Sunday, 31 January 2021

रेडा गावात ग्रामसेवक सतत गैरहजर असल्याने मूलभूत सुविधांपासून ग्रामस्थ वंचित

 


   रेडा : संतोष भोसले         

 इंदापूर तालुक्यातील रेडा गावात ग्रामसेवक गेली एक ते दीड महिन्यापासून गावात फिरकले नसल्याने गावातील ग्रामस्थांना ग्रामपंचायत पासून मिळणाऱ्या मूलभूत सुविधांच्या कुठल्याही प्रकारे लाभ मिळत नाही यासाठी गावातील ग्रामस्थ यांनी इंदापूर गटवि.कास अधिकारी यांच्याकडे वारंवार तोंडी व लेखी स्वरूपात तक्रार करूनही अद्याप रेडा गावातील ग्रामसेवकयांच्यावर कुठल्या प्रकारची गट विकास अधिकारी यांच्याकडून विचारणा अथवा कार्यवाही झालेली दिसून येत नाही.

 गावात ऑगस्ट  2020 मध्ये ग्रामपंचायत कार्यकारी संचालक मंडळ बरखास्त झाली व प्रशासक आणि ग्रामसेवक यांच्यामार्फत कामकाज सुरू झाली. ऑगस्ट दोन हजार वीस पासून ते निवडणूक कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत आणि आज अखेरपर्यंत ग्रामसेवक गावात गैरहजर राहिल्याने ग्रामपंचायत कर वसुली तसेच दिवाबत्ती व पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. यासाठी गावातील सुज्ञ नागरिक यांनी गटविकास अधिकारी यांना ग्रामसेवक बाबत अनेक प्रकारे माहिती देऊनही ग्रामसेवक वर कुठल्या प्रकारचे कामकाजाबाबत बंधन न घातल्याने रेडा गावातील ग्रामस्थ गट विकास अधिकारी यांच्यावर संताप व्यक्त करीत आहेत.

 याबाबत गट विकास अधिकारी यांना छेडले असता ते म्हणाले की सदरचे ग्रामसेवक यांना गावात राहून ग्रामस्थांची कामे मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या आहेत तरीही ग्रामसेवक गावात गैरहजर राहिल्यास जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या अधीन राहून योग्य ती कारवाई केली जाईल असे गट विकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी सांगितले.


Labels:

माणुसकी हेच लेखनाची मूल्य गर्भ होय म्हणून लिहिते व्हा - डॉ. विजयकुमार फड

 


उस्मानाबाद : येथील मेघमल्हार सभागृहात श्री शाहूराज घोगरे लिखित "आयुष्याच्या मैदानावर" या आत्मकथनपर ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांनी वरील उद्गार काढले. मराठवाडा साहित्य परिषद शाखा उस्मानाबादच्या वतीने व मुक्तरंग प्रकाशन लातूर द्वारा प्रकाशित "आयुष्याच्या मैदानावर " या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा  डॉ. विजयकुमार फड यांच्या शुभहस्ते आयोजित केला होता.

 प्रारंभी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी पुढे बोलताना डॉ. विजयकुमार फड यांनी अत्यंत ओघवत्या शैलीत आपले विचार मांडले. माणसाला जगताना लिहिणे आणि वाचणे किती गरजेचे आहे, तसेच वर्तमानात माणुसकीची जाणीव माणसामाणसात निर्माण होण्यासाठी लिहिते होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. अनेक संत वचनांच्या आधारे त्यांनी आपल्या विचारातून बहुमुल्य मार्गदर्शन केले. 

प्रमुख उपस्थिती मध्ये बोलताना प्रा. डॉ.  चंद्रजित जाधव यांनी श्री खोगरे सरांचे आणि त्यांचे गुरू शिष्याचे नाते सांगून सभागृहाला भावनिक करून सोडले तर माधव गरड यांनी आपल्या विचारातून प्रस्तुत ग्रंथ ग्रंथाचे अंतरंग बहिरंग उलगडून दाखविले. ग्रंथाची प्रस्तावना लिहिणारे व कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असणारे प्रा.डॉ.  शिवाजीराव देशमुख यांनी खोगरे यांच्या अनुभवकथनातील जिवंतपणावर नेमकेपणाने बोट ठेवले आणि घटना, प्रसंगातून श्री खोगरे यांच्या लिखाणातील प्रामाणिकपणा कसा उद्धृत होतो ते त्यांनी स्पष्ट केले.

याच प्रसंगी प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांनीही कार्यक्रमाला उपस्थित राहून प्रकाशन सोहळ्यास शुभेच्छा दिल्या. मराठीतील सुप्रसिद्ध साहित्यिक रा. रं. बोराडे ,भास्कर चंदनशिव, डॉ. प्रल्हाद लुलेकर, श्रीमती कमलताई नलावडे व सौ. वंदना कुलकर्णी यांनीही कार्यक्रमाला आवर्जून शुभेच्छा पाठविल्या. या वेळी अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडू कुमारी सारिका काळे यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी म सा प उस्मानाबाद चे अध्यक्ष श्री नितीन तावडे होते. कार्यक्रमाला श्री खोगरे कुटुंबीय शहरातील साहित्यिक म सा प पदाधिकारी व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. 

प्रस्तुत पुस्तकाच्या निर्मितीसाठी व प्रकाशन सोहळा  संपन्न करण्यासाठी श्री श्रीमंत सुरवसे, श्री हनुमंत लाटे, श्री दिनकर पाटील ,श्री भालचंद्र जाधव, श्री रवी निंबाळकर, श्री विजय यादव तसेच ज्ञात-अज्ञात अनेकांचे बहुमूल्य सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री भा.न. शेळके यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. डॉ.अरविंद हंगरगेकर यांनी व आभार प्रा. डॉ.  रुपेशकुमार जावळे  यांनी मानले.

Labels:

संदीप अमृतराव यांना मॅनेजमेंट मध्ये पीएच.डी.


तुळजापूर : संदीप अरुणराव अमृतराव यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद यांच्या वतीने व्यवस्थापनशास्त्र विषयात पीएच. डी. प्रदान करण्यात आली. संदीप अमृतराव यांनी डॉ. संजय अस्वले यांच्या मार्गदर्शनाखाली "अ क्रिटिकल इव्हॅल्युएशन ऑफ आयटी एम्प्लोयीज अँड देअर यूज ऑफ मॅनेजमेंट स्किल इन द प्रोफेशनल अँड पर्सनल लाईफ" या विषयाचा प्रबंध विद्यापीठाला सादर केला होता.

 संशोधनात पश्चिम महाराष्ट्रातील विशेषतः पुणे येथील आयटी इंड्रस्टी मध्ये काम करणारे कर्मचारी व्यवस्थापन कौशल्याचा त्यांच्या वैयक्तिक व व्यावसायिक जीवनात कसा उपयोग करतात याचा चिकीत्सक अभ्यास करण्यात आला आहे. संदीप अमृतराव हे मागील ९ वर्ष्यापासून आय टी क्षेत्रात आहेत. बंगलोर व हैद्राबाद येथे त्यांनी कार्य केले असून सध्या  पुणे येथील नामांकित आयटी कंपनी टी सी एस मध्ये कार्यरत आहेत. कार्पोरेट क्षेत्रात कार्यरत राहून संशोधनाची आवड असल्याने संदीप अमृतराव यांनी पीएच. डी. पदवी प्राप्त केल्याने  अमृतराव- कदम परिवाराचे प्रमुख श्री. दुर्गदास बप्पा अमृतराव, श्री. अरुणराव अमृतराव, डॉ. जयसिंग देशमुख, प्रा. संभाजी भोसले, डॉ. अर्षद रजवी, डॉ. आनंद मुळे, श्री. अभिजीत देशमुख, श्री. देवा नायकल यांनी अभिनंदन केले. तसेच एकाच परिवारातील डॉ. संदीप व डॉ. सुयोग या दोन्ही बंधूनी पीएच. डी. प्राप्त केल्याने कार्पोरेट व विविध क्षेत्रातील व्यक्तीं त्यांचे कौतुक करत आहेत.

Labels:

तुळजापूर रोटरी क्लबच्या वतीने रक्तदान शिबिर

 


तुळजापूर, दि. 31 : सतीश महामुनी

रक्तदान केल्यामुळे आपले शरीर सुदृढ राहते याला शास्त्रीय आधार आहे त्यामुळे सर्वांनी रक्तदान सातत्याने केले पाहिजे असे आवाहन रोटरी क्लब तुळजापूर अध्यक्ष ॲडव्होकेट स्वाती नळेगावकर यांनी केले.

तुळजापूर रोटरी क्लब च्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरासाठी सोलापूर येथील हेडगेवार रक्तपेढी रक्त संकलन करण्यासाठी आलेली होती या शिबिराचे उद्घाटन रोटरी क्लबचे अध्यक्ष स्वाती नळेगावकर आणि सचिव रामचंद्र गिड्डे यांच्या शुभहस्ते झाले. याप्रसंगी हेडगेवार रक्तपेढीचे संचालक महेंद्र कावरे, रोटरीचे पदाधिकारी भरत जाधव, संजय जाधव, अनिल रोजकरी, सुधीर शेळके, सौ निर्मला जाधव , श्रीमती मीना सोमाजी, गुलचंद व्यवहारे, प्रशांत भागवत, रवी पाटील आणि हेडगेवार रक्तपेढी चे अधिकारी डॉक्टर हरिश्चंद्र गालीमाल यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी रोटरी अध्यक्ष स्वाती नळेगावकर यांनी ७८   वेळा रक्तदान करणारे प्रशांत भागवत व ५१  वेळा रक्तदान करणारे रवींद्र पाटील यांचा सत्कार केला, तुळजापूर शहरामध्ये रोटरी क्लबच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून रक्तदान शिबीर आणि इतर आयोजित होणाऱ्या सामाजिक उपक्रमांमध्ये नागरिकांचा मोठा सहभाग असतो त्यामुळे आज ७८ नागरिकांनी रक्तदान करून रोटरी ची परंपरा कायम ठेवल्याचे सांगितले.

रोटरीचे सचिव उद्योजक रामचंद्र गिड्डे यांनी आज रक्ताची गरज लक्षात घेऊन रोटरी क्लबने शिबिर घेण्याचे आयोजन केले आणि त्याला रोटरी वर सुद्धा असणाऱ्या नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.

Labels:

शाळकरी मुलीच्या आत्याचार प्रकरणी गाव बंदला प्रतिसाद ; फरार आरोपीस अटक करण्यासाठी उपोषणचा इशारा

अणदूर, दि.३१ : 
 अणदूर ता. तुळजापूर येथे  नुकतेच शाळकरी मुलीवर तीन नराधमांनी अत्याचार केल्याची घटना घडल्याने  या  अत्याचाराचा निषेध करण्यासाठी व पिडितेला न्याय मिळावे ,  त्याचबरोबर  आरोपींना कठोर शिक्षा व्हावी म्हणून रविवार दि.३१ रोजी गाव बंद ठेवून गावातून रॅली काढून निषेध सभा घेण्यात आली. 

गावातील बाजार मैदानावर सभा घेत घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला यावेळी. दीपक आलुरे, साहेबराव घुगे,माणिक आलूरे,दीपक घोडके,सिद्रामप्पा नरे,अरविंद घोडके, बसवराज नरे,राजेश देवशिंगकर आदींनी आपल्या भावना व्यक्त करताना तिन्ही आरोपींना तात्काळ कारवाई व्हावी,फरारी असलेल्या आरोपीला तात्काळ अटक करावी,या प्रकरणात सरकारी वकील उज्वल निकम यांनी नियुक्ती करावी व खटला फासट्रक कोर्टात चालवावा आदी मागण्या मांडल्या.

फरारी आरोपी तात्काळ अटक करावी अन्यथा दि.२ रोजी नळदुर्ग पोलीस ठाणे येथे उपोषणाला बसणार असल्याचे पोलीस निरीक्षक नळदुर्ग यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे.

यावेळी घटनेचे तीव्र पडसाद उमटल्याने गावात मोठ्या प्रमाणावर फौजफाटा तैनात करण्यात आले आहे.गावात संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवून गावकऱ्यांनी घडलेल्या घटनेचा निषेध नोंदवले.

Labels:

श्रीराम मंदिर निर्माण कार्यासाठी किलज गावातून काढण्यात आली शोभायात्रा



किलज, दि.३१:
तुळजापूर तालुक्यातील किलज येथे दि.३१ जानेवारी रोजी अयोद्धा येथे बांधण्यात येणाऱ्या श्रीराम मंदिराच्या निर्माण कार्यासाठी निधी संकलनासाठी  गावातून शोभायात्रा काढण्यात आली. 

 दिंडीचा शुभारंभ  गावातील श्री. विठल रुक्मिणी मंदिर येथून करण्यात आला .यामध्ये गावातील भजनी मंडळ आणि तरूणवर्ग  मोठ्या संख्येनी सहभागी झाले  होते. या दिंडीच्या माध्यमातून लोकांना आपल्या माध्यमातून शक्यतो आर्थिक स्वरूपातील मदत  श्रीराम मंदिराच्या बांधणीसाठी सर्वानी द्यावी असे सांगण्यात आले.

 किलज गावाला प्रदक्षिणा घालून या दिंडीचा समारोप  गावातील विठल रुक्मिणी मंदीर येथे झाला.

Labels:

अचलेर येथे सरपंच प्रकाश लोखंडे यांच्या हस्ते पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे उद्घाटन

  


अचलेर : जय गायकवाड 

पोलिओ हा मज्जासंस्थेवर परिणाम करणारा आजार असून त्यामुळे गंभीर आजार अर्धांगवायू,किंवा मृत्यु देखील होऊ शकतो.

आणि त्यामुळेच देशात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वी पद्धतीने राबविण्यात येत आहे.याचे फलित म्हणून सन १९९९ पासून देशात पोलिओ रुग्णाच्या संख्येत लक्षणीय घट झालेली आहे.

पोलिओचा रोगप्रसार हा प्रामुख्याने अस्वच्छतेमुळे,दूषित मैलापाण्याच्या संपर्कामुळे होतो.

८० टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण हे वयाची तीन वर्षे पूर्ण होण्याआधी आढळतात.

त्यामुळेच पोलिओ लसीकरण हे अत्यंत गरजेचे आहे.

आज ३१ डिसेंबर रोजी लोहारा तालुक्यातील अचलेर येथे तीन ठिकाणी पोलिओ बूथ चे नियोजन करण्यात आले होते.याचे उद्घाटन सरपंच प्रकाश लोखंडे व सामाजिक कार्यकर्ते मल्लिनाथ आष्टगे यांच्या हस्ते करण्यात आले.

० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ डोस पाजण्यात आला.

कोरोना रोगाचे नियंत्रण म्हणून मास्क बंधनकारक करून या लसीकरणाचे नियोजन करण्यात आले होते.

यावेळी आष्टा(कासार)प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मेडिकल ऑफिसर डॉ.आर.एस.माने,सौ. जाधव सी.एम.(एल.एच.व्ही.)यांनी भेट देऊन पाहणी केली.

ही लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी बनसगोळे ए.एस.(आरोग्य सेविका),सौ.गावडे एस.के.,सौ.राजश्री माशाळकर, सौ.जिजाबाई चव्हाण,मल्लमा धत्तूरगे,सौ.लक्ष्मीबाई कांबळे,सौ. रेखा राठोड,विमल आष्टगे या आशा कार्यकर्त्यानी  आपले कर्तव्य बजावले...!!!

Labels:

"रूक्मिणी महिला विशेष क्रीडा पुरस्कार" सौ.अंजली वरटी यांना प्रदान


काटी : उमाजी गायकवाड

 येथील रूक्मिणी फाऊंडेशन्स मार्फत दिला जाणारा "रूक्मिणी महिला विशेष क्रीडा पुरस्कार(2020)या वर्षी आंतरराष्ट्रीय खेळाडू व मार्गदर्शक,स्पोर्टस् क्वीन,स्पोर्टस् गुरू,सौ.अंजली मंजुनाथ वरटी(एम ए.एम पी एड.सुवर्ण पदक)मुंबई यांना मान्यवरांचे उपस्थितीत प्रजासत्ताक दिनाचे(26 जानेवारी)औचित्य साधून आचार्य अत्रे सभागृह,पिंपरी येथे प्रदान करण्यात आला.

काटी येथील कुलस्वामिणी सुतगिरणीचे मा.संचालक सुर्यभान हंगरकर,प्रा.अभिमान हंगरकर,गोदन वडणे,विजया शितोळे,शामल शिंदे यांच्या मातोश्री कै.रूक्मिणी हंगरकर यांच्या स्मरणार्थ रूक्मिणी फाऊंडेशन्स मार्फत या वर्षापासून गुणवंत क्रीडाशिक्षक पुरस्कार देण्यात येत आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शारिरीक शिक्षण शिक्षक महामंडळ,पिंपरी चिंचवड शहर यांनी हा पुरस्कार सोहळा आयोजित केला होता.

या सोहळ्यात गुणवंत क्रीडाशिक्षक पुरस्कार(20-21)प्रदान करण्यात आले.या पैकीच एक पुरस्कार रूक्मिणी फाऊंडेशन्स,उस्मानाबाद मार्फत दिला जाणारा"रूक्मिणी महिला विशेष क्रीडा पुरस्कार सौ.अंजली वरटी यांना प्रदान करण्यात आला.निवड समितीने अंजली यांची निवड त्यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत केलेले भारतीय संघाचे प्रतिनिधित्व विचारात घेतले.अंजली यांनी भारताकडून 13 आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग, एशिया स्पर्धेत सहभाग, लंडन, मलेशिया, हाँगकाँग, बँकाॅक, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आदी देशात भारताचे प्रतिनिधित्व  केले आहे.

लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद, बास्केटबॉल, हॅन्डबाॅल, फुटबॉल, साॅप्टबाॅल या खेळात प्राविण्य प्राप्त केले असून सध्या अंजली वरटी सेंट्रल रेल्वे(मुंबई) येथे कार्यरत आहेत.

 या गुणवंत क्रीडाशिक्षक पुरस्कार सोहळ्यास पुणे विभाग क्रीडा उपसंचालक विजय संतान,महापौर माई ढोरे,क्रीडा सभापती प्रा.उत्तम केंदळे,माजी उपमहापौर मोहंमद भाई पानसरे,महामंडळ अध्यक्ष फिरोज शेख,संस्थापक निवृत्ती काळभोर,सचिव महादेव फपाळ,रोप स्किपींग च्या उपाध्यक्षा तथा रूक्मिणी फाऊंडेशन्सच्या संचालिका सौ.शामल माणिकराव शिंदे,महामंडळाचे सर्व पदाधिकारी,क्रीडाशिक्षक,खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Labels:

Saturday, 30 January 2021

नळदुर्ग एज्युकेशन वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने शुक्रवार दि.२९ जानेवारी रोजी सामुदायिक विवाह सोहळा संपन्न


नळदुर्ग ,दि. ३०,
येथील नळदुर्ग एज्युकेशन वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने शुक्रवार दि.२९ जानेवारी रोजी पार  सामुदायिक विवाह सोहळ्यात  नऊ जोडप्यांचे विवाह येथील बि.के फंक्शन हॉल येथे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव पासुन बचावासाठी प्रशासनाने केलेल्या सूचनेचे पालन करीत वधु वरांच्या जवळच्या मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत  पार पडला. 

 दरवर्षी प्रमाणे यावर्षी हि इज्तेमाई शादीयाॅ (सामुदायिक विवाह सोहळा)चे आयोजन करण्यात आले होते. नळदुर्ग एज्युकेशन असोसिएशनच्या वतीने गेल्या ६  वर्षा पासून नळदुर्ग येथे मुस्लिम समाजासाठी (इज्तेमाई शादीयाॅ) सोहळ्याचे आयोजन करीत आहे. 

नळदुर्ग एज्युकेशन असोसिएशनच्या या कार्यामुळे नळदुर्ग शहर व परिसरातील गोरगरीब गरजुवंत कुटुंबीयांना मोठ्या प्रमाणात आधार मिळत आहे. गेल्या ६ वर्षात ७० पेक्षा जास्त जोडप्यांचे विवाह लावण्यात आले आहेत. २९ जानेवारी रोजी झालेल्या विवाह सोहळ्यात ९ जोडपे विवाहबद्ध झाले.

विवाहबध्द झालेल्या नव वधुवरांना नळदुर्ग एज्युकेशन वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने प्रत्येकी २५ हजार रपयांचे संसारोपयोगी वस्तु भेट म्हणून देण्यात आले.हा विवाह सोहळा यशस्वी पार पाडण्याकरिता नळदुर्ग एज्युकेशन वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष पत्रकार लतीफ  शेख यांच्यासह रुकनोद्दीन शेख, युनुस शेख, अफरोज पंचभाई, बरकत जाहगिरदार, ॲड.मतीन बाडेवाले आमेर शेख, खालेद इनामदार, सादेक काझी, वसीम कुरेशी, आबेद इनामदार, अलीम शेख, अशपाक कुरेशी, वाजीद शेख, रफिक फुलारी, सज्जाद सावकार,सैफन शेख, रहेमान कुरेशी, शौकत कुरेशी, अबुबकर कुरेशी, मिन्हाजोद्दीन इनामदार, रब्बानी शेख, मुर्तुजा शेख, फकरोद्दीन मुजावर, दस्तगीर जाहगिरदार, शमा काझी, जावेद कुरेशी,सलाम कुरेशी, हुजुर शेख, मुर्तुजा मोजन , फुरखान शेख, खमर कुरेशी,जमीर मोजन, सरफराज बागवान, मजीब मोजन, आवेज शेख, आबेद इनामदार, सज्जाद इनामदार, आसीम जाहगिरदार, मुद्दसर शेख,फैसल पठाण, गौस इनामदार,मोईन जमादार,सलमान कुरेशी, सादिक बागवान, आसिफ बागवान, अब्दुल कदीर शेख, करीम इनामदार आवेज पटेल, मुज्जमिल शेख, दानिश शेख,मिनहाज नदाफ यांच्यासह शहरातील विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. 

या कार्यक्रमासाठी उस्मानाबाद  येथील हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी वेल्फेअर सोसायटीचे प्रमुख अलहाज सय्यद नादेरउल्ला हुसेनी व उस्मानाबाद येथुन आलेले त्यांचे सहकारी यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.यावेळी हाफेज व खारी सय्यद मैनोद्दीन जाहगिरदार व आलेम मोहम्मद रजा यांचे धार्मिक प्रवचन झाले.तसेच हफेज फुरखान अहेमद नक्शबंदी यांचे नातचे कार्यक्रम झाले.यावेळी हाफेज सय्यद नियामतुल्ला इनामदार आलेम अब्दुल हाई,हाफेज फारुख शेख,हाफेज मुसा जमादार, मुफ्ती कासीम इनामदार, हाफेज इम्रान शेख, हाफेज शब्बीर शेख,हाफेज खादर इनामदार यांच्यासह 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  प्रशासनाने केलेल्या सूचनेचे पालन करीत वधु वरांच्या जवळच्या काही नातेवाईकाच्या उपस्थितीत  सामुदायिक विवाह सोहळा  संपन्न झाला.

Labels:

नळदुर्ग येथे रिपाइंच्यावतीने मान्यवरांचा गौरव


वागदरी,दि.३०: 
नळदुर्ग येथे रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया(आठवले)शहर शाखा नळदुर्ग च्या वतीने नगरसेवक दयानंद बनसोडे , रिपाइंचे तुळजापूर तालुका अध्यक्ष बाबासाहेब बनसोडे यांचा सत्कार करण्यात आला.

  नळदुर्ग नगरपरिषदेच्या आरोग्य व स्वच्छता विषय समितीच्या सभापती पदी येथील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते तथा नगरसेवक दयानंद बनसोडे यांची निवड झाल्याबद्दल तर रिपाइंचे तुळजापूर तालुका अध्यक्ष बाबासाहेब बनसोडे याना रिपाइं जिल्हा शाखेच्या वतीने दि ग्रेट कार्यकर्ता सन्मान पुरस्कार मिळाल्या बद्दल रिपाइं नळदुर्ग शहर शाखेच्या वतीने  सत्कार करण्यात आला.


   याप्रसंगी रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष दुर्वास बनसोडे, जिल्हा सचिव एस.के.गायकवाड, तालुका संघटक सुरेख लोंढे, रिपाइं अल्पसंख्याक आघाडीचे तालुका अध्यक्ष बाशिद  कुरेशी,  शहर कार्याध्यक्ष महादेव कांबळे, नळदुर्ग सर्कल प्रमुख राजेंद्र शिंदे ,जेष्ठ कार्यकर्ते विठ्ठल  बनसोडे,मनोहर डावरे, दिपक डावरे, मारूती लोंढे, बबलु जहागीरदार,हरी पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Labels:

धाराशिव व संभाजीनगर नामकरणासाठी तुळजापुरात हिंदुराष्ट्र शिवसेनेच्या वतीने आंदोलन

 


तुळजापूर : सतीश महामुनी

हिंदुराष्ट्र सेना तुळजापूर तालुक्याच्या वतीने शहरातून पायी फेरी काढून तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांना धाराशिव व संभाजीनगर या दोन्ही जिल्ह्यांच्या नामांतर च्या मागणीचे निवेदन तहसील कार्यालय मार्फत देण्यात आले.

 आजचे शासकीय नाव हे उस्मानाबाद आहे हे नाव पारतंत्र्याची निशाणी असून हा भारतीयांवर गुलामीचा डाग आहे, त्यामुळे धाराशिव  नाव करून सरकारने स्वतंत्र भारतात आपण आहोत याची प्रचिती द्यावी मावजीनाथ महाराज यांनी या निमित्ताने केली आहे.

सदर निवेदनामध्ये क्रूर अत्याचारक औरंगजेबाचे नाव काढून टाकून धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचे नाव औरंगाबाद जिल्ह्यास सन्मानाने देऊन सर्व राजकीय पक्षांनी आपला छत्रपतींच्या विचाराचा वारसा तोंडी न बोलता खरोखर जपून दाखवण्यात यावा असंही या निवेदनात म्हंटले आहे.

   यापूर्वीही संघटनेच्या वतीने निवेदन देऊन देखील सरकारने दखल न घेतल्यामुळे पुनःश्च एकदा निवेदन देण्यात आल्याचे यावेळी हिंदुराष्ट्र सेनेचे पदाधिकारी म्हणाले, व आता दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा हिंदुराष्ट्र सेना च्या माध्यमातून देण्यात आला आहे. यानिमित्ताने तुळजापूर शहरांमधून हिंदुत्ववादी विचाराच्या नागरिकांनी शांततेच्या मार्गाने शोभायात्रा काढून या विषयाच्या अनुषंगाने तुळजापूर शहरातील नागरिकांत जनजागृती केली.

 यावेळी महंत मावजीनाथजी महाराज,महंत व्यंकटअरण्य महाराज, संजय  सोनवणे, अर्जुनाप्पा साळुंके,  परिक्षित साळुंके,  ओंकार पवार,  सुधीर कदम, बापुसाहेब नाईकवाडी, शिवाजी बोधले,  गुलचंद व्याव्हारे , अजय साळुंके,  सागर इंगळे, गणेश जळके, जिवणराजे इंगळे,  गिरीश लोहारेकर, दादा भोसले.  व शेकडो हिंदुत्ववादी उपस्थित होते.

Labels:

मुख्याधिकारी अशिष लोकरे यांनी मातंग समाजाच्या तरुणांना त्रास दिला - प्रदेशाध्यक्ष सोमनाथ कांबळे यांचा घणाघात

 


तुळजापूर : सतीश महामुनी

तुळजापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर आशिष लोकरे लिपिक दत्तात्रय साळुंखे आणि लिपिक पी.पी.बरुरकर यांच्यावर कारवाई होईपर्यंत लहुजी शक्ती सेना राज्यभर आंदोलन करेल असा इशारा प्रदेशाध्यक्ष सोमनाथ कांबळे यांनी तुळजापुरात निघालेल्या मोर्चा मधून दिला.

हा मोर्चा मोठ्या संख्येने घोषणाबाजी करीत नगरपरिषदेच्या आणि पोलिस कार्यालयाच्या समोर आल्यानंतर मोर्चे करांना तेथे अडवण्यात आले मोठा तगडा पोलिस बंदोबस्त तैनात केला असल्यामुळे व व्यासपीठ परवानगी नाकारल्यामुळे लहुजी शक्ती सेनेच्या वतीने पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनाला संदर्भात नाराजी व्यक्त करण्यात आली.

 प्रदेशाध्यक्ष सोमनाथ कांबळे यांनी मुख्याधिकारी लोकरे यांनी पैशाची देवाणघेवाण करून मनमानीपणे नियुक्त्या करणे आणि मातंग तरुणांना त्रास देण्याचे काम केले आहे त्यामुळे आणि समाजाच्या तरुणांना न्याय देण्यासाठी विशेषतः अनुकंप यादीत असणाऱ्या 17 तरुणांना तात्काळ नोकरीत सामावून घेण्यासाठी सदर मोर्चा काढला असल्याचे सांगून लहुजी शक्ती सेना आणि प्रदेशाध्यक्ष यांना बदनाम करण्यासाठी चुकीची आणि खोटी तक्रार करणाऱ्या दत्तात्रेय साळुंखे आणि प्रफुल्लता बरूरकर यांच्यावर प्रशासनाची फसवाफसवी केल्याप्रकरणी तातडीने गुन्हे दाखल करून लहुजी शक्ती सेना ची माफी मागण्याची मागणी याप्रसंगी करण्यात आली. अत्यंत आक्रमक पद्धतीने सोमनाथ कांबळे यांनी नगरपरिषदेच्या कारभाराचा याप्रसंगी समाचार घेतला अनेक चुकीच्या कामाचा आढावा त्यांनी सभेमध्ये वाचून दाखवला.

लहुजी शक्ती सेना चे संस्थापक विष्णू कसबे यांनी याप्रसंगी हुजी शक्ती सेनेच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे 17 तरुणांना न्याय मिळेल असा विश्‍वास व्यक्त करून हा प्रश्न मोर्चाने सुटला नसेल तर त्याला न्यायालयात जाऊन दातांना मागावी लागेल आणि लहुजी शक्ती सेना निश्चितपणे लोकशाही आणि न्यायालयाच्या माध्यमातून तरुणांना न्याय देईल असा विश्वास बोलून दाखवला

सदरील मोर्चाची सुरुवात शासकीय विश्रामगृह येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक,गोराई चौक,जूने बस स्थानक,लातूर चौक,डाँ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथून नगर परिषद समोर येवून विराट मार्चा स्तिरावून अनेकांनी आपल्या भाषणातून नगर परिषदच्या भोंगळ कारभारावर व सोमनाथ कांबळे व लहुजी शक्ती सेना संघटनेवर मुख्याधिकारी यानीं बदनामी केलेल्या वक्तव्यावर कडाडून निषेध केला.

 यावेळी लहुजी शक्ती सेना संस्थापक विष्णू भाऊ कसबे,प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भाऊ कांबळे,जिल्हाध्यक्ष शिवाजी गायकवाड, लक्ष्मण क्षीरसागर, कोयर कमिटीने कैलास दादा अर्जूने,दयानंद कांबळे,हेमंत भाऊ,दत्ता गंड,सोलापुरचे सुधाकर पाटूळे,अभिषेक देवरकर,बालाजी भाऊ गायकवाड, जालण्याचे संतोष तुपसुंदरे,जेष्ठ नेते बजीरंग ताटे,विजय जाधव,बुलढाण्याचे कैलास खंदारे,राज्य कोअर कमिटीचे संतोष आहिरे व लातूरच्या मायाताई लोंढे आदींची आवेशपूर्ण भाषणे झाली. त्यानंतर लहुजी शक्ती सेनेने मागण्याचे निवेदन पोलीस स्टेशन व नगर परिषद यांचेकडे सादर केले.सकाळपासून लहुजी शक्ती सेनेचे हजारो प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते तुळजापूर शहरात जमा झाले होते.

मोर्चा सभेत लक्ष्मण गायकवाड यानीं सुत्रसंचलन तर प्रास्ताविक शिवाजी गायकवाड यानीं केले.यावेळी लहुजी शक्ती सेनेचे हजारो सैनिक व समाज बांधव आणि महिला उपस्थीत होते.

Labels:

तुळजापूरच्या विकासासाठी नव्याने आराखडा करणार - आमदार राणाजगजितसिंह पाटील

 


तुळजापूर : सतीश महामुनी

तुळजापूर तीर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी आपण नव्याने तज्ञ आरेखाकाकडून नेत्रदीपक आणि सुंदर तुळजापूर विकसित करण्यासाठी प्रयत्नशील असून तुळजापूर शहराच्या विकासासाठी ज्या नागरिकांना आपल्या सूचना द्यायचे आहेत त्यांनी ई-मेलद्वारे सूचना देण्याचे आवाहन तुळजापूरचे आमदार आणि तुळजाभवानी देवस्थान संस्थान विश्वस्त राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.

तुळजापूर तीर्थक्षेत्राचा विकास या विषयावर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली याप्रसंगी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, युवक नेते आनंद कंदले, माजी जिप सदस्य गणेश सोनटक्के, माजी नगराध्यक्ष बापूसाहेब कणे, उद्योजक रतिकांत भोसले यांची उपस्थिती होती. तुळजाभवानीचे दर्शनाला येणाऱ्या भाविकांना दोन दिवस मुक्काम करण्यासाठी तसेच दर्शना बरोबर पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी ही योजना करीत असल्याचे आमदार पाटील यांनी प्रारंभी स्पष्ट केले.

जगभरामध्ये अनेक तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी नागरिकांच्या सूचना महत्त्वाचे ठरलेले आहेत त्याप्रमाणे तुळजाभवानीच्या देवस्थान परिसरातील पाच किलोमीटर वर्तुळात विकासाच्या योजना राबविण्यासाठी नागरिकांनी आपल्या सूचना ई-मेलद्वारे  देण्याचे आवाहन करताना छत्रपती शिवाजी महाराज आणि कुलस्वामिनी तुळजाभवानी यांच्या इतिहासाला समोर ठेवून प्रेक्षणीय अशी प्रदर्शनी आणि शिवसृष्टी करण्याचा मनोदय आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या पर्यटन आणि इतर खात्याकडून तुळजापूर तीर्थ क्षेत्राचा विकास करण्यासाठी एकात्मिक विकास आराखडा अत्यंत तज्ञ रचनाकाराकडून करण्याचा प्रयत्न आहे, उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर येथे पुरातत्व विभाग आणि स्थानिक संस्था यांना सोबत घेऊन नव्याने डीपीआर करण्यात आला आहे त्याच धर्तीवर तुळजापूरचा नवीन डीपी तयार करण्याचा हा प्रयत्न असून अद्यावत नाट्यग्रह क्रीडासंकुल बगीच्या यासह शहरामध्ये फिरण्यासाठी आवश्यक प्रेक्षणीय ठिकाणे नव्याने बसवण्याचा प्रयत्न या योजनेत आहे कृषी क्षेत्राला सोबत घेऊन एग्रीकल्चर टुरिझम करता येईल का या संदर्भात देखील सूचना मागवून घेत आहोत असेही आमदार पाटील यांनी यावेळी सांगितले ा प्रयत्नांमधून तुळजापूर मध्ये येणार्‍या भाविक भक्तांना आणि शहरवासीयांना उत्तम आणि सुंदर शहराचा अनुभव देण्याचा प्रयत्न यामधून केला जात आहे.

तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरण अंतर्गत या बाबी करण्यासाठी आपले प्रयत्न असून आपण यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून या संदर्भात विनंती करणार आहोत यापूर्वी प्राधिकरणा मधून करण्यात आलेली कामे पूर्ववत चालू राहतील परंतु शहराचा चेहरा-मोहरा बदलून टाकण्याचे सामर्थ्य या नवीन विकास आराखडा मध्ये असेल असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला.

तुळजापूर तीर्थक्षेत्राला जोडणारी रेल्वे लवकरात लवकर करण्यासाठी राज्य सरकारने आपला वाटा उचलावा आणि केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार पूर्ण करावा अशी मागणी याप्रसंगी आमदार पाटील यांनी केली तुळजापूर - उस्मानाबाद -  सोलापूर या रेल्वे मार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली आहे आजच्या स्थितीला हे काम कोणत्या स्थितीत असून त्याची प्रगती करण्यासाठी राज्य सरकारने लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले नगर-बीड-परळी मार्गाला ज्याप्रमाणे तातडीने निधी दिला व राज्य सरकारने प्रयत्न केले त्यानंतर वर्धा व नांदेड या मार्गासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे त्याचप्रमाणे तुळजापूर उस्मानाबाद सोलापूर मार्गासाठी राज्य सरकारने पुढाकार घेण्याची मागणी या निमित्ताने केली आहे.

पत्रकारांनी आमदार पाटील यांना विकासातील उणिवा दाखवून दिल्यानंतर त्यांनी सांगितले की या सर्व बाजू बाजूला ठेवून नव्याने अत्यंत देखणा आराखडा करण्याकडे आपला कटाक्ष आहे तो पूर्णत्वाला नेण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.

 

सदर पत्रकार परिषदेमध्ये आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी भाविक भक्तांना तुळजापूर शहरात आल्यानंतर संडास बाथरूम मिळत नसल्याने त्यांची कुचंबणा होत असल्याची बाब मान्य करून शहराचा अपुरा विकास झाल्याचा ठपका ठेवला आहे.

Labels:

Friday, 29 January 2021

14 वर्षीय मुलीला जबरदस्तीने घरातून उचलून नेवुन सामूहिक बलात्कार

 


नळदुर्ग , दि.२९ : अणदुर  ता.तुळजापूर येथील एका  अल्पवयीन मुलीवर तिघानी  सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस  आली आहे. 

तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे हा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 

गावातीलच   सागर घोडके, मुकेश भोरे आनंद घोडके  या तिघानी पीडित अल्पवयीन मुलगी ही आरोपी राहत असलेल्या घराच्या शेजारी वास्तव्यास होती. आरोपीनी जबरदस्तीने तिच्या घरात शिरले. ते मुलीला बळजबरीने घरातून उचलून घेऊन गेले. त्यानंतर त्यांनी पीडितेवर सामूहिक बलात्कार केला. या संतापजनक घटनेनंतर संबंधित परिसरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांनी दोघा नराधमास अटक केली आहे. तर पीडित तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पोस्को कायद्याअंतर्गत आणि कलम 363, 376 अंतगर्त गुन्हा दाखल केला आहे.

 पोलिसांना याप्रकरणातील तीन आरोपीं पैकी दोन आरोपींना पकडण्यात यश आले आहे. तर आणखी एका आरोपीचा शोध सुरु आहे. 

याप्रकरणी साहय्यक पोलीस निरीक्षक जगदीश राऊत हे पुढील तपास करीत आहेत.

Labels:

लोहगाव येथील अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे आयोजन; रविवारी होणार प्रारंभ



लोहगाव,दि. २९ , निजाम शेख

तुळजापूर तालुक्यातील लोहगाव येथे  श्री.संत ज्ञानेश्वरी पारायण, अंखड हरिनाम सप्ताह सोहळ्यास आज रविवार (दि.३१)रोजी प्रारंभ होत आहे.

सप्ताह सोहळ्यामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत, प्रवचन,किर्तन,भजन, हरीपाठ,
काकडा आरतीसह विविध धार्मिक कार्यक्रम  होणार आहेत.

 सोमवार (दि.३१)रोजी हभप श्री.प्रल्हाद सरडे महाराज(नांदुरी), हभप संजय पवार महाराज(शाहपूर,
सोमवार(दि.०१) हभप महेश महाराज (माकणी),हभप बलभिम बागल महाराज(चिकुंद्रा), मंगळवार (दि०२) 
तुकाराम हजारे महाराज (बेळगाव),
हभप दयानंद राजमाने महाराज (होर्टी),बुधवार( दि.०३)नितीन जगताप  महाराज(‌क.हिप्परगा),
हभप ज्ञानेश्वर महाराज (उमरगा)
गुरूवार (दि.०४) हभप तुकाराम पवार महाराज (धारवड), हभप राजू पाटिल महाराज(वागदरी), शुक्रवार (दि.०५) हभप गुरूवर्य विठ्ठल वासकर महाराज(वाशी).हभप  अशोक गर्जे महाराज (माळेगाव)
  यांचे किर्तन व प्रवचन पार पडणार आहेत. तर शनिवार(दि.०६)रोजी 
सकाळी ९ वाजता ज्ञानेश्वरी ग्रंथाची मिरवणूक व नगर प्रदक्षणा त्यानंतर ११ वाजता हभप राम गायकवाड महाराज(चिकुंद्रा)व हभप तुळशिराम मुळे महाराज यांच्या काल्याचे किर्तन व नंतर  भाविकांना महाप्रसादाचे  वाटप करून सप्ताहची सांगता होणार आहे.

 तरी लोहगावसह परीसरातील पंचक्रोशीत भावी भक्तांना लाभ घ्यावा असे अवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे.

Labels:

नळदुर्ग : नगरपालिकेच्या विविध विषय समीतींच्या सभापतींची बिनविरोध निवड

नळदुर्ग, दि.२९ : 
येथील नगरपालिकेच्या विविध विषय समीतींच्या सभापतींची बिनविरोध निवड करण्यात आली असून यामध्ये महाविकास आघाडी गटाला तीन तर सत्ताधारी गटाला एक सभापतीपद मिळाल्याने आता उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत काय परिणाम होणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.


गुरुवार दि.२८ रोजी पालिकेच्या सभागृहामध्ये पीठासन अधिकारी तहसीलदार गणेश माळी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होवून या बैठकीमध्ये सर्वानुमते विविध विषय समीतींच्या सभापतींची निवड करण्यात आली आहे. तर नगराध्यक्षा श्रीमती रेखाताई जगदाळे यांच्या उपस्थीतीमध्ये ही निवड करण्यात आली आहे. यामध्ये सत्ताधारी गटाला केवळ एका सभापती पदावर समाधान मानावे लागले आहे तर महाविकास आघाडीला तीन सभापतीपद मिळाले आहे. यामध्ये बांधकाम सभापती म्हणून नगरसेवक बसवराज धरणे यांची निवड करण्यात आली आहे तर महीला व बालकल्याण सभापती सौ. छमाबाई राठोड तर स्वच्छता व अरोग्य सभापती दयानंद बनसोडे यांची निवड करण्यात आली आहे तर सत्ताधारी गटाचे सौ. सुनंदा जाधव यांना पाणीपुरवठा सभापती पद मिळाले आहे. 

दरम्यान यावेळी सर्व सभापतींचा सत्कार सभागृहातील नगरसेवकांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना महाविकास आघाडीचे गटनेते नय्यर जहागिरदार म्हणाले की, आमदारा राणा जगजितसिंह पाटील, जिल्हा परिषद सदस्य बाबुराव चव्हाण व जेष्ठ नेते नरेंद्र बोरगावकर यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या सर्वच नगरसेवकांनी शहराच्या विकासासाठी एकमताने या सभापतींची निवड केली आहे. शहराच्या विकासासाठी कोणतेही राजकारण न करता शहर विकासाचा हा एकमेव मुददा समोर आसल्या कारणाने आम्ही सभागृहात विविध विषय समीतींच्या सभापतींची निवड बिनविरोध केली आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र मिळून शहराचा विकास करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत असे ही यावेळी श्री जहागिरदार यांनी म्हटले आहे. 

यावेळी सभागृहात नगरसेवक नितीन कासार, उदय जगदाळे, शहेबाज काझी, निरंजन राठोड, बसवराज धरणे, महालिंग स्वामी, विनायक अहंकारी, मुश्ताक कुरेशी यांच्यासह महीला नगरसेवक सौ. आंबूबाई दासकर, सौ. सुमनताई जाधव, श्रीमती काझी, श्रीमती कुरेशी आदी उपस्थीत होते. यावेळी सत्कार समारंभाच्या वेळी माजी नगरसेवक किशोर नळदुर्गकर, संजय जाधव, शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे, पत्रकार तानाजी जाधव, सुनिल गव्हाणे आदी उपस्थीत होते.

Labels:

Thursday, 28 January 2021

राष्ट्रीय कुटुंब व आरोग्य सर्वेक्षणात उस्मानाबाद जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी


उस्मानाबाद,दि.२९ :
केंद्र शासनातर्फे करण्यात आलेल्या राष्ट्रीय कुटुंब व आरोग्य सर्वेक्षण-5 चा अहवाल प्रसिद्ध करण्यात आलेला आहे, या अहवालानुसार माता व बाल आरोग्य, पोषण, प्रजनन स्वास्थ्य या प्रमुख निर्देशांकांमध्ये उस्मानाबाद जिल्ह्याने लक्षणीय प्रगती केली आहे. राष्ट्रीय कुटुंब व आरोग्य सर्वेक्षण-५ची आकडेवारी देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये गृहभेटीद्वारे जून-19 ते डिसेंबर-19 या कालावधीत गोळा करण्यात आली होती. 

डिसेंबर महिन्यात प्रकाशित करण्यात आलेल्या जिल्हानिहाय आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर, केंद्रशासनाच्या नीति आयोगाकडून आकांक्षित जिल्हा परिवर्तन कार्यक्रमांतर्गत सर्व जिल्हाधिकारी यांचा आढावा व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून या महिन्यात घेण्यात आलेला होता.या आढावा बैठकीत उस्मानाबाद जिल्ह्याने राष्ट्रीय कुटुंब व आरोग्य सर्वेक्षण-5 च्या प्रमुख निर्देशांकांमध्ये केलेल्या प्रगतीची दखल घेत नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी  अमिताभ कांत यांनी गौरवोद्गार काढून उस्मानाबाद जिल्ह्याचे अभिनंदन केले आहे.


राष्ट्रीय कुटुंब व आरोग्य सर्वेक्षण 1992-93 पासून केंद्र सरकारकडून दर पाच ते सहा वर्षांनी करण्यात येते. राष्ट्रीय स्तरावर करण्यात येणाऱ्या या सर्वेक्षणात माता व बाल आरोग्य, पोषण, प्रजनन स्वास्थ्य, गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा, महिला साक्षरता अशा महत्वपूर्ण निर्देशांकाची उच्च गुणवत्ता असलेली माहिती प्रत्यक्ष गृहभेटी करून घेण्यात येते. आरोग्य आणि पोषणची स्थितीमध्ये सुधारणा होणे करिता धोरणात्मक निर्णय तसेच नव्याने कार्यक्रमाची आखणी करण्यासाठी या सर्वेक्षणातील माहितीचा विविध पातळीवर उपयोग करण्यात येतो. यापूर्वी 2015-16 मध्ये राष्ट्रीय कुटुंब व आरोग्य सर्वेक्षण- 4 सर्वेक्षण करण्यात आले होते.राष्ट्रीय कुटुंब व आरोग्य सर्वेक्षण- 4 च्या आकडेवारी सोबत तुलना केली असता उस्मानाबाद जिल्ह्याची एकूण 52 निर्देशांकांमध्ये सुधारणा झाल्याचे दिसून येते.तसेच राज्याच्या आकडेवारी सोबत तुलना केल्यास उस्मानाबाद एकूण 59 निर्देशांकांमध्ये राज्यापेक्षा पुढे आहे. 

विशेषत: प्रसूतीपूर्व आरोग्य सेवा, संस्थागत प्रसूती, पूर्ण लसीकरण झालेली बालके,  लिंग गुणोत्तर मध्ये जिल्ह्याने लक्षणीय कामगिरी केली आहे. प्रसूतीपूर्व किमान 4 तपासणी, पाच वर्षाखालील वयानुसार वजन कमी असणाऱ्याबालकांचे 
प्रमाण कमी असणेआणि पाच वर्षाखालील बालकांचे जन्म नोंदणी करणे या निर्देशांकात उस्मानाबाद जिल्हा राज्यात सर्वोत्कृष्ट ठरला आहे. 

जिल्ह्यात एकूण 89.2 टक्के गर्भवती महिलांची किमान 4 वेळा प्रसूतीपूर्व तपासणी होत आहे. यापूर्वीच्या सर्वेक्षणात हे प्रमाण 74.8 टक्के होते व सद्यस्थितीत राज्याचे सरासरी प्रमाण 70.3 टक्के आहे. तसेच संस्थागत प्रसूतीचे प्रमाण एकूण 98.1 टक्के आहे. 2015-16 मध्ये हे प्रमाण 88.2 एवढे होते.पूर्ण लसीकरण होऊन संरक्षित करण्यात आलेल्या बालकांचे प्रमाण 62.7 टक्क्यावरून 89.3 टक्के वाढले आहे. या व्यतिरिक्त जिल्ह्यातील कुपोषणच्या स्थितीमध्ये घट झाल्याचे दिसून येत आहे. पाच वर्षा खालील बालकामध्ये वयानुसार उंची कमी असण्याचे प्रमाण 37.2 टक्के असून 2015-16 च्या तुलनेत एकूण 6.1 टक्के घट झाली आहे. कमी वजनाच्या बालकांचे प्रमाण 44.5 टक्क्यावरून 32.5 टक्के वर आले आहे तर उंचीनुसार वजन कमी असलेल्या बालकांचे प्रमाण 16.1 टक्के आहे. 

जिल्ह्याने प्रगती केलेल्या निर्देशांकामधील बहुतेक निर्देशांक हे नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हा परिवर्तन कार्यक्रमामध्ये समावेशित असल्याने,2017 पासून कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात आरोग्य व पोषण मध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाचे प्रभावीपणे अंमलबजावणी होत असल्याचे द्योतक आहे. 

उस्मानाबाद जिल्हा हा केंद्र सरकारच्या नीति आयोगामार्फत अंमलबजावणी होत असलेल्या आकांक्षित जिल्हा परिवर्तन कार्यक्रम अंतर्गत एकूण 117 जिल्ह्यामधून एक जिल्हा आहे. आकांक्षित जिल्हा परिवर्तन कार्यक्रम हा आरोग्य व पोषण, शिक्षण, कृषी व पशु संवर्धन, पायाभूत विकास,कौशल्य विकास आणि वित्तीय समावेशन या क्षेत्रातील एकूण 49 निर्देशांकामध्ये आमुलाग्र बदल घडून आणण्यासाठी 2017 पासून सुरु करण्यात आला आहे.या कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी होणे करिता नीति आयोगा तर्फे जिल्ह्यांचा नियमित आढावा घेण्यात येतो.राष्ट्रीय कुटुंब व आरोग्य सर्वेक्षण-5 ची आकडेवारी प्रसिद्ध झाल्यानंतर नीति आयोगाकडून आढावा घेण्यात आला होता. 

नीति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकरी यांच्या अध्यक्षेत झालेल्या या बैठकीत सर्व निर्देशांकांवर मुद्देसूद चर्चा करण्यातआली होती. सदर बैठकीनंतर जिल्ह्याच्या एकूण उपलब्धीबाबत डॉ.कौस्तुभ दिवेगावकर जिल्हासधिकारी उस्माचनाबाद   यांनी जिल्ह्यातील आरोग्य आणि पोषण यंत्रणेचे, विशेषतः आरोग्य सेविका,आशा स्वयंसेविका तसेच अंगणवाडी सेविका यांचे अभिनंदन करीत त्यांनी गावपातळीवर केलेल्या प्रयत्नाचे कौतुक केले आहे. तसेच इतरही निर्देशांकात सुधारणा करणेकरिता विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याकरिता लवकरच संबंधित विभागांची आढावा बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती दिली.

सर्वेक्षणात अतिसार, न्युमोनिया व रक्तक्षय च्या प्रमानामध्ये मात्र जिल्ह्याची पीछेहाट झाल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यात 15 ते 49 वयोगटातील एकूण 49.1 टक्के स्त्रियांमध्ये रक्तक्षय असल्याचे आढळून आले आहे. पाच वर्षाखालील बालकांमध्ये हे प्रमाण 67.4 असल्याचे दिसून आले आहे.याव्यतिरिक्त कमी वयात झालेली लग्न आणि किशोरवयीन गर्भवतीचे प्रमाण मध्ये विशेषत: जिल्ह्याची झालेली पीछेहाट चिंतनीय आहे. 
मागील पाच वर्षात एकूण 36.6 टक्के विवाह बालविवाह असल्याचे दिसून येत आहे. 2015-16 मध्ये हे प्रमाण 31.1 टक्के एवढे होते. याबाबत मा. जिल्हाधिकारी यांनी चिंता व्यक्त केली असून रक्तक्षयाचे प्रमाण कमी करणे, बालविवाह थांबिविणे तसेचलिंग गुणोत्तर वाढविण्याचे प्रयत्न व त्या करिता विशेष अभियान राबविण्याची गरज असल्याचे सांगितले.

Labels:

चिवरी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोना योध्दांचा गौरव

 


 चिवरी : राजगुरू साखरे

 तुळजापूर तालुक्यातील चिवरी  येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत कार्यालय कडून कोरोणाच्या  काळामध्ये आपल्या जिवाची पर्वा न करता अविरत सेवा देणाऱ्या गावातील पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या, ग्रामपंचायत कर्मचारी, तलाठी ,जि.प.शाळेचे शिक्षक, यांचा सत्कार करण्यात आला.

 यावेळी सरपंच अशोक घोडके, उपसरपंच बालाजी पाटील, पोलीस पाटील रुपेश बिराजदार, माजी सैनिक विठ्ठल होगाडे, सामाजिक कार्यकर्ते राजीव कचवाई, सचिन बिराजदार, विकास सोसायटीचे चेअरमन बालाजी शिंदे, कैलास शिंदे , राम झांबरे,शाहीर बंटी देडे, भारतीय जवान अंकुश कोरे, तलाठि डी एन गायकवाड, मुख्याध्यापक मेत्रे सर , ग्रामपंचायत लिपिक   अनिल देडे,अंगणवाडी सेविका अनिता बिराजदार,उषा नगदे, शिंदे  मेंढापूरे, चिमणे, आशा कार्यकर्त्या अर्चना राजमाने, राजश्री कांबळे, आदीसह  ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कमलाकर सूर्यवंशी तर आभार प्रदर्शन विठ्ठल होगाडे यांनी केले.

Labels:

नळदुर्ग : श्री खंडोबा याञा रद्द झाल्याने मंदिर परिसरात भाविकाविना शुकशुकाट


 नळदुर्ग, दि.28: दरवर्षी पौष पोर्णिमेनिमित्त  लाखोंच्या संख्येनी भरणारी नळदुर्ग येथील श्री क्षेत्र मैलारपूर खंडोबा यात्रा ही यावर्षी कोरोनामुळे  रदद करण्यात आली आहे. त्याचबरोबर मंदिर परिसरात संचारबदी लागु करण्यात आली आहे. त्यामुळे  दि.28 जानेवारी रोजी सकाळ पासुनच  खंडोबा मंदिर परिसर  भाविकाविना सर्वत्र  शुकशुकाट  असल्याचे दिसुन आले. 

 मैलारपूर नळदुर्ग येथील  मल्हारी मार्तंड श्री. खंडोबा  मंदिरा पासून जवळपास एक ते दिड कि.मी.अंतरापर्यंत संपुर्ण  परिसरात यळकोट , यळकोट!! जय मल्हार!!!चा गजर करत मानाच्या काट्या घेऊन वाजतगाजत जानेवारी महिन्यातील पौष पोर्णिमेला दरवर्षी राज्यतील व शेजारील राज्य कर्नाटकातून लाखोंच्या संख्येने भाविकांची गर्दी होते. परंतु यावर्षी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन निर्णयाची अमलबजावणी  यात्रा न  भरविण्याचा निर्णय घेतल्याने पौष पोर्णिमेला यात्रा भरलीच नाही.  


गतवर्षीचा संग्रहीत फोटो 


मंदिर परिसरात व्यावसायिकानी दुकान थाटले नाही. मंदिराकडे जाणारे सर्व रस्ते पोलीस प्रशासनाने बंद केले. याशिवाय मंदिर  कमिटीचे व्यवस्थापक अरूण मोकाशे यानी मंदिर स्पिकरवरून भाविकांना विनंती वजा आवहान करत होते की, मंदिरापासून दोन कि.मी.अंतरावर संचारबंदी लागू केलेली आहे. त्यामुळे भाविक फिरकले नाही, कांही भक्त  लांबुनच डोंगरावरून  श्रीफळ वाढुन दर्श घेताना दिसत होते. 

यात्रेच्या‍ इतिहासात  पहिल्यांदाच यत्रा बंद करण्याची वेळ आल्याने भाविक भक्तांना आपल्या कुलदैवताचे दुरून दर्शन करावे लागले. दरम्यान काही भक्त कुंटूबियासह वाहनाद्वारे आले असता मैलारपूरकडे जाणारे सर्व रस्ते सिल असल्याने नाइलाजाने त्यांना परत फिरावे लागले. नगरपालिकेचे मुख्यधिकारी लक्ष्मण राठोड. मंदिर समितीचे चेअरमन प्रकाश मोकाशे , व्यवस्थापक‍ आरूण मोकाशे ,  साहय्यक पोलिस निरिक्षक जगदीश राऊत, सुधीर मोटे, महामार्ग पोलिस केंद्राचे प्रभारी आधिकारी हणुमंत कवले , वैदयकिय आधिकारी डॉ. राहुल जानराव,   यांच्या मार्गदर्शनाखाली  कर्मचारी यानी  कडेकोट बंदोबस्त ठेवले आहे.

Labels:

चोरीस गेलेले दागिने मुळ मालकास परत

 


उस्मानाबाद : दिनांक 17.04.2019 रोजी दुपारी 16.00 वा. सु. भानसगाव, ता. उस्मानाबाद येथील सखुबाई तावाप्पा क्षीरसागर रा. भानसगाव ता. जि. उस्मानाबाद यांच्या उघड्या घरातील झुबे, फुले, साखळी असे 12 ग्रॅम सोन्याचे दागीने चोरीस गेल्यावरुन उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. येथे गु.र.क्र. 123 / 2019 दाखल होता. तपासादरम्यान पोलीसांनी आरोपींना लागलीच अटक करुन नमूद दागिने जप्त करुन न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले होते. ते दागिने मा. न्यायालयाच्या आदेशाने काल 27 जानेवारी रोजी पोलीस निरिक्षक- श्री दत्तात्रय सुरवसे यांच्या हस्ते सखुबाई क्षिरसागर यांना परत देण्यात आले. दागिने परत मिळाल्याबद्दल सखुबाई यांनी पोलीसांचे आभार व्यक्त केले.

Labels:

काटी येथे तीन ठिकाणी धाडसी चोरी,लाखोंचा ऐवज लंपास


काटी : उमाजी गायकवाड

तुळजापूर तालुक्यातील काटी येथे मंगळवार दि. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख, माजी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सतिश देशमुख व सुरेश गुंड यांच्या घरावर पहाटे एक ते दोनच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडला.या घटनेत सोने, मोबाईल व रोख रकमेसह 2 लाख 93 हजार रुपयेचा मुद्देमाल  शस्त्रधारी चोरट्यांनी लंपास केला. हि घटना घडत असताना तिघाचौघानी पाहिली परंतु चोरटे हत्यारासह असल्याने कोणाचेही पुढे जाण्याचे धाडस झाले नाही. आठवडाभरातील दुसऱ्या घटनेमुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

            याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मंगळवारी मध्यरात्री एकच्या सुमारास सुरेश तुकाराम गुंड यांच्या घराचा दरवाजा कटावणीच्या सहाय्याने उघडून एक एलईडी टिव्ही लंपास केली. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख यांच्या घराकडे वळवला. आई-वडिलांचे मासिक असल्यामुळे बारामती, कोपरगाव आदी ठिकाणांहून पाहूणे आले होते. एकाच हॉल मध्ये जवळपास 15 जण झोपले असताना घराच्या पाठीमागून घरात प्रवेश करुन पाहुण्यांचे पंधरा हजार असलेले पाकेट,अर्धा तोळे सोने,व तीन अंड्राईड मोबाईल लंपास केले. त्यानंतर जिल्हा परिषद प्रशालेच्या समोरील सतिश देशमुख यांच्या घरावरील जिन्यातून घरात प्रवेश करुन सतिश देशमुख यांच्या आईंच्या तोंड रुमालाने आवळून त्यांच्या हातातील पाच तोळ्याच्या सोन्याच्या पाटल्या,अडीच तोळ्याच्या बांगड्या व अर्धा तोळ्याचे गळ्यातील मणी असा ऐवज लंपास केला. रात्री झालेल्या चोरीच्या घटनेत घरातील लोकांचे उशाजवळील मोबाईल लंपास केले तरी एकालाही जाग न आल्याने चोरट्यांनी गुंगीचे औषध मारले असेल का? अशा नानाविध चर्चा ग्रामस्थांमधून सुरू होत्या. या घटनेची माहिती मिळताच तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे यांनी पोलिस पथकातील आपल्या सहकाऱ्यासह प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली.त्यानंतर तात्काळ श्वान पथक व फिंगरप्रिंट पथकातील तज्ञांना पाचारण करण्यात आले होते. यावेळी काटी पोलीस ठाण्यात नागरिकांनी गर्दी करुन गावातील हातभट्टी, मटका, जुगार, आदी अवैद्य धंदे बंद करण्याची मागणी केली. यावेळी सपोनि काळे यांनी गावातील अवैध धंदे बंद करण्याचे आश्वासन दिले.

        आठवडाभरापूर्वी 19 जानेवारी रोजी येथील अभिषेक अनिल शिंदे यांच्या घरातून चार तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास केले होते.त्याअगोदर मोबाईल दुकान व देशी दारूचे दुकान फोडून दारु व मोबाईल लंपास केले होते. त्याचा तपास अद्याप न लागतो तोच हि चोरीची दुसरी घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरीच्या छोट्या मोठ्या घटना नेहमीच घडत आहेत. चोरीच्या वाढत्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असून पोलिसांनी चोऱ्या रोखण्यासाठी गस्त वाढवावी आणि उपाय योजना राबवाव्यात अशी मागणी होत आहे.

         सतिश देशमुख, विक्रमसिंह देशमुख व सुरेश गुंड यांच्या फिर्यादीवरून तामलवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध भादवि 457,380 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि दत्तात्रय काळे करीत आहेत.

Labels:

तीस हजार भाविकांना दर्शन देण्याचा विश्वस्तांचा निर्णय

 


तुळजापूर : सतीश महामुनी

तुळजाभवानी देवीच्या भाविकांना दर्शन देण्याची मर्यादा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी 12 हजार वरून ३०  हजारापर्यंत वाढवली आहे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे

तुळजाभवानी मंदिर संस्थान चे अध्यक्ष डॉक्टर कौस्तुभ दिवेगावकर यांची विश्वस्त व आमदार राणाजगजितसिंह पाटील व तुळजापूरच्या नगराध्यक्ष सचिन रोजकरी यांनी भेट घेऊन भाविकांची संख्या वाढविण्यासाठी चर्चा केली यापूर्वीदेखील ही मागणी करण्यात आली होती वेगवेगळ्या संघटनांनी ही मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे यापुर्वी केलेली आहे त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी 12 हजार  संख्येवरून ३०  हजार भाविकांना दर्शन देण्याचा निर्णय घेतला आहे

सशुल्क दर्शन ३०० रुपये आकारण्यात येत आहे त्यामध्ये बदल करून २०० रुपये करण्याचा निर्णय झाला आहे ही संख्या ५०० भाविकांनी वाढवण्यात आली आहे त्यामुळे २५०० भाविकांना दोनशे रुपये प्रमाणे दर्शन दिले जाईल,  देवीचे कुळधर्म कुलाचार अभिषेक गोंधळ सारखे विधी सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी सकारात्मकता दाखवली आहेत मात्र सुरू करण्यात आल्याची घोषणा केलेली नाही विश्वस्त तहसीलदार सौदागर तांदळे जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे, अभियंता भोसले, अभियंता प्रवीण अमृतराव यांच्यासह इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Labels:

नळदुर्ग शहर पत्रकार संघाच्या वार्षिक दिनदर्शिकेचे प्रकाशन

     


              

नळदुर्ग : विलास येडगे

सालाबादाप्रमाणे याहीवर्षी नळदुर्ग शहर पत्रकार संघाने वार्षिक दिनदर्शिका २०२१ ही काढली आहे. या दिनदर्शिकेचे दि.२६ जानेवारी रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत नळदुर्ग (मैलारपुर) येथील श्री खंडोबा मंदिरात झाले. 

या कार्यक्रमास नगरसेवक शाहाबाज काझी,बसवराज धरणे, नितीन कासार, महालिंग स्वामी,विनायक अहंकारी, शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण, माजी नगरसेवक सुधीर हजारी,सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव,मारुती खारवे, प्रा. डॉ. सुभाष राठोड, बंडप्पा कसेकर, रघुनाथ नागणे, खंडोबा देवस्थान ट्रस्टचे अरुण मोकाशे, पत्रकार शिवाजी नाईक, आदीजन उपस्थित होते. 

प्रारंभी पत्रकार व सर्व मान्यवरांचा खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीने फेटा बांधुन सत्कार करण्यात आला. यानंतर नळदुर्ग शहर पत्रकार संघाच्या वार्षिक दिनदर्शिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी सर्व मान्यवरांचा शहर पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. 

यावेळी बोलताना शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण यांनी म्हटले की,नळदुर्ग शहर पत्रकार संघाचा सलग १७ वर्षे वार्षिक दिनदर्शिका काढण्याचा उपक्रम स्तुत्य व समाजपयोगी आहे. ही दिनदर्शिका आपल्या परिसरातील सर्व धर्मियांचे सण, उत्सव, जयंत्या, उर्स या दिनदर्शिकेत आहे त्यामुळे ही दिनदर्शिकासर्वानाच हवीशी वाटते त्यामुळे या दिनदर्शिकेची सर्वजण आतुरतेने वाट पाहतात. नळदुर्ग शहरातील पत्रकारांचे शहर विकासात मोठे योगदान आहे त्याचबरोबर सामाजिक कार्यातही पत्रकारांचा मोठा सहभाग आहे.असेही कमलाकर चव्हाण यांनी म्हटले आहे. 

यावेळी नगरसेवक शाहबाज काझी, विनायक अहंकारी यांनीही शहर पत्रकार संघाच्या कार्याचा गौरव करून पत्रकार संघाच्या दिनदर्शिका काढण्याच्या उपक्रमाचे कौतुक केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे,सचिव गुरुनाथ कबाडे, पत्रकार विलास येडगे, तानाजी जाधव, उत्तम बनजगोळे, लतीफ शेख, प्रा. डॉ. दीपक जगदाळे यांनी परीश्रम घेतले.

Labels:

नळदुर्ग येथे शिवसेनेच्यावतीने रक्तदान शिबिर संपन्न

 


नळदुर्ग : 

हिंदुह्दय सम्राट  शिवसेनाप्रमुख  बाळासाहेब ठाकरे यांच्या  ९५ व्या जयंती निमित्त नळ्दुर्ग शहर शिवसेनेच्यावतीने वतिने दि.  २५ जानेवारी रोजी  रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबीरात एकुण 57 दात्यानी  रक्तदान केले.

 प्रांरभी शिबिरचे उदघाटन नळ्दुर्ग पोलीस ठाण्याचे  साहय्यक पोलिस निरीक्षक  जगदीश राऊत , अशोक जगदाळे, शिवसेनेचे कमलाकर चव्हाण , नगरसेवक  नितिन कासार   आदी उपस्थित होते.

 कार्यक्रम यशस्वी करणासाठी तालुकाप्रमुख सरदारसिंह ठाकुर,शहरप्रमुख संतोष पुदाले, शाम कनकधर ,सोमनाथ म्हेत्रे,  नेताजी महाबोले ,बंडु कसेकर ,सुनिल गव्हाणे, भिमा कोळी, ओंकार कलशेट्टी, चंदु सगरे आदीनी परिश्रम घेतले.

Labels:

चिवरी येथील महालक्ष्मी करिअर अकॅडमी मोफत प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

   

         

 चिवरी : राजगुरू साखरे

तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथिल महालक्ष्मी करिअर अकॅडमी मोफत प्रशिक्षण केंद्रामध्ये संस्थापक अध्यक्ष माजी सैनिक विठ्ठल होगाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुलांनी प्रमुख पाहुण्यांना सैनिक पोलिस दलातील दिली जाणारी प्रशिक्षणाचे प्रात्यक्षिक करून दाखवले.

 या कार्यक्रमावेळी सरपंच अशोक घोडके, उपसरपंच बालाजी पाटील, मोतीराम चिमणे, सचिन बिराजदार, भारतीय सैन्य दल आपले कर्तव्य बजावत असणारे अंकुश कोरे, अंगणवाडी सेविका अनिता बिराजदार, उषाबाई नगदे, शिंदे, मेंढापुरे, सामाजिक कार्यकर्ते राजीव कचवाई, तलाठी डी एन गायकवाड, अरूण कोरे, धनराज मिटकरी, प्रभाकर हिमगिरे, आशा कार्यकर्त्या, राजश्री कांबळे,अर्चना राजमाने, आदीसह पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Labels:

बोरेगाव येथील श्री मल्लिकार्जुन प्रशालेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

 


 हन्नुर : नागराज गाढवे

अक्कलकोट तालुक्यातील बोरेगाव येथील श्री बृहन्मठ होटगी संस्था संचलित श्री मल्लिकार्जुन प्रशालेत ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक रेवणसिद्ध रोडगीकर हे होते. यावेळी सरपंच उमाकांत गाढवे  यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

याप्रसंगी रोडगीकर आणि सरपंच उमाकांत गाडवे यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांच्या कार्याची माहिती दिली प्रशालेत विविध स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले .यावेळी शालेय मुलांनी चित्तथरारक कसरती करून उपस्थितांची मने जिंकली .कार्यक्रमास ग्रामसेवक नागनाथ सोरेगाव लक्ष्मण शिवशेट्टी  श्रीशैल स्वामी शिवानंद औरसंगे अमोल जडगे अक्षय माने श्रीशैल कस्तुरे बंटी शिवशेट्टी राहुल उस्तूरगे दिलीप बनजगोळे यांच्यासह सर्व शिक्षक व गावातील प्रमुख नागरिक  उपस्थित होते. सुत्रसंचलन प्रकाश गुरव    यानी केले तर आभार मुख्याध्यापक रेवणासिद्ध रोडागीकर यांनी   मानले.

Labels:

काटी येथील कवि संमेलन उत्साहात संपन्न

 


काटी : उमाजी गायकवाड

 तुळजापूर तालुक्यातील काटी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त येथील निसर्ग काव्य मंच समुहाच्या वतीने उपक्रमशील शिक्षक तथा कवि, लेखक पंकज (कासार) काटकर यांच्या संकल्पनेतून आमची माती आमची माणसं हे कवि संमेलन येथील मुख्य बाजार चौकात बुधवार दि.27 रोजी सायंकाळी कवि, साहित्यिक,यांच्यासह विविध मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले. 

     या संमेलनाचे उदघाटन सरपंच आदेश कोळी, उपसरपंच सुजित हंगरगेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव ढगे, मकरंद देशमुख,जितेंद्र गुंड, पोलीस अभिजित गाटे, पत्रकार उमाजी गायकवाड,कवियित्री आशाबी शेख,जयश्री घोडके,सादिक शेख,अहमद पठाण,करीम बेग, सुनिल परिट आदी मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीमती भाग्यश्रीताई खुटाळे (कासार) फलटण यांच्याहस्ते करण्यात आले. तर संमेलनाध्यक्षा म्हणून मराठी साहित्य मंडळ बोरोवली विभाग मुंबईच्या श्रीमती विनिताताई कदम या होत्या. 


यावेळी आयोजक पंकज (कासार) काटकर यांनी आपल्या प्रास्ताविकातून निसर्ग काव्य मंच व पाहुण्यांचा परिचय करून दिला. याप्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणात श्रीमती विनिताताई कदम यांनी शेतकऱ्यावरील माझा शेतकरी राजा हि वास्तव मांडणारी कवितेचे सादरीकरण करून आपल्या मनोगतात निसर्ग काव्यमंचचे सर्व सदस्य व आयोजक पंकज (कासार) काटकर यांनी ग्रामीण भागात कविसाठी सलग दुसऱ्या वर्षी भरविण्यात आलेल्या कविसंमेलनामुळे नवोदित कविसाठी अविस्मरणीय मेजवानी असल्याचे मत व्यक्त करुन नवोदित कविनी भरपूर वाचन करावे व आपल्या कवितेतून वास्तवाचे दर्शन व भान ठेवून रचनात्मक मांडणी करून सादरीकरण करण्याचे आवाहन केले.


 तसेच कवि हा जगताचा धनी असल्याचे आवर्जून उल्लेख करीत त्यांच्या लेखनीचे महत्त्व व त्यांचा संघर्ष व त्यातून निर्माण साहित्य याविषयी सविस्तर माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच ग्रामीण भागातील कविंना पंकज (कासार) काटकर यांनी एकत्र बांधून त्यांच्या विचारांना प्रकट करण्यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल आयोजन समितीचे आभार व्यक्त केले. व काव्याचा हा जागर असाच तेवत ठेवून कवितेच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन करण्याचे आवाहन केले. 

     या कवि संमेलनात मुंबई, सोलापूर,बार्शी,फलटण, उस्मानाबाद,माढा आदी ठिकाणाहून एकूण 50 कवींनी सहभाग घेतला. यामध्ये कवि बालाजी पालमपल्ले, पोलीस अभिजित गाटे, युवराज जगताप, नितीन पाटील,आशाबी शेख, जयश्री घोडके,सादिक शेख,  बापू काळे, सुरज अंगुले, काटीतील फक्त दुसरीपर्यंत शिक्षण झालेला नवोदित कवि समीर कुरेशी, अजित थोरात, सागर गरड, युसूफ सय्यद, दत्ता आनंदगावकर, शेखर ठोंबरे, माधव धेंडे, फुलचंद नागटिळक, संतोष चव्हाण, सुशांत क्षिरसागर, वडरे सर, रविराज राठोड, प्रकाश हिरेमठ, गणेश लोंढे, शिवाजी गाडेकर,बालकवी क्षिरसागर‌ सावंतवाडी आदी मान्यवर कविंनी देशभक्ती,प्रेम, शेतकरी व्यथा,गरिबी,आई-बाप, बेटी बचाव, निसर्ग, मृत्यू,जगणं अशा विविध विषयांवरील कविता वाचन तर काही कवींनी गायनातून सादरीकरण करून उपस्थितांना अंतर्मुख केले.

तर सर्व कविंना रसिकांनी भरभरून दाद दिली.या कवि संमेलनात दुसरी पर्यंत शिक्षण झालेला नवोदित कवि समीर कुरेशी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील माझा राजा असा होता, त्यांच्या छायेत प्रत्येक समाज होता!मसुदीला जागा नाही ऐकताच स्वत:च्या महेल शेजारी मशीद बांधली, मनी कधी भेदभाव नव्हता!! हि कविता सादर करून रसिकांची वाहवा मिळवली तर पोलीस अभिजित गाटे यांनी पोरी जरा जपून वाग...पोरी तु माझी लेक, मी तुझा बाप हाय, पोरी जरा जपून वाग...व युवराज जगताप यांनी नशा नाद खुळा हे अभंग गावून प्रेक्षकांना खिळवून ठेवले.

       यावेळी आयोजन समितीच्या वतीने कवि पंकज (कासार)काटकर यांनी हे संमेलन यापुढे प्रत्येक वर्षी अखंडपणे चालू ठेवणार असल्याचा निश्चय यावेळी व्यक्त केला. या कवि संमेलनाचे सुत्रसंचलन सहशिक्षक पंकज काटकर तर आभार अनिल हंगरकर यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंकज काटकर, अनिल हंगरकर, दयानंद जवळगावकर, बापू काळे, हर्शवर्धन माळी, सोमनाथ जामगावकर, पंकज भापकर आदींनी परिश्रम घेतले.

Labels:

Wednesday, 27 January 2021

प्रजासत्ताक दिनानिमित्त माजी सैनिक श्रीकांत गाटे यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भेट

 


काटी : उमाजी गायकवाड 

तुळजापूर  तालुक्यातील काटी येथील ग्रामपंचायत कार्यालय व विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी, मराठा समाज सेवा  मंडळ  सोलापूर,  संचलित  येडेश्वरी कन्या प्रशाला व जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक प्रशालेत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहणापुर्वी संविधानाचे प्रशालेतील सर्व विद्यार्थी, विद्यार्थीनी,उपस्थित ग्रामस्थ यांचेकडून सामुहिक वाचन करण्यात आले. 

     सालाबादप्रमाणे सलग तिसऱ्या वर्षी सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून येथील माजी सैनिक तथा सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत सौदागर गाटे यांच्या वतीने येडेश्वरी कन्या प्रशाला व जिल्हा परिषद प्रशालेतील विद्यार्थी,विद्यार्थींना खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच येथील ग्रामपंचायत कार्यालय व विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीस छत्रपती शिवाजी महाराज यांचा छोटा पुर्णाकृती पुतळा सरपंच आदेश कोळी व चेअरमन विक्रमसिंह देशमुख यांचेकडे सुपुर्द करण्यात आला. 


  माजी सैनिक श्रीकांत गाटे यांच्या या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांमधून कौतुक केले जात आहे.

        यावेळी माजी सैनिक कल्याणकारी संस्थेचे माजी सैनिक श्रीकांत गाटे,माजी सैनिक जग्गनाथ खपाले, इजदानी बेग, विलास गाटे,सोसायटीचे चेअरमन तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख, सरपंच आदेश कोळी, व्हाईस चेअरमन भागवत गुंड, सेक्रेटरी संजय साळुंके,माजी चेअरमन सयाजीराव देशमुख,तन्वीर काझी, पत्रकार उमाजी गायकवाड,मकरंद देशमुख, सुजित हंगरगेकर,अतुल सराफ, जितेंद्र गुंड,सुहास साळुंके, बाळासाहेब भाले,दादा बेग, प्रा.भारत गुरव, प्रविण गाटे, वैभव गुंड, विकास खरात, दिनेश सुतार, समर्थ रोडे, सुरज गाटे, सोपान गाटे, तुकाराम गाटे, ज्ञानेश्वर गुरव, रावसाहेब गुंड, काका रोडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Labels:

मधुशाली महाविद्यालयात उत्साहात प्रजासत्ताक दिन उत्साहात

तुळजापूर ,दि.२७ :  तालुक्यातील सलगरा(दि) येथील मधूशाली महाविद्यालयात दि.२६ जानेवारी रोजी सकाळी ७:३५ वाजता महाविद्यालयाचे  प्राचार्य स्वामी आणि सलगरा गावचे माजी सरपंच. संतोष मुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 

यावेळी महाविद्यालयाचे   प्राध्यापक  संतोष केसकर, सचिन गिरी , मुबिन पटेल ,खंडेराव सुरवसे ,स्वप्निल भरगंडे , श्रद्धा पारवे , शैला भोसले ,लक्ष्मी मेंशेट्टी व कर्मचारी मेहबूब पठाण हे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन  महाविद्यालयाचे प्राध्यापक सचिन गिरी  यांनी तर आभार मुबीन पटेल  यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Labels:

रिपाइंच्यावतीने उस्मानाबाद येथे १०१ कार्यकर्त्यांचा सन्मान पुरस्कार वितरण सोहळा संपन्न


 
वागदरी, दि. २७ , एस.के.गायकवाड

 प्रजासत्ताक दिनाचे  औचित्य साधून शासकीय विश्रामगृह उस्मानाबाद येथे रिपाइं ( आठवले ) च्यावतीने ज्यानी आपले संपूर्ण जीवन पक्षाच्या माध्यमातून समाजाच्या हितासाठी घालवले व आज देखील काम करत आहेत ,अशा कार्यकत्यांचा सन्मान व्हावा या उद्देशाने कार्यकर्ता सन्मान पुरस्कार सोहळ्याचे आयोजन  करण्यात आला होते.

    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपाइंचे जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ ओहाळ हे होते, तर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे,  रासपा जिल्हाध्यक्ष आश्रुबा कोळेकर, रिपाइंचे प्रदेश सचिव संजय बनसोडे ,आदी मान्यवर उपस्थितीत होते. 

यावेळी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्हयातील १०१ कार्यकर्त्यांचा ट्रॉफी व सम्मानपत्र देवून गौरव करण्यात आला . 

  यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओहाळ यांनी पँथरच्या चळवळीमध्ये अनेक संकटाचा सामना करुन अन्याय , अत्याचाराच्या विरोधात संघर्ष उभा करून जिल्ह्यामध्ये पँथरच्या गाव तेथे शाखा स्थापन केल्या.  संघटना बांधणी केली .अनेक दलितावरील अन्याय , अत्याचाराला वाचा फोडली , त्यामध्ये नामांतर लढा , रिडल्स इन इंदूझम , इंदू मिल अशा अनेक प्रश्नांवरती व जिल्हयातील गायरान जमीन , शिष्यवृत्ती योजना, यावरती त्यांनी मार्गदर्शन करुन  युवकांना पक्ष बांधणीसाठी आव्हान केले.

 प्रदेश सचिव संजय बनसोडे यांनी आपल्या मनोगतात बोलताना म्हणाले को , तरूणपणी पँथरच्या चळवळी मध्ये जेल मध्ये गेलो. तरी पँथरची चळवळ सोडली नाही, यामुळे आज माझा गौरव होत आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे . कार्यक्रमाचे सुत्रसंचलन तालुकाध्यक्ष- भालचंद्र कठारे यांनी केले.खास बाब म्हणून दि .२२ व २३ फेब्रुवारी १ ९ ४१ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर हे कसबे तडवळा येथे येऊन महार - मांग वतनदार परिषद घेतली याची आठवण करून देत असताना ज्या शाळेत बाबासाहेब मुक्कामी होते. त्या शाळेला महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय स्मारक घोषित करुन देखील स्मारकाचे काम चालू झालेले नाही.

 नामांतर लढ्यात जे शहीद झाले त्यांच्या आठवणी ताज्या करुन त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास आनंद पंडगाळे , रविराज पाटील , भागवत शिंदे , बंडू बनसोडे , तानाजी कदम , अमोल शिंदे , विद्यानंद बनसोडे , तानाजी गंगावणे , सचिन शिंगाडे , संपत जानराव , उदयराज बनसोडे , स्वरान जानराव , मुकेश मोटे , फकीरा सुरवसे , बाबासाहेब मस्के , मुन्ना ओहाळ , बाबासाहेब बनसोडे , एस.के. गायकवाड  , रवि कांबळे , बालाजी माळाळे , गौतम कांबळे , महेंद्र जेटीथोर , तुकाराम वाघमारे , दिलीप गायकवाड , जयसिंग भालेराव , वंदू भालेराव , आकाश इंगळे , राजेंद्र शिंदे,तसेच यावेळी मध्यवर्ती शिवजयंती उत्सव समिती २०२१ चे अध्यक्ष अशिष मोदाणी , सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे , संग्राम बनसोडे , भिमशक्ती संघटनेचे मेसा जानराव यांच्यासह अनेक जिल्ह्यातील रिपांईचे पदाधिकारी व कार्यकर्ते आवर्जुन उपस्थित होते.
    शेवटी सर्वाचे आभार  जिल्हा संघटक  सोमनाथ गायकवाड  यांनी मानले.

Labels:

नळदुर्ग : वागदरी येथे प्रजासत्ताक दिन उत्सहात


वागदरी, दि.२७ ,एस.के.गायकवाड:

तुळजापूर तालुक्यातील वागदरी येथे विविध ठिकाणी प्रजासत्ताक दीन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

   येथील जि.प.प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचेआयोजन करण्यात आले होते .प्ररंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांच्या प्रतिमांचे पुजन करून संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुदायिकरित्या वाचन करून मुख्याध्यापिका महादेवी जत्ते यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजारोहण करण्यात आले.   
    
    येथील ग्रा.प. कार्यालयाच्या प्रागंणात प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने  ध्वजारोहणाच्या  करण्यात आले . प्रारंभी विद्यमान सरपंच ज्ञानेश्वर बिराजदार, उपसरपंच दत्ता सुरवसे, सर्व ग्रा.प..सदस्य, जेष्ठ कार्यकर्ते किसन पाटील, शिवाजी मिटकर , राजकुमार पवार ,सुरेशसिंग परिहार, तंटामुक्त अध्यक्ष राजेंद्र पाटील, उपाध्यक्ष फतेसिंग ठाकूर ,आदी मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, व ध्वज स्तंभाचे पुजन करुन संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून सरपंच ज्ञानेश्वर बिराजदार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .

     भिमनगर वागदरी येथील पंचशील बुध्द विहार येथे  सरपंच ज्ञानेश्वर बिराजदार, माजी सरपंच नागनाथ बनसोडे, ग्रामसेवक जी.आर.जमादार, मुख्याध्यापिका महादेवी जत्ते, ग्रा.सदस्या मुक्ताबाई वाघमारे आदींच्या हस्ते संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून व संविधानाचे वाचन करण्यात  आले.
  यावेळी रिपाइंचे जिल्हा सचिव एस.के.गायकवाड, ग्रा.प.सदस्य महादेव बिराजदार, बकुलाबाई भोसले, कमलबाई धुमाळ, विद्या बिराजदार, सहशिक्षक किसन जावळे, तानाजी लोहार, सहशिक्षीका आरती साखरेच,एस.एस.सागळे,एम.आर.घडके साखरे पंचशील बुद्ध विहार कमिटीचे महादेव वाघमारे, सुर्यकांत वाघमारे, भारत वाघमारे, सहदेव वाघमारे,  यासह महिला, पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Labels:

उस्मानाबाद : वाघोली येथे प्रिमिअर लीगचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन


उस्मानाबाद, दि.२७:  
तालुक्यातील वाघोली येथे वाघोली प्रिमिअर लीगचे प्रजासत्ताक दिनी मान्यवरांच्या हस्ते उद्घाटनाने शुभारंभ करण्यात आला. 

या स्पर्धेत सहा संघांनी सहभाग नोंदविला आहे. वाघोली येथील अनंत महाराज मठाजवळील मैदानात ही स्पर्धा होत आहे. सामने अत्यंत चुरशीचे होत असून खेळाडुंमध्ये मोठा उत्साह दिसून आला. 

स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी पोलीस निरीक्षक बालाजी मगर, संजय खडके, हरिभाऊ मगर, मुकुंद पाटील, विनोद बाकले, सुधीर मगर, रामेश्वर मगर, राहुल कापसे, प्रसाद चाबुकस्वार, अमर खडके, नाना पाटील, राहुल खडके, राहुल सुलाखे, रफीक शेख, असिफ सय्यद, सुनिल मगर, स्वप्निल मते, दिपक शेळके, बुबा मगर, प्रविण घुटे, सौरभ गुरव, विशाल बाकले, गणेश रणदिवे, साजिद शेख, महेश मगर, दत्ता मगर, मनोज मते, राम मगर, उत्रेश्वर इंगळे, उमेश इंगळे, काका माने, किरण ढोराळकर, सुरज सुलाखे, विनायक खडके, समीर तांबोळी, गुरू जाधव, यश कांबळे, कुंडलीक भक्ते, अनिल उंबरे, गणेश हुकीरे, अभिजित कुंभार, प्रशांत दणके, नरेंद्र मंडीवाळ, दर्शन नेवाळे, मनोज काकडे, रमेश मगर, समाधान डक आदींसह खेळाडू उपस्थित होते. 

Labels:

उस्मानाबाद : हजरत खाँजा शमशोद्दीन (रहे) गाजी पार्कचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हास्ते संपन्न

उस्मानाबाद,दि.२७ : 
येथिल  हजरत  खाँजा शमशोद्दीन (रहे) गाजी पार्कचे खासदार ओमराजे निंबाळकर  आणि नगराध्यक्ष मकरंद राजेंनिंबाळकर यांच्या हस्ते  उद्घाटन  करण्यात आले.

बाबा मुजावर यांनी आपल्या या भागात  स्वतः व त्यांच्या सहकाऱ्यांच्या अतिशय उत्कृष्ट  रितीने गाजी पार्क उभा केले. व कोरोना काळात मोहला क्लीनिकच्या माध्यमातुन डॉ.शकील खान, डॉ.मिनाहज शेख, डॉ.सय्यद रजवी यांनी उत्कृष्ठ काम केले. त्याबद्दल त्यांचे सत्कार करण्यात आले.  

 यावेळी बाग बगीचाची दुरुस्ती करावी व वृक्षा रोपण करावे व हिरवळ वाढवावी.  असे आवाहन करण्यात आले. या कामाचा सर्व क्षेत्रातुन  बाबा मुजावर यांचा कौतुक आणि अभिनंदन होत आहे. या कामासाठी जे परिश्रम आणि जिद चिकाटी बाबा मुजावर यांनी दाखवली. 

याबाबत सुद्धा त्याचा कौतुक होत आहे. या पार्कच्या शुभारंभ नंतर संगीत रजनी हा कार्यक्रम घेण्यात आला. उसमानाबाद मध्ये राहणारे जे लोक गायन क्षेत्रात आहेत, त्याना प्रोत्साहन देण्यासाठी हा कार्यक्रम फार उपयुक्त  ठरला. या कार्यक्रमाचा लोकांनी मनसोक्त आनंद घेतला.या सांगित रजनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालन  शागीरद  यांनी केले.  कार्यक्रमाची सुरवात अल्ल्हा ईश्वर यांच्या नामस्मरणाने करण्यात आले. संगीत रजनी कार्यक्रम तौफिक शेख यांच्या सहकार्याने  केले.

याप्रसंगी नगराध्यक्ष  राजेनिंबाळकर, नादेर उल्ला हुसेनी, खलील खादर खान बबलू भाई शहर अध्यक्ष राष्ट्रवादी , मैनुदिन पठाण, मसूद शेख,  इस्माईल शेख उद्योजक, मुस्तफा खान  प्रभारी जिल्हाधक्ष एम. आय. एम,प्रशांत पाटील, गणेश माळी, उपविभागीय पोलीस अधिकारी  मोतीचंद राठोड, नायब तहसीलदार खोंदे , आशिष मोदानी, नगसेवक तथा गटनेते गणेश खोचरे  ,नगसेवक अक्षय ढोबळे, खलिफा खुरेशी पिंटू घोणे , राहुल बागल, गफार काझी,  ग्राम पंचायत सदस्य  सिध्दिक भाई  आणि सदाम मुजावर तोफीक मुजावर, शहबाज मुजावर ,साहिल मुजावर  अशफाक मुजावर ,अरफात  मुजावर,आदी मान्यवर   उपस्थित होते.

Labels:

आष्टा (कासार) येथील सेवानिवृत्त सैनिक रामचंद्र गायकवाड यांचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान

 


 अचलेर : जय गायकवाड

लोहारा तालुक्यातील मौजे आष्टा (कासार)येथील रामचंद्र साधू गायकवाड हे भारतीय सैन्यातून ३१ डिसेंबर २०२० रोजी सेवानिवृत्त झाले.त्यांनी केलेल्या देशसेवेचा गौरव म्हणून आपल्या गावातील लाडक्या सुपुत्राचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती भीमनगर आष्टा (कासार) यांच्या वतीने दिनांक २६-१-२०२१ रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून भव्य मिरवणूक काढून सत्कार करण्यात आला.

रामचंद्र गायकवाड हे भारतीय सैन्यातील महार रेजिमेंट मध्ये हवालदार पदावरून निवृत्त झाले.तब्बल २६ वर्षे देशसेवा करून त्यांची सेवानिवृत्ती झाल्याने या लाडक्या सुपुत्राची मिरवणूक काढून आनंद साजरा केला.

देशसेवा करून आलेल्या आपल्या या जवानाचे गावकऱ्यांनी ठिकठिकाणी हार,तुरे,शाल,श्रीफळ देऊन स्वागत केल्याने गावात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण तसेच जल्लोष पहावयास मिळाला.

लुंबिनी बुद्धविहार आष्टा (कासार) येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी "वीर जवान तुझे सलाम"हा नारा निनादला.

या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते..

Labels:

Tuesday, 26 January 2021

नळदुर्ग : भुईकोट किल्ल्यात प्रजासत्ताक दिनाचा मुख्य समांरभ संपन्न

 


नळदुर्ग , दि. 26 : मंगळवार दि. 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्ता नळदुर्ग येथिल ऐतिहासिक किल्ल्यात व शहरातील  शाळा, महाविदयालय , नगरपरिषद कार्यालय, महावितरण कार्यालय , पोलिस ठाणे,  चावडी चौकसह विविधे ठिकठिकाणी मान्यवराच्या हस्ते  ध्वजारोहण करण्यात  आले.
भुईकोट किल्ल्यावर ध्वजारोहणाचा मुख्य समारंभ तुळजापूर तहसिलचे नायब तहसिलदार चंद्रकांत शिंदे, यांच्या हास्ते संपन्न झाला. यावेळी पत्रकार विलास येडगे , शिवाजी नाईक ,दादासाहेब बनसोडे, तलाठी टि.डी कदम , अशोक जगदाळे , नगरसेवक विनायक अहंकारी ,बसवराज धरणे,  नितीन कासार , निरंजन राठोड ,माजी नगरसेवक किशोर नळदुर्गकर, नवल जाधव ,भाजपाचे शहराध्यक्ष पद्माकर घोडके, शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख कमलाकर चव्हाण,  उपतालुका प्रमुख सरदारसिंग ठाकुर ,बंडु कसेकर ,गणेश मोरडे , सामाजिक कार्यकर्ते  संजय जाधव, खय्युम कुरेशी , नागनाथ गवळी , किल्ला  संगोपनार्थ घेतलेल्या युनिटी कंपनीचे व्यवस्थापक  जुबेर काझी याच्यासह प्रतिष्ठित नागरिक , पर्यंटक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रांरभी संविधान वाचन जयभिम वाघमारे यांनी केले.

Labels:

महावितरण विरोधात गुन्हा दाखल करण्याची मनसेची मागणी

नळदुर्ग , दि.२६ : 

राज्याचे  उर्जामंञी व महावितरणच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मनसेने निवेदनाव्दारे  नळदुर्ग पोलिस ठाण्याचे  साहय्यक पोलिस निरीक्षक 
यांच्याकडे केली आहे.

निवेदना पुढे नमुद करण्यात आले आहे की, कोरोनामुळे महाराष्ट्रात दि. २२ मार्च ते ८ जून २०२० दरम्यान   कडक  टाळेबंदी होती, या काळात महावितरण कडून ना वीज मीटर रिडींग साठी प्रतिनिधी आले , ना वीज देयके वितरीत करण्यात आले, घरातच बंदिस्त झालेल्या जनतेला या कालवधीतल्या वीज वापरासाठी महावितरण कंपनीकडून अचानक वापरपेक्षा तिप्पट-चौपट रक्कमेची अवाजवी व भरमसाठ वीज बिल पाठवली गेली.

 या वीज बिलाचे आकडे इतके मोठे होते की ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेसह शहरातील मध्यमवर्गीयांना ही भोवळ आली, कोरोनाच्या टाळेबंदीत व्यापार, उद्योग, बंद होऊन असंख्य लोक बेरोजगार झालेले आहेत, आणि अनेकांच्या पगारात २५ ते ५० टक्के कपात झाल्यामुळे उत्पनाचे स्रोत बंद झाले असताना विजबिलाची भरमसाठ रक्कम भरणे शक्य नाही, 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह इतरही राजकीय पक्षांनी याची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री ना.  उध्दव ठाकरे  व ऊर्जामंत्री ना  नितिन राऊत यांच्याकडे तक्रारी मांडल्या, त्यानंतर ऊर्जामंत्री यांनी वीज बिल कपात करुन देण्याचा निर्णय घेण्याचे आश्वासन दिले,परंतु वीज बिलासंदर्भात  नागरिकांना  झुलवत ठेवल्याचे आरोप मनसेने केला आहे. 

 शेवटी सर्व सामान्य नागरिकाना वीज पुरवठा खंडित करण्याच्या धमक्या देऊन  वीजबिल वसुल करीत असल्याचे नमुद करुन   ही केवळ राजकीय आश्वासनाची फसवणुक नाही,तर वीज कंपन्याशी संगनमत करून करण्यात आलेली जनतेची लूट आहे, 

यामुळे राज्यातील सर्वसामान्य जनता भयभीत झाली असून,प्रचंड मानसिक आघात व क्लेश पोहोचला आहे,याची सर्वस्वी जबाबदारी राज्याचे ऊर्जामंत्री , महावितरण कंपनीचे  आधिकारी  यांच्या विरोधात फसवणूक व मानसिक आघात पोहचविण्याचा गुन्हा दाखल करावा,अशी मागणी नळदुर्ग पोलीस ठाण्याचे साहय्यक  पोलीस निरीक्षक  यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे . 

या निवेदनावर जिल्हाध्यक्ष  प्रशांत नवगिरे ,  जिल्हा सचिव  ज्योतीबा येडगे, तालुकाध्यक्ष  मल्लिकार्जुन कुंभार,  ॲड.मतीन बाडेवाले, शहराध्यक्ष  आलिम शेख, शहर सचिव  प्रमोद कुलकर्णी, शहर उपाध्यक्ष  रमेश घोडके, मनविसे शहराध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या स्वाक्ष-या आहेत, यावेळी निखिल येडगे,आवेज इनामदार, संदीप वैद्य आदी उपस्थित होते.

Labels: