Monday, 30 September 2013

नारळ


Labels:

मुर्ख अध्‍यादेश


Labels:

गोंजारण


Labels:

ATM चा वापर


Labels:

बार्शी न.पा. सर्वसाधारण सभेत विविध विषयांना मंजूरी

बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : बार्शी नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत विविध ११ विषयांचे वाचन करण्यात आले. दोन तीन विषयांवरील वाद सोडले तर उरलेले सर्वानुमते मंजूर करण्यात आले.
    बार्शी नगरपरिषदेच्या कै. भाऊसाहेब झाडबुके स्‍मारक सभागृहात ही साधारण सभा पार पडली. यावेळी पिठासन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष कादर तांबोळी यांनी काम पाहिले. यात मुख्यत: न.पा.अध्यक्षांकरिता वाहनाची आवश्यकता असल्याने टाटा सफारी खरेदी करणे, केंद्र शासनाच्या युआयडी एसएसएमटी योजने अंतर्गत शहराकरिता भुयारी गटर बांधण्याच्या ८३७९.६० लाखांच्या कामाच्या प्राक्कलनास केंद्र शासनाच्या अनिवार्य व वैकल्पिक सुधारणासह सभागृहाची मंजूरी घेणे, सार्वजनिक संडास, मुतारी स्वच्छता व दुरुस्ती करणेकामी निविदा मागविणे, सेवानिवृत्त, स्वेच्छानिवृत्त, सेवेत मयत झालेल्या सफाई कर्मचार्‍यांच्या वारसांना कामगार पदी लाड कमिटी शिफाररसीनुसार नियुक्त्या देणे, यशोदा शिक्षण प्रसारक मंडळास न.प.ची भाडेतत्वार देण्यात आलेली जागेचे अधिमूल्य (भाडे) निश्‍चिती करुन घेणेकामी सविस्तर अहवाल करुन त्रिसदस्यीय समितीसमोर सादर करणे आदि विषयांना मंजूरी देण्यात आली.

Labels:

तन, मन व नवर्‍याच्या धनाने गौरी गणपतीचा उत्सव - सोपल

बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : सार्वजनिक गणोशोत्सव काळातील पुरुषांच्या मंडळाने सादर केलेल्या आरासाचे आपण कौतुक करतो, त्याला मोठ्या प्रमाणात प्रसिध्दीही देतो परंतु त्याच सणात गौरी लक्ष्‍मीचेही आगमन होते, गौरी लक्ष्‍मीसमोरील आरास करतांना माता भगिणी तन, मन आणि नवर्‍याच्या धनाने गौरी गणपतीचा उत्सव मोठ्या भक्तीमय वातावरणात साजरा करतात असे मत पालकङ्कंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. दिलीप सोपल यांनी व्यक्त केले.
    रविवारी सायंकाळी यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृहात पार पडलेल्या फोटोग्राफर्स असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या गौरी आरास स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारोहात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पोलिस उपनिरीक्षक सुरेखा धस, .पो.उ.नि.शोभा पडवळ, असोसिएशनचे अध्यक्ष राजेश वानखेडे, अंबादास कनकट्टी, सचिन रुद्रवार, सोमनाथ सेवकर, मनोज चिंचकर, अशोक नागरगोजे आदि उपस्थित होते.
    पुढे बोलतांना ना.सोपल म्हणाले, नवर्‍याचे धन म्हणण्यापेक्षा आता त्यावरही त्यांचाच हक्क आहे, कायद्यानेही त्यांना ५० टक्के आरक्षण व अधिकार दिले आहे. अत्यंत मनापासून गौरीसमोरील सजावट करुन इतरही स्नेही व मैत्रीणींच्या घरी जाऊन त्यांचेही कौतुक करत असलेल्यांकडे कोणी लक्ष देत नसतांना बार्शी फोटोग्राफर्स असोसिएशनने त्यांचे कौतुक करण्याचे महत्वाचे कार्य केल्याने व त्यांना न्याय दिल्याने त्यांचेही अभिनंदन केले पाहिजे.  पूर्वीच्या काळापासून बार्शी शहरातील फोटोग्राफर्सची परंपरा मोठी आहे, पूर्वी फसलकर, पराते, कांबोज, मुलगे, मनगिरे आदि ठराविकच फोटोग्राफर्स होते, त्यांच्या स्टुडिओत जाऊन फोटो काढण्याची पध्दत होती. चंद्र, जीप, कोट व टाय घालून काढलेल्या छायाचित्रांचे त्यावेळी अप्रुभ होते. पूर्वीच्या चित्रपटाचेही शुटींग बर्‍यापैकी स्टुडिओत होत, त्यानंतर जसाजास काळ बदलला नवनवे शोध लागले तसे बाग, सार्वजनिक बाग इत्यादी स्थित्यंतरे झाली आज बरीच क्रांती झाली आहे. पूर्वी टचिंग काढणे, डार्करुमही ऑपरेशन रुमसारखी होती, फोटो वाळविणे इत्यादी गोष्टी ऐकाव्या लागत पण आता मिनीटात फोटो तयार होण्याईतपत शोध लागले आहेत, चित्रपटामध्येही मराठी माणसांचा झेंडा लागला आहे, पूर्वीच्या फोटोग्राफर्सकडून गालावरची खळी घालविण्यासाठी टचिंग करण्याची पध्दती होती पण सध्या अँगल बदलून फोटो काढले तरी नकट्या माणसांचेही सरळ नाक असल्यासारखे फोटो येतात, अनेक नटनट्यांना पुढे आणण्यात फोटोग्राफर्सचा मोलाचा हिस्सा आहे, काहीजण फोटोजेनीक चेहर्‍यांचे असतात ते फोटोतच चांगले दिसतात, फोटोग्राफर्सच्या असोसिएशनने चांगला न्याय दिला आहे. सध्याची नोकरी करणारी ही ठोंब्याचा स्‍वयंपाक करुन नंतर कामावर जाते, रानात राबणारी स्त्री देखिली मोठ्या जबाबदारीने आपले संसार सांभाळते, आता हळूहळ जबाबदारी वितरीत करणे गरजेचे आहे, अमेरिकेसारख्या देशांचे अनुकरण करतांना त्यांच्या नवरा बायकोंच्या मिळून कामे करण्याच्या गुणांचेही अनुकरण होणे गरजेचे आहे, इथे सर्व कामे करतांना दिसून येत आहे, ज्या ठिकाणी सुशिक्षित असतील त्या देशाची प्रगती वेगाने झाल्याचे जगात दिसून येते.
          यावेळी गौरी गणपती आरास स्पर्धेतील विजेते विजया आप्पासाहेब इंगळे, शैलजा रेणके, सुशिला हिरेमठ, स्मिता शेळके, साधना वायकर, शिवशंकर कल्याण गौंडर, विजयश्री पाटील, सचिन गायकवाड, स्वप्नील बुरांडे, मंगल गव्हाणे यांना पारितोषिके देण्यात आली. परिक्षक म्हणून शरद काबरा, अशोक लोहार, प्रताप दराडे, अंकुश कंगले यांनी काम पाहिले. बार्शीतील फोटोग्राफीच्या क्षेत्रात चांगले काम करुन पुणे येथे स्थायिक होणार्‍या भाऊ समेळ यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्‍मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश वानखेडे यांनी तर सूत्रसंचलन आय्युब शेख व हातोडकर यांनी केले तर आभार कंगळे यांनी मानले.

Labels:

दुध उत्पादन वाढीसाठी राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाशी सामंजस्य करार : ना. चव्‍हाण

उस्‍मानाबाद -: मराठवाडा व विदर्भातील जिल्ह्यामध्ये दुध उत्पादन वाढ व दुधसंकलन व्यवस्था निर्माण करण्यात येणार असून त्यासाठी न्यु जनरेशन को-ऑपरेटीव्ह धर्तीवर प्रोड्युसर्स कंपनी स्थापन करण्यात येणार आहे. या कंपनीव्दारे दुध उत्पादन वाढ व दुध संकलनाची व्यवस्था राष्ट्रीय दुग्‍धविकास मंडळ संचलीत मदर डेअरी फ्रुट अँन्ड व्हेजीटेबल कंपनीमार्फत करण्यात येणार आहे. यासाठी राष्ट्रीय दुग्‍धविकास मंडळाशी सामंजस्य करार करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने आज सोमवार दि. 30 सप्‍टेंबर रोजी घेतला.
        त्यासाठी राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास  व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी यासाठी आग्रह धरला होता. पहिल्या टप्प्यात उस्मानाबादसह लातूर, नांदेड तसेच अमरावती, अकोला, वर्धा, बुलढाणा,यवतमाळ या जिल्ह्यातील 2 हजार गावातील 75 हजार पशुपालकांची निवड करुन दुध संकलन केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. मुंबई येथे राज्यमंत्रिमंडळाची आज बैठक झाली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
      या निर्णयानुसार नागपूर येथे असलेल्या शासकीय दुध योजनेची एकुण 27.32 एकर जमीनीपैकी दुग्धशाळेकरीता असलेली 21.86 एकर जमिनीपैकी 9.88 एकर जमीन व त्यावरील दुग्धशाळा ही राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ संचलित मदर टेअरी फ्रुट अँन्ड  व्हेजीटेबल लि. मार्फत स्थापन करण्यात येणा-या न्यु जनरेशन कंपनी करीता 30 वर्षाच्या नाममात्र भाडेकरारावर उपलब्ध करुन  देण्यात येणार  आहे.
     राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाकडून पहिल्या टप्प्यात 7 वर्षाच्या कालावधीत खालील कार्य करण्यात येईल. विदर्भ व मराठवाड्यातील 18 जिल्ह्यात कृत्रिम रेतन तसेच दुधाळ गाय व म्हैस वर्गीय पशुधनांच्या वासरांचे संगोपन करण्यास सहकार्य करणे त्यासाठी 560 फिरते कृत्रिम रेतनाची सुविधा उपलब्ध करुन देवून  दुध उत्पादन वाढविण्याचे कार्य करणार आहे. पहिल्या टप्प्यात 27 लाख कृत्रिम रेतनाचे उदिष्ट असून 11 लाख वासरे पैदाशीचे उदिष्ट निश्चित केले आहे. पहिल्या टप्यात दुध उत्पादनासाठी सक्षम असलेल्या 8 जिल्ह्यांमध्ये (अमरावती, अकोला, वर्धा, बुलढाणा, यवतमाळ, लातूर, नांदेड व उस्मानाबाद  2 हजार गावांची निवड करुन 75 हजार पशुपालकांची निवड करुन दुध संकलन केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. त्यापुढील टप्यात  दुध उत्पादनात सक्षम झालेल्या उर्वरीत जिल्ह्यात दुध संकलनाचे कार्य करण्यात येणार आहे. न्यु जनरेशन कंपनी करीता नागपूर येथील दुध प्रकल्प दुरुस्ती तसेच या कार्यक्रमासाठी रु. 50 कोटी इतका खर्च राष्ट्रीय दुग्धविकास मंडळामार्फत करण्यात येणार आहे. पहिला टप्पा संपेपर्यत प्रतिदिन 3.50 लाख लिटर्स दुध संकलनाचे उदिष्ट आहे.
      प्रक्रिया केलेले सकस, स्वच्छ दुध पॅकींगमध्ये मुंबई व त्या शेजारील महानगरांमध्ये उपलब्ध व्हावे यासाठी मुंबई व त्या शेजारील महानगरांमध्ये दुध प्रक्रिया प्रकल्प असणे आवश्यक आहे. त्यासाठी गोवे-भिवंडी, जि. ठाणे येथील शासकीय दुध योजनेची जागा राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ संचलित मदर डेअरी फ्रुट अँन्ड व्हेजिटेबल लि. या संस्थेस दुग्धविकास विभागाच्या ताब्यात असलेली 19.49 एकर जमिन 30 वर्षाच्या नाममात्र दराने  भाडे तत्वावर उपलब्ध करुन देण्यास मंजूरी देण्यात आली. याठिकाणी प्रतिदिन 5 लक्ष लि.क्षमतेची ज्याची 10 लक्ष लिटर्स प्रतिदिन क्षमता वाढविणे शक्य राहील. अशी अल्ट्रा मॉडर्न डेअरी राष्ट्रीय दुग्धविकास महामंडळामार्फत उभारण्यात येईल. याकरीता रुपये 150 कोटीची गुंतवणूक राष्ट्रीय दुग्धविकास मंडळामार्फत करण्यात येईल. यासाठी सामंजस्य करार करण्यास मंजूरी देण्यात आली आहे.

Labels:

तुळजाभवानी कारखाना दिर्घ मुदतीवर भाडेतत्‍वाने देण्‍याचा निर्णय

 नळदुर्ग -   श्री. तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखाना  हा  १८ ते २५ वर्ष दिर्घ  मुदतीवर  भाडेतत्‍वावर देवुन भाडेपोटी मिळणा-या रक्‍कमेतुन  बॅकेचे एकरक्‍कमी 19कोटी 50लाख रूपये  भरण्‍याचे प्रस्‍ताव बॅकेकडे दिले असुन शेतकरी व कामगारांच्‍या  हि‍तासाठी हा निणर्य घेतल्‍याचे श्री तुळजा भवानी साखर कारखान्याचे चेअरमन त‍थ माजी आ. नरेंद्र बोरगावकर यांनी कारखान्याची ३0 वी सर्वसाधारण सभेत बोलताना सांगितले .
   या कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्‍थानी  माजी आमदार  सि. ना.आलुरे गुरुजी,तर  कारखान्याचे व्‍हा.चेअरमन  सुनील चव्हाण, संचालक , अमर मगर, नेताजी पाटील ,महादेवप्पा आलुरे, प्रकाश चौगुले, शहबाज काजी, मुकुंद डोंगरे, गोकूळ शिंदे खंडू उंबरे, नवृत्ती माळी, लक्ष्मण वाघमारे, दिगंबर खराडे, सिद्रामप्पा मुळे, राजशेखर वडणे, राजकुमार पाटील, अशोक पाटील, बालाजी मोकाशे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सि. ना. आलुरे गुरुजी म्हणाले की, कारखाना का बंद पडला, याचा विचार न करता, यापुढे कारखाना चालविणार्‍यांना कर्मचारी व व्यवस्थापनाने सर्वतोपरी सहकार्य करावे, असे सांगितले.
कार्यकारी संचालक विकास भोसले यांनी अहवाल वाचन केले. आर्थिक अडचणीत सापडलेल्या या कारखान्याला वाचविण्यासाठी म्हणून लिक्वीडेशन मध्ये न काढता भाडेतत्वावर देण्यात आले. यापूर्वी लोकमंगल उद्योगसमूह व दृष्टी शुगर्स आणि डिस्ट्रीलरीजने मध्येच करार मोडला.

Labels:

कॉमर्स शाखा जिवनाला कलाटणी देणारी शाखा

बार्शी - कॉमर्स ही शाख  इतर शाखांप्रमाणे दर्जेदार आणि जीवनाला कलाटणी देणारी शाखा असून यामध्‍ये  मोठ्या प्रमाणात नोकरी व स्वयं-रोजगाराच्‍या  संधी उपलब्ध आहेत .ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी  मनामध्‍ये कुठल्याच प्रकारचे न्यूनगंड न बाळगत सहभागी झाल्‍यास   ते नक्कीच यशस्वी होतील ,  असा युवा संघर्ष व  कदम अॅकाऊट क्लासेस ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात तज्ञांनी मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
    यावेळी  व्यासपीठावर  कदम क्लासेस चे संस्थापक कदम  ,प्रमुख पाहुणे विनय संघवी ,पोलिस सब इन्स्पेक्टर सुरेख धस आणि युवा संघर्ष चे अध्यक्ष  अॅड .गणेश चव्हाण हे  उपस्थित  होते .
          ५ कोटी गुंतवणूक असणा-या  प्रत्येक कंपनी मध्ये सी.एस ची जागा भरणा आवश्यक असत. कंपनी कायदा २०१३ नुसार कंपनी सेक्रेटरी हे पद भरणे आवश्यक आहे.तसेच देशात फक्त ३१हजार  सी.एस आहेत .पण आताच गरजेनुसार त्याची गरज  लाखोत आहे ,असे मत अमोध महाजन यांनी व्यक्त केल.
          कुठल्याहि  शाखेचा १२ वी किंवा पदवीधर विध्यार्थी हा या कोर्सला प्रवेश घेवू शकतो तसेच घरी बसल्या याचा विध्यर्थी अभ्यास करू शकतो असे कौस्तुभ मराठे यानी सांगितले.
            सी ए साठी जिद्द आणि  अथक परिश्रम करण्याची तयारी असेल तर यश तुमचा पदरात आहे तसेच सी एं चा काम हे ऑफिस मधेच असल्याने मुलींनी पण यात  मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे.असे श्रद्धा काबरा या म्हटल्या . कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गणेश जगदाळे  रोहन घानेगावकर ,मुकेश रंगुडे.अतिश पाटील हकीब काझी हेमंत रंगुडे यांनी परिश्रम घेतले.

Labels:

Sunday, 29 September 2013

गर्भलिंग निदान टाळण्यासाठी अंगणवाडी ताईची मदत घ्या

उस्‍मानाबाद  - गर्भधारणापूर्व व प्रसुतीपूर्व निदानतंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) या कायद्याची यशस्वी अमलबजावणी व्हावी, यासाठी अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनीस, आशा, आरोग्यसेविका यांचे सहकार्य घ्यावे. लिंगनिदानासारख्या घटना होऊ नयेत म्हणून समाजातील सर्व घटकांनी दक्ष राहिले पाहिजे. अशा घटना घडत असतील तर त्या तातडीने निदर्शनास आणा, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी जे. टी. पाटील यांनी केले.
 येथील जिल्हाधिकारी कार्यालयात गर्भधारणापूर्व व प्रसुतीपूर्व निदानतंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा १९९४ (पीसीपीएनडीटी) अंतर्गत जिल्हास्तरीय दक्षता पथकाची बैठक श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जिल्हा सरकारी वकील व्ही. बी. शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण) श्री. नवले, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. टी. एच. माने, डॉ. दत्तात्रय खुणे, विधी सल्लागार अ‍ॅड. उमा गंगणे आदींची यावेळी उपस्थिती होती.
जिल्ह्यात पीसीपीएनडीटी कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी व्हावी तसेच स्त्री भ्रृण हत्या रोखण्यासाठी या दक्षता समितीची स्थापना करण्यात आली आहे. स्त्री भ्रृण हत्या रोखण्यासाठी विविध उपाययोजना करणे, जनजागृती करणे, विविध सोनोग्राफी केंद्रांची तपासणी करणे, सोनोग्राफी केंद्रांना अचानक भेटी देणे असे काम या दक्षता पथकामार्फत केले जाणार आहे. मुलगी नको ही मानसिकता बदलण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली.
 

Labels:

अंधांबाबत समाजाचा सकारात्मक दृष्टीकोन हवा-पालकमंत्री चव्हाण

उस्मानाबाद - अंध व अपंगांच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि राज्य स्तरावर त्यांच्या प्रलंबित असणा-या  मागण्याबाबत पाठपुरावा करु. इतर समाजघटकानीही अंध व्यक्तींच्या रोजगार व त्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी सकारात्मक भूमिका घ्यावी, असे प्रतिपादन  जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केले. 
   राष्ट्रीय दृष्टीहिन संघाच्या मराठवाडा शाखेने तुळजापूर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात  चव्हाण बोलत होते. माजी आमदार सि.ना. आलुरे गुरुजी, नगराध्यक्षा विद्या गंगणे, राष्ट्रीय दृष्टीहिन संघाचे राज्य उपाध्यक्ष रघुनाथ बारड, मराठवाडा विभागाचे महासचिव आत्माराम घोगरे, सोपानराव वडकर आदींची यावेळी उपस्थिती होती. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील अंध व्यक्ती या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या.

 चव्हाण यांनी यावेळी अंध व्यक्तींना येणा-या अडचणी आणि त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. राज्य शासनाच्या वतीने आर्थिकदृष्ट्या दुर्बल, निराधार व्यक्तींना संजय गांधी निराधार योजनेंतर्गत लाभ दिला जातो. जिल्ह्यातील अंध व्यक्तींची संख्या लक्षात घेऊन तसेच त्यांची परिस्थिती विचारात घेऊन नगरपालिका, जिल्हा परिषद, जिल्हा प्रशासन यांच्या योजनाचा लाभ देता येईल का, याबाबत संबंधितांना आढावा घेण्यास सांगण्यात येईल, असे श्री. चव्हाण यांनी नमूद केले. शासन सुविधा देत असते, त्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी राष्ट्रीय दृष्टीहिन संघटनेनेही प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले.

सि. ना .आलुरे गुरुजी यांनी अंध व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना संधी देणे आवश्यक असल्याचे सांगितले.


प्रास्ताविकात  बारड यांनी अंध व्यक्तींना समाजात वावरताना येणा-या  अडचणी विशद केल्या.  घोगरे यांनी अंध व्यक्तींच्या समाजाकडून असलेल्या अपेक्षा तसेच शासन योजनांबाबत लाभ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला लुई ब्रेल आणि हेलन केलर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुश्पहार अर्पण करण्यात आला. शोभा जगताप व अंध विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले.

Labels:

चेअरमनपदी धिमाजी घुगे यांची निवड

धिमाजी घुगे
नळदुर्ग -  श्री स्‍वामी समर्थ अर्बन को – ऑपरेटीव्‍ह बँकेच्‍या चेअरमनपदी धिमाजी घुगे यांची तर व्‍हा चेअरमनपदी  गोपाळकृष्‍ण देशपांडे याची निवड करण्‍यात आली आहे.  संचालक मंडळाच्‍या सभेत एकमतानी खेळी-मेळीच्‍या वातावरणात  ही निवड करण्‍यात आली असुन  त्‍यात सन 2013 -14 यावर्षाकरीता नुतन चेअरमन व व्‍हाईसचेअरमनची  निवड करण्‍यात आली . सभेच्‍या अध्‍यक्षस्‍थानी डॉ. सात्‍वीक शहा हे होते , प्रारंभी चेअरमनपदासाठी   धिमाजी सुधाकर घुगे यांचे नाव सौ. स्‍वाती नागणे यांनी सुचवले त्‍यास शिवाजीराव व-हाडे यांनी अनुमोदन दिले तर व्‍हाईस चेअरमन करीता गोपाळकृष्‍ण देशपांडे यांचे नाव सुधीर पोतदार यांनी सुचविले ,त्‍यास मोहन नाईक यांनी अनुमोदन दिले. मावळते  चेअरमन सौ. संध्‍याताई भुमकर यानी नुतन चेअरमन व्‍हा .चेअरमनचे अभिनंदन केले या वेळी सर्व संचालकासह बँकेचे कर्मचारी उपस्थित होते. 

Labels:

एकलव्‍य आश्रमशाळेचे यश

नळदुर्ग -    जिल्‍हास्‍तरीय  शालेय एअर रायफल शुटींग स्‍पर्धेत यमगरवाडी ता. तुळजापूर येथिल विद्यार्थ्‍यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.   एकलव्‍य आश्रमशाळेचे (यमगरवाडी) विद्यार्थ्‍यांनी दि. 13 डिसेंबर रोजी श्री तुळजाभवानी स्‍टेडीयम उस्‍मानाबाद येथे जिल्‍हास्‍तरीय शालेय  एअर रायफल शुटींग स्‍पर्धेत यश मिळविलयाने त्‍यांची  विभागीयस्‍तरील स्‍पर्धेसाठी  निवड करण्‍यात  आल्‍याचे उमाकांत मिटकर यांनी सांगितले .
             या स्‍पर्धा  14 , 17, 19  वयोगटाच्‍या मुला-मुलीमध्‍ये  झाले आहे . यामध्‍ये    रितेश दिनकर ठोंगे , शरद पवार हायस्‍कूल उस्‍मानाबाद (प्रथम), बालाजी प्रताप रंदवे , एकलव्‍य प्रा. आश्रमशाळा मंगरूळ (द्वितिय) , अर्जून समशेर राठोड . पदमसिं‍ह पाटील माध्‍यमिक वि. चिंचोली (प्रथम )    विवेक गणेश जळके भोसले हायस्‍कुल उस्‍मानाबाद (द्वितिय) ,    विक्रम मनोहर निंबाळकर ,पदमसिह पाटील माध्‍यमीक वि. चिंचोली (प्रथम)     सुषिमता महादेव शेंडगे, जि.प.प्रशाला मंगरूळ  (द्वितिय)      कु. सावित्री  शंकर बंडगर . पदमसिंह पाटील माध्‍यमिक  शाळा चिंचाली (प्रथम)     ,शितल दिपक यमगर – यशवंतराव चव्‍हाण महाविद्यालय तुळजापूर , या स्‍पर्धेत एकलव्‍य आश्रमशाळेनी (यमगरवाडी) आघाडी घेतली. या विदयार्थांना गणेश जळके, बनकर अशोक, ,  राहुल जाधव यांनी मार्गदर्शन केले . मुख्‍याध्‍यापक  विठठल मेत्रे  संस्‍थेच्‍या अध्‍यक्षा सुवर्णा रावळ उपाध्‍यक्ष   अभय शाहपूरकर, महादेव  गायकवाड, रावसाहेब कुलकर्णी ,नरसिंग झरे ,गिरीश कुलकर्णी ,चंद्रकांत गडेकर .मदन कुलकर्णी यासह  सर्व पदाधिकारी व शिक्षकांनी यशस्‍वी खेळाडुचे अभिनंदन करून पुढील स्‍पर्धेस सुभेच्‍छा दिले.                        

Labels:

राज्‍यस्‍तरीय पुरस्‍कारासाठी प्रस्‍ताव पाठविण्‍याचे अवाहन

नळदुर्ग  -येथिल   परिवर्तन सामाजिक संस्‍थेच्‍यावतीने   विविध क्षेत्रातील उल्‍लेखनिय कार्य केलेल्‍या मान्‍यवराना राज्‍यास्‍तरीय पुरस्‍कारने गौरविण्‍यात येणार आहे.विविध क्षेत्रात काम करणा-या मान्‍यवरांकडून पुरस्‍कारासाठी प्रस्‍ताव  मागविण्‍यात  येत आहे. राज्‍यस्‍तरीय परिवर्तन पुरस्‍कार कला,  साहित्‍य, क्रिडा, समाज सेवा, पत्रकरिता, शिक्षण मित्र, गुणवंत कामगार, शेती मित्र, उदयेगता आदि   क्षेत्रातील व्‍यक्‍तींना पुरस्‍कार देण्‍यात येणार आहे. तरी इच्‍छुकांनी आपले प्रस्‍ताव दि.  15 ऑक्‍टोबर  पर्यंत सचिव परिवर्तन सामाजिक  संस्‍थेकडे  संबंधितानी  अर्ज फोटो, बायोडाटा व कामासंबंधीची  सविस्‍तर माहितीचे  प्रस्‍ताव पाठविण्‍याचे   अवाहन  संस्‍थेचे  सचिव मारूती बनससोडे यांनी केले आहे.
 परिवर्तन सामाजिक  संस्‍था ही  गेली 17 वर्षे ग्रामीण  व शहरी भागात कार्यरत  असून महिला संघटन, बचत गट निर्मिती प्रशिक्षण, वसूधा पाणलोट व्‍यवस्‍थापन, जलस्‍वराज्‍य प्रकल्‍प, पोतराज पूनवर्सन प्रकल्‍प, अंधश्रदधा निर्मुलन, ग्राहक जाणिव जागृती , पंचयातराज, कायदा साक्षरता, व्‍यवसाय प्रशिक्षण, निरंतर  शिक्षण, किशोरी विकास प्रकल्‍प, बालकामगार विरोधी जनजागृती ,  पर्यावरण जनजागृती  इत्‍यादी क्षेत्रात कार्यरत  असून अशा प्रकारचे काम करणा-या, महाराष्‍ट्रातील विविध क्षेत्रात एक वेगळा ठसा उमटविणा-या  मान्‍यवरांना दरवर्षी परिवर्तन सामाजिक संस्‍थेच्‍यावतीने पुरस्‍कार देवुन ,   त्‍यांच्‍या कामाची ओळख इतरांना होण्‍यासाठी व त्‍यांच्‍या कामाबददल कृतज्ञता  व्‍यक्‍त करण्‍यासाठी  हा राज्‍यस्‍तरीय परिवर्तन पुरस्‍कार देण्‍यात येतो .
          

Labels:

Saturday, 28 September 2013

शासकीय योजना जनतेपर्यंत पोहचविण्‍याचे पालकमंत्रयाचे अवाहन

उस्‍मानाबाद - शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक महत्वाची भूमिका बजावू शकतात, असे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन दुग्ध विकास व मस्त्य व्यवसायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केले.
बालाघाट शिक्षण संस्था, नळदूर्ग संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालय,तुळजापूर यांच्या मार्फत डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,औंरगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना कार्यशाळेचे उदघाटन .चव्हाण यांच्याहस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी प्राचार्य डॉ.जे.एस.मोहिते, श्रीमती डॉ.एस.के.स्वामी, डॉ. शरद गवांडे,डॉ.आर.एन.करपे, डॉ.एस.एल.कोरेकर, डॉ.अनिल शिंगे व एल.टी.कोरेकर आदि उपस्थित होते.
   याप्रसंगी बोलताना पालकमंत्री चव्हाण म्हणाले की, या राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत वेगवेगळया गावामध्ये समाजासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधेची कामे उत्तम प्रकारे पार पाडत आहेत. या कार्याबरोबरच शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना जनतेला माहिती करुन देऊन या योजना त्यांच्यापर्यंत पोहचविण्याचे काम त्यांनी करावे. शासन त्यांच्या पाठीशी सदैव असेल,असे सांगितले. खेडयापाडयात या सेवा योजना कार्यकर्त्यांनी तेथील नागरिकांबरोबर राहून त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर कार्य केल्यास त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल, असेही सांगितले. या विद्यालयातील अनेक विद्यार्थी उत्तम रित्या घडले असून ते सध्या वेगवेगळया क्षेत्रात काम करीत असून उद्याचे उत्तम नागरिक घडविण्याचे कार्य होत आहे,असेही त्यांनी सांगितले.

   याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक श्रीमती डॉ.एस.के.स्वामी यांनी या योजनेमार्फत होत असलेल्या व राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. 
. 

Labels:

भाविकांची गैरसोय होवु नये असे नियोजन करा- पालकमंत्री चव्हाण

तुळजापूर :- शारदीय नवरात्र महोत्सव व कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूर येथे येणा-या  भाविकांची गैरसोय होणार नाही, यादृष्टीने वाहतूक नियोजन करण्याचे निर्देश राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी दिले. 
          तुळजापूर येथे शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृहात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या उस्मानाबाद विभागाच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. विविध शासकीय यंत्रणांच्या प्रमुखांनाही यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी श्री चव्हाण यांनी हे निर्देश दिले. राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे, खासदार डॅा. पद्मसिंह पाटील, नगराध्यक्षा विद्या गंगणे, तुळजापूर विकास प्राधीकरणाचे सदस्य नरेंद्र बोरगावकर व अप्पासाहेब पाटील, जिल्हाधिकारी  के. एम. नागरगोजे, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, विभाग नियंत्रक प्रदीप खोबरे आदींची यावेळी उपस्थिती होती.
    सोलापूर, लातूर या लगतच्या जिल्ह्यासह कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातून भाविक श्री तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येतात. त्यांची गैरसोय होणार नाही यासाठी परिवहन विभागाने योग्य नियोजन करुन त्याप्रमाणे बसगाड्यांची व्यवस्था करावी. आपल्या परिवहन महामंडळ आणि कर्नाटक परिवहन महामंडळाने परस्पर समन्वयाने नियोजन करावे. बसेस या पार्किंगच्या ठिकाणीच लागतील हे पाहावे, अशा सूचना त्यांनी दिले. 
  गोरे यांनी बसस्थानकावर येणा-या प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचे आदेश दिले. मोठ्या संख्येने येणा-या महिला भाविकांची सुरक्षितता डोळ्यासमोर ठेवून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
    पोलीस, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, नगरपालिका या यंत्रणांनी परस्पर समन्वयाने नियोजन करण्याच्या सूचना यावेळी पालकमंत्री चव्हाण आणि . गोरे यांनी दिल्या.     सुरक्षिततेत्या दृष्टीने भाविकांनी कोणतीही बॅग अथवा वस्तू मंदिरात घेऊन जावू नये, यासाठी संबंधित बसस्थानक तसेच पार्किंगच्या ठिकाणी वस्तू ठेवण्यासाठी लॅकर  रुमची व्यवस्था करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी . नागरगोजे यांनी दिल्या. . खोबरे यांनी मागील वर्षी एस.टी.ने केलेल्या नियोजनाची माहिती दिली. यावर्षी भाविकांची संख्या वाढणार हे गृहित धरुन विविध मार्गांवर बस फे-या  वाढविण्याबाबत नियोजन सुरु असून नवरात्र काळात द्वादशी ते दसरा(दि. 2 आक्टोबर ते 14 आक्टोबर) आणि द्वादशी ते प्रतिपदा (दि. 16 ते 19 आक्टोबर) अशा दोन सत्रात होणारी गर्दी लक्षात घेऊन वाहतूक नियोजन करण्यात येत असल्याचे सांगितले. या बैठकीस जिल्ह्यातील राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी तसेच सोलापूर व गुलबर्गा, हुमनाबाद येथील परिवहन मंडळाचे अधिकारीही उपस्थित होते.    
               

जिल्ह्यात हवामानावर आधारित फळपीक विमा योजना लागू

उस्मानाबाद :  प्रायोगिक तत्वावरील हवामानावर आधारित पथदर्शक फळपिक विमा योजना उस्मानाबाद जिल्ह्यासाठी द्राक्ष,डाळिंब (हस्त बहर),मोसंबी व पेरु या पिकांसाठी लागू केलेली आहे. सदर योजनेतंर्गत सन 2013-14 हंगामात कर्जदार व बिगर कर्जदार शेतक-यांना द्राक्ष पिकांसाठी विमा प्रस्ताव बॅकेत भरण्याची अंतिम तारीख दि.15 ऑक्टोबर-2013 ही असून डाळिंब द्राक्ष,डाळिंब हस्त बहर),मोसंबी व पेरु या पिकांसाठी विमा प्रस्ताव बँकेत भरण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर2013 ही असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी कळविले आहे.
शेतकऱ्यांना भरावयाची रक्कम द्राक्ष पिकासाठी 9 हजार, डाळींब (हस्त बहर) पिकांसाठी 6 हजार, मोसंबी पिकासाठी 3 हजार 600 व पेरु पिकांसाठी 1 हजार 800 रुपये प्रति हेक्टरी याप्रमाणे बँकेत भरुन पिक संरक्षित करावे.
सन 2013-14 साठी अधिसूचित फळपिके,तालुके व महसूल मंडळे खालील प्रमाणे आहेत. फळपिकाचे नाव : द्राक्ष व डाळींब (हस्त बहार) अनुसूचित तालुका-उस्मानाबाद, तुळजापूर, भूम, परंडा,कळंब,वाशी,उमरगा,लोहारा यातील सर्व महसूल मंडळे .
 मोसंबी पिकांसाठी तालुका-उस्मानाबाद -महसूल मंडळ -उस्मानाबाद ग्रामीण व जागजी. तुळजापूर- सर्व महसूल मंडळ. भूम- वालवड, माणकेश्वर,अंभी व ईट.,परंडा व वाशी तालुका- सर्व महसूल मंडळ तर लोहारासाठी लोहारा ही महसूल मंडळ असेल.
 पेरुपिकासाठी उस्मानाबाद, तुळजापूरसाठी सर्व महसूल मंडळे तर  भूमसाठी भूम,वालवड, अंभी व ईट असे राहील  परंडा, उमरगा,वाशी, लोहारा यासाठी सर्व महसूल मंडळे अधिसूचित करण्यात आली आहेत.
संबंधित पिकांसाठी अधिसूचित केलेल्या तालुक्यामधील  महसूल मंडळातंर्गत असणाऱ्या शेतकऱ्यांनाच या योजनेत सहभाग घेता येईल. या मंडळातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घ्यावा,असे आवाहन श्री. तोटावार यांनी केले आहे. शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी या कार्यालयाशी किंवा संबंधित उपविभागीय कृषि अधिकारी/तालुका कृषि अधिकारी /जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक/राष्ट्रीयकृत बँकेशी संपर्क साधवा,असे पत्रकान्वये कळविण्यात आले आहे.

Labels:

शिक्षक पदावर नवनियुक्तीसाठी अनिवार्य

  
उस्‍मानाबाद : केंद्र पुरस्कृत बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम-2009 व राज्य शासन निर्णयानुसार येथून पुढे इयत्ता 1 ली ते 8 वी वर्गासाठी शिक्षक पदावर नियुक्त होणा-या उमेदवारांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे. ही परीक्षा सर्व शाळा (सर्व व्यवस्थापन/माध्यम/परीक्षा मंडळे/खाजगी अनुदानित-विनाअनुदानित- स्वयंअर्थसहायित आदि) मध्ये काम करण्यास इच्छूक असणाऱ्या शिक्षकांसाठी लागू राहतील. तसेच कनिष्ठ प्राथमिक इयत्ता 1 ते 5 व उच्च प्राथमिक इयत्ता 6 ते 8 या दोन गटातील शिक्षक पदासाठी प्रत्येकी 1 प्रश्नपत्रिका राहील व त्याचे स्वरुप व काठिण्यपातळी अनुक्रमे माध्यमिक व उच्च माध्यमिक अभ्यासक्रमावर आधारित असेल. दिनांक 13 फेब्रुवारी,2013 च्या शासन निर्णयाने निश्चित केलेली शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता प्राप्त केलेले उमेदवार फक्त हया परीक्षेला प्रविष्ठ होण्यास पात्र राहतील.
पहिल्या शिक्षक पात्रता परीक्षाचे आयोजन नोंव्हेंबर-2013 मध्ये प्रस्तावित करण्यात आले आहे. या संबंधित शासन निर्णय व माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in  या संकेत स्थळावर उपलब्ध असल्याचे  माहितीसाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) के.टी.चौधरी यांनी कळविले आहे.  

Labels:

ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पोटनिवडणूकांचा कार्यक्रम जाहीर

उस्मानाबाद : राज्य निवडणूक आयोगाने आदेशित केलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील नोव्हेंबर ते डिसेंबर,2013 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच विभाजनामुळे व नव्याने अस्तित्वात आलेल्या स्वतंत्र ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व पोटनिवडणूकांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांनी कळविले आहे.
    दिनांक 1 सप्टेंबर 2013 रोजीची  मतदार यादी यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. मुंबई ग्रामपंचायत निवडणूक नियम 1959 मधील नियम 7 चे पोटनियम 1 अन्वये राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाची प्रत व पोट नियम 2 नुसार नमुना अ अ मधील निवडणूकीची नोटीस प्रसिध्दी -मंगळवार,दि.1ऑक्टोबर,2013,नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक -,दि.8 ऑक्टोबर (मंगळवार) ते दि.12 ऑक्टोबरपर्यंत (शनिवार) सकाळी 11 वाजेपासून ते दु.3 वाजेपर्यंत, नामनिर्देशनपत्र छाननी -सोमवार,दि.14ऑक्टोबर रोजी 11 वाजेपासून, नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम तारीख- गुरुवार,दि.17 ऑक्टोबर सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत राहील. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्दी- गुरुवार, दि.17 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजेनंतर, मतदान दिनांक - रविवार,दि.27 ऑक्टोबर रोजी सकाळी 7-30 वाजेपासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत, मतमोजणी सोमवार,दि.28 ऑक्टोबर,2013 रोजी जिल्हाधिकारी यांच्या  मान्यतेने तहसीलदार निश्चित करतील त्यानुसार राहील. ग्रामपंचायतींच्या निवडणूकांचा निकाल मंगळवार,दि.29 ऑक्टोबर,2013 रोजी प्रसिध्द करण्याचा अंतिम दिनांक राहील, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असेही जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांनी दिलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
    यानुसार सार्वत्रिक निवडणूक- उमरगा तालुक्यातील येळी येथील सर्व प्रभाग क्रमांक, परंडा तालुक्यातील खासगावातील सर्व प्रभाग क्रमांक, पोटनिवडणूक- तुळजापूर तालुक्यातील शिरगापूर प्रभाग क्रमांक- तीन (प्रवर्ग-ना.मा.प्र.स्त्री-1), तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा येथे  प्रभाग क्रमांक -1 (सर्वसाधारण) तर कळंब तालुक्यातील कोथळा येथील  प्रभाग क्रमांक- 3 (ना.मा.प्र.)  अशा पोटनिवडणूका होणार आहेत.   

Labels:

Friday, 27 September 2013

किल्‍ल्‍यातील कोसळणारा एक धबधबा बंद पडण्‍याच्‍या मार्गावर

नळदुर्ग -: येथील कुरनूर (बोरी धरण) मध्‍यम प्रकल्‍पातून कॅनलद्वारे पाणी सोडण्‍यात आल्‍याने ऐतिहासिक किल्‍ल्‍यातील प्रेक्षणीय स्‍थळ असलेल्‍या दोन धबधब्‍यापैकी एक धबधबा बंद पडण्‍याच्‍या मार्गावर आहे. त्‍यामुळे राज्‍यासह परप्रांतातून नळदुर्गला भेट देणा-या पर्यटकांची निराशा होत आहे.
    श्री क्षेत्र तुळजापूर, नळदुर्ग शहर व अणदूर गावाला नळदुर्ग येथील बोरी धरणातून पाणी पुरवठा करण्‍यात येतो. तब्‍बल तीन वर्षानंतर बोरी धरण पूर्ण क्षमतेने भरल्‍याने शुक्रवार दि. 20 सप्‍टेंबर रोजी धरणाच्‍या सांडव्‍यातून पाणी वाहण्‍यास सुरुवात झाली. हे पाणी बोरी नदीच्‍या पात्रातून पुढे नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्‍ल्‍यातील प्रेक्षणीय स्‍थळ असलेल्‍या नर-मादी धबधब्‍यातून धो-धो कोसळण्‍यास सुरुवात झाली. याचे वृत्‍त प्रसिध्‍द होताच पर्यटकांची एकच गर्दी उसळली. यामध्‍ये शालेय, महाविद्यालयीन, शासकीय, निमशासकीय कार्यालयाचे कर्मचारी, अधिकारी यांनी भेट देऊन डोळ्याचे पारणे फिडणारे विलोभनीय दृश्‍य धबधबा व किल्‍ला पाहिले.
नळदुर्गपासून जवळपास दहा किलोमीटर अंतरावर असलेल्‍या शहापूर (ता. तुळजापूर) येथील साठवण तलाव अपु-या पावसामुळे भरले नसल्‍याच्‍या कारणावरुन बोरी धरणातून बुधवार दि. 25 सप्‍टेंबर रोजी सकाळी सव्‍वा नऊ वाजल्‍यापासून प्रति सेकंद 25 क्‍यूसेक (घनफूट) पाणी कॅनलद्वारे सोडण्‍यात येत आहे. त्‍यामुळे साहजिकच बोरी नदीला वाहून जाणारे पाणी कमी झाल्‍याने किल्‍ल्‍यातील कोसळणा-या नर-मादी धबधब्‍यापैकी ‘नर’ हा धबधबा बंद झाल्‍यात जमा आहे. त्‍यामुळे खूप दुरवरुन येणा-या पर्यटकांची निराशा होत असून नाराजी व्‍यक्‍त केली जात आहे.

Labels:

Thursday, 26 September 2013

जिल्ह्यातील एकही मतदार ओळखपत्रापासून वंचित राहू नये : मवारे

उस्मानाबाद -: भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणूकीचे  महत्व  लक्षात घेऊन या जिल्ह्यातील एकही मतदार, मतदान ओळखपत्रापासून वंचित राहू नये, अशा मतदार याद्या तयार करण्याचे  निर्देश अपर विभागीय आयुक्त गोकूळ मवारे यांनी संबंधित यंत्रणेला दिले.
    उस्‍मानाबाद येथील यशवंतराव चव्हाण सभागृह,जिल्हा परिषद,उस्मानाबाद येथे दि.1 जानेवारी 1014 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार याद्यांचे संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत उस्मानाबाद विधानसभा मतदार संघातील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या आयोजित बैठकीत अपर विभागीय आयुक्त मवारे यांनी वरील निर्देश दिले. याबैठकीत अपर जिल्हाधिकारी जे.टी.पाटील, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) भालचंद्र चाकूरकर, तहसीलदार सुभाष काकडे, कळंब चे तहसीलदार श्री. शिंदे, गटविकास अधिकारी प्रियदर्शनी मोरे यांची उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करतांना ते म्हणाले की, सर्व केंद्रस्तरीय अधिकारी व पर्यवेक्षकांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांची माहिती करुन घ्यावी.  हा कार्यक्रम 16 सप्टेंबर,2013 ते 6 जानेवारी,2014 या कालावधीत राबविण्यात येत आहे. यामुळे  सर्व पात्र मतदारांची नोंदणी कशी होईल, फोटोसह मतदार याद्या अचूक कशा होतील याची काळजी घ्यावी, असे सांगून ते पुढे म्हणाले की,  मतदार वंचित राहू नये यासाठी संगणक ज्ञान  व प्रशिक्षणाचे महत्व किती आहे हे स्पष्ट केले.
      या बैठकीस उपजिल्हाधिकारी (निवडणूक) चाकूरकर,तहसीलदार काकडे यांनी 242-उस्मानाबाद विधानसभा मतदार संघ व 241-तुळजापूर विधानसभा मतदार संघ या मतदार संघातील  सर्व केंद्रस्तरीय अधिकारी व पर्यवेक्षकांना सविस्तर मार्गदर्शन केले.
      या बैठकीचे प्रास्ताविक चाकूरकर यांनी केले तर आभार नायब तहसीलदार राजेश जाधव यांनी मानले.

Labels:

मोदींनी केली गुजरात-तमिळनाडुची जुगलबंदी; म्हणाले, गुजराती-तमिळी दुध-साखरेसारखे

तिरुचिरापल्ली (तमिळनाडू) :- तमिळी नागरिक मेहनती, प्रामाणिक आणि रॉयल आहेत. तमिळ आणि गुजराती नागरिक दुधात साखर विरघळावी तसे एकमेकांसोबत मिळून मिसळून राहतात, असे सांगून गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी आज (गुरुवार) मतदानासाठी तमिळी जनतेला साद घातली.
    भोपाळमधील भाजपचा महामेळावा गाजविल्यानंतर नरेंद्र मोदी थेट तमिळनाडूला गेले आहेत. भोपाळमधील सभेत मोदींनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली, भाजपचे अध्यक्ष राजनाथसिंग, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान आदी नेत्यांना एका मंचावर आणले होते. यावेळी अडवाणींची नाराजी दूर करण्यासाठी मोदींनी त्यांचे आशिर्वादही घेतले. अडवाणी यांनीही मोदींची स्तुती करीत नाराजी मावळल्याचे संकेत दिले होते.
    यशाच्या या लाटेवर स्वार होत नरेंद्र मोदी आज तमिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथे दाखल झाले आहेत. यावेळी सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले, की गुजरातला भारताचे मॅंचेस्टर करण्यासाठी तमिळी जनतेने मोठे योगदान दिले आहे. गुजराती जनताही तमिळनाडूच्या विकासासाठी काम करीत आहे. समस्या दोन राज्यातील लोकांमध्ये नव्हे तर केंद्रात आहे. केंद्र सरकार कमकुवत असल्याने विकास साधण्यात बरेच अडथळे येत आहेत. गुजरात कापूस उत्पादक राज्य आहे. गुजरातमधील कापसावर तमिळनाडूत प्रक्रिया केली जाते. दोन्ही राज्यांमधील बऱ्याच बाबी सारख्या आहेत. दोन्ही राज्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात भरीव कामगिरी केली आहे. गांधीजी गुजरातमधून होते तर राजाजी तमिळ होते.
    दहशतवादी हल्ल्यावर बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले, की पाकिस्तानमधील दहशतवादी भारतात घूरखोरी करून आपल्या जवानांना ठार मारतात आणि आपण त्यांच्या नेत्यांना बिर्याणी खाऊ घालतो. इटलीच्या नौदलाचे जवान आपल्या मच्छिमारांना ठार मारतात आणि आपण केवळ बघ्याची भूमिका घेतो. कॉंग्रेस सरकारच्या काळात दहशतवादी हल्ल्यात जेवढे जवान शहिद झाले असतील तेवढे एखाद्या युद्धातही शहिद झाले नसतील. आपण केंद्रात कमकुवत असल्याने शेजारी राष्ट्रे त्याचा लाभ उचलत आहेत.

* साभार - दिव्‍यमराठी

Labels:

हज यात्रेकरुंची गैरसोय होणार नाही यासाठी शासनाचे पुरेपुर प्रयत्न - नसीम खान

मुंबई : यंदाच्या वर्षी हज यात्रेसाठी जाणा-या भाविकांना शासनाने चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन दिल्या असून मक्का-मदिना येथे त्यांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही यासाठी शासन पुरेपुर प्रयत्न करेल, असे प्रतिपादन अल्पसंख्याक विकास मंत्री मोहम्मद आरिफ (नसीम) खान यांनी केले.
    येथील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन बुधवारी सायंकाळी हज यात्रेकरुंची पहिली तुकडी मक्का-मदिनाकडे रवाना झाली. त्यांना निरोप देण्यासाठी तेथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय हज समितीचे सदस्य खासदार सालिम अन्सारी, इलियास खान पठाण, आमदार कृपाशंकर सिंह, आमदार एम.एम.शेख, केंद्रीय हज समितीचे माजी सदस्य इब्राहीम शेख (भाईजान), केंद्रीय हज समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अताउर रहमान, राज्य हज समितीचे मुख्य अधिकारी सिराज इनामदार यांच्यासह हज यात्रेकरु उपस्थित होते.
    खान म्हणाले, राज्यातील हज यात्रेकरुंना येणाऱ्या अडचणी तातडीने सोडविण्यासाठी राज्य हज समितीमार्फत हेल्पलाईन नंबर सुरु करण्यात आला आहे. यावर दूरध्वनीद्वारे संपर्क साधून अनेक हज यात्रेकरु आपल्या शंकांचे समाधान करुन घेत आहेत. हज यात्रेकरुंच्या सेवेसाठी यापुढेही ही सेवा सुरु ठेवली जाणार आहे. हज यात्रा, तेथील राज्य हज समितीची कार्यालये, त्यांचे पत्ते, संपर्क क्रमांक, संबंधित अधिकारी, त्यांचे संपर्क क्रमांक, हज यात्रा कालावधीत घ्यावयाची दक्षता आदी परिपूर्ण माहिती असलेली उर्दू, मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील पुस्तिका तयार करण्यात आली असून हज यात्रेकरुंना त्यांच्या प्रवास कालावधीत याचा निश्चितच उपयोग होईल.
    भारतातील हज यात्रेकरुंचा कोटा हा 2001 च्या जनगणनेच्या आधारे निश्चित करण्यात आला आहे. हा कोटा 2011 च्या जनगणनेच्या आधारे निश्चित करणे गरजेचे असून यासाठी केंद्रीय हज समितीने प्रयत्न करावेत. त्यामुळे आपल्या देशाला वाढीव कोटा मिळेल, असे श्री.खान यावेळी म्हणाले.
    पुर्वी महाराष्ट्रात फक्त मुंबईतच हज हाऊस असल्याने विदर्भ-मराठवाड्यातील हज यात्रेकरुंची गैरसोय होत होती. त्यामुळे राज्य शासनाने मागील वर्षी नागपूर येथे भव्य हज हाऊस सुरु केले असून त्याचा विदर्भवासीयांबरोबरच मध्य भारतातील हज यात्रेकरुंना चांगला उपयोग होत आहे. औरंगाबाद येथेही असेच भव्य हज हाऊस निर्माण केले जाणार असून त्यासाठी जागा निश्चिती आणि निधीची तरतूद करण्यात आली आहे. नागपूरप्रमाणे औरंगाबादेतील हज हाऊसही लवकरच मराठवाड्यातील हज यात्रेकरुंसाठी उपलब्ध केले जाईल, असे ते म्हणाले.

Labels:

परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी

उस्मानाबाद -: जिल्हा प्रशासनाच्यावतीने घेण्यात येणारी सहायक पूर्व परीक्षा-2013 पदाची लेखी परीक्षा रविवार, दि.29 सप्टेंबर रोजी 5 परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्यात येणार असून या परीक्षा केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये सकाळी 8 ते सायंकाळी 4 यावेळेत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आल्याचे अपर जिल्हादंडाधिकारी राम मिराशे यांनी कळविले आहे. श्रीपतराव भोसले ज्युनिअर कॉलेज, नवीन इमारत तळमजला, पहिला मजला, दुसरा मजला, तिसरा मजला, उस्मानाबाद तसेच श्रीपतराव भोसले हायस्कूल,जूनी इमारत, उस्मानाबाद येथे होणार आहे.
     या आदेशानुसार परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात घोषणा देण्यास, परीक्षार्थी अथवा अन्य व्यक्तीकडून शांततेस बाधा निर्माण होईल असे कृत्य करण्यास मनाई करण्यात आली आहे. याशिवाय या परिसरातील झेरॉक्स,फॅक्स, ईमेल, रेडीओ, इंटरनेट सुविधा, भ्रमणध्वनी (मोबाईल) संगणक, गंणनायंत्र (कॅल्क्युलेटर) व अशा इतर प्रकारच्या स्वरुपातील बाबी  विद्यार्थ्यांना पुरवठा करण्यात येऊ नये तसेच इंटरनेट कॅफे बंद राहतील. परीक्षा केंद्र परिसरात सेल्यूलर फोन, फॅक्स, व इतर प्रसार माध्यमे घेऊन प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांवर कोणत्याही वाहनास प्रतिबंध असेल. केवळ संबंधित परीक्षा केंद्रांवर नेमणूक केलेले अधिकारी/ कर्मचारी , शासकीय कामावरील अधिकारी व कर्मचारी, संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक,कर्मचारी आणि उमेदवारांनाच परीक्षा केंद्रांवर प्रवेश असेल. परीक्षा केंद्राच्या 100 मीटर आवारात 5 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येता येणार नाही. हे आदेश संबंधित दिवशी सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत लागू राहणार आहेत.               

Labels: