय सेवालाल बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष-अशोक चव्हाण,समाजसेवक-डॉ.युवराज राठोड, संपादक-करसन राठोड, पोलिस निरीक्षक उत्तम राठोड, मंदिराचे पुजारी-विठ्ठल राठोड,विक्रम चव्हाण, सुरेश नाईक,सोमला राठोड,किसन पवार,समाजसेवक-अनिल राठोड,केवलसिंग जाधव,विजय पवार,देवराम राठोड,चंद्रकांत नाईक यांच्यासह  समाजबांधव उपस्थित होते.
      

Labels:

Saturday, 6 December 2025

डॉ बाबासाहेबांना अभिप्रेत आसलेला समाज निर्माण करणे गरजचे - पोलिस निरीक्षक सचिन यादव

डॉ बाबासाहेबांना अभिप्रेत आसलेला समाज निर्माण करणे गरजचे - पोलिस निरीक्षक सचिन यादव

६ डिसेंबर हा भारतीय इतिहासातील एक भावस्पर्शी, चिंतनशिल अत्म परिक्षण करण्याचा दिवस आहे. हा दिवस केवळ शोक करण्याचे नसुन समाज परिवर्तनाचा संकल्प लोकशाही मध्ये समता, बंधुता न्याय आणि मानवतेच्या मुल्यांना जागवणारा दिवस असल्याचे मत पोलिस निरीक्षक सचिन यादव यांनी व्यक्त केले.

 नळदुर्ग येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विश्वास  रणे यांनी 
आयोजित केलेल्या अभिवादन कार्यक्रमात पोलिस निरीक्षक सचिन यादव हे बोलत होते .



प्रारंभी तथागत भगवान  गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. या कार्यक्रमास  सामाजिक कार्यकर्ते विश्वास रणे, अजयकुमार बागडे, बाळू रणे, देवा कांबळे, फारुक कुरेशी, प्रकाश बनसोडे, दत्ता बनसोडे, नामा यादव, बापू झेंडारे, विकी कांबळे, करण लोखंडे, बबलू जाधव, संभा कांबळे, आयापा भांगे, दिलीप भांगे, पप्पू कांबळे, विनय सोनवणे, रामा झेंडरे, चांगदेव रणे, दिनेश सोनवणे,  अनिता रणे, कविता झेंडरे, रश्मी रणे,  कलावती भांगे, विमल बनसोडे, चंद्रभागा राजगुरू, झुंबर साबळे, सुजाता लोंढे,  सुनंदा सुरवसे आदीसह भिमसैनिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक पत्रकार  दादासाहेब बनसोडे यांनी केले.

Labels:

जळकोट ग्रामपंचायतीच्या लक्षावधी कामाच्या गैरकारभारा प्रकारणी दोषींवर कारवाईसाठी उपसरपंचाची ग्रामविकास मंत्र्याकडे धाव


जळकोट ग्रामपंचायतीच्या लक्षावधी कामाच्या गैरकारभारा प्रकारणी दोषींवर कारवाईसाठी उपसरपंचाची ग्रामविकास मंत्र्याकडे धाव


नळदुर्ग, दि.०६ डिसेंबर 


तुळजापूर तालुक्यातील जळकोट ग्रामपंचायतीच्या वित्त आयोग निधीमधील लक्षावधी रुपयांच्या गौरप्रकाराची चौकशी करून दोषींवर  फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी ग्रामविकास मंत्र्यासह धाराशिव जिल्हा प्रशासनाकडे उपसरपंच प्रशांत नवगिरे यांनी धाव घेत तक्रार दाखल केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की,जळकोट ता.तुळजापूर  ग्रामपंचायत ही तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असून  दरवर्षी वित्त आयोगाच्या माध्यमातून ५० ते ७० लाख रुपये विकास कामांसाठी मिळतात. तसेच ग्रामनिधीच्या माध्यमातूनही चांगले उत्पन्न मिळते.
सन २०२४-२५ दरम्यान, ग्रामपंचायतीतून वित्त आयोग निधीमधील विविध कामांची बिलं काढण्यात आली आहेत. मात्र, अनेक बाबींमध्ये संशयास्पद व्यवहार असल्याचे उपसरपंचांनी नमूद केले आहे.
डस्टबिन खरेदीः ८ लाख रुपये साई एन्टरप्रायजेसच्या नावाने बिल काढले. परंतु डस्टबिन अद्याप उपलब्ध नाहीत. फॉगींग मशीन ग्रामपंचायतीकडे यापूर्वी यंत्र नव्हते; तरी २.४५ लाखांचे बिल काढले. महिला प्रशिक्षणः २ लाख रुपये., सिमेंट रस्ते कामेः २५ लाख रुपये., बंदिस्त गटारीः १५ लाख रुपये., शौचालय खरेदीः २ लाख रुपये., पाणीपुरवठा कामेः २६ लाख रुपये असा भष्ट्राचार झाल्याचे निवेदनात नमूद केले आहे.


उपसरपंच प्रशांत नवगिरे यांनी ही माहिती ग्रामपंचायत अधिकारी आणि त्रयस्त कारभारकांकडे विचारल्यावर उडवाउडवीची उत्तरे मिळाली आणि डस्टबिन खरेदीसाठी धावपळ सुरू असल्याचे सांगितले गेले. निवेदनात म्हटले आहे की, वित्त आयोग आणि ग्रामनिधीचा खर्च करण्यासाठी ग्रामपंचायत बैठकीत चर्चा करून मान्यता घेणे आवश्यक आहे; परंतु याबाबत कोणतीही बैठक न झाल्याचे दिसून येते.


त्यामुळे, प्रत्यक्ष कामे मोजमापानुसार व मापदंडानुसार केली आहे का ?, याचीही चौकशी करून उपसरपंच नवगिरे यांनी या गैरप्रकरणाची उच्चस्तरीय तपासणी करून दोषींवर  फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अन्यथा याप्रकरणी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. निवेदनाच्या प्रती ग्राम विकास मंत्री, धाराशिव जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा पोलीस अधिक्षक , तुळजापूर पं स.गटविकास अधिकारी यांना पाठवण्यात आले आहे. याप्रकरणी ग्रामपंचायत अधिकारी देवानंद रेड्डी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा मोबाईल बंद असल्याने संपर्क होवु शकला नाही.

Labels:

Thursday, 4 December 2025

जेष्ठ विचारवंत पन्नालालभाऊ यांच्या जाण्याने कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली - माजी मंत्री मधुकरराव चव्हाण

जेष्ठ विचारवंत पन्नालालभाऊ यांच्या जाण्याने कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली - माजी मंत्री मधुकरराव चव्हाण 

नळदुर्ग,दि.०४ :

 जेष्ठ समजवादी विचारवंत पन्नालालभाऊ सुराणा यांच्या निधनामुळे पुरोगामी चळवळीत पोकळी निर्माण झाली असून जे कधीही भरून निघणार नाही,असे मत माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी पन्नालालभाऊ सुराणा यांना श्रद्धांजली आर्पित  आयोजित शोकसभेत  व्यक्त केले.

जेष्ठ विचारवंत पन्नालाल सुराणा यांचे नुकतेच निधन झाले आहे. नळदुर्ग  येथील 'आपलं घर' प्रकल्पात गुरुवारी शोकसभा आयोजित करुन आदरांजली वाहण्यात आली. यावेळी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण हे बोलत होते.
याप्रसंगी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित शिंदे, आमदार प्रवीण स्वामी, पन्नालाल भाऊचे पुत्र प्रभास सुराणा, कन्या आरती खरीदे, मुकुंद खरीदे, आपलं घरचे व्यवस्थापक विलास वकील, गुंडू पवार, अँड सयाजी शिंदे, देविदास वडगावकर, बसवराज नरे, कॉ. अरुण रेणके, सुनील पुजारी, निजगुण स्वामी, दयानंद काळुंखे, मानवलोकचे अनिकेत लोहिया, संतोष बुरंगे,सरिता उपासे, प्रल्हाद दुगले, कमलाकर चव्हाण, उषा क्षिरसागर, सुनील क्षिरसागर यांच्यासह आपलं घर येथील विद्यार्थी यासह समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवर,  गृहमाता, राष्ट्रसेवा दलाचे पदाधिकारी आणि विविध शैक्षणिक संस्थांचे प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. शोकसभेच्या प्रारंभी 'आपलं घर'चे व्यवस्थापक विलास वकील यांनी श्रद्धांजली वाहिली.

पुढे बोलताना माजी मंत्री चव्हाण यांनी सांगितले की, साथी पन्नालालभाऊ सुराणा यांचे जीवन हे इतरांची उन्नती, समाजकार्यात समर्पित होते.त्यांचे कार्य हे अत्यंत मौलिक, उल्लेखनीय आहे. जे कधी विसरले जावू शकत नाहीत. दिवंगत पन्नालालभाऊ यांच्या निधनाने समाजाचे  नुकसान झाले असून, त्यांचे कार्य येणाऱ्या भविष्यातही प्रेरणा देणारे असल्याचे सांगून 
त्यांनी पन्नालाल भाऊनी केलेल्या अनेक कार्याना उजाळा दिला. सूत्रसंचालन श्रीशैल बिराजदार यांनी केले.


Labels:

Wednesday, 3 December 2025

ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल भाऊ सुराणा यांचे निधन

ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल भाऊ सुराणा यांचे निधन


नळदुर्ग,दि.०३ डिसेंबर 

राष्ट्रसेवादलाचे माजी अध्यक्ष, जेष्ठ   समाजवादी विचारवंत, नळदुर्ग येथील "आपलं घर" प्रकल्पाचे आधारवड,असंख्य कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान पन्नालाल भाऊ सुराणा यांचे मंगळवारी रात्री निधन झाले आहे.

 ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल भाऊ सुराणा  यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांचे मंगळवारी रात्री साडे आठ वाजता धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग येथील'आपलं घर'  प्रकल्पात निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा प्रभास आणि कन्या आरती असा परिवार आहे.

साथी पन्नालाल सुराणा हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे. शाळेत असताना ते राष्ट्रसेवादलात दाखल झाले. पुढे तरुणपणी त्यांनी जयप्रकाश नारायण यांच्या बिहारमधील सोखादेवरा येथील सर्वोदय आश्रमात राहून भूदान चळवळीत भाग घेतला. समाज प्रबोधन संस्थेचे सचिव म्हणून व समाजवादी पक्षाच्या राज्य शाखेचे सचिव म्हणूनही त्यांनी काम बघितले.

महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर त्यांनी पत्रकारिता केली. मराठवाडा दैनिकाचे ते संपादक होते. साथी सुराणा यांचा व्यासंग दांडगा होता. शिक्षण, शेती, बेरोजगारी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केले.

आज होणार देहदान

साथी पन्नालाल सुराणा यांचे आपलं घर येथे निधन झाल्यानंतर मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या  सुमारास त्यांचा पार्थिव देह 
सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयास देहदानासाठी नेण्यात आला. बुधवारी सर्व प्रक्रिया पूर्ण करून त्यांचे देहदान होणार आहे.

त्यांनी राजकीय, आर्थिक, वैज्ञानिक विषयांवर चाळीस पुस्तके लिहिली आहेत. दुष्काळ निवारण, निर्मूलन, शेतकरी-शेतमजुरांच्या हक्कासाठी त्यांनी आंदोलने केली आहेत. आणीबाणीच्या काळात ते भूमिगत होते. त्यानंतर त्यांना अटक झाली होती. भूमिमुक्ती आंदोलनात त्यांना चार वेळा तुरुंगवास झाला. लातूर भूकंपात निराधार झालेल्या मुलांसाठी त्यांनी नळदुर्ग येथे'आपलं घर' ही शाळा सुरू केली. पर्यावरण आणि जलसंधारणाच्या क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय काम केलेले आहे.

पत्नी डॉ. वीणाताई यांच्या समवेत त्यांचे बिहारमध्येच वास्तव होते. त्यानंतर समाजवादी पक्षात त्यांनी काम केले. जनता पक्षाचेही ते नंतर प्रदेश सचिव होते. बार्शी येथील विधानसभा निवडणूक व सोलापूरची लोकसभा निवडणूक त्यांनी लढविली होती.

सन २०१५ मध्ये नळदुर्ग शहरातील बहुतांश कुटुंबियांची न.प. प्रशासनाने राहती घरे पाडून उध्वस्त करत बेघर केले . पिडित कुटुंबास न्याया मिळण्याकरिता  त्यांनी  न डगमगता वयाच्या ८३ व्या वर्षी प्रशासनाविरुध्द लढा दिला.नळदुर्ग शहरातील बेघर कुटूंबियांच्या वतीने पन्नालाल भाऊना भावपुर्ण श्रद्धांजली.

Labels:

Tuesday, 2 December 2025

नळदुर्ग नगरपालिका निवडणुकीसाठी ७३.१७ टक्के मतदान,उमेदवारांचे भवितव्य मत पेटीत बंद, मतदानाचा टक्क्यात किंचित वाढ

नळदुर्ग नगरपालिका निवडणुकीसाठी ७३.१७ टक्के मतदान,उमेदवारांचे भवितव्य मत पेटीत बंद, मतदानाचा टक्क्यात किंचित वाढ

नळदुर्ग,दि.०२ :

नळदुर्गमध्ये १७ हजार १२० पैकी १२५२९   एवढे मतदान झाले. ७३.१७% मतदान झाले. पोस्टल मतदाना व्यतिरिक्तची ही आकडेवारी आहे. महिला मतदान ८३८६ पैकी ५९८६ मततसेच पुरुष ८७३६ पैकी ६५४३ मतदान झाले. प्रभाग तीन मधील आदर्श मतदान केंद्र व पिंक मतदान केंद्रात सरासरी ७३.४०% मतदान झाले. सर्वाधिक मतदान वसंत नगर येथील प्रभाग क्रमांक १/२ येथे ८२.३७% तर सर्वात कमी मतदान इंदिरानगर येथील प्रभाग २/२ येथे ६३.८१ % झाले.

 नगरपालिका सार्वञीक निवडणुकीसाठी मंगळवार दि.२ डिसेंबर रोजी नगराध्यक्ष व २० नगर सेवक निवडीसाठी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली,मात्र नगरपालिकेचा निकाल लागण्यासाठी उच्च न्यायलायच्या आदेशाप्रमाणे मतमोजणी २१ डिसेंबर पर्यंत लांबल्याने उमेदवारांना १९ दिवस वाट पाहावी लागणार आहे, त्यानंतर पालिकेतील नविन कारभारी ठरणार आहेत.गत निवडणुकीत २०१६ साली एकूण मतदाराचा टक्का ७१.५१ ने वाढ होवून ७३.१७ ने म्हणजे दोन टक्क्याने वाढ झाली आहे.

नगराध्यक्ष पदासह २० नगरसेवकांच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया मंगळवारी पार पडली,निर्गमित २० मतदान केंद्रांवर दिवसभर नागरिकांनी गर्दी करुन आपले मतदानाचे पविञ हक्क बजावले,यामध्ये एकूण १७ हजार १२० पैकी १२५२९ एवढे मतदान झाले. ७३.१७% मतदान झाले. महिला मतदान ८३८६ पैकी ५९८६ मत तसेच पुरुष ८७३६ पैकी ६५४३ मतदान झाले. प्रभाग तीन मधील आदर्श मतदान केंद्र व पिंक मतदान केंद्रात सरासरी ७३.४०% मतदान झाले. सर्वाधिक मतदान प्रभाग क्रमांक १/२ येथे ८२.३७% तर सर्वात कमी मतदान प्रभाग २/२ येथे ६३.८१ %झाले. स्ञी-पुरुष मतदारांनी स्फूर्तपणे मतदान केले,याची सरासरी टक्केवारी ७१.५१ आहे,मा उच्च न्यायालयाचा आदेशानुसार २१ डिसेंबर पर्यंत निकालाची प्रतीक्षा राहणार आहे.

प्र.क्र. १ मध्ये ८१.११ टक्के 
प्र.क्र. २ मध्ये ६७.२०टक्के  
प्र.क्र.३ मध्ये ७३. ५२ टक्के 
प्र.क्र. ४ मध्ये ६८.९५ टक्के 
 प्र.क्र. ५ मध्ये ७३.६० टक्के 
प्र.क्र.६ मध्ये ७४. ७४ टक्के 
 प्र.क्र. ७ मध्ये ७४.२८ टक्के 
प्र.क्र.८ मध्ये ७१.९८ टक्के 
प्र. क्र.९मध्ये ७५.०५ टक्के
प्र.क्र.१० मध्ये ७१.४६ टक्के असा सरासरी एकूण मतदान ७३.१७ टक्के मतदान झाले आहे, यामध्ये पुरुष ७४.०९ टक्के आणि महिला मतदारांचा टक्का ७१. ४० राहिला.

Labels:

श्री सिद्धीविनायक परिवाराकडून रक्तदान शिबिर, दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त राबवला उपक्रम

श्री सिद्धीविनायक परिवाराकडून रक्तदान शिबिर, दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त राबवला उपक्रम

धाराशिव,दि.०२:

 श्री सिद्धीविनायक परिवाराच्या वतीने संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला. शिबिरात एकूण ८५ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवित मानवतेची श्रेष्ठ सेवा साकारली.

 शिबिरामध्ये खामसवाडी येथील श्री सिद्धीविनायक ग्रीनटेक इंडस्ट्रीज प्रा. लि. येथून ६५ रक्तदाते, तर जिल्हा न्यायालय येथील श्रीसिद्धीविनायक मल्टीस्टेट येथील शिबिरात २० रक्तदाते सहभागी झाले. धाराशिव शहरातील सह्याद्री ब्लड बँक आणि शासकीय रक्तिपेशी यांनी पार पाडली. ग्रीनटेक इंडस्ट्रीजतर्फे कार्यकारी संचालक गणेश कामटे, संचालक प्रथमेश आवटे, बलराम कुलकर्णी, अक्षय शेळके, शेतकी अधिकारी विकास उबाळे, केन अकाउंटंट अमित कुरुळे आणि अभय शिंदे यांनी शिबिराचे मार्गदर्शन केले. तर जिल्हा न्यायालयातील मल्टीस्टेट शाखेकडून अतिरिक्त सीईओ अरविंद गोरे, शाखा व्यवस्थापक प्रज्वल जाधव, तसेच नितीन हुंबे, अविनाश पवार, रंजित भोरे यांनी सक्रिय सहभाग घेत आयोजन यशस्वी केले.

Labels:

Monday, 1 December 2025

भूलथापाला बळी न पडता राष्ट्रवादीच्या उमेदवाराना निवडून देण्याचे माजी मंत्री नवाब मलिक यांचे आवाहन


 भूलथापाला बळी न पडता राष्ट्रवादीच्या उमेदवाराना निवडून देण्याचे माजी मंत्री नवाब मलिक यांचे आवाहन

नळदुर्ग,दि.०१ डिसेंबर 

कुरेशी समाजासह अल्पसंख्याक समाजावर अन्याय झाला. त्यावेळी काँग्रेस पक्षाने आवाज उठविला नाही.मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी आवर्जुन दखल घेत अन्याविरुध्द  उभे राहिले. राष्ट्रवादी पक्ष सर्वाना सोबत घेऊन विकास करणारा असुन कुणाच्याही भूलथापाला बळी न पडता राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवाराना निवडून देण्याचे आवाहन माजी मंत्री नवाब मलिक यांनी नळदुकराना केले.

नळदुर्ग नगरपालिका निवडणूक राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय बताले व नगरसेवक  उमेदवारांच्या प्रचार सभेचे ऐतिहासिक किल्ला गेट येथे  सोमवार दि.०१ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले. यावेळी माजी मंत्री नवाब मलिक हे बोलत होते.

यावेळी पुढे बोलताना नवाब मलिक म्हणाले की,
आपण यापुर्वीही नळदुर्गकराना मत मागितले. आणि येथिल जनतेनी पालिकेची सत्ता दिली.‌ गावात राहणाऱ्यानाच खरी समस्यांची जाण असते.अडचणी  प्राधान्याने सोडवुन शहराचा विकास करणा-या उमेदवाराना विजयी करुन पालिकेची सत्ता देण्याचे सांगुन तुमच्या समस्या ,अडचणी बरोबरच विकासाची गंगा नळदुर्ग शहरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून साकारेल असे अभिवचन त्यांनी यावेळी दिले.

प्रचारक शफी शेख (राष्ट्रवादी अल्पसंख्याक) यांनी आपल्या भाषणात म्हणाले की, शहराचा विकास करण्याच्या तळमळीने मी निवडणुकीत थांबलो नाही. किंवा पक्षाकडे तिकीट मागितले नाही, मला राजकारण पेक्षा निःस्वार्थ समाजकारण करण्याची आवड आहे. पालिकेतील राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे आज घडीला शहराची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.सर्वत्र घाण, कचरा, रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे.आजही शहरात नीट रस्ते, गटारी नाही, १०, १० दिवस पाणी पुरवठा होत नाही. बेरोजगारी प्रचंड वाढली आहे.साधे प्रमाणपत्रासाठी नागरिकांना वेठीस धरले जात आरोप करीत भावनिक साद घालत राष्ट्रवादीला एक हाती सत्ता देण्याचे आवाहन करत शहराचे बकाल झालेले चित्र बदलुन दाखविणार असे सांगितले.

यावेळी  संजय बताले यांच्यासह अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी अजित जुनोदी,अँड आनंद बताले, मुश्ताक कुरेशी, बबलु इनामदार, मिनाज इनामदार, मनोज राजमाने, रमेश फिस्के, रवी महाराज राठोड, प्रमोद कुलकर्णी, अजहर जाहगीरदार ,आदीसह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.

Labels:

नळदुर्ग नगरपालिका निवडणुकीसाठी मतदान यंत्रे मतदान केंद्राकडे रवाना, उद्या होणार मतदान

नगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी; मतदान यंत्रे मतदान केंद्राकडे रवाना, उद्या होणार मतदान 


नळदुर्ग,दि.०१:


 मंगळवार दि.२ डिसेंबर रोजी होणाऱ्या नळदुर्ग नगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली आहे. निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून  मतदानाच्या पुर्व संध्येला  सोमवार दि. १ डिसेंबर रोजी दहा प्रभागांतील २० मतदान केंद्रांवर मतदान यंत्रे सीलबंद करून मतदानकेंद्रावर रवाना करण्यात  आली आहे. 


ही प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार प्रमोद गायकवाड आणि सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी रामकृष्ण जाधवर यांच्यासह निवडणुक कर्मचारी उपस्थित होते.निवडणूकीत महसूल, कृषी विभाग, शिक्षकासह अन्य कर्मचारीही या तयारीमध्ये सहभागी झालेले आहे.  प्रशासनाने सर्व यंत्रे सीलबंद करून सुरक्षित ठेवल्यामुळे आता निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.


मतदान यंत्रे सीलबंद करण्यापूर्वी बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट या दोन्ही यंत्रांची तपासणी केली व मतदान केंद्रावर रवाना केली. नगराध्यक्ष पदासाठी सहा उमेदवार आणि नगरसेवक पदासाठी ८३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.



 कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, शांततेत मतदान प्रक्रिया पार पडावी यासाठी नळदुर्ग पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तसेच राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी तैनात असणार आहे.बंदोबस्त करिता मागविण्यात आलेला बाहेरील बंदोबस्त अधिकारी व कर्मचारी पुढीलप्रमाणे आहे.


05 पोलीस अधिकारी 
25 पोलीस अंमलदार 
01 राज्य राखीव पोलीस तुकडी
60 होमगार्ड आणि 
पोलीस ठाणे नळदुर्ग येथील बंदोबस्त 
05 पोलीस अधिकारी 
57 पोलीस अंमलदार असा एकूण 10 पोलीस अधिकारी 
82 पोलीस अंमलदार 
01 SRPF सेक्शन 
60 होमगार्ड तैनात असणार आहेत.


  नळदुर्ग शहरात २० ठिकाणी मतदान केंद्रावर  १७ हजार १२० मतदारा मतदान करणार 



नळदुर्ग नगरपालिकेच्या १० प्रभागातुन  एका अध्यक्षपदासह, नगरसेवकांच्या २० जागेसाठी दि.२ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानाकरिता शहरातील २० मतदान केंद्रावर एकुण १७ हजार १२० मतदाते मतदान करणार आहेत. मतदान केंद्रनिहाय मतदानाची माहिती पुढीलप्रमाणे आहे.


🚫वसंतनगर, दुर्गानगर प्रभाग  क्रमांक ०१ मध्ये मतदान केंद्र क्रमांक १/१ जि प प्राथमीक शाळा वसंतनगर उत्तर बाजू खोली क्रमांक १, या मतदान केंद्रावर ८३४ मतदानाची संख्या आहे. याठिकाणी मतदान केंद्र क्रमांक १/२  दक्षिण बाजू खोली क्रमांक २, येथे ८३४ मतदार आहेत.


🚫 इंदिरानगर , व्यासनगर प्रभाग क्रमांक ०२ ,मतदान केंद्र क्रमांक २/१ इंदिरानगर जि प प्राथमीक शाळा खोली क्रमांक १, मतदार १०१४, याच शाळेत खोली क्रमांक दोनमध्ये मतदान केंद्र क्र.२/२ एकूण मतदार ९९७,


🚫 माऊली नगर, व्यासनगर, शनिवारवाडा प्रभाग क्रं ०३, माऊली नगर जि प केंद्रीय प्रशाला खोली क्रं १ मतदान केंद्र क्रं ३/१ -एकुण मतदार ६४५, याच शाळेत खोली क्रमांक २, मतदान केंद्र क्रं ३/२,६४६ एवढे मतदार आहेत. 


🚫 ब्राह्मण गल्ली, गवळी गल्ली, बेडगे गल्ली व मोहम्मद पन्नाह गल्ली प्रभाग क्रमांक  ०४, धरित्री विद्यालय उत्तर बाजू खोली क्रमांक एक, मतदान केंद्र क्रं ४/१ ,एकूण मतदार ६९९, याच ठिकाणी खोली क्रमांक दोनमध्ये मतदान क्रं ४/२ मध्ये ६९९मतदार आहेत.


🚫 मराठा गल्ली,बोरी घाट, मोहम्मद पन्नाह गल्ली, लोहार गल्ली,पठाण गल्ली, काझी गल्ली हा भाग प्रभाग क्रमांक ०५ असुन  मतदान केंद्र क्रमांक ५/१ मराठा गल्ली सभागृह नळदुर्ग याठिकाणी ८९७ मतदार आहे, तर मतदान केंद्र क्रमांक ५/२ व्यायाम शाळेत  मतदार ८९४ आहे. 


🚫 मुलतान गल्ली, भोई गल्ली,साठे नगर हा
प्रभाग क्रमांक ०६ आहे . मतदान केंद्र क्रमांक ६/१  जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा प्राथमिक आरोग्य केंद्र समोर येथे ९७४ मतदार, तर मतदान केंद्र क्रमांक ६/२. जि. प. प्राथमिक कन्या उर्दू प्राथमिक शाळा प्राथमिक आरोग्य केंद्र समोर १००० मतदार आहेत.


🚫 कुरेशी गल्ली, इनामदार गल्ली, हात्ती गल्ली हा प्रभाग क्रमांक ०७ आहे .मतदान केंद्र क्रमांक ७/१ हुतात्मा स्मारक हॉल येथे ९२७ मतदार, तर मतदान केंद्र क्रमांक ७/२ व्यायाम शाळा हुतात्मा स्मारक येथे ९२८ मतदार आहे.


🚫 चांभार गल्ली, कासार गल्ली,व हात्ती गल्ली व भिमनगर हे प्रभाग क्रमांक ०८ असुन  मतदान केंद्र क्रमांक ८/१ जि. प. प्राथमिक  स्पेशल शाळा  दक्षिण बाजू खोली क्रमांक १ भिमनगर ७३३ मतदार,तर  मतदान केंद्र क्रमांक ८/२ जि प कन्या प्रशाला वर्ग ०५ बौद्धनगर या ठिकाणी ७७४ मतदार.


🚫 भवानीनगर, प्राध्यापक कॉलनी , व्यकंटेशनगर, माने प्लॉटिंग व रहिमनगर  प्रभाग क्रमांक ०९, मतदान केंद्र क्रमांक ९/१ स्वामी विवेकानंद डीएड कॉलेज संगणक खोली क्रमांक ०३ या ठिकाणी ८८१ मतदार आहेत, मतदान केंद्र क्रमांक ९/२ बालाघाट शिक्षण संस्था हॉल नंबर ५७ येथे ८३१ मतदार आहेत. 


🚫 भिमनगर, बौद्धनगर, मुळे प्लॉटिंग,
 शिवकरवाडी, रणे प्लॉटिंग प्रभाग क्रमांक १०, मतदान केंद्र क्रमांक १०/१ जि. प. कन्या शाळा उत्तर बाजू वर्ग १० बौद्धनगर येथे  ९९१ मतदार आहेत. मतदान केंद्र क्रमांक १०/२ स्वामी विवेकानंद अध्यापक विद्यालय डीएड कॉलेज नंबर ०५ या ठिकाणी ९२२ मतदार आहेत.


Labels:

विकासाच्या सोबत जायचं की मागील काळात केलेल्या भकास कारभार, याचा विचार करून मतदान करण्याचे आ.पाटील यांचे आवाहन

विकासाच्या सोबत जायचं की मागील काळात  केलेल्या भकास कारभार, याचा विचार करून मतदान करण्याचे आ.पाटील  यांचे आवाहन

 
नळदुर्ग,दि.०१:


नळदुर्ग नगरपालिका निवडणुकीसाठी चारित्र्य संपन्न उमेदवार दिले असुन जनतेनी ठरवायचे विकासाच्या सोबत जायचं की मागील काळात  केलेल्या भकास कारभार, यातून कोणाला निवडणार हे तुम्ही ठरवा. पाणी पुरवठा, रस्ते गटारी ,पथदिवे,  महापुरुषाचे स्मारक असे विकासाचे कामे चालू आहे. कोणत्याही अमिषाला बळी न पडता भाजपच्या पाठीशी  जनतेने उभे राहवे असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यानी केले.

 
रविवार दि.३० रोजी भाजप - शिंदे शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ नळदुर्ग शहरातील भवानी चौकात आयोजित सभेत आमदार पाटील हे बोलत होते.  यावेळी भजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी म्हणाले की, तरुण चेहऱ्याला भाजपने संधी दिली असून या संधीचे सोनं करण्याची संधी नळदुर्गकरना मिळाली आहे. विकास कामे चालू आहे. पुढे चालू राहतील आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या माध्यमातून निधीची कमतरता भासू देणार नाही. येणाऱ्या काळात नळदुर्ग शहराचे रुपडे या विकासाच्या माध्यमातून बदलणार आहे. सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे  त्यांनी सांगितले. 


यावेळी बोलताना नितीन काळे यांनी विरोधकांवर टीका करून एकच हशा पिकविला व भाजप धार्मिकतेच्या नावाखाली बदनाम करण्याचे षड्यंत्र विरोधक करत आहेत त्याना आमचे एकच सांगणे आहे की, भारतीय जनता पार्टी तथा नरेंद्र मोदी याच्यावर सर्वच जाती धर्माचा विश्वास असून  प्रत्येक नागरिकांच्या विकासासाठी व उन्नतीसाठी भारतीय जनता पार्टी सक्षम आहे. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून असेच विकासाचे कोणतेही व्हिजन आणि मागील पाच वर्षांच्या काळात नळदुर्ग शहराचा केलेला भकास या गोष्टी त्यांना माहीत आहे. भारतीय जनता पार्टी  कुठल्याही धर्म ,जात ,पात न पाहता सर्व सामान्यांच्या विकासासाठी व उन्नतीसाठी निवडणूक लढवत आहे .
याप्रसंगी बसवराज धरणे,नय्यर जहागीरदार, शिवाजी गायकवाड, सुनील उकंडे,   विनायक अहंकारी , दत्तात्रय दासकर, ज्ञानेश्वर घोडके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सर्व प्रभागातील उमेदवार व  उमेदवार उपस्थित होते. 

Labels: