Friday, 28 November 2014

डीसीसी बँकेवर कारवाई होणार - राजेंद्र राऊत कलम ८३ चौकशी अहवालात बँकेवर ठपका

 बार्शी - माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या तक्रारीवरुन न्यायालयाच्या शिफारशीनुसार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ८३ अन्वये सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. सोलापूर या संस्थेचा चौकशी अहवाल बी.टी.लावंड प्राधिकृत चौकशी अधिकारी तुथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था सोलापूर यांनी पाठविला आहे. यामध्ये बँकेवर ठपका ठेवण्यात आल्याने संचालकांवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती तक्रारदार राजेंद्र राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
   
      सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून साखर कारखाने व इतर उद्योगांना मोठ्या प्रमाणात तर शेतकर्‍यांना कमी प्रमाणात कर्जपुरवठा केल्याने बार्शीतील माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी रिझर्व बँक व नाबार्ड यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्यावर न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले होते. सदरच्या चौकशी अहवालात ३९ युनिटच्या कर्ज वाटप, मंजुरी, गहाणखत व अनुषंगीक कागदपत्रांची छाननी केल्यास बँकेच्या संचालक मंडळाने कायदा नियम व पोटनियम तसेच रिझर्व बँक, नाबार्ड व शासनाचे आदेश, निर्देश, परिपत्रक, सूचनांचे उल्लंघन केले असल्याचे चौकशी अधिकारी बी.टी.लावंड कलम ८३ तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी त्यांच्या चौकशी अहवालात म्हटले आहे. यामध्ये बँकेविरुध्द महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० अंतर्गत प्रशासकिय कारवाई व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ८८ नुसार जबाबदारी निश्‍चित करण्याची शिफारस केल्याचा अहवाल दि.१० नोव्हेंबर २०१४ रोजी पाठविला आहे. त्यानुसार संचालक मंडळावर जबाबदारी निश्‍चित करुन पुढील कारवाई होईल असे राजेंद्र राऊत यांनी सांगीतले.
    सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकर्‍यांचा दुवा असलेली बँक आहे. सहकारी साखर कारखाने, खाजगी साखर कारखाने, सूत गिरण्या, गुळ पावडर उद्योग, शैक्षणिक संस्था यांमध्ये, आमदार, माजी आमदार, मंत्री, माजी मंत्री, चेअरमन, माजी चेअरमन यांचेशी संबंधीत व्यक्तींचे आहेत. संपूर्ण बलाढ्य राजकिय व्यक्तींचे सर्व उद्योग असून, कर्ज देतांना पुरेसे तारण ठेवण्यात आले नाही. दुष्काळी परिस्थिती, गारपीठ यावेळी बँकेची मदत शेतकर्‍यांना झाली नाही. शेतकर्‍यांच्या हितासाठी ही बँक निर्माण झाली असल्याने त्यांना मदतीचा हात देणे गरजेचे होते. पाईपलाईन, बोअर, पेरणी, दुबार पेरणी, बि-बियाणे यांना देण्याचे टाळून तसेच केवळ ३५ टक्के कर्ज इतर उद्योगांना देण्याचे नाबार्डचे निर्बंध असतांना बिनशेतीच्याा इतर उद्योगांना मर्यादेपेक्षा जास्त कर्ज देण्यात आले व शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडले. दरवर्षी शेतकर्‍यांच्या पीक कर्जासाठी देण्यात आलेले उद्दीष्टही पाळले नाही. इतर संस्थांना कोणताही नियम न पाळल्याने सदरची बँक ही अडचणीत आली आहे. कर्जदारांकडून दिलेल्या कर्जाची वसूली करणे कठीण असल्याने चौकशी अधिकार्‍यांनी त्यांच्या अहवालात प्रशासकिय कारवाई करावी, ८८ प्रमाणे चौकशी करुन जबाबदारी निश्‍चित करावी अशी शिफारस उच्च न्यायालयात केली असल्याचेही राऊत यांनी यावेळी सांगीतले.

Labels:

जिल्हयात शस्त्रबंदी व जमावबंदी

 उस्मानाबाद -  जिल्ह्यात  शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी अप्पर जिल्हादंडाधिकारी, उस्मानाबाद यांनी  मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) व (3) अन्वये संपूर्ण जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी प्रतिबंधात्मक आदेश  निवार,दि. 29 नोव्हेंबरच्या सकाळी 6 पासून आदेश लागू केले आहेत. यासंदर्भात जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, उपरोक्त कालावधीत जिल्हयात नागरीकांना शस्त्र किंवा तत्सम वस्तु बाळगण्यास अथवा त्यांची वाहतूक करण्यात बंदी राहील.
    आवेशी भाषणे, अंगविक्षेप, विडंबनात्मक नक्कला करता येणार नाही.  सभ्यतेस व नितिमत्तेस बाधा येईल किंवा अराजकता माजेल अशी चित्रे, नकाशे, घोषणा फलक, चिन्ह आणि अशा अन्य वस्तु जवळ बाळगता येणार नाहीत. व्यक्ति किंवा समुहाच्या भावना जाणूनबुजून दुखविण्याच्या उद्देशाने वाद्य वाजविता येणार नाही अथवा गाणी म्हणता येणार नाहीत.
तसेच पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तिंना एकत्र येण्यास, सभा घेण्यास किंवा मिरवणूका काढण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचा भंग करणा-यांविरुध्द कायदेशिर कार्यवाही करण्यात येईल. हे आदेश  आज जारी करण्यात आले असून हे आदेश दि. 13 डिसेंबर,2014   रोजीच्या  मध्यरात्रीपर्यंत लागू राहील

Labels:

चिकुंद्रा येथे घरकुल योजनेत गैरप्रकार

नळदुर्ग  चिकुंद्रा (ता. तुळजापूर) येथे इंदिरा आवास योजनेचे चोवीस घरकुल मंजूर झाले असून लाभार्थ्‍यांना डब्‍बल घरकुले मंजूर झाल्‍याचे नमूद करुन मोठा गैरप्रकार झाल्‍याचे आरोप अखिल भारतीय विरोधी सामाजिक न्‍याय मंचचे तुळजापूर तालुकाध्‍यक्ष बापूराव गायकवाड यांनी केले आहे.
निवेदनात म्‍हटले आहे की, इंदिरा आवास योजनेचे चिकुंद्रा गावात चोवीस घरकुले लाभधारकाना मंजूर झाले आहेत. त्‍यात बारा घरकुले डब्‍बल मंजुर झाली आहेत. तरी सदरची यादी ग्रामपंचायत चिकुंद्रा सरपंचानी जाणुनबुजून खोटी माहिती देवून तसा ठरावा देवून शासनाची फसवणूक केली आहे. तरी सरपंचाविरुध्‍द गुन्‍हा दाखल करुन व चौकशी पूर्ण झाल्‍याशिवाय सदरचे चोवीस घरकुले वाटप करु नये, सदरचे घरकुले वाटप केल्‍यास आम्‍ही मागासवर्गीय आंदोलन केल्‍याशिवाय राहणार नाही. बाकीचा गरीब समाज घरकुल्‍यापासून वंचित राहिला आहे. सदरचे घरकुले वाटप करु नये, अशी मागणी करण्‍यात आली आहे. रमाई आवास योजनेची घरकुले पूर्वी मिळालेले आहेत. तसेच इंदिरा योजनेचे घरकुले अगोदर मिळाली आहेत. याप्रकरणी चौकशी करावी, असे अखिल भारतीय भ्रष्‍टाचार विरोधी सामाजिक न्‍याय मंचचे तुळजापूर तालुकाध्‍यक्ष बापूराव सोपान गायकवाड यांनी लेखी तक्रार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्‍याकडे केली आहे. याची एक प्रत जिल्‍हाधिकारी, जिल्‍हा ग्रामीण विकास यंत्रणा यांना देण्‍यात आले आहे. या निवेदनावर विलास गायकवाड, शंकर गायकवाड, व्‍यंकट गायकवाड, मल्‍हारी गायकवाड, गीता सुभाष वाघमारे, मंकाबाई राजेंद्र कांबळे यांच्‍यासह वीस ग्रामस्‍थांच्‍या स्‍वाक्ष-या आहेत.

Labels:

युवकाचा मृत्यू; लाईनमनवर गुन्हा

तुळजापूर : विद्युत पोलवर काम करण्यासाठी चढलेल्या युवकाच्या मृत्यू प्रकरणी लाईनमन विरूध्द तुळजापूर पोलिस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २0 नोव्हेंबर रोजी तुळजापूर शहरात घडली होती.
    याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तुळजापूर येथील पापनास गल्ली भागातील तांबोळी यांच्या घराजवळील विद्युत पोलवरील काम करण्यासाठी महादेव भास्कर सिध्दगणेश यास लाईनमन माणिक लोंढे यांनी बोलावून घेतले होते. खांबावर चढण्यापूर्वी तारेतील विद्युत प्रवाह सुरू नसल्याची खात्री करून त्याला काम करण्यास सांगणे गरजेचे होते. मात्र, सिध्दगणेश यास तसे सांगितले नाही. तो काम करण्यासाठी खांबावर चढला असता त्यास विजेचा जोरात धक्का बसून मयत झाल्याची फिर्याद सुरेखा भास्कर सिध्दगणेश यांनी तुळजापूर पोलिस ठाण्यात दिली.
या घटनेच्या चौकशीअंती आलेल्या या फिर्यादीवरून लाईनमन माणिक लोंढे यांच्याविरूध्द तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक बुवा हे करीत आहेत.

Labels:

दहिफळ येथे खंडोबाची यात्रा उत्साहात

येरमाळा : 'येळकोट घे'च्या गजरात दहिफळ गावचे ग्रामदैवत श्री खंडोबा देवाचा आगाडा बगाडाच्या मंदिरास प्रदक्षिणा पार पाडल्या. श्री खंडोबा देवस्थानच्या चंपाष्टमी यात्रेत हा कार्यक्रम पार पडला.
सकाळपासून श्री खंडोबा देवाचा गजर करत पूजाअर्चा करून बाजरीची भाकर व वांगी भर्ताचा नैवेद्य भाविकांकडून दाखविण्यात आला. लोखंडाच्या लंगाराची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर श्रीकांत धोंगडे व तुकाराम भातलवंडे यानी लंगर तोडला. यावेळी भंडारा खोबर्‍याची उधळण व 'येळकोट-येळकोट घे..'च्या गजराने नगरी दुमदुमली. आगडा बगाडावर मानकरी पुरुषोत्तम जोशी व सुतार कुटुंबाला उभे राहण्याचा मान असतो. यात्रेत राजे ग्रुपच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यात्रा कमिटीचे अध्यक्ष नामदेव कोठावळे, हरिश्‍चंद्र भातलवंडे, सतीश मते, समाधान मते, सरपंच दत्तात्रय बोरके, हणमंत मते यांच्यासह गावकर्‍यांनी व्यवस्थेसाठी पुढाकार घेतला. दरम्यान, खंडोबाच्या या यात्रेनिमित्त २८रोजी कुस्त्यांचा फड भरविण्यात येणार असून यासाठी परजिल्ह्यातील पैलवाणही येणार आहेत.

Labels:

बीएसएनएल कर्मचार्‍यांचा देशव्यापी संप

बार्शी :- भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांसाठी संघटनेच्या वतीने देशव्यापी एक दिवसाच्या लाक्षणिक संपाचे आयोजन केले होते. बार्शीतील कर्मचार्‍यांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला तर अधिकार्‍यांची गैरहजेरी दिसून आली.
    बार्शीतील बीएसएनएल विभागातील अधिकार्‍यांची नेहमीच वाणवा दिसून येते. सरकारचे जावई असल्याच्या थाटात काम करणारे कायम कर्मचारी या ठिकाणी नेहमीच प्रकर्षाणे दिसून येतात. अनेक कर्मचार्‍यांच्या बाबत कधीही वेळेवर कामावर न येता, कामातील टाळाटाळ, आपले काम दुसर्‍यावर ढकलणे, आलेल्या तक्रारदार व ग्राहकांना चुकीचे उत्तर देणे, या प्रकारामुळे शासनाच्या उपक्रमातील सेवेचा ग्राहकांना आर्थिक नुकसान व असमाधानकारक सेवा मिळत असल्याने ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस घटली आहे. या कार्यालयात प्रत्येक ठिकाणी सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसवून त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. याउलट तात्पुरते सेवेत घेतलेल्या कर्मचार्‍यांकडून चांगली सेवा देण्यात येतांनाही त्यांच्या वेतनाचे व सेवेत सामावून घेण्याचे प्रश्‍न मागील कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहेत. या कार्यालयात मागील २२ वर्षांपासून तात्पुरत्या सेवेत व सर्व तांत्रीक कामांचा अनुभव असलेल्या कर्मचारी रामलिंग भिमा बसवंत याने आपल्या व्यथा यावेळी बोलून दाखविल्या. त्याच्यासारखे आणखी बरेच कर्मचारी मागील काही वर्षांपासून सेवेत असतांना त्यांचे अनेक प्रश्‍न प्रलंबित राहिले आहेत.
    कर्मचार्‍यांच्या मागण्यांमध्ये बोनस, ग्रुप डी (वर्ग ४ कर्मचारी वेतन), अनुकपा कर्मचार्‍यांचे प्रश्‍न, रजेवर बाहेरगावी जाण्याची मागणी, मेडिकल ऍडव्हान्स, इ.मा.व. कर्मचार्‍यांच्या परीक्षेत गुणांची सवलत, तात्पुरत्या स्वरुपातील भरती केलेल्या कर्मचार्‍यांना सेवेत सामावून घेणे, ऑपरेटर, वाहन चालक, लाईनमन, क्लर्क यांच्या वेतनश्रेणीत वाढ करावी. लाईनमन परीक्षा पात्रता अटींची शिथीलता, मूळ वेतनात वाढ व फरक, सर्व कर्मचार्‍यांना रु.२०० चे सीमकार्ड, तात्पुरत्या कर्मचार्‍यांना नियमित कर्मचार्‍यांप्रमाणे वेतन मिळावे, दुरुस्तीसाठी व नवीन कनेक्शनसाठी आवश्यक असलेल्या उपकरणांची व साहित्यांची उपलब्धता करावी, आवश्यकतेनुसार कर्मचार्‍यांची वाढ करावी, आदी मागण्यांसाठी या संपाचे आयोजन करण्यात आले होते.
    यावेळी कर्मचारी संघटनेचे व्ही.एस.पाटील, के.ए.चव्हाण, व्ही.बी.कापुरे, एल.एस.घुगे, ए.सी.मणियार, बाळासाहेब माने, मनोज भोकरे, अशोक बरचे, एच.एस.कोळेकर, यल्लाप्पा कबाडे, एस.जी.शिंदे, इस्माईल शेख, रामलिंग बसवंत, जनक पालके, हनुमंत जाधवर, ए.एन.इंगळे, विकास बगाडे आदी उपस्थित होते.

Labels:

Thursday, 27 November 2014

कामगार विरोधी धोरणाविरोधात कॉर्नर मिटींग व मोर्चाचे आयोजन

बार्शी :- सरकारने स्विकारलेल्या श्रमजिवी वर्गाच्या विरोधातील धोरणांविरोधात लढा करण्याचा निर्णय भारतीय कम्युनिस्ट पक्ष, सोलापूर जिल्हा कौंन्सिल व आयटकच्या वतीने झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
       या बैठकीत कॉ.तानाजी ठोंबरे यांच्या नेतृत्वात २९ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०१४ या काळात अनुक्रमे एस.टी. स्टॅन्ड चौक, क्रांतीवीर लहुजी वस्ताद चौक, जुना महात्मा गांधी पुतळा चौक, डॉ. पांडे चौक, भिमनगर या ठिकाणी कॉर्नर मिटींग तसेच ५ डिसेंबर २०१४ रोजी भगवंत मैदान बार्शी येथुन मा. तहसिलदार यांच्या कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विविध क्षेत्रातील कामगार संघटनांना सहभागी होतील.

Labels:

हरभरा व तूर पिकांवर शेंगा पोखरणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव

उस्मानाबाद -: सध्या जिल्ह्यात तुर, हरभरा या पीकाची  किडरोग नियंत्रण व सल्ला प्रकल्पांतर्गत केलेल्या निरीक्षणावरुन तूर पिकावर काही ठिकाणी शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्याने शेतकऱ्यांनी या कीडीच्या नियंत्रणासाठी पुढील उपाय योजना करण्याचे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी, उस्मानाबाद यांनी केले आहे.
    तुर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळयाच्या नियंत्रणासाठी इमामेक्टीन बेन्जोएट 5 टक्के 0.2 ग्रॅम किंवा असाफेट 75  टक्के 1 ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारावी  व मोठ्या अळया हाताने वेचून नष्ट कराव्यात.
    हरभरा पेरणी करतेवळी रायझोबियम व पीएसबी प्रत्‍येकी 250 ग्रॉम आणि ट्रायकोडर्मा 40 ग्रॅम प्रती 10 किलो बियाणे बीज  प्रक्रिया करुन शेतकऱ्यांनी या अळीचा नियंत्रण करण्याचा सल्ला  कृषि अधिका-यांनी नी दिला आहे.

Labels:

तुळजापूर बालविकास प्रकल्पातंर्गत 2 मदतनीसाची पद भरती

उस्मानाबाद :- एकात्मिक बाल विकास सेवा योजन प्रकल्प, तुळजापूर प्रकल्पातंर्गत  तुळजापूर तालुक्यातील  सावरगाव  येथील अंगणवाडी क्रमांक 70 व सांगवी काटी येथील अंगणवाडी क्रं 90 मधील प्रत्येकी एक अशी दोन मदतनीसाची पद भरती करण्यात येणार आहे. पद भरतीबाबतचे विहीत नमुन्यातील अर्जाचे वाटप 26 नोव्हेंबरपासून होणार आहे.  पात्र व इच्छुक महिलांनी विहित नमुन्यात अर्ज 5 डिसेंबरपर्यंत भरुन पाठवावेत, असे आवाहन बाल विकास प्रकल्प अधिकारी, तुळजापूर यांनी  केले आहे.
    विहीत नमुन्यातीलअर्ज सविस्तर अटी व शर्ती याबाबत बालविकास प्रकल्प     अधिकारी, तुळजापूर या कार्यालयासाठी संपर्क साधून विहीत वेळेत विहीत नमुन्यात अर्ज सादर करण्यात यावे,असेही पत्रकात नमूद करण्यात  आले आहे.

Labels:

कंत्राटी पद पात्र, अपात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द

उस्मानाबाद -: जलस्वराज्य टप्पा क्र. 2 कार्यक्रमातंर्गत अभियांत्रिकी तज्ञ, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन/ तपासणी गुणवत्ता तज्ञ, सल्लागार पाणी गुणवत्ता, ग्रामलेखा समन्वय या कंत्राटी पदाच्या पात्र व अपात्र यादया 27 नोव्हेंबर रोजी  जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद, उस्मानाबाद, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद, उस्मानाबाद  येथीलल नोटीस बोर्डावर डकविण्यात आली असून तसेच उस्मानाबाद जिल्ह्याच्या  http:osmanabad.nic.in  या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
    या कंत्राटी पदासाठी अर्ज केलेल्या उमदेवारांच्या  कांही आक्षेप असल्यास त्यांनी  जिल्हा पाणी  व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद, उस्मानाबाद येथे 1 डिसेंबर 2014 पर्यंत आक्षेप सादर करावेत.आक्षेप उशिरा प्राप्त झाल्यास त्याचा विचार केला जाणार नाही, याची सबंधित  उमेदवारांनी नोंद घ्यावी,असे उप मुख्य कार्यकारी  अधिकारी         ( पाणी पुरवठा स्व). जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांनी कळविले आहे.

Labels:

२६/११ हल्‍ल्‍यातील शहिदांनाी श्रध्‍दांजली

बार्शी -:  २६/११ मुंबई वर झालेल्या अंतकवादी हल्ला रोखताना झालेल्या शहीद जवानाना तसेच यामधअये बळी गेलेल्या निरापराध लोकांना येथील रोटरॅक्ट क्लब बार्शी व बार्शी युथ क्लब यांच्या संयुक्त विद्यामाने  शहीद रॅली व रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी बार्शीकर व तसेच तरुणांनी मोठा प्रतीसाद दिला. तसेच १५१ रक्तदात्यांनी रक्तदान करुन शहीद जवानांना श्रध्दांजली अर्पण केली.
    मुंबई दहशतवादी हल्ला आज ६ वर्षे पूर्ण झाली. या हल्यात शहीद जवान हेमंत करकरे,अशोक कामटे,विजय साळसकर, तुकाराम ओंबाळे व राहूल शिंदे हे जवान शहीद झाले होते. तसेच यामध्ये शकडो निरापराध नागरिकांचा बळी गेला होता. आज रोटरॅक्ट क्लब बार्शी व बार्शी युथ क्लब व्यर्थ हो ना बलिदान या कार्यक्रमा अतर्ंगत येथील जवाहर हॉस्पीटल शहीद रॅली चे आयोजन केले होते. याचे ज्योत प्रज्वलन पोलीस निरीक्षक सालार चाऊस यांच्या हस्ते करुन रॅलीची सुरुवात झाली. या वेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष गौतम कांकरीया ,जीवन ज्योत संघटनेटे अध्यक्ष अजित कुंकूलोळ, रोटरॅक्ट क्लबचे अध्यक्ष आनंद बेदमुथ्था व बार्शी युथ क्लबचे अध्यक्ष मयुर मैंदरकर, डॉ.मनोज लोंखडे,डॉ.रामचंद्र जगताप,डॉ.तांबारे,अमर काळे,उदय पोतदार विजय गुंदेचा, संदीप सुराणा, प्रा.मधुकर डोईफोडे  या सह मोठ्या संखने नागरिक उपस्थित होते. ही रॅली शहरातील प्रमुख मार्गाने अमर रहे अमर रहे शहीद जवान या घोषणा देत होती. यानंतर येथील श्रीमान रामभाई शाह रक्तपेढी मध्ये शहीद जवांनाना श्रध्दांजली म्हणून भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. याचे उद्घाटन रोटरी चे अध्यक्ष गौतम कांकरीया यांच्या हस्ते शिबीराचे सुरुवात करण्यात आली. या वेळी मोठी संखेने तरुण वर्ग उपस्थित होते. या शिबीरामध्ये १५१ रक्तदात्यांनी रक्तदान करुन उस्फुर्त प्रतिसाद दिला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकल्प प्रमुख अनुप बकाल,प्रितम सुरवसे,प्रशांत गुळवे,स्वप्नील हागरे, सचिन नलावडे, स्वप्नील नेवाळे ,अमित माने, आदि नी परिश्रम घेतले.

Labels:

Tuesday, 25 November 2014

साखर उद्योग टिकवण्‍यासाठी ऊस उत्‍पादक टिकण गरजेचे : आ. सोपल

पांगरी -:  साखर उद्योग टिकवण्यासाठी ऊस उत्पादक टिकणे गरजेचे असून ऊस दरावर लवकरच तोडगा निघेल असे प्रतिपादन माजी मंत्री दिलीप सोपल यांनी केले. ते खामगाव ता.बार्शी येथे कुमुदा-आर्यन साखर कारखान्याच्या द्वितीय गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुमुदा उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष डॉ.अविनाश भोसले होते.दिलीप सोपल यांचा सत्कार कुमुदा उद्योग समूहाचे अध्यक्ष अविनाश भोसले व व्हा.चेअरमन श्रीकांत नलावडे यांच्या हस्ते करण्यात आला.
    यावेळी आर्यन शुगरचे चेअरमन योगेश सोपल,व्हा.चेअरमन श्रीकांत नलावडे,विजयसिंह महाडीक,प्रकाश पाटील,सुनील (बाप्पा) मोरे,प्रतापसिंह महाडीक,तुळजापूर देवस्थान प्रमुख सचिन पाटील,कैलास सावंत,बाजार समितीचे व्हा.चेअरमन कुंडलिक गायकवाड,माजी सभापति युवराज काटे,नंदकुमार काशीद,जि.प.सदस्य मकरंद निंबाळकर,विकास जाधव,कारखान्याचे जनरल म्यानेजर के.डी.पाटील,कार्यकारी संचालक एस.आर.धाबेकर आदी मान्यवर हजर होते.
    आ. सोपल पुढे बोलतांना म्हणाले की कारखान्यासमोर कमी दिवसात जास्त गाळप गाळप करण्याचे मोठे आव्हान असून ते आव्हान कर्मचारी व वयवस्थापक हे लीलया पार पाडतील.यापूवीच्या शासनाणे उसासंदर्भात वेळोवेळी योग्य निर्णय घेऊन साखर कारखाने टिकवण्यासाठी अनुदान दिले.
    कुमुदा उद्योग समूहाचे डॉ.अविनाश भोसले यांनी यावेळी कामगाराचे कौतुक करून पाच लाख मेट्रिक टन उसाचे गालाप करून कारखाण्याची कार्यक्षमता सिद्ध करून दाखवावे व सर्वांनी सहकार्य करावे असेही आवाहन केले.
  इतर कारखान्यांच्या तुलनेतच या कारखान्याकडून शेतकर्‍यांना दर देण्यात येईल असे आश्वासन कुमुदाचे व्हा.चेअरमन श्रीकांत नलावडे यांनी उपस्थित शेतकर्‍यांणा दिले.
   विजयसिंह महाडीक यांनी प्रास्ताविकात कुमुदा उद्योग समूहाची माहिती देऊन कुमुदा-आर्यन साखर कारखान्यामुळे परिसरातील 10 हजार बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचे सांगून कारखान्याच्या 21 गट कार्यांलयाच्या माध्यमातून आठ हजार 300 हेक्टर ऊसाच्या नोंदी घेतल्याची बाब कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.भविष्यात कुमुदा समूहातर्फे शेतकर्‍याना ठिबक सिंचन देण्याचा मानस असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.आभार के.डी.पाटील यांनी तर सूत्रसंचालन रोहित शिंदे यांनी केले.

Labels:

ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे बुधवारी उस्‍मानाबाद जिल्‍हा दौ-यावर

उस्मानाबाद :- राज्याच्या ग्रामविकास, जलसंधारण, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे एक दिवसाच्या उस्मानाबाद जिल्हयाच्या दौ-यावर येत असून त्यांचा दौ-याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.  बुधवार, दि. 26 नोव्हेंबर रोजी सकाळी  9-30 वा मुंबईहून हेलिकॉप्टरने वाशी तालुक्यातील  सोनारवाडीकडे प्रयाण. सकाळी 11-15 वा. सोनारवाडी येथे आगमन व राखीव. 11-30 वा. विविध विकास कामाबाबत पाहणी व ग्रामस्थांशी संवाद, दु. 1-45 वा. सोनारवाडीहुन  हेलिकॉप्टरने परळी, जि. बीडकडे प्रयाण व दु. 2-15 वा. परळी येथे आगमन व मुक्काम.  

Labels:

मेजर सासने यांच्या विश्वविक्रमाचे बुधवारी प्रात्यक्षिक

उस्मानाबाद :– उस्मानाबाद येथील जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने (निवृत्त) स्टेप अप्स आणि पुश अप्स प्रकारातील विशवविक्रम येत्या 1 डिसेंबर रोजी उस्मानाबाद येथील श्री तुळजाभवानी क्रीडा स्टेडिअम येथे करणार आहेत. त्यापूर्वी दिनांक 26 नोव्हेंबर रोजी याच स्टेडिअमवर संविधान दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या प्रमुख उपस्थितीती संविधान उद्देशिकेचे वाचन केल्यानंतर हजारो विद्यार्थ्यांना ते प्रात्यक्षिक दाखविणार आहेत.
       तरुणांच्या मनात शारीरिक तंदुरुस्तीबद्दल आवड निर्माण व्हावी, यासाठी हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात येत असल्याचे मेजर सासने यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यातील सर्व क्रीडाप्रेमींनी दि. 26 रोजी मेजर सासने यांची प्रात्यक्षिके पाहण्यासाठी तसेच दि. 1 डिसेंबर रोजी प्रत्यक्ष मेजर सासने यांच्या विक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी श्री तुळजाभवानी क्रीडा स्टेडिअमवर हजर राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी केले आहे. मराठवाड्यातील टंचाई परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अतिशय साधेपणाने मात्र कणखर आणि काटकपणाची तसेच निरोगी व सुदृढ आरोग्याचा मंत्र देत मेजर सासणे त्यांच्या विश्वविक्रमाचे प्रात्यक्षिक करणार आहेत.
      मेजर सासने हे सध्या येथे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. लष्करात त्यांनी आर्मी फिजीकल ट्रेनिंग कोअर मध्ये सैन्य अधिकारी म्हणून काम पाहिले. भारतीय कुस्ती संघाचे 2008 मध्ये जागतिक सैन्यदल क्रीडा स्पर्धावेळी त्यांनी प्रतिनिधीत्व केले आहे. तसेच ते मिशन ऑलिंपिक विंग टॅलेंट स्क्वॉटिंग अधिकारी होते.
      स्टेप अप्स आणि पुश अप्स प्रकारातील विविध चार विश्वविक्रम मेजर सासने हे उस्मानाबाद येथे नोंदविणार आहेत. या प्रयत्नांना सर्व उस्मानाबादकरांनी साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केलेय या उपक्रमास पाठिंबा देण्यासाठी शालेय विद्यार्थी, कॉलेज युवक-युवती, क्रीडापटू, विविध संस्था-संघटनांचे प्रतिनिधी, सर्वसामान्य क्रीडाप्रेमी नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
        यापूर्वी त्यांनी दोरीवरील उड्या मारण्याचा विश्वविक्रम केला आहे. सध्या मेजर सासने हे दि. 1 डिसेंबर रोजी  स्टेप अप्स आणि पुल अप्स प्रकारातील चार विक्रम करणार आहेत. यातील ती विक्रम हे यापूर्वी ब्रिटन, अमेरिका, जर्मनी या देशांच्या क्रीडापटूंनी केले आहेत तर एक स्वता मेजर सासने यांनी विकसित केलेला क्रीडाप्रकार आहे.
      या सर्व उपक्रमाबाबत सक्रीय सहभाग नोंदविण्याची इच्छा असणाऱ्या नागरिक मेजर सासने यांच्याशी 9970856438 (ई-मेल – subhash.sasne@gmail.com) यावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.   आपल्याला जी मदत होईल त्यातील काही भाग हा पंतप्रधान सहायता निधीसाठी देण्यात येणार असून त्याचा काही भाग हा मराठवाडा आणि विशेषता उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी वापरावा अशी विनंती करणार असल्याचे श्री. सासने यांनी नमूद केले.

Labels:

रोजगार हमी योजनेतील कामे वाढवा, पालक सचिवांची जिल्हा प्रशासनाला सूचना

उस्मानाबाद -: रोजगार हमी योजनेतील अपूर्ण कामे पूर्ण करण्याला प्राधान्य द्या, मजुरांना त्यांच्या मागणीप्रमाणे कामे उपलब्ध करुन द्या, अशी सूचना राज्याच्या पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव तथा उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकसचिव डॉ. महेश पाठक यांनी जिल्हा प्रशासनाला केली. त्याचबरोबर त्यांनी उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी आणि कळंब तालुक्यातील गोविंदपूर येथे भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली.
         येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पालकसचिव डॉ. पाठक यांनी मंगळवारी आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, अपर जिल्हाधिकारी जे.टी.पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे यांच्यासह विविध यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
         यावेळी सुरुवातीला जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा सादर केला. तसेच, टंचाई निवारणासाठी प्रशासनामार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
         यावेळी डॉ. पाठक म्हणाले की,  रोजगार हमी योजनेची कामे पूर्ण करण्यास प्राधान्य द्या. शेल्फवरील कामे असली तरी मजुरांची मागणी आली की कामे सुरु करा. विशेषता जलसंधारण आणि पायाभूत कामांना प्राधान्य देण्याची सूचना त्यांनी केली.
        मराठवाड्यासह राज्याच्या काही भागात भागात टंचाईची परिस्थिती आहे. गारपीट, अपुरा पाऊस यामुळे विविध भागातील पीकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे संबंधीत जिल्ह्यात जाऊन तेथील पालक सचिव आढावा घेत आहेत. उस्मानाबाद जिल्ह्याचा आढावा डॉ. पाठक यांनी घेतला.
        जिल्ह्याने केलेला टंचाई कृती आराखडा, त्याअनुषंगाने करण्यात येणारी कामे यांची माहिती घेतली. तात्पुरत्या पूरक नळ पाणीपुरवठा योजना, विहिर-विंधन विहीरींची विशेष दुरुस्ती,  नियमित दुरुस्ती,  पाणीपातळी खोल असलेल्या ठिकाणी प्राधान्याने जलसंधारणाची कामे हाती घेण्याची सूचनाही त्यांनी केली. जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून अखेर पर्यंतचा संभाव्य टंचाई आराखडा तयार करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
         जिल्ह्यातील पशुधन, त्यासाठी आवश्यक चाऱ्याची उपलब्धता याची माहितीही त्यांनी घेतली.  राज्य व जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग आणि कृषी विभाग यांनी समन्वयाने काम केल्यास  टंचाई परिस्थितीवर मात करता येऊ शकते असे त्यांनी सांगितले. किसान कॉल सेंटरच्या मोफत दूरध्वनी सेवेवरुन शेतकऱ्यांना अधिकाधिक मार्गदर्शन आणि प्रबोधन करण्याची सूचना त्यांनी केली. 
          मागील वर्षी टंचाई अंतर्गत अधीग्रहण व विविध कामांसाठीचा राज्य स्तरावर प्रलंबित असणारा निधी जिल्ह्याला मिळण्यासाठी पाठपुरावा करु, असे त्यांनी सांगितले.
            बैठकीनंतर  पालकसचिव डॉ. पाठक यांनी ढोकी आणि गोविंदपूर या गावांना भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. त्याठिकाणी त्यांनी संबंधित स्थानिक शतकऱ्यांशी संवाद साधून पीक परिस्थिती, पाण्याची उपलब्धता आदींची माहिती घेतली. जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांच्यासह उपविभागीय अधिकारी अभिमन्यू बोधवड (उस्मानाबाद) आणि सचिन बारवकर (कळंब), तहसीलदार सुभाष काकडे (उस्मानाबाद) आणि वैशाली पाटील (कळंब) या पाहणीवेळी त्यांच्यासमवेत होते.
        टंचाई आढावा बैठकीला सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, कृषी, पशुसंवर्धन, जलसंधारण, पाटबंधारे, जिल्हा परिषद यंत्रणेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Labels:

संविधान दिनानिमित्त बुधवारी ‘फ्लॅगमार्च‘चे आयोजन

उस्मानाबाद :- संविधान जागृती अभियानांतर्गत शहरातील विविध सामाजिक संस्था, संघटनांच्यावतीने बुधवार, २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनाचे औचीत्य साधून सकाळी ८ वाजता जिजाऊ चौक ते तुळजाभवानी क्रीडा संकुलापर्यंत ‘संविधान फ्लॅगमार्च’चे आयोजन करण्यात आले आहे. 
       शहरातील संविधान फाऊंडेशन, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, अंधश्रध्दा निर्मूलन समिती, टायगर सेना, लोकप्रतिष्ठान, मुस्लिम सामाजिक संघटना, रोटरी क्लब, मराठवाडा साहित्य परिषद, उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघ, जिल्हा मराठी पत्रकार संघ, शिवराज्याभिषेक सोहळा समिती, भाई उध्दवराव पाटील क्रीडा मंडळ, शिवशंभु प्रतिष्ठान, कास्ट्राईब कर्मचारी संघटना, बानाई, अंनिस, जमात-ए-इस्लामी हिंद, मुस्लिम विकास परिषद, जिल्हा व्यापारी संघ, मराठवाडा साहित्य संमेलन, सरसभारत वाचक चळवळ, महाराष्ट्र खासगी वाहनचालक संघटना, बहुउद्देशिय महासंघ, बार असोसिएशन, उस्मानाबाद दावा फाऊंडेशन, प्रेरणा सामाजिक व सांस्कृतिक मंडळ, ग्राहक आधार संघटना, एकता युवा मंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मंच, व्हिजन करिअर अकॅडमी आदी ४० संस्था संघटनांच्या प्रतिनिधींची यावेळी उपस्थिती असणार आहे. 
        या फ्लॅगमार्चला बुधवारी सकाळी ८ वाजता जिजाऊ चौक येथून प्रारंभ होणार आहे. फ्लॅगमार्चमध्ये शहरातील विविध शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी सहभागी होणार आहेत. नळदुर्ग येथील ‘आपलं घर’ संस्थेेचे कलापथकही असणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे येथील तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलावर आल्यानंतर सकाळी १० वाजता संविधानाच्या प्रास्ताविक वाचनाबरोबर इतर कार्यक्रम होणार आहेत. या उपक्रमात शहर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संविधान जागृती अभियानच्यावतीने करण्यात आले आहे.

Labels:

कै.बाबूरावजी डिसले जीवन गौरवसाठी आवाहन

बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: येथील सूरज क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील कला, क्रिडा, सांस्कृतिक, साहित्य, नाट्य, शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रातील गुणवंतांचा गौरव करण्यासाठी मागील १२ वर्षांपासून कै.बाबुरावजी डिसले स्मृती जीवन गौरव पुरस्कार देण्यात येतो. यावर्षीचा कै.बाबूरावजी डिसले जीवनगौरव पुरस्काराचे वितरण मंडळाचे आधारस्तंभ शिवाजीराव डिसलेशेठ यांच्या वाढदिवसानिमित्त दि.६ जानेवारीला करण्यात येत असल्याची माहिती आयोजक मंडळाचे अध्यक्ष रविंद्र कापसे, सचिव प्रताप दराडे यांनी प्रसिध्दपत्रकाद्वारे दिली आहे.
        स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. शिवाजीराव डिसलेशेठ यांच्या प्रेरणेने दि.१२ जुलै ९९ रोजी मंडळाची स्थापना करण्यात आली. स्थापनेपासून आजतागायत विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणार्‍या गुणवंतांचा मंडळाच्या वतीने गौरव करण्यात येत आहे. तसेच राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा घेऊन मंडळाने राज्यातील नाट्य चळवळीत तसेच बार्शीच्या इतिहासातील मानाचे स्थान निर्माण केले आहे.यंदाच्या सन २०१४-१५ च्या पुरस्कारासाठी सोलापूर जिल्ह्यातील वर नमूद केलेल्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य कलेल्या व्यक्तींनी आपल्या केलेल्या कार्याचा सविस्तर माहिती असलेला अहवाल व त्या संबंधीची कागदपत्रे शिवप्रभा, देशमुख प्लॉट, उपळाई रोड, बार्शी या पत्त्यावर दि. ५ डिसेंबर पर्यंत पाठवावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष रविंद्र कापसे ९४२३३३२२१५ , सचिव प्रताप दराडे ९७६६५६६३८९ यांनी केले आहे.

Labels:

Monday, 24 November 2014

संभाव्य चाराटंचाईच्या मुकाबला करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज

उस्मानाबाद :- जिल्ह्यात टंचाईसदृश् परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी आणि सर्व आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यात यंदा टंचाईची परिस्थिती आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी जिल्हा प्रशासन तातडीने पावले उचलत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात आगामी काळात चारा टंचाई जाणवू नये, यासाठी चा-याची उपलब्धता करण्याबाबत तयारी  केली आहे.
         जिल्ह्यात 19 व्या पशुगणनेनुसार मोठी जनावरे 4 लाख 12 हजार 14 इतकी आहेत तर लहान जनावरांची संख्या 1 लाख 13 हजार 791  आहे. शेळ्या मेंढ्यांची संख्या 2 लाख 11 हजार 542 इतकी आहे. जिल्ह्यात एकूण जनावरांची संख्या ही 7 लाख 37 हजार 347 इतकी आहे.
          जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी यासंदर्भात  पशुसंवर्धन आणि कृषी विभागाच्या अध्काऱ्यांना आराखडा तयार करण्यास सांगितले आहे. सध्या टंचाई परिस्थितीत जनावरांना लागणारा वाळलेला चाऱ्याची गरज ही 3 हजार 25 मेट्रीक टन इतकी आहे. प्रति महिना लागणारा चाऱ्याची आवश्यकता 90 हजार 750 मेट्रीक टन इतकी आहे.  सध्या खरीप हंगामातील पिकापासून 5 लाख 24 हजार 633 मेट्रीक टन  चारा उपलब्ध होईल, असा अंदाज आहे.  पशुसंवर्धन विभागाकडील विविध योजनेतून वाटप केलेल्या वैरण बियाणेपासून 20 हजार 670 मेट्रीक टन चारा उपलब्ध होईल, असा अंदाज आहे. शिल्लक चारासाठा 82 हजार 788 मेट्रीक टन इतका आहे. दरम्यान, ऑगस्ट ते ऑक्टोबर 2014 या कालावधीत 2 लाख 72 हजार 250 मेट्रीक टन चारा वापरला गेला. सध्या ऑक्टोबर अखेर  जिल्ह्यात 3 लाख 55 हजार 841 मे.ट. चारा शिल्लक असल्याने चाराटंचाई जाणवणार नाही, यासाठी जिल्हा प्रशासनाने नियोजन केल्याचे दिसून येत आहे.
          सध्या ऑक्टोबर 2014 ते जुलै 2015 या कालावधीत 9 लाख 7 हजार 500 मेट्रीक टन चारा लागेल असा अंदाज आहे. खरीप आणि रब्बी हंगामात 7 लाख 40 हजार मे.टन चारा उपलब्ध होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे 1 लाख 67 हजार 500 मे.टन चाऱ्याची आवश्यकता भासणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने नियोजन केले असून कृषी विभागाकडील 7 हजार हेक्टरवरील नियोजनातून 70 हजार मे.टन, पशुसंवर्धन विभागाकडील सोळाशे हेक्टरवरील नियोजनातून उपलब्ध होणारा 16 हजार मे.टन, 11 हेक्टर उसापासून उपलब्ध होणारा 81 हजार 500 मे.टन असे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी जिल्हा वार्षिक योजना, कामधेनू दत्तक ग्राम आणि कृषी विभाग यांच्या निधीतून तरतूद करण्यात आली आहे.
          पशुसंवर्धन विभागामार्फत निकृष्ट चारा सकस करणे, वैरण उत्पादन अशा माध्यमातून चारा टंचाई जाणवू नये, याचे नियोजन करण्यात येत आहे.

Labels:

टंचाईसदृश परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी कृती आराखडा तयार

उस्मानाबाद :- आगामी काळात जिल्ह्यात टंचाईसदृश् परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी आणि सर्व आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यात  पाणी टंचाई जाणवू नये, यासाठी टंचाई कृति आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी यासंदर्भात  पाणीटंचाईबाबत अधिका-यांना आराखडा तयार करण्यास सांगितले आहे. सध्या टंचाई परिस्थितीत जनतेस पिण्याचे पाणी  व शेतीसाठी पाण्याची टंचाई जाणवणार नाही, यासाठी जिल्हा प्रशासनाने नियोजन केल्याचे दिसून येत आहे.
      सध्या ऑक्टोबर 2014 ते डिसेंबर 2014  या कालावधीसाठी 53 सार्वजनिक विहीरीचे अधिग्रहण करुन 39 गावे/ वाडया वस्तीला पाणीपुरवठा करण्यासाठी 32 लाख 70 हजाराची तरतुद करण्यात आली असून  22 गाव, वाडया, वस्तीला टँकर/ बैलगाडीने पाणीपुरवठयासाठी 32 लाख 70 हजाराची तरतुद करण्यात आली आहे. 3 गाव, वाडी व वस्तीला पाणीपुरवठा करता यावी यासाठी  नळयोजनेच्या विशेष दुरुस्तीसाठी 18 लाखाचा, 15 नवीन विंधन विहीर घेणे/ कुपनलिका घेण्यासाठी 7 लाख 50 हजाराचा व 2 तात्पुरत्या पुरक नळ योजना घेण्यासाठी 7 लाखाचा असे एकुण 84 लाख 28 हजार रुपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.
          जिल्हयात 8 नगरपालिका असून त्यापैकी परंडा व कळंब नगरपालिका क्षेत्रात संभाव्य  पिण्याची पाण्याची टंचाई जाणवणार असून  या शहरांना पाणी पुरवठा करण्यासाठी प्रत्येकी 20 टँकरची आवश्यकता भासणार आहे. टँकरने पाणीपुरवठा करता यावा,  यासाठी कळंब तालुक्यातील चोराखळी साठवण तलाव व परंडा तालुक्यातील सिना कोळेगाव प्रकल्पातून टँकरने पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
         नागरी व शहरी ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये यासाठी तलावांच्या पाणी आरक्षणासंदर्भातही निर्णय घेण्यात आला आहे. उस्मानाबाद तालुका व शहर पाणीपुरवठा योजनेसाठी उजणी धरण, तेरणा प्रकल्प, शिंगोली तलाव व शेरकरवाडा , तुळजापूर व नळदुर्ग शहारासाठी  तुळजापूर शहर योजनेसाठी कुरनूर प्रकल्प बोरी तलावाचे आरक्षण करण्यात आले आहे. लोहारा तालुक्यातील 22 खेडी प्रा. पाणीपुरवठा योजनेसाठी माकणी व 3 गावास निम्न तेरणा प्रकल्पातून,  ढोकी व 4 गावे पाणीपुरवठा योजनेसाठी तेरणा मध्यम प्रकल्प, तुळजापूर तालुक्यातील जळकोटसाठी खंडाळा तलाव, तुळजापूर तालुक्यातील अणदूर बोरीसाठी बोरी का. स्व. न. पा. पुरवठा योजना, वाशी तालुक्यासाठी वाशी, पारडी, कन्हेरी, कोळेवाडी या गावासाठी आरसोली मध्यम प्रकल्प, भूम तालुक्यातील हाडोंग्रीसाठी आरसोली मध्यम प्रकल्पातील पाणी  आरक्षण करण्यात येणार आहे.
      उस्मानाबाद जिल्हयात एक  मोठा प्रकल्प असून त्याची  उपयुक्त पाणीसाठा 76.190 द.ल.घ.मी. आहे. 17 मध्यम असून या  प्रकल्पात पाणी साठवण्याची क्षमता 202.86 द.ल.घ.मी. आहे. सध्या या प्रकल्पात 41.45 दलघमी पाणीसाठा आहे, 196 लघु प्रकल्प असून या प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा 355.77  द ल घ मी आहे. सध्‍या या प्रकल्पात 92.02 दलघमी पाणीसाठा आहे. जिल्हयात भविष्यात पाणीटंचाई भासू नये, यासाठी प्रशासनपातळीवर नियोजन करण्यात येत आहे.

Labels:

सैनिक शाळा सातारा प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

उस्मानाबाद :- सैनिक शाळा, सातारा येथे प्रवेश परीक्षेव्दारा इयत्ता 6 वी आणि 9 वीच्या विदयार्थ्यांना सन 2015-2016 सत्रात प्रवेश देण्यात येणार आहे. विदयार्थ्यांकडून ठराविक नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे. प्रवेशासाठी  विदयार्थ्यांनी 29 नोव्हेंबर 2014 पर्यंत ऑनलाईन प्रवेश अर्ज भरावे, असे आवाहन प्राचार्य, सैनिक शाळा, सातारा यांनी केले आहे.
    प्रवेशासाठी वयोमर्यादा व परीक्षापध्दती इयत्ता 6 वीसाठी उमेदवार 2 जुलै 2004 ते 1 जुलै 2005 (दोन्ही दिवस धरुन)   या कालावधीत जन्मलेला असावा तर इयत्ता 9 वीसाठी उमेदवार 2 जुले 2001 ते 1 जुलै 2002 (दोन्ही दिवस धरुन ) या कालावधीत जन्मलेला असावा व सध्या मान्यताप्राप्त शाळेत इयत्ता आठवीमध्ये शिकत असावा.   इयत्ता 9 वीच्या प्रवेशासाठी प्रश्नपत्रीका फक्त इंग्रजी भाषेमधून असतील. प्रवेश संख्या 6 वीसाठी अंदाजे 80 ते 85 व इयत्ता 9 वी साठी 5 अशी राहील.
    अनुसूचित जातीसाठी 15 टक्के, अनुचित जमातीसाठी साडेसात टक्के, सैनिक सेवेतील माजी व आजी कर्मचाऱ्यांची मुलासाठी 25 टक्के  (अ.ज. व अ.जा.) यांच्या राखीव जागा सोडुन राहतील. प्रवेश परीक्षा रविवार, दि. 4 जानेवारी, 2015 आहे. माहितीपत्रक/ दरपत्रक सामान्यवर्ग, सरंक्षण दल, विमुक्त जाती, भटक्या जमातील इतर मागासवर्ग वर्ग, विशेष मागासवगातील उमदेवारांसाठी रुपये 425 रुपये फक्त अनुचित जाती व अनुसूचित जमातीमधील उमदेवारासाठी मुलांच्या जातीच्या दाखल्याची झेरौक्त प्रत जोडणे बंधनकारक असून रुपये 275 राहील. ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी www.sainiksatara.orag या संकेतस्थळास भेट देवून ऑनलाईन प्रवेशपत्र भरावा.
   ऑनलाईनवर पूर्णपणे भरलेल्या प्रवेश अर्जाची प्रिन्टेंड प्रत व डिमांड डर्‌फ या त 6 डिसेंबर 2014 रोजी  दुपारी 1-30 वाजेपर्यंत पोहोचतील अशा बेबाने पाठवावेत, अधिक   माहितीसाठी  प्राचार्य, सैनिक शाळा, सातारा संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.                                        

Labels:

बँकानी शेतक-यांचे आर्थीक जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्नशील रहावे - देशपांडे

उस्मानाबाद -:  एनजीओनी  बँकांच्या माध्यमातून  जे एल जीचे मोठ्या प्रमाणात  गट तयार करुन बँकानी शेतक-यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी सतत कार्यशील राहून  भुमीहीन शेतमजूरांना स्वालंबी बनवावे, असे आवाहन नाबर्डचे जिल्हा व्यवस्थापक चंद्रशेखर देशपांडे यांनी केले. उस्मानाबाद येथे राष्ट्रीय कृषी  व ग्रामीण विकास बँक नाबार्ड उस्मानाबादच्यावतीने   जे. एल. जी संयुक्त दायीत्व गट विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. त्याप्रसंगी देशपांडे बोलत होते.
           कार्यशाळेत मार्गदर्शन करताना देशपांडे म्हणाले की,  यांनी जे एल जी/ संयुक्त दायीत्व गटासंदर्भात म्हणाले की,  देशात भूमिहीन शेतकऱ्यांना सातत्यपुर्ण कर्जपुरवठा व्हावा, यासाठी  देशभरात 5 लाख  भुमिहीन शेतकऱ्यांचे संयुक्त दायीत्व गट तयार करुन बँकाव्दारे गटाना अर्थसहाय्य व्हावे, अशी  केंद्र शासनाची मुख्य भुमिका असल्याचे स्पष्ट  केले. 
        लिड बँकेचे अधिकारी भीमराव दुपारगुडे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळा घेण्यात आली.यावेळी रिझर्व बँकेचे सहायक महाप्रबंधक श्री. सांगवीकर जिल्हा प्रकल्प अधिकारी (एनआरएलएम) डॉ. केशव सांगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सामाजिक संस्थेचे पांडुरंग घोडके  उपस्थित होते.  

Labels:

सुशिक्षीत बेरोजगार युवती-महिलांसाठी ब्युटीपार्लरचे प्रशिक्षण

उस्मानाबाद :- महाराष्ट्र उदयोजकता विकास केंद्र, उस्मानाबादतफे उस्मानाबाद येथे  विशेष घटक योजनेतील सुशिक्षीत बेरोजगार युवती-महिलासाठी मोफत ब्युटी पार्लर  प्रशिक्षण कार्यक्रम 1 ते 30 डिसेंबर  या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. 
       या प्रशिक्षण कार्यक्रमात संपूर्ण ब्युटीपार्लर व उदयोजकीय अभ्यासक्रमाविषयी दररोज 12 ते 5 या कालावधीत तज्ज्ञ मार्गदर्शक व अधिका-यांव्दारे माहिती दिली जाणार आहे.  तरी इच्छुक युवतीं व महिलांनी  अधिक  माहिती व अर्जासाठी 28 नोव्हेंबरपर्यंत संपर्क साधावा तसेच दि. 29 नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष मुलाखतीव्दारे उमदेवारांची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येणार आहे. अर्ज व अधिक  माहितीसाठी कार्यक्रम आयोजक, मयुर  गायकवाड, मो. नं. 9673455500/ 7841053770 यांच्याशी महाराष्ट्र उदयोजकता विकास केंद्र, व्दारा जिल्हा उदयोग केंद्र, उस्मानाबाद येथे संपर्क साधण्याचे आवाहन एम. सी. ई. डी. प्रकल्प अधिकारी उस्मानाबाद यांनी केले आहे.

Labels:

अणदूरच्या श्री खंडोबाचे मैलारपुरात आगमन

अणदूर - हलगीच्‍या विशिष्ठ ठेक्यावर बेभानपणे नाचणारे वारू, भंडारा आणि खोब-याची मुक्त उधळण आणि येळकोट, येळकोट जय मल्हारचा जयघोषामुळे अणदूरचा श्री खंडोबा मंदिर परिसर रविवारी दिवसभर आणि रात्रभर दुमदुमून गेला होता.
    दरवर्षी मराठी तिथीनुसार मार्गशीर्ष शुध्द प्रतिपदा तथा देवदीपावलीला अणदूरच्या श्री खंडोबाची यात्रा भरते. यंदाची यात्रा रविवार दि.२३ नोव्हेंंबर रोजी पार पडली. पहाटे चार वाजता काकड आरती झाल्यानंतर, गावातील पाचशेहून अधिक महिलांनी तसेच काही पुरूषांनी आपल्या घरापासून ओल्या कपड्यांनी दंडवत घालून श्री खंडोबाचे दर्शन घेतले.सकाळी दहा वाजता श्री खंडोबास अभिषेक करण्यात आला आणि महाअलंकार पुजा करण्यात आली.त्यानंतर अणदूर ग्रामस्थांनी दिवसभर पुरण - पोळीचा नैवेध दाखविला.तसेच गावागावाहून आलेल्या भक्तांनी भंडारा तसेच खोबरे उधळून, येळकोट, येळकोट जय मल्हारचा जयघोष केला.दिवसभर नवससायाचे कार्यक्रम पार पडले.
      सायंकाळी सातनंतर भाविकांच्या संख्येत वाढ झाली. अनेक गावचे वारू हलकीच्या तालावर बेधुंदपणे नाचत श्री खंडोबा यात्रेसाठी दाखल झाले.रात्री दहा वाजता श्री खंडोबाची पुजा करण्यात आल्यानंतर श्रीचा वाजत - गाजत छबिना काढण्यात आला. फुलांनी सजावट केलेल्या पांढ-या शुभ्र घोड्यावर जेव्हा श्री खंडोबाचा छबिना निघाला, तेव्हा मंदिर परिसर भक्तीभावाने डुंबून निघाला.समोर हलकीच्या तालावर नाचणारे वारू, त्यामागे धनगरी ढोल, पाठोपाठ मृदंग, जगंट, पितळी टाळांच्या गजरात पुजा-यांनी एका सुरात गायिलेले खंडोबा स्तोत्र यामुळे वातावरण भारावून गेले.घोड्याने दोन प्रदक्षिणा घातल्यानंतर रात्री एक वाजता छबिन्याची सांगता करण्यात आली.याचवेळी नळदुर्गच्या मानक-यांचे आगमन झाले.यानंतर अणदूर आणि नळदुर्गच्या मानक-यांमध्ये हस्तांदोलन करण्यात आल्यानंतर श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीने चहापान करण्यात आली तसेच पान - सुपारी देण्यात आली.त्यानंतर मंदिराच्या गाभा-यात दोन्ही गावच्या मानक-यांत श्री खंडोबाची मुळ मुर्ती नेणे आणि आणण्याचा लेखी करार करण्यात आला.यावेळी मुख्य मानक-यांचा फेटा बांधून तर अन्य मान्यकरांचा टोपीत फुलांचा तुरा घालून आणि प्रसाद देवून सत्कार करण्यात आला.त्यानंतर श्री खंडोबाची पत्नी म्हाळसाबाई, हेगडीप्रधान यांच्या मुत्र्या मैलारपूरकडे मार्गस्थ झाल्या.श्री खंडोबाची मुळ मुर्ती सजावट करण्यात आलेल्या पालखीत ठेवण्यात आल्यानंतर मध्यरात्री अडीच वाजता श्री खंडोबा पावनेदोन महिन्याच्या वास्तव्याकरिता मैलारपूरकडे निघाले. श्री खंडोबाची पालखी जात असताना, वाटेत भाविकांनी जागो जागी पालखीचे दर्शन घेतले. वाजत - गाजत चार किलो मीटर अंतर चालल्यानंतर सोमवारी पहाटे साडेपाच वाजता श्री खंडोबाचे मैलारपुरात आगमन झाले.त्यानंतर मुख्य गाभा-यात मुर्तीची प्रतिष्ठापणा करण्यात आली.यावेळी श्री खंडोबाची साधी पुजा करण्यात येवून, पंचारती म्हणण्यात आली. दहा मिनीटांनी मंदिराचा गाभारा बंद करण्यात आला आणि सहा वाजता पुन्हा काकडआरती करण्यात येवून, मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुले करण्यात आले.त्यानंतर श्री खंडोबा पालखीसोबत आलेल्या अणदूर आणि नळदुर्गच्या सर्व भाविकांना श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीने शि-याचा प्रसाद वाटप करण्यात आला.यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट आणि श्री खंडोबा यात्रा कमिटीच्या सर्व पदाधिका-यांनी परिश्रम घेतले.

Labels:

Sunday, 23 November 2014

बार्शीत पोलिसांचे संचलन

 बार्शी - बार्शीत मागील दोन-तीन वर्षांपासून सुरु झालेल्या शहिद हजरत टिपू सूलतान जयंतीच्या मिरवणुकीला पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव यावर्षी परवानगी नाकारली आहे. शांतता व सुव्यवस्थेसाठी पोलिसांनी शहरात चोख बंदोबस्त ठेवला होता.
       
    दंगा काबू पथकासह मोहोळ, वैराग, पंागरी, अकलूज, माढा आदी ठिकाणहून मागविण्यात आलेल्या अतिरिक्त पोलिस बंदोबस्तासह बार्शी पोलिसांच्या पथकाने शहरातील विविध भागांमध्य संचलन केले. कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी. गुन्हेगारांवर वचक बसावा, पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी या संचलनाचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती पोलिस उपअधिक्षक सर्जेराव ठोंबरे व पोलिस निरीक्षक सालार चाऊस यांनी दिली.शहरातील भाजी मंडई परिसर, भोगेश्वरी मंदिर परिसर, ख्वाजा नगर, ४२२ घरकुल, परंडा रोड, एकवीराई चौक, मंगळवार पेठ आदी भागातून पोलिसांनी संचलन केले. रविवारी अचानक पोलिसांनी केलेल्या संचलनामुळे शहरवासीयांमध्ये चर्चा सुरु होती.

Labels:

दारूच्‍या नशेत एकाची आत्‍महात्‍या

पांगरी - दारूच्या नशेत एका चाळीस वर्षीय तरुणाने गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दि.22 रोजी सकाळी धसपिंपळगांव ता.बार्शी येथील शिवारात घडली.भानूदास प्रभू वाघमोडे  असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्याचे नांव आहे.
  कल्याण वसंत वाघमोडे वाय 47 यांनी पांगरी पोलिसात डिलेल्या खबरीत म्हटले आहे की मयत भानूदास यांना  दारूचे व्यसन होते.त्यांनी दारूच्या नशेत त्यांच्याच शेतातील चिंचेच्या झाडास स्वत: गळफास लावून घेऊन आत्महत्या केली.पांगरी पोलिसात अकस्मात मयत म्हणून गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास हवालदार ठाकर हे करत आहेत.

Labels:

उपचारादरम्‍यान वृध्‍देचा मृत्‍यू

पांगरी - फळीवरील चिमणी अंगावर पडून चिमणीचा भडका होऊन एका वृद्धेचा उपचार सुरू असताना मृत्यु झाल्याची घटना धोत्रे ता.बार्शी येथे घडली.मिजाजबी मेहबूब शेख वय ७५ रा.धोत्रे असे मयत झालेल्या वृद्धेचे नाव आहे.
 वैद्यकीय अधिकारी उस्मानाबाद यांनी दिलेल्या खबरीत म्हटले आहे की मयत मिजाजबी शेख ह्या दि.१६ रोजी रात्री घरी असताना त्या फळीवरील चिमणी घेत असताना त्यांच्याकडुन चिमणी निसटल्यामुळे चिमणीचा भडका होऊन त्या शंभर टक्के भाजून गंभीर जखमी झाल्या होत्या.त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यु झाला पांगरी पोलिसात अक्समात मयत म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास बिराजदार हे करत आहेत.

Labels:

सकनेवाडी पॅटर्न राज्यात राबविणार - खडसे

उस्मानाबाद - अत्याधुनिक पद्धतीने जमीन मोजणीचा राज्य पातळीवरील प्रायोगिक उपक्रम सर्वप्रथम उस्मानाबाद जिल्ह्यात सकनेवाडी येथे राबविण्यात येत आहे.  यापुढे अशाच पद्धतीने उपग्रहाची मदत घेऊन जमीन मोजणी उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी 4 हजार कोटींच्यापेक्षा जास्त खर्च होणार असून केंद्र शासनाचे मदतीची तयारी दर्शविली असल्याची माहिती राज्याचे महसूल, मदत व पुनर्वसन मंत्री एकनाथराव खडसे यांनी दिली.
 विविध उपक्रमांसाठी गावातील नागरिकांना निधीचा वाटा भरावा लागतो. मात्र, सर्व गावाने सहकार्य केल्यास जमा झालेल्या रकमेपैकी 25 टक्के निधी पुन्हा ग्रामपंचायतींना सार्वजनिक विकासकामांसाठी
उस्मानाबाद तालुक्यातील सकनेवाडी येथे जमिनीची ई-मोजणी करण्याच्या उपक्रमास सुरुवात झाली. गावातील हद्दीवरुन होणारे तंटे यामुळे कमी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांचा बराच वेळ हा अशाप्रकारच्या हद्दीवरुन होणाऱ्या तक्रारी मिटविण्यासाठी जातो, असेही ते म्हणाले.
पूर्वी शेतीसाठी असणारी जमीन ही नंतर निवासी, उद्योग, जलसंधारण अशा कामांसाठी वापरली गेली. त्यामुळे कृषी क्षेत्र सातत्याने कमी कमी होत आहे. त्यामुळे निश्चित शेतजमीन राज्यात किती आहे, याची माहितीही याद्वारे मिळू शकणार आहे. तसेच कोणत्या प्रयोजनासाठी किती जमीन गेली आहे, याचीही माहिती उपलब्ध होणार असल्याचे श्री. खडसे यांनी नमूद केले.
सकनेवाडी येथे त्यांनी ई-मोजणी कार्यक्रमाची पाहणी केली. तसेच गावात आयोजित केलेल्या सुवर्ण जयंती राजस्व अभियान अंतर्गत समाधान मेळाव्याचे उदघाटन केले. त्यावेळी ते बोलत होते. आमदार राणा जगजीतसिंह पाटील आणि आमदार राहूल मोटे, उपसचिव श्री. इंदुलकर, विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्ह परिषद उपाध्यक्ष सुधाकर गुंड गुरुजी, अपर जिल्हाधिकारी जे.टी.पाटील, जिल्हा भूमी अभिलेख अधिकारी श्री. मगर, कृषी सहसंचालक श्री. देशमुख यांच्यासह विविध यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी श्री. खडसे यांनी दुष्काळ जाहीर करा अशी मागणी करण्यापेक्षा आपण दुष्काळ निवारणासाठी आणि दुष्काळ येऊच नये यासाठी आवश्यक कामे हाती घेतली पाहिजेत, असे सांगितले. गाव एकत्र आले तर अनेक विकास कामे शक्य आहेत, असे त्यांनी सांगितले.
मराठवाड्यातील टंचाई परिस्थिती लक्षात घेता नदी जोड प्रकल्प कार्यान्वित करुन कोकणातील नद्यांचे वाहून जाणारे पाणी मराठवाड्याकडे वळवावे, अशी विनंती केंद्र शासनाला केली असून केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी याबाबतीतील प्राथमिक अहवाल तयार करण्याच्या सूचना राज्य शासनाला दिल्याची माहितीही श्री. खडसे यांनी यावेळी आपल्या भाषणात दिली.
जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी प्रास्ताविक केले.  समाधान मेळाव्याच्या माध्यमातून नागरिकांना विविध प्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे सांगितले.
यावेळी सकनेवाडी ग्रामस्थांना रेशनकार्ड, आधारकार्ड नोंदणी, बचतगट प्रमाणपत्र वाटप, रहिवासी दाखला, शेतकरी गट स्थापन प्रमाणपत्र आदींचे वाटप करण्यात आले. यावेळी सकनेवाडी (ता. उस्मानाबाद) आणि वांगी बुद्रुक (ता. भूम)  ही गावे लोकराज्यग्राम झाल्याबद्दल श्री. खडसे यांच्या हस्ते सकनेवाडीचे सरपंच दयानंद भोईटे आणि ग्रामसेवक एस.डी. राठोड तसेच वांगीचे माजी जि.प. सदस्य आदिनाथ पालके आणि ग्रामसेवक प्रवीण देशमुख यांचा महसूलमंत्री खडसे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

उपलब्ध करुन दिला जाईल, असेही त्यांनी नमूद केले. युती शासनाच्या काळात राबविलेली वर्षातून एकदा शेतकना सातबारा मोफत देण्याची योजना पुन्हा सुरु करण्यात येत असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.

Labels:

उपग्रहाच्या मदतीने गावांची आणेवारी ठरविणार-महसूलमंत्री खडसे

उस्मानाबाद - रोजगार हमी योजनेतील अपूर्ण कामांना प्राधान्य, जलसंधारणाची अधिकाधिक कामे हाती घेणे, पायाभूत सुविधा निर्माण करण्याबरोबरच रोजगार उपलबध करुन देणे, अशा माध्यमातून मराठवाड्यातील टंचाई परिस्थितीला सामोरे जाण्याचे राज्य शासनाचे धोरण असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल, मदत व पुनर्वसन मंत्री एकनाथराव खडसे यांनी केले. याशिवाय पीकआणेवारीबाबत उपग्रहाच्या मदतीने सर्वेक्षण करुन संबंधित गावांची प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेऊन आणेवारी ठरविण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. मराठवाड्यातील टंचाई परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस औरंगाबाद येथे दि. 27 नोव्हेंबर रोजी बैठक घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात महसूलमंत्री श्री. खडसे यांनी जिल्ह्यातील टंचाई परिस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. खासदार प्रा. रवींद्र गायकवाड, जिल्हा परिषद अध्यक्ष कुलदीप (धीरज) पाटील, आमदार सर्वश्री मधुकरराव चव्हाण, राणा जगजीतसिंह पाटील, राहूल मोटे, ज्ञानराज चौगुले, आठही पंचायत समित्यांचे सभापती, उपसचिव श्री. इंदुलकर, विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, अपर जिल्हाधिकारी जे.टी.पाटील, कृषी सहसंचालक श्री. देशमुख यांच्यासह विविध यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी सुरुवातीला जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा सादर केला. तसेच, टंचाई निवारणासाठी प्रशासनामार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती देणारी पुस्तिकेचे प्रकाशनही श्री. खडसे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी श्री. खडसे म्हणाले की, रोजगार हमी योजनेची कामे पूर्ण करण्यास प्राधान्य द्या. केंद्र शासन प्रत्यक्ष काम पूर्ण झाल्यानंतर निधी देत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. रोहयोची कामे केवळ तांत्रिक बाबींचा आधार घेऊन बंद ठेवणे योग्य नाही. त्यामुळे जिल्हा पातळीवर काही अडचण आली तर मार्गदर्शन मागवा, मात्र, कामे पूर्ण करण्यास प्राधान्य द्या, असे त्यांनी नमूद केले.
मराठवाड्यासह राज्याच्या काही भागात भागात टंचाईची परिस्थिती आहे. गारपीट, अपुरा पाऊस यामुळे विविध भागातील पीकांचे नुकसान झाले आहे. त्यांना मदत करण्याचे शासनाचे धोरण अ
मराठवाड्यातील कृष्णा खोरे अंतर्गत पाणी उपलब्ध करुन देण्याबाबत मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना बैठक घेण्याबाबत विनंती करणार आहे, असे सांगून टंचाई परिस्थितीत शेतक-यांची वीज तोडू नये, अशा सूचना त्यांनी महावितरणला दिल्या.
सून दुष्काळासाठी पैकेज देण्याऐवजी कायमस्वरुपी टंचाई निवारणासाठी उपाययोजना करण्यावर भर राहणार असल्याचे श्री. खडसे यांनी स्पष्ट केले. रोहयोअंतर्गत विविध कामांचे मजुरांच पैसे तात्काळ वाटप करण्याचे निर्देश त्यांनी दिले. मागील टंचाईवेळी ज्या शेतकऱ्यांच्या विहीरी-विंधनविहीरी अधीग्रहीत करण्यात आल्या. त्यांचे पैसेही देण्यात येतील, असे श्री. खडसे यांनी सांगितले. ज्या ठिकाणच्या विंधनविहीरींची पाण्याची पातळी खाली गेली आहे, तेथे हातपंपाऐवजी सिंगल फेज वीज पुरवून विद्युत पंप बसविण्याचे निर्देश त्यांनी दिले.

Labels:

शिवसैनिकांनी ग्रा. प. निवडणुकीसाठी कामास लागावे

उस्‍मानाबाद -  विधानसभा निवडणूकीत जिल्ह्यात शिवसेनेचा एकच उमेदवार विजयी झाला असला तरी सगळ्यात जास्त मते शिवसेनेला मिळाली  आहेत.  जिल्ह्यातील आगामी होणा-या ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी शिवसैनिकांनी आतापासूनच कामास लागावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख सुधीर पाटील यांनी केले.
      विधानसभा निवडणूकीनंतर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिका-याची एक महत्वपूर्ण बैठक मेघमल्हार सभागृहात नुकतीच संपन्न झाली. या बैठकीस मार्गदर्शन करताना पाटील हे बोलत होते. याप्रसंगी शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख अनिल खोचरे, आमदार ज्ञानराज चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती.
      याप्रसंगी पुढे बोलताना पाटील  म्हणाले की, गेल्यावेळी आपल्या जिल्ह्यात शिवसेनेचे दोन लोकप्रतिनिधी होते. यावेळी दुर्देवाने पक्षास एकच जागा मिळाली. मात्र असे असले तरीही इतर पक्षाच्या तुलनेत जिल्ह्यात शिवसेनेस सर्वाधिक मते मिळाली ही आपल्या दृष्टीने अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत शिवसेनेस सगळ्यात जास्त म्हणजे २ लाख ३४ हजार, राष्ट्रवादी काँग्रेसला २ लाख २३ हजार, काँग्रेसला १ लाख ३४ हजार तर भाजपाला १ लाख ३२ हजार मते मिळाली आहेत. त्यामुळे आजही शिवसेना जिल्ह्यात एक नंबरवर आहे. असे सांगून आगामी कांही दिवसात जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका होत आहेत. जिल्ह्यातील शिवसेनेचा पाया भक्कम करण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायतीच्या निवडणूका जिंकणे अतिशय महत्वाचे आहे. तेव्हा शिवसेनेच्या सर्व पदाधिका-यासह शिवसैनिकांनी ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी आतापासूनच कामास लागावे असे आवाहन त्यांनी केले.
     या जिल्ह्यात दुष्काळ पडण्यास नैसर्गिक कारणे असले तरीही राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने या जिल्ह्यातील सहकारी संस्थाचे आर्थिक दिवाळे काढळल्यामुळे त्याचा फटकाही शेतक-यांना सहन करावा लागला आहे. शेतक-यांना कमी व्याजात कर्ज देणारी जिल्हा मध्यवर्ती बँक,काँग्रेस, राष्ट्रवादीच्या लोकांनी डबघाईस आणली, त्यामुळे शेतक-यांना इतर बॅकाचे चढ्या व्याजदराचे कर्ज घ्यावे लागते, जिल्हा दुध संघ या लोकांनी बंद पाडला, त्यामुळे शेतक-याच्या दुधाला ग्राहक नाही, परिणामी कमी भावाने शेतक-
याबैठकीसाठी उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण, दिलीप शाहू महाराज, विद्यार्थीसेना जिल्हाप्रमुख श्रीकांत देशमुख, युवा सेना जिल्हाधिकारी सुरज साळुंके, उस्‍मानाबाद तालुकाप्रमुख दिलीप जावळे, कळंब तालुकाप्रमुख रामलिंग आवाड, भूम तालुकाप्रमुख अनिल शेडगे, तुळजापूर तालुकाप्रमुख राजअहमद पठाण, लोहारा तालुकाप्रमुख मोहन पनुरे यांच्यासह सर्व उपतालुकाप्रमुख, शहरप्रमुख, विभागप्रमुख, शाखाप्रमुख व शिवसैनिक उपस्थित होते.
यांना दुध विकावे लागते. त्यामुळे शेतक-याच्या नुकसानीस जेवढा दुष्काळ जवाबदार आहे, तेवढेच काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते मंडळीही जवाबदार असून या लोकांच्या सहकारी संस्थामधील गैर कारभाराची चौकशी करण्यास शिवसेना शासनास भाग पाडेल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Labels:

Friday, 21 November 2014

महसूलमंत्री खडसे यांची शनिवारी उस्मानाबादेत टंचाई आढावा बैठक

उस्मानाबाद : नागरिकांच्या विविध अडचणी सोडविण्यासाठी सुवर्ण जयंती राजस्व अभियानाच्या माध्यमातून सकनेवाडी येथे शनिवारी समाधान मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या समाधान मेळाव्यास राज्याचे महसूलमंत्री एकनाथराव खडसे हे सकाळी आठ वाजता भेट देणार आहेत. तसेच राज्यात सर्वप्रथम सुरु करण्यात आलेल्या जमीन ई-मोजणी उपक्रमातील शेतक-यांना जमीन मोजणी नकाशा प्रमाणपत्र खडसे यांच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहेत.
      महसूलमंत्री  खडसे यांचे शुक्रवारी सायंकाळी 5-30 वाजता हेलिकॉप्टरने बीडहून उस्मानाबाद येथे आगमन झाले. त्यांच्यासमवेत मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव श्री. इंदुलकर, विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल हे होते. जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर श्री. खडसे यांचे शिंगोली सर्कीट हाऊस येथे आगमन झाले. तेथे आमदार राणा जगजीतसिंह पाटील, नितीन काळे आदींनी त्यांचे स्वागत केले. याचबरोबर विविध संस्था-संघटनांच्या प्रतिनिधींनीही त्यांचे स्वागत केले.
     शनिवारी सकाळी आठ वाजता श्री. खडसे हे सकनेवाडी येथे ई-मोजणी उपक्रमास भेट देणार असून नकाशा प्रमाणपत्राचेही वितरण त्यांच्या हस्ते होणार आहे. त्याचबरोबर सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत समाधान मेळाव्यासही ते भेट देणार आहेत.
     त्यानंतर सकाळी 10-30 वाजता महसूलमंत्री विविध शासकीय अधिका-यांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालय येथे आढावा बैठक घेणार आहेत.
      दरम्यान आज सकनेवाडी येथे जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी भेट देऊन ई-मोजणी कार्यक्रमाचा आढावा घेतला. यावेळी अपर जिल्हाधिकारी जे.टी.पाटील, उपविभागीय अधिकारी अभिमन्यू बोधवड, प्र.तहसीलदार राजेश जाधव, सरपंच दयानंद भोईटे यांच्यासह भूमिअभिलेख विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
      शेतजमीनीवरुन होणारे वाद मिटविण्यासाठी  महाराष्ट्रात प्रथमच सकनेवाडी येथे सरपंच व गावकऱ्यांच्या सहकार्यातून प्रायोगिक तत्वावर हा ई-मोजणीचा उपक्रम राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना मोजणी विभाग व प्रशासनाच्या दारी फेऱ्या माराव्या लागू नयेत यासाठी हा उपक्रम आहे. ही संधी गावकऱ्यांनी दडवू नये. या उपक्रमास संबंधित गटातील शेतकऱ्यांनी उपस्थित राहून प्रतिसाद दयावा. जेणेकरुन वाद, विवाद, पोलीस स्टेशनमधील तंटे, न्यायालयातील खटले अशा विविध प्रकारापासून वाद मिटल्याने आपल्याला समाधान मिळेल. जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून या गावातील संपूर्ण क्षेत्र मोजून देण्याचा निर्णयही घेतला आहे. या मोजणीच्या वेळी शेतकऱ्यांना जागेवरच मोजणीचा सातबारा व नकाशा देण्यात येणार आहेत, अशीही माहिती डॉ.  नारनवरे यांनी दिली.
गावातील मोजणी करण्यासाठी डिजीटल प्लेक्स तयार करण्यात येणार असून यावर गावाची रचना व गट तयार करण्यात येणार आहेत. यापूर्वी 1930 मध्ये ब्रिटीश कालावधीत अशा प्रकारचे मोठी मोजणी झाली होती. त्यानुसार शेतकऱ्यांना त्यांच्या जमीनीच्या खुणा आखून घेण्यात आल्या होत्या. त्यानंतर आताच या नाविन्यपूर्ण उपक्रम महाराष्ट्रात प्रथमच सरपंच व गावकऱ्यांच्या पुढाकारातून सकनेवाडीत राबविण्यात  येत आहे. याचाही लाभ शेतकऱ्यांनी  घेऊन हा उपक्रम महाराष्ट्रात आदर्श निर्माण व्हावा, यासाठी सर्व गावकऱ्यांनी योगदान देण्याचे आवाहनही डॉ.नारनवरे यांनी यावेळी केले.
       आपल्या गावात समाधान योजनेच्या माध्यमातून शासन आपल्या दारी येत असून जिल्हा प्रशासनातील विविध विभागाचे स्टॉल लावण्यात येणार आहेत. महसूल विभागाकडून जात प्रमाणपत्र, सातबारा उतारा, आधार कार्ड, रेशनकार्ड अशा अनेक प्रकारची प्रमाणपत्र आपल्याला गावातच उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत, महसूल विभागासह कृषी, पशुसंवर्धन,आरोग्य,शिक्षण,राज्य परिवहन, एकात्मिक बाल विकास, महिला आर्थीक विकास महामंडळ, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषदेचा स्वच्छ भारत अभियान कक्ष यांच्यासह विविध विभागांचे स्टॉल्स लावण्यात येणार असल्याचे  माहिती डॉ. नारनवरे यांनी दिली.
       डॉ. नारनवरे यांनी प्रत्यक्ष मोजणी स्‍थळास भेट मोजणी सर्व्हअर व तलाठी यांच्या समन्वयातून चालू असलेल्या गटनिहाय मोजणीचा पाहणी केली. जास्तीत जास्त पारदर्शकता या मोजणीच्या अनुषंगाने यावी. शेतकऱ्यांनी मोजणीची शासकीय फी भरुन मोजणी करावी. आपल्या शेतामध्ये खुणा करण्यासाठी विशिष्ट चाकोरीत आखून दिलेल्या साईजचा दगड आणावा. जेणेकरुन  भविष्यात खुणा नष्ट होणार नाहीत, याची काळजी घ्यावी.  यावेळी गावातील पदाधिकारी, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.      ****

Labels:

पांगरीतील एटीएम सेवा बंद; ग्राहकांची गैरसोय

पांगरी -: पांगरी ता.बार्शी परिसरातील तीस गावांच्या सोयीसाठी बँक ऑफ इंडिया तर्फे पांगरी येथे सुरू केलेली ए.टी.एम.सेवा गत पंधरा दिवसापासून बंद असल्यामुळे येथील हजारो ग्राहकांना ही सेवा असून अडचण नसून खोळंबा अशा स्वरूपाची ठरत आहे. ए.टी.एम.सेवेच्या संबंधित वरिष्ठ अधिकार्‍यांनी याकडे लक्ष देऊन पांगरीतील सेवा कार्यान्वित करून ग्राहकांची सोय करून द्यावी अशी पांगरी भागातील अनेक गावातील ग्रामस्थांची मागणी आहे.
     याबाबत अधिक माहिती अशी की, बार्शी तालुक्यात महत्वाचे गांव अशी ओळख असलेल्या  व  पुणे-लातूर राज्यामार्गावरील सर्व सोई युक्त गाव असलेल्या पांगरी येथे दै.पुढारीच्या पाठपुराव्यामुळे कांही महिन्यांपूर्वी ए.टी.एम.सेवा सुरू झाली आहे.मात्र गत अनेक दिवसापासून पांगरी येथील ए.टी.एम.सेवा सतत खंडित होत आहे.त्यात कळस म्हणजे अलीकडील पंधरा दिवसात ही सेवाच ग्राहकांना मिळणे दुरापास्त झाले आहे.पांगरी पासून वीस की.मी. अंतरावर ही सेवा उपलब्ध असल्यामुळे ग्राहकांना बँक वेळेव्यतिरिक्त आर्थिक भुरदंड सहन करून येडशी,अथवा बार्शी या शहराकडे जावे लागत आहे.
   तरी संबंधित कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी याकडे लक्ष देऊन येथील ए.टी.एम.सेवा तात्काळ सुरू करावी अशी पांगरी परिसरातील ग्राहकांची मागणी आहे.

Labels:

जात पडताळणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र अतिरीक्त जिल्हाधिकारी नेमण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय

मुंबई -: जात पडताळणीप्रमाणपत्र मिळण्यात होणारा विलंब लक्षात घेऊन प्रत्येक जिल्ह्यात जात पडताळणीसाठी स्वतंत्र अतिरीक्त जिल्हाधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतला. राज्यात सध्या जात पडताळणीची एक लाख प्रकरणे प्रलंबित असून या निर्णयामुळे लाखो नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
    अनुसुचित जाती-जमाती आणि इतर प्रवर्गाच्या नागरिकांना शिक्षण, शासकीय नोकरी आदी कामांसाठी जात पडताळणीचे प्रमाणपत्र आवश्यक असते. सध्या राज्यात आठ ठिकाणी असलेल्या जात पडताळणी समित्या हे प्रमाणपत्र देण्याचे काम करीत होत्या. तथापि कामाचा आवाका प्रचंड असल्याने हे प्रमाणपत्र मिळण्यात वेळेचा अपव्यय होत असे. ही अडचण लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या सर्व 36 जिल्ह्यांमध्ये फक्त जात पडताळणीच्या कामासाठी अतिरीक्त जिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी नेमण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्याची प्रलंबित प्रकरणे निकाली निघतील व नविन अर्जदारांना तातडीने प्रमाणपत्र मिळण्यास मदत होणार आहे.

Labels:

पुढील वर्ष डिजीटल आणि कालबद्ध सेवा देणारे म्हणून साजरे करावे : मुख्यमंत्री

मुंबई -: जनतेला विविध सेवा जलद गतीने मिळाव्यात यासाठी प्रशासकीय कामकाजात माहिती तंत्रज्ञानाचा वापर प्रभावीपणे करावा. सर्व विभागांनी पेपर फाईल सादर न करता, ई फाईल स्वरुपातच सादर करावी. 2015 हे वर्ष डिजीटलआणि कालबद्ध सेवा देणारे वर्ष म्हणून साजरे करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
     पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेला ‘डिजीटल इंडिया’ हा कार्यक्रम राज्यात प्रभावीपणे राबविण्याच्या अनुषंगाने सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित केलेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. या बैठकीस मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव के.पी. बक्षी, महसूल विभागाचे प्रधान सचिव एस.एस. संधू, ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव व्ही. गिरीराज, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव राजेश अग्रवाल आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
    मुख्यमंत्री म्हणाले, प्रशासकीय कामकाज गतीमान होण्यासाठी सर्व विभागांनी त्यांचे प्रस्ताव व फाईल्स या ई-फाईल्स स्वरुपात सादर कराव्यात. ज्या फाईल्स पूर्वी तयार झाल्या आहेत, अशा  फाईल्स सुध्दा ठराविक तारीख निश्चित करुन त्यासुध्दा ई-फाईल्स स्वरुपात तयार कराव्यात.
    जनतेशी निगडीत असलेले महसूल विभागातील संबंधित कामकाज उदा. सातबारा उतारा, जमीन मोजणी, फेरफार उतारा या प्रक्रियासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर  करण्यात यावा. ई टेंडरींगमध्ये सुलभता आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. सी.सी. टी.व्ही.चा वापर चांगल्या प्रकारे व्हावा, यासाठी त्याचा दर्जा वाढविणे आवश्यक आहे. सायबर लॅबमध्ये होणा-या कामाची प्रक्रिया जलद गतीने होण्यासाठी अधिक लक्ष द्यावे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, डाटा सेंटरसाठी मुंबईत जागा उपलब्ध नसल्यास राज्यातील औरंगाबाद, नागपूर अशा इतर ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात येईल.
    मुख्यमंत्री सहायता निधी, माहितीचा अधिकार याबाबतचे कामकाज ऑनलाईन करावे. तसेच ऑनलाईन रोस्टर सॉफ्टवेअर करावे. ई-लिलाव बंधनकारक करण्यात यावेत. वाहतूक  पोलीसांसाठी ई-चलन पध्दत सुरू करावी. शालेय विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी ऑनलाईन अभ्यासक्रम सुरु करण्यात यावा. तसेच मालमत्ता खरेदी व विक्रीची नोंदणी ऑनलाईन करण्यात यावी, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
       माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात राज्य शासनाने राबविलेल्या विविध उपक्रमांचे तसेच प्रस्तावित उपक्रमाबाबतचे सादरीकरण माहिती तंत्रज्ञान प्रधान सचिव राजेश अग्रवाल यांनी केले.

Labels:

महसूलमंत्री खडसे यांनी घेतले श्री तुळजाभवानीचे दर्शन

तुळजापूर -: राज्याचे महसूलमंत्री ना. एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी सायंकाळी तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत उपसचिव इंदुलकर आणि विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल हे होते. यावेळी जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ. प्रशांत नारनवरे यांनी त्यांचे स्वागत करुन सत्कार केला.

Labels:

संविधान दिनी मेजर सासने यांच्या विश्वविक्रमाचे प्रात्यक्षिक

उस्मानाबाद –: उस्मानाबाद येथील जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने (निवृत्त) स्टेप अप्स आणि पुश अप्स प्रकारातील विशवविक्रम येत्या 1 डिसेंबर रोजी उस्मानाबाद येथील श्री तुळजाभवानी क्रीडा स्टेडिअम येथे करणार आहेत. त्यापूर्वी दिनांक 26 नोव्हेंबर रोजी याच स्टेडिअमवर संविधान दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या प्रमुख उपस्थितीती संविधान उद्देशिकेचे वाचन केल्यानंतर हजारो विद्यार्थ्यांना ते प्रात्यक्षिक दाखविणार आहेत.
         जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे आणि मेजर सासने यांनी पत्रकार परिषदेत या उपक्रमाची माहिती दिली. 
    यावेळी जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे म्हणाले की, प्रशासनातील कोणी अधिकारी अशी आगळीवेगळी कामगिरी करीत असेल तर त्याला प्रोत्साहन देणे प्रशासनाचा प्रमुख म्हणून आवश्यक आहे. त्याचबरोबर, मेजर सासने यांची क्रीडाविषयक आवड आणि त्यातील रुची उस्मानाबादकर क्रीडा रसिकांना माहिती व्हावी, तरुणांच्या मनात शारीरिक तंदुरुस्तीबद्दल आवड निर्माण व्हावी, यासाठी हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात येत असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील सर्व क्रीडाप्रेमींनी दि. 26 रोजी मेजर सासने यांची प्रात्यक्षिके पाहण्यासाठी तसेच दि. 1 डिसेंबर रोजी प्रत्यक्ष मेजर सासने यांच्या विक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी श्री तुळजाभवानी क्रीडा स्टेडिअमवर हजर राहण्याचे आवाहनही डॉ. नारनवरे यांनी केले आहे.
यावेळी मेजर सासने (निवृत्त) यांनी, ते करणार असणाऱ्या विक्रमाविषय माहिती दिली. मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील असणारे मेजर सासने हे सध्या येथे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. लष्करात त्यांनी आर्मी फिजीकल ट्रेनिंग कोअर मध्ये सैन्य अधिकारी म्हणून काम पाहिले. भारतीय कुस्ती संघाचे 2008 मध्ये जागतिक सैन्यदल क्रीडा स्पर्धावेळी त्यांनी प्रतिनिधीत्व केले आहे. तसेच ते मिशन ऑलिंपिक विंग टॅलेंट स्क्वॉटिंग अधिकारी होते.
स्टेप अप्स आणि पुश अप्स प्रकारातील विविध चार विश्वविक्रम मेजर सासने हे उस्मानाबाद येथे नोंदविणार आहेत. याठिकाणी विश्वविक्रमाची संधी मिळणे, हे भाग्यदायी असल्याची भावना मेजर सासने यांनी व्यक्त केली. आपल्या या प्रयत्नांना सर्व उस्मानाबादकरांनी साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केलेय या उपक्रमास पाठिंबा देण्यासाठी शालेय विद्यार्थी, कॉजेज युवक-युवती, क्रीडापटू, विविध संस्था-संघटनांचे प्रतिनिधी, सर्वसामान्य क्रीडाप्रेमी नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
       यापूर्वी त्यांनी दोरीवरील उड्या मारण्याचा विश्वविक्रम केला आहे. सध्या मेजर सासने हे दि. 1 डिसेंबर रोजी  स्टेप अप्स आणि पुल अप्स प्रकारातील चार विक्रम करणार आहेत. यातील ती विक्रम हे यापूर्वी ब्रिटन, अमेरिका, जर्मनी या देशांच्या क्रीडापटूंनी केले आहेत तर एक स्वता मेजर सासने यांनी विकसित केलेला क्रीडाप्रकार आहे.
     या सर्व उपक्रमाबाबत सक्रीय सहभाग नोंदविण्याची इच्छा असणाऱ्या नागरिक मेजर सासने यांच्याशी 9970856438 (ई-मेल – subhash.sasne@gmail.com) यावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Labels:

अकलूज मनसे शहराध्यक्षाची हत्या

अकलूज :- महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचे अकलूजचे अध्‍यक्ष  राहूल शिवाजी भोसले (वय ३0) यांचा गुरुवारी सायंकाळी ८ च्‍यासुमारास विजय चौक येथील दर्ग्यासमोरील बोळात भरवस्तीत अज्ञात मारेक-यांनी निघृण हत्‍या केली. हत्‍या का व कशामुळे झाली याबाबत तर्कवितर्क केले जात आहे.
    अकलूज पोलीस स्टेशनला भोसले यांचे  भाऊ राजू मधुकर भोसले यांनी तक्रार दाखल केली असून यात संशयित म्हणून राहूलचा चुलतभाऊ पंट्या (प्रवीण) भोसले याचे घराचे वादावरुन वैमनस्य होते व त्यानेच घात केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे, अशी माहिती पो.नि. विश्‍वास साळुंखे यांनी दिली. राहूल भोसले यांच्या पश्‍चात पाठीमागे पत्नी, १ मुलगा, आई-वडील आहेत.राहूलचे हत्तेनंतर त्वरित अकलूज बंद झाले. खुनाची चर्चा भाऊ बंदकीतून झाली की राजकीय वैमन्यसातून झाली. याबाबत चर्चा चालू होती. मयताचे पोस्टमार्टेम केल्यानंतर नातेवाईकांचे ताब्यात देण्यात आले.

Labels:

Thursday, 20 November 2014

सकनेवाडी येथे शनिवारी समाधान मेळावा

उस्मानाबाद - नागरिकांच्या विविध अडचणींची सोडवणूक व्हावी, यासाठी विविध शासकीय यंत्रणा येत्या शनिवारी प्रत्यक्ष सकनेवाडी (ता. उस्मानाबाद) या गावात जाणार आहेत. विविध योजनांची माहिती नागरिकांना व्हावी, शासन योजनांचा थेट लाभ त्यांना मिळावा, यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील यांनी विविध शासन यंत्रणांच्या प्रमुखांची यासंदर्भात बैठक घेऊन या मेळाव्यात सहभागी होण्याबाबत सूचना दिल्या.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी.टी. वाबळे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे यांच्यासह विविध विभागांच्या प्रमुखांची यावेळी उपस्थिती होती.
महसूल विभागासह कृषी, पशुसंवर्धन, आरोग्य, शिक्षण, राज्य परिवहन महामंडळ, एकात्मिक बालविकास, महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जि.प.चा स्वच्छ भारत अभियान कक्ष यासह विविध विभागांचे स्टॉल्स याठिकाणी लावण्यात येणार आहेत. 
सकनेवाडी ग्रामस्थांनी या योजनांचा आणि शासन आपल्या दारी उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Labels:

फीस व शिष्यवृत्तीबाबत विदयार्थ्‍याना सूचना

 उस्मानाबाद -    सन 2014-15 या शैक्षणिक वर्षात्त अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागासवर्ग प्रवर्ग व इतर मागासवर्ग वर्गातील विदयार्थ्यासाठी  भारत सरकार व शिक्षण फी परीक्षा फी या शिष्‍यवृत्तीची योजना सुरु केली आहे. या  योजनेचा लाभ घेण्यासाठी विदयार्थ्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट सुरु करुन देण्यात आली  आहे. ऑनलाईन नवीन अर्ज व नुतनीकरण अर्ज ऑनलाईन व्दारे भरुन या योजनेचा लाभ घ्यावे, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, उस्मानाबाद
इच्छुक विदयार्थ्यांनी  ऑनलाइन फॉर्म भरुन  या योजनेचा लाभ घ्यावा. तसेच राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, विदयावेतन आणि परराज्यात शिक्षण घेणा-या विदयार्थ्यांना शिष्यवूत्ती ई-स्कॉलरशिप या योजनेमध्ये  समावेश करण्यात आला आहे. मागासवर्गीय विदयार्थ्यांकंडून ऑनलाईन अर्ज भरुन घेण्याची जबाबदारी संबंधित महाविदयालयाच्या प्राचार्यांनी विदयार्थ्यांच्या निदर्शनास आणून दयावी व विदयार्थ्यास अडचणी आल्यास संबंधितांनी त्वरीत मदत करावी.
जर विदयाथ्यानी ऑनलाईन अर्ज न भरल्यास शिष्‍यवृत्तीपासून वंचित राहील्यास याची जबाबदारी संबंधित महाविदयालयाचे विदयार्थी व प्राचार्यावर राहील, जिल्हयाअंतर्गत  ऑनलाईन शिष्यवृत्ती फॉर्म भरण्याकरीता 235 महाविदयालये कार्यरत असून त्यापैकी अदयाप 75 महाविदयालयातील विदयार्थ्यांनी ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची कार्यवाही चालू आहे.
उर्वरीत महाविदयालयापैकी 68 महाविदयालयातील विदयार्थी ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्ज भरण्याकरीता प्रचलित सिस्टीमध्ये गेले नसल्याचे आढळून आले आहे. उपरोक्त महाविदयालयाने आपले अभ्यासक्रम अदयावत केल्यानंतरच विदयाथ्या्रंनी ऑनलाईन शिष्यवृत्ती /फ्रीशिप अर्ज विहित मुदतीत ऑनलाईन सिस्टीमने भरता येतील.  विदयार्थ्यांना शिष्यवृत्ती /फ्री‍शिप अर्ज विहीत मुदतीत ऑनलाईन सिस्टीमने अर्ज भरण्याकरीता प्राचार्यांनी विदयार्थ्यांना शिष्यवृत्ती/ नोटीस बोर्डावर योग्य त्या सूचना डकवाव्यात. ऑनलाईन शिष्यवृत्ती /फ्रीशीप फॉर्म भरुन घेण्याची जबाबदारी  हि प्राचार्याची व विदयार्थ्यांची राहिल याची नोंद घेवून तात्काळ योग्य ती कार्यवाही करावे, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, उस्मानाबाद या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मागील  वर्षात 22 हजार 796 विदयार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.       

Labels:

उमरगा तालुक्यातील रामनगरला महसूल गावाचा दर्जा

  उस्मानाबाद - महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 महाराष्ट्र अधिनियम 41 च्या कलम 4 च्या पोटकलम 1 च्या परंतुकाखाली प्राप्त अधिकारानुसार  जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी उमरगा तालुक्यातील रामनगर  एकुण गट क्रं. 105 क्रमांक गावास महसूली  गावास दर्जा देण्यास   मंजूरी  दिली आहे. रामनगर या गावात खालीलप्रमाणे गटाचा समावेश करण्यात आला आहे.
    यानुसार गट क्र. 228, 230 ते  गट क्रं.249, गट क्र. 292 ते 312, गट क्र. 354 ते 374, गट क्र. 403 ते 418 , गट क्र. 420 ते 424 गट क्र. 420 ते 424, गट क्र. 458 ते 477 या गटाचा  रामनगर महसूली गावास महसूल गावाचा दर्जा देण्यात आला आहे. याची सबितानी नोंद घ्यावी, असेही कळविण्यात आले आहे. 

Labels:

अज्ञात मृत महिलेबाबत आवाहन

 उस्मानाबाद - उस्मानाबाद तालुक्यातील करजखेडा  शिवारात राज्य रस्ता क्र. 3 तुळजापूर ते औसा रोडवर  अज्ञात वाहनचालकाने वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवून रोडवरुन जाणारी अज्ञात महिलेस जोराची धडक देवून तिला गंभीर जखमी केल्याने ती जागीच  25 ऑगस्ट, 2014 रोजी  मरण पावली असल्याची फिर्याद बालाजी  दगडुसिंग ठाकूर रा. ताकविकी, ता. जि. उस्मानाबद यांनी दिल्याने बेंबळी पोलीस स्टेशनला  अज्ञात मयत स्त्रीच्या गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे.
    सदरील मयत स्त्रीचे वर्णन- यानुसार मयत महिलांचे  अंदाजे वय 55 ते 60 वर्ष असून शरीरबांधा-सडपातळ, उंची अंदाजे 150 से.मी, चेहरा-गोल, अंगात निळा रंगाचा ब्लाऊज पिवळसर रंगाची काळे पांढरे रेषाचे डिझायरची साडी, गुलाबी रंगाचा परकर, पायात लाल पटटयाची स्लीपर चप्पल परीधान केली आहे. 
वरील वर्गणाचे अज्ञान मयत स्त्रीचा व अज्ञात वाहन व चालकांचा कोणास माहिती असल्यास त्यांनी पोलीस स्टेशन, बेंबळी, ता. जि. उस्मानाबाद यांचे दुरध्वनी क्रमांक 02472-235033 वर संपर्क साधण्याचे आवाहन बेंबळीचे सहा.पोलीस निरीक्षकांनी   एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले  आहे.

Labels:

शासकीय निवृत्तीवेतन धारकांना सूचना

 उस्मानाबाद - राज्य शासकिय निवृत्तीवेतनधारक/ कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांनी विहित नमुन्यात 1 नोव्हेंबर रोजी हयात असल्याचे प्रमाणपत्र राष्ट्रीयकृत बँकेमार्फत  कोषागारास सादर करावयाचे असून सर्व राष्ट्रीयकृत बँकेना हयात प्रमाणपत्राची यादी पुरविण्यात आली आहे.
          कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी पुनर्विवाह व पुर्णनियुक्ती/ अनुकंपा तत्वावर नियुक्तीबाबतचे प्रमाणपत्र कोषागार कार्यालयात सादर करणे अनिवार्य आहे. त्याशिवाय त्यांचे कुटुंब निवृत्तीवेतन प्रदान केले जाणार नाही.    सर्व राज्य शासकिय निवृत्तीवेतनधारक/ कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांनी आपले प्रमाणपत्र 15 डिसेंबरपर्यंत विहित नमुन्यात हयात प्रमाणपत्रासमोर स्वाक्षरी करुन संबंधित बॅकेमार्फत  कोषागारात सादर करावीत अन्यथा  माहे डिसेंबर 2014 पासून पुढील निवृत्तीवेतन/कुटुंब निवृत्तीवेतन मिळणार नाही,  याची सर्व संबधितानी नोंद घ्यावी, असे आवाहन कोषागार अधिकारी, उस्मानाबाद यांनी केले आहे.     

Labels:

जिल्ह्यातील ई-मोजणी उपक्रमास प्रारंभ

 उस्मानाबाद - शेतक-यांच्या जमीन मोजणीसंदर्भात अनेक अडचणी असतात. हद्दीवरुन भांडणेही होतात. अशावेळी जमीनीची शासनामार्फत मोजणी झाली तर त्याचा लाभ गावक-यांना होऊन गावातील तंटेही कमी होतील या उद्देशाने राज्यातील पहिल्या डिजीटल जमीन मोजणी कार्यक्रमाचा शुभारंभ उस्मानाबाद तालुक्यातील सकनेवाडी येथे अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील यांच्या हस्ते झाला.
         याप्रसंगी भूमापक, तलाठी, सर्व तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांच्या उपस्थितीत या मोजणीस प्रारंभ झाला.महसूल विभागामार्फत सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत विविध योजना, उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहेत. विविध प्रमाणपत्र, दाखल्यांचे वाटप, पाणंदमुक्ती, समाधान मेळावे अशा माध्यमातून महसूल प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून संपूर्ण गावातील जमीन मोजणी उपक्रमाचा शुभारंभ अपर जिल्हाधिकारी पाटील यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आला. उपविभागीय अधिकारी, उस्मानाबाद अभिमन्यू बोधवड, उमरग्याचे उमरगा व कळंबचे उपविभागीय अधिकारी सर्वश्री रवींद्र गुरव, सचिन बारवकर, जिल्हा भूमी अभिलेख अधिकारी  मगर, आठही तालुक्यांचे तहसीलदार सर्वश्री रामहरी गोरे, वैशाली पाटील, यु. व्ही. सबनीस, ज्योती चव्हाण, स्वरुप कंकाळ,  अरविंद बोळंगे, काशीनाथ पाटील आणि प्र. तहसीलदार राजेश जाधव, आठही तालुका भूमी अभिलेख अधिकारी, सकनेवाडीचे सरपंच दयानंद भोईटे, उपसरपंच रामलिंग घायतिडक आदींची उपस्थिती होती.
यावेळी अपर जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी या ई-मोजणी उपक्रमाचा उद्देश समजावून सांगितला. जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. सकनेवाडीपासून या उपक्रमास सुरुवात झाली आहे. सकारात्मक पद्धतीने गावकऱ्यांनी प्रतिसाद दिल्याने या गावाची निवड करण्यात आली आहे. गावची कुटुंबसंख्या 148 इतकी आहे. जवळपास येत्या 23 नोव्हेंबरपर्यंत गावातील सर्व मोजणी पूर्ण केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हास्तरावरील या कार्यक्रमासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आठ पथकांची स्थापना करण्यात आली असून त्यात तहसीलदार, तालुकास्तरीय भूमी अभिलेख अधिकारी, भूमापक, चार तलाठी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक पथक प्रत्यक्ष शेतात जाऊन ही मोजणी करणार असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.
गावकऱ्यांनी विविध योजनांसाठी पुढाकार घ्यावा, तंटामुक्त आणि निर्मल ग्राम करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
उपविभागीय अधिकारी श्री. गुरव यांनी जमीनीच्या हद्दीचे वाद यामुळे संपतील आणि गा
उपविभागीय अधिकारी श्री. बोधवड यांनी सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.
उपविभागीय अधिकारी श्री. बारवकर यांनी या अभियानामुळे महसूल प्रशासन गतीमान झाल्याचे सांगितले.
या एकत्रित शेतजमीन मोजणीमुळे आपापसात होणारे वाद मिटण्यास मदत होणार आहे. सध्या शासन अथवा न्यायालयात शेतकऱ्यांच्या जमिनीसंदर्भातील तक्रारींचे प्रमाणच सर्वाधीक असते. त्यामुळेच प्राथमिक पातळीवर प्रायोगिक स्तरावर या कार्यक्रमास आज सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमाचे आभार श्री. जाधव यांनी मानले. कार्यक्रमास गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.                                                 
वात एकप्रकारे चांगले वातावरण राहील, असे नमूद केले.

Labels:

ऊसतोड मजुराचा मृत्‍यू

पांगरी (गणेश गोडसे) पाणी आणण्यासाठी गेलेल्या एका ऊस तोड मजुराचा त्याच्या पत्‍नीसमोर  विहीरीतील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवारी सकाळी पांगरी ता.बार्शी शिवारात घडली॰लहू दादाराव राठोड वय 22 रा.सावरवाडी तांडा  ता.मुखेड जि.नांदेड असे विहिरीत बुडून मृत्यूमुखी पडलेल्या तरुण ऊस तोड मजुराचे नांव आहे.
  याबाबत अधिक माहिती अशी की पांगरी शिवारातील पांगरी-पाथरी रस्त्यावर सुभास योगिराज गोडसे यांच्या शेतातील गट नंबर 372 मध्ये आज गुरुवारी सकाळी मयत लहू राठोड व त्याची पत्नी बबीता राठोड हे दोघे विहीरीतील पाणी आणण्यासाठी गेले होते.पाणी घागरीत भारत असताना लहू राठोड या युवकाचा पाय घसरून तो पाण्यात पडला.पत्नीने आरडा ओरड करून पतीचा जीव वाचवण्याचा अयश्यास्वी प्रयत्न केला.ऊस टोळीचे मुकादम तुकाराम किसन पवार वय 36 रा.गुंटूर ता.कंधार यांच्या खबरीवरून पांगरी पोलिसात आकसमात मयत म्हणून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.अधिक तपास पांगरी पोलिस करत आहेत.

Labels:

निर्मलग्राम करण्‍यासाठी सहभागी होण्‍याचे अवाहन

पांगरी (गणेश गोडसे)  शौचालयासाठी  शासन विविध स्तरावर अनेक  योजना राबवून जनजागृती करत घर तेथे शौचालय ही मोहीम राबवत असून त्याचा लाभ ग्रामीण भागातील जास्तीत जास्त लाभधारकांनी घेऊन गावे निर्मलग्राम होण्यासाठी सहभाग नोदवावा असे प्रतिपादन बार्शी पंचायत समितीच्या माजी सभापति व पांगरीच्या पंचायत समिति सदस्या सौ.कौशल्या माळी यांनी केले.त्या शौचालय दिनानिमित्त पांगरी ता.बार्शी येथे बालविकास सेवा योजना प्रकल्पाआंतर्गत आयोजित विभागीय महिला व पालक मेळाव्यात बोलत होत्या.यावेळी अंगणवाडी समन्वयक सौ.एस.पी.सवणे उपस्थित होत्या.
 प्रारंभी सौ.एस.पी.सवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पांगरी शहरातून विद्यार्थ्यांची स्वछता संदेश देत फेरी काढण्यात  आली.शौचालय बांधा,आरोग्य सांभाला आदि संदेश यावेळी देण्यात आले.तसेच सवणे यांनी शौचालयाचे महत्व उपस्थित महिलांना पटवून दिले.कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली.यावेळी महिलांनी शौचालय बांधण्याचा निर्णय घेतला.कार्यक्रमाला संगीता नाईकवाडी, रतन काळे, प्रमीला झानपुरे, नजमूद्दीन आतार ,कविता मोरे यांच्यासह गावातील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.

Labels:

निधी मागणीचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

  उस्मानाबाद - जिल्हयात पाणी, आणेवारी, चारा टंचाई व आरोग्य विषयक प्रश्न सोडविण्यासाठी तात्काळ प्राधान्य देण्यात येईल, यासाठी सर्व यंत्रणांनी आपल्याकडील निधीची मागणी व प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे आवाहन खासदार रविंद्र गायकवाड यांनी केले.
        येथील जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई संदर्भात आढावा बैठकीत आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी वरील आवाहन केले. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी जे.टी.पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी.टी.उबाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी बी.एस.घुगे, ग्रामीण पाणी पुरवठयाचे कार्यकारी अभियंता श्री.चाटे, उपविभागीय अधिकारी अभिमन्यू बोधवड यांच्यासह विविध यंत्रणेचे अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
              खासदार श्री. गायकवाड म्हणाले की,  आगामी काळात पाऊस नाही पडला तर जिल्हयाला पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चाऱ्यांची कमतरता पडू नये, यासाठी आराखडा तयार करुन निधीची मागणी नोंदवावी, याबाबींना प्राधान्य देण्यात येईल. पशुपालकांनी आपले जनावरे छावणीत सोडावीत यासाठीही जनजागृती करण्याची गरज आहे. जिल्हयातील जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारती व रस्ते विषयक माहिती घेऊन निधीची मागणी नोंदविणे. वीजेच्या बाबतीत समन्वयाने मार्ग काढण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित यंत्राणेला दिले. यावेळी श्री.गायकवाड यांनी विभागनिहाय आढावा घेऊन अडचणी जाणून घेतल्या.
            श्री.पाटील म्हणाले की, पुढील काळात होऊ घातलेल्या बैठकीच्या अनुषंगाने प्रत्येक विभागाने आपल्या स्तरावरील माहिती सादर करावी.कृषि व पशुसंवर्धन विभागाने चाऱ्यांचे नियोजन करण्यासाठी आराखडा तयार करण्याची निर्देश दिले. प्रलंबित कामांबाबत आढावा घेऊन त्यावर उपाययोजनांची माहितीही तात्काळ सादर करावी. अपूर्ण सिंचन योजना तात्काळ पूर्ण कराव्यात. विभागाकडे विशेष कार्यक्रम असतील तर त्यांच्या छायाचित्रासह माहिती सादर करावी, असे निर्देश श्री. पाटील यांनी दिले. या   बैठकीचे प्रास्ताविक व आभार श्री.तांबे यांनी  मानले.

Labels:

प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करावीत- जे.टी.पाटील

  उस्मानाबाद - शासनाने ठरवून दिलेल्या उदिष्ठानुसार जिल्हयातील सर्व यंत्रणांनी आपल्याकडील प्रलंबित असलेली महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतील अपूर्ण  कामे प्राधान्याने वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील यांनी दिले.
           जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनाच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी वरील निर्देश दिले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी.टी. उबाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (रोहयो ) श्री.चव्हाण यांच्यासह सर्व तहसीलदार गटविकास अधिकारी व यंत्रणांचे सर्व अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.
        रोहयोच्या कामांचा ग्रामीण स्तरावरील यंत्रणांनी आढावा घेऊन सदयस्थिती  पाहून तात्काळ कामे सुरु करुन डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण करा. रोहयोतंर्गत पूर्ण व अपूर्ण कामांचा विभागनिहाय आढावा त्यांनी यावेळी घेतला. रोहयोमधून ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना शौचालय बांधण्यासाठी संबंधित यंत्रणेला प्रस्ताव पाठवून तात्काळ प्रथम प्राधान्याने मान्यता देऊन कामे सुरु करुन पूर्ण करण्याचे निर्देशही श्री पाटील यांनी संबंधित यंत्राणेला दिले. 
            श्री. तांबे यांनी  जिल्हयात सुरु असलेली व अपूर्ण असलेल्या कामे तात्काळ पूर्ण करा. सिंचन विहीर प्रपत्रा 1 मधील भाग 1 ते 4 प्रत्येक तालुक्यांनी भरुन प्रलंबित कामे सुरु करुन त्यांची माहिती तात्काळ संकेतस्थळावर अपलोड करावी. जर यंत्रणेला वेळोवेळी सूचना देऊन ती कामे होत नसेल तर संबंधित यंत्रणेवर दंडात्मक कारवाई करण्यात येईलही त्यांनी सांगितले.
         श्री.उबाळे म्हणाले की, प्रत्येक ग्रामपंचायतीने प्रलंबित ठेवू नयेत. नागरिकांची कामांचे प्रस्ताव येताच ते  मंजूर करुन काम सुरु करावे. प्रलंबित कामांची गावनिहाय यादी तयार करुन आढावा घ्यावा आणि गती वाढविण्यासाठी ग्रामपातळीवर आढावा घ्यावा, असे त्यांनी सांगितले. यावेळी तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच यंत्रणेचे सर्व अधिकारी व संबंधित उपस्थित होते.               

Labels:

महसूलमंत्री एकनाथ खडसेचा जिल्‍हा दौरा

  उस्मानाबाद -  राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे एक दिवसाच्या  उस्मानाबाद दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्याचा तपशिलवार कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
           शुक्रवार, दि.21 नोव्हेंबर रोजी  सायंकाळी  4-30 वा. बीड येथून हेलिकॅप्टरने उस्मानाबादकडे प्रयाण. सायंकाळी 5 वा.उस्मानाबाद येथे आगमन, राखीव आणि शासकीय विश्रामगृह, उस्मानाबाद येथे मुक्काम. शनिवार, दि. 22 रोजी सकाळी 10-30 वा. आढावा बैठक, उस्मानाबाद जिल्हयातील लोकप्रतिनिधी  व सरकारी अधिकारी  (स्थळ- जिल्हाधिकारी  कार्यालय, उस्मानाबाद).  दु 1 वा. उस्मानाबाद येथील शासकीय विश्रामगृह येथे राखीव. दु .2 वाजता उस्मानाबाद येथून हेलिकॅप्टरने लातूरकडे प्रयाण.  

Labels:

माणूस असल्याची जाणीव निर्माण करणारा 'स्विंग'

   बार्शी - पंचमवेद नाट्यसंस्था सोलापूर यांनी सादर केलेल्या स्विंग या नाट्यप्रयोगात विविध प्रकारच्या स्वभावाची व आवडी निवडीची माणसे समाजामध्ये एकत्रपणे वावरत असतांना प्रत्येकातील स्वार्थ, अडचणी, पैशाची गरज, वागण्यामुळे होणारे परिणाम, विचारातील बदल मानसाचे आयुष्य बदलून टाकते व मनातील स्वप्नांची पूर्तता होते. माणूस श्रेष्ठ की पैसा या प्रश्‍नाचे उत्तर. प्रेम, विश्वास, त्याग, एकता यांच्यामुळे सुटलेले प्रश्‍न. यांवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.
    या नाटकातील पात्र ऋतुराज आरसिद, सूरज कोडमूर, सौरभ कुलकर्णी, सुमित चोळ्ळे, संजीव शेंडे यांनी साकारले आहे. लेखक, दिग्दर्शक सूरज कोडमूर, नेपथ्य मयुरेश देशमुख, पार्श्‍वसंगीत विपुल आरसीद, प्रकाश योजना शिवानंद करुटे, रंगमंच व्यवस्था तानाजी होटकर, अरुण कोरुळकर यांनी केले आहे.
     एका रुममध्ये वास्तव्य करीत असलेल्या ऋतुराज, अरुण, मयुरेश, सूरज यांच्यात अनेक चांगले गुण असले तरी त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या आवडी व एकमेकांवर असलेली इर्षा. आयुष्यातील भविष्याचा विचार करणारी स्वप्ने पाहतांना स्वत:च्या स्वार्थाशिवाय इतरांकडे न पाहणार्‍या चारही मित्रांना मोबाईलवर मेसेस येतो. यामध्ये मनोरंजन खेळासारख्या एका स्पर्धेत विजयी होणार्‍यास दहा कोटी रुपये मिळणार असल्याची जाहीरात असते. त्यानुसार ते चारही जण त्यामध्ये सहभागी होतात. यचत एकएक करुन प्रत्येकाच्या मनातील इच्छेनुसार घटना सत्यात उतरवतांना इतरांनी त्याला मदत करायची असे सांगण्यात येते. यावेळी त्यांना एकमेकांच्या स्वभाव गुण़-दोष, विषयाचे गांभीर्य, नेमके कोणत्या वेळी काय करायला हवे याचे आकलन होते. यात त्यांना इतरांकडून मनापासून होणारी मदत यामुळे त्यांचा एकमेकांवरील विश्वास दृढ होतो. स्पर्धेच्या दुसर्‍या राऊंडमध्ये त्यांच्या हातात पिस्तूल देऊन इतरांचा जीव घेण्यास सांगण्यात येत यावेळी त्यांच्या मनातील झालेले परिवर्तन, पूर्वी एकमेकांच्या जीवावर उठू शकतील इतके स्वार्थी, एकमेकांचे स्पर्धक असलेले चार मित्र एकमेकांच्या जीवाची काळजी करतांना दिसून येतात. ते चारही जण आमच्यातील कोणाच्या जीवाच्या बदल्यात आम्हाला दहा कोटी रुपये नको असे म्हणतात. यानंतर स्पर्धा आयोजकांनी दिलेली पिस्तुल त्यांच्यावर रोखण्यात येते यावेळी ते पिस्तुल नकली असल्याचे सांगण्यात येते. यावेळी माणसाचे विविध स्वभाव वेगवेगळ्या घटनेत त्याच्याकडून होणार्‍या घटना, प्रसंगानुसार त्याच्याकडून होणार्‍या कृतींचा अभ्यास करणारे हा मनो वैज्ञानिक तज्ञांचा प्रयोग असल्याचे सांगण्यात येते.
    शंभर दिवस मैत्री असलेल्या माणसांचे एक दिवस पटत नाही. यावेळी तो शंभर दिवस विसरतो. इतरांच्या आवडी निवडी, भिन्न सवयी यांचा तुम्ही विचार केल्यास ते सर्वजण तुमच्या यशाचे वाटेकरी ठरतात व तेच तुमच्यासाठी मदतीला धावून येऊ शकतात. याचा उलगडा यामध्ये करण्यात आला आहे.


Labels: