Sunday, 27 December 2015

'लोकमाता आहिल्‍यादेवी होळकर' पुस्तकाचे गृहमंत्री शिंदे यांच्‍या हस्ते प्रकाशन

उस्मानाबाद :- सामाजिक चळवळीतील ज्‍येष्ठ विचारवंत प्रा. अर्जुन जाधव यांनी लिहिलेल्‍या लोकमाता अहिल्‍यादेवी होळकर या पुस्तकाचे प्रकाशन रविवार दिं. 27 डिसेंबर रोजी गृहराज्‍यमंत्री राम शिंदे यांच्‍या हस्ते झाले.
छोटाखानी झालेल्‍या एका कार्यक्रमात ना. राम शिंदे यांनी होळकर यांच्‍या कार्याचा गौरव करत समाजकारण, राजकारण यांना दिशा देण्‍याचे मार्गदर्शक तत्व या पुस्तकातून मिळेल असा आशावाद व्‍यक्‍त करून लेखक प्रा.अर्जुन जाधव यांच्‍या लिखानाचा त्‍यांनी गौरव केला. या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात भाजपचे जिल्हाध्‍यक्ष नितीन काळे, डॉ.गोविंद कोकाटे, अॅड.खंडेराव चौरे, राजाभाऊ वैद्य, यशवंत सोनट्नके, दिगंबर मैंदाड, महानंदाताई पैलवान, संदीप वाघमोडे, बालाजी लांडगे, प्रा.सोमनाथ लांडगे, ढगारे, शेवाळे, गणेश लोकरे, बाबासाहेब गाडे, विजय बनसोडे, प्रमोद दाणे आदी उपस्थित होते.

Labels:

Friday, 25 December 2015

गृहराज्यमंत्री शिंदे शनिवारी उस्मानाबादेत

उस्‍मानाबाद -: राज्याचे गृह (ग्रामीण), सार्वजनिक आरोग्य, कृषी व फलोत्पादन, पणन व पर्यटन राज्यमंत्री प्रा.राम शिंदे हे उस्मानाबाद जिल्हा दौ-यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. 
     शनिवार, दि.26 डिसेंबर,2015 रोजी सायंकाळी 5 वाजता शासकीय मोटारीने अहमदनगर येथून उस्मानाबादकडे प्रयाण. रात्री 9 वाजता शासकीय विश्रामगृह,उस्मानाबाद येथे आगमन व राखीव आणि मुक्काम. 
    रविवार,दि.27 डिसेंबर,2015 रोजी सकाळी 11 वाजता शासकीय मोटारीने उमरगा जि.उस्मानाबादकडे प्रयाण. दुपारी 1 वाजता  उमरगा येथे आगमन व शेंडगे हॉस्पीटल ॲड रिसर्च सेंटरच्या उदघाटन  कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 3 वाजता उमरगा येथून शासकीय मोटारीने करमाळा जि.सोलापूरकडे प्रयाण करतील. 

Labels:

नावीन्यपूर्ण संकल्पनेतून सुशासन दिन साजरा

उस्मानाबाद -: माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्य जन्मदिवस सुशासन दिन म्हणून साजरा करण्याचे राज्य शासनाने जाहीर केले आहे. त्यानुसार येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत सुशासन दिन साजरा करण्यात आला. 
जिल्हा माहिती कार्यालय, जिल्हा हिवताप कार्यालय, दुय्यम निबंधक, विवाह निबंधक/ विवाह अधिकारी कार्यालय यांच्यावतीने शुक्रवारी सुशासन दिन साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थितांना माहिती अधिकार पुस्तिका, डिसेंबर महिन्याचे लोकराज्य मासिक आणि शासन वर्षपूर्तीनिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने प्रकाशित केलेली माहिती पुस्तिका वितरीत करण्यात आल्या. यावेळी विवाह नोंदणी कार्यालयात नोंदणीसाठी आलेल्या नवदांपत्यास या पुस्तिका देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण यांनी नवदांपत्य आणि त्यांच्या पालकांना या पुस्तिकांचे वितरण केले. यावेळी जिल्हा हिवताप अधिकारी एन.एन.बोरकर, विवाह  निबंधक श्री. कुलकर्णी यांच्या हस्ते ही पुस्तिकांचे वितरण करण्यात आले. जिल्हा माहिती कार्यालयाचे अशोक माळगे, भीमा पडवळ,शशीकांत पवार, अशोक सुरडकर, हिवताप कार्यालयाचे व्ही.बी.कांबळे,एन.एच.गाडे, मिलींद गायकवाड, महादेव होळकर यांच्यासह  विवाह नोंदणी कार्यालयाचे मुल्यांकन दुय्यम निबंधक कल्याण कुलकर्णी, राजाभाऊ पवार, एस.बी.मंडलीक, टी.पी.पाटील, सी.पी.जमादार यांची उपस्थिती होती.

Labels:

कुसळंब येथे मारहाण

पांगरी (गणेश गोडसे) :- घर जागेच्या भांडणाच्या कारणावरून पाचजनांनी मिळून फिर्यादीच्या अंगणात व घरासमोर जावून लोखंडी पाईप,दगडाने घरावर मारहाण करून जखमी केल्याची घटना काल दि.24 गुरुवारी कुसळंब ता.बार्शी येथे घडली.
नंदा अनिल शिंदे रा.कुसळंब असे जखमी झालेल्या महिलेचे नांव असून संभाजी महादेव खोडवे,शिवाजी महादेव खोडवे,महेश वसंत नणवरे,अजय उत्तम नणवरे,कुमोदींनी
वसंत नणवरे सर्व रा.कुसळंब अशी जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांची नांवे आहेत.
     नंदा अनिल शिंदे यांनी पांगरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,काल लग्नाची वरात दारासमोरून लग्न मंडपाकडे गेल्यानंतर त्यांच्या दिराबरोबर गावातील लोकांची भांडणे झाली होती.त्याचा राग मनात धरून वरील आरोपींनी संगनमत करून गैरकायद्याची मंडळी जमवून संभाजी खोडवे याने फिर्यादीच्या घरी येऊन दार उघड असे म्हणून शिवीगाळी करत दारावर लाथा मारून गच्ची पकडून ढकलून दिले. त्यावेळेस आरोपीच्या हातातील धारदार शस्त्र फिर्यादिस लागून त्या जखमी झाल्या.तसेच त्याच झटापटीत फिर्यादीच्या गळ्यातील मंगळसूत्र गहाळ झाले.शिवाजी खोडवे याने त्याच्या हातातील लोखंडी पाईप खिडक्यावर मारून काचा फोडल्या.तसेच महेश नणवरे,अजय नणवरे व कुमोदींनी नणवरे यांनी शिवीगाळ करत घरावर,खिडक्यावर दगडफेक करून नुकसान केले.तुझी मुले आता वाचली आहेत पण यापुढे जिवंत राहणार नाहीत असे म्हणून धमकावून निघून गेले आहेत.पांगरी पोलिसात मारहाण करून जखमी करत नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक राजू राठोड हे करत आहेत.

Labels:

ज्येष्ठ अभिनेत्री साधना यांचं निधन

मुंबई : 60 आणि 70 च्या दशकातील ज्येष्ठ अभिनेत्री साधना शिवदासानी यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं. मुंबईतील राहत्या घरी आज सकाळी साडे अकराच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 74 वर्षांच्या होत्या.
मेरा साया, वो कौन थी, हम दोनो, एक मुसाफिर एक हसिना, वक्त, राजकुमार यांसारख्या सुमारे 35 चित्रपटांत त्यांनी अभिनय केला आहे. वक्त आणि वो कौन थी या सिनेमांसाठी साधना यांचं फिल्मफेअरसाठी नामांकन झालं होतं.
साधना यांचा जन्म 2 सप्टेंबर 1941 कराचीमध्ये झाला होता. साधना यांनी चित्रपट दिग्दर्शक आर के नय्यर यांच्याशी लग्न केलं. मात्र साधना यांना अपत्य नाही.
साधना या फॅशन आयकॉन म्हटलं जायचं. साधना यांनीच ‘फ्रिन्ज’ हेअरस्टाईलची ओळख करुन दिली. त्यांचा ‘साधना कट’ अतिशय प्रसिद्ध आहे. इतकंच नाही तर टाईट ‘चुडीदार-कुर्ता’ याचा ट्रेण्ड भारतात आणण्याचं श्रेयही साधना यांनाच जातं.

Labels:

Thursday, 24 December 2015

उद्यापासून रेल्वेप्रवास महागणार

नवी दिल्ली :- रेल्वे प्रशासनाने उद्यापासून (25 डिसेंबर) तत्काळ तिकिटाच्या दरात 25 टक्के वाढ करण्‍याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे प्रवाशांना आर्थिक फटका बसणार आहे. तत्काळ तिकिटासाठी आता 200 रुपये मोजावे लागणार आहे. याआधी स्लीपर क्लासच्या तत्काळ तिकिटावर प्रवाशांना 175 रुपये मोजावे लागत होते. सेकंड एसी क्लासच्या तत्काळ तिकिटासाठी 400 ऐवजी 500 रुपये मोजावे लागणार आहेत.
      
काय होईल परिणाम?
- रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, तत्काळ तिकिटाच्या दरात प्रवासाच्या अंतरानुसार वाढ केली जाते.
- सेकंड क्लास सिटिंगच्या तत्काळ तिकिट दरात कोणताही बदल करण्‍यात आलेला नाही.
- एसी चेअर कार, थर्ड एसी, सेकंड एसी व एक्झिक्युटिव्ह श्रेणीतील तत्काळ तिकिटाच्या दरात 25 ते 100 रुपयांची वाढ केली आहे.

Labels:

आगीत पती-पत्नी जळून खाक

कळंब :- शेतातील राहत्या गोठ्यास अचानक लागलेल्या आगीत पती-पत्नीसह शेळ्या व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले असून अंगणात झोपलेला मुलगा व दोन बैल सुखरूप बचावले असल्याची घटना कळंब तालुक्‍यातील खामसवाडी येथे दि. २३ डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली असून या दुखःद घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. 
कळंब तालुक्‍यातील खामसवाडी येथील गट. नं. ५३३ मधील जमिनीमध्ये शेतकरी सखाराम शंकर शेळके हे मागील काही महिन्यापासून गावातील पाणीटंचाईमुळे कुटुंबासह शेतामध्ये राहात होते. शेतामध्ये राहण्यासाठी पत्र्याच्या खोल्यांत संसाराचा गाडा हाकत असतानाच दि. २३ डिसेंबर रोजी संध्याकाळी जेवण करून पती-पत्नी गोठ्यामध्ये तर मुलगा रामकिसन शेळके हा अंगणात झोपला होता. पहाटेच्या सुमारास गोठ्यास अचानक आग लागली. ही आग इतकी भिषण होती की, क्षणात होत्याचे नव्हते झाले आणि काही वेळातच गोठ्यासह आतमध्ये झोपलेल्या शेळके पती-पत्नीचा व शेळ्यांचा जळून कोळसा झाला.
या आगीची चाहूल लागताच मुलगा रामकिसन याने आरडाओरड करून शेजारी राहणा-या शेतक-यांना बोलावून आणेपर्यंत पत्र्याच्या शेडमध्ये (गोठ्यात) झोपलेले वडील सखाराम शंकर शेळके (६५), आई शकुंतला सखाराम शेळके (५५) तसेच शेळी, चार पिल्ले व १० क्विंटल सोयाबीन, १० क्विंटल कापूस, ५ क्विंटल पिवळी तसेच संसारोपयोगी साहित्य आगीत जळून खाक झाले. यात पती-पत्नीचे नुसते सापळेच राहिले होते. अंगणात झोपलेला मुलगा रामकिसन व दोन बैल सुखरूप बचावले आहेत. या घटनेची माहिती गावात वा-यासारखी पसरताच 
गावक-यांनी धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला; परंतु आगीने एवढे रौद्ररूप धारण केले होते की, गावक-यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करूनही ती आटोक्यात आली नाही. या आगीत जवळपास २ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. 
या घटनेत पती-पत्नीचे अक्षरक्ष: सापळेच राहिल्याने वैद्यकीय अधिका-यांना शवविच्छेदनपण करता आले नाही. या घटनेमुळे मयत शेतकरी सखाराम शेळके यांची दोन्ही मुले पोरकी झाली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून शासनाने दोन्ही मुलांना मदत देऊन जगण्याचे बळ द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.

Labels:

जिल्हाधिका-यां हस्ते गोदाम हमालांना धनादेशाचे वितरण

उस्मानाबाद -: जिल्हा पुरवठा विभाग कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यातील 16 गोदामातील हमालांना जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांच्याहस्ते माहे फेब्रुवारी-2014 ते नोंव्हेंबर-2015या कालावधीतील हमाली कामाचे  दि.23 डिसेंबर  रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात धनादेशाचे वितरण करण्यात आले.
          यावेळी माजी आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे, कृषी उपसंचालक मदनलाल मिनीयार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एकनाथ माले, जिल्हा पुरवठा अधिकारी भागवत देशमुख,सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी राजकुमार माने, सुभाष कदम आदींची उपस्थिती होती. 
            या हमालींचे वाटप करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.नारनवरे, जिल्हा पुरवठा अधिकारी श्री.देखमुख यांनी विशेष प्रयत्न करुन नोंव्हेंबर-2015 अखेरपर्यंतची मजूरी अदा केली. 
          जिल्ह्यातील उस्मानाबाद, बेंबळी, तेर, ढोकी, तुळजापूर, नळदूर्ग, उमरगा, मुरुम, लोहारा, भूम, परंडा, अनाळा,कळंब, येरमाळा, शिराढोण आणि वाशी या 16 गोदामातील हमालांचा या धनादेश वितरणामध्ये समावेश होता. यापुढे दरमहा हमाली देण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ.नारनवरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिले. 

Labels:

बार्शी तालुक्‍यातील बोर उत्‍पादक हवालदील

पांगरी (गणेश गोडसे) :- संपूर्ण महाराष्ट्राला बोरांचे गाव म्हणून ओळख करून दिलेल्या कुसळंब (ता. बार्शी) येथील बोर उत्पादक शेतकर्‍यांची अवस्था थोडी खुशी जादा गम अशीच काहीशी झाली आहे. बोरांचे दर चांगले असले तरी बोरांचा हंगाम चालू होण्यापूर्वीच संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.त्यामुळे बोर उत्पादक चांगलेच हवालदिल झाले असून त्यांचे आर्थिक गणितच कोलमडुन गेल्यामुळे त्यांच्यापुढे आता पुढे काय हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.ग्राहकांना गोड बोरांची चव चाकायला देणार्‍या बोर उत्पादक शेतकर्‍यांणा मात्र यावर्षी बोर आंबट लागू लागली आहेत॰वर्षभर बोरांच्या बागांच्या जतनापोटी केलेला खर्च तर सोडाच पण बोरे काढण्यासाठी,वाहतुकीसाठी,आडत,कमिशन याचाही कांही केल्या ताळमेळ लागत नाही.त्यामुळे बोरे काढायची का तशीच झाडाला ठेवायची याचा विचार शेतकरी करू लागले आहेत.
  गत दोन तीन वर्षापासून बोर उत्पादक शेतकर्‍यांची खूपच चांदी होती.एकरी दोन ते तीन लाख रुपयांचे उत्पादन या बोर उत्पादकांच्या पदरात पडले होते.मात्र यावर्षी या बोर उत्पादकांच्या बोर शेतीला खुद्द निसर्गाचीच दृष्ट लागली.कांही दिवसापूर्वी बाजारपेठेत बोरांना चांगलीच मागणी होती.तसेच दरही साधारणत: 25 रुपयांच्या आसपास होता.कुसळंब येथे बोर उत्पादनाचे खूप मोठे क्षेत्र आहे.प्रत्येक वर्षी बोरांच्या लागवडीत वाढच होत आहे.येथील जमीन बोरांच्या बागासाठी पोषक असल्यामुळे व यातून चांगले उत्पादन मिळत असल्यामुळे येथे लागवडीत वाढ होत आहे.इतर फळबागांच्या तुलनेत बोर बागांना खर्च,रोगराई फवारणी आदींचा खर्च अत्यल्प आहे.मात्र बोरे गोळा करण्यासाठी मजुरांची मोठी गरज लागते.दर कोसळल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
   कुसळंब येथे खूप मोठ्या क्षेत्रावर बोर फळांची लागवड असून बोर उत्पादकानी वर्षभर कष्ट करून अतिशय चांगल्या प्रतीची बोरे तयार केली आहेत.मात्र काबाड कष्ट करूनही यांच्या हाती कांहीच लागण्याची चिन्हे आहेत.बोर बागांतून मिळणारे उत्पादन अपेक्षित धरून आगामी वर्षाचा लेखा जोखा या शेतकर्‍यांनी तयार केला होता.मात्र हे गणितच कोलमडून गेले आहे. इंदोर, भोपाळ, नांदेड, दिल्ली, मुंबई, पुणे, कोलकाता, नागपूर आदि बाजारपेठेत कुसळंब येथील बोरांना मोठी मागणी आहे. कुसळंब, वाणेवाडी, आगळगाव, घारी, खामगाव, पांगरी, भोयरे, जामगाव, धोत्रे येथे चमेली, कडाका,उमराण आदि विविध जातीच्या बोरांचे उत्पादन घेतले जाते.
अवकाळीचा परिणाम :
बोर बागांचा हंगाम हा साधारणत: नोव्हेबर ते डिसेंबर महिन्यात सुरू होतो. मात्र मध्यंतरीच्या काळात व अधून मधून या भागात झालेल्या गारपीठ,अवकाळी पाऊस याचा दुष्परिणाम म्हणून उभ्या बोर बागांची बोरे ही कमी प्रमाणात तयार झाली.
बोरांचे दर घसरल्यामुळे बोर उत्पादकांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाल्यामुळे बागांचे पंचनामे करून उत्पादकांना नुकसान भरपाई देता येईल का याचा विचार होणे गरजेचे आहे.

Labels:

Wednesday, 23 December 2015

दुष्काळ ग्रस्त गावांना मदत करण्यासाठी प्रशासन सदैव तत्पर : शिंदे

कळंब : दुष्काळग्रस्त गावामध्ये पाण्याची टंचाई सह, रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन सदैव तत्पर असेल असे मत कळंब चे नायब तहसीलदार श्री. डी. एम. शिंदे यांनी हसेगाव केज येथील पर्याय संस्था व नारायणदास मोरबाई बुदराणी ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित कडबा कुट्टी यंत्र वाटप कार्यक्रमा प्रसंगी व्यक्त केले. 
     पर्याय संस्था व नारायणदास मोरबाई बुदरानी ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने कळंब तालुक्यातील तीन तर वाशी तालुक्यातील तीन गावामध्ये दुष्काळ निवारणासाठी सहा महिने चाऱ्याचे वाटप केले जाणार आहे तो चारा कुट्टी करून दिला जाणार असून लाभार्थी शेतकऱ्याकडून २५ टक्के चार्यामध्ये लोकसहभाग घेतला जाणार आहे, कडबा कुट्टी यंत्रासाठी ५० टक्के सहभाग हा महिला बचत गटाने दिला आहे, कळंब तालुक्यातील भिमाई महिला बचत गट पाथर्डी, जिजामाता महिला बचत गट नागझरवाडी, लालबहादूर शास्त्री महिला बचत गट शिंगोली तर वाशी तालुक्यातील यशोदा महिला बचत गट कवडेवाडी, राजमाता जिजाऊ महिला बचत गट तांदुळवाडी, जिजाऊ आणि राजमाता महिला बचत गट पिंपळवाडी या गटांनी हे कडबा कुट्टी यंत्र घेतले असून महिला बचत गटाच्या सहभागाने दुष्काळ निवारणाचा हा प्रकल्प राबवला जाणार असल्याचे पर्याय चे कार्यवाहक विश्वनाथ तोडकर यांनी आपल्या भाषणात सांगितले, या कार्यक्रमात सदरच्या गटांना कडबा कुट्टी मशीन हस्तांतरणाचे प्रमाणपत्राचे वाटप नायब तहसीलदार शिंदे व श्री. एस. एस पाचभाई यांच्या हस्ते करण्यात आले, या वेळी बुदरानी ट्रस्ट चे कार्यक्रम अधिकारी तुषार येरमळ, एक्शन एड चे विनायक पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास गोडगे यानि केले, यावेळी सहा गावातील महिला बचत गटाच्या १५० महिला उपस्थित होत्या, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालाजी शेंडगे, भिकाजी जाधव, मीरा पवार, वंदना चिलवंत, असेफ मुलानी, रामलिंग स्वामी, प्रमिला राख यांनी प्रयत्न केले.  

Labels:

पांगरीत मोहम्‍मद पैगंबर जयंतीनिमित्‍त रक्‍तदान शिबीर

पांगरी :- रक्तदान ही काळाची गरज असून प्रत्येकाने वर्षातून किमान एकदा तरी रक्तदान करावे,रक्तदानाबाबतीत असलेले गैरसमज दूर करावेत असे प्रतिपादन पांगरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी केले.ते पांगरी ता.बार्शी येथील पोस्ट चौकात मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतिंनिमित्त मुस्लिम जमात व पांगरी ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.अध्यक्षस्थाणी सरपंच युन्नुस बागवान होते.यावेळी माजी उपसभापती विजय गरड,उपसरपंच रामभाऊ गाढवे,तात्या बोधे,शशिकांत नारकर,डॉ.अरिफ शेख,नीलकंठ शेळके,सुहास देशमुख,धनंजय तौर,औदुंबर काकडे,सादिक पठाण,मोरे मेजर,शहाजी धस,अंकुश लाडे,रूपाली नारकर आदि मान्यवर उपस्थित होते॰
  या शिबिरात पांगरीतील अनेक तरुण युवकांनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जपली.रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी शोएब बागवान,अनिस शेख,शकिल बागवान,अस्लम बागवान,अल्लामिन शेख,किरण गरड यांच्यासह मुस्लिम जमात व पांगरी ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन डॉ.अरिफ शेख यांनी केले.

Labels:

Tuesday, 22 December 2015

कुंथलगिरी येथे गुरुवारपासून वार्षिक रथयात्रा महोत्सव

उस्मानाबाद -: श्रीदिगंबर जैन सिद्धक्षेत्र कुंथलगिरी येथे २४ ते २६ डिसेंबर या कालावधीत वार्षिक रथयात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 
       श्री १००८ कुलभूषण-देशमभूषण यांच्या पदस्पर्शाने मोक्षामुळे सिद्ध झालेल्या पावन भूमी कुंथलगिरी येथे वार्षिक रथयात्रा महोत्सवाचे आयोजन केले जाते. त्यानुसार िदनांक २४ ते २६ डिसेंबर दरम्यान या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दिनांक २४ रोजी सकाळी पूजा अभिषेक, दुपारी सर्व मंदिरावर ध्वजारोहण, दुपारी वाजता देशभूषण-कुलभूषण विद्यालयाचा पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. तत्पूर्वी दुपारी ११ ते वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन केले आहे. शुक्रवारी, दिनांक २५ राेजी सकाळी ९.३० वाजता पूजा अभिषेक, दुपारी वाजता रथयात्रा महोत्सव, तत्पूर्वी महाप्रसादाचे वाटप होणार आहे. दिनांक २६ रोजी सकाळी पूजा अभिषेक, दुपारी महाप्रसादाचे वाटप होणार आहे. या रथयात्रा महोत्सवाचा जिल्हाभरासह परिसरातील जैन बांधवांनी लाभ घेण्याचे आवाहन श्री दिगंबर जैन सिद्धक्षेत्र कुंथलगिरीचे अध्यक्ष अरविंद दोशी, उपाध्यक्ष सुभाष गांधी मंत्री वालचंद संघवी यांनी केले आहे. 

Labels:

तुळजापुरात लवकरच वायफाय सुविधा

तुळजापूर :-  तुळजापुरात लवकरच मोफत वायफाय सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याते नूतन नगराध्यक्षा अॅड. मंजूषा मगर यांनी सांगितले. 
तीर्थक्षेत्र तुळजापूरच्या नगराध्यक्षा पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर नगराध्यक्षा मगर 'दिव्य मराठी'शी बोलत होत्या. यावेळी गटनेते नारायणराजे गवळी, नगरसेवक अमर हंगरगेकर, विनोद गंगणे, कुलदीप मगर आदी उपस्थित होते. शहरात मोफत वायफाय सुविधा सुरू करण्याकरीता गटनेते नारायणराजे गवळी यांच्या नेतृत्वाखाली एक समिती इस्लामपूर नगरपालिकेला भेट देणार आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठनेते जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इस्लामपूर पालिकेने मोफत वायफाय सुविधा सुरू केली आहे. तेथून माहिती घेऊन शहरातही मोफत वायफाय सुविधा लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे. नगरपालिकेसमोरील बेशिस्त दुचाकी पार्किंगला शिस्त लावणे, पालिका आवारात कोणतेही वाहन नेण्यास मनाई करण्यात येणार आहे. तसेच पालिकेच्या बाहेरच सर्वांचीच वाहने लावणे बंधनकारक करण्यात येणार असल्याचे अॅड. मगर यांनी स्पष्ट केले. 

Labels:

तरुणीचा गळा चिरून प्रेत विहिरीत फेकले

उस्मानाबाद : बावीस वर्षीय अनोळखी तरूणीचा गळा चिरून तिचे प्रेत पोत्यात टाकून विहिरीत फेकल्याची खळबळजनक घटना आज दि. २१ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास उस्मानाबाद तालुक्यातील वाघोली येथे उघडकीस आली आहे. 
उस्मानाबाद तालुक्यातील वाघोली येथील गावच्या सार्वजनिक पाणी पुरवठा विहिरीजवळ अरूण केशव पिंपळे हे नेहमी प्रमाणे आपल्या शेतात गेले असता पाणी पुरवठा विहिरीत कांही तरी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबत गावात माहिती दिल्यानंतर विहिरीतुन ते पोते बाहेर काढण्यात आले. त्यावेळी या पोत्यामध्ये एका तरूणीचा मृतदेह आढळून आला. सदरील आरोपीकडून पुरावा नष्ट करण्यासाठी या तरूणीचे प्रेत पोत्यात बांधुन विहिरीत टाकले आहे. सदर तरूणीचा गळा चिरून खुन करून तिचे प्रेत विहिरीत टाकल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच विभागीय पोलिस अधिकारी टिपरे यांच्यासह ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक गावडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. 
मयत तरूणीची उंची ५.५ असुन अंगावर जांभळट कलरची पँट, जांभळट लाल फुली असलेला टॉप आहे. या तरूणीची ओळख रात्री उशिरापर्यंत पटलेली नव्हती.  दरम्यान पोलिसांनी समोर असलेल्या परिस्थितीवरून व अरूण केशव पिंपळे यांनी दिलेल्या माहितीवरून उस्मानाबाद ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणाचा तपास ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक गावडे करीत आहेत. वाघोली येथील ही घटना ऐकून सर्वत्र खळबळ उडाली आहे.

Labels: ,

नळदुर्गमध्ये सात जोडपी विवाहबद्ध

नळदुर्ग : येथील नळदुर्ग एज्युकेशन वेलफेअर असोसिएशनच्या वतीने आयोजित मुस्लीम धर्मिय मोफत सामुदायिक विवाह सोहळा इदगाह मैदानात पार पडला. या सामुदायिक विवाह सोहळ्यात नळदुर्ग व परिसरातील ७ जोडपी विवाहबध्द झाली.
या विवाह सोहळ्यासाठी इदगाह मैदानात भव्य मंडप उभारण्यात आला होता. वधु-वरांकडील जवळपास ४ हजार वर्‍हाडी या सोहळ्यास उपस्थित होते. लग्न मंडपात बेटी बचाव, वृक्ष संवर्धन आदीबाबत जनजागृती करणारे फलक लावण्यात आले होते. मुस्लीम धर्म रुढी परंपरेने वकील, गवाह, काझी यांच्या उपस्थितीत हा विवाह धार्मिक पद्धतीने पार पडला. असोसिएशनच्या वतीने नव वधू-वरांना संसारोपयोगी साहित्य देण्यात आले. या सामुदायिक विवाह सोहळ्यास हाफेज, आलीम, पेशईमाम, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची मोठय़ा संख्येने उपस्थिती होती. 
या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी असोसिएशनचे लतिफ शेख, बरकतुल्ला जहागिरदार, अँड. मतीन बाडेवाले, रुकनोद्दीन शेख, युनूस शेख, अफरोज पंचभाई, सज्जाक सावकार, सादेक काजी, खालेद इनामदार, खमर कुरेशी, रहेमान कुरेशी, फकरोद्दीन शेख, सिद्दीक शेख, आबेद इनामदार, आमीर शेख, मैनोद्दीन शेख, सद्दाम शेख, अबउबकर शेख, शमा काझी, अहेमद इनामदार, सादीक बागवान, रफिक फुलारी, दस्तगीर जहागिरदार, कलीम नदाफ यांनी परिश्रम घेतले. विवाह सोहळ्यात तय्यब शाह, चिश्ती जुबेर यांनी सूत्रसंचलन केले. 

Labels: ,

Sunday, 20 December 2015

आता पत्रकारांसाठी "स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार"

मुंबई :- स्वच्छता अभियानाच्या प्रचार, प्रसार आणि प्रसिध्दीसाठी पत्रकारितेचा प्रभावी वापर करण्याऱ्या पत्रकारिता क्षेत्रातील व्यक्तींना 2015 या वर्षापासून उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारांतर्गत "स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार" (राज्यस्तरीय) देण्याचा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने १९ डिसेंबर २०१५ रोजी  निर्गमित केला आहे.
      शासनाच्या विविध विकास योजना, त्याची अमंलबजावणी आणि या अंमलबजावणीच्या प्रकियेमध्ये लोकांचा सहभाग या बाबी जनतेपर्यंत पोहोचविणे व त्याद्वारे संबंधितांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रसारमाध्यमाची भूमिका अतिशय महत्वाची आणि परिणामकारक ठरत आहे. त्याअंतर्गत अशा चांगल्या प्रयत्नांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारांच्या माध्यमातून प्रोत्साहित केले जाते.
        केंद्र शासनाने स्वच्छता चळवळीला गती देण्यासाठी ' स्वच्छ भारत अभियान ' सुरु केले आहे. महाराष्ट्रातही त्याची प्रभावी अंमलबजावणी होत आहे. त्याअनुषंगाने या अभियानास चांगली प्रसिद्ध देणाऱ्या पत्रकारिता क्षेत्रातील व्यक्तींना हा पुरस्कार महाराष्ट्र शासनाच्यावतीने देण्यात येणार आहे.  स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्काराचे स्वरुप मानचिन्ह, प्रमाणपत्र व 41 हजार रुपये असे आहे. 
या पुरस्कारासाठी निवडीच्या स्पर्धेसंबंधीचे निकष पुढीलप्रमाणे आहेत. वृत्तपत्रे, इलेक्ट्रानिक्स मीडिया यामधून प्रसारित होणाऱ्या मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू भाषेतील स्वच्छता अभियानाविषयक वृत्त / पत्रकारिताविषयक मजकुराचा स्पर्धेसाठी विचार होईल. या स्पर्धेत स्वच्छता अभियानाच्या प्रचार, प्रसार आणि प्रसिध्दीसाठी पत्रकारितेचा प्रभावी वापर करण्याऱ्या पत्रकारिता क्षेत्रातील व्यक्तींना सहभाग घेता येईल. या स्पर्धेसाठी केलेले स्वच्छताविषयक लिखाण हे स्पर्धेंच्या संबंधित वर्षातील असावे. प्रवेशिका पाठविताना अर्जकर्त्याने वृत्तपत्र / इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या स्वच्छता अभियानविषयक बातम्या, लेख, वृत्तविशेष आदींची कात्रणे / व्हिडीओ सीडी हे त्यांच्या प्रसारणाच्या तारखेच्या माहितीसह सादर करावे. या पुरस्कासाठीचे इतर नियम व अटी उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराप्रमाणे आहेत. 

Labels:

मनस्‍वी गादेकर जिल्‍हास्‍तरीय वक्‍तृत्‍व स्‍पर्धेत प्रथम

पांगरी (गणेश गोडसे) :- कुसळंब ता.बार्शी येथील जिल्हा परिषद प्रशाळेतील कु.मनस्वी मनोज गादेकर इयत्ता तिसरी हिने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला आहे.सांगोला येथील पंचायत समिती येथे नुकत्याच जिल्हास्तरीय विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास स्पर्धा पार पडल्या. मनस्वी हिने यापूर्वीही विविध स्पर्धामध्ये घवघवीत यश प्राप्त केले आहे.
 जिल्हास्तरीय यश मिळवल्याबद्दल शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय बोकेफोडे,केंद्र प्रमुख कांदे,मुख्याध्यापक किशोर बगाडे,अर्चना राऊत,मंगल शेळके,सुनीता अंबुरे आदींनी तिचे अभिनंदन केले.सांगोल्याचे गट शिक्षनाधिकारी श्री.घाडगे यांनी तिचा सत्कार केला.

Labels:

कुख्यात गुंड अश्विन नाईकला अटक

मुंबई : कुख्यात गँगस्टर अमर नाईक याचा भाऊ कुख्‍यात गुंड अश्विन नाईक यास मुंबई पोलिसांनी आज रविवार रोजी अटक केली. दादर येथील एका व्यापा-कडून 15 लाखांची खंडणीची रक्‍कम स्विकारताना त्‍यास पोलिसांनी रंगेहाथ पकडलं आहे.
अश्विन नाईक दादरमधल्या एका बिल्डरकडून 15 लाखांची खंडणी मागत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानंतर कारवाई करत दादर पोलिसांनी अश्विन नाईकला ही खंडणीची रक्कम स्विकारताना अटक केली.

Labels:

किरकोळ कारणावरुन मारहाण

पांगरी (गणेश गोडसे) :- सोबत फिरण्याच्या किरकोळ कारणावरून चौघांनी मिळून दोघांना लोखंडी गज व काठीने बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना काल दि.19 शनिवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास कारी ता.बार्शी येथील खिंड चौकात घडली.
महेश मल्लिकार्जुन चालखोर व अरुण रामलिंग गादेकर दोघेही रा.कारी अशी गज हल्ल्यात जखमी झालेल्यांची नांवे असून किरण अरुण कावळे,पांडुरंग आगतराव कावळे,मुन्ना अरुण कावळे व महादेव रामलिंग कावळे अशी लोखंडी गजाने मारहाण करून जखमी करण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
   जखमी महेश चालखोर यांनी पांगरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,ते दुचाकीवरून जात असताना किरण कावळे,पांडुरंग कावळे,मुन्ना कावळे,महादेव कावळे यांनी संगनमत करून कारी-पांगरी मार्गावरील खिंड चौकात त्यांची दुचाकी अडवली.तु विकास गादेकर याच्या सोबत का फिरतोस असे म्हणून शिवीगाळी करून लोखंडी गजाने डोक्यात मारहाण करून व काठ्यांनी हातावर पाठीवर मारहाण करून जखमी केले.चालखोर याच्या फिर्यादीवरून पांगरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास टि.एच.डाके करत आहेत.

Labels:

Saturday, 19 December 2015

सावरगाव येथे रविवारी सर्वधर्मीय सामुदायीक विवाह सोहळा

तुळजापूर : सावरगाव (ता. तुळजापूर) येथे रविवार दि.२० डिसेंबर रोजी सर्व धर्म सामुदायीक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या सोहळ्यामधे १६ जोडपी विवाहबध्द होणार असल्याची माहिती " मंगल सोहळ्याचे " संयोजक तथा कुलस्वामिनी सुतगिरणीचे माजी संचालक रामेश्वर तोडकरी यांनी दिली .
        सामुदायीक विवाह सोहळ्याचे हे ७ वे वर्ष आहे. या सोहळ्यात वधु वरांना शुभाशिर्वाद देण्यासाठी विद्यमान आमदार मधुकररावजी चव्हाण, शिक्षण महर्षी माजी आमदार सि.ना.आलुरे गुरूजी, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आप्पासाहेब पाटील, श्री कुलस्‍वामिनी सूतगिरणीचे चेअरमन सुनील चव्हाण, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष धिरज पाटील, तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन पाटील, माजी कृषी सभापती पंडीत जोकार, तुळजापूर पंचायत समितीचे सभापती प्रकाश चव्हाण साहेब, तुळजापूर पंचायत समितीचे माजी सभापती संतोष बोबडे, पंचायत समितीचे उपसभापती विलास डोलारे, सावरगाव ग्रा.पं. चे उपसरपंच आनंद बोबडे, सोलापूरचे खा. शरद बनसोडे, जिल्हा शिवसेना प्रमुख सुधीर आण्णा पाटील, भाऊसाहेब आंधळकर, विद्यार्थी सेना अध्यक्ष श्रीकांत देशमुख आदीजण उपस्थितीत राहणार आहेत.
या सोहळ्यास  परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून वधु वरांना शुभाशिर्वाद देण्यासाठी आवाहन संयोजक रामेश्वर आबा तोडकरी यांनी केले आहे.

Labels:

कळंब प्रकल्पातंर्गत मदतनीस पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

उस्मानाबाद :- एकात्मिक बालविकास सेवा योजना ग्रामिण प्रकल्प,कळंब अंतर्गत अंगणवाडी सेविका,मदतनीस या पदासाठी इटकूर विभागात इटकूर येथे मदतनीस-2 पदे,माहा विभागात माहा येथे मदतनीस-1पद,येरमाळा विभागात पानगाव येथे मदतनीस-1 पद,दहिफळ विभागात शेलगाव येथे अंगणवाडी सेविका-1 पद,शिराढोणा विभागात सौदना अंबा येथे तदतनीस-1 पद व शिराढोणा(लमाणतांडा) येथे मदतनीस-1 पद,या पदासाठी विहित नमुनयात प्रकल्प कार्यालयात कार्यलयीन वेळेत,दि.23 डिसेंबर पर्यत सादर करावे.अधिक माहितीसाठी कार्यालसाशी संपर्क साधावा,असेआवाहन बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना ग्रामीण प्रकल्प,कळंब यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.

Labels: ,

सर्व प्रकारची दारु विक्री दुकाने २४ डिसेंबरला बंद

उस्मानाबाद :- जिल्हृयात दि.24 डिसेंबर रोजी ईद-ए-मिलाद हा सण साजरा होत आहे. जिल्हृयात कायदा व सुव्यस्था अबाधित राहण्यासाठी सर्व प्रकारच्या दारू विक्रीची दुकाने गुरूवार, दि.24ऑक्टोबर रोजी ईद-ए-मिलाद सणानिमित्त दारू विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी जारी केले आहेत. 
      या आदेशानुसार सर्व देशी-विदेशी मद्य विक्रिची दुकाने, परमिट रूम, शिंदीची दुकाने, ताडी विक्री व बिअर शॉपी उपरोक्त दिवशी बंद राहतील, याची सर्व सबंधीतांनी नोंद घ्यावी.                   

Labels:

सास्‍तूर येथे दि. २२ डिसेंबर रोजी मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन

उस्मानाबाद :- जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद व स्पर्श ग्रामीण रुग्णालय, सास्तुर च्या वतीने दि. 22 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता स्पर्श ग्रामीण रुग्णालय,सास्तुर ता. लोहारा, जि. उस्मानाबाद येथे राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजने अंतर्गत मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन केले आहे.
      या शिबीरामध्ये, बालरोग, शल्यचिकित्सा, अस्थीरोग तज्ञ, स्त्रीरोगतज्ञ व भीषकतज्ञ सहभागी होऊन उपस्थितांची तपासणी मोफत करणार आहेत. तसेच तपासणीतून आवश्यकता भासल्यास रुग्णाना मोफत शस्त्रक्रिया किंवा उपचारासाठी संदर्भित केले जाणार आहे. तरी परिसरातील पिवळे, केसरी, अंत्योदय व अन्नपुर्ण शिधापत्रिकाधारक व श्रुभ्र शीधा पत्रीक धारक शेतकरी कुटुंबातील रुग्णांनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद व प्रकल्प व्यावस्थापक स्पर्श ग्रामीण रुग्णाल, सास्तुर यांनी केले आहे.

Labels:

येरमाळा येथे तालुकास्‍तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्‍न

पांगरी (गणेश गोडसे) :- विद्यार्थ्यांच्या अंगी वैज्ञानिक दृष्टीकोण जागृत होऊन ते विज्ञानवादी होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन कळंब पंचायत समितीच्या सभापति जयश्रीताई कांबळे यांनी केले.त्या विद्यानिकेतन प्राथमिक व माध्यमिक शाळा येरमाळा व गट शिक्षण कार्यालय पंचायत समिती कळंब यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यानिकेतन प्रशाळेत आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात उद्घाटक म्हणून बोलत होत्या.अध्यक्षस्थाणी उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या बालकल्याण समितीच्या सभापति लता पवार होत्या.यावेळी कळंबच्या गटविकास अधिकारी श्रीमती शांता सुरेवाड,गटशिक्षणाधिकारी चंद्र्कांत गावडे,उपसभापति विश्वनाथ तांदळे,येरमाळ्याचे सरपंच विकास बारकूल,नवोदय विद्यालय तुळजापूरचे प्राचार्य व वैज्ञांनिक मार्गदर्शक विजयकुमार बोस,प्रशाळेच्या संस्थापिका श्रीमती प्रभावती पाटील,विद्यानिकेतन प्रशाळेचे अध्यक्ष सचिन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते॰
   यावेळी तालुक्यातून आलेल्या विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी स्मार्ट व्हीलेज,पर्यावरण संतुलीत गांव आदीवर 80 प्रकल्प सादर केले.प्राथमिक गटातून 42,माध्यमिक गटातून32 प्रयोग सादर झाले.लोकसंख्या शिक्षण प्रवर्गातून प्राथमिक व माध्यमिक गटातून प्रत्येकी तीन प्रयोग सादर करण्यात आले.शैक्षणिक साहित्य निर्मितीत अकरा शिक्षकांनी प्रयोग सादर केले.माध्यमिक विभागात कळंबच्या विद्याभवन हायस्कूलच्या रोहण मिटकरीचा आपत्ती व्यवस्थापन प्रथम,येरमाळा येथील न्यानोद्योग विद्यालयातील विजय ठोंबरेच्या कृषि नियोजनास द्वितीय,कण्हेरवाडीच्या विद्याविकास विद्यालयाच्या अपरंपारिक ऊर्जा ला तृतीय क्रमांक मिळाला.प्राथमिक गटात बाभळगावच्या भाग्यश्री औसेकर हिच्या सोया दूध प्रकल्पास प्रथम,येरमाळा येथील विद्यानिकेतन प्रशाळेच्या वसुधा कचरे हिच्या सोलार एनर्जी प्रयोगास द्वितीय,रतणापुर येथील सृष्टी जाधवर हिच्या स्मार्ट व्हीलेज प्रयोगास तृतीय क्रमांक मिळाला.लोकसंख्या शिक्षण विभागात (प्रा)वाठवडा जि.प.शाळेचे आर.पी.माने प्रथम,धोरला जि.प.चे बि.एन.जमाळे द्वितीय,हासेगांव येथील एस.डी.बीडवे तृतीय आले.माध्यमिक गटातून कळंब जि.प.चे टी.एन.काजी प्रथम,इटकुर जि.प.सीएचआर एन.बि.पाळखे द्बितीय,येरमाळ्याचे डी.बि.मांडावे तृतीय आले.शैक्षणिक साहित्य मधून शिवपूर जि.प.चे एन.आर.शेळके प्रथम,ढोराळा जि.प.चे बि.एन.जमाळे व टी.एन.काजी यांना द्वितीय टीआर पंगांव येथील राजीव गांधी विद्यालयातील बि.एन.मडके यांना तृतीय क्रमांक मिळाला.सूत्रसंचालन आशा ताटे यांनी तर आभार वैभव पंडित यांनी मानले.

Labels:

उस्मानाबाद शहरात अतिक्रमण हटवून वृक्षारोपण

उस्मानाबाद -: शहरात नगरपालिकेच्या मालकीच्या अनेक ठिकाणी खुल्या जागा आहेत. बहुतांश जागांवर अतिक्रमण करण्यात आलेले आहे. हे अतिक्रमण हटवून त्या जागा ताब्यात घेण्याची मोहीम पालिकेने सुरू केली आहे. या मोहिमेचा प्रारंभ महात्मा गांधी नगर येथील खुल्या जागेवर नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आला. 
महात्मा गांधी नगर येथील सर्वे 165/3 मधील खुल्या जागेचे बेकायदेशीररित्या खरेदीखत करण्यात आले होते. याबाबत नगरपालिकेत तक्रार दिल्यानंतर नगराध्यक्ष राजेनिंबाळकर यांनी तकडाफडकी जागेवरील अतिक्रमण दूर करून स्थानिक नागरिकांच्या मदतीने वृक्षारोपण केले. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश पोतदार, मराठवाडा साहित्य परिषदेेचे अध्यक्ष नितीन तावडे, पत्रकार सुहास सरदेशमुख, गोपाळ व्यास, पी. एम. गवार, माधव इंगळे यांच्यासह सुजित ओव्हाळ, नाना गाटगे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. 
शहरातील खुल्या ज्या खुल्या जागांवर अतिक्रमण करण्यात आले आहे, तेथील नागरिकांनी पालिका प्रशासनाशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असे आवाहन नगराध्यक्ष राजेनिंबाळकर यांनी केले आहे. तसेच पालिकेच्या मालकीच्या शहरातील सर्व जागांवर फलक लावण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी पालिका प्रशासनाला केली.

Labels:

तुळजापुरात ई-गॅलरी सुविधा सुरू

तुळजापूर :- दिवस-रात्र२४ तास पैसे काढणे, जमा करणे यासह सर्वच बँकिंग सुविधा असलेली ई-गॅलरी सुविधा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या तुळजापूर शाखेत शुक्रवार दि. १८ डिसेंबर रोजी सुरू करण्यात आली. ई-गॅलरी सुविधा उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यातील पहिली सुविधा तुळजापूर शाखेत सुरू करण्यात आली आहे. 
ई-गॅलरी सुविधेचा शुभारंभ स्टेट बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक एन. के. शर्मा प्रादेशिक व्यवस्थापक रघुनाथ लोटे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शाखाधिकारी श्याम वाघमारे यांच्यासह बाळासाहेब हंगरगेकर, प्रशांत अपराध, अभिजीत जेवळीकर आदी कर्मचारी उपस्थित होते. बँकिंग व्यवहारात स्पष्टपणा आणण्यासाठी एसबीआयच्या तुळजापूर शाखेत जीआरसी मशीन बसविण्यात आले असून, जीआरसी कार्डद्वारे बँकिंग व्यवहार करण्यात येणार असल्याने जानेवारीपासून स्लीप पद्धत पूर्णपणे बंद करण्यात येणार असल्याचे बाळासाहेब हंगरगेकर यांनी सांगितले. 
ई-गॅलरीमध्ये रक्कम जमा करणे, रक्कम काढणे, पासबुकमध्ये इन्ट्री करणे, अकाउंट स्टेटमेंट काढणे, धनादेश जमा करणे, ऑनलाइन खाते उघडणे आदी सुविधा २४ तास विनामूल्य उपलब्ध राहणार आहेत. यामुळे ग्राहकांना गर्दीचा त्रास होता चांगली सेवा मिळणार आहे. ई-गॅलरी सुविधा इंन्ट्रानेट तंत्रज्ञानावर आधारित असल्याने इंटरनेट प्रॉब्लेमचा त्रास टळणार आहे. 

Labels:

नागपूरमध्ये मातंग समाजाच्या मोर्चावर पोलिसांचा लाठीचार्ज

नागपूर : विधानसभेवर काढण्‍यात आलेल्‍या मातंग समाजाच्या मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. या लाठीचार्जध्ये 70 मोर्चेकर्ते जखमी झाले आहेत. नागपूरच्या कस्तूरचंद चौकात ही घटना घडली आहे.
नागपूरमध्ये राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे विधानसभेवर दररोज मोर्चे धडकत आहेत. विविध मागण्यांसाठी आज मातंग समाजाने मोर्चा काढला. नांदेडहून नागपूरपर्यंत पायी येऊन मातंग समाजाने हा मोर्चा काढला होता. या मोर्चात १५० जण सहभागी होते. मुख्य चौकात जाण्याआधीच हा मोर्चा अडवला, असे कार्यकत्र्यांचे म्हणणे आहे. परंतु कार्यकर्ते बॅरिकेटस् हटवून मध्ये घुसण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी लाठीमार सुरू केला. यामध्ये ७० जण जखमी झाले आहेत. पोलिसांच्या या लाठीमाराबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. 

Labels:

Friday, 18 December 2015

भ्रष्टाचारमुक्त प्रशासनासाठी पगारात भागवा अभियान

उस्मानाबाद :- भ्रष्टाचारमुक्त शासन आणि प्रशासनासाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या वतीने संपूर्ण राज्यात कार्यसंस्कृती अभियान राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून उस्मानाबाद जिल्ह्यात शुक्रवारी राजपत्रित अधिकाऱ्यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. महासंघाचे राज्य सरचिटणीस समीर भाटकर आणि राज्य संघटक मधुकर डोईफोडे यांनी या कार्यशाळेस मार्गदर्शन केले.  महासंघाच्या वतीने  राज्यभर पगारात भागवा अभियान सुरु करण्यात आले आहे. या अभियानामुळे अधिकाऱ्यांची सकारात्मक प्रतिमा राज्यभर तयार झाली आहे. या अभियानास सगळ्यांनी प्रतिसाद देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
      येथील जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात ही कार्यशाळा झाली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी उद्धव घुगे, उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, श्रीरंग तांबे, उप विभागीय अधिकारी तेजस चव्हाण, कोषागार अधिकारी विशाल पवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक डॉ. रुपाली सातपुते, डॉ. शीतलकुमार मुकणे यांच्यासह विविध विभागांचे राजपत्रित अधिकारी उपस्थित होते. 
        यावेळी श्री. भाटकर म्हणाले की, बहुसंख्य अधिकारी हे कार्यालयीन कामकाज त्परतेने करतात. मात्र, तरीही अधिकाऱ्यांविषयी एक नकारात्मक भावना दिसून येते. त्यामुळेच हे कार्यसंस्कृती अभियान आणि पगारात भागवा अभियान सुरु करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. लोककल्याणकारी योजनांची प्रभावीरित्या अंमलबजावणी आणि प्रशासन पारदर्शक आणि लोकाभिमुख ठेवण्यासाठी सर्वच अधिकारी दक्ष आहेत, याची प्रचिती नागरिकांना होण्याच्या दृष्टीने हे अभियान उपयुक्त ठरत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.  सहाव्या वेतन आयोगानंतर अधिकाऱ्यांना मिळणारे वेतन चांगले जीवन जगण्यासाठी पुरेसे आहे. त्यामुळे वेतन कमी असल्याची तक्रार न करता आणि मोहापासून दूर राहून अधिकाऱ्यांनी काम केले तर एक प्रकारची सकारात्मकता येईल, असे त्यांनी आवर्जून सांगितले. 
       अनुचित आचरण आणि व्यवहार करताना सापडलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कधीही महासंघ पाठीशी घालणार नाही, चौकशीअंती दोषी आढळलेल्या कर्मचाऱ्यांना कठोर शिक्षेची तरतूद आणि तात्काळ अंमलबजावणीसाठी महासंघाचा आग्रह राहील असे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले.
     राजपत्रित अधिकारी महासंघ विविध मागण्यांसाठी कायम शासनाकडे पाठपुरावा करत असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र शासनाप्रमाणे 5 दिवसांचा आठवडा, सेवानिवृत्तीचे वय केंद्र आणि भारतीय प्रशासनिक सेवेप्रमाणे 60 वर्षे करणे, महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांना दोन वर्षाची बालसंगोपन रजा,  प्रशंसनीय कामाबद्दल आगाऊ वेतनवाढी, सर्व रिक्त पदे भरण्याची आवश्यकता, अधिकाऱ्यांच्या पाल्यांना अनुकंपा तत्वावर नेमणूक, चौकशीशिवाय अधिकारी-कर्मचाऱ्यांचे निलंबन करु नये आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांना होणाऱ्या मारहाणीसंदर्भात परिणामकारक कायदा अशा मागण्यांचाही सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. 
    सुरुवातीला निवासी उपजिल्हाधिकारी श्री. घुगे यांनी श्री. भाटकर आणि श्री. डोईफोडे यांचे स्वागत केले.  प्रास्ताविक कोषागार अधिकारी श्री. पवार यांनी केले. यावेळी श्री. डोईफोडे यांनीही विविध बाबींवर मार्गदर्शन केले

Labels:

बेंगळूर येथे 28 डिसेबर रोजी सैन्य भरती मेळावा

उस्मानाबाद -: जिल्हयातील आजी सैनिक /माजी सैनिक/विधवांच्या पाल्यांना कळविण्यात येते की,आर्मी सप्लाई क्राप्स सेंटर ,बेगळूर येथे दि.28 डिसेंबर,2015 पासून युनिट हेडक्वार्टर कोटा सैन्य भरती मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे.तरी उस्मानाबाद जिल्हयातील आजी सैनिक/माजी/सैनिक / विधवांच्या इच्छूक पाल्यांनी/भावांनी दि.28डिसेंबर,2015 रोजी सकाळी 6.30 वाजता आर्मी सप्लाई क्राप्स सेंटर बेगळूर येथे भरतीसाठी उपस्थित रहावे व सोबत शैक्षणिक प्रमाणपत्र, डोमिसाईल प्रमाणपत्र, जातीचा दाखला, चारित्र्याचा दाखला व या सर्व कागदपत्रे सोबत घेऊन जावे असे,जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, मेजर (नि) सुभाष सासने,उस्मानाबाद यांनी कळविले आहे.

Labels:

प्ररेणा कार्यशाळा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

उस्मानाबाद :- जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांच्या अध्येक्षतेखाली प्रकल्प प्रेरणा कार्यशाळा जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रूग्णालय उस्मानाबाद येथे संपन्न झाली.
          या कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी़ डॉ. प्रशांत नारनवरे उस्मानाबाद यांनी असे सांगीतले केले की, सध्या दुष्काळी परिस्थिती असून ग्रामिण भागातील शेतकरी व शेतमजुर अडचणीत आहेत. जनावरांसाठी चारा छावण्या सुरु असून सध्या पाणी टंचाईच्या ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. सुरु असलेल्या चारा छावण्यांच्या ठिकाणी शेतकऱ्यांचे आरोग्य तपासणी व समुपदेशन आरोग्य कर्मचारी व आशा यांचे मार्फत करण्यात यावे व टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असलेल्या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पाण्यामध्ये टी.सी.एल. पावडरच्या नियमित वापर करावा ज्यामुळे जलजन्य आजार होणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
          तसेच जिल्हयातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ग्रामीण / उपजिल्हा रुग्णालय येथे प्रत्येक बुधवारी तज्ञ डॉक्टरामार्फत मोफत आरोग्य तपासणीशिबीरांचे आयोजन करण्यात आले असून तपासणी शिबीरामध्ये तपासणी, उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. त्या प्रमाणे मातृत्व संवर्धन दिन महिन्याच्या 2 व 16 तारखेस साजरा करण्यात  येत आहे. त्यामध्ये नाविन्यपुर्ण उपक्रम म्हणून आरोग्यासाठी योगा शिबीर, सासू-सुन मेळावा, हळदी-कुंकू कर्यक्रम, प्रसुतीपुर्व व प्रसुती पश्चात घ्यावयाची काळजी, बाळाचे संगोपन, गरोदर माता व बाळ यांनी घ्यावयाचे पुरक आहार या बाबत मातृत्व संवर्धन दिनी माहिती देण्यात यावी,या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषेद, उस्मानाबाद चे सदस्य, पंचायत समिती सभापती, सदस्य, सरपंच, पत्रकार, खाजगी संस्थाचे प्रतिनिधी, खाजगी वैद्यकीय व्यवसायीक, आशा, अंगणवाडी कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, यांचा सहभाग घेण्यात यावा अशा सुचना जिल्हाधिकारी,डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिल्या.
        जिल्हयातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ग्रामीण / उपजिल्हा रुग्णालया मध्ये तज्ञ डॉक्टरां मार्फत मोफत तपासणी, उपचार व शस्त्रक्रिया प्रतेक बुधवारी करण्यात येणार आहेत. 
         तरी शहरी व ग्रामीण भागातील जनतेने याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी, यांनी केले आहे. त्याचप्रमाणे माहे नोव्हेंबर 2015 अखेर निर्शेशांकडून गुणानुक्रमे निवड झालेल्या तालुका आरोग्य अधिकारी डॉ. खराडे,डॉ.पोतरे,वैद्यकी अधिक्षक डॉ. वाळके यांचा सत्कार जिल्हाधिकारी यांचे हस्ते करण्यात आला.
        या कार्यशाळेस सहा.संचालक (हिवताप लातूर मंडळ ) डॉ. आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी  डॉ. आर.बी. पवार,जिल्हा शल्यचिकिस्तक-डॉ एकनाथ माले, वैद्यकिय अधिक्षक स्त्री रुग्णालय डॉ.आर.पी. वाघमारे, सहा. जि.आ.अ. डॉ. एस.एस.फुलारी,  अति. जि. आ. अ. डॉ. एम. आर. पांचाळ, जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ.के.के.मिटकरी, जिल्हा हिवताप अधिकारी-श्री. एन.बोरकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. गामसाळे,तसेच उपजिल्हा / ग्रामीण रुग्णलयाचे वैद्यकिय अधिक्षक, तालुका आरोग्य अधिकारी आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आणि जिल्हास्तरीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.   ****


Labels:

विरोधात भाषण केल्‍यामुळे एकास मारहाण

पांगरी (गणेश गोडसे) :- विरोधात भाषण केल्याचा राग मनात धरून चौघांनी मिळून एकास गाठून लोखंडी गज,काठी व लोखंडी पाईपने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना महागांव-पिंपळगांव चौकात घडली.
दिगंबर शिवाजी काशिद (वय 40 रा.महागांव ता.बार्शी) असे लोखंडी गजाच्या हल्ल्यात जखमी झालेल्याचे नांव असून अंकुश श्रीपती मोरे,अमोल अंकुश मोरे,संतोष फुलचंद घोलप,फुलचंद नागनाथ घोलप चौघेही रा.महागांव अशी मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्याची नांवे आहेत.
   जखमी दिगंबर काशिद यांनी पांगरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,ते महागांव-पिंपळगाव चौकात एस टी बसची वाट बघत बसले असता आरोपीं एम.एच 13 0827 व एम.एच.13 ए .एच.5019 या दुचाकीवरून चौकात आले.आरोपी अंकुश मोरे याने तू माझ्या विरोधात भाषण का केले असे म्हणत शिवीगाळी केली.अमोल अंकुश मोरे याने त्याच्या हातातील लोखंडी गजाने फिर्यादिस डाव्या हातावर मारहाण करून जखमी केले.संतोष घोलप याने काठीने डाव्या हातावर मारहाण करून जखमी केले.तसेच अंकुश मोरेयाने लोखंडी पाइप पाठीवर,पायावर मारहाण करून जखमी केले.फुलचंद घोलप याने हातावर मारहाण केली.तसेच आमच्या नाडी लागलास तर आमच्याकडे बंदूक आहे सोडणार नाही असे म्हणून धमकीही दिली आहे.उबाळे यांच्या फिर्यादीवरून चार जनावर मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.अधिक तपास पांगरी पोलिस करत आहेत.

Labels:

एसटी कर्मचार्‍यांचा संप अखेर मागे

मुंबई -: पगारवाढीच्या मागणीसाठी संपावर गेलेल्या एसटी कर्मचार्‍यांच्या इंटक संघटनेनं अखेर संप मागे घेतला आहे. 
परिवहन मंत्री ना. दिवाकर रावतेशी ‘इंटक’सोबत झालेल्या बैठकीत या संपावर तोडगा निघाला आहे. दिवाकर रावते यांच्या आश्वासनानंतर इंटक संघटनेनं आपला संप मागे घेत कामावर रूज होण्यास सुरुवात केली आहे.. डेपोतून बसेस सुटण्यास सुरू झाल्यामुळे प्रवाशांचा जीव भांड्यात पडलाय.
कमी पगारामुळे एका कर्मचार्‍याने आत्महत्या केल्यामुळे इंटक संघटनेनं पगारवाढीसाठी संप पुकारला होता. कर्मचार्‍यांनी आक्रमक पवित्रा घेत डेपोतून बसेस बाहेर पडू दिली नाही. एवढंच नाहीतर डेपोत बसेसची हवाच सोडण्यात आली. त्यामुळे बसेस जागेवरच उभा राहिल्या. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या संपामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांचे हाल झाले. अखेर आज परिवहन मंत्री दिवाकर रावतेंसोबत झालेल्या बैठकीनंतर संप मागे घेण्यात आला.

Labels:

कॅन्सरवर मात करत नाशिकच्या नमिता कोहक ठरल्या मिसेस युनिव्हर्स

नाशिक : इच्छा शक्तीच्या जोरावर माणूस काय करू शकतो, हे शक्य करून दाखवलंय नाशिकच्या नमिता कोहक या महिलेनं. या महिलेनं हाँगकाँग इथं झालेल्या ‘मिसेस इंटरनॅशनल वर्ल्डवाईल्ड क्वीन’ या सौंदर्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. विषेश म्हणजे कॅन्सरशी लढा देत असताना त्यांनी हा किताब मिळवला.
      केवळ विवाहित महिलांसाठी घेण्यात आलेल्या या स्पर्धेत त्यांनी हे यश मिळवलं आहे. या स्पर्धेतल्या ‘ग्लोरी ऑफ ट्रेडिशन’ म्हणजे ‘सर्वोत्कृष्ट पारंपरिक पोषाख’ या प्रकारात राजवस्त्र पैठणी नेसून पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय रॅम्पवर रॅम्पवॉक नमिता यांनी केला. जगभरातील 28 देशांमधील महिला स्पर्धकांनी यामध्ये सहभागी झाल्या होत्या. मात्र त्या सर्वजणींना मागे टाकत सौंदर्य आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर नमिता यांनी मिसेस इंटरनॅशनल वर्ल्डवाईल्ड क्वीनचा किताब पटकावला. त्यांच्या या खडतर प्रवासात साथ दिली ती त्यांच्या पती पारितोषिक कोहक यांनी. कोहक यांच्या विवाहाला 15 वर्षे झाली आहेत. नमिता सध्या कॅन्सरशी झगडत असून केमोथेरपीचे उपचारही त्या घेत आहेत.

* साभार :- आयबीएन लोकमत

Labels:

आश्‍वासनांच्‍या खैरातीत सरले वर्ष

पांगरी (गणेश गोडसे) :- अनेक प्रश्‍न, समस्या, ग्रांम पंचायतीच्या निवडणुका, ऊस दराचे व ऊसाच्या बिलासाठी झालेले आंदोलन शेतक-यांच्या पाचविला पुजलेला दुष्काळ, शासनाने आणेवारीचे कारण पुढे करत वगळलेला तालुका, सरकारकडे मोठया आशेने पाहणारा शेतकरी, आश्‍वासनांची खैरात तशिच पाठिमागे ठेवत सरते वर्षे सरत चालले आहे.
        1972 च्या भिषण दुष्काळाची किंबहुना त्याहीपेक्षा भयावह परितस्थतीचा सामना गतवर्षी शेतक.यांसह सर्वसामान्य नागरिकांना करावा लागला.तशिच परिस्थिती उदभवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुणे लातुर राज्य मार्गाचे रूंदीकरण विकासकांमांचा अडकलेला रथ सर्वसामान्यांच्या समाधानासाठी व नेत्यांनी त्यांच्या मनोरंजनासाठी केलेल्या फुसक्या घोषणा रोजगाराच्या शोधार्त भटकत असलेला व दिशाहीन होत असलेला तरूण यासह अणेक प्रश्‍न तसेच मागे ठेऊन 2015 हे वर्षे जनतेला हुल देऊन गुड बाय म्हणत आहे.
       या भागाच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा विषय ठरणारा टेंभुर्णी ते येडशी या 90 किलो मीटर अंतराच्या रूंदीकरणाच्या कामाचा शुभारंभ कधी होणार अशी स्थिती असतानाच नुकतेच या मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर झाल्यामुळे पुढे काय होणार हा प्रश्‍न पडला आहे. डिसेंबर उलटुन जाऊ लागला असला तरीही अदयाप अजुन शुभारंभाचा श्रीफळ वाढवलेला दिसत नाही.रस्ता रूंदीकरनानंतर या मार्गावरील अणेक शुक्षिक्षीत तरूणांना विविध माध्यमातुन रोजगारनिर्मितीच्या संधी उपलब्ध होऊन अणेकांचा रोजीरोटीचा प्रश्‍न मिटनार आहे.अणेक शेतकरी प्लॉट मालक कधी एकदाचे काम सुरू होऊन रस्ता कुठपर्यंत येर्इल याच्या विवंचनेत आहेत.रस्ता पुर्ण झाल्यांनतर बांधकामाचे बघु असे म्हणुन अणेकांनी आपली राज्यमार्गालगतची बांधकामेच थांबवलेली आहेत.मात्र पाच सहा वर्षांपासुन प्रलंबित असलेला रूंदीकरणाचा प्रश्‍न आनखी किती दिवस रखडणार असा सवाल विचारला जात आहे.या मार्गाचे बि.ओ.टी तत्वावर निविदा प्रसिदध होऊन पुण्यातील एका कंपनीने टेंडर घेतले असुन अणेक महिन्यांपासुन कंपनीकडुन फक्त मोजन्याच चालु असल्याचे दिसत आहे.रस्ते चौपदरीकरणाचा प्रश्‍न मार्गी लागल्यास दळणवळन वाढुन या मार्गावर होणा.या अपघातांच्या संख्येत मोठी घट होणार आहे.
    गत चार वर्षे दुष्काळात होरपळलेला शेतकरी कसाबसा सावरन्याचा प्रयत्न करत असतानाच या भागातील शेतक.यांच्या मानगुटीवर पुन्हा भयावह दूष्काळाचे भुत बसु पहात आहे.शेतीच्या माध्यमातुन अल्पशा पावसाच्या पाण्यावर उदरनिर्वाह करणारा या पटयातील शेतकरी या येत असलेल्या संकटामुळे खुपच भयभित झाला असुन पुढे काय करायचे हा मोठा प्रश्‍न त्यांच्यासमोर आ वासुन उभा आहे.गतवर्षी द्राक्षबागांना छाटनीच्या वेळैस पाणी मिळु शकले नाही त्यामुळे या भागातील जवळपास एैशी टक्के द्राक्ष बागांना यावर्षी मालच लागलेला नाही.उलट शेतकरी या बागा जगवन्यासाठीच कसरत करताना दिसत आहे.शासनाने या परिस्थतीकडे साधे ढुंकुनही बघन्याचे औदार्य दाखवलेले नाही.तरीही शेतकरी असो असे म्हणत बागां टिकवन्यासाठी धडपडत आहेत.
  कांदा कधी शेतक-यांच्या चेह-यांवर हासु आनतोय तर कधी ग्राहकाला रडवतोय.कांदाच्या दरातील चढउतार कांदा उत्पादक शेतक.यांच्या जिवावर बेतत आहे. कांदयाच्या दरातील चढउतारामुळे कांही कांदा उत्पादक शेतक-यांनी आत्महत्या केल्याच्या घटना ताज्या आहेत.त्यामुळे अशा घटना टाळन्यासाठी हमीभाव देणे गरजेचे आहे.
   पोलिस प्रशासनाच्या दृष्टीने गत वर्षे विविध निवडणुकामुळे तानतनावाचेच गेले आहे.काटेगांव येथिल खुनाची घटणा वगळता गंभिर गुन्हे त्या मानाने कमी घडले. सरत्या वर्षात हदीत कोणती स्फोटक अथवा प्रशासनावर तान आनणारी एकही घटना घडलेली नाही. प्रशासनाने परिस्थती हाताळत शांतता ठेवन्याचे काम केले आहे.एकंदर सरते वर्षे हे सर्वसामान्यांसह शेतकरी कष्ठकरी यांच्यासाठी कांही अपवादात्मक गोष्ठी वगळता त्रासदायकच गेले असुन आगामी वर्षे तरी कसे सुरू होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

Labels:

आ. सोपल यांच्‍या वाढदिवसानिमित्‍त वह्या वाटप

पांगरी (गणेश गोडसे) :- सध्याच्या स्पर्धेच्या युगात सर्वसामान्य गरीब,होतकरू विद्यार्थिही टिकने गरजेचे असून विद्यार्थ्यांना त्या सुविधा मिळाव्यात असे प्रतिपादन पांगरीचे माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ.अरुण नारकर यांनी केले. ते पांगरी (ता.बार्शी) येथिल जिल्हा परिषद मुलांच्या तिन्ही प्रशाळेतील विद्यार्थ्यांना आमदार दिलीप सोपल यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मोफत वह्या वाटपाच्या कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जिल्हा प्रशाळेतील 400 विद्यार्थी-विद्यार्थिनींना मोफत वह्या वाटप करण्यात आले.यावेळी पांगरीचे सरपंच युन्नुस बागवान,उपसरपंच रामभाऊ गाढवे,ग्रांमपंचायत सदस्य अंकुश लाडे,नीलकंठ शेळके,मोरे मेजर,स्वप्नील काळे,माजी सरपंच दत्ता काकडे,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास गोडसे,धनंजय तौर,विक्रांत गरड,बाबा जाधव,सादिक पठाण,प्रल्हाद गाढवे,बालाजी पवार,दिपक शेळके,मुख्याध्यापक लक्ष्मण काशीद,नवनाथ मुंढे,शिंदे गुरुजी,जनाब खान यांच्यासह ग्रामस्थ व शिक्षक उपस्थित होते.

Labels:

येरमाळा येथे तालुकास्‍तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

पांगरी (गणेश गोडसे) :- विद्यानिकेतन प्राथमिक व माध्यमिक शाळा येरमाळा व गट शिक्षण कार्यालय पंचायत समिती कळंब यांच्या संयुक्त विद्यमाने येरमाळा (ता. कळंब) 2015-16 चे दि.18 डिसेंबर रोजी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती विद्यानिकेतन प्रशाळेचे अध्यक्ष सचिन पाटील यांनी प्रसिध्‍दी पत्रकाद्वारे दिली.
         विद्यानिकेतन प्रशाळेत होणार्‍या तालुकस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन माजी मंत्री व आ.राणा जगजितसिह पाटील यांच्या हस्ते होणार आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कळंब पंचायत समितीच्या सभापती सौ.जयश्रीताई कांबळे असणार असून यावेळी उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ.लताबाई पवार,उपसभापति विश्वनाथ तांदळे,पंचायत समितीच्या सदस्या सौ.छायाताई वाघमारे,येरमाळ्याचे सरपंच विकास बारकूल,नवोदय विद्यालय तुळजापूरचे प्राचार्य व वैज्ञांनिक मार्गदर्शक विजयकुमार बोस,प्रशाळेच्या संस्थापिका श्रीमती प्रभावती पाटील आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
  तरी या विज्ञान प्रदर्शनात तालुक्यातील जास्तीत जास्त शाळांनी सहभागी व्हावे असे आवाहन कळंबचे गटविकास अधिकारी श्रीमती शांता सुरेवाड,गटशिक्षणाधिकारी चंद्र्कांत गावडे,सचिन पाटील यांनी केले आहे.

Labels: ,

दहिफळमध्ये खंडोबा यात्रा उत्साहात

कळंब : दहिफळ (ता. कळंब) येथील ग्रामदैवत श्री खंडोबाची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी भाविकांनी यळकोट यळकोट घे च्या जयघोषात भंडा-याची मुक्‍त उधळण केली. 
कळंब तालुक्‍यातील दहिफळ येथील ग्रामदैवत श्री खंडोबाची यात्रा चंपाष्टमी या दिवशी भरते. वर्षातुन होणारी ही यात्रा पंचक्रोशीत सगळ्यात मोठी यात्रा म्हणून ओळखली जाते. घटस्थापना झाल्यापासून यात्रेस सुरूवात होते. नागदिव्याच्या दिवशी भरीत वडगा, नागदिवे देवाला नैवेद्य म्हणून दाखविला जातो. रात्री परंपरेनुसार भव्य असा छबिना काढण्यात आला. यावेळी नृत्यांगणामध्ये तिन ग्रुप होते. यात्रा कमिटीतर्फे, गावातील तरूण युवक मंडळींनी जामखेड येथील नृतिका आणल्या होत्या. लेझीम पथक, बँड, वारूवालेसह शेवटचा छबिना संपन्न झाला. छबिना संपताच गावातील भाविकांनी देवाला ओल्या अंगाने दंडवत घातला. सकाळी १० वा. पहिला मानाचा नैवेद्य पाटलांचा दाखविण्यात आला. तर दुसरा मान वाजत गाजत दु. १ वा. सुतार समाजाचा दाखविण्यात आला. नैवेद्य दाखविल्यानंतर हजारो भाविकांच्या उपस्थितीत लंगर तोडण्याचा कार्यक्रम झाला. यावेळी मंदिर परिसर हजारो भाविकांनी फुलून गेला होता. छावणीचा लंगर तोडण्याचा मान श्रीकांत धोंगडे, सज्जन कोठावळे यांचा होता. लंगर तुटल्यानंतर देवाचा रथ मिरविण्यात आला. या गाडा बगाद्याचे घंटीचे मानकरी गणेश मते, गजेंद्र मते, राजकुमार जोगदंड, संभाजी मते, कृष्णा लोहार, तर बैलाचे मानकरी भागवत कदम, देविदास भूसारी, तुकाराम भातलवंडे, भाऊसाहेब घेवारे होते. 

Labels:

कॉम्रेड पानसरे, दाभोळकर विचार यात्रेचे उस्मानाबादेत स्वागत

उस्मानाबाद :- राज्यभरात १४ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आलेल्या कॉम्रेड गोविंद पानसरे व डॉ. नरेंद्र दाभोळकर महाराष्ट्रव्यापी विचार यात्रेचे उस्मानाबादमध्ये मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी गोविंद पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या पुस्तकांसह इतर लेखकांच्या पुस्तकांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. त्याला उस्मानाबादकरांनी उदंड प्रतिसाद दिला.
कम्युनिस्ट पार्टीच्यावतीने कॉम्रेड गोविंद पानसरे व डॉ. नरेंद्र दाभोळकर महाराष्ट्रव्यापी विचार यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. विदर्भातील टप्पा पूर्ण केल्यानंतर मराठवाड्यातील नांदेड, बीड जिल्ह्यातून ही विचार यात्रा गुरूवारी सकाळी उस्मानाबाद शहरात दाखल झाली. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ विचार यात्रेत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांचे पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश पोतदार, जिजाऊ जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष अग्निवेश शिंदे आणि ऍड. भारती ठवळे यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. या विचार यात्रेअंतर्गत कॉम्रेड गोविंद पानसरेंसह पुरोगामी चळवळीतील अनेक मान्यवर लेखकांच्या पुस्तकांचाही या ठिकाणी स्टॉल उभारण्यात आला होता. या पुस्तक प्रदर्शनाला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. यावेळी राष्ट्रसेवा दलाचे जिल्हाध्यक्ष ऍड. देवीदास वडगावकर, जिजाऊ जन्मोत्सव समितीचे रोहीत बागल, शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे उपाध्यक्ष रवि निंबाळकर, राज ढवळे, सरस भारत अकादमीचे ऍड. राज कुलकर्णी, माधव इंगळे, रविंद्र केसकर, सुनिल बडूरकर, अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे सचिव राकेश वाघमारे, राहुल साळवे, संविधान फाउंडेशनचे हुंकार बनसोडे, सुदेश माळाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सुदेश माळाळे तर आभार ऍड. राज कुलकर्णी यांनी मानले. 

Labels:

मल्लिकार्जुन सोनवणे यांना विभागस्तरीय प्रथम तंटामुक्त पुरस्कार जाहीर

उस्मानाबाद :- राज्य शासनाच्यावतीने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमे अंतर्गत पत्रकारांना दिले जाणारे पुरस्कार जाहीर झाले असून, दै. यशवंतचे जिल्हा प्रतिनिधी मल्लिकार्जुन दशरथ सोनवणे यांना मराठवाडा विभागस्तरीय प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे.
यापूर्वी सोनवणे यांना कै. अनंतराव भालेराव स्‍मृती पुरस्‍कार, समर्थनल मानवी हक्‍क वार्ता पुरस्‍कार, राजमाता जिजाऊ स्‍वावलंबन उत्‍कृष्‍ट पत्रकारिता पुरस्‍कार मिळालेले आहेत. सदरील विभागस्‍तरीय पुरस्‍काराचे स्‍वरुप एक लाख रुपये व स्‍मृतीचिन्‍ह असे आहे. सदरील पुरस्‍कार जाहीर झाल्‍याबद्दल सोनवणे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Labels:

राजपत्रित अधिकारी महासंघाची आज कार्यशाळा

उस्मानाबाद :- महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची उस्मानाबाद जिल्ह्यासाठीची एक दिवशीय कार्यशाळा शुक्रवार, दिनांक 18 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात दुपारी एक वाजता होणार आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व राजपत्रित अधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 
        राजपत्रित  अधिकारी महासंघाच्या वतीने राज्याच्या विकासासाठी आणि भ्रष्टाचारमुक्त शासन प्रशासनासाठी ‘पगारात भागवा’ अभियान सुरु करण्यात आले आहे. यासंदर्भात जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी कार्यशाळा आयोजित करण्यात येत असून त्याचा एक भाग म्हणून उस्मानाबाद येथे ही कार्यशाळा होत आहे. याशिवाय, राजपत्रित अधिकाऱ्यांच्या विविध मागण्या आणि त्यांच्या पाठपुराव्यासंदर्भातही या कार्यशाळेत चर्चा होणार आहे.
महासंघाचे सरचिटणीस समीर भाटकर, उपाध्यक्ष डॉ. एन. आर. शेळके आणि डॉ. उत्तमराव शेळके, संघटन सचिव डॉ. रत्नाकर पेडगावकर आणि डॉ. सुभाष मद्रेवार, महिला सहचिटणीस डॉ. जयश्री गोरे, सहचिटणीस इंजिनिअर बाळासाहेब शेलार आणि एकनाथ पावडे यांच्यासह राज्य संघटक डॉ. मधुकर गिरी, मधुकर डोईफोडे आणि प्रल्हाद जावळे हे पदाधिकारी येणार आहेत.

Labels:

Thursday, 17 December 2015

पोलीस पाटील दिनानिमित्त आज तुळजापुरात मेळावा

तुळजापूर :- पोलीस पाटील दिनानिमित्त गुरूवार, दि. 17 डिसेंबर रोजी तुळजापूर येथे पोलीस पाटलांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 
तुळजापूर येथील पोलीस संकुल सभागृहात गुरूवारी दुपारी 1 वाजता मेळावा होणार आहे. या मेळाव्याला पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष हारूण पटेल (काझी), मिडीया विभागाचे जिल्हाध्यक्ष सुभाष कदम-पाटील, जिल्हा सचिव धनंजय गुंड, प्रदेश कार्यकारिणी सदस्य दिनकर पाटील, आण्णासाहेब कोळेकर, राहुल वाकुरे, बालाजी खरात, उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. 
जिल्हास्तरीय मेळाव्याला जिल्ह्यातील पोलीस पाटीलांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मिडीया विभागाचे जिल्हाध्यक्ष सुभाष कदम पाटील यांनी केले आहे. 

Labels:

Wednesday, 16 December 2015

वाहतुक नियंत्रण व नियमनात्म‍क आदेश

उस्मानाबाद :- जिल्ह्यात दि. 24 डिसेंबर 2015 रोजी   बकरी ईद  हा सण साजरा होणार आहे. तरी वरील  उत्सव  जिल्ह्यात  शांततेत  पार पाडवा मिरवणुका  दरम्यान  वाहतुकीचे  नियंत्रण व  नियमन  करणे आवश्यक आहे  व कोणतेही  अनुचित प्रकार  न घडता  कायदा व सुव्यवस्था  अबाधीत  रहावी.  जर तणावाची  परिस्थिती  निर्माण झाली तर त्या परिस्थितीवर तात्काळ मात करता यावी, म्हणून   पोलीस अधीक्षक  उस्मानाबाद  यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 प्रमाणे उस्मानाबाद  जिल्ह्यातील सर्व पोलीस उपनिरीक्षक व त्यापेक्षा  वरीष्ठ  दर्जाच्या अधिकाऱ्यांना  दि. 23 डिसेंबर ते दि. 25 डिसेंबर 2015 रोजीचे मध्यरात्रीपर्यंत  नियमनात्मक अधिकार बहाल केले आहेत. 
       यानुसार हे अधिकारी सडकांवरील  किंवा सडकेने  जाणाऱ्या  मिरवणुकीतील  किंवा जमावातील  लोक कशा रितीने  चालावे, त्यांनी  त्यांची  वर्तणुक  किंवा वागणुक कशी ठेवावी  याविषयी  निर्देश देणे, अशा कोणत्याही मिरवणुका कोणत्या मार्गानी  जाव्यात किंवा कोणत्या मार्गानी  जाऊ नयेत ते मार्ग  विहीत करणे, सर्व मिरवणुकींच्या व जमावांच्या प्रसंगी व प्रतिमा पुजनाच्या कोणत्या सर्व कोणत्या सर्व जागांच्या  आसपास प्रतिमा पुजनाचे वेळी  व कोणत्याही  सडकेवरुन  किंवा  सार्वजनिक  जागी किंवा  लोकांच्या  एकत्र  जमण्याच्या जागी गर्दी होणार असेल किंवा अडथळा निर्माण  होण्याची  शक्यता  असेल अशा सर्व ठिकाणी  अडथळा  होऊ न देणे, सर्व रस्त्यांवर, नद्यांच्या घाटांवर सार्वजनिक  ठिकाणी, स्नानाचे कपडे धुण्याच्या ठिकाणी जागेमध्ये बंदोबस्त  व सुव्यवस्था राखणे, कोणत्याही रस्त्यात सडकेजवळ  किंवा  सार्वजनिक  जागेत किंवा  जागेजवळ  वाद्य वाजविणे आणि शिंगे, कर्कश वाद्य, वाजविणे यावर नियंत्रण  करणे अगर त्यावर नियंत्रण ठेवणे, सक्षम अधिकाऱ्यांनी  मुंबई पोलीस अधिनियमाच्या  कलम 33,34,37 ते 42 45 या कलमान्वये केलेल्या कोणत्याही  नियमनात्मक आदेशांचे अधिन असलेले व त्यास पुष्टी देणारे योग्य आदेश देणे आदीबाबत निर्देश देऊ शकतील.  जो कोणी  वरील नियमनात्मक  आदेशांचे  कोणत्याही  प्रकारे उल्लंघन  करेल तर  तो मुंबई पोलीस अधिनियम कलम 134 प्रमाणे  शिक्षेस पात्र राहील, असे पोलीस अधीक्षक उस्मानाबाद यांनी कळविले आहे.                                          

Labels:

मतदान क्षेत्रात 19 डिसेंबर रोजी स्थानिक सुट्टी

उस्मानाबाद :- जिल्हृयातील ग्रामपंचायतीचा माहे जानेवारी ते एप्रील 2016 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व पोटनिवडणूकीचे मतदान शनिवार, दि.19 डिसेंबर रोजी सार्वत्रिक दोन व पोटनिवडणूक सहा अशा एकूण आठ ग्रामपंचायतची निवडणूक होणार आहे. 
     उस्मानाबाद तालुक्यातील-कौडगाव बावी व सांजा,तुळजापूर तालुक्यातील-किलज,लोहारा तालुक्यातील-चिंचोली रेबे, खेड व होळी,कळंब तालूक्यातील-लोहटा पुर्व,वाशी तालुक्यातील-सोनारवाडी या ठिकाणी सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. येथील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, या क्षेत्रापुरती स्थनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.

Labels:

जय बाबा रामदेव

- राहुल सावे

Labels: ,

महिलेची दोन मुलांसह आत्महत्या

चाळीसगाव :- गोंडगाव (ता. भडगाव) येथील महिलेने आपल्या दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज बुधवार रोजी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 
गोंडगाव येथील शीलाबाई छोटू मोरे (वय 35) ही महिला कालपासून (ता. 15) आपल्या दहा व सहा वर्षीय मुलांसह बेपत्ता झाली होती. तिच्या कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला असता, ती कुठेही मिळून आली नाही. आज सकाळी गावालगतच्या विक्रम पाटील यांच्या शेतात तिघांचे मृतदेह तरंगताना आढळून आले. शीलाबाईच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून तिच्या पतीचा मासे विक्रीचा व्यवसाय आहे. तिचे ओढरे (ता. चाळीसगाव) येथील माहेर आहे. शीलाबाईने मुलांसह आत्महत्या का केली, हे अद्याप समजू शकले नाही. पुढील तपास पोलिस करीत आहेत. दरम्यान, सात महिन्यांपूर्वी गोंडगावलाच एका महिलेने आपल्या दोन मुलांसह विहिरीतच उडी घेऊन आत्महत्या केली होती. तसाच प्रकार पुन्हा घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Labels:

जिजाऊ जन्‍मोत्‍सव समितीच्‍या अध्‍यक्षपदी अग्निवेश शिंदे

उस्‍मानाबाद -: मध्‍यवर्ती जिजाऊ जन्‍मोत्‍सव समितीच्‍या २०१६ ची कार्यकारिणी निवड व उत्‍सवाची रुपरेषा ठरविण्‍यासाठी समितीची बैठक डॉ. सुभाष वाघ यांच्‍या अध्‍यक्षतेखाली पार पडली. यावेळी समितीच्‍या अध्‍यक्षपदी अग्निवेश शिंदे यांची तर कार्याध्‍यक्षपदी जयराज खोचरे यांची सर्वानुमते निवड करण्‍यात आली. 
      उर्वरित कार्यकारिणीमध्‍ये रोहित बागल (कोषाध्‍यक्ष), प्रसाद देशमुख (संघटक), अभिजित पतंगे, मयुर काकडे (उपाध्‍यक्ष), बाळासाहेब खोचरे (सचिव), मनोज सरडे (सहसचिव), गणेश उंबरे (सहसंघटक) यांच्‍या निवडी करण्‍यात आल्‍या.
    यावेळी बैठकीत यंदाच्‍या जिजाऊ जन्‍मोत्‍सवानिमित्‍त प्रतिवर्षाप्रमाणे विविध क्षेत्रामध्‍ये विशेष योगदान दिल्‍याबद्दल 'जिजाऊ पुरस्‍कार', 'शहाजीराजे क्रीडाभूषण पुरस्‍कार', 'राजर्षी शाहू समाजभूषण पुरस्‍कार', तसेच 'कर्मवीर मामासाहेब जगदाळे आदर्श शिक्षक पुरस्‍कार' या पुरस्‍कार निवडीबाबत विचार विनिमय करण्‍यात आला. यंदाच्‍या उत्‍सवानिमित्‍त पुरस्‍कार वितरण तसेच रक्‍तदार शिबीर आयोजित करण्‍याच्‍या निर्णय घेण्‍यात आला. 
       बैठकीला प्रा. भालचंद्र जाधव, प्रा. रवि निंबाळकर, प्रा. रवि शितोळे, महेश मुंडे, प्रा. वैजिनाथ खोसे, विजय देशमुख, जयदिप दळवे आदीजण उपस्थित होते.

Labels:

ग्रामीण बीटच्‍या विभाग प्रमुखपदी अशोक खडके

तुळजापूर :- सरडेवाडी (ता. तुळजापूर) येथील जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळेतील सहशिक्षक अशोक खरडे यांची महाराष्‍ट्र राज्‍य प्राथमिक शिक्षक संघ शाखा तुळजापूरच्‍या ग्रामीण बीटच्‍या प्रमुखपदी निवड झाली आहे.
      त्‍यांच्‍या या निवडीबद्दल शालेय समितीचे अध्‍यक्ष शरद धुरगुडे, मुध्‍याध्‍यापक मार्तंडे एस.आय., ग्रा.पं. सदस्‍य सौ. संध्‍या सरडे यांनी अभिनंदन केले आहे.

Labels: