Monday, 28 February 2022

नळदुर्ग येथे एका इसमाच्या निर्घृण खुन प्रकरणी अज्ञाताविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल

प्रतिकात्मक

नळदुर्ग , दि . २८ 



अज्ञात व्यक्तीने  अज्ञात  कारणावरुन एका ५५ वर्षीय इसमाच्या डोक्यात अवजड वस्तुने मारुन निर्घृण खुन करुन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह कालव्यात टाकल्याची घटना उस्मानाबाद जिल्ह्यातील  नळदुर्ग येथे  घडल्याची फिर्याद मयताच्या भावाने पोलिसात दिल्यावरुन अज्ञात मारेक-याविरुध्द नळदुर्ग पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. 



नळदुर्ग पोलीस ठाणे : इंदिरानगर, नळदुर्ग, ता. तुळजापूर येथील संजय हनुमंत कोळी, वय 55 वर्षे यांचा दि. 24- 25.02.2022 रोजी दरम्यान अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी काहीतरी अवजड वस्तू डोक्यात मारुन खून केला. तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने संजय कोळी यांचा मृतदेह नळदुर्ग ग्रामस्थ- सुधीर पाटील यांच्या शेतातील कॅनलमधील पाण्यात टाकला. अशा मजकुराच्या मयताचा भाऊ- लक्ष्मण हनुमंत कोळी यांनी दि. 27.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 302, 201 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

Labels:

सब ज्युनियर सॉफ्ट टेनिस स्पर्धेत उस्मानाबाद जिल्हा संघाची चमकदार कामगीरी



 तुळजापूर , दि . २८ 


सांगली येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय सब ज्युनियर  सॉफ्ट टेनिस स्पर्धेत उस्मानाबाद संघाने तीन सुवर्ण पदक, तीन रौप्य पदक पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली. तसेच टीम इव्हेंट मध्ये चमकदार कामगीरी करत उस्मानाबाद जिल्हा संघाने रौप्य पदकाची कमाई केली.  यशस्वी खेळाडूंचे कौतुक होत आहे. 


महाराष्ट्र राज्य सॉफ्ट टेनिस असोसिएशन आणि सांगली जिल्हा सॉफ्ट टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आठवी सबज्युनियर राज्यस्तरीय टेनिस स्पर्धा  दि. २५ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी दरम्यान पार पडली.  या स्पर्धेत उस्मानाबाद जिल्हा संघाने घवघवीत यश प्राप्त केले.

   
या संघाला प्रशिक्षक संजय नागरे, हेमंत कांबळे, राहुल जाधव, जिल्हा सॉफ्ट टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष संदीप गंगणे, सचिव शेख यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडूंवर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. 

●  सुवर्ण पदक ●


 यश हुंडेकरी ( मुले एकेरी) , प्रियांका हंगरगेकर ( मुली एकेरी)  कृष्णा थिटे व यश हुंडेकरी (मुले दुहेरी)

● रौप्य पदक ●

कृष्णा थीटे  (मुले एकेरी) , प्रियांका हंगरगेकर, यश हुंडेकरी (मिश्र दुहेरी) , कृष्णा थिटे, उन्मेष माळी, यश हुंडेकरी, प्रथमेश अमृतराव, समर्थ शिंदे, श्रेयस गायकवाड, हर्षवर्धन गुळवे ईत्यादी.

Labels:

कुंभारी येथे मराठी भाषा दिनानिमित्त वकृत्व स्पर्धा संपन्न


काटी , दि . २८ :

तुळजापूर तालुक्यातील कुंभारी येथे मंगळवार दि.28 रोजी सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना वीज कामगार संघटनेचे तालुकाध्यक्ष खंडु बब्रुवान कुंभार यांच्या वतीने  मराठी भाषेतील ज्येष्ठ साहित्यकार आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिनानिमित्त शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अविनाश इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी वकृत्व स्पर्धा घेऊन  मराठी भाषा दिन उत्साहात  साजरा करण्यात आला.


 आजच्या नवीन पिढीला महाराष्ट्राचा इतिहास,मराठी भाषेचा इतिहास, मराठी साहित्य समजावे व वकृत्व स्पर्धेच्या  माध्यमातून मराठी भाषेला दिशा देण्यासाठी व मराठी भाषेचे संवर्धन होण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांसाठी "मराठी भाषेचे महत्त्व" हा विषय देऊन वकृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते.
       

या स्पर्धेत लहान गट व मोठा गट विभाग करण्यात आले होते. लहान गटातून प्राजक्ता दुरुगकर, आर्यन काळे, जिया पठाण, कल्याणी कुंभार यांनी सहभाग नोंदवून तर मोठ्या गटातून रामेश्वरी तांबे, प्रज्ञा कापसे, साक्षी तांबे यांनी सहभाग घेऊन रोख स्वरूपात प्रोत्साहनपर बक्षीस पटकावले.
         

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रताप तांबे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अविनाश इंगळे सुहास वडणे, आयाज पटेल, अमिरुद्दीन पटेल, डॉ.गोविंद तांबे, खंडू रोकडे, राहुल क्षिरसागर, महावीर जगताप, दाऊद मुलानी, तात्यासाहेब पारधे आदी मान्यवरांसह शाळेचे मुख्याध्यापक दुरुगकर, सहशिक्षक विजयकुमार गायकवाड,  श्रीमती वासंती गायकवाड उपस्थित होते.

Labels:

जिल्हा परिषद मानमोडी शाळेतील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्पर्धेत केली पदकांची कमाई.


नळदुर्ग , दि . २८


सोलापूर सिंहगड इन्स्टिट्यूट केगाव येथे दुसऱ्या राष्ट्रीय लाठी स्पर्धेत मानमोडी ता .तुळजापूर येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी लाठी  स्पर्धेत अनेक पदकांची कमाई केली. विजेत्या खेळाडू व मुख्याध्यापक विक्रम पाचंगे यांचे सर्वञ कौतुक व आभिनंदन केले जात आहे.


 यामध्ये प्रसाद दिनेश राठोड सुवर्ण पदक ,दीपक कदम ,आर्यन सुरवसे, कृष्णा सुरवसे ,आर्यन आडे, यश राठोड, श्रद्धा सुरवसे ,अंकिता सुरवसे, सोहम कदम सिल्वर मेडल, व शुभम कदम आदी विद्यार्थ्यांनी  ब्रांझ या  पदकांची कमाई केली.  या स्पर्धेसाठी महाराष्ट्र,कर्नाटक, तेलंगणा, गुजरात, मध्य प्रदेश, दिल्ली, हरियाणा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश ,बिहार आदी राज्यातून स्पर्धक विद्यार्थ्यांनी भाग घेतला. 


या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून उत्तम प्रकाश खंदारे  माजी आमदार तथा क्रीडा राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य, सौ सविता व्हंडरे निष्ठा इंडिया अँटिकरप्शन कौन्सिल अध्यक्ष, शिवकन्या शिवानी देशमुख,सुभाष चौगुले   सामाजिक कार्यकर्ते केगाव , मोहिते सुभाष महागुरू ,राष्ट्रीय अध्यक्ष अजय शहा, सायराबानू शेख राष्ट्रीय लाठी महासचिव ,माशाळे  फाउंडेशन समन्वयक ,प्रकाश चव्हाण जिल्हा परिषद सदस्य उस्मानाबाद, प्रशांत नवगिरे जिल्हाध्यक्ष मनसे उस्मानाबाद ,सतिष पिसे , धनराज रेणुके मुख्याध्यापक संभाजी नगर जळकोट, गुणवंत चव्हाण  फाउंडेशन जिल्हा समन्वयक उस्मानाबाद, शिवानंद अंकलकोटे सामाजिक कार्यकर्ते, श्रीशैल व्हंडरे सामाजिक कार्यकर्ते, दत्ता सामंत सामाजिक कार्यकर्ते सोलापूर ,तुकाराम डिगोळे वन परिमंडळ अधिकारी उमरगा ,माधव डिगोळे ,भोसले प्रकाश, शिवराम भोसले, विक्रम पाचंगे मुख्याध्यापक मानमोडी महंमदरफी शेख टेक्निकल डायरेक्टर या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला. 


यावेळी लाठी हा शिवकालीन पारंपारिक खेळ आहे व तो सर्वांनी जोपासला पाहिजे अशी प्रतिक्रिया कार्यक्रमाचे अध्यक्ष उत्तम प्रकाश खंदारे  यांनी व्यक्त केली. तर लाठी हा खेळ आजच्या परिस्थितीला खूप महत्त्वाचा असून महिला सक्षमीकरणासाठी व सुरक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे अशी प्रतिक्रिया सविता व्हडरे यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे आभार मुख्याध्यापक विक्रम पाचंगे यांनी मानले.

Labels:

Sunday, 27 February 2022

तुळजापूर तालुक्यातील वडाचा तांडा येथे ७६ बालकांना दिले पोलिओ डोस

नळदुर्ग ,दि . २७ 

 तुळजापूर तालुक्यातील  वडाचा तांडा ( होर्टी) येथे पोलिओ लसीकरण मोहिमेचे रविवार दि . २७ फेब्रुवारी रोजी शुभारंभ करण्यात आले. यावेळी ७६ लाभार्थी बालकांना पोलिओ डोस देण्यात आले.

यावेळी सरपंच सौ. विजया चव्हाण, उपसरपंच सौ.निमबाई राठोड,सदस्य लखन चव्हाण,जयराम चव्हाण,फुलचंद चव्हाण,सुनील जाधव, विजय राठोड ,ग्रामसेवक सी आर अवया , आशा कार्यकर्ती बबिता राठोड, मदतनीस अनिता चव्हाण,विकास चव्हाण  आदी उपस्थित होते.


Labels:

कवयित्री भाग्यश्री केसकर पद्मश्री नामदेव ढसाळ काव्यप्रतिभा पुरस्काराने सन्मानित


 उस्मानाबाद, दि. २७

येथील कवयित्री भाग्यश्री केसकर यांच्या ‘उन्हानं बांधलं सावलीचं घर’ या कवितासंग्रहास जाहीर झालेला पद्मश्री नामदेव ढसाळ काव्यप्रतिभा पुरस्कार रविवारी मराठी राजभाषा दिनी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.


महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कोषाध्यक्ष सुनिता राजे पवार, आमदार जयदेव गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार महावीर जोंधळे, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा राजगुरुनगरचे अध्यक्ष संतोष गाढवे यांची प्रमुख उपस्थिती होती.


कवयित्री केसकर या शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात अधिपरीचारिका पदावर कार्यरत असून त्यांचा कवितासंग्रह जानेवारी 2020 मध्ये प्रकाशित झाला. मुंबई येथील ग्रंथालीने प्रकाशित केलेल्या या कवितासंग्रहाला यापूर्वी बडोदा येथील अखिल भारतीय पातळीवरील अभिरुची साहित्य गौरव पुरस्कारासह उमरगा येथील महात्मा ज्योतिबा फुले राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार, लातूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार, मंगळवेढा येथील शब्दकळा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार, कोपरगाव येथील भि. ग. रोहमारे ट्रस्टचा उल्लेखनीय ग्रंथ सन्मान पुरस्कार मिळाला आहे. पद्मश्री नामदेव ढसाळ काव्यप्रतिभा पुरस्कार मिळाल्याबद्दल भाग्यश्री केसकर यांचे अभिनंदन होत आहे.
 

Labels:

पोलिओ लसीकरण मोहिमेचा अस्मिता कांबळे यांच्या हस्ते बालकास पोलिओचा डोस देऊन शुभारंभ


उस्मानाबाद , दि . २७ : 

येथील नागरी प्राथमिक  रुग्णालय वैराग रोड,उस्मानाबाद येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम 2022 चा अस्मिता कांबळे जिल्हा परिषद अध्यक्ष उस्मानाबाद यांच्या हस्ते बालकास पोलिओचा डोस देऊन शुभारंभ करण्यात आला.

 
यावेळी बालकांच्या आई-वडिलांना पोलिओचे महत्त्व समजावून देण्यात आले व दर वेळी पोलिओ मोहीमेला दुर्लक्ष न करता  5 वर्षाच्या आतील बाळाला पोलिओ डोस द्यावा असे आव्हान करण्यात आले. यावेळी अस्मिता कांबळे जिल्हा परिषद अध्यक्ष उस्मानाबाद, डॉ. नितिन बोडके जिल्हा आरोग्य अधिकारी,  डॉ. कांबळे नोडल ऑफिसर महाराष्ट्र राज्य, डॉक्टर धनंजय पाटील जिल्हा शल्यचिकित्सक उस्मानाबाद, डॉक्टर कुलदीप मिटकरी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. सी.के ऐवाळे, डॉ. शकील अहमद खान वैद्यकीय अधिकारी नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक 1, डॉ. मृणाल धावारे, डॉ. सोनाली शिंदे, बाळासाहेब काकडे, एम पी डब्ल्यू मगर,  श्रीमती शीतल गायकवाड, रत्नाकर पाटील, श्रीमती शेटे ए एन एम  तसेच PHN गायकवाड,फार्मासिस्ट सुमेध बनसोडे,सुहास चौहान, स्टाफ नर्स नीता डुकरे तसेच नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी सहकारी उपस्तीत होते,मोठ्या संख्येने लाभार्थी यावेळी हजर होते यानंतर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र-1 चे वैद्यकीय अधिकारी यांनी सर्वांचे आभार मानून पल्स पोलिओ लसीकरण पुढे चालू ठेवण्यात आले.

Labels:

कर्तव्याच्या जाणिवेतून मंगरुळ बीटने आर्थिक मदत करत ‘ऋणानुबंध’ जपले


काटी , दि . २७ : उमाजी गायकवाड

 हुशार; परंतु गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी, अपघातात मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला मदत, कोरोना काळात गरजु कुटुंबांना किराणा साहित्याची मदत करून स्वावलंबी करणाऱ्या तुळजापूर तालुक्यातील शिक्षण क्षेत्रातील मंगरुळ बीटच्या पुढाकाराने सातत्याने मदत करुन ऋणानुबंध जपण्याची परंपरा कायम जपली आहे. कर्तव्याची जाण असलेल्या या मंगरुळ बीटने उस्मानाबाद तालुक्यातील मौजे नितळी येथील कु. अंकिता बालाजी कुंभार हिने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत उस्मानाबाद येथील भोसले हायस्कूल मधून कोणत्याही खासगी शिकवणी क्लासमध्ये ट्युशन न लावता तिचा सेमी गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज मध्ये प्रवेश मिळवला. 


परंतु वडिलांच्या अकाली निधनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या कुंभार कुटुंबात कमावती व्यक्ती कोणीच नसल्याने तिचे पुढील मेडिकलच्या शिक्षणावर आर्थिक अडचणीमुळे प्रश्न चिन्ह उभे राहिले होते. हि गोष्ट मंगरुळ बीटचे सतर्क विस्तार अधिकारी मल्हारी माने यांच्या लक्षात आली.सामाजिक बांधिलकीची जाणीव व मुख्य दुवा असलेल्या मंगरुळ बीटच्या व्हाट्सअप गृपच्या माध्यमातून त्यांनी बीटमधील आपले सहकारी शिक्षक मित्र, संबंधित दानशूर व्यक्ती यांचेकडे मदतीचे आवाहन केले. 


या आवाहनाला बीटमधील शिक्षकांनी सकारात्मक प्रतिसाद देत मदत निधी जमा करून कु.अंकिता, तिची आई सरस्वती बालाजी कुंभार यांचेकडे पुढील मेडिकलच्या शिक्षणासाठी विस्तार अधिकारी मल्हारी माने, नांदुरी केंद्राचे केंद्र प्रमुख संजय वाले, येवती केंद्राचे केंद्र प्रमुख विठ्ठल गायकवाड, मुख्याध्यापिका नागर सोनार, सहशिक्षिका श्रीमती दिपा जाधव, श्रीमती आदटराव, श्रीमती वर्षा कोल्हाळे, सहशिक्षक भोयटे, साखरे, क्षिरसागर, बागवान,वाघमाडे, पाटील यांच्या हस्ते 76 हजार 300 रुपयेंचा सुपर्द केला.
   

 मंगरुळ बीटमधील शाळेच्या माध्यमातून विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असून आर्थिक मदतही केली जात आहे. आतापर्यंत कंत्राटी कर्मचारी सचिन पडवळ यांचे अकाली निधन झाल्याने त्याच्या कुटुंबीयांना 115000/- एक लाख पंधरा हजार रुपये मदतनिधी दिला, एप्रिल 2020 मध्ये लॉक डाउन कालावधीमध्ये बीट मधील 116 गरजू कुटुंबांना प्रत्येकी पाचशे रुपयाचे किराणा साहित्याच्या किटचे वाटप करण्यात आले, जून 2020 पूर्वी बीटमध्ये कार्यरत असलेल्या व नंतर बीट मधून बदली होऊन गेलेल्या शिक्षिका श्रीमती शशिकला कोळी यांचे अपघाती निधन झाल्याने त्यांच्या मुलांना 46000 रुपये निधी जमा करून दिला, 
जून 2021 मध्ये बीट मधील माध्यमिक विद्यालय चिवरी या शाळेतील उपक्रमशील शिक्षक  चंद्रकांत कांबळे यांचे कोरोनामुळे अकाली निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांना 3,54000/- तीन लाख 54 हजार रुपयांचा धनादेश दिला.
     

विस्तार अधिकारी मल्हारी माने यांच्या पुढाकाराने कर्तव्याच्या जाणिवेतून स्वयंप्रेरणेने बीटमधील सहकारी शिक्षकांच्या मदतीने  दर महिना ठराविक रक्कम जमा करून आर्थिक परिस्थितीमुळे त्यांची शैक्षणिक संधी वाया जाऊ नये ही सामाजिक जबाबदारी व कर्तव्याची जाणीव ठेवून ऋणानुबंध जपण्याची परंपरा कायम जपली आहे. या सामाजिक उपक्रमाबद्दल मंगरुळ बीटचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


‘हुशार व गरीब विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करून शिक्षण घेतात. केवळ आर्थिक परिस्थितीमुळे त्यांची शैक्षणिक संधी वाया जाऊ नये, या जबाबदारीने, कर्तव्याची जाणीव ठेवून आम्ही हा उपक्रम हाती घेतला. यात दानशूर व्यक्तींचा सहभाग वाढल्यास आम्हाला जास्त मुलांना मदत करता येईल.‘यापुढे आम्ही बीट मधील संत गाडगेबाबा आश्रम शाळेतील अभिजित बागल यांचे अपघाती निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांना मदत करणार आहोत...
  - विस्तार अधिकारी 
    मल्हारी माने, 
मंगरुळ बीट, ता. तुळजापूर

Labels:

जगण्याचा आनंद देणारी माय मराठी - डॉ शिवाजीराव देशमुख

तुळजापूर, दि.२७ 


 श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे कवि कुसुमाग्रज जन्मदिनी मराठी राजभाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.


 सर्वप्रथम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एम मणेर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले, आपल्या मार्गदर्शनपर भाषणात डॉ देशमुख म्हणाले की, मराठी भाषा ही जगातील सर्वोत्तम भाषा पैकी एक आहे,

  जैसी दीपांमाझि दिवटी 
का तिथींमाझि पूर्णिमा गोमटी
तैसी भाषांमध्ये मऱ्हाटी, सर्वोत्तम
अशा शब्दांत माय मराठीचे वर्णन करता येईल, मराठी भाषा शोभिवंत आहे,व्यक्तीमत्व घडविण्याची शक्ती मातृभाषेत असते,खरे पहाता मराठीचे  सामर्थ्य हे तिच्या व्यवहरात दिसून येते,ज्ञान आणि विद्येचा प्रसार फक्त मातृभाषेतून होत असतो, त्यामुळे जनभाषा या ज्ञानभाषा होणे आवश्यक आहे,माय मराठचा अभिमान बाळगताना इतर भाषेचा अनादर होता कामा नये,भाषा व्यवहारामध्ये शुध्दतेच्या कर्मकांडामध्ये भाषा अडकू नये.मराठी भाषेचा प्रचारासाठी साहित्यामध्ये भाषांतर प्रक्रीया वाढीस लागणे गरजेचे आहे,मराठी भाषा शिक्षण शाळा महाविद्यालये व विद्यापीठे अशा विविध स्तरावरुन नियोजन बध्द पध्दतिने प्राप्त होण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली.

अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एम मणेर म्हणाले की, मायबोली मराठीच्या विकासासाठी सकारात्मक प्रयत्न गरजेचे आहेत, मराठी साहित्यिकांमध्ये आजतागायत एकुण चार लेखकांना ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला आहे, साहित्य विश्वात सुखात्मक साहित्य निर्माण होणे गरजेचे आहे, आपल्या साहित्यात नायक विजयी होत असतो तर खलनायक आपल्या कर्मामुळे पराजित होत असतो  सत्य मेव जयते  चे संस्कार भारतीय संस्कृती शिकवते त्या मुळे साहित्य, सिनेमा मध्ये शेवटी सत्या चा विजय मनाला समाधान देतो.  दुःखातमक .शोक नाट्य शेवट मनाला बरं वाटत नाहीआणि ही आपली परंपरा देखील आहे,मराठी भाषेचा वापर व्यवहारात झाला तरच तिचे आयुष्य वाढीस लागेल.भाषा व्यवहारात न्युनगंड नको,आपण भाषेला मर्यादेत बांधू शकत नाहीत,भाषा विकासासाठी अन्य भाषेचे शब्द स्विकारावे लागतील, वाचन संस्कृती वाढीस लागली तर भाषा विकासाला निश्चित बळ मिळेल,आज जागतिकीकरणाच्या काळात एका व्यक्तीला कमीतकमी दोन भाषा येणे गरजेचे आहे, आधुनिक काळात भाषेचे व्यवस्थापन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सोहन कांबळे यांनी तर आभार प्रा.डॉ.रामा रोकडे यांनी मानले.सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Labels:

तुळजापूर तालुक्यातील येवती येथे शिवजन्मोत्सवसोहळ्या निमित्त किर्तन सोहळा संपन्न

           
 चिवरी , दि . २७ : राजगुरू साखरे

तुळजापूर तालुक्यातील येवती येथे रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि,२६ रोजी  सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीतर्फे कु. मुक्ताई महाराज चाळक व कु. उन्नती ताई महाराज तांबे यांचा जुगलबंदी कीर्तन सोहळा संपन्न झाला. 

दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी येवती येथे शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे, समितीतर्फे दि . १९ फेब्रुवारीपासून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या किर्तन सोहळ्यास शिवजन्मोत्सव सोहळा समिती अध्यक्ष समाधान ढोले, उपाध्यक्ष क्रांतिसिंह तांबे, सचिव ईश्वर नाना शिंदे, सरपंच सौ पुजा अमोल गवळी, उपसरपंच प्रितम गायकवाड, आदींसह गावातील तरुण, महीला, भजनी मंडळ, वारकरी संप्रदायातील परिसरातील नागरिक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होत.

Labels:

तुळजापूरच्या शिवरूपसज्जा स्पर्धेत शंभुराजे जळके व आयुष केवटे यांना प्रथम पारितोषिक



तुळजापूर,  दि. २७ 

तुळजापूर येथे शिवजयंती निमित्ताने आयोजित केलेल्या शिवकालीन वेशभूषा स्पर्धेत मोठ्या गटामधून शंभूराजे शेळके आणि लहान गटामधून कु. आयुषी केवटे यांनी प्रथम पारितोषिक प्राप्त केले. 


दुपारी चार वाजेपासून सुरू असलेली शिवकालीन वेशभूषा स्पर्धा रात्री साडेनऊ वाजता संपन्न झाली, स्पर्धेसाठी तुळजापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शिवजयंती निमित्ताने तुळजापूर येथे शिवजन्मोत्सव समिती तुळजापूर संस्कार भारती तुळजापूर व विशाल रोजकरी मित्र मंडळ यांच्याकडून आयोजित केलेल्या शिवकालीन वेशभूषा संवाद स्पर्धेसाठी 114 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. छोट्या विद्यार्थ्यांनी शिवकालीन सादर केलेले प्रसंग पाहून उपस्थित शेकडो रसिक श्रोत्यांनी शिवपार्वती मंगल कार्यालय डोक्यावर घेतले. जय भवानी जय शिवाजी च्या घोषणांनी सभागृह दणाणून निघाले. टाळ्यांच्या कडकडाटात सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक झाले.

पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना माजी नगरसेवक विशाल रोचकरी, संस्कार भारती जिल्हा अध्यक्ष शामसुंदर भन्साळी, संगीततज्ञ सुरेश वाघमारे, अभाविप माजी प्रदेश उपाध्यक्ष गणेश जळके, नाट्यकलावंत सचिन घोडके, नाट्यकलावंत कु. संगीता कोळेकर ,परीक्षक सौ अश्विनी शिंदे, माजी नगरसेविका दीपाबाई मस्के यांच्या  हस्ते पारितोषिक देण्यात आले.

स्पर्धेचे उद्घाटन माजी नगरसेवक विशाल रोचकरी, नगरसेवक पंडित जगदाळे, संस्कार भारती प्रदेश लोककला प्रमुख डॉ. सतीश महामुनी, एनजीओ फेडरेशन राज्य समन्वयक तानाजी जाधव, अध्यक्ष पद्माकर मोकाशे, संयोजक प्रफुल्लकुमार शेटे, कोषाध्यक्ष अविनाश धट, संगीत प्रमुख नागेश धर्माधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. या स्पर्धेच्या मोठ्या गटामधून प्रथम पारितोषिक शंभुराजे जळके, द्वितीय पारितोषिक कुमारी तनवी खडके ,तृतीय पारितोषिक कु. सिद्धि साठे व कु.प्राची जाधव, चौथे पारितोषक स्वरांजली भोसले, पाचवे पारितोषक दुर्गेश्वरी झटे आणि उत्तेजनार्थ पाच अनुक्रमे कुमारी गार्गी कावरे, प्रणव ढेरे, वैष्णवी गुंड,  समर्थ त्रिकोणे,  व तमन्ना शेख यांना देण्यात आले. लहान गटामध्ये प्रथम पारितोषिक कु. आयुषी केवटे, द्वितीय पारितोषिक कु. स्विमीता सोनवणे, तृतीय पारदर्शक अर्णव म्हस्के, चौथे पारितोषक शिवतेज सूर्यवंशी, पाचवे पारितोषक आदर्श शिरसागर उत्तेजनार्थ पाच अनुक्रमे शरयू साळुंखे, शिवम शिरसागर, आराध्या जगताप, समृद्धी सपकाळ, स्वप्नाली पेंदे यांना देण्यात आले. परीक्षक म्हणून नाट्यकलावंत सचिन घोडके, कुमारी संगीता कोळेकर व सहशिक्षक सौ अश्विनी शिंदे यांनी कामकाज पाहिले. मान्यवरांचे स्वागत अध्यक्ष पद्माकर मोकाशे, अभिषेक लक्षणे, ओंकार लसणे, मयूर शेटे, संतोष डोईफोडे, रोहित भोसले, कुणाल बंडोडकर, यांनी केले. सूत्रसंचालन महामंत्री सुधीर महामुनी व संगीत प्रमुख प्रसाद महामुनी यांनी केले. आभार  प्रफुल्ल कुमार शेटे यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लक्ष्मीकांत सुलाखे, संदीप रोकडे, सौ अपर्णा शेटे, सौ सविता भोसले, धनाजी साठे, प्रेम दिवटे, राज भोरे, यांनी परिश्रम घेतले.

Labels:

नळदुर्ग येथे मराठी भाषा दिन उत्साहात साजरा


महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन,ग्रंथ पूजन,व मराठी भाषा प्रतिज्ञेचे वाचन,पत्रकार  सत्कारांचा सत्कार 

नळदुर्ग , दि. २७

 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मराठी राजभाषा दिन व कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्म दिनानिमित्त प्रतिमेचे पूजन,ग्रंथ पूजन,मराठी भाषा प्रतिज्ञेचे सामूहिक वाचन,व तसेच मराठी पत्रकार बांधवाचा सत्कार  आदि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रारंभी कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे व ग्रंथाचे पूजन पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे व  सचिव सुनील गव्हाने , मनसेचे जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे,शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी  यांच्या हस्ते पूजन करण्यात आले, त्यानंतर मराठी भाषा प्रतिज्ञेचे सामुहिक वाचन करण्यात आले,त्यानंतर शहरातील सर्व पत्रकार बांधवाचा सत्कार करण्यात आला,यावेळी जेष्ठ पत्रकार विलास येडगे,पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे,तानाजी जाधव,दादासाहेब बनसोडे, शिवाजी नाईक,डॉ.प्रा.दिपक जगदाळे, सुनील गव्हाणे,अजित चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे,जनहित कक्ष व विधी विभाग ता.अध्यक्ष ॲड.मतीन बाडेवाले, शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी,शहर उपाध्यक्ष  रमेश घोड़के, शहर संघटक रवि राठोड,मनविसे शहर सचिव आवेज इनामदार, आदि उपस्थित होते,


कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांच्या मार्गदर्शनाख़ाली मनविसे शहराध्यक्ष सूरज चव्हाण यांनी केले,तर सूत्रसंचालन,प्रास्ताविक प्रमोद कुलकर्णी यांनी केले.

Labels:

Saturday, 26 February 2022

वसंत ऋतुची चाहुल ; नळदुर्ग परिसरात पळस बहरला


नळदुर्ग , दि .२६ : विलास येडगे


 नळदुर्ग परीसरात पळस फुलाने बहरल्याने नागरीकांना उन्हाळ्याची चाहुल लागली आहे. सध्या उन्हाची तीव्रता वाढली आहे. उन्हाळ्यात डोंगर--माळरानावर पळस फुलाने बहरलेला पाहणे म्हणजे डोळ्याचे पारणे फेडून घेतल्यासारखे आहे . डोंगर - माळरानावर पळस फुलाने बहरू लागला की समजायचे आता उन्हाळा सुरू होणार. 



फुलाने बहरलेला पळस अतीशय सुंदर दिसतो. केशरी रंगाच्या फुलांनी बहरलेला पळस पाहणे म्हणजे डोळ्याचे पारणे फेडून घेण्यासारखे आहे. निसर्गाचा हा एक चमत्कारच आहे. या फुलांपासून रंगही बनविला जातो.पुर्वी रंगपंचमीला या पळसाच्या फुलांचाच रंग केला जायचा. हा रंग अतीशय गडद व शरीराला कुठल्याच प्रकारचा अपाय न करणारा म्हणुन ओळखला जायचा. पळसाच्या पानांच्या जेवणासाठी पत्रावळ्याही बनविल्या जातात.सध्या नळदुर्ग परीसरात पळस केशरी फुलाने बहरून गेल्याचे दिसुन येत आहे.

Labels:

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांची विविध गावाना सदिच्छा भेट ; ग्रामस्थांशी विविध विषयांवर साधला संवाद

अणदूर , दि . २६ : 


शेतकरी, कष्टकरी, कामगार, व इतर जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी, तसेच त्यांना महाविकास आघाडी सरकारच्या विविध योजनेचा लाभ कसा घ्यावा याचे मार्गदर्शन करण्यासाठी व कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी माजी मंत्री, मधुकरराव चव्हाण हे तुळजापूर तालुक्याच्या ग्रामीण भागाचा दौरा करीत आहेत,


 माजी मंञी मधुकरराव चव्हाण यानी तुळजापूर तालुक्यातील  चिवरी, उमरगा, येवती, आरबळी ,आरळी(बु.) या गावांचा दौरा केला व तेथील जनतेशी संवाद साधून विचारपूस केली तसेच अनेक शासकीय तक्रारी चे ताबडतोब निवारण केले,या दौऱ्याला जनतेचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला सलग 25 वर्ष आमदार असणारे, जनतेशी डायरेक्ट संपर्क असणारे चव्हाण  हे छोट्या छोट्या वाडी वस्तीवर या वयात फिरत असल्याने कौतुक जनतेतुन होत असून आपल्या विविध तक्रारी ते त्यांच्या पुढे मांडत होते, असा दररोज संपर्क दौरा संपूर्ण तुळजापूर विधान सभा मतदार संघात असणार असून रोज 4 ते 5 गावे करून जनतेचे प्रश्न सोडवणार असल्याचे त्यांनी  बोलताना सांगितले.

Labels:

तुळजापूर : गुणी रत्नांचा सत्कार ; तूळजापुरकरांनी करिअरच्या दुसऱ्या संधी शोधाव्यात - तहसीलदार तांदळे


तुळजापूर , दि . २६ : उमाजी गायकवाड

तुळजापूर शहराच्या नावलौकिकात भर टाकणाऱ्या तुळजापूर रत्नांच्या कर्तत्वाचा  सन्मान सोहळा शहरवासीयांच्या  वतीने आयोजित “तुळजापूर रत्न सन्मान कर्तृत्वाचा” हा कार्यक्रम गुरुवारी  लोहिया मंगल कार्यालयात   उत्साहात पार पडला. 


या कार्यक्रमामध्ये अष्‍टपैलू क्रिकेटपटू  राजवर्धन सुहास हंगरगेकर, महाराष्ट्र राज्य स्थापत्य अभियांत्रिकी परीक्षेत महाराष्ट्रामध्ये 17 वा रँक प्राप्त प्रथमेश प्रदीप हंगरगेकर, सी.ए. परीक्षा उत्तीर्ण झालेले सुरज सुधीर जाधव या तुळजापूरातील तीन रत्नांचा सत्कार  तहसीलदार सौदागर तांदळे,पोलीस उपअधीक्षक डॉ सई भोरे पाटील  यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ  देऊन करण्यात आला 


तसेच रोटरी क्लब तुळजापूरच्या वतीने रोटरी क्लबचे अध्यक्ष चंद्रकांत गिड्डे, ब्रह्मकुमारी संचालिका उस्मानाबाद,सेवानिवृत्त प्राध्यापक घाडगे व पत्रकार उमाजी गायकवाड,महाडीक सर यांच्या वतीने या सर्व गुण रत्नांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तहसीलदार सौदागर तांदळे यांनी  या तीन गुणी रत्नांचे कौतुक करीत ते म्हणाले की, कुठल्याही स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळविण्यासाठी परीश्रम, चिकाटी, दीर्घ अभ्यास, सातत्य आणि योग्य मार्गदर्शन ही पंचसूत्रे अंगिकारल्यास आपली गुणवत्ता सिद्ध करता येत असल्याचे सांगून दहावी नंतरचा टप्पा तितकाच महत्त्वाचा असून भविष्यातील करिअरची दिशा दहावीच्या वळणानंतर निश्चित तर करिअरलाही अपेक्षे इतका चांगला आकार देणे शक्य असल्याचे सांगितले. अनेकदा दहावीनंतर कुठली शाखा निवडावी, कोणत्या शाखेनंतर कुठली शाखा निवडावी,  कोणत्या शाखेनंतर कुठल्या करिअरच्या संधी उपलब्ध असतात, त्यासाठी सुरुवातीपासून पूर्वतयारी कुठल्या स्वरूपाची करावी, विशिष्ट विद्याशाखेत निभाव लागण्यासाठी स्वतः जवळ कोणते गुण-कौशल्य असायला हवे, करिअरची वाट निवडताना स्वतः चा कल व धोके कसे ओळखावे आदी प्रश्नांवर सविस्तर मार्गदर्शन केले.  पालकांनीही विद्यार्थ्यांचा कल ओळखून त्यांना पाठिंबा देण्याचे आवाहन करुन तुळजापूरला काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल येथील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिल्याबद्दल समाधान व्यक्त करुन    या तुळजापूरच्या रत्नांनी प्रशासकीय सेवेचा फायदा तुळजापूर वासियांसाठी व सर्व सामान्यांसाठी करावा असे आवाहन करुन तुळजापूरकरांनीही आता सध्याच्या ह्या जागतिक महामारीच्या कोरोना संकटाच्या काळात जसे पुजारी मंडळींवर आर्थिक संकट ओढवले होते. त्याअनुषंगाने आता आपल्या पाल्ल्यासाठी करिअरच्या  दुसऱ्या संधी शोधण्याची काळाची गरज असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. तसेच नियोजन समितीने असा उल्लेखनीय कार्यक्रम राबविल्याबद्दल त्यांचे कौतुक करुन यापुढे अशा प्रकारे विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहनपर कार्यक्रम घेण्याचे आवाहन केले.
   

पोलीस सेवेत येण्यासाठी धिप्पाड व कनखर असण्यापेक्षा बुध्दीमान असण्याची गरज असून सध्या प्रशासकीय सेवेत येण्याची स्पर्धा वाढत आहे. यास्पर्धेत यश मिळविण्यासाठी शालेय व महाविद्यालयीन जीवनापासून तयारी केली तरी निश्चितच यश मिळविता येते. महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे प्रशासकीय सेवेत येण्याचा महामार्ग आहे. महिलांनी स्पर्धा परिक्षा देऊन पोलीस सेवेत यावे.


डॉ. सौ.मई भोरे पाटील 
पोलीस उपअधीक्षक, तुळजापूर


    या कार्यक्रमाप्रसंगी तुळजापूर शहराचे नगराध्यक्ष मा श्री सचिन भैया  रोचकरी, नगरसेवक अमर (भैया) मगर,पंडितराव जगदाळे, विजय कंदले, गुणरत्नांचे पालक अनिता हंगरगेकर, मनिषा हंगरगेकर, प्रदीप हंगरगेकर, सुधीर जाधव, रोहिणी जाधव,प्रा. राजेंद्र घाडगे तसेच राजकीय, शैक्षणिक, सामाजिक या क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती. कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा.श्री रमेश ननवरे सर व सूत्रसंचालन प्रा.डॉ आनंद मुळे  यांनी केले व धनंजय पाटील  यांनी आभार मानले.

Labels:

शेतकऱ्यांनी बदलत्या काळानुसार हवामानाचा अंदाज घेऊन शेती करावी : पंजाबराव डक पाटील


वागदरी , दि . २६ : एस.के.गायकवाड


देशातील मोठ मोठ्या कंपन्या,लघु उद्योग, मोठे उद्योग तांत्रिक आडचणीमुळे बंद पडू शकतात. पण शेती हा असा एकमेव उद्योग आहे की, तो कधीही बंद पडू शकत नाही.तेंव्हा शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज घेऊन नियोजनबध्द शेती करण्याचे आवाहन  महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक पाटील (परभणी) यांनी वागदरी ता.तुळजापूर येथे आयोजित कार्यक्रमात शेतकऱ्यांना केले.



  शिव-बसव-रणा-काशीबा महाराज जन्मोत्सव मंडळ वागदरी च्या वतीने शिवजयंती निमित्ताने वागदरी येथे आयोजित शिवसप्ताहामध्ये परभणी येथील प्रसिद्ध हवामान आभ्यासक पंजाबराव डक पाटील यांच्या व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच ज्ञानेश्वर बिराजदार हे होते. प्रारंभी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रतापसिंह महाराज, महात्मा बसवेश्वर, व थोर संत काशीबा महाराज यांच्या प्रतिमांचे पुजन उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते करून हवामानतज्ञ पंजाबराव डक पाटील यांच्या हस्ते गावातील जेष्ठ सेवानिवृत्त कर्मचारी शिवाजी मिटकर गुरूजी, अशोक धुमाळ गुरुजी,राजेंद्र पाटील, सुरेशसिंग परिहार, कृष्णा वाघमारे, संदिपान वाघमारे, राम बिराजदार, गोविंद गुरव आदी शासनाच्या विविध विभागातून शासकीय सेवा करून सेवानिवृत्त  झालेल्या जेष्ठ कर्मचाऱ्यांचा जन्मोत्सव मंडळाच्या वतीने फेटा पुष्पहार, व शिवप्रतिमा देवून  सत्कार करण्यात आला.
   

याप्रसंगी पंजाबराव डक पाटील प्रमुख मार्गदर्शक म्हणून  पुढे बोलताना  ते म्हणाले की,शेतकऱ्यानी परिस्थिती नुसार बदत्या हवामानाचा अंदाज बांधला पाहिजे. जसे की चिमणी पाखरे धुराळ्यात अंघोळ करत असतील, कांवळे आपले घरटे झाडाच्या मध्यभागी बांधत असतील, सरपटणारे प्राणी सतत जमीनवर येत असतील  तर समजावे की,यावर्षी वेळेत व चांगला पाऊस पडणार आहे. असा अंदाज बाधून शेतीची पेरणी पूर्व मशागत करून शेत जमीन पेरणीसाठी तयार ठेवावी. तसेच बियाणे स्वतःच तयार करून ठेवावे, बाजारातून सोयाबीन खरेदी करताना फुले संगम किंवा फुले किमया या जातीचे बियाणे वापरावे, रब्बी हंगामातील गहू, हरबरा ही पिके थंडीत येणारी आहेत . तेंव्हा वाटीत काढून ठेवलेले खोबरेल तेल ज्या दिवशी अळूण घट्ट होईल त्या दिवशापासुन गहू, हरभरा पिकांची पेरणी करावी. वेळच्या वेळी तननाशकाची फवारणी करावी .पश्चिम महाराष्ट्रात झाडे मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे तिथे पिकाना पुरक असा रिमझिम पाऊस पडतो .तर या उलट मराठवाड्यात झाडांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे येथील तापमानात वाढ होऊन वादळी वाऱ्यासह  गारपीटचा  पाऊस पडून पिकांचे नुकसान होते. त्यामुळे झाडे लावणे व ती जगविणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
   

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन अँड.अमोल पाटील यांनी केले. याप्रसंगी मंडळाचे सुरेंद्रसिंग ठाकूर, प्रमोद बिराजदार, भरतसिंग ठाकूर, महेश बिराजदार, योगेश सुरवसे, श्रीकार धुमाळ, लक्ष्मण बिराजदार, अमोल गोगावे, बाबूराव बिराजदार, दीपक धुमाळ, सौरव यादव, पंकज सुरवसे सह परिरातील शेतकरी, युवा कार्यकर्ते, ग्रामस्ध महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Labels:

तुळजापूर तालुक्यातील दहिटणा येथे मोफत नेत्र तपासणी व रक्तदान शिबीर


नळदुर्ग ,दि . २६ : 

शिवसेना जिल्हा प्रमुख , आमदार  कैलास  पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दहिटणा  ता . तुळजापूर येथे जनशुभदा फाउंडेशन व शिवसैनिकांच्या वतीने गावात मोफत नेत्र तपासणी व  रक्तदान शिबीर घेण्यात आले.

  सुरवातीला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून आभिवादन करण्यात आले. त्यानंतर  शिबिराला सुरवात झाली. यावेळी गावचे सरपंच अप्पसाहेब बिराजदार ,जनशुभदा फाउंडेशनचे संस्थापक अधक्ष तथा उपसरपंच सोमनाथ गुड्डे,  ,युवासेना उपतालुक प्रमुख सुनील कदम,  नागनाथ पाटील, शिक्षण समिती अधक्ष धनराज कदम,अनिल कदम,स्वामींनाथ राचेट्टी, अण्णा कदम,दत्ता कुंभार,प्रवीण बिराजदार ,ओंकार  नागरसे, राहुल गुड्डे, सैपन शेख, ग्रामपंचायत कर्मचारी, शिवसैनिक व ग्रामस्थ  उपस्थित होते.

 बॅनर बाजी किंवा वाढदिवस हे धुमधडाक्यात साजरा न करता या निमित्याने नेहमी समाज उपयोगी कार्यक्रम  राबवण्याचा मनोदय  सोमनाथ गुड्डे यांनी व्यक्त  केले.

Labels:

भक्ताकडुन नळदुर्ग रामतीर्थच्या प्राचिन मंदिरांचा जीर्णोद्धारास प्रारंभ


नळदुर्ग , दि . २६: विलास येडगे

 नळदुर्ग येथील प्राचिन, पवित्र व श्री प्रभु रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री क्षेत्र रामतीर्थ येथील ध्यान मंदिराचे रंगकाम व रामतीर्थ ट्रस्ट कार्यालयाचे रंगकाम तसेच पी. व्ही. सी. सिलिंग काम नळदुर्ग येथील रामभक्त डॉ. सत्यजीत डुकरे यांच्यावतीने तर रामतीर्थ येथील महादेव मंदिरात मार्बल फरशीचे काम रामभक्त मनिषसिंह हजारे यांच्यावतीने करण्यात येत आहे.
         

नळदुर्ग येथील श्री क्षेत्र रामतीर्थ अतीशय प्राचिन व पवित्र तीर्थक्षेत्र आहे. हे तीर्थक्षेत्र श्री प्रभु रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेले तीर्थक्षेत्र आहे. श्री प्रभु रामचंद्र याठिकाणी दोन वेळेस येऊन गेल्याचा उल्लेख इतिहासात आहे. याठिकाणी दररोज श्री प्रभु रामचंद्रांची पूजाअर्चा केली जाते. दर शनिवारी श्री मारुतीरायांची महाआरती तसेच हनुमान चालीसाचे पठण याठिकाणी केले जाते. या महाआरतीस शहरांतील युवक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. महाआरतीनंतर उपस्थित भाविकांना याठिकाणी महाप्रसाद दिला जातो. या महाआरतीसाठी भाविकांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे यासाठी  विष्णु महाराज शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन डुकरे, प्रभाकर घोडके, श्रीकांत  पोतदार,  ॲड. धनंजय धरणे यांच्यासह त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी प्रयत्न केले त्यांच्या प्रयत्नाला आज यश येतांना दिसत आहे.
        

या मंदिरात असणाऱ्या ध्यान मंदिराचे रंगकाम व रामतीर्थ मंदिर कार्यालयाचे रंगकाम तसेच पी. व्ही. सी. सिलिंग काम नळदुर्गचे सुपुत्र व मुरूम येथील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणुन कार्यरत असलेले डॉ. सत्यजीत डुकरे हे करून देत आहेत. तर याठिकाणी असणाऱ्या महादेव मंदिरात मार्बल फरशीचे काम नळदुर्ग शहरांतील तरुण उद्योजक मनिषसिंह हजारे यांच्या वतीने करण्यात येत आहे. नळदुर्ग शहरांतील दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातुन नळदुर्ग शहरांतील प्राचिन मंदिरांचा जीर्णोद्धार होत आहे. ही नळदुर्गकरांसाठी अभिमानाची बाब आहे. या दोन्ही रामभक्तांचे श्री रामतीर्थ देवस्थान ट्रस्टने अभिनंदन केले आहे.


Labels:

Friday, 25 February 2022

श्री तुळजाभवानी साखर कारखान्यात एक हजार एक साखर पोते उत्पादित

नळदुर्ग, दि. २५

बारा वर्षे बंद पडलेला श्री.तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखाना केवळ शेतकऱ्यांच्या विकासासाठी  सुरू केले आले असून नुकतेच  १ हजार १०१ पोते साखर उत्पादित झाली आहे.  शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रथम प्राधान्य  देणार असुन भविष्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडी अडचणी दुर होणार असल्याचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी बोलताना सांगितले.

नळदुर्ग येथिल  श्री.  तुळजाभवानी साखर कारखाना सुरु करुन शेतकऱ्यांना दिलासा देवुन कामगाराना न्याय दिल्याबद्दल  माजी मंञी मधुकरराव चव्हाण यांचा   आणि काँग्रेस प्रदेश सचिव तथा तुळजाभवानी कारखानाचे चेअरमन सुनील चव्हाण यांची उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याने नळदुर्ग शहर पत्रकार संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी मंञी मधुकरराव  चव्हाण हे बोलत होते.


याप्रसंगी नळदुर्ग शहर पञकार संघटनेचे अध्यक्ष  सुहास येडगे , सचिव सुनिल गव्हाणे, जेष्ठ पञकार  विलास येडगे , तानाजी जाधव , शिवाजी नाईक , उत्तम बणजगोळे , अजित चव्हाण , माजी नगरसेवक  सुधीर हजारे , बसवराज धरणे ,  सामाजिक कार्यकर्ते अमर भाळे ,  गणेश मोरडे , राहुल जाधव , नाभिक समाजाचे राजेंद्र महाबोले ,  प्रदिप ग्रामोपध्य आदी उपस्थित होते.

Labels:

Wednesday, 23 February 2022

तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील महालक्ष्मीच्या ' कायरं ' यात्रेमध्ये शेकडो भाविकांनी घेतले दंडवत



चिवरी , दि . २३ : राजगुरू साखरे

तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील महालक्ष्मी यात्रेत शेकडो भाविकांनी दंडवत घेतला, यावेळी आराधी, वाघ्या, मुरळी पोतराज गीताने मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.यंदाही कोरोनाच्या सर्व नियमाचे पालन करीत यात्रेची बुधवारी  दि.२३ रोजी धार्मिक कार्यक्रमांनी सांगता झाली.



 दोन दिवस चालणाऱ्या यात्रोत्सवात महालक्ष्मीच्या दर्शनासाठी राज्यासह परराज्यातून हजारो भाविक दाखल झाले होते. यात्रेनिमित्त सोमवार व मंगळवार च्या मध्यरात्री १२:३० वाजता देवीचा अभिषेक व महापूजा आरती करण्यात आली. यानंतर गाव ते मंदिर या एक किलोमीटर अंतरावर दंडवत व लिंबाच्या पाल्याने रस्ता झाडण्यात आला. यामध्ये गावातील शेकडो भाविकांनी सहभाग नोंदवला होता. यानंतर सकाळी आंबट भाताची दुरडी वाजत गाजत पोतराज ,आराधी, जान्या मुरळ्या यांच्यासह बनसोडे यांच्या घरी पोहोच करण्यात आली. मंगळवारी दिवसभरात मानकरी वाणी पाटील ,मराठा पाटील यांच्या वाड्यावर जाणे घोंगड्यात भात झेलणे यासह मानपानाची विधी पार पडले. यानंतर रात्री दहा वाजता होमामध्ये धार्मिक विधी पार पडल्यानंतर भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला, रात्री बारा वाजता आताषबाजी हलगीच्या वाद्यांसह महालक्ष्मीची‌ पालखीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. बुधवारी दि,२३ फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजता पान आणि लिंबू यांचा घाव घेण्याचा कार्यक्रम झाला, यानंतर पालखी मानाच्या पुजाऱ्याच्या घरी प्रस्थान करण्यात आली. यात्रेनिमित्त मंदिरापासून ते स्नानगृहापर्यत आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. 

महालक्ष्मीच्या यात्रेला ' कायरं याञा ' या नावानेही ओळखले जाते. तसेच देवस्थान ट्रस्टच्यावतीने, पुजारी मंडळ  ग्रामपंचायतीच्या वतीने यात्रेकरूंसाठी सर्व सोयी करण्यात आल्या होत्या. यात्रेसाठी नळदुर्ग  पोलीस स्टेशनचा तगडा बंदोबस्त करण्यात आला होता . 


दरम्यान मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास यात्रेमध्ये पारधी समाजाच्या दोन गटात शाब्दिक चकमक होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. दोन्ही गटाने एकमेकांना तलवारी, दगड ,काठ्यांनी मारहाण केली. या अचानक झालेल्या भांडणामुळे यात्रेतल्या भाविक रानावनातून सैरभैर पळत सुटले , यावेळी पोलीस बंदोबस्तावर असलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन जमावाला पांगवण्यात आले. या घटनेमुळे गाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

Labels:

नळदुर्ग : राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त नगरपरिषद स्वच्छता कर्मचा-यांचा गौरव

नळदुर्ग ,दि . २३

राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून नळदुर्ग नगरपालिकेच्या स्वच्छता विभागातील  कामगारांचा मान्यवरच्या हस्ते सत्कार  करण्यात आले.


यावेळी व्यासपीठावर नळदुर्ग शहर संघ पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुहास येडगे, सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव, जेष्ठ पत्रकार विलास येडगे, शिवाजी नाईक, तानाजी जाधव, अजित चव्हाण, अमर भाळे, दादासाहेब बनसोडे, माजी नगरसेवक सुधीर हजारे,  भाजपाचे शहराध्यक्ष  पद्माकर घोडके ,  खलील शेख, मुश्ताक पटेल ,  राणूबाई सपकाळ, हरिभाऊ फुंड, मयुरी जाधव आदि उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हास्ते   राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर स्वच्छता कर्मचारी उषाबाई कांबळे, जयश्री बनसोडे, शोभा कांबळे, करुणा कांबळे, चंद्रकला खारवे, मिनाबाई भालेराव, सूंक्षता रणे, मनीषा साबळे, संगीता काळे, मीराबाई काळे, रुक्मिण माने, रेश्मा कांबळे, वाल्मिक खारवे, शैलेश बनसोडे, आनंद खारवे, भिमा कोळी, भारत पारधे, आदिसह इतर कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजक माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन विनायक अहंकारी यांनी केले. मान्यवरासह कर्मचाऱ्यांनी यावेळी  रस्त्याची  स्वच्छता केली.


या कार्यक्रमास खंडू नागणे , अजय काकडे ,नवनाथ  होनराव , शहाजी येडगे , शैलेश बनसोडे , अनंत खारवे ,  मुकूंद भुमकर ,  दिपक कांबळे ,  खंडू शिंदे , दिनेश चव्हाण , फुलचंद सुरवसे , बाबा पारधे, सुनिल देडे , भिमसेन भोसले ,  विठ्ठल खंदारे , हारिदास काळे , आदी उपस्थित होते.

Labels:

नळदुर्ग : जनता दरबारात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी जाणून घेतल्या नागरिकांच्या विविध समस्या


नळदुर्ग ,दि . २३ :  एस.के.गायकवाड

 आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दि.२२ फेब्रुवारी  रोजी नळदुर्ग येथे आयोजित  जनता दरबारमध्ये नागरिकांच्या  जाणून घेतल्या  विविध समस्या
  


नळदुर्ग शहरातील विकास कामाला चालना मिळावी या उद्देशाने थेट जनतेतून समस्या जाणून घेण्यासाठी व  त्या समस्येचे निवारण करण्याकरिता आमदार राणाजगजितसिह पाटील  यांनी नळदुर्ग येथील नगरपरिषद कार्यालयाच्या प्रागंणात मंगळवारी  जनता दरबार भरवला. या जनता दरबारास जनतेतून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला असून सभागृह बांधकाम, रमाई आवास,पंतप्रधान आवास घरकुल योजना, अंतर्गत रस्ते,गटार,पाणी पुरवठा, पथदिवे, पाण्याच्या टाकीचे बांधकामसह जवळपास २५० हून अधिक समस्या यावेळी नागरिकांनी लेखी स्वरूपात नोंदविल्या.
  
या जनता दरबारात लेखी स्वरुपात नोंदविलेल्या समस्यांचे निवारण करण्यासाठी संबंधीत त्या त्या खात्यतील कर्मचारी व आधिकारी याना बोलविण्यात आले होते. प्रत्येकाने आपापल्या खात्यासी संबंधीत समस्यांचे निवारण केले.
  आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शहर विकास कामाला चालना मिळावी म्हणून राबविलेल्या जनता दरबार या आनोख्या उपक्रमाबद्दल नागरिकांतून समाध व्यक्त केले जाते आहे.
    

याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्षा अस्मिता कांबळे, नगरसेवक उदय जगदाळे, भाजपा शहराध्यक्ष धिमाजी घुगे, माजी शहराध्यक्ष पद्माकर घोडके, सुशांत भूमकर, श्रमिक पोतदार, संजय जाधव, जिलानी कुरेशी, सचिन घोडके, सुनील बनसोडे, दादासाहेब बनसोडे, सागर हजारे, रियाज शेख,रिपाइं (आठवले)चे शहराध्यक्ष दत्ता बनसोडे, कार्याध्यक्ष महादेव कांबळे, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत कांबळे सुनील जाधव मुदस्सर शेख, कृषी मंडळ अधिकारी डि.डी.सरवदे, ए.व्हि. घिरडे, डी.पि.बिराजदार,नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे,पिराजी तायवाडे, नळदुर्ग प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ राहुल जानराव, महावितरणचे सहाय्यक अभियंता प्रवीण गायकवाड, मंडळ अधिकारी जयंत गायकवाड, तलाठी तुकाराम कदम, नगरपालिका कार्यालयीन अधिक्षक लक्ष्मण कुंभार,अजय काकडे, समीर मोकाशी आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Labels:

Monday, 21 February 2022

शिवशाहीर अरविंद घोगरे यांचा उमरग्यात शाहिरी कार्यक्रमाचे आयोजन


कळंब , दि .२१

येथील मराठा सेवा संघ,जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने उमरगा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर मंगळवार दि .  22  फेब्रुवारी  रोजी रात्री आठ वाजता  शिवशाहीर अरविंद घोगरे जालना यांचा शाहिरी कार्यक्रम  होणार असून या कार्यक्रमाला शहर व तालुक्यातील शिवप्रेमी नागरिकानी  सहभागी व्हावे असे आवाहन मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब माने, जिल्हा सल्लागार शांतकुमार मोरे, तालुकाध्यक्ष भारत कापसे सचिव भूमिपुत्र वाघ, कार्याध्यक्ष प्रा. मुरलीधर जाधव, संघटक सुरज सूर्यवंशी शहराध्यक्ष पप्पू सगर, विश्वनाथ महाजन  यांच्या वतीने करण्यात आले.

Labels:

सकल मध्यवर्ती शिवजन्मोत्सव समिती आयोजित शिबीरात ४०६ दात्यानी केले रक्तदान


कळंब ,दि . २१

सकल मध्यवर्ती शिवजन्मोत्सव समिती आयोजित महारक्तदान शिबीराचे उद्घाटन शिवाजी कापसे  यांच्या हस्ते करण्यात आले
या महारक्तदान शिबिरात ४०६ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

 
या कार्यक्रमासाठी उपस्थित खा.ओमराजे निंबाळकर,आ.कैलास पाटील, अभय देशपांडे,शिवाजी कापसे, श्रीधर भवर,अजित पिंगळे, पांडुरंग कुंभार,संजय  मुंदडा, अजित काळे,मुस्ताक खुरेशी, प्रताप मोरे, अनंत वाघमारे,सतीश टोणगे, संदीप बाविकर, बाळासाहेब धस,दिनकर काळे,शकुंतला फाटक,महादेव आडसुळ, प्रकाश भडांगे, माधवसिंग राजपूत, रवी नरहिरे, शिवाजी गिद्दे, अरविंद शिंदे,तर समितीचे प्रा.संजय घुले,सुमित बलदोटा, अतुल गायकवाड,बाळासाहेब कथले,डॉ.रुपेश कवडे,दादा खंडागळे, संदीप शेंडगे, हर्षद अंबुरे,गजानन फाटक,उदयचंद्र खंडागळे,यश सुराणा, बप्पा चोंदे, प्रकाश खामकर,धर्मराज पुरी, मनोज फल्ले, ऋषीकेश साखरे,संकेत भोरे,आदींनी परिश्रम घेतले. 


यावेळी शासकीय रक्तपेटी उस्मानाबाद, सयाद्री उस्मानाबाद,शहा बार्शी,अंबाजोगाई,बीड येथील रक्तपेढीने रक्त संकलन केले. कार्यक्रमांचे प्रास्ताविक प्रा. संजय घुले  तर आभार सुमित बलदोटा यांनी मानले.

Labels:

रोटरी क्लबच्या वतीने आयोजित सावरगाव येथील मोफत नेत्ररोग तपासणी शिबीरात ७५ रुग्णांची तपासणी


काटी , दि . २१ : उमाजी गायकवाड

 तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथे शनिवारी   शिवजयंतीनिमित्त तुळजापूर रोटरी क्लब, रोटरी नेत्र रुग्णालय व सानवी केक सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी 10 ते 5 या कालावधीत घेण्यात आलेल्या शिबिरात 75 रुग्णांची तपासणी करण्यात आली.
      

या शिबिराचे उद्घघाटन रोटरी क्लबचे सदस्य आप्पासाहेब पाटील, जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, सरपंच रामेश्वर तोडकरी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत तुळजापूर रोटरी क्लबचे अध्यक्ष रामचंद्र गिड्डे , तामलवाडी पोलीस स्टेशनचे  साहय्यक  पोलीस उपनिरीक्षक सचिन पंडीत यांचे हस्ते करण्यात आले. 


यावेळी रोटरी क्लबचे सदस्य आप्पासाहेब पाटील यांनी  जागतिक स्तरावरील रोटरी क्लबचे कार्य उल्लेखनीय असल्याचे सांगून जागतिक स्तरावर रोटरी क्लब एक समाजसेवेचे मंदीर असून या मंदिराच्या माध्यमातून स्वयंस्फूर्तीने सुरु असलेले समाजोपयोगी कार्य एखाद्या देवदुताप्रमाणे अविरत सुरु असल्याचे सांगितले. 


याप्रसंगी सावरगावचे सरपंच रामेश्वर तोडकरी, जि.प. सदस्य राजकुमार पाटील, भाजपचे तालुका अध्यक्ष संतोष बोबडे यांनी रोटरी क्लबच्या माध्यमातून सुरु असलेल्या समाजोपयोगी कार्याबद्दल कौतुक केले. या शिबिरात रोटरी क्लबच्या वतीने शिबिरार्थी रुग्णांना मोतीबिंदू, काचबिंदू डोळ्यांची शस्त्रक्रिया करून घेण्याबाबत सल्ला देण्यात  येऊन शस्त्रक्रियेची गरज पडल्यास रोटरी क्लबच्या वतीने उस्मानाबाद रोटरी नेत्र रुग्णालयाच्या वतीने मोफत केली जाणार असल्याचे आवर्जून सांगितले.
      

हे शिबिर यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब तुळजापुरचे अध्यक्ष रामचंद्र गिड्डे ,आप्पासाहेब पाटील,रो.दत्ता अंबर,रो.अनिल रोचकरी, रो.रुपाली गुंड यांनी परीश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. अमोल गुंड यांनी तर आभार  मगर बंधु यांनी केले.

Labels:

अपघातातील मृत वानरावर जळकोट येथे अंतिम संस्कार


जळकोट, दि.२० : मेघराज किलजे

तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे ज्याची साक्षात पवनपुत्र हनुमानाचे रूप मानले जाते. अशा वानराचे रविवारी पहाटेच्या सुमारास मुंबई - हैदराबाद महामार्गावरील जळकोट नजीकच्या ओढ्यावरील पुलावरून उडी मारताना वानराचा कारच्या धक्क्याने मृत्यू झाला. ही बातमी गावात पसरताच गावकऱ्यांच्यावतीने मृत वानराची वाजत -गाजत अंत्ययात्रेची मिरवणूक काढून गावातील  हनुमान मंदिरासमोर अंतिम संस्कार करण्यात आले.


जळकोट (ता. तुळजापूर ) येथील मुंबई हैद्राबाद- महामार्गावर गावच्या नजीक असलेल्या ओढ्याच्या पुलावरून उडी मारताना वानराचा कारच्या धक्क्याने रविवार  रोजी पहाटेच्या सुमारास मृत्यू झाला.ही घटना वाऱ्यासारखी गावात पसरताच मृत वानराला ग्रामपंचायत कार्यालयासमोर अंतिम दर्शन घेण्यासाठी ठेवण्यात आले होते. या अंतिम दर्शनप्रसंगी गावकर्‍यांनी व हनुमान भक्तांनी अंतिम संस्कारासाठी दान टाकले. त्यानंतर वाजत -गाजत वानराची मिरवणूक काढण्यात आली. या अंतिम संस्कार मिरवणुकीत अनेक जण सहभागी झाले होते. मोठ्या भक्तिमय वातावरणात वानराला निरोप देण्यासाठी हनुमान भक्त सहभागी झाले होते. पवनपुत्र हनुमान की जय , बजरंग बली की जय , अशा गर्जनांनी  वातावरण दुमदुमून गेले होते. गावच्या जुन्या हनुमान मंदिरासमोर अंतिम संस्कार करण्यात आले.  

Labels:

उमरगा (चिवरी) व शिरगापूर येथे मोफत आरोग्य शिबीर


वागदरी , दि. २१ : एस.के.गायकवाड


बुधवार दि.२३ व गुरुवार दि.२४ फेब्रुवारी २०२२ रोजी तुळजापूर तालुक्यातील अनुक्रमे उमरगा (चिवरी) व शिरगापूर येथे तेरणा जनसेवा केंद्र उस्मानाबाद व तेरणा स्पेशालिटी हाँस्पिटल आणि रिसर्च सेंटर नेरुळ नवी मुंबई यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.


 रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील  यांच्या मार्गदर्शनाखाली दि.२३ फेब्रुवारी रोजी उमरगा (चिवरी ) येथे तर दि.२४ फेब्रुवारी रोजी शिरगापूर (ता.तुळजापूर) येथे सकाळी ठिक १० वाजता मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरात ह्रदयरोग,कान नाक घसा, बालरोग, स्त्रीरोग, त्वचारोग,आस्थीरोग,पोटाचे विकार आदी आजारांची तपासणी व उपचार करण्यात येणार आहे. तरी उमरगा (चिवरी) ,शिरगापूर व परिसरातील जनतेनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Labels:

Thursday, 17 February 2022

रामनगरमध्ये सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन

                                                    

जळकोट, दि.१७ : 


तुळजापूर तालुक्यातील रामतीर्थ ग्रामपंचायत अंतर्गत रामनगर येथे सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले.



वसंतराव नाईक तांडा सुधार योजने अंतर्गत सिमेंट रस्ता जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण यांच्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आला असून त्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, जळकोटचे सरपंच अशोक पाटील, रामतीर्थ येथील सरपंच बालाजी राठोड, उपसरपंच सुनील चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण राठोड, माजी उपसरपंच रामु चव्हाण, धनाजी राठोड पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष गुरूदेव राठोड, बाबुराव राठोड, तुकाराम चव्हाण, सुनील राठोड,व्यकट‌ राठोड, , सुनील माने, सिताराम चव्हाण यांच्यासह महिला उपस्थित होते.

                                                                  डांबरीकरण कामाचे उदघाटन 


-तुळजापूर तालुक्यातील हगलूर तांडा येथे डांबरीकरण कामाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

जिल्हा परिषद सदस्य यांच्या फंडातून हा निधी मंजूर करण्यात आला आहे.सदर कामासाठी १४ लाख रुपये निधी मंजूर करून प्रकाश चव्हाण यांनी हगलूर तांड्याकडे जाणारा रस्ता डांबरीकरणासाठी आश्र्वासन दिलेले पुर्ण केल्याने जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.

यावेळी नितीन पाटील,हरिष जाधव, माजी सरपंच अंकुश घुगे,  माजी उपसरपंच संजय पवार ,माजी प.स.सदस्य दता मस्के, धिमाजी घुगे,सतिश दराडे, लक्ष्मण चव्हाण,रवि राठोड, देवजी पवार, अनिल पवार, सुनील पवार, राजेंद्र चव्हाण,प्रेमदास नाईक, शंकर कारभारी, राजपाल पवार, भिलू राठोड,राम पवार, लक्ष्मण राठोड, रोहित राठोड, धनाजी चव्हाण, बालाजी राठोड, सुनील राठोड, सुभाष राठोड, ग्रामसेवक अरुणा कदम उपस्थित होते.


Labels:

मुलीचा वाढदिवस शैक्षणिक साहित्य देऊन केला साजरा


कळंब , दि . १७ : भिकाजी जाधव

मुलीच्या वाढदिवसा निमित्त अनावश्यक खर्च टाळुन एका डाँक्टर पित्याने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देवुन कन्येचा वाढदिवस साजरा केला आहे .

 
हसेगाव केज येथील रहिवासी डॉ. अभिजित महादेव यादव यांनी आपल्या मुलीच्या कु आश्लेषा  हिच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त गावातील जिल्हा परिषद हसेगाव  शाळेतील 10 गरजवंत विद्यार्थ्यांना दप्तर,वह्या व 291 विद्यार्थ्यांना पेन वाटप करून आदर्श पद्धतीने वाढदिवस साजरा केला.


 याप्रसंगी डॉ. अभिजीत यादव, उत्तम यादव शाळेचे मुख्याध्यापक रामेश्वर जगदाळे, अमोल बाभळे, प्रशांत घुटे, राजकुमार गुंजाळ, समाधान भातलवंडे , विकास खारके,कालींदा समुद्रे, लक्ष्मी कोकाटे, विद्या समुद्रे, प्रतिभा बिडवे हे उपस्थित होते,

Labels:

कोरोनाचा फटका: चिवरी येथील श्री महालक्ष्मीची यात्रा रद्द, मोजक्याच मानकऱ्यांच्या उपस्थितीत परंपरेनुसार होणार धार्मिक विधी

                    
चिवरी, दि . १७

  महाराष्ट्र राज्यासह परप्रांतातील   भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील श्री महालक्ष्मी यात्रा यंदाही  कोरोनाच्या  पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय मंदिर कमिटी,  व प्रशासनाच्या वतीने गुरुवारी ,दि,१७ रोजी संयुक्त बैठक घेऊन करण्यात आला. 



यामध्ये श्री महालक्ष्मी देवीचे सर्व धार्मिक विधी रूढी व परंपरा ह्या स्थानिक पातळीवर मोजक्याच मानकरी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पार पडले जाणार असल्याचे बैठकीत निर्णय घेण्यात आला, दरवर्षी माघ महिन्यातील पोर्णिमेपासुन येणाऱ्या पहिल्या मंगळवारी यात्रा भरते . या बैठकीमध्ये   तहसीलदार सौदागर तांदळे  यांनी यावर्षी दि,२१, व २२ फ्रेबुवारी रोजी  होणारी महालक्ष्मी यात्रा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सलग दुसऱ्या वर्षी यात्रा रद्द करण्यात आली आहे .याञा काळामध्ये मंदिर बंद ठेवून व बाहेर गावातील भाविकांनी घरातच राहुन  प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
 या बैठकीस  तहसीलदार सौदागर तांदळे,  पोलीस उपअधीक्षक सई भोरे पाटील, नळदृर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर गोरे,   पोलीस पाटील योगेश बिराजदार ,ग्रामसेवक गोरोबा गायकवाड, मंडळ अधिकारी  जे. एस .गायकवाड ,तलाठी डी.एन.गायकवाड , मंदिर कमिटीचे अध्यक्ष. जयपालसिंह बायस,   धनराज मिटकरी, यांच्यासह ग्रामस्थ , व्यापारीवर्ग व पुजारी  बांधव उपस्थित होते.
     
यात्रा काळामध्ये चिवरी  महालक्ष्मी मंदिर बंद असल्यामुळे गावातील तसेच पंचक्रोशीतील भाविकांनी घरीच देवीच्या प्रतिमेचे प्रतिष्ठापना करून पूजाअर्चा ,  नैवेद्य दाखवून यात्रा साजरी करावी  असे आवाहन ग्रामपंचायत व मंदिर ट्रस्टच्या वतीने भाविकांना करण्यात आले आहे.

Labels:

Wednesday, 16 February 2022

संत शिरोमणी गुरू रविदास महाराज यांची जयंती नळदुर्ग येथे साजरु

नळदुर्ग , दि . १६ : विलास येडगे


 नळदुर्ग येथे दि.१६ फेब्रुवारी रोजी श्री संत रोहिदास चर्मकार समाज सेवा मंडळाच्या वतीने  संत शिरोमणी गुरू रविदास यांची जयंती साजरी करण्यात आली.
         
बुधवार दि.१६ फेब्रुवारी रोजी संपुर्ण देशात संत शिरोमणी गुरू रविदास यांची जयंती साजरी करण्यात आली. नळदुर्ग येथेही श्री संत रोहिदास चर्मकार समाज सेवा मंडळाच्या वतीने संत शिरोमणी गुरू रविदास यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी  गुरू रविदासांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुजन करण्यात आले. 


यावेळी भाजपाचे पद्माकर  घोडके, युवा सेनेचे माजी तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर घोडके,माजी नगरसेवक सुधीर हजारे,सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव, शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुहास येडगे, पत्रकार विलास येडगे, उत्तम बनजगोळे,सामाजिक कार्यकर्ते अमर भाळे,विजय ठाकुर, चर्मकार समाज सेवा मंडळाचे शहर अध्यक्ष शंकर वाघमारे, सौदागर इंगोले, अमोल कांबळे, बाबू गायकवाड व महेश वाघमारे आदीजन उपस्थित होते.

Labels:

विमा कंपनीला पीक विमा वाटपाचाच पडला विसर ,जिल्ह्यातील अनेक शेतकरी अजुनही विम्याच्या प्रतीक्षेत



चिवरी , दि . १६ : राजगुरू साखरे  


उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतक-यानी  खरीप पिकासाठी सन २०२१ च्या खरीप हंगामातील पीक विमा भरून देखील हजारो शेतकऱ्यांच्या अद्यापही  खात्यावर पीक विमा जमा न झाल्याने विमा कंपनीच्या अनागोंदी कारभारविरुद्ध संताप व्यक्त होत आहे.

 पंतप्रधान पीक विमा योजना ही शेतकऱ्यांच्या  नैसर्गिक आपतीमुळे पिकांचे झालेले नुकसान भरपाई देण्यासाठी  योजना राबवली जाते.  गतवर्षी सप्टेंबर , आक्टोंबर या  खरीप हंगाममध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन या मुख्य पिकासंह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे सर्वश्रुत आहे. सात महीने उलटून जात आहेत.  तरीही शेतकऱ्यांना  पिकांची नुकसान भरपाई मिळत नाही. त्यामुळे मंजूर झालेल्या पीक विम्याची रक्कम कोणाच्या घशात घालणार ? असा संतप्त सवाल शेतकरी करीत आहेत. 



शेतकऱ्यांनी  पिकांचे नुसकान झाल्यावर  वेळेत कंपंनीकडे ऑनलाइन दावा करूनही शेतकऱ्यांना  पिक विम्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे . परंतु विमा कंपनीकडून केवळ मोजक्याच शेतकऱ्यांना  पाच महिन्यापूर्वीच  विमा देण्यात आल्याचे  समजते, त्यामुळे उर्वरित शेतकरी अद्यापही पिक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत.  


खरीप हंगाम  हातून गेल्यामुळे सोयबिन पिकांसह ,उडीद ,मूग,तूर ,आदि पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुसकान झाले होते. आता रब्बी हंगामातसुद्धा सातत्याने बदलत्या हवामानामुळे धुक्यामुळे ,ज्वारी,हरभरा पिकांचे नुकसान होत आहे यामुळे उत्पादनात प्रचंड प्रमानात घट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पिकावर केलेला खर्च ही निघणे कठिण होऊन बसले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक बोज्याखाली दाबला जाऊ लागला आहे, निसर्गाच्या लहरीपणामुळे तोट्याची शेती सहन करावी लागत आहे. जगाचा पोशिंदा कृषिप्रधान देश शेतकरी राजा अशा मोठमोठ्या उपमा शेतकऱ्यांना दिल्या जातात मग कृषिप्रधान देशात शेतकर्‍यांची हेळसांड कायम सुरू ठेवायची का? असा संतप्त सवाल शेतकरी वर्गातून होत आहे. 


एकंदरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सलग दोन वर्षे संबंधित पिक विमा कंपनीकडून ससेहोलपट होत आहे. त्याच बरोबर सांग 2020 च्या पीक विम्याचा प्रश्न तर गुलदस्त्यातच आहे, त्यामुळे हा पिक विमा मिळणार की नाही? असा प्रश्न सध्या शेतकर्‍यांना पडला आहे, त्यामुळे संबंधित विमा कंपनीने सलग दोन वर्षापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ विमा वाटप करण्यात यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे

Labels:

वागदरी येथे श्री संत तुकाराम महाराज गाथा पारयण व श्रीमद भागवत कथा महायज्ञ सप्ताहाचे आयोजन


वगदरी , दि . १६ : एस.के.गायकवाड


वागदरी ता.तुळजापूर येथे दि.१७ फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारी  दरम्यान श्री संत तुकाराम महाराज गाथा पारायण व श्रीमद भागवत कथा महायज्ञ व सामुदायिक विवाह सोहळयाचे आयोजन करण्यात आले असून या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.
  

प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी दि. १७ ते २४ फेब्रुवारी२०२२ दरम्यान मौजे वागदरी ता.तुळजापूर येथे श्री संत भवानसिंग महाराज भजनी मंडळ व समस्त ग्रामस्थ वागदरी यांच्या वतीने ह.भ.प.राजकुमार पाटील यांच्या आधिपत्याखाली व भागवत कथा आभ्यासक ह.भ.प.साधवी अनुराधा दिदी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संत तुकाराम महाराज गाथा पारायण व श्री मद भागवत कथा महायज्ञ सप्ताह व सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून. दि.१७ फेब्रुवारी रोजी सकाळी ठिक ६ वाजता गाथा पूजन, कलश पूजन, विना पूजन मृदंग पूजन व टाळ पूजन करून या सोहळ्याची विधीवत सुरूवात होणार आहे.  दि .१७ ते २३ फेब्रुवारी  दरम्यानच्या काळात ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज दिंडेगावकर, राम गायकवाड महाराज चिकुंद्रा,धनाजी जाधव महाराज येडोळा, प्रल्हाद सरडे महाराज नांदुरी, महेश महाराज माकणीकर,फुलचंद महाराज रिंगणीकर,आबा पाटील महाराज कुरनुर आदींच्या किर्तनाचे व विविध गावातील भजनी मंडळाच्या हरी जागर भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  दि.२४ फेब्रुवारी रोजी ह.भ.प.श्रीहारी ढेरे महाराज यांच्या काल्याच्या किर्तना नंतर महाप्रसादाने या सप्ताह सोहळ्याची सांगता होणार  आहे. 
  

 तरी भावीक भक्तानी मोठ्या संख्येने या सप्ताह सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन समस्त वागदरी ग्रामस्थ मंडळीच्या वतीने करण्यात येत आहे.

Labels:

तुळजापूर तालुक्यातील आलियाबाद येथे संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी


जळकोट , दि . १६  

तुळजापूर तालुक्यातील आलियाबाद येथे बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांची २८३ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.


कार्यक्रमाच्या सुरुवातीस संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन  करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य तथा माजी सभापती प्रकाश चव्हाण, ग्रा.प.सदस्य अमृता चव्हाण, अँड.बाबुराव पवार, शिवाजी चव्हाण पोलीस पाटील,ग्रा.प.सदस्य विलास राठोड,थावरू राठोड, कारभारी पांडुरंग चव्हाण, सुभाष नाईक, विनायक चव्हाण, ताराचंद राठोड, नेमिनाथ राठोड, शिवाजी राठोड, शिवाजी चव्हाण, मनोज चव्हाण, श्रीमंत राठोड, देविदास चव्हाण,रेखु राठोड, अंकुश जाधव, शंकर चव्हाण, वसंत पवार,धर्मु राठोड, वसंत चव्हाण,सिद्राम पवार,बांबू राठोड, विनोद चव्हाण,नेमिनाथ राठोड, रामु राठोड, हरीदास चव्हाण,आनंद राठोड, संतोष चव्हाण,किरण चव्हाण, सागर चव्हाण उपस्थित होते.

Labels:

नळदुर्ग : वसंतराव नाईक चौकात संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी


नळदुर्ग , दि . १६ 

   नळदुर्ग  शहरातील  वसंतराव नाईक चौकात बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांची २८३ वी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.


प्रारंभी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन  मान्यवराच्या हस्ते करुन  ध्वजवंदन करण्यात  आले.
   

यावेळी तुळजापूर कृर्षी उत्पन्न बाजार समितीचे माजी सदस्य हरिष जाधव,  जि.प. सदस्य प्रकाश चव्हाण , जेष्ठ नागरिक  अमृता चव्हाण, बंजारा परिषदेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण चव्हाण,‌ उपाध्यक्ष संजय राठोड, लक्ष्मण राठोड, माजी सरपंच वसंत पवार, ओबीसी सेलचे उपाध्यक्ष सुरेश राठोड, सरपंच बालाजी राठोड, डॉ.सुभाष राठोड, माजी सरपंच दामाजी राठोड, श्रीमंत चव्हाण, ग्रा.प.सदस्य विलास राठोड, सावंत राठोड, हरी पवार, देविदास राठोड, लक्ष्मण चव्हाण ,रवि राठोड, दत्ता राठोड, ग्रा.प. सदस्य संतोष चव्हाण, रवि जाधव,आकाश जाधव, विशाल जाधव, बाबु राठोड,अशोक जाधव, साकारू राठोड, विष्णू जाधव, गुरूनाथ राठोड, पत्रकार शिवाजी नाईक,अजय चव्हाण,मनोज चव्हाण यांच्यासह बंजारा समाज बांधव  उपस्थित होते.

Labels:

संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीरात २५ दात्यानी केले रक्तदान

 

नळदुर्ग , दि . १६ 


बंजारा समाजाच्या न्याय हक्क अधिकार करिता सातत्याने संघर्ष करणाऱ्या गोर सेना या सामाजिक संघटनेकडून  संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीचे  औचित्य  साधून राणा प्रताप नगर तांडा जळकोटवाडी ता. तुळजापूर येथील समाज मंदिरात रक्तदान शिबिर घेण्यात आले.


 या शिबिरात पंचवीस रक्तदात्यांनी रक्तदान केले. जिल्हा रुग्णालय उस्मानाबादचे रक्त संकलनासाठी टीम उपस्थित होती.  गोर सेना या संघटनेकडून हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन जिल्हा उपाध्यक्ष लखन चव्हाण  ,जिल्हा सहसचिव कुमार राठोड , तालुकाध्यक्ष राजू चव्हाण, वसंत महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, अमृता चव्हाण, लक्ष्मण चव्हाण, अर्जुन राठोड ,गोविंद राठोड, रवींद्र राठोड, विलास राठोड, हरीश जाधव इत्यादींनी शिबिरास भेट दिली.

Labels:

Tuesday, 15 February 2022

देशाची मान उंचाविण्याचे प्रेरणादायी व कौतुकास्पद कार्य केलेल्या विद्यार्थ्यांचा पञकार संघटनेच्या वतीने नळदुर्ग येथे गौरव

नळदुर्ग , दि . १५

स्पर्धेच्या युगात शहराच्या तुलनेत  ग्रामीण भागातील बंजारा समाजाच्या तांड्यातील महाविद्यालयीन, शालेय विद्यार्थ्यांनी राज्यासह परदेशात  भारत देशाची मान उंचविण्याचे प्रेणादायी व कौतुकास्पद  कार्य
केलेल्या विद्यार्थ्यांचा पञकार  संघटनेच्यावतीने नळदुर्ग येथे गौरव करण्यात आला.


 संत श्री सेवालाल महाराज यांची २८३ वी जयंती मंगळवार दि. १५ फेब्रुवारी रोजी नळदुर्ग शहरातील अक्कलकोट रोड लगत बंजारा समाजाच्या वतीने साजरी करण्यात आली.यावेळी नाव लौकीक मिळविलेल्या बंजारा समाजाच्या विद्यार्थ्यांना नळदुर्ग शहर पत्रकार संघटनेच्या वतीने सन्मानित  करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतीमेचे पुजन पत्रकार विलास येडगे माजी नगरसेवक सुधिर हजारे, विनायक अहंकारी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नळदुर्ग जि.प. कन्या प्रशालेत शिक्षण घेणाऱ्या कुमारी प्रणिता मोहन पवार हिने श्रीलंका येथे आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पीयन स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक मिळवुन दिले, कोरोना कालावधित उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या बालाघाट महाविद्यालयाचा विद्यार्थी विक्रम माणिक राठोड, यास कोविड योध्दा म्हणून शिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते पुरस्कार मिळाल्याबद्दल, त्याच बरोबर याच महाविद्यालयातील अरुण सुधाकर नाईक याने एन.सी.सी. च्या वतीने घेण्यात आलेल्या ५३ महाराष्ट्र बटालियन परिक्षेत ए ग्रेड ने उत्तीर्ण होऊन तब्बल चार वर्षा नंतर महाविद्यालयाचे नाव उंचावल्या बद्दल अनुक्रमे या तिघांचा नळदुर्ग शहर पत्रकार संघटनेच्या वतीने फेटा, शाल व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.  

                       
नळदुर्ग शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुहास येडगे ,पत्रकार विलास येडगे, उत्तम बणजगोळे, दादासाहेब बनसोडे, अजित चव्हाण, तानाजी जाधव, प्रसिध्दि प्रमुख शिवाजी नाईक, माजी नगरसेवक सुधिर हजारे, विनायक अहंकारी, सामाजिक कार्यकर्ते मारुती खारवे, संजय विठ्ठल जाधव, अमर भाळे, भाजपाचे माजी शहराध्यक्ष पद्माकर घोडके, शिवसेनेचे जेष्ठ कार्यकर्ते बंडोपंत कसेकर, बंजारा समाजाचे जेष्ठ नागरिक नामदेव जाधव, बाबुराव राठोड, राजाराम नाईक, सुभाष पवार, नवल नाईक, अविनाश नाईक, फुलचंद जाधव, किरण नाईक, प्रदिप पवार, दगडू जाधव, आदिसह नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवाजी नाईक यांनी केले. सुत्रसंचलन माजी नगरसेवक विनायक अहंकारी तर आभार पत्रकार तानाजी जाधव यांनी मानले.

Labels: