Monday, 31 May 2021

कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात सोमवार दि. 31 मे रोजी 291 पॉजिटीव्ह; तर 8 जणांचा मृत्यू

 


उस्मानाबाद, दि. 31 : उस्मानाबाद जिल्हयात आज सोमवार दि. 31 मे रोजी  प्राप्त झालेल्या अहवालानुसार 291 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर 8 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात 490 जण बरे होवून घरी परतले आहेत.

जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची एकूण संख्या 54 हजार 947 इतकी झाली आहे. यातील 50 हजार 707 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 1 हजार 241 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 2 हजार 999 जणांवर उपचार सुरु आहेत.








Labels:

लहान मुलांना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराची सोय निर्माण करा - वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे निर्देश

 


उस्मानाबाद,दि.31 :- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना धोका असल्याचा तज्ञांचा अंदाज आहे. यामुळे १८ वर्षाखालील बालकांना कोरोनाची लागण झाली तर लक्षण दिसत नाहीत. यामुळे त्यांची काळजी घ्या, प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराची सोय निर्माण करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी प्रशासनाला दिले.

उस्मानाबाद येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात परिचारिका प्रशिक्षण केंद्रात कोरोना आढावा बैठकीत श्री. देशमुख बोलत होते. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड, पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन, अधिष्ठाता डॉ. मालू, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. डी. के.पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी हणमंत वडगावे आदिंसह विभागप्रमुख उपस्थित होते.


कोमॉर्बिड बालकांची काळजी घ्या

श्री. देशमुख यांनी सांगितले की, कोरोनाची दुसरी लाट आता ओसरु लागली आहे. तिसरी लाट येणार हे ग्रहीत धरुन नियोजन करा. लहान मुलांना आतापासूनच विलगीरणात ठेवायला हरकत नाही. ज्या मुलांना हृदय विकार, शुगर, दमा आहे, त्यांची काळजी योग्य काळजी घ्या. तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी बालरोगतज्ज्ञ आणि बालरोग अतिदक्षता विभाग यांच्याशी योग्य समन्वय साधून नियोजन करा. लहान मुलांसाठी व्हेंटिलेटर बेडची संख्या वाढवा. वार्ड, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर यांचे नियोजन करा. ग्रामीण भागातील शासकीय दवाखान्यात व्हेंटिलेटर, बायपैप मशीन, ऑक्सिजन बेड याची तयारी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

येणारे 100 दिवस महत्वाचे आहेत, जिल्ह्यात संसर्ग कमी होत असल्याचे दिसत असले तरी चाचण्यांची संख्या कमी करू नका. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर द्या. आरटीपीसीआर चाचण्यासाठी प्रयोगशाळा संख्या वाढवा. त्वरित चाचण्या करता याव्यात, अशी व्यवस्था निर्माण करा. ग्रामीण रुग्णालयात किमान एक व्हेंटिलेटर आणि पाच मिनी व्हेंटिलेटरची सोय करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.


कोरोना रुग्णांना आधार द्या

कोरोनाचा रुग्ण घाबरलेला असतो, त्यांना मानसिक आधार द्या. लस उपलब्धतेनुसार लसीकरण करून घ्या. मास्कचा वापर, सुरक्षित अंतर आणि हात साबणाने धुतल्याशिवाय पर्याय नाही, हे नागरिकांना पटवून द्या, असेही श्री. देशमुख यांनी सांगितले. 

अनाथ मुलांचा सर्व्हे करा

कोरोनामुळे आई वडील मृत झालेल्या बालकांची माहिती जमा करा. जिल्ह्यातील अशा बालकांची यादी तयार करण्यासाठी सर्व्हे करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

आगामी वर्षी वैद्यकीय महाविद्यालय सुरू

उस्मानाबाद जिल्ह्याची अनेक वर्षाची मागणी असलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आगामी वर्षांपासून सुरू करण्यात येईल. इथल्या व्यवस्था परिपूर्ण करा. जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या जागेतच 10 हेक्टर 81 आर. मध्ये हे महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे. या महाविद्यालयासाठी लागणाऱ्या पदांना मंजुरी देण्यात आली आहे. या ठिकाणाहून चांगले तंत्रज्ञ, नर्स, डॉक्टर तयार व्हावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.राज्यातील वैद्यकीय परीक्षा ठरलेल्या वेळेतच होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.जिल्हाधिकारी श्री. दिवेगावकर यांनी जिल्ह्याची स्थिती, वैद्यकीय महाविद्यालय याबाबत माहिती दिली. यावेळी वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केल्याने मंत्री श्री. देशमुख यांचा सन्मान करण्यात आला.

     

Labels:

जिल्हा काँग्रेस कार्यालयात अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त अभिवादन

 


उस्मानाबाद :

पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त उस्मानाबाद जिल्हा काँग्रेसच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

यावेळी जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांच्या शुभहस्ते राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

याप्रसंगी जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे, संघटक राजाभाऊ शेरखाने, उपाध्यक्ष प्रशांत पाटील, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, महिला प्रदेश उपाध्यक्ष डॉ.स्मिता शहापुरकर, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सय्यद खलील सर, मागासवर्गीय जिल्हाध्यक्ष नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे, सेवादल जिल्हाध्यक्ष विलास शाळू, जिल्हा सरचिटणीस जावेद काझी, हरिभाऊ शेळके, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव उमेश राजेनिंबाळकर, जिल्हा उपाध्यक्ष रोहित पडवळ, माजी शहराध्यक्ष समियोद्दीन मशायक, महिला जिल्हा सरचिटणीस सौ.स्नेहल स्वामी, राज कुलकर्णी, मेहराज शेख, सुभाष हिंगमीरे, सौरभ गायकवाड, समाधान घाटशिळे, प्रणित डिकले आदी उपस्थित होते।.

Labels:

मायेची सावली संस्थेच्या वतीने गरजूना धान्य किटचे वाटप


नळदुर्ग : एस.के.गायकवाड

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शासनाने लागू केलेल्या संचार बंदी, जनता कर्फ्यू, लाँकडाउन यामुळे आर्थिक आडचणीत सापडलेल्या बुधवार पेट सोलापूर येथील गोरगरीब गरजू पन्नास कुटुंबाना   

 दि . 31 मे रोजी मायेची सावली बहुउद्देशीय विकास संस्थेच्या वतीने धान्य किटचे वाटप करण्यात आले.

    या वेळेस संस्थेचे प्रमुख डॉ. सतीश खारवे , रोहित खारवे  , डॉ. रितेश खारवे तसेच सामाजिक कार्यकर्ते सतीश सरवदे उपस्थित होते .

    डॉ. सतिश खारवे हे नळदुर्ग ता.तुळजापूर येथील मूळ रहिवासी असून मायेची सावली बहुउदेशियस विकास संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रीय आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे.

Labels:

सावरगाव ची श्री विठ्ठल बिरुदेव यात्रा साध्या पद्धतीने साजरी



तुळजापूर : तालुक्यातील सावरगाव येथील बिरूदेव यात्रा दर वर्षी मोठ्या प्रमाणात साजरा होते .धनगरी ढोल , धनगरी ओव्या व विविध कार्यक्रमांनी साजरा होत असते. पण गेले दोन वर्ष कोरोना प्रादुर्भाामुळे या वर्षी साध्या पद्धतीने यात्रा पार पडली. यावेळी  अहिल्या प्रतिष्ठान सावरगावचे पदाधिकारी उपस्थित होते.


Labels:

उस्मानाबाद : ढोकी ठाण्यात आयोजित शिबिरात 153 जणांचे रक्तदान


ढोकी,दि.३१ :
उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी येथे ढोकी पोलिस ठाणे व पोलिस पाटील संघटना, ग्रामसुरक्षा दल यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी दि. 31 मे रोजी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 153 रक्तदात्यांनी रक्तदान केले. 

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या तसेच रक्ताची वाढती मागणी लक्षात घेता व जिल्ह्यातील सर्वच रक्तपेढीमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.


ढोकी पोलिस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक रविकिरण जगताप व हेडकोन्स्टेबल आनंद उंबरे हे दोन कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याने कळंब उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ढोकी पोलिस ठाण्यात सोमवारी रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबिरात ढोकी ग्रामस्थ, पोलिस कर्मचारी, पोलिस पाटील संघटनेने भरभरुन प्रतिसाद देऊन तब्बल 153 जणांनी रक्तदान केले. बार्शी येथील भगवंत रक्तपेढीच्या वतीने रक्त संकलन केले. 

यावेळी डॉ. गणेश जगदाळे, किरण कोथमिरे, शबाना पठाण, आकांशा कदम, विजय तोडकरी, ढोकी पोलिस ठाण्याचे सपोनि सुरेश बनसोडे, पीएसआय रविकिरण जगताप, बुद्धेवार, एएसआय सुहास गवळी, पोलिस हेडकोन्स्टेबल प्रकाश औताडे, अमोल गोडगे, बिबिशन सोनवणे, श्रीमंत क्षीरसागर, पंचायत समिती सदस्य संग्राम देशमुख, उपसरपंच अमोल समुद्रे, पोलिस पाटील राहुल वाकुरे, बिभीषण गवाड, श्रुतिका हाजगुडे, दत्ता हाजगुडे, सुनील अंधारे, फकिरनाथ कांबळे, धनराज सगर आदी उपस्थित होते. तसेच सेवानिवृत्त झाल्याबद्दल  पोलिस उपनिरीक्षक रविकिरण जगताप, पोलिस हवालदार आनंद उंबरे यांचा ढोकी पोलिस ठाण्याकडून सत्कार करून निरोप देण्यात आला.  या रक्तदान शिबिरात प्रत्येक रक्तदात्यास पोलिस ठाण्याकडून वाफेची मशीन तर भगवंत रक्तपेढीकडुन टिशर्ट व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.

Labels:

तुळजापूर तालुक्यातील गुळहळ्ळी येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर जंयती साजरी

 


नळदुर्ग ,दि. ३१: सोमवार दि. ३१ मे रोजी राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त मौजे-गुळहळ्ळी ता.तुळजापूर  येथे ग्रामपंचायत कार्यालयात प्रतिमेचे पूजन सरपंच सौ मिरा सचिन घोडके यांच्या  हस्ते करुन वंदन करण्यात आले.

 यावेळी ग्रामसेवक एम सी निलगार व इतर मान्यवर उपस्थित होते.

Labels:

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सौ सुनंदा राजेंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णाना फळे वाटप

 


नळदुर्ग ,दि.३१ : बारामती अग्रीकल्चरल ट्रस्टच्या विश्वस्त तथा आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री, सौ सुनंदा राजेंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नळदुर्ग येथील कोविड सेंटर येथे रोहित पवार विचार मंचच्या वतीने कोविड रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. 

याप्रसंगी रोहित पवार विचारमंचचे प्रदेश कार्याध्यक्ष  ॲड अमोल पाटील , तुळजापूर तालुका अध्यक्ष, श्रीधर नरवडे, प्रमोद बिराजदार, गुरव समाज संघटनेचे प्रदेश सरचिटणीस महेश बिराजदार,शंकरसिंग चव्हाण, लक्ष्मण बिराजदार आकाश बिराजदार, उपस्थित होते.

Labels:

चोरीच्या मोटारसायकलसह आरोपी पोलिसांच्या ताब्यात


उस्मानाबाद,दि ३१ :

पोलीस ठाणे, आंबी: सचिन किसन भांडवलकर, रा. वाटेफळ, ता. परंडा यांची हिरो एचएफ डिलक्स एम.एच. 12 एसएस 4285 ही दि. 28.04.2021 रोजीच्या रात्री त्यांच्या राहत्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली होती. यावर आंबी पो.ठा. येथे गु.र.क्र. 66 / 2021 हा भा.दं.सं. कलम- 379 नुसार दाखल आहे.

            गुन्हा तपासा दरम्यान आंबी पो.ठा. चे सपोनि- श्री आशिष खांडेकर, पोहेकॉ- गजानन मुळे, पोना- सिध्देश्वर शिंदे, पोकॉ- राहुल गायकवाड, सतीश राऊत यांच्या पथकास खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे हिंगणगाव (खु.), ता. परंडा येथील रुपचंद मधुकर शिंदे, वय 23 वर्षे यास दि. 31.05.2021 रोजी ताब्यात घेउन त्याच्या ताब्यातून नमूद चोरीची मोटारसायकल जप्त केली आहे.

Labels:

उमरगा व मुरुम येथे अवैध मद्य विरोधी कारवाई


उस्मानाबाद,दि.३१ : 

 पोलीस ठाणे, मुरुम: 1)श्रीनिवास शंकरराव कणकधर, रा. सालेगाव 2)दत्तात्रय श्रीपती लाळे, रा. कोराळ हे दोघे दि. 30 मे रोजी कोराळ शिवारातील राम माडजे यांच्या पत्रा शेडमध्ये अवैध विक्रीच्या उद्देशाने देशी दारुच्या 15 बाटल्या (किं.अं. 900 ₹) बाळगलेले असलेले मुरुम पो.ठा. च्या पथकास आढळले.

 

पोलीस ठाणे, उमरगा: अनिल राजकुमार तेलंग, रा. बस्वकल्याण, राज्य- कर्नाटक हे दि. 30 मे रोजी कोळसुर, ता. उमरगा शिवारातील एका पत्रा शेडसमोर 20 लि. शिंदी (किं.अं. 1,700 ₹) अवैधपणे बाळगलेले असलेले उमरगा पो.ठा. च्या पथकास आढळले.

यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत संबंधीत पो.ठा. येथे गुन्हे नोंदवले आहेत.

Labels:

मनाई आदेश झुगारुन हॉटेल चालु ठेवणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल

 


पोलीस ठाणे, परंडा: कोविड- 19 च्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, उस्मानाबाद यांनी जिल्ह्यात विविध मनाई आदेश जारी केले आहेत. असे असतांनाही 1)तानाजी मारुती सोनमाळी, रा. वाकडी, ता. परंडा 2)सफीक चाँद शेख, रा. वारदवाडी, ता. परंडा या दोघांनी दि. 30 मे रोजी 14.45 वा. सु. वारदवाडी चौकातील आपापले हॉटेल व्यवसायास चालू ठेउन भा.दं.सं. कलम- 188, 269 सह आपत्ती व्यवस्थापण कायदा कलम- 51 (ब) चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकातर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद दोघांविरुध्द परंडा पो.ठा. येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.

Labels:

उस्मानाबाद येथे मारहाणप्रकरणी तिघावर गुन्हा दाखल



उस्मानाबाद ,दि.३१

पोलीस ठाणे, उस्मानाबाद (श.): तुळजापूर नाका, उस्मानाबाद येथील रस्त्यावर दि. 28 मे रोजी 13.00 वा. सु. एका महिलेकडून तीच्या स्कुटरचा धक्का अजय दशरथ काळे, रा. तुळजापूर नाका यांना लागला. यावेळी अजय काळे यांनी त्या महिलेच्या स्कुटरची चावी काढून घेतली असता तेथे उपस्थीत असलेले नाना शिवाजी पेठे, रा. तुळजापूर नाका यांनी तसे न करण्यास अजय काळे यांना विनंती केली. 



यावर अजय काळे यांसह विशाल काळे, अजय काळे अशा तीघांनी संगणमताने नाना पेठे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, खोऱ्याने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या नाना पेठे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

Labels:

व्हाट्सॲपद्वारे महिलेस अश्लील मजकुर पाठवणाऱ्यावर गुन्हा दाखल



येरमळा ,दि.३१: 

पोलीस ठाणे, येरमाळा: येरमाळा पो.ठा. हद्दीतील एका 35 वर्षीय महिलेस (नाव- गाव गोपनीय) दि. 30 मे रोजी 16.17 ते 19.13 वा. दरम्यान एका अज्ञात मोबाईल क्रमांकावरुन व्हाट्सॲपद्वारे अश्लील संदेश येउ लागले. तो क्रमांक परिचयाचा नसल्याने आपल्यास कोणीतरी जाणुनबुजून त्रास देत असल्याचे त्या महिलेस समजले. यावर त्या महिलेने दिलेल्या प्रथम खबरेवरुन अज्ञात मोबाईल क्रमांक धारक व्यक्तीविरुध्द भा.दं.सं. कलम- 354 (ड) सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 67, 67 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

Labels:

काटी येथे अडीचशे जेष्ठ नागरिकांचे लसीकरण; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 
 
काटी,दि.३१ :
 तुळजापूर तालुक्यातील काटी येथे सोमवार दि. 31 मे रोजी  ग्रामपंचायत कार्यालयात आरोग्य विभाग आणि प्रशासनाच्या सहकार्याने सरपंच आदेश कोळी, उपसरपंच सुजित हंगरगेकर, ग्रामसेवक लक्ष्मीकांत सुरवसे आदींसह सर्व ग्रा.प.सदस्य, स्थानिक पदाधिकारी यांनी पुढाकार घेवून गावासह जवळील दहिवडी, वाणेवाडी,खुंटेवाडी येथील 45 वर्षापुढील दोनशे पन्नास जेष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. 


नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी नोंदणी कक्ष, शिक्षक आणि आरोग्य सेवक, शिक्षक वृंद, आशा कार्यकर्ती, लसीकरण कक्षा बाहेर टेबल मांडून आधार कार्ड तपासणी, नागरिकांची नोंदणी करुन टोकन देण्यात येत होते. शिक्षक व आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत लसीकरण का आवश्यक आहे, याबाबत नागरिकांना माहिती  समजावून सांगत होते. या लसीकरण मोहिमेत नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून येथील कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या व कोरोनामुळे काटीसह परिसरातून झालेल्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर  आणखी पाचशे डोसचे लसीकरण तात्काळ होणे गरजेचे असल्याचे सरपंच आदेश कोळी आणि ग्रामसेवक लक्ष्मीकांत सुरवसे यांनी मत व्यक्त केले.


 या लसीकरण मोहिमेत आरोग्य अधिकारी डॉ.अजित राठोड, सी.एच.ओ. डॉ.नदाफ सर्फराज, सरपंच आदेश कोळी, उपसरपंच सुजित हंगरगेकर, विस्तार अधिकारी वैरागे, ग्रामसेवक लक्ष्मीकांत सुरवसे, कृषी अधिकारी अशोक काळे, केंद्र प्रमुख सोलंनकर, हवलदार गिरी, पोलीस पाटील जामुवंत म्हेत्रे, जिल्हा परिषद प्रशालेतील शिक्षक वृंद, सर्व ग्रा.प. सदस्य, ग्रामसेवक लक्ष्मीकांत सुरवसे,ग्रामपंचायत कर्मचारी,आरोग्य कर्मचारी,आशा कार्यकर्त्या,अंगणवाडी सेविका आदींसह पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Labels:

उस्मानाबाद : विविध संस्थांकडून जिल्हा रूग्णालयास दहा ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर मशिन सुपुर्द


उस्मानाबाद,दि.३१ : 
शहरातील रोटरी सेवा ट्रस्ट,रोटरी क्लब,लघु उद्योग भारती,धारासुर मर्दिनी महिला स्वयंसेवी संस्था संघ,आर्ट ऑफ लिव्हिंग,सन ग्रुप आदींच्या अर्थिक सहकार्यातून दहा ऑक्सिजन काॅन्सेन्ट्रेटर मशिन्स  जिल्हा शासकीय रुग्णालयास जिल्हाधिकारी डाँ. कौस्तुभ दिवेगावकर यांच्या  उपस्थितीत  सोमवार दि.३१ मे रोजी जिल्हा  सुपुर्द करण्यात आले.


 
रोटरी सेवा ट्रस्ट व रोटरी क्लब उस्मानाबाद यांच्या वतीने 10 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन  जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, उपजिल्हाधिकारी स्वामी , जिल्हा शल्यचिकित्सक रो. डॉ. धनंजय पाटील , डॉ. सचिन देशमुख, रोटरी क्लब उस्मानाबादचे अध्यक्ष रो. अमरसिंह देशमुख, सचिव रो. इंद्रजित आखाडे यांच्या उपस्थितीमध्ये  जिल्हाधिकार्‍यांकडे सुपूर्द करण्यात आले. जेष्ठ रो. रविंद्र साळुंके  यांच्या मार्गदर्शना नुसार सर्व रोटरी सदस्यांनी निधी उभारणीचे काम केले.


रोटरी क्लब उस्मानाबादच्या वतीने पर्यावरण रक्षण व ऑक्सिजनच्या वाढीसाठी दरवर्षी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन हा उपक्रम घेतला जातो. परंतु गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या संकट काळामध्ये याच ऑक्‍सिजनचा रुग्णांना तुटवडा जाणवू लागल्यामुळे सामाजिक बांधिलकी जोपासत रोटरी सेवा ट्रस्ट व रोटरी क्लब उस्मानाबाद यांच्या वतीने 10 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आल्या. 


सदर मशीन 5 लिटर क्षमतेचा असून एका मशीनचा उपयोग 2 रुग्णांना उपचार करण्यास मदत होऊ शकते.
या सामाजिक उपक्रमासाठी रोटरी क्लब उस्मानाबादचे आजी-माजी सदस्य विविध संस्था यांचाही यामध्ये मोलाचा वाटा आहे. यामध्ये
 राजकुमार अजमेरा, योगिता अजमेरा, संतोष शहा, राजेश कुलकर्णी, अमित साळुंके, अमर देशमुख, संजय देशमाने, प्रदीप मुंडे, उल्हास गपाट, संतोष शेटे, संजय शेटे,  धारासूरमर्दिनी महिला  फेडरेशन
अध्यक्ष सौ संगीता प्रविण काळे या सदस्यांबरोबरच
, आर्ट ऑफ लिव्हिंग, लघुउद्योग भारती, सन ग्रुप अशा संस्थांनी देखील आर्थिक मदत या कार्यासाठी केली, निल डिस्ट्रीब्यूटर सोलापूरचे इंद्रनील जोशी यांनी या मशिन उपलब्ध करून दिल्या.


 या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरीचे अध्यक्ष अमरसिंह बाजीराव देशमुख यांनी केले.तर आभार रोटरीचे सचिव इंद्रजित आखाडे यांनी मानले

Labels:

मंकावती तीर्थ कुंडावर बेकायदेशीर काम बंद करावे , तुळजापुरातील महंत शिष्टमंडळाची मागणी



तुळजापूर, दि. ३१ :
तुळजाभवानी मंदिराच्या समोर मंकावती गल्लीत असणाऱ्या विष्णू कुंड जय मंकावती तीर्थकुंड या नावाने परिचित आहे. येथे बेकायदेशीरपणे करण्यात येणारे बांधकाम तातडीने थांबून ते तिर्थ कुंड तुळजाभवानी देवीच्या भावी भक्तांना स्नानासाठी पुन्हा पूर्वीप्रमाणे सुरू करावे अशी मागणी महंत मावजीनाथ महाराज आणि त्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे


महंत मावजीनाथ महाराज, महंत इच्छागिरी महाराज , महंत आरण्य गिरी महाराज, ॲड. जनक पाटील, संजय सोनवणे, सुदर्शन वाघमारे यांनी जिल्हाधिकारी आणि तुळजापूर येथील तहसीलदार यांना निवेदन देऊन सदर तीर्थकुंड भक्ताला  खुले करणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे.

 येथे पूर्वी नगरपरिषदेच्या वतीने पाच रुपये दर लावून भावी भक्तांना स्नानाची सोय नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आली होती. ती सोय पुन्हा चालू करण्यात यावी, या तीर्थ कुंडाच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाने तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये निधीची तरतूद करुन व निधी या तीर्थ कुंडावर खर्च करण्यात आलेला आहे. हे सार्वजनिक असणारे तीर्थकुंड पुढील काळात देवीच्या भावी भक्तांना स्नान करण्यासाठी मिळावे अशी मागणी या निवेदनामध्ये करण्यात आली आहे.


मंकावती तीर्थकुंड हे पवित्र तीर्थ कुंडा असून हे हिंदू समाजाचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे येथे अनाधिकृतपणे व बेकायदेशीरपणे होणारे बांधकाम तात्काळ थांबून महाराष्ट्र सरकारच्या या मालमत्तेचे संरक्षण झाले पाहिजे, यासाठी तातडीने जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करावी अशी मागणी सदर निवेदनात महंत मावजीनाथ महाराज व त्यांच्या शिष्टमंडळाने केली आहे.

Labels:

तुळजापूर : मंकावती तीर्थ कुंडाच्या परिसरात बेकायदेरशिर बांधकाम प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी


तुळजापूर, दि. ३१ :

तुळजापूर शहरातील मंकावती गल्ली मध्ये असणाऱ्या मंकावती तीर्थ कुंडाच्या परिसरात बेकायदेशीरपणे होत असलेले बांधकाम त्वरीत थांबवुन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी व तुळजापूर  नगराध्यक्ष यांना निवेदन देऊन मनसेचे जिल्हा संघटक अमरराजे कदम यांनी केली आहे.



 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हा संघटक अमरराजे कदम व युवक नेते समाधान कदम यांनी निवेदन देऊन तुळजापूर शहराची प्राचीन ओळख असणाऱ्या मंकावती तीर्थकुंड उर्फ विष्णू कुंड येथे बेकायदेशीर बांधकाम केले जात असल्याचा आरोप करुन  याप्रकरणी  तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मंकावती तीर्थकुंड उर्फ  विष्णू कुंड आहे, अत्यंत प्राचीन असून भेंडोळी सणाच्या निमित्ताने महंत मावजी महाराज जास्तच कुंडामध्ये स्नान करून शुद्ध होऊन तुळजाभवानी देवीच्या दर्शनाला वर्षातून एकदा जातात ही प्राचीन जुनी परंपरा आहे. त्यामुळे हे तीर्थकुंड कोणाच्याही खासगी मालकीचे नाही. तसेच तुळजापूर विकास प्राधिकरण अंतर्गत या तीर्थ कुंडचा विकास करण्यासाठी यापूर्वी निधी खर्च करण्यात आला आहे.

 या संदर्भातील सर्व दस्तऐवज तुळजापूर नगरपरिषद कार्यालयात उपलब्ध असून जिल्हाधिकारी आणि नगरपरिषद प्रशासन यांनी यासंदर्भात योग्य ती कारवाई करून सदर तीर्थकुंड भाविक भक्तांना स्नानासाठी खुले करावे, यापूर्वी नगर परिषदेने पाच रुपये दर लावून येथील कुंडामध्ये तुळजाभवानी देवीच्या भाविक भक्तांना स्नानाची सोय केली होती. या संदर्भातील पुरावे नगर परिषदेकडे आजही उपलब्ध असून या सर्व कागदपत्रांच्या आधारे सदर तीर्थ कुंडावर बेकायदेशीरपणे करण्यात येणारे काम थांबून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

Labels:

अचलेर येथील बोगस मजूर दाखवून गैरव्यवहारप्रकरणी ग्रामस्थांनी केली वरिष्ठाकडे चौकशीची मागणी

 
मुरूम, दि. ३१ : 
लोहारा तालुक्यातील अचलेर येथील कृष्णा खोरे साठवण तलावाच्या बाजूला रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायतीने सार्वजनिक विहिरीचे खोदकाम पोकलेनच्या साह्याने रातोरात करून बोगस मजूर दाखवून लाखो रुपयेचा गैरप्रकार  करण्याचा प्रयत्न  लघुपाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. या कामाची तातडीने चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अचलेर ग्रामस्थांनी लोहारा तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, उस्मानाबाद व  विभागीय आयुक्त, औरंगाबाद यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. 


सुरवातीला  दि. १५ एप्रिल व नंतर २६ मे रोजी ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, तालुक्यातील लघुपाटबंधारे विभागाच्या संबंधित  उपअभियंता  यांनी पोकलेन व जेसीबीच्या साह्याने रात्री अचलेर येथील ग्रामपंचायतीची सार्वजनिक विहीर रोजगार हमी योजनेतून  खोदून घेतल्याचा  आरोप ग्रामस्थांनी एका निवेदनातून केला आहे. ही सार्वजनिक विहीर रोजगार हमी योजनेतून मंजूर करण्यात आली होती. शासनाच्या उद्दिष्टानुसार मजुरांच्या हाताला काम मिळावे, असा उद्देश असताना संबंधित अधिकाऱ्यांनी संगनमत करून रातोरात विहीर खोदाई केली आहे. या प्रकरणाची नियम बाहय कामाची तातडीने चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे अचलेर ग्रामस्थांनी मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, उस्मानाबाद, तहसीलदार, लोहारा व त्यानंतर विभागीय आयुक्त, औरंगाबाद यांच्याकडे केली आहे. या निवेदनावर विकास गोपने, समर्थ सोमवंशी, हिराकांत सोलंकर, जयेश कणभुसे, महादेव कंटे, सुधीर बंडगर, हरिश्चंद्र खरात, अतुलराजे सोमवंशी, दत्तु गावडे, केतन सोमवंशी, सागर खंडाळकर, सुरज सोलंकर, गोपाल राजपूत, तुळशीराम सोलंकर, दत्ता गोपणे, भिम सुतार आदींनी चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. 

Labels:

तुळजापूर तालुका काँग्रेसच्यावतीने अहिल्याबाई होळकर जयंती साजरी



तुळजापूर, दि. ३१ : 
राजमाता अहिल्यादेवी होळकर  यांनी  सामाजिक सुधारणेसाठी मोलाचे कार्य केले, त्यांच्याच प्रेरणेने  तुळजाभवानीचे तीर्थक्षेत्र असणाऱ्या तुळजापूर शहरांमध्ये  त्यांनी  तुळजाभवानी देवीच्या भक्तांसाठी  अहिल्याबाई होळकर  यांच्या नावाने विहीर बांधली.  आजही अहिल्याबाई होळकर यांच्या विचारांची साक्ष देत दिमाखात असल्याचे उदगार काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमर मगर यांनी काढले.



 तुळजापूर शहरातील काँग्रेस कार्यालयात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली . या निमित्ताने सर्व कार्यकर्त्यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले.

यावेळी उपस्थित मान्यवर काँग्रेस तालुकाध्यक्ष अमर  मगर ,  काँग्रेस नेते रणजित इंगळे, उद्योजक आनंद  जगताप, विशाल  भांजी, भास्करराव क्षिरसागर ( बारुळ ), सुरेश कोकरे,  ( कोरेवाडी ),  प्रहार क्रांति संघटना जिल्हा सचिव महादेव चोपदार,  विकास तांबे , मारुती  पवार ,  तालुका उपाध्यक्ष  दिनानाथ दिक्षीत , दिपक थोरात,  उमेश  पैलवान यांची उपस्थिती होती. अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन तालुका अध्यक्ष अमर मगर यांनी केले. कोरोनामुळे नियमाचे पालन  करुन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Labels:

उस्मानाबाद : अपयशी ठरलेल्या केंद्र सरकारला तात्काळ बरखास्त करण्याची काँग्रेसची मागणी


 

उस्मानाबाद, दि.३१ :
 प्रधानमंत्री नरेद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीचे सरकार सत्तेत येऊन ७ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र या कालावधीत नोटाबंदी, जीएसटी, महागाई व सर्व शासकीय मालकीचे उद्योग व संस्था मोदी सरकारने त्यांच्या अत्यंत जवळच्या उद्योजक मित्रांच्या घशात घालून देशात मोठ्या प्रमाणावर बेकारी निर्माण केली आहे. तर कोरोना संसर्ग रोखण्यासाठी या निकामी ठरलेल्या सरकारने कोणत्याच उपाययोजना न केल्यामुळे देशातील लाखो लोकांचा बळी गेला आहे. 


त्यामुळे सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या केंद्र सरकारचा  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि.३१ मे रोजी जाहीर निषेध करुन हे अपयशी सरकार तात्काळ बरखास्त करावे, अशी मागणी अशी आग्रही मागणी काँग्रेस कमिटीच्यावतीने एका निवेदनाद्वारे दि.३१ मे रोजी राष्ट्रपती यांच्याकडे केली आहे.



दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, मोदी सरकारने कोरोनि विषाणू सारख्या जीव घेणाऱ्या महामारीला रोखण्यासाठी अत्यावश्यक असणारे लसीकरण देशातील नागरिकांना करण्याऐवजी  देशात तयार करण्यात आलेल्या लसीपैकी जवळ जवळ ६ कोटी लसी विदेशात पाठविलेल्या आहेत. तर औषधे, ऑक्सिजन, बेड, व्हेंटिलेटर देखील रुग्णालयांना उपलब्ध करून दिले नाहीत. त्यामुळे देशातील लाखो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर नोटाबंदी व जीएसटी लागू केल्यामुळे अनेक उद्योग बंद पडले असून अनेकांना त्यांच्या हक्काचा रोजगार गमवावा लागला आहे. तसेच अर्थव्यवस्था केंद्रातील सरकारच्या चुकीच्या  धोरणामुळे पूर्णता ढासळलेली आहे. पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीमुळे जनतेच्या खिशाला कात्री लावून सरकारने मोठ्या प्रमाणात जनतेची आर्थिक लूट केली आहे. विशेष म्हणजे देशात दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्या धोरणाची अंमलबजावणी करण्याऐवजी  बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढविली आहे. तर शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू म्हणणाऱ्या मोदी सरकारने शेतकरी विरोधी काळे कायदे बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेऊन शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला आहे. तर उद्योजक मित्रासाठी सार्वजनिक संस्था, उद्योग विक्रीस काढून हम दो, हमारे दो यांचे भले करण्यासाठी सत्तेचा गैरवापर केला आहे. यासह इतर सर्व पातळ्यांवर केंद्र सरकार
अपयशी ठरल्यामुळे काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारच्या विरोधात विविध घोषणांनी संपूर्ण परीसर दणाणून निघाला होता. 


हे आंदोलन काँग्रेस कमिटीचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील व माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष ॲड. धीरज पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.


यावेळी माजी जिल्हाध्यक्ष विश्वास शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे, जिल्हा मुख्य संघटक राजाभाऊ शेरखाने, तालुकाध्यक्ष लक्ष्मण सरडे, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, प्रदेश महिला उपाध्यक्ष डॉ. स्मिता शहापूरकर, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष विलास शाळु, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष खलील सय्यद, मागासवर्गीय विभागाचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ बनसोडे, उपाध्यक्ष प्रशांत पाटील, ॲड. राज कुलकर्णी, विजय मुद्दे, जावेद काझी, मुनीर कुरेशी, रोहित पडवळ, धनंजय राऊत, नाना निंबाळकर, सलमान शेख, उमेश राजेनिंबाळकर, बाबुराव तवले, प्रणित डिकले, संजय पवार, सुभाष हिंगमिरे, सुर्यकांत पाटील, हरिभाऊ शेळके, मेहराज शेख, अकबर शेख, शामराव भोसले, बाळासाहेब गपाट, ॲड. विश्वजीत शिंदे, ॲड. राहुल लोखंडे,  कृष्णा तवले, भूषण मांडवेकर देशमुख, बालाजी माने, अब्दुल लतीफ, संजय गजधने, स्नेहल स्वामी, स्वामी, शहाजी मुंडे, समाधान घाटशिळे, अविनाश कानवले आदीसह कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  या आंदोलना नंतर शिष्टमंडळाच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

Labels:

कुन्सावळी येथे ग्रामस्थाची कोरोना चाचणी करुन संपूर्ण गावात फवारणी

नळदुर्ग ,दि.३१ , 
माझे गाव कोरोनामुक्त गाव अभियानांतर्गत  कुन्सावळी ता. तुळजापूर  येथे ग्रामपंचायतद्वारा आरोग्य विभागाच्या कर्मचा-यानी आतापर्यत   ७१ ग्रामस्थांची  आर.टी.पी.सी.आर.टेस्ट करण्यात आली आहे. गावातील नागरिकांना यापुर्वीच मास्कचे वाटप करण्यात आले असून गाव परिसरात तिसऱ्यांदा निर्जंतुकीकरण  फवारणी देखील करण्यात आलेली आहे.तसेच लसीकरणाबाबत जागृती केली जात असून त्यास ग्रामस्थांनी उत्सर्फुत  प्रतिसाद दिले.गावातील नियुक्त कर्मचाऱ्यांकडून  सर्वेक्षणाचे काम चालू असून सदर नियोजन सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत टीम व स्थानिक शासकीय कर्मचारी यांच्या उपस्थितीत चालू आहे.

यावेळी कोरोनाविषयक सर्व नियमांचे पालन केले जात असून नागरिकांना पूर्णपणे काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.

Labels:

Sunday, 30 May 2021

महाराष्ट्र राज्यात लाॕकडावुन दि.१५ जुन पर्यंत वाढवला


मुंबई, दि 30 : महाराष्ट्र  राज्यातील कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत कठोर निर्बंध लागू केले. या निर्बंधांचा सकारात्मक परिणाम राज्यात दिसून आला आणि वाढत्या रुग्णसंख्येला ब्रेक लागला तसेच रिकव्हरी रेटही वाढू लागला. मात्र काही जिल्ह्यांत रुग्णवाढ अद्यापही असल्याने राज्य सरकारने 15 दिवसांनी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय़ घेतला आहे. ब्रेक दि चेनचे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून त्यानुसार 15 जूनच्या सकाळी 7 पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात आले आहेत.


आत्यावश्यक सेवेतील दुकानं आता सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत खुली रहाणार.

राज्यातील जिल्हाबंदी कायम ठेवण्यात आलीय

29 मे 2021 च्या तारखेनुसार आठवड्याच्या शेवटी असलेली पॉझिटीव्हीटी दर आकडेवारी आणि तेथील ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता यासाठी गृहीत धरली जाईल.

पालिका स्वतंत्र प्रशासकीय घटक असतील

2011 च्या जणगणनेनुसार 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्व महानगरपालिका जसे की, बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, वसई-विरार, पुणे, पिंपरी चिंचवड , नागपूर, औरंगाबाद, नाशिक यांना कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून समजण्यात येईल. या पालिकांच्या क्षेत्रांव्यतिरिक्तचा जिल्ह्यातील उर्वरित भाग हा वेगळा प्रशासकीय घटक राहील.

पॉझिटीव्हीटी दर 10 टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या जिल्हे व पालिकांसाठी :

वरील ज्या पालिका किंवा जिल्हा क्षेत्रात कोविड पॉझिटीव्हीटी दर 10 टक्के किंवा त्यापेक्षा कमी असेल आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेड्स 40 टक्क्यांपेक्षा कमी भरले असतील तर तिथे (12 मे 2021 ब्रेक द चेन आदेशाप्रमाणे) खालीलप्रमाणे निर्बंध शिथिल करण्यात येतील.

सर्व आवश्यक वस्तू व सेवांची दुकाने जी सध्या सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरु आहेत, ती सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत सुरु ठेवता येतील.

सर्व आवश्यक गटात नसलेल्या इतर दुकानांना उघडणे आणि त्यांच्या वेळा (केवळ एकल दुकाने. मॉल्स किंवा शॉपिंग सेन्टर्स नव्हे) याबाबतीत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्णय घेईल. मात्र आवश्यक गटातील दुकानाच्या वेळेप्रमाणेच त्यांच्या वेळा असतील तसेच शनिवार, रविवार ती बंद राहतील.

अशा भागांत आवश्यक वस्तूंच्या जोडीने आवश्यक नसलेल्या वस्तू देखील ई कॉमर्स माध्यमातून वितरीत करता येतील

दुपारी 3 नंतर मात्र वैद्यकीय किंवा इतर आणीबाणीच्या प्रसंगांव्यतिरिक्त येण्याजाण्यावर निर्बंध असतील.

कोरोनाविषयक कामे करणाऱ्या कार्यालयांव्यतिरिक्त इतर सर्व शासकीय कार्यालये ही 25 टक्के कर्मचारी उपस्थितीनिशी सुरु राहतील. संबंधित विभाग प्रमुखास यापेक्षाही जादा उपस्थिती हवी असेल तर संबंधित आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी त्यास परवानगी देईल.

कृषिविषयक दुकाने आठवड्याच्या कामाच्या दिवसांना दुपारी 2 पर्यंत सुरु राहू शकतील. येणारा पावसाळा व पेरणीच्या तयारीसाठी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी या दुकानाच्या वेळा वाढवू शकते किंवा शनिवार, रविवार सुरु ठेवण्यास परवानगी देऊ शकते

पॉझिटीव्हीटी दर 20 टक्क्यांपेक्षा जास्त असलेल्या जिल्हे व पालिकांसाठी :

वरील ज्या पालिका किंवा जिल्ह्यांत पॉझिटीव्हीटी दर 20 टक्क्यांपेक्षा जास्त असेल आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेड्स 75 टक्क्यांपेक्षा जास्त भरले असतील तर तिथे 12 मे 2021ब्रेक दि चेन आदेशातील निर्बंध खालीलप्रमाणे वाढविण्यात येतील.

अशा जिल्ह्यांच्या सीमा पूर्णपणे बंद करण्यात येतील आणि कुणाही व्यक्तीला जिल्ह्याच्या आत बाहेर करण्यास परवानगी राहणार नाही. केवळ कुटुंबातील मृत्यू, वैद्यकीय कारण आणि आवश्यक, आणीबाणीच्या कोविड प्रसंगीची सेवा देणाऱ्या व्यक्तींचा अपवाद असेल.

उपरोक्त प्रशासकीय घटकांमध्ये न येणाऱ्या इतर सर्व जिल्हे व पालिकांच्या ठिकाणी 12 मे 2021 चे ब्रेक दि चेनचे निर्बंध नेहमीप्रमाणे लागू राहतील.

दुकानांना पुरवठा केल्या जाणारा वस्तूंच्या वाहतुकीवर निर्बंध नाहीत हे पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात येते. मात्र दुकानांना ठरवून दिलेल्या वेळेनंतर ग्राहकांना विक्री करता येणार नाही. या नियमांचा भंग केल्यास दुकान कोरोना साथ जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत बंद ठेवण्यात येईल तसेच 12 मे च्या आदेशाप्रमाणे दंडही आकारण्यात येईल. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी यांनी निश्चित केलेल्या वेळेनुसार होम डिलिव्हरी सुरूच राहतील.

Labels:

उस्मानाबाद जिल्ह्यात आज 577 जण कोरोनामुक्त, 219 पॉझिटीव्ह, 8 मृत्यू


कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात रविवार  दि. 30 मे  रोजी 219 पॉजिटीव्ह;  तर 8 जणांचा मृत्यू


उस्मानाबाद, दि. 30   :  उस्मानाबाद जिल्हयात आज रविवार   दि. 30  मे रोजी  प्राप्त झालेल्या अहवालानुसार 219 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर 8 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात 577 जण बरे होवून घरी परतले आहेत. 
जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची एकूण संख्या 54 हजार 656  इतकी झाली आहे. यातील 50 हजार 217 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 1 हजार 233 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 3 हजार 206 जणांवर उपचार सुरु आहेत.
बरे होण्याचे प्रमाण 91.87 टक्के , मृत्यू दर 2.25 टक्के .

Labels:

मनाई आदेश झुगारुन गर्दी जमवून वाढदिवस साजरा केला, गुन्हा दाखल


प्रतिकात्मक
भुम,दि.३०
पोलीस ठाणे, भुम: कोविड- 19 च्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, उस्मानाबाद यांच्या आदेशाने जिल्ह्यात जनता कर्फ्यु अंमलात आहे. असे असतांनाही लहु अर्जुन नागटिळक, रा. वसंतनगर, रामेश्वर, ता. भुम यांनी दि. 28 मे रोजी 20.00 वा. सु. राहत्या घरासमोर आपल्या वाढदिवसानिमीत्त 40- 50 लोकांची गर्दी जवमून कोविड- 19 संसर्गाची शक्यता निर्माण होण्याची निष्काळजीपणाची कृती केली. अशा मजकुराच्या भुम पो.ठा. चे पोना- शशिकांत खोत यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188, 269, 270 सह महाराष्ट्र कोविड- 19 उपाययोजना नियम- 11 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

Labels:

लोहारा : घरफोडी करुन सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे मिळुन १ लाखाचा मुद्देमाल चोरुन नेले

लोहारा,दि.३०
पोलीस ठाणे, लोहारा: दशरथ नागनाथ शिरगीरे, रा. कानेगांव, ता. लोहारा या दि. 24- 28.05.2021 रोजी दरम्यान बाहेर गावी गेले होते. दरम्यानच्या काळात त्यांच्या घराचा कडी- कोयंडा अज्ञात व्यक्तीने तोडून घरातील कपाटातील 20 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व 45,000 ₹ रोख रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या दशरथ शिरगीरे यांनी दि. 29 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 454, 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

Labels:

वाशी तालुक्यातील इंदापुर व नांदगाव मारहाण

वाशी,दि.३०
पोलीस ठाणे, वाशी: इंदापुर, ता. वाशी येथील बिभीषण काशीनाथ गपाट व मंगल गपाट या दोघांनी पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन दि. 28 मे रोजी 18.30 वा. सु. इंदापुर गट क्र. 32 मधील शेतात भाऊबंद- चंद्रकांत एकनाथ गपाट यांसह त्यांची पत्नी- दमयंती यांना शिवीगाळ करुन काठीने, कुऱ्हाडीने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या चंद्रकांत गपाट यांनी दि. 29 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

पोलीस ठाणे, वाशी: नांदगाव, ता. वाशी येथील सुरेश चत्रभु बांगर यांसह मछिंद्र सारुक, उमाकांत सानप असे तीघे दि. 28 मे रोजी 05.00 वा. सु. गावातील मारुती मंदीरासमोर उभे असलेले गावकरी- दादाराव जाधवर यांना सार्वजनिक विद्युत पंप चालू करण्याबाबत विचारण्यासाठी गेले होते. यावेळी दादाराव जाधवर यांसह जाधवर कुटूंबातील- संतराम, महादेव, राजाभाउ, विकास, अनिल, विशाल, अशोक, बाळु व दत्ता घुले, पांडुरंग घुले, प्रकाश सारुक या सर्वांनी संगणमताने बेकायदेशी जमाव जमवून नमूद तीघांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गज, काठीने मारहान करुन जखमी केले. यावेळी नमूद तीघांच्या बचावास आलेले गावकरी- तुळशीराम सारुक व रमाकांत सानप यांनाही नमूद बाराजणांनी शिवीगाळ करुन मारहान केली आणि ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या सुरेश बांगर यांनी दि. 29 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन 143, 147, 148, 149, 326, 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            तर दुसऱ्या घटनेत महादेव केदारी जाधवर, रा. नांदगाव, ता. वाशी हे भाऊबंद- दाराराव, संतराम, अनिल असे सर्वजण दि. 28 मे रोजी 06.00 वा. सु. राहत्या गल्लीत बोलत थांबले होते. यावेळी मागील भांडणाच्या कारणावरुन गावकरी- मछिंद्र सारुक, तुळशीराम सारुक, भारत सारुक, प्रभाकर सारुक, रमाकांत सानप, उमाकांत सानप, जाकीर सय्यद, कादर शेख, लखन घुले अशा 9 जणांनी बेकायदेशीर जमाव जमवून नमूद चौघांना शिवीगाळ करुन कोयता, दगड, लोखंदी गजाने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या महादेव जाधवर यांनी दि. 29 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 326, 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

Labels:

नारळी मठ स्मशानभूमीचे युवकांच्या पुढाकाराने सुशोभीकरण

मुरुम, दि.३०  : 
अनुभव मंटपचे जनक महात्मा बसवेश्वर यांचे क्रांतिकारी विचार स्मरणार्थ आणून गेल्या दीड महिन्यांपासून नारळी मठ स्मशानभूमीची युवकांच्या पुढाकाराने सुशोभीकरण करण्यात आले. 

भारतीय माजी सैनिक संघटनेचे जिल्हा सचिव विजयकुमार हिरेमठ यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यासाठी सर्वांना एकत्र केले. या लॉकडाउनचा सद्पयोग करून या काळात प्रत्येक आठवड्यातील शनिवारी व रविवारी जावून स्वच्छता करण्याचे ठरवले होते. परंतु सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, शहर बंद असल्याने प्रत्येक दिवशी सकाळी दोन तास स्मशानभूमीच्या सुशोभीकरणासाठी वेळ देवून सदर कार्य पूर्णत्वास नेले. या स्मशानभूमीत वाढलेली काटेरी-झुडूपे काढणे, सुकलेल्या झाडांना पाणी देणे, आळे करणे, परिसरात वाढलेल्या गवतावर औषध फवारणी करणे, संरक्षण भिंतीस रंगरंगोटी करुन त्यावर घोष वाक्य लिहिणे, वृक्षारोपण आदीं कामे करण्यात आली. मुक्या जनावरांना कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था, मयत व्यक्तीच्या अंतिम संस्कारास आलेल्या वृद्धांना बसण्यासाठी आसन व्यवस्था करण्यात आली असून स्मशानभूमीच्या परिसरात असणाऱ्या व या रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या मुक्या जनावरांना पाणी पिण्यासाठी एका हौदचीपण व्यवस्था केली आहे. स्मशानभूमीत असलेल्या बोअरचे पाणी दररोज सकाळी पाईपच्या सहाय्याने हौद भरून ठेवण्यात येत आहे. सरंक्षण भिंतीचे रंगरंगोटीचे काम पूर्ण झाले असून त्या भिंतीवर महात्मा बसवेश्वरांची मार्गदर्शक वचने लिहिण्याचे काम किरण गायकवाड व देवराज संगुळगे मिळून करीत आहेत. महात्मा बसवेश्वर यांच्या दासोह सिद्धांतानुसार ही सेवा निरंतर चालू ठेवत आहेत. 


याकरिता नगरसेवक सिद्धलिंग स्वामी, उद्योजक धनराज धुम्मा यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष चटगे, श्रीशैल मंगरुळे, राम डोंगरे, शरणाप्पा धुम्मा, गुंडप्पा पुराणे, श्रीशैल स्वामी, दयानंद स्वामी, सोमनाथ धुमुरे, वीरभद्र मोरखंडे, शिवपुत्र सोलापूरे, बसवराज भोसगे, रमेश पुराणे, संतोष येवले, संगमेश्वर करके, महादेव मुलगे, बादल गव्हाणे, स्वप्नील पांचाळ आदींनी पुढाकार घेतला. येणाऱ्या काळात मुरूम येथील सर्वच स्मशानभूमीची स्वच्छता करण्याचा आमचा मानस देवराज संगुळगे यांनी यावेळी व्यक्त केला.

Labels:

अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिर केले ४०जणानी रक्तदान

उस्मानाबाद ,दि.३०
अहिल्यादेवी होळकर यांच्या 296 या जयंतीनिमित्त  राजमाता अहिल्यादेवी चौक येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले यावेळी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतीमेला अभिवादन करून रक्तदान शिबिराचे उद्घाटन उस्मानाबाद  नगरीचे नगराध्यक्ष   राजेनिंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले .

यामध्ये चाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी नरसिंग मेटकरी ,
 बालाजी वगरे लिंबराज डुकरे,
रवी देवकते, निलेश शिंदे सुदर्शन सूर्यवंशी, हर्षद थवरे, ओमकार देवकते, संतोष देवकते, कुणाल मानवर, सचिन साळुंके , बाळासाहेब घोडके, तानाजी मेटकरी शाम थवरे आदींसह इतर आयोजक व समाज बांधव उपस्थित होते.

Labels:

मराठा आरक्षणासाठी कायदेशीर लढाईच योग्य ,मोर्चे व आंदोलन हा पर्याय असूच शकत नाही - ॲड. विजयकुमार शिंदे




उस्मानाबाद, दि.३० 
 मराठा समाजाला आरक्षणाची नितांत गरज असून यासाठी मराठा समाज गेल्या अनेक वर्षापासून शासन दरबारी मागणी करीत आहे.‌ राज्य सरकारने देखील या मागणीचा विचार करून आरक्षण देण्यासाठी कायदा केला. मात्र तो सर्वोच्च न्यायालयात टिकू शकला नाही. त्यामुळे मराठा समाजामध्ये सर्वत्र अस्वस्थता पसरली असून या आरक्षणासाठी काहीजण रस्त्यावर उतरुन मोर्चे व आंदोलने करण्याची तयारी करीत आहेत. मात्र आरक्षणासाठी मोर्चे, आंदोलने व इतर कोणत्याही मार्गाच्या अवलंब करण्याची अजिबातच गरज नाही. ती कायद्याची लढाई असल्यामुळे कायद्यानेच ती लढली व जिंकली पाहिजे, असे ठाम मत ज्येष्ठ विधिज्ञ विजयकुमार भगवानराव शिंदे यांनी व्यक्त केले.


मराठा समाज आरक्षण संदर्भात ते बोलत होते. पुढे बोलताना विधीज्ञ विजयकुमार शिंदे म्हणाले की, मराठा समाजाला शैक्षणिक व नोकरीमध्ये आरक्षण मिळणे ही काळाची गरज आहे. कारण आरक्षण नसल्यामुळे अनेकांना इच्छा असून देखील आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने मराठा समाजातील तरुणांना शिक्षण पूर्ण करता येत नाही. परिणामी शिक्षण नसल्यामुळे नोकऱ्या मिळत नसल्याचे वास्तव व विदारक चित्र आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाच्या तरुणांनी शासन दरबारी सतत मागणी करण्याबरोबरच मोर्चे, आंदोलने केली. याचा विचार करून आघाडी सरकारने नारायण राणे समिती स्थापन करुन प्रथमत: मराठा समाजाला आरक्षण दिले. मात्र ते न्यायालयात टिकू शकले नाही. त्यानंतर सत्तेवर आलेल्या महायुती सरकारने या समाजाला आरक्षण देण्यासाठी न्यायमूर्ती गायकवाड आयोगाची स्थापना करून आरक्षण कायदा केला व आरक्षण लागू केले. मात्र ते आरक्षण देखील सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. त्यामुळे मराठा समाजातील तरुण व सर्व घटकांमध्ये आरक्षणावरून अस्वस्थता पसरलेली आहे. या आरक्षणासाठी काही मंडळी मोर्चे, आंदोलन करण्याची तयारी करीत आहेत. मात्र आरक्षणाची लढाई ही न्यायालयीन लढाई आहे.  त्यासाठी मोर्चे, आंदोलने करणे हा मार्ग चुकीचा व मराठा समाजातील युवकांसाठी अत्यंत घातक ठरणार आहे. त्यामुळे त्यासाठी न्यायालयीन लढा देणेच योग्य ठरणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.



मोर्चे व आंदोलने कोणाच्या विरोधात ?

जर राज्य सरकार व विरोधी पक्ष आरक्षणाच्या बाजूने आहेत. तर मग तुम्ही मोर्चे व आंदोलने कोणाच्या विरोधात व कशासाठी करणार आहात ? असा जळजळीत सवाल शिंदे यांनी मराठा समाजातील युवक, सर्व सामाजिक संघटना व राजकीय पक्षांच्या नेते मंडळींना विचारला आहे. त्यामुळे मराठा समाजातील युवकांनी व सर्व संघटनांनी रस्त्यावर उतरुन आंदोलने करू नयेत, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.



सर्वोच्च न्यायालयाच्या निकाल पत्रात न्या. गायकवाड आयोगाच्या शिफारशी बाबत काय भूमिका मांडली आहे ? हे पाहणे गरजेचे आहे. जर या शिफारशीमध्ये काही त्रुटी असतील तर त्या त्रुटी सर्वांनी मिळून दूर करणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे उच्च न्यायालयाचे न्या. भोसले यांच्या समितीचा अहवाल काय येतो ? त्याचीही सर्वांनी थोडावेळ थांबून वाट बघावी व त्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाला सूचना कराव्यात. तत्पूर्वी कसल्याही प्रकारची आंदोलने करणे योग्य वाटत नसल्याचेही त्यांनी सांगितले.



 तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी वसतीगृहे सुरु करावीत

सर्वत्र कोरोना महामारी सुरू असून मराठा समाजातील तरुणांनी आपल्या नातेवाईकांसह खेडेगावातील सर्वांना कोरोना प्रतिबंध लस कशी देता येईल ? यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच समाजातील सुशिक्षित व आर्थिक सुबत्ता असणाऱ्या मंडळींनी मंदिरासाठी दानधर्म करण्याऐवजी त्या रकमेतूनच तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी वसतीगृहे सुरू करावीत. तसेच समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्याबरोबरच एमपीएससी व यूपीएससी क्लासेस सुरु करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

Labels:

उमरगा: साने गुरुजी नगर रस्त्यावर नालीच्या पाण्याचे तळे , नागरीकांचे आरोग्य धोक्यात ?


उमरगा, दि.३० :  
शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या साने गुरूजी नगरमधील पतंगे रस्ता ते एकोंडी रस्त्यावर दररोज नालीचे घाण पाणी साचल्याने घाण पाण्यातुनच नागरिकांना ये-जा करावी लागत असून नगर परिषद प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. 


नवीन जलवाहिनी टाकण्याचे कामासाठी ज्या नळाला पाणी येत होते ते ही पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे  गेल्या अडीच महिन्यापासुन ते काम स्थगित असल्याने या भागातील नळाला  पाणी येत नसल्याने कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाल्याचे नागरिकानी सांगितले . 


पतंगे रोडवरून उपविभागीय पोलिस अधिकारी व तलाठी कार्यालयासह अजय नगर,महात्मा बसवेश्वर विद्यालय,जकापूर काॕलनी या भागातील नागरिकाना सर्व शासकीय कार्यालयासाठी हाच मार्ग आहे. या रस्त्यावरून नगरपरिषद, तहसिल, कोर्ट,पंचायत समिती,आदर्श विद्यालय गटशिक्षण कार्यालयासह विविध ठिकाणी जाणारा ह्दारीचा प्रमुख  रस्ता वर्दळीचा झाला आहे. मात्र रस्त्यावर नेहमी घाण पाणी साचलेले असते. 


पोलिस निवासस्थानातुन बाहेर येणाऱ्या पाण्याला योग्य निचारा  करण्यासाठी नालीचे काम झालेले नाही. त्यामुळे घाण पाणी जवळपास दोनशे ते तीनशे मीटर पर्यंत रस्त्यावर साचत आसल्याचे दिसुन येत आहे. अक्षरशः  तळ्यातूनच मार्ग काढत चाचपडत जावे लागत असल्याने चालत जाणे तर शक्यच नाही व घाणीमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. दरम्यान या भागात नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी सिंमेंट रस्ता खोदुन महिन्याचा कालावधी लोटला. पालिकेकडे पाईप्स् उपलब्ध नसल्याने काम पूर्ण केले जात नसल्याने या परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी हाल होत आहेत.

 जवळपास दोन महिने पाणी नाही संबधित नागरिक नगर परिषदेकडे विचारणा करण्यासाठी गेले असता अरेरावी भाषा वापरली जात असल्याने नागरिक वैतागले  असुन
दुरुस्तीच्या कामात दिरंगाई का  केली जात आहे, असा प्रश्न या भागातील नागरिक उपस्थित करुन आपला रोषा व्यक्त करीत आहेत.
 
या भागातून येजा करत असताना झाडे झुडपा बरोबरच लाईटच्या उघड्या डीपी मुळे नागरिकांचे आरोग्यच नाही तर जिव ही धोक्यात आला आहे

Labels:

धोत्री येथील 30 लाभार्थ्यांना रमाई घरकुल योजनेअंतर्गत निवाऱ्याचा आधार


काटी , उमाजी गायकवाड
 तुळजापूर तालुक्यातील 
धोत्री  येथील दारिद्र्य रेषेखालील 30 गरीब कुटुंबीयांना रमाई घरकुल योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले असून या घरकुलांची कामे प्रगतीपथावर आहेत.


राज्य शासनाने दारिद्रय़रेषेखालील गरीब कुटुंबीयांसाठी रमाई घरकुल आवास योजना नोव्हेंबर 2008 साली सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून दारिद्रय़रेषेखालील लोकांच्या कुटुंबाचे राहणीमान उंचावणे, त्यांना राहण्या करिता घराची सोय उपलब्ध करून देणे किंवा त्यांच्या घराच्या कच्च्या जागेवर त्यांना पक्की घरे बांधून देणे ही कामे करण्यात येतात.

दारिद्रय़रेषेखालील लोकांना राहण्याकरिता चांगली घरे बांधून देणे हा शासनाचा हेतू आहे. त्या अनुषंगाने येथील ग्रामपंचायत मार्फत सरपंच अश्विनी साठे, ग्रामसेवक भिमराव झाडे, पंचायत समिती सदस्य शिवाजी साठे, रोजगार सेवक सुनिल मस्के, सामाजिक कार्यकर्ते दत्ता उबाळे यांनी गावातील रमाई घरकुल आवास योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांसाठी वेळोवेळी प्रशासनाकडे पाठपुरावा करून 30 घरकुल मंजूर केली असून या घरकुलांची कामे प्रगतीपथावर आहेत. यासाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. प्रशांतसिंह मरोड यांच्यासह घरकुल योजनेतील पंचायत समितीचे डेटा एन्ट्री ऑपरेटर संजय पवार, कनिष्ठ सहाय्यक डी.बी. शितोळे,आशिष तानवडे यांनी सहकार्य केले. हक्काचे कुठलेही घर नसल्याने कोरोना कालावधीत व पावसाळ्याच्या तोंडावर, आपल्याला हक्काचे घर, हक्काचा निवारा मिळाल्याने 30 लाभार्थ्यांच्या कुटुंबीयांतील सदस्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.

Labels:

नळदुर्ग : येडोळा येथे मोठया प्रमाणावर बाधीत रुग्ण आढळल्याने आनेकानी भितीने संसार थाटले रानात


नळदुर्ग, दि. ३० :
 येडोळा ता.तुळजापूर या  गावात संसर्गजन्य कोरोनाचा प्रादुर्भाव  वाढल्याने ग्रामस्थामध्ये भितीचे वातावरण निर्माण  झाले आहे. दरम्यान महसुल ,आरोग्य , पोलिस प्रशासनातील आधिक-यानी या गावास भेट दिली आहे.

तुळजापूर तालुक्यातील येडोळा गावाची लोकसंख्या १ हजार ६६६ असुन त्यापैकी १ हजार २०० मतदार आहेत. हे गाव नळदुर्गच्या दक्षिणेस असुन जखणी तांडा,गायरान व अन्य एक तांडा असे येडोळा गावात समावेश आहे. सुरुवातीस काही प्रमाणात कोरोना बांधित रुग्ण आढळुन आल्याने प्रशासकीय यंञणा अलर्ट झाली.  सध्या एकुण बाधित ५३ रूग्ण असुन ते नळदुर्ग, तुळजापूर, उमरगा येथिल कोविड सेंटरमध्ये तर काही  इतर ठिकाणी खासगी रुग्णालयात   उपचार घेत आहेत.  


येडोळा ता. तुळजापूर येथे दि. १५ मे रोजी पहिला बाधित रूग्ण आढळला. 
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी व ही साखळी तोडण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नळदुर्ग येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. राहुल जानराव, डॉ. एम. एम शेख, व आरोग्य कर्मचा-यांनी येडोळा येथील जि.प. प्राथमिक शाळेत दि. 22 मे ते 26 मे दरम्यान 152 ग्रामस्थांची  रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्ट केली. त्यापैकी  ४० जण  बाधित  आढळुन आल्याने सर्वञ खळबळ उडाली. यामुळे येडोळा गाव हॉटस्पॉट ठरल्याने तुळजापूरचे तहसिलदार सौदागर तांदळे, तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. सुहास पवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक जगदीश राऊत यासह महसुल, अरोग्य व पोलिस प्रशासनातील कर्मचा-यांनी येडोळा गावास भेट दिवून माहिती जाणून घेतली. त्यानंतरही तपासणी केली असता १३ रूग्ण बाधित आढळल्याने एकुण कोरोना बाधित रूग्णांची संख्या ५३ झाली आहे. 
महादेव अकुंश पवार,शिवसैनिक ,येडोळा ता.तुळजापूर 
कोरोनाबद्दल कोणीही फारसे गांभिर्य 
दाखवले नाही. आशातच काहीनी कार्यक्रम घेतले,त्यास बाहेर गावचे नागरिक गावात येवुन गेले. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे आज भितीने बहुतांश कुटूंबिये आपला संसार रानातच (शेतात) थाटलयं.
    
सरपंच पद्माकर पाटील,येडोळा
गावात बांधित रुग्णाची संख्या ५३ वर पोहचल्याने खबरदारीचा उपाय म्हणुन ग्रामपंचायती च्यावतीने  संपुर्ण गाव निर्जंतुकी करण्यासाठी फवारणी करण्यात आली आहे. तसेच मास्क व साॕनिटायझरचे ग्रामस्थाना वाटप केले आहे. मी वैयक्तिक रुग्णालयात  उपचार घेत असलेल्य गावातील रुग्णास प्रत्यक्ष भेट देवुन त्याचे मनोबल वाढवत आहे.


Labels:

तंबाखू सारख्या जीवघेण्या विष बद्दल अधिक जागरूकता आवश्यक , जागतिक तंबाखू निषेध दिन - 31 मे




तंबाखू सारख्या जीवघेणे विष बद्दल अधिक जागरूकता आवश्यक

(जागतिक तंबाखू निषेध दिन - 31 मे 2021)

तंबाखू, बिडी, सिगार, हुक्का, क्रिटेक्स, पान मसाला, खर्रा, चिलम, खैनी, गुटखा, ई-सिगारेट आणि अशा कित्येक प्राणघातक पदार्थांचा मोठ्या प्रमाणात सेवन होतो. खूप मोठी विडंबना ही आहे की तंबाखू सारखे विष आपल्याला अगदी स्वस्त, सहजपणे उपलब्ध होतो आणि लहान मुलांपासून ते युवा, वृद्धांपर्यंत सगळेच या घातक व्यसनाचा आहारी असल्याचे दिसून येतात. ग्रामीण आणि दुर्गम भागातील लोक तंबाखूच्या अति प्रमाणात व्यसनाधीन झाले आहेत. शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थीही तंबाखूचे व्यसन करतात. महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एका कार्यक्रमात जाताना मी पाच वर्षाच्या मुलाला तंबाखूचे सेवन करताना पाहिले, या घटनेने मी स्तब्ध झालो की ऐवळ लहान मुल कसे काय व्यसनाधीन झाले? मी त्या मुलाला हाक देताच तो पळून गेला, जेव्हा मी तेथील लोकांशी ह्या समस्येवर बोललो तेव्हा ते म्हणाले की येथे ही गोष्ट खूप सामान्य आहे, लहान मुले, आई-वडील, म्हातारी मंडळी अधिकांश लोक तंबाखूचे सेवन करतात. निर्व्यसनी लोकांना तंबाखूच्या वासाने सुद्धा चक्कर येते, मळमळ वाटू लागते, मग माहित नाही ही लहान कोवळ्या शरीराची मुलेदेखील ह्या नशेच्या तावडीत कसे अडकतात, ही अतिशय गंभीर बाब आहे.

व्यसनासारखे अनेक समस्या आपल्या समाजात प्रचंड वेगाने वाढत आहेत, परंतु लोकांमध्ये जागरूकताच नाही. आपल्या समाजात दोन प्रकारचा लोकांचा वर्ग आहे ज्या अशा गंभीर समस्या चांगल्याप्रकारे समजतात. पहिला वर्ग त्या लोकांचा जे, समस्यांना ओळखूण, विश्लेषण आणि निष्कर्ष समजून दक्ष नागरीक म्हणून सामाजिक बांधीलकी पाडतात लोकांना जागरूक करतात, समाजाची काळजी करतात, सामाजिक जबाबदारी चांगल्यापणे निभावतात. आणि दुसरा वर्ग, जे या समस्येने ग्रस्त आहेत किंवा समस्येतून गेले आहेत त्यांना अशा समस्यांची जाण असते ते समजून घेतात. या व्यतिरिक्त सर्व लोक अशा समस्यांकडे दुर्लक्ष करतात, स्वतःच्या स्वार्थानुसार जगतात आणि म्हणतात की अशा समस्येशी माझा काय संबंध?. आपले स्वताचे जोपर्यंत नुकसान होत नाही तो पर्यंत आपण जागरूक होत नाही. आपल्या समाजात हे खूप मोठे दुर्दैव आहे की अशा सामाजिक समस्यांना दूर करण्याची धाडसी वृत्ती फारच थोड्या लोकांमध्ये दिसून येते. जेव्हाकी समाजातील अशा सर्व समस्यांना सोडवणे प्रत्येक नागरिकाची नैतिक जबाबदारी असते.

व्यसन करणाऱ्या लोकांद्वारे सिगरेट बिडीचा विषारी धूर जवळपासच्या वातावरणात पसरतो व त्या वातावणातील लोकांना देखील आजारी बनवतो. तंबाखूजन्य पदार्थांमध्ये हजारो प्रकारचे जिवघेणे विषारी पदार्थ असतात. त्यात प्रामुख्याने निकोटीन, कार्बन मोनोऑक्साइड, टार असते. निकोटीन शरीरात, हाडे, स्नायूंमध्ये पसरते. कार्बन मोनोऑक्साइड रक्तामध्ये वाहून नेणाऱ्या ऑक्सिजनचे प्रमाण कमी करते ज्यामुळे श्वास घेण्यात अडचण येते. टार हा बेंझोपायरिनयुक्त एक चिकट पदार्थ आहे जो घातक कर्करोगासाठी सहायक म्हणून काम करतो. इतर विषारी पदार्थांमध्ये कार्बनडाय ऑक्साईड, नायट्रोज्नॉक्साईड, अमोनिया, वाष्पशील नायट्रोसामाइन, हायड्रोजन सायनाइड, वाष्पशील सल्फर, वाष्पशील हायड्रोकार्बन, अल्कोहोल, अल्डीहाइड्स आणि केटोन्स यांचा समावेश आहे आणि यातील काही संयुगे शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये कर्करोगासाठी कारणीभूत ठरतात. तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केल्यावर सार्वजनिक ठिकाणी थुंकण्या मुळे देखील कोरोना, क्षयरोग, स्वाइन फ्लू, एन्सेफलाइटिस सारख्या अनेक संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते महत्त्वाची तथ्ये

तंबाखूमुळे त्याचे अर्धे वापरकर्ते जीव गमावतात. दरवर्षी तंबाखूमुळे 80 लाखांहून अधिक लोक मरतात. यापैकी 70 लाखांहून अधिक मृत्यू हे थेट तंबाखूच्या वापरामुळे होते, सुमारे 10-12 लाख लोक स्वतः धूम्रपान न करणारे पण दुसर्या व्यसनकर्त्याचा धूम्रपानाचा धुराची लागण होत असून मृत्यूमुखी पडतात, याला निष्क्रीय किंवा सेकंड हैंड धूम्रपान म्हणतात. जवळजवळ अर्धी मुले सार्वजनिक ठिकाणी तंबाखूच्या धुराद्वारे प्रदूषित हवेमध्ये श्वास घेतात आणि दरवर्षी या धुरामुळे होणाऱ्या आजारांमुळे 65,000 लोकांचा मृत्यू होतो. जगातील 130 कोटी तंबाखू वापरणाऱ्या पैकी 80 टक्क्यांपेक्षा अधिक लोक निम्न आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशात राहतात. तंबाखू हा जगातील आतापर्यंतच्या सर्वात मोठा सार्वजनिक आरोग्यास धोक्यापैकी एक आहे.

देशात तंबाखू बद्दल तथ्य

ग्लोबल एडल्ट टोबैको सर्वे इंडिया-2, 2016-17 नुसार भारतात तंबाखूचे सेवन करणारे सुमारे 27 कोटी लोक (15 वर्षांहून अधिक) आहेत. तंबाखू हा मृत्यू आणि आजार होण्याचे मुख्य कारण आहे आणि यामुळे दरवर्षी देशात सुमारे 13 लाख मृत्यू म्हणजेच दररोज सुमारे 3500 मृत्यू होतात. देशातील कर्करोगाच्या जवळपास अर्धा घटना तंबाखूच्या वापरामुळे होतात. महाराष्ट्रात सध्या 6.0% पुरुष, 1.4% महिला आणि 3.8% सर्व प्रौढ तंबाखूचे सेवन करतात. जागतिक आरोग्य संगठनेच्या म्हणण्यानुसार, 15 वर्षापेक्षा जास्त वयाच्या 28.6 टक्के आणि 13 ते 15 वर्षे वयोगटातील सुमारे 15 टक्के मुलांनी 2018 मध्ये भारतात कोणत्या न कोणत्या स्वरूपात तंबाखूचे सेवन केले. दररोज 18 वर्षाखालील सुमारे 2500 मुले पहिली सिगारेट ओढतात आणि त्यातील 400 हून अधिक नवीन मुले रोजचे धूम्रपान करणारे होतात आणि त्यापैकी अर्धे शेवटी स्वताचा जीव गमावतात. द टोबॅको एटलसच्या मते, 10 ते 14 वयोगटातील 6,25,000 हून अधिक भारतीय मुले दररोज सिगारेट ओढतात. मंत्रालयाने केलेल्या अभ्यासानुसार, 2011 साली तंबाखूच्या सेवनाने होणारे सर्व रोग उपचार आणि मृत्यू यामुळे एकूण 1,04,500 कोटी रुपये खर्च आला, जो भारतासारख्या विकसनशील देशासाठी मोठा ओझा आहे. इंडिया ब्रँड इक्विटी फाउंडेशनच्या म्हणण्यानुसार भारत जगातील दुसर्या क्रमांकाचा सर्वात मोठा तंबाखूचा ग्राहक आणि निर्यातदार देश आहे. भारतीय तंबाखूच्या विविधतेमुळे भारत जगातील 100 हून अधिक देशांमध्ये तंबाखूची निर्यात करतो आणि अब्जों रुपये महसूल प्राप्त करतो. तारी आणि असोचॅमच्या अहवालानुसार देशात एकूण तंबाखूचा आर्थिक व्यापार 11,79,498 कोटी रुपये आहे.

तंबाखू संबंधित कायदेशीर प्रतिबंध

तंबाखूच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी भारत सरकारने विविध कायदे केले आहेत. राष्ट्रिय तंबाखू नियंत्रण कायदा भारत सरकारने मे 2003 मध्ये सिगरेट आणि इतर तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा या नावाने मंजूर केला. सर्व सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास मनाई आहे. सर्व तंबाखूजन्य पदार्थांच्या जाहिरातींचे प्रचार आणि प्रायोजकत्तेवर बंदी आहे. अठरा वर्षाखालील व्यक्तीस तंबाखू विक्री प्रतिबंधित आहे. सर्व तंबाखूजन्य पदार्थांवर आरोग्य चेतावणीचे लेबल लावणे बंधनकारक आहे. तंबाखूच्या पॅकेटमध्ये परवानगी असलेल्या मर्यादेसह निकोटिन, टार सामग्री आणि निर्दिष्ट चेतावणी तंबाखूच्या पॅकेटवर 85 टक्के भागात दर्शविली जावी. कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल 5 वर्षापर्यंत कारावास आणि 10 हजार रुपयांपर्यंत दंड करण्याची तरतूद आहे.

तंबाखू आतापासूनच सोडा

जगात सर्वाधिक तोंडाचा कर्करोगाचे रुग्ण भारतात आहेत, त्यापैकी 90 टक्के तोंडाचा कर्करोग तंबाखूच्या वापरामुळे होतो. देशात तंबाखूची विविध प्रकारची उत्पादने अतिशय कमी किंमतीत उपलब्ध आहेत. भारतीय लोकांमध्ये, विशेषत ग्रामीण भारतीयांमध्ये असे काही गैरसमज आहेत की तंबाखू हे धूम्रपान बिडी व सिगारेटपेक्षा कमी हानिकारक आहे आणि तंबाखूच्या वापरामुळे चिंता, शारीरिक दुखणें, सूजन, थकवा, पोटविकार आणि अश्या छोट्यामोठ्या आजारावर आराम होतो. डिजिटल, सोशल मीडिया आणि प्रिंटमीडियाच्या माध्यमांद्वारे समाजातून हे गैरसमज दूर करणे फार गरजेचे आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक पातळीवर शासन, प्रशासन, संस्था यांच्यामार्फत अनेक जागरूकता कार्यक्रम, तंबाखूच्या व्यसनमुक्तीसाठी आरोग्य अभियान राबविले जातात.


तंबाखूच्या व्यसनातून मुक्त होण्यासाठी प्रथम सकारात्मक विचार व दृढ इच्छाशक्ती आवश्यक आहे. कोणालाही व्यसनातून मुक्त होऊन आनंदी आणि निरोगी आयुष्याचा आनंद घेता येईल. आपल्याला फक्त हे सत्य गृहित धरायचे आहे की व्यसन एक वेदनादायक मृत्यू आहे आणि आपल्याला एक सुंदर निरोगी जीवन निवडायचे आहे. आपल्याला कितीही कठोर संघर्ष करावा लागला तरी आपल्याला या नशेवर नियंत्रण मिळवायचे आहे. आपण आपल्या निश्चयावर ठाम व संयम जोपासायला हवे, तंबाखूच्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी आपल्या जिल्ह्यातील तंबाखू व्यसनमुक्ती केंद्र/आरोग्य केंद्राशी संपर्क साधा किंवा तंबाखूमुक्त सेवा केंद्रावर 1800-11-2356 (टोल फ्री) वर संपर्क साधा किंवा दूरध्वनी क्रमांक 011-22901701 वर मिस कॉल करा त्याशिवाय भारत सरकारच्या नेशनल हेल्थ पोर्टल वेबसाइटच्या क्वीट टोबॅको वर जाऊन स्वतःची नोंद करून घ्या व तंबाखू, धूम्रपान व्यसनमुक्तीच्या सुविधेचा लाभ घ्या. स्वस्थ राहा, अमूल्य जीवन जगा.

डॉ. प्रितम भि. गेडाम

(prit00786@gmail.com)

Labels:

उस्मानाबाद : पत्रकार श्रीराम क्षीरसागर यांना पितृशोक


उस्मानाबाद दि.२९ :
 भूम तालुक्यातील अंजनसोंडा येथील विठ्ठल लक्ष्मण क्षीरसागर वय- ६५ वर्ष यांच्यावर  कोरोनाचे उपचार सुरु असताना  सह्याद्री हॉस्पिटल येथे  निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित २ मुले, १ मुलगी, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे. ते पत्रकार श्रीराम क्षीरसागर यांचे वडील होते.

Labels:

गुळहळ्ळीचे माजी सरपंच हनुमंतराव पाटील यांचे उपचारादरम्यान निधन

नळदुर्ग,दि.३० :
 गुळहळ्ळी ता.तुळजापूर येथिल   माजी संरपंच हनुमंतराव विश्वनाथ पाटील वय ८८ वर्ष यांचे अल्पशा आजाराने शनिवार दि.२९ मे रोजी सोलापूर येथिल रुग्णालयात उपचारादरम्यान दुपारी १वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मूले, एक मुलगी व नातवंडे असा परिवार आहे.

तुळजापूर तालुक्यातील गुळहळ्ळी, दहिटणा व गुजनूर या ग्रुप ग्रामपंचायतीचे  सरपंच होण्याचा बहुमान  मिळविलेल्या व  गुळहळ्ळी गावचे सुपुत्र  हनुमंतराव विश्वनाथ पाटील  हे काही दिवसापासुन आजारी आसल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार सु होते. ते भाजपचे कार्यकर्ते सचिन घोडके यांचे मामा होत. पाटील यांच्या निधनाचे वृत्त समजताच गावावर शोककळा पसरली. व परिसरात हळहळ व्यक्त केले जात आहे.

Labels:

Saturday, 29 May 2021

लोहारा: शिवसेनेच्या वतीने शहरातीवल प्रभाग क्र ११ व १२ मध्ये जंतुनाशक फवारणी


लोहारा,दि.२९:  
 शहरात गेल्या तीन-चार महिन्यांपासून बाधित रुग्ण संख्या वाढत होती. सध्यस्थितीला कोरोनाचा वाढता आलेख कमी होत असून  कोरोनाचा पुन्हा प्रसार होऊ नये. याअनुषंगाने आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली युवानेते किरण गायकवाड व शिवसेना तालुका प्रमुख मोहनज पणुरे यांच्या सहकार्याने माजी नगरसेवक शाम नारायणकर व डॉ.सुवर्णमाला शाम नारायणकर यांच्या सहकार्याने  शुक्रवार  (दि.२८) रोजी शिवसेनेच्या वतीने संपूर्ण प्रभागात जंतुनाशक फवारणी करण्यात आली. 

 या फवारणीचा शुभारंभ शिवसेना शहरप्रमुख सलिम शेख,युवासेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी माजी ग्रा.पं.सदस्य महेबुब गंवडी, युवासेना शहरप्रमुख श्रीकांत भरारे,मल्लिकार्जुन पाटिल,महेश बिराजदार व ग्रामस्थ उपस्थित होते.

Labels:

कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात शनिवार दि. 29 मे रोजी 303 पॉजिटीव्ह; तर 8 जणांचा मृत्यू ,बरे होण्याचे प्रमाण 91. 18 टक्के तर मृत्यू दर 2.25


उस्मानाबाद, दि. 28   : 
उस्मानाबाद जिल्हयात आज शनिवार   दि. 28  मे रोजी  प्राप्त झालेल्या अहवालानुसार 303 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर 8 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात 424 जण बरे होवून घरी परतले आहेत. 
जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची एकूण संख्या 54 हजार 437  इतकी झाली आहे. यातील 49 हजार 640 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 1 हजार 225 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 3 हजार 572 जणांवर उपचार सुरु आहेत. बरे होण्याचे प्रमाण 91. 18 टक्के तर  मृत्यू दर 2.25 एवढे आहे.

Labels: